Thursday, December 22, 2022

महाराष्ट्रातील मंदिरे व प्रेक्षणिय स्थळे ब्लॉग बॅकअप

 http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com/2015/10/blog-post_6.html

जगातील सर्वोत्तम शि‍वस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम

जगातील सर्वोत्तम शि‍वस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम

महाराष्ट्रातील शिवस्मारक अद्याप कागदावरच राहिलेले आहे. दूर आंध्रप्रदेशात मात्र ३० वर्षांपूर्वीच भव्य स्मारकाचे भूमीपूजन होऊन ते आज अभिमानाने उभे आहे!
ना बड्या घोषणा, ना मोठ्या वल्गना. नाहीत निवडणुकीच्या मोसमातील शिवप्रेमाचे पोकळ उसासे. तरीही केवळ शिवभक्तीच्या ध्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एक (आजच्या मितीला तरी) भव्य राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्रात नव्हे, तर दूर आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्याच्या जंगली पट्ट्यामध्ये आज साक्षात उभे राहिले आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मंदिराच्या पुरातन भिंतीजवळच या अपूर्व शिवस्मारकाची उभारणी मोठ्या कष्टाने मराठी नव्हे तर तेलगु बांधवांनी केली आहे हे विशेष! आजच्या बांधकाम सामुग्रीचा विचार करता या स्मारकाचे मूल्य दोनशे कोटींच्या वर जाईल. हैदराबादपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर नलमलाई पर्वताच्या रांगांमध्ये आणि घनदाट अरण्यात असे भव्य स्मारक उभारण्याची ज्योत एखाद्याच्या हृदयात पेटावी हेच खरे नवल. १९७४ मध्ये जेव्हा रायगडावर शिवराज्याभिषेकाचे तीनशेवे वर्ष साजरे केले जात होते तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींसह रायगडावर जमलेल्या लाखोंच्या मेळ्यात मोरोपंत पिंगळे या ऐतिहासिक नावाच्याच एका तेलुगु शिवप्रेमी इसमाच्या डोक्यात ही ठिणगी पडली.
मूळ नागपूरवासी मोरोपंतांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते या धर्मकृत्यासाठी सोबत घेतलेच, शिवाय श्री. टी. जी. व्यंकटेश हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि रायलसीमा केमिकल्स या उद्योग समूहाचे कारखानदार तसेच कै. जी. पुलारेड्डी अशी अनेक पक्षांचे आणि धर्मीयांचे बळकट हात या महान कार्यासाठी एकत्रित आणले. या तेलुगु बांधवांनी 'शिवाजी स्फूर्ती केंद्रम' या संस्थेची प्रथम स्थापना केली. १९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या दोघांना त्या पवित्र क्षेत्री पाचारण केले. त्यांच्याच हस्ते स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक साकारणाऱ्या आणि महाबलीपुरम येथील स्थापत्य शास्त्र कॉलेजचे प्राचार्य असलेल्या श्री गणपती सत्पथी त्यांच्या खनपटीला अहोरात्र बसून या शि‍वस्मारकाचा सुंदर आराखडा बनवून घेतला.
या राष्ट्रीय स्मारकाचा तळमजला पंचाहत्तरशे स्क्वेअर फूट असून तेथे शस्त्रागारांची व चित्रकलेची अनेकदा प्रदर्शने भरविली जातात. पहिल्या मजल्यावरचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा दरबार हॉल केवळ नावातच नव्हे तर प्रत्यक्ष रूपात 'दरबार हॉल' आहे. या स्मारकाची उंची ब्याऐंशी फूट असून वरच्या नक्षीदार घुमटाची उंची अठ्ठेचाळीस फुटांची आहे. या मंडळींनी मुंबईत येऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रोफेसर एन. पी. खानविलकरांना गाठले होते. त्यांच्याकडून शि‍वरायांचा सिंहासनाधिष्ठित बारा फूट उंचीचा ब्राँझचा सुंदर पुतळा घडवून घेतला. तो चार फुटी चबुतऱ्यावर बसवला गेला आहे. त्या दरबार हॉलमधील शिवपुतळ्याच्या आजूबाजूचे भव्य खांब, वरचा देखणा छत, अनेक धातूंतून बनवलेले पुढचे दोन खूर उंचावत दिमाखात उभे ठाकलेले बारा अश्व हा स्फूर्तीदायी प्रकार मुळातून पाहण्यासारखा आहे. दरबार हॉलच्या चारी भिंतीवर शिवचरित्र कथन करणारी सुमारे साठहून अधिक भव्य रंगीत चित्रे आहेत. त्या प्रत्येक चित्राखाली अभ्यागतांसाठी इंग्रजी, हिंदी ‌आणि तेलगु‌मध्ये त्या त्या प्रसंगाची नेमकी आणि नेटकी वर्णने केली आहे.
गोवळकोंडा जिंकून, राजांनी मार्च १६७७ मध्ये भागानगर (आताचे हैदराबाद) सोडले. ते तिरुपती मार्गे जिंजीकडे (आताच्या तामिळनाडूमध्ये) निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत वीस हजारांचे घोडदळ आणि तीस हजार पायदळ अशी चतुरंग सेना होती. आत्माकपूरच्या तळावर आपला मुख्य फौजफाटा ठेवून ते मर्यादित सड्या फौजेनिशी मलय पर्वतावरील श्रीशैलमकडे आले. बाजूच्या नदीमध्ये स्नान करून शिवरायांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. एप्रिल १६७७ मध्ये राजांचा तिथे सलग नऊ दिवस मुक्काम होता. तिथला निसर्गदेवतेचा अजब नजारा पाहून राजे इतके प्रसन्न आणि प्रभावित झाले की, त्यांनी हा दुसरा कैलासच आहे असे धन्योद्गार काढले. आज हैदराबादवरून श्रीशैलम दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. पाऊणशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर नीलपर्वताच्या मोठ्या रांगा आणि दुतर्फा घनदाट राखीव जंगल लागते. श्रीशैलम जवळ येताच अचानक घोड्यावरून खाली उडी ठोकावी तशी एक खोलगट दरी लागते. तेथेच श्रीशैलसागर हे धरण डोंगराच्या खोबणीमध्ये बांधले गेले आहे. ते पार केले की उंचवट्यावर श्रीशैलम लागते.
आजसुद्धा इथली निसर्गराजी मनाला भुरळ घालते. तो शांत आणि पवित्र परिसर पाहून शिवरायांना विरक्ती आली होती. शिवरायांनी त्या प्राचीन मंदिराच्या उत्तरेस स्वखर्चाने एक भव्य गोपुरम बांधून कढले आहे. त्याचा 'शिवाजी गोपुरम' असा आज उल्लेख केला जातो. ह्याच चिरेबंदी भव्य कमानीतून कार्तिक महिन्यामध्ये दीप पूजनासाठी भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. राजांच्या आगमनापूर्वीच त्यांच्या अनुयायांनी तेव्हा याच परिसरात घाईने एक 'ध्यानमंडपम्' नावाची टोलेजंग वास्तू बांधून काढली होती. ती कालौघात पडून गेली आहे. मात्र त्या ध्यान मंदिराचे एक जुने छायाचित्र शिवाजी स्फूर्ती केंद्राकडे उपलब्ध आहे. आता तसेच ध्यानमंदिर नव्याने बांधायचा या मंडळींनी संकल्प सोडला आहे.
शि‍वस्मारकाच्या शेजारीच आवारात स्मारक समितीने 'शिवाजी अतिथी भवन' नावाचे तीन मजली मोठे गेस्टहाऊस बांधले आहे. त्यामध्ये साठ खोल्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आवारात एक सुसज्ज ग्रंथ विक्री केंद्र, आयुर्वेदिक औषधींचे प्रदर्शन अशा बऱ्याच सोयी आहेत.
शि‍वराय आणि त्यांचे सुपुत्र संभाजी व राजाराम या तिघांनीही दक्षिणेत कोलार, चिकमंगळूर, जिंजी, तंजावर, बेंगलोर ते त्रिचन्नापल्ली अशा विस्तीर्ण भूप्रदेशात तलवार गाजवली होती. औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या छाताडावर बसला होता. तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी शि‍वपुत्र राजाराम गोसाव्याचे रूप घेऊन सातशे मैल दक्षिणेत चालत गेले आणि आजच्या चेन्नई जवळ जिंजी येथे त्यांनी राज्य स्थापन केले हा वास्तव इतिहास आहे. शिवरायांचे महाराष्ट्रात कुठे नाही असे भव्य स्मारक दक्षिणेत व्हावे ही खूपच मंगलमय घटना आहे.
शि‍वरायांनी स्वखर्चाने गरीब यात्रेकरूंसाठी श्रीशैलम येथे अन्नछत्र बांधले होते. ते पुढे अनेक दशके सुरू होते. येथील नलमलाई पर्वतातील चांचू वनजमातींची अनेक गीते मी ऐकली. त्यामध्ये शिवरायांच्या श्रीशैलम भेटीचा गौरव आहेच.
दूर श्रीशैलमच्या जंगलातील शिवरायांचा तो दरबार पाहून मी जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा आमच्या भग्न रायगडाभोवतीची कावल्याची ऐतिहासिक खिंड, कोकण दिवा, लिंगाणा ही गिरीशिखरे आणि किल्ले माझ्या मनाभोवती गर्दी करत होती. शिवरायांच्या रायगडाचा जिर्णोद्वार बाजूला राहू दे किमान आजची गडावरची दुरवस्था तरी कधी संपणार आहे, हा मेलेला महाराष्ट्र रायगडासाठी तरी कधी जागा होणार आहे असे प्रश्न ते सर्वजण मला विचारीत होते.
महाराष्ट्र सरकारचे बहुचर्चित शि‍वस्मारक कधी पूर्ण व्हायचे असेल ते होवो. परंतु निस्सिम शिवभक्तीच्या ध्यासातून आणि कष्टत्यागातून आम्ही श्रेष्ठ असे राष्ट्रीय शिवस्मारक बांधू शकतो. इतिहासकारांच्या फळीला किंवा एखाद्या शासकीय कमिटीला न जमेल असे संपूर्ण सेतू माधवराव वाङ्मयाचे प्रकाशन करू शकतो, याचे अद्वितीय उदाहरण दूरदेशीच्या तेलुगु बांधवांनी घालून दिले आहे. मी इतिहासाच्या वेड्या शोधापायी आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकेपर्यंत जाऊन आलो आहे. मात्र श्रीशैलम येथील शिवस्मारकासारखे शि‍वरायांचे अन्य भव्य स्मारक मला तरी कोठेही पहावयास मिळाले नाही. ते निर्माण करणाऱ्या शि‍वप्रेमी तेलुगु बांधवांना मानाचा मुजरा!!
http://maharastrawonderbynikhilaghade.blogspot.com

 

श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)

श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना इ.स.१६९५ मध्ये राजाराम महाराजांनी केली होती. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांची जी मूर्ती आहे,  तिच्या डोक्यावर मंदिल आहे. पद्मासनावर बसलेली मूर्ती एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुडघ्यावर आहे. हातात कडे आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे.
या मंदिराच्या प्रशस्त सभा मंडप पुढे इ.स. १९०६ \ ०७ च्या मध्ये  छत्रपती शाहू महाराजांनी बांधला.
करवीर छत्रपतींच्या वतीने मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.
प्रवास अंतर :
मुंबई - सिंधुदुर्ग. 459 की.मी
पुणे - सिंधुदुर्ग. 356 की.मी
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !

छत्रपति शिवाजी महाराज , शंभूराजे आणि समस्त भोसले कुळाचे कुळदैवत
महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील
शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !
शिखर शिंगणापूरची स्थापना सिंघणराजे यादव (१२१० - ४७) या राजाने केली
म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे.
इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर
हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते .
हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते
तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.
साधारणतः २ एकर परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिराजवळ पोचण्यास जवळपास शेकडो पायऱ्या चढून जावे लागते.
पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून
मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी
आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना
भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन
मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत.
शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.
महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे.
या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत.
मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर
आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो.
इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे.
छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे
आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस
हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.
मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच
अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत
तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.
बळी महादेव
मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते.
या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.
मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे.
मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे.
मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो.
मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून
थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज
यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले.
यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत.
मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते
याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.
यात्रा :
१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते.
पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते.
हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते.
कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो.
देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात.
या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते.
द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते.
हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात
तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते.
द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.
गुप्तलिंग :
शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता
माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन
त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला
हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले
आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.
या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच
शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
अशा या ठिकाणास भेट देऊन या ठिकाणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव नक्कीच जाणून घ्या.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

अष्टविनायक : १ || श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||


  अष्टविनायक : १ 
|| श्री मयूरेश्वर (मोरगाव) ||

मोरेश्वर/मयूरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो.

 श्री मयुरेश्वर मंदिर :

मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्यादगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनीमनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून यादेवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५०फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे .
श्री मयुरेश्वराची मूर्ती :

 गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्तीबैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे.मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावरनागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूसऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

 आख्यायिका :

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावरउत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेरगणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असेनाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यालामोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत.असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्तीबनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली.म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.
सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचेमानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासूनबनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती,मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीलायेथेच ठेवण्यात आले.

 जाण्यासाठी मार्ग :
· पुण्यापासून मोरगाव, हडपसर-सासवड आणि जेजुरीमार्गे ६४कि.मी. वर आहे.
 पुणे-सोलापूर मार्गावर पुण्यापासून ५५ कि.मी. वर चौफुला गावआहे. तेथून मोरगावला जाता येते. चौफुला ते मोरगाव अंतर २३कि.मी. आहे.
 पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात.

जेवण्याची व राहण्याची सोय :

श्री माहेश्वरी भक्त निवास आहे. मेवाड भोजनालय या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था आहे. 

जवळील प्रेक्षणिय स्थळे :

१) पांडेश्वर :
पांडवानी बांधलेले पांडेश्वर मंदिर आहे. 
२)कऱ्हा नदी तीरावर जडभरताचे स्थान. 
नदीतीरावरील शिवमंदिर उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे.
३)जेजुरी :
श्री मल्हारी मार्तंड खंडोबाचे प्रसिद्ध स्थळ आहे.
४) लवथळेश्वर :
शिवमंदिर - जेजुरी पासून सुमारे २ कि.मी. अंतरावर आहे.
५) सासवड :
श्री संत सोपान महाराज समाधी.
६) नारायणपूर :
एकमुखी दत्ताचे मंदिर. शेजारीच नारायणेश्वरचे शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर.
 जवळच श्री बालाजी मंदिर तसेच पुरंदर किल्ला आहे 

|| गणपती बाप्पा मोरया ||
http;//maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

अष्टविनायक : २ || श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ||

 अष्टविनायक : २ 
|| श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ||

सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ.
अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकामधील दुसरा गणपती.

 इतिहास :

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.
हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती :

श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फुट रुंद आहे. मूर्ती उत्तराभिमुखी असून गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे.उत्तराभिमुखी असलेली या मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.

 भौगोलिक :

श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.

 जाण्याचा मार्ग :

सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरुन शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर नाव चालू असते.
·दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबच्या मार्गाने (नदी पार न करता) जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
·पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते.)

जवळील प्रेक्षणिय स्थळे :

१) पेडगाव :
भीमा नदीच्या तीरावर प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक किल्ला आहे.
२) राशीन :
झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर आहे.
३) रेहेकुरी :
प्राणी-पक्षी अभयारण्य आहे.
४) भिगवण :
पक्षी अभयारण्य आहे.
५) दौंड :
भैरवनाथ व श्री विठ्ठल मंदिर आहे.

|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

अष्टविनायक : ३ || श्री बल्लाळेश्वर (पाली) ||

 अष्टविनायक : ३ 
|| श्री बल्लाळेश्वर (पाली) ||

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचेदेऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.गणेश पुराणातअष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहेकी जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हागणपतीचा असीम भक्त होता.

 इतिहास :

नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतरकेले.

 श्री बल्लाळेश्वर मूर्ती :

श्री बल्लाळेश्वराची मूर्ती गाभार्यात पाषाणाच्या सिंहासनावर विराजमान आहे.मूर्ती अर्धगोलाकार असून तीन फूट उंचीची व डाव्या सोंडेची आहे.श्रीच्या मस्तकावर मुकुट आहे.श्रीच्या डोळ्यांत आणि नाभित जडवलेले हिरे मूर्तीवर सूर्याची किरणे पड़ताच झळाळून उठतात.श्रीच्या मागे चांदीची कलात्मक प्रभावळ असून रिद्धिसिद्धि त्यावर चवऱ्या ढाळीत उभ्या असलेल्या दिसतात.दुसऱ्या गाभार्यात चांदीने मढविलेला मूषक हातात मोदक घेतलेल्या अवस्थेत उभा आहे.

 श्री बल्लाळेश्वर मंदिर :

या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूसदोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्‍यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत.

 आख्यायिका :

विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्रीबल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. तर मुद्गलपुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथासांगितल्याचा उल्लेख आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबातबल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासूनध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेचकरायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपतीदूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतरबल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशादृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननानेविप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले वत्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपणयेथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात.तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली.बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धानपावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.

 जाण्याचा मार्ग :

बल्लाळेश्वर (पाली) हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे.पुण्यापासून ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोलीमार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.

  जेवण्याची व राहण्याची व्यवस्था :

गावात भोजन व्यवस्था नाही, आगावू सूचना दिल्यास गावातील रहिवासी घरगुती भोजनाची व्यवस्था करू शकतात.
येथील देवस्थानच्या भक्त निवासात निवासाची व्यवस्था आहे. तसेच दुपारी प्रसादाची व्यवस्था आहे.

 जवळची प्रेक्षणीय स्थळे :

१) सरसगड : मंदिराजवळील किल्ला.
२) सुधागड : किल्ला असून भृगू ऋषींनी स्थापन केलेले भोराई देवीचे मंदिर आहे.
३) सिद्धेश्वर : पालीहुन ३ की.मी. स्वयंभू शंकराचे स्थान.
४) उद्धर : पालीहुन १० कि.मी.श्री रामाने जटायुचा उद्धार केलेले स्थान.
५) उन्हेरे : पालिहुन ३ कि.मी. गरम पाण्याचे झरे असलेले स्थान.
६) पुई : येथे एकविस गणेश मंदिरे आहेत.
७) ठाणाळे : येथे कोरीव लेणी आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
  

अष्टविनायक : ५ || श्री चिंतामणी (थेउर) ||

 अष्टविनायक : ५ 
|| श्री चिंतामणी (थेउर) ||

चिंतामणी (थेउर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

 इतिहास :

गणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला 40 हजार रूपये लागले होते.युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27 वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिध्दी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.

 श्री चिंतामणी मंदिर :

श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे.त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत.हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.

 श्री चिंतामणी विनायक मूर्ती :

येथील चिंतामणी विनायकाची मूर्ती स्वयंभू आणि डाव्या सोंडेची आहे.चिंतामणीने मांडी घातलेली आहे.मूर्ती अत्यंत सुबक रेखीव आणि देखणी आहे.मूर्तीच्या डोळ्यांत माणिक-रत्न मढविलेली दिसतात.

 आख्यायिका :

ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली.गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.

 जाण्याचा मार्ग :

मुळा-मुठा नदींनी वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त ५ कि.मी. अंतरावर आहे.
हडपसर येथून थेऊर पी.एम.पी.एम.एल. ही शहरी बस सेवा आहे.

 जेवण्याची व राहण्याची सोय :

थेऊर येथे मंदिर परिसरात भक्तिनिवास आहे, तसेच खाजगी हॉटेल आहेत.

 जवळची प्रेक्षणीय स्थळे :

१) भुलेश्वर :
प्राचीन,शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले शिवमंदिर आहे.
२) केडगाव बेट :
श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्त मंदिर आहे.
३) रामदरा :
येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे.रामदरा हे निसर्गरम्य स्थळ आहे.
४) उरुळी कांचन :
म.गांधीनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे.
५) वाडे बोल्हाई मंदिर :
वाघोली-केसनंद मार्गावर हे मंदिर आहे.
६) तुळापुर :
भीमानदी काठी संगमेश्वर मंदिर व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे.
७) मरकळ :
आळंदी जवळ मरकळ येथे भिमानदी तीरावर विपश्यना केंद्र आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

अष्टविनायक : ६ || श्री गिरिजात्मज (लेण्याद्री) ||

 अष्टविनायक : ६ 
|| श्री गिरिजात्मज (लेण्याद्री) ||

गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हेदेऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकांमधील सहावागणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हाएकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. कुकडीनदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या याडोंगरात १८ गुहा आहेत.
त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेशलेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायरयाचढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एकाअखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेलेआहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्याडोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीचीमूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हाभाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदीवाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असाझाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समजआहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरलीआहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नांवपडले.

 गिरिजात्मज मंदिर(गुहा) :

पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते वत्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोरओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळचीलेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहातवैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स.पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंदआहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशीजलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ,सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्धगोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत.चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचारफूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे. सातवे लेणे थोडे उंचावरअसून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणं आहे. मंदिर यावास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टीनाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिरआहे.या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहाअशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंतप्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहाकोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.
या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाचमोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हेदेवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरीलसभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचाआधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांनावर्षभर पाणी असते.

 गिरिजात्मज विनायक मूर्ती :

गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली असून ती उत्तराभिमुख आहे.मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत.मूर्तीच्या नाभीत आणि भालावर अस्सल हिरे बसविलेले आहेत.मूर्तीच्या मागचा भाग लांबलचक आणि मोठया डोंगराने व्यापला असल्याने आपणास प्रदक्षिणा घालता येत नाही.येथील मुर्तीला इतर कोणतेही अलंकार नाहीत.

 आख्यायिका :

पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्याकेली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाबटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र)म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले.

 जाण्याचा मार्ग :

पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री असे एस.टी.बसने जाता येते.
पुणे येथील शिवाजीनगर एस.टी.बसस्थानकातून लेण्याद्री येथे जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.

 जेवण्याची व राहण्याची सोय :

देवस्थानातर्फे भोजनाची आणि निवासाची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे.

 जवळची प्रेक्षणीय स्थळे :

१) शिवनेरी किल्ला :
श्री छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ.
२) ओतूर :
पुरातन असे कपर्दिकेश्वर मंदिर आणि संत तुकाराम महाराज यांचे गुरु चैतन्यस्वामी महाराज यांची संजीवन समाधी
३) कुकडेश्वर् :
कुकडी नदीच्या उगमाजवळ कुकडेश्वर् मंदिर आहे.
४) माळशेज घाट :
अभयारण्य आणि थंड हवेचे ठिकाण
५) नाणेघाट :
प्राचीन राजमार्गावरील ऐतिहासिक घाट
६) कुकडी नदी :
या स्थानापासून सुमारे तीन कि.मी.अंतरावरुन वाहते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
माहिती संकलन-:निखिल आघाडे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

अष्टविनायका : ७ || श्री विघ्नहर (ओझर) ||

 अष्टविनायका : ७ 
|| श्री विघ्नहर (ओझर) ||

विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हेदेऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.

 इतिहास :

१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हेदेऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.

 श्री विघ्नहर विनायक मूर्ति :

या मुर्तीचे मुख पूर्व दिशेला असून मूर्ती पूर्णाकृती आहे.मांडीचेआसन घातलेली मूर्ती डाव्या सोंडेची आहे.मूर्तीच्या भाल-प्रदेशावर चमचमनारे हिरे जडवलेले आहेत.तसेच डोळ्यांत माणके आणि नाभित खडा जडविलेला आहे.डौलदार महिरपी कमानित मूर्ती विराजमान आहे.मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रिद्धि-सिद्धिच्या पितळी मूर्ती दिसून येतात.

 श्री विघ्नहर विनायक मंदिर :

विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतीलगाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षकभिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.

 आख्ययिका :

राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळेभयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूरराक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्याससांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्नआणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्तकरण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतरविघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजाकेली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूरानेगणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नावभक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची हीविनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावानेवास्तव्य करू लागला.

 जाण्याचा मार्ग :

पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थाननारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे.

 उत्सव :

त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो.गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.

 जेवण्याची व राहण्याची सोय :

१) मंदिरासमोर एक धर्मशाळा आहे.
२) देवस्थानचे "भक्तभवन" आहे.भक्तगणांसाठीखास स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे.

 जवळील प्रेक्षणीय स्थळे :

१) भीमाशंकर :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, हे निसर्गरम्य क्षेत्र ही आहे.
२) आर्वी :
येथे उपग्रह केंद्र आहे.
३) खोडद :
येथे आशिया खंडातील सर्वात मोठी आकाश निरिक्षण दुर्बीण बसवलेली आहे.
४) आळे :
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडयाच्या मुखातून वेद वदवून आपले अलौकिकत्व सिद्ध केले,त्या रेडयाची समाधी येथे आहे.
|| गणपती बाप्पा मोरया ||
माहिती संकलन-:निखिल आघाडे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

यमाई देवी मंदिर औंध

महाराष्ट्राची कुळस्वामिनी
आदिशक्ती आई यमाई देवी मंदिर
मूळपीठ डोंगर, औंध
श्री यमाची देवीची मंदिर महाराष्ट्रात अनके ठिकाणी आहेत परंतु औंध मधील हे मंदिर मूळपीठ आहे.
यमाई देवीचे देवस्थान औंध च्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे.
भक्त जणांवर चाललेला औंधसुराचा अन्याय दूर करण्यासाठी जोतीबा चालून आले
परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली
तेव्हा जोतिबांनी श्री यमाई ची मदत घेऊन औंधसुराचा वध केला आणी जनतेस भयमुक्त केले.
आणी तेह्वाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली,
आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
श्री मातेचे मंदिर औंधच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरमाथ्या वर वसले आहे.
मंदिरा सभोवतालचा परिसर हा निसर्गरम्य आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे.
पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते आणी
पुढे अंतर-अंतरावर दोन्ही बाजूंस संगमरवरात कोरलेली हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल
यांची शिल्पे पहावयास मिळतात तसेच डोंगरात असलेले गणेश मंदिराचे दर्शन होते.
मंदिराजवळ पोहचण्यआधी मध्ये पठारावर उजव्या बाजूस सुप्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते.
हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून यामध्ये
अनेक चित्रकृती, शिल्पे आणी पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
पुढे पायरी मार्गाने मंदिराकडे प्रस्थान करताना पुन्हा दोन्ही बाजूस गरुड व हनुमान
यांची संगम्राव्रातील शिल्पे आणी पुढे नजरेस पडतो.
भक्कम तटबंदी असलेल्या या किल्ल्यात श्री यमाई देवीचे मंदिर आहे.
मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे.
तटबंदिस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब
येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट
श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीची
काळ्या पाषाणात घडविलेली आणी कमळात स्थित असलेली मूर्ती आहे.
मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले.
म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे.
यात्रा: पौष महिन्यात पौर्णिमेस देवीची यात्रा भरते. यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.
श्री यमाई देवी मंदिर (मूळपीठ): औंध गावात देखील देवीचे भव्य मंदिर आहे.
या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून या मध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी
आपल्या कुंचल्यातून चितारलेली पुरानातील घडामोडींची तैलचित्रे आहेत.
मंदिराच्या अवरमध्ये असलेली दीपमाळ हि राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आसे बोलले जाते.
या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी याच्या कलाकृती आहेत.
यात्रा: पौष महिन्यात पौर्णिमेस देवीची यात्रा भरते.
यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.
मोकळाई मंदिर: औंध गावामध्ये असलेल्या तळया शेजारी असलेले हे मंदिर
जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे. जेव्हा यमाई मातेने औंदासुराचा वाढ केला
तेह्वा झालेल्या युद्ध जखमांचा दाह देवीस असह्य झाला तेह्वा मातेने
येथील तळ्यात आपलेकेस मोकळे सोडून जलविहार केला आणि दाह शमविला,
यामुळे या ठिकाणी देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली.
तळ्यातील पाणी पवित्र आहे आणि शरीरावरील रोग नाहीसे करतो आसे मानले जाते.
अंतर: सातारा पासून ४८ किमी, वडूज पासून १९ किमी, दहिवडी पासून ३८ किमी
कसे जाल: औंध येथे जाण्यासाठी वडूज, दहिवडी, सातारा या ठिकाणांपासून पासून बसेस उपलब्ध.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

या मंदिराचे वैशिष्ट :

जगातील सर्वात उंच भव्य-दिव्य दगडी दीपमाळ !
आपल्या 'औंध' मधे यमाई मंदिरात आहे
मराठा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ही दगडी दीपमाळ
औंध गावातील यमाई मंदिरासमोर असून तिची उंची तब्बल ६५ फूट आहे...
आकाशाला गवसणी घालणारया दीपमाळेला तोडण्याचे धाडस
क्रुरकर्मा अफझलखानालाही झाले नाही ..त्यालाही या दीपमाळेची भुरळ पडली ..
असा उल्लेख बाँम्बे गॅझेटिअर मधे आढळतो
दीपमाळेवरील पायरया अथवा दीपप्रज्वलनाच्या जागा
ह्या पक्षाच्या आकारात कोरल्या असून या दीपमाळेचा वापर उत्सवप्रसंगी अजूनही केला जातो.

कृष्णा- कोयना व शिवगंगा यांचा त्रिवेणी प्रितीसंगम...

कृष्णा- कोयना व शिवगंगा यांचा त्रिवेणी प्रितीसंगम...
कराडचा प्रितीसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे.
उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत
जातात.
असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पर कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.
तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच...
महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक,
थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही.
हिला घाई असते ती घाटांवर यायची. तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची.,
तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर...
डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे.,
प्रतापगड, मकरंदगड, आणि वासोटा, जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार...
पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते.
तर अश्या या दोघी. अगदी भिन्न
स्वभावाच्या पण सख्या बहिणी.
जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना.
उस शेती पिकवणारी कृष्णा,
तर भात पिकवणारी कोयना.
वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा,
तर प्रतापगडच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना.
पण कराडला आलेवर दोघीँचाही ऊर दाटून येतो आणि धावत येवून दोघी एकमेकांना अलिँगन देतात.
"उत्तर भारतात जे स्थान गंगा यमूनेला तेच महाराष्ट्रात कृष्णा- कोयनेला, आणि कराड म्हणजे इथले प्रयाग."
कृष्णेचा किँवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणूस सहसा करत नाही. आपण नेहमी "कृष्णा कोयनाच" म्हणतो.
उदा. महाराष्ट्र गितातील हे कड्व,
"रेवा, वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी,
एक पणाच्या भरती पाणी,
मातीच्या घागरी,
किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता.-
कशासाठी पोठासाठी, देशासाठी - देशासाठी.
गंगा आणि गोदावरीसाठी, कृष्णा- कोयना यांच्यासाठी.
याच कराडच्या प्रितीसंगमात शिवप्रभूंनी व त्यांच्या मावळ्यांनी अफजल्याच्या वधानंतर शस्त्रे धुतले.
यामुळे कृष्णा कोयना व शिवगंगा असा त्रिवेणी प्रितीसंगम झाला.
हा परिसर इतका सुंदर आहे की आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहीते ते यशवंतराव चव्हाणांपर्यँत पण यांच्या सौँदर्याला भुलले.
याच संगमावर कराडची ग्रामदेवी आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी व शिवप्रभूस्थापीत आई जगदंबा तुळजा भवानीचे मंदीर आहे. तसेच यशवंतराव
चव्हाण यांची समाधी आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी " राजा शिवछत्रपती व शेलार खिँड " मध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे सुरेख वर्णन केले आहे.
या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रुप दिसते. तर पावसाळ्यात याचे रौद्र रुप दिसते.
मराठी मानसाने निदान एकदा तरी कराडच्या या प्रितीसंगमाचे दर्शन घ्यावे...
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

सिद्धेश्वर कुरोली

सिद्धेश्वर कुरोली
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेले सिद्धेश्वर कुरोली म्हणजे
महादेवाचे जागृत शिवलिंग आणि त्यावरील ११ धारी पत्रातून होणार शिवनाद ...
कुरोली सिद्धेश्वर हे गाव खटाव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण
सातारा शहरापासून ५० कि.मी च्या अंतरावर आहे
प्रभू रामचंद्र वनवासात असताना ते दंडकारण्यातील रामेश्वर या डोंगरावर राहीले होते.
त्यांनी दैत्यांचा नाश करुन भूमि सुफलाम् केली .त्यामुळे जनता भयमुक्त झाली.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ निघून गेला.देशात बहामनी राज्य आले.दुहीमुळे त्याचे भाग झाले.
त्यापैकी विजापुरच्या आदिलशाहीखाली हा कुरोली भाग आला.
सतराव्या शतकात कुरोली येथिल भाविक देशमुखास शंकराचा दृष्टांन्त झाला की,
'मी येथे प्रगट होत आहे,तरी मला वर काढावे.त्यानुसार जमिन नांगरत असताना नांगराच्या फाळाला रक्त लागल्याचे आढळले.
त्यानंतर ती जमिन खोदण्यात आली व त्या ठिकाणी पिंड निघाली.तोच हा श्री सिद्धेश्वर होय.
वेदावती गंगेत विलीन होणाऱ्या ओढ्याकाठी या पिंडीची स्थापना करुन छोटेसे मंदिर बांधले गेल.
नंतर छत्रपति शंभूराजे पुत्र शाहू महाराजांतर्फे मंदिराचा जीर्णोद्धार झाला
सद्गुरु दामोदर महाराजांचे शिष्य श्री शिवभक्त नारायण गणेश देशपांडे यांनी
'श्री सिद्धेश्वरमहात्म्य' हे अध्यायी ओवीबद्ध् पुस्तक रचून प्रकाशित केले आहे.
सिद्धेश्वराची मोठी यात्रा दरवर्षी कार्तिक पौर्णिमा ला होते ,
त्यावेळेस गावातील लांबवर पसरलेले ग्रामस्थ तसेच सिद्धेश्वरचे भक्त समस्त साताऱ्यातून दर्शनासाठी येतात
आणि रथोत्सव सोहळा पाहून जातात ....
अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत गावातील हिंदू तसेच मुस्लिम महिला हि उपवास धरतात
हे एक वैशिष्ट्य येथे पाहायला मिळते ..... तसेच सिद्धेश्वर हा आमचाही देव आहे असे मुंस्लीम बांधव अभिमानाने म्हणतात ....
दक्षिणेसी शुकस्थान । दुजें कुरोली सिद्ध जाण ।
शीवनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ||
----------- गोंदवलेकर महाराज
गावाची वैशिषटये:-
१)जागृत शिवालिंगातुन येणारा शिवनाद.
२)यशवंत बाबा महाराजांची समाधी
३)क्षेत्रफळानुसार मोठे गांव
४)प्रसिद्ध मराठी सिनेकलाकार दिवंगत राजा गोसवीचे यांचे जन्मगांव
५)सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गांव
६) दारूबंदी साठी प्रसिद्ध असे गाव
७) किर्तन केसरी ह.भ.प. श्री विलासबुवा गरवारे ह्यांचे गाव
गावातील धार्मिक स्थळे :-
१) श्री सिद्धेश्वर स्वयंभू शिवलिंग आणि त्यातून होणारा शिवनाद
२) सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराजांचे निर्वाण स्थळ
३) ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित राम मंदिर
४) विठोबा - विरोबा मंदिर ५) हनुमान मंदिर ६) कुर्लेश्वर मंदिर ७) हनुमान मंदिर
८) खंडोबा मंदिर ९) मशीद १०) दत्त मंदिर अशी जुनी धार्मिक स्थळे आहेत.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी

|| तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी ||
करमाळ्याच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवरील मंदिरातील करमाळ्याची आराध्य देवता श्री कमलाभवानी माता ही महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते . १७ व्या शतकामध्ये मराठा सरदार व तुळजाभवानीचे उपासक राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यामध्ये कमलाभवानी मातेचे वैशिष्ट्यपुर्ण मंदिर बांधकाम व देवीची प्रतीष्टापना करण्यात आली आहे.
कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजे रावरंभा निंबाळकर यांच्या उपासनेमुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते . तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणा-या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे .
करमाळ्याच्या पूर्वेकडील उंच माळावर वैशिष्ट्यपुर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमलाभवानीचे मंदीर आहे १७ व्या शतकात बांध ण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पाय-यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे . मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभा-यात श्री विष्णु - लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभा-यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत. शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत. मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर झाल्याचे दिसत आहे .
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

अस्तंबा ऋषीची यात्रा

अस्तंबा ऋषीची यात्रा

सातपुडयातील उंच डोंगर....

दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान...
अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात. दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन
करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे

ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे

हि मूर्ती काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्ती साधारणपणे ८व्या शतकातील म्हणजे शिलाहारकालीन आहे. महाराष्ट्रात शिलाहारांच्या ३ शाखा – उत्तर कोकणाचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कऱ्हाड / कोल्हापूरचे शिलाहार. आता काहींना प्रश्न पडेल, शिलाहारांच्या तीन शाखा, मग हि मूर्ती कोणत्या शिलाहार शाखेने तयार करून घेतली आणि ती कोणत्या मंदिरात होती?

उत्तर कोकणचे शिलाहार या राजघराण्याने हि मूर्ती तयार करून घेतली. याच राजघराण्याने इ.स.१०६० मध्ये अंबरनाथचे सुप्रसिद्ध शिवमंदिर बांधले. हे राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक. इ.स. ८०० ते १२५० अशा साधारणपणे ४५० वर्षांचा त्यांचा काळ. या शिलाहार राजांची राजधानी होती श्रीस्थानक (सध्याचे ठाणे).

सिद्धेश्वर तलाव परिसरात ब्रम्हदेवाचे मंदिर असावे आणि हि मूर्ती त्या मंदिरातील गाभाऱ्यात असावी. तसेच मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले असावे आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्तीला वाचवण्यासाठी तिला मंदिराजवळ असलेल्या तलावात (म्हणजे आताच्या सिद्धेश्वर तलावात) लपवून ठेवली असावी.

ह्याचाच अर्थ असा निघतो कि ८व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात ब्रम्हदेवाची पूजा होत होती. अशीच दुसरी एक ब्रह्मदेवाची मूर्ती नालासोपारा येथील मंदिरात आहे.
मूर्ती सुमारे ५ फुट उंच आणि उभी आहे. मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे हातात काय असावे हे कळायला मार्ग नाही. मुर्तीशास्त्राप्रमाणे अक्षमाला, वेद, कमंडलू आणि माला असावी. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मूर्तीच्या मागच्या आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेला मुकुट आहे. कानात कुंडले असून जानवे आणि करगोटा धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मुर्तीच्या उजव्या बाजूला सावित्री आणि डाव्या बाजूला सरस्वती खोदलेली आहेत. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर(गणेशखिंड),अहमदनगर

श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर(गणेशखिंड),अहमदनगर
या  मंदीराचा उल्लेख गणेश पुराणामध्ये आहे. क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या भुमीगत काळामध्ये भालचंद्र गणपती मंदिर परिसरामध्ये राहुन इंग्रजाबरॊबर लढा दिला. येथे त्यांचे भुयार आहे. त्यांनी येथे राहुन बॉम्ब तयार केले. त्यांची या गणपतीवर खुप श्रध्दा होती. त्यांना वायुगमनाची ताकद येथेच प्राप्त केली होती. मंदीरामध्ये श्री गणेशखिंड ट्रस्ट कार्यरत आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर पुणवाडी,अहमदनगर

श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर
पुणवाडी,अहमदनगर
या मंदीराला ’क’वर्ग भेट्ले आहे. या मंदीराच्या वरच्या बाजुस विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर आहे. समोर देवांची भक्त पदुबाई यांचे मंदीर आहे. मंदीराच्या आवारात मोठा सभामंडप आहे, देवाची पुजा रोज पहाटे २:३० वाजता होते. पुजेचे पथ्य खुप कडक आहेत.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री सदगुरु मठ, मेहकरी
श्री सदगुरु मठ, मेहकरी
हे अतिशय जुने देवस्थान आहे. ज्ञानेश्वर महाराज पैठ्णला चालले होते त्यावेळेस सर्व भावंडांनी येथे मुक्काम केला होता. हे पवित्र जाग्रुत स्थान आहे. या देवस्थानामध्ये अनेक संत-महात्मे होऊन गेले त्यापैकी,
१. संत नामदेव महाराज
२. संत खुशालभारती महाराज
सध्या, श्री हरी लक्ष्मण महाराज हे मठाधिपती आहेत. भगवान बाबा हे नामदेव बाबांना आपला गुरु मानत असत व त्यांच्या दर्शनासाठी येथे येत असत. नामदेव बाबांना वैकुंठ्वास झाल्यानंतर त्यांच्या चाळीसाव्याचे कीर्तन भगवान बाबांनीच केले होते.
मार्गशीष वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी या कालखंडामध्ये कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आमटी-भाकरीचा भंडारा असतो. २०-२५ हजार लोक भंडारयाचा लाभ घेतात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
श्री घोडेश्वरी देवी,अहमदनगर
श्री घोडेश्वरी देवी,अहमदनगर
नगर औरंगाबादरोड वर घोडेगाव हे एक छोटे गाव. गावच इतिहास फार जुना आहे. साधारणतः १००० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी त्यावेळी गावाचे नाव होते निपाणी वडगाव, गावात पाणी नसल्याने त्यावेळी सर्व साधारण पणे नामकरण झाले असावे. कारण त्यावेळी गावात पाणी नव्हते गावाला पिण्यासाठी पाणी नसल्याने सर्व गावकऱ्यांनी पिण्यासाठी विहीर खांदण्याचे ठरवले .
एक चांगला मुहूर्त पाहूनकामच शुभारंभ ही झाला, त्याकाळी आजच्या सारखी यंत्र सामुग्री नसल्याने टिकाव, फावडे, खोरे, घमेले या साधनाचाच वापर होत आसे अत्यंत कष्टाने १० परस विहीर गावकऱ्यांनी खान्दली तरी विहिरीला एक थेब ही पाणी लागले नाही गावकरी निराश झाले त्यामुळे गावकऱ्यांनी विहिरीच नाद सोडून दिला. काही लोकांनी दुसरीकडे स्थलांतरही केले.
काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असणाऱ्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात राहणाऱ्या एका साधूने गावकऱ्यांना त्या मंदीराजवळ विहीर खांदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सुचवले, त्या नंतर एका शुभ मुहूर्तावर तुळजाभवानी ची पूजा करून विहीर खांदण्यास सुरुवात केली, पाच -सहा पारस विहीर खांदली तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले? त्या दिवशी मंगळवारच दिवस होता, विहीर खांदण्याचे काम चालू असतानाच सहा परसाच्या पुढे आचानक चमत्कार झाला, विहीर खणात असतानाच एक आश्वरूपी म्हणजे घोड्याचा आकार असलेली दगडी मुर्ती सापडली, सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला कारण इतक्या खोलवर ही मुर्ती आलीच कशी हा प्रश्न सर्वांना भिडसावत होता सर्व गावकऱ्यांनी ही मुर्ती कडून एका जागेवर ठेवली
अंधार पडल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघुन गेले त्या रात्री तत्कालीन गावाच्या पाटलाच्या स्वप्नात देवी आली आणि `मी घोडेश्वरी देवी आहे` माझी प्राणप्रतिष्टा तुळजाभवानी मातेच्या मंदिरात करा, यापुढे गावाला कधीच पाणी कमी पडणार नाही आसे म्हणून देवी अंतर्धान पावली. सकाळी पाटलांनी स्वप्नात पाहिलेला सर्व चमत्कार चावडीवर गावकऱ्यांना सांगितला सर्व गावकऱ्याना खूप आनंद वाटला , एक शुभ मुहूर्त पाहून त्या आश्वरूपी देवीच्या मुर्तीची प्रती स्थापना पुरातन तुळजाभवानी मंदिरत करण्यात केली. त्या दिवशी मोठी यात्राही भरली त्याद्नंतर सर्व गावकरी त्या साधू महाराजांकडे आले आणि म्हणाले महाराज आपण सांगितल्या प्रमाणे आम्ही या मंदिराजवळ विहीर खणली सहा पारस विहीर झाली पण एक थेंबही पाणी लागले नाही, बाबांनी आणखी एक पारस विहीर खांदण्यास सांगितले . दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करून गावकऱ्यांनी विहीर खांद्ण्यास प्रारंभ केला आणि पाचच फुट खाली खणले आसतानांच अचानक विहिरीला भरपूर पाणी लागले पाणी पिण्यास गोड होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात आशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे गावकरी खुप आनंदी झाले .
विहिरीतून प्रगट झालेल्या देवीची मुर्ती ही आश्वरुपी, घोड्याच्या आकाराची आसल्याने घोडेश्वरी नाव पडले आणि याच घोडेश्वरी मातेच्या कृपेने गावाला खूप काही पाणी मिळाले व गावाच्या पाण्याच प्रश्न सुटला त्यामुळे गावाचे निपाणी वडगाव या नावाचा अपभ्रंश होऊन घोडेगाव हे नाव रूढ झाले याच देवीच्या करुणे हा भाग सुजलाम सुफलाम झाला, बागायत झाला आणि बाजारही खुप मोठा भरू लागला आणि आत्ता देशभरात ही प्रसिद्ध झाला आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य मुर्ती स्वयंभु आसून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे, मंदिरचे बांधकाम हेमाडपंथी आसून बांधकाम केव्हा झाले कुणालाही सांगता येत नाही मंदिर हेमाडपंथी आसून मोठ-मोठ्या दगडात मंदिराचे काम झाले आहे .
देवीचे व गावाचे वैशिष्ट्य
*********************
प्राचीन रुढे परंपरे नुसार गावात तेल्याचा घाना चालत नाही . कुंभाराचे चाक चालत नाही तसेच गावात कुणी घोडे पळत नाही, स्थानिक सोनार व्यवसाय गावात चालत नाही. कुठलाही गुंड, समाज विरोधक काम करणारा ( दादा ) ३ वर्ष पुढे टिकत नाही . यात्रेत गोंधळ करणारा, मारामाऱ्या करणारा पुढची यात्रा बघत नाही, हा इतिहास आहे .
आत्ता नुकतेच गावातील काही उमद्या युवकांनी एकत्र येउन मंदिर जीर्नौधाराचे काम चालू केले आहे गाव ही मोठ्या प्रेमाने त्यांची पाठीशी उभे राहिले आहे, साथ दिली आहे. सुरक्षाभिंतीचे काम पूर्ण होत आले आहे, सभामंडप एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे आणि दुसऱ्या बाजूचे काम प्रगती पथावर आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर,अहमदनगर

श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर,अहमदनगर
हे महादेवाचे मंदीर आहे.मंदीराचे काम हे अतिशय भव्य आहे. सर्व बांधकाम दगडी आहे.
हे बांधकाम विश्वकर्मा यांच्या काळाचे आहे. येथे शिलालेखमोडी लिपीमध्ये कोरलेले आढळते. रामायण व महाभारताचा अभ्यास केल्यास पाराशर ऋषींना येथे तपश्चर्या केलेली आहे. या मंदीराचा संबंध पुराणाशी आहे.
चक्रधर स्वामी येथे दर्शनासाठी आले होते. मंदीराच्या मागच्या बाजुस धबधबा वाहतो. मंदीराच्या वरील बाजुस "कृषी वर्त" आहे. तेथे विठ्ठल मंदीर आहे. कृषीवर्ता समोरील कुंडमध्ये एका बाजुस गार व दुसऱ्याबाजुस गरम पाणी असते. मंदीराचे बांधकाम असे आहे की एप्रिल महिन्यात बरोबर पिंढीवर सुर्यकिरण पड्तात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

केडगावची रेणुकामाता,अहमदनगर

केडगावची रेणुकामाता,अहमदनगर
नगर रेल्वे स्टेशनपासुन सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री रेणुकामातेचे जागृत स्थान आहे. शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचे मंदिर उभारले. भरगच्च निवंडुगाचे झाडांनी वेढलेल्या या परिसरात विविध घनदाट वृक्षांमुळे जंगलाचेच स्वरुप प्राप्त झाले. वाघ या जंगलात मुक्तपणे वावरत असे. आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दर्शनास वाघोबांची स्वारी डरकाळ्या फोडत येई. त्यामुळे सायंकाळ्च्या आरतीनंतर सर्वजण घरी परतत.
          या मंदिराबाबतची आख्यायिका सर्व प्रचीती अशीच आहे. पुर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुकामातेच्या कॄपाप्रसादाने पुत्ररत्न जन्मले. बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले. या भवानीने रेणुकामातेची अखंड मनोभावे सेवा केली. श्री क्षेत्र माहूरगड हे त्यांचे मुख्य श्रध्दास्थान साडेतीन शक्तीपीठांतील हे एक पूर्ण पीठ होय. या माहुरगड हे निवासिनी रेणुकामातेच्या नामस्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे. त्यांच्या या निस्सीम भक्तीवर देवी प्रसन्न झाली. “मी आता तुझ्यासोबत येते" असे देवीने सांगताच आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला लागले. केडगावाच्या परिसरात येताच त्यांनी मागे वळून पाहिले. देवीचे दर्शन झाले, मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली. हल्ली त्याच जागेवर स्वयंभू श्री रेणुका देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती अगदी हुबेहुब माहूरगडाप्रमाणेच आहे. देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरवाने वळून पाहिले तेथे पादुका आहेत.
          रेणुकादेवीच्या मूर्तीशेजारीस तुळजाभवानीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचे मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो. छोटे विठ्ठल रुक्णिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे.
याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.
१९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

श्री विठ्ठल-रुख्मिणी(धाकटी पंढरी),अहमदनगर

श्री विठ्ठल-रुख्मिणी(धाकटी पंढरी),अहमदनगर
शेवगाव तालुक्यातील वरुर बु. मधिल हे मंदीर संपुर्ण गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे.
आख्यायिका:
वरुर गावचा खांबट नावाचे पाटील होते. एके दिवशी त्यांच्या स्वपनात विठ्ठल-रुक्मिणी आले व सांगीतले कि "आम्ही काळेगाव टोका गावातील एका इस्माच्या उकांड्यामध्ये आहोत. "पाटील दुसऱ्यादिवशी त्या ठिकाणावर गेले व ती जागा विकत घेतली व तेथे खोद्ण्यास सुरवात केली. खोदत असताना मुर्तीच्या डाव्या डोळ्यावर कुदळीचा घाव लागला, मुर्तीच्या डोळ्यातुन रक्त वाहु लागले. मग मुर्ती थोड्या वर काढल्या. ही गोष्ट कळाल्यावर काळेगाव टोकातील गावकरी तेथे गोळा झाले व त्यांनी मुर्ती गावाबाहेर नेण्यास विरोध केला आणि मुर्ती बैलगाडीत टाकल्या, त्या गाडीचा चकणाचुर झाला. तरीसुध्दा विरोध कायम होता. मग खांबट पाटील मागारी निघाले. जसे पाटील मागारी फ़िरले तशी मुर्ती गायब झाली. हा चमत्कार घडल्यानंतर काळेगाव टोकातील मंडळींनी पाट्लांना थांबवले व मुर्ती नेण्यास परवानगी दिली तेव्हा मुर्ती पुन्हा वर आलेली दिसु लागली. मग मुर्ती गावात वाजत-गाजत आणण्यात आली व तिची स्थापणा करण्यात आली.
आषाढी-पोर्णिमेला काल्याच्या दिवशी मंदीरामध्ये भजन चालु असताना मुर्तीच्या अंगावर घाम येतो, असे गावक्ऱ्यांचे म्हणने आहे.. हे खुप जागृत मंदीर आहे. 
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर,अहमदनगर

श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर,अहमदनगर
गोरक्षनाथांची मुर्ती स्वयंभु आहे. नवनाथांनी येथे १ महिना वास्तव्य केले आहे त्यानंतर सर्व नवनाथांनी स्थलांतर केले. इ.स.१८४६ साली मंदीराचा जीर्णोध्दर झाल्याचा उल्लेख सापडतो. अंबादास भिकाजी कदम येथील पुजारी आहेत.
श्रावण महिन्यात येथे महिनाभर श्रावणी यात्रा असते. मुख्य यात्रा  तिसऱ्या व चौथ्या सोमवारी असते. येथे प्रत्येक महिन्याल्या राहुरीच्या गोरक्षनाथ मंड्ळ यांच्याकडुन भंडारा असतो. कार्तिक शु.१३ ला गोरक्षनाथ प्रकटदिन साजरा केला जातो. महाशिवरात्रीला देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते, यासाठी पायी कावडी जातात. आषाढी एकादशीला  यात्रा भरते. शुध्द एकादशीला भंडारा असतो.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री विरभद्र (बिरोबा), मिरी (अ.नगर)

श्री विरभद्र (बिरोबा) देवस्थान, मिरी
श्री विरभद्र मंदीर हे मंदीर पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातील प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीराला आतल्या बाजुने काचकाम केलेले आहे.
आख्यायिका :
राजस्थान मधील घोडगिरी येथे भुत्तीरबुआ होते. राजस्थान मधील काही लोकांनी भुत्तीरबुआंच्या कावडींना विरोध केला. त्यावेळेस त्यांनी येथे राहणार नाही असे ठरवले. आधी ते नेवासा येथे आले व धनगरवाडीत बसले, परंतु त्यांना कोणी ओळखु शकले नाही .त्यांनी नंतर कोल्हारला मुककाम केला. मग त्यांनी जिथे मन रमेल तेथे राहण्याचे ठरवले, मिरी येथे त्यांना मेंढरे दिसली, त्यांनी येथेच राहण्याचे ठरवले. मग ते कै.मनाजी भगत यांच्या स्वप्नात दर्शन दिले व मंदीर बांधण्यास सांगितले. बिरोबा त्यांच्या अंगात यायचे व अंगावर लाकडी तलवारीचे वार घ्यायचे. इंग्रज अधिकारयाला ही गोष्ट खोटी वाटु लागली. त्याने स्वत:हा त्यांच्या अंगावर लोखंडी तलवारीने वार केले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला )  येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी  आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
या दिवशी  श्री सिताराम मनाजी भगत यांना देवाचे वारे येते, त्यावेळेस ते अंगावर तलवारीचे वार घेतात व वार्षिक भविष्य(पाऊस,नैसर्गिक आपत्ती, किंवा देशात काही  बदल होणारे ) सांगतात. हे मंदीर गोपाळराव मिरीकर यांच्या जागेत आहे. जत्रेच्या दिवशी गावातुन त्यांची मिरवणुक निघते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी,अहमदनगर

पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी,अहमदनगर
हे आतिशय भव्य व प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीरचे संपुर्ण काम काचेमध्ये केलेले आहे . येथील मंदीराच्या बाजुला विहीर आहे ,या विहीरीमधुन नवरात्रामध्ये सोन्याची घागर वर येते असे ,असे स्थानिक लोकांचे म्हणने आहे.
आख्यायिका :
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त  हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा  पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व  अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली  ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
सासरे घोडी व शिंगरु घेवुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. अंबिकेचा शोध घेता-घेता सासरे फ़ार थकले व विचार करु लागले की ,घरच्या व माहेरच्या लोकांना काय सांगावे? या प्रश्नाचा विचार करता करता त्यांनी जीव सोड्ला .हे पाहुन घोडी व शिंगरु त्या देहाच्या कडेने फ़िरु लागले व किंचाळु लागले.मालकाची कुठल्याही प्रकारची हालचाल न दिसल्यामुळे त्या बिचारया मुक्या प्राण्यांनीही आपला देह सोडला. पद्मावती सासुच्या स्वप्नात गेली व गुप्त झालेल्या ठिकाणाची माहिती द्रुष्टांत रुपात सांगितली. झरयाजवळील एका दगडाखाली दाग-दागिणे ठेवले आहेत त्याच ठिकाणी सासरे,घोडी व शिंगरु यांचा त्याच ठिकाणी देहत्याग झालेला आहे. दरंद्ले कुटुंबातील व्यक्तींनी त्या ठिकाणी येवुन शहनिशा केली. त्यावेळी घोसपुरी गावातील लोकांनी त्या ठिकाणी सासरयांची व घोड्याची समाधी बांधली व ज्या दगडाखाली दाग-दागिने ठेवले होते ते पाहण्यास गेले.त्या ठिकाणी  दाग-दागिने व तांदळा(देवीचा) सापडला .ते दाग-दागिने त्यावेळी दरंदले कुटुंबीयांच्या स्वाधीन झाले. तांदळा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात आले व मंदिरा तांदळाची विधी विधीनपुर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजही तो तांद्ळादर्शनासाठी खुला केला जातो.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

नृसिंह मंदीर (भातोडी),अहमदनगर

नृसिंह मंदीर (भातोडी),अहमदनगर
मंदीराची स्थापना १३०० -१४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सी नावाचा प्रधान हा शाही दरबारात होता. तो खुप ईमानदार होता. परंतु दरबारातील काही मंड्ळींनी त्यांच्या विरुध्द बादशहा चे कान भरले. यामूळे बादशहाने त्यांना प्रधान या पदावरुन निलंबित केले. त्यावेळेस त्यांनी भातोडी येथे अनुष्ठान केले व नवस बोलला. ठीक ४ दिवसांनी त्यांच्यावरील आरोप टळला व बादशहाने त्यांना दरबारात बोलावुन घेतले व त्यांना त्यांचे पद परत देण्यात आले. त्यांनी बोललेल्या नवसाप्रमाणे मंदीराची उभारणी केली. मंदीराला भक्क्म तटबंदी करुन त्यावर मंदीर बांधले आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदिचा उगम आगडगाव-रतडगावच्या डोंगरावरुन झाला आहे.
याच मंदीराचे प्रतीरुप  पाकिस्थानात कराचीमधील नरसिमपाल या भागात आहे. या मंदीरावर आनंद जोशी यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे.
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर

नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर
नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्ययटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे.
शेकडो वर्षाची परंपरा असलेले सदर गणेश मंदिर गोदातीरी पूर्वाभिमुख वसलेले आहे गणेशाच्या बाजूला ऋध्दि-सिध्दी यांच्या मूर्ती असून, बाजूलाच काशी विश्वेश्वराच मंदिर असलेले हे एकमेव प्राचीन देवस्थान आहे.
प्रसिध्द २१ गणेशांमध्ये सदर गणेशाची गणना होत असल्याने पूर्वी नाशिकचे ग्रामदैवत म्हणूनही या गणेशाकडे पाहिले जायचे. गणेश कोष, पंचवटी दर्शन यात्रा, गोदावरी माहात्म्य अशा विविध पुस्तकांमध्ये मोदकेश्वराचा उल्लेख आल्याने संपूर्ण भारतातून येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
या गणेश मदिरांच्या जीर्णोध्दार विलास क्षेमकल्याणी यांच्या पूर्वजांनी केला. तेव्हापासून आजतागायत क्षेमकल्याणी यांची नववी पिढी मंदिराचे कामकाज पाहत आहे. दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी भल्या पहाटे पासून गणेशभक्तांची दर्शनासाठी गर्दी असते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

पैठण*

पैठण
औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५६ किलोमीटरवर पैठण तालुका आहे. हा तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनही संबोधतात. या तालुक्याला ऐतिहासिक व नैसर्गिक असे म्हत्यव आहे. येथे एकनाथ महाराजांमुळे पैठण प्रसिद्ध आहे. शिवाय पैठणी साड्यांचे निर्मिती केंद्रही येथेच आहे. गोदावरी नदीवरील सर्वंत मोठे जायकवाडी धरण येथेच आहे. याच धरणाच्या पाण्यावर ज्ञानेश्वर उद्यान आहे. पैठणला एकनाथ महाराजांची समाधी आहे. ही समाधी गोदावरी तीरावर एका आकर्षक व विलोभनीय मंदिरात आहे. या ठिकाणी षष्ठीच्या दिवशी नाथषष्ठी नावाने मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या वेळी मनोभावे येथे उपस्थित असतो. येथेच ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. पैठण जगप्रसिद्ध पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या साड्यांना आकर्षक असा जरतारी पदर असतो. या साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते. या साड्या हातावर विणल्या जातात. येथील पैठणी हातमाग केंद्राला भेट देऊन थेट तेथूनच पैठणी खरेदी करू शकतो.

जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचनप्रकल्प. या प्रकल्पाचे आराखडे प्रथमत: जुन्या हैदराबाद राज्याने तयार केले होते. त्यांमध्ये बीड जिल्हयांतील जयकुचीवाडी या खेड्याजवळ गोदावरी नदीवर २,१४७ दशलक्ष घ. मी. जलसाठ्याचे धरण बांधण्याची योजना होती. खेड्याच्या नावावरून प्रकल्पास जायकवाडी प्रकल्प हे नाव पडले. राज्यपुनर्रचनेनंतर व विविध पर्यायी जागांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर जयकुवाडीऐवजी वरच्या बाजूस असलेल्या १०० किमी. वरील पैठण येथे धरणाचे बांधकाम करावयाचे निश्चित होऊनही प्रकल्प सध्याच्याच नावाने ओळखला जाऊ लागला. धरणजागा बदलल्याने कालवे पूर्वीपेक्षा वरच्या पातळीवरून नेणे व सिंचनाखाली अधिक क्षेत्र आणणे शक्य झाले, पैठण उजव्या कालव्याची पातळी उंचावल्याने त्यामधून माजलगाव जलाशयास पुरवठा करणे तसेच गेवराई व माजलगाव या परंपरागत दुष्काळी तालुक्यांना सिंचनसुविधा उपलब्ध करणे शक्य झाले. प्रकल्प –अहवाल १९६४ मध्ये पुर्ण झाला. पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ कै. लालबहादूरशास्त्री ह्यांच्या हस्ते १८ऑक्टोबर १९६५ रोजी झाला. जायकवाडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सांगता २४ फेब्रुवारी १९७६ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली.
प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला २७ दरवाजे आहेत. या धरणाला मराठवाड्याला अन्यसाधारण म्हत्यव आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संद्याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्या सागराच्याच किनारी असल्याचा भास आपल्याला होतो. संद्याकाळी काळी क्षितिजापलिकडे डुंबणार्या सुर्याची किरणे समुद्राच्या पाण्याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते.

जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते म्हेसुरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धबधबाही आहे. तालावर नाचणारे पाणी पाहण्याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

पाबळ- मस्तानी गढी व विज्ञान आश्रम*

पाबळ- मस्तानी गढी व विज्ञान आश्रम

पुण्याजवळ हवेली-शिरूर-खेड तालुक्याच्या मध्यावर वाघोली, कोरेगाव भीमा, रांजणगाव, निघोज, मलठण, मोराची चिंचोली, पाबळ, वढू, तुळापूर, वाफगाव, निमगाव, दावडी, कन्हेरसर अशी असंख्य सहलीची ठिकाणे आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा गावातून वढू, केंदूरमार्गे पाबळला एक रस्ता जातो. पुण्याहून हे अंतर आहे जवळपास ६० किलोमीटर! अशा या पाबळला यायचे ते दोन कारणांसाठी. एक इतिहासातील त्या गूढ सौंदर्यवती मस्तानीचे स्मरण करण्यासाठी, तर दुसरे इथल्याच माळरानावर डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी फुलवलेला विज्ञान आश्रम पाहण्यासाठी!

इतिहासातील अनेक पात्रे वर्तमानाला अद्याप निटशी उलगडलेली नाहीत. अनेकदा अशा पात्रांचा खरा इतिहास समजण्याऐवजी त्यांच्या विषयीच्या रंजक कहाण्याच जास्त परिचित झालेल्या असतात. थोरल्या बाजीरावांच्या मस्तानीचा उल्लेख यामध्ये खास करावा लागेल. मस्तानी कोण, कुठली, बाजीरावाबद्दलची तिची निष्ठा, तिचा मुलगा समशेर बहाद्दरनेही पेशव्यांबरोबर पानिपतच्या रणांगणावर पराक्रम गाजवत सोडलेला प्राण, हा सारा इतिहास कुणाच्या गावीही नसतो पण त्याऐवजी तिचे सौंदर्य आणि तिच्या गळ्यातून उतरताना दिसणारा रंगलेल्या विडय़ाचा रस..! या असल्या अतिरंजित कथा मात्र सर्वत्र परिचित असतात. असो, एकूणच पेशवाईतील या पात्राभोवतीचे तत्कालीन गूढ अद्याप कायम आहे.

इतिहास जे काही थोडेफार सांगतो त्यानुसार बुंदेलखंडचा राजा छत्रसालची ही मुलगी! इसवी सन १७२९ च्या सुमारास बाजीरावांच्या आयुष्यात ती आली. या दोघांमधील प्रेम जसे फुलत गेले तशी पुण्याच्या शनिवार वाडय़ावरही अनेक वादळे उठू लागली. बाजीराव-मस्तानीच्या या नात्यास आप्तेष्टांपासून ते धर्ममरतडांपर्यंत अनेकांचा उघड विरोध झाला. पुढे हा विरोध आणि ताणापासून मस्तानीला दूर ठेवण्यासाठीच बाजीरावाने तिला शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ आणि लोणी (ता. आंबेगाव) ही तीन गावे इनाम दिली. यातील पाबळला तिच्यासाठी चार बुरुजांची एक बळकट गढीही बांधली. एकूणच या प्रखर विरोधातही बाजीरावाने मस्तानीला अंतर दिले नाही. अशातच उत्तरेत एका मोहिमेवर गेलेले असताना कुठल्याशा आजाराने बाजीरावांना घेरले आणि यात २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिणतिरी रावेरला त्यांचे निधन झाले. बाजीराव गेले पण जीवन मात्र मस्तानीचेच संपले! त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच ‘जेथे राया तेथे मी’ असे म्हणत या मस्तानीनेही पाबळच्या या गढीत आपला प्राण सोडला! गावाबाहेर जिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या जागी तिची समाधी बांधण्यात आली.

जिवंतपणी जिची उपेक्षा झाली त्या मस्तानीच्या वाटेला मृत्यूनंतरही फक्त उपेक्षाच आली. ना तिच्या प्रेमाची कदर कोणी केली ना तिच्या मृत्यूची! मस्तानी पाठोपाठ तिची ही वास्तूही बेवारस झाली. दिवसामागे तटबंदीचे दगडचिरे निघू लागले. पुढे तर तिला नावे ठेवणाऱ्यांनीच तिच्या या गढीच्या दगड मातीने स्वत:ची घरे बांधली. आज ही गढी पूर्णपणे नामशेष होऊन तिचे खिंडार बनले आहे. या खिंडारात नाही म्हणायला तो अखेरचा एक बुरूज कसाबसा शिल्लक आहे. आता ही जागाही कोणीतरी बळकावण्यापूर्वीच तिथे या मस्तानीच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही करता आले तरच पाबळच्या इतिहासाला काही अर्थ राहील. गढीप्रमाणे समाधीचीही व्यथा! गावाबाहेर रानात असलेल्या या समाधी भोवतीच्या भिंती ढासळल्या आहेत. भोवताली झाडा-झुडपांचे रान माजले आहे. हे सारे कमी होते म्हणून की काय मध्यंतरी गुप्तधनाच्या लालसेपोटी कुणीतरी माथेफिरूने या समाधीचीच तोडफोड केली. दुर्दैवाचे हे फेरे मस्तानीच्या मृत्यूनंतरही तिला असे छळत राहिले. खरे तर सारा आमच्याच इतिहासाचा धागा. त्याचेही तितक्याच संवेदनशील हातांनी संरक्षण करण्याची गरज आहे. पण ना आमच्याकडे असे हात आहेत ना तसे मन ! नाही म्हणायला एक दिव्याचा खांब या समाधीजवळ अद्याप निष्ठेने उभा आहे आणि समाधीवरील दगडी कुंडीतील जाईचा वेल गेली कित्येक वर्षे मस्तानीच्या प्रेमाचा दरवळ पसरवत फुलतो आहे.

पाबळचा मस्तानीचा हा सारा इतिहास जसा आपल्यासमोर व्यथा बनून पुढे येतो. त्याचप्रमाणे इथल्या भूगोलाने मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत एक नवी कथा जन्माला घातली आहे. पाबळचा भोवताल हा तसा पूर्णपणे रखरखीत, पाण्यावाचून करपलेला माळ! अशा या माळावर १९८३ च्या सुमारास डॉ. श्रीनाथ कलबाग नावाचा एक व्रतस्थ अवतरला. शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीमुळे देश-विदेशातील सर्व आकर्षणांना लाथ मारत त्याने इथे पाय रोवले! ग्रामविकासाचे ध्येय आणि तेही प्रयोगशील शिक्षणातून! या एकाच ध्यासातून या कर्मवीराने इथे एक प्रयोगशाळाच उभी केली- विज्ञान आश्रम! जिला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक अभ्यासक-संशोधक आणि सामान्य पर्यटक इथे येत असतात.

संस्थेच्या नावातच आधुनिकता (विज्ञान) आणि परंपरेचा (आश्रम) मिलाफ आहे. निसर्गावरच आधारित इथला अभ्यास, शिक्षण असे सारे काही आहे. चाकोरीबद्ध शिक्षण देण्याऐवजी मुलांची विविध कौशल्ये-गुणवत्ता विकसित करत त्यातून एकूण समाजाचाच विकास साधण्याचा प्रयत्न या प्रयोगशाळेतून केला जातो. इथे आलो की संस्थेच्या डोंबवजा खोल्यांपासून ते मुलांनीच विकसित केलेल्या विविध तंत्र कौशल्यांपर्यंतचा साराच प्रवास थक्क करून सोडतो. शेती, पाणी, हवामान, पशुपालन, गृह, आरोग्य, अभियांत्रिकी या साऱ्याच क्षेत्रातील प्रयोग संशोधन आणि कार्यानुभवात मुलांप्रमाणेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचाही सहभाग असतो. ग्रामीण विकासावर कुठेतरी चर्चा-व्याख्याने झोडण्या-ऐकण्यापेक्षा अशा एखाद्या उपक्रमाला भेट दिली की डोळे उघडतात, पाय जमिनीवर येतात आणि हात मदतीसाठी धावतात! असे पर्यटन आपल्याला समृद्ध करण्याबरोबरच संवेदनशील करत जाते! पाबळला जाण्यासाठी पुण्यापासून शिक्रापुर पर्यंत बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल. स्वत:चे वाहन असेल तर अगदी उत्तम आहे.
 

सातपुड्यातील तोरणमाळ

सातपुड्यातील तोरणमाळ

महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुसर्‍या क्रमांकावर तोरणमाळचा समावेश आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. हरिणीला जशी आपल्याजवळ असलेल्या कस्तुरीची कल्पना नसते त्याचप्रमाणे तोरणमाळच्या सौंदर्याची कल्पना असलेले अहिराणीच्या खान्देशात फारच कमी आहेत. कालपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता. या सर्वांचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले.
पुराणात तोरणमाळचा तूर्णमाळ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडले असावे. पण माळवा साम्राज्याचा राजा मांडू याच्या राजधानीचे ठिकाण काही काळ तोरणमाळ होते. त्याच्या ताब्यात असलेल्या सातपुडा पर्वतावरील राज्याचे द्वार अथवा तोरण म्हणूनही या प्रदेशाला तोरणमाळ म्हटले जात असावे. तोरणमाळ या डोंगरी किल्ल्यापासून खान्देशचा इतिहास सुरू होतो. आज तेथे फक्तया किल्ल्याचे अवशेष आहेत, त्याचे बांधकाम भक्कम असल्याचे ते पुरावे आहेत.
तोरणमाळला पाहण्यासारखी अनेक सौंदर्यस्थळे आहेत. तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकदा तोरणमाळला भेट दिली होती. तोरणमाळच्या सौंदर्याने यशवंतराव चव्हाणांनाही मोहिनी घातली. त्यांच्या भेटीनंतर 26 सप्टेंबर 1969ला या तलावाचे ‘यशवंत तलाव’ असे नामकरण करण्यात आले. कधीही न आटणार्‍या या तलावात विहार करण्यासाठी खास स्वयंचलित बोटींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तोरणमाळमधील सीताखाई ही एक गर्द झाडींनी नटलेली अंगावर शहारे आणणारी दरी आहे. तिन्ही बाजूंनी फाटलेला पहाड आणि मध्येच एक उंच सुळका, निसर्गाच्या अचाट शक्तीने साकारलेले एक निसर्गनिर्मित शिल्पच म्हणावे लागेल. पावसाळ्यात त्यावरून खळखळणारा धबधबा म्हणजे सीताखाईचा वस्त्रालंकार भासावा. सीताखाईला लागूनच एक तलाव आहे. या तलावाला सर्वत्र कमळाच्या वेलींनी आपल्या कुशीत दडवून टाकलेय.
मावळत्या सूर्याचे लोभस दर्शन ही एक तोरणमाळची खासियत आहे. ‘मावळताना इथला सूर्य अक्षरश: हसरा असतो,’ असेही इथल्या सूर्यास्ताच्या बाबतीत म्हटले जाते. इथला पाऊस अनुभवणे हासुद्धा एक अविस्मरणीय अनुभव असतो. खडकी व आमदरी हीसुद्धा विशेष उल्लेखनीय सौंदर्यस्थळे आहेत. येथून आगपेटीच्या आकाराच्या झोपड्या व मुंग्यांप्रमाणे माणसांच्या हालचाली दृष्टीस पडतात. तोरणमाळला जाताना चार किलोमीटर अगोदर ‘सातपायरी’ घाट लागतो. जणू या हिरव्यागार झाडांची मलमली शाल पांघरलेल्या डोंगराने सात फेर्‍यांची माळ परिधान केली आहे, असा आभास होतो. निसर्गाच्या अंगभूत सौंदर्यात मानवी कौशल्यांची भर पडली तर घाटातही सुंदरतेचा आभास निर्माण करता येतो, हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी येथे सिद्ध करून दाखवले आहे. सातपायरी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कपारीत एक लेणी आहे. तिला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तिचे प्रवेशद्वार कोरलेले असून त्यावर नक्षीकाम असलेली ललाटपट्टी आहे. समोरचे चौकोनी दालन आता गाभारा बनले आहे. भिंतीवर पुरुषभर उंचीची, पाठीमागे सदाफणा नागाचे छत्र असलेली पारसनाथाची उभी असलेली मूर्ती आहे. हे जैन लेणे पारसनाथ किंवा नागार्जुन या नावाने प्रचलित आहे.
इतर संरक्षित वनांप्रमाणे तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे इतर वन्य प्राण्यांबरोबरच अस्वलांचे प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही तेथे दर्शन दिल्याचे सांगितले जाते. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. वर्दळीचा अभाव हेच तोरणमाळच्या सुंदरतेचे गुपित आहे. नियोजनबद्ध रीतीने या पर्यटनस्थळाचा विकास केल्यास तेथे ऐतिहासिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाच्या अर्मयाद शक्यता एकवटलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तेथे तोरणमाळ हिल रिसॉर्ट सुरू केले आहे. 1990 पासून रावल उद्योग समूहाने ते चालवण्यास घेतले आहे. खान्देशातील एकमेव असलेल्या या अहिराणीच्या हिल स्टेशनला दोन-तीन दिवस मुक्काम करूनही समाधान होत नाही. अर्मयाद सुंदरतेच्या आभाळर्मयादा उदरात साठवून साद घालणार्‍या तोरणमाळला डोळ्यांत सामावून घेताना ओठांवर शब्द येतात..
‘तुझ्या संगतीत क्षितिज हळवं होतं,
मावळणार्‍या सूर्यालाही मायेनं जोजावतं’
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

सवतसडा

सवतसडा...!
सारे कोकणच खरेतर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो,की हा निसर्ग जागो जागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळानेपाय खेचून घेतले- सवतसडा! वर्षां ऋतूचे प्रेमकोकणाच्या बाबतीत थोडे जास्तच.ज्येष्ठ-आषाढातल्या पहिल्यासरीपासून सुरू होणारा हा सोहळापुढे चार महिने साऱ्या कोकणाला भिजवत राहतो. पाऊस पडू लागतो,सारा मुलुख हिरवागार होतो. या हिरवाईवरून असंख्य जलधारा वाहू-धावू लागतात. यातलीचएक मोठी जलधार- सवतसडा!
मुंबई-गोवे महामार्गा लगतचा हा धबधबा चिपळूणहून ५ किलोमीटरवर.परशुरामाच्या डोंगरावर पडणारासारा पाऊस इथे या धारेतून खाली कोसळतो आणि वाशिष्ठीला जाऊन मिळतो. भोवतीने घट्ट झाडी आणि मधोमध एका उंच उघडय़ा कातळावरून कोसळणारी ही शुभ्र धार. जणू याशुभ्रतेला हिरवाईचेच कोंदण!सवतसडय़ाचे हे पहिले दर्शनच मोहातपाडते. मुख्य रस्त्यावरून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक चांगली पाऊलवाटबांधली आहे. या वाटेच्या सुरुवातीलाच सवतसडय़ाची ओळख सांगणारी एक शासकीयपाटी येते. पण तिच्यावर अगदी सुरुवातीलाच ‘‘..‘क’वर्ग पर्यटन स्थळ’असा उल्लेख येतो.पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांची अ, ब,क,अशी प्रतवारी केलेली आहे. त्यानुसार त्या त्या स्थळांवरखर्च केला जातो. पण या वर्गवारीचा उल्लेख असा जाहीर पाटीवर करत शासनाने जणू आपल्या लेखन अभिरुचीचे प्रदर्शनच मांडले आहे.
मोठाल्या वृक्षराजीतूनही वाट धबधब्याकडे सरकते. वाटेत झाडांच्या फांद्यांची कमानघेत हा धबधबा वेगवेगळय़ा कोनातून दिसतो. जवळ जाईपर्यंत त्याचेते विस्तीर्ण रूप आणि रोरोवणारा आवाज मन व्यापून टाकतो.शेपाचशे फूट उंचीचा तो कडा, मात्र त्याचे पोट खपाटीला गेल्याने वरून निघालेली ती धार थेट जमिनीकडे झेपावते. असंख्य धारांमधून तो पाण्याचा पदर वाटतो. जणू एखाद्यासुंदर स्त्रीने तिचे लांबसडक केस मोकळे सोडावेत,त्याप्रमाणे! आपण असे या भावमग्नतेत असतानाच कुणीतरी सांगू लागते,‘‘..त्या तिथे वर धबधब्याच्या कडय़ाच्या टोकाशीत्या दोघी सवती बसल्या होत्या.एक राजाची आवडती,तर दुसरी नावडती.नावडती आवडतीला तिची वेणी घालूनदेते असे म्हणते. तिच्या बोलण्यातील काळेबेरे लक्षात आल्याने आवडती आपला पदर हळूच नावडतीच्या ओच्यालाबांधते. वेणी होते,आवडती उठणार तोचनावडती तिला कडय़ावरून खाली ढकलते.पण तिच्याबरोबर नावडतीदेखीलखाली कोसळते..’’सवतीमत्सराचीगोष्ट सांगणारा हा धबधबा ‘सवतसडा’हे नाव घेत कोसळतअसतो.
गेली अनेक वर्षे कोसळत असलेल्या या धबधब्यानेइथे एक मोठा डोहच तयार केला आहे.त्यात पडणारी ही धार दूपर्यंततिचे तुषार उडवते. सवतसडय़ाचेहे सौंदर्य पाहता पाहता या तुषारांमध्येच भिजायला होते. सवतसडय़ाला मनात साठवावे आणि पुढे निघावे तोघाटात आणखी एक सौंदर्य विसावावाट पाहात असतो. उंच उंच जाण्यात पायथ्याचे जग,देखावा पाहण्याचे मानसशास्त्र दडल्याचे सांगितले जाते. परशुराम घाटाच्या डोंगराला असाच एक निसर्गदर्शनाचा कोन आहे. त्याला कुणी वाशिष्ठी दर्शन नाहीतर कुणी विसावा पॉइंट असेम्हणते. परशुरामघाटाचे शेवटचे वळण पार पाडतगाडी सर्वोच्च स्थानी आली,की रुंदावलेल्याया रस्त्यावरून एकदम डावीकडच्या दरीकडे सगळय़ांचेच लक्ष जाते.वाशिष्ठी नदीचे खोरे सुजलाम्सुफलाम् होऊन अवतरते.
डोंगरदऱ्यांच्या आश्रयाने, हिरवाईलासोबत घेत वाशिष्ठी मार्ग काढत असते. समोरच्या गोवळकोटला चंद्राकृती वळण घेणारी ही जणू चिपळूणचीचंद्रभागाच! तिचे हे भरलेलेपात्र, भोवतीची हिरवाई, भातशेतीचे पट्टे सारे काही मन मोहरून टाकते.कधी संध्याकाळी इथे आलो तर यासाऱ्या निसर्गदृश्यावर मावळतीचे गहिरे रंग अवतरलेले असतात. इथल्या झाडांच्या कमानीतून हे सारे पाहताना जीव गुंतून जातो. मुशाफिरीचेहे असे गहिरे रंगच मग नव्या प्रवासाची उमेद ठरतात!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

मस्तानी तलाव

मस्तानी तलाव
पुण्याजवळचा दिवे घाट ओलांडत सासवडला जाऊ लागलो, की डावीकडे दरीतील आखीव-रेखीव मस्तानी तलाव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात तर भोवतालच्या साऱ्या डोंगर-टेकडय़ा हिरव्यागार होतात आणि पाण्याने भरलेला हा तलाव अधिकच उठून दिसतो. या ओल्या दिवसात मुशाफिरीसाठी या दिवेघाटात जरूर वाट वाकडी करावी. पुण्यापासून साधारण १७ किलोमीटरवर वडकी गाव. या गावातूनच एक गाडी रस्ता डोंगराच्या अगदी पायथ्याशी तलावावर आणून सोडतो. एरवी घाटातून एक भिंतवजा वाटणारे हे बांधकाम जवळ जाताच एक बुलंद वास्तू वाटू लागते. सभोवतालचे डोंगर अंगावर येतात. डोंगरांचा हा वेढा आणि विस्तीर्ण जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर आपले खुजेपणही जाणवू लागते.
थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाने खरेतर साऱ्या पेशवाईचा इतिहासच भारावलेला आहे. या प्रेमाचा स्पर्श पुण्याभोवतीच्या काही स्थळ-वास्तूंच्या नशिबीही आला. यातलीच ही एक मस्तानी तलावाची जलवास्तू. असे म्हणतात, शूर योद्धा असलेले बाजीराव पेशवे त्यांच्या विश्रांतीच्या,निवांतक्षणी पुण्याबाहेर इथे या तलावावर येत असत. इथल्या डोंगर-दऱ्यांच्या, त्यातील हिरवाईच्या, तिच्या कुशीतल्या या तलावाकाठी चार क्षण घालवत. अथांग पाण्याच्या सान्निध्यात आणि मस्तानीच्या सहवासात त्यांच्या मोहिमांचा सारा ताण नाहीसा होत असावा. एका शूर योद्धय़ाचे एक रसिक मनच यातून डोकावते.
महाराष्ट्रात अनेक गावा-शहरांजवळ ऐतिहासिक तलाव आहेत. पण या साऱ्यांमध्ये वडकीच्या मस्तानी तलावाची जागा, परिसर आणि त्याचे बांधकाम हे वैशिष्टय़पूर्ण असे आहे. थोरल्या बाजीरावांनी १४ एकर क्षेत्रात हा तलाव बांधला, पण तत्पूर्वी त्यांनी या जागेचा व परिसराचा चांगलाच अभ्यास केला होता. या भागात किती पाऊस पडतो, पाणी कुठून खाली येईल, डोंगराला कुठे चढ-उतार आहेत, या साऱ्याचा तपशिलाने विचार केलेला आहे. या संदर्भात पुण्याच्या पेशवे दप्तरात एक स्वतंत्र पत्रच आहे. ज्यामध्ये पेशव्यांच्या दोन निरीक्षकांनी नोंदवलेले वर्णन याप्रमाणे – ‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसीजे. छ. १२ मोहरमी.. सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वाचे नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तरदक्षण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्व पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात कोठे चार हात येणेप्रमाणे होते पु(ढे) उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोऱ्यांतील ओढे व दक्षणेकडील तल्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तल्यात आणिले आहेत..सदरहू लि।। प्रमाणे लिंगोजी निंबाणेकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले..’
आज अडीचशे वर्षांनंतरही तलावाचे बांधकाम खणखणीत उभे आहे. तलावाच्या भिंती सहा ते बारा फूट जाडीच्या आहेत. यातही पश्चिमेकडची 3बांधाची आडवी भिंत तर एखाद्या चिरेबंदी किल्ल्याप्रमाणे आहे. या आडव्या भिंतीला तीन बुरुजांनी भक्कम केले आहे. या बांधकामात जागोजागी छोटय़ा खोल्या,कोनाडे, भुयारी मार्ग, बसण्यासाठी ओटे-धक्के अशी रचना केली आहे. तलावाच्या काठावर गणेश, हनुमान आणि महादेवाची मंदिरे व उघडय़ावर काही देवतांच्या मूर्ती आहेत. या भिंतीवरच पूर्वी एक महाल होता. त्याच्या खांबांच्या खुणा आजही दिसतात. इथूनच एक भुयारी मार्ग तलावाशेजारच्या विहिरीत उतरतो. या तलावाशेजारी पूर्वी घोडय़ाची पागाही असल्याचे इथले गावकरी सांगतात. थोरल्या बाजीरावांनी बांधलेल्या या तलावावर नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन १७५१ मध्ये काही रक्कम खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे. पण यानंतर आजपर्यंत तब्बल अडीचशे वर्षांत या तलावाच्या वाटय़ाला फक्त उपेक्षाच आली आहे. तलावाचे खरे सौंदर्य ते इथल्या पाण्यात पण वर्षांनुवर्षांच्या उपेक्षेने तो सध्या गाळानेच भरला आहे. महात्मा फुले जलसंधारण अभियानांतर्गत २००३ मध्ये या तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. पण हे कामही अन्य ‘सरकारी’ कामांप्रमाणे अर्धवट अवस्थेत राहिले. खरे तर या तलावातील गाळ काढून इथे बारमाही पाणी अडवले - साठवले तर या भागाची सिंचनाची मोठी सोय होईलच पण एका ऐतिहासिक स्मारकाचेही चांगल्या रीतीने जतन होईल. तलाव व आजूबाजूच्या वनराईमुळे हे एक वनस्पती व पक्षिनिरीक्षणासाठी चांगले सहल केंद्र ठरू शकते.
पुण्याबरोबरच राज्यातील अनेक शहरे सध्या चहू दिशांनी वाढत आहेत. या वाढत्या नागरीकरण आणि अतिक्रमणांच्या विळख्यात या शहरालगतची असंख्य स्मारके-निसर्गस्थळेही गुदमरू लागली आहेत. अशावेळी या स्थळांना वेळीच संरक्षण देत विकासाच्या चार गोष्टी केल्या नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. असो, पाण्याअभावी एरवी रुक्ष, कोरडा वाटणारा हा मस्तानी तलाव व परिसर पावसाळ्यात मात्र रसिला होतो. आजूबाजूच्या हिरवाईने त्याला तारुण्याची झालर चढते. या काळात कुठल्याही दिवशी इथे यावे, तलावाच्या काठावर तासन्तास बसून राहावे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा,लाटांवर विहार करणाऱ्या पाणकोंबडय़ा न्याहाळाव्यात. दिवेघाटाच्या डोंगरातले, उनपावसाचे खेळ पाहावेत, निसर्ग शांतता अनुभवावी आणि समाधान घेऊन परतावे..!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

पळसदेवमधील श्री पळसनाथ

पळसदेवमधील श्री पळसनाथ
धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात. या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले.
आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे.
मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)

आदिशक्ती श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)
श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार) हे गाव महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील महाबळेश्वरच्या पश्चिमेस रडतूंडीच्या घाटतून सहा मैल अंतरावर आहे. या रडतूंडीच्या घाटाचा नामोलेख इतिहासात आहे, तर प्रतापगडाच्या दक्षिणेला पायथ्याशी वसलेले आहे. सध्याच्या महाबळेश्वर - पार या रस्त्याने हा मार्ग केवळ २० कि.मी. आहे. छ्त्रपतीच्या कालखंडमथ्ये पार्वतीपूर (पार) हे गाव एक महत्वाची बाजारपेठ होती. सातारा – वार्इ - मेढा त्याचप्रमाणे रायगड जिल्हयातील महाड पोलदपूर इत्यादी ठिकाणाहून व्यापारी लोक पारला येवून मोठा बाजर भरवत असत. हे गाव एक मोठी व्यापारी पेठ होती. त्यामु ळेच या गावचे विभाजन करून पारपार, पेठपार व सोंडपार अशी तीन गावे निर्माण केली व वेगवेग ळी मुलखी व पोलीस पाटिल व्यवस्था केली.
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक जागॄत शक्तीपीठ आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची ही कुलदैवत आहे.
देवालय परिसर
श्रीरामवरदायिनी आईचे सुंदर देवालय हेमाडंपंथी पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असलेल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. सहयाद्रीच्या कुशीत घनदाट वनरार्इत नटलेले हे गाव. निसर्गाने अतिशय उदार अंत:करणानं अनोखे असे सॄष्टीसौंदर्य हया पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी व छ्त्रपतीच्या का ळात या नदीवर बांधलेला प्राचीन पुल हे या गावच्या सौंदर्यात आणखी एक आभूषण.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

टाहाकारी मंदिर*

टाहाकारी मंदिर .....!

महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल या शक्तिदेवतेचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, माहूरगड ही प्राचीन ‘शक्ति’स्थाने याचीच प्रचिती देतात. या प्राचीन माळेतीलच एककोरीव मणी म्हणजे नगर जिल्ह्य़ातील अकोल्याजवळचे टाहाकारी!
अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात अनेक प्राचीन व कलाकुसरीने युक्त मंदिरे आहेत. अकोल्याहून समशेरपूरमार्गे टाहाकारी साधारण वीस किलोमीटरवर. अकोले आणि संगमनेरदोन्ही ठिकाणांहून एस.टी. बसची सोय. खरेतर गावात शिरेपर्यंत टाहाकारी देवीची श्रद्धा कानी येत असते. पण प्रत्यक्ष गावात गेल्यावर मात्र आढळा नदीकाठच्या त्या भव्य, कोरीव मंदिरावरील शिल्पकलेचे गारुडच मनावरआरूढ होते. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित. यावरूनच मंदिराची भव्यता ध्यानी येते. अध्र्यापर्यंत भिंत. या भिंतीचा बाह्य़ भागआणि या खांबांवर मुक्त हस्ते कोरीव काम केलेले. बाह्य़ भागावर शिव, पार्वती, गणेश, देवी आदी देवता; हत्ती, व्याल, घोडे असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सुरसुंदरी आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पेहीकोरलेली! या मुखमंडपातच भिंतीलगत दगडी कक्षासनांची (बसण्याचे ओटे) रचना केलेली. मुखमंडपातील हे ‘वेरुळ’ पाहत सभामंडपात शिरल्यावर तर हे मंदिर लेणे आणखी विस्तीर्ण होते. बारा खांबांवर आधारित हा मंडप.त्याच्याभोवती पुन्हा तीन दिशांना तीन गर्भगृह. पैकी समोरचे मुख्य! हा मुख्य गाभारा आणि सभामंडपा-दरम्यान पुन्हा अंतराळाची रचना.

मंदिराची ही एकूण रचनाच गुंतागुंतीची! पण थोडेसे शांतपणे, लक्षपूर्वक पाहू लागलो की हा सारा गुंता त्यातली कोरीव कला दाखवत सहज सुटत जातो. सभामंडप आणि अंतराळाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या,यक्ष प्रतिमा आणि देव-देवतांचे मूर्तिकाम केलेले आहे.  सभामंडपाच्या छतावर एकात एक गुंफलेली वर्तुळे आणि मधोमध लटकणारे एक दगडी झुंबर आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गाभाऱ्याच्यादरवाजावरही बारीक नक्षीकाम केले असून, त्याच्या शीर्षपट्टीवर गणेशाऐवजी देवीची संकेतमूर्ती स्थापन केली आहे. हे सारेच अफलातून! पण आपल्याकडील देवदर्शनामध्ये या इतक्या सुंदर मंदिरांना काहीच स्थाननसते. त्यामुळे मग या साऱ्या नजाऱ्याकडे दुर्लक्ष करत आपण फक्त त्या अभिषेक आणि हार-तुऱ्यांमध्ये अडकतो. दुर्दैव कुणाचे? आमचे की या जागोजागीच्या संपन्न वारशाचे हेच कळत नाही. मुख्य गाभाऱ्यातील त्याजगदंबेचे दर्शन घेत बाहेर यावे तो तिच्या बाह्य़ भिंतीवरील मूर्तिकाम थक्क करून सोडते. या मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती आहे. ही भिंत अगदी छोटय़ा-छोटय़ा अंतरावर विविध कोनात दुमडली आहे. या दुमडलेल्याप्रत्येक छोटय़ा भिंतीच्या मध्यावर ओळीने हे मूर्तिकाम केलेले आहे. खरेतर टाहाकारी मंदिराचे हेच मुख्य आकर्षण! या मूर्तिकामात गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सुरसुंदरीचे तब्बल बावीस आविष्कारप्रकटले आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल त्यांचा मान! त्यांच्या रचना-शैलीतून तत्कालीन कला आणि सौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कुठकुठल्या या सुरसुंदरी..! कधी आरशात स्वत:चे सौंदर्यपाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा - ‘दर्पणा’, तर कुठे नृत्य अवस्थेतील नृत्य सुरसुंदरी! बासरी, मृदंग वाजवणाऱ्या, हाती पक्षी घेतलेल्या शुकसारिका, मुलालाघेतलेल्या मातृमूर्ती अशा या त्रिभंग अवस्थेतील हे नाना सौंदर्याविष्कार! ..असे म्हणतात या सुरसुंदरीचा जन्म समुद्रमंथनातून झाला. खरेखोटे माहीत नाही, पण त्या अमृताचे भाव मात्र आजही त्यांच्या दर्शनी चमकूनजातात!

टाहाकारीचे हे मंदिर पाहिले, की मग त्याच्या निर्माणाच्या काळात उतरावेसे वाटते. या मंदिराची शैली, रचना यावरून ते यादवकालीन नि:संशय! शिवाय या मंदिराशेजारीच आणखी एक मोडकळीस आलेल्या मंदिरावर एकशिलालेख आढळला. ज्यावर साल दिले होते शके १०५० म्हणजेच आजच्या भाषेत इसवी सन ११२८! आणखी काय हवे!

टाहाकारीसारखी अनेक कोरीव शिल्पमंदिरे आज आपल्याकडे खेडोपाडी उपेक्षेचे जीवन जगत आहेत. अशा प्राचीन वास्तूंच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे त्यांच्याकडे लक्ष नाही तर दरदिवशी ढासळत्याबांधकामाने स्थानिक गावकऱ्यांचे मात्र चित्त लागत नाही. मग यातूनच जीर्णोद्धाराची टूम निघते. निधी जमतो आणि काम सुरू होते. पण शास्त्र-इतिहास सोडून फक्त श्रद्धेतून केले जाणारे हे प्रयोग म्हणजे ‘आजारापेक्षाउपचार जालीम!’ अशा पद्धतीचे ठरतात. टाहाकारीचे हेच दु:ख! एवढय़ा महत्त्वाच्या मंदिरापर्यंत पुरातत्त्व विभाग पोहोचलाच नाही, तेव्हा गावकऱ्यांनीच त्यांचे काम सुरू केले. जुनी, प्राचीन मोडकळीस आलेली शिखरेउतरवली. तिथे नवी अत्यंत विजोड अशी रंगीबेरंगी शिखरे चढवली. एवढा सुंदर मुखमंडप असताना त्यावर पुन्हा ‘आरसीसी’ मंडप घालण्यात आला. अनेक मूर्तीना विनाकारण शेंदूर थापला. आतील भाग रंगरंगोटीनेबटबटीत केला आणि या साऱ्यावर पुन्हा देणगीदारांच्या याद्या, नवे आरसे, झुंबरे असे बरेच काही..! हजार-अकराशे वर्षे जुने-प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळवले. टाहाकारीसारखे हेअसले प्रयोग गावोगावी सुरू आहेत आणि सरकार, संबंधित विभाग, तज्ज्ञ मंडळी आणि सुजाण लोकप्रतिनिधी या साऱ्यांनाच याकडे लक्ष द्यायला वेळ नाही! आमच्या गौरवशाली इतिहासाचाच हा भयाण वर्तमान म्हणावाकी काय! असे असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. महाराष्ट्रातील प्राचीन ठेवा जपून कसा ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
 

पिंगळजाई भवानी माता,पिंगळी

पिंगळजाई भवानी माता,पिंगळी(तालुका:- माण)
फलटण-दहिवडी-विटा मार्गावर खटाव व माण तालुक्याच्या सीमारेषेजवळ पिंगळी हे गाव असून गावात पिंगळजाई म्हणजेच भवानी मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे ,
चकीत करणारी गोष्ट म्हणजे ह्या देवीच्या अगदी मूर्तीसमोर नंदी, कासव, व हनुमानाचेही मंदिर आहे पण इथे रामाची मूर्ती व शिवलिंग कुठेच पाहायला मिळत नाही...
गाभारयात भवानी मातेची मूर्ती असून दरवाजावर गणरायाचे शिल्प आहे,
सभामंडपातील खांबावर कोरीवकाम नाही
मंदिराला समोरील बाजूने जुना दगडी बांधकामाचा नगारखाना व तटबंदी असून मंदिराबाहेर दीपमाळ व नंदी पाहायला मिळतो
दीपमाळेच्या मागेच रसत्याला लागून हनुमानाचे मंदिर आहे व मंदिराबाहेर एक वीरगळ व दोन सतीशिळा पाहायला मिळतात.
पिंगळीवरून काही अंतरावर कातरखटाव येथे पुरातन कातरेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

मधुकेश्वर मंदिर'

वास्तूशिल्पकलेच्या अजोड नमुन्यांचं बनवासीचं 'मधुकेश्वर मंदिर'…  
ऐका,या शिव मंदिराच्या काही खांबांना असं काही 'पॉलीश' केलं आहे की त्यांत आपल्या कपड्यांचे निळा,गुलाबी सारखे रंग दिसतात ;आणि मंडपाच्या कोरीव कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल (convex) व अंतर्गोल (concave) 'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार दिसतात;देव-देवतांसारखे 

लाल माती, हिरव्या गर्द झाडीच्या कर्नाटकातील देखण्या 'शिर्सी' पासून २३ कि.मी.वर असलेल्या 'बनवासी'चं दोन हजार वर्षांपूर्वीचं मधुकेश्वर(महादेव) मंदिर म्हणजे वास्तू शिल्पकला आविष्कार सौंदर्याचा एक अजोड नमुनाच ! दुस-या ते अठराव्या शतकांच्या दरम्यान चुटु वंशियांनी प्रथम बांधलेल्या, इ.स.३२५ पासून २५० वर्षे राजधानी राहिलेल्या,बनवासी च्या अप्रतिम मधुकेश्वर मंदिरात शिल्पकलेची एक-दोन नव्हे तर ४०चे वर स्तिमित करणारी वैशिष्ठे बघायला मिळतात.ती कळण्यासाठी मात्र जाणकार 'गाईड' बरोबर हवा !

सगळ्यात वैशिष्टपूर्ण आहे तो नंदी मंडपातील होयसाळा धर्ती शैलीतील प्रचंड मोठा नंदी.शिव मंदिरांतील बहुतेक नंदी हे सरळ पिंडीकडे चेहरा करून असतात.इथला नंदी तिरकस बसलेला असून,त्याचा एक डोळा शंकराच्या पिंडीकडे असून, त्यांत शांत भाव दिसतो; तर दुसरा डोळा शेजारच्या मंदिरातील पार्वतीकडे असून,तिने मारल्याने,त्यांत रागीट भाव जाणवतो.या मंडपाच्या मायादेवी कोरीव कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल(convex) व अंतर्गोल (concave) 'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार दिसतात.स्वत:ला देव-देव्यांसारखे चार हात करून पहायला कोणाला आवडणार नाही ? काही खांबांना असं 'पॉलीश' केलं आहे की त्यांत आपल्या कपड्यांचा निळा,गुलाबी सारखा रंगही दिसतो.स्वयंभू चतुर्भूज देव्यांनो रंगमय वस्त्रानिशी या खांबांत स्वत:ला करा नमो नम:!                                               

मधुकेश्वर मंदिरात प्रवेश करताच दिसतात दोन विशाल स्थंभ.पहिला ४०फूट उंचीचा,एकसंध दगडातील 'ध्वजस्तंभ';आणि दुसरा 'दीप' किंवा 'ज्योतीस्तंभ'. देवालयात पाच मंडप असून,आवारात देव-देवतांसंबंधित अनेक वैशिष्ठपूर्ण गोष्टी आहेत. होयसाळ शैलीतील प्रत्येक खांबावरचं कोरीव कारागिरीचं नक्षीकामही निरनिराळं !सभा मंडपातील एका खांबांवर नागरी,हळकन्नड,तेलगु,तमिळ, संस्कृत अशा पाच भाषांतील शिलालेख असून,जमिनीवर चुटु वंशाची नागशिला आहे.त्रिलोक मंडपातील सिंहासनात खाली पाताळ;सत्व,रज,तम प्रतिकांचा भूलोक;वरती देवलोक असून,देवळातील घंटेमधून 'ओमकारा'चा नादध्वनी बराच काळ ऐकू येतो.मधुकेश्वर मंदिरात कोरलेले अष्ट दिशांचे देव त्यांच्या वाहनांसह;सपत्निक ('गाईड'ने कानडीतील पुस्तकावरून भाषांतरीत करून सांगितल्या प्रमाणे): पूर्व: इंद्रदेव-वाहन ऐरावत;पत्नी सचिदेवी.पश्चिम:वरुणदेव-वाहन मगर+हत्ती रूप;पत्नी अलकादेवी.उत्तर: कुबेरदेव-वाहन घोडा;पत्नी चित्रलेखा दक्षिण: यमदेव वाहन रेडा;पत्नी श्यामलादेवी. आग्नेय(S-W) : अग्नि-वाहन दोन तोंडी मेंढा;पत्नी अग्निस्वाहादेवी. वायव्य(N-W): वायू-वाहन सारंग(हरिणी);पत्नी अंजानादेवी.ईशान्य(N-E) : ईश्वर-वाहन नंदी;पत्नी पार्वती नैऋत्य(S-E): निराऋती-वाहन राक्षस;पत्नी दीर्घादेवी.       

भित्तीचित्रात दूध देतानाची दोन तोंडाची गाय असून,तिचे एक मुख झाकले असता,वासराला पहिल्यांदीच दूध पाजत असल्याने घाबरल्यासारखी वाटते; तर दुस-या तोंडाने वासराकडे वात्सल्याने पहात असल्या सारखी वाटते.दोन देह,एक मुख अशी प्राण्यांतील विकृतीही कोरलेली दिसते.एका खोलीत बंद आहे सहाशे वर्ष जुना ग्रानाईटचा एकसंध पलंग.सूर्यनारायणा च्या मूर्तीचे खाली सात घोड्यांचे चित्र कोरलेले असून,एके ठिकाणी गणपतीची उभी अर्धी मूर्ती असून, तिचा दुसरा अर्धा भाग काशीत असल्याचं मानलं जातं.म्हणून या मंदिराला 'दक्षिण काशी' ही संबोधलं जातं.एका छोट्या नंदीवर टोर्चने प्रकाशझोत टाकला असता त्याची बुबुळे हालताहेत असा भास होतो.

 
 
 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...