Schezwan (often spelled Szechuan), the name of a province in China and the style of the food there, is pronounced SECH-wahn. To sound it break it down with these two simple parts:
- SECH: Sounds just like "setch", or like the word "sketch" without the k.
- wahn: Sounds like the word "swan" without the s
चेअरमन माओ कम्युनिस्ट पक्षाचे मुख्य असतानाच्या काळांत खुंटलेल्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांच्यानंतर चीन देशाची सूत्रे हातात घेतलेल्या Deng Xiaoping यांनी Hu Yaobang आणि Zhao Ziang यांना हाताशी धरून (कम्युनिस्ट पक्षाची मूलभूत तत्वे न सोडता) कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीत सुधारणा केल्या आणि लाचलुचपत कमी होऊन सरकारी यंत्रणा जास्त कार्यक्षम व्हावी यासाठी प्रयत्न केले. Hu Yaobang यांनी सांस्कृतिक क्रांती (Cultural Revolution) मुळे विस्थापित झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सक्षम पदाधिकाऱ्याना पुन्हा पक्षांत संधी मिळवून दिली. त्यांच्या इतर अनेक वैयक्तिक यशांखेरीज त्यांच्या वेगळ्या विचारसरणीचा एक नमुना म्हणजे चीनमध्ये सगळीकडे प्रचलित असलेल्या "Mao suit" चा (भारतीय "बंद गळ्या" सारखा काहीशा अव्यवस्थित तऱ्हेचा डगला) त्याग करून पाश्चिमात्य कपडे वापरणारे ते पहिले कम्युनिस्ट उच्च पदस्थ होते. या सगळ्यामुळे कम्युनिस्ट पक्षांतील इतर उच्च पदाधिकारी करत त्याप्रमाणे फक्त पक्षादेश काटेकोर न पाळता काही प्रमाणात का होईना पण सहृदयपणे काम करणारा उच्चपदस्थ असा त्यांच्याबद्दलचा सर्वसाधारण माणसाचा ग्रह झाला होता.
१९८६ च्या शेवटी आणि १९८७ च्या सुरवातीला चीनमधल्या वेगवेगळ्या शहरात (आणि बेजिंग मध्ये तर तियानानमेन चौकातच) काही हजार ते काही शेकडा विद्यार्थी एकत्र येऊन, कुठे घोषणा देत मिरवणुका काढत तर कुठे मोठ्या चौकात जमावापुढे भाषणे देत सरकारकडे अनेक मागण्या करू लागले. त्या मागण्यांना काही एकसंध रूप नव्हते आणि लोकशाही आणण्यापासून वाढत असलेल्या महागाईवर ताबा मिळवण्यापर्यंत अनेकविध मागण्या होत्या. मुख्यतः विद्यार्थी करत असलेल्या या सगळ्याच सरकार विरोधी चळवळीत कोणी राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी किंवा इतर नेते नव्हते आणि सरकारने फारसे त्यात लक्ष घातले नाही तरी या चळवळीने फारसे उग्र स्वरूप घेतले नाही आणि काही काळातच विद्यार्थी रस्त्यावरून हटले.
या थोडक्यात शमलेल्या चळवळीने जरी फारसे काही बिघडले नाही तरी हु याओबांग (Hu Yaobang) यांच्यावर त्या बद्दल मवाळ धोरण ठेवल्याचा आरोप केला गेला आणि त्यांना १५ जानेवारी १९८७ रोजी राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. कम्युनिस्ट पक्षातल्या Deng Xiaoping यांच्यापेक्षा एकच पायरी खाली असलेल्या Hu Yaobang यांना त्या राजीनाम्यानंतर जेमतेम कांही समित्यांमधील आपले स्थान टिकवता आले पण त्यांची आधीची कर्तबगारी विसरली जाऊन कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासातून त्यांचे नांव जवळजवळ पुसूनच टाकले गेले. या राजीनाम्यामुळे तयार झालेला Hu Yaobang हे विद्यार्थी धार्जिणे असल्याचा खरा खोटा समज पडताळून पाहता येण्याआधीच १५ एप्रिल १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.
या पार्श्वभूमीवर पूर्ण चीनभरातल्या विद्यार्थ्यांना वाटत होते की Hu Yaobang यांच्यावर मृत्यूनंतर मानसन्मानाने अंत्यसंस्कार व्हावेत पण त्यांचा मृत देह तियानानमेन चौकातल्या "Great Hall of the People"मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवला जाण्यानंतरच्या कार्यक्रमाबद्दल बरीच संदिग्धता होती. त्यामुळे बेजिंगमधील सुमारे ९२ विद्यापीठातील हजारो तरुण विद्यार्थ्यानी प्रथम त्यांच्या संस्थेत १६ एप्रिल १९८९ पासून एकत्र जमून श्रद्धांजली वाहिली आणि नंतर लहान मोठ्या जमावाने अंत्यदर्शनासाठी तियानानमेन चौकाकडे जाण्यास सुरवात केली.
मे १८ रोजी संध्याकाळी Deng Xiaoping, Li Peng आणि इतर काही सहकाऱ्यानी 'मार्शल लॉ" लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ही बातमी १९ मे ला विद्यार्थी नेत्यांना कळल्यावर त्यांनी उपोषणाचा नाद सोडून तियानानमेन चौकात ठिय्या मांडण्याचा आणि तो सगळा चौकच व्यापून टाकण्याचा निर्णय घेतला.
पुढील काही दिवसात बेजिंगच्या आजूबाजूच्या प्रदेशातून काही लाख सैनिकांना शहरात बोलावले गेले. परंतु त्यांच्या वाहनांना शहरांत पावलोपावली नागरिकांकडून अडवले गेले आणि त्यामुळे ते शहराच्या मध्यभागाकडे म्हणजे तियानानमेन चौकाच्या दिशेने फारशी प्रगती करू शकले नाहीत. त्यांना अजूनही गोळीबार करण्याची परवानगी दिली गेली नव्हती.

तियानानमेन चौकातून अदृश्य करण्यात आलेल्या Goddess of Democracy ची एक प्रतिकृती १९९७ पर्यंत (ब्रिटिश अमलाखालील) हाँग काँग मध्ये प्रत्येक वर्षी "४ जून" च्या स्मरणार्थ होणाऱ्या कार्यक्रमांत दिसायची. नंतर ती देखील बहुतेक सरकारी आदेशावरून दृष्टीआड गेली. तरीही जगभरातल्या अनेक जागी, विशेषतः चिनी वंशाचे लोक राहात असलेल्या शहरात (जसे सान फ्रान्सिस्को, टोरोंटो) तिच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. १९४९ नंतर चीनमधील कम्युनिस्ट राजवट टाळण्याकरता हाँग काँग मध्ये पळून आलेल्याना तसेच इतरत्र स्थायिक झालेल्या चिनी वंशाच्या लोकांना असे प्रतीक पाहून कदाचित, वेळ पडल्यास, चीन मधील सरकार किती कठोर होऊ शकते याचा अंदाज येत असावा.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.