Friday, February 17, 2023

महाशिवरात्री विशेष: शिवरायांच्या गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे

 https://pudhari.news/maharashtra/kolhapur/463849/mahashivratri-2023-special-story-shiva-temples-on-the-forts-of-shiva-raya/ar


Arun Patil

Mahashivratri 2023 Special Story :गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे

कोल्हापूर, सागर यादव : Mahashivratri 2023 Special Story :सह्याद्रीच्या बेलाग डोंगररांगांतील अभेद्य गडकोट-किल्ल्यांच्या साहाय्याने गनिमी कावा युद्धतंत्राचा वापर करून शिवछत्रपतींनी आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण केले. ‘हर हर महादेव’ अशी युद्ध गर्जना करत शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाने अनेक लढाया जिंकत या स्वराज्याचे रक्षण केले. यामुळे महादेव म्हणजेच शिवाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळेच शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या प्रत्येक गडकोट-किल्ल्यावर शिव मंदिरे पाहायला मिळतात. महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गवैभवावर असणार्‍या महादेव मंदिरांविषयी थोडे…

Mahashivratri 2023 Special Story : महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी उपवास सोडतात. या दिवशी बेलाची पाने, पांढरी फुले वाहून शिवाची पूजा केली जाते.

तर गड-किल्ल्यांवरील शिव मंदिरे

गगनगड, सामानगड, महिपालगड, कलानिधीगड, पारगड, गंधर्वगड या गडकोट-किल्ल्यांवर आणि परिसरात महादेव तथा शिव मंदिरे आहेत. काही मंदिरांना विशेष नावे आहेत, तर बहुतांशी मंदिरे केवळ महादेव मंदिर नावाने ओळखली जातात.

Mahashivratri 2023 Special Story :पन्हाळगड

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची दक्षिणेकडील राजधानी म्हणून पन्हाळगडाला महत्त्व होते. पर्णालदुर्ग असे पन्हाळगडाचे प्राचीन नाव. सोमेश्वर, हरिहरेश्वर, बालेकिल्ल्यातील महादेव मंदिरासह 5 ते 6 छोटेखानी शिव मंदिरे आहेत. शिवछत्रपतींनी या मंदिरांत दर्शन घेतल्याचे संदर्भ अनेक संदर्भग्रंथांत मिळतात.

पावनगड

पन्हाळगडाचा जोड किल्ला असणार्‍या पावनगडाच्या डोंगराला मार्कंडेय पर्वत असेही म्हटले जायचे. शिवछत्रपतींनी मार्कंडेय पर्वताला किल्ल्याचे स्वरूप दिले. पावनगडाकडे दुर्लक्षामुळे शिव मंदिरात अनेक वर्षे शिवलिंग नव्हते. अलीकडच्या काळात ते पुन्हा बसविण्यात आले आहे.

विशाळगड

शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या विशाळगडावर सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणार्‍या हजरत मलिक रेहानबाबांच्या दर्ग्याबरोबरच विविध हिंदू देवदेवतांची मंदिरे आहेत. भगवंतेश्वर, अमृतेश्वर अशा महादेव मंदिरांचा यात समावेश आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.

भुदरगड

गारगोटीपासून जवळ असणार्‍या भुदरगडावर भैरवनाथ, भवानीदेवी यासह दोन महादेवाचीही मंदिरे आहेत. याशिवाय जखुबाई गुहा मंदिर, पहारेकर्‍यांची शिळा खोली, दूधसाखर तलाव, कचेरी, तटबंदी-बुरूज अशा वास्तू आजही पाहायला मिळतात.

Mahashivratri 2023 Special Story : रांगणा किल्ला

प्रसिद्धगड ऊर्फ रांगणा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत जंगल परिसरात आहे. रांगणाई मंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिरासह गडावर महादेव मंदिरही आहे. पूर्णपणे पडलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांपूर्वी निसर्गवेध परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.


 

पर्यटक आणि भाविकांना खुणावतेय कोकणेरचे जटाशंकर मंदिर!

       पालघर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर सूर्या नदी काठावर वसलेल्या कोकणेर गावात पेशवेकालीन पुरातन जटाशंकर मंदिर आणि नैसर्गिक गरम पाण्याच्या झर्यांसाठी प्रसिद्ध आहे. स्वयंभू शिवमंदिर असल्याने श्रावणातील सर्व सोमवार, मकर संक्रांत आणि महाशिवरात्रीला जटाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. शनिवारी 18 रोजी हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे त्यानिमित्त छोटासा केलेला लेखप्रपंच….
        पालघर ते मनोर हमरस्त्यावरील चहाडे आदिवासी नाका येथून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पुरातन काळातील दगडी बांधकाम असलेल्या पेशवेकालीन मंदिराचा जीर्णोद्धार पालघरनवली, मासवण आणि कोकणेरच्या ग्रामस्थांनी मिळून मिती वैशाख शुद्ध 3 चंद्रवासरेसा 1972 शके 1837 रोजी करण्यात आला आहे. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपूर्वी मंदिराचे सुशोभीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आले.
        मंदिराच्या मागच्या बाजूस उत्तरेला साईबाबा मंदिर आणि गगनगिरी महाराजांचा सप्तश्रृंगी मठही आहे. मठाची स्थापना 1983 साली करण्यात आली आहे. जटाशंकर मंदिराच्या मागच्या बाजूच्या भिंतींना लागून भग्नावस्थेतील मूर्त्या आणि शिलालेख आहेत.
        जटाशंकर मंदिराच्या पूर्वेला पन्नास मीटर अंतराववरून वाहणार्या सूर्या नदीच्या काठावर नैसर्गिक गरम पाण्याचे झरे असलेली आणि सूर्या नदीच्या पात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने बुडालेली कुंडे अस्तिवात आहेत. कुंडाच्या भिंतीपासून तीन फूट वर पाण्याची पातळी असल्याने कुंडे बुडालेल्या अवस्थेत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मासवण पुलालगतच्या कोल्हापूर टाइपच्या बंधार्याच्या झडपा काढल्यानंतर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन कुंडे उघडी पडतात. त्यामुळे मे महिन्यापासून ते दिवाळीपर्यंतच्या कालावधीत या कुंडातील गरम पाण्यात आंघोळीचा लाभ घेता येतो. पावसाळ्यात सूर्या नदीला पूर आल्यास कुंडे पाण्यासाठी जात असतात.
       कोकणेर गावच्या हद्दीतील गरम पाण्याच्या नैसर्गिक झर्यांचा इतिहास पाहता, शंभर वर्षांपूर्वी सूर्या नदीकाठच्या भागात गरम पाण्याचे झरे आढळून आले होते. त्याकाळी ग्रामस्थांनी दगड बांधकाम करून गरम पाण्याचा वापर सुरू केला होता. परंतु, सूर्या नदीला आलेल्या पुरात नदीकाठ खचल्याने कुंडे पाण्यात गेली होती. अलीकडच्या काळात आमदार निधीतून नदीकाठच्या भागात कुंडांचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सूर्या नदीवरील बंधार्यामुळे नदीपात्राची पाणी पातळी वाढल्याने कुंडातील गरम पाण्याचा लाभ भाविकांना घेता येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे.
        मासवण पुलालगतच्या बंधार्याची वरच्या बाजूची एक झडप कायमस्वरूपी अथवा मकर संक्रांतीपर्यंत काढून ठेवल्यास सूर्या नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. वर्षाचे बारा महिने गरम पाण्याच्या कुंडांचा वापर करता यावा, यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रशासनाकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती कोकणेरच्या सरपंच मालिनी इभाड यांनी दिली.
 
 संकलनमंगेश तावडे, नविद शेख (पालघर)

मुरुडेश्वरला कधी गेलाय का? नक्की प्लॅन करा

   जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची शिवमूर्ती मुरुडेश्वर इथे आहे. कर्नाटक राज्यातील कंडुका डोंगरावर मुरुडेश्वर मंदिर आहे. (Mahashivratri Murudeshwar ) अरबी समुद्राने वेढलेला मुरुडेश्वर बीचदेखील आहे. भोलेनाथाची विशाल आणि भव्य मूर्ती पाहण्यासाठी तीर्थयात्रेकरू दूरवरून येत असतात. शिवची मूर्ती इतकी उंच आहे की, ती दूरवरूनही पाहता येईल. ही भगवान शिवची मूर्ती बनवण्यासाठी दोन वर्षाचा काळ लागला आहे. (Mahashivratri Murudeshwar )
     मुरुडेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मुरुडेश्वर मंदिराची उंची (Murudeshwar Temple Height) १२३ फूट आहे. भगवान शिवची विशाल मूर्तीचे एक मनमोहक दृश्य नजरेस भरते. मुरुडेश्वर मंदिराच्या मुख्य द्वाराला गोपुर म्हटले जाते.








 
मुरुडेश्वर येथे काय काय पहाल?
स्टॅच्यू पार्क मुरुडेश्वर
         मुरुडेश्वरच्या जवळपास अनेक ठिकाणी फिरeयला जाता येईल. स्टॅच्यू पार्क मुरुडेश्वरचं प्रमुख आकर्षण आहे. स्टेच्यू पार्कमध्ये भगवान शिवची १२३ फूट उंच मूर्ती आहे. हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनली आहे. या पार्कमध्ये हिरवीगार ढाचे, सुंदर फुले आणि उत्साहित वातावरणासाठी ओळखले जाते. मूर्ती पार्कमध्ये सुंदर तलावात फिरणारे बदक आणि धबधबा पाहण्याजोगे आहे.
मुरुडेश्वर किल्ला
        मुरुडेश्वर मंदिराच्या परिसरात मुरुडेश्वर किल्ला एक प्रमुख आकर्षण आहे. मुरुडेश्वर किल्ला प्रसिद्ध मुरुडेश्वर मंदिराच्या मागे आहे. मुरुडेश्वर किल्ल्यांचा इतिहास विजयनगर साम्राज्याच्या संबंधित आहे.
भटकल बीच मुरुडेश्वर
         मुरुडेश्वर मंदिरच्या जवळ फिरण्यसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे भटकल बीच. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. भटकल बीच अरबी समुद्राच्या किनारी स्थित असून नारळाच्या झाडांनी येथे गर्दी केलेली दिसते. (Mahashivratri Murudeshwar )
नेत्रानी द्वीप मुरुडेश्वर
      मुरुडेश्वरचे पर्यटन करताना नेत्रानी द्वीपला नक्की भेट द्या. नेत्रानी द्वीपलाकबूतर द्वीपनावानही ओळखले जाते. उंचावरून हे द्वीप पाहिले असता ऋदयाच्या आकाराप्रमाणे दिसते. अरबी समुद्रात पर्यटकांना स्कूबा डायविंग, नौका विहार आणि मासेमारीचा आनंद घेता येतो.
मुरुडेश्वर बीच
       मुरुडेश्वर समुद्री किनारी पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. मुरुडेश्वर मंदिराला भेट देणारे पर्यटक मुरुडेश्वर बीचला अवश्य भेट देतात. मुरुडेश्वर बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्टदेखील करू शकता. पर्यटकांसाठी हे एक शानदार पिकनिक डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. मुरुडेश्वर मंदिराच्या शेजारी नौकाविहार करण्याचा आनंदही तुम्ही लूटू शकता. इथे उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडे, अडमारे सीगल पक्षी, गल, किंगफिशर पक्षी दृष्टीस पडतात.
काय खाल?
        स्थानिक पदार्थांमध्ये डोसा, बिसी बेले बाथ, उप्पितु, वंगी बाथ, अक्की रोटी, जलादा रोटी, इडली-सांभर, केसरी बाथ, वडा, रग्गी मुडडे. यासिवाय मैसूर पाक, ओब्बट्टू, धारवाड पेढा .
काय खरेदी कराल?
         मुरुडेश्वर मंदिर आणि पर्यटन स्थळी यात्रेदरम्यान स्मृति चिन्हे, मूर्ती, हस्तशिल्प वस्तू आणि पेन, ज्वेलरी बॉक्स, कपडे खरेदी करू शकता.
या महिन्यांमध्ये जाणे योग्य
       मुरुडेश्वरला ऑक्टोबर ते मे यादरम्यान जाणं योग्य ठरेल.
कसे जाल मुरुडेश्वरला?
        मुरुडेश्वर फिरणयासाठी फ्लाईट, ट्रेन आणि बसचीदखील निवड करू शकता. तुम्ही कारने गेल्यास उततमच! फ्लाईटसाठी मंगलोर विमानळ आहे. तर रेल्वेसाठी मुरुडेश्वर जंक्शन प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मुरुडेश्वर रेल्वे स्टेशन मंदिरापासून जवळपास किलोमीटर अंतरावर आहे.
(फोटो-नीता कुबडे, कोल्हापूर)

 

नाशिकचं कपालेश्वर मंदिर, जिथे महादेवासमोर नंदी नाही ; जाणून घ्या आख्यायिका...

          नाशिक शहरातील प्रसिद्ध पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या किना-याजवळ कपालेश्वर महादेव मंदिर आहे. पुराणात असे म्हटले आहे की, भगवान शिव शंकर येथे काही काळ वास्तव्यास होते. जगभरात असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा शिवपिंडीसमोर असतोच. नंदी हा जरी महादेवाचे वाहन समजला जात असला तरी नाशिकच्या या मंदिरात महादेवाच्या पिडींसमोर नंदीच नाही, कारण याठिकाणी महादेवाने नंदिला आपले गुरु मानले आहे. मग, नेमकं असं काय झालं की या ठिकाणी महादेवाने नंदिला आपलं गुरु मानलं आहे. चला तर जाणून घेऊया या मागची आख्यायिका….
अशी आहे या मागची आख्यायिका
        एकदा इंद्र सभा भरली होती. त्या सभेला सर्व देव उपस्थित होते. त्यावेळी ब्रम्हदेव शिवशंकर यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असलेल्या ब्रम्हदेवाची चार तोंडे वेध म्हणत तर एक तोंड निंदा करत असे. संतापलेल्या महादेवांनी ब्रम्हदेवाचे पाचवे तोंड (निंदणारे) तोंड उडविले. ते तोंड शिवशंकर यांच्या हाताला चिटकून बसले. त्यामुळे शिवशंकरास ब्रम्हहत्येचे पातक लागले. त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईनाया पातकापासून आपली कशी सुटका करुन घ्यावी याची चिंता महादेवांना सतावत होती.
         ब्रम्हहत्येच्या दोषापासून मुक्ती कशी मिळवायची या चिंतेत असलेल्या महादेवांची हीच समस्या अखेर नंदीने सोडविली. अशातच नंदीनं महादेवांना नाशिकच्या रामकुंडावर आणले. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं ब्रम्हहत्येचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय. अशी आख्यायिका आहे.
रामकुंडात विसावला नंदी
        कपालेश्वर मंदिराच्या समोरच काही अंतरावर गोदावरी नदी वाहते. या नदीतच म्हणजेच रामकुंडात हा नंदी विसावलेला आहे. यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार बारा ज्योतिर्लिंगानंतर नाशिकमधील कपालेश्वर मंदिराचे महत्व आहे. महादेवाचं हे असं मंदिर आहे, जिथे नंदीच नाही. एका कपालेश्वर मंदिराच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य मिळत असल्याचा पौराणिक संदर्भही सापडतो.
महाशिवरात्रीला होते मोठी गर्दी
          आजच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळपासून भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक केला जातो. पूजाविधी केले जातात. याशिवाय कपालेश्वर मंदिरात दर सोमवारी श्रावणी सोमवारी भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात.

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...