नगर शहरातील संरक्षित वास्तू - 1) दमडी मशीद, 2) न्यामतखानी दरवाजा, 3) कोटला, 4) मक्का मशीद, 5) चंगेजखान महालाजवळील सज्रेखान मकबरा (दोबोटी चिरा), 6) अहमद निजामशाहचा मकबरा, बागरोजा, 7) सलाबतखान मकबरा (चांदबीबी महाल) 8) फराहबख्क्ष महाल.
जिल्ह्यातील संरक्षित वास्तू - 1) ढोकेश्वर लेणी (ता. पारनेर), 2) जैन मंदिर, घोटण, ता. शेवगाव, 3) मल्लिाकार्जुन मंदिर, घोटण, 4) हेमाडपंती मंदिर, 5) गुहा व मंदिर, हरिश्चंद्रगड (ता. अकोले) 6) जरासंधनगरी, जोर्वे (ता. संगमनेर), 7) मल्लिकार्जुन मंदिर व 8) नकटीचे देऊळ, कर्जत, 9) जुने महादेव मंदिर, कोकमठाण (ता. कोपरगाव), 10) देवी मंदिर, मांडवगण (र्शीगोंदा), 11) सिद्धेश्वर मंदिर, पारनेर, 12) बाळेश्वर मंदिर व 13) लक्ष्मीनारायण मंदिर, पेडगाव बहाद्दूर(र्शीगोंदा), 14) अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी (ता. अकोले), 15) भवानी मंदिर, टाहाकारी (ता. अकोले), 16) तिसगावच्या वेशी (ता. पाथर्डी), 17) सिद्धेश्वर मंदिर, 18) देवी मंदिर व 19) विष्णू मंदिर व घाट, कायगाव टोका (ता. नेवासे), 20) दायमाबाद (ता. र्शीरामपूर) व 21) लाडमोड टेकडी (नेवासे).
टाकळी, पळशी, जामगाव नि पारनेर
३.. जामगावचा भुईकोट :
![]() |
| पूर्वाश्रमीचे जामगाव भुईकोटाचे तथा महादजी शिंदे यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार अर्थात आजचे रयत शिक्षण संस्थेचे अद्यापक महाविद्यालय प्रवेशद्वार |
जामगावचा हा भुईकोट सुमारे शहाऐंशी एकरभर जागेत वसला असून त्याला कोट व परकोट अशी दुहेरी तटबंदी आहे आणि विशेष म्हणजे अजूनही ती बव्हंशी सुस्थितीत आहे. मागे असलेल्या टेकडीपर्यंत दोन्ही बाजूने ही तटबंदी वर चढवून हा कोट अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळेच कोटाचे आतले बाजूस, टेकडीवर, राजपरिवारासाठी असलेला वाडा, जणू बालेकिल्लाच आहे. या कोटास एकोणीस बुरुज नि चार दरवाजे आहेत; पैकी, यातील पूर्वाभिमुख प्रवेशद्वार सोडलं तर उर्वरित तीनही दरवाजे आजमितीला पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
४.. पारनेर :
पारनेरच्या आसपासची आणखी काही ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळे :
![]() |
| टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे व निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर या दोहोंची सीमाहद्द विभागणाऱ्या कुकडी नदीतील जगप्रसिद्ध रांजणखळगे व दोन्ही तीरावरील मातामंदिरे |
टाकळी ढोकेश्वर आणि पळशी
टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिर व लेणी, जामगावचा भुईकोट, पळशी येथील विठ्ठल मंदिर आणि पळशीकरांचा वाडा नि पारनेर या शहराबद्दल चार शब्द घेऊन!
तर तिसरा ब्लॉग मात्र पेडगावच्या बहादुरगड तथा धर्मवीरगडाविषयी असेल आणि तो लवकरच आपल्यासमोर येईल.
१.. टाकळी ढोकेश्वर येथील
ढोकेश्वर मंदिर व लेणी
![]() |
| टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध ढोकेश्वर मंदिर |
![]() |
| श्री ढोकेश्वर |
![]() |
| श्री नंदी |
२.. पळशीचे विठ्ठल मंदिर, भुईकोट आणि पळशीकर यांचा वाडा
विठ्ठल मंदिर :
![]() | |
. |
![]() | |
|
भुईकोट :
पळशीकर यांचा वाडा :
| पळशी येथील पळशीकरांचा वाडा ... १ |
![]() | |
|
![]() | |
|
![]() | |
|
पेमगिरी (संगमनेर)
'थोडकाच माथा नि कमी अवशेष पण भोवताली निसर्गाची खासी किमयागिरी;
स्वराज्याची मुहूर्तमेढच जणू रोवली जिथं, तो हा संगमनेरजवळील किल्ले पेमगिरी!'
पेमगिरी :
सुर्यास्त तर मांजरसुंभ्यालाच न्याहाळून झालेला. तेंव्हा मध्येच कुठे तरी एक ठिकाणी रात्रीच्या जेवणाचे नियोजन करून आम्ही गडपायथ्याचे गावापर्यँत पोहोचलो होतो. इथवर येईतो अंधार चांगलाच झाला असल्याने गावात कुणी जागे वा रस्त्यावर कुणी फिरताना दिसले नाही म्हणून मग गावात इतरत्र कुठे जागेचा शोध घेण्याऐवजी आम्ही गाडी थेट गडरस्त्यालाच घातली नि डोंगर-माळरानाच्या त्या उजाड़ परिसरातील वळणावळणाने पण छानशा अशा डांबरी सडकेने तो रस्ता पार करीत थेट गडमाथा गाठला. इथे तिथे जागाच शोधत होतो; एवढ्यात, नशिबात थोडा 'वाद' मांडूनच ठेवलेला होता की काय माहित; पण, तिथल्या त्या हिंदीभाषिक 'बाबां'नी तर तो थेट सरपंचांपर्यंतही पोहोचवला. पण, सुदैवाने पेमाईदेवीकृपेने अन सरपंचांच्या सुचनेनुसार पाचच मिनिटांत तिथल्या खोल्यांची चावी त्या 'बाबां'च्या मदतनिसाकरवी आमच्या हाती आली आणि आम्ही धन्य होत एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला.
पण.. त्यानंतरही बराच वेळ 'नाखूष'बाबांच्या त्या चालूच राहिलेल्या 'भुणभुणण्या'तच आम्ही थकलेले जीव केंव्हा झोपी गेलो ते कळलेदेखील नाही. सकाळी जाग आली तीही पुन्हा त्या बाबांच्या 'उच्चरवा'नेच! पण यावेळी त्यात काहीसा ओलावा होता.. का कोणास ठाऊक, थोडासा मायेचा गंधही होता. आणि मग,आम्हीही जले गेले विसरुन त्यांच्याकडून आलेल्या त्या हाकेस साद देत मिळालेल्या 'काली चाय'चे आमंत्रणही स्नेहाने स्वीकारले आणि पहाटेचा तो साजिरा प्रहर त्या 'खुशबाबां'च्या 'कुटी'तच गोजिरा केला. बाबांच्या हाकेने अपेक्षेपेक्षा जरा लवकरच आवरल्याने आम्हीही त्या संधीचे सोने करीत भल्या सकाळीच गडफेरी हाती घेतली.
![]() |
| पेमगिरी किल्ल्याचे एक मनमोहक दृश्य |
![]() |
| पेमगिरी किल्ल्याचे आणखी एक मनमोहक दृश्य |
![]() |
| पेमगिरी किल्ल्यावरील पेमाई मातेचे मंदिर व् मातेची तैलरंगात रंगविलेली मूर्ति |
हा गड भीमगड तथा शहागड म्हणूनही संबोधला जातो, असे दिसते. हा किल्ला इ.स.१२ व्या शतकात यादव राजांनी बांधला. मुर्तजा निजामशहा म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो केवळ शहाजीराजांच्या पराक्रमामुळेच!
![]() |
| हनुमान मंदीर ... १ |
![]() | |
|
इथल्या भटकंतीत किल्ल्याच्या पायथ्याला एक व भोवतालात एक अशी दोन विशेष अप्रुपंही आपणांस पहावयास मिळतात; ती पुढीलप्रमाणे..
१. ऐतिहासिक बारव :
![]() |
| ऐतिहासिक बारव.. १ |
![]() |
२. विशाल वटवृक्ष :
![]() |
| विशाल वटवृक्ष ... १ |
![]() | |
|
![]() | |
|
![]() | |
|
![]() | |
|
टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर
gar)
![]() |
| सप्तमातृका, टाकळी ढोकेश्वरची लेणी |
![]() |
| टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी |
![]() |
| टाकळी ढोकेश्वर प्रवेशव्दार |
![]() |
| लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह,टाकळी ढोकेश्वर |
मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे.
![]() |
| पाण्याचे टाके |
![]() |
| सीता न्हाणीला जाण्यासाठी दगडातल्या खोबण्या |
फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. आम्ही लेण्यांच्या परिसरात आलो तेंव्हा तेथे पांढरा लेंगा सदरा घातलेले आजोबा होते. लेण्यांची साफ़सफ़ाई करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अशा स्थानिकांशी गप्पा मारल्यावर अनेक नवीन गोष्टी कळतात असा माझा अनुभव आहे. आजोबांशी संवाद साधायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तंबाखू आहे का? तो आमच्याकडे नसल्याने त्यांची निराशा झाली आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यचे टाळले आणि एका जागी जाऊन चक्क झोपले.
![]() |
| पळशीच्या भुईकोट |
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. गाभार्या समोर मोठे कासव आहे. मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते या गल्लीत एक मोठा तोफ़गोळा पडलेला आहे. तेथेच दोन पुरातन दिपमाळा आहेत. तेथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे.
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
![]() |
| पळशीकरांचा वाडा |
| पळशीकरांचा वाडा |
| लाकडावरील नक्षीकाम , पळशीकरांचा वाडा |
![]() |
| देवघर, पळशीकरांचा वाडा |
वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खांब पाम वृक्षा सारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला कोसळलेला असल्याने त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाड्याची कुठल्याही प्रकारची निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे.
वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवषेश दिसतात. याठिकाणी दुसरा वाडा होता. या वाड्याच्या दोन भिंती कशाबशा उभ्या आहेत. त्या भिंतीतले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. या वाड्याची गावातल्या लोकांनी हागणदरी केलेली आहे. त्यामुळे येथे थोडा वेळ उभ राहाणे कठीण आहे. या दोन वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिरात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र, गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे.
देवीचे मंदिर पाहून पुन्हा महादेव मंदिराच्या चौकात येऊन मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे अरुंद पात्र आहे. दरवाजावर चढून जाण्यासाठी पायर्या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा परीसर दिसतो.
![]() |
| विठ्ठल मंदिर, पळशी |
| व्याल आणि हत्ती, विठ्ठल मंदिर, पळशी |


![]() |
| मुख्य प्रवेशव्दार, जामगावचा भुईकोट |
![]() |
| शिंदेंचा वाडा, जामगाव किल्ला |
![]() |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |
![]() |
| पुष्कर्णी, सोमेश्वर मंदिर, पारनेर |
![]() |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |
कल्याण - नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर ३३ किमी) पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे. पारनेर गावातून ४ किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर आहे. (पुणे - शिरुर - जामगावचा किल्ला हे अंतर १०५ किलोमीटर आहे.)
टाहाकारीचे मंदिर ( Tahakari Temple )
![]() |
| हेन्री कौसेन्स यांनी १८८० मधे काढलेला मंदिराचा फ़ोटो. |
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.
रणगाडा म्युझियम ( Tank Museum at Ahmednagar , Maharashtra )
| Tank Museum Ahmednagar, Maharashtra |
पहिल्या महायुध्दात रणगाडा या अदभुत वहानाच्या शोधाने अनेक युध्दांचे निकाल बदलले. कुठल्याही पृष्ठभागावरुन आग ओकत जाणार्या या वहानाने पायदळात महत्वाचे स्थान पटकावले. भारतीय युध्द इतिहासातही रणगाड्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. एकेकाळी विदेषी बनावटीचे रणगाडे वापरणारा आपला देश आज स्वत: निर्माण केलेले रणगाडेही वापरतोय. जागतिक आणि भारतीय सैन्यातल्या रणगाड्यांचा चालता बोलता इतिहास आपल्याला आशियातील एकमेव नगर येथील "रणगाडा म्युझियम" मध्ये पाहाता येतो.
| "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" Rolls Royce, Silver Ghost |
| " सेंच्युरीयन टर्ट" Centurion Turt Tank |
रणगाडा म्युझियम मधे प्राथमिक अवस्थेतील रणगाड्यांपासून पहिल्या आणि दुसर्या महायुध्दात वापरलेले ५० च्या वर रणगाडे लष्करी शिस्तीत मांडून ठेवलेले आहेत. पहिल्या चिलखती गाडी पासून आजच्या अद्ययावत रणगाड्या पर्यंतचा प्रगतीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. म्युझियम मधे शिरल्यावर दोनही बाजूंना " सेंच्युरीयन टर्ट" ठेवलेले आहेत. रणगाड्यावरचा हा तोफ़ असलेला फ़िरता भाग कासवा सारखा दिसतो म्हणुन याला "टर्ट"(ल) म्हणतात. जमिनी वरुन जमिनीवर व जमिनी वरुन आकाशात मारा करण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. रणगाड्यासारखी याला चाक किंवा पट्टे नसतात. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी दुसर्या वहानाची मदत घ्यावी लागते. टर्टच्या पुढे रोल्स राईस कंपनीची पहिली चिलखती गाडी (Armoured Car) ठेवलेली आहे. रणगाड्याच्या शोधापूर्वी युध्दभुमीवर वापरण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल एयर सर्व्हीसेसनी १९१४ साली रॉल्स राईस कंपनी बरोबर "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" या पहिल्या चिलखती गाडीची निर्मिती केली. पहिल्या महायुध्दात या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला १९४१ मधे गाडीच उत्पादन बंद करे पर्यंत त्यात अनेक बदल केले गेल. भारतात जनरल डायरने जालियनवाला बाग मधे शिरण्यासाठी या चिलखती गाडीचा उपयोग केला होता. "रोल्स राईस सिल्व्हर घोस्टच्या मागे "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" ही १९३४ मधे जर्मनीत वापरात असलेली चिलखती गाडी त्यावरील नाझींच्या उलट्या स्वस्तिकच्या चिन्हामुळे चटकन नजरेत भरते.
| "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" |
| "वॉटर बफ़ेलो" Water Buffalo Tank |
| जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडे Sea Lion Tank |
| Bulldog tank captured in India -Pakistan war |
| पाकीस्तान कडून जिंकलेले "चॅफ़ी" रणगाडे |
| "जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर" |
रणगाडा म्युझियमचा परीसर गर्द वनराईने नटलेला आहे. जागोजागी फ़ुलझाड, कारंजे, लॉन्स ठेऊन परीसर रमणीय बनवलेला आहे. जगोजागी बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. म्युझियम मधे कॅफ़ेटेरीयाची सोय आहे. म्युझियमचे आकर्षण असणारे रणगाडे सुस्थितीत ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. लष्कराच्या ताब्यात असूनही छायचित्रणास बंदी नाहीये. वर्षभर ९.०० ते ५.०० यावेळात, नाममात्र शुल्कात हे म्युझियम पाहाता येते. तरीही आशियातील या एकमेव रणगाडा म्युझियमला भेट देणार्यांची संख्या तशी कमीच आहे. रणगाड्याच आकर्षण लहान थोरांना सर्वांनाच असत. एखादा दिवस थोडीशी वाट वाकडी करुन नगरच्या रणगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही.
रांजण खळगे
‘रांजण’ हा शब्द वाचून तुम्हाला काही आठवलं का ? मला तर तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवली. त्याने नाही का, रांजणात लहान – लहान दगड टाकले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. मग तो ते पाणी प्यायला आणि स्वतःची तहान भागवली. अशीच काही रांजणं आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुकडी नदीमध्ये. पण, ही रांजणं कोणी मनुष्याने बनवली नाहीत, ती आपोआप तयार झाली आहेत. एवढंच नाही तर, “आशिया खंडातील महाकाय जलकुंड” म्हणून त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झाली आहे. त्यांनाच रांजण खळगे म्हणतात.या जलकुंडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती बारमाही आहेत. दुष्काळ पडला तरी आटत नाहीत ! विज्ञान सांगतं, ही नद्यांची भौगोलिक विशेषता आहे. त्या पाण्यासोबत लहानमोठे दगडगोटे वाहून आणतात आणि प्रवाह संथ झाला की ते तिथेच असलेल्या खाचखळग्यांमध्ये साठतात. पाण्याच्या प्रवाहानुसार हे खाचखळग्यांमध्ये साठलेले दगडगोटे तिथल्या तिथेच आपटत- फिरत राहतात. त्यामुळे रांजणाच्या आकाराचे गोल खळगे तयार होतात. बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले हे खळगे हळूहळू मोठे होतात आणि मग त्यातूनच जलकुंडांची निर्मिती होते. पण त्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. असेच तयार झालेले हे रांजण खळगे !
पाण्याचा प्रवाह व दगडगोट्यांच्या करामतीने कुकडी नदीवर खिंड तयार झाली आहे. तिची लांबी २०० मीटर आणि रुंदी ६० मीटर आहे. त्यात तयार झालेले विविध आकारांचे, लांबी-रुंदींंचे खळगे अगदी गुळगुळीत आहेत. ते पाहताना आपण जणू मंगळावरच आलोय असं वाटावं ! जशी वर्ष लोटली तशी या खळग्यांची खोलीही वाढतच गेली. काही ठिकाणी तर अगदी १०० फूट खोल खळगेही आहेत ! निसर्गाची ही निर्मिती खरंच सुंदर आहे. कारण, खळगे बनायला वर्षानुवर्षांचा काळ लागत असला तरी त्यानंतर दिसणारं दृश्य मात्र विलोभनीय असतं. या रांजणखळग्यांबाबत आणखी एक दुर्मीळ गोष्ट म्हणजे इथे राहणाऱ्या पक्ष्यांनी बनवलेली मातीची घरटी. घरटीही दुर्मीळ आणि इथे आढळणारे पक्षीही ! भारतातील खूप कमी ठिकाणी अशी घरटी पाहायला मिळतात. त्यामुळे रांजणखळग्यांची सफर पक्षीप्रेमींसाठीही पर्वणीच ठरते.
पूर्वी फक्त भौगोलिक बदलांचा अभ्यास करणारे अभ्यासकच इथे यायचे पण, गिनिज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर अनेक उत्साही पर्यटकही ही निसर्गाची निर्मिती पाहायला आवर्जून येतात. याशिवाय कुकडी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना असलेली मळगंगा देवीची मंदिरं आणि या दोन्ही मंदिरांना जोडणारा ‘झुलता पूल’ही पर्यटकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरतोय. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही वाढतेय. मग या वीकेंडला तुम्हीही करा की बेत रांजण खळगे पाहण्याचा ! त्यासोबतच तुम्ही मोराची चिंचोली हे पर्यटनस्थळही पाहू शकता.
कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब....
जाताना बघण्यासारखे :
१) वाघोलीतले वाघेश्वरीचे मंदीर...ईथे एक पेशवेकालीन समाधीही आहे..बोटींग आहे...
२) तुळापुर ::जायच्या मुख्य रस्त्यापासुन ६ किमी आत...ईतर काहीही सांगण्याची गरज नाही.
३) कोरेगाव भीमा : नदीच्या कठड्यावर वसलेले गाव...
४) रांजणगावचा गणपती : अष्टविनायकांपैकी एक
जाताना हे बघुन डोक्याला शॉट लागला...मीठाबरोबर थेट मिरच्या..
....घोडनदीच्या किनार्यावर ....शिवकालीन मंदीरे आणे एक अपुर्ण राजवाडा....
धोके आणी सुचना :
१) रांजणगावपासुन थेट टाकळी हाजी पर्यंत,मुख्य रस्त्यावर दुचाकी-चारचाकीचे गॅरेज नाही.थोडस गावात शिरावं लागत..आठ ते नऊ किमी...
२) खळगी वरुनच पहावीत...खोलात शिरु नये...रांजणखळग्यांमध्ये प्रवाहात अनेक जण वाहुन गेलेत,त्यांची शव देखील मिळाली नाहीत.......काही दिवसांपुर्वी...पावसाळ्यात वाळुचा ट्रक वाहुन गेलाय...तो आख्खा ट्रक सापडला नाही...आता पाणी आटलेले असले तरी पाण्याचा प्रवाह कुठुन सुरु होतो आणी कुठुन नाहीसा होतो ते कळत नाही.
मोराची चिंचोली
“नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी ,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा……”
बघा ! वाचताना नकळत तुम्हीही लयबद्ध आवाजात बोललात. हे बालगीतच तसं आहे. ते ऐकलं किंवा वाचलं तरी आपण भूतकाळात जातो आणि बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात. तेव्हा शाळेत आपण मोठ्या उत्साहाने कोरसमध्ये हे गीत म्हणायचो, पण तुम्ही कधी असा नाचणारा मोर पाहिलात का? आंब्याचं वन तर आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिलंय. पण, पावसाची चाहूल लागताच आनंदाने नाचणारा मोर पाहणारा खरंच भाग्यवान! अशा भाग्यवानांच्या यादीत तुम्हांलाही यायची इच्छा आहे का ? जर उत्तर ‘हो’ असेल तर ‘मोराची चिंचोली’ तुमची वाट बघतेय.
मोराची चिंचोली. नाव थोडं वेगळं आणि आकर्षक आहे ना ! खरं तर या गावात फार पूर्वीपासून चिंचेची खूप झाडं आहेत. त्यामुळे त्याला चिंचोली हे नाव पडलं. त्यानंतर इथे आढळणाऱ्या मोरांमुळे गावाच्या नावात त्यांची भर पडली व ‘मोराची चिंचोली’ म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. गावाचं हे ‘मयूरवैभव‘ टिकवण्यात गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. चिंचोलीतील शांत वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच मोर वास्तव्यास आहेत. “आपला राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा मोर गावाचे वैभव आहे ,तसेच भगवान कार्तिकेयाचे वाहनही !” या समजुतीमुळे गावकऱ्यांनी कधीही मोरांची शिकार केली नाही. उलट त्यांंचं अस्तित्त्व टिकून राहावं व त्यांची संख्या वाढावी म्हणून गावकऱ्यांनी आपल्या शेतांभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडं लावली. त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं. एवढंच नाही तर पुढच्या पिढीनेही त्यांना इजा न पोहोचवता त्यांची काळजी घ्यावी, असे संस्कारही केले.म्हणूनच आजच्या घडीला गावातल्या लोकसंख्येइतकीच मोरांचीही संख्या आहे. जवळजवळ ३ हजारांच्या घरात ! शहरांतल्या प्राणिसंग्रहालयात एखादा मोर दिसताना पंचाईत आणि इथे मात्र हजारोंच्या संख्येत मोर ! तेही सहज घरासमोरच्या व्हरांड्यात फिरताना दिसणारे !
इथले गावकरी आणि मोरांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे.मोर ‘हे गाव आपलंच असल्यासारखे’ बिनधास्त इथे फिरतात आणि त्यांच्या एकांताची काळजी गावकरी घेतात. मोरांना लपता यावे म्हणून ग्रामस्थांनी खास शेताच्या परिसरात, मोकळया जागांवर मोठी झाडं लावली आहेत. शिवाय उन्हाळ्यात त्यांना अन्नपाण्याचा तोटा होऊ नये यासाठी त्यांची खाण्यापिण्याची सोय मनुष्यवस्तीपासून दूर रानात केली जाते. यामागे गावकऱ्यांचा एक ठोस विचार आहे.तो म्हणजे मोरांचा मूळ लाजाळू स्वभाव बदलू दयायचा नाही. त्यांना पाळीव करायचं नाही. इतका विचार गावकरी करतात ! त्यामुळे या गावकऱ्यांपासून आपल्याला काही इजा पोहोचणार नाही, हे मोरांना कळून चुकलंय म्हणून ते गावात, शेतांत सहज फिरतात. ते गावकऱ्यांपासून दूर पळत नाहीत, पण कोणी नवीन दिसलं की मात्र सरळ धूम ठोकतात.
ऐन पावसाळ्यात इथे येणं म्हणजे दुग्धशर्करायोगच ! मी दुग्धशर्करायोग म्हटलं कारण, मेघराजाच्या वर्षावाने न्हाऊन निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह , ताजी हवा आणि या अशा ‘मौसम मस्ताना’ मध्ये हिरव्यागार माळरानावर डौलाने ठेका धरणारे मोर ! ‘याचि देही, याचि डोळा पाहावा हा सोहळा ! हे दुर्मिळ दृश्य पाहताना “ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच…” हे बोल मुखात आले नाहीत तर नवल ! गावाचं हे ‘मयूरवैभव’ सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक ‘मोराची चिंचोली’ पाहण्यासाठी इथे येतायत. गेल्या ४-५ वर्षांत मुंबई-पुण्याजवळचा ‘वन डे पिकनिक स्पॉट‘ म्हणून हे गाव नावारूपाला आलंय. याची दखल घेऊन काही गावकऱ्यांनी पर्यावरणपूरक कृषी पर्यटन केंद्रही उभारली आहेत. तिथे पर्यटकांच्या राहण्याची व जेवणाची सोय होते. शिवाय खेडेगावातील साध्या जीवनाचा जवळून अनुभव घेता येतो. इथल्या माणसांच्या मनाची श्रीमंती पाहून प्रसन्न वाटतंं. हे सगळं असलं तरी तिथे जाण्यापूर्वी काही नियम समजून घ्या. त्यांचं पालन केलं तरच हा निर्भेळ अनुभव तुम्हांला घेता येईल.
मोर हा अतिशय लाजाळू आणि संवेदनशील पक्षी आहे. त्यामुळे त्याला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.
‘मोराची चिंचोली’ला जाण्यापूर्वी तुमचं आगाऊ बुकिंग करा. पर्यटकांची संख्या जास्त होत असल्यास आज गावाला येऊ नका असं गावकरी थेट सांगतात.
फोटोसाठी किंवा काही खाऊ घालण्यासाठी मोराच्या पाठीमागे लागू नका.
मोर काही खात असेल तर तिकडे अजिबात फिरकायचं नाही.
पर्यटन केंद्रात फक्त शाकाहारी जेवणच मिळतं. संपूर्ण गावात मद्यपानास बंदी आहे.
याशिवाय मोरांच्या सूक्ष्म हालचाली टिपायच्या असतील तर आणखी काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. इथे जवळजवळ अडीच-तीन हजार मोर आहेत. त्यामुळे सतत त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो. जर आवाजाचा लक्षपूर्वक कानोसा घेतला तर मोर कुठे आहेत ते कळतं. शेतात फिरताना या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतात. मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीही पाहायला मिळतात. शेतात एकाच ठिकाणी अनेक लांडोरी पाहायला मिळाल्या की समजायचं मोर जवळपासच आहे. याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर , नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या अनेक दुर्मीळ हालचाली तुम्हांला टिपता येतील. त्यासाठी सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंतची वेळ अगदी मोक्याची आहे. इथे जास्त गोंधळ घालायचा नाही. मोराच्या हालचाली टिपायच्या असतील तर शांतताच हवी, नाहीतर मोर जवळ येणारच नाहीत. मोरांव्यतिरिक्त इथे बया पक्षी, खंड्या, भारद्वाज, कीर्कीडे अगदी सहज दृष्टीस पडतात. तसेच चिंचेच्या झाडांसोबतच डाळींबाच्या बागा व गर्द आमराईही मन मोहून टाकते.म्हणूनच तर म्हणतात ‘मोरांची चिंचोली’ हा एक निसर्गसंपन्न व आगळा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीही तो नक्की घ्या.मोराची चिंचोली आहे कुठे ?
पुणे -अहमदनगर मार्गावरील शिरूरजवळ मोराची चिंचोली आहे.अहमदनगर मार्गाच्या सुरूवातीला डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून आत सुमारे २३ किमी अंतरावर हे गाव आहे. मोराची चिंचोलीपासून अंदाजे २० किमीवर निसर्गाचा आणखी एक आविष्कार आहे. तो म्हणजे रांजणखळगे त्याला निघोज कुंड, मळगंगा कुंड असेदेखील म्हणतात. इथे येणारे पर्यटक आवर्जून रांजणखळगे व रांजणगावच्या महागणपतीचेही दर्शन घेतात. शिवाय शिक्रापूरपासून जवळच संभाजी महाराजांची समाधीही आहे. त्यामुळे एकाच भेटीत ही सगळी पर्यटनस्थळं पाहायला हरकत नाही.
Ahmednagar Fort – Maharashtra’s Historical Gem Or Ahmednagar Fort
Located in the heart of Maharashtra, Ahmednagar is an ancient Indian city famous for its architectural brilliance and scenic surroundings. If you decide to visit this city, you will be spellbound by its majestic palaces, sugar factories, and exotic flora and fauna. This town has been an integral part of India’s rich ancient and medieval history, proof of which is etched on the walls of important landmarks such as the Ahmednagar fort. Since the times of the British, Ahmednagar has been an important military base for India. Even today, the Mechanised Infantry Regimental Center and the Indian Armoured Corps Center and School remain there.Ahmednagar dates its existence back to 1490. It was founded by Ahmed Nizam Shah I, who dissolved Bhingar in favor of Ahmednagar. After the 15th century, it was taken over by the Sultanate kings of the era. It remained an important part of the Sultanate until the Mughals, led by Shah Jahan, captured the city in 1636. It remained with the Mughals until the death of the last Mughal emperor, Shah Jahan. Thereafter, the Maratha kings and the British fought numerous battles over the city. At the time of Indian independence, the city was under British rule according to the Treaty of Poona.
Ahmednagar is a perfect vacation spot for those looking to get away from the busy tourist destinations. While there, you will not run out of things to do, but will also not be overwhelmed. It is a small, yet welcoming city that will keep you entertained.
Find Best Hotels In Ahmednagar
AHMEDNAGAR FORT – MAJESTY PERSONIFIED
The Ahmednagar Fort is the perfect reflection of the forts in India. This fort, with its towering roofs and firm bastions, will propel you deep into the history of the Indian subcontinent. Its history is incredibly interesting, making it one of the most frequented tourist spots in the country.The Ahmednagar fort is one of the best historical places in Maharashtra, which was constructed by the first ruler of the Nizam Shahi dynasty – Malik Ahmed Nizam Shah I. At the time, it was just a mud-fort with kutcha construction all over. Fortification of the Ahmednagar fort commenced in 1559 under the rule of Hussain Nizam Shah. The fort was completely constructed by 1562. The last Mughal Emperor died in the fort, after which it was handed back and forth numerous times by the Marathas and the British. Both of them used the fort as a prison. The Marathas imprisoned a Peshwa within its walls, while the British kept Pandit Jawaharlal Nehru as a political prisoner. Nehru wrote the world-famous book “The Discovery of India” whilst serving his sentence within the fort, making it immortal for generations.
A thing of beauty, the fort has 22 bastions and about 18 m high walls supporting its roofs. You will be astonished by the impregnable design of the Ahmednagar fort with its carefully constructed glacis and a 30 m wide ditch. As you stand in its corridors, you will hear the sound of the Bhingar River flowing through the surrounding hills. Historically, these hills were considered to be a weakness to the fort’s otherwise impenetrable build. The Pettah of Ahmednagar lies to the west of the Ahmednagar fort. Its main gate faces the Pettah. The fort premises consists of several towers. These housed military men in times of war. The ditch had a bridge over it. According to legends, the bridge supported tons of ammunition during the war. It was also used to set alight the fort’s surroundings when the rulers desired protection from the enemy.
This fort tells stories of countless wars and invasions. While the fort is controlled by the Indian Armoured Corps, it is open to the public. You will be amazed by the stories you hear as you enter the two rooms of the fort that are now museums. Remnants of the Indian freedom struggle can be viewed in this museum, reminding tourists of the constant struggle of the revolutionaries. Its surroundings are covered with trees and wild grasses through which you can walk to look at the facade of the fort. The roofs of the fort offer spectacular views of the entire town of Ahmednagar.
EXPLORING TOURIST SPOTS IN AHMEDNAGAR
Chand Bibi Palace
The Chand Bibi Palace is named incorrectly, for it is not a palace but the tomb of Salabat Khan II. This stone-made structure sits atop a low hill. You can hike a little to reach this three-storied octagon that offers gorgeous views of Ahmednagar. Lying at an altitude of 3080 feet from the sea level, this tomb tells stories of the death of Changiz Khan and the Nizams that ruled Ahmednagar. Besides the Ahmednagar Fort, this is one of the most prominent monuments of the city.The Cavalry Tank Museum
Established in 1994, the Cavalry Tank museum is one of its kind. It has on display numerous remnants of significant wars such as the First World War and the Indo-Pakistani war of 1972. While there, your kids will be fascinated when they see the Rolls Royce Silver Ghost Armoured Car, Valentine, Churchill Mk VII, M47 Patton, and the Canadian Sexton Self Propelled Artillery Vehicle. It is open to visitors every day. The regular opening time is 9 AM.Meherabad
Situated 9 km away from Ahmednagar, Meherabad is an ashram that plays home to many pilgrims and devotees of Meher Baba who established the ashram in 1923. You can visit this ashram to escape the busy streets of the main city.Rehkuri Blackbuck Sanctuary
One of the most exotic animals of the Indian subcontinent – the blackbuck – finds its home in the Rehkuri Sanctuary. Taking a photography tour of the Rehkuri Sanctuary will be rewarding for both you and your kids. Here, you can see more than 400 blackbucks roaming amidst tall grasses and green trees. If you love adventure, take a jeep safari of this wildlife sanctuary.STAYING IN AHMEDNAGAR
Despite being a small town, Ahmednagar has an expansive list of lodging options. You will easily spot plenty of budget hotels in the city offering excellent amenities. High-end hotels are not present in plenty. Most of these are located near premier tourist spots like the Ahmednagar fort. Resorts and boutique hotels offer amenities like free Wi-Fi, private suites, guest lounges, gardens, indoor and outdoor pools, and gyms. In some of these, you will find the option to opt for a guided tour of the town. Budget hotels are conveniently located near the main markets and in the city center.A TREAT FOR YOUR TASTE BUDS
There are plenty of small and big restaurants you can visit in Ahmednagar to get a taste of authentic Marathi food. Marathi cuisine is primarily vegetarian, although tasty non-vegetarian options are also available in plenty. While in Ahmednagar, the best way to taste local food is by visiting small restaurants and local street food vendors. A must-try delicacy of Ahmednagar is Thakkar, a fritter made of sabudana and potato and served with Kaju chutney. You can also try Udid Vada and Sambhar, a sweet called Kala Sona, Chutney Vada, Thalipeeth, Bread Rolls, Handi Bhakari, Bhel, Vada Pav, Nachani Papad, Bhakari Chura, Biriyani, Chewda, and Misal. Some places in the city serve decent continental food and Indo-Chinese cuisine. Fine-dining is not a popular option in Ahmednagar.SHOPPING IN AHMEDNAGAR
Ahmednagar has plenty of local shops offering some Maharashtrian staples that you should take home with you. There are a few big malls to shop from. The street markets and small vendors offer excellent handicrafts and decorative items. You can shop for sculptures, Warli paintings, Kolhapuri chappals, silk sarees, Lacquerware, Bidri ware, and Paithani sarees.ENJOY THESE FESTIVALS IN AHMEDNAGAR
The most popular festival celebrated in Ahmednagar is Ganesh Chaturthi. Celebrated enthusiastically by the locals in September-October, this festival sees the entire town decorated with fairy lights, colorful hangings and special pandals housing extravagant statues of Lord Ganesha. If you happen to be in Ahmednagar during this time, you will find yourself enthralled by aromatic lit up streets. People of Ahmednagar sing and dance on the streets, making it a hearty affair for tourists. Festivals like Holi, Diwali, and Eid are also popular in the region.HOW TO REACH AHMEDNAGAR?
- If you are traveling from outside India, you will have to board a flight to Chhatrapati Shivaji International Airport, Mumbai and take a bus from there to reach Ahmednagar. The closest domestic airports to Ahmednagar are the Pune airport and the Aurangabad airport.
- If you have decided to travel by train, board one heading to the Ahmednagar Railway Station.
- Traveling by road to Ahmednagar is also very convenient. It is connected to major Maharashtra cities like Mumbai, Pune, and Aurangabad. You can either board a bus or rent a cab going to Ahmednagar from these cities.
CAMERAS AND MOBILE PHONES
In Ahmednagar, there is little to no restriction on the usage of cameras and mobile phones. Most tourist places will allow you to use them freely. Museums and natural parks might charge an extra fee for their usage. Many religious places will restrict their usage completely or partially.Whether you are passionate about adventure, history, architecture or culture – Ahmednagar holds the promise of an enjoyable trip. This city is capable of amazing you with its stunning forts, brilliant architecture, serene landscapes, and vibrant markets. Plan your Ahmednagar vacation soon to experience this Maharashtrian marvel.
विल्सन डॅम (भंडारदरा)
सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं. पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सहय़ाद्रीच्या रांगा म्हणजेच बालाघाट. राकट कातळाच्या िपगट करडय़ा रंगाची ही डोंगररांग.. ऋतुमानाप्रमाणेच तिचं सौंदर्यही बदलत जातं. कधी काळी थंड हवेची ठिकाणं म्हणून पर्यटक इथ भ्रमंती करायचे. आता पावसाळी पर्यटनाची टूमही जोरात आहे. सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या डोंगररांगा इथल्या जंगलात वाढलेल्या करवंद, जांभळाच्या जाळ्यांमुळे सुरुवातीला पाचूच्या मण्यांची माळ, उन्हाळ्याच्या मध्यावर तांबूस पोवळ्यासारख्या तर पिकल्यानंतर नीलम रत्नांच्या माळा ल्यायल्यासारख्या दिसतात. सरता ग्रीष्म आणि वर्षां ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके या झाडांवर वास्तव्याला असतात. काजव्यांच्या गुणन पद्धतीने होणाऱ्या प्रजननामुळे काही दिवसांतच झाडांवर जणू अंतराळातील नक्षत्रांचे संमेलन भरल्याचा भास होतो. खरं तर लौकरच येणाऱ्या कृष्ण जलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देत असतात. पावसाला सुरुवात होताच त्यांचं अस्तित्व लुप्त होतं. वर्षां ऋतूला सुरुवात झाली की, इथल्या करडय़ा कातळाचा रंगही बदलू लागतो. संबंध डोंगरावर हिरवाईची शाल पसरायला लागते. जसजसं पावसाचं प्रमाण वाढतं. तसतसं या पर्वतरांगांचं सौंदर्य खुलायला लागतं. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उत्तुंग शिखरांवर विसावतात. पर्वताच्या उतरंडीवर रेंगाळतात. गडद निळे-गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू, चपल चरण, अनिल गण निघाले या बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती स्मरतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघराजाची दुलई बाजूला होताच डोंगरांच्या घळईतून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे नजरेस पडतात. अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा हे धरण नगरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पुणे-ठाणे जिल्हय़ातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवसीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण. भंडारदऱ्याच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते. भंडारदरा (शेंडी), पांजरी, साम्रद, घाटघर, रतनवाडी, मुतखेल ही निर्सगरम्य पर्वतराजीतील दुर्गम गावे अगदी अलीकडच्या दशकात या भागात डांबरी रस्ते झाल्याने पर्यटकांचे पाय इकडे वळू लागले. नागमोडी वळणांच्या घाटदार रस्त्याने जसजसा या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या डोंगरकडय़ांवरून घरंगळणारे मेघ, संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नांमधील गावा.. अशा ओळी ओठांवर तरळतात. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे. धरणांपासून साधारण २० किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरी नावाचे छोटेखानी गाव इथून कळसूबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखराची चढाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून करता येते. मांजरीहून पुढे घाटघरकडे जाता येते. पांजरी, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात. एकदा पाऊस सुरू झाला की चार ते सहा दिवस अविश्रांत कोसळणं ठरलेलंच. घाटघरच्या कोकणकडय़ांवर उभे राहून खाली डोकावले की खोल दरीतला उदंचन विद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा, वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्यांचा मंजुळ नाद पर्यटकांना भुरळ पाडतो. कोकणकडय़ाच्या बाजूलाच असलेल्या आश्रमशाळेच्या िभतीही हिरवळीने रंगविल्यासारख्या दिसतात. घाटघरच्या घाटणदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यंत रमणीय असतो. घाटघरकडून साम्रदमाग्रे रतनवाडीकडे जाताना साधारण १ किलोमीटर आडवाटेला सांदण लागते. या सांदणीची रुंदी साधारण ५० फूट असून रतनगड डोंगरातून येणारा ओढा या सांदणीतून वाहतो. या सांदणीतील मोठमोठय़ा शिळा साहसी पर्यटकांना साद घालत असतात. अर्थात पावसाळ्यात या सांदणीत उतरणं धोक्याचंच आहे. उन्हाळ्यात या सांदणीतून भ्रमंती करण्यातली मजाच वेगळी.. या सांदणीची लांबी सुमारे पाऊण ते एक किलोमीटर असून, दोन कडय़ांमधील ही उतरंड थेट ठाणे जिल्हय़ातील शहापूर तालुक्यात उघडते. साम्रद ते रतनवाडीच्या प्रवासात डोंगरमाथ्यावरून कोसळणारे अनेक धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. रतनवाडीच्या अलीकडेच एक धबधबा दूरवरून दिसतो. डोंगराच्या माथ्यावर दिसणारा हा धबधबा एका खडकाच्या दोन्ही बाजूने कोसळत पुन्हा एकत्र होतो. जणू निसर्गाने त्याच्या शोरूममध्ये लावलेलं ते एक नेकलेस असतं, धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्याचा येथे बराच वावर राहिल्याने इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नावे दिल्याचे दिसून येते. या भागात दिसणाऱ्या अनेक धबधब्यांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. तर काही धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच असतात. त्यामुळे तिथे पर्यटकांचे पाय नक्कीच थबकतात. बालाघाट डोंगररांगांत कोकणकडय़ांच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे. गडसर करताना ट्रेकिंगचाही आनंद मिळतो. मात्र पावसाळ्यात चढणीच्या सर्व वाटा अत्यंत निसरडय़ा होतात. दोन तासांच्या चढाईनंतर शेवटच्या कडय़ावरच्या शिडीचा आधार घेत गडावर पोहोचता येते. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खालीभंडारदरा धरण बांधले आहे. भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल. रतनगड डोंगरच्या पायथ्याशी एक जुनाट हेमांडपंथी शिवालय आहे. भंडारदऱ्याच्या जलाशयाच्या शेपटाकडचा हा भाग येथे धरण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो. भंडारदरा धरणाच्या िभतीपासून इथपर्यंतच अंतर ११ मलांचं धरण पूर्ण भरलं की होडीतूनही येथे येता येते. रतनगडच्या अमृतेश्वराचे (रत्नेश्वर) हे हेमांडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वदंता आहे. मंदिराच्या आतील काम आणि आजूबाजूची कोरीव शिल्पे पाहण्यासारखी आहेत. छतालाही कोरीव शिल्पांची सजावट आहे. मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अलीकडे दगडी बांधकामांची देखणी पुष्करणी आहे. विष्णुपुष्करणी नावाच्या या पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या आतल्या बाजूच्या िभतीतील कोनाडय़ावजा गाभाऱ्यात विष्णू नरसिंह, गणपती आदी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पुष्करणीच्याच एका बाजूला असलेल्या झाडांना विळखा घालून काही वेली वाढल्या आहेत, त्या वेलींच्या फांद्या एकमेकांशी बिलगून नसíगक झुले तयार झाली आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही या झुल्यांवर बसून झुलण्याचा मोह आवरता येत नाही. रतनवाडी ते मुतखेलमाग्रे पुन्हा धरणाच्या िभतीपाशी पोहोचता येते. या ठिकाणी आपली धरण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रवासात मुतखेलजवळच्या डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे पायथ्याशी न पोहोचताच वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना रोखून तर धरतातच आणि अंगावर येणारे तुषार मन रोमांचित करतात. या नागमोडी वळणांच्या प्रवासात काही ठिकाणी एकमेकांना बिलगून उभी असलेली कौलारू घरं इथल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवितात. डोंगरउतरणीवर भात आवणीसाठी केलेल्या अर्धगोल, चौकोनी खाचरांमध्ये साठलेल्या पाण्यात निसर्ग जणू आपलं प्रतििबबच न्याहाळत असल्याचा भास होतो. अनेक शेतांतून भातशेतीसाठी घोटाभर पाण्यात मशागत चाललेली दिसते. तर कोठे इरलं अंगावर घेऊन बायाबापडय़ा भातआवणी करीत असतात. अनेक ठिकाणी वीतभर वाढलेली भाताची पिकं जमिनीवर अंथरलेल्या हिरव्याकंच मखमली गालिच्यासारखी दिसतात, वाऱ्याच्या झुळकावर लवलवणारे हे गालिचे पाहताना मनपाखरूही आपल्या नकळत विहरायला लागते.. भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० कि.मी. अंतरावर रंधा फॉल या मोठय़ा धबधब्याचे दर्शन घडायचे, मात्र आता कोंदणी विद्युत प्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा लुप्त झाला आहे. अतिवृष्टीनंतर अथवा धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गानंतर महाराष्ट्राचा हा गिरसप्पा आपलं अक्राळविक्राळ रूप घेऊन प्रकटतो. हा धबधबा पाहायला मिळणं म्हणजे या भागातील पर्यटनातला अलभ्य लाभच. भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल या धबधब्याजवळ एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषार स्नान घेता येते. इथंही इंग्रजांच्या रसिक कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. अंब्रेला फॉल पाहण्यासाठी धरण भरण्याची वाट पाहावी लागते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टनंतर अंब्रेला फॉल काही महिने पाहता येतो. रंधा फॉल, अंब्रेला फॉल, कळसूबाई शिखर दर्शन, घाटघर उदंचन विद्युत प्रकल्प रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर अशीएकदिवसीय भंडारदरा परिक्रमा करता येते. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. भंडारदरा परिसरात निवांत भटकंती करायची म्हटले की, पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो. पर्वतरांगेतील अलंग, कुलंग, मदनगडसह हरिश्चंद्रगड, विश्रामगड या गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्टय़पूर्ण गावंही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर फोकसंडी हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते. फोकसंडीतून थेट माळशेज घाटात पोहोचण्यासाठीही आता रस्ता झाला आहे. जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड, अकोले, समशेरपूर, खिरविरे फाटामाग्रे विश्रामगडावर जाता येते. तीरपाडे पाचपट्टा पठारावरील पवन ऊर्जा पकल्प पाहण्यासारखा आहे. डोंगरपठावरील ८०ते ८५ पंखे भिरभिरतानाचे दृश्य विलोभनीय असते. या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजीमाग्रे कुमशेतसारख्या दुर्गम आदिवासी भागाला भेट देणे आता सहज शक्य आहे. कळसूबाई, कुलंगगड, रतनगड, आजोबाचा डोंगर या सर्व शिखरांतील शेवटचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाने नुकतीच ३५० वष्रे पूर्ण केली. अत्यंत अवघड चढणीचे हे शिखर ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्य़ातून या गडाकडे जाता येते. नगर जिल्ह्य़ातील कोतुळ, शिरपुंजी, पाचनईमाग्रे हरिश्चंद्रगडाकडे जाता येते. या गडाचे पौराणिक महत्त्वही मोठे आहे. हरिश्चंद्रगडालगतच तारामती, रोहिदास ही शिखरे पाहायला मिळतात. साहसी गिरिभ्रमणाबरोबरच वन्यजीव दर्शनही अनुभवता येते. निबिड जंगल, उंच डोंगर, खोल दऱ्या, मुळा नदीचे पात्र अशी वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी. उंबर, जांभूळ, कारवी, पांगारा, मोहाची झाडे अशा वृक्षवल्लरी तर कोल्हा, साळुंदी, बिबटय़ा, रानडुक्कर, विविध पकारचे साप, सरडे असे वनचर आणि सातभाई, भारद्वाज, बुलबुल, कोकिळा, खंडय़ा, वेडा राघू आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात. हिवाळ्यातही या परिसराचे रुपडं अवर्णनीय असतं. अनेक प्रकारच्या रानफुलांनी इथले डोंगर पायथे सजतात. नवरातीदरम्यान ही फुले जणू रंगोत्सव साजरा करतात. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. या व्यतिरिक्त इतरही फुलांमुळे सर्व खोरे हिमाचल प्रदेशातल्या फ्लॉवर्स व्हॅलीचे प्रतििबब दर्शवितात. सहय़पर्वताच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत. खासगी लॉजपासून ते महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासकीय विश्रामगृहाचे आरक्षण एक आठवडाभर अगोदर इंटरनेटच्या माध्यमातूनही करता येते. उन्हाळ्यात गिरिभ्रमण, उन्हाळा-पावसाळ्याच्या संधिऋतूत काजवा महोत्सव, पावसाळी पर्यटन आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे वर्षभर पर्यटन करण्यासारखा हा परिसर. कधी काळी दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गावे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा सरावाच्या व्हायला लागल्या आहेत. घाटदार, नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वनराई, हिरडा, तेरडा, करवंद, जांभूळ इतर आयुर्वेदिक वनस्पतीबरोबरच काही प्रमाणातील तेंदूपत्ताच्या वनराईने हा परिसर नटला आहे. या वनराईच्या कमानीतून प्रवास करताना निबिड अरण्य भ्रमंतीचा आनंद मिळतो. मात्र इतर पर्यटनस्थळी बाजारपेठांमुळे आलेला बकालपणा इथे नाही. स्वच्छ पर्यटनामुळे इथे अनट्च्ड नेचर इथं अनुभवता येत. अर्थात इथलं पर्यावरण, स्वच्छता या बाबी जपणं पर्यटकांच्याच हाती आहे.
भंडारदरा शेंडी म्हणजे माझ्या लहानपणापासून आता पर्यंतचे सर्वात आवडते निसर्गरम्य ठिकाण आहे असे म्हंटले तरी चालेल. आम्ही लहानपणी कुणीही पाहुणे आमच्या कडे आले की त्यांना तेथेच नेत असू. मग आई बरोबर डबा घेत असे भरल्या वांग्याची भाजी त्यावर दही , बाजरीची भाकरी, तव्याचे पिठले आणि कांदा हा हा हा आताही ती चव तोंडात रेंगाळत आहे....मग आम्ही भंडारदरा गार्डनमध्ये आधी भरपूर पाण्यात डुंबत असू आणि सडकून भूक लागली की आशा पक्वान्नाचा फडशा पाडत असू. खरच काय दिवस होते ते ......गार्डनमध्ये दोन मोठे फॉंल आहेत. त्यातला मोठा 'आम्रेला फॉंल' या नावाने प्रसिद्ध आहे.त्याच्या जवळ जायला मिळावे म्हणून तिथे ब्रिटीशकालीन सुंदर ब्रिज आहे. तिथून छत्रीच्या आकाराच्या ह्या भव्य फॉंलमधून जणू दुधच ओसंडत आहे असेच वाटते. हे धारण ब्रिटीश कालीन आहे आणि विशेष म्हणजे आजही ते आपल्याला त्या काळात नेते. त्या काळातील सरकारी अधिकार्यांच्या उतरण्यासाठी बांधलेला काच बंगला 'बॉबी'तील 'हम तुम एक कामरेमे' या गाण्याच्या शुटिंग मुळे 'बॉबी बंगला' म्हणून प्रसिद्ध आहे.धरणाच्या भिंतीवरून चालत असताना धरणाच्या विशालतेत आपण स्वतः हरवून जातो आणि त्या अथांगतेचे भाग बनून जातो. दूरवर असलेल्या डोंगरांकडे नजर भिडवतो आणि शोधू लागतो शून्याला कारण ते स्थब्ध जल आपल्याला थांबवलेल्या तुफानासारखे भासते, जणू ते सांगत आहे आपल्याला की तुम्ही मला आडवले म्हणून नाही तर ....... आणि त्याच्या या थांबण्याला इतकी स्थिरता कोणी दिली हे गूढच आपण त्या शून्यात शोधतो. मग आपल्याला दिसते डोंगराच्या मध्यावरची एक पोकळी. आहो हा शून्य नसून 'रतनगड डोंगरावर'असलेली नैसर्गिक खिडकी आहे. गार गार वर घेत आपण पुढे पुढे जातो आणि भिंतीच्या शेवटच्या टोकाला येतो तिथे आहे 'स्पील वे'.म्हणजे धरण भरले की येथूनच जास्तीचे पाणी ओसंडते. भले मोठे लोखंडी गेट आपले डोळे फिरवतात. ह्या भिंतीवरून ओसंडणारे पाणी अंगावर घेण्यातली मौज तुम्हीही एकदा आनुभावाच दर वर्षी साधारण पणे ऑगस्ट महिन्यात धरण भरतेच भरते.पावसाची श्रावण महिन्यातील हलकीशी भुरभूर नी धरणाच्या साठ्यातील शक्तिशाली लाट यांच्या संगतीत निसर्गाची मजा घ्यायला मी दरवर्षी नक्की जातेच आणि मग धरण्याच्या पाण्याबरोबर माझे मनही उचंबळत असते.
अणे घाट आणि वडगाव दर्या, निघोजची राजंणकुंड
Ane ghat, India's largest natural bridge formed by contineous hamering of rain water flowing through it. The process of formation of this natural bridge is thousands of years old, now dimentionaly the height of bridge is around 9m and width is around 21m. This natural bridge is located at Ane ghat on Mumbai-Vishakhapattanam national highway-222, near alefata, which 12km away from our Parashar Agri & village tourism. Being we are engaged in developement of Junnar Tourism, we are welcoming you to visit India's natural bridge.
Regards
Manoj Hadwale
President
Junnar Tourism Development Organization
09970515438
Micromorphology and Textural Variations in the Ane Ghat Waterfall Tufa Deposits from Upland Deccan Traps and their Genesis
Calc tufa associated with waterfalls and rapids from Ane Ghat in the western Deccan Traps have been studied on the basis of their field occurrence, morphology and microtextures. The calc tufas are semi-consolidated and show porous, spongy morphology and occasionally ‘soda straw’ structure. Blue green algae, moss and diatoms are the predominant biotic components of the calc tufa. The growth of such calcifying biota has played a constructive role in building calc tufa deposits at Ane Ghat. Mineralogically, the tufas are made of calcite and contain variable carbonate percentage (53 to 78%). Petrographically, they contain fragments of basalt, devitrified glass, plagioclase, quartz, agate, zeolites, etc. set in a clay-rich and clay-poor micrite. Irregular pore spaces and voids are partially filled with spary calcite lined by thin layers of clay. SEM images of pristine calc tuffa surfaces reveal micromorphological and textural features that dominantly reflect precipitation. Images of insoluble residue of phases like glass, plagioclase and zeolites indicate some dissolution and corrosive features indicating post depositional diagenetic processes. δ18O V-SMOW values range from 27.03 to 28.92‰ and δ13C V-PDB values of −3.58 to −6.02‰ are recorded for the Ane Ghat samples. The calc tufas were precipitated from waters at paleotemperatures of 16.3 to 27.1°C. The calc tufa from Ane Ghat represents biological and physico-chemical calcification processes in response to variability in calcium carbonate saturation and water chemistry in temperate to semi-arid climate.
https://www.semanticscholar.org/paper/Micromorphology-and-Textural-Variations-in-the-Ane-Ukey-Pardeshi/00d9960cac093ee4738faed07d735030b59b80fe
श्री दर्याबाई-वेल्हाबाई देवस्थान - वडगाव दर्या
तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील जगप्रसिद्ध रांजन खलगे (लवनस्तम्भ).
भारतात फक्त 2 ठिकाणी हे आढळतात.
त्यातल एक हे आपल्या महाराष्ट्रातील वडगाव दर्या येथे आहे.
हे तीर्थ क्षेत्र म्हणून सुधा प्रसिद्ध आहे.
या तीर्थ क्षेत्राला अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखल जात.
हे तीर्थ क्षेत्र निसर्गाच्या सानिध्यात एका गुहेमधे देवीचे वास्तव्य आहे.
याच ठिकाणी हे रानजन खलगे(लावनस्तम्भ) आहेत.
यातून सतत थंडगार पानी टिप टिप पडत असते.
हे पानी वर्षभर चालू असते....
Ranjangaon, Nighoj, Wadgaon Daryabai & Takali Dhokeshwar
September 8, 2008 by Ruhi
Ever since I heard about Nighoj, had keen interest to see this wonder. Best part is, this moon-land is very close to Pune. I found out few more interesting places to see around Nighoj. It was summer weekend and we took up Pune-Nagar highway.
1. Ranjangaon –
Our day began with sacred darshan of Mahaganapati of Ranjangaon. Ranjangaon Ganesh is one of the eight holy Ganapatis i.e. Asthavinayak. Ranjangaon temple is in Shirur district and on main highway at 52 Kms from Pune. There is beautiful garden developed outside the temple. We had a quick tea break here and then proceeded towards Nighoj. While on the way to Nighoj, we came across birds like Shrike, Purple Sunbird and Black shouldered kite.
2. Nighoj –
To reach Nighoj –
- Take Pune – Nagar Highway and drive upto “Ghodnadi” river bridge.
- Take immediate left turn after crossing the bridge. This is “Nighoj Phata”.
- Drive approx. 25 Kms to reach Nighoj village. The road is in OK condition.
- From village travel 3 Kms more to reach “Kukadi” river where you can see pot holes.
The entire bank of Kukdi River is turned into moon land of huge pot holes. The phenomenon behind its formation goes back to more than thousands of years. The river flow wears out the vesicular basalt’s upper layer and compact basalt layer of the rock. Then small hard pebbles vigorously swirl in these wear out areas due to flow of the water to create circular pot holes. There is huge gorge or canyon created in the river due to the whirl effect of stones for the ages. These are believed to be the largest natural pot holes in Asia. It is very amazing and interesting place. You just have to see this miracle with your eyes to believe it. There is small temple of “Malganga” on the bank on this river.
Only thing, which hurt, is that we don’t do anything to conserve this beauty. Not many people know about it.
Best time to visit: Summer (March-April). May month will be extremely hot.
Summer is best time to visit this place. As water level goes down, pot holes are easily visible. In monsoon, you merely can view gigantism of pot holes. It is said to be approx. 100 feet deep and 3 kms long. Besides, it can be very dangerous to experience their gigantism otherwise.
I took as many snaps as I could and also some live clippings of whirl effects for my folks. We started back and it was already time for food. We found a shady place and unwind mattresses. We enjoyed home made food and relaxed for some time. We had way to go.
3. Wadgaon Daryabai cave temple –
From Nighoj, we went to Wadgaon to see another marvel. Wadgaon is plain plateau, which is rich in calcium/limestone. On the way, we saw flock of Swallows. We reached the place and started climbing down stone stairs to go to Daryabai cave temple. Our ancestors warmly greeted us.
CAUTION – Be sure that you don’t carry any eatables to the Daryabai cave temple. There is entire gang of Bonnet monkeys and their IQ is as good as ours. They know how to snatch away and eat all that you carry from “coconut” to “peanuts” and “Cadbury’s Dairy Milk” to “Center fresh”.
Jokes apart, about another marvel called “Daryabai cave temple” – this temple is dark inside and has dripping water streams inside which gives birth to stalactite. A stalactite is type of cave formation that hangs from the ceiling or wall of limestone caves. It is sometimes referred to as dripstone. It is called as “Lavan kandya” in Marathi. Each stalactite takes thousands and lakhs of years to form. Unfortunately, people who visit this place break them for fun; get them home and then just throw away without knowing their importance.
4. Takali Dhokeshwar –
Takali is a small village in Parner district. We went to this place from Wadgaon Daryabai temple. Around 3 kms from Takali village is Dhokeshwar mountain temple. We took tea and Misal-paav break on the way to Takali village.
We climbed the mountain stone stairs to reach the top. There is a beautiful cave temple on the top dates back in 5th – 6th century. Along with Shivlinga, nandi, it also has idols of Laxmi, Ganesh and Bhairav carved in black stones. We relaxed inside the temple. Cold breeze fade away our tiredness. Another must mention thing here is – the water source near the cave. It has water springs throughout the year. I can say I never tasted the water like that anywhere else. We got our water bottles filled and started climbing down.
Each place we visited in this trip was unique in its own way. It was already evening by then and we drove back to Pune with feelings of contentment.
NOTE: For more snaps visit – http://www.flickr.com/photos/ruhiclicks/sets/72157601019246769/detail/
कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्याखोर्यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत. ह्या मध्ययुगीन देवस्थांनांबरोबरच इथे प्राचीन म्हणजेच साधारण ६ व्या, ७ व्या शतकात राष्ट्रकूट कालखंडात खोदली गेलेली ब्राह्मणी शैलीची लेणीसुद्धा आहेत. कधीची ही लेणी पाहायची होती शेवटी परवा अगदी अचानक ही लेणी पाहायला जाण्याचे ठरले आणि रविवारी मी, आत्मूबुवा आणि धन्या असे तिघेजण आत्मूबुवांच्या खेचरावर बसून निघालो.
आमच्या भटकंतीचा गूगल नकाशा
मोशीला चहासाठी थांबून पुढचा पडाव घेतला ते नारायणगावला राजकमलच्या सुप्रसिद्ध मिसळीपाशी. मिसळ हाणून आळेफाट्याला उजवी मारून नगर रस्त्याला लागलो. आळे गावापासून थोडेसे आत साधारण ३ किमी वर ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या रेड्याची समाधी आहे. गंमत म्हणून आम्ही आत वळलो. समाधीमंदिर बर्यापैकी मोठे आहे. स्वागतकमानी, भक्तमंडप अशी जोरदार बांधकामे चालू आहेत. समाधीमंदिरातील गाभार्यात विठ्ठल रखुमाई आणि माऊलींची मूर्ती आहे. आणि खालच्या पातळीत रेड्याचे दगडी मुख कोरलेले आहे. एका दंतकथेचेही लोकांनी आधी दैवतीकरण आणि त्याअनुशंगाने नंतर बाजार मांडलेला पाहून गंमत वाटली. मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा माघारी येऊन नगर रस्त्याला लागलो.
वाटेत गुळूंचवाडी ओलांडल्यावर अणे घाट लागतो. डावीकडच्या दरीत एक नैसर्गिक आश्चर्य दडलेले आहे ते म्हणजे गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू. मळगंगा नदीच्या प्रवाहामुळे कातळाला मोठे भगदाड पडलेले असून पुलासारखीच रचना तिथे तयार झालेली आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तिथून अगदी फुफाटत वाहतो. बाजूलाच मळगंगा देवीचे छोटेखानी मंदिर आहे. मी तो नैसर्गिक पूल अगोदरच एकदा खाली उतरून पाहिला असल्याने आणि इतर दोघांना उन्हातान्हात दरीत उतरण्यास फारसा इंट्रेस्ट नसल्याने आम्ही घाटातूनच पुलाचे विहंगम दर्शन घेतले आणि पुढे निघालो. आळेफाट्यापासून आमचे लेण्यांचे ठिकाण, टाकळी ढोकेश्वर साधारण ३८ किमीवर. रस्ता अतिशय उत्तम त्यामुळे लवकरच टाकळी ढोकेश्वर गावात पोहोचलो. हे तसे बर्यापैकी मोठे गाव. गावातूनच ४/५ किमीवर ढोकेश्वराचा डोंगर. गावात कोठेही ढोकेश्वर मंदिर विचारले तर गावकरी रस्ता सांगतात. गावातून बाहेर पडून मंदिर रस्त्याला लागलो. मंदिर म्हणजे डोंगरावरची ढोकेश्वर लेणी. सरत्या पावसाळ्यातही हा डोंगर तसा भकासच वाटत होता. हिरवाई असूनही नसल्यासारखीच आणि जी काही थोडीफार आहे ती देखील पुढच्या महिन्याभरात लयास जाईल.
रस्ता थेट लेण्यांच्या पायथ्यापर्यंत जातो. काही बांधीव तर काही खोदीव अशा पायर्या लेणीपर्यंत जाण्यासाठी आहेत. साधारण दोनशेच्या आसपास पायर्या असाव्यात. लेण्यांभोवती तट बांधला आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार केले आहे. तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हातरी झाले आहे. तटाच्या दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख आहे. दरवाजाच्या आधी उजवे बाजूस एका यादवकालीन मंदिराचा अवशिष्ट भाग असून गाभार्यात काही शिवपिंडी तसेच दगडी पादुका कोरलेल्या आहेत. तर डाव्या बाजूस शरभ शिल्पांकित दगड बेवसाऊ पडला आहे.
१. ढोकेश्वराचा डोंगर
२. लेण्यांभोवतीचा तट
३. प्रवेशद्वाराअलीकडील मंदिर
४. मंदिरद्वाराच्या उंबरठ्यावरील शिल्प
५. प्रवेशद्वाराच्या डावीकडील शरभाचे शिल्प
६. प्रवेशद्वारातील शिलालेख
प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अजून काही पायर्या चढून आपला प्रवेश थेट लेणीच्या पुढ्यातच होतो.
ही लेणी राष्ट्रकूटकालीन. साधारण ६ व्या/ ७ व्या शतकात खोदली गेलेली. एक मोठं प्रमुख लेणं, त्याच्या बाजूला जराशा उंचीवर खोदलेले एक अर्धवट लेणं आणि एक खोलवर गेलेलं पाण्याचं टाकं अशी याची रचना. लेण्याच्या पुढ्यातच एक पेशवेकालीन दिपमाळ आहे. ही लेणी पाहून वेरूळच्या रामेश्वर लेणीची आठवण येते. तिथे डावीकडे गंगा आणि उजवीकडे यमुना. इथे मात्र उलट. डावीकडे यमुना व उजवीकडे गंगा. अगदी सहजी ओळखू येतात त्या त्यांच्या वाहनांमुळे. यमुना कासवावर उभी आहे तर गंगा मकरावर. दोन्ही मूर्ती बर्याच भग्न झाल्यात. भग्न झाल्या असे म्हणण्यापेक्षा इथला कातळाचे ठिसूळ असल्याने बरेच विदारण झालेय. त्यामुळे इथल्या मूर्ती काहीशा कुरुप दिसतात पण तरीही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही. दोन्ही नद्यांची वस्त्रे पारदर्शक असून ती त्यांचे प्रवाहीपण सूचित करतात. आधारासाठी आपला एक हात त्यांनी एका बटूच्या खांद्यावर ठेवला आहे. जणू आपला वेगवान प्रवाह त्या काहीसा आवरून घेत आहेत. तर वरती गंधर्व ही नदीची रूपे निरखत आहेत.
७.लेण्याबाहेरची दिपमाळ
८. कूर्माधिष्ठित यमुना
९. मकरारूढ गंगा
१०.गंगेशेजारीच मकराजवळ एका सेविकेची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली आहे.
११. लेण्याचा दर्शनी भाग
१२. दर्शनी भागातील नक्षीदार स्तंभ
इथे आमचा झोपाळू मित्र प्रवेशद्वारातील ओसरीवरच आडवा झाला आणि लेणी पाहायला मी आणि आत्मुबुवा आत शिरलो.
सभापंडप, डाव्या आणि उजव्या कोपर्यातील उपमंडप अथवा अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी ह्या लेणीची रचना. गर्भगृहाभोवती फेरी मारण्यासाठी कातळकोरीव मार्ग आहे. तसेच गर्भगृहात प्रवेशण्यासाठी उजवीकडूनही एक द्वार आहे. वेरूळच्या लेणी क्र. १४ (रावण की खाई) किंवा पुण्याच्या पाताळेश्वराच्या लेणीसारखी अशी ही रचना.
प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरूड), वाराही (वराह), ऐन्द्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा माडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.
१३. संपूर्ण सप्तमातृकापट
१४. वीरभद्र
१५. सप्तमातृका अधिक जवळून अनुक्रमे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा
१६. वराहमुखी वाराही
सप्तमातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजवीकडे एक उपमंडप आहे. त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव. दोन स्तंभांमुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झाला आहे. त्रिशूळ, नाग, डमरू आदी आयुधे हाती धरून शिव तांडवनृत्य करत असून पार्वती, शिवगण, देवगंधर्व हे नृत्य पाहात आहेत.
१७. शिवतांडव
१८. शिवतांडव जवळून
१९. शिवतांडव पटाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत नागप्रतिमा आहेत.-
सप्तमातृका तसेच शिवतांडव अशा दोन्ही पटांच्या बाजूला कक्ष खोदलेले आहेत. मातृकांशेजारच्या कक्षात कुठल्याश्या जुन्या मंदिरातल्या मूर्तींचे बहुत अवशेष आहेत. बहुधा पायथ्याचे हे कुठलेतरी यादवकालीन मंदिर असावे. कक्ष जाळी लावून कुलूपबंद केला असल्याने हे नीट पाहताच आले नाही मात्र जमेल तशी काही छायाचित्रे घेतली.
२०. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष (विष्णू)
२१. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष
शिवतांडवपटासशेजारच्या क़क्षात काही वीरगळ आडवे करून ठेवलेले आहेत.
२२. वीरगळ
एव्हाना माझी आणि बुवांची चर्चा ऐकून ढोकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या गावकर्यांचे कोंडाळे झाले होते. त्यांच्या शंकांना आम्ही जमेल तशी उत्तरे देत होतो. स्थानिकांच्या दंतकंथा, मूर्तीं त्यांनी दिलेली चुकीची नावे पाहून थोडी मौजही वाटत होती. इतक्यातच त्यांनी गर्भगृहाच्या दरवाजातील एका मूर्तीकडे निर्देश केला आणि म्हणाले ही शनीची मूर्ती. अर्थात ही मूर्ती शनीची नसून ती होती आयुधपुरुषाची- त्रिशुलपुरुषाची.
कलचुरी, राष्ट्रकूट कालखंडात आयुधपुरुष द्वारपालांच्या भरपूर मूर्ती खोदल्या गेल्या. त्या आपल्याला वेरूळ, घारापुरी, टाकळी ढोकेश्वर अशा ब्राह्मणी लेण्यांत तसेच वेरूळ येथेच बौद्ध लेण्यांतही दिसून येतात. सर्वसाधारणपणे द्वारपाल आणि त्यांच्या शेजारी खालच्या बाजूस एक ठेंगणी व्यक्ती अशी यांची रचना. ह्या ठेंगण्या मूर्ती म्हणजेच द्वारपालांच्या हातातील आयुधे, इति आयुधपुरुष. तर टाकळी ढोकेश्वरच्या गाभार्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना अशा आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच.
ह्या आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या बाजूला कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत करणार्या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.
२३. गर्भगृहाचा दर्शनी भाग
२४. आयुधपुरूष द्वारपाल
२५. त्रिशुळपुरुष
२६. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील कुबेर
२७. गाभार्यातील शिवलिंग
गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळातच खोदून काढलेला मार्ग आहे. वाटेत दोन अतिशय देखणे वीरगळ ठेवलेले आहेत.
२८. वीरगळ
२९. वीरगळ
३०. कातळकोरीव प्रदक्षिणा मार्ग
गर्भगृहाच्या प्रदक्षिणामार्गाच्या उजवे बाजूच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरही एक भव्य नंदीची मूर्ती कोरलेली आहे. एक फेरी मारून आम्ही लेणीच्या बाहेर आलो. आमचे झोपाळू मित्र नुकतचे झोपेतून उठत होते. परत एकदा त्यांना बळेबळे आत बोलावून सप्तमातृकांचे आणि इतरही दर्शन घडवले आणि तिघे लेण्याच्या बाहेर आलो.
लेण्याच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे जे आहही पिण्यायोग्य आहे आणि त्याच्या वरच्या बाजूलाच एक लहानसे लेणे आहे. तेथे जायला उभ्या कातळावर पावठ्या खोदलेल्या आहेत. हे लेणे म्हणाजे एक लहानसा कक्ष असून आत काहिही नाही. इकडे मात्र धन्या आणि बुवा जाऊन आले.
३१. वरील लहानशा लेण्यकडे जाणार्या पावठ्या
थोडा वेळ थांबून आम्ही लेणी उतरायला सुरुवात केली. दुपारचे दोन अडीच वाजत होते. आता कुठे जायचे ह्याचा विचार चालू झाला. ठिकाणही ठरले, जुन्नरची हिनयान तुळजा लेणी. टाकळी ढोकेश्वर पार करून निघालो. काही अंतर पुढे जातात एक फलक सामोरा आला- कोरठण खंडोबा ८ किमी, बोरी १३ किमी. बोरी हे आमचे मूळ गाव. आमचे आजोबा देखील त्या मूळ गावी कधी गेले नाहीत पण कुठेतरी आमची नाळ मात्र त्याच्याशी जोडलेली राहतेच. कोरठण खंडोबा आमचे कुलदैवत. आतापर्यंत फक्त एकदाच तिकडे जाणे झाले होते. आता इतके जवळ आलोच आहोत तर कुलदैवताला भेटून यावे असे ठरले आणि तुळजा लेणीची भेट रद्द केली.
फाट्यावरून आत शिरलो. कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३ किमी तर उजवीकडे ६ किमी वर वडगाव दर्या. आधी कोरठण खंडोबाला गेलो. देवस्थान भले प्रचंड झालेय. इथेही श्रद्धेचा बाजारच. मूळ मंदिर मात्र १५ व्या शतकातले असून शके १४९१ चा अर्थात इ.स. १४१३ रोजीचा एक शिलालेख गर्भगृहाचा प्रवेशद्वारावर आहे.
खंडोबाची मूर्ती ही तांदळा स्वरूपात म्हणजेच धोंड्याच्या स्वरूपात ( धोंड्यावर नाक डोळे रेखाटलेली अशी) आहे.
३२. कोरठण खंडोबा देवस्थान
३३. सभामंडपातील स्तंभ जे हा मंडप खूप जुना आहे हे सूचित करतात.
३४. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख
३५. खंडोबा
कोरठण खंडोबाचे दर्शन करुन परत पिंपळगाव रोठा येथे आलो. तिथून सरळ ६ किमीवर वडगाव दर्या. इथली दर्याबाई ही आत्मुबुवांची कुलदेवी. वडगाव दर्याला एक नैसर्गिक आश्चर्य आहे ते म्हणजे इथले अधोमुखी आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ.
वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही पायर्या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.
इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. ह्यापूर्वी मी अधोमुखी लवणस्तंभ पाटेश्वर येथील वर्हाडघर लेणीसमूहात पाहिले होते. येथे मात्र दोन्ही प्रकार पाहता आले.
३६. वडगाव दर्या गुहामंदिर
३७. वेल्हाबाई मंदिरातील उर्ध्वमुखी लवणस्तंभ
३८. दर्याबाई मंदिरातील दीड पुरुष उंचीचे अधोमुखी लवणस्तंभ
३९. गुहांतील अधोमुखी लवणस्तंभ
४०. लवणस्तंभ निर्मितीची आजही चालू असलेली प्रक्रिया
४१. लवणस्तंभ निर्मिती
मंदिर आणि लवणस्तंभ पाहून निघालो. धन्या मात्र एव्हाना वैतागला होता. मात्र आता आमच्या वायफळ गप्पा सुरु झाल्या. विविध विषयांवर भरपूर गप्पा झाल्या, कित्येकदा निरर्थक. वाटेत स्पाला फोन करून त्यांचा राजगड ट्रेक कुठवर आला ह्याची विचारणा केली. थोड्याच वेळात अन्या दातारचा फोन आला. मग त्याला रात्री निगडी प्राधिकरण येथे भेटलो व जेवण करून घरी.
एकंदरीत कान्हूरपठारावरचा हा छोटेखानी दौरा अगदी झक्कास आणि नेहमीपेक्षा वेगळाच असा झाला.
कळायला लागल्यापासून पैठणच्या ब्रम्हवृंदासमोर ज्ञानदेवांच्या आज्ञेने वेद बोलणारा* रेडा मनात घर करुन राहीला होता. या भटकंतीच्या निमित्ताने त्या रेडयाची समाधी पाहता आली.

* दंतकथेनुसार.
निघोजचा भौगोलिक चमत्कार - रांजणखळगेकसे जाल? - पुण्यापासून निघोज सुमारे ११२ किलोमीटर. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर गावानंतर काही अंतरावर निघोजचा फाटा आहे. शिक्रापूरहूनही एक फाटा निघोजला जातो. निघोजमध्ये भोजन आणि निवासाची सोय आहे.
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो. प्रवाहाबरोबर दगड-गोटे आणि इतरही वस्तू वाहत असतात.
या खडकांशी लाखो वर्षं सातत्यानं घर्षण होत राहिल्यानं हा कॅनियन किंवा दरी निर्माण झाली. ही दरी तब्बल ४४६ किलोमीटर लांब आणि २९ किलोमीटर रुंद आहे. अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे २०० मीटर लांब आणि काही ठिकाणी ६० मीटर रुंद दरी तयार झाली आहे.
याच दरीत नदीनं कोरून काढलेली चित्तवेधक पाषाणशिल्पं दिसतात. अनेक ठिकाणी खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्यानं त्याला सामान्यपणे रांजणखळगे असं म्हटलं जातं. प्रवाहातून वाहत आलेले लहान-मोठे दगड नदीपात्रात तयार होणाऱ्या भोवऱ्यांमुळे गोल फिरत राहतात. त्यामुळं वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच आहेत रांजणखळगे. लाखो वर्षांपासून ही क्रिया घडत असल्यानं, पात्रातील खडकांना खळग्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला पॉट होल्स म्हणतात. या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
कुकडी नदीच्या पात्रातले काही रांजणखळगे खूप खोल आहेत. काही ठिकाणी छोटी गुहा आणि काही ठिकाणी पाषाणाला मधोमध कोरून त्यातून पाण्याचा प्रवाह वाहतो. नदीच्या या विशिष्ट ठिकाणच्या पात्रातले पाषाण, अंतरंगात कठीण आणि बाहेरच्या बाजूनं मृदू आहेत. नदीच्या प्रवाहानं मृदू भाग कोरून काढला आहे. लाखो वर्षांपासून घर्षणाची ही क्रिया घडत असल्यानं, पाषाणांची आकर्षक शिल्पं तयार झाली आहेत. या लहानशा दरीत एक छोटा धबधबाही आहे. इथल्या काही कुंडांमध्ये दीर्घकाळ पाणी साठून राहात असल्यानं, तिथं हायड्रिला किंवा वॉटर थाईम नावाची वनस्पती उगवते.
खळग्यांच्या तळाशी उगवणाऱ्या या वनस्पतीच्या फांद्या प्रसंगी २५ फुटांपर्यंत वाढतात. अशा असंख्य फांद्यांमुळं तळ दिसेनासा होतो.
पाण्याच्या उपलब्धतेमुळं पशुपक्षी या ठिकाणी आकर्षित होतात. चिखलानं घरटं बांधणारे स्वॅलो पक्ष्यांची लगबगही इथं पाहता येते. काही वर्षांपूर्वी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. परिणामी पाण्याचा ओघ काहीसा कमी झाला आहे. पर्जन्यछायेत असलेल्या या प्रदेशात पाऊस तसा कमीच होतो. त्यामुळं पावसाळ्यातही हा चमत्कार कधीकधी पाहता येऊ शकतो. नदीच्या प्रवाहावर एक झुलता पूलही बांधण्यात आला आहे. त्यामुळं रांजणखळगे वेगवेगळ्या कोनातूनही पाहता येणं शक्य झालंय. किनाऱ्यावर श्री मळगंगा देवीची दोन सुंदर मंदिरं आहेत. शिवाय कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राममंदिरही पाहण्यासारखं आहे.
निघोजपासून कान्हूर पठारमार्गे सुमारे २३ किलोमीटरवर पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या हे छोटंसं गाव लागतं. या गावाजवळ निसर्गाचा आणखी एक चमत्कार पाहता येऊ शकतो. गावापासून सुमारे एक किलोमीटरवर एक खोल दरी आहे. ही दरी हिरवाईनं नटलेली असते. दरीतच दर्याबाई आणि वेल्हाबाई या देवींची स्थानं आहेत. दरीत मंदिरापर्यंत उतरून जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आढळून येतात. इथं माकडांचा मुक्त संचार दिसतो. देवीचं मंदिर प्रचंड खडकातील गुहेत आहे. या गुहामंदिराच्या छतातून सतत क्षारयुक्त पाणी वाहत असतं. हे वाहणारं पाणी आपल्यासोबत क्षार घेऊन येतं. क्षाराचे हे कण भिंतीवर स्थिरावतात. वर्षानुवर्षं चाललेल्या या प्रक्रियेमुळं मंदिरात लवणस्तंभ तयार झाले आहेत. मंदिरात परशुरामाची मूर्ती आहे आणि शंकराची पिंडही आहे. वडगाव दर्याहून पुन्हा निघोज, टाकळी हाजीमार्गे मोराच्या चिंचोलीलाही जाता येतं. हे अंतर सुमारे ४६ किलोमीटरवर आहे. परतीच्या प्रवासात इथं जाता येईल.
अहमदनगर जिल्हाचे पर्यटन
अहमदनगर
काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर.
आज अहमदनगरचा वाढदिवस आहे.
वाढदिवस शहराचा आहे, जिल्ह्याचा असलेला इतिहास वेगळा.
२८ मे १४९० ला शहर स्थापन झाल.
देशात ५०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेली मोजकीच शहर आहेत त्यातल अहमदनगर एक.
आज जिथ किल्ला आहे तिथ अहमदशहा बहिरी निजामशहा थांबलेला असताना त्याने सशाला कुत्र्याच्या अंगावर धावून जाताना पाहिलं आणि अशी चमत्कारिक जागा त्याने किल्ला आणि शहर वसवायला निवडली ते अहमदनगर.
सीना नदीच्या काठावर वसलेलं शहर.
चांदबीबी च्या शौर्याची आठवण असणार अहमदनगर.
मलिक अंबरच्या खापरी नळाने शहराला ५०० वर्षापूर्वी पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाच शहर.
जमिनीच्या मोजमापाची, शेतसार्याची पद्धत राबवणाऱ्या आणि साधा हबशी गुलाम स्वकर्तृत्वावर थेट राज्याचा प्रधानमंत्री बनू शकतो हे दाखवणाऱ्या मलिक अंबरची कार्यभूमी असलेल अहमदनगर.
लाड-कारंजा-पैठण( प्रतिष्ठान )-अहमदनगर-जुन्नर-नाणेघाट-कल्याण ह्या मार्गाने थेट बगदादपर्यंत व्यापार उदीम करणार आणि एकेकाळी समृद्ध बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल अहमदनगर.
शहाजीराजे आणि शरीफजीराजे ह्यांच्या वडिलांनी ,मालोजीराजांनी जिथे नवस बोलला त्या शहाशरीफ दर्ग्याच शहर.
शहाजीराजे ज्या भातोडी च्या लढाईने सगळ्या देशात युद्धकुशल सेनापती म्हणून प्रसिद्ध झाले ते अहमदनगर.
संभाजीराजांच्या मृत्युनंतर , दक्षिणेत एकूण २७ वर्ष लढूनही महाराष्ट्र जिंकता न आल्याने निराश झालेल्या औरंगजेबाने शेवटचा श्वास घेतला ते अहमदनगर.
संभाजीपुत्र शाहूंना ज्या किल्ल्यात कैदेत ठेवलेलं होत ते अहमदनगर.
शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज ह्यांचा निर्घृण खून झाला ते अहमदनगर शहर.
इथलं वातावरण धातुकाम करायला योग्य आहे म्हणून इथे त्याकाळात देशातल्या सर्वोत्तम तोफांची निर्मिती झाली, त्या भागाला आजही तोफखाना नाव आहे.
जिथ नेहेरू-पटेल-मौलाना आझाद आणि इतर अनेक नेते १९४२ च्या आंदोलनाची हाक दिल्यावर तुरुंगवासात होते ते ,
जिथ “ भारताचा शोध “ हा ग्रंथ नेहेरुनी लिहिला ते ,
जिथ गांधीजींच्या खुनाचा कट रचला गेला ते ,
जिथ पटवर्धन बंधूनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला ते अहमदनगर.
अहमदनगर-पुणे ही राज्यातली पहिली एसटी बस स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली ते अहमदनगर.
बरावाईट असा इतिहास असलेल अहमदनगर.
भौगोलिक दृष्टीने अतिशय उत्तम हवामान असलेल शहर ब्रिटीश काळाच्या आधीपासून लष्करी छावणी म्हणून नावाजलेल आहे.
इथली सलाबतखानाची कबर असलेली इमारत जी चांदबीबी महाल म्हणून ओळखली जाते तिची समुद्रसपाटीपासून उंची जवळपास माथेरानइतकी आहे.
ब्रिटीशकाळापासून नगरला लष्करी महत्व आलेल आहे.मध्यवर्ती ठिकाण, दळणवळण सोयीचे ह्यामुळे अहमदनगरला वाहन संशोधन विकास केंद्र, रणगाडा दल, चिलखती दल, बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट, यांत्रिकी पायदळ प्रशिक्षण संस्था,खारे-कर्जुने ( केके रेंज ) हे युद्धसराव आणि प्रात्यक्षिक केंद्र अश्या अनेक संस्था शहराच्या भवताली उभ्या राहिल्यात.
दीडशे वर्षापेक्षा जून संपूर्ण दगडी बांधकाम आणि तत्कालीन सागवानी फर्निचर उत्तम असलेलं माणिक चौकातील ह्युम मेमोरियल चर्च , मुक्तीफौजेच रुग्णसेवेला समर्पित असलेलं बूथ हॉस्पिटल , ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ' हे टिळकांचे भाषण झाले ती इमारत कंपनी , महाराष्ट्रातील मोजक्या जुन्या शिक्षण संस्थापैकी एक असलेली भा.पा.हिवाळे शिक्षण संस्था अहमदनगर शहरात आहे.
हा सगळा बरावाईट इतिहास आणि इतिहासाची कवन भूतकाळ आहेत.
अहमदनगर शहराचा वर्तमान आणि भविष्य मात्र अवघड आहे.
तीन बाजूने लष्करी केंद्र असल्याने वाढीला आणि विकासाला भौगोलिक मर्यादा प्रचंड आहेत.
स्थानिक पातळीवर नेतृत्वाची अनास्था आणि दूरदृष्टीचा अभाव हा रोग तर गेली चाळीस पन्नास वर्षे पोखरतोय.
आधी नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका, सत्ताधारी म्हणजे सोयरेपक्ष आणि सत्ताधारी कुणीही असले तरी ठेकेदार तेच असल चित्र.
चांदबीबी घोड्यावर बसून पुन्हा आली तरीही शहरातले रस्ते चुकणार नाही हा विनोद आम्ही निर्लज्जपणे सांगतो ह्यातच सगळ आलय.
नियम पाळण्याच आणि नगरकरांचा दुरान्वये संबंध नाही त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी,बेशिस्त वाहतूक आणि मरणारी माणस ह्याचीही लाज वाटत नाही.
ह्या उदासीनतेचा परिपाक म्हणून एमआयडीसी सुरुवातीपासून कुपोषित आहे.जुने उद्योग बंद पडले,नवीन येत नाहीत, आलेतरी राजकीय दबावाला कंटाळून पळून जातात, रोजगारनिर्मिती नाही पर्यायाने बाजारपेठ मर्यादेपलीकडे वाढत नाही ह्या दुष्टचक्रात शहर अडकलेल.
यथा राजा तथा प्रजा किंवा उलट वाचा, आम्ही नालायक आहोत म्हणून राज्यकर्ते तसे मिळतात कि आम्हाला पर्याय उपलब्ध होत नाही म्हणून आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून वीट डोक्यात हाणून घेतोय कुणास ठाऊक.
आमचीच प्रवृत्ती संकुचित आहे. राज्यकर्त्यावर अंकुश ठेवण्याची, जाब विचारण्याची मानसिकता नाहीये, त्यामुळे नगरसेवक,पदाधिकारी सार्वजनिक कामापेक्षा व्यक्तिगत कामांना प्राधान्य देतात आणि निवडणुका जिंकून मोकळे होतात.
अहमदनगर शहराचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नेमकं मध्यवर्ती असलेलं. पुणे - औरंगाबाद-बीड-नाशिक अवघ्या १२५-१५० किलोमीटर टप्प्यात आणि मुंबई ३००किलोमीटर.
औरंगाबाद-अहमदनगर-पुणे अशी थेट रेल्वे सुरू झाली तर पुणे शहरावर असलेला ताण कमी होईलच शिवाय अहमदनगर आणि औरंगाबाद या शहरांच्या बरोबर मराठवाडा मध्य महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर लागेल.
आश्वासन भरपूर मिळतात मात्र स्थिती बदलत नाही.
बाकी सामान्य नगरकर हेही दिवस जातील ह्या आशेवर जगत असतोय.
https://www.facebook.com/anand.shitole/posts/4152229494797354
अहमदनगर शहर

सलाबतखान दुसरा यांची कबर (चांदबीबी महाल)
शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकीर्दीत सलाबतखान महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला.
सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे 20 फूट रूंद आहे.या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे.

दमडी मशीद
अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित, इ. स. 1567 मध्ये साहिर खाननी दमडी मशिदीची स्थापना केली. मशिदीचा विस्तृत आकार आणि शिलालेख यासाठी प्रसिध्द आहे. येथे युरोप लोकांची आणि इतर लोकांची कबरे आहेत. मुगल पुरातन वास्तू – दमडी मशिदीची प्रतिकृती आहे गुजरातमध्ये आढळते.

कोटला 12 इमाम
उल्लेखनीय मशिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात.इ.स 1536 मध्ये बुर्हान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली होती. बुरहान शाहने मशिदी शाह ताहिरच्या ताब्यात दिली आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात आली.
कुंपणाची भिंत (91 * 91 मीटर) दगड आणि चुना या पासून तयार केलेली आहे.पूर्वेस व दक्षिण बाजूला दोन दरवाजे आहेत. बारा इमामांचा कोटाला निजामशाही वास्तुकलाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे, जो त्याच्या कोरलेल्या आणि सजावलेल्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे.यात तीन आयतांचे एकच प्रार्थना सभागृह आहे, प्रत्येकी पाच पाट्या खोल आहे आणि त्यावर सपाट छत आहे. समतोल वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम कारागिरीचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

कोट बाग निजाम
बहमनी राजाचा सूड घेऊन उध्वस्त करण्यासाठी ज्याने अविश्वासाचा प्रयत्न केला आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अहमद निजामशाह, आता मलिक अहमद म्हणून स्वतःला म्हणतात, त्याने दौलताबाद नष्ट करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरच्या 75 मैलांवर दक्षिण-पश्चिम असलेल्या दौलताबादच्या काही अंतरावर येण्यासाठी त्यांनी अहमदनगरला पुण्याजवळील जुन्नर येथून आपले मुख्यालय हलविले. 1494 मध्ये सिना नदीच्या डाव्या काठावर अहमदनगर शहराची स्थापना झाली. शहराच्या मध्यभागी बाग निजाम होता (विजयाची बाग). 1499 मध्ये, मलिक अहमदला त्याचा सूड त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर कब्जा केला आणि बहामन साम्राज्याचा नाश केला. या दुसऱ्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी बाग निजाम भोवतीची भिंत उभारली. बाग निजाम नंतर अहमदनगर किल्ला बनला.

बाग रौझा
हे ऐतिहासिक स्मारक, काळ्या दगडांनी बांधलेले, अहमद निजामशाह यांचे निवासस्थान होते. हे ठिकाण एकेकाळी अहमद निजाम शाह यांचे एक घर होते. हे 16 व्या शतकात राजा निजामी यांनी बांधले होते. ही संपूर्ण स्मारक काळ्या दगडापासून बनलेली आहे जी दिल्ली गेटच्या अगदी जवळ आहे. पर्यटक इथे भेटायला येतात तेव्हा, जवळच एक दगड स्मारक असे म्हटले जाते की, 1565 मध्ये विजयनगर राजाच्या विरोधात तलकिटच्या युद्धात स्वतःला ओळखणारे एक राजघराण्याचे गुलाम अली याचे आहे. गुलाम अली तिसरे निजामशाहच्या काळात होते.

फरिया बाग पॅलेस
हे स्थान निजामशाहचा मुलगा बुरहान शाह,जो सातव्या वर्षी 1508 मध्ये सिंहासनावर बसला होता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला. हे महल प्राचीन काळातील कला व संस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपात केले जाते. येथे एक मोठे घुमट-आकार असलेले हॉल आहे. निजाम शाही राजा या राजवाड्यात शतरंज खेळत होते.

अहमदनगर भुईकोट किल्ला
या किल्ल्याला 500 वर्षांचा इतिहास असून निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशाहाने शहर वसविण्यापूवी इ.स.1490 मध्ये किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ 1 मैल 80 यार्ड इतका असून किल्ल्यास 22 बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात इ.स.1832 मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला, अजूनही त्याचे अवशेष बाकी आहेत.

चौथा रेजीमेंट अहमदनगर, 1841
मुघल काळानंतर मराठा साम्राज्याचा अर्धा शतक 1803 मध्ये वेलिंग्लीच्या ड्यूक ऑर्थर वेलेस्ली यांनी अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला, परंतु ते पेशवेला दिले. 1817 साली ब्रिटिश लष्करींनी अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते राहिले. 1830 साली, ब्रिटीश सैन्याने अहमदनगरला पोहचण्यास सुरुवात केली, जी पूर्णत: ब्रिटिश सैन्याची गाडी बनली. 184 9 साली स्थानिक शेतकर्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की बार्ट प्रॅक्टिस घेऊन आर्टिलरी युनिट्सनी त्यांची शेती नष्ट केली जात आहे. कलेक्टरांनी त्यांच्याकडून कब्जा केलेली जमीन ताब्यात घेण्यास सेनाला विचारले. 1849 ते 1852 पर्यंत ब्रिटिशांनी किल्ल्याभोवती 400 एकर जमीन हस्तगत केली आणि कॅन्टोनमेंटची निर्मिती सुरू केली. 1889 मध्ये अहमदनगर गॅझेटियर मध्ये प्रकाशित केलेल्या विस्तृत खात्यांनुसार, फील्ड आर्टिलरी, युरोपियन इन्फंट्रीतील आमच्या कंपन्या आणि इंडियन इन्फंट्रीची एक कंपनी अहमदनगर येथे ताब्यात घेण्यात आली होती. 1913 साली 500 घोडेससाठी एक स्मृती डिपार्ट स्थापन करण्यात आले. 1897 मध्ये, अहमदनगरमध्ये एकूण 559 एकर जमीन लष्कराला प्राप्त झाली होती.

सेंट जॉन कॅथलिक चर्च
सेंट जॉन कॅथलिक चर्च हे ब्रिटीश काळाशी संबंधित आर्किटेक्चरचे उत्कृष्ट प्रदर्शन आहे. अठराव्या शतकात अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने सैनिकी युनिट तैनात करण्यात आले होते परंतु त्यांच्या पवित्र पुनरुज्जीवनसाठी त्यांचे जवळचे कोणतेही स्थळ नव्हते, अगदी केरकीहून परत येणारे पॅडरही होते. शेवटी अखेरीस सैनिकांना ब्रिस्टर्सने चर्च बांधले. ऐतिहासिक स्मारक असल्याने, सेंट जॉन्स चर्च हे अहमदनगरचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. चर्च रजिस्टरानुसार, 1817 मध्ये या ठिकाणी आगमन करण्यासाठी ऑक्सिलीरी हॉर्सेड कॅव्हलरी हे पहिले ब्रिटिश सैन्याची युनिट होते. नंतर 1830 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत एक मोठी सैन्याची संख्या पाठविली गेली आणि हे ठिकाण एक मोठे छावणी बनले.
चर्चच्या दफनभूमीत आपल्याला अहमदनगरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश सैन्याचे अनेक कबर सापडतात. दक्षिण-पूर्वेकडे रोमन कॅथलिक चर्च आणि एपिस्कोपलियन चर्च हे आणखीन दोन चर्च येथे जवळच आहेत.सेंट जॉन्स कॅथलिक चर्च हे अहमदनगरच्या बाहेरील भागात भिंगार येथे आहे.

औरंगजेब कबर
खुलताबाद गावात स्थित असलेला औरंगजेब महान मुगल सम्राटांचा शेवटचा होता. 1680 च्या सुमारास शिवाजी महारांजाच्या मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब संपूर्ण दख्खन साम्राज्य जिंकला आणि त्याच्या राजवटीखाली आणला. त्यांनी आपले राज्य भिंगार जवळ स्थापन केले आणि 1707 सालात वयाच्या 91 पर्यंत तेथेच ते राहिले. येथे त्यांना दफन करण्यात आले . त्याच कबर परिसर मध्ये, औरंगजेबचा दुसरा मुलगा, आझम शाह, आणि त्याची पत्नी यांचे समाधीही आहे.

लष्कर दल मुख्यालय
1921 मध्ये, सहा कार कंपन्या येऊन 1924 मध्ये रॉयल टँक कॉर्प्स शाळाची स्थापना रॉयल टँक कॉर्प्सच्या प्रशासकीय कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर येथे करण्यात आली.

आनंद धाम
अहमदनगरची जमीन या भूमीवर जन्मलेल्या अनेक संतांनी पवित्र केली आहे. त्यापैकी एक जैन संत श्री आनंद ऋषिजी महाराज आहेत. पोस्टल विभागातर्फे रु. 4 / – आचार्य आनंद ऋषिजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुद्रांक छापलेले आहे. आचार्य आनंद ऋषिजी महाराज हे असे एक संत होते, ज्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्यांच्या अनुयायांना त्यांच्या अध्यात्मिक मार्गदर्शनाप्रमाणे विपुल व महत्त्वपूर्ण होते. त्यांचा जन्म 1900 साली शिरल चिंचंदी, अहमदनगर येथे झाला आणि 13 व्या वर्षी रतन ऋषिजी महाराज यांच्याकडून दीक्षा मिळाली आणि अशाप्रकारे त्यांनी स्वतःला आध्यात्मिक उपक्रमातील जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून आत्मसात केले. त्याच्या शिकवणुकींमध्ये प्रेम, अहिंसा आणि सहनशीलतेमध्ये खोलवर रुजलेली होती. ते नऊ भाषांमध्ये प्रवीण होते आणि त्यांनी मराठी व हिंदी भाषांतून मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांनी अनेक शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांची स्थापना केली आणि अनेक आरोग्य संस्थांची पुनर्रचना केली आणि नियतकालिकांची स्थापना केली. 1965 साली त्यांना “आचार्य” हे नाव देण्यात आले आणि 1992 मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला.आनंद धाम त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आला.

अहमदनगर ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र
अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयमध्ये या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र , जर्मनीची साखळी नसलेली सायकल , तांत्रिक गणपती, संस्कृत – मराठी शब्दकोश, 200 फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची काही आकर्षणे आहेत.
(गुरुवारी, संग्रहालय बंद राहते. इतर दिवशी, भेट देण्याची वेळ – सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत.)

कवलरी टँक संग्रहालय
टैंक संग्रहालयमध्ये, ब्रिटीश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टँक संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन 1994 मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. आशियातील एकमेव संग्रहालय आहे .अनेक राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे येथे ठेवलेले आहेत. येथे 40 देशांतील टँकदेखील प्रदर्शित केले गेले आहेत जे अद्वितीय आहेत.

मेहेर बाबा समाधी
मेहेर बाबा (फेब्रुवारी 25, इ.स. 1894 – जानेवारी 31, इ.स. 1969) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. 1954 मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.
बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.

शुक्लेश्वर मंदिर, भिंगार
हे मंदिर हजारो वर्षांपूर्वीचे आहे. हे रामायण काळापासून आहे. भृगु ॠषींचे शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती. नानासाहेब पेशवे यांच्या आदेशानुसार सदाशिवभाऊ हे पानिपतची लढाई लढण्यासाठी निघत होते. या घटनेचे स्मरण करून शुक्लेश्वर मंदिराचे पुनर्विकास करण्यात आले. 1757 मध्ये हैदराबादच्या निजाम यांनी नगरच्या किल्ल्याला भेट दिली व शुक्लेश्वर मंदिरासमोर बेलभंदरची मूर्ती बांधली. विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कदंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे.

नृसिंह मंदिर
नगरपासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर भातोडी गाव येथे सुमारे 400-450 वर्षे जुन्या तलावाच्या जवळील कलावंतीण महल, एकंगबाबी मैदान आणि प्रसिद्ध नृसिंह मंदिर आहेत. येथे नृसिंह पुतळ्याऐवजी तांडला आहे.
चांदबिबीचा महाल
अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्याला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल नावाने ओळखली जाणारी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. तो चांदबिबीचा म्हणून ओळखला जात असला, तरी तो मूळचा सलाबतखानाचा महाल आहे.
सलाबतखान हा निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह याचा मंत्री होता. त्याचे मूळ नाव शाह कुली. सलाबतखान ही निजामाने त्याला दिलेली पदवी. त्याने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.
अहमदनगर ही निजामशाहीची राजधानी. नगर हा पठारी प्रदेश. लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा. त्यामुळे येथे राजधानी उभारण्यात आली. शहराच्या संरक्षणासाठी आजूबाजूला अनेक बांधकामे उभारण्यात आली. त्यातीलच एक म्हणजे हा महाल असे मानण्यात येते. हा महाल अशा ठिकाणी आहे, की जेथून अहमदनगरकडे चाल करून येणारी फौज सहज दिसू शकते. या महालाचे दुसरे नाव दुर्बिण महाल असेही आहे, हे येथे लक्षात घेण्याजोगे आहे.
काहींच्या मते ही सलाबतखानाची आराम फर्मावण्याची जागा होती. दौलताबाद हा सलाबतखानाचा आवडता किल्ला. त्याचे सतत दर्शन व्हावे या हेतूने या महालाची उंची वाढविण्याचा त्याचा इरादा होता. पण तत्पूर्वीच (१६१९?) त्याचे तळेगाव-दाभाडे येथे निधन झाले. मोगल परंपरेनुसार या महालात, तळघरामध्ये सलाबतखानाने आपल्या कबरीची व्यवस्था आधीच केली होती. त्याप्रमाणे तेथे तो व त्याची पत्नी चीरनिद्रा घेत आहेत. त्या दोघांच्या कबरी तेथे आहेत. शिवाय तळघरातच, जरा बाहेरच्या बाजूला त्याची दुसरी पत्नी, मुलगा आणि एका कुत्र्याची कबर आहे.
http://ahmednagar-tourism.blogspot.com/2013/02/blog-post_599.html
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अनेक छोट्या गावात प्राचिन कलाकुसर केलेली मंदिर आहेत. एकेकाळी त्याकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिर आज आडबाजुला पडली आहेत. प्राचिन काळी घाटवाटांचे/ व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले तशीच त्याकाळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गांवर मंदिरांचीही निर्मिती केली. या मार्गांवरुन प्रवास करणार्या व्यापारी तांड्यांची, पांथस्थांची विश्रांतीची राहाण्याची सोय या मंदिरात होत असे. व्यापार्यांनी केलेल्या दानामुळे या मंदिरांचा दैनंदिन खर्च आणि डागडुजीची कामे होत अशी परस्पर पूरक रचना होती. इसवी सनाच्या बाराव्या शतकात टाहाकारीच्या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केली असावी.
![]() |
| हेन्री कौसेन्स यांनी १८८० मधे काढलेला मंदिराचा फ़ोटो. |
| Tank Museum Ahmednagar, Maharashtra |
पहिल्या महायुध्दात रणगाडा या अदभुत वहानाच्या शोधाने अनेक युध्दांचे निकाल बदलले. कुठल्याही पृष्ठभागावरुन आग ओकत जाणार्या या वहानाने पायदळात महत्वाचे स्थान पटकावले. भारतीय युध्द इतिहासातही रणगाड्यांनी महत्वाची भूमिका बजावलीय. एकेकाळी विदेषी बनावटीचे रणगाडे वापरणारा आपला देश आज स्वत: निर्माण केलेले रणगाडेही वापरतोय. जागतिक आणि भारतीय सैन्यातल्या रणगाड्यांचा चालता बोलता इतिहास आपल्याला आशियातील एकमेव नगर येथील "रणगाडा म्युझियम" मध्ये पाहाता येतो.
| "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" Rolls Royce, Silver Ghost |
| " सेंच्युरीयन टर्ट" Centurion Turt Tank |
रणगाडा म्युझियम मधे प्राथमिक अवस्थेतील रणगाड्यांपासून पहिल्या आणि दुसर्या महायुध्दात वापरलेले ५० च्या वर रणगाडे लष्करी शिस्तीत मांडून ठेवलेले आहेत. पहिल्या चिलखती गाडी पासून आजच्या अद्ययावत रणगाड्या पर्यंतचा प्रगतीचा इतिहास इथे पाहायला मिळतो. म्युझियम मधे शिरल्यावर दोनही बाजूंना " सेंच्युरीयन टर्ट" ठेवलेले आहेत. रणगाड्यावरचा हा तोफ़ असलेला फ़िरता भाग कासवा सारखा दिसतो म्हणुन याला "टर्ट"(ल) म्हणतात. जमिनी वरुन जमिनीवर व जमिनी वरुन आकाशात मारा करण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. रणगाड्यासारखी याला चाक किंवा पट्टे नसतात. त्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी दुसर्या वहानाची मदत घ्यावी लागते. टर्टच्या पुढे रोल्स राईस कंपनीची पहिली चिलखती गाडी (Armoured Car) ठेवलेली आहे. रणगाड्याच्या शोधापूर्वी युध्दभुमीवर वापरण्यासाठी ब्रिटनच्या रॉयल नेव्हल एयर सर्व्हीसेसनी १९१४ साली रॉल्स राईस कंपनी बरोबर "रोल्स राईस सिल्व्हर घोस्ट" या पहिल्या चिलखती गाडीची निर्मिती केली. पहिल्या महायुध्दात या गाडीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला १९४१ मधे गाडीच उत्पादन बंद करे पर्यंत त्यात अनेक बदल केले गेल. भारतात जनरल डायरने जालियनवाला बाग मधे शिरण्यासाठी या चिलखती गाडीचा उपयोग केला होता. "रोल्स राईस सिल्व्हर घोस्टच्या मागे "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" ही १९३४ मधे जर्मनीत वापरात असलेली चिलखती गाडी त्यावरील नाझींच्या उलट्या स्वस्तिकच्या चिन्हामुळे चटकन नजरेत भरते.
| "Schmerer Panzersphah Wagen (8-RAD)" |
| "वॉटर बफ़ेलो" Water Buffalo Tank |
| जमिनीवर आणि पाण्यात चालणारे रणगाडे Sea Lion Tank |
| Bulldog tank captured in India -Pakistan war |
| पाकीस्तान कडून जिंकलेले "चॅफ़ी" रणगाडे |
| "जम्पिंग टॅंक किंवा बख्तावर" |
रणगाडा म्युझियमचा परीसर गर्द वनराईने नटलेला आहे. जागोजागी फ़ुलझाड, कारंजे, लॉन्स ठेऊन परीसर रमणीय बनवलेला आहे. जगोजागी बसण्यासाठी बाक ठेवलेले आहेत. म्युझियम मधे कॅफ़ेटेरीयाची सोय आहे. म्युझियमचे आकर्षण असणारे रणगाडे सुस्थितीत ठेवलेले आहेत. त्यांच्या बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. लष्कराच्या ताब्यात असूनही छायचित्रणास बंदी नाहीये. वर्षभर ९.०० ते ५.०० यावेळात, नाममात्र शुल्कात हे म्युझियम पाहाता येते. तरीही आशियातील या एकमेव रणगाडा म्युझियमला भेट देणार्यांची संख्या तशी कमीच आहे. रणगाड्याच आकर्षण लहान थोरांना सर्वांनाच असत. एखादा दिवस थोडीशी वाट वाकडी करुन नगरच्या रणगाडा म्युझियमला भेट द्यायला काहीच हरकत नाही.
| "व्हॅलेंटाईन ब्रीज" Valentine Bridge Tank |
| "चर्चिल ब्रीज" Charchil Bridge Tank रणगाडा संग्रहालय पण मस्त आहे. |
तुम्ही म्हणताय ती 'सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार' पाहिली. तिचे काही फोटो खाली देत आहे.
इथे प्रत्येक रणगाड्याची माहिती देणारे फलक हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत लावले आहेत पण सदर फोटोत आलेला बोर्ड हिंदी भाषेतला आहे त्यामुळे काही मिपाकरांच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करून ठेवतो 😀
१६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील आशिया खंडातील पहिले (आणि बहुतेक एकमेव) अशी ख्याती असलेले “कॅवलरी टँक म्युझियम” अर्थात ‘रणगाडा संग्रहालय’ पहाण्याचा योग आला.
अहमदनगर - सोलापूर रस्त्यावर शहराच्या ‘इवळे’ परीसरात प्रचंड मोठे क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रवेशाच्या कमानीच्या दोन्ही बाजुंना भारतीय बनावटीचे ‘विजयंता’ रणगाडे ठेवले आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे भर रस्त्यात, उघड्यावर ठेवलेल्या ह्या रणगाड्यांचे आणि कमानीचे फोटो काढण्यास मनाई आहे.
कमानी जवळ तैनात असलेल्या जवाना कडील रजीस्टर मध्ये आपले नाव, गाव, फोन नंबरची नोंद केल्यावर तिथुन सुमारे दिड ते दोन की.मी. अंतरावर असलेल्या संग्रहालयाकडे जाण्याचा आपला मार्ग खुला होतो.
आतल्या रस्त्याच्या दुतर्फाही वेगवेगळ्या बनावटीचे रणगाडे ठेवले आहेत. त्यापैकी काही रणगाड्यांची चालत्या गाडीतून टिपलेली छायाचित्रे-
शक्तीशाली इंजिन, २० सैनीक वाहुन नेण्याचा क्षमता, ३६० अंशातून बाहेर लक्ष ठेवण्याची सोय असलेला आणि जमीनीवरून तसेच पाण्यातुनही जाऊ शकणारा अशी अनेक वैशिष्ट्ये असणारा उभयचर गटातला हा रणगाडा पुर्वाश्रमीचा चेकोस्लोव्हाकिया आणि पोलंडने संयुक्तरीत्या तयार केला होता.
१९६४ मध्ये चेकोस्लोव्हाकिया आणि १९६६ मध्ये पोलंडने वापरात आणलेला हा रणगाडा पुढे भारत, अंगोला, बल्गेरिया, ईजिप्त, ईराक, लिबिया, मोरोक्को आणि सुदान अशा देशांच्या सैन्यदलांत दाखल झाला होता.
‘टोपाझ’ रणगाड्याचा अंतर्भाग -
पार्किंग पासुन सुमारे दीडशे मीटर अंतरावर तिकीट काउंटर असुन
लहान मुलांसाठी ₹ २५/-
मोठ्यांसाठी ₹ ५०/-
फोटोग्राफी साठी ₹ ५००/-
असे तिकिटांचे दर आहेत.
आधुनिक स्वयंचलित रणगाड्यांचा वापर विसाव्या शतकात सुरु झाला असला तरी त्यांचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरु होतो.
रणगाड्याची मूळ संकल्पना पंधराव्या शतकातला सुप्रसिद्ध चित्रकार आणि संशोधक 'लिओनार्दो दा विंची' (Leonardo da Vinci) ह्याने सर्वप्रथम मांडली होती आणि चिलखती वॅगन वर तोफ बसवून रणगाडा सदृश्य वाहन तयार करून पहिल्यांदा त्याचा प्रत्यक्ष रणभूमीवर वापर करण्याचे श्रेय पंधराव्या शतकातला पराक्रमी चेक जनरल 'जन जिझका' (Jan Zizka) ह्याला जाते.
रणगाड्यांचा इतिहास दर्शवणारा फलक-
1994 साली लष्कराचे तत्कालीन जनरल बी. सी. जोशी ह्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या ह्या संग्रहालयात चाळीस-पंचेचाळीस रणगाडे आणि काही रणगाड्यांच्या प्रतीकृती, त्यांचे फोटोज व भारतीय सेनेच्या पराक्रमाची गौरवशाली गाथा दर्शवणाऱ्या दोन गॅलरीज इथे आपल्याला बघायला मिळतात.
सुरुवातीला प्रत्येक रणगाड्याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आणि त्यांची वैशिष्ट्ये समज़ुन घेण्यात बराच वेळ घालवत होतो पण घरच्या मंडळींना वेळेचे भान होते (आणि त्यांना भुकही प्रचंड लागली होती) त्यामुळे पुढचे काही रणगाडे आणि गॅलरीज बघण्याचा कार्यक्रम घाईघाईने उरकावा लागला.
तिथे पाहीलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण रणगाड्यांचे फोटो + माहिती आणि बाकीच्यांचे फक्त फोटोज खाली देत आहे.
डिसेंबर १९१४ मध्ये रोल्स रॉइसच्या ‘सिल्व्हर घोस्ट’ ह्या कारचे रूपांतर चिलखती वाहनात केले गेले आणि हे त्या काळातील सर्वात यशस्वी आर्मर्ड कॉर्प्स वाहन ठरले.
पहिल्या महायुद्धात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. ह्या चिलखती वाहनाचे पराक्रम फ्रान्स, इजिप्त, पूर्व आफ्रिका आणि रशियामध्ये युद्धकाळात पाहायला मिळाले. दोन्ही महायुद्धांच्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत पोलिस दलासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ह्या वाहनाचा वापर केला जात असे.
१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी जनरल डायरने ह्याच कारचा उपयोग केला होता असे म्हणतात.
१९२० मध्ये तिचे इंजिन अपग्रेड केले गेले आणि स्पोक व्हील्सच्या ऐवजी डिस्क व्हील्स बसवण्यात आली.
१९२१ मध्ये त्यावर टरेट (Turret) बसविण्यात आले आणि त्यात मशीन गन बसवण्यात आली होती ज्याला व्हिकर म्हणतात, तसेच मागील चाकांचा आकार मोठा करण्यात आला. तिच्या टरेट मधुन आत बसलेल्या क्रूला पुढे असलेल्या क्षेत्राचे दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर लहान छिद्रे ठेवली आहेत.
६ सिलेंडरचे पेट्रोल इंजिन बसवण्यात आलेल्या ह्या कारची वेगमर्यादा ताशी ४५ कि.मी. होती.
शत्रूने पेरलेले भुसुरुंग नष्ट करत मागून येणाऱ्या सैन्याचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश आर्मीसाठी 1944 साली विकसित करण्यात आलेला 'शर्मन क्रॅब' हा अवाढव्य आकाराचा रणगाडा मला फारच आवडला, बाहुबली सिनेमातील भल्लालदेवचा फिरती पाती बसवलेला रथच आठवला एकदम.
हा रणगाडा समोरून येताना पाहून शत्रू सैन्याची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना त्याचे अक्राळ विक्राळ रूप बघूनच येते.
शत्रूपक्षाने जमिनीत पेरलेले भुसुरुंग उखडून पुढे फेकून देण्यासाठी किंवा त्यांचा जाणीवपूर्वक स्फोट घडवून आणण्यासाठी ह्याच्या पुढे 'mine flail' उपकरण बसवले असून त्याच्या फिरत्या ड्रमला खालच्या टोकाला लोखंडी गोळे असलेल्या जमिनीपर्यंत लोंबकळणाऱ्या दणकट साखळ्या जोडलेल्या आहेत. ह्याची मजबुती एवढी आहे की पुढे भुसुरुंगाचा स्फोट झाला तरी ह्याचे काही नुकसान होत नसे.
ह्या रणगाड्याची काही वैशिष्ट्ये -
उत्पादक : ब्रिटन
वापरकर्ते: ब्रिटन, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा
लांबी: 6.6 मीटर
रुंदी: 2.62 मीटर
उंची: 2.74 मीटर
वजन: 31.6 टन
कमाल वेग: ताशी 40 किमी आणि डी-माइनिंगचे काम सुरु असताना ताशी 1.5 किमी
मुख्य शस्त्रास्त्र: एक 75 मिमी तोफ
दुय्यम शस्त्रास्त्र: सह-चालकासाठी एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन आणि टरेट मधून आणखीन एक ब्राउनिंग 7.62 मिमी मशीन गन
इंजिन: 6 सिलेंडरचे पेट्रोल इंजिन
क्रू सदस्य : 5 (कमांडर, गनर, रेडिओ ऑपरेटर, चालक, सह-चालक)
ह्या रणगाड्याच्या रिमोट कंट्रोल्ड मॉडेलचा खाली एम्बेड केलेला युट्युब वरील व्हिडीओ बघून त्याच्या कार्यशैलीची थोडीफार कल्पना येते.
आधीच्या 'चर्चील' रणगाड्यात काही सुधारणा करून 1942 साली तयार करण्यात आलेला 'चर्चील ब्रिज लेयर' हा रणगाडा म्हणजे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. हायड्रॉलीक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ 2 मिनिटात 30 फूट लांबीचा अतिशय मजबूत पूल सैन्याला वापरासाठी उपलब्ध करून देण्याची ह्याची क्षमता होती.
दुसऱ्या महायुद्धात इटली आणि वायव्य युरोपमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावणारा हा रणगाडा 1960-1961 पर्यंत सेवेत होता.
ह्या रणगाड्याचे कार्य कशापद्धतीने चालायचे हे खालील छोट्याशा व्हिडीओत पाहता येईल.
ब्रिटनच्या 'ब्रिटिश व्हिकर्स लिमिटेड' कंपनीने 1963 मध्ये विजयंताचे प्रोटोटाईप तयार करून दिल्यावर त्यात काही सुधारणा करून चेन्नईजवळील आवडी येथील हेवी व्हेईकल फॅक्टरीमध्ये ह्या रणगाड्यांचे उत्पादन सुरु झाले. संपूर्णपणे भारतीय बनावटीचा पाहिला रणगाडा अशी 'विजयंता' ची ओळख आहे.
ताशी 50 किमी वेगाने चालू शकणाऱ्या ह्या रणगाड्याचे वजन 43 टन होते.
105 मी. मी. ची तोफ आणि मशिनगन्सने सुसज्ज असलेल्या विजयंता रणगाड्यांनी 1971 च्या भारत - पाकिस्तान युद्धात मोलाची कामगिरी बजावली होती.
1966 पासून भारतीय लष्कराच्या विविध चिलखती तुकड्यांत दाखल झालेल्या विजयंता रणगाड्यांना 2004 साली निवृत्त करण्यात आले.
हिटलरच्या नाझी सैन्याकडून प्रभाविपणे वापरली गेलेली अँटी एअरक्राफ्ट गन. हिला FLAK हे नाव 'Flugabwehrkanone' ह्या जर्मन शब्दावरून दिले गेले ज्याचा अर्थ होतो 'aircraft defense cannon'.
30,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवरच्या लक्ष्याचा भेद करण्याची हिची क्षमता होती.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पॅंझर रणगाड्यांनी धडाकेबाज कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले होते त्या पथकातील ही आर्मर्ड कार. हिचा उपयोग मुख्यत्वे शत्रूच्या प्रदेशात शिरून टेहाळणी करणे आणि त्याच्या लष्करी छावण्या, युद्ध सज्जता, रसदीची माहिती मिळवणे ह्या कामांसाठी केला जात असे.
-----
आता ह्यापुढे बाकीच्या रणगाड्यांचे फक्त फोटोज देत आहे. इच्छुक्कांना त्यांच्या बद्दलची तपशीलवार माहिती https://tanks-encyclopedia.com/ ह्या वेबसाईट किंवा विकीपीडिया वर मिळू शकेल.
-----
अशा गोष्टींची आवड असणाऱ्यांनी आवर्जून बघावे असे हे संग्रहालय आहे. तीन ते चार तासांचा वेळ हाताशी असल्यास अगदी व्यवस्थित बघता येईल, आत भरपूर झाडे असल्याने उन्हाचा त्रासही होत नाही. ह्याच संग्रहालयाच्या आवारात 'फरिया पॅलेस' ही प्राचीन वास्तुही आहे परंतु वेळे अभावी आम्हाला ती बघता आली नाही.
ढोकेश्वर मंदिर / लेणी
वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ.
दर्याई आणि वेल्हाई देवी मंदिराबाहेरील वनारसेना.
नगरचे ग्रामदैवत.
"तब्बल ४९ वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने अहमदनगर जवळील भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला.
आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. १६८१ मध्ये सुरू झालेली ही मोहीम १७०७ मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं १६८३ मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी १७०६ मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी १७०७ मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत.
औरंगझेबाने मृत्यूपुर्वी इच्छा व्यक्त केली होती की "आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, त्यानुसार आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्याचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.
बजाज उद्योग समूहात सामिल असलेला फिरोदिया उद्योग समूह मूळचा नगरचा. याच उद्योग समूहाने पुढे दुचाकी क्षेत्रातील क्रांती ठरलेली लुना मोपेड बाजारात आणली जिला नंतर टीव्हीस आणि हिरो उद्योग समूहाकडून स्पर्धा निर्माण झाली. गुटखा किंग धारिवाल उद्योग समूह पण नगरचा. पूर्वी त्यांची ऑइल मिल स्टेशन रोडवर होती. धूतपापेश्वर यांची पनवेल नंतरची फॅक्टरी नगरला होती. त्याच बरोबर वैद्य नानल यांचा आफाली हा आयुर्वेदिक औषधांचा कारखानापण नगरला होता. व्हिडीओकॉनचे धूत नगरचे. त्याच बरोबर पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा फक्त नगरला होती.
व्हीआरडीई हे नवीन वाहनांची चाचणी घेणारे केंद्र चेन्नई नंतर फक्त नगर येथे आहे.
लखनौला असलेला बडा इमामचे एक पिठ नगरला आहे त्याला स्थानिक भाषेत बारा इमाम म्हटले जाते. तसेच बुर्हाण नगर येथील मंदिर हे तुळजापूरचे पिठ समजले जाते.
नगरचा रामप्रसाद चिवडा हा पुण्यातील लक्ष्मीनारायण चिवड्याइतकाच जुना आणि दर्जाने काकणभर जास्तच चांगला असा चिवडा आहे.
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.
रेहेकुरी : निसर्गसौंदर्याच्या दिठीतून...
भारताला लाभलेल्या जैवविविधतेमुळे विविध प्रकारचे प्राणी-पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. सह्याद्रीच्या रांगांमधलं निसर्गसौंदर्य जसं मनमोहक आहे, तसंच विदर्भातल्या जंगलांमधलं निसर्गसौंदर्यही वेड लावणारं आहे. तीच बाब माळरानांचीही.
या माळरानांकडे निसर्गसौंदर्याच्या दृष्टीनं पाहिलं तर या त्यांची सुंदरता लक्षात येईल. ती ओसाड वाटणार नाहीत. इथली जैवविविधता या सुंदरतेकडे पाहण्यासाठी उपयोगी पडेल. आज अशाच एका सुंदर जंगलाची माहिती घेऊ या. हे जंगल म्हणजे रेहेकुरी काळवीट अभयारण्य. नगर जिह्यातलं हे अभयारण्य सन १९८० मध्ये अस्तित्वात आलं. कर्जत तालुक्यातील २१७.३१ हेक्टर जंगलाला ‘देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्य’ असं नाव देण्यात आलं. नावावरून लक्षात आलंच असेल की ‘काळवीट’ या सुंदर प्राण्याच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य आहे.
काळवीटाला कृष्णमृग असंही म्हणतात. हा एक देखणा प्राणी आहे. तो कळपानं राहणारा असून एका कळपात १० ते ३० काळवीट असतात. गवताळ व खुरटी झुडपं असलेल्या क्षेत्रात प्रामुख्यानं काळवीटांचं अस्तित्व आढळतं. घनदाट तसंच डोंगराळ जंगलात राहण्याचं काळवीटं टाळतात. प्रौढ नराच्या पाठीचा रंग राखाडी किंवा पूर्ण काळा आणि पोटाकडील भाग पांढरा असतो. नराची लांबी १२० ते १३० सेंटिमीटर व उंची खांद्याजवळ ८० सेंटिमीटर आढळते.
माद्या नरापेक्षा लहान असतात आणि त्यांना शिंगं नसतात. त्यांच्या पाठीचा रंग पिवळसर बदामी आणि पोटाचा भाग नराप्रमाणेच पांढरट असतो. नरांना पीळदार आणि डौलदार शिंगं असतात. काळवीट हा वेगानं धावणारा प्राणी आहे. त्याचं आयुष्यमान असतं अंदाजे १२ ते १५ वर्षं.
काळवीट हा हरणांच्या ‘कुरंग’वर्गातील प्राणी आहे. हरणांमध्ये ‘सारंग’ आणि ‘कुरंग’ ही दोन उपकुळं असतात. या उपकुळांत काळवीट, नीलगाय, चिंकारा, चौशिंगा आदी प्रजातींच्या हरणांचा समावेश होतो. कुरंग हरणांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिंगं. ही शिंगं सारंग उपकुळातील हरणांच्या शिंगांपेक्षा पूर्णत: वेगळी असतात. ती पोकळ असून हाडाच्या सांगाड्याचा एक भाग असतात. ही शिंगं कधीही गळून पडत नाहीत. याउलट, सारंग प्रजातीच्या हरणांची शिंगं दरवर्षी गळून पडतात आणि नव्यानं येतात. कुरंग प्रजातीच्या हरणांच्या शिंगाला एकच टोक असतं. शिंगाचं आकारमान सारंग हरणांच्या शिंगांपेक्षा बरंच लहान असतं.
काळवीट हा भारतीय संस्कृतीत फार वर्षांपासून असणारा प्राणी आहे. अगदी इसवीसनपूर्व काळातही दगडावर केलेल्या रंगकामात काळवीटाचं चित्र आढळून आलेलं आहे. एकेकाळी भारतीय उपखंडात मोठ्या संख्येनं दिसणारा हा प्राणी अवैध आणि मोठ्या प्रमाणावरच्या शिकारीमुळे कमी होत चालला आहे. सन १९७२ मधील अभ्यासानुसार, भारतीय उपखंडात या प्राण्यांची संख्या चार दशलक्षच्या आसपास होती. सन १९८२ मध्ये रणजितसिंह यांनी केलेल्या अभ्यासानुसार, भारतात २२ हजार ५०० ते २४ हजार ५०० इतकी काळवीटांची संख्या होती, तर २०१० ला झालेल्या गणनेनुसार, नगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत काळवीटांची संख्या दहा हजारहून अधिक होती. सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानं काळवीटांना मिळालेलं संरक्षण आणि वनविभागानं केलेला प्रयत्न यांमुळे काळवीटांची संख्या वाढीस लागली आहे.
शुष्क माळरान असलेल्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात हा प्राणी आढळत असल्यामुळे रेहेकुरीसारख्या जंगलांचं महत्त्व अधोरेखित होतं. रेहेकुरीचं जंगल या प्राण्याच्या संरक्षणासाठी घोषित करण्यात आलं असलं तरी या इथं आणखी एक महत्त्वपूर्ण प्राणी आढळतो व तो म्हणजे भारतीय लांडगा. ‘शुष्क माळरानांचा हा बादशहा’ या जंगलभागातला नैसर्गिक समतोल राखण्याचं मोठं काम करतो. महाराष्ट्रात अतिशय कमी संख्येनं शिल्लक राहिलेल्या या प्राण्याच्या अस्तित्वामुळे रेहेकुरी अभयारण्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. अभयारण्याच्या प्रदेशात १५ विहिरी आहेत. प्राण्यांची पाण्याची गरज
या विहिरींमुळे भागते. या विहिरींच्या पाण्याचा वापर करून वनविभागानंही अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय केली आहे. नाल्यावर घातलेले बंधारे, गवताळ माळरानांच्या वाढीसाठी केलेले प्रयत्न, पावसाचं पाणी साठून राहण्यासाठी ठिकठिकाणी खोदलेले खंदक, वन्यजीवांना आणि जंगलाला दिलेलं संरक्षण या वनविभागाच्या प्रयत्नांमुळे रेहेकुरी अभयारण्याला तर फायदा झाला आहेच; याशिवाय आजूबाजूच्या भागातील जमिनीतील पाण्याची पातळीही सुधारली आहे.
रेहेकुरी अभयारण्यात या माळरानांवर अवलंबून असणारे इतर वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. खुरटी झुडपं, गवताळ प्रदेश, छोटी-मोठी झाडं यांवर अवलंबून असलेले १०० हून अधिक प्रजातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. अभयारण्यात असलेल्या पाण्याच्या जागांच्या आसपास दहाहून जास्त प्रजातींचे उभयचर पाहायला मिळतात. या माळरानांवर अवलंबून असलेलं हे जीवनचक्र पाहताना आणि त्याच्या निरीक्षणाचा आनंद लुटताना भान हरपून गेलं नाही तरच नवल. अशा अनेक जीवांचं आश्रयस्थान असलेले रेहेकुरीसारखे प्रदेश वाचवणं ही आपली गरज आहे.
‘लेसर फ्लोरिकन’सारखा सुंदर पक्षी भारतात असलेल्या या प्रकारच्या माळरानांवरच अवलंबून आहे. अशा अनेक प्रजातींच्या प्राणी-पक्ष्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर रेहेकुरीसारखी जंगलं वाचवावी लागतील. स्थानिक लोकांना या माळरानांचं महत्त्व पटवून देणं, लहान मुलांमध्ये या जंगलांविषयी प्रेम आणि ओढ निर्माण होईल हे पाहणं असे प्रयत्न करावे लागतील.
रेहेकुरी हे अभयारण्य घोषित होण्यापूर्वी या जंगलात १५-२० काळवीटांचा केवळ एक कळप होता. सन १९८० मध्ये अभयारण्य म्हणून मान्यता मिळाल्यापासून काळवीटांना संरक्षण मिळालं. जंगलाच्या आणि माळरानांच्या दर्जात सुधारणा झाली आणि आज रेहेकुरीत वनविभागाच्या प्राणिगणनेनुसार, सुमारे ४५० पेक्षा जास्त काळवीटं पाहायला मिळतात. जंगलात आजूबाजूच्या भागातून येणारी भटकी कुत्री ही या काळवीटांना असलेला मोठा धोका आहे.
वनविभागानं या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या जंगलाचं आणि इथं मोठ्या संख्येनं आढळणाऱ्या काळवीट, लांडगा यांसारख्या प्राण्यांचं संरक्षण-संवर्धन करायचं असेल तर माळरानांचं संरक्षण-संवर्धन हा एकमेव मार्ग आहे. याकडे केवळ ‘ओसाड भूप्रदेश’ यादृष्टीनं बघून चालणार नाही. या भागात दडलेली सुंदरता, जैवविविधता पाहून त्यादृष्टीनं प्रयत्न करायला हवेत, तरच ही जंगलं आणि त्यांत असलेली जैवविविधता वाचवता येऊ शकेल. त्यासाठी आपली दिठी अर्थात् दृष्टी स्वच्छ करणं आणि निसर्गाच्या नजरेतून या जंगलांकडे पाहणं हेच आवश्यक आहे, अन्यथा ही सुंदर माळरानं कधी भकास होतील हे सांगता येणार नाही.
कसे जाल?
पुणे/मुंबई-भिगवण-राशीन-कर्जत-रेहेकुरी.
भेट देण्यास उत्तम कालावधी :
ऑक्टोबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्ट.
काय पाहू शकाल?
सस्तन प्राणी : काळवीट, भारतीय लांडगा, वटवाघळांच्या काही प्रजाती, खवल्या मांजर, मुंगूस, जवादी मांजर, साळिंदर, रानससा, वानर, कोल्हा, खोकड, रानडुक्कर, काळवीट इत्यादी.
पक्षी : टकाचोर, हळद्या, नाचण, पिंगळा, दयाळ, सोनपाठी सुतार, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, माळ टिटवी, नकल्या खाटीक, तुईया, पावशा, चातक, गायबगळा, भारद्वाज, सातभाई, रानभाई, राखी वटवट्या इत्यादी.
सरपटणारे प्राणी : घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, नाग, फुरसे, मण्यार, घोणस इत्यादी.
वृक्ष : अर्जुन, बहावा, बाभूळ, बेल, बोर, चंदन, चिंच, धामण, जांभूळ, करवंद, खैर, मोवई, नीम, पळस, पांगारा, पिंपळ, सालई, तेंदू, वड, उंबर, आपटा इत्यादी.
झुडपं : लोखंडी, मुरुडशेंग, निरगुडी, रुई, तरोटा, रानतुळस इत्यादी.
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
मेहेराबाद
मेहेराबादला आज पहिल्यांदा गेल्यावर अगदी असं वाटलं की “तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी” किंवा ही वेळेची/काळाची परिपक्वता म्हणावी लागेल.सहसा आपण वयाची परिपक्वता म्हणतो ,पण मला वेळेची परिपक्वता हा शब्द जरा योग्य वाटतो.नाहीतर एव्हढी वर्ष मी का नाही गेले तिथे?असो....
https://avatarmeherbabatrust.org/
मेहेरबाबा जन्म (२५ फेब्रुवारी १८९४; - ३१ जानेवारी १९६९) हे अध्यात्मिक अवतार होते. बाबांनी आजन्म वंचितांची सेवा केली.बाबांच्या साधनेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे १९२५ पासून देहत्यागापर्यंत त्यांनी बाळगलेले मौन ! शांततेत धर्माची मुळे आहे आणि तिच्याशी शांततेने संवाद साधता येऊ शकतो अशी बाबांची धारणा होती. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत.अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे काम अनेक क्षेत्रात असून विविध कार्यक्रम राबविले जातात.वर्षातून तीन दिवशी येथे उत्सव असतो आणि जगभरातून त्यांचे अनुयायी येथे येतात.
प्रथम दर्शनी आपल्याला दिसतो मेहेर पिलीग्रीम रित्रिट उंच दगडी वास्तू!पुढे गेल्यावर आहे मेहेर बाबांची समाधी स्थळ.भक्कम अशी दगडी छोटीशी वास्तू जिच्या वरती घुमत असून त्यावर वेगवेगळ्या धर्मांच्या चिन्हाचे छोटे बुरुज आहेत.जी सध्या बंद आहे.बाहेरून दर्शन घेता येते.बाबांच्या आजूबाजूलाच त्यांच्या मंडळींची(विविध शिष्यगण )यांच्याही संगमरवरी दगडातील समाधी आहेत .नन्तर पुढे बाबांची रसोई,टीन शेड उजवीकडे आहे. तिथे आम्हांला योगायोगाने trusty भेटले.जे वयाने खूप वृद्ध होते आणि व्हीलचेअरवर होते.नुकत्याच त्यांच्या केअर टेकरने त्यांना औषधे दिली होती.माझ्या लहान मुलीला पाहताच त्यांनी आम्हाला थांबवले आणि मेहेर बाबांचा छोटा फोटो भेट म्हणून तिला दिला.
सगळीकडे हिरवाई आणि शांतता !हा तुकडा जणू बाहेरच्या गर्दीत हवेत तरंगतो आहे असे वाटलं.फेरफटका मारताना अनेक विदेशी अनुयायी दिसले.सध्या श्रावणात हा परिसर अतिशय मनमोहक झालाय .माझ्या डोळ्यांचे खरच पारणं फिटले.असच भटकत राहिलो तर पुढे संस्थेचीच रोपवाटिका पाहिली.विविध औषधी ,फुलांची रोपं तिथे बनवून या मोठ्या जागेत लावली जाते.सागाची मोठमोठाली झाडे बहराने फुलून गेली होती. नांगरलेल शेत,पाण्याने भरलेल्या विहिरी आणि निस्सीम शांतता !अमूर्त!मध्येच एका मोरपंखी , लांब चोच असणाऱ्या इवल्या पक्षाने दर्शन दिले !
जातांना मुख्य रोडला लागवाल्यावर मेहेरागड आहे जिथे बाबा राहायचे,त्यांची धुनी आहे.पण तो बंद होता.आता नेहमी जमेल तसं इथे डोकावणार आहेच तेव्हा पुढल्यावेळी तिथे गेल्यावर याबद्दल लिहीन.
१.मेहेराबाद आराखडा
२.मेहेरबाबा समाधी
३.
४.
५.
६.
खाली दिलेलं संकेतस्थलावर मेहेराबादला कसे पोहचायचे ,राहण्याची सोय काय,संस्थेचे काम काय ,कसे चालते आणि शांतीदूत मेहेरबाबा यांचे कार्य आणि समाधीस्थळ बांधणी याविषयी संपूर्ण माहिती आहे.
श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर(गणेशखिंड),अहमदनगर
केडगावची रेणुकामाता,अहमदनगर
याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.
१९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.
पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू
ऋषी पराशर यांच्या नावावरून पारनेर हे नाव या तालुक्याला लाभले, असे मानण्यात येते. पारनेर तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील दोन नगरकोट - जामगावचा व पळशीचा नगरकोट याची थोडक्यात माहिती इथे देत आहे. नगरकोट म्हणजे चहुबाजूंच्या तटबंदीच्या आत वसलेले नगर अथवा गाव.
जामगाव नगरकोट – महादजी शिंदे यांचा वाडा
पेशव्यांचे शूर सेनापती आणि इंग्रजांकडून ‘द ग्रेट मराठा’ अशी उपाधी मिळालेले महादजी शिंदे (१७३०-१७९४) यांनी जामगाव येथे हा नगरकोट निर्माण केला. ८०-८५ एकरात एका टेकडीवर दगडी तटबंदी आणि चार वेशींमध्ये याचे बांधकाम आहे.
मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. त्याच्यासमोरच किल्ल्याबाहेर मारुतीरायाची भव्य मूर्ती आहे. या दरवाज्यातूनच पुढे परकोट (वाडा)कडे जाताना वाटेत अनेक जुनी मंदिरे, बांधकामे दिसतात.

वाड्यासमोरील मारुतीराया

जामगाव येथील जुनी मंदिरे

वाड्यात प्रवेशासाठी पुन्हा दोन दरवाजे आहेत. त्यातील सध्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर समोरच चंद्राकृती विहीर नजरेत भरते. विहिरीची खोली १५० फूट असून पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था आहे.
शिंदे यांचे वारस जिवाजीराव शिंदे यांनी रयत संस्थेस हा वाडा बक्षीस दिला आहे, त्यामुळे सध्या येथे शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय सुरू असते.
वाड्यात शिरताच सल्लामसलतीचा एक छोटेखानी दरबार दिसतो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर सुंदर कोरीव नक्षी पाहायला मिळते. कोपर्यात एक खोली आहे, जेथे महादजी शिंदे यांची तसबीर आहे. समोर वाड्याचा मोठा चौक आहे.
महादजी शिंदे यांची तसबीर
जामगाव वाड्याचा चौक
सोप्यातून असलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाता येते. वरील मजल्यावर आकर्षक नक्षी असलेल्या खिडक्यांचे झरोके आहेत. बांधकामातच बनवलेल्या कुंड्याही छान आहेत. शेवटच्या मजल्यावरून सभोवतालचा आकर्षक परिसर नजरेत भरतो.

जामगाव वाडा बांधकामातील कुंडी

वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या २०० मीटर पुढे पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. हेमाडपंथी व इतर दगडी बांधकाम असलेली गणपती व इतर देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्ती विशेष घडवल्या आहेत.
रामेश्वर मंदिर शिखर
मंदिरांच्या दाराखाली विविध कीर्तिमुख आहेत. चाफ्याच्या झाडाखाली निवांत दोन क्षण अद्भुत आनंद वाटला.
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (१)
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख (२)

पळशी नगरकोट - पळशी वाडा आणि विठ्ठल राही रखुमाबाई पुरातन मंदिर
पळशी हे गावदेखील दगडी तटबंदी असलेल्या नगरकोटात वसलेले आहे. याला प्रवेशासाठी चार वेशी (दोन छोट्या व दोन मोठ्या) असून सुस्थितीत आहेत.
किल्ल्याच्या आत तीन जुने वाडे आहेत, त्यातील एक वाडा चांगल्या स्थितीत आहे आणि एक वाडा - पळशीकरांचा वाडा काष्ठशिल्पासाठी परिचित आहे. होळकरांचे दिवाण असलेल्या कांबळे-कुलकर्णी यांनी वाड्याची निर्मिती केली, असे समजले. मूळ मालक सध्या इंदूरला वास्तव्यास आहेत. एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते.
प्रवेश करतानाच लाकडी कोरीव काम असलेल्या दरवाजा दिसतो. वाड्यात आत गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत. अंबारीसह हत्ती, मर्कट, ड्रॅगनसम शिल्प, लाकडी कोरीव मनुष्य मूर्ती, फुलांच्या परड्या अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी आनंद देतात. समोरच्या चौकात जुने भुयारी मार्ग बुजवण्यासाठी दगडी परात, जाते बसवलेले आहेत.
कोपर्यातच जुने पारंपरिक मंदिर आहे. मंदिराचे दार आणि पुढील आतील कोरीव छत त्या काळातील लाकडी फॉल्स सीलिंगच म्हणावे लागेल. दुसर्या मजल्यावर राण्यांच्या महाल, रंगमहालसदृश महाल होता. तो आता ढासळला आहे.







दगडी परात

अशा प्रकारे अप्रतिम काष्ठशिल्प पाहून पुढे जवळचेच 'प्रतिपंढरपूर' समजले जाणारे राही राखुमाबाईसह असणारे मंदिर पाहायला गेलो.
उंचच उंच प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे, ज्यावर जाण्यासाठी आतील बाजूने जिन्याची सोय आहे. मंदिराचे शिखर दोन भागांत आहे. समोरील मंडपाचे घुमटाकार आणि गर्भगृहाचे उंच शिखर आहे.



मंदिरामध्ये गोपाळ विठ्ठलरूपातील मूर्ती आहे, कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी धेनू, गोवत्सल आहेत. मूर्तीच्या बाजूला दशावतार रेखलेले आहेत. विठ्ठलाच्या एका बाजूला रुक्मिणीची आणि एका बाजूला राहीची अशा मूर्ती आहेत. चौथाराच्या खालील बाजूस वाद्ये वाजवणारे लोक घडवले आहेत.


मंदिराच्या आतील भिंतीवर राधा-बासरीधारक कृष्ण, राम-सीता-लक्ष्मण, गणेश-ऋद्धिसिद्धी, ६४ योगिनी अशा अनेक सुबक मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोराच्या अनेक छटा, युद्धातील दृश्ये, व्याल, गजयुद्ध कोरीव काम आहे. महिषासुरमर्दिनीची व इतरही २ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराचे शिखर सुंदर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.









मंदिरामागे पाण्याचा प्रवाह आहे. त्यापलीकडे शंकराचे आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला आधुनिक रंगरंगोटी केली आहे तीही उठून दिसत आहे.

पळशीचा गणपती

पावसाळ्याचे दिवस, श्रावणाची हिरवाई, पाण्याच्या प्रवाहाचा मनमधुर खळखळाट... हे दृश्य नेत्रांत मनसोक्त सामावून एक सुंदर दिवस भटकंती घडली.
http://www.misalpav.com/node/50640
भातवडी, अहमदनगर
पारगाव भातोडी
गुगल करता करता , मराठा युद्ध जेथे झाले त्याची रोचक माहिती वाचली.प्रवास मोठा नव्हता ,तेव्हा जवळच्याच पण ऐतिहासिक पानाला कधी भेट देईन याचा मागोवा घेत होते.घरीच बनवलेल्या मिसळ पावचा भरपेट न्याहरी करून निघाले.
रस्त्याने नव्याने चाललेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रचंड लगबग होती.हळूहळू ती लगबग मागे टाकत टाकत मिलिटरी एरिया त्याच्या ऐसपैस भव्य इमारती आणि काही रणगाडे नजरेस पडत होत्या.पुढे तो भाग संपताच दुतर्फा हिरवीगार कांद्याची शेत नांदताना दिसली.आणि मोकळी हवा केसांशी खेळू लागली.मास्क अलगदच पर्समधे शिरला.आता रस्तावरची वर्दळही नाहीशी झाली.लवकरच पारगाव भातोडी वेस आली.टिपिकल गावची घर पण कमी लोकसंख्या वाटत होती.तेव्हा डाव्या बाजूस नृसिंह मंदिर आणि उजव्या बाजूस शरीफ राजे समाधी स्थान होते.मंदिर जुने आहे असे समजले ,तेव्हा नक्कीच पाहायचे म्हणत डाव्या बाजूला वळालो.
दुरूनच तीन उंच कळस,सुंदर दगडी पायऱ्या ,घाट पाहून अचंबित आणि उत्साहित झाले.मंदिर खाली उतरून जायचे होते.जीव हळू हळू थंड होऊ लागला.अत्यंत भव्य आणि विशिष्ट रचना असलेले हे सुंदर मंदिर आहे ,जे १४४० ला पेशवा कान्होजी नरसोजी यांनी बांधले आहे. आत गाभारा वेगळाच आहे.दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे पण मूर्तीचे मुख समोर नसून पूर्वेला एका खिडकीच्या समोर आहे जिथून ध्रुव तार्याचे दर्शन होते असा उल्लेख आहे.स्वयंभू मूर्तीची रचनाही अनोखी आहे.
सुंदर प्रवेशद्वार
स्वयंभू नृसिंह
तांडव गणपती
गरुड देव
मंदिर मात्र ११११ सालचे आहे.एका ठिकाणची खिडकी इतकी अप्रूप आहे,नजरेला सुखावणारी जळकीर्ती ...काळ्या पाषाणात कोरलेली महिरप..सहज ठाण मांडता अशी जागा..:)
प्रदक्षिणा घालण्यासाठी वरती बांधलेल्या देखण्या दोन बुरुजावर आपण जाऊन शांत ,निरामय वाहत्या नदीचे दर्शन घेऊ शकतो.दोन्ही बाजूंनी नदीच्या प्रवाहात उतरण्यासाठी भव्य पायऱ्याची रचना आहे.मंदिरालगतच घाट पाहून वाईच्या मंदिराची आठवण झाली .तलावात पाय सोडून निवांतपणा घेतांना निसर्गसखे खेकडा,मासोळ्या आपपल्या विश्वात रमताना पाहून मजा येत होती.
या घाटाची देखभाल केली तर एका पुरातन काळाचा गंध मन भरून अनुभवता येईल असे वाटून गेले.
मनोहरी जळ...
घाटाचा हाही उपयोग ..
उन्ह चढू लागली तेव्हा लवकरच ऐतिहासिक स्थळ पाहण्यसाठी उजव्या बाजूस वळालो.समाधीस्थानाकडे जाण्यासाठी कोणतीच पाटी नसल्याने जरा गैरसोय झाली.पण चिंचवडच्या गडकिल्ले सेवा समिती, गडवाट या संस्थने २०१५ ला याचा जीर्णोदधार करून इतिहास संवर्धनाचा एक उत्तम पायंडा दिला आहे.
शरीफराजे समाधीस्थळ
१६२४ ला भातवशेची लढाई झाली. अहमदनगर शहरापासून दहा मैल अंतरावर भातवडी तलावाजवळ शहाजी व शरीफजी राजांनी घडवलेला जगप्रसिद्ध रणसंग्राम होता. निजामशाहाकडून लढताना, सलाबतखान (निजामशहाचा इंजिनीयर) ने बांधलेला तलाव फोडून आदिलशाही आणि मोगलांचे सैन्य,शहाजी व शरीफजी राजांनी गनिमी काव्याचा वापर करून परास्त केले होते, मराठ्यांनी जिंकलेले हे पहिले युद्ध
होय. शरीफजी राजांना वीर मरण आले आणि शहाजीराजांनी त्यांच्या तेराव्याला भातवडीचे जेवण ठेवले तेव्हा या गावाचे भातोडी असे नाव पडले.
इतरत्र फिरताना “हे चिंचेचे झाड “गान आठवत राहिले कारण असंख्य चिंचेची झाडे आजूबाजूला होती.पटापट चिंचा तोडल्या तर चक्क गाभुळलेल्या लाल चिंचा होत्या “आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन”
मस्त लाल चिंच
पुढे वाघेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
पाथर्डी रस्त्यानेच वीरभाद्राचे जुने मंदिर आहे.वीरभद्र शंकराचा मुलगा आहे आणि जो लिंगायत समाजाचा कुलदैवत आहे असे समजले.मूर्ती अत्यंत विलोभनीय आहे.
वीरभद्र
-भक्ती
सांदण दरी
कार्यालयीन कामकाजातून वेळ काढून नाशिकला मामाच्या गावाला जायचा उद्देश यावेळी निराळा होता. तो म्हणजे सांधण दरी ला भेट द्यायचा. अर्थात पूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे २४ एप्रील ला मी आणी माझा मामेभाउ व त्याचा मित्र असे तिघे पहाटे ५.३० वाजता नासिक वरून निघालो ते त्याच्या चारचाकीने. नासिक-मुंबई महामार्गाने घोटीच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात डावीकडे औंढ्या, पट्टा, डुबेरे व उजवीकडे अंजनेरी,डांग्या, घारगड, कावनई असे किल्ले दिसू लागले. समोरच कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची सह्याद्रीतील सर्वोच्च रांग दिसू लागली.
आम्ही घोटीच्या अलीकडून डावीकडे वळण घेतले व मोरधन किल्ल्याच्या कातळभिंतीच्या शेजारून असलेल्या सडकेने बारी गाठले. बारी हे कळसूबाईच्या पायथ्याचे गाव. आसपासच्या सर्व शिखरांत कळसुबाई आपले सर्वोच्च शिखर त्यावरील मंदिरासह मिरवत होती.
आम्ही खालूनच त्याचे दर्शन घेऊन पुढे निघालो ते भंडारदरा धरणापाशी असलेल्या शेंडी गावात पोहोचलो.
इथून सांदण दरीला दोन रस्ते जातात. एक शेंडीच्या अलीकडून घाटघरच्या मार्गाने साम्रद गावाला जातो (२३ किमी) व दुसरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला वळसा घालून घनचक्कराच्या पदरातून रतनवाडीच्या मार्गाने साम्रदला पोहोचतो (२६ किमी). आम्ह्लाला अर्थातच रतनगडाच्या पायथ्याल्या असलेल्या रतनवाडीच्या शिल्पसमृद्ध श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घ्यावयाचे असल्याने आम्ही रतनवाडीच्या मार्गाने निघालो.
हा रस्ता निर्विवादपणे देखणा आहे. घनचक्कराच्या कडेने, तलावाच्या बाजूने कधी दाट झाडीतून तर कधी उघड्या आभाळाच्या साक्षीने ह रस्ता चढ उतार घेत वळणे वळणे घेत जातो. वाटेने कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगडाची रांग, बाजूलाच घनचक्कर रांग, त्याचे मुडा हे सह्याद्रीतील तिसर्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे रौद्र दर्शन देतात. रतनगड व खुट्टा सुळका कायमच साथीला असतात. ३० मिनिटातच रतनवाडीला पोहोचलो.
अमृतेश्वर मंदीर व त्याच्या जवळच असलेली कोरीव काम असलेली पुष्करणी (कुंड) आमच्या पुढ्यातच होती. मंदीराच्या पाठीमागेच रतनगड व त्याचा खुट्टा सुळका उठावला होता.
पुष्करणी ही अतीशय देखणी व शिल्पसमृद्ध आहे. शंख, चक्र, गदाधारी विष्णू च्या अनेक प्रतिमा आहेत. शेषशायी भगवान विष्णू व लक्ष्मी तसेच गजाननाचीही प्रतिमा आहे.
पुष्करणी पाहून आम्ही श्री. अमृतेश्वर मंदीराचे दर्शन घेतले. १२०० वर्षांपूर्वीचे हे अतीशय देखणे हेमाड्पंथी कोरीव मंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुख मुख्य द्वार व पश्चिमाभिमुख दुसरे द्वार अशी २ द्वारे आहेत. विविध शिल्पाकृतींचा खजिनाच इथे भरला आहे.
हे सर्व डोळ्यांत व कॅमेर्यात साठवून चहा, पोहे खावून आम्ही आमच्या मुख्य उद्दिष्टाकडे म्हणजे सांदण दरीकडे जाण्यासाठी साम्रदकडे निघालो( रतनवाडीपासून साम्रद ५ किमी) थोड्याच वेळात तिथे पोहोचलो. इथेतर सह्याद्री आपले राकट सौंदर्य दाखवत उभा होता. रतनगड, खुट्टा यांचे एका वेगळ्याच बाजूने अतीशय प्रेक्षणीय दर्शन होत होते. बाजूलाच आजोबाचा महाकाय पर्वत आपल्याला आजोबा का म्हणतात ते दाखवून देत होता. कळसुबाई, अलंग, कुलंग व मदनगड पाठीमागच्या बाजूने रौद्र दर्शन देत होते.
साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. तिथे गाडी लावून आम्ही खंडूमामा यांस सांदण दरीची वाट दाखवण्यास बरोबर घेतले. १०/१५ मिनिटातच कातळाच्यासड्यावरून आमची वाट दाट झाडीत शिरली. व थोड्याच वेळात आम्ही एका घळीच्या मुखाशी आलो. सांदण दरीचे वैशिट्य म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. अतिशय अरूंद अशी ही लांबच लांब जमिनीला पडलेली भेग आहे.
सांदण दरीचे मुख.--
घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. दगडांनी तो बंदिस्त केल्यामुळे अतिशय निर्मळ असे ते थंडगार असे ते पाणी पिवून आम्ही उल्ह्सित झालो. घळ उतरायला लागलो. सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आम्ही आत दरीच्या नाळेत प्रवेश केला.
आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसत होते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ती अतिशय निरुंद नाळ होती. दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त केली होती.
पहिला कातळ्टप्पा उतरताच एका पाणसाठ्याने आमचा मार्ग अडवला. साधारण १.५ फूट खोल १२/१३ फूट लांब अश्या त्या पाण्यातून शेवाळलेल्या दगडांवरून आम्ही कौशल्याने मार्ग काडून पलीकडे गेलो. आता तीव्र उतार सुरु झाला होता. नाळ अधिकाधिक अरूंद होत होती. कुठेही सपाट मार्ग नव्हता. दरडी, लहानमोठे दगडगोटे यांचा अक्षर्शः तिथे खच पडला होता.
आता आमचा मार्ग दुसर्या मोठ्या पाणसाठयाने अडवला होता. एका बाजूला ४.५ फूट खोल पाणी दुसर्याबाजूला ३ फूट खोल पाणी होते. हेही कधीही आटत नाही कारण सुर्य इकडे कधीही पोहोचू शकत नाही. अतिशय थंडगार अश्या त्या पाण्यातून १७/१८ फूट लांब चालण्याचा थरार हा शब्दातीत आहे. प्रत्यक्ष अनूभवातूनच तो घ्यावा.
अजूनही आमचा नाळेतूनच प्रवास चालला होता. जवळ जवळ १.५ किमी अश्या ह्या अरूंद नाळेच्या टोकाशी पोहोचायला ३० /४० मिनिटे लागतात. दोहो बाजूंचे उंच उंच कातळकडे व आकाश्याच्या छोट्या तुकड्यापलीकडे काहीही दिसत नाही.
आता आम्ही नाळेच्या टोकाशी आलो होतो. आत इथून सह्य पर्वताचे उग्र दर्शन होते होते. ३५०० फूट सरळ तुटलेले कडे व रतनगडाचा कडा प्रेक्षणीय दिसत होता. ही नाळ पुढे काही अवघड कातळारोहण टप्प्यांवरून जात करोली घाटाला जावुन मिळते. अर्थात आम्ही त्याच्या वाटेला गेलो नाही हे सांगणे न लगे.
१५/२० मिनिटे तिथे थांबून आम्ही मागे फिरलो. परत त्या पाण्याचा थरार अनुभवला. दगडगोट्यांवरून दडस दडस चढून आम्ही घळीच्या बाहेर पडलो.
अप्रतीम अश्या ह्या निसर्गनवलाने आम्ही अवाक झालो होतो. ही अरूंद घळ पाणी व ज्वालामुखी यांच्या एकत्रीत परीणामामुळे बनली असावी. पूर्ण सांदण दरीत कधीही उन पोहोचत नाही त्यमुळे कायमच सुखद गारवा असतो.
आता परत आजोबा, रतनगड, खुट्टा , कळसुबाई रांगेचे डोळे भरून दर्शन घेतले.
साम्रद गावात अचानक छोटे चक्रीवादळ आले.
साम्रद वरून घाटघरच्या वाटेने निघालो. घाटघरचा रौद्र कोकणकडा व पायथ्याचा तलाव व त्यावरील विद्युत प्रकल्पाचे इथून सुंदर दर्शन होते.
तिथे थोडावेळ थांबून आम्ही आता धरणाच्या दुसर्या बाजूने निघालो. कळसूबाईच्या मागच्या पदरातून वळसा मारून परत शेंडी गाव व तिथून बारी, घोटी वरून आम्ही ३ च्या सुमारास नाशिकला पोहोचलो ते परत पुन्हा इथे यायच्या विचारानेच.
https://www.misalpav.com/node/12184
तुम्ही साम्रदला पोहोचताच तुमच्या गाडीभोवती कुणी ना कुणी गावकरी येतातच. कुणीही तुमच्याबरोबर वाट दाखवायला येईल. पावसाळ्यात मात्र शक्य नाही तेही अर्थात त्या २ पाणसाठ्यांमुळेच. जानेवारीनंतर कधीही जा किंवा आता या महिन्यात वा जूनच्या पहिल्या आठवड्यात जा.
रविवारी नगरच्या महिलांना स्वयंपाकाचा कंटाळा आला,आणि होटेलात जायचा कंटाळा आला , झणझणीत खावं वाटलं की आगडगावाचे प्लॅन केला जातो.
आगडगावाला शंकराचा अवतार/सेवक काळभैरव याचे जुने मंदिर आहे.रतनमल,देवमल ,आगडमल या तीन राक्षसांनी हे दगडाने बनलेले मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची शिरं आहेत.कदाचित हे किर्तीमुख असावेत पण आता मंदिरावर इतके आधुनिक रंगरंगोटी इतर थर आहेत की ओळखता येणे अवघड आहे.आतील , बाहेरील बांधकामही हेमाडपंथी दिसत आहे परंतु कोणताही शिलालेख नाही.
रविवारी १२ वाजता काळभैरव आणि जोगेश्वरी मातेची अत्यंत मोहक मूर्ती/तांदळा ज्याची आरती झाल्यावर अतिशय रूचकर महाप्रसादाच्या पंगतीच्या पंगती उठतात.यामध्ये गरमागरम मिश्र डाळीची आमटी, बाजरीची भाकरी,ठेचा,कांदा लिंबू फडफडीत भात,गोड शिरा/लापशी असे अस्सल गावरान पदार्थ असतात.यासाठी असंख्य भगिनी स्वच्छेने आनंदाने भाकरी करण्यासाठी सहभाग घेतात.सर्वांना प्रसाद वाटप होईपर्यंत माईकहून भाविकांना नामस्मरणात तल्लीन केले जाते.कोणताही प्रसाद उष्टा ठेवू नका यांची वारंवार सुचना दिली जाते.
हळूहळू गर्दी वाढली असते.ताजी भाजी, गावरान डाळी, कडधान्य विकायला असतात.पेढे, लहान मुलांसाठी किरकोळ खेळणी ...एक जत्राच भरते.
आणखिन एक विशेष म्हणजे भैरव जयंती नंतरच्या रविवारी येथे यात्रा भरते तिथे रात्री भुतांची असते कोणत्याही गावकरी ,बाहेरील व्यक्तींना येथे प्रवेश करता येत नाही.याविषयी अजूनही फारशी शहानिशा केली नाही.
परततांना पवनचक्की मोजत मोजत , उंचीवरून हिरव्या शेताचे आकार ओळखत बुर्हानगरला पोहोचलो.तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे.प्रत्यक्ष तुळजाभवानी बालरूपात येथे भक्तांची सेवा करत असे मानले गेले.तुळजापूरला येथून पाठवलेल्या पालखीचा मोठा मान आहे.
अहमदनगर - भिंगार / चाँद बीबी महल / अहमदनगर फोर्ट
| मळगंगा माता मंदिर |
| रवींद्र - मळगंगा माता प्रवेशद्वार |
| वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले |
| वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले - प्रवेशद्वार |
| निसर्गनिर्मित पूल |
| प्रवेशद्वार - भिंगार औरंगजेब यांची समाधी ठिकाण |
| डावीकडे मी आणि उजवीकडे शशांक - औरंगजेबाच्या समाधी जवळ |
| चांद बीबी का महाल |
| चांद बीबी का महाल |
| शशांक - महालातल्या एका समाधी जवळ |
| शशांक, रवि आणि मी |
| काहीतरी आहे तिथे |
| वरच्या मजल्यावर जायला असणारी वाट |
| शोधा मग सापडेल - नवीन न्यानो |
| अहमदनगर किल्ला |
| रवि - किल्ल्याच्या बाहेर |
| किल्ल्याचा प्रवेशद्वार |
| तटबंदी |
Ranjan Khalge or Potholes of Nighoj
Ranjan Khalge or Potholes of Nighoj
Along with Morachi Chincholi we went to visit Rajan Khalge.
Asia’s
largest natural gigantic potholes in riverbed of Kukdi near Nighoj is
an archeological site recorded in the Guinness Book of World records.
This is a geographical phenomenon where the pebbles that are carried by
the river get locked in the cracks developed in the basalt rock
riverbed. These pebbles, which rotate due to the water current, form pot
shaped cavities in the basalt rock over the hundreds of years.
The
interiors of potholes are smooth and regular. The miracle resembling
the rock sculptures are are on the riverbed and the narrow walls of
gorge through which river flows.
The
Gorge is just about 2-3 kms in length and is hardly visible from a
distance. The fascinating formations with its looks of a canyon, would
give you a chilling thought how mars or moons surface might be.
Over
the years the depth of these potholes has increased and villagers tell
us that they could be even more than 100 feet deep at few spots. There
is small temple of “Malganga” on the bank on this river.
Nighoj is just 90 kms from Pune, off Pune Ahmednagar Road and the Kund Devi is another 2 kms from Nighoj. If you are visiting Morachi Chincholi and doing this excursion this is around 20 kms through internal roads.
Avoid monsoons as the gushing water would hide the giganticness of these potholes. The trip can be combined with Rajangaon Ganpati too.Morachi Chincholi
Nach re Mora Ambyachya Vanat...
From
my childhood days I always wondered - do ever peacocks dance or is it
just the song? The Peshve Park peacocks always looked so cramped in that
cage that it always kept me guessing if they could really blow up their
feathers in that cage. I had never experienced this. The dream finally
came true last Sunday. Morachi Chincholi is a rustic village which is sort of natural peacock sanctuary. It is home for over more 2,500 peacocks.
How to reach:
From Swargate its approx 45KMs drive. On Pune-Ahmednagar highway after
Shikrapur cross the bridge and in next chauk itself, watch for signboard
on left turn for Pabal phata. Take this turn, travel further for 200
mts and again take a left turn to Kanhur Mesai village passing Hivre
village and drive up to Kanhur Mesai village, which is around 15KMs from
this chauk. After Kanhur Mesai, take a left from big tamrind tree
towards Morachi Chincholi which is hardly the distance of 3KMs. Morachi
Chincholi Arch welcomes you on the right.
We
started at 6.45 am and reached the village by 7.30 am. I had checked up
with this guy called Dattatrya Thopte and he was waiting for us near
the gate. He had already called me twice to check that I was indeed
coming. He owns a farm out there. Immediately he took us in the farms
and we could see several peacocks roaming here and there. 2-3 peacocks
were dancing with all feathers completely opened up. It said that the
peacock dances up to 1-1.5 hours once he opens up all his feathers! Did
you ever know that when peoacock actually opens its feather there this -
khad khad khad noise? My gosh this was simply amazing! We watched two
peacocks dancing and sun bathing for 20-25 minutes from a spot near his
well. After that we continued exploration till almost 9AM. It was so
beautiful to see peacocks flying from trees and roaming freely in the
fields. After that we had a hearty breakfast-Pohe and Bhaji at
Dattatrya’s wada. Then along with another family who had also checked in
on same day, we all went to Nighoj. After seeing the famous Rajan Khalge
we went to see Sardar Pawar’s Wada and Somnath Temple. Later we enjoyed
a sumptious meal- Zunka, Chuli varchya bhakri, Mirchi-danya cha kharda
andi javaschi tup chatni, tur chi bhaji. We all were tired and relaxed
under the peepal tree. Late afternoon we again tracked down few
peacocks. They offered coconut as per their tradition. The bombshell:
About the charges, Dattarya and his family said we need to keep the
money in front of the God whatever we thought was appropriate. It didn’t
really matter whatever we kept. They even called back in the evening to
check whether we had reached safely.
I was deeply moved to see how these simple people lived, kept a complete faith in humanity and struggle to preserve our tradition. It was far far away from the material world running like crazy after money!
Best time to visit this magical splendor is from June to December. Well rather I would say ASAP before this place gets commercialized and it looses the charm of its rural simplicity.
Dattarya's Website:
http://www.chincholimorachi.com/Krishi Paryatan Kendra: http://morachichincholi.com/
(check out amazing peacock closeups)
Sardar Pawar’s Wada (Malthan):
8 KMs from Morachi Chincholi there is small fort like wada resemling miniature of Shaniwar Wada of pune or like Purndar wada of Saswad. It seems the place has historical value from Mughal times. We were not able to see the place from inside as it seemed locked but probably Agritourism has a center here too called 'Malthan Krishi Paryatan Kendra (http://malthan.in/Inner/Home.aspx)
Somnath Hemadpanthi Temple (Pimpri Dumaala):
This
temple is located in small village and the villagers believe this from
Pandav era. There’s no tar road and the so called mud-road is extremely
in bad condition and could be worse in monsoon. But the drive is
pleasant across the dotted custard apple and sweet lime farms. The
temple itself is very clean and the fresh coat of paint makes it a
pleasant sight. There’s a huge banyan tree and you can see village
children swinging on the 'parambya' and playing around it.
The most attractive thing is the water cistern next to the temple. I recalled that I had something similar in Hampi. You definitely need a guide to visit this one. One the return journey in the village itself we stopped in a custradapple farm to buy some fresh fruits. In spite of taking 3 dozen custard apples the farmer was refusing to take any money saying that "Pahunyankadun kasle paise ghayache, tumhi amchaya deva la alat!" meaning why to take money from visitors, we are very happy that you come to visit our village temple. Finally we gave him what was appropriate and the proceeded. I was touched by his simpleness, generosity and his beliefs.
It was an marvellous trip and I will cherish the memories of dancing peacocks forever!!!
-July 19, 2009
१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक ‘अमृतानुभव’ पाहायला.
नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.
मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.
आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुंबर आणि बहावाची सोनेरी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.
-भक्ती
पैस
मोहिनीराज
बहावा
रसप्रिया
मोहिनीराज कुलदैवत असल्यामुळे नेवासे येथे बरेच वेळा जाणे होते.या मंदिराचा जीर्णोद्धार होळकरांचे दिवाण गंगोबा तात्या चंद्रचूड यांनी केला.तत्कालीन सरन्यायाधीश यांचे पुर्वज आणी पेशवाईतील एक बडे प्रस्थ. कनेरसर, हे चंद्रचूड यांचे मुळगाव. तीथे यांचा मोठा भुईकोट किल्लयासारखा वाडा आहे. प्रथमदर्शनी याची बनावट शनिवारवाड्या सारखी दिसते. बरेच वेळा या वाड्यात जाण्याचा योग आला.
भक्ती,याच रस्त्यावर , नेवासा पासून दहा बारा कि मी वर,गंगापूर येथे भव्य व सुदंर दत्त संस्थान आहे. हायवेवर गंगापूर फाटा,पाच कि मी आत मधे. येथील पेढे व नारळ बर्फी खुपच चविष्ट आहे. जाल तर जरूर खाऊन बघा. अर्थात दत्त मुर्ती सुद्धाएकच गोष्ट खटकते.
मंदीर व्यवस्थापनाला सुद्धा तक्रार करून झाली आहे तरीही त्या मद्दड लोकांच्या डोक्यात हे काही शिरत नाही.
पैसाचा खांब ते सरळ सरळ पैशाचा खांब करून टाकतात.
ज्या खांबाला टेकून माऊलींना वैश्विक पसायदान मागितलं, त्या खांबाशेजारी दानपात्राची ती गलिच्छ पेटी ठेऊ नका अशी माफक अपेक्षा आहे. म्हणजे बघा, हा माऊलींचा अपमान आहे. अमूल्य ज्ञानाची गंगा माऊलींनी या खांबाजवळ महाराष्ट्रात वाहती केली. मराठीला, मराठी संस्कृतीला जे वैभव माऊलींनी दिले, त्याचे मोल कसे करू शकतो आपण? मग अशी अलौकिक, अनमोल घटनेचा प्रत्यक्ष साक्षी आहे त्याशेजारी आपली कुबडी दानत दाखवायला दानपेटी ठेऊन भीक मागणे जरातरी शोभते काय? तेही अगदी खांबाला खेटून. कशी बुद्धी चालते अशी?
खांबाला समोर करुन, पैशाचा पेटी बघवत नाही. ज्ञानेश्वरांचं महत्त्व समजायला पाहिजे लोकांना. श्री ज्ञानेशांच्या पवित्र चरणांनी पावन झालेली ही नगरी आहे. ज्ञानेश्वरांनी या खांबाला पाठ टेकून लेखन केले तो काळ आणि ते भगवद्गीतेचं ज्ञान सामान्यांना व्हावं, या हेतूने ते केलेलं लेखन आहे, नेवासे हे ज्ञानेश्वरीचं लेखनस्थळ आहे. नेवासा नगरीचं कौतुक ज्ञानेश्वरीतच आहे. पावित्र्य जपलं पाहिजे.
ऐसे युगी वरी कळी । आणि महाराष्ट्र मंडळी
श्री गोदावरीच्या कुळी | दक्षिणिली
तेथ महेशान्वय संभृते । श्रीनिवृत्तनाथ
केले ज्ञानदेव गीते । देशीकार लेणे (ज्ञा.अ. १८ वी ओवी)
वाचन हुडकायला बरेच संदर्भ तपासावे लागले. देव, तुळपुळे, माटे यांच्या ग्रंथात ह्या लेखाचा उल्लेख नाही मात्र श्री. महेश तेंडुलकरांच्या 'शिलालेखांच्या विश्वात' ह्या ग्रंथात ह्याचे वाचन आढळले ते याप्रमाणे
ओन्नम : [कर] वीरेश्वराय । पिता
महेन यत्पूर्व [दत्तं] षट्कं जगद्गुरोः [जगद्गुरो]
अखंडवर्त्ति तैलार्थ प्र
तिमासं सदा हि तत् । [रूपका]
णां षट्क संख्या देया आचंद्रसू
र्यकं । [ यः स्वी] करोति दुष्टः [सः ] तस्य
पूर्वे व्रजंत्यधः । मंगल महाश्रीः ।।
१. अर्थ : ॐ करवीरेश्वरास नमस्कार असो. पूर्वी माझ्या पितामहाने [ वडिलांनी] जगद्गुरूस दरमहा अखंड तेलवातीसाठी [नंदादीप सतत तेवत ठेवण्यासाठी] जे सहा रुपये दिले तेच सहा रुपये [आकाशात] चंद्रसूर्य असेपर्यंत देण्यात यावेत. जो त्यांचा अपहार करील तो दुष्ट होय, त्याचे पूर्वज नरकात जातील. महाश्री [मोहनीराज ] मंगल करो...
अर्थात हा लेख कालोल्लेखविहिन आहे. श्री गुप्ते यांनी याचे वाचन केले. मात्र त्यांनी रुपका हा तिथे नसलेला शब्द तिथं नष्ट झालेला असल्याने ठशांच्या आधारे अंदाजे दिला आहे मात्र त्याचा अर्थ रुपया लावला आहे तो त्यानुसार हा लेख बहुधा पेशवेकालीन असावा असे दिसते किंवा रुपका म्हणजे रुपये नसून चांदीची नाणी असावीत असेही असू शकते.
ज्ञानेश्वर मंदिर नेवासा / Dnyaneshwar Temple Newasa
ज्ञानेश्वर मंदिर नेवासा
श्री क्षेत्र नेवासा हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरेच्या तटावर अनादी काळापासून वसलेले व अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा जपणारे, सांगणारे एक उत्तम क्षेत्र आहे. परम पावन प्रवरेच्या काठावर बसलेले नेवाशा शहर महणजे वारकरी उर्फ भागवत धर्माचे आध्यात्मिक पीठच होय. नेवासा तीर्थक्षेत्राची ओळख नाही अशी मराठी व्यक्ती महाराष्ट्रभर शोधूनही सापडणार नाही.
विश्ववंदनीय ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि पवित्र भूमी आहे. याच भूमीत माऊलीनी मराठी भाषिकांना गुह्य असा ज्ञानाचा सागर खुला करून दिला व तमाम जगातला ललामभूत ठरणारा ग्रंथ याच भूमीमध्ये १२ व्या शतकात निर्माण केला. ह्याच पवित्र भूमी वर पूर्वी करवीरश्वराचे मंदिर होते आणि त्याच मंदिरातील पवित्र खांबाला (पैस) टेकून श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, आमुतानुभव, हरिपाठ इ. मौलिक ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी केली. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले, परंतु जगाला दिव्य संदेश देणारा पवित्र खांब (पैस) मात्र आजहि अबाधित राहिला. खांबाभोवती मंदिर असणारे जगातील एकमेव ठिकाण. तोच पवित्र खांब एका भव्य दिव्य पुरुषाची जवळ - जवळ ६५० ते ७०० वर्ष वाट पहात उभा होता ती व्यक्ती महणजे वै.ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांची, त्याच्याच जीवन प्रेरणेतून व पवित्र हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार लाखो भाविकांच्या सहकार्यातून झाला आहे.
आज हि देवस्थान स्मरणीय व विलोभनीय वाटते. ज्ञानेश्वर मंदिराच्या ईशान्य भागात आणि वायव्य भागात जर एकट्याने फिरून पहिले तर असंख्य प्रमाणात मोरांचे व पोपटांचे ठावे आजही दृष्टीस पडतात. या ठिकाणी विहार केला तर मनास एक अनामिक गोड शक्तीचा शोध घेण्याची नकळत ओढ निर्माण होते. दर वद्य एकादशीला २० ते २५ लोक एकत्र येऊन या मंदिरात भजन करीत असतात. नेवासा हे क्षेत्र पुरण प्रसिद्ध तर आहेच शिवाय महाराष्ट्राच्या वारकरी सांप्रदायाचे आदिपीठ आहे. कारण वारकरी सांप्रद्रायातील जी प्रस्थान त्रयी आहे. त्यातील ज्ञानेश्वरी हा एक श्रेष्ठ ग्रंथ होय. याच कारविरेश्वरांच्या मंदिरात, याच खांबाला टेकून दुसरा अमृताचा अनुभव सांगणारा व श्रोत्यांना पाजणारा ग्रंथ अमृतानुभव निर्माण झाला या ग्रंथांना आज महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे.
श्री क्षेत्र देवगड़ संस्थान
ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती देणारे देवगड़ हे एक प्रसन्न तीर्थक्षेत्र आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर(महाराष्ट्र) येथे या ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती तुम्हाला नक्कीच मिळेल.
संत परंपरेला समृद्ध करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा.देवगडजवळच्या गोधेगावात १९०७ साली सत्शील माता-पित्यांच्या पोटी जन्म घेउन त्यांनी स्वत:सहसमाजाच्या कल्याण्याचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत १२ वर्ष श्री शंकराची आराधना करणा-याबाबांनी समाजाला साधानेतिल सातत्याचा सल्ला दिला. अत्यंत साधी रहाणी आणि सात्विक भोजनाचाआग्रह धरून देहवाद सोडला पाहिजे हे शिकविले. पूजनीय किसनगिरी बाबांनी सामान्यांना श्रधेसहजगण्याची शिकवण दिली. आपल्या वैराग्यसंपन्न वर्तनातून जगण्याचा मापदंड घालून दिला.देवगडलाश्रीद्त्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करुन संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. ज्या प्रवरेतीरी नेवासा येथे श्रीज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून त्याच प्रवरेच्याकाठी देवगड़ येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंडनामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते.
आपली जीवनयात्रा १९८३ मध्ये संपवताना समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी इश्वरनिष्ठांची मंडियाळीउभी केली होती. विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेल्या सतशिष्यांचा मेळा जमवला होता. तळागाळातीलसामान्यालाही अध्यात्म सोपे आहे, असे समजावून मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले होते.
सत्पुरुषांचे लौकिक जीवन देह्त्यागाने संपले, तरीही समाधिरुपाने त्यांचे अलौकिक जीवन निरंतर,अक्षय असते. सत्पुरुषांच्या समाधिस्थळी भाविकांना श्रधेच्या बळाने त्यांचे वास्तव्य अनुभवता येते. हाअनुभव देणारे समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर
श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिंगणापूर / Shani Shinganapur
श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, शिंगणापूर
अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही.
संतांची कर्मभूमी असलेल्या ह्या गावात श्री शनिदेवच स्वामी,मालक,अधिपती सर्व काही आहे.इथे असे म्हणतात कि आपण जशी कृती - कर्म करू तसे फळ तत्काळ श्री शनिदेव देतो.अशा या जग प्रसिध्द गावात दरवाजा,खिडकी,साखळ दंड,कडी,कोयंडा, कपाट,बॉक्स,पेटी,कुलूप,किल्ली वगैरे चा काहीही उपयोग व प्रयोग कुणीही करत नाही.कारण आसं म्हणतात कि हा श्री शानिदेवा चाच आदेश आहे कुलूप लावू नका.आणि गावातील लोकच सांगतात कि आमच्या घराचे रक्षण करणे हे श्री शनिदेवाच्या अधिकारातील आहे.ते असे मानतात कि श्री शनिदेव स्वत: त्यांना सांगतो.
'' मी २४ तास तुमच्या घराचे,शेतीचे,मालाचे रक्षण करीन,तुम्ही निश्चिंत रहा,कुठलीही काळजी करू नका अन तुम्हाला हि काही होणार नाही,तुमचे रक्षण हे माझे कर्तव्य होय.''
म्हणूनच जगभर ह्या गावाचा उल्लेख होतो.तसे इतरत्र पहिले तर जगभर चोऱ्या होताहेत.कंपाउंड वर कुलूप,कुलूपवार कुलूप लावून सुध्दा चोर आरामात चोरी करून फरार होतो.पण शिंगणापूर मध्ये उलट चित्र आहे.सर्व उघडयावर, खुले आहे तरी चोरी होत नाही.कोणी चोरी करण्याचा प्रेयतन जरी केला तरी तो त्यात यशस्वी होत नाही.प्रस्तुत साक्षात्कार संपूर्ण गाव अनेक पिढ्यांपासून पहात आहे.येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनि���ेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
श्री रेणुका माता मंदिर सोनई / Renuka Temple, Sonai
नेवासा तालुक्यातील आणखी एक पाहण्याजोगे ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर सोनई.
सोनई नजीक बेल्हेकरवाडी येथे हे काच मंदिर आहे. श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पासून ७ की. मी. अंतरावर रेणुकादेवी मंदिर आहे. सन १९५४ मध्ये श्री अण्णा स्वामी महाराजांना संचार होऊन जगदंबा भगवतीने संदेश दिला कि - तुमच्या सोनई च्या वडिलोपार्जित भूमीत मी प्रकट होईन तेथे मंदिर स्थापून माझी प्राणप्रतिष्ठा करा व भक्तीने सेवा उपासना करा. उज्ज्वल भविष्यकाळ निकट येत आहे.
श्री क्षेत्र रेणुकामाता दरबार परिसरात अन्य काही देवतांची स्थापना केलीली दिसून येते विशेषतः जलदेवता, नागदेवता, काळभैरव, सप्तयोगिनी, श्री दत्तात्रय, औदुंबर, छाया , वेताळ , चतुराई ईत्यादि . मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावर सन १९९१ मध्ये श्री दुर्गामातेची ८ फुटाची प्रसन्न मूर्तीची स्थापना केलीली आ���े. मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात. त्या पैकी वासंतिक नवरात्र, गुरुपोर्णिमा , शारदीय नवरात्र या उत्सवांना भाविकांची अलोट गर्दी असते.
प्रातःकाल ते मध्यरात्रीपर्यंत आश्रमात नित्य भजन , पूजन , आरती , नामस्मरण आदि उपासना चालू असते, हया व्यतिरिक्त अनेक पारायणे, शतीचंडी,पंचकुंडी याग, नवग्रह याग, दशकुंडी याग, विष्णूयाग, भागवत सप्ताह , गीत याग , शिवयाग , गायत्री याग, गणेशचंडी याग, नवार्णी , यजुर्वेद संहिता,स्वाह्कर, पंचायतन याग, महारुद्र स्वाहाकारा १३५ कुडात्मक लाक्षचंडी याग , अतिरुद्र स्वाहाकार, स्वर्गारोहण शैत्यथान, सहस्त्रचंडी, श्री दत्त याग ई. पवित्र विधी वेळोवेळी सम्पन्न होतात. संस्कृत विर्याजनासाठी वेदशाळा उभारली असून त्यात अनेक बुध्दिमान विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. इथे संगीत कला व ताल वाद्याचे शिक्षण दिले जाते.
श्री दत्तधाम चांदा!!! / Datt Temple, Chanda
श्री दत्तधाम चांदा!!!
अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .
अशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .
श्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली . त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्��ीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.
सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.
दत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.
येथील वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...
१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा
२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस
३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर











































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.