http://sskothawade.blogspot.com/
।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
।। श्री गुरुदेव दत्त ।।
उम्मीद 🤞 पे दुनिया कायम है.. ગિરનાર.. peak ⛰️ of the year
ગિરનાર
बद्दल पहिल्यांदा मी देवेशकडून ऐकलं होतं.. १. त्याचे अनुभव ऐकून, २. खूप
काही दूर नसल्याने, आणि साहजिकच, ३. trekking असल्याने - कधीतरी
आपल्यासाठीही विचार करायला हरकत नाही, म्हणजे सहजा-सहजी कधी जमलं तर जाऊन
येऊ 😊, इथपर्यंत विचारांची गाडी पोहोचली होती.. नंतर प्रसादने जेव्हा
त्यांचा दुसऱ्यांदा जायचा plan सांगितला, तेव्हा self-drive 🚗 असल्याने
'नको' म्हणत विषय तात्पुरता / परत back-burner वर ठेवण्यात आला..
recently,
राजगडला जेव्हा राहुलने विषय काढला, तेव्हा गाडी विचारांमधून निघून
writing मध्ये पळायला लागली 😀.. सर्व available optionsचा विचार करत ३.५
दिवसांचा (3 days 🌇, 4 nights 🌃) plan तयार झाला - शनिवार-रविवार धरून
फक्त १ दिवस सुट्टी.. पहिली train 🚉 होती १ तारखेच्या रात्री, दुसरी ३
तारखेच्या आणि चौथी ४ तारखेच्या रात्री.. म्हणजे झोपण्यासाठी hotelची गरज
होती ती फक्त २च्या रात्री, जेव्हा actually आम्ही night trek करणार होतो
(३ला पहाटे).. plan कसा / किती जरी असला तरी, article 'घरबसल्या trekking'
blog मधले असल्यामुळे ह्यात रुळांवरच्या 🛤️ किंवा रस्त्यावरच्या 🛣️
गाडींचे किस्से नसून फक्त ગિરનાર trek (पायांच्या गाडी) विषयी माहिती आहे..
बाकीच्या sightseeingचे spots शेवटी 'Annexure' मध्ये थोडक्यात..
writing
मध्ये तयार झालेले ६ जण होते, राहुल (२), वैभव, महेश आणि मी.. हे तर ५च
🖐️ झाले ना?, हो.. जाणाऱ्या trainचं booking झाल्यावर प्रशांत देवर्डेने
interest दाखवला (आडनाव सांगायचं कारण येईल लक्षात लवकरच).. seats
available आहेत, हे बघत त्यालाही add ➕ करण्यात आलं.. so, equation for now
was ५ जण एका boggieत आणि प्रशांत शेजारच्या 🚃..
जशी-जशी
तारिक जवळ येत होती, बाकीचे bookingsही झाले.. म्हणजे, returnचे, ગુજરાત
internal, hotel 🏨 etc etc.. नंतरचे काही दिवस हे गणित सुस्थितीत होतं..
आणि मग, एखादा जो cancel होणार असतोच 🤦, तो झाला - महेश.. 'replacement
भेटली तर ठीक, नाहीतर ticket शेवटच्या दिवशी cancel करू', approach सोबत
मागच्या रविवारीच नागेश्वरला 🔱 (ज्योतिर्लिंग नाही, trek) गेलो असता
राहुलने प्रशांत चौधरीला 'एक ticket आहे', म्हणून सांगितलं.. rest, you can
guess.. so, final ६ होते, २ राहुल, २ प्रशांत आणि १ वैभव-सुशिल 😆..
train
मध्ये कधी काय checking होईल, ह्याचा नेम नाही, म्हणून महेशकडून जी आधार
cardची soft copy घेतली होती, त्याची प्रशांतने print 🖨️ काढून आणली
होती.. and, it actually paid off.. 'hair transplant चा खर्च किती होतो?',
ह्याचं उत्तर जरी नसेल भेटलं, तरी 'प्रशांतच महेश आहे का?', ह्याचं उत्तर
द्यायची गरज नाही पडली 😎.. कारण 'आधार card, हे photo id म्हणून कसं
वापरतात?', हे मला अजूनही गुपितच 🤨 आहे..
articleचं
title 'उम्मीद पे दुनिया कायम है', म्हणजे રાજકોટ (आणि बरंच काही) 😁..
plan नुसार आम्ही ३ वेळेस રાજકોટ cross करणार होतो.. जातांना आम्ही
અમદાવાદला machineचा चहा ☕ नाकारला कारण उम्मीद होती की રાજકોટला सोय होईल,
which was overruled 😔.. तरी, येतांना आम्ही railway staffच्या जेवणाच्या
हाकांना 🗣️ परत-परत ignore करत होतो, कारण उम्मीद होती की 'રાજકોટला
चांगलं भेटेल', which was partially sustained 🥪 🥐.. असो, back to -
ગિરનાર
- आजू-बाजूला दाट जंगल, म्हणजे हिंस्त्र प्राणी असल्यामुळे परिक्रमेसाठी
फक्त कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा 🌕 असे ५ दिवस allowed, आणि / कारण ह्या ५
दिवसात कुठलेच प्राणी आपल्याला त्रास देत नाहीत.. trekking साठी वर्षभर
खुला, आणि एका बाजूने १०,००० पायऱ्या.. खूप जास्त वाटत असतील तर ५,०००
पर्यंत ropewayही 🚡 आहे.. नंतर मात्र खाली-वर आहे, जिथे पायी जाण्याशिवाय
पर्याय नाही, इ.. अशी काही जी आपल्याला ગિરનારची ओळख आहे, त्यात दिवेकर
काकांनी थोडी भर घातली - मंदिर संध्याकाळी ०७:०० 🕖 वाजता बंद होतं, सकाळी
०६:०० 🕕 वाजता उघडतं, ०६:१५ वाजता आरती 🪔 असते.. सिंहगडला regular
जाणाऱ्या publicला ३-३.५ तासापेक्षा जास्त वेळ नाही लागायला पाहिजे 🙃..
ह्या महत्त्वाच्या माहितीसोबत त्यांनी एक जो 'पहाटे ०३:००-०३:३० ला चालू
करा' चा सल्ला दिला, त्याने plan आखायला आणि आमच्यापैकी कोणाला कसलाच त्रास
न होता execute करायला खूप मदत केली 🤝 🤘.. त्यानुसार,
२
(तारखे)ला જૂનાગઢला दुपारी ३ला पोहोचून बंद असलेल्या / झालेल्या
attractionsची जमेल तशी थोडीफार sightseeing 📸 करून लवकर झोपी जात 😴, ३ला
early morning २ वाजता 🕑 उठून आंघोळ 🚿 वगैरे करून ३:१५ ला आमची पायांची
गाडी ભવનાથ / તળેટી हून निघाली पूर्व दिशेने ➡️ - ગિરનાર calling..
०३ डिसेंबर २०२२
पहिल्या ५,००० पायऱ्या
सुरवातीपासूनच
मंदिरं (साहजिकच).. काही पायऱ्या चढून होत नाही तर राम-लक्षण-सीता च्या
शेजारी स्वामी समर्थ, आणि एका श्लोकचा / मंत्राचा सुमधुर background score
🎼.. नाही आठवत आता, exactly कुठला?, पण त्याला साथ होती एकदम योग्य volume
🔉 आणि tempoची.. #CannotAskForMore
काही
ठिकाणी टपरीवाल्यांनीच पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या, ह्या रंगांनी
रंगवलेल्या पायऱ्या दिसतात.. पण हा उत्साह थोड्यापुरताच.. ropewayची 🚡
सोय असलेल्या अंबाजी मंदिरापर्यंत (अ)ठराविक अंतराने आकडे.. आता, १०,०००
किंवा ह्या मंदिरापर्यंतच्या ५,००० जरी
चढायच्या असतील, तर कोणाला मोजणे 🔢 तर नाही जमणार, पण मग "आपण किती
आलोय?" पेक्षा "अजून किती बाकी आहेत?" ची माहिती असणे पण महत्वाचे आहे ना?
😌, म्हणून checkpoint / psychological support किंवा demotivation म्हणा,
काही irregular intervals वर एक आकडा वाचण्यात येतो - e.g., ७०, ८०, ५००,
११००, २०००, ३१००.. sequence मध्ये कुठलाच ताळमेळ 😑 नसल्यामुळे, ज्याला जो
random / round / whole number आवडला, त्याने तसं छापायचं / गिरवायचं 🖌️
काम आप-आपल्या परीने केल्याचं लक्षात येतं..
आम्ही
पहाटे चालू केलं असलं तरी रस्त्याने बरेच भाविक चढतांना दिसत होते.. बरेच
लोक मराठीच होते, जे बहुतेक पुणे-વેરાવળ express आठवड्यातून एकदाच
असल्यामुळे असावेत.. मंदिरांसोबत वाटेत maggi 🍝, पाणी, biscuit 🍪
वगैरेच्या भरपूर टपऱ्याही लागतात, ज्यातले काही भाड्याने काठी 🦯 सुद्धा
देतात.. lion 🦁 sighting बद्दल १-२ जणांकडून ऐकल्यामुळे आम्ही ६ काही वेळ
एकत्रच होतो.. अगदीच एकटे नाही आहोत, लक्षात येत आमच्यात ३-३ चे २ group
झाले.. म्हणजे, माझ्यामुळे दोन्ही राहुलचा speed आता कमी झाला होता..
सिंहगडहुन खाली आतकरवाडी आणि पुण्याचं दृश्य 🌌 दिसतं, साधारण तसंच इथून
खाली बघितल्यावर ભવનાથ / તળેટી आणि જૂનાગઢ दिसतात..
साधारण
२.५ हजार पायऱ्या चढून झाल्यावर लागतो (kind-of) एक कडा (nothing
technical), जो चढण्यासाठी घाटरस्ता type पायऱ्या बांधलेल्या / बनवलेल्या
आहेत.. height आणि width तीच ठेवत इथून पुढे पायऱ्यांची depth कमी होते,
आणि म्हणूनच relatively कमी पायऱ्या चढूनच दम लागायला सुरुवात होते 😓..
कमी झालेली मंदिरांची density परत वाढते आणि ४-५ भव्य जैन मंदिरांसोबत ☸️
उच्चांक गाठते.. थोडं अजून चढल्यावर खालून दिसणारा top, म्हणजे ropewayचं
दुसरं टोक किंवा "अंबाजी मंदिर" 🛕 लागतं.. Appवर राहिलेली trail बघत एक
doubt लागलीच हट्ट करत / धरत मनात घर करून बसला, अजिबात ऐकेच ना 🙄..
अंदाजे ७०% रस्ता cover करून जर फक्त ५,००० पायऱ्या झाल्या आहेत तर, इथून
पुढे राहिलेल्या ५,००० नसणारच (उम्मीद)..
"अंबाजी मंदिर" आजचं highest altitude का? 🤔, तर,
शेवटच्या ५,००० (कुछ भी !?) पायऱ्या
इथपर्यंत
आम्हाला लागले १ तास आणि ५५ मिनिटे, म्हणजे तासकाट्याने नुकताच ५चा आकडा
ओलांडला होता.. समोर बघतो तर अंधारात का होईना, lights मुळे एक शिखर
ह्याहून किंचीतसं उंच दिसून येत होतं 📈.. खालपासूनच / चालू केल्यापासूनच
follow करत असलेला approach इथेही घेत, 'परत येतांनाच सगळे वाटेतले मंदिरं
बघू' म्हणत, दुसऱ्या बाजूला उतरायला 🚶♂️ सुरुवात केली.. नंतर, २
टप्प्यांमधल्या पायऱ्या चढून झाल्यावर आला आजचा highest point 🔝, गोरखनाथ
मंदिर, आणि अजून समोर स्पष्ट दिसायला लागलं होतं आजचं target - "श्री गुरु
दत्तात्रेय चरण पादुका" मंदिर.. अजूनही अंधारच होता पण मंदिराच्या
location, आकारामुळे आणि त्यात चालू असलेल्या light मुळे हे सगळं
आमच्यासाठी चकचकीत हिऱ्यापेक्षा 💎 कमी नव्हतं..
इथून
पूढे तर आम्हाला return येणारे सुद्धा दिसले.. शंका हीच की, 'मंदिर बंद
असल्यावर, हे परत कुठून आणि का येत आहेत?' 🤷, असो.. समोर दिसणाऱ्या
प्रकाशाबरोबरच खाली पण (lightचा) उजेड दिसत होता.. immediate calculation
🔣 was - इतक्या खाली जाऊन जर समोर परत चढायचं असेल तर may be, in an
extreme case, ५,००० पायऱ्या असू शकतील.. इसी बात पे, मनात घर करून बसलेला
doubt मिश्कीलपणे हसत होता 😂.. ५,००० नंतर एकही आकडा कुठे वाचायला भेटला
नाही, त्याचं कारण 'खरं सांगितलं तर तो thrill कसा येईल', हेच असावं 🫣..
थोडं
खाली जात एक कमान लागली ⛩️, जिथून पुढे २ वाटा होत्या.. ठरल्याप्रमाणे,
'target आधी आणि बाकीचे lights नंतर' revise करत, डावीकडची वर जाणारी वाट
धरत non-stop चढत जे थांबलो ते थेट बंद मंदिराबाहेर वाढत जाणाऱ्या
रांगेच्या शेवटीच, ~४० जण असतील.. वेळ होती ५:४५, म्हणजे २.५ तासात
hotelहुन मंदिरापर्यंत.. आमच्या पुढे मंदिर उघडायची वाट बघत असणाऱ्यांना
जेव्हा हे सांगितलं, तर, 😮 "शक्यच नाही, तुमचं घड्याळच बंद पडलंय" म्हणत
वाद घालायला लागले.. जेव्हा राहुल "चला खाली आणि येऊ परत 🔁" उत्तरला,
तेव्हा कुठे त्यांनी माघार घेतली.. त्यांचाही point of view बरोबर ✔️
होता.. कारण ते आमच्या फक्त अर्धा तास आधी पोहोचले होते, पण त्यांनी चढायला
सुरुवात मात्र रात्री ११ला 🕚 केली होती.. दुपटीहून जास्त फरक - 'शक्यच
नाही', तुम्ही पण करताय ना विचार, 'कोणीतरी चुकतंय', म्हणून.. होता है,
nothing new in there.. आमच्याहून दुप्पट speed वाले 🫡 सुध्दा बरेच आहेत,
हे तुम्हाला सांगितलं / दाखवले तर 😱..
थोड्यावेळात
मंदिर उघडलं आणि exact ६ला 🕕 आरती चालू झाली.. आरती संपल्यावर रांग पुढे
सरकली आणि आम्ही इथली शेवटची पायरी चढत, श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन घेत,
चरणस्पर्श केले 👣.. #DoneNDusted #CannotAskForMore
ती शेवटची पायरी १०,०००वी होती का?.. एकतर हे साफ खोटं आहे 😒, नाहीतर 'अजून कुठल्या-कुठल्या मोजल्या आहेत?', हे तरी कोणी सांगावे..
कुछ भी !?, ५,००० आणि अजून काही पायऱ्या
परत
येतांना वेळ होती - 'कमानीच्या दुसऱ्या sideला उतरून 📉 काय आहे?', हे
discover करायची.. 'इथे प्रसाद / नाश्ता 🧆 सुद्धा मिळतो' was a surprise..
बरं झालं आम्हाला हे कोणी सांगितलं नव्हतं.. few things are better left
unsaid / untold.. खमण 🧀 इतका delicious 😋 होता की सगळ्यांचा double
round झाला, काहींचा तिसरा सुद्धा - '५,०००' + 'कुछ भी !?' पायऱ्या चढून
भूकच 🤤 इतकी लागली होती.. पण, इथे गेलात तर काही गोष्टी / नियम लक्षात
ठेवा -
१. रांगेनेच बसायचं - तुमच्या बरोबरचे कुठे मागे-पुढे असतील तर मोकळी जागा बघून सगळे एकत्रच बसू, हा हिशोब इथे चालत नाही
२. अजिबात बोलायचं नाही 🤫
३. खायला पाहिजे तेव्हडं भेटेल, पण वाया अजिबात घालवायचं नाही (हे तर मी सुमेधला पण सांगत / शिकवत असतो)
४. table वर बसलं की इतर timepass (mobile वगैरे) करायचा नाही 📵
५. उभं राहून चहा सुद्धा प्यायचा नाही
६. पाणी पितांना पेल्याला तोंड लावायचं नाही 🫗
ह्यातल्याच वेग-वेगळ्या कारणांनी, आम्ही ६ पैकी काहींनी बोलणे खात, इथे entry केली / exit घेतला..
वेळेनुसार
आता सूर्योदय 🌄 due होता.. तांबडं फुटायला सुरुवात होणार / झाली होती..
पहाटे बघितलेल्या हिऱ्याचे फोटो 📸 ह्या तांबड्याचं पिवळं व्हायच्या आतच
काढले गेले पाहिजे, म्हणून आम्ही परत कुठेही न थांबता आजच्या highest
pointला माघारी आलो, गोरखनाथ मंदिर.. ગિરનારला येऊन ह्या spot वरून photo
काढणे 🖼️ is a must.. बाकी काही नाही केलं / जमलं, तरी it's ok 🆗..
![]() |
| credits: राहुल |
रस्त्यात
जशे लागतील तशे एक-एक मंदिरं बघत, आम्हाला अंबाजी मंदिरातली (आजची दुसरी)
आरती भेटली.. इथून थोडं खाली जात आम्ही गौमुखी गंगा मंदिरात शिरलो..
गौमुखातून पडणारं पाणी 💧 आपल्या घरच्या purifierच्या output इतकं स्वच्छ,
पण rich in minerals.. इथेही नाश्त्याची सोय होती.. तिघांत एक plate घेऊन,
आजूबाजूच्या शांततेचा आनंद घेत इथेच थोडा वेळ रिकामे बसलो (इथले साधू 👨🦳
काही नाही बोलले).. ह्या वेळेस तोंड न लावता mineral water पिऊन इथून
बाहेर पडलो आणि 'लक्ष्मीनारायण मंदिर' board 📋 दिसला.. 'जवळच असावं', हे
guestimate करत आम्ही घेतला detour.. बरंच चालून झाल्यावर जेव्हा उत्तरेकडे
खाली एक मंदिर दिसलं, त्याला 'इतक्या खाली जाऊन return ↪️ नको' म्हणत एका
भाविकाला जेव्हा विचारलं, त्याने आमचं लक्ष अजून उजवीकडे असणाऱ्या कमानीकडे
नेलं.. almost गडाच्या उत्तरेकडच्या ⬆️ ridge पर्यंत जाऊन परत आल्यावर
आम्ही आलो त्या रस्त्याला लागलो.. पहाटे जो १०,०००चा आकडा राहिला होता, तो
ह्या २ diversionsनी पूर्ण झाला असावा 🤗 - श्री गुरु दत्तात्रेय संस्थान
(अन्नक्षेत्र) आणि लक्ष्मी नारायण मंदिर..
![]() |
| cannot stop adding photos from this spot |
जैन
मंदिरांमध्ये आम्हाला काही entry नाही भेटली / दिली 🚷.. ropeway सुरू
झाला होता आणि एकाच वेळेस one-side, at least १० अंडे तरी ये-जा करत होते..
एका अंड्याची capacity ६-८ जण असावी, म्हणजे गर्दी होण्याचा प्रश्न नाही..
पुढे रमत-गमत १०च्या सुमारास परतलो पहिल्या पायरीला, तोच मंत्र / श्लोक /
जप 🎼 ऐकायला..
आम्ही घेतलेले दोन्ही diversions जर वगळले, तर एका sideने १०,००० steps
(पायऱ्या) जरी नसल्या, तरी १०,००० steps (पावलं) नक्कीच आहेत.. परत एकदा
नाश्ता केल्यावर / झाल्यावर, रस्त्यात एक जण गाड्यावर काहीतरी नवीनच /
वेगळंच विकतांना दिसला - आकार आंब्यासारखा 🥭 आणि रंग हिरव्या नारळांसारखा
🌴.. विचारल्यावर कळलं, फोडल्यावर ह्यातून १०-१२ पिस्ता निघतात, ज्यांचं
roasted स्वरूप आपण generally खातो..
first
of other highlights of the trek was - a dog 🐕.. सह्याद्री मधल्या treks
सारखंच, ह्याने सुद्धा सुरवातीपासून शेवटपर्यंत आणि return आम्हाला साथ 👥
दिली - such noble souls 😇 they are.. कोकणाच्या levelला असूनही
humidityचा कसलाच त्रास नाही was 'the cherry on (top of) the cake 🍰'..
कमीत-कमी कचऱ्यामुळे शांत आणि स्वच्छ वातावरण ☮️.. ना माकडांचा 🐒, ना
टपरीवाल्यांचा त्रास - दोघेही अपनी अलग दुनियामे आराम करण्यात busy..
पलके चमकने लगी हैं, ये राज़ कैसे छुपायें..
ગિરનારच्या
ह्या trek / article सोबतच माझं ह्या वर्षाचं resolution ही (almost)
पूर्ण झालं आहे 🥳, ज्या बद्दल तुम्ही लवकरच, म्हणजे ५१व्या article मध्ये
वाचाल, ready for publication, on or before this International Mountain
Day ⛰️.. so, till then, आणि of course, नंतर सुद्धा, have a good time..
Annexure
१. एकाच दिवसात जी तिसरी आरती भेटली, ती होती સોમનાથची 🔔..
२. बाण स्तंभ, સોમનાથ - आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग
३. દ્વારકાच्या flatची चावी दिल्याबद्दल प्रजेशचे आभार 🙏..
४. ludo 🎲 खेळण्यात आणि हे article लिहण्यात 📝 परतीचा train प्रवास अगदी सुकर झाला..
५. 'मोती महल' hotelला already ५ स्टार rating दिली गेली आहे 👌..
६. travelling / train 🚂 details,
a. पुणे ते જૂનાગઢ - Pune Veraval express (11088)
b. વેરાવળ ते દ્વારકા - Somnath Okha express (19251)
c. દ્વારકા ते અમદાવાદ - Saurashtra mail (22946)
d. અમદાવાદ ते पुणे - Pune AC Duronto express (12297)
७. total trip expenses (घर से घर तक) - ₹७,२००
![]() |
| महोबत मकबरा, જૂનાગઢ, credits: राहुल |
![]() |
| अशोक शिलालेख, જૂનાગઢ |
![]() |
| only bus travel, courtesy: प्रशांत, credits: राहुल रामपुरा |


















No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.