Tuesday, April 18, 2023

हेरिटेज साइट्सचे एकूण प्रकार किती? भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत?

 

World Heritage Day 2023:

लोकसत्ता ऑनलाइन

UNESCO द्वारे दरवर्षी १८ एप्रिल रोजी World Heritage Day साजरा केला जातो. याच्या माध्यमातून जगातील वारसा स्थळांबाबत जनजागृती केली जाते.

World Heritage Day 2023: दरवर्षी १८ एप्रिल रोजी जगभरात ‘जागतिक वारसा दिन’ म्हणजेच ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ साजरा केला जातो. यामागे आपल्या इतिहासाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या वास्तू, पुरातन जागा यांविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांना ठाऊक असावी हा उद्देश आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गोष्टींचे जतन न केल्यास त्यांची पडझड होऊ शकते. असे घडू नये म्हणून लोकांमध्ये त्याबाबत जागरुकता असणे आवश्यक असते. १९८३ मध्ये युनेस्को संघटनेने ‘वर्ल्ड हेरिटेज डे’ साजरा करायची सुरुवात केली होती. एखाद्या ठिकाणाला हेरिटेज साइटची मान्यता देण्याचे काम युनेस्कोद्वारे पूर्ण होत असते. हे काम सोपे व्हावे म्हणून या संघटनेने वारसा स्थळांची म्हणजेच हेरिटेज साइट्सची तीन विभागांमध्ये विभागणी केली आहे.

सांस्कृतिक समृद्धी असणारी जागतिक वारसा स्थळे (Cultural World Heritage Sites) – या वारसा स्थळांमध्ये पुरातन कालीन मंदिर, किल्ले, लेणी, गुफा यांचा समावेश असतो.

नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे (Natural World Heritage Sites) – यांमध्ये विविध जंगलाचा प्रदेश, वर्षावने, उद्याने तसेच घाटांचा समावेश होतो.

मिश्र स्वरुपाची जागतिक वारसा स्थळे (Mixed World Heritage Sites) – एकाच ठिकाणी नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोन्ही गोष्टी असलेल्या जागा या विभागात येतात.

भारतामध्ये एकूण ४० जागा/ वास्तू आहेत, ज्यांना युनेस्कोने हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली आहे. त्यातील ३२ वारसा स्थळे ही सांस्कृतिकरित्या; ८ वारसा स्थळे नैसर्गिकरित्या समृद्ध आहेत. तर एका जागेचा समावेश मिश्र जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होतो.

भारतातील सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे –

१. आग्रा किल्ला (१९८३)
२. अजिंठा लेणी (१९८३)
३. बिहार येथील नालंदा महाविहाराचे पुरातत्व स्थळ (२०१६)
४. सांची येथील बौद्ध स्मारके (१९८९)
५. चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान (२००४)
६. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (२००४)
७. गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स (१९८६)
८. हडप्पन काळातील धोलावीर शहर (२०२१)
९.एलिफंटा लेणी (१९८७)
१०. वेरुळ लेणी (१९८३)
११. फतेहपूर सिक्री (१९८६)
१२. तमिळनाडूमधील चोला मंदिरे (१९८७, २००४)
१३. हंपी (१९८६)
१४. महाबलीपुरम (१९८४)
१५. पट्टाडकल (१९८७)
१६. राजस्थानमधील किल्ले (२०१३)
१७. अहमदाबाद (२०१७)
१८.दिल्लीमधील हुमायूंचा मकबरा (१९९३)
१९. जयपूर शहर (२०१९)
२०. काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर, तेलंगणा (२०२१)
२१. खजुराहो (१९८६)
२२. बोधगया (२००२)
२३. भारतातील माउंटन ट्रेन्स (१९९९, २००५, २००८)
२४. कुतुबमिनार (१९९३)
२५. राणी की वाव, पाटण-गुजरात (२०१४)
२६. लाल किल्ला (२००७)
२७. भीमबेटका (२००३)
२८. कोनार्कमधील सूर्यमंदिर (१९८४)
२९. ताज महाल (१९८३)
३०. ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल कार्य (२०१६)
३१. जंतरमंतर, जयपूर (२०१०)
३२.मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स (२०१८)

भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे –

१. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क (२०१४)
२. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (१९८५)
३. केवलादेव राष्ट्रीय उद्यान (१९८५)
४. मानस वन्यजीव अभयारण्य (१९८५)
५. नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क्स (१९८८, २००५)
६. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (१९८७)
७. पश्चिम घाट (२०१२)

भारतातील मिश्र जागतिक वारसा स्थळे –

१. कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्कीम

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

बदामी हंपी https://maharashtradeshee.blogspot.com/2026/06/pune-to-gokak.html

    ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे! विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्य...