उरण – भटकंतीला चढले स्फुरण
रविवार, २१ फेब्रुवारी २०२१ (२१-२-२१)

तर अशा घरगुती गप्पातून माझा उरण दर्शन प्लॅन नक्की झाला. तसे सायकल वरून डोंबिवली-हर्णे केले होते पण त्याला आता बरीच वर्षे झाली. आजपर्यंत मी टू-व्हिलर वरून स्वतः चालवत कधी कुठली ट्रिप केली नव्हती. त्यात परत माझ्याकडे ऍक्टिव्हा, म्हणून मी प्रविणला (ही ट्रिप आखणारा आमचा ग्रुप कॅप्टन) विचारून खात्री करून घेतली की ही बाईकर ट्रिप तर नाही ना. “नाही हो, स्कुटी ही चालेल”, हे उत्तर वाचून केवढे हायसे झाले काय सांगू! पुढे हाय कमांडची हसत हसत परवानगी मिळाली आणि शनिवारी रात्रीच मी ऍक्टिव्हाला पेट्रोल ने टुम्म करून आणि हवा भरून उद्याच्या सफरीसाठी फिट फाट करून ठेवली.
मोरा जेट्टी
प्रविण आणि अजून कोण भाऊंचा धक्का बंदरावरून स्पीड बोट वर आपापल्या बाईक लादून उरण जेट्टीवर ९ वाजता उतरणार आणि मी सीवूड्स वरून उरणला ९.३० वाजता पोचणार असे ठरले. त्याप्रमाणे गूगल बाबा, नव्हे गूगल बाईला सकाळीच जागे करून मी रस्ता नक्की केला आणि ठीक ८.१० वाजता सीवूड्स वरून उरणकडे प्रयाण केले. सकाळची वेळ असल्यामुळे वातावरण अल्हाददायक तर होतेच पण रस्त्यावर वर्दळही कमी होती. तसेही उरणला JNPT बंदराकडे जाणारे मोठमोठाले ट्रक सोडून फार कोणी जात नाही. २ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळायला मी उलवे येथे जात होतो. तेव्हा या रस्त्याचे काम चालू होते त्या चिखलातून मी कशी वाट काढायचो हे आठवले आणि मनाचा हिय्या करून स्वारी निघाली. आणि निघताच सुखद धक्का बसला. दोन वर्षात पुलाखालून बरेच कॉंक्रिट नेले गेले होते आणि उलवे पर्यंतचा रस्ता आता एकदम चकाचक झाला होता. मधल्या गावांचा अपवाद वगळता सीवूड्स ते उरणपर्यंतचा २६ कि. मी रस्ता एकदम मस्त होता. ऍक्टिव्हाचे शोषण न करत, रस्त्याची, हवेची आणि मोकळ्या परिसराची मजा घेत मी बरोबर एक तासात उरण मधील मोरा जेट्टीच्या गेटपाशी पोहोचलो.

योगायोगाने प्रविणची बोट त्याच वेळी मोरा जेट्टीला लागली होती. ५ मिनिटात प्रविण बाहेर आला आणि आमची भेट झाली. त्याची स्प्लेंडर बाईक होती. काल ७ जण उत्सुक होते पण इथे तर प्रविण एकटाच आला होता. बाकीच्यांनीं टांग दिली. काय फरक पडतो. गेट पाशी एक जुनी पांढरी संगमरवरी पाटी दिसली. बघितले तर ती ब्रिटिशकालीन मोरा जेट्टी बांधल्याची नोंद होती. ती बघून आणि दोघांची एक सेल्फी उरकून आम्ही एकविरा देवी देवळाकडे निघालो.


एकविरा देवी लेणी
जेट्टी पासून जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावर प्रवीण एकदम उजवीकडे वळाला. बघितलं तर वर एकविरा देवी अशी पाटी दिसली, आणि मीही त्याच्या मागोमाग त्या गल्लीत घुसलो. १०० मीटर आत जाताच समोर डोंगरामध्ये स्थापित एकविरा देवीचे देऊळ दिसले. बाईक एका पायावर विसावून आम्ही पायऱ्या चढून वर गेलो. समोर डोंगराच्या पोटात दगडाला गुलाबी रंग दिलेले प्रवेशद्वार दिसले “वाटले तसेच ही तर लेणी आहे”, प्रवीणच्या मुखातून नकळत हे उद्गार निघाले. परिसर स्वच्छ होता.

माझ्या अपेक्षेप्रमाणे आत अक्राळविक्राळ देवी नसून एका दगडाला शेंदूर आणि लाल रंग दिलेला असे देवीचे रूप दिसले. पायाशी डाव्या बाजूला कृष्ण आणि उजव्याबाजूला गणपती. मुख्य गाभार्याच्या डाव्या बाजूला एक गोरीगोमटी, लिपस्टिक लावलेली देवीही विराजमान होती.


बाहेर आलो तर उजवीकडे एक बंद दरवाजा होता. आत डोकावून बघितले तर दगडात कोरलेले पाण्याचे कुंड! कुलूप बघून तिथेच बसलेल्या एका वयस्कर गृहस्थांना मी विचारले आणि त्यांनी लगेच सांगितले की किल्ली डावीकडेच अडकवली आहे. कुलूप उघडून आत शिरलो आणि खाली स्वच्छ पाण्यात डोकावले व स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत उभा राहिलो. तोपर्यंत प्रवीणही आला. येताच त्याने बॅगमधून एक टॉर्च काढली. पाण्यावर प्रकाशझोत सोडताच डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी प्रकट झाल्या. काही नाणी दिसली, दोन काळे मासेही दिसले. मला असं दिसत होतं की ती नाणी पाण्यावर तरंगत आहेत, पण प्रवीण ने माझ्या बावळटपणाचे लगेच परत टॉर्चप्रकाशात निरसन केले. ती नाणी तरंगत नव्हती पण तळाशी होती. पण पाणी इतके स्वच्छ होते आणि अंधारही असल्यामुळे असा भास होत होता की नाणी पाण्यावर तरंगत आहेत.

लेणी आणि कुंड बघून तृप्त मनाने आम्ही बाईक पाशी आलो. तेवढ्यात आणखी दोघे आम्हाला येऊन मिळाले. ते होते अजून एक प्रवीण (प्रवीण गोरे) आणि निलेश सागवेकर. ते दोघेही ऍक्टिव्हा वरून ठाण्याहून उरणला आले होते. म्हणजे मी आलो त्याच्या दुप्पट अंतर! ५ मिनिटात तेही एकविरा लेणी बघून आले आणि आम्ही पुढच्या वास्तूकडे निघालो.
रिद्धी सिद्धी प्रसन्न
एव्हाने १० वाजले होते. वाटेत नाश्ता करू असे ठरले आणि बरेसे हॉटेल दिसताच आम्ही पोटपूजा आटोपली. तेथून जवळच रिद्धी सिद्धी देऊळ होते. आता मुख्य रस्ता मागे गेला होता आणि आम्ही गावाच्या रस्त्यावरून चाललो होतो. छोटा रस्ता, दोन्ही बाजूला झाडे, टुमदार घरं, असे वाटत होते की आम्ही अलिबाग किंवा गोवा मध्ये आहोत. लवकरच आम्ही देवळात पोहोचलो. परिसर प्रशस्त होता आणि विशेष म्हणजे कुठेही घाण नाही. देऊळ नवीन बांधलेले वाटत होते. आत छानशी रंगरंगोटी केली होती, लाकडी भागांनी उठावदार पॉलिश केलेले. एकूण रंग भरपूर होते पण बटबटीत नव्हते.


गाभाऱ्याच्या दरवाज्यावर भिंतीला निळा रंग मारला होता आणि त्या रंगाखाली लपलेली एक हत्तीची आकृती कोरलेली दिसली. पण आजूबाजूला दुसरे काहीच कोरलेले नव्हते त्याअर्थी हे देऊळ जुने असण्याची शक्यता होती. पण बाकी सर्व खूण पुसून टाकण्यात आल्या होत्या. हे स्पष्ट दिसत होते की गाभाऱ्याचा चौकोन हे मुख्य देऊळ होते आणि बाजूचे सर्व बांधकाम नंतरचे होते.

बाहेर एक विहीर, तीही रंगवलेली. विहिरीला लागून एक तलाव होता, तोही स्वच्छ. एकूणच छान, मनाला भावणारा अनुभव गाठीशी बांधून आम्ही बाप्पाचा आणि रिद्धी-सिद्धी देवीचा निरोप घेतला आणि निघालो.

बाबदेव देऊळ
पुढचा पाडाव होता पिरवाडी बीच. पण वाटेत करंजा गावात एक बाबदेव देऊळ असल्याचे प्रवीणने दाखवले आणि आम्ही निमुळत्या रस्त्यातून आमच्या ऍक्टिव्हा आणि बाईक दामटवत बाबदेव देवळात पोहोचलो. रिद्धी सिद्धी देऊळासारखे या देवळाचा दरवाजाही बंद होता पण कुलूप नव्हते. हे छोटेखाना देऊळ प्राचीन तरी वाटत नव्हते. इथे देवाच्या जागी एक दगड होता ज्याला शेंदूर फासून ठेवला होता. मी एखादी देवाची मूर्ती शोधात होतो आणि तेवढ्यात प्रविणने खुलासा केला की कुठेही, कुठल्याही बाबदेव देवळात जा, तुम्हाला तिथे फक्त दगडचं दिसेल, मूर्ती नाही. लोक दगडातच देव शोधतात तर.

पिरवाडी मुसलमानी जत्रा
परत बाईकवर बसलो आणि आता थेट पिरवाडी गाठायचे ठरले. गूगल बाईशी सल्लामसलत करत, वाटेत कोणालातरी विचारत आम्ही पिरवाडीला पोहोचलो. वाटेत एकाने आम्हाला सतर्क केले होतेच की पिरवाडीला दर रविवारी मुसलमानांची जत्रा असते. तिथे तुम्ही गेलात तर ते लोक तुम्हाला हाकलून लावतील, तिथे फिरकू देणार नाहीत.
वाटेत जाताना एका वाटेवर डावीकडे वळालो आणि उजवीकडे सदा मोहक समुद्रकिनारा सुरु झाला. त्याकडे बघत बघत पुढे जात होतो आणि डावीकडे ONGC चे गेट लागले. थोडे पुढे जाताच एक पोलीस चेक पोस्ट. त्याच्या मागे एक हिरवेगार पटांगण होते आणि बरीच मुस्लिम कुटुंबे रिक्षातून, गाडीतून उतरून तिकडे जाताना दिसत होती. पिरवाडीमध्ये आम्हाला दोन गोष्टी बघायच्या होत्या, पिरवाडी बीच आणि जुना वाडा.
प्रवेश निषिद्ध
इथे आल्यावर कळले की हा जुना वाडा हा मुसलमानांचा आहे. डावीकडच्या रोडवर आम्ही वाडा शोधात गेलो. एका गेटपाशी एक माणूस भेटला. त्याला विचारले आणि कळले की मागे दिसत होता तोच मोठा वाडा आहे पण त्याने आम्हाला आत येण्यास व वाडा बघण्यास व त्याचे फोटो काढण्यास मनाई केली. आत मुसलमानी स्त्रिया होत्या असे त्याचे म्हणणे होते.
मला तरी फारशी उत्सुकता नव्हती. एक तर तो वाडा पुरातन वाटत नव्हता, वाडा नव्हे तर मोठे घरच दिसत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मुसलमानी जत्रेत मला तर जायची इच्छा नव्हती.
ONGC अग्नितांडव
पण एक दुसरी अद्भुत गोष्ट आमची वाट बघत होती. वाटेत आम्ही एक अजस्त्र chimney बघितली होती जी सतत आकाशात आग ओकत होती. प्रत्येक वेळी जेव्हा वायू बाहेर पडत होता आणि पेट घेत होते त्या त्या वेळी ‘भक भक भक’ असा प्रचंड आवाज यायचा जसे की कोणते अजस्त्र पाशवी यंत्र चालू आहे. आम्ही ज्या ठिकाणी चौकशीसाठी थांबलो होतो तेथून ती चिमणी स्पष्ट आणि कोणत्याही अडथळ्याविना दिसत होती.


लगेच प्रविणच्या डोक्यात भटक्या शौकीन फोटोग्राफरला साजेशी कल्पना जन्मास आली.
पिरवाडी खडक, बोट, झोपाळा
तेथून आम्ही ती मुसलमानी जत्रा असलेल्या मैदानाला वळसा मारून पिरवाडी बीचच्या दिशेकडे वळलो. बीच म्हणजे काय, तर काळे कुळकुळीत खडक आणि पलीकडे अथांग समुद्र. तरी आम्ही बीच बीच करत खडकांवर गेलो, थोडे फोटो काढले आणि समुद्रात पाय बुडवून बीचची हौस पूर्ण करून घेतली. पण त्या खडकातही मला छोटे छोटे शंख, शिंपले दिसत होते व त्यातले काही मी ओमसाठी खिशात टाकले सुद्धा.

माघारी येत असताना काठावर एक आखीव, रेखीव रंगवलेली बोट दिसली. मग तिथे फोटो झाले. तेवढ्यात मला झाडाच्या फांदीला दोऱ्या बांधलेला लाकडी फळीचा झोपला दिसला. लगेच मी त्याच्यावर विराजमान झालो आणि समोर पसरलेला समुद्र बघत निवांत झोका घेत बसलो. इकडे बोटीवर फोटो सेशन चालू होते आणि मी मस्त झोपाळ्यावर झोके घेत होतो. तेवढ्यात जायची वेळ झाली आणि हे निवांत क्षण क्षणिक असतात याची जाणीव झाली.


H फॉर हेलिपॅड
पिरवाडीकडे जाताना ONGC गेटसमोर एक मोठाली H आकृती काढली होती आणि त्याभोवती एक गोल रिंगण होते. त्यापलीडे पसरलेला समुद्र. मी बघत होतो आणि तेवढ्यात खुलासा झाला, हे आहे हेलिपॅड, ONGC हेलिकॉप्टर साठी! पण तिथे आता न थांबता आम्ही परत जाताना थांबू असे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही तिथे थांबलो. माझी कल्पना होती की त्या रिंगणात H भोवती आमच्या ३ बाईक गोल लावू आणि फोटो काढू.
त्याप्रमाणे मी आणि निलेशने त्या हेलिपॅडवर आमच्या ऍक्टिव्हा लावल्या सुद्धा आणि तेवढ्या प्रविणभाऊ हजर झाले. “इथे का अशा बाईक लावल्या आहेत. आपण नुसता H चा फोटो काढू ना. तसंही हेलिपॅडवर बाईक लावू शकत नाही, ते बेकायदेशीर आहे.” या शेवटच्या वाक्याची मात्रा लगेच लागू झाली आणि आम्ही बाईक निमूटपणे H पासून आणि गोलापासून लांब बाजूला नेऊन पार्क केल्या. मग प्रविणने आपल्या नेहमीच्या अचूक शैलीत स्टिक वरून सेल्फी घेतला.

समुद्र आणखी जवळून बघू म्हणून आम्ही जरा उजवीकडे गेलो तर तिथे एक गाडी पार्क केली होती. आम्ही तिथे जाताच गाडीत बसलेल्या जोडप्याची बेचैन हालचाल सुरु झाली आणि आम्ही समजलो की आम्ही कबाब में हड्डी रोल निभावला होतो. तेथून काढता पाय घेतला आणि बाईक वर बूड टेकवून द्रोणागिरी किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले.

द्रोणागिरी झेप
आता उरण मधून आम्ही बाहेर पडलो होतो. रस्त्यावर गर्दी आणि कचरा दिसू लागला आणि समजलो की द्रोणागिरी आले. किल्ल्याचा रस्ता बघण्यासाठी एका चौकात थांबलो असताना चहा प्यायचा विषय निघाला. तेवढ्यात मला उसाचा रस दिसला आणि सर्वानुमते गोड रसाचे प्राशन झाले. दुपाचे १२.३० वाजले होते, सूर्य डोक्यावर होता त्यामुळे उसाचा रस अमृतासारखा वाटला. गूगल बाईने दर्शिवल्या प्रमाणे आम्ही किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोहोचलो. बाईक पार्क केल्या आणि बघतो तर काय समोर कातरलेला डोंगर, पायवाट किंवा किल्ला चढायची वाटच कुठे दिसेना. बाईने गोंधळ घातला होता तर. मग शेवटी एका माणसाला विचारले आणि परत मागे फिरलो. थोड्याच अंतरावर उजवीकडे एक बोर्ड दिसला ‘द्रोणागिरी किल्ल्याकडे’ आणि समजलो की हीच ती वाट. आता किल्ला चढायचा म्हटलं की बूट हवेत. ते तर मी ऍक्टिव्हाच्या पोटात जपून ठेवले होते. उगीच देऊळ बघताना सारखे बूट काढा घाला नको म्हणून ही शक्कल. लगेच पायात ट्रेकिंग बूट चढवले आणि आमची चौकडी किल्ला चढू लागली. सुरुवात द्रोणागिरी गावाच्या खेड्यातून होते. दोन्ही बाजूला पत्र्याची घरे आणि त्यामुधून वाट किल्ल्याच्या पायथ्यापाशी जाते.


तिथेच द्रोणागिरी किल्ल्याविषयी माहितीचे फलक लावले होते. चढण होती पण अवघड असे काही नव्हते. झाडे खूप असल्यामुळे चढताना किल्ल्याचा माथा नक्की कुठे ते दिसत नव्हते. जसे जसे वर चढत होतो तसा तसा द्रोणागिरी, उरण आणि ONGC प्रकल्प आमच्या नजरेस पडू लागला. जेमतेम ३०-३५ मिनिटात मी, प्रवीण गोरे आणि निलेश सागवेकर द्रोणगिरीचा माथ्यावर पोहोचलो पण प्रविण कांबळेचा पत्ताच नाही. १० मिनिटानंतर तो हळू हळू वर आला. तो काही नवखा ट्रेककर नव्हता. नंतर कळाले की १.५ महिन्यांपूर्वी त्याला कोरोना झाला होता आणि त्यामुळे त्याला स्पष्ट जाणवत होते की फुफुसाची शक्ती कमी झाली आहे आणि म्हणून ही दमछाक.
किल्ल्यावर सगळीकडे भगव्या पताका लावल्या होत्या. बहुदा १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त जंगी सोहळा झाला असणार.

द्वारातून आत गेलो तर समोर ३०-४० तरुणांचा समूह दंड शिक्षा घेताना दिसला. एकाच्या टीशर्ट वर ABVP बघून यांची ओळख पटली.

आधी माहिती घेतली त्यामुळे लगेच समजले की किल्ल्यावर जी वास्तू आहे ते एका पोर्तुगीज चर्चचे अवशेष आहेत. तशा भिंती धडधाकट होत्या पण त्यावर पिंपळाच्या झाडांनी आक्रमण केले होते. भिंतींच्या वरून पिंपळाची मुळे खाली जमिनीपर्यंत आली होती. कंबोडिया मध्ये बघितलेल्या अजस्त्र भिंतींवर पसरलेली अजस्त्र मुळे आठवली.



पुढे एक बुरुज दिसला, आणि त्यावर होता डौलाने फडकणारा भगवा झेंडा! पाय लगेच तिकडे ओढले गेले. बुरुजावर उभे राहून बघितले तर थोडं खाली अजून एक बुरुज दिसला आणि त्याबाजूने एक पायवाट गडावरून खाली उतरत होती. याने तर आम्ही आलो नव्हतो, म्हणजे ही दुसरी वाट होती. तेवढ्यात त्या वाटेवरून काही गावकरी मुले वर आली. विचारल्यावर कळाले की ही वाट गावातल्या मारुती देवळापाशी उतरते.

क्लीक फुस्स
आम्ही किल्ला बघत होतो आणि बघितले तर निलेश एका बाकावर निवांत पहुडलेला होता. १०-१५ मिनिटात तो ही उठला आणि झेंड्यापाशी सेल्फी तो बनता है ना म्हणून आम्ही परत बुरुजावर झेंड्यापाशी गेलो. प्रवीण ने सेल्फी स्टिक काढली आणि डिरेक्टर जशा सूचना देतो तशा सूचना आम्हाला मिळाल्या. प्रत्येकाची पोज, उभे राहण्याचे ठिकाण त्याने नेमून दिले. वारे वाहू लागले, झेंडा फडकू लागला आणि पहिला फोटो झाला. फुस्स. मी कॅमेरामध्ये बघत नव्हतो म्हणून फोटो बाद. दुसरा फोटो झाला पण तो ही फुस्स. यात निलेशने एकट्याने हाताची घडी घातली होती. तिसरा फोटो झाला. आमच्या दृष्टीने तर सर्वच फोटो चांगले होते, पण प्रवीण काही ऐकायला तयार नाही. या फोटो मध्ये प्रवीण गोरेने झेंड्याची दांडी हाताने पकडली होती. शेवटी चौथा फोटो झाला आणि प्रविणनेही हार मानली असावी. फोटो ओके! हसत खिदळत आम्ही बुरुजाचा आणि द्रोणागिरी किल्ल्यावरच्या शानदार भगव्याचा निरोप घेतला.

एव्हाने ABVPचा दंड वर्ग संपला होता आणि सगळी तरुण टाळकी फोटोसाठी इकडे तिकडे फिरत होती. चर्चच्याच बाजूला जाळीने आच्छादलेले पाण्याचे टाके आहे पण त्यातून पाणी घेता येत नाही. वर जाळी आहे आणि त्याखाली आडवे दगडी खांब ही आहेत. किल्ला फारसा मोठा नव्हता

पण किल्ल्यावर येऊन आता एक तास तरी सहज झाला होता. शेवटी किल्ला तो किल्लाच, लहान असो व मोठा! एव्हाने दुपारचे ३ वाजले होते आणि अजून बरीच ठिकाणे राहिली होती म्हणून आम्ही किल्ल्यावरून उतरणीला लागलो. नाहीतर त्या झाडांच्या सावलीत, मस्त हवा घेत अजून एक तास तर सहज गेला असता.
पुढच्या १५ मिनिटात आम्ही पायथ्यापाशी पोहोचलो सुद्धा. वाटेत एक ८-९ वर्षांचा गावातला छोटा मुलगा बागेत फिरतो तशा टुणूक टुणूक उड्या मारत आमच्या पुढे गेला होता. तो १०व्या मिनिटाला खाली पोहोचला सुद्धा असणार.
खाली येताच मी पहिल्यांदा बूट काढले आणि चपला चढवल्या. आता थेट पिरकोण!
विष्णू शिव देऊळ, पिरकोण
पिरकोणकडे जात असताना वाटेत मला एक नीरा स्टॉल दिसला. मनात आलं की अशा उन्हात मस्त नीरा प्यावी. पण बाकी दोन बाईक पुढे गेल्या होत्या म्हणून मलाही थांबता आले नाही. ५० मीटर पुढे जाताच मला दोन बाईक रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दिसल्या. यालाच म्हणतात रेकी. ते ही नीरा प्यायच्या विचारानेच माझी वाट बघत थांबले होते. मग निरावाल्याशी गप्पा मारत मारत प्रत्येकाने एक ग्लास नीरा पिऊन झाली, नंतर दुसरा ग्लास झाला आणि नंतर तिसरा ग्लासही, पण फक्त प्रवीण ची. आम्ही तिघे दोन ग्लास मध्येच तृप्त! पण आमचा फोटोग्राफर मित्र तृप्त व्हायला तयार नव्हता. प्रवीण गोरेने फोटो काढायच्या आधी एक घोट प्यायल्यामुळे त्याचा ग्लास पूर्ण भरलेला दिसत नव्हता. मग फोटो परफेक्ट कसा येणार? मग तो ग्लास पूर्ण भरेपर्यंत त्यात परत नीरा घालायला सांगितली आणि त्यानंतर हसत खिदळत सेल्फी झाला.

पिरकोन गाव म्हणजे खरंच गाव आहे. गूगलच्या दिशेनुसार, कौलारू घरांच्या मधून जाणाऱ्या चिंचोळ्या गल्ल्यातून आम्ही बाईक दामटत गावाच्या बाहेर माळरानात आलो. रास्ता असा नव्हताच. दोन्ही बाजूला शेतजमीन आणि पक्ष्यांची चिवचिवाट. आणि उजवीकडे झाडाआड आम्हाला ते शिव देऊळ दिसले. गावाच्या बाहेर छान निसर्गरम्य परिसरात हे देऊळ होते.


देवळाच्या बाहेर दोन वीरगळ आढळले. एक मोठा वीरगळ होता आणि त्याला लागूनच आणखी एक छोटा वीरगळ. मोठा जरा तरी स्पष्ट दिसत होता पण छोटा जरा जीर्ण झालेला वाटत होता. मोठा वीरगळ तर मला समजला पण छोटा काही उमजायला तयार नाही कारण त्यावर एक लांब हात वर जात होता पण खाली तुटलेल्या भागात दोन योद्धा युद्ध करताना दिसत होते. प्रवीणने लगेच शंकेचे निरसन केले. त्यावर लांब हात होता म्हणजे हा छोटा वीरगळ नसून सतीशिळा होता. अच्छा, असे असते तर!


देवळात प्रवेश करताच वर विष्णू-शंकर असा फलक दिसला. गर्भगृहात प्रवेश करताच डावीकडे विष्णूची मूर्ती होती आणि उजवीकडे शंकराची पिंड. म्हणजे दोन्ही पंथांसाठी हे देऊळ निर्माण केले गेले होते. या देवळात आखीव रेखीव असे काही नव्हते पण खरी जादू ही या भोवतीच्या परिसरात होती. पाच वाजल्यामुळे ऊन आता उतरले होते. देवळाच्या मागेच शेतजमीन होती. तेवढ्यात प्रवीण गोरेने आवाज दिला, “कोणाला पालक हवा आहे का, पालक?” मला काही कळले नाही की इथे पालक कुठून आला? बघितले तर शेतात काम करणारा माणूस शेतात उगवलेला पालक तोडून आम्हाला देत होता. थेट शेतातला माल मिळतोय म्हटल्यावर नाही म्हणेल कोण. १० रुपयाला एक जुडी अशा आम्ही ४ जुड्या घेतल्या आणि पिरकोणचा निरोप घेतला.
दिशाबदल, आणखी मजा दाखल
आता पुढचे ठिकाण होते बहिरीदेव आणि केरुमाता देऊळ. बाईक काढताना प्रवीणने सुचवले की ५ वाजल्याकारणाने आता एक तर केरुमाता देऊळ करता येईल नाहीतर बेलापूर किल्ला. कारण केरुमाता ला गेलो तर बेलापूर किल्ल्यापर्यंत पोहोचेपर्यंत अंधार होणार. मग असे ठरले की आता सरळ बेलापूर किल्ल्याकडे जायचे आणि बाकी उरलेले परत कधीतरी करायचे. अशा प्रकारे दिवस संपता संपता आमचा प्लॅन थोडा बदलला आणि आता थेट धडक होती बेलापूर किल्ल्यावर!
बेलापूर धुडगूस
नाही म्हटलं तरी पिरकोण ते बेलापूर हे २२ किलोमीटर चे अंतर आहे. मग निलेशने सुचवले की बाईक जरा जोरात चालवू म्हणजे उजेड असेपर्यंत आपण बेलापूरला पोहोचू. थोडं पुढे गेल्यावर एक गाव लागले आणि त्यात होता एक हलवाई. भूक तर सगळ्यांनाच लागली होती. वाटेत कोणते हॉटेलही नव्हते आणि बसून खाण्यासाठी वेळही नव्हता. पटापट आम्ही मिळेल ते, कचोरी, वडा, सामोसा पोटात ढकलले. नीलेश चहाची वाटच बघत होता आणि तिथे तो मिळाला. पोटात इंधन जाताच अंगात आणखी उत्साह आला. पुढच्या ३०-४० मिनिटात आम्ही बाईक चिरनेर मार्गे दामटत बरोबर ६ वाजता बेलापूर महानगरपालिका सिग्नल पाशी पोहोचलो. माझी ऍक्टिव्हा जुनी असल्यामूळे मला ५० पेक्षा जास्त वेग घेत येत नव्हता. मग प्रत्येक वळणावर बाकीचे मी यायची वाट बघत थांबायचे आणि मग पुढे निघायचो.
इथून पुढे किल्ला शोधायची मोहीम सुरु झाली. पहिल्यांदा आम्ही गेलो तर समोर बेलापूर पोलीस स्टेशन. तिथल्या पोलिसाने रस्ता दाखवला त्याप्रमाणे गेलो तर चढावर एका सोसायटीमध्ये घुसलो. त्यांनी रस्ता दाखवला तसं आणखी पुढे गेलो तर सरळ सिडको गेस्ट हाऊसमध्ये! तिथल्या रखवालदारने सांगितले की किल्ला आता बंद आहे कारण त्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण चालू आहे आणि खर्च आहे १८ कोटी रुपये. त्याने सांगितले तसे परत थोडं उलट खाली आलो आणि उजवीकडे एक गेट दिसले पण त्याला कुलूप वगैरे काही नसून सताड उघडे होते.

थोडासा चढ पार केला आणि वळणावर एक मोडकळीला आलेला बुरुज समोर उभा ठाकला. त्याभोवती बांबू लावले होते म्हणजे डाड्गुजीचे काम चालू असणार. समोर काही तरुण जोडपी दिसत होती. त्यांच्या आणि आमच्या शिवाय इतर कोणीही नव्हते. बुरुजाच्या मागच्या बाजूला एक उघडे कोठार सारखी जागा होती. त्यात एक शिवलिंग ठेवले होते, बहुदा ती जागा विद्रुप होऊ नये म्हणून ही युक्ती असावा. बाजूला पाटी तर ‘बुरुज’ असेच सांगत होती.


थोडं पुढे गेल्यावर एक चौकोनी उभट वास्तू दिसली. सगळीकडे दगड, चुना, सिमेंट पडलेले होते पण काम करणारी माणसेच गायब होती, सर्वच्या सर्व! त्या चौकटीवर चढलो तर सध्या जो उरला आहे तो अक्खा किल्ला नजरेस पडला. समोर झाडांपलीकडे क्षितिजावर सूर्य आपले अस्त व्हायचे काम उरकत होता आणि एक जोडपे त्या चौकटीच्या कठड्यावर सूर्यास्ताचा आनंद घेत बसले. बहुतेक तेव्हाच आम्हा चौघांचे आगमन झाले आणि त्यांनी काढता पाय घेतला.
मग तो अक्खा चौकोनी भाग आमचा. मुंबईच्या इतर किल्ल्यांच्या गप्पा झडल्या. जसे सायनचा किल्ला जो आता सुंदर केला आहे, किंवा बांद्राचा किल्ला जिथे जणू जोडप्यांसाठी प्रायव्हेट रूम्स झाल्या आहेत, झाडांच्या रचनेतून. मग धारावीचा किल्ला आणि वसईचा प्रसिद्ध किल्ला वगैरे. १०-१५ मिनिटे छान मुंबई किल्ल्यांचे दर्शन मला बेलापूर किल्ल्यावर बसून झाले. तेवढ्यात आम्हाला ते जोडपे बुरुजावर गेलेले दिसले. संवर्धन चालू होते आणि आपण कशाला त्यात खोडा घाला म्हणून आम्ही वर गेलो नव्हतो. त्यांना बघून खात्री झाली की बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या भक्कम असणार. जसे आम्ही बुरुजापाशी आलो तसे ते जोडपे तिथूनही गायब. आज त्यांच्या नशिबी शांत भ्रमंती नव्हती खरी. मोठाल्या पायऱ्या चढून आम्ही बुरुजावर आलो आणि पलीकडे सुंदर समुद्राचा नजारा दिसला.
हा किल्ला समुद्रावर नजर ठेवण्यासाठीच तर बांधला गेला होता. जंजिऱ्याच्या सिद्धी लोकांनी हा किल्ला बांधला, मग कालांतराने पोर्तुगीजांनी तो काबीज केला. त्यांच्याकडून मराठ्यांनी स्वराज्यात सामील केला आणि शेवटी ब्रिटिशांना तो ताब्यात घेतला असा दोन ओळीत याचा इतिहास. डाव्या बाजूला खाली बघितले तर सोसायटीच्या गराड्यात एक दगडी बांधकामाचा जुना तलाव दिसला. तो किल्ल्याचाच भाग असणार पण आता किल्ल्याबाहेर फेकला गेला आहे. प्रविणला दाखवले तर तो म्हणाला हा तर बारव आहे, म्हटलं बारव का? कारण इथे पायऱ्या तर कुठे दिसत नाहीत. पण झाडांमुळे आम्हाला पूर्ण तलाव दिसतही नव्हता आणि प्रवीण ठाम होता की हे बारवच आहे. म्हटलं चला चांगलच आहे, आपल्या घराजवळ बेलापूरला एक पुरातन बारवही आहे.


दिवसातला दुसरा किल्ला, बेलापूरचा किल्लाही बघून झाला होता. आता प्रकाश कमी व्हायला लागला होता तरी आम्ही ठरवलं की लॉटरी म्हणून जवळच असलेला दिवाळे किल्ल्यालाही भेट देऊ.
दिवाळे किल्ला, दिवाळे निघाले
परत गूगल उघडले आणि पाल्म बीच रोडवरून सरळ पुढे जात पुलानंतर उजवीकडे वळालो. अचानक आधुनिक बेलापूर मधून गावठाण परिसरात प्रवेश केला. रस्त्याच्या बाजूला मासे घेऊन बसलेल्या कोळी बायका, गावातली घरे, रस्त्यात घातलेला मांडव, भर रस्त्यात समारंभ अशी दृश्ये बघत बघत आम्ही गूगलने दाखवल्याप्रमाणे एका ठिकाणी थांबलो. आजूबाजूला तर किल्ल्यासारखे काहीच दिसत नव्हते. डावीकडे समुद्र आणि उजवीकडे घरे. तरी गूगलने दाखवले म्हणजे इथेच असणार म्हणून आम्ही खाली उतरून बघितले आणि लक्षात आले की हे तर स्मशान आहे. एका चौकटीत प्रेत जळतही होते. परिसरात इतर कोणीच दिसत नव्हते. अचंबित होऊन आम्ही परत बाहेर आलो आणि बाजूलाच असलेल्या पायऱ्या उतरून समुद्र किनाऱ्यावर आलो.

तिथे दोन कोळी लोक बांबू कापत बसले होते. त्यांना दिवाळे किल्ल्याबद्दल विचारले तर त्यांनी उजवीकडे हात करून समुद्रावर एक किल्ला आहे म्हणून सांगितले. पण त्यांच्या सांगण्यावरून कळले की ते तर बेलापूरचा किल्लाच दाखवत होते. आम्ही खोदून खोदून विचारले पण हे दिवाळे गाव आहे आणि इथे दिवाळे नावाचा किल्ला नाही यावर ते कोळी लोक ठाम होते. शेवटी आम्ही किल्ला शोधायचा नाद सोडून दिला आणि वर येऊन समुद्राचा नजारा बघत बाकावर शांतपणे बसलो.
चहा रडार
आता अंधार झाला होता आणि आम्ही इथेच आजच्या भटकंतीचा अंत करायचे ठरवले, म्हणजे भागच होते. परत घरी जायचे मार्ग ठरले, घरी जायची वेळ झाली पण निलेशची चहाची तलफ शांत व्हायला तयार नाही. इथे गावठणमध्ये तरी चहा दिसला नव्हता. मग आम्ही बेलापूरला गेलो आणि निलेशच्या चाणाक्ष चहा नजरेने दुकानांच्या गराड्यातून आणि भगभगीत प्रकाशातून बरोबर एक छोटेसे चहाचे खोपटे शोधून काढले, ते ही बाईक चालवताना. आणि चहा होताही चांगला, फक्कड इलाचीवाला!
जशी दिवसाची सुरुवात प्रसन्न सकाळी, स्वप्नवत रोडवरून उरण गाठण्यात झाली. नंतर छान मोरा जेट्टी बघून झाली, अक्खा दिवस देऊळ बघत, रस्ता शोधत, किल्ले चढत, बघत आणि शोधत मजा करत गेला. दिवसभर जबरदस्त भटकंती झाली आणि तसाच दिवसासाचा शेवटीही गोड झाला, झक्कास चहाने. धन्यवाद निलेश!
धन्यवाद प्रविण कांबळे, अक्खा रूट आखल्याबद्ल आणि धन्यवाद प्रवीण गोरे, हसतमुख साथ दिल्याबद्दल!
आता पुढची भटकंती पनवेल आणि चौक येथील देऊळे आणि बारव शोधत. चल मेरी ऍक्टिव्हा!
तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते. असे हे अलिबागच्या ईशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.
कनकेश्वर देवस्थान प्राचीन असून त्यास पौराणिक पार्श्वभूमी आहे. देवस्थान पर्वतावर ७५० पायऱ्या चढूनच दर्शनाला जावे लागते. या पायऱ्यांचे व पुष्करणीचे बांधकाम अलिबागच्या सरखेल राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकांनी १७६४ मध्ये स्वखर्चाने करवून घेतले. या सर्व पायऱ्यांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा - अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असे. मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे कनकेश्वर देवासाठी वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्याकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा. ही कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला भरत असते. कार्तिक शु.१४ ला भरणाऱ्या श्री नागेश्वराच्या मोठ्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव येतो. पूर्वी यात्रेच्या दिवशी आवास येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलिकडे फक्त आवास येथीलच पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वर स्थानाबद्दल दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासूर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासूराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिध्यर्थ शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव पडले. सर्व पृथ्वी जिंकून परशुरामाने ती ब्राम्हणाला दान दिली. हे दान घेतल्यावर ब्राम्हणाने परशुरामाला सांगितले की, दान दिलेल्या भूमीवर तुला राहता येणार नाही. तेंव्हा या भूमीचा तू त्याग कर. ब्राम्हणाचे हे वाक्य ऐकून परशुरामाने सह्याद्री पर्वतावर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाशवाणी होऊन, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे, तो समुद्रात जेथे पडेल तेथपर्यंत नवीन भूमी तयार होईल. या आकाशवाणीप्रमाणे परशुरामाने समुद्रात परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली. असा हा कनकेश्वर परशुराम सृष्टीतला आहे. रेवसपासून कन्याकुमारीपर्यंत परशुरामाने प्रवास करुन अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. त्रिपुरी पोर्णिमेला येथील दीपमाळेला दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
अशा या जागी आवश्य भेट द्या.. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गालाही फिके पाडील असे आहे.. जर मला कोणी विचारले की स्वर्ग कोठे आहे तर मी अभिमानाने म्हणेल की पावसाळ्यात आमच्या महाड रायगड मध्ये भेट द्या.. येथेच स्वर्ग सुखाची प्रचिती येईल..
येथे जाण्यासाठी पुण्या मार्गे आलात तर एक मढेघाट कर्णावडी वरून रानवडी वाकी मार्गावर पुढे शेवते फाटा लागतो तेथून पुढे 20 मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा आहे
मुंबई किंवा पुणे वरंध मार्गावरून येणार्यांनी बिरवाडी वरून वाघेरी रोड दहिवडला आल्यावर उजवीकडे ➡ वाकीरोडने वळावे पुढे सरळ खरकवाडी.. वाकी.. नंतर शेवते गावी यावे
पिकनिकचा आनंद जरूर लूटा पण निसर्गाचे भान राखून..
धन्यवाद
चौल (अलिबाग जवळील)
इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख “पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजात आणि अगदी सुमारे २५०० वर्षांपासून आढळतो. प्रवासवर्णन लिहिणाऱ्या टॉलेमीच्या दस्तावेजात या सातवाहनकालीन बंदराचा उल्लेख येतो आणि आज विस्मरणात गेलेले चौल त्या काळी किती महत्वाचे व्यापारी बंदर होते, याची प्रचिती येते. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेल्या चौलमध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळाचे चौलशी असलेले नाते दाखवते. आक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हि देखील एक जोडगोळी आहे. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा नगर उदयास आले म्हणूनच आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असाच केला जातो. पुराणात गेलो तर चौलचे नाव “चंपावती” तर रेवदंड्याचे नाव “रेवती” असे आढळते पण चौल या नगरीचे पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एखाद्या गावाला ही एवढी नावे कशी, असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तावेजांतून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले. इतिहासात चौल या नगरीचा प्रदीर्घ कालखंड आणि त्यातच हे प्रसिद्ध बंदर होते, साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी-विदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या साऱ्यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली.
अशा ह्या ऐतिहासिक चौल बंदराची ओळख बंदरापुरती होती, असेही नाही तर आज चौलमध्ये आल्यानंतर निसर्गाच्या सौंदर्याची मोहिनी पडतेच परंतु आजही काही वास्तू चौल नगरीची ओळख सांगण्यासाठी पर्यटकांची, अभ्यासकांची वाट पाहत उभ्या आहेत. त्यातीलच सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर, काहीसा चौल नगरीच्या बाहेर असलेला कलावंतिणीचा वाडा, घुमट टेकडी, हमामखाना, दत्ताचे मंदिर असलेली टेकडी, पोर्तुगीजांनी बांधलेली ती अभेद्य तटबंदी व त्याच्या बाजूचे खंदक, किनाऱ्यावरील बलाढ्य किल्ला व त्याची तितकीच बलाढ्य प्रवेशद्वार अशा बऱ्याच वास्तू आज त्या काळातील साक्ष देत उभ्या आहेत. हे सर्व मी जेव्हा अभ्यास दौऱ्यात पाहिले तेव्हा खरंच त्या आठवणीत हरवून गेलो. येथील रामेश्वर मंदिर हे चौलचे ग्रामदैवत आहे. उतरत्या कौलारू छताचे मंदिर, लांबून घरासारखे वाटते. (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप आहे. तेथे असणारी दिपमाळ आणि रेखीव पुष्करणी या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर टाकत असते. वास्तुशैलीचा हा उत्तम नुमना असून मूळ मंदिराची निर्मिती कधी व कोणी केली ? याची ठोस माहिती मिळत नाही पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात.

हे ऐतिहासिक मंदिरात एक गंमत आहे. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशी नावे असलेली तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला अथवा पावसाने ओढ दिली की, पर्जन्यकुंडावरील फरशी उघडायची. वारा थांबला अथवा वादळस्थिती निर्माण झाली की, वायूकुंड उघडायचे आणि थंडी किंवा गारठा वाढला की, उर्वरित अग्नीकुंड उघडायचे. या गावावर नैसर्गिकरित्या आलेल्या या तीन संकटांचे निवारण करण्यासाठी ही कुंडे महत्वाची होती. खरंच, हे सर्वच तिथे पाहताना खूपच विलक्षण वाटते ! याच्या नोंदी तपासल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्यकुंड १७३१, १८७६ आणि १९४१ मध्ये उघडल्याच्या आणि त्या-त्यावेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. गावोगावीच्या या श्रद्धा आणि त्यासाठीच्या त्या काळातील लोकांनी केलेल्या या योजना वाखाणण्याजोगे आहेत. आज मात्र काळाच्या ओघात अग्नीकुंड आणि वायूकुंड बुजवले, असे ग्रामस्थ सांगतात. पर्जन्यकुंड मात्र आपल्याला दिसते. तरी सुद्धा त्या काळातील लोकांनी केलेल्या अद्भुत कल्पना मनाला सुखावून जातात.

चौलमध्ये रामेश्वराशिवाय अनेक पुरातन मंदिरे आहेत. यातील समुद्रकिनारी आणि पोर्तुगीजांच्या किल्ल्याजवळील मंदिर म्हणजे सिध्देश्वर मंदिर ! ह्या मंदिरात पोर्तुगीजांच्या काळातील काष्टशिल्प आहे. आज त्या शिल्पाला घंटा टांगल्या आहेत. अप्रतिम कोरीवकाम असलेल्या ह्या शिल्पात पोर्तुगीज टोपीधारी एका चार पायच्या प्राण्याला मारून घेऊन जात आहेत तसेच जंगली प्राण्याची भांडणे आणि त्यांना मारताना असलेले हे शिल्प आपल्याला त्या काळात घेवून जाते. (खालील फोटोत पाहू शकता) मंदिरासमोर चावीच्या आकाराची उथळ विहीर अगदी शोभून दिसते. हे सर्व आता रेवदंड्यातील पोर्तुगीजांच्या किल्ल्याच्या बाजूला आहे.

चौलच्या बाहेरील रस्त्यावर कलावंतिणीचा वाड्याचे अवशेष आहेत. पुरातत्व खात्याकड़े असलेली हि वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे. एके काळी हा वाडा चौलची ओळख होती, असे इतिहासात वाचायला मिळते. हि वास्तू निजामशाही व आदिलशाहीत कितीतरी करमणुकीच्या क्षणांची साक्षीदार असेल. मोठमोठे अधिकारी या वाड्यात येत असतील. कितीतरी लोकांना या वाड्याची मोहिनी असेल. उदयाकडून अस्ताकडे चाललेल्या या वाड्याची आजची स्तिथी खूपच वाईट आहे. या वाड्याची तटबंदी पूर्णतः भग्न झाली आहे. फक्त प्रवेशद्वार आणि त्या समोरील वास्तू आज ठीकठाक अवस्थेत आहेत. आज या वाड्याच्या आत पूर्णतः शेती केली जात आहे. घुंगरांचा आवाज ऐकलेला आणि नाचगाणे पाहणाऱ्या ह्या वास्तूच्या मागे प्रचंड मोठे तळे आहे. बहुतेक ह्याच वास्तूतील कलाकारांसाठी हि पाण्याची व्यवस्था असू शकेल. ऐतिहासिक नजरेतून त्या वास्तूत जेव्हा आपण शांत उभे राहतो. तेव्हाचा थिरकणाऱ्या घुंगरांचा आवाज आणि नाद कानावर पडल्याशिवाय राहणार नाही. अशी हि मुकं वास्तू एकदातरी पाहणे गरजेचे आहे. (फोटोत पाहू शकता.)

त्याच रस्त्यावर एका छोट्या टेकडीवर अशीच एक मुकं वास्तू म्हणजे घुमट टेकडी ! (खालील फोटोत पाहू शकता.) कोणी व का बांधली ? हे सांगता येत नाही. पण त्यावरील बारीक कलाकुसर मात्र अद्भुत आहे. आकाशाशी स्पर्धा करणारे उंच उंच माड आणि त्याच्या कुशीत लपलेले चौल तिथून पाहण्यात एक पर्वणी आहे. समुद्रावरून येणारी दमट गरम हवा मागे उभे असलेल्या दत्ताच्या टेकडीला आदळून पुन्हा जेव्हा घुमट टेकडीकडे येते आणि येताना घुमट टेकडीच्या खाली असलेल्या तळ्यावरून तिचा प्रवास होतो, तेव्हा मात्र ती थंड झुळूक अनुभवण्यासारखी असते. वास्तू छोटी आहे परंतु चौलच्या सौंदर्यात भर घालणारी आहे.

ह्याच रस्तावरून रेवदंड्याकडे येताना आता तिठा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पोर्तुगीज किल्ल्याचे त्या काळातील महत्वाचे प्रवेशद्वार होते. आजही पोर्तुगाल भाषेत असलेला त्यांचा शिलालेख आणि त्या काळातील त्यांची महत्वाची शिल्पकला उठून दिसते. यामध्ये जागतिक स्वामित्व (आर्मीलरी स्पियर), कोट ऑफ आर्मस आणि तीन भाले एकाच गाठीत बांधून तीस वर्ष सत्ता उपभोगल्याचे शिल्प दर्शनी भागांत लावून स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन केले आहे. असे हे शिल्प आपल्याला त्या काळात घेऊन जातात. (खालील फोटोत पाहू शकता)

पूर्ण किल्ल्यात आल्यानंतर दुसऱ्या गोमुखी प्रवेशद्वाराच्या मागे पोर्तुगीज राजाचा राजमुकुट शिल्प बसवले आहे. त्याकाळी मागे फिरून लवून मुजरा करण्याचे ठिकाण असलेला हा महत्वाचा दरवाजा होता. कितीतरी अधिकाऱ्यांचा मुजरा या मुकुटासमोर झडला असेल पण दुर्दैवाने आज मात्र हे शिल्प वेलींच्या विळख्यात अडकलेले आहे. शिवरायांच्या कर्तृत्वाने हादरून गेलेली पोर्तुगीज सत्तेची शिल्प आज निसर्ग उखडून फेकण्याच्या तयारीत आहे. हे शिल्प पूर्णतः दगडी असून हे पाहणे म्हणजे पर्वणी आहे. असे शिल्प पोर्तुगीजांच्या किल्ल्यांवर खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा खास फोटो तुमच्यासाठी !

याच किल्ल्यातील चौलची अजून एक प्रसिद्ध वास्तू म्हणजे सातखणी मनोरा ! पोर्तुगीजांच्या या किल्ल्यात सातमजली हा मनोरा त्याकाळी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. (खालील फोटोत पाहू शकता.) आज त्याचे ५ मजले सुस्थितीत आहेत पण हे सर्व पाहताना समुद्रावर दादागिरी करणारी हि सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांमूळे हादरली आणि लक्ष ठेवण्यासाठी अतिदक्ष झाली ह्याचे हे द्योतक पुरावा आहे. या मनोऱ्याच्या आजूबाजूला लांब पल्ल्याच्या तोफा पडलेल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस झेलत एकेकाळी सुवर्णकाळ अनुभवणाऱ्या या तोफा आज मात्र त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या तटबंदीवरुन अफाट आणि अथांग समुद्र दिसतो, इथूनच पोर्तुगीजांनी टेहळणीसाठी खास बांधलेला एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र असलेल्या टेकडीवर कोर्लई किल्ला दर्शन देतो. आज तिथे दिपस्तंभसुद्धा आहे.

असे हे संस्मरणीय आणि अद्भुत चौल आज फक्त समुद्री पर्यटनासाठी ओळखले जाते. खरं तर प्राचीन ठेवा असलेले मंदिरे आजही स्फूर्ती देतात. शिवरायांच्या दरारामुळे हादरलेली पोर्तुगीजशाही तिथे गेल्यावर समजते. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेले अलिबागमध्ये गेलात तर तिथून चौल-रेवदंडाकडे पावले वळवा आणि नक्की सातवाहनकालीन रामेश्वर मंदिर आणि इतर वास्तू पहा. काळाच्या ओघात लुप्त होत चाललेला ठेवा पहावा आणि इतिहास जागा व्हावा म्हणून हा लेखप्रपंच ! विस्मरणात चौल हा माझा लेख तरुण भारत या वृत्तपत्रांत रविवार, दिनांक २१ मे २०१७ ला फोटोंसकट पूर्ण पानभर आला होता त्याचा फोटो आपण खाली पाहू शकता.

लेख कसा वाटला ? हे आपण comment मध्ये आणि sagarblog4@gmail.com या मेल आयडी वर कळवू शकता.
या चौल नगरीचे खाली काही आणखी फोटो खास तुमच्यासाठी !
तटबंदी तोडून तयार केलेला हा रस्ता….

चौलची ओळख असलेले रामेश्वर मंदिर येथील रेखीव पुष्करणी !

पोर्तुगीज किल्ल्यातील सातखणी मनोऱ्याजवळ एकेकाळी दरारा निर्माण केलेल्या आणि आता निपचित पडलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा….

“पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी” या दस्तावेजातील पान क्रमांक २०० वरील प्रकरण ५३ चा फोटो (ज्या मध्ये चौलचा उल्लेख आला आहे. )
कोंडाणे लेणी

कर्जत गावापासून साधारणतः १० किमी अंतरावर कोंदिवडे गाव आहे आणि ह्या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्ता आजही उल्हास नदीच्या काठावरून गेलेला आहे. तिथे जाताना डाव्या बाजूला ढाक बहिरीचा गड दर्शन देतो तर समोर किल्ले राजमाची दिसायला सुरुवात होते. कोंदिवडे गाव सोडले कि, कोंडाणे गाव आपले स्वागत करते आणि आपण सह्याद्रीच्या पायथ्याला पोहचतो. इथूनच सुरुवात होते त्या आडवळणावरील लेणीच्या पायवाटेची ! इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात हा आविष्कार साकारण्यात आला. सह्याद्रीत कोरलेली भाजे व कोंडाणे ह्या दोन्ही लेणी समकालीन असू शकतात, असा अंदाज अभ्यासकांचा आहे. ह्या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. हि लेणी हीनयानपंथीय आहे. चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून त्या काळातील खांबसुद्धा पूर्णतः पडून गेले आहेत. पुरातत्वाने आता नवीन खांब लावलेले आहेत. गजपृष्ठाकार छत आपले लक्ष वेधून घेते. एकेकाळी लाकडी कोरीव कामाने ह्या भिंती झाकल्या असतील, त्याला जवनिका म्हणतात कारण त्याची साक्ष द्यायला भिंतीत एक रांगेत खोबण्या केलेल्या आढळतात. संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तूपाभोवती चापाकार असे त्या काळातील अष्ठकोनी खांबांच्या खुणा इथे आजही पाहता येतात. प्रवेशद्वार कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पपटातील युगुले त्यांची वस्त्रप्रावरणे व आयुधे पाहताना नजर खिळून राहते. ह्या शिल्पपटातील स्त्रिया नर्तकी असून त्या योद्धाबरोबर नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्यांची केशभूषा, अलंकार आणि शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास इथे करता येतो तसेच चैत्यकमानीत सागवानी लाकूड आजही सुस्थितीत असून ते सुद्धा किमान दोन हजार वर्षे जुने आहे, भन्नाट आहे हे सर्व !

ह्या चैत्यगृहाच्या अगदी बाहेच्या बाजूला एक रेखीव असा यक्ष कोरलेला आहे. त्याच्या बाजूला तो तयार करून घेणाऱ्याचा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आजही ठसठशीत आहे. “कन्हस अंतेवासिना बलकेन कतम” असा लेख असून त्याचा अर्थ “कन्हाचा शिष्य बालुक याने हे काम केले” असा होतो. (फोटोत लाल चौकडीत दाखवलेले आहे.) आज त्या यक्षाचे मुख भग्न झाले आहे. त्याचे शिरोभूषण व केशभूषा पाहता ग्रीक आणि रोमन शैलीचा प्रभाव त्यावर जाणवतो. अतिशय देखणा असेल हा यक्ष ! हे तिथे प्रत्यक्ष पाहताना वाटते. अलंकृत लेणीवर गवाक्ष, वेदिकापट्टी आणि अतिशय बारीक नक्षी कोरलेली आहे, इथे मेहनत घेणाऱ्या अनामिक हातांना मनोमन वंदन करावेसे वाटते. ह्या चैत्यगृहाच्या पुढे अनेक विहार व त्यात कक्षसुद्धा आहेत. कक्षात दगडी सोपे असून संपूर्ण विहाराला एकेकाळी व्हरांडा होता जो आज भग्न झाला आहे. पहिल्याच विहारात भिंतीवर स्तूप कोरलेला आहे, ह्यावरून चैत्यगृहातील स्तूप कसा असेल ह्याची जाणीव होते. खालील फोटोत पाहू शकता. शेवटी पाण्याच्या दोन टाक्या आहेत व तिथे कोरलेला विहार हे भोजनगृह असावे, असे वाटते. पहिल्या विहाराच्या दर्शनी बाजूवर दोन ओळींचा पुसटसा ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे जो विहार कोरण्यासाठी मदत देणाऱ्याच्या नावाने आहे. “सिधं बरकस हमयस कुचिकापुतस पाठे” असा असलेल्या शिलालेखाचा अर्थ बरकस येथे राहणारा कुचिकाचा पुत्र हमयक्ष याने विहारासाठी दान दिले, असा होतो. बहुधा बरकस म्हणजे गुजरात मधील भडोच असावे, असा अंदाज इथे करता येतो.

हि लेणी राजमाचीच्या घेऱ्यात आहे. “लेण्यांच्या परिसरात गड व गडाच्या परिसरात लेण्या” हे सूत्र इथे सुद्धा आहे. कल्याणच्या बंदरात उतरलेला माल घाटावर घेऊन जाण्यासाठी कर्जतच्या परिसरात अनेक घाटवाटा निर्माण करण्यात आल्या. त्यातील प्रसिद्ध असा कुसूरचा घाट इथेच असून त्याच्या पायथ्याकडून प्राचीन काळी ढाक बहिरीच्या परिसरातून कोंडाणे लेणीकडे जाता येत असे. इथूनच पुढे ‘कोकण दरवाजा’ म्हणून ओळख असलेला किल्ले राजमाची काही तासांच्या अंतरावर आहे. तिथून वळवण लेणी व पुढे कार्ले – भाजे लेण्यांच्या जोडीकडे जाता येते. ह्याचा अर्थ हा मार्ग अगदी पुरातन होता आणि ह्याच मार्गावर असलेल्या लेण्या म्हणजे विश्रांतीचे थांबे होते. पावसाळ्यात बौद्ध भिक्षु ह्याच लेणीत विसावत असत आणि म्हणून लेण्यांना “वर्षावास” असे सुद्धा म्हणतात. कोंडाणे लेणी सह्याद्रीतील पहिली लेणी असल्यामुळे दगड खराब असल्याचे ज्ञान बहुतेक त्यावेळी झाले नसेल व प्रचंड पावसाच्या माऱ्याने झीज होऊन सरते शेवटी हि लेणी अर्धवट सोडलेली काही ठिकाणी दिसून येते. तरी सुद्धा शंकेची पाल चुकचुकते आणि मनांत विचार येतो की, आक्रमकांकडून स्तूप भग्न केला गेला कि पावसाने झिजला ? ह्याचा अंदाज येत नाही परंतु जे आज शिल्लक आहे ते मात्र अद्भुत आहे. खालील फोटोत पाहू शकता. ह्याच व्यापारी मार्गावरील घाटावर असलेली कार्ला लेणी प्रसिद्ध आहेच व ह्या लेणीत एका शिलालेखात नहपानचा जावई उषवदत ह्याने भिक्षुसंघाला मामल विषयातील “करजिक” नावाच्या गावाचे दान दिले असा उल्लेख आहे. ह्यातील करजिक म्हणजे कर्जत आहे आणि म्हणूनच पुरातन मार्गावरील हे कर्जत नक्कीच ऐतिहासिक ठरत आहे.

प्राचीन व्यापाराचा विचार करता, कर्जतच्या जवळच कल्याण बंदर होते आणि ह्याच परिसरातून घाटावर जायला विविध घाटवाटा इथे होत्या. ह्याच ऐतिहासिक कर्जत मधून भीमाशंकरला जायला पायवाट आहे आणि आजही वर्षभर तिथूनच ह्या श्रद्धास्थानाला भेट द्यायला लोक ये-जा करत असतात. कर्जत ऐतिहासिक आहे आणि ते जाणून घेण्यासाठी मी फेसबुकवर ऐतिहासिक पाऊलखुणांचे कर्जत हे पेज सुरु केले. ज्यावर बऱ्याच पाऊलखुणांची माहिती अगदी फोटोंसकट देत आहे म्हणूनच ह्या पेजला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

असे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतची ओळख आज फार्महाऊस सिटी होत चाललेली आहे, ज्याची मुळातच खंत वाटते आणि ह्या पाऊलखुणा आज सर्वांना माहीत व्हाव्यात म्हणून हा लेख प्रपंच !
चिरनेर सत्याग्रहाचा साक्षी महागणपती
अशाच एका तीर्थक्षेत्राचा परामर्श आपण घेणार आहोत ज्याने परक्या राजवटींचा वनवासही भोगला आणि स्वातंत्र्य संग्रामातल्या एका सत्याग्रहाचे, तो सत्याग्रह चिरडताना झालेल्या अत्याचाराचे साक्षीही राहीले.
पनवेल पासुन २२ किमी आणि उरणपासुन १६ किमी अंतरावर ऐतिहासिक चिरनेर गाव आहे. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या, या गावात प्रवेश करत जसजसे आत जातो, तशी मुंबईच्या गल्ली बोळांची आठवण नक्की होते. वाटेत कुंभारवाडा लागतो. मातीची मडकी, तवी, मातीचे तवे ( पहिल्यांदाच पाहिले)
![]() |
| तवली आणि आवा |
![]() |
| महागणपती मंदिर आणि बाजूला नवीन उभारलेला स्मृतीस्तंभ |
मंदिराचा आता जिर्णोद्धार झाला असला. तरी मुळ गाभारा पेशवेकालीन बांधकामाची साक्ष देतो, मंदिरासमोरच तळे आहे.
तस हे मंदिर प्राचीन असावे, परचक्र आल्यावर अनेक देवस्थळांची धुळधाण झाली. या विघ्नहर्त्यालाही इथल्या तळ्यात लपून रहावे लागले. किती काळ तळ्यातला आज्ञातवासात होता कुणास ठाऊक. पण मराठेशाहीचा डंका त्रिखंडात निनादू लागला आणि या गणरायाला अज्ञातवासाच्या इतश्रीचे वेध लागले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दित सरदार रामजी महादेव फडके यांना गणरायाने तळ्यात असल्याचा दृष्टांत दिला. त्यानुसार फडकेंनी तळ्यातल्या आज्ञातवासातून गणरायाला बाहेर काढले. त्याची स्थापना केली, मंदिर बांधले. तळ्यात गणरायाची
![]() |
| देवाचे तळे |
ब्रिटीश राजवटीतील काळ ब्रिटिशांनी वन संपत्ती वर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांवर जंगल बंदी लादली. लाकूड फाटा, फळे, गवत, वनऔषधी गोळा करण्यावर बंदी घालण्यात आली. गुरे जंगलात चरायला नेण्यासही मज्जाव करण्यात आला. याचा परीणाम म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आणि देशभरातून जंगल सत्याग्रहाची हाक उठली. 25 सप्टेंबर 1930 रोजी ठाणे व रायगड जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेर आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या सत्याग्रहाची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे इन्स्पेक्टर रामचंद्र दौलत पाटील यांच्या हाताखाली अलिबागचे २२ संगिनधारी पोलीस तसेच पनवेलवरून २० पोलीसांचे पथक सत्याग्रह रोखण्यासाठी आणले होते.
चिरनेरचे वैद्य अंताजी महादेव पोवळे हे सत्याग्रहात अग्रणी होते. सत्याग्रहींचे नेते भाई गुप्ते शांततेच्या मार्गाने सत्याग्रह पार पाडायचा आहे असे सांगत होते. सत्याग्रहींनी "जंगल आमच्या हक्काचे" अशा घोषणा देत इंग्रजांचे आदेश झुगारून गायी म्हशी जंगलात चरण्यासाठी नेण्याचा आणि झाडे तोडण्याचा निर्धार केला. आक्का देवीच्या माळरानावर अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींवर सरकारी हुकुमावरून पोलीसांनी गोळीबार केला. यात काही स्थानिक हुतात्मा झाले.
त्या हुतात्म्यांची नावे :-
1) धाकू गवत्या फोफेकर (चिरनेर )
2) रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोपरोली )
3) रामा बामा कोळी (मोठीजुई )
4) आनंदा माया पाटील (धाकटीजुई)
5) परशुराम रामा पाटील (पाणदिवे )
6) हसुराम बुध्या पाटील (खोकटे )
7) नाग्या महादू कातकरी (चिरनेर )
8) आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे)
सत्याग्रहींनी केलेल्या प्रतिकारात काही सरकारी यंत्रणेतील लोकही मारले गेले. त्यांची नावे :-
१) नारायण पांडू कदम (पनवेल शिपाई )
२) हरि नारायण तवटे (constable)
३) जयराम बाबाजी सावंत (Head constable )
४) काशिनाथ जनार्दन शेवडे Raundguide
५) केशव महादेव जोशी (मामलेदार )
यापैकी केशव जोशी हे झालेल्या गदारोळात पोलिसांना गोळीबार थांबवा असे सांगत असताना, गोळी लागून मृत्युमुखी पडले. या घटनेत चौदा सत्याग्रही जखमी झाले. चिरनेर सत्याग्रहात ४७ जण आरोपी म्हणून पकडण्यात आले. ठाणे सेशन कोर्टात खटला चालला. महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या खटल्याला सत्याग्रहींच्या बाजूने उपस्थित होते. यापैकी १८ जण निर्दोष सोडण्यात आले. २० जण दंड घेऊन मुक्त करण्यात आले. ९ जणांना कैदेची काहींना सहा महिने तर काहींना तीन वर्ष शिक्षा झाली.
![]() |
| जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक |
![]() |
| इंग्रजांनी पाडलेल्या स्तंभाचा कळस |
गणपती मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूच्या खिडकीच्या गजा पैकी एका गजावर गोळी लागल्याची खूण आहे.
![]() |
| गोळी लागलेला गज |
मंदिराचे नूतनीकरण झाले असले तरी, तो गोळी लागलेला हा गज ग्रामस्थांनी आठवण म्हणून तसाच ठेवलेला आहे. मंडपामध्ये मुषकाची सुबक मुर्ती आहे.
![]() |
| श्रींची मुर्ती |
![]() |
| मंदिराशेजारील मारूती |
![]() |
| शिवमंदिर |
![]() |
| मंदिरातील शिवलिंग आणि भैरव |
![]() |
| गद्धेगाळवरील अस्पष्ट लेख |
![]() |
| भैरव मंदिरातील गद्धेगाळ आणि भैरवमुर्ती |
गणपती मंदिरात माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव प्रसंगी गणपतीच्या मस्तकी चांदीचा मुकूट झळाळत असतो. हा बाप्पा नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. निरनिराळ्या भागातील भाविक इथे दर्शनास येतात.
आपणही नक्की या बाप्पाच दर्शन घ्यावे, इथल्या हुतात्मा स्मारकाला भेट द्यावी. इथला इतिहासाचा परामर्श घ्यावा हीच वाचकांना विनंती.
गुळसुंद्याचा सिध्देश्वर आणि कराडेचा गढीवजा वाडा
पनवेल पासून साधारण सोळा किमीवर गुळसुंदे गाव आहे. पनवेल वरून दांडा मोहपाडा मार्गाने आणि सावळा मार्गाने पेण, आपटा गावी जाणाऱ्या बस आहेत. या बसने गुळसुंदेला उतरता येते. गुळसुंदे कोकणातील गावांप्रमाणेच निसर्गाच्या कुशीत वसले आहे. कर्नाळा किल्ल्यासारखा पाठीराखा आणि कर्नाळा अभयारण्यामुळे लाभलेलं हिरवळीच लेणं. यात भर म्हणून पाताळगंगेचा सहवास, असा हा टुमदार गुळसुंदे गाव. या गावातच पातळगंगेच्या पश्चिम तीरावर वसला आहे सिद्धेश्वर. शिवाचे इथे वास्तव्य कसे झाले आणि केव्हापासून आहे याविषयी काही माहिती नाही. गावातून मंदिराकडे येणारी वाट सोपी आहे. दुतर्फा घरांना पार करत एका बाजूला नदीकाठी वसलेल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ पोहोचतो.
![]() |
| सिद्धेश्वर मंदिर संकुल मुख्य प्रवेशद्वार |
![]() |
| मारुती, राम, भैरव |
![]() |
| सिद्धेश्वर मंदिर |
![]() |
| मंदिराचे कळस आणि मंदिर डाव्या बाजूने |
![]() |
| मंदिराच्या प्रवेशद्वारावरील मखर आणि नक्षीकाम |
![]() |
| मंदाराचे प्रवेशद्वार आणि खाली दिसणारी गजशिल्पे |
![]() |
| नंदी |
![]() |
| गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम आणि गणपती |
![]() |
| गणपती |
![]() |
| गरूडारूढ विष्णुलक्ष्मी |
![]() |
| शिवलिंग आणि मागे देवळीत पार्वतीची मूर्ती |
पेशवेकाळात गावातील गणपतराव भीडे यांना जमिनीची सनद देऊन देवाच्या पूजाअर्चेची सोय करण्यात आली होती. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यादिवशी पंचक्रोशीतील भाविकांची इथे गर्दी होते. मंदिरात हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. मंदिर परीसरात मुंज आणि गंगापूजन सारखे विधी होतात सिद्धेश्वर मंदिराशेजारी लक्ष्मीनारायण मंदिर आहे हे मंदिर आनंद काशिनाथ जोशी यांनी १८६७ मध्ये बांधले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला विश्रामधाम आहे. येथे एक शिलालेख आहे त्यात महादेव सुत बाजी करमरकर यांनी अर्पण केले असा उल्लेख आहे. सिद्धेश्वर मंदिरासमोर नदीवर सुंदर घाट बांधला आहे.
![]() |
| दिपमाळ आणि घाटावरून दिसणारे दृष्य उजवीकडे माणिकगड डोके उंचावताना |
![]() |
| घुमटीवजा देवळातले विरगळ तुकडे आणि तुळशी वृंदावन |
![]() |
| घाटावरून दिसणारा कराडे गावचा घाट आणि मंदिर |
![]() |
| दरवाजा जवळचे महिषासुरमर्दिनी शिल्प |
![]() |
| गाभाऱ्यातील शिल्पे |
![]() |
| गारमाता मंदिर, मंदिरातील लेख आणि तलाव |
![]() |
| देवीचा तांदळा |
![]() |
| गढी |
![]() |
| चौथारा, तळखडा, पडझड झालेले खोलीसदृश्य बांधकाम, जंग्या |
![]() |
| विहीरी |
![]() |
| रामेश्र्वर मंदिर |
![]() |
| खिडकीला गणपती |
![]() |
| शिवलिंग आणि भिंतीवरील लेख |
![]() |
| घाट आणि शिलालेख |
या व्यतिरिक्त गुळुसुंद्यापासून १.७ किमीवर असलेले आपटा गावातील गणपती आणि शिवमंदिर ही पाहता येते. ही मंदिरे पेशवेकालीन आहेत. मंदिरांचा इतिहास सापडत नाही पण ही मंदिरे पाहण्यासारखी आहेत. आपटा बस स्थानकाच्या आधी मुख्य रस्त्याशेजारी उजवीकडे ही मंदिरे आहे.
![]() |
| गणपती मंदिर |
![]() |
| गणरायाची मखरातील सुंदर मूर्ती |
![]() |
| शिवमंदिर |
![]() |
| मारूती मंदिर |
![]() |
| खांब आणि त्यावरील नक्षीकाम |
![]() |
| भिंतीवरील नक्षीकाम |
![]() |
| गणपती आणि विष्णुमूर्ती |
![]() |
| शिवलिंग आणि पार्वती मूर्ती |
![]() |
| नंदी मंडप आणि तुळशीवृंदावन |
![]() |
| मंदिरामागील तलाव |
मग काय कधी निघताय पहायला!!
संदर्भ:- कुलाबा गॅझेट, कित्ता आणि सर्वेक्षण
रायगड जिल्ह्याची भटकंती
येथून निघाल्यावर रूम शोधणे सुरु झाले. दोन दिवस सलग सुटी असल्याने बहुतेक हॉटेल भरलेली होती. थोडयाफार रूम खाली होत्या तेही चढे दर सांगत होते. पूर्वी गविंच्या एका प्रतिसादात प्रकृती रिसॉर्टचे नाव वाचल्याचे आठवत होते तेथे पोहचलो. रिसॉर्टचे दरपत्रक पाहून भर दुपारच्या उन्हात आम्ही गार पडलो. चार जणांसाठी रूमचा दर होता जवळपास रु.४० हजार. असे असूनही रिसॉर्ट पूर्ण भरलेले होते. यांचेकडे कोणतीच रूम शिल्लक नसल्याचे कळल्यावर जावयांना उत्साह संचारला. काहीही करून एखाद्या रूमची व्यवस्था कराच असे सांगू लागले. शेवटी रूम मिळतच नाही म्हटल्यावर नाईलाज झाल्यासारखे दाखवत आम्ही परत फिरलो. चार वाजायला आले होते. आता सरळ बीचवर जाऊन रात्री मुक्कामी आपल्या घरीच जावे असाही विचार मनात येऊ लागला. प्रकृती रिसॉर्टच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यालाच एक रिसॉर्ट दिसले.
चौकशी केल्यावर एसी रूमचा तीन हजार असा दर मिळाला. घासाघीस करून पाच हजारात दोन रूम ताब्यात घेतल्या. थोडा आराम करून बीचवर गेलो. आज फक्त भिजायचे. फोटो काढायचेच नाहीत असे ठरवून फक्त एक फोन सोबत घेतला व बाकी सगळ्या इलेकट्रोनिक वस्तू रूमवरच ठेवल्या. किनारा माणसांनी फुलून गेला होता. . ऍडव्हेंचर स्पोर्ट्सवाल्यांची चांगलीच चलती होती. सूर्यास्त पाहून व पाण्यात यथेच्छ मजा करून रूमवर परत आलो. नऊच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर पडलो. दुपारी जेवलो तेथेच जायचे ठरले. अंधार पडला होता आणि भूकही लागली होती त्यामुळे आता हेच अंतर खूप जास्त वाटत होते. येथे पोहचलो आणि गर्दी बघूनच कळले कि यांचे चायनीज जेवण खरोखरच चांगले असणार आहे. ऑर्डर दिली. वेळ लागणार होता. मधल्या वेळात सासरा-जावयानेआडोशाला एका टेबलवर आपली सोय करून घेतली.
यथील एक स्पेशल डिश, पॅकिंग फ्राईड राईस
पॅकिंग चिकन फ्राईड राईस, चिकन क्रिस्पी, चिकन चिली व माझ्यासाठी व्हेज फ्राईड राईस सर्व मिळून बिल झालं रु.५६०/- फक्त! अकरा वाजले. रूमवर जाण्यासाठी निघालो. दोन्ही मुली कामचलाऊ गाडी चालवतात त्यामुळे ह्यांची व जावयांची ड्रिंक अँड ड्राइव्हच्या त्रासातून मुक्तता होते. वाटेत थांबून आइस्क्रीमचा आनंद घेतला. रिसॉर्टला येऊन बऱ्याच वेळ आवारातच गप्पा मारून झोपायला गेलो.
सकाळी आरामात उठलो. नाश्ता करून बाहेर पडलो. येथील नाश्ता म्हणजे पोहे/उपमा. नाश्ता रु.३०/- एका प्लेटचे, चहा २० रुपये. खूप छान आणि स्वस्त.
थोडे रिसॉर्टविषयी : मुख्य रस्त्यालाच लागून दोन मजली इमारत आहे पुढे, पार्किंगसाठी जागा, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, पाठीमागे स्विमिंग पूल व आमराई (पूल काही कारणाने बंद होता. आंब्याची झाडे अजून लहान आहेत). एक विशेष वाटले इतकी चांगली व्यवस्था असून व आजूबाजूचे रिसॉर्ट गजबजलेले असताना या रिसॉर्टमध्ये आमच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. जणूकाही संपूर्ण रिसॉर्ट आमच्यासाठीच राखीव होते. रिसॉर्टच्या मालकांनी यदाकदाचित हा लेख वाचला तर माझे सांगणे आहे की व्यवस्थापनात कुठेतरी सुधारणा आवश्यक आहे. (मालक मराठी माणूस व पुण्याचा आहे असे कळते).
रिसॉर्टचे प्रवेश द्वार ते मागील स्विमिंग पूल पर्यंतचा १८० अशांतला पॅनोरॅमिक व्ह्यू
येथील इतर काही फोटो
रिसॉर्ट सोडले व बीचवर गेलो. आज बीचवर थोडासा फेरफटका मारून काल फोटो काढले नव्हते त्याची भरपाई करून घेतली.
‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर.
कुलाबा /सर्जेकोट किल्ला : अलिबागच्या सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिद्धीस आला.
कनकेश्वर निसर्गाचा एक अध्यात्मिक अविष्कार
पेण हुन अलिबाग कडे जाताना उजवीकडे वडखळ सोडल्यावर एक डोंगररांग दिसायला लागते. त्यातल्या एका डोंगरावर 2 मनोरे दिसतात तो आहे कनकेश्वर चा डोंगर. सुमारे 700 पायऱ्या असलेला हा डोंगर चढून जाताना आपल्याला खूप सुंदर निसर्ग दाखवतो पण तो 12 च्या उन्हात कसा दिसेल हा विचार करत आम्ही चढत होतो. सारखा दम लागत होता पण देवाचे बोलावणे आले की सगळे फिके पडते, इथे देवाचे बोलावणे म्हणजे वेगळ्या अर्थाने घ्यावे. तर देवाच्या मनात असले की तो आपल्याला त्रास होऊ देत नाहीत त्याचा प्रत्यय आम्हाला आला. पायर्यांच्या बाजूला चांगली सावली आहे त्यामुळे थकवा भरून निघतो आणि त्यात सूर्य डोक्यावर असताना खांदेरी उंदेरी कडून येणारा सुसाट वाराच आम्हाला वर घेऊन गेला. प्रत्येक थांब्यावर वारा आम्हाला सुख देत होता आणि आम्ही कधी कनकेश्वर पर्यंत पोचलो लक्षात आलं ही नाही.
दिवेआगारला""पाटील मेस / खाणावळ" आहे, छान मिळतं तिथे जेवण. नक्की जेवा त्यांच्याकडे.
राहण्याची ठिकाणांची काही माहिती. फक्त संपर्क क्रमांक आहेत
, ही माहिती मला माझ्या कंपनीतील सहकार्यांकडून मिळाली आहे.
Diveagar Stay
Anand Kelkar: 0214724242
Mauli Resort: 9969383433, 9324485569, 2147225015, 2147225225
Ramesh Awlaskar: 214724707
Suhas Bapat: 21472243777
Uday Bapat: 214724235
-
Panthasta Prangan - Pure VEG - 08087660965, 07588681403
पेण, पनवेल, उरण, घारापुरी...
कर्नाळा किल्ला : किल्ल्यामध्ये दिसून येणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडक्या स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा सुळका प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७मध्ये हा किल्ला घेतला. कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातच हा किल्ला आहे. त्यामुळे किल्ला व अभयारण्य या दोन्ही गोष्टी पाहून होतात. अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या आकारामुळे याचे वेगळेपण जाणवते. करणाई देवी मंदिर, तटबंदीचे जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या अद्यापही पाहण्यास मिळतात. बोरघाटावर नजर ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला लढवून अगतिक झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला.
कर्नाळा अभयारण्य : येथे वर्षभरात हंगामाप्रमाणे सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे १२ चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज, मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लायकॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आढळतात. जंगल परिसरात विविध औषधी वनस्पती आहेत. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण, यांचे प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. कर्नाळा किल्लाही याच परिसरात आहे.
न्हावा शेवा बंदर (JNPT) : न्हावा शेवा हे‘जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) म्हणूनही ओळखले जाते. मुंबई बंदरावरील बोजा कमी करण्यासाठी, तसेच रेल्वेने मुंबईमधून इतरत्र वाहतूक करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारला गेला. जगातील अत्याधुनिक बंदरांमध्ये याचा समावेश होतो. न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी) म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील हे बंदर ठाणे खाडीतील न्हावा व शेवा या दोन गावांमधील जमिनीत घुसलेल्या समुद्राच्या पाण्यावर उभे केले आहे. आपल्याला घारापुरी बेटावरूनही हे बंदर दिसते. कोणत्याही बंदराला भेट देणे खूप आनंददायी असते. बोटीवर कंटेनर चढविले आणि उतरविले जात असतात, ते काम पाहण्यात खूप मजा येते. अजस्र क्रेन, कंटेनर्स उचलून बाजूला ठेवणारी अवजड मशिनरी यांचे काम तोंडात बोट घालायला लावते. बंदराच्या बाहेर कंटेनर वाहतूक करणारे हजारो मोठे ट्रक्स उभे असतात.
द्रोणागिरी किल्ला : हा किल्ला उरण शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. बहुधा यादव काळात याची उभारणी झाली असावी. उरण आणि करंजाच्या जवळ असल्याने हा किल्ला जुन्या काळापासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण टेकडी जंगलाने झाकलेली आहे. किल्ला देवगिरीच्या यादवच्या राजवटीखाली होता. १५३०मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला दुरुस्त केला. १५३५मध्ये फादर एंटोनो-डी-पोर्टोने येथे तीन चर्चेस बांधली.
पिरवाडी बीच : रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील हा सुंदर सागरकिनारा असून, येथून सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते.
माणकेश्वर बीच : पिरवाडी बीचच्या उत्तरेला जवळच हा सुंदर सागरकिनारा आहे.
जसखार : उरणजवळ न्हावा शेवा परिसरात हे ठिकाण असून, येथे रत्नेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. उरण तालुक्यातील हे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उरण तालुक्यातील जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरून दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा भरविण्यात येते.
घारापुरीची लेणी : ही लेणी उरण तालुक्यात आहेत. परंतु सध्या मुंबईहून गेट वे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटी निघतात. त्याला साधारण एक ते दीड तास लागतो; पण पनवेल भागातूनही हे ठिकाण जवळ आहे. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किलोमीटर असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातील मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव नि मुघल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले. सन १७७४मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापन केले. १९८७ साली या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला.
समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. हे पक्षी फेकलेले अन्नपदार्थ लीलया हवेतच उचलतात. सध्या तरी मुंबईमार्गे जाणे सोईस्कर आहे; मात्र लवकरच उरण येथून पर्यटकांसाठी व घारापुरीतील लोकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटसेवेचा प्रस्ताव विचाराधीन आहे. (घारापुरी लेण्यांबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
कुंडलिका नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता त्यापैकी चार शिल्लक आहेत.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे.
चौल : चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे. हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे.
कर्जत, पनवेल, माथेरान परिसर...
नेरळ-माथेरान रेल्वे : ही आबालवृद्धांची आवडती रेल्वे आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किलोमीटर अंतर सुमारे दोन तास २० मिनिटांमध्ये पार करताना एक विलक्षण आनंद मिळतो. सह्याद्रीच्या डोंगरातील वळणे, बोगदे ही छोटी गाडी पार करत असताना वेगळाच अनुभव येतो. इ. स. १९०१मध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी १६ लाख रुपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. आता ती भारतीय रेल्वेखात्याच्या अखत्यारीत आहे.
शार्लोट लेक : माथेरानला पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीतच बांधला गेला. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव गर्द हिरव्या झाडीत असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तलावाच्या जवळच माथेरान-इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट आहेत. पावसाळ्यात तलाव भरून वाहू लागल्यावर धबधबा वाहू लागतो. त्याचा आवाज आसमंतात घुमत असतो. पर्यटक हे पावसाळी सौंदर्य टिपण्यासाठी येथे येतात.
किल्ले पन्हाळघर : रायगडाकडे जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा. किल्ल्याला फारसा इतिहास नाही. ४५० फूट उंचीच्या लहान डोंगरावर हा किल्ला आहे. रायगडच्या संरक्षक शृंखलेतील हा एक किल्ला आहे. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. गडावर तटबंदी शिल्लक नाही. तसेच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात.
इरशाळगड : याला किल्ला म्हणण्यापेक्षा शिखर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ३७०० फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील समजला जातो. इतिहासातही किल्ल्याचा फारसा उल्लेख नाही. मे १६६६मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. गडावरील माचीपासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाके लागते. अशी अनेक टाकी बघण्यास मिळतात. समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. हा ट्रेकर्सचा मानबिंदू आहे. ट्रेकर्सच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण समजला जातो. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली. कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दर वर्षी २६ जानेवारीला मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
कोंडाणे बौद्धलेणी : इ. स. पूर्व २०० म्हणजे २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी म्हणजे भारताच्या गौरवशाली कला व विचार परंपरेच्या साक्षीदार आहेत. कातळात काढलेली लेणी व त्यामधील कोरीव काम थक्क करणारे आहे. सन १८३०मध्ये विष्णू शास्त्री यांनी ही लेणी प्रथम पाहिली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी येथे भेट दिली. बौद्ध साधकांना चिंतनासाठी अशी निर्जन स्थळी निर्माण केलेली अनेक लेणी महाराष्ट्रात आहेत. साधारण सातवाहन राजवटीत यांची निर्मिती झाली. पुरातन बोरघाटमार्गे जाणाऱ्या मार्गावरच ही लेणी आहेत. जंगलाने वेढलेली ही लेणी निसर्गाचे लेणे अंगावर घेतल्यासारखी दिसतात.
चैत्यगृह : या लेण्यातील जे चैत्यगृह आहे, त्याच्या दर्शनी भागावरील वातायान हे पिंपळपानाच्या आकारात असून, छत हे गजपृष्ठाकार आहे. या चैत्यगृहाची लांबी २२ मीटर असून, ते आठ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे. स्तूपाचा परीघ हा २.९ मीटर आहे. सध्या स्तूप क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. जवळपास दोन हजार वर्षे जुनी सागवान लाकडाची कमान आजही आपणास पाहायला मिळते. चैत्याला स्तंभाचे वलय होते. यातील स्तंभ अष्टकोनी असून, स्तंभावर चिन्हे अंकित आहेत. आज ते भग्नावस्थेत पडलेले आहेत. चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे नक्षीकाम आहे. तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात. सुंदर असे युगलपटदेखील येथे आहेत. या युगलपटातील पुरुष हे योद्धे असावेत. कारण त्यांच्या हातात शस्त्रे पाहायला मिळतात. त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प प्रत्येक छज्जावर कोरलेले दिसते.
कोथलीगड : हा पेठकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकाराचे बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड असे म्हणतात. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कर्जतच्या पूर्वेसच हा किल्ला आहे. या छोटेखानी किल्ल्यावर शिवकाळामध्ये शस्त्रागार होते. तसेच याचा उपयोग टेहळणीसाठीही होत असावा. येथील निसर्गसौंदर्य ट्रेकर्सना मोहात टाकते. येथे कातळाचे शिखर व गुहापण आहे.
आंबिवली बौद्धगुंफा : कोथळीगडाच्या पायथ्यातच आंबिवली बौद्धगुंफा आहेत. येथे पाण्याच्या टाक्या, १२ विहार आहेत. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेखही आहे. ही लेणी कोथळीगडाबरोबरच बघता येतात. आवर्जून बघावीत अशी ही लेणी आहेत.
प्रबळगड : पनवेलच्या पूर्वेस खालापूर तालुक्यात हा किल्ला आहे. माथेरानच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून २३२५ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मुघलांकडून हा किल्ला ताब्यात घेतल्यावर खजिना मिळाला असे म्हणतात. सन १८१८मध्ये येथील तटबंदी व बुरुज ढासळले आहेत. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी काही काळ येथे आश्रय घेतला होता. किल्ल्यावर काही इमारतींचे जोते आढळून येते.
बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही...
पालीचा श्री बल्लाळेश्वर : अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे, की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखला जातो. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. पालीचा गणपती हा अष्टविनायकांच्या परिक्रमेतील आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सूर्य उगवतो, तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणेशाचे कपाळ विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून, ती चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. ठाणाळे व खडसांबळे ही बौद्ध लेणीही याच परिसरात आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.
पौराणिक कथेनुसार, विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख मुद्गल पुराणात आहे. कृत युगात येथे पल्लीपूर नावाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नावाचा वैश्यवाणी राहत असे. या कुटुंबात बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासूनच ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्तिमार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे. म्हणून कल्याणशेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने ‘घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन’ अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली, की आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देऊन श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळेमध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
येथे ३० ते ४८ इतक्या मोठ्या संख्येने लेणी असावीत, असा संशोधकांचा कयास आहे. लेणी किती होती याबाबतीत अनेक मते आहेत. ही सर्व लेणी एकाच दगडात कोरलेली आहेत. हा दगड थोडा ठिसूळ असल्याने लेणी क्षतिग्रस्त झाली आहेत. लेण्यांच्या मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. आज ती भग्न असली, तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी योजना आजच्या घडीलाही आश्चर्यकारक आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी अभ्यासकांना माहिती करून घेता येतील.
ठाणाळे /नाडसूर लेणी : पालीच्या गणपतीजवळ एका निसर्गरम्य ठिकाणी ही बौद्ध लेणी आहेत. तैलबैला ते मांदाड या जुन्या व्यापारी मार्गावर वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम उतरंडीवर ही लेणी एक हजार फूट उंचीवर आहेत. ठाणाळे गावापासून लेण्यांपर्यंत पायवाट आहे. सोबत वाटाड्या हवाच. हा लेणीसमूह सर्वप्रथम मराठी मिशन, मुंबई यांनी इ. स. १८९०मधील जानेवारी महिन्यात जाऊन पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स यांच्या संशोधक नजरेसमोर आणला. इ. स १८९०मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ. स. १८११मध्ये त्याने ‘Caves at Nadasur and Kharasamla’ ही पुस्तिका प्रकाशित केली.
खडसांबळे लेणीसमूहापासून ही लेणी अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात तर येथील वातावरण आणि निसर्ग मोहून टाकणारा असतो. डोंगरावरून झेपावणारे प्रपात तुमची नजर खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या हंगामात फुलणारी फुले, जांभळे आणि करवंदांसारखा मेवा येथे उपलब्ध असतो. ठाणाळे येथील लेणीसमूहातील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. येथे २३ लेण्यांचा समूह असून, पॉलिग्राफिक परीक्षणानुसार इसवी सनापूर्वी ५० ते सत्तर दशकात ही लेणी निर्माण केली असावीत. निवासी गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. पूर्णावस्थेत नसलेल्या चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम केलेले दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी या गुंफांचे वर्णन लिहून ठेवले आहे. गुंफा क्रमांक सात सर्व गुंफांमध्ये सर्वांत सुंदर आहे. गुहेच्या संपूर्ण भिंतीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि प्राणी यांच्या आकृतीसह सजावट केली आहे. येथे दोन उल्लेखनीय शिलालेख आहेत. त्यावर दात्यांची नावे दर्शविली आहेत.
![]() |
| ठाणाळे लेणी ठाणाळे लेणी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा |
- मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
- खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे
- खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
- पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
- पेडली ते ठाणाळे ६.५ किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.
![]() |
| गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर |
![]() |
| ठाणाळे लेणीच्या पठारावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो |
संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रवेशद्वाराची संरक्षणात्मक रचना थक्क करणारी आहे. दरवाज्याच्या आत इंग्रजी ’एल’ आकाराची देवडी बांधलेली आहे. हे दार बंद केले, तर या बाजूने शत्रू काय मुंगीसुद्धा आत येऊ शकणार नाही अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तुंग कातळाच्या भिंतीजवळ एक सुळका आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी अनेक गुहा, तळटाकी असून, त्यात भरपूर पाणी आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरुज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पाली गाव, अंबा नदी, उन्हेऱ्याची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर येथून दिसतो. किल्ला ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे.
सुधागड : पालीच्या जवळचाच हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, याची उंची ५९० मीटर आहे. पूर्वी हा गड भोरपगड म्हणूनही ओळखला जायचा. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. इ. स. १६४८ साली मालवजी नाईक कारके, सरदार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक या शिवाजी महाराजांच्या शूरवीरांनी किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी या गडाचे सुधागड असे नामकरण केले. हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी केला होता, असे सांगितले जाते.
पाच्छापूर दरवाज्यातून गडावर गेल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्याची कोठारे, टाके, हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी आहे. गडावर रायगडच्या टकमक टोकासारखे टोक असून, येथून घनगड, कोरीगड, तैलबैला व अंबा नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रायगडावरील टकमक टोकासारखेच येथेही टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे दिसतात.
महडचा वरदविनायक : महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. सन १७२५मध्ये सुभेदार रामजी महादेव बिवलर यांनी हे मंदिर बांधले. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एका भक्ताला त्याच्या स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात मूर्ती पडली आहे असे दिसले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून, गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
शिवथरघळ : आध्यात्मिक, धार्मिक, तसेच निसर्गप्रेमींचे हे आवडते ठिकाण आहे. शिरवळहून महाडला येताना वरंधा घाट उतरल्यावर उजवीकडे शिवथरघळ आहे. हे ठिकाण सर्व बाजूंनी असलेल्या उंच पर्वतराजीत असून, वाघजाई दरीच्या कुशीत आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून, ती पुढे सावित्रीला मिळते. शिवथरघळ आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात होता. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भू-प्रदेशामुळे मोरे यांना निसर्गाचे संरक्षण असल्याने ते बलाढ्य झाले होते. शिवरायांनी हा परिसर १६४८मध्ये आपल्या ताब्यात घेतला. समर्थ रामदास सन १६४९मध्ये या घळीत (गुहेमध्ये) वास्तव्यासाठी आले. सन १६६०पर्यंत म्हणजे दहा-अकरा वर्षे ते या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच घळीत झाला. दासबोधाची सात/आठ दशके त्यांनी या घळीतच लिहून पूर्ण केली. दासबोध समर्थ रामदासांनी रचला आणि त्याचे लेखन त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामींनी केले. दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेने ७८०० ओव्यांचा हा ग्रंथ ऑडिओ स्वरूपात आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. शास्त्रीय गायक संजय अभ्यंकर यांच्या आवाजातील या दासबोधाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. (दासबोधातील व्यवस्थापनासंदर्भातील उपदेशाबद्दलची लेखमाला वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वरंधा घाट : पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर ‘वरंध घाट’ तथा ‘वरंधा घाट’ नावाचा २०-२५ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला छेदून देशावरून कोकणात उतरतो. एका अवघड ठिकाणी एकावर एक अशी ४/५ हेअरपिन कर्व्हज (वळणे) यात आहेत. ज्या वेळी खालून बस किंवा ट्रकसारखे एखादे वाहन येत असते, त्या वेळी एकदम वरच्या बाजूला उभे राहून वाहन पाहताना, वळताना श्वास रोखला जातो. या घाटात पर्वत आणि जंगल याशिवाय काहीच दिसत नाही. घाटात गाड्यांचे आवाज प्रतिध्वनित होत असतात. भोरहून निघाल्यावर डावीकडे देवघर धरणाचा जलाशय, नागमोडी वळणे हा प्रवाससुद्धा खूप छान वाटतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. घाटाच्या सुरुवातीला भोर तालुक्यातील हिरडोशी गाव आहे, मध्यभागी वाघजाई मंदिर आहे. वरंधा घाटातून उतरताना मध्यावर एका ठिकाणी गरम भजी, नाश्त्याचे पदार्थ मिळतात. थंडीत कुडकुडत गरम भजी आणि चहा पिताना खूप मजा येते.
महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील महाड हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले हे शहर एके काळी ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही जुने नामोल्लेख आढळतात. पूर्वी उधाणाच्या भरतीच्या वेळी महाडपर्यंत गलबते येत असत. इतर भरतीच्या वेळी महाडच्यावर दीड किलोमीटरपर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. सोळाव्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. महाडमध्ये लोणारी कोळसा, तांदूळ यांचे उत्पादन होते. महाडच्या औद्योगिक वसाहतीमध्ये रासायनिक, तसेच कापड उद्योग आहेत. महाड हे जणू रायगडाचे प्रवेशद्वार समजले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड येथून जवळच असल्याने शिवकाळात महाडचे महत्त्व अधिक वाढले. १७९६ साली येथे दुसरा बाजीराव, नाना फडणवीस व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन बाजीरावाला पेशवाई मिळाली.
कोल बौद्ध लेणी : महाड तालुक्यात मंडणगडच्या बाजूला कोल हे गाव आहे. या गावात सातवाहन काळातील दोन लेणीसमूह आहेत. या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका, तसेच ब्यूलर यांच्या इंडियन पॅलिओग्राफी यामध्येआहे. ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत.
लेणी क्रमांक २ : हे मुख्य विहारलेणे आहे. या ठिकाणी प्रार्थनास्थान असावे. हे लेणे मातीने पूर्ण भरलेले आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या लेण्यात काही नाणी वगैरे सापडली आहेत.
गांधार पाले बौद्ध गुंफा : महाडजवळील सावित्री-गांधारी नद्यांच्या संगमावर जवळ असलेल्या टेकडीवर ३१ गुंफा आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत. हिनायन बौद्ध गुंफा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात खोदण्यात आल्या. टॉलमेनीनुसार इसवी सन १५०च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लसच्या काळात इसवी सन २४७च्या काळात पालैपटमई म्हटले जायचे वा तसे नाव असावे. शिलाहार राजा अनंत देव याच्या ११व्या शतकातील शिलालेखानुसार पालीपट्टण म्हणून या ठिकाणाचा उल्लेख आहे. या लेण्यांमध्ये चैत्यग्रियां नावाचे काही छोटे स्तूप आहेत. तसेच भगवान बुद्धांच्या मूर्ती, बोधिसत्त्व आणि काही विहारांच्या भिंती आणि खांबांवर काही शिलालेख आहेत. एका गुहेच्या भिंतीवर ब्राह्मी लिपीत कोरलेला शिलालेखदेखील आहे. ही बौद्धकालीन लेणी शिल्पकलेचा सुंदर नमुना आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत.
पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनिटे लागतात. लांबून ही लेणी त्रिस्तरीय दिसतात. या लेण्यांची अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.
रायगडाच्या संरक्षक साखळीतील हा मंगळगड किल्ला कांगोरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. जेव्हा जेव्हा रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी येथील फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. त्या वेळी सरदार गिरजोजी यादव यांनी रायगडावरील सोनेनाणे व अन्य महत्त्वाच्या वस्तू या गडावर सुरक्षेकरिता आणल्या. नंतरच्या काळात त्या पन्हाळगडावर रवाना करण्यात आल्या. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात हा किल्ला इंग्रजांनी घेतला. अभिजित बेल्हेकर यांच्या ‘दुर्गांच्या देशा’ या पुस्तकामध्ये याचे छान वर्णन आहे. महाडहून या गडाजवळील पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय आहे. पुणे-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवावी. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोईची. गडावर काहीही मिळत नाही.
चंद्रगड : हा पोलादपूर तालुक्यात असून, महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंटच्या पश्चिमेस आहे. हा किल्ला दौलतराव मोरे यांनी बांधला. २२५८ फूट उंचीवरील या किल्ल्यावर फक्त पायवाटेनेच जाता येते. कृष्णा नदीच्या बलकवडी धरणाच्या मागे असलेल्या जोर गावातून पायवाटेने किंवा उमरठ-ढवळे गावाकडूनही पायवाटेने जाता येते; मात्र वाटाड्या हवाच. सह्याद्रीच्या रांगेतील हा अवघड किल्ला निसर्गरम्य तर आहेच; पण ट्रेकिंगच्या सरावासाठीही चांगला आहे.
रायगड - लोहरज्जू मार्गे
रायगडवर एक रस्ता १४०० पायºयांनी गडावर जातो. तर दुसरा रस्ता रोपवे कडे हिरकणीगावातून जातो. १५ - २० वर्षांपूर्वी सुमारे १४०० पायºया चढून या किल्यावर जावे लागे. आता मात्र रोपवे सेवा सुरु झाली आहे. अवघ्या ५ मिनिटांत रायगडवर पोहचता येते. १५ वर्षांपूर्वी मी एका ट्रेकिंग क्लबबरोबर येथे पानशेत ते रायगड असा ट्रेक केला होता. मजा आली होती. दिवसभर चालून चालून पाय चांगले दमले होते. तीन दिवसाचा या ट्रेकमध्ये एक संपूर्ण दिवस व एक रात्र रायगड पाहून झाला होता. रोलचा कॅमेरा असल्यामुळे जास्त फोटो काढता आला नाहीत. त्यानंतर आज बºयाच वर्षांनी रायगड किल्ल्यावर जाण्याचा आनंद काही औरच होता. आणि तेही रोपवे मधून.
रोप वे मार्गे रायगड :
४ फुट उंचीखालील लहान मुलांसाठी ११५ रुपये जाऊन येऊन. तर प्रौढ व्यक्तींसाठी १८० रुपये जाऊन येऊन तिकीट आहे. एका ट्रॉलीमध्ये ४ प्रौढ व २ लहान मुले बसतात. एका वेळी दोन ट्रॉली गडावर घेऊन जातात. त्याचवेळी वरून खाली दोन ट्रॉली गडावरून शिवभक्तांना घेऊन खाली येतात. गडावर जाण्यासाठी ट्रॉलीतून पाच मिनटं लागतात. चौकशी केली असता मे महिन्यात, शनिवारी व रविवारी, सुटटी दिवशी येथे गर्दी असते. दोन दोन तास थांबून वर गडावर जाण्याची वाट पहावी लागते. मी मात्र सुदैवी निघालो. शनिवार असूनही देखील पर्यटकांची गर्दी पाहिजे तेवढी नव्हती. तिकीट काढून रोपवे मध्ये बसलो. रोपवे सुरू झाला. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत रायगडाकडे रोपवेची ट्रॉली निघाली. मराठीतून रोप वे ला ‘लोहरज्जू’ असे मजेशीर नाव आहे. वर जाण्याचा अनुभव लिहिणे शक्य नाही. यासाठी एकदा तरी प्रत्त्यक्ष अनुभव घ्यायला हवा. वर जाण्यासाठी पाच मिनिटेच लागतात. परंतु जो अनुभव आहे तो मोजता येणार नाही. जसे जसे किल्यावर पोहचत होतो तस तसे खालील लावलेली वाहने, माणसे, शेती छोटे छोटे होत गेले. छातीत चांगलीच धडधड वाढत होती. लांबवर उंच डोंगर दिसू लागले होते. ज्युरॅसिक पार्कमधील धबधबा व हॅलिकॉप्टरचे दृश्य आठवले. रायगडावरून कोसळणारा धबधब्या शेजारून आपण वर पोहचतो. एकदम मस्त वातावरण अनुभवयाला मिळाले. वरती पोहोचोस्तोवर ढग दाटून आले. वर पोहाचलो ते दाट ढगामध्येच. अचानक खालील दृश्य गायब झाले. गडावर काही पायºया चढून जाऊन मेणा दरवाज्यातून गडावर जाता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली राजगडावरून रायगडावर राजधानी हलवली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६७४ साली याच किल्यावर झाला. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये याच किल्यावर झाला. गडावर जगदीश्वराचे मंदिर आहे. त्यासमोर समाधी व त्यांच्या वाघ्या या कुत्र्याचे स्मारकही आहे. हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, होलरचा माळ, हिरकणी बुरुज, मदरशाचे थडगे, नाना दरवाजा, महादरवाजा या गोष्टी पहाण्यासारख्या आहेत. गडावर भोजनाची सोय आहे.
संपूर्ण गडावर मध्येच जोरात पाऊस व दाट धुक्यामुळे खालील परिसरत पाहणे शक्य नव्हते. मात्र, पाऊस संपता संपता गड पाहणे एक वेगळाच अनुभव होता. गड पाहून अडीचला रोप वे परत खाली आलो. खाली आल्यावर झुणका भाकरीवर ताव मारून पोटपूजा उरकली.
तेथून आम्हाला चिपळूणला करंजेश्वरी देवीचे दर्शन व मुक्कामाला जायचे होते.
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे. सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)
भगवान श्री परशुराम मंदिर
![]() |
| हिरकणी गावातून रायगडावर दाट ढगातून जाणारा रोप वे. |
![]() |
![]() |
| रोपवेतून जाण्यासाठीचे नियम व अटी |
![]() |
| रोप वे स्टेशन. |
![]() |
| रायगडावरील एक दरवाजा |
![]() |
| रायगडावरील बाजारपेठेतील एका दुकानाबाहेरी नक्षीकाम. |
![]() |
| छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा. |
![]() |
![]() |
| जगदिश्वराचे मंदिर. |
![]() |
| लाडक्या वाघ्या कुत्र्याची समाधी. |
![]() |
| छत्रपती शिवाजीमहाराजांचे समाधीस्थळ. |
![]() |
| समाधीस्थळाशेजारील शिलालेख. |
![]() |
| रायगडावर जाणारा रोपे वे मार्ग या मोठ्या धबधब्याशेजारून जातो. |
![]() |
| रोपे वे चे यांत्रिकी जाळे |
कसे जाल :
- मुंबई - गोवा महामार्गावरील महाड येथून २४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
- पुण्याकडून ताम्हिणी घाटातून उतरल्यावर एक रस्ता सरळ कोलाडगावाकडे जातो. तेथे न जाता घाट उतरल्यावर डावीकडे निजापूरला जाणारा रस्ता आहे. तेथून सुमारे २५ किलोमीटरवर रायगडला पाचाडमार्गे जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही या रस्त्याने गेलो. काही रस्ता घनदाट जंगलातून व निर्मुष्यवस्तीतून जातो. वाटेत धामणी, हरवंडी, खराबाचीवाडी आदी छोटे गावे लागतात.
- मुंबई - रायगड २१० कि. मी. (महाडमार्गे),
- पुणे - रायगड - १२६ कि. मी.,
- महाड - रायगड - २७ कि. मी.,
- पर्यटन महामंडळाची निवासस्थाने याशिवाय खाजगी हॉटेल उपलब्ध आहे.
पाहूनच डोळ्यांचे पारणे फेडणारा.. मनाला घायाळ करणारा हा आड्राई रोड शेवते गावाजवळील हा प्रसिद्ध धबधबा आहे.. उंचावरून फेसाळणारे पाणी.. चहूबाजूंनी रांग सह्याद्री हिरवागार परिसर वातावरण धुंद करते..
अशा या जागी आवश्य भेट द्या.. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गालाही फिके पाडील असे आहे.. जर मला कोणी विचारले की स्वर्ग कोठे आहे तर मी अभिमानाने म्हणेल की पावसाळ्यात आमच्या महाड रायगड मध्ये भेट द्या.. येथेच स्वर्ग सुखाची प्रचिती येईल..
येथे जाण्यासाठी पुण्या मार्गे आलात तर एक मढेघाट कर्णावडी वरून रानवडी वाकी मार्गावर पुढे शेवते फाटा लागतो तेथून पुढे 20 मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा आहे
मुंबई किंवा पुणे वरंध मार्गावरून येणार्यांनी बिरवाडी वरून वाघेरी रोड दहिवडला आल्यावर उजवीकडे ➡ वाकीरोडने वळावे पुढे सरळ खरकवाडी.. वाकी.. नंतर शेवते गावी यावे
पिकनिकचा आनंद जरूर लूटा पण निसर्गाचे भान राखून..
धन्यवाद
मातेचे रान’ अर्थात माथेरान
निर्सग सौंदर्याने नेटलेले व प्रदूषण मुक्त असे पुणे-मुंबईजवळील सर्वात जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे ‘माथेरान’ प्रशासनाच्या कृपेने सध्या तरी येथे केवळ मिनी ट्रेनच जाऊ शकते. बाकी प्रवास घोडा व पायी यांच्याद्वारेच करावा लागतो. अशा माथेरानला दिवाळीच्या सुट्टीच्या शेवटच्या रविवारी गेलो. त्या विषयी...
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.
‘मातेचे रान’
ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एलफिन्स्टन व ठाण्याचा कलेक्टर ह्यूज मॅलेट यांनी माथेरान शोधले. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने माथेरानवर बंगला बांधला. माथेरान शोधले म्हणजे येथे आधी वस्ती होतीच.
माथ्यावरील दाट वनश्रीमुळे याला ‘माथेरान’ हे नाव पडले. असेही म्हणतात की, धनगरांचे मातापिता याच जंगलात मरण पावल्याने या जंगलात ‘मातेचे रान’ (माथेरान) आहे. येथील निसर्ग पाहून सर आदमजी पीरमॉय यांनी प्रथम नेरळ ते माथेरान अशी पाऊलवाट तयार केली. नेरळ-माथेरान लोहमार्ग बांधण्यासाठी त्यांचा दुसरा मुलगा अब्दुल हुसेन यांनी प्रयत्न केले. एवढ्याश्या छोट्या माथेरानवर १९०५ साली नगरपालिकेची स्थापना झाली.
पार्इंट (स्थळे) :
इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.
वाहनांना बंदी :
माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.
बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.
![]() |
लहान मुलांचे अर्थात मोठ्यांचेही आकर्षण असलेली माथेरानची राणी ‘मिनी ट्रेन’ |
वनश्री :
संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.
शार्लोट लेक
मुख्य बाजारपेठेपासून १ ते १.५ कि. मी. अंतरावर हे नैसर्गिक तळे आहे. माथेरानवरील पिण्याच्या पाण्याचा मुख्य साठा हाच आहे. पावसाळ्यात हा जलाशय संपूर्ण भरतो. या ठिकाणीही काही हॉटेल्स असून, दमून भागून आल्यावर याही ठिकाणी आपली पोट पूजा होऊ शकते. पाण्यात पाय अथवा आंघोळ करू नये अशी सूचना देऊनही अनेक पर्यटक सूचनेला न जुमानता यथेच्छ पाय धुण्यासारखे प्रकार करताना आपल्या दिसून येतात. या पाण्यावर पुढे प्रक्रिया करून संपूर्ण माथेरानच्या हॉटेल्स व रहिवाशांना पुरविलेले आहे.
![]() |
शार्लोट लेक |
![]() |
बाजारपेठेतील चप्पल विक्रेत्याचे दुकान. |
प्रदूषणापासून मुक्ती अनुभवण्यासाठी व निर्सगाच्या सान्निध्यात यायचे असल्यास एक दिवस का होईना पण माथेरानला येणे गरजेचे आहे.
माकडेच माकडे :
माथेरानमध्ये पायथ्याशी आपण गाडी लावतो. या ठिकाणपासून ते संपूर्ण माथेरानावर माकडे दिसून येतात. पर्यटकांशी ओळख झाली असल्याने ही माकडे टोळीने पर्यटकांच्या मागे जाऊन हातातल्या खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसून येतात.
![]() |
‘छोटे कुटुंब सखी कुटुंब’ |
कसे जाल :
- माथेरान हे पुण्यापासून १२५ तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर आहे.
- पुण्याहून येताना जुन्या पुणे-मुंबई महार्गावर खोपोली सोडल्यावर चौक म्हणून उजवीकडे रस्ता जातो. या रस्तावर कर्जतच्या अलिकडे नेरळ माथेरानकडे जाणारा रस्ता आहे.
- (रस्त्याचे डांबरीकरण चालू असल्याने चौक ते नेरळ हा रस्ता खराब आहे.)
- पायी माथेरानला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण गाडीने येण्यासाठी नेरळवरून डांबरी रस्त्यावर ८ किलोमीटरची घाटातून वेडीवाकडी वळणे घेत वाट आहे. याशिवाय लिट्ल चौक पॉईंटच्या खालून येणारी वाट, कर्जतहून गार्बेट पॉईंटवर येणारी १३ कि.मी.ची पायवाट आहे.
कधी जाल :
येथे जाण्यासाठी सप्टेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. भटक्यांसाठी पावसाळा ही योग्यच ठरतो. जून ते आॅगस्ट या काळात येथे जोरदार पाऊस पडतो. रायगडप्रमाणेच या ठिकाणी वरपर्यंत धुक्याचे साम्राज्य असते. उन्हाळ्यात येथे जाणे चांगले. कारण दोन्ही बाजूंनी गर्द हिरवी गार झाड असल्याने उन्ह्याच्या झळा लागत नाही.
काही टिप्स :
- शक्यतो वेळ काढून सकाळी ९ वाजेपर्यंत माथेरानाला पोचून काही पार्इंटस पाहून संध्याकाळी ६ पर्यंत परतीचा मार्ग धरावा. एका दिवसात सर्व पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. घोड्यावरून जाणार असलात तरी हे पार्इंटस पाहणे शक्य होत नाही. त्यासाठी किमान ३ दिवस तरी पाहिजेत.
- सर्व पार्इंटस एकमेकांपेक्षा लांब अंतरावर असल्याने सोबत नकाशा असणे गरजेचे आहे. तसे वाटेत लोक ये - जा करत असतात.
- स्वत:चे जेवण घेऊन जाणे उत्तम. येथील हॉटेल्स सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेरील आहेत. म्हणजे काही मार्केट मधील हॉटेल्स तशी स्वस्त आहेत. पण ती शोधावी लागतात.
- पाण्याची सोय करून जाणे चांगले. कारण काही पार्इंट सोडले तर वाटेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
देवकुंड
INTRO:
HOW TO REACH THE BASE VILLAGE FROM PUNE:
THINGS TO CARRY:
- A backpack to carry everything in it,
- Lunch/ snacks/ packs of Energy Bar,
- Water bottle (2 -3 Liters),
- Good grip quality trekking shoes,
- Personal medication / First Aid kit,
- Toiletries ( Hand sanitizer, tissue papers etc.),
- Cap, goggles, sunscreen, mosquito repellent etc. (depending on season),
- Extra Pair of Clothes ( in case you want to dive into the water which you will),
- Slippers (optional – at the end of the day to relax your feet),
- Electoral Powder / Dry Snacks (might come handy),
- Jacket/ pullover/ windcheaters ( depending on season).
WHEN THE MOUNTAIN CALLS
Then the path kept going through the land of muds followed by green & golden meadows of grass by keeping the lake on its left. The range of Sahyadris is visible in such close distance as if one can just reach it by a semi-long sprint.
After crossing the second stream, one has to go around hiking the peripheral mountain of the waterfall as the straighter way isn’t an option in this hill. This hike continues through a dense forest & to be placed on the tougher side as it takes one’s breath out with its short (10-15 mins.) yet steep climb. The key here is to climb without pausing in calm, steady & rightly paced manner. Just listen to your rapid heartbeats (off course you should pause if you feel any bad) & take all the breath once you reach a suitable rocky resting place at the top. Post this, there’s still a little hiking to do but that's of low endurance.
Then after a little downward journey lies the final stream in the path of the wanderer. While crossing it, one could see the origin of the waterfall, from where the water is gushing down, brilliant! No matter how exhausted I was after the 2-hour trek, the heart finally began to dance in joy as the goal seemed only a few minutes away.
All the fear, all the doubts & all that fatigue faded away as in less than 10 minutes I found myself standing right at the place where I was supposed to be. The mighty Devkund waterfall was in front. It was the complete eye-catch for the seeker.
सकाळी-सकाळी सुर्यनारायण क्षितिजावर अवघा वीतभरही वर येण्याआधीच पिरंगुट ओलांडून पाऊस पिऊन हिरव्याकंच झालेल्या मुळशीच्या पांढरीतून, सह्याद्रीच्या पावलांना तुम्ही स्पर्श करावा. मालेच्या खिंडीतून जमिनीला भेटायला येणारे ढगांचे लोटच्या लोट वळणावर थांबून पाहावेत, मग मालेची खिंड ओलांडून, मुळशी धरणाचा जलाशय उजव्या हाताला ठेवत ताम्हिणीच्या अंतरंगात शिरावे. अग्नीच्या धगधगत्या वीर्यातुन जन्माला आलेला अतिप्रचंड, राकट, कणखर, काळा-कभिन्न सह्याद्री स्वतःचं आडदांड सामर्थ्य उधळत समोर यावा. डाव्या हाताला आभाळात घुसलेले सरळसोट अजस्त्र कडे तर उजव्या हाताला मुळशीचा प्रचंड जलाशय, वळणा-वळणाच्या सुंदर रस्त्याने, छोटी-छोटी गावे, वाड्या-वस्त्या झपाट्याने मागे टाकत, पुण्याची हद्द ओलांडून रायगडच्या हद्दीत पोहोचताच एका वळणावर अचानक दाट धुक्याच्या पोटात शिरावे व दुसऱ्याचं वळणाला बाहेर ही पडावे. मग प्रत्येक वळणाला हा पाठशिवणीचा खेळ तसाच खेळत, घाट उतरून पाटणुस-भिराची वाट पकडावी. मोठमोठ्या दगडी शिळांमधून वाट काढत धावणारं फेसाळ पाणी डाव्या हाताला ठेवत एका छोट्या पुलावरून पार होत, भिरा गावच्या वस्तीत गाडी उभी करत पाठपिशव्या अडकवीत, नाव-नोंदणीचा सोपस्कार आटोपून देवकुंडच्या वाटेला लागावे.
एक जवळपास कोरडा म्हणावा असा ओढा ओलांडून, गावातील सिमेंटचा रस्ता मागे टाकत आणि समोर येणारी दाट जंगलात घुसणारी पायवाट पकडावी. भिरा धरणाचा जलाशय डाव्या हाताला ठेवत त्याच्या कडे-कडेने जाणारी जंगलवाट, जलाशयाच्या पलीकडे तसेच उजव्या हातालाही हजारो वर्षांपासून स्थितप्रज्ञपणे ठाण मांडून बसलेले अजस्त्र सह्यकडे......त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब न्याहाळत संथ चालीनं पुढे चालत रहावं. एखाद्या भुरळ पाडणाऱ्या सुंदर जागी, जलाशय आणि पाठीमागील गर्द झाडी निव्वळ अनुभवत शांत बसून राहावं. झाडी-झुडपे, वृक्ष त्यात गुरफटलेल्या वेली, अविरतपणे कानावर पडणारा नानाविध पक्षांचा एकमेकांत मिसळून गेलेला गुंजारव...सगळंच स्वर्गीय.....
मग मार्गातील दोन ओढे ओलांडून पुढे यावं. एव्हाना भिरा जलाशय मागे पडून, त्याची जागा डाव्या हाताने अवखळपणे वाहणाऱ्या ओढ्याने घेतलेली असते, मोठमोठ्या शिळांमधून वेगाने वाहणाऱ्या फेसाळ पाण्याचा आवाज कानात साठवत लाकडी पुलावरून अजून एक ओढा पार करून अंधारबन वाटावं अशा जंगलात घुसणाऱ्या चढणीच्या वाटेला भिडावं. पुढची पंधरा-वीस मिनिटे, घामाघूम करणारा, अंगावर येणार चढ, सूर्याची किरणे न पोहोचणाऱ्या पायवाटेवरून चालत पार करावा, दरम्यान, सुर्यकिरणाच्या अनुपस्थितीमुळे, मोठमोठ्या शिळा आणि झाडांची खोडं यावर जागोजागी समोर येणारी शेवाळाची कलाकारी, वेलींनी जखडलेल्या झाडा-झुडपांनी धारण केलेले गूढ अवतार न्याहाळत पुढे सरकत राहावं. सरतेशेवटी शेवटचा चढ पार करताच समोर येणारा दोन डोंगराच्या बेचक्यातून, खाली, खोल निवळशंक पाण्याच्या हिरवट-निळ्या डोहात, अदमासे ऐंशी ते शंभर फूट उंचीवरून सरळसोट खाली कोसळणारा स्वर्गीय शुभ्र जलप्रपात भान हरपून पहात राहावं......
चटका देणाऱ्या उन्हातून, पावलां-पावलांगणिक शरीरातील पाणी अव्याहत शोषून दमछाक करणाऱ्या दमट हवेतून, दगड-धोंड्यांची, ओढ्या-वघळीची सात किलोमीटरची पायवाट पार केल्यावर समोर येणाऱ्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नजाऱ्याने सगळा शीण क्षणार्धात नाहीसा झालेला असतो, घामाने शिणलेलं खारट झालेलं अंग घेऊन तुम्ही देवकुंडाच्या डोहाकडे धाव घ्यावी, थंडगार पाणी पावलांना लागताचं हुडहुडी भरावी पण पहिल्याचं डुबकीबरोबर सगळे श्रम देवकुंडाच्या पाण्यात झरझर विरघळावे, मागे उरावे ते ईप्सित साध्य झाल्याचं प्रचंड आनंद देणारं समाधान....
सभोवतालची गर्दी विसरून, देवकुंडाचा स्वर्गीय प्रपात डोळ्यांत साठवून घेताना वेगळीच तंद्री लागावी, हजारो वर्षे महाराष्ट्राला आधार देणारा सह्याद्री, याच्या काळ्या-कभिन्न कड्यांना येथील माणसांनी लेण्यांचे, किल्ल्यां-बुरुजांचे साज चढवले, खिंडीना घाट-वाटांचे रूप दिले. वारा ठरत नसलेल्या ह्याच्या शिखरांवर मंदिरांचे दगड रोवून ते राबते ठेवले. स्वतःच्या कडे-कपारीच्या, शुभ्र जलप्रपातांच्या जोडीने, हे वैभवही या सह्याद्रीने मोठ्या प्रेमाने जपून ठेवले, सांभाळले. आजही देवकुंड सारखी स्वर्गीय जागा याच सह्याद्रीच्या कुशीतून डोंगरभटक्यांना स्वर्गीय अनुभूती चे चार क्षण देऊ करते आहे. याबद्दल सह्याद्रीचे मनापासून आभार मानावे.
देवकुंडात मनसोक्त डुंबून झाल्यावर परतीच्या मार्गावर पायांना पुन्हा मार्गस्थ करावे. आता अंतर वेगाने मागे पडतच असते तो झाडांच्या शेंड्यांपलीकडून दूरवर काळ्या-कभिन्न ढगांची दाटी तुमच्याच रोखाने तुमच्या दुप्पट वेगाने येताना दिसावी, काही क्षणात अंधारून येऊन टपोरे थेंब झाडांच्या दाटीतून जमिनीवर कोसळू लागावे, सवयीनं आडोसा घेण्याच्या निष्फळ प्रयत्नात पाचचं मिनिटात तुम्ही ओलेचिंब व्हावं अन मग अनायसे झालेली चूक उमजून पावसाला स्वाधीन होत रमत गमत चालू लागावं. गावात पोहोचता-पोहोचता पावसानेही शहाण्या मुलासारखी उघडीप देऊ करावी. झटपट कपडे बदलून तुम्ही गाडी काढावी तर त्याने पुन्हा: तुफान कोसळू लागावे. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात तुम्ही ताम्हिणीच्या घाट-चढणीवर असावे तर त्याने मागून दाट धुक्याचे लोट घेऊन वेड्यासारखं बरसू लागावे, वळणा-वळणाच्या रस्त्यावरून, धुक्याच्या दाट चादरीखालून, सह्याद्रीच्या साथीने तुम्ही काळजीपुर्वक पुढे मार्गक्रमण करीत राहावं पण पावसाने मात्र अजिबात उसंत न घेता तुमच्या पाठलागावर असल्यासारखं मुसळधार कोसळत राहावं. धुक्यात लपलेल्या वाड्या-वस्त्या, गावे तुम्ही कोसळत्या पावसातच मागे टाकावी, सरतेशेवटी मालेची खिंड वळसा घालून पार करावी आणि अचानकचं पावसाने साथ सोडून मागे पडावे, घाटातच दाटून राहावे...... इथ त्याला निरोप द्यायला थोडा वेळ थांबून तुम्ही, पौड-पिरंगुट-भुकुम-भुगाव ओलांडत चांदणी चौकातून वैताग आणणाऱ्या ट्रॅफिक मध्ये शिरत, मजल-दरमजल करीत घर गाठावे.
रात्री, अंथरुणाच्या सुरक्षित ऊबेमध्ये, देवकुंडची वाट, देवकुंडचा स्वर्गीय जलप्रपात, ताम्हिणीतील धुक्याची चादर, तुफान कोसळणारा पाऊस आठवत निद्रेच्या अधीन व्हावे.
आयुष्यातील एका नितांत सुंदर स्वर्गीय दिवसाची, शांत - निवांत सांगता......
नांदगाव येथील ‘सिद्धीविनायक’
महाराष्ट्रामध्ये ‘गणपतीची’ अनेक वेगवेगळी वेगवेगळ्या काळातली ठिकाणे आहेत. अश्याच काही गणपतींची ठिकाणे ही बऱ्याचदा आडवाटेवर आपल्याला पहायला मिळतात. असेच एक सुंदर ‘गणपतीचे’ मंदिर आपल्याला निसर्गरम्य कोकणातील ‘मुरुड’ तालुक्यामध्ये असलेल्या ‘नांदगाव’ या गावामध्ये पहायला मिळते. ‘नांदगाव’ येथे हा गणपती ‘नांदगावचा सिद्धीविनायक’ म्हणून प्रसिद्ध आहे.
‘फणसाड’ अभयारण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर ‘नांदगाव’ वसलेले आहे. या नांदगावच्या ‘सिद्धिविनायक’ याला भेट द्यायची असेल तर आपली स्वतःची गाडी असेल तर उत्तम तसेच ‘मुरुड’ आणि ‘फणसाड’ येथून देखील नांदगाव येथे येण्यासाठी आपल्याला गाड्या मिळतात. ‘रेवदंडा-मुरुड’ या रस्त्यावर असलेले हे ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर अत्यंत सुंदर आहे. या नांदगावच्या ‘सिद्धीविनायक’ मंदिरापासून अगदी जवळच समुद्र किनारा आहे. काही संस्कृत पोथ्यांमध्ये तसेच इतिहासामध्ये या नांदगावचा उल्लेख हा ‘नंदीग्राम’ असा देखील आलेला आढळतो.
‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर अत्यंत सुंदर आहे.
१६ व्या शतकात येथे ‘नंदीग्राम’ म्हणजेच ‘नांदगाव’ येथे राहणाऱ्या एका ब्राम्हण कुटुंबामध्ये ‘गणेश’ यांचा जन्म झाला. या ‘गणेश’ यांचे ज्योतिषशास्त्रावर एवढा सूक्ष्म अभ्यास होता कि त्यांनी वर्तवलेली भविष्य अचूक ठरत असत. म्हणून गावातील लोकं त्यांना दैव जाणणारे म्हणजेच ‘दैवज्ञ’ असे म्हणू लागले. या ब्राम्हण असलेल्या ‘गणेश दैवज्ञ’ यांच्यावर गणपतीची कृपा होती. या ‘गणेश दैवज्ञ’ यांनी इ.स. १५५० मध्ये रचलेला ‘ग्रहलाघव’ नावाचा सगळ्या भारतामध्ये हा प्रसिद्ध झाला होता. ‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेल्या ‘ग्रहलाघव’ ग्रंथामध्ये ग्रहांच्या गणिताचा अभ्यास करण्याविषयी १९२ श्लोक ‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेले आहेत. पुढे जवळपास ४०० वर्ष याच ‘ग्रहलाघव’ ग्रंथावर आधारित पंचांगे बनवली जात होती.
‘गणेश दैवज्ञ’ यांनी रचलेला ‘ग्रहलाघव’ ग्रंथ.
‘नांदगाव’ येथील ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर हे नव्याने जीर्णोद्धारीत केलेले आहे. त्यामुळे आपल्याला या मंदिरात बाकी कलाकुसर अशी बघायला मिळत नाही. मंदिराला सभामंडप आणि गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये आपल्याला गणपतीची सुंदर पाषाणमूर्ती पहायला मिळते. या पाषाणमूर्तीची स्थापना ही ‘ग्रहलाघव’ ग्रंथाचे लेखक ‘दैवज्ञ गणेश’ यांनीच केलेली आहे. उंच असलेली पाषाणाची गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. मांडी घालून बसलेल्या या मूर्तीचे हात मात्र आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. नांदगावच्या या सुंदर ‘सिद्धीविनायक’ गणपती मंदिराला भारताचे पहिले राष्ट्रपती ‘डॉ. राजेंद्रप्रसाद’ यांनी देखील भेट दिली होती असा एक संदर्भ आढळतो.
असे हे नितांत सुंदर समुद्रकिनारी असलेले नांदगाव येथील ‘सिद्धीविनायकाचे’ मंदिर नक्कीच बघण्यासारखे आहे. या सुंदर आणि शांत ठिकाणी भेट देऊन आपण येथील समुद्रकिनाऱ्यावर देखील फेरफटका मारू शकतो आणि आपला दिवस नक्कीच सत्कारणी लावू शकतो. असे हे नांदगावचा वारसा असलेले ‘सिद्धीविनायक’ मंदिर भेट देण्यासारखे आहे.
पाषाणमूर्तीची स्थापना ही ‘ग्रहलाघव’ ग्रंथाचे लेखक ‘दैवज्ञ गणेश’ यांनीच केलेली आहे.
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
पुणे – पौड – मुळशी – कोलाड – रोहा – फणसाड – नांदगाव.
देवखोलचा ‘कुसुमेश्वर’
महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणे आजही लपलेली आहेत ज्यांचा इतिहास शोधणे आणि अभ्यासणे गरजेचे आहे. अश्या ठिकाणांंच्यापैकी काही ठिकाणे निसर्गरम्य कोकणामध्ये देखील आहेत. अश्या काही ठिकाणांंच्यापैकी एक ठिकाण हे ‘बोर्ली-श्रीवर्धन’ रस्त्यावर असणाऱ्या ‘देवखोल’ या गावामध्ये ‘कुसुमेश्वर’ मंदिर गर्द झाडीमध्ये लपलेले आहे. ‘देवखोल’ या गावाला नक्कीच प्राचीन इतिहास असणार हे येथील ‘कुसुमेश्वर’ मंदिरामुळे समजते.
‘देवखोल’ येथील ‘कुसुमेश्वर’ मंदिर येथे जायचे असल्यास आपली स्वतःची गाडी असलेली कधी देखील उत्तम तसेच ‘देवखोल’ याठिकाणी येण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बस देखील उपलब्ध आहेत. ‘बोर्ली-श्रीवर्धन’ रस्त्यावरून आपल्याला १० कि.मी. अंतरावर हे गर्द झाडीमध्ये लपलेले ‘कुसुमेश्वर’ मंदिर आपल्याला खुणावते. ‘कुसुमेश्वर’ मंदिरापर्यंत गाडी येते.
गर्द झाडीमध्ये लपलेले ‘कुसुमेश्वर’ मंदिर आपल्याला खुणावते.
या ‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या समोरच्या बाजूलाच एक पुष्करणी आपल्याला पहायला मिळते. ‘कुसुमेश्वर’ मंदिराचा परिसर रमणीय आहे. ‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या परिसरात आपल्याला एक छोटासा झरा देखील पहावयास मिळतो. एकंदरीतच ‘कुसुमेश्वर’ मंदिराचा जर आपण नीट पहिला तर आपल्याला हे ‘कुसुमेश्वर’ मंदिर ‘शिलाहार’ काळातील असावे असे वाटते. याला अजून एक महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे या ‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या आवारामध्ये असलेल्या प्राचीन विष्णू मूर्ती. साधारणपणे १० ते १५ वर्षांच्यापूर्वी या प्राचीन ‘कुसुमेश्वर’ मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला तेव्हा या मंदिराच्या आवारातील पुष्करणी देखील स्वच्छ केली गेली तेव्हा त्यामध्ये काही प्राचीन मूर्ती सापडल्या. त्यामध्ये विष्णूमूर्ती, गणपती, वीरगळ, सतीशिळा अश्या बऱ्याच मूर्ती मिळाल्या. सध्या देवस्थानाने पत्र्याची शेड बनवून या सगळ्या मूर्तींचे चांगल्या रीतीने संवर्धन केलेले आहे.
‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या आवारातील पुष्करणी स्वच्छ केली गेली तेव्हा त्यामध्ये काही प्राचीन मूर्ती सापडल्या.
‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण विष्णू मूर्ती पहायला मिळते त्या विष्णूमूर्तीला मागे प्रभावळ असून डोक्याच्या बाजूने नाग कोरलेला दिसतो परंतु मूर्तीची झीज झाल्यामुळे मूर्ती कोणत्या रुपात आहे हे लवकर समजत नाही. परंतु एकंदरीत ही मूर्ती पाहता ही विष्णू मूर्ती शिलाहार कालीन असावी असे दिसते. तसेच अजून एक विष्णूमूर्ती आपल्याला पहायला मिळते त्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला ‘भूमाता’ आणि ‘श्रीलक्ष्मी’ कोरलेल्या देखील पहायला मिळतात तसेच मूर्तीच्या हातामध्ये असलेले चक्र देखील पहायला मिळते बाकी मूर्ती ही झिजलेली असून तिला सिमेंट लावून बसवलेली आहे. त्यामुळे मूर्तीची अवस्था थोडी खराब झालेली आहे. तसेच मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला ‘शिव-पार्वती’ यांची देखील मूर्ती पहायला मिळते. बहुधा ही शिव-पार्वतीची मूर्ती ही मंदिराच्या देवकोष्ठामध्ये बसवलेली असावी असे वाटते.मंदिराच्या परीसरामध्ये जिथे वीरगळ सतीशिळा आणि इतर मूर्ती ठेवलेल्या आहेत तिथे एक गद्धेगाळ देखील पहायला मिळतो परंतु त्याच्यावर शिलालेख दिसून येत नाही. तसेच मंदिर परिसरात आपल्याला नवनाथांच्यामूर्ती देखील बघायला मिळतात.
मंदिराच्या पुष्करणीमध्ये सापडलेल्या प्राचीन मूर्ती, वीरगळ आणि गद्धेगाळ यामध्ये दिसणाऱ्या गद्धेगाळावर कोणताही शिलालेख दिसून येत नाही.
‘कुसुमेश्वर’ मंदिराची नव्याने रचना करण्याचे काम हे १९८१ साली सुरु झाले होते. नव्याने जीर्णोद्धार झालेले ‘कुसुमेश्वर’ मंदिर हे साधारणपणे १० ते १५ वर्षापूर्वी पूर्ण झाले. ‘कुसुमेश्वर’ मंदिराची रचना बघता मंदिराला सभामंडप आणि गर्भगृह पहावयास मिळते. मंदिराच्या द्वारशाखेवर गणपती उत्कृष्ट रीतीने कोरलेला आहे. तसेच सभामंडपामध्ये एका प्राचीन मूर्तीच्या पिठावर नवीन नंदी बसवलेला आपल्याला पहायला मिळतो. मंदिरामध्ये नव्याने बसवलेली ‘सूर्यमुर्ती’ देखील आपल्याला बघायला मिळते. तसेच सभामंडपामध्ये आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. महाशिवरात्रीला ‘कुसुमेश्वर’ येथे खूप मोठा उत्सव असतो.
विष्णूमूर्तीला मागे प्रभावळ असून डोक्याच्या बाजूने नाग कोरलेला दिसतो.
‘कुसुमेश्वर’ हे मंदिर नक्कीच शिलाहार काळातील असावे हे तेथील प्राचीन विष्णू मूर्तींंवरून समजते. परंतु नव्याने जीर्णोद्धार झाल्यामुळे ह्या प्राचीन मंदिराचे बाकी अवशेष आपल्याला पहायला मिळत नाही परंतु मंदिर हे नक्कीच १० व्या ते १२ शतकातील असावे हे समजण्यास मदत होते. ‘कुसुमेश्वर मंदिराचा उल्लेख हा पुराणामध्ये देखील आलेला आहे. ‘हरिहरेश्वर’ याचा उल्लेख जिथे आपल्याला पुराणामध्ये येतो तेथेच उत्तरेस ‘कुसुमेश्वर’ वसलेला आहे असा उल्लेख आढळून येतो.
शिव-पार्वती यांची मूर्ती आणि विष्णूमूर्ती.
असे हे प्राचीन ‘कुसुमेश्वर’ मंदिर ज्या परिसरात वसलेले आहे त्याचा नक्कीच अभ्यास होणे फार गरजेचे आहे. तसेच या ‘देवखोल’ गावाला प्राचीन शिलाहार काळात काही देणग्या दिल्या होत्या का किंवा या ‘देवखोल’ गावाचे अथवा ‘कुसुमेश्वर’ मंदिराचे प्राचीन नाव कोणते होते किंवा त्याचे अजून काही उल्लेख आपल्याला मिळतात का हे नक्कीच अभ्यासणे फार महत्वाचे आहे जेणेकरून या प्राचीन ‘कुसुमेश्वर’ मंदिराच्या बाबतीत नवीन इतिहास उजेडात येईल.
मंदिराची द्वारशाखा तसेच मंदिरातील सूर्यमूर्ती आणि प्राचीन पिठावर स्थापन केलेला नंदी.
निसर्गरम्य ‘कुसुमेश्वर’ मंदिर परिसरातून आपले पाय नक्कीच निघत नाही. या प्राचीन ‘कुसुमेश्वर’ देवस्थानी एका अनामिक व पवित्र शांततेचा अनुभव नक्कीच येतो. तेव्हा गर्द झाडीत लपलेल्या या ‘कुसुमेश्वर’ मंदिराला नक्की भेट देऊन येथील शिल्पांचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. तसेच हे ‘कुसुमेश्वर’ मंदिर हे विष्णूचे होते कि शंकराचे होते हे देखील बघणे गरजेचे आहे. अश्या या निसर्गरम्य ‘कुसुमेश्वर’ मंदिराला भेट देऊन आपण नक्कीच एका वेगळ्या ठिकाणाची अनुभूती घेऊ शकतो.
‘कुसुमेश्वर’ मंदिरातील शिवलिंग.
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – किहीम – आवास
आवास मधील ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’
कोकणातील निसर्गरम्य गावांपैकी एक गाव म्हणजे ‘आवास’. ‘आवास’ या शब्दाची फोड केली तर देवांचे वास्तव्य ज्याठिकाणी असते ती जागा म्हणजे ‘आवास’. रायगड जिल्ह्यातील ‘आवास’ गाव हे खरोखरच देवांचे वास्तव्य असलेले ठिकाण आहे कारण गावामध्ये आपल्याला सिद्धेश्वर, खंबाळेश्वर, मारुती, गणपती, राम, शांतेश्वरी अशी बरीच मंदिरे आहेत परंतू या मंदिरांंमध्ये एक अत्यंत वेगळे मंदिर आपल्याला पहायला मिळते ते म्हणजे ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ या देवीचे एक मंदिर आपल्याला पहायला मिळते.
महाराष्ट्रामध्ये आपल्याला पांडवाच्या संबंधित खूप आख्यायिका ऐकायला मिळतात. अशीच एक आख्यायिका आपल्याला ‘आवास’ मधील ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ हिच्या संबंधित ऐकायला मिळते. ‘पांडवा देवीचे’ हे मंदिर ‘आवास’ येथील समुद्र किनाऱ्याजवळ आहे. ‘आवास’ येथील समुद्रकिनाऱ्याजवळ एक पुळण आहे तिथेच हे ‘पांडवा देवीचे’ छोटेखानी सुंदर मंदिर आहे. मंदिर एकदम साधे आहे. या ‘पांडवा देवीचे’ महत्व आजही तेथील कोळी समाजामध्ये खूप आहे.
‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण शिखर.
या ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ संबंधी एक आख्यायिका ‘आवास’ येथे सांगितली जाते ती आख्यायिका पुढीलप्रमाणे:-
पांडवाना आवास येथे प्रतिकाशी वसवावी असे वाटले. ते एका संध्याकाळी एका दगडी होडीमध्ये बसून आवास इथे आले. परंतु आवास येथील सगळी मंदिरे ही एका रात्रीमध्ये जर बनवली तर आवास प्रतिकाशी होणार होते परंतु ‘पाणबा देवी’ किंवा ‘पांडवा देवी’ हिला काही हे पटले नाही. म्हणून ‘पाणबा देवी किंवा ‘पांडवा देवी’ हीने एका कोंबड्याचे रूप घेतले आणि ती मध्य रात्री आरवली. हा कोंबड्याचा आवाज ऐकून पांडवांनी मंदिर उभारणीचे काम थांबविले. थोड्यावेळाने जेव्हा पांडवाना लक्षात आले कि आपली फसवणूक झाली आहे तेव्हा भीम खूप चिडला आणि त्याने ‘पांडवा देवी किंवा पाणबा देवी’ हिच्या श्रीमुखात ठेवून दिली. भीमाचा तो फटका इतका जबरदस्त होता कि, या ‘पाणबा देवी’ किंवा ‘पांडवा देवीचे’ तोंड कायम वाकडे राहिले आणि अजूनही ते तोंड तसेच वाकडे आहे. तसेच या ‘पाणबा देवी’ हिला छप्पर देखील मिळणार नाही अशी शापवाणी दिली.
‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ येथील मंदिरासमोरील दीपमाळ आणि ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ हिची मूर्ती.
अशी ही आख्यायिका या ‘पांडवा देवी’ बाबत पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या पांडवा देवीच्या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिरात असलेली ‘दगडी होडी’. ‘पांडवादेवी’ मंदिरामध्ये असलेली दगडी होडी ही नक्कीच मंदिराचे आकर्षण आहे. ‘पांडवादेवी किंवा पाणबादेवी’ हिची होडी म्हणून गावामधले लोकं या होडीची रोज पूजा देखील करतात. गावापासून थोडेसे दूर समुद्राच्या काठावर असलेले ही ‘पाणबादेवी’ मंदिरातील ‘दगडी होडी’ नक्कीच ‘आवास’ गावाचे आकर्षण आहे.
असे हे ‘आवास’ गावातील ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ मंदिर हे महत्वाचा वारसा आहे. या ‘पाणबादेवी’ पूजा गावकरी मोठ्या भक्तीभावाने करतात. असे हे ‘आवास’ येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेले ‘पांडवा देवी’ किंवा ‘पाणबा देवी’ मंदिर नक्कीच आपल्या ‘आवास’ येथील भेटीमध्ये बघण्यासारखे आहे.
‘पाणबादेवी’ मंदिरातील ‘दगडी होडी’.
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – किहीम – आवास.
आवास येथील ‘नागोबा मंदिर’
निसर्गरम्य कोकणामधील रायगड जिल्ह्यामध्ये अशी बरीच ठिकाणे आहेत ज्यांची फार कमी माहिती उपलब्ध आहे परंतु अश्या ठिकाणांना वेगवेगळ्या लोककथा आणि इतिहास यांचे वलय लाभलेले आहे. असेच एक सुंदर ठिकाण अलिबाग तालुक्यामधील ‘आवास’ या गावी आहे. याच ‘आवास’ गावामध्ये आपल्याला एक मंदिर बघायला मिळते. आवासच्या पंचक्रोशीमध्ये हे मंदिर ‘नागोबा मंदिर’ म्हणून प्रसिद्ध आहे.
‘आवास’ येथील नागोबा मंदिर पहायला जायचे असेल तर स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच परंतु आवास येथे येण्यासाठी राज्यपरिवहन मंडळाची बससेवा देखील उपलब्ध आहे. मुळातच समुद्रकिनारी वसलेले हे आवास गाव अत्यंत सुंदर आहे. गावामध्ये आपल्याला सिद्धेश्वर, खंबाळेश्वर, मारुती, वक्रतुंड, राम, देवी, पाणबादेवी किंवा पांडवदेवी, शांतेश्वरी अशी बरीचशी सुंदर मंदिरे बघायला मिळतील. पूर्वी आवास या गावी ‘किल्ल्याचे भाट’ होते असे उल्लेख सापडतात. याच आवास गावामध्ये आपल्याला बघायला मिळते ते ‘नागोबा मंदिर’.
‘आवास’ येथील ‘नागोबा मंदिर’.
आवास गावाच्या अगदी मधोमध वसलेले हे राउळ अत्यंत सुंदर आणि देखणे आहे. अत्यंत साधे कौलारू असलेले हे नागोबाचे मंदिर आणि परिसर स्वच्छ आहे. ‘नागोबा मंदिराचे बांधकाम अत्यंत साधे असून लाकडाचा वापर उत्तम रीतीने केलेला आहे. या नागोबा मंदिराच्या परिसरात आपल्याला कोकणी पद्धतीने बांधलेली सुंदर दीपमाळ बघायला मिळते. अनेक भाविक या मंदिरामध्ये नवसासाठी घंटा बांधतात त्यामुळे ‘नागोबा मंदिरात’ आपल्याला मोठ्या प्रमाणात घंटा लटकवलेल्या बघायला मिळतात.
या ‘नागोबा मंदिराची’ एक अख्यायिका आजूबाजूच्या गावांमध्ये प्रसिद्ध आहे ती पुढीलप्रमाणे:-
प्राचीन काळी आवास या पुण्यक्षेत्रामध्ये ‘नागोबा’ आणि त्यांचे शिष्य ‘बुधोबा’ तसेच ‘चांगोबा’ हे राहत होते. हे ‘नागोबा आणि त्यांचे शिष्य ‘बुधोबा’ आणि ‘चांगोबा’ साधूवृत्तीचे होते. हे रोज आवास येथील समुद्रावर स्नान करत असत आणि आवास गावामधील ‘श्री वक्रतुंड’ याचे दर्शन घेत असत आणि ‘कनकेश्वर’ येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असत. ‘कनकेश्वर’ येथे महादेवाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा झाल्यानंतर रात्री ते ‘आवास’ येथे मुक्कामी येत असत. जेव्हा वयाची शंभरी ओलांडल्यानंतर या ‘नागोबांंनी’ संजीवन समाधी घेतली. या आपल्या गुरुंचे म्हणजेच ‘नागोबांचे’ अनुकरण करत ‘बुधोबा’ आणि ‘चांगोबा’ यांनी देखील आपल्या गुरूच्या इथेच समाधी घेतली. ज्याठिकाणी नागोबा, बुधोबा, चांगोबा यांनी समाधी घेतली त्याच जागेवर या गुरु शिष्यांची पाषाणरूपामध्ये पूजा सुरु झाली.
नागोबा मंदिर आवारातील दीपमाळ आणि भाविकांनी नवसासाठी बांधलेल्या घंटा.
वैकुंठ चतुर्दशीला प्राचीन आवास गावामध्ये या ‘नागोबांची’ मोठी यात्रा असते. लाखो लोकं आजूबाजूच्या गावांंमधून याठिकाणी आवास येथील ‘नागोबा मंदिरामध्ये’ ‘नागोबा’ आणि त्यांच्या शिष्यांच्या दर्शनाला येतात. दुसऱ्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमेला ‘कनकेश्वराची’ यात्रा असते तेव्हा ‘आवास’ गावामधील ‘नागोबा’ याची पालखी ही ‘कनकेश्वर’ येथे जाऊन येते. ‘आवास’ येथील या नागोबा मंदिराचा जीर्णोद्धार हा ‘मापगांव’ येथील ‘गणू उर्फ बाळाजी सखोजी राऊत’ यांनी इ. स. १८५६ साली केला त्याच्यानंतर इ. स. १९२६ साली गावकऱ्यांनी वर्गणी काढून या ‘नागोबा मंदिराचा’ नव्याने जीर्णोद्धार केला. या ‘नागोबा मंदिरात’ येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे कि कोणत्याही माणसाला जर साप चावला तर त्याला याठिकाणी आणल्यास त्याच्या अंगातील विष उतरते अशी समजूत आहे.
निसर्गरम्य ‘आवास’ मधले हे ‘नागोबा’ मंदिर आजही ‘आवास’ गावाचा अत्यंत महत्वाचा वारसा आहे. ‘आवास’ गावाच्या ऐतिहासिक वारसा रुपात या ‘नागोबा’ मंदिराचे अत्यंत महत्वाचे स्थान आहे. अश्या या आगळ्यावेगळ्या ‘नागोबा मंदिराला’ भेट देऊन आपण ‘आवास’ गावाच्या इतर मंदिरांना देखील नक्कीच भेट देऊ शकतो आणि संध्याकाळ ‘आवास’ येथील नितांत रमणीय समुद्र किनाऱ्यावर घालवून आपल्या मुक्कामच्या ठिकाणी परतू शकतो.
‘आवास’ येथील ‘नागोबा’ मंदिरातील नागोबा, बुधोबा आणि चांगोबा यांच्या प्रतिमा.
______________________________________________________________________________________________
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – किहीम – आवास.
अलिबाग जवळील ‘जेरुसलेम गेट’
आपल्या महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणे आहेत जी बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतात परंतु अश्या ठिकाणांची माहिती जाणून घेणे ते ठिकाण प्रत्यक्ष जाऊन बघणे आणि माहिती मिळविणे हे देखील आपल्याला फार महत्वाचे ठरते. अश्या ठिकाणांंच्यापैकी एक महत्वाचे ठिकाण अलिबाग येथील ‘नवगाव’ येथे आहे ते म्हणजे भारतामधील ‘ज्यू’ धर्मीय लोकांसाठी अत्यंत महत्वाचे स्थळ म्हणजे ‘जेरुसलेम गेट’.
‘अलिबाग’ येथील समुद्रकिनारा सर्वदूर प्रसिद्ध आहे परंतु ‘अलिबाग’ पासून अगदी १० किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘नवगाव’ येथे ‘ज्यू’ धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक ‘जेरुसलेम गेट’ आहे. तसे इतिहासामध्ये बघायला गेले तर ‘ज्यू’ लोकांचा भारताशी प्राचीन काळापासून व्यापाराचा संबंध होता. फिनिशियन लोकांच्या सोबत ‘ज्यू’ लोकं हे देखील व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये येत असे. हे ‘ज्यू’ लोकं व्यापाराच्या निमित्ताने प्राचीन सोपारा म्हणजेच आजचे नालासोपारा, चौल, आणि मलबार येथील बाजारपेठांना भेटी देत असत तसेच त्यांनी आणलेला माल देखील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकत असत. ‘बायबल’ किंवा जुन्या करारामध्ये ‘राजा हिराम’ याने ‘जेरुसलेम’ येथील साॅलोमनच्या मंदिरासाठी सागाचे लाकूड हे ‘शूर्पारक’ म्हणजेच नालासोपारा किंवा ‘ओफिर’ येथून मागवले होते याचा संदर्भ मिळतो.
‘ज्यू’ धर्मियांसाठी महत्वाचे असलेले ऐतिहासिक ‘जेरुसलेम गेट’
इ. स. १ ल्या शतकापासून इ. स. ६ व्या शतकापर्यंत ‘ज्यू’ लोकांचे भारतामध्ये येणे जाणे होते. या काळामध्ये व्यापाराच्या निमित्ताने काही ‘ज्यू’ लोकं हे भारतामध्ये केरळ किनारपट्टीवर कोचीन आणि जवळपासच्या भागामध्ये उतरले. त्यांच्या हुशार आणी तीव्र बुद्धीमुळे त्यांना केरळच्या तत्कालीन राजाने आपल्या कारकिर्दीमध्ये काही महत्वाची शासकीय पदे देखील दिली. ‘ज्यू’ लोकांचे व्यापारामध्ये खूप चांगले लक्ष असल्याने मसाल्यांचा सर्व व्यापार हा ‘ज्यू’ लोकांच्या हातामध्ये होता. याच कालावधी मध्ये इ. स. ६ व्या शतकामध्ये जेव्हा धार्मिक जाचाला कंटाळून काही ‘ज्यू’ लोकं दोन जहाजांच्या मधून कोकणाकडे आली आणि दुर्दैवाने अलिबागजवळ ‘नवगाव’ येथे त्यांची जहाजे खडकावर आपटली यामध्ये बरेच ‘ज्यू’ लोकं मृत्युमुखी पडले.
या जहाजाच्या झालेल्या घटनेमध्ये सात पुरुष आणि सात स्त्रीया सुदैवाने वाचल्या आणि त्यांनी ‘नवगाव’ किनारपट्टीचा आसरा घेऊन ही कुटुंब त्याठिकाणी स्थायिक झाली. जहाजामधील ज्या स्त्री आणि पुरुषांना जलसमाधी मिळाली होती त्यांंचे मृतदेह या वाचलेल्या कुटुंबांनी एकत्र केले. या पाण्यात बुडून मेलेल्या ‘ज्यू’ लोकांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘नवगाव’ येथील स्थानिक लोकांनी लाकडे आणि अग्नीची व्यवस्था केल्यावर मात्र त्या १४ लोकांनी खाणाखुणा करत थांबायला सांगितलं आणि मृतदेह पुरण्याची परवानगी मागितली आणि ‘नवगाव’ येथे ‘ज्यू’ कबरी बांधल्या. याच कबरी आपल्याला ‘जेरुसलेम गेट’ येथे बघायला मिळतात.
‘जेरूसलेम गेट’ येथे असलेला स्तंभ आणि त्याच्यावर असलेले मराठी, इंग्रजी आणि हिब्रू भाषेमधील माहिती.
तसेच या ‘ज्यू’ लोकांनी तत्कालीन राजसत्ता यांनी देखील ‘नवगाव’ येथे राहण्याची परवानगी या ‘ज्यू’ लोकांना दिली. हळूहळू हा ज्यू समाज अलिबाग येथील किनारपट्टी ठाणे आणी मुंबई येथे स्थायिक झाला. महाराष्ट्रातील लोकांच्या सहकार्याच्या भावनेमुळे आणि सहिष्णू वृत्तीमुळे ‘ज्यू’ लोकं येथील संस्कृतिशी समरस झाले. या सर्व ज्यू लोकांनी नवगाव, अलिबाग, नागाव, किहीम, चौल, कोर्लई, आवास, रोहे, पेण या ठिकाणी वसाहती केल्या. तसेच या गावांच्या नावाप्रमाणे त्यांनी स्वतःची आडनावे घेतेली पेणकर, किहीमकर, चौलकर, कोर्लेकर, रोहेकर, आवासकर, भौगावकर अशी नावे त्यांनी स्वीकारली. तसेच या ‘ज्यू’ लोकांनी कोकणात आल्यावर आपला तेल गाळण्याचा पूर्वापार व्यवसाय तसाच चालू ठेवला. ‘ज्यू’लोकं हे इतर लोकं शनिवारी आपल्या तेल विक्री व्यवसायाला सुट्टी देत असत म्हणून यांना ‘शनिवार तेली’ असे संबोधण्यात येत असे. हे ‘ज्यू’ लोकं उत्तम मराठी भाषा बोलतात.
अश्या या ‘ज्यू’ लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थान असलेले ‘जेरुसलेम गेट’ आहे. ‘नवगांव’ किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या ‘बेने-इस्राएल’ म्हणजेच ‘ज्यू’ लोकांच्या पूर्वजांची ही दफनभूमी आहे. ‘अलिबाग’ जवळील ‘नवगाव’ येथून ‘बेने-इस्राएल’ लोकं संपूर्ण भारतभर पसरली आहेत. ‘जेरुसलेम गेट’ येथील दफनभूमी मध्ये आपल्याला एक स्तंभ देखील बघायला मिळतो त्याच्यावर मजकूर पुढीलप्रमाणे:-
हिब्रू भाषेमध्ये असलेला स्तंभावरील लेख हा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही मध्ये आपल्याला पहायला मिळतो.
Here are buried the ancestors of the Bene-Israel community of India who were shipwrecked on the shores of Nawgaon nearly 2000 years ago. From Nawgaon the Bene-Israel community spread all over India. In the beginning they were engaged in oil pressing and agriculture. Later they took to small scale industry, the armed forces, and government services and attained the highest positions. They have been true citizens of India and have participated in the freedom movement of the country. With the establishment of the state of Israel in 1948 they have emigrated in large numbers to the state of Israel where they are happily settled.
तसेच मराठी मजकूर हा या इंग्रजी शिलेवरून ट्रान्सलेशन केलेला आहे तो पुढीलप्रमाणे:-
दोन हजार वर्षांपूर्वी नवगाव किनाऱ्याजवळ जहाजाबरोबर बुडालेल्या बेने-इस्राएल ज्ञातीतील पूर्वजांची ही दफनभूमी आहे. नवगावहून बेने-इस्राएल जात संपूर्ण भारतभर पसरली. प्रारंभी हे लोक तेल गाळणे व शेती हे व्यवसाय करीत. कालांतराने त्यांनी छोटे उद्योगधंदे, सेनादल, सरकारी नोकरी करून मोठे हुद्दे मिळवले. ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताचे नागरिक असून त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला होता. १९४८ च्या इस्राएल च्या निर्मितीनंतर त्यातील बहुसंख्य लोक इस्राएलला जावून आनंदाने राहत आहेत.
‘नवगाव’ येथे असलेल्या ‘ज्यू’ कबरी.
तसेच आपल्याला हिब्रू भाषेमध्ये देखील हा मजकूर बघायला मिळतो. असा हे ‘ज्यू’ लोकांचा महत्वाचा वारसा असणारे ‘जेरुसलेम गेट’ अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे. ‘नवगाव’ येथील ‘जेरुसलेम गेट’ हे लवकरच जागतिक पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित केले जाणार आहे. ‘महाराष्ट्र’ आणि ‘इस्त्राईल’ यांच्या संस्कृतिचे प्रतिक हे ‘जेरुसलेम गेट’ आहे. दोन संस्कृती एकमेकांना किती चांगल्या प्रकारे मदत करतात याचे उत्तम उदाहरण असलेले ‘जेरुसलेम गेट’ हा महाराष्ट्राचा खूप महत्वाचा वारसा आहे. ‘नवगाव’ येथील ‘जेरुसलेम गेट’ याला भेट देऊन दोन संस्कृतीच्या संगमाचे हे प्रतिक असलेले ‘जेरुसलेम गेट’ नक्कीच भारताचा एक महत्वाचा सांस्कृतिक वारसा आहे.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१. Gazeteer of Bombay Presidencey Bombay:- Government Central Press, 1883.
२. Gazeteer of Bombay Presidencey Kolaba:- The Executive Editor And Secretary, Gazetteers Department, Government Of Maharashtra, Mumbai, 1883.
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – खोपोली – पेण – पोयनाड – नवगाव.
अलिबाग येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’
जेव्हा इंग्रज भारतात आले आणि त्यांनी त्यांची राजवट भारतामध्ये पक्की केली तेव्हा त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधल्या आणि काही नवीन संशोधने देखील केलेली आपल्याला पहायला मिळतात. विविध प्रयोग करण्यासाठी इंग्रजांनी काही संशोधनशाळा भारतामध्ये मध्ये बांधल्या. अश्याच काही संशोधन शाळांपैकी एक महत्वाची ‘भूचुंबकीय वेधशाळा’ आपल्या महाराष्ट्रातील ‘अलिबाग’ येथे उभारली गेली. आता ही ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही अलिबाग येथे का उभारली गेली हे देखील पाहणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.
संपूर्ण जगामध्ये पृथ्वीच्या भूगर्भीय गुणधर्माचा अभ्यास करण्याचे काम हे साधारणपणे १५ व्या शतकापासून सुरु झाले. विल्यम गिल्बर्ट याने साधारण १६ व्या शतकात ‘भूचुंबकाचा’ अभ्यास करून ६ धडे असलेले ‘De Magnete, Magneticisque Corporibus, et de Magno Magnete Tellure’ या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आणि याच्यानंतर ‘भूचुंबकीय’ क्षेत्रांचा अभ्यास करणे याला गती मिळाली. ‘जिओमॅॅग्नेटीझम’ याचा अभ्यास तसा भारतामध्ये खऱ्या अर्थाने सुरु झाला तो इ.स. १८२२ साली जेव्हा ‘मद्रास’ म्हणजेच आत्ताचे ‘चेन्नई’ येथे इ.स. १८२२ साली ‘वेधशाळा’ उभारली गेली. त्याच्यानंतर ‘सिमला’ आणि ‘त्रिवेंद्रम’ येथे अश्याच ‘भूचुंबकीय वेधशाळा’ उभारल्या गेल्या याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये इ.स. १८४१ साली मुंबईमधील कुलाबा येथे असलेल्या वेधशाळेमध्ये ‘भूचुंबकीय नोंदी’ घेणे सुरु झाले.
अलिबाग येथील इ.स. १९०४ पासून कार्यरत असलेली ‘भूचुंबकीय वेधशाळा’.
जेव्हा मुंबईमध्ये घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ‘ट्राम’ ऐवजी विजेवर चालणाऱ्या ‘ट्राम’ सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने जेव्हा घेतला तेव्हा ‘कुलाबा’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ अन्यत्र हलविण्याचे ठरले याचे मुख्य कारण असे कि वीजप्रवाहामुळे ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये पडतो. इ.स. १९०४ साली ‘कुलाबा’ येथे असलेली ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही ‘अलिबाग’ येथे हलविण्यात आली. ‘अलिबाग’ येथे इ.स. १९०२ मध्ये ‘भूचुंबकीय वेधशाळाची’ इमारत ही बांधण्यात आली. जवळपास ७ एकर परिसरामध्ये ही वेधशाळा आहे. इ.स. १९०४ सालापासून या ‘भूचुंबकीय वेधशाळेमध्ये’ नोंदी घेण्यास सूरुवात झाली आणि मुंबई मधील ‘कुलाबा’ वेधशाळेतील नोंदी थांबविण्यात आल्या.
‘कुलाबा वेधशाळेची’ उभारणी आणि कार्यपद्धती ही एल्फिन्स्टन महाविद्यालयातील प्राध्यापक ‘ऑर्थर बेडफोर्ड ऑलेंबर’ यांनी ठरवून दिली. पुढे ‘भूचुंबकीय वेधशाळेमध्ये’ ‘चार्ल्स चेम्बर्स’ यांनी नव्या पद्धती अमलामध्ये आणून कुलाबा येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ नावारूपाला आणली. कुलाबा येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही एन. एफ .मूस यांच्या काळामध्ये ‘ट्राम’ योजना आमलात येणार होती यामुळे होणाऱ्या वीजप्रवाहामुळे ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये फरक पडतो म्हणून ‘अलिबाग’ येथे ‘भूचुंबकीय वेधशाळा’ स्थलांतरित केली. ‘भूचुंबकीय वेधशाळा’ याच्या इमारत बांधणीसाठी ‘पोरबंदर सँँडस्टोन’ हा दगड वापरण्यात आलेला आहे. हा ‘पोरबंदर सँँडस्टोन’ वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे हा ‘पोरबंदर सँँडस्टोन’ कोणत्याही ‘भूचुंबकीय’ नोंदीमध्ये व्यत्यय आणत नाही.
‘अलिबाग’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही जवळपास १७९ वर्षे ‘भूचुंबकीय’ निरीक्षणांंची नोंद करत आहे.
शाळेमध्ये’ ज्या खोलीमध्ये ‘भूचुंबकीय’ निरीक्षणे ठेवली जातात ती खोली कायम विद्युतप्रवाहापासून सुरक्षित राखली जाते. तसेच या खोलीचे तापमान हे देखील बदलणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाते. अशी ही ऐतिहासिक वारसा असलेली ‘अलिबाग’ येथील ‘भूचुंबकीय वेधशाळा’ ही जवळपास १७९ वर्षे आजही सातत्याने ‘भूचुंबकीय’ माहितीची नोंद अविरतपणे करत आहे. अश्या या ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळेबद्दल’ कोणाला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी ‘भूचुंबकीय वेधशाळा’ यांची रीतसर परवानगी घ्यावी लागते. अशी ही ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळा’ हा संपूर्ण भारताचा एक महत्वाचा वारसा आहे. अश्या या ऐतिहासिक ‘भूचुंबकीय वेधशाळेला’ अलिबाग येथे गेल्यावर नक्की भेट द्यावी.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१. Gazeteer of Bombay Presidencey Bombay : Government Central Press, 1883.
टीप:-
‘भूचुंबकीय वेधशाळा’ बघायची असल्यास वेधशाळेची रीतसर परवानगी घ्यावी लागते.
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – खोपोली – अलिबाग.
भिवपुरी येथील ‘पेशवेकालीन तलाव’
महाराष्ट्रात आजही अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे आजही इतिहासाच्या पाउलखुणा आजही लपलेल्या आहेत. अश्याच काही पाउलखुणा या कर्जत पासून जवळच असलेल्या ‘भिवपुरी’ गावात आपल्याला पहायला मिळतात. भिवपुरी गाव मुळातच निसर्गरम्य असल्यामुळे या ‘भिवपुरी’ गावामध्ये काही घाटवाटा या देशावरून खाली उतरतात. अश्या या महत्वाच्या ‘भिवपुरी’ गावामध्ये एक सुंदर ‘पेशवेकालीन तलाव’ आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
‘भिवपुरी’ येथे यायचे झाले तर आपल्याला पुण्याहून कर्जतमार्गे येता येते तसेच मुंबईवरून कर्जत गाठून आपल्याला ‘भिवपुरी’ येथे आपल्याला येता येते. कर्जत गावामधून ‘भिवपुरी’ गावामध्ये येण्यासाठी आपल्याला रिक्षा देखील सहज उपलब्ध होतात. ‘भिवपुरी’ हे गाव मुळातच निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. याच्या एका बाजूला उंचच उंच सह्याद्रीचे कडे आपले लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सगळ्या बाजूने धबधबे अक्षरशः कोसळत असतात. अश्या सुंदर ठिकाणी बांधला गेलेला ‘पेशवेकालीन तलाव’ यामध्ये अजून भर घालतो.
‘भिवपुरी’ येथील ‘पेशवेकालीन तलाव’.
राजमाचीपासून उत्तरेस जवळपास १४ कि.मी. अंतरावर ‘कुसूर’ गावापासून भिवपुरी गावापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे ४ कि.मी. लांबीचा ‘कुसूर’ घाट आहे. हे ‘कुसूर’ गाव समुद्रसपाटीपासून जवळपास २१४५ फुट उंच असून ‘आंध्रा नदी’ दरीच्या मुखावर हे गाव वसलेले आहे. या कुसूर घाटामधून वाट खाली उतरून कोकणात ‘भिवपुरी’ या गावात येते. पूर्वी पुणे, तळेगाव याठीकाणावरून कर्जत, नेरळ, कल्याण या गावांकडे जाण्यासाठी ‘कुसूर’ घाटामधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे. या ऐतिहासिक ‘कुसूर’ घाटामधून पूर्वी घोडेस्वार आणि ओझे लादून गुरे नेली जात असत. परंतु ‘कुसूर’ घाटामधून बैलगाडी जाण्यायोग्य रस्ता कधीही नव्हता. ‘कुसूर’ घाटामधून जाणारा रस्ता हा पेशवेकाळातील आहे.
याच घाटवाटेवरील पांथस्थांची तहान भागावी म्हणून ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या पत्नी ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी हा सुंदर अष्टकोनी तलाव ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या स्मरणार्थ बांधला. जेव्हा पानिपत येथे ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ धारातीर्थी पडले त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ‘पार्वतीबाई पेशवे’ या पुण्यामध्ये आल्या त्याच्यानंतर त्या काहीकाळ वास्तव्यासाठी ‘भिवपुरी’ येथे आल्या तेव्हा त्यांनी हा सुंदर अष्टकोनी ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या स्मरणार्थ हा सुंदर तलाव बांधला. याबाबत पुणे गॅॅझेटियर १८८५ मध्ये पान क्रमांक १५२ यामध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-
‘भिवपुरी’ येथील ‘पेशवेकालीन तलाव’ येथे बांधलेला दगडी दरवाजा.
At Bhivpuri there is a fine stone reservoir built at a cost Rs. 75000 by Parvatibai widow of Sadashiv Chimnaji of the Peshwa’s family. The road is passable for mounted horsemen or laden bullocks, but not for carts. It is a great line of traffic from Talegaon to Karjat, Neral, Kalyan and Panvel. The yearly toll revenue of about Rs. 200 is spent on repairing the pass.
अशी ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला या ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या ‘सदाशिवभाऊ पेशवे’ यांच्या स्मर्णार्थ बांधलेल्या तलावाबद्दल माहिती मिळते तसेच या तलावाला बांधण्यास ७५००० रुपये लागले याची देखील नोंद आपल्याला मिळते. ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी बांधलेल्या या सुंदर तलावाला पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे आणि या तलावाच्या आतमध्ये उतरण्यासाठी काही ठिकाणी छोट्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आपल्याला पहायला मिळतात. तसेच काही ठिकाणी तलावातील पाणी काढण्यासाठी रहाटाचीसुद्धा सोय केली होती हे आपल्याला तेथील कधी दगडांच्या खुणांवरून समजते.
आजही ‘पेशवेकालीन तलाव’ हा ‘भिवपुरी’ गावाचा महत्वाचा वारसा आहे.
‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी बांधलेला हा तलाव आजही प्रचंड पाण्याचा साठा आपल्या पोटात साठवून वर्षाचे बारा महिने हा ‘भिवपुरी’ गावाची तहान आजही भागवत आहे. आजही ‘भिवपुरी’ येथील पेशवेकाळातील अष्टकोनी तलाव बघताना आजही ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ आणि पानिपतची लढाई आठवते. असा हा सुंदर ‘भिवपुरी’ गावाचा महत्वाचा वारसा आहे. या सुंदर पेशवेकालीन अष्टकोनी तलावाला भेट देऊन ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी केलेल्या या महत्वाच्या कामाची प्रत्येकाने या तलावाला भेट देताना आठवण ठेवावी. अश्या या ‘भिवपुरी’ गावाच्या वारसास्थानाला भेट देऊन ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांचे स्मरण नक्की करावे.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१. Gazeteer of Bombay Presidencey Poona:- Page No 152, Government Central Press, 1885.
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – कर्जत – भिवपुरी.
एक सफर चौलची
एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना ? त्याचे उत्तर चौलच्या बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड, त्यातच बंदरात असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या स्थळांचा आपापल्या भाषा-संस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत, पुढे नदी मंडप, दिपमाळ आणि सुंदर पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५ मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे. गाभाऱ्याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. पर्जन्य, वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की पर्जन्य कुंड, वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची उणीव ही कुंड भागवत असतात.
या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह ! कमानीची रचना, तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी, हौद तर येथील शाही श्रीमंतीच ! कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा, नागपंचमी, गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे.
चौलचा अगदी प्राचीन उल्लेख "पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी" या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्या काळातील चौलशी असलेले नातेसंबध दर्शविते, पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष, "जेटी"ची भिंत, सातवाहन कालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही !
कसे जावे ?
मुंबई-अलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टम-टमच्या सहाय्याने चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टम-टम, एस.टीने चौलला जाता येते. परंतु, पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते.
- श्वेता दांडेकर
dandekarshweta12@gmail.com
9757282750
काळडोह वाळणकोंड
अज्ञाताचे आकर्षण सर्वांनाच असते. सृष्टीत आजही अशी अनेक रहस्ये लपली आहेत ज्यांचा शोध घेणे मानवाला शक्य झालेले नाही. आता रायगड जिल्ह्याचेच उदाहरण घ्या, एका बाजूस दुर्गम सह्यपर्वतरांगा व दुर्सया बाजूस अरबी समुद्र यांच्या मधोमध असलेल्या या निसर्गसंपन्न अशा भुप्रदेशात अनेक रहस्यमय स्थळे आहेत ज्याची माहिती फारच कमी लोकांना आहे. याच रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असलेला वळणकोंड हा डोह सुद्धा अशाच एका अज्ञात गुढाची सफर आपल्यास घडवतो.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारी सर्वात मोठी नदी म्हणजे सावित्री. ती महाबळेश्वरजवळ उगम पाऊन महाडमार्गे पुढे बाणकोटजवळ समुद्रास मिळते. घोड, गांधारी व काळ व नागेश्वरी या तिच्या उपनद्या आहेत. या पैकी गांधरी हि उपनदी सह्याद्री रांगेत पुनाड येथे उगम पावते तर काळ नदी कोकणदिव्याजवळील कावळ्या घाटाजवळ उगम पावते. सावित्री नदीला बिलगर्णाया या चार नद्यांच्या काठावरील प्रदेश मोकळा व पिके देणारा आहे. या नद्या लहाव व वाकड्यातिकड्या असून समुद्रास मिळण्याआधीच त्यांची पात्रे कोरडी पडतात. पावसाळ्यात मात्र या नद्यांना पूर येतो पण उन्हाळ्यात या कोरड्या पडतात. याच दक्षीण कोकणातील जमीन सामन्यतरू खडकाळ व नापिक आहे परंतु तित नद्या व खाड्या पुष्कळ असल्याने त्यांच्या काठचा प्रदेश मात्र सुपीक आहे. मुख्य पिक तांदूळ असून नागली, वरी वाल वैगेरे फळे व सर्वसाधारण शाक भाज्या उत्पन्न होतात. मासेमारी व त्यांच्या व्यापार चांगला चालतो.
अशा या विविधांगी रुपाने नटलेला रायगड जिल्ह्याचा महाड तालुका आहे आणि अर्थात या तालुक्याचे ठिकाण असलेले महाड शहरही तितकेच ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शहर आहे. सातवाहनांच्या काळापासून बाणकोट खाडीवरील एक प्रसिद्ध बंदर म्हणून ख्याती असलेल्या महाडास पूर्वी पाश्चिमात्य देशातील जहाजे हजारोंच्या संख्येने बहुमुल्य असा माल घेऊन थांबायची व येथून तो माल बैलांवर लादून मढ्याघाट, कावल्या-बावल्या घाट तसेच बोराट्याची व सिंगापुरची नाळ इत्यादी मार्गांनी घाटावर नेला जात असे, सह्याद्रीतील या प्राचिन घाटमार्गांवर मालवाहतूक करण्यासाठी काही लेण्यासुद्धा बांधण्यात आल्या यातील गांधारपाले नामक एक प्रसिद्ध लेणी खुद्द महाड शहरातच आहे. या महाडास पूर्वी महाहाट असे नाव होते. येथील चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह तर प्रसिद्धच आहे, याशिवाय महाडने अनेक राष्ट्रपुरुषांसही जन्म दिला क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा कमलाकर दांडेकर, सुरबनाना टिपणीस अशी नावे घेता येतील.
या महाड तालुक्यात शिवाजी महाराजांची राजधानी असलेला दुर्गदुर्गेश्वर रायगडसुद्धा आहे, हा महाकाय किल्ला पहाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात, काही वर्षांपूर्वी येथे रोपवे करण्यात आला आहे त्यामुळे आता अबालवृद्धांसही हा किल्ला सहजतेने पहाता येतो. मात्र याच रायगड किल्ल्याच्या आसमंतात लपलेली अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजुनही प्रसिद्धीच्या झोतात यायची आहेत. तशी ती स्थानिक भागात प्रसिद्ध आहेत मात्र त्यांना आजही म्हणावे तितके वलय लाभलेले नाही. पूर्वीचा महत्वाचा शिवकालीन मार्ग रायगड ते राजगड हा होता. राजगडावरून राजधानी रायगडास आल्यावर सर्व ताफा याच मार्गाने रायगडास आला. ही वाट कोकणात ज्या ठिकाणि उतरते त्या मार्गावर छत्र निजामपूर नामक खेडे आहे. या गावावरुन काळ नदी गेली आहे, मग दोन-तीन कि.मी. अंतरावर वारंगी नामक खेडे आहे. तिथून काही अंतरावर पाणं, हे पाणं लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. घाटावरील तोरणा व कोकणातील रायगड यांच्या बरोबर मध्ये सह्याद्रीच्या मुख्य रांगेत शिवलिंगासारखा आकार असलेला एक प्रखर सुळका असलेला लिंगाणा दुर्ग हा पूर्वी रायगडचे तुरुंग होता. शिवकालात खुद्द रायगड, तळातली वाडी व लिंगाणा किल्ला हा परिसर तर्फ रायगड या नावाने ओळखला जात असे.
पायथ्याशी असलेल्या पाणं या गावापासून गावापासून किल्ल्याचा चढाव सुमारे चार मैल आहे. तळात लिंगाणामाची नामक छोटे गाव आहे. चढावयास अवघड असलेल्या या किल्ल्यावर पूर्वी वर जाण्यासाठी पार्यया कोरलेल्या होत्या पण आता त्यांची पडझड झाली आहे. शिडीच्या सहाय्याने वर जावे लागते. कड्यावर पाण्याची टाकी व कैदी ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या काही गुहा आहेत. या गुहांच्यावरील प्रखर सुळक्यावर चढाई करण्यासाठी हौशी गिर्यारोहक येथे येत असतात. किल्ल्याच्या पायथ्याला उअजवीकडे दापोली गाव लागते. हे झाले प्राचिन मार्गाचे वर्णन. सद्यस्थितीला महाडमधून एम्.आय.डी.सी. बिरवाडी-मांघरुण मार्गे दापोलीस जाता येते, अर्ध्या पाऊण तासाचा हा मार्ग आहे.
या दापोली गावाजवळ असलेला काळ नदीचा वळणकोंड हा रुद्रभिषण डोह हा निसर्गाचा एक चमत्कारच मानायला हवा. महाडपासून सुमारे बारा कि.मी. अंतरावर असलेला वळणकोंड डोह येथील पवित्र अशा महाकाय माशांसाठी प्रसिद्ध आहे. या वळणकोंडाविषयी कधीतरी कुणाकडून ऐकिवात आलं होतं आणि इतका गुढ परिसर आपल्याच जिल्ह्यात असून आजवर तिथे जाता आले नाही ही खंत सुद्धा मनात होती आणि जेव्हा तिथे जाण्याचा योग आला तेव्हा क्षणाचाही विचार न करता अवधूत नामक भावाला घेऊन तेथे दाखल झालो. बिरवाडीपासून वारंगीपर्यंतचा परिसर हा वाळणखोरे म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडे रायगड, पोटल्याचा डोंगर, उजवीकडे मुख्य सह्याद्री रांगेतला मढ्याघाट, कावल्याबावल्या घाट, बोराट्याची व सिंगापुरची नाळ हा परिसर, थोडी पुढे नजर टाकल्यास अवकाशाला छेदून गेलेला लिंगाण्याचा सुळका आणि त्याच्याही पलिकडे असणारी पण नाव माहित नसलेली कोकणदिव्याची चार पाच शिखरे या सर्वांच्या मधोमध असलेल्या या प्रदेशातील मार्गावर असलेल्या अनेक गावांच्या नावामध्ये वळण किंवा कोंड असा उल्लेख आढळतो. उदा.केतकीचा कोंड, वाळण खुर्द, पांढेरी कोंड इत्यादी. वारंगी गावच्या वेड्यावाकड्या रस्त्यावर उजव्या बाजूस काळनदी आपली साथ देत असते, मात्र मार्च महिना असल्याने नदीचे पात्र पुर्णपणे सुकून फक्त नावापुरताच नदी वाटत रहाते.
निसर्गाची हि अद्भुत निर्मिती पाहताना अचानक गाडी थांबते आणि उजवीकडे अगदी नजरेच्या टप्प्यात असलेला एक हावडा ब्रिज टाईप लोखंडी झुला दिसतो. हा झुला काळनदीच्या वळणकोंड या डोहावरुन वरदायिनी देवीचे दर्शन घेऊन दापोलीस जाण्यासाठी बांधला आहे. वळणकोंड हा डोह पाहताक्षणीच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या डोहाबद्दल जितके ऐकले होते तितकेच ते सत्यही आहे याची प्रचिती हा डोह पाहताना आली. तसा मी काळनदी परिसरातील माणगाव व लोणेरे परिसरात र्बयापैकी वावरलेला. मुळात काळ नदी ही सावित्रीची उपनदी, पावसाळ्यात पुर आणणारी ही नदी उन्हाळ्यात पार कोरडी ठाक होऊन जाते. त्यामुळे ज्याची खोलिच कळत नाही असा डोह याच नदीस आहे याची खात्री होत नव्हती. मात्र या नदीबद्द्ल आम्ही बरेच ऐकुन होतो. जिच्या नावातच काळ आहे अशी दरवर्षी निदान एकत्री बळी घेणारी ही नदी. माझ्या मावशीचे घर काळनदीच्या अगदी अलिकड असल्याने सुट्टीत तिथे गेल्यावर आम्ही बच्चेकंपनी दर संध्याकाळी नदीवर जात असू. मध्यंतरी तिथे मगरींचा संचार असल्याची बातमी आली, या नदीची मुख्य नदी सावित्री ही तिथल्या मगरींसाठीच प्रसिद्ध आहे त्यामुळे काही मगरींनी आपला मार्ग या निर्जन नदीकडे वळवला असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र नदीच्या पुलावर बसलो असताना पुलाखालीच साधारण सात्-आठ फुटी काळया महाकाय मगरीचे दर्शन आम्हाला झाले होते. अशा या काळ नदीच्या या वळणकोंड डोहाबद्दल ऐकल्यापासून तो पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. मार्च महिन्यात नदीचे पात्र पुर्णपणे सुकून गेले होते पण हा डोह मात्र पुर्णपणे भरलेला होता आणि याचा आकारसुद्धा प्रचंड होता.
मंदिरात लिंगाणा दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या दापोली नामक खेडेगावात राहणारे आणि वरदायिनी देवी मंदिराचे पुजारी श्री. रेणूसे भेटले. त्यांनी देवीची महती सांगितली. ही देवी परिसरातील पाणं, दापोली, पांढेरी, वाळण खुर्द, माणगाव, देवगड व वाघोली या सात गावांचे मुख्य दैवत. पुर्वीच्या काळी अडल्या नडलेल्यांनी नवस केल्यांनतर त्यांच्या कार्यासाठी मदत म्हणुन या डोहातून सोन्या चांदीची भांडी व दागिने येत असत मात्र कार्य झाल्यानंतर भक्र्तांना हे दान परत या डोहात सोडावे लागत असे. मात्र एका भक्ताने हे सर्व साहित्य मिळवल्यावर डोहात परत सोडले नाही यामुळे देवीचा या परिसरावर प्रकोप होवून ती नाहिशी झाली आणि परिसरात दुष्काळ व रोगराईचे संकट कोसळले यामुळे सर्व गावर्कयांनी एकत्र येऊन देवीची करुणा भाकली. तेव्हा देवीने उपवर दिला कि मी आता या डोहामध्ये माशांच्या रुपाने वावरिन तेव्हा या माशांची निगा राखा त्यांचा नाश करु नका, त्यांची पुजा करा तुमच्या सर्व इच्छा आकांशा पुर्ण होतील. वरदायनी देवीचे मंदिर डोहावर आहे. देवतांच्या इतिहास पाहता त्यांची विभागणी विवीध स्तरामध्ये झाल्याचे आढळून येते वैदिक देवता, पौराणीक देवता, स्वयंभू देवता, अवतारी देवता असे अनेक प्रकार आहेत. काही देवतांचा जन्म हा विशिष्ट दैत्याचा नाश करण्याकरित झाला तर पर्वतक्षेत्रांमध्ये काही देवतांची स्थाने आढणून आली म्हणुन त्यांना पर्वतीय देवता म्हणुन ओळखले जाते. काही देवतांचा जन्म मानवी रुपात झाला असून त्यांनी केलेल्या अतिमानवी चमत्कारांमुळे त्या देवतास्वरुप पावल्या. वरदायिनी देवीची नवसाला पावणारी आणि वर देणारी अशी महाड परिसरात ख्याती आहे.
डोहाविषयी अधिक माहिती जाणुन घेताना असे कळले की, अनेक वर्षांपासून या डोहातले प्रचंड आकाराचे मासे दैवी मानले जातात व पुजले जात असल्याने त्यांचा नाश करणे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि तसा प्रयत्न कोणी केल्यास त्या व्यक्तीचे प्रचंड नुकसान होते. ब्रिटीशकाळात एका इंग्रज अधिर्कायाने हा प्रयत्न केल्याच संदर्भ सापडतात. मुंबईहून रायगडास काही कामानिमित्त आलेला हा अधिकारी या डोहाविषयी आणि डोहातल्या ६-७ फुटी आकाराच्या माशांविषयी ऐकुन होता. डोह पाहताना आतले प्रचंड आकाराचे मासे पाहून त्याला त्यांची शिकार कराविशी वाटली. मात्र उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करुन त्यास ते माशे मारणेच काय तर पकडणेही जमले नाही. सर्व प्रयत्न करताना अंधार पडू लागल्याने हताश अवस्थेत तो तळागडाकडे जाण्यास निघाला. तळागडावर पोहोचताच त्यास अतिशय तिव्र तापाने घेरले व एका दिवसातच त्याचा तिथे मृत्यू झाला. या घटनेमुळे ब्रिटीशांनी त्या परिसराची धास्ती घेतली होती.
सुमारे ३०० फुट लांबी व ३० फुट रुंदी असलेल्या या रौद्रभिषण डोहाची खोली आजही कुणालाही मोजता आलेली नाही, फार पुर्वी इंग्रजांनी या डोहाची खोली किती आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला होता यासाठी त्यांनी टेपचा आधार घेतला होता मात्र सुमारे १००० फुट लांब टेप आत बुडवून सुद्धा याच्या तळाचा ठाव इंग्रजांस लागला नाही याचा अर्थ याची खोली आणखी कितीतरी असली पाहिजे हे स्पष्ट होते. डोहामध्ये कमित कमी २-३ फुट ते जास्तित जास्त ८ फुटांपर्यंत वाढ झालेले अजस्त्र आकाराचे मासे आहेत ज्यामध्ये काडा, कोला आणि शिंगाडा या माश्यांचा समावेश होतो. यातले शिंगाडे ७ ते ८ फुट वाढले आहेत आणि फार क्वचित्र दर्शन देतात. या माशांना प्रसाद म्हणुन कुरकुरे किंवा तांदुळ टाकल्यास एकाच वेळी गर्हिया पाण्यातून हजारो माशे बाहेर येऊन प्रसादाचा आस्वाद घेतात हे दृश्य फारच रोमांचकारी असते, मात्र हा प्रसाद देताना अतिउत्साहात डोहाच्या जवळ अजिबात जाऊ नये कारण डोह खोल असल्याने तसेच आजुबाजुस वस्ती नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यास मदतकार्यास अडथळा येण्याची शक्यता आहे. याबाबतीत एक घटना रेणुसे यांनी सांगितली, या डोहाबद्दल अशीही एक अख्यायिका आहे की, डोहामध्ये अनावधाने एखादा भक्त पडला तरिही त्यास मरण येत नाही, एकदा माशांना प्रसाद देता देता एक भक्त पाण्यात पडला मात्र बघता बघता हजारो माशांचा समुह त्यास पाण्याबाहेर घेऊन आला. अशा या रौद्रभिषण व गुढ अशा डोहास पर्यट्कांनी एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे जेणेकरुन तो याची देही याची डोळा अनुभवायास मिळेल. शेवटी सृष्टीची अनेक गुढ तत्वे आजही विज्ञानाच्या पलिकडे आहेत आणि काळडोह वाळणकोंड त्यापैकीच एक आहे.
महाड - नररत्नांची ऐतिहासिक भुमी
महाराष्ट्राला भुगोलाबरोबरच इतिहास देखील आहे असे आजही अभिमानाने म्हटले जाते. रायगड जिल्ह्यात तर इतिहास व भुगोल खचून भरला आहे. अशा या रायगड जिल्ह्यातले एक सुप्रसिद्ध स्थळ म्हणजे जिल्ह्याच्या दक्षीणेकडील तालुक्याचे महाड शहर.
साक्षात शिवाजी महाराजांचे वास्तव्य या परिसरात असल्याने महाड शहराचे ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असले तरी शिवकाळापुर्वी सुद्धा महाड हे महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र राहीले असले पाहीजे कारण १५३८ सालीं महाडला भेट देणारा पोर्तुगिज डी कास्ट्रो असें लिहितो कीं महाड व्यापारी वस्तीचें गांव असून येथें गव्हाची फार मोठी घडामोड होते. तसेच १७७१ सालीं जॉन फोर्बस याने महाड चांगल्या तटबंदीचें व भरवस्तीचें शहर असल्याची नोंद केली आहे.
महाड हे शहर रायगड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नदीच्या म्हणजे सावित्रीच्या तिरावर वसले आहे. या सावित्री नदीस गांधारी, घोड, काळ व नागेश्वरी अशा एकूण चार उपनद्या आहेत. सावित्री नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावून महाडमार्गे बाणकोट खाडीस मिळते. सावित्री नदीच्या या परिसराचे महत्त्व फार प्राचिन असून तिचा उल्लेख पुराणांत सुद्धा आला आहे. स्कंदपुराणातल्या कथेनुसार सावित्री ही ब्रह्मदेवाची पत्नी. एक दिवस ब्रह्माने ब्रह्मारण्यात यज्ञाचे आयोजन केले मात्र सावित्री आभुषणे परिधान करण्यात गुंग राहिल्याने यज्ञास उशीर होऊन पाहुण्यांची गैरसोय नको म्हणुन ब्रह्माने शंकर, विष्णू इत्यादी देवतांची अनुमती घेऊन आपली उपपत्नी गायत्री हिच्यासोबत दिक्षा घेतली मात्र एवढ्यात सावित्रीची तिथे आगमन होऊन समोरचे दृश्य पाहिल्याने तिचा संताप अनावर झाला व तिने सरसकट सर्वांना तुम्ही जलमय होऊन स्त्रीरुपाने प्रसिद्ध व्हाल व गायत्री नदी होऊन सर्व लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतील असा शाप दिला मात्र संतापलेल्या विष्णूने सावित्रीसही शाप देऊन जलप्राय केले त्यामुळे त्राग्याने सावित्रीने सह्याद्रीच्या कड्यावरुन उडी टाकून समुद्रास मिळण्याचा मार्ग पत्करला. तिला परत आणण्यासाठी ब्रह्मदेव तिच्या मागोमाग गेले मात्र ती परत आली नाही. आजही सावित्री नदीच्या तिरावर उगमापासून ते समुद्रकिनार्यापर्यंत बारा शिवलिंगे आहेत ते पाहता या परिसराच्या प्राचिनत्वाची प्रचिती येते.
महाड परिसराच्या प्राचिनत्वाचा दुसरा पुरावा म्हणजे शहरापासून फक्त तीन कि.मी. अंतरावर असलेली गांधारपाले लेणी. फार पुरातन काळापासून बाणकोटच्या खाडीचा परिसर हे देश व परदेशांतर्गत दळणवळणाचा प्रमुख मार्ग असल्याने व्यापाराच्या या प्रमुख मार्गावर इसवी सनाच्या पहील्या शतकात कोरल्या गेल्या. या लेण्यांमध्ये अस्तिवात असलेल्या तीन ब्राह्मी शिलालेखांवरुन कुमार कंबोज विष्णूपुलीत, वेदश्री व संघरक्षीत अशी तीन नावे मिळतात. काहींच्या मते या लेण्याची निर्मिती करणारा कंबोज विष्णूपुलीत हा याच परिसरात राज्य करत होता मात्र या लेण्यांची निर्मीती सातवाहन काळातच झाली असून त्यांच्याच काळात सध्याच्या अफगाणीस्थानातील गांधार, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, क्रिगिजस्तान इत्यादी प्रदेशावर राज्य करणार्या कंबोज या राजवंशाच्या व्यापारी उद्देशाकरीता मिळालेल्या देणग्यांतून या लेण्यांची निर्मिती झाली असावी. कारण या लेण्याचे गांधारपाले (गांधार-पल्ली) हे नाव पाहता कंबोज हे राजघराणे त्याकाळी अफगाणीस्थानातील गांधार येथेच राज्य करीत होते त्यामु़ळे ही शक्यता अजून दृढावते.
या लेण्यांची निर्मिती कोणीही केली असली तरी या लेण्यांच्या निर्मितीचा काळ पहाता महाडचा इतिहास किती पुरातन आहे हे लक्षात येते. महाड या शहराच्या मुळ नावातही इतिहास द्डलेला आहे. महाड हे महा व हाट या दोन शब्दांचे रुप आहे. महा म्हणजे मोठा व हाट म्हणजे बाजार त्याअर्थी बाणकोट खाडीवरील मोठी बाजारपेठ म्हणुन महाड हे नाव या गावास मिळाले असावे. कालांतराने महाहाट या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाड हा शब्द तयार झाला असावा कारण असे अपभ्रंश मध्ययुगात प्रामुख्याने झाले जसे कर्हाड पुर्वी करहाट या नावाने व वर्हाड पुर्वी वरहाट या नावाने प्रसिद्ध होते.
प्राचिन काळी महाड हे स्थानिय बाजारपेठेचे ठिकाण असले तरी या ठिकाणी लोकवस्ती तुरळक असावी कारण भौगोलिक दृष्ट्या महाड शहर सावित्री नदीच्या तटास लागून असल्याने असल्याने पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रमाण त्याही काळी असावे त्यामुळे कदाचित त्याकाळी मुख्य लोकवस्ती आजुबाजुच्या पंचक्रोशीतल्या गावांत असून व्यापार्यांच्या व नागरिकांच्या सोयीकरीता हे सर्व व्यापारी वर्षातला ठरावीक काळ हा मोठा बाजार भरवत असण्याची शक्यता आहे. कारण मध्ययुगपुर्व प्राचिन साधनांमध्ये महाडचा थेट उल्लेख अजुनपर्यंत मिळाला नसला तरी प्राचिन काळातली एक मोठी बाजारपेठ म्हणुन महाड निसंशय प्रसिद्ध होती.
महाडचे व्यापारी महत्त्व प्राचिन काळापासून कायम असले तरी राजकिय महत्त्व निजामशाही काळापासून मिळाले असले पाहिजे. याच काळापासून येथे लोकवस्ती वाढू लागली असावी कारण सध्याचा जो महाडचा कोट आहे तो आदिलशाही काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. पुर्वी निजामशहा व नंतर आदिलशहा यांचा मांडलिक असलेल्या जंजिर्याच्या सिद्दीच्या ताब्यात महाडचा त्याकाळी कारभार असून महाडच्या उत्तरेस मुल्ला अहमदच्या अखत्यारीत असलेला कल्याण सुभा सुरु होत असे.
१६५६ साली जावळीकर मोर्यांचा पाडाव करुन महाराजांनी महाड स्वराज्यात आणले व खर्या अर्थाने या भागाच्या उत्कर्षाचा पाया रचला. महाडपासूनच काही अंतरावर असलेल्या रायगड किल्ला ही शिवरायांनी राजधानीचे ठिकाण केल्याने महाड परिसर मराठी साम्राज्याचा केंद्रबिंदू बनला व महाडचे वैभव हळूहळू वाढू लागले. महाड शहराचे सध्याचे जे रुप आहे ते अर्थात शिवकालीन आहे. येथील पुरातन विरेश्वर मंदीर व इतर मंदीरे, इथल्या वस्त्या, चवदार, वीरेश्वर व हापूस (हबशी) ही तीन तळी तसेच इथली नगररचना ही मुख्यत्वेकरुन शिवकाळातच रचली गेली असावी. एकाअर्थी किल्ले रायगड मुख्य राजधानीचे कार्य पार पाडत असताना दुय्यम राजधानीचे ठिकाण हे महाड होते, शिवाजी महाराजांनी निवासाकरीता महाडास एक वाडा बांधला होता, या अगोदरही समुद्रस्नानाची आवड असल्याने बाणकोट खाडीवर महाडात त्यांनी एक वाडा खास समुद्रस्नानासाठी बांधला होता.
महाड हे ऐतिहासिक स्थळ आहेच मात्र अनेक नररत्नांची भुमी म्हणुनही महाड परिसर प्रसिद्ध आहे, या ठिकाणी एकतर या नररत्नांनी जन्म घेतला अथवा इतर नररत्नांची ही कर्मभूमी ठरली स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, संभाजी महाराज, समर्थ रामदास, कवींद्र परमानंद, मुरारबाजी देशपांडे, दादाजी देशपांडे, क्रांतीसुर्य नानासाहेब पुरोहीत, काळकर्ते शि.म.परांजपे, त्र्यंबक कारखानीस, हुतात्मा कमलाकर दांडेकर, हु. वसंत दाते, हु. अर्जुन कानू भोई आणि हु. नथू दौलत टेकावला, सुरबनाना टिपणीस अशा अनेक नररत्नांची महाड ही जन्मभूमी व कर्मभूमी आहे. नाना फडणीसांचे महाडचे प्रख्यात राजकिय कारस्थानही प्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच १९ व २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह केला.
महाडचे श्रद्धास्थान ग्रामदैवत विरेश्वर महाराज यांचा छबीना उत्सव हा येथील पंचक्रोशीतल्या तमाम नागरिकांचे प्रमुख आकर्षण आहे, हा उत्सव पाहण्यासाठी दुरवरुन पर्यटक महाडला भेट देतात याशिवाय दुर्गराज रायगड, पाचाड येथील जिजाबाईंची समाधी, दासबोधाचे जन्मस्थान शिवतरघळ, गांधारपाले लेणी, सव येथील गरम पाण्याचे झरे, ऐतिहासिक चवदारतळे ही महाड शहरातील व परिसरातील प्रमुख प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. प्राचिनता व आधूनीकता यांचा संगम असलेले महाड शहर व परिसर पाहिल्यावर या परिसरास नररत्नांची भुमी असे का म्हटले जाते याची खर्या अर्थाने प्रचिती येते.
महाराष्ट्रातील सूक्ष्मदर्शी ज्यू
अल्पसंख्यांक म्हणून भारतामध्ये मुसलमान, ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध व जैन या सहा समाजांना मान्यता मिळालेली आहे. महाराष्ट्र सरकारने येथील ज्यू धर्मीयांना तशी मान्यता २२ जून २०१६ रोजी दिली. ज्यू समाज त्या निर्णयाची गेली अनेक वर्षें वाट पाहत होता. स्वाभाविकच, तो समाज आनंदित झाला आहे. ते लोक महाराष्ट्रात खरोखरी अल्पसंख्य म्हणजे बारा कोटी लोकसंख्येमध्ये फक्त दोन-चार हजारांच्या दरम्यान आहेत. पश्चिम बंगालने तेथील ज्यू लोकांना अल्पसंख्याक ही मान्यता दहा वर्षांपूर्वी दिलेली आहे. त्यावेळी तेथे फक्त सत्तेचाळीस ज्यू नागरिक होते! महाराष्ट्र हे ज्यू धर्मियांना मान्यता देणारे भारतातील दुसरे राज्य आहे.
अल्पसंख्याक या उपाधीच्या मान्यतेमुळे त्यांना विवाह नोंदणी, मृत्यू नोंदणी करणे सुलभ होईल. तसेच, त्यांना शैक्षणिक संस्था सुरू करता येतील, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि ‘विकास निधी’ मिळवता येईल. अल्पसंख्याकांना त्यांच्या ऐतिहासिक स्थानांचे रक्षण करण्यासाठी खास तरतुदी आहेत त्यानुसार ज्यू समाज त्यांच्या तशा स्मृतिस्थळांचे जतन प्रभावी रीतीने करू शकेल.
महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिव जयश्री मुखर्जी म्हणतात, की ज्यू धर्मीयांना तशी मान्यता या आधीच द्यायला हवी होती, कारण त्यांची लोकसंख्या फारच कमी आहे.
मात्र राज्य सरकारकडे त्यांची लोकसंख्या नेमकी किती आहे त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही! जनगणनेच्या अर्जामध्ये त्यांच्यासाठी वेगळा रकाना (कॉलम) सुद्धा नसे, अधिकारी त्यांना सांगत, की ख्रिश्चन किंवा मुसलमान असे लिहा, त्यामुळे ज्यू धर्मीयांची खरी जनगणना होत नसे. महाराष्ट्रात१९६१ साली पंधरा हजार आठशेएक्कावन्न ज्यू नागरिक होते, तत्पूर्वी ती संख्या तीस हजारापर्यंत असावी. आता मात्र पश्चिम किनारपट्टीवर (मुख्यत: महाराष्ट्रात व केरळमध्ये) चार-साडेचार हजार ज्यू नागरिक असावेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यूंचे योगदान भरीव आहे. ज्यूंचे हे ‘अल्पसंख्याक’ होणे त्याला स्थलांतर हे कारण आहे; पक्षी एकामागोमाग एक उडून जावेत तसे येथील ज्यू नागरिक त्यांच्या धर्मदेशी, इस्रायलला निघून गेले आहेत. ज्यू लोक साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी - इसवी सनपूर्व ७३० मध्ये - पॅलेस्टाईनमधून स्वसंरक्षणाकरता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले. कथा अशी, की त्यांची जहाजे अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ या बंदरकिनारी बुडाली व त्यातून जे वाचले त्या सात-आठ जोडप्यांचे जे वंशज ते बेने-इस्रायली! त्यांचे वंशज महाराष्ट्रात दोन-अडीच हजार वर्षें नांदले. दुसरे जहाज दक्षिण किनाऱ्याला लागले. ते कोचीनला उतरले, ते कोचिनी ज्यू! बगदादहून स्थलांतरित झाले ते बगदादी ज्यू – ते कोलकात्यामध्ये स्थिरावले होते. ‘बेने इस्त्रायल’ या हिब्रू शब्दाचा अर्थ इस्त्रायलची लेकरे!
अपघाताने अलिबाग तालुक्यात आलेल्या निराधार लोकांना स्थानिकांनी आश्रय दिला. त्यांना तेल गाळण्याची कला अवगत होती. म्हणून त्यांनी गलबतांना लागणाऱ्या उंडीच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला. ते शनिवारी विश्रांती घेत. म्हणून त्यांना ‘शनिवार तेली’ असे म्हटले जाई. त्यांनी मराठी भाषा स्वीकारली, ज्या गावात ते राहिले, त्या गावांची नावे त्यांनी स्वीकारली. म्हणून अष्टमीचे अष्टमकर, झिराडचे झिराडकर, चरीकर, मळेकर, रोहेकर, आवासकर अशी आडनावे त्यांच्यात आहेत. त्यांची प्रगती कान्होजी आंग्रे यांच्या काळात चांगली झाली. रायगड जिल्ह्यातील बेने-इस्रायली १७४६ मध्ये मुंबईत आले. त्यानंतर त्यांची संख्या मुंबई-ठाण्यात वाढली. त्यांनी रायगड जिल्ह्याप्रमाणेच (कुलाबा जिल्हा) मुंबईतही त्यांची प्रार्थनामंदिरे बांधली. ते सुतारकामासाठी प्रसिद्ध झाले. स्त्रियांनी शाळेत शिक्षिका म्हणून नोकऱ्या पत्करल्या. मुंबईमध्ये भायखळ्याला ‘सर एली कदूरी’ ही शाळा ज्युईश मुलांसाठी सुरू झाली. त्यांचे स्वतंत्र कॅलेंडर प्रसिद्ध होऊ लागले. सण व इतर धार्मिक संस्कार मंदिरात (सिनेगॉग्ज) होऊ लागले, त्या लोकांनी मराठी साहित्यात, संगीत नाटक, किर्तने ह्यामध्ये योगदान दिले. मराठीमध्ये महाराष्ट्रात त्यावेळी बेने इस्रायली समाजाने बावीस लहानमोठी नियतकालिके चालवली. एडवीन रोहेकर, रेचल गडकर (अनुबंध- ग्रंथाली प्रकाशन), नाथान सातामकर, भाई बंदरकर यांनी नाटके, कादंबऱ्या लिहिल्या. बिनयामीन अष्टमकर हे हरिदासबुवा किर्तनकार म्हणून प्रसिद्ध होते. हिंदी, गुजराथी व ऊर्दू भाषेतही ज्यू समाजाचे योगदान आहे. बनी रुबेन, सिनेनट डेव्हिड, रिबेका रूबेन, डॉ. जेरूषा झिराड, निस्सीम इझीकेल, विजू पेणकर (भारतश्री), डॉ. ई. मोझेस ही आणखी काही प्रसिद्ध नावे! इझिकेल रोहेकर यांनी ज्ञानेश्वरीवर सलग आठ दिवस प्रवचने सोलापूर, अमरावती येथे दिली होती.
इस्रायलचे राष्ट्र १९४८ साली निर्माण झाल्यानंतर, जगातील अनेक देशांतील ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले. भारतात ज्यू समाजाला कोणता त्रास झाला नव्हता. ते सुखी व समाधानी होते. त्यामुळे त्या समाजातील फारच थोडे लोक १९४८ ते १९६० पर्यंत इस्रायलला गेले. इतकेच नव्हे तर तेथे गेलेल्या काही लोकांना परत भारतात यायचे होते म्हणून पंडित नेहरूंनी त्यांच्याकरता विमानही पाठवले होते. सुरुवातीला, जे १९४८ च्या आसपास गेले त्यांना राष्ट्रउभारणीसाठी फार कष्ट करावे लागले. बेने इस्रायलींचे स्थलांतर १९६४ नंतर मात्र महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात झाले. ते स्थलांतर मुख्यत्वे धर्मासाठी, मुले-नातेवाईक तिकडे गेले म्हणून किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घडून आले. मराठी भाषिक ज्यू मुख्यत्वे रामले, बेरशेवा, किर्यातगात, दिमोना या शहरांतून राहतात. इस्रायल सरकारने त्यांना घर, नोकरी अशा अनेक सुविधा पुरवल्या. अनेकांनी सैन्यातील सक्तीच्या शिक्षणामुळे इस्त्रायलसाठी लढाईत - अरब-ज्यू संघर्ष - भाग घेतला. इस्रायलच्या प्रगतीमुळे त्यांचीही आर्थिक भरभराट, कष्टाची कास धरल्यामुळे झाली. त्यांना हिब्रू भाषा शिकावी लागली. त्याबरोबरच वेश आणि खाणे-पिणे ह्यात बदल करावा लागला. आता ते ज्येष्ठ नागरिक आहेत. ते मराठी सर्व जगभर फिरतात; अनेक वेळा भारताला भेटी देतात.
ती मंडळी इस्रायलमधील सिनेगॉग्जमध्ये भेटू लागली. तेथे स्त्रीमंडळे निघाली, त्यातून तेथे महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना झाली. ते ‘१ मे’ रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतात; सर्वजण एकत्र जमून मराठी पेहराव, मराठी भाषा, मराठी जेवण आवर्जून करतात. मुंबईमधून गेलेला एखादा सांस्कृतिक कलाकार कार्यक्रम सादर करतो. तसेच, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे भारताचे राष्ट्रीय सणही साजरे करतात. फ्लोरा सॅम्युअल या उच्चशिक्षित स्त्रीने सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे ‘मायबोली’ मासिक चालवले, ते अजूनही चालू आहे. त्यांना मराठी भाषा, आपला गाव, आपले शेजारी ह्यांचा विसर पडलेला नाही. येलू पेणकर नावाचे नाटकवेडे मराठी वाचनालयही लूद या शहरी चालवत असत.
मराठी ज्यू-ज्येष्ठ नागरिक मुंबईत विमानतळावर उतरला, की त्याच्या मातापित्यांच्या गावाकडील कबरीवर मेणबत्ती लावण्यासाठी सर्वप्रथम तिकडे जातो. तो कबरस्थान सुव्यवस्थित राहण्यासाठी आर्थिक निधी देतो आणि मगच पुढे भारतभेटीला निघतो. मानवी आयुष्याच्या प्रेम, कष्ट, भावनांचा ओलावा, कर्तव्यनिष्ठा या साऱ्या गुणांचे तेथे दर्शन होते.
काही लोकांच्या वाडवडिलार्जित जमिनी रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. जमिनीच्या किंमती अतोनात वाढल्यामुळे, दलाल ज्यांच्या नावावर सात-बाराचा उतारा आहे अशा इस्रायलमधील व्यक्तींचा शोध घेतात, त्यांच्या जमिनींची विक्री करून देतात. काही लोक ते पैसे इस्त्रायलमध्ये घेऊन जातात, तर काही उदार लोक तो पैसा महाराष्ट्रातील स्थानिक शाळांना, दवाखान्यांना दान करतात.
मूळ मराठी लोकांच्या इस्रायलमध्ये जन्मलेल्या पिढीचे लोकही भारतभेटीला येतात. त्यांना मराठी येत नाही तरी थोडेफार शब्द बोलतात, वडापाव-भेळ आवडीने खातात, बॉलिवूडच्या आकर्षणाने मुंबईत फिरतात, ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमामुळे शनिवार वाडा पाहण्यास मुद्दाम पुण्यास जातात.
माधव गडकरी ह्यांच्या प्रयत्नाने इस्रायलमध्ये ‘जागतिक मराठी अकादमी’चे अधिवेशन जेरुसलेम येथे १९९६ साली झाले. त्यावेळी ‘इस्रायल - माणूस आणि देश’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच सुमारास फ्लोरा सॅम्युअल ह्यांचे ‘संस्कृती संगम’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर रेचल गडकर ह्यांचे ‘आम्ही भारतवासी बेने इस्त्रायली’ हे पुस्तक व ‘ग्रंथाली-ज्ञानयज्ञ’ प्रकल्पातून मी लिहिलेले ‘इस्त्रायलची मराठी लेकरे’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली. इस्रायलच्या मराठी स्थलांतरांची कहाणी, त्यांच्या व्यथा, त्यांची कर्तबगारी आणि त्यांचा आनंद सांगणारी ही तीन पुस्तके आहेत. त्यापूर्वी ‘छळाकडून बळाकडे’ हे इस्रायलची माहिती देणारे पुस्तक नाना पालकर ह्यांनी लिहिले होते. त्यानंतर इस्रायलवर काही पुस्तके प्रकाशित झाली, एक्झोडस (अनुवादित) – नीळकंठ देशमुख; २. शालोम इस्त्रायल – अभिजित वैद्य; 3. एक होती बाय (अनुवादित) – आपटे - राजहंस प्रकाशन, ३. जेरुसलेम ओ जेरुसलेम – निळू दामले; ४. छेडिता हृदय हे (अनुवादित) – उषा तांबे - राजहंस प्रकाशन, ५. विशेष पर्व (अनुवादित) – स्नेहा महाजन, ६. जेरुसलेम एक चरित्रकथा(अनुवादित) – सविता दामले - डायमंड पब्लिकेशन ही काही महत्त्वाची पुस्तके मराठीत आहेत.
लिऑन उरीसच्या कादंबऱ्यांचे अनुवादही मराठीत झाले आहेत. ‘शायली’ नावाचे मासिक ठाण्याहून ‘इव्हज् असोसिएशन’ तर्फे प्रसिद्ध केले जाते, ‘मक्काबी’ नावाचे मासिक भाई बंदरकर व त्यांचा मुलगा रेमंड बंदरकर ह्यांनी मिळून, सदुसष्ट वर्षें चालवले. ‘मक्काबी’ नुकतेच बंद झाले आहे.
महाराष्ट्रातील ज्यूंचे वर्णन ‘सूक्ष्मदर्शी अल्पसंख्यांक’ असे करता येईल. त्यांना नुकतीच मिळालेली तशी मान्यता त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरते. ज्यू धर्मीय म्हणजे नेमके कोण ते महाराष्ट्रात माहीत नसते. कोणी त्यांना ख्रिश्चन समजतात. ज्यू समाजाचे मुंबईतील कुलाबा येथील ‘छाबाड हाऊस’ही २००८ साली झालेल्या २६/११च्या अतिरेकी हल्ल्यात सापडले होते. त्यामुळे भारतात ज्यू आहेत असे अनेकांना कळले. भारतात त्यांची सिनेगॉग्ज आहेत, त्यांपैकी दहा मुंबईत आहेत, ठाणे, पनवेल, पेण, अलिबाग येथे प्रार्थना मंदिरांच्या इमारती आहेत, पण तेथे स्थानिक ज्यू नसल्यामुळे प्रार्थनेसाठी दहा माणसे जमणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यांच्या ए.जे.डी.सी. आणि ओ.आर.टी. ह्या संस्था आहेत. ज्युईश मध्यवर्ती संस्था सुद्धा आहे. इस्त्रायलमधील सधन नागरिक येथील प्रार्थना मंदिरे सुस्थितीत राहवी म्हणून देणग्या देतात. कबरस्थानातून जागा अपुरी आहे. किप्पूर, रोश-हा-शाना आणि हान्नुका(या सणांच्या) सुट्ट्या मिळाव्यात अशी ज्यू समाजाची अपेक्षा आहे. अलिबाग तालुक्यातील ‘नौगाव’ येथे स्मृतिस्तंभ आहे. खंडाळा या खेड्यामध्ये ‘येलिहाउहन्नाबी’च्या रथाच्या टापांचा खडक आहे. त्या स्थानांची निगा राखली जाईल असे स्थानिकांना वाटते. ‘सर एली कदूरी’ या एकेकाळी ज्युईश विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या शाळेत ना एकही शिक्षक ज्यू आहे ना विद्यार्थी ज्यू आहेत. मुंबईतील उरलीसुरली तरुण मुले इस्त्रायल भेटीसाठी जातात, तेथील जीवनशैली आणि झगमगाट, आर्थिक सुस्थिती पाहून इस्रायलला स्थलांतरित होतात. अल्पसंख्याक मान्यतेमुळे कदाचित महाराष्ट्रातील उरलेल्यांना अधिक सुरक्षितता, अधिक फायदे मिळतील व स्थलांतराचे प्रमाण कमी होईल अशी शक्यता वाटते.
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांनी तेल अवीव येथे मराठी भाषा शिकवण्याची सोय करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तेथील युवकही महाराष्ट्राकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. ४ जुलै २०१६ रोजी, ‘तेल अवीव विद्यापीठा’त मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू झाले आहेत. ही मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने त्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातून सरकारने विजय तापस, कादंबरी भंडारी आणि सोनल गुजर ह्या तीन प्राध्यापकांना तीन महिन्यांसाठी इस्रायलला पाठवले आहे. ‘तेल अवीव विद्यापीठा’तील सव्वीस विद्यार्थी तेथे ‘ग म भ न’चे धडे घेत आहेत. पुढील पिढीमध्ये मराठी आणि महाराष्ट्र या त्यांच्या पूर्व भूमीतील भाषेविषयी, प्रदेशाविषयी औत्सुक्य व आत्मीयता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
ज्यू प्रार्थनेत, ‘आम्ही जेरुसलेमला विसरलो तर उजवा हाता कापा’ असे म्हणतो. मराठी ज्यू ‘आम्ही भारताला विसरलो तर दोन्ही हात कापून टाका’ असे सांगतो तेव्हा ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ या ओळी आठवतात.
शाही दफन भूमी - खोकरी
मुरुडवरून म्हसळा येथे जाताना चार किलोमीटरवर एका टेकडीवर खोकरी नावाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांचा भास मशिदी असल्यासारखा होतो. त्या वास्तू आपले लक्ष्य वेधून घेतात. पण त्या प्रत्यक्षात मशिदी नसून मुरुड संस्थानाचे राजे सिद्दी यांच्या तीन शाही कबरी आहेत.
कबरी दगडी तीन आहेत. त्या सुमारे साडेचारशे वर्ष जुन्या आहेत. सर्वात मोठी कबर सिद्दी सुरूल खान यांची आहे. जंजिऱ्याची सत्ता सुरूल खान यांच्या हातात 1708 ते 1734 या काळात होती. सुरुलखानाची कबर त्याच्या हयातीत बांधण्यात आली असे सांगण्यात येते. सुरुलखानाची कबर उंच चौथऱ्यावर आहे. तेथपर्यत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. कबरीच्या भिंतीवर दगडात जाळ्या कोरल्या आहेत. तसेच, छोटीछोटी कोष्टके बनवली आहेत. कबरीवर सर्वत्र फुलांचे कोरीव काम केलेले आहे. कबरीच्या अंतर्भागात सुरुलखान आणि त्यांचे गुरु यांचे थडगे आहे.
दुसऱ्या दोन कबरींपैकी एक कबर मुघली सत्तेचा नौदलाचा प्रमुख सिद्दी कासीम याची आहे. ती 1677 ते 1697 या काळात बांधली असावी. सिद्दी कासीम याकुतखान या नावाने ओळखला जात होता. त्याने 1670 ते 1677 आणि पुन्हा 1697 ते 1707 अशी सत्ता उपभोगली. तिसरी कबर याकुतखानाचा भाऊ खैरियातखान यांची आहे. खैरियात खान दंडा राजापुरी प्रांताचा 1670 ते 1677 या काळात प्रमुख होता. खैरियात खान जंजिऱ्याचा प्रमुख 1677 ते 1696 या काळात होता. याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या प्रवेशद्वारावर अरबी शिलालेख कोरले आहेत. त्या शिलालेखानुसार खैरियातखानाचा मृत्यू हिजरी 1108 (सन१६९६) आणि याकुतखानाचा मृत्यू 30 जमादिलवल हिजरी 1118 (सन 1707 ) रोजी झाला.
सुरुलखानाच्या कबरीच्या देखरेखीसाठी दोन हजार रुपये वार्षिक महसूल असलेले सावळी-मिठागर, याकुतखान आणि खैरियातखान यांच्या कबरीच्या देखभालीसाठी दोडाकल गावाचा महसूल नवाबाने लावून दिला होता. त्या तीन कबरींच्या आजूबाजूला अनेक कबरींचे दगड पसरलेले आहेत. कबरीच्या परिसरात मशिदीसुद्धा आहेत. तसेच, रस्त्याच्या आजुबाजूला अजून एक कबर आहे, पण ती कोणाची आहे हे समजलेले नाही.
- संकलन
(भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे यांच्या फेसबुकवरुन, संपादित -संस्कारित)
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
रायगड जिल्ह्यास 'रायगड' हे नाव ज्या किल्ल्यामुळे मिळाले तो अभेद्य व शिवछत्रपतींच्या राजधानीचे ठिकाण असलेला किल्ला हा रायगड जिल्ह्याची मुख्य ओळख आहे.
याची किर्ती आजच नाही तर पुर्विही इतकी दुरवर पसरली होती की, पाश्चिमात्य यास 'पुर्वेकडील जिब्राल्टर' म्हणुन ओळखत. केळनृपविजयम या कानडी काव्याचा कर्ता रायगडचा उल्लेख 'भुतलावर आश्चर्यकारक म्हणुन गणला जाणारा रायरी' असे करतो. सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून विलग झालेला तरिही तब्बल एक मैलाची दरी असलेला हा किल्ला शिवाजि महाराजांनी त्यांच्या राजधानीचे स्थळ म्हणुन निवडला यात नवल ते काय? रायगडचे प्राचिन नाव रायरी, याशिवाय यादवकाळात या किल्ल्यास तणस व रासिवटा अशिही नावे होती. दुरुन हा किल्ला पाहिल्या एका तेवत्या नंदादिपासारखा दिसतो त्यामुळे यास नंदादिप असेही म्हणत. यादवकाळानंतर जेव्हा दुर्गांचे महत्त्व कमी झाले तेव्हा या किल्ल्यांचा वापर फक्त टेहळणी अथवा कैदखाना म्हणुन केला गेला, निजामशाही काळात रायगडाचाही वापर कैदखाना म्हणुनच केला गेला.
आदिलशाही काळात हा परिसर जावळीच्या मोर्यांच्या अखत्यारित होता. या मोर्यांच्या प्रमुखास 'चंद्रराव' हा किताब असे, १६४८ च्या दरम्यान जेव्हा प्रमुख दौलतराव म्रन पावला तेव्हा त्याच्या वारसांमध्ये किताबासाठी झगडा सुरु झाला तेव्हा त्याच्या बायकोने शिवाजी महाराजांची मदत घेऊन त्यांच्या सल्ल्याने पोलादपुरकर घराण्यातला 'यशवंतराव' हा मुलगा दत्तक घेतला व त्यास चंद्रराव हा किताब दिला. मात्र एवढी मदत करुनही कालांतराने मोरे शिवाजी महाराजांना न जुमानते झाले त्यामुळे १६५५ नंतर जावळीवर हल्ला करुन शिवाजी महाराजांनि मोर्यांचा नि:पात केला व जावळी सोबत याच प्रांतातला रायगड सुद्धा ताब्यात घेतला. हा किल्ला स्वराज्यात आल्यामुळे शिवाजी महाराजांचा खुप फायदा झाला कारण रायगडपासून मुंबई, पुणे व सातारा ही प्रमुख शहरे सारख्याच अंतरावर आहेत, तसेच समुद्र येथून फक्त ४८ मैल असल्यामुळे सिद्दीवर वचक ठेवणे शक्य होणार होते. तसेच किल्ल्याचे भौगोलिक स्थान इतके दुर्गम आहे की सह्याद्रीच्या रांगानी वेढल्यामुळे अगदी जवळ जाईपर्यंत किल्ल्याचे दर्शन होत नाही.
रायगड किल्ल्यावर जाण्यास पुर्वी अनेक मार्ग होते, आजही हे दुर्गम मार्ग अनेक स्थानिकांकडून अथवा गिर्यारोहकांकडून वापरात आणले जातात मात्र आधुनिक काळात सर्वसामान्यांनाही जाण्यास सोपा असा मार्ग म्हणजे महाड मार्गे रायगडास जाणारा गाडीमार्ग, या मार्गे महाडपासून रायगड अदमासे १४ मैल अंतरावर आहे. पुर्वी हा मार्ग कोंझर पर्यंत होता व येथून पायी चालत जावे लागायचे मात्र आता थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जातो, अबालवृद्धांना हा दुर्गम गड चढण्यास सोपा जावा म्हणुन काही वर्षांपुर्वी येथे रोप वे ची सुवीधा सुरु करण्यात आली आहे ज्याचा लाभ लक्षावधी नागरिकांनी घेतला आहे. गडवाटेवरुन जेव्हा चालत आपण रायगडावर जाण्यास सुरुवात करतो तेव्हा प्रथम लागतो खुबलढा बुरुज येथेच पुर्वि प्रसिद्ध चित दरवाजा होता. येथून पुढे गेल्यावर लागतो नाणे दरवाजा, पुढे काही बुरुज व नंतर महादरवाजा लागतो. येथे पहारेकर्याच्या चौक्या व कोठारे आहेत. पालखी दरवाज्यानंतर बालेकिल्ल्यास सुरुवात होते. रायगडावरील महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शिवरायांची समाधी, जगदिश्वर मंदीर, राजवाडा, सिंहासनाची जागा, बाजारपेठ, टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी टोक, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, शिर्काई मंदीर. या किल्ल्याचे बांधकाम वास्तुतज्ञ हिरोजी इंदुलकर यांनि केले त्यांच्या नावाचा शिलालेख जगदिश्वर मंदीराच्या पायरीवर आहे. याशिवाय आणखी एक संस्कृत शिलालेख एका चौथर्यावर आहे. किल्ल्यावर एक पोलादी स्तंभ आहे ज्यास संभाजी महाराजांचा मल्लखांब म्हणतात त्यावर सुद्धा एक लेख आढळुन आला आहे. असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला रायगड जिल्ह्याचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रियांचे एक तिर्थस्थानच आहे.
नागांव - अष्टागरांचा 'नागमणी'
रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे.
रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचिन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन म्हणुन प्रसिद्ध असले तरी या गावास अतिशय प्राचिन असा ऐतिहासिक वारसा आहे. नागावचे प्राचिन संस्कृत नाव नागग्राम, महाभारतातल्या नागसत्र यज्ञानंतर जी नागकुळे दक्षीणेत स्थित्यंतरीत झाली व जी गावे वसवली त्यापैकी नागाव हे एक गाव. नागाव मध्ये आजही नागवंशाच्या प्राचीन खुणा अस्तित्वात आहेत. यातील अत्यंत महत्त्वाची खुण म्हणजे दश नागांचे मंदीर, या मंदीरात नागाव गावाच्या मुळ दैवत असलेल्या दश नागांच्या मुर्त्या पहावयास मिळतात ज्या अत्यंत प्राचिन आहेत.
अनेक प्राचिन साधनांमध्ये नागावचा उल्लेख नागुम असा सुद्धा करण्यात आला आहे. नागाव मध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा जागोजागी सापडतात, यापैकी महत्त्वाच्या खुणा म्हणजे नागावच्या वैभवशाली इतिहासाची साक्षी असलेली पुरातन मंदीरे भिमेश्वर मंदीर, सिद्धीविनायक मंदीर, वंखनाथ मंदीर, नागेश्वर मंदीर, दक्षीणमुखी देवस्थान अशी यादी संपता संपणार नाही. ही सर्व मंदीरे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय अप्रतिम अशीच आहेत. यापैकी भिमेश्वर हे मंदीर या मंदिरात असलेल्या १२ व्या शतकातल्या शिलालेखामुळे इतिहासप्रेमींमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. हा शिलालेख भिमेश्वर मंदीराच्या उत्तरेकडील दरवाज्याच्या पायरीवर कोरला असून आजही सुस्थितीत आहे, यावरिल मजकुर पाहता हा ठाणे-कोकण या भागावर राज्य करणार्या कुणा हंबीरराव नामक राजाच्या नावे असून शिलालेखावरील प्रौढी प्रताप चक्रवर्ती ही अक्षरे हा शिलालेख यादवकालीन असल्याची साक्ष देतात. याशिवाय याच मंदीरापरिसरात शिल्पशास्त्राचा अजब नमुना असलेल्या काही मुर्त्या सुद्धा पहावयास मिळतात. येथील सिद्धीविनायकाचे देवस्थान तसे मुख्य मार्गावर असूनही अपरिचितच आहे. या मंदीराचे लाकडी सभागृह आता पुरते मोडकळीस आले असून फक्त गाभाराच सुस्थितीत आहे. या मंदीराच्या गाभार्याच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख कोरला असून भग्नावस्थेत असल्याने पुर्णपणे वाचता येत नाह मात्र यावर सुस्थितीत असलेली 'प्लवंग संवस्तरात कुणा बाळभट्टाच्या नावे असलेले हे दानपत्र असल्याचे लिहीले असल्याने' ह्या शिलालेखावरील बाळभट्ट म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचे पुरोहीत चौलचे वेदसंपन्न पुरोहित प्रभाकरभट्ट यांचे चिरंजीव बाळभट्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाळभट्ट सुद्धा वेद्संपन्न असून शिवराज्याभिषेकात अनेक कार्ये त्यांनी गागाभट्टांसोबत पार पाडली होती. नागाव मधील एक अतिशय देखणे मंदीर म्हणुन वंखनाथाच्या मंदीराचे नाव घेता येईल. हे शिवमंदीर पुरातन असले तरी आहिल्याबाई होळकरांच्या काळात म्हणजे सन १७९० मध्ये या मंदीराचा जिर्णोद्धार झाल्याचे दाखले आढळतात. या मंदीरासमोरील पुष्करणी सुद्धा अतिशय प्रेक्षणीय असून या पुष्करणीमधील कासवे ही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. या मंदीरातील नंदीची मुर्ती हि अतिशय रेखीव असून अशा प्रकारची दुसरी मुर्ती कुठल्याही शिवमंदीरात सापडणे केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. येथील नागेश्वर हे शिवमंदीर सुद्धा बरेच जुने असून जानकोजी आंग्रे यांनी या मंदीराचा जिर्णोद्धार केल्याची माहिती सापडते.
प्राचिन काळापासून प्रसिद्ध असलेल्या नागावं ने शिवकाळात सुद्धा राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या स्थानाची भुमिका बजावली होती. त्याकाळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नागावचा समावेश होत असे व शेजारच्या चौल वर पोर्तुगिजांची सत्ता होती तसेच पलिकडे मुरुड येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू जंजिर्याचा सिद्दी याची सत्ता असल्याने शिवाजी महाराजांनी सिद्दीच्या ताब्यातल्या अनुक्रमे जंजिरा व उंदेरी या ठिकाणांवर काढलेल्या मोहिमांचे आरंभस्थान नागाव हेच होते. १६७० च्या नोव्हेंबर महिन्यात शिवाजी महाराजांनी नागाव येथे १६० लहान जहाजे, १०००० घोडदळ व २०००० पायदळाचे सैनिक तयार ठेवून जंजिर्याला वेढा घालण्याच्या तयारीने जमावले होते. या सैनिकांसोबत इतर शस्त्रास्त्रांसोबत कुदळी, फावळी, पहारी इत्यादी बांधकामाची आयुधे सुद्धा होती. २४ नोव्हेंबरला या तुकडीने नागाव सोडले मात्र २६ तारखेला महाराज अचानक माघारी वळले व आरमारास परत बोलावून काही काळातच त्यांनी खानदेश व वर्हाडवर स्वारी केली व प्रचंड प्रमाणात लुट मिळवली. अर्थात नागाव मधून निघालेली ही मोहिम ही महाराजांच्या राजकिय डावपेचांचाच एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्यास गनिमीकावा असे प्रसिद्ध नाव आहे.
नागावचा समुद्रकिनारा सुद्धा अतिशय स्वच्छ, सुंदर व डोळ्यांचे पारणं फेडणारा असून सभोवताली दाट सुरुबनाने वेढल्याने किनार्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पुरेशी काळजी घेतल्यास या सुरक्षित अशा समुद्रकिनार्यावर जलक्रिडेचा मनसोक्त आनंद लुटता येतो.
गेली हजारो वर्षे नागावने आपली प्राचिन संस्कृती जपून ठेवल्याने आजही नागाव मध्ये येणार्या पर्यटकांना खर्या अर्थाने कोकणातल्या एका टुमदार गावात आल्याचा भास होतो. नागावचा स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा पोहोण्याच्या दृष्टीने सुद्धा सुरक्षित असल्याने जलक्रिडेसाठी पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देत असतात मात्र समुद्र पर्यटनाबरोबरच नागाव मधील ऐतिहासिक वारश्याचे दर्शन जर या पर्यटकांना देता आले तर खर्या अर्थाने नागावचे सांस्कृतीक व ऐतिहासिक वैभव जगासमोर येईल . सर्वांनी एकत्र येऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्राचिन काळी नागांव, चौल, रेवदंडा सारखी बंदरे युरोप, अरब तथा आफ्रिकन राष्ट्रांशी व्यापार करण्यामध्ये अग्रेसर होती मात्र मध्ययुगातली अस्थिरता या बंदरांच्या नाशासाठी कारणीभुत ठरली. इतक्या राजकिय स्थित्यंतरातही नागाव, चौल, रेवदंडासारखी गावे आपले अस्तित्व टिकवून आहेत ही खरे तर दैवी कृपाच म्हणायला हवी. अष्टागरांचे वैभव असलेले नागाव म्हणजे जणू ऐतिहासिक, सांस्कृतीक, भाषिक, वांशिक व राजकिय ठेव्यांचे एक संग्रहालयच आहे.
नागोठणे - इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे शहर
रायगड जिल्ह्यास फार पुरातन असा ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यातली प्रत्येक गावे, मंदिरे, लेण्या, किल्ले, स्थळे इतिहासाला जपणारे फार मोठे पुरावे आहेत. मात्र या स्थळांच्या गर्भात शिरुन इतिहासास बोलते केले पाहिजे तरच मानवाला अजुनही न सापडलेल्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा गुंता उकलला जाईल.
यासाठी आपण नागोठणे या गावाचे उदाहरण घेऊ, भौगोलिक दृष्ट्या नागोठण्याचे स्थान महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या रायगड जिल्ह्यात येते. रायगड जिल्ह्याचे भौगोलिक दृष्ट्या दोन भाग पडतात ज्यास उत्तर रायगड व दक्षिण रायगड असे म्हटले जाते. मात्र नागोठणे हे उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड यांच्या बरोबर मध्यभागी वसले आहे. नागोठण्याच्या पश्चिमेकडून अंबा नदी वाहते. अंबा नदी लोणावळ्याच्या दक्षिणेकडे आंबवणे येथे उगम पावते आणि नैऋत्येस ४८ कि.मी. वाहत जाते. पालीच्या दक्षिणेस रोहा तालुक्यातल्या वझरोली गावाखाली दिशा बदलून वायव्येस वाहते. नागोठण्यापासून पुढे नदीच्या खोर्याचा तळ रुंद होतोत व नदी सपाट माथा असलेल्या डोंगरांगांमधून धरमतर खाडीला मिळते यामुळे परिसरात दलदलीचा मोठा प्रदेश तयार झाला आहे. अंबा नदी धरमतर खाडीस जाऊन मिळते. अंबा नदीच्या प्रवाहाचे दोन भाग आहेत. भरती ओहोटीचा परिणाम होणारा मुखाकडील भाग आणि भरती ओहोटीचा परिणाम न होणारा उगमाकडिल भाग. पुर्वी नागोठण्याच्या मुखापर्यंत ३५ कि.मि. चा प्रवाह पाण्याच्या उपलब्धतेमुळे पुर्वी जलवाहतुकीस उपयोगी पडायचा. नागोठण्याच्या उत्तरेस १८ कि.मी. वर धरमतरच्या दक्षिणेस नदीचे पात्र रुदं होते. धरमतपासून रेवसपर्यंतचा अंबा नदीचा प्रवाह दलदलमय प्रदेशातून जातो. नागोठण्या पासून अंबा नदीस एकही मोठी नदी येऊन मिळत नाही.
परिसरातल्या प्रमुख डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य शाखेपासून अलग झालेल्या उपशाखा आहेत. नागोठण्याच्य पुर्वेस जि डोंगररांग आहे तिला महालमिरा डोंगर रांग या नावाने ओळखले जाते. आणि नागोठण्याच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे पसरलेल्या डोंगररांगेस सुकेळी डोंगररांग म्हणुन ओळखले जाते. या डोंगरांगेत सुरगड, अवचित गड आणि सागरगड यासारखे तिन बेलाग दुर्ग नागोठणे परिसराचे पुरातन काळापासून संरक्षण करत आहेत. याशिवाय नागोठण्याच्या पुर्वेस नागोठणे गावास लागुनच एक उपशाखा महालमिरा रांगेपासून अलग झालेली आहे हिला पुर्व नागोठणे डोंगररांग असे नाव आहे. अशा प्रकारे तिन बांजूनी डोंगररांगानी वेष्टित असलेल्या नागोठण्यातून दक्षिणेकडे सुकेळी खिंडीतून, पश्चिमेकडे भिसे खिंडीतून व उत्तरेकडे अंबा नदीच्या तटाला लागून जावे लागते. सुकेळी डोंगररांग अंबा आणि कुंडलिका नद्यांचे पाणलोट क्षेत्र विभागते.
सद्यस्थितीस मुंबई गोवा महामार्गावरिल एक शहरवजा गाव असलेल्या या गावास हजारो वर्षांचा इतिहास आहे हे सांगुन कोणास खरे वाटणार नाही. खर तर नागोठण्याच्या नावातच फार मोठा इतिहास दडला आहे जो महाभारत काळापर्यंत जाऊन पोहोचतो. पुर्व महाभारतातल्या खांडवकांड नामक घटनेनंतर उत्तरेत राहणार्या नागलोकांमध्ये आणि पांडवांमध्ये जे वैर झाले त्याची परिणीती उत्तर महाभारत काळातल्या नागसत्र यज्ञामध्ये झाली, या भयानक युद्धात अनेक नागकुळांचा संहार झाला जिवंत राहिलेली नागकुळे दक्षिणेकडे सरकत जाऊन दक्षिणेकडिल अनेक भागांत स्थिरावली. यातिल काही कुळे कोकणात सुद्धा दाखल झाली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल (पन्नगपल्ली), नागोठणे (नागस्थान), नागाव (नागग्राम) अशी ठिकाणे वसवून तेथे राहिली. रायगड जिल्ह्यात अनेक गावांत सापडणार्या नागमुर्त्या आणि गांवामधले नागदर्शक नाम हे नागवंशियांच्या रायगड जिल्ह्यातल्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बहुदा नागलोकांच्या जेथे जेथे वस्त्या झाल्या ति ठिकाणे समुद्रतिरी, बंदरावर अथवा खाडीच्या मुखाशी दिसून येतात यावरुन नागलोक हे निष्णात दर्यावर्दी होते असाही सिद्धांत लावता येतो कारण अगदी बुद्धकाळातही नागलोकांची कोकणपट्ट्यात आरमारे होती असे उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळुन येतात याचा अर्थ नागलोकांनीच कोकण पट्टीतली पहिली आरमारे स्थापन केली होती असे ठामपणे म्हणता येईल आणि यापैकीच एक आरमार नागोठणे येथेही स्थापन झाले असावे.
नागोठणे गावास खुप जुना आरमारी इतिहास आहे नागलोकांनी येथे आरमाराचा पाया रचला आणि सातवाहन, मौर्य, चालुक्य, शिलाहार, यादव, गुजरात सुलतान, निजामशहा, आदिलशहा, मराठे, आंग्रे, इंग्रज यांनी या आरमाराच्या इतिहासाच्या इमारतीची पक्की बांधणी करुन उत्कर्षाचे कळस चढवले. मौर्य सातवाहन काळात नागोठण्याचे व्यापारी महत्त्व खुपच वाढले इ.स्.पुर्व २२५ मध्ये चौल्-रेवदंडा, नागोठणे, महाड, मुरुड, गोरेगाव, पेण, पनवेल, राजपुरी या पुरातन व्यापारी पेठा होत्या. सह्याद्री पर्वतामधून कोकणात उतरणार्या कोंडाणे घाट, हिंदोळ घाट, मिरघाट, बोरघाट, कुरवंडा घाट, आंबेनळी, पायमोडी (मोराडी) घाट, निसणी (सव), कोराई (काठी), अनघाई, वारसदार, वाघजाई, सवाष्णी, भोरप्या, नांणदांड, नाळेची वाट, गाढवलोट, सावळा, लेंड आणि ताम्हिणी सारख्या घाटाटून नागोठणे बंदरात आयात केलेला माल देशभर पाठविण्यात येत असे आणि देशभरातला माल याच ठिकाणाहून परदेशात निर्यात होत असे. येथुन येणार्या व्यापार्यांच्या निवासासाठी नागोठणे मार्गे मावळात जाणार्या याच घाटरस्त्यांवर कार्ले, भाजे, कुडे, घारापुरी, नेणवली (खडसांबळे), ठाणाळे इत्यादी लेण्या वेगवेगळ्या राजवटींच्या काळामध्ये कोरुन काढण्यात आल्या. वरिल सर्व लेण्यांवरुन असे दिसून येते कि इ.स्.पुर्व १०० ते इ.स.३०० पर्यं बोरघाटामार्गे रहदारीचा मुख्य मार्ग होता. नेर्न या इतिहासकाराच्या मते प्राचिन काळी सह्याद्रीच्या घाटांमधुन चालणार्या व्यापाराची उलाढाल चौल मार्गे चालत असे आणि चौल हे नागोठण्यास समांतर आहे. चौलवरुन रेवदंडा खाडीमार्गे सुकेळी खिंडीतून व्यापारी मार्ग जात असावा. त्यामुळे तत्त्कालिन प्रमुख मार्ग बोरघाट ते नागोठणे, नागोठणे ते अष्टम आणि अष्टम ते चौल हा असावा. इ.स. सनाच्या दुसर्या शतकात भारतात आलेल्या भुगोलतज्ञ टोलेमीने नागोठण्याचा उल्लेख नानागुना (नागोठणा) आणि नागरोरी (नागपुरी) असा केला आहे. पेरिप्ल्स मध्ये जे वर्णन करण्यात आले आहे त्यानुसार इ.स.७० ते ८० च्या सुमारास इजिप्तबरोबर धान्य, तिळ, साखर, तांदुळ, आले, कापड, खाद्यतेले इत्यादी वस्तूंचा व्यापार चालत असे. याशिवाय विविध प्रकारची मद्ये, कापड, तांबे-पितळ, जस्ताची भांडी, सोन्या चांदीची नाणी,शिंपल्यांचे दागिने, चांदिचे पेले, थाळ्या यांची आयात निर्यात होत असे. मौर्य काळाशिवाय सातवाहन, चालुक्य, शिलाहार, मराठे, गुजरातचे सुलतान, आदिलशाही, निजामशाही इत्यादी काळातही नागोठण्याचे व्यापारी महत्त्व कायम होते. शिलाहार काळातील अनंतदेव राजाच्या ताम्रपटात त्याने आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे महाप्रधान दुर्ग श्रेष्टींचे पुत्र भवन श्रेष्ठी आणि त्यांचे भाऊ धर्मश्रेष्ठी यांच्या मालवाहू जहाजांस नागोठणे, चौल व नालासोपारा या तिन बंदरामध्ये करमाफी दिल्याचा उल्लेख आहे. नागोठण्याच्या अंबा नदीवर दिसणारा जो पुल आहे तो याच प्रमुख व्यापारी मार्गावर विजयनगर साम्राज्याच्या राजा अलिया राम राया याच्या काळात बांधण्यात आला होता यावरुन विजय नगर साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती हि महत्त्वाची माहिती कळते. याशिवाय गुजरात सुलतान, निजामशाही काळात चौलमार्गे नागोठण्यातून देशावर जाणार्या मुख्य व्यापारी रस्त्यावर वाहतुक सुलभ होण्याकरिता १५८० साली काजि अलाऊद्दीनने अंबा नदीवरिल याच पुलाचा जिर्णोद्धार केला होत पुढे मराठे तसेच इंग्रजांच्या काळातही या पुलाची वेळोवेळी दुरुस्ती झाल्याचे उल्लेख मिळतात.
नागोठण्यास फक्त आरमारी इतिहासच आहे असे नाही तर वांशिक, धार्मिक, औद्योगिक, भौगोलिक, भाषिक, व्यापारी अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागोठण्यास भुतकाळात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते. कारण वांशिक किंवा भाषिक इतिहासाबद्दल पहायचे झाले तर नागोठण्यात पाच हजार वर्षांपुर्वीची प्राचिन अशी नागवंशिय संस्कृती स्थिरावली होती. याकाळी कोकण परिसरात शैवपंथांचा आणि थोडाफार वैष्णव व शाक्तांचा प्रभाव होता नागलोकांनी अनेक वर्षे येथे आपली मुळ संस्कृती जपून ठेवली असावी मात्र कालांतराने नागसंस्कृती हि शैवसंस्कृतीमध्ये विलिन झाली असावी. एका वेगळ्या विचारप्रवाहाप्रमाणे नाग शब्दाचा विचार करतां हे लोक मूळचे डोंगरदर्यांतले रहिवाशी असावेत, कारण नग या शब्दाचा संस्कृत अर्थ डोंगर असा होतो त्यामुळे नाग लोक मूळचे डोंगराळ मुलखांतील रहिवाशी असून ते कालांतराने जिकडे तिकडे पसरले असावे. जर यांचीं समुद्रांतरीं द्वीपें (उदा नागोठणे, नागाव, पनवेल, नागापट्टण) होतीं, तर जलयानाच्याशी यांचा बराच परिचय पूर्वीच्या काळीं असला पाहिजे. नागांचा लोक हे पाताळातले रहिआशी समजण्याचा संस्कृतांत संप्रदाय आहे. या संप्रदायावरून नाग हे मूळचे दक्षिण दिशेचे (कोकणपट्ट्यातले) रहिवाशी असून, ते पुढें वर हिमालयापर्यंत व काश्मिरापर्यंत पसरले असेंही म्हटले जाते. सप्तपाताळ या शब्दाचा सप्तकोकण या शब्दाची काहितरी संबध असावा. महाभारत काळात कुंकण नामक एका नागकुळाने येथे आपले राज्य स्थापिल्यामुळे या परिसरात सप्तकुंकण असे म्हटले गेले असेही म्हटले जाते. गुजरातमध्ये आजही नागर नामक जमात आहे. हे झाले वांशिक महत्त्व आणि भाषिक महत्त्वाचा विचार करता महाराष्ट्राच्या भाषिक जडणघडणीत नागोठण्याच्या नागवंशी संस्कृतीचा नक्कीच सहभाग होता कारण प्रथम नागवंशिय लोकांनी येथे वस्ती केल्यावर इ.स्.पुर्व सहाव्या सातव्या शतकामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रिक, वैराष्ट्रिक व महाराष्ट्रिक या तिन संघाचे लोक उदयास आले व या चारही संस्कृतींचा मिलाप होऊन महारट्ट अर्थात मराठी वंशाचा उदय झाला. नाग लोक वैदिक अपभ्रंशित भाषा बोलत असत तर महाराष्ट्रिक त्यांची महाराष्ट्रि भाषा बोलत असत. याच महाराष्ट्रिक आणि वैदिक अपभ्रंशित भाषांच्या मिलनातून मराठी भाषेचा उदय झाला.
वरिल अनेक घटनांवरुन नागोठण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते मात्र इतकेच नव्हे तर नागोठणे हे गाव अनेक वेळा वेगवेगळ्या साम्राज्यांच्या संकरसिमेवरिल संवेदनशिल गाव म्हणुन प्रसिद्ध राहिले आहे. सन १५४२ ते १५६५ हा काळ विजय नगर साम्राज्याचे सम्राट अलिया राम राय यांच्या कारकिर्दीचा काळ या काळात विजयनगर या संपन्न हिंदू साम्राज्याची हद्द नागोठण्यापर्यंत भिडली होती. आजही तज्ञ हे मानत असले कि विजयनगर साम्राज्य रत्नागिरी पर्यंत मर्यादित होते तरी रायगड जिल्ह्यात असलेल्या तळे गावातल्या एका मंदिरात विजय नगर साम्राज्य काळातला एक तेलुगु भाषेतला शिलालेख आजही पहावयास मिळतो याशिवाय नागोठणे गावातला अंबा नदीवरिल जो मजबुत पुल आहे तो सुद्धा विजय नगर साम्राज्याच्या काळातच तालिकोटच्या लढाईच्या आधी राम रायाच्या काळात बांधण्यात आला होता कारण तसा प्राकृत भाषेतला शिलालेख या परिसरात दुर्लक्षित स्थितीत पडलेला होता मात्र भारतीयांच्या इतिहासाविषयीच्या उदासिनतेमुळे हा शिलालेख यानंतर अंबा नदीस आलेल्या वारंवार पुरामुळे आता दिसूनही येत नाही. याच पुलाचा जिर्णोद्धार पुढे १५८० साली गुजरातच्या सुलतान अथवा निजामशाही काळात झाला यावेळी जिर्णोद्धार करताना जुन्या पद्धतीचे बांधकाम नष्ट करुन त्याऐवजी नविन पद्धतीचे बांधकाम करण्यात आले तसेच पुलावर नविन शिलालेख बसवण्यात आला ज्यावर येथिल काजी अल्लाऊद्दीन याचे नाव दिसून येत होते मात्र दुदैवाने हा शिलालेख सुद्धा आता दिसून येत नाही. सन १४९८ मध्ये गुजरातच्या सुलतानाकडे महाराष्ट्रातिल साष्टी, मुंबई,ठाणे वसई पासून नागोठण्याचा प्रदेश होता व उर्वरित महाराष्ट्रात बहामनी राज्य होते. नागोठण्यास त्या काळात गुजरातच्या दक्षिण टोकाकडिल शहर म्हणुन सुद्धा ओळखण्यात येत होते. याच काळी चौलमध्ये पोर्तुगिजांनी शिरकाव केला होता या दोन्ही सत्तांच्या संकरस्थळी नागोठणे असल्याने येथे अनेकदा पोर्तुगिज विरुद्ध सुलतान यांची युद्धे झाली होती. गुजरातचा सुलतान मेहमुद बेगडा याने नागोठण्यात तळ ठोकून चौलवर बरेच हल्ले केले होते. १५२९ साली हेक्टर दे सिल्व्हेरिया ने नागोठण्यावर हल्ला करुन जाळपोळ केली त्याला नागोठण्यातिल सेनापतीने प्रत्युत्तर दिले होते.
मक्का येथून येणार्या काही भाविकांच्या जहाजाला लुटल्याने पोर्तुगिजांविरुद्ध गुजरात सुलतान, निजामशाह आणि आदिलशहा अशा तिन सत्ता एकत्र येऊन युद्ध पुकारले होते या काळी नागोठण्यामार्गे सुकेळी खिंडीतून रेवदंडा खाडीत मोठ्या प्रमाणात घोडदळ, हत्तीदळ तसेच तोफखाने इत्यादींची वाहतुक झाली होती आणि हि वाहतुक सुकर व्हावी यासाठी नागोठण्याच्या विजयनगर कालिन पुलाचा जिर्णोद्धार करण्यात आला होता.
सन १६३६ साली मुघलांनी निजामशाही नष्ट करुन नागोठ्णे आदिलशहाच्या ताब्यात दिले याच काळी पुण्यात शिवाजी महाराजांचा उदय झाला होता. सन १६४३ च्या सुमारास आदिलशाही सत्ता कोकणातली सर्वश्रेष्ट सत्ता होती त्याकाळि नागोठणे विभाग हा सुभे कल्याणच्या अख्यतारित येत असे. सुभा कल्याण हा वैतरणा नदीपासून नागोठण्यापर्यंत् मुल्ला अहमदकडे तर दुसरा सुभा नागोठण्यापासून महाडपर्यंत जंजिर्याच्या सिद्दीकडे होता. सन १६५७ साली शिवाजी महाराजांनि कल्याण सुभ्यावर हल्ला करुन हा सुभा स्वराज्यात आणला अशा तर्हेने नागोठणे शिवाजी महाराजांच्या राज्यात आले. इथे शिवाजी महाराजांनी आदिलशहा विरोधात मोहिम उघडली असताना मुघल सुद्धा मराठ्यांवर हल्ले करण्याच्या तयारित होते आणि या कामासाठी औरंगजेब याने त्याचा मामा शाईस्ताखान यास दख्खनवर पाठवले आणि त्याने पुण्यात तळ मांडला. त्याने पुण्यातून कल्याण सुभ्यावर हल्ला करुन कल्याण स्वतःच्या ताब्यात घेतले मात्र नागोठणे त्याच्या ताब्यात येऊ शकले नाही. नागोठण्यावरिल मोहिम फत्ते करण्यासाठी त्याने करतलब खान उझबेक याची निवड केली. त्याच्या दिमतीला बलाढ्य सैन्य व अनेक सरदार तसेच देशमुख देऊन नागोठण्यावर कुच करण्यास सांगितले. या खानाने लोणावळ्यावरुन अंबा नदीचा जो उगम आहे ति वाट कोकणात उतरण्यासाठी पकडली मात्र शिवाजी महाराजांना या कटाची अगोदरच माहिती लागून ते स्वतः सैन्यासह या परिसरात दाखल झाले होते. दाट रानात जागोजागी मराठा सैन्य लपुन खानाच्या सैन्याची वाट पहात होते. मेंढराचा कळप जसा वाघाच्या तावडित येतो तसा कारतालब खान आपल्या सैन्यासह उंबर खिंडीत येऊन पोहोचला होता. महाराजांना दया येऊन त्यांनी आपला वकिल खानाकडे पाठवला मात्र खानाने उद्धट वर्तन करुन नागोठणे आपण ताब्यात घेणारच अशि दर्पोक्ती केल्याने महाराजांनि सैन्याला हल्ल्याचे आदेश दिले. मराठे सैन्य मुघलांवर तुटून पडले सैन्याची धुळधाण उडवली व खानास अक्षरशः जबरी खंडणी देऊन माफी मागुन पुण्यास पळ काढावा लागला. या लढाईस उंबरखिंडीची प्रसिद्ध लढाई म्हणुन ओळखण्यात येते.
महाराजांना या काळात जंजिर्याच्या सिद्दीचा सुद्धा सामना करावा लागत होता. पुर्वी आदिलशहा व नंतर मुघलांचा मांडलिक झालेल्या या सिद्दीचे राज्य मर्यादित असले तरी नागोठण्याच्या हद्दीस लागून होते. नागोठण्यास शिवाजी महाराजांचा जहाज बांधणीचा कारखाना असून ते मराठा राज्यातले सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असल्याने सिद्दी बर्याच वेळा आपले सैन्य पाठवून नागोठण्यात जाळपोळ करत असे आणि अनावश्यक रक्तपात करुन माणसे, मुले व स्त्रिया गुलाम बनवून मुंबईस नेत असे. सिद्दी संबळने १६७३ मध्ये सुद्धा असे कृत्य केले तेव्हा महाराजांनी रायगड वरुन १०० सैनिक धाडून सिद्दीच्या सैन्याला चकित करुन कापुन काढले. १६७७ मध्ये सिद्दी कासिम परत एकदा नागोठण्यास आला आणि छापे टाकून येथिल रहिवाशांना भंगिकाम आणि अंगमेहनतीचे काम करायला लावले तेव्हा महाराजांनि या घटनेचा बदला घेण्यासाठी आरमार प्रमुख दौलत खान याला ४००० सैन्याच्या तुकडीसह सिद्दीवर कुच करायला सांगितले. पुढे नागोठण्याचे सिद्दी व इंग्रजांपासून रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी व दौलत खान यांना खाडीसमोरील खांदेरी किल्यावर बांधकाम करण्याचे आदेश दिले. हे करताना मराठ्यांना इंग्रजांच्या विरोधाचा सामना करायला लागला. इंग्रजांनी कॅप्टन गेप व केगविन यांना मराठ्यांवर हल्ला करण्यास जहाजे व कुमक सोबत देऊन खांदेरीवर धाडले मात्र मराठ्यांच्या हल्ल्यात गेप ठार झाला व त्याचे जहाज मराठ्यांच्या हाती लागले. केगविनने मराठा आरमारावर हल्ला चढवला आणि रिव्हेंज हे जहाज घेऊन मराठा गुराबांचा नागोठण्यापर्यंत पाठलाग केला. दोनच दिवसांनी मराठा आरमाराने नागोठण्यातून परत इंग्रजांवर हल्ला केला व इंग्रजांचे नुकसान केले. पुढे इंग्रजांना नाईलाजाने मराठ्यांशी तह करावा लागला ज्यामधिल कलमे स्वतः शिवाजी महाराजांनी तयार केली होती यामध्ये एका कलमात नागोठणे व पेण परिसरात मराठ्यांच्या शत्रूला प्रवेश देऊ नये आणि सिद्दीने नागोठणे येथून ज्या नागरिकांना, स्त्रियांना व मुलांना धरुन नेले आहे त्यांची ताबडतोब सुटक करण्यात यावी अशी कलमे होती.
संभाजी महाराजांच्या काळातही नागोठण्याचे राजकिय महत्त्व कायम होते. या काळातही सिद्दीचे नागोठण्यावरिल हल्ले थांबले नव्हते. सिद्दीने लहान लहान नौका नागोठण्यास पाठवून कैद्यांना गुलाम बनवून मुंबईस नेल्याचे कृत्य संभाजी महाराजांना कळल्यावर त्यांनि दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवले होते. १६८१ मध्ये परत एकदा सिद्दीने नागोठण्यात शिरुन जाळपोळ केल्यावर संभाजी महाराजांनी जंजिराच हस्तगत करुन सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे ठरवले व यानंतर संभाजी महाराजांच्या सर्व जंजिरा मोहिमा सिद्दीने नागोठण्यावर जे अत्याचार केले त्याचा बदला म्हणुनच काढल्या असल्याचे लक्षात घ्यावयास हवे. जंजिरा मोहिमेच्या काळात मुघलांनि हसन अलिखानास मोठे सैन्य देऊन कोकणात मराठ्यांविरुद्ध पाठवुन दिले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिरा मोहिम अर्धवट सोडून कल्याण कडे जावे लागले मात्र जाताना त्यांनी नागोठण्याच्या रक्षणासाठी १५००० सैन्याची कुमक तैनात करुन ठेवली होती.
शाहू महाराजांच्या काळात भोसले घराण्यात यादवी सुरु झाली या यादवी मध्ये ताराराणींच्या पक्षात असलेल्या कान्होजी आंग्रे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी आवाहन करण्यास शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना कोकणात धाडले होते. बाळाजी विश्वनाथ हे अवचितगडावरुन नागोठणे प्रांतात येऊन त्यांनि कान्होजी आंग्रे यांची भेट घेतली व आपल्या पक्षात घेतले तसेच शाहू महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब देऊन संपुर्ण कोकणपट्टीची जबाबदारी सोपवली.
पेशवे काळात नागोठण्यामध्ये नाण्यांची टांकसाळ तसेच तोफ गोळे बनवण्याच्या कारखान्यांची निर्मिती झाली होती. याशिवाज नारायणराव पेशवा खुनाच्या कटात सामिल असलेले रघुनाथराव पेशवे गटातले एक सदस्य सरदार आबाजी महादेव हे नागोठण्याचे नागरिक होते. या गुन्ह्याबद्दल त्यांना नागोठण्यातून अटक करुन कुटूंबियांसह सुरगड किल्यावर अटकेत ठेवण्यात आले होते.
सन १७९६ नंतर आंग्रे घराण्यात जि यादवी सुरु झाली त्यामध्ये सुद्धा नागोठण्याचा सहभाग विशेष महत्त्वाचा होता रघोजी आंग्रे मरण पावल्यावर त्यांचे पुत्र मानाजी, कान्होजी व सावत्र पुत्र जयसिंग यांच्या गृहकलह निर्माण झाल्यावर जयसिंगास अटक करुन त्याच्या परिवारास नजरकैदेत ठेवण्यात आले मात्र जयसिंग आंग्रेची पत्नी सकवारबाई हिने नजरकैदेतून सुटका करुन नागोठण्याचा किल्ला ताब्यात घेऊन तेथून तिने बंडाचा झेंडा फडकविला आंग्र्यांच्या राज्यात धुमाकुळ घालू लागली कालांतराने जयसिंगाने आपली सुटका करुन घेऊन तो सुद्धा पुण्यास पेशव्यांकडे गेला.
पुढे आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे यांनी जयसिंगाच्या मदतीसाठी अलिबाग येथे कुच केले ग्व्हाल्हेरच्या दौलत राव शिंदे यांनी आपले सरदार भावे यांस बंदुका आणि चारशे घोडेस्वार देऊन बाबुरावाच्या मदतीने कुलाबा सर करण्यास पाठवले. हे सैन्य पुण्याहून निघून खंडाळ्यास थांबले. अलिबाग ला आल्यावर सैन्याने हिराकोटला वेढा दिला पण जयसिंग गुपचुप निसटून रात्री नदी पोहत कुलाब्यास आला. बाबुराव यांनी हिराकोट ताब्यात घेऊन मानाजी, कान्होजी आणि जयसिंग यांना पकडले. यानंतर सकवारबाईने नवर्याच्या मदतिस जाऊन खांदेरी किल्ला काबिज केला. इ.स.१७९९ मध्ये मानाजी आणि कान्होजी हे पुण्यास पळून गेले आणि काही माणसे मदतीस घेऊन परत आले. बाबुरावाने खांदेरीस वेढा दिला पण त्यात त्यांची माणसे मारली गेली परत एकदा बाबुरावाच्या सैन्याची आणि मानाजी व कान्होजीच्या सैन्याची गाठ चौल व नागोठणे येथे पडून तुंबळ युद्ध झाले आणि यात मानाजी आणि कान्होजी या दोन्ही भावांचा पराभव होऊन कैदी बनवण्यात आले. यानंतर बाजिराव दुसरा याने बाबुराव यांना सरखेलपद दिले.
जानेवारी १८१८ मध्ये कर्नल प्रोथर ने ३८० इंग्लिश आणि ८०० स्थानिक सैनिकांच्या सहाय्याने अवचितगड, नागोठणे, सोनगड, पाली हि ठिकाणे ताब्यात घेतली. सन १८१८ ते १८४० च्या दरम्यान ब्रिटीश सत्ता आणि आंग्रे, पंतसचिव यांच्यात गावे ताब्यात घेण्यावरुन देवाणघेवाण झाली. यानंतर सांक्षी, राजपुरी व रायगड उपविभाग ब्रिटीश सत्तेखालील रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यात आले. सन १८३० साली ठाण्याला जिल्हा केल्यामुळे हे सर्व उपविभाग ठाण्यास जोडण्यात आले. ब्रिटीशांच्या आधि हा परिसर आंग्रे आणि पंतसचिव यांच्यामध्ये विभागला होता. नागोठणे विभागातली खेडी पंतसचिव आणि आंग्रे यांच्या ताब्यात होती. सन १८३० मध्ये नागोठण्यातला अर्धा भाग ब्रिटीशांना देऊन त्याबदली भोरकरांनी अवचितगडचा निम्मा भाग स्वतःकडे घेतला. पुढे १८३३ मध्ये ब्रिटीशांनी आंग्रेंकडून नागोठणे भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा अर्धा भाग आंग्य्रांना दिला. रघोजी आंग्रे यांचा मुलगा दुसरा कान्होजी याच्या मृत्यूनंतर आंग्र्यांच्या गादीस वारस नसल्याने इंग्रजांनी १८३९ साली कुलाबा संस्थान खालसा करुन ब्रिटीश राज्यात विलीन केले आणि ब्रिटीश कायदे लागू झाले. १८४० साली रामोशी स्वातंत्र्य सैनिकांचा एक संघ भोर संस्थानाहून घाटावरुन खालि उतरली आणि त्यांनी ब्रिटीशांच्या ताब्यातल्या पाली आणि आणि नागोठणे गावावर हल्ला चढवला आणि ति गावे जाळून टाकली. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटीशांनि नेटीव्ह लोकांच्या १५ व्या रेजिमेंटला पाचारण केले यामध्ये अनेक रामोशी पकडले गेले किंवा मारले गेले. ऑक्टोबर १८४४ साली तुंगारतन, कर्नाळा, वाक्रुळ, हवेली, अंतोरा हि ठिकाणे ठाणे जिल्ह्यात घेऊन नागोठण्याचा दर्जा कमी केला गेला आणि नागोठण्याचा साक्षी प्रांतात समावेश केला. १८५२ साली इंग्रजांनी कुलाबा एजन्सी रद्द केली आणि या एजन्सी मधली खांदेरी, रेवदंडा, सांक्षी, राजपुरी, रायगड उपविभाग आणि नागोठणे, तळा, निजामपुर, गोरेगाव, बिरवाडी आणि पोलादपुर हे लहान विभाग एकत्र करुन कुलाबा उपजिल्हा तयार केला. पुणे सार्वजनिक सभेने सुरु केलेल्या १८५७-१८७६ च्या दुष्काळविषयक मोहिमेनंतर १८९६ च्या दुष्काळात, दुष्काळ निवारण कार्यासाठी सार्वजनिक सभेने मोठी मोहिम काढली. १८५६ साली भोर संस्थानाने नागोठण्यात पहिली देशी शाळ उघडण्यात आली. हि रायगड जिल्ह्यातली महाड नंतर उघडलेली दुसरी देशी शाळा होती. डिसेंबर १८९६ मध्ये सार्वजनिक सभेच्या दुष्काळ समितीने पनवेल, पेण, नागोठणे, गोरेगाव व रेवदंडा येथे शेतकर्यांच्या सभा आयोजित करुन दुष्काळ निवारण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार करण्याचा चंग बांधला. सन १८८२ साली तत्कालिन जिल्ह्यातली अलिबाग, पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि महाड उपविभागत १०६४ गावांचा समावेश होता. सन १९२१-१९३१ च्या दरम्याने नागोठणे महाल खालसा करण्यात आले.
ब्रिटीशकाळातसुद्धा नागोठणे गावाचे पेठ व महालाचे स्वरुप कायम होते आणि अनेक सरकारी कार्यालये आणि कचेर्या तिथे स्थापन झाल्या ज्या आजही येथे पहावयास मिळतात . एक जुन ते ३१ ऑगस्ट हे पावसाचे तिन महिने सोडले तर नागोठणे बंदर त्याकाळि चोविस तास गजबजलेले असे. गोरेगाव, इंदापुर, कोलाड, खांब, पाली सुधागड ते अगदी महाबळेश्वरपर्यंतचे मुंबईत जाणारे प्रवासी नागोठणे बंदरात येत. या प्रवाशांचा नागोठणे बंदराकडे होणारा प्रवास बैलगाडीतून असे आणि जिकडून तिकडून चाळिस पन्नाच कि.मी. बैलगाडीतून येऊनही बोट चुकली म्हणजे दुसर्या दिवशी भरती ओहोटीची वेळ पाहून नागोठ्णे बंदरावर बांधलेल्या धर्मशाळ्त प्रवाशांना मुक्काम करावा लागत असे.त्यामुळे परिसरात जिकडे तिकडे बैलगाड्या सोडलेल्या असत व सोडलेले बौल गळ्यातल्या घुंगरांना मंजुळ झटका देऊन रवंथ करताना दिसत. सायंकाळी प्रवाशांच्य पेटलेल्या चुलीमुळे बंदरावर ठिक ठिकाणी चुलींचा उजेड दिसत असे आणि चुलीवर भाजल्या जाणार्या भाकर्या किंवा घमघमणार्या सुक्या मासळीच्या कालवणारे हा परिसर धुंद होत असे. १९१८ च्या दशकाच्या अखेरपर्यंत नागोठणे-धरमतर्-मुंबई या जलवाहतुकिच्या मार्गावरुन तांदुळ, मिठ, मासे, जंगली लाकुड, तांब्या पितळेची भांडी या मालाची निर्यात होत असे. १९१४ ते १५ या दरम्याने धरमतर ते नागोठणे स्टीम बोट सेवा चालत असे मात्र पुढे बंदर गाळात सापडल्याने हि वाहतुक बंद पडली. तरी मुंबईहून महाबळेश्वरपर्यंत प्रवासी नागोठणे बंदरात उतरुन प्रवास करत असत. आजुबाजुच्या डोंगर माथ्यावरिल बेछुट आणि अविरत जंगलतोड यामुळे कोकणातील एकेकाळी हिरवेगार असणारे डोंगर आज उघडे बोडके दिसतात. हि परिस्थिती सुधागड तालुक्यातल्या अंबा नदीच्या उगमापासून नागोठण्यापर्यंत कायम आहे. जंगलतोडीमुळे डोंगरावरिल माती व जमिन जोरदार पावसामुळे सुटून नदीत आली आणि खाडीपर्यंत सरकली त्यामुळे गाळ साचून बोट सेवा बंद पडली. त्यामुळे गेली ५००० वर्षे उत्कर्षाच्या शिखरावर असलेले हे ऐतिहासिक नागोठणे बंदर काळाच्या ओघात नाहिसे झाले आणि नागोठण्याचे व्यापारी आणि ऐतिहासिक महत्त्वही त्याबरोबर संपुष्टात आले.
नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाकडे पाहिले तर अभिमानाने उर दाटून येतो मात्र इतिहासाचे जतन करण्यामध्ये जि उदासिनता आपण दाखवतो ति नक्कीच दुर्दैवी आहे. नागोठण्याच्या वैभवशाली इतिहासाचे जतन होण्यासाठी लोकजागृती होण्याची नितांत गरज आहे यासाठी शहराच्या इतिहासाचे संकलन करुन नागोठण्याच पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, गावातल्या सोळाव्या शतकातल्या ऐतिहासिक पुलाचे तसेच इतर ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे रक्षण करणे, गावात पुरातत्विय दृष्ट्या उत्खनन करुन नाहिशे झालेले शिलालेख अथवा इतर ऐतिहासिक पुरावे शोधून काढणे, गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे इत्यादी उपक्रम राबवणे गरजेचे आहे अन्यथा नागोठण्याचा वैभवशाली इतिहास इतिहास जमा होण्यास वेळ लागणार नाही. कोकणपट्ट्यातल्या वाढत्या शहरीकरणाच्या अजगराने ठाणे (स्थानक), मुंबई (पुरी), साष्टी, वसई (विषय), नालासोपारा (शुर्पारक), पनवेल (पन्नगपल्ली) अशी अनेक ऐतिहासिक शहरे एकामागुन एक अशाप्रकारे गिळंकृत केली आहेत कि आज तिथे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणे कठिण झाले आहे. उद्या नागोठण्याची स्थिती सुद्धा अशीच होण्याआधी या वैभवशाली इतिहासाचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे अन्यथा शहरीकरणाचा अजगर या ऐतिहासिक शहरास
अशा रितीने गिळंकृत करेल कि या ठिकाणी नागोठणे नावाचे एक गाव अस्तित्वात होते हे देखिल पुढील पिढीच्या लक्षात राहणार नाही.
मेढे-चौल रस्त्यावरील अद्भुत विरगळी
रायगड जिल्हा हा विवीधतेने नटलेला जिल्हा असून येथे दर आठवड्यास लाखो पर्यटकांनी गजबजणारी पर्यटनस्थळेही आहेत व दुर्गम भागातील अपरिचीत व पर्यटकांना पारखी अशी स्थळेही आहेत. रायगड जिल्ह्याची भौगोलिक विवीधता पाहता येथे डोंगर, दर्या व अरण्यांनी व्यापलेला असा खुप मोठा प्रदेश आहे व या प्रदेशातली अनेक वैशिष्यपुर्ण स्थळे अजुन प्रसिद्धीच्या झोतात यावयाची आहेत. मात्र यासाठी रुळलेल्या वाटा सोडून थोडं आडवाटेचा प्रवास करायला हवा तरच ही रहस्यमयी स्थळे पाहता येतील.
जिल्ह्यातील काही प्रमुख मार्ग वगळले तरी दुर्गम भागातील गावागावांना जोडणार्या अनेक रस्त्यांची साखळी आहे. यातील काही मार्ग अतिशय पुरातन असून सातवाहन पुर्व काळापासून वहिवाटीत आहेत व असे रस्ते इतिहासप्रेमींसाठी जणू पर्वणीच असतात. असाच एक प्राचिन रस्ता म्हणजे चौल या प्राचिन व्यापारी शहरापासून मेढा-नागोठणे मार्गे मावळात जाणारा रस्ता. हा रस्ता सध्याच्या नागोठणे-रोहा राज्यमार्गावरील मेढा या गावातून पुर्वेस वळतो. याच प्राचिन काळातल्या प्रमुख रस्त्याच्या संरक्षणासाठी मेढा येथील एका मोक्याच्या ठिकाणी अवचीतगड या अभेद्य दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. हा रस्त्या कुंडलीका खाडीच्या पुर्वेकडून समांतर दिशेने जातो व वावेखार, यशवंतखार, कुडे, सुडकोली, मालाडे, रामराज सारखी गावे या रस्त्याला लागतात. या रस्त्यात जागोजागी दिसणारे जलाशयाचे साठे पुर्वी या रस्त्यांवरील प्रवाशांची तहान भागवत असत. यशवंत खार हून एक वळण घेतल्यावर खर्या अर्थी कुंडलीका नदी संपून खाडीस सुरुवात होते, डोंगर दर्यामधून प्रवास करताना अधुन मधुन या विस्तीर्ण खाडीचे दर्शन मंत्रमुग्ध करते हीच खाडी पुढे रेवदंड्याची खाडी बनते. या रस्त्यास चौलकडे जाणारे काही उपमार्ग आहेत मात्र मुळ रस्ता रामराहून बोरघर, बापळे, वासखार, वावे असा आहे. याच रस्त्यावर बापळे नावाचे गाव आहे, या ठिकाणी रस्ता अतिशय निर्जन होतो मात्र याच परिसरात काही ऐतिहासिक ठेवे आहेत याचा थांगपत्ता तोपर्यंत लागत नाही जोपर्यंत एक मंदिर आपल्या पहाण्यात येते.
रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या या मंदीरात काही अद्भुत विरगळी पहावयास मिळतात. विरगळ म्हणजे विरांचे स्मारक व ही स्मारके सध्याची नसून चालुक्य, शिलाहार तथा यादवकाळातील असायची. विरगळ हा शब्द विरकल्ल या कन्नड शब्दापासून तयार झाला असल्याचे सांगितले जाते व या विरगळींचा काळ चालुक्य काळ ते मराठेकाळाची सुरुवात असा असून कालांतराने ही पद्धत कमी होत गेली. विरगळ, गद्धेगळ, सतीशिळा हे शब्द इतिहास अभ्यासकांना नवीन नसले तरी इतरांसाठी नवीन आहेत. या विरगळी म्हणजे कोरीव शिळा असून यावर त्या काळातल्या युद्धाचे प्रसंग कोरले जात असत, प्रामुख्याने या विरगळी ज्या स्थळी असत त्याच परिसरात हे संग्राम झालेले असायचे त्यामुळे त्या समरांगणी धारातिर्थी पडलेल्या विरांच्या स्मरणार्थ युद्धाचा प्रसंग कोरण्याचा प्रयत्न विरगळींच्या माध्यमातून केला जात असे. अशा विरगळी महाराष्ट्राच्या अनेक भागात सापडत असल्या तरी ही विरगळी वेगळी व अद्भुत आहे. ही विरगळी तीन स्वरुपांत पहायला मिळत असली तरी मुळात दोनच विरगळी असाव्यात व यातील एका विरगळीचे दोन भाग होऊन एकुण तिन झाल्या असाव्यात असा अंदाज येतो. या विरगळींची कालनिश्चीती करणे कठीण आहे कारण येथे को़णताही लेख नसल्याने किंवा प्राचिन काळी कुठल्या युद्धाने येथे आकार घेतला याचे पुरावे नसल्याने या चालुक्यकालीन आहेत, शिलाहार कालीन आहेत की यादव कालीन हा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते. येथील एका विरगळीवर एकूण तिन प्रसंग कोरले असून पहील्या भुमीत गाडल्या गेलेल्या समशेरी व दुसर्या तथा तिसर्यामध्ये या युद्धात भाग घेतलेल्या सैनिकांच्या व्युहाचे वर्णन असावे. एका भल्या मोठा दोरखंडास धरुन हे सैनिक चाल करीत आहेत असे प्रथमदर्शनी पाहील्यावर वाटते मात्र हजारो वर्षांच्या स्थित्यंतरांमुळे पाषाणाची झिज झाल्याने ठाम मत बांधता येत नाही. दुसर्या विरगळीचेही तिन भाग असून या तिनही भागात एकून सहा समशेरी उलट्या जमिनीत गाडल्या गेल्याचे दिसून येते, तिसरी विरगळ भग्न असून यावरही अशीच एक अद्भुत आकृती आहे मात्र भग्न असल्याने याही आकृतीचा थांग लागत नाही या सर्वाचा सांकेतीक अर्थ काय ते तज्ञांकडूनच जाणून घेता येईल.
अर्थात या सर्व विरगळी प्राचिन काळी याच परिसरात झालेल्या एका दुर्धर संग्रामाचे प्रतिनिधीत्व करतात, चौल हे सातवाहन काळी मोठी बाजारपेठ असल्याने तसेच चौल मार्गे मावळात जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने याच ठिकाणी त्या काळातल्या काही प्रमुख सत्तांमध्ये दुर्धर रणसंग्राम झाला असावा व त्यांच्याच स्मरणार्थ या विरगळींची निर्मीती येथे करण्यात आली असवी. हा भाग खाडी किनारी असल्यामुळे फार पुर्वीपासून समुद्रमार्गे येथे परकियांचे हल्ले होत असत व या भुभागाचे रक्षण करण्याकरीता येथील स्थानिक सत्ता प्राणांची बाजी लावीत असत तेव्हा असेच एखादे परकिय आक्रमण थोपावताना हे अज्ञात विर धारातिर्थी पडले असावेत. दुर्दैवाने प्राचिन काळातील लिखीत पुराव्यांचे प्रमाण कमी असल्याने या अज्ञात विरांची नावे मिळणे दुरापास्तच असते मात्र त्यांनी या भुमीकरीता वेळोवेळी दिलेल्या बलीदानामुळेच आपण वेळोवेळी स्वातंत्र्य उपभोगित आलो हे विसरता कामा नये. मेढामार्गे चौल या रस्त्यावरील या विरगळी त्या सर्व अज्ञात विरांना नकळत मुजरा घालण्यास भाग पाडतात व भविष्यातील कार्यासाठी स्फुर्ती देतात. अशा अनेक विरगळी, गद्धेगळी, सतीशिळा रायगड जिल्ह्यात जागोजागी आहे व या फक्त शिळा नसून त्याकाळातला इतिहास आहे जर या सर्व स्थळांची खानेसुमारी करुन कोश तयार केल्यास प्राचिन रायगड जिल्हाचा सुसंगत इतिहास तयार होण्यास मदत होऊ शकते तेव्हा या विरांच्या स्मरणार्थ का होईना या आडवाटेवरुन एकदातरी प्रवास करावाच.
चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा
रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत.
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास
जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे.
मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा संपुर्ण फेरफटका मारणे अगत्याचे ठरते. चांदोरे गावात पुर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तिवात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी गेलेले. मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असल्याने चांदोरेकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागास इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला एवढेच नव्हे तर येथील नागरिकही या उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले, मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक के चांदोरे गावाचा अविभाज्य घटकच झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही अर्थात याबद्दल चांदोरे गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले पाहीजे.
चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे म्हणजे पुर्वेकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे उत्खनन चालू असून अनेक नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. डावीकडल्या रस्त्यावरुन चालायल लागल्यावर प्रथम दिसतो तो विस्तिर्ण असा जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभुमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याचे पारणे फेडतो. जलाशये, विहीरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत, चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवितो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खुप वैभवसंपन्न व भरभराटीत असावे, चांदोरे गावाच्या ज्ञात इतिहासाबाबत अजुन बरीच माहिती प्रकाशझोतात यायची आहे मात्र या गावाचे पुर्वीचे नाव चंद्रपुर असावे असा कयास बांधता येवू शकतो, शिलाहारांच्या ताम्रपटांत व शिलालेखांत अनेकवेळा चंद्रपुर असे उल्लेख येतात अर्थात चांदोर या नावाची अनेक गावे अस्तित्वात आहेत मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातल्या चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या जलाशयाच्या कडेने चालत गेल्यावर प्रथम दिसते ते एक शिवमंदीर, कौलारु छप्पर असलेले हे शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. याच शिवमंदीरात चांदोरे परिसरात उत्खनन चालू असताना सापडलेल्या काही प्राचिन सतीशिळा, विरगळी व मुर्त्या पहायला मिळतात. येथे पहावयास मिळणारी शेषशायी विष्णूमुर्तीरायगड जिल्ह्यात क्वचितच सापडेल. ही मुर्ती पाहता या परिसरात प्राचिन काळी वैष्णवपंथिय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते अर्थात या मुर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्यशैलींशी जुळणारी असल्याने इसवी सनाच्या ७व्या शतकापासून ८व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेचा या गावातील स्थापत्यशैलींशी संबध असण्याची शक्यता बळावते. सन ७५३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजघराण्याची इतिश्री केली. चालुक्य राजघराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्यशैलीमध्ये विष्णूची रुपे पहावयास मिळतात. राष्ट्रकुटांनी चालुक्यांविरुद्ध मदत केल्याबद्दल शिलाहार राजघराण्यास पुर्ण कोकणाची सत्ता दिली त्यामुळे कालांतराने या परिसरावर शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले जे ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले. येथे पहायला मिळणारी मिळणार्या सतीशिळा व विरगळी ही याच गावात झालेल्या एका महासंग्रामाच्या प्रतिक आहेत ज्यामध्ये चांदोरे गावाचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्याचे निरिक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आढळून येतो, पुर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारार्तिथी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजाचे स्मारकाप्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालिन युद्धाचे जीवंत प्रसंग कोरले जात. चांदोरेच्या विरगळीमध्ये दाखालेल्या प्रसंगात दोन अश्वारुढ व्यक्ती हातात भाले अथवा तरवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती तर स्त्रीसदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळी सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्यत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वर कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देव्-दानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता आहे.
याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी कारण या शिळेवर कोरलेला प्रसंग हा कुणा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे कारण यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरुढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे तसेच खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी व एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामत धारातिर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय येथे गणपती तसेच इतर देवतांच्या भग्नावस्थेतल्या मुर्त्या सुद्धा आढळून येतात.
या मुर्त्या पाहून आपण मंदीराबाहेर येऊन त्याच रस्त्यास लागलो की काही अंतरावर डाव्या बाजुला पुरातन अवशेष असल्याचा भास होतो अर्थात हेच ते ठिकाण जेथे सध्या उत्खनन चालू आहे. रस्ता सोडून आपण खाली उतरलो कि भरलेल्या गवतातून जाणार्या रस्त्याचा आजुबाजुला काही जुन्या घरांची जोती दिसून येतात तसेच उजव्या बाजुस एक भग्नावस्थेतला नंदी दिसून येतो, हे शिवमंदीराचे अवशेष असावेत हे लक्षात येण्यास वेळ लागत नाहीत. याच शिवमंदीरासमोर एक भलीमोठी जांभ्या दगडात खोदून काढलेली पायर्यांची विहीर अर्थात पुष्करणी आहे, या विहीरीत जाण्यास रस्ता आहे व याच रस्त्यात काही कोनाडे कोरले आहेत ज्यातल्या एका कोनाड्यात उमा माहेश्वराची मुर्ती दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेले उत्खनन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ते पुरातत्ववेत्ते व त्यांच्या सहकार्यांनी या संपुर्ण पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचिन अवशेष अवगत केले आहेत ज्यांच्यावर सध्या अभ्यास सुरु आहे.
चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत स्थित आहे त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर नावाचे एक गाव लागते तिथे अमृतेश्वर हे प्राचिन व सुरेख असे शिवमंदीर आहे, या शिवमंदीराचा व चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता आह. कारण ज्या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदीराबाहेर सुद्धा आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचिन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडावयाचा आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढला आहे, लांबुन लांबुन अगदी परदेशातून पर्यटक हे प्राचिन वैभव पाहण्यासाठी गावास भेट देत आहेत व चांदोरे गावातले नागरिक त्यांना आस्थेवाईपणे मार्गदर्शन करत आहेत. चांदोरे गावच्या उत्खननासोबत रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधून काढण्याच्या पर्वास सुरुवात झाली आहे व भविष्यात याचा फायदा रायगड जिल्ह्याच्या स्थानिक पर्यटन विकासाला व रोजगारास होईल अशी आशा करुयात.
सरसगडाच्या कुशीतले बल्लाळेश्वराचे पाली
रायगड जिल्ह्यास जसा ऐतिहासिक व भौगोलिक वारसा आहे, त्याचप्रमाने धार्मिक व सांस्कृतीक वारसा सुद्धा आहे. येथे अनेक धार्मिक स्थळे आहेत जी राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत, या देवतेस आपल्याकडे आराध्यदेवतेचा मान दिला जात असल्याने कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही गणपतीची पुजा करुनच केली जाते व ही आजची नव्हे तर पुरातन कालापासून चालत आलेली प्रथा आहे.
गणपतींची अनेक स्थाने महाराष्ट्रात आहेत मात्र त्या सर्वांत अष्टविनायक हे सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. गणपतीवर श्रद्धा असणारे सर्व भाविक अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे कधीच चुकत नाहीत. अष्टविनायकांपैकी एकून दोन विनायक खुद्द रायगड जिल्ह्यातच आहेत. यातला एक म्हणजे महडचा वरदविनायक व दुसरा पाली गावचा बल्लाळेश्वर, बल्लाळेश्वरामुळे या गावास 'बल्लाळेश्वराची पाली' असे नामाभिमान प्राप्त झाले आहे. पाली हे गाव मुंबई गोवा हायवेवर लागणार्या वाकण गावापासून आठ कि.मी. अंतरावर खोपोली पुणे मार्गावर आहे व मुंबई व पुण्याहून सारख्याच अंतरावर आहे. अंबा नदीच्या तिरावर व सरसगडाच्या कुशीत वसलेल्या या गावास प्राचिन इतिहास आहे, पाली हा पल्ली या नावाचा अपभ्रंश आहे, पल्लीचा अर्थ नगर असा होतो, याशिवाय या गावास इतर कुठेही आढळून न येणारी जुन्या धाटणीची वेस आहे यावरुन पालि हे पुरातन काळापासून एक टुमदर नगर म्हणुन प्रसिद्ध होते हे स्पष्टच आहे . प्राचिन महाराष्ट्राचा सुसंगत इतिहास सातवाहन कालापासून मिळतो, त्याकाळी परदेशातून आयात अथवा निर्यात केलेला माल कोकणातून देशावर जात असे किंवा देशावरुन कोकणात येत असे, अशाच एका महत्त्वाच्या प्राचिन हमरस्त्यावर पाली आहे याला दुजोरा याच परिसरात असलेल्या ठाणाळे-नाडसुर, गोमाशी व घाटमाथ्यावरील अनेक लेण्या देतात. याशिवाय हे गाव ज्या सरसगडाच्या पायथ्याशी वसले आहे तो सरसगड पुरातन कालापासून या व्यापारी रस्त्याचा संरक्षक म्हणुन सेवा करीत होता, आजही या किल्ल्याच्या पोटात अनेक लेण्या, कोठारे व टाक्यांचे अवशेष आढळतात जे प्रामुख्याने सातवाहन कालीन असावेत.
येथील श्री बल्लाळेश्वर व श्री धुंडीराज ही दोन गणेशदैवते तर समस्त भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. या दोनही देवस्थानांना प्राचिन इतिहास असून पुराणात यांचे उल्लेख आढळून येतात. गणेश पुराणात पालीचा उल्लेख 'सिंधुदेशे विख्याता पल्लीनामा भवत्पुरी' असा उल्लेख असून मुद्गल पुराणात 'सिंधुदेशे समाख्याता पल्लीनामा पुरी पुरा' असा उल्लेख आहे यावरुन बल्लाळेश्वराची व पालिची प्राचिनता लक्षात येते. गणेश पुराणात विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे व मुद्गल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे. या कथा पुढीलप्रमाणे, कृत युगात पल्लीपूर नांवाचे नगर होते. या पल्लीपुरात कल्याण नामक वाणी रहात असे, त्यास बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. हा बल्लाळ लहानपणापासूनच गणेशचिंतनात मग्न असे. गणेशचिंतनान मग्न राहिल्यामुळे त्याचे अभ्यासात व व्यापारात दुर्लक्ष होते, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले मात्र बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री स्वतः प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला मात्र बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे. बल्लाळेश्वर फार प्राचिन असल्याचे सर्वज्ञातच आहे मात्र बल्लाळेश्वराच्या मंदिराचे फार पुरातन काळापासून अनेक जिर्णोद्धार झाले असावेत, सध्या जे मंदीर दिसून येते त्याची धाटणी पेशवेकालीन आहे, कारण पेशवे हे गणेशभक्त होते. बाबुराव फडणिस यांनी पुर्वीच्या लाकडी मंदीराचे भक्कम अशा दगडी मंदिरात रुपांतर केले. या मंदिराची रचना करताना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण बारकावे वापरले आहेत, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत, हे मंदिराचे बांधकाम करण्यासाठी लागणारे दगड काढताना खोदकाम करुन झाले असावेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिर्यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भलीमोठी पितळेची घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी वसईच्या विजयातून मिळवली होती. तसेच या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेला चुन्याचा प्रचंड घाणा मंदिराच्या प्रांगणात आजही पहावयास मिळतो. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यापुर्वी श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे व दर संकष्टी चतुर्थीस व विनायकीस लाखो भाविक राज्यभरातून दर्शनास येत असतात. श्री बल्लाळेश्वराची मुर्ती अतिशय तेजस्वी असून भव्य आहे, डाव्या सोंडेची ही मुर्ती तीन फुट उंच आहे.
येथील सरसगड हा किल्ला म्हणजे जणू बल्लाळेश्वराची प्रतिकृतीच, खुप दुरवरुन याचे दर्शन झाल्यास साक्षात बल्ला़ळेश्वराचेच दर्शन झाल्याचा आभास होतो. याच्या पगडीसारख्या आकारामुळे यास पगडिचा किल्ला असेहि एक स्थानिक नाव आहे मात्र बर्याचदा अनेक पर्यटक याचा सुधागड असा चुकीचा उल्लेख करतात, सुधागड हा वेगळा किल्ला असून सह्याद्रीच्या जवळ आहे. हा किल्ला अतिशय दुर्गम व अभेद्य असून पाहणार्याच्या छातीत धडकी भरवणारा आहे. पाषाणाचा एकसंध कडा असल्यामुळे हिवाळ्यात हा थंड झाल्यास पुर्ण पाली गावात गारवा निर्माण होतो व उन्हाळ्यात तापल्यामुळे पाली गावाचे तापमान बरेच तप्त असते. निजामशाही काळात पालीस मामलेदार कचेरी होती, त्यावेळी पालीस मामले अमिनाबाद असेही नाव होते. राजाराज महाराजांचे सेनापत शंकराजी नारायण यांनी हा भाग ताब्यात घेतल्यावर अगदी १९४८ सालापर्यंत हा भाग पंतसचिवांच्याच ताब्यात होता, संस्थाने खालसा झाल्यावर हा भाग रायगड जिल्हास जोडण्यात आला व सुधागड नावाचा तालुका निर्माण करुन पालि हे त्याचे मुख्यालय करण्यात आले. तर असे हे पाली खर्या अर्थाने धार्मिक, ऐतिहासिक व भौगोलिक वारश्याने नटलेले सर्वसंपन्न असे गाव आहे.
अक्षी - मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं
अलिबागहून चौल-रेवदंड्याच्या रस्त्याला लागलं की पाच कि.मी. अंतरावरच्या एका वळणावर आक्षी नावाचं एक टुमदार गावं लागतं. वळणावरचं असलेल्या एका अर्वाचिन स्तंभावरुन हे गावं आल्याची चाहूल लागते. आक्षी व नागावं ही जुळी भावंड, निसर्गरम्यताव व ऐतिहासिकता यांच्या बाबतीत या दोन्ही गावांत विलक्षण साम्य दिसून येते.
गेल्या काही वर्षांपुर्वी अक्षी हे गाव आपल्या निसर्गरम्यतेसाठी व स्वच्छ पांढर्या वाळूच्या समुद्रकिनार्यासाठी प्रसिद्ध होतं, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अक्षीची ओळख मराठीतल्या पहील्या शिलालेखाचे गावं म्हणुन समोर आली आहे.
अक्षी गावात शिरणार्या मुख्य रस्त्यास लागलं की काही अंतरावर सोमेश्वराचे प्राचिन शिवमंदीर आहे, याच परिसरात मराठीतला प्राचिन व पहीला शिलालेख पहावयास मिळतो. एका गधेगळीवर कोरलेला हा शिलालेख देवनागरी लिपीत असून संस्कृत-मराठी मिश्रीत आहे, संशोधनाअंती या शिलालेखाचा काळ १६ मे १०१२ असा ठरला याचा अर्थ २०१२ साली या शिलालेखास हजार वर्षे पुर्ण झाली. त्याकाळी संपुर्ण कोकण प्रांतावर शिलाहार नावाचे राजघराणे राज्य करीत होते, हे शिलाहार राष्ट्रकुट नामक साम्राज्याचे मांडलिक असून यांच्या तीन शाखा अस्तित्वात होत्या त्यांना उत्तर कोकण शाखा, दक्षीण कोकण शाखा व कोल्हापुर शाखा असे म्हटले जाते. अक्षीचा शिलालेख हा उत्तर कोकणच्या शिलाहार शाखेचा राजा केशिदेवराय याच्या काळातला हा शिलालेख असून केशिदेवाचा महाप्रधान भइर्जु सेणूई याने अक्षी गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दिले असल्याचे या शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. या शिलालेखाबरोबरच या परिसरात आणखी एक यादवकालीन शिलालेख दिसून येतो सन १२९१ सालचा हा शिलालेख यादव नृपती रामचंद्रदेव यांच्या काळातला असून त्यांचे मांडलिक जाईदेव यांचा पुत्र ईश्वरदेव क्षत्रीय याने देवीस एक गद्याण दान दिले असे शिलालेखात नमुद करण्यात आले आहे. अर्थात या दोन्ही शिलालेखांमधले उल्लेख हे कालंबिका देवीचे आहेत हे लक्षात यायला वेळ लागत नाही.
अक्षी गावातील कालंबिका माता मंदीर व सोमेश्वर महादेव हे शिवमंदीर समस्त अक्षीकरांची आराध्य दैवते आहेत. कालंबिका मंदीराचा जिर्णोद्धार झाला असून देवीचे सर्व उत्सव ग्रामस्थ भाविक अतिशय उत्साहाने साजरे करत असतात. कालंबिका मंदीराच्याच आवारात काही काळांपुर्वी प्राचिन गजांतलक्ष्मीची मुर्ती आढळली, आता तिची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी कालंबिका मंदीराशेजारीच एक छोटेखानी मंदीर बांधून केली आहे. या शिवाय सोमेश्वर महादेव शिवमंदीरही अतिशय प्रेक्षणीय आहे या मंदीरातला प्रवेश धीरगंभीर व मंत्रमुग्ध वातावरणाचा अनुभव देतो. या मंदीरातील नंदीची मुर्ती भलीमोठी
असून एवढी मोठी मुर्ती आजुबाजुच्या परिसरामध्ये क्वचितच पहावयास मिळते.
अक्षी गावाचे नाव कसे पडले असावे हा अभ्यासाचा विषय आहे. अक्षी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ नेत्र किंवा अक्ष असा होतो. प्रत्येक गावाच्या नावामागे एक अर्थ दडलेला असतो ज्यावरुन गावाच्या आद्य इतिहासाचा थोडाफार निष्कर्ष लावता येतो. अक्षी हे गाव साखरखाडीच्या जवळच असल्याने व येथून उत्तर व दक्षीणेकडिल खुप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने टेहळणीसाठी या प्रदेशाचा वापर पुर्वी मोठ्या प्रमाणात होत असावा आणि भौगोलिक दृष्ट्या अक्षी हे गाव अष्टागरांच्या मधोमध येत असल्याने अष्टागराची नेत्रे या अर्थी या गावास हे नाव मिळाले असल्याचा अंदाज लावू शकतो. अर्थात अक्षी हे गाव प्राचिन अष्टागरांपैकी एक असल्याने तसेच या गावातल्या दोन प्राचिन शिलालेखांमुळे हे गाव फार पुर्वीपासून राजकिय व सांस्कृतिकदृष्ट्या वैभवसंपन्न होते याची खात्री पटते. उत्तर आंग्रे काळात म्हणजे १७ फेब्रुवारी १७९७ मध्ये आंग्रे घराण्याच्या ग्वाल्हेर शाखेचे बाबुराव आंग्रे व रघुजी आंग्रे यांचे पुत्र जयसिंगराव आंग्रे यांच्यात अक्षी या गावात तुंबळ युद्ध झाले होते ज्यामध्ये बाबुरावांचा पराभव झाला मात्र कालांतराने बाबुरावांनी जयसिंगरावांचा पराभव करुन दुसर्या बाजिरावाकडून सरखेलपदाची वस्त्रे घेतली.
अक्षी गावात फेरफटका मारावा तो चालतच, नारळी पोफळीच्या बागांमधून गेलेल्या रस्त्यांवरुन चालत असताना फळा-फुलांच्या बागांतून आलेला सुगंध वेगळ्या विश्वात घेऊन जातो, येथील समुद्रकिनार्यावरील पांढरी वाळू व समोर विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचा निनाद वातावरणात गुढ ध्वनीलहरी निर्माण करीत असतात. अक्षी गावाची एक दिवसाची सफर सुद्धा वर्षभर पुरेल इतका उत्साह देऊन जाते. अलिबाग चौल रस्त्यावर अलिबागपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या अक्षी गावास भेट देण्याकरीता आपले खाजगी वाहन, बस किंवा रिक्षांचा वापर करता येऊ शकतो, येथील स्तंभापासून साधारणतः १.५ कि.मी. अंतरावर अक्षीचा समुद्रकिनारा आहे जेथे थेट वाहने जाऊ शकतात. अक्षीच्या किनार्यावरुन आपल्याला अलिबागच्या कुलाबा किल्ल्याचे दर्शन घडते याशिवाय अक्षी गावात राहण्याच्या व खाण्याच्या विपुल सोयी असल्याने हा बीच पर्यटकांसाठी अतिशय सोयीचा आहे. एका वेगळ्या विश्वाचा आनंद घ्यावयाचा
असल्यास अक्षी या गावास एकदातरी भेट द्यायलाच हवी.
विनायक गावातील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिर
प्राजक्ता म्हात्रे
निसर्गाच्या सान्निध्यात असणारं असं आमचं छोटंसं उरण हे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’प्रमाणेच माझ्या हृदयात घर करून आहे. इथल्या करंजा गावातील द्रोणागिरी पर्वताबद्दल एक आख्यायिका आहे. मारुतीने लक्ष्मणाला संजीवनी वनस्पतीसाठी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक तुकडा उरणच्या करंजा गावी पडला. तो डोंगर द्रोणागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या डोंगराच्या एका भागात द्रोणागिरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर टेकडीवर असून करंजा जेट्टीचे, समुद्र किनाऱ्याचे, तिथल्या होडय़ांचे विहंगम दृश्य या टेकडीवरून होते. द्रोणागिरीच्या डोंगरावर एक इतिहासकालीन पडका किल्ला आहे. उरणमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत. चिरनेरचा महागणपतीच्या देवळावर जंगल सत्याग्रहाच्या खुणादेखील आहेत. उरणच्या बाजारपेठेत उरणावती देवीचे मंदिर आहे. याच देवीला शितळादेवी असेही म्हणतात. याच देवळाच्या आजूबाजूला एका ओळीत शंकर, विठोबा, तिरुपती, दत्तगुरू या देवतांची पूर्वीपासून मंदिरे आहेत. या भागाला देवळांवरून देऊळवाडी संबोधण्यात येते. त्याच्याच पुढे नाक्यावर, मारुती, गणपती व लक्ष्मीनारायण यांची पूर्वापार मंदिरे आहेत. देऊळवाडीच्या मागच्या अंगाला मोठा विमला तलाव आहे वयोवृद्धापासून ते लहान बालकांसाठी हे विरंगुळ्याचे स्थान आहे. केगांव या गावी माणकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्यातच आमच्या उरण तालुक्यात पूर्वीचे रानवड गावी असलेले रिद्धी-सिद्धी विनायकाचे देवस्थान आहे.
हिंदू धर्मात बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नहर्ता मानला जाणारा देव म्हणजे गणपती. गणपतीची अनेक नावे आहेत. त्यातील विनायक म्हणजे विशिष्ट रूपाने नायक किंवा नेता. रिद्धी-सिद्धी विनायका वरून सदर गाव हे विनायक या नावाने ओळखले जाते. विनायक गावातील परिसर हिरवागार आहे. इथे आल्यावर नक्कीच कोकणची सफर घडल्यासारखे वाटते. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी फुललेली बाग, बागेत अबोली, गावठी गुलाब, जास्वंद, चाफा अशा प्रकारची टवटवीत फुले व त्यांचा सुगंध, त्यात आंबा, फणस, नारळांसारख्या महावृक्षांची शीतल सावली, विविध पक्ष्यांचे गुंजन, तोऱ्यात चालणाऱ्या वाटा, खेळता वारा असे सुंदर श्री रिद्धी-सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाच्या छायेत असणारे विनायक हे गाव.
रिद्धी-सिद्धी विनायक हे प्राचीन मंदिर ६५४ वर्षांपासूनचे आहे. हे मंदिर शके १२८७ म्हणजे इसवी सन १३६५मधील हम्बीराज कालीन आहे. हम्बीराज हा देवगिरी येथील यादव राजवटीतला सरदार होता व त्याच्या आधिपत्याखाली कोंकण भूमीचा भाग होता. त्यानेच हे मंदिर बांधलेले आहे असे रानवड व अलिबाग-नागाव येथे सापडलेल्या प्राचीन शिलालेखात उल्लेख केला आहे. सध्या हे शिलालेख मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स या म्युझियममध्ये आहेत.
मंदिरातील गणेशाची मूर्ती ही दगडी कोरीव असून, अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. एकाच पाषाणावर गणपती व त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय़ आहे. कारण अन्य कोणत्याही देवळामध्ये एकाच पाषाणावर गणपतीसह रिद्धी-सिद्धी असलेली अशी मूर्ती आढळून येत नाही. ही मूर्ती काळ्या पाषाणात असून, पाषाण साडेतीन फूट उंचीचा आहे तर अडीच फूट रुंद व आठ इंच जाडी असलेला आहे. विनायकाची मूर्ती साडेतीन फूट उंच असून, रिद्धी-सिद्धी दोन फूट उंचीच्या आहेत. श्री विनायकाने आपले दोन्ही पाय मांडी घालण्यासाठी दुमडलेले आहेत. श्री गजाननाने पितांबर धारण केलेले आहे, तसेच माथ्यावर सुंदर नक्षी असलेले मुकुट आहे. श्री गणेशाच्या हातात परशू, अंकुश आहेत आणि मांडीवर ठेवलेल्या हातात मोदक, लाडू आहेत. रिद्धी-सिद्धीच्या हातात चवऱ्या आहेत. मूर्तीचा गोलाकार गाभारा दगडी आहे. मुस्लिमांनी सदर मूर्तीचा विध्वंस करू नये म्हणून मंदिराचा कळस मशिदींच्या आकारासारखा बांधला होता. त्यामुळे १२ व्या शतकात ही मूर्ती टिकून राहिली. या मंदिराच्या गाभाऱ्यातून कळसाचे दर्शन होते हेदेखील या देवळाचे अजून एक वैशिष्टय़ आहे. गेली कित्येक वर्षे रोज सकाळी सूर्यनारायण या प्रथम पूज्य, विघ्नहर्त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी मंदिरात किरणरूपी नमस्कार घालतात. नियमित सकाळी सव्वासातला सूर्यकिरण मूर्तीवर पडतात. देवळाच्या बाजूला एक हिरवेगार तळे आहे. देवळाचा परिसर टापटीप व स्वच्छ आहे. या परिसरात एक विहीर आहे, त्यातून पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे.
मूर्तीच्या पाठीमागे सव्वातीन फूट उंचीचा प्राकृत भाषेतला शिलालेख आहे. शिलालेखाच्या वर सूर्य, चंद्र व कलश यांच्या आकृती आहेत, तसेच खालच्या बाजूला गद्धेगल म्हणजे वस्तूचा व जमिनीचा अपहार करणाऱ्यास दहशत घालणारे चित्र आहे. हा शिलालेख अनेक शतकांपासून एक गूढ होते, या गूढ शिलालेखाचा उलगडा सन ९१४० मध्ये सेंट झेवियर कॉलेज, मुंबईच्या हिस्टॉरिकल ग्रुपने केला हे अलीकडच्या काळात जुन्या कागदपत्रांचा शोध घेताना सापडले. या शिलालेखाचा मराठी अनुवाद नांदेड येथील इतिहास संशोधक प्रभाकर देव यांनी केलेला आहे.
सदर देवस्थानाची मालकी गेल्या नऊ पिढय़ांपासून घरत कुटुंबीयांकडे आहे. या देवळात श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे येणे-जाणे होते. श्रीमंत पेशव्यांनी सन्मानाने घरत कुटुंबीयांना फजनदार हा किताब बहाल केला व आजूबाजूच्या शेतजमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला देण्यात आल्या. सन १८६७ मध्ये ब्रिटिश सरकारने पांडुरंग दामाजी घरत (खोत) यांच्या नावे सनद दिली. पूर्वी या देवस्थानाची पूजाआर्चा उपाध्ये कुटुंबाकडे होती. सन १९९३ पासून या देवळाचे व्यवस्थापकीय विश्वस्त- फजनदार हे सदानंद रघुनाथ घरत आहेत. हे मंदिर घरत घराण्याच्या मालकीचे असले तरी ते सगळ्यांसाठी खुले आहे व हे विनायक गावातले मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे.
सदानंद घरत यांच्या पुढाकारातून कौलारू व मोडकळीस आलेल्या जुन्या देवळाचे १९१० साली नूतनीकरण करून प्रशस्त व सुबक सभागृह असलेले मंदिर उभारण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण केले असले तरी मंदिराचा मूळ गाभारा व घुमट जाणीवपूर्वक तसाच ठेवला आहे. तसेच सभागृहात असलेल्या प्राचीन काचेच्या हंडय़ा अजून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या आहेत व देवळाच्या प्रत्येक उत्सवाला व संकष्टी चतुर्थीला हंडीमध्ये काकडा प्रज्वलित करून मंदिराचे सभागृह मंगलमय व प्रकाशमय केले जाते. सदानंद घरत यांच्या वडिलांच्या नावाने देवळात नंदादीपाची ज्योत अखंड तेवत आहे. सभागृहात दोन बाजूला दोन लाकडी जिने असून, लाकडी खांबाची किनार असलेला माळा आहे. सभागृहाच्या भिंतीवर वरच्या बाजूला चारही दिशंना हत्तींची रांग व त्यावर कलाकुसर असलेल्या नक्षीची पट्टी आहे- जी सभागृहाच्या शोभेत वाढ आणते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मूर्तिरूपी हत्ती भाविकांचे स्वागत करतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसरही हिरवागार आहे. मंदिर जवळच एक तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या मारुती मंदिरातील शक्तिशाली मारुतीचे दर्शन घेतल्याने मनातील भय निघून जाऊन मन शांत होते. मंदिराच्या आवारातील रंगरंगोटी व कुंडय़ांमधली हिरव्यागार झाडे व फुलांमुळे परिसर सुशोभित दिसतो. काही दानी भक्तांनी दान म्हणून दिलेले बाकडेही मंदिराबाहेरच्या आवारात विश्रांतीसाठी ठेवले आहेत. देवळाच्या परिसरात भाविक यात्रेकरूंसाठी निवासस्थान उभारले आहे. या मंदिराची साफसफाई व नीटनेटकेपणा तिथे प्रवेश करताक्षणीच डोळ्यांना सुखावतो. परिसरात प्रवेश करायचा मुख्य दरवाजाही सुंदर मोराच्या नक्षीने सुशोभित केलेला आहे. मंदिरालगत असलेले तळे पाहून मन उल्हसित होते. या तळ्यात पूर्वी गावकरी मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असत.
गावकरी कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी विनायकाचे दर्शन घेतात व कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करतात. २००३ साली या मंदिराचा द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सव साजरा झाला. या द्विशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवाच्या निमित्ताने रिद्धी-सिद्धी विनायकाची प्रतिमा असलेले एक नाणे काढण्यात आले. या नाण्याच्या छपाईचे काम उरण येथील रहिवासी मिंट टाकसाळमधील प्रोफेशनल कलाकार वसंत गावंड यांनी केले आहे. मूळ मूर्ती ही अत्यंत दुर्मीळ व पुरातन असून ती हल्लीच्या भेसळयुक्त शेंदूर व तेलामुळे मूर्तीची हानी होऊ नये या उद्देशाने पुरातत्त्व खाते व इतिहास संशोधक यांच्या सूचनेनुसार वसंत गावंड यांनी रिद्धी-सिद्धी विनायकाची हुबेहूब छोटी प्रतिकृती तयार केली आहे व ती भक्तांच्या पूजनासाठी सभागृहात एका जागी विराजमान केली आहे.
prajaktaparag.uran@gmail.com
फणसाड : गिधाडांचं जंगल | Phanasad Wildlife Sanctuary
अफाट नैसर्गिक साधन संपत्तीची देणगी आपल्या राज्याला लाभली आहे असं आपण कायम ऐकतो. अगदी लहान असताना शाळेत शिकत असल्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या या वरदानाविषयी आपण वाचलेले आहे. महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अथांग निळ्या विश्वात दडलेल्या अफलातून जलसंपत्तीने महाराष्ट्राला समृद्ध केले आहेच पण त्याचसोबत निसर्गाचे चक्र संतुलित ठेवले आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात असणारा पश्चिम घाट हा इथल्या सौंदर्यात अधिक भर टाकतो. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वर्षानुवर्षांपासून टिकून राहिलेलं सुंदर जंगल महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चांद लावतं. इथल्या जंगलांमध्ये आल्यावर आपल्याला निसर्ग आपल्यावर वेगळीच जादू करतो. आणि आपणही त्याच्या या मोहिनीत अडकत जातो. असं गुरफटलेपण आपल्याला अधिकाधिक आनंद देऊन जातं.
कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या मुरुड-जंजिरा या सुप्रसिद्ध किल्ल्यापासून जवळच असणाऱ्या एका अप्रतिम जंगलानं मला कायम वेड लावलं आहे. इथल्या निसर्ग सौंदर्यात न्हाऊन निघताना मनाला जो अलौकिक आनंद होतो त्याची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी करणं तसं कठीणच. या जंगलाचं नाव आहे फणसाड वन्यजीव अभयारण्य. या जंगलाला निसर्गाचा जणू वरदहस्तच लाभला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात हे जंगल जंजिऱ्याच्या नवाबाचं शिकारीसाठीचं राखीव क्षेत्र होतं. स्वातंत्र्योत्तर काळात इथल्या निसर्गसंपदेचे संरक्षण व्हावे आणि इथला निसर्गठेवा सुरक्षित राहावा यासाठी राज्य सरकारनं १९८६ मध्ये २५ फेब्रुवारीला या जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला. अभयारण्यात आपल्याला शुष्क पानगळीचे सदाहरित-निमसदाहरित आणि मिश्रसदाहरित तसेच किनारी वनराजी म्हणजेच तटीय परिसंस्था असे जंगलप्रकार बघायला मिळतात. पूर्वी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेले हे जंगल आज तटीय परिसंस्थेचे संवर्धनक्षेत्र बनले आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा तालुक्यात असणारे सुमारे ६९.७९ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे जंगल जैवविविधतेचा उत्कृष्ट नमुना आहे.
अभयारण्यात आपल्याला नानाविध प्रजातींच्या वनस्पती, पशू, पक्षी बघायला मिळतात. या जंगलात अनेक पाण्याच्या जागा आहेत. या जागांना स्थानिक भाषेत ‘गाण’ म्हणतात. या पाणथळ जागांच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या जागेस ‘माळ’ असे संबोधले जाते. चिखलगाण, फणसाडगाण, गुण्याचा माळ, भांडव्याचा माळ अशा अनेक जागा आपल्याला या अभयारण्यात पाहायला मिळतात. अभयारण्यात भ्रमंतीसाठी पायवाटा आहेत. जंगलात पूर्वीच्या काळात जांभा दगडांनी बांधलेले वर्तुळाकार आडोसे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. या पूर्वीच्या लपणाच्या जागा होत्या ज्यांचा उपयोग शिकारीसाठी केला जाई. यांना ‘बारी’ म्हणत असत. सरासरी २८०० मिलीमीटर पडणारा पाऊस दरवर्षी जंगलाला नवं रुपडं देतो. वनस्पती प्रकारात आपल्याला या जंगलात अतिशय मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. असंख्य प्रजातीचे वृक्ष, झुडपे, वेली आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. गारंबीच्या वेली हेही या जंगलाचे आणखी एक वैशिष्ट्य.
अजस्त्र स्वरूपाच्या या वेलींनी जंगल एखाद्या जटाधारी साधूसारखं भासतं. जंगलात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहायला मिळेल. हे एक रेस्टॉरंट आहे. इथला मेन्यूही तितकाच स्पेशल. कधी यात गाय, बैल अशा एखाद्या प्राण्याच्या कलेवराचा समावेश असतो तर कधी एखाद्या जंगली प्राण्याच्या मृत शरीराचा. या अनोख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला येणारे जीवही तितकेच अनोखे आणि दुर्मिळ आहेत. या रेस्टॉरंटचं नाव आहे ‘व्हल्चर रेस्टॉरंट’.
संख्येने अतिशय कमी होत चाललेल्या गिधाड पक्ष्यांसाठी महाराष्ट्र वनविभागातर्फे या अनोख्या रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली आहे. अॅक्सिपिट्रिडी या कुलात मोडणारा पक्षी आहे. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. गिधाडे आकाराने खूप मोठी आणि अतिशय ताकदवान असतात. गिधाडांचे पाय दणकट आणि चोच बाकदार व टोकदार असते. नखे आत वळलेली आणि टोकदार असतात. बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. त्यांची नजर तीक्ष्ण असते. ती दिवसा आकाशात खूप उंचावर पंख न हलविता तासनतास घिरट्या घालतात. गिधाडे मृतोपाजीवी आहेत. ती प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाहीत. मृतोपजीवी असल्याने निसर्ग स्वच्छ ठेवण्यास ती मदत करतात. गिधाडांच्या जठरातील आम्ल अतिशय क्षरणकारी असते. त्यामुळे कृमी आणि संसर्गजन्य जिवाणूंनी सडलेले मृतदेहाचे मांस ती सहजरीत्या पचवू शकतात.
गिधाडांची घरटी खडकांच्या कपारींसारख्या दुर्गम ठिकाणी असतात. काही प्रजाती झाडांवर देखील घरटी बांधतात . मादी प्रत्येक विणीच्या हंगामात एक किंवा दोन अंडी घालते. पाळीव जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना डायक्लोफिनॅक औषध देतात. अशा जनावरांचे मांस खाऊन गिधाडे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात जनावरांसाठी डायक्लोफिनॅक या औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अगदी प्राचीन पौराणिक काळापासून आपल्याला गिधाडांचा उल्लेख पाहायला मिळतो. अगदी रामायणकाळातही जटायू आणि संपाती या दोन गिधाडबंधूंची कथा आपण ऐकली आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ठेवणाऱ्या या अनोख्या जिवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचे संवर्धन करण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नात फणसाड सारख्या जंगलात उभारलेली व्हल्चर्स रेस्टॉरंट अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. भारतात आपल्याला गिधाडांच्या सात उपजाती पाहायला मिळतात. पांढरे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाड, भुरे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि राज गिधाड यापैकी पांढऱ्या पाठीची गिधाडे आपल्याला फणसाडमध्ये पाहायला मिळतात.
याशिवाय फणसाडमध्ये आपल्याला बेडूकतोंड्या अर्थात फ्रॉग माउथ नावाचा दुर्मीळ पक्षीही पाहायला मिळतो. याशिवाय सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर यांचीही विविधता आपल्याला फणसाडमध्ये बघावयास मिळते. अभयारण्य हे समुद्रकिनाऱ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर असून काशीद, कोकबन, चिकनी. दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव अशा एकूण ३८ गावांनी वेढलेले आहे. पण तरीही वनविभागाचे प्रयत्न आणि गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे इथली विविधता आजही टिकून आहे. इथल्या दांडा मनोऱ्यावरून अथांग पसरलेल्या सागराचे मनोहारी रूप पाहताना भान हरपून जाते.
अनोख्या जैविविधतेने नटलेले हे सुंदर जंगल बघताना आपल्याला वेगळ्याच सुखाची अनुभूती होते. तटीय वनराजी या अनोख्या परिसंस्थेचे संवर्धन करणारे हे जंगल गिधाडे, बेडूक तोंड्या, शेकरू अशा सुंदर प्राणी-पक्ष्यांच्या संवर्धनातही मोठा वाटा उचलते. इथे आल्यावर आपल्याला परिपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण पाहायला मिळते. अशीच परिसंस्था आपण कायम टिकवून ठेऊ शकलो तर आपल्या पृथ्वीतलावर आपल्याइतका सुंदर देश दुसरा नसेल. निसर्ग वाचवण्यासाठी अशाच छोट्या छोट्या जंगलांचे संरक्षण होणे अतिशय मोलाचे असते. निसर्गचक्रातला अगदी छोट्यात छोटा घटक जरी वाचला तर त्यावर अवलंबून असलेले संपूर्ण निसर्गचक्र आपण वाचवू शकू. आपल्याला मिळालेला हा निसर्गाचा अनमोल ठेवा जपून ठेवणे आणि या ठेवीला मर्मबंधातली ठेव बनवणे अधिक आवश्यक आहे. निसर्गाला आपण आपल्या हृदयाच्या जितके जवळ ठेऊ तितके तो आपल्याला भरभरून देत राहिलं यात शंका नाही.
कसे जाल?
पुणे/मुंबई-रोहा-तळेखार-फणसाड
भेट देण्यास उत्तम हंगाम
ऑक्टोबर ते एप्रिल
काय पाहू शकाल?
वनस्पती - आंबा, ऐन, किंजळ, साग, पारजांभूळ, पळस, पांगारा, कांटे सावर, हळदु, काजरा, वाद, पिंपळ, हिरडा, बेहडा, आवळा, मुरुडशेंग, सर्पगंधा, कुडा, आघाडा, गेळ, गुंज, ब्राह्मी, अनंतमूळ, तमालपत्र, नागरमोथा, मिरी, नरक्या, इ.
सस्तन प्राणी – रानगवा, शेकरू, बिबट्या, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, कोल्हा, खवल्या मांजर, रानडुक्कर, वानर, माकड, उदमांजर, रानमांजर, मुंगूस, इ.
पक्षी – मलबारचा कवड्या धनेश, कृष्णगरुड, हरियाल, स्वर्गीय नर्तक, ठिपकेदार पिंगळा, हळद्या, सुभग, पंचरंगी पोपट, पाचू कवडा, शिक्रा, ब्राह्मणी घार, तुरेवाला सर्पगरूड, ससाणा, पांढऱ्या पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, हरियाल, कोकीळ, समुद्र गरूड, बेडूकतोंड्या इ.
सरपटणारे प्राणी – नाग, फुरसे, मण्यार, घोणस, धामण, अजगर, रुका, नानेटी, हरणटोळ, घोरपड, इ.
(या सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
फणसाड वन्यजीव अभयारण्य - Fansad Wildlife Sanctuary
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरुड तालुक्यातील १७,२५० एकर जागेवर जंगल, गवत आणि दलदल यांनी व्यापलेला भूभाग म्हणजेच फणसाडचे जंगल. फणसाडचे जंगल रोहा येथून मुरुडकडे जाणार्या वाटेवर काशिद समुद्र किनार्यापासून कुंडलिका नदीदरम्यान पसरलेले आहे. स्वातंत्रापूर्वी शिकारीसाठी मुरुड जंजिर्याच्या सिध्दी नवाब यांच्या राज्यकर्त्यांसाठी हे जंगल राखीव होते. भारत स्वातंत्र्यानंतर वनविभागाकडे या जंगलाची जबाबदारी आली आणि १९८६ साली तत्कालीन सरकारने या जंगलातील जैवविविधता जोपासण्यासाठी फणसाड जंगलाला अभयारण्याचा दर्जा दिला.
या अभयारण्यात सदाहरित, निमसदाहरित, पानझडी, शुष्क पानझडी प्रकारातली झाडे आहेत. येथे आयन, आंबा, सागवान, अंजन, जांबा, जांबुळ व अनेक औषधी झाडे अशा एकून ७१८ प्रजातीच्या वनस्पती, झुडपे तसेच विविध प्रकारची फुलझाडे आढळतात.
या अभयारण्यात बिबट्या, हरण, सांभर, रान डुक्कर, भारतीय राक्षसी खारुताई (Ratufa indica), भेकर, तरस यांसारख्या प्राण्यांच्या १७ प्रजाती याचबरोबर शिक्रा, हॉक गरुड, क्रेस्टेड सर्प गरुड, केस्ट्रल, हरियाल (हिरवे कबूतर), असे एकूण पक्ष्यांच्या १६४ प्रजाती, सापांच्या २७ प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारची रंगांची फुलपाखरांच्यासुद्धा ९० प्रजाती या अभयारण्यात दिसतात. अभयारण्यात हमखास पशु पक्षी दिसतील असे गुन्याचल माळ, चिखलगाव, फणसाडगाण ही मुख्य पाणवठ्याची ठिकाणं आहेत.
वन्यजीव छायाचित्रण (Wildlife Photography) करणार्यांसाठी नंदनवन ठरावे असे हे ठिकाण असल्यामुळे येथे विविध खाजगी शिबिरेसुद्धा आयोजित केली जातात.
बरे येथे जाताना सोबत पाण्याची पुरेशी बाटली, ग्लुकॉन-डी किंवा इलेक्ट्रोल पावडर, चांगले स्पोर्ट शूज किंवा ट्रेकिंग शूज, छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा, वन्यजीवांचे निरिक्षण करण्यासाठी दुर्बिण, टोपी, गॉगल, प्रथमिक उपचाराची पेटी, अवश्यतेवढे खाण्याचे पदार्थ अवश्य घेऊन जाणे.
येथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा उपलब्ध आहे.
आणि सर्वात शेवटचे अभयारण्यात आपल्यामुळे वन्य पशु पक्षांना, पर्यावरणाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि कुठेही कचरा करु नका.
जवळील ठिकाणे : पावसाळ्यात फणसाड धबधबा, किहिम समुद्र किनारा, अलिबाग, मुरुड-जंजिरा इत्यादी...
कसे जायचे : स्वत:च्या वाहनाने मुंबई मधून अलिबाग रस्त्याने जाताना वाटेतच अभयारण्य लागते. किंवा मुंबई अलिबाग एस.टी. ने सुद्धा फणसाड अभयारण्य स्थानकात उतरता येते.
कधी जायचे : ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन अखेर दरम्यान
जिल्हा : रायगड
राज्य : महाराष्ट्र
दुरशेत - Durshet
मुंबई आणि पुणे दरम्यान सह्याद्रीच्या कुशीत आणि अंबा नदीच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य असे एक छोटे गाव आहे. दुरशेतचा परिसर सभोवताली डोंगराळ प्रदेश आणि पठाराने व्यापलेला आहे. मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी बरीच लोकं या ठिकाणी भेट देतात.
दुरशेत हे ठिकाण येथील अप्रतिम सौंदर्याने नटलेले, पावसाळ्यात सगळीकडे दिसणारी हिरवळ, धबधब्यातून वाट काढत टेकट्यांकडे जाणार्या पायवाटा अशा या नाना विविध सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांमध्ये खुप प्रसिध्द आहे.
गिर्यारोहकांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. दुरशेत हे अंबा नदीच्या किनारी असल्यामुळे येथे वन्यजीव तसेच मुबलक प्रमाणात वन्य संपदा येथे आढळते. हल्ली येथे पर्यटकांनची होणारी गर्दी पाहून येथे जलक्रिडांचे (Water Sports) आणि साहसी खेळांचे आकर्षण केंद्र बनले आहे. यात उत्साह, साहस आणि रोमांच भरणार्या अनेक खेळांचा समावेश आहे, जसे की रॅपलींग, वॉल-क्लाइंबिंग, टार्झन स्विंग इत्यादी.
दुरशेत हे महाड येथील श्री वरदविनायक गणपती आणि पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती या दरम्यान वसलेले आहे म्हणून जर वेळ असेल तर धार्मिक लोकांसाठी देखील दुरशेतची भ्रमंती संस्मरणीय ठरू शकते.
जवळील ठिकाणे : लोणावळा १२ कि.मी, माथेरान ३१ कि.मी, कामशेत २८ कि.मी, लवासा ३९ कि.मी.
कसे जायचे : दुरशेतला जाताना स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच कारण तेथे जाण्यासाठी सार्वाजनिक वाहतूक मर्यादित आहे. मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. तेथे जाताना मुंबई-पुणे महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चा वापर करावा.
कधी जायचे : पावसाळ्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंतचा काळ येथे भेट देण्यासाठी योग्य आहे.
जिल्हा : रायगड
राज्य : महाराष्ट्र
अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा - Alibag Geo-magnetic Observatory
आपल्या भारत देशातले हवामान जसे आहे तसे इतर देशांमध्ये क्वचितच बघायला आणि अनुभवायला मिळतील. आपल्या देशात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आढळतात. इतर देशांमध्ये शक्यतो हिवाळा आणि उन्हाळा हेच ऋतू आढळातात आणि क्वचितच पाऊस पडतो. आपल्या भारत देशातील शेती प्रामुख्याने पावसावर आणि लहरी हवामानावर खूप अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अभ्यास असणे खूप आवश्यक होते. सतरा अठराव्या शतकाच्या दरम्यान पार्याच्या तापमापक (थर्मामीटर/Thermometer) आणि वायुभारमापक (बरोमीटर/Barometer) यांचा शोध लागला होता. या दोन यंत्रांमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याची शक्यता खूप वाढली होती म्हणून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने या तंत्रज्ञानाचा वापर करुन हवामानाचा आधुनिक अभ्यास करण्यासाठी १८२३ साली मुंबईच्या कुलाबा येथे वेधशाळा उभारली व ती पुढे कुलाबा वेधशाळा म्हणून ओळखू लागली. येथे सुरुवातीला हवामान आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करत त्यांच्या नोदी करत असत. १८४० साली येथे चुंबकाकर्षकमापन (Magneto Meter) यंत्रे बसविण्यात आली. तेव्हापासून येथे पृथ्वीवरील चुंबकीय लहरींचा देखील अभ्यासास सुरुवात झाली आणि या सर्व मापकांच्या नोंदी घेण्यास सुरुवात केली. या मापनांमध्ये सुसुत्रता यावी म्हणून दर दोन तासांनी नियमित मापने घेणे सुरू झाले.
या वेधशाळेवर १८९६ सालापर्यंत ब्रिटिश अधिकार्यांचेच प्रमुखपदावर वर्चस्व होते. १८९६ साली या वेधशाळेचे पहिले भारतीय प्रमुखपद भुषविले ते डॉक्टर नानाभाई अर्देशीर मूस या पारसी व्यक्तीने. डॉक्टर नानाभाई यांनी या वेधशाळेत खूप नवनवीन सुधरणा करण्यासोबत भूकंपमापनदेखील सुरू केले.
मुंबईमध्ये १९०० साली घोड्याच्या ट्रामच्या ऐवजी विजेवर चालणार्या ट्राम चालवण्याचे ठरले. पण मुंबईत पसरणार्या विजेच्या तारांमुळे ज्या नैसर्गिक चुंबकीय मापने मिळत होती ती चुकण्याची शक्याता वाढण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा मुंबईजवळील अशा ठिकाणांचा अभ्यास सुरू झाला ज्या ठिकाणी मुंबईसारखी मापने मिळतील. मुबंईच्या दक्षिण पुर्वेला असलेल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या किनारी नवीन भूचुंबकीय वेधशाळा बांधण्याचे ठरले. ही वेधशाळा बांधताना बाहेरील चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही याची काळजी घेऊनच केले. त्यासाठी खास पोरबंदरहून चुंबकीय गुणधर्म रहीत असेच दगड मागवून, वास्तूत वापरणार्यात येणार्या नाजूक यंत्रणेला जराही धक्का पोहोचणार नाही अशा पध्दतीने दोन वास्तूंचे बांधकाम पूर्ण केले.
ही भूचुंबकीय वेधशाळा बांधून झाल्यावर सुमारे दोन वर्षे मुंबई आणि अलिबाग येथील वेधशाळांमध्ये एकाच वेळी मापने घेण्यात येत होती, आणि त्यांची तुलना करून झाल्यावर दोन्ही वेधशाळेतील मापनामध्ये साम्यता आढळून आली, त्यानंतरच अलिबागच्या वेधशाळेला अधिकृत मान्यता देण्यात आली. तेव्हापासून अलिबागच्या भूचुंबकीय वेधशाळेने आजपर्यंत सुमारे ११६ वर्षे अविरत एकदाही खंड न पडता अचूक मापने करत आहे. या वेधशाळेने केलेल्या अचूक मापनांची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली जाते.
आपल्या भारत देशाच्या नौदल आणि वायुदलासाठीही या वेधशाळेच्या मापनांचा उपयोग केला जातो.
सध्द्या डी आय फ्लक्स मॅग्नेटोमीटर, जेम सिस्टीम, प्रोटोन प्रिसिशन मॅग्नोमीटर, ओव्हरहाउसर इफेक्ट प्रोटोन स्केलर मग्नेटोमीटर अशा विविध मोजणी यंत्रणांनी ही अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा सुसज्ज आहे.
येथे छोटे संग्रहालय सुद्धा आहे. भेट देण्यासाठी येथील अधिकार्यांना पुर्वसुचना देऊन संग्रहालय पाहण्यास परवानगी घेता येते. हे संग्रहालय फक्त कामकाजाच्या पाच दिवशीच सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यानच पाहू शकता.
तर अशा या भारतातील पहिल्या आणि जागतिक दुसर्या क्रमांकाची वेधशाळा असलेल्या आपल्या महाराष्ट्राची मानबिंदू असलेल्या अलिबागच्या भूचुंबकीय वेधशाळेला कधी भेट देता.
जवळील ठिकाणे : अलिबाग समुद्रकिनारा, समुद्रात असलेला कुलाबा किल्ला, काशिद समुद्रकिनारा, मुरुड-जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला इत्यादी...
कसे जायचे : मुंबई मधून रस्त्याने यायचे झाले तर पनवेल, पेण, वडखळ मार्गे अलिबागला येऊ शकता तेथून के. ई. एस. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल जवळ येऊन वेधशाळेला भेट देऊ शकता.
मुंबई मधून जलमार्गाने यायचे झाले तर मांडवा किंवा रेवस येथे उतरुन अलिबाग रेवस मार्गाने के. ई. एस. जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कुल येऊन वेधशाळेला भेट देऊ शकता.
पुण्यावरुनही येथे खंडाळा घाट, वडखळ मार्गे अलिबागला येऊ शकता.
कधी जायचे : नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्या दरम्यान येथील वातावरण आल्हाददायक असते.
तालुका : अलिबाग
जिल्हा : रायगड
राज्य : महाराष्ट्र
(Based on Latest visit Oct 2017)
Its a peaceful place to spend one day.
How to Reach :
Approx 100 km. from Pune.
Pune-Pirangut-Paud-Mulashi dam backwater road-Tahmini ghat-Nive-Plus valley view point- when tahmini ghat ends go straight,( Don't take left turn to Bhagad MIDC road which is wider)- go ahead- Varachi Wadi village-Take right trun to Patnus village (left turn goes to Kundlika river rafting - Mumbai) -Patnus village -take right turn to Bheera dam- Its Dam project place i.e. Tata Power House - Park your vehicle.
The road condition is good from Pune to Varchi wadi village. Varachi Wadi to Bheera dam its narrow road but condition is good. Road had bad condition from Chandani chauk Pune to Male villahe (Mulshi Dam).
Avoid night drive in Tahmini ghat in rainy and winter season.
Parking :
Free Parking place is available at Bheera dam project i.e. Tata Power House. You can take vehicle upto the Dam wall place.
Food and Stay :
Many veg-non veg restaurants are available from Pune to Tahmini ghat. Then small restaurants are there at Varchi Wadi and Patnus village. Many restaurants are opened only on Sundays. No tiffins are required. Many home made hotels are there.
Home stay with food also provided in Patnus village which is nearest village to the dam.
What to See :
The Bheera dam is very calm and cool place. You can have look of beautiful scene of dam water and Kundlika Valley mountains at the background. Its the peaceful place to roam around in the nature.
The incoming running water channel after power project generation can be observed from one corner of the dam wall.
The end point of Andharban trail can be seen other side dam.
Trek safety :
- Avoid on weekdays !
- Take care in monsoon season, the land become sleepery due to heavy and continuous rain.
- Summers are hot.
- Best season July to April.
Kumbhe Waterfall Oct_2019
https://punetrekss.blogspot.com/2020/12/kumbhe-waterfall-2019.html
Kumbhe Waterfall
How to Reach : Its is about 110 km from Pune with 3 and half hours ride via Tamhini Ghat. Bikes and cars can reach to the waterfall.
- It is remote and lonely place, so go with group.
- Carry all food and water with you.
- Roads are lonely and help is available at the base i.e. Borawadi village which is far away.
- Keep anti-puncture material with you. No shops around.
Kondeshwar Waterfalls Sept_2019
https://punetrekss.blogspot.com/2020/04/kondeshwar-temple.html
Trekking Patlan members
Devkund Waterfall
https://punetrekss.blogspot.com/2019/05/devkund-waterfall.html
Best time to visit is September to October after rainy days gets over. Waterfall disappears after October so no point to go after it. I visited recently on 7th October 2018.
How to Reach : Its about 110km from Pune. It will take almost 3 hours road drive.
Search Bhira dam on Google map to get a route of Devkund Waterfall. Bhira dam is parking point of Devkund trek.If search Devkund waterfall on google map it will show a top route of the waterfall which is used by professional trekkers with rappelling and climbing skills. So search Bhira dam for regular trek.
Food a Water :
There is a food and water available at the parking. Veg and no veg can be served as per order.
No Full meal available on the trek. So better to carry food with you. Water bottles and lime juice, tea, biscuits, snacks and kandabhaji are available on the trek route. Running streams on the way aslo contains drinkable water.
Stay is not allowed by govt at the Devkund waterfall. But there are many local hotels at Bhira village which give stay facility at the Bhira village. Tent stays also provided with charges like Rs.1500 a night with food and guide. Tree house stay also available. All these stay facilities are made available at the backwaters of Bhira dam.
Here are some contact Nos.
Pramod Shelar -7276283442
Shelar Sunil - 8446130788
Prakash Zore - 8793532972
Gujar Ashok -8793811870
The Trek starts from parking. Need to take entry ticket of village govt. Rs.10 per head.
They also insist to take a guide for Rs.50 per head of the group. Actually guide not much required other than rainy season. But Its very useful to have a guide in monsoon days.
They have chain system of guide. A guide is with the group up to specific spot, then next guide takes you upto next guide, how a team of guide take you up to Devkund waterfall. They really help to cross rivers with ropes in rainy season. You cant cross the forceful water without their help.
So don't debate about the compulsion of the guide on the entry point. Many accidents already happened on the destination. Some tourists argue about the hiring a guide, but Rs.50 per head is not much amount for it. Local should be always benefited form tourism. If employment is created for locals, then a place can be preserved better. Government cant reach everywhere to do it.
There are restaurants on the way run by locals where water bottles, lime juice, kokum juice, chips, snacks, Kandabahji, tea, biscuits etc. are available on weekends.
There are 3 main water streams to be crossed on the way. These are very risky in rainy season. Cross with the help of local guides. There is one wooden bridge built by locals which is very weak. You have to cross one by one and carefully.
After last bridge, high ascend starts of 15 to 20 mins. which may test your endurance. After ascend to start down to one more powerful water stream. you can listen to noise of crowd from the waterfall, which indicates that you are near to it. Cross the last stream by river stones and you will standing in front of magnetic Devkund waterfall.
What to See :
The waterfall gives a look that you have not seen before. Waterfall falls down through a Curved mountain. The waterfall falls freely because of concave shaped overhang collapse.
There is plunge pool developed which is called 'kund' in Marathi. because of huge plunge pool the place is called Dev-kund. The plunge pool of God.
There is one small open worship place of Lord Mahadev behind the waterfall.
People used to swim in the kund. There a rope hand for showing a risk. Dont go beyond the rope. Its very risky. The pool is very deep and having whirlpool beneath the surface. The locals and sometimes police are present there to protect. There are some accidents happened in which some people died by drowning in the pool by over enthusiasm. Some tourists take too much risk to click photos like standing on stones, going deep in the pool, beyond rope, snatching each other in the water, making fun on fear of friends etc. Remember that risking life.
The flow can be increased suddenly anytime due to rain in Tamhini ghat. So be aware when in water.
You can enjoy a fresh and cold water bath and splash here in safe area of a pool.
There is a small food stall where you can get water bottles, Vadapaw, Pithal-Bhakri, Lemon juice. Its a stony land, so find a suitable place for lunch.
- Best time to visit September and October.
- Some people died already here, so take care.
- Take guide in rainy days.
- Avoid in days of heavy rain.
- Don't go if local tells you.
- Carry food.
- Cross water streams with great safety.
- Look at the stepping stones in the water.
- Don't be hyper and over joyful with others during the trek.
- Don't get your self in water stream without consent of guides.
- Don't bring kids for this trek. if bring, look after kids, they can be over energetic.
- Be in group, Don't be isolated.
- Mobile coverage is weak.
- Follow the safety instructions in the pool.
- Don't cross rope in the Pool.
- Remember photo is not more important than your life.
देवकुंड धबधबा - भिरा पाटणुस रायगड महाराष्ट्र Devkund Waterfall - Bhira Patnus Raigad Maharashtra
https://susheelrajagolkar.blogspot.com/2017/11/devkund-waterfall-bhira-patnus-raigad.html
08 नोव्हेंबर 2017 ला सकाळी 8:00 वाजता देवकुंडला जायला निघालो, आनंद बिराजदार ला घेऊन 8:30 ला निघालो. "थंडी आणि दुचाकी हे समीकरण लक्षात घेऊन थोड्या उशिराच निघायचे" हा निर्णय तसा ठीकच वाटला. ताम्हिणी घाटामध्ये पुणे रायगड हद्दीवर पोटभर नाष्टा केला. दुपारी 12:30 ला भिरा येथे पोहोचलो. दुपारी 1:00 ला ट्रेक सुरू केला, भिरा धरणाच्या बाजुने जंगलातुन आम्ही चालु लागलो, चालतांना मध्ये मध्ये पक्ष्यांचे प्राण्यांचे निरनिराळे आवाज तर मध्ये मध्ये खळखळत जाणारा पाण्याचा आवाज ऐकु येत होता. साधारणपणे दीड तासाच्या वाटचालीनंतर देवकुंड ला पोहचलो, उंची वरुन पडणारा धबधबा व तेथिल थंड व नितळ स्वच्छ पाणी पाहुन मनभरून गेले, न राहुन पाण्यात डुबकी मारली पोहुन झाल्या नंतर आनंदने आणलेला डबा पाण्यात पाय ठेऊन निवांतपणे खाल्ला, बुधवार असल्याने तशि गर्दि कमिच होती तेथुन सर्व पर्यटक परतिच्या वाटेला निघायला लागले, आम्ही मात्र तेथुन सर्व पर्यटक गेल्या नंतर निरव शांतते मध्ये थोडावेळ थांबून छायाचित्रे घेतली आणि परतिच्या वाटेला लागलो.
©सुशील राजगोळकर
रायगड ⛰️🚩 RAIGAD २० नोव्हेंबर २०२१
खूप दिवसांपासून मुलगा म्हणत होता ट्रेकला जाऊया ना पप्पा, नेमकं बायकोला पण रायगड पहायचा होता. मग काय केला प्लॅन रायगडाचा..! अन अखेर तो दिवस उजाडला.... सहपरिवार शुक्रवार १९-नोव्हेंबर-२०२१ सकाळी ०८:३० वाजता आम्ही निघालो 🏍️ व पिरंगुटला येऊन थांबलो. थोड्याच वेळात हेमंत परिवारा सोबत आला आणि आम्ही पुढे निघालो. मुळशी तलावाच्या 🌅 काठावरती बसून सकाळचा नाष्टा केला🍜.
| मुळशी तलावा काठी |
| पाली गावाचे बल्लाळेश्वर गणपती मंदिर |
| पाली येथून किल्ले सरसगड |
पुढे सणसवाडी निजामपूर मार्गे रायगडाकडे निघालो. प्रथम वाटेमध्ये पाचाडला असलेले राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधीला नमस्कार केला व जवळच असलेला माँसाहेबांचा वाडा पाहिला. 🏘️ वाडयामधील असलेल्या अवशेषा वरून त्याची भव्यता लक्षात येते. वाडयाच्या आतमध्ये असलेली चौकी, सदर, तकयाची विहीर, तटबंधीला असलेल्या पायऱ्या, शौचालय, पाण्याचा टाक्या व इतर अवशेष आजही आपले थोडेफार अस्तित्व जपून आहेत. वाडा बघेपर्यंत संध्याकाळ झाली व तेथून दिसणारा सुर्यास्त पाहत होतो तितक्यात सुरक्षा रक्षकाची शीळ कानावर आली....चला वाडा बंद करायचा आहे. तसे आम्ही बाहेर आलो व किल्ले रायगडचा पायथ्याला असलेल्या हॉटेल रायगड फार्म हाऊस येथे मुक्कामासाठी आलो.
| राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधी - पाचाड |
| राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड |
| राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड |
| तकयाची विहीर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा - पाचाड |
| सुर्यास्त |
| पायर्यांची वाट - किल्ले रायगड |
| खुबलढा बुरूज - किल्ले रायगड |
| महादरवाजाचे बुरुज - किल्ले रायगड |
| महादरवाजा - किल्ले रायगड |
| तोफा - किल्ले रायगड |
| वरील दिशेने महादरवाजा व तटबंदी - किल्ले रायगड |
| हनुमान टाकी येथील कोरीव हनुमान -किल्ले रायगड |
| हनुमान टाके - किल्ले रायगड |
| गंगासागर तलाव - किल्ले रायगड |
| पालखी दरवाजा - किल्ले रायगड |
| गंगासागर तलाव व मागे मनोरे - किल्ले रायगड |
| राणीवसा - किल्ले रायगड |
| राणीवसा - किल्ले रायगड |
| धान्यांचे कोठार - किल्ले रायगड |
| राणीवसा येथील सौचालय- किल्ले रायगड |
| अष्टप्रधांनाचे वाडे - किल्ले रायगड |
| मेणा दरवाजा - किल्ले रायगड |
| टाकसाळ - किल्ले रायगड |
| खलबतखाना - किल्ले रायगड |
| छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा - किल्ले रायगड |
| राजसभा येथील मेघडंबरी मधील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती - किल्ले रायगड |
| नगारखाना - किल्ले रायगड |
![]() |
| शिर्काई देवीचे मंदिर - किल्ले रायगड |
![]() |
| बाजारपेठ - किल्ले रायगड |
![]() |
| बाजारपेठेतील नाग - किल्ले रायगड |
![]() |
कोळिंब तलाव - किल्ले रायगड |
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये शिवलिंग व गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराचा बाहेरील नंदी पाहता इतर राजवटीमध्ये नंदीची मोडतोड झालेली जाणवते. मंदिरा समोरील (पूर्व) दरवाजाने बाहेर येताच उजव्या बाजूला नजरे समोर अष्टकोनी चौथरा दिसतो ती महाराजांची समाधी, तेथे नतमस्तक झालो. या पूर्वेकडील दरवाजाचा दुसऱ्या पायरीवर एक लहानसा शिलालेख दिसतो ’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’, ज्यांनी हा रायगड बांधला त्यांच्या नावाचा हा शिलालेख. तसेच दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख कोरलेला दिसतो. ते सर्व पाहून झाल्यानंतर मंदिरामधून बाहेर आलो.
![]() |
| जगदीश्वर मंदिर - किल्ले रायगड |
![]() |
| मंदिरामधील हनुमानाची मूर्ती- किल्ले रायगड |
![]() |
| जगदीश्वर मंदिरासमोरील नंदी - किल्ले रायगड |
![]() |
| मंदिराच्या पायरीवरील शिलालेख 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर' - किल्ले रायगड |
![]() |
| भिंतीवरील शीलालेख - किल्ले रायगड |
![]() |
| छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी - किल्ले रायगड |
मंदिराच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे ते लांब असल्यामुळे नाही पाहता आले, मग उजवीकडे थोडे खालील दिशेला असलेली बारा टाकी व दारूची कोठारे पाहिली. तेथून खोल दरीमध्ये वाघ दरवाजा दिसत होता मन तर खूप सांगत होते पुन्हा कधी पाहणार? पण परिवार सोबत असल्यामुळे तेथूनच माघारी फिरलो.
![]() |
| बारा टाकी येथील कोठारे - किल्ले रायगड |
![]() |
| बारा टाकी - किल्ले रायगड |
बाजारपेठेच्या बाजूला गावकऱ्यांची काही घरे 🛖⛺ आहेत तेथे दुपारचे जेवण🥘 उरकले. नंतर बाजारपेठतुन होळीचा माळावरती आलो व तेथुन डाव्याबाजूला थोडे खालील दिशेला असलेल्या वाडेश्वर महादेव मंदिर, कुशावर्त तलाव व इतर इमारतींचे अवशेष पाहून माघारी फिरलो व गड उतार झालो.
| कुशावर्त तलाव - किल्ले रायगड |
| वाडेश्वर महादेव मंदिर - किल्ले रायगड |
| कुशावर्त तलाव - किल्ले रायगड |
ज्या कारणासाठी इतके दिवस जाणे टाळत होतो तसेच झाले. रायगड हा धावत पळत वा एका दिवसात जगण्याचा / पाहण्याचा विषय नाही. शेवटी हिरकणी बुरुज, महादरवाजा समोरील पाण्याचा टाक्या, टकमक टोक, वाघ दरवाजा, भवानी कडा, काळा हौद, वाघबीळ, गुहा व इतर कित्येक अवशेष पाहायचे राहिले आहेत याचीच आता खंत.....!!
सध्या रोपवेमुळे किल्ल्यावरती येणाऱ्या लोकांची गर्दी वाढलेली आहे ते अभिमानाचेच आहे पण किल्ल्यावरती कचऱ्याचे प्रमाण देखील खूप दिसत आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे...!
साडेचार वर्षाचा माझा मुलगा निरव मात्र इतका मोठा रायगड किल्ला अगदी न थकता चढून आला व पूर्ण फिरला देखील, यासाठी त्याचे विशेष कौतुक वाटले. भेटू लवकरच पुन्हा रायगडा वरती.....!!
© सुशील राजगोळकर
| रायगड किल्ल्यावरून दिसणारा जिजाऊ माँसाहेब यांचा राजवाडा |
भिवपुरी येथील ‘पेशवेकालीन तलाव’
महाराष्ट्रात आजही अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे आजही इतिहासाच्या पाउलखुणा आजही लपलेल्या आहेत. अश्याच काही पाउलखुणा या कर्जत पासून जवळच असलेल्या ‘भिवपुरी’ गावात आपल्याला पहायला मिळतात. भिवपुरी गाव मुळातच निसर्गरम्य असल्यामुळे या ‘भिवपुरी’ गावामध्ये काही घाटवाटा या देशावरून खाली उतरतात. अश्या या महत्वाच्या ‘भिवपुरी’ गावामध्ये एक सुंदर ‘पेशवेकालीन तलाव’ आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
‘भिवपुरी’ येथे यायचे झाले तर आपल्याला पुण्याहून कर्जतमार्गे येता येते तसेच मुंबईवरून कर्जत गाठून आपल्याला ‘भिवपुरी’ येथे आपल्याला येता येते. कर्जत गावामधून ‘भिवपुरी’ गावामध्ये येण्यासाठी आपल्याला रिक्षा देखील सहज उपलब्ध होतात. ‘भिवपुरी’ हे गाव मुळातच निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. याच्या एका बाजूला उंचच उंच सह्याद्रीचे कडे आपले लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सगळ्या बाजूने धबधबे अक्षरशः कोसळत असतात. अश्या सुंदर ठिकाणी बांधला गेलेला ‘पेशवेकालीन तलाव’ यामध्ये अजून भर घालतो.
‘भिवपुरी’ येथील ‘पेशवेकालीन तलाव’.
राजमाचीपासून उत्तरेस जवळपास १४ कि.मी. अंतरावर ‘कुसूर’ गावापासून भिवपुरी गावापर्यंत जाण्यासाठी साधारणपणे ४ कि.मी. लांबीचा ‘कुसूर’ घाट आहे. हे ‘कुसूर’ गाव समुद्रसपाटीपासून जवळपास २१४५ फुट उंच असून ‘आंध्रा नदी’ दरीच्या मुखावर हे गाव वसलेले आहे. या कुसूर घाटामधून वाट खाली उतरून कोकणात ‘भिवपुरी’ या गावात येते. पूर्वी पुणे, तळेगाव याठीकाणावरून कर्जत, नेरळ, कल्याण या गावांकडे जाण्यासाठी ‘कुसूर’ घाटामधून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असे. या ऐतिहासिक ‘कुसूर’ घाटामधून पूर्वी घोडेस्वार आणि ओझे लादून गुरे नेली जात असत. परंतु ‘कुसूर’ घाटामधून बैलगाडी जाण्यायोग्य रस्ता कधीही नव्हता. ‘कुसूर’ घाटामधून जाणारा रस्ता हा पेशवेकाळातील आहे.
याच घाटवाटेवरील पांथस्थांची तहान भागावी म्हणून ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या पत्नी ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी हा सुंदर अष्टकोनी तलाव ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या स्मरणार्थ बांधला. जेव्हा पानिपत येथे ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ धारातीर्थी पडले त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी ‘पार्वतीबाई पेशवे’ या पुण्यामध्ये आल्या त्याच्यानंतर त्या काहीकाळ वास्तव्यासाठी ‘भिवपुरी’ येथे आल्या तेव्हा त्यांनी हा सुंदर अष्टकोनी ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांच्या स्मरणार्थ हा सुंदर तलाव बांधला. याबाबत पुणे गॅॅझेटियर १८८५ मध्ये पान क्रमांक १५२ यामध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-
‘भिवपुरी’ येथील ‘पेशवेकालीन तलाव’ येथे बांधलेला दगडी दरवाजा.
At Bhivpuri there is a fine stone reservoir built at a cost Rs. 75000 by Parvatibai widow of Sadashiv Chimnaji of the Peshwa’s family. The road is passable for mounted horsemen or laden bullocks, but not for carts. It is a great line of traffic from Talegaon to Karjat, Neral, Kalyan and Panvel. The yearly toll revenue of about Rs. 200 is spent on repairing the pass.
अशी ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला या ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या ‘सदाशिवभाऊ पेशवे’ यांच्या स्मर्णार्थ बांधलेल्या तलावाबद्दल माहिती मिळते तसेच या तलावाला बांधण्यास ७५००० रुपये लागले याची देखील नोंद आपल्याला मिळते. ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी बांधलेल्या या सुंदर तलावाला पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे आणि या तलावाच्या आतमध्ये उतरण्यासाठी काही ठिकाणी छोट्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आपल्याला पहायला मिळतात. तसेच काही ठिकाणी तलावातील पाणी काढण्यासाठी रहाटाचीसुद्धा सोय केली होती हे आपल्याला तेथील कधी दगडांच्या खुणांवरून समजते.
आजही ‘पेशवेकालीन तलाव’ हा ‘भिवपुरी’ गावाचा महत्वाचा वारसा आहे.
‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी बांधलेला हा तलाव आजही प्रचंड पाण्याचा साठा आपल्या पोटात साठवून वर्षाचे बारा महिने हा ‘भिवपुरी’ गावाची तहान आजही भागवत आहे. आजही ‘भिवपुरी’ येथील पेशवेकाळातील अष्टकोनी तलाव बघताना आजही ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ आणि पानिपतची लढाई आठवते. असा हा सुंदर ‘भिवपुरी’ गावाचा महत्वाचा वारसा आहे. या सुंदर पेशवेकालीन अष्टकोनी तलावाला भेट देऊन ‘पार्वतीबाई पेशवे’ यांनी केलेल्या या महत्वाच्या कामाची प्रत्येकाने या तलावाला भेट देताना आठवण ठेवावी. अश्या या ‘भिवपुरी’ गावाच्या वारसास्थानाला भेट देऊन ‘सदाशिवरावभाऊ पेशवे’ यांचे स्मरण नक्की करावे.
______________________________________________________________________________________________
संदर्भग्रंथ:-
१. Gazeteer of Bombay Presidencey Poona:- Page No 152, Government Central Press, 1885.
कसे जाल:-
पुणे – लोणावळा – कर्जत – भिवपुरी.































































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.