Thursday, April 4, 2024

वाराणसी येथील घाट

 श्री. पुरुषोत्तम लेले, पुणे  शिल्पकथा ८९८
 भाग  ०१
घाट या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार वेगवेगळा आहे. खंडाळा, कुंभार्लि घाट म्हणजे डोंगर ओलांडण्यासाठी केलेला, चढ, उतार असलेला वळणा वळणाचा रस्ता. घाट घालणे म्हणजे समारंभ, एखादे कार्य धुमधडाक्यात साजरे करणे. घाट म्हणजे भांड्यांचा विशिष्ट आकार. घाट म्हणजे नदीच्या पाण्यात उतरण्यासाठी केलेल्या पाय-या. एखाद्या तिर्थक्षेत्री‌ नदीमध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते, अशा ठिकाणी घाट बांधणे, म्हणजे अनेक भक्तांची नदीत स्नानासाठी उतरण्यासाठी सोय करणे, हे पुण्याचे काम मानले जाते. त्यामुळे अनेक दानशूर लोकांनी, राजे महाराजांनी येथे घाट बांधले आहेत, स्वतःची नांवे दिली आहेत. यातील काही घाट पौराणिक संदर्भ असलेले आहेत.
काशी, बनारस, वाराणसी या नांवाने ओळखली जाणारी पुरातन नगरी आहे.  १९५६ साली वाराणसी नामकरण करण्यात आले. पुरातन नगरी असल्याने येथे सध्या *८४* घाट आहेत. प्रत्येकाचा थाट वेगळा, बांधकामाची शैली वेगळी, परंपरा वेगळी, आकार वेगळा, पाय-याची संख्या, तेथे करण्यात येणारी धार्मिक कार्ये वेगवेगळी, घाट कुणी बांधला, त्याचा इतिहास वेगळा, ही माहिती फार मनोरंजक आहे.
गंगा नदी, वाराणसी येथे अर्धचंद्राकार, उत्तरवाहिनी आहे. पश्चिम दिशेला, वाराणसी शहर व घाट आहेत. दक्षिणेला अस्सी नदी गंगेला मिळते, तेथे अस्सी घाट आहे. तर शेवटच्या आदि केशव घाटानंतर, वारणा नदी गंगेला मिळते. प्रत्येक घाटाच्या भिंतीवर, घाटाचे नांव लिहिलेले असल्याने घाट ओळखणे सोपे आहे.
  पुढील भागात येथील घाटांचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

फोटो   :
१) 'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/ Swami Raghav Chaitanya
 
माहिती:
१) वाराणसी चे घाट- श्री सरिता देव
    'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav       
       Chaitanya
३) Laukika Raste Gokhale
४) गुगलच्या सहकार्याने

भाग  ०२
'घाट वॉक' अंतर्गत आपण अस्सी घाटाकडून आदि केशव घाटापर्यंत नदीच्या डाव्या बाजुने चालत जाऊ शकतो. त्यामुळे घाट चढ-उतार करावे लागत नाहीत. याला घाट परिक्रमा असेही म्हणतात. ही परिक्रमा ६.५ किमी अंतराची आहे. सध्या घाटावर उत्तम स्वच्छता ठेवली जात आहे. 'नमामि गंगे' प्रोजेक्ट अंतर्गत गंगा नदीचे पाणी ही प्रदुषण मुक्त, स्वच्छ ठेवले जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकसभा मतदार संघातून निवडुन येत आहेत. त्यांचा दौराही अधुन मधुन होत असतो. त्यामुळे ही स्थानिक प्रशासन जास्त लक्ष देत असते.
  येथील सर्व घाट उत्तर प्रदेशमधील चुनार, सोनभद्र,‌ चंदोली जिल्ह्यात उपलब्ध असणा-या लाल बलुआ पत्थर मध्ये (Red Sandstone) घडवले आहेत. यांचे वैशिष्ट्य म्हणजे कालांतराने हवेच्या घर्षणाने त्याची तकाकी / चमक वाढत जाते व पाण्याचा कोणताही परिणाम त्यावर होत नाही.
 या भागात पहिल्या पाच घाटांचा परिचय करून देण्यात आला आहे.
१) अस्सी घाट     २) गंगामहल घाट     ३) रेवा घाट ४) तुलसी घाट      ५) मैदानी घाट
फोटो   :
१) प्रसाद' वाराणसी विशेषणां ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
    Swami Raghav Chaitanya
३)  Laukika Raste Gokhale,Pune
४) गुगलच्या सहकार्याने   
 
माहिती:
१)  वाराणसीचे घाट- श्री सरिता देव
        'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२)  स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३)  मनिष दधीच
     Raging Bull Vlogs
४)  Wekipedia
५)  गुगलच्या सहकार्याने




 
भाग  ०३
'काशीस जावे नित्य वदावे' असा संकल्प रोज म्हटला तरी काही वर्षांनी तेथे न जाता ही पुण्य मिळते अशी या क्षेत्राची महती आहे. व वारंवार स्मरणाने आयुष्यात कधी तरी काशी यात्रा घडते अशी भारतीयांची श्रध्दा आहे. रात्री अंथरूणावर पाठ टेकताना सुध्दा  देवाला हात जोडून
  'पडपड कुडी, धरणीवरी, गंगाभागिरथीचे तीरी, गयागी गमन, प्रयागी मरण, काशी विश्वेश्वरा, तुझे नित्य स्मरण'म्हणायची पध्दत आहे.
  अंघोळ करताना 'हर हर गंगे' म्हणुन आपण ज्या घंघाळातील (गंगा आलय)पाणी घेऊन अंघोळ करतो ते गंगेचे पाणीच आहे असे समजुन गंगा नदीचे स्मरण करतो. अशा काशीमध्ये गंगा स्नान, गंगा पुजन हे पुण्यकारक मानले गेले आहे. येथे येणा-या भाविकांसाठी काहींनी धर्मशाळा बांधल्या, काहींनी अन्नछत्रे सुरू केली. काही धनिकांनी, भारतातल्या निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी, भाविकांना नदीत उतरून स्नान करण्यासाठी घाट बांधले आहेत.
  सर्व घाट शांतपणे पाहण्यासाठी, घाट परिक्रमा करण्यासाठी नौकाविहार उत्तम आहे. या घाटांचा परिचय करून देणारा हा  दुसरा लेख.
  या लेखात
६)  जानकी घाट        ७) माता आनंदमयी घाट
८). वच्छराज घाट      ९) जैन घाट
१०) निषादराज घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
      
माहिती:
१) वाराणसीचे घाट- श्री सरिता देव
        'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/ Swami Raghav
     Chaitanya
३) मनिष दधीच.   Raging Bull Vlogs
४) दोन तिर्थक्षेत्रे- अलाहाबाद व वाराणसी
      मोहनीराज दातार- साप्ताहिक सकाळ एप्रिल 94.
५) गुगलच्या सहकार्याने




भाग  ०४
 

भारतात टुरिस्ट डेस्टिनेशन बरेच आहेत. काश्मिर, गोवा, आग्रा. पण सगळ्यात जास्त टुरिस्ट धार्मिक तिर्थस्थळ  काशी / वाराणसी मध्ये येत असतात. १३ डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी श्री.काशी विश्वनाथ मंदिर कॉरीडोरचे उद्घाटन केले, त्यामुळे वाराणसीचे रूप पालटुन गेले आहे.
  वाराणसी विश्वनाथ मंदिराच्या आसपास व अनेक घरे, मंदिरे, दुकाने होती. अरूंद रस्ते होते, स्वच्छता नीट ठेवली जात नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी श्री.विश्वनाथ मंदिर कॉरीडार अंतर्गत मंदिराच्या आसपासच्या‌ घरातील लोकांना पर्यायी जागा देऊन, आसपास असलेली छोटी छोटी मंदिरे हटवुन, पुनर्रचना केली. मोठे प्रशस्त रस्ते तयार केले. या भागांची स्वच्छता केली,सुशोभिकरण केले. ठिकठिकाणी ५० शौचालये १५३ सार्वजनिक शौचालये  बांधली, सांडपाणी निवारण करण्यासाठी ९ ठिकाणी यंत्रणा  घाटावर उभारली. रामाना वाराणसी येथे Sewage Treatment Plant उभे केले.
 स्वच्छ भारत योजने अंतर्गत दररोज सफाई करण्याची यंत्रणा उभी केली. घाटांची स्वच्छता करून, नित्य नियमाने स्वच्छता आता होत आहे. सर्व घाटांवर  LED दिवे बसवण्यात आले आहेत. घाटावर स्नान करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी खास कक्ष उभे केले आहेत. एकेकाळी रात्री भयाण वाटणारे घाट आज रात्री उशीरा पर्यंत स्त्री पुरूष,लहान मुले यांच्या गर्दीने गजबजून गेलेले असतात.
या घाटांचा परिचय करून देणारा हा  तिसरा लेख.
  या लेखात
११)  प्रभुघाट              १२) पंचकोटा घाट
१३)  चेतसिंह घाट        १४) निरंजनी घाट
१५)  महानिर्वाणी घाट
 
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.

.पंचकोटा घाट
   हा घाट पंचकोटा,बंगाल च्या राजाने 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला आहे.हा घाट सुस्थितीत आहे.येथे फारशी गर्दी नसते.घाटावरच्या बाजुला शिवमंदिर व काली मंदिर आहे.
या घाटाचा फोटो उपलब्ध नाही.
.महानिर्वाणी घाट
निरंजनी आखाड्याच्या उत्तरेकडे हा आखाडे आहे
चेतसिंह घाटाचाच काही भाग निरंजनी घाट आहे.
नागा साधू महानिर्वाणी यांचा आखाडा आहे. कुंभ मेळ्याच्या वेळेस महानिर्वाणी आखाड्याचे नागा साधू राहतात. नेपाळ नरेश यांनी बांधलेले शिव मंदिर, कार्तिकेय मंदिर येथे आहे.भगवान बुध्दांनी या घाटावर स्नान केले होते.  
  या घाटाचा फोटो उपलब्ध नाही.
 


 भाग  ०५
बाजीराव प्रथम यांची पत्नी काशी बाईसाहेब पेशवे तर बाजीराव द्वितीय यांची पत्नी वाराणसी बाईसाहेब पेशवे. दोन्ही नांवे काशी तीर्थक्षेत्रासंबंधित हा योगायोगच नव्हे का ?
वाराणसी येथील घाटांचा परिचय करून देणारा हा पांचवा  लेख.
या लेखात
 १६) शिवाला घाट              १७) गुलेरिया घाट
१८) दंडी घाट                   १९) हनुमान घाट
२०) प्राचीन हनुमान घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
माहिती:
१) वाराणसीचे घाट- श्री सरिता देव
        'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
     Raging Bull Vlogs
४) गुगलच्या सहकार्याने 






 भाग  ०६
  ज्या ठिकाणी पापांचा क्षय होतो त्याला 'काशी' म्हणतात किंवा जिथे लोक मुक्तीची कामना करतात ती काशी होय. बारा ज्योतिर्लिंगा पैकी 'वाराणस्यांतु विश्वेशं' हे नववे ज्योतिर्लिंग.
  काशीला मरण आले तर त्या आत्म्याला मुक्ती मिळते, पण सर्वांच्याच बाबतीत हे शक्य नाही, म्हणुन त्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार झाल्यावर त्याच्या ज्या अस्थी राहतात, त्या त्यांच्या मुलांबाळांतर्फे काशीला जाऊन गंगेत विसर्जन करण्यात येतात.आपल्या दिवंगत माता-पिता आदींच्या आत्म्यांना चिरशांती लाभावी ही त्यामागे भावना असते. अस्थी विसर्जन हा अंतीम संस्कार मानला जातो. हरिद्वार, वाराणसी, रामेश्वरम, गया, पुरी, पुष्कर येथे अस्थिविसर्जन केल्यास आत्म्याला जन्म मृत्यू चक्रापासुन मुक्ती मिळते अशी श्रध्दा आहे. काशीतील मणिकर्णिका व हरिश्चंद्र घाटावर अस्थी विसर्जन केले जाते.
या घाटांचा परिचय करून देणारा हा  सहावा लेख.
या लेखात
२१) कर्नाटक स्टेट घाट      २२)‌ हरिश्चंद्र घाट
२३) लाली घाट               २४) विजयनगरम् घाट
२५) केदार घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
     श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२)  स्वामी राघव चैतन्य/
     Swami Raghav Chaitanya
३)  मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४)  Weikipedia
५)  गुगलच्या सहकार्याने








 भाग  ०७
   काशी, वाराणसी नांव उच्चारताच आपल्या नजरेसमोर येते अर्धचंद्राकार वाहणारी गंगा नदी, व तिथले गजबजलेले घाट. घाटावर चाललेली धार्मिक कार्ये, नदीवर स्नानाकरिता उधळलेली स्त्रीपुरूषांची गर्दी, घाटासमोर गर्दी करून थांबलेल्या नांवा. घाटावर बांधलेले महाल, मंदिरे, मंदिराचे कळस. हरिश्चंद्र, मणिकर्णिका घाटावर चाललेले दाह संस्कार.
  घाट दक्षिणोत्तर नदीच्या प्रवाहाप्रमाणे‌ अर्धवर्तुळाकृती बांधलेले आहेत. सकाळची‌ सूर्याची पहिले किरण जेव्हा घाटावर पडतात, तेव्हा गंगेच्या किना-यावर पुजा अर्चा सुरू होते. लोकांना स्नानसंध्या, पुजापाठ करण्यासाठी अडचण, सुविधा होऊ नये म्हणुन निरनिराळ्या राजांनी, धनिकांनी, वाराणसी नरेशांनी घाट‌ बांधले. हे घाट, घाटावर बांधलेल्या इमारती व गंगेच्या प्रवाहावर पडणारे सूर्यकिरण सतत परावर्तित होत असतात. संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. आता तर अहोरात्र LED लाईट चालू असतात.
  त्यामुळे सूर्योदय, सुर्यास्त यावेळी घाटावरील स्त्रीपुरुषांची लगबग, चालणारी धार्मिक कार्ये, संध्याकाळी होणारी गंगा आरती, संध्याकाळी घाटावर चालणारे करमणुकीचे कार्यक्रम हे सर्व नांवेत बसुन पाहणे अवर्णनीय, आनंदाची अनुभूती देणारा ठरतो. यासाठी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी नावाडी वल्हवणा-या नांवा बरोबरच, डिझेल, सीएनजी वर चालणारे क्रूझ, गाईडसहित उपलब्ध आहेत. साधारणपणे ६०० ते १००० रूपये नौका विहारासाठी घेतले जातात. त्यात अस्सी घाटापासुन पंचगंगा घाटापर्यंत किंवा शेवटच्या आदिकेशव घाटापर्यंतच्या नौका विहाराचा समावेश आहे.     
 'अलकनंदा’ या Five Star डबलडेकर क्रुझवर, वरती ६०, खाली असलेल्या A/c lower deck वर ६० प्रवासी बसु शकतात.
  या भागात अशा वेगवेगळ्या नौकांचा परिचय करून देण्यात आला आहे.

माहिती
१) वाराणसी चे घाट
      श्री.सरिता देव
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४) Weikipedia
५) गुगलच्या सहकार्याने
 













भाग  ०८
  वाराणशी येथील घाटांचा परिचय करून देणारा हा आठवा  लेख.
  या लेखात
२६) चौकी घाट            २७) क्षेमेश्वर/ सोमेश्वर घाट
२८) मानसरोवर घाट     २९)  नारद घाट
३०) राजा घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.

माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४) Weikipedia  
५) गुगलच्या सहकार्याने







 भाग  ०९
 वाराणसीच्या घाटासंबंधी माहिती लिहीताना अनेक नवनवीन गोष्टींची माहिती झाली. ग्वालियर घाटाजवळ, मंगला गौरी घाट आहे, त्याला बाला/लक्ष्मण बाला / मंगला गौरी/ बाला घाट अशी निरनिराळी नांवे आहेत. प्रत्यक्षात लक्ष्मण बाला सिंधीया यांनी हा घाट बांधला. सत्यनारायण कथेतील, कुणी सत्यदेव, कुणी सत्यईश अशी विविध नांवे सत्यनारायणाला जशी आहेत त्याची आठवण झाली कारण एका घाटाला असणारी विविध नांवे.
  तेलियानाला घाटावर तेली लोक राहतात. शेजारी पुर्वी नाला वहात होता त्यामुळे त्या घाटाला तेलियानाला म्हणतात. सध्या हा नाला अस्तित्वात नाही.
  गाय घाटावर पुर्वी गाईला चारा घालत असत, गाई धुत असत म्हणुन त्या घाटाला गाय घाट म्हणतात. प्रत्यक्षात तेथे तीन फुट उंचीची नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. एका ठिकाणी तेथे गाईची मोठी मूर्ती आहे, म्हणुन गाय घाट म्हणतात असा उल्लेख केलेला आढळला.
  गुलेरिया घाट येथे औदुंबराची (हिंदीत गुलेर)झाडे होती, सध्या नाहीत, तरीही घाटाचे नांव गुलेरिया घाट आहे, असा उल्लेख आढळला.
  श्री.नारायण दिक्षीत हे बाजीराव प्रथम व चिमाजी अप्पा यांचे अध्यात्मिक गुरू. अनुष्ठानासाठी ते वाराणसी येथे घाट बांधुन राहु लागले. त्यांनी दशाश्वमेध, दुर्गा घाट, पंचगंगा घाटांची दुरूस्ती केली. एके ठिकाणी पेशवा नारायण दिक्षीतने इस घाट का पुनर्निर्माण किया असा उल्लेख आढळला.
  दशाश्वमेध घाटावर नेमके कुणी दहा अश्वमेध केले याचा उल्लेख नाही अनेक नांवाचा अश्वमेध यज्ञ केले असल्याचा उल्लेख आढळतो.  अनेक घाटांचा परिचय करून देताना येथे शिवमंदिर आहे असा उल्लेख आढळतो. प्रत्यक्षात सर्व घाटावर शिवलिंग व नंदी मंदिरात किंवा घाटावर उघड्यावर शिवलिंग व नंदी असलेले आढळतात.
  राजा घाट व राज घाट एकमेकांपासुन बरेच दुर आहेत तरी नेमकी माहिती लिहीताना जरा संभ्रम निर्माण होतो. प्रह्लाद घाटावर हिरण्यकश्यपुचा वध नृसिंहाने केला ते हे ठिकाण म्हणुन प्रह्लाद घाट आहे असा उल्लेख एका ठिकाणी आढळला. एका घाटाचे चार घाट व वेगवेगळी नांवे आढळली तर पुर्वीचे दोन घाट एकत्र करून नवीन नांव दिल्याचेही आढळले.
  काही घाटांचे जुने, पक्क्या स्थितीतील फोटो उपलब्ध आहेत, पण वाराणसी स्मार्ट सिटी, व नमामि गंगे प्रोजेक्ट अंतर्गत वाराणसी बरोबरच वाराणसी घाटाचे पुनर्निर्माण, निर्मळ घाट प्रकल्प,  घाटावरील महालांचे five star hotel मध्ये रूपांतर व्हायला लागले आहेत. तरीही उपलब्ध असलेल्या माहितीनुसार संपुर्ण घाटांचा परिचय करून देण्याचा व उपलब्ध झालेल्या माहितीनुसार त्यात बदल करण्याचा विचार आहे. आपले सहकार्य आहेच. घाटांचा परिचय करून देणारा हा नववा  लेख.
या लेखात
  ३१) खोरी घाट                  ३२) पांडे घाट
३३) सर्वेश्वर घाट                ३४) दिगपतिया घाट
३५) चौसष्टी घाट
  यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
 
माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४)  Weikipedia
५)  गुगलच्या सहकार्याने   
            
३१) खोरी घाट
हा घाट कविंद्र नारायण सिंह यांनी बांधला. हा गंगामहल घाट या नांवाने देखील ओळखला जातो. घाटावर पांच मंदिरे आहेत. येथे धार्मिक, सांस्कृतिक उत्सव फारसे होत नाहीत.  खोरी या शब्दाचा अर्थ आहे अरूंद रस्ता गल्ली. त्याप्रमाणे हा घाट अरूंद असावा.
(फोटो उपलब्ध नाही)
३२) पांडे घाट
बबुआ पांडे हे वाराणसीमधील नामवंत मल्ल. ते छपरा, बिहार मधून येथे आले होते. येथे त्यांचा घाटावर आखाडा आहे. येथील घरे  चुनार लाल बलुआ पाषाणात बांधलेली आहेत. तसेच आखाड्या जवळ हनुमान मंदिर ही आहे.  (फोटो उपलब्ध नाही)
३३) सर्वेश्वर घाट
याला धोबी घाटही म्हणतात.येथे पांडे यांची पांच घरे आहेत.१९०० साली चुनार लाल बलुआ पाषाणात येथील हवेली मथुरा पांडे यांनी बांधली. येथे बोटीत दुरुस्तीचे काम चालते. येथे सर्वेश्वर महादेव मंदिर आहे. त्यामुळे या घाटांचे नांव सर्वेश्वर घाट पडले.
(फोटो उपलब्ध नाही)

भाग  १०
 घाटांचा परिचय करून देणारा हा दहावा लेख या लेखात
३६) राणा महाल घाट        ३७) दरभंगा घाट
३८) मुंशी घाट                 ३९) देवी अहिल्याबाई घाट
४०) शीतला घाट
  यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४)  Weikipedia
५)  गुगलच्या सहकार्याने   









भाग  ११
  
घाटांचा परिचय करून देणारा हा अकरावा लेख.
या लेखात
४१) दशाश्वमेध घाट              ४२) प्रयाग घाट
४३) राजेंद्रप्रसाद घाट            ४४) मानमंदिर घाट
४५) त्रिपुर भैरवी घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
  
माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४) Weikipedia
५) Kevin Standge
६) गुगलच्या सहकार्याने 










भाग  १२
  
घाटांचा सचित्र परिचय करून देण्याचा प्रयत्नात पहिला फायदा झाला ते घाटांच्या भिंतीवर लिहीलेल्या हिंदी, इंग्रजी नांवाचा. Weikipedia, Dsource, Indrajit Das, Kolkatta यांच्या pdf file फाईलचा, मनीष दधिच यांनी घाटावर प्रवास करत सांगितलेल्या यु ट्यूब वरील वर्णनाचा तसेच 'प्रसाद' मासिकाच्या वाराणसी विशेषांकांचा.  Kevin Standge हे United Kingdom मधील फोटोग्राफर, Archeologist, Blogger आहेत. त्यांच्या Blog मध्ये वाराणसी घाटांसंबंधी  काही वेगळी माहिती मिळाली. ती माहिती येथे समाविष्ट केली आहे.
  या सर्व ठिकाणाहून मिळालेल्या माहितीचे योग्य संकलन करून ती माहिती येथे लिहीली आहे.
जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे ।
शहाणे करून सोडावे सकल जन ॥
या समर्थ रामदास स्वामी यांच्या शिकवणीनुसार आपल्या संस्कृतीची ओळख आपण करून घ्यावी ती दुस-यांना सांगावी हा या शिल्पकथांचा उद्देश आहे.
घाटांचा परिचय करून देणारा हा बारावा लेख.
या लेखात  
४६)  मीर घाट             ४७) नया/ फुटा घाट
४८)  नेपाली घाट         ४८) ललिता घाट
५०)  बावली/उमरावगिरी /अमरोहा घाट
  
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
माहिती:
१) विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
२) स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
३) मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
४) Weikipedia
५) Kevin Standge
६) गुगलच्या सहकार्याने
.बाऊली/उमरावगिरी/अमरोहा

हा पुर्वी राजराजेश्वरी घाटाचा भाग होता. 
हा घाट 19 व्या शतकात एक श्रीमंत व्यापारी बाबु केशव दास यांनी बांधला.
( फोटो उपलब्ध नाही)
 










भाग  १३
स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत, काशी विश्वनाथ धाम कॉरीडोर, वाराणसी अंतर्गत परिसर विकासाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांनी २०१९ ला पायाभरणी करून सुरूवात केली होती. 33 महिन्याच्या कालावधी मध्ये परिसर विकासाचे काम डिसेंबर २१ मध्ये पुर्ण झाले.
  त्या अंतर्गत घाटावरही अनेक बदल झाले आहेत. घाटांची नित्य नियमाने करण्यात येणारी स्वच्छता, नमामि गंगे प्रोजेक्ट अंतर्गत नदीच्या पाण्याची स्वच्छता, रात्री घाटावर असलेली प्रकाश व्यवस्था यामुळे घाट नेहमी गजबजलेले‌ असतात. त्यामुळे पर्यटन, व्यापारात वाढ, अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
  त्यामुळे येथे करून देण्यात आलेला घाट परिचय ह्यामध्येही वेळोवेळी बदल करावा लागणार आहे.
घाटांचा परिचय करून देणारा हा तेरावा लेख.
  या लेखात
५१) जलसेन /जलशायी घाट          
५२) खिडकी घाट          ५३) मणिकर्णिका घाट        
५४) बाजीराव घाट         ५५) सिंधिया घाट
यांचा परिचय करून देण्यात आला आहे.
  
  माहिती:
  1. विश्वनाथ काशीला कसे आले ?
      श्री.गजानन शं.खोले
      'प्रसाद' वाराणसी विशेषांक ऑगस्ट 98
  2. स्वामी राघव चैतन्य/
       Swami Raghav Chaitanya
  3. मनिष दधीच
      Raging Bull Vlogs
  4.Weikipedia
  5. Kevin Standge
  5. गुगलच्या सहकार्याने
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...