माझी काश्मिर डायरी 1 of 10
मी, माझी बहिण निमा आणि तिची मुलगी सौदामिनी, जीला आम्ही मिनी म्हणतो, आत्ता मार्चमध्ये जम्मू - काश्मिर ट्रीप करुन आलो. ट्रीप मस्तंच झाली. पण तरीही असं वाटलं कि काही माहिती आधी मिळाली असती तर ट्रीप अजून छान होऊ शकली असती. मग माझे अनुभव पोस्ट करायचे ठरवलं. खरंतर आपल्या ग्रुपवर नुकतेच एक छान काश्मिर वर्णन येऊन गेलय. पण मी जे लिहीत आहे त्याला मी प्रवासवर्णन म्हणणार नाही. ही माझी डायरी आहे.
जम्मू - काश्मिर म्हणल्यावर आपल्याला निसर्गाचं छान वर्णन वाचायला मिळेल ह्या अपेक्षेने वाचणाऱ्यांची निराशा टाळण्यासाठी आधीच warning देतीये. तिथल्या सौंदर्याचं वर्णन करण्याइतकी शब्द शक्ती, प्रतिभा माझ्याकडे नाही. पृथ्वीवरचा स्वर्ग हे विशेषण कमी पडावं असा तिथला निसर्ग आहे एवढेच मी म्हणू शकते.
ज्यामुळे नंतर थोडी रुखरुख लागली.....
01. अवंती पुरा, जीथे शिव मंदिराचे अवशेष आहेत, आमच्या पटनीटॉप - पहलगाम वाटेवर होतं. पण आम्हाला माहित नव्हतं त्यामुळे राहून गेलं. जे पटनीटॉपला जाणार नसतील त्यांच्यासाठी, झेलमचा उगम बघायला गेलात तर येता-जाता अवंतीपुरा करु शकाल.
02. वुलर लेक, श्रीनगरपासून 62 kms आहे. साधारण दोन तास लागतात पोचायला. भारतातले गोड्या पाण्याचे सगळ्यात मोठं आणि आशिया मधलं दोन नंबरच तळं आहे. आम्हाला माहित नव्हतं.
03. श्रीनगर पूर्ण बघायचं असेल तर तीथे दोन दिवस द्यायला हवे. आम्ही श्रीनगर नाही बघु शकलो.
04. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी गुलमर्गला स्टे करावं. गुलमर्ग जास्त व्यवस्थित बघता येतं. शिवाय फेज 2 राईड मिळण्याचे चान्सेस वाढतात.
05. ज्यांना शक्य आहे त्यांनी पहलगामला दोन दिवस ठेवावेत. एक दिवस हॉर्स राईड आणि दुसऱ्या दिवशी कार राईड. आरु व्हॅली आणि बेताब व्हॅली दोन्हींचा एरीया खूप मोठा आहे. आणि छान सिनिक आहे.
06. दुधपथरीला जरुर स्टे करावा. आम्ही राहीलो ते हाय स्पीड रीसॉर्ट पण चांगलं होतं पण तीथे एक ईग्लु हॉटेल पण आहे.
07. सींथनटॉपला लीस्टमधे होतं पण फायनल प्रोग्रॅममधे कसं कुणाला माहित पण मिस झालं.
08. हॉटेल सीलेक्ट करतांना शक्यतो फार गल्ली-बोळातले नसावे. म्हणजे त्या शहराचा थोडं चालत जाऊन फील घेता येतो.
09. आमचं पटणीटॉप आणि दुधपथरीच्या हॉटेलचं लोकेशन छान होतं. त्याबद्दल पूनम मॅडमना फुल मार्क.
10. पहलगामचं आम्ही फोटो बघून सीलेक्ट केलेलं हॉटेल मात्र त्यांनी आम्हाला न सांगता बदललं. आम्ही सीलेक्ट केलेलं हॉटेल लीद्दर नदीजवळ होतं. आणि त्यानी बुक केलेलं हॉटेल एकदम गल्ली-बोळात होतं आणि चांगलं नव्हतं.
11. श्रीनगरचं हॉटेल चांगलं होतं पण एकदम गल्ली-बोळात होतं.
12. थोडी communication gap झाली आणि आमचा हाऊसबोटचा experience हुकला.
पण आमची ट्रीप मस्त झाली. हे points mention केले ते पुढच्यास ठेच मागचा शहाणा यासाठी.
तयारी ट्रीपची......
तर झालं असं कि १३ मार्च हा मिनीचा adoption day. ह्या वर्षी तिच्या adoption ला २५ वर्षे पूर्ण होत होती. त्यामुळे तिच्या आईच्या, निमाच्या डोक्यात काहीतरी memorable करावं असं घोळत होतं. मिनी नी अजून एकदाही गारांचा पाऊस अनुभवला नाही. ती प्रत्येक पावसाळ्यात वाट बघते गारांची. मग गारांचा पाऊस नाही तर बर्फ तरी, म्हणून निमानी नोव्हेंबर मधे काश्मिर ट्रीपची टूम काढली. काश्मीर ट्रिपची आमचीही खूप दिवसांची इच्छा होती. मग आमचा research सुरु झाला.
माझ्या एका जेष्ठ मैत्रीणीची मुलगी दोनदा काश्मिरला जाऊन आलीये. दोन्ही वेळा तिनी तीथेच ज्यांची कार बुक केली होती त्या लतीफभाईंशी तीची चांगली ओळख झाली होती. मग local transport साठी त्यांनाच बुक करायचं ठरवलं (M +91 94698 64839).
चांगल्या आणि सेफ हॉटेल साठी मी आपल्या ट्रॅव्हल ग्रुप वर मदत मागितली. आणि ग्रुप मधल्या अदिश्री हॉलिडे च्या पूनमने मला कॉन्टॅक्ट केलं. मग हॉटेल बुकिंग ची रिस्पॉन्सिलीटी त्यांच्यावर टाकली. निमा तिच्या ऑफिसच्या ट्रॅव्हल डेस्कच्या लोकांच्या मदतीने फ्लाईट बुकिंग करण्याच्या मागे पडली. अशी आमची तीन पायांची शर्यत होती.
सुरुवातीला श्रीनगर गुलमर्ग सोनमर्ग आणि पहेलगाम एवढेच लिस्टमध्ये होतं. मग माझ्या मैत्रिणीने पटणीटॉप सजेस्ट केलं. त्यामुळे जाताना जम्मूला जायचं तिथून पटणीटॉप आणि मग पहेलगाम करून श्रीनगरला जायचं ठरलं. मग आमच्या एका यंग फ्रेंड ने दूधपथरीला स्टे जरूर करा म्हणून सांगितलं. मग ते पण add झालं. एक दिवस हाऊसबोट मध्ये राहायचं ठरवलं होतं.
आधी आठ मार्च, शनिवार ते 16 मार्च, शनिवार असा प्लान होता. त्यात फ्लाईटच्या टायमिंग मुळे आठ मार्चचा दिवस वाया जात होता. म्हणून 7 मार्च ची रात्रीची फ्लाईट घ्यायची ठरलं. मुंबईहुन direct flights होत्या. पण आम्हाला पुणे - दिल्ली - जम्मू आणि श्रीनगर - दिल्ली - पुणे जास्त सोयीचं वाटलं. दिल्लीत दोन्ही वेळेला ले ओव्हर असला तरीही. अशाप्रकारे डिसेंबर मध्ये प्रोग्राम फायनल झाला आणि पूनम आणि लतीफभाईंना तसं कळवून टाकलं आणि त्यांनी मागीतलेला advance pay करुन टाकला.
एकदा प्रोग्राम फायनल झाल्यावर, सगळ्या भावंडांना आमचा प्रोग्रॅम सांगितला. काश्मीर बद्दल अजूनही सर्वसामान्य लोकांच्या मनात धास्ती आहे. त्यातून आम्ही तिघीजणी कुठल्याही ट्रॅव्हल कंपनी थ्रू न जाता इंडिपेंडेंट ली जाणार म्हटल्यावर सगळ्यांना काळजी वाटत होती. आमच्या दोघी मोठ्या बहिणी डोळ्यात तेल घालून काश्मीरच्या बातम्या बघायला लागल्या.
या पार्श्वभूमीवर आम्ही आमची तयारी सुरू केली. सगळ्यात आधी थर्मल वेअर, वूलन सॉक्स, हॅन्ड ग्लोज ही खरेदी. मग बरोबर न्यायच्या बॅग्सना दुरुस्तीची गरज आहे का ते बघणं आणि करून घेणे. त्यानंतर डॉक्टरांची व्हिजिट झाली.आणि मग बरोबर ठेवायच्या औषधांची खरेदी झाली. कुणीतरी सांगितलं म्हणून भीमसेनीकापूर पण बॅगेत टाकला.
गुलमर्गच्या गोंडोला राईडच्या दोन फेजेस आहेत. फेज वन 3000 फुटांवरती आणि फेस टू 14000 फुटांवर आहे. तिकीट ऑनलाईन बुक करावे लागतात आणि बुकिंग 3 weeks आधी ओपन होतं. तिकीट बुक न करता जाण्यात काहीच पॉईंट नसतो. त्या बुकिंग ची जबाबदारी पण अदिश्री हॉलिडे च्या पूनमने घेतली.
तीन पायांची शर्यत असल्यामुळे थोडीशी धास्ती होती. लतीफभाईंना आम्ही, आम्ही सिलेक्ट केलेले हॉटेल्स कळवले होते.
तीन मार्चला पूनमने हॉटेलची वाउचर पाठवली. मी हॉटेलची नाव बघण्याच्या फंदात पडले नाही. पूनमने पाठवलेले फोटो बघून आम्ही हॉटेल सिलेक्ट केली होती त्यामुळे आम्हाला कन्सल्ट न करता हॉटेल बदलली जाऊ शकतात असं मला वाटलंच नाही. फक्त हाऊस बोट बुकिंग केलेलं नाही आहे ते कळलं. थोडासा मूड ऑफ झाला पण आम्ही इग्नोर करायचं ठरवलं.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
माझी काश्मीर डायरी 2 of 10 : -
7 मार्च 2025 पुणे ते दिल्ली
फायनली सात तारीख उजाडली. पुणे दिल्ली फ्लाईट रात्री साडेदहाची होती, त्यामुळे शुक्रवारी आम्ही कोणी सुट्टी घेतली नव्हती. माझा भाऊ, अतुल पोहोचवायला येणार होता. घरातून आठ वाजता निघायचं टार्गेट होतं त्याप्रमाणे निघालो. रस्त्यात निघायच्या आधी करायची ठरवलेली आणि राहून गेलेली एक एक काम आठवायला लागली. डस्टबिन बाहेर ठेवायची राहिली होती. उरलेल्या दुधाची विल्हेवाट लावायची राहिली होती. ती सगळी जबाबदारी अतुल न उचलली.
ट्रॅफिक ची वेळ असल्यामुळे सगळीकडे गर्दी होती, पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफिकला शिव्या देत आणि त्यातून कौशल्याने गाडी काढत अतुलनी सव्वा नऊ वाजता आम्हाला एअरपोर्ट वरती पोहोचवल. मेन गेटवरचे सिक्युरिटी चेक आणि चेक इन लगेज, बोर्डिंग पास घेणं हे सोपस्कार कुठल्याही इन्सिडन्स शिवाय पार पडले. पण केबिन लगेच ला थोडा प्रॉब्लेम झाला. मिनीच्या बॅगेत पेडी केअर च किट होतं. त्यात छोटी कात्री होती. ते तिच्या लक्षात नव्हतं. दोन-तीन वेळा बॅग चेक झाल्यावर फायनली सापडलं आणि फेकावं लागलं. निमाच्या बॅग मधला टाल्कम पावडर चा डबापण त्यांनी टाकून दिला. हे सगळे व्याप संपवून 9.50 ला प्रॉपर गेटवर जाऊन बसलो.
साडेदहाला प्लेन मध्ये जागेवर जाऊन बसलो. 2/2.05 ला दिल्लीला पोहोचलो. चेकिंग लगेज connecting flight मध्ये ऑटो ट्रान्सफर होणार होतं. त्यामुळे केबिन लगेज घेऊन लगेच बाहेर पडलो. जम्मूची फ्लाईट जिथून सुटणार होती ते टर्मिनल फार दूर नव्हतं. बोर्ड पण व्यवस्थित होते. त्यामुळे एक्झिट करून त्या टर्मिनल च्या मेन गेटवरच सिक्युरिटी चेक पार करून केबिन लगेज चेकिंग साठी पोचलो. सगळ्या आक्षेपार्ह वस्तू पुणे एअरपोर्टवरच फेकल्या गेल्या होत्या त्यामुळे हा सोपस्कार पण स्मूथली पार पडला. 2.20 ला जम्मूची फ्लाईट ज्या गेटवरून सुटणार होती तिथे पोहोचलो. तीन पायांपैकी या पायाने तरी चांगली सर्विस दिली होती.
स्थिरस्थावर झालो आणि मेसेजेस बघायला सुरुवात केली. तर लतीफ भाईंचा मेसेज येऊन पडला होता. ते ऑलरेडी जम्मूमध्ये येऊन थांबले होते. आम्ही दिल्लीला व्यवस्थित पोहोचलो का याची चौकशी करत होते. म्हणजे हा पाय पण चांगला जोरदार पळत होता. मग हाऊसबोटमध्ये राहायला न मिळण्याचे दुःख कोपऱ्यात फेकून दिल.
आता तीन-चार तास टाईमपास करायचा होता. मग आधी फूड कोर्ट कडे मोर्चा वळवला. मला भूक नव्हती त्यामुळे मी सामान सांभाळत बसले. मिनी आणि निमा इडली खाऊन आल्या. मग मी आणि मिनी नी हॉट चॉकलेट घेतलं. आणि विंडो शॉपिंगला निघालो. मिनीला जरा सर्दी खोकला वाटत होता. नेमकी ती औषध बरोबर नव्हती. मग आधी मेडिकल स्टोअर शोधलं.. दहा टॅबलेटच्या दोन strips घेतल्या. एक सर्दी साठी आणि दुसरी खोकल्यासाठी. बिल झालं ७७० रुपये फक्त.
मग बाकी दुकानातून नुसतीच फिरत. होतो टी-शर्ट असू दे नाहीतर पूर्ण सूट 3000 शिवाय बातच नव्हते. बॅग तर अगदी छोट्या छोटी सुद्धा 4000 or above. शेवटी माझ्या चपलेनी जबाब दिला. मग मी पाय घासत जागेवर येऊन बसले. बँडेड लावून डागडूजी करायचा प्रयत्न केला. पण चपलेने दाद दिली नाही. मग जम्मू एअरपोर्ट पर्यंत तसंच चालण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण शूज चेक इन बॅग मध्ये होते.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
माझी काश्मीर डायरी 3 of 10
8 मार्च 2025 दिल्ली टू जम्मू
6:45 ला जम्मू फ्लाईट बोर्ड केली आणि जागेवर बसून डुलक्या घ्यायला सुरुवात केली. फ्लाईट वेळेवर सुटली आणि पाठोपाठ आम्ही तिघीही स्वप्ननगरीत पोहचलो. मला जाग आली ती आपण जम्मूला पोचलोय या कॅप्टनने केलेल्या अनाउन्समेंट मुळे. लँडिंगची तयारी चालू झाली होती. खिडकीतून पर्वतांच्या रांगा दिसत होत्या. काही डोंगरावर अर्ध्या भागापर्यंत बर्फ होता. जम्मू काश्मीरमधल्या बर्फाचं हे पहिलं दर्शन.
फ्लाईट ८:४५ land झाली. मीना प्रभू चा दक्षिण रंग चा अनुभव घ्यावा लागेल की काय अशी धाक-धूक मनात होती. देवाचं नाव घेऊन बेल्ट जवळ जागा पकडली. तीन चार राऊंड्स आमच्या बॅगेच्या दर्शनाशिवाय गेले. पण फायनली बॅगा आल्या. बॅगा ताब्यात घेतल्यावर आधी तुटक्या चपलेची रवानगी बागेत केली आणि शूज चढवले.
जम्मू एअरपोर्ट छोटासाच आहे. एअरपोर्ट इंडियन फोर्स च्या ताब्यात आहे. त्यामुळे जागोजागी एअर फोर्स ची माणसं होती. फोटोग्राफी अर्थातच बॅन आहे.
लतीफ भाई एअरपोर्टच्या बाहेरच थांबले होते. कारण जम्मूच्या टॅक्सी युनियनच्या रुलनुसार श्रीनगर ची गाडी एअरपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. त्यांनी मला फोनवर सांगितलं होतं की टॅक्सी वाल्यांना बाहेर गाडी थांबली आहे असं सांगू नका. आम्हाला जवळच जायचं जायचं आहे असं सांगा. लकीली सगळ्या टॅक्सीवाल्यांना पुरून उरतील एवढे पॅसेंजर उतरले होते. त्यामुळे आमच्यात कोणाला इंटरेस्ट नव्हता.
*जम्मू ते पटणीटॉप*
गेटमधून बाहेर पडलो आणि लगेचच लतीभाईंनी आम्हाला ओळखलं. गाडीत बसल्याबरोबर सगळ्यांची लतीफ भाई ची गट्टी जमली. जाताना मिनी बरेच प्रश्न विचारत होती आणि ते न कंटाळता उत्तर देत होते.
जम्मू पटणीटॉप रस्ता पण छान आहे. आजूबाजूला डोंगरांच्या रांगा दिसत राहतात. आणि स्वच्छ निळा आकाश. जमतील तसे फोटो काढत होतो. इथल्या डोंगरांचे टेक्सचर सह्याद्री आणि विंध्याचल पेक्षा वेगळच वाटलं. मधूनच एखाद दुसऱ्या डोंगरावर बर्फ दिसत होता.
रस्त्यात साडेदहाच्या दरम्यान ब्रेकफास्ट साठी थांबलो. Minjara The Dogra Village नावाचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट होतं. डोगरा ही जम्मू साईडची एक जमात आहे. आमच जम्मू काश्मीर मधलं हे पहिलं food intake. मी पुण्याहून निघतानाच ठरवलं होतं जास्तीत जास्त लोकल फूड टेस्ट करायच. त्यामुळे मी आलू खमीरा नावाची लोकल डिश ऑर्डर केली. निमानी पनीर पराठा आणि मिनीने छोले भटूरे घेतले. आलू खमीरा हे डोगरीचं ट्रेडिशनल फूड आहे. बटाटा टोमॅटोची रस्सा भाजी आणि मोस्टली मैद्याच्या जाडसर आणि फुलक्याच्या आकाराच्या दोन पुऱ्या. चांगली वाटली. रेस्टॉरंट पण स्वच्छ आणि छान होतं.
पोटोबा करून निघालो. इथे रस्त्याची बरीच काम चालू आहेत. Road widening, fly overs, tunnels ची काम ठीक ठिकाणी चालू आहेत. त्यामुळे थोडा ट्रॅफिक लागत होता. शिवाय कोकण इतके घाट नसले तरी रस्ता वळणावळणाचा आणि चढ उताराचा आहे. पण नीलाताई फेम सुतशेखर गोळ्या जिंदाबाद. उपाशीपोटी दोन- दोन गोळ्या तिघेंनी खाल्ल्या होत्या. त्यामुळे त्रास झाला नाही. जम्मू आणि पटणी टॉप टेंपरेचर मध्ये ड्रास्टिक फरक आहे. त्यामुळे जसं पटणी टॉप जवळ यायला लागलं तसं थंडी जाणवायला लागली.
Hotel Samsan मध्ये पोहोचता – पोहोचता मध्ये गोंडोला राईडचा बोर्ड दिसला. मग हॉटेलमध्ये पोहोचल्यावर चक्कर मारायची ठरवली. हॉटेल बघितलं आणि खुश झाला. हा पाय पण ठीकच आहे हे जाणवलं. हॉटेल समोर प्रशस्त मोकळी जागा आहे. त्यावर फरशा घातलेल्या आहेत. तिथे खुर्च्या आणि टेबल ठेवलेली आहेत. थोडं खाली उतरून पण हॉटेलची एक बिल्डिंग आहे, दोन मजली. या फॅमिली रूम्स आहेत. या बिल्डिंग समोर पण, रस्ता क्रॉस केल्यानंतर फरसबंद जागा आहे. तिथे पण खुर्च्या टेबल ठेवली आहेत. हॉटेलच्या porch च्या समोर डोंगरांच्या रांगा आणि बरीच झाडी आहेत. मस्त व्ह्यू आहे. आमच्या रूमच्या खिडकीतून पण छान व्ह्यू दिसत होता.
हॉटेलमध्ये पोहोचायला दीड वाजला होता. तरीही थंडी वाजत होती. रूमवर पोचल्यावर आधी थर्मल वेअर बाहेर काढले आणि चढवले. वूमन्स डे असल्यामुळे आमच्या ट्रॅव्हल एजंट ने आमच्यासाठी केक अरेंज करून ठेवला होता. येतानाचा ब्रेकफास्ट आणि केक खाऊन जेवणाची गरज उरली नव्हती. निमानी आधीच पडी टाकली होती. मग मी आणि मिनी रिसेप्शनवर गोंडोला राईडची चौकशी करून आलो. ती राईड साडेपाच पर्यंत असते असं कळलं. मग लतीफ भाईंना चार वाजता जायचंय असं सांगून रूमवर आलो. साडेतीन चा अलार्म लावला आणि आम्ही दोघी पण झोपलो.
चार वाजता तयार होऊन गोंडोला राईट साठी गेलो. पटणी टॉप नावाप्रमाणेच उंचावर आहे. गोंडोला आपल्याला खाली घेऊन जातो. जाताना व्हॅली चा जबरदस्त व्ह्यू दिसतो. खालच्या पॉईंटला adventure games, restaurants, shopping असं बरंच काही आहे. वेळ नसल्यामुळे adventure games कडे गेलो नाही. शिवाय रेस्टॉरंट दिसल्याबरोबर मिनीला भूक लागली. मग द बनाना लिफ नावाच्या रेस्टॉरंट मध्ये घुसलो. मिनी नी शेजवान नूडल्स मागवल्या आणि मी काश्मिरी कावा मागवला. spell करताना kahwa करतात आणि उच्चार कावा करतात. मला तर हा प्रकार आवडला. कपामध्ये खोबरं आणि ड्रायफ्रूट्स चे काप टाकलेले होते. त्यामध्ये कॅटल मधून उकळलेलं पाणी सदृश्य लिक्विड टाकतात. त्यामध्ये मध, केशर आणि दालचिनी मला ओळखू आले, अजून काय असतं माहित नाही.
रेस्टॉरंट मधून बाहेर पडल्यावर थोडी फोटोग्राफी झाली. तोपर्यंत साडेपाच वाजत आले होते. मग परत गंडोला मध्ये आणि back to Samsan. तिथे समोरच्या जागेत परत थोडे फोटो काढले. मग मी आणि निमानी तिथे बसून व्ह्यू एन्जॉय करत कॉफी घेतली आणि रूमवर जाऊन पडी टाकली.
जेवण रात्री आठ वाजता मिळणार होतं. डायनिंग रूम ग्राउंड फ्लोअरला होते. मिनी हीटर चा मॅक्सिमम इम्पॅक्ट मिळेल अशी जागा पकडून बसली. जेवण चांगलं होतं. पोटात अन्न आणि पाणी गेल्यावर अजूनच हुडहुडि भरली. मग लगेचच रूमवर जाऊन उबदार ब्लॅंकेट मध्ये शिरलो. झोपेचा बॅक लॉग पण भरून काढायचा होता.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
माझी काश्मीर डायरी 5 of 10*
10 मार्च 2025 पहलगाम
साडेनऊ वाजता हॉटेलचा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून पहलगाम साईड सिईंग साठी बाहेर पडलो. सकाळी असे पॉईंट्स बघायचे होते जिथे फक्त घोड्यावरून जाता येत. Kashmir Valley, Pahalgam Valley, Denow Valley, Debyan Valley आणि मिनी स्विझर्लंड हे ते पॉईंट. सगळे पॉईंट्स आहेत छान, सीनिक आहेत. पण जी वेगवेगळी नांवे दिली आहेत ती फॉर टुरिस्ट सेक. फोटो बघून नंतर तुम्ही सांगू नाही शकणार हा कुठला point वर काढलाय. ह्याला मिनि स्विझर्लंड exception आहे. मोठं पठार आहे. Entrance ला एक कमान करुन नावाचा बोर्ड पण लावलाय. सीनिक आहे. आणि नावाप्रमाणे दिसतं. अर्थात आम्ही काही स्वित्झर्लंड पाहिलं नाही. पण मिनी स्विझर्लंड च्या पठारावर भरपूर बर्फ होतं. आजूबाजूला डोंगर आणि डोंगरावर पण थोडं थोडं बर्फ.
तर आम्ही जिथून राईड्स सुरू होतात त्या पॉइंटला पोहोचलो. तिथल्या रुल प्रमाणे ज्या घोडेवाल्याचा नंबर असेल त्याच्याबरोबर तुम्हाला जायला लागतं. लतीफभाईंनी आम्हाला आधीच सांगितलं होतं मी तिथे काही बोलू शकणार नाही. पण तुम्ही बार्गेन करा. निमाचा पाय थोडा त्रास देत होता. त्यामुळे तिने हॉर्स राईड स्कीप करायचं ठरवलं होतं. मी आणि मिनी निघालो. घोडेवाल्यांनी पर पर्सन 7500 सांगितले मी 5000 पर्यंत उतरवू शकले. गमबूट आणि रेनकोटचा जमानीमा करून दहा वाजता आमच्या हॉर्स ड्रायव्हरच्या मदतीने घोड्यावर स्वार झालो. घोड्याबरोबर लगाम धरून जे चालतात त्यांना हॉर्स ड्रायव्हर किंवा हेल्पर म्हणतात. त्यांना हॉर्स ओनर पर ट्रिप काही पैसे देतात. ते पैसे बहुदा फार थोडे असतात. त्यामुळे ही लोक टीप मागतात. त्यांना मिळालेल्या टीप मधले पण काही पैसे हॉर्स ओनर घेतात. त्यामुळे ही लोकं आधीच काही टीप घेतात आणि ओनर समोर पण थोडे द्या म्हणून सांगतात. आम्ही पर पर्सन फाईव्ह हंड्रेड आणि ओनर समोर दोघांना मिळून 500 दिले तरी ते हॅपी नव्हते. असो.
नॉर्मली चार-पाच हॉर्स रायडर्स बरोबर एक हेल्पर असतो. पण घोड्यावर बसतांना चा मिनीचा आरडा ओरडा ऐकून, 300 extra घेऊन त्यांनी आम्हाला प्रत्येकी एक हेल्पर दिला.
खरंतर ती लोक खूप सांभाळून नेतात. पण आपल्यासाठी ते एक adventure च असतं. रस्ता खूप चढउतारांचा आणि दगडांचा आहे. पाऊस असल्यामुळे चिखल पण होता. कधी कधी घोड्याचा पाय घसरत होता. पण घोडे trained होते. ती लोकं सारखं सांगत होते की घोड्यांना पण त्यांच्या जीवाची काळजी असते. एका पॉईंटला मात्र खूपच उतार होता. खाली एक स्ट्रीम आणि वॉटर फॉल असावा बहुदा. पण मिनी रस्ता बघून तिथे जायला नाही म्हणाली. त्यामुळे आम्ही तो पॉईंट स्किप केला.
मिनी स्वित्झर्लंड ही जागा सगळ्या बाजूने डोंगरांनी वेढलेली आहे. ग्राउंड वर मध्ये भरपूर बर्फ होतं. खूप सिलिक जागा आहे. पण तिथेही लोकांनी कचरा केला आहे. रिकाम्या बाटल्या wrappers पडलेले दिसतात. बघून वाईट वाटलं. खरंच, आपण आपली responsibility कधी समजणार?
तो कचरा टाळून थोडी फोटोग्राफी केली. बर्फ एन्जॉय केला. खूप वेळ लागला म्हणून आमचे घोडेवाले आम्हाला शोधत आले. त्यामुळे निघण्याशिवाय पर्याय नव्हता. मेन एंट्रन्स जवळच खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत. पण त्यांना टाळून आम्ही बाहेर पडलो.
पार्किंग पर्यंत पोहोचायला एक वाजले. आधीच्या प्लॅन प्रमाणे हॉर्स राईड संपल्यावर जेवण करायचं आणि मग जेवण करायचं आणि मग कार राईडला जायचं असं ठरवलं होतं. पण मी आणि मिनी आमचे गम बूट, रेनकोट वगैरे उतरवून कार पाशी आलो तोपर्यंत आमची पहलगाम साईट सीईंगची कार ऑलरेडी आलेली होती. मग जेवणाचा विचार सोडून देऊन कार राईड साठी सज्ज झालो.
कारनी तीन पॉईंट दाखवतात. आरु व्हॅली, हजन किंवा बेताब व्हॅली, आणि चंदनवाडी. बेताब व्हॅली आणि चंदनवाडी एकाच रुट वरती आहेत. त्यामुळे आधी अरु व्हॅलीला नेतात. अरु व्हॅलीचा रस्ता पण अप्रतिम आहे. खरं तर या प्रत्येक पॉईंटला एक एक दिवस द्यावा. मिनिमम. आणि सगळ्या रस्त्यांवरून रमत गमत पायी फिरावे. पण त्यासाठी काश्मीरला निदान महिनाभर तरी मुक्काम ठोकून राहायला लागेल.
अरु व्हॅलीला पोहोचलो तेव्हा पाऊस बऱ्यापैकी पडत होता. तिथे छत्री किंवा रेनकोट रेंट ने मिळण्याची सोय नव्हती. त्यामुळे जास्त एक्सप्लोर करता नाही आलं. आमच्या नंतर येणाऱ्यांना आम्ही लगेच स्वतःच जाकीट किंवा छत्री घेउन यायचा सल्ला दिला. अरु व्हॅलीला जातांना रस्त्याच्या कडेने बर्फाच्या राशी दिसत होत्या. मोकळे मैदान बर्फाने झाकलेले होते. आणि आजूबाजूला डोंगराच्या रांगा. त्याही बर्फाने नटलेल्या. पावसात जमेल तेवढे फिरलो. फोटो काढले. आणि पाऊस फारच वाढतोय असं दिसल्यावर एका रेस्टॉरंट मध्ये कॉफी आणि थोडा पोटोबा केला. पाऊस कमी झाल्यावर परत थोडे फिरलो. आणि मग कार कडे परतलो.
चंदनवाडी बेताब व्हॅलीच्या पुढे आहे. कार वाले आधी चंदनवाडी ला नेतात. आणि येताना बेताब व्हॅलीला थांबवतात. हाही रस्ता अफलातून. व्हॅली असल्यामुळे अर्थातच सगळे घाट रस्तेच. रस्ता छोटा आणि कुठे कुठे स्टीफन चढ आणि लगेच वळण. ड्रायव्हरच्या कौशल्याची परीक्षा घेणारे रस्ते.
चंदनवाडीला पोहोचलो तर स्नो फॉल होत होता. आमच्या आयुष्यातला हा पहिलाच स्नो फॉल. चंदनवाडी हा घाटाच्या मध्येच असलेला एक स्पॉट. डाव्या बाजूला एक रेस्टॉरंट आणि उजव्या बाजूला पठार. पठाराच्या पलीकडे अर्थातच खोल दरी. आणि पलीकडे डोंगररांग. पठार पूर्ण बर्फानी भरलेलं. बर्फात भरपूर खेळून घेतलं. हात सुन्न होईपर्यंत बर्फाचे गोळे करून एकमेकांवर फेकले. आणि अंगात थंडी भरली तशी गाडीकडे धावलो.
तिथून बेताब व्हॅली. तिथे बर्फ नव्हता पण पाऊस पडत होता. पण मेन गेटपाशी छत्री भाड्याने मिळत होती. इथं entry fee आहे. आतला परीसर बराच मोठा आहे. डाव्या बाजूला एक झरा आहे. स्वच्छ पाणी. पाणी कमी असल्यामुळे झऱ्यातून चालता येत होतं. पाणी अर्थातच थंडगार होतं. आत एक restaurant पण आहे. समोर डोंगर. सगळा परीसर चालत किंवा स्लेजवर explore करु शकता. फक्त तेवढी energy आणि patience हवा. आणि अर्थातच वेळ. ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आणि पैसा आहे त्यांनी पहलगामच्या ह्या प्रत्येक पॉईंटला एक-एक दिवस द्यावा.
प्रत्येक ठिकाणाहून पावसामुळे किंवा थंडीमुळे एका तासाच्या आतच गाडीत परतत होतो. सव्वा पाच पर्यंत लतीफ भाईंच्या गाडीपाशी पोहोचलो आणि सहा पर्यंत हॉटेलवर पोहोचलो. खूप दमणूक झाल्यामुळे लवकर झोप लागेल असं वाटलं होतं पण तिघींनाही झोपच लागली नाही.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
माझी काश्मीर डायरी 6 of 10*
11 मार्च 2025 पहलगाम ते श्रीनगर
आज पहलगाम सोडून श्रीनगर ला जायचं होतं. सकाळी दहा वाजता तयार होऊन आणि ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. रस्त्यात एका ठिकाणी फ्रेश ॲपल ज्यूस प्यायला थांबलो. छान लागलं. आपल्याकडच्या उसाच्या गुऱ्हाळासारखे इथे जागोजागी फ्रेश ॲपल ज्यूस काढून देणारे स्टॉल असतात. त्यांच्याकडे ॲपलचे पीकल, जाम, सॉस, चटणी असे बरेच प्रकार होते. मिनीनी जाम आणि निमानी पिकल पिक केलं. ही लोकं ऑर्डर घेऊन देशभरात कुठेही कुरिअर करतात. ( Wazir-E-Baug. M 7051434393 / 8082310194). अर्थात कुरिअर चार्जेस किती घेतात ते बघायला पाहिजे.
पहलगाम श्रीनगर रस्त्यावर केशराची शेतं आहेत. आणि केशराची भरपूर दुकान आहेत. त्यातल्याच Red Pearl Saffron नावाच्या दुकानात लतीफ भाईंनी आम्हाला नेलं. (Red Pearl Saffron, Lethpora, Pampore, Kashmir. M Banday - 9596558822, Sajid 9596551566 email sbanday41@gmail.com) त्या दुकानात केशराचे अनेकविध प्रॉडक्ट जसे की फेस क्रीम, स्क्रब, बाथसोप, परफ्युम शिवाय ड्रायफ्रूट, कावा असं बरंच काही होतं. तिथल्या मालाची क्वालिटी चांगली आहे आणि रेट रिझनेबल आहेत असं लतीफभाईंचं म्हणणं होतं. त्या दुकानात बरीच खरेदी झाली. लगेज जड आणि खिसे हलके करून बाहेर पडलो.
श्रीनगर मध्ये पोहोचलो तर पाऊस पडत होता. भूक लागलीच होती त्यामुळे आधी जेवायचं ठरवलं. लतीफ भाईंनी Veg Panjabi Huti नावाच्या रेस्टॉरंट मध्ये नेलं. गर्दी बरीच होती. स्वच्छतेच्या नावाने आनंदच होता. आणि मेन्यू पण फार चांगला नव्हता. जेवण करुन बाहेर पडलो. आणि श्रीनगर साईट सिईंग साठी निघालो. आधी शालीमार बाग, नंतर शंकराचार्य मंदिर मग शिकारा राईड आणि मग हॉटेल असं planning होतं. त्याप्रमाणे शालीमार बागेत गेलो. It's not at all worth going. पाऊस तर पाठ सोडत नव्हता. मग शॉपिंग उरकायचं ठरवलं. मिनी आणि निमाला काश्मीरचे ड्रेस घ्यायचे होते. त्यामुळे आधी शॉपिंग करू मग पाऊस थांबला तर शंकराचार्य मंदिर बघूया असं ठरवलं. मग लतीफभाईं आम्हाला काश्मीर कॉटेज एम्पोरियम नावाच्या दुकानात घेऊन गेले. तिथून खरेदी करून बाहेर पडलो तरी पाऊस पडतच होता. मग सरळ हॉटेल अजराला गेलो. आजरा हॉटेल आहे छान पण गल्ली-बोळात. त्यामुळे थोडं चक्कर मारुन शहराचा फील घेऊन म्हणलं तर मेन रोडला पोहोचू पर्यतच उत्साह संपून जातो.
आता उद्या गुलमर्ग.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
*माझी काश्मीर डायरी 7 of 10*
12 मार्च 2025 गुलमर्ग
सकाळी हॉटेल मधला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून आठ पस्तीस ला गुलमर्ग कडे कुच केलं. वाटेत लाल चौकात एक क्लॉक टॉवर आहे तिथे फोटोसेशन झालं. मी गाडीतच बसले होते.
श्रीनगर गुलमर्ग रस्ता पण खूप सीनिक आहे पण एकदा श्रीनगरच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर.
गुलमर्गच्या बाहेरची गाडी वरती पार्किंग पर्यंत जाऊ शकते. पण पार्किंग पासून गंडोला स्टेशन दूर आहे. खूप चालायला लागते. शिवाय तिथे काही पॉईंट्स आहेत हिंदी मूव्ही चे शूटिंग झालेल्या जागा, आर्मी म्युझियम, वर्ल्ड हायेस्ट 18 hole गोल्फ कोर्स, ड्रंग धबधबा वगैरे. गाडी घेतली नाही तर सगळीकडे पायी फिरायला लागते. ते खूप जास्त होते. Especially तुम्ही विंटर मध्ये गेला असाल तर हे सगळं चालणं बर्फातून करावं लागतं. गुलमर्गची गाडी घेतली तर गंडोला राईड पर्यंत आणण्यासाठी 2500 आणि वरचे पॉईंट्स फिरवण्यासाठी 3500 चार्ज करतात. शिवाय एक गाईड बरोबर घेऊन येऊ शकतो. तो 1000 चार्ज करतो. आणि गंडोला पासून प्रत्येक राईड पर्यंत तुमच्याबरोबर असतो. तिथल्या राईड साठी, गेम साठी बार्गेनिंग पण करतो. अर्थात हे सगळे लतीफभाईंचे कॉन्टॅक्ट होते. आणि चार्जेस त्यांनी सांगितले. तुम्ही डायरेक्ट गेलात तर कदाचित तिथली लोक जास्त चार्जेस सांगतील.
साडेनऊ पर्यंत गुलमर्गच्या बॉर्डर ला पोहोचलो. तिथेच गमबूट, जाकीट असा सगळा जामा-निमा करून गुलमर्ग च्या कार मध्ये बसलो. गंडोलाराईड पर्यंतचा रस्ता पण अफलातून. इथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग साठलेले. रस्ता पूर्ण घाटाचा. डोंगरावरती आणि दरीमध्ये सुद्धा बर्फच बर्फ दिसत होते.
गंडोला स्टेशन जवळ सव्वा दहाला पोहोचलो. तिथे तिकीट चेकिंग आयडी प्रूफ चेकिंग साठी मोठी लाईन होती. पण बऱ्यापैकी फास्ट सरकत होती. चेकिंग करून नंतर गंडोलाच्या लाईन मध्ये उभे राहिलो. एका गंडोलात सहा जणांना बसवतात. आम्ही गाईड धरून चार जण असल्यामुळे जाताना आमच्याबरोबर दोन स्ट्रेंजर्स बसले. साडेदहा वाजता आमची राईड सुरू झाली. साधारण दहा-बारा मिनिटात आपण फेज वन ला पोहोचतो. तिथे स्किईंग, स्लेज राईड, स्नो बाईक राईड असे गेम्स आहेत. शिवाय रेस्टॉरंट आहेत. वॉशरूमची पण सोय आहे. फेज टू ला मात्र यातलं काहीच नाही. तिथे सगळीकडे बर्फच बर्फ आहे. आपण ऑल मोस्ट ढगात असतो. तिथून पाक व्यक्त काश्मीर बघू शकतो असं म्हणतात. आधी असं ठरवलं होतं की फेज टू ला विजीट करून यायचं आणि मग फेज वन ला येऊन तिथले गेम्स, खाना पिना आणि साईट सीईंग करायचं.
फेज वन ला पोचल्यावर कळलं की फेज टू खराब हवामानामुळे लगेच सुरू होत नाही आहे. मग फेज वन च्या राइडस् कडे वळलो. मिनी स्कीईंग करायचं नाही म्हणाली. मला पण धडपडाट होऊन हाड बीड तुटण्याची भीती वाटत होती. म्हणून मी पण स्किईंग स्कीप करायचं ठरवलं. थोडेफार फोटो काढून आम्ही स्नो बाईक राइड साठी निघालो. तुम्हाला उत्साह आणि वेळ असेल तर तुम्ही पायी जाऊ शकता. नाहीतर स्लेजचा option आहे. ह्या स्लेज माणसं ओढतात. आम्हाला तिघींसाठी प्रत्येकी बाराशे रुपये द्यावे लागले. स्नो बाईक पर्यंत आणि बॅक. कधी कधी स्लेज कंट्रोल करण्यासाठी एक हेल्पर लागतो, जो मागून बॅलन्स करतो. त्याचे पर पर्सन 400 घेतात. जे लोक स्लेज ओढून येतात ते पगारी नोकर असतात. त्यांना पर ट्रिप काही पैसे मिळतात. ते पण बहुदा कमी असावेत. त्यामुळे इथेही टीप मागतातच. त्यांना पर पर्सन 200 दिले तरी ते खुश होते. अर्थात यांचं डिस्टन्स खूप कमी होतं.
स्नो बाईकचे पर पर्सन २००० होते बाईक वरून ते एका अशाच सीनिक पॉईंट ला घेऊन जातात. पाच दहा मिनिटे फोटोसाठी वेळ देतात. आणि मग परत फिरायचं. येताना तुमची इच्छा असेल तर थोड्या वेळ तुम्हाला बाईक चालवायला देतात. मजा येते. बाईक ड्रायव्हर पण टीप मागतातच. ते सुद्धा पर पर्सन 200 रुपये टीप वरती खुश झाले.
तिथे जवळच आर्मीच एक पोस्ट होतं. तिथे दोघेजण बंदूक घेऊन उभे होते. मिनीनी रिक्वेस्ट करून त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतला.
आत्तापर्यंत बर्फात एक दोनदा पडून झालं होतं. त्यामुळे पडून फारसा काही प्रॉब्लेम होत नाही असा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे स्किईंग ट्राय करायचं ठरवलं. माझ्याबरोबर मिनी पण तयार झाली. आमच्या गाईडने बार्गेन करून अडीच हजार पर पर्सन विथ कोच च्या ऐवजी पंधराशे पर पर्सन विथ कोच असं ठरवून दिलं. मग मी न पडता आठ दहा मिनिटं स्किईंग केलं. अर्थात मी माझ्या कोचला मला अजिबात सोडायचं नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे न पडण्याचं क्रेडिट कोचला जातं. मिनीला तिचा कोच बऱ्यापैकी स्वतंत्रपणे करू देत होता. त्यामुळे तिने दोनदा पडून घेतलं. पण मजा आली.
गुलमर्गला एक स्किईंगची इन्स्टिट्यूट आहे. If time, health & Bank balance permits, मला तिथे दोन-तीन आठवडे राहायला आवडेल, स्किईंग शिकण्यासाठी.
आतापर्यंत हवामान सुधारलं नव्हतं. त्यामुळे फेज टू राईड आजच्या दिवसासाठी कॅन्सल झाल्याचे डिक्लेअर झालं होतं. त्यामुळे तीन साडेतीन तास एन्जॉय करून सव्वा वाजता परत जाण्यासाठी गंडोला मध्ये बसलो.
मग कारनी साईट सिईंग सुरू झालं. काही पॉईंट्स कार मधून मधूनच बघून समाधान मानलं. कारण बरोबरची मंडळी कंटाळली होती. आर्मी म्युझियमला मात्र भेट दिली. खूप मोठं नाही आहे. पण इन्फॉर्मेटीव आहे. समोर कॅफेटेरिया आहे तिथे डोनट पेस्ट्री वगैरे होतं. की चेन आणि टी-शर्ट पण विकायला होते. आणि दोन फोटो पॉईंट होते. एक जीप होती आणि एका ठिकाणी रायफल अड्जस्ट करून ठेवली होती.
3.45 ला परतीचा प्रवास सुरू झाला. जाताना बऱ्यापैकी ट्रॅफिक लागला त्यामुळे गुलमर्ग बॉर्डरला आमच्या कार जवळ पोहोचायला पाच सव्वा पाच झाले. तिथे कोट गमबूट परत करून लतीभाईंबरोबर श्रीनगरला निघालो. श्रीनगर शहरात पोहोचायला 6 आणि पुढे हॉटेलमध्ये पोहोचायला 6.30 वाजले. परत असं वाटलं की जर चेक इन चेक आउट करण्याचा उत्साह असेल आणि पैसे खर्च करायची तयारी असेल तर श्रीनगरला राहून गुलमर्गला येण्यापेक्षा एक दिवस गुलमर्गला मुक्काम करणे खूपच छान आणि सोयीचं म्हणजे. उजेड असता काही पॉईंट्स तुमचे तुम्हाला एक्सप्लोर करता येतात. अर्थात अगदी वरचे जे हॉटेल्स आहेत त्यांचे रेट काहीच्या काहीच जास्त आहेत.
आता उद्या सोनमर्ग.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
माझी काश्मीर डायरी 8 of 10
13 मार्च 2025 सोनमर्ग
आज मिनीचा adoption day. ज्याच्या celebration साठी ही trip arrange केली होती. पहलगाम हून श्रीनगरला येताना shopping साठी थांबलेल्या Red Pearl Saffron मधून मिनीसाठी तीला आवडलेलं केशर परफ्यूम तीला न सांगता घेतलं होतं. ते देऊन आणि तीच्या चेहेऱ्यावरचा गुलाबकावलीच फुल मिळाल्यासारखा आनंद बघून ब्रेकफास्ट करायला खाली उतरलो. हॉटेलचा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट करून साडेनऊला सोनमर्ग साठी बाहेर पडलो. थोड detour करून खीर भवानीचे मंदिर बघायचं ठरवलं होतं. ते साडेचार वाजता बंद होतं म्हणून जातानाच तिथे गेलो. अकरा वाजता मंदिरात पोहोचलो. पाऊस पडतच होता. त्यामुळे मिनी गाडीतच बसली.
मंदिर सुंदर आहे. परिसर स्वच्छ ठेवलेला आहे. जेष्ठ अष्टमीला इथे मोठा मेळा असतो. 1990 मध्ये अतिरेक्यांनी धमकी दिल्यापासून हे मंदिर CPRF (Central Reserve Police Force) च्या अखत्यारीत येतं. या मंदिराचे उल्लेख इतिहासात कालहन काळापासून सापडतात. मंदिर एका स्प्रिंग वर बांधले आहे. आणि असं म्हणतात की देवी इथे पाण्याच्या रूपात पूजली जाते. स्प्रिंगच्या मध्यावर एक छोटसं मंदिर बांधलेल आहे. मंदिराच्या बाहेर तांदळाची खीर प्रसाद म्हणून दिली जाते. वाटी चमचा आपण धुवून ठेवायचा असतो. पाणी इतकं थंड होतं की हात गारठले. वाटी चमचा आत ठेवून जायला निघालो तर तिथे खीर सर्व्ह करणाऱ्या सरदारजीने आग्रहांनी आम्हाला साईडला ठेवलेल्या शेकोटी वरती हात शेकायला सांगितले.
मंदिराच्या आवारातच एक मारुतीचे मंदिर सुद्धा आहे. दर्शन घेऊन आणि थोडे फोटो काढून पुन्हा मार्गाला लागलो.
मंदिर बघून पुढे निघाल्यावर सोनमर्ग च्या आधी पंजाब दरबार नावाच्या एका धाब्यावर लतीफभाईंनी वॉशरूम साठी गाडी थांबवली. ब्रेकफास्ट व्यवस्थित झालेला होता त्यामुळे खाण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण त्याच बिल्डिंगमध्ये धाब्याच्या समोर एक क्राफ्ट शॉप होतं. तिथं अक्रोडच्या लाकडापासून बनवलेल्या बनवलेल्या वस्तू, रेडिमेड कुर्तीज, जॅकेट, ड्रेस मटेरियल, गालीचे असं बरंच काही होतं. तिथून शिकारा-कीचेन, एक मॅजिक बॉक्स, एक शिकारा शोपीस आणि मिनीनी एक लोकरीची टोपी, हॅन्डग्लोज, सॉक्स अशा फुटकळ वस्तू घेतल्या.
सोनमर्गला जाताना एक 6.5 किलोमीटरचा बोगदा झालाय. तो गगनगिरी आणि सोनमर्गला जोडतो. त्यामुळे श्रीनगर सोनमर्ग हा प्रवास पण खूप आरामदायी आणि वेळ वाचवणारा झाला आहे.
एकच्या दरम्यान सोनमर्गला पोहोचलो. जबरदस्त स्नो पडत होता. इथं थजीवास आणि लिद्दरवास असे दोन ग्लेशियर आहेत. शिवाय क्रीश्नासर, गदसर आणि गंगाबल लेक आहेत. बलतल व्हॅली, सिरबल पिक आणि झिरो पॉईंट म्हणजे काश्मीर आणि लडाखची बाउंड्री असे पॉईंट्स आहेत. सोनमर्गला स्नो बाईक, स्लेज आणि घोडा असे तीन ऑप्शन्स आहेत साईट सिईंगसाठी. पण नॉर्मली सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू स्लेज प्रेफर केलं जातं. आम्ही पण तेच केलं. बार्गेन तर भरपूर करावं लागतं. आधी त्यांनी पर पर्सन 5000 सांगितले. आम्ही 2000 पासून सुरुवात केली. आणि फायनली तिघींचे मिळून दहा हजार ठरलं. मग परत गमबूट, कोट चढवणं आलं. सगळं करून स्लेजवर सज्ज झालो.
स्नो फॉल एवढा हेवी होता की दहा मिनिटे एका जागी स्थिर उभा राहिलं तर तुम्ही बर्फात गाडले जाल. अशा कुडकुडत्या थंडीत आमच्या स्लेज बर्फावरून निघाल्या. पण 8 - 10 मिनिटातच मिनीचा पेशन्स संपला. थोडी सर्दी तिला दिल्ली एअरपोर्ट पासून होती. त्यात गोठवणाऱ्या थंडीत तिचं डोकं जास्तच दुखायला लागलं. तिने तुम्ही जा पुढे मी गाडीत जाऊन बसते असा तगादा लावला. त्या लोकांनी थोडं पुश करून अजून थोडं पुढे नेलं. पण शेवटी आम्ही सगळेच मागे फिरलो.
अधी ती लोक परत फिरायला तयार नव्हते. मग त्यांना प्रॉमिस केलं की आम्ही पूर्ण पैसे देऊ. पण खाली पोचल्यावर लतीफभाईंनी त्यांच्याशी वाद सुरू केला. आम्हाला वॉर्न केलं होतं की आम्ही काही न बोलता गप्प बसायचं. He will handle the situation. पहिलं तर साईट सिईंग साठी 10000 जास्त होतात हा त्यांचा मुद्दा. दुसरे एकही पॉईंट न बघता परत फिरलो तर पूर्ण पैसे का मागतात. त्यांचं काश्मिरी भाषेत काय चाललं होतं ते ओ कि ठो कळत नव्हतं. अर्धा पाऊण तास वाद घालून २००० कमी केले. आमच्या दृष्टीने तो अर्धा पाऊण तास जास्त किमती होता. असो. तर 2000 वाचवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तोपर्यंत 2-2.15 वाजले होते.
जाताना टनेल जवळ थांबलो नव्हतो. पण येताना बोगदा पार केल्यानंतर फोटोसाठी थांबलो.
थोडं पुढे आल्यावर अजून एका पॉईंटवर रस्त्यात फोटोसाठी थांबलो.
असं तर सगळा रस्ताच फोटोजेनिक आहे. खरं तर मला वाटतं काश्मीरची सिनरी खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर काश्मीर सायकल किंवा बाईकवर फिरायला हवं.
मध्ये परत पंजाब दरबार धाब्यावर जेवणासाठी थांबलो. तेव्हा परत एकदा समोरच्या क्राफ्ट शॉप मध्ये घुसण्याचा मोह झाला. तिथे पेपरमाशे पासून बनवलेली कांगडी दिसली. अर्थात शोपीस नॉट द रियल वन. कांगडी ही एक प्रकारची पर्सनल शेगडी असते. उबेसाठी. ही फिरनच्या आत पकडली जाते. आता फिरन काय? तर ही एक ट्रेडिशनल काश्मिरी युनीसेक्स कुर्ती आहे. हिवाळ्यात नॉर्मली वुलनची कुर्ती वापरतात. ही आपल्या लूजर सारखी असते. हाताचं काही काम नसेल तेव्हा उबेसाठी दोन्ही हात बाहीतून काढून फिरन मध्ये घेता येतात. खूप थंडी असेल तेव्हा लोक बाहेर पडताना एक हात फिरत मध्ये ठेवून पोटाजवळ या हातात कांगडी पकडतात.
आता थोडं कांगडी बद्दल. कांगडीचा बाहेरचा भाग विलो नावाच्या झाडापासून बनवलेला असतो. विलो हा आपल्याकडच्या वेताच्या जवळ जाणारा प्रकार. ही एक बास्केट असते. धरायला हँडल असलेली. बास्केटमध्ये एक मातीचं किंवा सिरमिकच मोठं बाऊल असतं. त्यामध्ये उबेसाठी कोळसे पेटवून ठेवलेले असतात. काश्मीरमध्ये खेड्यातून घरातल्या प्रत्येक माणसासाठी एक अशी कांगडी असते. श्रीनगर मध्ये सुद्धा फिरन मध्ये कांगडी घेऊन फिरणारे लोक दिसत होते. लतीफभाईंनी जेव्हा कांगडीबद्दल सांगीतलं तेव्हा मिनीनी रस्त्यात फिरनच्या आत कांगडी घेऊन फिरणाऱ्या बायकांबद्दलचा तीचा गैरसमज सांगीतला. आणि लतीफभाईंसगट आम्ही सगळे हसत सुटलो. तीला वाटलं होतं ह्या सगळ्या बायका प्रेग्नंट आहेत.
सोनमर्गला येताना खीरभवानी मंदिरासाठी detour केलं होतं. त्यामुळे सिंधू नदीवर बांधलेला नवा पूल लागला नव्हता. पण येताना सरळ मार्गाने आल्यामुळे त्या पुलावरून आलो. मग परत एकदा गाडी थांबवून फोटोसेशन झालं.
असं करत सहा वाजता श्रीनगरला हॉटेलमध्ये पोहोचलो. आता उद्या दूधपथरी आणि मग back to pavilion.
सोनमर्ग जवळ एक बोर्ड बघितला. तर कळलं की कारगिल 130 किलोमीटर आहे. अर्थात घाट रस्त्यामुळे तिथे पोहोचण्यासाठी तीन तास लागतात. नॉर्मली लद्दाखला बाय रोड जाताना कारगिल्ला हॉल्ट घेतला जातो. नेक्स्ट टाईम काश्मीर ट्रिप मध्ये कारगिल ऍड करावं लागेल.
क्रमशः
सीमा जोहरे
M 9766333419
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.