मोर्यकालीन स्तुपाचे संवर्धन हे कर्तव्यच!
त असतात. त्याला हुडकून काढण्याची आणि नवा इतिहास जगासमोर मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या पिढीच्या खांद्यावर असते. पण भविष्यातील संशोधकांसाठी आपण त्यांच्या अभ्यासाचा अधारच नष्ट करत असू, तर त्यापैक्षा दुर्देव दुसरे काय असेल.

भारतात एकेकाळी बौद्ध धर्म सर्वत्र विस्तारलेला होता. त्यामुळे त्याच्या खुणा या आजही सापडत आहेत. असेच काही पुरावे २००२ मध्ये विदर्भात सापडले. भोन स्तुपाचा शोध २००२ मध्ये डॉ. बी. सी. देवतारे यांनी लावला आणि येथे उत्खननाने जोर धरला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात मौर्यकालीन बौद्ध स्तुप आढळले. येथे २००३ पासून उत्खनन सुरु झाले आणि २००७ मध्ये उत्खननाचे काम थांबवले. भोन गावाजवळील पूर्णा नदीकिनारी बौद्ध स्तुप सापडले. त्यामुळे याचे नामकरण भोन स्तुप झाले. पुर्णा नदीकिनारी अनेक छोट्या-मोठ्या टेकट्या आहेत. या टेकड्या १० ते १२ हेक्टर परिसरात पसरल्या आहेत. टेकटी क्रमांक ६ येथे उत्खननादरम्यान हे स्तुप आढळले. हे स्तुप साधारण इसवी सन पूर्व ३०० शतकातील असल्याचे सिद्ध झाले. येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवर बोधिवृक्षाची (पिंपळाचे झाड) प्रतिमा आढळली. तसेच एका पत्र्यावरही बोधिवृक्ष आढळून आला. टेराकोटा अर्थात विशेष प्रकारच्या मूर्तीवर ‘त्रिरत्न’ आढळले. एवढेच नाही तर येथे पाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट्य रचना असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे उत्खनन वेगाने होण्याची गरज भासू लागली. मात्र इतके भक्कम पुरावे आढळल्यानंतरही पुरातत्व विभागाने २००७ नंतर येथील उत्खनन बंद केले. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असो, उत्खनन थांबले इथपर्यंत ठिक आहे, पण हा ऐतिहासिक वारसाच नष्ट करण्याचा डाव तत्कालीन काँग्रेस सरकारने मांडला आणि त्यानुसार पुरातत्व विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येथे जीगाव धरण प्रकल्प सुरु केला. मुळात येथे आणखी उत्खनन होणे गरजेचे होते. उत्खनन झाले असते तर नवीन काही हाती लागले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार निवडून आले. यावेळी सरकार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. काही महिन्यांपूर्वीच्ा दिल्लीतील रविदास मंदिर जमिनदोस्त करण्यात आले. अर्थात हे मंदिर तोडण्याचे आदेश दस्तरखुद्द सर्वाेच्च न्यायालयातून आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा हाेता, असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान करण्यासारखे ठरेल. पण जनभावना लक्षात घेता मंदिराचे संरक्षण करून संवर्धन करणे हे सरकारच्या हाती होते. मात्र सरकारने तसे न करनेच पसंत केले. संत रविदास मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. सिकंदर लोधीने दिल्लीतील तुगलकाबाद येथे १५०० च्या काळात हे मंदिर येथे उभारले. आज दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये संत रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जनभावनाचा आदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन कारणे संत रोहिदास मंदिर न तोडण्यास पर्याप्त होती. मात्र तसे झाले नाही.
हीच बाब आता भोन स्तुपाबाबत होत आहे. मुळात हे स्तुप मौर्यकालीन असल्याने त्याचे संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आणि सरकारचे कर्तव्यच आहे. पण याबाबत सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. परिणामी आता स्थानिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. भोन स्तुपाच्या संरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली. मात्र मागील दोन महिन्यांत आंदोलनाची धार तीव्र झाली. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बॅनरखाली आंदोलनाची रुपरेषा ठरली आहे. सप्टंेबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाशिममध्ये धरणे आंदोलन झाले. बुलढाण्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत चालले आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०१९) शेगावमध्ये राज्यस्तरीय संमेलन झाले. यामध्ये बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत हजारो स्तुप समर्थकांनी मेळाव्यात हजेरी लावली आणि सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. भोन स्तुप वाचवण्याचा लढा तीव्र झाला असून थेट उत्तरप्रदेशमधूनही लढ्यात आंदोलक सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.
https://vinayshakyaviewson.blogspot.com/2019/09/blog-post.html
ऑरेंज सिटी’ नागपूर, रामटेक आणि बरंच काही
नागपूर हे विदर्भातील सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक शहर आहे. या शहरात महाराष्ट्राच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरविले जाते. त्यामुळे ऐन थंडीत येथील वातावरण राजकीयदृष्ट्या तापलेले असते. नागपूर हे दिल्ली, चेन्नई व मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे.
नागपूरचा पहिला संदर्भ देवळी या वर्धा जिल्ह्यातील एका ताम्रपटामध्ये आढळून आला. प्रचलित माहितीनुसार छिंदवाड्यातील गोंड राजाचा मुलगा बख्त बुलंद शाह याने या शहराची स्थापना केली. या गोंड राजाने औरंगजेबाच्या पदरी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्याने १२ गावांचे मिळून एक शहर बनविले. तो भाग म्हणजेच नागपूर. नागपूरला फणींद्रपूर असेही एक नाव आहे. येथून एक वृत्तपत्रही ‘फणींद्रमणी’ या नावाने प्रसिद्ध होत असे. फणा म्हणजेच नागाचे फुत्कारलेले तोंड. काहींच्या मते नाग नदी येथून वाहते म्हणून या शहराचे नाव नागपूर, तर काहींच्या मते येथे नागा लोकांची वस्ती होती म्हणून ते नागपूर.
नागपूरमध्ये रिझर्व्ह बँकेचे कार्यालय आहे. ब्रिटिशकालीन सुंदर इमारत हे या इमारतीचे वैशिष्ट्य. तसेच नागपूरमध्ये महालेखापाल (AG) यांचे कार्यालयही आहे. नागपूरमध्ये सध्या मेट्रोचे काम द्रुतगतीने चालू आहे. नागपूर हे कापड व्यापाराचे मुख्य ठिकाण आहे. पूर्वी नागपूरमध्ये कापड गिरण्या होत्या. आताही येथील कापडनिर्मिती (टेक्सटाइल्स) उद्योग मोठा आहे. येथे कापसाची मोठी उलाढाल होते. तसेच रेशीमकामही मोठ्या प्रमाणावर होते. खाद्यपदार्थनिर्मितीचे अनेक उद्योगही येथे आहेत. खवय्यांसाठी पाटवडी ऊर्फ सांबारवडी, तेजतर्रार चणा-चिवडा, बड्या मिठाईवाल्यांकडची संत्राबर्फी, नागपूर स्पेशल सोनपापडी आणि इथले सावजी जेवण खवय्यांसाठी तयार असतेच.
दीक्षाभूमी: पश्चिम नागपूरमधील चार एकर जागेवर विस्तारलेली दीक्षाभूमी हे सामाजिक क्रांतीचे स्मारक आहे. नागपूर हे बौद्धधर्मीयांचे प्रेरणस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीचा मुहूर्त साधून विचारधारेचे सीमोल्लंघन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून पाच लाख अनुयायांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा येथे घेतली. तेव्हापासूनच हे स्थळ दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाऊ लागले. कलिंग लढाईनंतर सम्राट अशोकाने धर्मांतर केले होते. त्यानंतर झालेले हे मोठे धर्मांतर समजले जाते. फरक एवढाच, की कलिंगची लढाई रक्तरंजित होती. त्यातून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले; मात्र या वेळी सामाजिक अन्यायातून बाहेर पडण्यासाठी हे क्रांतिकारक पाऊल उचलले गेले. बौद्ध धर्म हा धर्म नसून, एक आदर्श वैचारिक जीवनशैली आहे. दीक्षाभूमीवर विजयदशमीला अनुयायांचा महापूर लोटतो. येथे अत्यंत आकर्षक असा, सांची येथील स्तूपासारखा स्तूप बांधला असून, ते नागपूरचे वैभव आहे. सेओ दान मल (sheo dan mal) या जोधपूर येथील वास्तुविशारदाने याचा आराखडा तयार केला. १९७८ साली या स्मारकाचे बांधकाम सुरू झाले. ते २००१मध्ये पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्याला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. सुमारे १० हजार अनुयायी येथे बसू शकतील एवढी याची क्षमता आहे. आशियातील मोठ्या स्तूपांत याची गणना होते. याच्या तळमजल्यावरील हॉल २११ फूट बाय २११ फूट एवढा मोठा असून, मध्यभागी बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. अनुराधापूर येथून आणलेल्या बोधिवृक्षाची फांदी येथे लावण्यात आली असून, तो वृक्ष आता मोठा झाला आहे.
अंबाझरी तलाव : हा तलाव नागपूर शहराच्या दक्षिणेकडे असून, नाग नदीचा उगम येथेच झाला आहे. या तलावाला पूर्वी ‘बिंबाझरी’ असे म्हणत. नागपूरच्या गोंड राजाच्या कार्यकाळात या तलावाची निर्मिती झाली. त्यासाठी, नागपूरजवळच्या लाव्हा गावानजीक असलेल्या महादगड डोंगरातून उगम पावलेल्या नाग नदीवर बंधारा बांधण्यात आला. उत्तर भारतातून नागपुरात या कामासाठी आलेल्या कोहळी समाजाच्या लोकांनी हा तलाव निर्माण केला. भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात सुधारणा केल्या गेल्या. नंतर सन १८६९ या साली पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटांनी व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली. येथे १८ एकर जागेवर सुंदर उद्यान उभारण्यात आले आहे. म्युझिकल फाउंटन हे येथील आकर्षण आहे.
सीताबर्डी किल्ला : सीताबर्डी शब्दाचा अर्थ सीतेची टेकडी असा होतो. आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या निकराच्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ रोजी हा किल्ला ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात गेला. त्या वेळी येथे किल्ला नव्हता. त्याला ‘बडी टेकडी’ असे संबोधले जात असे. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. तेव्हा या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे. वर्षात फक्त तीन वेळा म्हणजेच, २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व एक मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.
बालाजी मंदिर : हेही नागपूरमधील एक आकर्षक ठिकाण आहे. भगवान कार्तिकेयाची मूर्तीही येथे आहे.
पोद्दारेश्वर राम मंदिर : राजस्थानमधील उद्योगपती पोद्दार यांनी या राम मंदिराची उभारणी केली. शुभ्र संगमरमर व लाल दगडात हे मंदिर बांधण्यात आले आहे. रामनवमीला येथे मोठ्या शोभायात्रेचे आयोजन केले जाते.

झाशीच्या राणीचा पुतळा : सीताबर्डी भागात झाशीच्या राणीचा भव्य पुतळा हे मोठे आकर्षण आहे. लांब उडी घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या घोड्यावर बसलेल्या राणीसाहेब आणि घोड्याचे मागील दोन पाय व शेपूट यावर तोललेला हा पुतळा बघत राहावा असाच आहे.
नागपूर म्युझियम : अजब बंगला नावाने ओळखले जाणारे हे संग्रहालय सिव्हिल लाइन्समध्ये आहे. १८६३ साली याची उभारणी झाली. पुरातन नाणी, शिलालेख, शिल्पे, सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू, अश्मयुगीन हत्यारे अशा अनेक गोष्टी येथे आहेत. मुंबई कला संस्थेची अनेक पेंटिंग्जही येथे आहेत. येथे एकूण सहा दालने असून, मंगळवारची सुट्टी वगळता अन्य सर्व दिवशी सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत हे म्युझियम उघडे असते.
मिहानमिहान : हा नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा प्रकल्प आहे. नागपूरच्या भारतातील मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. भारतात चालू असलेल्या आर्थिक विकास प्रकल्पांमधील सध्याच्या प्रकल्पांमध्ये हा सर्वाधिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे.
कामटी ड्रॅगन हाउस : ड्रॅगन पॅलेस नावाचे बुद्धिस्ट सेंटर सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नांतून कांती येथे उभे राहिले आहे. जपानच्या ओगावा सोसायटीमार्फत १९९९मध्ये याची उभारणी झाली. भारत-जपान मैत्रीचे हे प्रतीक आहे. येथील भगवान बुद्धाचे चंदनशिल्प अतिशय देखणे आहे.
बुटीबोरी : ही नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
कोराडी औष्णिक विद्युत केंद्र : हे केंद्र २४०० मेगावॉट क्षमतेचे असून, ते १९७४मध्ये सुरू करण्यात आले.
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र : कन्हान व कोलार या नद्या या गावाच्या आजूबाजूने वाहतात. पुढे कामठीकडे जाताना बीना या गावाजवळ या नद्यांचा संगम होतो. फार पूर्वी येथे ३० मेगावॉट क्षमतेचे इंग्रजकालीन औष्णिक विद्युत केंद्र होते. या गावाजवळच वलनी येथे कोळशाच्या खाणी आहेत. नागपूर शहरापासून हे केंद्र सुमारे १४ किलोमीटरवर आहे.
उमरेड कोळसा खाण : आठ दशलक्ष टन वार्षिक क्षमता असलेली ही कोळशाची खाण आहे. या भागात हलबा कोष्टी समाजाची वस्ती असून, ते विणकर आहेत. कोळसा खाणीमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
उमरेड-करहांडल अभयारण्य : हे अभयारण्य १८० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारले आहे. आशियातील सगळ्यात मोठ्या असलेल्या जय या वाघाचे वास्तव्य येथे होते. भंडारा जिल्ह्यातील पवनी व नागपूरमधील भिवा, कुही व उमरेड परिसरात हे अभयारण्य विस्तारले आहे. जंगली कुत्री, बिबटे, शेकरू व अनेक प्रकारची हरणे येथे पाहण्यास मिळतात. नुकतीच (मार्च २०१८) ताडोबा वनक्षेत्रातील एक वाघीण प्रियकराच्या शोधात येथे आली आहे.
खेकरानाला : येथे एक बंधारा असून, हे सहलीचे ठिकाण आहे. हे सौंदर्याने ओतप्रोत असलेले धरणाचे ठिकाण आहे. खाप्राजवळील छिंदवाडा मार्गावर ते आहे. साहसी कृत्य करणाऱ्यांसाठी, विशेषत: पर्वतारोहण करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय आदर्श असेच आहे. खेकरानाला धरणाच्या सभोवताली असलेला अतिशय शांत आणि निश्चल असा तलाव, घनदाट जंगल, हिरवागार निसर्ग, आरोग्यासाठी पोषक वातावरण हे येथील मुख्य आकर्षण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी येथे लॉजिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे ठिकाण नागपूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.
मरकड : हे २४ मंदिरांचा समूह असलेले ठिकाण असून, खजुराहो शैलीची छाप यावर पडली आहे. संत मार्कंडेय यांचे नावावरूनच या ठिकाणाचे नाव पडले.
नागपूरमध्ये राहण्यासाठी सर्व श्रेणीतील उत्तम प्रकारची हॉटेल्स आहेत. रेल्वे, विमान, रस्तेमार्ग अशा सर्व मार्गांनी हे ठिकाण भारताशी जोडले गेले आहे. थंडीत कडाक्याची थंडी, तर उन्हाळ्यात कडक उन्हाळा असे येथील वातावरण असते. साधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा येथे जाण्यासाठी उत्तम काळ असतो.
- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5215861370476415045
उमरखेड, जि. यवतमाळ - विदर्भातील असं एक ठिकाण जिथे आहेत 10 बारव/पायविहीर
"मातृतीर्थ" सिंदखेडराजा
राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
https://www.maayboli.com/node/61353
खोपड़ी: महापाषाण कालीन सभ्यता का साक्षी
![]() |
माला चा गोटा |
![]() |
माला चा गोटा |
![]() |
महापाषाण कालीन स्मारक |
![]() |
उत्खनन कार्य |
![]() |
उत्खनन में प्राप्त मृदाभांड के टुकड़े |
![]() |
उत्खनन स्थल पर डॉ रेशमा सावंत, ललित शर्मा एवं किसान भाऊ |
![]() |
डॉ कांति पवार (सहायक प्राध्यापक डेक्कन महाविद्यालय पुणे) |
न्यु गद्रे
राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हे छ्त्रपती श्री शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान. शिवपूर्व काळातील अनेक महत्वपूर्ण घडामोडींचे हे एक केंद्र होते. येथे जन्मलेल्या जिजाऊ साहेबांचा जीवनप्रवाह जसजसा प्रवाहित होत गेला तसतसा अवघा महाराष्ट्र नकळत एका भावनिक सुत्रात बांधला गेला. मातोश्री जिजाऊ साहेबांच्या अलौकीक कतृत्वामुळे तत्कालीन लोकजीवनात स्वधर्म, अस्मिता आणि स्वाभिमान जागृत झाला. यावाड्याचे बांधकाम इ.स.१५७६ च्या सुमारास झालेले आहे. जिजाऊ साहेबांचा जन्म म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नामसंवत्सर शके १५११च्या पौष शुद्ध पौर्णिमेला, गुरूवारी पुष्य नक्षत्रावर (१२ जानेमाव्री १५९८ रोजी) झाला. शिवमाता जिजाऊ हि महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्य व सुराज्य यांची अखंडपणे स्फुर्ती देणारी राजमाता आहे. म्हणुन जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा हे तिर्थेक्षेत्र झाले आहे.
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
https://www.maayboli.com/node/61353