Sunday, November 29, 2020

पुणे जिल्ह्याचे पर्यटन

 पुणे खादाडी :-
अमर्यादित पण मिनी थाळी हवी असतील तर आपटे रोड वरील आशा डायनिंग हॉल ला पर्याय नाहीं.
लॉ कॉलेज रोडवरील कृष्णा डायनिंग हॉल मध्ये उत्तम फुल थाळी मिळते.
'खत्री'ची मस्तानी घेऊन बघा. एकदम नैसर्गिक, आणि सरसरीत.
कॉर्न घालून जो कृत्रिम घट्टपणा आणतात तो प्रकार नाही.
बदामशेक : कॅम्प मध्ये महात्मा गांधी रस्त्याच्या शेवटी अरोरा टॉवर्सच्या अलीकडे एक गाडी असते. त्याच्याकडे बदामशेक, फालुदा झकास मिळतो.
वाकड ला इंदिरा नॅशनल शाळेच्या एकदम समोर एक टपरी आहे, लॉकडाऊन पूर्वी तिकडचे पोहे अप्रतिम होते, सध्या चालू आहे का नाही हे माहीत नाही.
थाळी साठी जनसेवा पण मस्त आहे. थोडे स्वस्त पाहिजे असेल तर आशा. अर्थात यालाही 10-15 वर्ष झाली, सध्याची स्थिती माहीत नाही.
मला सगळ्यात जास्त आवडलेली मिसळ श्री उपहारगृह.
आता रामनाथ.
बेडेकर अजिबात आवडत नाही.
केळकर संग्रहालयाच्या बाजूला बापट खास आवडले नाही.
वैशाली रुपाली आणि वाडेश्र्वर चांगले असेल तरी ओव्हर हाईप झालेले आहेत. पण क्राऊड चांगला असतो.
सध्या सौधिंडीयनसाठी विमाननगर ला सांबार मध्ये जातो.
एकदा विमाननगर मध्येच चेट्टीनाड चिकन साठी मलबार स्पाइस नामे ठिकाणी गेलो होतो, मजा आली नाही.
मानकर च्या चटणीत पोतंभर साखर असते, याच्याशी सहमत.
थाळी प्रकार मला आवडत नाही.
खिचडी एक दोन वेळा टिळक रस्त्यावर अप्सरा हॉटेल चौकातील गाडीवर खाल्ली होती. बिपिन चं उपिट २००५-०६ मध्ये खूप आवडलं होतं. तीन चार वर्षांपूर्वी तसच होतं.
शनिपार चौकातील गौरव snacks ची मटार करंजी आणि उकडीचे मोदक सुंदर असतात.
ग्राहक पेठे शेजारी एक खाऊचं दुकान आहे. तिथे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे स्वस्त, मस्त आणि टेस्टी स्नॅक्स मिळतात.
मस्तानीला तूर्त सुजाताशिवाय दुसरा चांगला पर्याय दिसत नाही. (आणि हडपसर मध्ये सुजाताच्या दोन शाखा आहेत)
रामनाम मिसळ >>> रामनाथ आहे ना नाव ह्याचे? का तिखट प्रकारावरुन रामनाम आठवते म्हणुन तसे करुन टाकले नाव???

दुर्वांकुर पेक्षा श्रेयस जास्ती आवडलेले मला..... काही वर्षापुर्वी दुर्वांकुरमधे ताटात काही उरवले नाही तर थोडी सुट (डिस्काउंट) अशी काही योजना होती का?? असेल तर उत्तम आहे..... अमर्यादित थाळी असलेल्या ठिकाणी लोक वाट्तेल तेवढे घेतात पानात अन टाकुन देतात, पाहुन चिड येते... त्याहुन वाईट म्हणजे तिथे मोठे ग्रुप जाउन उगाच आग्रह आग्रह खेळतात.... अन मग २ - ३ श्रीखंडाच्या वाट्या फुकट वाढायला लावतात अन ते सर्व कचर्‍यात जाते कारण लेचेपेचे भिडु गार झालेले असतात....
श्रेयसमधे मी पुण्यात जेव्हा जेव्हा अलो, तेव्हा जेवलो आहे. मला ते आवडते. पण आता येव्हढी मोठी थाळी खाता येत नाही. म्हणूनच मी, फक्त स्नॅक्स देणार्‍या ईटरीजची माहिती विचारली होती.

म्हणून दूर्वांकूर (नाव खूप ऐकून आहे)... इत्यादी माझ्यासाठी आता बाद. :(
काकाकुआ मॅन्शन येथील मूळ वडेवाला, कुमठेकर चौकाजवळील श्री उपहारगृह (मिसळीसाठी) केव्हाच बंद झाले. आता मिसळ म्हणावी अशी मिसळ तुळशीबागेतील श्रीकृष्ण उपहारगृहात मिळते.
ज्ञानप्रबोधिनी सदाशिव पेठ , अनारसे सामोसा ( जीवाला खा )
सुकांता चे खूप फॅन आहेत मिपावर (पण मला शनिवार पेठ अहिल्यादेवी शाळेजवळील ) रसोई डायनींग हॉल ची थाळी आवडते ..
माझा प्रेफरंन्स
१. रसोई २. दुर्वांकुर टिळक रोड ३. सुकांता

आपटे रॉड वरील श्रेयस मध्ये २-३ वेळेला जेवलो ( आणि त्या सर्व वेळेला कुटुंबियांना जुलाब , उलट्या वैगरे त्रास झाला )
थाळी मला वैयक्तिक रित्या काही एव्हडी खास वाटली नाही , कुजबुज मार्केटिंग खूप झालंय श्रेयस चे (माझे वैयक्तिक मत )
दुसरं एक पूर्णब्रम्ह का काहीतरी थाळी एकदम भंगार, याचंही कुजबुज मार्केटिंग खूप झालंय श्रेयस चे (माझे वैयक्तिक मत )
लोखंडे तालीम नारायण पेठ , इथे मटकी भेळ एकदा , ट्रायवली होती मी ..
लक्ष्मी रोड बोहरी अळी (हार्डवेअरची बाजारपेठ ) इथं वेगवेगळ्या हातगाड्या , सराफ मार्केट बंद झाल्यावर येतात
तिथं , लोण्याचे गोळे ठेवलेला दावणगिरी डोसा , सॅन्डविच , वडाच्या झाडाच्या पानावर मिळणारे मटका आईस्क्रीम ...
मंडईतून बुधवार पेठेच्या साईड बोंबील मार्केट मधुन , नाकोडा ज्वे आणि रांका ज्वे आणि मिरज गालिब रॉड वरील मस्जिद , यांच्या इंटरसेक्शन वर
उपवासाची मिसळ मिळते ... हातगाडीवर ...
कसबा गणपती जवळ (सध्याला ) (पूर्वी फडके हौदाजवळ ) पारस खाजा , यांच्या बाकरवड्या चांगल्या ...
शनिवार वाड्याच्या पूर्व दिशेला (लाल महाल / कसबा गणपती साईड )
साबुदाणा वडे ...
नुमवी शाळेच्या मागील बोळात (तांबडी जोगेश्वरीच्या ) सॅन्डविच च्या गाड्या ..
मुख्य चितळेंच्या बाजूलाच ग्रीन बेकरीत मटार पॅटिस
त्यापुढे बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंगच्या आवारात गोल गोल चेंडूसारखे वडे व पाव ...
कुमठेकर रोड वर चितळेंच्या अलीकडच्या चौकात , श्री उपहार केंद्र होत
(सध्या ची स्थिती माहित नाही ) तिथं खिचडी चांगली मिळायची ...
लक्ष्मी रोड पु ना गाडगीळ समोर पावगी वाडा इथं स्वीट कॉर्न कटलेट
गुडलक मधला बन मस्का आवडतो.
सुकांता छान. तसेच हॉटेल श्रेयस म्हणून आपटे रोडला आहे ते सुद्धा बरे आहे.
पाषाण सुस रोडवर सनीज रेजोर्ट म्हणून छान प्रकरण आहे. तेथे दिवसभर फिरण्याऐवढे मटेरियल असावे, पण ट्राय केले नाहीये. मात्र तिथे जेवण अगदी भारी आहे.

बार्बेक्यू नेशन अगदी बकवास. आजिबात जाऊ नका.
हे पुण्यातल्या अत्यंत तोकड्या अनुभवावर आधारित.
शिवदीप वडापाव कर्वेनगर (ठाणे जनता सहकारी बँक आणि कॉर्पोरेशन बँक जवळ )
    naturals - इथे मिळणारी टेंडर कोकोनट आईसक्रीम जाम भारी असते.
    पत्ता - कर्वे पुतळा तसेच बालगंधर्व ह्या ठिकाणी शाखा आहेत.

नॅचरल्स ही एक साखळी आहे. पुण्यात त्यांची दुकाने आहेत त्याप्रमाणे मुंबईत तर आहेतच. इतकेच काय सांगलीत पण एक दुकान आहे.
असो, फडके हौदाजवळील, वैद्य मिसळ (हिरवी मिसळ, पातळ पोह्याचा चिवडा , दुधी भोपळा , ओलं खोबरं असलेला हिरवा रस्सा .. )
बाकीच्या मिसळी लाल असतात , हि हिरवी असते.
कॅड बी साठी कुठे जावे?
अनेक ठिकाणी आहेत. सर परशुराम महाविद्यालयासमोर एक दुकान आहे. येथे सर्व गोष्टी छान आहेत.
खाली दिलेल्या यादीतील १४-१५ ठिकाणी मी गेलो होतो.
मानकर डोसा - फारसा चांगला नाही. डोश्याबरोबर देण्यात येणाऱ्या चटणीत पोतंभर साखर असते.
संतोष बेकरी - इथली पिळाची खरी मस्त. पण आकाराने खूप मोठा असलेला क्रीमरोल आतून बहुतांशी पोकळ असतो.
सुजाता मस्तानी - पेलाभर मस्तानीत पोतंभर साखर घालतात.
काटा किर्र मिसळ - फरसाणावर थोडा कांदा घालून त्यावर तर्री ओतून दिलेल्या मिश्रणाला मिसळ म्हणणे हा मिसळ शब्दाचा घोर अपमान आहे. ज्यात पोहे, उसळ, चिवडा, टोमॅटो वगैरे नाही ती मिसळच नाही.
रामनाम मिसळ - महाविद्यालयात असताना अनेकदा खाल्लीये. पण आता एक घास चेण्याची सुद्धा हिंमत नाही, कारण ही मिसळ खूप चटकदार व तिखट असते व खायला प्रारंभ करताक्षणीच सर्वांगातून पाणी यायला प्रारंभ होतो.
वाडेश्वर - फक्त इडली उत्कृष्ट मिळते.
सुप्रीम पावभाजी - एकदम बंडल
बाकी राजमंदीर आईस्क्रीम, वैशाली, मालगुडी डेज इ. ठिकाणे चांगली आहेत.
डांगी पॅटीस मला ओव्हर रेटेड वाटले. म्हणजे तसं वाईट नाहीये, पण चार वाजता जगाचा अंत आल्यासारखी तिथे झुंबड उडते, मालक एक एक ट्रे भरून पॅटीस आणतात आणि ते हातोहात संपतात, हे थोडं जास्त वाटलं.
हडपसर मध्ये एस कुमार म्हणून एक वडापाव आहे. आधी १९९० च्या आधीपासून साधना शाळेसमोर गाडी होती. नंतर नोबेल हॉस्पिटल शेजारी गाळा सुरू केला. तिथला वडापाव आणि पॅटीस अतिशय उत्कृष्ट असते. जगात भारी! वडापाव गार्डनचा जास्त चांगला असला तरी पॅटीस मात्र एस कुमार सारखं कुठेही खाल्लेलं नाही.

कोल्ड कॉफी साठी आम्ही बऱ्याचदा हडपसर वरून दुर्गाला जायचो. हे २००७ च्या आधी. तेव्हा बहुधा आठ रुपयांना कोल्ड कॉफी मिळायची.

आकुर्डीला गीता पावभाजी प्रसिद्ध आहे, तेथील मँगो मस्तानी खाऊन बघा.

 

पुण्यातील ही काही ठिकाणे पहा.

१) बिपिन स्नॅक्स सेंटर - इथले पोहे , ब्रेड पॅटीस आणि काकडी खिचडी लाजवाब आहे..
पत्ता - विमलाबाई गरवारे शाळेच्या बाजूला , डेक्कन कॉर्नर , पुणे

२) अप्पा गुरुदेव स्नॅक्स - इथला उपमा , शिरा , समोसा चटणी भारी असते.
पत्ता - शगुन चौक , लक्ष्मी रोड , पुणे

३) अण्णा - इथले पोहे खूप भारी असतात. चटणी आणि सांबर शिवाय ज्या पोह्याना चव असते अश्या पठडीतले .
पत्ता - शनिवार वाड्याच्या बाजूला , कसबा पेठ पोलिस चौकी , शेजारी , पुणे

४) सुशील - इथले पोहे म्हणजे केवळ लाजवाब.. एकदम आगळीवेगळी चव.
पत्ता - नवी पेठ , लाल बहादुर शास्त्री रोड , प्रेमाचे साई हॉटेल च्या बाजूला, पुणे

५) हिंदवी स्वराज - ह्याच्या वेगवेगळया गाड्यावर मिळणारी डाळ खिचडी तडका , शेवभाजी भारी आहे . ह्याचा कोअर विषय हा साजूक तुपातला साबुदाणा वडा अन् काकडी चटणी हा आहे...
पत्ता - जंगली महाराज मंदिराच्या विरुद्ध दिशेला आत , जे एम रोड , पुणे .

६) काका वडेवाले - इथला वडापाव भारी असतो. कुरकुरीत अन् एक आगळीच चव असणारा .
पत्ता - वनाज कॉर्नर ला बस स्टॉप शेजारी हातगाडी लागते . कोथरुड ,पुणे

७) रस्ता पेठ खाऊ गल्ली - इथे दालचा राइस , इडली सांबार अन् आबाची मिसळ ह्या गोष्टी जाम प्रसिद्ध आहेत.
पत्ता - केईम हॉस्पिटल च्या विरुद्ध दिशेला..

८) सद्गुरू अमृततुल्य - इथला साजूक तुपातला पायनापल शिरा भारी असतो.
पत्ता - कोथरुड डेपो , पुणे

९) संस्कृती प्युअर् व्हेज - इथली लसूण मेथी भाजी छान असते.
पत्ता - नारायण पेठ , पुणे

१०) अंबिका सँडविच - जगात भारी सँडविच खाल्ल्याचा आनंद इथे मिळतो.. इथली नेपोलियन सँडविच जी खासियत आहे . तर मायो मसाला चीज सँडविच हे ही भारी आहे. लिहतानाच तोंडाला पाणी सुटतय ती बाब अलाहिदा..
पत्ता - सिटी प्राइड शूज च्या बाजूला , कुमठेकर रोड , पुणे

११) राधिका भेळ - इथली एसपिडीपी खूप लाजवाब असते. पुऱ्यांवर वरतून टाकलेली शेव खूपच भारी असते.
पत्ता - ज्ञान प्रबोधिनी जवळ , सदाशिव पेठ , पुणे

१२ ) निरा विक्री केंद्र - इथे लाल पेरू , पान मसाला , जीरा मसाला अन् लिंबू हे सरबताचे प्रकार प्रचंड भारी असतात. लाल पेरू माझा फेवरेट आहे. तसेच इथे मिळणारे वेगवेगळ्या flavour चे कॉम्बिनेशन सोडा पण भारी असतात.
पत्ता - पत्र्या मारुती चौक , नारायण पेठ , पुणे

१३) यशवंत दाबेली - इथली दाबेली ही बाप आहे. पुण्यातली सर्वोत्कृष्ट म्हणाल तरी वावग ठरणार नाही.
पत्ता - हाँग काँग लेन , केएफसी च्या बाजूला , डेक्कन , पुणे

१४) फ्लेवर टोस्ट - इथे व्हेज ग्रिल सँडविच , चॉकलेट सँडविच अन् जांबून शॉट्स भारी असतात.
पत्ता - रानडे इन्स्टिट्यूट समोर , एफसी रोड , पुणे

१५) लंडन bubble - इथे मिळणारे waffles खूप crunchy अन् टेस्टी असतात.
पत्ता - कोथरुड . ( ह्याच्या franchise भरपूर ठिकाणी आढळतील )

१६ ) खात्री बंधू आईसक्रीम - याच्याकडे मिळणारी मावा , सीताफळ मस्तानी भारी असते.
पत्ता - शिवाजी पुतळा , कोथरुड ,पुणे. ( कर्वेनगर , वनाज कॉर्नर , सिंहगड रोड अश्या बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत )

१७) राजमंदिर आईसक्रीम - यांच्या इथे मिरचीची पूड वरतून टाकून भेटणारी लाल पेरू आईसक्रीम निव्वळ अप्रतिम.
पत्ता - न्यू डिपी रोड , कोथरुड , पुणे
(सिंहगड रोड , तसेच डेक्कन ला ही शाखा आहे )

१८) तांबे मिसळ - इथे मिळणारी तर्रिदार मिसळ खरोखरच मिसळ खाल्ल्याचा फील देते. हॉटेल च वातावरण typical असल तरी मिसळ तुम्हाला खुश करते.
पत्ता - शिवाजी पुतळा , कोथरुड , पुणे

१९) शिवराज वडेवाले - इथला कुरुकुरित असता जंबो वडा खाण्याची रंगत वाढवतो.
पत्ता - स्पेंसर चौक , कर्वेनगर , पुणे
( कोथरुड ला ब्रांच आहे पण मूळ शाखेतला वडा भारी आहे.)

२०) विशाल चिवडा भेळ - इतकी मटकी चिवडा भेळ प्रसिद्ध आहे. शेव , पोह्याचा चिवडा , हिरव्या मिरचीचा ठेचा अन् मटकी अन् त्यावर पिळलेल लिंबू केवळ अप्रतिम...
पत्ता - स्पेंसर चौक , कर्वेनगर , पुणे

२१) एस एम टी सेंटर - इथे मिळणार इडली सांबार बाप असतं. घरगुती जेवण ही खूप छान मिळत.
पत्ता - aspirant लायब्ररी समोर , कर्वेनगर ,पुणे

२२) लाखेश्र्वर अमृततुल्य - काचेच्या मोठ्या ग्लासात मिळणारा चहा केवळ सुखं देतो.
पत्ता - कर्वेनगर ( कमिन्स कॉलेज जवळ ) अन् वारजे हायवे ला अश्या दोन ब्रंच आहे.

२३) कॅफे दुर्गा - पुण्यात नवीन आल्यावर जिकडे तिकडे दिसणाऱ्या ह्या नावावरून पुण्याची प्रसिद्ध कॉफी म्हणून फसवणूक होऊ शकते. तरी सावध रहा . पत्ता नीट वाचा. इथे मिळणारी कोल्ड कॉफी अन् कोल्ड चॉकलेट तृप्तीचा आनंद देत. MIT वाल्यांच्या अन् कोथरुड करांच्या आयुष्यातील mandatory गोष्ट.
पत्ता - पौड रोड , MIT कॉलेज जवळ , हॉटेल जंजिरा समोर , कोथरुड पुणे .

२४) हॉटेल ममता - मालक अन् कामगार साऊथ इंडियन तरी इथे नॉर्थ इंडियन प्रकारातल्या भाज्या खूप छान मिळतात. आणि बजेट फ्रेंडली हॉटेल आहे.

२५) सुजाता मस्तानी - इथली मंगो मस्तानी इज एव्हरग्रीन अन् प्रेम आहे. त्याबरोबरच सीताफळ अन् तस्तम सीझनला मस्तानी ही खूप छान असतात.
पत्ता - निंबाळकर तालीम , सदाशिव पेठ , पुणे
( शाखा भरपूर आहेत)

२६) संतोष बेकरी - इथल खारी पॅटीस अन् खोबरा केक भारी असतो.
पत्ता - आपटे रोड , पुणे

२७) कडक स्पेशल मिसळ - गोड तिखट प्रकारातली मिसळ छान असते.
पत्ता - मयुर कॉलनी , कोथरुड ,पुणे

२८) हिना टी सेंटर - इथे आद्रक टाकून केलेला चहा भारी असतो.
पत्ता - पेरुगेट पोलिस चौकी समोर , सदाशिव पेठ , पुणे.

२९) मोमो पांडा - इथे तंदूरी मोमोज भारी मिळतात.
पत्ता - करिश्मा सोसायटी , कोथरुड
( ब्रांचेस आहेत ह्याच्याही )

३०) ममता मेस - इथे राजस्थानी पद्धतीचे जेवण छान मिळते. गुरवारी संध्याकाळी व रविवारी सकाळी स्पेशल मेनू असतो.
पत्ता - रामबाग कॉलनी , कोथरुड, पुणे

३१) राजू अंकल - छोले भटुरे छान मिळतात.
पत्ता - भारती विद्यापीठ बॅक गेट , कात्रज

३२) naturals - इथे मिळणारी टेंडर कोकोनट आईसक्रीम जाम भारी असते.
पत्ता - कर्वे पुतळा तसेच बालगंधर्व ह्या ठिकाणी शाखा आहेत.

३३) ला डे खीर डेली - इथे मिळणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या खीर म्हणजे केवळ अप्रतिम.
पत्ता - घोले रोड , बालगंधर्व चौक , पुणे

३४) काटा किर्र - तिखट प्रकारातल्या मिसळ मध्ये वरतून कांदा लसूण मसाला अन् तर्री टाकून जाळ अन् धूर काढणारी मिसळ.
पत्ता - प्रभात रोड च्या शाखेला भेट द्या. बाकिकडे चवी मध्ये फरक वाटला.

३५) नेवाळे मिसळ - तिखट प्रकरातील ही अजुन एक मिसळ.
पत्ता - चिंचवड

३६) कॅफे गुडलक - बन मस्का पाव भारी असतो. तसेच जेवणही हटके असत. तिथे रुमाली कशी बनवतात हे पहाण्यासाठी खूप वेळ टंगळमंगळ करत बसलोय.

३७) बालाजी स्नॅक्स सेंटर - इथे घरगुती जेवण छान मिळते .
पत्ता - कर्वेनगर , पुणे

३८) सुकांता - इथली थाळी प्रचंड फेमस आहे. पण एक मोलाचा सल्ला देतो .पहिल्यांदाच भाज्या कमी प्रमाणात घ्या अन् एखादीच रोटी. चाट जास्त खाऊन पोट भरायची काम करू नका. फक्त रबडी वर लक्ष केंद्रित करा. कारण इथल्या सारखी रबडी शक्यतो कुठे मिळत नाही थाळी ह्या प्रकरात. नंतर मला नक्कीच तुम्ही धन्यवाद द्याल.
पत्ता - डेक्कन , Z-bridge जवळ , पुणे

३९) barbeque नेशन - हा प्रचंड पैसे देऊन quantity च्या नावाखाली येड बनण्याचा प्रकार आहे. इथली पान आईसक्रीम अन् कॉर्न चाट भारी असतं.
पत्ता - डेक्कन , कल्याणी नगर , हॉटेल सयाजी , अमानोरा ला ब्रांचं आहेत.

४०) रामनाथ मिसळ - कोल्हापुरी पद्धतीची मिसळ छान भेटते.
पत्ता - महाराष्ट्र मंडळा जवळ , टिळक रोड , पुणे

४१) मोरे डोसा सेंटर - स्पंज डोसा , टोमॅटो ओनियन चीज डोसा भारी भेटतो. इथली हिरवी चटणी खूपच लाजवाब.
पत्ता - कर्वे पुतळा , कोथरुड तसेच कोथरुड स्टँड जवळ व सातारा रोड ला शाखा आहेत.

४२) मानकर डोसा - या ठिकाणी ही उत्तम डोसे मिळतात.
पत्ता - कर्वे रोड , करिश्मा सोसायटी जवळ , कोथरुड , पुणे

४३) सुप्रीम पावभाजी - चांगली पण खूपच overrated झालेली पावभाजी मिळते.
पत्ता - जे एम रोड , पुणे

४४) चैतन्य पराठा हाऊस - इथे मिळणारा फुल चीज पराठा माझा विक पॉईंट आहे. अजूनही बरेच पराठे मिळतात.
पत्ता - तुकाराम पादुका चौक , एफसी रोड , पुणे

४५) अगरवाल कचोरी - कचोरी , समोसा आणि मुगभजी खूप भारी असतात.
पत्ता - काका हलवाई जवळ , बुधवार पेठ , पुणे.

४६) शिवशंकर - लस्सी आणि कलाकंद भारी असते.
पत्ता - काका हलवाई जवळ , बुधवार पेठ , पुणे

४७) शिवकैलास - वरतून लोणी टाकून मिळणारी लस्सी अप्रतिम असते. अन् रबडी ही.
पत्ता - पुणे स्टेशन समोर , पुणे

४८) शशिकांत डेरी - इथे मिळणार मसाला ताक म्हणजे लाजवाब. लस्सी ही छान असते.
पत्ता - केईएम् हॉस्पिटल जवळ , रास्ता पेठ , पुणे

४९) हॉटेल महेंद्र - इथे शेवभाजी चांगली भेटते.
पत्ता - कर्वेनगर , पुणे

५०) हॉटेल आनंद उपाहार गृह - इथे गुरवारी दोन्ही वेळेस आणि रविवारी सायंकाळी मिळणारी मुगदाल खिचडी आणि कढी निव्वळ अप्रतिम. कोशबिर पण भारी असते. रविवारी सकाळी आळुची भाजी अन् मसालेभात ची छान असतो.
पत्ता - नागनाथ पार , सदाशिव पेठ , पुणे

५१) मातोश्री भेळ - इथे खूप छान भेळ मिळते.
पत्ता - जय भवानी नगर , कोथरुड , पुणे ( शिवराय शाळेजवळ )

५२) एसएनडीटी ला जोशी उपहार गृहाजवळ एक हातगाडी लागते तिथले कांदाभजी अप्रतिम असतात.
पत्ता - Sndt बस स्टॉप ( SBI बँक च्या शेजारील बोळीत ), पुणे

५३) केएचएस शाळेसमोर शेवपाव खूप भारी मिळतो.
पत्ता - एरंडवने , पुणे

५४) इंदोर फुड्स - पोहे , प्याज कचोरी आणि घी जलेबी निव्वळ अप्रतिम.
पत्ता - शिवार गार्डन चौक , पिंपळे सौदागर , पुणे

५५) हॉटेल ममता समोर एक हातगाडी लागते तिथे चॉकलेट सँडविच छान असते.
पत्ता - कोथरुड , पुणे

५६) नागनाथ पार चौकात मिळणारे मसाले दूध छान असते. इथली चवआधी खूप छान होती पण सद्ध्या इतरांपेक्षा तरी चांगलं आहे.
पत्ता - सदाशिव पेठ , पुणे

५७) वाडेश्र्वर - इथे घी इडली भारी भेटते.
पत्ता - एफसी रोड , पुणे

५८) वैशाली - इथला म्हैसूर डोसा जगात भारी असतो.
पत्ता - एफसी रोड , पुणे

५९) हॉटेल मालगुडी डेज - इथे उत्तप्पा अन् डोसा छान मिळतो. त्यासोबत मिळणाऱ्या चटण्या , सांबर
अप्रतिम असते.फिल्टर कॉफी ही छान असते.

६०) FIR - इथे छान वेगळ्या पद्धतीचे आईस क्रीम रोल्स भेटतात.
पत्ता - सिटी प्राइड , कोथरुड जवळ , पुणे

६१) कॅड एम अन् कॅड बी - करिश्मा सोसायटी आणि गुडलक चौकात छान मिळते.

६२) नारायण खमंग ढोकळा - इथला ढोकळा आणि रविवारी मिळणारा चायनीज समोसा छान असतो.
पत्ता - वारजे नाका , वारजे माळवाडी, पुणे

६३) जयेश सँडविच - सँडविच साठी प्रसिद्ध
पत्ता - कर्वे रोड , करिश्मा सोसायटी जवळ , कोथरुड , पुणे.

६४) अलंकार ज्युस सेंटर - हे खरेतर ऍपल ज्यूस साठी फेमस आहे. पण इथे सीताफळ अन् मँगो शेक ही छान असतो. ऍपल ज्यूस पूर्वी खूप छान होता .
पत्ता - गरवारे सेंट्रल जवळ ( संजीवन हॉस्पिटल समोर ) , पुणे

६५)हॉटेल टिळक - इथला चहा छान असतो.
पत्ता - टिळक रोड , पुणे

६६) हॉटेल सुखकर्ता - हे हॉटेल ही थाळी साठी प्रसिद्ध आहे. परंतु लोकांनी फार स्वीट खाऊ नये म्हणुन ते खूप गोड बनवलेलं असत. बाकी भाज्या , चाट वगैरे छान असतं.
पत्ता - मयुर कॉलनी , कोथरुड , पुणे

६७) हरी ओम ज्यूस सेंटर - इथे बेरी ज्यूस खूप भारी असतो. तसेच सिजनल ज्यूस /शेक छान असतात.
पत्ता - पौड रोड ,कोथरुड , पुणे

६८) हॉटेल जंजिरा - नॉर्थ इंडियन भाज्या छान असतात. अन् dessert ही छान आहेत.
पत्ता - MIT कॉलेज रोड , कोथरुड , पुणे

६९) गोल्डन ड्रॅगन - इथे चायनीज हे खूप अप्रतिम मिळते. आणि सूप तर खूप लाजवाब.
पत्ता - कर्वे रोड , कोथरुड , पुणे

७०) सुदित्सु - हे ही चायनीज साठी प्रसिद्ध आहे.
पत्ता - डहाणूकर कॉलनी , कोथरुड , पुणे

७१) हॉटेल पृथ्वी - पंजाबी डिशेस अन् स्टार्टर्स छान भेटतात.
पत्ता - कर्वे रोड , कोथरुड , पुणे

 

 

 श्री पार्श्‍वप्रज्ञालय तळेगाव

       दर रविवारी नवीन जवळच कुठेतरी फिरायला जायचे मनात नक्की असते. पण कुठे हा प्रश्न पडतो. मागे एकदा तळेगावजवळील जैन मंदिरात गेल्याचे आठवले व मग तळेगावचा रस्ता गाठला.
     श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिर जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर तळेगावच्या पुढे डाव्या बाजूला हे मंदिर आहे. तळेगाव सोडल्यावर अर्धा ते एक किलोमीटरवर अंतरावर अभिनव तीर्थ, श्री पार्श्‍वप्रज्ञालय, तळेगाव असा एक फलक आपले लक्ष वेधून घेतो. तेथून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर एका छोटय़ाश्या डोंगरावर हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरार्पयत रस्ता बनविलेला आहे. त्यामुळे गाडी अगदी वर्पयत जाते. डोंगर असा जाणवतच नाही. पार्किगला गाडी लावून आपण थेट पोचतो ते मंदिरासमोरच. 

           मुंबईकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला डोंगर उतारावर, निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. रस्त्यावरून प्रथमदर्शनी हे मंदिर दिसून येत नाही. येथे जैन धर्मियांचे तेविसावे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवान यांची सुंदर मूर्ती आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ होताच पण वेगवेगळी झाडे लावून अधिक आकर्षक बनविलेला दिसला. मंदिराच्या पाय:या सुरू होण्यापूर्वीच उजव्या हाताला भोजनालय होते. येथे भाविकांसाठी प्रसादाचे वाटप केले जाते. सुमारे 75 पाय:या चढून आपण मंदिरात प्रवेश करतो. समोरच पांढ:या शुभ्र दगडात कोरलेली श्री पार्श्वनाथ भगवानाची आकर्षक मूर्ती दिसते. मंदिर परिसरात टेकडीच्या उतारावर 52 शिखरांची 52 मंदिरे बनवली असून त्यावर सुंदर व अप्रतिम अशी शिल्पकला साकारलेली आहे.

पार्श्वनाथ  : 

जैनांचे तेविसावे तीर्थंकर म्हणून ओळखले जातात. राणी वामादेवी व राजा अश्वसेन हे त्यांचे मातापिता. पाश्र्वनाथांचा जन्म वाराणासीतील काशीनगरीत झाला. महावीरांपूर्वी सु. 250 वर्षे म्हणजे इ.स.पू. 850 च्या सुमारास पार्श्वनाथ होऊन गेले. पार्श्वनाथ तीर्थंकरांचे चिन्ह सप्तफाणाधारी नाग असून त्यांच्या मूर्तीच्या डोक्यावर तो कोरलेला असतो. प्रत्येक तीर्थकराच्या मूर्तीवर चंद्र, नाग, हत्ती, सिंह  इत्यादी चिन्ह असतात. त्यावरु न कोणत्या तीर्थकराची ती मूर्ती आहे  याचा बोध होतो.

 

मुख्य मंदिरात छतावरती सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात व प्रवेशद्वारातून येताना आकर्षक खांब आपले लक्ष वेधून घेतात. येथील प्रत्येक मंदिरातील मूर्ती सुद्धा आकर्षक असून त्यात आदीनाथ स्वामी भगवान, श्री शंखेश्वर पाश्र्वनाथ भगवान, श्री श्रेयांसनाथ  स्वामी भगवान आदींच्या मूर्ती आहेत.

जैन धर्मात एकूण 24 र्तीथकार होऊन गेले. तीर्थंकर म्हणजे धर्म प्रकट करणारे.

जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांची नावे :

1) ऋषभदेव, 2) अजितनाथ, 3) संभवनाथ, 4) अभिनंदन, 5) सुमितनाथ, 6) पद्मप्रभ, 7) सुपाश्र्च,  8) चंद्रप्रभ,  9) पुष्पदंत,  10) शीतलनाथ,  11) श्रेयासनाथ, 12) वासुपूज्य,  13) विमलनाथ,  14) अनंतनाथ, 15) धर्मनाथ,  16) शांतीनाथ, 17) कुंन्युनाथ,  18) अरहनाथ,  19) मिल्लनाथ,  20)  मुनिसुव्रत,  21) निमनाथ,  22) नेमिनाथ,  23) पार्श्वनाथ , 24) महावीर

जैन धर्म : 

पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी जैन धर्माचा पाया रचला. तर चोविसावे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले जाते. ‘जीन’ म्हणजे सर्व सुख-दु:खांना जिंकलेला किंवा विजय मिळविला तो जीव आणि त्यांनी स्थापन केलेला धर्म म्हणजे ‘जैन’ होय. त्यामुळे या धर्माला ‘जैन धर्म’ असे संबोधले जाऊ लागले.

जैन बांधव अनेक धार्मिक उत्सव वर्षभर साजरे करतात. बरेचसे उत्सव किंवा पर्व ही तीर्थंकरांच्या जन्म आणि निर्वाणाच्या तिथींना धरून आलेले आहेत. पर्युषण, श्रुतपंचमी, दिवाळी, अक्षय्यतृतीया आणि भगवान महावीर जयंती हे जैनांचे प्रमुख सण उत्सव. याशिवाय पाडवा, गणोश चतुर्थी, रक्षाबंधन, मकरसंक्रांत, नवरात्र, दसरा, गौरीपूजा आदि सण-उत्सव जैन बांधव पाळतात. जैन समाजात उपवासाला मोठे महत्त्व आहे; परंतु उपवास करण्याचा काळ व स्वरूपात वैविध्य दिसते. ज्यांना वर्षभर उपवास करणे शक्य नसते, ते लोक चतुर्मासातील प्रत्येक अष्टमी व चतुर्दशीला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी केवळ अन्नपदार्थच नव्हे तर पाणीही वज्र्य करतात.
        श्री पार्श्वप्रज्ञालय मंदिरात  ज्ञान संस्कार मंदिर शाळा असून येथे जैन धर्मातील मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या 150 मुले येथे शिकतात. 5 ते 10  शिक्षण येथे उपलब्ध आहे. मंदिराची प्रतिष्ठापना 2006 साली झाली.असल्याचे श्री. प्रवीण भाई यांनी सांगितले.
            मंदिरात पार्श्वनाथ भगवानाजींचे दर्शन घेऊन बाहेर आलो. समोर तळेगावचा परिसर व एक मोठे तळे दिसत होते. मंदिर परिसरातून देहूगावचे गाथा मंदिरही दिसते. एकूण हा परिसर पावसाळय़ात छान दिसणारा आहे. तेव्हा पावसाळय़ात या ठिकाणी नक्की जायचे असे ठरवून घरी परतण्याचा मार्ग धरला. प्रत्येकाने हे मंदिर आवर्जून पाहावे.

अजून काय बघाल :

पिंपरी-चिंचवड परिसरात देखील आजुबाजूच्या बहुतेक लोकांना हे ठिकाण माहिती नाही. देहूरोडच्या पुढे बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या जवळ, शंकरवाडी थांब्याजवळच्या डोंगरावर घोरावडेश्वराचे मंदिर आहे. जुन्या पुणे -मुंबई रस्त्यावर घोरावडेश्वर मंदिर खूप प्राचीन आहे. महाशिवरात्रीला व श्रावणी सोमवारी पिंपरी-चिंचवड व तळेगाव परिसरातील हजारो लोक येथे येतात. पायथ्याजवळ आहे अमरजाई मंदिर, गणपती मंदिर तसेच नवीन झालेले शिरगावचे श्रीसाईबाबा मंदिर येथून जवळच आहे. 

 

ब्रम्हेश्वर मंदिर व इंद्रेश्वर मंदिर
गावाचे नाव :- इंदुरी
जिल्हा :- पुणे
जवळचे मोठे गाव :- तळेगाव, चाकण, पुणे 

Bramheshwar Mandir, Induri, dist. PuneBramheshwar Mandir, Induri, dist. Pune

  तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी  आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. 

Bramheshwar Mandir, Induri, dist. PuneBramheshwar Mandir, Induri, dist. Pune
ब्रम्हेश्वर मंदिर 

इंदुरी किल्ल्याच्या बाजूला इंद्रायणी नदीच्या काठी पुरातन ब्रम्हेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे, तर खालच्या बाजूला कोरलेले आहे. मंदिरा बाहेर जूना दगडात कोरलेला नंदी व दोन पिंडी आहेत. 

इंद्रेश्वर मंदिर

इंदुरी गावात तळेगाव चाकण रस्त्याला लागून तलावाकाठी पुरातन इंद्रेश्वर मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार झाल्यामुळे त्याचे बाह्यरूप बदलले आहे. परंतू मंदिराचा गाभारा अजूनही जूनाच आहे. गाभार्‍याचे व कळसाचे काम काळ्या दगडात केलेले आहे. गाभार्‍या बाहेर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या चौकटीवर वरच्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. मंदिरा बाहेर  दगडात कोरलेला जूना नंदी व गणपती आहेत. 

Indreshwar Mandir, Induri, dist. Pune
ऋषींच्या शापाने अंगावर आलेले कोड घालवण्यासाठी इंद्राने येथे तपश्चर्या करून येथील तलावात आंघोळ केल्यावर त्याच्या अंगावरचे कोड निघून गेले अशी या मंदिरा बद्दल दंतकथा आहे. या मंदिरासमोरील तलाव आता पाण वनस्पतींनी भरल्यामुळे दिसेनासा झालाय. जर हा तलाव साफ करून सुशोभित केला, तर या परीसराची शोभा वाढू शकते.

Indreshwar Mandir, Induri, dist. Pune

जाण्यासाठी :- 
मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्‍या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो. किल्ल्या समोर उभे राहील्यावर डावीकडे एक रस्ता खाली उतरतो, त्या रस्त्यावर किल्ल्यापासून २ मिनिटाच्या चालीवर ब्रम्हेश्वर मंदिर आहे. 
इंद्रेश्वर मंदिर इंदुरी गावात आहे. 

आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
१) इंदुरीचा किल्ला
२) इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.
३) राजवाडा व बनेश्वर मंदिर , तळेगाव
४) चाकणचा किल्ला

आय्यप्पा स्वामी - शिरगावचे साईबाबा मंदिर - बिर्ला गणेश मंदिर


सध्या लोकांच्या नवसाला व भक्तीला पावणारी म्हणून अनेक ठिकाणो प्रसिद्धी होऊ लागली आहे. काहींना पंढरपूरच्या विठ्ठलाचे, तिरुपतीच्या बालाजीचे, शिर्डीच्या साईबाबांचे, पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी देवीच्या धार्मिक स्थळांना लांब असल्याने जाता येत नाही. अशांसाठी त्यांच्या काही भक्तांनी प्रति पंढरपूर, प्रति बालाजी, प्रति शिर्डी अशी मंदिरे उभारली आहेत. यातच सोमाटणे फाटा शिरगाव येथील साईबाबांचे मंदिर,  आय्यप्पा स्वामी मंदिर पाहण्याचा योग अनेकवेळा आला. त्या विषयी...

आय्यप्पा स्वामींचे मंदिर

देहूरोडला पुणे-मुंबई महामार्गावरील पुल ओलांडण्याच्या आधी उजवीकडे देहूरोड बाजारपेठेकडे एक रस्ता जातो. जवळची खूण म्हणजे उजव्या बाजूला असलेला पेट्रोलपपं. मल्याळी बांधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या देहूरोड येथील लष्करी भागातील उंच डोंगरावर अय्यप्पा स्वामी मंदिर आहे. पेट्रोल पंपाच्या मागेच थोडय़ाच अंतरावर हे गेट असून, तेथून मंदिर सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्याचा रस्ता मस्तच आहे. नगमोडी वळणो थोडा चांगलाच चढ मध्येच उतार असे करत आपण मुख्य मंदिराच्या पाय:यापाशी येऊन पोचतो. वर येताना जुना पुणो-मुंबई रस्ता, देहूगावतील गाथा मंदिर, देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसर, नवीन एक्सप्रेस हायवे आपल्या दिसतो. देहूरोड रेल्वेस्टेशनला एखादी रेल्वे आली असल्यास तीही वरून छान दिसते. मंदिर जरी उंचावर असले तरी मंदिरात जाण्यासाठी काहीच पाय:या चढून जावे लागते. मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. त्यामुळे आतील फोटो मंदिराच्या वेबसाईवरून डाऊनलोड केले आहेत. (http://www.ayyappatemplepune.com) मंदिर सुंदर आहे. केरळच्या शबरी माता येथील डोंगरावर असलेले अय्यप्पा स्वामींचे मंदिर देहूरोड भागातही असावे, असे येथील केरळी बांधवांना वाटत होते. गेल्या 20 वर्षांत मंदिराची बांधणी करण्यात आली आहे.  केरळला शबरी माता येथे जाऊ न शकणारे भाविक निगडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते देहूरोड अय्यप्पा मंदिरापर्यंत पायी येऊन उपवासाचा करतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पितळी मखर आहे. अय्यप्पा सेवा संगमतर्फे अन्नदान केले जाते. पूर्वेकडे दर्शनी भाग आहे. मंदिरात मध्यभागी अय्यप्पा स्वामींचा गाभारा आहे. स्वामींची पंचधातूची मूर्ती सुबक आहे. डाव्या बाजूस श्री गणोशाचे, तर उजव्या बाजुला कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. मंदिर आवारात देवी दुर्गा, हनुमान, नागदेवता, नवग्रह आदी देवतांची मंदिरे आहेत. मंदिर पहाटे साडेपाचला उघडून रात्री साडेआठला बंद करतात. दुपारी काही काळ मंदिर बसते. संध्याकाळी 5.30 ला मंदिर दर्शनासाठी पुन्हा उघडते. पिंपरी-चिंचवड शहरातील मल्याळी बांधव आहेत. त्यांचा ओणम सण येथे मोठा उत्साहात साजरा करतात. केरळचा अधिपती असलेल्या महाबलीला आदरांजली वाहण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. इंद्र व वामनावराची गोष्ट बहुद्धा सर्वानाच माहिती असेल. इंद्राकडे मागितलेल्या वारमध्ये वामनाने पहिल्या दोन पावलांमध्ये पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ घेतले. आणि तिसरा पाय कोठे ठेवू अशी विचारणा केली. तेव्हा महाबलीने आपले डोके पुढे करीत तिसरा पाय ठेवण्याची विनंती केली. तसे करताच महाबली राजा नरकात ढकलला गेला. त्याच वेळी इंद्राने महाबलीला, तू वर्षातून एक दिवस पृथ्वीवर येऊन तुङया प्रजेला भेटू शकशील, असे सांगितले. तो दिवस म्हणजे ओणम. यालाच तिरु वोणम असेही म्हटले जाते. 

येथून काही वेळाने निघून शिरगावला जाण्यास निघालो.

बिर्ला गणेश मंदिर : 

पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणो फाटयावरून सुमारे 3 किलोमीटरवर शिरगाव येथे साईबाबांचे मंदिर आहे. मंदिराच्या रस्त्याला जाताना प्रथमच डाव्या हाताला एका छोटय़ाश्या डोंगरावर गणपतीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने 72 फूट उंचीची श्री गणोशाची मूर्ती उभारण्यात आली आहे. पुण्यावरून मुंबईला जाताना सोमाटणो फाटय़ाजवळ या 72 फूट उंचीच्या गणपतीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते.  एका छोटय़ाश्या टेकडीवर ही मूर्ती उद्योगपती अदित्य बिर्ला यांनी त्यांच्या मातोश्री सरला बसना कुमार यांच्यासाठी उभारली आहे. मूर्ती राजस्थानच्या पिलानी येथील कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे. त्यासाठी सुमारे 5 ते 6 कोटी खर्च आला.  17 जानेवारी 2009 मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने  सिमेंट काँक्रिटमध्ये ही मूर्ती उभारली आहे. मूर्तीवर तांब्याचा मुलामा आहे. या मूर्तीची निर्मिती 16 एकर जागेत झाली आहे. एकूण 179 पाय:या येथे जाण्यास लागतात. मूर्तीचे वजन 1000 टन आहे. आपल्या संस्कृतीत 9 अंक शुभ मानला जातो. मूर्ती उंची 72 फूट म्हणजे 7 अधिक 2, चबुतरा 18 फूट, रुंदी 54 फूट म्हणजेच या अंकाची बेरीज 9 येते. म्हणूनच येथे 19 पाय:यांचे टप्पे केलेले आहे.  मूर्ती शेजारी मूषक राज हातात मोठा लाडूचा प्रसाद घेऊन उभे आहेत. संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुंदर दिसते. या ठिकाणावरून तळेगावची खिंड (जुना पुणे-मुंबई रस्ता), देहूरोडचा काही भाग, घोरावडेश्वर डोंगर व आजुबाजूचा परिसर छान दिसतो. विशेषत: पावसाळय़ात या ठिकाणी सभोवतातील हिरव्यागार शेतीमुळे पाहण्यासारखे असते. 179 पाय:या जरी असल्या तरी या चढण्यास केवळ 10 मिनिटे पुरेसे होतात. येथून जवळच असलेले साईबाबांचे शिरगाव येथील मंदिर सुद्धा पाहण्यासारखे आहे. पार्किगसाठी टू व्हिलरला 5 रुपये तर फोर व्हिलरला 10 रुपये आहे.

शिरगावचे मंदिर (साईबाबा) : 

शिरगाव हे मावळ परिसरातलं एक छोटंसं गाव आहे. शेती हा मुख्य व्यवसाय. इथून जवळच असलेल्या गोडुंब्रे गावात संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. या लहानशा गावात शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिराची प्रतिकृती उभी राहिली आहे. हे गाव आता प्रति शिर्डी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. पुण्यातील माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकारातून हे मंदिर उभं राहिलं आहे. सोमाटणो फाटा येथील टोल नाक्यावरून आपल्याला डाव्या बाजुला डोंगरावर एक मोठी गणपतीची मूर्ती रस्त्यावरूनच दिसते. टोल नाक्यावरून लगेचच डाव्या बाजुला वळल्यावर अंदाजे 4 ते 5 किलोमीटरवर वर शिरगावला जाता येते. रस्ता छोटा असल्यामुळे अनेक वेळा ट्रॅफिक जमाही होते. विशेषत: उत्सवाच्या वेळी. येथील साई मंदिर शिर्डीप्रमाणोच मोठे भव्य आहे. मंदिराच्या समोरच एक विशाल सभागृह आहे. या सभागृहात सोन्याचा मुलामा दिलेला चकचकीत पत्र आहे. सभागृहातील भिंतींवर शिरगावातील व साईभक्तांचे मोठे फोटो दिसतात. इथे दर्शनरांगेसाठी स्टीलचे कठडे उभारलेले आहेत. त्यामुळे दर्शन लवकर मिळते. महिला व पुरुषांसाठी दोन वेगळय़ा दर्शन रांगा आहेत.  गर्दी नसते तेव्हा थेट साईबाबांच्या मूर्ती व पादुकांपर्यंत जाता येते. ज्यांना रांगेतून दर्शन घेणं शक्य नसतं त्यांच्यासाठी  साईंचे मुखदर्शनाची सोय बाहेरच केलेली आहे. सभागृहाच्या पुढील गाभा:यात संगमरवरी चौथा:यावर साईबाबांची सोन्याने सजवलेल्या सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. ही मूर्ती शिर्डीतील मूळ मूर्तीप्रमाणोच असून संगमरवरात साकारलेली आहे. चौथा:यावरच साईबाबांच्या पादुका आहेत. मूर्तीच्या मागील भिंतीवर बाहेरच्या बाजूने संगमरवरी गोमुख दिसतं.  सुमारे चार ते पाच एकरात हे मंदिर साकारलेले आहे. दर वर्षी रामनवमी, गुरु पौर्णिमा, साई पुण्यतिथी, दस:याला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

प्रसादालय : 

 

जवळच असलेल्या प्रसादालयात अल्पदरात भक्तांची जेवणाची सोय होते. हे भव्य प्रसादालय श्री साई अन्नछत्र आहे. ही इमारत राजवाडा म्हणून ओळखली जाते. इमारत तीन मजली आहे. इथे राजस्थानी कलावंतांनी मोठी छान कलाकुसर केली आहे. छताला काचेची आकर्षक झुंबरं आहेत. जमिनीवर मार्बल टाइल्स बसवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी ही इमारत जणू काही राजवाडा असल्याचे भासते.  इथे तळमजल्यावर एका वेळी 1000 ते 1500 लोक भोजन करू शकतात. भोजनासाठी खास डायनिंग टेबलं आहेत. वरच्या दोन मजल्यांवर प्रमुख पाहुण्यांसाठी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. केवळ वीस रुपयांत ही भोजनाची सोय आहे. दुपारी 12  ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9  अशी भोजनाची वेळ आहे.  दुपारच्या वेळी अन्नछत्रशेजारीच केवळ 5 रुपयांत द्रोणामध्ये मसालेभात मिळतो.  मंदिराचं बांधकाम छान आहे. मोठी व सुशोभित असा हा परिसर स्वच्छता व टापटीप यामुळे छानच दिसतो. मंदिराजवळच्या मोकळय़ा जागेत वाहनांच्या पार्किगची व्यवस्था आहे. 10 रुपये फोर व्हिलरसाठी व 5 रुपये टू व्हिलरसाठी. इतर देवस्थान परिसरात आढळणारी प्रसाद, पूजासाहित्य, चहा-नाश्त्याची हॉटेलं, रसवंतीगृह, साई भजनांच्या सीडीज वगैरेंची दुकानं आहेतच.

कसे जाल :

  • पुण्यापासून 35 किलोमीटर.
  • कात्रज - देहूरोड बायपास येथूनही जाता येते. 
  • कात्रजवरून देहूरोड बायपासला येऊन तेथून सोमाटणो फाटा टोलनाक्यार्पयत जायचे.

 

पवना डॅम-प्रति पंढरपूर -दुधीवरे खिंड-लोहगड-लोणावळा


जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळ सोडल्यानंतर कामशेत गाव लागते. कामशेतला डाव्या बाजुला पवनानगरकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने मावळातील अनेक पर्यटन स्थळांना भेटी देता येतात.  पवना धरण, तिकोना, तुंगी किल्ला, याच रस्त्याने पुढे पौडकडे ही जाता येते. उजव्या बाजूला वळवण डॅम लागतो. येथून पुढे उकसान, गोवीत्री, जांभवली अशी गावे आहेत. येथूनच पुढे ढाकचा बहिरी आहे. याबाबत पुढे कधी तरी. डाव्या बाजुला वळून साधारणपण 10 ते 12 किलोमीटरवर काळेकॉलनी लागते. या काळेकॉलनीतून लोहगडला पायी जाता येते.  पण आम्ही पवना डॅमला वळसा घालून दुधीवरे खिंडीतून लोहगडला गेलो.

पवना धरण 

संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसराला याच पवना धरणातून पाणीपुरवठा होतो.  पावसाळय़ात धरण 1क्क् टक्के भरल्यावर मात्र, पाणी सोडल्यास त्याचा फटका खालील शहरातील गावांना होतो. चिंचवड, पिंपरी, सांगवी येथील नदी शेजारीला झोपडपट्टी, तसेच अन्यत्र पाणी घुसते. सध्या बंद नळ योजनेतून पाणीपुरवठा प्रकल्प वादात आहे. असो. पवना धरण एक दिवसाच्या ट्रीपसाठी छान जागा आहे. काहीजण अनधिकृतरित्या स्वीमिंग तर अधिकृतरित्या बोटिंगचा अनुभव घेता येतो.  पवना धरणाच्या समोरच तुंग किंवा तुंगी किल्ला असून, डाव्या बाजुला तिकोणा तर उजव्या हाताला लोहगड आहे.
बोटिंगसाठी जागा छान आहे. येथे नाष्टा करून पुढे लोहगड किल्ल्यावर जाता येते.  आम्ही गाडीवरून लोहगडकडे जाण्यासाठी निघालो. धरणाच्या कडेकडेने जाताना हिरवळ व धरणाचे पाणी.. सुरेख देखावा दिसतो.

प्रति पंढरपूर मंदिर : 

पवना धरणापासून साधारणपणो 3-4 किलोमीटर अंतरावर प्रति पंढरपूर मंदिर आहे. मंदिर बाबामहाराज सातारकर यांनी बांधले असून, सुमारे 2 ते 4 एकरात मंदिर वसलेले आहे. मंदिराचा परिसर पावसाळय़ात सुरेखच दिसतो. आजुबाजूला दाट किर्र हिरवी झाडी. समोर डोंगरातून कोसळणारे धबधबे व मागे सुरेख मंदिर परिसर.  विठ्ठल रुक्मिईची सुरेख मूर्ती मंदिरात दिसते. मंदिरातून निघून पुढे दुधीवरे खिंड लागते. या ¨खिंडतून उन्हाळा  असल्यास राजगडचा बालेकिल्ला दिसतो. नवीन यात्रेकरूंसाठी संध्याकाळी 5 नंतर या खिंडीतून लोणावळय़ाकडे न गेलेले चांगले. लोणावळय़ार्पयत अंतर जरी 9 किलोमीटर असले तरी वाटेत जंगल आहे. गाडी पंक्चर होणो, बंद पडली तर मनस्ताप भोगावा लागेल. तर मग सावधान. दर पावसाळय़ात काही वेळा या दुधीवरे खिंडीत दरड कोसळून हा रस्ता बंद  होतो. एकमेव मार्ग असल्याने पवनानगर ते लोणावळा दरम्यान जाणा:यांचे हाल होतात. यासाठी पावसाळय़ात येणार असाल तर नियमित मावळातील वार्ता / बातम्या वाचत चला.




लोहगड :

उजव्या हाताला वळल्यावर गाडीसाठी चांगलीच चढण लागते. याला घाट म्हणायचे की चढ आणि तो चढ तरी कसा युटर्न तर कधी सरळ अंगावरच. गाडीला फस्र्ट गिअर खाली अजून एक गिअर असावा काय? अशी सूचना करावाशी  मनात येते. जबरदस्त चढण, बाजूला दरी नाही. तर जंगल. ही चढण गाडीने सुमारे 5 मिनटे चढल्यावर तेथून 3 किलोमीटरवर आहे. पूर्वी लोहगड किल्लावर जाण्यासाठी 1998 साली येथे रस्ता नावाचा प्रकार नव्हता. तेव्हा मी व माङो काही मित्र मळवली बाजूने गायमुख खिंडीतून येथे पायी चालत किल्यावर गेलो होतो. आता ****खाली गाडी असल्याने काही वाटले नाही. धनाढय़ लोकांनी या ठिकाणी जमीन व बंगले बांधायला सुरूवात केली आहे. 10 ते 15 मिनिटात लोहगाडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगावाडीत आपण पोहचतो. येथे लोकवस्ती अंदाजे 50 ते 100 बि:हाडे. काहींनी हॉटेल काढून झुणाका भाकर, कांदा भजी, पोहे, चहा, नाष्टा, तुम्ही कोंबडी आणून द्या आम्ही तयार करतो असा व्यवसाय थाटला आहे. असो. त्यानिमित्ताने का होईना. पर्यटकांचे पाय लोहगडाला लागले आहे. गडावर जाण्यासाठी पूर्वी मळवलीकडून येताना पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी तुडवत यावे लागे. मग वाटेतून येताना भाजे लेणी, विसापूर किल्याकडे जाणारा रस्ता व गायमुख खड अशी ठिकाणो लागायची. आतातर येथून काही प्रमाणात टू व्हिलर येऊ लागली आहे. लोहगडा जवळच असणारी भाजे व बेडसे ही बौद्धकालीन लेणी आहे. सुमारे 2700 वर्षांपूर्वी किल्ल्याची बांधणी झालेली असावी असे ऐतिहासिक पुस्तकात लिहले आहे.  1789 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कोन असलेली एक विहीर बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला आहे. त्यावर त्याचा अर्थ असा-शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली याचेकडून बांधली असल्याचा उल्लेख आहे. नाष्टा करून (20 रुपये झुणका भाकरी, पिठलं एक्स्ट्रा घेतल्यास 5 रुपये जादा, भाकरी 5 रुपये) आम्ही गाडावर जाण्यासाठी निघालो. गाडावर जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटे खूप होतात. वर जाईर्पयत घनदाट झाडी आहे. निम्म्या वाटेत  गेल्यावर विस्तृत असे पवना धरण दिसते. बाजूला तुंगी व समोर तिकोना दिसतो. तर समोर अडवा पसरलेला असा विसापूर किल्ला दिसतो.  गडावर चढतांना आपल्याला सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते.

गणेश दरवाजा :

याच्या डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती. तसा आतील बाजूस शिलालेख आहेत.

नारायण दरवाजा :

हा दरवाजा नाना फडणीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे तांदूळ व अन्नधान्य साठवून ठेवण्यात येई.
हनुमान दरवाजा:- हा सर्वात जुना दरवाजा आहे.

महादरवाजा : 

हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. दरवाज्याचे काम नाना फडणीसांनी केले आहे. गडावर पोहोचल्यावर सरळ गेल्यास एक दर्गा लागतो. औरंगजेबाच्या मुलीची कबर असल्याचे काहींनी सांगितले. दग्र्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे तुटलेले अवशेष आढळतात. याच दुग्र्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ दुर्गप्रेमींनी सिंमेटमध्ये बसवली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. यालाच लोपेश ऋषींची गुहा असेही म्हणतात. एवढय़ा मोठय़ा कातळात एवढी मोठी कोठी तयार कशी केली असेल याचे आश्चर्य वाटते. या कोठीत राहाण्याची सोय होते. कोठीत अनेक खोल्या आहेत. दग्र्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. येथे शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत एक तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे.  ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे हे तळे सोळाकोनी आहे. यापुढे विंचूकाटाकडे जातांना वाडय़ाचे काही जुने अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. 

विंचूकाटा

या विंचूकाटय़ाकडे पाहिले असता राजगडाच्या संजीवनी माचीची आठवण होते. संजिवनी माची तीन पदरी बांधली आहे. हा विंचूकाटा म्हणजे सुमारे 1.5 किलोमीटर लांब आण तीस मीटर रु ंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचुकाटयावर जाण्यासाठी थोडेसे खाली उतरून जावे लागते. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. पाणी पिण्यास योग्य नाही. खाली दाट जंगल आहे. येथून  उजवीकडे पुणो-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रे हायवे) तर समोर लोणावळय़ामधील डय़ुक्स नोज दिसते.
लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस्तो पहारेकर्यांच्या नजरेआड जात नाही. तो व्यविस्थत हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरु ज आहेत. त्यावरून बाहेरून येणा:या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणोश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. या दरवाज्यांची रचना गायमुखाप्रमाणो असल्याचे सांगण्यात येते. शत्रुवर गडावर येईर्पयत एकाच ठिकाणवरून लक्ष ठेवता येता. तसेच वेळप्रसंगी त्यावर बंदुकीतून हमला ही करता येईल अशी रचना केलेली आहे.

लोहगडावर जाण्यासाठी वाटा  

  1. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना मळवली स्टेशनवर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरायचे तेथून पुलावरून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावात येता येते. दीड तासानंतर गायमुख खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे विसापूर किल्ल्यावर पोहचतो.
  2. पवना डॅम अथवा लोणावळय़ातून टय़ु व्हिलर किंवा फोर व्हिलरवरून लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.
  3. काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे. तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर दिसतो पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेकडीवर जातो तेथून एक पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-पवना डॅम-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी.

 

ओझर - लेण्याद्री - शिवनेरी - खोडद


वर्षातील शेवटचा रविवार. तो ही सुटटीचा त्यामुळे घरात रिकामे बसणे शक्य नव्हते. कोठे जायचे असा विचार करत असतानाच जुन्नरला अष्टविनायकांपैकी दोन गणपती व शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहण्याचा विचार मनात आला. तसे ही स्थाने यापूर्वी 15 वर्षापूर्वी मित्रंबरोबर व सहलीला गेलो असताना एकदा पाहिली होती. पण आता फारशी आठवत नव्हती. आज रविवार व इच्छा असल्यामुळे आम्ही ओझर, लेण्याद्री व शिवनेरीचा प्रवास करण्याचे ठरविले. त्यानुसार सकाळी 10 ला घर सोडले.  मोशी, चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव मार्गे ओझर तेथून लेण्याद्री व शिवनेरी व खोडद असा मार्ग होता. त्या विषयी...

थोडा परिचय

जुन्नर शहर प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक म्हणून. जवळच असलेला शिवनेरी किल्ला, नारायणगड, हडसर, जीवधन, हरिश्चंद्रगड तसेच अष्टविनायकांपैकी लेण्याद्री, ओझर, तसेच प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणोघाट हा इथून जवळच आहे. ‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवी सनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपूत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणोघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गाची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थापन झाल्यावर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदलेली दिसतात. सातवाहनांनंतर शिवनेरीवर चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. शिल्पकलेचा सुंदर नमुना म्हणजे येथील लेणी! महाराष्ट्राचे विविध भाग अशा सुंदर लेण्यांमुळे समृध्द आहेत. येथील काही लेणी शिवनेरी व लेण्याद्री डोंगरावर कोरलेली आहेत. लेण्यांमध्ये पर्यटकांची गर्दी होते. अनेक स्थळांची माहिती फक्त येथील स्थानिक किंवा ऐतिहासिक पुस्तकांत पाहावयास मिळते.  जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहेत. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती महाराज यांचे हे जन्मस्थान.

ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. कुकडी नदीच्या तिरावर हे मंदिर आहे. चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. येथील श्रींची मूर्ती लांब व रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. श्रींच्या डोळय़ात माणिकरत्न असून, कपाळावर हिरा आहे. संकट / विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. श्रीविघ्नेश्वराची मूर्ती स्वयंभू आणि पूर्वाभिमुख असून, डाव्या सोंडेची आहे. मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तटबंदी असून, मध्यभागी हे गणोशाचे मंदिर आहे.  आतमध्ये दोन दीपमाळा आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी या दगडी तटबंदीच्या बाजुने रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी जावे लागते. सकाळी 5 ते रात्री 11 वाजेर्पयत श्रींचे दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले असते. गणपतीचा फोटो काढण्यास येथेही बंदी आहे.

गाडी पार्किग येथून ओझर मंदिर.


मंदिराचे प्रवेशद्वार

मंदिरा बाहेरील दीपमाळ.

राहण्याची व्यवस्था : 

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी अल्पदरात धर्मशाळेची व्यवस्था आहे. येथे 4 भक्तभवन बांधलेले आहेत. पस्तीस रुपयांला प्रति व्यक्ती, अडीचशे रुपयात पाच व्यक्तींसाठी स्वतंत्र खोली, चारशे रुपयांत डिलक्स खोली उपलब्ध आहे.

ओझर मंदिरा शेजारील भक्तनिवास. परिसरातील दुकाने :

नेहमीप्रमाणो मिळणारे हार, तुरे, नारळ, ओटी भरण्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य या ठिकाणी मिळते. येथे न वाळणा:या फुलांचे हार मी प्रथमच पाहिले. दहा ते पन्नास रुपयांना हे हार विकतात. हे हार वर्षभर टिकतात. द्राक्षे या भागात जास्त पिकत असल्यामुळे काळे मनुका, मनुका, सुकामेवा या ठिकाणी विकण्यास होता. 

बाजारपेठेत मिळणारा न वाळणारा फुलांचा हार.


बाजारपेठेत मिळणा:या काळय़ा मनुका. (50 रुपये पाव)


मंदिराशेजारील बाजारपेठ.

कसे जावे : 

नारायणगाव तेथून जुन्नरला जाताना उजव्या बाजूला ओझरकडे फाटा फुटतो. तेथून ओझर 7 मैल आहे.  देवाळाच्या अलीकडे  कुकडी नदीवर पूल आहे. ओझर ते नारायणगाव हे अंतर 12 किलोमीटर तर पुणो ते ओझर हे अंतर 85 किलोमीटर एवढे आहे.

लेण्याद्री 

लेण्याद्रीचा डोंगर (मध्यभागी बारीक गुहा दिसत आहेत.)

या ठिकाणी विविध अंतरे दिली आह.

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरजिात्मक म्हणून ओळखला जातो.  कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर हे स्थान आहे.  हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.  लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात 28 गुहा आहेत. त्यातील 7 व्या गुहेत गिरजिात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणोश लेणी असेही म्हणतात.  लेणाद्रीच्या या लेण्या स्वच्छ आहेत. याचे श्रेय पुरातत्व खात्यास जाते.  प्रत्येकी 5 रुपये असे पुरातत्व विभागाचे तिकीट आहे. देवळात जाण्यासाटी 283 पाय:या चढाव्या लागतात. (दमल्याने एखाद-दोन पाय:यांचा फरक येऊ शकतो)

गिरिजात्मक मंदिर :

लेण्याद्री गणोश लेणी म्हणून ओळखली जाते.  हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले. या मंदिरात कोणत्याही प्रकारचा दिवा लावलेला नाही. फक्त गणपतीच्या समोर लावण्यात आलेल्या समईच्या प्रकाशातच गणपतीचे दर्शन घ्यावे लागते. गणपती असलेल्या मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र कॅमे:यात चांगली झूम लेन्स असेल तर बाहेरून गर्दी नसल्यास फोटो काढता येतो. हा पूर्ण उंच डोंगर चढून आल्यावर जो थकवा आलेला असतो, तो या मंदिरात आल्यावर व गणपतीचे दर्शन घेतल्यावर पूर्ण निघून जातो. मंदिरात प्रवेश केल्यावर थंडगार वातावरण अनुभवायला मिळते. 283 पाय:या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणो लागते व त्यानंतरच्या मोठय़ा गुहेमध्ये गणपती आहे. मंदिर म्हटले की, खांब, कमानी, मंडप असते, परंतु येथे तसे नाही. साधारणपणो 58 फूट लांब व 58 फूट रुंद या गुहेत हे मंदिर आहे. विशेष म्हणजे मंदिराला इतर अष्टविनायक गणपती मंदिराप्रमाणो कळस नाही. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूला हनुमान व शिवशंकर हे देव आहेत. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. येथे पाण्याच्या चार टाक्या आहेत. त्या वापरात नाहीत.  या देवालयाच्या सभामंडपाची उंची कमी आहे. मंदिराच्या गाभा:यापुढील सभामंडप मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. बहुतेक सर्व लेण्यांसमोर बसण्यासाठी ओसरी आहे.

चैत्यगृह :


चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


चैत्यगृहातील कोरलेले हत्ती व वाघाची खांबातील शिल्पे.


मंदिराबाहेरील कोरीव खांब


पोहचण्यासाठी सोय :

अबालवृद्धांसाठी तसेच ज्यांना पाय:या चढता येत नसेल अशांसाठी 500 रुपयांत डोलीतून वरर्पयत नेण्याची सोय आहे. 4 माणसे न थांबता खालपासून वरर्पयत एका दमात तब्बल 283 चढतात. लेण्याद्रीच्या डोंगरावरून समोर शिवनेरी किल्ला दिसतो.


मदिरातून दिसणारा लेण्याद्रीकडे येणारा रस्ता.


मंदिराकडे जाणारा रस्ता. या तब्बल 283 पाय:या आहेत.

चैत्यगृहात पाच खांबांच्या दोन्ही बाजूला  रांगा आहेत.  हे खांब इ. स. पूर्व 90 ते इ. स. पूर्व 300 या या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. या खांबावर नक्षीकाम आहे. त्यात वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पकृती आहेत. गुहेच्या मध्यावरती प्रार्थनास्थळ कोरण्यात आलेले आहे. ते घुमटाकार आहे. साडेचार फुट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे.  काही पर्यटक विनाकारण येथे पैसे टाकून काय करतात कुणास ठाऊक.  येथे अष्टकोनी खांबाच्या आहेत. तळाशी व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रतिकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्र ावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार लाकूडसारख्या कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ आहे.  अशीच रचना मळवली, कामशेत येथील भाजे व कार्ला लेण्यांमध्येही दिसते.


जायचे कसे :

लेण्याद्री  हा जुन्नरपासून 8 कि.मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून सुमारे  97  कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
शास्त्रनुसार मोरगाव, सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव आणि शेवटी पुन्हा मोरगावच्या गणपतीचे दर्शन घातल्यावर अष्टविनायकाची यात्र संपते असा क्रम आहे. पण आजकाल यात्र कंपनीवाले वेळेनुसार या क्रमात थोडा बदल करतात.

शिवनेरी

शिवनेरी किल्ला समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणोकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे. गडाचा आकार बाणाच्या टोकासारखा निमुळता आहे व त्याचे अगट्रोक उत्तरेकडे रोखलेले आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणो अथवा मुंबईहून एका दिवसात शिवनेरी , लेण्याद्री व ओझरचा गणपती पाहून घरी परतता येते.

महाराष्ट्र शासनाने गडावर जाण्यासाठी चांगल्या पाय:या बांधून दिल्या आहेत.

सात दरवाज्यातून :

जुन्नर एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून खासगी वाहन करून किल्यावर येता येते. अंदाजे अंतर 4 किलोमीटर आहे. सिंहगडाप्रमाणो या ठिकाणी वर्पयत चार चाकी गाडी जाते. मात्र या ठिकाणी पार्किगची योग्य सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करून गड पाहण्यास जावे लागते. पार्किग मोफत आहे. येथून मुख्य गड दीड ते दोन किलोमीटर पायी चालावे लागते.

साखळीची वाट :

दुसरी वाट साखळीची वाट आहे. या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळय़ाशी यावे लागते. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणा:या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्याकडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी पायवाट  शिवनेरी किल्ल्याच्या एका दगडी भिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साहयाने आणि कातळात खोदलेल्या पाय:यांच्या मदतीने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो. बहुतेक लोक पहिल्या वाटेचाच (दरवाज्यातून) उपयोग करतात.


सात दरवाज्यांची वाट :

गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिवाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आण सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी 1 तास लागतो. हत्ती दरवाजा सोडल्यास इतर दरवाज्यांना दरवाजे नाहीत केवळ कमानी आहेत.

महादरवाजा


पीर दरवाजा


हत्ती दरवाजा


हत्ती दरवाजा


शिवाई दरवाजा


कुलूप दरवाजा


 मेणा दरवाजा

शिवाई मंदिर :

गडात प्रवेश केल्यानंतर साधारणपणो 15 ते 2क् मिनिटे चालल्यानंतर हे मंदिर दिसते. मंदिरासमोर येणोर - कुसुरचे धरण व आजूबाजूचा परिसर दिसतो. मंदिराच्या मागे कातळात 6 ते 7 गुहा आहेत. या गुहा ट्रेकर्ससाठी मुक्कामासाठी योग्य नाहीत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले असे म्हटले जाते.





अंबरखाना

शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे.  1485 मध्ये मलिक अहमद या निजामशाहीच्या संस्थापकाने हा गड ताब्यात घेऊन आपली राजधानी उभारली त्याच कालखंडात ही इमारत बांधली आहे. मराठेशाहीत ती इमारत अंबारखाना किंवा हत्ती व घोडय़ांच्या पागेसाठी उपयोगत आणत असत. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणा:या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी (शिवाजी महाराज जन्मस्थान) घेऊन जाते. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात. गडावर अनेक टाकं आहेत. परंतु काळजी न घेतल्यामुळे इतर किल्यांबरोबरच या किल्ल्यावरील टाक्यांची दुरवस्थाच आहे.


कमानी मशिद :

शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो. येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे.


शिवजन्मस्थान इमारत :

ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे पुतळा बसविण्यात आला आहे.  वरती पोहचण्यासाठी 2क् पाय:या चढून वर जावे लागते. ही इमारत सात दरवाजे ओलांडून आल्यानंतर डाव्या हाताला लांबूनच दिसते. तसेच जुन्नर एसटी स्टॅडमधून देखील ही छोटी इमारत पटकन ओळखता येते.  येथे सुंदर महिरप चौकट असून, या चौकटी बसून खालील बाजूने अनेक पर्यटक फोटो काढताना दिसतात. येथून जुन्नर शहर व परिसर दिसतो.



बदामी टाके :

नावाप्रमाणो बदामाच्या आकाराचे हे टाकं आहे.  शिवजन्म इमारतीच्या समोरच हे बदामी पाण्याचे टाकं आहे. येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फुट उंचीचा या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.  गड फिरण्यास 2 तास लागतात.


शिवकुंज  :

महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक मंडप बांधला आहे. ‘शिवकुंज’ असे त्याचे नाव आहे. जिजाबाई व तलवार घेऊन बसलेला बाल शिवाजी यांची पंचधातूची मूर्ती आहे. शिवजयंतीला शिवनेरीवर मोठा उत्सव असतो.


शिवनेरी वरून दिसणारा परिसर :

किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.  किल्ल्यावरून चावंड, नाणोघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय दिसतो.

कसे जाल :

  • शिवनेरी-लेण्याद्री-ओझरचा गणपती - खोडदच्या दुर्बिणी ही ठिकाणे पाहावयाची असल्यास मंचर-नारायणगाव-जुन्नर-शिवनेरी नंतर - लेण्याद्री व तेथून ओझर व खोडदच्या दुर्बिणी व परतीचा मार्ग अशा क्रमाने अथवा उलटय़ा क्रमानेही जात येईल.

खोडद

शिवनेरीवरून 5 वा चालायला सुरूवात केली. पाऊण तासात खाली आलो. तेथून नारायणगावला यायला अर्धा तास गेला. संध्याकाळचे 6.30 वाजले होते. खोडदला दुर्बिणी पाहण्याचे मनात होते. वाटेत उसाचे मळे होते. उस कारखान्याला उसाच्या मोळय़ा पोचवून दमलेले बैल व त्यांचे चालक रस्त्याच्याकडेला बसलेले दिसले. संध्याकाळी 7 ला जीएमआरटीला पोचलो मात्र अंधारामुळे तेथून वॉचमनने काहीही पाहता येणार नसल्याचे सांगितले. निराश न होता पुढच्या वेळी प्रथम खोडदला जायचे मनात निश्चित केले. याआधी मित्रबरोबर खोडदला गेलो होतो. त्यावेळी तेथे प्रदर्शन भरले होते.

पुण्यातून येताना नारायणगावला आल्यावर एस.टी स्टँडसमोरून डाव्या हाताला खोडदला जाणारा रस्ता आहे.
जगातील दुस:या क्रमांकाची सर्वात मोठी दुर्बीण असलेले गाव म्हणून खोडद ओळखले जाते. नारायणगावापासून 9 कि.मी अंतरावर आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर मीना नदीच्या काठावर आहे. खोडदच्या अलिकडे डाव्या हाताला जीएमआयआरटी अर्थात Giant Metrewave Radio Telescope 3 किलोमीटरवर आहे.   नारायणगावाहून खोडदला बसने जाता येते. स्वत:चे वाहन असल्यास पुण्यातून येताना प्रथम हे ठिकाण पहावे.
हा प्रकल्प  दुस:या व चौथ्या शनिवारी सगळय़ांना भेटीसाठी खुला असतो. इतर वेळी ग्रुप असल्यास विनंती करून पाहता येते. मे महिन्यात या ठिकाणी सर्वासाठी तीन दिवसांसाठी ग्रह, तारे व अवकाशावर प्रदर्शन असते. तसेच त्यासाठी त्यांच्या बसेस सुद्धा उपलब्ध असतात. या बाबत पेपरमध्ये बातम्या येतात. त्या जरूर पाहव्यात. मीना नदीच्या कडेचा परिसरात उसाचे मळे आणि फुलशेतीने हिरवागार झाला आहे. गावाबाहेर जगदंबा मातेचे भव्य मंदिर आहे. चैत्र महिन्यातील रामनवमीला येथे जगदंबा मातेचा उत्सव भरतो.

 

अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह


रविवार होता. दुपारी जेवण झाल्यावर झोपण्यापेक्षा हिंडणे बरे म्हणून गाडीवरून निघालो. ते अप्पूरघरला. पुण्याकडून मुंबईला जाताना पिंपरी-चिंचवड शहर लागते. शहराची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. जुने रस्ते जाऊन नवीन सहा पदरी रस्ते, मोठे पूल बनू लागले.

अप्पूघर :

या ठिकाणी अप्पूघर व दुर्गादेवी टेकडी या नावाने प्रसिद्ध अशी बघण्यासारखी दोन ठिकाणो आहेत. संजय गांधी उद्यान असे नाव आहे. पुण्याकडून बसने यायचे झाल्यास पिंपरी, आकुर्डीनंतर निगडी जकात नाका येतो. येथून डावीकडून सुमारे 2 किलोमीटरवर अप्पूघरकडे जाता येते. अप्पूघरला मनोरंजनाचे व लहान मुलांसाठी खेळ उभारलेले आहेत. यात माय फेअर लेडी, मेरी गो राउंड, धडक गाडी, हसरा विदुषक असे खेळ आहे. मात्र, हे खेळ पाहण्यासाठी सुद्धा प्रवेश तिकीट आहे. पार्किग तिकीट, प्रवेश तिकीट मग खेळण्याचे तिकीट असे तिकीट गोळा करून आपण आत पोहचतो. मात्र, थोडीशी निराशाच पदरी पडते कारण आतमध्ये आहे. मोडकी व काहीशी तुटलेली खेळणी. नवीन असताना येथे ब:यापैकी खेळणी शाबूत होती. मात्र, आता त्याची ब:यापैकी वाट लागलेली दिसते. असू देत. येथून दुर्गादेवी टेकडीवर जाण्यासाठी मार्ग आहे. या टेकडीवर आजुबाजूच्या परिसरातील लोक सकाळी व संध्याकाळी पाय मोकळे करायला येतात. तसेच नवे जोडपे काही तरुण-तरुणीही आडोश्याला बसलेले पाहायला मिळतात. टेकडीवरून जुना पुणो-मुंबई रस्ता, निगडी, प्राधिकरण, रावेतचा परिसर दिसतो व शहर व गावांचे पुन्हा शहर कसे घडते ते पाहायला मिळते. लहानपणी येथे खेळायला जायचो तेव्हा टेकडीवरून संध्याकाळी 5.30 वाजता बाहेर पडण्याचे आदेश मिळायचे. टेकडीचा काही भाग देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आरक्षित असल्यामुळे काही ठिकाणी ‘नो एंट्री’चा बोर्ड ही पहावयास मिळतो. लोकांच्या सोईसाठी या ठिकाणी मोठी झाडी निर्माण केली आहे. टेकडीवर वर्पयत रस्ते व आजुबाजूला बागकाम केल्याने येथे उन्हाळय़ात हिंडायला मजा येते.

दुर्गादेवी मंदिर :

दुर्गादेवीच्या मंदिरावरून या टेकडीला दुर्गादेवीटेकडी नाव पडले. हे मंदिर सुद्धा छान आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या टेकडीवरून अनेकवेळा वृक्षारोपण केल्याने टेकडी हिरवीगार झाली आहे.

भक्ती-शक्ती शिल्पसमूह :

महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजीमहाराज व संत तुकाराममहाराज यांचे मोठय़ा आकारातील शिल्प या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी निगडी जकात नाक्यावर आलेल्या गाडय़ा थांबत असत. सध्या येथे एका टेकडीवजा उंचवटय़ावर हिरवळ लावली असून, त्याच्या मध्ये भक्ती-शक्ती शिल्पसमूहाची मूर्ती लावली आहे. दिवाळी पाडव्याला या ठिकाणी असंख्य पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. येथून  समोर दिसणारे श्रीकृष्णाचे मंदिर असून, ते पाहण्यासारखे आहे.  सध्या भक्ती-शक्तीसमूहाच्या येथे चौपाटी निर्माण झाली. भेळ, वडापाव, चायनीज गाडय़ांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळणी त्यामुळे येथे रात्री 9 वाजेर्पयत गर्दी असते.

देहूगाव :

निगडी जकात नाका, भक्तीशक्ती शिल्पसमूह सोडल्यावर अंदाजे 2 किलोमीटरवर देहूफाटा आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना उजव्या हाताला देहूगावाकडे जाणारा  रस्ता आहे. पुणो-मुंबई रस्त्यावर आकर्षक कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूस वीणा असून, ‘जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज प्रवेशद्वार’ असे लिहिले आहे. येथून देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून रस्ता जातो. देहू तीर्थस्थान असल्यामुळे रस्ता ब:यापैकी चांगला केलेला आहे.

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महारांजाचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेलेचे सांगितले जाते. देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर अशी स्थाने पाहण्यासारखी आहेत. तुकारामबीजेला देहूत उत्सव असतो.  या ठिकाणी  सुमारे 1 एकरावर उभारलेले गाथा मंदिर सुंदर असून, संपूर्ण मंदिर पांढ:या रंगाने रंगवलेले आहे. मंदिर इंद्रायणी तिरावर असून, मंदिर परिसर सुशोभीत केलेला आहे. मुख्य मंदिरात तुकाराममहाराजांची मोठी मूर्ती असून, येथे तुकाराम गाथेच्या ओव्या भिंतीवर कोरल्या आहेत. एकूण तीन मजले असून आतमध्ये पौराणिक देखावे मूर्तीच्या स्वरूपात कोरले आहेत. यात भक्तप्रल्हाद, संत ज्ञानेश्वरमहाराज, विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच आहे.


गाथा मंदिर

जायचे कसे :

पुण्याहून स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन येथून थेट निगडीर्पयत बस उपलब्ध आहेत. 1 ते 1.30 तासात तेथून येता येते. नंतर पायी चालत अथवा रिक्षा करून 10 ते 15 मिनिटांत प्रथम अप्पूघर व नंतर भक्ती-शक्तीला भेट देता येते. तसेच येथून आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आहे. तेथूनही गाडय़ा उपलब्ध आहेत. निगडी जकात नाक्याला थांबून देहूगावकडे जाणारी बस पकडता येते.

 

लवासा


‘लवासा’ची गरज? मौजमजेसाठी

          सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर तर येथे देशी - विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. या पर्यटनगरीला अजून आकर्षण निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पर्यटकांसाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे पर्यटनासाठी खुली करून देण्याचा  जोरदार प्रयत्न सुरू आहे. पूर्वी खडकवासल्याच्या व मुंबईच्या चौपाटीवर जाऊन भेळ खाल्याची चैन आठवते. आता ही चैन आधुनिक जगात अजून वाढली आहे. श्रीमंतांसाठी या गावातल्या दरीत ‘स्कूबा डायव्हिंग’ ‘रिव्हर राफ्टिंग’ करणं आदी गोष्टी म्हणजे चैन मानलं जावू लागले आहे.
          ‘लवासा’ हे प्रकरण रोजच प्रसारमाध्यमांतून गाजतयं. रोज त्यावर उलटसुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. लवासा प्रकल्पाला सुरूवात झाल्यापासून त्याची प्रसिद्धी केली जात आहे.  पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात मुळा-मुठा नदीच्या क्षेत्रात हा प्रकल्प उभा रहात आहे. वरसगावच्या धरणाच्या बाजूची १८ गावे  वेल्हा, मावळ,  मुळशी या तीन तालुक्यांतर्गत येतात. त्यांचा पर्यटनासाठी विकास सध्या सुरू आहे. पुण्यातून चांदणी चौकातून पिरंगुटच्या पुढे गेले की लवासाकडे जाण्यारे मोठे फलक आपले लक्ष वेधून घेतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अवाढव्य प्रकल्प उभारत असताना स्थानिक रहिवाशांना कितपत विश्वासात घेतले आहे. हा प्रश्न  पडतो. येथील वातावरण पर्यटन स्थळाला पोषक आहे. पर्यटन स्थळाच्या नावाखाली निसर्गाला धक्का लावून, कायद्याला धाब्यावर बसवून हा प्रकल्प सुरू असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यांतून येऊ लागल्या आहेत.
          लवासा हे शहर सरकारच्या विशेष निर्माण अधिकार वापरून म्हणजेच ‘स्पेशल प्लानिंग आॅथॉरीटी’ अतंर्गत तयार होत आहे.  जागतिक ख्यातीची डिझाइनिंग कन्सल्टंट असलेल्या ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी’ या कंपनीने या संपूर्ण प्रकल्पाची आखणी केली आहे. यात लवासामध्ये तीन मोठी महानगरेच वसवण्यात येत आहेत. यातल्या पहिल्या नगराचं नाव आहे दासवे. भोईनी, मुगाव,  कोळोशी, उगावली, धामण ओहोळ, गडले, साखरी, पडलघर, वदवली, आळमळ, पाथरशेत, बेंबटमाळ, मोसे ब्रदुक, साईव, भोडे, वरसगाव या गावांमध्ये संपूर्ण लवासा सिटी २०२१ पर्यंत उभी राहील, अशी अपेक्षा आहे. नावातच लवासा ‘सिटी’ आल्यामुळे पर्यटनाबरोबरच येथे अत्याधुनिक शहर उभे राहणार हे निश्चित आहे. अनेक आयटी कंपन्या इथे कार्यालये थाटणार असून त्यातील आयटी प्रोफेशनल्स याच भागात राहावेत, अशी ही कल्पना आहे. अर्थातच अनिवासी भारतीयांची मोठी गुंतवणूक येथे आहे. आज  राज्यात कुठे नसेल असा सुमारे ४० किमीचा रस्ता पुण्यातून थेट लवासाला तयार करण्यात आलेला आहे. याच रस्त्यावर टोल नाका झाला आहे.

भौगोलिक दृष्ट्या परिसर :
          या १८ गावांत शेती जमिनीबरोबर वन जमिनीचे क्षेत्रही मोठ्याप्रमाणावर आहे.  हा सगळा भाग दाट झाडाझुडुपांनी, डोंगराळ भागांनी वढलेला आहे. शतकानुशतके वाढलेले मोठे वृक्षसंपादा या ठिकाणी आहे. गावांमध्ये जुने रस्ते आहेत काही ठिकाणी पायवाटा आहेत. लवासा प्रकल्प ज्या ठिकाणी पूर्ण होतोय त्या ठिकाणी डोंगर उतारावर शेकडो वर्षांपासून ठाकर, कातकरी व धनगर, कुणबी शेतकरी कुटुंब करून राहतात.
दासवे, मुगाव आणि नासा, लवार्डे  या ठिकाणी अनेक ठिकाणी डोंगरावरील झाडे बांधकामासाठी तोडण्यात आली. काही ठिकाणी झाडे लावण्यातही आली आहेत.  पण ती किती प्रमाणात याचा प्रश्न पडतो आहे.
          पुणे जिल्ह्यातल्या मोसे खोºयात खडकवासला धरणाच्या मागे वरसगाव नावाचं एक धरण आहे. वरसगाव धरणाचं २५ किलोमीटर लांबीचं पाणलोट क्षेत्र  आहे. मुळातच दुर्गम असलेला हा भाग पूर्वी सहजरित्या पोहचण्यास अवघड होता. हे संपूर्ण पाणलोट क्षेत्र पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचं ठरवल्यानंतर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही संपूर्ण जमीन विकत? घ्यायला सुरूवात केली. यातील १२५०० एकर विकसित करण्याची ही योजना आहे.
          कोणत्याही राज्यात धरणे बांधण्यासाठी प्रथम केंद्रशासन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागते. या परवानगीनंतरच देशाच्या मालकीचे होते. या धरणामध्ये काही सुधारणा करायची असेल तर पुन्हा केंद्र शासनाची परवानगी लागते. वरसगाव धरणामध्ये मागील बाजूस आणखीन एक धरण बांधण्याचे अधिकार लवासाला देण्यात आले आहेत. अशा प्रकारचे नवीन नियम कायद्यात करून धनाढ्य लोक कायद्यात तुरतुद असल्याचे सांगत आहे.   या धरणामुळे वरसगाव धरणातील ५ टीएमसी पाणी अडविले जाणार आहे. या पाण्याची मालकी लवासाकडेच आहे. धामणओहोळ आणि दासवे या खेडय़ांजवळ प्रत्येकी पाच बंधारे बांधून सुमारे २ अब्ज घनफूट पाणीसाठा व्यापारी वापराकरता करण्याची परवानगी लवासाने मिळवली आहे.  हे वाढीव धरण बांधण्यापूर्वी वरसगाव धरणातल्या पाण्यावरचा अधिकार जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगक्षेत्र यांचा होता. तो आता नष्ट होणार असल्याच्या बातम्याही वाचण्यास मिळू लागल्या आहेत. लेकसिटीमधील हॉटेल्स, बंगले, बागा, उद्याने, क्रीडा अशासाठी हे पाणी वापरले जाणार आहे.

धरणे :
          पुणे  जिल्ह्य़ाच्या पश्चिम हद्दीच्या सीमेवर सह्याद्रीच्या प्रचंड पर्वतरांगा आहे.  या डोंगर फाटय़ांच्या बेचक्यामध्ये डोंगरात उगम पावलेले नदीनाले यांची खोरी आहेत. घाटमाथ्यावर वारेमाप पाऊस पडतो नव्हे कोसळतो. येथे नसिर्गाची मुक्त उधळण आपल्याला पाहायला दिसते. हे पाणी साठवण्याच्या दृष्टीने या खोºयात अनेक धरणे बांधलेली आहेत. या डोंगरातून अनेक झरे मिळून टेकपोळे व धामण ओहोळ नजीक अंबी नदी व मोशी नदी उगम पावते.
          ब्रिटिशकालात पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला १६ किमी अंतरावर मुठा नदीवर धरण बांधण्यात आले.  मुठा उजव्या कालव्याने पुणे शहर व शेतीसाठी पाणी पोचवले जाई. शहराची व शेतीसाठी वाढणारी गरज लक्षात घेऊन १९५७  साली मुठा खोºयात म्हणजेच खडकवासल्याच्या वरील क्षेत्रात पानशेत  या ठिकाणी धरणाचे बांधकाम सुरू झाले. काम अर्धेकच्चे असतानाच १२ जुलै १९६१ रोजी धरण फुटले याच्या तडाख्याने खडकवासला धरणही फुटले. अर्थातच याचा फटका जनसामान्यांना बसलाच. १९७५ साली पानशेत धरण पुन्हा बांधण्यात आले.
          मुठेच्या दोन उपनद्या आहेत एक अंबी व दुसरी मोशी या अंबी नदीवर पुण्याच्या पश्चिमेस अंदाजे ४० कि. मी. वर पानशेतजवळ तानाजी सागर तर मोशी नदीवर वरसगावजवळ वीर बाजी पासलकर सागर आणि मुठा नदीवर टेमघर अशी धरणे बांधण्यात आली.  टेमघरच्या उत्तरेस मुळा नदीवर टाटांचे मुळशी धरण आहे.  वरसगाव, पानशेत व टेमघर धरणांमधील पाणी मुठा नदीच्या पात्रातून खडकवासला धरणात व तेथून कालव्याने व पाइपने पुण्यास आणले जाते.
          पुणे शहराला पानशेत, खडकवासला आणि वरसगाव धरणातून पाणी पिण्यासाठी मिळते. या तीनही धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे शहराला अंदाजे १४ टीएमसी पाण्याची गरज भासते. जिल्ह्यातील शेतीसाठी १८ टीएमसी पाणी वापरले जाते. औद्योगिक क्षेत्रासाठी ०.४० टीएमसी पाणी राखीव ठेवले जाते. अशा परिस्थितीत लवासाच्या बांधकामासाठी ३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे.

निसर्गाची हानी :
          येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, तलाव, क्रीडांगणे आादी बांधण्यासाठी डोंगरमाथ्यावर व डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणात डोंगर खोदाई सुरू आहे.  हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. जांभूळ, आंबा, फणस, हिरडा, शिकेकाई, बेहडा, खैर, ऐन, कडुलिंब, करंज, पळस, शिसम, आवळा, कोकम, बांबू, तसेच अनेक औषधी वनस्पतींचे इथे नैसर्गिक भांडार आहे.  तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करून आहेत. या समृद्ध निसर्गाचे या ‘पर्यटन’ स्थळामुळे काय हानी होईल ते काळाच ठरवेल.

नैसर्गिक संपत्तीची हानी
          या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीची हानी तर होत नाही ना असा प्रश्न उभा राहातो. आणि ही हानी तरी कशासाठी पर्यटनासाठी. हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. नाहीतर नैसर्गिक अन्नसाखळी तुटण्याची शक्यता आहे.  ही सारी मानवनिर्मित शहरे आज मुळशी, भाटगर, पानशेत, टेमघर, वरसगाव, पवना या धरणाच्या पाण्याची वाट लावणार आहेत. याचा थेट परिणाम पुणे व आजुबाजूच्या लोकवस्तीवर झाल्यावाचून राहणार नाही.
          लवासाचे हे मानवनिर्मित ‘हिल’ स्टेशन उभारताना अनेक ठिकाणी डोंगर ‘किल’ केलेले दिसतात. त्याशिवाय एवढा मोठा रस्ता, खिशाला न परवडणारे येथील अवाढव्य गृहप्रकल्प हे झालेच नसते. डोंगरांचे सपाटीकरण करून उभे केलेले हे हिल स्टेशन म्हणले तर वावगे ठरणार आहे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत महाबळेश्वर, माथेरान, आंबोली येथे  हिल स्टेशन बांधली जातात. परंतु तेथील पर्यावरणाला धक्का न लावता? लवासातील डोंगर तीव्र उताराचे आहेत आणि त्यावर माथे विस्तीर्ण नाहीत अर्थातच हा प्रकल्प डोंगर सपाट करून काही ठिकाणी झाडांची कत्तल करून पूर्ण करावा लागणार आहे.
          सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असलेले हे आधुनिक शहर राहणार आहे. सध्या वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण या मूलभूत सुविधांपासून अनेक खेडोपाडी वंचित आहे. सध्या पडलेला २०१३ सालचा कोरडा भीषण दुष्काळ पाहता अशा प्रकल्पांना राज्य सरकार परवानगी तरी कशी देते याचे गौडबंगाल काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. हिलस्टेशनची महागडी घरे, तेथील उच्चभ्रू स्कूल, वाहतुकीसाठी एअर कंडिशन बस या सेवा नाहीतर काय कामाच्या.  पर्यावरणाची मानवनिर्मित हानी पाहून मन खिन्न होते. आपण एक दिवसाची पिकनिक म्हणून या क्षेत्राकडे न पाहता येणाºया पिढीसाठी निसर्ग ठेवणार आहोत का नाही याचा विचार करायला हवा. ‘मला काय त्याचे’ हे धोरण आता थांबविले पाहिजे.
          पर्यावरणाच्या प्रश्नावरून लवासा वादात असतानाच आणखीन एका खासगी हिल स्टेशन उभे राहू लागले आहे. तेही मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर, माजगाव बार्फे, भांबुर्डे, एकोले, घुटके, आडगाव येथे हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पाला लागणारं पाणी मुळशी धरणातून मिळणार आहे.  जमीन खरेदी करण्याचा काम सध्या जोरात सुरू आहे.
          वरील लेख लिहण्यासाठी पुन्हा एकदा मी व मित्र लवासाला गेलो तेथील एकूण भौगोलिक परिस्थिती सध्या तेथील लोकवस्ती यांचा अभ्यास करून व काही वर्तमानपत्रात आलेल्या लेखाच्या आधारे हा लेख लिहीला आहे. चूका आढळल्यास जरूर कळवा. धन्यवाद

          आज रविवार होता. बरेच दिवस लवासाबद्दल ऐकत होतो. त्याबद्दल वर्तमानपत्रातून लेखही वाचले होते. येथे जाण्याचा मोह अवरेना  दुपारी 2 ला घर सोडले. हिंजवडी, माण, घोटावडे मार्गे पिरंगुट चौकातून रस्ता आहे.  काही किलोमीटर रस्ता खराब आहे. मात्र, 10 किमीअंतर पुण्यातून चांदणी चौकातून जाण्याचे वाचते. पिरंगुट सोडल्यानंतर लवासा सिटीचा सरळ रस्ता आहे. वाटेत वरसगावचे धरण दिसते.
          मुळशी तालुक्यातल्या मौजे सालतर,  भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव गावाच्या परिसरात हा प्रकल्प उभा आहे. लवासा सिटीकडे जाणारा रस्ता छानच आहे. येथील डोंगर तीव्र उताराचे आहेत. रस्ता नागमोडी व घाटाचा आहे. काही टर्न खूपच मास्त आहे. वाटेत लवासातर्फे दिवे लावले आहेत. रस्त्याच्या आजुबाजूला जास्त लोकवस्ती नाही. पुण्यातून चांदणी चौक ओलांडून पिरंगुटच्या पुढे गेले की डाव्या हाताला लवासाकडे जाता येते. वाटेत भुगाव, लवार्डे,  दासवे  अशी गावे आहेत. याच रस्त्याने पुढे ताम्हीणी घाटात जाता येते.  दुपारी 4 ला लवासा सिटीत पोहचलो.
          येथील निसर्गदृश्य बघण्यासाठी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणारं आहे. वरून लवासा सिटीचा परिसर, पूल, आजुबाजूच्या इमारती, दिवाळीतल्या किल्लांवरील चित्रंसारख्याच दिसतात. लवासा सिटीत एक गार्डन असून, त्यात लहान मुलांसाठी खेळणी बसविलेली आहेत. गार्डन छान आहे. सायंकाळी 5.30 ला लवासा सिटीतून निघालो. चांदणी चौकात एक टोल आहे. 30 रुपयांचा. जाताना पिरंगुट मार्गे चांदणी चौकातून बाणेर मार्गे घरी पोहचलो.



 

 

मोरगाव- नारायणपूर-बालाजी मंदिर

तारीख : 21/10/2012

मोरगाव

सकाळी ७.४५ ला घर सोडले. खडकीतून येरवडा मार्गे पुणेस्टेशन तेथून  हडपसरमार्गे निघालो. रविवार असल्यामुळे गर्दी नव्हती. वाटेत दिवेघाटाखाली  थांबलो. येथे मटकी भेळ प्रसिद्ध आहे. दिवे घाट ओलांडून सासवडला पेट्रोल भरले. पेट्रोल येथे पिंपरी-चिंचवडच्या तुलनेने स्वस्त आहे. 

मोरगावचा मयुरेश्वर : -

           अनेकवेळा एसटीने मार्गावरून गेलो. पण गणपतीचे दर्शन करण्याचे राहून गेले. तेव्हा मुद्दाम गाडीने जाऊन दर्शन घेतले.
           अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती म्हणजेच मोरगावचा हा मोरेश्वर. अष्टविनायक यात्र या गणपतीचे दर्शन घेऊन सुरू केली जाते. सर्व आठही गणपतींचे दर्शन घेऊन शेवटी पुन्हा याच गणपतीचे दर्शन घेतली की यात्र पूर्ण होते असे म्हटले जाते. मोरेश्वर हा गणपती नवसाला पावणारा अर्थातच त्यामुळे भक्तांचा तारणहार समजला जातो. वेळेअभावी अष्टविनायकांची यात्र एकदम करता येणो शक्य नव्हते. तेव्हा जमेल तेव्हा अष्टविनायकांचे दर्शन घेण्याचे ठरवले.
           मोरगाव पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यात असून क:हा नदीकाठी असलेले छोटेसे गाव. अष्टविनायकांमध्ये या गणपतीला विशेष स्थान आहे.  पुणे-सातारा मार्गावर पुण्यापासून केवळ 64 कि. मी. वर असणारे हे मोरगाव पुण्यातून हडपसरकडून सासवडमार्गे जेजुरीच्या थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला मोरगावकडे जाण्याचा रस्ता आहे.
           मंदिरात जाण्यासाठी गाडी पार्किग तळापासून थोडे पुढे गेलो. श्रींच्या आरतीचे सामान, फुले, माळा, हार, कॅसेटी यांनी बाजारपेठ सजलेली दिसली. पुराणात कथेनुसार सिंधू राक्षसाला ठार मारणारा हा मयुरेश्वर होय. मोरावर बसून गणेशाने राक्षसाला मारले म्हणून मोरेश्वर (मयुरेश्वर) हे नाव प्राप्त झालं.
           सुमारे अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर दर्शनाची वेळ झाली. तेही फक्त काही सेकंदच मंदिरातील सेवकांनी भराभरा दर्शन घेण्याच्या सूचना केल्या होत्या. गणेशाची बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आहे. श्रींच्या डोळय़ात व बेंबीत हिरे बसविलेले आहेत. डोक्यावर नागाची फणी आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराला एकूण 11 दगडी पाय:या आहेत. मंदिराच्या चारही बाजूला 50 फूट उंचीची तटबंदी आहे.  मंदिर हे काळय़ा दगडातून साकारलेले आहे. बहमनी राजवटीत मंदिर बांधले असल्याचे अनेक पुस्तकात वाचण्यास मिळते.
           देवळात प्रवेश केल्यावर चौकातच दोन दीपमाळा दिसल्या  अशा प्रकारच्या दीपमाळा अष्टविनायकातील बहुतांश मंदिरात पाहण्यास मिळतात. भक्कम तटबंदी व कळसावरील शिल्पकाम तर छानच आहे. सभामंडपाला दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत . देवळाजवळ नगारखान्याची इमारत आहे .  इथलं एक वैशिष्टय़ म्हणजे अष्टविनायकांतलं  हे एकच मंदिर असं आहे, जिथे दगडी नंदी आहे.

भाद्रपद व माघ या दोन महिन्यात पुण्याच्या जवळच्या चिंचवडहून श्रींची (मोरया गोसावी) पालखी मोरगावी येते. मोरगाव हे साधू मोरया गोसावींचं जन्मस्थान. चिंचवडगावातील मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या मंदिराच्या परीसरातील क:हा नदीत त्यांना गणोशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे ही मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. चिंचवडला मोरया गोसावींचे मोठे मंदिर आहे.  मोरगाव मंदिराचे  व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.

(चिंचवडच्या मोरया मंदिराबाबत लवकरच ब्लॉग्ज लिहतो..)

कसे जावे :


  • मार्ग : मोरगांव - पुणे- सासवड - जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते. 
  • जेजुरीतूनच मोरगावाकडे जाणारा फाटा फुटतो. जेजुरी - मोरगांव अंतर 17 कि.मी.,
  • पुणे - मोरगांव 64 कि.मी
  • पुणे - सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे.
  • स्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे.

नारायणपूर 

तेथून पाहुणचार घेऊन दुपारी ३ ला निघालो. मोरगावमार्गे पुन्हा हडपसरमार्गे जाण्याचा विचार होता. मात्र वाटेत दत्ताचे प्रसिद्ध नारायणपूर होते. सासवड मार्गे फक्त ८ किलोमीटरवर म्हणून गाडी तिकडे फिरवली. दत्ताच्या मंदिराशेजारी शंकराचे एक मंदिर असून, पुरातन काळात बांधलेले आहे. नारायणूपरला जाणारा रस्ता थोडा खराब आहे. 

प्रति तिरुपती बालाजी : 

आजकाल मंदिर बनविण्यामध्ये ही प्रतिरुप म्हणजे ‘च्या’ सारखे, क्लोन, कॉपी, नक्कल, पायरसी सारखे प्रकार वाढू लागले आहेत. जाऊ द्यात आपल्याला काय त्याचे. पण यामुळे अनेकांना लांब असणारी धार्मिक स्थळे आपल्या घरापासून काही अंतरावर बघण्याची संधी मिळते. त्यामुळे अशी प्रति रुपे अजून निर्माण झाली तर आमच्यासारख्या भटकंती करणा:यांची चंगळच होईल. प्रति शिर्डी (शिरगाव), प्रति पंढरपूर (पवनानगर, दुधिवरे खिंडीजवळ) अशा यादीत आता प्रति बालाजी (केतकावळे) हे नवीन नाव समाविष्ट झाले आहे.

              पुणे परिसरातून जेजुरी, सासवड, बनेश्वर, केतकावळे, किल्ले राजगड, तोरणा आदी ठिकाणांकडे जाणा:या  संख्या मोठी आहे. त्यामुळे खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर वाहनांची नेहमीच गर्दी व कोंडी होते. नशिबाने मी गेलो तेव्हा गर्दी कमी होती. नारायणपूरच्या दत्ताचे दर्शन घेऊन कापुरहोळला बालाजी दर्शन घेण्यास निघालो. व्यंकटेश्वरा हॅचरीज या उद्योग समूहाचे संस्थापक डॉ. बी. व्ही. राव यांचे तिरुपती हे कुलदैवत. सर्वसामान्य भाविकांना तिरु पतीला जाणं शक्य होत नाही म्हणून पुण्यात बालाजीचं मंदिर उभारावं, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा ते असताना पूर्ण होऊ शकली नाही. पुढे त्यांची मुले व्यंकटेश राव, बालाजी राव व अनुराधा देसाई यांनी ती पूर्ण केली.  पुणे - बेंगलोर महामार्गावर पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर पुरंदर किल्ल्याच्या परिसरात केतकावळे हे छोटंसं गाव. मंदिर डोंगराच्या पुरंदर किल्ल्याच्या मागील बाजूस एका छोटय़ाश्या डोंगराखाली आहे.  बालाजीचे मूळ मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला-तिरुपती येथे आहे.  येथील मंदिर सुमारे 2 ते 3 एकरांवर बांधलेलं आहे.  कापुरहोळला पोहचल्यावर वाहनतळावर गाडी लावली केली. ‘व्यंकट रमणा गोविंदा’ अशी तेलुगू भाषेतील गोड भजनं ऐकू येऊ लागली.

स्वच्छता व टापटिपपणा :

गाडीतळापासून मुख्य मंदिर थोडसे लांब आहे. प्रशस्त जागा, मोकळे वातावरण, ‘व्यंकट रमणा गोविंदा’चे भजन, असे मंगलमय वातावरण येथे अनुभवाला मिळाले. डाव्या बाजुला प्रसाधनगृहे होती. तर बॅग ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. मंदिरात प्रवेश करतानाच समोर चप्पल स्टँड आहे. मंदिरात मोबाईल व कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी नाही. दर्शन रांगेच्या आधीच टोकन देऊन आपले मोबाईल जमा करावे लागतात. संपूर्ण मंदिराला बाहेरून मोठा प्रदशिणा मार्ग आहे. पुरुष व महिलांसाठी अशा दोन रांगा आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पायरीवर पाणी सोडलेले आहे. आपोआप पाय स्वच्छ होऊनच भाविक पुढे जातो. मस्त कल्पना आहे ना. अशी मंदिर व्यवस्था आपल्याकडील मंदिरात सुद्धा व्हायला हवी. दान धर्मासाठी येथे मोठय़ा आकारातील हुंडय़ा ठेवलेल्या आहेत. मंदिराचा लाडूचा प्रसाद तर फारच छान असतो. एका द्रोणामध्ये भरून हा प्रसाद वाटप केला जातो. विशेष म्हणजे प्रसाद खाली सांडल्यास तो उचलण्यासाठी सेवा देणारे अनेक लोक येथे आहेत. अतिशय स्वच्छता येथे पहावयास मिळते. भाविकांची गर्दी येथे नेहमीच असते. मात्र गडबड, गोंधळ इथे दिसला नाही. मंदिरातर्फे  येथे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी आहेत.  आपल्याकडील मंदिरात होणारी भाविकांची ढकलाढकली येथे नव्हती.

               श्री बालाजी हा विष्णूचा अवतार. बालाजीची मूर्ती ही काळय़ा दगडात घडवली असून कमळावर उभी आहे. मूर्तीचे चार हातात शंख, चक्र , गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. कानांत सोन्याची कर्णफुलं  आहेत. उभट आकाराचा मुकुट आहे. सोन्याच्या विविध अलंकारांनी मूर्तीला सजविण्यात येतं. दिवसभरात मंदिरात तीन वेळा पूजा केली जाते. मंदिराच्या समोर ध्वजस्तंभ व गरु ड मंदिर आहे.  त्यात विविध देवदेवता आहेत. मंदिराच्या चारही बाजूंना छोटी मंदिरं आहेत. त्यात वेणुगोपालस्वामी, नृसिंह, पद्मावती, सुदर्शनस्वामी, गोदामाता अशा देवता आहेत. मंदिराच्या डावीकडे कुबेर व वराहस्वामी यांची मंदिरं आहेत.  मंदिरावर उंच व भव्य गोपूर आहे. येथे वर्षातून दोन मोठे उत्सव साजरे केले जातात. एक वार्षिक उत्सव व दुसरा ब्रमोत्सव.  बालाजीला भाविकांनी केस वाहण्याची प्रथा आहे. तसा कल्याण कट्टा येथेही आहे.

या गावांमध्ये व परिसरात रिक्षा, जीप, सुमो, ट्रॅक्स वगैरे वाहनांची संख्या वाढली आहे.  बालाजी मंदिरात बालाजीचे दर्शन घेऊन रात्री ८ला शिरवळमार्गे कात्रज बायपासला यायला निघालो. वाटते ७० रुपयांचा चांगलाच टोल भरला. तेथून पुढे अर्धा तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव घेतला. 

जावे कसे : 

  • पुणे - बेंगलोर मार्गावर शिरवळमार्ग
  • हडपसर - सासवड - नारायणपूर - कापूरहोळमार्ग थोडा घाट आहे. फक्त ८ किलोमीटर अंतरावर
    बालाजी.
  • जवळची पाहण्याची ठिकाण : नारायणपूर, कानिफनाथ, जेजुरी, सासवड, भुलेश्वर. 

 

थेऊरचा चिंतामणी :

पुणो जिल्हय़ातील हवेली तालुक्यात थेऊर हे गाव आहे . अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणोशाचे ठिकाण आहे.तेथील गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जातो. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात.  देवळाचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. गणोशाची मूर्ती मात्र पूर्वेकडे तोंड केलेली आहे. गणपती डाव्या सोंडेचा आहे. थोरले माधवराव पेशवे या गणपतीच्या दर्शनास नेहमी येत असत.  त्यांनी मंदिराचा सभामंडप बांधला. देवळाजवळच राहण्यासाठी एक वाडाही त्यांनी बांधला होता . माधवराव पेशवे अकालीच थेऊर मुक्कामीच वारले .  त्यांची पत्नी रमाबाई येथेच सती गेली तिची समाधीही नदीकाठी आहे. मोरया गोसावी यांनी तेथेच गणपतीची तपश्यर्या केली. थोरले माधवराव पेशवे यांनी देवस्थानला येथील गणपतीच्या व्यवस्थेसाठी या गावचा महसूल इनाम म्हणून दिला होता .
सध्या देवस्थानचे ट्रस्टी चिंचवड देवस्थानकडे आहे. माणसी 15 रुपयांत सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेर्पयत मंदिराशेजारीच अन्नछत्रलयात जेवण मिळते. गरम गरम भात, पोळी, भाजी व शिरा असा बेत आम्ही जेवलो. एकाचवेळी 1क्क् माणसे जेवण करतील एवढी प्रशस्त जागा आहे. इतर अष्टविनायकामध्ये मंदिराचा बाहेरील परिसर मात्र, प्रचंड रहदारीचा वाटला. वाटेत बसलेले भाजीविक्रेते, छोटे स्टॉलधारक, अस्वच्छता आहे. पार्किगची सोय आहे. येथून रांजणगाव गणपतीला जाता येते. अंदाजे अंतर 4क् किलोमीटर आहे.
गणपतीचे दर्शन घेऊन व जेवण करून निघण्यास एव्हना दुपारचे 3 वाजले होते. तेथून पुढे मनात भुलेश्वरला जायचे ठरले होते. त्यामुळे रांजणगावला न जाता भुलेश्वरला निघालो. भुलेश्वर येथून अंदाजे 25 किलोमीटरवर आहे. जेवण झाल्यामुळे चांगलीच सुस्ती आली होती. गार वारा घेत भुलेश्वरकडे जाण्यास निघालो.

कसे जायचे? :

थेऊरचा गणपती पुणो-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर असून, पुण्यापासून हे 26 कि.मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे.

 

श्री भुलेश्वर मंदिर (यवतचे पुरातन शिवमंदीर)

रविवार सुट्टीचा दिवस त्यातच 26 जानेवारीची सुट्टी जोडून आलेली. मग काय रविवारी सकाळीच अष्टविनायकातील थेऊर गणपतीचे दर्शन घेऊन रामदरा, भुलेश्वर व नंतर रांजणगावचा महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. त्या विषयी..

               भुलेश्वर हे प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.  सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्य दिशेला 700 फूटावर भुलेश्वर मंदिर आहे. 13 व्या शतकात देवगिरी यादवांच्या काळात हेमाडपंती बांधकामाची अनेक मंदिरे निर्माण करण्यात आली.  याच शतकाच्या मध्यास मंदिराचे बांधकाम झाले असावे.    पुणे शहराच्या दक्षिणोकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची ही उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत दौलतमंगळ (भुलेश्वर) किल्ला आहे.  आता फक्त किल्याचे जुने अवशेष उरले आहेत. दौलतमंगल आता भुलेश्वराची अप्रतिम अशी दगडात कोरलेली शिल्पांसाठी ओळखले जाऊ लागले आहे. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे.  पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरिक्षत स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. पण येथेही पुरातत्व विभागाचे इतर स्थळांप्रमाणोच दुर्लक्ष आहे. पार्वतीने शंकरासाठी नृत्य केले व नंतर हिमालयात जाऊन लग्न केले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते. रामायण व महाभारतातील अनेक प्रसंग इथे कोरलेले आढळतात. हे मंदिर संपूर्ण दगडी आहे.

जावे कसे  :

               पुण्यातून जाणार असल्यास दोन मार्ग सोयीचे आहेत. पहिला मार्ग पुणे-दिवे घाटातून सासवड-आंबळे-माळशिरस मार्गे भुलेश्वर असा रस्ता आहे. दुसरा मार्ग दक्षिणोकडून यवत मार्गे  पुणे-सोलापूर रस्त्यावरील आहे. यवतच्या अलीकडे अंदाजे 3 किलोमीटर  पुण्याकडून सोलापुरकडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने एक रस्ता आत जातो. येथे कुठलीही पाटी लावलेली दिसली नाही. विचारात विचारात फाटा गाठला. रस्ता मंदिरार्पयत चांगला आहे. पुण्याहुन 45 किमी अंतरावर सोलापूर रोडवर यवतच्या अलिकडे 3 किलोमीटरवर भुलेश्वर फाटा आहे तेथून 7 किलोमीटरवर हे मंदिर आहे. या रस्त्यावरून भुलेश्वरचा डोंगर ओळखता येतो. कारण डोंगरावर एक भला मोठा बीएसएनएलचा टॉवर उभा आहे.  जाताना एक छोटा घाट लागतो. घाट संपताच उजव्या बाजूला भुलेश्वरच्या डोंगरावर जायचा रस्ता आहे. डोंगरावर जाण्यासाठी पाय:या आहेत. ज्यांना फोर व्हिलर चालवायची सवय नाही. अशांनी गाडी येथेच पार्क करावी कारण येथून पुढचा थोडाच रस्ता अवघड आहे. एकदम वर चढणारा शॉर्प टर्न आहे. चुकल्यास गाडी नक्कीच खाली येईल. तेव्हा सावधान. फक्त एकच फोर व्हिलर वर किंवा खाली जाऊ शकते. एकदम दोन वाहने समोर आली तर वाट द्यावी लागते. माळशिरस हे गाव किल्ल्याच्या पायथ्याला आहे. दौलतमंगळ किल्ल्यामधील भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे. किल्ल्याची काही तटबंदी तोडून हा रस्ता केलेला आहे.

दिसणारा परिसर : 

               पुरंदर, सिंहगड किल्ला दिसतो. जेजुरी, सपाटीवरचा प्रदेशही पहाता येतो. येथून जवळच जेजुरी, नारायणपूर व केतकवळेचा बालाजी आदी ठिकाणी आपण भेट देवू शकतो.

भुलेश्वरबद्दल थोडी माहिती

               मंदिरास भुलेश्वर किंवा यवतेश्वर असेही म्हणतात. मंदिराचे बांधकाम 13 व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तीकाम केलेले आहे. या मंदिराची बांधणी दक्षिणोकडील होयसळ मंदिराप्रमाणो आयताकृती व पाकळय़ासमान आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा या मंदिराचा परिसर आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. मोगल लढाईच्या काळात ब:याच मूर्तीची तोडफोड झालेली आहे. पण तरीही ज्या मूर्ती तडाख्यातून वाचल्या त्याचे वर्णन करणे शक्य नाही. गाभा:यात शिवलिंग आहे. शंकराच्या पिंडीखाली खोबणीमध्ये जर प्रसाद ठेवला तर तो खाल्यासारखा आवाज येतो व नंतर प्रसाद खाल्लेला दिसतो. अशी येथे कहाणी सांगितली जाते. पुजा:याने आम्हाला पिंडीचा वरचा भाग उचलून दखविला.
किल्ल्याची तटबंदी, बुरु जांचे काही अवशेष आजही उभे आहेत. किल्ल्याचा दरवाजा, पाय:यांचा मार्ग, पाण्याची टाकी पहायला मिळतात. किल्ल्याचे भग्नावशेष पाहून मन खिन्न झाले. 7 ते 8 वर्षापूर्वी येथे गेलो होतो. तेव्हा परत संपूर्ण परिसर पहाणे व्यर्थ होते. मुख्य मंदिराच्या बाहेरून भिंत बांधलेली आहे. या भिंतीवरून संपूर्ण मंदिराला प्रदशिणा घालता येते. मात्र, प्रदशिणा घालताना उंचावर असल्याने थोडी भीतीही वाटते. मध्येच मुख्य मंदिराची छोटी खिडकी आली की गार वा:याची झुळूक येते. येथून आजुबाजूचा परिसर छान दिसतो.
                सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे  17 व्या शतकात मराठा राजवटीत बांधलेली आहे. पहिले बाजीराव पेशवे व साताराचे शाहू महाराज यांचे गुरू ब्रम्हेंद्रस्वामी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैली झालेली आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रवण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. मंदिरात मानवी व देवतांची शिल्पकलाकृती आहेत. देवळाभोवती अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अध्र्या भिंतींवर  युद्धप्रसंग, सिंह, हत्ती व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत.  द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही शिल्पे कोरलेली आहेत. कुंभ, कमळ, मखर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. येथे दगडात कोरलेली स्त्री व तिने वापरलेले अलंकार अतिशय सुंदर आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा खोल असून समोर काळय़ा दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. पिंडीमागे  संगमरवरी दगडावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोप:यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रम्हा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसिर्गकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात.  मंदिराच्या बाहेरील बाजूस गणोशाचे स्त्री स्वरूपातले दुर्मिळ शिल्प आहे.
 
 

रामदरा येथील सुंदर निसर्ग, थेऊरचा चिंतामणी, भुलैश्वरचे मनाला भुरूळ घालणारे अद्भूत असे शिल्प, रांजणगावचा महागणपती असे प्रवास नुकताच झाला. त्या विषयी..

सकाळी घरातून लवकर निघता निघता 11 वाजले. त्यातून आज रविवार त्यामुळे हडपसरला नेहमीपेक्षा थोडी जास्तच गर्दी होती. हडपसर सोडून सोलापूर हायवेला गाडी आली. टोल भरून रामदरा पाहण्यास निघालो.

पुण्याकडून येताना उजव्या हाताला रामदरा असा फलक लावला आहे. सुमारे 4 किलोमीटरवर एकरी रस्त्यावरून शेतीशेजारून  हा रस्ता आपल्याला रामद:यावर घेऊन जातो.  रामदरा हे एक नैसर्गिक तळ्याकाठी असलेले छोटय़ाश्या डोंगरावरील देवस्थान आहे.  गाडीवरर्पयत जाते. डोंगर आहे हे प्रथम कळतच नाही. उंचावर असलेल्या या ठिकाणी मोठे तळे आहे. इथे शंकराची देऊळ आहे. विशेष म्हणजे मंदिरातील खांबांवर अनेक देव-देवता आणि ऋ षिंचेमुनींचे पुतळे कोरले आहेत. अतिशय प्रसन्न वातावरण आणि  शांत तळे,  सुंदर निसर्ग असा येथील देखावा आहे. मंदिरात दुर्वासा ऋषी,  स्वामी विवेकानंद, विभीषण, सनत्कुमार, वासुदेव, धन्वंतरी, वेदव्यास, गोरा कुंभार, ज्ञानेश्वर, तुकाराम असे छोटय़ा आकारातील रंगीत पुतळे येथे आहे. पावसाळय़ात या ठिकाणीचा परिसर विलोभनीय दिसतो. नारळाची मोठमोठी झाडे लावून परिसर सुंदर केला आहे. मंदिरात दत्ताची मूर्ती, राम, लक्ष्मण, सीता व त्यांच्यासमोर शंकराची पिंड असा सर्व देवांचा मिलाप या ठिकाणी दिसतो. गाभा:याच्या बाहेर हनुमानाची मूर्ती सुंदर आहे.

रांजणगावचा महागणपती


            पुणे-नगर रस्तावर शिरूर तालुक्यात रांजणगावचा  अष्टविनायकातील हा गणपती आहे. हे ठिकाण पुणे जिल्हय़ात येते.  मुख्य रस्त्यापासून जवळच मंदिर आहे. अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. गणपतीला महागणपती असेही म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. मंदिराचा दरवाजा पूर्वेकडे आहे. देवळाचा मुख्य गाभारा व मंडप अजूनही चांगल्या स्थितीत आहे. मराठेशाहीत अनेक सरदारांनी या देवळाला इनामे दिली होती . मंदिराचे दोनही गाभारे थोरले माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तीमान असे महागणपतीचे रूप आहे.
             येथील देवस्थान कमिटीने सध्या मोठय़ा प्रमाणात चांगला जीर्णोद्धार सुरू केला आहे.  गणपतीचे 5, 10, 15 व 25 ग्रॅम मध्ये चांदीची  नाणी येथे विकत मिळतात. देवस्थानने मोठा सभामंडप बांधला आहे. सकाळी व सायंकाळी या ठिकाणीही अन्नछात्रलय  आहे. प्रवेशद्वारावर आकर्षक दोन हत्तींचे मोठे पुतळे उभारलेले आहे. मोठय़ा कमानीतून आपण प्रवेश करतो. येथे गाडय़ा पार्किगसाठी मोठे वाहनतळ, स्वच्छतागृह उभारलेले आहे.

नारायणी धाम

लोणावळय़ाला  मिसेसची बाल मैत्रिण राहते. त्यांच्याकडे अर्धा तास गप्पागोष्टी केल्या. तिच्या मिस्टरांनी आम्हाला मग नारायणी धामला पाहिले का विचारले नाव तर ऐकून होतो. पण गेलो नव्हतो. संध्याकाळचे 6 वाजले होते. तेव्हा चला म्हणालो. लोणावळय़ाकडून जुन्या मुंबई - पुणे  मार्गावरून जायला निघाले की डाव्या हाताला कैलास प्रभात नावाचे हॉटेल दिसते तेथून अवघ्या दीड किमी अंतरावर नारायणी धाम आहे. जवळच तुंगार्ली नावाचे छोटे धरणही आहे. मंदिराच्या शेजारून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे जातो.  नारायणी धाम हे एक पर्यटन स्थळ म्हणून लवकर प्रसिद्धीस आले. कारण हे मंदिरांपेक्षा काही वेगळेच आहे. मंदिराचे बाहेरून दिसणारे रुप सुंदर राजवाडय़ाप्रमाणो दिसले. मंदिराच्या सभोवताली सुरू असलेली पाण्याची कारंजी तर मनमोहक होती. बरेच फोटोसेशन करून पुढे निघालो. मंदिर सुमारे 5 वर्षांपूर्वी स्थापना  केल्याचे समजले. नारायणी धाम मध्ये श्री. नारायणी देवी, श्री. गणोश व भगवान हनुमान चंद्रांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिरात श्री. नारायणी देवीची सिंहावर आरूढ झालेली मूर्ती आहे. शेजारीच गणेश व हनुमानाचीही सुंदर मूर्ती आहेत. मंदिराच्या आत छताला मोठे चित्र रंगवलेले आहे. सुंदर नक्षीकाम ही आहे. भाविकांना देण्यात येणारा प्रसाद सुद्धा छान होता. बहुद्धा डिंकाचा लाडूचा असावा. भाविकांना बसण्यासाठी खुच्र्या ठेवलेल्या होता. मी प्रथमच मंदिरात खुच्र्या ठेवलेल्या पाहिल्या. अन्यथा अन्य मंदिरात खाली बसण्यावाचून वृद्धांना पर्याय नसतो. मंदिराचा परिसर खरोखरच सुंदर व देखाणा आहे. येथे येणा:या भाविकांसाठी राहण्याची सोय माफक दरात केली आहे. शेजारीच गोशाला  बांधण्यात आलेली आहे. सभागृह समारंभासाठी भाडे तत्वावर दिले जाते. नारायणी धाम ट्रस्टतर्फे  मंदिराच्या आवारात वाचनालय, संगणक प्रशिक्षण केंद्र,  तसेच लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान बनविण्यात आले आहे.

प्रति पंढरपूर


पवना धरणापासून साधारणपणे  3-4 किलोमीटर अंतरावर प्रति पंढरपूर मंदिर आहे. मंदिर बाबामहाराज सातारकर यांनी बांधले असून, सुमारे 2 ते 4 एकरात मंदिर वसलेले आहे. मंदिराचा परिसर पावसाळय़ात सुरेखच दिसतो. आजुबाजूला हिरवी किर्र दाट झाडी. समोर डोंगरातून कोसळणारे धबधबे व मागे सुरेख मंदिर परिसर.  विठ्ठल रुक्मिाईची सुरेख मूर्ती मंदिरात दिसते. मंदिरात बसल्यावर येणारा वारा काहीच वेगळाच होता. थंडगार वा:याची झुळूक अंगावर घेऊन मन प्रसन्न झाले. मंदिर पाहून दुधिवरे खिंडीतून लोणावळय़ाला जायला निघालो.

 

...चला निसर्ग व अध्यात्माच्या सान्निध्यात हाडशीला - श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर


24 Feb. 2013

महिन्याचा शेवटचा रविवार कुठेतरी लांब हिंडण्याची इच्छा. पवनानगरला तिकोना, तुंगी किल्यावर अनेक वेळा गेलो होतो. त्यामुळे आजुबाजूचा परिसर चांगलाच परिचयाचा झाला. मागे पेपरात हाडशीला सत्यसाईबाबांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिराचे उद्घघाटन होणार असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. अनेक मित्राकडून हाडशीच्या मंदिराबाबत ऐकले होते. सत्यसाईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा व मंदिर पाहण्याची इच्छा झाली. हाडशी हे मुळशी तालुक्यातील एक छोटेसे गाव. गावाची लोकसंख्या तशी कमीच. उस उत्पादन हे येथील मुख्य व्यवसाय. पावसाळय़ात धो-धो कोसळणारा पाऊस, हिवाळय़ातील बोचरी थंडी व उन्हाळय़ातील डोके गरम करणारे उन या तिघांचा आशिर्वाद या गावाला लाभला आहे. अशा हाडशी गावात विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. मग रविवारचा मुहूर्त गाठून घरातून सकाळी 11 ला निघालो. काळेवाडी, हिंजवडी आयटी पार्क, माण, घोटावर्डे मार्गे हाडशी असा हा रस्ता सुमारे 41 किमोचा. साईंच्या कृपेने रस्ता एकदम मस्त. वाटेत काहीच ठिकाणी रस्ता थोडा खराब पण तेवढा चालतो. वाटते उसाची मोठी शेती पाहून गाडी थांबवली. उस तोडणी सुरू होती. मग थोडा खायला ऊस देत का असे विचारल्यावर एक दोन भले मोठे लांब उसाचे दांडके  तोडून हातात दिले. लहानपणी पवना नदीच्या पलिकडच्या तिरावर असलेल्या शेतात चोरून उस खाल्याची आठवण या वेळी आली. तेथून पुढे दहा ते पंधरा मिनिटांतच हाडशीला कधी पोचलो ते कळलेच नाही.

हाडशीचे मंदिर

हाडशीचे मंदिर एका छोटय़ाश्या डोंगरावर उभारलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्वागत कमानीवर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माची चिन्हे कोरलेली होती. तेथून पुढेच डाव्या हाताला डोंगरावर जाण्यासाठी रस्ता होता. डांबरी रोड थेट मंदिरार्पयत एकदम मस्त बांधलेला होता. सुरेख वळणावळणाचा चढाचा रस्ता. छोटेखानी घाटच म्हणायला हवा. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, आंबा अशी हिरवीगार गर्द झाडी. तेथेच ‘आंब्याच्या बागेत जाऊ नये व झाडांना हात लावू नये, अन्यथा 500 रु पये दंड आकारण्यात येईल’ अश्या आशयाची आंब्याच्या झाडावर लावलेली पाटी पाहिली. कोकणात गेलो की वाटेत थांबून कै:या, आंबे तोडायचा हा आमचा नेहमीचा शिरस्ता. पण पाटीतील धमकी पाहून मन आवरले, असेही आंब्याचा सिजन आताच सुरू झाला. घाट चढून वर आलो. तेथे गाडी पार्किगची उत्तम सोय होती. विशेष म्हणजे इतर मंदिरात नसलेली पण येथे असलेली एक सोय पाहून आनंद झाला. ती म्हणजे अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी व्हीलचेअर. मंदिरात जाण्यासाठी  छोटीशी लिफ्टही येथे बांधलेली आहे.
उन्हाळा नुकताच सुरू झाला असला तरी आजुबाजूचा सुंदर निसर्ग, सगळीकडे हिरवेगार लॉन्स, पवनचक्क्या, कारंजी पाहून दुपारच्या 2 च्या उन्हातही मन प्रसन्न वाटत होते. पार्किग शेजारी पोटपूजा करण्यासाठी छोटे हॉटेलही आहे.  पोहे, भेळ, भजी, चहा, कॉफी असे पदार्थ मिळतात.
शेजारीच मंदिराचे प्रांगण सुरू होते. आधी गणपती मंदिर आहे. तिथे गजानानाचे दर्शन घेऊन आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. मंदिरात जाताना शेजारीच अपंगांसाठी असलेली छोटी लिफ्टही होती. संध्याकाळी या ठिकाणी कारंजे सुरू करतात. असे येथील कर्मचा:याने सांगितले. बाजूला गोल आकाराच्या कुंडात कमळे लावलेली होती. मंदिराच्या पाय:यांवर तुळशीच्या रोपांच्या कुंडय़ा रांगेत ठेवलेल्या दिसल्या. मंदिरात  शांतता आणि स्वच्छता राखलेली दिसली. मंदिराच्या भिंतीवर सत्यसाईबाबांची वचने, भजने आणि संदेश लिहिलेले फलक होते. मंदिराच्या उदघाटनाच्या कार्यक्र माचे काही फोटोही होते.  मंदिरातील मूर्ती सुंदर रेखीव आहेत. मंदिराच्या खाली एक ध्यान मंदिर आहे. तिथे भजन, प्रवचन इ. चालू असतं. मंदिराच्या मागे थोडंसं चालत गेलं की एक महालासारखी वास्तू दिसते. ते सत्यसाईबाबांचे निवासस्थान आहे. सत्यसाईबाबांनी लिहिलेली पुस्तके, कॅसेट, त्यांची प्रवचने असा संग्रह असलेले छोटे पुस्तकालय दुकानही येथे आहे. एकूण मंदिर मनाला छान वाटले. मंदिरा भोवतालीचा परिसर सुद्धा तितकाच सुंदर आजूबाजूला खोल दरी समोर तिकोना किल्ला, वरून दिसणारे छोटे रस्ते असा परिसर. अनेक लोक जेवणाचे डब्बे घेऊन झाडाखाली जेवण करत होते. बच्चे कंपनीसाठी छोटेखानी खेळणी सुद्धा या ठिकाणी आहेत.

मंदिरात एका ठिकाणी मंदिराची माहिती दिली आहे.
पुणे शहरापासून पश्चिमेस 40 किमोवर निसर्गरम्य परिसरात श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी हे ठिकाण भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या प्रेरणोने व आशिर्वादाने उभारले आहे. सदर जागा श्री. जाधव कुटुंबिय व वनश्री सामाजिक वनीकरण संस्था मर्या. हाडशी, ता. मुळशी यांची मिळून 300 एकर शेती आहे.  काळाची गरज ओळखून मंदिर परिसरात ‘केशर’ जातीच्या आंब्याची लागवड केली आहे. ‘साईकेशर’ या नावाने मुंबई, पुणे व स्थानिक बाजारपेठेत आंबा पाठविला जातो. येथील जागेवर जी वास्तू उभारली आहे तिची मूळ कल्पना जाधव कुटुंबियांची. जाधव कुटुंबिय भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे परमभक्त आहेत. पुणो परिसरातील सर्व भक्तांना श्री सत्यसाईबाबांचे दर्शन व्हावे या हेतूने जाधव कुटुंबियांनी बाबांना पुण्यास येण्याची विनंती केली. बाबांनी विनंती स्वीकारली ‘तुम विठ्ठल रुक्मिणीजीका मंदिर निर्माण करो. मैं प्राण प्रतिष्ठापना के लिए आऊँगा. आणि श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी, ता. मुळशी येथे मंदिर उभारले गेले. मिती कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2009 ला श्री सिद्धिविनायक, श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री शिर्डीसाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. 

        सुंदर व शांत असा निसर्ग आणि तो ही अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर हाडशीच्या या मंदिराला आवश्य भेट द्यायलाच हवी.
        दुपारचे 3 वाजले होते. पोटात कावळे ओरडायला लागले होते. तेव्हा पवनानगरला नेहमीच्या हॉटेलात जाण्यासाठी निघालो. पवनानगरकडे जाणारा हा रस्ता छोटय़ाश्या घाटाचा आहे. वाटेत दिसणारा तिकोना किल्ला पवनानगर येईस्तोवर आपणास दिसतो. डाव्या हाताला दिसणारे पवना धरण व त्या मागे दिसणारा तुंगीचा किल्ला जुन्या आठवणींना उजाळा देत होता. हाडशी ते लोणावळा अंतर 3क् किलोमीटर आहे. पवनानगरला पोटपूजा केली. तेथून पवना धरणाशेजारून प्रति पंढरपूरला जाण्यासाठी निघालो.

(फोटो जास्त असल्याने या पुढील स्थळासाठी नवीन ब्लॉग्ज लिहला तो पाहावा.  प्रति पंढरपूर)

जाण्याचा मार्ग -:-

  • पुण्याकडून येणार असाल तर  :पुणे-नळस्टॉप - पौड रोड - चांदनी चौक - पिरंगुट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण 60 किमी. 
  • पिंपरी-चिंचवडमार्गे येणार असाल तर : हिंजवडी आयटीपार्क - माण - घोटावडे मार्गे उजवीकडून वळून - चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण 42 किमी.
  • मुंबई, लोणावळय़ाकडून येणार असाल तर : लोणावळा - रेल्वे स्टेशनमागून - बांगरवाडीमार्गे - दुधिवरे खिंड - प्रति पंढरपूर - पवना धरण - पवनानगर - तिकोना किल्ला - हाडाशी. साधारण 35 किमी.
  •  एसटी बसेस : स्वारगेटवरून हाडशीर्पयत किंवा लोणावळय़ावरून हाडशीर्पयत एसटी बसेस आहेत. परंतु मंदिर डोंगरावर असल्याने पायी 2 किमी जायला व तेवढेच यायला असे चालण्याची तयारी असल्यास वरील पर्याय निवडावा. अन्यथा स्वत:चे वाहन असणे उत्तम.

‘पुणे तिथं काय उणं’ असे पुण्याबाबत म्हटले जाते. पुणे कुठल्याही बाबतीत कमी नाही. शैक्षणिक, सांस्कृतिक, एैतिहासिक अशा अनेक क्षेत्रात पुणे सरस आहे. अशा या पुण्यात मंदिरे काही कमी नाहीत. पण त्यातही पुरातनकाळचे मंदिर म्हणावे अशी काही मंदिरे आहेत. पाताळेश्वर (जंगलीमहाराज), नागेश्वर, त्रिशुंड गणपती, तुळशीबाग, बेलबाग, पर्वती किंवा ओंकारेश्वर ही पुण्यातली प्रसिध्द मंदिरे  त्यापैकीच एक त्रिशुंड गणपती, नागेश्वर मंदिर व लाल महाल तसेच नवीन उभारलेली पु.ल. देशपांडे बाग या ठिकाणी मागील रविवारी येथे जाण्याचा योग आला. त्या विषयी...

पिंपरी-चिंचवडपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेले पुणे शहर. संध्याकाळी कुठेतरी हिंडायला जायचे असे ठरले. मग पुणे गाठले. खूप पूर्वी गेलेलो त्रिशुंड गणपतीचे मंदिर आठवले मग गाडी तिकडे वळविली. 

त्रिशुंड गणपती मंदिर 

पुण्यातील गणेश मंदिरांपैकी संस्कृत व फारशी भाषेतील शीलालेख असणारे पेशवेकालिन मंदिर म्हणजे सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती. तीन सोंड असलेला हा गणपती. दोनशे वर्षांहून अधिक जुने असलेले हे मंदिर पुण्याच्या पूर्व भागात आहे. आजुबाजूला मोठमोठ्या आधुनिक इमारतीने वाढलेल्या त्या छोट्याश्या मंदिराच्या समोर गाडी लावली. मंदिरासमोरील आवारात बसण्यासाठी बाक ठेवलेले होते. आजुबाजूच्या परिसरातील वयोवृद्ध महिला तेथे बसलेल्या  होत्या. मागे मंदिरा विषयी पाटी लावून मंदिराची माहिती दिलेली दिसली. माहिती वाचून श्रींचे दर्शन घेण्यास निघालो.

माहिती फलकावरील माहिती :

          पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत. परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तूशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरूळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालिन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नागझरीच्या काठावर असणाºया सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भाग त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापूरा ही पेठ वसली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाºया भागास गोसावीपुरा असे म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषांच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे  अवशेष अद्यापही दृष्टीत पडतात. स्मशानामुळे येथील मंदिरामध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रिशुंड गणेशाचे मंदिर उत्कृष्ट पाषाणशिल्प असूनही समाधी मंदिराची वस्तू असल्यामुळे दुर्लक्षित राहिली.

          कसबा पेठेतून मंगळवार पेठ दवाखान्याच्या दिशेने जकातेपुलानंतर उजव्या बाजूस दगडी कोरीव शिल्पांनी नटलेले त्रिशुंड गणपतीचे मंदिर आहे. त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. कालमानानुसार येथे देवातांच्या व मंदिराच्या स्वरूपामध्ये थोडाफार बदल झालेला आढळतो. या मंदिरा संदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार  इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ आॅगस्ट १७५४ मध्ये या मंदिराचे बांधकाम केले. १७५४ ते १७७० या दरम्यान या मंदिराचे बांधकाम चालू होते. या मंदिरातील गर्भगृहाच्या चौकटीवर दोन संस्कृत व एक फारशी भाषेत शिलालेख आहेत. पहिल्या संस्कृत शिलालेखात मंदिराच्या बांधकामाचा काल व रामेश्वराची (श्री शंकर) प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख असून, दुसºया शिलालेखात गीतेतील आरंभीचा नमनाचा श्लोक कोरलेला आहे. तर फारशी शिलालेखात हे स्थान गुरुदेवदत्तांचे असल्याचे नमूद केले आहे. या शिलालेखांमध्ये मंदिराच्या बांधकामाची तारीख २६ आॅगस्ट १७५४ ही दिलेली आहे. हे शिलालेख सुस्पष्ट व सुवाच्च आहेत. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुुरुषभर उंचीच्या दगडी ज्योत्यावर पूर्वाभिमूख उभे आहे. राजस्थानी, माळवा व दाक्षिणात्य वास्तूशैलीचा संमिश्र वापर येथे करण्यात आलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वर धारदार कमान असून, अगदी वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. यक्ष, किन्नर, लक्ष्मीमंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगलकलश, दशावतार, गजान्तलक्ष्मी अशी अनेक मांगल्य दर्शविणारी चिन्हे प्रवेशद्वारच्या भिंतीवर कोरलेली आहेत. 

          येथील एक शिल्प मात्र राजकीयदृष्ट्या वैशिष्टपूर्ण आहे. हिंदुस्थानातील तत्कालिन राजकीय परिस्थितीचे चित्रण या शिल्पातून साकार होते. इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर १७५७ मध्ये बंगाल व आसामवर सत्ता प्रस्थापित केली. याची दखल मोठ्या खुबीने शिल्पकाराने घेतलेली दिसते. एक इंग्रज शिपाई बंगाल व आसामचे प्रतिक असलेल्या गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहे. लवकरच इंग्रज हिंदुस्थानात आपले पाय रोवणार याची अप्रत्यक्ष भविष्यवाणी व इशारा या शिल्पातून स्पष्ट होतो. राजकीय परिस्थितीचे चित्रण करणारे हे शिल्प भारतातील मंदिरामध्ये क्वचितच आढळत असावे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती असून, त्याखाली गणेशचक्र आहे. प्रदशिक्षणेच्या वाटेवर दक्षिणेकडील भिंतीत नटराजाची मूर्ती असून उत्तरेकडील भिंतीत विष्णू व काळभैरवाच्या कलात्मक रेखीव मूर्ती आहेत.   दक्षिणेकडील भिंतीत मंदिराच्या मागील बाजूस आगळ्या पद्धतीचे कुठेही सहासा न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे.  यात फक्त शाळुंका असून, त्यावर वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह व शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा ठळक प्रतिमा कोरलेल्या आहेत.  पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारित आहे. एकादा ब्रह्मा, आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासंदर्भात प्रश्न निर्माण झाला. या प्रसंगी एक देदिप्यमान अग्निस्तंभ प्रगट होऊन या स्तंभाचा आदी व अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णूने हंसाचे रूप घेऊन स्तंभाच्या अंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर ब्रह्माने वराह रुपाने पाताळात मुसंडी मारली. परंतु या स्तंभाचा आदी व अंत दोघांनाही सापडला नाही. शेवटी दोघे श्री. शंकर देवाला शरण गेले. आपापल्या परिने दोघेही श्रेष्ठ आहात, असे सांगून श्री शंकराने लिंगोद्भव स्वरूपात आपले रुप प्रगट केले. या कथेला शिल्पातून साकार करण्याची हातोडी शिल्पकाराने उत्तमरित्या साधलेली आहे.

          गर्भगृहातील गणेश मूर्ती वेगळ्या स्वरूपातील आहे. एक मुख, तीन सोंडा व सहा हात असलेली काळ्या पाषाणातील मूर्ती मोरावर आरूढ आहे. उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करीत असून, मधली सोंड उंदरावर आहे. तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या हनुवटीला स्पर्श करीत आहे. हा गणेश सत्व, तम व रज या गुणांनी युक्त आहे. बाजूस रिद्धी - सिद्धी आहे. या मूर्तीस पाषाणाची मेघडंबरी आहे. गणेशाच्या वरच्या, उजव्या व डाव्या हातात अंकुश व परशू आहे. मोराच्या प्रतिमा असून, भिंतीवर श्री गणेशयंत्र कोरलेले आहे. शिवमंदिराच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या मंदिरात कालांतराने शाक्तपंथीयांनी श्री गणेशाची स्थापना केलेली असावी. मात्र, या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निश्चित काल व ऐतिहासिक संदर्भ सापडत नाही. १९३२ ते १९५२ पर्यंत हे ऐतिहासिक कलात्मक शिल्प दुर्लक्षित होते. मंदिराला शिखर नसल्यामुळे या मंदिराचे अस्तित्व लक्षात येत नव्हते.

           तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेस तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते. विश्वस्त मंडळाने येथील शिल्पांचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपाय योजलेले आहे. या अप्रतिम मंदिराची बहुसंख्य भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही. त्रिशुंड गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने मंदिराची व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. शिल्पदृष्ट्या महत्वाचे असणारे त्रिशुंड गणेशाचे मंदिर खरोखरच अप्रतिम आहे.

            वरील माहिती फलकामध्ये मंदिराची सर्वच माहिती सविस्तर आल्याने मला मंदिराविषयी जास्त माहिती गोळा करावी लागली नाही. अन्य समजलेली माहिती पुढे देत आहे. 

          या मंदिराचे संस्थापक श्रीदत्तगुरू गोसावी महाराज. त्यांच्या समाधीशेजारी श्री भीमगीरजी यांनी या मंदिराची 1754 च्या सुमारास स्थापना केली. मंदिराच्या तळघरात संस्थापकांची समाधी आहे. श्री गजाननाच्या स्नानाचे तीर्थ समाधीवर पडावे, अशा प्रकारची रचना येथे करण्यात आलेली आहे. त्यांच्या समाधीचे दर्शन केवळ गुरु पौर्णिमेच्या दिवशी घडते. अन्य दिवशी दरवाजे बंद असतात. गणेशाचे दर्शन मात्र केव्हाही घेता येते. त्रिशुंड मयुरेश्वर गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने या मंदिराची व्यवस्था पाहिली जाते. या मंदिराचे बांधकाम काळया घोटीव दगडांवर करण्यात आलेले आहे. सभामंडपावर गोल घुमट असून मागे मंगलमूर्तीचा गाभारा आहे. मंदिराला कळस नाही. 

          मंदिराच्या प्रवेशद्वारावर डाव्या व उजव्या बाजूला जय विजय यांच्या मूर्ती आहेत. वर दोन हत्ती आहेत, त्यांच्या तोंडून एक तोरण निघते ज्याचे दुसरे टोक एका देवीवर आहे. ही देवी म्हणूनच गजांत लक्ष्मी म्हणूनही ओळखली जाते.  बाजूला विविध प्राणी आहेत ज्यांना  ‘व्याध’  म्हणतात. शिल्पावर मोर, पोपट असे अनेक प्राणी दिसून येतात.  पुढे आलेले चार खांब आहेत त्यावर कीचक उलटे लटकताना दिसतात, त्यांच्या हातात साखळ्या असून त्यावर मंदिराचे छत आहे. मूर्तीकाराने त्यांनी हे छत जणू काही उचलून धरले आहे असे शिल्प साकारले आहे. 

          पुणे शहराचा विकास व विस्तार झाला व ही जुन्या काळातील मंदिरे काळा आड जाऊ लागली. या प्राचीन पुणे शहराचा वारसा जपणारी काही मंदिरे अजूनही आपल्यात आहे. ही सुदैवाची बाब आहे. मंदिराचे प्राचीन महत्त्व असल्याने पुरातत्त्व खात्याने ही वास्तू राज्य संरिक्षत वास्तू म्हणून घोषित केलेली आहे. त्यामुळे मंदिराच्या डागडुजीचे काम महानगरपालिकेने केलेले आहे.  

महाराष्ट्र शासनाने ही पुरातन वास्तू व स्मारकाच्या जतनाच्या संवर्धनास सुरवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने आतापर्यंत 240 वास्तू व स्मारके घोषित केलेली आहेत. महात्मा फुले वाडा, नागेश्वर मंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर, विश्रामबागवाडा, शनवारवाडा, पर्वती ही राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

नागेश्वर मंदिर

           नागेश्वर मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराजवळ गाडी लावली. येथेही त्रिशुंड गणपतीप्रमाणे पुणे महानगरपालिकेने माहिती फलक लावलेला दिसला त्यावरील माहिती पुढीलप्रमाणे :

‘‘नागेश्वर मंदिराचे बांधकाम इ. स. तेराव्या शतकाच्या जवळपास झालेले असून, संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेवांच्या अभंगांमध्ये नागेश्वर मंदिराचा उल्लेख असल्याने या मंदिराच्या प्राचिनत्वाची ओळख पटते.मंदिराच्या प्राचीन मूळ लहान दगडी मंदिराचा जीर्णोद्धार वेळोवेळी अगदी पेशवाई काळापर्यंत झालेला आहे. या मंदिराचा सभामंडप १७ व्या शतकात बांधण्यात आला असून, मराठा वास्तूशैलीची वैशिष्ट्ये त्यामध्ये  आढळतात. सभामंडपावरील छतास सुंदर कोरीव नक्षीकाम असून, सुरूदार खांब व महिरपीमुळे मंदिर व परिसर सौंदर्यपूर्ण झालेला आहे. पेशवाईतील सावकार आबा शेलूकर यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून, महाद्वारे, नगारखाना, सिमाभिंत इ. बांधकामे त्या काळात झालेली आहेत.

            चार ते पाच फूट गर्भगृह व त्यामध्ये मोठे शिवलिंग व त्यावर गोलाकार वैशिष्ट्य पूर्ण दगडी बांधकामातील छत अशी वास्तूवैशिष्ट्ये असलेल्या या मंदिराच्या परिसरात शनि, विठ्ठल, रुक्मिणी, विष्णू, दत्त गणेश या देवदेवतांची मंदिर मूर्ती या स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. पुजाºयांसाठी निवासस्थान, दीपमाळा, मंदिरास उंच शिखराबरोर असलेली उपशिखरे इ. सह. येथील शांतता व त्यामुळे निर्माण झालेले पर्यावरण इ. वैशिष्ट्यांमुळे ‘मंदिर वास्तू समूह म्हणून नागेश्वर मंदिराचे मूल्य अतिशय वेगळे आहे. मूळ सातशे वर्षांपूर्वीचे यादवकालीन मंदिर व त्यावेळचा निसर्गरम्य परिसर यामध्ये आता अमूलाग्र बदल झालेला आहे. मंदिराच्या भोवती दाट वस्ती झाली व मूळ मंदिराचाही चेहरा मोहरा बदलला गेला.

काळानुरूप अनेक बदल झालेले हे मंदिर शिल्प पुरातत्व खात्याने संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेले आहे. अशा या प्राचीन मंदिर परिसरात स्वच्छता व शांतता राखावी व वास्तूचे पावित्र्य जतन करावे.’’

                   माहिती फलक वाचून मंदिरात प्रवेश केला तर मंदिराच्या कळसावर  डागडुजीचे काम सुरू होते. अधिक चौकशी केली असता या यादवकालीन श्री नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत असल्याचे समजले.  ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत अ  दर्जा असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुरातत्त्व खात्यानेही परवानगी दिली आहे. लवकरच या मंदिराला गतवैभव प्राप्त होईल.

            पूर्वी पुण्याला पुनवडी म्हणत असत गावाच्या वेशीबाहेर नाग नदीच्या काठावर (सध्याचा नागझरी नाला) नागेश्वराचे मंदिर असल्याचा होते. हे मंदिर सातशे वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिरात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे कीर्तन करीत असत. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ही मंदिरात येऊन अभिषेक केला आहे. काशी यात्रेला जाण्यापूर्वी या मंदिराचे दर्शन घेऊन जाण्याची पूर्वी परंपरा होती.

            मुख्य गर्दीच्या रस्त्यापासून काहीश्या आत असलेल्या या मंदिराबाबत अनेकांना नाव ऐकूनही माहिती नाही. भगवान शंकराचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. मंदिरापासून जवळच असलेल्या लाल महाल पाहण्यास निघालो.

 पु. ल. देशपांडे बाग

लाल महाल

             लाल महालातून निघालो. एव्हाना साडे सहा वाजले होते. रस्त्यात गर्दी वाढली होती. वाटेत दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेऊन स्वारगेटला पोचलो तेथून पार्वतीच्या जवळच्या रस्त्यावरून पु. ल. देशपांडे उद्यान  पाहण्यासाठी गेलो. पु. ल. देशपांडे उद्यान हे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळील उद्यान. उद्यानाबाबत बरेच दिवसांपासून ऐकले होते. येथे हिंदी पिकचर बॉडी गाडचे चित्रीकरण झाले होते. उदयाना दोन विभागात विभागाले आहे. पहिल्या उदयानात हिरवळ, गुलाबाची झाडे आहेत. तर दुसºया उद्यानात मनाला मोहन टाकणारे कारंजे आहेत. रविवार असल्याने गर्दी होती. पाच मिनिटे रांगेत उभे राहून उद्यानात जाण्यासाठी प्रवेशिका घेतली. माणसी ५ रुपये असा दर आहे. उद्यान छान आहे. चारही बाजुला गुलाबाची झाडे लावलेली होती. विशेष म्हणजे फुलं होती. जसजशी रात्र होऊ लागली तशी येथे लावलेली कारंजे मनाला मोहून गेली.

   पुणे शहराच्या मध्यभागी असलेला हा महाल संपूर्ण लाल असल्याने त्याचे नामकरण ‘लाल महाल’ असे करण्यात आले. शहाजी राजे भोसले यांनी हा महाल आपल्या पत्नी जिजाबाई व मुलगा शिवाजी राजे यांसाठी 1630-34 साली बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणाचा काही काळ  या वास्तूत घालविला. राज्यांनी तोरणा किल्ला  काबीज केला तोपर्यंत ते याच महालात राहत होते. शाहिस्तेखानाची चार बोटीही महाराजांनी या ठिकाणी कापली.            काही वादांमुळे लाल महाल काही दिवस बंद होता मात्र, सध्या सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत लाल महाल बघण्यासाठी खुला असतो. या ठिकाणी शिवसृष्टी उभारली असून, रायगडाची प्रतिकृती उभारली आहे. १९९४ - ९८ या वर्षी लाल महालाची पुन्हा  डागडुजी करून त्याला पर्यटन स्थळाचे महत्व आणून दिले. महापालिकेने लाल महालाचे व्यवस्थापन सध्या यशश्री महिला पतसंस्थेला दिले आहे. प्रती व्यक्ती दोन रुपये देऊन आत प्रवेश केला. वरील मजल्यावर छत्रपतींच्या काळातील वेगवेगळ्या तलवारी, भाले, बंदूका असा शस्त्रसाठा जूपून ठेवला दिसला. शिवाजीमहाराजांच्या इतिहासातील अनेक युद्धप्रसंग येथे चित्र स्वरूपात रेखटाले आहेत. आगºयाहून सुटका, राज्याभिषेक, पवनखिंड अशी चित्रे येथे रंगवली आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आणि तोही महाराष्ट्रातील डोंगर,   दºया, नदी यांच्यासकट असा थ्रीडी नकाशाचे छान शिल्पही येथे उभारले आहे.

 

मोरया मंगलमूर्तीवाडा

श्री मोरया गोसावी हे नाव महाराष्ट्राच्या संतांमध्ये अनेक शतकांपासून ओळखलं जातं. आजही जनसामान्यांमध्ये याविषयी खूप श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून पुण्याजवळील चिंचवडला महत्व प्राप्त झाले आहे ते येथील श्री मोरया गोसावी मंदिरामुळे.  चिंचवडगावात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक श्री मोरया गोसावी यांचा मंगलमूर्तीवाडा.

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर चिंचवड स्टेशनपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. आधुनिक काळानुसार चिंचवडगाव ही बदलले आहे. मोठमोठ्या इमारती, मोठे पुल उभे राहू लागले आहे. मात्र आजही आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम येथील मंदिरे करत आहेत. हे एक जागृत गणेशस्थान आहे.  मंगलमूर्ती वाड्याला देऊळवाडा असेही म्हणतात.  मोरया स्वामींनीही देऊळ मळ्यात समाधी घेतली. पवना नदीच्या किनारी असलेला हा वाडा मोठा प्रशस्त असून, आजही वाडा सुस्थितीत पाहावयास मिळतो ते येथील चांगल्या व्यवस्थापनामुळे. 

     वाडा एका उंचवट्यावर उभारलेली वास्तू आहे. आत प्रवेश केल्यावर समोर मंगलमूर्तीचा सभामंडप दिसतो. प्रवेशद्वाराच्या शेजारी संस्थेचे कार्यालय आहे. कार्यालयाशेजारी वेदशाळा आहे. या शेजारी दुमजली इमारत आहे. समोरच लाकडी सभामंडप दिसून येतो. लाकडी बांधकाम असलेले कठडे या ठिकाणी दिसतात. येथे मंगलमूर्तीचे देवघर असून, शेजारी शमी वृक्षाचे झाड आहे. पूर्वी या वाड्याला तट होता. तसेच चार बुरूज होते. आज फक्त शेजारी असलेल्या धनेश्वर मंदिराच्या बाजूचा एक बुरूज आपणास दिसतो. बाकीचे बुरूज काळाच्या ओघात पडझड झाल्याचे दिसून येते.  १७०० शतकाच्या सुरूवातीला हा वाडा बांधला गेला असावा. इ.स. १६७५ मध्ये वाड्याची डागडुजी होऊन नवीन बांधकाम केले.

मुख्य मंदिरात श्री मोरया गोसावी महाराजांच्या प्रतिमा रेखाटलेल्या आहेत. उजव्या बाजूला अष्टविनायकांचे दर्शन घडते. या प्रतिमांमध्ये मोरया गोसावी यांच्या जीवनपटातील काही प्रसंग रेखाटलेले आहेत. सभामंडप छान व कोरीव नक्षीकाम केलेला आहे. या मंडपात अनेकवेळा शास्त्रीय संगीत, भजने यांचे मोठे कार्यक्रम होतात. मुख्य मंदिरातील गणेशमूर्ती ही उजव्या सोंडेची आहे. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. 

श्री मोरया गोसावी 

          श्री मोरया गोसावी यांचे मूळ घराणं कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील शाळी या गावाचं.  त्यांचे मूळ पुरुष लाहेभट - दायंभट, कानभट, सायंभट - वामनभट. वामनभटांना मूलबाळ नव्हते. वामन नारायण भट सन 1330 मध्ये आपल्या पत्नीसह सासवड, जेजुरीजवळील मोरगावला आले व तिथल्या देवाची मोरयाची भक्ती करू लागले.  ते स्वत गणेशभक्त होते. मोरगाव येथील कºहानदीच्या काठी त्यांनी श्रींची सेवा केली. त्यांना सन 1375 मध्ये एक मुलगा झाला, त्याचे नाव होते त्यांनी मोरया ठेवले. मोरया एक दिवस आजारी पडला. त्याचा आजार बरा होत नसल्यामुळे आई वडीलांनी श्रींची आराधना सुरू केली. याच काळात एका साधुने येऊन मोरयावर उपचार केले. त्यामुळे मोरयाचे प्राण वाचले. त्या गोसाव्याने मोरयास गुरू उपदेश केला व तेव्हापासून या भट घराण्यास ‘गोसावी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

भाद्रपद चतुर्थी 1492 ला कºहा नदीत स्नान करत असताना गणपती दिसला तो त्यांनी चिंचवड येथे आणून मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली. पुढे त्यांनी ताथवडच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या मुलीबरोबर विवाह केला होता व त्यांना मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी 'चिंतामणी' ठेवलं.  मोरया गोसावींनीही आपले कार्य संपले असा निश्चय करून सन 1561 मध्ये पवना नदीच्या काठी वयाच्या 187 व्या वर्षी जिवंत समाधी घेतली.  श्री मंगलमूर्ती वाडा ते मोरया गोसावी समाधी मंदिर मंगलमूर्तीची द्वारयात्रा निघते.  सध्या मंदिराचा कार्यभार देवस्थानाचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र उर्फ कुमार देवमहाराज पाहतात.

  अष्टविनायक स्थानांपैकी मोरगाव, सिध्दटेक व थेऊर या देवस्थानांची व्यवस्था चिंचवडच्या या देवस्थानामार्फत पाहिले जाते. 

कसे जाल :

  • जुन्या पुणे - मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे बिग बाजार नंतर डावीकडून वळून पुलावरून चापेकर चौकात. तेथे बाजारपेठेतून मोरया वाड्याकडे जाणारा रस्ता .
  •  अंदाजे अंतर : पुणे - चिंचवड गाव १८ किमी.
  • चिंचवडस्टेशनला उतरून चिंचवडगावात जाण्यासाठी बसेस, रिक्षा उपलब्ध आहे.

 

तुळापूर   

रविवार होता. ‘एलबीटी’मुळे सर्व दुकाने आठवड्यानंतर सुरू झाली होती. सकाळीच खरेदी केल्याने संध्याकाळी फिरायला जायचे असे ठरवून जवळ असल्या तुळापूरला जायचे ठरले. अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान श्री छत्रपती शिवाजीमहाराज व त्यांचे सुपूत्र धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तुळापूर येथील भूमी पुण्यापासून काहीच अंतरावर आहे. त्या विषयी...

तुळापूर : 

आदिलशाही दरबारातील वजिर मुरारपंत जगदेव यांनी ठिकाणी हत्तीला तराफ्यात उतरवून त्याचे वजनाइतके सोने दान केले अशी एक गोष्ट सांगण्यात येते. यावरूनच गावाला तुळापूर नाव पडले. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. पूर्वीचे नाव 'नांगरवास' असे होते. भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेले छोटेसे गाव. तुळापुर आळंदी पासून अंदाजे १४ किलोमीटरवर  तर पुण्यापासून ३० किलोमीटरवर आहे.  येथे महाराष्ट्रातील नद्यांचा दुर्मिळ त्रिवेणी संगम पहावयास मिळतो. श्रीक्षेत्र आळंदीकडून वाहत येणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलात उगम पावलेली भीमा व तिची उपनदी भामा  या तीन मोठ्या नद्यांचा संगम तुळापूर येथे झाला आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

संगमेश्वर मंदिर

तुळापूरला श्री शंकराचे जुने  मंदिर होते. काही कालावधीनंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. इसवी सन १६३३ च्या सुमारास आदिलशाही दरबारातील वजिर श्री मुरारपंत जगदेव यांनी स्वामी रुद्रनाथ महाराज यांच्या आज्ञेचे पालन करून श्री संगमेश्वर मंदिराची डागडुजी केली. येथे वास्तव्यास असताना छत्रपती शहाजी महाराज तसेच बालशिवाजी दोघेही संगमेश्वराची पूजा करीत असत. येथील संगमावर मोठा नदीघाट उभारला असून, बोटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. माणसी ३० रुपये प्रमाणे आपल्याला नदीतून एक चक्कर मारता येते.  निरगुडकर फाउंडेशनद्वारा येथे संभाजीमहाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. 

तमाम शिवप्रेमींची ही श्रद्धास्थाने. तुळापूरपासून जवळच असलेले वढू बुद्रुक आणि तुळापूर ही भीमा नदीतीरावरची ही पवित्र स्थाने. या दोन गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. या भूमीत छत्रपती संभाजी महाराजांवर अंतिम संस्कार झाले. औरंगजेबाने अमानुष व क्रुरतेने संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले. त्या सर्व इतिहासाची साक्षीदार ही भूमी आहे.  शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने साखळदंडात कैद करून तुळापूर येथे आणले होते.  फाल्गुन अमावस्येला ११ मार्च १६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली होती.  वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे. वढूपासून तुळापूर ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. वेळेअभावी मला वढूला जाता आले नाही.  औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक मराठी माणूस हादरून गेला. आपला राजाचा क्रुरतेने केलेला अंत येथील जनतेला कळल्यावर अंतिम संस्कार योग्य रीतीने व्हायला पाहिजे असे वाटले. वढूच्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव धोक्यात घालून, भीमानदी रात्रीत ओलांडून व मुगली सैन्याला चकवून त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे गोळा केली आणि विधिवत अंतिमसंस्कार केले. 

संभाजी राजे : 

संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ (14 मे 1657चा.) रोजी पुरंदर गडावर झाला. राजे केवळ २ वर्षांचे असतानाच सईबाई वारल्या. सईबार्इंच्या मागे राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीत त्यांना राजकारणाचे धडे शिकू लागले.  या काळात महाराजांच्या बरोबर त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडला. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या गोष्टीत संभाजी राजे पारंगत होते. राजांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही विलक्षण प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथात  केवळ ९ वर्षांच्या कालखंडात राजांनी १२८ लढाया जिंकून शिवाजीमहाराजांचे नाव राखले. 

                   संभाजीराजांचा वाढता पराक्रम औरंगजेबाला घाबरून सोडणारा होता. पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला. संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. 1689 मध्ये राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संमगमेश्वर येथे मुक्कामी थांबले होते.  1 फेब्रुवारी 1689 ला आपला सख्खा मेहुणा गणोजी शिर्केयाच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी मुकर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले.  तेथून धिंड काढत अतिशय क्रूरपणो  15 फेब्रुवारी 1689 या दिवशी पेडगावच्या किल्यात औरंगजेबासमोर राजांना आणण्यात आले. धर्म बदलण्याची अट लाथाडून धर्मनिष्ठ राजांनी मरण पत्करले. 12 मार्च 1689 या दिवशी गुढीपाडवा होता.  गुढीपाडवा हा हिंदुचा मोठा सण. या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी 11 मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली.   राजांना तुळापूर येथे आणण्यात आले. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. मृत्युसमयी राजांचे वय अवघे 32 होते.

महाराजांच्या पराक्रमाने, शौर्याने ही भूमि पावन झालेली आहे.  संभाजीराजांबद्दल वाचून व ऐकून अंगावर आजही काटा उभा राहतो. अशा ह्या परमप्रतापी धर्मविर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळास एकदा तरी प्रत्येकाने भेट अवश्य द्यायला हवी. 

तुळापूरहूनजवळच असलेल्या वाघोलीकडे जाण्याकडे निघालो. वाघोली हे पुणे-नगर रस्त्यावरील प्राचीन गाव. येथे वाघेश्वराचे जुने मंदिर आहे. तुळापूरहून निघाताना संध्याकाळचे ६.३० वाजले होते. 

वाघाच्या जबड्यात घालुनि हात मोजुनि दात...

बलिदान स्थळाकडे जाणाºया मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर हे शिल्प बसविले आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांचे मनाला स्फूर्ती देईल असे शिल्प आहे. रायगडच्या पायथ्याला सांदोशीच्या जंगलात संभाजीमहाराजांनी सिंहाशी झुंज दिली होती. त्याचा जबडा हाताने फाडून ठार केले होते. या घटनेवर आधारित हे शिल्प असून, सुमारे आठ फूट उंच, दहा फूट लांब असे शिल्प आहे.

 तुळापूर येथे स्वागत कमानीवर साकारलेले आकर्षक शिल्प.
श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांचे प्रेरणादायी शिल्प.

कवि कलश यांची समाधी.

श्री कवी कलश यांची समाधी : 

श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तसेच संभाजी महाराजांचे जवळचे सल्लागार व  काव्यसम्राट श्री कवी कलश यांना देखील संभाजी महाराजांबरोबरच तुळापूर येथे ठार करण्यात आले. त्यांची समाधी आपणांस संगमेश्वर मंदिराच्या डाव्या बाजुस दिसते.

श्रीधर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज समाधी.

संगमेश्वर येथील मंदिर व कळस.

मंदिरासमोर असलेला छोटा नंदी.


श्री संगमेश्वर
श्री संगमेश्वराचा कळस.



भीमा, भामा व इंद्रायणनदीचा त्रिवेणी संगमावरील मनोहारी दृश्य.
नदीपात्रत करण्यात येणारे नौकाविहार.


नदीतिरावरील श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर


नदीचा घाट

कसे पोचाल :

  • पुण्यापासून ईशान्येला अंदाजे ४० किलोमीटरवर असलेल्या तुळापूर या ठिकाणी पोहचण्यासाठी नगररोड मार्गे सुमारे ३२ किलोमीटर अंतर तर आळंदी रोड मार्गे अंदाजे ३४ किलोमीटर अंतर पार करावे लागते. 
  • तुळापूर येथे जाण्यासाठी पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

पुण्याकडून यायचे झाल्यास :

  • पुणे नगर रोड - चंदन नगर  - वाघोली -  लोणीकंद - (डावीकडे) तुळापूर फाटा -फुलगाव - तुळापूर.

दुसरा मार्ग

  • पुणे -आळंदी रोड मार्गे:  पुणे - येरवडा - विश्रांतवाडी - कळस - दिघी - च-होली -आळंदी - मरकळ - तुळापूर (रस्ता थोड्या ठिकाणी खराब आहे.)
  • स्वत:ची गाडी असेल तर तुळापूरमध्ये पोहोचण्यासाठी जवळपास १ तास  पुरेसा होतो.

भीमा नदी  :
आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे उगम पावते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह आंबेगाव, खेड, शिरुर या तालुक्यामधुन व दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या भागातून जातो. दौंड आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमांवरुन जाताना काही काळ पुणे व अहमदनगर आणि पुणे व सोलापूर या जिल्हयांमधील हद्दीवरून ती पुढे जाते. दौंड आणि इंदापूर या तालुक्यांच्या सीमांवरुन वाहत जाऊन ती पुढे नीरा नदीला घेऊन सोलापूर जिल्ह्यात जाते. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, व नीरा या भीमेच्या जिल्ह्यातील प्रमुख उपनद्या आहेत. 

इंद्रायणी नदी : 

इंद्रायणी ही भीमेची उपनदी पुणे जिल्ह्याच्या मध्ये भागातून वाहते. ही नदी लोणावळयाच्या नैऋत्येला कुरवंडेजवळ उगम पावते. हवेली तालुक्यातील तुळापूर येथे ही भीमेस मिळते.

 

वाघोलीचा वाघेश्वर


         तुळापूर येथून निघून 20 मिनटात वाघोलीला असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे  पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच  पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
          वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ  वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे. मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.  मंदिराजवळ असणारा  तलाव  पर्यटकांचे आकर्षण ठरू लागला आहे ते येथील बोटिंगमुळे. संध्याकाळचे 7.30 वाजल्यामुळे मला फोटो काढता आले नाही.

 

पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील  वाघेश्वर  मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी 1722  मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली.   पिलाजीरावांनी  दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 1729 च्या पूर्वी या तलावाची बांधणी  पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.

सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरु षांच्या समाध्या दिसतात. 

 

थेरगाव बोट क्‍लब


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे  उभारण्यात आलेल्या काही पर्यटक प्रकल्पांमधील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून थेरगाव येथील बोट क्लब नावारुपाला येऊ लागला आहे. सुमारे 5 एकरावर पसरलेल्या या बागे शेजारी  वाहणा:या पवना नदीत पर्यटकांना बोटिंगचाही मनसोक्त अनुभव घेता येऊ लागला आहे. त्या विषयी...

थेरगाव :
      थेरगाव हे पवना नदीकाठी असलेले एक छोटेसे गाव. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशानंतरचे हळूहळू विकसित होऊ लागले. बापुजीबुवा हे थेरगावचे ग्रामदैवत. पूर्वी थेरगावचे गावठाण पवनानदीकाठी केजुबाई मंदिर परिसरात होते. कालांतराने बापुजीबुवा मंदिर विभागात गावचे स्थलांतर झाले. येथील पदमजी पेपर मिल या कारखान्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला.
      गावाच्या इतिहासाविषयी एक कथाही सांगितली जाते. फार पूर्वी शेतीला पाणी सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी थेरगावचे गावठाण नदीकाठी होते. येथील केजुबाई मंदिराजवळ सुसरींचे प्रमाण वाढले. पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही सुसरींचे हल्ले वाढले. यामुळे सोळाव्या शतकानंतर गावठाणाचे स्थलांतर बापूजीबुवा मंदिर परिसरात झाले.  प्रत्येक वर्षी चैत्रपौर्णिमेस गावामध्ये बापुजीबुवा देवाचा उत्सव भरतो.  थेरगाव परिसर पिंपरी व चिंचवडला जवळ असल्याने अनेकांनी येथे गृहउद्योग उभारले आहे. वाहतूकदृष्टीने पुण्याकडे जाण्यास थेरगाव जवळ आहे.
        बच्चे कंपनीला शाळांच्या सुट्टय़ा लागल्या आणि परिसरासतील बागा फुलू लागल्या. संध्याकाळी कुठल्याही बागेत जाण्यापेक्षा घरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणा:या थेरगाव येथील बागेत जाण्यास निघालो. उन्हाळय़ात अंगाची लाहीलाही करून सोडणारे उन. उन्हामुळे बाहेर तर जाता येत नाही. मग अंगावर पाण्याचे थंडगार तुषारे घेण्यसाठी मस्त ठिकाण म्हणजे थेरगाव येथील हा बोटक्लब.
       श्री मोरया गोसावी मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणा:या या क्लबची उभारणी १६ फेब्रुवारी 2007 साली महापालिकेतर्फे  करण्यात आली. थेरगावला शेती प्रमुख व्यवसाय. औद्योगिकीकरणानंतर येथील राहणीमानात फरक जाणवू लागला. मोठमोठे प्रकल्प, औद्योगिक वसाहतीमुळे थेरगाव रुप पालटू लागले. पवना नदी शेजारील सुमारे 5 एकर जागेवर महापालिकेने सुंदर बाग निर्माण केली आहे. या बागेचे वैशिष्ट म्हणजे येथून वाहणारा कृत्रिम धबधबा. सुमारे 400 ते 500 मीटर लांब असा येथे कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे. पाणी स्वच्छ असल्याने बच्चे कंपनीला येथे मनसोक्त पाण्यात खेळायला मिळते.

लहान मुलांसाठी खेळणी
       येथे झोकाळे, घसरगुंडी, खांबावरील विविध खेळ लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. मात्र, काही हौशी पर्यटक लहान मुलांच्या झोकळय़ांवरती झोकळा घेऊन आपली इच्छा पूर्ण करताना दिसतात. मात्र, यामुळे नाहक खेळण्याची मोडतोड नक्कीच होणार आहे. या ठिकाणी पर्यटकांबरोबरच प्रेमी युगलांचाही वावर वाढल्याचे दिसते. झाडामागे, ओडाश्याला जाऊन प्रेमाचे चाळे करणारे प्रेमवीर ही आपणास पाहावयास मिळतात. असो.

टॉयट्रेन :
       लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन ठरू लागली आहे. ट्रेन खाली बहुधा रिक्षाचे एंजिन जोडून रेल्वेसारखा गाडीला आकार दिला आहे. तरीही लहान मुलांना अर्थातच त्यांच्या पालकांनाही या ट्रेनमध्ये बसण्याचा मोह आवारता येत नाही. फक्त 5 रुपये तिकीट दर असल्याने येणारा प्रत्येकजण याचा अनुभव घेतोच. उद्यानातील प्रवेशद्वारापासून बागेच्या शेवटर्पयत एक फेरफटका मारता येतो.

लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन

कृत्रिम धबधबा

बोटक्लब :
       उद्यानाचे मुख्य आकर्षण ठरलेले हा बोट क्लब पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागला आहे. केजुदेवी बंधारा बांधल्याने पवना नदीत पाणी अडवून ठेवता येते. याच अडविलेल्या पाण्यावर येथे बोट क्लब सुरू केला आहे. हौशी पर्यटक येथे बोटिंगचा अनुभव घेतात. माणसी 30 रुपये पॅडल बोट 15 मिनिटांसाठी तर मोटार बोट 40 रुपये 15 मिनिटांसाठी आहेत. इतर बोटिंग क्लब पेक्षा या ठिकाणी दर कमी आकारणी आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक बोटिंग करतात.

बोट क्लब

बोट क्लब

बोट क्लब

केजुदेवी मंदिर :
       बोटक्लबच्या अलीकडेच वाहनतळाच्या ठिकाणी नदीकाठी आपल्याला एक मंदिर दिसते. हे केजुदेवीचे मंदिर. नवरात्रत या ठिकाणी मोठा उत्सव भरलेला दिसतो. पावसाळय़ात अनेकवेळा हे मंदिर पाण्याखाली जाते. या बंधा:यावर आजुबाजूच्या परिसरातील पोहणारे तरुण नदीत डुंबायला व पोहायला येतात. अनोळखी ठिकाण असल्याने या बंधा:यावर नवख्या माणसाने पोहण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा या बंधा:यावर दुर्घटना घडल्याच्या बातम्या वाचण्यात आलेल्या आहेत.

केजुदेवी

केजुदेवीचे मंदिर व पवना नदी.

वेळ व दर आकारणी :

  • उद्यानात प्रवेश घेण्यासाठी लहान मुलांना 5 रुपये तर 12 वर्षापुढील व्यक्तीसाठी 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते. 
  • उद्यानाची वेळ : सकाळी 11 ते सायं. 7

  • कसे जाल :
  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवडगावात जाणा:या रस्त्याने थेट चापेकरचौकात जाऊन तेथून मोरया गोसावी मंदिरात गजानानचे दर्शन घेऊन धनेश्वरच्या महादेवाचे दर्शन घ्यावे तेथील जवळच्या पुलावरून सरळच आपल्याला थेरगाव बोटक्लबकडे जाता येते.
  • दुसरा मार्ग : पुण्यातून डांगे चौकातून येऊन उजवीकडे वळून चिंचवडगावाकडे जाणा:या रस्त्यावर डावीकडे बोटक्लबला जाता येते.
  • तिसरा मार्ग : चापेकर चौकातील नव्याने उभारलेल्या पुलावरून डांगे चौकाच्या अलिकडे डावीकडे बिर्ला हॉस्पिटलशेजारील रस्त्यावरून बोटक्लबकडे जाणारा रस्ता आहे.
  • पुणे ते चिंचवडगाव अंदाजे 18 किमी.
  • चिंचवड ते बोटक्लब : अंदाजे 3 किमी.

 

सद्‌गुरू जंगली महाराज


           सध्या जेएमरोड नावाने प्रसिद्ध असलेला हा रस्ता ज्यांच्या नावामुळे नावारुपास आला त्या श्री सद्‌गुरू  जंगलीमहाराजांचे येथे समाधीमंदिर आहे. अनेक भाविकांची या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यावर काही मोजक्याच पायºया चढून आपण मंदिरासमोर येतो. मुख्य मंदिराबाहेर मोठी घंटा बांधण्यात आलेली आहे. मंदिरात महाराजांचा फोटो व समाधीस्थळ आहे. 

 महाराष्ट्राच्या संतमंडळात जंगली महाराज हे नाव प्रख्यात आहे. जंगली महाराज हे अगदी अलिकडच्या काळातील संत होऊन गेले. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. त्यांचे हेच नाव रुढ झालं. विविध धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना ते आपलेच वाटले. यातच त्यांचं खरं   संतत्व आहे. महाराजांचं वास्तव्य बराच काळ पुण्यातच होतं आणि त्यांचं बरंचसं कार्यही पुण्यातच झालं. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा. त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत. 

           त्यांचं मूळगाव सोलापूर जवळील होनमूर्गी. हिंदू, इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात राहतात. गावाचं कुलदैवत बसवेश्वर आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्र्सी या भाषा त्यांना अवगत होत्या. हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरु होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धमर्गुरु म्हणून ते मानले जात. 

 ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांची प्रकृती खालावली. भांबुर्ड्याच्या टेकडीवर (शिवाजीनगर) येथे समाधीची/कबरीची जागा त्यांनी निश्चित करुन ठेवली होती. जंगली महाराज मंदिरात हिंदू पद्धतीने पूजाअर्चा करीत होते. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत संगीत महोत्सव होतो.  

           मंदिराशेजारून होणारी वाहनांची वर्दळ व गोंगाटाचा येथे आवाज सुद्धा येत नाही. मंदिरात गेल्यावर मन शांत व प्रसन्न होते. 

 

विज्ञानाची जिज्ञासा जागविणारे ‘सायन्स सेंटर’

‘सायन्स सेंटर’  

        मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरला काहीच महिन्यांपूर्वी भेट देऊन आलो होतो. याच सायन्स सेंटरच्या उपक्रमातून पिंपरी-चिंचवडलाही सायन्स सेंटर उभे राहीले आहे. घरापासून केवळ दोन किलोमीटरवर असलेले हा महापालिकेचा प्रकल्प पाहण्यासाठी निघालो. त्या विषयी....

           विविध वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्या कलागुणांना आणखी वाव निर्माण होऊन ते समृद्ध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथे आटो क्लस्टरजवळ विज्ञान केंद्र विकसित केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील हे पहिलेच विज्ञान केंद्र आहे.
            आपल्या प्रत्येकाच्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल व जिज्ञासा असते. एखादी गोष्ट कशी कार्य करते, ती तशीच कार्य का करते, मोटार कार, टू व्हिलर कशी सुरू होते. ती कार्य कशी करते याचे या ठिकाणी लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही हाताळून पाहता येते. भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत असणाºया नॅशनल काउंसिल आफ सायन्स म्युझियमच्या सहायाने हे केंद्र विकसित केले आहे.  ध्वनींचे तरंग उठविणारे काष्ठरंग, लांब नलिकांमधून येणारे ध्वनी, वजन मोजण्याची नवी समतोल पद्धत, समुद्रातील परिदर्शी आणि कोण बोलतो आहे, हे सांगणारे दोन पुतळे. अशी जादूई वैज्ञानिक खेळणी या ठिकाणी सायन्स पार्कच्या बाहेरील मोठ्या बगीच्यामध्ये उभारलेली आहेत.
          केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत  ८ फेब्रुवारी २०१३ ला झाले. अंदाजे सात एकर क्षेत्रात हे सायन्स पार्क उभारले आहे. प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे उभारलेले आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेली पण जरा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उभारलेली येथे खेळणी आहेत. त्यात प्रतिध्वनीचा अनुभव देणारी भव्य नलिका आहे. लांबवर असणाºया दोन पुतळ्यांमधून आपलाच आवाज कसा ऐकायला येतो. ‘योयो’, कुजबुजणारी बाग, वजन पाहण्याची समतोल पद्धती, विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळेही येथे बसविले आहेत. असेच पुतळे मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये  ही आपणास पाहावयास मिळतात.
         मुख्य इमारत दुमजली आहे. त्यात चार दालने असून, इमारतीत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस पहिले दालन आहे. तेथे मानवाची निर्मितीनंतर त्यात कसे काळानुसार कसे बदल होत गेले. याची प्रतिकृती साकारलेली आहे. चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती आहे. इस पूर्व १५० मध्ये हेरॉनने वाफेवर चालणाºया यंत्रांचा लावलेला शोध आणि पुढे त्यावरील यंत्रांची झालेली निर्मिती याचेही दर्शन घडते. १८८५ मध्ये विकसित केलेली सायकल, त्यानंतर आलेली मोटार सायकल, चारचाकी गाडी असा २०१३ पर्यंतच्या वाहन उद्योगाचा मोठा फोटो येथे लावलेला आहे.







डायनोसोरची उत्पत्ती व त्यांच्या विविध जाती या विषयीचें पुतळे





विविध शास्त्रज्ञांची ओळख करून देणारे पुतळे








चाकाचा शोध कसा लागला या संदर्भात ही प्रतिकृती





दुसरे दालन हे आटो मोबाईल दालन आहे. त्यात दुचाकी, चारचाकी वाहनाचे इंजिन कसे असते. मोटार कशी चालते. याच्या खºया प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही प्रतिकृतींना लहान मुलांना हात लावण्यास परवानगीही आहे. गिअर कसे पडतात, टू व्हिलर कशी काम करते. नॅनोचे इंजिन कसे बनवले आहे. बाहेरून छान वाटणारी गाडीच्या आतमध्ये कसे असते. गाडी चालविण्याचा अनुभव कसो येतो. त्यांची कार्ये काय याची जाणीव हे दालन देते. वाहनउद्योगाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला आहे.
दुसºया मजल्यावर गेल्यानंतर समोरच ऊर्जा दालन आहे, सौर, इलेक्ट्रिक, वाफेवरील उर्जांचा उपयोग कसा केला आहे, याची माहिती हे विविध खेळण्यांच्या माध्यमातून दिली आहे. विविध छोटे मॉडेल पाहून छान वाटते. शेजारील दालनामध्ये धड गायब झालेला माणूस,  दोनशे फुट खोल विहीर (दृष्टीभ्रम) हवेत तरंगण्याचा अनुभव, भास घडविणारी दुर्बिण, विविध प्रकारचे आरश्यांमध्ये आपली दिसणारी खुजी व उंच, जाड अशी प्रतिकृती पाहून मजा येते.
चौथे दालन थ्रीडी थिअटरचे आहे. मी गेलो तेव्हा ते काही कारणांमुळे बंद होते. तेथे मुंबईतील नेहरू तारांगणाप्रमाणे अवकाशातील तारे, ग्रह यांचा थ्रीडी चित्रपट दाखवितात.























मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर ज्यांनी पाहिले असेल त्या पेक्षा हे वेगळे आहे. तेथील काही खेळण्यांप्रमाणे येथेही काही खेळण्यांचा इतक्या लवकर (उद्घाटन ८ फेब्रुवारी २०१३ ) ‘सत्यानाश’ झाल्याचे पाहून मन दु:खी होते. काही वैज्ञानिक खेळण्यांची बटन दाबून देखील ते सुरू होत नसल्याने बच्चे कंपनी नाराज होते. परंतु लहान मुलांना विज्ञानाची आवड लावण्यासाठी एकदा जरूर या सायन्स पार्कला प्रत्येकाने आवश्य भेट द्यावी.
  • तिकीट दर : प्रौढांसाठी ५० रुपये, लहान मुलांसाठी ३० रुपये.
  • प्रत्येक सोमवारी बंद
  • वेळ : सकाळी १० ते ५.३० 
  • पाहण्यासाठी लागणारा वेळ :  निवांत असला तर अख्खा दिवसही . घाईत पाहत असला तर दोन तास तरी. 
  • जायचे कसे : पुण्याहून पिंपरी-चिंचचवडला स्वत:चे वाहन अथवा बसने येता येते. चिंचवड स्टेशनच्या येथून यु टर्न घेऊन पुन्हा पुण्याच्या दिशेकडे जाण्यास निघावे. डाव्या बाजूला सायन्स पार्ककडे जाण्याचा फलक दाखविला आहे.
    दुसरा मार्ग : पिंपरी महापालिकेच्या येथून मोरवाडी कोर्टाकडे जाणाºया मार्गावरून मोहननगरकडे जाणाºया रस्त्यावर डावीकडून वळूनही जाता येते. 

 

पाताळेश्वर



१ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी असल्याने बाहेर कुठे जावे याचा विचार करत बसलो. पण बाहेर रणरणते उन आणि तेही ४१ ड्रिगीच्या पुढे तेव्हा गप्प घरी बसून, टिव्ही पाहण्यात आनंद मानावा लागला. तरी संध्याकाळ होता होता ५.३० वाजता घराबाहेर पडलोच.  लहानपणी मावस भावांबरोबर लपाछपीचे खेळ खेळण्यासाठी पाताळेश्वरला जायचो खूप मजा यायची. मोठ्या आकारातील खांब त्यामुळे लपायला चांगली जागा मिळायाची. आज बरेच वर्षांनी पाताळेश्वरला जात होतो. त्या विषयी....

            पुणे शहरला प्राचीन इतिहास आहे. पूर्वी येथून कोकणातील कल्याण, चेऊन, सोपारा या बंदरांशी व्यापार चालत असे. हा व्यापार नाणेघाटातून होत असे. या मार्गावर अनेक स्तूप, लेणी व मंदिरे निर्माण झाली. पुणे जिल्ह्यात जुन्नर, कार्ले, भाजे या ठिकाणी लेणी खोदली गेली. पुण्यातील गणेशखिंड व भांबुर्ड्यात (शिवाजीनगर) या परिसरात लेणी आहेत. राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत पातळेश्वर लेणी खोदण्यात आले. 

            पाताळेश्वर हे पुणे शहरातल्या शिवाजीनगर  (पूर्वीचे भांबुर्डे) भागात असलेले एक शंकराचे मंदिर. हे मंदिर इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात तयार केलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे देवाळाला कळस नाही. सध्या जंगली महाराज (जेएमरोड) या नावाने प्रसिद्ध असलेल्या रस्त्याशेजारी हे मंदिर आहे. एकसंध कातळातून हा लेणीमंदिराचा देखावा आपल्या पूर्वाजांनी साकारलेला आहे. शेजारीच दत्तसंप्रदायातील सत्पुरुष जंगली महाराजांची समाधी आहे. सध्या ही लेणी अर्कालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या देखरेखीखाली आहेत.

            पुरातत्व खात्याने एक छोटीशी बाग या ठिकाणी उभारली आहे. परंतु दुर्लक्षपणामुळे बागेची दुरवस्था झाली आहे.  बागेतून  सात - आठ पायºया उतरून आपला प्रवेश होतो ते लेण्यांच्या प्रांगणात. येथे डावीकडे एक नंदीची जीर्णावस्थेतील एक मूर्ती ठेवलेली आहे. त्यानंतर लागतो तो गोलाकार खोदलेला नंदीमंडप. या मंडपाचा आकार गोलाकार छत्रीप्रमाणे असून, भोवताली चौकानी आकाराचे खांब आहे. १२ स्तंभ गोलाकार आकारत रचून त्यामध्ये आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये नंदी विराजमान आहे. नंदीच्या गळ्यात माळा, माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्व कोरीवकामातून कोरलेले आहे. नंदीमंडप पाहून पुढे जाताच खडकात एक ओसरी खोदलेली दिसते. मध्ये दोन स्तंभ, आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना आहे. त्याच्या पुढे मुख्य प्रवेशद्वार आहे. यामध्ये एकूण २४ खांब आहेत. मंदिरामध्ये इतर मंदिरांप्रमाणे कोरीव काम आढळून येत नाही. कदाचित त्यावेळी असलेल्या परकिय आक्रमणांच्या भीतीमुळे कारागिरांनी येथील शिल्पाचे काम अर्धवट सोडून दिले असावे. काही खांबावर खोलगट कोनाड्यात पूर्वी मूर्ती असाव्यात. सभामंडपाचे छत व जमीन खडकात खोदलेली आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या भिंतीमध्ये पानाफुलांची नक्षी असलेली पट्टी कोरलेली आहे. 

        ही लेणी ब्राह्मणीशैलीची आहेत. बौद्ध - ब्राह्मणी शैलीतील फरक म्हणजे त्यांची असलेली रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गभर्गृह असते.  पाताळेश्वर लेण्यांमध्ये विहार दिसत नाहीत. विहार हे भिक्खू संघाच्या राहण्याची जागा असते. मात्र ही लेणी प्रार्थनामंदिर आहे. येथे इतर शंकराच्या मंदिरांप्रमाणे कोरीवकाम दिसून येत नाही. मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीरावांनी केल्याच्या नोंदी आहेत. 

 गर्भगृहात पितळी पत्र्याने मढवलेले शिवलिंग, बाण व नागाची प्रतिमा आहे. १० बाय १२ फूट आकाराचे हे गर्भगृह आहे. मागील भिंतीजवळ गणेशाची लहान, सुबक संगमरवराची मूर्ती आहे. शेजारी शेंदूराचा लेप असलेला मुखवटा आहे. मंदिराला लागूनच दोन लहान मंदिरे सुद्धा आहेत. डाव्या बाजुस एका दगडी चौथºयावर राम, लक्ष्मण व सीतेच्या संगमरवरी मूर्ती आहेत. 

  मुख्य मंदिर परिसर दिवसाही उजेड नसल्यामुळे अंधर असतो. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी आता येथे ट्यूबलाईट लावण्यात आली आहे. पुण्यातील सर्वात प्राचीन शिवलिंग असल्यामुळे  महाशिवरात्र, त्रिपुरी पौणिर्मा व दिवाळी पाडव्याला भाविक या लेण्यांमध्ये दिव्यांची रोषणाई करतात. या दिवशी प्रचंड गर्दी असते. एकूण येथील वातावरण शांत व मन प्रसन्न करणारे आहे. पर्यटकांनी व अर्थात सर्वांनीच एकदा अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण आहे

  • मंदिराची वेळ : सकाळी ८.३० ते सांय. ५.३० पर्यंत.
  • प्रवेश : विनामूल्य 
  • कसे जायचे : शिवाजीनगर एस.टी स्टँडपासून बस अथवा चालत निघाल्यास १० मिनिटात पातळेश्वरला पोहचता येते.
  • अजून काय पहाल : चर्तुशृंगी, शनवारवाडा, कसबा गणपती,  दगडूशेठ, तुळशीबाग अजून बरेच काही.
  • जंगली महाराज
  • त्रिशुंड गणपती

 

‘द ग्रेट मराठा’ महादजी शिंदेंची वानवडीतील छत्री


पुण्यात ऐतिहासिक, धार्मिक स्थळे तशी खूप आहेत. अशा ऐतिहासिक स्थळापैकीच वानवडची महादजी शिंदेची छत्री आहे. ‘द ग्रेट मराठा’ म्हणून इंग्रज इतिहासकारांनीही ज्यांची स्तुती केली त्या महादजी शिंदेंची छत्री (समाधी) पाहण्यास  आवर्जुन                     गेलो त्या विषयी....

सकाळी ११ वाजता समाधी मंदिराजवळ पोचलो. गावातील काही मुले येथे क्रिकेट खेळताना दिसली.  प्रवेशद्वारावर ५ रुपये प्रति व्यक्ती तिकीट काढून समोर असलेले मंदिर पाहण्यास निघालो.

महादजींचा मृत्यू पुण्याजवळ    

महादजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी येथे शके १७१५ च्या माघ शुद्ध १३ रोजी (१२ फेब्रु. १७९४) वयाच्या ६७ व्या वर्षी झाला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पुण्यातील वानवडीजवळ ‘महादजी शिंदे छत्री’ उभारण्यात आली आहे. सुमारे तेरा हजार चौ.मी. क्षेत्रावर समाधी, छत्री व मंदिरासाठी एकूण चारशे चौ.मी.चे बांधकाम केल्याचे दिसून येते. समाधीच्या आतील बाजूने पंधरा फूट उंचीची संरक्षक दगडी भिंत उभारण्यात आली आहे. 

मंदिर परिसर : 

        वानवडीतील या समाधीजवळ येताच प्रथम दर्शनी आपल्याला दिसते ते  मंदिराच्या समोरील छोटेसे मारुतीचे मंदिर. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे.  या स्मारकाची उभारणी भव्य दगडी चौथºयावर करण्यात आलेली आहे. आवारात घुमट असलेले समाधीचे बांधकाम आहे. ही एक वेगळी छोटीशी चौकोनी इमारत आहे. ही इमारत मात्र बंदच ठेवलेली दिसली. दरवाज्यामधनू आतील समाधीचे दर्शन होते. तेथे महादजींचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. 

        जागेच्या मध्यभागी शंकराचे मंदिर उभारलेले आहे. सुंदर कलाकुसर असलेली ही वास्तू सर्व बाजूंनी कोरीवकाम, नक्षीदार घुमटने सजवलेली आहे.  मुख्य मंदिर १७१५ मध्ये बांधण्यात आले नंतरची वास्तू १९१५ मध्ये वाढविण्यात आली. राजस्थानी शैलीने बांधकाम केलेली ही वास्तू, 'वास्तू-हर' शास्त्रानुसार उभारली आहे. मंदिरावर ऋषी-मुनींचे पुतळे पिवळ्या खडकातून कोरलेले आहेत. तीनही बाजूंनी भव्य नक्षीकाम केलेली बाल्कनी केलेली आहे. या बाल्कनीमध्ये जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने नक्षीचा लोखंडी जिना केलेला आहे. सध्या येथे जाण्यास परवानगी नाही. मंदिराचा हॉल प्रशस्त असून त्यात महादजी शिंदे घराण्यातील पुरुषांचे पेंटिग्ज लावलेले आहेत. ग्वाल्हेरचे सिंदिया घराण्यातर्फे ट्रस्ट मार्फत या स्थळाची देखभाल केली जाते. मंदिराच्या छतावर चित्रकला करण्यात आली आहे. महादजी शिंदे यांचा बैठ्या स्थितीतला पुतळा, छोटा संगमरवरी नंदी आहे. 

महादजी शिंदे परिचय : 

        महादजी शिंदे यांचा जन्म राणोजींच्या पत्नी चिमाबाई यांची पोटी १२ एप्रिल १७३० मध्ये  झाला. महादजी शिंदे हे मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार होते. आपल्या तलावारीच्या बळावर महादजींनी हिंदुस्थानभर दरारा निर्माण केला होता. 

        महादजी शिंदे (सिंधिया) तसेच पाटिल बाबा म्हणून प्रसिद्ध होते. महादजींचे  नाव मराठ्यांच्या इतिहासात मुत्सद्दी सेनानी म्हणून घेतले जाते. शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण त्यांच्यात होते. इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जाते. साताºयाजवळील कन्हेरखेड हे त्यांचे मूळ गाव. ग्वाल्हेरचे संस्थान शिंदे यांचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचे निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हे या संस्थानेचे संस्थापक पुरुष होते. महादजी राणोजींचे सर्वात छोटे चिरंजीव. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले. महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले.भव्य पायदळ, पाचशे तोफा व एक लाख घोडदळ असे महादजी शिंदे यांचे लष्कर होते. पानिपतची लढाई, पुण्याजवळील लोणावळ्यातील वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसºया लढाईनंतर मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. मराठी साम्राज्याला पूर्ववैभव मिळवून देण्याचे काम महादजींनी केले. इंग्रज, मुघल व स्वकीयांच्या विरुद्ध ते लढले. 

        पानिपतावर झालेला मराठ्यांचा पराभव व त्यानंतर झालेली मराठेशाहीची दुरवस्था याचा कलंक धुऊन काढण्यासाठी महादजींनी आपले जीवन खर्च केले. पुण्यातील लोणावळ्याजवळ असलेल्या वडगावच्या लढाईत महादजींनी ब्रिटिशांच्या  'इष्टुर फाकडा' या सेनानीचा पराभव  केला. भारतात ब्रिटीशांचा झालेला हा एकमेव पराभव आहे.  

महादजींची वर मालिका :

        महादजींच्या आयुष्यावर कथा, कादंबºयांप्रमाणेच टिव्ही मालिका ही तयार झाली. लहानपणी ही मालिका माझ्या आवडीची होती.   दिग्दर्शक संजय खानला यांनी महादजींवर ‘दी ग्रेट मराठा’ ही मालिका काढली. शाहबाज खान, मुकेश खन्ना, परीक्षित साहानी यांनी या मालिकेत काम केले होते. मालिकेच्या व्हिसीडी सुद्धा उपलब्ध आहेत. सुरेश देसाई यांनी लिहिलेले ‘महायोद्धा’ हे पुस्तक सुद्धा छान आहे. 

एकदा तरी या सुंदर ऐतिहासिक स्थळला भेट द्यायलाच हवी.

 

कसे जाल : 

  • पुणे कँपच्या पलीकडे पुणे मिलिटरी कँपमध्ये एएफएमसी लागते. त्याच रस्त्याने पुढे जातांना डाव्या बाजूला वानवडीसाठी फाटा फुटतो.  तेथे महादजी शिंदे चौक आहे.
  • रेसकोर्सहून हडपसरकडे जातांना बिगबाजारपाशी उजव्या हाताला वळल्यावर तो रस्ता वानवडीमधूनच जातो.
  • पुणे दर्शन बस डेक्कन जिमखाना येथून सुटते. पाताळेश्वर, शनिवारवाडा, टिळक संग्रहालय, पुणे विद्यापीठ, चतु:श्रुंगी, डॉ. आंबेडकर संग्रहालय, केळकर संग्रहालय, सारसबाग, कात्रज सर्प उद्यान, महादजी शिंदे छत्री, महात्मा फुले स्मारक, आदिवासी संग्रहालय, आगाखान पॅलेस अशी दर्शन बस आहे.

  • प्रवेश फी : भारतीयांसाठी ५ रु.  
  • परदेशी पर्यटकांसाठी : २५
  • साप्ताहिक सुट्टी : पुणे दर्शनामध्ये समावेश असल्याने सुट्टी नाही. 

 

गावाचे नाव :- नारायणपूर
जिल्हा:- पुणे
जवळचे मोठे गाव :- नारायणपूर , सासवड



पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे. कापूरहोळ - सासवड रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून आपला मंदिराच्या परीसरात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला रामेश्वराचे छोटे देऊळ आहे. या देवळाबाहेर ४ फूट उंचीची हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाने पायाखाली अवकळेला दाबून ठेवल्याचे दाखवण्यात आलेले आहे. 

नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी भंगलेली नंदीची मुर्ती ठेवलेली आहे. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला स्टेडीयम मधे असते तशी पायर्‍या पायर्‍यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या मंदिराच्या भरभराटीच्या काळात या सभामंडपात होणारे कार्यक्रम प्रेक्षकांना समोरून व बाजूने पाहांयासाठी ही व्यवस्था केली असावी. पायर्‍यांच्या डाव्या बाजूला खालील बाजूस गध्देगाळ बसबलेला आहे. मंदिराचे छ्त कोसळल्यावर त्यातील दगड आजूबाजूच्या बांधकामात वापरलेले आढळतात. नारायणेश्वर मंदिराचा कळस काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे. या कळसाच्या जागी सिमेंटचा (अतिशय भयानक) मंदिराच्या रचनेला न शोभणारा कळस बांधलेला आहे.


मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे. सभामंडपात ३ एक अक्षरी शिलालेख आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस खांबावर "चांगा वटेश्वर" व त्याच्या पुढे शेवटच्या खांबावर "चांगा वटेश्वराचा श्रीधरयोगी" असे शिलालेख कोरलेले आहेत. सभामंडपाला असलेल्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराच्या डावीकडील बाजूवर "अंचालध्वज" कोरलेले आहे.सभामंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीवर २ गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. चांगदेव व त्यांच्या शिष्यांनी या मंदिरात तपश्चर्या केली होती. 

मंदिरातील गाभार्‍याच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो "राक्षस" गण असून दुसरा "देव" गण आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

गाभार्‍यात उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात. यातील सर्वात मोठी पिंड विष्णुची (नारायणेश्वराची) असून ती बाराही महीने पाण्यात असते. पुरंदर किल्ल्यावर उगम पावणार्‍या केदारगंगेचे पाणी येथून वाहाते अशी श्रध्दा आहे. गाभार्‍याच्या उजव्या कोपर्‍यातील भिंतीत एक दगडी पात्र बसवलेले आहे. पावसाळ्याचे ४ महीने छतावर पडणारे पाणी यात जमा होते. वर्षाचे बाकीचे महीने मंदिरा मागिल बांधीव कुंडातून पाणी आणून मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या कोनाड्यात ओततात तेथून ते दगडी पात्रात येते व तेच पाणी अभिषेकासाठी वापरतात. अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना या मंदिरात पाहायला मिळते. मंदिराच्या गाभार्‍यात पार्वतीची भग्न मुर्ती आहे.

गाभारार्‍यातील नारायणेश्वराचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराने बाहेर पडावे. या दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. या व्दारासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.  



    आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
१) पुरंदर व वज्रगड किल्ला.
२) मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), सासवड मार्गे २० किमी अंतरावर आहे.
३) नारायणपूरचे बालाजी मंदिर १५ किमी अंतरावर आहे.

जाण्यासाठी :- 
पुण्याहून ३० किमी अंतरावर सासवड गाव आहे. सासवड ते नारायणपूर अंतर १२ किमी आहे. नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव  आणि एकमुखी दत्ताच्या देवळा यामुळे प्रसिध्द आहे. नारायणपूर गावातच एकमुखी दत्त मंदिराच्या बाजूला रस्त्यालगतच नारायणेश्वराचे मंदिर आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. 

पुणे - बंगलोर हायवेने (४६ किमी वरील) कापुरहोळ गावापर्यंत यावे. येथे हायवे सोडून कापूरहोळ - सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर (३.५ किमीवर) बालाजीचे प्रसिध्द मंदिर  आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.

सूचना :- 
१) खाजगी वाहानाने पुण्याहून पुरंदर किल्ला व लेणी आणि नारायणेश्वराचे मंदिर ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात.
२) पुरंदर, वज्रगड आणि मल्हारगड किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.




Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra

पांडेश्वरचे शिवमंदिर


२० मे २०१३

 

अष्टविनायकांपैकी एक असलेला मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी थांबण्याचे हे माझे आवडते ठिकाण. बारामती - मोरगावमार्गे सासवड या रस्त्यावर मोरगावाचे हे मंदिर आहे. या पूर्वीही या मंदिराविषयी लिहिले आहे. गाडी पार्किंगसाठी या ठिकाणी मोठे स्वतंत्र पटांगण असून, गाडी पार्किंगच्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असल्याचे दिसून आले. मयुरेश्वराचे दर्शन घेऊन गाडी पार्किंगच्या ठिकाणी हे शंकराचे छोटे मंदिर आहे. मंदिर तसे छोटेच पण बाहेरील कलाकुसरीवरून छान वाटले. इतर मंदिराच्या मूर्तीप्रमाणे द्वारपालाच्या मूर्तींचे नुकसान झाल्याचे येथे दिसते. हे द्वारपाल आहे की कुठल देव ते समजले नाही. परंतु या दोन्ही द्वारपालांचे चार हात असून, चारही हातात आयुधे आहेत. एका हातात शस्त्र, दुसºया मागील हातात शंख व तिसºया हातात चक्र आहे. अन्य हात मूर्तीभंजकांनी तोडले आहे. दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे, कंबरेला कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, डोक्यावर नक्षीदार सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी त्यांची रचना आहे. शेजारीच पाच अन्य मूर्ती या मूर्तीपेक्षा लहान आकारात कोरलेल्या दिसून येतात. याही मूर्ती थोड्याप्रमाणात तोडल्या गेल्या आहेत. मुख्य मंदिरात मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. गाभाºयात शंकराची पिंड असून, दर्शनी भागावर सिंहाची प्रतिमा कोरलेली दिसून येते. छोटासा पण कोरीवकाम असलेला नंदी आहे.

      मंदिराला कळस नाही. मुस्लिम राजवटीत बहुधा याही मंदिराला तडाखा बसल्याचे दिसून येते. नंतरचे बांधकाम १८ ते १९ व्या शतकात केल्याचे दिसून येते. आजुबाजूच्या स्थानिक दुकानदारांकडे चौकशी केली असता मंदिर शंकराचे असून, बाकी माहिती माहित नसल्याचे सांगण्यात येते. शंकराचे दर्शन घेऊन पुढे पांडेश्वरला जाण्यास निघालो. 


द्वारपाल


  पांडेश्वरचे शिवमंदिर

पुण्यापासून अंदाजे ४५ किलोमीटरवर असणारे सासवड हे शंकराच्या मंदिरासाठी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. निरा, बारामती, मोरगाव या गावांना जाण्यासाठी येथूनच जावे लागते. श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक नारायणपूर किंवा अष्टविनायकापैकी एक असणाºया मोरगावच्या मोरेश्वरला जातात. परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास प्राचीन वास्तुकला पहावयास मिळते. अर्थात पांडेश्वर हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करेलच असे नाही. परंतु ज्यांना प्राचीन मंदिरे व वास्तूकला पाहण्याचा नाद आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण छान आहे. 

           सासवड येथून कºहा नदी वाहत येते. या नदीच्या काठावर प्राचीन काळी शिवमंदिरे बांधली गेली. नदीच्या काठी गावे वसली गेली व काठावर मोठे घाट बांधून शिवशंकराची मंदिरे उभारली गेली. असेच एक शिवशंकराचे प्रसिद्ध व जुने मंदिर पाहण्यासाठी मोरगाव येथून मयुरेश्वराचे दर्शन घेऊन थोडी वाट वाकडी करून पांडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजून गेले होते. सूर्यास्ताला काही वेळ शिल्लक होता. थोडी हिंम्मत करून पांडेश्वरकडे जाणाºया डांबरीरोडवरून गाडी पुढे नेली. काही अंतरावरच चांगला डांबरी रस्ता संपला व सुरू झाला दगडी व काही काळानंतर सुधारेल असा दगडी रस्ता. तब्बल दोन एक किलोमीटर या छोट्याश्या रस्त्यावरून आम्ही निघालो होतो. वाटेत गाडी पंक्चर होण्याची मनात भीती होती. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. अन्यथा या नवख्या ठिकाणी अवघडच होते. १५ ते २० मिनिटांनी दगडी रस्ता संपवून काही अंतरावरून पांडेश्वराचे मंदिर दिसले. मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पांडेश्वर गावातून रस्ता जातो. गावाच्या पारावर बसलेल्या ग्रामस्थांना रस्ता विचारल्यानंतर थेट असेच पुढे जा असे त्यांनी सांगितले. येताना रस्ता खूपच खराब होता असे सांगितल्यावर सासवड-नाझिरे मार्गे सुद्धा येता येते असे गावकºयांनी सांगितले. 

गाव प्राचीनकाळचे असल्याचे येथील काही अवशेषावरून दिसून येते. मंदिराकडे जाणाºया वाटेवर एक वीरगळ आणि त्याशेजारीच नागाची प्रतिमा कोरलेला एक दगड आहे.

 

मंदिराच्या रस्त्यावर असलेली प्राचीन नागप्रतिमा व वीरगळ.


मंदिराच्या समोरील मनोरा

मंडपातला नंदी

मनोºयाच्या आतमधून वर जाण्यासाठी आतील बाजूस असलेल्या पायºया

मुख्य मंदिर : 

           या मंदिराला शिखर, दगडी मंडप, नदीकाठी तट, मराठाकालीन भित्तीचित्रे, मुस्लिम राजवटीचे बांधकाम असा साज चढवत हे मंदिर पूर्णात्वास गेल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या कालावधीत मंदिराचा जिर्णोद्धार झालेला येथील मंदिराच्या बांधकामावरून लक्षात येते. मंदिरातील विटा चौथ्या शतकात, नंतर सतराव्या व अठराव्या शतकात मंदिराचे जोडकाम झालेले दिसते.  हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर आहे. 

          वनवासात असताना पांडवांनी हे शिवलिंग स्थापन केल्याची लोकांची मान्यता आहे. गाभाºयात भव्य शिवलिंग आहे. इतर मंदिरात जमिनीवर शिवलिंग दिसून येते. मात्र, या ठिकाणी अंदाजे ५ फूट बाय ५ फूट कोरलेल्या दगडावर हे शिवलिंग आहे. मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील आयताकृती छताचा सभामंडप आहे. 

इतर मंदिरांप्रमाणेच मुस्लिम राजवटीत व परकीयांच्या अतिक्रमणांमुळे मंदिरातील मूर्ती वाचू शकल्या नाही. अन्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसणारे द्वारपाल या ठिकाणी दिसून येतात. अंदाजे पाच फुटी असलेले दोन द्वारपाल सुंदर व कोरीव शिल्पे असल्याचे दिसून येते. काही प्रमाणात या मूर्तींची तोडफोड झाल्याचे याही ठिकाणी दिसून येते. या मूर्तीचे मूळचे देखणेपण आपल्याला प्राचीन दगडी कोरीवकामाबद्दल कुतूहल निर्माण करते. दोन्ही द्वारपालांच्या पायात तोडे, कंबरेला कटीवस्त्र, कमरपट्टा, मेखला, गळ्यात नक्षीदार माळ, बाहूंना बाजूबंद, कानात कुंडले, डोक्यावर नक्षीदार निमुळता होत जाणारा मुकूट, त्यापाठीमागे चक्र व मुकुटावर सावलीसाठी धरलेले दगडी छत्र अशी त्यांची रचना आहे. मंदिरात मात्र एवढे कोरीवकाम आढळून येत नाही. मंदिराच्या समोरीला बाजूस दोन्ही द्वारपालांच्या बाजूंना जाळीदार खिडक्या फुलाफुलांची नक्षी कोरलेली आहे.


द्वारपाल


मंदिराचा अंतर्भाग

 मंदिराच्या आसपासची पांडवांची मंदिरे

तटाच्या भिंतीत कोरलेल्या मूर्ती

इस्लामिक स्थापत्यशैलीतील कमानदार रचना

धनुधार्री वीराची मूर्ती

     पांडवकालीन मंदिर : 

       तब्बल सोळाशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात असणाºया मंदिराला काहीना काही इतिहास असतोच. असाच इतिहास येथील पांडेश्वर मंदिरालाही आहे. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभारल्याने या मंदिराला ‘पांडेश्वर’ असे म्हणतात अशी लोकसमजूत आहे.  मंदिराच्या आवारात कुंती, धर्म, भीम, नकुल आणि सहदेव अशी लहान मंदिरे बांधलेली दिसली. या छोट्याखानी मंदिरात मूर्ती नसून त्या जागी शेंदूर फासलेले दगड आहेत. अर्जुनाचे मंदिर येथे नाही. मंदिराच्या समोरच आवारात एका धर्नुधारी वीराची मूर्ती असलेला दगड कोरलेला दिसतो. तिलाच अजुर्नाची मूर्ती असल्याचे येथील तरुणांनी सांगितले. मंदिराच्या समोर मुंबईतील कापड गिरणीला असलेल्या चिमणीसारखा मनोरा दिसतो. मजा म्हणजे या मनोºयाच्या आत पायºया असून, वर जाता येते. पण मनोºयाची स्थिती पाहता वर न गेलेले बरे. हा मनोरा कशासाठी बांधला गेला हे समजत नाही. मनोºयाच्या वरती कोरीव काम केल्याचे दिसून येते. मंदिराच्या समोरच भव्य असा नंदीमंडप असून त्यात नंदीची मूर्ती कोरलेली आहे. 


मंदिर परिसर : 

               मंदिराचा परिसर शांत व सुंदर आहे. उन्हाळा असल्यामुळे शेजारून वाहणाºया कºहा नदीच्या पात्रात दगड, कचरा, मोठाले धोंडे, गवताशिवाय काहीच नव्हते. या नदी पात्राला नदी म्हणणे की काय असा प्रश्न आपल्याला पडतो. या नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख दिशेला हे मंदीर आहे. मंदिराला कºहा नदीच्या बाजूने एक मोठा तट बांधलेला आहे. तटाचे हे बांधकाम बहुधा आदिलशाही काळात झालेले असल्याचे येथे असणाºया तरुणांनी सांगितले. तटाच्या आतल्या भिंतीवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. तटात खालची बाजू  मुस्लिम शैलीत बांधलेली कमानीची रचना असलेली आहे.  तट चांगला रूंद असून आजूबाजूचा परिसर दिसतो. पावसाळ्यात नदी वाहत असल्याने हा परिसर खूपच छान दिसेल. 

कसे जाल :

  • सासवड ते पुणे हे अंतर 34 कि.मी.
  • सासवडपासून पांडेश्वर मंदिर अंदाजे 25 किमी. तर जेजुरीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. 
  • सासवडे नाझिरे मार्गे सुद्धा येथे पोहचता येते. सासवडवरून भुलेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग मुख्य चौकातून आहे. भुलेश्वर येथून 27 किलोमीटर अंतरावर आहे. 


आजुबाजूची प्रेक्षणीय स्थळे : 

नारायणपूर, जेजुरी, संगमेश्वर,  वटेश्वर (चंगावटेश्वर), सिध्देश्वर, केतकावळे, मोरगाव, भुलेश्वर, थेऊर

घोरावडेश्वर

कुटुंबकबीला ‘मामाच्या’ गावाला गेल्याने एकटाच होतो. कुठे तरी जवळपास हिंडून यावे असा विचार करत बसलो होतो. ‘काखेत कळसा व गावाला वळसा’ अशीच परिस्थिती माझी झाली. त्यासाठी जुने फोटो अल्बम पाहत  होतो. सुमारे १५ वर्षांपूर्वी साध्या रोलच्या कॅमेºयाने काढलेला एक फोटो दिसला. तेथे जाण्याचे पक्के केले. १० वाजता गाडी, पाण्याची बाटली व कॅमेरा घेऊन घराजवळच सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या घोरावडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी निघालो त्या विषयी....

          जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणेफाटा व तळेगाव मध्ये घोरावडेश्वर  एक प्राचीन शंकराचे मंदिर असलेली तिसºया किंवा चौथ्या शतकातल्या दगडात कोरलेल्या  बौद्धकालीन ११ लेण्यांचा समूह.  घोरावडेश्वर देवस्थान पंचक्रोशीतल्या भाविकांचे श्रद्धास्थान. दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा असते. लाखो भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लांबून येतात.


         जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड सोडल्यावर किंवा मुंबईकडून येताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक मोठा डोंगर नजरेस दिसतो तोच हा घोरावडेश्वरचा डोंगर. डोंगर बराच मोठा असून या डोंगरात कालांतराने महादेवाचे मंदीर दिसून येते. या गुंफांमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते.  समुद्रसपाटीपासून सुमारे  ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायºया बांधलेल्या आहेत. खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाकच होते. पायथ्यापासून वर चढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. वाटेत सुमारे २२५ पायºया चढून गेल्यावर पायºयांचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसले. १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्याकरिता पाऊलवाट होती. त्यामुळे डोंगरावर जाण्यास चांगली दमछाक  व्हायची. अर्थातच हौशी पर्यटकांची वर्दळ कमी होती. मी सरळ मार्गाने न जाता डोंगरच्या पाऊलवाटेने जाण्यास निघालो. १० मिनिटातच वर पोचलो. वाटेतून जाताना येथून दिसणारा परिसर मोठा सुंदर दिसतो. 


लेण्यांविषयी : 

         शेलारवाडीची लेणी-बौद्धधमार्तील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या.  ११ लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. बेडसे, भाजे, कार्ले, भंडारा या डोंगरावरील बौद्धकालिन लेण्या या काळच्या. बौद्धकालिन असलेल्या या लेण्या खोदण्यासाठी पूर्वी राजे, व्यापाºयांकडून अनुदान दिले जात असते. बहुधा या लेणीसाठी निधी अभावी कमी नक्षीकाम व विहार बांधलेले दिसून आले. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला एका विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज तेथे शिवमंदिर आहे. हाच येथील घोरावडेश्वर महादेव.  मंदिराच्या आत एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. हे चैत्यगृह अगदी साधे दिसते. सभामंडप, त्यात विहार आत मध्ये ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकटही दिसते. हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट अशी चौकट कार्ला येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळते. या चैत्यगृहाच्या पुढे एक छोटी विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे  चालत गेल्यावर वरच्या बाजूला थोडे प्रस्तरारोहण करून एक मोठा प्रशस्त विहार खोदलेला आहे. इथली लेणी मोठी असून विहारात गणपती, शिवलिंग, देवी आदींच्या मूर्ती आहेत. डोंगरातील याच लेणीमध्ये थोडेफार कलाकुसर काम केलेले दिसते. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात. सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. या विहाराच्या बाहेर दोन नंदी दिसतात. एक जुना व दुसरा नवीन कोरलेला. येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे दिसतो. सुब्रतो स्टेडियम लक्ष वेधून घेते. बिर्ला मंदिराकडून बांधण्यात आलेली सोमाटणे फाट्याजवळील भव्य गणेशमूर्ती दिसते. हा परिसर सुमारे अर्धा पाऊण तासात पाहून होतो.  महादेवाचे दर्शन घेऊन परत माघारी फिरलो. वाटेत डोंगराच्या माथ्यावर विटांचे बांधकाम व शेजारी कुठल्या महाराजांची पाटी दिसून आली. सध्या येथे कुणी राहत नसल्याचे दिसून आले. पुरातत्व विभागाने येथे बांधकाम कसे करू दिले हा प्रश्न पडतो.  एका गुंफेमध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असून संत तुकाराम महाराजांचा एक फोटो ठेवलेला दिसला. येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन, मनन करताना दिसतात.

पाण्याची टाकी : 

          डोंगराच्या माथ्यावर दगडात कोरलेले पाण्याची टाकी आहेत.  संपूर्ण डोंगरावर पाण्याची ५ ते ६ टाकी आहेत. मे महिन्यात देखील येथील पाण्याची टाकी पाण्याने चांगलीच भरलेली होती. महाराष्ट्रात एवढा भीषण दुष्काळ पडून देखील येथे पाणी असल्याचे समाधान वाटले. पाण्याचे नियोजन आपल्या पूर्वाजांनी एवढे चांगल्यारित्या केले आहे. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक खेड्यात पाण्याच्या थेंबासाठी मारामारी पाहताना दिसून येते. अवघड आहे. असो. 

पुरातत्व विभागाचे लक्ष 

         प्रत्येक ऐतिहासिक व बौद्धकालिन लेण्यांवर पुरातत्व विभागाची एक पाटी दिसून येते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत ही पाटी असते. लेण्यांविषयी माहिती देण्याची सोडून यावर लेणी परिसराचे विद्रुपीकरण केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असी धमकीवजा विनंती लिहलेली असते. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणी लेण्यांची नासधुस जरी केली ती कळणार कशी? कारण पुरातत्व विभागाचा कोणी माणूस अथवा चौकीदार येथे कुठेच आढळला नाही. नुसत्या पाटया लावून संवर्धन कसे होणार महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

लोकांची मानसिकता : 

         पावसाळ्यानंतर घोरावडेश्वरचे रूपच पालटून जाते. सर्वत्र हिरवळ दिसून येते. मात्र उन्हाळा जासा सुरू होतो. तशी ही हिरवळ गायब होते. महाशिवरात्रीला तर हा संपूर्ण डोंगर परिसर शिवभक्तांनी फुलून निघतो. गुळाच्या ढेपेला जसे मुंगळे चिकटतात तसे भाविक या डोंगराला चिटकतात. लाख दीड लाख भाविक या ठिकाणी दर महाशिवरात्रीला येतात. शिवशंकराचे दर्शन घेऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या पिण्याच्या बाटल्या  व केरकचरा या डोंगराच्या कानाकोपºयात फेकून देऊन मला काय त्याचे म्हणत निघून जातात.  सर्व मंदीर परिसर फॉरेस्ट खात्याच्या मालकीचा आहे. संपूर्ण डोंगरावर झाडे लावणे गरजेचे आहे. पर्यटन स्थळावर असा कचरा करणाºया लोकांना दंड करायला हवा व या दंडाचे जमा झालेले पैसे येथील सुधारणेवर खर्च करायला हवेत. यासाठी लोकांची मानसिकता बदलायला हवी. पिंपरी, चिंचवड व देहूरोड, लोणावळा, तळेगाव येथे मोठी कॉलेज उभी राहिली. अर्थातच तरुण-तरुणी या ठिकाणी मोकळ्या व निवांत (एकांत) वातावरणाचा आनंद? घेण्यासाठी या घोरावडेश्वराच्या डोंगरावर येतात. कुठे कोपºयात तर कुठे एखाद्या झाडाच्या सावलीत बसून काय गप्प मारत असतात कुणास ठाऊक अशा जोडप्यांवर गांभीर्याने कारवाई करायला हवी.

घोरावडेश्वरवरून दिसणारा परिसर : 

         या डोंगराच्या पायथ्यापासून जुना पुणे-मुबई महामार्ग गेलेला आहे. दिवाळीतील किल्यावर दिसणाºया चित्रांप्रमाणे वरून संपूर्ण देहूरोड परिसर दिसतो. देहूगावातील गाथा मंदिर, इंद्रायणीचे पात्र, तळेगावचा काही परिसर, तळेगावची खिंड, नवीन उभरण्यात आलेले सुब्रूतो मुखर्जी स्टेडिअम,पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे, भव्य गणेशमूर्ती, शिरगावचे साई मंदिर, भंडारा डोंगर, आयप्पा मंदिर, मुरगन मंदिर, लांबवर दिसणारा लोहगड व विसापूरचा किल्ला, हा संपूर्ण परिसर या डोंगराच्या अनेक विभागातून मोठा सुंदर दिसतो. 

घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी :

         अनेकांना या डोंगराचे नाव घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी असा प्रश्न पडतो. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडी गावामुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणू लागले. खरे पाहता ही लेणी पायथ्याच्या शेलारवाडीला चिकटून आहे. संपूर्ण डोंगरावर अग्निजन्य खडक विखुरलेले दिसतात. स्पटिकरुपी असलेले हे छोटे दगड लाखो करोडो वर्षापूर्वी या डोंगराची निर्मिती कशी झाली याची साक्षच देतात. परत येत असताना वाटेत एक छोटा सरडा दिसला मी फोटो काढायला कॅमेरा आॅन केला तर हे महाराज सुद्धा पोज देण्यास पुढे आले. अनेक अँगलमधून फोटो सेशन करून पुढे परतीच्या प्रवासाला निघालो. डोंगर उतरून पुढे बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या इंद्रायणी नदीच्या शेजारील कुंडमळा पाहण्यास निघालो.

कसे जाल : 

  • पुण्यातून अथवा लोणावळ्याकडून रेल्वेने आल्यास बेगडेवाडी हे रेल्वे स्थानकावर उतरून डोंगरावर जाता येते. मात्र रेल्वे स्टेशनापासून डोंगर सुमारे  २ ते ३ किलोमीटर आहे. पायी चालण्याशिवाय पर्याय नाही.
  • स्वत:चे वाहन घेऊन आल्यास पुण्यातून येताना देहूरोड सोडल्यावर देहूरोड बायपासच्या थोडे पुढे घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून  जाता येते. 
  • मुंबई बाजूने आल्यास तळेगावची खिंड ओलांडल्यावर डाव्या बाजूला भव्य गणपती दिसतो. तेथून पुढे घोरावडेश्वराला येता येते. 
  • पुणे ते घोरावडेश्वर अंतर सुमारे ३५ किलोमीटर.
  • हॉटेलची सोय आहे. जवळच पेट्रोलपंप सद्धा आहे. 

पावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)


अजुन काय पहाल :

 

निसर्गाचा चमत्कार कुंडमळा

 

महादेवाचे दर्शन घेऊन जवळस असलेले निसर्गाचा चमत्कार पाहायला गेलो. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनकडून पुणे-मुंबई महामार्गाकडे न जाता कुंडमळ्याकडे जाण्यास निघालो. हा संपूर्ण परिसर देहूरोड लष्करी तळाच्या हद्दीतून जातो. त्यामुळे जागोजागी चौक्या उभ्या केलेल्या दिसतात. फोटो काढण्यास मनाई आहे. केल्यास लष्करी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे जरा जपूनच. कुंडमळ्याचे फोटो काढण्यास हरकत नाही. कुंडमळा म्हणून प्रसिद्ध असलेले हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील एक छोटे गाव. सुमारे २ किलोमीटरवर असलेला हा कुंडमळा.  इंद्रायणी नदीच्या प्रवाहात खालच्या खडकांवर कोसळून पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. परिसरही खूपच निसर्गरम्य आहे. मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी एक टू व्हिलर जेमतेम जाईल असा मजेशीर पूल पाहिला. हा पुलाखाली इंद्रायणी नदीचे पाणी पुढे जाते. हेच ते रांजणखळगे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रांजणखळगे पाहण्यास दिसतात.  रांजणगावचे रांजणखळगे तर प्रसिद्धच आहेत. येथील खळगे मोठे जरी नसले तरी सुमारे ५०० मीटर अंतर विविध आकारातील रांजणखळगे पहाण्यास दिसतात. पावसाळ्यात येथे एकदातरी आवर्जुन जाण्यासारखे हे ठिकाण आहे. खरे तर महाराष्ट्र शासनाने अशा ठिकाणी पर्यटनाला वाव द्यायला हवा तेवढीच स्थानिक लोकांना रोजगाराची निर्मिती होईल. मागील दोन एक महिन्यापूर्वी कुंडमळा परिसरात बिबळ्या आल्याची घटना घडली होती. तसा हा परिसर दाट झाडीचा असल्याने बिबळ्या येणे शक्य आहे. कुंडमळ्यातून दिसणारा घोरावडेश्वरचा डोंगर मस्तच दिसला. मागील बाजूला असलेला भंडारा डोंगर साद घालत होता. मात्र वेळ कमी असल्याने व कामावर जायचे असल्याने पुढील वेळेस भंडारा व भामचंद्र डोंगर करण्याचे मनात पक्के करून परतीचा मार्ग धरला. 


पावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)


पावसाळ्यात कुंडमळ्यावर टिपलेले चित्र. (२८ जुलै २०१३)

कसे जाल :

  • बेगडेवाडी रेल्वेस्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर.
  • वाहन पंक्चर झाल्यास दुकान नाही. हॉटेलची सोय नाही.
  • शक्यतो अंधार व्हायच्या आत हा परिसर सोडलेला बरा. 

 गतवैभवाची साक्ष देणारा बोरगेवाडा


 शाळेला सुट्टी लागली की लहानपणी आमचा मोर्चा पवना नदीवर असायचा. चिंचवडगावातील फत्तेचंद शाळेच्या पाठीमागील नदीवर, रावेत बंधाºयावर आम्ही पोहायला जायचो. मस्त मजा यायची. रावेत बंधाºयावरून पलिकडील काठावर एक जुनी गढी दिसायची. फिरता फिरता या ठिकाणी गेल्याचे आठवते आहे. आज सकाळी पाऊस कमी होता. वातावरण स्वच्छ असल्याने पुनावळेचा बोरगेवाडा पाहण्याचे मनात आले.  त्या विषयी...

              पिंपरी-चिंचवड शहर फोफाट्याने चारही बाजुला पसरत आहे. पूर्वीची लहान-लहान गावे आता चक्क मोठ्या इमारती, अलिशान बंगले व मोठे पुलांनी सजत आहे.  अशाच रावेत गावात पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही जायचे तेव्हा संध्याकाळनंतर येथे थांबण्यास भीति वाटायची. दुर्गादेवी टेकडीची हिरवीगार झाडी, रावेत येथील झाडी व यामुळे संध्याकाळनंतर या ठिकाणी भयाण शांतता असायची. कालांतराने येथील पुनावळे, रावेत ही गावे रुप पालटू लागली. गावाचे महानगरात रुपांतर होऊ लागले.  डीवायपाटील सारखी महाविद्यालये, आकुर्डी रेल्वेस्टेशन, अलिशान इमारती यामुळे वाल्हेकरवाडी, पुनावळे, रावेत या गावांचा कायापालट काहीच वर्षात झाला.

              अशाच पुनावळे या गावी एक छोटा गढीवजा वाडा आहे. त्याचे नाव बोरगेवाडा.  नव्याने समाविष्ट झालेल्या पुनावळे गावात ही शिवकालीन गढी आहे. इतर ऐतिहासिक इमारतींप्रमाणे या ही वाड्याची दुरवस्था झाल्याचे येथे गेल्यावर दिसले. ऐतिहासिक ठेवा असणारी ही गढी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. अंदाजे १ एकरावर असलेला वाडा मोठा प्रशस्त आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव या भागातील बोरगेंना शिवकाळात पुनावळे गाव वतन म्हणून मिळाले होते. तळेगावातील दाभाडे सरदार आणि पुनावळेत बोरगे सरदार या वतनदारांचा खूप नावलौकिक होता. हे दोन्ही वतनदार छत्रपतींच्या पदरी काम करीत असत. दाभाडे सरकार पुण्यात शनिवारवाड्यावर जेव्हा जात, तेव्हा त्यांना पुनावळेतून जावे लागे. म्हणजेच छत्रपतींच्या कालखंडात, अर्थात साडेतीनशे वर्षांपूर्वी या गढीची निर्मिती बोरगे सरकारांनी केली.
               १७७१ म्हणजेच म्हणजे उत्तर पेशवाईतील हा वाडा असल्याचे येथील नागरिक सांगतात. गढीचा इतिहास फारसा माहित नसल्याने नक्की कोणत्या वर्षी या गढीची निर्मिती झाली, याची माहिती देणे अशक्य आहे. गढीस मोठे चार बुरुज असून, दोन मोठे दरवाजे आहेत. गढीमध्ये एक तुळशी वृंदावन आणि एक छोटीशी विहीर सुद्धा आहे. तुळशी वृंदावनावर सुंदर नक्षीकाम केले आहे. तसेच राहण्यासाठी एक छपरवजा घर आहे. त्या समोर एक चावडी आहे. सध्या गढीच्या चारही भिंतींची पडझड झाली आहे. मुख्य दरवाजाची चौकट ही त्यामुळे काष्ठशिल्पाचा उत्कृष्ट आहे. काही ठिकाणी ही चौकट खराब होण्याच्या मार्गावर आहे. गढीची पडझड मोठ्या प्रमाणावर झाल्याने आतमध्ये कोणीही राहत नाही. गेल्या काही वर्षांत या गढीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.
              बोरगे सरदारांचे घराण्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोगलांच्या सैन्याबरोबर पुनावळे येथे मोठी लढाई झाली होती. या लढाईत बोरगे घराण्यातील सैन्य मोठ्या प्रमाणावर धारातीर्थी पडले होते.
इतिहासाची आवड असणाºयांनी या वाड्याला भेट देण्यास हरकत नाही.  अन्य  हौशी पर्यटकांना मात्र, येथे काहीही विशेष वाटणार नाही. उगाच काहीतरी. या ब्लॉगवर वाचून तेथे गेलो व आपली सुट्टी वाया घालावली अशी टीका मात्र हौशी पर्यटक करतील. जवळच रावेतचा नवीन आकर्षक पूल बांधलेला आहे. ऐतिहासिक ठेवा असणाºया या वास्तूचे जतन व्हावे यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. येथून जवळच असलेल्या रावेतच्या बंधाºयावर गेलो.   नुकताच पावसाळा सुरू झाल्याने पवना नदीत वाहून आलेली मोठ्याप्रमाणावरील जलपर्णी सर्वत्र पसरलेली दिसली.

              वाड्याशेजारी सिमेंट क्राँकिटच्या बिल्डिंग उभा राहिलेल्या आहेत. त्यामुळे अंग चोरून बसल्यासारखा हा वाडा सध्या दिसत आहे. चिखलीतील जाधववाडी, इंदोरीची गढी, बोरगेवाडा, चाकणचा भुईकोट किल्ला, खेड वाफगावजवळील होळकर यांचा वाडा असे अनेक वाडे पुणे जिल्ह्यात आहेत. जुनं ते सोनं म्हणतात. पण आपल्याकडे ऐतिहासिक वस्तूंची जपणूक केली जात नाही. जिल्ह्यात अनेक असे छोटे वाडे, गढी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. जीर्ण झालेले हे पडके वाडा आपल्या गतवैभवाची साक्ष देत उभे आहेत. लवकरच संवर्धन न केल्यास या वास्तू केवळ मातीचे ढिगारे होऊन राहतील.

कसे जावे 

  •  चिंचवड गावातून वाल्हेकरवाडीमार्गे रावेत पुलावरून पुनावळे गावाकडे जाताना येते.
  • पुण्याकडून येताना डांगे चौकातून चिंचवडगावाकडे न वळता सरळ येऊन पुनावळे गावाकडे जाता येते.
  • देहूरोड-कात्रज बायपास या गावाच्या शेजारूनच जातो. तेथूनही येता येईल.

 

मुरुगन हिल्स


रविवार होता. लोणावळ्यातील निसर्गाचे सौंदर्य पाहून ६.३० परतत होतो. धो-धो पाऊस पडत होता. मध्येच काही काळ पाऊस विश्रांतीसाठी थांबत होता. चहा पिण्यासाठी म्हणून देहूरोड बायपासवरील हॉटेलमध्ये थांबलो असता समोरील डोंगरावरील मंदिराकडे लक्ष गेले. चौकशी केली असता ‘मुरुगन हिल्स’ असे नाव कळले. त्या विषयी....

मुरुगन हिल्स

                देहूरोड हे पिंपरी-चिंचवड शहरालगतचे एक छोटेसे गाव. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इथला परिसर. शेलारवाडीच्या  (घोरावडेश्वर)च्या डोंगराच्या पश्चिम बाजुस एक छोट्याश्या टेकडीवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींचे हे मंदिर आहे. ‘मुरुगन हिल्स’ नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपले काही अभंग गायले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे मंदिर देहूरोड आणि पंचक्रोशीतील भक्तांचे एक धार्मिक स्थळ आहे. देहूरोड बायपास संपल्यानंतर डाव्या बाजूला घोरावडेश्वराचा मोठा डोंगर  दिसतो. याच्या कुशीत हे मंदिर आहे. 

         

मंदिराची स्थापना : 

               समुद्रसपाटीपासून हे मंदिर ३५०० फूटावर निसर्गरम्य ठिकाणी आहे. परिसरातील अनेक भक्तांच्या प्रयत्नातून १९७४ पासून या मंदिराचा विकास झालेला आहे. मंदिराची कोनशिला १४ मार्च १९७५ मध्ये देहूरोड लष्करी भागातील सीआयएसबीचे नियंत्रक ब्रिगेडियर सी. सुंदरम् यांच्या हस्ते बसविण्यात आली आहे. शारदापीठाचे जगद्गुरू शंकराचार्यमहाराज यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन २८ मे १९९५ मध्ये झाले होते. मंदिरातील मूर्ती तामिळनाडूतील वेलूर  जिल्ह्यातील रत्नागिरी गाव स्थित बालमृगन मंदिराच्या कार्तिक स्वामींचे परमभक्त श्री बालमुरुगन स्वामीद्वारा दान मिळाल्या आहेत. दरवर्षी सुब्रमण्यम स्वामींच्या होणाºया सर्व उत्सवात हजारो भक्त सहभागी होतात. सुब्रमण्यमस्वामी मंदिर हे साऊथ इंडियन लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या मंदिरात दिसून येते.

           मुरगन हिल्सवर प्रभू सुब्रमण्यमस्वामी अर्थात भगवान कार्तिक स्वामींच्या मंदिराबरोबरच गणपती, हनुमान, बालाजी, पद्मावती, नवग्रह मंदिर, साईबाबा मंदिरे ही आहेत. धार्मिक विधी करण्यासाठी येथे मोठा हॉलही उभारलेला आहे. साईबाबांची काकड आरती दररोज होते.

डोंगरावर जाण्यासाठी पायºयांचा रस्ता आहे. तसेच फोर व्हिलर वरपर्यंत जाते. मंदिराच्या परिसरातून देहूरोड परिसर मोठा छान दिसतो. मागे असलेला घोरावडेश्वराचा डोंगर पुढे देहूगावातील गाथा मंदिरही दिसते. एकदा तरी आवश्य जाण्यासारखे हे ठिकाण आहे.   

                                                                        
 मंदिराची वेळ :

सोमवार ते शुक्रवार (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते १०.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

शनिवारी (धार्मिक कार्यक्रम नसल्यास)

  • सकाळी ६.३० ते ११.३०
  • संध्याकाळी ५.३० ते ८.३०

धार्मिक कार्यक्रम असल्यास : 

  • सकाळी ६.३० ते संध्याकाळी ८.३०

कसे जाल : 

  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड ओलांडून तळेगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला घोरावडेश्वर डोंगर दिसतो. याच्या पायथ्याशी छोट्याच्या टेकडीवर हे मंदिर आहे. त्यासाठी डाव्या बाजूला वळून डोंगरावर जाता येते.
  • कात्रज-देहूरोड बायपासवर तळेगावला जाण्यासाठी रस्ता लागतो. वरील प्रमाणे जाता येते.
  • मुंबईकडून येताना घोरावडेश्वर डोंगर ओलांडल्यानंतर देहूरोड बायपासच्या अलिकडे डाव्याबाजूला हे मंदिर दिसते.
 

भंडारा डोंगर


अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगरावर आवर्जुन गेलो. त्या विषयी...

 मराठी चित्रपटात तुकाराममहाराजांची पत्नी जिजाबाई एका डोंगरावर भोजन घेऊन जात असल्याचे दाखविले आहे. तोच हा भंडारा डोंगर. भल्या पहाटे उठून तुकाराममहाराज आपली आध्यात्मिक साधना, भजन, लिखाण, चिंतन करण्यासाठी येथे जात असत. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तोच हा भंडारा डोंगर. देहूगावातील संत तुकाराममहाराज व  आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत मोटार रस्ता तयार केलेला आहे. 

 या डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साºया विश्वाला मार्गदर्शक असणाºया गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपºयांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात. येथे येणाºया सर्व भाविकांना तसेच वारकºयांना सप्ताहकाळात रात्रीपर्यंत महाप्रसाद दिला जातो. नित्यनेमाने दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था केली आहे. 

          या डोंगराच्या नावाबाबत एक गोष्ट सांगितली जाते. एकदा छत्रपती शिवाजीमहाराज तुकाराममहाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे आले. छत्रपतींच्या समवेत शेकडो मावळे वीर होते. एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून जिजाबाईने आणलेल्या शिदोरीचे दोन दोन घास दिले तरीही ती शिदोरी संपली नाही. तरीही शेकडो मावळे छत्रपतींसह पूर्ण जेऊन तृप्त झाले. या डोंगरावर अन्न केव्हाच कमी पडत नाही. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांनी आपल्या ग्रंथातून जगापुढे आध्यात्मिक भांडार उघडून दिले. भंडारा डोंगरावरही भगवंताने जणू काही अन्नासाठी भांडारच उघडून दिले आहे. म्हणून या डोंगराला ‘भंडारा’ असे नाव दिले आहे. 


  भंडारा डोंगरावर जाणारा घाट रस्ता मस्तपैकी नागमोडी वळणे घ्यायला लावणारा आहे. घाट चढताना दिसणारा आजुबाजूचा परिसर सुरेख दिसतो.  एक मोठे वळण घेऊन आपण माथ्यावर पोहोचतो. तिथे गाडी पार्क करून मुख्य मंदिरात जाण्यास निघालो. येथे तुकाराममहाराजांचे एक मंदीर असुन, काही वारकरी मंडळी त्याची देखभाल करतात. मंदिरात संत तुकाराममहाराज, विठोबा-रखुमाई, गणपती, शिवलिंग अशा मुर्ती आहेत. डोंगरावरील एकांत, आजूबाजूचा सुंदर निसर्ग, वाºयाची झुळूक आपल्याला प्रसन्न करते. पावसाळा सुरू झाल्यामुळे आजूबाजुला हिरवाई दिसून येत होती. 

        तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. भंडारा डोंगराचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडयात झाला असल्याने याही ठिकाणी विकासकामे सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास निधीतून या क्षेत्राला  निधी मिळतो. सध्या भंडारा डोंगरावर जाणारा रस्ता मोठा व प्रशस्त बांधलेला आहे. अंदाजे ४० फुट रुंद असा हा रस्ता आहे. सुमारे २  ते अडीच किलोमीटर रस्ता डोंगरपायथ्यापासून मंदिरापर्यंत तयार केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकºयांना पदपथ निर्माण केला आहे. शासनाच्या माध्यमातून वृक्ष लागवडी केल्याचे दिसून आले.  भंडारा डोंगराच्या पश्चिम बाजूला जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे,  सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते. 

           ट्रीप, पिकनिक, मौजमजा, हुल्लाडबाजी करण्यासाठी येणार असाल तर हे ठिकाण नक्कीच नाही. असे करताना आढळल्यास भाविक भक्तांकडून ‘प्रसाद’ नक्की मिळेल. 

          डोंगर उंचावर असल्याने छान गार हवा वाहते. एकदा तरी तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसगार्चा आनंद घ्यावा. 

भंडारा डोंगर उतरून तळेगावकडे जाताना इंदोरी हे छोटे गाव लागते. तेथे इंदोरीचा भुईकोट किल्ला पाहिला.

इंदोरीचा भुईकोट किल्ला

दिसणारा परिसर : 

भंडारा डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भामचंद्र डोंगर, इंद्रायणी नदी, इंदोरीगाव, जाधववाडी धरण परिसर, तळेगाव परिसर, घोरावडेश्वर डोंगर व अय्यप्पा स्वामींचा डोंगर व त्यामागे पसरलेले पिंपरी-चिंचवड शहर दिसते.

कसे जावे : 

  • मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर तळेगाव हे रेल्वे स्टेशन आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तळेगाव आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर ५ किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूस कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहनाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.
  • देहूगावातून येथे जाण्यासाठी व्यवस्था आहे. स्वत:चे वाहन असल्यास गाडी वर पर्यंत नेता येते. 
  • पायथ्यापासून पायी जायचे झाल्यास अर्धा ते पाऊणतास लागतो.
 
 

इंदोरीचा किल्ला


दाभाडे सरकारांचा इंदोरीतील भुईकोट किल्ला

तळेगाव दाभाडेपासून पूर्वेस ५ कि.मी. अंतरावर चाकण-तळेगाव मार्गावर इंदोरी गाव आहे. येथे इंदोरीचा हा भुईकोट किल्ला आहे. महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या भुईकोट किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. सध्या किल्ल्यामध्ये कडजाई देवीचे मंदिर असून हे देवस्थान जागृत असल्याचे मानले जाते. पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने गाव सैन्यासह तटबंदीच्या आत किल्ल्यात वसलेले होते. कालांतराने गाव किल्ल्याबाहेर आले.

        इंदोरीच्या किल्ल्याला दहा बुरुज, घोड्यांचा तबेला आणि किल्ल्याची तटबंदी एवढेच अवशेष तग धरून अजूनही इतिहासाची साक्ष देत आहेत. उत्तर-दक्षिण वाहणाºया इंद्रायणी नदीच्या पूर्व तटावर नैसर्गिक उंच खडकावर हा भुईकोट किल्ला आहे. 

        छत्रपती शाहू महाराजांचे सेनापती खंडेराव दाभाडे यांना तळेगाव हे वतन म्हणून मिळाले. या तळेगावात पाण्याची तळी आहेत म्हणून तळेगाव नाव पडले. कालानंतराने यालाच तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. दाभाडे घराण्याचे मूळ पुरुष बजाजीराव दाभाडे. त्यांचे नातू  सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी १७२०-२१ मध्ये भुईकोट किल्ला बांधला.  दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात  झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. वेळेअभावी मला तेथे जाता आले नाही. 

        किल्ल्याच्या आतील अनेक ऐतिहासिक वास्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड झाल्या असल्या, तरी तटबंदीसह भव्य प्रवेशद्वार अजून अभिमानाने उभे आहे.  जागोजागी तटबंदीची पडझड झालेली आहे. इंदोरीहून १५ किलोमीटरवर असलेल्या चाकणचा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे या किल्ल्याला संरक्षणदृष्ट्या फार महत्व प्राप्त झाले. तटबंदीच्या आतील क्षेत्र अंदाजे ६ एकर असे विस्तृत क्षेत्र आहे. सध्या किल्ल्यात थेट मंदिरापर्यंत वाहन जाते. आतमध्ये जागृत ग्रामदैवत कडजाई मातेचे मंदिर, बापुजीबुवांचे मंदिर व बंद पडलेल्या शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या दुरवस्था झालेली इमारत आहे. वैशाख महिन्यात अक्षयतृतीयेनंतर येणाºया मंगळवारी कडजाई मातेचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. 

प्रवेशद्वार 

        पूर्व दिशेला असलेले किल्ल्याचे दुमजली भव्य प्रवेशद्वार आहे. कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे.  प्रवेशद्वाराच्या मध्यावर देवीची कोरीव मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन बुरुजांसह एकूण चौदा बुरूज आहेत. प्रवेशद्वाराचे दोन्ही बुरूज घडीव दगडात बांधलेले आहेत. दरवाज्याच्या कमानींमध्ये दोन्ही बाजूस दोन ओवºया असून, पहारेकºयांसाठी दोन दोन देवड्या आहेत. वरच्या मजल्यावर नगारखाना होता. तिथे हत्तीचे दगडी चित्र कोरलेले आहे. तटबंदी सुमारे ५ फूट रुंदीची आहे. शत्रूने हल्ला केल्यास जागोजागी तोफा व बंदुकांसाठी  मोठमोठी छिद्रे शत्रूचा ठाव घेण्यास सज्ज आहेत. किल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणाºया इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. 

        इंदोरीचा हा भुईकोट किल्ला केवळ इंदोरीचे नाही, तर अवघ्या मावळाचे वैभव व स्वाभिमान आहे.  मावळातील कार्ला, भाजे व बेडसे येथील जगप्रसिद्ध लेण्या, तसेच लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची या गडांप्रमाणेच इंदोरी येथील सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा भुईकोट किल्ला याची साक्ष आहे.

नंतर तळेगावाला जाण्यास निघालो. तळेगावात श्रीमंत सरसेनापती दाभाडे घराण्याने जपलेले एक मंदिर पाहण्यास निघालो. मंदिराचे नाव पाच पांडव मंदिर. 

कसे जाल : 

  • तळेगाव दाभाडेमधून चाकणकडे जाणाºया रस्त्यावर सुमारे पाच किलोमीटरवर इंद्रायणीनदीवर दोन पुल उभारलेले आहे. यातून छोट्या पुलाने इंदोरीच्या या भुईकोट किल्ल पाहता येतो.
 

बेडसे लेणे - ‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’


मुख्य स्तूप

काही कामानिमित्त मागील गुरुवारी कामशेतला जावे लागले. काम कधी होईल याची कल्पना नव्हती. एवढ्या लांब जाणार असल्याने कुठेतरी फेरफटका करावा असे मनात होते. पुणे जिल्ह्यात विशेष करून कामशेत मळवली परिसरात अद्भूत अशा काही लेण्या आहेत. पूर्वी (आताही) किल्यांवर भटकंती करायला मला खूप आवडायचे. गडांवर हिंडताना तेथील परिसरातील या लेण्या पाहण्याचा योग आला होता.    तेव्हा हिंडताना या लेण्या कोणी कोरल्या, त्याचे प्रयोजन काय असेल असे अनेक प्रश्न पडायचे. त्या विषयी थोडा बहुत अभ्यास ही केला. भाजे, कार्ला व बेडसे लेणी या त्यापैकीच काही. दुपारी १ पर्यंत काम संपले. वेळ मिळाला. कामशेतपासून जवळच असलेली बेडसे लेणी पाहण्यासाठी निघालो त्या विषयी...
पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे एक वाट गेली आहे.  पावसाची भूरभूर थोड्या प्रमाणात काही अंतरावर होती. रस्ता एवढ्या पावसात सुद्धा अजून चांगला होता. त्यामुळे दुचाकी चालवायला त्रास झाला नाही. पवनानगरकडे जाणाºया कामशेतच्या खिंडीत पोहोचल्यावर तर पाऊस धो-धो कोसळण्यास सुरूवात झाली. काही वेळ तेथल्या मंदिरात एकटाच या पावसाचे रूप पाहत होतो.  एकटाच असल्याने आणि त्यात धो-धो वरून पाऊस कोसळत असल्याने लेणी पाहायला जायचे का नाही असा मनात विचार करत होतो. पूर्वी या लेणीवर तीन-चार वेळा गेलो असल्याने जायचा रस्ता माहित होता. त्रास काही त्रास सुद्धा होणार नसल्याचे मनात होते. पण उगच मनात भीती. पूर्वी एकट्याने अनेकवेळा या परिसरातील लोहगड, विसापूर, तुंग, तिकोन्यावर गेलो होता. पण आता परिस्थिती वेगळी होती. आता दोनाचे चार हात झाले होते. बघू काय होते असे मनात म्हणत एकदाचा निश्चिय करून निघालो.  कामशेत खिंडीतून पवनानगरकडे जाणारा हा रस्ता चांगला आहे. वरून मावळ परिसर छान दिसतो. भातशेतीची काम जोरात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. २० मिनिटांतच बेडसे या गावच्या वळणावर पोहाचलो. तेथून १.५ किलोमीटरवर लेणी डोंगरात कोरलेली आहे. विशेष म्हणजे लेणीच्या पायºयांपर्यंत जाणारा हा रस्ता सुद्धा एकदम डांबरी. ‘गाव तेथे एसटी व एसटी तेथे रस्ता’ ही योजना महाराष्ट्र सरकारने चांगलीच राबविलेली दिसली. ५ मिनिटांतच लेण्यांच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो.  पलिकडच्या शेतात शेतीची कामे जोरात सुरू होती. धो-धो पाऊस काही वेळ थांबत तर काही वेळ भूरभूर सुरू होती. अशातच खेकडे पाकडणारा बगळा दिसला. मस्त पांढरा शुभ्र कॅमेरा काढून त्याला कॅमेºयात टिपले. गाडी पायºयांपाशी लावून वर जाणारी वाट धरली. पाऊसचा जोर काहीचा कमी जास्त होत होताच.

पायºया

बेडसेच्या लेण्यांपर्यंत पोहचण्यासाठी शेवटपर्यंत पायºयांची सोय करण्यात आलेली आहे. काहीवर्षांपूर्वी पायºयांची दुरवस्था झाली होती. पुरातत्व विभााने आता मात्र या पायºया छान दगड कापून बांधलेल्या आहेत. आजुबाजूला डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या ओहळासाठी मधेच काही ठिकाणी वाट करून देण्यात आलेली होती. तेथील थंडगार पाणी ओंजळीत भरून ‘प्वॉट’भरून पिलो व पुढे निघालो. किल्यांवर, डोंगरावर जाताना अशा काही पायºया असल्या दम लागल्याने आपोआप गप्पा-टप्पा बंद होतात व मनात १, २, ३,४ .... असे आकडे सुरू होतात. येथे तर गप्पा मारायला कोणीच नव्हते. त्यामुळे पायºया मोजण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वर चढताना बाजूने विश्रांतीचे ओटे असल्यामुळे मध्येच थांबून खालील निसर्गदृश्य न्हाहळत बसलो. १५ मिनिटांतच बेडसा लेणीच्या प्रवेशदारात येऊन पोहोचलो. आकडा आठवत नाही परंतु ३५० ते ४०० पायºया सहज मोजल्या.
हुश्श....हुश्श....आता बस झाले वर्णन.  आता लेण्यांविषयी सविस्तर लिहितो.


  


बेडसे लेणी

कार्ला, भाजे अशा लेणीसमुहामधील बेडसे ही एक लेणी. नेहमीच्या सहलींच्या वर्दळीपासून दूर एकांतातील हे बौध्दकालीन लेणं. आडवाटेवरील हे लेणी असल्याने सर्व सामान्यांपासून ती आजवर तुटलेली व अपरिचित अशी राहिली. बेडसे लेणीला फारसे कोणी येत नसल्याने अर्थातच येथे खूप शांतता असते. अस्वच्छतेचा कुठे मागमूसही नाही. याचे खरे श्रेय येथे न येणाºया पर्यटकांनाच द्यायला हवे. पुरातत्व विभागाने बेडसेची निगा चांगली राखली आहे. वरपर्यंत चांगल्या पायºया तयार करून घेतल्या आहेत. कार्ला लेणीप्रमाणे या ठिकाणी प्रवेश तिकीटघर नाही. एक रखवालदार असतो तेवढाच.
आपल्याकडे पायथ्याच्या गावावरून किंवा डोंगराच्या नावावरून, मंदिराच्या नावावरून एखाद्या ठिकाणाला नाव देण्याची परंपरा आहे.  या ही लेण्यांना डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बेडसे या गावावरून बेडसे लेणी असे नाव मिळाले. याचा अनेकजण ‘बेडसा’ असा चुकीचा इंग्रजीत उल्लेख करतात. या गावाजवळ भातराशी नावाच्या दुर्गम पहाडात ही बौद्ध लेणी आहेत. लेणी पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सूर्योद्याच्या वेळी संपूर्ण आसमंत सुंदर दिसतो. पूर्वी लोहगडला जाण्यासाठी एकदा आम्ही येथे मुक्काम केला होता. सकाळी सूर्योदय पाहूनच पुढे निघालो होतो.

भव्य खांब  मंडपामधील समोरील दोन्ही भिंतींवर कलाकुसर केलेली आहे.

लेण्यांचा कालावधी :

इ.स. पूर्व २०० ते ५०० च्या काळातील हे शिल्प सौंदर्य आहे. साधारण २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी. हीनयान पंथाची ही लेणी आहेत. पायथ्यापासून ते वरपर्यंत २० ते २५ मिनिटातच आपण शैलगृहाच्या प्रांगणात येतो. दक्षिणोत्तर शंभर-दोनशे मीटर लांबीच्या कातळकड्यात खोदलेल्या या लेण्या असून, एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप, पाण्याची कुंडे असा बेडसे लेणीचा अमूल्य खजिना आहे.  पायºया चढून वर आल्यावर प्रथम दिसते एक लहानसा स्तूप. याच्या डावीकडे २-३ पाण्याची टाकी. टाकीवरच पाली भाषेतील एक शिलालेखही कोरलेला आहे.

प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे,  गवाक्षे, वेदिकापट्टी.

वैशिष्टपूर्ण ४ स्तंभ

प्रवेशाद्वारातून आत गेल्यावर समोरच व्हरांडा असलेले भले मोठे चैत्यगृह दिसते. हा व्हरांडा चार अष्टकोनी स्तंभावर उभारलेला आहे. मध्यभागी दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धे अशा या स्तंभांनी जणू काही हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा सारा व्हरांडा आपल्या खांद्यावर तोलून धरला आहे. हे खांब पायापासून थेट छताला भिडलेले.  अंदाजे  २५ फूट उंचीचे स्तंभ आहे. हे स्तंभ म्हणजे बेडसे लेणीचे वेगळेपण ठरतात. अशा प्रकारचे स्तंभ इतरत्र आढळत नाहीत. भव्य दिव्य अशा स्तंभांना पर्सिपोलिटन धतीर्चे स्तंभ असे म्हणतात. प्राचीन पर्शिया (इराण) इथल्या एका ठिकाणाचे नाव पर्सिपोलिस. तिकडून अशा प्रकारची कला निर्माण आली.
दोन मोठे खांब, षटकोनी बांधणीचे, रांजणाच्या आकाराचा मोठा गोल, घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर असलेला चौरंग व त्यावर घोडे व बैलांवर बसलेल्या स्त्रीपुरुषांच्या जोड्या असे शिल्प येथे कोरलेले दिसते. विशेष म्हणजे घोड्यांना लगाम नाही बहुधा हे काम रंगकामातून दाखवले जात असावे. हत्तींना सुळे नाहीत, पण त्याजागी खोबणी दिसतात, तिथे खरेखुरे हस्तीदंत बसविले जात असावेत असा अंदाज बांधता येतो.
बाजूच्या दोन्ही भिंतीनाही असेच अर्धे खांब कोरलेले आहेत. त्यावरही असेच कोरीव काम. दोन खांबाच्या बरोबरमध्ये चैत्यगृहाचे पिंपळ पानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार असून त्यावर नक्षीदार जाळी कोरलेली आहे. बाजूच्या दोन्ही भिंतींवर अनेक मजली प्रासादांचे देखावे. त्यामध्येच गवाक्ष, एकावर एक चढत जाणारे सुंदर असे कोरीवकामाने सजलेले. याच्या खालील बाजूस विश्रांतीसाठी दोन विहार आहेत. लेणीचे आणखीन वेगळेपण म्हणजे त्याचा सजलेला अलंकृत भव्य दर्शनी भाग. आखीव, रेखीव प्रत्येक मजल्यावर छोटी चैत्यतोरणे, गवाक्षे, वेदिकापट्टी सारं काही प्रमाणबद्ध आहे. व्हरांडाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. या व्हरांडातच शेजारच्या भिंतीत प्रत्येकी दोन विहार आहेत.
उजवीकडच्या एका विहाराच्या वरती एक  लेख  कोरलेला आहे.
‘नासिकान अनदस सेठीस पुतस पुसणकस दान’
म्हणजे ‘नाशिकमध्ये राहणाºया आनंद श्रेष्ठीचा पूत्र पुष्पणक याचे दान.


घोडे, हत्ती, वृषभांवरती युगुल अशी कलाकुसुर.


पिंपळपानाकृती चैत्यप्रवेशद्वार


चैत्यगृह


चैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यावर अष्टकोनी २४ स्तंभ आहेत.

चैत्यगृह :

चैत्यगृह बाहेरून नीटसे दिसत नाही. कारण ते खोदत असतानाच त्याच्या पुढ्यातील कातळ तसाच ठेवला असावा बहुधा छताकडील काम करण्यास आधार मिळावा, पाऊस, वादळ आत चैत्यगृहात येऊ नये  म्हणून तो ठेवलेला असावा. भाजे किंवा कार्ले लेण्यांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था दिसत नाही. येथील प्रवेशमार्ग डोंगर मधोमध फोडून त्याचे दोन भाग केले आहेत. जनावरे आत येऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने छोटेसे एक लोखंडी गेटही येथे उभारले आहे.  प्रवेशमार्गावर लेणीच्या वरती जाण्यासाठी कातळात काही पायºया खोदलेल्या आहेत. परंतु पावसाने घसरडे झाल्याने मला या ठिकाणी जाता आले नाही. नाहीतर स्तंभावरील मूर्तींचे छान दर्शन घडते.  आत जाताच चैत्यगृहाचे विशाल स्वरूप समोर येते. याच्या आत आहेत ४ अभूतपूर्ण स्तंभ या स्तंभाच्या मागे चैत्यगृह आहे.
चैत्यगृहाच्या दरवाजापाशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची मोठी कमान कोरलेली आहे. त्या खाली पुन्हा खाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या आहेत. उजवीकडच्या कमानीखाली छोट्या-छोट्या छिद्रांच्या नक्षीतून एक सुंदर गवाक्ष कोरलेले आहे. प्रत्येक चैत्यकमानीमध्ये पुन्हा फुला-पानांची सुंदर नक्षी गुंफलेली दिसून येते. या गवाक्षांचा उपयोग सूर्यप्रकाश येण्यासाठी केला जात असे. पिंपळाकृती कमानीतून आत एका ओळीत दिसणारे स्तंभ दिसत होते. व मध्यभागी चैत्य दिसत होता. चैत्यगृहात प्रवेश केला जर जपूनच न जाणो एखादे जनावर पावसामुळे बसलेले असायचे. पण तसे काही नव्हते. एकदा खात्री करून बिनधास्त आत शिरलो. येथील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर बाकी सर्व स्तंभ अष्टकोनी आहेत. यातील उजवीकडच्या काही खांबांवर त्रिरत्न, कमळ, चक्र आदी बौद्ध शुभचिन्हे कोरली आहेत. गजपृष्ठाकृती छत असून २६ स्तंभ आहेत. पूर्वी बेडशाच्या छतालाही लाकडी तुळया होत्या. तुळया पुढे चोरल्या गेल्या असे वाचण्यात आले.  चैत्याची हर्मिका अजूनही चांगल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे हर्मिकेवरचे लाकडी छत्र सुमारे २२०० वर्षांपूवीर्चे असूनही चांगल्या स्थितीत आहे. कमलपुष्पांसारखी रचना असलेले. चैत्यगृहातील स्तंभावर काही बौद्ध प्रतिकंही कोरलेली आहेत. चक्र, कमळ व कोरीवकाम  हे सारे पाहून क्षणभरात डोळ्यांचे पारणे फिटते. अन्य लेण्यांप्रमाणे बौद्धमूर्ती या ठिकाणी नाही.
या चैत्यगृहात १८६१ पर्यंत हा प्राचीन सुंदर चित्रकाम केलेले टिकून होते. त्यावर्षी कुणी मोठा इंग्रज अधिकारी ही लेणी पाहण्यास येणार होता. त्याच्यासाठी साफसफाईचे करण्यात आली. सरकारी लोकांनी ही लेणी साफ केली. त्यामध्ये तग धरून असलेली चित्रेही पुसून गेली.
कार्ला व भाजे, लेण्याद्री येथील लेण्यात चैत्यगृहात आढळणारी लोकांची गर्दी मी गेलो तेव्हा नव्हती. एकांत होता. माझ्याच हालचालींचा आवाज चैत्यगृहात घुमत होता. सारेच काही विस्मयकारी व अदभूत असे होते. जरा वेळ आतमध्ये बसलो काही फोटो काढले व परत बाहेर येण्यास निघालो.

पाण्याचा ऐक थेंब ही नाही

आर्श्चय कारण्यासारखी गोष्ट बेडसेतील चैत्यगृहात व विहारात पहावयास मिळाली ती म्हणजे एवढा जोराचा पाऊस गेले दीड महिना पडतोय परंतु आतमध्ये पाण्याची ओल, कुठे तरी टिपटिप पाणी पाजरणे असा प्रकार येथे दिसला नाही. यावरून त्याकाळच्या स्थापत्यकारांचे कौतुकच करावयाचे वाटते.


स्तंभांवर फुले, धर्मचक्र, कमळ इ. बौद्ध चिन्हे कोरली आहेत.


हर्मिका व तिच्यावरील लाकडी कमलपुष्पाकृती छत्र


छोटासा स्तूप.

पुरातत्त्व विभाग :

बेडसे लेणी ही पुरातत्त्व विभागाच्या अंर्तगत येतो. अन्य ठिकाणांपेक्षा (कार्ला लेणी) या ठिकाणीची ही लेणी खूपच स्वच्छ व टापटीप ठेवलेली आहे. वरपर्यंत पायºया, कुठेही मानवी कचरा नाही. प्लॅस्टिक च्या पिशव्या नाही  बाटल्या नाही.


चैत्यगृहाच्या उजवीकडील मोठा विहार


विहार

विहार

बेडसेच्या चैत्यगृहाप्रमाणे विहारही आगळा-वेगळा आहे. चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि बाजूने भिक्षुकांसाठी राहण्यासाठी खोल्या. वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या. प्रत्येक विहारात झोपण्यासाठी दगडी ओटा. येथे ९ विहार आहेत. या विहाराचे बाहेरील काही भाग काळाच्या ओघात पडल्याचे स्पष्ट दिसून येते.
लेणीच्या बाहेर ओळीने थंडगार पाण्याची कुंडे आहेत. पुरातत्व विभागाने सध्या तरी या ठिकाणी लोखंडी जाळी टाकून बंद केलेले आहेत. चांगले आहे. कुंडा शेजारी बसण्यासाठी ओटे खोदलेले आहेत. 

कसे जाल :   

  • बेडसे येथे जाण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई हायवेवरुन कामशेत येथे डावीकडे वळावे (पुण्याकडून मुंबईकडे जाताना) तेथून दहा किलोमीटरवर बेडसा लेणी आहे.  पवना धरणाच्या रस्त्याने गेल्यास पवना धरणच्या आधी दहा किलोमीटरवर बेडसे लेण्यांकडे जाता येते.  
  • पुण्यापासून बेडसे लेणी ६० ते ६५ किलोमीटरवर अंतरावर. पुणेकरांना पौडमार्गे हडशी, पवना धरण पाहून बेडसे लेणीकडे जाता येईल.
  • एस.टी. किंवा खाजगी वाहनाने यायचे झाल्यास पवनानगर (काळे कॉलनी) येथे जााºया रस्त्याने राऊतवाडी येथे उतरावे. करुंजगावच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातच ही बेडसे लेणी आहे. 

  • कधी जावे :

    पावसाळ्यात हिवाळ्यात आवश्य जावे. साधारणपणे पाऊस कमी झाल्यावर नाहीतर धो-धो पाऊस. शक्यतो उन्हाळ्यात टाळावे.  हिवाळ्यात डोंगरावर नाना प्रकारची फुल झाडे उगवतात. पळस, पांगारा, चाफ्याची पांढरी फुलांनी हा परिसर फुलून जातो. पावसाळ्यात व हिवाळ्यात बेडसेचा हा परिसर  निसर्गरम्य दिसतो.
    नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ पाहायचे असेल तर नक्कीच बेडसेला या. अत्यंत शांत, निवांत अस हे ठिकाण आहे.  पर्यटकांची अगदी क्वचितच हजेरी यामुळे या लेणीत सदैव निरव शांतता नांदत असावी. शांतीचा संदेश जगभर पोचविणाºया बुद्धाप्रमाणेच शांततेचा संदेश जणू काही ही बेडसे लेणी आपल्यापर्यंत पोहोचवित आहे.  आतापर्यंत तीन चार वेळा बेडसे लेणीला भेट दिली. प्रत्येक वेळी बौद्ध लेण्यांविषयी नवीन ज्ञान लेणी माझ्यापुढे उलगडते आहे की काय असे वाटते.
    पाऊस अजूनही येतच होता. या लेणीच्या बाजूलाच मोठा धबधबा वाहत होता. पायºया चढत असताना मध्येच तो आपले दर्शन देत होता. त्यामुळे काही काळ तेथे थांबून परतीची वाट धरली १५ मिनिटांतच खाली आलो. गाडीला किक मारून घर गाठले.

अजून काय पाहाल :

कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवनानगर येथील पवना धरण, प्रति पंढरपूर, नारायणी धाम 

 

ताम्हिणी घाट

१०/८/२०१३
बरेच दिवसांपासून कुठे तरी लांब हिंडण्याचा मनोदय होता. पाऊस  उघडला होता. त्यामुळे लांब कुठेतरी हिंडून येण्याचे पक्के केले. चिपळुणला आमचे  कुलदैवत श्री. करंजेश्वरी आहे. तिचे दरवर्षी दर्शन  घेण्यासाठी आम्ही नवरात्रात जातो. मागील वर्षी काही कारणामुळे राहून गेले होते. यावर्षी लवकरच दर्शन घेण्यासाठी निघालो. ताम्हिणी घाटातून रायगड, चिपळूण, श्री. परशुराम मंदिर, विसावा पाइंट व नंतर संगमेश्वर येथील श्री. कर्णेश्वर मंदिर व परत येताना कुंभार्ली घाटातून परत घरी असा दोन दिवसांचा प्रवास केला. त्या विषयी....
(४ ते ५ ठिकाणे असल्यामुळे एकदम सर्व प्रवास वर्णन करणे शक्य नव्हते. फोटो सुद्धा बरेच काढले असल्यामुळे दोन वेगळे भाग करून प्रवास वर्णन करत आहे.  सध्या फक्त ताम्हिणी घाट व रायगड रोपेवे मधून रायगड हे वर्णन देत आहे. लवकरच श्री. करंजेश्वरी देवी, परशुराम मंदिर व श्री कर्णेश्वर याचा भाग लिहितो.)

कोकणात जाण्यासाठी पुण्याहून ताम्हिणी घाट, कुंभार्ली घाट, महाबळेश्वर मार्गे पोलादपूर, वरंधा घाट हे गाडी रस्ते आहेत. तसे पानशेतधरणाच्या पाठीमागून, तसेच सह्याद्रीच्या अनेक खिंडीतून पायी कोकणात उतरणारे रस्ते आहे. चिपळणूमधील करंजेश्वरी आमची कुलस्वामिनी दरवर्षी नवरात्रात देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही नेमाने जातो. जाताना रायगड किल्ला पाहण्याचा विचार नक्की केला. 


ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता.



सकाळी घरातून तयारी करून ७ वाजता निघालो. काळेवाडी, हिंजवडीमार्गे घोटावडे व तेथून पौड मार्गे ताम्हिणी घाटात पोहोचलो. येथपर्यंतचा रस्ता चांगलाच खराब आहे. त्यामुळे सकाळचे ९.०० वाजले. शनिवार-रविवार असून  देखील हौशी पर्यटकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमचे प्रकाराचा अनुभव आला नाही. पाऊसाची हलकिशी रिमझिम सुरू होती. ताम्हिणी घाटच्या एका बाजूला दरी व दुसºया बाजुला डोंगर आहेत.  वाटेत गरुडमाची म्हणून पाहणेसारखे निसर्गरम्य ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे, खळखळून वाहणारे ओढे, डोंगरांवरती आच्छादून टाकणारे ढग, ताम्हिणीचा घाट, समोरच्या डोंगरातून जाणारी एसटी, रस्त्यावरील पांढरे शुभ्र दाट धुके, हिरवाईने वेढलेले डोंगर हे  मनोहरी दृश्य मनात साठवून ताम्हिणीचा घाट सोडला. घाट माथ्यावर पोहोचलो व वातावरण स्वच्छ झाले होते. पाऊस सुद्धा थांबला होता.

ताम्हिणी घाटातून जाणारी एसटीची बस. 

पुण्याहून ताम्हिणी घाट लांब नाही. हा प्रवास करणे चांगला असला तरी तितकाच धोकायदायकही आहे. वळणवळणाचा रस्ता असल्याने नवशिक्या चालकांनी गाडी न चालविलेलीच बरी. घाटातील वळणावळणाचा रस्ता असल्यामुळे वेळ जास्त लागतो.  दुर्मिळ औषधी वनस्पती व जीवसृष्टी इथं खूप प्रमाणात  आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटाला महाराष्ट्र शासनाने अभयारण्याचा दर्जा दिला आहे. बिबट्या,  शेकरू, सांबर, गिधाड या वन्यजीवांचं अस्तित्व इथं आढळतं.
ताम्हिणी घाटातून रायगड पाहण्यासाठी निघालो.
(रायगड पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)

ताम्हिणी घाटातील धो-धो कोसळणारे धबधबे.


घाटात कसे जायचं  : 


  •  पुण्याहून जायचे झाल्यास पिरंगुट, पौड, मुळशी मार्गे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब +आहे.) 
  • पिंपरी-चिंचवडमधून जायचे झाल्यास हिंजवडी, माण, घोटावडेमार्गे पौड, मुळशीधरणा मार्गे ताम्हिणी घाटात जाता येते. (काही रस्ता खराब आहे.) 
  • मुंबईतून ताम्हिणीला जायचं असेल तर दोन मार्ग आहेत
  • पहिला मार्ग मुंबई-पुणे महामार्गावरून लोणावळा गाठावे. तेथून अ‍ॅम्बी व्हॅलीवरून मुळशी धरण व पुढे ताम्हिणी घाट. (काही रस्ता खराब आहे)
  • दुसरा रस्ता म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड तिथून ताम्हिणी घाट. कोलाडपासून ताम्हिणी घाट अंदाजे ६० किलोमीटर अंतरावर आहे. 
  • ताम्हिणी घाटात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाºया कोणतीही एसटी या मार्गावरून जाते. 


अजून काही पाहण्यासारखे 


  • प्लस व्हॅली.
  • मुळशी धरणाच्या बाजूने कैलासगड, घनगड, तैलबैला हे किल्ले दिसतात.
  • मुळशी धरण, पिंपरी व्हॅली व पिंपरी तलाव ही पाहण्यासारखे आहे. 
  • हल्ली कोलाडच्या जवळून वाहणाºया कुंडलिका नदी वर रिव्हर राफ्टिंग चा अनुभवू घेता येऊ शकतो. 
  • ताम्हिणी घाटातून घनगड, तेलबैला किल्ल्यांना भेट देता येते. 

 

पुण्याचे वैभव : शनिवारवाडा (भाग १)


 

गणपती दर्शनासाठी पुण्यात गेलो होतो. पुण्यातील शनिवारवाड्याजवळून जात असताना माझ्या लहान मुलाने घोड्यावरील स्वार झालेल्या पुतळ्याकडे लक्ष वेधून विचारले, ‘‘बाबा हा शिवाजी का? मी नाही म्हणताच मग कोण? बाजीराव पेशवे म्हटल्यावर ते बाजीराव ‘सिंघम’ का? असा उलट प्रश्न त्याने केला. तो लहान असल्याने मी जास्त लक्ष दिले नाही. सध्याच्या पिढीला बाजीराव सिंघम माहिती आहे मात्र, बाजीराव पेशवे माहिती नाही. मुलाला इतके दिवस आपण शनिवारवाडा कसा दाखविला नाही याचे मलाच आश्चर्य वाटले. गणपती पाहायला वेळ होता. तेव्हा तासाभरात शनिवारवाडा दाखवू असे ठरवून मुलाला शनिवारवाडा दाखवून आणला. त्यानिमित्ताने का होईना मीही बºयाच वर्षांनी शनिवारवाडा पाहणार होतो. लहानपणी शनिवार पेठेतील आजी व मावशीकडे गेलो की मी व माझे मावसभाऊ व त्यांचे मित्र असे शनिवारवाड्यात लपाछपी खेळायला जायचो. मजा यायची.

              मराठ्यांच्या भरभराटीचा व अस्ताचा साक्षीदार ठरलेला ‘शनिवारवाडा’. पुण्यात शनिवारवाड्यासमोर घोड्यावर बसलेला, हातात भाला घेऊन शत्रूच्या उरात धडकी भरणारा आवेशपूर्ण असा पुतळा दिसतो.  पुण्याच्या वाढत्या इमारतींच्या साम्राज्यात आपले अस्तित्व टिकून राहिलेला हा शनिवारवाडा केवळ पुण्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे.  शनिवारवाड्यात पेशवे राहत असत. थोरले बाजीराव पेशवे यांनी हा वाडा बांधला. भगवी झेंडा ते युनियन जॅक फडकताना या वाड्याने अनुभवला आहे. आपल्या अनेक कटू व काही सुखद आठवणी घेऊन हा वाडा आजही उभा आहे. अनेक घटना, दुर्घटना पाहिल्या. पानिपतचे महायुद्ध असो, त्यानंतरचा तोतया भाऊसाहेब, राघोबादादांची अटेकपार स्वारी,  नारायणरावाचा खून असो , राजकारणं, लग्नसमारंभ व मंगल प्रसंग पाहिले. आपल्या कारकिर्दीत प्रत्येक पेशव्याने येथे बांधकाम करून वाड्याच्या सौंदर्यात भर टाकली.  तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. मात्र, दुर्देवाने १८२७ मध्ये लागलेल्या आगीत वाडा आतून जळून नष्ट झाला. यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी जेल, हॉस्पिटल, शासकीय कार्यालये आदी सुरू केले होते. यानंतर १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला. पुण्याचे सध्याचे विस्तारीकरण या शनिवारवाड्याच्या आजुबाजूला झालेले आहेत.

               सध्या शनिवारवाड्यात पाहण्यासारखी काहीच अवशेष उरलेले आहेत.  इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून गेला. त्यामुळे खºया स्वरूपातील वाडा आपण आज शकत नाही. पुरातत्व विभागाने बसवलेल्या फलकावरून आपणाला त्याची माहिती व अंदाज करता येतो. दिवाणखाना, गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, हजारी कारंजे यांचे केवळ अवशेष पाहण्यास मिळतात. एक तर येथील तटबंदी आणि बुरुज, दिल्ली दरवाजा व अन्य दरवाजे,  नगारखाना.

तटबंदी आणि बुरुज

शनिवारवाड्याचा आकार चौकोनी असून जवळपास ६.२५ एकर जमीन वाड्याने व्यापली आहे. तटबंदीची उंची अंदाजे ३३ ते ३४ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा दगडी चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम विटांचे आहे. संपूर्ण वाड्याभोवती असलेल्या तटबंदीमध्ये बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या अर्थात भोके ठेवण्यात आली आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था असे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास तोफेचा बुरुज तर पश्चिम बुरुजास पागेचा बुरुज म्हणत.  तट रुंद असल्याकारणाने आत शिपार्इंच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने  १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ आहेत. बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव बाळाजी बाजीराव यांनी १७५० ला वाड्यात बरेच बदल केले. अनेक नवीन इमारती बांधल्या. १७८० च्या सुमारास सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी नवीन खोल्या, दिवाणखाने, कारंजी बांधली. पेशवे कुटुंबातील परिवाराला रहाण्यासाठी, अनेक दालने व सदनिका शनिवारवाड्यात होत्या. जवाहिरखाना, तिजोरीची खोली, भांडार, वाचनालय, जिन्नसखाना, औषधालय, शस्त्रास्त्रांची खोली, दस्तऐवज ठेवण्याची खोली आणि चित्रशाला अशी स्वतंत्र दालने होती. महालांच्या बाहेर असलेल्या  चौकांच्यात कारंजी बांधण्यात आलेली होती. हजारी कारंजे या नावाने ओळखले जाणारे एक विशेष कारंजे होते. ८० फुटाचा परिघ असलेले एक १६ पाकळ्यांचे कमळ या कारंजात बनविण्यात आले होते. यातल्या प्रत्येक पाकळीवर पाणी उडण्यासाठी १६ नळ होते.

वाड्यास एकूण ५ दरवाजे  सध्या या दरवाज्याच्या शेजारून रस्ता गेला आहे. सतत गाड्यांची वाहतूक होत असते.

अष्टकोनी बुरुज

बांधकामाची माहिती :

संभाजीमहाराजांचे पूत्र शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटले. त्यानंतर त्यांनी सातारा येथून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. पुण्याचे सरसुभेदार बाळाजी विश्वनाथ होते. त्यांना १७१३ मध्ये शाहूंनी ‘पेशवे’ हे पद दिले. बाळाजी विश्वनाथांनी आपला कारभार सासवड व सुप्यावरून सुरू केला. १७२० ला बाळाजी विश्वनाथ मृत्यू पावले.  त्यानंतर त्यांचा थोरला मुलगा बाजीरावला १७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली.  सुरूवातीची काही वर्षे त्यांनी सासवड व सुप्यावरून पेशवाईचा कारभार सुरू केला. पाण्याची कमतरतता व राजकीयदृष्ट्या सोयीचे म्हणून पुणे येथे कारभार करण्याचे ठरले. कारण जवळच असलेले राजगड, तोरणा, पुरंदर, सिंहगड सारखे बळकट किल्ले होते. पुण्यात पेशव्यांचे स्वत:चे घर नव्हते.  पुणे पूर्वी फार लहान गाव होते. छोट्या छोट्या वस्त्या होत्या. यातच कसबा पेठ होती. पेठेजवळ शनिवार पेठ होती. लाल महालाच्या शेजारीच बाजीरावांनी स्वत:चा वाडा बांधण्याचे ठरविले. वाड्याची पायाभरणी शनिवार, १० जानेवारी १७३० ला केली गेली.  बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. १६,०१० रुपये खर्चून हा वाडा उभारला गेला. वाडा शनिवारपेठेत होता. म्हणूनच की काय या वाड्याचे शनिवारवाडा असे नाव ठेवले असावे. वाड्याच्या कोटाचे काम सुरू झाले. पेशव्यांनी वाड्याला कोट घालावा व सगळ्या पुण्याभोवती वस्तीला कोट करावा हे छत्रपती शाहूमहाराजांनी हे पसंत पडले नाही. त्यांचे म्हणणे होते की, ‘अशा प्रकारच्या वाडा बांधल्यास तो जर चुकून मोगलांच्या ताब्यात गेला तर परत जिंकणे अवघड होऊन बसेल.  व त्याच्या आसºयाने आणखीही काही ठिकाणे मोगल जिंकू शकतील. परिणामी शाहूमहाराजांच्या आज्ञेनुसार कोटाचे काम थांबविण्यात आले.
बाजीरावांच्या काळात वाड्याचे बांधकाम लहान स्वरूपाचे होते. १७४९ ला छत्रपती शाहूमहाराजांचे निधन झाले. मराठ्यांच्या राजकारणाची सूत्रे नानासाहेब पेशवे ऊर्फ बाळाजी बाजीराव यांनी पुण्यास आणली. त्यामुळे महाराष्टÑाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुणे बनले. त्यानंतर शनिवारवाड्याच्या इतर बांधकामास सुरूवात झाली. अर्धवट काम पूर्ण करून त्या जागी दिल्ली दरवाजा, बुरुजयक्त तटबंदी बांधण्यात  आली. वाड्याच्या सर्व तटांवर २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.


दिल्ली दरवाजा

१. दिल्ली दरवाजा :

शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेला प्रत्येक पर्यटक याच दरवाज्यातून प्रवेश करून वाड्यात प्रवेश करतो. आपल्या वैशिष्टपूर्ण दिल्ली दरवाजाने शनिवारवाडा ओळखला जातो. हत्तींच्या धडकांपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या येथे बसविलेल्या आहेत. दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे.  दिल्ली ही उत्तरेला असल्यााने या उत्तरकडे असणाºया दरवाज्याला दिल्ली दरवाजा म्हणतात. वाड्यातील इतर दरवाज्यांच्या तुलनेने हा दरवाजा सर्वात मोठा आहे. आत प्रवेश करण्यासाठी छोटा दिंडी दरवाज्यातून आपला प्रवेश होतो. पुरातत्व विभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी तिकीट घर उघडले असून, तिकीट घेऊन आपण आत प्रवेश करतो.

शेषशायी विष्णू व गणेशाची चित्रे



नगारखाना

दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दोन मजली इमारत दिसते. तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकºयांच्या कोठड्या व वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात. वरती नगारखान्यात गेल्यावर पुणे परिसरचा काही भाग पाहता येतो. झपाट्याने विस्तारलेले पुणे व आजुबाजूचा भाग दिसतो. जवळच असलेली पर्वती ही दिसते.

भग्नावषेशातून नगारखाना

जुने कारंजे

शनिवारवाडा (भाग २)


२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा :

 मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू (आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे ईशान्य कोपºयात राहत असत. ते वाड्याच्या ईशान्य बाजूच्या दरवाज्यातून ये-जा करत असत म्हणून त्या दरवाज्यास अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. दरवाजा सर्वात लहान आहे.

३. खिडकी दरवाजा : 

पूर्व बाजूस असणाºया या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत.

 ४.गणेश दरवाजा : 

पूर्व दिशेला असलेला हा दरवाजा आहे. दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याने यास गणेश दरवाजा असे नाव पडले.

 ५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा :  

वाड्यात सगळ्यात जास्त नावे असलेला हा दरवाजा आपल्या वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळ्या नावाने ओखळला जात असे. दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास दक्षिण दरवाजा असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास नारायण दरवाजा नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास जांभळीचा दरवाजा असेही म्हणत.


वाड्यातील तटबंदी व जंग्या


हजारी कारंजे


वाड्यात एकत्र करण्यात आलेला कचरा.

खंत :

शनिवारवाड्याचे गतवैभव परत मिळविण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून सुद्धा या वास्तूकडे केवळ ऐतिहासिक दृष्ट्या महत्व देऊन सरकारने आपले हात झटकणे चांगले नाही. केवळ पर्यटनस्थळ घोषित करून किरकोळ डगडुजी करून शनिवारवाडा आपल्या शेवटच्या घटका मोजत असेल की काय असे वाटते.  एवढे नक्की की पुरातन वस्तू असल्याने नवीन डागडुजी करता येत नाही परंतु त्या ठिकाणी त्या जागे विषयी आवश्यक ती माहिती चांगल्या स्वरूपात ठेवण्याची तसदी तरी सरकारने घ्यावी. ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असलेला शनिवारवाड्याची सध्याची अवस्था बिकट आहे. आवश्यक तेवढे कर्मचारी नेमून परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे. वाड्यात गेल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटकांनी फेकून दिलेल्या पिशव्या, बाटल्या दिसल्या विशेष म्हणजे हा सर्व कचरा एका बाजूला नेऊन पेटवून देत असल्याच्या खूणाही दिसल्या. खरे तर अशी पर्यटनस्थळे केवळ पर्यटनस्थळेच नसून, तो आपला एैतिहासिक वारसा आहे. पर्यटकांनीसुद्धा अशा ठिकाणी ठेवलेल्या कचरापेटीतच कचरा टाकणाचे कष्ट करायला हवे. मी एकाट्याने घाण केल्याने काय होणार? असा विचार बदलला पाहिजे. वाड्याची पार्श्वभूमी मागे  ठेऊन स्वत: ‘बाजीराव’ असल्याचा आव आणून काही महाभाग स्टाईलमध्ये फोटो सेशन करताना दिसतात. तटबंदीवरील एखाद्या बुरुजाचा आसरा घेऊन बसलेले जोडपे, शाळा, कॉलेजला दांडी मारून वेळ घालवण्यासाठी फक्त ५ रुपयांत येथे विश्रांतीसाठी आलेल्या  बहाद्दरांना अटकाव करणे गरजेचे आहे. दिल्ली दरवाज्याच्या बाहेरील बाजूस पेपर वाचत बसलेले. हातपाय पसरून निवांत झोपलेले महाभागांना अटकाव केला पाहिजे. बाजीराव पुतळ्याच्या चौकटीच्या खालील बाजूस तर प्रचंड घाण साचलेली दिसते. तेथे स्वच्छता करणे गरजेचे आहे. बाजीरावांच्या पुतळ्यावर कधी काळी अर्पण केलेला हार वाळून खाली पडण्याची वाट पाहणे कितपत योग्य आहे. हे सर्व पाहिल्यावर वाईट वाटते. ब्लॉगवर लिहण्याशिवाय काहीच करू शकत नसल्याची खंत ही वाटते.


वाड्याची तटबंदी

तटबंदीवरून खाली वाड्यात जाणाºया पायºया

वाड्यातील तटबंदी व जंग्या.


शनिवारवाड्या शेजारून वाहणारा वाहतुकीचा रस्ता

शनिवारवाड्यातील मस्तानीच्या वाड्यावरील हिरवळ


नगारखान्यातून बाजीराव पेशव्यांचा पुतळा


नगारखान्यातून शनिवारवाड्यातील दृश्य


शनिवारवाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात विविध सभांसाठी मांडव टाकलेला असतो.

नगारखान्यातील खांबावरील कलाकुसर

दिल्ली दरवाज्यावरील कलाकुसर

शनिवारवाडा पाहण्याची वेळ :

  • सकाळी ८.३० ते सायं. ६.००
  • तिकीट विक्री :
  • ५.४५ ला बंद करण्यात येते. त्यानंतर अर्धा तास पाहण्यासाठी मिळतो.
  • १५ वर्षांखालील मुलास मोफत प्रवेश व त्यावरी प्रत्येक व्यक्तीस ५ रुपये प्रवेश फी आकारली जाते.
  • वर्षभर शनिवारवाडा पाहण्यासाठी उपलब्ध असतो.

कसे जावे :

  • स्वारगेट वरून शनिवारवाड्याकडे अथवा शिवाजीनगरकडे जाणाºया बसने अथवा पायी चालत १५ ते २० मिनिटांत शनिवारवाडा येथे येता येते. वाटेत येताना पुण्यातील मंडई जवळील प्रसिद्ध तुळशीबाग तेथून शनिवारवाड्याकडे येता येईल.
  • रिक्षा सुद्धा शिवाजीनगर, पुणेस्टेशन व स्वारगेट वरून आहेत.

भामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर


जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...

           परमेश्वराच्या भेटीसाठी तब्बल पंधरा दिवस तहानभूक विसरून तुकाराममहाराजांनी जिथं समाधी लागाली. ते ठिकाण म्हणजे भामचंद्राचा डोंगर किंवा भामगिरी.  तुकाराममहाराजांची घोरवाडेश्वर, भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्र डोंगर ही अभंग लिहिण्याची प्रेरणास्थळे होती.  येथील शांत व सुंदर वातावरणामुळे विठ्ठलाची आस लागलेल्या महाराजांना  निर्गुण, निराकार विठ्ठलाची भेट झाली. देहूगावातील मुख्य मंदिरातून समोरच एक मोठा डोंगर दिसतो तो भंडारा डोंगर याच भंडारा डोंगराच्या समोर कातळकड्याची जणूकाही उलटी टोपी घालून निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात समाधी लावून बसलेला भामचंद्र डोंगर आहे.

धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥

तुकोबांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेले देहू गाव पुण्यभूमी आहे. देहू गावाला धन्यत्व-पुण्यत्व आले ते तेथे नांदत असलेल्या पांडुरंगामुळे. देहूगावातील संत तुकाराममहाराज व  आळंदीतील संत ज्ञानेश्वरमहाराज असे दर्शन करणारे अनेक भक्त या भंडारा व भामचंद्र डोंगरावर गेल्यावाचून राहत नाही. देहूतून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर असलेल्या भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे.

पाऊणतासात ८ किलोमीटर :

भंडारा डोंगरावर अनेकवेळा गेलो. मात्र तेथून काही अंतरावर असलेल्या भामचंद्रावर जाण्याचा योग काही केला येत नव्हता. रविवारी तळेगावात एका कामासाठी गेलो होतो. काम संपवून भामचंद्र पाहण्यासाठी निघालो. तळेगाव-चाकण महामार्गावर भंडारा डोंगराच्या पुढे गेल्यावर देहूगावातून येताना एक फाटा लागतो. या फाट्याकडे न जाता संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. हे अंतर कापण्यासाठी तब्बल पाऊणतास गेला. कारण रस्ता. रस्ता कसा तयार करतात याची येथे प्रचिती येते. मोठे मोठे दगड टाकून कच्चा रस्ता तयार केलेला आहे. काही ठिकाणी जेमतेम बरा रस्ता म्हणता येईल असा रस्ता आहे. तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने देहू गावाला आज तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. पर्यटकांचा ओढा या तीर्थक्षेत्राकडे वाढला आहे. मात्र, प्रशासन रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी आशा करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कंबरतोड  रस्ता पार करून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो.  रामभरोसे दुचाकी लावून वर जाणाºया रस्त्यावर बसलेल्या गुरख्याला रस्ता हाच ना. अशी खात्री करून घेऊन पुढे जाण्यासाठी निघालो. पाच मिनटे चाललो असेल तेवढ्यात चरण्यासाठी आलेली गुरे ढोरे दिसली. त्यातील एक तर वाटेवरच वाट अडवून उभा होता. कसेबसे मीच थोडी वाट वाकडी करून पुढे निघालो. जाताना त्याचे दोन फोटोही काढले. घाबरून अंगावर येण्याची मलाही भीती. थोडे पुढे गेल्यावर वासुली गावातील एक भाविक त्यांच्या दोन लहान नातवंडांना डोंगरावर दर्शनासाठी जात असल्याचे पाहिले. मी एकटाच असल्याने त्यांच्या सोबत चालू लागलो. डोंगराविषयी त्यांना काय माहिती आहे याबद्दल मी जाणून घेतले. त्यांनी चांगली माहितीही सांगितली. आमचाही एक फोटो काढाल का? असे त्यांच्या नातवंडांने विचारले. ठिक आहे काढतो. पण पाठवू कसा? तर  ‘मेल’वर पाठवा असे तो म्हणाला.  २० मिनिटातच  डोंगरावर पोहोचलो. उभी चढाई असल्याने चांगली दमणूक होते. पण थंडगार व स्वच्छ हवेमुळे दमणूक कळत नाही.

            

सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारा भामचंद्र डोंगर.

   भामचंद्र डोंगर तसा आडवाटेवरचा. एखाद्या तपस्वी मुनीप्रमाणे समाधी घेऊन एकांतात तपश्चर्या करीत बसलेला. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून तुटल्याने एकटा पडलेला, दाट झाडी असलेला. भामचंद्र डोंगररांग पूर्वकडून पश्चिमेकडे पसरली आहे. डोंगर रांगेच्या पश्चिमेला असलेल्या गावातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे ही काहीजण म्हणतात. हा डोंगर म्हणजे अर्ध्या डोंगरापर्यंत गर्द हिरवी झाडी व वरती सुमारे ८०० ते ९०० फूट कातळकडा आणि तोही उलटी टोपीच्या आकाराचा. याच काताळात गुहा आहेत.  डोंगरावरील एकंदरीत झाडीवरून तुकोबामहाराजांच्या काळात या ठिकाणी यापेक्षाही दाट झाडी असणार.  डोंगर परिसर व आजुबाजूच्या परिसरात त्याकाळी चांगले जंगलच असणार याची खात्री होते.


सुदुंबरे रस्त्यावरून दिसणारे भामचंद्रावरील मंदिर.


भामचंद्र डोंगर


डोंगरावर जात असताना दाट झाडी


डोंगरावर जात असताना दाट झाडी

      झाडीतला रस्ता संपवून छोटेसं पठार लागत. या पठावरावर दगडांनी बांधलेला चौथरा आहे. वासकरमहाराज या ठिकाणी कीर्तन करीत. तेथून पुढे निघालो या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. पहिल्या गुहेत  शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पाण्याचं टाकंही आहे. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. थोडे पुढे जाऊन जेमतेम एक माणूस वर किंवा खाली येऊ शकेल अशा दगडात पायºया खोदून ठेवलेल्या आहेत. एका बाजूला रेलिंगची सोय केल्यामुळे सुरक्षा वाढली आहे. अंदाजे पन्नास ते साठ पायºया चढून वर गेलो. तेथेही एक छोटी गुहा आहे. आतमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. शेजारीच भिंतीवर तुकाराममहाराजांचे शिल्प कोरलेले आहे. महाराजांचे दर्शन घेऊन पुन्हा खाली आलो. मुख्य गुहेतून खाली आलो. तर आणखीन एक गुहा येथे दिसली. काही विद्यार्थी इथ राहून संतपंरपरेचा अभ्यास करतात.

     


भामचंद्रावरून दिसणारा भंडारा डोंगर व परिसर. उजवीकडे जाधववाडी धरण परिसर

    तब्बल चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी या ठिकाणची परिस्थिती कशी असेल याचा विचार करू लागलो. गर्द हिरवाईने, झाडीझुडपांनी हा प्रदेश सजलेला असले. या डोंगरावरील ही गुहा महाराजांनी का निवडली असेल याचेही उत्तर मिळाले. ते येथील निरव शांततेत. केवळ पक्ष्यांच्या आवाजा व्यतिरिक्त कुठलाही आवाज या ठिकाणी नव्हता. शांतता. अशा शांततेत मन एकाग्र करून तुकाराममहाराजांची समाधी लागत असेल यात शंकाच नाही.

     


शंकराच मंदिर


मंदिरासमोरील मोठी परात


डोंगरावरील पाण्याचं टाकं


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट


मुख्य मंदिराकडे जाण्याची वाट

भामचंद्र डोंगर परिसर विकास समितीने इथं चांगली सुधारणा केलेली आहे. सौर दिवेही लावले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे. डोंगरमाथ्यावरून भंडारा डोंगर दिसतो. लांब देहू गावातील गाथा मंदिरही दिसले.  भंडारा डोंगराप्रमाणेच भामचंद्रावरही पायवाटेवर दोन्ही बाजूला वनखात्याने वृक्ष लागवडी केल्याने अजून हिरवळ व दाट झाडी निर्माण झाली आहे. एकंदरीतच येथील शांत वातावरणात नक्कीच समाधी लागेल असेच हे ठिकाण आहे. डोंगराच्या जवळच जाधववाडी नावाचे छोटे धरण दिसते. तेथून जवळच सुधा नदीचे उगमस्थान आहे, ही नदी जांबवडे,  सुदवडी, सुदुम्बरे, येलवाडी मार्गे देहूतील इंद्रायणी नदीला जाऊन मिळते.  एकदा तरी तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  भामचंद्र डोंगर व शेजारील श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर येऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद घ्यावा आणि निसर्गाचा आनंद घ्यावा.

पावसाळ्यात येथून धबधबा वाहतो.


रेलिंगचा आधार घेऊन येणारे पर्यटक मागे चाकण परिसर

     ईश्वरप्राप्तीसाठी महाराजांनी भंडारा, भामचंद्र व घोरावडेश्वर सारख्या एकांतवास असलेल्या ठिकाणी समाधी लावून विठ्ठलाचे चिंतन केले. एकदा तुकाराममहाराज घरी परत न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा आजुबाजूच्या परिसरात त्यांना शोधू लागले. शोधत-शोधत ते भामचंद्रावर आले. तेथे त्यांना तुकाराममहाराज दिसले.  निवार्णीचा संकल्प करून तब्बल पंधरा दिवस महाराज ध्यान करत होते. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले, ते अंगाला झोंबले व पीडा देऊ लागले. वाघाने झेप घातली. मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. पंधराव्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. साक्षात ईश्वर प्रकट होऊन त्यांचे रक्षण केले. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले, त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरिता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्यानंतर कान्होबांनी येथे तुकोबांची प्रतिमा कोरून घेतली. मूर्तीच्या मागे विंचू व पाठीमागे साप व वाघ कोरलेले आहेत.

साक्षात्काराविषयी तुकाराममहाराज म्हणतात,

पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार ॥1॥
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रम्ही ॥2॥
निर्वाण जाणोनि आसन घातले
ध्यान आरंभिले देवाजीचे ॥3॥
सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले।
पीडू जे लागले सकळीक ॥4॥
दिपकी कर्पूर जैसा तो विराला
तैसा देह झाला तुका म्हणे॥5॥

अशा या निसर्गाने रम्य ठिकाणी महाराजांना अभंग लिहिले.

वृक्ष वल्ली आम्हां सायरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥
येणों सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥2॥
आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेंथे मन क्रीडा करी ॥ध्रु॥

या अभंगाचा येथे प्रत्याय येतो.


वासुली गावाचा परिसर व औद्योगिकीकरण.

वाढते औद्योगिकरण :

गेल्या काही वर्षात भामचंद्र डोंगर समितीचे नाव पेपरात येत आहे. त्याला कारण ही तसेच आहे. चाकण एमआडीसी, नवीन होणारे विमानतळ, तळेगाव एमआडीसी असा हा सर्व परिसर झपाट्याने वाढत आहे. मोठे रस्ते , अनेक विदेशी कंपन्या येथे कंपन्या सुरू करत आहेत. श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात तूर्तास तरी समावेश करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा व पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. मात्र, अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणेच भामचंद्र डोंगराचाही या आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी सेवान्यासाचे संस्थापक मधुसूदन पाटील महाराज यांनी राज्य सरकारकडे केली होती.  काही जमिनींवर खाणमालकांनी जागा खरेदी करून डोंगरचा काही भाग खोदण्यास सुरूवात केली आहे. मधुसुदन महाराजांनी आंदोलन छेडल्यानंतर  हे काम थांबविण्यात आले. शिंदे वासुली गावाजवळ उभ्या होत असलेल्या 'डाऊ' कंपनीच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरले आहेत. वाढते औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास ही पुढची भीती नक्कीच पुढे राहणार आहे.

सुदुंबरे गावातून येणारा रस्ता.


वाट अडवून उभा असलेली गाय.

कसे जावे :

  • पुणे-मुंबईकडून रेल्वेने येत असाल तर रेल्वेमार्गावर तळेगावला उतरून एसटी, अथवा खासगी वाहनाने तळेगाव चाकण रस्त्यावरील संत जगनाडे महाराजांच्या सुदुंबरे या गावापर्यंत येऊन तेथून सात ते आठ किलोमीटरवर भामचंद्र डोंगर आहे. मात्र हा रस्ता  दगडी असल्याने शक्यतो या फाट्याच्या पुढे चाकणहून भामचंद्र डोंगराकडे जाण्याचा रस्ता चांगला आहे.
  • तळेगाव पासून ११ किमी अंतरावर खालुंब्रे गाव आहे. या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण एम. आय. डी. सी. फेज - २ ला जातो. या रस्त्याने हुंडाईचा प्लांट - सावरदरी गाव यामार्गे ५ किमीवरील वसुली नाक्यावर जाता येते.  येथून जवळच डोंगरावर जाता येते.
  • स्वत:चे वाहन असल्यास एक दिवसात देहूगाव, गाथा मंदिर भंडारा व नंतर भामचंद्र, इंदुरीचा किल्ला अशी एक दिवसाची छोटी ट्रिप होईल. भामचंद्र डोंगराच्या पाथय्यापर्यंच वाहन जाते. तेथून पुढे १५ ते २० मिनटे पायपीट करून डोंगरावर जाता येते. शक्यतो अंधार पडायच्या आत डोंगरावरून खाली यावे. वाटेत कुठेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.
  • चाकणमार्गे भामचंद्र पाथया अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

दिसणारा परिसर :

डोंगरावरून देहूतील गाथा मंदिर, भंडारा डोंगर, जाधववाडी धरण परिसर, चाकण परिसर दिसतो.

कोटेश्वरवाडी

 

काही कामानिमित्त तळेगावात गेलो येतो. तुकाराममहाराजांना जेथे सिद्धी प्राप्त झाली त्या भामचंद्र डोंगर पाहण्यासाठी गेलो. वाटेत कोटेश्वरवाडी म्हणून एक छोटेसे गाव लागते. कुंडमळा व इंदोरीचा भुईकोट किल्ला यांच्या मध्यावर इंद्रायणीकाठी असलेल्या कोटेश्वरवाडी येथे पुरातन हेमाडपंती कोटेश्वराचे मंदिर असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.  तळेगाव-चाकण महामार्गावर कोटेश्वरवाडी हे सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेले हे गाव. महाराष्ट्रातील बहुतेक शंकराची प्राचीन मंदिरे ही नदीकाठी तयार गेलेली आहेत. या नदीच्या घाटावर दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी करता यावा हा उद्देश. मंदिराजवळून बाराही महिने  दुथडी भरून इंद्रायणी नदी वाहत असते. इंदोरीच्या हद्दीत दक्षिणेकडे असलेल्या कुंडमळ्यात खालच्या खडकांवर कोसळणाºया पाण्यामुळे तयार झालेल्या खोल दºया व रांजणखळगे मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. जणू काही निसर्गाची कृपाच. हा परिसरही खूपच निसर्गरम्य आहे.
            मंदिरावर कळस नसून मंदिर अगदी नदीच्या काठावर बांधलेले आहे. मंदिराबाहेर नंदी असून, मंदिराला दोन खांब आहे. खांबावर थोड्याप्रमाणात कलाकुसरही केलेली आहे. ग्रामस्थांनी शंकराच्या पिंडीवर तांब्याचे आवरण घातलेले आहे. हे मंदिर जरी खूप प्रशस्त नसले तरी येथील शांत वातावरण व नदीचा परिसर पाहण्यासारखा आहे. नदीकाठावरून भंडारा डोंगर दिसतो.

 कोटेश्वरवाडी

कात टाकून उभा राहतोय : विश्रामबागवाडा

पुण्याने आपल्या वाढत्या आधुनिकतेबरोबर आपले पुरातनपण वास्तू रूपात जपले आहे. शनिवारवाडा, पर्वती, महादजी शिंदेंची छत्री, विश्रामबागवाडा या त्यापैकीच एक वास्तू. पेशवेकाळात पुण्यात अनेक वाडे बांधले गेले. त्यापैकी अनेक काळाच्या पडद्याआड गेले. खुद्द दुसºया बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या राहण्यासाठी व आरामासाठी बांधलेला ‘विश्रामबागवाडा’ सध्या दुरुस्ती व डागडुजीकरणामुळे त्याच्या मूळ रुपात येत आहे. त्या विषयी....



दुसरा बाजीरावांविषयी (थोडक्यात)

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला.  रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा बाजीराव हा मुलगा. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळव्यातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेथे १० जानेवारी १७७५ ला बाजीराव यांचा जन्म झाला. दुसरा बाजीराव म्हणून ते ओळखले जाऊ लागले. वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढले. १७९६ ला पेशवेपद व पेशवे पदासाठी झालेले राजकारण, पेशवेपद मिळणं दरम्यानच्या काळात मराठी सत्तेची अवकळा, ब्रिटिशांकडून ३ जून १८१८ ला धुळकोट येथे शरणागती व त्यानंतरची कानपूरजवळील ब्रह्मावर्तास रवानगी. १८७० रोजी मृत्यू असा बराच मोठा इतिहास या दुसºया बाजीरावांच्या कारकिर्दीत घडला.
दुसºया बाजीरावांविषयी पुढे वेगळा लेख लवकरच...

विश्रामबाग वाड्याविषयी :

पुण्यातील भरवस्तीत असणारा हा विश्रामबाग वाडा. त्यांच्या अनेक कथांनी प्रसिद्ध आहे. दुसरा बाजीरावांचा हे विश्रामगृह. सध्या येथे ‘पुनवडी ते पुण्यनगरी’ हा प्रवास विविध चित्रांच्या माध्यमाने पहावयास मिळतो. काळाच्या पडद्याआड गेलेल्या अनेक वास्तू, त्यांच्या खुणा सांगण्याचा हा चांगला प्रयत्न आहे. ‘पुनवडी ते पुण्यनगरी' या प्रदर्शनात पुण्याचा पुनवडीपासून १७७२ पर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्यानंतर १८५५ पर्यंतचा इतिहास, माहिती चित्रे, नकाशे, छायाचित्रे यांच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. शनिवारवाडयाचा जुना नकाशा, पहिले बाजीरावा, नानासाहेब पेशव्यांनी वसविलेल्या पुण्यातील पेठा, बंदीस्त नळयोजजेसाठी कात्रजवरून आणलेला पाणीपुरवठा, पुण्यातील विविध देवस्थाने, घाट, त्यांचे भौगोलिक स्थान, निर्मितीची प्रक्रिया यांची माहितीही छान व विस्तृत दिली आहे. आहे. वाड्यातील ही सर्व माहिती बघून मन इतिहासकाळात जाते. 





वाड्याचे बांधकाम :

दुसºया बाजीरावाने राहण्यासाठी म्हणून १८०७ रोजी २ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला. वाडा बांधण्यासाठी ६ वर्ष गेली. २६ मार्च १८०३ रोजी वाड्याच्या बांधकामाला सुरूवात झाली. २० नोव्हेंबर  १८०८ रोजी वाड्याची वास्तूशांत झाली.  ३९ हजार चौरस फुटांची ही वास्तू आहे. वाड्याची मूळ जागा पेशवाईतील सरदार हरिपंत फडके यांची. या जागेवर प्रथम बाग होती. शनिवारवाड्यापासून काहीच अंतरावर मोकळ्या जागेत असलेल्या या जागेमुळे ही जागा विकत घेऊन त्यावर सध्याचा वाडा बाजीरावांनी बांधला. १६ फेब्रुवारी १७९७ रोजी बाजीरावांचे सासरे सरदार दाजीबा ऊर्फ हरिपंत फडके यांनी मुलगी राधाबाई हीच्या लग्नात हुंड्याच्या स्वरुपात ही जागा दिली गेली असेही वाचण्यात आले.  वाडा बांधण्यापूर्वी येथे सुंदर अशी बाग होती. बागेची निगा राखणाºया माळ्याचे नाव विश्राम असे होते. तसेच आराम करण्यासाठी ही जागा बांधल्याने याला ‘विश्रामबाग’ वाडा असे म्हणण्यात येऊ लागले. 
            वाड्याचे बांधकाम हे विटांचे आहे.  दुसºया मजल्यावर नृत्यदरबार आहे.  या ठिकाणी पिवळ्या रंगातील मोठे पडदे असून, त्याकाळातील व्यवस्था कशी असेल याचे सादरीकरण केलेले आहे. हॉलच्या मुख्य जागी गादी व शेजारी दोन लोड ठेवण्यात आलेले आहेत. वरती गणपतीची मूर्ती आहे. पडद्यांच्या शेजारील खांबांवर, छतावर बारीक सुंदर नक्षीकाम केलेले आहे.  लाकडी महिरपीतून साकारलेले सुंदर कोरीव खांब असून छतावर नक्षीदार आकृत्या कोरलेल्या आहेत. चौकात लाकडी मोर व वेलबुट्टीच्या नक्षीकामामुळे सुंदरता प्राप्त झाली आहे. संपूर्ण वाड्यात सुरू व सागाच्या लाकडांचा वापर केलेला आहे. वाई येथील नाना फडणवीसांच्या मेणवली  वाड्यात सुद्धा असेच बांधकाम आहे. विश्रामबागवाड्याचे बांधकाम जुने झाले असल्याने वाड्यातील मेघडांबरीत (बाल्कनीमध्ये) पर्यटकांना सध्यास प्रवेश बंद केलेला आहे.  तीन चौक असणारा हा प्रशस्त वाडा असून चारही बाजूंनी मोकळा असा मोठा चौक येथे आहे. वाड्यात अतिथ्यगृह, विश्रामस्थान, भोजनगृह, खलबतखाने अशी विविध दालने आहेत. चौकामुळे सर्व दालनात हवा व उजेड भरपूर प्रमाणात मिळतो. १३ मे १८७९ ला वाड्यात आग लागली. या आगीत पुढील चौकाभोवतीचा इमारतीचा भाग जळाला. मागचा भाग मात्र तेवढा वाचला. त्यावेळच्या बांधकामाशी मिळता जुळता अशा स्वरुपाचा वाडा इंग्रजांनी पुढे बांधला. त्यामुळे या वाड्याला पेशवे व इंग्रज धाटणीच्या बांधकामाचे स्वरुप दिसून येते. सजावटीसाठी लाकडी खांब, तुळ्या, पटई यावर कोरीव काम केलेले आहे. आतील बांधकाम हे लाकडामधील कोरीव काम असल्याने एक प्रकारची भव्यता वास्तूला प्राप्त होते. वाड्यात असलेले काचेच्या हंड्यांमुळे वाड्याची शोभा आणखीनच वाढली आहे. वाडा सजवताना पक्ष्यांच्या आकृत्यांचा वापर केलेला आहे. तेल लावून हे लाकडीकाम चकचकीत करण्यात येत असे. वाड्यात कात्रजच्या तलावातून भूमिगत नळातून पाणी आणून चौकातून कारंजी उडवीत असत. वाड्यात एक छोटी विहिर सुद्धा आहे. सध्या ती बंद केलेली आहे.  
              ब्रिटिशांनी अटक करेस्तोवर बाजीराव ११ वर्ष याच वाड्यात राहत होते. त्यानंतर बिठूरला बाजीरावांची उचलबांगडी होईपर्यंत त्यांची पत्नी वाराणशीबाई राहत होत्या. १८२१ मध्ये वाड्यात वेद व संस्कृत शिकविण्याची शाळा सुरू करण्यात आली.  १६ नोव्हेंबर १८५२ रोजी येथील दिवाणखान्यात महात्मा जोतिबा फुले यांचा इंग्रज सरकारतर्फे मेजर कॅडी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
                दुसºया बाजीराव पेशव्यांनंतर ब्रिटीश सत्तेच्या उदयानंतर प्रथम वाडा जेल म्हणून उपयोगात आणला गेला. त्यानंतर १९३० ते १९५८ दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात होता. सध्या वाड्याच्या तळमजल्यावरील बहुतांश मोठा भाग हा पोस्ट आॅफीससाठी उपयोगात आणला जात आहे. शासकीय ग्रंथालय सुद्धा येथे आहे. तर दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूची जागा वापरण्यासाठी देण्यात आली आहे. यात भारतीय हस्तकला, कपड्यांवरील भरतकाम आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. येथे उपहारगृह आहे.
        दुसºया बाजीरावाने शनिवारवाड्यात नारायणरावाचे भूत वावरते या सबबीखाली बुधवार, शुक्रवार व विश्रामबागवाडा हे वाडे बांधले. कोथरूड, पाषाण येथेही वाडे बांधले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी गड किल्यांना महत्त्व दिले. पुढे १८ व्या शतकानंतर या गडकिल्यांऐवजी जमिनीवर मोठमोठे आलिशान असे वाडे बांधण्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. बहुधा महाराजांच्या काळात धामधुमीमुळे असले वाडे बांधणे संरक्षण दृष्ट्या शक्य नव्हते. पुढे किल्यांची गरज कमी भासू लागल्याने वाडे बांधण्यात येऊ लागले. श्रीमंत व्यापारी, सावकार, सरदार यांनी १८ व्या शतकात आपआपले मोठे वाडे बांधले.

वाड्याच्या आतील विस्तृण चौक व शोभीवंत कारंजे.

महादजी शिंदे यांचे वानवडी येथील छत्रीची प्रतिकृती.


तुळशीबाग मंदिराची प्रतिकृती.




हुबेहुब प्रतिकृती :

          वाड्याच्या मागील बाजूस पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या वस्तूंच्या छोट्या प्रतिकृती तयार करून त्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या विषयी थोडक्यात माहितीही येथे देण्यात आलेली आहे.  पुण्यातील प्रसिद्ध गोखले हॉल, कसबा गणपती, मंडईची जुनी इमारत. फर्ग्युसन कॉलेज, ससून हॉस्पिटल, महादजी शिंदे यांची छत्री, पेशवे दफ्तर अशा वास्तूंचे  छोटे छोटे दरवाजे, खिडक्या व इतर बारीकसारीक गोष्टी या प्रतिकृतींमधून तयार केलेल्या आहेत.
       ऐतिहासिक वारसा असलेल्या या वाड्याचे सध्या नूतनीकरण सुरू आहे. हा वाडा पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार हे निश्चित. वाडा पुण्यातील सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या बाजीराव रस्ता व लक्ष्मी रस्त्यावर आहे. पुण्याच्या कुमठेकर, रस्त्यावर, सदाशिव पेठेत हा वाडा आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. वाड्याच्या समोरच्या बाजूला महाराष्ट्र बँक आहे. पुण्यातील प्रसिद्ध मिठाईवाले चितळेबंधू,  महिलांचे दागदागिने, कपडे यासाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग आहे.  त्यामुळे विश्रामबाग परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. अनेकजण तुळशीबाग, मंडई व विविध कपड्यांची दुकाने यांच्याकडे आवर्जून जातात. परंतु या वाड्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. दुपारच्या वेळी वाड्याच्या ओसरीत ताणून देणारे महाभाग ही येथे आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. पुणे शहराचा इतिहास समजण्यासाठी एकदा आवश्य येथे भेटी द्यावी.

मंडईची प्रतिकृती.











खांबावरील व छतावरील नक्षीकाम


खांबावरील व छतावरील नक्षीकाम






वाड्यातील नृत्यदरबार.




तुळशीबाग परिसर.

Add caption

तुळशीबाग परिसर.


नानासाहेब पेशव्यांनी कात्रजच्या तलावावरून पुणे शहरापर्यंत बंदीस्त पाणीपुरवठा केला होता. त्यांच्या विषयी विश्रांतवाड्यात दोन माहितीपत्रक दिलेले आहेत.






वाहतूककोंडी नित्याचीच :

पुणे शहराच्या मध्यभागी आणि एक महत्त्वाचा रस्ता म्हणून बाजीराव रस्त्याची ओळख आहे. जवळच असलेली तुळशीबाग, मंडई यामुळे हा परिसर नेहमीच खरेदी करणाऱ्यांनी गजबजलेला असतो. त्यातच अरुंद रस्ते व फुटपाथची कमी जागा, या जागेवरच पथारीवाल्यांनी उदरनिर्वाहासाठी मांडलेला त्यांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांचे स्टॉल यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी असते. मोकळा श्वास घ्यायला येथे मोठी मारामारी करावी लागते.

तिकीट दर :

चित्र व प्रतिकृतींच्या माध्यमातून पुण्याचा इतिहास सांगणारा ‘पुणवडी ते पुण्यनगरी’ हा विश्रामबागवाडयातील एक छोटे दालन आहे.
पुणवडी ते पुण्यनगरी पाहण्यासाठी माणसी ३ रुपये असे तिकीट दर् आहे. तिकीट आठवणीने घेणे.

कसे जाल :

पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेटवरून रिक्षा, बसेस या भागात येतात. पुणे स्टेशनपासून अंदाजे ४.५ ते ५ किलोमीटर आहे.

डोंगराच्या कोंदणात लपलेले भीमाशंकर



भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी.....

सरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बºयाच वर्षांनी योग आला. मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहचलो. येथील निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंदणात असल्याने सुमारे ३०० ते ३५० पायºया उतरून मंदिरात जाता येते. गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरवात केली. दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील. आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो. मात्र, डोलीवाल्याने ६०० रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला. मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले. आजुबाजूला चौकशी केल्यावर गाडीतळाशेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले. मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो. कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोरव्हिलर बसेल एवढीच जागा मिळते. शिवाय कच्चा रस्ता, दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट लागण्याचीही शक्यता आहे. आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो. दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो.


गावाचे नाव ‘भीमाशंकर’

इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने 'शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे', असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाºया घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली.


मंदिराविषयी :

हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.  मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.  शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.

भीमाशंकरचा परिसर :

रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपतीघाट किंवा शिडीघाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाºयांसाठी आहे. येथून जवळच असलेला भंडारधरा, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, चावंड, हडसर, आदी किल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. मी १७ वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता. जाम मजा आली होती. त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला. त्यावेळचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला.

वातावरण :

भीमाशंकर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३४५४ फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो-धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित.

पशुपक्षी :

भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे.  वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १९८५ पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे.  निर्सगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. नानाप्रकारचे पशुपक्षी, वेली, झाडे, औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात. रिठा, शिसम, आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, रानजाई, रानतुळस, आपटा, आवळा, अडसुळा, डोंगरची काळी मैना असलेली करवंदे, जांभूळ या ठिकाणी आढळून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहावयास मिळतात. बहुधा हे लोक कातकरी, ठाकर, आदीवासी असतात. किरकोळ किंमतीला ते विविध रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात. याच जोडीला पशुपक्षी देखील पहावयास मिळतात. भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टयÞपूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’. महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरू ला महत्व आहे. छोट्या खारीची ही मोठी बहीणच. त्याचबरोबर बिबळ्या, भेकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प  या प्राण्यांबरोबरच सुतारपक्षी, दयाळ, पोपट, कोतवाल, जंगली कबुतरे, कोकीळ, तांबट, घुबड, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडया, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.

‘वाहतूक कोंडीची समस्या’

भीमाशंकर आधीच धार्मिक स्थळ. त्यात सर्वसामान्य पर्यटकांप्रमाणे ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमुळे हे ठिकाण बाराही महिने गजबजलेले असते. मुख्य भीमाशंकरच्या एसटी स्टॅण्ड पार्किंगच्या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे व संपूर्ण रस्ता एकपदरी (वन वे) असल्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुककोंडी होत असते. बारा ज्योर्तिलिंगची सफर घडविणारे टुरिस्ट मोठ मोठ्या गाड्या या ठिकाणी घेऊन येतात. शाळांच्या सहली, ट्रेकिंग व आमच्यासारखे हौशी पर्यटक या ठिकाणी येऊन आणखीनच गर्दी वाढवतात. तेव्हा श्रावणातील सोमवार, महाशिवरात्र, त्रिपुरी पौर्णिमा व अन्य धार्मिक समारंभ सोडून या ठिकाणी आल्यास कदाचित गर्दी कमी सापडेल. अन्यथा ट्रॅफिक जॅमचा चांगलाच दणका पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयीच्या बातम्या पेपरात अनेक वेळा झळकताना दिसतात.

भीमाशंकर भीमा नदीचे उगमस्थान :

महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाºया भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील ‘डाकिणीचे वन’ या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेतेस्तोवर नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते. 'भीमरथा', 'भीमरथी' ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे  दिसते. त्यामुळे तेथे ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना आदी भीमेच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.

भीमेवरील धरणे :

भीमा नदीवर एकुण बावीस धरणे बांधली आहेत. त्यात डिंबे, कुकडी, चासकमान, उजनी सारखी मोठमोठी धरणे आहेत. भीमेच्या कठावर अनेक मोठी तीर्थक्षेत्रे देखील आहेत.

कसे जावे :

पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून तसेच  नारायणगाव किंवा मंचरहून एसटी बसेस भीमाशंकरला जातात. पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण अंदाजे १२५ किलोमीटर भरते. सकाळी लवकर निघून संध्याकाळपर्यंत एका दिवसात पुण्यात येता येण्यासारखे हे स्थळ आहे. कर्जतहून या ठिकाणी येता येते.  पोखरा घाटातून येताना लाल माती, अवघड वळण, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे गाडीत बसून डोके चांगले हालते. हेलकावे घेत, एकमेकांच्या अंगावर जात आपण भीमाशंकरला येऊन पोहचतो.  गाडी पार्किंगची जागा अजून थोडी सुधारल्यास होणारा मनस्ताप कमी होऊ शकतो. भगवान शंकराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.

प्रशासनाचे कौतुक :

या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते. अनेकवेळा पेपरात या संदर्भातील बातम्या वाचण्यास मिळतात. मी गेलो तेव्हा मंचर पासून ते भीमाशंकरपर्यंतचा संपूर्ण रस्ता डांबरीकरण केल्याने सुसह्य वाटला. वाटेत काहीच ठिकाणी थोडा रस्ता उखडला आहे पण तेवढे पाहिजेच नाही का? प्रशासनाने या ठिकाणी ‘प्लॅस्टिक’, कचरा न करण्याचे आवाहन केलेले जागोजागी लिहून ठेवलेले आहे. त्यासाठी रस्त्यात थांबून जेवणाचा आस्वाद घेणाºया पर्यटकांसाठी रस्त्याच्याकडेला कचरा टाकण्यासाठ आवश्यक त्या सोयी केलेल्या आहेत. एकूणच हे धार्मिक स्थळ इतर धार्मिक स्थळांपेक्षा जास्त स्वच्छ व निर्मळ वाटले हे नक्की.

कसे जावे :

  • पुणे - नाशिक महामार्गावरून मंचर येथून भीमाशंकरकडे जाता येते.
  • मुंबईहून येताना माळशेज घाट, आळेफाटा व तेथून नारायणपूर-मंचर-भीमाशंकर असा रस्ता आहे.
  • पुणे ते भीमाशंकर : १२५ कि.मी.
  • मंचर ते भीमाशंकर : ६५ कि.मी.

अजून काय पहाल :

  • ट्रेकिंग करणाºयांसाठी हे क्षेत्र म्हणजे पंढरपूरच आहे.
  • हडसर, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक गणपती.

आगाखान पॅलेस



पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो.  सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले  गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा  केलेला हा  फेरफटका....


आगाखानांविषयी :  

आगाखान पॅलेस इमाम शाह सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी बांधला. त्यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने १८३० मध्ये  'आगाखान' हा किताब बहाल केला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबईचा. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर सुलतान महंमद शाह  यांचा जन्म कराचीत  २ नोव्हेंबर १८७७ झाला. वयाच्या ८ वर्षी 'आगाखान' झाले.  १९३० मध्ये लंडन येथे  झालेल्या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धांत त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले. ते सुमारे ७२ वर्षे इमामपदावर होते. १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील ही जागा खरेदी केली.  ११जुलै १९५७ ला स्विझरलँडमध्ये  आगाखान निधन पावले.


पॅलेसविषयी :

पुणे-नगररोडवर येरवडाजवळ हे ठिकाण आहे. इटलियन वास्तू आणि वास्तू समोरील सुंदर गार्डन हे त्याचे वैशिष्ट्य. सुमारे १९ एकराचा हा परिसर मोठा सुंदर आहे. शिाया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम, सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे) यांनी १८९२ साली बांधला. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा व त्यातून गोरगरीबांना चार पैसे मिळावेत या उद्दात हेतूने त्यांनी ही वास्तू उभारली. १८९२ मध्ये या राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले व १८९७ मध्ये ते पूर्ण झाले. संपूर्ण वास्तू बांधण्यासाठी त्या काळात १२ लाख रुपये खर्च आला. त्यातून एक हजार लोकांना रोजगार मिळाला. पुढे ‘आगाखान पॅलेस’ म्हणून या वास्तूला ओळखले जाऊ लागले.  मोठे प्रवेशद्वार व डोळ्यात मावणार नाहीत असे मोठे व्हरांडे. गच्ची व कौलारू छपरामुळे या वास्तूला देखणेपण आले आहे. मुस्लिम, इटालियन, ब्रिटिश, रोमन, फ्रेंच अशा विविध स्थापत्यकारांच्या बांधकाम  शैलींचा अनोखा संगम या ठिकाणी दिसून येतो. कमानीदार स्तंभ, नक्षीकाम, इटालियन पद्धतीचे कारंजे, जाळीदार कमानी, वेलबुट्टी, उंची गालिचे, महात्मा गांधी, कस्तुरबा, आगाखान यांची भव्य तैलचित्रे, काचेची मोठी झुंबरे लक्ष वेधून घेतात. वाड्यात इमाम सुलतान महंमद शाह त्यांचे सुपूत्र अलिखान, मौलाना हजल इमाम शाह करीम अली हुसैन यांचे वास्तव्य येथे काही काळ होते.
                दुसºया महायुद्धात ब्रिटिश सरकारने ‘भारत सुरक्षा कायद्या’ अंतर्गत ही वास्तू ताब्यात घेतली.  १९४२ मध्ये ‘चलेजाव चळवळ’ सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी महात्मा गांधीजी, त्यांची पत्नी कस्तुरबा, गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई तसेच काही काळानं गांधीजींच्या शिष्या मीराबेन आणि वैद्यकीय सल्लागार डॉ. एम. डी. डी. गिल्डर यांनाही येथे बंदीवासात (नजरकैदेत) ठेवले होते. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नी प्रभावती, सरोजिनी नायडू यांनाही काही काळ येथे ठेवण्यात आले होते. दि. ९ आॅगस्ट १९४२ ला म. गांधीजींची कैद सुरू झाली. याच दरम्यान गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई १५ आॅगस्ट १९४२ रोजी हृदयविकाराने मृत्यू पावले. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी गांधीजींच्या पत्नी कस्तुरबांजींचे निधन झाले. या दोघांच्या समाध्या येथे जवळच आहेत.  समाधींच्या जवळच गांधीजींच्या अस्थींचा काही भाग असलेला कलश तुळशी वृंदावनाखाली ठेवलेला आहे.  १९६९ मध्ये राजपुत्र शाह करीम अल हुसेनिम आगाखान (चौथे) यांनी ही वास्तू राष्ट्राला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २२ फेब्रुवारी १९६९ रोजी पॅलेस ' महात्मा गांधी स्मारक निधी ' कडे सुपूर्द केला गेला. कस्तुरबांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त हा पॅलेस देशास सुपूर्द करण्यात आला. सध्या या पॅलेसची देखभाल भारतीय पुरातत्त्व खात्याअंतर्गत सुरू आहे. २००३ रोजी हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आणि संरक्षित करण्यात आले आहे.

आगाखान पॅलेसमध्ये काय पहाल :

या वास्तूत महात्मा गांधी, कस्तुरबा यांच्या वापरातील  ठेवण्यात आल्या आहेत. आभाबेन गांधी यांनी भेट  स्वरुपात १९८८ ला काही वस्तू दिल्या आहेत. महात्मा गांधीजींच्या वास्तव्य असलेल्या या वास्तूत गांधीजींच्या चपला, पलंग, दैनंदिन वापरातील भांडी, चरखा, सूतकताईचे साहित्य, भारतीय बैठक, लिहिण्याचे व जेवणाचे टेबल, कस्तुरबांजींची साडी काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. या शिवाय गांधीजींचे शिल्प, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या सेनानींचे अर्धपुतळ्यांमध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महादेवभाई देसाई, कस्तुरबा गांधी यांचे पुतळे आहेत.
याच बरोबर स्वातंत्र्यपूर्वकाळातील कृष्णधवल गांधीजींची छायाचित्रे आहे. सध्या येथे महात्मा गांधी सोसायटीचे कार्यालय आहे. महिलांसाठी येथे कार्य चालते.

                

पुणे पूर्वीसारखी शांतता हरवू लागले आहे. गोंगाट, गर्दी, प्रचंड वाहतूक व त्यातून होणारी कोंडी शहरात  सर्वत्र दिसून येते. मात्र, या ठिकाणी असलेल्या शांत व सुंदर परिसरामुळे या सर्वांचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना व मोठ्यांनाही गांधीजींचा थोडा इतिहास येथे नक्कीच शिकायला मिळेल.

  • कसे जाल : येरवड्यापासून २ किलोमीटर अंतरावर, पुण्यातील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत असल्यामुळे सर्वांच्या परिचयाचे आहे. रिक्षा, बसेस जातात. पुणे स्टेशनवरून जवळ.
  • प्रवेश फी : प्रत्येकी ५ रुपये, लहान मुलांना मोफत.
  • परदेशी पाहुण्यांसाठी १०० रुपये.
  • वेळ : वर्षभर खुले.

पुणेकरांची आवडती ‘पर्वती’



पुण्यात राहून पर्वतीला गेला नाही असा पुणेकर सापडणे अवघडच. सिमेंट क्राँकिटच्या वाढल्या जंगलामुळे पर्वती टेकडी लांबून दिसणे जरा अवघडच बनली. पूर्वी लांबून सहजरित्या दिसणारी पर्वती बांधकामांमुळे दिसेनाशी होत आहे. संध्याकाळी  व्यायामासाठी येणारे असंख्य पुणेकर व पर्यटकांमुळे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पर्वती गजबजलेली असते. टेकड्यांवरील अवैध बांधकामांचा मध्यंतरी प्रश्न उभा राहिला होता. या टेकडीला सुद्धा हा प्रश्न सतावू लागला आहे. अशा या पर्वती टेकडीवर केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत. मनाला थोडा विरंगुळा व व्यायाम असेच या टेकडीकडे पाहिले जाते. लहानपणी पर्वतीवर अनेक वेळा गेलो.  शर्यती लावून पर्वतीवर पोहोचयचे हा आमचा आवडता कार्यक्रम. आज बरेच वर्षांनी ‘फेरफटका’ करण्याच्या निमित्ताने पर्वतीवर गेलो. त्या विषयी.....

टेकडीविषयी :

मुळा-मुठेच्या संगमावर असलेल्या पुण्याला अनेक छोट्या-मोठ्या टेकड्या लाभल्या आहेत. या टेकड्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. चतु:श्रृंगी, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, फर्ग्युसन कॉलेजमागील टेकडी अशा टेकड्यांनी पुणे शहर वेढलेले दिसून येते.  या टेकडीची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे २१०० फूट आहे. माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत.  टेकडीवर पोहचण्यासाठी सुमारे १०३ ते १०५ पायºया चढल्या की १५ ते २० मिनिटात आपण वर पोहोचतो. पेशवेकाळात परिसरात हिरवीगार दाट झाडी, तुरळक वाड्यावस्त्या होत्या. टेकडीच्या पायथ्याच्या परिसरात सपाट मैदान असल्याने पेशव्यांचे सरदार व त्यांचे घोडदळ या ठिकाणी तळ देत असत. पुढे नानासाहेबांनी पर्वतीवर मंदिर बांधून या टेकडीला अजून नावारूपास आणले.  कालांतराने लोकसंख्या वाढल्याने या टेकडीच्या परिसरात प्रचंड बांधकामे सुरू झाली. टेकडीला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडायला वेळ लागला नाही. बघता बघता हा सर्व परिसर बांधकामांनी भरून गेला.

टेकडीवरील मंदिर उभारणी :

थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांची कारकिर्द म्हणजे १७४०-१७६१ या कारकीर्दीत पुणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानचे मध्यवर्ती केंद्र बनले होते.  पेशव्यांनी पुणे शहराची व मराठी राज्याची आर्थिक घडी नीट बसवली.  पुण्याचा विकास व सुशोभीकरण करताना नानासाहेब पेशव्यांनी पर्वती देवस्थान व सारसबाग वसवली. या पाठोपाठच पुण्यातील अनेक पेठा, वाडे, मंदिरे, रस्ते, हौद यांचा विकास केला.

‘देवदेवेश्वर’

२३ एप्रिल १७४९ साली नानासाहेबांनी ‘देवदेवेश्वर’ मंदिर बांधले व नाव दिले ‘पर्वती’. नानासाहेबांनी प्रतिष्ठा केलेल्या शंकराच्या पिंडिला ‘देवदेवेश्वर’ असे नाव दिले. देवस्थानचा उभारणीचा आरंभ जरी नानासाहेबांनी केला असला तरी दुसºया बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत पायºया बांधल्या गेल्या. भारतातील सर्वच मंदिर उभारताना ज्योतिष व खगोलशास्त्राचा वापर झाल्याचे दिसून येते. याही ठिकाणी २२ मार्च व २३ सप्टेंबरला सूर्याेदयाच्या वेळी सूर्यकिरण शिवपिंडीवर पडतात. हे पाहण्यासाठी काहीच अवधी असतो. मात्र, यावेळी चांगलीच गर्दी होते. मुख्य मंदिराच्या बाहेरील चारही कोपºयांवर सूर्यनारायण, गणेश, पार्वती आणि जनार्दन विष्णू यांची छोटी मंदिरे आहेत. पूर्वी मंदिराच्या व्यवस्थेसाठी पेशव्यांच्या दरबारातूनच रकमेची व्यवस्था करण्यात येत असे. सवाई माधवरावांची मंजुही या मंदिरात झाल्याची नोंद इतिहासात सापडते. कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा आदी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमे दिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते.  तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. १५ जुलै १९३२ ला मंदिरातील मूर्तींची चोरी झाली. या चोरीचा तपास मात्र लागला नाही. त्यानंतर ब्रासपासून तयार केलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. १७६१ला पानिपताच्या तिसºया लढाईत मराठी साम्राज्याची प्रचंड हानी झाली. मुलगा विश्वासराव व भाऊसाहेब गेल्यामुळे खचून गेलेल्या नानासाहेबांनी जून १७६१ पर्वतीवर ‘‘भाऊ भाऊ...’’ करीत देह ठेवला. मंदिराच्या बाहेरील बाजूस नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे.  पर्वतीवर अनेक थोरांचे पाय लागले. नाना फडणवीस, भाऊसाहेब, पाहिले माधवराव, महादजी शिंदे, रामशास्त्री, दुसरा बाजीराव, पेशवे घराण्यातील स्त्रिया येथे दर्शनासाठी नेहमीच येत असत. दुसºया बाजीराव पेशव्यांनी खडकी येथे सुरू असलेली ब्रिटीशांबरोबरची लढाई याच पर्वतीवरून पाहिल्याची नोंद आहे.

पेशवे  संग्रहालय :

     मुख्य मंदिरा शेजारी नानासाहेब पेशव्यांचे स्मारक आहे. त्या शेजारी १७९५ रोजी बांधलेल्या वाड्यातील काही भागात  पेशव्यांचे संग्रहालय उभारले आहे.  मराठी साम्राज्याच्या असंख्य बºयावाईट घटनांची साक्षीदार राहिलेल्या पर्वती टेकडी वर चित्रकार जयंत खरे यांनी पेशवे  संग्रहालयाची उभारणी केली आहे. या संग्रहालयात मराठा  साम्राज्यातील अनेक सुंदर वस्तूंचा संग्रह मांडला आहे. १० रुपये तिकीट देऊन आपण हे संग्रहालय पाहू शकतो.
       मराठा राजवटीतील वापरण्यात येणारी ‘नाणी’, ब्रिटीशकालीन नाणी, विविध प्रकारच्या तलवारी, ढाल, विविध हत्यारे, बंदूका याच बरोबर पेशवे घराण्यातील व्यक्तींची चित्रे व त्यांची थोडक्यात माहिती वाचण्यास मिळते. शनिवारवाड्याचा नकाशा, १७९१ नुसार पुण्यातील विविध बागांची नावे जसे की, हिराबाग, सारसबाग, वसन्तबाग, मोतीबाग, पर्वतीबाग, वानवडीचीबाग, हिंगण्याचीबाग, रमणबाग, वडगावबाग, माणिकबाग, पाषाणबाग, कात्रजबाग आदी बागांची नावे येथे वाचण्यास मिळतात. पेशवेकालीन दरवाज्यांना लावण्यात येणारी कुलपे, अभ्यासासाठी वापरण्यात येणारी धुळपाटी, विविध पगड्या, हत्तीचा पाय. याच बरोबर तांदूळ, गहू व कडधान्यांचे त्यावेळेचे दरपत्रक पाहून आश्चर्य वाटते. बºहाणपुरचे सरदार भुस्कटे यांच्या वाड्यातील खांब व खिडक्यांच्या चौकटी येथे आणून या संग्राहलयाची शोभा अजून वाढवलेली आहे. पर्वती व पुणे शहराची जुन्या काळातील छायाचित्रे हे सारे पाहत असताना नकळत मन इतिहासात रमते व वेळ कसा जातो हे समजत नाही. 

‘मॉर्निंग वॉक’

पुणे शहर हे पर्वती टेकडीच्या चारही बाजूला पसरलेले शहर आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. हे जाणूनच पुणेकर रोजच्या धकाधकीतही सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करून ताजेतवाने होण्यासाठी पर्वतीवर येतात.  पर्वती म्हणजे हक्काची व्यायामशाळाच बनली आहे. पर्वतीवर अनेक विक्रम केले गेलेले आहेत. तीन तासात टेकडी २१ वेळा चढणे, ७ तासात ४४ वेळा चढणे याच बरोबर अनेक सामाजिक संघटना अबालवृद्धांसाठी टेकडी चढण्याच्या स्पर्धा होतात. पुणे शहराचा विस्तार या निसर्गरम्य ठिकाणाच्या जवळ झाल्याचा हा फायदा सध्या पुणेकर उठवत आहेत.  व्यायामाच्या निमित्ताने या टेकडीस वषार्नुवर्षे भेट देणारे अनेक पुणेकरांचा दिनक्रम येथून सुरू होते ते येथील हिरवीगार वनराई, टेकडीवरील वारा, स्वच्छ हवा  (?) घेऊनच. पण मी गेलो तेव्हा संध्याकाळी येथील पायºया चढत असताना एक प्रकारचा घाणेरडा वास जाणवत होता. बहुद्या टेकडीला पडलेल्या विळख्याचा हा परिणाम असावा. असो.


‘मॉर्निंग वॉक’ दुसºयांना ‘ताप’

तर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या टेकडीवर सकाळी व सायंकाळी व्यायामसाठी येतात. बरं नसते चालत जाऊन पर्वतीवर जाणे इतपत ठिक आहे. मात्र, काहीजण आपण पायºया चढत असताना हश्श हुश्श करत जोरात पळत जातात अचानक मागून आलेल्या या महाभागाचा धक्का लागून वा गांगरून वृद्ध व्यक्ती पडलेल्या मी पाहलेल्या आहेत. काही जण याही कहर म्हणून की काय पायाने पर्वतीवर लंगडी घालताना दिसून येतात. पायºया उलट्या उतरणे, मोकळी जागा पाहून योगाभ्यासाचे नाना प्रकार करणे. हा व्यायाम प्रकार करत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहतो आहे का ? नाही  याचे भान न ठेवता व तेही ‘अर्धी पॅन्ट’ व आता खाली वाकला तर पॅन्ट फाटेल की काय? अशी पाहणाºयाला उगाचच भीती देत घाबरवत आपला व्यायाम करत असतात.  हे व्यायाम करताना नवीन येणाºया पाहुण्यांना, पर्यटकांना  व विशेष करून स्त्रियांना हे विचित्र वाटते व हसूही येते. पण वाढते प्रदूषण, वाढती लोकसंख्या व अपुरी जागा यामुळे याला पर्याय नाही असेच वाटते. तरी सुद्धा याचे भान ठेवायला पाहिजे हे मात्र, नक्कीच. पर्वतीवर गेल्यावर तळजाई टेकडीवरही जाता येते त्या विषयी पुन्हा कधीतरी

पर्वती मंदिराचा परिसर :

मुख्य देवालयाचे प्रवेशद्वार भव्य आहे. दोन्ही बाजूस द्वारपाल म्हणून भैरवांच्या मूर्ती असून त्यांची स्थापना मात्र, १९८४ मध्ये केलेली आहे. मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी पायºया आहेत. अर्ध्या तासासाठी ५ रुपये नाममात्र तिकीट घेऊन येथे जाता येते. या सज्जावरून पुणे शहराचे विहंगम दर्शन घडते. मनपा भवन, स्वारगेट एसटी स्टॅण्ड, सारसबाग, खालून वाहणारा कॉनॉल येथून छान दिसतो. सुर्याेदय व सुर्यास्त या ठिकाणी सुंदरच दिसतात.  दिवाळीतील किल्ल्यात दाखवलेल्या शहराप्रमाणे पुणे शहर दिसते. मोठ मोठे ट्रक, कार सुद्धा अगदी छोटे खेळण्यातल्या गाड्यांसारखे दिसतात. सूर्यास्तानंतर लखलखणारे पुणे शहर पाहण्यासारखे असते. देवळाच्या अंगणात जमिनीखाली भुयारात जाणारा रस्ता आहे.  हा रस्ता तळघरात जातो व पुढे शनवारवाड्यावर निघतो असेही बोलले जाते. मात्र हे खरे नाही. खाली एक चौकोनी खोली असून तिचा उपयोग बहुधा कोठारासारखा केला जात असावा. सध्या या भुयारावर कुंपण घातले आहे.

जुनी पर्वती व पुणे कसे होते. या विषयी अनेक दुर्मीळ छायाचित्रे सध्या उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे ब्रिटीश राजवटीतील आहे. त्यापैकीच पर्वतीची ही छायाचित्रे. 

गतकाळाचे वैभव व आधुनिकतेची साक्ष ठरलेल्या या पर्वतीवर फिरावयास येणाºयांनी येथील इतिहासाचें स्मरण नक्कीच ठेवायला पाहिजे.

  • पर्वती टेकडी पाहण्याची वेळ  : पहाटे ५ ते रात्री ८ पर्यंत.
  • तिकीट दर :
  • मंदिराच्या सज्जावरील गच्चीसाठी प्रत्येकी ५ रुपये अर्धा तासाकरिता.
  • पेशवे संग्राहलय : सकाळी ७.३० ते रात्री ८ पर्यंत. प्रत्येकी १० रुपये.
  • टीप :  पेशवे संग्रहालय निवांत पाहण्यासाठी किमान २ तास तरी वेळ राखून ठेवावा. पर्वतीवर पोहचण्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरतात.  संग्रहालय परिसरात व मंदिरात फोटोग्राफीसाठी बंदी आहे.
  • अजून काय पहाल : शनिवारवाडा, सारसबाग, केळकर संग्रहालय, विश्रामबाग वाडा, मंडई परिसर, तुळशीबाग, दगडू शेठ गणपती, केसरी वाडा, चतृश्रृंगी.
  • कसे जाल : स्वारगेटला उतरल्यावर रिक्षा अथवा पायी अथवा कोणाला तरी विचारात व आकाशाकडे नजर ठेवल्यास नक्कीच सापडेल न सापडल्यास येथे विचारा की?
  • अंतर :  डेक्कन जिमखाना : अंदाजे ४ किलोमीटर,
  • स्वारगेट ते पर्वती : 2 किलोमीटर.

मोरया गोसावी समाधी मंदिर

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे नावारुपाला आलेले आहे. याच पुण्याच्या जवळ सुमारे २० किलोमीटरवर भक्तीशक्तीची परंपरा जपणारे चिंचवड हे छोटेसे पूर्वीचे गाव. चिंच व वडाची झाडे पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात होती. त्यावरून चिंचवड हे नाव पडले. सध्या मात्र इमारतींच्या जंगलामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाली. नवे पूल, नवे रस्ते, उंच इमारतींमुळे ही झाडे काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत. मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. याचबरोबर क्रांतिकारक चापेकरांचीही भूमी आहे. या मंदिरापासून काहीच अंतरावर चापेकरांचा वाडा आहे. 

चिंचवड गावाचा उल्लेख शिवाजीमहाराज व पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तऐवजात सापडतो. चिंचवडला महान साधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. मंगलमूर्ती वाडा व मोरया गोसावी समाधी मंदिर आहेत. गणेश भक्तीसाठी गावकºयांनी मोरया गोसावी यांना ही जागा उपलब्ध करून दिली. याच कालखंडात निजामशाही, आदीलशाही यांच्याकडून मोरया गोसावी यांना वतनरूपी सदना मिळाल्या. पूर्वी गावाला तटबंदी होती. गावात अन्नछत्र सुरू झाले. हजारो गोरगरीब, रंजले गांजलेले, श्रीमंत लोक सुद्धा मोरया गोसावींच्या दर्शनासाठी येऊ लागले. पुढे छत्रपती शिवाजीमहाराज, पेशवे, होळकर यांनीही महाराजांना गावे, जमिनी इनामी दिल्या. चिंचवड देवस्थानाला रुपया मोहरा पाडण्यास टंकसाळ दिली. पेशव्यांचे कुलदैवत गजानन असल्यामुळे अष्टविनायक गणपतीच्या मंदिराचा विकास झाला. साताºयाचे शाहूमहाराज, तुकाराममहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज या ठिकाणी दर्शनासाठी येत असते.

           हे मंदिर सुमारे ३० बाय २० फूट आकाराचे आहे.  शेजारून पवना नदी वाहते. पावसाळ्यात पूर आल्यास अथवा पावसाळ्यात पवना धरणातून पाणी सोडल्यास या नदीला पूर येतो. अर्थातच हे मंदिर अर्धे पाण्याखाली जाते.  दगडी आणि साध्या बांधणीचे हे मंदिर आहे . सभामंडपाच्या मागे गणेशभक्त श्री  मोरया गोसावी यांनी १६५५ ला जिवंत समाधी घेतली.  त्या समाधीवरच १६५९ ला चिंतामणी गोसावीमहाराजांनी मंदिर बांधले.  पवनेकाठी असलेल्या या मंदिरात मोरया गोसावींची पुण्यतिथी डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत मुख्य महोत्सव म्हणून साजरी केली जाते. सध्या देवस्थान विश्वस्तांच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालतो. याचबरोबर मोरगाव, थेऊर व सिद्धटेक या अष्टविनायकांच्या मंदिराचे व्यवस्थापन श्री मोरया गोसावी मंदिराकडे आहे.  मंदिराच्या बाहेरील बाजूस पूजासाहित्य विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. या मंदिरापासून काहीच अंतरावर देऊळवाडा आहे.  अरुंद रस्त्यांमुळे या ठिकाणी यात्रेच्या काळात भाविकांची गैरसोय होते. वाढते औद्योगिकीकरणामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीमुळे या ठिकाणी लोकवस्ती वाढली आहे. नवीन येणाºया नागरिकांना व खुद्द चिंचवड येथील स्थानिकांनाही देखील इतिहास व धार्मिकता यांचे महत्व नसते. माझ्या या फेरफटकाचा उपयोग अशा लोकांसाठी नवीन माहिती म्हणून उपयुक्त ठरेल.

कसे जाल :

  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथून चिंचवडगावाकडे जाणारा रस्ता आहे.
  • तसेच देहूरोड-कात्रज बायपासवरून डांगेचौकात येऊन येथे येता येते.

बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय


घरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले सर्पोदयान पाहण्याचा आज सकाळी विचार आला मग काय मुलाला घेऊन सर्पोदयानाचा रस्ता धरला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या सहल केंद्रातील एक प्रकल्प आहे.  शाहूनगर (चिंचवड) येथे हा प्रकल्प आहे. शहराची वाढती लोकसंख्या याही ठिकाणी आपणास पाहयला मिळते. पूर्वी आजूबाजूचा परिसर रिकामा होता. आता जिकडेतिकडे इमारती, सुंदर बंगले उभे राहिले आहे.
निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान हे लहान मुलांचे आकर्षण आहे. येथे माकड, साप, मोर, मगर, बिबटय़ा, पोपट, गव्हाणी घुबड अन्य पक्षी पाहायला मिळतात. सायंकाळी पावणोसहा वाजता उद्यान बंद होत असल्याने लहान मुलांना उद्यान बघता येत नाही. मे महिन्याच्या सुटीत देखील उद्यानाची वेळ कमी असते.  कात्रज सर्पोदयानापेक्षा येथे प्राणी कमी आहेत. मात्र, जास्त न चालता ब:यापैकी प्राणी पाहाण्यास मिळण्याचा आनंद घेता येतो. आजुबाजूला सुंदर झाडी लावली आहे. लहान मुलांसाठी खेळणी सुद्धा येथे आहे. उद्यानात सध्या सापांसाठी दोन मोठे कुंड आहेत. सापांचे प्रजोत्पादन केंद्र, एक प्रयोगशाळा व तात्काळ सेवा केंद्र असे विभाग आहेत. प्राण्यांसाठी स्वतंत्र दालन व पक्षांसाठी ¨पज:यांची व्यवस्था आहे.

सर्पोद्यान पिंपरी-चिंचवड परिसरात आढळलेले साप, कासव, दुर्मिळ पक्षी आणून त्यांच्यावर उपचार करून पुन्हा निसर्गात सोडून देण्याचे चांगले काम होत असते. सर्पमित्र या कामात मदत करतात. सर्पोदयानाचे संचालक अनिल खैरे आहेत. दरवर्षी नागपंचमीला या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण साजरा केला जातो. सापांबद्दल असलेल्या गैरसमजूती व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम यावेळी केले जाते.  परिसरातील अनेक शाळांची सहल या ठिकाणी नेहमीच येते. त्यामुळे लहान मुलांची गर्दी या ठिकाणी नेहमीच आढळून येते.

कसे जावे :

पुण्याहून येणार असला तर पुणो-मुंबई रस्त्यावरून मोरवाडीमार्गे (पिंपरी) केएसबी चौकातून डाव्या बाजूला वळून पुन्हा निगडीकडे जायला लागायचे. बर्ड व्हॅली रस्त्यावरच आहे. तेथून थोडे पुढे गेली की वृंदावन सोसायटीकडे जाण्याचा मार्ग आहे. उजव्या बाजूला बहिणाबाई सर्पोद्यानाची पाटी दिसते. नवीन माणसाला थोडे चुकण्याचा संभव आहे. म्हणून कमलनयन बजाज शाळेमागे पोहचल्यावर रस्ता विचारायला हरकत नाही. मुंबईकडून थरॅमक्स चौकातूनही येता येते.

अजून काय पाहाल : 

सर्पोदयानापासून पुढे भक्तीशक्ती शिल्प, बॅर्ड व्हॅली, शिरगावचे साईबाबा मंदिर, देहूगाव, असा एक दिवसाची मस्त भटकंती होऊ शकते.  सर्पोदयान पाहायला 1 तास पुरेसा होतो.

तिकीट दर व वेळ  : 

  • उद्यानाची वेळ सकाळी 10.30 ते 5.30 (दुपारी 2 ते 3 बंद) मंगळवारी बंद. 
  • लहान मुलांसाठी 5 रुपये (वय 12 वर्षाआतील), प्रौढांना : 10 रुपये प्रत्येकी  अशी आहे.

मावळसृष्टी


पर्यटकांच्या भटकण्याच्या यादीत कोकण, महाबळेश्वर, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. या नेहमीच्या या ठिकाणांऐवजी एखाद्या नव्या व निवांत ठिकाणी हिंडायला प्रत्येकालाच आवडते. नेहमीच्या पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असतो. पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर असलेल्या लोणावळा-खंडाळा परिसरातील मावळातील पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ लागला आहे. येथील ऐतिहासिक किल्ले, पवना, भुशी डॅम, धबधबे, नवीन उभारण्यात आलेली मंदिरे पाहण्यासाठी पर्यटक येथे येऊ लागला आहे. निर्सगाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण या परिसरावर केली आहे. मावळातील काही परिसर सोडला तर पर्यटनदृष्टया हा परिसर उपेक्षित राहिला आहे त्या विषयी.... 

सध्या विकएंड साजरा करण्याचा प्रघात आपल्याकडेही सुरू झाला आहे. दोन-चार दिवस सलग सुटी आल्यास घरातील मंडळी कुठे तरी बाहेर जाण्याचा बेत आखतात. मग चर्चा सुरू होते ती नवीन ठिकाणे पाहण्याची पण तिच तिच ठिकाणे पाहून कंटाळलेल्या पर्यटकांना नवे पर्यटनस्थळ पाहिजे असते. अशीच काही पर्यटन स्थळे त्यांचे स्वागत करण्यासाठी मावळात आहेत.  त्यातच पुण्याला पर्यटननगरीचा दर्जा मिळाल्यानंतर देशी- विदेशी पर्यटकांची पावले आपोआप वळू लागली. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या ठिकाणांना आणखीन एक नवा पर्याय म्हणून ‘लवासा’, सहारा सिटीसारखे मानवनिर्मित शहरे स्वागतासाठी तयार होऊ लागली आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यातील सैनिकांना मावळे म्हणत. हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या या मावळ्यांना ‘मावळे’ हे नाव पडले ते ‘मावळ’ सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोºयात पसरलेले आहे. सह्याद्रीला खेटून आणि देशावरचा भाग डोंगरावरून उतरणाºया नदीचे खोरे  म्हणजे  मावळ.  पुणे जिल्ह्यात एकूण बारा मावळ आहेत. यात आंदर मावळ, कानद मावळ, कोरबारसे खोरे, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौड मावळ, मुठा खोरे, मुसे खोरे, रोहिड खोरे, वळवंड खोरे, हिरडस मावळ यांचा समावेश होतो.  यातील तीन मावळ लोणावळा-खंडाळा परिसरात येतात ते म्हणजे आंदर, पवन आणि नाणे मावळ. पवन मावळात पवना नदी उगम पावते आणि वाहते म्हणून याला पवन मावळ म्हणतात. मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले या परिसरात आहेत. तर कार्ला, भाजे, बेडसे या बौद्धकालीन लेण्या देखील आहे. एकविरा देवी, भंडारा डोंगर, भामचंद्रा डोंगर, तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली देहूनगरीही या परिसरात आहे. पवनामाई व इंद्रायणी नदी या परिसरातून वाहते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील १७ नवीन पर्यटन स्थळांना ‘क’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.  या यादीत मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला,  तुंग आणि तिकोना किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. या किल्यांच्या विकासासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच्या वतीने वीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. पुरातन लेणी म्हणून ओळखल्या जाणाºया कार्ला लेणीला ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने कार्ला येथे सुमारे ३ कोटी ६६ लाख रुपये खर्च करून जलक्रीडा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.  पर्यटनातून या भागातील लोकांना रोजगार मिळावा तसेच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

मावळात वर्षाविहाराचा आनंद

पर्यटकांना आकर्षित करणारे मोठे जलाशय तर मावळचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पवना, वळवण, आंद्रा, भुशी, तुंगार्ली, शिरोता, ठोकळवाडी, वडीवळे धरणे मावळच्या समृद्धतेची साक्ष देतात.   पावसाळ्यात मावळातील निसर्गसौंदर्य बहरू लागते. डोंगरातून धबधबे खळाळून वाहू लागतात व आपसूकच पर्यटकांचे पाय धरण क्षेत्राकडे वळतात. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी सुटीच्या दिवशी या परिसरात पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात दहा लाखांहून अधिक पर्यटक लोणावळ्याला येतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की, जेली खरेदीसाठी येथील दुकानांतून ग्राहकांची गर्दी असते. धरणाच्या जलाशयात बोटिंग व्यवसाय, गाइड, फोटोग्राफी यांसारखे व्यवसाय सुरू झाले आहेत. या देखण्या परिसरामध्ये नौकाविहाराचीही व्यवस्था सुरू करण्यात झाली आहे. एक दोन दिवस निवांत पाहण्यासारखी ठिकाणे या परिसरात असताना लोणावळा व खंडाळ्यातील मोठ्या हॉटेलचे दर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारसारखे आहे. हे दर आवाक्यात आल्यास या भागात येणाºया पर्यटकांची संख्या वाढू शकेल. यामुळे पर्यटक लोणावळा खंडाळ्यापुरताच मर्यादित न राहता उर्वरित  मावळातील पर्यटनाला चालना मिळू शकेल. संततधार पाऊसाने मावळातील आतील गावातील रस्ते खराब होतात. काही गावांचा संपर्कही तुटतो.  पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून  आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजन ढासळते. पावसाळ्यात तर पोलिसांना गर्दी आवरता येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव येथे आलेल्या पर्यटकांना घ्यावा लागतो. यातून होणाºया दुर्घटना, पाण्यात वाहून जाणे, किरकोळ वादावादी आदी दुर्घटनांना पर्यटकांना सामोरे जावे लागते.
 आंदर मावळ व नाणे मावळाच्या परिसरातील नव्या नैसर्गिक स्थळांचा शोध घेत पर्यटक येथे पोहचू लागला आहे. उंच डोंगर, शांत वातावरण, हिरवाईमुळे बॉलीवूडमधील चित्रपट निर्मातेही या भागाकडे आपला मोर्चा वळवितात. अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या भागात करण्यात आले आहे.  नाणे व आंदर मावळामध्ये खास पावसाळ्यातील निर्सगाची देखणी सजावट पाहण्यासाठी या भागात येतात.

ट्रेकर्स लोकांची पंढरी

थंड हवेचे ठिकाण म्हणून ‘लोणावळा-खंडाळा’ प्रसिद्ध आहेच. पण तरुणांच्या आवडत्या ट्रेकिंगसाठीही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मावळातून कोकणात उतरणाºया पायवाटा व मोठे घाटरस्ते आहेत. पावसाळा सुरू झाला की तरुणांच्या चर्चेत येतो तो लोणावळा खंडाळाचा परिसर. हिरवागार डोंगर, हिरवी-पोपटी भातखाचरे, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे व सोबतीला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील शिवाजीमहाराजांचे गडकोट. त्यांना येथील निर्सग वेड लावतो. मग वेडे होण्यासाठी भटक्यांची पावलेही या मावळाकडे वळतात. लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ला, ढाकचा बहिरी म्हणजे ट्रेकर्स लोकांची पंढरीच. कुणी इथल्या लेण्या-दुर्गावर निघतात, काही इथल्या धरणांवर विसावतात, काहींना फक्त इथल्या वाटांवर फिरण्यात मजा वाटते. विविध जातीची फुले, पक्षी पाहण्यात वेळ निघून जातो. हाडशी जवळील सत्यसाई मंदिर, लोहगडाजवळील प्रति पंढरपूर परिसर, देहूरोडजवळील कुंडमळ्यात निसर्गाची किमया पाहता येते. इंद्रायणी नदीच्या पाण्याने येथील कातळात रांजणखळगे तयार झाले आहेत. मावळातली दिवसभराची ही भटकंती चिंब भिजवून टाकते.
 येथील सगळाच भाग निसर्गत:च सुंदर आहे. येथे पोहचण्यासाठी घाटरस्ते, मोठे टुमदार बंगले, भव्य हॉटेल्स, हेलीपॅड, उद्याने, धरणे पर्यटकांना आकर्षित करतात. हा सारा परिसर अमूल्य अशा झाडा-झुडुपांचा आहे. मावळातील या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडतात. शनिवार, रविवार या ठिकाणी असंख्य ट्रेकर्स पाठीवर बॅग घेऊन येथील डोंगरवाटा तुडवताना दिसतात. मात्र, दळणवळणा अभावी खासगी वाहन घेऊनच ही  भटकंती करावी लागते.
भरपूर पाऊस, सुपीक जमीन अशा जमेची बाजू असताना या भागात़ील शेतकºयांना मात्र योग्य मार्गदर्शनाअभावी या गोष्टींचा पुरेसा फायदा होताना दिसत नाही. धरणे आणि पाण्याचा मुबलक साठा असताना शेतकरी मात्र तहानलेले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा बरचसा भाग हा मावळातून गेल्याने हा परिसर ओळखला जाऊ लागला. गहुंजे येथील क्रिकेटप्रेमींचे सुब्रोतो स्टेडियमुळे तर मावळ आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले.
पुणे-मुंबईपासून तासाच्या अंतरावर येथील ठिकाण असल्याने साहजिकच या परिसरात गृहप्रकल्पांना वाढती मागणी होऊ लागले. ‘निसर्गाच्या कुशीत ‘स्वत:चे हक्काचे घर’ अशा जाहिरातींना प्रचंड प्रतिसाद येऊ लागला आहे. यासाठी शेतकºयांच्या जमिनी कवडीमोलाने खरेदी करून बांधकाम होऊ लागले आहे. बांधकामासाठी वृक्षतोड, डोंगराच्या जवळील जागा खरेदी करून डोंगराची लचकेतोड थांबवली पाहिजे. धरणाच्या परिसरात बांधकामे होऊ लागली आहे. येथील झपाट्याने होणाºया विकासावर कोणाचातरी अंकुश असणे गरजेचे आहे. अन्यथा हे पर्यटनक्षेत्र धनाढ्य लोकांच्याच हाती राहून सर्वसामान्य पर्यटकांना मात्र, यापासून वंचित राहावे लागेल. लोणावळा, खंडाळात हळूहळू मानवी प्रदूषणाचा फटका बसत आहे. ऐतिहासिक किल्ले व नैसर्गिक वरदान असलेला हा परिसर आहे. हा ठेवा जपण्यासाठी सरकारकडून योग्य उपाययोजनांची गरज आहे. पर्यटकांसाठी नवा पर्याय ठरू लागलेल्या या क्षेत्रात दळणवळणाचा अजूनही अभाव दिसून येतो. या सर्व गोष्टींचा विचार पर्यटनाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे अन्यथा निर्सगाची हानी होऊन झालेले पर्यटन कायम कामाचे राहणार हाच प्रश्न आपणापुढे उभा राहतो.

मावळातील प्रेक्षणीय पयर्टन स्थळे  

पवना धरण
लोहगड
विसापूर
तुंग
तिकोना
ढाकचा बहिरी
नागफणी
प्रति पंढरपूर
ड्युक्सनोज (नागफणी)
बिर्ला गणेश मंदिर
शिरगावचे साईबाबा मंदिर
देहूगाव
घोरावडेश्वर मंदिर
आय्यप्पा स्वामींचे मंदिर
बेडसा, भाजे, कार्ला ही लेणी
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर, हाडशी, पुणे

श्रीक्षेत्र नारायणपूर

नेहमीच्याच ठिकाणी जाऊन कंटाळा आला होता. घरापासून अंदाजे ६५ किलोमीटरवर असलेल्या श्रीक्षेत्र नारायणपूरला जायचे ठरले. राशीचा स्वामी गुरु म्हणून दहावीत असल्यापासून श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यास जायचा उपक्रम सुरू झाला. त्या नादाने मंदिरामागील पुरंदर किल्यावरही ट्रेकिंगच्या निमित्ताने अनेकवेळा वारी झाली होती.  जमेल तेव्हा गुरुवारी जातच होतो. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली. शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले. पंढरपूरला पालखी पोहचून सुद्धा पाऊस आलेला नव्हता. पावसाची सर्वच लोक चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. गुरुवार असल्यामुळे श्रीक्षेत्र नारायणपूरला दत्तमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी निघालो. वाटेत लागणारी प्रेक्षणीय स्थळे यापूर्वी पाहिलेली होती. त्यामुळे तिकडे न जाता मंदिरात दत्त महाराजांचे दर्शन घेतले. पुरंदर तालुक्यातील सासवडला अनेक प्राचीन मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील काही स्थळे यापूर्वी पाहिली होती. पण त्याचे फोटो पूर्वी काढले नसल्याने त्या विषयी नंतर कधीतरी. सध्या नारायणपूर व नारायणेश्वर मंदिरा विषयी....


दिवे घाट :

    नारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्यास निघालो. हडपसरमधील प्रचंड वाहतुककोंडी सुधारते आहे असे वाटले. घरातून निघून ऐव्हना पाऊणतास झाला होता. वाटेत कुठेच पाऊसाचे चिन्ह दिसेना. ढग मात्र, भरून आलेले होते. मायबाप सरकारच्या कृपेने हडपसर ते दिवेघाटापर्यंतचा रस्ता चांगलाच खाचखळग्यांनी तयार केलेला दिसला.

      सासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. दोन वर्षांपूर्वी या तलावाची साफसफाई करण्यात आली होती. बरेच ट्रक माती व गाळ काढण्यात आला होता. यंदा मात्र, तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिलेले दिसून आले. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथाचा डोंगर पाहून पुढे निघालो.


सासवड

            सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण. सासवडला पूर्वी सहा वाड्या होत्या. कालांतराने त्या वाड्यांचे गावात रुपांतर झाले म्हणून ‘सासवड’ हे नाव पडले. प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते या सात वडांवरुन हे गाव ‘सातवड’ असे नावे पडले कालांतराने सातवडाचा उच्चार ‘सासवड’ बनला असावा अशी कहाणी सांगितली जाते. येथील अनेक ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व सासवडला आहे. सासवड हे मंदिरे आणि प्राचीन वाडयांचे गाव आहे.

ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान यांनी कºहा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिध्देश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरच पाहण्यासारखी आहेत. संतश्रेष्ठ सोपानदेव, संत चांगदेव, श्रीदत्त महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, होळकर, पुरंदरे, पानसरे यांच्या कर्तृृत्वाने पावन झालेले हे सासवड हे गाव आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे हे जन्मगाव. याच ठिकाणी प्रा. अत्रे यांनी ‘कºहेचे पाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कºहेकाठची शिवमंदिरे  तर मल्हारगड, पुरंदर असे किल्ले आहेत. कानिफथनाथ, प्रति बालाजी मंदिर, काही अंतरावरील जेजुरी, अष्टविनायकातील मोरगाव अशी विविध पर्यटनस्थळे येथे असल्याने एक दिवसात यातील काही स्थळांना भेट देणे शक्य होते.

संगमेश्वर

            सासवड एसटीस्थानकापासून अंदाजे १ ते दीड कि.मी अंतरावर हे पांडवकालीन स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. कºहा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे.

सध्या नदीला पाणी नसल्याने फक्त दगडधोंडेच पात्रात पहुडलेले दिसतात.  नुकतीच आचार्य अत्रे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सासवड हे सांस्कृतिक केंद्र बनले होते. रस्त्यावरूनच संगमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पुढे नारायणपूरला जायला निघालो. या मंदिराविषयी परत कधीतरी. वाटेत सासवडमधून जाताना पुरंदरेंचा मोठा वाडा आपले लक्ष वेधून घेतो.

श्री क्षेत्र नारायणपूर 

दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

 

        नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते.  श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी  नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर  आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत.  संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे.  हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.

नारायणेश्वर मंदिर

            पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या  पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.

  मंदिराचे दगडी बांधकाम  अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६  फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो. 

 नारायणपूरचे मूळ नाव पूर.  यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.

  हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे.  मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो,  सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.

या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.  मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.

पोटभर प्रसाद

            श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.

पुरंदर किल्ला

नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे.  या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.

कसे जाल :

नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.

  • स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
  • सासवड  >   नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
  • स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
  • स्वारगेट >  हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)

अजून काय पहाल :

प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)
पांडेश्वर मंदिर
भुलेश्वर मंदिर
पुरंदर, व्रजगड किल्ला
कानिफनाथ मंदिर

पुरंदर- वज्रगड किल्ला   
संगमेश्वर मंदिर
नारायणेश्वर मंदिर
वटेश्वर मंदिर
बालाजी विश्वनाथ यांची समाधी
मल्हारगड
जेजुरी

इतिहासाच्या पाऊलखुणा : राजा दिनकर केळकर संग्रहालय



ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’

             प्रत्येकाला काही ना काही तरी छंद असतोच. जुनी नाणी, एकाच क्रमांकाच्या नोटा, विदेशी नोटा, दस्तऐवज, स्टँप, कविता करणो, नट नाटय़ांची चित्रे, क्रिकेटमधील खेळाडूंची चित्रे व स्कोर याचे रेकॉर्ड ठेवण्याचे छंद असतात. लहानपणी सुरू झालेला हा छंद पुढे अनेक कारणांमुळे मागे पडतो. मग घराच्या माळय़ावर, अडगळीत पडलेला हा छंद धुळ खात इतिहासजमा होऊन जातो. मात्र अनेकजण याच छंदाला आपले जीवन समर्पित करून आयुष्यातील अनेक वर्षे हा छंद जोपासतात. छंदाने वेडे झालेल्या काकासाहेब केळकर हे मात्र यातील  ‘कोहिनूर’ हिराच ठरतात. ऐतिहासिक पुरातन वस्तूंचा नसता छंद न करता तो वाढवून शासनाला अर्पण करणा:या काकासाहेब केळकर यांनी उभारलेलेले संग्रहालय म्हणजे ‘राजा केळकर संग्रहालय.’

             पुरातन भांडीकुंडी, चूल, वस्त्रे पाहताना हे काय पाहत आहेत. असा प्रश्न  नवीन पिढीला पडल्यावाचून राहत नाही. या वस्तू प्रत्यक्ष पाहताना केवढा आनंद होतो. प्रदर्शनातील प्रत्येक वस्तू आपल्या इतिहासाची मूक साक्षीदार आपल्याची बोलल्याचा भास होतो. वन बीएचके व टू बीएचके, प्लॅट संस्कृतीत जुन्या वस्तू केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. म्हणूनच या वस्तूंना एवढे महत्त्व आहे. पुणोकर म्हणजे इतिहासप्रेमी, परंपरा व जुना वारसा जतन करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. एका व्यक्तीच्या अफाट कष्टांतून, चिकाटी आणि अथक मेहनतीतून उभे राहिलेले हे संग्रहालय आहे. दैनंदिन जीवनातील पारंपरिक कलात्मक वस्तूंचा खजिना येथे आहे.

पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर तथा काकासाहेब केळकर

             10 जानेवारी, 1896 रोजी करंजे, पश्चिम महाराष्ट्र येथे जन्म :झाला. वास्तव्याला पुण्यातच होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. 1915 पासून अज्ञातवासी या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत. आपल्या हयातीची 70 वर्षे हे संग्रहालय उभे करण्यासाठी त्यांनी खर्च केली. पुरातन वस्तूंच्या प्रेमाने भारावलेल्या काकासाहेबांनी या वस्तूंचा संग्रह जमविला हा पुराणवस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी 1962 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सुपूर्द केला.  हे त्यांचे दातृत्वही अनोखेच म्हणता येईल. इतिहास क्षेत्रतील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल 1978 साली पुणे  विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. हा संग्रह करताना त्यांच्या पत्नी कमलाबाई केळकर यांचीही मोलाची साथ मिळाली. डॉ. दिनकर केळकर यांनी आपल्या दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ  संग्रहालयाला ‘राजा’ केळकर असे नाव दिले आहे. संपूर्ण भारतभ्रमण करून जमवलेल्या 21,000 वस्तूंचा संग्रह या ठिकाणी आहे. या वस्तू जमवण्यासाठी किती वणवण केली असेल हे येथील वस्तू पाहून समजते. 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाडय़ातील सा:या खोल्यातून पसरले आहे. संग्रह जमा करण्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेही गहाण विकले. एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. अशा या संग्राहकाचे 1990 साली निधन झाले.

संग्रहालय

             संग्रहालय एकूण 9 दलानामध्ये असून, तीन मजल्यांमधे विभागले आहे. वनिता कक्षामध्ये भारतीय नारीच्या जीवनशैलीवर आधारित आहे. भारतीय नारीच्या दिवसाची सुरूवात कशी होते. याची साधारण कल्पना या दालनात होते. पाय घासण्याचे दगड, केस वाळविण्याच्या व विंचरण्याच्या फण्या, कुंकवाचे करंडे आदी वस्तू येथे आहेत.  भारतीय चित्रकला या विभागात भारतीय चित्रकला मांडण्यात आली आहे. ही चित्रे 17 ते 19 व्या शतकातील असून, त्यात कांचचित्रे, पटचित्रे आणि कागदावरील चित्रे यांचा समावेश आहे. स्वयंपाक घरातील भांडी या पहिल्या मजल्यावरील दालनात ठेवण्यात आली आहे. यात विवाहकार्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी लागणारी भांडी मांडण्यात आली आहे. यात पाणी आणि धान्य साठविण्याची सोय होत असे. विळय़ा, मसाला पाळी, विविध साहित्यातील लाकूड, धातू, पाषाण, भाजकी मातीपासून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

संगीत वाद्ये पहिल्या मजल्यावर आहेत. यात तबला, बासरी, सनई, सितार, तानपुरा, टाळ, झांज, चिपळय़ा यांचा समावेश आहे.  दुस:या मजल्यावरील मूर्तीकला आणि विवि प्रकारचे दिवे, समया, नेपाळ येथील सूर्यदिवा, कदंबवृक्ष दीप आपले लक्ष वेधून घेतात. याच बरोबर अडकित्ते ,दौती, हस्तिदंत, खेळणी, तसेच बाहेर जाण्याच्या मार्गावर मंदिरे आणि प्राचीन वाडे यांचे रेखीव, नक्षीदार दरवाजे व खिडक्या मांडण्यात आल्या आहेत. यात राजस्थानी शैलीतील दरवाजे आहेत. 13 व्या शतकातील श्री विष्णूची दगडातील कोरीव मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. तळमजल्यावरील ‘एल पॅसेजच्या प्रवेशद्वारपासून सुरेख कोरीव दरवाजे आणि खिडक्या आकर्षक आहेत. 1857 मधील स्वातंत्र्यसेनानी रंगो गुप्ते यांना इंग्लंडला मिळालेले चांदीचे तबक, 150 वर्षांपूर्वीचा नक्षीदार देव्हारा, 1782 मधील भक्तीविजय ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत,  पानिपत युद्धातील पेशवेकालीन पेटारा, पेशव्यांचे सरदार ओंकार यांचा लाकडी देव्हारा, 125 वर्षे जुना असलेला लाकडी पाळणा. चूल फुंकणीपासून ते उंटाच्या कातडीपासून तयार केलेल्या तेल्याच्या मोठय़ा रांजणार्पयत तसेच दैनंदिन वापरातील अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टी त्यांनी जमा केल्या आहेत. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, घरगुती वस्तू, दिवे, कुलपे, अडकित्ते, दौत, लेखणी संग्रह येथे पाहण्यास मिळतो. दिवे,  जहाजावरील दिवे, गंजीफा , सोंगट्या,  पानदाने, पेटारे, दरवाजे, विविध आकार व रुपातील गणोश मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या, लहान मुलांचे कपडे, धान्य साठवण्याचे कोठार, जुन्या काळातील टांगा पाहताना आपण ऐतिहासिक काळात जातो. याचबरोबर शस्त्रत्रे दालनात 18 व्या शतकातील तलवारी, मूठ, म्यान, खंजीर,कटय़ार, चिलखत, ढाल, ठासणीची बंदूक, बंदुकीची दारू ठेवण्याची कुपी, भाले आदी शस्त्रत्रे येथे आहेत.

मस्तानी महाल :

             मस्तानी ही शूर सेनानी थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी. थोरले बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी पुण्याजवळ असलेल्या कोथरूड येथे 1734 मध्ये महाल बांधला. कालांतराने तो नामशेष झाला. पडझड झालेला मस्तानीचा महाल केळकरांनी आणून त्यातील काही भाग कुशल कारागीरांच्या मदतीने काढून आणून त्याची पुर्नरचना केली आहे. मोठ मोठे झुंबर, दिवे लावण्याचे झुंबर, कोरीव नक्षीकाम पाहताना त्यावेळचा पेशवाई थाट लक्षात येतो.

              महाराष्ट्राचा व एकूणच संपूर्ण भारताचा गेल्या कित्येक वर्षांचा इतिहास या माध्यमातून आणण्याचे महत्वाचे कार्य हे संग्रहालय करीत आहे. डॉ. केळकरांनी  भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा वर्तमानकाळातही आपल्या पुढील पिढीच्या भविष्याकालासाठी उपलब्ध केला आहे. काळाच्या ओघात चौसोपी वाडे जाऊन घरे झाली, घरे जाऊन आज इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे वन बीएचके, टू बीएचके मध्ये जागाही कमी झाली. प्लास्टिकचे युग सुरू झाले. वस्तू वापरा व फेकून द्या ‘युज अॅंड थ्रो’ पद्धतीमुळे जुने ते सोने ही संकल्पना पडद्याआड जाऊ लागली आहे. पण आपल्या आजच्या पिढीला, पुढच्या पिढीला ही संस्कृती, हा वारसा, परंपरा, इतिहास समजावा म्हणून काही छंद जोपासणारे संग्राहक अशा वस्तूंचा संग्रह करतात.
पुण्याची शान असलेल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातील दुर्मिळ वस्तूंचा ठेवा आता अधिक समृद्ध होऊ लागला आहे. गेल्या पाच वर्षांत पाचशेपेक्षा अधिक वस्तू संग्रहालयाला भेट मिळाल्या आहेत. शिवकालीन तसेच पेशवेकालीन घराण्यांमध्ये तसेच त्यांच्याकडे असणा:या सरदार घराण्यांमध्ये अनेक दुर्मिळ व ऐतिहासिक पुरातन वस्तू असतात. मात्र, सर्वांनाच त्या वस्तूंचे मूल्य (पैशाचे नव्हे)  कळतेच असे नाही. ज्यांना त्या वस्तूंचे महत्त्व कळते त्यांना त्या वस्तू भविष्यातही टिकाव्यात असे वाटते. हीच भावना मनात असलेल्या ब:याच जणांनी त्यांच्या घरातील दुर्मिळ आणि पुरातन वस्तू संग्रहालयाला भेट दिल्या आहेत. सध्या असलेल्या संग्राहलयाच्या जागेअभावी सर्वच वस्तू प्रदर्शनात मांडलेल्या नाहीत. पुण्यातील बावधनजवळ  सुमारे सहा एकर जागेत राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे स्थलांतर करण्यात येणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी वर्तमानपत्रत आल्या होत्या. 

              संग्रहालयातर्फे माहितीपुस्तिका व पोस्टकार्डही विक्रीस उपलब्ध आहेत. तेव्हा जमेल तेंव्हा हा वारसा आपल्या पुढील पिढीला अवश्य दाखवा. पर्यटन किंवा सहलीला म्हणून पुण्यात आलात किंवा खुद्द पुण्यातील असूनही देखील कधी हे संग्रहालय पाहिले नसेल तर आवजरुन पहावे. जेणोकरून भारतीय  संस्कृती व त्यातून दिले जाणारे संस्कार जपले जातील. पुरातन वस्तू आपल्या संस्कृतीच्या पाऊलणखुणाच आहे. तुमच्या आमच्या घरातल्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची माहिती व्हावी, परंपरेची ओळख व्हावी या उद्देशाने केळकरांनी हा ठेवा पुढील पिढीसाठी राखून ठेवला आहे.

  • कसे जावे : पुण्यातील प्रसिद्ध असा लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कु मठेकर रस्ता, मंडईपासून या ठिकाणाहून कोणाला विचारले असता सहज जाता येईल.

  • प्रवेश फी : लहान मुले (3 ते 12 वर्षे) : 10 रुपये, प्रौढ : 50 रुपयेसंग्रहालयाची वेळ : सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 र्पयत (सायं. 5.30 नंतर तिकीट विक्री बंद)

  • सुटीचे दिवस : 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, अनंत चतुर्दशीपत्ता : 1377/78 शुक्रवार पेठ, राजा केळकर संग्रहालय, नातूबाग, 

  • दूरध्वनी : 24482101 / 24461556

    बघण्यासाठी लागणारा वेळ : सुमारे 1  तास (थोडी घाई), निवांत पाहण्यासाठी किती वेळा ही.

क्रांतितीर्थ’ - क्रांतिवीर चापेकर


महान क्रांतिकाराक चापेकर बंधूंचे ‘क्रांतितीर्थ’

आज दामोदर हरि चापेकर यांचा आज (18 एप्रिल) बलिदानदिन. तीन सख्ख्या भावांनी राष्ट्रकायार्साठी केलेले हे बलीदान जगात एकमेव आहे ! भूमातेला स्वतंत्र करण्याच्या प्रेरणेने ऐन तारुण्यात स्वत:च्या प्राणाची आहुती देणाºया चापेकरांना  आदरांजली. 

चापेकर बंधूना त्रिवार अभिवादन

पुणे हे स्वातंत्र्यकाळात क्रांतिकाराकांचे माहेरघर बनले होते. अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक या पुण्याने दिले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यात चापेकर बंधूंचे नाव उल्लेखनीय आहे. एकाच घरातील तिघा बंधुंना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती. चापेकर बंधू राहत असलेले चिंचवडगावातील त्यांचे ठिकाण मोरया गोसावी मंदिरापासून काहीच अंतरावर आहे. मी लहान असताना चापेकर बंधूंविषयी मराठी चित्रपट पाहिला होता. चित्रपटाचे नाव आठवत नाही. पण चित्रपटातील ‘रँड’ या इंग्रज अधिकाराला चापेकर बंधूंनी ठार केल्याचे दृश्य पाहिले होते. चिंचवडगावातील त्यांच्या या वाडय़ाजवळून अनेकवेळा गेलो. परंतु वाडय़ात गेलो नव्हतो.  आज आवजरुन वाडा पाहण्याचे ठरवून गेलो.

वासुदेव हरी चापेकरांचा जन्म 1879 मध्ये कोकणात झाला. कालांतराने ते चिंचवड येथे स्थायिक झाले. 1897 पुण्यात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीत अनेकांचे बळी घेतले गेले. प्लेगच्या साथीमध्ये रोगी शोधून काढून त्याला उपचारासाठी  अमानवीय पद्धतीने नेले जात असे. तसेच ज्यांना या रोगाची बाधा झाली नाही अशा व्यक्तींना देखील केवळ संशयावरून अत्याचार करण्यात आले. प्लेगची साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने भारतात पाठविलेल्या वॉल्टर चार्ल्स रॅन्डने रोग नियंत्रणाच्या नावाखाली जनतेवर अत्याचाराचे सुरु  केले. रॅडने सामाजिक रुढी परंपरांना पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. या बिटिश अधिका:याने लोकांचा छळ केला. हिंदूंची घरे जाळणो, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणो, तपासणीच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन करणो अशा त्याच्या क्रूर कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. याचा चापेकर बंधूच्या (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) मनात राग निर्माण झाला. हे अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड होता.
         रँडचा सूड घेण्याची योजना तयार करु न त्याची अंमलबजावणीही केली गेली. यात दामोदरांच्या ‘दादा गोंद्या आला रे आला’ या आरोळी ऐकून बाळकृष्ण चापेकरांनी रॅडची बग्गी आली आहे. अशा समजाने चुकून लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ती चूक कळल्यावर रँडची बग्गी आल्यावर दामोदर चापेकरांनी रँडवर गोळीबार केला. २२ जून १८९७ला रँडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. यात लेफ्टनंट आयरिस्ट जागीच ठार झाला तर रॅडने 3 जुलै 1897 रोजी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्राण सोडले. पुणे युनिवर्सिटीजवळ असलेल्या गणेशखिंडीनजीक ही घटना घडली. चापेकर बंधु त्यावेळी निसटण्यात यशस्वी झाले असले तरी नंतर तिघांनाही नंतर पकडण्यात आले. चापेकर बंधूंना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली. याचा बदला चापेकरांचे तिसरे बंधू वासुदेव हरी चापेकर व त्यांचे एक सहकारी महादेव रानडे यांनी खुन्या मुरलीधराजवळ द्रविड बंधूंचा वध करून घेतला. त्यानंतर त्यांनाही अटक झाली. दामोदर चापेकर यांना 18 एप्रिल 1898 रोजी फाशी देण्यात आले. त्यानंतर वासुदेव चापेकर यांना 8 मे 1899 तसेच बाळकृष्ण चापेकर यांना 12 मे 1899 रोजी येरवडा तुरुगात फाशी देण्यात आली.
          आज चापेकर वाडय़ात ठेवलेला चापेकर यांचा पुतळा 4 ते 5 वर्षापूर्वी चिंचवड भाजी मंडईतील मुख्य चौकात उभारलेला होता. 1978 मध्ये चिंचवड गावातील मुख्य चौकात एका हातात पिस्तुल घेऊन उभे असणा:या दामोदर चापेकरांचा सहा फुटी पुतळा उभारण्यात आला होता. या चौकात घडय़ाळ टॉवर व पुतळय़ाचे भूमीपूजन समारंभ कै. बॅ. विठठलराव गाडगीळ व शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. सध्या या पुतळाच्या चौकात मोठा पूल निर्माण झाला आहे.
      चापेकर बंधू राम आळीतील ज्या वाड्यात राहत होते त्याची फार दुरवस्था होती. या वाडय़ाची आतापर्यंत समाजकंटकांनी दोन वेळा जाळपोळ केली. 1930 च्या सुमारास हा वाडा पेटवण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 मध्ये ही हा वाडा पेटविण्यात आला होता. स्मारक समितेने  तेथे प्रथम व्यायामशाळा सुरू केली.
        चिंचवड गावात क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू 125 वर्षांपूर्वी ज्या वाडय़ात राहात होते त्या जागेवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे.  या चौघा क्रांतिकारकांचे स्मारक चापेकर बंधूंच्या जुन्या वाडय़ात उभारण्यात आले आहे. त्याला शोभेल असेच ‘क्रांतितीर्थ’ असे नाव दिले आहे. येथे अजून काही काम बाकी आहे. स्मारक उभारण्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे  करण्याचे 1998 मध्ये महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केले. सध्या समितीचे कार्यवाह गिरीश प्रभुणे आहेत.  चापेकरांचा वाडा 1857 च्या सुमारास उभारला असावा. स्मारक म्हणून जुना वाडा त्याच पद्धतीने उभारण्यात येत आहे.  सध्या हा वाडा 30 फूट लांब व 150 फूट रूंद आहे. जुन्या वाड्यांचा अभ्यास करून स्मारकाची रचना करण्यात आली आहे. लाकूड, दगडकाम, कोरीव काम हे दुस:या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.  स्मारकामध्ये चापेकरांच्या वस्तू, त्यांच्याविषयी लेखन साहित्य ठेवण्यात येणार आहे. स्मारकाच्या दुस:या मजल्यावर देशातील विविध क्रांतिकारकांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत.  यात संत मुक्ताई, संत मीराबाई,  झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजनी नायडू,  पुण्शोल्क अहल्याबाई होळकर आदीं विषयी माहिती दिलेली आहे.
       दामोदर चापेकर यांचा स्मृतिदिन 1972 पासून दर 18 एप्रिल रोजी चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावात साजरा केला जातो. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रतिकारकांमधे चापेकर बंधु यांना आद्य क्रांतीकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चापेकर बंधूंचे ‘गौरव भारतातील क्रांतीचे जनक’ असा केला आहे.
        रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते 27 वर्षे, बाळकृष्ण यांचे  वय होते 24 वर्षे व वासुदेवरावांचे वय होते 18 वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरु णांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे ! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन.

‘‘स्वदेशिहताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोटय़वधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय.’’  
                                                                                                                       - दामोदर हरी चापेकर




दामोदर हरी चापेकर
जन्म : 25/6/1869 फाशी  18/4/1898

क्रांतिवीर बाळकृष्ण हरी चापेकर
जन्म : 1873  फाशी 12 मे 1899

वासुदेव हरी चापेकर
जन्म : 1879, फाशी  : 8 मे 1899

Apr 18, 2014

‘मढे घाट’

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मढे घाट’. कोकणात उतरणाºया अनेक वाटा आहेत. त्यापैकीच तोरणा किल्याच्या पाठीमागील या वाटेविषयी....

गजाननाचे आगमन होऊन तीन दिवस झाले होते. रविवारी गौरीपूजन. किल्ले सिंहगडच्या मागील बााजूस असलेल्या मोगरवाडीत जेवणाचे आमंत्रण होते. काहीच किलोमीटरवर असलेला मढे घाट ही पाहून येऊ असे वडिलांनी सुचविले.  पावसाळ्यात यंदा कुठेच न गेल्याने जायचे ठरवले. सकाळीच घर सोडले. खडकवासला धरणाच्या बाजूने रस्ता कापत डाव्या बाजूला सिंहगड व परिसरातील वाढलेली सिमेंट काँक्रिटची जंगले बघत आमची गाडी पुढे जात होती. पुण्यापासून खडकवासाला व तेथून खानापूरगावातून सिंहगडवर न जाता सिंहगड डाव्या बाजूला ठेऊन मोगरवाडी या गावी जायचे होते. दोनशे ते अडीचशे वस्ती असलेले हे सिंहगडच्या पाठीमागील छोटे गाव. गाव तसे शिवकालीन. कारण  शिवकाळात मोगली छावण्या या परिसरात पडत असत. किल्याच्या परिसरात या छावण्या असत. मोगलवाडी या शब्दाचा पुढे मोगरवाडी असा नामोल्लेख सुरू झाला. १० वाजता चहा, नाष्टा घेऊन मढे घाट पाहण्यासाठी निघालो. मोगरवाडीपासून वेल्हा सुमारे १९ किलोमीटरवर तेथून पुढे ३२ किलोमीटरवर मढे घाट होता. 

खरेतर अनेकजण पुणे-नसरापूर-वेल्हा मार्गे मढे घाटात जातात. परंतु सिंहगड किल्याच्या मागील बाजूस असलेला पाबे घाट नुकताच चांगला केल्याचे समजले. पूर्वी सिंहगडावर अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने वाºया झाल्या होत्या. त्यामुळे हा परिसरात चांगलाच आठवणीत होता. तेथून पाबे घाट १० किलोमीटरवर होता. घाट छोट्या छोट्या डोंगरावरून वेडीवाकउी वळणे घेत गेलेला. सिंहगडाचा विस्तार कसा आहे, हे पाबे घाटातून चांगले दिसते. रस्ता चांगलाच होता. ग्रामीण भागातून गेला असला तरी कोठेही खड्डे नव्हते. का यंदा पाऊस पडला नाही म्हणून तर रस्ते टिकले नसतील ना अशी ही शंका मनात आली. एका ठिकाणी ओढ्यात मनसोक्त डुंबत असलेले दोन बैल व गुराखी दिसले. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने यंदा प्रथमच ओढा भरल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत पुढील वर्षी दुष्काळ नक्कीच असल्याची कुणकुण काहीशी आली. पर्यावरणाचा जो काही आपल्याकडून ºहास होतोय तेचेच हे परिणाम. असो. 

 

पाबेघाटातून अर्धा तासातच तोरणा किल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात पोहोचलो. तेथून पुढे मढे घाट ३२ किलोमीटरवर होता.  साडेबारा वाजून गेले होते. उशीर होऊ नये म्हणून गावात न थांबता तसेच पुढे गेलो. धरणाच्या कडेकडेने छोट्या वाड्यावस्त्या बघत आमची गाडी पुढे जात होती. मधेच थांबून गावकºयांना मढे घाट कुठे आहे असे विचारत पुढे जात होतो. तोरणा किल्याला प्रचंडगड असे का म्हणतात? याचे उत्तर त्याचा आवाका पाहून होतो. किल्याच्या खालून त्याचे रौद्र रुप पाहतच राहावे असे वाटते. आभाळात घुसलेले बुुरुज, तटबंदी केवळ अंदाजे दिसत होती. वाटेत कानंदीचं खोरं, भट्टी, पासली ही गावं सोडून आम्ही केळदला येऊन पोहोचतो. वेल्हे-केळद व केळद गावापासून दीड किलोमीटरवर मढे घाट असल्याचे समजले. 

तोरण्याजवळ असलेला मढे घाट हे ठिकाण पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावर. पावसाळ्यात या ठिकाणी दाट धुके, धबधबे व एकूणच निसर्गाचा चमत्कार पहावयास मिळतो. भटकंतींचा आनंद लुटण्यासाठी व ट्रेकिंगची आवड असणारे अनेकजण या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. त्यातच दोन दिवसांपासून वरणराजाची कृपा झालेली होती. धो-धो पावसाने सर्वत्र पाणी झाले होते. ऐन पावसाळ्यात थंड झालेले ओढे, नाले, धबधबे पुन्हा सुरू झाले होते. पाहावे तिकडे पसरलेली हिरवळ, काहीसे पसरलेले धुके व ढग पाहत मन प्रसन्न झाले. सह्याद्रीच्या या भागाचं हे रूप खरेच पाहण्यासारखे आहे.
केळद गावाबाहेर वेळवण नदीवरचा छोटा पूल ओलांडून मढेघाटाकडे  आमची गाडी पोहचली. गाडी मोकळ्या मैदानावर उभी करून पुढील अंतर पायी निघालो. मोकळ्या-ढाकळ्या रस्त्याचे हे दीड किलोमीटरचे अंतर. पाऊस काहीसा येत जात होता. वडिलांचे गुडघे दुखत असून देखील थोड्याच्या चढणीचे हे अंतर पार केले. फार पूर्वी या ठिकाणाबद्दल वाचले होते. आज प्रत्यक्षात येथे आलो. याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. रविवार असल्यामुळे भटकंती करणारे अनेक वीर या ठिकाणाही आल्याचे दिसले. कोण टू व्हिलरवर मैत्रांसोबत तर कोण मैत्रिणींसोबत. पंधराच मिनिटात वाटेने चालत एकदाचे मढे घाटातील त्या प्रसिद्ध धबधब्यापर्यंत आम्ही पोहचलो. नेहमी धबधब्याखाली मनसोक्त डुंबणारे यावेळी धबधबा जेथून सुरू होतो तेथून पाहत असल्याने वेगळाच आनंद होत होता. कोकणातील वाड्यावस्त्यांचे सुंदर दृश्य दिसत होते. धो-धो पडणारा तो धबधबा पाहून मन प्रसन्न झाले. दोन अडीच तासांचा प्रवास सार्थकी लागल्याने आनंदही झाला.  ओढ्यातच मी व माझ्या मुलाने बैठक मारून डुंबण्याचा आनंद घेतला. अंग पुसून  होतच होते. तो पर्यंत ताडताड-ताडताड पाऊस कोसळू लागला. एकदम ढग, धुके व पावसाने सर्व परिसर भरून गेला.  डोक्यावर छत्री घेऊन सुके कपडे सांभाळत झाडाच्या आढोश्याला येऊन थांबून राहिलो. सुमारे पंधरा मिनिटांनंतर काहीसा पाऊस कमी झाला. परतीचा मार्ग धरला. वाटेत पायी चालत येताना असलेल्या हॉटेलमध्ये गरमा गरम आले घातलेल्या चहा पिऊन, गप्पा मारत आम्ही परतीला लागलो.

‘मढे’घाटाविषयी थोडे :

अंधाºया रात्री कोंढाण्यावर स्वारी केलेले वीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने सिंहगड ओळखला जातो.  शिवाजी महाराजांच्या शूरवीराने गड सर केला, पण स्वराज्याचे अनमोल असे रत्न नरवीर तानाजी मालुसरे या लढाईत पडले. पुढे शिवाजीमहाराजांनी त्यांचा ‘गड आला पण सिंह गेला’ या शब्दात गौरव केला.  मालुसरे गडावर पडले. गड जिंकला. मावळ्यांनी त्यांचा मृतदेह मूळगावी नेण्याचे ठरविले. तळकोकणातील पोलादपूरच्याजवळील उमरठ हे ते गाव.  कोकणात नेताना केळद गावाजवळील या घाटरस्त्याचा वापर केला गेला. या टेकडीवरून खाली उतरणाºया मागार्ला मढे घाट म्हणतात. ग्रामीण भाषेत मृत व्यक्तीला ‘मढे’ असे संबोधतात. त्यावरून या पायवाटेतील घाटाला मढे घाट असे म्हणतात. भटकी मंडळी मढ्या, उपांड्या किंवा मढ्या शिवथरघळ, कावळ्या किल्ला अशा भटकंत्या करतात. केळदहून पुढे मढे घाट सुरू होतो. पायवाटेने कोकणातील कर्णवाडी साधारणपणे २ ते ३ किलोमीटर अंतरावर असणाºया या गावात उतरतो.   मढे घाट, पुण्यापासून अगदी एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखी जागा आहे. फक्त स्वत:चे वाहन असावे एवढेच.  हा घाट पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पूर्वी घाटावरील गावांना व तळकोकणातील महाड, बिरवाडी बंदरांना जोडणाºया महत्त्वाच्या घाटावाटांमध्ये या घाटाचा उल्लेख येतो.  सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या अत्याधुनिक युगातही हया वाटा अजूनही वापरत आहेत. डोंगर एका बाजूने चढून गेल्यास दुसºया बाजूने उतरण्यासाठी या घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही वाट या फक्त आणि फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही गाडी रस्ते किंवा रेल्वेने शक्य आहे. मढे घाट, सवाष्णी घाट, बोचे घळ, बोप्या घाट, बैलघाट, शिंगणापूरची नाळ अशी कितीतरी घाटवाटा सह्याद्रीच्या वेड्यांना खुणावत असतात.

काहीसे मनातील :

नरवीर तानाजींच्या सिंहगड पराक्रमानंतर त्यांच्या मृत्यूची दु:खद आठवण ज्या सह्याद्रीने अजूनही जुपून ठेवली आहे. तो हा रांगडा मढे घाट. पावसाळी पर्यटनाच्या नावावर सध्या अनेक पर्यटन व ऐतिहासिक स्थळांची सुरू असलेली विटंबना पाहून मन खिन्न होते. मोठमोठ्यांदा गाणी लावून, हातात बाटल्या घेऊन झिंगत चाललेली ‘मढी’ बघीतली की वाटते. यांच्यातील एखादा तरी या ठिकाणावरून पडला पाहिजे. म्हणजे बाकीच्यांची तरी मस्ती जिरेल. या तळीरामांचा स्वैराचार मनाला अस्वस्थ करून जातो. खरे तर अशा ठिकाणी पर्यटनकाळात पोलिसांनी चौकी उभारून चेकिंग करूनच पर्यटकांना सोडले पाहिजे. जेणेकरून ऐतिहासिक स्थळे, व निसर्गाचा मान, आदब राखला जाईल. खरे तर याचे भान प्रत्येकानचे ठेवायला पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराज की जय म्हणत घाणारडी व्यसने करत असलेली तरणाईला लगाम लावायलाच हवा. व्यसनासाठी न जाता मोकळ्या मनाने जाऊन निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तरच या ठिकाणी जावे हीच अपेक्षा.

कसे जाल :

  • मढे घाट, उपांड्या घाट अशा वाटांना भेट द्यायची असेल, तर स्वत:चं वाहन सोबत असलेलं बरे.
  • पुण्यातून सकाळी लवकर निघून एका दिवसात पाहता येण्यासारखे हे ठिकाण आहे.
  • फक्त पावसाचा अंदाज बांधून हे स्थळ पहा. कारण धो-धो पावसात हे ठिकाण अवघड होऊ शकते.
  • पुण्यापासून अंदाजे ७० किलोमीटर अंतरावर
  • घाटमाथ्यावरच्या गाव केळद गावाजवळ हा घाट आहे.
  • मढेघाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन मार्ग आहेत.
  • एक पुणे-सातारा रस्त्यावरील नसरापूर फाट्याहून राजगड किल्याशेजारून वेल्ह्याला जाणारा
  • दुसरा खडकवासला धरणामागच्या खानापूरहून डाव्या हाताला पाबे गावाकडून वेल्ह्याला येणारा.
  • वेल्ह्याच्या बाजारपेठेतून हा रस्ता आपल्याला केळद गावाकडे घेऊन जातो.  
  • वेल्ह्यावरून किंवा नसरापूरहूनही थेट केळदपर्यंत जीपही ठरवता येते.  पण हे थोडे खर्चिक व वेळकाढू काम आहे.
  • मढे घाटाच्या वाटेवर हॉटेल असून, जेवणाची सोय होऊ शकते.

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड


22/11/2015

दिवाळीची सुट्टी संपत आली होती. मुलाला पायी किल्ला चढण्याचा अनुभव देण्यासाठी सिंहगडावर जाण्याचे ठरले. यावर्षी  त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात तानाजी मालुसरेंवर असलेला धडा असल्याने अनायासे ती जागा प्रत्यक्ष पाहून ही होईल व त्याचे पदभ्रमणही होईल यासाठी सिंहगडावर जाण्यास निघालो त्याविषयी....

पुण्यनगरीचे दोन मानबिंदू एक म्हणजे शनवारवाडा व दुसरा किल्ले सिंहगड. पुण्यातून नैऋत्य दिशेला उंच आकाशात दिसणारा व आकाशवाणी केंद्राचे दोन टॉवर असलेला किल्ला म्हणजे सिंहगड. सिंहगडाबाबत काहीजणांना लहानपणी शाळेतील शिकलेला ‘गड आला पण सिंह गेला’ या धड्यातील यशवंती घोरपड व ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचं’ असे म्हणणारा तानाजी मालुसरे आठवतो. पण या शिवाय जास्त काही सिंहगडाविषयी सांगता येत नाही. मात्र, एन्जॉय म्हणून मित्रमैत्रिणींसोबत, पिकनिक स्पॉट, एक दिवसाचा चेंज, थ्रील अनुभवण्यासाठी दुचाकी अथवा चारचाकीवरून उगाच आपण काही तरी जगावेगळे पाहत आहोत. याचा प्रत्याय आणून देतात. हल्ली सुट्टीच्या दिवशी घराबाहेर तेही निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन येण्याचे वेड वाढू लागले आहे. खरेतर सिंहगडावर वर्षभर पर्यटक येत असतात, पण पाऊस सुरू झाला, की तो जास्तच वाढतो. पुण्यापासून जवळ असलेल्या सिंहगडावर ऐरवी सुट्टीच्या दिवसा खेरीज सुद्धा हजारोजण किल्यावर ये-जा करत असतात.  त्यात पुणे परिसरातील विशेषत: बाहेरून येणाºया कॉलेज तरुण-तरुणींचा भरणा अधिक असतो हे सांगावयास नकोच. पानशेत धरण, खडकवासला, सिंहगडचा परिसर या कॉलेजकुमारांनी व्यापून गेलेला असतो. अनेकजणांना  केवळ एन्जॉयमेंट करण्यासाठी या स्थळाचा वापर करताना पाहून चिडही येते. मोठमोठ्यांदा मोबाईलवरील गाणी वाजवत, टिंगलटवाळ्या करत ही मंडळी किल्यावर भटकताना दिसतात. वेगवेगळ्या दरवाज्यांजवळ सेल्फी काढून ही मंडळी जणूकाही आपणामुळे या स्थळाचे महत्व वाढते आहे हे इतरांना मेसेज पाठवून करतात. असो...

पुण्याहून अवघ्या २४ किलोमीटरवर हा सिंहगड किल्ला आहे. सह्याद्रीच्या पूर्व रांगेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा किल्ला आहे.  गडाच्या पायथ्याजवळील आतकरवाडीतून वर चढणारी पायवाट आहे. पण ज्यांना गड चढायचा त्रास  नको अशांसाठी गोळेवाडीतून एक सोपी घाटवाट चांगल्या डांबरी रस्त्याने आपणाला थेट गडावरही पोहचवते. याशिवाय सह्याद्रीतील अस्सल ट्रेकर्स कात्रज-सिंहगड, कोंढणपूर-कल्याण-सिंहगड, खानापूर-सिंहगड, सिंहगड-राजगड-तोरणा अशा गडांवरून ही यात्रा पूर्ण करतात.
आम्ही सकाळी ९ ला पायथ्यापाशी आतकरवाडीला पोहचून सिंहगडाची वाट चढण्यास सुरूवात केली. जसजसे वर चढू लागतो तस तशी घरे, शेती, रस्ते छोटे होऊ लागले. आजुबाजुचे  हिरवे रान, डोंगर, त्यावरील ऊन-सावलीचा खेळ, सुसाट वारा व धुके याचा अनुभव घेत सिंहगडाचे हे राजबिंडे रुप मनात साठवत आम्ही पुढे जात होतो. वाटेत दूर दिसणारी वाहने व रस्ता पाहून मुलाने मला विचारले,‘‘बाबा यापेक्षा आपण गाडीने वर आलो असतो तर लवकरच पोहचलो असतो ना’’? या प्रश्नाचे उत्तर मी केवळ ‘हो ना’ असे म्हणत टाळून नेले. मुलाला गड, किल्यांची आवड निर्माण व्हावी हाच उद्देश. मुलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत तासाभरात आम्ही गडमाथ्यावर दाखल झालो. काल अचानक रात्री थोडा पाऊस पडून गेल्याने अनेक ठिकाणी माती ओली होती. त्यात ढगाळ वातावरणाने थकवा जाणवला नाही. पुणे दरवाज्याच्या परिसरात पर्यटकांचा जथ्था पाहून आज रविवार व सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी झाल्याचे लक्षात आले. आम्हीही याच गर्दीचा एक भाग होऊन संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी निघालो. संपूर्ण किल्ला मुलाला दाखवून पिठलं भाकरीचा आस्वाद घेत दुपारी ४ला किल्ला सोडला. ऐव्हाना गडगडाट होऊन पाऊस येण्यास सुरूवात झाली.

सिंहगडाविषयी : 

सिंहगडावर प्रवेश करण्यासाठी प्रथम पुणे मार्गाने गेल्यास तीन दरवाजे लागतात.  दोन दरवाजे मराठेशाहीतील तर तिसरा यादवकाळातील. या तिसऱ्या दरवाज्यावरील नक्षीकाम कमळांची रचना हे त्याचे पुरावे. विशेष म्हणजे पुणे दरवाज्याचे चित्र टपाल तिकीटावरही आले आहे. पुढे थोड्या अंतरावर लिहलेला घोड्यांची पागा हा फलक दिसला. खरे तर हे कातळात खोदकाम करून केलेली सातवाहन कालीन लेण. मधोमध खांब सोडलेल्या खोल्या, आतमध्ये बसण्यासाठी ओटे, समोर मोकळे प्रांगण ही सारी विहाराची रचना. पण कुणाच्यातरी डोक्यात घोड्याची पागा अशी कल्पना आली आणि ती रुढही झाली. खरे तर घोड्याची उंची पाहता या ठिकाणी घोडा कसा बांधता येईल याचेच आश्चर्य वाटते. अशाच पद्धतीची दोन खोदकामे वाटेत गणेश टाके आणि देव टाक्याच्या पाठीमागे एका भूमीलगत टाक्यातही दिसतात. हा गड किमान दोन हजार वर्षांपासून असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे.  तर अशा या गडाचे प्राचीनकाळी नाव होते कौंडिण्यदुर्ग. कौंडिण्यऋषींच्या वास्तव्यावरून हे पडले असावे. पुढे यादवकाळात या जागी मंदिर बांधले गेले. अपभ्रंश होत या कौंडिण्यदुर्गचा झाला ‘कोंढाणा’ यातूनच गडाखालच्या गावालाही नाव मिळाले कोंढणपूर.  येथून पुढे समोरच दारुकोठार आहे तिथून पुढे काही अंतरावरच गणेश टाके आहे. आणखी पुढे गेल्यावर डाव्या हाताला किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथून अमृतेश्वर मंदिराकडे जाताना उजव्या हाताने टिळकांच्या बंगल्यापाशी जाता येते. स्वातंत्र्यप्राप्ती आधी सिंहगडावर लोकमान्य टिळकांचा सहवासही लाभला आहे.  बंगल्याच्या मागच्या बाजूलाच  राजाराममहाराज यांची समाधी आहे. ३ मार्च १७०० ला त्यांचा इथे मृत्यू झाला होता. किल्यावरील अमृतेश्वर भैरवाचे मंदिर सगळ्यात जुने मानले जाते. काहीच अंतरावर आहे देवटाके. संपूर्ण किल्यावरील हा एकमेव पिण्याजोग पाणी. या देवटाक्यापासून उजव्या हाताने नरवीर तानाजी मालुसरे च्या समाधीपाशी पोहोचतो. देवटाक्याकडून सरळ खाली गेले की कल्याण दरवाजा लागतो.   येथून कल्याणपूर या गावात उतरता येते. कल्याण दरवाज्यावरून तसेच पुढे गेले की आपण झुंजार बुरुजाकडे जातो. या  भागातील तटबंदी अजून चांगल्या स्थितीत आहे. तेथून पुढे डोणागिरीचा कडा पाहून गडाला प्रदक्षिणा पूर्ण होते.

इतिहास व ठळक घटना

सिंहगडाचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाहीत होता. मराठे, मुघल व आदिलशाही या तीन सत्तांमधे हा सिंहगड अनेक वेळा फिरला. सन १६४८-४९ मधे शहाजीमहाराजांच्या सुटकेसाठी हा गड आदिलशाहला द्यावा लागला. इ.स. १६४९ मध्ये शहाजी राजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंडाणा पण होता. मोगलांतर्फे उदेभान राठोड हा कोंडाण्यावरचा अधिकारी होता.  शिवाजी महाराज जेव्हा आग्राहून सुटून परत आले तेव्हा त्यांनी दिलेले गड परत घ्यायला सुरुवात केली. शिवाजीमहाराजांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या ५०० मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला’  असे गौरवोद्गार काढले. शिवरायांच्या निधनानंतर हा गड कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे राहिला. यामध्येच एक जुलै १६९३ मध्ये नावजी बलकवडे आणि विठोजी कारके या मराठावीरांनी तानाजींच्या पराक्रमाची पुनरावृत्ती करत गड जिंकला. छत्रपती राजाराममहाराजांच्या मृत्यूनंतर दोनच वर्षांनी औरंगजेबाने सिंहगड पुन्हा जिंकला आणि त्याचे नाव ठेवले ‘बक्षी-दा-बक्ष’! याचा अर्थ दैवी देणगी. पण औरंगजेबाची ही देणगी त्याच्याकडे दोनच वर्षे राहिली. मराठ्यांनी पुन्हा हा गड जिंकला आणि तो १८१८च्या पेशवाईच्या अखेर मराठे-इंग्रज लढाईपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. शेवटच्या लढाईनंतर इंग्रजांनी हा गड घेतला. त्या वेळी इंग्रजांना गडावर ६७ तोफा, त्यांना पुरेल एवढा दारूगोळा, जडजवाहीर, दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा मोठा खजिना मिळाला.  पुढे अनेक दिवस हे इंग्रज गडावरील ही लूट टोप्यांमध्ये भरभरून आणून पुण्याच्या बाजारात विकत होते.

सिंहगडावरील माहिती फलकानुसार

सध्या फलकाची दुरवस्था झाली आहे. 

‘‘सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाणा, इसामी नावाच्या कवीने फुतुहस्सलातीन किंवा शाहनामा-इ-हिंद या फार्शी काव्यात (इ. १३५०) महमद तुघलकाने इ.१६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता. अहमदनगरच्या निजामशाही कारकिदीर्तील कोंढाण्याचे उल्लेख इ. १४८२, १५५३, १५५४ व १५६९ च्या सुमारसचे आहेत. इ.१६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर सिदि अवर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाणा घेतला. यावेळेस (इ.१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार मुधाजी मायदे याने लुटला.
शहाजी राज्यांच्या काळात सुभेदार दादोजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंढाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फर्मानात आहे.
दादोजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (इ.१६४७) कोंढाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.
इतिहासकार श्री.ग.ह. खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वीच कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. कै.ह.ना. आपटे यांच्या कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे. शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मोगलांकडे ताब्यात होता.

या युद्धाबाबत सभासद बखरीत पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो : 

‘‘तानाजी मालुसरेंनी ‘कोंडाणा आपण घेतो. असे कबूल करून वस्त्रे, विडे घेऊन गडाचे यत्नास  ५०० माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे मदार्ने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले. गडावर उदेभान रजपूत होता त्यांस कळले की, गनिमाचे लोक आले. ही खबर कळून कुल रजपूत कंबरबस्ता होऊन, हाती तोफा-बार घेऊन, हिलाल (मशाल), चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज, बरचीवाले चालून आले. तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर रजपुतांचे चालून घेतले. मोठे युद्ध एक प्रहर झाले. पाचशे रजपूत ठार झाले. उदेभान किल्लेदार खाशा त्यांशी व तानाजी मालुसरे सुभेदार यांशी गाठ पडली. दोघे मोठे महाशूर, एक एकावर पडले. तानाजीचे डावे हातची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास आली नाही. मग तानाजीने आपले डावे हाताची ढाल करून त्याजवरि वोढ घेऊन, दोघे महारागास पेटले. दोघे ठार झाले. मग सूयार्जी मालूसरे (तानाजीचा भाऊ) याने हिंमत धरून, कुललोक सावरून उरले राजपुत मारले. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ च्या रात्री हे युद्ध झाले. ’’

पहाण्यासारखी ठिकाणे :

दारूचे कोठार : 

तिसऱ्या दरवाजातून आत शिरताच डाव्या हातास दारू गोळ्याचे कोठार लागते. गडावर आज टिकून असलेली ही एक इमारत. या कोठारावरच ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. त्यावेळच्या फडणीसांचे घर उध्वस्त होऊन सर्व माणसे मरण पावली होती.  याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

लोकमान्य टिळक बंगला : 

 रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत. टिळक १८८९ मध्ये गडावर राहण्यास आले. इथल्या निसर्गरम्य एकांतात त्यांनी ‘आर्क्टिक होम इन वेदाज’ हा ग्रंथ आणि ‘गीतारहस्य’ची मुद्रणप्रत तयार केली.   टिळक आणि महात्मा गांधीजींची भेटही येथेच झाली.  याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोसही १९३१ साली सिंहगड भेटीवर आले होते. ते येथे मुक्कामाला होते. 

श्री अमृतेश्वर भैरव मंदिर : 

कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा दोन मूर्ती आहेत.

देवटाके :  

या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होतो. औषधी पाणी म्हणून देवटाक्याचे महत्व आहे. खरे तर जमिनीतून फिल्टर होऊन येणारे पाणी औषधीच. संपूर्ण गडावर हॉटेल विक्रेत्यांसाठी हे एकमेव पाण्याचा स्त्रोत. केवळ हॉटेल विक्रेते याचा वापर करू शकतात. कारण पाणी उपासण्यासाठी दोरी त्यांच्या प्रत्येकाकडेच असते. एका अर्थी हे बरे झाले निष्कारण येणारे पर्यटक पाण्याचा हातपाय, तोंड धुण्यासाठी या अमूल्य पाण्याचा वापर करताना मी पूर्वी पाहिले आहे.

कल्याण दरवाजा : 

गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून सिंहगडावर येता येते.  एकामागोमाग असे दोन भक्कम दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाज्याच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंतीत श्रीशालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती.  कल्याण दरवाजाचा बुरूज काही वर्षांपूर्वी ढासळल्याच्या बातम्या पेपरातून आल्या. मात्र, यंदा गडावरील तुटक्या दरवाज्यांचे, बुरूजांचे, तटबंदीची पुर्नउभारणी करण्यात आल्याने समाधान वाटत आहे. जागोजागी सुचना फलक, कचरा टाकण्यासाठी सोय, मार्गदर्शक फलक, तानाजी मालुसरे यांच्या समाधीशेजारील परिसराचे होणारे सुशोभीकरण यामुळे सिंहगड लवकरच सजणार आहे.

उदेभानाचे स्मारक : 

कल्याण दरवाजाच्या मागच्या बाजूस वर असलेल्या टेकडीवर  सध्या  चौकोनी दगड दिसतो. ते उदेभान राठोडचे स्मारक म्हणून ओळखले जाते. मोगलांतर्फे उदेभान हा सिंहगडचा किल्लेदार होता.

झुंजार बुरूज :

 झुंजारबुरूज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानूच्या स्मारकापुढे समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. पण हे वातावरण स्पष्ट असेल तरच ओळखता येतात.

डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा : 

झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पाय वाटेने तानाजीकड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. या ठिकाणाहूनच ५०० मावळ्यांसह तानाजी मालुसरे वर चढले होते.

राजाराम स्मारक : 

राजस्थानी पद्धतीची देवळासारखे ही वास्तू आहे. चौकोनी बांधकाम, चारही दिशांना निमुळते होत गेलेले छत अशी ही वास्तू आहे. छत्रपती राजाराम महाराज यांची ही समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणाºया राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी शनिवार दि. २ मार्च इ.स. १७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.  ऐन कड्यालगत ही वास्तू आहे.

तानाजी मालुसरेंचे स्मारक : 

अमृतेश्वर मंदिराच्या पाठीमागे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे. शिवकाळातच बांधलेल्या या चौथऱ्यावर सुरुवातीला २० फेब्रुवारी १९४१ रोजी तानाजींचा अर्धपुतळा बसवला गेला. पुढे २४ मार्च १९७६ रोजी पहिला पुतळा काढून त्याजागी आजचा धातूचा पुतळा बसविण्यात आला.  तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले. पण तानाजींच्या प्रयत्नांने गड जिंकला. दरवर्षी माघ वद्य नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

यंदा दीपावलीचे औचित्य साधून कोंढवे-धावडे येथील भुलेश्वर तरुण मंडळाने सिंहगडावरील पुणे दरवाजा व पादचारी मार्गावर विद्युत रोषणाई केल्याने गडावरील पादचारी मार्ग व पुणेद्वार उजळले निघाल्याच्या बातम्या पेपरात वाचण्यात आल्या.  दरवर्षी सेवाभावी संस्था व दुर्गप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते दिपोत्सव साजरा करीत असतात.

खंत : 

पूर्वी गडावर झुणका-भाकरी, दही-ताकापुरता असलेला स्थानिक लोकांचा रोजगार ठीक होता. गडावर वाढलेले सध्याचे बाजारू पर्यटनही सिंहगडाच्या पर्यावरणाला त्रासदायक ठरू लागले आहे. पण आता गडाच्या पायथ्यापासून ते गडावर सर्वत्र पसरलेली छोटीखानी हॉटेल्स पाहून आश्चर्य वाटते. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या या हॉटेल्समध्ये पिठलं भाकरी, भजी, दही, ताक तयार करून विकले जाते. चुलीवरील भाकरी ही ठरते जाहिरात. सध्याच्या तरुणांना सिंहगडाचे महत्त्व विचारले असता गरमा-गरम पिठलं भाकरी, दही ताकासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांच्याकडून सांगतले जाते. या बरोबरच काकडी, पेरू, चिंचा, बोर, चन्यामन्या बोर, आवळे, वाफवलेल्या शेंगा या रानमेव्यांबरोबरच हल्लीचे मुलांचे आवडते कुरुकुरे, बर्फाचे गोळे, आईस्क्रिम विक्रीस ठेवण्यात आले आहे. पर्यटक  या गोष्टी खरेदी करून भलेही स्थानिकांना चार पैसे मिळत असतील. पण यातून वाढणारे प्रदूषण, गडावरील प्लॅस्टिकचा कचरा, अनावश्यक पाण्याचा होणारा वापर याचा ताळमेल कसा साधणार. गडावर केवळ मोजकीच स्थानिकांची हॉटेल्स ठेऊन पर्यटकांची सोय होऊ शकते. अन्य अनधिकृत विक्रेत्यांना थारा न दिल्यास काही प्रमाणात तरी हानी कमी पोहचेल. वन विभागाकडून पायथ्याखालून गाडीने गडावर येण्यास दुचाकीस २० रुपये व चारचाकीस ५० रुपये असे शुल्क घेऊन सोडले जाते. पर्यावरणास काही हानी पोहचल्यास दंड म्हणून १०० रुपये उपद्रव शुल्कही आकारला जातो. सध्या याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे. गडावर मद्यपान, सिगरेट, कचरा करण्यास बंदी आहे. अशा आशयाच्या सूचनाही जागोजागी लिहून ठेवल्याने थोडातरी अटकाव होत आहे. गडावर साध्या वेशात फिरणारे वनखात्याचे तसेच पोलीस पाहून जरा हायसे वाटते. गळ्यात गळे घालून फिरणारी जोडपी, हुल्लडबाजी करणारे तरुण याचे प्रमाण यामुळे काहीसे तरी कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. याबद्दल वनविभागाचे मनावेत  तेवढे आभार कमीच. पण केवळ येईल त्याला गडावर प्रवेश देण्यापेक्षा काही अजून निर्बंध टाकणे गरजेचे आहे. आॅक्टोबरमध्ये सिंहगडाच्या घाटात दरड कोसळून आठवडाभर येथील रस्ता बंद होता. हा पर्यावरणाचा ºहास टाळणे गरजेचे आहे. हिरव्यागर्द झाडी, शांत निवांत सकाळ वा संध्याकाळ आणि भन्नाट वारा याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिंहगडला नक्कीच भेट द्यायला हवी. पण तीही इतिहास समजण्यासाठीच.  सिंहगडाला दररोज शेकडो पर्यटक भेट देतात, पण त्यातले अनेकजण गड कुठे दिसलाच नाही असे म्हणत नाक मुरडतात. आपल्या पूर्वजांचे रक्त येथील मातीत पडल्याची मनात कोठेतरी जाण ठेऊनच. स्वराज्य व आपल्या राजाबद्दल निष्ठा कशी असावी, याची ओळख  तानाजी मालुसरेंनी आपल्या पराक्रमातून व बलिदानाने दाखवून दिली. स्वत:च्या मुलाचे लग्न बाजूला ठेवत, स्वराज्यातून गेलेला हा गड जिंकण्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले होते. याचे कुठेतरी भान ठेवल्यास नक्कीच सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी भेट दिल्याचे सार्थक होईल.

कसे जाल :

  • सिंहगड पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे.
  • पुणे दरवाजा : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-सिंहगड  बसने आतकरवाडीपर्यंत पोहचून तेथून पायी एक ते दीड तासात गडावर जाता येते. स्वारगेट - आनंदनगर - वडगांव - खडकवासला - सिंहगड पायथा. अशी या मार्गावरील गावे आहेत. ५० ते ५६ क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात.
  • पुणे-कोंढणपूर : स्वारगेट वरून सुटणाऱ्या पुणे-कोंढणपूर बसने कोंढणपूरला उतरून कल्याण गावातून गडावर पायी जाता येते.

सिंहगडावरून काय पहाल :

  • पुरंदर, राजगड, तोरणा, वातावरण स्पष्ट असेल तर लोहगड, विसापूर, तुंग हे किल्ले, एनडीए, खडकवासला धरण असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

पुण्यनगरीचा मानबिंदू - सिंहगड छायाचित्रे


आपल्या प्रतिक्रिया येथे लिहा.

गडावर उभारण्यात आलेला मार्गदर्शक नकाशा


सिंहगडावरील पागेची जागा?


गडावर मिळणाºया खाद्यपदार्थांचे वन संरक्षण समितीतर्फे  नेमून देण्यात आले दर.


कल्याण दरवाजा


कल्याण दरवाजा



कल्याण दरवाजा


डोणागिरीच्याकड्यावरून खाली दिसणारे छोटे गाव

पुणे दरवाजा


सिंहगडावर वर चढण्यासाठी येणारी पायवाट



सिंहगडावर जागोजागी दिसणारे विक्रेते


 गडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा


 गडावर विक्रीस ठेवण्यात आलेला रानमेवा



गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके


गडावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाक. देवटाके


गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं


गडावरील काही दुर्लक्षित पाण्याची टाकं

भाजेची कातळकला


पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकाच्या डाव्या आणि उजव्या हाताला दोन प्रसिद्ध कातळशिल्प आहेत. डाव्या बाजूची भाजे गावातील भाजे लेणी, तर उजव्या बाजूची प्रसिद्ध कार्ला लेणी. यापैकी भाजे लेणीचा मागील आठवड्यात फेरफटका केला. त्याबद्दल... ¸

                  चैत्यागृहाच्या बाहेरील बाजूस कातळात कोरलेल्या कोरीव सज्जे, वेदिकापट्टीची नक्षी, चैत्य गवाक्षांच्या माळा, कातळात खोदलेल्या सुंदर कड्या, भिक्षुंसाठी निवासस्थाची केलेली सोय, सुंदर कोरीवकामातून सूर्यप्रकाश येण्यासाठी तयार करण्यात आलेली जाळी आणि पडदे दिसून येतात. काही गवाक्षात युगुले कोरलेली आहेत. चैत्यागृहाच्या डाव्या हाताला एक यक्षिणी कोरलेली असून तिच्या हातात तिने धरलेले झाड दिसते. तेथील कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत. या चैत्यागृहात ओळीने २७ अष्टकोनी खांब आहेत.  या खांबांवर कमळ, चक्र अशी काही शुभचिन्हे कोरलेली आहेत. अशीच शुभचिन्हे बेडसे येथील लेणीमध्येही पाहण्यास मिळतात. एका खांबावर तर एक खुंटी कोरलेली असून त्या खुंटीवर हारही कोरलेला आहे. चैत्यगृहात शेवटच्या भिंतीसमोर वाटोळा गुळगुळीत केलेला स्तूप आहे. प्राचीन काळी लेण्यांना चैत्यगृहात आतील बाजुने माती-गवताचा गिलावा देऊन त्यावर रंगकाम केलेले असे. बेडसे लेणी जेव्हा इंग्रजांच्या कालावधीत सापडली. तेव्हा तेथे साहेब येणार म्हणून तेथील कर्मचाºयांनी चैत्यगृहातील ही अनमोल रंगकाम पुसून, खरडून काढले. काळाच्या ओघात जरी आज हे रंग उडाले असले तरी भाजे येथील चैत्यागृहात गिलाव्याचे अजूनही काही अवशेष दिसतात. बॅटरीच्या प्रकाशात मुख्य स्तूपाच्या पाठीमागच्या काही खांबांवर ध्यानस्थ बुद्धाच्या चित्रप्रतिमांचे पुसटसे अंश दिसतात. स्तुपावर असलेला हर्मिकेचा चौथरा स्वतंत्र दगडात कोरून बसवलेले आहे. या चैत्यागृहात असलेला तुळयांचे छत म्हणजे लेणीकलेतील आश्चर्य म्हणावे लागेल. बावीस अर्धवतुर्ळाकार आणि पाठीमागे निमुळत्या होत गेलेल्या भागात अकरा लाकडी तुळयानी हे छताला आधार दिलेला आहे. १९६० च्या दशकात या लेण्याची साफसफाई करताना यातील दोन तुळयांवर ब्राम्ही लिपीत लिहिलेले दोन लेख आढळले. वेगवेगळ्या गुफेत एकूण १२ शिलालेख आहेत. या लेखांमुळे या तुळयांबरोबर या लेण्यांनाही इसवी सन पूर्व दुसºया शतकाचा इतिहास असल्याचे सिद्ध झाले.  सुरुवातीला असलेल्या पाच-सहा तुळया सोडल्या तर बाकीच्या बावीसशे वर्षे जुन्या असल्याचे सांगितले जाते. चैत्यगृहाचे छत गजपृष्ठाकृती असून या छताला आतल्या बाजूने लाकडी तुळ्यांनी आधार दिलेला आहे. या लाकडी तुळया प्राचीन असण्याचा उल्लेख मात्र मनाला पटेनासा वाटतो. कारण जेथे किल्यातील दगड परिसरातील लोक घेऊन जातात. तेथे या लाकडाचे काय. चैत्यगृहाचे स्तंभ आणि आतील भिंती देखील थोड्या कलत्या ठेऊन तासून काढलेल्या आहेत. कलत्या स्वरूपामुळे छताचा दाब ते तोलून धरू शकतील हा बहुदा कारागिरींचा उद्देश असावा. अर्थात नंतरच्या काळात खोदलेल्या लेणींमध्ये मात्र, अशा स्वरुपाची कलत्या स्तंभांची गरज नसल्याचे लक्षात आल्याने तशी रचना दिसत नाही.

                चैत्यगृह पाहून बाहेर मुख्य प्रांगणात आल्यानंतर शेजारी, दुमजली विहारांकडे जाता येते. काही विहार साधे तर काही कोरीव कामाने नटलेले दिसून येतात. भिक्षुंच्या योग्यतेप्रमाणे बहुधा हे कोरीवकाम केलेले असावे.  येथील विहारांना दरवाजे, खिडक्या आहेत आणि झोपण्यासाठी दगडी कट्टा सुद्धा आहेत. काही कट्टांच्या खालती सामान ठेवण्यासाठी कप्पेही केलेले दिसून येतात. साधारणपणे इसवी सन पूर्व दुसºया शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरवात झाली व पुढे तब्बल सातशे ते आठशे वर्षे ही लेणी कोरण्यासाठी छिन्नी व हाथोडे काम करत होते. ही लेणी अनेक वर्षे वापरात राहिली.
                महाराष्ट्रात असलेल्या लेणी बांधण्यासाठी खर्च येणारच.  बेडसे लेणीत, भाजे लेणीत अशा कामांसाठी देण्यात आलेले दानाचा उल्लेख आढळतो. सुरुवातीच्या एका विहारातील एक लेख ब्राह्मी लिपीतील असून, या लेखांचे वाचन व आकलन इतिहासतज्ज्ञांना झाल्याने अनेक गोष्टींवर प्रकाश पडलेला आहे. या संपूर्ण लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसºया शतकात कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निमिर्तीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्या दानाचे लेख तेथे दिसून येतात.

‘बाध या हालिकजयांना दान’ याचा अर्थ असा, की ‘बाध या शेतकºयाच्या बायकोचे दान!
लेणी तयार करताना मुख्य प्रश्न पडतो. तो पिण्याच्या पाण्याचा भाज लेणीमध्ये ४ ते ५ पाण्याची टाकी आहेत. चैत्यागृहाच्या दक्षिण दिशेला पाण्याचे एक जुळे टाके आहे. ‘महारठी कोसिकीपुत विन्हुदत’ असा दानधर्माचा ब्राम्ही लिपीतील लेख या टाक्याच्या मागील भिंतीत कोरला आहे. या टाक्यावरून आणखी पुढे गेलो की वाटेत ओळीने कोरलेला १४ स्तूपांचा समूह दिसतो. या लेण्यात राहून गेलेल्या बौद्ध भिक्षूंची ही स्मारके आहेत. यातील काही स्तुपांवर त्यांचे नावही कोरलेले आहे. यालाच डागोबा असेही म्हणतात. डागोबा किंवा डागाबा हा सिंहली शब्द सामान्यपणे स्तूप या बौद्ध धर्मीय वास्तूचा निर्देश करण्याकरिता श्रीलंकेमध्ये रूढ आहे. हा शब्द ‘धातुगर्भ’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे, असे समजतात. धातू याचा अर्थ अवशेष. असा अवशेष ज्याच्या गर्भात तो धातुगर्भ स्तूप = डागोबा. स्तूपाच्या अंडाकृती भागास हा विशेषकरून वापरतात, कारण त्यात अवशेषांचा लहान करंड असतो.

‘सूर्यलेणे’

                १४ स्तूपांच्या समुहावर सध्या शेड टाकल्याने थोडे संरक्षण मिळाले आहे. तसे संपूर्ण लेणीभोवती संरक्षण जाळी टाकल्याने परिसरातील जनावरांना अटकाव मिळतो. येथून थोडे पुढे  गेल्यावर डाव्या बाजूला कातळात दिसते ते ‘सूर्यलेणे’. १८७९ साली भाजे लेण्यांजवळ ब्रिटीश संशोधकांनी साफसफाई केली तेव्हा शिल्पसौंदर्याने नटलेले हे लेणे सापडले. ‘सूर्यलेणे’ असे त्याचे नाव. व्हरांडा, आत एक दालन आणि त्याला आत पुन्हा खोल्या अशी या लेण्याची रचना आहे. सध्या पर्यटकांसाठी आतील ठिकाण कुलूप लावून बंद करण्यात आलेल्याने थोडेतरी संरक्षित झाले आहे. हे लेणे म्हणजे विहार (बौद्ध भिक्षुंसाठी आरामाची जागा) आहे.


सूर्य आणि इंद्राचा देखावा

                शस्त्रधारी द्वारपाल, हिंदु पौराणिक प्रसंग आणि चैत्य-स्तुपांचे नक्षीकाम येथे कोरून ठेवले आहे. या विहाराच्या उजव्या भिंतीवर देखावा आहे. सूर्य आणि इंद्राचा देखावा तर अप्रतिम आहे. यातील पहिल्या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वर होऊन चालला आहे. रथात मागे-पुढे दोन स्त्रिया असून, एकीने छात्र धरलेले असून दुसरीने चामर धरलेले आहे. सूर्याच्या रथाखाली काही असुर तुडवले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. रथाचे चाक, हातातील चाबुक, पुरुष व स्त्रिया या नीट न्याहाळल्यास आपल्या त्यातील अर्थ कळू लागतो.  दुसºया बाजुला असलेल्या शिल्पात इंद्र हत्तीवर बसलेला दिसून येतो. एका हातात अंकुश आणि गळ्यात फुलांची माळ घातलेली आहे. इंद्राच्या पाठीमागे त्याचा दास असून त्याने हातात पताका धरलेली आहे. इंद्र शिल्पाखाली नृत्यकलाकार, वादक, देवदेवता, प्राणी, राजे, नोकर दाखवले  आहेत. तबला वाजवताना एक इसम ही दाखवला आहे. ओट्यावरच्या शिल्पांमध्ये घोडे, बैल आदी प्राण्यांना पंख असल्याचंही दाखवलं आहे. येथील स्त्री-पुरूषांच्या शिल्पांमधून त्या काळचा पेहराव पाहायला मिळतो. स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला आहे, त्यांच्या कमरेला शेला आहे तर पुरूषांनी धोतर व पागोटे परिधान केले आहे. बांगड्या, तोडे, मेखला, गळ्यातील हार, कर्णफुले, बिंदी अशी आभूषणेही महिलांच्या अंगावर त्यावेळच्या शिल्पकारांनी कोरून ठेवलेली आहेत.
                सूर्यलेणीच्या थोड्याश्या अंतरावर दोन विहार आहेत. विहारासमोरच वरील डोंगरातून येणारा धबधबा आपले मन मोहून टाकतो. पुरातत्व विभागाने जाळी लावून लेणीला संरक्षण दिले आहे. मात्र, काही पर्यटकांनी येथील जाळी तोडून डोंगरावरून येणाºया या धबधब्याखाली जाण्यासाठी वाट केली आहे. मात्र, हे किती धोकादायक आहे हे येथे येऊनच कळते. घसरडे असल्या कारणाने आम्ही काही खाली उतरलो नाही.
                सुमारे अर्धा ते पाऊणतासात लेणीचे दर्शन घेऊन आम्ही लेणी उतरलो. वाटेत असलेल्या धबधब्यातून येणाºया पाण्यामध्ये बसून, चिंब ओले होऊन वर्षाविहाराचा आनंद लुटला.
एकदा तरी वेळेत वेळ काढून पाहून येण्यासारखी हे जागा आहे.

                इसवी सन पूर्व दुसºया शतकापासून ते इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या कालखंडात भारतात अनेक ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या.  लेणींचे हे प्रसिद्ध लेणं महाराष्टÑात सर्वदूरपर्यंत पोहचले. पुण्याच्या जवळ असलेली  कोंडाणे, कार्ले, भाजे, बेडसे, तसेच भंडारा डोंगरावरील लेणी, घोरावडेश्वरावरील लेणी तसेच जुन्नर, नाशिक पांडवलेणी, धाराशिव, खरोसा, कोकणच्या घाटवाटांवरची ठाणाळे, खडसांबळे, गांधारपाले, कºहाड मार्गावरची शिरवळ, आगाशिवची लेणी आणि पैठणजवळची पितळखोरे, पाटण, वेरूळ, औरंगाबाद-अजिंठ्याची प्रसिद्ध लेणी. प्रसिद्ध आहेत. शतकानुशतके बंंदरावरील माल देशावर आणण्याचा हा मार्ग होता. बौद्ध भिक्षुंसाठी हा नेहमीचा वापरात येणारा व्यापारी मार्ग होता.  थेट कोकण ते घाटमार्ग जोडणारा हा मार्ग आपल्याला जुन्नर, नाणेघाटात जायचा.  अर्थातच विश्रांतीसाठी तसेच ध्यानधारणा करण्यासाठी अशा अनेक लेणी खोदण्यात आल्या. डोंगरातील कपारींमध्ये गुफा खोदून त्यात बौद्ध मठ स्थापन करण्याचे कौशल्य भाजे मठाच्या कामात बौद्ध भिख्खूंनी प्राप्त करून घेतले असले पाहिजे व नंतरच्या काळात या कुशलतेचा वापर करून अन्य ठिकाणी असे बौद्ध मठ खोदले गेले असावेत. भाजे लेण्यामधील सर्वात जुन्या गुंफा इ.स. पूर्व २०० च्या आधी परंतु सम्राट अशोकाच्या (इ.स.पूर्व २७२) कालाच्या नंतर या कालखंडात खोदलेल्या असल्या पाहिजेत.  लेणींमध्ये स्तूप उभारले गेले. स्तूप म्हणजे बुद्धाच्या किंवा मोठ्या बौद्ध भिक्षूंच्या शरीराच्या अस्थी किंवा इतर अवशेषांना करंडकात ठेवून त्यावर दगडाचे बांधकाम करण्यात येई.  आदर दर्शविण्यासाठी एक छोटी छत्री उभारली जाई.  चैत्यगृहाच्या आत असलेला दगडी स्तूप बांधलेला आहे. हे स्तूप जेव्हा दगडात कोरलेल्या गुहांमध्ये असत तेव्हा त्याची शैलगृह अशी संज्ञा आहे.  हे लेणे शैलगृह या संज्ञेने ओळखले जाते. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.

पुरातत्व विभागाच्या  फलकावरील माहिती  : 

लेणीच्या मुख्य दरासमोर भारतीय पुरातत्त्व विभागाने माहिती देणारी कोनशिला बसविली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीतील ही माहिती पर्यटकांना माहिती देण्यास चांगलीच मदत करते.
'भाजे येथील हीनयान (थेरवाद) परंपरेतील गुंफा इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.सनाचे पहिले शतक या काळात कोरल्या गेलेल्या २९ गुंफांचा समूह आहे. हे दख्खनमधील सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुंफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी त्यांचे महत्त्व अपरंपार आहे. चैत्यगृहांच्या (प्रार्थनागृह) रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत प्राचीन स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळया, दगडातले साधे सरळ पण किंचित कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे गुंफांच्या आत व बाहेर पाहावयास मिळतात. पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्ठशिल्पांनी अलंकृत केली होती. आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत. या गुंफेतील स्तुपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्याखालचा भाग अंडाकृती आहे. तसेच वरती 'हर्मिका' नावाचा चौकोनी भाग आहे. येथे निरनिराळ्या गुंफांमध्ये एकूण १२ शिलालेख आहेत. त्याचप्रमाणे येथे असलेला स्तुपांचा समूह सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यातर्फे या गुंफा गॅझेट नोटिफिकेशन क्र. २७०४-ए दि. २६-५-१९०९ नुसार राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केल्या आहेत.'

काही इतर गोष्टी :

चैत्यगृहाच्या स्तूपावर तीन प्रयत्नात नाणं फेकून आपली मनोकामना पूर्ण करण्याची नवीन पद्धत  सुरू झाली आहे. हे फेकलेले नाणे स्तुपावर राहील्यास अथवा  घरंगळ्यास त्याची मनोकामना पूर्ण होते. अशा काही अंधश्रद्धेच्या गोष्टी सर्वच लेणींमध्ये होत असतात. अर्थातच अशा अंधश्रद्धेला काय अर्थ आहे.

अशा पर्यटन स्थळी येताना तरी कपडे घालून येण्याचे साधे भान सध्याच्या तरुणीईला नसल्याचे पाहून वाईट वाटते. पुरुषांना सुद्धा लाजवेल अशा हाफ पॅन्ट घालून, अंगात तोकडे कपडे घालून  विक्षिप्तपणे वागत, लेणी परिसरात हिंडत होते. बाहेरील स्तूपांबरोबर सेल्फी काढणारे पाहून वाईट वाटले. केवळ पावसात भिजण्याचा आंनद घेणाºयांना लेणीविषयी जरा सुद्धा माहिती घेण्याची इच्छा होत नाही. महाराष्ट्रातील या लेणी आपला सांस्कृतिक वारसा आहे. त्याची मंदिराप्रमाणे पूजा जरी होत नसली तरी मंदिरासारखे पावित्र्य नक्कीच जपायला हवे. पेपरात पावसाळा सुरू झाला की धबधब्यात वाहून जाणारे तरुणांच्या मृत्यूच्या बातम्या यायला लागतात. पावसाळा नक्कीच आनंदाने साजरा करा. मात्र थोडेतरी भान ठेवायला हवे. आम्ही धबधब्यातून येणाºया पाण्याखाली उभे होतो तर काही महाभाग जेथे धबधबा कोसळतो त्या ठिकाणी सेल्फी काढण्यात मग्न होते. पावसाळ्यात अशा ठिकाणी घसरडे होते. पाय सटकतो. याचे जराही भान न ठेवता पावसाळा एन्जाय केला जातो.

भाजे गावाविषयी :

भाजे हे एक लहानसे गाव. पुणे जिल्ह्यातील वडगाव पासून काहीच अंतरावर असलेल्या मळवली येते. पुण्याहून जुन्या हायवेने मुंबईला जातांना कार्ला फाटा लागतो. येथून डाव्या बाजुने मळवली रेल्वेस्टेशनाचा ओव्हर ब्रीज ओलांडून भाजे गावात जाता येते. या गावातून डाव्या बाजूने लोहगडकडे जाणा-या रस्त्याला लागूनच डाव्या बाजूच्या विसापुर किल्याच्या डोंगराला लागून असलेल्या डोंगरात भाजे लेण्यांचा समूह आहे. भाजे येथे २३ जुलै १९८९ रोजी अतिवृष्टीमुळे डोंगरपायथ्याला असलेल्या चार घरांवर दरड कोसळून ४७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

कसे जाल :

  • पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर भाजे लेणी आहे.
  • पुण्याहुन लोकलने लोणावळ्याकडे जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनिटांच्या अंतरावर ही लेणी आहेत.
  • मुंबईहून एक्सप्रेस वे मार्ग येत असल्यास लोणावळ्याला बाहेर पडून मळवलीपर्यंत येता येईल.  तेथून मळवली गावाकडे जाताना रेल्वे लाईनवरचे एक रेल्वे क्रॉसिंग ओलांडून पुलावरून भाजे गावात येत येईल.
  • जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने गेल्यास कार्ला (एकवीरा माता) कडे जाण्यासाठी एक चौक लागतो. येथून डावीकडे वळून कार्ल्याच्या विरुद्ध दिशेने साधारण ३-४ किमी वर मळवली स्टेशन येत. तेथून काहीच अंतरावर भाजे लेणी आहेत.

अजून काय पाहाल

मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर येथून जवळच असलेले लोहगड व विसापूर किल्ले आपले स्वागत करतात. वाहन असल्यास सुमारे अर्धा तासात लोहगडवाडीपर्यंत गाडीरस्ता आहे. मात्र, काहीसा वळणावळण असल्याने गाडी जपून चालवलेली चांगलीच. येथून पुढे उजव्या बाजूने लोहगडाला वळसा घालून गेल्यास उर्से येथील खिंडीतून पवना धरण, तुंग, तिकोना, पौड रस्त्याला जाता येते. मात्र, पावसाळ्यात शक्यतो हा मार्ग नवख्यांनी वापरू नये कारण या खिंडीत अनेकवेळा दरड कोसळत असते.

तिकीट दर : 

भारतीयांसाठी प्रत्येकी १५ रुपये नाममात्र, तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये.

घाटांचा रक्षक ‘तिकोना’


२६ जानेवारी २०१७

सुमारे २२ वर्षांपूर्वी मी गडाचे पहिले पदभ्रमण केले होते. यानंतर आधे-मधे कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच असे दहा पंधरा वेळा तरी वेगवेगळ्या मार्गे तिकोना सर केलेला होता. आज २६ जानेवारी. मॉल किंवा पिक्चरला न जाता ट्रेकर्स लोकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाºया मावळातील तिकोना किल्यावर जाण्याचा मनोदय घरच्यांपुढे मांडला. त्यांनीही काही तक्रार न करता जाऊ या असा ग्रीन सिग्नल दिला. मग आमची स्वारी निघाली ती तिकोना किल्याकडे. या विषयी या लेखात....

 पवन मावळात वसलेला आणि आपल्या वैशिष्टपूर्ण अशा त्रिकोणी आकाराने पटकन ओळखता येण्यासारखा किल्ला म्हणजे ‘किल्ले तिकोना उर्फ  वितंडगड’  पवन मावळातील जुन्या काळचा घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो.
पवन मावळ. बारा मावळांपैकी एक. लोणावळयाच्या दक्षिणेकडे सहयाद्रीत उगम पावणाºया पवना नदीचे हे खोरे. पिंपरी-चिंचवड परिसराला याच धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. या नदीवर १९७५ मध्ये पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय साकारला आहे. दोन मोठ्या किल्यांच्या म्हणजेच लोहगड आणि विसापूरच्या काहीसा मागे लपलेला हा किल्ला आपल्या थेट नजरेस पडत नाही.  (मळवली बाजुने पाहिल्यास ) चौथ्या शतकापासून, राजा भोज, यादव काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. कोकणातील बंदराना घाटमाथ्याशी जोडणाºया अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. सध्याचा मुंबई-पुणेचा बोरघाट चढून आल्यावर कार्ले,  भाजे, (मळवली) बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी (देहूरोड) येथे लेणी उभारली गेली. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन काळी या मार्गावर व लेणीच्या संरक्षणासाठी या दुर्गांची निर्मिती केली गेली होती.  पुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या संशोधनानुसार सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला गेला आहे.  समुद्रसपाटीपासून ३४८० फूट (९९३ मीटर) उंचीवरील हा किल्ला.


सोमाटणे फाटा मार्गे परंदवडी, बेबेडओहोळ व तेथून पवनानगर असा मार्ग क्रमात आम्ही तिकोना पेठेत येऊन पोहोचलो.  तिकोना पेठेतून गडावर दोन वाटा जातात. एक सरळ उभ्या चढणीची, तर दुसरी लांबची गडाच्या डावीकडील खिंडीतून वर जाणारी सोपीवाट. आम्ही दुसºया मार्गे गेलो. पावसाळा होऊन गेल्यानंतरही सध्या येथील रस्ता शाबुत आहे. थेट गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंग करून किल्यावर जाण्यास सुरूवात केली. हा मार्ग अतिशय सोपा. नवख्यांना काहीसा दमवणारा. तरीही सहज गडावर जाता येण्यासारखा असा.
तिकोना गड तसा फार छोटा. त्यातही गडाचा घेराही कमी. त्यामुळे पायथ्यापासून चालण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या तासाभरातच आपण बालेकिल्यावर पोहोचतो. गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे अर्धा तास किल्ला पाहण्यास पुरेसा होतो.

पहिल्या वाटेने वर आलो तर गडाच्या पहिल्या दरवाजातून माचीवर प्रवेश होतो. तर दुसºया वाटेने आपण खिंडीजवळून माचीत दाखल होतो. काशिगकडून येणारी वाटही इथेच येऊन मिळते. याशिवाय घेवंडमार्गे येणारी वाट वेताळ दरवाजातून माचीत दाखल होते.

महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. गडाच्या या छोट्याश्या माचीवर दाखल होताच मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपल्याला दर्शन देते. सुमारे ४-५ फूट उंचीची शेंदूर फासलेली ही मारुतीरायांची मूर्ती. इतर मूर्तींप्रमाणे हातात द्रोणागिरी पर्वत उचललेली नसून पायाखाली दैत्य मारलेली विजयी मद्रेतील लढवैय्यी मूर्ती  आहे.   दुर्गप्रेमी संस्थांनी  येथे स्वच्छता व डागडुजी केल्याने परिसर स्वच्छ करून ठेवला आहे. विशेष म्हणजे गड आपल्याला कसा वाटला याची नोंदवहित प्रतिक्रिया देण्यासाठी गडावर मावळी वेशभूषेत  चक्क सहकारीही ठेवला आहे. येथून थोड्याच अंतरावर किल्याच्या बांधकामासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आहे. या ही ठिकाणी स्वच्छता केलेली आढळून येते.  काही जुन्या घरांचे जोते दिसतात. येथून थोडे पुढे उभ्या कातळात खोदलेले एक लेणे आहे. तळजाई मंदिर म्हणून येथील परिसरात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. या लेण्यासमोर एक टाकेही खोदलेले आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. सिंहगडावरील देवटाक्याप्रमाणेच हे पाणीही गोड व थंडगार असते.
गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे काहीसे अंतर चालून गेल्यावर एक पाण्याचे टाके आणि गुहा लागते. गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात मात्र, पाणी शिरते. गुहेच्या बाजुने वर जाणारी वाटेने थेट बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो.

बालेकिल्ला : 

राजगडप्रमाणे याही किल्याला बालेकिल्ला लाभला आहे. या बालेकिल्यावर जाण्यासाठी आधी दोन दरवाज्यातून आपणास जावे लागते. प्रवेशद्वाराच्या पायºया या दमछाक करणाºया आहेत. सध्या किल्याचे दुर्गप्रेमींकडून डागडुजीचे काम सुरू आहे. या पायºयांवर चढण्यासाठी तोल जाऊ नये म्हणून आधारासाठी दोरी लावलेली आहे. या दोरीच्या साहयाने सहजच बालेकिल्यापर्यंत जाता येते.  बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या सुमारे पन्नास पायºया चढल्यावर पहिला दरवाजा येतो. उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके आहे. पहिल्या दरवाजापासून ते दुसºया दरवाज्यापर्यंत उभा कातळ फोडून ही वाट तयार केली आहे. येथपर्यंत किल्ला चढून दमून आलेले काहीजण या अलिकडेच धारातीर्थ होतात. दमछाक करणारा हा छोटासा ट्रेक आहे. दहा ते पंधरा फूट उंचीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते.  अरुंद वाट, उंच पायºया आणि अंगावर येणाºया उभ्या कातळभिंती आपल्याला एका वेगळ्याच गूढ विश्वात घेऊन जातात. गडाची निर्मिती, शिल्पकार कोण असावा? कोणास ठाऊक मात्र, बांधणी सुरेख केलेली आहे. शत्रू जरी येथपर्यंत आला तरी एका वेळी एकजणच वर येता येईल अशा येथील पायºयांची रचना आहे.
दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा थोडा मोठा. दरवाजा बंद केल्यानंतर या ठिकाणी असणारा लाकडाचा अडसरासाठी खोबणी दिसून येतात. अर्धवर्तुळाकार बुरूजाच्या मध्ये भागी असलेल्या दरवाजाचे काळाच्या ओघात आता त्याचे काही अवशेषच राहिलेले दिसून येतात. उजव्या हातास पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत. तर डावीकडे ढालकाठीचा बुरूज आहे. येथून आपण चढून आलेला काही परिसर दिसून येतो.  येथून पुढे गडाचा तिसरा दरवाजा येतो. याला ओलांडतच आपण बालेकिल्यात प्रवेश करतो. बालेकिल्यावर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे. याच्या मागील बाजूस ध्वजस्तंभ आहे.  धान्याची कोठारे असे थोडेफार अवशेष व दगडविटांचे ढिगारे इथे दिसतात. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. पावसाळ्यात येथील वातावरण एकदम बदलून जाते.
मुलाचा असला किल्ला सर करण्याचा पहिलाच अनुभव. त्यामुळे काहीसा माझ्यावरचा राग... थोडे अंतर पार झाल्यावर बसण्याची व पाणी पिण्यासाठी हट्ट... माझे त्यावर नाही म्हणणे. या सर्व गोष्टी करत करत एकदाचे आम्ही बालेकिल्यावर जाऊन पोहचलो. वरील सर्व वातावरण पाहून तो खूष झाला. आपणही एवढ्या उंचावर येऊ शकतो ही भावना त्याच्याकडून ऐकल्यावर किल्यावर आल्याचे सार्थक झाले. थोडा वेळ थांबून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. अर्ध्या तासातच नॉन स्टॉप आम्ही खाली आलो.








लांबून गड किल्ले बघायला येणाºयांसाठी :
स्वत:चे वाहन असल्यास भाजे लेणी, लोहगड, विसापूर, पवना डॅम शेजारून तिकोना व तुंग व बेडसे लेणी असा दोन दिवसांचा जलद ट्रेक ही करता येऊ शकतो. यापैकी लोहगडावर राहण्याची सोय होऊ शकते. तुंग किल्यावर जाण्यासाठी पूर्वी लाँचची सेवा उपलब्ध होती. मात्र, सध्या ती सुरू नाही. त्यासाठी एसटी बसने अथवा खासगी वाहनाने तुंगवाडीपर्यंत जाता येते.









गडाचा इतिहास : 

इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्यांबरोबरच हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. इ.स. १६८२ च्या आॅगस्ट महिन्यात संभाजीमहाराज व अकबर (औरंगजेबाचा मुलगा) यांची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्यावर काही काळ राहिला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. पुढे मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकला. विजयाची निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड’ असे ठेवले.  मात्र, काही वर्षांतच औरंगजेबाचा मृत्यू झाला व पुन्हा तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे होता. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला. पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे देण्यात आला.
सध्या पुण्यातील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे  किल्याच्या डागडुजीचे काम सुरू आहे. खरे तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रत्येक किल्यावर अशा प्रकारचे काम जोरात सुरू करायला हवे. मुंबईतील अरबी समुद्रात महाराजांचा अश्वारुढ पुतळा बांधण्यासाठी लागणारे करोडो रुपये खर्च करून काय साधणार? त्यापेक्षा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील अशा शेकडो किल्यांवर हा पैसा चांगल्या मार्गाने व खºया अर्थाने खर्च केल्यास महाराजांना मुजरा केल्यासारखेच होईल.



किल्यावरून दिसणारा परिसर :
तिकोना किल्यावरून तुंग, लोहगड, विसापूर, कोरीगड, भातराशीचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवन मावळ परिसर, फागणे धरण (पवना डॅम) हा सर्व परिसर नजरेत येतो.
सर्व गड फिरण्यास १ तास पुरतो.

कसे जाल :

मुंबईकडून येणाºया पर्यटकांसाठी :

लोणावळा रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तेथून पुण्याकडे जाणाºया रेल्वेने दोन स्टेशन पुढे असलेल्या कामशेत या स्टेशनावर उतरावे. कामशेत ते काळे कॉलनी अशी बस सेवा, जीपसेवा उपलब्ध आहे.
मुंबईहून येणाºया पर्यटकांसाठी दुसरा मार्ग म्हणजे लोणावळ्याच्या पुढील रेल्वे स्टेशन मळवली. तेथे उतरून भाजे लेणी, विसापूर, लोहगडला रात्री मुक्काम व दुसºया दिवशी तिकोना व तुंगी किल्ला करून तेथूनच लोणावळ्याला जाणाºया एसटीने मुंबईला जाता येते.
कामशेतपासून सकाळी ८.३० ला सुटणारी पौड एसटी बस पकडून तिकोनापेठ या गावी उतरावे. तसेच कामशेत ते मोर्सेबस पकडूनही तिकोनापेठला उतरता येते. तिकोनापेठतून ४५ मिनिटात आपण किल्यावर पोहचता येते.

पुण्याकडून येणाºया पर्यटकांसाठी :

पहिला मार्ग :
पुण्याहून येताना सोमाटणे फाटा येथे शिरगावच्या पुढे म्हणजेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या डावीकडे एक्सप्रेस हायवेला जाणाºया मार्गाकडे जाण्यास निघावे तेथून पूल ओलांडून आपण परंदवडी, बेबेडओहळ मार्गे पवनानगर व तेथून तिकोना किल्यावर जाता येईल. हा प्रवास विशेषत: पावसाळ्यात खूपच सुंदर असतो. छोटे रस्ते, सर्वत्र भाताची लावणी सुरू असते. हे सर्वत्र दृश्य मनमोहक असते.

दुसरा मार्ग :

पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतपासून डावीकडे वळून पंधरा किलोमीटरवर पवना धरण. या धरणालगतच्या पवनानगर, काळे कॉलनी भागापर्यंत तळेगाव, कामशेतहून एस.टी. बस येतात. इथून चार ते पाच किलोमीटरवर तिकोना गड आहे. दक्षिणेकडून पौड- कोळवण-काशिग मागेर्ही गडापर्यंत एक रस्ता येतो. यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून सुटणारी जवण, काशिगची एसटी सुविधा आहे. याशिवाय कामशेत, तळेगावहूनही जवणच्या दिशेने देखील काही एसटी बस धावतात. यापैकी कुठलीही बस मिळाल्यास गडाच्या पायथ्याशी असलेल्या घेवंड गावी उतरून तिकोना किल्ला पाहता येतो. स्वत:चे वाहन असल्यास पुण्याहून दोन ते अडीच तासात किल्याच्या पायथ्याशी पोहाचता येते.

 

 

 

पार्किंगसाठी पैसे :

शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला. मात्र, काहीजण या रोजगाराकडे पैसे उकळण्याचे साधन समजू लागले आहेत. गडाच्या पायथ्याशी पोहचल्यावर गाडी लावण्यासाठी  टू व्हिलरला २० रुपये, फोर व्हिलरसाठी ४० रुपये अशा प्रकारचे पार्किंग दर आकारले जात आहे. वादविवाद केल्यास ही जागा अमुकअमुक यांची असून, त्यासाठी हा दर आकारला जात आहे असे सांगितले जाते. येथे येणारा पर्यटक गडाच्या पायथ्यापर्यंत आल्यानंतर हे दर पाहून आश्चर्यच व्यक्त करतो. काही पर्यटक पैसे न देण्याची भाषा करू लागतो. प्रसंगी भांडणे होतात. हवा सोडून देण्याची भाषा ही बोलली जाते. हे कुठेतरी टाळणे गरजेचे आहे. यासाठी नाममात्र दर आकारल्यास अधिक पर्यटन घडून स्थानिकांना रोजगार होऊ शकतो.



माझी ‘बकेट लिस्ट’ तशी फार साधारण आणि छोटी आहे.
‘भिगवणला एकदा तरी जायचे !’ हा माझ्या या छोट्या लिस्टमधला एक पॉइंट होता.
कित्येक वर्षांपासून फक्त प्लॅनच तयार व्हायचा आणि ऎनवेळी कोणत्या तरी कारणाने तो रद्द व्हायचा.
गेल्या २ वर्षांपासून पुण्यात राहतोय, तरी योग जुळून येत नव्हता.
शेवटी मागच्या महिन्यात २९ तारखेचा प्लॅन केला आणि यावेळी तो रद्द होऊ दिला नाही.

भिगवणबद्दल ‘वेगळे’ काही लिहिण्यासारखे माझ्याकडे नाहीये, कारण भिगवण कशासाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांनाच माहित आहे.
त्यामुळे फक्त माझा अनुभव शेअर करतो.

भिगवणबद्दल बरेच ऎकून, वाचून आणि फेसबुकवर बघून होतो.
भिगवणला जाऊन आलेले पर्यटक अनेक ब्लॉग आणि वेबसाईट्सवर संदिप नगरे (दूरध्वनी क्रमांक-9960610615) यांचा उल्लेख करतांना दिसायचे.
या संदिप नगरेंवर Pune Mirror मध्येसुद्धा एक लेख आला होता.
http://www.punemirror.in/pune/others/Birding-takes-wing-for-Bhigwans-fis...

संदिप नगरे कुंभारगावला (Birding Point) पर्यटनाचा व्यवसाय चालवतात, कसलेही ‘व्यावसायिकीकरण’ होऊ न देता.

भिगवणच्या जवळ पोहोचल्यावर रस्ता विचारण्यासाठी आम्ही फोनवरून सतत त्यांच्या संपर्कात होतो.
एका ठिकाणी त्यांच्या ‘अग्निपंख बर्ड वॉचर ग्रूप’ची पाटी दिसली म्हणून आम्ही आमची गाडी तिथे थांबवली.
तिथे काही सदगृहस्थ उभे होते, त्यांना आम्ही संदिप यांच्याबद्दल विचारले तर त्यांच्यापैकी एक सदगृहस्थ म्हणाले, ’तो पुढे गेलाय. मी तुमच्याबरोबर एक मुलगा पाठवतो, तो तुम्हाला बोटीजवळ घेऊन जाईल.’
त्यांनी बोलावलेला एक मुलगा आमच्या गाडीत बसला आणि ड्रायव्हरला रस्त्याबद्दल गाईड करायला लागला.
बरेच अंतर पुढे आल्यावर त्या मुलाने एका घराजवळ गाडी थांबवायला सांगितली.
गाडीखाली उतरून आम्ही संदिप भाऊंची वाट बघायला लागलो.
तेव्हढ्यात संदिप भाऊंचाच फोन आला.
आम्ही कुठवर पोहोचलोत याची विचारपूस ते करत होते.
आम्ही त्यांना सगळी परिस्थीती सांगितल्यावर त्यांनी आम्हाला आहोत तिथेच थांबायला सांगितले आणि थोड्याच वेळात स्वतःच्या दुचाकीवर ते तिथे आले.
तिथून गाडी परत फिरवून मग आम्ही संदिप भाऊंच्या घरी पोहोचलो.

संदिप भाऊंनी सांगितले की ज्या सदगृहस्थांनी आम्हाला पुढे पाठवले होते, त्यांचा स्वतःचा एक वेगळा ग्रूप आहे.
बरं, त्या सदगृहस्थांचा काही गैरसमज झाला असेल असे म्हणायलासुद्धा काही वाव नव्हता, कारण आम्ही संदिप भाऊंकडे आलो आहोत हे आम्ही त्यांना सांगितले होते.
तेव्हा मात्र आम्हाला जाणीव झाली की या ठिकाणी व्यावसायिक स्पर्धा सुरू व्हायला लागली आहे.

तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून हा अनुभव शेअर केला.

गरमागरम पोह्यांचा नाश्ता करत संदिप भाऊंसोबत चर्चा करतांना जाणवत होते की त्यांचा पक्षी, पक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांची दिनचर्या वगैरे गोष्टींचा अभ्यास फार चांगला आहे.
पोहे संपवून संदिप भाऊंच्या ग्रूपमधल्या एका मुलाच्या होडीतून आम्ही पक्षी निरीक्षणासाठी निघालो.
एका होडीमध्ये साधारणतः ८ लोक बसू शकतात.
शेरींगमध्ये होडी केल्यास प्रत्येकी ८० ते १०० रूपये लागतात, आणि फक्त एकट्यासाठी किंवा एका छोट्या फॅमिलीसाठी सेपरेट होडी केली तर ६०० रूपये लागतात असे त्या मुलाने सांगितले.

होडीतून प्रवास करतांना आम्ही अनेक पक्षी पाहिले. (फोटो अपलोड केले आहेत.)
आयुष्यात पहिल्यांदा नैसर्गिक अधिवासात फ्लेमिंगो (रोहित पक्षी) मी इथेच पाहिले.
शेकडोंच्या संख्येने असणारे रोहित पक्षी जेव्हा एकाच वेळी आकाशात उडाले, तेव्हा त्यांना मिळालेले अग्निपंख हे नाव किती यथार्थ आहे याची प्रचिती आली.
रोहित पक्ष्यांची आकाशभरारी केवळ अनुभवण्यासारखीच !

चांगल्या दोन-अडीच तासांच्या बोटिंगनंतर आम्ही परत फिरायचे ठरवले.

फिरून आल्यानंतर आम्ही संदिप भाऊंना जेवणाचे बघायला सांगितले.
जेवण अगदी घरगुती पण तितक्याच उत्तम चवीचे होते.
विशेष म्हणजे जेवण अतिशय स्वस्त होते.
आत्ता निट आठवत नाही, पण फिश थाळी बहुतेक १०० रूपयांना आणि व्हेज थाळी बहुतेक ८० रूपयांना होती.

आदरातिथ्यासाठी संदिप भाऊ आणि त्यांच्या टिमचे आभार माणून आम्ही परतीचा मार्ग धरला.

अथांग पसरलेल्या उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये होडीत बसून केलेला प्रवास आणि पक्षी निरीक्षण माझ्या कायम स्मरणात राहील.

ता. क. :-
भिगवणला बोटिंगवर बंदी आणल्याचे मागच्या आठवड्यात वर्तमानपत्रात वाचले होते.
त्यामुळे भिगवणला जाण्याअगोदर खात्री करूनच जा.

अथांग पसरलेला जलाशय

Northern Shovelers - थापट्या

बघा, मोजता येत असतील तर.
तरी फक्त ५० टक्केच आलेत या फ्रेममध्ये.
Northern Shovelers - थापट्या

Northern Shovelers - थापट्या

Asian Openbill Stork (मुग्धबलाक) and Black headed ibis (काळा शराटी)

Asian Openbill Stork (मुग्धबलाक)

Brown headed gullls (तपकिरी डोक्याचा कुरव) and Greater flamingos - रोहित/अग्निपंख (background)

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

अशी ‘बझुका लेन्स विकत घेणे’सुद्धा आहे माझ्या बकेट लिस्टमध्ये

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

Greater Flamingos - रोहित/अग्निपंख

भुरटा चोर
Brown headed gull (तपकिरी डोक्याचा कुरव) and Painted Storks (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Painted Stork - Juvenile (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Painted Stork (रंगीत करकोचा)

Brown headed gulls - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gull - तपकिरी डोक्याचा कुरव

Brown headed gulls - तपकिरी डोक्याचा कुरव

Grey Heron - राखी बगळा

Great Egret - बगळा

Pond Heron - वंचक

 

 साडेसहाला भिगवणास उतरलो. चहावाल्याच्या सल्ल्याने पटकन बाहेर पडून शेअर रिक्षाने ३ किमीवरच्या इंदापूर चौफुला या पुणे-सोलापूर रस्त्यावरच्या नाक्याकडे निघालो.थंडी चांगलीच होती. पाचच मिनीटात ऑंङ ऑँङ आवाज आला म्हणून वर पाहिले. काळे शराटी होते. डोक्यावरून पंधरा फुटांवर उघड्या चोचीचे, राखी, बगळे ,रोहित उडत होते. लगेच रस्त्याकडेच पाण्यावर दाट धुके आणि असंख्य बदके दिसली. आलो की पंढरीत. इतक्या सकाळीच भिगवण फत्ते झाले की.

ईंदापूर चौफुला येथे असे कळले की कुंभारगाव पाच किमी पुढे हाइवेने जाऊन नंतर आणखी पाच किमी डावीकडे आत आहे आणि स्पे रिक्षा (रु २००)करावी लागेल अथवा नऊ वाजता बस आहे.सवासात वाजले होते "आता तुम्ही येताना पक्षी पाहिलेत ते तिकडेही कुंभारगावला आहेत की"हा मोलाचा सल्ला मानून लगेच कुंभारगाव रहीत केले आणि पुलावर पुण्याची बस पकडून यवतला जाण्यासाठी उभा राहिलो.एका ट्रकमधून यवतकडे प्रवास सुरू झाला. पुणे १००किमीची पाटी दिसली. थोड्या वेळाने 'बगळ्यांची ही माळ दिसे' शंभरेक पाणकावळ्यांची माळ वेगवेगळी रचना करत पुण्याच्या दिशेनेच(!) उडत होती. हे दृष्य बराच वेळ पाहण्यास मिळाले कारणकी ट्रकच्याच साठ किमी वेगाने तेही पुण्याकडेच जात होते. डोळे भरून पाहणे झाले (दुसरं काय करणार?).

यवत नाक्यास (पुणे ४४किमी)साडे आठला आलो. प्रथम वडापाव चहा घेऊन पोटोबा थंड केला. रस्त्यावरूनच डोंगरावरचे भुलेश्वर दिसते. अंतर फार नाही (९किमी )परंतू या यवत -माळशिरस- सासवड/ जेजुरी मार्गावर बस कमी(चारच) आहेत.दहाची बस मिळून वीस मिनिटांत भुलेश्वरफाट्याला आलो. पंधरा मिनिटांत सूनसान परंतू मोकळ्या हवेत चालत देवळात पोहोचलो.टेकड्यांवर पसरलेल्या घायपात आणि बाभळींच्या रानटी झाडांत एका उंच ठिकाणचे हे वेगळेच घडणीचे मोठे देऊळ लक्ष वेधते.बाहेरून किल्ल्यासारखे साधे दगडी बांधकाम आहे पण आतल्या अंधारात खूप सुंदर कोरीव मूर्ती आहेत (होत्या).त्यांचे थोडे फोटो काढून बससाठी फाट्यावर बारा वाजता आलो.दीड वाजता एका टेंपोने परत यवतला आलो.

पुण्याच्या बसने उरुळीला येऊन रेल्वे स्टेशन(चालत दहा मिनिटे)जवळच्या आश्रमरोडच्या 'निसर्गोपचार आश्रमा'त पोहोचलो त्यावेळी अडीच वाजले. माहितीपत्रक मिळाले.
निसर्गोपचार ग्रामसुधार ट्रस्ट उरुळीकांचन पुणे ४१२२०२ फोन 02026926230
02026926298
Email : nisargopchar@live.com
nisargopchar@gmail.com
website : http://www.nisargopcharashram.org
अ)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.
ब)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.
क)
या पत्रकाच्या फोटोची लिँक इथे आहे.

येथून रे स्टे पाच मिनीटांवर आहे. सिंधीलोकांचा प्रयागधाम आश्रम{जुना} स्टेसमोरच आहे. नवीन दहा किमीवर उत्तरेस आहे. तिथे संक्रातिनिमित्त धार्मिक कार्यक्रम चालू होते त्यासाठीच सकाळी बरेचजण उतरले होते. १०ते २६ जानेवारीपर्यँत सर्व एक्सप्रेस गाड्या विशेषरुपाने उरुळीला थांबणार होत्या. त्यामुळे मला ईंद्रायणीचे तिकिट मिळाले आणि रात्री दहाला आरामात घरी पोहोचलो.

लुप्त होणारे पवना धरणातील वाघेश्वर मंदिर

विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री आणि त्याच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आजही आदर्शवतच आहे. मावळातील सर्वसामान्य लोक मराठेशाहीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले आणि त्यांना मावळे संबोधले गेले. स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजे सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला “मावळ” म्हणतात. अशी कथा सांगितली जाते. हा मावळ विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले. पवन, हिरडस, गुंजन, पौड, मुठा खोरे, कानद खोरे, मुसे खोरे, वळवंड खोरे, रोहिड खोरे, आंदर मावळ, नाणे मावळ आणि कोरबारसे मावळ ! पवन मावळ हा त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे. ह्या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत. ह्या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव, उर्से, बऊर, आपटी व दुधिवरे खिंड आपले स्वागत करतात. निसर्गाने संरक्षित केलेल्या ह्या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला, हि आहे खासियत मावळाची ! ह्या मावळातील भाजे, कार्ले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीतील आभूषणं आहेत ! तर असा हा पवन मावळ मंदिर स्थापत्यात मागे राहील का ? तर त्याचे उत्तर कदापि “नाही” असे आहे.

कालांतराने सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले, वस्ती वाढली आणि अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या पाण्यासाठी मोठमोठाले धरणं बांधायला सुरुवात झाली मग पवन मावळ कसा मागे राहील ? पवना नदीवर अजस्त्र अशा धरणाचे काम सुरु झाले. इतिहासाच्या बाबतीत आपले दुर्दैव हे कि, ढासळत असणाऱ्या वास्तू वाचवल्या जात नाहीत तर धडधाकट प्राचीन वास्तू जेव्हा धरणात अथवा रस्ता रुंदीकारणात जातात तेव्हा त्यांचा वाली देवसुद्धा नसतो. असाच एक फटका ह्या पवन मावळात एका आडवाटेवरील मंदिराला बसला. पवनानगरच्या पुढे वाघेश्वर नावाचे टुमदार गाव वसले आहे. कोणे एकेकाळी ह्या गावाच्या मागून पवना नदीच्या ओढीने धावत जाणारा टुमदार नाला वाहत होता. ह्याच नाल्याच्या काठावर गर्द अशा झाडीत इथे यादवांच्या काळातील वाघेश्वराचे मंदिर उभे राहिले. वरील फोटोत पाहू शकता. शुष्कसांधीच्या स्थापत्यात रचलेले महादेवाचे मंदिर बाजूने वाहणारा नाला, गर्द झाडी आणि थंड वाऱ्यात इथे दर्शनाला येणारे भाविक तर प्रवास करणारे वाटसरू क्षणभर का होईना, इथे विसावत असत. ह्या शांत अरण्यात कोकिळाचे गान, तो घंटेचा हळुवार नाद आणि एकवारएक रचलेले ते काळेकभीन्न दगडसुद्धा रोमांचीत होत असतील. दुरून तुंग, तिकोणा, लोहगड आणि विसापूर हे उत्तुंग गड ह्या मंदिराला मनोमन वंदन करत असतील.

दूरवर दिसणारी लोहगड – विसापूरची जोडगोळी खालील फोटोत पाहू शकता.

काळ बदलला आणि पवना धरणाने ह्या मंदिराचा घोट घेतला. औद्योगिकीकरणाच्या वावटळीत हे मंदिर सापडले आणि धरणाच्या पसरत चाललेल्या व्यासाने हे मंदिर पाण्यात लुप्त झाले. चिरावर चिरा रचलेले मुकं दगड पाण्यात बुडत गेले. छोट्या नाल्याच्या काठावर असलेले मंदिर नाल्यासकट धरणात गेले. हिमालयावर तांडव नृत्य करणारे शंभो महादेव धरणाच्या पाण्यात विसावले. गोंडस गणपती बाप्पाच्या मूर्त्यासुद्धा ह्या पाण्यात खोलवर गेल्या. ना कोणाला सुयर, ना कोणाला सुतक….. आता धरणाचे पाणी आटल्यामुळे हे मंदिर मी पाहवयांस गेलो. अवशेष, अवशेष आणि अवशेष चोहीकडे पाहताना नकळत अश्रू तराळले. तरीसुद्धा देव आहे, हे तिथे गेल्यावर कळले. तो शांत, निपचित स्वरूपात हे सर्व पाहतोय, असा भास होत होता. काय वाटत असेल त्याला ? गाभाऱ्यातील शिवलिंग खालील फोटोत पाहू शकता.

संपूर्णतः दगडी चिऱ्यांत रचलेले हे मंदिर धरणात पूर्ण बुडत असल्यामुळे ते काही वर्षांचे सोबती आहे, हे पाहूनच वाटते कारण दगडी चिरांना चहू बाजूंनी क्षाराच्या थरांनी गाठले आहे. कळस उध्वस्त झाला असून मंडप फक्त बाकी आहे. चौकट वितानात असलेल्या ह्या मंदिराच्या वितानाच्या शिळा आज जागोजागी हललेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत. मंदिराच्या चहू बाजूंना प्रचंड प्रमाणात अवशेषांचा ढिगारा झाला आहे. अप्रतिम अशी दिपमाळ तिथे नक्की असेल हे आता तिथे पडलेल्या अवशेषांवरून कळते. नाल्याला छोटासा घाट त्यानंतर वाहनमंडप त्यात अगाध कोरीवकामाचा नमुना असलेला नंदी त्यानंतर मुखमंडप पुढे रंगमंडप असण्याची दाट शक्यता पुढे सभामंडप, अंतराळ आणि त्यानंतर दोन पायऱ्या उतरून गर्भगृह असे परिपूर्ण रचनात्मक भव्य मंदिर असेल. प्रवास करणारा वाटसरू नक्कीच इथे काहीवेळ विसावत असेल ह्यात शंका नाही. काय सांगता येते, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगडवरून जाताना इथे दर्शन घेतले असेल ?

आज वाहनमंडपातील नंदी पूर्ण भग्न झाला असून त्याच्या मुखाची शिळा तात्पुरती रचलेली दिसली परंतु त्याला सुद्धा आधार द्यावा लागला आहे. (वरील फोटोत पाहू शकता.) वाहनमंडप तर पूर्णतः नेस्तानबुत झाला आहे. प्रवेशद्वारावर रत्नशाखा आहे, देव तिथे वास करतो असे म्हणतात. उंबरठ्यावर किर्तीमुख असून एक रत्न मध्यभागी आहे. द्वारललाटबिंबावर पार्वती असून दुसऱ्या शाखेतील द्वारललाटबिंब भग्न झाले आहे. आतमध्ये स्तंभ काही चौकोनी तर काही गोलाकार आहेत. सभामंडपात रंगाशिला आहे कि नाही ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कारण चार महिने पाण्याबाहेर दर्शन देणाऱ्या मंदिरात लादी लावली असून रंगशिला असल्यास ती गाडली गेली असावी, असे वाटते. सभामंडपातील देवकोष्ठ भग्न झाले आहेत. तर एका बाजूचे देवकोष्ठ अस्तित्वात नाही. ह्याच सभामंडपात बारीक नजरेने पाहिल्यास एका बाजूला वितानमध्ये दैत्य आहे. हो ! रागाने नाकपुड्या फुगवलेला, सुळे बाहेर आलेला आणि मोठी कर्णफुले परिधान केलेला हा दैत्य आजही आपल्याला घाबरवतो. अंतराळात गोंडस गणपती बाप्पांच्या दोन मूर्त्या ठेवल्या आहेत. बहुतेक त्या बाहेरील देवकोष्टतील असाव्यात. दोन पायऱ्या उतरून आपण गर्भगृहात पोहचतो तेव्हा शिवलिंगाचे दर्शन होते. लिगांवरील शाळुंका बाजूला काढून ठेवली असून तिचा अर्धा भाग आतमध्ये तुटलेला दिसतो. समोरच देवता असून तीसुद्धा जीर्ण होत चाललेली आहे. हे सर्व पाहता, त्या मंदिराची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते.

गावातील वृद्ध लोकांच्या सांगण्यावरून ह्या मंदिराच्या आजूबाजूला ७० विरगळ होत्या, आज सातसुद्धा विरगळ सुस्थितीत नाही, फक्त तुकडेच तुकडे ! ह्या मंदिराच्या परिसरात बऱ्याच समाधीशिळा दिसतात. ज्या ह्या धरणातील गाळात अगदी रुतून बसल्या होत्या. समाजसेवक नवनाथभाऊ पायगुडेंच्या प्रयत्नामुळे ह्या सर्व तत्परतेने काढून त्यांनी त्या मंदिराच्या जवळ आणून ठेवल्या आहेत. असे हे पवना धरणात लुप्त होणारे एकेकाळचे भव्य मंदिर व आपल्या पूर्वजांचा ठेवा म्हणून आपण एकदा तरी पहावे म्हणून हा लेखप्रपंच !

ह्या वाघेश्वर मंदिराचे काही खास फोटो तुमच्यासाठी….

मंदिराबाहेरील अवशेष

तिकोणा

तुंग

वेलबुट्टी व रत्नशाखा

भिंत खचली कलथुन खांब चालला….

वितानातील दैत्य..

देव इथे राहतो..

 

 

सदर माझा लेख २० मे २०१८ ला तरुण भारत ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता, खालील लिंकवर तुम्ही तो पाहू शकता.

बाणेर गावातील 'बाणेश्वरची लेणी'


पुणे शहर आणि परिसर फार झपाट्याने दिवसेंदिवस विकसित होत आहे. आता तर पुणे या विद्येच्या शहरामध्ये मेट्रो देखील दाखल झाली आहे. एवढ्या झपाट्याने शहराचा विकास चालू असताना देखील पुणे शहराच्या परिसरात प्राचीन वारसा आपले अस्तित्व आजही दाखवत आहे. पुणे शहर हे चारही बाजूने टेकड्यांनी वेढलेले आहे. या टेकड्यांनी वेढलेल्या पुणे शहरामध्ये काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांमध्ये 'पाताळेश्वर' ची लेणी सर्वश्रुत आहेच. तसेच पुणेकरांच्या लाडक्या 'पर्वती' येथील टेकडीवर देखील काही लेण्या खोदल्या गेल्या या लेण्यांसारखीच एक लेणी हि खोदली गेली ती पुण्याच्या सध्या झपाट्याने विकसित होणाऱ्या 'बाणेर' या गावी.

बाणेर गावातील तुकाई देवी मंदिर या मंदिराच्या थोड्याश्या खालच्या बाजूला 'बाणेश्वरची लेणी' आहेत.

पुणे आणि परीसरामध्ये इतिहासाच्या बऱ्याच पाउलखुणा लपलेल्या आहेत. या पाउलखुणांचा मागोवा घेताना आपल्याला खूप गोष्टी पाहायला मिळतात. बऱ्याचदा असेही होते कि या इतिहासाच्या  पाउलखुणा आपल्याजवळ असून देखील त्या माहिती नसतात किंवा आपले त्या ठिकाणी जाणे होत नाही त्यापैकीच बाणेर येथील 'बाणेश्वरचे गुंफा मंदिर' किंवा 'बाणेश्वरची लेणी' हे ठिकाण होय.

बाणेश्वर लेणीच्या आवारात असलेली दगडी दीपमाळ आणि समाधीशिळा व वीरगळ तसेच येथे दिपमाळेच्या समोर एक 'बलीपीठ किंवा बळीपीठ' देखील पहायला मिळते या पीठावर बोकड किंवा तत्सम प्राणी किंवा नैवेद्य ठेवण्यासाठी हे वापरले जात असे.

लेणीच्या आवारात असलेली हि मूर्ती कोणाची आहे हे समजत नाही.

आता काही जणांना हा देखील प्रश्न पडेल कि आम्ही बाणेर ला कितीवेळा जातो किंवा बाणेर पासून जवळ राहतो पण कोणती लेणी वगैरे तेथे आम्ही पाहिली नाही. बाणेर ची हि लेणी वसलेली आहे खुद्द 'बाणेर' या मूळ गावठाणात. बाणेर गावामध्ये आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक टेकडी दिसते या टेकडीवर जिथे सध्या नव्याने बांधलेल्या 'तुकाईदेवी' मंदिराच्या टेकडीच्या मधल्या भागात काही लेण्या खोदलेल्या आहेत. हेच ते बाणेर येथील. 'बाणेश्वरचे लेणे'.

बाणेश्वर लेणीच्या खोदलेल्या पायऱ्या आणि लेणीची रचना.

हे छोटेखानी लेणे पाहायचे असेल तर पुणे येथून बाणेर गाव गाठावे. हे बाणेर गाव या टेकडीच्या पायथ्याशी वसलेले असून या बाणेर गावामध्ये ग्रामदैवत 'भैरवनाथाचे' सुंदर देऊळ देखील पाहायला मिळते. या भैरवनाथ मंदिराच्या येथे आपल्याला गाडी लावता येते. येथून एक चिंचोळा रस्ता आपल्याला 'बाणेश्वर लेण्यांकडे' घेऊन जातो. तसेच भैरवनाथ मंदिराच्या येथे एक फलक देखील लावला आहे त्याच्यावर एक व्यवस्थित प्रसिद्ध लोकवाक्य आपल्याला लिहिलेले पाहायला मिळते ते म्हणजे 'पांडवकालीन बाणेश्वर लेणी' या फलकाच्या डावीकडून दोन नवीन बांधण्यात आलेल्या बिल्डिंग च्या मधल्या चिंचोळ्या वाटेने आपण वरती जातो. येथे सर्व पायऱ्या या सिमेंटने बांधलेल्या आहेत अगदी सहज पाच एक मिनिटात आपण थेट उभे राहतो ते 'बाणेश्वर गुंफा' मंदिरासमोर.    

'बाणेश्वरची लेणी' 

या मंदिराच्या आवारात एक समाधी शिळा आणि एक वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात तसेच तेथे एक दगडी रचलेली दीपमाळ देखील आहे. त्याच्यावर एक समाधीशिळा कोरून ठेवलेली आहे. या 'बाणेश्वर' लेणी ला तीन ठिकाणी लोखंडी गेट (ग्रिल) बसवलेले असून दुपारच्या वेळेस तो बंद असतो जर तुम्ही तिथे उजव्याबाजूस एक गुरव राहतात त्यांच्या कडे चावी मागितली आणि सांगितले कि मंदिर पाहायचे आहे तर ते किल्ली आपल्याला देतात.

 झरा असलेली पहिली खोली.

यातील मधले लोखंडी गेट (ग्रिल)  उघडे असते. हे लोखंडी गेट (ग्रिल) मधून आपण तीन खोदलेल्या पायऱ्यांनी खाली उतरावे येथून खाली उतरले असता आपण 'बाणेश्वर लेण्यांमध्ये' प्रवेश करतो. या 'बाणेश्वर लेण्यांमध्ये' तीन खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी मधल्या खोलीमध्ये भगवान शंकराची पिंड आहे. डाव्या बाजूच्या खोलीमध्ये मोठा पाण्याचा झरा असून त्याच्यामध्ये सध्या लोकांनी काही पैसे वाहिलेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरी गुहा मात्र बंद अवस्थेत पाहायला मिळते. हे लेणे साधारणपणे पाताळेश्वर आणि पर्वतीच्या लेण्यांच्या काळात खोदली असावी असे वाटते.

काळभैरवनाथ आणि योगेश्वरी यांच्या मूर्ती.

या बाणेश्वराच्या लेणी मध्ये डाव्या बाजूच्या कोनाड्यात जवळपास ५ फुट उंच असलेल्या वीरगळ देखील काच लावून बंदिस्त केलेल्या बघायला मिळतात. तसेच एका खांबावर गणपती कोरायचा प्रयत्न केलेला दिसतो. सध्या या गणपतीला शेंदूर फासण्यात आलेला आहे. या मंदिरात नंदी, गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांच्या ग्रॅनाईट मध्ये घडविलेल्या सुबक मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. या लेण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खडक संपूर्ण खोदुन केलेली वाट मात्र थक्क करते. लेण्यांमधील खांब व्यवस्थित घडवलेले आपल्याला बघायला मिळतात.

खांबावर कोरलेला गणपती.

प्राचीन पांडव लेणे असे लिहिलेली लेणी मधील पाटी.

हे सगळे पाहून आपले मन मात्र आश्चर्यचकित होते हे सुंदर आणि छोटेखानी 'बाणेश्वर लेणे' देखणे आहे. खूप काही कलाकुसर जरी या लेण्यात नसली तरी त्याचे खांब आणि खडक संपूर्ण खोदुन केलेली वाट मात्र आपल्याला थक्क करतात. असे हे पुण्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारे 'बाणेश्वर लेणे' अगदी पुणे शहरामध्ये आहे याची माहिती मात्र खूप कमी जणांना असते. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा हे छोटेखानी 'बाणेश्वर लेणे' बघायला एकदा तरी जरूर या बाणेर येथील 'बाणेश्वर लेण्याची' वाट नक्की पकडावी.         

मधल्या खोली मधील 'बाणेश्वरची लेणी' मधले बाणेश्वर शिवलिंग.

________________________________________________________________________________________________

संदर्भ ग्रंथ:-

१) Cave Temples of India:- James Burges.
२) लेणी महाराष्ट्राची:- दाउद दळवी.

कसे जाल:-

पुणे (शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन) – बाणेर 

सेनापती बापट रोडवरील डोंगराच्या कुशीत वसलेले 'चतु:शृंगी मंदिर'


पुणे आणि परीसराला चारही बाजूंनी टेकड्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेले आहे. या संपूर्ण टेकड्यांवर आपल्याला कोणते ना कोणते मंदिर हे पहायला मिळतेच. असेच ‘चतुशृंगी देवीचे’ मंदिर हे पूर्वीच्या पुण्यापासून साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर वसलेले असून पुण्यातील अत्यंत महत्वाचे हे देवस्थान आहे. आजच्या नविन पुण्यामध्ये हे मंदिर पुण्यातील सेनापती बापट या प्रसिद्ध आणि मोठ्या रस्त्यावरून डोंगराच्या कुशीत वसलेले आपल्याला पहायला मिळते. काळानुसार मंदिराच्या परिसराचा देखील मोठा कायापालट झालेला आहे.

मोठ्या मोठ्या इमारती आणि आय.टी पार्क यांच्या घेऱ्यामुळे हे ‘चतुशृंगी मंदिर’ आज मात्र लपलेले आहे परंतु या डोंगरावरील देवीच्या मंदिरात जायला सेनापती बापट रस्त्यावरून कमान आणि पायऱ्या देखील आज बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे मंदिरामध्ये सहज जाता येते. १९६१ पूर्वी चतुशृंगी देवीच्या मंदिरात जायचे झाल्यास कृषीविद्यापीठावरून पुणे विद्यापीठाच्या रस्त्याने यावे लागत असे. इ.स. १९६१ साली जेव्हा पानशेतचा पूर आला त्याच्यानंतर येथे गोखले नगर वसवले गेले आणि पानशेत पुराच्या वेळेस ज्यांचे घर उध्वस्त झाले त्यातील बरीचशी पुणेकर मंडळी याठिकाणी राहायला आली म्हणून बालभारती, पुणे येथून खिंड फोडून एक मोठा रस्ता बनवला गेला तोच हा सेनापती बापट रस्ता होय. त्यामुळे ‘चतुशृंगी मंदिरात’ येण्यासाठी हा एक अजून एक पर्यायी मार्ग देखील उपलब्ध पुणेकरांना झाला आणि चतुशृंगी मंदिरातील भाविकांची गर्दी वाढली. 

चतु:शृंगी देवीच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. 

‘चतु:शृंगी देवी’ हे पुण्यातील एक जागृत स्थानांपैकी एक महत्वाचे स्थान मानले जाते. वर्षभर येथे भक्तांची वर्दळ ही चालूच असते. ‘चतुशृंगी देवीच्या’ मंदिरात जाण्यासाठी आपल्याला मोठ्या पायऱ्या बांधलेल्या आजही दिसून येतात. या पायऱ्यांवरून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर ‘चतु:शृंगी देवीचे’ विलोभनीय दर्शन होते. या देवी संदर्भात एक आख्यायिका आजही सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे:-

साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी ‘सवाई माधवराव पेशवे’ यांच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये ‘दुल्लभशेठ’ नावाचे खूप मोठे सावकार राहत होते. पेशव्यांचे आणी त्यांचे चांगले संबंध देखील  होते आणि त्यांचे वजन देखील पेशव्यांच्या दरबारात होते आणि दरबारात त्यांना मोठा मान होता. बऱ्याचवेळेस पेशव्यांना काही आर्थिक मदत लागली तर प्रसंगानुसार पेशवे ‘दुल्लभशेठ’ यांच्याकडून कर्ज घेत असत. तसेच ‘दुल्लभशेठ’ यांना सरकारी पालखीचा मान होता आणि पेशव्यांच्या सरकारी टांकसाळीचा मक्ता देखील त्यांच्याकडे होता. ही आख्यायिका त्यांच्याबाबत सर्वत्र प्रसिद्ध आहे.

चतु:शृंगी मंदिराच्या पायऱ्या.

दरवर्षी नित्यनियमाने ‘दुल्लभशेठ’ सावकार हे नाशिक जवळील ‘सप्तशृंग देवीच्या’ दर्शनाला जात असत. जेव्हा त्यांचे वय झालेत्या त्याच्यानंतर त्यांना प्रवासाची दगदग झेपेनाशी झाली तेव्हा त्यांना दरवर्षीच्या ‘सप्तश्रृंगी देवीच्या’ न चुकणाऱ्या वारीची चिंता वाटू लागली. तेव्हा त्यांना एकेदिवशी स्वप्नात देवीचे दर्शन झाले. देवीने त्यांची मनस्थिती ओळखून त्यांना स्वप्नामध्ये संगीतले कि ‘पुण्याजवळील एका डोंगरात माझे स्थान आहे. त्या ठिकाणावरील मूर्तीला तु माझी मूर्ती समजून त्याची नित्यनियमाने पुजा केलीस तर प्रत्येकवर्षी तुला ‘सप्तशृंगी गडाची’ वारी करायची आवश्यकता नाही. या स्वप्नामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी त्वरित आपली माणसे जमा करून या देवीच्या स्थानाबाबत शोध घ्यायला पाठविली.

तेव्हा देवीच्या स्थानाचा शोध घेताना ‘दुल्लभशेठ’ सावकारांना असे कळले कि गणेशखिंडीच्या डोंगरात देवीचे एक उपेक्षित स्थान आहे. हे जसे त्यांना समजले तसे त्यांची पावले देवीच्या दर्शनाच्या ओढीने गणेशखिंडीच्या डोंगराच्या वाटेच्या दिशेने चालू लागली. साधारणपणे अर्धा डोंगर त्यांनी चढल्यावर ते एका लेणीसदृश ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी येऊन पोहोचले आणि त्यांना साक्षात ‘चतु:शृंगी देवीची’ अत्यंत सुंदर मूर्ती एका दगडी खोबणीत त्यांना आढळून आली. ही देवीची मूर्ती पाहिल्यावर त्यांनी या मूर्तीभोवती सुंदर मंदिर गणेशखिंडीच्या डोंगरात बांधले. आणि नित्याची पुजा अर्चा करण्यासाठी त्यांनी पुजारी देखील नेमले. इ.स. १७८६ सालची ही आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे.

अशी ही आख्यायिका असणारा गणेशखिंडीमध्ये असणारा चतु:शृंगी मंदिर’ आणि परिसर पुण्याच्या पंचक्रोशी मध्ये मोडत असे. येथून जवळच उत्तर दिशेस ‘भांबुर्डे’ नावाचे एक गाव वसले होते तेच गाव आज शिवाजीनगर म्हणून प्रसिद्ध आहे. या गावापासून ज्या डोंगररांगा जातात त्या आडबाजूला हे देवीचे स्थान येत असे तसे ते उपेक्षित देखील होते. पेशवाईमधील दुल्लभशेठ सावकारांमुळे या आडवाटेवर असलेल्या ‘चतु:शृंगी देवीच्या’ स्थानाला महत्व प्राप्त झालेले आपल्याला पहायला मिळते. दुल्लभशेठ सावकार हे पेशव्यांच्या टांकसाळीचे प्रमुख होते. दुल्लभशेठ सावकारांनी पुण्याच्या चलनात ‘दुदांडी आणि शिवराई’ अशी नाणे प्रचलित केली आणि त्यांनी ‘चतु:शृंगी देवीच्या’ नावाने ‘चतरसिंगी’ हे रुपयाचे नाणे टांकसाळीमध्ये पाडले  होते. सवाई माधवराव पेशवे यांच्या रोजनिशी मध्ये इ.स. १७८८ च्या जमाखर्चाच्या नोंदीमध्ये ‘चतरसिंगी रुपया’ असा उल्लेख देखील केलेला आहे.

चतु:शृंगी देवीची तांदळा रूपातील मूर्ती.

पुढील काळामध्ये या ‘चतरसिंगी रुपया’ बाबत काही जास्त नोंदी मिळत नाहीत. हे नाणे कदाचित देवीच्या नावाने देखील पाडले असावे आणि काही काळापुरते चलनात आणले असावे असे दिसते. आजही याप्रकारची देवाची नाणी पाडली जातात. इ.स. १८१८ साली पेशवाई संपली आणि पुण्यातील देवस्थानांना मिळणारी वर्शासने देखील संपली अशीच काही वर्षासनाची रक्कम ‘पर्वती संस्थानाकडून’ ही चतु:शृंगी मंदिर’ देवस्थानास मिळत होती परंतु काळ बदलला परंतु लोकांच्या देणग्या या मात्र या देवस्थानास कायम येत राहिल्या.

प्लेगच्या दिवसांमध्ये बऱ्याच लोकांनी तात्पुरते पुणे शहर सोडले आणि तात्पुरती सोय म्हणून काही पुणेकर लोकं या ‘चतु:शृंगी मंदिर’ परिसराच्या भागामध्ये येऊन वसले. इ.स. १७६० सालानंतर धनिकांनी या भागामध्ये बंगले बांधायला सुरुवात केली. आणि एकेकाळी निर्मनुष्य असलेला आणि निसर्गाने नटलेला चतु:शृंगी मंदिर’ परिसर मात्र गजबजू लागला.चतु:शृंगी देवीची’ यात्रा ही अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होते आणि दशमीपर्यंत चालते. ‘अनगळ’ घराण्याने आजही पिढ्यानपिढ्या या चतु:शृंगी मंदिराचे’ स्थान अबाधित राखलेले आहे. नवरात्रामधील या उत्सवात सगळे पुणेकर आजही मोठ्या भक्तीभावाने येतात. ह्या जत्रेचे स्वरूप खूप मोठे असे होते. ही जत्रा आजच्या पत्रकार नगरपासून सुरु होत असे ते गणेशखिंडीच्या रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ही जत्रा पसरलेली होती. परंतु आता मात्र हे स्वरूप अगदी छोट्या स्वरूपाचे झालेले आहे अगदी २००० सालापर्यंत ह्या जत्रेचे स्वरूप खूप मोठे होते. आता मात्र चतु:शृंगी मंदिरच्या समोरील’ जागेत ही जत्रा नवरात्रात भरते.

इ.स. १८६८ साली पुणे शहरावर ना. वि. जोशी यांनी ‘पुणे वर्णन’ या नावाचे पुस्तक लिहिले हे पुणे शहरावर लिहिले गेलेल्या पहिल्या पुस्तकात ते चतु:शृंगी मंदिर’ आणि परिसराचे वर्णन करताना पुढीलप्रमाणे लिहितात:-

चतु:शृंगी मंदिराचा बाह्य परिसर.

“पुण्याचे ईशान्ये दिशेस एक जागा आहे तिला गणेशखिंड असे म्हणतात; तेथे गणपतीचे देवालय असून ह्यावरून ह्या खिंडीचे नाव पडलेले आहे असे वाटते. तेथे डोंगरावर ‘चतु:शृंगी’ ह्या नावाची स्वयंभू देवी आहे. काही दिवसांपूर्वी ह्या देवीचे देऊळ चांगले बांधण्यात आले नव्हते पण ती एका गोसाव्यास नवसास पावली म्हणून त्याने तिचे देवळाचा जीर्णोद्धार करून यात्रेकरूस बसण्यासाठी सभामंडप बांधला व डोंगराखाली चांगली विहीर बांधली आहे. प्रदक्षिणा डोंगरावरून घालण्यासाठी आणि खालून वर देवीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. तसेच ह्याच डोंगराच्या अलीकडल्या डोंगरावर एक पांडवकृत्य (कोरीव लेणे) आहे, त्यात सांब आहे.” म्हणजेच हे मंदिर देखील एका लेण्यामध्ये बांधले आहे नीट निरखून पाहिल्यावर लगेच लक्षात येते.             

चतु:शृंगी मंदिर’ जसे पुण्याच्या हद्दीमध्ये आले तशी या भागातील गर्दी वाढू लागली तसेच रस्ते देखील गजबजले. १९४७ सालानंतर या संपूर्ण परिसरात अनेक मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आणि निसर्गसंपन्न असलेल्या या चतु:शृंगी मंदिर’ परिसराचा कायापालट झाला. आता काळाच्या ओघात हा संपूर्ण परिसर आय.टी पार्क म्हणून ओळखला जातो. या परिसरात चतु:शृंगी मंदिर’ देखील आहे हे पुणे शहर फिरायला येणाऱ्या लोकांना तसेच नोकरीनिमित्त स्थायिक होणाऱ्या लोकांना आवर्जून सांगावे लागते. एकेकाळी प्रदुषणमुक्त असलेले चतु:शृंगी मंदिर’ आज मात्र वाहनाच्या आवाजात आणि मोठ्या मोठ्या बिल्डींगच्या कचाट्यात आलेले असल्यामुळे येथील निरव शांतता मात्र आज कुठेतरी हरवलेली आहे. असे हे ऐतिहासिक चतु:शृंगी मंदिर’ आजही पुण्यनगरीमधले महत्वाचे देवस्थान आहे अश्या या देवस्थानाला जाऊन नव्या युगातील पुण्याचा नजारा पाहणे नक्कीच सुखावह ठरते.

चतु:शृंगी मंदिराचा जुना फोटो.

______________________________________________________________________________________________

संदर्भग्रंथ:-

१) Gazetteer of The Bombay Presidency Poona District:- पान क्रमांक ६५४, इ.स. १८८५.

२) पुणे वर्णन, लेखक:- ना. वि. जोशी, वरदा प्रकाशन इ.स. १८६८.

३) पुण्याची स्मरणचित्रे शतकापूर्वी व आता, लेखक:- अजित फाटक, मंदार लवाटे, सकाळ, २०१६.

४) हरवलेले पुणे, लेखक:- डॉ अविनाश सोवनी, उन्मेष प्रकाशन, २०१७.

 

ओंकारेश्वर मंदिर, पुणे.

     महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची शान आहे. यामध्ये अनेक धार्मिक, पुरातन, देवाची मंदिरांचा समावेश आहे. मला, ही देवस्थान फिरायला आवडतात कारण त्यांना एक इतिहास लाभला असतो व अनेक मंदिरावरील कलाकुसर बघण्यासारखी असतात.

     महाराष्ट्रातील पेशवे कालीन मंदिरांपैकी एक म्हणजे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर. हे मंदिर पुण्यातील अनेक पेशवे कालीन मंदिरांपैकी सगळ्यात मोठे मंदिर म्हणून ओळखले जाते.

     चिमाजी अप्पा पेशवे यांनी चित्राव शास्त्री आणि श्रीराम भट्ट शास्त्री यांच्या मार्फत २८० वर्षा पूर्वी या मंदिराची रचना केली. मुळ ओंकारेश्वर जे स्थान आहे, तिथून सोहळ्यामध्ये कावड करून, हे शिवलिंग आणले गेले होते. पेशव्यांनी ऑक्टोबर १७३६ मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. 

     मुठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरुंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणा-मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये या मंदिराची आहे.

     मंदिरात प्रवेश ‌करताच नंदीच दर्शन होत. नंदीच्या बाजूला काळभैरव व सुर्य देवच्या मुर्ती दिसतात. तर गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या विठू - रखुमाईचे दर्शन होताच आपले हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्यातील ओंकारेश्वराच्या पिंडीवर होणाऱ्या जल अभिषेक पाहून आपणही ध्यानमस होतो. 

     पेशवे कालीन हे मंदिर लोकांच्या फारस्या नजरेत येत नाही. तीन भागात बांधलेल्या मंदिरात आपल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. भाविक या ओंकारेश्वर मंदिरात येतात ते मुळात ईश्र्वर चरणी लीन होण्या करिता व मानसिक शांती मिळविण्या करिता. तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की भेट द्या.
     
पात्ता : श्री ओंकारेश्वर मंदिर.
          बालगंधर्व पूल,
          चंद्रशेखर गोविंद आपटे मार्ग,
          शनिवार पेठ, पुणे - ४११०३०.

शब्दांकन : स्मृती कुडाळकर.

 

Kavdi AKA Kavdipat

Unknown

Type: Sunrise and Bird Watching site
Near: Loni Kalbhor
Base Village: Kavdi
Where: 20 Kms from Pune
Route: Pune-Solapur road
Time visited: November 2011
How to reach: On Pune Solapur road, 2 minutes after the toll plaza watch out for Manali Resort. Take a left turn about few meters ahead. Theres a narrow road travelling through farms. Cross the railway crossing and about 1.5 kms ahead park your vehicles in temple complex. The Pat or Bandh as called in marathi is right infront of you.
Best Time to visit: Early morning November-January

About: Kavdi is a small village and is known as birding place. There are more than 50 varities of birds spotted here which include different types of kingfishers, Ibis, Kites, Egrets, Wagtail and Heron birds. Other than that Red vented Bulbuls, Drongo, Sunbird, Hoopoe and variety of stork and ducks can be easily seen.
We started at about 5.30 AM to reach Kavdi Pat in the chilly saturday morning. We reached at about few minutes to six and we were surpised to see few people all set to capture the sunrise with tripods and different cameras.

The entire landscape was breathtaking. The fog had engulfed the area and it was literally flowing rather wandering on the calm of the the river.


As the redness started to spead we could spot some early arrivals. We took our positions right at the center of the bridge to catch few early snaps before the sunrise.



Once the light started to spread across the whole area was filled with chirping of hundreds of birds.




We proceeded back to home at around 10am after a  yummy Vadapav. Will cherish forever the mesmerizing sunrise and the beautiful birds.

Updates December 2011: After this weekend I have been several times there to catch more snaps and everytime it simply amazes me.

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...