आजपासून या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती
भाग १
नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगताना सर्वप्रथम मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते आणि ती अशी की ही नर्मदा परिक्रमा मी केलेलीच नाही. ही नर्मदा परिक्रमा माझ्याकडून माझ्या गुरुंनी आणि माझ्या नर्मदा माईनी करवून घेतेली आहे, लहान मुलाला आई जशी हात धरून चालायला शिकवते आणि त्याच्या पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आईचं बारीक लक्ष असतं तसंच एका बाजूला गुरूमूर्ती प. पू नाना महाराज तराणेकर आणि दुसरीकडे माझी नर्मदा मैया यांच्या सुरक्षा कवचात माझी परिक्रमा पूर्ण झाली. सुरक्षा कवच असणं आवश्यक आहेच, आणि परिक्रमेतला काही भाग हा खरोखर घाबरवून सोडणारा आहे. मी भाग्यवान कारण हे सुरक्षा कवच मला मिळालं! कसं याचा उलगडा पुढे होईलच. परिक्रमेचं अनुभव कथन करताना माझ्या वाणीला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नको ही प्रार्थना मी माझ्या मैयाला करेन. याच प्रार्थनेसोबत मी वाचकश्रोत्यांना एक विनंतीसुद्धा करेन ती अशी की जशी मी मैयाचं लेकरू आहे तसे आपण सर्वजण ही तिची लेकरे आहात, तेव्हा जो काही भाव आपल्या मनात आहे तो तिच्याचपर्यंत थेट पोहचवावा, मी तुमच्या आणि तिच्यामधील दुआ नाही तर तुमच्यासारखीच तिची एक बालिका आहे, मी निश्चितच भाग्यवान आहे कारण ह्या परिक्रमेची संधी आणि ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मैया आणि गुरू यांची सोबत मला लाभली. बरेचदा आपण काही तरी करावं असं आपल्या मनात असतं आणि कुणाच्या तरी प्रेरणेने आपल्या त्या कार्याची नीव ठेवल्या जाते. माझ्या अनुभव कथनाने आपल्या पैकी एखाद्याच्या जरी मनात नर्मदा माईच्या परिक्रमेची इच्छा निर्माण झाली तरी माझं हे अनुभव कथन सफ़ल झालं असं मी समजेन. संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारी ही एक तपश्चर्या आहे आणि ज्याच्या त्याच्या शक्तिनुरूप आणि प्रारब्धानुसार ती घडवून घेतल्या जात असते हेच समजून घेणं आवश्यक आहे.
नर्मदा परिक्रमाच का करायची? तुम्हाला नर्मदा परिक्रमा करायचा विचार कसा आला?
साडेपाच महिने तुम्ही घराबाहेर राहिलात, घरच्यांनी कसं मान्य केलं? असे अनेक प्रश्न या वेळी
तुमच्या मनात असणार आहेत. त्या सर्वांची उत्तरं मी माझ्या कडून देण्याचा प्रयत्न करेनच.
तुमच्याकडून कदाचित काही असेही प्रश्न येतील ज्यांचे समाधान करण्याची क्षमता माझ्याकडे नसेल, अशी प्रश्न मैयावर सोपवून देऊयात, तिचं काय समाधान करायचे ते करेल! कदाचित तेच तुमच्या परिक्रमेचं बीज ही असेल? बघुयात.
तर नर्मदा परिक्रमाच का करायची? त्याची एक अख्यायिका आहे.
एकदा गंगा मैया आणि नर्मदा मैया तपश्चर्येला बसल्या होत्या. ज्यावेळी गंगामैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी तिने शंकराला "मला तुमच्यात सामावून घ्या" असा वर मागितला आणि म्हणून शंकरांच्या जटेमध्ये गंगामाईला स्थान मिळालं. नर्मदा मैयाची तपश्चर्या पूर्ण झाली त्यावेळी "तुम्ही तुमच्या पंचायतनां सकट माझ्या मधे सामावून जा" असा वर तिने मागितला. आणि सर्व पंचायतनांसकट शंकर नर्मदा मैयामधे सामावून गेले. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजापासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजल्या जातो. इथे " हर कंकर शंकर " अशी उक्ती प्रचलीत आहे. आणि म्हणूनच परिक्रमा ही फ़क्त नर्मदा मैयाचीच करायची असते. बाकी कुठल्याही नदीला तिची परिक्रमा होण्याचं भाग्य लाभलेलं नाही. तसंच नर्मदा नदीचे महात्म्य सांगताना असं म्हटल्या जातं की सरस्वती मधे तीन वेळा स्नान करून पुण्य मिळतं, यमुने मधे सात वेळा स्नान करून पुण्य मिळतं, गंगेमधे एकदा स्नान करून पुण्य मिळतं मात्र तितकच पुण्य नर्मदेच्या केवळ दर्शनाने लाभतं. नर्मदा किनाऱ्यावर अनेक शक्ती
अदृष्य रुपात आजही तप करीत आहे आणि तिथली पवित्र कंपने आपल्याल्या त्या त्या ठिकाणी जाणवतात देखील!!
तुम्हाला नर्मदा परिक्रमा का कराविशी वाटली असं जेव्हा मला विचारल्या जातं तेव्हा
खरंच जाणवतं की हा विचार मनात आला आणि पूर्ण झाला असं काही झालं नाही. त्यासाठी मधे बरीच वर्ष जावी लागली. थोडक्यात मी विचार केला आणि मी परिक्रमा केली इतकं सोपं हे गणित नाहीये, त्यासाठी गुरू आणि मैया य दोघांची ही इच्छा असावीच लागते. मी १४ वर्षांची असताना मला पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा कराविशी वाटली, मात्र आज मी परिक्रमा केली त्यावेळी मी चाळीशीला पोचलेली आहे. अर्थात त्या वयात ही परिक्रमा करणं शक्य ही नव्हतं , आणि भाग्यतही नव्हतं म्हणून ती तेव्हा झाली नाही, आता होतं म्हणून आता झाली. माझे गुरू प. पू नाना महाराज तराणेकर यांची पोथी मला माझी आजी वाचायला सांगत असे. मी रोज एक पान अशीच पोथी वाचायचे. त्या पोथीमधे नाना महारांजानी जेव्हा जलेरी (नर्मदा मैया सतत डोळ्यापूढे ठेवून) नर्मदा परिक्रमा केली होती त्यातले अनुभव कथा रुपात सांगितलेले आहे. ते अनुभव वाचताना अंगावर काटा यायचा, वाटायचं खरंच नर्मदा असं दर्शन देते का? खूप इच्छा व्हायची, पण तो विषय तिथेच थांबून राहीला. मात्र या अनुभवातून एक अनुभव माझ्या कायम लक्षात राहीला तो इथे आपाल्याला मुद्दाम सांगतेय कारण याचा संबंध पुढे मला आलेल्या अनुभवाशी आहे. तर ज्या वेळी नाना महारांजानी परिक्रमा केली तो काळ आजच्या काळासारखा नव्हता. आजच्या सारख्या सेवा, ठिकठिकाणी आश्रम, अन्नदान किंवा अन्नछत्र ठायी ठायी नव्हते. मोबाईल सारखी व्यवस्था ही नव्हती आणि दळवळणाची साधन देखील नाही. रस्ते नाही, किनाऱ्यावरची वाट ही अतिशय बिकट आणि घनदाट जंगलाची असा तो काळ. तर नानामहाराज जंगलातून एकटेच जात होते, संध्याकाळ व्ह्यायला आलेली, भूक तहानेनी व्याकूळ नाना महाराज थोडी विश्रांती घ्यायला म्हणून एका झाडाखाली बसलेले, भूक खूप लागलेली, तहान खूप लागालेली, आणि तोंडने नामस्मरण सुरू. नाना थकले होते, त्यांचा किंचीत डोळा लागतो न लागतो तोच त्यांना आवाज आला, "बेटा दूध पाओगे?" बघतात समोर
एक गावकरी महिला सोन्याचा भला मोठा घडा घेऊन उभी. दूध म्हंटल्यावर नांनाची भूक बळावली आणि तो भला मोठा घडा तोंडाला लावून ते घटाघट दूध पिऊ लागले. दूध संपल्यावर घडा तोंडाचा काढतात आणि बघतात तो ती महिला तिथे नाहीच... आता हा सोन्याचा घडा परत कसा कारायचा? कोण असेल ती महिला जिने इतका किमती सोन्याचा घडा असा सोडून दिला असावा? नानांच्या लक्षात आलं, ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात नर्मदा माई होती. नानांनी तिचा घडा तिच्या पात्रात अर्पण केला... असे अनेक प्रसंग या पोथी मधे आहे.
माझ्या मनात नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा ही भक्ती पोटी नव्हे तर उत्सुकतेपोटीच निर्माण झाली होती.. माझी उत्सुकता माझ्या नर्मदा माईनी अशी काही शमवली की तिचं रुपांतर आता तिच्या भक्ती मधे आणि तिच्यावरच्या श्रद्धेमधे झालं आहे. मला नर्मदा परिक्रमा का करविशी वाटली याचं एक आणखी कारण आहे. किंबहूना ती अमलात कशी आली त्याचं कारण आहे असं म्हंटलं तरी चालेल. जुलै २०१७ मधे माझं पी.एच.डी चे सबमिशन होते. ते काम मला खरंच खूप जड जात होतं. त्यावेळी मी जरा डिप्रेशन मधे गेले होते, मात्र नर्मदा मैयाचे अनुभव ऐकले की खूप प्रसन्न वाटायचं एक वेळ तर अशी आली की जणू ती मैया बोलावतेय मला असं वाटू लागलं. मला माझ्या बद्दल, आयुष्याबद्दल, अध्यात्माबद्दल बरेच प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भेडसावत होते. काहीतरी वेगळं समाधान, कसली तरी तृप्ती मला हवी होती, पण नक्की काय हे काही समजत नव्हतं. अज्ञाताचा अखंड शोध सुरु होता अणि त्याची उत्तरं मला नर्मदा परिक्रमेत मिळतील असा विश्वास मला जाणवत होता. तर असे काही माहित असलेले आणि काही माहितच नसलेले कारणं घेऊन मी परिक्रमेला निघाले.
सुरवातीला मी काही महिने घराबाहेर राहणार म्हंटल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या घरून ही विरोध झालाच, पण माझा हट्ट आणि त्याहून माझ्या मनाची होणारी घालमेल समजून घेऊन माझ्या घरच्यांनी मला परिक्रमेला जाऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या होकारा शिवाय मला जाता येणं शक्य नव्हतच. १ नोव्हेंबर २०१७ला ओंकारेश्वर येथून परिक्रमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूरहून मी, ठाण्याहून सौ डोंगरे आणि मुंबई हून सौ मंत्री अशा तिघी जणी सोबत परिक्रमा करू असा निर्णय घेतला. पण निर्णय घेणारे आपण कुणीच नसतो खरं.... ते सगळं तीच ठरवत असते आणि हे ती नर्मदा मैया वेळोवेळी जाणवूनसुद्धा देते. कसं ते पुढच्या भागांमध्ये लक्षात येईलच.
क्रमशः
मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती-
भाग २
प्रत्यक्ष परिक्रमेच्या आधीच जेव्हा आशिर्वचनांची अनुभूती येते त्यावेळी.......
परिक्रमा करण्या आधी अनिल दास महाराजांकडून संकल्प करवून घेतला. हा संकल्प केला त्यावेळी मनात खूप घालमेल होती. नर्मदा माईशी डायरेक्ट पण मनातल्या मनात बोलणं पहिल्यांदा सुरू झालं. समोर खळखळून वाहणारी नर्मदा नदी, तिचं जीव घाबरवणारच ते रूप आहे. तिच्या प्रेमाची आणि तिच्या माझ्यावरच्या ममतेची प्रचिती मला जरी आली नसली तरी आई लेकराला काय हवय हे समजून घेण्यात कधीच कमी पडत नाही. तीने माझ्या मनाची घालमेल ओळखली मला म्हणाली यथाशक्ती परिक्रमा पूर्ण करेन असा संकल्प कर.... ती म्हणाली असच वाटलं मला. जसा एखादा विचार आपला नाही हे आपल्याला अचानक समजतं तसं झालं.. कुणीतरी कानात सांगावं तसं वाटलं... परिक्रमा सुरुही झाली नाही आणि आईनी सांगीतलं.. तुला जिथे गरज पडेल तिथे माझ्याशी निःसंकोच बोल, मी तुला मार्ग दाखवेन. परिक्रमा सुरु होण्याच्या आधीच मला आलेला हा अनुभव...
खरं तर या ही आधी मला एक अनुभव आला, माझ्या गुरु माऊलीचा.. मी परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतला आणि ठरल्याप्रमाणे मी इंदोरला आले. माझी आत्या इंदोरला असते तिच्याकडे मी मुक्कामाला होते. माझ्याकडे सगळेच नाना महारांजाचे अनुग्रहीत आहेत, पण अजून माझा अनुग्रह झाला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी मी अनुग्रह घेणार होते, नाना महाराज ज्या भक्ताना अनुग्रह देणार होते त्या वहीत माझं नाव आणि अनुग्रह घेण्याची तारीख ही नमूद झाली होती, पण पुन्हा तेच आपण काहीच ठरवत नसतो. नाना महारांजाची तब्येत बिघडली, त्यांनी देह ठेवला, आणि माझा अनुग्रह घ्यायचा राहून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा मी १५-१६ वर्षांची असेन. मी ठरवलं, आता अनुग्रह घ्यायचाच नाही. माझे गुरू नानाच..., मला दुसऱ्या कुणाच कडून अनुग्रह घ्यावासाच वाटला नाही... आणि मी घेतला ही नाही. मनात मात्र मी नेहेमीच नानांनाच माझे गुरू समजत राहीले. तर गंम्मत अशी झाली की आत्ता म्हणजे नर्मदा परिक्रमा सुरू करण्याच्या दोन दिवस आधी मला आत्यानी विचारल, "का ग?, तुझा मंत्र झालाय नं घेऊन?" आणि मला अचानक मंत्र घ्यावासा वाटू लागला, रात्री साडे अकराला मला खूप बेचैनी वाटू लागली आणि गुरुमंत्र हवाच हे प्रकर्षानी जाणवू लागलं.
मी माझ्या आत्येभावाला सांगितलं. त्याने सकाळी बाबासाहेब तराणेकर (नानांचे नातू) यांना फ़ोन केला. माझी आधी भेट झाली होती, मी परिक्रमेला जाणार हे सांगून नानांचा आणि बाबा साहेबांचा अशिर्वाद घेऊन आले होतेच पण आता मला गुरुमंत्र हवा होता. बाबासहेबांना परगावी जायचे असतानाही, लेकरू परिक्रमेला जातय म्हणून वेळात वेळ काढून, त्याच दिवशी मला गुरुमंत्र दिला. माझ्या परिक्रमेला निघण्याच्या आधीच माझ्या गुरुंनी मला पंखाखाली घेतलं..
गुरुबळ पाठीशी आणि मैया भोवताली असताना माझी परिक्रमा पूर्ण आणि सुकर कशी होणार नाही?
परिक्रमा सुरु झाल्या झाल्या अनेकांच्या पायाला छाले आलेले मी पाहिले, असं म्हणतात या कालावधीत जो काय त्रास होतो ते आपले भोग असतात, आपण कुणाला तरी काही तरी त्रास दिलेला असतो आणि तो अपल्याला परत मिळणार असतो. आपलं देणं झालेलं असतं, आपण घेणं आता बाकी असतं.... तो त्रास सहन करावाच लागतो.. आणि खरोखर सोबत असलेले अनेक परिक्रमावासी वेगवेगळ्या त्रासातून जाताना मी पाहिले. मला काहिही त्रास झाला नाही. पूर्ण परिक्रमेत मला तीनदा ताप चढला, आणि त्या त्या वेळेला मैयाचे अनुभव आले, मात्र शरीराला जखम, दुःख, पोट खराब होणे, पाय दुखणे, पायाला छाले येणे असा काहीही त्रास मला परिक्रमेत झाला नाही.... मला झाला नाही म्हणण्यापेक्षा माझ्या माईनी आणि माझ्या गुरुंनी तो वरचेवर झेलून घेतला. तो माझ्यापर्यंत पोहचूच दिला नाही... आणि हे मी इतक्या खात्रीपूर्वक फ़क्त येवढ्यासाठी सांगू शकते की मी एक अत्यंत सर्वसाधारण व्यक्ती आहे. माझ्या जीवनकालात किंवा गतजन्मांमधे मी अनेक चुका, अनेक पापं नक्कीच केले असणार आहे आणि तरीही मला त्रास झाला नाही कारण तो माझ्या गुरुंनी आणि मैयानी मला होऊ दिला नाही. अनेक पापकर्मांसोबत निस्वार्थ पणानी आणि निष्पाप मनानी एखाद तरी सत्कर्म माझ्या कडून करवून घेतल्या गेलं असलं पाहीजे की या जन्मामधे मला नाना महाराज गुरू म्हणून लाभले, त्यांचे आशिर्वाद मला मिळाले आणि काहीही त्रास न होता परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले आहे. म्हणून सुरवातीला मी जे म्हणाले तेच खरे.. ही परिक्रमा मी केलेली नाहीच.
एक महत्वाचा आणि अगदी सुरवातीचा अनुभव मी नमूद करायला विसरले आहे, त्याला कारण पण तसंच आहे, ते असं की हा अनुभव मला नागपुरात, म्हणजे परिक्रमा सुरु करण्याच्या महिनाभर आधी आला... आश्चर्य वाटलं नं? सांगते. माझ्या घरापासून कोराडी देवस्थान हे साधारण २५ किलोमीटर आहे. पायी चालण्याचा सराव म्हणून मी इथे पायी जाण्याचं ठरवलं. नुकतेच पांढरे कपडे शिवून घेतले होते. तेही वापरून बघावेत कम्फर्टेबल आहेत की नाही म्हणून त्या दिवशी तेच घातले, दसऱ्याचा मुहूर्त साधला, आणि निघाले. रस्त्यात कुत्री त्रास देतात म्हणून एक काठी घेतली होती, आणि कमंडलू हातात घेऊन चालण्याचा सराव करावा म्हणून तो ही घेतला होता. पाठीवर १२-१३ किलोची बॅग पण होतीच. साधारण १५ की. मी अंतर चालून झालं होतं. उन फार होतं. तसे सकाळचे साडे आठ नऊ झाले असतील. एका हॉटेल समोर जरा सावली होती म्हणून तिथे जरा थांबले. तेवढ्यात आतून एक मध्यम वयीन तरुण धावत बाहेर आला" नर्मदे हर मैया जी, परीक्रमेचा सराव करता आहात का? कार्तिक द्वादशीला उचला परिक्रमा" असं म्हणतच तो बाहेर आला. मला खूप आश्चर्य वाटलं. इथे नागपुरात मैयाजी म्हणून धावत येऊन मला हा नमस्कार करतो, याला कसं माहित मी परिक्रमा करणार ते? "मैयाजी थंड पाणी प्या, नाश्ता करा" असं म्हणत माझ्या हातातून कमंडलू ओढून घेऊन एव्हाना गरम झालेलं पाणी बदलून थंडगार पाणी त्यात दिलंसुद्धा.
त्याच्याशी छान ओळख झाली. गप्पा झाल्या. त्यांचं नाव अविनाश सोळंकी. ते दुबईला असतात, आणि नर्मदा खंडात ७ ठिकाणी अन्नछत्र चालवतात. त्यांची सासुरवाडी नागपूरला म्हणून ते इथे आले होते. हा माणूस मैयाचा भक्त आहे. सुट्टी अभावी त्यांची परिक्रमा होऊ शकत नाही याची त्यांना फार खंत आहे आणि काहीतरी सत्कार्य म्हणून ते स्वखर्चाने आणि काही मदतीने हे ७ आणि पुढे येऊ घातलेले ३ अन्नछत्र चालवत आहेत. अविनाशजींनी माझा नंबर लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी वेळ काढून घरी आले आणि परिक्रमेची पूर्ण माहिती दिली आणि एक पुस्तक मला भेट म्हणून दिलं. संपूर्ण परिक्रमेत जिथे जिथे मला नेटवर्क असेल तिथे तिथे मला यांचा दुबईहून फोन येत. फोन करून हा माणूस मला पुढची माहिती सांगायचा आणि एक मागणी करायचा..." मैयाजी मागच्या फोन नंतर काय अनुभव आले सांगा". नेटवर्क अभावी बरेचदा फोन होत नसत. अविनाशजींच्या माध्यमातून माई मला सतत सोबत देत होतीच. आता सांगा, कोण कुठले हे अविनाशजी मला परिक्रमेच्या महिनाभर आधीपासून सोबत करत होते, ते अगदी परिक्रमा संपेपर्यंत. माझी परिक्रमा होणे हे खरंच सांगा, फक्त माझ्या निर्णयामुळे साध्य झालंय का? नाही. ह्या लेकराकडून परिक्रमा करवून घ्यावी हा माझ्या माईचा आशीर्वाद आणि माझ्या जन्मदात्यांची आणि पूर्वजांची पुण्याईच आहे. आणि हे जाणवून देणारे शिवाय अविनाशजींच्या मदतीचे अजूनही अनुभव आहेत.
लक्कडकोटची झाडी, नेमावर हे अनुभव मी विसरू शकत नाही. पण अनुभव सूचीमध्ये त्यांचा क्रमांक जरा नंतर आहे, पण त्या आधीचे विलक्षण आणि अविश्वसनीय अनुभव
आहेत, ते पुढच्या भागांमध्ये येतीलच. संकल्प घेतल्या गेला, आता परिक्रमेला सुरवात करायची. आम्ही तिघी एकत्र होतो, आणि एकत्र राहू असं वाटत होतं. सौ मंत्री यांना चालण्याचा फ़ारसा सराव नव्हता असं त्या म्हणाल्या त्यामुळे संकल्प घेण्याआधी देखील मोरटक्का ते ओंकारेश्वर आम्ही पायी चालून गेलो होतो, सराव करण्यासाठी. असं म्हणतात संकल्पात बळ असतं.. आणि हो, ते असतच! ते कसं समजलं याचा अनुभव सांगते. पण त्या आधी एक कबूलीनामा मला द्यावासा वाटतो. संकल्प झाला होता, खरं तर आता माझी मैयावर पूर्ण श्रद्धा असायला हवी होती, मनातून तशी इच्छाही होती, पण कुठली तरी भिती मनात होतीच... ओंकारेश्वर ते मोरटक्का मैया किनारी जाऊ नका असा सल्ला अनेकांनी दिला. तुमचं वजन जास्त आहे, तुम्हाला झेपणार नाही, वाट कठीण आहे असंही सांगण्यात आलं. इथे माझ्या मनानी दोन कारणं पुढे केली.. एक कठीण असेल, काही झालं तर? परिक्रमा पूर्ण व्हायची नाही आणि दुसरं, सौ मंत्री आणि सौ. डोंगरे या दोघीही त्या मार्गाने जाण्यास तयार नव्हत्या... मीसुद्धा हाय वे नी जायचं ठरवलं. खरं तर ती मैयानी माझ्या मनाची घेतलेली परिक्षा असावी, मी त्यात नापास झाले आहे... आणि पुढे आलेल्या अनुभवांनंतर आज मला हे जाणवतय की त्यावेळी मी चूक केली. यथा शक्ती केलेला संकल्प हे माझ्या भित्र्या मनाला झाकणारं आवरण ठरलं.. संकल्प कसा असावा असं सांगताना एक गोष्ट मुद्दाम इथे सांगतेय, आधीच सांगतेय म्हणजे संकल्प हा शब्द जरी आला तरी तो पाळल्या जाईल आणि जी चूक मी केली ती इतरांकडून होणार नाही.
गोष्ट अशी आहे, एक व्यापरी होता, त्यानी ठरवलं, आता यापुढे आपण कुणालाही पैसे द्यायचे नाही, जे काही देणं असेल ते देऊन मोकळं व्हायचं आणि मग पुढे कुणालाही एक पैसा पण द्यायचा नाही. त्यानी ठरल्याप्रमाणे जे काही देणे होते ते पूर्ण केले आणि संकल्प घेतला... पुढे काही दिवसांनी एक सन्यासी त्या व्यापाऱ्याकडे आला, आणि म्हणाला मला तुमच्याकडून १ रुपये घेणे आहे. व्यापाऱ्याने संकल्प घेतलेला, तो म्हणाला मी काहीही झालं तरी पैसे देणार नाही. सन्यासी निघून गेला, काही दिवसांनी परत आला, तेव्हा व्यापाऱ्यानी त्याला दुरून बघितलं, मुलाला सांगितलं, जा बाबा झोपलेत म्हणून सांग... सन्यासाला तसं सांगितल्यावर सन्यासी म्हणाला मी वाट बघतो पण आज मी माझे पैसे घेऊनच जाईन! बराच वेळ निघून गेला... व्यापाऱ्यानी मुलाला सांगीतलं, जा सांग त्या संन्याशाला, बाबा आजारी आहेत, तुला आता १ रुपया मिळनार नाही. मुलाने व्यापाऱ्याला समजवल, १ रुपया तर आहे, देऊन टाका नं.... व्यापारी आपल्या मतावर ठाम... मुलाने सांगितलं, बाबा आजारी आहेत... सन्यासी ठिय्या
मारून बसलेला एक दिवस व्यापारी मुलाला म्हणाला.. जा संन्याशाला सांग बाबा वारलेत. मुलाने संन्याशाला तसाच निरोप दिला. संन्यासी म्हणाला " अरेरे, माझा रुपया ही गेला आणि व्यापारी ही, आता याचा अंतिम विधी झाल्यावर मी माझ्या गावी परत जाईन" मुलगा घाबरला... त्याने वडिलांना सांगितले. व्यापाऱ्याने मुलाला अंतिम संस्कारांची तयारी करायला सांगितलं. मुलगा बिचारा नाईलाजाने तयारी करू लागला. लोक जमा झाले, व्यापाऱ्याला चितेवर ठेवण्यात आलं, आता मात्र मुलगा घाबरला, आपल्या वडिलांना जिवंतपणीच अग्नी द्यायचा?... त्याचे हात थरथर कापू लागले. वडिलांच्या छातीवर डोकं ठेवून तो वडिलांना विनवू लागला. "बाबा अहो एका रुपयासाठी तुम्ही मरणसुद्धा पत्करताय? काय हा मूर्खपणा?.. व्यापारी काही ऐकेच ना.. म्हणाला.. अग्नी दे, पेटव चिता, पण मी रूपया देणार नाही. मुलाने नाईलाजास्तव चितेला अग्नी दिला, आणि आता चिता पेटणार तेवढ्यात त्या अग्नीचं रुपांतर फुलांमधे झालं. संन्यासी चितेजवळ गेला आणि साक्षात विष्णू रुपात समोर आला... व्यापाऱ्याला चितेवरून दूर केलं... म्हणाला.. संकल्प असावा तर असा...
मी मात्र यथाशक्ती संकल्प केला.. म्हणजे कुठेतरी माझा विश्वास माझ्यावर आणि माझ्या मैयावर कमी पडला... ती कनवाळूच आहे, मला त्रास होऊ नये याची काळजी ती घेतेच आहे, पण मी तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून, काही तरी नियम ठेवून संकल्प केला असता तर तोही तिने पूर्णत्वाला नेलाच असता. पुन्हा परिक्रमेची संधी मिळाल्यास ही चूक माझ्याकडून होऊ देऊ नको असं मी तिला आताच विनवते. परिक्रमेचे नियम नक्की काय, त्याची कारणं नक्की काय हे खरं तर अजूनही हवं तसं मला समजलेलं नाहीये, पण १००% श्रद्धा हा नियम असायलाच हवा हे नक्की. भिती वाटणे म्हणजे श्रद्धा कमी पडणेच आहे आणि काही वेळेला माझ्याकडून ही चूक झालेली आहे. मात्र काही वेळेला माझ्या नर्मदा माईनी मला अगदी अभयाचं वरदान देखील दिलं ते कसं ते ही माझ्या अनुभव कथनामध्ये येईलच.
संकल्प करून झाला होता. कार्तिक द्वादशी, १ नोव्हेंबर २०१७ हा दिवस. मी या अनुभव कथनामधे माझी रोजनिशी सांगणार नाहीये कारण ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि प्रारब्धानुसार परिक्रमा घडत असते. मी इथे मला आलेले अनुभव कथन करणार आहे कारण माझ्या मते ते अनुभव मला मिळणं हेच महत्वाचं होतं.. तर परिक्रमेची वाटचाल प्रत्यक्ष रित्या सुरु होण्याआधीचे अनुभव मी सांगितले, आता अनुभवाला सुरवात करू पुढच्या भागापासून.... नर्मदे हर.....
क्रमशः
या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा: विलक्षण अनुभूती!

भाग - 4
परिक्रमेच्या पहिल्याच दिवशी लागोपाठ अनुभव, एक शुभ संकेत, आणि एक कोडं पडतं तेव्हां…
नर्मदे हर.
नर्मदे हर… तर मागच्या भागात आपण मला पडलेल्या कोड्याबद्दल बोलत होतो! लेले काका असं काय म्हणाले होते? मी इतकी बुचकळ्यात का पडले? या कोड्याचा उलगडा कसा आणि कुठे झाला ते आता सांगते.
लेले काकांशी माझ्या ब-याच गप्पा झाल्यात. साधना कशी करायची? माझे गुरु कोण? कुठले श्लोक म्हणायचे, काय वाचायचं असे अनेक विषय ते माझ्याशी बोलत होते... खरंतर माझ्या बाबतीत त्यांनी फ़ार काही विचारलं नाही पण मी मात्र अनेक प्रश्न विचारू लागले. तेवढी मोकळीक तोवर बोलून निर्माण झाली होती. ते अगदीच प्रेमाने माझ्याशी बोलत होते… मधे मधे मला आशिर्वाद ही देत होते... छान होईल बेटा तुझं सगळं’… असं ऐकून छान वाटत होतं, कुणी एक आजोबा, काही कारण नसताना, निस्वार्थ भावनेनी आशिर्वाद देतात हेच मुळात एक वेगळं फ़ीलिंग होतं. मला हे लेले आजोबा वेगळे वाटले, पण आवडले होते.
आमचं भोजन प्रसादी घेऊन झालं आणि लेले काका म्हणाले, ‘बाळ, बरीच प्रश्न दिसतात तुझ्या मनात… बरं मी उत्तर देतो... तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगतोच आता!’
आजोबा काय सांगतात याकडे मी कान लावून होते. त्यांनी जरा पॉज घेतला, मला थोडं बाजूला बोलावलं, आणि म्हणाले, ‘नाही मी नाही सांगणार तुला माझ्याबद्दल…’
अरेच्या, अचानक काय झालं आजोबा, सांगा ना... मी आग्रह केला. त्यावर ते म्हणतात… ‘नको, माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबत च्या लोकांकडून समजेल… आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी’.
मला आता मात्र फ़ारच वेगळं वाटू लागलं…
पण एक शुभ संकेत मिळाला... माझ्या परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात असं आजोबा म्हणाले, म्हणजे परिक्रमा पूर्ण होणार हे नक्की. आजोबांना जास्त आग्रह न करता आम्ही पुढची वाटचाल सुरु केली. मी आता मझ्या मैत्रिणीसोबत होते आणि आजोबा त्यांच्या सोबतच्या पुरुष मंडळीं सोबत. ती माझी आणि आजोबांची शेवटची भेट. काय आश्चर्य न? त्या नंतर पूर्ण परिक्रमेत मला लेले काका पुन्हा दिसलेच नाही. मी मात्र प्रत्येक आश्रमात ते येऊन गेले का ही चौकशी करायचे. म्हातारा माणूस, आपल्या पेक्षा पुढे जाणार नाही कदाचित असं वाटायचं.
पुढे माझ्यासोबत मंदार वाळिंबे, सुदिन पराडकर आणि त्याचे काका, आणि तांबे बाबा असे लोक होते. सौ मंत्रींची परिक्रमा पूर्ण होऊ शकली नाही आणि सौ डोंगरे काही कारणास्तव वेगळ्या ग्रुप बरोबर होत्या… आम्ही सोबत राहयचं ठरवलं असून ते तसं झालं नव्ह्तं!... असो... तर लेले काकांबद्दल मंदार व ग्रुप माझ्याकडून ऐकून होते. मी लेले काकांचा शोध घेतेय हे त्यांना महित होतं. तब्बल साडे चार महिने गेलेत… मला लेले काका भेटलेच नाही, मात्र एक दिवस अचानक माझ्या समोर जे काही आलं त्याने मी धन्य धन्य झाले… माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटावा अशीच गोष्ट.
नरसिंगपूर जिल्ह्यातल्या गुरसी गावात एका मंदिरात आम्ही आश्रय घेतला. तिथून पुढचं गाव रमपूरा, फ़क्त ७ किमी. मी आणि तांबे बाबा गुरसीहून थोडं उशीरा निघालो... मंदार आणि मंडळी सकाळी लवकर निघून रमपू-याला पोचली. तिथून मंदार चा फ़ोन आला, म्हणाला, ‘ताई आज रमपुरा ला मुक्काम करायचाय!’
मी- काय? फ़क्त ७ किमी चालून मुक्काम? नाही रे, अशानी कशी पूर्ण व्हायची परिक्रमा. मी नाही मुक्काम करणार... मंदार- पण ही रमपु-याची मंडळी जाऊच देत नाहीयेत ताई… तुला मुक्काम करायचा नसेल तर तू दुसरी कडून जा... असं पुढच्या फ़ोन मधे मला सुदिन सुद्धा सांगत होता… त्या दोन तासात आमचे ३ ते ४ फ़ोन झाले…कुठे पोचलात, पुढचा रस्ता कसा असं आम्ही सतत कॉन्टेक मधे होतो. पुन्हा एक फ़ोन… मंदार म्हणाला, ताई नो ऑप्शन... तुला थांबायलाच लागेल... आणि आता जे मी सांगणार आहे त्याला तू नकार देऊच शकत नाही… तो म्हणाला, तुला लेले काका आठवतात?… मला वाटलं ते तिथे आहेत म्हणून मंदार आपल्याला थांबायला म्हणतोय... पण माहितिये का, ते तर नव्हते तिथे, मात्र तो आश्रम माझ्या गुरुबंधूनी तयार केलेला. माझ्या गुरुंचा वास तिथे…
आता विषयच संपला होता… मंदारच्या एका वाक्याने पिक्चर क्लीअर झाला... तो म्हणाला, ‘ताई नाना महारांजाचा आश्रम आहे, तू मुक्काम करतेयेस, आणि लेले काकांबद्दल महत्वाची बातमी सांगायचीय... लवकर ये.’
साडे चार महिने, परिक्रमेचा जवळ जवळ शेवटचा टप्पा... अमरकंटकच आमचं नेक्स्ट टारगेट... काय समजणार होतं मला लेले काकांबद्दल???…
‘माझ्याबद्दल तुला नर्मदा मैयाच सांगेल काय ते! मी कोण आहे हे तुला तुझ्या नर्मदा मैयाकडून आणि तुझ्या सोबतच्या लोकांकडून समजेल…आणि ते ही तुझी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात असेल त्या वेळी.’ मला लेले काकांचं वाक्य आठवलं... उत्सुकता शिगेला पोचली… आणि मी रमपु-याला! गेल्या गेल्या गुरुंचा प्रसाद मिळाला…आणि मग मंदारनी जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न च झाले… ‘ताई लेले काका कोण माहितिये का? ते साक्षात शंकर महाराज आहे...’
पुण्याला शंकर महाराजांचा आश्रम आहे हे आपल्याला महितच असेल. दत्त संप्रदायातले हे संत सद्गुरु! मोठे आणि भेदक डोळे, अजानुबाहू आणि गुडघ्यावर हात ठेवून बसलेले अशी यांची मूर्ती मी पाहिली होती. हे लेले काका म्हणजे शंकर महाराजच होते...मी विचारलं मंदार ला... तुला कसं समजलं रे?
तर त्याने धनंजय नाईक नावाच्या एक नर्मदा भक्ताची गोष्ट मला सांगीतली…
धनंजय नाईक हे दर वर्षी परिक्रमा करतात. ते शंकर महाराजांचे भक्त. दर वेळी शंकर महाराज त्यांना भेट देतात, पण ह्या साक्षात्काराबद्दल धनंजय नाईकांना उशीरा कळतं… या वेळी श्री नाईकांनी शंकर महाराजांना विनवणी केली की ‘मीच शंकर महाराज असं स्वत:च्या तोंडून सांगा, तरच माझा विश्वास बसेल...’ मी रमपु-याला असताना लेले काका अमरकंटकला पोहचले होते. धनंजय नाईंकाना त्यांनी स्वत: सांगितलं ‘माझी वाट बघत होतास ना? मीच शंकर महाराज आहे’ ही वार्ता वाऱ्यासारखी रमपु-याला पोचली, आणि माझ्या पर्यंत आली…परिक्रमा झाल्यावर मी धनंजय दादांना फोन करून या प्रसंगाची खात्री करून घेतली होती.
मी खरच भाग्यवान… परिक्रमेच्या आधी गुरुमाऊली मला पदरात घेते, श्री दत्तगुरु त्यांच्या अनेक रुपातून मला भेट देतात, माझी काळजी घेतात… लेले काकांनी मन भरून आशिर्वाद दिले आणि ठरवल्याप्रमाणे माझ्या कोड्याचा उलगडा माझ्याच गुरुंच्या ठिकाणी माझ्या डोळ्यासमोर आणला… या सगळ्या काळात एक घटना अजून घडली होती, आणि ती माझ्या नजरेतून सुटून गेली... पण मी त्यांचा नजरेतून सुटली नाही... शंकर महाराजांचं माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होतं हे मला नंतर जाणवलं.
मी गरुडेश्वरला असतानाची गोष्ट. भालोद चे प्रतापे महाराज म्हणजे आई स्वरूप. मी त्यांची लेक... मूळचे नागपूर चे, त्यामुळे अजून थोडा सॉफ़्ट कॉर्नर… त्यांचे अनुभव पुढे सांगेनच, पण हे प्रतापे महाराज मला गरुडेश्वरला भेटायला आले... हो खास मला भेटायला भालोदहून नर्मदा मैया क्रॉस करून नावेतून आले होते. त्या वेळी त्या नावेत शंकर महाराजांचे भक्त त्यांची मूर्ती घेऊन आले होते. गरुडेश्वर घाटावर मी शंकर महाराजांच्या आरती आणि पूजे मधे सामिल होते...पण मी अनभिज्ञ होते... हे निम्मित्त मात्र होतं, संकेत होता, इशारा होता का काय ते माहित नाही, पण शंकर महाराज माझ्यावर लक्ष ठेवून होते हे समजायला मला साडेचार महिने लागले. नक्कीच मी पुण्यकार्य केलं असलं पाहिजे की असे संत सद्गुरु मला प्रत्येक ठिकाणी सांभाळून घेत होते. ‘गुरुकृपा हि केवलम’ म्हणतात तेच खरं. एक गुरु प्रसन्न असलेत की सुख दु:खाची तमाच जाणवत नाही... माझ्यासारख्यांना हे समजायला वेळ लागतो…पण हळू हळू प्रचिती येतेच!
गुरु आणि नर्मदा मैया यांनीच माझी परिक्रमा पूर्ण करवून घेतलीये असं मी का म्हणतेय ते आता तुमच्या लक्षात येईल. कारण जसे संत सद्गुरु माझ्यासोबत सुरवाती पासून होतेत तशीच माझी नर्मदा माई पण होती... आमचा दुसरा, म्हणजे मोरटक्क्यानंतरचा मुक्काम झाला टोकसर ला. परिक्रमा सुरू होऊन अजून आठवडा ही व्हायचा होता… पूर्ण तयारी करून मी परिक्रमेला निघाले होते...
माझ्या बाबांचे चांगले महागडे आणि सगळ्यात छान समजणारे केचूआ कंपनीचे जोडे मी घातलेले होते… आणि इतके चांगले जोडे असून ते टोकसर गावाच्या ५ कि.मी आधी फ़ाटले… अजून परिक्रमेची जेम तेम सुरवात होती…मात्र इथे सुद्धा मला वेगळाच अनुभव आला…
क्रमश:
या मालिकेचा रोज एक भाग शेअर केला जाणार आहे. लेखिकेने नितांत सुंदर रीतीने आपले अनुभव मांडले आहे. वाचत असताना आपणच परिक्रमा करत असल्याची अनुभूती येईल.
______________________________
नर्मदा परिक्रमा एक विलक्षण अनुभूती !
भाग - ५
परिक्रमेच्या सुरवातीला केचूआ चे चांगल्या प्रतीचे जोडे पूर्ण फ़ाटतात तेव्हा…
नर्मदे हर… माझे जोडे फ़ाटले… तो अनुभव आता सांगते... मोरट्क्का ते टोकसर म्हणजे गोमुख घाट असा साधारण १० किमी चा प्रवास. यात मधे परमहंस आश्रम लागतो. इथे आमची भोजन प्रसादी झाली आणि इथून पुढे कसं काय माहित नाही पण अचानक माझा एक जोडा पूर्ण फ़ाटला, त्याचं सोल आणि वरचा जोड्याचा भाग वेगळा होऊ लागला. मी चक्क जोडे हातात घेऊन चालू लागले. पण त्यावेळी मनात जे विचार आले ते एरवी माझ्या मनात आले नसते.
नर्मदा खंड ही तपोभूमी आहे आणि या परिसराचा परिणाम आपल्या मनावर झाल्याशिवाय राहात नाही. मुख्य म्हणजे तो इतका नकळत होतो की आपल्यासाठी सुद्धा तो एक आश्चर्याचाच भाग असतो. एरवी रस्त्यात जोडे फ़ाट्ल्यावर माझी थोडी का होईना चिडचिड झाली असती…निदान आता कसं करायचं ही घालमेल तर झालीच असती, पण या वेळी असं झालं नाही… जोडे फ़ाटले हे वास्तव माझ्या मनानी इतकं चटकन स्वीकार केलं की त्याची वाच्यता सुद्धा सह प्रवाश्यांकडे झाली नाही… आपल्या सोबत या पुढे ज्या काही घटना घडणार आहेत त्या मैयाची कृपा असणार आहे असा विचार मनात आला… वाटलं, कदाचित आपण परिक्रमा अनवाणी केली पाहीजे असं काहितरी मैयाला सुचवायचं असेल. पुढचं ३-४ किमी अंतर मी अनवाणी चालले... फार फ़ार कठीण असतं ते. तेव्हा जे काय दगड गोटे बोचले असतील त्या प्रत्येक बोचण्यातून मला अनवाणी परिक्रमा करणा-यांचं मनोबल काय असेल याची कल्पनाच आली! नाही…मी तेवढ्या तयारीची नव्हती… मला अजून खूप खूप शिकायचं आहे हे मला तेव्हा ख-या अर्थानी उमगलं… ते फ़ाटकेच जोडे मी पुन्हा पायात घातले आणि जमेल तसं चालू लागले. टोकसर आले की चांभाराकडून शिवून घेऊ असं स्वत:ला धीर देत मी टोकसर पर्यंत तशीच फ़ाटक्या जोड्याने पोचले खरे…पण टोकसर आणि पुढच्या तीन गावात चांभार नाही असं मला तिथे समजलं... आता काय करायचं?
अनवाणी चालण्याची क्षमता माझ्यात नाही हे मला समजलच होतं. तो विचार तिथेच सोडून मी झोपी गेले आणि मला शांत झोप लागली देखील! सकाळी गोमुख घाटावर मैया स्नानाला गेले होते. तिथे मैयाला विनवणी केली… आई योग्य तो मार्ग दाखव… मला हेच जोडे घालून परिक्रमा करायची होती, आणि याला ही कारण होतं, हे जोडे माझ्या बाबांचे... त्यांना परिक्रमा करण्याची खूप इच्छा होती, आणि म्हणून त्यांच्या जोड्यांमधून मला या नर्मदा मैयाची प्रदक्षिणा करायची होती. भावनिक कारण हे असं होतं या जोड्यांमागचं. मैयामधे उतरले आणि तिला विनवलं, आई, शक्य असल्यास हेच जोडे सुधरवून शिवून घालता येतील असं काहितरी घडवून आण.
सकाळच्या साधारण सहा वाजताची गोष्ट असेल. मी पुढचा प्रवास थोडा अनवाणी, थोडा फ़ाटक्या जोड्यातून असा करू लागले. कांकरीया गावाच्या आधी एक छोटसं गाव लागतं पीतनगर. तिथे एक किराणा मालाचं दुकान दिसलं... सौ डोंगरेंच्या मनात आलं की फ़ेविक्विक नी जोडे चिकटवून बघावे... निदान चालायला थोडं सोपं जाईल. मी आणि सौ डोंगरे त्या दुकानासमोर बसलो, मी फ़ेविक्विक विकत घेतेलं आणि जोडा चिकटवायला म्हणून पायातून बाहेर काढायला लागले… इतक्यात एक माणूस अगदी धावत माझ्याकडे आला, त्यानी माझ्या पायातला जोडा जवळ जवळ ओढून घेतला आणि तो पळून गेला… ‘अरे बाबा दुसरा तरी घेऊन जा’ इतकं सुद्धा बोलायची संधी मला मिळाली नाही… आता अनवाणी च चालायचं… जोडाच नाही… मात्र त्या माणसाबद्दल माझ्या मनात राग सुद्धा उत्पन्न झाला नाही… एरवी कदाचित आपल्या जवळची वस्तू कुणी हिसकावून घेतल्यावर क्षणिक का होईना राग येईल... पण कसा काय नाही आला मैयाच जाणे… तो दुकानदार, मी आणि सौ डोंगरे आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो होतो…दुकानदारानी आम्हाला चहा पाजला… आणि आम्ही पुढे निघालो... तो उरलेला एक जोडा मी तिथेच सोडून दिला आणि आता अनवाणी चालू लागले... सधारण अर्धा किमी जाऊन झालं असेल नसेल, हा मघाचा जोडा पळवून नेणारा माणूस मैया मैया करत आमच्या मागे आला... त्याच्या हातात माझे दोन्ही जोडे होते, म्हणाला, ‘वो चामरदा की घरवाली को बाहर जाना था, इसलिये जूता जल्दी जल्दी लेकर गया मैं. मैं तो केवट हूं...मुझसे जैसा बना मैंने सिलवा दिया. अब आपको नंगे पैर नहीं चलना पडेगा’.
मी काय विचार करत होते आणि तो बिचारा माझ्यासाठी किती धडपड करत होता... मी पैसे देऊ केले… आणि जबरदस्ती त्याच्या हातात ठेवलेच... तो तयार नव्हता पण पैसा हा पैसा असतो आणि गरीबाला गरज असते... तसे मी काही फ़ार पैसे दिले नाहीत... आणि तसं करून सुद्धा त्याचे उपकार कमी ही होणार नाहीतच…पण निदान काहीतरी समाधान... तिथून पुढे एका गावात एक चांभार दिसला आणि त्याच्याकडून मग ते जोडे मी पुन्हा व्यवस्थित शिवून घेतले.
तिथून पुढे कांकरीया नावाच्या गावाला एका आश्रमात थांबलो. ‘आसन लगादो’ असा आदेश मिळाला. आसन लावणे म्हणजे इथे विश्रांती करा, असा अर्थ होतो… त्यात भोजन प्रसादी घेणार हे येतच. इथला अनुभव मजेशीर होता. तास झाला, दिड तास झाला... पोटात भुकेनी खळ्बळ माजलेली आणि हा साधू काही भोजन प्रसादीचं नाव घेईना… शेवटी आमच्यातल्या एकाने हिम्मत करून भोजन प्रसादी चं विचारलं…तो रागवलाच... म्हणाला आप ही बना लो… आप तो बहोत पैसे वाले हो, आपको भोजन की क्या जरूरत? खरीद के खा लेना कहीं…’ आम्हाला काही समजेच ना, असं काय झालं एकदम? मग त्यानी सांगीतलं, ‘आपका सामान देखो…दुनिया भर की चिजें उठाके लाये हो... ऐसे आता है कोई मैया के घर?... मैया पर भरोसा नहीं, शहर से पढ लिख कर आते हो, और परिक्रमा परिक्रमा का ढोंग रचाते हो…अरे खाना भी ले लेना था साथ में…’ तो साधू चांगलाच चिडला होता.
आमच्या जवळच्या भल्या मोठ्या आणि वजनी बॅग्स पाहून त्याला आमचा वैताग आला... मग तिथेच आम्ही प्रत्येक बॅग मधून अनावश्यक सामान, जास्तीचे कपडे वगैरे सगळं काढून गरीबांना देऊन टाकलं… आणि खरं सांगू…संचय हा त्रासदायकच… तिथे एक धडा असा मिळाला की संचय कुठला ही असो... तो वाईट...
आपण लोक नुसताच संचय करत असतो...पैशाचा, संपत्ती चा, नात्यांचा, माणसांचा, भावनांचा, आठवणींचा आणि मला वाटतं अगदी अनुभवांचा सुद्धा! ते साठवून ठेवलं की वजन होणारच! त्यापेक्षा येईल त्या प्रसंगी, मिळेल त्या परिस्थित, गाठीशी आलेले क्षण, जगणं आणि विसरून जाणं हे खरं समाधानाचं साधन आहे, आणि असं वागता येण्यासाठीचा प्रयास ही असावी साधना...
आम्ही सामान काढून टाकल्यावर त्या साधू महाराजांनी आम्हाला भोजन प्रसादी वाढली… ओझं उतरवल्याचा शरीराला आनंद झाला होता आणि मनालाही. इथून पुढे आमच्या जवळ दोन जोडी कपडे, एक पांघरूण (स्लिपिंग बॅग) आणि थोडे औषध... इतकंच सामान होतं. यातलं काही हरवलं गेलं तरी त्याची तमा असणार नव्हती…मुक्त मनानी आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
पुढे रावेरखेडीला जाताना एका परिक्रमावासी मैयाजींना तब्येती मुळे एका गाडीवाल्याचा आधार घ्यावा लागला… लोकं अनोळखी परिक्रमावासी च्या मदतीला धावून येतात इथे. परिक्रमावासीच्या रूपात नर्मदा मैयाला बघणारी इथली ही स्थानीय मंडळी आणि या अन्न्दाता स्थानीयांच्या रुपात परिक्रमा वासींना भेटणारी नर्मदा मैया, हा खरोखर विलक्षण प्रकार आहे. कोण कधी कुठे कुठल्या रूपात येईल आणि काय देऊन जाईल याचा अंदाजही बांधण कठीण आहे… आणि कधी कधी तर मैयाचं अस्तित्व जाणवतं पण ती अदृष्य रुपात आपल्या सोबत असते हे अनुभावाताक येतं, सांगितलं तर विश्वास बसू नये असेही काही अनुभव येतात. असाच एक अनुभव पुढच्या भागात सांगते.
क्रमश:🌹