मलप्रभा नदीच्या शीतल जलाने सिंचित झालेल्या सुंदर वनांनी भरलेल्या प्रदेशात चालुक्य राजांनी राज्य स्थापन केले. त्यांनी पृथ्वीवरील राजांमध्ये आपल्या कीर्तीचा प्रसार केला.
पट्टदकल - पट्टद (राज्याभिषेक) कल्लू (शिळा). अर्थात पट्टदकल्लू किंवा पट्टदकल हे राज्याभिषेकाचे स्थान. चालुक्यांचे अतिशय महत्वाचे ठिकाण. ऐहोळेत मंदिरनिर्मितीला सुरुवात करुन बदामीत थोडी अधिक विकसित मंदिरे आणि लेण्या कोरून चालुक्यांनी आपल्या मंदिरकलेचा उत्कर्ष पट्टदकलला केला. एकूण १० मंदिरांचा हा समुच्चय. त्यातील ८ मंदिरे जवळजवळ आणि एकाच प्रचंड मंदिरसंकुलात आहेत तर नववे पापनाथ मंदिर ह्या संकुलाच्या बाहेर थोडे गावाच्या बाजूला आहे तर दहावे जैन मंदिर गावाच्या बाहेर साधारण दीडेक किमी अंतरावर आहे. वेळेअभावी आम्हाला पापनाथ आणि जैन मंदिर पाहता आले नाही मात्र संकुलातली सर्व ८ मंदिरे व्यवस्थित पाहता आली. ऐहोळे बघून पट्टदकलला आम्ही साधारण दीड दोनच्या सुमारास आलो. ऐहोळेला जेवायला काही मिळत नाही मात्र पट्टदकलला जेवण मिळते. मंदिरसंकुलाच्या बाहेरच टपरीवजा लहान लहान हॉटेलं आहेत आणि तिथे ग्रामीण कर्नाटकी पद्धतीचे जेवण मिळते. ज्वारीच्या लाटलेल्या पातळ भाकर्या, एखादे कडधान्य, भाजी, शेंगा चटणी आणि डाळभात असे साधेच पण रूचकर जेवण. जेवण करुन तिकिट काढून आम्ही मंदिर संकुलात गेलो. मंदिर संकुलाचे आवार विस्तीर्ण असून हिरवळ जोपासली आहे. पट्टदकल हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असल्याने परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटका आहे.
मलप्रभेच्या खोर्यात चालुक्यांचे राज्य बहरले. बदामी तसे मलप्रभेपासून लांब. ऐहोळेपासून मलप्रभा जवळ असली तरीही नदी तशी गावाच्या बाहेरुन वाहते मात्र पट्टदकल हे मलप्रभेच्या काठावरच वसलेले आहे. पट्टदकल येथील मंदिरे अधिक विकसित आणि देखणी असल्याचे कारण म्हणजे येथील मंदिरांची निर्मिती ही प्रामुख्याने विजयादित्य आणि विक्रमादित्याच्या (दुसरा) ह्याच्या काळात झाली आणि चालुक्य राजवटीचा हा काळ शांततेने भरलेला असल्यामुळे अगदी भरभराटीचा होता. इथल्या मंदिरांवर अप्रतिम नक्षीकाम आणि मूर्तीकाम आहे. मंदिराच्या आतील स्तंभांवरदेखील विविध पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत किंबहुना अशा पद्धतीच्या मूर्तीकामाची सुरुवात येथेच झाली असे म्हणता येईल. येथेही दक्षिण भारतीय द्रविड शैली, उत्तर भारतीय नागर शैली, दोन्हीचे मिश्रण असलेली वेस्सर शैली, प्राथमिक मंदिरांची मंडप शैली अशा विविध प्रकारांनी बांधलेली मंदिरे आपणास दिसतात. त्यातीलच एकेक आपण आता पाहू.
पट्टदकल मंदिरसंकुल
संकुलाच्या अगदी सुरुवातीला लागणारी काडसिद्धेश्वर आणि जंबुलिंग मंदिरे ही अगदी लहान आहेत आणि जवळपास सारखीच आहेत.
१. काडसिद्धेश्वर मंदिर
सातव्या शतकाच्या मध्यात बांधले गेलेले हे मंदिर आकाराने लहान असून त्याचे शिखर उत्तर भारतीय रेखा नागर पद्धतीचे आहे. द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. पीठावर शिवलिंग स्थापित असून त्याच्या द्वारशाखेवर शिवपार्वती प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या शुकनासीवर नटराज आणि पार्वती आहे तर बाह्यभिंतीवर लकुलिश शिव, हरीहर आणि अर्धनारीश्वराच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
मंदिराचे मुखदर्शन
लकुलिश
हरिहर
अर्धनारीश्वर
गर्भगृहातले शिवलिंग
२. जंबुलिंग मंदिर
ह्या मंदिराचे स्थापत्य देखील काडसिद्धेश्वर मंदिरासारखेच आहे. रेखा नागर पद्धतीचे शिखर आणि शुकनासीवर शिव पार्वती
रेखा नागर पद्धतीचे पद्धतीचे शिखर आणि शिवपार्वती
३. चंद्रशेखर मंदिर
हे मंदिर गळगनाथ आणि संगमेश्वर मंदिराच्या मध्ये असून हेही अगदी लहान आहे. मंदिराचा शिखरभाग आज नष्ट झाला असून हे मंदिर मंडप शैलीत साधे चौकोनी असे दिसते. गर्भगृहात पीठावर शिवलिंग स्थापित आहे.
चंद्रशेखर मंदिर
चंद्रशेखर मंदिर
४. गळगनाथ मंदिर
पट्टदकलमधले हे आगळ्यावेगळ्या शैलीचे मंदिर. आठव्या शतकातल्या मध्यातले हे मंदिराचे शिखर रेखा नागर पद्धतीचे असून अतिशय उत्तम स्थितीत आहे. नागरी शैलीच्या शिखर प्रकाराचे हे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणा ना. कलत्या छपरांवर तोललेला मुखमंडप, वर नागर पद्धतीचे उतरते शिखर आणि कळसाच्या भागात आमलक अशी ह्याची रचना. येथील सभामंडप आज पडून गेलेला दिसतो आणि शुकनासी भग्न झालेली दिसते. मात्र ह्याचे वैशिष्ट्य आहे ते येथील प्रदक्षिणा मार्गात. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग गर्भगृहातूनच काढलेला दिसतो. ऐहोळेतील असाच प्रकारचे हुच्चीमली मंदिर ह्याआधीच्या लेखात पाहिल्याचे आपल्याला आठवतच असेल. ह्या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील तीन बाजूंना असलेली घनद्वारे. म्हणजे तिन्ही बाजूंना दरवाजाचा आभास निर्माण केलेला असून हि द्वारे मात्र भिंतीनी अथवा दगडाच्या जाळीदार खिडक्यांनी बंदिस्त असतात. मंदिराच्या मुखमंडपावर गंगा-यमुना कोरलेल्या असून एका भिंतीवर अंधकासुरवधाची प्रतिमा आहे.
गळगनाथ मंदिर
अंधकासुर वध
काडसिद्धेश्वर मंदिराच्या बाजूने दिसणारे गळगनाथ मंदिर
घनद्वार
रेखानागर पद्धत दर्शवणारे आदर्श शिखर
ह्या मंदिराच्या बाजूलाच आहे ते संगमेश्वर मंदिर
५. संगमेश्वर मंदिर
आतापर्यंत आपण वरील मंदिरे पाहिली ती नागर शैलीत होती तर चंद्रशेखर मंडप शैलीत (मूळचे नष्ट झालेले शिखर नागर शैलीतले असावे). मात्र संगमेश्वर मंदिर हे पूर्णतः द्रविड शैलीत आहे. हे मंदिर पूर्वी विजयेश्वर नावाने ओळखले जात असून चालुक्य सम्राट विजयादित्याने इसवी सन ७२० ते ७३३ च्या दरम्यान बांधले. एका उंच अधिष्ठानावर असलेल्या मंदिरात स्वतंत्र नंदीमंडप असून तीन बाजूंना मुखमंडप आहेत. मंदिराची विमान रचना हि द्विस्तरीय असून वरती कलश आहे आणि त्याखाली कूट शिखरे कोरलेली आहेत. प्रदक्षिणा मार्गावर वेगवेगळ्या नक्षीच्या जाळीदर खिडक्या असून बाह्यभिंतींवर देवकोष्ठे आहेत त्यावर अंधकासुर वध, त्रिपुरांतक, वराह, गजासुरवध, हरिहर अशा विविध मूर्ती बघायला मिळतात. सभामंडप अनेक स्तंभांवर तोललेला असून अंतराळ आणि गर्भगृहामध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. अर्थात हे मंदिर जरी खूप मोठे असले तरीही ते येथील विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरांच्या मानाने लहानच आहे.
द्रविड शैलीतले संगमेश्वर मंदिर
भल्या थोरल्या अधिष्ठानावर असलेले संगमेश्वर मंदिर
गळगनाथ (डावीकडे) आणि संगमेश्वर (उजवीकडे)
संगमेश्वर आणि जांबुलिंग
मंदिराच्या बाह्य भिंतींवरील मूर्तीकाम
विविध प्रकारच्या जाळीदार खिडक्या
संगमेश्वर आणि पाठीमागे काशी विश्वेश्वर
आतापर्यंत आपण काडसिद्धेश्वर, जांबुलिंग, चंद्रशेखर ही तीन लहान मंदिरे, गळगनाथ हे मध्यम आणि संगमेश्वर हे मोठे अशी पाच मंदिरे पाहिली. आता राहिलीत ती तीन महत्वाची मंदिरे. काशी विश्वेश्वर, मल्लिकार्जुन आणि विरुपाक्ष. काशी विश्वेश्वर हे तसे लहान असूनही आतमधील स्तंभांवर असलेल्या अप्रतिम शिल्पपटांमुळे विख्यात आहे तर विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन ही जुनी मंदिरे तर प्रचंड मोठी आणि शिल्पकामाने अगदी भरलेली आहेत. या तिन्ही मंदिरांवर लिहायचे झाल्यास प्रत्येकावर एक स्वतंत्र लेखच लिहायला लागेल. त्यामुळे प्रत्यक्ष मंदिरे बघताना जरी वेळेचे नियोजन करायचे असल्यामुळे आम्ही मंदिरे बघताना काशी विश्वेश्वर, विरुपाक्ष, मल्लिकार्जुन, संगमेश्वर, गळगनाथ आणि उरलेली तीन लहान मंदिरे असा क्रम घेतला तरी लिहिण्याच्या सोयीच्या दृष्टीने इतर मंदिरांवर आधी लिहिले आणि आता पुढच्या भागात आपण उरलेले एकेक मंदिर विस्ताराने बघू. पुढच्या भागात भेट देऊ ती काशी विश्वेश्वराला.
मलप्रभेच्या खोर्यात चालुक्यांनी मंदिरांच्या निर्मितीला सुरुवात केली,
बदामीच्या शैलमंदिरांपासून सुरुवात करुन ऐहोळेतील प्राथमिक मंदिर
निर्माणाच्या कार्यशाळेत अभ्यास करुन एकाहून एक सरस मंदिरे ते बांधतच गेले.
नंतर राष्ट्रकूटांनीही येथे काही भर घातली. काशी विश्वेश्वर हे मंदिर याच
परंपरेतले. आठव्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या छोटेखानी मंदिरात पुढे
निर्माण झालेल्या एकाहून एक सरस शिल्पपटांची बीजे दिसतात असे मानण्यास
काहीच हरकत नाही.
नागर शैलीतल्या ह्या मंदिरांचा मुखमंडप आज पडून गेलाय मात्र येथे
मंदिराच्या पुढ्यात नंदीप्रतिमा अजूनही दिसते. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह
ह्यांनी युक्त असलेल्या ह्या मंदिराचा आज रेखानागर शिखरावरील आमलक आणि
त्यावरील कळसही आज अस्तित्वात नाही मात्र तरीही मंदिराचे मूळचे देखणेपण
उणावत नाही. मंदिराच्या शुकनासीवर नटराज शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे.
काशी विश्वेश्वर मंदिर व शुकनासीवर असणारा नटराज
द्वारशाखांच्या तळाशी गंगा यमुना आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर देखील
गंगा यमुना आणि निधी आणि सेवक असून ललाटबिंबार दोन्ही हातात नाग पकडलेला
गरुड दिसतो आणि आतमध्ये शिवलिंग आहे.
अंतराळ आणि गर्भगृह, ललाटबिंबावर असलेला गरुड
ह्या मंदिराचे खरे सौंदर्य आहे ते मात्र येथील सभामंडपात असणार्या स्तंभांवरील शिल्पपटात. तेच आता एकेक करुन आपण पाहूयात.
रावणानुग्रह
कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे
दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी
हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या
सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत
पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने
कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची
भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची
थोडक्यात कथा.
गजासुरवध
अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्या
रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त
होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी
जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे
पूजन करणार्या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक
दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा
धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. येथे मात्र अंधकासुरवध दाखवला नसून
पूर्ण प्रसंग फक्त गजासुरवधाचा आहे.
सोमास्कंद शिवमूर्ती
शिवपार्वती आणि पार्वतीने कडेवर घेतलेला कार्तिकेय अर्थात स्कंद अशी ही उमेसहित स्कंद असलेली प्रतिमा अर्थात सोमास्कंद शिवमूर्ती.
लिंगोद्भव शिवमूर्ती
एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक
दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो
श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर
ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग
लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने
श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.
ह्या शिल्पपटात खालील बाजूस वराहरूपी विष्णू स्तंभाचा तळ शोधत असताना
दाखविले आहेत तर वरील बाजूस उजवीकडे चतुर्मुखी ब्रह्मदेव स्तंभाचा वरील भाग
शोधत आहेत. आदी अंताचा कसलाही थांग न लागल्याने शेवटी ते लिंगरूपी
स्तंभातून प्रकट झालेल्या शिवाला शरण गेलेले आहेत. अष्टदिक्पाल हे शिवाचे
कौतुक पाहायला आलेले आहेत.
त्रिपुरांतक शिव
ही येथील एक अतिशय देखणी प्रतिमा. तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली,
तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली
अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली.
ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू
शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या
पुरांमुळे अतिशय बलवान झालेल्या ह्या तीनही असुरांचा शंकराने पृथ्वीरुपी रथ
धारण करुन, त्याला सूर्यचंद्ररूपी चक्रे लावून, चार वेदरुपी अश्व जोडून,
ब्रह्मदेवाला सारथी करुन आणि बाणाच्या जागी विष्णूला स्थापित करुन करून
त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा. येथे रथात पार्वतीसह गणपतीही बसलेला
दिसतो.
कल्याणसुंदर शिवमूर्ती
शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात.
ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो.
ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या
विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात. हिमालय हा गडू घेऊन कन्यादान करताना दिसतो.
गंगावतरण
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून भगीरथ
प्रयत्न करून स्वर्गातून आणलेल्या गंगेला शिव आपल्या जटा मोकळ्या करत
गंगेला पृथ्वीवर जाण्यास जागा मोकळी करून देत आहे. डाव्या बाजूस पार्वती
उभी असून उजव्या बाजूस भगीरथ बाजूस एका पायावर तप करीत आहे. तर उजव्या
बाजूस पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र हात जोडून मुक्तीची याचना
करीत आहेत.
ह्या शिवलीलांसहित कृष्णलीलाही येथील स्तंभांवर कोरलेल्या दिसतात.
गोवर्धन गिरीधारी
इंद्रोत्सव साजरा न करता गोवर्धनपूजन केल्याने संतप्त झालेल्या इंद्राने
घनघोर वृष्टी सुरु केली. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्याखाली
संपूर्ण गोकुळाचे रक्षण केले अशी ह्याची थोडक्यात कथा. उपरोक्त शिल्पपटात
उजव्या बाजूस गोवर्धन प्रसंग कोरला असून वरच्या बाजूस अनंतशयनी विष्णू आहे,
तर डावीकडे विष्णू बळीराजाच्या मस्तकावर तिसरा पाय ठेवत त्याचे त्रिविक्रम
रूप दाखवत आहे.
कृष्णजन्म व काही लीला
यशोदा पलंगावर झोपलेली असून वसुदेव कृष्णाला गोकुळात घेऊन जात आहे. खालच्या
बाजूस कृष्णाच्या लहानपणीचे काही प्रसंग असून कालियामर्दनाचा देखावा
कोरलेला आहे.
कृष्णलीला
खालच्या बाजूस असलेल्या शिल्पपटात डाव्या बाजूस मथुरेच्या राजरस्त्यावर
बेभान होऊन चालून असलेल्या कुवलयापीड हत्तीला कृष्ण थोपवत आहे तर त्याच्या
शेजारी घोड्याच्या रूपाने आलेल्या केशी दैत्याचे कृष्ण निर्दालन करत आहे.
वरील बाजूस उखळाचा प्रसंग आणि काही बाललीला दाखवल्या आहेत.
दैत्यनिर्दालन
वरच्या बाजूस शिंकाळ्यातील लोणी खाणे, चक्राच्या रूपात आलेल्या शकटासुराचा
वध, काकासुराचा वध आणि झाडांच्या रुपात आलेल्या वृक्षरूप धारण केलेल्या
यमलाजुर्नांना कृष्ण दुभंगून टाकत आहे. तर खालच्या बाजूस बैलाच्या रुपात
आलेल्या धेनुकासुराचा कृष्ण वध करत असून त्याच्या शेजारीच पुतनेला मारताना
कृष्णाचे मनोहारी स्वरुप येथे दाखवले आहे.
याखेरीज शिव आणि कृष्णाच्या जीवनांतील इतरही शिल्पपट येथे आहेत पण त्या
सर्वांचे वर्णन करणे विस्तारभयास्तव कठीण आहे. स्तंभांवर असणार्या ह्या
पटांशिवाय येथे भिंतींच्या आतल्या भागात विविध व्याल प्रतिमा देखील येथे
कोरलेल्या आहेत त्या येणेप्रमाणे
ह्याखेरीज मंदिराच्या बाह्यांगाचे सुरेख दर्शन आपल्याला विविध कोनांतून घेता येते.
मधले काशी विश्वेश्वर, डावीकडे गळगनाथ तर उजवीकडे भव्य मल्लिकार्जुन मंदिर
काशी विश्वेश्वर
नागर शैलीचे उत्तम उदाहरण
छोटेखानी काशी विश्वेश्वर मंदिरची इतके परीपूर्ण आहे तर येथील दोन भव्य
मंदिरे विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन काय असतील त्याविषयी पाहू पुढच्या
भागात.
सुख-दुखात, आनंदात अशा कुठल्याही मानवी भावनांच्या हिंदोळ्यावर आपण असतो तेव्हा आजही आवर्जून किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांचा आधार घेत असतो. हीच या गायकाची महानता आहे. त्यांच्या आठवणी जोपासणारे स्मारक खांडवा येथे उभारलेले आहे. ज्यांचे किशोर कुमार आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांवर प्रेम आहे, त्यांनी हे स्मारक नक्की बघावे, असेच आहे.
भटकंतीसाठी चक्क एका गायकाचे स्मारक म्हटल्यावर आपल्या डोळ्यात अचानक आश्चर्याचा भाव उतरतो; पण भारतात असणारे संगीताचे, त्यातही गायकावर असलेले प्रेम यासाठी अशी ठिकाणे पाहिली पाहिजे. त्यातूनच अशा कलावंतांचा जीवन-प्रवास, त्यांची महानता, त्यांचे कलेवर असणारे प्रेम त्यातून प्रकट होत असते. आपल्या भारतात चित्रपट गीतांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व हे गाणाऱ्या कलावंतांना आहे. त्यामुळे गुणगुणल्या जाणाऱ्या गीतांच्या ओळीबरोबरच गायकांची भक्ती करणारा एक मोठा वर्ग आपल्याला दिसतो. विशेषतः जुन्या संगीतावर प्रेम करणारा ज्येष्ठ आणि तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात आढळतो. मोहम्मद रफी, मन्ना डे, आशा भोसले, लता मंगेशकर ही नावे ऐकली की आपली चित्रपटसृष्टी किती भाग्यवान होती, हे लक्षात येईल. या प्रत्येक गायकाला प्रसंगी देवाच्या स्थानी ठेवून त्यांची गाणी ऐकण्यात आनंद घेणारीही मंडळी कमी नाहीत. आज कित्येक वर्षे लोटली तरीही त्यांच्या आवाजाची जादू, त्यांचा पगडा तसूभरही कमी झालेला नाही. याच पंक्तीतले एक नाव म्हणजे किशोर कुमार. गाणी आवडतात, चित्रपट संगीत आवडते; पण किशोर कुमार हे नाव माहिती नाही, असा एकही व्यक्ती निदान भारतात तरी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. इतकी या आवाजाची मोहिनी आहे. किशोरदांनी गाणी गायली ती ६०, ७० आणि ८०च्या दशकात. आज कितीतरी वर्षे लोटली; पण त्यांचा आवाज गाण्यातून ऐकला की आपण त्यात गुंतून जातो. आजच्या तरुण पिढीने किशोर कुमारांना पाहिलेदेखील नाही; पण केवळ त्यांच्या जादूभरल्या आवाजाने ही पिढी अक्षरशः दिवानी होऊन जाते.
किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ सालचा. त्यांचे मूळ नाव आभास कुमार. खंडवा या मध्य प्रदेशमधील गावचे. त्यामुळेच त्यांना किशोर कुमार खंडवावाले असेही म्हणत. ते केवळ पार्श्वगायक नव्हते तर अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकदेखील होते. एवढेच नव्हे तर हिंदीव्यतिरिक्त त्यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम आणि उर्दू यासह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठीत त्यांनी जी काही थोडकी गाणी गायली तीदेखील कमालीची लोकप्रिय झाली.
आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकीर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी सहकलाकारासोबत गायलेली युगूलगीते रसिकांनी डोक्यावरच घेतली. त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, गीता दत्त, शमशाद बेगम, सुलक्षणा पंडित, एस. जानकी, पी. सुशीला आणि कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत गीते गायली; पण आशा भोसले यांच्यासोबत सर्वाधिक युगूलगीते गायली. अभिनेत्यांपैकी राजेश खन्ना यांच्यासाठी सर्वाधिक गाणी गायली, जी गायक-अभिनेता यांच्या जोडीसाठी एक अजिंक्य विक्रम आहे. हजारो गाणी गाऊन रसिकांच्या हृदयावर राज्य करणारा किशोर कुमार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं, असं म्हणायला हरकत नाही. अशा या महान गायकाचा मृत्यू १३ ऑक्टोबर १९८७ रोजी वयाच्या ५८व्या वर्षी मुंबईत झाला; पण त्यांच्याच इच्छेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी म्हणजे खंडवा येथे करण्यात आले. नंतर या खंडवावासीयांनीसुद्धा त्यांच्या या आवडत्या गायकाचे, त्यांच्या सुपुत्राचे यथोचित स्मारक उभारून त्यांना मानवंदना दिली. एखाद्या गायकाचे उभारलेले हे स्मारक आवर्जून पाहायलाच पाहिजे.
हे स्मारक म्हणजे एक उद्यान असून, त्याची देखभाल इथले स्थानिक प्रशासन करते आहे. ढोलपूर प्रकारच्या लाल रंगाच्या दगडात बांधलेले हे स्मारक फारच कलात्मक पद्धतीने बांधलेले दिसते. हे स्मारक आणि उद्यान कंपाउंडने बंदिस्त असून त्याच्या प्रथमदर्शनी भिंतीवर किशोर कुमार यांची विविध अभिनेते, संगीतकार आणि संगीतातल्या मान्यवर व्यक्तींची छायाचित्रे लावली असल्यामुळे आपण पाहताक्षणीच या स्मारकात गुंतून जातो. या स्मारकात आत शिरलो, की विविध झाडे आणि या बरोबरच संगीतातली वाद्येही त्याच रंगाच्या दगडात घडवलेल्या दिसून येतात. म्हणजे तबला, हार्मोनियम अशा वाद्यांची उद्यानात केलेली रचना पाहून आपण अचंबित होऊन जातो. याचबरोबर मध्यभागी लांब निमुळते आकाराचे कारंजे आणि रंगीत दिव्यांचीही मांडणी केलेली दिसून येते.
मुख्य स्मारकासमोर आलो, की फुलातून उमललेले किशोर कुमार यांचे शिल्प समोर दिसते. हे शिल्पदेखील लाल दगडात घडवलेले; पण इतके कलात्मक की थक्क होतो. म्हणजे फुलाच्या तीन पाकळ्या यात उमललेल्या दाखवल्या आहेत आणि या तीन पाकळ्यांमध्ये किशोर कुमार यांचे दगडात कोरलेले शिल्प. या शिल्पातदेखील तबला आणि हार्मोनियम मोठ्या खुबीने चितारलेले आहेत. अशा या शिल्पाला अनेक रंगीबेरंगी दिव्यांची सोबत दिली आहे. हे पाहत असतानाच आपल्याला आणखी एक गोष्ट कळते, ती म्हणजे या स्मारकामागेच किशोर कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती जागा आहे. हे स्थळही अतिशय सुंदर पद्धतीने जतन केले आहे. या स्थळाकडे जाण्याअगोदरच किशोर कुमार यांची छबी असलेले छायाचित्र आणि त्यांनीच गायलेल्या ओळी लिहिलेल्या आपल्याला थांबवतात..
चलते चलते... मेरे ये गीत याद रखना
कभी अलविदा ना कहेना...
एकेकाळी त्यांनीच गायलेल्या ओळी त्यांच्या पश्चात वाचताना आपल्याला बराच अर्थ सांगून जातात.
एका चौथऱ्यावर त्यांचा कोट घातलेला आणि एका हातात माइक घेतलेला पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. काही क्षण असे वाटते, की लगेचच हा पुतळा सजीव होऊन गायला लागेल आणि आपले कान तृप्त करून टाकेल.
हे सारे पाहून, अनुभवून आपण काही क्षण स्तंभित होतो. गायनाची कला किती प्रभावी आहे, याचा अंदाज येतो. गाण्यातून, आवाजातून समस्त रसिकांना वेड लावणे ही सोपी गोष्ट नाही; पण किशोर कुमार नावाच्या अवलियाने ही गोष्ट आणि किमया करून दाखवली आहे. आज संपूर्ण भारत वर्षात असा एकही क्षण असा नसेल, की तिथे किशोर कुमार यांचा जादूभरला आवाज घुमत नसेल. दिवसाच्या चोवीस तासही या आसमंतात या गायकाची आवाजाची जादू कुठे ना कुठे तरी नक्की ऐकली जात असणार.
मध्य प्रदेशातील खंडवा शहराचे केवळ भौगोलिकच नव्हे तर सांस्कृतिक वैशिष्ट्यदेखील अद्वितीय आहे. या शहराजवळच असिरगड आणि बुऱ्हाणपूर ही ठिकाणे आहेत. ही पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळे काहीशी वाट वाकडी करून हे ठिकाण आवर्जून पाहायला पाहिजे. किशोर कुमारच्या बालपणातील बऱ्याच आठवणी येथे आहेत. त्यांचे बालपण खंडवामध्ये गेले. आजही त्यांचे वडिलोपार्जित घर येथे पाहायला मिळते; पण ते आता मोडकळीस आले आहे. त्यांना या शहराची इतकी आवड होती, की माझ्या मृत्यूनंतर माझ्यावरती अंत्यसंस्कार याच गावी केले पाहिजेत, अशी त्यांची इच्छा होती. आजही त्यांचे अनेक चाहते वाढदिवशी आणि स्मृतिदिनानिमित्त मोठ्या संख्येने येथे येतात. त्यांना अभिवादन करतात. त्यांच्या गायनाच्या सेवेप्रती आदरभाव व्यक्त करतात. आलेल्या चाहत्यांना येथील लोक दूध-जिलेबीदेखील देतात. वास्तविक, दूध-जिलेबी किशोर कुमार यांनादेखील आवडत असे. खंडवा- इंदूर रस्त्यावर शहराच्या अगदी सुरुवातीलाच हे स्मारक आपल्याला उभारलेले दिसते. ज्यांचे किशोर कुमार आणि त्यांनी गायलेल्या गाण्यांवर प्रेम आहे त्यांच्यासाठी हे स्मारक मस्ट वॉच या श्रेणीतले आहे.
देखण्या मंदिरांचा ‘गोवा’
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
गोव्यातील
पर्यटन बहुतांशी समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, खाद्यसंस्कृती
यापुरतेच मर्यादित राहिले आहे; पण गोव्यात मंदिरेही तितकीच देखणी आहेत.
गोव्यात प्राचीन, पुरातन आणि निसर्गाच्या कुशीत दडलेली मंदिरे पर्यटनाला
समृद्ध करणारी आहेत. गोव्यातील
मंदिरांचे आणि देवदेवतांचे स्थान हेवा वाटणारे असेच आहे. या मंदिरांमध्ये
आर्य आणि द्रविड अशा दोन्ही संस्कृतीचा संगम आणि पोर्तुगीज म्हणजे लॅटिन
शैलीची छापही यात उमटलेली दिसते.
गोव्यातल्या मंदिरात जाऊन तिथे
नतमस्तक होणे किंवा त्या मूर्तीसमोर जाऊन माथा टेकवणे यापेक्षाही जास्त
आनंद या मंदिरांच्या भव्यपणात आहे. सुटसुटीतपणा, चकचकीतपणा, स्वच्छता ही
अक्षरशः आपल्या डोळ्यांनी अनुभवावी अशीच आहे. फोंडा तालुक्यातील कवळे गावात
असणारे शांतादुर्गा मंदिरही त्याला अपवाद नाही. काही एकरवर पसरलेलं हे
मंदिर म्हणजे वास्तुस्थापत्यचा आणि मंदिरामागे दडलेल्या मोठ्या इतिहासाचा
एक अनोखा संगम आहे. त्यामुळे गोव्यात आल्यावर आपल्या ‘बकेट लिस्ट’मध्ये या
मंदिराचे स्थान सर्वप्रथम असायलाच हवे.
मंदिरापर्यंत
पोहोचायला एक चांगली फरसबंदी वाट तयार केलेली आहे. जाताना या वाटेवरून
डाव्या बाजूला एक छानसे तळे दिसते. बहुदा या तळ्याची निर्मिती मंदिराच्या
दैनंदिन पूजेच्या वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी झाली असावी. सुरुवातीला
असणारे भव्य असे प्रवेशद्वार पार केले की मग मंदिराचा कॅनव्हास एका क्षणात
आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मुख्य मंदिराची इमारत, त्याच्या समोर असलेली
भव्य दीपमाळ किंवा दीपस्तंभ आणि मंदिराच्या आसपास असलेल्या मंदिराच्या
कार्यालयीन वापरासाठी व्यवस्थापनासाठीच्या इमारती हा सारा पसारा आपल्यासमोर
येतो. मंदिर इतके भव्य आणि देखणे असू शकते, यावर आपण विचार करायला लागतो.
सुरुवातीला हे मंदिर न वाटता तो एखादा भव्य राजवाडाच वाटतो. मंदिरासाठी
वापरण्यात आलेली रंगसंगती हासुद्धा एक जाणवणारा सुखद धक्का. लाल,
पिवळ्या, तपकिरी, पांढऱ्या या रंगाचा इतका बेमालूमपणे वापर केला आहे की आपण
या रंगांच्या प्रेमातच पडतो आणि हो.. हे सारे रंग आजूबाजूच्या हिरव्या
निसर्गाच्या पार्श्वभूमीवर अगदी उठून दिसतात. याचे श्रेय रंगसंगती
करणाऱ्यालाच द्यायला हवे. तरीसुद्धा मंदिराचे सारे सौंदर्य उतरत्या
छपराच्या लाल रंगात सामावलेले वाटते. पोर्तुगीज वास्तुकलेची म्हणजे लॅटिन
वास्तुकलेची छाप या छपरांवर जाणवते. थोडा जपानी पागोड्याचा अंशही या
बांधकामात दिसतो. मंदिराच्या समोर जो एक दीपस्तंभ आहे, तो मात्र प्रत्येक
भाविकाच्या आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे. ही अष्टकोनी आकाराची
दीपमाळ मंदिराच्या मानाने मात्र थोडी मोठीच वाटते. मंदिराच्या
यात्रेदरम्यान आणि इतर उत्सवांच्या वेळी असंख्य दिव्यांनी हा दीपस्तंभ
उजळून निघतो.
श्री मंगेशी मंदिर
आपण
बऱ्याच ठिकाणी वाचतो आणि पाहतोही की शंकराचे वास्तव्य उंच गिरीस्थानी
किंवा हिमालयात नाहीतर निसर्गातील एकांत स्थानी असते; पण या मंगेशी मंदिरात
भोळा शंकर अतिशय निसर्गसंपन्न आणि वैभवशाली राजवाड्यात आहे. गोव्यातील
सर्वच मंदिरे आकर्षक सुंदर आहेत; परंतु मंगेशी देवालयाला राजवाड्याची जी
शान आणि ऐट लाभली आहे ती इतर कोणत्याच मंदिराला लाभलेली दिसत नाही.
पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून सात कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव
आहे. मंदिराच्या आवारात जर आपण आलो तर सर्वप्रथम आपले लक्ष वेधून घेते ती
मंदिराची भव्य अशी दीपमाळ. या दीपमाळेला मंदिरापेक्षाही अधिक आकर्षक
वास्तुस्थापत्य लाभले आहे. हे दिमाखदार वास्तुस्थापत्य, आजूबाजूच्या
हिरव्यागार डोंगराच्या आणि निसर्गाच्या कॅनव्हासवर अतिशय सुंदर उठून दिसते.
त्यात दाक्षिणात्य पद्धतीची छाप जाणवते. अशीच छाप गोव्यातील बहुतेक
मंदिरांच्या स्थापत्यवर दिसते. मंदिराच्या बाहेरच असलेली प्रचंड आणि भव्य
दीपमाळ ही द्राविडी संस्कृतीची प्रतीक गणली जाते. मंदिराचा भव्य सभामंडप,
गाभारा, आतील सुंदर मूर्ती, लिंग आपले भान हरपून टाकतात. त्याशिवाय मंदिर
परिसरातील तलाव आपले लक्ष वेधून घेतो. संपूर्ण भारताला गायन आणि
संगीत क्षेत्रात योगदान देणारे मंगेशकर कुटुंब हे इथलेच. याच मंदिर परिसरात
त्यांचे घर होते. त्यामुळे मंगेशाच्या आशीर्वादाने या कुटुंबीयाला अपूर्व
देणगी मिळाली. असे हे मंगेशी मंदिर म्हणजे गोव्याचे सांस्कृतिक संचित आहे,
असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे गोवा भेटीत किल्ले
समुद्रकिनाऱ्याबरोबर हे मंगेशी मंदिरसुद्धा तुम्हाला भक्तिभावाचा एक सुंदर
अनुभव देते.
सप्तकोटेश्वर मंदिर
गोमंतक
भूमीतली वैभवशाली आणि समृद्ध अशी राजवट म्हटली की ‘कदंब राजांची राजवट’
असे नाव समोर येते. या कदंब राजघराण्याचे कुलदैवत होते श्री सप्तकोटेश्वर.
असे म्हणतात की, हे मंदिर राजाने त्यांची पत्नी कमलदेवी हिच्यासाठी बांधले
होते. कदंब राजे आपल्या बिरुदावलीमध्ये ‘श्री सप्तकोटेश्वर लब्धवर प्रसाद’
असा या सप्तकोटेश्वराचा उल्लेख करत. या बिरुदावलीचा अर्थ असा की ‘श्री
सप्तकोटेश्वराचा कायमचा आशीर्वाद असणारे कदंब राजे’. वैभवशाली वर्णन
असणाऱ्या कदंब राजांच्या या सुंदर मंदिरावर पोर्तुगीजांनी सप्तकोटेश्वरावर
पहिला घाव घातला. त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केले. हे असे भग्न रूप
बराच काल तसेच होते. परंतु इ.स. १६६८ मध्ये शिवाजी महाराज गोव्यात डिचोली
इथे आल्यानंतर श्री सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि
श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा पहिला चिरा बसविला गेला. त्या प्रसंगाचा
शिलालेखही मंदिराच्या दारावर आजही आपल्याला अगदी दर्शनी भागात पाहायला
मिळतो. ‘श्री सप्तकोटेश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे
श्री शिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभा.’ शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष नाव
असलेला हा अतिशय दुर्मिळ शिलालेख. या ऐतिहासिक घटनेला फार मोठी पार्श्वभूमी
होती आणि तिचे होणारे दूरगामी परिणाम शिवछत्रपती जाणून होते. त्यामुळेच
पोर्तुगीजांनी ज्याप्रमाणे येथील राजसत्तेचे प्रतीक असलेल्या राजदैवताची
विटंबना केली, त्या देवतेला आपल्या राज्यात राजाश्रय देण्याचा निर्णय
छत्रपतींनी घेतला. श्री सप्तकोटेश्वर मंदिर हा गोवा सरकारच्या
पुरातत्त्व विभागाचा ऐतिहासिक वारसा संवर्धन प्रकल्प होता आणि याच
माध्यमातून आताचे नवीन मंदिर जीर्णोद्धारीत झालेले दिसते. हे मंदिर
डोळ्यांनाही सुखावते. खरंतर हा मंदिर बांधणीचा प्रकल्प भारतातील जुन्या
मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पथदर्शी ठरायला हरकत नाही. जुन्या भिंती आणि
अवशेष कसे शाबूत ठेवायचे आणि त्यांची माहिती एखाद्या फलकातून पर्यटकांना
कशी द्यायची, यासाठी या मंदिराची भेट फार गरजेची आहे. या मंदिराला
शिवरायांनी भेट देऊन मंदिराची नवनिर्मिती केली, हे ऐकून आणि वाचूनच आपण
हर्षित होऊन जातो.
अलंकृत मंदिराचे लावण्य
ओंकार वर्तले-ovartale@gmail.com
जालना
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अन्वा या नावाचे एक छोटे खेडे आहे.
महाराष्ट्राचे कलावैभव असलेल्या अजंठापासून सोळा किलोमीटर अंतरावर तर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडपासून अवघ्या सत्तावीस किलोमीटरवर हे
गाव आहे. छत्रपती संभाजीनगर-अजिंठा रोडवरील गोळेगावपासून या गावात जाता
येते.
प्रवासाच्या दृष्टीने हे गाव तसे छत्रपती संभाजी
नगरपासून जवळ; आहे मात्र जालन्यात. त्यामुळे कधी या भागात अजिंठा-वेरूळच्या
पर्यटनासाठी आले की न चुकता या गावात यायलाच पाहिजे. एकदा का वाट वाकडी
करून आलो की या गावाचा महिमा कळेल. या छोट्या गावात दडलाय पर्यटनाच्या
दृष्टीने एक खजिना. गाव जरी छोटेसे असले तरी या गावात उभे आहे एक नितांत
सुंदर मंदिराचे पाषाण-पुष्प. भगवान शिवाला समर्पित असलेले. एक कलेचा
प्रासाद. मंदिर स्थापत्याचा अप्रतिम आविष्कार म्हणून येथल्या शिव मंदिराचा
जो काही अनुभव येईल तो शब्दातीत असेल.
गावाच्या ऐन
मध्यवस्तीत हे मंदिर उभे आहे. ते भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित
केल्यामुळे निगराणी राखली जाते आणि स्वछताही बऱ्यापैकी आहे. भर नागरी
वस्तीतून आपण आत आलो की मंदिराच्या बंदिस्त प्रांगणात प्रवेश करतो.
चहूबाजूंनी घातलेले हे दगडी कुंपण आपल्याला आत एक वेगळेच विश्व उलगडून
दाखवते. मंदिर पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांच्या संदर्भात कोणताही लिखित
पुरावा किंवा शिलालेखही अजूनपर्यंत तरी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे साहजिकच
मंदिर निर्मितीचा नेमका अचूक काळ सांगता येत नाही; पण अनेक अभ्यासक या
मंदिराचे स्थापत्य, मूर्तिकाम यावरून निर्मितीच्या आधारे वेगवेगळे अनुमान
काढतात.
एका मोकळ्या प्रांगणात बरोबर मध्यावर उंच दगडी
जोत्यावर हे मंदिर उभे आहे. मंदिर प्रांगणाच्या सीमाभिंती सध्या पडीक
अवस्थेत आहेत. मंदिराची उंची मात्र आपल्याला चकित करते. इतर मंदिरात एवढ्या
उंचीवर असे मंदिर उभारलेले आपल्याला आठवतही नसते. याला कारण हे मंदिर
जमिनीपासून साधारण ४ फुटांहून अधिक उंचीच्या पीठावर उभे आहे. पीठावर
जाण्यासाठी पायऱ्यादेखील आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीला अगदी जमिनीलगत
दोन्ही बाजूला दोन देवकोष्ठे आहेत. दोन्ही बाजूंना वैष्णव द्वारपाल आहेत.
यावरून हे मंदिर पूर्वी विष्णूचे असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
एकंदरीतच
मंदिराची ढोबळ रचना गर्भगृह, सभा मंडप, अंतराळ अशी असून मुख्य मंडपाच्या
समोरच पूर्वेला अर्ध-मंडप आहे. आपला प्रवेश याच अर्धमंडपातून सभामंडपात
होतो. मंडपाच्या तिन्ही भिंतींवर आकर्षक भद्र आहेत. त्यांच्यामुळे विशिष्ट
कोन तयार झाले. त्यातूनच मंडपाचा तारकाकृती आकार तयार झाला आहे. मंडपाला
तिन्ही बाजूला अर्धमंडप आहेत. मंडपाला आतील बाजूला उंचावलेले असे पीठ आहे
म्हणजेच आसनव्यवस्था आहे. या मंडपात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे मंडपाचे
छत. हे छत म्हणजे स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. ते घुमटाकार आहे.
घुमटाच्या मध्यावर एक अर्धवट उमलते फुल खाली लोंबत आहे, असे कोरलेले आहे.
त्याच्या भोवती लहान लहान आठ फुले कोरलेली आहेत. ही नक्षी पाहून आपण काही
क्षण चक्रावतोच. कागदावरही असे नक्षीकाम उतरवणे अवघड आहे; पण तत्कालीन
कलाकारांनी हे कसब मात्र पाषाणात उमटवलंय.
मंडपाचे बाकीचे
छत सपाट आहेत. कमळाची नक्षी छतावर आहे. मंडपाच्या मध्यभागी थोडासा उंच असा
दगडी उंचवटा आहे. यालाच रंगमंडप म्हणतात. याच रंगमंडपाच्या भोवताली
मंडपाचे खांब वर्तुळाकार असे उभारले आहेत. त्यामुळे या रंगमंडपाला वेगळीच
झळाळी प्राप्त झाली आहे. रंगमंडप हा नृत्य आदी कला यासाठी उभारलेला असतो.
मंदिराचे सांस्कृतिक अवयवच जणू. कलाकाराचे नृत्य-संगीत-गायन आदी कार्यक्रम
इथेच होत असत. याचा पृष्ठभाग मात्र एकदम गुळगुळीत आहे. याच रंगमंडपात नंदी
दिसतो; पण याची ही जागा नसावी.
मंडपामध्ये असलेले स्तंभ
हा आणखी एक आकर्षणाचा विषय. विविध भौमित्तिक रचना अंगावर घेऊन असलेले हे
खांब आहेत. त्यामध्ये १२ मुख्य स्तंभ, आठ लहान स्तंभ अर्धमंडप आणि उरलेले
अंतराळाच्या बाजूला आहेत. त्यांपैकी चार मंडपाच्या मध्यभागी आहेत. अतिशय
अलंकारित आणि नक्षीकामाने सजलेले हे स्तंभ आवर्जून पहावे असेच आहेत.
मंडपाच्या मधल्या चौरसाकृती, कमी उंचीच्या पीठावर प्रत्येक कोपऱ्यावर एक
असे चार स्तंभ आहेत. या स्तंभांनी घुमटाला आधार दिलेला आहे. येथील स्तंभ हे
दोन प्रकारच्या ओळीत दिसतात. रंगमंडपाच्या भोवताली एक ओळ आणि त्याच्याच
मागे दुसरी ओळ. ही रचना मात्र आवर्जून पाहण्यासारखी. हे
पाहून आपण अंतराळ कक्षात येतो. मंडपाच्या चार स्तंभांच्या ओळीमुळे अंतराळ
मंडपापासून विलग झालेला दिसतो. ही रचना वैशिष्ट्यपूर्ण. या दालनात भिंतीवर
देवकोष्टके नाहीत. अंतराळातून आपण गर्भगृहाच्या समोर येतो. गर्भगृह हे
चौरसाकृती असून याचे प्रवेशद्वार कोरीव कामाने नटलेले आहे. यावर चार
द्वारशाखा दिसतात. पहिल्या शाखेवर एकमेकांत गुंतलेल्या सिंहांची लहान
शिल्पे आहेत, तर दुसरी शाखा ही नक्षीची आहे. तिसरी स्तंभशाखा आहे. चौथ्या
द्वारशाखेवर पुन्हा नक्षी कोरलेली आहे. शेवटच्या द्वारशाखेवर यक्ष मूर्ती
हातातील हारासहीत कोरलेल्या आहेत. ललाट पट्टीवर गणेश कोरलेला आहे. वरती
तोरणाची नक्षी आहे. तोरणाच्याही वर म्हणजे उत्तरांगजवळ देवांच्या मूर्ती
आहेत. त्यातील एकूण पाच लघुकमानीमध्ये पाच देवमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या
भिंती सपाट आणि साध्या आहेत. मध्यावर शिवलिंग आहे. गर्भगृहाचे छत घुमटाकार
आहे; परंतु हा घुमट उंच नाही तसेच मंडपातील घुमटाप्रमाणे त्यावर नक्षीही
नाही.
हे
पाहून झाले की आपण बाहेरील भागाकडे येतो. मंदिराचे अंतराळ, गर्भगृह
यांच्या भिंतीचे अनेक कोन तयार झाले. यामुळे मंदिराची रचना तारकाकृती झाली.
या अशा रचनेमुळे मंदिराभोवती आपण प्रदक्षिणा मारू शकतो. तसेच कलाकारानाही
भिंतीच्या या विविध कोनांवर शिल्पकाम करणे सोपे व्हायचे. कलाकुसरीसाठी असे
विविध कोण मुद्दाम तयार केले जायचे. त्यामुळेच मंदिराच्या बाह्य भिंतींवर
देवदेवतांची शिल्पे, कोरीव काम आढळते. यामध्ये विष्णूची अनेक प्रकारची
शिल्पे दिसतात. असे विष्णूंचे शिल्पांकन भारतात अन्यत्र ठिकाणी आढळत नाहीत.
यावरूनसुद्धा हे मंदिर विष्णूचे असावे; पण कालांतराने यामध्ये शिव-लिंगाची
स्थापना झाल्याचे अभ्यासक मानतात. म्हणजे या मंदिराचा प्रवास हा वैष्णव ते
शैव असा झाल्याचे सांगण्यात येते. आडवाटेवर असणारी अशी ठिकाणे आपली भटकंती
समृद्ध करत असतात. आपण भटकंतीसाठी अजिंठ्याला येत असतो; पण तिथून अगदी
काहीच किलोमीटरवर असलेल्या अन्वाकडे मात्र दुर्लक्ष करतो. खरे तर हे अन्वा
अतिशय लहान गाव असून, येथील अलंकृत मंदिर सुखद धक्का देणारे आहे.
खुणावताहेत दगडांची शिखरे
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
उत्तर
कन्नड जिल्ह्यातील सिरसी गाव. शब्दशः जंगलात वसलेलं गाव. या गावातील
दगडांची दोन शिखरे पर्यटकांचे आकर्षण आहे. ही शिखरे आपल्या डोळस भटकंतीला
समृद्ध करणारी आहेत. ती भटकंतीचा आनंद तर देतातच, शिवाय आपल्या
ज्ञानातदेखील भर घालतात.
आपल्या महाराष्ट्रातली अनेक
हौशी मंडळी कर्नाटक राज्यातील कोस्टल भागात फिरायला जातात. इथली कोस्टल
कर्नाटक ट्रीप खूप प्रसिद्ध आहे. याच ट्रिपचा एक अविभाज्य भाग म्हणजे
सिरसी. येथे एक भूगर्भी आश्चर्य दडलंय. यालाच ‘याना रॉक्स’ किंवा ‘याना
केव्हज’ असंही म्हटलं जातं. घनदाट अरण्यात लपलेलं हे ठिकाण अगदी
लहान-थोरांना सहजपणे पाहता येऊ शकते. सोंडेवरून सिरसी हे साधारण १६
किलोमीटर अंतर आहे. अर्धा तास लागतो. याना येते उत्तरा कन्नड जिल्ह्यात.
शब्दशः जंगलात वसलेलं गाव. या गावात दोन अद्वितीय खडक; दगडांची दोन शिखरे
म्हणा हवं तर. हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
सिरसी
गावातून बाहेर पडताच सिद्धापूरमार्गे निलेकणी, हेग्डेकट्टा, देवनाहल्ली
पार करत याना केव्हजच्या पार्किंगजवळ येतो. येथून पुढचा साधारण दोन-अडीच
किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. चांगलं दणकट आणि ग्राउंड क्लीअरंस असलेलं
वाहनच येथून पुढे जाऊ शकतं, अन्यथा येथे स्थानिक जीपने आपल्याला पुढे
सोडतात. पावसाळ्यात तर इथल्या रस्त्यांची अवस्था फारच वाईट असते. त्यामुळे
इथं येण्यासाठी पावसाळा टाळूनच यावे. वाटेत अतिशय घनदाट झाडी लागते. आपण
रस्ता चुकलो की काय, असंच वाटत राहते. कारण आपल्याला याना रॉक्स काही दिसत
नाही. एकमेकांत घुसलेले महाकाय वृक्ष, भरदुपारीही सूर्याची किरणेही पोहचत
नाहीत, इतकी दाट सावली आणि या साऱ्या निःशब्द वातावरणात आपल्याच पायाचे
येणारे आवाज तसेच पक्ष्यांचा किलबिलाट... यामुळे हा प्रवास अक्षरशः संपूच
नये, असं वाटत राहते. ज्यांना निसर्गाची आवड आहे, असे काही ट्रेकर्स तर
चक्क चालतच निघतात. वयस्कर आणि महिलावर्गाने शक्यतो खासगी वाहनाने यानाच्या
एका कमानीपाशी यायचे. येथून पुढे मात्र चालल्याशिवाय पर्याय नाही. कारण
याच कमानीतून एक पायवाट थेट रॉक्सपाशी जाते. यादरम्यान विविध ठिकाणी बाकडे
असून, विश्रांती थांबे आहेत.
वीस-पंचवीस मिनिटांत आपण गर्द झाडीतून
चालत असतानाच अचानकपणे दोन प्रचंड मोठे काळेकुळकुळीत पाषाण दिसायला लागतात.
दुरून जणू काही भव्य दोन आकाशात घुसलेली शिखरेच वाटतात. यांनाच याना रॉक्स
म्हणतात. निसर्गप्रेमींसाठी नवल असणारे आणि सर्वसामान्य भटक्यांचे कुतूहल
चाळविणारे रॉक्स पाहून आपण काही क्षण स्तंभित होतो. जसजसे आपण जवळ जातो
तसतसे निसर्गाच्या चमत्कारापुढे आपण सारेच खुजे आहोत, याची जाणीव होते. या
शिखरांचे स्थानिक लोकांनी नामकरण केलेलं आहे. भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी
शिखर.
भैरवेश्वर
शिखराची उंची मोहिनी शिखराच्या उंचीपेक्षा जास्त आहे. भैरवेश्वर शिखराच्या
खाली असलेल्या गुहेतील एका मंदिरामुळे यानाला तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले
जाते, जेथे स्वयंभू लिंग तयार झाले आहे, अशी स्थानिकांची धारणा आहे.
भौगोलिक शास्त्रज्ञ यांची रचना समजावून सांगतात, की कार्स्ट रॉक म्हणजे
खडकाची एक अशी क्लीष्ट रचना जी चुन्याचा दगड (लाइमस्टोन), डोलोमाईट आणि
जिप्समसारख्या विद्रव्य खडकांचे विघटन होऊन तयार होते. त्यामुळे याना येथे
पाहायला मिळणारी ही प्रस्तररचना फारच दुर्मिळ मानली जाते. या दोन्ही
शिखरांना अतिशय अणकुचीदार टोक आहेत. विशेष म्हणजे, या रचना हजारो
वर्षांपासून ऊन व पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देत उभी आहेत. सह्याद्रीतील
बहुतांश खडक हे बेसॉल्ट प्रकारचे आहेत; पण ‘याना रोक्स’मधील हे दोन्ही
कातळ स्फटिकावस्थेतील लाईमस्टोन या प्रकारच्या दगडाचे बनलेले आहेत. हा
लाईमस्टोन दगड साधारण जलचर प्राण्यांचे नष्ट होणे किंवा पाण्यात
विरघळलेल्या कॅल्शियम क्षारांचे स्फटिकीकरण यासारख्या कारणांनी तयार होतो. याना
येथील पाषाणांना स्थानिकांनी एक पौराणिक कथा जोडलेली आहे. या
पाषाणस्तंभांना ‘भैरवेश्वर’ आणि ‘मोहिनी’ अशी नावे देऊन पुराणकथा जोडल्या
गेल्या आहेत. भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून याच ठिकाणी भस्मासुराचा
वध केला, असे मानले जाते. त्यामुळे याना हे भूगर्भशास्त्रज्ञांसाठी आवडते
ठिकाण तर आहेच; पण आता ते तीर्थक्षेत्र म्हणूनदेखील नावारूपाला येत आहे.
भैरवेश्वर शिखराच्या डाव्या बाजूने एक रस्ता काढलेला आहे आणि वर चढून
जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या मात्र कृत्रिमरीत्या सिमेंटच्या
बनवलेल्या आहेत. भैरवेश्वर शिखराच्या पोटात प्रस्तराला भेगा पडून एक भली
मोठी नैसर्गिक घळ तयार झाली आहे. याच घळीमधून एका अरुंद रस्त्याने
भैरवेश्वर शिखराला प्रदक्षिणा मारता येते. भैरव शिखर हे एक पवित्र
स्थान मानले जात असल्याने ही प्रदक्षिणा आपली पादत्राणे काढून अनवाणीच
करावी लागते. हा प्रदक्षिणेचा मार्ग काही ठिकाणी ओबडधोबड, काही ठिकाणी
बांधीव पायऱ्यांचा तर काही ठिकाणी दगडातून जाणारा खडबडीत आहे. त्यामुळे
चालताना काळजी घ्यावी लागते; पण यातही आनंद आहे. सिमेंटच्या पायऱ्या चढून
आपण घळीच्या तोंडाशी येऊन पोहोचतो. ही एक भली मोठी गुहाच आहे. या घळीमधून
चालताना वर मान करून पाहिले असता संपूर्ण आकाश कधी दिसतच नाही. वरचा भाग
खडकांनी एकमेकांना जोडलेला आहे. त्यामुळे जसजसे आत जात असतो तसेतसे एक गूढ
अंतरंगात आपला प्रवेश होतो की काय, असे वाटत राहते. आत अतिशय थंडावा तसेच
एक प्रकारची शांतताही आपली सोबत करत असते. गुहेच्या
दोन्ही बाजूच्या भिंतींना उभ्या घळी आहेत व त्याच्या बाजूंचे खडक अतिशय
धारदार आणि निमुळत्या शस्त्रासारखे दिसतात. या गुहेमध्ये नैसर्गिकरीत्या एक
रस्ता तयार झाला आहे. हाच अत्यंत निमुळत्या जागेमधून तयार झालेला
प्रदक्षिणा मार्ग. आतमध्ये याच मार्गातून अनेक भाविक किंवा पर्यटक फेरफटका
मारतात. काही ठिकाणी हा मार्ग इतका अरुंद होतो की जेमतेम एका माणसालाच
त्यातून जाणे शक्य होते; पण अगदी लहान-थोरही ही प्रदक्षिणा पूर्ण करतात,
इतकी सोपी आहे. अवघड असे काहीही नाही. साधारण दोन किमीची ही प्रदक्षिणा
पूर्ण करताना एक वेगळाच आनंद अनुभवता येतो. ही प्रदक्षिणा पार करून आपण
पलीकडच्या बाजूस आलो की मग आपल्याला मोहिनी शिखर व्यवस्थित दिसते. येथे
भैरव शिखराची प्रदक्षिणा पूर्ण करायची. ‘याना रॉक्स’ हे कोस्टल
सफरीमधील एक अद्भुत असे ठिकाण आहे. त्यामुळे ते चुकवू नयेच. हे ठिकाण
काहीसे आडवाटेवर आणि जंगलात असल्यामुळे बरेचसे पर्यटक हे ठिकाण पाहत नाहीत.
ही
दोन्ही शिखरे म्हणजे आपल्या डोळस भटकंतीचा एक समृद्ध अनुभव. अशी
ठिकाणे भटकंतीचा आनंद तर देतातच, शिवाय आपल्या ज्ञानातदेखील भर घालत असतात.
मेहकरचे शारंगधर बालाजी
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
संपूर्ण
भारतात श्री बालाजीच्या अनेक मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. मेहकर येथील
ही सुंदर अन् विलोभनीय मूर्ती सर्वात उंच मूर्ती म्हणूनही गणली जाते. तसा
उल्लेख बुलढाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.
मंदिरे,
त्यांचे वास्तु-स्थापत्य आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या पौराणिक कथा हा
आपला जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय. मनात असलेल्या श्रद्धेपोटी आपण
प्राचीन, आधुनिक अशा मंदिरांना नियमितपणे भेटी देतच असतो. श्रद्धेपोटी
केल्या जाणाऱ्या अनेक तीर्थयात्रा हा तसा पाहिला तर धार्मिक पर्यटनाचाच एक
प्रकार. यात आपल्याला तिथला भाग, स्थळ महात्म्य, निसर्ग हे सारे कळत असते.
या अशा वास्तु-स्थापत्यात सर्वात जास्त मंदिरे पाहायला मिळतात भगवान
शिवाची. त्यानंतर दिसतात ती भगवान विष्णूची मंदिरे. विष्णूच्या मूर्तीही
आपल्याला या मंदिरात पाहता येतात.
विष्णूची
मूर्ती म्हटली की आपल्या सर्वांना आठवते ती दक्षिण भारतातल्या तिरुपती
येथील बालाजीची मूर्ती. यासाठी आपण त्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घ्यायला
कित्येक शेकडो किलोमीटरची पायपीट करत जाऊनही येतो; पण आपल्याला हे माहीत
नसते की आपल्याही महाराष्ट्रात अशीच एक देखणी, अत्यंत सुंदर मूर्ती स्थापित
आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतातील भव्य अशी ती मूर्ती आहे. ती आहे
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी. थोडक्यात देखण्या विष्णूमूर्तीची
यादी करायची झाली तर त्यात मेहकरच्या बालाजीचे नाव नक्कीच अग्रस्थानी असेल.
यावरून या मूर्तीच्या कलेचा आणि तिला घडविणाऱ्या शिल्पकाराचा अंदाज येईल.
गावातूनच
वाहत गेलेल्या पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मेहकर हे गाव विदर्भाचा भाग
सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात तसे अपरिचित. त्यामुळे या गावात असा काही
आपला धार्मिक, सांस्कृतिक, कलेचा वारसा लपला आहे, याचा अंदाज येणे तसे
कठीणच. त्यामुळे सुरुवातीला याच गावात ही मूर्ती आहे, असे म्हटल्यावर
आपल्यालाही आश्चर्य वाटून जाते. बुलढाणा जिल्हा हा पर्यटनाच्या बाबतीत
ओळखला जातो तो लोणारमुळेच. देशातीलच नव्हे तर विदेशातील अनेक पर्यटक लोणार
या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाला भेट देतात. याखेरीज सिंदखेडराजा येथील राजमाता
जिजाऊ यांचे स्मारकदेखील पाहतात; पण अगदी जवळच असलेले हे मेहकर पाहत नाही.
नागपूर-मुंबई
महामार्गावर हे गाव आहे. याच गावात मध्यवर्ती ठिकाणी शारंगधर बालाजी हे
मंदिर उभारलेले आहे. मंदिराचा परिसर अगदी आटोपशीर, गाभारा आणि सभामंडप अशी
याची रचना. यातला गाभारा हा दगडी घडीव दगडाचा, तर सभामंडप हे आखीव-रेखीव
अशा लाकडाच्या छताचे बनलेले. आत प्रवेश केला की हे मंदिर उलगडायला लागते.
सभामंडपातील लाकडी कलाकुसर आणि त्याचा डोलारा डोळ्यात साठवतच आपण
गाभाऱ्यासमोर येतो आणि काही क्षण थबकतोच. समोर दिसणारी मूर्ती आणि
तिच्यातील भव्यता पहिल्यांदा डोळ्यासमोर येते. या भव्यतेतून आपण बाहेर पडतो
न पडतो तोच तिच्यामध्ये कलाकारांनी ओतलेली कला आपल्याला मंत्रमुग्ध करते.
ही मूर्तिकला आपल्याला चकित करते. मोठ्या काळ्या पाषाणावर ती कोरलेली असून
तिच्याभोवती सुंदर अशी प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले
आहेत. या मूर्तीची माहिती आपल्याला इथल्या माहिती फलकावरदेखील मिळून जाते.
इतिहास
अभ्यासकांच्या मते ही मूर्ती मध्ययुगीन कालखंडातील आहे. काळ्या पाषाणात
घडवलेल्या आणि ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाड अशा या मूर्तीचे
सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. सध्या गाभाऱ्याला काचेचे
तावदान लावलेले दिसते. ही मूर्ती पूजेच्या वेळी मूळ पाषाण रूपातच पाहायला
मिळते; अन्यथा भरजरी वस्त्रांमुळे अनेक मूर्तींचे मूळ सौंदर्य आपल्याला
पाहायला मिळत नाही; पण अनेक मूर्तींना मुळातच पाषाणतच वस्त्रे घडवलेली
दिसतात. ही त्यापैकीच एक. शिवाय या विष्णुमूर्तीच्या गळ्यात दागिने पाषाणतच
घडवलेले दिसतातच. कमरेचे वस्त्र आणि त्यावर शिल्पांकित केलेले विविध
दागिने मूर्तीच्या सौंदर्यात आणखी भर घालताना दिसतात. मूर्तीला असलेल्या
प्रभावळीतच दोन्ही बाजूंनी विष्णूची दहा रूपे म्हणजेच दशावतारांचे सुंदर
रेखाटन करण्यात आले आहे. हे दहाही अवतार अगदी स्पष्ट असेच दिसतात.
मूर्तीच्या उजव्या बाजूला खांद्याच्या वर ब्रह्मदेव तर डाव्या खांद्याच्या
बाजूला महादेवाच्या मूर्ती आहेत. विष्णुमूर्तीला किरीट मुकुट आहे. या रेखीव
मूर्तीची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. पोट गोमुखाकृती आहे. मूर्ती चतुर्भुज
असून हातात गदा, चक्र, पद्म आहे. पायाजवळ जय-विजय, लक्ष्मी-कुबेर भूदेवी
आहे.
या मूर्तीचे वैशिष्ट्य, सौंदर्य
मुकुटात आहे. मुकुटामध्ये आसनस्थ विष्णुमूर्ती कोरलेली असून, तिच्या हातात
धनुष्य दाखविलेले आहे. असे म्हणतात, की याच वैशिष्ट्यामुळे या
विष्णुमूर्तीला शारंगधर हे नाव प्राप्त झाले. सांबराच्या शिंगाच्या
धनुष्याला शारंग म्हणतात. हे शारंग हातात धारण करणारा शारंगधर, अशी या
नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. अगदी अनोखी, अत्यंत देखणी अशी ही
विष्णुमूर्ती. आता मंदिर आणि त्यातही अशी पाषाणात घडवलेली मध्ययुगीन
मूर्ती आली की आपसूकच अनेक कथा आणि आख्यायिका या ओघाने येतच असतात. आपणही
त्यात रमायचे असते. यातल्याच एका आख्यायिकेनुसार मेघंकर नावाच्या दैत्याचा
भगवान विष्णूने शारंग धनुष्याने पराभव केला. मेघंकर विष्णूला शरण आला आणि
देवाने याच नगरीमध्ये वास्तव्य करावे, अशी प्रार्थना केली. विष्णूने ती
मान्य केली आणि शारंगधराच्या रूपात मी इथेच वास्तव्य करीन, असा आशीर्वाद
त्याने मेघंकराला दिला. तेव्हापासून भगवान विष्णू इथे शारंगधराच्या रूपात
राहू लागले, अशी एक कथा आहे. ती कथा इथले भाविक आणि ग्रामस्थ आपल्याला
ऐकवितात. आणखी एका कथेनुसार ही मूर्ती येथेच कशी सापडली, याचाही
उलगडा आपल्याला होतो. एका व्यक्तीच्या सांगण्यानुसार विशिष्ट जागी
खोदल्यानंतर साधारण १५ फूट लांबीची मोठी लाकडी पेटी जमिनीखाली सापडली. ही
घटना साधारण १८८८ची. त्या वेळी आपला देश इंग्रजांच्या अमलाखाली होता. त्या
पेटीत हीच बालाजीची मूर्ती आणि दोन ताम्रपट होते. तत्कालीन मुस्लिम
आक्रमकांपासून आणि मूर्ती-भंजकापासून वाचवण्यासाठी बहुधा ही मूर्ती
जमिनीखाली लपविण्यात आली असावी, असा अनेक अभ्यासकांचा दावा आहे. कारण
तत्कालीन परकीय आक्रमकांचा इतिहास पाहता हे शक्यही असेल, असे वाटून जाते.
तत्कालीन
ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल मूर्तीचा ताबा घेऊन ती लंडनच्या
संग्रहालयात घेऊन जाण्यासाठी ते नागपूरहून निघाले. ही बातमी समजताच इथल्या
ग्रामस्थांनी तातडीने छोटेसे मंदिर बांधून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
प्राणप्रतिष्ठा झालेली मूर्ती रिचर्ड यांना घेऊन जाता आली नाही. ते या
घटनेने संतप्त झाले; पण ग्रामस्थांच्या संघर्षामुळे ही मूर्ती इथेच राहिली;
पण मूर्तीऐवजी मूर्तीसोबत सापडलेले दोन ताम्रपट आपल्या ताब्यात घेतले.
ज्या दिवशी ही मूर्ती खोदकामात सापडली तोच दिवस हा प्रकटदिन म्हणून इथले
ग्रामस्थ साजरा करतात.
खुणावणारे मंदिर वैभव
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
चंद्रपूर
जिल्ह्यात विविध भागांत आढळणारी प्राचीन आणि वैविध्यपूर्ण मंदिरे हा तर
अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय ठरावा. कारण ही सारी मंदिरे आजही सुस्थितीत
उभी असून धार्मिक महत्त्व राखून आहेत, त्यामुळेच ती पर्यटकांना खुणावत
आहेत.
चंद्रपूर हा जिल्हा ताडोबा अभयारण्यासाठी आपल्याला
सुपरिचित आहे; परंतु याही पलीकडे एक भटकंतीचे दालन या जिल्ह्यात आहे. हे
बऱ्याच जणांना माहीत नाही. जिल्ह्यात अनेक वास्तू गोंड साम्राज्याची साक्ष
देत आजही उभ्या असलेल्या दिसतात. अनेक ऐतिहासिक वास्तू असलेला हा जिल्हा
पर्यटकांना खुणावत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध भागांत आढळणारी प्राचीन
आणि वैविध्यपूर्ण मंदिरे. ही सारी मंदिरे आजही सुस्थितीत उभी असून, त्या
निर्मितीसाठी वापरण्यात येणारा दगड हा काळ्या पाषाणापासून वेगळा असून तो
‘सॅण्डस्टोन’ या नावाने ओळखला जातो. वालुकाष्म पद्धतीचा काहीसा पिवळसर
रंगाचा असलेला हा दगड मंदिराचे बाह्य सौंदर्य वाढविण्यास निश्चितच मदत
करतो. अशाच दगडांपासून बनवलेली दोन सुंदर मंदिरे भटाळा गावात मोठ्या
दिमाखात उभी आहेत. वरोरा तालुक्क्यातील हे गाव तसे लहान आहे; पण या दोन
मंदिरांच्या अस्तित्वामुळे मात्र या गावाची दखल आपल्याला घ्यायलाच लागते.
नागपूर-चंद्रपूर
या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्ते महामार्गावर टेंभुर्डा नावाचे गाव
लागते. येथूनच साधारण आठ किलोमीटर अंतरावर भटाळा हे छोटेसे गाव आहे. या
गावात आलो, की मग पहिल्यांदा ‘भोंडया महादेवा’कडे आपला मोर्चा वळवायचा. हे
मंदिर शंभू महादेवाचे असून या वरचा कळस कालौघात नष्ट झाल्यामुळे या
मंदिराला ‘भोंडा महादेव’ असेही म्हटले जाते. गावाच्या सुरुवातीलाच हे मंदिर
आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. मंदिरासमोर आलो की याची रचना
उलगडत जाते.
पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर एका मोठ्या चौथऱ्यावर उभे
केलेले दिसते. मंदिराला तत्कालीन कालखंडात तटबंदी बांधली असावी. तसे अवशेष
आजही आजूबाजूला दिसतात. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यापूर्वी
पायऱ्यांच्या सुरुवातीला उजव्या हाताला बरेच त्रिशूल उभे केलेले दिसतात.
डाव्या हाताला नंदीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. पायऱ्यांनी वर आलो की
मोकळ्या फरसबंदी आवाराच्या नंतर भोंड्या महादेवाची वास्तू समोर येते. आणि
आपले मन अक्षरशः तरारून उठते. इतकी भव्य आणि आकर्षक वास्तू बांधली गेली
आहे. मंदिर कोणत्या कालखंडात बांधले असावे, याची निश्चित माहिती आपल्याला
मिळत नाही; पण काही इतिहास अभ्यासकांचे असे मत पडते, की माणिकगडाच्या परमार
राजांनी या मंदिराची निर्मिती केली असावी. ही घटना साधारण दहाव्या
शतकातील. गोंड साम्राज्याच्याही आधीची. हे परमार राजे खूप मोठे शिवभक्त
होते, त्यामुळेच त्यांनी त्यांच्या राज्यात अनेक शिवमंदिराची निर्मिती
केली. हे मंदिरसुद्धा त्याच पंक्तीतले.
सध्याची
मंदिराची रचना ही सभामंडप आणि गाभारा अशी आहे. सभामंडपात एका नंदीची
स्थापना केलेली दिसते. या सभामंडपाला सुरुवातीलाच दोन दगडातील खांब उभे
केलेले दिसतात. या खांबांच्या वर छताच्या दिशेने भिंतीत छोट्या-छोट्या
शिखरांच्या रचनेचे सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. सभामंडप आणि गाभारा
यामध्ये अंतराळ कक्ष दिसतो. यानंतर आपल्याला लागतो तो गाभारा. गाभाऱ्यात
अतिशय सुंदर आणि मोठी शिवपिंडी आहे. हे विदर्भातील सर्वात मोठे शिवलिंग
म्हणून ओळखले जाते. दक्षिणोत्तर असलेली ही शिवपिंडी एका खास वैशिष्ट्यासाठी
ओळखली जाते. ते म्हणजे या पिंडीचा वारीमार्ग थेट भिंतीत गेला आहे.
त्यामुळे पिंडीभोवतीच्या प्रदक्षिणेस आपोआपच अटकाव होतो. वारीमार्गाच्या या
अनोख्या रचनेमुळे हे मंदिर लक्षात राहते. मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र
पिंडीच्या भोवती ऐसपैस जागा आहे. शिवपिंडीवर माथा टेकवला की मग आपण बाहेर
यायचे. मंदिराच्या बाहेरील तीनही भिंतींवर तीन दिशेला देव कोनाडे दिसतात.
याबाबत सांगितले जाते, की या मंदिरावर अनेक वर्षांपूर्वी वीज कोसळली होती.
त्यामुळे याचा कळस त्या वेळी नाहीसा झाला. पुनर्निर्मिती करताना या
मंदिराचा कळस मात्र नव्याने बांधला गेला नाही. कळस नसल्यामुळेच पुढे
भोंड्या महादेव हे नाव प्रचलित झाल्याचे इथले स्थानिक गावकरी सांगतात.
महादेवाच्या
या मंदिराच्या अगदी जवळच एक मकरध्वजाची मूर्ती आहे. ती अतिशय देखणी असून,
जवळपास पाच फूट उंच आहे. आवर्जून पाहण्यासारखी. रामायणातील अनेक पात्रे आणि
त्यांच्या कथा आपण बालपणापासून ऐकत आहोत. रामायणात अनेक पात्रे अशीही आहेत
जी महत्त्वाची असूनही त्यांची फारशी माहिती आपल्याला नसते. यातील एक आहे
मकरध्वज. हा बजरंगबली हनुमान यांचा पुत्र म्हणून ओळखला जातो. हनुमान तर
चिरंजीव आहेतच; पण यांना पुत्र कसा काय..? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तर
त्याची आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे हनुमानाच्या घामाचा एक थेंब
समुद्रात पडला तो एका मगरीने गिळला आणि त्यापासून मकरध्वज जन्माला आला. अशी
त्याची कथा. ही कथा ऐकतच आपण बाहेर पडायचे
नंतर
आपण मोर्चा वळवायचा तो भवानी माता मंदिरकडे. हे मंदिर गावाच्याच बाहेर
असून ते ‘भवानी माता मंदिर’ म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. एका तळ्याच्या
काठावर हे सुंदर मंदिर पाहताक्षणीच आपले भान हरवते. याची रचना
उत्तराभिमुखी असून कंपाउंडच्या भिंतीने बंदिस्त केलेले दिसते. काही पायऱ्या
चढून आत यायचे. याच कंपाउंडच्या सुरुवातीच्या प्रवेशद्वारावर दोन शरभाच्या
कलाकृती आपले लक्ष वेधून घेतात. शरभ हा अनेक जुन्या पुस्तकात वर्णिलेला,
अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी. म्हणजेच सिंह
आणि पक्षी यांच्या संकरातून निर्माण झालेला. या शरभाचे शिल्प हे बहुधा
प्रबळ राजसत्तेचे निदर्शक. या शरभच्या हातात हत्ती दिसत आहे, तोही खूप
छोट्या आकारात. या दोन शिल्पांव्यतिरिक्त आणखी एक शिल्प सभामंडपाच्या
भिंतीवरदेखील आपल्याला पाहायला मिळतो. अशी एकूण तीन शरभ शिल्पे या ठिकाणी
आहेत. एकदा का आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला, की मग हे मंदिराचे
लावण्य आपल्यासमोर खुलायला लागते.
सभामंडप, गाभारा अशी या मंदिराची
ढोबळ रचना आहे. संपूर्ण मंदिर हे इथल्याच भागात मिळणाऱ्या आणि काहीशा
पिवळसर रंगाच्या सॅण्डस्टोनपासून बनलेले दिसते. मंदिराचा वेळोवेळी
जीर्णोद्धार झालेलाही असावा; पण मंदिर आहे मात्र सुस्थितीत. मंदिराच्या
गर्भगृहावर उभारलेला कळसही तितकाच देखणा आणि लक्षवेधक आहे. सभामंडपाच्या
बाह्य भिंतींवर नजर फिरवली, की मात्र शिल्पकलेची अक्षरशः रेलचेल अनुभवायास
मिळते. बाह्य भिंतींवर देव-देवतांची शिल्पे तर पाहायला मिळतातच; पण अनेक
शृंगारिक कामशिल्पेदेखील येथे कोरलेली आहेत. देव-देवतांमध्ये भगवान शंकर,
राम, कृष्ण, ऐरावतासह इंद्र, वराहरूपी अवतारात विष्णू आदींची शिल्पे
घडवलेली आहेत. याव्यतिरिक्त स्त्री नर्तकी, केस विंचरणारी दर्पणधारी स्त्री
ही मात्र या सर्वात जास्त भाव खाऊन जाते. ही सारी शिल्पे पाहिली की
त्याकाळी शिल्पकला किती प्रगत होती, हे कळून येते.
मंदिर
हे पूर्वी समाजाचा आरसाच असायचे. लोकशिक्षणाचे धडेही याच माध्यमातून
लोकांना दिले जायचे. याचेच प्रतिबिंब मंदिरांच्या भिंतींवर पाहायला मिळतात.
मंदिराचे बाह्य रूप पाहिले की मग सभामंडपात शिरायचे. एका छोट्या पण
नक्षीने चितारलेल्या प्रवेशद्वारातून आपला आत प्रवेश होतो. सभामंडपाच्या
डाव्या आणि उजव्या बाजूला कोपऱ्यात देवीची आणि गणेशाची अशा दोन भव्य मूर्ती
ठेवलेल्या दिसतात. गाभाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दोन्हींकडे दगडी
खांब उभे केलेले दिसतात. ही रचना तर फारच सुरेख. या दगडी खाच्यांमध्ये
ओटेही उभारलेले दिसतात, यांचा उपयोग बहुधा मंडपात बसण्यासाठी असावा. या
सभामंडपाला पूर्व दिशेलादेखील एक दरवाजा दिसतो. मंदिराचे गर्भगृह छोटेसे
असून, आतमध्ये येण्यासाठी एक छोटेखानी प्रवेशद्वार आहे. या दारावर फुलांची
नक्षी कोरलेली दिसते. भवानी मातेची अतिशय आखीव आणि रेखीव मूर्ती पाहायला
मिळते. सिंहावर आरूढ असलेली ही मूर्ती जवळपास पाच फुटांची आहे. या
मूर्तीसमोर नतमस्तक व्हायचे. या मंदिराच्या निर्मितीविषयी आणि तिच्या
कालखंडाविषयी आपल्याला निश्चित माहिती मिळत नाही; पण हे मंदिर जवळच्याच
भोंड्या महादेव मंदिराच्या काळातच निर्माण केले असण्याची शक्यता इतिहासकार
वर्तवितात. एकंदरीतच मंदिराचा परिसर हा अतिशय स्वच्छ असून मंदिर सुस्थितीत
असल्यामुळे मंदिराची भटकंती संस्मरणीय होते. गावातल्याच भोंड्या महादेवाचे
दर्शन घ्यायला अनेक भाविक तर येतातच; पण अगदी जवळच असलेल्या या भवानी माता
मंदिराकडे कोणीही फिरकत नाही. विदर्भात त्यातही चंद्रपूरमध्ये आलो की भटाळा
या गावातील हे वैभव पाहण्यासाठी आपली वाट वाकडी करायलाच पाहिजे.
दक्षिणेचे प्रवेशद्वार
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
उत्तरेकडून
दक्षिणेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील असीरगड किल्ला. हा सारा भाग
तापी आणि नर्मदा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमधील. त्यामुळे आपोआपच या
किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व आहे. दख्खनच्या मार्गावरचा राखणदार होता, असेही
असीरगड किल्ल्याला संबोधले जाते. अनेक इतिहास अभ्यासक याला दक्षिणेचे
प्रवेशद्वार असेही म्हणतात.
मध्य प्रदेशमध्ये जे काही
देखणे किल्ले आहेत, त्यात बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड हे नाव अग्रक्रमाने
घ्यावे लागेल. ऐतिहासिक बुरहानपूर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर
आणि समुद्रसपाटीपासून सुमारे ८५० फूट उंचीवर हा अभेद्य किल्ला आहे.
त्यामुळे बुरहानपूर भेटीत हा किल्ला आवर्जून पाहिला पाहिजे. डोंगरी किल्ला
असला तरी अगदी अर्ध्या डोंगरापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. ज्यांना
चालायचे त्यांच्यासाठी पायथ्यापासूनच गावातून पायऱ्यांच्या वाटा लागतात. या
वाटेने किल्ल्यावर जाताना एकापाठोपाठ एक अशी भक्कम दरवाजांची मालिका आहे.
यांपैकी मदार दरवाजा, हप्त दरवाजा हे प्रसिद्ध आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी
एक गाडीमार्ग असून तो मार्ग लांबचा व गडाच्या मुख्य डोंगराला वळसा घालून
बालेकिल्ल्याजवळ पोहोचतो. त्यामुळे स्वतःचे वाहन घेऊन जाऊ शकतो. सहकुटुंब
पाहता येण्यासारखा हा किल्ला असून तो भारतीय पुरातत्त्व विभागाने सुस्थितीत
ठेवला आहे.
किल्ल्यावर जाण्याअगोदर
या किल्ल्याच्या अंतरंगात डोकावणे गरजेचे आहे. मुळात या किल्ल्याविषयी
इतिहास कमी पण आख्यायिका जास्त जोडल्या गेलेल्या आपल्याला ऐकायला आणि
वाचायला मिळतात. आसा अहिर या अहिर राजाच्या नावावरून सातपुडा डोंगररांगेतील
या किल्ल्याला असीरगड किंवा असीरगढ हे नाव अपभ्रंशाने प्राप्त झाले. या
किल्ल्याला खरी ओळख दिली, ती फारुकी राजवटीतील शासनकर्त्यांनी. त्यांचे
पूर्वज खल्जी, तुघलक यांसारख्या परकीय आक्रमणकर्त्यांसोबत हिंदुस्थानात आले
आणि त्यांनी दिल्ली दरबारात स्वत:चे स्थान निर्माण केले. १३७० मध्ये
फारुकी सरदार मलिक याला तुघलक सुलतानाने गुजरातच्या दक्षिण सीमेलगतच्या
प्रांताची जहागिरी दिली. त्याने जहागिरीचे मुख्यालय थाळनेरला म्हणजेच
खानदेशात केले. तुघलकांची सत्ता खिळखिळी होताच मलिक राजाने स्वत:ला
स्वतंत्र संस्थानिक घोषित करून फारुखी साम्राज्याची स्थापना केली.
कालांतराने त्याचा मुलगा नासीर खान गादीवर बसला. नासीर खानने किल्लेदार आसा
अहीर याच्याकडून कपटाने असीरगड किल्ला घेतला. अशा रीतीने फारुकी वंशांचे
राजे या किल्ल्यावर स्थापित झाले. या वंशाने सुमारे दोनशे वर्षे राज्य
केले.
दोनशे वर्षांच्या फारुकी शासनकाळात एकूण बारा सुलतान झाले.
१६०० मध्ये अकबराने किल्ला जिंकला. ही घटना मोठी रंजक होती. याबाबत पर्शियन
इतिहासकार फिरिश्तानेही नोंद करून ठेवली आहे. ‘किल्ल्याला वेढा घालून बरेच
महिने झाले. पावसाळ्यानंतर कसल्या तरी रोगाचा प्रसार झाला आणि किल्ल्यातील
जनावरांचा मृत्यू होऊ लागला आणि कुजून दुर्गंधी पसरली. त्यात कोणीतरी
बातमी पेरली की, हे सगळे अकबर त्याच्या जवळच्या मांत्रिकामार्फत घडवतोय, या
बातमीवर सैन्यांचा विश्वास बसला. खुद्द फारुकी सुलतान बहादूरखान कामकाज
सोडून यावर उपाय शोधण्यात गुंतला.
यापेक्षा
त्याने मेलेली जनावरे बाहेर फेकण्याची, रोगराई फैलू नये म्हणून हकिमाकरवी
उपचाराची, बिनकामी जनावरे, माणसे गडाखाली धाडण्याची आज्ञा द्यायला हवी
होती. आगाऊ पगार देऊन सैन्याला प्रोत्साहित करायला हवे होते; पण त्याने
काहीच केले नाही. त्याच्याकडे धनसंचय भरपूर होता. धान्य, पाणी,
दारूगोळ्यासह लढण्यासाठी पूर्ण सज्जता आणि सैनिकी सामर्थ्य असूनही केवळ
बहादूरशाहाच्या नाकर्तेपणामुळे फारुकी साम्राज्याचा अंत झाला. विजयाने
आनंदित झालेल्या अकबराने त्याचे गुणगान गाणारा शिलालेख गडाच्या दरवाजावर
बसविला. ‘जर्ब असीर’ (असीरला नमवले) हे शब्द असलेली सोन्याची नाणी पाडली.
बलाढ्य ठिकाण झडप घालून गारद करणाऱ्या बहिरी ससाण्याचे चिन्ह नाण्याच्या
दुसऱ्या बाजूला होते.
पुढे किल्ला पेशव्यांचे सरदार शिंदेंच्या
ताब्यात होता. १८१८ मध्ये पेशवे दुसरे बाजीराव किल्ल्याजवळील धुळकोट गावी
ब्रिटिशांना शरण गेले आणि मग या किल्ल्यावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला तो
अगदी स्वातंत्र्यापर्यंत होता. या काळात त्यांनीदेखील अनेक इमारती
बांधल्या. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई झाशीचा किल्ला पडल्यानंतर काही
काळ येथे मुक्कामाला होत्या. पुढे उठावात सहभागी झालेल्या कित्येकांना
ब्रिटिशांनी अटक करून येथेच कैदेत ठेवले. असा मोठा इतिहास असलेला हा
किल्ला. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरच होता. हा
सारा भाग तापी आणि नर्मदा या दोन नद्यांच्या खोऱ्यांमधील. त्यामुळे आपोआपच
या किल्ल्याचे भौगोलिक महत्त्व वाढले तरच नवल. दख्खनच्या मार्गावरचा
राखणदार होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अनेक इतिहास अभ्यासक याला
दक्षिणेचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.
हा
किल्ला तीन भागांत विभागला असून किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी आणि
बालेकिल्ला अशी विभागणी आहे. त्यामुळे एकात एक असे तीन स्वतंत्र किल्लेच
तयार झाले आहेत. पायथ्याजवळचा मलयगड, मधला कमरगड आणि त्यांचा मुकुटमणी
म्हणजे असीरगड. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा रुंद असा मार्ग
बांधलेला आपल्याला दिसतो. यावर जाताना अकबर, दानियाल, शाहजहान आणि औरंगजेब
यांचे चार फार्सी भाषेतील शिलालेख आहेत. प्रवेशद्वारातून प्रवेश केला की
मग किल्ल्याच्या अंतरंगात शिरायचे. किल्ल्याला फेरी मारायला निघायचे.
किल्ल्यामधील
आवर्जून पहावी अशी भव्य वास्तू म्हणजे जामा मशीद. फारुकी वंशाच्या
अदिलशाहा चौथा याने १५९० मध्ये ही इमारत बांधली. प्रार्थना हॉलमध्ये एका
शिळालेखात या इमारतीच्या निर्मात्याचे नाव लिहिलेले आहे. या मशिदीपर्यंत
जाण्यासाठी पायऱ्याही बांधलेल्या दिसतात. आपण तीन कमानी असलेल्या भिंतीमधून
प्रवेश करतो. आतमध्ये पटांगण असून त्यामागे प्रार्थना हॉल दिसतो. या
हॉलमधील खांबांची कमानी रचना भारीच. ही वास्तू म्हणजे फारुकी शासन काळातील
बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण दगडात घडवलेली ही गडावरील
सुस्थितीतील इमारत. सदर मशिदीचे बांधकाम काळ्या दगडात असून दोन्ही बाजूस ८०
फूट उंच दोन मिनार आहेत. हे दोन्न मिनार गडावरील बालेकिल्ल्याच्या
कुठल्याही कोपऱ्यातून दिसतात. इतक्या उंचीचे हे दोन मिनार पाहून आपण
आश्चर्यचकीत होतो. इतकी वर्षे झाली या बांधकामाला, पण आजही चांगल्या
अवस्थेत आहेत.
असीरगड किल्ल्यावर
पाण्याची उत्तम सोय आहे. किल्ल्यावर सहा तलाव असून काही विहिरीदेखील आहेत.
याशिवाय ब्रिटिशांचे या गडावर अनेक वर्षे वास्तव्य होते. किल्ल्यावर
ब्रिटिशांनी बांधलेल्या बराकी, कैदखाने आणि चर्च यांचे अवशेष दिसतात. तसेच
गडावर एक ब्रिटिशकालीन दफनभूमी आहे. किल्ल्याच्या एका बाजूला शिवमंदिरदेखील
आहे. खिळगत भागात कोरलेल्या या शिवमंदिरात जाण्यासाठी पायऱ्याही कोरलेल्या
आहेत. हे मंदिर म्हणजे अनेकांसाठी जिज्ञासा आणि गूढ म्हणूनच ओळखले जाते.
आपल्या
देशात अनेक मंदिरे आहेत. ज्यांना अनेक आख्यायिका चिकटलेल्या दिसतात, शिवाय
त्यांचा संबंध हा थेट रामायण किंवा महाभारताशी जोडला जातो. या
असीरगडावरदेखील जे शिवमंदिर आहे त्याचादेखील संबंध हा थेट महाभारताशी जोडला
गेलाय. स्थानिकांच्या मते या मंदिरात महाभारतातील एक पात्र अश्वत्थामा हा
पूजा करण्यासाठी आणि आपल्या मुक्तीची प्रार्थना करण्यासाठी येतो.
भारतात
संस्कृती, परंपरा, प्राचीन ग्रंथ, पुराणे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाभारत तर भारतीय इतिहासात मैलाचा दगड ठरलेले आहे. अनेक युग लोटले, तरी
त्याविषयीची जिज्ञासा, लालसा आणि गोडी कमी होत नाही. महाभारतातील अनेक
गोष्टी आजच्या काळातही आपल्याला अचंबित करत असतात. येथील स्थानिकांच्या
मते, श्रीकृष्णांनी दिलेल्या शापामुळे अश्वत्थामा येथे भटकत असतो. सांगायचा
उद्देश हा की हा असीरगड अशा आख्यायिकांमुळेच जास्त ओळखला जातो; पण आपण
मात्र भूगोलाचे आणि इतिहासाचे बोट धरूनच हा किल्ला पाहायचा. शिवपिंडीवर
माथा टेकवायचा आणि आपली असीरगड भ्रमंती समाप्त करायची.
किल्ला
फिरताना आपल्याला जाणवते की येथील स्थापत्यावर फारुकी आणि मुघल वास्तुकलेचा
प्रभाव आहे, जी इस्लामिक, पर्शियन, तुर्की आणि भारतीय शैलींचे मिश्रण आहे.
असीरगड किल्ला हा हिंदू राजवटीत निर्मिला गेला होता. त्यानंतर या
किल्ल्याने मोगल, मराठे आणि ब्रिटिशांनी राज्य केले. इतिहासाचे अनेक टप्पे
त्याने पाहिले आहेत. पर्यटनासाठी अनेक जन बुरहानपूर किंवा इंदूर येथे येत
असतात. अशा वेळी वाट वाकडी करून आवर्जून पहावा असा हा किल्ला न चुकवावा
असाच.
निलंग्याचे निळकंठेश्वर!
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
मराठवाड्याच्या
कला विश्वात वेगळाच आब राखून अनेक मंदिरे आपल्याला खुणावत असतात. या
मंदिरांमुळे मराठवाडा हा मंदिरांचा वाडा म्हणूनही ओळखला जातो. याला कारणही
तसेच आहे. शिल्प-वैभवाने समृद्ध असलेली अनेक मंदिरे या भागात फिरताना
आपल्याला पाहायला मिळतात. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या कला-प्रेमामुळे या
भागात मंदिराच्या रूपाने अनेक कलेची पीठे उभारली गेली. या अशा मंदिरांमुळे
तत्कालीन स्थापत्य शैलीसुद्धा किती विकसित होती, हेसुद्धा आपल्याला लक्षात
येईल. या यादीत लातूर जिल्ह्यातीलसुद्धा एक मंदिर उभं आहे. निलंगा शहरात
असणारं हे मंदिर म्हणजेच निळकंठेश्वराचे मंदिर. स्थानिक भाषेत ‘हरिहरेश्वर’
नावाने ओळखले जाणारे मंदिर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मंदिर आहे.
या
मंदिराचे स्थापत्य अचंबित करणारे तर आहेच; पण या मंदिराची सद्यस्थिती
मात्र कलेची निस्सीम आवड असणाऱ्या अनेक कलाप्रेमींना निराश करणारी आहे.
संपूर्ण दगडात घडवलेले हे मंदिर मात्र बाहेरील बाजूने ऑइल पेंटने
रंगविण्यात आलेले आहे. त्यामुळे या मंदिराचा खास टच कुठेतरी हरवल्यासारखा
दिसतो. मंदिरासमोरदेखील नव्याने सभामंडप बांधण्यात आलेला दिसतो. या काही
गोष्टी सोडल्या तर हे मंदिर आहे मात्र देखणे. पूर्वाभिमुख असलेल्या या
मंदिराची ढोबळमानाने रचना सभामंडप, अंतराळ, गाभारा अशी दिसते. सभामंडपाला
मुखमंडपही आहे.
पूर्वी हे मंदिर एका
उंच जोत्यावर बांधले असण्याची शक्यता आहे; पण कालांतराने हे जोते जमिनीत
गाडले गेल्यामुळे मंदिराच्या बाह्य-भिंतींचे थरच सुरुवातीला दिसतात. या
मंदिराचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हे त्रिदल पद्धतीचे आहे. पूर्वेकडे
असणाऱ्या मुखमंडपातून आपण येतो ते थेट सभामंडपात. हा सभामंडप प्रशस्त असून
त्याच्या मधोमध चार पूर्णाकृती खांब उभारलेले दिसतात. या खांबांवर अनेक
शिल्पे कोरलेली दिसतात; परंतु हे खांब रंगवलेले असल्यामुळे यावरील
शिल्पांचे आणि नक्षीचे अंकन अगदी अस्पष्ट दिसते. या चार खांबांच्या मधोमध
चौकोनी रंगशिळा खाली जमिनीवर उभारलेली दिसते. तत्कालीन काळात रंगशिळेवर उभे
राहून पूर्वी कीर्तन, प्रवचन, भजन, नृत्य, गायनादि कार्यक्रम होत असत.
मंदिराचे छत हे समतल वितांन पद्धतीचे असून त्यावर कोरीव कामाचा अप्रतिम
आविष्कार दिसतो. मंडपाच्या दक्षिणेला एक गर्भगृह दिसते. या गर्भगृहात
शिव-पार्वतीची सुंदर मूर्ती दिसते. या गाभाऱ्याचे गर्भगृह अतिशय सुंदर असून
त्याची द्वारशाखा अतिशय सुंदर आहे. गर्भगृहातील एका शिल्पाचे आणखी एक
वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे
संबोधले जाते. या अशा हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मिळ आहेत. यासाठी एक कारण
मूर्ती अभ्यासक देतात. ते म्हणजे गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले
आहे. तसेच गौरी ही घोरपड या वाहनावर उभी असल्याचे दाखवले जाते.
असेच
एक गर्भगृह उत्तर दिशेला असून त्यात विष्णूची मूर्ती स्थापन केलेली दिसते.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या मागे विष्णूचे अवतार दाखविलेले
आहेत. सभामंडपाचे छत समतल वितांन पद्धतीचे असून त्याच्यावरचे नक्षीकाम
थक्क करणारे आहे. सभामंडपाच्या दक्षिण भिंतींवर सप्तमातृका कोरलेल्या
दिसतात. सप्तमातृका म्हणजेच सात देवी एकत्र पूजल्या जातात. यात ब्राह्मी
(ब्रह्मिणी), वैष्णवी, माहेश्वरी, इंद्राणी, कौमारी, वाराही व चामुंडा,
यांचा समावेश आहे.
मंदिराचे मुख्य
गर्भगृह तितकेच सुंदर आहे. शिवाची पिंडी असलेले गर्भगृह अतिशय सुंदर असून
सात द्वारशाखा असलेल्या या गर्भगृहाच्या तळाला द्वारपालही दिसतात. यामध्ये
गंगा-जमुना, चवरीधारी स्त्रिया तसेच गर्भ-गृहातील परिवाराचे द्वारपाल अशी
दोन्ही बाजूला शिल्पे आहेत. नीळकंठेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर
चितारलेल्या सुरसुन्दरी या पाहण्यापेक्षा अभ्यासणे हे जास्त गरजेचे आहे.
मानवी भाव-भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या या सूर-सुंदरी म्हणजे मंदिर
स्थापत्यशैलीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य ठरावे. पत्र-लेखिका, शत्रूमर्दिनी,
रती, नृत्य-मग्न असलेल्या, दर्पणा, डाल मालिका, शुक-सारिका अशी नावे धारण
केलेल्या या साऱ्या सूर-सुंदरी आपल्या मनाचा ठाव घेतात, हे मात्र खरे. रंग
लावल्यामुळे यांचं सौंदर्य काही प्रमाणात झाकोळले गेले हे जरी सत्य असले
तरी त्या शिल्पांची कला अजूनही आपली नजर खिळवून ठेवतात. मंदिराचे शिखर हे
कालौघात पडले असल्यामुळे सध्या हे जीर्णोधारित शिखर अलीकडच्या काळात उभारले
आहे.
मराठवाड्यातील कला विश्वात जी काही थोडी मंदिरे वेगळाच ताल
राखून उभी आहेत, त्यामध्ये या मंदिराचा क्रमांक नक्कीच वरचा लागेल.
त्यामुळे असे मंदिर न चुकवावे असेच. हे निलंग्यातील मंदिर पाहून झाले की
लातूर निलंगा रस्त्यावर आपल्याला खरोसा गाव लागते. या गावात एक सुंदर लेणी
पाहण्यासाठी निघायचे. जांभ्या दगडात खोदलेली ‘खरोसा लेणी’. रस्त्याला लागून
असलेल्या छोट्या डोंगरावर भेट लेणींपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे.
आपली गाडी थेट लेणींपर्यंत येते.
महाराष्ट्रात
आढळणारी बहुतांश लेणी ही सह्याद्रीच्या काळ्या पाषाणात म्हणजेच काळ्या
बेसाल्टमध्ये खोदलेली आहेत. हा बेसाल्ट लेणी खोदण्यासाठी उत्तम मानला जातो;
पण या बेसाल्ट व्यतिरिक्त महाराष्ट्रात आढळणारा दुसरा दगड म्हणजे जांभा
दगड. हा दगड विशेषतः कोकणात आढळणारा सच्छिद्र आणि ठिसूळ असल्याने लेणी
खोदण्यासाठी निकृष्ट प्रतीचा समजला जातो. त्यामुळे जांभा दगडात सहसा लेणी
खोदलेली पाहायला मिळत नाहीत; पण तरीही या दगडात लेणी कोरलेली आपल्याला
पाहायला मिळतेच. खरं तर हे मोठे आश्चर्यच म्हणायला पाहिजे की कोकणापासून
शेकडो मैल दूर असलेल्या लातूर जिल्ह्यातील खरोसा गावाजवळ एक चक्क जांभा
दगडाचा डोंगर आहे. या वेगळ्याच प्रकारच्या लालसर रंगाच्या जांभ्या दगडाचे
त्यावेळच्या लेणी खोदणाऱ्या कलाकारांना आकर्षण वाटल असेल आणि त्यातूनच या
ठिसूळ दगडात त्यांनी लेणी कोरायचे आव्हान स्वीकारले असेल; पण तरीही ही लेणी
काही बेसाल्टप्रमाणे तग धरू शकली नाही. सध्या तर ही लेणी अक्षरशः नामशेष
होण्याच्या मार्गावरच आहे.
लेणींच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या
गावामुळे ही लेणी खरोसा लेणी म्हणून प्रसिद्ध झाली. या समूहातील पहिले लेणे
बौद्ध लेणे असून बाहेर स्तुपाचा उरलेला भाग पाहायला मिळतो. या स्तुपाच्या
समोरच असलेल्या एका भल्यामोठ्या विहारात बुद्धाची मूर्ती आहे. हे पाहून
झाले की मग पुढच्या लेणीकडे वळायचे. दुसरे लेणे हे दोन मजली आहे. लेणीच्या
खालच्या आणि वरच्या मजल्यावर सभामंडप आणि गर्भगृह, प्रदक्षिणापथ अशी रचना
पाहायला मिळते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उत्तरेकडील भागात एक जिना आहे.
वर एक भव्य शिवलिंग आहे. या लेणीच्या उत्तरेकडील भागावरही काही शिल्पे
कोरण्यात आलेली आहेत; पण ही सारी शिल्पे आता केवळ आकारावरूनच ओळखावी लागत
आहेत. कारण कालौघात ती शिल्पे हळू-हळू नष्ट होत चालली आहेत. यानंतर
आपल्याला लागते ते तिसरे लेणे म्हणजेच महादेव लेणे. हे या समूहातील सर्वात
महत्त्वाचे लेणे, या लेणीत शैव आणि वैष्णन अशा दोन पंथांचा मिलाप झालेला
पाहायला मिळतो. लेणींच्या दोन्ही भिंतींवर अनेक पौराणिक शिल्पपट कोरण्यात
आलेले आहेत; परंतु बरीचशी शिल्पे आता पुसट झाली आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर
सामान्यतः वैष्णव शिल्पे यामध्ये मुख्यतः मल्ल, गोवर्धन पर्वत उचलणारा
कृष्ण, नागदेवता तसेच विष्णू अवतारांपैकी वराह, वामन, नरसिंह, कृष्ण, राम
ही शिल्पे दिसतात; तर उत्तरेकडील भिंतीवर शैव शिल्पे यामध्ये रावणानुग्रह
मूर्ती, शिव-पार्वती, तांडवनत्य, भैरव इ. शिल्पे कोरण्यात आलेली आहेत.
याशिवाय समुद्रमंथन शिल्पपट, कार्तिकेय, द्वारपाल व इतर शिल्पे कोरलेली दिसतात.
यानंतर
पुढचे महत्त्वाचे लेणे म्हणजे लकोला लेणे. या लेणीला लकोला असे नाव का
पडले याविषयी इथे आख्यायिका सांगितली जाते. सहाव्या सातव्या लेणींसमोर एक
वैशिष्ट्य आपल्याला दिसते. ते म्हणजे दोन बाजूंना दिसणारी हत्तीची शिल्पे.
नामशेष होत असलेली ही दोन हत्तींची शिल्पे मात्र आपले लक्ष वेधून घेतात. या
शिल्पांवरून तत्कालीन काळात या लेणीचे वैभव कसे असेल याची कल्पनाच केलेली
बरी. खरोसा लेणी हे मराठवाड्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचेच वैभव
आहे; पण संवर्धनाअभावी हे लेणे भविष्यात पुढच्या पिढीला बघायला तरी राहील
का, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही. उरलेल्या भग्न अवशेषांमधूनही हे लेणे
मात्र इथली सफारी संस्मरणीय करते.
देखणं ‘जव्हार’
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
घनदाट
जंगलं, वैविध्यपूर्ण वनस्पती आणि विविध पक्षीप्रजातींनी नटलेलं जव्हार हे
निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत भांडारच आहे. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या या
परिसरात औषधी वनस्पती, प्राचीन वृक्ष आणि निसर्गनिर्मित समृद्ध परिसंस्था
आढळतात. पावसाळ्यात इथल्या हिरवाईला जणू नवा बहर येतो. धबधबे, नद्या आणि
दाट जंगल यामुळे संपूर्ण परिसर अधिक जिवंत भासतो.
पालघर
हा महाराष्ट्रात अगदी अलीकडे नव्याने निर्मित झालेला जिल्हा. मूळच्या ठाणे
जिल्ह्याचे विभाजन होऊन हा जिल्हा आकारास आला. हा जिल्हा अतिशय दुर्गम आणि
मुख्यत: आदिवासीबहुल म्हणूनच ओळखला जातो. त्याला समुद्रकिनारपट्टीही
लाभलेली आहेच, शिवाय दुसऱ्या बाजूला सह्याद्रीची डोंगर-रांगदेखील चिकटून
गेली आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात भौगोलिक वैविध्यही पाहायला मिळते.
नागमोडी वाहत गेलेल्या नद्या, सागर किनारे, डोंगर-दऱ्या, घनदाट जंगल,
पशु-पक्षी आणि फळाफुलांनी बहरलेला हा भाग पाहण्यासाठी कमीत कमी दोन दिवस
असायलाच हवेत.
याच जिल्ह्यात असलेले जव्हार हे ठिकाण मस्ट वॉच याच
श्रेणीतले. महाराष्ट्रात जशी महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची
ठिकाणे आहेत, तसेच जव्हार हेदेखील आहे; पण हे काहीसे दुर्लक्षित आणि
अपरिचित. दुर्गम भागामुळे येथे फक्त रस्तेमार्ग हाच पर्याय आहे. तरीही आता
बऱ्यापैकी हा सारा परिसर कात टाकत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी येथे हॉटेल,
रिसॉर्टमध्ये राहण्याची, जेवणाची उत्तम सोय आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे
५१८ मीटर उंचीवर असलेलं जव्हार हे ठिकाण डोंगरदऱ्यांच्या नयनरम्य
सौंदर्यामुळे, समृद्ध इतिहासामुळे आणि आदिवासी संस्कृतीच्या ठेव्यामुळे
प्रसिद्ध आहे.
या भागाचा इतिहास
शेकडो वर्षे मागे जातो. प्राचीन महिकावतीच्या बखरीमधील ग्रामनामांमध्ये
जव्हारचा उल्लेख यवसाहार प्रेक्षादिगण म्हणून आलेला आहे. इ.स. १३व्या
शतकापर्यंत इथे उत्तर कोकणच्या शिलाहार राजवटीचा अंमल होता. नंतर इथल्या
आदिवासी राजाने इ.स. १३४१मध्ये दिल्लीच्या महम्मद तुघलकाचे मांडलिकत्व
पत्करले होते. त्यानंतर मग इथल्या भागाचा संबंध थेट शिवछत्रपतींशी आला.
याला कारण म्हणजे इ.स. १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरतेवर चढाई केली
तेव्हा त्यांनी या प्रदेशातून प्रवास केला. शिवाजी महाराज हे जव्हारमधून
जात होते, तेव्हा इथल्या स्थानिक राजाने शिवाजी महाराजांची भेट घेतली. ती
ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे शिरपाचा माळ होय. इ.स. १६७०मध्ये शिवाजी
महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मात्र इथले राजे मोगलांच्या
भीतीने तटस्थ राहिले. त्यानंतर ५ जून १६७२ रोजी मोरोपंत पिंगळे यांनी
जव्हार जिंकले. स्वातंत्र्यापूर्वी मुकणे राजघराण्याचे स्वतंत्र असे
संस्थान होते. हे संस्थान मात्र स्वातंत्र्यानंतर २० मार्च १९४८ भारतामध्ये
विलीन करण्यात आले.
या संस्थानाची साक्ष देणारा जय विलास पॅलेस
म्हणजे सध्या तरी पर्यटनासाठी मोठे आकर्षण आहे. तसे पाहिले तर जव्हारमध्ये
एकूण दोन राजवाडे आहेत. त्यापैकी जुना राजवाडा एसटी स्टँडजवळ असून तो अतिशय
जीर्ण अवस्थेत आहे. त्याचे अवशेषच पाहायला मिळतात. हा जुना राजवाडा मुकणे
यांचे वंशज राजे पतंगशहा यांनी बांधला होता. नवीन राजवाडा जव्हार- विक्रमगड
रस्त्यावर आहे. हा राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी बांधला. तो आजही
सुस्थितीत आहे. मुकणे राजघराण्याचं निवासस्थान असलेला जय विलास पॅलेस हा
जव्हारच्या ऐतिहासिक वारशाचा एक अभिमानास्पद भाग आहे. विसाव्या शतकाच्या
सुरुवातीला बांधलेली ही भव्य राजवाड्याची रचना निओ-क्लासिकल शैलीत असून,
प्रशस्त बगिचे आणि जुन्या वैभवाची आठवण करून देणारी भव्यता त्याने आजही
जपली आहे.
जव्हारच्या बाहेरच म्हणजे
एसटी स्टँडपासून दोन किमी अंतरावर घनदाट झाडीच्या कोंदणात हा राजवाडा
प्रथमदर्शनीच प्रेमात पाडतो. दुरून राजवाड्याचे घुमटाकार मनोरे लक्ष वेधून
घेतात. हा राजवाडा अतिशय भव्य असून, त्याचे बाह्यस्वरूपाचे दर्शन नजरेत
मावत नाही. अतिशय देखणी, भव्य आणि प्रशस्त अशी एक मजली असलेली ही वास्तू
म्हणजे आपल्या भटकंतीचा खास बोनसच आहे. या राजवाड्यात सध्या कुणीही
वास्तव्य करत नाही. मुकणे राजघराण्याचे वंशज हे पुण्यात स्थायिक आहेत.
वर्षातून अनेकदा ते येथे येत असतात. दसऱ्याचा सण साजरा करण्यासाठी आवर्जून
येतात. त्यामुळे दसऱ्याला इथे आल्यास ही वास्तू आतूनही पाहायचे भाग्य लाभू
शकते.
तरीपण नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या परवानगीने हा
राजवाडा आतूनही पाहता येतो. राजवाड्यामध्ये अनेक दालने आहेत. दालनेही मोठी
असून त्यात झुंबरे आहेत. पॅलेसमध्ये मुकणे राजघराण्यातील व्यक्तींची
तैलचित्रे, प्राचीन वस्तू, तोफा, राजकुमारांची खेळणी इत्यादी आहेत. हे सारे
पाहत असताना आपण नकळतपणे थेट इतिहासकाळात जातो. राजवाड्याच्या छतावरील
घुमट्यांमधून सूर्यास्ताचे होणारे दर्शन तर डोळ्याचे पारणे फेडते. हा
राजवाडा उत्तर-मध्ययुगीन काळातील स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या
पॅलेसच्या आवारात फेरफटका मारल्यास मागील बाजूच्या पॉइंटवरून जव्हारच्या
परिसराचे अतिशय प्रेक्षणीय आणि विहंगम दृश्य आपल्याला दिसते.
हे
पाहून झाले, की आणखी एक ऐतिहासिक स्थान आपल्याला खुणावते. ते म्हणजे ५
जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: सुरतेवर स्वारी करण्यास निघाले
असता त्यांना या भागातून जाण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी जव्हारच्या
राजाची सदिच्छा भेट घेतली. जव्हारच्या राजाने शिवाजी महाराजांचे मोठे
स्वागत केले. त्यांच्या या भेटीची आठवण मुरूचंडी गावाजवळील शिरपामाळ येथे
एका कमानीच्या रूपाने जपून ठेवण्यात आली आहे.
जव्हारमध्ये
पूर्वी एक किल्ला होता; पण आता त्याचे अवशेषच पाहायला मिळतात. या
किल्ल्याची आता बरीच पडझड झाली आहे; पण नगारखाना अद्याप सुस्थितीत उभा आहे.
काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्नावशेष व त्या
भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष
देतात.
हा सारा भाग जसा पर्यटकांसाठी आकर्षक आहे, तसाच तो निसर्ग
अभ्यासकांनाही खुणावतो. कारण घनदाट जंगलं, वैविध्यपूर्ण वनस्पती आणि विविध
पक्षीप्रजातींनी नटलेलं जव्हार हे निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत भांडारच
आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पश्चिम घाटाचा भाग असलेल्या या
परिसरात औषधी वनस्पती, प्राचीन वृक्ष आणि निसर्गनिर्मित समृद्ध परिसंस्था
आढळतात. पावसाळ्यात इथल्या हिरवाईला जणू नवा बहर येतो. धबधबे, नद्या आणि
दाट जंगल यामुळे संपूर्ण परिसर अधिक जिवंत भासतो. जव्हारमध्ये असंख्य
स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती दिसून येतात, त्यामुळे हे
ठिकाण पक्षीनिरीक्षणासाठी अतिशय आकर्षक ठरतं. इथली निसर्गरचना विविध प्राणी
आणि कीटकांच्या अधिवासासाठीदेखील अनुकूल असून, जंगलात फिरताना अनेक
प्रकारच्या प्रजाती दिसतात. पावसाळ्यात संपूर्ण परिसर निसर्गाच्या अनुपम
सौंदर्यानं नटतो. तो अनुभवण्यासाठी जव्हारपेक्षा उत्तम ठिकाण दुसरं नाही.
या
साऱ्या ठिकाणाबरोबरच इथला प्रसिद्ध दाभोसा धबधबासुद्धा पावसाळ्यातले मोठे
आकर्षण. हा धबधबा तब्बल ३०० फूट उंचीवरून कोसळतो. दाट जंगलाने वेढलेल्या या
धबधब्याचे दृश्य थक्क करणारे असते. याशिवाय हनुमान पॉइंटवरून दिसणारा
सूर्यास्त लाजवाबच. इथल्या कड्यांवरून जव्हारच्या हिरव्यागार खोऱ्यांचे आणि
पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. या ठिकाणी एक आख्यायिकाही आपल्याला
ऐकवली जाते, ती म्हणजे लंकेकडे जाताना भगवान हनुमान येथे विसावले होते,
त्यामुळेच या ठिकाणाला हनुमान पॉइंट असे नाव पडले. या ठिकाणी हनुमानाचे
सुंदर मंदिरही बांधलेले पाहायला मिळते.
ऑफबीट दमण
ओंकार वर्तले - ovartale@gmail.com
महाराष्ट्राच्या
बाहेर भटकंतीसाठी पडलो की शेजारीच असलेल्या गोवा, कर्नाटक या भागाला अनेक
पर्यटक पसंती देतात. दीव-दमण हा भाग आता या यादीत समाविष्ट केला पाहिजे.
त्यामुळेच दोन दिवसांच्या भटकंतीसाठी एक हटके आणि गर्दीविरहित ठिकाण
पाहायचे असेल तर समुद्रकिनारी वसलेले दीव-दमण तुम्हाला निराश करणार नाही.
निळाशार
समुद्र, रमणीय समुद्रकिनारे, खास पोर्तुगीज टच लाभलेले किल्ले, धावपळीच्या
जगातून निवांतपणा देणारे ठिकाण असे केलेलं वर्णन हे गोव्याचेच, आहे असे
अनेकांना प्रथमदर्शनी वाटेल, पण इथेच तुम्ही चुकाल. कारण हे वर्णन गोव्याचे
नसून दीव-दमणचे आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण पर्यटनाच्या
दृष्टीने हे ठिकाण अजून तरी सर्वसामान्य पर्यटकांच्या आणि भटक्यांपासून
काहीसे दूर राहिले आहे. त्यामुळे कधी दोन दिवसांच्या भटकंतीसाठी विचार कराल
तर हे दीव–दमण मात्र मस्ट वॉच याच श्रेणीतले आहे.
गोवा आणि दीव-दमण
या दोन्ही भागांनी अगदी स्वातंत्र्यानंतरही पोर्तुगीज राजवट अनुभवली.
त्यामुळे गोव्यासारखेच या भागातही पोर्तुगीज स्थापत्याचा प्रभाव इमारती,
खाद्य-संस्कृतीवर आपल्याला जाणवत राहतो. शहराच्या गर्दीपासून दूर, एकांत,
तरीही मोहक असे हे ठिकाण म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९६१मध्ये
दमण व दीव भारतात सामील झाले आणि नंतर ३० मे १९८७ला दमण व दीव केंद्रशासित
प्रदेश म्हणून घोषित झाले. दमणच्या पूर्वेला गुजरात, पश्चिमेला अरबी समुद्र
आणि दक्षिणेला महाराष्ट्र असा प्रदेश लाभलेला आहे. दीव व दमण हा भाग आता
बऱ्यापैकी एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावाजलेला आहे. त्यामुळे या भागात
आलो की अनेक लघु व मध्यम उद्योगांचा पसारा पाहायला मिळतो. त्यामुळे या भागत
दळणवळणाच्या सोईही चांगल्या उपलब्ध आहेत. हा प्रदेश गुजरातला लागून
असल्याने इथे गरबा उत्सवदेखील मोठ्या दिमाखात साजरा होतो. याव्यतिरिक्त दीव
फेस्टिव्हल, अंबा पूजा असे उत्सव साजरे केले जातात.
जसे
आपल्या भागात सागरी किल्ले आढळतात तसेच या भागातही आहेत, पण इथल्या
किल्ल्यांची रचना निराळी, स्थापत्य आगळे! दिवपेक्षाही दमण हा भाग जास्तच
आकर्षक. कारण याची असलेली भौगोलिक रचना. एका नदीने या शहराचे दोन भाग केले
आहेत. हे शहर नानी दमण आणि मोटी दमण या दोन भागांमध्ये दमणगंगा नदीमुळे
विभागले आहे. स्थानिक बोली भाषेत मोटी म्हणजे थोरला आणि नानी म्हणजे धाकटा.
आणि त्यातही आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच नावाचे दोन किल्ले तर
खाडीच्या समोरासमोरच उभारलेले पाहून भारीच वाटते. थोडक्यात नानी दमण किल्ला
आणि मोटी दमण किल्ला दमणगंगा नदीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर समोरासमोर
आहेत. हे किल्ले इतके जवळ आहे की एका किनाऱ्यावरून अगदी पलीकडे दुसरा
किल्ला सहज दिसतो.
पोर्तुगिजांनी या दोन्हीही किल्ल्यांवर आपली छाप
सोडली आहे. त्यामुळेच हे वेगळ्या शैलीतले किल्ले पाहताना एक वेगळाच आनंद
मिळतो. हे दोन्हीही किल्ले दिवसभरात सहज पाहून होतात. यातल्याच एका ‘मोटी
दमण’ किल्ल्यापासून आपली भटकंती सुरुवात करायची. दमणगंगा नदीच्या दक्षिण
तीरावर हा मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमण या दोन
किल्ल्यांमध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. या किल्ल्याचे व्यवस्थित
संवर्धन केलेले दिसते.
रस्त्याने
जाताना आपल्याला या किल्ल्याची तटबंदी सोबत करीत असते. तसेच या तटबंदीला
लागून आणि रस्त्याच्या कडेला छान हिरवळदेखील फुलवलेली दिसते. त्यामुळे या
किल्ल्याचे हे प्रथम दर्शन आपल्या डोळ्यांना न सुखावले तरच नवल. याच
हिरवळीवर आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वाराअगोदरच आपल्याला एक आश्चर्य
थांबवते. ते म्हणजे एक रणगाडा (टॅंक) येथे उभा केलेला दिसतो. याचे
वैशिष्ट्य म्हणजे हा रणगाडा टी-५५ या नावाचा असून, त्याचा वापर भारतीय
सैन्याने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात केला होता. याच्या सहाय्याने
शत्रूचे अनेक टॅंक उद्ध्वस्त केल्याची गौरवशाली माहितीदेखील आपल्याला मिळून
जाते. एक प्रकारे किल्ल्याच्या अगोदर भटकंतीचा एक खास बोनसच आपल्याला
मिळून जातो. अशी काही काही ठिकाणे आपण डोळे उघडी ठेवूनच पाहिली पाहिजेत.
किल्ल्याच्या
सुंदर अशा प्रवेशद्वारातून प्रवेश केला की मग किल्ल्याचा विस्तार लक्षात
येतो. आपल्याला दमणमधली अनेक सरकारी ऑफिसेस लागतात. आतमध्येसुद्धा डांबरी
सडक गेलेली आहे. आणि आपण थेट सुंदर अशा चर्चसमोर येऊन उभे राहतो. याचे नाव
बॉम जीसस चर्च. हे चर्च म्हणजे किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. या
चर्चचा दगडात बांधलेला दर्शनी भाग पाहून आपण अवाक् होतो. इतकी सुंदर
कलाकुसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
पोर्तुगिजांनी
बांधलेल्या या चर्चच्या आतील भागात लाकडावर केलेले कोरीवकाम पाहण्यासारखे
आहे. विशेष म्हणजे आजही हे सर्व व्यवस्थित संवर्धन करून ठेवले आहे. जवळपास
चारशे वर्षांपूर्वी उभारलेला हा वास्तू-स्थापत्याचा आविष्कार मात्र न
चुकवावा असाच आहे. किल्ल्याच्या आत एक सुंदर अशी बागदेखील पाहायला मिळते.
असे म्हणतात की पोर्तुगिजांनीच या बागेची निर्मिती केली. या बागेतूनच
आपल्याला किल्ल्याच्या तटबंदीवर जाता येते. येथे आपल्याला अनेक तोफा मांडून
ठेवलेल्या दिसतात.
किल्ल्यात एक जुने लाइट हाऊस आहे, पण ते आता बंद
असून किल्ल्याच्या बाहेर आणखी एक लाइट हाऊस आहे, जे नव्याने उभारलेले
आपल्याला दिसते. किल्ल्याची प्रवेशद्वारे, तटबंदी, बुरूज आणि किल्ल्याच्या
बाहेरील खंदक इत्यादी अवशेष आपल्याला दिसतात. याव्यतिरिक्त या किल्ल्यात
अनेक भुयारी मार्गही दिसतात. बहुधा हा किल्ला जर शत्रुपक्षाच्या ताब्यात
पडला तर समुद्रमार्गे पळून जाण्यासाठी या भुयारांची निर्मिती झाली असावी.
किल्ल्यात
पोर्तुगीज स्थापत्यात सजलेले अनेक बुरूज पाहायला मिळतात. बुरुजांवर आणि
तटबंदीवर कॅप्सुल बुरूज आहेत. हे पोर्तुगीज बांधणीची खासियत असलेले बुरूज
अगदी दुरूनही सहज ओळखता येतात. एका वेळी एकच माणूस आत जाईल एवढे निमुळते
असतात. कॅप्सुल आकाराचे असतात म्हणून यांना तसे नाव पडले. किल्ल्याच्या
उतरेला आणि दक्षिणेला अशी दोन प्रवेशद्वारे आहेत.
मोटी
दमण किल्ला पाहून झाला की किल्ल्याच्या समोरील किनाऱ्यावर नानी दमण
किल्ल्याकडे निघायचे. यासाठी मोटी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा
नदीवरील पूल ओलांडून या किल्ल्यासमोर हजर व्हायचे. यालाच सेंट जेरॉम असे
दुसरे नाव. किल्ल्याच्या दमणगंगा नदीकडील दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश
होतो. या किल्ल्याचे प्रवेशद्वार मात्र मोती दमण किल्ल्यापेक्षा जास्त
आकर्षक आहे. प्रवेशद्वारावर शिलालेख आणि कोट ऑफ आर्म कोरलेले आहेत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूस सेंट जेरोम याची प्रतिमा कोरलेली
दिसून येते. आणि सर्वात वरच्या बाजूला एक क्रॉसदेखील उभारलेला आपल्याला
दिसतो.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर लगेचच उजव्या बाजूला तटबंदीला
लागून असलेल्या फांजीवर जाण्यासाठी पायऱ्या आपल्याला दिसतात. या पायऱ्या
चांगल्याच रुंद आहेत. या पायऱ्यांनी वर गेलो की किल्ल्याचे मुख्य
प्रवेशद्वार आणि अंतरंग व्यवस्थित दिसते. शिवाय फांजीवरून संपूर्ण किल्ला
फिरता येतो. फांजीवरून फिरताना किल्ल्याला पोर्तुगीज स्थापत्यात सजलेले
अनेक कॅप्सुल बुरूज पाहायला मिळतात. या किल्ल्याच्या मधोमध एक मोठे पटांगण
असून, याच्या एका कोपऱ्यात अवर लेडी ऑफ चर्च हे साधारण १६२७ साली बांधलेले
दिसते. याशिवाय किल्ल्याच्या आत एक स्मशानभूमीदेखील आहे.
एकंदरीतच
हे दोन्हीही किल्ले अतिशय व्यवस्थित निगराणीखाली असल्यामुळे पाहताना आपण
सुखवतो. खरंतर पर्यटनाच्या दृष्टीने दमणचा हा भाग काहीसा अपरिचित.
महाराष्ट्राला लागूनच असलेल्या या भागाकडे पर्यटकांचा ओढा कमीच आहे. इथले
किल्ले तर पाहण्यासारखे आहेत. शिवाय काही काही समुद्रकिनारेसुद्धा आपल्याला
भुलवतात. रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यालगत नव्याने सुशोभित करण्यात
आलेले रस्ते हे आता इथले नवीन आकर्षण झाले आहे. या रस्त्यांवरून रात्रीच्या
वेळी फेरफटका मारण्याची मजा काही औरच. शिवाय शहरात फिरताना पोर्तुगीज
स्थापत्यही डोळ्याला सुखावते.
आजकाल नेहमीपेक्षा वेगळे म्हणजे व्हिएतनाम, साऊथ कोरिया, कझाकस्तान या
अनवट देशात आपले पर्यटक जाऊ लागले आहेत. कझाकस्तान या देशात जाण्यासाठी
व्हिसा लागत नाही. त्यामुळे इथे जायचं आम्ही नक्की केलं. या प्रवासातील
अल्माटी हे आमचे पहिले ठिकाण.
पहिल्याच दिवशी अरासन वॉटरफॉल हा उंच डोंगराच्या कपारीमधून वाहत येणारा
हा निसर्गनिर्मित धबधबा पाहताना प्रवासाचा थकवा चटकन गेला. उंच पर्वतावरील
बर्फाच्या पाण्यांनी हा धबधबा तयार झाला होता. निसर्गाच्या मस्त दर्शनानंतर
पुकोलसाई लेक, शारिन कॅन्यन आणि आयसिक लेक ही तीन ठिकाणे आमच्या यादीत
होती. कोलसाई सरोवर तीन टप्प्यात विखुरलेले असून अल्माटी शहरापासून 300
कि.मी. अंतरावर आहे. सरोवराला पोचेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला
पसरलेल्या पर्वत-रांगा पाहताना मन प्रसन्न होते. या रस्त्याला जराही रहदारी
नाही आणि आजूबाजूला पसरलेली प्रचंड पठारे आणि पर्वतरांगा याचीच साथ असते.
इथेच कोलसाई सरोवराचा पहिला विस्तीर्ण टप्पा येतो. समोरचा नितांत सुंदर
देखावा पाहून मन सुखावून जाते. सरोवरामधील नितळ निळे पाणी, बाजूला अल्पायीन
वृक्षांची हिरवीगार झाडी आणि दूरपर्यंत बर्फाच्छादित पर्वत रांगा
कॅमेऱ्यात कैद करताना एक देखणे चित्र अवतरल्याचा भास होतो. कोलसाई
सरोवरापर्यंत पोचण्यापूर्वी मून कॅन्यन म्हणजे नदी असलेली एक खिंड पाहता
आली. पर्वतराजींमध्ये एका नदीचा स्वच्छ प्रवास दर्शवणारे ते दृश्य खूप
लोभसवाणे होते.
दुसऱ्या दिवशी पाहायचे होते ते शारिन कॅन्यन म्हणजे, थोडक्यात
विखुरलेल्या खडकांमधले सौदर्य. कुणाला वाटेल खडकात सौंदर्य ते काय असणार?
मात्र कल्पनेहून पूर्ण वेगळे असे दृश्य इथं पाहायला मिळते. हा जगातला
दुसऱ्या नंबरचा कॅन्यन आहे, तर पहिल्या नंबरवर आहे नॉर्थ अमेरिकेतील ग्रँड
कॅन्यन जो 200 कि.मी. परिसरात विखुरलेला आहे. 154 कि.मी. लांब अशा परिसरात
पसरलेल्या या कॅन्यनमध्ये लाल आणि नारिंगी रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे
अद्भुत खडक पाहताना आपण आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहात नाही. परत येताना
ब्लॅक कॅन्यनचा आनंद घेता आला. इथे काळ्या डोंगराच्या दरीत फेसाळती नदी
वाहत होती.
अल्माटी शहरापासून 70 कि.मी. अंतरावर पर्वतांच्या खिंडीमध्ये वसलेले
निसर्गनिर्मित असे आयसिक सरोवर पाहिले. त्याचा इतिहास असा- आठ हजार
वर्षांपूर्वी डोंगराचे खच्चीकरण झाले त्यातून आयसिक नदीचा प्रवाह बदलला आणि
हे सरोवर (लेक) बनले. साठ वर्षांपूर्वी म्हणजे 1963 मध्ये हे नैसर्गिक
सरोवर चिखलाच्या झंझावातात नष्ट झाले. त्यानंतर अनेक जणांच्या मेहनतीने
छोटय़ा प्रमाणात ते उभे केले गेले. सरोवराच्या आताच्या आकारावरून पूर्वीचे
सरोवर किती भव्य असेल याची कल्पना करता येते. सरोवराजवळ राज्याचे ऐतिहासिक
आणि सांस्कृतिक वस्तुसंग्रहालय पाहता आले. पुरातत्व खात्यातर्फे राख्त आणि
ओपॅक प्रांतात केलेल्या संशोधनात प्राचीन कालखंडातील सापडलेली जुनी नाणी,
भांडी, वरवंटे, चाकू, गालिचे, काही कलात्मक वस्तु, लोकर विणण्याचे साधन अशा
अनेक पुरातनकालीन वस्तू सुबकपणे मांडल्या आहेत.
शिम्बुलक म्हणजे माऊंटेन रिसॉर्टला केबल कारने भेट देणे आणि कॉक टु बी
म्हणजे अॅम्युझमेंट पार्क हाही सफारीमधला एक आनंदाचा भाग. माऊंटेन
रिसॉर्टमध्ये तीन भागांत केबल कारने जाण्याचा आणि तेथील थंडगार हवेचा तसेच
आजूबाजूचे पर्वत, हिरवीगार झाडी पाहणे हा एक वेगळा अनुभव घेता येतो.
थंडीमध्ये इथे बर्फ साचत असल्यामुळे बर्फात स्कीईंगची मजा लुटता येते आणि
उन्हाळ्यामध्ये छान अशा हवेची.
अल्माटी शहराची एका दिवसाची सहल प्रेसिडेंट पार्क, जुने चर्च, गार्डसमन
पार्क मस्जिद अशा वास्तूना भेट देऊन पूर्ण होते. इथे एका आगळ्या
वस्तुसंग्रहालयाने आमचे लक्ष वेधून घेतले. ते होते संगीतवाद्यांचे अनोखे
संग्रहालय. शंभराहून अधिक वर्षांची (1908) ही देखणी वास्तू आजही दिमाखात
उभी आहे आणि आत असलेल्या एक हजारहून अधिक संगीत वाद्यांनी ती परिपूर्ण आहे.
ही सगळी वाद्ये 17 व्या शतकापासूनची आहेत आणि त्यात पारंपरिक कझाक वाद्ये
तसेच इतर देशांतील म्हणजे भारत पाकिस्तानमधील लोक संगीतात वाजवली जाणारी
वाद्ये सुंदररीत्या ठेवली आहेत. इथे पारंपरिक कझाक संगीत ऐकण्याचीही सोय
आहे. इथले सेंट्रल स्टेट म्युझियमसुध्दा थोडे पाहता आले. हे संग्रहालय
सेंट्रल आशियामधील एक मोठे संग्रहायल मानले जाते. गोल्डन प्रिन्स
वॉरियरच्या अंगावर 4 हजार सोन्याचे दागिने आहेत. तो उत्खनन करताना सापडला
आणि देशाचा राष्ट्रीय प्रतीक बनला. इथेही कलात्मक जुन्या वस्तु, लोक
संगीतामधील वाद्ये पाहता आली.
या सफरीमध्ये तीन चांगली वस्तुसंग्रहालये पाहता आली. अशा संग्रहालयामधून
त्या देशाचे कला, संगीत यामधील वेगळेपण अधोरेखित होते आणि पर्यटकांना त्या
देशाचे कलात्मक रूपदर्शनही घडते.
पाऊलखुणा – श्रीरामांच्या मूळ मूर्ती : कालेराम मंदिर
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोष बापट , ashutosh.treks@gmail.com
अयोध्येच्या मध्यभागात असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे.
इ.स.च्या 12 व्या शतकात अयोध्येमध्ये बांधलेले रामलल्लाचे मंदिर
पाडण्यासाठी सन 1528 मध्ये बाबर आला. त्याने राममंदिर पाडण्याचा हुकूम
त्याचा सेवक मीर बकी याला दिला. त्या वेळी रामाच्या मूर्ती शामानंद सरस्वती
या पुजाऱयांनी नदीच्या डोहात विसर्जित केल्या. चार पुजारी गाभाऱयाच्या
बाहेर पहारा देत उभे राहिले. ते चारही पुजारी मारले गेले. या मूर्ती 1528
ते 1749 पर्यंत डोहात होत्या. सन 1749 ला नरसिंहराव मोघे या सत्पुरुषांना
साक्षात्कार झाला आणि त्यांनी त्या मूर्ती डोहातून बाहेर काढल्या व आज
असलेल्या कालेराम मंदिरात प्रस्थापित केल्या.
हे एक राम पंचायतन आहे. श्रीराम, सीतामाता, चार भाऊ आणि पायाशी हनुमान
अशा या मूर्ती. प्रभू राम इथे बद्धपद्मासनात बसले असून त्यांच्या डाव्या
मांडीवर सीता आहे. पायाशी श्रीयंत्र असून शेजारी हनुमान आहेत. मढीकर,
आंबेकर यांनी हे मंदिर सांभाळले. मढीकर यांनी हे देऊळ बांधले. तत्कालीन
इंग्रज अधिकारी या देवळात येत असत. देवळाच्या मागे लोक कचरा करत म्हणून
देवळाच्या मागची बाजूसुद्धा इंग्रज अधिकाऱयांनी देवस्थानला देऊन टाकली.
रामजन्माचा उत्सव त्याकाळी 50 रुपयांत होत असे. दरवर्षी वाण्याकडून उधारीवर
सामान घ्यायचे आणि उत्सव करायचा. वर्षभर वाण्याचे कर्ज फेडण्यात जायचे.
उत्सवाच्या वेळी पुन्हा कर्ज. एके वर्षी वाण्याने उधारीवर वस्तू देण्यास
नकार दिला. व्यवस्थापक आंबेकरांनी देवाला ही व्यथा सांगितली. पैसे उभे नाही
झाले तर देवळाला कुलूप लावून किल्ली शरयूमध्ये टाकून द्यायची आणि आपण
अयोध्या सोडून निघून जायचे ठरवले.
त्याच दिवशी एक बाई देवळात आल्या. घरी भांडण झाल्यामुळे आपल्या जवळ
असलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन वडिलांचा सल्ला घेऊन त्या देवळात राहायला
आल्या. त्या बाईंनी आपल्या जवळचे 1200 रुपये आणि दोन सोन्याच्या बांगडय़ा
रामाच्या सेवेत अर्पण केल्या. त्यावेळेपासून आजतागायत अव्याहत उत्सव सुरू
आहे. आता या उत्सवाला 10 लाख रुपये खर्च होतो. अयोध्येतील रामाच्या मूळ
मूर्ती असलेल्या या कालेराम मंदिराची व्यवस्था देशपांडे नामक मराठी गृहस्थ
बघतात. अयोध्येतील स्वर्गद्वार भागात नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे हे
मंदिर आहे. प्रशस्त असे हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात 15 कोटी रामनामाचा
जप लिहिलेले कागद आहेत. त्या खोलीत आजही अनेक जण रामनामाचा जप लिहीत बसलेले
असतात. संत श्री गोंदवलेकर महाराज या मंदिरात तीन वेळा चातुर्मासात राहून
गेले आहेत. त्यांच्या मातोश्री त्यांना दरवेळी अयोध्येला नेण्यासाठी आग्रह
करीत असत, पण महाराज अजून वेळ आली नाही असे सांगून मातोश्रींना घेऊन येत
नव्हते. मात्र एके वर्षी गोंदवलेकर महाराज आपल्या आईला अयोध्येला रामाच्या
दर्शनासाठी घेऊन आले. श्रीरामाच्या दर्शनानंतर त्या माऊलीने याच कालेराम
मंदिरात आपला देह ठेवला अशीही या मंदिराची महती आहे.
इथले अजून एक वैशिष्टय़ म्हणजे इथे असलेली मारुतीरायाची मूर्ती
दक्षिणाभिमुख असून ती स्त्राr रूपातली आहे. त्याची कथा अशी की, अहिरावणाने
राम-लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना देवीला बळी देण्यासाठी तयार केले.
हनुमंताला हे समजल्यावर तो पाताळात गेला आणि त्याने त्या देवीच्या मूर्तीत
प्रवेश केला. अहिरावणाने या बंधूंना समोर आणल्यावर देवीच्या रूपातील
मारुतीने श्रीरामांना शेवटची इच्छा विचारली. प्रभू रामांनी आपला भक्त
हनुमंताला भेटायची इच्छा प्रकट केली. हनुमंत ही इच्छा ऐकून गहिवरले. इतक्या
अवघड प्रसंगीसुद्धा श्रीरामांना आपली आठवण व्हावी हे समजल्याने हनुमंताला
धन्य वाटले. त्याने त्याच देवीच्या रूपात अहिरावणाला आपल्या पायाखाली दाबून
ठार केले आणि राम-लक्ष्मणांना घेऊन तो पृथ्वीवर आला. या देवीच्या रूपातील
अशी ही मारुतीची मूर्ती इथे कालेराम मंदिरात बघायला मिळते.
या मंदिरात भाविकांची राहण्याचीसुद्धा सोय होते. पूर्वापार अनेक मराठी
मंडळी अयोध्येला आली की, या मंदिरात राहत आले आहेत. अयोध्येच्या मध्यभागात
असलेल्या स्वर्गद्वार इथे असलेले रामाच्या मूळ मूर्ती असलेले हे मंदिर
अयोध्या भेटीत अवश्य बघायला हवे. श्री गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने
पुनीत झालेली ही जागा अतिशय प्रसन्न आणि सात्त्विक भाव जागृत करणारी आहे.
त्यांचे स्मरण करताना आपणही रामनामाचा काही जप करावा. शक्य असेल तर लिहून
काढावा. अयोध्येतली इतकी आगळीवेगळी अशी ही वास्तू ज्याचा मराठी माणसांशी
जवळचा संबंध आहे ती वेळ काढून बघितली पाहिजे. शक्य असेल तर इथे मुक्काम
करावा. अन्यथा किमान तिथे जाऊन रामरायाच्या मूळ रूपाचे दर्शन तरी अवश्य
घ्यावे.
वारसा – लोणारचे वारसावैभव
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> वर्षा चोपडे
महाराष्ट्राला लाभलेल्या अनोख्या वारसावैभवाची समृद्धता आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात पाहावयास मिळते.
उल्कापातातून निर्माण झालेले लोणार सरोवर जसे प्रसिद्ध आहे तसेच इथली
गोमुख मंदिर व दैत्यसूदन मंदिर त्यांच्या शिल्पसमृद्ध वास्तुकलेसाठी ओळखली
जातात.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा हा एकेकाळी आध्यात्मिक
आणि ऐतिहासिक तसेच मौर्य साम्राज्याचा भाग होता आणि नंतर सातवाहन
साम्राज्याचा भाग होता. चालुक्य आणि राष्ट्रकुटांनीही या भागात राज्य केले.
मुघल, यादव, निजाम आणि ब्रिटिशांच्या काळात या भागात व्यापार वाढला.
वाल्मीकी रामायणात याचा उल्लेख पंचपसर असा आहे. दंडकारण्यातून प्रवास
करताना भगवान राम, माँ सीता व लक्ष्मणाने या सरोवराला भेट दिल्याचा उल्लेख
आहे. लोणार सरोवर 52,000 ते 57,000 वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. विशेषत
महाराष्ट्रातील दख्खन पठारावर उल्कापात आघात झाल्यामुळे ते तयार झाले.
काही पूर्वीच्या संशोधनात 52,000 वर्षे जुने असल्याचे सूचित केले गेले
होते, परंतु अलीकडच्या अभ्यासात ते अंदाजे 57,000 वर्षे जुने असल्याचे
दिसून आले आहे. भूगर्भशास्त्रज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ,
पुरातत्त्वशास्त्रज्ञ, निसर्गशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांनी या
सरोवराच्या विविध पैलूंवर अभ्यास केला आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण
यांसारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये तसेच 1600 च्या सुमारास लिहिलेल्या
‘ऐन-ए-अकबरी’ या ग्रंथात या सरोवराचा उल्लेख आढळतो. जिजाऊ माँसाहेबांचे
माहेर सिंदखेडराजा लोणारच्या जवळच आहे. या जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या
काठावर आढळणारी अनेक यादव मंदिरे आणि हेमाडपंती मंदिरे म्हणून ओळखली
जातात. लोणार हे प्रामुख्याने लोणार विवर आणि त्यात असलेल्या खाऱया
पाण्याच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर त्याच्या समृद्ध
जैवविविधतेसाठीदेखील ओळखला जातो, ज्यामध्ये विविध मंदिरे आहेत आणि
निसर्गप्रेमी आणि संशोधकांना ती एक मोठी पर्वणी आहे. विशेषत
भूगर्भशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रात युनायटेड स्टेट्स
जिओलॉजिकल सर्व्हेसारख्या संस्थांनी विवर आणि त्याच्या निर्मितीचा अभ्यास
केला आहे. लोणारमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यात गोमुख मंदिर व
दैत्यसूदन मंदिराचा समावेश आहे, ही मंदिरे त्यांच्या विशेष वास्तुकलेसाठी
ओळखली जातात.
मंदिराशी संबंधित आख्यायिका सांगते की, लोणासुर किंवा लवणासुर नावाचा एक
राक्षस या परिसरात राहत होता. तो राक्षस लोकांना आणि प्राण्यांना त्रास
देत असे. तो प्रबळ झाल्याने देवांनाही संपवण्याची धमकी देत असे.
त्यामुळे देवतांनी विष्णूदेवाला मदत करण्याची विनंती केली, आणि विष्णू
भगवंताने त्याचा वध केला. त्यानंतर येथे विष्णूपूजेला सुरुवात झाली. हेच
दैत्यसूदनाचे मंदिर हेमाडपंथी शैलीचे सर्वोत्तम उदाहरण आहे. या मंदिरावर
खजुराहो मंदिरांमध्ये दिसणाऱया कोरीवकामांसारखेच कोरीवकाम आहे. मंदिराच्या
मागील बाजूस असलेल्या मुख्य कोनाडय़ात सूर्याच्या उभ्या प्रतिमेवरून असे
अनुमान काढले जाते की, हे मंदिर मूळत सूर्याला समर्पित होते. तथापि,
सध्याच्या स्वरूपात ते दैत्यसूदन म्हणून विष्णूचे हिंदू मंदिर आहे.
गर्भगृहात मृत लोणासुरावर उभा असलेला विष्णूचा पुतळा आहे. मंदिरावर विविध
सजावट आणि महत्त्वपूर्ण प्रतिमांसह असंख्य कडा आहेत. अनेक प्रतिमा देवता
आणि हिंदू पुराणांशी संबंधित घटना दर्शवितात. येथील तलाव आकर्षक आहे, पण
त्याची पडझड झाली आहे. अंबर सरोवराजवळ एक हनुमान मंदिर आहे, ज्यामध्ये
दगडापासून बनवलेली मूर्ती अत्यंत चुंबकीय असल्याचे मानले जाते. या
सरोवराभोवती असंख्य मंदिरे आहेत, त्यापैकी बहुतेक मंदिरे आज भग्नावस्थेत
आहेत. विष्णू, शिव, ब्रह्मा, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती हे विवराच्या आत
सापडलेल्या इतर मंदिरांमध्ये देवता आहेत.वाघ महादेव मंदिर, मोर महादेव
मंदिरात शिवलिंग नाही.
असंख्य वटवाघळे येथे बघायला मिळतात. मंदिराचे खांब आणि दर्शनी भाग
विखुरलेले दिसतात. मारुती मंदिर, कमलाजा देवी मंदिर,गोमुख मंदिर विवराच्या
काठावर स्थित आहे. येथून एक बारमाही तळे वाहते आणि मंदिराला भेट देणारे
यात्रेकरू या तळय़ात स्नान करतात. याला सीता न्हाणी मंदिर आणि धारा असेही
म्हणतात. याच परिसरात भगवान शिवाचे एक अत्यंत उद्ध्वस्त मंदिर, जे
यज्ञेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते ते बघायला मिळते.
आपल्या वारसावैभवाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच तळ्याची व
इतर परिसराची स्वच्छता कायम राखायला हवी. विवराचे जतन करण्यासाठी,
प्रदूषणमुक्त, कचरामुक्त लोणार असावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. प्राचीन
मंदिरे आणि अवशेष यांना इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारने हे ठिकाण पर्यटन
आकर्षण म्हणून विकसित करण्याची योजना सुरू केली; पण पर्यटकांनी,
इतिहासप्रेमीनी स्वच्छतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. या ठिकाणाला जगाच्या
पर्यटनक्षेत्र यादीत मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्याची जपणूक अत्यावश्यक
आहे.
varsha@rajagiri.edu
भटकंती – एकशे आठ दिव्य मंदिरांपैकी वामनमूर्ती मंदिर
बळीराजा आणि वामन अर्थात भगवान विष्णू यांची गोष्ट सर्वश्रुत माहीत
आहे, पण या वामन देवतेचे मंदिर कुठे आहे, याबाबत खूप कमी लोकांना माहिती
असावी. राजगिरी कॉलेजला जाताना रस्त्याच्या कडेला असलेले हे भव्य वामन
मंदिर अर्थात थ्रिक्काकर-अप्पन मंदिर मला आकर्षित करायचे. मुंबईला जरी
पोस्टिंग मिळाली तरी या मंदिराचा भव्यपण व सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत
मनातून जात नाही. थ्रिक्काकर मंदिर हे ओणम उत्सवाचे केंद्र मानले जाते.
कारण कोची शहरातील थ्रिक्काकर हे राजा महाबली यांचे निवासस्थान मानले जाते.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्रावणकोरच्या महाराजांच्या
नेतृत्वाखाली 61 नादुवजी (स्थानिक शासक) यांनी ओणम उत्सवाचे संयुक्तपणे
आयोजन केले होते. जातीय सलोखा हा उत्सव साजरा करण्याचे वैशिष्टय़ आहे.
उत्सवाच्या भावनेनुसार ओणसद्य किंवा ओणम मेजवानीसाठी विविध धर्मांचे लोक
मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. विष्णुमूर्ती असुर राजा महाबलीवर पाय ठेवत
असलेल्या मुद्रेत आहे. मूर्तीचा चेहरा प्रसन्न आणि देखणा आहे. परशुरामाने
मंदिराची स्थापना केल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात 861
सालच्या ओणम उत्सवाच्या सर्वात जुन्या उल्लेखांच्या नोंदीदेखील आहेत.
मूर्तीची सजावट मुख्यत चंदनाची पेस्ट, दागिने आणि कपडे वापरून केली जाते.
प्रत्येक दिवशी विष्णू देवतेला मत्स्य (मासे), कूर्म (कासव), वराह
(डुक्कर), नरसिंह (अर्धा मानव अर्धा सिंह), वामन, परशुराम, राम, बलराम,
कृष्ण, कल्की आणि त्रिविक्रम (वामनाचे दुसरे रूप) यांसह विष्णूच्या दहा
अवतारांपैकी एकाच्या रूपात सजवले जाते. ओणम उत्सवात मंदिरात चक्यर कुथू,
ओट्टमथुल्लाल, कथकली आणि पटकमसारख्या अनेक सांस्कृतिक कलांचे तसेच
पंचवाद्यम आणि थायंबका नृत्य आणि संगीताचे सादरीकरण केले जाते. इतर वेळी
येथे पारंपरिक वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते. हे मंदिर त्रावणकोर देवस्वोम
बोर्डाच्या प्रशासनाखाली आहे. मंदिराच्या जवळ दोन मोठे तलाव आहेत. आतमध्ये
गोडय़ा पाण्याची विहीर आहे.
दरवर्षी ओणम उत्सवात जुना ध्वज काढून नवीन ध्वज चढवण्यात येतो.
मूर्तीला हत्तीवर बसून तलावाजवळ नेण्यात येते तेथे विधिवत पूजा होते.
साऱ्या मंदिराभोवती नेहमीप्रमाणे दिवे लावले जातात. पारंपरिक वाद्यांचा गजर
होतो. अनेक भक्त त्याकरिता मदत करतात. दिव्याच्या रोषणाईने मंदिर दिव्य
प्रकाशाने उजळून निघते. पारंपरिक पांढऱ्या, सोनेरी पोशाखात सजून
महिला-पुरुष, लहान मुले-मुली सामील होतात. वामन मंदिराच्या उपदेवता म्हणजे
भगवती, सस्थवू, गोपालकृष्ण, नाग, ब्रह्मराक्षस आणि यक्षी. ब्रह्मराक्षस
मंदिराबाहेरील संकुलात वटवृक्ष देवता आणि सर्पदेवता विराजमान आहेत.
भागवत पुराणात वर्णन केले आहे की विष्णुदेवतेने स्वर्गावर इंद्राचा
अधिकार पुनर्संचयित करण्यासाठी वामन देवतेच्या रूपात अवतार घेतला होता.
कारण परोपकारी असुर राजा बळी याने स्वर्ग ताब्यात घेतला होता. बळी हा
विरोचनाचा मुलगा आणि भक्त प्रल्हाद याचा नातू होता. राजा बळी उदार होता आणि
कठोर तपस्या आणि तपश्चर्येत गुंतला होता. त्याने आपल्या परोपकाराने आणि
शूरपणामुळे जगाची प्रशंसा मिळवली होती. असे म्हणतात, इतरांकडून मिळालेल्या
कौतुकामुळे तो स्वत:ला जगातील सर्वशक्तिमान राजा मानत असे आणि ते सत्य
होते.
इंद्राला त्याचे राज्य परत मिळावे म्हणून ताडपत्राची छत्री घेऊन एका
लहान ब्राह्मणाच्या वेषात वामन, बळीराजाकडे तीन पावले जमीन मागण्यासाठी
गेला. राजा बळी उदार होता. देवावर त्याची प्रचंड आस्था होती. राजा बळीने
त्याच्या गुरू शुक्राचार्य यांच्या इशाऱ्याला न जुमानता होकार दिला.
त्यानंतर वामनाने आपली ओळख प्रकट केली आणि तीन पावले जमीन मागितली. वामनाने
तिन्ही लोकांवर पाऊल ठेवण्यासाठी प्रचंड भव्य रूप घेतले. त्याने पहिले
पाऊल स्वर्गातून पृथ्वीवर टाकले आणि दुसरे पाऊल पृथ्वीवरून पाताळात टाकले.
राजा बळी आपले वचन पूर्ण करू शकला नाही. त्याने तिसऱ्या वेळी आपले डोके
वामनासमोर केले. त्यानंतर वामनाने आपला पाय त्याच्या डोक्यावर ठेवला आणि
राजाला त्याच्या नम्रतेसाठी अमरत्व दिले. वामनाने महाबली आणि त्याचे पूर्वज
प्रल्हाद यांची पूजा करून आशीर्वाद मागितले आणि वामनाने त्याचे
सार्वभौमत्व मान्य केले. काही ग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की, वामनाने
बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवले नाही, तर त्याची केवळ परीक्षा घेतली.
त्यानंतर त्याचे राज्य बळीला परत दिले व त्याला पुढील इंद्र होण्याचे
वरदान दिले. याबाबत मतभेद आहेत. महाकाय स्वरूपात असलेल्या वामनाला
त्रिविक्रम म्हणून ओळखले जाते. ही आख्यायिका उलागलंथा पेरुमल मंदिर,
तिरुकोयिलूर मंदिर, उलागलंथा पेरुमल मंदिर, कांचीपुरम आणि काझीराम
विन्नगरम, सिरकाझी या मंदिराशीदेखील संबंधित आहे.
या थ्रिक्काकारा मंदिरातील उत्सवाचा समारोप म्हणजे ध्वज खाली उतरवणे आणि
मूर्तीला आंघोळ घालणे. याला आरत्तू असे संबोधले जाते. खजुराहोला वामन
मंदिर आहे, पण ते या मंदिरासारखे फार प्राचीन नाही. राजा बळीला दुष्ट राजा
म्हणून चित्रित का गेले, याचे उत्तर नाही, परंतु काही पौराणिक कथांनुसार तो
एक दानशूर आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखला जात असे. त्याच्या राज्याला
स्वर्गासारखे मानले जात होते आणि त्याच्या राज्यात कोणताही अन्याय किंवा
दुःख नव्हते. दिवाळीच्या सणातील बलिप्रतिपदा म्हणजेच बळीचा पाडवा म्हटलं
की, आपल्याला बळीराजा आठवतो. त्याला ‘बळी’ किंवा ‘महाबली’ या नावानेही
ओळखले जाते. त्याच्या राज्याचा उल्लेख ‘बळीचे राज्य’ असा केला जातो, जो
‘इडा-पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या प्रसिद्ध वाक्यात आजही वापरला जातो.
नाशिक शहरात बळीराजाचे एकमेव मंदिर आहे. पुराणात जे लिहिले त्याला अनुसरून
हा लेख आहे. सत्य काही का असेना, पण परशुरामाने स्थापन केलेले दक्षिणेतील
हे वामनमूर्ती मंदिर अत्यंत सुंदर,भव्य आणि नक्षीदार असून तेथील पावित्र्य
अनुभवायला काहीही हरकत नाही.
varshakisanc@gmail.com
पाऊलखुणा – हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोषबापट
हिरापूरचे 64 योगिनीमंदिरहेत्यातलेचएक. अगदीनचुकतापाहावेअसेहेआगळेवेगळेमंदिरआणिपंथआहे. भुवनेश्वरपासूनफक्त 20 कि.मी. वरअसलेलेहेमंदिरभारतातीलअगदीहाताच्याबोटावरमोजतायेईलअशामंदिरांपैकीएकआहे. कोणअसतातयायोगिनीआणिकशीअसतातयांचीमंदिरे?
निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची
मंदिरे यांचीसुद्धा विपुलता मोठय़ा प्रमाणावर आहे हे आपल्याला प्रकर्षाने
जाणवते. इथल्या देवता संप्रदायांवर आणि त्यांच्या उपासना पद्धतींवर आदिवासी
परंपरेची मोठी छाप पडलेली दिसते हेसुद्धा इथले एक वेगळेपण आहे. बऱ्याच
आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासना पद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात.
हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे
आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे
मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे.
कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?
योगिनी या शाक्त संप्रदायाच्या गौण देवता आहेत. त्यांना आवरण देवता
असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे.
योगिनींची संख्या कोटय़वधी असल्याचे सांगितले असले तरीसुद्धा 64 योगिनी
प्रसिद्ध आहेत. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या
कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेनी 64 रूपे घेतली आणि
त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले व त्यात त्या दैत्याचा
पराभव केला. या युद्धानंतर त्या योगिनींनी दुर्गेकडे याचना केली की,
स्मारक रूपाने त्यांना तिच्या जवळच स्थान मिळावे. दुर्गेने ते मान्य केले
आणि त्या योगिनी दुर्गेच्या सर्व बाजूने स्मारक रूपाने वास्तव्य करून असतात
अशी समजूत आहे. दुसऱ्या एका कथेनुसार घोर नावाच्या राक्षसाचा वध
करण्यासाठी दुर्गेने त्याच्याशी युद्ध मांडले, परंतु तिचा युद्धात विजय
होईना म्हणून शंकराने सूक्ष्म रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिची
शक्ती शतगुणित केली. त्या वेळी दुर्गेचे रूप पाहता पाहता भयानक रौद्र झाले
आणि त्यातून तेजस्वी, युयुत्सु, भयंकर गर्जना करणाऱ्या अशा योगिनी बाहेर
पडल्या.
भारतात 64 योगिनींची फक्त चार-पाच मंदिरेच आहेत आणि विशेष म्हणजे
त्यातली दोन ओडिशामध्ये आहेत. एक हिरापूरला आणि दुसरे रानीपूर-झरीयाल या
ठिकाणी. मध्य प्रदेशात भेडाघाटला एक आणि खजुराहोला एक अशी 64 योगिनींची
मंदिरे आढळतात. त्याचबरोबर ग्वाल्हेरजवळ मितावली इथे एक चौसष्ठ योगिनी
मंदिर आहे. हिरापूर इथले 64 योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.
च्या 9 व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा
आकाशाखाली 64 कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे
आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण
आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या
रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित
केलेली दिसते. अशा 56 मूर्ती या वर्तुळाकृती भिंतीच्या आत असलेल्या
कोनाडय़ात आहेत. मंदिराच्या मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या
कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीचा मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते.
तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. या चंडी
मंडपाच्या चारही बाजूंनी एकूण 8 योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. पूर्वी
या चंडी मंडपावर महाभैरवाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. वर्तुळाकार
भिंतीच्या आतील कोनाडय़ात असलेल्या 56 आणि चंडीमंडपावरील 8 अशा 64 योगिनी
इथे दिसतात. इथे अजून एक वेगळी मूर्ती दिसते ती आहे एकपाद भैरवाची. 64
योगिनींची पूजा ही तांत्रिक पूजा समजली जाते. योगिनी शक्यतो प्राणी, राक्षस
किंवा माणसाचे मुंडके यावर उभ्या असलेल्या दाखवतात.
रानीपूर–झरीयाल
बोलांगीर जिह्यात असलेले रानीपूर-झरीयाल हे ठिकाणसुद्धा 64 योगिनींच्या
मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूला राष्ट्रीय महत्त्व असलेले ठिकाण असा
दर्जा राज्य सरकारने दिलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी शिव पार्वती आलिंगन
मुद्रेत असून त्यांच्या सर्व बाजूंनी 64 योगिनींच्या मूर्ती दिसतात. या
सर्व योगिनी विविध नृत्यमुद्रेत दाखवलेल्या आहेत. हे या ठिकाणचे अगदी सुंदर
आणि अत्यंत वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. यातल्या 13 मूर्ती आता दिसत
नाहीत तर इतर काही भग्न झालेल्या आहेत, परंतु तरीही त्यांचे सौंदर्य मात्र
अजिबात कमी होत नाही. इथे जवळच 20 मीटर उंचीचे ‘इंद्रलथ’ नावाचे एक विटांचे
मंदिर असून ते तत्कालीन ओडिशामधील सर्वात उंच विटांचे मंदिर समजले जाते.
ओडिशाच्या भटकंतीमध्ये या आगळ्यावेगळ्या मंदिरांना मुद्दाम भेट द्यावी व
भटकंती समृद्ध करावी.
ashutosh.treks@gmail.com
पाऊलखुणा – आडवाटेवरचे गणपती
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> आशुतोष बापट
सुंदर परंतु दुर्लक्षित असणाऱ्या गणेशस्थानांत पुण्यातील खिंडीतला गणपती
आणि कनकेश्वरचा श्रीराम सिद्धिविनायक या बाप्पांचा उल्लेख आवर्जून करायला
हवा. आगळीवेगळी, रमणीय आणि गर्दीपासून दूर अशी ही आडवाटेवरची गणेशस्थानं,
ज्यांचं दर्शन अवश्य घ्यायला हवे.
महाराष्ट्राला देवस्थानांची मोठी देणगी लाभलेली आहे. विविध संप्रदायांची
विविध देवस्थाने इथे विराजित आहेत. त्यातील काही ठिकाणे आगळीवेगळी आणि
गर्दीपासून दूर आहेत. अशा गणेशस्थानांचे दर्शन अवश्य घ्यावे. आज जी दोन
गणेशस्थाने बघणार आहोत त्यातले एक आहे ऐन पुण्यात, तर दुसरे आहे कोकणात
अलिबागजवळ एका रमणीय टेकडीवर. काहीशा आडवाटेवर वसलेल्या या गणपतींचे दर्शन
अवश्य घ्यायला हवे.
खिंडीतला गणपती
पुण्यातले गणपती असं म्हटलं की, कसबा गणपती, सारसबाग, दगडूशेठ हलवाई आणि मग
इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती, 10 दिवस चालणारा गणेशोत्सव इत्यादी सगळ्या
गोष्टी डोळ्यांसमोर येतात, पण पुण्यातसुद्धा आडवाटेवरची काही गणेशस्थाने
आहेत आणि त्यांना चांगला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. गणेशखिंडीमधे असलेला
पार्वतीनंदन गणपती किंवा खिंडीतला गणपती हा त्यातलाच एक.
शिवकाळापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असावे. या गणपतीशी खूप साऱया
आगळ्यावेगळ्या कथा निगडित आहेत. राजमाता जिजाबाई यांना साक्षात्कार
झाल्यामुळे बांधण्यात आलेले हे मंदिर असेही सांगितले जाते. जिजाबाई या एका
श्रावणी सोमवारी पालखीमधून पाषाणच्या सोमेश्वराच्या दर्शनाला निघाल्या
होत्या. त्या वेळी खिंडीतल्या या मंदिरात एक ब्राह्मण अनुष्ठानात मग्न
होता. सत्पुरुषांचे आशीर्वाद आणि देवाचे दर्शन या दुहेरी हेतूने त्यांनी
झाडीतील या गजाननाचे दर्शन घेतले. कसबा गणपतीसारखीच ही पण पुरातन मूर्ती
असल्याचा साक्षात्कार जिजाबाईंना झाला आणि त्यांनी इथे सुघड मंदिर बांधले.
काळाच्या ओघात या मंदिराची पडझड झाली. नंतर पाषाण भागात राहणारे शिवराम
भट्ट चित्राव यांनी या मंदिराची दैन्यावस्था पहिली आणि जीर्णोद्धाराचे
कार्य हाती घेतले. इथल्या विहिरीची साफसफाई करत असताना त्यांना विहिरीत
मोठेच गुप्तधन सापडले. चित्राव ते धन घेऊन शनिवारवाडय़ावर गेले, परंतु
बाजीराव पेशव्यांनी ते धन घेण्याचे नाकारले. अखेर त्याच धनाचा वापर करून
शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर आणि खिंडीतल्या या पार्वतीनंदन गणेशाचे
मंदिर उभारले गेले. या मंदिरात गणेशाची सिंदूरचर्चित चार फूट उंचीची भव्य
मूर्ती आहे. मूर्ती बैठी असून सोंड डावीकडे वळलेली आहे. पुढील दोन हात
मांडीवर असून मागील दोन हातांत परशू आणि अंकुश आहे. सभामंडपाच्या
सुरुवातीला एका दगडावर लाडू हातात धरलेला मूषक आहे. श्रीमंत बाजीराव
पेशव्यांप्रमाणे इतर पेशवेसुद्धा मोहिमेवर जाताना या खिंडीतल्या गणपतीचे
दर्शन घेत असत. राक्षसभुवनच्या मोहिमेवेळी थोरल्या माधवराव पेशव्यांनी याचे
दर्शन घेतले होते. दुसऱया बाजीराव पेशव्याने पुत्रप्राप्तीसाठी या
गणपतीपुढे दक्षिणा ठेवल्याची नोंद आढळते.
किवळे इथल्या कान्ट्रक्टर रानडे घराण्यातील मंडळी कुटुंबात कुणाचे लग्न
झाले की, नवीन जोडप्याला घेऊन या गणेशाच्या दर्शनासाठी आजही येत असत. त्या
विधीला ‘ओहर’ असे म्हणत. त्या वेळी मोठा जेवणावळीचा कार्यक्रम होत असे.
एकदा हे सर्व कुटुंबीय या समारंभासाठी जमले असता त्यातल्या श्रेष्ठींना या
गजाननाचा दृष्टांत झाला की, या ठिकाणी दरोडेखोर येणार आहेत. तेव्हा तुम्ही
इथून लगेच निघावे. श्रेष्ठींनी सर्व मंडळींना लगेच किवळे इथे हलवले.
दरोडेखोर आले, पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही. आजही पुण्यातील
कान्ट्रक्टर रानडे मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आवर्जून जातात. अजून एक
महत्त्वाची घटना या गणेशाबाबत घडली ती 1897 साली. रँङच्या खुनापूर्वी
चापेकर बंधूंची खलबते याच मंदिरात होत असत. निर्दयी रँङचा खून केल्यावर
दामोदर हरी चापेकरांनी ‘खिंडीतला गणपती नवसाला पावला’ असा सांकेतिक निरोप
खंडेराव साठे यांच्या मार्फत लोकमान्य टिळकांना पाठवला होता. सेनापती बापट
भूमिगत असताना याच मंदिरात वास्तव्याला होते. अशा या अनेक ऐतिहासिक घटनांचा
साक्षीदार असलेल्या पार्वतीनंदन गणपतीचे दर्शन मुद्दाम घ्यायला हवे.
हे निसर्गरम्य गिरीस्थान-कनकेश्वर अलिबागपासून अगदी जवळ 2000 फूट
उंचीवरील डोंगरावर आहे. काहीसे वेगळे, चढून जाण्यासाठी सुलभ आणि माथ्यावरून
दिसणारे दृश्य केवळ अप्रतिम असे हे ठिकाण आहे. ‘आज्ञापत्र’ या प्रख्यात
ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई
यांच्या संघर्षात कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मनःस्थितीत सापडले.
शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते.
अलिबागपासून फक्त 10 किमीवर मापगाव नावाचे गाव लागते. मापगावपासून अंदाजे
800 दगडी पायऱया चढून वर जावे लागते. इथे असलेल्या एका पुष्करणीच्या
उत्तरेला सिद्धिविनायकाचे पश्चिमाभिमुख मंदिर वसले आहे. हे मंदिर कऱहाड
येथील गणेशशास्त्राr जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव रामचंद्र यांनी ज्येष्ठ
वद्य चतुर्थी शके 1798 रोजी बांधले. या रामचंद्र संन्याशाने पुढे थथस्वामी
लंबोदरानंद असे नाव धारण केले. याच परशुरामभक्त श्री लंबोदरानंद स्वामी
यांना भगवान परशुरामाने तपश्चर्येसाठी श्री लक्ष्मी, गणेशाची लहान आणि
देखणी मूर्ती दिली आणि त्यांना कनकेश्वर इथे जाऊन तपश्चर्या करावयास
सांगितले. पुढे स्वामींनी समाधी घेतल्यावर त्यांचे एक स्नेही श्री. बापट
यांनी स्वामींच्या समाधीशेजारीच हे गणेशमंदिर बांधले, परंतु या गणेशाची
पूजा करू नये असा परशुरामाचा आदेश असल्यामुळे त्यांनी वडोदरा येथील श्री.
गोपाळराव मैराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात
प्रतिष्ठापना केली. परशुरामाने लंबोदरानंद स्वामींना दिलेली मूर्ती
तांब्याच्या पेटीत बंद करून ठेवली आहे आणि तिची एक प्रतिकृती लोकांच्या
दर्शनासाठी ठेवलेली आहे. पूजेची गणेश प्रतिमा जवळ जवळ तीन फूट उंच असून
संगमरवरी आहे. गणेशाच्या मूर्तीशेजारीच रिद्धीसिद्धीच्या यांच्या
मूर्तीसुद्धा आहेत. वैशाख शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या दिवशी इथे मोठा
वार्षिक जन्मोत्सव साजरा करतात. ज्येष्ठ वद्य सप्तमीला लंबोदरानंद
स्वामींची पुण्यतिथी साजरी होते.
मुंबईपासून अगदी जवळ निसर्गाच्या कुशीतला आडवाटेचा असा ताहुलीचा डोंगर
आणि याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा! कडय़ावरून
कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि
पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं,
निसर्गाचा आविष्कार असलेलं हे एक विवर.
अनेक महिन्यांनी सह्याद्रीत भटकंती करण्याचा योग गेल्या आठवडय़ात जुळून
आला. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत असताना
जवळच असलेला छोटेखानी भिवगड पाहून झाला होता. आता उन्हाच्या काहिलीपासून
जरा आराम मिळण्यासाठी आम्हाला पावसात चिंब भिजायचं होतं. सह्याद्रीच्या
डोंगरातील जंगलाचा आनंद लुटायचा होता. मग आम्ही निवडली एक थोडीशी आडवाटेला
असलेली जागा – वाघबीळ!
बदलापूरला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पूर्वेस बाहेर पडायचं.
स्टेशनवरून तुम्ही सावरोली गावासाठी रिक्षा घेऊ शकता. स्वतचे वाहन असल्यास
सर्वात सोयिस्कर आणि उत्तम! सावरोली गाव बदलापूरच्या नैऋत्येस वसलेले एक
छोटेसे. सह्याद्रीतील ताहुली डोंगराच्या कुशीतल्या दाट जंगलाची हिरवी गोधडी
पांघरून गुडूप झोपलेलं! इथल्या डांबरी सडकेवर रिक्षा आपल्याला सोडते. लगेच
डावीकडे आपल्याला झेडपीची शाळा दिसते. त्याच्या बाजूनेच एक छोटासा रस्ता
नदीकडे जातो. त्या रस्त्याला लागून चालताच पाच मिनिटांत आपण ओढावजा नदीपाशी
पोहोचतो. ती पायीच ओलांडून जंगलात जाणारी ठळक आणि रमलेली वाट आपल्याला
लागते आणि इथून खऱ्या ट्रेकची सुरुवात होते.
जंगल अधिक दाट होत जाते. चालता चालता आपण झाडावेलींनी तयार केलेल्या एका
नैसर्गिक बोगद्यातून थोडासा चढ चढतो आणि अचानक समोर एक विस्तीर्ण पठार
लागतं, तिथे आपल्यासमोर विश्वरूप दर्शन देत उभा असतो ताहुलीचा महाकाय आणि
प्राचीन डोंगर. आपले दोन्ही बाहू पसरून तुम्हाला कवेत घेऊ पाहणारा! याच
ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा!
इथून पुढे दाट जंगलातून वाट काढत दोन-तीन ओढे ओलांडत अचानकपणे आपण थबकतो.
कोसळणाऱया धबधब्याची गाज आपल्या कानी पडू लागताच आपला चालण्याचा वेग वाढतो
आणि अगदी काही क्षणात वाघबीळचा धबधबा नजरेस पडतो. कडय़ावरून कोसळणारा
पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी
यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा
आविष्कार असलेलं एक विवर – वाघबीळ!
त्या विवराकडे जाणारी वाट मात्र शेवाळलेली आहे. त्यामुळे तिथे जाताना
अत्यंत काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे. तसेच धबधब्यापर्यंत पोहोचायला लागणारे
ओढे ओलांडताना पाण्याचा जोर बघूनच ते ओलांडावेत.
त्या विवरात प्रवेश करून आम्ही आतमध्ये पडणाऱ्या पाण्याच्या
संततधारेखाली चिंब भिजून मन तृप्त करून घेतले आणि त्या धारांचा अभिषेक
आपल्या मस्तकी करून घेतला. पाऊस आता वाढायला लागला होता. खालच्या ओढय़ांना
पाणी वाढायच्या आत आम्ही परत फिरलो. वाघबीळच्या थंडगार आठवणी सोबत घेऊन
झपाझप पाऊले टाकीत घराकडे निघालो.
पाऊलखुणा – बंदलिके : आडवाटेवरचा चालुक्य ठेवा
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोष बापट
कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना एक खजिना गवसला.
राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर
‘बंदलिके’. इथे जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर
मंदिर अशी ठिकाणं आहेत. अप्रतिम कलाकुसर, कोरीव व देखणं शिल्पकाम असलेली ही
मंदिरे पाहण्याचा अनुभव अद्भुत असाच असतो.
एकदा धोपट वाट सोडून आडवाटेवर जायची सवय लागली की पाय आपोआप तिकडे
वळतात. मग ती आडवाट कोकणातली असो, मराठवाडय़ातली असो किंवा कर्नाटकातली असो.
बऱयाचदा आडवाटेवर काहीसा दुर्मिळ आणि सुंदर खजिना सापडतो आणि तो जो आनंद
असतो तो अवर्णनीय असतो. कर्नाटक प्रांत हा वारसा स्थळे, संस्कृती, कला
यांनी समृद्ध आहे. मोठमोठी ठिकाणं तर इथे आहेतच, पण इथल्या आडवाटेवरसुद्धा
कमालीची सुंदर स्थळं आणि देखणी ठिकाणं सापडतात. कर्नाटकात चालुक्यांच्या
पाऊलखुणा धुंडाळताना असाच एक खजिना गवसला. शिरसी-बनवासी-बळ्ळीगावी असं
हिंडत असताना आणि तिथली देखणी मंदिरं बघत असताना बळ्ळीगावी या ठिकाणी एक
प्राथमिक शिक्षक भेटले. मोडक्यातोडक्या हिंदी-इंगजीमध्ये त्यांचाशी बोलत
होतो. इतक्या लांब ही मंदिरं बघायला मी आलोय हे कळल्यावर त्यांनी आवर्जून
काही ठिकाणं सुचवली. त्यातले एक होते ‘बंदलिके’. ‘बळ्ळीगावीवरून तालेगुंडा,
बिलकी, शिरीहळ्ळीमार्गे फक्त 15 किमी आहे. तुम्ही अवश्य जा तिथे’, असं
अगदी अजिजीने सांगत होते. रस्ता कळणारा नाही म्हणून या मधल्या गावांची नावे
कानडीमध्ये लिहून दिली आणि ‘लोकांना हे दाखवा, ते वाट दाखवतील’ असे
सांगितले. त्यांचा आग्रह बघूनच बंदलिकेला जायचे ठरवले आणि तिथे मोठा खजिनाच
हाती आला.
बंदलिके हे इ.स.च्या 10 व्या शतकातले एक महत्त्वाचे शहर होते.
राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर
होते. नगरखंड-70 या प्रदेशाच्या राजधानीचं हे नगर. जैन आणि कालामुख या
संप्रदायांचे हे महत्त्वाचे केंद्र. बंदलिकेचा इतिहास हा इथे मिळालेल्या 31
शिलालेखांवरून समजला आहे. काही शिलालेखांतून याचे नाव ‘बांधवपुरा’ असेही
आले आहे. या गावी जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर
मंदिर अशी ठिकाणं आहेत. बंदलिके इथे खूप मोठा पाण्याचा तलाव आहे. इथली
मंदिरे या तलावाच्या आजूबाजूलाच वसली आहेत. त्यातल्या शांतीनाथ बसदीमध्ये
आता कुठलीही मूर्ती नाही. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या
बसदीची रचना आहे.
त्रिमूर्ती नारायण मंदिर हे तीन गाभारे असलेले मंदिर आहे. इ.स. 1160 मधे
बांधलेले खास कल्याणी चालुक्य शैलीचे मंदिर. मुख्य मंदिरात विष्णूची उभी
मूर्ती असून बाजूच्या दोन गाभाऱयांत शिवलिंगे आहेत. गाभाऱयाचे दार, त्याला
दगडी जाळी, ललाटबिंब म्हणून गजलक्ष्मी अशी सगळी चालुक्यांची वैशिष्टय़े इथे
दिसतात. तीनही गाभारे असेच सजवलेले आहेत. मंदिराच्या परिसरात बरेच वीरगळ
मांडून ठेवलेले. काही वीरगळांवर जुन्या कानडी लिपीतले लेख कोरले आहेत.
कुण्या वीराचे हे स्मारक त्याच्या देहत्यागानंतरसुद्धा वर्षानुवर्षे इथे
उभे आहे. परिसरात अनेक लढाया झालेल्या असणार, त्याशिवाय हे एवढे वीरगळ इथे
दिसायचे नाहीत. हे बघून बाहेर पडत असताना तिथला पुरातत्त्व विभागाचा सेवक
माझ्यापाशी आला आणि ‘सोमेश्वर मंदिर बघितलं का?’ असं विचारलं. मी ‘नाही’
म्हटल्यावर मला म्हणाला, ‘मग एवढय़ा लांब येऊन काय बघितलं तुम्ही?’ मला
हाताला धरूनच तो एका छोटय़ाशा उंचवटय़ापलीकडे घेऊन गेला. तिथे एक छोटेखानी
देऊळ वसले आहे. आम्ही पाठीमागच्या बाजूने गेलो. माझ्या चेहऱयावरील आश्चर्य
बघून तो म्हणाला, ‘पुढे तर चला…’ समोरच्या बाजूला गेल्यावर एक मंदिर त्याचा
दरवाजा बंद असलेला, पण त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन शिल्पपट! एकावर
रामायण कोरलेलं आणि दुसऱया बाजूच्या शिल्पपटावर महाभारत कोरलेलं. वरपासून
खालपर्यंत सात पट्टय़ा. खालून वर बघत जायचे की, रामायण आणि महाभारताच्या कथा
दिसू लागतात. सगळी शिल्पं अगदी प्रमाणबद्ध आणि फार सुंदर. अगदी बारीक, पण
कमालीचं कोरीव आणि देखणं शिल्पकाम केलेलं. ते बघून थक्क व्हायला झालं. बाकी
मंदिर अगदी साधं. नगरखंड-70 चा प्रशासक बोप्पसेट्टी याने हे मंदिर इ.स.
1274 साली बांधले. गाभाऱयात शिवलिंग, ललाटावर गजलक्ष्मी आणि बाहेर दोन
बाजूंना हे अफाट शिल्पवैभव.
कोण कधी कुठे कशासाठी एखादं मंदिर बांधेल… तेव्हा त्यांचा काय उद्देश
असेल…आणि ते मंदिर शेकडो वर्षांनतरही त्या माणसाची महती सांगत उभे असेल हे
सगळं आश्चर्यकारक म्हणायला हवं. त्याचबरोबर रामायण आणि महाभारत हे
भारतीयांच्या मनात किती खोलवर रुजले आहे याची प्रचीती इथे आली. असं वाटलं
की, हे रामायण आणि महाभारताचे शिल्पपट दाखवण्यासाठीच जणू हे मंदिर बांधले
आहे की काय! त्या पुरातत्त्व विभागाच्या सेवकाचे मनोमन आभार मानले. तो
म्हणाला, ‘इथे येणारी माणसे हे न बघताच जातात म्हणून माझं त्यांच्यावर
बारीक लक्ष असतं.’ मला आपले राज्य आठवले. जाऊ दे. इतके सुंदर आणि देखणे
शिल्पवैभव कर्नाटकात अगदी आडभागात वसले आहे ते बघता आले. भटकंती समृद्ध
झाली. देवाक काळजी दुसरं काय!
– ashutosh.treks@gmail.com
(लेखक लोक संस्कृतीचे अभ्यासक आहेत)
पाऊलखुणा – चेन्नकेशव आणि राणी शांतलादेवी
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> आशुतोष बापट
होयसळ राजघराण्यातील विष्णुवर्धन राजाने चोळांवर मिळालेल्या
विजयाप्रीत्यर्थ बेलूरचे सुप्रसिद्ध ‘चेन्नकेशव’ मंदिर बांधले. वेसर
स्थापत्यशैलीतील हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. मंदिराच्या खांबाच्या
कोपऱयावर कोरलेल्या चार पुत्तलिकांपैकी एक आहे नृत्यमुद्रेतील राणी
शांतलादेवी.
इ.स.च्या 10 ते 14 व्या शतकातले दक्षिण भारतातले एक प्रबळ राजघराणे
म्हणजे होयसळ राजघराणे होय. ते मुळात कल्याणी चालुक्यांचे मांडलिक राजे
होते. पुढे स्वतच्या सामर्थ्यावर त्यांनी स्वतंत्र साम्राज्य निर्माण केले.
होयसळ हे कलेचे भोत्ते होते. धार्मिक बाबतीत सहिष्णू होते. मुळात हे घराणे
जैन धर्माचे अनुयायी होते. मात्र पुढे रामानुजाचार्यांच्या संपर्क आणि
प्रभावामुळे होयसळ नरेश बिट्टीदेव याने वैष्णव धर्म स्वीकारला.
रामानुजाचार्यांनी या बिट्टीदेवाचे नामकरण ‘विष्णुवर्धन’ असे केले. आधी
बेलूर आणि नंतर हळेबिडू ही होयसळांची राजधानी होती. बेलूरचे सुप्रसिद्ध
‘चेन्नकेशव’ मंदिर हे याच विष्णुवर्धन राजाने चोळांवर मिळालेल्या
विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.
कर्नाटकातील हसन या जिह्यात वसलेले हे मंदिर होयसळ राजा विष्णुवर्धन
याने इ.स. 1117 मध्ये बांधायला सुरुवात केली. आदल्याच वर्षी म्हणजे सन 1116
साली झालेल्या तलक्कड इथल्या लढाईत त्याने चोळांवर मोठा विजय मिळवला होता.
त्या विजयाप्रीत्यर्थ या राजाने हे देखणे विष्णुमंदिर उभारले. ‘चेन्न’
म्हणजे सुंदर. सुंदर अशा केशवाचे हे मंदिर ‘विजयनारायण मंदिर’ या
नावानेसुद्धा ओळखले जाते. चोळांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक हे कारण या
विजयनारायण नावामागे असावे. होयसळांच्या मंदिरांची खासीयत म्हणजे तारकाकृती
रचनेचा आकृतिबंध, मंदिर एका जोत्यावर उभारणे आणि मंदिरावर भरगच्च शिल्पकला
ही होय. बेलूर, हळेबिडू, सोमनाथपूर इथल्या मंदिरांवर ही लक्षणे प्रकर्षाने
दिसून येतात. होयसळांच्या मंदिर स्थापत्याचे अजून एक ठळक लक्षण म्हणजे
यांच्या मंदिरावर असलेले ‘वेसर’ शैलीचे शिखर हे होय. वेसर ही नागर आणि
द्राविड या दोन शैलींच्या मिश्रणातून तयार झालेली शैली आहे. मंडपाच्या
मधोमध चौकोनी रंगशिळा असून त्यावर कोरलेले छत म्हणजे सीलिंग हा तर प्राचीन
कोरीव शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणायला हवा. या गोलाकार छताचा व्यास हा
जवळपास 10 फूट, तर त्याची खोली 5 ते 6 फूट एवढी असून ते सगळे छत अत्यंत
सुंदर मूर्तींनी घडवले आहे. छताचे झुंबर कमळाच्या आकाराचे असून त्यावर
नरसिंह कोरलेला आहे. छत ज्या चार खांबांवर तोलून धरले आहे, त्या चारही
खांबांच्या कोपऱयावर पुतलिका/अप्सरा कोरल्या आहेत आणि हेच इथले मोठे आकर्षण
आहे. या चार पुतलिकांपैकी एक स्वत राणी शांतलादेवी आहे. राणी इथे
नृत्यमुद्रेत दाखवली असून तिच्या पायाशी वादक कोरले आहेत. ही राणी आहे
कशावरून, तर या चार पुतलिकांपैकी फक्त राणीच्या डोक्यावर मुकुट दाखवला आहे.
तिच्या हातात कोपरापर्यंत बांगडय़ा, गळ्यात हार आहे. सगळे राजेशाही घटक
राणीच्या मूर्तीत दाखवले आहेत. बाकी तीन अप्सरांच्या डोक्यावर मुकुट नाही.
राणी शांतलादेवी ही स्वत नृत्यात निपुण होती. ऐन रंगशिळेवर राणीची मूर्ती
कोरणे किती समर्पक, सुंदर आहे हे इथे या मंडपात आल्यावर समजते.
बेलूरचे चेन्नकेशव मंदिर आणि तिथली राणी शांतला हिची नृत्यमूर्ती खूप
देखणी आणि महत्त्वाची आहे. या राणीची माहिती घेऊ लागलो की, खूप काही रंजक
गोष्टी समोर येतात. राणी शांतला ही होयसाळांच्या एका सरदाराची लावण्यवती
लेक. ती उत्कृत्ष्ट नृत्यांगना होती. हिचा विवाह राजा विष्णुवर्धनाशी
व्हावा अशी राजाच्या आजीची इच्छा होती. त्यासाठी तिने ठरवून हिच्या
नृत्याचा कार्यक्रम राजासमोर आयोजित केला, जेणेकरून राजा हिच्या प्रेमात
पडावा आणि त्याने हिच्याशी लग्न करावे आणि झालेही तसेच. ते देखणे नृत्य
बघून राजा भारावून गेला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. शांतलेने ही
मागणी अमान्य केली. तिच्या मते हे नृत्य तिने एकटीने केले नसून तिच्या
समवेत तिची सखी लक्ष्मीसुद्धा सहभागी होती आणि शिवाय शांतला धर्माने जैन
होती, तर राजा वैष्णव. राजाने तिच्यासह तिची सखी लक्ष्मी आणि त्याबरोबर
तिच्या धर्मातील इतर पाच मुलींशी लग्न केले. मात्र राजाने शांतला हिलाच
पट्टराणी म्हणून मान्यता दिली. शांतला राणीने बेलूरच्या परिसरात मंदिरे
बांधली आहेत. शांतलेचे माहेर बळ्ळीगावी इथले. तिने त्या गावी केदारेश्वराचे
सुंदर देवालय बांधले आहे.
मात्र शांतलेला काही पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे तिने राजापुढे
प्रस्ताव मांडला की, तिचे पट्टराणीपद काढून ते तिची सखी लक्ष्मी हिला
द्यावे आणि लक्ष्मीला होणारा मुलगा पुढे राज्याचा अधिकारी व्हावा. राजा
विष्णुवर्धनाचे शांतलेवर नितांत प्रेम होते. त्याने तिचा हा प्रस्ताव
नाकारला. पुढे जेव्हा लक्ष्मी गर्भवती राहिली तेव्हा शांतलेने एक मोठा
निर्णय घेतला. ती बंगळुरूजवळ असलेल्या शिवगंगा टेकडीवर गेली आणि तिथून खाली
उडी घेऊन तिने आत्महत्या केली. एका सुंदर, लावण्यवती आणि नृत्यनिपुण
राणीचा असा दुर्दैवी अंत झाला. काही अभ्यासकांच्या मते राणीने जैन धर्माचे
संलेखना व्रत स्वीकारले आणि याद्वारे जैन धर्माच्या अनुयायांना मुक्तीकडे
जाण्याचा मार्ग स्वतच्या त्यागाने दाखवून दिला.
बेलूर किंवा हळेबिडू इथली होयसळ मंदिरे बघताना राणी शांतला वारंवार
मूर्तिरूपे भेटत असते. राणीच्या आरस्पानी सौंदर्यामागे लपलेली एक करुण छटा
त्या मूर्तीतूनही आपल्याला जाणवेल. आजही बेलूरच्या लोकांच्या मनात राणी
शांतला जिवंत आहे. आजही राणी या मंदिरांचे रक्षण करते आहे अशी या लोकांची
गाढ श्रद्धा आहे. श्रद्धा अपार असतात त्यांना सीमा नसते हेच खरे.
बॅग पॅकर्स – चैतन्य जागवणारी हर की ‘धून’
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> चैताली कानिटकर
उत्तराखंडमधील प्रसिद्ध हर की दून ट्रेक एकदा तरी करायलाच हवा असा.
हिमालयातील ही भ्रमंती प्रत्येक पावलावर नवं काहीतरी शिकवणारी आणि चैतन्य
जागवणारी ठरली.
मळवाटेचा ट्रेक असं ज्या ट्रेकला म्हणता येईल तो ट्रेक आहे उत्तराखंडमधील प्रसिद्ध हर की दून ट्रेक.
सलग तीन ट्रेक केल्यानंतर गढवाल हिमालयातील हर की दून हाच ट्रेक करायचं
आम्ही ठरवलं. हा ट्रेक जरा जास्त दिवसांचा आहे. त्यामुळे हातात 9-10 दिवस
हवेतच. आम्ही हा ट्रेक केला जूनच्या पहिल्या आठवडय़ात. मार्च ते जून आणि
सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये हा ट्रेक करता येतो. फक्त हा पहिलाच ट्रेक असेल
तर पूर्वतयारीसाठी तीन-चार महिने द्यावे लागतात. 21000 फूट उंचीवर असलेल्या
या ट्रेकमध्ये आठ दिवसांत 43 किमी अंतर कापावे लागते. उत्तराखंडला
पोहचल्यावर सकाळी निघून आपण पोहचतो 210 किमीवर असलेल्या बेस कॅम्प सांक्री
या गावात. हे अंतर प्रचंड जास्त आणि वळणावळणाचं असल्याने कंटाळा येतो, पण
पुढे वाटेवर नैनिताल, मसुरी इथली लोभसवाणा नजारा, हिमाच्छादित शिखरे
तुमच्या सोबत राहतात. सांक्री गाव गोविंद वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे.
त्यामुळे इथलं निसर्गरम्य वातावरण भारावून टाकतं.
दुसऱ्याच दिवशी सकाळी सांक्री ते सांक्री बेस पुन्हा गाडीने प्रवास होता
आणि मग सुरू झाला ट्रेक. चिरूरगाड गावापर्यंत फक्त 15 -16 किमी अंतर आहे.
हिरव्यागार कुरणांवर हलकी चढण चढत नदीकिनारी असलेल्या कॅम्प्सला आम्ही
पोहचलो. नदीजवळ ही कॅम्पसाईट असल्याने पाण्याचा खळखळाट आपली सोबत करतो. इथे
मस्तपैकी संध्याकाळचा ब्रेकफास्ट करून थोडा वेळ फिरून रात्रीचे जेऊन
दुसऱया दिवसासाठी स्वतला आम्ही तयार केले. ऑक्सिजन लेव्हल, ब्लडप्रेशर
वगैरे तपासले. आमच्या ट्रेक लिडरने पुढील दिवसांचा तपशील दिला. या वेळेस
आमची ग्रुपलिडर होती आस्था मॅडम. गंगाडला जाताना आमच्या फिटनेसचा कस लागत
होता पण मध्ये मध्ये लागणारे ढाबे, तिथला चहा, कॉफी, रेरेडेंड्रॉन फुलांचे
सरबत मन प्रफुल्लित करणारे होते.
पुढच्या दिवशी सिमात्रा हे कॅम्पसाईटचे गाव होते. वाटेत जाताना एक
मोठ्ठा ब्रीज, पुरातन मंदिरे लागली पण ट्रेक लिडरच्या सूचनेनुसार आम्ही
समीट करून परत येताना ती पाहणार होतो. सिमात्रा कॅम्पसाईटला
पोहोचतानासुद्धा थोडी दमछाक होतेच. पण वाटेत दिसणाऱया, पर्वतातून वाहणाऱया
पारदर्शक नद्या, कुरणावर चरणाऱ्या मेंढ्य़ा, गाई, खेचरे, गावातील छोटी छोटी
पहाडी मुलं हे सारं सुखावणारं होतं. या कॅम्पसाईटला आम्हाला प्रचंड पाऊस
लागला. थंडीही प्रचंड होती. ओले शूज सुकले नाहीत. शिवाय थंडीमुळे
टेन्टबाहेरही पडता येत नव्हते. पण नंतर मात्र चांदण्यांनी भरलेले आभाळ,
धुक्यातली रात्र पाहण्याचा अद्भुत आनंद मिळाला. थंडीपासून आपले रक्षण
करायला योग्य ती काळजी आपण घ्यायलाच हवी. त्याच दिवशी रात्री माझ्याच
बहिणीला थंडी प्रचंड भरली आणि हिमालयातील थंडीचा अंदाज आला. दुसऱया दिवशी
समीट होतं, त्यामुळे लवकर उठावे लागले. अगदी अर्धा तास सूर्यदर्शन झालं आणि
इतका आनंद झाला की विचारून सोय नाही. शूज, कपडे वाळले. या कॅम्पसाईटवर
आम्ही परत रात्री येणार होतो. त्यामुळेच फारसे सामान बरोबर न घेता समीटला
सुरूवात केली.
पाऊस, प्रचंड थंडी, बऱयापैकी चढण करत करत सलग 4-5 तास चालल्यावर समीटला
पोहोचलो. आजूबाजूचं निसर्गसौंदर्य जणू एखादं वॉलपेपर वा पेंटिंग असल्याचा
भास होत होता. छानसी वाहणारी नदी, मागे व दोन्ही बाजूला पर्वत, जबरदस्त
दणकट कुत्रे, भरपूर पक्षी, जंगली फळं विकणारे, लालबुंद गाल व गोरेपान पहाडी
बांधव… अहाहा! मन प्रसन्न झालं. हृदयाच्या एका कप्प्यात हे दृश्य साठवून
परतीच्या प्रवासाला लागलो.
समीटच्या दुसऱया दिवशी चढलेली चढण उतरायची होती. त्यामुळे जरा सोप्पं
झालं आणि परत पोहोचलो गंगाडला. ही ट्रेकची शेवटची कॅम्प साईट होती.
प्रत्येकाच्या चेहऱयावर समीट केल्याचा आनंद होताच आणि त्या आनंदात अजून भर
पडली. ‘आज क्या है इव्हिनिंग स्नॅक्स?’ असे विचारताच ‘आज गोलगप्पे है’ असं
ऐकलं, पण विश्वास बसेना. त्या दिवशी संध्याकाळी चक्क इतक्या जबरदस्त थंडीत
आम्हाला ऊऊप् ने गरमागरम रगडा व पाणीपुरी दिली. सर्वांनी मिळून हिमालयात
खाल्लेल्या त्या पाणीपुरीची चव आजही जिभेवर तरळते आहे. पाणी पुरीने पोट
इतकं भरलं की रात्री जेवण स्कीप करून आम्ही माफिया, मेमरी असे खेळ खेळण्यात
दंग झालो.
हिमालयात फिरताना प्रत्येक पावलावर आपण त्याच्याकडून काहीतरी शिकत
राहतोच. ते सारं पदरी बाळगत आम्ही बेस कॅम्पला आलो. दुसऱया दिवशी उत्तराखंड
व नंतर मुंबईत परतलो. हर की दून व त्याची धून आजही मनात गुंजते आहे.
नतीन या रमणीय गावापासून सुरू होणारा हा दयारा बुग्याल ट्रेक. हिमालयाच्या कुशीतल्या ग्रामीण संस्कृतीची, तिथल्या निसर्गसौंदर्याची झलक दर्शवणारा हा ट्रेक.
हमता पास आणि सार पास ट्रेक केल्यानंतर यावेळेस सोपा ट्रेक करायचं ठरवलं
आणि दयारा बुग्याल या अनोख्या ट्रेकची निवड केली.स्थानिक भाषेत दयारा
म्हणजे ‘जमिनीचा गोलाकार भाग’ आणि बुग्याल म्हणजे उंचावरील गवताळ प्रदेश
किंवा प्राण्यांचे चरण्याचे कुरण. नवशिक्यांसाठी उत्तम आहे यात शंकाच नाही.
दिवस आणि वेळ वाचावा म्हणून मुंबईहून डायरेक्ट डेहराडूनला फ्लाईटने गेलो.
त्या दिवशी डेहराडून फिरून दुसऱया दिवशी 10-12 तासांचा बस प्रवास करत थेट
पोहोचलो बेस कॅम्प व्हिलेजला नतीनला!
भारतातील उत्तराखंडच्या चित्तथरारक लँडस्केपमध्ये वसलेले,मनमोहक दयारा
बुग्याल हे उंचावरील कुरण आहे. या कुरणाचं नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे.
उन्हाळ्याच्या कालावधीत गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी अगदी योग्य तर
हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशातल्या साहसी ट्रेकसाठी आकर्षित करणारं ठिकाण.
उत्तरकाशीहून सहज पोहोचता येणाऱया बारसू अथवा नतीन या रमणीय गावापासून सुरू
होणारा हा ट्रेक सुमारे 7,400 फूट उंचीवरून आपले चमत्कार उलगडतो आणि
हळूहळू समुद्रसपाटीपासून सुमारे 12,100 फूट उंचीवर असलेल्या दयारा
बुग्यालच्या भव्य उंचीवर घेऊन जातो.
सुरुवात केली नतीन गावातून. शब्दही फिके पडतील इतकं सुंदर गाव. गावातले
लोकही प्रेमळ. प्रत्येकाच्या घराला कुंपण आहे ते सफरचंदाच्या झाडांचं. आणि
जवळपास प्रत्येक कुटुंबाने पाळले आहेत लाख – दीड लाखाचे खेचर! कारण
वाहतुकीची सोय गावात फारच अत्यल्प आहे. हे सगळं गाव आम्ही मनसोक्त फिरलो
तेही समोर दिसणारे बर्फाच्छादित पर्वत पाहत. दुसऱयाच दिवशी सुरू होणार होता
आमचा ट्रेक.
हा ट्रेक वर्तुळाकार आहे. म्हणजे गोल फिरून आपण सुरुवातीच्या नतीन
व्हिलेजमध्येच येतो. चार रात्री, पाच दिवसांच्या या ट्रेकचे एकूण अंतर 24
किमी आहे आणि आपण समीटला 12000 फूट उंचीवर पोहोचतो.
डेहराडून-नतीन-गुई-चीलापाडा-दयारा टॉप-नायता – नतीन असा ट्रेक आहे. यावेळेस
सुद्धा ‘ट्रेक द हिमालयाज्’ याच कंपनीसोबत आम्ही गेलो आणि ट्रेक लिडर होते
दीपक! अत्यंत नम्र, हुशार, धाडसी अशा या ट्रेक लिडरने बऱयाच गोष्टी
ट्रेकिंगदरम्यान शिकवल्या. हा ट्रेक विंटर किंवा समर कधीही करा, फार सुंदर
आहे.
नतीनपासून गुईचा ट्रेक पूर्ण जंगलातून जातो. विविध पक्षी, मोठमोठे
वृक्ष, थंडगार वारा आपल्याला अनुभवता येतो. वाटेत एका ठिकाणाहून काला नाग,
बंदरपूछ, श्रीखंड महादेव, द्रौपदी का दांडा आणि गंगोत्री या मनमोहक
शिखरांचे दृश्यही आम्ही पाहिले आणि चार तासांनंतर पोहोचलो कॅम्प साईट
गुईला. मस्तपैकी एकमेकांच्या मदतीनं तंबू उभारले आणि मग थंड वातावरणात
गरमागरम जेवणाचा आनंद घेतला. यावेळेस ट्रेकला गेल्यावरही चक्क मोबाईलला
नेटवर्क मिळत असल्याने आनंद द्विगुणित झाला. दुपारीच आम्ही गुईला पोहचलो
आणि मग छानपैकी आराम करून संध्याकाळी वॉकला गेलो. ट्रेक लिडरने तेथील
जंगलं, झाडं याची फार छान माहिती दिली. मग काय रात्रीच्या जेवणावर ताव
मारून सज्ज झालो पुढील दिवसासाठी.
दुसऱया दिवशी हिमालयीन फुलंझाडं निळी खसखस, डेझी आणि प्रिमरोझ यांचं
दर्शन घडलं. कुरणाच्या सभोवतालचे ओक आणि रोडोडेंड्रॉनच्या जंगलामुळे हे
दृश्य अधिकच नयनरम्य दिसत होतं. एका बाजूला भव्य बर्फाच्छादित पर्वत आणि
त्याच्यासमोर ही रंगांची उधळण असं ते दृश्य होतं. हा ट्रेकिंग मार्ग विविध
पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यात उत्तराखंडचा राज्य पक्षी
हिमालयीन मोनलचाही समावेश आहे. हे सर्व पाहत आम्ही थंडगार चिलापाडा कॅम्प
साईटवर पोहोचलो. त्या दिवशी ट्रेक लिडरने चक्क थोडं पुढे चालत नेऊन
संध्याकाळी बर्फात मजेशीर खेळ घेतले. परत येताना चमकदार तलाव आणि वाहते ओढे
पाहून मन भरून आलं.
ती रात्र अविस्मरणीय ठरली. रात्री निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला मी आणि
माझी टेन्ट पार्टनर बाहेर ऊठून आलो तर चक्क हिमालयीन हरणाने दर्शन दिलं आणि
आम्ही बाहेर दिसतात टुणकन् अल्पाइन जंगलात पळून गेलं. ही आठवण आजही मनात
तशीच आहे. पुढचा दिवस थोडा कठीण होता, कारण आम्ही समीट करणार होतो. ट्रेक
लिडरने गीटर्स वगैरे दिले होतेच. जसे जसे समीट जवळ येऊ लागले बर्फाची चादर
दिसू लागली. मग काय भन्नाट फोटोसेशन झालं. समीट गाठलं. हातात भारताचा ध्वज
घेऊन फोटो काढून तेथून दिसणारे सर्व पर्वत पाहून परतीच्या प्रवासास लागलो.
येताना एक आइसस्लाईड केली आणि नतीनकडे परतलो. परतल्यावर छानपैकी
प्रशस्तीपत्रक देण्यात आली. दुसऱया दिवशी आम्ही बसने डेहराडूनला परतलो व
नंतर मुंबई गाठली.
ट्रेकमध्ये हिमालयीन गावाच्या अद्वितीय संस्कृतीची झलक खूप जवळून
अनुभवता आली. पायवाटेवरच्या असंख्य रोडोडेंड्रॉनच्या फुलांना अंतरंगात
साठवून हा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.
chaitalikanitkar1230@gmail.com
पाऊलखुणा – हिरापूर येथील चौसष्ट योगिनी मंदिर
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोषबापट
हिरापूरचे 64 योगिनीमंदिरहेत्यातलेचएक. अगदीनचुकतापाहावेअसेहेआगळेवेगळेमंदिरआणिपंथआहे. भुवनेश्वरपासूनफक्त 20 कि.मी. वरअसलेलेहेमंदिरभारतातीलअगदीहाताच्याबोटावरमोजतायेईलअशामंदिरांपैकीएकआहे. कोणअसतातयायोगिनीआणिकशीअसतातयांचीमंदिरे?
निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची
मंदिरे यांचीसुद्धा विपुलता मोठय़ा प्रमाणावर आहे हे आपल्याला प्रकर्षाने
जाणवते. इथल्या देवता संप्रदायांवर आणि त्यांच्या उपासना पद्धतींवर आदिवासी
परंपरेची मोठी छाप पडलेली दिसते हेसुद्धा इथले एक वेगळेपण आहे. बऱ्याच
आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासना पद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात.
हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. अगदी न चुकता पाहावे असे हे
आगळेवेगळे मंदिर आणि पंथ आहे. भुवनेश्वरपासून फक्त 20 कि.मी. वर असलेले हे
मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा मंदिरांपैकी एक आहे.
कोण असतात या योगिनी आणि कशी असतात यांची मंदिरे?
योगिनी या शाक्त संप्रदायाच्या गौण देवता आहेत. त्यांना आवरण देवता
असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे.
योगिनींची संख्या कोटय़वधी असल्याचे सांगितले असले तरीसुद्धा 64 योगिनी
प्रसिद्ध आहेत. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या
कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेनी 64 रूपे घेतली आणि
त्यांच्या सर्वांच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले व त्यात त्या दैत्याचा
पराभव केला. या युद्धानंतर त्या योगिनींनी दुर्गेकडे याचना केली की,
स्मारक रूपाने त्यांना तिच्या जवळच स्थान मिळावे. दुर्गेने ते मान्य केले
आणि त्या योगिनी दुर्गेच्या सर्व बाजूने स्मारक रूपाने वास्तव्य करून असतात
अशी समजूत आहे. दुसऱ्या एका कथेनुसार घोर नावाच्या राक्षसाचा वध
करण्यासाठी दुर्गेने त्याच्याशी युद्ध मांडले, परंतु तिचा युद्धात विजय
होईना म्हणून शंकराने सूक्ष्म रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिची
शक्ती शतगुणित केली. त्या वेळी दुर्गेचे रूप पाहता पाहता भयानक रौद्र झाले
आणि त्यातून तेजस्वी, युयुत्सु, भयंकर गर्जना करणाऱ्या अशा योगिनी बाहेर
पडल्या.
भारतात 64 योगिनींची फक्त चार-पाच मंदिरेच आहेत आणि विशेष म्हणजे
त्यातली दोन ओडिशामध्ये आहेत. एक हिरापूरला आणि दुसरे रानीपूर-झरीयाल या
ठिकाणी. मध्य प्रदेशात भेडाघाटला एक आणि खजुराहोला एक अशी 64 योगिनींची
मंदिरे आढळतात. त्याचबरोबर ग्वाल्हेरजवळ मितावली इथे एक चौसष्ठ योगिनी
मंदिर आहे. हिरापूर इथले 64 योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.
च्या 9 व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा
आकाशाखाली 64 कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे
आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण
आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या
रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित
केलेली दिसते. अशा 56 मूर्ती या वर्तुळाकृती भिंतीच्या आत असलेल्या
कोनाडय़ात आहेत. मंदिराच्या मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या
कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीचा मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते.
तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. या चंडी
मंडपाच्या चारही बाजूंनी एकूण 8 योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. पूर्वी
या चंडी मंडपावर महाभैरवाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. वर्तुळाकार
भिंतीच्या आतील कोनाडय़ात असलेल्या 56 आणि चंडीमंडपावरील 8 अशा 64 योगिनी
इथे दिसतात. इथे अजून एक वेगळी मूर्ती दिसते ती आहे एकपाद भैरवाची. 64
योगिनींची पूजा ही तांत्रिक पूजा समजली जाते. योगिनी शक्यतो प्राणी, राक्षस
किंवा माणसाचे मुंडके यावर उभ्या असलेल्या दाखवतात.
रानीपूर–झरीयाल
बोलांगीर जिह्यात असलेले रानीपूर-झरीयाल हे ठिकाणसुद्धा 64 योगिनींच्या
मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या वास्तूला राष्ट्रीय महत्त्व असलेले ठिकाण असा
दर्जा राज्य सरकारने दिलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी शिव पार्वती आलिंगन
मुद्रेत असून त्यांच्या सर्व बाजूंनी 64 योगिनींच्या मूर्ती दिसतात. या
सर्व योगिनी विविध नृत्यमुद्रेत दाखवलेल्या आहेत. हे या ठिकाणचे अगदी सुंदर
आणि अत्यंत वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. यातल्या 13 मूर्ती आता दिसत
नाहीत तर इतर काही भग्न झालेल्या आहेत, परंतु तरीही त्यांचे सौंदर्य मात्र
अजिबात कमी होत नाही. इथे जवळच 20 मीटर उंचीचे ‘इंद्रलथ’ नावाचे एक विटांचे
मंदिर असून ते तत्कालीन ओडिशामधील सर्वात उंच विटांचे मंदिर समजले जाते.
ओडिशाच्या भटकंतीमध्ये या आगळ्यावेगळ्या मंदिरांना मुद्दाम भेट द्यावी व
भटकंती समृद्ध करावी.
ashutosh.treks@gmail.com
(लेखकलोकसंस्कृतीचेअभ्यासकआहेत)
फिरस्ती – वाघबीळ धबधबा निसर्गाचा आविष्कार!
सामना ऑनलाईन
~3 minutes
>> प्रांजल वाघ
मुंबईपासून अगदी जवळ निसर्गाच्या कुशीतला आडवाटेचा असा ताहुलीचा डोंगर
आणि याच ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा! कडय़ावरून
कोसळणारा पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि
पाणी यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं,
निसर्गाचा आविष्कार असलेलं हे एक विवर.
अनेक महिन्यांनी सह्याद्रीत भटकंती करण्याचा योग गेल्या आठवडय़ात जुळून
आला. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढत असताना
जवळच असलेला छोटेखानी भिवगड पाहून झाला होता. आता उन्हाच्या काहिलीपासून
जरा आराम मिळण्यासाठी आम्हाला पावसात चिंब भिजायचं होतं. सह्याद्रीच्या
डोंगरातील जंगलाचा आनंद लुटायचा होता. मग आम्ही निवडली एक थोडीशी आडवाटेला
असलेली जागा – वाघबीळ!
बदलापूरला रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर पूर्वेस बाहेर पडायचं.
स्टेशनवरून तुम्ही सावरोली गावासाठी रिक्षा घेऊ शकता. स्वतचे वाहन असल्यास
सर्वात सोयिस्कर आणि उत्तम! सावरोली गाव बदलापूरच्या नैऋत्येस वसलेले एक
छोटेसे. सह्याद्रीतील ताहुली डोंगराच्या कुशीतल्या दाट जंगलाची हिरवी गोधडी
पांघरून गुडूप झोपलेलं! इथल्या डांबरी सडकेवर रिक्षा आपल्याला सोडते. लगेच
डावीकडे आपल्याला झेडपीची शाळा दिसते. त्याच्या बाजूनेच एक छोटासा रस्ता
नदीकडे जातो. त्या रस्त्याला लागून चालताच पाच मिनिटांत आपण ओढावजा नदीपाशी
पोहोचतो. ती पायीच ओलांडून जंगलात जाणारी ठळक आणि रमलेली वाट आपल्याला
लागते आणि इथून खऱ्या ट्रेकची सुरुवात होते.
जंगल अधिक दाट होत जाते. चालता चालता आपण झाडावेलींनी तयार केलेल्या एका
नैसर्गिक बोगद्यातून थोडासा चढ चढतो आणि अचानक समोर एक विस्तीर्ण पठार
लागतं, तिथे आपल्यासमोर विश्वरूप दर्शन देत उभा असतो ताहुलीचा महाकाय आणि
प्राचीन डोंगर. आपले दोन्ही बाहू पसरून तुम्हाला कवेत घेऊ पाहणारा! याच
ताहुलीच्या पोटात आहे वाघबीळचा अद्भुतरम्य धबधबा!
इथून पुढे दाट जंगलातून वाट काढत दोन-तीन ओढे ओलांडत अचानकपणे आपण थबकतो.
कोसळणाऱया धबधब्याची गाज आपल्या कानी पडू लागताच आपला चालण्याचा वेग वाढतो
आणि अगदी काही क्षणात वाघबीळचा धबधबा नजरेस पडतो. कडय़ावरून कोसळणारा
पांढराशुभ्र प्रपात आणि त्या पाण्याच्या पडद्याआड लपलेलं, हवा आणि पाणी
यांच्या शतकांच्या माऱयामुळे पाषाणाची झीज होऊन निर्माण झालेलं, निसर्गाचा
आविष्कार असलेलं एक विवर – वाघबीळ!
त्या विवराकडे जाणारी वाट मात्र शेवाळलेली आहे. त्यामुळे तिथे जाताना
अत्यंत काळजीपूर्वक जाणे गरजेचे आहे. तसेच धबधब्यापर्यंत पोहोचायला लागणारे
ओढे ओलांडताना पाण्याचा जोर बघूनच ते ओलांडावेत.
त्या विवरात प्रवेश करून आम्ही आतमध्ये पडणाऱ्या पाण्याच्या
संततधारेखाली चिंब भिजून मन तृप्त करून घेतले आणि त्या धारांचा अभिषेक
आपल्या मस्तकी करून घेतला. पाऊस आता वाढायला लागला होता. खालच्या ओढय़ांना
पाणी वाढायच्या आत आम्ही परत फिरलो. वाघबीळच्या थंडगार आठवणी सोबत घेऊन
झपाझप पाऊले टाकीत घराकडे निघालो.
‘मिनिएचर’ (छोट्यात छोटी) पुस्तकांचे जगातील पहिले आणि एकमेव असे
म्युझियम, युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडांना जोडणाऱ्या ‘अझरबैजान’ या
देशात पाहावयास मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये 2015 मध्ये
त्याची नोंद झाली आहे. राजधानीच्या बाकू शहरातील जुन्या इचेरी शहरात हे
म्युझियम थाटण्यात आले आहे. बाकूच्या भटकंतीत म्युझियमच्या निर्मात्या
सालाखोव्हा झरिफा तेयमूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
एका अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित
झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे
प्रदर्शन थाटले आहे. झरिफा या अझरबैजान देशात सांस्कृतिक क्षेत्रात
सन्माननीय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेच्या
आयुष्याला 1982 मध्ये मोठी कलाटणी मिळाली. त्या नोव्हेंबर 1982 ला मॉस्को
येथे पुस्तकप्रेमींच्या भरलेल्या ‘ऑल युनियन व्हॉलेंटरी सोसायटीच्या’
अधिवेशनाला गेल्या होत्या. तेथे क्रायलोव्ह या नामांकित लेखकाच्या 1935
मध्ये प्रसिद्ध झालेल्या दंतकथांच्या संग्रहाची, अगदी छोट्या आकारातील
आवृत्ती 23 रुबेल्सना विक्रीसाठी उपलब्ध होती. झरिफा यांनी त्याची खरेदी
केली. त्याचे पैसे देऊन त्या ते पुस्तक घेण्यासाठी बाजूच्या गोदामात
गेल्या. तेथे त्यांनी आयुष्यात प्रथम, अगदी छोट्या आकाराची ‘मिनी’ पुस्तके
पाहिली आणि त्या दिवसापासून अशी पुस्तके जमविण्याचा छंदच त्यांना लागला.
दरवर्षी या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. त्या म्युझियममध्ये 2002 मध्ये
अशा प्रकारच्या मिनिएचर पुस्तकांनी भरलेली काचेची 25 कपाटे होती. आता त्या
कपाटांची संख्या 39 झाली असून एकूण 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700
मिनिएचर पुस्तके तेथे पाहावयास मिळतात. यात विशेष म्हणजे भारतातील ‘हनुमान
चालिसा’ व गीतेची अगदी छोटी आवृत्तीही तेथे आढळली.
मिनिएचर पुस्तकाची व्याख्या काय, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या
प्रमाणानुसार 75 * 75 मि.मी.पर्यंतच्या आकाराचे पुस्तक हे मिनिएचर पुस्तक
ठरते. झरीफा यांच्या संग्रहालयात अशी 3370 पुस्तके आहेत. पूर्वीच्या
सोव्हिएत रशियाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे 100 * 100 मि.मी. पानाच्या
आकाराचे पुस्तक ‘मिनिएचर’ सौंधेत बसते. त्या मापनानुसारही अनेक पुस्तके
त्यांनी जमविली. म्युझियममधील चार पुस्तके ही सर्वात छोटी म्हणजे अक्षरशः
‘मायक्रो’ आकाराची व अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यात जपानची राजधानी टोकियो
येथून प्रसिद्ध झालेल्या ‘टोपान’ (Toppan) पुस्तकाचा आकार 0.75 * 0.75
मि.मी. एवढा आहे. तेथील चार मोसमांतील फुलांचे वर्णन त्यात आहे. ते एका खास
आकर्षक बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ‘मायक्रो बुक’ असे त्यावर इंग्रजीत
लिहिले आहे. आणखी एक जपानी पुस्तक 2 * 2 मि.मी.चे आणि दोन जर्मन मायक्रो
पुस्तकेही येथे पाहावयास मिळतात. त्यापैकी एकाचा आकार 2.0 * 2.9 मि.मी. आणि
दुसऱ्याचा 3.5 * 3.5 मि.मी. एवढा आहे. या सर्वांच्या शेजारी जाड भिंग
ठेवण्यात आले असून, त्याच्या सहाय्यानेच ती पुस्तके वाचता येतात. या
म्युझियमसाठी शिरव्हान शहाज राजवाडय़ाजवळची छोटी, पण मध्यवर्ती जागा शासनाने
दिली आणि 23 एप्रिल 2002 मध्ये या म्युझियमचे तिथे उद्घाटन झाले.
सालाखोव्हा यांनी उद्घाटनासाठी तो दिवस मुद्दाम निवडला. कारण याच दिवशी
1616 मध्ये जागतिक कीर्तीचा नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे निधन झाले आणि
तो दिवस आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि पुस्तकांचे हक्क (कॉपी राईट) यासाठी
जगभर पाळण्यात यावा असा निर्णय युनेस्कोने घेतला. शेक्सपिअरचे नाव चिरकाल
राहावे हा त्या मागचा हेतू होता आणि त्याच दिवशी हा ‘मिनिएचर म्युझियम’
पर्यटक, स्थानिक नागरिक या सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला.
87 वर्षे वयाच्या झरिफा माडम आजही मोठ्या उत्साहाने साऱ्या जगभर विविध
बैठका, परिषदांच्या निमित्ताने लंडन, बर्लिन, म्युनिक, ब्रुसेल्स, बीजिंग,
पारीस तसेच हवाना, मास्को येथे गेल्या होत्या. तेथील अँटिक पुस्तकांची
दुकाने, बाजारपेठांना त्यांनी भेटी दिल्या. मिनिएचर पुस्तकांची माहिती घेऊन
त्यांनी ती खरेदी केली. त्याखेरीज अनेक स्नेही, पुस्तकप्रेमी, राजकारणी
व्यक्ती यांनी काही मिनी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. तसेच 1985 पासून
त्यांनी मिनिएचर पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. विशेषतः सोव्हिएत रशियात
अशी पुस्तके जमविणारी पुस्तकप्रेमी मंडळी आहेत. त्यांचे खूपच सहाय्य झाले.
हे म्युझियम 145 चौ.मीटर क्षेत्रफळाच्या जागेत थाटण्यात आले असून त्याची
रचना अतिशय आखीव अशी आहे. एकूण 39 काचेच्या भव्य कपाटात हे प्रदर्शन
मांडण्यात आले आहे. पुस्तकांची वर्गवारी केल्याने कोणत्या कपाटात कोणती
पुस्तके आहेत याची कल्पना येते. शेक्सपियरच्या अजरामर साहित्याचा ठेवा येथे
पाहावयास मिळतो. ‘रोमियो आण्ड ज्युलिएट’पासून संपूर्ण शेक्सपिअरच्या एकूण
40 खंडांपैकी 24 खंड हे 50*73 मि.मी.च्या आकारात आहेत. झरिफा यांच्या या
अगदी आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील
अनेक पारितोषिके मिळविलीत. पण सर्वात मोठा सन्मान म्हणजे 2015 मध्ये या
म्युझियमची ‘गिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्’मध्ये नोंद झाली आहे. बाकू
शहरात इचेरी शहरात असलेले हे मिनिएचर म्युझियम पुस्तकप्रेमींना पाहण्यासाठी
विनामूल्य खुले असते.
जंगलातून भटकंती करणे, वन्यजिवांचा अभ्यास करणे, छायाचित्रण करणे हे
अनेकजण वर्षानुवर्षे करत आले आहेत. अमोल हेंद्रे यांनी आपला कॅमेरा गळ्यात
अडकवून भारतातली जंगलं पालथी घातली आहेत. तसंच दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया,
युगांडा, केनिया, टांझनिया, श्रीलंका या देशातल्या जंगलातून भटकंती केली
आहे. वेगवेगळ्या देशातले दूतावास, तिकडच्या संबंधित संस्था, नेचर क्लब,
फोटोग्राफी क्लब, शासकीय वनखाते या ठिकाणी भेटी देत, तिथे नेटवर्किंग करत
त्या मंडळींना भारतातल्या जंगलांविषयी ते माहिती देतात. परदेशी पर्यटक
भारतातल्या जंगलात कसे येतील याविषयी प्रयत्न करतात. आपली हौस आपल्यापुरती न
ठेवता तिला समाजभानाचं अस्तर त्यांनी लावलं आहे.
ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. असा प्रयत्न यापूर्वी कोणी केला असेल
असं माझ्या माहितीत तरी नाही. हा उपक्रम समजण्यापूर्वी माझी थोडी
पार्श्वभूमी सांगायला हवी. शाळेपासून मी जंगलऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा
भक्त. त्यांना यंदा, 2025 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले. त्यांची जंगलाविषयीची सर्व पुस्तकं मी अनेकदा वाचली आहेत.
त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आधी महाराष्ट्रात अन् भारतात जंगलभ्रमण सुरू
केले. सुरुवातीला मी एकटाच फिरायचो, फोटोग्राफी करायचो. मी काढलेले फोटो
पाहून हळूहळू माझे मित्र आकर्षित होऊ लागले. माझा हुरूप वाढला. मग मी
त्यांच्यासोबत जंगले पालथी घालायला सुरुवात केली. तरी याविषयातली माझी भूक
काही शमेना. पुढे मी विदेशातल्या जंगलांची भटकंती सुरू केली. यात माझे
वरिष्ठ डॉ. प्रा. चेतन पोंक्षे, संतोष यादव, झंकार गडकरी, डॉ अभंग प्रभू,
डॉ. प्रा. मनीषा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.
इंडोनेशियामधील बाली, श्रीलंकेतील कोलंबो, केनिया, युगांडा, दक्षिण
आफ्रिका, इस्रायल, लेक नाकुरू, नैवाषा, अबर डेअर, मसाईमारा, सामोसीर ही
जगभरातली जंगलं धुंडाळली. तिथे मनसोक्त फोटोग्राफी केली. या अनुभवाने मला
वेडं केलं. ते एक अनोखं विश्व आहे. त्याचा संपूर्ण मागोवा घेण्यासाठी माझे
शंभर जन्म अपुरे आहेत.
पणयामुळेजंगलाविषयीसांस्कृतिकआदानप्रदानकसंझालं?
जगातल्या कानाकोपऱ्यात भटकंती करत असताना, फोटोग्राफी करत असताना, जंगलं
अभ्यासत असताना वेगवेगळे प्राणी, आदिवासी माणसं भेटली, झाडं, पानं भेटली.
त्यांची भाषा, जीवनमान, चालीरीती, खाणंपिणं अभ्यासता आले. त्याची मी नोंद
केली. या कालावधीत माझं देशीविदेशी नेटवर्क मस्त तयार झालं होतं. मी भारतीय
पर्यटक असूनही त्यांच्या जंगलांचा अभ्यास करतोय, प्रचार-प्रसार करतोय याचे
त्यांना नवल वाटले. त्यांनी माझे आणि माझ्या कामाचे स्वागत केले. मी
परदेशी जंगलप्रेमींना भारतातल्या जंगलांची वैशिष्टय़े सांगितली. फोटो
प्रेझेंटेशन केले. ते पाहून त्यांनी भारतातल्या व जगातल्या जंगलांचे
फोटोंचे प्रदर्शन आमच्या देशात का भरवत नाहीस, असं विचारलं. त्यानुसार मला
मदतही केली.
याफोटोग्राफीप्रदर्शनांनाकसाप्रतिसादमिळाला?
सर्वप्रथम इंडोनेशियाने त्यांच्या पर्यटन खात्याद्वारे माझ्या फोटोचे
प्रदर्शन बाली येथे भरवले. त्यांना माझ्या बंगाल टायगर्सचे फोटो प्रचंड
आवडले. नंतर ते भारतात जंगलं पाहायला आले. महाराष्ट्र पर्यटन आणि भारत
पर्यटन विभागाला जोडून दिले. बालीतली प्रतिष्ठित ‘तमन देदारी आर्ट गॅलरी’
चाहत्यांनी ओसंडून वाहिली. मग मला श्रीलंका दूतावासातून संपर्क करण्यात
आला. त्यांनी त्यांच्या मुंबईतल्या कार्यालयात प्रदर्शन भरवलं. त्याचा
प्रतिसाद पाहून त्यांनी मला कोलंबोत निमंत्रित केले. अशा प्रकारे जंगलाच्या
माध्यमातून भारताचे इतर देशांशी सांस्कृतिक आदानप्रदान सुरू झाले.
नजीकच्याकाळातनवीनकोणतेप्रकल्पयेऊघातलेआहेत?
यंदा नोव्हेंबर महिन्यात मी लेक तोबा येथील सामोसिरमध्ये एक परिषद
आयोजित करणार आहे. विषय आहे, ‘बंगाली टायगर आणि सुमाट्रन टायगर’. यासाठी मी
भारतीय पर्यटकांना तिथे नेणार आहे. या परिषदेमुळे जागतिक जंगलप्रेमींना
भारतातल्या वाघांबद्दल माहिती मिळेल. अशा प्रकारे आचारविचारांची देवाणघेवाण
होईल. ऑगस्ट मध्ये ‘ग्लोबल वाईल्ड लाईफ नेटवर्किंग समिट’ मी करणार आहे.
nilayvaidya@gmail.com
।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक
सामना ऑनलाईन
8–10 minutes
>> वृषाली साठे
पहलगामसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आजही रावण ही वृत्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्यास आहे.
या वृत्तीला दूर सारायचे तर आपल्यातील राम आणि सीता दोहोंनाही कायम जागृत
ठेवले पाहिजे. उद्या सीतानवमी आहे. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वातील सार आपण
अंगिकारले पाहिजे. सीता हे केवळ नाव वा पौराणिक व्यक्ती नव्हे तर ते
आत्मसन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि कणखरतेचे रूपकच आहे.
सीतामाईची कहाणी आता सोमा सांगू लागते. वनवासात असताना रामजी ज्या-ज्या
प्रदेशातून गेले, तेथील राक्षसांचा त्यांनी नायनाट केला. राक्षसांमुळे
कोणाचा लहान मुलगा गेला होता तर कोणाचा भाऊ, कोणाची आई, तर कोणाचे बाबा
गेले होते. काहीजण तर सर्वस्व हरवून बसले होते. त्या लोकांना सीतामाईंने
भावनिक आधार दिला. त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना प्रेमाने खाऊ
घालायच्या. त्यांना वनऔषधींची चांगली माहिती होती. त्या औषधांचा वापर करून
त्या स्वयंपाक बनवायच्या. मानसिक सामर्थ्य देऊन त्यांनी लोकांना आनंदाने
जगायला शिकवले.
आजच्या काळात एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तर पोलीस, न्यायालय तिला
न्याय मिळवून देते. पण तिच्या मानसिक अवस्थेचे काय? कोणीतरी प्रेमाने जवळ
घेऊन दुःख हलके करायला लागतेच ना? आज जर मानसिक उपचारांची एवढी गरज आहे, तर
त्या काळात राक्षसांनी केलेला विध्वंस पाहता किती भयानक काळ असावा!
जंगलातील लोकांना शेती करायला सीतामाईंने शिकवले. जर कोणाला बरे नसेल तर
त्या औषध द्यायच्या. शिवाय लोकतंत्र शिकवून त्यांना आत्मनिर्भर देखील
करायच्या.
प्रत्येक वेळी जंगलात त्यांना खायला काही मिळेलच असे नव्हते. मिळेल त्या
अन्नात ते तिघे जेवायचे व एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. चित्रकूट सोडून
पंचवटीला येईपर्यंत रामजी आणि लक्ष्मणजी यांनी अनेक राक्षसांना यमसदनी
पाठवले. आश्रमातले ऋषी, शिष्यगण यांनादेखील निर्भय बनवून त्यांची घडी
पुन्हा बसवून दिली. मिथिलेत जनकबाबांमुळे सीतामाईंना शास्त्र चर्चामध्ये
खूप रस होता. त्यामुळे रामजी व सीतामाई बरोबर ऋषींच्या शास्त्रचर्चा भरपूर
रंगायच्या.
रामजी आणि लक्ष्मणजी सीतामाईची खूप काळजी घ्यायचे. त्यांनी सांगितलेले
औषधोपचार करायचे. सीतामाई राजमहालात जशा आनंदात राहायच्या त्यापेक्षा
जास्त आनंदात त्या जंगलातल्या पर्णकुटीत राहायच्या. रामजी आणि सीतामाई
जेव्हा पंचवटीत आले, तेव्हा तिथला निसर्ग खूप सुंदर होता. तिथे त्यांची
मुलगी गोदावरी नदी होती. सीतामाई जेव्हा गोदावरीच्या तीरावर येऊन बसायच्या,
तेव्हा गोदावरी त्यांचे पाय धुवायची. सुंदर फुले व वनऔषधी स्वतच्या
पाण्याबरोबर वाहून आणत सीतामाईंना अर्पण करायची. पण वरून सुंदर, लोभस
वाटणाऱया पंचवटीत आतून काहीतरी बिनसलेले नक्कीच होते. हे दोघांनाही जाणवले
होते.
ऋषी-मुनी श्रीरामांना भेटायला येत व सांगत की राक्षसराज रावण महादेवाची
भक्ती करून खूप प्रबळ झाला आहे. त्याला अनेक वर मिळाले आहेत. खूप सिद्धी,
मंत्र, तंत्र, विविध अस्त्र त्याच्याकडे आहेत. त्याचा तो दुरुपयोग करतो
आहे. दंडकारण्याला त्याने त्याचा प्रमुख तळ बनवले आहे. इथे त्याचे प्रमुख
सेनापती राहतात. ते आम्हाला खूप त्रास देतात. रावणाला उत्तरेकडे आक्रमण
करायचे आहे. म्हणूनच दक्षिणेत हा तळ त्याने खूप मजबूत बनवला आहे. त्याचे
सेनापती आम्हाला सतत त्रास देतात. आमच्या आश्रमाची विटंबना करतात. इतके
दिवस आम्हाला अवगत असणाऱया मंत्रांनी आम्ही आमच्या आश्रमाची सुरक्षा करत
होतो. पण रावणाकडे आमच्या प्रत्येक मंत्रावर प्रतिमंत्र असतो. त्यामुळे
आमचे मंत्र तेवढे प्रभावी ठरत नाही. रावणाने निसर्गात केलेल्या
ढवळाढवळीमुळे काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. आम्हाला जगणे खूप कठीण होत
चालले आहे. आमचे रक्षण करा. लक्ष्मणजी चिडून म्हणाले की आपण थेट रावणावर
हल्ला करू. पण श्रीराम यांनी त्यांना समजावले की आपल्याकडे रावणावर हल्ला
करायला ठोस कारण नाही आणि आपल्याकडे याचा पुरावाही नाही की रावण हे सर्व
सेनापतींमार्फत घडवून आणत आहे. कारण रावण कुठलाच पुरावा मागे ठेवत नसे.
आजकाल आपण एखाद्या बातमीवर लगेच चिडून व्यक्त होतो. ऐकीव बातम्यांवर
विश्वास ठेवतो. त्याची शहानिशा करत नाही. श्रीराम त्यांच्याकडून खूप काही
शिकण्यासारखे आहे जे आपल्याला जगात वावरायला उपयोगी पडेल. ते तिघे जेव्हा
अगस्त्य मुनींना भेटायला गेले तेव्हा त्यांची पत्नी महातपस्विनी
लोपामुद्राने त्यांना रावणाबद्दल अधिक माहिती दिली. रावण एवढा प्रबळ झाला
आहे की तो त्याच्या तपर्श्च्येच्या बळावर मिळवलेल्या शक्तीच्या सहाय्याने
कोणाच्याही बुद्धीत शिरून त्यांचे विचार केवळ ओळखत नव्हता तर त्यात त्याला
हवे तसे बदलही घडवून आणू शकत होता. लोपामुद्राने श्रीराम आणि सीतामाईंना
काही मंत्र व मुद्रा शिकवल्या आणि सांगितले की याचा उपयोग अगदी टोकाच्या
क्षणी करा. कारण हे मंत्र अतिसंहारक आहेत. तुम्ही मनाने आणि बुद्धीने खूप
खंबीर आहात. हे मंत्र तुमच्या बुद्धीत शिरून वाचायला रावणाला जमणार नाही.
माता अनुस्येने आपल्या पूर्ण ध्यानाचे फल सीतामाईंना दिले होते. त्यामुळे
असीम शक्ती आणि सुरक्षा सीतामाईंना मिळाली. माता लोपामुद्रेने मंत्र आणि
मुद्रा सीतामाईना स्वत च्या रक्षणासाठी दिल्या. श्रीरामाची बाह्य युद्धाची
तर सीतामाईची आंतरिक युद्धाची तयारी होत होती. त्यांचा शेवटी सामना रावणाचा
सेनापती खरदूषण याच्याशी झाला. श्रीरामांनी एकटय़ाने त्याला पराभूत केले.
पण एक गोष्ट त्यांना लक्षात येते की या युद्धात वापरलेली अस्त्र-शस्त्र
आधीच्या युद्धांपेक्षा खूप वेगळी आहेत. जर सेनापतीकडे अशा प्रकारची
अस्त्र-शस्त्र असतील तर रावणाकडे कोणत्या प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील?
याबद्दल श्रीराम सजगतेने विचार करू लागले. जसजसे रावणाचे सेनापती मारले जाऊ
लागले, तसतसे रावण अधिक सैन्य पंचवटीत पाठवू लागला. पंचवटीमधील वातावरण
अशांत बनत चालले होते. पशुपक्षी, जीव-जंतू या सगळ्यावर यांचा परिणाम दिसत
होता.
सोमा कलशातील अग्निद्वारे हे सगळे पाहू व अनुभवू शकत होती. तिला
सीतामाईची खूप काळजी वाटत होती. पण सीतामाईची काळजी करणारी ती एकटीच
नव्हती. अयोध्यामध्ये सर्वच स्त्रिया शरयू नदीवर पहाटे येऊन एकत्र
सीतामाईच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायच्या. अगदी सीतामाई वनवासात गेल्या
तेव्हापासून. महामुनी अनुसूया, लोपामुद्राचे आशीर्वाद आणि अनेक
स्त्रियांच्या प्रार्थनेचे सुरक्षा कवच सीतामाईच्या भोवती होतेच. अशातच
शूर्पणखेची या कथेत एन्ट्री झाली. रावणाची बहीण शूर्पणखा ही मायावी होती.
एकदा लक्ष्मणाला बरे नव्हते म्हणून सीतामाई औषधी झाडपाला शोधण्यासाठी
जंगलात खूप आतपर्यंत गेल्या. औषधी घेऊन येताना त्यांना एका स्त्राrच्या
रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्या गेल्या तेव्हा त्यांना एक
स्त्राr पार्वतीमातेच्या मूर्तिसमोर बसून रडताना दिसली. सीतामाईंनी तिला
रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझं नाव चंद्रिका. माझे पती
योगी आहेत. आमचा एक आश्रम होता. खूप विद्यार्थी आमच्या आश्रमात शिकायचे.
एकदा माया नावाची एक सुंदर स्त्राr आमच्या आश्रमात आली. तिचे वडील मोठे
योगी असल्याचे तिने आम्हाला सांगितले. तिच्या अंगाला खूप सुगंध येत होता.
तिने आणलेला पक्वान्न तिने सर्व पुरुषांना खायला घालून भुलवले. एक दिवस
माझे पती तिच्याबरोबर मला सोडून निघून गेले. तेव्हापासून मी अशी एकटी आहे.
मला आत्महत्या करायची होती. पण पार्वती मातेने मला अडवले. मी जगून तरी काय
करू? माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.’ ते ऐकून सीतामाई म्हणाल्या, ‘तुझा
पती तुला सोडून दुसऱया स्त्राrच्या मागे गेला हे चुकीचेच आहे. पण माझ्या
बाबांनी मला सांगितले होते की स्त्राrचा पहिला धर्म म्हणजे स्वतचा
आत्मसन्मान राखणे. नंतर पत्नीधर्म. तू स्वत खंबीर हो. तू तुझ्या आध्यात्मिक
प्रगतीकडे लक्ष दे. मी तुला श्वासावर आधारीत काही ध्यानपद्धती शिकवते.’
चंद्रिका म्हणाली, ‘हीच पद्धत माया सर्व आश्रमात वापरते. ही रावणाची बहीण
शूर्पणखा आहे. हिच्यामुळे आजपर्यंत कित्येक संसार उध्वस्त झाले. कितीतरी
स्त्रियांनी आत्महत्या केल्या. तिला या भागातील सर्व गुरुकुले नष्ट करायची
आहेत.’ सीतामाई म्हणाल्या, ‘हिला हिच्या कर्माची फळे याच जन्मी भोगावी
लागतील.’
चंद्रिकाला सांत्वना देऊन सीतामाई कुटीत परतल्या. श्रीराम व लक्ष्मणजी
तिची वाटच बघत होते. जेवण झाल्यावर रामजींने सकाळी झालेली घटना सांगितली.
ते शेजारच्या गावी गेले असता त्यांना नदीत एका योग्याचे शव दिसले. गावात
चौकशी केल्यावर कळले की तो योगी चांगल्या चारित्र्याचा नव्हता. ते शव बाहेर
काढण्यासाठी मदतीला कोणीच पुढे आले नाही. शेवटी रामजींने एकटय़ानेच ते शव
बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले. ‘कोण योगी होता तो माहीत नाही,’
रामजी म्हणाले.
तेव्हा सीतामाईने त्यांना चंद्रिकेची कहाणी सांगितली. रामजींनी केलेल्या
वर्णनावरून सीतामाईची खात्री पटली की तो योगी चंद्रिकेचा नवरा होता.
सीतामाईंना चंद्रिकेला हा समाचार कसा द्यायचा याचा प्रश्न पडला. त्या
ध्यानाला बसल्या आणि त्यांच्या सूक्ष्म रूपाने चंद्रिकेजवळ गेल्या.
चंद्रिकेच्या भौतिक शरीराला सीतामाई दिसत नव्हत्या. तेव्हा तिथे माता
पार्वती प्रगट झाल्या. तिने दिलेल्या दिव्य दृष्टीने चंद्रिका सीतामाईला
बघू लागल्या. सीतामाईने तिला तिच्या नवऱयाच्या मृत्यूची बातमी देताच
चंद्रिकेला शोक अनावर झाला. सीतामाई तिला म्हणाल्या की, ‘तुझ्या नवऱयाला
शांतपणे त्याचा पुढचा प्रवास करू देत. तुझ्या शोकाने त्याला अडवू नकोस.’
यातून सीतामाई आपल्याला सांगतात की, आपली प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून
देवाघरी गेली, तर देवाकडे त्याच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करा. तुमच्या
प्रेमाचे बंधन घालून त्यांची गती अडवू नका.
vrishali.sathe@gmail.com
अनवट काही- बौद्धधर्माचा सर्वांगीण परिचय
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> अशोक बेंडखळे
बौद्ध धर्माचा जन्म भारतात झाला, मात्र या मानवतावादी धर्माचा प्रसार
इतर देशांत अधिक झाला, एवढे आपल्याला माहीत असते. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध
धर्म स्वीकारल्यानंतर तो आपल्याकडे चर्चेत आला. त्यादृष्टीने ‘बुद्ध धर्म
आणि संघ’ (1910) हे विद्वान प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे छोटेखानी पुस्तक
संदर्भासहित चांगली माहिती देणारे आहे. कलाप्रेमी सयाजीराव गायकवाड यांनी
आयोजित केलेल्या तीन व्याख्यानांचे संकलन म्हणजे हे पुस्तक असून ते मनोरंजक
ग्रंथप्रसारक मंडळी गिरगाव मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाचे तीन भाग आहेत. बोधिसत्व म्हणजे बुद्ध, त्याचा बौद्ध धर्म
आणि बुद्धाला मिळालेला अनुयायी शिष्यगण म्हणजे संघ होत. बोधिसत्वाचे
थोडक्यात चरित्र असे – कपिलवस्तू शहरात इ.स. 600 वर्षांपूर्वी शाक्य राजाचे
राज्य होते. शुद्धोधन नावाच्या राजाला दोन राण्या, मायादेवी व
महाप्रजापती. मायादेवी माहेरी जात असता लुंबिनी नावाच्या वनात ती प्रसूत
होऊन तिला मुलगा झाला तो म्हणजे बोधिसत्व, जो पुढे बुद्ध नावाने प्रसिद्धीस
आला. त्याच्या जन्माच्या वेळी अद्भुत चमत्कार घडल्याला काही आधार नाही.
बोधिसत्वाच्या विवाहाचा त्रिपिटक ग्रंथात उल्लेख नाही. तथापि 29 व्या वर्षी
त्याने गृहत्याग करून अरण्यवास पत्करला.
बोधिसत्वाच्या गृहत्यागाविषयी त्रिपिटकात आधार सापडतो. बोधिसत्वाला
राहण्यासाठी तीन प्रासाद होते तरी त्याला कोंडले नव्हते. सर्व प्रकारची
साधन सुखे असूनही त्याचे समाधान झाले नाही. जराव्याधी मरणाच्या उग्र
स्वरूपांची कल्पना त्याच्या मनात दृढ होत गेली आणि त्याचा तारुण्य, आरोग्य व
जीवित यांचा मद नाहीसा झाला. बोधिसत्व गृहत्याग करून राजगृहनगरास आला.
पुढे त्याचे माराशी भांडण होते व त्याचा पराभव करून धर्ममार्ग शोधून
काढल्यावर बोधिसत्व बुद्ध झाला. सात दिवस आसनावर बसून त्याला धर्मज्ञान
प्राप्त झाले. ब्रह्मदेवाने त्याला धर्मेपदेश करण्यास सांगितले. (ब्रह्मदेव
म्हणजे मैत्री, करुणा अशा चार श्रेष्ठ मनोवृत्ती होत) बुद्धाला पहिला
शिष्य मिळाला तो कौंडिल्य. पुढे त्याला आणखी चार भिक्षु शिष्य मिळाले. असे
बुद्धाला अनेक शिष्य मिळाले आणि वयाच्या 80 व्या वर्षी कुसिनारा इथे त्याचे
परिनिर्वाण झाले.
धर्म या दुसऱया भागात बौद्ध धर्म म्हणजे काय, त्याचे विवेचन आहे.
बुद्धाने गृहस्थ व गृहिणी यांच्यासाठी करण्यास सांगितलेल्या गोष्टी
विहितशीलमध्ये येतात तर निषिद्धशीलमध्ये वर्ज्य गोष्टी येतात, त्या अशा-ः
माणसाला चांगल्या रीतीने वागवणे, गुरूजनांची सेवा करणे, प्राणी हिंसेविषयी
संयम करणे व दानधर्म करणे. निषिद्धशील म्हणजे प्राणघात, चोरी न करणे, खोटे न
बोलणे, दारू आदी मादक पदार्थांचे सेवन न करणे या गोष्टी बौद्ध
म्हणवणाऱयाने वर्ज्य कराव्यात. तसेच कायावाचामने दहा पापांचा त्याग करणे ही
मुख्य गोष्ट आहे, ती म्हणजे प्राणदान, अन्नदान व व्यभिचार (तीन कायिक
पापे) असत्य भाषण, चहाडी, कठोर भाषण व व्यर्थ बडबड (चार वाचिक पापे)
परद्रव्यासक्ती, क्रोध व नास्तिकता (तीन मानसिक पापे) ज्याला आपले शील
पूर्णत्वाला न्यायचे असेल आणि त्याने या दहा पापांचा त्याग अवश्य केला
पाहिजे असे बौद्ध धर्म म्हणतो.
संघ या तिसऱया भागात धर्मासाठी भ्रमण करणारे भिक्षुगण वा संन्यासी
याविषयी विवेचन आहे. प्रारंभी बुद्धाला पाच भिक्षू मिळाले. बुद्ध
भगवंताच्या उपदेशाने पुढे साठ भिक्षू आले आणि बुद्धाने त्यांना स्वत दीक्षा
दिली. भिक्षू संघाचा बहुमान होऊ लागला. अनेकजण लाभासाठी सामील होऊ लागले
म्हणून बुद्धाने नियम केले. त्यात भिक्षान्नावर अवलंबून राहणे, झाडाखाली
राहणे. गोमूत्राच्या औषधावर निर्वाह करणे, मिथुन व्यवहार करू नये, चोरी करू
नये. प्राणघात न करणे (त्यात किडा, मुंगीही येतात) अशा बाबी येतात.
बुद्ध धर्म वेगळा ठरतो तो पुढील काही बाबींसाठी. तिथे जातीभेद
प्रारंभापासून नव्हता. कुणी जातीमुळे नाही तर कर्माने चांगला वा वाईट होतो
हे तत्त्व बुद्धाने भिक्षुसंघास लागू केले होते. स्त्रियांसाठी भिक्षुणी
संघ स्थापन करून त्यांना सर्व धर्मग्रंथ (त्रिपिटक इ.) वाचण्याची मोकळीक
दिली.
बौद्ध धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे आणि तो सर्वांनी स्वीकारायला
हवा असे डॉ. आंबडेकर म्हणतात तेव्हा ते पटते. कारण हा वास्तववादी धर्म आहे.
मानवाला अनुभवता येत नाही वा अस्तित्व सिद्ध करता येत नाही. अशा कोणत्याही
गोष्टीवर बुद्ध भगवंताचा विश्वास नव्हता. ही जाणीव देण्यास हे छोटे, पण
महत्त्वाचे पुस्तक नक्की यशस्वी ठरते.
ashok.bendkhale@gmail.com
संस्कृती-वैभव – श्रीरामाच्या बहिणीचे मंदिर
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> वर्षा चोपडे
पुराणात उल्लेख असलेली रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि
बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात
शांतादेवीचा उल्लेख आढळतो. हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात
शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत.
कोण होती भगवान रामाची बहीण? फार कमी लोकांना माहिती आहे की, भगवान राम
यांना एक मोठी बहीणदेखील होती. पुराणात उल्लेख असलेली हिंदू महाकाव्य
रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती.
वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो.
पौराणिक कथेनुसार, भगवान रामाच्या जन्मापूर्वी दशरथ आणि कौसल्या यांना
एक शांता नावाची मुलगी होती. राजा अंगराज रोमपाद आणि राणी वर्षिनी (रामाची
मावशी) यांना मूलबाळ नव्हते. राजा रोमपाद शांताचे तेजस्वी रूप व युद्धातील
ज्ञान ऐकून प्रभावित झाले. आपल्याला अशीच कन्या असावी अशी इच्छा त्यांनी
राजा दशरथासमोर प्रगट केली. विशाल मनाच्या राजा दशरथाने आपली कन्या उदारपणे
राजा रोमपाद आणि राणी वर्षिनी यांना दत्तक दिली. राजकुमारी शांता दोघा
राजाराणीची अत्यंत लाडकी होती. एकदा एक ब्राह्मण राजाकडे मदतीसाठी आला असता
राजाने त्या ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो ब्राह्मण क्रोधित
झाला. रोमपादाच्या राज्यात दुष्काळ पडेल असा त्याने शाप दिला. इंद्राने
रोमपादाच्या अंगदेशात पाण्याचा वर्षाव बंद केला आणि दुष्काळ पाडला.
त्यानंतर यातून मुक्तता मिळवण्यासाठी राजा रोमपादने शृंगी ऋषींना यज्ञ
करण्यास विनंती केली. शृंगी ऋषी हे विभांडक ऋषी व अप्सरा उर्वशी यांचे
पुत्र होते. शृंगी ऋषींच्या डोक्यावर शिंग होते, म्हणून त्यांचे नाव
ऋष्यशृंग पडले. शृंगी ऋषी हे कश्यप ऋषींचे नातू असल्याचेही म्हटले जाते.
त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते श्रंगेरी, सध्या कर्नाटकात आहे.
श्रंगेरीजवळ त्याच नावाचा एक पर्वतदेखील आहे. शृंगाच्या जन्मानंतर उर्वशी
स्वर्गात निघून गेली. या फसवणुकीमुळे विभांडक दुखावला गेला. त्याला
स्त्रीचा द्वेष वाटू लागला आणि त्याने आपला मुलगा ऋष्यशृंगावर स्त्रीची
सावलीही पडू न देण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने ऋष्यशृंगाचे संगोपन
जंगलात केले. ते जंगल अंगदेशच्या सीमेला लागून होते. तीव्र क्रोधाचे परिणाम
अंगदेशाला भोगावे लागले, तिथे भयानक दुष्काळ पडला. शृंगी ऋषींच्या
तपश्चर्येत इतकी शक्ती होती की, ते भगवान इंद्राला प्रसन्न करू शकत होते
आणि त्यांना हवा तेव्हा पाऊस पाडू शकत होते. अंगराज रोमपाद यांनी ऋषी आणि
मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि असा निष्कर्ष काढला की, जर ऋष्यशृंगाला
अंगदेशाच्या भूमीवर आणले तर त्यांची समस्या दूर होईल. म्हणून राजाने
ऋष्यशृंगाला प्रसन्न करण्यासाठी देवदासींची मदत घेतली; कारण शृंगाने
त्याच्या जन्मानंतर कधीही स्त्री पाहिली नव्हती… आणि नेमके तेच घडले.
अंगदेशात शृंग ऋषीचे मोठय़ा आनंदात स्वागत करण्यात आले; परंतु विभांडकच्या
रागाच्या भीतीने रोमपादाने ताबडतोब आपली मुलगी शांताचा हात ऋष्यशृंगाच्या
हाती सोपवला. यज्ञानंतर इंद्रदेवाने दुष्काळ दूर केला. याच शृंगी ऋषी यांनी
गुरू वशिष्ठांच्या विनंतीवरून राजा दशरथाकरिता उत्तर प्रदेशातील बस्ती
जिह्यातील मखौडा धाम मनोरमा नदीकाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता.
यज्ञादरम्यान माता शांता यांनी 45 दिवस देवी शक्तीची पूजा केली. त्यानंतर
काही महिन्यांनी भगवान राम आणि त्यांच्या तीन भावांचा जन्म झाला. ऋषी
शृंगाने अश्वमेध यज्ञ केला ते ठिकाण अयोध्येपासून सुमारे 38 किमी पूर्वेस
होते.
हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल राज्यात शांतादेवीची दोन मुख्य
मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर
हरैया तहसील परिसरात एक ठिकाण आहे, ज्याचे नाव शृंगिनारी आहे. त्रेतायुगात
माता शांता तिथल्या घनदाट जंगलात राहत असत आणि पूजा-अर्चा करत असत. येथे
शृंगी ऋषींनी बांधलेले माता शांताचे एक मोठे मंदिर आहे. हे एक सिद्ध ठिकाण
आहे. देशभरातून इथे भक्त येतात. प्रार्थना करतात आणि देवी तिच्या
भक्तांना आशीर्वाद देत त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हटले जाते. या
मंदिरात देवी शांता आणि त्यांचे पती शृंग ऋषी यांची एकत्र पूजा केली जाते.
असे म्हणतात, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मंदिर शांतादेवीचे
निवासस्थान होते. हिमाचल राज्याच्या कुल्लूपासून 50 किमी दूर असलेले हे
मंदिर दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय लाकडी
वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे
की, या मंदिरात मनापासून पूजा करणाऱया भक्तांना भगवान राम, त्यांची बहीण
शांता व शृंगी ऋषी यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदुस्थानातील दक्षिणेकडील काही
भागांत भगवान रामाची बहीण शांता ही पूजनीय आहे. याच शृंगी ऋषीचे मंदिर
प्रामुख्याने बिहारमधील लखीसराय येथे आणि छत्तीसगडमधील धमतरी येथेही आहे.
लखीसराय मंदिर, बाबा शृंगी ऋषी धाम, सूर्यगढ प्रखंडमध्ये स्थित आहे. हे
मंदिर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले आहे. शृंगी ऋषी हे राजा दशरथ यांचे जावई
आणि भगवान श्रीराम यांचे मेहुणे होते. असे मानले जाते की, भगवान रामाने ऋषी
शृंगीच्या आश्रमात रावणाशी युद्ध करण्याची योजना आखली होती. पौराणिक
कथेबाबत अनेक मतभेद असले तरी शांता ही प्रभू रामचंद्राची मोठी बहीण होती
असे सांगितले जाते.
varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
भटकंती – डर के आगे जीत है!
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> हेमलता जाधव
भटकंतीचा आनंद आपण सारेच घेत असतो, परंतु ही भटकंती थरारक अनुभव देणारी
ठरणार असेल तर तो अनुभव औरच म्हणायला हवा. कुडाळ तालुक्यातील बारमाही
कोसळणाऱ्या पालमळई येरम धबधब्याचे रौद्र रूप आणि तिथला निसर्ग न्याहाळत
सत्तर फूट उंचीवरून रॅपलिंग करण्याचा आनंद वेगळी अनुभूती देणारा ठरला.
जीवन म्हणजे रोजचा नवीन खेळच! आयुष्यात येणाऱ्या चांगल्या – वाईट
गोष्टी, नवनवीन संकटे यांना तोंड देत प्रवास करायचा. त्यातूनच ऊर्मी येते
ती काहीतरी वेगळे करायची. धाडसी निर्णय घेण्याची ऊर्जा मिळते ती जीवनाच्या
संघर्षातूनच! असाच एक अनुभव घेण्याची संधी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या
माध्यमातून मिळाली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव
खोऱ्यात कडेकपाऱ्यातून बारमाही कोसळणाऱया पालमळई येरम धबधब्याच्या
डोक्यावरून निसर्ग न्याहाळण्याची मजा काही औरच आहे.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पालमळई येरम धबधबा येथे सर्व
सदस्यांची सहल आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळीच सहा वाजता छोटा भाऊ
प्रसाद आणि मी कुडाळहून निघालो. कुडाळपासून साधारणतः 30 किमी अंतरावर
हळदीचे नेरूर गावापासून पुढे पाच किमी अंतरावर पालमळई येथे श्री क्षेत्रपाल
मंदिर या ठिकाणी रस्ता संपतो. तेथूनच सुरू होतात सह्याद्रीच्या डोंगररांगा
आणि निसर्गाच्या कुशीतील सुंदर प्रवास. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सर्व
सदस्य या ठिकाणी एकत्र जमलो. श्री क्षेत्रपाल मंदिरात जाऊन दर्शन घेऊन
सर्वांनी येरम धबधब्याच्या दिशेने आगेकूच केली. जंगलातील पायवाट तुडवत 15
ते 20 मिनिटे चालून गेल्यानंतर धबधबा नजरेस पडतो. धबधब्याकडे जाणारी पायवाट
अजिबात दमछाक करत नाही. धबधब्याच्या परिसरात उंबराची अनेक झाडे
निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकतात. या ठिकाणी मानवाचा विशेष वावर नसल्यामुळे
घनदाट जंगलातील शांतता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे
अनुभवता येतात. भर उन्हाळ्यात 90 फूट उंचीवरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह,
खडकावर आदळून उडणारे तुषार शरीराला आणि मनाला रोमांचित करतात.
येरम धबधब्याच्या वर जाऊन मोठ्या उंचीवरून दोरीच्या सहाय्याने खाली
उतरणे (रॅपलिंग) हा खरे तर धाडसी आणि तितकाच रोमहर्षक अनुभव होता. दुर्ग
मावळा प्रतिष्ठानचे अॅडव्हेंचर विभागप्रमुख संदेश गोसावी, गणेश नाईक,
समील, रोहन, विशाल यांनी धबधब्याच्या वर जाऊन सुरक्षितरीत्या रॅपलिंगची
सर्व तयारी केली. सर्वात आधी गोसावी यांनी (रॅपलिंग) खाली उतरत अंदाज
घेतला. टीममधील सर्वांच्या सुरक्षेची खात्री करणे ही प्रमुखाची जबाबदारी
असते याची प्रचीती या वेळी दिसून आली. त्यानंतर आम्हा महिलांना म्हणजे
गार्गी नाईक, समृद्धी आणि मी एवढय़ा उंचीवर निसरडय़ा वाटेवरून (क्लायंबिंग)
करत वर घेऊन जाणे खचितच सोपे नव्हते, परंतु गोसावी यांनी आम्हाला
प्रोत्साहन देत, प्रसंगी हात देत, क्लायंबिंगची बेसिक कौशल्ये शिकवत वर
नेले. त्या वेळी मनाला झालेला आनंद शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही.
धबधब्याच्या वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर म्हणजे अद्भुत पर्वणीच.
रॅपलिंगसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी केल्यानंतर प्रमुखांनी महत्त्वाच्या
प्राथमिक गोष्टी सांगून खाली उतरण्यास (रॅपलिंग) प्रोत्साहन दिले.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानमधील सर्व सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे सत्तर फूट
उंचीवरून रॅपलिंग करण्याचा अविस्मरणीय आनंद आणि अनुभव माझ्यासह सर्वांना
घेता आला. मनात कोणतीही भीती न बाळगता हा विलक्षण अनुभव मी घेऊ शकले. ‘डर
के आगे जीत है’ हे केवळ टीव्हीवरील जाहिरातीत पाहिले होते. मात्र
यानिमित्ताने ते प्रत्यक्षात अनुभवता आले.
रॅपलिंग झाल्यानंतर धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. वन भोजनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
सुखाचे कव्हरेज क्षेत्र
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी असे शांत वातावरणात निसर्गाच्या
कुशीत जाऊन पहुडण्याचा आनंद फार वेगळाच असतो. तिथे भलेही मोबाईलला रेंज
नसेल. मात्र तुमच्या मनाला मिळणारे शांती, सुखाचे आणि समाधानाचे कव्हरेज
क्षेत्र मात्र नक्कीच भरभरून प्रेम देते. हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी
सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच जायला हवे. जीवनातील खऱयाखुऱया
तृप्तीचा आनंद मिळवायचा असेल तर अशा ठिकाणांची सफर केव्हा ना केव्हा तरी
व्हायलाच हवी.
शब्दांकन : स्वप्नील साळसकर
पाऊलखुणा – शिवचरित्राचा मागोवा
सामना ऑनलाईन
6–7 minutes
>> रोहित पवार
परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही.
चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसपासून ते
अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को
पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलाने
भरलेल्या नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या.
त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा
उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून
घेताना या परदेशी प्रवाशांच्या नोंदी तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात.
‘कुतूहल’… माणसाला जगण्याची प्रेरणा देणारा हा शब्द. दगडी हत्यारे
बनविणाऱ्या अश्मयुगीन माणसाने पुढे चंद्रावर पाऊल ठेवले. हा संपूर्ण प्रवास
या कुतूहलाचाच. युगानुयुगे याच कुतूहलाने प्रेरित होऊन मानवाने अज्ञात
क्षितिजांचा वेध घेतला आहे. पलीकडचे जग कसे असेल? तिथले लोक कसे असतील,
त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली आपल्यापेक्षा वेगळी असेल का? अशा अगणित
प्रश्नांनी मानवी मनात काहूर उठवले आणि याच अतृप्त जिज्ञासेपोटी काही
धाडसी माणसे आपल्या ज्ञात जगाच्या सीमा ओलांडून अज्ञात वाटा तुडवत निघाले.
समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन आणि दूरवरच्या दुर्गम भूभागांना तुडवत
हे प्रवासी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांच्यापैकी काही
भारतभूमीकडेही आले. परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन
नाही. चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस पासून
ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को
पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलपूर्ण
नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. असे काही क्षण
नोंदवून ठेवण्याच्या त्यांच्या सवयीतून त्यांनी तत्कालीन भारताचे जे चित्र
रेखाटले, उद्या त्या नोंदींकडे जग ‘इतिहास’ म्हणून बघणार आहे याची बहुतांशी
प्रवाशांना जाणीवही नसावी. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना
भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. ते केवळ प्रवासी
नव्हते तर ते भूतकाळाचे साक्षीदार होते!
शिवकाळात अनेक परकीय प्रवासी महाराष्ट्रात येऊन गेले. यात काही प्रवासी
होते, काही वैद्य, काही धर्मप्रसारक, काही व्यापारी तर काही अधिकारी
लोकसुद्धा. काही जण थोडे दिवस इथे राहिले तर काही कायमचेच या भारतभूमीशी
एकरूप झाले. या लोकांनी ज्या घटनांची, व्यक्तींची नोंद केली त्यात छत्रपती
शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि ही सर्व माहिती
अपरिचित तर आहेच, पण महत्त्वपूर्णदेखील आहे. शिवाजी महाराज हयात असतानाच
त्यांची कीर्ती दूर युरोपपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या पराक्रमी
कार्यांनी, धाडसी कृत्यांनी आणि चलाखीने समकालीन परदेशी इतिहासकारांच्या
लेखनात स्थान मिळवले होते. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इटालियन लेखक
मराठय़ांचे नाव जगात प्रसिद्ध होण्याआधीच शिवाजी महाराजांचे वर्णन करत
होते. त्यापैकी काही जणांनी ओळखले होते की, शिवाजी महाराज हे फक्त बंडखोर
सरदार नव्हते तर ते एक थोर सेनानी आणि त्याहूनही महान राजनीती धुरंधर होते.
या बुद्धिमान निरीक्षकांमुळेच आपल्याला या मराठा वीराची सर्वात जुनी
चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अचूक माहिती किंवा
निष्पक्ष इतिहासाची अपेक्षा करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्यासाठी अनेक
रंजक किस्से, तेव्हाच्या चर्चा आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा काही
सत्य घटनांचा खजिना जतन करून ठेवला आहे. तब्बल 100 वर्षांपूर्वी बंगालचे
साक्षेपी इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’
हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये अशाच परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
केलेल्या नोंदींचा समावेश केला होता.
इतिहासाचा अभ्यास करत असताना माझ्या मनात सारखे यायचे की, सेनांचे हे
‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हे पुस्तक एक वेगळी दृष्टी देणारे आहेच,
परंतु ते इंग्रजीतच राहिल्याने अपरिचित राहिले आहे. जर हे मराठीमध्ये असते
तर किती सोपे झाले असते आणि मग विचार आला की, हे काम आपणच का करू नये?
म्हणून मग मी सदर पुस्तकाच्या अनुवादाच्या कामाला लागलो. या पुस्तकात परकीय
लोकांनी केलेल्या समकालीन नोंदी आहेत, यात संक्षिप्त-दीर्घ अशी
शिवचरित्रेही आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अन्य कोणत्याही ग्रंथांप्रमाणे
भावानुवाद करून चालणार नव्हते. साधन ग्रंथांचे भाषांतर काटेकोरपणे करून तो
साधन ग्रंथाप्रमाणेच मांडणे आवश्यक होते. अखेरीस ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ
राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ गेल्या महिन्यात 15 मार्च 2025 रोजी प्रकाशित
झाला.
या पुस्तकात ‘कॉस्मी द ग्वार्द’ याने लिहिलेले पोर्तुगीज भाषेतील
शिवचरित्र आहे, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधराच वर्षांत
लिहिले होते. या पोर्तुगीज शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून
मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराज
आपल्या सैनिकांना भरघोस पगार देत ही गोष्ट या शिवचरित्रात नोंदवली आहे.
पुढे या पुस्तकात फ्रांस्वा व्हॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याची नोंद आहे, जी
शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरत लुटीचा वृत्तांत सांगते. महाराज कसे
दिसायचे, याचे वर्णन करणारा फ्रेंच प्रवासी ‘थिवेनो’ याचाही समावेश
पुस्तकात केला आहे.
‘अॅबे कॅरे’ हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात भारतात येऊन गेला. तो शिवाजी
महाराजांच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्याची मराठा अधिकाऱ्याशी भेट
झाली. या चर्चेदरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या
आहेत. कोकणातून प्रवास करताना या कॅरेने टिपलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे
स्वप्न आणि हेरगिरीचे रहस्य वाचण्यासारखे आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळा
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पार पडला. या सोहळ्याचा साक्षीदार हेन्री
ऑक्सिडेन हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याची रोजनिशी या पुस्तकात दिली
आहे. याशिवाय सध्या चर्चेत असणारी ‘मार्टिनची डायरी’देखील या पुस्तकात
तुम्हाला वाचायला मिळेल. या डायरीत शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या
अतिशय महत्त्वाच्या मोहिमेच्या घटनांचा समकालीन वृत्तांत वाचायला मिळतो.
याशिवाय अनेक अप्रकाशित डच पत्रांचासुद्धा समावेश या पुस्तकात केला आहे.
आज मराठय़ांच्या इतिहास संशोधनाला सुरुवात होऊन एक शतकाहून अधिक काळ
लोटला आहे. इतिहासाचार्य राजवाडे, का.ना. साने, मेहेंदळे, परांजपे आदी
मंडळीनीं मराठय़ांच्या इतिहासाशी निगडित कागदपत्रे शोधून त्यांची चिकित्सा
केली. पुढे ग.ह. खरे, द.वा. पोतदार, आप्पासाहेब पवार आदी मंडळींनी तो
वारसा पुढे चालवला. सध्याच्या काळात गजानन मेहेंदळे, डॉ. उदय कुलकर्णी
यांसारखे इतिहासकार अविरतपणे इतिहासाचे कार्य पुढे नेत आहेत, ‘जिथे पुरावा
नाही तिथे इतिहास नाही’ हे ब्रीद आम्हाला शिकवणारे, अवघ्या महाराष्ट्राला
आपल्या वाणीने समृद्ध करणारे इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांना हा ग्रंथ मी
अर्पण केला आहे. या पुस्तकामागची प्रेरणाही तेच आहेत. ‘फॉरेन बायोग्राफीज
ऑफ राजा शिवछत्रपती’ हा अस्सल साधन ग्रंथ असल्याने येणाऱ्या पिढय़ांना,
इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
प्रत्येक देशाचे वेगळेपण हे तिथल्या विविधतेवर ठरत असते. युरोपात तर आपण
भारतात राज्यांच्या सीमा बदलतो तशा देशांच्या सीमा ओलांडत असतो. पण इतके
एकमेकांना खेटून हे युरोपीय देश गर्दी करून असले तरी सीमा बदलल्यावर
त्या-त्या देशाचे वैशिष्टय़ दिसायला लागते. अगदी भाषेपासून ते
संस्कृतीपर्यंत देशादेशांतील वेगळेपण जाणवायला लागते. स्पेनचे आपल्याला
असेच दर्शन होते. स्पेनचे दर्शन ‘जिंदगी मिले ना दोबारा’मध्ये आपल्यापैकी
बहुतेकांना झाले आहेच. पण ही स्पेनची झलक आहे. मी जेव्हा स्पेनला जातो
तेव्हा दरवेळी मला स्पेनचे वेगळे पैलू दिसतात. स्पेनमधील बार्सिलोना,
माद्रिद , व्हॅलेंशिया आणि सेव्हिल ही प्रमुख शहरे धरली तरी यात प्रत्येक
शहराचे वेगळेपण आहे. कारण स्पेनचा भूभाग इतर युरोपियन देशांच्या मानाने खूप
मोठा आहे.
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मी बार्सिलोनाच्या विमानतळावर उतरलो तेव्हा
थंडीचा मोसम संपत होता. मुंबईच्या उकाडय़ातून तिथे गेल्यावर चांगलीच थंडी
जाणवत होती. माझी टॅक्सी विमानतळावरून बाहेर पडली आणि शहरातील हायवे
ओलांडून जेव्हा डोंगरांच्या कुशीत शिरली तेव्हा आजूबाजूचे चित्र पालटले.
उंच डोंगर आणि बोगदे पार करत माझी टॅक्सी हॉटेलपर्यंत पोहोचली तेव्हा मी
भूमध्य समुद्राच्या काठावर उभा होतो. थोडक्यात, शहराला वळसा घालून
डोंगरांच्या पलीकडे समुद्राच्या काठावर माझे हॉटेल मेलिया सिजेस होते.
माझ्या हॉटेलच्या खोलीत पोहोचलो तर बाल्कनीतून भूमध्य समुद्राच्या लाटा
समोरच्या किनाऱ्यावर लुप्त होत होत्या आणि समुद्राच्या काठावर अनेक छोटी
छोटी रेस्टॉरंट्स स्वागत करायला तयार होती.
बार्सिलोना शहर कळायला सुरुवातीला थोडा वेळ लागतो. कारण स्पॅनिश भाषा
कानाला कितीही सुंदर वाटत असली तरी आपल्याला हवी असलेली माहिती मिळवायला
उपयोगाची नाही. इंग्लिश स्पेलिंग आणि स्पॅनिश उच्चार यांचा काही संबंध
असेलच असे नाही. कुठलेही शहर कळायला पायी फिरण्यासारखा उत्तम पर्याय नाही.
तेव्हा टॅक्सीचा नाद सोडून मी शहरात जायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा
पर्याय शोधला. माझ्या हॉटेलपासून एक किलोमीटर चालल्यावर एक आपल्या
गावातल्या स्टेशनसारखे एक रेल्वे स्टेशन होते. तिथून अर्ध्या तासात मला
बार्सिलोना सिटी सेंटर म्हणजे मध्यवर्ती भागात जाता येणार होते.
बार्सिलोना बघायचे असेल तर सॅगराडा फॅमिली चर्चला भेट दिल्याशिवाय
बार्सिलोनाची भेट पूर्ण होणार नाही. एका अपूर्ण चर्चची ही कहाणी आहे. 1882
साली या चर्चच्या बांधकामाला सुरुवात झाली. फ्रान्सिस्को फिलारनंतर पुढे
गाऊडी या स्थापत्य विशारदाने कार्यभार स्वीकारला. गाऊडी 1926 साली निधन
पावला. तोपर्यंत चर्चचे एक चतुर्थांशही काम झाले नव्हते. पुढे हे काम
स्पेनच्या यादवी युद्धात अडकले. आजही हे बांधकाम चालू आहे. इतकी वर्षे
बांधकाम चालू असलेली वास्तू म्हणून त्याची नोंद जागतिक वारसा हक्काच्या
स्थानात झाली. गाऊडीच्या मृत्यूच्या शताब्दी वर्षात म्हणजे 2026 साली हे
पूर्ण करण्याचा मानस आहे. या चर्चला भेट देताना जाणवते ते म्हणजे जिद्द आणि
चिकाटीचे प्रतीक.
युरोपच्या कुठल्याही शहराची एक ओळख म्हणजे विस्तीर्ण मध्यवर्ती जागा.
तिथे कारंजी, पुतळे असतात आणि कबुतरखाना असतो. लंडनच्या ट्रपाल्गार
स्क्वेअरची आठवण करून देणारा असा हा बार्सिलोनाचा कॅटालुनिया भाग. शहराचा
हा मध्यवर्ती भाग असल्याने प्रचंड वर्दळीचा भाग, पण तो भाग आता लोकांना
बसायला, कबुतरांना आश्रयाला ठेवला आहे हे कौतुक. तुम्हाला जर का थोडा वेळ
असेल तर बार्सिलोनापासून दोन तासांवर असलेले मॉँटसेराट बघायलाच हवे. इथल्या
कॉग व्हील रेल्वेने डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसते ते शब्दांत
वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे.
स्पेनच्या विस्ताराने बार्सिलोना वेगळे, माद्रिद वेगळे आणि
समुद्रकाठावरचे सेविला वेगळे आणि ‘जिंदगी मिले ना दोबारा’त दाखवलेले स्पेन
अजून वेगळे आहे. जशी मुंबईची ओळख म्हणजे भारताची ओळख नाही, पण मुंबई
विविधता दाखवते तसेच बार्सिलोनाचे आहे. स्पेनची विविधता थोडक्यात बघायची
असेल तर बार्सिलोनासारखे सुंदर शहर नाही.
मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून
पाहिले तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या
जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठय़ांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर तो
अनन्वित अत्याचार करे. बळजबरी धर्मांतर, लोकांना पकडून गुलाम म्हणून विकणे,
आया-बहिणींची अब्रू लुटणे, कत्तली यामुळे तिथली प्रजा कंटाळून गेली होती.
त्यात जंजिरा किल्ल्यात बसून हा सिद्दी दर्यावर सत्ता गाजवायचा आणि तिथला
व्यापार आपल्या ताब्यात ठेवायचा.
पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेणे, व्यापार सुरळीत चालवणे आणि प्रजेला
धर्मांध सिद्दीपासून मुक्त करणे या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी
महाराजांनी मुरुड जवळील कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग बांधायचा
ठरवला. सिद्दीच्या ऐन दारात किल्ला उभा करणे म्हणजे सामान्य कार्य नव्हे.
शिवाजी महाराजांनी इ.स. 1675 मध्ये दर्यासारंग दौलतखान याला बेटाची सुरक्षा
आणि सुभेदार जिवाजी विनायक यांस रसद पुरवठय़ाची जबाबदारी देऊन तिथे
पद्मदुर्ग निर्माण करायला सांगितला. अनेक हल्ले, लढाया यांना तोंड देऊन चार
वर्षांत हा किल्ला उभा राहिला. पद्मदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी
राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच निर्माण केली.
मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावरुन आता प्रत्येकी 300 रु दराने बोटी सुटतात.
हे तिकीट काढून आपल्याला किल्ल्यात जाता येते. आपली बोट जिथे लागते
त्याच्या डाव्या बाजूस पद्मदुर्गाचा परकोट आहे. कमळाच्या पाकळ्याच्या
आकाराच्या चऱ्या असलेला खणखणीत बुरुज आपल्या नजरेस पडतो. किल्ल्याच्या
तटबंदीचे दगड शतकानुशतके समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत करत झिजले आहेत.
पण त्या दगडांमध्ये वापरलेला चुना आज ही शाबूत आहे. शिवरायांची
दुर्गबांधणी किती उच्च दर्जाची होती याचा इथे प्रत्यय येतो. परकोटाच्या आत
‘कोटेश्वरी आई’चे छोटेखानी मंदिर, पाण्याचा हौद, अनेक तोफा आणि काही
इमारतींचे अवशेष आहेत. दुर्लक्षित असल्यामुळे इथल्या भिंती अक्षरश शेवटच्या
घटका मोजत आहेत.
मुख्य किल्ल्याला दोन महाद्वार आहेत. इथली सगळी तटबंदी अजूनही शाबूत आहे
आणि 7 भक्कम बुरुज आजही पहारा देत उभे आहेत. किल्ल्यात पाण्याची टाकी,
पहारेकऱ्याच्या देवडय़ा, तटात असलेले शौचालय असे अनेक अवशेष आपल्या नजरेस
पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांच्या काळात पण
पद्मदुर्ग मराठय़ांकडे होता. साधारण 1698-99 च्या आसपास सिद्दीने हा किल्ला
जिंकून घेतला. पुढे पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु हा किल्ला
स्वराज्यात आला नाही. हा किल्ला शेवटी मराठय़ांकडे आला की नाही हे फक्त
सर्वभक्षी काळच सांगेल.
बोटीत बसून परत निघताना दूर दक्षिणेस सिद्दीचा जंजिरा दिसतो. जवळच
डोंगरावर शिवरायांनी बांधलेला सामराजगड आपल्या नजरेस पडतो. अलिबाग किंवा
मुरुडला गेलात तर मुद्दाम पद्मदुर्गाला भेट द्या. शिवरायांच्या
दुर्गशास्त्राचा एक अनोखा नमुना म्हणून त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
भटकंती- हिंदुस्थानातील सप्तभाषा संगमभूमी कासारगोड
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> वर्षा चोपडे
सप्तभाषा संगमभूमी अशी ओळख असलेला कासारगोड हा केरळमधील देखणा व समुद्राने वेढलेला जिल्हा. वास्तुकलासंपन्न अशा या भागातील संरक्षित किल्ल्यांमध्ये बेकल किल्ल्याचे महत्त्व आगळे आहे.
केरळ राज्य सुशिक्षित, बुद्धिवादी लोकांचे राज्य आहे. इथले लोक
सुसंस्कृत आहेत. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा त्यांना खूप अभिमान आहे.
भाषा त्यांचा प्राण आहे. कासारगोड अत्यंत स्वच्छ आणि सुंदर जिल्हा.
सप्तभाषा संगमभूमी अशी या कासारगोडची ओळख आहे. मल्याळम, कन्नड, मराठी,
हिंदी, इंग्रजी, कोंकणी आणि तमीळ भाषा या शहराची ओळख आहे. बहुतांश लोकांना
या सगळ्या भाषा येतात हे विशेष. मल्याळममध्ये कासारगोडला कानरम वृक्षांची
भूमी अथवा कान्हिरा वृक्षांची भूमी म्हणून ओळखले जात असे. हा जिल्हा अत्यंत
देखणा आणि समुद्राने वेढलेला असून या जिह्यात केरळमधील सर्वाधिक नद्या
आहेत.
16 व्या शतकापर्यंत कासारगोड कुंबळा राजवंशाच्या ताब्यात होते. ते
कन्नूर येथील कोलाथुनाडू राज्याचेही वतनदार होते. 16 व्या शतकात कन्नड
राज्यांनी बंदर आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले. 12 व्या शतकातील जुने
मल्याळम भाषेत लिहिलेले कदाचित सर्वात जुने साहित्यिक लिखाण रामचरितम
कासारगोड जिह्यात लिहिले गेले असावे असे मानले जाते. कारण त्याची
हस्तलिखिते नीलेश्वरम येथून सापडली होती. त्यात कुंबळा येथील अनंतपुरा तलाव
मंदिराचा तपशीलवार उल्लेख आहे.
बेकल किल्ला येथील मुख्य आकर्षण आहे. या बेकल किल्ल्याविषयी जाणून
घ्यायला हवे. हा केरळमधील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम संरक्षित किल्ला आहे.
40 एकर (160,000 चौरस मीटर) मध्ये पसरलेल्या भव्य बेकल किल्ल्याची रचना डच
लोकांनी बांधलेल्या कन्नूर येथील थलासेरी किल्ला आणि सेंट अँजेलो
किल्ल्यासारखी दिसते. गडाच्या खालच्या बाजूला अथांग अत्यंत स्वच्छ
समुद्रकिनारा आहे. किल्ल्याचा आतील बराच भाग पडला असून या किल्ल्याचा
तीन-चतुर्थांश भाग पाण्याच्या अगदी जवळ आहे. किल्ल्याच्या मध्यभागी
असलेल्या या ठिकाणावरून किनारपट्टी आणि कान्हांगड, पल्लीकारा, बेकल, मावळ,
कोट्टिकुलम आणि उदुमा या शहरांचे दृश्य दिसते. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि
आजूबाजूचे खंदक त्याच्या बचावात्मक रणनीतीचे दर्शन घडवतात. बाहेरील
भिंतींवरील छिद्रे नौदलाच्या हल्ल्यांपासून प्रभावीपणे किल्ल्याचे रक्षण
करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. पेरुमल काळात बेकल हा महोदयपुरमचा एक भाग
होता. महोदयपुरम पेरुमलांच्या पतनानंतर, 12 व्या शतकात बेकल मुशिका किंवा
कोलाथिरी किंवा चिराक्कल राजघराण्याच्या सार्वभौमत्वाखाली आला.
कोलाथिरींच्या काळात बेकलचे सागरी महत्त्व वाढले आणि मलबार एक महत्त्वाचे
बंदर शहर बनले. 1565 मध्ये तालीकोटाच्या लढाईनंतर केलाडी नायक (इक्केरी
नायक) या प्रदेशात सामंती सरदार शक्तिशाली बनले.
बेकल हे प्रथम वर्चस्व गाजवण्यासाठी आणि नंतर मलबारचे रक्षण करण्यासाठी
एक केंद्र म्हणून काम करत होते. या बंदर शहराच्या आर्थिक महत्त्वामुळे
नायकांना नंतर बेकलला मजबूत करण्यास प्रवृत्त केले. हिरिया वेंकटप्पा नायक
यांनी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि ते 1650 मध्ये शिवप्पा नायक यांनी
पूर्ण केले. कासारगोडजवळील चंद्रगिरी किल्लादेखील याच काळात बांधण्यात आला.
हैदर अलीने नायकांवर विजय मिळवला तेव्हा कोलाथिरी आणि नायकांमधील हा परिसर
ताब्यात घेण्यासाठीचा संघर्ष संपला व बेकल म्हैसूर राजांच्या हाती लागला.
टिपू सुलतानने मलबार काबीज करण्यासाठी लष्करी मोहिमेचे नेतृत्व केले तेव्हा
ते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे लष्करी तळ होते. बेकल किल्ल्यावर
पुरातत्वीय उत्खननात सापडलेली नाणी आणि कलाकृती म्हैसूर सुलतानांच्या मजबूत
उपस्थितीचे संकेत देतात. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान टिपू
सुलतानच्या मृत्यूमुळे 1799 मध्ये म्हैसूरचे नियंत्रण संपुष्टात आले.
त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला आणि मुंबई
प्रेसिडेन्सीमधील दक्षिण कॅनरा जिह्यातील बेकल तालुक्याचे मुख्यालय बनले.
बेकल आणि त्याच्या बंदराचे राजकीय व आर्थिक महत्त्व कमी झाले. 1992 मध्ये
भारताने बेकल किल्ल्याला एक विशेष पर्यटन क्षेत्र घोषित केले आणि तीन
वर्षांनंतर त्याचा प्रचार करण्यासाठी बेकल पर्यटन विकास महामंडळाची स्थापना
केली. या किल्ल्यास भेट दिल्यास हिंदुस्थानातील अत्यंत सुंदर किल्ल्यास
भेट दिल्याचे पर्यटकांना समाधान मिळेल हे नक्की.
varsha@rajagiri.edu
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
पाऊलखुणा- आठवणींचा सुवर्णकाळ मालगुडी म्युझियम
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोष बापट
‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान, हिरव्या-लाल रंगात
नटलेले जुने रेल्वे स्टेशन आणि मालिकेतील अनेक आठवणी… हे सारे पाहायला
मिळते शिमोग्याजवळील ‘अरासळू’ या गावात. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय टीव्ही
मालिकेची संकल्पना मांडणारे हे म्युझियम आपल्याला नॉस्टॅल्जिक अनुभव देणारे
ठरते.
‘मालगुडी डेज’ ही अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका. मालगुडी नावाच्या
खेडेगावाचे कथानक मांडणाऱया या मालिकेचे चित्रीकरण या शिमोग्याजवळील
गावात झाले. अरासळू येथे उभे केलेले मालगुडीचे रेल्वे स्टेशन आता
म्युझियममध्ये परावर्तित झाले आहे.
ही गोष्ट आहे एका प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही मालिकेची. जेव्हा
मनोरंजनासाठी फक्त दूरदर्शन एवढे एकच माध्यम होते आणि इतर कुठल्याही खासगी
वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या त्या काळातली. तो जमाना होता दूरदर्शनचा.
अनेकविध सुंदर मालिका त्या काळात दूरदर्शनचा पडदा गाजवून गेल्या. काही
मालिका मुलांसाठी, तर काही तरुणांसाठी. काही घरातल्या वडीलधारी मंडळींसाठी,
तर काही खास महिलांसाठी. घरातल्या प्रत्येक घटकासाठी एकेक मालिका त्या
काळी दूरदर्शनवर दाखवली जात असे. मात्र एक मालिका अशी होती, ती सुरू झाली
की, घरातली झाडून सगळी मंडळी टीव्हीसमोर येऊन ठाण मांडून बसत असत. ती
मालिका म्हणजे ‘मालगुडी डेज’! सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या
लेखनावर आधारित ही मालिका आणि तिच्या जोडीला त्यांचे बंधू आर. के. लक्ष्मण
यांची चित्रे यामुळे ही मालिका अफाट लोकप्रिय झाली. गिरीश कर्नाड, शंकर नाग
अशा दिग्गज कलाकारांनी ही मालिका गाजवली. दक्षिण भारतातले एक छोटेसे
खेडेगाव मालगुडी आणि त्या गावाशी निगडित असलेल्या विविध कथा असे या
मालिकेचे कथानक. स्वामी हा लहान मुलगा आणि त्याचे कुटुंब ही त्या मालिकेतील
मध्यवर्ती संकल्पना. मालगुडी डेजचा काळ दाखवला होता तो
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. त्यामुळे इंग्रजी राजवट, त्यांचे पोलीस,
त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक आणि त्यांच्या काळातल्या शाळा असा सगळा जुना
मामला आर. के. नारायण यांनी फार समर्थपणे मांडला होता. छोटय़ाशा खेडय़ातले
स्वामी हे मालिकेतील पात्र तर घराघरांत जाऊन पोहोचले आणि त्याचबरोबर
ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचले होते ते या मालिकेचे युनिक म्युझिक…!
‘मालगुडी डेज’ची ती टय़ून तर आजही अनेकांची मोबाइल रिंगटोन आहे.
‘मालगुडी डेज’ या मालिकेत अनेक प्रसंग, अनेक पात्रे, अनेक घटना आपल्याला
भेटत जातात. त्या गावचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मालगुडीचे रेल्वे
स्टेशन. त्या स्टेशनला मध्यवर्ती ठेवून काही पात्रे येतात, काही कथानके
तयार होतात आणि रेल्वे स्टेशनच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर कथानक साकार
झालेले दिसते. ‘मालगुडी डेज’च्या रेल्वे स्टेशनचे शूटिंग कर्नाटकातील एका
सुंदर ठिकाणी केले गेले होते. ‘अरासळू’ असे त्या गावाचे आणि स्टेशनचे नाव.
शिमोग्याच्या जवळ असलेले हे ठिकाण. या अरासळू रेल्वे स्टेशनवर मालगुडी
डेजच्या काही भागांचे चित्रीकरण झालेले आहे.
रेल्वे स्टेशनचे शूटिंग जिथे झाले त्या ठिकाणी आता एक सुंदर ‘मालगुडी
म्युझियम’ उभारले आहे. मालिकेमध्ये दिसणारे ‘मालगुडी’ हे रेल्वे स्टेशन आता
एका सुंदर म्युझियममधे परावर्तित झाले आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेऊन
हे स्टेशन आणि तिथले म्युझियम तयार केले आहे. शिमोग्यापासून फक्त 34
किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या तालीगुप्पा-शिमोगा मार्गावर
‘अरासळू’ हे स्टेशन आहे. अरासळूच्या जुन्या स्टेशनवर ‘मालगुडी डेज’चे
शूटिंग झाले होते. इथेच शेजारी आता नवीन अरासळू स्टेशन उभारले आहे आणि
जुन्या स्टेशनचे रूपांतर ‘मालगुडी म्युझियम’मध्ये केले आहे.
शिमोग्याकडे जाताना वाटेत उजवीकडे अरासळू स्टेशनपाशी ‘मालगुडी म्युझियम’
असे लिहिलेली कमान आपले स्वागत करते. कमानीतून आत गेल्यावर आपल्याला समोर
दिसते ते हिरव्या-लाल रंगांत नटलेले बुटके जुने रेल्वे स्टेशन. त्याच्या
बाहेरच्या बाजूला नॅरो गेजवरील इंजिनाची प्रतिकृती आपले लक्ष वेधून घेते.
परिसर अतिशय शांत आणि हिरवागार आहे. 1960 च्या दशकातले स्टेशन तसेच ठेवले
आहे. तीच जुनी तिकीट खिडकी, तीच जुनी घडय़ाळे, जुनी समयसारिणी असा सगळा
सुंदर सरंजाम तिथे आहे. स्टेशनच्या भिंतींवर ‘मालगुडी डेज’ या मालिकेतील
वेगवेगळे प्रसंग चित्रित केलेत. एका टीव्हीवर सतत ‘मालगुडी डेज’ मालिका
सुरू असते आणि सगळ्यात भारी म्हणजे या स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला
स्वामी, त्याचे मित्र मणी आणि राजम यांचे पुतळे केलेले आहेत.
या मालगुडी स्टेशनच्या शेजारी रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर करून
‘मालगुडी कॅफे’ तयार केला आहे. एखादी संकल्पना घेऊन त्याचं चीज कसं करायचं
याचा परिपाठ म्हणजे हे ‘मालगुडी म्युझियम’ आहे. याचे प्रवेश शुल्क फक्त पाच
रुपये आहे, पण इथे मिळणाऱया अनुभवाचे गाठोडे प्रचंड मोठे आहे. शिमोग्याला
जाऊन मुद्दाम हे स्टेशन आणि म्युझियम बघायलाच हवे. तिथे असेपर्यंत
मालगुडीची ‘ता ना ना नाना नाना ना…’ ही अफाट गाजलेली धून मनात सतत रुंजी
घालत असते. काही गोष्टी शब्दांत नाही सांगता येत, तर त्या तिथे जाऊनच तो
सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवायला हवा.
ashutosh.treks@gmail.com
अनवट काही- तंजावर संस्थान आणि मराठी सहसंबंध
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> अशोक बेंडखळे
दक्षिणेकडील तमिळनाडूमधील तंजावर प्रांतात मराठय़ांनी राज्य केले आणि
तिथे राजवाडय़ात सरस्वती महाल ग्रंथालय असून त्यात अनेक ग्रंथ-हस्तलिखिते
आहेत. एवढे आपल्याला माहीत असते, पण तिथल्या राजांविषयी वा एकूण
राज्यकारभाराविषयी खूप कमी माहिती असते. विनायक सदाशिव वाकसकर लिखित आणि
दामोदर सावळाराम आणि कंपनीने प्रकाशित केलेले (सन 1933) ‘तंजावरचे मराठे
राजे’ या पुस्तकाने ही उणीव काही प्रमाणात भरून काढलेली आहे. बडोद्याचे
महाराज विद्याभिलाषी सयाजीराव गायकवाड यांच्या देणगीतून हे पुस्तक प्रकाशित
झाले हे नमूद करायला हवे.
शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे आदिलशहाच्या पदरी सरदार होते.
शहाजीराजांना दोन पुत्र शिवाजी जिजाबाईंच्या पोटी तर व्यंकोजी दुसरी पत्नी
उमाबाईंच्या उदरी जन्मास आले. या व्यंकोजीने तंजावरला मराठी राज्य स्थापन
केले (1676). त्यापूर्वी तंजावरला चौल आणि नायक राजांनी अनेक वर्षे राज्य
केले होते. शहाजींचा हा मुलगा व्यंकोजी भोसले बंगलोरचा जहागीरदार होता.
तंजावरच्या अलगिरी नायकांची हकालपट्टी करण्याची जबाबदारी आदिलशहाने
व्यंकोजीवर सोपवली. व्यंकोजीने युद्ध करून नायकाच्या ताब्यातून तंजावरची
मुक्तता केली. त्याच वेळी तंजावरच्या लोकांमध्ये यादवी झाली आणि त्यांनी
व्यंकोजीला (म्हणजे मराठय़ांना) राज्य हस्तगत करण्यास सांगितले. अशा प्रकारे
व्यंकोजीकडे तंजावरचे राज्य आले. खरे म्हणजे निराळी भाषा जाणणारे लोक
राज्यावर अधिष्ठीत झाले होते. मात्र या नवीन राजांनी तंजावर हे आपलेच घर
आहे असे समजून तिथे राज्यकारभार हाकला आणि प्रजासंरक्षणाची परंपरा चालविणे,
धर्मासंबंधी कार्याचा पुरस्कार करणे, कला व शिक्षणाला उत्तेजन देणे ही
सत्कृत्ये त्यांनी सतत व अखंड चालवली म्हणून मराठी राज्ये तिथे पुढील काही
काळ बस्तान बसवू शकले.
व्यंकोजीच्या कारकिर्दीतील रोमांचकारी धामधुमीचा प्रसंग म्हणजे
शिवाजीराजांनी व्यंकोजीवर व कर्नाटकवर केलेली स्वारी होय (1676-77).
राजांच्या सैन्याने जिंजी व काही प्रांत काबीज केला. राजांची व व्यंकोजीची
भेटही झाली; पण ती निष्फळ ठरली. पुढे मोगलांची स्वारी आपल्या राज्यावर होईल
अशी शंका येऊन शिवाजी राजे रायगडावर परत आले. त्यांच्यात एक तह झाला आणि
वार्षिक खंडणी देण्याचे व्यंकोजीने मान्य केले. शिवाजी राजांच्या
मृत्यूपर्यंत (1680) ही खंडणी तंजावरहून येत होती. पुढे बंद झाली आणि
सातारकर भोसले व तंजावरचे भोसले यांचा संबंध राहिला नाही.
व्यंकोजी राजा 1683मध्ये निवर्तला आणि त्याचा वडीलपुत्र राजा शहाजी
तंजावरचा दुसरा राजा गादीवर आला (1684-1712). शहाजीच्या मृत्यूनंतर सरभोजी व
तुकोजी राज्यव्यवस्था पाहत. सरभोजीनंतर तुकोजी हा राज्याचा एकटा धनी झाला.
त्याने (1728-1736) असे राज्य केले. तुकोजीला प्रताप नावाचा पुत्र होता.
तंजावरच्या लोकप्रिय व प्रसिद्ध राजाच्या नामावलीत हा शेवटचा राजा ठरतो
(1739-1763). त्यानंतर तुळजाजी (1763-1787), अमर सिंग (1787-1798), दुसरा
सरभोजी (1798-1833) आणि शिवाजी (1833-1855) यांनी राज्य केले. पण प्रभावी
ठरले नाहीत. शेवटी ब्रिटिशांनी हे राज्य खालसा केले आणि तंजावर संस्थानावर
राज्य करीत असलेली मराठी सत्ता नष्ट झाली.
खरे म्हणजे शिवाजी राजांनी कर्नाटकवर स्वारी केली ती व्यंकोजीला मदत
करून कर्नाटकात भगवा झेंडा फडकवावा या हेतूने. मात्र व्यंकोजीने बंधू
शिवाजीचे सामर्थ्य ओळखले नसावे आणि त्यांनी राजांची मदत नाकारली असे दिसते.
एकूणच तंजावरच्या बाहेर जाणे, ते वाढवणे, लष्करी सामर्थ्याची वृद्धी करणे
हे प्रकार व्यंकोजीने वा नंतरच्या मराठी राजांनी केले नाहीत. व्यंकोजीने
शिवाजी राजांना हात दिला असता तर कदाचित दक्षिणेकडे मराठी राज्य विस्तारले
असते. व्यंकोजीनंतर तंजावरचे राजे इतके निक्रिय व सामर्थ्यहीन होते की,
इंग्रजांना तंजावर संस्थान बिनखर्चाने मिळाले असे म्हटले जाते.
आता तंजावरच्या काही चांगल्या बाबी – संस्थानात न्यायदान व्यवस्थित
होते. सरकारी पुस्तकालयाशिवाय खाजगी पुस्तकालये होती. येथील राजे विनोद,
वाङ्मय, वाद्य, नृत्य, रंगकाम, धातू व लाकूड यावरील नक्षीकाम, रेशीम
विणण्याची कला आदींना आश्रय देत असत. यावरून आर्थिक स्थिती ठीक असावी. चोल
राजापासून ते मराठे राजापर्यंत हे संस्थान हिंदू राज्याखाली होते. या
राजांनी प्राचीन संस्कृती व त्या संस्कृतीची ओळख अशी मंदिरे ही यवन अथवा
ख्रिस्ती यांच्या आक्रमणापासून वेगळी ठेवून त्यांचे संरक्षण केले.
प्रतापसिंह या मराठय़ांच्या राजाची उपपत्नी मुद्दुपल्लानी ही प्रसिद्ध
नायकीण होती. तिने ‘राधिकासन्तवनम्’ नावाचे काव्य रचले आहे.
एकूण राजे अल्पसंतुष्ट असतील, त्यांच्याकडे दूरदृष्टी नसेल तर ते राज्य
लयास जाण्यास वेळ लागत नाही. तंजावर त्याचे उदाहरण आहे. काही काळ तंजावरला
मराठे राजे राज्य करीत होते असे म्हणून आपण समाधान करू शकतो.
ashok.bendkhale@gmail.com
वेधक – आबूधाबीतील लक्ष्मीनारायण मंदिर, अरेबियन मैत्रीचे प्रतीक
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> भगवान हारूगडे
आबूधाबी येथील जेबेल अली व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले
लक्ष्मीनारायणाचे भव्य मंदिर हिंदुस्थान-अरबी शैलीच्या वास्तुकलेचा उत्तम
नमुना आहे. या मंदिरासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दिली. वास्तुविशारद एक
कॅथोलिक ख्रिश्चन तर व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. डिझायनर बौद्ध तर
मंदिराचा संचालक जैन होता. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द
दिसून येते. हे मंदिर म्हणजे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अखंड
मैत्रीचे प्रतीकच होय.
एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये भव्य हिंदू मंदिर असणे प्रत्येक
हिंदुस्थानीसाठी अभिमानाची बाब आहे. दुबई आबूधाबी येथील जेबेल अली
व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले आणि अध्यात्मिक समृद्धी –
स्थापत्य कलेच्या सौंदर्याने नटलेले भव्य लक्ष्मी नारायण मंदिर हे
आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील शेख झायेद ग्रँड
मस्जिद ही सर्वात मोठी मस्जिद पाहून भारावलेले हिंदुस्थानी पर्यटक
स्वामीनारायण मंदिराची भव्यता न्याहाळताच पायरीवर नतमस्तक होतात.
प्रामुख्याने लक्ष्मी आणि नारायण या देवतांचे 27 एकरावर वसलेले
आबूधाबीतील हे मंदिर हिंदू स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कुशल
कोरीव काम असणारे हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळ नाही तर सांस्कृतिक केंद्र
देखील आहे. परिसरात पाऊल टाकताच आल्हाददायक शांत वातावरणाने मन अगदी भरून
येते. मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. मंदिराला दोन
घुमट, युएईमधील सात अमिरातीचे प्रतीक असलेले सात शिखर आणि 402 खांब आहेत.
उन्हाळय़ातील कडक तापमानाला तोंड देण्यासाठी बाहेरील बांधकामासाठी राजस्थानी
गुलाबी वाळू आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे. आतील भागात पांढऱया रंगातील
इटालियन संगमरवरी कोरीव काम आहे. मंदिरात स्वामीनारायण, राधाकृष्ण,
राम-सीता-लक्ष्मण, शिव-पार्वती, गणेश- कार्तिकेय, वेंकटेश्वर- पद्मावती,
अय्यप्पन स्वामी यांच्या मूर्ती आहेत. हे भव्य मंदिर भारतीय-अरबी शैलीच्या
वास्तुकलेचे मिश्रण आहे.
गेल्या काही वर्षांत दुबईला भेट देणाऱया आणि तेथे स्थायिक होणाऱया
हिंदुस्थानींची संख्या पाहता एका भव्य मंदिराची आवश्यकता होती. हे मंदिर
चार मजल्यांमध्ये उभे आहे; त्यात दोन तळघर, एक तळमजला आणि पहिला मजला आहे.
25,000 पेक्षा जास्त दगडांच्या तुकडय़ांनी बनलेल्या या मंदिराच्या
गुंतागुंतीच्या कोरीवकामासाठी दोन हजारपेक्षा जास्त कारागिरांनी काम केले.
प्रत्येक शिखरात रामायण, शिवपुराण, भागवत, महाभारतातील कथा आणि जगन्नाथ,
स्वामीनारायण, व्यंकटेश्वर आणि अयप्पा यांच्या जीवनाचे चित्रण करणारे
कोरीवकाम आहे. तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश या पाच नैसर्गिक
घटकही दाखवण्यात आले आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतीवर घोडे, उंट यांसारख्या
प्राण्यांचे कोरीव काम आहे. मंदिराच्या सभोवतालचे पाणी हे हिंदुस्थानातील
पवित्र नद्यांचे प्रतीक आहे. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर दिसणारे
पाण्याचे दोन प्रवाह गंगा आणि यमुना नद्यांचे प्रतीक आहेत.
मंदिराच्या उभारणीपूर्वी जगन्नाथ, कोणार्क, रणकपूर, देलवाडा आणि
भारतातील इतर प्रार्थनास्थळांच्या मंदिरांचा अभ्यास करण्यात आला. हे मंदिर
भूकंप प्रतिरोधक बनवण्यात आले. हिंदुस्थान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या
अखंड मैत्रीचे प्रतीक म्हणून या मंदिराच्या वास्तूकडे पाहिले जाते. या
मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, युएईचे मंत्री शेख नाह्यान बिन
मुबारक अल नाह्यान आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक नेते
महंत स्वामी महाराज यांनी यावेळी जागतिक सहिष्णुता व एकोपा याचे महत्त्व
विषद केले.
ऑगस्ट 2015 मध्ये युएई सरकारने आबूधाबीमध्ये हिंदू मंदिर बांधण्यासाठी
जमीन देण्याचा निर्णय जाहीर केला. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू
धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी मंदिरासाठी 13.5 एकर
आणि पार्किंगसाठी 13.5 एकर जागा भेट दिली. त्यानंतर 27 एकर जमिनीवर डिसेंबर
2019 मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
तसे पाहायला गेले तर दुबईत अनेक छोटी-मोठी हिंदू मंदिरे आहेत. 60
वर्षांपूर्वी दुबईचे पहिले हिंदू मंदिर बुर दुबई प्रदेशात बांधले गेले
होते. त्यामुळे युएईमध्ये हिंदूधर्मीयांचे वास्तव्य बऱयाच काळापासून होते
हे स्पष्ट होते. या मंदिरात पारंपरिक हिंदू मंदिराचे सर्व पैलू आहेत. मंदिर
परिसरात अभ्यागत केंद्र, प्रार्थना हॉल, प्रदर्शने, शिक्षण क्षेत्रे,
मुलांसाठी ाढाrडा क्षेत्र, थीमॅटिक गार्डन्स, पाण्याची सुविधा, फूड कोर्ट,
भेटवस्तूंचे दुकान यांचा समावेश आहे. भूकंपाच्या हालचाली, तापमानातील फरक
आणि दाबातील बदलांचा डेटा देण्यासाठी संपूर्ण मंदिरात 350 हून अधिक सेन्सर
आहेत. मंदिरात स्वागत करणारी ‘द वॉल ऑफ हार्मनी’ ही 47 मीटर लांबीची
3डी-प्रिंटेड भिंत आहे. ही भिंत दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाने पूर्ण केली
आहे.
या मंदिराच्या बांधकामासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दान केली. या
प्रकल्पाचा प्रमुख वास्तुविशारद एक कॅथोलिक ख्रिश्चन होता आणि बांधकाम
प्रकल्पाचे व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. पायाभूत डिझायनर बौद्ध आणि
मंदिराचा संचालक जैन होते. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द
दिसून येते. दुबईत जवळजवळ 40 टक्के भारतीय आहेत. त्यांच्यासाठी हे भव्य
लक्ष्मीनारायण मंदिर अध्यात्मिक आकर्षण आहे. भारतीयांसह अनेक देशांतील
पर्यटक येथे श्रद्धेने भेट देतात आणि मंदिराची भव्यता, बारकावे, कोरीव काम
पाहून भारावून जातात.
महिपळगडाच्या प्रवेशद्वाराजवळील दीपस्तंभ ढासळतोय
Rohit Salunke
1–2 minutes
इतिहासप्रेमी, पर्यटकांमधून संवर्धनाची मागणी
बेळगाव : कर्नाटक महाराष्ट्र सिमेवरील चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध
महिपळगडाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ असलेला दीपस्तंभ ढासळत असून याचे
संवर्धन होण्याची मागणी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमधून होत आहे.
महिपळगड चंदगड तालुक्यातील एक बुलंद किल्ला. कर्नाटक महाराष्ट्र राज्य
सीमेवर वसलेल्या या किल्ल्याला महिपत राजाच्या नावावरून महिपळगड हे नाव
देण्यात आले आहे. किल्ल्यावर लोकवस्ती असून प्राचीन विहिर, तटबंदीवरील
बुरूज, धान्यकोठार, प्राचीन गणेश प्रवेशद्वार व प्राचीन गुहा आहे. हे सर्व
पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेला किंवा सरदारांना एकाfत्रत
करण्यासाठी पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ असलेला दीपस्तंभ प्रज्वलित करण्यात
येत असे. गावातील लोक या दीपस्तंभाला चिलीम या नावाने संबोधतात. तसेच या
ठिकाणाला खिंड म्हणूनही ओळखले जाते. मात्र, सध्या हा दीपस्तंभ ढासळत असून
नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाने याचे संवर्धन करावे, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमधून
होत आहे.
प्राचीन ठेवा गेला सातासमुद्रापार ; कोल्हापूरला कोल्हापुरकरच कधी जाणून घेणार?….
Tarun Bharat Portal
4–5 minutes
सुधाकर काशीद,कोल्हापूर Kolhapur Historical News : कोल्हापूर किती प्राचीन आहे
याचा अस्सल पुरावा असलेल्या आठ वस्तू जगभरातील लोकांना पाहण्यासाठी साता
समुद्रापार नेल्या जात आहेत.पण ज्या वस्तू आपल्या कोल्हापुरात
आहेत,कोल्हापूरच्याच आहेत त्या आपल्या जवळ टाऊन हॉलमध्ये आहेत.पण दिवसातून
फक्त 70 ते 80 जणांच्या पलीकडे या प्राचीन वस्तू किंवा प्राचीन ठेवा
पहाण्याची तसदी कोणी कोल्हापूरकर घेत नाहीत अशी परिस्थिती आहे.त्यामुळे
कोल्हापूरच्या प्राचीन इतिहासाचा म्हणजे साधारण 2500 वर्षाचा इतिहास प्रथम
प्रत्येक कोल्हापूरकरांनी जाणून घेण्याची पाहण्याची गरज आहे.
ज्या प्राचीन कोल्हापूरचे महत्त्व जगात आहे त्या कोल्हापुरचे महत्व आपण
कोल्हापूरकर कधी जाणून घेणार हा विचार करायला लावणारा खरा प्रश्न आहे.
वस्तुसंग्रहालयात पुरातत्व विभागाने वस्तू ,मूर्ती शिलालेख,भांडी,दागिने
अशा स्वरूपात अगदी व्यवस्थित जतन करून ठेवला आहे.आणि तो पाहण्यासाठी
सर्वांना खुला आहे.
कोल्हापुरातील ब्रह्मपुरी उत्खननात म्हणजे पंचगंगा नदी जवळच्या टेकडीवर
मूळ कोल्हापूर होते.काही नैसर्गिक आपत्तीत ते गाडले गेले.तेथे झालेल्या
उत्खननात अनेक वस्तू सापडल्या.गावाच्या रचनेचे अवशेष मिळाले.त्यातल्या काही
वस्तू इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या कालावधीतील आहेत.म्हणजेच अडिच
हजार वर्षांपूर्वीचे आहेत.त्या वस्तू म्हणजे कोल्हापूर प्राचिन काळातही
व्यापार,उद्योग अशा विविध क्षेत्रात कसे सक्षम होते त्याचे अस्सल पुरावे
आहेत.त्या काळात कोल्हापुरात ओतकाम (फाउंड्री) करून केलेल्या काही वस्तू
आहेत.म्हणजेच त्या काळातहो फाउंड्रीची हस्तकला कुशलता येथे होती याचे ते
दाखलेच आहेत. या वस्तू म्हणजेच कोल्हापूरच्या अडीच हजार वर्षाच्या
इतिहासाचे वस्तू रुपातील दस्तऐवज आहे.जगभरात पुरातत्व अवशेष इतिहासात
त्याची दखल घेतली जाते. पण आपण कोल्हापूरकर याकडे आस्थेनेआणि दखल देतो? हे
या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचे उत्तर नक्कीच अस्वस्थ करून टाकणारे आहे.
या प्राचीन वस्तू पैकी समुद्रदेवता,हत्तीवरील स्वार.पाण्याच्या भांड्यात
भांड्याची कडा,खेळण्यातली गाडी व मंगल प्रतीके या वस्तू काल न्युयॉर्ककडे
रवाना झाल्या. तेथे जागतिक प्रदर्शनात या वस्तू ठेवल्या जाणार आहेत.तेथून
त्या वस्तू कोरिया त जाणार आहेत.वर्षभर या वस्तू बाहेरच असणार आहेत.अर्थात
त्यानिमित्ताने जगातील लोकांसमोर कोल्हापुरातील हा प्राचीन ठेवा जाणार आहे.
या वस्तू प्राचीन आहेत.कोल्हापूर तर त्याहून प्राचीन आहे.पण आता समोर
किंवा सभोवती दिसते ते कोल्हापूर अशीच बहुतेकांची समजूत आहे.आपण आपले
नातेवाईक कोल्हापुरात आली तर त्यांना आवर्जून अंबाबाईला नेतो.मिसळ,पांढरा
तांबड्या रस्स्याची चव चाखायला देतो.रंकाळा,पंचगंगा, राजवाडा, पन्हाळा,
जोतिबा दर्शन करून पाहुण्याला परत पाठवतो.पण कोणीही आपल्या पाहुण्यांना
कोल्हापूरचा अडीच हजार वर्षाचा इतिहास दाखवायला टाऊन हॉलमध्ये नेत नाही.
मुळात कोल्हापूरच्या बहुतेकांनी हा इतिहास जाणून घेतलेला नाही.त्यामुळे
इतरांनाही आपण दाखवत नाही.रोज साधारण 50 ते60 जण व सुट्टीच्या दिवशी शंभर
ते दीडशे जण वस्तुसंग्रहालयात येतात.वास्तविक सुट्टीच्या काळात एक नव्हे
दोन नव्हे तब्बल तीन ते चार लाख लोक बाहेरून कोल्हापुरात आलेले असतात. वर
वरचे कोल्हापूर पाहून ते परत जातात.आपण अडीच हजार वर्षापासूनचा इतिहास
असलेल्या एका गावात आलो आहोत.खूप प्राचीन असे हे कोल्हापूर आहे हेच समजून न
घेता कोल्हापूर पाहतात आणि परत निघूनही जातात.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा इतिहास नव्या पिढीला जाणीवपूर्वक करून
देण्याची गरज आहे.आणि हा सारा इतिहास आपल्याकडे उपलब्ध आहे पाहायला खुला
आहे.आपण डोळे उघडे ठेवून हा इतिहास पाहणार का एवढाच खरा प्रश्न आहे.
पहा अस्सल इतिहास…
कोल्हापूर खूप प्राचीन आहे. ही प्राचीनता म्हणजे कोल्हापूरच्या समाज
जीवनाची अस्सल प्रतीके आहेत. कोल्हापूरच्या प्राचीनते बद्दल पुरातत्त्व
अभ्यासाच्या दृष्टीने जगभर कुतहुल आहे. आपण सर्वांनी हा इतिहास जाणून
घ्यावा टाऊन हॉल वस्तुसंग्रहालयात हा ठेवा जतन करून ठेवला गेला आहे. या
संग्रहालयातील वस्तू प्रदेशातील संग्रहात अभ्यास व निरीक्षणासाठी काही
काळासाठी नेल्या जातात हे खरोखरच आपले भूषण आहे. उदय सुर्वे,कोल्हापूर वस्तू संग्रहालय अभिरक्षक
तब्बल 6 वर्षानंतर राधानगरी धरणामधील बेनझीर व्हिला ही ऐतिहासिक वास्तू आज खुली
Tarun Bharat Portal
~2 minutes
राधानगरी/महेश तिरवडे
राधानगरी धरणाच्या मध्यभागी असलेला बेनझीर व्हीला हा धरणातील पाणी साठा
कमी झाल्याने सुमारे 6 वर्षानंतर आज सायंकाळी खुला झाला आहे,सध्या
राधानगरी धरणातील पाणी साठा 1.65 टक्के असल्याने ही वास्तू खुली झाली आहे
कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय व
सिंचनासाठी छ, शाहू महाराजांनी 1908 साली राधानगरी धरण उभारणीचे काम सुरू
केले,छ, शाहू महाराजांनी धरणाच्या पाहणी व देखरेखीसाठी धरणाच्या मध्यभागी
हा बेनझीर व्हीला उभारण्यात आला होता,
गेल्या अनेक वर्षे राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाली नव्हती, मात्र
यावर्षी अवकाळी व वळीव सदृश पावसाने दडी मारल्याने ,पाण्याची वाढती मागणी
लक्षात घेऊन व मृग नक्षत्र पावसाने ओढ दिल्याने सन 2016 व 2017 या साली सलग
दोन वर्षे मे महिन्याच्या अखेरीस ही वास्तू खुली होत असे, मात्र धरण
पाणलोट क्षेत्रात या वर्षी जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही, म्हणून
ही वास्तू पहिल्यांदा जून महिन्यात खुली झाली, अनेक वेळा ही वास्तू मे
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खुली व्हायची या वर्षी जून महिन्यात
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खुली झाली आहे
या वास्तूकडे जाताना राधानगरी, हत्तीमहाल,पडळी, राऊतवाडी धबधबा या
मार्गे राऊतवाडी(जुने करंजे) या गावात जाऊन तेथून 2 ते 3 की मी पायी चालत
जाऊन ही वास्तू पहावयास मिळते, सध्या ही वास्तू खुली झाली असली तरी धरणातील
पाण्यात ओलावा असल्याने साधारणपणे 50 मीटर अंतरा पासून चिखल तुडवत जावे
लागत आहे, याठिकाणी ही वास्तू आता काट्याकुट्यानी व झाडाझुडुपांमध्ये
व्यापली असून पर्यटकांनी हया वास्तुकडे जाताना वाटेत विशेष काळजी घेणे
गरजेचे आहे तसेच शाहूकालीन ऐहितासिक वास्तुचे जतन करणे आवश्यक आहे
वेधक – आबूधाबीतील लक्ष्मीनारायण मंदिर, अरेबियन मैत्रीचे प्रतीक
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> भगवान हारूगडे
आबूधाबी येथील जेबेल अली व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले
लक्ष्मीनारायणाचे भव्य मंदिर हिंदुस्थान-अरबी शैलीच्या वास्तुकलेचा उत्तम
नमुना आहे. या मंदिरासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दिली. वास्तुविशारद एक
कॅथोलिक ख्रिश्चन तर व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. डिझायनर बौद्ध तर
मंदिराचा संचालक जैन होता. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द
दिसून येते. हे मंदिर म्हणजे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अखंड
मैत्रीचे प्रतीकच होय.
एखाद्या मुस्लिम राष्ट्रामध्ये भव्य हिंदू मंदिर असणे प्रत्येक
हिंदुस्थानीसाठी अभिमानाची बाब आहे. दुबई आबूधाबी येथील जेबेल अली
व्हिलेजच्या शांत परिसरात दिमाखात उभे असलेले आणि अध्यात्मिक समृद्धी –
स्थापत्य कलेच्या सौंदर्याने नटलेले भव्य लक्ष्मी नारायण मंदिर हे
आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील शेख झायेद ग्रँड
मस्जिद ही सर्वात मोठी मस्जिद पाहून भारावलेले हिंदुस्थानी पर्यटक
स्वामीनारायण मंदिराची भव्यता न्याहाळताच पायरीवर नतमस्तक होतात.
प्रामुख्याने लक्ष्मी आणि नारायण या देवतांचे 27 एकरावर वसलेले
आबूधाबीतील हे मंदिर हिंदू स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. कुशल
कोरीव काम असणारे हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळ नाही तर सांस्कृतिक केंद्र
देखील आहे. परिसरात पाऊल टाकताच आल्हाददायक शांत वातावरणाने मन अगदी भरून
येते. मंदिर 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद आहे. मंदिराला दोन
घुमट, युएईमधील सात अमिरातीचे प्रतीक असलेले सात शिखर आणि 402 खांब आहेत.
उन्हाळय़ातील कडक तापमानाला तोंड देण्यासाठी बाहेरील बांधकामासाठी राजस्थानी
गुलाबी वाळू आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे. आतील भागात पांढऱया रंगातील
इटालियन संगमरवरी कोरीव काम आहे. मंदिरात स्वामीनारायण, राधाकृष्ण,
राम-सीता-लक्ष्मण, शिव-पार्वती, गणेश- कार्तिकेय, वेंकटेश्वर- पद्मावती,
अय्यप्पन स्वामी यांच्या मूर्ती आहेत. हे भव्य मंदिर भारतीय-अरबी शैलीच्या
वास्तुकलेचे मिश्रण आहे.
गेल्या काही वर्षांत दुबईला भेट देणाऱया आणि तेथे स्थायिक होणाऱया
हिंदुस्थानींची संख्या पाहता एका भव्य मंदिराची आवश्यकता होती. हे मंदिर
चार मजल्यांमध्ये उभे आहे; त्यात दोन तळघर, एक तळमजला आणि पहिला मजला आहे.
25,000 पेक्षा जास्त दगडांच्या तुकडय़ांनी बनलेल्या या मंदिराच्या
गुंतागुंतीच्या कोरीवकामासाठी दोन हजारपेक्षा जास्त कारागिरांनी काम केले.
प्रत्येक शिखरात रामायण, शिवपुराण, भागवत, महाभारतातील कथा आणि जगन्नाथ,
स्वामीनारायण, व्यंकटेश्वर आणि अयप्पा यांच्या जीवनाचे चित्रण करणारे
कोरीवकाम आहे. तसेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि अवकाश या पाच नैसर्गिक
घटकही दाखवण्यात आले आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतीवर घोडे, उंट यांसारख्या
प्राण्यांचे कोरीव काम आहे. मंदिराच्या सभोवतालचे पाणी हे हिंदुस्थानातील
पवित्र नद्यांचे प्रतीक आहे. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर दिसणारे
पाण्याचे दोन प्रवाह गंगा आणि यमुना नद्यांचे प्रतीक आहेत.
मंदिराच्या उभारणीपूर्वी जगन्नाथ, कोणार्क, रणकपूर, देलवाडा आणि
भारतातील इतर प्रार्थनास्थळांच्या मंदिरांचा अभ्यास करण्यात आला. हे मंदिर
भूकंप प्रतिरोधक बनवण्यात आले. हिंदुस्थान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या
अखंड मैत्रीचे प्रतीक म्हणून या मंदिराच्या वास्तूकडे पाहिले जाते. या
मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, युएईचे मंत्री शेख नाह्यान बिन
मुबारक अल नाह्यान आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक नेते
महंत स्वामी महाराज यांनी यावेळी जागतिक सहिष्णुता व एकोपा याचे महत्त्व
विषद केले.
ऑगस्ट 2015 मध्ये युएई सरकारने आबूधाबीमध्ये हिंदू मंदिर बांधण्यासाठी
जमीन देण्याचा निर्णय जाहीर केला. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबू
धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी मंदिरासाठी 13.5 एकर
आणि पार्किंगसाठी 13.5 एकर जागा भेट दिली. त्यानंतर 27 एकर जमिनीवर डिसेंबर
2019 मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
तसे पाहायला गेले तर दुबईत अनेक छोटी-मोठी हिंदू मंदिरे आहेत. 60
वर्षांपूर्वी दुबईचे पहिले हिंदू मंदिर बुर दुबई प्रदेशात बांधले गेले
होते. त्यामुळे युएईमध्ये हिंदूधर्मीयांचे वास्तव्य बऱयाच काळापासून होते
हे स्पष्ट होते. या मंदिरात पारंपरिक हिंदू मंदिराचे सर्व पैलू आहेत. मंदिर
परिसरात अभ्यागत केंद्र, प्रार्थना हॉल, प्रदर्शने, शिक्षण क्षेत्रे,
मुलांसाठी ाढाrडा क्षेत्र, थीमॅटिक गार्डन्स, पाण्याची सुविधा, फूड कोर्ट,
भेटवस्तूंचे दुकान यांचा समावेश आहे. भूकंपाच्या हालचाली, तापमानातील फरक
आणि दाबातील बदलांचा डेटा देण्यासाठी संपूर्ण मंदिरात 350 हून अधिक सेन्सर
आहेत. मंदिरात स्वागत करणारी ‘द वॉल ऑफ हार्मनी’ ही 47 मीटर लांबीची
3डी-प्रिंटेड भिंत आहे. ही भिंत दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाने पूर्ण केली
आहे.
या मंदिराच्या बांधकामासाठी जमीन एका मुस्लिम राजाने दान केली. या
प्रकल्पाचा प्रमुख वास्तुविशारद एक कॅथोलिक ख्रिश्चन होता आणि बांधकाम
प्रकल्पाचे व्यवस्थापन एका शीख व्यक्तीने केले. पायाभूत डिझायनर बौद्ध आणि
मंदिराचा संचालक जैन होते. यावरून या मंदिर उभारणीत आंतरधर्मीय सौहार्द
दिसून येते. दुबईत जवळजवळ 40 टक्के भारतीय आहेत. त्यांच्यासाठी हे भव्य
लक्ष्मीनारायण मंदिर अध्यात्मिक आकर्षण आहे. भारतीयांसह अनेक देशांतील
पर्यटक येथे श्रद्धेने भेट देतात आणि मंदिराची भव्यता, बारकावे, कोरीव काम
पाहून भारावून जातात.
पर्यटकांना खुणावतोय राऊतवाडी धबधबा…राऊतवाडी धबधब्याचा नवा लुक
Tarun Bharat Portal
3–4 minutes
ऱाधानगरी तालुक्यातील इतर धबधबे प्रवाहित, या वर्षीपासून धबधब्याला प्रवेश शुल्क , व पार्किंग शुल्क
राधानगरी / महेश तिरवडे
कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी असणा-या राधानगरी-
दाजीपुर परिसरात कोसळणा-या जिल्ह्यातील सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न
परिसर वर्षा पर्यटनासाठी नेहमीच पर्यटकांच्या पसंतीचा ठरला आहे. धुवांधार
कोसळत असलेल्या पावसामुळे राउतवाडी आणि तालुक्यातील इतर धबधब्याकडे पर्यटक
आकर्षित होत आहेत.
गर्द हिरवाई, अतिशय घनदाट अभयारण्य, हुडहुडी भरणारी बोचरी थंडी, वादळी
वारा त्यातच सतत कोसळणारा पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट रस्ते,
अनेकदा बंद होणारे मोबाईलफोन, संपर्काला येणा-या मर्यादा अशा अनेक नैसर्गिक
अडचणींचा सामना करून जगणारी दाजीपुर अभयारण्य क्षेत्रातील जनता आणि
जिल्ह्यात अधिक कोसळणारा पाऊस म्हणजे दाजीपुर परिसर.येथील पाऊस
झेलण्यापेक्षा बघण्यातच आनंद आहे म्हणून पर्यटक केवळ पावसाळी पर्यटनासाठी
येथे येत असतात.
राधानगरी म्हणजे हमखास पाऊस…. सह्याद्रीच्या उंच डोंगरातून कोसळणारे व
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले राऊतवाडी व रामनवाडी येथील गायकडा
धबधबा, कासारवाडी धबधबा, राधानगरी, काळम्मावाडी धरण यामुळे नजरेच्या
टप्प्यात दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि बेभानपणे कोसळणा-या पावसाच्या
सरीमध्ये ओलेचिंब होण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आंबोली पेक्षाही राधानगरी पासून थोड्या अंतरावर असणा-या राऊतवाडी
धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. शनिवार, रविवार या सुट्ट्याबरोबरच
शासकीय सुट्टीदिवशी पर्यटक राऊतवाडी येथे प्रचंड गर्दी करतात. पावसाच्या
धारा अंगावर झेलत मनमुराद आनंद घेता घेता तालुक्यातील राधानगरी,
काळम्मावाडी व तुळशी जलाशय देखील पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात.
यावर्षी पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम, प्रकाश आबीटकर व वन्यजीव
विभाग प्रयत्नातून पर्यटन विकास निधीतून स्वागत कमान, पुरुष व महिलासाठी
स्वतंत्र चेंजिंग रूम, स्वछतागृह, ,वनकर्मचारी व पोलिसांसाठी चौकी ,संरक्षक
कठडा आदी विकासकामे केली आहेत, त्यामुळे यावर्षी पर्यटकांची गर्दी वाढणार
आहे.
तसेच या वर्षी प्रथमच ग्रामपरिस्थिती विकास समितीच्या मार्फत लहान
मुलांना पाच रुपये व महिला व पुरुष यांना दहा रुपये प्रवेश शुल्क आकारले
जाणार आहे, या मिळालेल्या निधीतून धबधब्याची स्वच्छता, प्लॅस्टिक व इतर
कचरा गोळा करणे, दुरुस्ती व देखभाल, स्वच्छतागृहात विजेची सोय,
ग्रामपरिस्थिती विकास समितीच्या वतीने नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचा पगार
आदींचा समावेश असणार आहे,तसेच पार्किंग साठी मोटारसायकल 10 रुपये व चार
चाकी वाहनांस 20 रुपये आकारण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक हा राऊतवाडी धबधबा पहाण्यासाठी
येत असतात, काही अति उत्साही युवक मद्यपान करून नृत्य करणे, मोटारसायकल
वेगाने चालवणे, कड्यावरून डोकावून पहाणे, वाहनांची कोंडी करणे असे प्रकार
करू नये, जेणेकरून स्थानिक नागरिकांना याचा त्रास होऊ नये याची जाणीव ठेवून
पर्यटकांनी धबधब्याचा आंनद लुटावा, यासाठी स्थानिक ग्रामपरिस्थिती विकास
समिती व पोलीस प्रशासनास सहकार्य असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले
आहे,
मैत्रीची चिरंतन स्मृती ‘भावसिंगजी रोड’
Tarun Bharat Portal
3–4 minutes
सुधाकर काशीद
मैत्रीचे प्रतीक म्हणून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मैत्री दिन साजरा
करण्याची प्रथा आहे. अडचणीच्या वेळी कोण मदतीला धावून आले नाही तर मित्र
तरी येतोच हा बहुतेकांचा अनुभव आहे. त्यामुळे जीवनात मैत्रीचे स्थान अमूल्य
आहे.वेगवेगळ्या माध्यमातून हा दिन आज साजरा झाला.पण कोल्हापुरात असा एक
रस्ता आहे की तो फक्त मैत्री या शब्दाचे प्रतीक आहे.भावसिंगजी रोड असे
त्याचे नाव आहे.आणि तो चक्क आपली राजर्षी शाहू महाराज व भावनगरचे महाराज
भावसिंगजी या दोघातील मैत्रीचा अतूट असा धागा आहे.अर्थात नवी पिढी हे सारे
विसरून गेली आहे.पण जोवर भाऊसिंगजी रोड आहे,तोवर शाहू महाराज आणि भावसिंगजी
महाराज यांच्या मैत्रीची स्मृती जिवंत राहणार आहे.
जुना राजवाडा ते नवीन राजवाडा हा रस्ता म्हणजे कोल्हापूरचा राजमार्ग.या
रस्त्याला खूप महत्त्व.कारण रस्त्याच्या एका टोकाला जुना व दुस्रया टोकाला
नवीन राजवाडा.कोल्हापुरातले त्या काळातले जे जे महत्त्वाचे ते याच
रस्त्यावर . या रस्त्यावरून जाताना पहिल्यांदा जुना राजवाडा ,नंतर नगार
खाना ,राजाराम हायस्कूल , उजव्या हाताला करवीर नगर वाचन मंदिर ,डाव्या
हाताला खर्डेकर बोळ,अंबाबाई मंदिर ,सराफ व्यवसायाची मोठी उलाढाल असलेली
गुजरी ,नालबंद वाडा ,शहरातले सर्वात श्रीमंत गृहस्थ नगरशेठ यांची पाच मजली
हवेली,शाहू महाराजांनी सुरू केलेला पहिला होमिओपॅथी दवाखाना ,संस्थानकालीन
हुजूर गल्ली ,घुडनपीर दर्गा
डॉक्टर जयंत नारळीकर यांचे आजोळ असलेली भेंडी गल्ली ,विल्सन चौक म्हणजे
आताचा छत्रपती शिवाजी चौक ,फेरीस मार्केट म्हणजे आत्ताचे शिवाजी मार्केट
,माळकर वाडा , खाना , नगरपालिका इमारत , बोर्ड ऑफिस , ट्रेझरी (सिटीसर्वे
), टाऊन हॉल उद्यान , चौधरी वाडा ,गुणेवाडा ,तेंडुलकर वाडा , समाज
सुधारणेचे प्रतिक गंगाराम कांबळे यांचे हॉटेल , टेलीफोन ऑफिस , करवीर चावडी
, जिल्हा न्यायालय,थोरला दवाखाना ,पुराभी लेख कागदपत्रांचे दालन, पॉवर
हाऊस (करवीर पंचायत ), दरबार सर्जन सिंक्लेअर यांचा बंगला .बारा खोल्याचा
हा बंगला आजही आहे पण वीना वापर पडून आहे . जैन बस्ती ,उजव्या हाताला
असेंब्ली रोड (कलेक्टर ऑफिस . ) वाडा, इचलकरंजीकर बंगला, महावीर कॉलेज व
तेथून नेसरीकर वाड्याच्या पुढे नवीन राजवाडा. दस्रयाचे सोने लुटण्यासाठी जो
शामियाना निघतो तो याच रस्त्यावरून. इतक्या साऱ्या महत्त्वाच्या
वास्तूमुळे हा रस्ता तसा राजपथच होता.
या राजपथालाच शाहू महाराजांनी त्यांचे मित्र भावसिंगजी यांचे नाव
दिले.त्याला कारण म्हणजे,ते दोघे राजकोट येथे एकत्र शिकायला होते. त्या
काळात त्यांची मैत्री झाली.पुढे भावसिंगजी यांच्याकडे भावनगरचा राज्यकारभार
आला .त्यांनी शाहू महाराजांच्या प्रमाणे आपल्या संस्थानात खूप चांगली कामे
केली .या दोघातील संबंध दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेले .आपल्या या मैत्रीची
स्मृती कायम राहावी म्हणून त्यांनी भावसिंग जी रोड असे या रस्त्याला नाव
दिले. पुढे या भाव सिंग रोडला लोक अपभ्रंशाने भाऊसिंगजी रोड असे म्हणू
लागले.
आजही भावसिंगजी रोड आहे पण त्याचे मूळ स्वरूप बदलले आहे.सोने-चांदी ,औषध
, कपडे, मिठाई या उलाढालीसाठी आता प्रसिद्ध आहे.रस्त्याचा मूळ दिमाख गेला
आहे.पण झगमगाट वाढला आहे.हा भावसिंगजी रस्ता रॉयल स्ट्रीट म्हणून शंभर फुटी
करण्याचा महापालिकेचे पहिले प्रशासक द्वारकानाथ कपूर यांचा संकल्प होता.पण
कपूर यांची बदली झाली.त्यानंतरही या रस्त्याला राजपथाचे स्वरूप
देण्याविषयी फक्त चर्चा होत राहिली.या रस्त्याला भावसिंगजी रस्ता का
म्हणतात हे देखील नवी पिढी काळाच्या ओघात विसरली.पण जोवर हा रस्ता आहे तोवर
भाव सिंगजी रस्ता हे नाव कायम राहणार आहे.आणि शाहू महाराज जसा खेळ जपत
,समाजकारण जपत , शेती जपत , जपत तशी मैत्रीही कशी जपत याचे ते चिरंतन
प्रतीक असणार आहे.
हिरवाईनी नटलयं माद्याळचे पठार..! ‘कास‘च्या धरतीवर पर्यटनस्थळ होण्याची गरज
Tarun Bharat Portal
3–4 minutes
विशेषवृत्त सदाशिव आंबोशे
जैव विविधतेने नटलेले पण दुर्लक्षित असलेले कागल तालुक्यातील माद्याळ पठार
पर्यटकांना खुणावत आहे. सातारा जिह्यातील ‘कास‘ पठारावर जशी जैव विविधता
आढळते, तशीच इथं जैवविविधता असून, आता हा पठार रान फुलांनी बहरलेला आहे.
त्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. विविध पक्षासह राष्ट्रीय पक्षी म्हणून
ज्याची ओळख आहे, अशा मोर पक्ष्यांचा येथे मोठा वावर आहे.
कागल तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणून माद्याळ आणि
माद्याळ-हुडा परिसर व आजरा तालुक्यातील धामणे गावाचा डोंगर भाग असलेल्या
पठारावर हा भाग विखुरलेला आहे. माद्याळ-हुडा ते धामणे हा नव्याने झालेला
रस्ता असून या रस्त्यालगतच सुमारे एक ते दीड किलोमीटरचा असलेला हा पठार
आहे. येथेच हे रंगी-बेरंगी फुलांनी बहरलेला आहे. त्यामुळे साहजिकच
पर्यटकांना भुरळ पडनार आहे. मात्र हे पठार तसे दुर्लक्षित असल्यामुळे तिकडे
कोणीच फारसे फिरकत नाही.
या परिसरात औषधी वनस्पतीही खूप आहेत. विविध प्रकारचे वृक्ष, गवतांच्या
जाती या परिसरात आढळून येत आहेत. विविध रंगी-बेरंगी फुलांचे ताटवे आता
सजलेले आहेत. येथील पक्षांचे थवेच्या थवे येथे येत आहेत. विविध प्रकारचे
भुंगेही येथे येतात. राष्ट्रीय पक्षी म्हणून ज्याची ओळख आहे त्या मोर
लांडोरासह ससाणा, सुगरण याशिवाय विविध पक्षांचे इथे ये- जा सुरू असते.
सध्या हा परिसर विविध फुलांच्यासह पिवळ्या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला
आहे. त्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. वन्यजीवांचाही येथे सहवास आहे.
फुललेल्या फुलांच्यावर विविध रंगांची फुलपाखरे ही मनमुराद आनंद लुटताना
दिसतात. त्यामुळे एक वेगळेच दृश्य पहावयास मिळते. सकाळ, संध्याकाळी तर खूपच
नयनरम्य दृश्य असते. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येथील विहंगम दृश्य
पाहण्याची मजा औरच असते. तर विविध पक्षांचे आवाज ऐकता ऐकता सुगरणीचे खोपे
पहायला मिळतात.
असे वेधले लक्ष…
सेनापती कापशीपासून हे ठिकाण नऊ- दहा किलोमीटर अंतरावर आहे. सायकल
ट्रेकिंगसाठी रोज माद्याळहुडा येथे सेनापती कापशीहून शशिकांत खोत, सुनिल
चौगले, राजेश उत्तुरे, अजित वंदुरे, सोमनाथ खोत, आर्यन चौगले, विष्वेश खोत
हे जातात. ते नेहमी कापशी ते लिंगनूर किंवा कधी- कधी कापशी, माद्याळ, हुडा,
धामणे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, काळमा बेलेवाडी, वडगाव असा
सायकलवरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांना येथे गेल्यानंतर ही सर्व जैव
विविधता पहावयास मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘दै. तरुण भारत संवाद‘ संवाद
साधला.
खूप सुंदर परिसर…
सातारा जिह्यातील कास पठार पेक्षाही खूप सुंदर हा परिसर आहे. येथे सर्व
वृक्ष, झाडे-झुडपे, विविध रंगांची फुले ही नैसर्गिकरित्या आहेत. विशेष करून
या परिसरात मोर-लांडोर यांची संख्या खूप मोठी आहे. याशिवाय इतर पक्षीही
येते पहावयास मिळतात. या परिसराकडे जर लक्ष दिले तर चांगले पर्यटन स्थळ होऊ
शकते. याशिवाय पावसाळ्यामध्ये माद्याळहून या परिसरात जाताना मध्येच
डोंगरांमध्ये एक छोटा धबधबा आहे. त्याचाही आनंद या पर्यटकांना मिळू शकतो,
असे पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत यांनी सांगितले.
कोपेश्वर मंदिरात सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष
Tarun Bharat Portal
4–5 minutes
संकलन, राहूल गडकर
भारत देश हा विविध संस्कृती, शिल्पे, मंदिर स्थापत्य, लेणी, व सुंदर
नक्षीकाम असलेल्या वाड्यांनी नटलेला आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे
वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती, परंपरा या अगदी प्राचीन काळापासून
आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहेत. भारतीय संस्कृती जितकी कर्मठ आहे, तितकीच
लवचिकही आहे. भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला
मिळतात. अगदी हजारो वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही
इतिहासाची व त्याकाळातील संस्कृतीची साक्ष देत उभी असल्याचे आपल्याला
पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भूत
नमुना म्हणावा अशाच आहेत. अशाच अद्भुत नमुना असलेले खिद्रापूर येथील
कोपेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय दृष्ट्या
महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या स्वर्ग मंडपाचे आकर्षण
सर्वांनाच आहे. या मंदिरात असलेले शिल्प, त्यावरील अभूषणे, दिग्पाल याने हे
मंदिर नटलेले असल्याचे दिसते. व जगभरातील अनेक पर्यटक प्राचीन काळापासून
ते आजपर्यंत येथे येत असल्याचे निदर्शनास येते.
नासिकच्या प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व
रत्नागिरीच्या स्नेहन बने यांना दि. २६ मे रोजी कोपेश्वर मंदिराला भेट दिली
होती. सोज्वळ साळी यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध शहरात असलेल्या
मंदिरात, लेणीमध्ये व टेकडीवर प्राचीन पटखेळ (बैठेखेळ) शोधलेले आहेत. ज्यात
नासिकमधील त्रिरश्मी लेणी, गोंदेश्वर मंदिर, अंकाई लेणी, ढग्या डोंगर,
त्रिंगलवाडी लेणी, पासून लोणार सरोवराभोवती असलेल्या मंदिरामध्ये तसेच
महाराष्ट्रातील ५० पेक्षा जास्त ठिकाणांवर पटखेळ शोधलेली आहेत. काही
दिवसांपुर्वी फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यातील हिंजवडी परिसरात असलेल्या
मारुंजी टेकडीवर ४१ खेळ तर कापूरहोळ येथे ३५, भोरदरी येथे १७, वैष्णवधाम
येथे ३७, तुळजा लेणी येथे २८ असे महाराष्ट्रात ९०० पेक्षा जास्त खेळांचे
दस्तऐवजीकरण करण्याचे काम वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या “ प्राचीन
पटखेळ संवर्धन मोहिमेंतर्गत” सुरु असून प्राचीन व्यापारी मार्गांवर
व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात
प्रवास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर या
मंदिराच्या सभामंडपात रोमन साम्राज्य व रोमन व्यापाराचा नाइन मेन्स मॉरीस व
पंचखेलीया या खेळांचे अवशेष सापडले असून त्यांनी प्राचीन पटखेळ संवर्धन
मोहिमेत या खेळांची नोंद व दस्तऐवजीकरण करण्यात यश आले आहे.
नवकंकरी या खेळाला मराठीत फरे-मरे या नावानेसुद्धा ओळखले जाते. तर
इंग्रजीमध्ये दि मिल गेम, मेर्रील्स, नाईन पेंनी मार्ल, व उत्तर अमेरिकेत
कॉवबॉव चेकर्स यानावाने ओळखले जाते. नाइन मेन्स म्हणजे ९ माणसे म्हणजेच हा
खेळ २ खेळाडू बसून खेळू शकतात. या खेळाचे इतर ३ प्रकार पाहावयास मिळतात
ज्यात ३ मेन्स मॉरिस, ६ मेन्स मॉरिस, १२ मेन्स मॉरिस हे आहेत. या खेळाचे
नियम हे फुल्ली-गोळा प्रमाणे असले तरी हा धोरणात्मक खेळ आहे.
पंचखेळीया/पंचखेलीया हा खेळ श्रीलंकेतील विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा
खेळ असून हा खेळ बैठे खेळातील शर्यतीचा खेळ म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आपण
ज्याप्रकारे पचिसी व ल्युडो खेळतो त्याप्रमाणे या खेळाचे नियम आहेत. या
दोन खेळांचे अवशेष कोपेश्वर मंदिरात सापडले आहेत. हे संवर्धित व्हावे साळी
यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यासोबतच असे खेळ कोल्हापुरातील इतर
मंदिरात असल्याचेही ते बोलताना म्हणाले.
भारताच्या इतिहासात प्राचीन काळापासून ते २० व्या शतकापर्यंत विविध
देशातून व्यापार व्यापारासाठी, युद्धासाठी, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अनेक
प्रवासी येऊन गेले आहेत. ज्यावेळी हे प्रवासी, व्यापारी महाराष्ट्रातून
गेले त्यावेळी विश्रांतीच्या वेळी व पावसाळ्यात प्रवास न करता एका ठिकाणी
मनोरंजन कसे होईल त्यासाठी त्यांच्या देशात असलेले पट-खेळ कोरून ते
खेळल्याचे दिसते. सदरील खेळांचा इतिहास पाहता हे खेळ सुमारे २०००
वर्षापेक्षा जुने आहेत. आता हे खेळ या मंदिरात कधी कोरले याबाबत संशोधन
होणे गरजेचे आहे. तसेच त्या देशातील पारंपरिक खेळ आपण शिकल्यास यातून
धोरणात्मक खेळ नक्कीच खेळता येऊ शकतो. या खेळांचे संवर्धन होण्यासाठी मी
महाराष्ट्रभर फिरून या खेळांच्या शोधात आहे. आजच्या मोबाईल व
तंत्रज्ञानाच्या जगामध्ये या खेळांना महत्व देणे काळाची गरज आहे. सोज्वळ शैलेंद्र साळी, पुरातत्त्वज्ञ व प्राचीन पटखेळ संवर्धक, नासिक
‘मिनिएचर’ (छोट्यात छोटी) पुस्तकांचे जगातील पहिले आणि एकमेव असे
म्युझियम, युरोप आणि आशिया अशा दोन्ही खंडांना जोडणाऱ्या ‘अझरबैजान’ या
देशात पाहावयास मिळते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये 2015 मध्ये
त्याची नोंद झाली आहे. राजधानीच्या बाकू शहरातील जुन्या इचेरी शहरात हे
म्युझियम थाटण्यात आले आहे. बाकूच्या भटकंतीत म्युझियमच्या निर्मात्या
सालाखोव्हा झरिफा तेयमूर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
एका अझरबैजानी महिलेने केवळ आपला छंद म्हणून 20 देशांमध्ये प्रकाशित
झालेली 8700 पेक्षाही अधिक छोट्यात छोटी (मिनिएचर) पुस्तके जमवून हे
प्रदर्शन थाटले आहे. झरिफा या अझरबैजान देशात सांस्कृतिक क्षेत्रात
सन्माननीय कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. अशा या कर्तृत्ववान महिलेच्या
आयुष्याला 1982 मध्ये मोठी कलाटणी मिळाली. त्या नोव्हेंबर 1982 ला मॉस्को
येथे पुस्तकप्रेमींच्या भरलेल्या ‘ऑल युनियन व्हॉलेंटरी सोसायटीच्या’
अधिवेशनाला गेल्या होत्या. तेथे क्रायलोव्ह या नामांकित लेखकाच्या 1935
मध्ये प्रसिद्ध झालेल्या दंतकथांच्या संग्रहाची, अगदी छोट्या आकारातील
आवृत्ती 23 रुबेल्सना विक्रीसाठी उपलब्ध होती. झरिफा यांनी त्याची खरेदी
केली. त्याचे पैसे देऊन त्या ते पुस्तक घेण्यासाठी बाजूच्या गोदामात
गेल्या. तेथे त्यांनी आयुष्यात प्रथम, अगदी छोट्या आकाराची ‘मिनी’ पुस्तके
पाहिली आणि त्या दिवसापासून अशी पुस्तके जमविण्याचा छंदच त्यांना लागला.
दरवर्षी या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. त्या म्युझियममध्ये 2002 मध्ये
अशा प्रकारच्या मिनिएचर पुस्तकांनी भरलेली काचेची 25 कपाटे होती. आता त्या
कपाटांची संख्या 39 झाली असून एकूण 20 देशांमध्ये प्रकाशित झालेली 8700
मिनिएचर पुस्तके तेथे पाहावयास मिळतात. यात विशेष म्हणजे भारतातील ‘हनुमान
चालिसा’ व गीतेची अगदी छोटी आवृत्तीही तेथे आढळली.
मिनिएचर पुस्तकाची व्याख्या काय, तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्च्या
प्रमाणानुसार 75 * 75 मि.मी.पर्यंतच्या आकाराचे पुस्तक हे मिनिएचर पुस्तक
ठरते. झरीफा यांच्या संग्रहालयात अशी 3370 पुस्तके आहेत. पूर्वीच्या
सोव्हिएत रशियाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे 100 * 100 मि.मी. पानाच्या
आकाराचे पुस्तक ‘मिनिएचर’ सौंधेत बसते. त्या मापनानुसारही अनेक पुस्तके
त्यांनी जमविली. म्युझियममधील चार पुस्तके ही सर्वात छोटी म्हणजे अक्षरशः
‘मायक्रो’ आकाराची व अत्यंत दुर्मिळ अशी आहेत. त्यात जपानची राजधानी टोकियो
येथून प्रसिद्ध झालेल्या ‘टोपान’ (Toppan) पुस्तकाचा आकार 0.75 * 0.75
मि.मी. एवढा आहे. तेथील चार मोसमांतील फुलांचे वर्णन त्यात आहे. ते एका खास
आकर्षक बॉक्समध्ये ठेवण्यात आले असून ‘मायक्रो बुक’ असे त्यावर इंग्रजीत
लिहिले आहे. आणखी एक जपानी पुस्तक 2 * 2 मि.मी.चे आणि दोन जर्मन मायक्रो
पुस्तकेही येथे पाहावयास मिळतात. त्यापैकी एकाचा आकार 2.0 * 2.9 मि.मी. आणि
दुसऱ्याचा 3.5 * 3.5 मि.मी. एवढा आहे. या सर्वांच्या शेजारी जाड भिंग
ठेवण्यात आले असून, त्याच्या सहाय्यानेच ती पुस्तके वाचता येतात. या
म्युझियमसाठी शिरव्हान शहाज राजवाडय़ाजवळची छोटी, पण मध्यवर्ती जागा शासनाने
दिली आणि 23 एप्रिल 2002 मध्ये या म्युझियमचे तिथे उद्घाटन झाले.
सालाखोव्हा यांनी उद्घाटनासाठी तो दिवस मुद्दाम निवडला. कारण याच दिवशी
1616 मध्ये जागतिक कीर्तीचा नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे निधन झाले आणि
तो दिवस आंतरराष्ट्रीय पुस्तके आणि पुस्तकांचे हक्क (कॉपी राईट) यासाठी
जगभर पाळण्यात यावा असा निर्णय युनेस्कोने घेतला. शेक्सपिअरचे नाव चिरकाल
राहावे हा त्या मागचा हेतू होता आणि त्याच दिवशी हा ‘मिनिएचर म्युझियम’
पर्यटक, स्थानिक नागरिक या सर्वांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला.
87 वर्षे वयाच्या झरिफा माडम आजही मोठ्या उत्साहाने साऱ्या जगभर विविध
बैठका, परिषदांच्या निमित्ताने लंडन, बर्लिन, म्युनिक, ब्रुसेल्स, बीजिंग,
पारीस तसेच हवाना, मास्को येथे गेल्या होत्या. तेथील अँटिक पुस्तकांची
दुकाने, बाजारपेठांना त्यांनी भेटी दिल्या. मिनिएचर पुस्तकांची माहिती घेऊन
त्यांनी ती खरेदी केली. त्याखेरीज अनेक स्नेही, पुस्तकप्रेमी, राजकारणी
व्यक्ती यांनी काही मिनी पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. तसेच 1985 पासून
त्यांनी मिनिएचर पुस्तकांचे प्रकाशन सुरू केले. विशेषतः सोव्हिएत रशियात
अशी पुस्तके जमविणारी पुस्तकप्रेमी मंडळी आहेत. त्यांचे खूपच सहाय्य झाले.
हे म्युझियम 145 चौ.मीटर क्षेत्रफळाच्या जागेत थाटण्यात आले असून त्याची
रचना अतिशय आखीव अशी आहे. एकूण 39 काचेच्या भव्य कपाटात हे प्रदर्शन
मांडण्यात आले आहे. पुस्तकांची वर्गवारी केल्याने कोणत्या कपाटात कोणती
पुस्तके आहेत याची कल्पना येते. शेक्सपियरच्या अजरामर साहित्याचा ठेवा येथे
पाहावयास मिळतो. ‘रोमियो आण्ड ज्युलिएट’पासून संपूर्ण शेक्सपिअरच्या एकूण
40 खंडांपैकी 24 खंड हे 50*73 मि.मी.च्या आकारात आहेत. झरिफा यांच्या या
अगदी आगळ्यावेगळ्या आणि जगातील एकमेव मिनिएचर म्युझियमने जागतिक पातळीवरील
अनेक पारितोषिके मिळविलीत. पण सर्वात मोठा सन्मान म्हणजे 2015 मध्ये या
म्युझियमची ‘गिनीज बुक आाफ वर्ल्ड रेकार्डस्’मध्ये नोंद झाली आहे. बाकू
शहरात इचेरी शहरात असलेले हे मिनिएचर म्युझियम पुस्तकप्रेमींना पाहण्यासाठी
विनामूल्य खुले असते.
समुद्र किनाऱ्याचा आभास घडवणारे राधानगरीतील ‘हसणे’
Tarun Bharat Portal
3–4 minutes
राधानगरी तलाव बॅक वॉटर परिसरातील तिन्ही ऋतूतील पर्यटन स्थळ
तरूण भारत – कौलव
राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटरमुळे निर्माण झालेल्या प्रति ‘बीच‘ या
सर्वांचा नजराणा अनुभवायचा असेल तर सह्याद्रीच्या रांगेतील हसणे परिसराला
भेट देऊन उन्हाळी पर्यटनाचा अनुभव कुटुंब आणि मित्र परिवार सहलीमार्फत मे
महिन्यात द्विगुणित करण्यासारखा आहे. राधानगरी आणि दाजीपूर परिसराला
आवर्जून भेट पर्यटनप्रेमींनी दिली पाहिजे.
राधानगरी तालुक्यातील राधानगरी ,दाजीपूर आणि काळम्मावाडी परिसर निसर्ग
सौन्दर्याने नटलेला परिसर आहे.या परिसरात कोणत्याही दिवसात पर्यटनाचा आनंद
लुटता येतो.सध्याचा उन्हाळा म्हणजे पर्यटकाना अनेक ठिकाणी जाऊन निसर्गातील
नजराणे, जैवविविधता यांचे अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.वाढलेली
फुलपाखरांची संख्या, सायंकाळच्या वेळी काजवा किड्यांचे थवे, दिवसभर मिळणारा
करवंदे,
आंबा, फणस, नेर्ली, चिखल्या, जांभळे असा रानमेवा भरभरून लगडलेला परिसर पर्यटकांना साद घालत आहे. फेजीवडे
गावाजवळ भोगावती नदीवर राजर्षी शाहू महाराजांनी लक्ष्मी जलाशय बांधणी
केली. या जलाशयामुळे कोल्हापूर जिह्यात हरित क्रांती झाली.फेजीवडे
गावापासून हसणे,दाजीपूरपर्यंतचा बावीस किलोमीटर अंतराचा परिसर निसर्ग
सौंदर्याने नटलेला आहे. या सौदर्यांत आणखी भर घालणारी बाब म्हणजे राधानगरी
जलाशयाचे बॅक वॉटर ,विस्तीर्ण क्षेत्र लाभलेला लक्ष्मी जलाशय. कोकणला
जोडणाऱ्या कोल्हापूर -राधानगरी- फोंडा या राज्यमार्गावर हसणे गावापासून
दाजीपूर पर्यंत पाच किलोमीटर अंतरावर राधानगरी जलाशयाचे बॅक वॉटर मनमोहित
करून टाकते. रस्त्याच्या शेजारी बॅक वॉटर चा परिसर ,पाण्यावर उसळणारे
लाटांचे तरंग ,थंडगार वाऱ्याचा पाण्यावरून येणारा प्रवाह जणू समुद्र
किनाराच भासतो. एकदिवशीय सहल कुटुंबियांच्या समावेत असो किंवा मित्रपरिवार
यांच्यासोबत असो जंगली सहलीचा मनमुराद आनंद लुटता येतो.स्वच्छ पाणी, स्वच्छ
हवा वातावरणातील गारवा, ट्रेकिंगचा अनुभव मिळवून देतो. हसणे परिसरात
बॅक वॉटरचे बीच आहेतच. शिवाय शेजारील जंगलात देवराई जागोजागी पाहण्यास
मिळतात.हसणे गावच्या उत्तर बाजूला लघु तलाव आहे या तलावा शेजारी देवराई
आहे.येथिल लोकांनी देवाच्या नावाने संरक्षित ठेवलेले लहानसे जंगल आहे.या
जंगलात फिरण्याचा आनंद कांही औरच आहे.विविध प्रकारच्या वनस्पती ,फुलपाखरे
असा हिरवागार परिसर पर्यटकाना पुन्हा पुन्हा देवराइत येण्यास भाग पाडतो.
शांत निसर्गाची अनुभूती देणारा परिसर म्हणजे देवराई.
या परिसरात दहा देवराई निसर्गाचा वारसा जपत आहेत.हसणे गावच्या लघु तलाव
शेजारी गंगामाऊली देवराई,दाजीपूर येथे उगवाई देवी देवराई.तर शेजारच्या
भागात फराळे येथील डोंगराई देवराई ,वाकी येथील वाकी देवराई,सावरदे, पडसाळी,
पाट पन्हाळा, मिसळवाडी याठिकाणी देवराई सुस्थितीत असून दुर्मिळ वनस्पती
आणि प्राण्यांचे आगार पाहण्यास मिळते. देवराईची जंगले पर्यटकाना आणि
अभ्यासकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
राधानगरी जलाशयाचा विस्तीर्ण परिसर सुमारे बावीस किलोमीटर अंतरात वसलेला
असूनराधानगरी,हसणे,दाजीपूर,राऊतवाडी असा गोलाकार प्रवास निसर्गाची
सौन्दर्य अनुभुती देतो. सोबत कोकण दर्शन,राधानगरी लक्ष्मी जलाशय,राऊतवाडी
धबधबा परिसर,मधुमक्षिका पालन केंद्र आदी ठिकाणे पाहता येतात.राधानगरी नेचर
क्लब,बायसन क्लब मधील संघटक ,कार्यकर्ते मदतीसाठी येतात. शिवाय गाईड
राधानगरी शहरात मिळत असल्याने पर्यटकाना सुलभता निर्माण झाली आहे.
कसे जाल कोल्हापूर -राधानगरी-हसणे परिसर —-75 किलोमीटर . कोकणाकडून फोंडा ते हसणे परिसर —-25 किलोमीटर. भोजनाची व्यवस्था , भाऊसाहेब हॉटेल, खिंडी व्हरवडे. राधानगरी शहर येथे अनेक हॉटेल उपलब्ध,घरगुती भोजन ठिकठिकाणी सुविधा आहेत.
संस्कृती-वैभव – श्रीरामाच्या बहिणीचे मंदिर
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> वर्षा चोपडे
पुराणात उल्लेख असलेली रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि
बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात
शांतादेवीचा उल्लेख आढळतो. हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात
शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत.
कोण होती भगवान रामाची बहीण? फार कमी लोकांना माहिती आहे की, भगवान राम
यांना एक मोठी बहीणदेखील होती. पुराणात उल्लेख असलेली हिंदू महाकाव्य
रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती.
वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो.
पौराणिक कथेनुसार, भगवान रामाच्या जन्मापूर्वी दशरथ आणि कौसल्या यांना
एक शांता नावाची मुलगी होती. राजा अंगराज रोमपाद आणि राणी वर्षिनी (रामाची
मावशी) यांना मूलबाळ नव्हते. राजा रोमपाद शांताचे तेजस्वी रूप व युद्धातील
ज्ञान ऐकून प्रभावित झाले. आपल्याला अशीच कन्या असावी अशी इच्छा त्यांनी
राजा दशरथासमोर प्रगट केली. विशाल मनाच्या राजा दशरथाने आपली कन्या उदारपणे
राजा रोमपाद आणि राणी वर्षिनी यांना दत्तक दिली. राजकुमारी शांता दोघा
राजाराणीची अत्यंत लाडकी होती. एकदा एक ब्राह्मण राजाकडे मदतीसाठी आला असता
राजाने त्या ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो ब्राह्मण क्रोधित
झाला. रोमपादाच्या राज्यात दुष्काळ पडेल असा त्याने शाप दिला. इंद्राने
रोमपादाच्या अंगदेशात पाण्याचा वर्षाव बंद केला आणि दुष्काळ पाडला.
त्यानंतर यातून मुक्तता मिळवण्यासाठी राजा रोमपादने शृंगी ऋषींना यज्ञ
करण्यास विनंती केली. शृंगी ऋषी हे विभांडक ऋषी व अप्सरा उर्वशी यांचे
पुत्र होते. शृंगी ऋषींच्या डोक्यावर शिंग होते, म्हणून त्यांचे नाव
ऋष्यशृंग पडले. शृंगी ऋषी हे कश्यप ऋषींचे नातू असल्याचेही म्हटले जाते.
त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते श्रंगेरी, सध्या कर्नाटकात आहे.
श्रंगेरीजवळ त्याच नावाचा एक पर्वतदेखील आहे. शृंगाच्या जन्मानंतर उर्वशी
स्वर्गात निघून गेली. या फसवणुकीमुळे विभांडक दुखावला गेला. त्याला
स्त्रीचा द्वेष वाटू लागला आणि त्याने आपला मुलगा ऋष्यशृंगावर स्त्रीची
सावलीही पडू न देण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने ऋष्यशृंगाचे संगोपन
जंगलात केले. ते जंगल अंगदेशच्या सीमेला लागून होते. तीव्र क्रोधाचे परिणाम
अंगदेशाला भोगावे लागले, तिथे भयानक दुष्काळ पडला. शृंगी ऋषींच्या
तपश्चर्येत इतकी शक्ती होती की, ते भगवान इंद्राला प्रसन्न करू शकत होते
आणि त्यांना हवा तेव्हा पाऊस पाडू शकत होते. अंगराज रोमपाद यांनी ऋषी आणि
मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि असा निष्कर्ष काढला की, जर ऋष्यशृंगाला
अंगदेशाच्या भूमीवर आणले तर त्यांची समस्या दूर होईल. म्हणून राजाने
ऋष्यशृंगाला प्रसन्न करण्यासाठी देवदासींची मदत घेतली; कारण शृंगाने
त्याच्या जन्मानंतर कधीही स्त्री पाहिली नव्हती… आणि नेमके तेच घडले.
अंगदेशात शृंग ऋषीचे मोठय़ा आनंदात स्वागत करण्यात आले; परंतु विभांडकच्या
रागाच्या भीतीने रोमपादाने ताबडतोब आपली मुलगी शांताचा हात ऋष्यशृंगाच्या
हाती सोपवला. यज्ञानंतर इंद्रदेवाने दुष्काळ दूर केला. याच शृंगी ऋषी यांनी
गुरू वशिष्ठांच्या विनंतीवरून राजा दशरथाकरिता उत्तर प्रदेशातील बस्ती
जिह्यातील मखौडा धाम मनोरमा नदीकाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता.
यज्ञादरम्यान माता शांता यांनी 45 दिवस देवी शक्तीची पूजा केली. त्यानंतर
काही महिन्यांनी भगवान राम आणि त्यांच्या तीन भावांचा जन्म झाला. ऋषी
शृंगाने अश्वमेध यज्ञ केला ते ठिकाण अयोध्येपासून सुमारे 38 किमी पूर्वेस
होते.
हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल राज्यात शांतादेवीची दोन मुख्य
मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर
हरैया तहसील परिसरात एक ठिकाण आहे, ज्याचे नाव शृंगिनारी आहे. त्रेतायुगात
माता शांता तिथल्या घनदाट जंगलात राहत असत आणि पूजा-अर्चा करत असत. येथे
शृंगी ऋषींनी बांधलेले माता शांताचे एक मोठे मंदिर आहे. हे एक सिद्ध ठिकाण
आहे. देशभरातून इथे भक्त येतात. प्रार्थना करतात आणि देवी तिच्या
भक्तांना आशीर्वाद देत त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हटले जाते. या
मंदिरात देवी शांता आणि त्यांचे पती शृंग ऋषी यांची एकत्र पूजा केली जाते.
असे म्हणतात, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मंदिर शांतादेवीचे
निवासस्थान होते. हिमाचल राज्याच्या कुल्लूपासून 50 किमी दूर असलेले हे
मंदिर दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय लाकडी
वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे
की, या मंदिरात मनापासून पूजा करणाऱया भक्तांना भगवान राम, त्यांची बहीण
शांता व शृंगी ऋषी यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदुस्थानातील दक्षिणेकडील काही
भागांत भगवान रामाची बहीण शांता ही पूजनीय आहे. याच शृंगी ऋषीचे मंदिर
प्रामुख्याने बिहारमधील लखीसराय येथे आणि छत्तीसगडमधील धमतरी येथेही आहे.
लखीसराय मंदिर, बाबा शृंगी ऋषी धाम, सूर्यगढ प्रखंडमध्ये स्थित आहे. हे
मंदिर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले आहे. शृंगी ऋषी हे राजा दशरथ यांचे जावई
आणि भगवान श्रीराम यांचे मेहुणे होते. असे मानले जाते की, भगवान रामाने ऋषी
शृंगीच्या आश्रमात रावणाशी युद्ध करण्याची योजना आखली होती. पौराणिक
कथेबाबत अनेक मतभेद असले तरी शांता ही प्रभू रामचंद्राची मोठी बहीण होती
असे सांगितले जाते.
varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
काय झाले होते हो, 1857 साली?…
Tarun Bharat Portal
~4 minutes
सुधाकर काशीद,कोल्हापूर आज इथे काय आहे हो?….
गर्दी कशासाठी झाली हो?…..1857 ला इथे काय झाले होते?….बंड? कसले बंड…
चिमासाहेब महाराज कोण? मग आज इथे जुन्या राजवाड्यात काय चाललंय? अशा असंख्य
प्रश्नार्थक चेहऱ्याने सोमवारी हा जुन्या राजवाड्याचा परिसर खिळून राहिला.
1857
साली म्हणजे 165 वर्षांपूर्वी कालच्या दिवशी (5 डिसेंबर) या जुन्या
राजवाड्याच्या परिसरात सशस्त्र क्रांतीचा थरार घडला होता.क्रांतिकारकांच्या
रक्ताने हा परिसर भिजला होता. ब्रिटिश सत्तेला धडक देण्याचा अतिशय धाडसी
असा हा प्रयत्न कोल्हापुरातल्या सैनिकांनी केला होता.या कटाचा सूत्रधार
म्हणून चिमासाहेब महाराजांना आजन्म बंदीवास कराचीत भोगावा लागला
होता.कोल्हापूरच्याच नव्हे, देशाच्या क्रांतिकारक इतिहासात हा क्षण नोंदला
गेला.पण आजच्या पिढीचा या जुन्या राजवाड्याच्या परिसरातला वावर त्या
क्रांतिकारक इतिहासाशी आपले काय देणे घेणे? अशाच तटस्थतेचा राहिला.
जुन्या
राजवाड्याच्या या साऱ्या परिसराला क्रांतिकारक इतिहासाची किनार
आहे.ब्रिटिश राजवटीच्या विरोधात खदखदणाऱ्या असंतोषाला कोल्हापूरच्या
राजघराण्यातूनही कसे अप्रत्यक्ष बळ मिळत होते याचा हा सारा अस्सल इतिहास
आहे.165 वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानातील सैनिकांनी ब्रिटिशांच्या
सत्तेला अतिशय धाडसाने अशी धडक दिली होती.फिरंगोजी शिंदे,बाबाजी आयरेकर या
साहसी वीरांनी व त्यांच्या निडर सहकाऱ्यांनी बंड करून जुना राजवाडा ताब्यात
घेण्याचा प्रयत्न केला होता.ब्रिटिश अधिकाऱ्यांना याची सुरुवातीला फारशी
चाहूल नव्हती.पण अचानक झालेल्या या उठावाने मोठा धमाका उडवून दिला.सारी
यंत्रणा खडबडून जागी झाली.अर्थात हा उठाव अपुऱ्या मनुष्य व अपुऱ्या
शस्त्राच्या बळावर होता.त्यामुळे उठाव पूर्ण ताकदीने यशस्वी झाला नाही.पण
कोल्हापूर सारख्या एका टोकाच्या गावात अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेला
सशस्त्र आव्हान देण्याचा प्रयत्न होतो हेच खूप त्या काळात धक्कादायक असे
घडले होते.त्यामुळे ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढला.फिरंगोजी शिंदे यांना
गोळ्या घालण्यात आल्या.उठावात सहभागी सैनिकांना जुन्या राजवाड्याच्या
प्रांगणातच गोळ्या घालून ठार करण्यात आले.रक्तरंजित क्रांतीचा थरार या
परिसराने अनुभवला.आणि या सार्या उठावामागे कोल्हापूरचे चिमासाहेब महाराज
यांची प्रेरणा आहे असे समजून ब्रिटिशांनी त्यांना कराचीला आजन्म बंदीवासात
ठेवले.
अशा कोल्हापूरच्या या क्रांतिकारक लढ्याचा कालचा दिवस म्हणजे
वास्तविक कोल्हापूरच्या इतिहासातील खूप मोठी घटना. पण आज अखिल भारतीय मराठा
महासंघ वगळता त्याची फारशी कोणी नोंदही घेतली नाही. कोल्हापूर म्हणजे
पांढरा तांबडा, कोल्हापूर म्हणजे कार्र कार्र वाजणारे चप्पल, कोल्हापूर
म्हणजे जगात भारी असल्यास चर्चेत आपण आज आहोत. आणि कोल्हापूरचा सशस्त्र
क्रांतिकारक इतिहास विसरून बसलो आहोत. क्रांती करणारे करून गेले. मरणारे
मरून गेले पण आपल्या पिढीने त्याची आठवणी ठेवू नये यासारखे दुसरे दुर्दैव
ते काय आहे.
अभिवादनाची गरज.. वास्तविक आज
जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात पुष्प अर्पण करून त्या सशस्त्र
कांतिकारकांना साऱ्या कोल्हापुरकरांनी अभिवादन करायला हवे होते.शाळकरी
मुलांना या परिसरात आणून हा इतिहास कथन करायला हवा होता.पण मराठा महासंघाचा
कार्यक्रम वगळता सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे चालू होते.जाताजाता बघणारेही
हे काय चाललय असे तटस्थतेने विचारत होते.
अज्ञात विरांचा शोध … या
लढ्यातील फिरंगोजी शिंदे याचे घर गिरगाव (ता. करवीर) येथे आहे. बाबाजी
आयरेकर यांच्या नातेवाईकांनी काही स्मृती जपल्या आहेत. पण या उठावानंतर
चिमासाहेब महाराजांबरोबर त्यांच्या दहा सेवकांना कराचीला नेण्यात आले. 3 6
जणांना राजवाड्याच्या आवारातच गोळ्या घालून मारण्यात आले. त्यांची नावे
अज्ञात आहेत. त्या विरांच्या नावाचा शोध इंद्रजीत सावंत, पद्मजा पाटील,
गणेश खोडके, राम यादव, भरत महारुगडे, यशोधन जोशी, गणेश नेर्लेकर, अमित
आडसुळे यांच्या सारख्या कोल्हापूर अभ्यासकांनी घ्यावा. 1857 च्या या उठावात
बलिदान देणारे आपल्या कोल्हापूरचे हे अज्ञात वीर आपल्याशी संबधित असणारेच
आहेत.
सृजन संवाद – राक्षसांचा विजयोत्सव?
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> डॉ. समिरा गुजर जोशी
सध्या आपला देश युद्धजन्य परिस्थितीतून जात आहे. प्रतिपक्षाकडून खोटय़ा
माहितीचा प्रसार वारंवार केला जात आहे. त्यांच्या सोशल मीडियावरून
धडधडीतपणे खोटय़ा गोष्टी सांगितल्या जात आहेत, पण रामायणातील युद्धकांड
वाचताना लक्षात येते की, युद्धात अशा प्रकारे खोटे बोलणे, वल्गना करणे,
यशस्वी झालो आहोत असा आभास उत्पन्न करणे ही आसुरी वृत्ती आहे. राम-रावण
युद्धात रावणाच्या बाजूने अनेकदा असे खोटे बोलण्यात आले आहे. त्यापैकीच एक
असणारा हा नागबाणांचा प्रसंग आज पाहू.
युद्धाचा पहिलाच दिवस. वानर सैन्य सर्वत्र विजयी होत असताना दिवस
मावळला. अंधार पडू लागला, पण युद्ध काही थांबेना. राम आणि लक्ष्मण बाणांचा
वर्षाव करत होते. एका वेळी शेकडो राक्षस त्यांच्या बाणांनी कोसळत होते. आज
दिवसभराच्या युद्धामध्ये अंगदने इंद्रजिताच्या – रावणाच्या मुलाच्या
सारथ्याला मारले होते. त्याचा रथ मोडला होता. त्यानंतर इंद्रजित नाहीसा
झाला होता.
समोर आलेल्या शत्रूशी युद्ध करायचे हेच वानर सेनेचे धोरण होते, पण
राक्षस हे मायावी कूटयुद्ध खेळण्यात निष्णात होते. त्याचप्रमाणे इंद्रजितने
अंधाराचा फायदा घेऊन लपून बाण मारायला सुरुवात केली. तो अत्यंत चपळाईने
जागा बदलत नागबाणांचा वर्षाव करू लागला. ते बाण आकाराने विचित्र असत. ते
पुढील टोकाकडून वेडय़ावाकडय़ा वळणाचे असतात. ते शरीरात एकदा घुसले की, काढता
येत नसत. या बाणांनी राम-लक्ष्मण, दोघेही घायाळ झाले आणि ग्लानी येऊन खाली
कोसळले.
युद्धात सैन्यदलाने आपले आत्मबळ सांभाळणे किती गरजेचं असते यासाठी
रामायणातील हा कथाभाग फार महत्त्वाचा आहे. राम-लक्ष्मण कोसळले ही बातमी
लगेच सगळीकडे पसरली. इंद्रजितने लंकेत जाऊन आपल्या परामाचा डांगोरा पिटला.
लंकेत विजयोत्सव सुरू झाला. वानरांच्या सैन्यात मात्र दुःखाचे वातावरण
निर्माण झाले. त्या वेळी बिभीषण पुढे आले. त्यांनी सुग्रीवाला सांगितले की,
राम-लक्ष्मण जखमी झाले असले तरी ठार झालेले नाहीत. सैन्याचे मनोबल
टिकवायला हवे.
अशा वेळी गैरसमज वा अफवा किती सहज पसरतात हे महर्षी वाल्मीकींनी येथे
फार उत्तम प्रकारे दाखवले आहे. बिभीषण जवळ आल्यावर व तो आपल्याच पक्षातील
आहे हे ठाऊक असताना अंधारामुळे आणि मनोबल खचल्यामुळे मेघनाद आला आहे असे
समजून वानर सैन्यात गोंधळ माजू लागल्याचे वर्णन इथे येते.
चुकीच्या बातम्यांविषयी खात्री पटवण्याचे प्रकार कसे होतात, याचेही
उदाहरण इथे सापडते. लंकेत तर विजयोत्सव सुरूच झाला होता. रावणाला इतका आनंद
झाला होता की, सीतेची खात्री पटावी आणि ती शरण यावी म्हणून त्याने सीतेला
पुष्पक विमानात बसवले आणि आकाशमार्गाने जिथे राम-लक्ष्मण कोसळले आहेत ते
ठिकाण दाखवण्यासाठी तिला नेण्याची व्यवस्था केली. आपल्या डोळ्यांनी हे
दृश्य पाहिल्यावर तिच्या संदेहाला जागा तरी कशी राहणार?
पण सीता सुदैवी की, तिच्याबरोबर पुष्पक विमानात त्रिजटा नावाची राक्षसी
होती. तिने सीतेचा विवेक शाबूत ठेवला. विमानातून दृश्य दिसत होते की,
राम-लक्ष्मण कोसळले आहेत. त्रिजटा म्हणाली की, जरी राम-लक्ष्मण निपचित
पडलेले दिसत असले तरी ते मेले हे मानायला मी तयार नाही. जर ते धारातीर्थी
पडले असते तर सैन्य शोकाकुल झाले असते, पण सैन्य शांत आहे. ते दोघांचे
रक्षण करत आहेत आणि इथून त्या दोघांचे चेहरे दिसत आहेत. जरी जखमी असले तरी
त्यांच्या चेहऱयावर चैतन्य आहे. अशा अनेक गोष्टी सांगून तिने सीतेचे मनोबल
वाढवले.
युद्धात काय बातम्या पसरवल्या जात आहेत या गोष्टीला किती महत्त्व आहे
याचा अनुभव आपण आजही घेत आहोत. अर्थात खोटय़ा बातम्या पसरवण्याचा आपल्याला
फायदा होईल असे जरी राक्षस पक्षाला वाटत असले तरी प्रत्यक्षात काय झाले हे
पाहणे महत्त्वाचे आहे. गरुडाच्या मदतीने ते मायावी नागबाण दूर करणे शक्य
होऊन राम-लक्ष्मण शुद्धीवर आले. वानर सैन्य आनंदाने बेहोश होऊन जयजयकार करू
लागले.
कोणतीही शहानिशा करता राम-लक्ष्मण मारले गेले म्हणून विजयोत्सवात दंग
झालेल्या राक्षस सेनेला जेव्हा अचानक वानर सेनेतून आनंदाचे चित्कार ऐकू येऊ
लागले तेव्हा त्यांना स्वतला सावरणेही मुश्कील झाले. सगळी सेना आनंद साजरा
करत अस्ताव्यस्त पसरली होती. तिची जमवाजमव करत त्यांनी पुन्हा युद्धाची
सुरुवात केली. त्यांच्या तुलनेत वानर सैन्य अधिक सावध तर होतेच, पण आता
अधिक उत्साहात होते. त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता.
आज युद्धाचे तंत्र आमूलाग्र बदलले असेल, पण युद्धनीती आणि युद्ध
जिंकण्याचे मानसशास्त्र आजही तेच आहे. त्यामुळे रामायणातील युद्धाचे तपशील
आजही मार्गदर्शक ठरतात.
samira.gujar@yahoo.com
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)
World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
Tarun Bharat Portal
3–4 minutes
World Heritage Week : सौरभ मुजुमदार,कोल्हापूर इ.स.
1945 – 46 साली कोल्हापुरात पंचगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी टेकडी
परिसरात संशोधनात्मक खोदकाम झाले. त्या उत्खननातून सापडलेल्या वस्तू
सुरक्षीत ठेवण्याच्या संकल्पनेतूनच 30 जानेवारी 1946 ला महाराष्ट्र
शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना
झाली.
सर्वप्रथम पुरातत्त्व विभागाचा समावेश असणाऱ्या या संग्रहालयात
कालांतराने स्थानिक चित्रकारांच्या चित्रांसाठी स्वतंत्र विभाग करण्यात
आला. संचालक पुराभिलेख व ऐतिहासिक स्मारके, मुंबई राज्य यांच्या सूचनेवरून
कागल व सावंतवाडी येथून बंदुका, तोफा, हत्यारे, भाले ,तलवारी अशी विविध
दुर्मिळ शस्त्र आणून स्वतंत्र असा शस्त्रास्त्र विभाग साकारला. काही लाकडी
वस्तू, पंचधातूच्या तसेच पितळेच्या अत्यंत बारीक कलाकुसर असणाऱ्या
देवदेवतांच्या मूर्ती ,पुतळे ,भरजरी पंखे ,मातीची व भाजीव मातीवर कलाकुसर
केलेली नक्षीदार मातीची भांडी ,जुनी वस्त्र ,चंदन मूर्ती दुर्मिळ पंचांग
इत्यादींचा आणखीन एक विभाग तयार केला. साधारणतः इ. स. पूर्व 200 पासून
म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा कोल्हापूरचा इतिहास जगापुढे
मांडणाऱ्या दुर्मिळ वस्तूंनी साकारलेले हे अमूल्य वस्तूसंग्रहालय आजही
इतिहास संशोधक व अभ्यासकांना एक अनमोल ठेवाच आहे. अत्यंत नियोजनबद्ध मांडणी केलेल्या या संग्रहालयात या दुर्मिळ वस्तूंचा ठेवा
1)e†Meuheoeueve, 2) पुरातत्त्व दालन, 3)Mem$eem$e दालन , 4)संकीर्ण कलाकृती, 5)e†®e$ekeÀueeke=Àleer , 6) धातू वस्तू दालन अशा विविध स्वरूपात मांडलेला आहे.
ब्रह्मपुरी
उत्खनन, केशवराव भोसले नाटय़गृह ,कपिलतीर्थ तलाव , श्री महालक्ष्मी मंदिर
,फॉरेस्ट विभाग रायबाग, पन्हाळा, शिवाजी पेठ,सांगरूळ, कसबा बीड,अशा विविध
ठिकाणी सापडलेल्या कोल्हापूरच्या इतिहासाशी घट्ट नाळ जुळलेल्या शेकडो वस्तू
संस्थानकालीन वैभव दाखविणारा दरबारी पोशाख, पंचधातूंच्या देवदेवतांच्या
इ.स. अकराव्या शतकातील विविध मूर्ती, शिल्पकलाकृती तसेच तत्कालीन
कोल्हापूरचे ग्रामीण चित्र ,पंचगंगा नदी, रंकाळा, पन्हाळा हे आपल्या
कुंचल्यातून महान चित्रकारांनी साकारलेली दुर्मिळ चित्रे असा हा अमूल्य
खजिना याच राज्य शासनाच्या कोल्हापूर वस्तुसंग्रहालयात पहावयास मिळतो.
सुमारे
दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक, रोमन देशांशी असणारे व्यापारी संबंध सिद्ध
करणाऱ्या साक्षीदार कलाकृती, विविध राजघराण्यांची कारकीर्द, अशा या
संग्रहालयास इ.स .1948 ला एका महिन्यात सुमारे 2500 पर्यटकांनी भेट
दिल्याची ऐतिहासिक नोंद कोल्हापूर राज्याने प्रकाशित केलेल्या कागदपत्रात
आढळते.याच वस्तु संग्रहालयाच्या टाऊन हॉलच्या इमारतीसमोर बरोबर मध्य
केंद्रावर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा संगमरवरी शुभ्र पांढरा
पुतळा कोल्हापूरचे रेसिडेंट कोल.ई. ओब्रेन यांनी 6 मे 1927 रोजी बसविला हे
तेथील कोनशिले वरूनच समजते.
आपलाच ऐतिहासिक वारसा जगासमोर मांडणारे
हे अमूल्य वस्तुसंग्रहालय पर्यटक, स्थानिक रहिवाशी, इतिहास संशोधक व
अभ्यासक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या वारसा संग्रहालयास अवश्य
भेट द्यावी असे आवाहन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत करण्यात
आले.
या वस्तूसंग्रहालयात ग्रीक समुद्रदेवतेचा अमुल्य इतिहासाच्या
साक्षीदाराचा पुतळा आहे. याचप्रमाणे येथील प्रत्येक वस्तू ही तत्कालीन
इतिहासाचा जणू काही साक्षीदारच आहे.केवळ अभ्यासकांनी या वस्तू संग्रहालयास
भेट देणे इतकेच अपेक्षित नसून सामान्य व्यक्तींपर्यंत याची माहिती
पोहोचविण्याचा आमचा सदैव प्रामाणिक प्रयत्न राहील तरच हा ठेवा, संस्कृती ,व
वारसा अबाधित राहील.
सीतामाईंच्या वनवासातील आयुष्यातील हा पट. या
काळातही त्या तितक्याच विचारपूर्वक निर्णय घेत परिस्थिती हाताळत. सीतामाई
श्रीरामाच्या शक्ती आहेत हे कायम सिद्ध झाले आहे. मागच्या भागात आपण
शूर्पणखा ही मायावी रूप धारण करून आश्रमातील योगींना भुलवत होती ते पाहिलं.
आता पुढे…
सीतामाई स्वयंपाक करत होत्या. त्यांना एक तीव्र सुगंध आला. त्यांनी
पाहिलं की, एक सुंदर स्त्राr हातात एक भांडं घेऊन आश्रमात आली आहे. श्रीराम
आणि लक्ष्मणजी तिच्याशी बोलत आहेत व तिने आणलेलं भांडं लक्ष्मण यांनी
हातात घेतलं आहे. सीतामाई त्वरित बाहेर येतात आणि ते भांडं लक्ष्मण
यांच्याकडून घेतात. सीतामाईंना बघताच ती सुंदर स्त्राr वैतागून श्रीरामाकडे
बघत म्हणते, “मला माहीत नव्हतं की, तुमची दासी तुमच्याबरोबर राहते.’’
श्रीराम तिला सीतामाई पत्नी असल्याचे सांगतात.
शिवाय हेही सांगतात की, “माझ्या पत्नीची हरकत नसेल तर तुम्ही
आमच्याबरोबर जेवायला बसा.’’ सीतामाईचे संस्कारच होते की, त्या कधीही
अतिथीला खाल्ल्याशिवाय पाठवत नसत. सीतामाई आश्रमाच्या मागच्या बाजूला
काळोख्या जागी जातात. त्या स्त्राrने आणलेलं अन्न तिथे टाकून भांडं स्वच्छ
धुऊन त्यात स्वत शिजवलेलं अन्न भरतात आणि मग त्या तिघांना जेवायला वाढतात.
जेवून झाल्यावर श्रीरामजी आणि लक्ष्मणजीमध्ये काहीच फरक पडला नसल्याचं
पाहून ती स्त्राr सीतामाईला ओरडून बोलली, “मी आणलेलं अन्न तू का वाढलं
नाहीस?’’ सीतामाई म्हणतात की, “मी तुला ओळखलं आहे. तू आमच्यावर तुझी मायावी
शक्ती वापरू शकत नाही.’’ हे ऐकताच ती स्त्राr मूळ रूपात येते. ती रावणाची
बहीण शूर्पणखा असते. ती सीतामाईच्या अंगावर धावून जाते. श्रीरामजी काही
करणार इतक्यात लक्ष्मणजी शूर्पणखेच्या दिशेने चाकू फेकतात. त्याने तिचं नाक
कापल जातं. ती रागावून निघून जाते. जाताना लक्ष्मणाला म्हणते, “याची फळं
तुला भोगावीच लागतील. तुला खूप यातनादायी मृत्यू येईल.’’ सीतामाईंना खूप
वाईट वाटतं. कारण त्यांना माहीत असतं की कर्माचं फळ मिळतंच आणि लक्ष्मणाने
हे कर्म केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी केलं होतं. मग या कर्माचं फळ एकटय़ा
लक्ष्मणाने का भोगावं?
सीतामाई श्रीरामजी आणि लक्ष्मणाला म्हणतात की, “रावणाच्या बहिणीची
झालेली अशी दुर्दशा रावण सहन करणार नाही. तो आपल्यावर कधीही हल्ला करू
शकतो. आपल्याला अजून सतर्क राहायला हवं.’’ दुसऱया दिवशी सीतामाईंना दिसलं
की त्यांनी फेकून दिलेलं अन्न खाऊन तीन पक्षी मरून पडलेले आहेत. श्रीरामजी
सीतामाईंना समजावतात की, आपण धैर्याने घ्यायला हवं. पुढे रावणाशी होणाऱया
युद्धात किती जीव जाणार आहेत याची कल्पना न केलेली बरी.
लक्ष्मणजी आवेशाने म्हणतात की, “आपण रावणावर हल्ला करू.’’ श्रीरामजी
त्याला सांगतात की, “काही ठोस कारण असल्याशिवाय आपण त्याच्याशी युद्ध करू
शकत नाही.’’ लक्ष्मणजी म्हणतात की, “रावणाच्या बहिणीने आपल्याला विष देऊन
मारायचा प्रयत्न केला हे कारण आहेच की.’’
श्रीरामजी म्हणतात की, “यात रावणाचा प्रत्यक्ष हात होता हे आपण सिद्ध
करू शकत नाही. शिवाय रावण महादेवाचा भक्त आहे हे आपण विसरता कामा नये.
सध्या तरी आपण शांत राहून पुढे काय होते त्याची वाट बघू या.’’
सीतामाई म्हणतात की, “मी रावणाला एकदा पाहिलं होतं. तेव्हा त्याला
बाबांकडे असलेलं महादेवाचं धनुष्य हवं होतं. बाबांनी त्याला नकार दिला.
तेव्हा तो बऱयाच धमक्या देऊन गेला होता, पण त्या वेळेस बाबांनी मला
त्यांच्या शेजारी बसवलं होतं. का ते माहीत नाही.’’ श्रीरामजी म्हणाले,
“सीते, तू जनकबाबांची शक्ती होतीस. तसंच तू माझीदेखील शक्ती आहेस (रामरक्षा
या स्तोत्रातदेखील सीता शक्तीही सीतामाई असल्याचं बुधकौशिक ऋषी सांगतात).
त्या वेळचा रावण आणि आताचा रावण यात खूप फरक आहे. जपतपाने आणि
तपश्चर्येने त्याला खूप वरदान मिळाली आहेत, पण त्याचा तो दुरुपयोग करतो
आहे. शिवाय आता त्याच्याकडे बऱयाच मायावी शक्ती आहेत. जगातील सगळ्या वाईट
शक्तींना त्याने एकत्र केलं आहे. त्याच्याशी केलेलं युद्ध हे केवळ एका
व्यक्तीशी नसून सर्व वाईट शक्तींशी असेल.’’ सीतामाई एकदम गप्प होतात.
त्यांच्या डोळ्यांसमोर अचानक एक दृश्य दिसू लागतं. त्या दृश्यात नारायण
होते आणि त्या स्वत नारायणी होत्या. त्यांचा एक भक्त त्यांच्यापासून दूर
दूर एका शून्य विवरात जात आहे आणि त्या त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न
करत आहेत. श्रीरामजी यांनाही हेच दृश्य दिसतं, पण दोघंही काहीच बोलत नाहीत.
सीतामाईंना निसर्गातला फरक जाणवत असतो. वेळी-अवेळी पाऊस येणं, नेहमीच्या
लयीत वारा न वाहणं, पशुपक्ष्यांच्या वागण्यातला बदल आणि नद्यांची बदलणारी
गती… वातावरण गंभीर जाणवत होतं. संकटाची चाहूल सीतामाईंना लागली होती.
त्या पुत्री गोदावरीला भेटायला गेल्या. गोदावरी म्हणाली, “माते, आता ती वेळ
आली आहे. रावणाचा सामना करावाच लागेल आणि हा सामना तुम्हाला एकटीला करावा
लागेल. कारण तुम्हीच रावणाच्या हृदयात जाऊन त्याच्या मनात अद्वितीय प्रेम
जागवू शकता. सध्या त्याच्या मनात फक्त घृणा आहे. पण हे सगळं तुमच्या
सहमतीशिवाय होऊ शकत नाही.’’ सीतामाई तिला सहमती देत म्हणतात, “मी रावणाचा
सामना करेन आणि माझ्या आध्यात्मिक साधनांचा उपयोग करून त्याला समजावेन.’’
गोदावरी म्हणते, “माते, तुम्हाला असूर साम्राज्यात एकटीने जाऊन हे कार्य
करायचं आहे. त्यासाठी सर्व आध्यात्मिक शक्तींचा वापर करावा लागेल. मगच या
वसुंधरेचं दुःख दूर होईल. या दरम्यान श्रीरामांचा वियोग सहन करावा लागेल.
यासाठी तुमची सहमती आवश्यक आहे. कारण तुमच्या सहमतीशिवाय पुढचा घटनाक्रम
घडणं शक्यच नाही.’’
सीतामाई जड अंतकरणाने सहमती देते. श्रीरामजी सीतामाईंना शोधत येतात.
सीतामाईंच्या डोळ्यांतलं पाणी बघून विचारतात, “सीते, तू अशी विचलित का झाली
आहेस?’’ तेव्हा सीतामाई म्हणतात, “स्वामी जर कधी मी तुमच्याबरोबर नसल्याचा
प्रसंग ओढवला तर त्या विचाराने अजिबात घाबरू नका. मी माझी सुरक्षा नक्कीच
करू शकते.’’
श्रीरामजी म्हणतात, “सीते, मला माहीत आहे की, तुझ्यात आध्यात्मिक शक्ती
खूप आहे आणि त्यायोगे तू तुझं रक्षण करू शकतेस, पण मी पण शपथ घेतो की, तू
पृथ्वीवर कुठेही असलीस तरी मी तुला हुडकून काढीन. तुझ्याशिवाय मी अपूर्ण
आहे.’’ सीतामाई म्हणतात, “स्वामी तुम्ही आणि मी वेगळे नाहीच आहोत. जेव्हा
मी तुमच्या डोळ्यांत बघते तेव्हा मी दुःखमुक्त होते आणि मला शांती मिळते.
खऱया अर्थाने मी मला गवसते.’’
मग दोघे कुटीत परत येतात. त्या दिवसापासून सीतामाई थोडय़ा विचारमग्न
राहायला लागल्या. श्रीरामजी सीतामाईंना खूश कसं करावं याचा विचारात असताना
त्यांना एक सोनेरी हरीण दिसतं.
vrishali.sathe@gmail.com
दाट वृक्षांच्या सावलीत आजही इतिहासाची साक्ष देतेय कोल्हापुरातील ‘ही’ वास्तू
Tarun Bharat Portal
4–5 minutes
जागतिक वारसा सप्ताह; कोल्हापूरचे अमूल्य वारसा स्थळ टाऊन हॉल
World Heritage Week : 19 ते 25 नोव्हेंबर
संपूर्ण जगभर वर्ल्ड हेरिटेज विक अर्थात जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा
होतो. आपल्या ऐतिहासिक वास्तू, त्यांच्याशी संबंधित संस्कृती, परंपरा यांचा
सखोल अभ्यास, त्यांची ओळख, संरक्षण व संवर्धन तसेच जागरूकता यासाठीच हा
सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्त ऐतिहासिक वास्तू टाऊन हॉलमधील विलक्षण
माहितीचा खजिना लेखन व छायाचित्र स्वरूपात लेखमालेतून आजपासून देत आहोत.
(World Heritage Week Kolhapur Town Hall Museum)
सौरभ मुजुमदार,कोल्हापूर कोल्हापूर
शहराला ऐतिहासिक वारसा पाऊला पाऊलांवर आजही आपण पाहतो.त्यापैकीच शहराचा
शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत घेऊन,माणसांच्या भाऊ गर्दीत,दाट
वृक्षांच्या सावलीत एक वास्तू आजही ताठ मानेने उभी आहे.ती म्हणजे टाऊन हॉल
(नगर मंदिर)होय.करवीर संस्थानचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या
कारकीर्दीत जगातील प्रसिद्ध वास्तू रचनाकार मेजर चाल्सॅ मेंट हा गव्हर्मेंट
ऑफ बॉम्बे रॉयल इंजिनिअर सोबत कार्यान्वित होता.त्यानेच या अभूतपूर्व
वास्तूची उभारणी केली.गॉथिक शैलीमध्ये बांधलेल्या या वास्तूत सर्व
झरोके,खिडक्या,चौकटी,दगडी बैठका,गज,तावदाने यामध्ये आजही त्याचा प्रभाव
आपणास जाणवतो.इ.स. 1872 ला सुरू झालेले बांधकाम इ.स.1876 रोजी सुमारे 80
हजार रुपये मध्ये पूर्ण झाले.सदरची नोंद या नगर मंदिराच्या प्रवेश कमानीवर
दोन्ही बाजूस असणाऱ्या कोनशिलेवर पहावयास मिळते.
पंचगंगा नदी महापुराचा अभ्यास मेंटने
सर्वप्रथम कोल्हापूर शहराचा समुद्रसपाटीपासून उंचीसह पंचगंगेच्या
महापुराचा सूक्ष्म अभ्यास केला. ज्यावरुन भाऊसिंगजी रोडवरच ही वास्तू
साकारण्यापूर्वी एक दिशादर्शक पातळीची जागा निश्चिती केली. त्यापासून टाऊन
हॉल इमारतीची जोत्याची उंची ठरविली इतकेच नाहीतर येथून पुढे शहरात बांधल्या
जाणाऱ्या सर्व सरकारी अथवा खासगी इमारतींना हीच उंची प्रमाण मानून
त्यापासून उंचीवरच बांधकाम निश्चितीचा कायदाच केला.म्हणजेच टाऊन हॉलच्या
दर्शनी भागावर आजही सुरक्षितपणे असणारा हा बेंच मार्क हजारो नवीन
बांधकामांचा दिशादर्शकच ठरला.टाऊन हॉलच्या इमारतीच्या बरोबर मध्यभागावर
सर्वप्रथम एक दगडी बैठक(कट्टा)आहे .ज्यावर सहज न लक्षात येणारी ही पाषाणात
कोरलेली शून्य पातळी आपण आजही पाहू शकतो.(GTS – Great Trigonometrical
Survey , BM – Bench Mark , ” 0″ ) याच्या मधोमध शून्य “0” वरील बाजूस GTS
तर शून्याच्याखाली BM असे त्यामध्ये कोरलेले आहे.
संस्थानकालीन
सार्वजनिक कार्यक्रम,सभा,बैठका,यासाठी नगर मंदिर म्हणून बांधलेल्या या
वास्तुत 500 लोकांची बैठक व्यवस्था होते.पुरेसा सूर्यप्रकाश,स्वच्छ व खेळती
हवा,सुयोग्य ध्वनी व्यवस्था,छतावरील उत्कृष्ट लाकडी रूफबांधणीचा कलात्मक
वापर,बाहेरील दगडी बांधकामात साकारलेली पाषाणातील विविध फुले,द्राक्षांचे
वेल यांसह सूक्ष्म नक्षीदार शिल्पवैभव अशी ही टाऊन हॉलची वास्तू प्रगत
तंत्रज्ञानासह अभ्यास करणाऱ्या आजच्या वास्तुविशारदानांही अचंबित
करते.ज्याप्रमाणे कस्तुरी म्रृगालाच आपल्या जवळील कस्तुरीचे मूल्य अथवा
त्याची माहिती नसते.त्याचप्रमाणे आजही लाखो शहरवासीय व पर्यटक यांच्या
निरीक्षणातून अभ्यासापासून अथवा लोकप्रियतेपासून ही वास्तू थोडी लांब
राहिल्याचे वाटते . निर्जीव असणारी ही टाऊन हॉलची वास्तू आपण प्रत्यक्ष भेट
दिल्यास एक जिवंत वास्तुविशारदतेचा, शिल्पवैभवचा अद्भुत नमुनाच ठरेल हे
मात्र नक्की.
टाऊन हॉल अर्थात नगर मंदिर ही वास्तू केवळ इमारत म्हणून
न पाहता त्याच्या निर्मितीचा, उद्देशाचा अभ्यास सखोलपणे झाल्यास त्याचे
महत्त्व आजच्या पिढीला नक्कीच समजेल. ज्या ज्या देशात शहरात ब्रिटिशांनी
राज्य केले त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी असा सुंदर टाउन हॉल उभा केला. याच
नगर मंदिराचे निर्मितीचे महत्त्व जेथून आपण सकारात्मक ऊर्जा विचार घेऊन
बाहेर पडू ,एका सत्कर्मासाठी एकत्र येऊ तेव्हाच हे नगर मंदिर अनेक
समस्यांच्या समुळ नाशाचे निमित्त ठरेल. आपण नक्कीच याची इत्तंभूत माहिती
सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू यासाठी ‘तरुण भारत’चे देखील
सहकार्य मोलाचे ठरेल.
इंजि.इंद्रजीत नागेशकर, वास्तु अभियंता आणि पुरातत्व वास्तु संवर्धन सल्लागार.
।। सीतास्वरुपा ।।- आत्मसन्मानाचे रूपक
सामना ऑनलाईन
8–10 minutes
>> वृषाली साठे
पहलगामसारख्या दुर्घटना घडल्यानंतर आजही रावण ही वृत्ती आपल्या आजूबाजूला वास्तव्यास आहे.
या वृत्तीला दूर सारायचे तर आपल्यातील राम आणि सीता दोहोंनाही कायम जागृत
ठेवले पाहिजे. उद्या सीतानवमी आहे. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वातील सार आपण
अंगिकारले पाहिजे. सीता हे केवळ नाव वा पौराणिक व्यक्ती नव्हे तर ते
आत्मसन्मानाचे, स्वाभिमानाचे आणि कणखरतेचे रूपकच आहे.
सीतामाईची कहाणी आता सोमा सांगू लागते. वनवासात असताना रामजी ज्या-ज्या
प्रदेशातून गेले, तेथील राक्षसांचा त्यांनी नायनाट केला. राक्षसांमुळे
कोणाचा लहान मुलगा गेला होता तर कोणाचा भाऊ, कोणाची आई, तर कोणाचे बाबा
गेले होते. काहीजण तर सर्वस्व हरवून बसले होते. त्या लोकांना सीतामाईंने
भावनिक आधार दिला. त्यांच्यासाठी जेवण बनवून त्यांना प्रेमाने खाऊ
घालायच्या. त्यांना वनऔषधींची चांगली माहिती होती. त्या औषधांचा वापर करून
त्या स्वयंपाक बनवायच्या. मानसिक सामर्थ्य देऊन त्यांनी लोकांना आनंदाने
जगायला शिकवले.
आजच्या काळात एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, तर पोलीस, न्यायालय तिला
न्याय मिळवून देते. पण तिच्या मानसिक अवस्थेचे काय? कोणीतरी प्रेमाने जवळ
घेऊन दुःख हलके करायला लागतेच ना? आज जर मानसिक उपचारांची एवढी गरज आहे, तर
त्या काळात राक्षसांनी केलेला विध्वंस पाहता किती भयानक काळ असावा!
जंगलातील लोकांना शेती करायला सीतामाईंने शिकवले. जर कोणाला बरे नसेल तर
त्या औषध द्यायच्या. शिवाय लोकतंत्र शिकवून त्यांना आत्मनिर्भर देखील
करायच्या.
प्रत्येक वेळी जंगलात त्यांना खायला काही मिळेलच असे नव्हते. मिळेल त्या
अन्नात ते तिघे जेवायचे व एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. चित्रकूट सोडून
पंचवटीला येईपर्यंत रामजी आणि लक्ष्मणजी यांनी अनेक राक्षसांना यमसदनी
पाठवले. आश्रमातले ऋषी, शिष्यगण यांनादेखील निर्भय बनवून त्यांची घडी
पुन्हा बसवून दिली. मिथिलेत जनकबाबांमुळे सीतामाईंना शास्त्र चर्चामध्ये
खूप रस होता. त्यामुळे रामजी व सीतामाई बरोबर ऋषींच्या शास्त्रचर्चा भरपूर
रंगायच्या.
रामजी आणि लक्ष्मणजी सीतामाईची खूप काळजी घ्यायचे. त्यांनी सांगितलेले
औषधोपचार करायचे. सीतामाई राजमहालात जशा आनंदात राहायच्या त्यापेक्षा
जास्त आनंदात त्या जंगलातल्या पर्णकुटीत राहायच्या. रामजी आणि सीतामाई
जेव्हा पंचवटीत आले, तेव्हा तिथला निसर्ग खूप सुंदर होता. तिथे त्यांची
मुलगी गोदावरी नदी होती. सीतामाई जेव्हा गोदावरीच्या तीरावर येऊन बसायच्या,
तेव्हा गोदावरी त्यांचे पाय धुवायची. सुंदर फुले व वनऔषधी स्वतच्या
पाण्याबरोबर वाहून आणत सीतामाईंना अर्पण करायची. पण वरून सुंदर, लोभस
वाटणाऱया पंचवटीत आतून काहीतरी बिनसलेले नक्कीच होते. हे दोघांनाही जाणवले
होते.
ऋषी-मुनी श्रीरामांना भेटायला येत व सांगत की राक्षसराज रावण महादेवाची
भक्ती करून खूप प्रबळ झाला आहे. त्याला अनेक वर मिळाले आहेत. खूप सिद्धी,
मंत्र, तंत्र, विविध अस्त्र त्याच्याकडे आहेत. त्याचा तो दुरुपयोग करतो
आहे. दंडकारण्याला त्याने त्याचा प्रमुख तळ बनवले आहे. इथे त्याचे प्रमुख
सेनापती राहतात. ते आम्हाला खूप त्रास देतात. रावणाला उत्तरेकडे आक्रमण
करायचे आहे. म्हणूनच दक्षिणेत हा तळ त्याने खूप मजबूत बनवला आहे. त्याचे
सेनापती आम्हाला सतत त्रास देतात. आमच्या आश्रमाची विटंबना करतात. इतके
दिवस आम्हाला अवगत असणाऱया मंत्रांनी आम्ही आमच्या आश्रमाची सुरक्षा करत
होतो. पण रावणाकडे आमच्या प्रत्येक मंत्रावर प्रतिमंत्र असतो. त्यामुळे
आमचे मंत्र तेवढे प्रभावी ठरत नाही. रावणाने निसर्गात केलेल्या
ढवळाढवळीमुळे काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे. आम्हाला जगणे खूप कठीण होत
चालले आहे. आमचे रक्षण करा. लक्ष्मणजी चिडून म्हणाले की आपण थेट रावणावर
हल्ला करू. पण श्रीराम यांनी त्यांना समजावले की आपल्याकडे रावणावर हल्ला
करायला ठोस कारण नाही आणि आपल्याकडे याचा पुरावाही नाही की रावण हे सर्व
सेनापतींमार्फत घडवून आणत आहे. कारण रावण कुठलाच पुरावा मागे ठेवत नसे.
आजकाल आपण एखाद्या बातमीवर लगेच चिडून व्यक्त होतो. ऐकीव बातम्यांवर
विश्वास ठेवतो. त्याची शहानिशा करत नाही. श्रीराम त्यांच्याकडून खूप काही
शिकण्यासारखे आहे जे आपल्याला जगात वावरायला उपयोगी पडेल. ते तिघे जेव्हा
अगस्त्य मुनींना भेटायला गेले तेव्हा त्यांची पत्नी महातपस्विनी
लोपामुद्राने त्यांना रावणाबद्दल अधिक माहिती दिली. रावण एवढा प्रबळ झाला
आहे की तो त्याच्या तपर्श्च्येच्या बळावर मिळवलेल्या शक्तीच्या सहाय्याने
कोणाच्याही बुद्धीत शिरून त्यांचे विचार केवळ ओळखत नव्हता तर त्यात त्याला
हवे तसे बदलही घडवून आणू शकत होता. लोपामुद्राने श्रीराम आणि सीतामाईंना
काही मंत्र व मुद्रा शिकवल्या आणि सांगितले की याचा उपयोग अगदी टोकाच्या
क्षणी करा. कारण हे मंत्र अतिसंहारक आहेत. तुम्ही मनाने आणि बुद्धीने खूप
खंबीर आहात. हे मंत्र तुमच्या बुद्धीत शिरून वाचायला रावणाला जमणार नाही.
माता अनुस्येने आपल्या पूर्ण ध्यानाचे फल सीतामाईंना दिले होते. त्यामुळे
असीम शक्ती आणि सुरक्षा सीतामाईंना मिळाली. माता लोपामुद्रेने मंत्र आणि
मुद्रा सीतामाईना स्वत च्या रक्षणासाठी दिल्या. श्रीरामाची बाह्य युद्धाची
तर सीतामाईची आंतरिक युद्धाची तयारी होत होती. त्यांचा शेवटी सामना रावणाचा
सेनापती खरदूषण याच्याशी झाला. श्रीरामांनी एकटय़ाने त्याला पराभूत केले.
पण एक गोष्ट त्यांना लक्षात येते की या युद्धात वापरलेली अस्त्र-शस्त्र
आधीच्या युद्धांपेक्षा खूप वेगळी आहेत. जर सेनापतीकडे अशा प्रकारची
अस्त्र-शस्त्र असतील तर रावणाकडे कोणत्या प्रकारची अस्त्र-शस्त्र असतील?
याबद्दल श्रीराम सजगतेने विचार करू लागले. जसजसे रावणाचे सेनापती मारले जाऊ
लागले, तसतसे रावण अधिक सैन्य पंचवटीत पाठवू लागला. पंचवटीमधील वातावरण
अशांत बनत चालले होते. पशुपक्षी, जीव-जंतू या सगळ्यावर यांचा परिणाम दिसत
होता.
सोमा कलशातील अग्निद्वारे हे सगळे पाहू व अनुभवू शकत होती. तिला
सीतामाईची खूप काळजी वाटत होती. पण सीतामाईची काळजी करणारी ती एकटीच
नव्हती. अयोध्यामध्ये सर्वच स्त्रिया शरयू नदीवर पहाटे येऊन एकत्र
सीतामाईच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करायच्या. अगदी सीतामाई वनवासात गेल्या
तेव्हापासून. महामुनी अनुसूया, लोपामुद्राचे आशीर्वाद आणि अनेक
स्त्रियांच्या प्रार्थनेचे सुरक्षा कवच सीतामाईच्या भोवती होतेच. अशातच
शूर्पणखेची या कथेत एन्ट्री झाली. रावणाची बहीण शूर्पणखा ही मायावी होती.
एकदा लक्ष्मणाला बरे नव्हते म्हणून सीतामाई औषधी झाडपाला शोधण्यासाठी
जंगलात खूप आतपर्यंत गेल्या. औषधी घेऊन येताना त्यांना एका स्त्राrच्या
रडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्या गेल्या तेव्हा त्यांना एक
स्त्राr पार्वतीमातेच्या मूर्तिसमोर बसून रडताना दिसली. सीतामाईंनी तिला
रडण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझं नाव चंद्रिका. माझे पती
योगी आहेत. आमचा एक आश्रम होता. खूप विद्यार्थी आमच्या आश्रमात शिकायचे.
एकदा माया नावाची एक सुंदर स्त्राr आमच्या आश्रमात आली. तिचे वडील मोठे
योगी असल्याचे तिने आम्हाला सांगितले. तिच्या अंगाला खूप सुगंध येत होता.
तिने आणलेला पक्वान्न तिने सर्व पुरुषांना खायला घालून भुलवले. एक दिवस
माझे पती तिच्याबरोबर मला सोडून निघून गेले. तेव्हापासून मी अशी एकटी आहे.
मला आत्महत्या करायची होती. पण पार्वती मातेने मला अडवले. मी जगून तरी काय
करू? माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे.’ ते ऐकून सीतामाई म्हणाल्या, ‘तुझा
पती तुला सोडून दुसऱया स्त्राrच्या मागे गेला हे चुकीचेच आहे. पण माझ्या
बाबांनी मला सांगितले होते की स्त्राrचा पहिला धर्म म्हणजे स्वतचा
आत्मसन्मान राखणे. नंतर पत्नीधर्म. तू स्वत खंबीर हो. तू तुझ्या आध्यात्मिक
प्रगतीकडे लक्ष दे. मी तुला श्वासावर आधारीत काही ध्यानपद्धती शिकवते.’
चंद्रिका म्हणाली, ‘हीच पद्धत माया सर्व आश्रमात वापरते. ही रावणाची बहीण
शूर्पणखा आहे. हिच्यामुळे आजपर्यंत कित्येक संसार उध्वस्त झाले. कितीतरी
स्त्रियांनी आत्महत्या केल्या. तिला या भागातील सर्व गुरुकुले नष्ट करायची
आहेत.’ सीतामाई म्हणाल्या, ‘हिला हिच्या कर्माची फळे याच जन्मी भोगावी
लागतील.’
चंद्रिकाला सांत्वना देऊन सीतामाई कुटीत परतल्या. श्रीराम व लक्ष्मणजी
तिची वाटच बघत होते. जेवण झाल्यावर रामजींने सकाळी झालेली घटना सांगितली.
ते शेजारच्या गावी गेले असता त्यांना नदीत एका योग्याचे शव दिसले. गावात
चौकशी केल्यावर कळले की तो योगी चांगल्या चारित्र्याचा नव्हता. ते शव बाहेर
काढण्यासाठी मदतीला कोणीच पुढे आले नाही. शेवटी रामजींने एकटय़ानेच ते शव
बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले. ‘कोण योगी होता तो माहीत नाही,’
रामजी म्हणाले.
तेव्हा सीतामाईने त्यांना चंद्रिकेची कहाणी सांगितली. रामजींनी केलेल्या
वर्णनावरून सीतामाईची खात्री पटली की तो योगी चंद्रिकेचा नवरा होता.
सीतामाईंना चंद्रिकेला हा समाचार कसा द्यायचा याचा प्रश्न पडला. त्या
ध्यानाला बसल्या आणि त्यांच्या सूक्ष्म रूपाने चंद्रिकेजवळ गेल्या.
चंद्रिकेच्या भौतिक शरीराला सीतामाई दिसत नव्हत्या. तेव्हा तिथे माता
पार्वती प्रगट झाल्या. तिने दिलेल्या दिव्य दृष्टीने चंद्रिका सीतामाईला
बघू लागल्या. सीतामाईने तिला तिच्या नवऱयाच्या मृत्यूची बातमी देताच
चंद्रिकेला शोक अनावर झाला. सीतामाई तिला म्हणाल्या की, ‘तुझ्या नवऱयाला
शांतपणे त्याचा पुढचा प्रवास करू देत. तुझ्या शोकाने त्याला अडवू नकोस.’
यातून सीतामाई आपल्याला सांगतात की, आपली प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून
देवाघरी गेली, तर देवाकडे त्याच्या उत्तम गतीसाठी प्रार्थना करा. तुमच्या
प्रेमाचे बंधन घालून त्यांची गती अडवू नका.
vrishali.sathe@gmail.com
तुम्ही प्रवास आणि खाण्याचे शौकीन आहात? या ५ शहरातील हे पदार्थ नक्की ट्राय करा
Tarun Bharat Portal
~2 minutes
अर्चना बनगे, प्रतिनिधी India Tourism Food : पर्यटन
म्हटलं की प्रवासा सोबत खाद्य-पदार्थ हे आलेचं. जे खाण्याच्या बाबतीत
शोकिन असतात ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणावरील खाद्यपदार्थांवर ताव
मारतातच. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना वेगवेगळ्या पदार्थांची
आणि पदार्थांची नावे ऐकून तोंडाला पाणी सुटते, तर संधी मिळताच तुम्ही या
पाच शहरांची ही प्रसिद्ध डिश नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला प्रवासासोबत
आनंद अनुभवायला मिळेल.
दिल्लीचे पराठे तुम्ही
कधी दिल्लीला गेलात तर दिल्लीतील चांदणी चौकाला नक्की भेट द्या. हा परिसर
खाण्यापिण्याचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. पराठा वाली गली, छोले भटुरे
आणि छोले कुल्चे या पराठ्यांशिवाय इथले पदार्थही खूप प्रसिद्ध आहेत.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा.मुंबईचा वडा पाव तुम्ही कधी मुंबईला गेलात तर तिथल्या प्रसिद्ध डिश वडा पावाचा आस्वाद नक्कीच घ्या.जयपूरचा दाल बाटी चुरमा जेव्हा
तुम्हाला गुलाबी शहर जयपूरला भेट देण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही
तिथल्या ‘दाल बाटी चुरमा’चा नक्कीच आस्वाद घ्या. जयपूरला गेल्यावरही जर
तुम्ही दाल बाटी चुरमा खाल्ला नाही तर तुमचा खाण्याची चव घेण्याचा प्रवास
अपूर्णच राहील.हैदराबादी बिर्याणी जर
तुम्ही हैदराबादला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील उत्तम मुगलाई, तुर्की
आणि अरबी खाद्यपदार्थ नक्कीच खा. याशिवाय येथील बिर्याणी सर्वत्र प्रसिद्ध
आहे. इथल्या कच्च्या चिकन बिर्याणीशिवाय हैदराबादी बिर्याणी खूप प्रसिद्ध
आहे.लखनऊचे गोलगप्पे लखनऊला
नवाबांचे शहर म्हटले जाते. तुम्ही जेव्हा कधी इथे जाण्याचा विचार कराल
तेव्हा इथला गोलगप्पा नक्की खा. येथे गोलगप्पा खाण्यासाठी पाच प्रकारचे
पाणी दिले जाते. याशिवाय अमीनाबादमध्ये कुल्फी खाण्याचा आनंद घ्या.
सृजन संवाद – न झालेले स्वयंवर
सामना ऑनलाईन
3–4 minutes
>> डॉ. समिरा गुजर जोशी
रामनवमी अर्थात प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आपल्याला ठाऊक असतो, पण
ज्याप्रमाणे चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी साजरी केली जाते, त्याचप्रमाणे
वैशाख शुद्ध नवमीला सीतानवमी साजरी केली जाते. महाराष्ट्रात सीतानवमी साजरी
होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे, पण उत्तर भारतात, खास करून बिहार,
झारखंड या भागात आणि नेपाळमध्येही सीतानवमी मोठय़ा प्रमाणात साजरी केली
जाते. यंदा 5 मे रोजी सीतानवमी साजरी होणार आहे. म्हणून त्यानिमित्ताने
पुन्हा एकदा सीतेच्या जन्माच्या गोष्टीकडे पाहावे असे वाटले.
तशी सीताजन्माची गोष्ट साधीच आहे, पण ती सांगितली आहे वाल्मीकी
रामायणामध्ये बालकांडाच्या 66 व्या सर्गात. जिथे राम आणि लक्ष्मण शिवधनुष्य
पाहायला उत्सुक आहेत म्हणून जनक राजा त्यांना ते दाखवत आहे. हे शिवधनुष्य
त्यांच्या राजघराण्यातील देवरात राजापासून त्यांच्या घरी देवांनी ठेव
म्हणून ठेवले आहे. त्याची कथा अशी की, दक्ष यज्ञाच्या प्रसंगी शिवशंकर
अतिशय क्रुद्ध झाले होते. त्यांना देवांनी त्यांचा हवि दिला नाही या
अन्यायाने ते देवांवर चिडले आणि हे धनु त्यांनी धारण केले, पण देवांनी
क्षमा मागितल्यावर आसुरी शक्तींचा संहार करण्यासाठी हे धनुष्य त्यांनी
देवांना दिले, जे देवांनी देवरात राजाकडे सोपवले असा इतिहास जनक राजा
अभिमानाने सांगतो आणि जो या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल अशा वीराला आपली
कन्या सीता देण्याचा आपला विचार आहे, असेही नमूद करतो. इथे तो सीताजन्माची
गोष्ट सांगतो की, एके दिवशी मी यज्ञभूमी नांगरत असताना मला एक तान्ही मुलगी
मिळाली. ती नांगरताना सापडली म्हणून मी तिचे नाव सीता ठेवले. ( ‘सीता’ या
शब्दाचा शब्दश अर्थ नांगरणी करणे असाच होतो) इथे लक्षात घेण्यासारखी बाब
म्हणजे, सीताजन्माची तिथी सांगितलेली नाही, पण परंपरेत ती रूढ आहे. त्याचा
स्रोत काय हा संशोधनाचा विषय ठरावा.
पुढे राजा सांगतो की, तिला मी प्रेमाने मोठे केले, तिची कीर्ती सर्वत्र
पसरली. तिला प्राप्त करण्यासाठी अनेक तरुण राजे तिला मागणी घालायला येऊ
लागले. पण सीता वीर्यशुल्का असेल असे मी ठरवले. वीर्य म्हणजे पराक्रम.
पराक्रम दाखवून तिला जिंकावे लागेल. आता आपल्याला जनकाचा सीतेच्या
लग्नासंदर्भात असलेला ‘पण’ तर ठाऊक असतो, पण सीतेच्या स्वयंवराची गोष्ट जशी
आपल्याला ठाऊक असते तशी वाल्मीकी रामायणात नाही. मुळात एके दिवशी
सीतेच्या स्वयंवराचे आयोजन केले असे घडलेले नाही. आपल्यासमोर चित्र असते
की, एकाच सभामंडपात सर्व राजे जमले आहेत. तिथेच रावणही आला आहे.
राम-लक्ष्मणही आहेत. सर्व राजे प्रयत्न करून असफल होत आहेत. रावणाची तर
मोठी फजिती होते. एखाद्या गोष्टीत रावण नसतो, पण फजिती होणारे इतर राजे
असतातच आणि मग प्रभू श्रीराम पुढे सरसावतात वगैरे.
वाल्मीकी रामायणात या प्रसंगाचे वर्णन वेगळे आहे. एकदा अनेक राजांनी
एकत्र येऊन या प्रकारचा प्रयत्न केला आणि स्वतची फजिती करून घेतली आणि
त्यानंतर आपल्याला सहसा ठाऊक नसलेला एक प्रसंग सांगितला आहे की, जनक राजाने
असा ‘पण’ ठेवून आपला अपमान केला या भावनेने क्रोधित होऊन सर्व राजांनी
मिथिलेवर आक्रमण केले. तिला वेढा घातला. एक वर्ष हा संघर्ष सुरू होता.
शेवटी रसद संपू लागली. आता काय करावे, असा प्रश्न जनक राजासमोर होता.
तेव्हा देवांनी त्याला चतुरंग सैन्य दिले व त्याने वेढा मोडून काढला.
सीतेचे आयुष्य कायम संघर्षमय राहिले आहे. ती भूमिकन्या आहे. भूमी
ज्याप्रमाणे संघर्षाचे कारण ठरते तशीच तीही संघर्षाचे कारण ठरली आहे. एक
राजकुमारी म्हणून आपल्यासाठी हा असा संघर्ष सुरू असलेला पाहून तिला काय
वाटले असेल? तिचा जन्म अयोनिज म्हणून दिव्य खरा. तो खास असला तरी सुखद
नक्कीच नव्हता, पण यातही तिने आपल्या चारित्र्याचे धवलपण जपले म्हणूनही ती
सीता ठरते. कारण ‘सीता’ या शब्दाचा एक अर्थ ‘शुभ्रधवल रंग’ असाही होतो.
samira.gujar@yahoo.com
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)
सैनिकांचं गाव….चौकुळ!
अनुजा कुडतरकर
~2 minutes
अनुजा कुडतरकर–
प्रत्येक गावाची काही ना काही वेगळी खासियत असते. तशीच वेगळी खासियत या
गावाची देखील आहे. हे गाव ओळखलं जातं ते तेथील सैनिकी परंपरेमुळे
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही सैनिकी परंपरा सुरु आहे. व आजही जवळपास
इथल्या साठ टक्के घरात सैनिकी पेशा असणारे लोक आहेत. सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ हे खरं तर दुर्गम असं गाव.आंबोली
पासून ७ किमी अंतरावर हे गाव आहे .पण, इथल्या नैसर्गिक वातावरणामुळे व
सैनिकी परंपरा या गावाला लाभल्यामुळे हे गाव नेहमीच प्रकाशझोतात असतं.
पावसाळ्यात प्रचंड पडणारा पाऊस… त्यामुळे इथली भूमी आपल्या अंगावर जणू
हिरवळीची शालच पांघरते असा भास झाल्याशिवाय राहत नाही. हिवाळ्यात पडणाऱ्या
दाट धुक्यात हे गाव हरवून जातं. या गावात भातशेती मोठ्या प्रमाणात केली
जाते .या गावात एकूण १३ वाड्या आहेत. सभोवताली पसरलेलं मोकळं मैदान, दाट
वनराई , वन्य प्राण्यांचा असणारा वावर ,करवंदाची झाडं अशी नैसर्गिक रचना
इथे पाहायला मिळते. चौकुळ हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम असं गाव
आहे. ज्यांना भटकंती करायचीय त्यांच्यासाठी हे ठिकाण एक उत्तम स्पॉट ठरू
शकतो .विविध ठिकाणचे ट्रेकर्स या ठिकाणाला अवश्य भेट देतात. या गावात विविध
गुहा पाहायला मिळतात . या अद्भुत अशा गुहांना लोक आवर्जून भेट देतात.
इथल्या मोकळ्या जमिनीवर विविध रंगाची फुलं , पाहायला मिळतात. ही फुलं
पर्यटकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
या गावातील सैनिकांनी आपल्या भारत देशासाठी बहुमोल योगदान दिलय. जम्मू
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दीपक गावडे हे जवान शहीद झाले
होते . तसेच अनेक जवान आहेत ज्यांनी देशसेवेसाठी मरणालाही कवटाळलंय. दुर्गम
असं गाव असून देखील इथला तरुण सैनिकी पेशात करिअर करण्याचे स्वप्न काल
पाहत होता आणि आजदेखील पाहत आहे.भलेही मरण जवळ करावं लागलं तरी इथला सैनिक
निधड्या छातीने शेवटपर्यत लढतच राहतो. असं हे चौकुळ गाव कर्तृत्वाचे एक एक
किस्से सांगत दिमाखात उभं आहे.
बावेली येथील धबधबा ठरतोय लक्षवेधी
Tarun Bharat Portal
1–2 minutes
प्रतिनिधी/ गगनबावडा
bhavli dhabdhaba gaganbawada : ऑगस्ट अखेर जवळ आला तरी गगनबावडा
तालुक्यात पावसाचा जोर वाढताच आहे.मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बावेली
येथील धबधब्याखाली पर्यटकांची गर्दी वाढत आहे.स्थानिक युवकांनी मार्ग
काढल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पूर्वेला पांडवकालीन
किल्ला, तर पश्चिमेला मोरजाई पठार असा ऐतिहासिक वारसा लाभलेले बावेली, हे
धुंदवडे खोरीतील प्रमुख गांव आहे.येथे पावसाचा जोर वाढताच आहे. डोंगररांगात
अनेक धबधबे ओसंडून वाहत आहेत.लक्ष्मी ओढ्य़ावरील धबधबा व बाजारी ओढ्य़ाचा
धबधबा हे त्यापैकीच होत. घोरपडीच्या कड्य़ावरुन कोसळणारा बावेली धबधबा
पर्यटकांना भूरळ घालत आहे.बावेली येथील आदर्श युवक मंडळाच्या
कार्यकर्त्यांनी झाडी, झुडपे बाजूला केली, परिसर स्वच्छ केला. प्रमुख
रस्त्याकडेला असलेल्या या धबधब्याखाली पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.
गगनबावडाहून राधानगरी कडे जाताना पर्यटकांना आणखी एका नरनरम्य ठिकाणाची
चाहूल लागली आहे.
भटकंती – डर के आगे जीत है!
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> हेमलता जाधव
भटकंतीचा आनंद आपण सारेच घेत असतो, परंतु ही भटकंती थरारक अनुभव देणारी
ठरणार असेल तर तो अनुभव औरच म्हणायला हवा. कुडाळ तालुक्यातील बारमाही
कोसळणाऱ्या पालमळई येरम धबधब्याचे रौद्र रूप आणि तिथला निसर्ग न्याहाळत
सत्तर फूट उंचीवरून रॅपलिंग करण्याचा आनंद वेगळी अनुभूती देणारा ठरला.
जीवन म्हणजे रोजचा नवीन खेळच! आयुष्यात येणाऱ्या चांगल्या – वाईट
गोष्टी, नवनवीन संकटे यांना तोंड देत प्रवास करायचा. त्यातूनच ऊर्मी येते
ती काहीतरी वेगळे करायची. धाडसी निर्णय घेण्याची ऊर्जा मिळते ती जीवनाच्या
संघर्षातूनच! असाच एक अनुभव घेण्याची संधी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या
माध्यमातून मिळाली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव
खोऱ्यात कडेकपाऱ्यातून बारमाही कोसळणाऱया पालमळई येरम धबधब्याच्या
डोक्यावरून निसर्ग न्याहाळण्याची मजा काही औरच आहे.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून पालमळई येरम धबधबा येथे सर्व
सदस्यांची सहल आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळीच सहा वाजता छोटा भाऊ
प्रसाद आणि मी कुडाळहून निघालो. कुडाळपासून साधारणतः 30 किमी अंतरावर
हळदीचे नेरूर गावापासून पुढे पाच किमी अंतरावर पालमळई येथे श्री क्षेत्रपाल
मंदिर या ठिकाणी रस्ता संपतो. तेथूनच सुरू होतात सह्याद्रीच्या डोंगररांगा
आणि निसर्गाच्या कुशीतील सुंदर प्रवास. दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे सर्व
सदस्य या ठिकाणी एकत्र जमलो. श्री क्षेत्रपाल मंदिरात जाऊन दर्शन घेऊन
सर्वांनी येरम धबधब्याच्या दिशेने आगेकूच केली. जंगलातील पायवाट तुडवत 15
ते 20 मिनिटे चालून गेल्यानंतर धबधबा नजरेस पडतो. धबधब्याकडे जाणारी पायवाट
अजिबात दमछाक करत नाही. धबधब्याच्या परिसरात उंबराची अनेक झाडे
निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकतात. या ठिकाणी मानवाचा विशेष वावर नसल्यामुळे
घनदाट जंगलातील शांतता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे
अनुभवता येतात. भर उन्हाळ्यात 90 फूट उंचीवरून कोसळणारा पाण्याचा प्रवाह,
खडकावर आदळून उडणारे तुषार शरीराला आणि मनाला रोमांचित करतात.
येरम धबधब्याच्या वर जाऊन मोठ्या उंचीवरून दोरीच्या सहाय्याने खाली
उतरणे (रॅपलिंग) हा खरे तर धाडसी आणि तितकाच रोमहर्षक अनुभव होता. दुर्ग
मावळा प्रतिष्ठानचे अॅडव्हेंचर विभागप्रमुख संदेश गोसावी, गणेश नाईक,
समील, रोहन, विशाल यांनी धबधब्याच्या वर जाऊन सुरक्षितरीत्या रॅपलिंगची
सर्व तयारी केली. सर्वात आधी गोसावी यांनी (रॅपलिंग) खाली उतरत अंदाज
घेतला. टीममधील सर्वांच्या सुरक्षेची खात्री करणे ही प्रमुखाची जबाबदारी
असते याची प्रचीती या वेळी दिसून आली. त्यानंतर आम्हा महिलांना म्हणजे
गार्गी नाईक, समृद्धी आणि मी एवढय़ा उंचीवर निसरडय़ा वाटेवरून (क्लायंबिंग)
करत वर घेऊन जाणे खचितच सोपे नव्हते, परंतु गोसावी यांनी आम्हाला
प्रोत्साहन देत, प्रसंगी हात देत, क्लायंबिंगची बेसिक कौशल्ये शिकवत वर
नेले. त्या वेळी मनाला झालेला आनंद शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही.
धबधब्याच्या वरून दिसणारा निसर्गरम्य परिसर म्हणजे अद्भुत पर्वणीच.
रॅपलिंगसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी केल्यानंतर प्रमुखांनी महत्त्वाच्या
प्राथमिक गोष्टी सांगून खाली उतरण्यास (रॅपलिंग) प्रोत्साहन दिले.
दुर्ग मावळा प्रतिष्ठानमधील सर्व सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे सत्तर फूट
उंचीवरून रॅपलिंग करण्याचा अविस्मरणीय आनंद आणि अनुभव माझ्यासह सर्वांना
घेता आला. मनात कोणतीही भीती न बाळगता हा विलक्षण अनुभव मी घेऊ शकले. ‘डर
के आगे जीत है’ हे केवळ टीव्हीवरील जाहिरातीत पाहिले होते. मात्र
यानिमित्ताने ते प्रत्यक्षात अनुभवता आले.
रॅपलिंग झाल्यानंतर धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. वन भोजनाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
सुखाचे कव्हरेज क्षेत्र
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून कधीतरी असे शांत वातावरणात निसर्गाच्या
कुशीत जाऊन पहुडण्याचा आनंद फार वेगळाच असतो. तिथे भलेही मोबाईलला रेंज
नसेल. मात्र तुमच्या मनाला मिळणारे शांती, सुखाचे आणि समाधानाचे कव्हरेज
क्षेत्र मात्र नक्कीच भरभरून प्रेम देते. हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी
सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या कुशीत नक्कीच जायला हवे. जीवनातील खऱयाखुऱया
तृप्तीचा आनंद मिळवायचा असेल तर अशा ठिकाणांची सफर केव्हा ना केव्हा तरी
व्हायलाच हवी.
शब्दांकन : स्वप्नील साळसकर
पावसाळी पर्यटनाला जायचंय ?मग कोल्हापुर जिल्ह्यातील या ठिकाणांना नक्की भेट द्या
Tarun Bharat Portal
6–7 minutes
पावसाळा म्हंटल की चिंबचिंब भिजायला कोणाला आवडत नाही. मग पाऊस सुरु
होताच आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि
शुभ्र खळाळणारे धबधबे,हिरव्यागार डोंगरावरून हळुवार सरकणारे दाट ढग,त्यातून
वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवण्यासाठी आपली पाऊले आपोआप
घराबाहेर पडतात.पण पावसाळी सहलीसाठी कुठे लांब जाण्याची काहीच गरज नाही
कारण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच अशी अनेक पावसाळी पर्यटन स्थळे आहेत जिथं
आपल्याला पावसाचा मनमुराद आनंद लुटता येतो चला तर पाहुयात ही स्थळे कोणती
आहेत.
१. राधानगरी
कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर हिरवाईने नटलेला राधानगरी
तालुका आहे.हा तालुका जलाशययुक्त असल्याने याला धरणाचा तालुका म्हणून देखील
संबोधले जाते. दरवर्षी पावसाळ्यात या तालुक्यातील राऊतवाडी ,रामणवाडी,
हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर
पर्यटकांची अफाट गर्दी होत असते.हिरवागार डोंगर आणि पावसाच्या धारा यांचा
मानमूरादव आनंद इथे घेता येतो. याच तालुक्यातील दाजीपूर अभयारण्यावरील कोकण
पॉईंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे
दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा
आहे.
२. राऊतवाडी
राधानगरी मधून अवघ्या साडेसहा किलोमीटर राऊतवाडी धबधबा आहे.सतत पाऊस
सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा धबधबा चालू होतो. पर्यटकांची
ये-जा चालू होते. या धबधब्याची उंची दीडशे फूट आहे. एवढ्या उंचावरून
पडणारे पाण्याचे दृश्य डोळ्याचं पारणं फेडतं. दरवर्षी या ठिकाणी लाखो
पर्यटक येत असतात आणि पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटतात.
३. फोंडा घाट धबधबा
दाजीपूर जवळील घाटातील हा धबधबा ही पर्यटकांचे आकर्षण आहे. वन
खात्याने केलेल्या सुविधांमुळे पर्यटकांना याचा आनंद घेता येतो.पावसाळ्यात
या घाटाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते.
४.गगनबावडा
कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गगनबावडा तालुक्याला
पावसाचे माहेरघर ओळखलं जातं.येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात
मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ
घातल्याशिवाय राहत नाहीत. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून
झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो.
गगनगडावरून संपूर्ण घाटातील दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
५. रामलिंग
कोल्हापूर शहरापासून ४२ कि. मी. अंतरावर गगनबावडा रोडवर पळसंबे
गावापासून दक्षिणेकडे ३ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.पावसाळ्यात आकर्षक
धबधबा, हिवाळ्यात धुके, उन्हाळ्यात थंड हवेचे ठिकाण अशा तिन्ही ऋतूमध्ये
निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे.या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे येथे
पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेले एकाच शिळेमध्ये कोरलेले
वैशिष्टपूर्ण मंदिर आहे .येथील गुहेमध्ये एक शिवलिंग आहे. या शिवलिंगावर
डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा तिन्ही ऋतूंमध्ये अभिषेक होत असतो.रामलिंगचा
धबधबा सुरक्षित आणि पावित्र्य जपलेला असा आहे. हा धबधबा ८-१० फुटांवरून
कोसळत असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
६. पन्हाळा
कोल्हापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर पन्हाळागड
आहे.कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात या
ठिकाणी आल्हाददायक वातावरण असते.म्हणूनच पावसाळा सुरु होताच अनेक पर्यटक
पन्हाळ्यावर येतात.गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास
महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत.एक दिवसात
या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.
७. बर्की
‘बर्की’ हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे.
कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर
मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच
पर्वतरांगा आहेत.धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे
पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे,
डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण
अनुभवायास मिळते.धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी
बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४००
फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत.
८. स्वप्नवेल
कोल्हापूरहून जाण्यासाठी १४0 किलोमीटर अंतरावरअसलेला
महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला, चंदगड तालुक्यातील
तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉईंट. परिसरात राहण्याची सोय आहे. येथे
स्वप्नवेल पॉईंटसह पारगड, रातोबा, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च
पॉईंट,मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत
प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत
जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे
मोर, वानरं, ससे, हत्ती, रानडुकरे, सांबर, गवे व निरनिराळे पक्षी व
प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे
धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर व
विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. रस्ते आणि पर्यटनाचा विकास झाल्याने
पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे.
९. आंबा घाट
कोल्हापूर-रत्नागिरीच्या जिल्ह्यांची सीमा सजवलेला तेरा किलोमीटरचा
नागमोडी आंबाघाट, आंबा-विशाळगड व केंबुणेर्वाडी ते पावनखिंड हा जंगल,
इतिहासाची साद घालणारी वनराई, केर्लेचा धबधबा, मानोली धरणाच्या सांडव्याने
घेतलेले प्रशस्त धबधब्याचे रूप, गेळवडे धरणाचा झाडीत विसावलेला बारा
किलोमीटरचा बॅक वॉटर व्हू, बर्की, पांढरेपाणी ही वर्षा पर्यटनाला हाकणारी
स्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोल्हापूर,कोकण व
पुणे, मुंबई भागातील हौशी मंडळी येथील शहारणारा पाऊस एन्जॉय करण्यास गर्दी
करीत आहेत.भर पावसातील पावनखिंडीची वारी तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचली
आहे.
१०. रामतीर्थ
कोल्हापूरपासून १00 किमी अंतरावर आणि आजरा तालुक्यापासून फकत दोन
कि़मी अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळी नैसर्गिक
सौंदर्याची मुक्त उधळण पाहायला मिळते.हिरण्यकेशीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे
ठिकाण येथे असलेल्या धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे.असं म्हणतात कि वनवासात
असताना रामाने इथे काही काळ वास्तव्य केले होते म्हणून या स्थळाला रामतीर्थ
असं म्हंटल जातं.या ठिकाणी भगवान रामाचं मंदिर आहे. मंदिरासभोवतालचा परिसर
देखील सुंदर आहे.पावसाळ्यात महाराष्ट्रातून येथे अनेक पर्यटक या स्थळाला
भेट देतात.
ओडिशाची ही स्वादिष्ट डिश आपण चाखली आहे काय…
Tarun Bharat Portal
~2 minutes
ऑनलाईन टीम तरुण भारत :
भारताचे ओडिशा (पूर्वीचे ओरिसा) आपल्या ‘स्वादिष्ट खाद्यपदार्थाने’
सर्वात जास्त प्रभावित करत आले आहे. ओडिशाचे जेवण हे मसाले आणि तेल यांचा
वापर कमी असून देखील चवीला मात्र एकदम स्वादिष्ट असे असते. जेव्हा तुम्ही
ओडिशाला भेट द्याल तेंव्हा सालच्या पानांवर दिलेले एकापेक्षा एक चांगले
पदार्थ तुम्हाला सुगंधाने आकर्षित करतात. ओडिशातील लोकांना त्यांचे गोड
पदार्थ आवडतात म्हणून तुम्हाला या राज्यात सर्वत्र मिठाईची खूप दुकाने
पाहायला मिळतील.
ओडिशा हे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय दोन्ही राज्यांनी वेढलेले
असल्याने, ओडिशाच्या पाककृतीवर प्रामुख्याने उत्तर भारत, बंगाल आणि
आसामच्या खाद्यपदार्थांचा प्रभाव आहे. तांदूळ हे ओडिशाचे मुख्य अन्न आहे
आणि अनेक घरांमध्ये मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. येथील चुंगडी
मलाई या लोकप्रिय रेसिपी बद्धल सांगणार आहोत.
चुंगडी मलाई नारळाचे दुध आणि झिंग्यापासून बनवण्यात आलेले ‘चुंगडी
मलाई’ येथील खूपच प्रसिद्ध व्यंजन आहे. हलके मसाले, यापासून ही डिश बनवली
जाते. झिंगे हे येथे सर्रास जेवणात असतातच. ताजे झिंगे, नारळाचा मलईदार पणा
या डिशला आणखी स्वादिष्ट बनवते. येथे भातासोबत चुंगडी मलाई जेवणात वाढली
जाते. चुंगडी मलाईला पाहूनच तोंडाला पाणी सुटते. ही डिश खाण्यासाठी पर्यटक
खूप लांबून येथे येतात. तुम्ही जर ओडिशाला कधी गेलात तर चुंगडी मलाई ची चव
चाखायला विसरू नका.
मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून
पाहिले तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या
जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठय़ांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर तो
अनन्वित अत्याचार करे. बळजबरी धर्मांतर, लोकांना पकडून गुलाम म्हणून विकणे,
आया-बहिणींची अब्रू लुटणे, कत्तली यामुळे तिथली प्रजा कंटाळून गेली होती.
त्यात जंजिरा किल्ल्यात बसून हा सिद्दी दर्यावर सत्ता गाजवायचा आणि तिथला
व्यापार आपल्या ताब्यात ठेवायचा.
पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेणे, व्यापार सुरळीत चालवणे आणि प्रजेला
धर्मांध सिद्दीपासून मुक्त करणे या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी
महाराजांनी मुरुड जवळील कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग बांधायचा
ठरवला. सिद्दीच्या ऐन दारात किल्ला उभा करणे म्हणजे सामान्य कार्य नव्हे.
शिवाजी महाराजांनी इ.स. 1675 मध्ये दर्यासारंग दौलतखान याला बेटाची सुरक्षा
आणि सुभेदार जिवाजी विनायक यांस रसद पुरवठय़ाची जबाबदारी देऊन तिथे
पद्मदुर्ग निर्माण करायला सांगितला. अनेक हल्ले, लढाया यांना तोंड देऊन चार
वर्षांत हा किल्ला उभा राहिला. पद्मदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी
राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच निर्माण केली.
मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावरुन आता प्रत्येकी 300 रु दराने बोटी सुटतात.
हे तिकीट काढून आपल्याला किल्ल्यात जाता येते. आपली बोट जिथे लागते
त्याच्या डाव्या बाजूस पद्मदुर्गाचा परकोट आहे. कमळाच्या पाकळ्याच्या
आकाराच्या चऱ्या असलेला खणखणीत बुरुज आपल्या नजरेस पडतो. किल्ल्याच्या
तटबंदीचे दगड शतकानुशतके समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत करत झिजले आहेत.
पण त्या दगडांमध्ये वापरलेला चुना आज ही शाबूत आहे. शिवरायांची
दुर्गबांधणी किती उच्च दर्जाची होती याचा इथे प्रत्यय येतो. परकोटाच्या आत
‘कोटेश्वरी आई’चे छोटेखानी मंदिर, पाण्याचा हौद, अनेक तोफा आणि काही
इमारतींचे अवशेष आहेत. दुर्लक्षित असल्यामुळे इथल्या भिंती अक्षरश शेवटच्या
घटका मोजत आहेत.
मुख्य किल्ल्याला दोन महाद्वार आहेत. इथली सगळी तटबंदी अजूनही शाबूत आहे
आणि 7 भक्कम बुरुज आजही पहारा देत उभे आहेत. किल्ल्यात पाण्याची टाकी,
पहारेकऱ्याच्या देवडय़ा, तटात असलेले शौचालय असे अनेक अवशेष आपल्या नजरेस
पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांच्या काळात पण
पद्मदुर्ग मराठय़ांकडे होता. साधारण 1698-99 च्या आसपास सिद्दीने हा किल्ला
जिंकून घेतला. पुढे पेशव्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु हा किल्ला
स्वराज्यात आला नाही. हा किल्ला शेवटी मराठय़ांकडे आला की नाही हे फक्त
सर्वभक्षी काळच सांगेल.
बोटीत बसून परत निघताना दूर दक्षिणेस सिद्दीचा जंजिरा दिसतो. जवळच
डोंगरावर शिवरायांनी बांधलेला सामराजगड आपल्या नजरेस पडतो. अलिबाग किंवा
मुरुडला गेलात तर मुद्दाम पद्मदुर्गाला भेट द्या. शिवरायांच्या
दुर्गशास्त्राचा एक अनोखा नमुना म्हणून त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
भटकंती- हिंदुस्थानातील सप्तभाषा संगमभूमी कासारगोड
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> वर्षा चोपडे
सप्तभाषा संगमभूमी अशी ओळख असलेला कासारगोड हा केरळमधील देखणा व समुद्राने वेढलेला जिल्हा. वास्तुकलासंपन्न अशा या भागातील संरक्षित किल्ल्यांमध्ये बेकल किल्ल्याचे महत्त्व आगळे आहे.
केरळ राज्य सुशिक्षित, बुद्धिवादी लोकांचे राज्य आहे. इथले लोक
सुसंस्कृत आहेत. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा त्यांना खूप अभिमान आहे.
भाषा त्यांचा प्राण आहे. कासारगोड अत्यंत स्वच्छ आणि सुंदर जिल्हा.
सप्तभाषा संगमभूमी अशी या कासारगोडची ओळख आहे. मल्याळम, कन्नड, मराठी,
हिंदी, इंग्रजी, कोंकणी आणि तमीळ भाषा या शहराची ओळख आहे. बहुतांश लोकांना
या सगळ्या भाषा येतात हे विशेष. मल्याळममध्ये कासारगोडला कानरम वृक्षांची
भूमी अथवा कान्हिरा वृक्षांची भूमी म्हणून ओळखले जात असे. हा जिल्हा अत्यंत
देखणा आणि समुद्राने वेढलेला असून या जिह्यात केरळमधील सर्वाधिक नद्या
आहेत.
16 व्या शतकापर्यंत कासारगोड कुंबळा राजवंशाच्या ताब्यात होते. ते
कन्नूर येथील कोलाथुनाडू राज्याचेही वतनदार होते. 16 व्या शतकात कन्नड
राज्यांनी बंदर आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले. 12 व्या शतकातील जुने
मल्याळम भाषेत लिहिलेले कदाचित सर्वात जुने साहित्यिक लिखाण रामचरितम
कासारगोड जिह्यात लिहिले गेले असावे असे मानले जाते. कारण त्याची
हस्तलिखिते नीलेश्वरम येथून सापडली होती. त्यात कुंबळा येथील अनंतपुरा तलाव
मंदिराचा तपशीलवार उल्लेख आहे.
बेकल किल्ला येथील मुख्य आकर्षण आहे. या बेकल किल्ल्याविषयी जाणून
घ्यायला हवे. हा केरळमधील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम संरक्षित किल्ला आहे.
40 एकर (160,000 चौरस मीटर) मध्ये पसरलेल्या भव्य बेकल किल्ल्याची रचना डच
लोकांनी बांधलेल्या कन्नूर येथील थलासेरी किल्ला आणि सेंट अँजेलो
किल्ल्यासारखी दिसते. गडाच्या खालच्या बाजूला अथांग अत्यंत स्वच्छ
समुद्रकिनारा आहे. किल्ल्याचा आतील बराच भाग पडला असून या किल्ल्याचा
तीन-चतुर्थांश भाग पाण्याच्या अगदी जवळ आहे. किल्ल्याच्या मध्यभागी
असलेल्या या ठिकाणावरून किनारपट्टी आणि कान्हांगड, पल्लीकारा, बेकल, मावळ,
कोट्टिकुलम आणि उदुमा या शहरांचे दृश्य दिसते. किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि
आजूबाजूचे खंदक त्याच्या बचावात्मक रणनीतीचे दर्शन घडवतात. बाहेरील
भिंतींवरील छिद्रे नौदलाच्या हल्ल्यांपासून प्रभावीपणे किल्ल्याचे रक्षण
करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. पेरुमल काळात बेकल हा महोदयपुरमचा एक भाग
होता. महोदयपुरम पेरुमलांच्या पतनानंतर, 12 व्या शतकात बेकल मुशिका किंवा
कोलाथिरी किंवा चिराक्कल राजघराण्याच्या सार्वभौमत्वाखाली आला.
कोलाथिरींच्या काळात बेकलचे सागरी महत्त्व वाढले आणि मलबार एक महत्त्वाचे
बंदर शहर बनले. 1565 मध्ये तालीकोटाच्या लढाईनंतर केलाडी नायक (इक्केरी
नायक) या प्रदेशात सामंती सरदार शक्तिशाली बनले.
बेकल हे प्रथम वर्चस्व गाजवण्यासाठी आणि नंतर मलबारचे रक्षण करण्यासाठी
एक केंद्र म्हणून काम करत होते. या बंदर शहराच्या आर्थिक महत्त्वामुळे
नायकांना नंतर बेकलला मजबूत करण्यास प्रवृत्त केले. हिरिया वेंकटप्पा नायक
यांनी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आणि ते 1650 मध्ये शिवप्पा नायक यांनी
पूर्ण केले. कासारगोडजवळील चंद्रगिरी किल्लादेखील याच काळात बांधण्यात आला.
हैदर अलीने नायकांवर विजय मिळवला तेव्हा कोलाथिरी आणि नायकांमधील हा परिसर
ताब्यात घेण्यासाठीचा संघर्ष संपला व बेकल म्हैसूर राजांच्या हाती लागला.
टिपू सुलतानने मलबार काबीज करण्यासाठी लष्करी मोहिमेचे नेतृत्व केले तेव्हा
ते त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे लष्करी तळ होते. बेकल किल्ल्यावर
पुरातत्वीय उत्खननात सापडलेली नाणी आणि कलाकृती म्हैसूर सुलतानांच्या मजबूत
उपस्थितीचे संकेत देतात. चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान टिपू
सुलतानच्या मृत्यूमुळे 1799 मध्ये म्हैसूरचे नियंत्रण संपुष्टात आले.
त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला आणि मुंबई
प्रेसिडेन्सीमधील दक्षिण कॅनरा जिह्यातील बेकल तालुक्याचे मुख्यालय बनले.
बेकल आणि त्याच्या बंदराचे राजकीय व आर्थिक महत्त्व कमी झाले. 1992 मध्ये
भारताने बेकल किल्ल्याला एक विशेष पर्यटन क्षेत्र घोषित केले आणि तीन
वर्षांनंतर त्याचा प्रचार करण्यासाठी बेकल पर्यटन विकास महामंडळाची स्थापना
केली. या किल्ल्यास भेट दिल्यास हिंदुस्थानातील अत्यंत सुंदर किल्ल्यास
भेट दिल्याचे पर्यटकांना समाधान मिळेल हे नक्की.
varsha@rajagiri.edu
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
सौदी अरेबियाचे विंटर वंडरलँड
Tarun Bharat Portal
~2 minutes
54 लाख चौरस मीटरमध्य फैलावलेला मनोरंजन झोन : जगातील पहिला मोबाइल स्कायलूप
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये विंटर वंडरलँड खुला झाला आहे. येथे
येणाऱया प्रत्येक वयोगटातील व्यक्तीसाठी मनोरंजनाची विविध नवी साधने सादर
करण्यात आली आहेत. 54 लाख चौरस मीटरमध्ये फैलावलेल्या 14 मनोरंजन
क्षेत्रांपैकी (मेळा) हा पाचवा झोन आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये
मार्चपर्यंत आयोजन होत राहणार आहे. यादरम्यान 7,500 आश्चर्यजनक कार्यक्रम
आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होतील.
यात 500 ई-गेम्स उपलब्ध असून 9 आंतरराष्ट्रीय स्टुडिओंमध्ये कार्यक्रम
होणार आहेत. 40 टक्क्यांहून अधिक क्षमतेचा जगातील पहिला आणि सर्वात मोठा
मोबाइल स्कायलूप, 3 किलोमीटरचा वॉकवे देखील असणार आहे. पाहुण्यांना
झोनपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून दर 10 मिनिटांनी
राजधानीच्या सर्व मुख्य ठिकाणांहून बसेस धावत आहेत. या बसेस निर्धारित
वेळेपूर्वी वंडरलडच्या गेट्सवर आणून सोडतात. तेथे एकाचवेळी 50 पेक्षा अधिक
तिकीट बुथ आहेत. स्नो फॉरेस्ट एरिया अत्यंत लोकप्रिय असून नेहमीपेक्षा
वेगळय़ा खेळांचा आनंद घेण्यासाठी लोकांच्या मोठय़ा रांगा लागत आहेत. भीतीचा
रोमांचक अनुभव देण्यासाठी हॉरर झोन देखील आहे. यात भयपटांच्या थिएटरपर्यंत
पोहोचण्यापूर्वी भीतीदायक घरांमधून वाट काढावी लागते. वंडरवर्ल्डमध्ये
ई-गेम्ससोबत थिएटर आणि सर्कस देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
कुमाऊंला आलात तर या पारंपारिक चवींचा आस्वाद नक्की घ्या..
Tarun Bharat Portal
~2 minutes
ऑनलाईन टीम तरुण भारत :
गढवालचे लोक त्यांच्या विशिष्ठ रितरीवाज,परंपरांबद्दल ओळखले जातात. इथला
पेहराव, सण साजरे करण्याची पद्धत, जीवन जगण्याची पद्धत या सगळ्याची एक
विशिष्ठ खासियत आहे. पण याही पेक्षा प्रसिध्द आहे ते इथले जेवण. तुम्ही कधी
गढवाल-कुमाऊंला गेलात तर इथल्या पारंपरिक जेवणाचा आस्वाद घ्यायला विसरू
नका.
१.कुमाऊनी रायता कुमाऊनी
रायता चवदार चव जेवणाची चव वाढवते. कुमाऊनी रायत्याला गढवालमध्ये ‘रेलू’
म्हणतात. हा रायता बनवण्यासाठी मोहरीची पूड २ दिवस मातीच्या किंवा लाकडी
भांड्यात दहयात मिसळून ठेवली जाते. नंतर त्यात किसलेला मुळा किंवा काकडी
मिसळली जाते. लग्नासारख्या समारंभात हा रायता खास दिला जातो.
२. भांग सॉस कुमाऊंमध्ये
भांगाची चटणी बनवण्यासाठी वाळलेल्या भांगाच्या बिया हलक्या तपकिरी
होईपर्यंत मंद आचेवर गरम केल्या जातात. यामुळे त्याचा कच्चापणा दूर
होतो. नंतर त्यात हिरव्या मिरच्या, हिरवी धणे, पुदिना, लिंबू आणि मीठ घालून
बारीक वाटून घेतात. जेवणात भांगेचा सॉस वेगळीच चव देतो.
३. आलू के गुटके बटाटे
उकडून त्याचे मोठे तुकडे करतात. नंतर लाल मिरच्यांना मोहरीच्या तेलात
फोडणी देतात. हळद, धणे, लाल तिखट आणि मीठ एकत्र थोड्या पाण्यात विरघळवून
घेतात. तेलात उकडलेले बटाटे आणि हिरवी कोथिंबीर टाकून आलू के गुटके ही
प्रसिध्द डिश बनवली जाते.
सीतामाई जेव्हा वनवासाला जायला निघाल्या, तेव्हा जाण्याआधी त्यांनी
चारही दासींनी जवळ बोलावलं. मीनाक्षी म्हणाली, “माई, तुमच्याशिवाय आम्ही
इथे राहून काय करू?’’ सीतामाईंनी सांगितलं की, मी दिलेल्या कलशातल्या
अग्नीचे रक्षण करा. त्या अग्नीद्वारे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकाल.
मीनाक्षी विचारते, “माई, या जन्मात आपली पुन्हा भेट होईल का?’’ सीतामाई
तिला वचन देतात की, तुझं हे जीवन संपण्याआधी मी तुला एकदा तरी नक्की भेटेन.
सीतामाई वनवासाला गेल्यावर चारही जणी त्या अग्निकलशाला सांभाळून ठेवतात
आणि सीतामाईंनी दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडायचा प्रयत्न करतात. बरीच
वर्षे जातात. उषाचे निधन होते. रोहणा कोणी नातेवाईक आजारी आहे म्हणून
मिथिलेला निघून जाते. आता सोमा आणि मीनाक्षी दोघीच उरतात. मीनाक्षीचे वय
झाल्याने तिला अंधुक दिसायला लागते. त्यावेळी सीतामाई ध्यानातून सोमाला
औषधी वनस्पतीची माहिती देत त्या वनस्पतीचा रस मीनाक्षीच्या डोळ्यांना
लावायला सांगतात. तिला स्पष्ट दिसायला लागते.
एकदा मीनाक्षी शरयू तीरावर गेली असता तिला सीतामाईंची खूप आठवण येते. ती
नदीकडे बघून म्हणते, “सीतामाई, तुम्ही मला वचन दिलं होतं की, माझं हे जीवन
संपायच्या आधी तुम्ही मला भेटायला येणार असल्याचं, पण आता मला काही माझं
खरं वाटत नाही.’’ तितक्यात तिला सीतामाईंचा आवाज ऐकू येतो. बघते तर सीतामाई
तिच्यासमोर उभ्या असतात. त्या तिला म्हणतात, “अगं, मी तुझ्या जवळ कायमच
आहे. तू भौतिक शरीराच्या मर्यादेत मला का शोधतेस? जिथे जिथे चैतन्य आहे
तिथे तिथे मी आहे. या नदीत आहे, झाडात आहे, आकाशात आहे, तुझ्यातही आहे.’’
त्यानंतर त्या हिरव्या रंगाची शाल मीनाक्षीच्या भोवती लपेटून तिला
सांगतात, इतका वेळ पाण्यात उभी राहू नकोस. तुला थंडी लागेल आणि बघता बघता
सीतामाई अदृश्य होतात. तिला वाटतं हा माझा भ्रम तर नाही ना! ती राजवाडय़ात
येऊन सोमाला पूर्ण प्रकार सांगते. तिची शाल दाखवते. सोमा तिला घेऊन
सीतामाईंच्या दालनात जाते.
जेव्हापासून सीतामाई वनवासाला गेल्या तेव्हापासून सोमा दररोज
सीतामाईंसाठी पोशाख काढून ठेवायची. त्याप्रमाणे तिने त्या दिवशीही पोशाख
काढून ठेवलेला असतो. ती म्हणते, मी याबरोबर एक हिरवी शाल काढून ठेवली होती
आणि आता ती इथे नाही. मीनाक्षी तुला खरोखरच सीतामाई भेटल्या होत्या? कारण
त्यांनी तुला जी शाल दिली, ती मी आजच्या पोशाखासोबत काढून ठेवली होती.
मीनाक्षी बघते की जे कपडे काढून ठेवलेले असतात त्याची खालची बाजू पाण्याने
भिजलेली आहे. झाल्या अनुभवाने ती धन्य होते. त्यानंतर दोनच दिवसांत तिचे
निधन होते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जी मीनाक्षी आपल्याला ही गोष्ट
सांगते आहे ती आता या जगात नाही, तर आता पुढची गोष्ट आपल्याला कोण सांगणार?
त्यानंतर लेखिका तिच्या पुढच्या जन्माचा प्रवास आपल्यासमोर उलगडते. तिचा
पुढचा जन्म अयोध्येतला आहे आणि तिचे नाव अनुसूया आहे. मध्ये खूप वर्षे
लोटून गेली आहेत. राजा राम यांचा खूप वर्षे राज्यकारभार चालू आहे. तिचे
वडील श्री राम यांच्या सैन्यात मोठे सेनापती आहेत. सीतामाई या भौतिक जगात
नाहीत. लव व कुश मोठे झाले आहेत आणि ते राजा रामांबरोबरच राहत आहेत.
अनुसूया आई-वडिलांची खूप लाडकी लेक आहे. अनुसूया पाच वर्षांची असताना एकदा
राजा राम तिच्या वडिलांबरोबर असताना तिला भेटतात. राम तिला बरोबर ओळखतात,
पण त्यानंतर श्री राम यांचा अवतार संपतो. लव व कुश राज्य सांभाळतात.
अनुसूया अयोध्येत स्त्रियांसाठी महाराज राम यांनी सुरू केलेल्या
गुरुकुलात शिकत असते. एकदा शाळेत शिक्षक रामायण सांगत असताना महाराणी सीता
यांचे अपहरण रावणाने केले होते असे सांगतात. अनुसूयेला ते पटत नाही. तिचा
या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की, सीतामाईंचे अपहरण होऊ शकते. तो प्रश्न
तिच्या मनात घर करून राहतो. शाळा सोडून देऊन ती घरी आईला मदत करते. अनुसूया
मोठी झाल्यावर तिच्या आई-वडिलांना तिचे लग्न करून द्यावेसे वाटते, पण
अनुसूयेच्या मनात लग्नाबद्दल अढी असते. कारण पूर्वजन्मीचे संस्कार! तिला
मनातली लग्नाबद्दलची भीती पाहून तिचे आईवडील चिंतेत पडतात. खूप समजावूनही
तिची भीती कमी होत नाही, तेव्हा तिची आई तिच्या वडिलांना एका योगिनीबद्दल
सांगते. ही योगिन अयोध्येपासून दूर एका आश्रमात राहते. ती वृद्ध आहे, पण
ती (प्राणिक हीलिंग) प्राण ऊर्जेने उपचार करते. तिचे नाव सोमा. सोमाचे नाव
ऐकताच अनुसूयेला खूप आनंद होतो आणि तिला भेटण्याची उत्सुकता वाढते. सोमा
शेवटपर्यंत महाराणी सीता यांच्यासोबत होती हे समजल्यावर तिच्या मनातल्या
प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील असा अनुसूयेला विश्वास वाटतो. ती
आईवडिलांबरोबर सोमाच्या आश्रमात जाते.
सोमा अनुसूयेला ओळखते. जवळ बसवून तिच्या आईला तिचे नाव विचारते. तिची आई
सांगते की, हिचे नाव आम्ही अनुसूया ठेवले आहे. अनुसूया ही ऋषीं अत्रींची
आज्ञाधारक पत्नी होती. सोमा म्हणते, महामुनी अनुसूयेची ओळख अयोध्येमध्ये
केवळ एक आज्ञाकारक पत्नी अशी आहे का? तिने तिचे सर्व तपसामर्थ्य सीतामाईंना
दिले. तिने लंकेत जाण्यासाठी सर्व प्रकारची मानसिक व आध्यात्मिक तयारी
सीतामाईंकडून करवून घेतली.
अनुसूयेला जितकी सीतामाईंची गोष्ट ऐकण्याची उत्सुकता होती, तितकी सोमाला
गोष्ट सांगण्याची आतुरता होती. सोमा मोठय़ा प्रेमाने अनुसूयेला सीतामाईंची
गोष्ट सांगू लागते.सीतामाईंनी वनवासाला निघण्याआधी स्वतमधून चिदाग्नी काढून
एका कलशात ठेवली. त्या अग्नीच्या माध्यमातून सोमा वनवासातील सीतेचा प्रवास
पाहू शकत होती. संवादही साधू शकत होती. जेव्हा चित्रकुटात राम, लक्ष्मण
आणि सीतामाई महामुनी अत्री आणि महामुनी अनुसूयेच्या आश्रमात जातात तेव्हा
महामुनी अत्री रामाला जवळ बसवून राक्षसांमुळे आश्रमावरील होणारे हल्ले,
निरपराध लोकांच्या होणाऱ्या हत्यांबद्दल सांगतात. त्याक्षणी राम निश्चय
करतात की, राक्षसांच्या जाचातून संपूर्ण पृथ्वीला मी मुक्त करीन. महामुनी
अनुसूया सीतामाईंना सांगते की, राम यांना त्यांचा निश्चय पूर्ण करण्यासाठी
सीतामाईंची साथ लागेल. अनुसूया माता सीतामाईंना हजारो वर्षे केलेल्या
ध्यानाचे फळ देऊन टाकते. त्यामुळे सीतामाई यांना असीम शक्ती व निरंतर ध्यान
या अमूल्य भेटी मिळतात.
अत्री महामुनी एका विशाल गुहेत राम आणि सीतामाईंना घेऊन जातात आणि
विश्रांती घ्यायला सांगतात. सीतामाईंना तहान लागलेली असते. राम पाणी
आणण्यासाठी निघतात तोच त्यांच्या पायाशी एक झरा जमिनीतून बाहेर येतो.
त्यातून एक बालिका बाहेर येते. ती राम आणि सीतामाईंना नमस्कार करून म्हणते
की, मी तुमची पुत्री गोदावरी. तुमच्या संकल्पातून माझी निर्मिती झाली. मी
आता दक्षिणेकडे जाते. तुमच्या पुढच्या प्रवासात मी तुम्हाला पुन्हा भेटेन,
पण माझा एक झरा मी इथेच ठेवून जाते. तुम्हाला कधीही तहान लागली तर तो
उपयोगी पडेल. असे बोलून गोदावरी निघून जाते.
बिल्किस जहांचा मकबरा 50 वर्षांनी खुला
Tarun Bharat Portal
~2 minutes
पर्यटकांना पाहता येणारा ईराणी स्थापत्य कला
बेगम मुमताज आणि शाहजहांची सून बिल्किस जहांच्या मकबऱयाची 389 वर्षे
जुनी इराणी स्थापत्यकाला पर्यटकांना 50 वर्षांनी पुन्हा पाहता येणर आहे. हा
मकबरा खुला करण्यात आला आहे. या मकबऱयाची दुरुस्ती करत त्याला गतवैभव
प्राप्त करून दिले जाणार आहे. येथील इराणी स्थापत्यकला आजही सर्वांना
आकर्षित करत आहे.
सुमारे 389 वर्षांपूर्वी उतावली नदी आणि ताप्ती नदीच्या काठादरम्यान
बिल्कि जहांचा मकबरा निर्माण करण्यात आला होता. हा मकबरा जीर्ण झाल्याने
1970 मध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाने तो बंद केला होता. पर्यटकांच्या
मागणीवर आता पुन्हा खुला करण्यात आला आहे. मकबऱयाची दुरुस्ती करत रसायनाने
त्याच्या भिंती स्वच्छ केल्या जाणार आहेत. सुमारे 600 चौरस फुटांमध्ये
मकबरा फैलावलेला आहे. मकबऱयाच्या गुंबदाला टरबूजाचा आकार देण्यात आला आहे.
बिल्किस जहांचा जन्म 1616 मध्ये अजमेर येथे झाला होता. शाहजहांचा पुत्र
शाहशुजासोबत तिचा विवाह झाला होता. बुरहानपूरमध्ये 1632 साली बिल्किसचे
निधन झाले होते. तेथेच मकबरा तयार करून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
होते. मकबरा राष्ट्रीय स्मारकाच्या स्वरुपात नेंद आहे.
इराणी स्थापत्यशैलीमुळेच हा मकबरा आजही आकर्षणाचे केंद्र आहे. याचा आकार
टरबुजाप्रमाणे आहे. मकबऱयात आकर्षक रंगीत नक्षीकाम आहे. शेकडो
वर्षांनंतरही आज देखील पूर्वीप्रमाणेच तो मोहक वाटतो.
पाऊलखुणा- आठवणींचा सुवर्णकाळ मालगुडी म्युझियम
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> आशुतोष बापट
‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान, हिरव्या-लाल रंगात
नटलेले जुने रेल्वे स्टेशन आणि मालिकेतील अनेक आठवणी… हे सारे पाहायला
मिळते शिमोग्याजवळील ‘अरासळू’ या गावात. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय टीव्ही
मालिकेची संकल्पना मांडणारे हे म्युझियम आपल्याला नॉस्टॅल्जिक अनुभव देणारे
ठरते.
‘मालगुडी डेज’ ही अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका. मालगुडी नावाच्या
खेडेगावाचे कथानक मांडणाऱया या मालिकेचे चित्रीकरण या शिमोग्याजवळील
गावात झाले. अरासळू येथे उभे केलेले मालगुडीचे रेल्वे स्टेशन आता
म्युझियममध्ये परावर्तित झाले आहे.
ही गोष्ट आहे एका प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही मालिकेची. जेव्हा
मनोरंजनासाठी फक्त दूरदर्शन एवढे एकच माध्यम होते आणि इतर कुठल्याही खासगी
वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या त्या काळातली. तो जमाना होता दूरदर्शनचा.
अनेकविध सुंदर मालिका त्या काळात दूरदर्शनचा पडदा गाजवून गेल्या. काही
मालिका मुलांसाठी, तर काही तरुणांसाठी. काही घरातल्या वडीलधारी मंडळींसाठी,
तर काही खास महिलांसाठी. घरातल्या प्रत्येक घटकासाठी एकेक मालिका त्या
काळी दूरदर्शनवर दाखवली जात असे. मात्र एक मालिका अशी होती, ती सुरू झाली
की, घरातली झाडून सगळी मंडळी टीव्हीसमोर येऊन ठाण मांडून बसत असत. ती
मालिका म्हणजे ‘मालगुडी डेज’! सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या
लेखनावर आधारित ही मालिका आणि तिच्या जोडीला त्यांचे बंधू आर. के. लक्ष्मण
यांची चित्रे यामुळे ही मालिका अफाट लोकप्रिय झाली. गिरीश कर्नाड, शंकर नाग
अशा दिग्गज कलाकारांनी ही मालिका गाजवली. दक्षिण भारतातले एक छोटेसे
खेडेगाव मालगुडी आणि त्या गावाशी निगडित असलेल्या विविध कथा असे या
मालिकेचे कथानक. स्वामी हा लहान मुलगा आणि त्याचे कुटुंब ही त्या मालिकेतील
मध्यवर्ती संकल्पना. मालगुडी डेजचा काळ दाखवला होता तो
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. त्यामुळे इंग्रजी राजवट, त्यांचे पोलीस,
त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक आणि त्यांच्या काळातल्या शाळा असा सगळा जुना
मामला आर. के. नारायण यांनी फार समर्थपणे मांडला होता. छोटय़ाशा खेडय़ातले
स्वामी हे मालिकेतील पात्र तर घराघरांत जाऊन पोहोचले आणि त्याचबरोबर
ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचले होते ते या मालिकेचे युनिक म्युझिक…!
‘मालगुडी डेज’ची ती टय़ून तर आजही अनेकांची मोबाइल रिंगटोन आहे.
‘मालगुडी डेज’ या मालिकेत अनेक प्रसंग, अनेक पात्रे, अनेक घटना आपल्याला
भेटत जातात. त्या गावचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मालगुडीचे रेल्वे
स्टेशन. त्या स्टेशनला मध्यवर्ती ठेवून काही पात्रे येतात, काही कथानके
तयार होतात आणि रेल्वे स्टेशनच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर कथानक साकार
झालेले दिसते. ‘मालगुडी डेज’च्या रेल्वे स्टेशनचे शूटिंग कर्नाटकातील एका
सुंदर ठिकाणी केले गेले होते. ‘अरासळू’ असे त्या गावाचे आणि स्टेशनचे नाव.
शिमोग्याच्या जवळ असलेले हे ठिकाण. या अरासळू रेल्वे स्टेशनवर मालगुडी
डेजच्या काही भागांचे चित्रीकरण झालेले आहे.
रेल्वे स्टेशनचे शूटिंग जिथे झाले त्या ठिकाणी आता एक सुंदर ‘मालगुडी
म्युझियम’ उभारले आहे. मालिकेमध्ये दिसणारे ‘मालगुडी’ हे रेल्वे स्टेशन आता
एका सुंदर म्युझियममधे परावर्तित झाले आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेऊन
हे स्टेशन आणि तिथले म्युझियम तयार केले आहे. शिमोग्यापासून फक्त 34
किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या तालीगुप्पा-शिमोगा मार्गावर
‘अरासळू’ हे स्टेशन आहे. अरासळूच्या जुन्या स्टेशनवर ‘मालगुडी डेज’चे
शूटिंग झाले होते. इथेच शेजारी आता नवीन अरासळू स्टेशन उभारले आहे आणि
जुन्या स्टेशनचे रूपांतर ‘मालगुडी म्युझियम’मध्ये केले आहे.
शिमोग्याकडे जाताना वाटेत उजवीकडे अरासळू स्टेशनपाशी ‘मालगुडी म्युझियम’
असे लिहिलेली कमान आपले स्वागत करते. कमानीतून आत गेल्यावर आपल्याला समोर
दिसते ते हिरव्या-लाल रंगांत नटलेले बुटके जुने रेल्वे स्टेशन. त्याच्या
बाहेरच्या बाजूला नॅरो गेजवरील इंजिनाची प्रतिकृती आपले लक्ष वेधून घेते.
परिसर अतिशय शांत आणि हिरवागार आहे. 1960 च्या दशकातले स्टेशन तसेच ठेवले
आहे. तीच जुनी तिकीट खिडकी, तीच जुनी घडय़ाळे, जुनी समयसारिणी असा सगळा
सुंदर सरंजाम तिथे आहे. स्टेशनच्या भिंतींवर ‘मालगुडी डेज’ या मालिकेतील
वेगवेगळे प्रसंग चित्रित केलेत. एका टीव्हीवर सतत ‘मालगुडी डेज’ मालिका
सुरू असते आणि सगळ्यात भारी म्हणजे या स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला
स्वामी, त्याचे मित्र मणी आणि राजम यांचे पुतळे केलेले आहेत.
या मालगुडी स्टेशनच्या शेजारी रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर करून
‘मालगुडी कॅफे’ तयार केला आहे. एखादी संकल्पना घेऊन त्याचं चीज कसं करायचं
याचा परिपाठ म्हणजे हे ‘मालगुडी म्युझियम’ आहे. याचे प्रवेश शुल्क फक्त पाच
रुपये आहे, पण इथे मिळणाऱया अनुभवाचे गाठोडे प्रचंड मोठे आहे. शिमोग्याला
जाऊन मुद्दाम हे स्टेशन आणि म्युझियम बघायलाच हवे. तिथे असेपर्यंत
मालगुडीची ‘ता ना ना नाना नाना ना…’ ही अफाट गाजलेली धून मनात सतत रुंजी
घालत असते. काही गोष्टी शब्दांत नाही सांगता येत, तर त्या तिथे जाऊनच तो
सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवायला हवा.
ashutosh.treks@gmail.com
।। सीतास्वरुपा ।। – करुणामयी
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> वृषाली साठे
‘अन्टोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून डेना मॅरिअम यांनी त्यांच्या
शब्दात सांगितलेली ही कथा. सीतामाई आणि राम यांची ही जीवनकथा म्हणजे
संपूर्ण भारतवर्षाची कहाणी आहे.
विवाह झाल्यावर जनकबाबा या चारही दासींना म्हणजे सोमा, मीनाक्षी, उषा
आणि रोहणा यांना विचारतात की, त्या सीतामाईबरोबर अयोध्येला जायला तयार आहेत
का? चारही जणी सीतामाईबरोबर जायला तयार होतात, तेव्हा जनकबाबा चारीजणींना
जवळ घेतात आणि सांगतात की, ज्याप्रमाणे माझ्यासाठी सीतामाई आणि उर्मिला
आहेत त्याप्रमाणे तुम्ही पण माझ्याच कन्या आहात. मीनाक्षीला खूप भरून येतं.
तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येते.
लहानपणीच मीनाक्षीला तिच्या वडिलांनी त्यांच्या घराण्याला असलेल्या
शापाबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या घरात कोणाही मुलीचं लग्न होताच ती
विधवा बनून माहेरी परत यायची. त्यामुळे मीनाक्षीला लग्न कधी करायचेच
नव्हते. सीतामाईंना मीनाक्षीची खूप काळजी वाटायची. निघताना सीतामाई
मीनाक्षीला अश्व शाळेत काम करणाऱया किरणला भेटून यायला सांगते. मीनाक्षीला
कळत नाही की किरणला का भेटायचं, पण सीतामाईंना माहीत असतं की किरणला
मीनाक्षी खूप पसंत आहे. पण या जन्मी घराण्याच्या शापामुळे मीनाक्षीचं लग्न
होऊ शकत नाही. पण सीतामाईंना खात्री असते की पुढल्या कुठल्या तरी जन्मी हे
दोघं एकत्र येतीलच आणि हे खरं होतंही.
आता सीतामाईचा अयोध्यामध्ये प्रवेशाबद्दल बोलूया. अयोध्यामध्ये जोरदार
स्वागत होतं. कौशल्या मातेने तर मिथिलेत दूत पाठवून सीतेला काय आवडतं, काय
नाही याची चौकशी करून ठेवलेली असते. राम तर सगळय़ांचा आवडता म्हणजे
घरच्यांचा आणि प्रजेचादेखील. म्हणून सीतामाईबद्दल सगळय़ांना उत्सुकता होती.
भव्य आणि दिव्य स्वागत चारही राजकुमार आणि त्यांच्या पत्नींचं होतं.
मिथिलेतील चारही राजकन्या आणि त्यांच्या दासी अयोध्यामध्ये आल्यावर जरा
भांबवून जातात. मिथिलेत खूप साधेपणा आणि अयोध्येमध्ये खूप श्रीमंती व
दिखाऊपणा.
भव्यदिव्य राजवाडा, त्यातील अति श्रीमंती. कोणालाही भेटायला जायच्या आधी
दासीमार्फत वर्दी द्यायची. हे सर्व मिथिलेपेक्षा खूप वेगळं होतं. शिवाय
राण्यांमधील एकमेकींच्या नात्यात प्रेम कमी आणि स्पर्धाच जास्त पाहायला
मिळत होती. सीतामाई घराण्याच्या चालीरीती समजून घेतात. सगळय़ा सासवांची
मनापासून सेवा करतात. प्रत्येकाची आवड-निवड जाणून घेतात. त्याप्रमाणे
त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून प्रत्येकाला खूश करतात. बहिणींना आणि
त्यांच्याबरोबर आलेल्या दासींना मिथिलेची आठवण आली तर त्या त्यांना जवळ
घेऊन त्यांची समजूत काढतात. आपण इथे खूप जबाबदारीने वागलं पाहिजे जेणेकरून
आपल्या माहेरची शान कमी होता कामा नये असं सीतामाई त्या दासींना समजावून
सांगायच्या. रामजी आणि सीतामाईमधील प्रेम तर असं काही विलक्षण असतं की
त्यांच्या संपर्कात येणारे प्रत्येकजण हे प्रेम बघून आनंदित होतात.
त्यांच्यामध्ये फुललेले प्रेमाचे फूल इतके सुगंधित होते की, त्यात संपूर्ण
अयोध्या सुगंधित होऊन जाते. रामजी आणि सीतामाईंना एकमेकांविषयी आदर व
विश्वास होता. त्यांच्यात मनमोकळा संवाद होईल अशी मैत्री होती. मुख्य
म्हणजे प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ व प्रसंगी सर्वस्व अर्पण करण्याची
तयारी होती. यालाच प्रेम म्हणतात ना. त्यांचे मनाचे धागे इतके जुळले होते
की काही न सांगता त्यांना एकमेकांच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळायची. प्रेम
म्हणजे आंतरिक ओढ. हे केवळ एक स्त्राr व पुरुष यातील प्रेम नव्हते तर दोन
आत्म्यांचे मिलन होते. जे अभिन्न होते. यातच एक वर्ष निघून गेलं.
अयोध्येमध्ये स्त्रियांना राजवाडय़ाबाहेर मनात येईल तेव्हा जायची मुभा
नव्हती. सीतामाई तर लहानपणापासून जंगलात, नदीवर, बागेत, नगरात, शेतात एकटय़ा
जायच्या. इथे अयोध्येमध्ये राजवाडय़ात सीतामाईंना निसर्गाची खूप आठवण
यायची. एकदा त्यांनी मीनाक्षीकडून सेविकेचा पोशाख मागून घेतला आणि त्या
सोमा आणि मीनाक्षीबरोबर शरयू तीरावर गेल्या. त्यांनी शरयू नदीच्या दिव्य
आत्म्याची पूजा केली तेव्हा शरयू नदी स्वत येऊन सीतामाईंना भेटल्या.
तेव्हापासून सोमा आणि मीनाक्षीसाठी ती शरयू नदीची जागा खूपच पवित्र ठरली.
पुढे हीच जागा समस्त अयोध्येतील महिलांसाठी पवित्र पूजा स्थान बनली.
दशरथ महाराज रामाचा राज्याभिषेक ठरवतात. या पुढची गोष्ट तर आपल्याला
माहीतच आहे. रामाला 14 वर्षांचा वनवास माता कैकयीमुळे होतो. कौसल्या माता
सीतामाईंना रामजीबरोबर जायची परवानगी देतात. कारण त्यांना माहीत असतं की हे
दोघे एकमेकांशिवाय परिपूर्ण नाहीत. मीनाक्षी विचारते की, ‘आमचं काय? आम्ही
पण तुमच्याबरोबर येतो.’ तेव्हा सीतामाई म्हणतात, ‘मीनाक्षी हे शक्य नाही.
आज जरी तुम्हाला हे कैकयी माता व मंथरा हे कारण वाटत असलं तरी आम्ही जंगलात
जाणं हे विधिलिखित आहे, जे खूप गरजेचं आहे. जंगलातील आश्रमावर होणारे
हल्ले थांबवले नाहीत तर पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान कसं जाईल?’
त्या काळातील आश्रम म्हणजे आजच्या काळातील शैक्षणिक संस्था. या आश्रमाचं
संरक्षण होणं ही काळाची गरज होती. मीनाक्षी विचारते, ‘सीतामाई
तुमच्याशिवाय आम्ही चौघी इथे राहून काय करू?’ सीतामाई चौघींना बोलवते आणि
त्यांना एक कलश देते. त्या कलशामध्ये स्वतमधून चिदाग्नी काढून ठेवते.
कलशामध्ये अग्नी प्रकट होतो. नंतर प्रत्येकीला एक एक मंत्र देते आणि सांगते
रोज सकाळ-संध्याकाळ या मंत्राचा पाठ या कलशासमोर करा. तुमच्या माझ्यातील
संपर्क या कलशातील अग्नीद्वारे कायम राहील. नंतर ती चौघींना कौसल्या माता,
सुमित्रा माता आणि कैकयी माता यांची सेवा करायला सांगते.
मीनाक्षी रागावते, मी कैकयी मातेची सेवा का करू? सीतामाई तिला समजावून
सांगतात की, ‘आज कैकयी मातेला माहीत नाही की त्यांनी काय केलं आहे, पण
उद्या जेव्हा त्यांना त्याची जाणीव होईल तेव्हा कोणी त्यांच्याबरोबर नसेल.
तिला तेव्हा आधाराची गरज असेल. तू तेव्हा तिचा आधार हो. बघा किती प्रेम आहे
सीतामाईच्या मनात. अशाच प्रेमळ सीतामाईंना नमस्कार करून आजचा भाग संपवते.
vrishali.sathe@gmail.com
।। सीतास्वरुपा ।। – आंतरिक शक्ती
सामना ऑनलाईन
5–6 minutes
>> वृषाली साठे
डेना मेरियम त्यांच्या `अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता’ या पुस्तकातून काही
अद्भुत व आपण कधी न ऐकलेल्या गोष्टी त्या आपल्याला सांगतात. डेना मेरियम,
ज्या पूर्वजन्मी सीतेची दासी, मीनाक्षी होत्या. तार्किक दृष्टीने पाहिले तर
खऱया वाटणाऱया या गोष्टी आणि त्याचे सीतामाईच्या दृष्टीतून झालेले निरूपण
ऐकण्याजोगेच…
मदत करण्यात तर सीतामाई सदैव तत्पर असायच्या. शेतात जाऊन नांगरदेखील
त्या उचलायच्या तेव्हा सुनयना माता जनक बाबांकडे पार करायच्या की, “माझी
एवढी नाजूक मुलगी! तिला तुम्ही अशी कामं करायला सांगता?” जनक बाबा सांगायचे
की, “तिची भौतिक शक्ती बघू नकोस, तिची आंतरिक शक्ती बघ. मी शिकवलेल्या
यौगिक क्रियांनी व तिने केलेल्या ध्यानाने तिची आंतरिक शक्ती खूप वाढली
आहे. हे काम तर ती सहज करेल.”
एकदा सीतामाई जंगलात ध्यानाला त्यांच्या आवडत्या ठिकाणी गेल्या. खूप वेळ
होतो, त्या ध्यानातून बाहेर येत नाहीत. मीनाक्षी व सोमा धावत जनक बाबांना
येऊन सांगतात की, खूप तास होऊन गेले, पण सीतामाई ध्यानातून बाहेर नाही
आल्या. जनक बाबा म्हणाले की, “मला याचीच भीती होती. जर सीतामाई नारायणी
तत्त्वाशी एकरूप झाली तर मी तिला पुन्हा कसं आपल्यात आणू?” ते स्वत
ध्यानाला बसले. ध्यानात सीतामाईंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण ते
संपर्क करू शकत नव्हते. काही वेळाने त्यांनी आनंदाने डोळे उघडले आणि
म्हणाले की, सीतामाई ध्यानातून बाहेर येत आहेत. सीतामाई जेव्हा खरोखर
ध्यानातून बाहेर आल्या तेव्हा जनक बाबांनी त्यांना विचारले, “असं काय झालं
की, तू ध्यानातून बाहेर येऊ शकलीस?”
सीतामाई सांगितले की, कुठली तरी प्रेमाची शक्ती माझ्या जवळ आली आणि त्या
प्रेमाच्या शक्तीने मला ध्यानातून बाहेर आणले. जनक बाबा समजून गेले की,
आता कन्येच्या स्वयंवराची वेळ आली आहे. पण सीतामाईने निश्चय केला होता की,
त्यांना जाणवलेली प्रेमाची शक्ती ज्या राजकुमाराकडे आहे, त्याच्याशीच विवाह
करेन.
जनक बाबांनी स्वयंवराची घोषणा केली आणि त्यासाठी एक पण ठेवला होता. जनक
बाबांकडे जे महादेवाचे धनुष्य होते, ते जो कोणी उचलून त्याला प्रत्यंचा
लावेल त्याच्याशी सीतामाई विवाह करतील. ते धनुष्य परशुरामाचे होते. ते केवळ
पिढीजात सांभाळण्यासाठी होते आणि ते धनुष्य जनक बाबांकडे होते. लहानपणी
एकदा सीतामाई खेळत असताना त्यांचा चेंडू धनुष्याजवळ पडला होता. तेव्हा
सीतामाईने एका हाताने धनुष्य उचलून त्याच्या खालचा चेंडू काढून घेतला होता.
ते पाहून जनक बाबा आणि सुनयना माता खूप आश्चर्यचकित झाले होते. आंतरिक
शक्तीच्या जोरावर कितीतरी भौतिक शक्तीची कामे केली जातात.
स्वयंवराचा दिवस उजाडला त्या दिवशीदेखील सीतामाई शेतात गेल्या.
जमिनीवरची माती हातात घेऊन मीनाक्षीला म्हणाल्या की, ही धरती माता किती
आपल्यावर प्रेम करते… बोलता बोलता सीतामाई अचानक थांबल्या. त्यांना ध्यानात
जाणवलेली प्रेमाची शक्ती आसपासच कुठेतरी असल्याचा भास झाला. शेतात दूरवर
एक रथ उभा होता. त्यातून दोन राजकुमार खाली उतरले. सीतामाईने शेतकऱयाला
विचारले, “कोण आहेत हे?” शेतकरी म्हणाला की, हे अयोध्येचे राजकुमार आहेत.
अशा रीतीने कथेत राम आणि लक्ष्मण यांचा प्रवेश होतो.
स्वयंवरासाठी संपूर्ण मिथिला नगरी सज्ज होत होती. सीतामाई मीनाक्षी आणि
सोमाबरोबर पार्वती मातेच्या मंदिरात गेल्या. त्या वेळेस त्यांच्याबरोबर
त्यांची धाकटी बहीण उर्मिला आणि अजून दोन दासी होत्या. त्या दोन दासी
म्हणजे उषा आणि रोहणा. तिथे गेल्यानंतर पूजा करत असताना सीतामाईंना तीच
प्रेमाची शक्ती पुन्हा जाणवली. त्या मंदिरात राम-लक्ष्मण दोघेही आलेले
होते. सगळ्याजणी मागे वळून रामजीकडे बघतात. ते भव्य रूप, दैदिप्यमान कांती
यामुळे कोणालाही त्यांना पाहता आले नाही. फक्त सीतामाई ते रूप बघू शकत
होत्या. सोमाच्या मनात आले की, मी हे का बघू शकत नाही? सोमाच्या मनातली
प्रत्येक गोष्ट सीतामाईंना न सांगता कळत असे. त्या सोमाला म्हणाल्या,
“सोमा, कांतीच्या पलीकडे बघायचा प्रयत्न कर.” त्यानंतर सोमा रामजींकडे
थोडेफार बघू शकली. रामजी पण सीतामाईंना पाहून हीच नारायणी शक्ती आहे,
जिच्याशी एकरूप व्हायची वेळ आली असल्याचे समजून गेले.
त्यानंतर घडेलेली सीता-स्वयंवराची गोष्ट सगळय़ांना माहीत आहे. राम स्वयंवराचा पण जिंकतात.
जेव्हा रामजी आणि सीतामाईंचा विवाह निश्चित होतो, तेव्हा जनक बाबा
रामजींना जवळ बसवून मिथिलेतील स्वशासनाची माहिती देतात. अयोध्या भौतिक
दृष्टीने खूपच समृद्ध आहे, पण मिथिला आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण आहे हे ते
रामजींना सांगतात. हा केवळ रामजी आणि सीतामाईंचा विवाह नाही, तर हा अयोध्या
आणि मिथिला यांचा विवाह आहे. म्हणजेच शक्ती आणि आंतरिक शक्ती यांचे मीलन
आहे. ही एक काळाची गरज आहे की, अयोध्येत आता मिथिलेतील ज्ञानाचा वापर
व्हावा.
बघा, आजच्या काळातदेखील आपण कितीही ज्ञानी आणि शक्तिमान असलो, सर्व
प्रकारच्या कामात अव्वल असलो तरी जोपर्यंत आपण आपल्या आंतरिक शक्तीशी
परिचित होत नाही तोपर्यंत खऱया दृष्टीने विजय मिळवू शकत नाही. काम व
ाढाsधरूपी रावण आपल्याला छळतच राहतात …आणि सीतामाई आपल्याला शिकवतात की,
आंतरिक शक्ती ध्यानाने वाढवता येते.
जनक बाबांना हेही माहीत होते की, संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी राम आणि
सीतामाईंचा विवाह होणे खूप गरजेचे आहे. जनक बाबांकडे जेवढे ज्ञान होते ते
सर्व त्यांनी सीतामाईंना दिले होते. ते राम यांना सांगतात की, तुम्हा
दोघांना प्रेमाचा खरा धर्म या जगात प्रस्थापित करायचा आहे.
vrishali.sathe@gmail.com
सृजन संवाद – गोष्ट त्रिशंकूची
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> डॉ. समिरा गुजर जोशी
भारतीय परंपरेत गोष्टींची रचना फार कौशल्याने केली जाते. त्यामध्ये
मनुष्य स्वभावाचे विविध कंगोरे असतात. जगण्याविषयीचे अनुभव असतात आणि
त्याचबरोबर निसर्ग घटनाही समावलेल्या असतात. यापैकी एक जरी पैलू यशस्वीपणे
मांडता आला तर त्या गोष्टीची गणना उत्तम कथेमध्ये करायला हरकत नाही, पण
कथाकार जेव्हा ऋषी वाल्मीकी असतात तेव्हा ते हे सगळे पैलू एकाच कथेतही आणू
शकतात. आता ही कथा वाल्मीकींनी रचली की त्यांना परंपरेने ती ठाऊक झाली हा
प्रश्न आहेच. पण तूर्त तरी आपण उत्कृष्ट कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे
श्रेय वाल्मीकी ऋषींना देऊन पुढे जाऊ. तर ही कथा आहे राजा त्रिशंकूची.
राजा त्रिशंकू हा रामाच्याच ईश्वाकू कुळातील एक श्रेष्ठ राजा होता.
त्याचे आचरण अतिशय उत्तम असून तो कधीही खोटे बोलत नसे. तो प्रजाहितदक्ष
होता. त्याने अनेक यज्ञही केले होते. नाव ठेवण्यासारखे त्याच्यामध्ये काहीच
नव्हते. पण त्याच्या मनात एका विचित्र इच्छेचा जन्म झाला. आपण ‘सदेह
स्वर्गाला जावे’ असे त्याला वाटू लागले. त्याने आपले गुरू वसिष्ठ यांना तशी
विनंती केली की, आपण शंभर यज्ञ करा आणि त्या पुण्याच्या जोरावर मला
स्वर्गामध्ये स्थान मिळवून द्या. गुरू वसिष्ठ यांनी त्याला हे शक्य नाही हे
समजावून सांगितले. पण तो हट्टाला पेटला होता. आपल्या देहवासना कायम ठेवून
त्याला स्वर्गात जायचे होते. वसिष्ठांनी नकार दिल्यावर त्याने
वसिष्ठपुत्रांना विनंती केली. पण त्यांनीही ही मागणी धुडकावून लावली. हा
बालिश हट्ट सोड असे सांगितले. पण राजा ऐकायलाच तयार नाही हे पाहून त्यांनी
त्याला चांडाळ होण्याचा शाप दिला. हट्टामुळे राजाची एवढी अधोगती झाली तरी
तो हट्ट बाजूला ठेवायला तयार नव्हता.
अलीकडे आपणही अनेक वेळा फार मोठी स्वप्नं पाहणारी माणसे आजूबाजूला
पाहतो. अनेकदा त्यांची अशक्य कोटीतली स्वप्ने साकारही होतात. पण तरीही ही
उदाहरणे अपवादभूत असतात. आज-काल अशा अशक्यप्राय स्वप्नांचे मार्केटिंग केले
जाते तेव्हा त्रिशंकूची ही गोष्ट पुन्हा आठवण्याची गरज आहे असे वाटते.
हे स्वप्न उराशी बाळगणाऱया त्रिशंकूची गाठ राजर्षी विश्वमित्रांशी पडली.
तेव्हा शापामुळे त्याची अवस्था फारच बिकट झाली होती. विश्वामित्र स्वत
मुळात राजकुलातील असल्यामुळे ही त्यांना त्याच्याविषयी अधिक सहानुभूती
वाटली असावी. याप्रसंगी विश्वामित्रांकडे मदत मागताना त्रिशंकूने आपली बाजू
छान मांडली आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर ‘स्मार्टली’ मांडली आहे. आपल्या
आजवरच्या उत्तम वागणुकीचा दाखला देऊन तो विश्वामित्रांचे मन वळवू पाहतो की
स्वर्गात जागा मिळणे ही माझ्या हक्काची गोष्ट आहे.
हे जरी खरे असले तरी वसिष्ठांचा विरोध हा देहवासना कायम ठेवून स्वर्गाला
जाण्याला होता, हे तो आणि काही प्रमाणात विश्वामित्रही सोयीस्कररीत्या
विसरताना दिसतात. विश्वामित्रांच्या बाजूने पाहायला गेले तर त्यांना या
निमित्ताने जणू आपल्या तपश्चर्येचे बळ सिद्ध करायचे आहे. अशाप्रकारे दोघेही
जिद्दीने पेटून उठले आहेत. विश्वामित्र त्याच्यासाठी यज्ञ करतात. यज्ञातील
शेवटची आहुती दिली तरीही देवतांनी त्यांना इच्छित फळ दिले नाही. तेव्हा
विश्वामित्र अतिशय संतापले आणि त्यांनी स्वतच्या तपश्चर्येचे फळ वापरून
त्रिशंकू राजाला स्वर्गात धाडले. तो स्वर्गाकडे सदेह प्रवास तर करू लागला,
पण इंद्राने त्याला मध्येच अडवले की, ‘तू अधोमुख पृथ्वीवर पडशील.’ त्याने
‘त्राही त्राही’ असे म्हणत मदतीसाठी विश्वामित्रांना हाक मारली. त्यांनी
त्याला ‘तिष्ठ’ असे म्हणून मध्येच थांबवले. आता तो ‘ना स्वर्गात होता ना
पृथ्वीवर.’ मग विश्वामित्रांनी त्याच्यासाठी दुसरा स्वर्गच बनवायचे ठरवले.
दक्षिण दिशेला त्याच्यासाठी एक नवी नक्षत्रमाला तयार केली. विश्वामित्रांनी
प्रतिइंद्र आणि प्रतिदेवताही निर्माण करण्यास घेतल्या. तेव्हा मात्र
देवांनी त्यांना अडवले. त्यांचे तपोबल मान्य केले. जरी त्रिशंकूला स्वर्गात
स्थान दिले नाही तरी त्याला अवकाशात ताऱयाचे तेजस्वी स्थान दिले.
विश्वामित्रांनी तयार केलेली नक्षत्रमालाही कायम राहील असा वर दिला. आजही
क्रक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारकासमूहाचे भारतीय नाव ‘त्रिशंकू’ आहे
आणि हे दक्षिण गोलार्धातील नक्षत्र आहे. त्याच्या बाजूला सप्तर्षीसारखा
वाटणारा एक तारकांचा पुंजकाही दिसतो, ती जणू विश्वामित्रांनी तयार केलेली
नक्षत्रमाला आहे.
ह्या गोष्टीतले हे खगोलशास्त्रीय संदर्भ अचंबित करणारे आहेत. पुन्हा
एकदा महत्त्वाकांक्षा, जिद्द या मुद्द्यांकडे वळायचे तर विश्वामित्रांच्या
सामर्थ्यापुढे देवही झुकलेले दिसतात. याचे कारण कदाचित हे असावे की, ते
दुसऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायला तयार होते. त्यात
स्वार्थ नव्हता. त्रिशंकू मात्र अतिमहत्त्वाकांक्षेमुळे मधल्यामध्ये लटकत
राहिला. अर्थात ह्या गोष्टीचे आणखीही अर्थ लावता येतील. अनेक अर्थांची
शक्यता ही गोष्टसुद्धा उत्तम कथेचा गुण असतेच, नाही का?
samira.gujar@yahoo.com
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाची अभ्यासक)
पाऊलखुणा – शिवचरित्राचा मागोवा
सामना ऑनलाईन
6–7 minutes
>> रोहित पवार
परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन नाही.
चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसपासून ते
अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को
पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलाने
भरलेल्या नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या.
त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना भूतकाळातील घटनांचा पडदा
उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जाणून
घेताना या परदेशी प्रवाशांच्या नोंदी तितक्याच महत्त्वपूर्ण ठरतात.
‘कुतूहल’… माणसाला जगण्याची प्रेरणा देणारा हा शब्द. दगडी हत्यारे
बनविणाऱ्या अश्मयुगीन माणसाने पुढे चंद्रावर पाऊल ठेवले. हा संपूर्ण प्रवास
या कुतूहलाचाच. युगानुयुगे याच कुतूहलाने प्रेरित होऊन मानवाने अज्ञात
क्षितिजांचा वेध घेतला आहे. पलीकडचे जग कसे असेल? तिथले लोक कसे असतील,
त्यांची संस्कृती, त्यांची जीवनशैली आपल्यापेक्षा वेगळी असेल का? अशा अगणित
प्रश्नांनी मानवी मनात काहूर उठवले आणि याच अतृप्त जिज्ञासेपोटी काही
धाडसी माणसे आपल्या ज्ञात जगाच्या सीमा ओलांडून अज्ञात वाटा तुडवत निघाले.
समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन आणि दूरवरच्या दुर्गम भूभागांना तुडवत
हे प्रवासी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. त्यांच्यापैकी काही
भारतभूमीकडेही आले. परदेशी प्रवाशांची भारतात येण्याची परंपरा ही काही नवीन
नाही. चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस पासून
ते अल्बेरुनी, ह्युएन संग, जगप्रसिद्ध इब्न बतुता आणि अद्भुत मार्को
पोलोपर्यंत अगणित प्रवाशांनी या भूमीला भेट दिली. त्यांच्या कुतूहलपूर्ण
नजरेत ज्या ज्या गोष्टी आल्या, त्या त्यांनी नोंदविल्या. असे काही क्षण
नोंदवून ठेवण्याच्या त्यांच्या सवयीतून त्यांनी तत्कालीन भारताचे जे चित्र
रेखाटले, उद्या त्या नोंदींकडे जग ‘इतिहास’ म्हणून बघणार आहे याची बहुतांशी
प्रवाशांना जाणीवही नसावी. त्यांच्या नोंदी इतिहासाच्या अभ्यासकांना
भूतकाळातील घटनांचा पडदा उलगडण्यास मार्गदर्शक ठरतात. ते केवळ प्रवासी
नव्हते तर ते भूतकाळाचे साक्षीदार होते!
शिवकाळात अनेक परकीय प्रवासी महाराष्ट्रात येऊन गेले. यात काही प्रवासी
होते, काही वैद्य, काही धर्मप्रसारक, काही व्यापारी तर काही अधिकारी
लोकसुद्धा. काही जण थोडे दिवस इथे राहिले तर काही कायमचेच या भारतभूमीशी
एकरूप झाले. या लोकांनी ज्या घटनांची, व्यक्तींची नोंद केली त्यात छत्रपती
शिवाजी महाराजांबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि ही सर्व माहिती
अपरिचित तर आहेच, पण महत्त्वपूर्णदेखील आहे. शिवाजी महाराज हयात असतानाच
त्यांची कीर्ती दूर युरोपपर्यंत पोहोचली होती. त्यांच्या पराक्रमी
कार्यांनी, धाडसी कृत्यांनी आणि चलाखीने समकालीन परदेशी इतिहासकारांच्या
लेखनात स्थान मिळवले होते. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि इटालियन लेखक
मराठय़ांचे नाव जगात प्रसिद्ध होण्याआधीच शिवाजी महाराजांचे वर्णन करत
होते. त्यापैकी काही जणांनी ओळखले होते की, शिवाजी महाराज हे फक्त बंडखोर
सरदार नव्हते तर ते एक थोर सेनानी आणि त्याहूनही महान राजनीती धुरंधर होते.
या बुद्धिमान निरीक्षकांमुळेच आपल्याला या मराठा वीराची सर्वात जुनी
चरित्रे उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अचूक माहिती किंवा
निष्पक्ष इतिहासाची अपेक्षा करता येत नाही, परंतु त्यांनी आपल्यासाठी अनेक
रंजक किस्से, तेव्हाच्या चर्चा आणि ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा काही
सत्य घटनांचा खजिना जतन करून ठेवला आहे. तब्बल 100 वर्षांपूर्वी बंगालचे
साक्षेपी इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’
हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये अशाच परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
केलेल्या नोंदींचा समावेश केला होता.
इतिहासाचा अभ्यास करत असताना माझ्या मनात सारखे यायचे की, सेनांचे हे
‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी’ हे पुस्तक एक वेगळी दृष्टी देणारे आहेच,
परंतु ते इंग्रजीतच राहिल्याने अपरिचित राहिले आहे. जर हे मराठीमध्ये असते
तर किती सोपे झाले असते आणि मग विचार आला की, हे काम आपणच का करू नये?
म्हणून मग मी सदर पुस्तकाच्या अनुवादाच्या कामाला लागलो. या पुस्तकात परकीय
लोकांनी केलेल्या समकालीन नोंदी आहेत, यात संक्षिप्त-दीर्घ अशी
शिवचरित्रेही आहेत. त्यामुळे हा ग्रंथ अन्य कोणत्याही ग्रंथांप्रमाणे
भावानुवाद करून चालणार नव्हते. साधन ग्रंथांचे भाषांतर काटेकोरपणे करून तो
साधन ग्रंथाप्रमाणेच मांडणे आवश्यक होते. अखेरीस ‘फॉरेन बायोग्राफीज ऑफ
राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ गेल्या महिन्यात 15 मार्च 2025 रोजी प्रकाशित
झाला.
या पुस्तकात ‘कॉस्मी द ग्वार्द’ याने लिहिलेले पोर्तुगीज भाषेतील
शिवचरित्र आहे, जे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधराच वर्षांत
लिहिले होते. या पोर्तुगीज शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून
मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे. शिवाजी महाराज
आपल्या सैनिकांना भरघोस पगार देत ही गोष्ट या शिवचरित्रात नोंदवली आहे.
पुढे या पुस्तकात फ्रांस्वा व्हॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याची नोंद आहे, जी
शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरत लुटीचा वृत्तांत सांगते. महाराज कसे
दिसायचे, याचे वर्णन करणारा फ्रेंच प्रवासी ‘थिवेनो’ याचाही समावेश
पुस्तकात केला आहे.
‘अॅबे कॅरे’ हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात भारतात येऊन गेला. तो शिवाजी
महाराजांच्या प्रदेशातून प्रवास करत असताना त्याची मराठा अधिकाऱ्याशी भेट
झाली. या चर्चेदरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या
आहेत. कोकणातून प्रवास करताना या कॅरेने टिपलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे
स्वप्न आणि हेरगिरीचे रहस्य वाचण्यासारखे आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळा
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पार पडला. या सोहळ्याचा साक्षीदार हेन्री
ऑक्सिडेन हा त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याची रोजनिशी या पुस्तकात दिली
आहे. याशिवाय सध्या चर्चेत असणारी ‘मार्टिनची डायरी’देखील या पुस्तकात
तुम्हाला वाचायला मिळेल. या डायरीत शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय या
अतिशय महत्त्वाच्या मोहिमेच्या घटनांचा समकालीन वृत्तांत वाचायला मिळतो.
याशिवाय अनेक अप्रकाशित डच पत्रांचासुद्धा समावेश या पुस्तकात केला आहे.
आज मराठय़ांच्या इतिहास संशोधनाला सुरुवात होऊन एक शतकाहून अधिक काळ
लोटला आहे. इतिहासाचार्य राजवाडे, का.ना. साने, मेहेंदळे, परांजपे आदी
मंडळीनीं मराठय़ांच्या इतिहासाशी निगडित कागदपत्रे शोधून त्यांची चिकित्सा
केली. पुढे ग.ह. खरे, द.वा. पोतदार, आप्पासाहेब पवार आदी मंडळींनी तो
वारसा पुढे चालवला. सध्याच्या काळात गजानन मेहेंदळे, डॉ. उदय कुलकर्णी
यांसारखे इतिहासकार अविरतपणे इतिहासाचे कार्य पुढे नेत आहेत, ‘जिथे पुरावा
नाही तिथे इतिहास नाही’ हे ब्रीद आम्हाला शिकवणारे, अवघ्या महाराष्ट्राला
आपल्या वाणीने समृद्ध करणारे इतिहास तज्ञ निनाद बेडेकर यांना हा ग्रंथ मी
अर्पण केला आहे. या पुस्तकामागची प्रेरणाही तेच आहेत. ‘फॉरेन बायोग्राफीज
ऑफ राजा शिवछत्रपती’ हा अस्सल साधन ग्रंथ असल्याने येणाऱ्या पिढय़ांना,
इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांना हा ग्रंथ नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
pawarrohit14@gmail.com
(लेखक इतिहास संशोधक आहेत.)
संस्कृती-बिंस्कृती – बाजबहादूर-रूपमती आणि लव्ह जिहाद
सामना ऑनलाईन
6–8 minutes
>> मुकुंद कुळे
माळव्याचा सुलतान बाजबहादूर आणि त्याची राणी रूपमती यांचं प्रेम
माळव्याच्या भूमीतील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमकथा. आजही त्यांच्या प्रेमाची
कथा रंगवून सांगितली जाते. मात्र रूपमती हिंदू होती आणि बाजबहादूर मुस्लिम
होता हे माळव्याच्या लोकमानसाच्या कधी ध्यानीमनीही आलं नाही. आता मात्र
मांडूच्या त्या भूमीतील बाजबहादूरच्या महालाबाहेरील संगमरवरी पाटीवर
दोघांची नावं खरवडून काढत तिथे आताच्या आधुनिक काळातील `लव्ह जिहाद’चा
पुकार केला जात आहे. `लव्ह जिहाद’ची रट लावून बसलेल्या सध्याच्या तथाकथित
धर्ममार्तंडांच्या तावडीतून पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या इतिहासकालीन
व्यक्तीही सुटत नाहीत.
माळव्याचा सुलतान बाजबहादूर आणि त्याची राणी रूपमती. अगदी अभिन्न जीव.
जखम एकाला झाली, तर इलाज दुसऱ्यावर करावा लागावा, इतकं एकरूपत्व. इतकं
एकमेकांत मिसळून जाणं. म्हणायला दोन शरीर, पण त्यातलं प्राणतत्त्व एकच जणू!
… म्हणून तर माळव्याच्या संपन्न भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच त्या
दोघांच्या प्रेमाच्या अलवार कथा कुठून कुठून कानांभोवती आंदोलत राहतात. जणू
त्यांची प्रेमकथा म्हणजे माळव्याच्या भूमीत उमललेलं एक प्रणयफूल.
मध्ययुगात सोळाव्या शतकात आकाराला आलेली ही कथा. बाजबहादूर हा माळव्याचा
शेवटचा स्वतंत्र सुलतान, तर रूपमती एका सामान्य घरातील युवती. एकदा जंगलात
शिकारीला गेलेला असताना बाजबहादूरच्या कानावर गाण्याचे काही सुकोमल स्वर
पडले आणि शिकार सोडून तो त्या स्वरांच्या दिशेने वाहवत गेला नि जिथे
पोहोचला तिथलं दृश्य पाहून वेडावूनच गेला. त्याच्यासमोर गाणं आणि लावण्याचा
दस्तुरखुद्द मिलाफ बसलेला होता. रूपमती लाजवाब गायिका तर होतीच, वर
लावण्याखणीही होती.
बाजबहादूरला रूपमतीच्या गाण्याने वेडं केलं की सौंदर्याने ठाऊक नाही, पण
तो स्वतही गाण्यातला दर्दी होता. त्याला गाण्याचा गळा आणि कान दोन्हीही
होतं म्हणे. त्यामुळे त्याने तिथेच रूपमतीला लग्नाची मागणी घातली. शेवटी
सुलतानच तो, त्याला नाही म्हणायची प्राज्ञा ना रूपमतीची होती ना तिच्या
पालकांची. तरीही रूपमतीने त्याला ठणकावून सांगितलं म्हणतात, “मी
तुझ्याबरोबर येईन, पण माझा धर्म बदलणार नाही आणि मला आचार-विचारांचं
स्वातंत्र्यही तुला द्यावं लागेल.” बाजबहादूरने कसलेच आढेवेढे घेतले नाहीत.
त्याला तिला बंधनात ठेवायचं नव्हतंच मुळी. त्याला तिला मनमुक्त गाऊ
द्यायचं होतं आणि तिचं गाणं मनसोक्त ऐकायचं होतं. त्याने तिची अट विनापार
मान्य केली. मग तीही आली त्याच्याबरोबर विनासायास. एवढंच कशाला रूपमती
वाढली होती नर्मदेच्या काठावर. नर्मदेच्या दर्शनाशिवाय ती कधीच अन्न-पाणी
ग्रहण करत नसे. तेव्हा तिच्यासाठी त्याने आपल्या मांडवगडावर (मांडू) अगदी
उंच ठिकाणी खास वास्तूही उभारली, जी आज `रूपमती मंडप’ नावानेच ओळखली जाते.
त्या मंडपातील एका उंच मनोऱयावरून रूपमतीला आपल्या माता नर्मदेचं दर्शन
घडायचं. एवढं सगळं बाजबहादूरने केल्यावर रूपमतीही फार काळ आपल्याला रोखू
शकली नाही. तिने स्वतला केलंच त्याला समर्पित. तिनेच कशाला त्यानेही केलं
स्वतला तिला समर्पित. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन वेडे जीवच तर
होते ते दोघे. पण त्यांचं हे प्रेम चिरकाल टिकलं नाही. त्यांच्या प्रेमाचा
कळसाध्याय सुरू होण्याआधीच तत्कालीन मुघल बादशहा अकबराने माळवा प्रांत
काबीज करण्यासाठी सैन्य पाठवलं. तेव्हा मुघल सरदाराशी झालेल्या युद्धात
बाजबहादूरचा टिकाव लागला नाही. त्याला पळ काढावा लागला. मांडू किल्ला
मुघलांच्या हातात गेला. तेव्हा राणी रूपमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून
असलेला तो मुघल सरदार तिला वश करण्यासाठी लगेच तिच्या महालाकडे धावला. पण
तिथे जाऊन पाहतो तर काय, तिचं प्राणपाखरू केव्हाच उडून गेलेलं. आपल्यावरचा
बाका प्रसंग ओळखून रूपमतीने आपल्या अंगठीतला हिरा गिळला म्हणे. कारण तिला
मंजूरच नव्हतं बाजबहादूर सोडून दुसऱ्या कुणा पुरुषाची स्त्राr होणं.
रूपमतीच्या मृत्यूपश्चात तिच्या गावी सारंगपूरजवळ तिची समाधी बांधण्यात आली
आणि तिच्या मृत्यूची खबर कळताच त्या बाजबहादूरनेदेखील म्हणे त्या समाधीवरच
डोकं आपटून आपल्या आयुष्याची समाप्ती केली.
राणी रूपमती आणि बाजबहादूरच्या विफल प्रेमाच्या अशा अनेक दास्ताँ
माळव्याच्या भूमीत रुजलेल्या आहेत. लोकस्मृतींत दडलेल्या आहेत. आजही
त्यांच्या प्रेमाची कथा रंगवून रंगवून सांगितली जाते. परिसर बदलला की,
क्वचित कथेच्या आशयात थोडाबहुत फरक पडतो. पण रूपमती आणि बाजबहादूरच्या
प्रेमावर मात्र कुणीच संशय घेत नाही. किंबहुना त्यांच्या प्रेमावर संशय
घेणं म्हणजे `प्रेम’ या संकल्पनेवरच संशय घेण्यासारखं. इतकं त्या दोघांचं
प्रेम `पाक’ म्हणजे पवित्र मानलं जातं. नव्हे, त्यांचं प्रेमही आता
माळव्याच्या भूमीतील सर्वाधिक लोकप्रिय दंतकथाच बनली आहे. ते एक मिथक बनून
गेलंय.
मिथक संपूर्ण खरंही नसतं आणि पूर्णपणे खोटंही नसतं. ते कायम
खऱया-खोटय़ाच्या सीमारेषेवर आंदोलत राहतं. मिथक ज्या भूमीत जन्माला येतं,
त्या भूमीवरील लोकांच्या `भावभूमी’त ते जेवढं जपलं जातं, तेवढं ते अधिक
घट्ट, अधिक पक्क होत जातं. एकप्रकारे समाजाचं हे भावभिजलेपणच मिथकांना
जन्माला घालत असतं. राणी रूपमती आणि माळव्याचा सुलतान असलेल्या
बाजबहादूरच्या प्रेमाचं मिथक असंच जन्माला आलंय. हे दोघं इतिहासात होऊन
गेले हे खरंच आणि त्यांची प्रेमकथाही खरीच. पण त्यांच्या प्रेमकथेला साज
चढवला तो लोकमानसाने. हा साज चढवताना रूपमती हिंदू होती आणि बाजबहादूर
मुस्लिम होता हे माळव्याच्या लोकमानसाच्या कधी ध्यानीमनीही आलं नाही. कारण
प्रेमाला जाती-धर्माची बंधनं नसतातच ठाऊक. उलट माळव्याच्या भूमीत एक उत्कट
प्रेमकथा आकाराला आल्याचं समाधानच आजवर माळव्याच्या लोकमानसाने अभिमानाने
मिरवलं आहे.
… अन् तरीही अलीकडेच मांडुला फिरताना बाजबहादूरचा महाल पाहायला गेलो आणि
मनावर चरचरीत ओरखडा उमटला. बाजबहादूरच्या महालाबाहेर पुरातत्त्व
विभागाच्या वतीने महालाची माहिती देणारी संगमरवरी पाटी बसवलेली आहे. हिंदी
आणि इंग्रजीत असलेल्या त्या पाटीवर बाजबहादूरच्या महालाची माहिती देण्यात
आली आहे. साहजिकच ही माहिती देताना बाजबहादूर आणि त्याची राणी रूपमती
दोघांची नावंही तिथे ओघाने आलेली आहेत. मात्र हिंदी पाटीवरील `बाजबहादूर की
रानी रूपमती’ या ओळीतील `रानी’ हा शब्द खरवडून खरवडून खोडून टाकण्यात आला
आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी पाटीवर असलेल्या ‘his queen’ या उल्लेखातून
`his’ हा शब्द खरवडून काढून टाकण्यात आला आहे. जणू काही बाजबहादूर आणि
रूपमतीचा काही संबंधच नव्हता आणि हे का तर बाजबहादूर मुस्लिम होता आणि
रूपमती हिंदू होती म्हणून. परंतु केवळ हिंदू व मुस्लिम एवढाच इथला कळीचा
मुद्दा नाहीये, तर त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, बाजबहादूर हा
मुस्लिम होता आणि त्यातही तो पुरुष होता, तर रूपमती आधीच हिंदू नि त्यात
स्त्राr. मात्र इथे मामला इतिहासात ते कोण होते आणि काय होते हा नाही, तर
इथे संबंध आहे तो आताच्या आधुनिक काळातील `लव्ह जिहाद’चा.
आताच्या `लव्ह जिहाद’च्या नजरेतून बघितलं तर बाजबहादूर आणि रूपमतीची
प्रेमकहाणी म्हणजे जणू काही एका मुस्लिम पुरुषाने एका हिंदू स्त्राrला
पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं केलेलं धर्मांतरच. प्रत्यक्षात
बघायला गेलं तर राणी रूपमतीच्या धर्मांतराचे दाखले सापडत नाहीत. पण `लव्ह
जिहाद’ची रट लावून बसलेल्या सध्याच्या तथाकथित धर्ममार्तंडांना हे कोण
सांगणार? नुकतंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रात लव्ह
जिहाद कायदा आणण्याचा विचार करीत असल्याचं वक्तव्य केलं.
या साऱ्यांच्या नजरेतून मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्राीचा प्रत्येक
विवाह म्हणजे लव्ह जिहादच. मग यातून पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या
बाजबहादूर आणि राणी रूपमतीसारख्या इतिहासकालीन व्यक्तीही सुटत नाहीत.
संस्कृती-सोहळा – लोकदैवतांचे चैत्रोत्सव
सामना ऑनलाईन
6–8 minutes
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
संतांनी रचलेल्या वासुदेवाच्या रूपकात ‘अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ’ असा
उल्लेख आहे. या क्षेत्रपाळ देवतांच्या उपासनेतील काही अघोरी प्रथांचा
संतांनी अधिक्षेप केला आहे. त्यावर टीका केली आहे. मात्र एका बाजूला अघोरी
प्रथांचा अधिक्षेप केलेला असतानाच दुसरीकडे मात्र संतांनी क्षेत्रपाळ
देवतांची महतीही गायली आहे. इतकेच नव्हे तर त्यांची सदासर्वकाळ पूजा करावी,
असे सांगितले आहे. त्याचे कारण असे की, मराठी लोकधर्मात भक्ती संप्रदायाला
जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व क्षेत्रपाळ देवतांच्या लोकदैवत
संप्रदायाला आहे. किंबहुना पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांचे
तुष्टीकरण, त्यानंतर शेताची आणि गावाची राखण करणाऱया राखणदार क्षेत्रपाळ
देवतांची पूजा ही यातुक्रिया, विधी, कुलधर्म-कुळाचार म्हणजेच देवकार्य
यातून बांधली गेली आहे. कारण क्षेत्रपाळ देवता या सकाम भक्तीच्या देवता
असून त्यांचा कोप होऊ नये आणि त्यांचे वरदान लाभावे म्हणून त्यांची पूजा
केली जाते.
साधारणत होळीपासून पुढे अक्षय्य तृतीयेपर्यंत महाराष्ट्राच्या
कानाकोपऱयातून ग्रामोत्सव सुरू असतात. त्यामध्ये चैत्र महिन्यातील
ग्रामोत्सवांची संख्या अधिक आहे. शिव आणि शक्तीची विविध रूपे म्हणजेच या
क्षेत्रपाळ देवता. मग ती सातेरी असो, रवळनाथ असो, भैरवनाथ असो, भराडी असो
अथवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला धूमधडाक्यात भंडार म्हणजे
हळदकुंकू आणि गुलाल यांच्या उधळणीत सुरू असलेली कोल्हापूरजवळची ज्योतिबाची
यात्रा असो, फलटणची म्हसोबाची यात्रा असो, जेजुरीच्या खंडोबाची यात्रा असो,
सातारा जिह्यातील पालीमधील खंडोबाची यात्रा असो. अगदी या यात्रांमधून
पीरही सुटलेले नाहीत. यात्रा-जत्रांचा हा चैत्रोत्सव म्हणजे महाराष्ट्राचे
आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे वैभव आहे. केवळ कुळधर्म कुळाचार नव्हे,
तर या ग्रामोत्सवांमधून सगळे गाव एकत्र येते, सर्व जातीपाती एकत्र येतात.
माणूस या ग्रामोत्सवाचा अविभाज्य घटक असतो. त्यातून देवकार्यासोबत सामाजिक
सलोखा आणि ग्रामविकासाला चालना मिळते. क्षेत्रपाळ देवतांमध्ये शिवकुलातील
मुंजोबाचीदेखील गणना होते. पिंपळाखालच्या मुंजोबाची यात्रा हादेखील
ग्रामोत्सवातील विशेष असतो. पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव,
पिंपळगाव येथे अशी मुंजोबाची यात्रा मोठय़ा थाटात पार पडते. रामनवमीच्या
सुमारास एका बाजूला भक्ती संप्रदायाचा कीर्तन सप्ताह सुरू असतो, तर
दुसरीकडे मुंजोबाच्या यात्रेसारख्या क्षेत्रपाळ देवतांच्या काठय़ा नाचवल्या
जातात. मग म्हसोबाची काठीही नाचते आणि बगाडही काढले जाते.
खंडोबा यात्रेचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. ‘जेजुरी वर्णन’ या
प्रकरणात संत रामदास स्वामी यांनी खंडोबाच्या जागरणाचे चित्र रेखाटले आहे
ते असे –
रात्रभागी निवांत वेळा। ठाई ठाई गायनी कळा ।
वाटे नेणो गाती कोकिळा । दास म्हणे विवेक बळे । सकळामध्ये परि निराळे, तोचि सुख सर्वा आगळे ।।
शिवदौन केसरी यांनीदेखील जेजुरीच्या यात्रेचे वर्णन केले आहे ते असे…
‘दिवटय़ा कोटी असंख्यात। मुरळ्या वाघे नृत्य करीत।
येळकोट येळकोट अवघे म्हणत।।
अन् हात वाजंत्री यांची घाई । तुझे रे ठाई ठाई ।
किती भंडार दिशा दाही । अखंड उधळे निजरंगी ।।
चैत्र पौर्णिमेला खंडोबाची ज्या-ज्या ठिकाणी ठाणी आहेत, तेथे भव्य
यात्रा सुरू असतात. पुणे जिह्यातील जुन्नर तालुक्यातील धामणखेल, वडज ही
खंडोबाची जागृत देवस्थाने आहेत. तेथे चैत्र पौर्णिमेला यात्रा होते.
भंडार-खोबऱयाची तळी भरली जाते. त्या वेळी ‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे
चांगभले, अंबाबाईचा उदो उदो…’ अशी नामगर्जना करीत भंडारा आणि खोबरे उधळले
जाते. बैलगाडय़ांच्या शर्यती होतात. जागोजाग वाघ्या-मुरळ्यांची जागरणे
होतात. वडजच्या खंडोबाचे भक्त सीए नामदेव चव्हाण यांनी ‘खंडोबा हा शूर
सरदार कसा होता’ यावर इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिला आहे.
तमाशाची पंढरी नारायणगाव येथे मुक्ताईची भव्य यात्रा किमान चार-पाच दिवस
सुरू असते. त्यात खेडकर भाऊ बापू यांना मानवंदना देणारी मिरवणूक,
चोळी-पातळ छबिना, कळशांची मिरवणूक, रोषणाईचे दारूकाम असे वेगवेगळे
कार्यक्रम होतात, कुस्त्यांचा आखाडा होतो. महाराष्ट्रातल्या विविध
यात्रा-जत्रांमध्ये अशीच परंपरा सुरू असते. कोकणात मात्र प्रत्यक्ष
ग्रामजत्रेचा हंगाम शिमग्यापूर्वी संपलेला असतो. त्यानंतर तरंग मिरविणारी
जत्रा होत नाही, तर दशावतारी नाटके होतात. मोचेमाडकर, चेंदवणकर, कलिंगण,
गोरे पार्सेकर यांसह एकूण नऊ पारंपरिक दशावतारी मंडळे गावोगाव खेळ करत
असतात. साधारणत तुळशीच्या लग्नानंतर प्रत्येक गावातले हे दशावताराचे खेळ
सुरू असतात, असे ‘गोरे दशावतारा‘चे प्रमुख बाळकृष्ण गोरे यांनी सांगितले.
ग्रामोत्सव दोन प्रकारचे असतात – जेथे लोकदेवतेला सामिष नैवेद्य दाखविला
जातो आणि घरोघर सामिष प्रसाद शिजविला जातो ती जत्रा, असे समजण्याचा प्रघात
आहे, तर ज्यामध्ये कीर्तने होतात, भारुडे होतात, लळित होते, त्या
लोकदैवतांच्या यात्रा असतात. जत्रेत तमाशा सादर होतो. साधारणत शिमग्यानंतर
नारायणगाव आणि फलटण या ठिकाणी तमाशाच्या तंबू-राहुटय़ा पडतात आणि तिथे
गावोगावचे पुढारी तमाशा ठरविण्यासाठी आणि सुपारी देण्यासाठी येतात. रघुवीर
खेडकर, विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, मंगला बनसोडे, अंजली नाशिककर,
भिका भीमा सांगवीकर, काळू बाळू, किरण ढवळपुरीकर, विवेकानंद मांजरवाडीकर असे
सुमारे 50 च्या वर फड, तंबू, राहुटय़ा पडतात.
रात्री दहाच्या पुढे तमाशा उभा राहतो. ढोलकी-हलगीची सलामी, त्यानंतर गण,
गणानंतर मुजरा, मुजऱयानंतर गवळण, त्यानंतर रंगबाजी आणि शेवटी वग असे या
तमाशाचे सूत्र असते. पहाटेपर्यंत तमाशा चालतो आणि त्यानंतर लगेच सकाळी
दहाच्या पुढे एखाद्या पारावर तमाशा कलावंतांची हजेरी सुरू होते. हजेरीचे
स्वरूप पारंपरिक तमाशाचे असते. मात्र रात्रीच्या तमाशात रंगबाजीमध्ये
चित्रपटातील गाणी आणि त्यावरील नृत्य होते. पूर्वीच्या काळी भागवत
संप्रदायाचा प्रभाव असणाऱया गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू असायचे.
रामनवमीच्या उत्सवात अथवा हनुमान जयंतीच्या उत्सवात होणाऱया या
कीर्तन-सप्ताहांची सुरुवात गुढीपाडव्याला होत असे आणि काल्याच्या
कीर्तनाच्या दिवशी रात्री लळिताचा कार्यक्रम सादर होत असे. लळित म्हणजे
पुरातन काळाचे नाटक. भागवत संप्रदाय लळित, हरदास लळित, महानुभावांचे लळित,
असे लळिताचे अनेक प्रकार आहेत. चैत्र महिन्यात बोहाडा, चैती, आखाडी, पंचमी
असे सोंगांचे प्रकार ग्रामोत्सवात सादर होतात. दत्त जयंतीला अंबेजोगाईचे
दासोपंतांचे लळित सादर होते, तर मराठवाडय़ातील जालना जिह्यातील अंबड येथे
रामानंदांचे लळित सादर होते. या लळितात भालदार-चोपदार, वासुदेव,
काशी-कापडी, वाघ्या, भुत्या सौरी, मुंडा अशी सोंगे रात्रभर सुरू असतात, तर
बोहाडय़ामध्ये गणपती, रिद्धी-सिद्धी, त्राटिका, राम-लक्ष्मण, भैरवनाथ, रावण,
खंडेराय अशी सोंगे रात्रभर सुरू असतात. पालघर जिह्यातील मोखाडा येथे
बोहाडय़ाची मोठी परंपरा आहे.
एकूणच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये लोकदैवतांना अनन्यसाधारण
महत्त्व आहे. त्यांचे उत्सव शिमग्यापासून थेट पुढे अक्षय्य तृतीयेपर्यंत
सुरू असतात, पण खास काळ म्हणजे चैत्र महिना. या महिन्यात झाडांना जशी
हिरवीगार चैत्रपालवी फुटावी, तसे हे ग्रामोत्सव सुरू असतात आणि असे हे
ग्रामोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आनंदनिधान!
जर तुम्ही शहराच्या गजबजाटापासून दूर शांत आणि नैसर्गिक ठिकाण शोधत असाल, तर छत्तीसगडमधील सरोदा दादर गाव तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. हे गाव त्याच्या अद्भुत नैसर्गिक सौंदर्याने, शांत वातावरणाने आणि हिरवळीने मन मोहून टाकते. येथील वातावरण इतके शांत आहे की एकदा इथे येऊन निघून जावेसे वाटणार नाही. इथे आल्यावर तुम्हाला काळाची गती थांबल्यासारखे वाटेल आणि तुम्ही निसर्गाच्या कुशीत शांतपणे झोपू शकाल.
तुम्हीही रोजच्या धावपळीला कंटाळला आहात आणि अशा ठिकाणी जाऊ इच्छिता जिथे फक्त शांतता आहे? अशी जागा जिथे हिरवळ तुमचे स्वागत करते, जिथे हवेचा प्रत्येक श्वास तुम्हाला ताजेतवाने वाटतो आणि जिथे शांत वातावरण तुमच्या आत्म्याला शांती देते? सरोधा-दादर गाव घनदाट जंगलांनी आणि सर्व बाजूंनी हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले आहे. येथील थंड आणि शुद्ध हवा मनाला ताजेतवाने करते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाहत्या पाण्याचा आवाज या जागेला आणखी सुंदर बनवतो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इथे आल्यावर तुम्हाला एखाद्या परीकथेत आल्यासारखे वाटेल. शहराच्या गजबजाटापासून दूर शांततेची भावनाआजच्या धावपळीच्या जीवनात, प्रत्येकजण स्वतःसोबत काही क्षण घालवण्यासाठी शांत जागा शोधत असतो. सरोधा-दादर गाव हे असेच एक ठिकाण आहे जिथे मोबाईल नेटवर्क देखील कमकुवत आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय निसर्गाच्या जवळ असल्याचे अनुभवू शकता.
हे गाव केवळ सुंदरच नाही तर साहस आणि प्रवासासाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही आजूबाजूच्या जंगलात ट्रेक करू शकता, धबधब्यांचा आनंद घेऊ शकता आणि स्थानिक ग्रामस्थांना भेटून त्यांची संस्कृती समजून घेऊ शकता. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर येथील सौंदर्य तुमच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे असेल.
स्थानिक संस्कृती आणि अन्नाचा आस्वाद घ्या
सरोधा-दादर गावात राहणारे लोक खूप मैत्रीपूर्ण आणि पाहुणचार करणारे आहेत. येथील स्थानिक पदार्थ, विशेषतः महुआ आणि भातापासून बनवलेले पदार्थ, तुमच्या चवीला एक नवीन अनुभव देतील.गावातील साधेपणा आणि स्थानिक परंपरा तुम्हाला एका वेगळ्याच जगाचा अनुभव देतील.
सरोधा-दादर गावात कसे पोहोचाल?
हे सुंदर गाव छत्तीसगडच्या कबीरधाममध्ये आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्ही रायपूरहून बस, टॅक्सी किंवा तुमच्या वैयक्तिक वाहनाने येऊ शकता. रायपूरपासून या गावापर्यंत सुमारे १५० किमी अंतर आहे, जे तुम्ही रस्त्याने जाऊ शकता. जर तुम्हाला ट्रेनने यायचे असेल तर रायपूर रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे प्रमुख स्टेशन आहे जिथून तुम्ही बस किंवा टॅक्सीने गावात पोहोचू शकता. तुम्हाला सांगतो की, या गावाला २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट गावाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.
सरोधा-दादरला का यावे?
जर तुम्हाला शहराच्या धावपळीचा कंटाळा आला असेल आणि शांततेत काही वेळ घालवायचा असेल, तर सरोधा-दादर गाव तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असू शकते. येथे येऊन तुम्हाला निसर्गाचे सर्वात सुंदर आणि शांत क्षण घालवण्याची संधी मिळेल.
पाऊलखुणा – घोटणचा मल्लिकार्जुन
सामना ऑनलाईन
~4 minutes
>> आशुतोष बापट
यादवकालीन स्थापत्याचे दर्शन घडविणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण
रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर,
शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच
त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम
बघावे असे आहे.
प्राचीन ऐतिहासिक अवशेष आणि धार्मिक स्थळांनी नटलेला नगर जिल्हा हा
इतिहास संशोधनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. छत्रपती
संभाजीनगर आणि बीड या मराठवाडय़ातील जिह्यांच्या हातात हात मिसळून असलेल्या
नगर जिह्यावर बऱयाच ठिकाणी मराठवाडय़ाचा प्रभावसुद्धा जाणवतो. नगर जिह्याचा
शेवगाव तालुका हा तर प्राचीन पैठणला खेटूनच वसलेला आहे. सातवाहनांची
राजधानी असलेल्या पैठणच्या परिसरात आजही तत्कालीन राजवटीचे अवशेष सापडतात.
पुढे इ.स.च्या 10 ते 14 व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या
खाणाखुणा आजही या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. अशाच यादवकालीन स्थापत्याचे
दर्शन घडविणारे सुंदर ठिकाण शेवगाव-पैठण रस्त्यावर उभे आहे. ते म्हणजे घोटण
इथले मल्लिकार्जुन देवालय. रम्य परिसर, शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे
स्थापत्य असलेले मंदिर आणि अर्थातच त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सुंदर
आख्यायिका यामुळे हे मंदिर मुद्दाम बघावे असे आहे.
‘घोटण’ नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट
महाभारतापर्यंत जाते. कौरव आणि जरासंधाने विराट राजाच्या गायी पळवल्या.
त्या गायी भयभीत होऊन दंडकारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी
त्यांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे या ठिकाणाला ‘गो-ठाण’ असे नाव
मिळाले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘घोटण’ असा झाला. मल्लिक ऋषींच्या
आज्ञेवरून अर्जुनाने इथे तपश्चर्या केली. त्यामुळे इथला देव झाला
‘मल्लिकार्जुन’. यादवकालीन स्थापत्याच्या खुणा सांगणारे सुंदर असे देवालय
इथे आहे. चारही बाजूंनी तटबंदी असलेले हे पश्चिमाभिमुख मंदिर मुख्य
रस्त्यावर वसलेले आहे. मंदिर प्राकारात विटांनी बांधलेल्या तीन दीपमाळा
नजरेस पडतात. मंदिराच्या सभामंडपात 16 खांब असून ते सगळे विविध शिल्पांनी
मढवलेले आहेत. त्यात युद्धाचे प्रसंग, मल्लयुद्ध तसेच काही मिथुन शिल्पे
कोरलेली दिसतात. मंदिराचा खांब आणि त्यावर असलेली तुळई जिथे मिळतात तिथे
आधारासाठी ब्रॅकेटस असतात. त्यावर कधी दोन, तर कधी खांबाच्या चारही बाजूंनी
यक्षाची मूर्ती कोरलेली असते. मल्लिकार्जुन मंदिरात 16 पैकी मधील चार
खांबांवर चक्क पाच यक्ष कोरलेले आहेत.
असेच अजून एक स्थापत्यनवल पुढे बघायला मिळते ते म्हणजे इथे असलेला
गाभारा. साधारणत शिवमंदिराचा गाभारा हा तीन-चार फूट खोल असून त्यात
शिवपिंडी असते. इथे चक्क 15 फूट खोल गाभारा असून तो दोन टप्प्यांत विभागाला
आहे. पाच पायऱया उतरून गेलो की, आपण एका टप्प्यावर येतो. इथे परत दोन
बाजूला सपाट जागा असून एका बाजूला दरवाजा, तर दुसरीकडे झरोका आहे. इथे
पुन्हा चार खांब असून त्यावर विविध शिल्पे कोरलेली आहेत. इथून अजून दहा
पायऱया उतरून खाली गेलो की, मग शिवपिंडी दिसते. मुख्य गाभाऱयाच्या
दरवाजाच्या खाली दोन्ही बाजूंना पाठीवर मुंगुसाची पिशवी घेतलेल्या
कुबेराच्या सुरेख मूर्ती असून दरवाजा हा अत्यंत देखण्या अशा द्वारशाखांनी
सजवलेला आहे. इथले अजून वेगळेपण म्हणजे दरवाजाच्या डोक्यावर मधोमध असलेले
ललाटबिंब. इथे शक्यतो गणपती अथवा शंकराची प्रतिमा बघायला मिळते, पण
घोटणच्या या मंदिरावर हातात धनुष्य घेतलेल्या शिवाची मूर्ती आहे. देवाच्या
गुरवपदाचा मान अनेक पिढय़ांपासून शिंदे घराण्याकडे चालत आलेला आहे.
त्यांचाकडे काही सनदा बघायला मिळतात. शिक्षणाने अभियंता असलेले दिलीप केशव
शिंदे सध्या देवाचे गुरव आहेत.
याच गावात सध्या बरीचशी बुजलेली सासू-सुनेची बारव आणि प्राचीन जटाशंकर
मंदिर बघता येतात. पैठणपासून जेमतेम 15 किमीवर असणारे हे मल्लिकार्जुन
मंदिर मुद्दाम वाट वाकडी करून जावे आणि आगळेवेगळे स्थापत्य आवर्जून पाहावे
असे आहे.
ashutosh.treks@gmail.com
*उगवतीचे रंग*
सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन
तेरा आणि चौदा ऑगस्ट हे ( २०२४ ) दोन दिवस अत्यंत संस्मरणीय असे ठरले. सांगलीला काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. या दोन दिवसात सहकुटुंब देवदर्शनाचा लाभ घेता आला आणि खरोखरोच खूप प्रसन्न वाटले. या दोन दिवसात सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिर, नरसोबा वाडी, जयसिंगपूर येथील सिद्धिविनायकाचे मंदिर आणि चाफळ येथील श्री राम मंदिर यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. पण आज मी प्रामुख्याने बोलणार आहे ते जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल.
जयसिंगपूर येथील माझे मित्र श्री मदन बुरांडे मला अनेक दिवसांपासून घरी या म्हणून बोलावत होते. १४ ऑगस्टला तो योग अचानक आला. सांगलीपासून अवघ्या ११ किमी वर जयसिंगपूर आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजे जयसिंग यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे गाव आहे. कोल्हापूरपासून जयसिंगपूर अवघ्या ३८ किमी अंतरावर आहे. शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते. हे शहर तंबाखू, गूळ, मिरची आदींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. दूध, दुधाचे पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात. फळे, भाजीपाला यांचीही चांगली आवक आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर राज्याशी आणि देशाशी एस टी आणि रेल्वे सेवेने जोडले गेले आहे. विविध प्रकारचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शैक्षणिक संस्था या शहरात आहेत.
मदनजी यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला होता. मी, सौ. श्रद्धा आणि माझी कन्या चि. सौ सारिका असे आम्ही तिघेजण सकाळी लवकरच जयसिंगपूरला पोहोचलो. श्री मदनजी आणि सौ वहिनी आमची वाटच पाहत होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघांनी आमचे मनापासून स्वागत आणि उत्तम असे आदरातिथ्य केले. नंतर श्री मदनजी म्हणाले ' इथून जवळच सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही ते पाहिल्याशिवाय जाऊ नका. ' त्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्यासोबत ते स्वतः मंदिर दाखवण्यासाठी आले. त्यांच्या घरापासून साधारण एक दीड किमी अंतरावर मौजे आगर, जयसिंगपूर येथे हे मंदिर आहे.
दुरूनच हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. सिद्धिविनायक ट्रस्टने या मंदिराची निर्मिती केली आहे. दुरून ऑक्टोपसच्या आकाराचे दिसणारे पण कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेलं हे मंदिर खरोखरच आगळंवेगळं आहे. अशा प्रकारचं मंदिर महाराष्ट्रात तरी माझ्या पाहण्यात नाही. या मंदिराच्या बांधणीतील कल्पकता आणि बांधकामातील कौशल्य अप्रतिम आहे. आज कोणतीही वास्तू बांधताना साधारणपणे लोखंड आणि सिमेंट यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याशिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होत नाही. पण हे मंदिर मात्र सिमेंट आणि स्टील यांच्या वापरापासून मुक्त आहे. दगड, विटा आणि चुना या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आहे. पण हे मंदिर एवढे सुंदर, कलात्मक आणि भक्कम आहे की त्याच्या बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा वापर केलेला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या मंदिराच्या निर्मितीत वापरली गेलेली वीट आपण वापरतो तशा सर्वसाधारण प्रकारची नाही. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून ही मशीन कट वीट खास बनवून घेण्यात आली आहे. या विटेच्या वापरामुळे तसेच विशिष्ट प्रकारचा चुना आणि दगड यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर किमान पाचशे वर्षे टिकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
मंदिराच्या भोवताली रमणीय बाग आणि लॉन आहे. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी मंदिरावर रोषणाई केली जाते, त्यावेळी तर मंदिर फारच नयनरम्य दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सजवलेल्या एका भव्य अशा गजराजाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्या हातात मोदक आहे. आपल्या मनातील इच्छा या मूषकाच्या उजव्या कानात सांगायची. ती इच्छा पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही पूजाविधीची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेशिवाय होत नाही. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी असून विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्व दिशा मोकळ्या होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो असे आपण मानतो. या आपल्या श्रद्धेला अनुसरूनच या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात अष्ट दिशांना प्रत्येकी एक अशा अष्टविनायकांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर कमानी आहेत. त्या कमानींमध्ये असलेल्या आठ स्तंभांवर अष्टविनायक विराजमान झाले आहेत. या कमानी अत्यंत देखण्या आहेत. बाहेरच्या बाजूने लांबून या कमानींकडे पाहिले तर हत्तीच्या सोंडेचा भास होतो. मंदिराला प्रदक्षिणा करताना अनायासेच आपलं अष्टविनायकांचंही दर्शन पूर्ण होतं.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अष्टविनायकाच्या मूर्तीपुढे बाहेरच्या बाजूस हातात मोदक घेतलेला मूषक आहेच.
जेवढे मंदिराचे बाह्य स्वरूप देखणे आहे, तेवढेच अंतरंग देखील ! मंदिराच्या २१ पायऱ्या चढून आपण आत गेलो की दृष्टीस पडते ती श्रींची एक अतिशय सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती. ही मूर्ती पाहताच शांत, प्रसन्न वाटते. कमलदलात स्थानापन्न झालेली सुमारे ३० इंच उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती पाहताच आपण नतमस्तक होतो आणि हात आपोआप जोडले जातात. ही श्रींची मूर्ती पृथ्वीवर स्थानापन्न असून वरच्या बाजूला आकाशाचे प्रतीक म्हणून निळा रंग देण्यात आला आहे. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवघ्या विश्वात ईश्वर व्याप्त आहे हेच जणू ही रचना आणि रंगसंगती सूचित करते. त्याचप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि मोक्ष या संकल्पना देखील त्यातून सूचित होतात. मूर्तीच्या पाठीमागे १०८ टोकांची प्रभावळ सोनेरी रंगात असून त्यातील मधल्या बाजूस श्रीगणेशाचा आवडता लाल रंग देण्यात आला आहे. २८ डिसेंबर २०१२ या दिवसाच्या शुभमुहूर्तावर संत प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज ( आचार्य श्री किशोरजी व्यास ) यांच्या शुभहस्ते श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात. प्रवेशद्वारावर असलेली भव्य दगडी कमान जणू त्या सूर्यकिरणांचे स्वागत करण्यासाठीच उभी आहे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश पुराणातील आणि श्री गणेशाच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत.
या मंदिराचा आणखी एक विशेष असा आहे की नऊ या अंकाशी या मंदिराचे विलक्षण साधर्म्य आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली. ज्या दिवशी हे काम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस होता २८/१२/२०१२. या तारखेतील सर्व अंकांची बेरीज केली असता ती सुद्धा नऊ येते हा विलक्षण योगायोग आहे. मंदिरातील मूर्तीचे वजन १०८ किलो आहे. मूर्तीभोवती १०८ टोकांची प्रभावळ आहे. मंदिरातील घंटेचे वजन १०८ किलो आहे. १०८ या संख्येतील अंकांची बेरीज ९ येते. श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे मिळून नऊ श्रींच्या मूर्तींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मूषकही नऊच आहेत.
नऊ या अंकाचं एवढं विलक्षण महत्व काय असावं असं वाटून मी त्यासंबंधीची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मोठी मनोरंजक माहिती हाती आली. जशी रेडिओ लहरींची ( तरंगांची ) फ्रिक्वेन्सी असते, जिला आपण ' हर्ट्झ ' या एककात मोजतो, तशीच प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी असते असे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेनुसार चार उच्च कंपन तरंग आणि चार निम्न कंपन तरंग असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्वशक्तीचेही स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात आणि नऊ हा अंक विश्वशक्तीचा विशिष्ट कंपन तरंग अंक आहे असे मानले जाते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्वशक्तीच्या संपर्कात येणे आवश्यक असते. हे जेव्हा घडते, तेव्हा विश्वशक्ती त्याच्या जीवनात यायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.
विश्वातील प्रत्येक आकार नऊने बनलेला आहे. चक्र किंवा वर्तुळ ३६० अंशांचे असते. यातील अंकांची बेरीज ९ येते. तसेच एक तास म्हणजे ३६०० सेकंद. चौरस किंवा आयताकृतीतील कोनांची बेरीज ३६० येते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० असते. पंचकोनातील एकूण कोनांची बेरीज ५४० येते. षटकोनांच्या कोनांची बेरीज ७२० येते. यातील कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज केली असता ती नऊ येते. आईच्या पोटात नऊ महिने राहिल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे नवग्रह, नवरत्ने, नवरात्री या सगळ्या गोष्टीत नऊचे महत्व आहे. यावरून हा निष्कर्ष काढता येतो की हे मंदिर नऊ या अंकाने वेगवेगळ्या प्रकारे विश्वशक्तीशी जोडले गेले आहे. आपणही या मंदिरात या विश्वशक्तीशी जोडले जातो. श्री गणेश ही बुद्धीची, विद्येची देवता आहेच. तो विघ्नहर्ताही आहे. अशा या सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन आम्हाला घेता आले याचा आनंद झाला. नरसोबा वाडी किंवा कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ असल्याने भाविकांनी एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्यावी.
निसर्गाच्या कोंदणात वसलेला हिरा असावा असे धाऊलवल्ली. या गावावर असलेला
श्री विश्वेश्वराचा वरदहस्त आणि निसर्गाची उधळण इथे भ्रमंती करताना पदोपदी
जाणवत राहते.
कोकणात वर्षभरात कधीही, कुठेही गेले तरी हिरव्या रंगामुळे आपले डोळे
निवतात. त्यातून असे पावसाळ्याच्या मध्येच गेल्यावर तर काय निसर्गाची अफाट
उधळण अनुभवता येते. राजापूर तालुक्यातले अगदी नेमके कोंदणात बसवलेले गाव
आहे धाऊलवल्ली. दोन डोंगरांच्या मध्ये, नदीच्या बाजूने वसलेले अतिशय शांत
असे हे गाव. आंबे, माड, पोफळी आणि असंख्य फुलांनी सजलेले हे गाव. निवांत
गाव आणि गावात वसलेली जुनी देवळे-रावळे. त्यातलंच एक प्राचीन शिवालय
‘विश्वेश्वर’ महादेव.
गावाच्या किंचित एका बाजूला असलेले हे शिवालय. इथे जायला फारच सुरेख अशी
पाखाडी उतरून जावे लागते. या पाखाडीच्या आजूबाजूला उंचच उंच वृक्ष आहेत.
पाखाडी नदीपर्यंत उतरते, पण मध्येच देवळात जायला चिरेबंदी वाट आहे.
विश्वेश्वराचे देऊळ फारच जुने. जवळ जवळ 250 वर्षे होऊन गेलेली. आवार सगळा
चिऱयाच्या दगडांनी व्याप्त. देवळासमोर 5-6 दीपमाळा. त्याही खास कोकणातल्या
चिऱयाच्या बनवलेल्या.
इकडे काही कुटुंबे आपली एक दीपमाळ देवळात उभारतात. त्रिपुरी पौर्णिमेला
त्या कुटुंबाकडून ती दीपमाळ दिवे लावून सजवली जाते. कोकणात याला ‘टिपर
पाजळणे’ असं म्हणतात. दीपमालेच्या समोर आता जीर्णोद्धार झालेले देऊळ. आतून
फरशा बसवलेल्या असल्या तरी सभामंडपाचे खांब अजूनही पूर्वीचेच, पण
जीर्णोद्धारामुळे काहीसा चकचकीतपणा आलेला. आतल्या मंडपात देखणा नंदी.
गाभाऱयाच्या बाहेरच्या बाजूला गणपतीचे सुंदर आणि जुने शिल्प व गाभाऱयात
श्री विश्वेश्वर महादेवाची पिंड. सगळा आसमंत कमालीचा शांत. या
जीर्णोद्धारातसुद्धा काही जुन्या कमानी, त्यावर असलेली गणेशपट्टी तशीच
शाबूत असून ती इथेच व्यवस्थित ठेवलेली. या लाकडी खांबावर खालच्या एका
बाजूला व्याल प्रतिमा कोरलेली आहे. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. एका
प्राण्याचे डोके आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी ही रचना. इथल्या खांबावर
मकरव्याल आहे. म्हणजे तोंड मगरीचे आणि उरलेले शरीर सिंहाचे. त्याच
कमानीच्या दुसऱया खांबावर खाली गंडभेरुंड हा पण काल्पनिक पक्षी कोरलेला
आहे. अतिशय दुर्मिळ अशी ही कलाकृती. या पक्ष्याला एका धडाला दोन तोंडे
असतात. इथे त्याच्या दोन तोंडात एकेक हत्ती दाखवला असून त्याने आपल्या
पायात पण एकेक हत्ती धरलेला आहे. आपल्या सत्ता-सामर्थ्याचे प्रतीक म्हणून
हा पक्षी दाखवतात. कर्नाटक राज्याचे हे राजचिन्ह आहे. खूप दुर्मिळ अशा या
कलाकृती इथल्या लाकडी खांबांवर कोरलेल्या असून महत्त्वाचे म्हणजे
जीर्णोद्धारातसुद्धा हे खांब जपून ठेवलेले आहेत. विश्वेश्वराचे हे मंदिर शके 1663 (सन 1741) मध्ये गोखले, जोग व काळे या
मानकऱयांनी बांधले. दाते, परांजपे, बापट, बोडस, वेलणकर, गोरे, काळे ही
येथील घराणी. जोग यांनी येथे वासुदेवाचे देऊळ बांधले. विश्वेश्वर मंदिरातील एका तुळईवर एक लेख कोरलेला आहे. त्यावरून शके 1651
(सन 1729) मध्ये हे मंदिर बांधले असावे व त्यानंतर शके 1762 (सन 1842) मधे
जीर्णोद्धार करून सभामंडप बांधला असे समजते. धाऊलवल्ली आणि देवाचे गोठणे
यांच्या दरम्यान एक ओझरचा वहाळ आहे. त्या लगत धाऊलवल्लीचे हद्दीतील वाडीस
मारवेल असे म्हणतात व गोठण्याचे हद्दीतील वाडीस करवलें म्हणतात. कोकणातल्या गावावर निसर्गाचा वरदहस्त असतोच, पण त्यासोबत अनेक दंतकथा,
लोककथा इथल्या ठिकाणांशी निगडीत असतात. अशा कथा या स्थानांच्या सौंदर्यात
अजून भर घालतात.
ashutosh.treks@gmail.com
बॅग पॅकर्स – सुपिन व्हॅलीतील रिज वॉक ट्रेक
सामना ऑनलाईन
4–5 minutes
>> चैताली कानिटकर
फुलांची उधळण असलेल्या प्रदेशातील ही भटकंती. उंच टेकडय़ांवरून हिरव्यागार कुरणातून आणि फुलांच्या
प्रदेशातून असलेला हा ट्रेक. डेहराडून ते सांक्री आणि तिथून पुन्हा
डेहराडून असा हा उत्तराखंडमधील सुपिन व्हॅली परिसरातील ट्रेक वेगळा आनंद
देतो.
उत्तराखंडमधील सुपिन व्हॅली परिसरात करता येण्यासारखा एक अद्वितीय आणि
तुलनेने नवाच ट्रेक आहे फुलारा रिज ट्रेक. बहुतांश ट्रेक्स
दऱया-डोंगरांमधून जातात, पण फुलारा हा भारतातील काही “ridge trek“ पैकी एक-
म्हणजे उंच टेकडीवरील (ridge line) असा हा ट्रेक आहे.
फुलारा या शब्दाचा अर्थच फुलांनी फुललेला किंवा ‘फुलांची उधळण झालेला
प्रदेश’ असा घेतला जातो. स्थानिक गढवाली लोककथांनुसार, या परिसरात एकदा
देवीने आपल्या चरणस्पर्शाने पर्वतांवर फुलांचा वर्षाव केला आणि त्या
ठिकाणाला ‘फुलारा’ (फुलांनी भरलेला) असे नाव पडले. असंही म्हणतात की, वसंत
ऋतू येताच संपूर्ण पर्वतपट्टा देवीच्या आशीर्वादाने फुलतो आणि म्हणून आजही
ते ‘फुलारा’ नावाने ओळखले जाते.
सोपा ते मध्यम प्रकारात मोडणारा हा ट्रेक सहा दिवसांचा असून उंची 12150
फूट आहे. ट्रेकचा प्रवास डेहराडून पासून सुरू होतो. इथपर्यंत रेल्वेने अगर
विमानाने थेट पोहचता येते. पहिल्या दिवशी डेहराडून ते सांक्री असा जवळपास
आठ-नऊ तासांचा प्रवास करत आपण सांक्री या गावात बेस कॅम्पला पोहचतो. हे गाव
हर की दून, केदार कंठ, बाली पास अशा अनेक ट्रेकचे बेस कॅम्प असणारे गाव
आहे. टुमदार, लहान असे हे गाव निसर्गरम्य आहे. येथे त्या दिवशी आराम करून
आपण दुसऱया दिवशी पुढच्या प्रवासासाठी फुलोरा रिज ट्रेकसाठी तयार होतो.
सांक्री ते सिकोल्टा हे साधारण सात किलोमीटरचे अंतर पार करायला आपल्याला
पाच ते सहा तास लागतात. हा टप्पा शांत पाईनच्या जंगलातून जातो. पक्षी
निरीक्षणासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या शंकूच्या आकाराच्या
झाडांमध्ये हिमालयीन पक्ष्यांच्या ट्रीपीज, ड्रोंगो, बार्बेट, वुडपेकर अशा
जाती दिसू शकतात. एका मोकळ्या जागेत पोहचेपर्यंत पुढे चालत राहिल्यावर
सिकोल्टा कॅम्पसाईट आहे. येथे काही तुटलेल्या गुज्जर झोपडय़ा दिसतात. इथे
रात्री मुक्काम करून पुढील प्रवासासाठी निघता येते.
तिसऱया दिवशीचा पुढचा प्रवास म्हणजे सिकोल्टा येथून भोजगडी कॅम्पसाईटवर
करायची चढण आहे. सुरुवातीची चढाई सुमारे 30 मिनिटे घनदाट जंगलातून
चालण्याने सुरू होते. ही चढण आपल्याला जंगल ओलांडून एका पाण्याच्या
स्रोतावर पोहोचवते. रोडोडेंड्रॉन आणि भोज वृक्षांनी ही वाट अत्यंत नयनरम्य
दिसते. इथून धुंडा टॉप, केदारकंठ शिखर स्पष्टपणे दिसतात.
गवताळ प्रदेशाच्या आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या पांढऱया कॅनव्हासच्या
पार्श्वभूमीवर, हे शटरबग्ससाठी त्यांचे कॅमेरे क्लिक करण्यासाठी अर्थात
लॅण्डस्केपचे सौंदर्य टिपण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. कॅम्पसाईटभोवती
फिरून किंवा बसून आराम निसर्गाची शांतता ही रात्र हळूवार निघून जाते. चौथा
दिवस भोजगडी – फुलारा कडय़ामार्गे पुष्टारा असा आहे. सूर्योदयाच्या मनमोहक
दृश्याने दिवसाचे स्वागत होते आणि फुलारा रिज ओलांडून पुष्तारा कुरणांकडे
ट्रेक होतो. हा ट्रेक अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे आणि ट्रेकमधील सर्वात
निसर्गरम्य दिवस व अवघडदेखील आहे.
पुष्तारा मेडोज कडय़ावर चढल्यानंतर इथे कुरणावर चालण्याचा वेगळा आनंद
आपल्याला मिळतो. हिरव्यागार पोशाखात आणि विविध हिमालयीन वन्यफुलांनी
भरलेल्या कुरणांच्या सौंदर्याने आपण थक्क होतो. ज्यामध्ये प्रसिद्ध
ब्रह्मकमळ आणि फंकमल यांचा समावेश आहे. येथे उत्तराखंडचा राज्य पक्षी
चमकदार रंगीत मोनल तीतर, दुर्मिळ हिमालयीन पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला
मिळतात. रात्रीच्या मुक्कामासाठी पुष्तारा मेडोज हा चांगला कॅम्पिंग बेस
आहे. फक्त या मार्गावर पाण्याचे कोणतेही स्रोत नाहीत. म्हणून भोज गाडी
कॅम्पसाईटवरून किमान दोन लिटर पाणी सोबत घेऊनच निघावे.
ट्रेकचा पाचवा दिवस पुष्तारा – तालुका – सांक्री असा आहे. पुष्ताराच्या
कुरणातून सलग 30 मिनिटे उतरण आहे. ही उतरण संपल्यावर तालुक्याच्या ठिकाणी
पोहचता येते. इथे सुंदर गढवाली वस्ती पाहता येते. तसेच हर की दून ट्रेकची
एक कॅम्पसाईट व सांक्रीमधील स्थानिक वस्ती पाहायला मिळते. त्या दिवशी ट्रेक
पूर्ण केल्याचे समाधान चेहऱयावर स्पष्टपणे दिसते. दुसऱया दिवशी सांक्री ते
डेहराडून प्रवास करून ट्रेक पूर्ण होतो आणि प्रत्येकजण रिज ट्रेकच्या
आठवणी मनात साठवून घरी परततो.
chaitalikanitkar1230@gmail.com
सफर श्री विजयपुरमची
Tarun Bharat Portal
7–9 minutes
अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट
ब्लेअरचे नामकरण श्री विजयपुरम असे करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह यांनी नुकतीच केली. पोर्ट ब्लेअरला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास
आहे. सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर शहरातील अटलांटा पॉईंटवर वसलेले आहे.
काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी ओळखले जाणारे हे सेल्युलर जेल आज पर्यटनस्थळ
बनले आहे. याशिवाय येथील अनेक पर्यटनस्थळे देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ
घालत आहेत.
पूर्वीचे पोर्ट ब्लेअर आणि आताचे श्री विजयपुरम हे निसर्ग सौंदर्यासाठी जगभर
प्रसिद्ध आहे. जगातील सर्वाधिक सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून पोर्ट
ब्लेअरचे नाव घेतले जाते. हिंदी महासागराच्या उत्तर पूर्व भागात स्थित
अंदमान निकोबार द्वीप समूहामध्ये पोर्ट ब्लेअर आहे. सध्या या प्रदेशाला
केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे. आता पोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजयपुरम
होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्ध्यांना सेल्युलर जेलमध्ये
पाठविले जात असे. पारतंत्र्याच्या काळातील गुलामीचे प्रतीक असणाऱ्या
स्थळांची नाव बदलण्याचे केंद्र सरकारने ठरविले. त्यातून पोर्ट ब्लेअर आता
श्री विजयपुरम बनणार आहे.
या द्विपसमूहाचा इतिहास मराठी शासनकर्त्यांशी निगडित आहे. मराठी
शासनकर्त्यांनी 17 व्या शतकात येथे कब्जा केला होता. मात्र, नंतरच्या काळात
इंग्रजांच्या राजवटीत हा द्वीपसमूह त्यांच्या ताब्यात गेला. याच
द्वीपसमूहाच्या दक्षिण भागाला इंग्रजांनी पोट ब्लेअर नाव दिले. इंग्रज
राजवटीतील लेफ्टनंट आर्चिबाल्ड ब्लेअर यांच्या नावावरून 1789 मध्ये पोर्ट
ब्लेअर नाव ठेवले गेले. बंगालमध्ये सत्ता असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीने
येथे एक कॉलनी स्थापन केली. वादळात भरकटलेल्या जहाजांना निवारा देण्यासाठी
या कॉलनीची निर्मिती करण्यात आली. कालांतराने कॉलनीला उत्तर भागात शिफ्ट
करण्यात आले. येथे अॅडमिरल विलियम कार्निवलच्या नावानुसार पोर्ट
कार्निवालीस नामकरण करण्यात आले. हे दोन्ही मिळून पोर्टब्लेअर बनले. मात्र,
या शिफ्टिंगदरम्यान अनेकांचे प्राण गेले आणि इंग्रजांना 1796 मध्ये ही
प्रक्रिया थांबवावी लागली. 1857 च्या क्रांतीनंतर येथे इंग्रजांनी जेल
बनवली. सुऊवातीला येथे काहीच सुविधा नव्हत्या. मात्र, 1897 मध्ये जेलची
निर्मिती सुरू झाली. येथे सात विभागात 694 कोठड्या बनवल्या गेल्या. मात्र,
कालौघात या जेलमध्ये केवळ तीनच हिस्से बाकी आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या
दरम्यान 1942 ते 1945 पर्यंत तीन वर्षांमध्ये हा भाग जपानच्या ताब्यात
होता. त्यानंतर तो भारताच्या ताब्यात आला. सेल्युलर जेल भारतात ‘काळापाणी’
नावाने ओळखली जाते. या जेलमध्ये पाठविणाऱ्यांना जिवंत परतणे मुश्किल मानले
जात असे. उर्वरित भारताशी या जेलचा काही संपर्क नव्हता. आता भारताच्या
स्वातंत्र्यानंतर सेल्युलर जेल पाहण्यासाठी अनेक पर्यटक त्या ठिकाणी जातात.
सरकारच्यावतीने या जेलवर ‘लाईट अँड साऊंड’ शो केला जातो. या संपूर्ण
प्रदेशाचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम असून देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.
येथे जाण्यासाठी हवाई मार्ग सोपा आहे. तर जहाजमार्गे कोलकात्याहून पोर्ट
ब्लेअरला जाता येते. मात्र, त्यासाठी अधिक वेळ लागतो.
विमानतळ टर्मिनल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे गतवर्षी
उद्घाटन केले होते. नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे 710 कोटी
ऊपये खर्च आला असून दरवर्षी सुमारे 50 लाख प्रवासी वाहतुकीची याची क्षमता
आहे. सध्याच्या
टर्मिनलमध्ये 4000 पर्यटक वाहतुकीची क्षमता होती. नवीन टर्मिनलमुळे ही
संख्या 11,000 वर गेली असून आता एकाचवेळी दहा विमाने येथे उभी करता येतील.
त्यामुळे उ•ाणांची संख्या वाढणार आहे. या भागात अधिक पर्यटक दाखल होतील,
अशी अपेक्षा आहे.
पोर्ट ब्लेअरची सध्याची लोकसंख्या 1 लाख 52 हजार आहे. तेथे हिंदुंची
संख्या सर्वाधिक म्हणजे 74.37 टक्के आहे. त्याखालोखाल मुस्लीम 12.43 टक्के,
ख्रिश्चन 12.43 टक्के, शिख 0.51 टक्के, बुद्धिस्ट 0.05 टक्के, जैन 0.01
टक्के आणि अन्य 0.10 टक्के आहेत. तेथे बंगाली, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषा
बोलली जाते. बंगाली भाषा बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सायन्स सेंटर
अंदमान अँड निकोबार प्रशासनातर्फे पोर्ट ब्लेअर येथील सायन्स सेंटर
चालविले जाते. ते कोलकाता येथील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियमच्या
सहकार्याने 2003 मध्ये कार्यान्वित झाले. तेथे फन सायन्स गॅलरी, अंदमान अँड
निकोबार गॅलरी, मॉडर्न सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी गॅलरी आहे. 100 हून
अधिक प्रतिकृती तेथे पाहायला मिळतात.
वीकेंड पिकनिक पॉईंट
पोर्ट ब्लेअरपासून 17 किमी अंतरावर असलेले बेदोनाबाद प्रसिद्ध
पर्यटनस्थळ आहे. वीकेंड पिकनिक पॉईंट म्हणून ते फेमस आहे. टेलिस्कोपमधून
ग्रह तारे निरीक्षणाची सुविधाही येथे उपलब्ध आहे.
माऊंट मणिपूर राष्ट्रीय उद्यान
दक्षिण अंदमान बेटांवर स्थित माऊंट मणिपूर राष्ट्रीय उद्यान हे अंदमान
बेटांमधील नऊ राष्ट्रीय उद्यानांपैकी सर्वात सुंदर आहे. हे अंदमानचे तिसरे
शिखर आहे, जे 383 मीटर (1,257 फूट) वर उभे आहे. या उद्यानातून आकर्षक
सूर्यास्त आणि सूर्योदय अनुभवता येतो.
वंडूर बीच
पोर्ट ब्लेअर, दक्षिण अंदमानमधील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध
समुद्रकिनाऱ्यांपैकी एक वंडूर बीच पोर्ट ब्लेअरच्या नैऋत्येला आहे.
समुद्रकिनाऱ्यांवरील रंगीबेरंगी कोरल पर्यटकांचे आकर्षण ठरते. स्विमिंग आणि
सूर्यस्नानासाठी हा बीच प्रसिद्ध आहे. समुद्राचे स्वच्छ निळे पाणी आणि
किनाऱ्यावरील मच्छिमारांच्या बोटी असे विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते.
समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालच्या उंच भरतीमुळे तयार झालेल्या गुहेसाठीही हा
बीच ओळखला जातो.
जॉगर्स पार्क
जॉगर्स पार्क हे पोर्ट ब्लेअरमधील उद्यान निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर
ठिकाण आहे. पोर्ट ब्लेअरमधील सर्वात स्वच्छ उद्यानांपैकी ते एक आहे. हे
ठिकाण एका टेकडीच्या शिखरावर वसलेले आहे. जवळचे रॉस आयलंड आणि नॉर्थ बे
आयलंडसह निळ्या महासागराची भव्य दृश्य येथून नजरेस पडतात. येथून पोर्ट
ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे स्पष्ट दृश्य
दिसते. येथून फ्लाईट लँडिंग आणि टेक ऑफ पाहणे ही वेगळीच अनुभूती ठरते.
लक्ष्मणपूर बीच
लक्ष्मणपूर बीच हा अंदमान आणि निकोबार बेटांमधील नील बेटावर असलेला एक
नयनरम्य पांढरा वाळूचा समुद्रकिनारा आहे. ज्याला आता शहीद द्वीप म्हणून
ओळखले जाते. स्नॉर्कलिंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. कोरल रिफ आणि स्वच्छ
हिरव्या समुद्राच्या पाण्यासाठी हा बीच ओळखला जातो. ‘हावडा ब्रीज’ म्हणून
ओळखले जाणारे नैसर्गिक खडक हे येथील प्रमुख आकर्षण आहे. लक्ष्मणपूर बीचवरील
सूर्यास्ताची मोहक दृश्ये पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. अन्य लोकप्रिय
समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत त्याच्या आरामशीर आणि तुलनेने कमी गर्दीमुळे
येथे शांतता अनुभवता येते.
राधानगर बीच
राधानगर बीच हा भारतातील सर्वोत्तम बीच म्हणून ओळखला जातो. निळेशार पाणी
आणि हिरवेगार जंगल असलेला हा वाळूचा एक प्राचीन भाग आहे. टाईम्स मॅगझिनने
त्याला जगातील सातव्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्याचा किताब दिला. राधानगर बीच
हे केवळ स्वराज द्वीपमधीलच नव्हे, तर अंदमान बेटांमधील अनेक आकर्षणांपैकी
एक आहे. खजुराच्या झाडांनी नटलेला हा बीच पर्यटकांना शांत वातावरण देतो.
राधानगर बीचचे आणखी एक आकर्षण म्हणजे नीलची कोव्ह. हे एक प्राचीन सरोवर
आहे.
चिडियाटापू
चिडियाटापू हे पोर्ट ब्लेअरपासून 28 किमी अंतरावर दक्षिण अंदमान बेटाचे
सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. पोर्ट ब्लेअर येथून बससेवा उपलब्ध आहे. हे
पक्षी निरीक्षण, सूर्यास्ताचे दृश्य, विहंगम निसर्गरम्य सौंदर्यासाठी
प्रसिद्ध आहे. चिडियाटापू येथील जैविक उद्यान हे आणखी एक आकर्षण आहे.
वनविभागामार्फत चालविण्यात येणारे वन अतिथीगृह आहे. अभ्यागतांना विविध
स्थानिक आणि स्थलांतरित पक्षीदर्शन होते.
99,99,999 मूर्ती असणारे उनाकोटी
Tarun Bharat Portal
7–9 minutes
ईशान्य भारतातील राज्य असलेल्या त्रिपुरात उनाकोटी नावाचे
स्थळ आहे. जंगलांनी वेढलेल्या या दुर्गम पर्वतीय भागात देवी-देवतांच्या 99
लाख 99 हजार 999 मूर्ती निर्माण करण्यात आल्या आहेत. या मूर्ती कधी आणि
कुणी निर्माण केल्या, कुठल्या राजाच्या देखरेखीत हे काम झाले होते हे आजही
रहस्य आहे. परंतु येथील नैसर्गिक सौंदर्य आणि भगवान शिवाला समर्पित हे स्थळ
अत्यंत मनमोहक आहे. उनाकोटी येथील या प्राचीन मूर्तींना जागतिक
वारसास्थळात स्थान मिळवून देण्यासाठी पुरातत्व विभाग आणि त्रिपुरा सरकार
एकत्रितपणे प्रयत्न करत आहे.
त्रिपुरा आणि बांगलादेशच्या सीमेवर कैलाशहर आहे. येथून 10 किलोमीटर
अंतरावर घनदाट जंगलांमध्ये वसलेले आहे उनाकोटी. याच मार्गावरून एक कोटी
देवी-देवता काशी येथे पोहोचले होते अशी मान्यता आहे. इतक्या दुर्गम आणि
एकांत असलेल्या ठिकाणी कुणी आणि कधी पर्वतीय खडकांना कोरून इतक्या मूर्ती
निर्माण केल्या याचे रहस्य अद्यात अबाधित आहे.
दुर्गम भागात या स्थळाच्या निर्मितीची कथा रहस्यमय आहे. कुठलाही इतिहास
या रहस्याची उकल करू शकलेला नाही. कुठल्या कालखंडात, कुठल्या युगात येथे
मूर्ती साकारण्यात आल्या हेच माहित नाही. इतक्या साऱ्या भव्य मूर्ती कधीच
एकाच ठिकाणी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात दिसून आलेल्या नाहीत.
पाल साम्राज्यादरम्यान हे स्थळ निर्माण झाल्याचे काही लोक मानतात, तर 8
व्या-9 व्या शतकात हे स्थळ निर्माण झाल्याचे काही जण सांगतात. येथे निर्मित
मूर्ती बौद्ध संस्कृतीने प्रभावित असल्याचे काही लोक मानतात. परंतु तरीही
कुणीच ठोस दावा करू शकत नाही.
भोलेनाथ याच मार्गाने गेले काशीला
उनाकोटीविषयी अनेक वदंता आहे. भगवान शिव अनेक देवीदेवतांसोबत येथून
काशीला जात होते. याचदरम्यान रघुनंदन पर्वतावरून ते गेले, उनाकोटीला पूर्वी
रघुनंदन पर्वत या नावाने ओळखले जायचे. रात्रीची वेळ असल्याने सर्व
देवीदेवता थकून गेले होते. तेव्हा भगवान शंकराने सर्वांनी रात्री रघुनंदन
पर्वतावर आराम करावा आणि सूर्योदय होताच वाराणसीसाठी प्रस्थान करू असे
सांगितले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सूर्योदयासमयी कुठल्याही देवी-देवतेला
जाग आली नाही. केवळ भगवान शिव यांनाच जाग आली, हे पाहून भगवान शिव क्रोधित
झाले आणि त्यांनी शाप देऊन सर्वांना दगड करून टाकल्याची लोककथा
त्रिपुरामध्ये प्रचलित आहे. उनाकोटीविषयी अनेक लोककथा प्रचलित असून लोक
त्या मानतात.
उनाकोटीचा अर्थ एक कोटीपेक्षा एक कमी
उनाकोटीमध्ये दगडांना कापून पर्वतांमध्ये मूर्ती तयार करण्यात आल्या
आहेत. या मूर्ती कधी आणि कशा निर्माण करण्यात आल्या हे सांगणे अत्यंत अवघड
आहे. तर उनाकोटी शब्द हा बंगाली भाषेतील असून याचा अर्थ एक कोटीपेक्षा एक
कमी असा होतो असे त्रिपुरा विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. सुकेंदू
देववर्मन यांनी सांगितले आहे.
पूर्ण खोरेच वाटते मंदिराचा हिस्सा
उनाकोटीचे पूर्ण खोरे एका विशाल मंदिराप्रमाणे दिसते. सुमारे एक
किलोमीटरच्या कक्षेत फैलावलेल्या पर्वतांवर जिथवर नजर जाते तिथवर
दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती दिसून येतात.
येथे चतुर्मुखी गणेश, दुर्गामाता, लक्ष्मीमातेसमवेत अनेक देवी-देवतांच्या
मूर्ती आहेत. याचबरोबर येथे रावणाची मूर्तीही दिसून येईल, ज्यात हातात
धनुष्य-बाण घेऊन लक्ष्यभेद करू पाहणारा रावण दिसून येतो. उनाकोटी येथे
पोहोचल्यावर लोकांना वेगळीच अनुभूती होते. नैसर्गिक सौंदर्याने भरपूर या
स्थळाच्या चहुबाजूला पर्वत असून घनदाट वृक्षसंपदा आहे. हा भाग अत्यंत घनदाट
जंगलांमध्ये वसलेला असून अत्यंत दुर्गम आहे. वेगवेगळ्या काळात या मूर्ती
निर्माण केल्या असाव्यात असेही मानले जाते.
सीताकुंडात स्नान केल्यास मिळते पुण्य
भगवान शिवाच्या अनेक मूर्ती येथे दिसून येतात. येथील सर्वात मोठी मूर्ती
भगवान शिवाचीच आहे. तसेच या मूर्तीकडे नंदी देखील आहे. बांगलादेश आणि
शेजारील राज्यांमधून अनेक लोक येथे येतात आणि पूजा करतात. येथे पोहोचल्यावर
मनाला वेगळीच शांतता मिळत असते. उनाकोटीमध्ये मोठमोठ्या मूर्तींदरम्यान
छोट्या मूर्तीही दिसून येतात. उनाकोटीनजीकच सीता पुंड असून त्यातून
जलप्रवाह बाहेर पडतो. या ठिकाणी स्नान केले तर पुण्य लाभते अशी धार्मिक
मान्यता आहे. याचमुळे येथे येणारे लोक या कुंडात स्नान अवश्य करतात.
शिल्पकाराविषयी कहाणी
स्थानिक लोकांदरम्यान आणखी एक कहाणी प्रचलित आहे. कालू नावाचा एक
शिल्पकार होता, जो भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासोबत कैलास पर्वतावर
जाऊ इच्छित होता, परंतु हे शक्य नव्हते. पण शिल्पकाराच्या हट्टामुळे भगवान
शिव यांनी त्याला एका रात्रीत एक काटी देवी-देवतांच्या मूर्ती तयार केल्यास
स्वत:सोबत कैलासास नेईन असे सांगितले होते. हे ऐकताच शिल्पकार ताबडतोब
कामाला लागला आणि त्याने जलदपणे मूर्तींची निर्मिती सुरू केली. त्याने
पूर्ण रात्र मूर्ती साकारण्याचे काम केले, परंतु सकाळी जेव्हा मूर्तींची
मोजणी झाली तेव्हा एक कोटीपेक्षा एक मूर्ती कमी असल्याचे कळले. याचमुळे
त्या शिल्पकाराला भगवान शिवासोबत कैलासास जाता आले नाही अशीही कहाणी आहे.
आणखी एक कहाणी प्रचलित
आणखी एक कहाणीनुसार कलियुगाच्या प्रारंभी देवी-देवतांनी पृथ्वी सोडून
स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला. कलियुगात पृथ्वी राहण्यायोग्य नसेल हे
त्यांना ठाऊक होते. स्वत:च्या मूर्ती पृथ्वीवर सोडून जाण्याचा निर्णय
घेतला, जेणेकरून ज्यांना आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना घेता यावा अशीही
कहाणी प्रचलित आहे.
अंगकोरवाट सारख्या मूर्ती
रघुनंदन हिल्सवर असलेल्या मूर्ती कंबोडियातील अंगकोरवाटमध्ये निर्मित
मूर्तींप्रमाणेच आहेत. प्रसिद्ध इतिहासकार पन्नालाल यांनी या मूर्तींची
तुलना कंबोडियाच्या अंगकोरवाटशी केली आहे. या मूर्ती अत्यंत दुर्लभ असून
बंगालच्या पाला साम्राज्यावेळी उनाकोटी शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान
होते. असे म्हणत पन्नालाल रॉय यांनी या मूर्तींचे संरक्षण अत्यंत आवश्यक
असल्याचे म्हणत अनेक मूर्ती हवामान आणि अन्य कारणांमुळे खराब झाल्याचे
सांगितले आहे. परंतु पुरातत्व विभागाने हे स्थळ स्वत:च्या ताब्यात
घेतल्यापसून येथील मूर्ती वाचविण्यासाठी गंभीर प्रयत्न सुरू झाले आहेत.
एप्रिलमध्ये आयोजित होतो मेळा
पर्वतीय भाग असल्याने पावसाळ्यात येथील अनेक मूर्तींवरून झरे वाहत
असतात. त्रिपुराचे सरकार उनाकोटी येथील या मूर्तींच्या आसपास पर्यटन स्थळ
विकसित करु पाहत आहे. येथे दोन प्रकारच्या मूर्ती आहेत. पर्वतांवर कोरण्यात
आलेल्या तसेच दगड कापून तयार करण्यात आलेल्या मूर्ती येथे दिसून येतात.
येथील भगवान शिव यांची मूर्ती सुमारे 30 फूट उंच आहे. या मूर्तीनजीकच नंदी
बैलाच्या तीन मूर्ती देखील आहेत. यातील काही खास मूर्तींनजीक लोकांना
जाण्याची अनुमती नसते. एप्रिल महिन्यात येथे यात्रेचे आयोजन होते, ज्याला
अशोकाष्टमीचा मेळा असे म्हटले जाते. या मेळ्यात सहभागी होण्यासाठी दूर
दूरवरून लोक येत असतात. उनाकोटी येथे निर्मित भगवान शिवाच्या मूर्तीला
उनाकोटिश्वरा काल भैरव नावानेही संबोधिले जाते. ही मूर्ती सुमारे 30 फूट
उंच आहे.
कसे पोहोचाल?
त्रिपुराची राजधानी अगरतळा देशाच्या विविध शहरांसाठी विमानसेवेद्वारे
जोडली गेलेली आहे. उनाकोटी जिल्ह्याचे मुख्यालय कैलाशहर हे अगरतळापासून 178
किलोमीटर अंतरावर आहे. तेथून उनाकोटीसाठी दररोज बससेवा संचालित केली जाते.
येथे पोहोचण्यासाठी नजीकचे रेल्वेस्थानक एनएफ रेल्वेचे कुमारघाट असून ते
कैलाशहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. याचबरोबर गुवाहाटी, शिलाँग, सिलचर
आणि राज्याच्या अनेक जिल्हे आणि उपविभागीय शहरांमधूनही कैलाशहरसाठी दररोज
बस धावत असते. कैलाशहरपासून उनाकोटी केवळ 8 किलोमीटर अंतरावर आहे, जेथे
पोहोचल्यावर अद्भूत अनुभव प्राप्त होतो. तेथील नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध
करणारे आहे. उनाकोटी येथे खाली आणि वर चढण्यासाठी जिने तयार करण्यात आले
आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेलिंग तयार करण्यात आले आहेत. पूर्ण स्थळाला
पुरातत्व विभागाने संरक्षक भिंतीद्वारे वेढले आहे. तर त्याबाहेर जवानांचा
पहारा असतो. पर्यटकांना दिवसात एका निश्चित कालमर्यादेतच येथे येण्याची
अनुमती असते. उनाकोटीच्या सुमारे 10 किलोमीटरच्या परिघात कुठलेच हॉटेल
नाही. सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे आता या स्थळाच्या आसपास
पर्यटकांसाठी वास्तव्ययोग्य सुविधा निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.
चबीमुरा किंवा देवतामुरा
त्रिपुरातील आणखी एक स्थळ लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. चबीमुरा
हे त्रिपुरातील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. चबीमुराच्या शिखराला
देवतामुरा म्हणजेच देवतांचा पर्वत असेही म्हटले जाते. गोमती नदीच्या काठावर
असलेल्या या पर्वतावर अनेक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. दरवर्षी जानेवारी
महिन्यात येथे मेळा आयोजित होते आणि लोक त्यावेळी पवित्र गोमती नदीत स्नान
करत असतात.
उमाकांत कुलकर्णी
मध्यप्रदेशातील बटेश्वर मंदिर
Tarun Bharat Portal
7–8 minutes
मध्यप्रदेशच्या मुरैना जिल्ह्यानजीक एकाहून एक भव्य मंदिरं
उभी आहेत. या मंदिरांची निमिर्ती गुर्जर प्रतिहार राजांनी नवव्या शतकात
केली होती. परंतु शेकडो वर्षांपर्यंत ही मंदिरं घनदाट जंगलात हरवली होती.
चंबळमध्ये दरोडेखोरांची दहशत असल्याने देखील लोक तेथेपर्यंत पोहोचू शकले
नव्हते. परंतु आता भारतीय पुरातत्व विभागाच्या मेहनतीनंतर ही मंदिरं पुन्हा
आकार घेऊ लागली आहेत. मागील काही काळात देशांतर्गत तसेच विदेशी
पर्यटकांचा या स्थळाकडील ओढा वाढला आहे. हे स्थळ आता जागतिक पर्यटनाच्या
नकाशावरही स्वत:चे स्थान निर्माण करू लागले आहे.
मध्यप्रदेशचा मुरैना जिल्हा चंबळ विभागाच्या अंतर्गत येतो. तर
चंबळमध्ये कधीकाळी दरोडेखोरांचेच वर्चस्व होते. या दरोडेखोरांच्या
दहशतीच्या कहाण्या पूर्ण देशाने ऐकल्या असून बॉलिवूडमध्ये यावर अनेक
चित्रपटही निर्माण झाले आहेत. परंतु याच भागात कधीकाळी एकाहून एक सुंदर
मंदिरं असायची. काळाच्या चक्रात पडझड होऊनही या मंदिरांची भव्यता आजही
सर्वांना आकर्षित करते.
गुर्जर-प्रतिहार राजांकडून निर्मिती
बटेश्वरच्या मंदिरांची निर्मिती गुर्जर-प्रतिहार राजांकडून करण्यात आली
होती असे सांगण्यात येते. तेथे बलुआ दगडाच्या मदतीने 200 मंदिरे निर्माण
करण्यात आली आहेत. हा मंदिर समूह उत्तर भारतीय मंदिर वास्तुकलेच्या
प्रारंभिक गुर्जर-प्रतिहार शैलीचा मंदिर समूह आहे. मंदिरांचा आकार
प्रामुख्याने छोटा असला तरीही सुमारे 25 एकर भागात त्यांची निर्मिती
करण्यात आली आहे. ही मंदिरे भगवान शिव, विष्णू आणि शक्तिला समर्पित आहेत.
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम ग्वाल्हेर येथे जावे लागते, तेथून
बटेश्वरची मंदिरे सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहेत. तर दुसरा मार्ग मुरैना
शहरातून जातो, तेथून या ऐतिहासिक स्थळाचे अंतर सुमारे 30 किलोमीटर आहे.
गजनीच्या आक्रमणानंतर पतन
बटेश्वर मंदिर 8 व्या आणि 10 व्या शतकादरम्यान निर्माण करण्यात आली
होती. 1008 साली महमूद गजनीने उत्तर भारतावर आक्रमण केले होते आणि कन्नौजवर
नियंत्रण मिळविले होते. त्यानंतर गुर्जर-प्रतिहार राजघराण्याचे पतन झाले.
त्यानंतर कुठल्याही राजघराण्याचे आर्थिक आणि सांस्कृतिक संरक्षण या
ठिकाणाला मिळाले नाही. याचमुळे या स्थानावरील सांस्कृतिक घडामोडी बंद
झाल्या असण्याची शक्यता असल्याचे प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक एस. के.
द्विवेदी यांनी सांगितले आहे.
12 व्या आणि 13 व्या शतकात हिंदुस्थानच्या अनेक हिस्स्यांमध्ये अधिक
तीव्रतेचे भूकंप झाल्याने अनेक ऐतिहासिक स्थळांचे नुकसान झाले. त्याच काळात
बटेश्वर आणि मितावलीचेही अनेक हिस्से कोसळले आणि त्यानंतर त्यांची देखभाल
करणारा कुणीच राहिला नसावा असे के. के. मोहम्मद यांचे मानणे आहे.
तर मंदिरांचे आता जे स्वरुप दिसून येत आहे, त्यामागील कारण भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एएसआयचे अधिकारी आहेत. विशेषकरून याचे श्रेय
के.के. मोहम्मद यांना जाते, ज्यांनी 2005 मध्ये सुरू करण्यात आलेल्या एका
प्रकल्पाच्या अंतर्गत या अवशेषांच्या दगडांना पुन्हा जोडून मंदिराचा आकार
दिला होता. जगात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत शतकांपेक्षा जुन्या
मंदिरांना मूळ स्वरुप प्राप्त करून देण्यात आले आहे. या परिसरात सर्वात
मोठे मंदिर विष्णू मठ मंदिर असून ते दगडांचा ढिगच ठरले होते. परंतु
इन्फोसिस फौंडेशनकडून मिळालेल्या निधीनंतर हे मंदिर पुन्हा उभे राहिले आहे.
सुमारे अडीच वर्षांच्या मेहनतीनंतर साडे नऊ मीटर उंच विष्णू मठ मंदिर तयार
झाले आहे. विष्णू मठ मंदिराचा चबुतरा साडेसात फूट उंच आहे.
दरोडेखोरांशी आमना-सामना
बटेश्वरमध्ये जेव्हा आम्ही काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या काळात
एक व्यक्ती येथील डोडामल मंदिराच्या आत बसून विडी ओढत होता, त्याला पाहून
मी संतापलो आणि त्याच्याकडे पोहोचलो, मंदिरात धूम्रपान करताना लाज वाटत
नाही का असे मी त्याला खडसावून विचारले होते. तो मला पाहत होता, परंतु
माझ्याशी काहीच बोलला नाही. त्यावेळी माझ्यासोबत जो सहाय्यक होता, त्याने
माझा हात पकडला आणि तुम्ही त्याला काहीच बोलू नका असे सुचविले. तोपर्यंत
त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला, त्यानंतर तो दरोडेखोर निर्भय सिंह गुर्जर
असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्याच्या पायांवरच लोळण घेतल्याचा अनुभव
के. के. मोहम्मद यांनी सांगितला आहे.
बटेश्वर येथील सर्व मंदिरं ही गुर्जर-प्रतिहार राजघराण्याने निर्माण
केली होती. निर्भय सिंह गुर्जर हा देखील त्याच परिवाराशी संबंधित होता,
कारण त्याचे नाव देखील गुर्जर होते असा संदर्भ त्याला दिला होता. यानंतर
आम्ही त्याच्याशी बराचवेळ बोलत होतो. यानंतर त्याने मंदिरांच्या
पुनर्निर्मितीत मोठे सहकार्य केल्याची माहिती के. के. मोहम्मद यांनी दिली
आहे.
इतिहास
इतिहासकारांनुसार या मंदिरांची उभारणी सम्राट विजयपाल प्रतिहार यांच्या
शासनकाळात पूर्ण झाली होती. ही बलुआ दगडांनी निर्मित बहुतांश करून भगवान
शिवाला समर्पित आहेत. पर्यटकांसाठी हे स्थळ अत्यंत उत्सुकता वाढविणारे आहे.
हे स्थळ अनेक रहस्यांना स्वत:मध्ये सामावून आहे. अखेर एकाच ठिकाणी इतकी
मंदिरं का उभारण्यात आली तसेच सर्व मंदिरांमधील शिवलिंग एकसारखे का आहे असे
प्रश्न लोकांच्या मनात तयार होतात. ही शिवलिंग साधनेसाठी निर्माण
करविण्यात आली होती असे स्थानिक लोकांचे मानणे आहेत. परंतु याची पुष्टी
देणारे पुरावे मिळालेले नाहीत.
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
या मंदिराची कलाकृती आठव्या शतकाशी संबंधित आहे. मंदिराची रचना
वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. सर्वप्रथम 1882 मध्ये या स्थळाची ओळख
अलेक्झेंडर कनिंघम यांनी पटविली होती. यानंतर प्रोफेसर मायकल मीस्टर यांनी
येथे सर्वेक्षण केले होते. 2005 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने
पुरातत्व अधिकारी के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वात मंदिरांचे संरक्षण सुरू
केले होते. यादरम्यान सुमारे 60 मंदिरांची पुनउ&भारणी करण्यात आली.
मितावलीचे 64 योगिनी मंदिर
बटेश्वरनजीकच 64 योगिनीचे मंदिर आहे. त्याची स्थापत्यकला आणखी कुठलेच
दिसून येत नाही. योगिनी मंदिरात तंत्र-मंत्र होत असावे. सर्वसाधारण समुदाय
जे स्वीकारत नाही, तेथे ते सर्व होते. त्याचा अनुभवही घेता येतो.
अशाप्रकारची आणखी अनेक मंदिरे भारतात आहेत. परंतु त्यातील सर्वात मोठी
महत्त्वाची भूमिका येथील मंदिर बजावत असल्याचे के. के. मोहम्मद यांनी
सांगणे आहे.
64 कक्षांमध्ये प्रत्येकी एक शिवलिंग
गुर्जर प्रतिहार वंशाचे 10 वे शासक सम्राट देवपाल गुर्जर यांनी
लाल-करड्या रंगाच्या बलुआ दगडांच्या मदतीने या मंदिराची उभारणी 9 व्या
शतकात केली होती. मंदिरामध्ये 101 स्तंभ आणि 64 कक्षांमध्ये प्रत्येकी एक
शिवलिंग आहे. परिसरादरम्यान एक मोठे वर्तुळाकृती शिव मंदिर देखील आहे.
हिंदुस्थानात नाही असे एकही ठिकाण
बटेश्वरमध्ये 200 मंदिरे आहेत. एकाच ठिकाणी 200 मंदिरं असणारे स्थळ
हिंदुस्थानात अन्यत्र कुठेच नाही. या मंदिरांमध्ये विविध शैलीची
स्थापत्यकला दिसून येत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे. काही मंदिरं
शिखरयुक्त आहेत, तर काही मंडपीय आकाराची मंदिरं देखील आहेत. 9 व्या ते 12
व्या शतकाच्या 300 वर्षांच्या कालावधीत या मंदिरांची निर्मिती होत राहिली.
खजुराहोच्या मंदिरांच्या निर्मितीच्या 200 ते 300 वर्षांपूर्वी ही मंदिरं
निर्माण करण्यात आली होती. यामुळे या मंदिरांचे खास महत्त्व आहे.
भारतातील जुन्या संसद भवनाप्रमाणे येथील मंदिरात 101 स्तंभ निर्माण
करण्यात आले आहेत. ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स यांनी भारताच्या
संसद भवनाचे डिझाइन तयार केले होते. लुटियन्स हे याच चौसष्ठ योगिनी
मंदिराने प्रेरित होते असे मानले जाते. या मंदिराला भारतीय पुरातत्व
विभागाने प्राचीन ऐतिहासिक स्मारक घोषित केले आहे.
येथे कसे पोहोचाल?
मुरैना आणि भिंड जिल्ह्यात रेल्वेस्थानक आहे. ग्वाल्हेर रेल्वे
स्थानकावरून बस किंवा टॅक्सीद्वारे देखील येथे पोहोचता येऊ शकते. सर्व
जिल्हे बससुविधेद्वारे चांगल्याप्रकारे जोडले गेले आहेत. पर्यटक स्वत:चे
खासगी वाहन किंवा भाड्याच्या वाहनाद्वारे तेथे पोहोचू शकतात.
– संकलन : उमाकांत कुलकर्णी
चंदीगड भारतातील पहिले नियोजनबद्ध शहर
Tarun Bharat Portal
7–9 minutes
आणखी शोधा
सावंतवाडी तालुक्यातील
वृत्तपत्र
पेपर
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका
चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला असून या शहराची स्थापना 1
नोव्हेंबर 1966 रोजी झाली होती. चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही
राज्यांची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या आधारावर हे देशातील 36 व्या
क्रमांकाचे शहर आहे. या केंद्रशासित प्रदेशात केवळ एक लोकसभा मतदारसंघ आहे.
चंदीगडच्या कुठल्याही सर्कल किंवा उद्यानात कुठलीच मूर्ती नाही.
स्थापत्यतज्ञ ली कोर्बुजिए यांनीच यासंबंधी अट सरकारसमोर ठेवली होती.
आणखी शोधा
सावंतवाडी
पेपर
सावंतवाडी तालुका
वृत्तपत्र
सावंतवाडी तालुक्यातील
सुंदर पर्वतांनजीक सरोवराच्या काठावर वसलेले हिरवाईने नटलेले चंदीगड हे
भारताचे पहिले सुनियोजित शहर आहे. चंदीगडला बहुतांश लोक ‘सिटी ब्युटीफुल’
नावाने ओळखतात. एकप्रकारे हे बुद्धिजीवींचेही शहर आहे, याचमुळे याला सिटी
ऑफ इंटेलेक्चुअल असेही म्हटले जाते. हडप्पा आणि मोहेजोंदाडो संस्कृतीच्या
धर्तीवर वसविण्यात आलेल्या या शहरात स्वतःचे घर असावे असे अनेक लोकांचे
स्वप्न आहे. महाग भूखंडामुळे बहुतांश लोकांचे हे स्वप्न केवळ स्वप्नच बनून
राहते. जर तुम्ही भारतातील चंदीगडमध्ये राहत असाल तर तुम्ही युरोपमध्ये
राहिल्यासारखे आहे, असे विदेशात बोलले जाते. हे शहर प्रत्येकाला खुल्या
हातांनी आपलेसे करते. ‘ओपन हँड’चे चिन्ह तुम्हाला शहरात प्रवेश
करण्यापूर्वी स्वागत करताना प्रत्येक दिशेने दिसून येईल. हे ‘ओपन हँड’चे
चिन्ह या छोटय़ाशा शहराची ओळख आहे. शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याला
वसलेल्या या शहरातील अनेक ठिकाणे मनाला मोहीत करणारी आहेत. चंदीगडला
निवृत्तिवेतनधारकांचे नंदनवन असेही म्हटले जाते. मानवी विकास निर्देशांकात
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड प्रथमस्थानावर आहे.
सायकलस्वारी
चंदीगड हे शहर फ्रान्सचे स्थापत्यतज्ञ ला कार्बुजिए यांनी डिझाईन केले
होते. याचमुळे हे शहर स्वतःच्या विश्वप्रसिद्ध वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध
आहे. हे शहर नैसर्गिक संरक्षण अन् आधुनिकीकरणाचे संयुक्त मिश्रण आहे. येथील
खुले रस्ते आणि मोठमोठी सर्कल्स या शहराची ओळख आहे. रस्त्यांच्या काठावर
स्वतंत्रपणे सायकल ट्रक तयार करण्यात आले आहेत. या शहराला सायकल
रायडिंगच्या दृष्टीकोनातूनच वसविण्यात आले होते, असे बोलले जाते.
चंडी मातेवर आधारित नाव
चंदीगड शहराचे नाव देवी चंडी मातेच्या नावावर आहे. चंदीगडच सीमेवर
पंचकुलानजीक चंडी मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. पर्यटनस्थळाच्या स्वरुपात
मोठय़ा संख्येत लोक या मंदिराला भेट देत असतात. भारत-पाकिस्तान अशी फाळणी
होण्यापूर्वी पंजाब प्रांताची राजधानी लाहोर शहर होती. परंतु 1947 मध्ये
भारताची फाळणी झाल्यावर लाहोर शहर पाकिस्तानात गेले आणि पंजाबसाठी नव्या
राजधानीची निर्मिती करावी लागली. चंदीगड शहराचा पाया 1952 मध्ये रचला गेला
होता. याच्या निर्मितीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि राज्यपाल
चंद्रेश्वर प्रसाद यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. नेहरू हे चंदीगडला
आधुनिक भारतातील सर्वात सुंदर शहराच्या स्वरुपात पाहू इच्छित होते.
त्यांनी स्वतःचे हे स्वप्न साकार केले होते.
सुखना सरोवर
शहराची खरी ओळख असलेल्या सुखना सरोवराची निर्मिती 1958 मध्ये एका
कृत्रिम सरोवराच्या स्वरुपात करण्यात आली होती. यापूर्वी तेथे सुखना चोई
जलप्रवाह वाहत होता. याचेच पाणी साठवून सरोवर तयार करण्यात आला होता. हा
सरोवर मासे आणि सायबेरियन बदकांसह अनेक देश-विदेशातील पक्ष्यांचे
वास्तव्यस्थळ आहे. येथे स्केच आर्टिस्ट पर्यटकांची सुंदर चित्रे रेखाटताना
दिसून येतात. पावसाळय़ात हे शहर अधिकच सुंदर ठरते. सुखना सरोवराच्या काठावर
पावसादरम्यान शिवालिक टेकडय़ांकडे पाहत बसण्याचा अनुभव मोहक असाच आहे.
दगड, गुलाबांची नगरी
पंजाबी कवी शिवकुमार बटालवी यांनी या शहराला दगडांचे शहर अशीही उपमा
दिली होती. जगप्रसिद्ध रॉक गार्डन याच शहरात असून ते घरगुती आणि औद्योगिक
कचरा अन् टाकाऊ सामग्रीच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या रॉक गार्डनची
निर्मिती नेकचंद यांनी केली होती. हे ठिकाण वाहत्या झऱयांमुळे अन्
झोपाळय़ांमुळे ओळखले जाते. आशियातील सर्वात मोठे गुलाब उद्यान देखील याच
शहरात असून याचे नाव झाकिर हुसैन रोज गार्डन आहे. येथे गुलाबांच्या
रोपांच्या हजारांहून अधिक प्रजाती आहेत. दरवर्षी व्हॅलेंटाइन डेनिमित्त
येथे गुलाब महोत्सवाचे आयोजन हेते. शहरातील एक देखील हिस्सा असा नाही, जेथे
छोटी-मोठी उद्याने नाहीत. रोपे-वृक्ष, उद्यानांमुळेच हे शहर पर्यटकांच्या
आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. रोज गार्डन, रॉक गार्डन, जॅपनीज गार्डन, टेरेस
गार्डन, बर्ड पार्क इत्यादी अनेक ठिकाणांना भेट देण्याचा मोह आवरत नाही.
जागतिक वारसास्थळ
चंदीगडच्या कॅपिटल कॉम्प्लेक्सला युनेस्कोने 2014 मध्ये जागतिक
वारसास्थळाच्या यादीत सामील केले आहे. या कॉम्प्लेक्समध्ये उच्च न्यायालय,
सचिवालय, विधानसभेचे क्षेत्र सामील असून याची वास्तुकला विश्वप्रसिद्ध आहे.
येथे हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्यांची अनेक प्रशासकीय कार्यालये
आहेत. येथील ‘ओपन हँड’ स्मारक कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. पोलीस सुरक्षेतच
पर्यटकांना हे ठिकाण दाखविण्यात येते. चंदीगडमध्ये अनेक संग्रहालये आहेत.
येथील सरकारी संग्रहालय तसेच कला दीर्घामध्ये गांधार शैलीच्या अनेक
मूर्तींचा संग्रह पाहिला जाऊ शकतो. या मूर्ती बौद्धकाळाशी संबंधित आहेत.
संग्रहालयात अनेक लघुचित्रे आणि अश्मयुगातील जीवाश्मही ठेवण्यात आले आहे.
सेक्टर 10 मधील संग्रहालय पाहण्याजोगे आहे. सेक्टर 23 मधील आंतरराष्ट्रीय
डॉल्स म्युझियममध्ये जगभरातील बाहुल्या ठेवण्यात आल्या आहेत. टागोर थिएटर
साहित्य तसेच कलेच्या दृष्टीकोनातून शहरातील सर्वात चर्चेत राहणारे ठिकाण
आहे. येथे दररोज जगप्रसिद्ध नाटकांचे खेळ आयोजित केले जातात.
चंदीगड शहर नेमके कुणाचे?
चंदीगड शहर कुणाचे? पंजाब का हरियाणाचे? हा प्रश्न वारंवार उपस्थित होत
असतो. या मुद्दय़ावरून दोन्ही राज्ये आमने-सामने असतात. चंदीगड हे शहर आपले
असल्याचा दावा दोन्ही राज्यांकडून केला जात असतो. याकरता प्रसंगी संघर्ष
करण्याची तयारीही या राज्यांकडून दाखविली जात असते. 1950 मध्ये पूर्व
पंजाबचे नाव बदलून पंजाब राज्य करण्यात आले होते आणि चंदीगडला या
राज्याच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर 1966 मध्ये
अविभाजित पंजाबला पुन्हा पंजाबी भाषा आणि हिंदी भाषिकांच्या आधारावर पंजाब
अन् हरियाणा या दोन राज्यांमध्ये विभागण्यात आले होते. तर काही क्षेत्रांचा
समावेश नवे पहाडी राज्य हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आला होता. या
पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांनी चंदीगडवर स्वतःची
राजधानी म्हणून दावा सांगितला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी
वाद सोडविण्यासाठी चंदीगडला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता. परंतु
इंदिरा गांधी यांनी ही व्यवस्था केवळ तात्पुरती असल्याचे संकेत दिले होते.
पण पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्ये स्वतःच्या मागणीवर ठाम राहिल्याने हा
प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव
गांधी आणि अकाली दलाचे प्रमुख हरचंद सिंह लोंगोवाल यांच्याकडून स्वाक्षरी
करण्यात आलेल्या करारानुसार चंदीगड 1986 मध्ये पंजाबला सोपविण्यात येणार
होते. परंतु काही हिंदी भाषिक शहरे म्हणजेच अबोहर आणि फाजिल्का यांचा
हरियाणात समावेश करण्यात येणार होता. याचबरोबर एका राज्याला स्वतःची
राजधानी निर्माण करण्यासाठी त्यावेळी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार
होता. परंतु या कराराची कधीच पुष्टी होऊ शकली नव्हती, कारण लोंगोवाल यांची
हत्या काही शिख कट्टरवाद्यांकडून करण्यात आली होती. हे कट्टरवादी या
कराराच्या विरोधात होते. हा वाद 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत जारी होता.
चंदीगड हे अंबाला जिल्हय़ाचा हिस्सा असल्याचे म्हणत हरियाणाने स्वतःचा
दावा कायम ठेवला आहे.
हिमाचलचाही दावा
हरियाणा अन् पंजाबसह हिमाचल प्रदेशनेही 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने
दिलेल्या निर्णयाच्या आधारावर चंदीगडवर दावा केला होता. पंजाब पुनर्रचना
अधिनियम 1966 च्या आधारावर चंदीगडच्या 7.19 टक्के भूमी प्राप्त करण्याचा
अधिकार हिमाचल प्रदेशला आहे. चंदीगड हे शहर आर्थिक, सांस्कृतिक आणि
धोरणात्मक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण आहे. हरियाणात गुरुग्राम आणि फरीदाबाद
यासारखी मोठी अन् आर्थिकदृष्टय़ा संपन्न शहरे आहेत. तर पंजाबची आर्थिक
स्थिती खालावलेली असल्याने हे राज्य चंदीगडवरील स्वतःची पकड मजबूत करू पाहत
आहे.
– संकलन – उमाकांत कुलकर्णी
बॅग पॅकर्स – करेरी लेक ट्रेक
>> चैताली कानिटकर
करेरी लेक हा छोटासा परंतु साहसाचं दर्शन घडवणारा ट्रेक. इथल्या
पर्वतराजीत निसर्गसौंदर्यासोबतच अध्यात्माचा शांत अनुभव देणारा हा ट्रेक
जरूर करावा असा आहे.
हिमाचल प्रदेशातील धौलाधार पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे
2,900 मीटर उंचीवर वसलेले करेरी लेक हे ठिकाण केवळ निसर्गसौंदर्यासाठीच
नव्हे, तर त्याभोवती गुंफलेल्या आध्यात्मिक कथांसाठीही प्रसिद्ध आहे.
स्थानिक गद्दी जमातीमध्ये अशी आख्यायिका प्रचलित आहे की, या सरोवराच्या
पाण्यात शिवशंकराचे आशीर्वाद आहेत. धौलाधार पर्वत म्हणजेच शिवशंकरांचे
निवासस्थान मानले जाते. एकदा ध्यानस्थ बसलेल्या शंकरदेवांनी आपल्या
जटांमधून निघालेल्या जलधारेने हे सरोवर निर्माण केले, अशी लोकांची श्रद्धा
आहे. करेरी लेकचे पाणी वर्षभर अतिशय स्वच्छ व निर्मळ असते. स्थानिक लोक
म्हणतात की, “या सरोवरात खोटेपणा टिकत नाही.” जे मन, विचार आणि हेतू शुद्ध
ठेवून येथे येतात, त्यांना मानसिक शांतता लाभते.
आपल्याकडे कमी अवधी असेल आणि कमी दिवसात ट्रेक करायचा असेल तर या
ट्रेकचा पर्याय निश्चितच निवडता येईल. एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर,
नोव्हेंबर या महिन्यांत हा शॉर्ट ट्रेक करता येतो. याची उंची फक्त 9700
फूट आहे. पहिल्या दिवशी धरमशाला ते करेरी गावापर्यंत गाडीने प्रवास आणि
नंतर गावातून करेरी तलावाच्या मार्गावर लियोती येथे पहिली कॅम्प साईट
लागते.
करेरी गाव 25 किमी अंतरावर असून गावात पोहोचण्यासाठी दोन तास लागतात.
गावात पोहोचल्यावर संपूर्ण टूरचा थोडक्यात आढावा घेऊन पुढे भटकायला आपण
मोकळे होतो. करेरीतील स्थानिक लोक गद्दी जमातीचे आहेत. इथे त्यांच्या
दैनंदिन जीवनशैलीची झलक अनुभवता येते. इथून पाइन, देवदार आणि रुंद
पानांच्या मिश्र जंगलांमधून आपला ट्रेक सुरू होतो. येथे दाट जंगल आहे.
त्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते. मुख्य कारण म्हणजे या मार्गावर पाइन
सुया पसरलेल्या असतात. त्यामुळे या वाटा काहीशा निसरड्याही झालेल्या असू
शकतात. मात्र लियोती कॅम्प साईटकडे जाणारा मार्ग खूपच निसर्गरम्य आहे.
वाहत्या नदीवरून चालत, मध्ये लागणारे पूल ओलांडत जावे लागते. काही ठिकाणी
दगडी वाटांवरूनही चालावे लागते. वाटेत धबधबा आणि छोटे छोटे झरे लागतात. या
भटकंतीत फिजंट्स आणि ब्लू मॅग्पीसारखे स्थानिक पक्षी दिसू शकतात.
लियोती
कॅम्प साईट 8,000 फूट उंचीवरील अल्पाइन गवताळ प्रदेशात आहे. इथेच रात्रीचे
कॅम्पिंग असते. दुसऱया दिवशी करेरी तलावाकडे जाणारा ट्रेक करावा लागतो.
पाइन वृक्षांमधून हा ट्रेक करताना हिमालयाचे सुंदर दृश्य दिसते. सुरुवातीला
थोडं चिखलातून चालत जाताना नंतर खडकाळ भाग सुरू होतो. या डोंगराळ भागातून
जाताना न्युंड नाला नावाच्या ओढ्यावरून चालत ही चढाई करावी लागते. या चढाईत
ओढ्याच्या उगमापर्यंत म्हणजे करेरी तलावापर्यंत पोहोचेताना प्रवाह वाढत
जातो. इथे कांगडा प्रदेशातील भटक्या गद्दी मेंढपाळ जमातीने बांधलेल्या
गद्दी झोपड्या दृष्टीस पडतात. या झोपड्या म्हणजे तात्पुरत्या निवारा असतात.
मेंढपाळ त्यांच्या गुराढोरांसह इथे काही काळासाठी वस्ती करतात.
नदीच्या काठावरील वाट तलावापर्यंत पोहोचवते. तेथील पाणी स्फटिकासारखे
स्वच्छ आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे. येथून धौलाधर पर्वतरांगांची विलोभनीय
दृश्ये दिसतात. तलावाजवळ एक शिवमंदिर आहे. तेथे दर्शन घेऊन, तलावाची शांतता
अनुभवून लियोटी कॅम्प साईटकडे उतरण्यास सुरुवात होते. हा मार्ग अल्पाइन
कुरणांमधून आणि घनदाट जंगलांमधून जातो. या मार्गात निसर्गदृशंमधील बदल
अनुभवताना खाली असलेल्या दरीची झलकही दिसते. आपण लियोतीला पोहोचेपर्यंत,
दरी मावळत्या सूर्याच्या सोनेरी रंगात न्हाऊन निघते.
रात्रीच्या शांत कॅम्पिंगनंतर ताजेतवाने करणारा दिवस सुरू होतो. करेरी
गावात उतरण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर अनुभवण्यासाठी आणि पर्वतीय शांततेत
रमण्यासाठी थोडा वेळ मिळतो. करेरी गावात उतरण्याचा मार्ग सुमारे 7 किमी आहे
आणि तो पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात. वर जाताना आपण ज्या
निसर्गरम्य वाटेने गेलो होतो, त्याच वाटेने उतरण आहे.वाट हळूवारपणे खाली
वळत जाते. करेरीहून आपण धर्मशाळेला परत गाडीमार्गाने येतो, जे सुमारे 25
किमी अंतरावर आहे. संध्याकाळी 5ः30 वाजेपर्यंत धर्मशाळेला पोहोचत हा ‘शॉर्ट
बट स्वीट’ ट्रेक पूर्ण होतो. chaitalikanitkar1230@gmail.com
अरूण- हवाई आणि अलास्का
सामना ऑनलाईन
2–3 minutes
एखाद्या देशाचा भाग प्रमुख भूभागापासून दूर असणं ही
तशी भूगोलावर क्वचित आढळणारी स्थिती. बहुतेक सर्व देशांचे भूभाग सलग असतात.
परंतु एकेकाळची युद्ध, वसाहती यातून काही देशांचे भूभाग मुख्य भूमीपासून
दूर असणं सुरू झालं. विशेषतः युरोपीय देशांच्या वसाहतवादाच्या काळात
त्यांच्या पूर्वेकडील वसाहती (कालनी) त्यांच्या अधिपत्याखाली असल्या तरी
त्यांच्या मुख्य देशापासून त्या हजारो किलोमीटर दूर होत्या. पंधराव्या
शतकाच्या युरोपीय वसाहतवादाने जगभर या पद्धतीने धुमाकूळ घातला. वैज्ञानिक
संशोधनातून निर्माण झालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी
हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशालाही अंकित केले आणि आकाराने
हिंदुस्थानच्या टीचभरही नसलेल्या इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया आपल्या
देशाची ‘सम्राज्ञी’ म्हणून मिरवली.
कालांतराने वसाहतवाद संपला. विविध देश पाश्चात्यांच्या जोखडाखालून मुक्त
आणि स्वतंत्र झाले. मात्र हिंदुस्थानची फाळणी घडवून इंग्रजांनी पाकिस्तान
नावाच्या देशाच्या निर्मितीला मदत करून हिंदुस्थानच्या पूर्व आणि पश्चिम
भागातला दोन दूरस्थ भूप्रदेशांचा एक देश निर्माण व्हायला मदत केली.
कालांतराने त्यातला पूर्वेचा भाग वेगळा होऊन त्याचा स्वतंत्र बांगलादेश
बनला हा इतिहास आपण जाणतो.
मात्र मूळ भूभागापासून दूर असलेली बेटं किंवा प्रदेश अनेक देशांचे भाग
असतात. आपल्याकडे अंदमान, निकोबार, लक्षद्वीप वगैरे द्वीप आहेतच.
अमेरिकेकडे तर पासिफिक सागरातील आणि मूळ अमेरिकन म्हणजे यूएसच्या
भूभागापासून 3200 किलोमीटर दूरवरची हवाई बेटं हा अमेरिकेचा भाग असून त्याला
पूर्ण राज्याचा दर्जा लाभला.
तीच गोष्ट पानडाच्या पश्चिमेला आणि अमेरिकन भूभागाला सलग नसलेला अलास्का
हा मूळ रशियन प्रांत अमेरिकेने (यूएस) 1867 मध्ये चक्क 70 लाख डालरला विकत
घेतला आणि अमेरिकेचे भाग्य फळफळले. 1 लाख 58 हजार 800 चौरस कि.मी.
विस्तारलेला अलास्का हे अमेरिकेचे राज्य म्हणून घोषित झाले ते 1959 मध्ये.
तर हवाईच्या 3200 बेटांना तो दर्जा 1969 मध्येच मिळाला. जगातील अनेक देश
ऐतिहासिक किंवा व्यापारी कारणांनी दूरस्थ आणि भिन्न संस्कृतीच्या देशांवर
राज्य करतात. आताही ट्रम्प यांना पानडा, ग्रीनलाण्ड वगैरे देशांची अभिलाषा
आहेच!
नवलच! रेल्वे रूळांचे ‘गेज’
सामना ऑनलाईन
~3 minutes
>> अरुण
मुंबईतल्या आमच्या घरालगत देशातली 1853 मध्ये सुरू झालेली ट्रेन आधुनिक
रूपात अव्याहत धावत असते. या ट्रेनखालचे हे ‘ब्राडगेज’ अंतराचे रूळद्वय
अनेकदा बदलले गेले असले तरी ट्राक म्हणजे मार्ग 1853 मध्ये होता तोच आहे.
इंग्लंडमध्ये प्रवासी रेल्वे 1825 मध्ये सुरू झाली, तर हिंदुस्थानात 16
एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे अशी रेल्वे आगगाडी धावली. त्याकाळी (आणि
नंतरही सुमारे 100 वर्षे) दगडी कोळशाच्या वाफेवर चालणारी अजस्र इंजिनं
आम्ही बालपणापासून पाहत आलो. देशात अशी प्रवासी रेल्वे आणण्याचा ध्यास आपले
मराठी, दानशूर, समाजहितैषी असलेले जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे
यांनी घेतला होता. देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या समितीवरही ते
होते. एवढेच नव्हे तर ठाकूरद्वारच्या त्यांच्या हवेलीतच ग्रेट इंडियन
पेनिन्सुला रेल्वे तथा जीआयपी (आर) रेल्वे कंपनीचं कार्यालय होतं असं
सांगितले नाते.
Geographic Reference
1825 मध्ये इंग्लंडमध्ये स्टाकटन-डार्लिंगटन रेल्वे सेवा सुरू झाली
तेव्हा दोन रूळातलं अंतर 4 फूट 8 इंच होतं. त्यानंतर 1830 मध्ये
लिव्हरफूल-मान्चेस्टर लाइन कार्यान्वित झाली तेव्हा हे अंतर 4 फूट साडेआठ
इंच (1435 मिलिमीटर) करण्यात आले आणि त्याला ‘स्टाण्डर्ड गेज’ म्हटलं गेलं.
नंतरच्या काळात त्यामध्ये ट्रेनला स्थैर्य येण्यासाठी आयझेम्बर्ड ब्रुनेल
यांनी 7 फुटांचं ‘ब्राड गेज’ अंतर ठरवलं. नंतर त्यात 1/4 इंचाने सुधारणा
होऊन आताचं 2140 मिलिमीटरचं ‘ब्राड गेज’ सर्वमान्य झालं.
4 फुटांच्या स्टाण्डर्ड गेज रेल्वे रूळांना ‘नारो गेज’सुद्धा म्हटलं
जायचं. त्याशिवाय काही देशांत दोन रूळांमध्ये 5 फूट अंतर असलेलेही रूळ
टाकण्यात आले. शेवटी ‘ग्रेट वेस्टर्न (युरोपीय) रेल्वे’चं ‘ब्राड गेज’
अंतरच बहुतेकांनी स्वीकारलं. याशिवाय 3 फुटांचं गेज (914 मिमी.), मीटर गेज
(1000 मि.मी.), केप गेज (10,67 मि.मी.), स्टाण्डर्ड गेज (1435 मि.मी.),
रशियन गेज (1520 मि.मी.), पाच फुटी गेज (1524 मि.मी.), आयरिश गेज (1600
मि.मी.), आयबेटियन गेज (1668 मि.मी.) आणि इंडियन गेज (1676 मि.मी.) व
मीडियम गेज असे रेल्वे रूळांच्या ‘गेज’ (अंतराचे) प्रकार आहेत. 3 फूट 6
इंचाचे ‘गेज’ असल्यास त्याला ‘केप गेज’ म्हटलं जातं.
आपल्या देशात आता सर्वत्र साडेपाच फूट रूंदीचे (1676 मि.मी.) रेल्वे
ट्राक असतात, तर मेट्रोसाठी 1435 मि.मी. ‘गेज’चे स्टाण्डर्ड ट्राक वापरतात.
माथेरानच्या प्रसिद्ध रेल्वेचा ट्राक केवळ 2 फूट रूंदीचा असून हा मार्ग 21
किलोमीटर ‘टाय ट्रेन’चा आहे. तो 1901 मध्ये तो पिरभाय यांनी सुरू केला.