Thursday, February 6, 2025

पुणे ते श्रीलंका... एक सायकल प्रवास...!

 ध्येय,जिद्द, पराक्रम, एकाग्रता, सातत्य हे सर्व गुण म्हणजे मराठा वॉरियर्स टीम!
ध्येयवेडी लोक समाजात बदल घडवतात आणि अशा सर्व विचारांचा एकत्र समुदाय इतिहास घडवतो या विचारांप्रमाणेच मराठा वॉरिअरची टिम सतत नवीन मोहिमा करत असतात.
यावर्षी देखील अशीच मोहीम हाती घेतली आहे..
पुणे ते श्रीलंका... दोन्ही देशांना जोडणारा दुवा आणि मराठा वॉरियर्स चा सायकल प्रवास... तोही २०२५ किलोमीटर…!
आपण सर्व सोबत आहातच...
महाराष्ट्राने जसे प्रेम आम्हाला दिले..
तसेच प्रेम याही वर्षी देश परदेशातून मिळेल अशी आशा आहे.
चला तर मग येताय ना..
पुणे ते श्रीलंका...
एक सायकल प्रवास...!
सुरु करत आहे @ रॉकफ़िट जिम.
२३ जानेवारी २०२५.
*!! असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे !! तुकाराम महाराजांच्या या उक्ती प्रमाणे *मराठा वारीयर्स* टीम दिनांक 23 जानेवारी 2025 ठरल्याप्रमाणे आज *रॉक फिट जिम चर्होली बु* या ठिकाणाहून सर्व मान्यवर, मित्रमंडळी व कुटुंबीयांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार करून श्रीलंकेस साधारण साडेदहा वाजता मार्गस्थ झाली.
आम्हास शुभेच्छा देणार्या सर्व समुदाया मध्ये बाल चमूंचा उत्साह खरच कौतुकास्पद होता, या शुभेच्छांच्या ऊर्जेवर आणि जोरावर आम्ही हि मोहीम नक्कीच फत्ते करू....!!!
आज आमचा सायकल प्रवासाचा पहिला दिवस आम्ही संध्याकाळी ठीक 5.00 वाजता श्री खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आगमन झाले. आमच्या टिम चे सदस्य निलेश धावडे यांचे दाजी श्री.शरदजी बालगुडे तसेच जेजूरी सायकल ग्रुप,पुरंदर सायकलीस्ट ग्रुप,जेजूरी केमिस्ट असो. आणि न्यू सिद्धेश टेलिकॉम चे सर्वेसर्वा महेशजी म्हेत्रे यांनी फटाके फोडून, औक्षण करून आमचे भव्य स्वागत केले.त्यांच्याकडून झालेल्या स्वागताने व आपुलकीने सर्व टिम भारावून गेली. एकमेकांचे अनुभव देवाणघेवाण झाल्यावर दाजीॅनी आमची आजची मुक्कामाची व जेवणाची छान सोय केली. पुरंदर सायकलीस्ट क्लब ने सर्वांनी मिळून जेवणाचा आनंद घेतला. दाजीॅनी खूपच छान अँरेजमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार आणि धन्यवाद




सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे मराठा वॉरियर्स टीम निघाली जेजुरी गडाच्या पायथ्याशी नंदीचे दर्शन घेऊन पुढे मोरगावच्या दिशेने मार्गस्थ झाली मोरगाव गणपतीचे दर्शन घेऊन आता आम्ही बारामतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत
बारामती हून पुढे निघाल्यानंतर वालचंद नगर मध्ये आल्यानंतर निलेश शेठच्या मामांचा मुलगा प्रकाशजी साळुंखे, व त्यांचे मित्र सुनील डुबल यांच्या निवासस्थानी जाऊन महाराज प्रतिष्ठान चे बबलू पवार आणि अनिकेत रणमोडे व सर्व मित्र परिवार यांचे तर्फे संपूर्ण टीमचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं आपुलकीने विचारपूस करून पुढील मोहिमेसाठी त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या छोटासा कॉफी ब्रेक झाल्यानंतर आम्ही तिथून थेट निलेश भाऊंच्या शेताकडे निघालो आजचा दुपारच्या न्याहारी चा कार्यक्रम शेतामध्येच होणार आहे. पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद...!!!
आज दुपारी आम्ही ठीक 1.00 वाजता निलेश भाऊंच्या फार्म हाऊस वर आलो त्यांचे मोठे बंधू महेश भाऊ आणि कुटुंबियांनी दुपारच्या न्याहारीचा छान बेत केला होता.इथे पोहचण्यासाठी आम्ही मेन रोड वरून लेफ्ट घेऊन छान पानंद च्या रस्त्याने सायकलिंग करत उसाची शेती, केळीची बाग आणि गव्हाच्या शेतीचा हिरवाई चा आनंद घेत अतिशय रमानीय अशा जागेवर पोहचलो.येथील शेत तळे (क्षमता 1कोटी लिटर ),गाईंचा गोठा, बदकांची जोडी, नारळाची, आंब्याची झाडी, सोलर पॅनेल, विहीर निसर्गरम्य वातावरणात आम्ही आमचा थकवा विसरून गेलो. आमची क्षुद्धा शांती झाली आणि थोडासा आराम केला. निलेश भाऊंचे मामा, व दाजी किरणजी खलाटे खास फलटण वरून आम्हास शुभेच्छा देण्यासाठी आले होते त्याचबरोबर विकासजी हगवणे,संतोष सावंत यांनी आमचं आदरांतिथ्य केले त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून पुढील मार्गक्रमण सुरु केले. या गोड पाहुणचारासाठी टीम कडून खूप खूप धन्यवाद...!!!
#दिवस दुसरा#
🌟 "मनात जिद्द असेल, तर कठीण वाट सुद्धा सरळ होते!" 🌟
#मराठा_वॉरियर्स टीमने आज सकाळी 6.00 वाजता #जेजुरी_ते_अकलूज आव्हानात्मक प्रवासाला सुरुवात केली. कडाक्याच्या थंडीतही उत्साह कायम ठेवत, हा प्रवास आम्ही यशस्वीरीत्या संद्याकाळी 7.00 वाजेपर्यंत पूर्ण केला
#जेजुरी, #श्रीखंडोबा_देवस्थानासाठी प्रसिद्ध, आमच्या प्रवासाची प्रेरणास्थळ ठरले, तर # निलेश भाऊंच्या शेतावर आम्ही थकवा विसरून गेलो त्यानंतर आपुलकीची आणि प्रेमळ भेट औक्षण, या सगळ्या उपक्रमातून आमचा उत्साह द्विगुणित झाला निमगाव केतकी या ठिकाणी परममित्र सागर गोरे व मित्र परिवार आपुलकीचा स्वागत समारंभ पार पडला. संद्याकाळी त्याच मंडळी बरोबर चहापाण करून आम्ही निघालो आजचा दिवस पूर्ण सत्कार आणि आदराथीत्य या मधे व्यस्त असल्यामुळे अकलूज या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायला थोडा उशीर झाला. आणि आता टीम बरोबर उद्याच्या मार्गाची आणि नियोजनाची चर्चा सुरु झाली.
#प्रेमाचा सत्कार
#आपुलकीचे चविष्ट जेवण
#हिरवाईने नटलेला परिसर एकंदरीत दुसरा दिवस छान गेला..
हा प्रवास मैलांचा नव्हता, तर जिद्दीचा आणि ध्येयपूर्तीचा होता!
💪 "प्रयत्न आणि चिकाटीने कोणतंही ध्येय गाठता येतं."
धाडस करा, स्वप्न पूर्ण करा, आणि #मराठा_वॉरियर्स सारखा सदैव झेंडा उंच ठेवा! 🚴‍♂️

#दिवस 3 रा
!!जाय जाय पंढरी होय होय वारकरी!!
आजचा कॉफी ब्रेक झाल्यानंतर आम्ही विठुरायाची वैकुंठ नगरी पंढरपूर तीर्थक्षेत्राला भेट दिली. अखंड वारकरी संप्रदायाचे श्रद्धा स्थान पांडुरंग रायाच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील प्रवासा साठी ऊर्जा घेतली. या दर्शनाने सर्व क्षीण क्षणात नाहीसा झाला आणि आम्ही पुढील ठिकाणासाठी मार्गक्रमित झालो...!!!
आजच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा पार केला.. सकाळी अकलूज वरून निघून आम्ही पंढरपूर ला दर्शन घेतलं.. विठुरायाच्या नगरीत भक्ती भावाने नामदेव पायरीशी डोके टेकवून पुढील प्रवासासाठी निघालो. वारकऱ्यांची मोहिमे च्या औतुस्क्यापोटी विचारपूस, सेल्फी काढून घेण्यासाठी लगभग , आणि सर्वांचे कुतूहल कि टीम श्रीलंकेला निघाली आहे.. आता मंगळवेढा 15 किमी राहिले आहे आणि आम्ही नास्ता करत आहोत...🚩🚩🚩

#Day 3पुणे ते श्रीलंका सायकल प्रवासाचा आजचा दिवस तिसरा
आज मराठा वॉरियर्स ची टीम सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे अकलूज या ठिकाणाहून आम्ही उमदि या ठिकाणी पोहचन्यास सज्ज झालो. अकलूज ते पंढरपूर रोड ला पंढरपूर च्या अलीकडे 10 किमी आम्ही कॉफी ब्रेक घेतला. थोडीशी मजामस्ती करत मित्र परिवाराने आवडीने दिलेले choclates आणि cookies वर ताव मारला आणि पंढरपूर च्या पांडुरंगाला भेट देण्यासाठी निघालो. आजचा योग हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल कारण आज षटतिला एकादशी होती. वेळेअभावी संत नामदेव पायरी ला नमस्कार करून पुढे मार्गस्थ झालो. मंगळवेढा पुढील टार्गेट होते. आम्ही मंगळवेढा पार करून 15 किमी नंतर ब्रेकफास्ट साठी थांबलो. आमचे कूक नवनाथ भाऊंनी छान गरमागाराम पोहे केले होते त्यावर ताव मारला सगळ्यांनी ( सचिन आणि नवनाथ सोडून कारण उपवास 😅) असो, खरी कसोटी लागली ती नाष्टा झाल्यानंतर सायकलिंग करताना कारण उन्हाचा वाढलेला चटका, विरुद्धध दिशेने वाहणारे वारे आणि सिमेंट चा रस्ता सर्व टीम पूर्णपणे बेजार झाली. मजल दरमजलं करत मरवाडे या गावी पोहचली. तेथेच जवळच जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. योगायोगाने आम्हाला तेथील आरोग्य केंद्रात छान जागा उपलब्ध झाली आणि विशेष म्हणजे तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला जागा पूर्णपणे झाडून दिली तसेच मोबाईल चार्जिंग साठी पण मदत केली. सर्वाना कुतूहल हेच कि मोहीम कशी काय सिलेक्ट केली आणि आश्चर्य कारक मुद्रा 😅जेवण छान झाले आणि उल्हास पानमंद या मित्राचा फोन आला कि मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येतोय. तो आला आणि छान कार्यक्रम झाला (त्याचा फेसबुक लाईव्ह विडिओ ग्रुप वर उपलब्ध आहे )नंतर उमदी या ठिकाणी लॉजिंग सोय नाही असे समजले. आम्ही पुढे मार्गमध्ये थोडासा बदल केला. मार्गमध्ये कर्नाटका राज्याच्या हद्दीत RTO चेक पोस्ट ला थांबून RTO ऑफिसर कडून थोडी स्थानिक माहिती घेतली अर्थात त्यांच्याही शुभेच्छा मिळाल्याच. चडचन या ठिकाणी सुरज पाटील या मित्राने आवर्जून कॉफी ऑफर केली त्याचा आम्ही आनंदाने स्वीकार केला त्याचा आम्ही छोटासा सत्कार केला आणि चडचन या नवीन तालुक्याचा ठिकाणी हॉटेल इब्बानी या ठिकाणी मुक्कामी राहिलो, या हॉटेल हॉटेल चे मॅनेजर मन्सूर चौगुले यांनी सहकार्य केले आणि मोहिमेस शुभेच्छा दिल्या. नवनाथ भाऊंनी छान जेवण बनवलं होत त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर मस्त गाण्याची मैफिल जमली आणि अशा रितिने आजच्या दिवसाची समाप्ती झाली.*'रास्ते कहां खत्म होते हैं जिंदगी के सफ़र में, मंज़िल तो वहीं है जहां ख्वाहिशें थम जाएं*...!!!
# Day4 पुणे ते श्रीलंका सायकल प्रवासाचा चौथा दिवस
काल आपण महाराष्ट्र राज्य पार करून कर्नाटक राज्यात प्रवेश केला.. विठुराया महाराष्ट्रा मधे असला तरी तो मूळचा कर्नाटक चा कानडा राजा पंढरीचा. आज 76 वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्याचे औतुस्क्य साधून टीम एखाद्या शाळे मधे जाऊन तिरंग्याला सलामी देण्याचा मानस आहे. आजचा अपेक्षित प्रवास हा चडचन ते हाणगुण्ड असा असणार आहे. 🇮🇳🇮🇳
#Day4 पुणे ते श्रीलंका प्रवासाचा चौथा दिवस
*मिल ही जायेगी मंझिल यूही भटकते भटकते, गुमराह तो वो है जो घर से निकलें ही नही*
आजचा दिवस सकाळी होर्टी या गावी सत्कार नाष्टा आणि त्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर दर्शन, दुपारच जेवण शेतामध्ये विजापूर पासून साधारण 20 किमी पुढे केले. त्यानंतर आम्ही मंगोली या गावी मुक्कामाचा निर्णय घेतला कारण पुढे रस्त्यामध्ये साधारण 50 किमी पर्यंत राहण्यासाठी योग्य जागा नाही, तसेच रस्त्यात जंगल आणि ड्राय एरिया आहे असे स्थानिक लोकांकडून समजले त्यामुळे आजचा प्रवास थोडासा लवकर थांबवला आहे
#Day5 आजचा दिवस पाचवा
पुणे ते श्रीलंका सायकल expedition आजच्या दिवसासाठी थोडीशी कदाचित statergy change करावी लागेल, कारण आम्हाला आज बरेचसे अंतर कापाव लागणार आहे. मराठा वॉरियर्स टीम नवनवीन आव्हाने पेलण्यास सज्ज आहेच येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा आम्ही सामना करून आम्ही मार्ग परिक्रमण चालू ठेवणार आहोत.उद्याचा मुख्य पडावं हुनगुंडा शहर असेल.हुनगुंडा हे शहर पूर्वी चालुक्य राज्याच्या आधीप्त्याखाली होते आणि पूर्वी हि मोठी बाजारपेठ देखील होती. अशा ऐतिहासिक स्थळापासून आज आम्ही पुढे निघणार आहोत. इच्छा असून देखील सर्व ठिकाणे, ऐतिहासिक स्थळांना भेट देणे शक्य नाही...!!!

#Day 6th
आज सायकल expedition चा दिवस सहावा. आमचे मोहीम प्रमुख नेहमी म्हणत असतात कि, "पाणी से नहाते है वो लिबास बदलते है और जो पसीने से नहाते है वो किस्मत बदलते है" कालच्या दिवसभरातला सर्वांनाच अनुभव खूप काही शिकवून गेला असो,
आमचा नियोजित मार्ग हा तोरणगल्लू ते वेल्लूर असा होता पण काही अपरिहार्य कारणांमुळे आम्ही आज नियोजित मार्गात थोडासा बदल करत आहोत. स्थानिक लोकांकडून अशी माहिती मिळाली कि हा रस्ता सद्य परिस्थिती मध्ये cycling expedition साठी योग्य नाही म्हणून सावधगिरी म्हणून आम्ही होस्पेट या शहरावरून बंगलोर च्या दिशेने जाणार आहोत. मार्गात जरी बदल झाला असला तरी नागपाट्टनम हे इच्छित ठिकाण आम्ही नियोजित दिवसामध्ये गाठणार आहोत...!!!

#DAY 6 पुणे ते श्रीलंका सायकल मोहीम दिवस सहावा
"समघर्षातून अस्तित्व निर्माण झाले कि जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता हि येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो "
आजचा दिवस खरच संघर्षमय गेला. प्रथम सकाळी बुडागुफा वरून सकाळी 5.15 ला निघालो होस्पेट आम्ही पहाटेच पार केले नंतर तुंगभद्रा नदी चे विशाल पात्र छान थंडी होती सकाळी. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूस केळीच्या नारळाच्या, पोफळी च्या बागा आणि पवनचक्की असे मनोहर दृश्य होते.आम्ही बऱ्यापैकी अंतर उरकले होते त्यात breakfast ब्रेक च्या आधी संतोष ची सायकल puncture झाली त्यासाठी बॅकउप वॅन बोलावून आम्ही पुढे निघालो तर थोड्या वेळात नारायण भाऊंची सायकल puncture झाली विशेष म्हणजे त्यांनी दोघांनी स्वतः puncure काढून प्रवास सुरु केला. नाष्टा झाल्यावर निघालो तर संतोष ची सायकल पुन्हा puncture होती मग बाकीची टीम पुढे गेली व संतोष आणि सचिन सायकल ठीक करून पूढे निघाले. आज जेवणाच्या वेळेत *सद्दाम मोगल आणि अजित Sarens cranes Engineer* (सचिन चे मित्र )आवर्जून भेटायला आले होते त्यांची भेट घेऊन आम्ही इच्छित पल्ला गाठायचं ठरवलं पुढे पोफाळीच्या बागेजवळ संध्याकाळी कॉफी घेतली आणि मुक्कामाच्या ठिकाणी चित्रादुर्ग या ठिकाणी सुखरूप पोहचलो.

काल टीम ज्या ठिकाणी मुक्कामाला होती त्याविषयीं ऐतिहासिक स्थळा (चित्रादुर्गा ) थोडीशी संकलित माहिती पुढीलप्रमाणे,चित्रदुर्ग किल्ला हे या जिल्ह्याच्या नावाचा उल्लेख करूनच पर्यटकांच्या मनात डोकावणारा पहिला आणि महत्त्वाचा वास्तू आहे. 7 केंद्रित तटबंदी असलेल्या या भक्कम किल्ल्याचे वर्गीकरण “ गिरिदुर्ग ” म्हणजे डोंगरी किल्ला म्हणून केले जाते. सात शिखरे असलेल्या या डोंगरी किल्ल्याचे नाव " चिमुलाद्री " असे आहे. ज्याला ' तुप्पडा कोला' नावाच्या मध्यवर्ती टेकडीभोवती सात रांगा आहेत , ज्याच्या पूर्वेला हिडिंबेश्वरा टेकडी आणि शिवालय टेकडी अनुक्रमे पूर्व आणि ईशान्य दिशांना आहे आणि पश्चिमेला कहलेबथेरी टेकडी आहे आणि लाल-बथेरी आणि नल्लिकयसिद्धप्पा टेकड्या आहेत. दक्षिणेकडील बाजूस. या टेकडीच्या उत्तरेला जांडबथेरी आणि भीमनाभथेरी आहेत. संपूर्ण तुप्पाडा कोला टेकडी आणि तटबंदीसह आजूबाजूच्या खोऱ्याला मेलदुर्ग म्हणजेच वरचा किल्ला असे संबोधले जाते. हा तटबंदीचा प्रदेश योजनेनुसार वर्तुळाकार आहे. जमिनीपासून सुमारे 300 मीटर वर संपूर्ण तटबंदी असलेला प्रदेश.
आधुनिक चित्रदुर्गाला पौराणिक नोंदीनुसार चिमुलाद्री आणि हिडिंबीपट्टण ही नावे होती. कल्याण आणि होयसळांच्या चालुक्यांचे अग्रलेख या ठिकाणास सुलगल्लू, बेम्मथनगल्लू, बेम्मथनुरू, ब्रह्मपुरीगेरी, पेरुमालेपुरा, चिंचनगिरीदुर्ग, शिंगणागिरीदुर्ग आणि चिंथकलदुर्ग असे विविध प्रकारे संदर्भित करतात. १८ व्या शतकापर्यंत हे चित्रकल्लुदुर्ग म्हणून प्रसिद्ध झाले, ज्याचे नाव बदलून फारुख-याब-हिसार (फारुकाबाद) असे ठेवण्यात आले, जेव्हा ते हैदर अलीने जिंकले. स्थानिक आख्यायिका या ठिकाणाला सित्रकल्लुदुर्गा, चित्रकल्लू, सिंथारकल्लू इत्यादी नावाने संबोधतात.
#Day 7th
आज मराठा टीम चा पुणे ते श्रीलंका या मोहिमेचा सातवा दिवस.
सकाळी ठरल्याप्रमाणे टीम बरोबर सकाळी 5.50 ला हॉटेल मयूर चित्रादुर्गा वरून तुमकूर च्या दिशेने निघाली आणि कॉफी ब्रेक आणि नाष्टया पर्यंत इच्छित अंतर आरामात पार केले कारण आज सर्व रायडर्स जोशात होते. वातावरण पण खूप छान होते बऱ्यापैकी थंडी होती.साधारणता 9.00 वाजेपर्यंत हवेत गारठा होता. दुपारी ठरलेल्या वेळेत जेवणासाठी थांबलो, जागेचा थोडासा प्रॉब्लेम होता मग निलेश भाऊंनी छान नारळाच्या बागेत व्यवस्था केली. दुपारच्या जेवणानंतर रस्ता थोडासा कठीण होता ऊन आणि ट्राफिक चा थोडासा त्रास झाला. संद्याकाळी तुमकूर मध्ये हॉटेल बुक केले आणि मुक्कामास पोहचलो. येणारा प्रत्येक दिवस हा नवनवीन आव्हान घेऊन येतो आहे, आणि आम्ही ती आव्हाने पेलत आहोत याच आवाहनांना आम्ही मराठा वॉरियर्स आव्हान देत आहोत त्यासाठी आज एक खास कविता हिंदीमध्ये,
"ठोकरें खाते है पर ‘शान’ से चलते है,
हम खुले आसमान के नीचे सीना तान के चलते है
मुष्किलें तो ‘साज़’ हैं जिंदगी का
मुष्किलें तो ‘साज़’ हैं जिंदगी का
उठेंगे, गिरेंगे फिर उठूंगे
और
आखिर में… जीतेंगे हम ही ये ठान के चलते है"…!!!
“टीम मराठा वॉरियर्स”



#Day 8th
सुप्रभात, आज पुणे ते श्रीलंका सायकल प्रवासाचा आठवा दिवस उजाडला आहे.
आठवडाभर दररोज सलग पहाटे पासून संध्याकाळी उशीरा पर्यंत सायकलिंग केल्यानंतर आज आम्ही थोडासा उशिरा निघायचं ठरवलंय कारण आठवडाभर सायकलिंग करून थोडेसे exhaust झालो होतो. आम्हाला पूर्ण झोपेची गरज होती कारण आम्ही रोज साधारण रात्री 11.00 वाजता झोपून 4.00 वाजता उठत होतो म्हणून सर्वानुमते आम्ही हा निर्णय घेतला.काल रात्री आम्ही स्थानिक हॉटेल मध्ये जेवण केले आमच्या cook ला सुद्धा थोड्या आरामाची गरज होतीच.आज आम्ही बंगळूरू शहराच्या दिशेने जाणार आहोत तेथील ट्राफिक हि एक संभाव्य अडचण आम्हाला आहे.
" कारणं सांगणारी लोक कधीही यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी लोक कधीही कारण सांगत नाही
"मराठा वॉरियर्स आव्हाने पेलण्यास सज्ज आहे. Lets go...!!!

#Day 8th
पुणे ते श्रीलंका सायकल मिहिमेचा आजचा आठवा दिवस. आजचा प्रवास हा नियोजित तुमकूर सिटी ते बंगलोर (होसूर रोड ) हा होता. आज आम्ही प्रवास सुरु करताना सकाळी 11.00 वाजता नाष्टा केला होता त्यामुळे दुपारचं जेवण आम्ही घेतलं नाही आणि दुपारी कलिंगड आणि इतर (water base fruits )फळे खाल्ली. आज ट्रॅफिक आणि उन्हाचा फटका बसलाच जो संभाव्य होताच, त्यात संतोष ची सायकल पुन्हा पंक्चर झाली सचिन आणि संतोष ने एक्सप्रेस टायर चे दुकान बघून वे मधून सायकल बाहेर घेतली तर टायर वाला बोलला कि हवा तुमच्या जबाबदारीवर भरा टायर फुटला तर मी जबाबदार नाही 😂 मग सचिन ने सायकलला हवा भरली व पूढे नंतर अब्बास ने पंक्चर काढली. आम्ही होसूर एक्सप्रेस रॊड ला गेल्यावर टोल नाक्यावर थोडासा वाद झाला कारणं त्या रस्त्यावर सायकल ला परवानगी न्हवती पण कामगारांनी आम्हाला थोडासा चुकीचा रस्ता सांगितला होता पण शेवटी अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला दुसरा रस्ता बदलायला सांगितला आणि आम्ही त्या रस्त्याने मार्गस्थ झालो. पुढे ट्रॅफिक मुळे थोडीसी चुकामुक झाली पण शेवटी एका चौकात सगळे भेटलो व नंतर होसूर रस्त्यावर ट्रॅफिक कमी झाल्यावर चहा कॉफी चा आनंद घेतला, त्यानंतर ठरल्याप्रमाणे सचिन आणि संतोष ने हॉटेल बुक केले आणि सगळे त्याठिकाणी मुक्कामासाठी आले.संमिश्र अनुभवांचा आजचा दिवस होता.

#Day 9th
पुणे ते श्रीलंका सायकलिंग चा आजचा नववा दिवस. आज आम्ही सकाळी बंगळूरू शहरातून नियोजित वेळेत सकाळी 5.30 ला निघालो. बंगळूरू शहरातून ट्रॅफिक ची संभाव्य अडचण होतीच आणि त्याचा थोडासा त्रास आम्हाला झाला 2-3 वेळा आम्ही रस्ता चुकलो नंतर योग्य मार्गाला (होसूर रोड ) ला लागलो. होसूर ला येण्या अगोदर आम्ही 6.30 वाजता रामेश्वराम कॅफे जो बंगळूरू चा ब्रँड आहे तिथे कॉफी घेतली. संदीप ची खूपच इच्छा होती त्या कॅफे मध्ये जाण्याची. आम्ही कृष्णागिरी च्या अगोदर नाष्टा केला व कृष्णागिरी च्या पुढे येऊन 2 तासाने जेवणासाठी थांबलो ती जागा म्हणजे छान आंब्याची बाग होती. कृष्णागिरी बद्दल थोडेसे सांगतो,
"कृष्णगिरी हे शहर भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे आणि ते 2004 मध्ये स्थापन झालेल्या कृष्णगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय म्हणून काम करते. हे कृष्णदेवराया टेकड्यांच्या तळाशी आहे आणि हे शहर पूर्णपणे टेकडीने वेढलेले आहे. कृष्णागिरी ला भारताची आंब्याची राजधानी म्हणून ओळखले जाते". आज आम्ही होसूर पासून तामिळनाडू राज्यात प्रवेश केला. तामिळनाडू मध्ये प्रवेश केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबा, नारळाची झाडें, मोगऱ्याची आणि भात शेती होती. खूपच रम्य वातावरण होते. दक्षिण भारताच्या ठराविक खुणा सहज लक्षात येत होत्या. इकडची मंदिरे, शेती आणि रस्ता यामधला दोन्ही राज्यांमधला बदल सहज लक्षात येत होता. जेवणानंतर आम्ही कृष्णागिरी वरून आम्ही निघालो ते सरळ पोचमपल्ली या गावी या रस्त्याने च आम्ही पूढे डाव्या बाजूने नागपाट्टनम ला जाणार आहोत. आज आम्ही रस्ता बऱ्यापैकी चुकलो होतो मग, स्थानिकांशी संवाद साधून योग्य रस्त्याला लागलो. हा रस्ता पूर्ण खेडेगावातून जाणारा होता. Highway ला सायकलिंग करणे आणि गावातून सायकलिंग करणे यात खरंच खूप अंतर आहे. आम्ही गावच्या रस्त्याने सायकलिंग करताना सगळं थकवा, चिडचिड विसरून गेलो कारणं छान वळणावळनांचा रस्ता दोन्ही बाजूला नारळ, चिंच, आंबा ही घनदाट झाडी, भाताची आणि मोगऱ्याची शेती. एकदम थंड वातावरण खूपच मजा आली त्या 30 किलोमीटर मध्ये, दक्षिण भारताचा एक छान अनुभव आला,त्यात शाळा सुटली होती सर्व विद्यार्थी आम्हाला बघून रायडर- रायडर म्हणून cheer-up करत होते. आम्ही त्या रस्त्यावर एका बागेत थांबून कॉफी चा आनंद घेतला तेथे एका स्थानिक पुजाऱ्याने आम्हाला पुढील route साठी आपुलकीने मार्गदर्शन केले. यांनंतर आम्ही पोचमपल्ली ला नियोजित वेळेत पोहचलो.

#Day 10th
पुणे ते श्रीलंका सायकलिंग चा आजचा दिवस दहावा.
काल आम्ही पोचमपल्ली (तामिळनाडू )या शहरामध्ये नियोजित वेळेत पोहचलो होतो. आज आम्ही थिरुवान्नामलई च्या दिशेने वाटचाल करत आहोत.आम्ही जेवणाच्या वेळेत राहिलेल्या अंतराचा अंदाज घेऊन मुक्कामाचे ठिकाण शोधणार आहोत.
"प्रत्येक मैल एक गोष्ट सांगतो, प्रत्येक वळण एक नवीन साहस आहे.सीमेपलीकडे जाणारे आमचे सायकलचे चाक आहे , कारण प्रवासाला मर्यादा नसतात."
#Day 10th
पुणे ते श्रीलंका सायकल प्रवासाचा आजचा दहावा दिवस.
आज आम्ही सकाळी ठीक 5.30 वाजता पोचमपाल्ली या छोट्या शहरातून निघालो. आम्हाला भेटायला आलेले श्री. बजरंग शेठ काळजे यांनी आम्हाला सकाळी मराठा वॉरियर्स चा फ्लॅग दाखवून (flag off) रवाना केले. कालचा प्रवास न विसरण्या सारखा च झाला होता तिथून पुढे आम्ही तिरुवनमालाई या ऐतिहासिक शहाराजवळून आलो. वेळअभावी आम्हाला या शहरात जाता आले नाही.तिरू्वनामलई विषयी थोडेसे, हे शहर एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी अरुणाचलेश्वर मंदिर आहे ,
हे मंदिर शिवदेवाच्या भक्तीसाठी आहे.
हे मंदिर द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे.
हे मंदिर चोल साम्राज्याने बांधले आहे.
हे मंदिर आग या पंचभूतांना समर्पित आहे.
हे मंदिर हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार मोक्ष मिळण्यासाठी पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.
हे मंदिर अरुणाचला पर्वताच्या पायावर आहे.
हे मंदिर अनेक शिल्पांनी सजवले आहे.
या मंदिरात चार प्रवेशद्वार आहेत, ज्यांना गोपुरम् म्हणतात.
या मंदिरातील सर्वात उंच गोपुरम पूर्वेकडे आहे.
या मंदिरात मोठ्या आकाराच्या प्रांगणे आहेत.
या मंदिरात हजार स्तंभांचा हॉल आहे.
अशा मंदिरामध्ये दर्शनासाठी वेळ असावा लागतो जो कि आता आमच्याकडे खूप कमी शिल्लक आहे म्हणून आम्ही थांबू शकलो नाहि कारणं मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेल available दाखवत न्हवते.
पुढे आम्ही अननस खाण्याचा आनंद घेतला. नारायण भाऊंना सायकलिंग करताना एक्स आर्मी जवान भेटला होता त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने अननस खायला घातले. त्यांनंतर आम्ही जेवणासाठी थांबलो. आज आम्ही थिरुकोइलूर या ऐतिहासिक शहरामध्ये अन्नपूर्णा लॉज ला थांबलो आहे. आज या ठिकाणी सर्व हॉटेल्स बुक आहेत आणि कुठेही रूम्स उपलब्ध नाहीत पण या ठिकाणी थोडी नशिबाने साथ दिली आणि आम्हाला आरामाला जागा मिळाली.आज आम्ही या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. या जागेविषयी थोडी माहिती,
तिरुकोइलूर हे तिरुक्कोयिलूर किंवा तिरुकोविलूर असे देखील उच्चारले जाते आणि भारतातील तामिळनाडूमधील कल्लाकुरीची जिल्ह्यातील तिरुकोइलूर तालुक्याचे एक शहर आणि मुख्यालय आहे . हे शहर थेनपेन्नई नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले आहे आणि उलगलांथा पेरुमल मंदिर , वीरातेश्वर मंदिर आणि काबिलार कुंद्रूसाठी प्रसिद्ध आहे . तिरुकोइलूर हे तिरुवन्नमलाई आणि वेल्लोर शहरांना दक्षिणेकडील तामिळनाडूशी जोडणाऱ्या महामार्गावर स्थित आहे...!!!

#Day 11th
पुणे ते श्रीलंका सायकल प्रवासाचा आजचा अकरावा दिवस. मजल दरमजल करत आम्ही तामिळनाडू मधील तिरुकोविलूर या ठिकाणी पोहचलो काल अतिशय भव्य अशा उलगलांथा पेरुमल मंदिर, वीरातेश्वर मंदिर, अतुल्या नादेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो . त्रिविक्रम विष्णू मंदिरात एकदम शांत वातावरणात दर्शन झाले. श्री बालाजी विष्णू यांचा चा एक पाय स्वर्गात आणि एक जमिनीवर अशी येथील भक्तांची मान्यता आहे.🚩🚩🙏 या भागातील हे एक मोठे देवस्थान आहे. मंदिरात विष्णू वाहन गरुड, अंबामता महालक्ष्मी आणि श्री विष्णू च्या सुबक मूर्ती आहेत. दक्षिण भारतीय मंदिरामधील हे एक महत्वाचे मंदिर आहे.
सर्व टिम ने आज बाहेरच जेवण केले. गणेश जयंतीच्या दिवशी हा योग जुळून आला.
आज आम्ही नागपाट्टनम दिशेने निघणार आहोत हे अंतर आता 184 किमी राहिले आहे. 

पुणे ते श्रीलंका कालचा अकरावा दिवस. काल आम्ही सकाळी ठिक 5.30 वाजता थीरुकोईलूर या ठिकाणाहून निघालो. थिरुकोइलूर वरुन आम्ही पहाटे निघालो तेव्हा पासून पटेरी या शहरापर्यंत पर्यंत सलग 40 किमी धुक्याची चादर पसरली होती. सगळे टिम मेंबर्स धुक्यातून सायकल चालवत नागपट्टनम च्या दिशेने निघालो. दक्षिण भारतात एवढे दाट धुके आम्हाला खरंच पर्वणी वाटली. यांनंतर आम्ही वेळ वाचवण्यासाठी कॉफी हॉटेल मधेच घेतली नंतर संलग सायकलिंग करत आम्ही पाटेरी च्या पुढे पोहचलो. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र घेतला (brunch ). त्यानंतर आम्ही पुढील मार्गासाठी थोडी चर्चा केली कारण 105 किमी. शिल्लक होते नागपाट्टनम पोहचायला.इकडे humidity (आद्रता) खूपच जास्त आहे. सकाळी 10 ते 10.30 वाजल्यानंतर सायकलिंग खूप अवघड जाते. आम्ही नाष्टया नंतर थोडं थांबून लंच आणि आरामाचा निर्णय घेऊन नागपाट्टनम च्या दिशेने निघालो. आज टिम चा निर्णय ठाम होता कि कितीही वेळ होउदे आज नागपाट्टम ला पोहचायचे. हवेतील आद्रता काही सुचू देत न्हवती तरिहि सर्वांनी निर्णय घेऊन रात्री 11.00 वाजेपर्यंत नागपातट्टम ला Hotel Rever view ला पोहचलो आहे. आजची सायकलिंग 181 किमी झाली जी या पूर्ण expedition साठी एक रेकॉर्ड आहे. उद्या आम्ही श्रीलंकेच्या दिशेने निघणार आहोत. आज आम्ही नागपात्तनम ला पोहचल्यानंतर सर्व टिम आणि back up टिम चा आनंद खरंच अवर्णनिय होता. एक नवीन ध्येय गाठल्याच समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते. आमचे कॅप्टन आणि निलेश भाऊंचे प्रोत्साहन आणि सर्व सहकाऱ्यांनी मिळून ही सायकलिंग पूर्ण केली. आज आम्ही तामिळनाडू मधून पोंडेचेरी आणि परत तामिळनाडू मधील नागपात्ट्टनम बंदराजवळ पोहचलो आहोत...!!!
पुणे ते श्रीलंका सायकल मोहीम
थिरुकोविलूर त्रिविक्रम विष्णू मंदिरा🚩 मध्ये दर्शन झाले होते तेथून आम्ही नागापट्टनम च्या दिशेने निघालो. छान धुक्याची चादर पहिल्यांदाच आमच्या सर्व प्रवासात अनुभवायला मिळाली तेही 40km पर्यंत.
आम्ही पातेरी मध्ये पोहचलो कॉफी घेतली आणि 20 किमी नंतर नाष्टा केला आणि त्यानंतर निलेशभाऊ ना आमच्या ट्रॅव्हल ऑफिस वरुन हर्षद चा कॉल आला कि 4 तारखेचीं फेरी बोट boat⛴️ कॅन्सल झाली आहे त्यात ferry Boat कंपनी चा official mail हि आला पैसेही refund येणार होते, आणि इथून पुढे आमची खरी कसोटी होती कि आता पुढे काय करायच कारण नागपट्टनम 103 अंतर किमी शिल्लक होते पुढे फेरी बोट कॅन्सल आणि अजून destination ला पोहचलो नाही चर्चा आणि काहींशा उदास मनस्तिथी मध्ये आम्ही सगळे होतो पण आम्ही कुणालाही फोनवर हे सांगितलं नाही कि बोट कॅन्सल झाली आहे. यांनंतर निलेशभाऊ सलग हर्षद बरोबर फोन वर बोलत होते त्यात जवळचे एअरपोर्ट होते तिरुचिरापल्ली तेथून जाफना connecting flights होत्या पण त्यात स्पोर्ट्स equipment allowed न्हवते. या मध्ये संदीप खूपच नाराज झाला तो म्हणाला आपण कमीत कमी नागपाट्टनम ला पोहचू आणि पुढे बघू काय करायचं ते कारण त्या ठिकाणी काहीच सुचत न्हवते कि चेन्नई ला जायचं,नागपट्टनम कि त्रीची? एक वेळ असे वाटत होते कि मोहीम इथेच संपते कि काय मग संदीप ने जोर धरला कि नागप्पट्टनमला जाऊ सगळ्यांनी त्याला दुजोरा दिला सर्व जण मिळून निर्णय घेतला कि आपण पहिले नागपातट्टनम ला पोहचू मग पुढचे पुढे ठरवू. या सर्वात आमचा 3-4 तास महत्वाचा वेळ वाया गेलाच आणि पूर्णपणे गोंधळल्या मनस्तिथी मध्ये आम्ही होतो.हे आता थोडंसं सोप्प वाटतंय पण त्या वेळेला आम्ही थोडंसं अवघडवून गेलो होतो कि नक्की काय करायचं,एका मराठी सिनेमा मध्ये डायलॉग आहे कि *"परिस्तिथी जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट"* त्याप्रमाणे संध्याकाळी सायकलिंग सुरु करून ठिक रात्री 11.00 वाजता नागपाट्टणम ला पोहचलो. यांनंतर आमच्या लीडर्स ने *प्लॅन B* वर काम करायला सुरवात केली जो असा कि,निलेशभाऊनी आणि बजरंग भाऊंनी निर्णय घेतला कि चेन्नई ते कोलोम्बो विमानाने जायचं आणि कोलोम्बो ते जाफना बसने पोहचायचं. निलेश भाऊंनी पुढील तिकिटे आणि सर्व प्लॅन तयार केला, आणि त्या पद्धतीने आम्हाला व बॅक अप टिम ला सूचना दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही सायकल खोलून बॉक्स पॅक केल्या त्यात भरपूर वेळ गेला आमचा अब्बास मदतीसाठी होताच तसेच नवनाथ आणि महादेव दोघेही त्यात मदत करत होते. सर्व बॉक्स पॅक करून आम्ही आमच्या बॅक अप वॅन मध्ये टाकले आमच्या बॅग्स पण लोड केल्या आणि आम्ही एक private कार बुक करून सर्वजण बरोबर चेन्नई साठी रवाना झालो. चेन्नई साधारता 8 तासाने पोहचलो. आमची बॅक अप टिम आम्हाला ड्रॉप करून परतीच्या प्रवासाला निघाली तेव्हा ते पण थोडे भावनाविवश दिसत होते आणि आमचीहि स्तिथी काही वेगळी न्हवती 11-12 दिवस ते आमची अगदी घरच्यानंसारखी काळजी घेत होते. त्यांचा निरोप घेऊन आम्ही चेन्नई ✈️मार्गे विमानाने कोलोम्बो 🛬आणि तेथून बस ने जाफना शहरात हॉटेल The Thinni ला सुखरूप पोहचलो. त्यांपूर्वी immigration चे सोपस्कार पार पडल्यानंतर आम्ही थोडी currency exchange केली. आम्हाला ठरल्याप्रमाणे आमच्या स्वागतासाठी ट्रॅव्हल्स कंपनी कंपनी चा Executive Mr. Lassa आला त्याने पारंपरिक श्रीलंकन शिंपल्याच्या माळा घालून आमचे स्वागत केले व आमचे luggage आणि सायकल बॉक्स बस मध्ये लोड केल्या आणि आम्ही जाफना शहराच्या दिशेने रवाना झालो रस्त्यात संतोष ने लाझा बरोबर भरपूर गप्पा मारल्या 7. 00 तासाच्या प्रवासानंतर आम्ही हॉटेल वर पोहचलो अंघोळ करून दुपारचं जेवण घेतलं आणि आराम केला कारण सलग 2 रात्र आम्हाला झोप मिळाली न्हवती. आता जाफना शहर आणि आजूबाजूचे टुरिस्ट पॉईंट पाहून ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आम्ही 6 फेब्रवारी ला जाफना ते कोलंबो सायकल प्रवास सुरु करणार आहोत. आमचे नियोजन थोडंसं बदललं आणि त्रास झाला पण आम्ही कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराना देखील पूर्ण माहिती दिली नाही कारण मग सर्व जण काळजी करत राहिले असतें म्हणून हेतूपूरस्सर आम्ही हा प्लॅन B यशस्वी होईपर्यंत कुणाकडे बोलायचं नाही असं ठरवलं होत. आता जाफना शहर आणि इतर माहिती यापुढे देत राहू धन्यवाद 🙏


पुणे ते श्रीलंका सायकल मोहिमेचा कालचा चौदावा दिवस. बऱ्याचश्या नाट्यमय घडामोडीमोडीनंतर आम्हीv जाफना ला पोहचलो हॉटेल Thenni मध्ये विसावलो.. वगैरे, वगैरे.. आज आम्ही सायकल्स सर्व बॉक्स पॅक मधून काढून परत जोडून घेतल्या त्यानंतर त्यांची ट्रायल पण घेतली. हे सर्व अतिशत महत्वाचे होते त्यानंतर आम्ही बाहेर लंच चा प्लॅन केला. लासा ने आम्हांला एका रेस्टॉरंट मध्ये नेले थोडासा वेळ गेला पण आम्ही छान जेवण करून बाहेर पडलो त्यानंतर आम्ही जाफना शहर आणि आजूबाजूला फिरलो. इकडे रस्त्यावर शिस्त खूपच आहे, हेल्मेट शिवाय दुचाकीस्वार दिसत नाही, सगळीकडे neat & clean असंच मार्केट आहे.जाफनाला मंदिराचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. श्रीलंकेचीं सुरवात होते त्या ठिकाणी भेट दिली जो कि समुद्र किनारा आहे तिथे एक छोटे तळे आहे तिथे आम्ही थोडासा वेळ घालवला त्या तळ्यातील पाण्यात शारीरिक व्याधी कमी होतात असा स्थानिकांचा समज आहे, नंतर आम्ही fort jaffna ला गेलो साधारणता 1643 मध्ये पोर्तुगिजनी आक्रमण करून हा किल्ला बनवला होता. त्यानंतर आम्ही रिओ आईस क्रीम चा आस्वाद घेतला जी कि jaffna मधील एक प्रसिद्ध आउटलेट आहे. नंतर आम्ही थोडासा वेळ मार्केट मध्ये फिरून हॉटेल वर आलो. रात्री डिनर ला सेट मेनू होता जो काल buffet डिनर होता. जेवण करून आम्ही आरामासाठी निघालो. उद्या आम्ही अंदाजे 120 ते 140 किमी अंतर पार करणार आहोत. परदेशात नवीन रस्ते आणि नवीन बॅकअप वॅन असा विषय आहे.

#Day 15th
आज पुणे ते श्रीलंका सायकल प्रवास या मोहिमेचा दिवस पंधरावा.
आतापर्यंत आम्ही भारतात सायकलिंग वेळेत पूर्ण केले तसेच आलेल्या अडचणींचा सामना करून जाफना ला ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत पोहचलो. आज आम्ही जाफना ते वावयुनिया पर्यंत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज पासून येथील सायकलिंग सुरु करत आहोत. पुढील updates देत राहू.































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...