मार्च-एप्रिल-मे म्हटल्यावर आमच्यासारख्या भटक्यांचे प्लॅन्स होतात
सफारींचे.. त्यातून गेली २-३ वर्षे कोरोनामुळे कुठे जाता आले नव्हते. मग
आम्ही प्लॅन केला ह्या वेळेला टिपेश्वरला जायचा. मग मेंबर गोळा करणे सुरू
झाले आणि ११-१२-१३ जूनचा प्लॅन झाला. पटापट आधी परमिट बुक केले, विमान
तिकिटे बुक केली आणि नवीन कॅमेऱ्याची सगळी सेटिंग्ज वगैरे बघणे सुरू केले..
तेव्हाच लक्षात आले की सोमवारी टिपेश्वर बंद असते. आता फक्त आमच्या तीनच
सफारी होणार होत्या. आम्ही वेगवेगळे पर्याय पाहिले आणि शेवटी ठरवले की
रविवारची सफारी झाली की थेट ताडोब्यात जायचे. तिकडे सकाळ-संध्याकाळ सफारी
बुक केल्या, कारण विमान रात्री ११:३०चे होते.
आणि निघायच्या ३-४ दिवस आधी एकाच्या पायाला गाडीच्या सायलेन्सरचा चटका बसला
आणि त्यातून जखम चिघळत त्यांचे येण्याचे कॅन्सल झाले. आता परत चौथ्या
मेंबरसाठी शोधाशोध सुरू झाली, आणि नशिबाने एक मित्र तयार झाला.
आता विमानाची तिकिटे बुक करतोय तर रिटर्नचे विमान त्याला दिसले नाही. मी
म्हणालो, “अरे, बुक केले आहे आम्ही, तू कॉल कर कस्टमर केअरला." तर आणखी एक
बॉम्ब पडला - परतीचे विमान कॅन्सल झाले होते. मग काय, परत शोधाशोध करून
दुसऱ्या दिवशी पहाटे ४च्या विमानाचे तिकीट बुक केले.
.
शेवटी ही सगळी विघ्ने पार करून एकदाचे विमानात बसलो. गो-एअरचे ७.१५ला विमान
होते पुणे ते नागपूर. पण ७.३० झाले, तरी ते धावपट्टीवरच! शेवटी ७.४५ला
उड्डाण केले आणि नियोजित वेळेच्या अर्धा तास उशिरा नागपुरात पोहोचलो. तिकडे
२ जण पेंचहून आले होते, त्यांनी पिकअप केले आणि गाडीने यवतमाळच्या दिशेने
कूच केले. जांबला एकदम जंबो नास्ता केला - सामोसा सांबार, डोसा, इडली,
मेदूवडा आणि डाळिंबाचे सरबत आणि मग थोड्याच वेळात आम्ही AH ४३ ह्या
रस्त्याला लागलो. हा रस्ता पार दिल्लीपासून पुढे कन्याकुमारीपर्यंत जातो.
दोन-एक तासांनी आम्ही आतल्या रस्त्याला लागून टिपेश्वरच्या दिशेने लागलो.
त्या भागात आणखी जास्त हॉटेल्स, रिसॉर्ट्स नसल्याने आम्ही एका होम
स्टेमध्ये उतरलो. ही जागा जंगलाला एकदम लागून असून तिथून सफारी गेट साधारण
दीड कि.मी.वर आहे. ही जागा मथनी गेट ह्या बाजूला आहे. पटापट फ्रेश होऊन
जेवायला बसलो. विदर्भी जेवण असल्याने नुसती लाल चॉकलेटी तर्री आणि
बऱ्यापैकी तिखट जेवण, पण चविष्ट होते. जेवण झाले आणि सगळे लटांबर घेऊन
जिप्सीमध्ये बसलो. जिप्सी चालवणारा सरदारजी होता, पण आश्चर्य म्हणजे मथनी
ह्या तिथल्याच एकदम खेड्यातला राहणारा असल्याने अस्खलित मराठी बोलणारा
होता. जिप्सीने निघालो आणि गेटवर आलो. वातावरण अचानक बदलले आणि लांबवर पाऊस
दिसायला लागला. पटापट सगळे सोपस्कार पार पाडले आणि आमच्या जिप्सीने पहिली
एंट्री घेतली. ज्यांनी जिप्सीमध्ये बसून जंगलात जाण्याचा अनुभव घेतला असेल,
त्यांना जाणवेल तो क्षण किती भारी असतो ते.
(तुम्ही ओळखले असेलच, डावीकडचा अस्मादिक आहे!)
.
तर टिपेश्वरमध्ये ३ वाघिणी आहेत आणि त्यांना प्रत्येकी ३ पिल्ले आहेत आणि
म्हणून आम्ही इकडे जायचे ठरवले होते. नेहमीप्रमाणे शोधमोहीम सुरू झाली.
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असल्याने वाघ हमखास पाणवठ्यावर येतात. टिपेश्वर
हे नाव ‘तिपाई’ ह्या देवीच्या मंदिरावरून पडले आहे, हा भाग एकदम उंचसखल
असा आहे. इकडच्या जिप्सी फारच खराब होत्या, पण जंगल सफारी म्हटल्यावर खपवून
घ्यायचे, असे ठरवले. ४-४.३० झाले होते, पण काहीच कुठेच हालचाल दिसत
नव्हती. वातावरणही एकदम ढगाळ आणि पावसाळी झाले होते. आणि तेवढ्यात गुरमीत
(ड्रायव्हर) ह्याला फोन आला की वाघीण दिसते आहे दरीत. आम्ही लगेच तिकडे
मोर्चा वळवला आणि मग ती दिसली.. आर्ची - A मार्क असल्याने आणि सैराट तेव्हा
एकदम हिट असल्याने तिचे हे नाव ठेवले होते.
.
हळूहळू ती वरती येत होती रस्त्याकडे. पण रस्त्यावर तिच्यासमोरच २ जिप्सी
आणि मागे आमची जिप्सी होती. त्यांना म्हणालो की पुढे सरका आणि तिला जागा
द्या वरती येण्यासाठी. आम्हीही आमची जिप्सी मागे घेतली. हे सगळे होईपर्यंत
ती शांतपणे बघत होती. आता ही सुवार्ता कळल्याने सगळ्या गाड्या आमच्या मागे
येऊन लागल्या आणि मोबाइल कॅमेरे बाहेर निघाले. आमच्या अंदाजानुसार ती
बरोब्बर वरती आली आणि आमच्या समोर आली. आम्ही हळूहळू जिप्सी मागे घ्यायला
लागलो, जेणेकरून तिला चालायला मिळेल आणि आम्हाला फोटोसुद्धा मिळतील. पण
पण.. गाड्या मागेच जायला तयार नाहीत! आम्ही ओरडून सांगतोय की तिला चालायचे
आहे, मागे घ्या.. पण कोणीच ऐकायला तयार नाही. सगळ्यांना मोबाइलमध्ये फोटो
काढायचे होते. वाघिणीने २-४ मिनिटे वाट पाहिली, पण काहीच घडत नाही
म्हटल्यावर तिने रस्ता सोडला आणि थेट उंच डोंगर चढायला सुरुवात केली. आम्ही
इतके हताश आणि चिडलो होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. फोटो चांगले मिळाले
होते, पण गाड्यांनी ऐकले असते, तर तिला पूर्ण रस्ता चालता आले असते. असो.
अशा रितीने आमच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. फोटो मिळाल्यावर लगेच
आम्ही बाकरवड्यांची पार्टी केली आणि स्टेला आल्यावर जेवण एकदम साधे बनवायला
सांगून फ्रेश व्हायला गेलो. रात्री तिकडे इतर बाजारबुणगे लोक होते, जे
सफारी म्हणजे पिकनिक ट्रिप ह्या विचारांचे होते. जेवताना त्यांनी
अंडाकरीवरून इतका वाद घातला की आम्हालाही जेवण नीट जाईना. अक्षरशः शाळेत
जसे आपल्याला शिकवले होते की तारेवर १० पोपट असतील आणि ४ उडाले तर किती
राहतील, तसे त्यांचे चालले होते की आम्हीं १२ अंडी सांगितली होती, ४
खाल्ली, उरलेली कुठे गेली? जाम वैतागलो होतो आम्ही आणि त्या स्टेचा
मालकसुद्धा. तर शेवटी ह्यांना इग्नोर मारले, कारण भल्या पहाटे उठून सफारी
होती आणि प्रवास बराच झाला होता. पटकन पडी टाकली आणि पहाटे ४.३०ला उठून
५.००ला चहाचा घोट घेतला.
परत सगळा जामानिमा चढवला आणि गेटवर येऊन थांबलो. परत आमची जिप्सी
पहिल्या नंबरवर होती. एक महत्त्वाचे कारण असे की जमिनीवर वाघांचे, जंगली
प्राण्याचे ठसे असतात आणि त्यावरून आपण त्यांना ट्रॅक करू शकतो. नाहीतर
गाड्यांच्या टायरमुळे ते पुसले जातात. थोड्याच वेळात आम्हाला वाघाचे पंजे
दिसले. एका मोठ्या वाघाचे. आम्ही लगेच जिप्सी त्या बाजूला वळवली. काही अंतर
गेल्यावर ते ठसे आतमध्ये जंगलात गेलेले दिसले, तरी आम्ही खूप पुढे जाऊन
फेरफटका मारून आलो, पण वाघ दिसला नाही. अगदी पहाटे त्याने मूव्ह केलेली
होती. तर असेच शोधत पुढे जात राहिलो. रस्त्याने ह्या वाघाचे पंजे दिसत
होते, म्हणजे तो ५ कि.मी. चालत होता, हे दिसले. आम्ही आता एका सुंदर अशा
तळ्यापाशी येऊन थांबलो, जिकडे तालाबवाली वाघीण राहते. खूप मस्त वातावरण
होते, शांतता होती आणि मुख्य म्हणजे गाड्या नाहीत आणि लोकांचा कोलाहल नाही.
बराच वेळ वाट पाहिल्यावर एक वाघीण दिसली झाडीमध्ये आणि आम्ही ट्रॅकिंग
सुरू केले. तेवढ्यात एक गाडी आली. त्यांना आधीच दम भरला की शांत बसा,
सगळ्यांना नीट वाघ दिसेल. जवळच एक नाला होता, तिकडे हरणे चरत होती. तिने
हळूच पोझिशन घेतली. आम्हाला वाटले, आता मस्त एकदम action बघायला मिळणार..
पण त्यांना वाघाची चाहूल लागली आणि त्यांनी धूम ठोकली. हळूहळू ती पुढे
जायला लागली. आमच्या लगेच लक्षात आले की ती थोड्या अंतरावर एका ठिकाणी
बाहेर येईल. आम्ही एकदम पुढे जाऊन आमची जिप्सी उभी केली आणि त्या
गाडीवाल्याला सांगितले की तू अलीकडेच थांब, म्हणजे तुम्हालाही दिसेल आणि
आम्हालाही दिसेल आणि मुख्य म्हणजे तिला जायला जागा मिळेल. त्या
गाडीवाल्याने शांतपणे आमचे म्हणणे ऐकले आणि ती आम्हाला येताना दिसली. आमचा
अंदाज होता त्या ठिकाणीच बरोब्बर ती बाहेर आली आणि मस्तपैकी आमच्याकडे बघत
बघत रस्ता क्रॉस करून परत जंगलात निघून गेली.
.
खूप भारी पोझेस मिळाल्याने खूश होऊन लगेच बाकरवड्यांची मेजवानी झाली. आता
एका उंच रस्त्याने खाली उतरलो. वळण लागले आणि आणि मोठ्ठा वाघ येताना दिसला,
तो होता स्टार.. कारण त्याच्या डोक्यावर स्टारसारखी खूण आहे. हा ह्या
जंगलातल्या सगळ्या पिल्लांचा पिता आहे आणि वय साधारण १४ वर्षे आहे. आम्ही
पटापट पोझिशन घेऊन जिप्सी थांबवली. फोटो काढणे सुरू केले आणि जसाजसा तो
पुढे येऊ लागला, तसे आम्ही गाडी मागे घेणे सुरू केले, जेणेकरून त्याला
डिस्टर्ब नाही होणार आणि फोटोसुद्धा मिळतील.
.
मध्येच त्याने रस्ता सोडला आणि आतून चालायला लागला. नंतर आमच्या लक्षात आले
की आमच्या मागे परत गाड्या लागल्या आणि तो आवाज आणि कोलाहल त्याला सहन
नाही झाला. आम्हाला माहीत होते की तो परत बाहेर येणार, म्हणून परत
सगळ्यांना सांगितले की पटकन आपण सगळे मागे जाऊन थांबू, म्हणजे तो बाहेर
येईल.. पण हाय रे कर्मा, इथेही तेच. गाड्या मागे जायलाच तयार नाहीत. मग वाघ
आणखी आत निघून गेला. आम्ही तसेच पुढे निघालो दुसरीकडे - म्हणजे सुन्ना
गेटकडे, कारण तिकडे पिलखान वाघिणीची पिल्ले होती. तिकडे १-२ गाड्या होत्या,
तिकडे कळले की आत पिल्ले आहेत आणि बाहेर येतील. पण ही पिल्ले लॉकडाउनच्या
काळात जन्माला आल्याने त्यांना गाड्यांची सवय नाही आणि म्हणूनच खूपच लाजाळू
आहेत.. आणि तसेच झाले. ते पिल्लू (बऱ्यापैकी मोठे झालेले) बाहेर आले आणि
इकडेतिकडे न बघता लगेच आत निघून गेले. मग आम्ही परत मागे फिरलो. एका ठिकाणी
आम्हाला मारलेले रानडुक्कर (किल) दिसले. बराच वेळ तिकडे थांबलो, पण वाघाची
कुठलीच हालचाल न दिसल्याने स्टेवर परत आलो.
.
थोडी विश्रांती घेऊन, जेवण करून सफारीसाठी सज्ज झालो. आता आमची ही
शेवटची सफारी होती टिपेश्वरमधली आणि आम्हाला इतर २ वाघिणी आणि बच्चे दिसले
नव्हते. भरपूर वेळ वेगवेगळ्या ठिकाणी फिरस्ती केली, पण जंगल त्या दिवशी
एकदम शांत होते आणि त्या दिवशी खूप गाड्या सोडल्या होत्या. टिपेश्वरमध्ये
एक प्रॉब्लेम म्हणजे खाजगी गाड्यांना परवानगी आहे. त्याचा तोटा असा की
ड्रायव्हरला माहीत नसते गाडी कशी चालवायची, वाघापासून किती अंतर ठेवायचे
वगैरे. गाड्यांमध्ये मेंढरे भरावी तसे लोक भरले होते. वाघ दिसत नव्हता, तर
आम्ही गाइडला सांगितले की काही घुबड असल्यास बघू या, त्याप्रमाणे त्याने
एका ठिकाणी नेले आणि आम्हाला दाखवले एक झाड. ढोलीमध्ये मस्तपैकी एक घुबड
(indian scoups owl) बसलेले दिसले. माझ्यासाठी ते lifer (म्हणजे
पहिल्यांदाच दिसणे) होते. मस्तपैकी फोटो काढले. मग जिकडे मेलेले रानडुक्कर
होते, तिकडे परत जाऊन थांबलो. खूप वेळ वाट पाहिली आणि हळूहळू सूर्य
अस्ताकडे जायला लागलेला. मग बसल्या बसल्या त्या निसर्गाची अनुभूती घेत
शांतपणे बसलो आणि परतीच्या वाटेवर लागलो. डोळे शोधत होते वाघाला. प्रत्येक
पिवळसर वस्तू वाघ दिसत होती. लॉ ऑफ अॅव्हरेजेसच्या नियमानुसार आज वाघ
दिसणार नव्हता, पण आम्हीही खट्टू झालो नव्हतो, कारण दोन दिवस एका वेगळ्याच
भागात वाघाचे ट्रॅकिंग करायला आणि फोटो काढायला मिळाले होते. तीन सफारी
मिळून तीन वाघ म्हणजे तसे नशीब चांगलेच होते. बाहेर पडायच्या आधी एका
ठिकाणी मोर बसलेला दिसला आणि काही क्षणात मस्त पिसारा फुलवून नाचू लागला.
वाघ दिसला नाही, पण मोराचे नृत्य खूप छान दिसले.
.
होम स्टेला परत आलो. फ्रेश होऊन शांतपणे जेवण केले आणि ताडोबाकडे कूच केले
साधारण रात्री ९.३० वाजता. रात्री-बेरात्री १२:३० वाजता छावा रिसॉर्ट
कोलाराजवळ पोहोचलो. पटकन चेकइन करून झोपलो, कारण आमची सफारी दुसऱ्या दिवशी
१५-२० कि.मी. अंतरावर असलेल्या अलिझन्झा गेटवर होती आणि दुसरे म्हणजे आमची
कॅब नव्हती, त्यामुळे सकाळी सकाळी जिप्सीने जायचे होते.
पहाटे बरोब्बर ४.३०ला चहा मारून निघालो, उघड्या जिप्सीमध्ये मस्त थंडगार
वारे खात गेटवर पोहोचून पहिल्या नंबरवर जिप्सी लावली. आम्हाला तिकडे
ड्रायव्हरने सांगितले की काल रात्री गेटजवळ वाघाने एका म्हशीला मारले आहे,
पण तो भाग दाट झाडीत असल्याने तिकडे जाता येत नाही. सोपस्कार करून निघालो.
जिकडे काल म्हैस मारली होती, साधारण त्या बाजूला रस्त्यावर थांबलो काही वेळ
आणि पुढे निघालो. जवळच एका ठिकाणी एक adult आणि तरुण गरुड (Crested
Serpent Eagle) दिसले. पुढे गेल्यावर परत परवा दिसलेली घुबडे दिसली. दोन
पिल्ले होती, छानपैकी फोटो आणि व्हिडिओ घेऊन पुढे गेलो. आता एकदम उंच भाग
ओलांडून पुढे गेलो. खूपच सुंदर वातावरण होते. पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा
शांत आवाज.. एका ठिकाणी गेलो, जिथे इतकी वेगळीच झाडे होती - म्हणजे
मोठ्ठाले वेल होते आणि तो भाग एका वाघिणीचा होता. पुढे गेलो, जिकडे शंकराचे
पुरातन मंदिर आहे आणि दर सोमवारी तिकडे दर्शनाला लोक जातात आणि त्याच
भागात एक मोठ्ठा वाघ असतो. आणि महत्त्वाचे म्हणजे आजतागायत तिकडे कुठलेही
अनुचित प्रकार घडलेले नाहीत. आमची शोधमोहीम चालू होती कुठे कॉल्स येतात का
किंवा पंजे दिसतात का वगैरे आणि तेवढ्यात माझा मित्र सागर म्हणाला, “थांबा,
आतमध्ये झाडावर काहीतरी बसलेले दिसतेय.. शेपूट आहे” आणि हो! बिबट्या..
आम्ही वेडेच झालो गाइडसकट, की काय शोध लावला. आपल्या भागात झाडावर बसलेला
बिबट्या दिसणे म्हणजे खूपच नशीब लागते. पटापट १-२ फोटो काढले आणि त्याला
काय वाटले कळले नाही, तो झाडावरून खाली उतरला आणि डोंगराकडे निघून गेला.
आम्हाला पुढची काही मिनिटे खरेच वाटत नव्हते जे काही पाहिले ते.. एकवेळ वाघ
दिसू शकतो, पण बिबट्या दिसणे आणि तेही झाडावर म्हणजे कमाल प्रकार होता.
आम्ही आता परत थोडेसे पुढे गेलो, तर तिकडे खूप पक्षी दिसले. नवरंग,
स्वर्गीय नर्तक ह्यांची घरटी, नीलिमा पक्षी वगैरे. खूपच सुंदर परिसर होता
तो. परत आम्ही काही ठिकाणी फिरलो आणि एका मोठ्या पाणवठ्यावर आलो, जिकडे
झरणी नावाची वाघीण असते. गाइड म्हणाला, “काल आम्ही गाडी लावली आणि २
मिनिटांमध्ये ती पाण्यावर आली.” आम्ही म्हणालो, ”आजही असेच घडू दे..” पण
१०-१५ मिनिटे शांततेत गेली आणि अचानक पलीकडून एक मोठ्ठे अस्वल पाण्यावर
यायला लागले. अस्वल खूपच लाजाळू असल्याने आम्ही काही फोटो काढले, पण
तेवढयात एक जिप्सी मोठा आवाज करत आली आणि ते घाबरून आत पळाले. थोडा वेळ वाट
पाहून आम्ही निघालो. परत काही ठिकाणे शोधली आणि गेटवरून बाहेर आलो. जिप्सी
घेतली आणि रिसॉर्टला आलो.
रिसॉर्टवर मस्तपैकी नास्ता करून जरा विश्रांती घेतली आणि तयार झालो
शेवटच्या सफारीला. दोन सफारी ड्राय (वाघाच्या बाबतीत) गेल्या होत्या. आता
मनात वनदेवतेला प्रार्थना केली की आम्हाला आज चांगले काहीतरी दिसू दे.
आम्ही कोलारा बफरमध्ये एंट्री घेतली, गाइडकडून सध्याच्या हालचालीवर चर्चा
केली. शेवटची १५-२० मिनिटे blacky (ब्लॅक लेपर्ड) ठेवायची, असे ठरवले आणि
वाघाचे ट्रॅकिंग सुरू केले. ऊन बऱ्यापैकी असल्याने वाघ नक्कीच पाणवठ्यावर
येणार असा कयास केला आणि सगळे पाणवठे पालथे घालणे सुरू केले. तशातच काल
तिथली वाघीण आणि नवीन वाघ एका ठिकाणी दिसला, त्या भागात जिप्सी नेली. ते
ठिकाण बऱ्यापैकी लांब होते, पण आम्हाला ते शोधणे भाग होते. फिरून परत आलो. ४
वाजले होते, हाताशी तीनच तास उरले होते. पटकन वॉशरूमसाठी १० मिनिटे ब्रेक
घेतला आणि एका पाणवठ्याकडे गेलो. तिथे गेलो, तर २-३ जिप्सी होत्या आणि ते
म्हणाले की आत्ताच वाघीण पाण्यात उतरली होती, पाणी प्यायली आणि आत जंगलात
जायला लागली. आम्ही हताश झालो, स्वतःवर राग व्यक्त झाला की वॉशरूम
ब्रेकमुळे आम्ही त्या क्षणाला मुकलो. काय करावे कळत नव्हते. खूपच निराश
झालो होतो. पण असे हातपाय गाळून उपयोगाचे नव्हते. आम्ही परत तिला ट्रॅक
केले, तर ती जंगलात चालताना दिसली. आता परत आम्ही आधीच पुढे गेलो, साधारण
अंदाज घेतला की ती कुठून बाहेर येईल आणि तिथे जाऊन जिप्सी उभी केली.
सगळ्यांना सांगितले की ह्या बाजूला पटापट येऊन उभे राहा, म्हणजे ती
रस्त्यावर येईल आणि सगळ्यांना समोरून दिसेल व त्याचबरोबर आमच्या फोटोमध्ये
मागे गाड्या येणार नाहीत. पण लोक ऐकतात कसले! काही जणांनी आमचे ऐकले, पण
२-३ जिप्सीवाले मागेच थांबले. आता ती वाघीण हळूहळू रस्त्याकडे यायला लागली,
त्याचबरोबर आमचे श्वास जोरात चालू लागले आणि जिकडे अंदाज व्यक्त केला
तिकडेच ती बरोबर बाहेर आली, आमच्याकडे बघितले आणि थेट रस्त्यावर चालू
लागली. ह्याला म्हणतात ‘हेड ऑन चालणे’.
.
माझ्यासाठी हे ड्रीम होते, ती पुढे यायला लागली की आम्ही पटापट गाड्या पुढे
घ्यायचो, म्हणजे अंतरही राहील. ती १५ मिनिटे चालत होती आणि तेवढ्यात एका
जिप्सीवाल्याने जिप्सी इतक्या जवळ नेली की ती परत आत निघून गेली. सगळे जण
त्या माणसावर खूप भडकले. आम्ही पुढे जाऊन थांबलो तिची वाट बघत. खूप दाट
झाडी असल्याने नक्की कुठून बाहेर येईल ते कळत नव्हते आणि परत ती बाहेर आली
एकदम आमच्या जिप्सीच्या समोर.
.
आम्ही पटकन जिप्सी मागे घेतली, जेणेकरून तिला त्रास होणार नाही. हळूहळू ती
परत रस्त्यावर आली, येता येता ती झाडाचा वास घेत होती आणि सेंट मार्क करत
होती - म्हणजे आपली हद्द ठरवत होती.
.
ह्याबरोबरच माझे आणखी एक ड्रीम होते - वाघाचे एक behavior असते, त्याला
म्हणतात Flehmen Response ते बघणे आणि जमल्यास फोटो मिळवणे. त्यांच्या
टाळूवर असलेल्या Jacobson organपर्यंत घेतलेला वास पोहोचवतात आणि आपल्याला
जसे पाच सेन्स असतात, तसा वाघाला आणखी एक सेन्स असतो, ज्याच्यामुळे त्यांना
कळते की ह्या भागात आपल्या आणखी वेगळा वाघ / वाघीण आहे का, किंवा एखादी
वाघीण माजावर आली आहे का वगैरे. बऱ्याच फोटोमध्ये बघितले असल्यास
हसल्यासारखा किंवा चिडल्यासारखा चेहरा केलेला असतो, त्यालाच Flehmen
Response behavior असे म्हणतात. तर हा Flehmen Response मला बघायला आणि
फोटोमध्ये capture करायला मिळाला.
.
आता ती वाघीण - जिचे नाव जुनाबाई असे आहे, ती पुढे येत होती. एका ठिकाणी झाडाच्या मागून तिने मस्तपैकी आमच्याकडे बघितले.
.
आणि परत मुख्य रस्त्याला येऊन मिळाली आणि त्याच जिप्सीवाल्याने परत
तिच्याजवळ जिप्सी नेल्याने ती आतमध्ये गेली आणि एका ठिकाणी झोपली. सगळे
त्या ड्रायव्हरवर खूप चिडले होते आणि काही जण तर त्याला म्हणाले की तुझी
तक्रार करतो. असो. तर जुनाबाई आज जाऊन झोपली. आता आम्हाला स्ट्रॅटेजी
ठरवायची होती की इतर वाघांच्या मागावर जायचे की इकडेच थांबायचे. आमच्या
अंदाजानुसार ती नक्कीच परत रस्त्यावर यायची होती, कारण तिला तिची हद्द
मार्क करायची होती आणि पुढे वेगळ्या ठिकाणी जायचे होते. आमच्या सगळ्यांचे
एकमत झाले की काहीही झाले तरी इकडून जायचे नाही. मग काय, परत चितळे मदतीला
धावले आणि बाकरवड्या पोटात सरकावल्या गेल्या. काही जिप्सी १० मिनिटे
थांबल्या आणि कंटाळून गेल्या. इकडेतिकडे फिरून परत आम्ही जिकडे होतो तिकडे
यायचे, चौकशी करायचे आणि परत जायचे. अशा रितीने अर्धा तास झाला, पाऊण तास
झाला, १ तास झाला. ड्रायव्हर म्हणाला, “आपल्याकडे आणखी १ तास आहे, त्यामुळे
काळजी नाही.” आणि पुढच्याच मिनिटाला आतमध्ये हालचाल जाणवली आणि ती उठली,
चालू लागली. परत नेहमीप्रमाणे आम्ही एका ठिकाणी गाडी नेऊन उभी केली, इतर
गाड्यांना सूचना आणि विनंती केली आणि मॅडम रस्त्यावर आल्या. अ हा हा! काय
ती चाल, तो चेहरा, आणि जेव्हा कॅमेऱ्यातून आपण बघतो, तेव्हा तिचे डोळे
बरोब्बर आपल्यावर रोखलेले असावे.. ह्या अनुभवाला जगात तोड नाही. पुढचा
अर्धा तास ती मस्तपैकी रस्त्यावर चालत होती आणि वेगवेगळ्या पोझेसमध्ये
आम्ही फोटो-व्हिडिओ काढत होतो.
.
तो क्षण संपूच नये असे वाटत असताना एका ठिकाणी तिने रस्ता क्रॉस केला आणि आत निघून गेली.
.
आम्ही अक्षरशः स्वप्नवत थिजलो होतो. तेवढ्यात ड्रायव्हर म्हणाला, “सर, १०
मिनिटे राहिली आहेत फक्त, आपल्याला तातडीने निघावे लागेल.” त्याला म्हणालो,
“मित्रा, तू काय म्हणशील ते करतो आता. तुझ्यामुळे आणि गाइडकाकांमुळे सगळे
स्वप्नवत पाहायला, फोटो काढायला मिळाले.” अशा रितीने आमची शेवटची सफारी
एकदम भारी झाल्याने रिसॉर्टवर येऊन जोरदार स्वीट खाऊन आम्ही रात्री १०च्या
सुमारास निघालो. जाताना वाटेत चिमूरला पान खाल्ले, गाडीत मस्तपैकी
पंचम-किशोरची गाणी लावून नागपूर एअरपोर्टवर आलो १२ वाजता. आणखी ४ तासांनी
विमान होते, त्यामुळे तिकडेच खुर्चीवर पड्या टाकल्या आणि पहाटे ५ वाजता
पुण्यात पोहोचून ६ला घरी पोहोचलो. ह्या वेळेस आम्ही वाघ नुसता पाहिला नाही,
तर अनुभवला!
.
योगेश पुराणिक
जून २०२२
ह्या लेखातील सर्व फोटो योगेश पुराणिक ह्यांनी स्वतः काढलेले आहेत आणि
त्यांचा copyright आहे. कृपया कोणीही हे फोटो वापरण्याआधी योगेश पुराणिक
ह्यांची परवानगी घ्यावी, ही विनंती.
विदर्भातील व्याघ्र प्रकल्प :
१) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
२) नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प
३) मेळघाट व्याघ्र प्रकल्प
५) पेंच व्याघ्र प्रकल्प
६) टिपेश्वर व्याघ्र प्रकल्प
७) उमरेड - कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प
पुरातन सर्वेश्वर महादेव मंदिर, देऊरवाडी (बु ), ता. आर्णी जि. यवतमाळ
यवतमाळ
जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील माहूर रोड वरील ७ की. मी. अंतरावर देऊरवाडी
( बु ) आहे. येथे निसर्गरम्य सर्वेश्वर खोरी महादेवाचे मंदिर आहे. विशेष
म्हणजे मंदिरातील लिंग आपोआप निघाली असे सांगितल्या जाते..
झापरागड किल्ला, कोरची, गडचिरोली
प्राचीन ग्रंथालय, बाळापूर, अकोला
चारशे वर्षांपूर्वी जातीभेद विसरून सर्वधर्म समभाव, मानवतेचा संदेश देणारे अरबमधील महान सुफी संत नक्षबंदी यांचा बाळापूर येथे प्रसिद्ध दर्गा आहे. सर्वधर्मीय भाविक या ठिकाणी माथा टेकवितात. येथे प्राचीन ग्रंथालय असून, या ठिकाणी प्राचीन पुस्तकांचा खजिना आहे. या ग्रंथालयात अफाट अशी जुनी ग्रंथसंपदा आहे. सर्वच जाती, धर्मातील पुस्तके, मासिके यांचे संकलन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारी वर्तमानपत्रे, मासिकेही येथे
वाचायला मिळतात. या ग्रंथालयाची विशेषता ही आहे की, येथे सोन्याच्या द्रव्यापासून लिहिलेली पुस्तके आहेत. पूर्वी नदीमध्ये सहान दगड सापडत होता. या सहानेवर मध टाकून सोने घासल्यामुळे ते मधामध्ये मिसळत होते आणि सोन्याची शाई तयार होत होती. या शाईने लिहिलेली पुस्तके या ठिकाणी बघायला मिळतात. अशी एक नव्हे, तर अनेक पुस्तके या ठिकाणी आहेत. उर्दूतील गीता, रामायण, महाभारत आहे. इ.स.१६४८ साली बगदाद येथील गौस पाक शेख अब्दूल कदीर गिलानी यांच्या वंशातील सुफी संत हजरत मौलाना शेख अलकिरा हाफीज सय्यद शाह इनायतुल्ला हसनी उल हसेनी नक्षबंदी उल मुजहद्दीन यांनी बाळापूर येथे मनकर्णा नदीच्या काठावर खानका-ए-नक्षबंदिया हा दर्गा स्थापन केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दर्ग्याला एक रुपया प्रतिदिवस खर्च देणे सुरू केले होते ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
(माहिती आणि फोटो - ज्योती आंबेकर)
आमनेर किल्ला, जलालखेडा, नागपूर
वर्धा व जांब नदिच्या संगमावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या किल्ला परिसरातील जागृत सोमेश्वर देवस्थान हे या भागातील शिवभक्तांचे श्रध्दास्थान झालेले आहे.
या किल्ल्याचा परिसर २४ एकराचा या किल्याला ८ बुरूज आहेत. किल्याच्या सभोवताल शत्रू एकदम वार करू नये म्हणुन खंदक खोदलेला आहे. या किल्याची निर्मीती इ.स. ४०० च्या सुमारास वाकाटक राजांनी केल्याचे अवषेशावरून कळते.
उत्तरेस सम्राट हर्षवर्धन राज्य करीत असतांना हा पुलकेशी च्या रूपात राजघराण्यात एक तुल्यबळ राज्य स्थापन झाले. मंदिराची स्थापना हे त्याचे वैशिष्टे होती. परंतु पुढे इ.स. ७५७ च्या सुमारास हे राज्य लयाला गेले.
या नंतर राष्ट्रकुट राज घराणे या भागात उदयास आले. या घराण्याचा पहिला राज्यकर्ता दंतीवर्मा तर अखेरचा अमोघ वर्ष होता. इ.स. ७५७ ते ९७३ पर्यंत अनेक राजे होवून गेलेत त्यावेळच्या गोविंद या राजाने कन्नड ते पंजाब पर्यंतचा मुलूख त्यांनी जिंकला होता. त्याच कालखंडातील अखेर सोमेश्वर त्रिभुवमल हा. इ.स. १२०० पर्यंत राज्य करीत होता. त्यानंतर देवगिरीचा यादव वंश उदयास आला. अद्वउद्दीनखिलजी च्या स्वारीपर्यंत हा मुलूख यादवांच्या राज्यात होता. त्यानंतर हा भाग कायम इस्लाम संस्कृतीच्या छायेखाली आला.
त्याच मुस्लीम समाजाची अनेक घराणे आलीत. त्यात अकबराच्या काळात तो मोगलांच्या ताब्यात आला. अकबर जानाने मंडला येथील राणी दुर्गावतीचे राज्य नष्ट केल्यावर हा मुलूख देवगड च्या गोंड राजवटी खाली आला. परंतु हे राजघराणे दिल्लीच्या मोगल बादशाह चे मांडलीक राज्य होते.
परंतू इ.स, १७३८ मध्ये पहिजे राजे रघूजी महाराज यांनी हे राज्य जिंकल्यावर येचे मात्र मराठी राजवट आली. नंतर या परिसरात शेती ची लागवड झाली. शिक्षण आले कारण गोंडी राज्य त्यावेळेस पूर्णपणे अशिक्षित व मागासलेले होते.
पहिला राजा रघुजी महाराजांनी इस्लाम राजवटीत भग्न झालेल्या अनेक देवालयांचा जिर्णोध्दार केला. त्यात रामटेक च्या रामाचे मंदिर व जलालखेड्या जवळील प्रचिन शिवाचे मंदिर यांचा उल्लेख आहे.
इ.स. १७६५ मध्ये नागपूर चे रघुजी यांचे पुत्र जोमाजी राजे भोसले व मुधाजी राजे भोसले हे येथील किल्यावर स्वारीवर आल्यानंतर येथे काही काळ मुक्कामाला होते असा उल्लेख आहे.
येथील सोमेश्वर मंदिरातील शिवलिंग हे काळे गुळगुळीत पाषाणाचे असून चिमाजी आप्पा भोसले यांनी खास नेपाळ वरून बोलवण्याचा उल्लेख इतिहातात आढळतो.
पहिल्या रघुजी राजे भोसले यांचे नंतर पुत्र जानोजी राजे सुभेदार झाल्यानंतर त्याच वेळेस माधवराव पेशव्यांनी जानोजी राजे भोसल्यांच्या साम्राज्यावर स्वारी केली होती. माधवराव पेशव्यांचे सैन्य बीड, पाधरी, नसडी, ब्रामणी, कळमपुरी, वाशिम, मंगरूळपीर, पिंजर, कारंजा, अमरावती, वरूड, आमनेर (जलालखेडा), या मार्गाने आले. हा किल्ला (आमनेर चा भुईकोट किल्ला म्हनुण प्रसिध्द आहे.) . २०/०१/१७६९ रोजी हस्तगत केला येथुन ते नागपूर ला गेले. पेशव्यानंतर हा मुलूख नागपूर च्या भोसल्यांकडे आला. मोहनी राणीचा किल्ला म्हणुन ही त्याची ओळख आहे. इ.स.१८१८ मध्ये अपदस्त सेना साहेब सुभा आप्पासाहेब भोसले यांनी ब्रिटीशांच्या कैदेतून सुटका करून घेतल्यानंतर नरखेड, बैतुल, आमनेर व सावनेर या भागात अंमल बसविला होता. पण पुढे ब्रिटीशांनी सैन्याच्या भरोशावर तो मोडुन काढला.
इ.स. १८२० पासून १८४७ पर्यंत हा भाग ब्रिटीशांच्या ताब्यात होता. या प्राचिन सोमेश्वर देवस्थानाचा जिर्णोध्दार १९ फेब्रुवारी १९७० रोजी स्व. बाबासाहेब देशमुख (मुक्तापूर) यांच्या पुढाकाराने भानपुरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य स्वामी सत्यमीत्रानंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही भुमी संत उच्चुत्य महाराज, संत पाचलेगावकर महाराज व संत भाकरे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावरील क वर्ग पर्यटनाचा दर्जा या देवस्थानाला दिलेला आहे. व ब वर्गात समावेश करण्यासाठी या क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख प्रयत्नशिल अहे.
पुरातन काळातील प्रवेश व्दार, महाकाली टेकडी, कृषी महाराज यांचे मंदिर व निसर्ग रम्य परिसर आहे. या परिसराला निसर्गाचे उत्तम लेने लाभले आहे.
या देवस्थान व किल्ला परिसराचा योजनाबध्द विकास करण्यासाठी या देवस्थानाचे अध्यक्ष मा.श्री. रणजीतबाबू देशमुख व सर्व विश्वस्थ प्रयत्नशिल आहे.
टिप : केवळ ज्यांचे पुरावे उपलब्ध आहे तेवढेच या लेखात घेतले आहे. काल्पनिक भाग गाळला आहे.
Beauty of Chikhaldara
पुरातन शिव मंदिर, रामदेगी, चंद्रपूर
घनदाट जंगल, निसर्गाच्या डोंगरकुशीत वसलेले पुरातन मंदिर, मनमोहक धबधबा, असे वैशिष्ट्य असलेले रामदेगी हे स्थळ चिमुरपासून २५ की. मी. आणि वरोरापासून ३५ की. मी. अंतरावर आहे. रामदेगीला जाण्यासाठी गुजगव्हान गावावरून ५ की.मी.चा रस्ता करण्यात आलेला आहे. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पावसाळा हा योग्य वेळ आहे.
प्रभू श्री राम आणि सीता माता हे त्यांच्या वनवासाच्या काळात भ्रमंती करत काही दिवस रामदेगीला वास्तव्यास होते, अशी
आख्यायिका सांगितली जाते. त्यांच्या वास्तव्याच्या खुणा येथे कायम असल्याचेही सांगण्यात येते. रामदेगी येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात सोमवारला लाखोंच्या संख्येत भाविक या ठिकाणी येतात. रामदेगी देवस्थानाचाही प्राचीन इतिहास आहे. रामदेगी हे ऋषीमुनींच्या तपश्चर्येचे ठिकाण होते, असे सांगितले जाते.
रामदेगीचा परिसर १९५५ मध्ये तयार झालेल्या ताडोबा अभयारण्याचा भाग आहे. रामदेगी येथे एक जुने देवस्थान असून हे मंदिर काळ्या पाषाणाने बांधले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर शिवलिंग आणि चार फूट उंचीची पितळेची नागधारी शंकराची मूर्ती दृष्टीस पडते. या परिसरात जमनागड नावाची मोठी टेकडी आहे, या टेकडीवर जमनामतेचे मंदिर आहे. या टेकडीवरून सभोवतालचा परिसर बघितला की मन भारावून जाते.
जमनागडपासून उत्तरेस दोन की. मी. अंतरावर रामाच्या विश्रांतीचे ठिकाण आहे, या ठिकाणाला भीमनचापरा या नावाने ओळखतात, मंदिरापासून भीमनचापरापर्यंतचा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. या प्रवासातील पर्वतांमध्ये वाघाच्या गुफा पहावयास मिळतात.
याच रामदेगीला बौद्ध बांधव संघरामगिरी (संघ-आराम-गिरी) असेही संबोधतात. भिमनचापरा येथे बौद्धकालीन झोपण्याचे आसन आहे. याचा संबंध गौतम बुद्धांशी असल्यामुळे या ठिकाणी बौद्ध भिख्खू नेहमी वास्तव्यास असतात. बऱ्याच टेकड्यांवर विहार बांधलेले आहेत. विदेशातील भिख्खूही रामदेगीला येतात, हे विशेष.
हा परिसर ताडोबाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने येथे प्रदूषणाचे नियम पाळले जातात. हा परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यात आला आहे.
नानासाहेब मंदिर (वाडा), पातुर, अकोला
नानासाहेब यांचा जन्म पेशवेकालीन असून इ. स १७०० मधील आहे. त्यांच्या मंदिराच्या बांधकामावरून हा काळ सिद्ध होते, असे वास्तुशास्त्राचे मत आहे. इ स १७४० मध्ये नानासाहेब समाधिस्त झाले. त्यांनी बांधलेली वस्तू हि अत्यंत प्रचंड असून आजही अस्तित्वात आहे. तेथील वास्तू शास्त्रानुसार जे बांधकाम आहे, ते उलेखनीय आहे.
सर्व बांधकाम पक्क्या विटा आणि चुन्यात केले आहे. मंदिराचा मुख्य गाभारा बांधलेला आहे. मुख्य गाभाऱ्याचे खाम्बांचे वैशिष्ट आहे
कि, खांब विटांनी बांधलेले आहेत. एक सोडून एक खांबामध्ये आपण प्रहार केला असता ‘मृदुंगासारखा’ आवाज येतो. मंदिराचे क्षेत्रफळ अंदाजे ५० मीटरचे आहे. त्यांचे सभोवतली २०-२० मीटरचे पटांगण असून त्यामध्ये तेथील काही महाराजांच्या दगडी समाधी बांधलेल्या आहेत.
मंदिराच्या सभोवताली पटांगण व चारही बाजूनी दिलवाडा मंदिराप्रमाणे वरंन्डा बांधून अतिशय कलाकृतीने तो सभामंडप तयार केला आहे. तो इतका भव्य आहे कि आजही हजार-पाचशे लोकांचे वास्तव होऊ शकते. समोरच्या भागात भव्य असे दीपस्तंभ उभे आहे. या सर्व भागाला किल्ल्याप्रमाणे सजवले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे एक गोपुरम सारखे भव्य द्वार आहे. याची उंची पाहली असता २० फुटा वर येते.
या मंदिराच्या आत एक काळा मारोतीचे शिल्प असून याची स्थापना ‘श्री समर्थ रामदास स्वामी’ यांच्या हस्ते झाली. बाहेरून अवलोकन केल्यास निसर्ग रम्य परिस्थितीत किल्यासारखे ती मंदिरे पुरातन वस्तूची एक आठवण देऊन जाते. आजही इतिहास प्रसिद्ध नानासाहेबांचे स्थान अतिशय पवित्र असून हजारो लोक दर्शनासाठी येतात. हे मंदिर पातूरच्या उत्तरेस असून पातूर शहराच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे पातूर शहर हे ऐतिहासिक ‘पराशर नागरी’ म्हणून ओळखल्या जाते. आता हि नगरी ‘पातूर नानासाहेब’ यांच्या नावाने ओळखली जाते.










विदर्भातील शक्तीपीठ - अंबादेवी, अमरावती
अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिराचे अस्तित्व हजार वर्षांपूवीपासून असल्याची अधिकृत नोंद आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठवल्याचे इतिहासात नमूद आहे. हे मंदिर जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून आहे. अंबादेवीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मूर्ती काळ्या रंगाच्या वाळूकेची असून अतिशय पुरातन आहे. या मंदिराचा संबंध रुक्मिणीहरणाशी जोडला जातो.
मोगलांनी १५०० च्या कालखंडात वर्हाडावर कब्जा केला तेव्हा अनेक नगरांची लुटालूट, नासधूस केली. अनेक हिंदूमंदिरेही उद्ध्वस्त केली. त्यांत अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा समावेश होता. हे मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतरही आतील गाभारा व अंबेची मूर्ती त्यातून सुखरूप राहिली असावी. त्यानंतर १६६० च्या सुमारास श्री जनार्दन स्वामींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
जनार्दन स्वामींच्या पुढाकाराने व काही नागरिकांच्या मदतीने पुढे या मंदिराचा कायापालट होत गेला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराच्या उभारणीत फार मोठे योगदान दिले. अंबादेवीची स्वयंभू मूर्ती काळ्या रंगाच्या वाळुका पाषाणाची आहे. ही मूर्ती पूर्णाकृती व आसनस्थ आहे. भक्तांच्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण होते, अशी श्रद्धा दर्शनार्थी व्यक्त करतात. मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. मंदिराच्या उत्तर बाजूला मारुती व दुर्गादेवीचे मंदिर आहे. दर मंगळवारी अंबादेवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने चढवले जातात. मुखवटासुद्धा सुवर्णाने मढवलेला असतो. दागिन्यांमध्ये सोन्याची नथ, बिंदी, बाजूबंद, गळ्यातील एकदाणी, कमरपट्टा, बांगड्या आदींचा साज चढतो. दागिन्यांची आरास लक्ष वेधून घेते. अनेक जाती-धर्माचे व पंथाचे लोक या मंदिरात दर्शनाला येतात.





विदर्भातील शक्तीपीठ - श्री जगदंबा संस्थान, केळापूर, यवतमाळ
विदर्भ आणि तेलंगाना च्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात केळापूर या ऐतिहासिक गावात ‘आई
जगदंबा’चे मंदिर आहे. धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील केळापूरला विशेष महत्व असून वर्षभर येथे जगदंबा आईचा उदो उदो सुरु असतो.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून ४ किमी अंतरावर केळापूर हे गाव आहे. गावात खुनी नदीच्या काठी, आणि वनसंपदेने बहरलेल्या परिसरात आई जगदंबेचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. कुंतलापुरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे. डॉ या. मा. काळे लिखित “व-हाड इतिहास” या पुस्तकात कुंतलापुर म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर असा उल्लेख आढळतो. जेमिनी अश्वमेध या ग्रंथात कुंतलापूर ची भवानी व राजा चंद्रहास यांची कथा आहे. चंद्रहास राजाचे हे नगर होत आणि राजावर प्रसन्न होऊन जगदंबेने कुंतलापूर गावात आपला कायमचा निवास ठेवला. अशी आख्यायिका या ग्रंथात आहे. सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात १८१८ साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अज्ञातवासात असतांना केळापूर येथे आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे. इतिहासात केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचा पण उल्लेख आहे. आजही जीर्ण व पडझड झालेल्या पुरातन किल्याचे अवशेष नदीकाठावर आढळून येतात.
मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू प्रगटलेली आहे. मूर्तीच्या जागेवर २ बाण आहेत. जीर्णोद्धार कार्य सुरु असतांना जी मूर्ती सापडली ती भग्न असून चतुर्भुज जगदंबेच्या मांडी खाली राक्षस आहे. आईच्या एकां हातात त्रिशूल असून ती राक्षसाचा वध करीत आहे. देवीवर भक्तांची प्रचंड श्रद्धा असून औरंगाबाद येथील भक्तांने तर एक किलो सोने देवीला दान चढविले. विश्वस्तांनी त्याचा वापर करून देवीचा मुखवटा बनविला आहे.
जगदंबेवर आंध्र व तेलंगणातील भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. देवीला नवस बोलून लाखो भक्त अनवाणी पायाने चालत नवरात्री दरम्यान दर्शनाला येतात. या काळात मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलीत करण्यात येते. या प्राचीन मंदिराची १९८१ पूर्वी पारवेकर घराण्यांमार्फत देखभाल व्हायची. त्यानंतर पांढरकवडातील तरुणांनी एकत्रित येवून एकता मंडळ जीर्णोद्धार समितीची स्थापना केली. केळापूर गावात प्राचीन चतुर्मुखी गणपतीचे देखील मंदिर आहे. गावात असलेल्या या मंदिरातील गणपतीची अनोखी मूर्ती लोभस आहे. चारही दिशांना गणपतीचे मुख असून गोंड राजाच्या वास्तव्य काळात या चतुर्मुखी गणपतीची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. केळापूर गाव बारा हनुमानसाठी देखील ओळखले जाते. गावात मध्यभागी व वेशीवर हनुमान मंदिर आहे. बाजीराव पेशवाच्या युद्धानंतर काही मूर्ती आसपासच्या गावात स्थापित करण्यात आल्या आहे.
(माहिती - Milind Barbade)























विदर्भातील शक्तीपीठ - महाकाली, चंद्रपूर
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ
सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते . चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले . आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे .

















विदर्भातील शक्तीपीठ - कमळजा देवी मंदिर, लोणार सरोवर, बुलढाणा
हे मंदिर तलावाच्या काठावर असून त्याला तीन मुख आहेत. उत्तरेकडील महाद्वारातून
गंगाभोवतीचे पडणारे पाणी दिसते. देवीचे अष्टकोनाकृती असून वरील भाग गोलाकार आहे. मध्ये स्तंभ नाहीत. देवी मुखवट तांदळासारखा आहे. तिचा आकार माहूरच्या देवीसारखा आहे. पुराणामध्ये यास पद्मावती देवी संबोधले आहे. अनेक ऋषी-महंतांनी व संतांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. पापनाशिनी गंगाभोगावती धारेखाली स्नान करुन श्री कमळजादेवीची अनेकांनी आराधना केली आहे. श्री कमळजादेवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देखणी आहे. समोर यज्ञकुंड आहे. अध्यात्मयोगी महापुरुषांना सारी योगसिद्धी प्राप्त करुन देणारी ही देवी आहे. शक्तिस्वरुपिणी, वरदायिनी श्री. कमळजादेवी ही अत्यंत प्राचीन आहे. पूर्वी तेथे दीपमाळ होती. श्री. प्रभू रामचंद्र वनवासात दंडकारण्यात असताना या देवीचे दर्शन त्यांनी घेतले होते, असे लोकमत आहे. मारुती चितमपल्ली यांच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे हे मंदिर हेमाडपंथी आहे. तेलपाणी दिल्यावर, दिलेल्या काळ्याशार पार्श्वभूमीवर या दीपमाळा मनात एखाद्या ऑयकॉनसारख्या कोरल्या गेल्या आहे, हे त्यांच मत खरं आहे. मेहकरच्या बालाजी मंदिरापलीकडे एक जुनाट वाडा उद्धवस्त अवस्थेत आहे. तो कंचनी वेश्येचा महाल. तिला लोणारच्या कमळजादेवीसमोरील दीपमाळेची ज्योती रात्री बघायच्या होत्या. त्यासाठी उंच महाल बांधायला सुरुवात केली. शेवटचा मजला चढला, असता तर कंचनीला दीपमाळेच्या ज्योती दिसल्या असत्या. तिची अपार श्रद्धा श्री कमळजादेवीवर होती.
।। जय कमळजा माता।।

चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.
नेर तालुक्
यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्
याला मोठा सांस्कृतिक व
आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत, परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.
गणपतीच्या इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे सांगतात.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत आहेत. गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा मिळाल्याने याचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करीत आहेत.








विदर्भातील शक्तीपीठ - एकविरा देवी, अमरावती
श्री अंबादेवी मंदिराच्या दक्षिणेस एकवीरा देवीचे मंदिर आहे. हजार वर्षांपासून विदर्भाचे महाशक्तिस्थान
असलेल्या एकवीरेला श्री अंबादेवीची मोठी बहीण मानतात. येथील महान तपस्वी जनार्दन स्वामी हे एकवीरा देवीचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. एकदा नदीला पूर आल्याने त्यांना देवीचे दर्शन घेता आले नाही, काही दिवस त्यांना अन्नावाचून राहावे लागले. तेव्हा त्यांना दृष्टांत देऊन अंबादेवीनेच एकवीरा देवीची स्थापना करावयास सांगितल्याची आख्यायिका आहे. येथे येणारे भाविक प्रथम अंबादेवीच्या आणि नंतर एकवीरा देवीच्या दर्शनाला जातात. या ठिकाणी मोठ्या बहिणीने लहान बहिणीस मान दिला आहे. एकवीरेच्या मंदिराचे महाद्वार पश्चिमाभिमुख आहे. एकवीरा देवी हे रेणुकादेवीचे दुसरे रूप मानले जाते. या दोन्ही मंदिरांमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. नवरात्रात येथे यात्रा भरते. नऊ दिवस कार्यक्रमांची येथे रेचलेच असते.
नागपूर- मुंबई रेल्वेमार्गावर बडनेरा स्थानकापासून १० किमी अंतरावर अमरावती शहर आहे. बडनेराहून अमरावतीला येण्यासाठी एसटी व रिक्षाची सोय आहे. मुंबई-नागपूर विमानसेवा उपलब्ध असून नागपूर-अमरावती अंतर १५५ किमी आहे. नागपूरहून एसटी वा खासगी बस आहेत. एसटी स्थानकापासून दोन किमी अंतरावर श्री अंबादेवी मंदिर आहे. बसस्थानकापासून ऑटोरिक्षा उपलब्ध आहे. मंदिरात राहण्याची सोय आहे.














विदर्भातील शक्तीपीठ - जगदंबा माता कोराडी, जि. नागपूर
नव दुर्गे चे नऊ दिवसाचे नऊ रूप त्यात सहावे रूप म्हणजेच ”कात्त्यायंनी”, नागपुरातील कोराडी
येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता ही याच कात्त्यायनीचे दर्शन आपल्या भक्ताना देते. नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी येथे जगदंबा मातेचे अतिप्राचीन मंदिर असून हे देवस्थान भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. त्यामुळे या मानाच्या देवीचे दर्शन घ्यायला भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. स्थानिकांच्या मते देवीचे दिवसातून तीन रूप बघायला मिळतात. सकाळी बाल रुप, दुपारी युवा आणि संध्याकाळी वृद्ध अवस्थेत चेहरा भासतो. येथे आधी जुने मंदिर होते. जुन्या मंदिराचा कायापालट करून नवीन सुंदर व भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
विदर्भातील शक्तीपीठ - पिगंळा देवी, नेर पिंगळाई, अमरावती
श्री पिंगळादेवी संस्थान मंदिर हे एक जागृत देवस्थान असून शक्तीपिठ आहे व अनेक लोकांची
कुलदेवता आहे. श्री क्षेत्र पिंगळादेवी संस्थान हे फार पुरातन मंदिर असून श्री पिंगळा मातेचे मुख्य मंदिर सुमारे ६५० ते ७०० वर्षापूर्वी बांधलेले ऐतिहासिक व जागृत देवस्थान आहे. अमरावती - मोर्शी (राज्य महामार्गावर ) अमरावतीपासून ३५ किमी अंतरावर 'गोराळा ' गाव आहे, येथून दीड किमी अंतरावर टेकडीवर पिंगळाई देवी चे मंदिर आहे. 'पिंगळादेवीचा गड' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्थानाचे कृपाछात्र या विभागावर आहे. पिंगळादेवी संस्थान नेरपिंगळाई, सावरखेड व नांदुरा या तीन गावांच्या सीमारेषेवर असून पिंगळादेवी चे मंदिर नेरपिंगळाईच्या हद्दीत येते. या सिमारेशीचा दगड मुख्य प्रवेशद्वाराचे थोडे अंतरावर गाडलेला आहे. मंदिराचे सभोवताली बारा शिवाचा पसारा आहे. देवी भागवतानुसार या गडास 'सुंदरगिरी पर्वती' म्हणतात. पण आज पिंगळादेवीचा गड हेच नाव प्रचलित आहे.पिंगळा देवीची उत्पत्ती विहिरीतून झाली आहे. जुन्या लोकांच्या मानाण्यानुसार असे कळते कि पिंगळा देवी व कमळजा देवी या स्वयंभू आहेत. या देवीचा मंदिरात भवानी देवीचे मंदिर आहे. व देवळात मनाला भावून जाणारी मूर्ती आहे. व समोर मारोतीचे , मंदिर आहे. थोडे समोर गेल्यावर चढाई लागते . चढाई संपल्यावर एक भव्य राजावाडयाप्र्माने एक भिंतीचा परकोट आहे. बाजूला बेल्फुलाचे व ओटीच्या सामानाचे दुकान आहे. थोडे समोर गेले कि दोन तीन हिरवेगार मोठे वडाचे झाड आहे. समोर पुरातन मारोती चे मंदिर आहे या मंदिराला लागून एक पुरातन दीपमाळ आहे. ती दीपमाळ चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रा त लावली जाते. या मारोतीच्या मन्दिरापासून पूर्वमुखी मोठे परकोट असलेले पिंग्लादेवीचे प्रवेशद्वार आहे. प्रवेश द्वाराच्या आत गेल्यावर बाजूला फार जुने झाड आहे. थोडे समोर गेल्यावर गणपती व देवीचे मूर्ती आहे. थोडे समोर आल्यावर भैरवनाथ व होमकुंड आहे .त्या होमकुंडा पासून समोर गेल्यावर देवीच्या मंदिरात जाण्याचा दरवाजा आहे. त्या दरवाजातून गेले कि देवी च्या गाभार्यामध्ये देवीचे दर्शन होते गाभार्यामध्ये भव्य पाषाणाची शेंदूर माखलेली पिंग्लादेवी ची मूर्ती आहे हि मूर्ती अंदाजे ४ फुट उंच असून तिची गिली १० फुट व्येवढी आहे.या देवीच्या बाजूला देवीची मूर्ती आहे. मंदिरापासून 100 मीटर अंतरावर भोसलेकालीन तलाव आहे. त्याला 'कापूर तलाव' म्हणतात. हा तलाव कधीच आटला नसल्याचे भाविकांचे म्हणणे पडले. तलाव छोटेखानी असून, बाजूला भिंतीचे बाधकाम झालेले दिसून येते. तलावाच्या पाण्याचा कापूरासारखा सुगंध येतो अशी येणाऱ्या दर्शनार्थिची श्रद्धा असल्याने या तलावाला सध्याच्या काळात कापूर तलाव म्हणून ओळखल्या जाते. परंतु फेरफटका मारला असता या ऐतिहासिक तलावाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.तलावाला लागून नागेश्वर महाराजांची समाधी असून, तेथे पुरातन शिवपींड सुद्धा दिसून येते.










विदर्भातील शक्तीपीठ - मुऱ्हादेवी संस्थान, मुऱ्हा, अमरावती
श्री. मुऱ्हादेवी संस्थान हे मुऱ्हा या गावी वसलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.
मुऱ्हा हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील एक छोटेसे खेडे आहे. हे अमरावती शहरापासून ६२ किमी. अंतरावर आहे. मंदिराला आठशे वर्षाचा इतिहास असून पौराणिक वैभव आहे. पुण्याच्या पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रा. गुजल यांच्या मूर्ती पाहणीतून देवीची मूर्ती ही तेराव्या शतकातील असल्याची लेखी माहिती संस्थानाला देण्यात आली आहे. हे संस्थान गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला ३ प्रवेशद्वारे आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तगणांना मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करता येतो.
देवीचे मंदिर अतिशय पुरातन आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते कि, या परिसरात असलेल्या मूर नावाच्या दैत्याचा महिलांना खूप त्रास होता. त्याला साखळदंडाने जेरबंद करून देवीने प्राचीन महादेवाच्या मंदिरात असलेल्या विहिरीत त्याला कोंडून ठेवले. ती विहीर व मंदिर अजूनही या परिसरात आहे. दर चैत्र पौर्णिमेला जेव्हा रात्रौ देवीचा गाड्पगाळचा उत्सव होतो तेव्हा हा दैत्य मोठमोठ्या उसळ्या मारतो, असे अजूनही लोक सांगतात. पूर्वी हा संपूर्ण परिसर अरण्यमय होता, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भक्तांना आदिशक्तीच्या दर्शनाकरिता माहूरला जावे लागे. त्या भक्तांच्या सोयीसाठी माहूरच्या रेणुकेने रूप अवतीर्ण केले. माहूर->मैहयुर-> मुरहा->मुऱ्हा असा अपभ्रंश सांगितला आहे. अजूनही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी या देवीला मुराई असेच संबोधितात. या ठिकाणच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, मूर्ती पूर्णाकृती आहे. या ठिकाणच्या मूर्तीवर काही ठिकाणी तलवारीचे घाव आहेत. याचा अर्थ मुघल काळात सुद्धा हि मूर्ती होतीच. तसेच या ठिकाणाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सकाळी देवीचे आंघोळ केली जाते. तेव्हा मंदिर पूर्णपाने बंद केले जाते.स्त्रीयांशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हि परंपरा आजतागायत पाळली जाते. देवीसंबंधात माहिती देणारे स्तोत्र,सी. डी. , फोटो उपलब्ध आहेत. श्री संत वासुदेवजी महाराज यांनी लिहिलेल्या स्तोत्रामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचे दैवत- आई जगदंबा प्रत्येक मोहिमेला जाण्यापूर्वी शिवाजी महाराज आपले कुलदैवत आई जगदंबेचे स्मरण करून शिवनेरीच्या मंदिरात पूजन करीत असत. मुर्हादेवी येथील जगदंबा मातेचे स्तोत्र लिहिणाऱ्या स्व. वासुदेव महाराजांनी नमूद केल्यानुसार येथे शिवाजी महाराज आपले सरदार प्रतापराव गुजर यांचेसह दर्शनास आले होते. ऐतिहासिक नोंदीनुसार इ.स.१६७० च्या डिसेंबर महिन्यात प्रतापराव अचलपूर मार्गे कारंजा लाडाची लुट करण्यासाठी कित्येक दिवस परिसरात होते, अशी शक्यता वर्तविण्यात येते.
सातपुड्यातील भिल्ल, गोंड, कोरकू हे तिचे खरे भक्तगण आहेत. तसा नागरी मनुष्यांचेही दैवत देवी आहे. मुर-राक्षसाचा या देवीने इथे वध केला म्हणून आख्यायिका आहे. शासकीय राज्यपत्र गॅझेटियर १९६८ चे अमरावती जिल्हा राज्यपत्र पृ. ३७ वे ७५ वर उल्लेख आलेला आहे. अनेक संत पुरुष इथे झाले. रंगपंचमीच्या दिवशी आदिवासी गोंड, कोरकु आपल्या पारंपारिक पद्धतीने देवीची पूजा करतात. झिंग्राजी महाराज येथीलच. नवरात्रात नवदिवस भक्तीगंगेत भिजून जातात. चैत्र महिन्यात एक महिना यात्रा असते.
विदर्भातील शक्तीपीठ - गणोजा देवी, गणोजा, अमरावती
महाराष्ट्रात देवीचे साडेतीन पीठ आहेत. कोल्हांपूरची श्रीमहालक्ष्मी ही त्यापैकी एक पूर्ण पीठ
आहे. या देवीच्या मूर्तीची प्रतिरूप मूर्ती भातकुली (जि. अमरावती) तालुक्यातील गणोजा येथे आहे.. अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गणोजा (देवी) येथील महालक्ष्मीच्या मंदिराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. गणोजा येथील गणू भट हे महाराष्ट्रातील शक्तीपीठ कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे परमभक्त होऊन गेले. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्रात गणू भट कोल्हापूरला अनवाणी जात असत. दर्शनात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. वृध्दावस्थेला आल्यानंतर गणू भट यांनी देवीला विनवणी केली की, यापुढे मी तुझ्या दर्शनाकरिता कोल्हापूरला येऊ शकरणार नाही. त्यावेळी महालक्ष्मीने गणू यांना दर्शन देऊन सांगितले की, आता मीच तुझ्या गावी येणार आहे. तू येथून निघाल्यावर मागे वळून पाहू नको, असे म्हणून देवी अदृष्य झाली. गणू गावी पोहोचत असताना त्यांनी गणोजानजीकच्या नदीजवळ मागे वळून बघितले. त्याचवेळी चमत्कार झाला आणि मागे येणारी महालक्ष्मी त्या नदीच्या काठावर अंतर्धान पावली, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून या गावाला सुद्धा गणोजा देवी नाव पडले.
पाचशे वर्षांपीर्वी नदीपात्राच्या उत्खननात काळ्या पाषाणाची तेजस्वी मूर्ती सापडली. गावकऱ्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, असे सांगितले जाते. या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले असून नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनासाठी विदर्भातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणे शक्य नसले तरी गणोजा येथे गेल्यास महालक्ष्मीचे दर्शन घेतल्याचे समाधान होते, असे भक्त सांगतात.
गणोजा येथील या मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. अडीच फूट उंचीची ही मूर्ती चतूर्भूज आणि सिंहासनावर विराजमान आहे. देवीच्या एका हाती त्रिशूल आहे. दुसऱ्या हाती ढाल, तिसऱ्या हाती गदा आणि चौथ्या हाती पद्म आहे. डोक्यावर मुकूट आहे.
पेढी नदीच्या किनाऱ्यावरच पूर्वमुखी भव्य मंदिर आहे. मंदिराचा घुमट दर्शनीय असून घुमटाच्या दगडांवर कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिरातच राधाकृष्ण, विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती आहेत.
यात्रेच्या काळात या ठिकाणी तीर्थस्थापना, अखंड वीणा वादन, षोडशोपचार पूजा, अभिषेक, कीर्तन, हरीपाठ, भारूड, भागवत कथा, दहीहांडी, महाप्रसाद असे कार्यक्रम होतात. नवरात्रात देवीचा सोन्याचा मुखवटा विलोभनीय दिसतो. दागिन्यांनी सजलेले देवीचे रूप भक्तांना वेगळीच अनुभूती देत असते.












पिंगलेश्वरी देवी, कोरंभी, भंडारा
भंडारा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर वर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर उंच डोंगरावर असलेली ही देवीची मूर्ती
चारशे वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जातं. देवी शिवपिंडावर असल्यामुळे तिचं नाव पिंगेश्वरी असं पडल्याची आख्यायिका आहे. पिंगेश्वरी देवीची मूर्ती नयनरम्य आहे. कोरंभी गावातीलच नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील भाविक या कोरंभी देवीचे दर्शन घ्यायला येतात.
मंदिरात आल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन घेण्याकरिता दोनशे एक्कावन (२५१) पायऱ्या चढावं लागतं. मंदिरात प्रवेश करण्याआधी कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते लागते लागते. त्यानंतर मंदिराच्या समोर असलेल्या भोले शंकराचे दर्शन घेऊन भाविक पिंगेश्वरी देवीच्या मंदिरात पोहचतात. जे भाविक छत्तीसगढ या राज्यातील उंच पहाडावर असलेल्या बमलेश्वरी देवीचे दर्शन घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी कोरंभी येथील देवी खूप महत्त्वाची मानली जाते. देवीची मूर्ती पूर्वाभिमुख असून पहाटेच सूर्याचे पहिले किरण या देवीच्या मुखावर पडतात. त्यामुळे देवीची मूर्ती अधिकच बहरून दिसते.
चैत्र नवरात्री असो किंवा शारदीय नवरात्र या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल बघायला मिळते. या मंदिराला विदर्भाचे डोंगरगड असेही म्हटले जाते. मध्यप्रदेश, गोंदिया, बालाघाट, भंडारा या जिल्ह्यातील भाविक या देवीला नवस मागतात व नवस पूर्ण झाला की भाविक या ठिकाणी नवस फेडायला येतात.
भंडारा जिल्ह्यातील पांडे यांनी या मंदिराचा विकास करायला सुरुवात केली. या मंदिराचा जीर्णोद्धार १९८८ साली झाला. आज मंदिरात लाखो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. अत्यंत नयनरम्य असलेल्या या पिंगेश्वरी देवीचे दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवा.






























अंबादेवी संस्थान, तारापूर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यांत मोताळा तालुक्यातील तारापूर येथील प्राचीन हेमाडपंथी अंबादेवी मंदिर हे बुलढाणा जिल्ह्यातील
प्रसिद्ध मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांनी या देवीची स्थापना केलेली आहे. राणी तारामती च्या नावाने या गावाचे नाव तारापूर असे ठेवण्यात आले आहे. येथे निसर्गरम्य परिसर आणि अद्भुत शांतीचा अनुभव येथे मिळतो. नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या भक्तांनी हा परिसर दुमदुमून जातो. प्राचीन काळापासून येथे एक भव्य हेमाडपंथी मंदिर अस्तित्वात होते. त्या मंदिराचे अवशेष येथे पडलेले आढळून येतात. दगडावर कोरीव काम असलेले स्तंभ, अनेक देवी देवतांच्या मुर्ती, मंदिराचे तुटलेले अवशेष येथे सापडतात. काही वर्षांपूर्वी त्या मंदिराचा जिर्णोद्धार करून त्याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले. जुन्या मंदिराचे असंख्य अवशेष या बांधकामात गडप झाले.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक टेकडी आहे. ही टेकडी नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. कारण या टेकडीचे खोदकाम करताना दगड, विटा, आणि माती सापडते. टेकडीच्या सर्वात वरच्या भागावर आजही विटांनी बांधलेली एक भिंत दिसून येते.
असे सांगण्यात येते की या मंदिरावर परकीय आक्रमण झाले होते. त्यांनी मंदिराची तोडफोड केली. या मंदिरात 5 फूट उंचीची सोन्याची देवीची मूर्ती होती, ती मूर्ती वाचवण्यासाठी तारापूर येथील गावकर्यांनी आपली घरे पाडून त्या दगड, विटांनी ती मुर्ती झाकून ठेवली आणि तिथे ही टेकडी तयार झाली. टेकडीच्या शिखरावर देवीची पुजा केली जाते. या टेकडीच्या आत आणखी एक प्राचीन मंदिर दडलेले असण्याची शक्यता आहे. टेकडीच्या पायथ्याशी खूप ठिकाणी मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. मंदिराच्या पायथ्याशी खोदकाम केलेले आहे. मंदिर आणि मूर्ती शोधण्याचा प्रयत्न येथे झालेला आहे असे दिसून येते. पण येथे कोणीही गावकरी नाही त्यामुळे या मंदिराची पूर्ण माहीती अजून दडलेलीच आहे.
तारापूर हे गाव मातीने बांधलेल्या तटबंदीमध्ये होते. गावाच्या चारही बाजूंना चार मातीचे भव्य बुरूज आहेत. ते बुरूज आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. आज या गावात एकही मनुष्य नाही. तिथे आज शेती केली जाते. याच ठिकाणी ऋषी विश्वामित्र यांनी वास्तव्य केले होते. त्यांच्या नावावरुनच येथे उगम पावणार्या नदीला विश्वगंगा नदी म्हणून ओळखले जाते.
पुरातत्व विभागाने येथे दुर्लक्ष केलेले आहे. या मंदिराच्या अवशेषांचा अभ्यास केल्यास मंदिराच्या इतिहासाबद्दल आणखी माहीती प्राप्त होईल.
डोंगराळ भागात हे निसर्गरम्य ठिकाण असून जवळच पलढग धरण आहे. पर्यटकांनी व इतिहासकारांनी अवश्य भेट द्यावी.
दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या
मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा?
विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..
रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..
त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.
या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.
सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.
त्या मूर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.
शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..
रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.
गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.
कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.
आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.





भोलेश्वर मंदिर, अंजनी बुद्रुक, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे असलेले पुरातन हेमाडपंथी शिवालय

जगदंबादेवी शांती उत्सव, (मोठी देवी) खामगाव, बुलढाणा
संपूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणी म्हणजेच बुलढाणा जिल्हातील खामगाव येथील अनेक वर्षापासून
जगदंबेचा शांतीउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, जगदंबा उत्सव ची सुरवात कोजागिरी पासून केली जाते. देवीच्या उत्सवाची सुरुवात १६०८ मध्ये सुरु झाली, नवराञात नऊ दिवस दैत्यांशी युध्द केल्यानंतर तिचा क्रोध शांत हाण्यासाठी हा शांतिउत्सव, या देवीला मोठी देवी देखिल म्हणतात. क्रोधा मुळे चेहरा लाल रक्तवर्ण आहे. देवीचे मुळ ठाणे तेलंगणा मध्ये बोधन येथे आहे. पण आई चे भक्त खामगाव ला स्थाइक झाले. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रांनंतर जगदंबा देवी शांती उत्सव १० ते १२ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
अंचलेश्वर मंदिर आणि किल्ला, चंद्रपूर
पुरातन गुफा, पुल्लर, ता. भिवापूर, जि. नागपूर









विदर्भ सर्वार्थाने सर्वांगसुंदर आहे राव. प्रत्येक गोष्टीत निराळीच ब्युटी आहे. गडचिरोली नागपूर रस्त्यावर नागभिडच्या थोडं पुढं आल्यावर एक लाल रंगावर पांढऱ्या
अक्षरात लिहिलेला बोर्ड दिसला, प्राचिन पाचपांडव गुफा कुनघाडा चक आपले सहर्ष स्वागत करत आहे. थोडं आत वळलो आणि हा ऐवज हाती आला.
माझ्यासारखा राज्यात, देशात (म्हणजे आपसूकच जगात) सर्वाधिक लेणी असलेल्या तालुक्यातला गडी या ठिकाणी गुळाच्या ढेपंसारखा तासभर पाघळून बसला म्हणजे हे लेणं किती गुळचाट असेल याची कल्पना करा. समोरुन, कोपऱ्यातून, वरुन, खालून... शक्य त्या प्रत्येक कोनातून हे घडिव शिल्प अनुभवत होतो आणि प्रत्येक अॅगलने अलौकिक आनंद उरात साठत होता, ठसत होता.
काही लेणी ढोबळी मिरचीसारखी असतात, काही तळायच्या लांब फुगीर मिरचीसारखी, काही सुईच्या मिरच्या तर काही उरफट्या मिरच्या... हे लेणं म्हणजे लवंगी मिरची आहे. छोटंसं... बुट्टं, गिट्टं आणि ठसठशित. एकदम ठुमक्यात मनात घर करुन गेलं. जणून काही आत्ताच रेडी झालंय वन आरके, वन बिएचके फ्लॅटसारखं. खरंच यांची रचना माजघर, दिवाणखाना, ओसरी अशा पद्धतीची वाटली मला.
हा पूर्व विदर्भ आहे... इथल्या बहुतेक नवाट पुरातन वास्तू गोंड काळाशी जोडल्या गेलेल्या आहेत... आणि जुनाट पुरातन वास्तू थेट रामायण आणि महाभारताशी. या लेण्यांचा संबंध स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडलाय आणि तो समाजमान्यही पावलाय. हा भाग दंडकारण्यात मोडतो. पांडव वनवासात असताना या गुहांमध्ये मुक्कामी होते, किंबहुना त्यांच्या मुक्कामांसाठीच या गुहांची रचना केली गेली, असेही म्हटले जाते. हे सर्व ज्या दगडात आहे त्याच्या माथ्यावर एक पदचिन्ह कोरलेले आहे. ते पांडवांवर आक्रमण केलेल्या राक्षसाचे आहे म्हणतात.
ग्रामस्थांनी इथे पाचपांडव व हनुमान यांच्या संयुक्त मंदीराची उभारणी केलेली आहे. दत्त जयंतीला इथे उत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो. पावसाळ्यात या ठिकाणचे सौदर्य अधिक अफलातून असणार याचा अंदाज येतो... पण आत्ताही ऐन रणरणत्या उन्हातही त्याचे सौदर्य तसूभरही कमी नाही... फक्त आपली तहान जागी पाहिजे...
आसपासच्या गावठी आंब्यांना कैऱ्यांचे घोस च्या घोस लगडलेले आहेत. लेण्यांसमोरच्या हातपंपाचं पाणी दुसऱ्या झटक्यालाच उसळी मारुन वर येतं.. आयाबायांची धुणी धुवायला जायची लगबग सुरु असते डोक्यावर कपड्यांनी भरलेल्या बादल्या घेवून... एखादं म्हतारं हातातली काठी हनुवटीवर टेकवून विश्वाची चिंता वाहत मस्त मिचमिच्या डोळ्यानं शेरडं वळत असतं. उन मस्त लईत लाही लाही लाही करत असतं... त्याला कुठं कुठं लपलेल्या चिरक्या राग चिरचिर गावून चिरशांतीच्या कमाल पातळीवर नेवून पोचवत असतात. आपण त्याच शांतीशी वेव्हलेंथ जुळवायची, या अनोख्या वास्तुशी एकरुप निसर्गाशी एकात्म पावायचं आणि अवघा रंग एक झाला म्हणत रोमांचित होऊन पुढचे कित्येक तास... प्रहर... दिवस... रोम रोम जागवत रहायचं...
सुरजागड वरून घेतलेले विहंगम दृश्य

श्री भगवान नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्थळ - मेहकर, बुलढाणा
नृसिंह मुर्ती, मेहकर, बुलढाणा
जगामध्ये
पौराणिक ११ नृसिंह आहेत. त्यापैकी ६ वे नृसिंह मंदिर मेहकर (जि. बुलडाणा)
येथे आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या महात्म्यात या मेहकरच्या
नृसिंहाचा उल्लेख आहे, एवढे हे स्थान प्राचीन आहे. म्हणून ते खूप प्रसिद्ध
आहे.
विष्णूच्या दशावतारापैकी ज्या अवताराची पूजा होते, असा नृसिंह
हा पहिला अवतार आहे. मेहकरची ही नृसिंहमूर्ती खूप सुबक आणि रेखीव आहे.
पाकिस्तानातील
मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर भगवान नरसिंहाने मेहकर येथे भक्त
प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते, अशी आख्यायिका आहे. अयोध्येहून
लंकेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी मेहकरचा राजा मेघंकर याला नृसिंहरूपात
दर्शन दिले होते आणि कायम वास्तव्य करण्याचे अभिवचन दिले होते, असाही
संदर्भ आहे. या मंदिरात विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष
महत्त्व आहे.
ही स्वयंभू श्रीमूर्ती अनेक शतके जमिनीखालील हेमाडपंती
भुयारात बंदिस्त होती. (ते हेमाडपंती भुयार अद्यापही शाबूत आहे.) इ.स.
१५६९ साली नागपूरचे नृसिंहभक्त श्री. श्यामराज पितळे यांनी ही श्रीमूर्ती
त्या भुयारातून बाहेर काढून सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित केली.
तेव्हापासून साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला साडेचारशे वर्षांची परंपरा
आहे.

नृसिंह मेहकर (दृष्टांत)
चौदाव्या शतकाच्या ऊत्तरार्धात
नागपूर येथे श्री शामराज पितळे हे महान नृसिंह ऊपासक राहत होते. ऊपासना करत
असताना ऐका रात्री त्यांना स्वप्न पडले व स्वप्नात नृसिंहाने दर्शन देऊन
सांगितले की "नागपूर पासून 125 कोस पश्चिमेकडे महंकावती प्राचीन नगरी आहे.
या नगरीच्या ऊत्तरेस व पैनगंगैच्या पुर्वेस एक पडका वाडा असेल त्या वाड्यात
एक पीपळांचा विशाल वृक्ष आहे. त्याच्या ऊत्तरेस तुळशी जवळ खोदावे म्हणजे
भुयार सापडेल या भुयारात माझी विशालकाय पाषाणाची मुर्ती बंदिस्त करून
ठेवण्यात आली आहे. मला मोकळे कर व तेथेच माझी ऊपासना कर".
1569 मध्ये
स्वप्न दृष्टांत नुसार आज्ञा मानून ते मेहकर आले. त्याना सर्व खुणा
आढळल्या. भुयारात प्रवेश करताच ते आश्चर्य चकित झाले त्याना तेथे भगवान
प्रल्हाद वरद श्री लक्ष्मी नृसिंहाची साडेचार फुटाची ऊंच व तीन फूट रुंद
अश्या भव्य मुर्ती चे दर्शन झाले. बाजुला नंदादीप तेवत होता व नुकतीच कोणी
तरी पुजा केलेली दिसत होती. भुयार बाराफुट खोल होते. (दृष्टांत माहिती -
वर्षा मिश्रा)
भुयारातल्या श्रीमूर्तीला प्रतिष्ठापित केल्यानंतर
श्यामराज पितळे मेहकरलाच राहिले. पुढे तीनशे वर्षांनी त्यांच्या घराण्यात
साक्षात्कारी संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांचा अवतार
झाला. त्यांचे जीवनचरित्र अद्भुतरम्य आहे.
सध्या त्यांचे चौथे
उत्तराधिकारी विद्यमान गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे आहेत.
त्यांच्या आदेशानुसार संस्थानचे वर्षभर सतत धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू
असतात. श्रावण महिन्यात एक आठवडाभर विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे रात्रंदिवस
अखंड पाठ होतात. रात्रभर पुरुष आणि दिवसभर महिला एकही मिनिटाचा खंड न पडू
देता या मंदिरात हे पाठ करतात. हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम आहे.
विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थेने या विक्रमाची नोंद घेतलेली आहे.
नृसिंह
नवरात्रोत्सवामध्ये श्रीमूर्तीला दररोज वार देवतेच्या पोषाखाने सजविले
जाते. या पोशाखाचे दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. यावर्षी कोरोनाच्या
साथीमुळे नवरात्रोत्सवातले जाहीर व प्रकट कार्यक्रम स्थगित केले आहेत.
मात्र सर्व परंपरागत विधी यथाशास्त्र होणार आहेत.
जगातील ११ पैकी ६
वे नृसिंह मंदिर असल्याने दूरवरून लोक मेहकरला दर्शनाला येत असतात. आणि
सोबतच जवळच असलेल्या लोणार सरोवरालाही भेट देतात.
(माहिती - गोपाल पितळे) 




केवल नृसिंह, रामटेक, नागपूर
नरसिंहाचे आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील..
पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प..
नागपुर पासून जवळपास 40-50 किमी अंतरावर असणाऱ्या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या 'रामटेक' शहरातील एक पुरातन मंदिर..
80 च्या दशकपर्यंत एक फार मोठे शिल्प स्थानिकांकडून पूजले जायचे.
लोकांच्या-भक्तांच्या मते ते एका मारुतीचे शिल्प होते.
पुण्यातील
ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व अभ्यासक जामखेडकर सर हे या हनुमानाच्या मंदिरात
एका सर्वेक्षणासाठी आले होते.मंदिरातील साऱ्या भिंतीवर चुनखडीचा मोठा लेप
देण्यात आलेला होता,ज्यामुळे मंदिरातील स्थापत्यशिल्प आणि कलेवर त्याचे
दुष्परिणाम झाले असते,म्हणून ते साफ़ करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती
घेण्यात आले,आणि ह्याच कामात अचानक हाती आला एक मोठा ठेवा..
इसवी
सन तिसऱ्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोड्याफर प्रमाणात
मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयास आले.दोन शाखांमधे
विभागल्या गेलेले 'वाकाटक' घराणे म्हणजे एक प्रतिष्ठीत घराणे..
ह्याच
घराण्यातील 'वत्सगुल्म' शाखेच्या राजांनी अजिंठा लेणीमधे आपल्या कलेची छाप
उमटवली.आणि दुसऱ्या 'नंदिवर्धन' शाखेने विदर्भात अभुतपूर्व राज्यक्रांति
केली.
गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवणाऱ्या या शाखेची सून म्हणजे "प्रभावतीगुप्त"..!!
आणि तीच्या कारकिर्दीमधे हे मंदिर बांधण्यात आल्याचे उलेख मंदिरातील शिलालेखात आढळून आले.
मंदिर संवर्धन करत असताना अचानक हाती आलेल्या ह्या शीलालेखामुळे इतिहास बदलला.
वाकाटक साम्राज्याने मंदिर बांधल्याचा पहिला पुरावा हाती आला.पुरातत्वाची मदत घेऊन इतिहासचे नवे पैलू उलगडल्या गेले.
आतल्या मुर्तीवर चढवलेला शेंदुराचा थर काढण्यात आला,आणि समोर आले हे अतिविशाल शिल्प..
हे
शिल्प मारुतीचे नसून,नृसिंहाचे होते.जवळ जवळ 6 फुट उंचीच्या ह्या शिल्पात
असणारी अखंड नृसिंहाची मूर्ती निव्वळ अद्भुत आहे.हातात चक्र असल्याने ह्या
मूर्तिला 'चक्रपाणी' ह्याही नावाने ओळखतात.
लक्ष्मीशिवाय असणाऱ्या ह्या शिल्पाचा उल्लेख 'केवल नृसिंह' असा केला जातो.
आज ही जागा पुरात्तव खात्याच्या अखत्यारित्या आहे आणि त्याचमुळे ही मूर्ती,मंदिरातील शिलालेख सुस्थितीत आहेत.
पण
लोकांची ह्या मारुतीवर श्रद्धा एवढी,की अगदी हुबेहुब ह्या शिल्पासारखे
छोटे शिल्प तयार करुण आणून,मंदिराच्या समोरच छोट्या मंदिरात स्थापन करुण
त्याला शेंदुर लावला आणि त्याची अजूनही मारुती म्हणूनच पूजा केली जाते..!!
ह्याच
मंदिरापासून थोड्या दुरवर अजून एक नृसिंहाचे मंदिर आहे.त्यातील शिल्पही
तेच,मंदिर बांधनीही तीच आणि नृसिंहही एकटा..पण ह्याचे नाव 'रूद्रनृसिंह'
प्रभावतीगुप्त हिने तीच्या पतिच्या,रुद्रसेना याच्या स्मृतीमधे हे मंदिर बांधले होते.
5
व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ 250 वर्षे राज्य केलेल्या ह्या
साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली
इतिहास..!!
- केतन पुरी
मोवाड, ता. नरखेड, जिल्हा नागपूर येथे वरंधा नदीच्या तीरावर फार पुरातन नृसिंह मंदिर आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे पण पुरातन नृसिंह मंदिर आहे,
नृसिंह मंदिर, पुसद, यवतमाळ
यवतमाळ
जिल्ह्यातील पुसद हे तालुक्याचे ठिकाण. या गावातील अटकेश्वर वोर्डात हे
नृसिंह मंदिर आहे. हि पुसदची जुनी वस्ती आहे. ह्या मूर्ती व मंदिराविषयी
दंतकथा लोक मानसात रुजली आहे. असे सांगतात कि, कशीच्या एका ब्राह्मणाला
साक्ष्त्कार झाला व त्याने गावातील १. उकिरडा बाजूस करावयास सांगितला. त्या
खाली एक मोठी उभी शिळा दिसली. ती शीळा बाजूला केल्यावर मूर्ती नजरेस पडली.
हि मूर्ती जेथे सापडली तेथेच चौथरा बांधून मंदिर बांधले. मंदिराच्या
प्रवेशद्वारावर नागारखाना आहे. येथून आत गेले ६ पायर्या चढून सभामंडप
लागतो. चुन्यात बांधलेला हा मंडप प्रशस्त असून छत उंच आहे. समोरच्या
भिंतीला असलेल्या लहान झरोक्यातून गाभार्यातील नरसिंहाच्या उजव्या पायाचे व
पितळी पादुकांचे दर्शन घडते. ५ पायर्या उतरून गेल्यावर गाभारा नजरेस पडतो.
मूर्ती प्राचीन आहे. काहींच्या मते २००० वर्ष पूर्वीची तर काहींची ५००
वर्ष जुनी असा मत आहे. मूर्ती यवनांच्या भीतीपोटी लपवली असा अंदाज आहे.
नरसिंह मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीवर वज्रलेप केला आहे. मूर्ती
द्विभुज असून ४ फुटाची आहे. एका हातात चक्र तर दुसरा हात मांडीवर ठेवला
आहे. हातात बाजूबंद असून यज्ञोपवीत परिधान केले आहे. नार्सिन्हाचा चेहरा
सौम्य असून नजर थोडी झुकलेली आहे. जटामुकुट परिधान केला असून बाजूला
प्रल्हाद व लक्ष्मीच्या अंजनी मुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे
प्रभावळ असून पाठीमागे विष्णूची चतुर्भुज मूर्ती भिंतीत बसवली आहे.
विष्णूच्या बाजूला मध्यभागी सरस्वती व डाव्या बाजूला कालियामर्दन कृष्णाची
मूर्ती आहे.
नृसिंह जयंती ९ दिवस साजरी केली जाते. भंडारा होतो व साधारण १०००० लोक त्याचा लाभ घेतात

नरसिंह मंदिर, अंजी, यवतमाळ
यवतमाळ
जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात असलेले अंजी हे गाव. येथे 12 व्या शतकातील
प्राचीन भगवान नरसिंहाच मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून
पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कोरीव स्तंभावर सभामंडप आहे त्यानंतर गाभार्यात
नृसिंहाची मुर्ती आहे. मुर्ती च्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहे असून
मांडीवर हिरण्यकशपू आहे. मुर्ती खूप पुरातन असून अंदाजे 1000 वर्षे जूनी
असावी. चंद्रहास नावाच्या राजाने ही मुर्ती स्थापन केली अशी आख्यायिका
गावकरी सांगतात.
महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रपदेश व कर्नाटक राज्यातून
येथे भाविक येत असतात. धनत्रयोदिशीच्या दिवशी येथे किरणोत्सव सोहळा साजरा
केला जातो. वैशाख पौर्णिमेला नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते

नृसिंह मंदिर, जानोरी, बुलढाणा
जानोरी
येथे नृसिंह मंदीर खूप प्राचीन आहे. येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही
मूर्ती खूप प्राचीन आहे, या मूर्तीच्या चेहऱ्यावरील हाव भाव भारतातील
कुठल्याच नृसिहं मूर्तीला नाहीत, नृसिंहाची प्रत्येक मूर्ती हि आक्राळ
विक्राळ भाव असलेली आढळते, परंतु जानोरी येथील मूर्तीची मुद्रा शांत
स्वरूपाची आहे, तशी मुद्रा भारतात कुठेच नाही, आपण जानोरी येथील प्राचीन
नृसिंह मंदिराला भेट देऊन अनुभव घेऊ शकता.
नृसिंह मंदिर, देऊरवाडा, अमरावती
निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थँक्यू’ म्हणण्याचा विधी "आठवीची पूजा"
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार. निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थॅंक्यू’ म्हणण्याचाच जणू हा विधी आहे. अष्टमीला केली जाणारी पूजा म्हणजे आठवी, आज ही पूजा अनेक ठिकाणी साजरी झाली. त्यासाठी बाजारातही संबंधित पूजासाहित्याची खरेदी दिवसभर चालली.
दसरा आणि
दिवाळीच्या मध्ये ही पूजा होते. त्यामागे अनेक लोककथा, दंतकथा आहेत. भारतात शेती संपन्न आहे. या शेतीसंस्कृतीतून अनेक सण आलेत. आठवीची पूजा ही देवीची पूजा मानली जाते. काहीजण ही लक्ष्मीही मानतात. अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही पूजा होते.
एरवी शेतातून पिकं घरात आलेली असतात. या पिकांचीही पूजा या निमित्तानं करतात. पूर्वी ज्वारी हे मुख्य पीक होतं. त्याचेच पदार्थ खाण्यात असायचे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या या पूजेत ज्वारीचंही महत्त्व आलं. ज्वारीच्या कण्यांची आंबील यावेळी केली जाते. लोककथांनुसार कुंती आणि गांधारीने ही पूजा केली असं सांगतात.
आपली माता कुंती ही पूजा करीत आहे, हे अर्जुन पाहतो. आपल्या आईसाठी तो देवी अथवा इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र आणि ऐरावत पृथ्वीवर येतात. त्या ऐरावत हत्तीवर बसून कुंती प्रसाद वाटते. या दिवशी अनेकजण आपापल्या देवतांची पूजा करतात.
कालानुसार विविध देवता वाढलेत. काही कमी झालेत. एकंदरीतच हा कृषीसंस्कृतीतला महत्वाचा सोहळा आहे. विशेषतः हा विदर्भातच होतो. दिवाळीच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज होतात. आपल्या ईश्वराला, निसर्गाला थँक्यू म्हणण्याचाच हा सोहळा आहे.
(माहिती - सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती)















रुद्रेश्वर मंदिर, पोहणा, हिंगणघाट, वर्धा
पुरातन शिव मंदिर, चिखली, रिसोड, वाशिम
पुरातन बारव, कुंबेफळ, सिंदखेड राजा, बुलढाणा
अंबाळा तलाव, रामटेक, नागपूर
महागिरी महादेव गुफा, मांगेरी, संग्रामपूर, बुलढाणा
बुलढाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुक्यात सोनाळा येथून 14 किमी अंतरावर अंबाबरवा अभयारण्य आहे, या वनपरीक्षेत्रात मांगेरी याठिकाणी महागिरी महादेव गुफा अभयारण्याच्या मधोमध एका उंच पर्वत शिखरावर ही गुफा अस्तित्वात आहे.
सातपुड्याच्या हिरव्यागार पर्वतरांगे मध्ये वसलेले, नावा प्रमाने महा शिखरावर असलेले महादेवाचे ठिकाण. हे ठिकाण सोनाळा गांवापासून १४ किमी आहे. पिंगळी, शेंबा (अदिवासी तांडे) मार्गे मोटर सायकलने 'फॉरेस्ट
कँप' पर्यत जाता येते. तेथे मोटर सायकल उभ्या करुन शिखरावर चढाई करावी लागते. मोटर सायकलचा ६ किमी चा प्रवास हा एक थरारक अनुभव आहे. निसर्गाला एकदम जवळुन अनुभवण्या साठी हे ठिकाण सर्वोतम आहे. सातपुडा पर्यटन करणार्या ट्रेकर्सनी येथे चढाईचा आनंद घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य परिसरात ही अतिप्राचीन गुफा अस्तित्वात आहे, या गुफेच्या बाजूलाच आणखी एक गुफा आहे. काळ्या पाषाणात ह्या गुफा कोरलेल्या आहेत. आत मध्ये दगडी स्तंभ आहेत, गुहेत नेहमीच पाणी झिरपत असते त्यामुळे गुफेत पाणी साचलेले दिसते. याच टेकडीवर एक दगडात कोरलेले पाण्याचे कुंड देखील आहे. टेकडीवरून दिसणारा निसर्गरम्य परिसर हा मन मोहून टाकणारा आहे. डोंगर, हिरवी दाट गर्द झाडी, पाण्याचे झरे, धबधबे बघून मन प्रसन्न होते.
हा भाग मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येत असल्यामुळे येथे भेट देण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते. यात्रे दरम्यान येथे सर्वाना येण्यास मुभा दिलेली असते. श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी मांगेरी यात्रा असते. असंख्य संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.
पुरातन लेणी, शिवणी टाका, सिंदखेड राजा, बुलढाणा
मुरुडेश्वर मंदिर, केशव शिवणी, सिंदखेड राजा, बुलढाणा
खूप
दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यात माळढोक दिसला (Great Indian Bustard sighted
in Chandrapur District). गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात सर्वेत हा
पक्षी आढळला नव्हता, आजही सोलापूर आणि चंद्रपुर जिल्ह्यात 2 पक्षी दिसतात.
वनविभागाने संरक्षनासाठी लक्ष दिले पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातून हे पक्षी
नामशेष होतील.
पितळी
भांडी तयार करण्यासाठी प्रसिद्ध अशा भंडारा शहराला पितळी भांड्यांचं माहेर
म्हणावं लागेल. इथे पितळ, कांसे, तांब्यापासून तयार करण्यात येणाऱ्या
भांड्यांचा इतिहास फार जुना आहे. भटक्या अवस्थेनंतर नद्यांच्या काठांवर
मानवी जीवन स्थिरावलं. त्यानंतर अनेक संसाधनांची गरजेनुसार निर्मिती सुरू
झाली. भौगोलिक परिस्थिती व सामाजिक प्रघात, परंपरा यानुसार मानवाने अनेक
वस्तूंचा शोध सुरू केला.
मानवाने मातीच्या भांड्यांचा वापर सुरू
केल्यानंतरच त्यापेक्षा टिकावू आणि मजबूत धातूची भांडी तयार केली. यात
वेगवेगळ्या भागांतून आलेल्या लोकांचं कौशल्य आणि परंपरांमधून अधिक चांगल्या
प्रकारे धातूपासून विविध प्रकारची भांडी तयार केली असावीत असं समजलं जातं.
भंडारा
हा भाग पूर्वी वाकाटक साम्राज्याचा भाग होता. भंडारा शहराच्या जवळचं गावं
नंदीवर्धन (नगरधन) इथं वाकाटक राजा रुद्रसेन (इ.स. ४०० ते ४५०) द्वितीय
याचा विवाह मगधचा सम्राट चंद्रगुप्त द्वितीय याची मुलगी प्रभावती गुप्त
हिच्यासोबत झाला. तेव्हापासून या भागात उत्तर-पूर्व भारतातील लोकांसोबतचा
संपर्क वाढला. रुद्रसेनच्या अकाली मृत्यूनंतर मुलं लहान असल्यामुळे राणी
प्रभावती यांनीच राज्यकारभार सांभाळला. तिच्या मदतीसाठी गुप्त राजांनी
पंडित कालिदास यांना पाठवलं होतं. या काळापासून पूर्व विदर्भाचा संपर्क
पाटलीपुत्र राजधानीसोबत आल्यामुळे धातूपासून शस्त्रं व भांडी तयार
करण्याच्या उद्योगाचा अधिक विकास होत गेला. त्यानंतरच्या काळात रजनपूर
(बिलासपूर, छत्तीसगड) येथील रतनदेव राजाने या भागावर स्वारी केली, तेव्हा
पितळी भांड्यांपेक्षा श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या कांस्य धातूपासून भांडी
तयार करण्याची पद्धत सुरू झाली. याचप्रकारे इतर प्रांतांतील लोकांकडून
होणाऱ्या मागणीनुसार पितळ, कांसे, तांबे आणि भरत (मिश्रधातू)ची भांडी
भंडारा इथं तयार केली जात होती.
पितळी प्लेटला ठोकून ठोकून
भांड्यांचा आकार दिला जातो, त्या भांड्यांना पिटीव भांडी म्हणून ओळखलं
जातं. नागपूरकर भोसलेंच्या काळात भंडारा इथं तयार होणारी पिटीव भांडी
बैलगाडीने विक्रीसाठी माहूर, बालाघाट, देवगड (मध्य प्रदेश), रायपूर,
भद्रावती, कौंडिण्यपूर, मार्कंडा आदी महत्त्वाच्या व यात्रेच्या ठिकाणी
पाठवली जात होती. त्या वेळी येथील महात्मा फुले वॉर्ड, संताजी वॉर्डात
घरोघरी धातुकामाचे लहान स्वरूपातील कारखाने होते.
शहरातील व
परिसरातील ग्रामीण कामगार त्यात काम करत होते. इंग्रजाच्या काळात या
कामाबाबत भंडारा गॅझेटियरमधील नोंदीनुसार, ‘पूर्वी उत्तरेकडून आलेले कासार
आणि दक्षिणेकडून आलेले पांचाळ इथं पितळी भांडी तयार करत. त्यासाठी
मुंबईवरून पितळी प्लेट मागवली जात असे, किंवा जुनी मोडीची भांडी (अर्ध्या
किमतीत घेतलेली) वितळवून नवीन भांडी तयार करतात. यात गुंड, कप, प्लेट,
घंगाळ आदी भांडी इथं बनविली जातात. तसंच, कांसे व भरत या धातूपासूनही भांडी
तयार केली जात होती. त्यावेळी लग्नसमारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांत
धातूची भांडी भेट देण्याची प्रथा रूढ झाली होती.’ मोठ्या घरातील लोक
कांस्याचं ताट व वाट्यांचा वापर करत होते. समाजातील सर्वसाधारण लोक
नेहमीसाठी पत्रावळींचाच वापर करत होते. मात्र, पितळी धातूची भांडी ही
चांगली गुंतवणूक समजली जात असल्याने मुलीच्या लग्नात पितळ, तांबे व कांस्य
धातूची पाच तरी भांडी देण्याचा प्रघात रूढ झाला होता. त्यामुळे बाजारातील
किमती वाढल्या तरी ही भांडी विकली जातील, अशी आशा येथील कारखानदारांमध्ये
होती.
सुमारे ५० ते ५५ वर्षांपूर्वी श्रीमंत उद्योजकांनी इथं
पितळेच्या प्लेट तयार करण्यासाठी यंत्रांवर आधारित कारखाने सुरू केले.
यामध्ये उत्पादनाचा वेग वाढल्याने भंडाऱ्याच्या पितळी भांड्यांची झळाळी
संपूर्ण मध्य भारतात पसरली होती. मोटारी व रेल्वेद्वारे मालवाहतूक होत
असल्याने दररोज परराज्यांतील व्यापारी इथं माल खरेदीसाठी येत होते. शहरातील
गांधी चौकापासून मोठ्या बाजारापर्यंत गल्लीबोळांत पितळी भांड्यांची दुकानं
होती. ३० ते ३५ वर्षांपूर्वी शहरात लहान-मोठे सुमारे २० ते २५ कारखाने
होते. पावसाळ्याचे तीन महिने सोडले तर वर्षभर पितळी भांड्यांची निर्मिती
होत होती. त्या वेळी उच्चशिक्षित असलेले उद्योजक रंगनाथजी धूत, रामविलास
सारडा, श्यामसुंदर सारडा, सुरेंद्र चड्डा, राधाकिसन काबरा आणि मराठी
उद्योजक केशवराव निर्वाण हे येथील पितळ उद्योगाचा आधार होते. त्या वेळी
पंजाब, रेवाडी, हरियाना येथून कुशल कामगारांना बोलावलं जात होतं. त्यांना
दैनंदिन मजुरीसोबत उद्योजकाकडून राहण्याची व्यवस्था केली जात होती.
कालांतराने
दैनंदिन वापरात असलेल्या पितळ धातूच्या सतत वाढत गेलेल्या किमती आणि
उपलब्ध झालेले पर्याय यामुळे पितळी भांड्यांची मागणी कमी होत गेली.
त्याऐवजी ॲल्युमिनिअम, स्टीलच्या भांड्यांची मागणी वाढत गेली. १९९० च्या
दशकात आलेल्या प्लास्टिकने सर्वच क्षेत्रांत जारदार मुसंडी मारल्याने अन्य
धातूंसह पितळ, तांबे आदींच्या भांड्यांची विक्री कमी झाली. त्यासोबतच
कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी आणि कुशल कामगारांचा अभाव
यामुळे पितळनिर्मितीवर बंधनं आलीत.
कधीकाळी मोठेपणाचं प्रतीक असलेले
कांसं खरेदी करणं सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर गेलं. साधा गुंड खरेदी
करण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये लागतात, त्यापेक्षा प्लास्टिकची बकेट
स्वस्त व वापरास हलकी पडते. याच कारणामुळे पितळी भांड्यांचा बाजार अन्य
धातूंसह प्लास्टिकनं मोठ्या प्रमाणात काबीज केला आहे. आता वर्षभरातून फक्त
पाच ते सहा महिनेच कारखाने सुरू असतात. पितळी कारखान्यात काम करताना अधिक
परिश्रम करावे लागतात. त्या तुलनेत मजुरीचं प्रमाण शेतातील कामासोबतच असतं.
तसंच, कामगारांसाठी शासनाकडून अधिक सोयी-सुविधा दिल्या जात असल्याने
कारखान्यात काम करण्यास मजुर मिळेनासे झाले आहेत. तसंच, परप्रांतातून
येणारे कुशल कामगारही अधिक मोबदल्याची मागणी करत आहेत. या उत्पादनावर
स्टीलपेक्षा अधिक जीएसटी आकारला जातो. वाढत्या उत्पादन खर्चामुळे
उद्योजकांची ओढाताण होत आहे, त्यातही बाजारात मागणी नसल्याने अडचणींत वाढ
होत आहे.
कोरोनाचा फटका
गेल्या दोन वर्षांतील
कोरोनाकाळापासून पितळ व अन्य धातूंची विक्री ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली
आहे. लोकांजवळ खरेदीसाठी पैसे नाहीत. शिवाय, सर्वच उद्योग बंद झाल्याने
अनेकांचा रोजगार गेला. अशावेळी पितळेसारख्या महागड्या धातूच्या खरेदीचाही
कोणी विचार करू शकत नाही. याशिवाय वाढलेले विजेचे दर, जळाऊ लाकडांच्या
किमती या सगळ्यांचा परिणाम पितळ उद्योगावर झाला आहे. बाजारात मागणी कमी होत
असताना पितळनिर्मितीतही अनेक समस्या निर्माण झाल्यात, त्यामुळे दरवर्षी
येथील एक कारखाना बंद होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पितळ उद्योग हळूहळू
बंद होत जाणार, अशी चिंता दामोदर सारडा यांनी व्यक्त केली आहे.
युवकांनी शोधल्या नव्या वाटा
येथील
कवकुमार सिंग या उद्योजकाने ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी इथं मागणी असलेली
प्रसादाची प्लेट तयार करून पुरवठा करणं सुरू केलं आहे. सुरेंद्रकुमार आनंद
आणि भावंडांनी लेथ मशिनचा वापर करून गुंड तयार करण्याचं कसब प्राप्त केलं
आहे. एका कारखान्यात गॅस सिलिंडरचे व्हॉल्व्ह तयार केले जात आहेत.
याप्रमाणे तांत्रिक माहितीच्या आधारे नवनवीन उत्पादनं तयार करण्यावर युवा
उद्योजकांचा भर आहे. त्यातून मंदिरांच्या कळसांपासून बैलांच्या गळ्यातील
घंटांपर्यंतचे प्रयोग दररोज सुरू आहेत. मात्र, सध्या तरी घरगुती वापरातून
पितळ व तांब्याची भांडी हद्दपार झाली आहेत.
शिंगणेश्वर महादेव मंदिर, दुसरबीड, बुलढाणा
धारेश्वर मंदिर आणि धार कुंड बारव, दुसरबीड, बुलढाणा
(फोटो - दिलीप परसने)
कुमारिका बारव, रामटेक, नागपूर
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.