Friday, January 8, 2021

मेघालय

 

पूर्वांचलाचा इतिहास

गुवाहाटी शहराचे जुने नाव प्राग् ज्योतिषपूर. नरकासुराने हे शहर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजचा आसाम पूर्वी कामरुप प्रदेश म्हणुन ओळखला जात असे. दक्षाने शिवपत्नीचा केलेला अपमान सहन न झाल्याने तिने केलेले आत्मदहन व त्यातुन क्रोधित झालेल्या शंकराने हाती सतीचे शव घेउन केलेले तांडव नृत्य पाहुन पृथ्वी भयभीत झाली. विष्णुने सुदर्शन चक्राने सतीच्या शवाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले ती एकावन्न स्थाने शक्तीपीठे म्हणुन् भारताच्या चारी दिशांना पसरलेली आहेत. गुवाहाटीतील 'कामाख्या'(कामाक्षी) देवीचे मंदीर हे त्यापैकीच एक आहे.

उषा व अनिरुध्दाची प्रेमकथा आसामच्या तेजपूर मधे घडली होती. आसाम वर अनेक वर्षे ज्या 'अहोम' राजांनी राज्य केले ते स्वतःला स्वर्गदेव म्हणवत. त्यांच्या जुन्या ग्रंथाप्रमाणे ते इंद्राच्या मोठ्या भावाची संतती आहेत्. आसामच्या डोंगराळ कारबीआंगलांग जिल्ह्यातील कारबी समाज स्वतःला सुग्रीवाचे वंशज् समजतो.

अरुणाचल प्रदेशात परशुरामाने आईच्या रक्ताने माखलेला परशू धुण्यासाठी खडक फोडुन जो जलप्रवाह चालू केला त्याचा पुढे ब्रम्हपुत्र नद झाला. अरुणाचल प्रदेशाच्या लोहित या जिल्ह्यातच रुक्मिणीचा पिता भीष्मक याची भीष्मकनगर ही राजधानी होती. तिचे अवशेष अजुनही तेथे सापडतात. रुक्मिणीचे हरण करुन तिला द्वारकेला नेतांना काही काळ श्रीकृष्ण अरुणाचल च्या सियांग जिल्ह्यात थांबला होता असे स्थानिक लोक अजुनही मानतात.

मेघालयातील खासी स्वतःला एकलव्याचे वंशज् मानतात व त्यामुळे ते धनुष्यबाण चालवतांना अंगठ्याचा उपयोग आजही करीत नाहीत.

जयंतियांमध्ये जुळी मुले झाल्यास त्याची नांवे 'राम-लखन' व जुळ्या मुली झाल्यास "दुर्गा-गंगा' ठेवणे हा परंपरागत नियम आहे.

भीमाने ज्या हिडिंबेशी विवाह केला ती नागालँडची होती. नागालँडचे आजचे जे डिमापूर शहर आहे त्याचे मूळ नाव 'हिडिंबापुर्' असे होते.

मणिपूर् च्या राजकन्येशी - 'चित्रांगदे' शी अर्जुनाने विवाह केला होता.

त्रिपुरावर सुमारे दोन हजार वर्षे माणिक्य वंशाचे राज्य होते. त्यानी बांधलेली मंदिरे व बुध्दविहार एकात्मतेची साक्ष देतात. वरील ऐतिहासिक उल्लेखांवरुन पूर्वांचल हजारो वर्षांपासुन भारताशी किती समरस होता याची साक्ष पटते.

संदर्भःपूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन-सुनील देवधर.

मेघालयातील स्वातंत्र्य योध्दा-किआंग नॉन्गबाह्

Monument of Kiang Nongbah

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा लढा १८५७ पासुन सुरु असल्याचे आपण ऐकतो. तात्या टोपे, भगतसिह, राजगुरु, सुखदेव हे तर आपले दैवतच. पण या शिवाय ही ब्रिटींशाच्या कट कारस्थानात आपले प्राण ज्यानी अर्पण केले त्यात मेघालयातील क्रांतीकारी किआंग नांग्बाह् यांच्याबद्दल जर आपण जाणुन घेतले नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास अपुर्ण राहिल इतके त्याचे महत्व आहे. स्य्न्तु कसिआर् च्या किनार्‍यावर माइन्त्दु नदिच्या शेजारी एक् अति विस्तीर्ण मैदानी भाग आहे. या मैदानावर जयंतीया जमातीच्या प्रमुख नेत्यांची बैठक १८६१ मधे झाली होती. जयंतियांच्या पुर्वापार चालत आलेल्या प्रशासन व्यवस्थेत् ब्रिटिशांचा हस्तक्षेप् इतका वाढला होता कि त्यांच्या सामाजिक व्यवस्थेत असंतोष निर्माण व्हायला लागला. या सभेत उ. किआंग नान्ग्बाह् याला सर्वानुमते नेता निवड्ण्यात आले. त्याने हे नेतृत्व आनंदाने मान्य केले आणि ब्रिटीशांशी लढा देण्यात जंयंतीयाचे नेतृत्व करण्याची शपथ घेतली. काहिही झाले तरी ब्रिटिशांना आपल्या प्रदेशातून हाकलुन् देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. उपस्थित नेत्यांनी त्याला हे सिध्द् करण्याची गळ घातली की जेणेकरुन त्यानी त्याला नेतृत्व देण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. किआंग नांगबाह् ने सभोवार द्रुष्टिक्षेप केला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या॑ कडाक्याच्या थंडीत शेजारुन वहाणार्‍या नदित उडी घेतली आणी काही क्षणात तळातील एक रोप मुळासकट उपटुन सगळ्याना दाखविले. सर्व उपस्थिताना आपण घेतलेल्या निर्णयाच्या योग्यतेची पावती मिळाली. त्याच्या नेतृवाखाली जयंतीयानी इंग्रजाशी सतत २ वर्ष संघर्ष केला. पण अखेर ब्रिटिशांच्या कुट निती पूढे त्या भोळ्या लो़कांचे काहि चालेले नाही आणी ३०/१२/१८६२ रोजी ब्रिटिशांनी त्याचेवर खटला भरून त्याला सर्वांसमक्ष फासावर लटकवले.अखेरच्या क्षणि त्याने आपल्या देशबांधवांना उद्देशुन जे उदगार काढले ते खरे ठरले. तो म्हणाला फाशी झाल्यावर माझा चेहरा जर पुर्वेकडे वळला तर समजा कि आपल्याला १०० वर्षाच्या आत स्वातंत्र्य मिळेल पण जर चेहरा पश्चिमेकडे वळला तर मात्र आपली गुलामगिरी कायमची फाशीनंतर त्याचा चेहरा पुर्वेकडे वळला होता आणि खरोखर आपण १९४७ मध्ये म्हणजे त्याच्या बलिदानाच्या १०० वर्षाच्या आत स्वतंत्र झालो.

100 year old bridge on syntu ksiar alongside the river Myntdu
Entry gate to the mountain

 

मेघालय

स्वातंत्र्य् प्राप्तीच्या वेळी 'मेघालय' राज्य म्हणजे आसाम राज्यातील दोन जिल्हे होते. १९४७ साली त्या दोन जिल्ह्यात् केवळ १७% ख्रिश्चन् होते. काही वर्षातच त्यांनी अधिक अधिकार आपल्या हाती यावेत व मतांतरण अधिक सुलभ व्हावे म्हणुन स्वायत्त जिल्हा परिषदेची मागणी केली. ती पूर्ण झाल्यावर मतांतरणास गती मिळाली व १९७० साली ३५% ख्रिश्चन झालेल्या मेघालयाने स्वतंत्र राज्याची मागणी केली.२१ जानेवारी १९७१ रोजी मेघालय राज्याची निर्मीती झाली. चर्चेस् मधे घंटानाद करुन त्याचे स्वागत झाले. अधिकाधिक अधिकार ख्रिश्चनिटीच्या हातात आल्यामुळे मतांतरणाने वेग घेतला व आज बहुसंख्याक म्हणजेच ७०.३% ख्रिश्चन असलेल्या मेघालयाच्या भिंतीवर 'Stop treating us like an Indian Colony" व we are khasis by blood, 'Indians by accident" इत्यादी घोषणा लिहिलेल्या दिसतात. मेघालयातील ख्रिश्चनिटीच्या क्रमशः झालेल्या वाढीबरोबर बदलत्या मागण्यावरुन ख्रिश्चनिटी मतांतरणाचा उपयोग राष्ट्रांतरणासाठी करत असल्याचे दिसून येते.

लेखनविषय: दुवे:

Comments

धर्मांतर

धर्मांतरामुळे या देशाचे अत्यंत नुकसान झाले आहे हि गोष्ट खरिच आहे परंतु याला ९० टक्के आपणच जबाबदार आहोत॥ एखादे समाजाला दिलेली वागणूक तसेच आर्थीक कारण व पूर्वी एखाद्याने कोणाकडे काहि अभक्ष (?) भक्षण जाणून अथवा अजाणतेपणी केले तरि त्या कुटुंबालाच बहिष्कॄत करणे वगैरे अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्या देशाचे व धर्माचे नुकसान करण्यासाठी आपले धर्मीयच जबाबदार आहेत॥ अर्थात आपण एक असतो तर समुद्रमार्गे हजारो मैलावरुन येवून परकियानी या देशावर राज्यच केले नसते॥ आता व्यर्थ आक्रोश करुन काय फायदा॥
सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

चुका

आपला कदाचित चुकांतुन शिकण्याला विरोध नसावा. पण ते कुठे लिहिलेले दिसले नाही म्हणुन मी लिहितो आहे
आपण यांचा आक्रोश व्यर्थ जाऊ नये म्हनुन काही करु शकत असाल तर करा.

तुलना / काही स्वैर विचार / चॅरिटी बिगिन्स ऍट...

अधिकाधिक अधिकार ख्रिश्चनिटीच्या हातात आल्यामुळे मतांतरणाने वेग घेतला व आज बहुसंख्याक म्हणजेच ७०.३% ख्रिश्चन असलेल्या मेघालयाच्या भिंतीवर 'Stop treating us like an Indian Colony" व we are khasis by blood, 'Indians by accident" इत्यादी घोषणा लिहिलेल्या दिसतात. मेघालयातील ख्रिश्चनिटीच्या क्रमशः झालेल्या वाढीबरोबर बदलत्या मागण्यावरुन ख्रिश्चनिटी मतांतरणाचा उपयोग राष्ट्रांतरणासाठी करत असल्याचे दिसून येते.

या प्रश्नाचा विचार करताना भारतातील ख्रिस्तीबहुल नाही तरी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या गोवा, केरळ वगैरे राज्यांतील याबाबतचा अनुभव काय आहे, याचा अभ्यास करून तेथील वस्तुस्थितीची मेघालयातील वस्तुस्थितीशी तुलना करावी लागेल, असे वाटते.

तसेच मुळात ब्रिटिशांच्या काळापासून केवळ ब्रिटिश हिंदुस्थानाचा भाग असल्यामुळे 'आपण हिंदुस्थानी आहोत' अशी काही भावना या लोकांच्या मनात रुजलेली होती का, आणि केवळ धर्मांतरणामुळे ती नष्ट झाली का, की रोजच्या आयुष्याच्या मारामारीत 'राष्ट्रीयत्व' हा मुद्दा या लोकांच्या लेखी आजपावेतो गौण होता, आणि काल हे लोक ब्रिटिश हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली होते, त्याजागी केवळ हस्तांतरणाने स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आले, एवढाच फरक त्यांच्या लेखी भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीमुळे पडला, याचाही अभ्यास आणि विचार करावा लागेल.

ब्रिटिशांच्या काळापासून हा प्रदेश प्रशासकीयदृष्ट्या हिंदुस्थानचा भाग होता खरा, परंतु या प्रदेशातील लोकांना उर्वरित हिंदुस्थानवासीयांबद्दल आणि उर्वरित हिंदुस्थानवासीयांना या प्रदेशातील लोकांबद्दल देशबंधुत्वाची भावना होती का, की केवळ एकाच प्रशासनाशी जोडले गेल्याने केवळ (असलीच तर) 'एकाधिपत्या'ची भावना होती, याचाही विचार करावा लागेल. (हा शेवटचा मुद्दा तथाकथित 'मेनस्ट्रीम' भारतातील विविध प्रदेशांतील लोकांच्या एकमेकांबद्दलच्या भावनांनाही खरे तर लागू आहे; तेथे त्याची संहती किंचित प्रमाणात कमी होते, इतकेच.)

अवांतर: स्वतःच्याच अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर पुण्यात राहत असेपर्यंत 'सारा भारत एक आहे, भारताच्या सर्व प्रदेशांचे रहिवासी आपले बांधव आहेत, आपण सर्व एक आहोत, समान आहोत, बांधव आहोत, एकाच भारतमातेची लेकरे आहोत' वगैरे 'उदात्त' आणि 'राष्ट्रवादी' इ. विचार होते. तरीसुद्धा एस.पी.त नाहीतर फर्ग्युसनमध्ये वसतिगृहात राहणारे, वसतिगृहाबाहेर सहसा आपल्याच घोळक्यात वावरणारे, वेगळी भाषा बोलणारे आणि चेहरेपट्टीची वेगळी ठेवण असलेले ईशान्य भारतातून आलेले तुरळक विद्यार्थी कॉलेजात दिसत, परंतु अगदी क्वचित आणि अगदी जुजबी आणि कामापुरते संभाषण वगळल्यास त्यांच्याशी आपण होऊन संभाषण साधायला जावे अशी भावना सहसा होत नसे. (किंबहुना ईशान्येकडील नेमक्या कोणत्या राज्यातून हे विद्यार्थी आले आहेत हेही जाणून घेण्याची फारशी उत्सुकता नसे.) त्यांच्याबद्दल द्वेषभावना नसली तरी विशेष आपुलकीची भावना जागृत झाल्याचे आठवत नाही. फार तर 'चाललेत बिचारे आपल्या रस्त्याने, तर जाऊ देत' इतपत 'सहिष्णुते'ची, आणि निश्चितच एका प्रकारच्या 'वेगळेपणा'ची, भावना असल्याचे आठवते. मात्र अशी 'वेगळेपणा'च्या भावनेची जाणीव कॉलेजातील (उदाहरणादाखल) तमिळ अथवा बंगाली विद्यार्थ्यांबद्दल झाल्याचे, किंवा कॉलेजातील तमिळ अथवा बंगाली विद्यार्थ्यांशी संभाषण साधताना अशी काही मानसिक आडकाठी आल्याचे आठवत नाही. तर हा (कदाचित वरील मुद्द्यांना अधोरेखित करणारा) एक भाग.

त्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी आपण होऊन आणि कामाशिवाय (आणि तेही जुजबी वगळता) फारसे कोणी बोलायला जात नसल्यामुळे त्यांनाही आपल्याच घोळक्यात वावरण्याव्यतिरिक्त फारसा पर्याय नसावा, असे आता वाटते. हा दुसरा भाग.

तर ते एक असो. पण एरवी, अशी 'मेनस्ट्रीम' असण्याबद्दलची प्रतिमा ज्यांच्याबद्दल मनात येत नसे असे भारतीय वगळल्यास, उर्वरित भारतीयांबद्दल 'राष्ट्रीय एकात्मते'ची वगैरे भावना होती. (किंवा ती तशी आहे अशी स्वतःचीच समजूत होती.) हे सर्व पुण्यात राहत असेपर्यंत.

पुढे भारताच्या हिंदीभाषक पट्ट्यात, आणि तेही वसतिगृहावर, काही वर्षे राहण्याचा योग आला. भारताच्या विविध भागांतून येणारे विद्यार्थी आणि त्यांच्या एकमेकांबद्दलच्या धारणा जवळून पाहण्याची संधी लाभली. त्यातून, आणि त्यातसुद्धा हिंदीभाषक पट्ट्यातील - आणि विशेषतः दिल्लीहून येणार्‍या - विद्यार्थ्यांच्या, उर्वरित भारतातून येणार्‍या बिगरहिंदीभाषक - आणि त्यातसुद्धा दाक्षिणात्य - विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रवृत्ती पाहून, ही आपली 'राष्ट्रीय एकात्मते'ची भावना किती डळमळीत पायावर उभी राहिलेली आहे, याची थोडीथोडी कल्पना येऊ लागली. दक्षिण भारतातून येणार्‍या एखाद्या विद्यार्थ्याने, हिंदी येत असूनसुद्धा, केवळ इंग्रजीशी अधिक चांगला परिचय असल्याकारणाने रॅगिंगदरम्यान एखाद्या दिल्लीकर सीनियरच्या हिंदीतून विचारलेल्या प्रश्नास इंग्रजीतून उत्तर दिल्यास, त्यास त्याच्या आईच्या पोटापाण्याच्या व्यवसायाबद्दल शंका व्यक्त करणारी शिवी हासडली जाऊ शकते, हेही प्रत्यक्ष पाहिले. अर्थात हे टोकाचे उदाहरण झाले, आणि सर्वच दिल्लीकर विद्यार्थी असे नसत, काही चांगले नमुनेही भेटले आणि काही त्या काळी मित्रसुद्धा बनले, हेही आवर्जून सांगावेसे वाटते, परंतु एकंदर अनेक दिल्लीवासीयांच्या मनात उर्वरित भारतवासीयांबद्दल एका प्रकारच्या वर्चस्वाची, जणू काही उर्वरित भारत ही पूर्वी ब्रिटिशांची तर आता दिल्लीची वसाहत असल्यासारखी, भावना असावी अशी काहीशी धारणा होऊ लागली होती, असे आठवते. आणि 'मग आपणच मूर्खासारखी एकराष्ट्रीयत्वाची भावना का बाळगतो?' असाही एक प्रश्न पडत असे. आणि दिल्लीच्या स्थानिक बसेसमधली 'भारत की सभी भाषाऍं हमारी अपनी भाषाऍं हैं|' वगैरे 'सरकारी बोधवाक्ये' वाचून आणखीच चिडचीड होत असे.

अर्थात त्या काळची माझी ही धारणा टोकाची आणि काही थोड्या नगांच्या अनुभवाच्या सरसकटीकरणातून झालेली असू शकते, असे नग सर्वच समाजांत असतात आणि त्यावरून कोणतीही सरसकट अनुमाने काढू नयेत, सर्वच मनुष्यसमूहांत काही चांगले तर काही वाईट नमुने सापडतात, पैकी वाईट नमुने (विशेषतः त्यांच्या उदाहरणांसाठी मुद्दाम शोध घेत असल्यास) सहज उठून दिसतात, तर चांगले नमुने विशेष प्रयत्न केल्याशिवाय सापडत नाहीत किंवा दिसले तरी (शोधाचे लक्ष्य नसल्याकारणाने) नजरेत न भरल्यामुळे दुर्लक्षिले जातात, प्रत्यक्षात माझ्या स्वतःच्या धारणाही नेहमीच पवित्र किंवा तर्कसुसंगत नसू शकतील... वगैरे अक्कल पुढे बर्‍याच उशिराने आणि हळूहळू येऊ लागली, हा प्रस्तुत चर्चाविषयाच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळा आणि असंबद्ध मुद्दा. तर तेही एक असो.

पण यातून विचार करण्यासारखा प्रश्न असा, की केवळ काही वर्षे काही दिल्लीवासीय दृष्टिक्षेपात येण्यासारख्या वातावरणात राहून जर माझ्यासारख्या तथाकथित 'मेनस्ट्रीम' भारतातून येणार्‍या व्यक्तीला 'दिल्लीकरांना माझी भूमी (आणि उर्वरित भारत) ही दिल्लीची वसाहत आहे असे वाटते' अशी भावना (तात्पुरती का होईना, पण) होऊ शकते, तर भारताच्या 'मेनस्ट्रीम'मध्ये कधीच मानल्या न गेलेल्या या ईशान्यभारतीय लोकांना उर्वरित आणि तथाकथित 'मेनस्ट्रीम' म्हणवणार्‍या भारताबद्दल अशा किंवा याहूनही तीव्र स्वरूपाच्या काही भावना निर्माण होत असतील, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का? माझ्यासारख्याच्या मनात जर 'Stop treating me like a colonial native subject of Delhi' किंवा 'I am God-alone-knows-what(-I-am) by blood, (but I am an) Indian only by (an) accident (of history)' अशासारखी - अगोदर नसलेली - भावना निर्माण होऊ शकत असेल, तर या लोकांना 'Stop treating us like an Indian colony' किंवा 'We are Khasis by blood, Indians only by accident' असे वाटण्यात अनैसर्गिक असे नेमके काय आहे? (अर्थात, याचा अर्थ या लोकांनी भारतापासून वेगळे व्हावे, त्यात आणि केवळ त्यातच त्यांचे भले आहे, असे मला मु़ळीच वाटत नाही हे येथे स्पष्ट करणे आवश्यक आहे. मात्र या प्रश्नाचा विचार करताना थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून, आणि कदाचित त्या लोकांच्या दृष्टिकोनातूनही, विचार करणे आवश्यक आहे असे वाटते.)

दुसरे म्हणजे, ख्रिस्ती धर्मप्रसारकांना दोष देऊन काही साध्य होण्यासारखे आहे का, किंवा असा दोष देणे कितपत योग्य आहे? त्यांनी फक्त त्यांच्या 'कार्या'साठी संधी पाहिली, तर त्यात त्यांचे नेमके काय चुकले? त्यांना मुळात संधी उपलब्ध कशी झाली? मुळात जर 'एक'पणाची भावनाच नसली, तर 'वेगळे'पणाची भावना रुजवण्यासाठी वेगळे किंवा खास असे काय प्रयत्न करावे लागतात?

तिसरी गोष्ट, ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी जे काही केले तसे काही करून या लोकांच्या मनात भारतीयत्वाची भावना 'रुजवली' जाऊ शकते का? मुळात एकीची भावना ही वटहुकुमाने किंवा 'आम्ही म्हणतो तुम्ही आमचे आहात' असा काही प्रचार करून, किंवा धर्मप्रसार करून, होऊ शकते का? अशा प्रयत्नांतून केवळ वेगळेपणाची, दुहीची भावना रुजवली जाऊ शकते. हे तर मिशनर्‍यांचे - मग ते कोणत्याही धर्माचे असोत आणि कशाही प्रकारचे कार्य करत असोत - कामच नव्हे. (यापुढील भागात 'मिशनरी' हा शब्द 'ख्रिस्ती मिशनरी' या अर्थाने वापरलेला नसून, सामान्यतः ढोबळ अर्थाने आणि विशेष करून 'भारतीयत्वाचे मिशनरी' अशा अर्थाने वापरला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. 'मिशनरी' या शब्दाचा 'ध्येयप्रेरित', people with a mission असा अर्थ घ्यावा.) या लोकांत जर भारतीयत्वाची भावना रुजवायची असेल, तर त्यांना मुळात 'आपण भारतीय आहोत' असे वाटावयास पाहिजे. त्यासाठी त्यांनी आपल्याला आपलेसे करण्याअगोदर आपण त्यांना (खर्‍या अर्थाने) आपलेसे करायला पाहिजे. म्हणजे (शिक्क्याने) 'देशबांधव' किंवा (धर्मांतराने किंवा तथाकथित पुनर्धर्मांतरांने) 'धर्मबांधव' म्हणून नव्हे, तर त्यांची जी असेल ती जीवनपद्धती मान्य करून, तिला धक्का न पोहोचवतासुद्धा, हे इतर चारचौघांसारखे आपलेच लोक आहेत, आपलेच बांधव आहेत, कोणी वेगळे लोक नव्हेत, ही भावना प्रथम आपल्याच मनात रुजवली पाहिजे. या लोकांना त्यांच्या प्रदेशात विकासाच्या संधी स्वतःच कशा निर्माण करता येतील, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शिवाय या लोकांना पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी (इतर सर्वसाधारण भारतीयांसारखे) भारताच्या इतर प्रदेशांत जावे लागल्यास तेथे ते भावनिकदृष्ट्या कोणत्याही सर्वसाधारण भारतीयासारखेच गणले जातील असे वातावरण निर्माण झाले पाहिजे.

पैकी विकासाच्या संधी निर्माण होण्यात हातभार हे काम कदाचित भारत सरकार आणि या प्रदेशातले किंवा उर्वरित भारतातले खाजगी उद्योजक (या लोकांच्या स्वत्वभावनेला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने) करू शकतात; (काही प्रमाणात काही अत्यावश्यक मूलभूत सेवा पुरवणे वगळल्यास) 'मिशनर्‍यां'च्या अखत्यारीतले हे काम नसावे असे वाटते. (अत्यावश्यक मूलभूत सेवा पुरवणे हे आवश्यक आहे हे खरे, आणि 'मिशनरी' आणि समाजसेवक/समाजसेवी संस्था ते सक्षमपणे पार पाडू शकतात हेही खरे. परंतु आपलेपणाची, भारतीयत्वाची भावना रुजवण्यासाठी तेवढे पुरेसे आहे असे वाटत नाही.) मात्र उर्वरित भारतीयांत या लोकांबद्दल आपलेपणाची भावना रुजवणे हे खरे मोठे काम आहे, आणि तेथे 'मिशनर्‍यां'चे मोठे योगदान होऊ शकते, असे वाटते. मात्र याकरिता अशा मिशनर्‍यांनी या लोकांना आणि त्यांची जीवनपद्धती, चालीरीती वगैरेंना समजून घेण्यासाठी जो काही वेळ लागेल तेवढा वगळल्यास उरलेला वेळ (आणि एकंदर अधिकतर वेळ) या प्रदेशांत घालवण्याऐवजी उर्वरित ('मेनस्ट्रीम') भारतात जनजागृती करण्यात, उर्वरित भारतवासीयांच्या मनात या लोकांसंबंधी आपलेपणाची भावना रुजवण्यासाठी लागतील ते प्रयत्न करण्यात, 'मेनस्ट्रीम' भारतीयांचा 'मेनस्ट्रीम' भारतभूमीतच या लोकांशी जवळचा आणि वारंवार संपर्क येण्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात खर्ची करावा, असे सुचवावेसे वाटते. त्याने कदाचित उभयपक्षी आपुलकीची, भारतीयत्वाची भावना रुजू शकेल असे वाटते.

एकत्वाची भावना ही लादता येत नाही (तथाकथित 'पुनर्धर्मांतरा'ने तर ती मुळीच लादता येणार नाही), ती आतून निर्माण व्हावी लागते; आणि त्यासाठी पोषक असे वातावरण, पार्श्वभूमी निर्माण होणे आवश्यक असते. अशी पार्श्वभूमी निर्माण होण्याच्या दृष्टीने या प्रदेशांऐवजी या प्रदेशांच्या बाहेर बरेच मोठे कार्य, बरेच मोठे प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे वाटते. ते झाल्याशिवाय या प्रदेशांत कितीही कार्य केले, तरी त्याचा फारसा दूरगामी फायदा होणे नाही, असे वाटते. चूभूद्याघ्या.

सहमत - गोव्यातील अनुभव

गोव्यातील माझ्या ख्रिस्ती मित्रांकडून आणि ख्रिस्ती शिक्षकांकडून (यात काही पाद्री आणि सिस्टरी होत्या) भारताविरुद्ध कधी काही ऐकले नाही, आणि भारताबद्दल प्रेमाचे उद्गार पुष्कळ (म्हणजे बाकी लोकांइतकेच - सारखे-सारखे नाही - अधूनमधून) ऐकले.

पूर्वाञ्चल यांचा खालील प्रतिसाद भावनेच्या दृष्टीने प्रामाणिक आहे, असे वाटते. पण तथ्यांशाच्या दृष्टीने मर्यादित आहे. अशा ज्वलंत भावना असलेले लोक असतात, हीच काय त्यातील माहिती.

बराचसा सहमत मात्र..

बराचसा सहमत.

त्या ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांशी आपण होऊन आणि कामाशिवाय (आणि तेही जुजबी वगळता) फारसे कोणी बोलायला जात नसल्यामुळे त्यांनाही आपल्याच घोळक्यात वावरण्याव्यतिरिक्त फारसा पर्याय नसावा, असे आता वाटते. हा दुसरा भाग.

असहमती इतकीच की जसे मेनस्ट्रीममधील लोक (पक्षी: मी देखील)आपण होऊन बोलायला जात नाहि तसेच "ते" (पक्षी: इशान्यवासी) देखील आपणहून मैत्री वाढवू इच्छित नाहित.

यंदा ट्रेकिंगच्या निमित्ताने माझी तेथील काहि मुला-मुलींशी ओळख झाली.
माझा अनुभव असा.. की जरी तुम्ही त्यांच्याशी मैत्री/ठराविक मर्यादेपेक्षा अधिक ओळख करून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्यांचा कंपु तसे होउ देत नाहि. ते एकेकटे असतानाही त्यांना आकर्षण असते मात्र एकप्रकारचा अव्हेर (रिलक्टन्स) जाणवतो. त्यांच्याशी बोलताना काहिसा न्यूनगंड-बुजलेपणाही एकीकडे जाणवतो तर एकीकडे काहिसा द्वेषही..

मात्र इशान्येकडील मुलींबाबत माझा अनुभव अत्यंत वेगळा आहे. त्या बोलायला चांगल्या, (मेनस्ट्रीम मुलींच्या मानाने ;) ) तर्कशुद्ध विचार करणार्‍या, सरळ-स्पष्ट बोलणार्‍या वाटल्या. माझी त्यांच्याबरोबर या विषयावर थोडी चर्चा झाली होती. त्यांच्यामते, "आम्हाला तुझ्यासारखे भारतीय म्हणून जगायला आवडेल मात्र आमची मूळ ओळख पुसता जाता कामा नये.. मेन स्ट्रीम मधून अनेकांचे मदतीचे, मैत्रीचे हात येतात पण ते स्वीकारताना आपली संस्कॄती गमावू ही तीव्र भीती समाजात आहे. म्हणून ते जाणीवपूर्वक असे करायचे (फार मिसळणे वगैरे) टाळतात / तसे टाळायला त्यांच्या समाजात प्रोत्साहन मिळते."

समांतर अवांतरः
इशान्येला राष्ट्रीय सयंसेवक संघाचे फार मोलाचे काम आहे असे ऐकून होतो. तेथील लोकांना त्यांच्यामबद्दल विचारले असता ते अत्यंत रा.स्व.संबद्दल आदरपूर्वक बोलतात. त्यांच्यामते "जर ते नसते तर अख्खा इशान्य भागाला इशान्य "भारत" म्हणता येणे मुष्कील झाले असते. आमच्यावर बदलण्याची बळजबरी न करता आम्हाला सोयी पुरविणारे फक्त तेच आहेत. भारत सरकारला आम्ही आचाराने भारतीय व्हायला हवे आहोत तर मिशनर्‍यांना आम्ही ख्रिश्चन!"

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

पुर्वांचल - ख्रिश्चन मिशनरी आणि त्याच्या कारवाया

भारतामध्ये काम करत असलेले जे विदेशी मिशनरी आहेत ते या देशात सेवा वा उपासना पंथांपेक्षा अधिक राजकारणामधे व त्यातही राष्ट्रविघातक कारवायांमध्ये व्यस्त असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असूनही आमचे सरकार त्यांना येथे प्रोत्साहन कोणत्या आधारावर देते? केवळ त्या पाश्चात्य देशांकडून आपल्याला आर्थिक मदत मिळते व त्याच्या मोबदल्यात या मिशनर्‍यांच्या कारवायांना संरक्षण देण्याची हमी घेतली जाते म्हणुन कोणतेही स्वाभिमानी राष्ट्र या कारवाया खपवून घेणार नाही, आणि म्हणुनच भारतातील सर्व विदेशी मिशनरी व त्याच्या संस्थांना तत्काल प्रतिबंधित केले पाहिजे. आपल्या देशातील समाजाच्या उध्दारासाठी कार्य करणारे विदेशी मिशनरी म्हणजे या राष्ट्राचा अवमान आहे. काही वर्षांपूर्वी चीन मध्ये झालेल्या भयंकर भुकंपाच्या वेळेस चीनने बाहेरची सर्व प्रकारची मदत नाकारली व 'स्वसमाज व स्वजवाबदारीवर' आम्ही या संकटाचा सामना करु असे म्हटले होते. तो आदर्श अवलंबिणे गरजेचे आहे.

या देशात ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या कारवायांचे देखिल सरकारने सूक्ष्म अवलोकन केले पाहिजे. त्याना बाहेरील देशांमधून मिळणारी कोट्यावधी डॉलर्सची आर्थिक मदत एकतर पूर्णपणे बंद करावी वा त्याची देवाण सरकारच्या द्वारे व्हावी व त्याच्या व्ययाचा पूर्णपणे पारदर्शी हिशोब सरकारने घ्यावा.

जबरदस्तीने वा लालूच दाखवून केलेल्या मतांतरणाला केंद्र सरकारने बंदी घालणेच योग्य्. सेवेचा उपयोग जरी मतांतरणाला केला गेला तरी त्यावर कठोर कारवाई करण्याची कायद्यात तजवीज असावी.

अशा प्रकारचा कायदा 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' या नावाने अमेरिकेत देखील १७८६ मध्ये बनविण्यात आला होता. जर इजिप्त, सौदी अरेबिया व अनेक राष्ट्रे इस्लाममधून अन्य उपासनांमध्ये होणार्‍या मतांतरणाला पूर्णपणे बंदी घालतात, तर त्या देशांतुन भारतात मतांतरणासाठी येणारा पैसा आपण का म्हणुन चालू द्यावा? दुर्दैवाने नागालैंड्, मिझोराम व मेघालयांसारख्या 'ख्रिश्चन बहुसंख्य राज्यांमध्ये' ईस्कॉन सारख्या धार्मिक हिंदू संस्थांना बंदी घालण्यात आलेली आहे. हे जर या 'धर्मनिरपेक्ष' देशात चालू शकते तर बहूसंख्य हिंदू असलेल्या राज्यांमध्ये ख्रिश्चन संस्थांवर बंदी कां घालता येऊ नये? तेंव्हा केंन्द्र सरकारने अशा प्रकारच्या विषमतेच्या दुहेरी नीतीची धूळफेक बंद करावी आणि अल्पसंख्य म्हणून कोणाचेही चोचले न पुरवता सर्वांसाठी समान कायदा लागू करावा.

पूर्वांचलातील फुटीरतेचे बीज ब्रिटिशांच्या काळातच रोवले गेले . आज ज्या फुटीरतेने उग्र स्वरुप धारण केले आहे त्याची पाळेमुळे अत्यंत खोलवर पसरलेली आहेत. या समस्यांवर उपाय शोधणे म्हणजेच त्यांना मुळापासून उखडून टाकले पाहिजे. आजच्या परिस्थितीत ते अवघड वाटत असले तरी अशक्य मात्र निश्चितच नाही. अर्थातच हे उपाय व्हावेत ही प्रामाणिक इच्छा राजकिय पुढारी तसेच उर्वरित भारतातील समाज या दोहोंमध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. उर्वरित भारतातील लोकांनी एकत्रितपणे मदतीचा हात जर पुढे केला तर मनाने विशाल असलेले पूर्वांचलातील बांधव निश्चितच त्याला प्रतिसाद देतील. सर्वांनी मिळून एकत्रितपणे सतत १० वर्षे जर कठोर परिश्रम केले तर पूर्वांचल इतर् राज्यांप्रमाणेच शांत झालेला दिसेल. स्वर्गाहून सुंदर अशा पूर्वांचलाला शांत्, विकसित व आनंदी स्थितीत पाहणे हे आजचे स्वप्न व उद्याचे वास्तव असले पाहिजे.

अमेरिकेतील 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट'संबंधी: गैरसमज की दिशाभूल?

जबरदस्तीने वा लालूच दाखवून केलेल्या मतांतरणाला केंद्र सरकारने बंदी घालणेच योग्य्. सेवेचा उपयोग जरी मतांतरणाला केला गेला तरी त्यावर कठोर कारवाई करण्याची कायद्यात तजवीज असावी.

अशा प्रकारचा कायदा 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' या नावाने अमेरिकेत देखील १७८६ मध्ये बनविण्यात आला होता.

वरील अधोरेखित विधान हे गैरसमजातून उद्भवलेले आहे की दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, हे कळावयास मार्ग नाही.

उपरोल्लेखित 'फ्रीडम ऑफ रिलीजन ऍक्ट' अथवा 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट - १९७८'बद्दल जुजबी माहिती या दुव्यावर पहावी. या कायद्याचे संपूर्ण विधान (text) या दुव्यावर पहावे.

या कायद्यान्वये केवळ अमेरिकेतील स्थानिक आदिम जमातींच्या (नेटिव अमेरिकन्स अथवा अमेरिकन इंडियन्स) पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती पाळण्याच्या मूलभूत अधिकाराचे जतन केले गेले आहे. नेटिव अमेरिकनांना त्यांच्या पारंपरिक धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती पाळण्यास कायद्याची आडकाठी येऊ नये (जी आडकाठी हा कायदा संमत होण्यापूर्वी विविध कायद्यांद्वारे येत असे), तसेच त्यांच्या धार्मिक स्थळांवर सरकारकडून कायद्याच्या आधारे (जसे, सार्वजनिक बांधकामांसाठी वगैरे) अतिक्रमण होऊ नये, एवढीच या कायद्याची (मर्यादित) कार्यकक्षा आहे.

अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीच्या अन्वये प्रत्येक व्यक्तीस हवा तो धर्म पाळण्याचे (किंवा कोणताही धर्म न पाळण्याचे) स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य अमेरिकन घटनेनुसार व्यक्तीच्या मूलभूत हक्कांपैकी मानले जाते. मात्र नेटिव अमेरिकनांच्या धार्मिक श्रद्धा आणि चालीरीती यांना 'धर्म' म्हणून उर्वरित समाजाने न पाहिल्यामुळे अशा चालीरीतींवर अनेकदा (गैरसमजाने आणि अन्यायाने) कायद्याने बंदी आणली गेली. तसेच अनेकदा त्यांची धार्मिक स्थळे आणि मृतदेह पुरण्याच्या पारंपरिक जागा वगैरे ही 'सार्वजनिक जमिनी' या सदराखाली मोडल्या जाणार्‍या जमिनींमध्ये गेल्याने, अशा जमिनींच्या सरकारकडून सार्वजनिक कामांसाठी वापरामुळे (जसे, हमरस्ते, शाळा किंवा राष्ट्रीय उद्याने बांधण्यासाठी) नेटिव अमेरिकनांना त्यांच्या धार्मिक स्थळांपासून वंचित व्हावे लागले. किंवा अनेकदा एखादा कायदा करताना, नेटिव अमेरिकनांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल आणि चालीरीतींबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे अशा कायद्यांचा नेटिव अमेरिकनांच्या धर्मस्वातंत्र्यावर होणार्‍या परिणामांचा फारसा विचार केला गेला नाही. या सर्व बाबींच्या निवारणाकरिता 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट' बनवला आणि अमलात आणला गेला.

थोडक्यात, या कायद्यान्वये नेटिव अमेरिकनांच्या आपल्या धर्माच्या चालीरीती पाळण्याच्या अधिकारात सरकारकडून कोणतीही ढवळाढवळ होणार नाही याची खात्री करणे, एवढेच या कायद्याचे मर्यादित उद्दिष्ट आहे. खाजगी संस्थांनी केलेली धर्मांतरे या कायद्याच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहेत; किंबहुना खाजगी धर्मांतरांचा या कायद्याशी काहीही - दूरान्वयानेसुद्धा - संबंध नाही.

किंबहुना, कोणत्याही प्रकारच्या धर्मांतरांना बंदी आणणारा कोणताही कायदा करणे हे अमेरिकन घटनेच्या तरतुदींचा सरळसरळ भंग करणारे असल्यामुळे, धर्मांतरांवर बंदी घालणारा कायदा बनवणे हे अमेरिकन घटनेनुसार अशक्य आहे. (किंवा, असा कायदा यदाकदाचित बनवला गेल्यास, त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागणे - आणि न्यायालयाने तो 'घटनाविरोधी' म्हणून रद्दबातल ठरवणे - शक्य आहे.) आधी म्हटल्याप्रमाणे, अमेरिकन घटनेच्या पहिल्या दुरुस्तीच्या अन्वये प्रत्येक व्यक्तीस हवा तो धर्म पाळण्याचे (किंवा कोणताही धर्म न पाळण्याचे) स्वातंत्र्य आहे. नव्हे, तो मूलभूत हक्क आहे. (धर्म - किंवा धर्महीनता अथवा नास्तिकवाद - पाळण्याबरोबरच धर्माचा - किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा - पुरस्कार अथवा प्रसार करणेही या मूलभूत अधिकारात अंतर्भूत आहे.) घटनेप्रमाणे अमेरिकन सरकार हे कोणत्याही धर्माची (किंवा धर्महीनतेची अथवा नास्तिकवादाची) अधिकृत धर्म म्हणून प्रतिष्ठापना करू शकत नाही, कोणत्याही धर्मास (किंवा धर्महीनतेस अथवा नास्तिकवादास) प्राधान्य देऊ शकत नाही आणि कोणत्याही धर्माचा (किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा) प्रसार अथवा पुरस्कार करू शकत नाही. मात्र खाजगी व्यक्तींना आणि खाजगी संस्थांना हवा तो धर्म (किंवा धर्महीनता अथवा नास्तिकवाद) पाळण्याचे आणि हव्या त्या धर्माचा (किंवा धर्महीनतेचा अथवा नास्तिकवादाचा) पुरस्कार आणि प्रसार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि त्यावर कायद्याने बंदी आणणे हे घटनेच्या मूलतत्त्वांविरुद्ध आहे. धर्मांतर हा धर्मांतर करणारी संस्था आणि ज्या व्यक्तीचे धर्मांतर करावयाचे ती व्यक्ती यांमधील संपूर्णपणे खाजगी मामला आहे. धर्मांतर करणार्‍या संस्थेस आपल्या धर्माच्या प्रसारासाठी असे धर्मांतर करण्याचे आणि ज्या व्यक्तीचे धर्मांतर करायचे त्या व्यक्तीस असे धर्मांतर स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे अमेरिकन घटनेनुसार संपूर्ण स्वातंत्र्य आहे, आणि 'अमेरिकन इंडियन रिलीजियस फ्रीडम ऍक्ट - १९७८' या किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये अमेरिकेत कोणाच्याही कोठल्याही प्रकारे धर्मांतरांवर बंदी आणली गेलेली नाही, हे कृपया स्पष्ट व्हावे.

त्यामुळे अशा प्रकारचा कायदा जर भारतात केला आणि राबवला गेला, तर त्यातून कोणत्याही प्रकारच्या ख्रिस्ती धर्मप्रसारावर कोणत्याही प्रकारे बंदी आणता येणार नाही. मात्र त्याचबरोबर, अशी बंदी इतर धर्मांच्या प्रसारावर घातली गेल्यास अशी बंदीही अवैध ठरेल, इतकेच.

 

शीलान्ग पासुन ६५ कि मि वर असलेले नारटीआन्ग् हे गाव जयन्तीया हील च्या जोवाइ या जील्हा मुख्यालयाच्या शहरापासुन १९ की.मी.वर् आहे जयन्तीया च्या राजाचे हे राजधानीचे शहर. पण इथे आज मोनोलीथ हे भारत सरकार द्वारा संरक्षीत स्मारक या फलका व्यतीरीक्त काहीच दिसत नाही या मोनोलिथ चे वैषीष्ट्य म्हणजे येथील अनेक रचलेल्या दगडा पैकी सर्वात् मोठा दगड हा २७ फुट उन्च ६फुट रुन्द् आणी अडीच फुट जाड आहे हे मोनोलिथ म्हणजे Hynniewtrep लोकांच्या मेगालीथ सन्स्क्रुती चे प्रतीक आहेत.

याच गावात दुर्गादेवीचे ५०० वर्षा पुर्वीचे प्राचीन मन्दीर आहे आणी गमतीचा भाग म्हणजे याचे पुजारीपण् हे वंश परंपरेने एका मराठी आडनाव असलेल्या व्यक्तीकदडे आहे.

याचे फोटो माझ्या ब्लाग वर पहा-http://vishwaskalyankar.blogspot.com/

चेरापुंजी

जगातील सर्वात अधिक पावसाचा प्रदेश म्हणुन चेरापुजी प्रसिध्द आहे. आता मात्र हा मान इथुन जवळच असलेल्या माउसीनरॅम(Mawsynram) याला जातो.चेरापुंजी हे शिलांग-शेला या रस्त्यावर तर माउसीनरॅम हे शिलाग-बालट या रस्त्यावर्. चेरापुंजी आणि माउसीनरॅम हे अंतर(Ariel) केवळ ८ कि.मि. शिलांग ते चेरापुजी हे अंतर ५३ कि.मि.चे पण प्रवास मात्र अडिच तासाचा. चेरापुजी हा ४५०० फुटावरील पठाराचा प्रदेश. चेरापुजी ला जातांना डावी कडे लाबच लाब इंग्रजी "व्ही" आकाराची दरी पसरलेली आहे. या दरीत कायम ढग पसरलेले असतात. त्यामुळे ते द्रुष्य पहात पहातच आपला प्रवास संपतो आणि आपण चेरापुंजी ला पोचतो. उन असले तरी थंड हवेची झुळुक आणी कायम सभोवती डोगरावर दिसणारी हिरवळ मन प्रसन्न ठेवते. मेघालयात वाहतुकिचे मुख्य साधन म्हणजे टाटा सुमो आणी मारुती-८०० त्याही कायम चकचकीत कारण धुळीचे प्रमाण शुन्य. टॅक्सी स्टॅडवरच गरम गरम पुरी भाजी ची दुकाने त्यामुळे पावले तिकडे न वळली तरच नवल.

ठीक़ठीकाणी असलेले धबधबे हे चेरापुंजी चे वैषिष्ट्य. येथे रामकृष्ण आश्रम ची भव्य वास्तु १०० वर्ष जुनी असुन त्याच्या द्वारे अनेक शैक्षणीक उपक्रम राबविले जातात. सुरवातिच्या काळात त्याचे कार्य बंद पाडायचे अनेक प्रयत्न ख्रिश्चन मिशनर्‍याद्वारे केल्या गेले. शाळेचा पाणी पुरवठा बंद केल्या गेला आणी काही काळ शाळा बंद ही होती. पण मग तत्कालीन पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई याच्या मध्यस्तीने शाळा सुरु झाली.

चेरापुजी पठारावरुन दक्षिणेकडे सखल प्रदेशाकडे पाहिले असता संपुर्ण बागला देशाचा सिलहट जिल्हा दृष्टिस पडतो. शिलांग पीकवरुन येणारी उमीआम( Umiam)नदी चेरापुजी आणि माउसिन् रॅम् याच्या मधुन शेला मधुन बांगला देशातुन वाहुन समुद्राला मिळते. याच कारणाने या भागात पाउस झाला की बांगला देशात पूरसदृश परिस्थीती निर्माण होते. चेरापुजीत पडणारा सर्व पाउस वाहुन जात असल्यामुळे येथे कायम पाण्याची समस्या असते. मात्र इतका पाउस असुनही येथे चिखल नावाचा प्रकार् नाही.

 

एकाकी पूर्वांचल

शिलांग शहर् म्हणजे नानाविध रगांची मुक्त उधळण आहे. हॅपी व्हॅली ओलांडुन आपण शहराच्या वेशीवर् येतो नि मग डोंगर दर्यांच्या कडे़ खांद्यावर विसावलेलं अवघं शिलांग शहर हिडस्तोवर् आपण आनंदाच्या खोर्यातच असतो. डोळे निवतील् अशा कंच हिरव्या घनराईच कॅनव्हास् सगळ्या शहराला लाभलाय. त्यात निळ्या, तपकिरी नि तांबड्या रंगांची उतरती छप्परं मिरवणार्या घरांच्या रांगा म्हणजे नुसती रंगपंचमी. लहान मोठ्या चौकटीचं डिझाईन काढलेल्या लोकरी शालीत स्वतःला लपेटून् लगबगीत जा ये करणारी माणसं हे सगळ चित्रं जिवंत करतात, त्याला आणखीसच एक वेगळी रंगत् आणतात.

अडीच लाखांच्या आस पास शिलांगची लोकवस्ती आहे. हे शहर मेघालयाच्या राजधानीचं देशातील सर्वाधिक पावसाचा हा चिमुकला प्रान्त. इथे वर्षातले आठ महिने तरी सतत आपलं "नभ मेघांनी आक्रमीलेलंच!" साहजिकच जिथं जाल तिथं नी जेंव्हा जाल तेंव्हा सगळीकडेच "हिरवे हिरवे गार् गालिचे , हरित त्रुणांच्या मखमालीचे " असा प्रकार.

गोहाटि विमानतळावर उतरल्यावर जाणवली ती तेथील् दमट हवा. ब्रम्हपूत्र नद म्हणजे समुद्र्च त्याचा हा परिणाम. गोहाटि ची लोकसंख्या २००१ च्या शिरगणतीनुसार ८ लाख होती. गोहाटी हे शहर इ.स. पुर्वी ६ व्या शतकात अस्तीत्वात असल्याचे येथील पुरातत्व विभागाच्या उत्खननातुन निष्पन्न् झाले आहे. कामरुप राजवटीत गोहाटी हे राजधानी चे शहर होते. या शहराला महाभारत कालीन संन्दर्भ देखील आहेत. महाभारतातील नरक आणि भागदत्त राजांच्या राजधानिचे हे शहर, १२-१५ व्या शतकात कामता राजाच्या नाशानंतर या शहराच्या वैभवाला उतरती कळा लागली. कामाख्या देवीचे प्रसिध्द् शक्ती पीठ, नवग्रह मंदिर् आणी बसीस्ता येथील ऐतिहासीक अवशेष या शहराच्या गत वैभवाचे साक्षीदार् आहेत.

शिलांग ला जाण्यासाठी आपल्याला दक्षीणे कडे जावे लागते. तसे ईशान्य भारतातील कुठ्ल्याहि राज्यात जाण्यासाठी गोहाटि ला यावेच लागते. परस्पर् एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायला मार्गच नाही इतका हा प्रदेश दुर्गम आहे. गोहाटी ची वेस ओलांडून आपण जरा पुढे आलो की घाट रस्त्याला जी सुरुवात होते, ती थेट तीन साडेतीन तासानंतर् शिलांग येईस्तोवर. घाटाचा चढ सुरु होताच घनराईने गुरफटून टाकलेले डोंगर नजरेला पडतात, हवेतला ब्रम्हपुत्रे काठचा घामटपणा पार निघुन जातो नि एका सुखद गारव्याच्या अनुभवाने आपण मनोमन उमजतो की आपण मेघलयाकडे जात आहोत.

मेघालयातील् खासी काय् किंवा गारो आणि जयंतीया काय, सगळ्यांचेच इंग्रजी उच्चार् अगदी अधर्, अस्पष्ट. खासी भाषे साठी रोमन लीपी वापरतात्. त्यामुळे अर्थ जरी समजला नाही तरी निदान रोमन स्पेलिंग वरुन् आपण उच्चार तरी करु शकू अशी आपली भोळी समजूत पार् मोडीत निघते. एका पेक्षा एक कठीण शब्द म्हणतांना आपलीच बोबडी वळते.

आपले शब्द खासी शब्द
हात Ka Kti
पाय Ka kjat
चेहरा Ka dur khmat
नाक Ka khmut
जीभ U thylliej
शहर Nongbah
जंगल Lawbah
पाणी Ka um
पुल Ka jingkieng
जमीन Ka khyndew

उमनगोट(Umngot) आणी उमस्यू (Umsiew) ही नद्यांची नावं व उमसोसुम (Umsohsum)
हे शिलांग शहराच्या एका भागाचे नाव. सर्वच दुर्बोध . इथली नावं त्याहुन ताण . ही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.

 

३०/११/२०१९

               

           

               मेघालय ईशान्य भारतातील डोंगराळ प्रदेश.सेव्हन सिस्टर्स मधील एक. संस्कृत भाषेत मेघालय म्हणजे " ढगांचे निवासस्थान ". पूर्वी हा  आसामचा भाग होता.  १९७२ ला त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. खासी, जैनथानी आणि गारो अशा डोंगररांगांच्या वेढ्यात हे राज्य वसलेला आहे. जगातील आद्रता असलेल्या प्रदेशांपैकी हा आहे. तसेच जास्त पावसाचा प्रदेश म्हणून ह्याची एक वेगळी ओळख आहे. येथे खासी, गारो, जयंतियाँ हे मुख्य जाती समुदाय आहेत आणि सर्वात महत्वाचं वेगळेपण म्हणजे येथे आजही 'मातृसत्ताक' किंवा 'मातृ कुलीन' पद्धत रूढ आहे. म्हणजे येथील जन्माला येणार्‍या मुलांची ओळख ही त्यांच्या आईच्या वंशावळीतून होते.
            सध्या पर्यटन क्षेत्रात मेघालय एक महत्त्वाचं ठिकाण बनलं आहे. येथील जंगल,डोंगर-दऱ्या, तळी, गुहा आणि खूप सारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.  शिलाँग ही मेघालयची राजधानी. आजचाआमचा प्रवास काझीरंगा टू शिलॉंग. रोड अंतर 223 किमी साधारण पाच तास लागतात.
 

शिलाँग

     
  डोंगर उतारावर वसलेल्या या  गावावर आजही इंग्रजांचा अंमल दिसतो. मध्यवर्ती असलेले पोलीस बाजार हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे टॅक्सी, बसेस, हॉटेल्स, शॉपिंग या सर्व गोष्टींची मुबलक उपलब्धता असल्याने हा भाग कायम गजबजलेला असतो.येथील लोक त्यांच्या बोलीभाषे व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजी खूप चांगले बोलतात. निसर्गाने आपल्या दोन्ही हाताने भरभरून दिलेल्या शिलाँग मध्ये आवर्जून पहावीत अशी काही ठिकाणे.

    १) यूमीअम लेक  -: 

             
                        युमीअम   लेेकचे विहंगम दृश्य

         शिलाँग गावात जाण्याआधीच रोड साईडला हे भव्य तळ आहे. युमीअम नदी वर बांधलेल्या  धरणामुळे निर्माण झालेले हे तळे. तळ्याभोवती घनदाट जंगल, सुंदर निसर्ग, शिवाय येथे   वॉटर स्पोर्ट्स एडवेंचर्स, बोटिंग, मुलांसाठी पार्क अशा   खास सोयी उपलब्ध केल्यामुळे पर्यटक आकर्षित होतात. येथील  सूर्योदय पाहण्यासारखा असतो .  
        आम्हाला  येथे महाराष्ट्रातील पुण्याहून  आलेला दिव्यांग लोकांचा  ग्रुप भेटला. आपल्या कुटुंबासहित ते आसाम- मेघालय पर्यटनासाठी आलेले. त्यातील काही लोकांनी  पॅरा  ओलंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळवून देशाचे नाव सातासमुद्रापलीकडे  केले होते . देश-विदेश वाऱ्या करणाऱ्या या ध्येयवेड्या माणसांना भेटून अभिमान वाटला. त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करून त्यांचा निरोप घेतला.
                     

 श्रीयुत श्रीधर आखाडे आणि कुटुंबीय


   २)डॉन बॉस्को म्युझियम    :- 

                     


              पूर्व नार्थ ईस्ट भागातील संस्कृतीचे पैलू दाखवणारे हे संग्रहालय आहे. यामध्ये स्थानिक लोक, त्यांची संस्कृती, ते वापरत असलेली अवजारे, कपडे, कलाकृती इत्यादींची इतंभूत माहिती संग्रहित केली आहे.  दोन तास वेळकिमान असावा . येथील स्काय वॉक  मधून शिलॉंग चे नयनरम्य दर्शन घडते. संग्रहालय पाहण्यासाठी किमान दोन तास तरी जातात. रविवारी आणि नॅशनल हॉलिडेजना संग्रहालय बंद असते.
           
            संग्रहालयात बांबूपासून बनवलेला अप्रतिम मोर

स्कायवॉक मधून दिसणारे शहर

३) इलेफंट फॉल्स :- 

          हा धबधबा ज्या दगडावरून पडतो त्या दगडाचा एका बाजूचा आकार हत्ती सारखा असल्यामुळे याचं एलिफंट फॉल्स असं नामकरण झालं. १८९७ ला  झालेल्या भूकंपामध्ये हा दगड नष्ट झाल्यामुळे आता हत्तीचा आकार दिसत नाही. धबधबा तीन टप्प्यात पडतो.  हा  फारसा गोंगाट, आदळ-आपट न करता  पडत असतो. फारच शालीन आणि शांत भासतो.
                         
           

                 

४) वॉर्ड स् लेक :-

     शिलाँग गावात हे सुंदर तळ बांधले आहे. कुटुंबीयांसह, मित्र-मैत्रिणींबरोबर निवांत वेळ घालवण्याचे ठिकाण. इथे बोटिंग ची सोय आहे.

५) लेडी हैदरी पार्क :-

       पार्क सुंदर आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं जोपासली आहेत. तसेच छोट्या मुलांसाठी खेळ आहेत. म्युझियम पण आहे.
 ट्रीप मधील बिझी शेड्युलमधून वेळ असेल तर अवश्य भेट द्यावी.
         
                येथेही अंधार लवकर पडायला सुरुवात होते त्यामुळे स्थळे पाहण्याचा क्रम आपल्या वेळेनुसार ठरवावा .

** शाकाहारी लोकांसाठी खास टीप - 

          पोलीस बाजार याठिकाणी खूप शोधाशोध केल्यानंतर  सापडलेले एकमेव शाकाहारी हॉटेल. छान आहे.
         

                         

                      #   मेरा भारत महान.   #

                                                   सुनिता शाह.
                              evessonu@gmail.com

शिलाँग ते मावलिंनोंग.     

        १/१२/२०१९

                 आजचा आमचा प्रवास 90की.मी. होता.या जादुई नगरीत प्रवास करताना बिलकूल कंटाळा येत नाही. मंत्रमुग्ध करणारे हे निसर्गाचे चित्र विधात्याने आपले सारे कौशल्य पणाला लावून बनवले आहे.
       मावलीनोंगला पोहोचण्याआधी आपल्याला डावकी, स्नोंगपिडेंग,रिवाई ही सुंदर गाव लागतात. आवर्जून पाहण्यासारखी ही ठिकाण आहेत.

                     डावकी (Dawki )

     
                  डावकी पुलावरून दिसणारी उमंगोट नदी




                     भारत-बांगलादेश मैत्री प्रवेशद्वार

        या प्रवासात साधारण  78 की मी वर डावकी हे भारत व बांगलादेश यांच्या सीमेवरचे गाव लागते. आंतरराष्ट्रीय सीमेवरील गाव असल्यामुळे त्याला महत्त्व आहे पण त्याच बरोबर  या गावातून वाहत जाणाऱ्या उमंगोट नदी मुळे फार प्रसिद्धीस आले आहे. या नदीचे सौंदर्य पर्यटकांना चकित  करत .   नदीचे पाणी इतका स्वच्छ आहे ही नदीचा तळ आपण काचेतून पाहत असल्यासारखा भासतो.  येथे उमंगोट (Umngot) नदीवर एक सस्पेन्शन ब्रिज आहे जो जयंतियाँ हिल्स आणि खासी हिल्स यांना जोडतो. येथूनच बांगला देशात जाता येते. याच रस्त्याने आयात- निर्यातीचे व्यापार होतात. भारतातून या रस्त्याने दररोज किमान पाचशे ट्रक कोळसा बांगलादेशात निर्यात केला जातो. दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यात येथे नावांची शर्यत भरवली जाते ती पाहण्यासाठी देश-विदेश चे पर्यटक येतात. पर्यटकांसाठी बोटिंग, क्लीप जम्पिंग, झिप लाइनिंग, स्कुबा डायविंग उपलब्ध आहेत.
        इंटरनॅशनल हायवे च्या  बाजूलाच हे गाव असल्यामुळे पर्यटकांची येथे खूप गर्दी असते . ही गर्दी टाळण्यासाठी आमचा सारथी राहुल देव यांनी आम्हाला येथूनच सात किमी वर स्नोंगपिडेंग ( Shnogpdeng) गाव आहे तिथे नेले .

            स्नोंगपिडेंग  ( Shnogpdeng )



 
     उमंगोट नदीवरील  पूल

         डोंगराच्या कुशीत, नदीच्या काठावर वसलेले हे टुमदार सुंदर आणि शांत गाव. रहदारीच्या रस्त्यापासून आतील बाजूस असल्यामुळे पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असले तरीही पर्यटकांना हवे असलेल्या सर्व सुविधा गावकऱ्यांनी येथेही उपलब्ध केले आहेत. येथेही नदीवर पूल आहे पण तो फक्त पायी जाणाऱ्या लोकांसाठी आहे वाहनांसाठी नाही. त्यामुळे पुला वरून  नदीचे  आरसपाणी सौंदर्य आपण डोळ्यात साठवू शकतो. कॅमेऱ्यात कैद करू शकतो.
                  पुलावरून टिपलेले बोटींचे विहंगम दृश्य
       
   आम्ही इथे बोटिंगचा आनंद लुटला. ज्या लोकांना नेहमीच्या गडबडीच्या, या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असेल तर त्यांनी स्नोंगपिडेंग ला आवश्य भेट द्यावी. येथे नदीकाठी पर्यटकांसाठी तंबूची ही सोय केलेली आहे. शिवाय जेवणात  लोकल पदार्थही बनवून दिले जातात.
आपल्या कुत्र्याला घेऊन नदीत मासे पकडणारा स्थानिक
गावकरी आपल्या बोटी घेऊन मच्छिमारीसाठी  येथे येतात. त्यामुळे मासे खाणाऱ्या पर्यटकांना ताज्या माशांवर यथेच्छ ताव मारता येतो. या गावाच्या आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप सारी वेगवेगळ्या आकाराची आणि विविध रंगांची फुलपाखरे पहावयास मिळाली.
जैनथानी वेश परिधान केलेली स्थानिक महिला

 स्थानिक लोकांची सामान ठेवण्याची वेताची बास्केट


              कितीही पाहिलं तरी मन भरत नव्हतं पण वेळेचे भान  ठेवून आम्ही उमंगोट नदीचा निरोप  घेऊन ' रीवाई ' (Rewai) साठी गाडीत बसलो.

                         रीवाई ( RIWAI)





             डावकी  जिल्ह्यातील हे छोटसं गाव  आपल्या पूर्वजांच्या कला- गुणांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. डावकी गावातील उमंगोट नदीच जेवढे अपृप तेवढेच  रीवाई गावातील 'नोहवेट लिविंग रूट ब्रीज ' चे कौतुक आहे. येथील स्थानिक लोकांनी नदीच्या दोन्ही काठांना जोडणारा पूल तयार केला आहे ज्यामध्ये सिमेंट, लोखंड, तारा यांचा वापर नाही. नदीच्या काठावर असलेल्या   रबराच्या झाडांच्या मुळांना हाताने विशिष्ट प्रकारे एकमेकात गुंतवून लोकांच्या वाहतुकीसाठी पूल तयार केला आहे. आजमितीस पूलाच वय अवघ तीनशे वर्षे आहे. ही हस्तकला  केव्हापासून अस्तित्वात आहे याची माहिती नाही. 
रबराच्या  झाडांची मुळं एकमेकात गुंतवून तयार केलेला पूल 



           हा ब्रिज पाहण्यासाठी  माफक शुल्क आकारले जाते त्याचा गावाच्या कल्याणासाठी वापर करतात.  शिवाय स्थानिक लोक लिविंग रूटला जाण्याच्या रस्त्यावर खाद्यपदार्थ , फळ, हस्तशिल्पांचे स्टॉल लावून बसलेले असतात. विशेष म्हणजे आम्हाला  येथे गोड चवीचे उकडलेले रताळे खायला मिळाले.
           ब्रिज खालून वाहणाऱ्या नदीच्या काही भागापर्यंत पर्यटकांना जाण्याची मुभा आहे बाकीचा उर्वरित भाग स्थानिक लोकांसाठी राखीव ठेवलेला आहे. तिथे पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. 
         नदी, ब्रिज यांचे भरपूर फोटो घेऊन आम्ही परत फिरलो ते माऊलीनोंगला जाण्यासाठी.

                        मावलिंनोंग    (MAWLINNONG)  

        

             मावलिंनोंग या भारताच्या एका कोपऱ्यात असलेल्या छोट्याशा खेड्यान भारताचे नाव जगाच्या पटलावर नेऊन ठेवलं आहे .  सण २००३ मध्ये ' डिस्कवर इंडिया मॅगझीन ' ने या गावाला आशियातील सर्वात स्वच्छ खेडे असा किताब देऊन गौरविले आहे.
           . आपण वाडवडिलांची  संपत्ती वारसाहक्काने घेतो पण या गावात वाडवडिलांनी  वारसांना स्वच्छतेचा वसा दिला आहे. आणि हा वारसा ते प्रामाणिकपणे जपत आहेत.
     

         सार्वजनिक  स्वच्छतेवर त्यांचा जोर आहे. जंगल परिसर असलेल्या या गावात सर्व गावकरी रस्त्यावर पडलेला झाडांचा पालापाचोळा, घरातील कचरा यांची योग्य विल्हेवाट लावतात. त्याच्या पासून खत तयार करून ते शेतात वापरतात. गावातील प्रत्येक कोपऱ्यात व रस्त्यावर वेताची बाकडी व डस्टबिन ठेवलेले आहेत. सध्या येथील रहिवाशी प्लास्टिक बँन साठी सरसावले असून जंगल संवर्धन व संरक्षण मोहीम राबवत आहेत.                         हे सुंदर गाव पाहण्यासाठी देश-विदेश चे पर्यटक येथे  हजेरी लावतात त्यांची राहण्याची, खाण्याची सोय येथील स्थानिक लोक आपल्या घरी होम स्टे द्वारे करतात. त्यामुळे शेतीनंतर पर्यटन हा त्यांचा एक जोड व्यवसाय झाला आहे.

               बॅलेंसिंग रॉक -: 


      गावापासून एक किलोमीटरवर हा निसर्गाचा अविष्कार पहावयास मिळतो एक भलामोठा दगड  पाण्याने गुळगुळीत झालेला आहे तो एका छोट्या दगडाच्या पाठीवर आपला तोल सांभाळून बसला आहे. कित्येक वर्ष झाली मोठ्याने आपली जागा यत्किंचितही सोडलेली नाही आणि त्या छोट्याने पण कधी हू की चू  केली नाही. असाच एक आविष्कार मी तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथे पाहिला आहे.
         ऑगस्ट महिन्यानंतर येथे हिरव्यागार मखमलीच राज्य असते, नदी-नाले ओसंडून वाहत असतात तर डोंगर - कपारीतून धबधबे नाचत असतात. निळ्याभोर आकाशात ढगांचे पांढरेशुभ्र पुंजके पाठशिवणीचा खेळ खेळत कधी डोंगरावर तर कधी रस्त्यावर उतरतात. यापेक्षा स्वर्ग वेगळा असेल असं मला तरी वाटत नाही.

                 वेता पासून तयार केलेलं झाडावरच मचान.

       निसर्गाचे हे सर्व चमत्कार याची देही याची डोळा बघून आम्ही धन्य झालो. आजचा आमचा मुक्काम या सुंदर छोट्याश्या टुमदार गावातील होम स्टे मध्ये होता. आज रविवार होता आणि रविवारी येथील हॉटेल्स लवकर बंद होतात. त्यामुळे  आज आम्ही होम स्टेला  घरून आणलेल इंस्टंट उपीट करून खाल्ल.अजून  तीन दिवस आम्ही मेघालय चा पाहुणचार घेणार होतो.
       
         आजचा आमचा स्टे लाल शर्ट मधील 'फी' च्या घरी होता.

     विशेष टीप  -: 

        येथील गावांची नावे उच्चारताना जिभ वळत नाही. बरेच प्रयत्न करून मराठीत त्यांचे उच्चार लिहिले आहेत चूक झाली असल्यास  क्षमस्व . 

नॉनग्रियेट डबल डेकर लिविंग रूट ब्रिज

                                    आणि

                                रेनबो फॉल

          २/१२/२०१९

      लिविंग  रूट ब्रिज म्हणजे काय ?


           लिविंग रूट  ब्रिज पाहण्याआधी बहुतेक सर्वांना पडलेला हा प्रश्न.
          मेघालय राज्यातील चेरापुंजी हे जास्त पावसासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील खासी जमातीचे लोक ज्या भागात राहतात तिथे पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पाण्यामुळे दररोजचे जनजीवन विस्कळीत होत असे शिवाय नदीवर लाकडी पूल टिकत नसे. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून खासी लोकांनी नदीकाठी असलेल्या रबराच्या झाडांच्या मुळांचा योग्य असा वापर करून बनवलेले हे पूल. जास्त पावसात हे वाहून जात नाहीत ही त्याची जमेची बाजू. याचा नेमका संशोधक कोण याची माहिती नाही. हे कोणत्या काळापासून चालत आलंय याचीही माहिती नाही. पण आज  मितीस हे आपल्याला पाहायला मिळते हे आपलं नशीब.
             हे पूल जगासमोर आले ते १८४४  मध्ये जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल यांनी त्याचे  डॉक्युमेंटेशन केले.
आणि 'चेरापुंजी हॉलिडे रिसॉर्ट' चे मालक. ते तमिळ होते. त्यांनी इथल्या खासी जमातीच्या मुलीशी लग्न करून ते तिथेच स्थायिक झाले. त्यांनी हे टुरिस्ट मॅप वर आणले.

                                  नॉनग्रियेट


        आज आमचा प्रवास मौलींनोंग ते टायरना (Tyrna ) ९२ की मी  होता. टायरना पासून नॉनग्रियेटला जाण्यासाठी गाडीचा हा शेवटचा टप्पा. इथून पुढे गाडी, घोडा, सायकल  कशाचाही उपयोग करता येत नाही. फक्त आणि फक्त या घनदाट जंगलात आपण पायी जाऊ शकतो.आणि त्यासाठी  आपली शारीरिक-मानसिक क्षमता आणि पायांचे स्वास्थ्य चांगले हवे.
      


        येथे  टायरणा ला  साधारण ११.०० वाजता पोहोचलो.  नॉन-ग्रियेट  ला आमचा एक मुक्काम होता त्यामुळे आम्ही आमच्या छोट्याशा सॅकमध्ये एक दिवसाचं  कपडे, पोहण्याचे कपडे, थोडं  खायचं साहित्य आणि पाण्याची बाटली बरोबर घेऊन, गाडी व ड्रायव्हरचा निरोप घेतला. येथे आपल्याला स्थानिक गाईड मिळतात. आम्ही गाईड घेतला नव्हता.चालताना आधारासाठी फक्त दोन काठ्या भाड्याने घेऊन आम्ही ११.३० ला आमच्या छोट्या ट्रेकचा शुभारंभ केला.
        टायरना  ते नॉनग्रियेट अंतर ३.५ की मी आहे. निसर्गाचा आस्वाद घेत चालले तर साधारण दोन ते अडीच तास लागतात. या ट्रेकचा रस्ता तीन प्रकारात मोडतो.
१) विनासायास उतरता येणाऱ्या पायऱ्या
२) पूल-- लिविंग रूट ब्रिज, बांबूचा पूल आणि लोखंडी पूल
३) थोडासा त्रासदायक शेवटचा चढ
          सुरुवातीलाच सुलभ पायऱ्यांची उतरण  होती. दररोजचा सवयीचा भाग असल्यामुळे आम्हाला चालण्याचे फारसे कष्ट होत नव्हते. पूर्ण रस्त्यात विविध प्रकारची झाडं,फळझाडे(संत्री,अननस, फणस, बंपर  इ.) फुलझाडे, पक्षी, सरपटणारे प्राणी हाताच्या तळव्या एवढे मोठे कोष्टी, रंगीबेरंगी फुलपाखर पहात त्यांचे फोटो घेत आम्ही निघालो.
   



                       अननस  विकणारी छोटुकली


           साधारण पाऊण तासात आम्ही सर्वात लांब असलेल्या लिविंग रूट ब्रिज कडे आलो. खाली खडकाळ पात्रातून नदी वाहत होती. तिच्यावर हा लिविंग  रूट  ब्रिज तयार केला होता याच्यावरून चालताना खरोखरच भीती वाटत होती.   प्रत्येक पावलागणिक हा पूल झोके घेत होता.



नोंगठीमाई येथील लार्जेस्ट लिविंग रूट ब्रिज
१२.३० ला येथे पोहोचलो.(Nongthimmai)
     

     
           
                     हाताच्या पंजा एवढा मोठा कोष्टी

         उंचच उंच हिरवीगार झाडी असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. जैवविविधतेने नटलेला हा परिसर बघत आम्ही मस्त मजेत निघालो होतो. साधारण पाऊण तास चालल्यानंतर आम्हाला लोखंडी पूल लागला.

१.२० ला आम्ही हा पूल क्रॉस केला

                  १.४० ला आम्ही दुसरा लोखंडी पूल पार केला

             आणि  इथून अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही नॉनग्रियेटला  पोहोचता.
 

                                रेनबो वॉटर फॉल

        इथे आम्ही पूर्वनियोजित होमस्टे बुक केलेला होता आणि इथून आम्ही दोन किलोमीटर अंतरावर असलेला 'रेनबो वॉटरफॉल' पाहायला जाणार  होतो. आमच्यासमोर रम्य, गुढ,  अकल्पनीय डबल डेकर ब्रिज होता. त्याच्या समोरच आमचा आजचा होम स्टे होता पण त्याचा मोहात  न पडता, थोडीही  विश्रांती न घेता आम्ही आमच्या पाठीवरच्या सामान सहित रेनबो वॉटर फॉल ला निघालो.   


           हा रस्ता अरुंद , दगडी फुटलेल्या  पायऱ्यांचा अगदी खडबडीत दगड गोट्यांचा,मातीचा असा होता. आता चढाई होती. रेनबो फॉल ला पोहोचायला किमान १.३० तास लागणार होता. चालण्याचा वेग थोडा वाढवला  कारण तिथे लवकर पोहोचलो तर आम्हाला इंद्रधनुष्य पाहायला मिळणार होतं. इथे जंगल थोडं दाट होतं उन्हाचा त्रास होत नव्हता पण चालून सगळ्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या.
         रस्ता बिकट होता. सोबतीला कुणीही दूसरे पर्यटक नव्हते . लोकवस्तीचा मागमूस नव्हता. धबधबा पाहून येणारे सुद्धा कोणी भेटले नाहीत. दाट जंगलात पक्ष्यांच्या गूढरम्य आवाजाबरोबर आमच्या पावलांचा आवाज  होत होता. अशातच समोर एक पूल ओलांडून जायचा होता. त्याला पाहताच आपण 'विचित्र विश्वात ' येऊन काही अद्भुत गोष्टी पाहत असल्यासारखे वाटले.  

            

                    विचित्र विश्वातील अद्भुत पूल

                अशा चित्रविचित्र गोष्टी पारखत , अनुभवत  आम्ही जंगलची ही बिकट वाट तुडवत चाललो होतो. इतक्यात लांबून पाण्याचा आवाज कानावर आला. ज्याच्यासाठी एवढे श्रम घेऊन एवढे कष्ट झेलून येथे आलो होतो ते  आवाक्याच्या अंतरात आलं होतं आणि दहा मिनिटातच समोरचं दृश्य पाहून  या अगम्य, अद्भुत जंगलातून आम्ही पऱ्यांच्या राज्यात आल्यासारखं वाटलं. समोरच्या  दृश्या वरून नजर हटत नव्हती.  उंच डोंगरावरून पडणार पांढराशुभ्र फेसाळणारे पाणी खाली पडताच निळभोर व्हायचं. कितीतरी वेळ ही निसर्गाची किमया न्याहाळत बसलो. डोळ्यात साठवून ठेवलं, कॅमेऱ्यात कैद केलं.उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे आम्हाला इंद्रधनुष्य दिसू शकल नाही. 
                    

                 तीन टप्प्यांमध्ये पडणारा हा धबधबा भारताची शान आहे. आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून याला गौरविण्यात आले आहे   

       या निळ्याभोर पाण्यात डुंबण्याची फार इच्छा होती पण संध्याकाळचे पावणे चार वाजले होते. जंगल चा रस्ता पार करून आम्हाला आमच्या होम स्टे वर जायचे होते. पायाखालची वाट नव्हती. अंधार करून चालणार नव्हते . 'फिर मिलेंगे' म्हणत परतीची वाट धरली . 



          होम स्टे वर पोहोचेपर्यंत अंधारून आलेलं.    घड्याळ्यात ५.३० झालेले. घामाने अक्षरशा अंगावरचे कपडे खारावलेले. आता मात्र पायाचे गोळे बोलू लागले. येथे गरम पाण्याची सोय होती. जेवणाची ऑर्डर देऊन थोडा वेळ निवांत बसलो.
          होम स्टे समोरच डबल डेकर ब्रिज होता . पण अंधारून आलेलं. अंधारात तो अक्राळ- विक्राळ वाटत होता. येथे पहाट लवकर होते त्यामुळे पहाटे उठून त्याचं दर्शन घ्यायचं ठरवलं.


     हा ट्रेक करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी खास सूचना -:
१)  हा ट्रेक कमीत कमी एका रात्रीच्या मुक्कामाचा असावा .  येथे       होम  स्टे व जेवणाची सोय आहे.
२) गाईडची आवश्यकता नाही
३) गरजेपुरतं साहित्य घेऊन हा ट्रेक करावा 
४) एक दिवस  नोनग्रीऍट व एक दिवस रेनबो फॉल साठी द्यावा जेणेकरून सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्य दिसू शकेल.

 नॉनग्रियेट ते चेरापुंजी

         ३/१२/२०१९

   


        सकाळी सामान पॅक करून पहिले दर्शन डबल डेकर लिविंग रूट ब्रिज चे घेतलं.
             सकाळच्या रमणीय वातावरणात   तो शांत, धीरगंभीर, अगदी जटा सोडून ध्यानात मग्न योग्या  सारखा भासत होता. ती शांतता भंग  होणार नाही अशा रीतीने आम्ही त्याला न्याहाळले. त्याच्या अंगाखांद्यावर चढलो. निसर्गाच्या मदतीने मानवांनी  मानवाच्या हितासाठी बनवलेलं हे ' सुंदर  हस्तशिल्प ' बघून मन अवाक् झाले. निसर्ग दोन्ही हाताने भरभरून आपल्याला देतो आहे फक्त आपण आपल्या झोळीत घेताना आपली झोळी फाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
           चेरापुंजी मध्ये  एकूण 11 लिविंग रूट पूल आहेत. यातील आठ चालू स्थितीत आहेत आणि फक्त आणि फक्त नॉनग्रीएटचा हा डबल डेकर पूल आहे. पूर्वी कधीतरी अति पावसामुळे नदीचं पाणी या पुलापर्यंत आलं आणि  लोकांच जनजीवन विस्कळीत झाले. त्यासाठी लोकांनी याच्यावर आणखीन एक पूल तयार करून आपली अडचण दूर केली. 

                  *   नॅचरल स्विमिंग पूल :-

      डबल डेकर लिविंग रूट ब्रिज पासून पाठीमागच्या बाजूला हा निसर्गाने तयार केलेला निळ्याशार पाण्याचा स्विमिंग पूल आहे. येथे पोहोचण्यासाठी २५ ते ३० मिनिट लागतात. रस्ता खडकाळ, दगड- गोट्यांचा आहे . जाण्यासाठी थोडे श्रम पडतात पण  येथे  पोचताच निळ्याशार पाण्याचा डोह पाहून   श्रमपरिहार होतो. पर्यटकांनी अगदी आवर्जून याला भेट द्यावी नॉनग्रियेट मधील हे  निसर्गाने बहाल केलेलं आणखीन एक आश्चर्य आहे . 
           आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आलो त्याच मार्गाने जायचं होतं . आज पायऱ्यांची चढाई होती. अस्मिता ने आज पायऱ्या मोजण्याची मोहीम हाती घेतली होती आणि रमेशने तीला साथ दिली होती.

                         दाट वनराईने नटलेला रस्ता
                  घरासमोरील झाडांना लगडलेल्या संत्री
       
           ऊन वाढण्या आधी आम्हाला  Tyrna ला पोहोचायचं होत. येताना भीती दाखवणाऱ्या पुलांना सहज पार करत, निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही तैरनाला पोचलो तेव्हा ३७३५ पायऱ्या मोजून झाल्या होत्या. आमचा सारथी राहुल देव आमची आतुरतेने  वाट पाहत होता. कोणतीही अडचण न येता आम्ही हा ट्रेक पूर्ण केला.  आम्ही ' चेरापुंजी' साठी  गाडीत बसलो तोच राहुलने ( आमचा सारथी) डिक्लेअर केलं 'मी आज तुम्हाला एक सरप्राईज देणार'. आमच्या ट्रीपच्या शेड्युलमध्ये नसणार असे एक ठिकाण तो आम्हाला दाखवणार होता. हे ठिकाण तेरणा पासून २४  कीमी.   चेरापुंजी  मार्गावरच होतं. पार्किंगची सोय नसल्यामुळे रस्त्याच्या कडेलाच गाडी पार्क करून आम्ही हे आश्चर्य पाहण्यासाठी निघालो.

                 वुईस्वाडोंग  ( Weisawdong ):-



       


        हा छोटासा ट्रेक आहे. चालण्यासाठी लागणारा वेळ २० ते ३० मिनिटे. दरीच्या बाजूने खाली उतरावे लागते. उतरण साधारण
70 ते 90 अंशाच्या कोनात आहे.  गावकऱ्यांनी इथे खाली उतरण्यासाठी बांबूच्या साह्याने  छोट्या पायऱ्या वजा उंचवटे केले आहेत.  वाट थोडी  भीतीदायक पण  आव्हानात्मक आहे. विशेष करून ट्रेकर्सना आवडणारी. खाली उतरताना एका पॉईंटवरून आपल्याला तीन टप्प्यात पडणारा धबधबा नजरेस येतो. ते दृश्‍य पाहताच आपण स्वप्नात तर नाही ना असा भास होतो आणि जवळ जाऊन पाहण्याचा मोह अनावर होतो. निसर्गाचा एक सुंदर आविष्कार. खरंच मेघालय म्हणजे अलीबाबाच्या खजिन्यातील एक रत्नांची थैली आहे. राहुल देव ने सांगितल्याप्रमाणे खरोखरच हे एक सरप्राईज होतं.मेघालय ला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने हा धबधबा आपल्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत नमूद केला पाहिजे.

             वुईस्वाडोंग पासून चेरापूंजी १३ की मी आहे.  चेरापुंजी च्या आजूबाजूला पाहण्यासारखं काही प्रेक्षणीय स्थळ आहेत --

१) नोहकलिकाई धबधबा :-



         चेरापूंजी पासून पाच किलोमीटर वर असलेला हा भारतातील सर्वात उंच धबधबा. याची  उंची ११५ फूट आहे.
हा ट्रेक आहे. डिफिकल्ट रेंज चा ट्रेक आहे. वेळेअभावी आम्ही तो लांबूनच पाहिला.  ट्रेक करायची इच्छा असेल तर गाईड शिवाय जाऊ नये.

      २) सेवन सिस्टर  फॉल   :- 

        हा धबधबा पावसाळ्यात पाहण्यासारखा असतो. एरवी या  धबधब्याला पाणी कमी असते.

       ३)  अर्वाह गुहा /केव्ह (Arvah Cave )

            भलीमोठी गुहा आहे. याच्यामध्ये अब्जावधी वर्षापूर्वीचे समुद्री प्राण्यांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. येथे गाईडची सुविधा नसल्यामुळे नेमके काय पाहायचे आणि कुठे पहायचे ते समजत नाही.
                  गुहेच्या आतील बाजूस निरीक्षण करताना
दगडात उमटलेला माशाच्या हाडांचा सापळा

       ४) मौसमाई केव्ह (Mawsmai Cave)

            चेरापुंजी बस स्टॉप पासून चार किलोमीटर अंतरावर ही लाईम स्टोन ची गुहा आहे. याच्यामध्ये वर्षानुवर्ष पाणी  ठीपकून     पाण्यातील क्षारांचे वेगवेगळ्या आकारांचे थर तयार झाले आहेत. सध्या १५० मी. पर्यंतची गुहा पर्यटक पाहू शकतात.  

          ५) इको पार्क :- 

       मेघालय स्टेट गव्हर्नमेंटनी बनवलेला हा इको पार्क तेथील रहिवाशांसाठी व पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. येथून बांगलादेशाचा व्हू दिसतो. 
          आज आमचा स्टे चेरापूंजी मध्ये एका घरी होता.  चेरापुंजी इथे शाकाहारी जेवण मिळणं कठीण काम होतं. पण चेरापूंजी पासून तीन किमी वर एक छान व्हेज हॉटेल आहे तिथे आम्ही जाणार आहे.




      ऑरेंज रुट्स हे चेरापुंजी रीसॉर्ट हॉटेलचे युनिट आहे.   

     *   चेरापुंजी येथील शाकाहारी आणि छान

चवीचे पदार्थ मिळणार एकमेव सुंदर ठिकाण.

 

चेरापुंजी ते नोंगखूनम(Nongkhunm)

४/१२/२०१९

              घर सोडून आज चौदा दिवस होणार. पूर्व नियोजनानुसार आज आम्ही चेरापुंजी सोडून खासी हिल मधील राहिलेला भाग पाहणार होतो. त्यामध्ये सेक्रेड फॉरेस्ट , मॉफॅनलूर्
आणि नोंगखूनम ही ठिकाणी होती.

                           सॅक्रेड फॉरेस्ट / पवित्र वन

                चेरापूंजी पासून  हे ठिकाण 47  किमी अंतरावर आहे. महाराष्ट्रात पूर्वी गावाभोवती जंगल असायचं त्याला 'देवराई ' म्हणायचे. सध्या महाराष्ट्रात देवराया दिसत नाहीत पण मेघालयाच्या लोकांनी त्या राखून ठेवल्या आहेत.
               ईस्ट खासी हिल आणि जयंती हिल येथील  सॅक्रेड फॉरेस्ट मुळे स्थानिक लोकांची  एकमेकांशी धार्मिक व सांस्कृतिक नाळ घट्ट विणली गेली आहे . हजारो वर्षापासून ते या जंगलाचे संरक्षण व संवर्धन करत आहे  .

                जतन केलेली हिरवीगार जंगल (पवित्र वन )

           अशा खूप देवराया मेघालय मध्ये आहेत. या सगळ्यांमध्ये   माऊफलंग   ( Mawphlang) सेक्रेड फॉरेस्ट महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकांनी या जंगलांसाठी काही नियम केले आहेत.  ' देवराईतील काहीही घेतले जाणार नाही अगदी झाडाचे पान, दगड किंवा वाळून तुटून पडलेली फांदी सुद्धा ". १९२ एकरात पसरलेले हे जंगल स्थानिक लोकांसाठी पवित्र आहे. येथे ग्रामदेवता 'लवासा'  हिचा वास असतो आणि ती ह्या जंगलाचे आणि लोकांचे रक्षण करते. तिला प्रसन्न ठेवण्यासाठी स्थानिक लोक तिची पूजा करतात आणि तिला जनावरांचा बळी देतात. जंगलाचे नियम मोडणाऱ्यास  अगदी मृत्यूदंडाची सुद्धा शिक्षा आहे.
  

  देवीला प्रसन्न करण्यासाठी जनावरांचा बळी देण्याचे ठिकाण  


             हिरवीगार वनराई बघितली की आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी किती खोलवर होती याचा प्रत्यय येतो. आपल्या  संत तुकोबानी आपल्या अभंगातून  " वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे "
सांगितले आहे. आपले पूर्वज आपल्यासाठी हा अमूल्य ठेवा ठेवून गेलेत. पण आपण आपल्या वारसांना काय देत आहोत याचा क्षणभर विचार करा . आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या देवराया हि आपण  आधुनिकीकरणाच्या नावाखाली नष्ट  केल्या. पण  ज्यांना आपण आदिवासी म्हणून हिणवत असतो त्यांनी ह्या आपल्यासाठी राखल्या. प्रत्येक भारतीयाने येथे जाऊन नतमस्तक झाले पाहिजे आणि एक झाड लावेन असा विडा उचलला पाहिजे.
येथे  पर्यटकांची राहण्याची चांगली सोय आहे.
         

                          नोंगखूनम (Nongkhunm)

 

           सॅक्रेड फॉरेस्ट पासून हे १०२ की मी वर आहे.   पोचायला २.३० तास लागतात.  हे  भारतातील दुसऱ्या क्रमंकाचं मोठं नदीतील बेट आहे. फानलियांग ( Phanliyang )  आणि  नामलियाग(Namliyang)  या दोन नद्यांच्या  मुळे २० ते २५ की मी . हिरवागार परिसर तयार झाला आहे. येथे पर्यटकांसाठी बोटिंग, फिशिंग, कॅम्पिंग उपलब्ध आहे. सोनेरी वाळूचा बीच, नितळ पारदर्शी पाणी, हिरवीगार  झाडी मनाला भुरळ घालते. नद्यांमुळे तयार झालेला सुंदर धबधबा पहाता येतो.

                        नदीवरील सस्पेन्शन ब्रिज

                  स्थानिक मुली आपल्या भावंडां बरोबर



         

                      मेघालयच नंदनवन  " मॉफेनलूर "

                           ( MAWPHENLUR)


            नोंगखूनम हून परतीचा प्रवास सुरु झाला. ४७ की.मी. वर
असलेल्या  मॉफेनलूर ला आजचा मुक्काम होता. हा ट्रीप मधील शेवटचा मुक्काम.

               प्रवासात भेटलेली ही छोटी मंडळी

                   

                      लगोरी ने खेळत असलेला मुलगा

                  आपल्या छोट्या भावाला पाठीला बांधून फेरफटका मारायला निघालेला छोटुकला

            हा भाग 'मेघालय व्हिलेज डेव्हलपमेंट  अँड प्रमोशन टुरिझम कार्पोरेट सोसायटी' ने डेव्हलप केलेले आहे. चहूबाजूंनी डोंगररांगांनी घेरलेले हे पठार हिरव्यागार लुसलुशीत गवताने आच्छादलेली आहे. बऱ्याच ठिकाणी निळाशार पाण्याची सुंदर तळी आहेत. या नैसर्गिक देणगीचा योग्य असा वापर करून मेघालय टुरिझम ने  पर्यटकांसाठी हा टुरिस्ट स्पॉट डेव्हलप केला आहे. शहराच्या घाई-गर्दीच्या वातावरणातून  दूर निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. पर्यटकांसाठी  बोटिंग, फिशिंग उपलब्ध आहे.

      आमच्या कॉटेज शेजारी असलेले हे सुंदर तळ


          राहण्यासाठी ' ट्रॅव्हलर्स नेस्ट' ही खूप छान सोय आहे. त्याचे मालक मिस्टर फ्रान्सिस फोन नंबर 8974318450.
                सोशल मीडियामुळे हे लवकरच सर्वांना ज्ञात होईल पण मी देवाकडे प्रार्थना करते की या निखळ  सौंदर्याला बाधा येईल असे कोणतेही कंस्ट्रक्शन तेथे न होवो.

                          पहाटेच विहंगम दृश्य   

         उद्या सकाळी आम्ही गोवाहाटी एअरपोर्ट साठी निघणार. अंतर १४४ की मी. साधारण साडेचार तासांचा प्रवास.

                            #  अलविदा मेघालय   #






 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...