https://chinmaye.com/2020/03/05/mabhaneri/

विहीर म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी जमीन खोदून बांधून काढलेली सोय. पण भारतीय स्थापत्य परंपरेत विहीर बांधत असताना उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन केलेला व्यापक विचार हा बारव स्थापत्य रूपात विकसित झालेला दिसतो. खोलवर केलेलं दगडी बांधकाम, विविध आकारात रचना केलेला तलविन्यास आणि पाण्याच्या पातळीपर्यंत जाता यावं यासाठी केलेली पायऱ्यांची रचना. या सगळ्याचं भौमितीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर बारव पाहायला हवी. इंग्लिशमध्ये या रचनेला step well तर हिंदीत बावली असं म्हंटलं जातं. गुजरातमध्ये पाटण येथे राणी की वाव या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीतील नाजूक नक्षीकाम आणि शिल्प सौंदर्याने या रचनेला विश्व वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. अशाच बारवांची मालिका राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यात दिसते. राजस्थानमध्ये माझी फिल्म शूट करत असताना मी पाहिलेली एक सुंदर बारव म्हणजे आभानेरी येथील चांद बावली …

निकुंभ घराण्यातील राजा चांद किंवा चंद्र याने ८-९ व्या शतकात आभानेरी किंवा आभानगरी येथील आपल्या राज्यात ही विहीर बांधली. या विहिरीची खोली सुमारे १९.५ मीटर आहे. या आयताकृती विहिरीच्या तीन बाजूंना पायऱ्यांची सुंदर रचना आहे तर चौथ्या बाजूला जणू महालच बांधावा त्याप्रमाणे छज्जे आणि दरवाजे आहेत. विहिरीच्या चारही बाजूंना संरक्षक भिंत असून उत्तर दिशेला दरवाजा आहे.

या रचनेत सुमारे 3500 पायऱ्या आहेत आणि १३ मजली बांधकाम केले गेलेले दिसते. राजा चांद हा गुर्जर प्रतिहार घराण्यातील शासक असावा आणि या घराण्याच्या उत्कर्ष काळात या बारवेची बांधणी झाली असे इतिहासकार सांगतात.

या परिसरात एक प्राचीन मंदिरही आहे जे हर्षत माता मंदिर म्हणून ओळखले जाते आणि सुमारे १२ वर्षे जुने बांधकाम मानले जाते. स्थानिकांच्या मते गझनीच्या महंमदाच्या हल्ल्यात या मंदिराचे बरेच नुकसान केले गेले.

या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत.
या मंदिराची जुने अवशेष वापरून पुनर्बांधणी केली असावी असं वाटतं. इथलं कोरीवकाम आणि शिल्पेही आवर्जून पाहावीत अशीच आहेत. दिल्ली-आग्रा-जयपूर या पर्यटन त्रिकोणात असलेलं हे ठिकाण जयपूर आणि आग्रा महामार्गाजवळच आहे. आमेर किल्ला, हवामहल, आग्रा किल्ला, ताजमहाल अशी भटकंती करत असताना आभानेरी सारखी अद्भुत ठिकाणे सुद्धा नक्कीच पाहिली गेली पाहिजेत.
सुंदर, आलिशान राजवाडे, मंदिरं, अन्य ऐतिहासिक वास्तू आणि अभयारण्य असलेल्या राजस्थानात देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असतात. राजस्थान म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतं थरचं वाळवंट आणि त्यात संचार करणारे उंट. कला, संस्कृती, अनेकविध रंगांची उधळण करणारे उत्सव यामुळंही राजस्थानची ख्याती जगभर पसरलेली आहे. अशाच सुंदर राजस्थानामधलं एक सुंदर शहर आहे बीकानेर. वायव्य राजस्थानात वसलेलं बीकानेर शहर राजस्थानामधलं एक महत्वाचं पर्यटन केंद्र आहे.
बीकानेरच्या परिसरामध्ये आढळणारा लाल आणि पिवळा वालुकाश्म आणि उंट या गोष्टी या शहराला खास ओळख प्रदान करून देत आहेत. तिथं आशियामधलं सर्वात मोठं उंट संवर्धन केंद्र आहे. जुन्या बीकानेरमधील अनेक घरं लाल वालुकाश्मातच बांधलेली आहेत. त्यावरूनच या शहराला राजस्थानचं लाल शहर असं नाव पडलेलं आहे. बीकानेर शहरामध्ये आणि त्याच्या आसपास अनेक पर्यटक ठिकाणं आहेत.
राव बिका राठोड यांनी 1488 मध्ये बीकानेर राज्याची स्थापना केली होती. जोधपूर शहराचे संस्थापक राव जोधा राठोड यांचे ते सर्वात ज्येष्ठ सुपुत्र. तोपर्यंत या परिसराला जंगलदेश म्हणून ओळखलं जायचं. त्याच्याही पूर्वी प्राचीन काळापासून मध्य आशिया आणि गुजरातदरम्यानच्या व्यापारी मार्गावरचं ते एक महत्वाचं शहर बनलं होतं.
देश्नोकच्या कर्णी मातेच्या आशीर्वादानं राव बिका यांनी या शहराची स्थापना केली होती. कर्णी मातेचं देश्नोकमधलं मंदिर जगातलं असं एकमेव मंदिर आहे, जिथं उंदराला पवित्र मानलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे या मंदिरात प्रवेश करताच सगळीकडे उंदरांचा मुक्त संचार दिसतो. हे मंदिर बीकानेरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. बीकानेरचे महाराजा गंगा सिंग यांनी या मंदिराला दान केलेला चंदेरी दरवाजाही इथं पाहायला मिळतो. गंगा सिंग यांनीच बीकानेर राज्यामध्ये सिंचनासाठी गंगा कालवा बांधला होता.
बीकानेरमध्ये असलेला जुनागढ किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. याच्या बांधणीत लाल वालुकाश्म आणि संगमरवराचा प्रामुख्यानं वापर करण्यात आलेला आहे. जुन्या शहरापासून काहीच अंतरावर उत्तर दिशेला राजा राज सिंग यांनी हा किल्ला बांधला होता. याच्या भोवतीनं खोल खंदक खोदलेला आहे. सुरज पोल हे या किल्ल्याचं मुख्य द्वार. या किल्ल्यात असलेल्या हर मंदिरामध्ये राजघराण्याचे विवाह सोहळे आणि जन्म सोहळे पार पडत असत.
जुनागढ किल्लात अनुप महाल, करण महाल, बिजाई महाल, डुंगर निवास, गंगा निवास आणि रंग महाल असे महत्वाचे राजवाडे आहेत. पण चंद्र महाल आणि फूल महाल हे या किल्लामधले सर्वात सुंदर आणि आकर्षक राजवाडे आहेत. या महालांमध्ये सजावटीसाठी आरसे, बारीकबारीक कलाकुसर, चित्रकला यांचा वापर केलेला आहे. यामुळं या महालांचं अंतर्गत सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे. त्याचबरोबर उंच स्तंभ, कमानी यांचाही या महालांच्या बांधकामात समावेश करण्यात आलेला आहे. म्हणूनच या किल्ल्याला भेट देणं हा अतिशय सुंदर अनुभव ठरू शकतो.
लालगढ राजवाडा हे बीकानेरमधलं आणखी एक खास आकर्षण आहे. लाल वालुकाश्मात उभारलेला हा राजवाडा महाराजा गंगा सिंग यांनी आपल्या वडिलांच्या – महाराजा लाल सिंग -स्मृतिप्रीत्यर्थ बांधला होता. याचं बांधकाम 1902 ते 1926 दरम्यान करण्यात आलं होतं. या राजवाड्यात लाल वालुकाश्मावर करण्यात आलेली कलाकुसर अप्रतिम आहे. त्याचबरोबर जुनी छायाचित्रं आणि इतर साहित्याचाही मोठा संग्रह या राजवाड्यात पाहायला मिळतो, जो भोजन कक्षात मांडण्यात आलेला आहे. राजवाड्याच्या बाहेरच्या हिरवळीवर नाचणारे बरेच मोर पाहणं हेसुद्धा रोमांचक ठरतं. त्यांच्यामुळं लालगढ राजवाड्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. या राजवाड्याच्या काही भागाचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तरीही त्याचं मूळ रुप बदलण्यात आलेलं नाही.
गंगा सुवर्ण महोत्सव संग्रहालयात हडप्पा-पूर्व संस्कृतीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहायला मिळतात. गुप्त आणि कुशाण काळामधल्या वस्तूही तिथं मांडलेल्या आहेत. याबरोबरच अनेक सुंदर शिल्पकृती तिथं पाहायला मिळतात. टेराकोटा, चिनी मातीच्या वस्तू, चित्रं, जुनी हत्यारं आणि जुन्या नाण्यांचा संग्रहही तिथं आहे. बीकानेरच्या परिसरातील खास कला आणि कलाकुसरीच्या वस्तूंचा खजिना विशेष दालनात मांडलेला आहे.
देवी कुंड ही बीकानेरमधली शाही घराण्याची स्मशानभूमी आहे. बीकानेर शहरापासून हे ठिकाण 8 किलोमीटरवर आहे. बीका घराण्यामधल्या राजांच्या स्मरणार्थ तिथं अनेक छत्र्या उभारण्यात आलेल्या आहेत. त्यातील महाराजा सुरत सिंग यांच्या छत्रीच्या छतावर राजपूत पद्धतीची चित्रकला केलेली पाहायला मिळते.
बीकानेरच्या आसपास अनेक उद्याने आणि अभयारण्ये आहेत. गंगा निवास सार्वजनिक उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, रतन बिहारी मंदिर उद्यान, भवन राजवाडा उद्यान आणि गजनेर अभयारण्य ही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. गजनेर अभयारण्यात गच्च झाडी असून तिथं नीलगायी, चिंकारांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या अभयारण्यातच गजनेरचा राजवाडा वसलेला आहे. पूर्वी बीकानेरचे महाराजा याचा वापर उन्हाळी निवासस्थान म्हणून करत असत. या अभयारण्यामधल्या एका तळ्याच्या किनाऱ्यावर हा राजवाडा बांधलेला आहे. आता त्याचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.
अशा या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण बीकानेर शहराला पुन्हा एकदा भेट देण्याची इच्छा आहेच. दुर्दैवानं त्यावेळच्या ट्रीपमध्ये काढलेले जवळजवळ सगळेच फोटो खराब झाले आहेत. त्यामुळं इथं फारसे फोटो टाकता आले नाहीत. मागच्यावेळी एका सहल कंपनीमार्फत गेल्यामुळं दीड-दोन दिवसांमध्ये बीकानेर पाहताना गडबड झाली होती. आता मात्र गेलो तर स्वतंत्रपणेच जाईन. म्हणजे सगळं शांतपणे बघता येईल आणि नव्यानं फोटोही टिपता येतील.
लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/12/blog-post.html
राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात राजवाडे, मंदिरं, किल्ले, छत्र्या, हवेल्या आणि बावड्या. आपल्या जंगलांसाठी काही राजस्थान प्रसिद्ध नाही - त्यामुळे बिबट्या पाहायला आम्ही राजस्थानात चाललो आहोत असं मी जेव्हा लोकांना सांगितलं, तेव्हा अनेकांनी कान टवकारले. पण राजस्थानातल्या जवाई बांध आणि बेरा ह्या गावांमध्ये बिबटे आणि मनुष्यगण गेली अनेक वर्षं गुण्यागोविंदाने, आपला दुसर्याला अजिबात त्रास न होऊ देता एकत्र राहत आहेत. विशेष म्हणजे हे सगळे बिबटे जपलेत इथल्या गावकऱ्यांनी. वन्यजीव आणि मनुष्य यांचं सहजीवन किती सोपं आणि सुंदर असू शकतं, याचं बेरा हे एक उत्तम उदाहरण आहे.
रणथंबोर इथं वाघ किंवा काझीरंगा इथं गेंडा दिसावा तितक्या सहजपणे इथं
बिबट्या दिसतो. मी म्हणेन, बिबट्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची
ही भारतातली सर्वोत्कृष्ट जागा आहे.
२२ फेब्रुवारी

कोरोना महामारीमुळे प्रवास कमी झाल्याने आणि आजकाल एकूणच विमानप्रवासाला
पहिली पसंती मिळत असल्याने अनेक महिन्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवर जाण्याचा
योग आला.
संध्याकाळी ६:५०च्या जोधपूर एक्स्प्रेसने आम्ही पुण्यातून निघालो.
प्रवास अगदी छान झाला असला, तरी कोरोना महामारीच्या काळात बंद केलेली
पांघरूण सेवा रेल्वेने पुन्हा सुरु केलेली नसल्याने आम्हाला रात्र मात्र
कुडकुडत काढावी लागली!
सकाळी कुठेतरी काढलेला एक फोटो!
२३ फेब्रुवारी

जवाई बांध स्टेशनावर आम्ही पोहोचलो सकाळी साधारण अकरा वाजता. हे एक
चिमुकलं, खूपच गोड स्टेशन आहे. स्टेशनच्या बाहेर एखाददुसरी चहाची टपरी,
तीन-चार दुकानं, काही रिक्षा आणि आरामात गप्पा छाटत बसलेले गावकरी, असा
एकंदर मामला होता. थोड्या वेळानं रिसॉर्टची गाडी आम्हाला न्यायला आली आणि
आम्ही निघालो. प्रवास काही मोठा नव्हता, आमचं रिसॉर्ट रेल्वे स्टेशनपासून
पंधरा-सोळा किलोमीटर दूर असावं.
बेरा किंवा जवाई बांध इथे जागेची कमतरता नसल्याने इथली रिसॉर्टस् विशाल
जागेवर पसरलेली आहेत, आमचं रिसॉर्टही अर्थात याला अपवाद नव्हतं. मला
आवडलेली एक गोष्ट म्हणजे, मूळ जागेत फारसा बदल न करता, तिथली झाडं वगैरे न
कापता हे रिसॉर्ट उभारण्यात आलं होतं. राहण्यासाठी इथं तंबूंची सोय होती.
तंबूंपासून जवळच असलेल्या चार-पाच मोठ्या झाडांखालची जमीन सावरून तिथे
लोकांना बसण्यासाठी काही खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. इथे बसलेले
आमच्या सहलीतले काही ज्येष्ठ नागरिक.
अंघोळी करून, जेवून आणि नंतर थोडी झोप घेऊन आम्ही तयार झालो. तुमची गाडी
बाहेर येऊन थांबली आहे असा निरोप येताच निघालो. आम्ही ज्या कंपनीकडून
सफारी सेवा घेतली होती, त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाडीत
चालकाबरोबर एक गाइडही असतो. त्यामुळे ‘एक से भले दो’ या उक्तीनुसार चालक
आणि गाइड या दोघांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला मिळतो (ज्याचा प्रत्यय
आम्हाला पुढे अनेकदा आला.)

रिसॉर्टच्या बाहेर पडल्यापडल्या आम्हाला दिसले दोन तितर पक्षी.
हे दोन नर होते आणि चक्क भर रस्त्यात फिल्मी स्टाइलने मारामारी करत होते.
त्यांच्या मारामारीचा निर्णय काय होतो हे पाहण्यासाठी आम्ही काही थांबलो नाही.
थोडा वेळ इकडे-तिकडे फिरल्यानंतर आम्ही पोहोचलो एका टेकडीजवळ. आमच्या
चालकाने त्या टेकडीकडे तोंड करून आमची गाडी उभी केली आणि आम्ही समोर पाहत
बसलो. ह्या टेकडीच्या परिसरात मागचे काही दिवस एका बिबट्याचा वावर असल्याची
माहिती त्यांना मिळाली होती आणि त्यामुळे आम्ही इथे थांबण्याचा निर्णय
घेतला होता.

आमचा हा निर्णय योग्य होता, हे थोड्याच वेळात सिद्ध झालं, कारण सुमारे
दहा ते पंधरा मिनिटे दुर्बिणीने समोरचा डोंगर पिंजून काढल्यावर आमच्या
चालकसाहेबांना शेवटी तिथे दाट झाडीत लपलेला बिबट्या दिसला.
अर्थात, तो आम्हाला दुर्बिणीतून दिसायला पुढची दहा मिनिटं जावी लागली.
हे महाशय इतक्या दाट झाडीत लपले होते की चालक आणि गाइड नसते, तर समोरच्या
टेकडीवर बिबट्या आहे हे सांगितल्यावरही तो आम्हाला सापडला नसता.
काही वेळातच ही बातमी सगळीकडे पसरली आणि झाडून सगळ्या गाड्या त्या
टेकडीकडे निघाल्या. हा एवढा गोंधळ पाहून बिबट्या तिथून निघून जातो की काय
अशी भीती आम्हाला वाटत होती, पण सुदैवाने तसं काही झालं नाही.
बिबट्याला बहुतेक या सगळ्या गोंधळाची सवय झाली असावी, कारण पंधरा-वीस गाड्या समोर दिसत असूनही तो काहीच प्रतिक्रिया देत नव्हता.
सुमारे पंधरा ते वीस मिनिटं तिथे थांबल्यावर शेवटी बिबट्या कंटाळून तिथून
निघाला. एव्हाना प्रकाशही बराच कमी झाला असल्यामुळे त्याच्या मागे फिरण्यात
काही अर्थ नव्हता, तेव्हा आम्हीही तिथून निघालो. चला, सफरीची सुरुवात तर
एकदम झकास झाली होती!
रिसॉर्टकडे परत जाताना आपल्या शेळ्या आणि मेंढ्या गावाकडे परत येणारे
काही रबारी आम्हाला दिसले. रबारी ही गुजरात आणि राजस्थानमधली एक भटकी जमात
आहे. त्यांच्याविषयी जास्त माहिती इथे (https://www.atlasofhumanity.com/rabari) वाचता येईल.
२४ फेब्रुवारी
सकाळच्या सफारीची वेळ सहाची असल्यामुळे आम्ही धडपडत साडेपाचला उठलो, थोडंसं
आवरलं, खोल्यांना कुलपं घातली आणि निघालो. गाइड आणि चालक दहा मिनिटं आधीच
येऊन थांबले होते. आज आम्ही पुन्हा एकदा गेलो ते कालच्या टेकडीकडेच. तिथे
बराच वेळ घालवल्यावर आम्ही रेल्वे मार्ग ओलांडून पलीकडे जायचा निर्णय
घेतला. जवाई बांध आणि बेराचा परिसर हम्पीची आठवण करून देणार आहे, त्याच
त्या चारही बाजूंना दिसणार्या लहानमोठ्या टेकड्या, तेच ते इकडे-तिकडे
पसरलेले भलेमोठे दगड आणि तीच ती मध्ये मध्ये उगवलेली खुरटी झाडं (इथे फक्त
एका तुंगभद्रेची कमतरता होती!)
इथे चालकाने आमची गाडी चढवली एका भल्यामोठ्या दगडावर.
सपाट असा हा दगड जवळपास दोनेकशे मीटर पसरला असावा.

थोड्याच वेळात सूर्योदयही झाला.

इथे आम्हाला एक सुंदर पक्षी दिसला. (नाव माहीत नाही)

बिबट्या अशाच एखाद्या गुहेत लपला असण्याची शक्यता होती.
बराच वेळ तिथे घालवल्यावर आम्ही निघालो. वाटेत आम्हाला काही नीलगाई दिसल्या.
थोडं पुढे गेल्यावर आम्हाला चिमणीसारखे दिसणारे काही पक्षी दिसले.
नंतर आम्ही गेलो दगडखाणीजवळ. ही खाण काही दिवस चालू असली, तरी इथल्या
गावकऱ्यांनी आणि पर्यटनावर उपजीविका असणाऱ्या स्थानिकांनी विरोध केल्यावर
ती बंद करण्यात आली. या खाणीच्या परिसरात मागचे काही दिवस नीलम नावाची मादी
आणि तिची दोन पिल्लं यांचा वावर असल्याची माहिती आमच्या गाइडने दिली. पण
बराच वेळ घालवूनही नीलमने किंवा तिच्या पिल्लांनी आम्हाला दर्शन दिलं नाही.
जवळच एक पळस दिमाखात फुलला होता. पळसाला इंग्लिशमध्ये ‘फायर ऑफ द फॉरेस्ट’
असं का म्हणतात, ते त्याच्या लालभडक फुलांकडे पाहिलं की सहज लक्षात येत
होतं.
आज दुपारच्या सफारीत, ज्या धरणावरून ‘जवाई बांध’ हे नाव ह्या गावाला
मिळालं, त्या धरणाला भेट द्यायची होती. त्यामुळे आज तीनऐवजी दोनलाच तयार
रहा असं आमच्या गाइडने आम्हाला सकाळी सांगितलं होतं, त्यानुसार आम्ही तयार
राहिलो.
जवाई बांध हे धरण खूप जुनं आहे. जोधपूरच्या उमेद सिंग यांनी हे बांधलं.
धरणात फारसं पाणी नव्हतं - गेली तीन-चार वर्षं फारसा पाऊस होत नसल्यामुळे
हे धरण पूर्णपणे भरतच नाही, अशी माहिती आमच्या गाइडने दिली. पाणी कमी
असल्याने धरणाच्या अगदी आतपर्यंत गाडी जाते. आम्ही पाण्याजवळ गेलो, तर
तिथल्या चिखलात काही लोक कलिंगड लावत होते. ‘इथे पेरणीचं काम चालू आहे,
इकडे या भागात येऊ नका’ अशी त्यांनी आम्हाला सूचना दिली.
धरण मगरी, सुसरी आणि अनेक प्रकारचे पक्षी यांचं वसतिस्थान आहे.
दूरवर अनेक पक्षी दिसत होते, त्यात दोन फ्लेमिंगोही होते.
किनाऱ्यावर येऊन मजेत ऊन खात पडलेल्या मगरीही अनेक होत्या.
दोनेक तास काढून आम्ही पुढे निघालो. बेरातल्या आतल्या रस्त्यांवर बराच वेळ प्रवास केल्यावर चालकाने एका जागी गाडी थांबवली आणि तो म्हणाला, "जरा सांभाळून बसा." समोर पाहिल्यावर दिसलं की आम्ही एका प्रचंड टेकडीच्या पायथ्याशी उभे होतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे चक्क गाडीत बसून आम्ही ही टेकडी चढून जाणार होतो. टेकडी बरीच उंच होती. अगदी आपल्या पर्वतीपेक्षा उंच असावी. गाडीत बसून ती टेकडी चढणं हा माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय अनुभवांपैकी एक होता. अंगावर काटा यावा असा. टेकडीच्या टोकाशी पोहोचल्यावर आम्ही गाडीतून खाली उतरलो. काही फोटो काढले आणि परत निघालो.
उतरतानाचा अनुभव चढतानाच्या अनुभवापेक्षा अधिक भयानक होता.
हे ठिकाण पाहून झाल्यावर वेड्या बाभळी असलेल्या एका खडकाळ प्रदेशात आता
चालकाने गाडी घातली. आम्ही आलो, तर अनेक गाड्या इथे आधीच येऊन थांबल्या
होत्या आणि शांतपणे समोरच्या टेकडीकडे पाहत होत्या.
इथे २०-२५ मिनिटं थांबल्यावर अचानक कॅमेर्यांचा क्लिकक्लिकाट सुरू
झाला. मी समोर पाहिलं, तर डाव्या बाजूने एक बिबट्या दगडांवरून चालत येत
होता. तो चालत आला आणि अगदी त्याला बसण्यासाठीच खोदण्यात आला असावा अशा
दगडावर आमच्यासमोर बसला.
एकाद्या राजाने दिमाखात आपल्या सिंहासनावर बसावं, तसाच तो त्या दगडावर बसला होता.

आणि एखाद्या राजाने अधूनमधून मान उंचावून दरबारात उपस्थित असलेल्या लोकांकडे पाहावं, तसा तो समोरच्या लोकांकडे पाहत होता.
शेवटी अंधारामुळे बिबट्या दिसेनासा झाल्यावर आम्ही तिथून निघालो. आज
सकाळी काही दिसलं नसलं, तरी संध्याकाळच्या सफारीने ती कसर शंभर टक्के भरून
काढली होती.
२५ फेब्रुवारी
आजचा आमचा दिवस थोडा धकाधकीचा होता. सकाळची सफारी करून आज आम्हाला रनकपूरचं
जैन मंदिर आणि कुंभालगड किल्ला ही दोन ठिकाणं पाहायची होती. आधीच्या एका
सहलीत मी ही ठिकाणं पाहिली असली, तरी माझ्या सहप्रवाशांनी ती अजून पाहिली
नव्हती.
पहाटे गाडी आली आणि आम्ही निघालो पुन्हा एकदा नीलम आणि तिच्या पिल्लांकडे.
काल जरी त्यांनी आम्हाला हुलकावणी दिली असली, तरी आज त्यांचं दर्शन होईल
अशी आशा आम्ही मनात बाळगून होतो.
पहाटेचा दाट अंधार असूनही नदीपात्रात आमच्या चालकाला हालचाल दिसली. त्याने
बॅटरी मारल्यावर डोळे चमकले आणि नीलम आणि तिची पिल्लं तिथेच आहेत, हे
स्पष्ट झालं.
हळूहळू प्रकाश वाढू लागला आणि नीलमची आकृती आम्हाला स्पष्ट दिसू लागली.

नदीपात्रात कुणीतरी एक मेलेली म्हैस आणून टाकली होती आणि तिच्यावर नीलम ताव मारत होती.
थोड्या वेळानं नीलम तिथून निघाली.
तिच्यापाठोपाठ तिच्या दोन पिल्लांनीही तिच्यामागे धाव घेतली.

सफारी आटपून रिसॉर्टकडे परत जाताना आम्हाला हा पोपट () दिसला.

नंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात अंग शेकणारे काही मोर नि लांडोरी दिसल्या.
नंतर दिसली ही बिलायत नावाची झडुपं. मला ही झाडं जाम आवडतात.
नंतर एका वायरीवर कवायती करणारे हे आणखी काही पोपट दिसले.
नंतर दिसली ही पोपटांची एक जोडी.
त्यांचं प्रणयाराधान चालू होतं, तेव्हा त्यांना अधिक त्रास न देता आम्ही पुढे निघालो.
रिसॉर्टवर पोहोचल्यावर अंघोळ किंवा नाश्ता असे दोन पर्याय आमच्यासमोर होते,
आम्ही अर्थातच नाश्ता हा पर्याय निवडला. दहा वाजता गाडी आली आणि आम्ही
रनकपूर जैन मंदिराकडे निघालो.
पंधराव्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्वितीय
नमुना आहे. मी म्हणेन की हे जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या
जोत्याचीच उंची पंधराएक फूट आहे आणि ह्या जोत्याच्या वर तीन मजले आहेत.
पूर्णपणे संगमरवर दगडात बनवलेल्या ह्या मंदिरात तब्बल १४४४ खांब आहेत आणि
असं म्हणतात की ह्यातला एकही खांब दुसर्या खांबासारखा नाही. संपूर्ण
मंदिरात बारीक कलाकुसरीची रेलचेल आहे आणि छतांवरचं कोरीवकाम तर अक्षरश:
डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. आजचं तत्रज्ञान वापरून हे मंदिर बांधायचं
म्हटलं, तरी सहज दमछाक होईल आणि तोंडाला फेफरं येईल, १५व्या शतकात हे मंदिर
कसं बांधलं गेलं असेल?
कॅमेरा आत न्यायला पैसे असल्याने आणि मागच्या वेळी मनसोक्त छायाचित्रं काढली असल्याने या वेळी मी कॅमेरा आत नेला नाही.
२०१४ सालच्या सहलीत काढलेली काही छायाचित्रं -

रणकपूर जैन मंदिर पाहून आम्ही निघालो कुंभलगडाकडे. राजस्थानमधले रस्ते
चांगले आहेत असं मी ऐकत आलो असलो, तरी प्रत्यक्षात मात्र ते रस्ते पाहून
महाराष्ट्रातल्या रस्त्यांची आठवण होत होती. जेवण करून शेवटी तीनच्या आसपास
आम्ही कुंभलगडाला पोचलो.
खरं सांगायचं, तर महाप्रचंड असा कुंभलगड किल्ला दोनेक तासात ‘बसवणं’ हा
त्याचा शुद्ध अपमान आहे. हे म्हणजे ताजमहल पंधरा मिनिटांत उरकण्यासारखं
आहे. पण असो. घड्याळात तीन वाजले होते आणि याचा अर्थ स्पष्ट होता - किल्ला
पाहण्यासाठी आमच्याकडे फक्त दोन तास होते.
किल्ल्यात पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत, चार-पाच सुंदर मंदिरंही आहेत.
कुंभलगडाची काही छायाचित्रं
कुंभलगडाची २०१४ सालच्या सहलीत काढलेली काही छायाचित्रं -
सव्वापाचच्या सुमारास आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, आणखी एका सुंदर दिवसाची सांगता झाली.
२६ फेब्रुवारी
आजची सकाळची सफारी ही आमची ह्या सहलीतली शेवटची सफारी होती. गंमतीची गोष्ट
म्हणजे ह्या सफारीत आम्हाला कुठल्याच प्राण्याने दर्शन दिलं नाही: पण
आम्हाला ह्या गोष्टीची अजिबात खंत वाटली नाही. मागच्या चार सफारींमध्ये
बिबट्यानं मनसोक्त दर्शन दिल्याने आमची मनं तृप्त झाली होती. एका जागी
थांबून बिबट्याची वाट पाहण्याऐवजी आज आमची बेरा परिसरात स्वैर भटकंती चालू
होती. किंचीतशी थंडी, पिकांच्या पार आत घुसलेलं धुकं, झाडांच्या शेंड्यांवर
बसलेल्या पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज, शेतांचे छोटेछोटे तुकडे, आणि ह्या
शेतांमधून गेलेले अरुंद असे चिखलाने माखलेले रस्ते. बराच वेळ असं निरुद्देश
फिरल्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो. सकाळसकाळ मस्त जंगल फिरून आल्यावर एक
छानसा चहा पिण्याचा आनंद काय वर्णावा? सकाळी नि संध्याकाळीही सफारी
झाल्यावर ह्या चहावाल्याकडं येणं हा आमचा रोजचा कार्यक्रम ठरून गेला होता.
(किंमत? फक्त सात रुपये!)
सफारी झाल्यावर आम्ही हॉटेलला परत गेलो, पाच सुंदर सफारींमधे आम्हाला
सोबत असलेल्या चालक आणि गाइड या दोघांना चांगली बक्षिशी दिली आणि त्यांचा
निरोप घेतला.
परतीची रेल्वे संध्याकाळी पाचला असल्याने दुपारी जेवण करून जवळच्याच
सुमेरपूर गावात जाऊन एक-दोन तास काढायचे आणि नंतर जवाई बांध रेल्वे
स्टेशनवर पोहोचायचं, असं आजचं नियोजन होतं. जेवण करून एक वाजता आम्ही
निघालो. सुमेरपूर हे एक तालुक्याचं ठिकाण आहे, आपल्या इथल्या सासवडसारखं.
इथे पुण्यात नेण्यासाठी फरसाण आणि काही मिठायांची खरेदी झाली. आम्हाला खरं
तर ‘घेवर’ ही राजस्थानची खास मिठाई हवी होती, पण अनेक दुकानं फिरुनही ती
कुठेच मिळाली नाही. कारण विचारल्यावर ‘ती फक्त रक्षाबंधन सणासाठीच बनते’
अशी माहिती मिळाली. सुमेरपूरच्या बाजारपेठेतही एक फेरफटका झाला, तिथे
मातीपासून बनवलेल्या हत्तींची आणि काही बांगड्यांची खरेदी झाली. रात्रीच्या
प्रवासात खायला कचोरी, फळं, खाकरा असं थोडं सामान घेऊन आम्ही वेळेत जवाई
बांध स्टेशनावर पोहोचलो. रेल्वे वेळेवर धावत होती. रेल्वेत बसल्यावर काही
वेळाने जेवून घेतलं आणि आम्ही लवकर झोपी गेलो.
२७ फेब्रुवारी
थेट रेल्वे नसल्याने आमचा परतीचा प्रवास दोन टप्प्यांत होता. जवाई बांध ते
दादर आणि तिथून पुणे. पुणे-मुंबई असा रेल्वे प्रवास अनेकदा केला असला, तरी
चेअर कारने हा प्रवास मी अजूनही केला नव्हता. आज तो योग येणार असल्याने मी
त्यासाठी उत्सुक होतो. अतिशय आरामदायक हा प्रवास करून साडेबाराच्या सुमारास
आम्ही पुण्यात पोहोचलो आणि एका अतिशय सुंदर सहलीची सांगता झाली.
https://www.misalpav.com/node/50814




























































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.