Friday, June 19, 2026

हिमाचल प्रदेश भटकंती

प१

 https://www.misalpav.com/tourism/53715 -१

https://www.misalpav.com/tourism/53727 -२

आम्हांला आता पिंजोर गार्डन  कडे प्रस्थान करायचे होते........

आता पुढे.

राॅक गार्डनपासून पिंजोर गार्डन वीस किलोमीटर अंतरावर आहे. वरिष्ठ नागरिक म्हणून का कुणास ठाऊक मला कुटुंबासोबत इनोव्हा टाईप छोटी गाडी मिळाली. इतर पर्यटक टेंम्पो ट्रॅव्हलर्स मधे बसले.गाड्या पिंजोर गार्डनकडे निघाल्या. 

चालक गब्रू जवान, त्याच्या बोलण्यात हिन्दी कमी आणी पंजाबी शब्दच जास्त येत होते.डेकवर टपोरी,"जुगनी"चे गाणे ऐकू होते. 

चार वर्ष पंजाबमधे कार्यरत होतो.पंजाब मधला सर्वात कठीण   समय होता.राज्यातली पुर्वस्थिती आणी मुख्य स्वर्णमंदिरावर झालेल कारवाई जवळून अनुभवली होती. प्रदीर्घ वास्तव्यामुळे   थोडीफार पंजाबी भाषा समजते.गाण्याचे काही शब्द समजत होते. चालकाला म्हणालो गुरदास मानचे गाणे लाव.पंजाबीत उत्तर देत त्याने चॅनेल बदलला,म्हणाला "साढा प्यों भी माण(गुरूदास) दे ही गाने सुन्दा है गा". म्हणजे माझे वडील पण गुरदास मान चे च गाणे ऐकत असतात. "जुगनी",एक फार जुना आणी लोकप्रिय पंजाबी लोकसंगीताचा प्रकार आहे. याला खुप मोठा इतिहास आहे.चला,आता विषय निघालाच आहे तर  याबद्दल जाता,जाता चार शब्द  सांगतो..... 

"जुगनी",म्हणजे जुगनूची बायको (काजवा, Female Firefly).  पंजाबी लोकसंगीतातली "जुगनी", स्वतंत्र विचारांची, विद्रोही, बिनधास्त,बंडखोर प्रतीकात्मक लोकनायिका आहे.समाजीक   राजकिय,अध्यात्मिक,प्रेम इ.विषयांवरी गाण्यात "जुगनीचा ". नायिका म्हणून वावर लोकांना खुप भावतो. 

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी देशभक्तांनी या लोकनायीकेचा आपले विचार जनमानसात पसरवण्यासाठी उपयोग केला. (जसा बहिर्जी नाईक यांनी अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी केला होता. त्यांचे गाणे होते, "बाजीराव नाना तुम्हीं लग्नाला चला,तुम्हीं लग्नाला चला....")

१८५७ मधे रावी नदीच्या काठावर स्वातंत्र्या सैनिकांना ब्रिगेडियर जाॅन निकोलसन बरोबर लढताना विरगती प्राप्त झाली.त्यांच्या शौर्य गाथा याच लोकसंगीतातून गुंफून गायल्या गेल्या होत्या.

१९०८ मधे सरकारने या लोकसंगीतावर बंदी आणली होती. १९६० मधे "आलम लोहार", या सुफी गायकाने  लोकसंगीतावर अधुनिक साज चढवून नवे रूप प्रचलित केले. "जुगनी",चा इतिहास बराच मोठा आहे.सध्या दलजीत दोसांज,रब्बी शेरगिल सारखे आघाडीचे गायक हे लोकसंगीत अधिक लोकप्रिय करत आहेत. 

"जुगनी",ची जशी प्रेमगीते,सुफी गाणी आहेत तशीच XXX गाणी पण प्रसिद्ध आहेत. भाषा अतीशय खडी आणी अश्लील असल्याने इथे गाण्याचे बोल देऊ शकत नाही.(सैन्यात सर्व भाषिक सैनिक असल्याने सर्वच भाषातले थोडे थोडे शब्द परिचयाचे होतात.(विशेष करून शिव्या,टपोरी शब्द पटकन आत्मसात होतात.) असो, "जुगनी", पुराण इथेच थांबवतो कारण आपण पिंजोर गार्डन  जवळ आलो आहे.

राॅक गार्डन सोडल्या पासून भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीत हळूहळू बदल होत होता.सपाट प्रदेश मागे पडून डोंगराळ भागा कडे प्रवास सुरू झाला.हिरव्यागार शिवालिक डोंगररागां कडक उन्हात दिलासा देत होत्या. 

पिंजोर गार्डन. 

मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ,फिदाई खान कोका,सरहिंद प्रदेशाचा नबाब, वास्तुविशारद,याला हिरव्यागार जंगलातली जागा आवडली. त्याने या ठिकाणी पर्शियन "चहारबाग",शैलीत भव्य महाल १६६९ मधे बांधला व त्याचे बाग- ऐ'-फिदाई खान असे नाव दिले. 

(चहार बाग शैलीबद्दल मिपाकर "मनो", यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

https://www.misalpav.com/comment/1129983#comment-1129983)

हे उद्यान १०० एकर क्षेत्रात पसरलेले असून ते उत्तरेकडून दक्षिण दिशेने जाणाऱ्या उतारावर सात टप्प्यावर बांधले आहे.प्रत्येक टप्प्यावर वेगळा महाल आहे.महालांची नावे अनुक्रमे शिश महाल, हवा महल,रंग महल, जल महल, दिवाणे खास, दिवाणे आम आणी सातव्या टप्प्यावर मोठी बाग आहे.महालांच्या मधोमध एक पाण्याचा पाट व त्यामधे थोड्या थोड्या अंतरावर कारंजी आहेत. पर्शियन मुघल शैलीचे  मिश्रण आहे.श्रीनगर मधील शालीमार, निशात  बागा याच शैलीत बांधल्या आहेत.नैसर्गिक संसाधनांचा भरपूर उपयोग केल्याने महाल सुंदर,अल्हाददायक आहेत.महाल एका सरळ रांगेत आहेत.दोन्ही बाजूस मोठे पामचे वृक्ष आहेत.या वृक्षांवर खुप सारी वटवाघळे उलटी लटकलेली दिसली.अक्षय कुमारचा भूतबंगला  या चित्रपटाची आठवण झाली. गार्डनमधे रात्री काय होत असेल याचा विचार करून अंगावर काटा आला.

मुघलांकडून महाराजा रणजित सिह यांनी हा भूभाग जिंकून घेतला. पटियालाचे महाराजा अमर सिंग,महाराजा भूपिंदर सिंग आणि  महाराजा यादवेंद्र सिंग या शीख शासकांनी या बागेचे नूतनीकरण आणि विस्तार केला.पटियालाचे शेवटचे शासक महाराजा यादवेंन्द्र सिह यांच्या नावावरून बागेचे नाव बदलून 'यादवेंद्र गार्डन' असे ठेवले. प्रचलित नाव मात्र "पिंजोर गार्डन ", असेच आहे.

गाडी पार्किंगमधे येवून थांबली.समोर महालाचे प्रवेशद्वार,गोल पुष्करणी भोवताली मऊ गवत,फुलांच्या ताटवे,चहूबाजूला भक्कम तटबंदी आणी पूर्वेच्या अंगाला एक मोठी मशीद असे प्रथमदर्शनी दृष्य दिसले.मुलांसाठी पुष्करणी भोवती फिरणारी  टाॅय ट्रेन आहे.१९७६ मधे हे उद्यान हरियाणा सरकारने सर्वासाठी खुले केले.प्रवेश शुल्क अगदी नाममात्र आहे. त्या मानाने ऊद्यानाचा रखरखाव अतिशय सुरेख आहे.

प२

-.प५प४

प६

प७

प३

उन कडक होते,पर्यटकांचा उत्साहही तेव्हढाच कडक होता.आत गेल्यावर वास्तूची भव्यता लक्षात आली.आम्हीं पहिले दोन महाल बघीतले आणी परत फिरलो.एका महाला पासून दुसर्‍या महाला पर्यंतचे अंतर किती आहे हे प्रचि बघून वाचकांना अंदाज येईलच. भरदुपारी कडक उन्हात एवढे चालणे शक्य नव्हते आणी गरज वाटली नाही.परत फिरलो. प्रेक्षणीय स्थळांमधे इतिहास,वास्तू कलाकुसर, तांत्रिक गोष्टीं आणी निसर्ग असे बरेच काही बघण्या सारखे असते.यात फार कमी प्रमाणात पर्यटकांना इंटरेस्ट असतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन तोंडे वेंगाडून सेल्फी,फोटो,व्हिडिओ काढणे एवढेच बरेच जण करतात. एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की राॅक आणी पिंजोर गार्डनमधे लैला मजनूनीं आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या दिसल्या नाहीत.कुठेही कोळशाने, तीक्ष्ण शस्त्राने खरडलेले दिसले नाही. त्यामुळे  समाधान  वाटले.

मुख्य प्रवेशद्वारावर इतर सहप्रवासी येण्याची वाट बघत बसलो. तीथेच हरियाणा पर्यटन विभागाचे छोटेसे कार्यालय दिसले.सहज आत गेलो.एक स्मार्ट जाट तरूण बसला होता. पिंजोरचा इतिहास व आसपास  आणखीन काही बघण्यासारखे आहे का म्हणून विचारले. माहिती देताना तो म्हणाला,"मुघल कालीन माहिती नोटीस बोर्डवर दिलि आहे ती तुम्हीं वाचली असेलच.पुढे माहिती देताना म्हणाला,

महाभारत काळात  पांडव वनवासी असताना एक वर्ष इथे राहीले होते.त्या काळात भिमेश्र्वर महादेव मंदिर द्रौपदीकुंड, धाराकुंड इ. वास्तू  बांधल्या अशी अख्यायीका आहे. तेंव्हा या गावाचे नाव पंचपूरा असे होते.(त्याचा अपभ्रंश पिंजोर झाला असावा. )

आठव्या, नवव्या शतकात पंचपूरा, भीमानगर म्हणून ओळखला जाऊ लागला.प्रतिहार,गुर्जर सम्राटानी राज्य केले.राज्यकर्त्यांनी त्या  काळात भीमादेवी मंदिर संकुल पंचायतन शैलीत  बांधले.पुढे तेरा ते सतराव्या शतका मधे  मुघल राजांनी सर्व मंदिरे क्षतिग्रस्त केली. नबाबाने या भग्न हिंन्दू मंदिराचे कलात्मक दगड महालाच्या बांधकामात वापरले.१९७४ मधे हरियाणा पुरातत्व विभागाने इथे खुदाई काम करून शंभर पेक्षा जास्त मूर्त्या बाहेर काढल्या. 

प८

पंचायतन शैलीत बांधलेल्या मंदिर संकुलात मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूस कोपर्‍यात इतर देवतांची मंदिरे अशी ढोबळ माहिती आहे.सॅण्डस्टोन मधली ही मंदिरे खजुराहो मंदिरांच्या समकालीन असून या ठिकाणाला उत्तर भारता मधले खजुराहो म्हंटले जाते.

( प्रचेतस  यावर अधिक प्रकाश टाकू शकतात)

तुम्हीं जास्त माहिती साठी इंटरनेट आणी ASI च्या वेबसाईट बघा असे तो  उत्साही तरूण म्हणाला. त्याला भेटून आनंद  झाला. धन्यवाद  देत बाहेर  पडलो. 

टुर लिडर  लवकर  चलण्याची घाई करत होता. अंतर राज्य सिमा नाक्यावर तपासणी साठी वेळच लागणार  होता. 

काही मिनीटांच्या अंतरावर भिमा देवी मंदिर संकुल जे की आता पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे ते न बघता आल्याने अतिशय चुटपुट लागली.पण"किस्मत ज्यादा आणी समय से पहले कुछ भी नही मिलता",असा विचार करून मनाचे समाधान केले.

आमची मोठी बस पार्किंग मधे दाखल झाली. एक एक पर्यटकांनी आपपाल्या सीटवर बसून घेतले.उन खुप ,पायपीटही भरपूर  झालेली. तहानलेल्या जीवानीं बिसलेरीचे घोट भरायला सुरवात केली. नाष्टा तर केंव्हाच जिरला होता.फाड,फाड स्नॅक्सची पाकिटे फोडण्याचा आवाज  येवू लागला. ट्रिप मॅनेजरनी, सर्व पर्यटक आल्याची खात्री करून घेतली व पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करण्याचा हुकूम  चालकाला दिला. पर्यटक पुन्हा गप्पात रंगले.

मी अंतरजालावर मंदिर संकुलाची माहिती शोधू लागलो.  बरीच माहिती मिळाली

चंदिगढ शिमला हे अंतर फक्त एकशे बारा कि. मी.आहे सगळा घाटरस्ता,गती सीमा चाळीस कि.मी.साधारण साडेतीन तासाचा प्रवास,मधे तासभर जेवण्यासाठी व थोडा वेळ चहा पाना साठी जाणार होता.दुपारचे बारा वाजून गेले होते.व्यवस्थित योजनाबद्ध प्रवास झाल्यास  पाच वाजेपर्यंत  शिमल्याला पोहोचण्याची शक्यता होती.

पिंजोर वरून गाडी निघाली.राष्ट्रीय महामार्ग नंबर पाच, पुढे बावीस,दोनशे पाच अश्या वेगवेगळ्या महामार्गवरून गाडी धावणार होती. चंदीगड → परवाणू → धरमपूर → सोलन → कंडाघाट → शिमला असा प्रवास. महामार्गाचा मेन्टेनन्स,साईन पोस्ट्स, शिस्त  वाखाणण्याजोगी आहे.वहाने एका ओळीत शिस्तबद्ध चालली होती. ओव्हरटेक ओव्हरस्पिडिंग करताना अजीबात आढळली नाहीत.अर्थातच,केवळ आणी केवळ घाट रस्ता असल्याने सर्व चालक सजग,सतर्क होते.परिणाम सर्व विदीत असल्याने स्वयंशिस्त पाळत होते. "अती  घाई संकटात  नेई,लवकर निघा,सुरक्षीत पोहचा,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक",व तत्सम घोषवाक्ये लिहीलेली आढळली नाही. उलट परवाणू सिमावर्ती गावाजवळ हिमाचल प्रदेशात पेट्रोल, डिझेल  पंजाब, हरियाणा पेक्षा स्वस्त मिळेल अशीच पाटी लावलेली दिसली.

प११

प्रवास चालू होता. मी खिडकीतून बाहेर  बघत होतो. महिला मंडळ स्वमग्न होते तर काही पुरूष डुलक्या मारत होते. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला दरी,जागोजागी भूस्खलनाच्या खुणा दिसत होत्या.भूस्खलन थाबवण्या करता सुरक्षा जाळी, कठडे,भिंती बांधणे,शक्य तिथे भराव टाकून रस्ता रुंदीकरण व अन्य सुरक्षा विषयक दुरस्तीची कामे चालू होती.डोंगरांची उंची आणी दरीची खोली वाढत होती.उंचावर जात असल्याचे लक्षात येत होते.खुप दिवसा नंतर निसर्गरम्य वातावरणात प्रवास होत होता.आठवणीतल्या एका कवीतेचे शब्द  कानात घोळू लागले.

अल्याड डोंगर,पल्याड डोंगर, 

मधेच खोल खोल दरी...

या दरीतून वाहे नदी, 

जशी चांदीचीच सरी..."

प९

अगदी असेच दृष्य होते. पंडोह धरणातून बाहेर पडणारे बियास नदीचे (व्यास नदी) पाणी,स्टेप फार्मिंग,डोंगरात वसलेल्या छोट्या टुमदार वस्त्या व घरावर हिरव्या,लाल रंगाची उतरती छप्परे बघून एकंदरीत वातावरण मिपाकर  चित्रगुप्त किंवा आमचे चौको भाऊ यांनी कॅनव्हासवर काढलेली निसर्गचित्रे वाटत होती.प्रचि बघून वाचकांच्या लक्षात येईल.

प१० 

प११

"परवाणू", हरियाणा-हिमाचल प्रदेश सीमेवरचे गाव.इथे वाहनांचे चेकिंग होते.गाडी नाक्यावर थांबली चालक गाडीचे कागद घेऊन ऑफिस मधे गेला.खिडकीतून बाहेर रानमेवा विकणारे लोक दिसत होते.मला जुन्या खंबाटकी घाटाची आठवण आली.जसे तिथे स्ट्राॅबेरी विकणारे तसेच इथे चेरी आणी खुरमानी विकणारे होते. फार गर्दी नसल्याने चेकिंग सोपस्कार लवकर पूर्ण झाले व गाडी पुढे निघाली.

तासाभरा नंतर गाडी धरमपूर गावातील "हाॅटेल हवेली",च्या पार्किंग मधे थांबली दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.गाडी मधे पुन्हा एकदा हलचल तेज झाली. सर्वच जण खडखडले होते. शाकाहारी,सामिष भोजनावर तुटून पडले.गोड पदार्थात गुलाब जाम व मुंग दाल चा हलवा होता.भरपूर जेवण झाले. "आता गाडी सोलन मधे चहा साठी थांबणार आहे असे मधे अजीबात थांबणार नाही. गाडी मधे बसण्या आगोदर वाॅशरूमचा जरूर वापर करा", अशी प्रेमळ सुचना टुर लिडर ने सर्वांना केली. 

सामिष, गोड जेवणाने सर्वानाच झिंग चढली. थोड्याच वेळात बऱ्याच जणांची ब्रह्मांनंदी टाळी लागली.मी मात्र बाहेरचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत, कॅमेर्‍यात, भ्रमणध्वनीवर साठवून ठेवत होतो. गाडी धावत होती,डोंगर, दर्‍या, गाव मागे पडत होती. वळणावळणाचे रस्ते, वळणावळणावर छातीत धडकी भरत होती.

प१२

गाडी आता सोलन जवळ आली. मी जरी सोलन या गावाला पहिल्यांदाच भेट देत असलो तरी या गावाबद्दल  खुप सार्‍या जुन्या आठवणी जागृत झाल्या.जसे,मोहन मिकिन्स, सोलन नंबर  वन, ओल्ड माॅकं, गोल्डन इगल वगैरे. कायप्पावर मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारल्या.अगदी ऑफिसातले काम सोडून मिपाकर मित्रांनी हिरीरीने गप्पात भाग घेतला.सोलन पासून तीन किलो मीटर पुढे आल्यावर व्हॅली व्ह्यू शाॅपिंग काॅम्प्ल्याक्स समोर गाडी थांबली.डोंगर कड्यावरच्या  छोटेखानी हाॅटेल मधून खोल दरीचे रौद्र रूप दिसत होते. सर्वांनीच चहा,समोसा व सेल्फीचा आनंद  घेतला.जवळच असलेल्या स्नॅक्स सेंटर मधे फेरफटका मारला. दुकानदारांवर बरोबर डिस्टिलरी बद्दल चौकशी केली. फ्रुट वाईन चाखायला दिली.मग लाजेकाजेस्तव थोडी खरेदी केली.

गाडी पुन्हा शिमल्याकडे धावत निघाली.......

प१४

शिमल्याच्या वेशीवर आल्या नंतर गाडी रस्त्या लगत थांबली. इथून पुढे "हाॅटेल इस्ट बाॅर्न", राहाण्याचे ठिकाणा पर्यंतचा प्रवास छोट्या गाडीने झाला. सामान टेम्पो मधे मागाहून आले. 

संध्याकाळ झाली होती,हिरण्यकश्यपूचा वध झाला तीच वेळ.उंच देवदार वृक्षांच्या सावल्या घनदाट जंगलात एकमेकात मिसळून गेल्या होत्या.हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर चौकिदार, मॅनेजर,वेटर्स आमच्या स्वागतार्थ उभे होते. रहाण्याचे ठिकाण बघून मन खुश झाले. घनदाट झाडीत लपलेल्या किलबिलाटाने लक्ष वेधून घेतले. सभोवार नजर भिरभिरत असताना समोर ब्ल्यू व्हिसलिंग थ्रश (पहाडी कस्तुरचंद,शिळकरी कस्तूर) आणी स्ट्रिक्ड लाफिंग थ्रश (कशमिरी नाव छोटा पेंगा, स्थानिक नाव शिना पिपाणी,याकूर) हे दोन पक्षी दिसले. प्रवासाचा थकवा निघून  गेला....

प१६प१५

उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा समजून घेतली व रूम मधे गेलो.रात्रीचा मेन्यू मस्त होता. जेवल्यानंतर निद्रादेवीची अलगद कुशीत घेतले......

केले.
अ

 -

https://www.misalpav.com/tourism/53715-

पहिला भाग इथे वाचा

उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले.. 

पुढे..... 

रात्री गाढ झोप लागली.नेहमी प्रमाणे सकाळी साडेपाचला आपोआप डोळे उघडले.तयार होऊन खाली आलो. भर वस्तीतले हाॅटेल सिमेंटच्या जंगलाने वेढलेले.साडेसहा वाजले सकाळ होती तरी ही उन कडक व मार्तंड रागात दिसत होता.यावर्षी सर्व ठिकाणी कडक उन्हाळा भासतोय. 

एक कवीता आठवली, 

वेळ झाली भर माध्यान्ह 

माथ्यावर तळपे उन 

नको जाऊ कोमेजून 

माझ्या प्रितीच्या फुला....... 

(अवांतर - ही कवीता पुढे याचे अप्रतिम, अजरामर गाणे झाले. कवी रस्त्यावरून जाताना भरदुपारी डांबरीकरण चालू असते व रस्त्यालगत, रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या बाईचे तान्हुले पहुडले होते.त्या बाळा बद्दल आईच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत.) 

सकाळी,सकाळी चंदिगढचे तापमान बत्तीस डिग्री होते. आसपास हिरवाई नसल्याने पक्षी नव्हते.कावळे,घारी तेव्हढे दिसत होते. थोडा वेळ थांबलो,चहूबाजूस फेरफटका मारला व नाष्ट्यासाठी प्रयाण केले.आलू पराठे,कवड्या दही, मिक्स लोणचे बरोबर आलू पुडी असे उत्तर भारतीय,पंजाबी पदार्थ होते.उकडलेली अंडी, ऑम्लेट, काॅर्नफ्लेक्स,मोड आलेली धान्ये,फळे इ.होते.हाॅटेल मालक हल्ली ग्राहकांच्या प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असतात.दिक्षित,दिवेकर,खवय्ये सर्वाचा आत्माराम कसा शांत होईल याचा प्रयत्न करतो.आजचा अर्धादिवस चंदिगढ बघण्यासाठी होता. सुखना तळे, राॅक गार्डन व पिंजोर गार्डन ही तीन मुख्य प्रेक्षणीय स्थळे बघण्याचे ठरले. चंदिगढ मधे अजूनही काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.जसे कॅपिटल काॅम्प्ल्याक्स (सचिवालय वगैरे) व खरेदी साठी सेक्टर सतरा,रोज गार्डन वगैरे.पर्यटक अवर्जून या ठिकाणी जातात. उरलेला अर्धा दिवस चंदिगढ शिमला प्रवासा साठी होता.  चंदिगढ 

शिवालीक पर्वतरांगाच्या पायथ्याशी सुनियोजित वसवलेले शहर, भारताचे पहिले पं.प्र. पं जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्न. ले कॉर्बुझियर (Le Corbusier )प्रसिद्ध फ्रेंच वास्तुविशारद यांनी सन १९५२ मधे डिझाइन केले होते.याबद्दल जालावर भरपूर मााहीती उपलब्ध आहे ती इथे पुन्हा चोप्पपस्ते करत नाही...... उत्तरेकडील सीमावर्ती भागातले अत्याधुनिक प्रमुख शहर. ऐंशी, नव्वदच्या दशकात थंडीमधे होणार्‍या प्रचंड बर्फबारी मुळे श्रीनगर लेह मार्ग सैन्य आणी नागरी वहातूकीस बंद असायचा. तेंव्हा चंदिगड येथून हवाई मार्गा द्वारे सैनीकांचे आवागमन होत असे.पंजाब व हरियाणा राज्यांची समाईक राजधानी,केंद्रशासीत प्रदेश, मोठी छावणी ,मुख्यालय, चिन व तिबेट यांच्या अंतरराष्ट्रीय सिमा जवळच म्हणून चंदिगढचे महत्व खास आहे.

 सामरिक,राजकिय महत्त्वा बरोबरच शहराला ऐतिहासिक, पौराणिक वारसा सुद्धा आहे.महाभारतातमधे "पंचकुला", याचा उल्लेख पंचपुरा म्हणून आढळतो, असे अंतरजालावर समजले.

 आमचे रहाण्याचे होटल झिरकापूर गावात, शहराच्या बाहेर असल्याने मुख्य शहराला टाळून छोट्या गाड्यांनी पंचकुला, चंडिमंदिर भागात आलो. व्हि आय पी एरीया,भरपूर हिरवळ, मोठी झाडे,प्रशस्त,स्वच्छ रस्ते व नियंत्रित वहातूक दृष्टीस न पडली तर नवलच. दुचाकीवर चालक आणी सहप्रवासी हेल्मेट घालून फिरताना दिसले. शिख धर्मीय सोडून सर्वजण हेल्मेट वापरताना दिसले. 

सुखना तळे 

सुखना तळे 'ले कॉर्बुझियर, वास्तुविशारद यांच्या देखरेखी खाली १९५८ मधे बनले. शिवालीक पर्वतरांगा मधून वाहून येणारे पावसाचे पाणी या तळ्यात साठवले जाते.डोंगरा वरून येणारी चिखलमाती, दगड गोटे तळ्यात जमा होऊ नये म्हणून फिल्टरची विशेष व्यवस्था आहे.सुखना तळे शहराची शान आहे. इथले निसर्ग सौंदर्य आणी जैववैविध्य अप्रतिम आहे.

 "The Punjab & Haryana high court has declared Sukhna Lake a ‘living entity, or ‘legal person’ with the rights, duties, and liabilities of a living person. Therefore, all the citizens of Chandigarh as loco parentis (in the place of a parent) save the lake". (अंतरजालावरून)

 थंडी मधे स्थलांतरीत पक्षी,जसे सायबेरियन बदक,स्टाॅर्क, क्रेन्स या तळ्यावर जरूर मुक्कामाला येतात. जानेवारी ते मार्च या काळात तळे सर्वात जास्त सुंदर दिसते असे स्थानिकांकडून कळाले. तळ्याच्या काठावर सुशोभिकरण करण्यात आले आहे. कमालीची स्वच्छता बाळगण्या साठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जाणवले. सकाळ,संध्याकाळी व्यायाम,विरंगुळ्यासाठी शहरवासीयांना आणी पर्यटकांना ही एक छान जागा आहे. तळ्याचा विस्तार तीन किलोमीटर पर्यंत आहे जणू मुंबईचा मरिन ड्राईव्ह,..... 

आम्हीं सकाळी नऊ वाजता तळ्यावर दाखल झालो.उन्हाचे चटके लागत होते.बोटींगची व्यवस्था आहे पण उन्हामुळे पर्यटकानी पाठ फिरवल्या मुळे सर्व जणी तळ्याकाठी नांगर टाकून सुस्तावलेल्या होत्या.स्थानिक लोक,कर्मचारी सोडल्यास इतर लोक नगण्यच होते. पर्यटक झाडाच्या सावलीत उभे राहून सेल्फी, फोटो सेशन करत होते. अ

मी पक्षी कुठे दिसतात बघत होतो. कडक उन्हामुळे पक्षी सुद्धा जंगलात, झाडांवर निघून गेले होते.ते तळ्यात फक्त हळदी कुंकू बदके (Indian Spot Billed Duck)विहार करताना दिसली. बाकी साळुंक्या पोपट,एखाद दुसरा फुलचुखी पक्षी बागडताना दिसले.

खुप उत्सुकता होती पण पक्षीदर्शन न झाल्याने निराशा झाली. सहा वाजता आलो असतो तर कदाचित जास्त पक्षी दिसले असते. असा विचार चालू असतानाच एक ओळखीचा आवाज कानावर आला.पटकन वर नजर गेली,छोटा धनेशची(Indian Gray Hornbill) जोडी एकमेकाचा पाठलाग करत जंगलाकडे जाताना दिसली. जोडा कॅमेर्‍यात नाही पण दोघातला एक जण मात्र कॅमेर्‍यात सापडला.

अ

 -

अ

थोडावेळ फिरून झाल्यावर पुढे राॅक गार्डन कडे प्रस्थान करण्याची सुचना आली. आमची पावले पार्किंग कडे वळाली.....

 राॅक गार्डन. 

साधारण, बाग म्हणले की डोळ्या समोर झाडे,फुले, फुलपाखरे येतात पण दगडांची बाग कशी असेल याची उत्सुकता होती. जगद्विख्यात राॅक गार्डनचे जन्मदाता श्री नेकचंद सैनी,सब डिव्हिजनल इंजिनियर, हे फाळणीपुर्व पाकिस्तानात जन्मले होते .सैनी कुटुंबिय फाळणीनंतर भारतात स्थाईक होण्या साठी ते तत्कालीन पंजाबात स्थलांतरीत झाले. जन्मजात कलेचे वरदान लाभलेले सैनी ,१९५१ मधे रोड इन्स्पेक्टर म्हणून सरकारी कामावर रूजू झाले.काम करताना विवीध टाकाऊ वस्तूंच्या ढिगाऱ्यात त्यानां आपल्या कलेला उपयोगी सामुग्री आणी साकारण्याची क्षमता दिसून आली. 

१९५७ मधे श्री नेकचंद सैनी यांनी विवीध आकाराचे छोटे मोठे दगड, फुटक्या टाईल्स, बांगड्यांचे तुकडे,टेराकोटाची फुटकी भांडी,मटके,बाटल्या,इतर औद्योगिक कचरा,विजेचे फ्युज, ट्यूबलाईट चे होल्डर इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून पासून मानवी,प्राणी,पक्षी इत्यादी प्रेक्षणीय कलाकृती बनवण्यास सुरूवात केली.अगदी फेकून दिलेले,कापलेले माणसांचे केस सुद्धा त्यांनी या कलाकृतींच्या डोक्यावर लावण्यासाठी वापरले. अथक अठरा वर्ष श्री सैनी यांनी आपला छंद नेटाने जोपासला. त्यांनी सुखना तळ्याच्या एकाबाजूला जंगलात गुपचूप एक वेगळे अद्भुत साम्राज्य साकारले. 

या कलाकृतींचे निर्माण ॲबस्ट्रॅक्ट जरी असले तरी रचनेनुसार ते एका विशिष्ट उद्देशाने बनवलेले दिसते. हे काम, ते सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी मदती शिवाय करत राहीले.

राॅक गार्डन बघताना त्यांची कलासक्ती कल्पनाशक्ती, निष्ठ, प्रेम, सृजनशीलता, दृढनिश्चय पदोपदी दिसून येतो.त्यांनी आपला छंद नोकरी सांभाळून फावल्या वेळात जोपासला.  

आज बागेत ५,००० हून अधिक कलाकृती आणि शिल्पे आहेत.हे गार्डन जवळपास 40 एकर मधे पसरलेले आहे. तीन वेगवेगळ्या फेजेस मधे विकसित झालेले हे अद्भुत साम्राज्य चौदा कक्षात (चैंबर) विभागले आहे.(इती वाटाड्या ऊवाच) येथील कलाकृती उंच ओट्यावर प्रस्थापित केल्या आहेत. यात कलाकाराची दुरदृष्टी दिसते.जमीनीवर त्यांना सहज नुकसान पोहचले असते,किंवा त्यांचे वास्तविक सौंदर्य झाकोळून गेले असते.

अ

अ

  मानवनिर्मित धबधबे,झोपाळे,पारंपारिक पंजाबी गाव असे अनेक प्रकार अशाच टाकाऊ वस्तूंपासून बनवले आहेत. बाहुल्यांचे संग्रहालय,घुमावदार संकुचित पाऊलवाटा, गल्ल्या(लेन), उंच उंच दगडांच्या भिंती मधून एकमेकांना जोडणारे रस्ते,भव्य कमानी आणी भव्य दालने इत्यादी. अ

अ

अ

अ

अ

अ

अ

 या बाजूला जंगल असल्याने या उपद्व्याप कडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही.कचरा डेपो समजून अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर मधे हा भूखंड अवैध व अतिक्रमित ठरवून त्या सर्व कलाकृती नष्ट करण्या साठी सरकारी हुकूम जारी झाला.जन- सामान्यांच्या भारी विरोधामुळे सरकारला आपला हुकूम मागे घ्यावा लागला, आणी या जागेला सार्वजनिक बागेचे स्वरूप दिले गेले.

आज हे गार्डन शहराचा अभिमान तर आहेच पण श्री नेकचंद सैनी यांची यशोगाथा आहे.देशीविदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

  हिंन्दी भाषेत एक म्हण आहे,"अकेला चना भाड नही फोड सकता", म्हणजे "एका हाताने टाळी वाजत नाही."पण जुनून असेल तर अशक्य पण शक्य होते.

 "असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।"  

या अद्भुत,अनोख्या गार्डनबद्दल किती लिहिले तरी वाचका समोर पुर्ण चित्र उभे करणे मला तरी शक्य नाही. 

१९२४ मधे जन्मलेला अवलिया कलाकार २०१५ मधे एक मोठी कलाकृती,सांस्कृतिक धरोहर पाठिमागे सोडून गेला. भारत सरकारने निस्वार्थ कलाकाराच्या कलेचे कौतूक पद्म पुरस्कार देऊन केले. असो, निर्मात्याबद्दल थोडक्यात सांगायचा प्रयत्न होता.

या बागेत फिरणे,कलाकृतींचा अनुभव घेणे त्यांना समजणे हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. सभोवताली बागेत झाडांवर किलबिलाट चालू होता. उंच आकाशातील पक्षांचे फोटो काढू की कलाकाराच्या जमिनीवरील मोहक अद्भुत कलाकृतींचे ? अशा द्विधा परिस्थितीत सापडलो होतो............."पक्षी इतरत्रही सापडतील, सध्यातरी कलाकृतीवर ध्यान दे.........". असे मनाला समजावले. 

भरपूर गर्दी होती. सेल्फिवाले,तूनळीवाले,समूह ,सोलो पर्यटक असे अनेक प्रकारचे,भाषेचे,विवीध वेशभूषा परिधान केलेले सर्व वयाचे पर्यटक आपापल्या पद्धतीने आनंद घेत होते. मी सुद्धा माझ्या कुंटूबासोबत एन्जॉय करत होतो. झाडांचे प्राकृतिक अच्छादन असल्याने चाळीस डिग्री तापमानातही अल्हाददायक वाटत होते. मस्त गारवा होता. 

फिरता,फिरता अचानक एक वेगळा आवाज कानावर आला. चमकून वर बघितले तर डोक्यावर एक "पहाडी तांबट",आपल्या साथीदाराला साद घालताना दिसला.अ 

अ  अ  महाराष्ट्र,गुजरात मधील तांबट पक्षी. निकाॅन डि एस एल आर डी ३४००.

" रूप पाहता लोचनी,सुख झाले हो साजणी", 

गर्द झाडीत लपलेला तांबट बघताना अशी अवस्था झाली. पटापट फोटो काढले, आवाज रिकाॅर्ड केला. 

हिमालयातला दिसलेला पहिला पक्षी. मला पुन्हा एकदा शहारूख खानचा तो प्रसिद्ध डायलॉग आठवला,

"किसी चिज को शिद्द्त से चाहो तो.....सारी कायनात.....ब्ला, ब्ला, ब्ला". 

मी याला थोडे माॅडिफाय केले,

"तुम किसी पंछी को मुद्दाम चाहो तो वो आपके कानमे आ के बोलता है!" "मै यहाँ हू....,मै यहाँ हू....,मै यहाँ हू......"

ग्रेट बार्बेट,पहाडी तांबट' असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव Psilopogon virens आहे.मोठा आशियाई बार्बेट पक्षी, प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. अतिशय सुरेख,रंगबिरंगी पक्षी.प्रकृतीचे जवळपास सारे रंग याच्यात दिसतात.आपल्या कडे आढळणारा तांबट (काॅपरस्मिथ बार्बेट) सुद्धा सुरेख आहे पण एव्हढा नाही. 

रूप ग्रेट बार्बेटचे! 

आखूड मान,मोठे डोके,जणू रंगपेटीचे खोके! ​

मोठ्या पिवळ्या चोचीवर झुपकेदार मिशा, 

निळे पाणीदार डोळे,याला खुल्या दाही दिशा! ​

पाठीवर साजिरा,मखमली तपकिरी कोट, 

हिरव्या-पिवळ्या छटांनी,सजले सुंदर पोट! ​

बुडावर घातला याने लाल चुटुक डायपर, 

भिरभिर,तीक्ष्ण नजर,जसा चारचाकीचा वायपर! ​

'पिल-हॉ... पिल-हॉ...', गुंजे डोंगर-दरा,

 झाडांच्या पानांआड दडे, वनराणीचा तुरा! ​

मुक्तहस्त चित्राचा पिसारा हिरवागार, 

ग्रेट बार्बेट,निसर्गाचा अद्भुत अविष्कार! 

राॅक गार्डन बघण्यासाठी शुल्क मात्र वीस रुपये आहे.इतर सर्वजनिक उद्यना प्रमाणेच पार्किंग, स्नॅक्स, प्रसाधन रूम इत्थंभूत सोयी आहेत.  

आम्हांला आता पिंजोर गार्डन कडे प्रस्थान करायचे होते........

बाकी पुढच्या भागात.

राॅक गार्डनपासून पिंजोर गार्डन वीस किलोमीटर अंतरावर आहे. वरिष्ठ नागरिक म्हणून का कुणास ठाऊक मला कुटुंबासोबत इनोव्हा टाईप छोटी गाडी मिळाली. इतर पर्यटक टेंम्पो ट्रॅव्हलर्स मधे बसले.गाड्या पिंजोर गार्डनकडे निघाल्या. 

चालक गब्रू जवान, त्याच्या बोलण्यात हिन्दी कमी आणी पंजाबी शब्दच जास्त येत होते.डेकवर टपोरी,"जुगनी"चे गाणे ऐकू होते. 

चार वर्ष पंजाबमधे कार्यरत होतो.पंजाब मधला सर्वात कठीण   समय होता.राज्यातली पुर्वस्थिती आणी मुख्य स्वर्णमंदिरावर झालेल कारवाई जवळून अनुभवली होती. प्रदीर्घ वास्तव्यामुळे   थोडीफार पंजाबी भाषा समजते.गाण्याचे काही शब्द समजत होते. चालकाला म्हणालो गुरदास मानचे गाणे लाव.पंजाबीत उत्तर देत त्याने चॅनेल बदलला,म्हणाला "साढा प्यों भी माण(गुरूदास) दे ही गाने सुन्दा है गा". म्हणजे माझे वडील पण गुरदास मान चे च गाणे ऐकत असतात. "जुगनी",एक फार जुना आणी लोकप्रिय पंजाबी लोकसंगीताचा प्रकार आहे. याला खुप मोठा इतिहास आहे.चला,आता विषय निघालाच आहे तर  याबद्दल जाता,जाता चार शब्द  सांगतो..... 

"जुगनी",म्हणजे जुगनूची बायको (काजवा, Female Firefly).  पंजाबी लोकसंगीतातली "जुगनी", स्वतंत्र विचारांची, विद्रोही, बिनधास्त,बंडखोर प्रतीकात्मक लोकनायिका आहे.समाजीक   राजकिय,अध्यात्मिक,प्रेम इ.विषयांवरी गाण्यात "जुगनीचा ". नायिका म्हणून वावर लोकांना खुप भावतो. 

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी देशभक्तांनी या लोकनायीकेचा आपले विचार जनमानसात पसरवण्यासाठी उपयोग केला. (जसा बहिर्जी नाईक यांनी अफजल खानाच्या स्वारीच्या वेळी केला होता. त्यांचे गाणे होते, "बाजीराव नाना तुम्हीं लग्नाला चला,तुम्हीं लग्नाला चला....")

१८५७ मधे रावी नदीच्या काठावर स्वातंत्र्या सैनिकांना ब्रिगेडियर जाॅन निकोलसन बरोबर लढताना विरगती प्राप्त झाली.त्यांच्या शौर्य गाथा याच लोकसंगीतातून गुंफून गायल्या गेल्या होत्या.

१९०८ मधे सरकारने या लोकसंगीतावर बंदी आणली होती. १९६० मधे "आलम लोहार", या सुफी गायकाने  लोकसंगीतावर अधुनिक साज चढवून नवे रूप प्रचलित केले. "जुगनी",चा इतिहास बराच मोठा आहे.सध्या दलजीत दोसांज,रब्बी शेरगिल सारखे आघाडीचे गायक हे लोकसंगीत अधिक लोकप्रिय करत आहेत. 

"जुगनी",ची जशी प्रेमगीते,सुफी गाणी आहेत तशीच XXX गाणी पण प्रसिद्ध आहेत. भाषा अतीशय खडी आणी अश्लील असल्याने इथे गाण्याचे बोल देऊ शकत नाही.(सैन्यात सर्व भाषिक सैनिक असल्याने सर्वच भाषातले थोडे थोडे शब्द परिचयाचे होतात.(विशेष करून शिव्या,टपोरी शब्द पटकन आत्मसात होतात.) असो, "जुगनी", पुराण इथेच थांबवतो कारण आपण पिंजोर गार्डन  जवळ आलो आहे.

राॅक गार्डन सोडल्या पासून भोवतालच्या भौगोलिक परिस्थितीत हळूहळू बदल होत होता.सपाट प्रदेश मागे पडून डोंगराळ भागा कडे प्रवास सुरू झाला.हिरव्यागार शिवालिक डोंगररागां कडक उन्हात दिलासा देत होत्या. 

पिंजोर गार्डन. 

मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ,फिदाई खान कोका,सरहिंद प्रदेशाचा नबाब, वास्तुविशारद,याला हिरव्यागार जंगलातली जागा आवडली. त्याने या ठिकाणी पर्शियन "चहारबाग",शैलीत भव्य महाल १६६९ मधे बांधला व त्याचे बाग- ऐ'-फिदाई खान असे नाव दिले. 

(चहार बाग शैलीबद्दल मिपाकर "मनो", यांनी विस्तृत माहिती दिली आहे.

https://www.misalpav.com/comment/1129983#comment-1129983)

हे उद्यान १०० एकर क्षेत्रात पसरलेले असून ते उत्तरेकडून दक्षिण दिशेने जाणाऱ्या उतारावर सात टप्प्यावर बांधले आहे.प्रत्येक टप्प्यावर वेगळा महाल आहे.महालांची नावे अनुक्रमे शिश महाल, हवा महल,रंग महल, जल महल, दिवाणे खास, दिवाणे आम आणी सातव्या टप्प्यावर मोठी बाग आहे.महालांच्या मधोमध एक पाण्याचा पाट व त्यामधे थोड्या थोड्या अंतरावर कारंजी आहेत. पर्शियन मुघल शैलीचे  मिश्रण आहे.श्रीनगर मधील शालीमार, निशात  बागा याच शैलीत बांधल्या आहेत.नैसर्गिक संसाधनांचा भरपूर उपयोग केल्याने महाल सुंदर,अल्हाददायक आहेत.महाल एका सरळ रांगेत आहेत.दोन्ही बाजूस मोठे पामचे वृक्ष आहेत.या वृक्षांवर खुप सारी वटवाघळे उलटी लटकलेली दिसली.अक्षय कुमारचा भूतबंगला  या चित्रपटाची आठवण झाली. गार्डनमधे रात्री काय होत असेल याचा विचार करून अंगावर काटा आला.

मुघलांकडून महाराजा रणजित सिह यांनी हा भूभाग जिंकून घेतला. पटियालाचे महाराजा अमर सिंग,महाराजा भूपिंदर सिंग आणि  महाराजा यादवेंद्र सिंग या शीख शासकांनी या बागेचे नूतनीकरण आणि विस्तार केला.पटियालाचे शेवटचे शासक महाराजा यादवेंन्द्र सिह यांच्या नावावरून बागेचे नाव बदलून 'यादवेंद्र गार्डन' असे ठेवले. प्रचलित नाव मात्र "पिंजोर गार्डन ", असेच आहे.

गाडी पार्किंगमधे येवून थांबली.समोर महालाचे प्रवेशद्वार,गोल पुष्करणी भोवताली मऊ गवत,फुलांच्या ताटवे,चहूबाजूला भक्कम तटबंदी आणी पूर्वेच्या अंगाला एक मोठी मशीद असे प्रथमदर्शनी दृष्य दिसले.मुलांसाठी पुष्करणी भोवती फिरणारी  टाॅय ट्रेन आहे.१९७६ मधे हे उद्यान हरियाणा सरकारने सर्वासाठी खुले केले.प्रवेश शुल्क अगदी नाममात्र आहे. त्या मानाने ऊद्यानाचा रखरखाव अतिशय सुरेख आहे.

प२

-.प५

प४

प७

प३

उन कडक होते,पर्यटकांचा उत्साहही तेव्हढाच कडक होता.आत गेल्यावर वास्तूची भव्यता लक्षात आली.आम्हीं पहिले दोन महाल बघीतले आणी परत फिरलो.एका महाला पासून दुसर्‍या महाला पर्यंतचे अंतर किती आहे हे प्रचि बघून वाचकांना अंदाज येईलच. भरदुपारी कडक उन्हात एवढे चालणे शक्य नव्हते आणी गरज वाटली नाही.परत फिरलो. प्रेक्षणीय स्थळांमधे इतिहास,वास्तू कलाकुसर, तांत्रिक गोष्टीं आणी निसर्ग असे बरेच काही बघण्या सारखे असते.यात फार कमी प्रमाणात पर्यटकांना इंटरेस्ट असतो. प्रत्येक ठिकाणी जाऊन तोंडे वेंगाडून सेल्फी,फोटो,व्हिडिओ काढणे एवढेच बरेच जण करतात. एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली की राॅक आणी पिंजोर गार्डनमधे लैला मजनूनीं आपल्या पाऊलखुणा सोडलेल्या दिसल्या नाहीत.कुठेही कोळशाने, तीक्ष्ण शस्त्राने खरडलेले दिसले नाही. त्यामुळे  समाधान  वाटले.

मुख्य प्रवेशद्वारावर इतर सहप्रवासी येण्याची वाट बघत बसलो. तीथेच हरियाणा पर्यटन विभागाचे छोटेसे कार्यालय दिसले.सहज आत गेलो.एक स्मार्ट जाट तरूण बसला होता. पिंजोरचा इतिहास व आसपास  आणखीन काही बघण्यासारखे आहे का म्हणून विचारले. माहिती देताना तो म्हणाला,"मुघल कालीन माहिती नोटीस बोर्डवर दिलि आहे ती तुम्हीं वाचली असेलच.पुढे माहिती देताना म्हणाला,

महाभारत काळात  पांडव वनवासी असताना एक वर्ष इथे राहीले होते.त्या काळात भिमेश्र्वर महादेव मंदिर द्रौपदीकुंड, धाराकुंड इ. वास्तू  बांधल्या अशी अख्यायीका आहे. तेंव्हा या गावाचे नाव पंचपूरा असे होते.(त्याचा अपभ्रंश पिंजोर झाला असावा. )

आठव्या, नवव्या शतकात पंचपूरा, भीमानगर म्हणून ओळखला जाऊ लागला.प्रतिहार,गुर्जर सम्राटानी राज्य केले.राज्यकर्त्यांनी त्या  काळात भीमादेवी मंदिर संकुल पंचायतन शैलीत  बांधले.पुढे तेरा ते सतराव्या शतका मधे  मुघल राजांनी सर्व मंदिरे क्षतिग्रस्त केली. नबाबाने या भग्न हिंन्दू मंदिराचे कलात्मक दगड महालाच्या बांधकामात वापरले.१९७४ मधे हरियाणा पुरातत्व विभागाने इथे खुदाई काम करून शंभर पेक्षा जास्त मूर्त्या बाहेर काढल्या. 

प८

पंचायतन शैलीत बांधलेल्या मंदिर संकुलात मध्यभागी मुख्य मंदिर व चार बाजूस कोपर्‍यात इतर देवतांची मंदिरे अशी ढोबळ माहिती आहे.सॅण्डस्टोन मधली ही मंदिरे खजुराहो मंदिरांच्या समकालीन असून या ठिकाणाला उत्तर भारता मधले खजुराहो म्हंटले जाते.

( प्रचेतस  यावर अधिक प्रकाश टाकू शकतात)

तुम्हीं जास्त माहिती साठी इंटरनेट आणी ASI च्या वेबसाईट बघा असे तो  उत्साही तरूण म्हणाला. त्याला भेटून आनंद  झाला. धन्यवाद  देत बाहेर  पडलो. 

टुर लिडर  लवकर  चलण्याची घाई करत होता. अंतर राज्य सिमा नाक्यावर तपासणी साठी वेळच लागणार  होता. 

काही मिनीटांच्या अंतरावर भिमा देवी मंदिर संकुल जे की आता पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे ते न बघता आल्याने अतिशय चुटपुट लागली.पण"किस्मत ज्यादा आणी समय से पहले कुछ भी नही मिलता",असा विचार करून मनाचे समाधान केले.

आमची मोठी बस पार्किंग मधे दाखल झाली. एक एक पर्यटकांनी आपपाल्या सीटवर बसून घेतले.उन खुप ,पायपीटही भरपूर  झालेली. तहानलेल्या जीवानीं बिसलेरीचे घोट भरायला सुरवात केली. नाष्टा तर केंव्हाच जिरला होता.फाड,फाड स्नॅक्सची पाकिटे फोडण्याचा आवाज  येवू लागला. ट्रिप मॅनेजरनी, सर्व पर्यटक आल्याची खात्री करून घेतली व पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान करण्याचा हुकूम  चालकाला दिला. पर्यटक पुन्हा गप्पात रंगले.

मी अंतरजालावर मंदिर संकुलाची माहिती शोधू लागलो.  बरीच माहिती मिळाली

चंदिगढ शिमला हे अंतर फक्त एकशे बारा कि. मी.आहे सगळा घाटरस्ता,गती सीमा चाळीस कि.मी.साधारण साडेतीन तासाचा प्रवास,मधे तासभर जेवण्यासाठी व थोडा वेळ चहा पाना साठी जाणार होता.दुपारचे बारा वाजून गेले होते.व्यवस्थित योजनाबद्ध प्रवास झाल्यास  पाच वाजेपर्यंत  शिमल्याला पोहोचण्याची शक्यता होती.

पिंजोर वरून गाडी निघाली.राष्ट्रीय महामार्ग नंबर पाच, पुढे बावीस,दोनशे पाच अश्या वेगवेगळ्या महामार्गवरून गाडी धावणार होती. चंदीगड → परवाणू → धरमपूर → सोलन → कंडाघाट → शिमला असा प्रवास. महामार्गाचा मेन्टेनन्स,साईन पोस्ट्स, शिस्त  वाखाणण्याजोगी आहे.वहाने एका ओळीत शिस्तबद्ध चालली होती. ओव्हरटेक ओव्हरस्पिडिंग करताना अजीबात आढळली नाहीत.अर्थातच,केवळ आणी केवळ घाट रस्ता असल्याने सर्व चालक सजग,सतर्क होते.परिणाम सर्व विदीत असल्याने स्वयंशिस्त पाळत होते. "अती  घाई संकटात  नेई,लवकर निघा,सुरक्षीत पोहचा,मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक",व तत्सम घोषवाक्ये लिहीलेली आढळली नाही. उलट परवाणू सिमावर्ती गावाजवळ हिमाचल प्रदेशात पेट्रोल, डिझेल  पंजाब, हरियाणा पेक्षा स्वस्त मिळेल अशीच पाटी लावलेली दिसली.

प११

प्रवास चालू होता. मी खिडकीतून बाहेर  बघत होतो. महिला मंडळ स्वमग्न होते तर काही पुरूष डुलक्या मारत होते. एका बाजूला डोंगर दुसर्‍या बाजूला दरी,जागोजागी भूस्खलनाच्या खुणा दिसत होत्या.भूस्खलन थाबवण्या करता सुरक्षा जाळी, कठडे,भिंती बांधणे,शक्य तिथे भराव टाकून रस्ता रुंदीकरण व अन्य सुरक्षा विषयक दुरस्तीची कामे चालू होती.डोंगरांची उंची आणी दरीची खोली वाढत होती.उंचावर जात असल्याचे लक्षात येत होते.खुप दिवसा नंतर निसर्गरम्य वातावरणात प्रवास होत होता.आठवणीतल्या एका कवीतेचे शब्द  कानात घोळू लागले.

अल्याड डोंगर,पल्याड डोंगर, 

मधेच खोल खोल दरी...

या दरीतून वाहे नदी, 

जशी चांदीचीच सरी..."

प९

अगदी असेच दृष्य होते. पंडोह धरणातून बाहेर पडणारे बियास नदीचे (व्यास नदी) पाणी,स्टेप फार्मिंग,डोंगरात वसलेल्या छोट्या टुमदार वस्त्या व घरावर हिरव्या,लाल रंगाची उतरती छप्परे बघून एकंदरीत वातावरण मिपाकर  चित्रगुप्त किंवा आमचे चौको भाऊ यांनी कॅनव्हासवर काढलेली निसर्गचित्रे वाटत होती.प्रचि बघून वाचकांच्या लक्षात येईल.

प१० 

प११

"परवाणू", हरियाणा-हिमाचल प्रदेश सीमेवरचे गाव.इथे वाहनांचे चेकिंग होते.गाडी नाक्यावर थांबली चालक गाडीचे कागद घेऊन ऑफिस मधे गेला.खिडकीतून बाहेर रानमेवा विकणारे लोक दिसत होते.मला जुन्या खंबाटकी घाटाची आठवण आली.जसे तिथे स्ट्राॅबेरी विकणारे तसेच इथे चेरी आणी खुरमानी विकणारे होते. फार गर्दी नसल्याने चेकिंग सोपस्कार लवकर पूर्ण झाले व गाडी पुढे निघाली.

तासाभरा नंतर गाडी धरमपूर गावातील "हाॅटेल हवेली",च्या पार्किंग मधे थांबली दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती.गाडी मधे पुन्हा एकदा हलचल तेज झाली. सर्वच जण खडखडले होते. शाकाहारी,सामिष भोजनावर तुटून पडले.गोड पदार्थात गुलाब जाम व मुंग दाल चा हलवा होता.भरपूर जेवण झाले. "आता गाडी सोलन मधे चहा साठी थांबणार आहे असे मधे अजीबात थांबणार नाही. गाडी मधे बसण्या आगोदर वाॅशरूमचा जरूर वापर करा", अशी प्रेमळ सुचना टुर लिडर ने सर्वांना केली. 

सामिष, गोड जेवणाने सर्वानाच झिंग चढली. थोड्याच वेळात बऱ्याच जणांची ब्रह्मांनंदी टाळी लागली.मी मात्र बाहेरचा निसर्गरम्य परिसर डोळ्यांत, कॅमेर्‍यात, भ्रमणध्वनीवर साठवून ठेवत होतो. गाडी धावत होती,डोंगर, दर्‍या, गाव मागे पडत होती. वळणावळणाचे रस्ते, वळणावळणावर छातीत धडकी भरत होती.

प१२

गाडी आता सोलन जवळ आली. मी जरी सोलन या गावाला पहिल्यांदाच भेट देत असलो तरी या गावाबद्दल  खुप सार्‍या जुन्या आठवणी जागृत झाल्या.जसे,मोहन मिकिन्स, सोलन नंबर  वन, ओल्ड माॅकं, गोल्डन इगल वगैरे. कायप्पावर मित्रांबरोबर या विषयावर गप्पा मारल्या.अगदी ऑफिसातले काम सोडून मिपाकर मित्रांनी हिरीरीने गप्पात भाग घेतला.सोलन पासून तीन किलो मीटर पुढे आल्यावर व्हॅली व्ह्यू शाॅपिंग काॅम्प्ल्याक्स समोर गाडी थांबली.डोंगर कड्यावरच्या  छोटेखानी हाॅटेल मधून खोल दरीचे रौद्र रूप दिसत होते. सर्वांनीच चहा,समोसा व सेल्फीचा आनंद  घेतला.जवळच असलेल्या स्नॅक्स सेंटर मधे फेरफटका मारला. दुकानदारांवर बरोबर डिस्टिलरी बद्दल चौकशी केली. फ्रुट वाईन चाखायला दिली.मग लाजेकाजेस्तव थोडी खरेदी केली.

गाडी पुन्हा शिमल्याकडे धावत निघाली.......

प१४

शिमल्याच्या वेशीवर आल्या नंतर गाडी रस्त्या लगत थांबली. इथून पुढे "हाॅटेल इस्ट बाॅर्न", राहाण्याचे ठिकाणा पर्यंतचा प्रवास छोट्या गाडीने झाला. सामान टेम्पो मधे मागाहून आले. 

संध्याकाळ झाली होती,हिरण्यकश्यपूचा वध झाला तीच वेळ.उंच देवदार वृक्षांच्या सावल्या घनदाट जंगलात एकमेकात मिसळून गेल्या होत्या.हाॅटेलच्या प्रवेशद्वारावर चौकिदार, मॅनेजर,वेटर्स आमच्या स्वागतार्थ उभे होते. रहाण्याचे ठिकाण बघून मन खुश झाले. घनदाट झाडीत लपलेल्या किलबिलाटाने लक्ष वेधून घेतले. सभोवार नजर भिरभिरत असताना समोर ब्ल्यू व्हिसलिंग थ्रश (पहाडी कस्तुरचंद,शिळकरी कस्तूर) आणी स्ट्रिक्ड लाफिंग थ्रश (कशमिरी नाव छोटा पेंगा, स्थानिक नाव शिना पिपाणी,याकूर) हे दोन पक्षी दिसले. प्रवासाचा थकवा निघून  गेला....

प१६

प१५

उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा समजून घेतली व रूम मधे गेलो.रात्रीचा मेन्यू मस्त होता. जेवल्यानंतर निद्रादेवीने अलगद कुशीत घेतले.........

चौकस चिंगी सारखे,निरीक्षण हा माझा स्थाई भाव आहे. जीथे जातो तीथे जरा हटके माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पहाता हाॅटेलचे मालक कोण,खाजगी,सरकारी, किती वर्षपुर्वी स्थापन झाले वगैरे चांभार चौकश्या करायची काही गरज नाही पण रहमान किडा स्वस्थ बसू देत नाही.हाॅटेल मधील फोटो गॅलरी मधे कै.रा.ब. श्री दिवान सिंह मदान,व  मिळालेल्या "रायबहादूर", या पदवी प्रमाणपत्रांच्या फोटोफ्रेम दिसल्या. रायबहादूर हे तत्कालीन मालकांचे पुर्वज,प्रिन्सली नाभा स्टेट मधील प्रतिष्ठित व्यक्ती होते.त्यांना ब्रिटीश सरकारने रायबहादूर ही पदवी दिली होती. पुश्तैनी जागेवर १९९२ मधे बांधलेले हाॅटेल समुद्र सपाटीपासून हाॅटेल साडेसहा हजार फुट उंचीवर आहे. हाॅटेलची रचना,रंगरंगोटी,पडदे, फर्निचर आणि प्रकाशयोजने मधे राॅयल टच दिसून येत होता. 

बिशप काॅटन शाळा जवळच,दोन चाकीने सहा सात मिनिटाच्या अंतरावर.डोंगर उतारावर,उंच सुचिपर्णी,देवदार वृक्षांनी वेढलेला,अतिशय निसर्गरम्य परिसर. मुख्य रस्त्याजवळ पण  कोलाहला पासून दूर. निरव शांतता कशाला म्हणतात ते इथे कळते.(utter serenity).सखोल वर्णन करण्याचा उद्देश असा की हे सर्व बघून मन प्रसन्न झाले.सकाळी लवकर उठून पक्षीदर्शन करण्या साठी परफेक्ट लोकेशन वाटले.नेहमी प्रमाणे,पाच वाजता डोळे उघडले. हात जोडले,

 "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती 

करमुले तू गोविंदम्,प्रभाते कर दर्शनम्",

सकाळी उठवल्याबद्दल भगवंताचे आभार मानले व प्रातस्मरणीय श्र्लोक पुटपुटत चहाचे सामान ठेवलेल्या टेबला कडे मोर्चा वळवला. 

​"आदौ रसना सौख्यमं,

ततः दन्तधावन-लीला,

तदनन्तरं अंगविक्षेप:, 

अन्ते च महा-उदरभरणम्!"

​"नास्ति चहात् परं सौख्यं",हे मात्र बरिक खरे हों

नित्यकर्म आटोपून खाली उतरलो.सहा वाजले होते. शुकशुकाट होता.स्वागतकक्ष कर्मचारी बसल्या बसल्या डुलक्या घेत होता. डायनिंग हाॅल कडे डोकावले.तिकडेही सामसूम होती.मला पाहता मुख्य प्रवेशद्वारावरील चौकीदार घुमटीच्या बाहेर आला. सुहास्य वदने अभिवादन केले.याचे कारण कालच त्याला मी पक्षी कसे ओळखतात याबद्दल शिकवले होते मोबाईल वर ॲप डाऊनलोड करून दिले.तो तेच पहात होता.मला म्हणाला "सर,हाॅटेलच्या   मागच्या बाजूला  जा हमखास  पक्षी दिसतील."

मी पण माझे ॲप सुरू केले व कॅमेरा घेऊन चालायला सुरुवात  केली.रस्ता छोटाच,डांबरी पंचेचाळीस डिग्री चढण, आसपासचा परिसर न्याहाळत चाललो होतो. किलबिलाट सोडला तर इतर कुठलाच आवाज   येत नव्हता. सर्वस्वी नवी जागा, पुण्यातील झाडाच्या तिप्पट उंचीची झाडे,कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत याचा अंदाज घेण्यासाठी ॲप कडे नजर टाकली. त्यात चार पक्षांची नावे दिसत होती,एकही ओळखीचा नाही.नजरेला पडावेत म्हणून एका जागी स्थिरावलो.

सकाळी सकाळी,एकाच ठिकाणी उभा,हातात कॅमेरा, भिरभिरणारी नजर,मला अशा अवस्थेत बघून, रस्त्यावरून जाणाऱ्या शिडशिडीत माणसाने विचारले "पक्षी बघताय काय? या माझ्या बरोबर." मी त्याच्या बरोबर चालू लागलो. आम्ही कोण,तुम्ही कोण झाले. "शिनपा",चा सेवानिवृत्त चिफ इंजिनियर होता.(जशी मनपा तशी इथली शिनपा) थोडे अंतर पुढे आल्यावर तो म्हणाला,"इथे थांबा, दाणे टिपयला पक्षी येतील",आणी पुढे निघून गेला.खरोखर थोड्या वेळात पक्षी जमा होऊ लागले.

पाचशे मिटर मधेच रेंगाळत राहिलो.बिशप काॅटन शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या टोळ्या रनिंग करत गेल्या.पि टी चा (फिजिकल ट्रेनिंग) तास असावा.नेहमीचे प्रभात फेरीवाले एकमेकाला जाता येता हाय,हॅलो करत होते.काही जणांनी विचारपूस केली, काही जण विचीत्र नजरेने बघत पुढे निघून गेले.

सारेच नवीन पक्षी, ग्रेट बारबेट,व्हर्डिटर फ्लायकॅचर, ग्रे ट्रिपी (Gray Treepee),ग्रे हुडेड वॅर्ब्लर,कबुतर,थ्रश वगैरे. 

पक्षांची दाणे टिपण्याची लगबग बघीतली.एक भांडकुदळ असावा तो इतरांच्यात न मिसळता जरा बाजूलाच दाणे टिपत होता.सारे पक्षी पोट भरल्यावर निघून गेले.आठ वाजता  "कुफ्रीला",जायचे होते.साडेसात वाजले होते.घाई घाई मागे फिरलो. 

पक्षांची काही प्रचि.....

^^^^^^^^^

का

नाष्ट्यासाठी मंडळी जमली होती.डायनिंग हाॅल मधे सर्व गोष्टी निटनेटक्या पद्धतीने मांडून ठेवलेल्या होत्या.हाॅलचे नाव "व्हर्टिगो", दोन बाजूला काचेच्या पारदर्शक भिंती,बाजूच्या खोल दरीतले पाईन, देवदार वृक्षांचे शेंडे इथे बसून सहज दिसत होते.पलीकडे शिमला शहराचे विहंगम दृश्य दिसत होते.मोठ्या सिट आऊट मधे "पिटोनिया, फ्लाॅक्स" फुलांच्या कुंड्या,बर्ड फिडर पक्षी, फुलपाखरे किटकांना आकर्षित करत होत्या.हाॅलचे नाव जरा विचित्र वाटले,"व्हर्टिगो",असे नाव ठेवण्याच्या मागे नक्की काय कारण असावे! तेंव्हाच कुणाला तरी विचारायला हवे होते पण नाष्टा व पक्षी यांच्या नादात साफ विसरलो.मला वाटते, कदाचित भोवतालचा निसर्ग,पक्षी आणी शांतता अनुभवत चविष्ट जेवणामुळे एक प्रकारची झिंग येत असावी म्हणून तर नाही?.

की

असो,सर्वजण कथा, कादंबरीत वाचलेल्या "कुफ्री", गावाकडे प्रस्थान करण्यास उतावीळ  झाले होते. सर्व पुणेकर मंडळी,शिमला थंड हवेचे ठिकाण असे प्राथमिक शाळेपासून घोकलेले.हायनेक स्वेटर्स,हुडिज घालून तयार होते.महिलांनी एक शाल जवळ ठेवली होती. मी मात्र एक जाडसर टी शर्ट आणी जीन्स घातली होती. छोट्या गाड्या तयार होत्या.ट्रान्सपोर्ट लिडर मात्र बरमुडा, गोल गळ्याचा टी शर्ट व चपला घालून फिरत होता. चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते की शिमला आता शिमला राहीला नाही.सांगत होता,"बिशप काॅटन शाळे जवळ एकच घर होते, आता भरपूर वस्ती झाली आहे".वाहन चालक त्याच गल्लीत वाढलेला होता.त्याने जुने घर सुद्धा दाखवले. घराचे वय आणी संरचना पहाता शंका घेण्यास जागा नव्हती.इतर घराच्या मानाने हे एकच घर वेगळे दिसत होते.

सोळा कि.मी.प्रवास होता.कुफ्री भारत-तिब्बत रोड वरचे एक निसर्गरम्य ठिकाण.पुर्वी हा भाग नेपाळ मधे होता. तत्कालीन नेपाळ नरेशने केलेल्या साम्राज्य विस्तारामुळे ब्रिटीशांचे लक्ष वेधले गेले १८१९ मधे "सुगौल", रणभूमीवर ब्रिटिश सैन्याने गोरखा सैन्याला धूळ चारली. सुगौल संधी तहा अंतर्गत हा प्रदेश भारताशी जोडला गेला.याच मार्गावर"जतोंग",छावणी आहे.याचा सुद्धा मोठा इतिहास आहे. पण पुन्हा कधीतरी.साडेसहा हजार फुटावरून आठ हजार फुट उंचीवर चाललो होतो. पर्यटकांना "माऊंटन सिकनेस",चा त्रास होत नव्हता ही  जमेची बाजू होती.

ऐंशी व नव्वदच्या दशकात जम्मू रेल हेड होते. तिथून पुढे सर्व प्रवास बसने करावा लागत असे. रस्ते छोटे व दुर्गम. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्या सैनिकांना माऊंटन सिकनेस बद्दल सुचना दिल्या जायच्या.पत्नीटाॅप (उधमपुर जवळच्या एका शिखराचे नाव आहे) ते काझीकुंड हा प्रवास तर "गोल गोल राणी", खेळा सारखा असायचा.काहीजण खाणेपिणे टाळायचे.जम्मू ते कारगिल, केरण, गुरेज,तंगधार, बुधखरबू, लेह मधे कार्यरत असलेल्या सैनिकांना आठ ,दहा कधी विस,विस दिवस थांबत थांबत प्रवास करावा लागत असे. "विंटर स्टाॅकिंग",ही एक मोठी ॲक्टीव्हिटी,मे ते आक्टोंबर च्आया दरम्यान पुर्ण करावी लागत असे.आता ऑल व्हेदर थेट रेल आणी रोड झाल्याने सैन्य आणी नागरी दळणवळण बरेच सोपे झालेय आहे.दिल्ली ते श्रीनगर, बारामुल्ला पर्यंत सरळ ट्रेन आहे.तंत्रज्ञानामुळे अंतरही कमी झाले आहे.सलग प्रवास सुखकर झाला आहे.कुशल इंजिनियर,तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने हे साध्य  झाले आहे.मला तर नवल वाटते.आजही पिरपंजाल पर्वताचे रौद्र रूप आठवते. ते खुनी नाले,जागोजागी छोटी मंदिरे,पिर बाबा..... आणी त्याच्या बद्दल वरिष्ठांकडून ऐकलेले किस्से....... असो, पुन्हा एकदा तसेच वातावरण बघून माऊंटन सिकनेस नाही पण नॉस्टॅल्जिया जरूर झाला. 

मिपावर "ओव्हर हाइप्ड",हा शब्द बोकाळलाय.मला वाटते कुफ्री सुद्धा ओव्हर हाईप्ड टुरिस्ट डेस्टीनेशन आहे. (वाक्य रचनेमुळे भारी वाटू लागलय) का ते नंतर  सांगतो.

साडेआठ वाजता निघून कुफ्री ॲडव्हेंचर ॲण्ड स्नो पार्कला साडेदहाला पोहोचलो.पर्यटकांचे स्वागताच्या साठी विवीध सहासी खेळ तयार होते.एक वाजेपर्यंत मनसोक्त खेळायला मिळणार होते.झिप लाईन,हाॅन्टेड हाऊस,डॅश कार,बंगी जम्प,फाईव्ह डी मुव्ही,इनफिनीटी रूम वगैरे वगैरे.पर्यटकांनी राख्या (Wrist Band) बांधून घेतल्यावर वयोगटा नुसार आपापल्या आवडीच्या खेळाकडे पांगले. तैनात कर्मचारी बॅण्डवर सही करत होते. रिस्ट बॅण्डची युक्ती कोणी शोधली असावी? बरेच ठिकाणी हे बॅण्ड बांधताना बघीतले आहे. यामधे एकच गोष्ट  दोन वेळा करता येत नाही.आजकाल बहुतेक सर्व खेळ पर्यटन स्थळांवर उपलब्ध असतात. "पुलंची", आठवण आली. ते जर आज बरोबर असते तर म्हणाले असते."शिंच्या,हे काय रें,आमच्या रत्नांग्रिस सुद्धा हे सगळं आहे बरं का! इतक्या लांब येवून कशास एवढ्या दमड्या खर्च करायच्या", किंवा असेच काहितरी. 

कुफ्री मधील निसर्ग सौंदर्य सोडले तर बाकी विशेष काही नाही. म्हणून मला ओव्हर हाईप्ड वाटले.मी सर्व खेळ खेळून चुकल्याने असे वाटत असेल.

कदाचित पर्यटन स्थळांचे सुद्धा वय असते असे म्हणावे लागेल. सहप्रवाशांमधे एक नवविवाहित जोडपे, स्वमग्न, आलौटेड सिटवर न बसता शेवटच्या सिटवर बसायचे. कुणाशी फारसे घेणे देणे नाही. तेव्हढ्या पुरते हाय,हॅलो करून कोषात जात होते.बाकी अनुभवी कुटुंबवत्सल मुलां नातवंडा बरोबर तर कुणी समदु:खी, गट्टी जमली त्यांच्या बरोबर असे विभागले होते.

थोड्यावेळा पुरते का होईना मन कोल्हापूरास फेर फटका मारून आले.आणी,अर्थात फेमस गाणे आठवले जे लग्नापूर्वी एकमेकास हमखास  विचारले जाते.....

"लोणावळा, खंडाळा,

कोल्हापूरचा पन्हाळा

बेंगलोर, गोवा नि काश्मिरला

कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?"

मला फक्त विस दिवस सुट्टी मिळाली होती. सत्यनारायण, गोंधळ व इतर धार्मिक कार्यक्रमा  मुळे वेळ कमी होता म्हणून आम्हीं जवळचेच कोल्हापूर,पन्हाळा ऑप्शन पसंत केले.तेंव्हा झाशीला कार्यरत होतो,नंतर "खजुराहो ", फ्रिक्वेंट डेस्टीनेशन झाले होते.

आलोच आहोत तर एक दोन खेळ बघू. हाॅन्टेड हाऊस, फाईव्ह डी मुव्ही बघीतली आणी बंगी जम्पच्या समोरच्या बाकड्यावर येवून बसलो. जाडे भरडे,लुकडे सुकडे,मोटे नाटे,लहान थोर सर्व जण "पहले आप,पहले आप" करत बंगी जम्पचा आनंद घेत होते. बरोबरचे चित्रीकरण करत होते.  जवळच्या दुकानात विंण्डो शाॅपिंग करावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला. हिमाचल स्पेशल ड्राय फ्रुटस्,ज्यूस, जाम, केसर,पहाडी बदाम,पहाडी लसूण,ॲपल बर्फी,किवी बर्फी       जडीबुटी, शिलाजित(खलमकडा) व इतर अनेक गोष्टी विकायला होत्या.पर्यटन स्थळावरचे दुकानदार हुषार असतात. त्यांना माहित असते कोणाला काय दाखवायचे. आम्हांला त्यानी पहाडी लसूण, हृदय, किडनी, लिव्हर वर किती गुणकारी आहे याचे गुणगान केले. तर लहान मुलांबरोबर असणाऱ्यांना कुटुंबाला घरगुती चॉकलेट्स कशी हेल्दी आहेत या बद्दल  बौद्धिक देत होते.आम्हीं थोडे ड्राय फ्रुटस् व लसूण खरेदी केला. (लसूण,बारीक सुपारीच्या आकाराचा गोल,खालून चपटा व आतमधे मोतीया कलर असा असतो.सोलून ठेवला तर मोती म्हणून कुणी सहज फसेल)

एकाने अंबा बर्फी घेतली.कहर....शोले मधला असरानीचा डायलॉग आठवला "जेल मे सुरूंग." पुणेकर कुफ्रीमधे अंबाबर्फी घेतो म्हंजे कहरच......अर्थात कुणी,कुठे,काय घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

एक वाजला आला होता,जेवण्यासाठी प्रस्थान केले. जेवण उत्तम होते.बाजूच्या खिडकीतून कुफ्री शहराचे सुंदर दृश्य दिसत होते.

चिनी महाल,हिमालयन प्राणी संग्रहालय व ओव्हर हाईप्ड The Mall road, Scandal Point and Shimla Church ही प्रेक्षणीय स्थळे उर्वरित दिवसाचे लक्ष होते.पर्यटक गाडीमधे बसले आणी गंतव्य स्थाना कडे अग्रेसर झाले.

कु

चिनी महाल.

कुफरी जवळ चीनी बंगला एक ऐतिहासिक, ब्रिटिश कालीन वास्तू आहे.मागे उंच पर्वत शिखरांची रांग आणी अद्भुत निसर्गरम्य परिसर आहे.स्थानिक व ब्रिटीश वास्तुकलेचे अद्भुत मिश्रण बघायला मिळते.संपुर्ण महाल लाकडी आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महाराजा पटियाला भुपेंदरसिंह यांनी चिनी मूलच्या पत्नीसाठी हा बंगला बांधला होता.भारत व पाकिस्तान मधे सन बहात्तरचा "शिमला समझौता", इथेच संपन्न झाला. ख.खो.दे.जा. प्रधानमंत्री इंदिरा गांधी शिमला येथील वास्तव्यात इथे रहाणे पसंत करत. बंगल्या समोर दोन भूर्ज पत्राची झाडे आहेत. पर्यटनस्थळ,स्थानिक विक्रेते भरपूर आहेत. 

हिमालयन प्राणी संग्रहालय 

चिनी बंगल्या शेजारीच प्राणी संग्रहालय आहे. डोंगराळ भाग चढ उतारावर प्राण्यांचे,पक्षांचे आवास बांधलेले आहेत.कमी जास्त प्रमाणात इतर प्राणी संग्रहालया सारखेच हे  संग्रहालय आहे.

सांगण्या सारखी गोष्ट इथे "ओरिऐंटल टर्टल डव्ह", (खवलेदार होला, तामकवडा) आणी "मुनाल",(हिमाचलचा राज्य पक्षी) त्यांच्या नैसर्गिक अधिवासात दिसले  ना की प्राणी संग्रहालयाच्या खुराड्यात."ओरिऐंटल टर्टल डव्ह" यांची जोडी प्रेम करताना दिसली.

कु

ओरिऐंटल टर्टल डव्ह. 

पुण्यामधे लाफिंग डव्ह व अम्रीकेत मोर्निग डव्ह  बघीतले आता हा तिसऱ्या प्रकारचा डव्ह दिसला.तिन्ही प्रकारचे पक्षी,आकार,रंग व खास चिंन्हामुळे सहज ओळखता येतात. टर्टल डव्हच्या गळ्यावर स्कार्फ सारखे पट्टे असतात. विषयांतर नको. 

मुनाल पक्षी आपल्या कडील मोरासारखा रंग बिरंगी असतो.मोर आणी लांडोर प्रमाणेच नर मुनाल खुप सुंदर,डोक्यावर हिरवा तुरा, लाल मान बाकी अंग मोरपंखी, शेपटीचा रंग नारंगी सोनेरी असतो.मादा मुनाल ही तेव्हढी सुंदर नसते.तीचा रंग तपकिरी असतो.इच्छुकानी  स्पष्ट कल्पना येण्यासाठी अंतरजालावरील प्रचि बघावे. 

सुर्यास्ताची वेळ होती. पूर्वनियोजित पार्किंग मधे बस पोहचली. येथून पुढे छोट्या गाडीने प्रवास होणार होता. 

शिमला पर्वतीय क्षेत्रात वळणावळणाचे,अरुंद आणि शांत रस्ते आहेत.जणू मोठ्या पायर्‍या. बरेच ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही.नगर निगमने प्रदूषण नियंत्रणा साठी नो व्हेईकल झोनस डिक्लेअर केले आहेत. वाहने, गर्दी,शार्प टर्न, हेअरपिन बेंण्ड मुळे वहातूक कोंडीचा सामना बरेच वेळा करावा लागतो. माॅल रोडवर वाहनांना प्रतिबंध आहे. माॅल रोडवर जाण्यासाठी शिमला नगर निगमने दोन उदवाहक (Elivators) लावले आहेत. पर्यटक, स्थानिक सर्वांनाच या उदवाहकांचा वापर करावा लागतो.भयंकर गर्दी असते.आम्ही रांगेत उभे राहीलो. व्यवस्थापन उत्तम होते. लवकरच आम्ही रोडवर पोहचलो जणू तळ मजल्यावरून दहाव्या मजल्यावर गेल्या सारखे.

रोडच्या सुरूवातीलाच बरेच लोक लहान मुलांच्या बाबा गाड्या (Stroller) घेऊन उभे होते.हे कशासाठी!,रहावले नाही, विचारले. गंमतशीर उत्तर मिळाले.इथे कुठलेही वाहन आणण्यास प्रतिबंध आहे. लहान मुल बरोबर असल्यास या बाबा गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात. तिथेच बँकर्स शाॅपमधे प्रत्येकाच्या  पसंतीचे चहा,काॅफी,पॅटिस,समोसा आणी पेस्ट्रीज फस्त केले व माॅल रोडवर चालायला सुरुवात केली. दोन्ही बाजूला विवीध प्रकारची दुकाने.शहरातील बाजारपेठ,प्रचंड गर्दी जणू पुण्यातल्या लक्ष्मी रोड वरील गणपतीची मिरवणूक,फक्त ढोल ताशे व गुलाल नव्हता.असो पण खुप मजा आली.दोन तास फिरलो. क्राईस्ट चर्च, स्कॅण्डल पाॅईंट,गेऐटी थिएटर बघीतले. अर्थात बाहेरूनच.विंण्डो शाॅपिंग करून उदवाहकाने पार्किंग मधे परत आलो.माॅल रोडचा संक्षिप्त इतिहास व भूगोल  काही माहित असलेला काही अंतरजालावरील माहितीनुसार खाली वाचकांसाठी दिलाय.

द माॅल रोड

के

मैदानी कडक उन्ह सहन होत नसल्यामुळे साहेबांनी उन्हाळ्यात मसूरी,नैनिताल,शिमला, मनाली अशा पर्वतीय शहरात तात्पुरती वस्ती केली.मनोरंजन,सकाळ संध्याकाळ फिरणे,खरेदी, सोशलायझिंग साठी थिएटर्स,क्लब बनवले. साहेबांची गरज भागवण्यासाठी व्यापारी इथे पोहोचले. सुरवातीला ऐत्तदेशीय लोकांना इथे येण्यास प्रतिबंध असे.आता हेच माॅल रोड पर्यटकां साठी प्रेक्षणीय स्थळ  बनले आहे. 

को

शिमल्यातील माॅल रोड आणी रिज रोडच्या वळणाला स्कॅण्डल पाॅईंट म्हणून ओळखतात. ब्रिटिश मुलगी महाराजा बरोबर पळून गेली म्हणून हे नाव पडले असे अंतरजालावर कळाले."माॅल रोड शिमला", अधिक माहिती साठी गुगल सर्च करावे.

कौ

१८८७ मधे "गेएटी थिएटर", मनोरंजनासाठी बांधले ते ही माॅल रोडवरच आहे. 

कौ

माॅल रोड, लक्कड बझार जवळचे क्राईस्ट चर्च, १८५७ मधे बांधलेले प्रार्थनास्थळ गोथिक वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. 

दूरSsssss.. दर्शन.

पर्यटन करताना, काही प्रेक्षणीय स्थळे जवळ असतात पण वेळे अभावी,किंवा बकेट लिस्ट मधे नसल्याने बघता येत नाहीत. पण जाता जाता सहज त्यांचे दर्शन घेता येते.अशा काही जागा,

शिमला हवाई अड्डा.

जुबारहट्टी,घरेलू हवाई अड्डा डोंगरमाथा कापून बनवलेला आहे.टेबल टाॅप क्ष्रेणीत येतो. कुफ्री जाताना त्याचा एरियल व्ह्यू दिसतो. खराब मौसम,पुअर व्हिजिब्लिटी या ना त्या कारणाने उडाने बहुतेक वेळा रद्द होतात. त्यापेक्षा रोड कनेक्टिव्हिटी खुप चांगली आहे. 

चैल पॅलेस.

थ्रि इडियट्स चित्रपटाचे शेवटी रणछोडदास छांछड याच्या शोधार्थ बाकीचे मित्र येतात तो हाच शानदार पॅलेस. बाहेरचे चित्रीकरण याच बंगल्यासमोर तर आतले छायाचित्रण दुसरी कडे कुठेतरी झाले.

महाराजा भुपेदर सिह,पटियाला यांना लाॅर्ड किचनरने शिमल्या मधून निष्कासित केले. १८९१ मधे महाराजांनी शिमल्यापेक्षा जास्त  उंचीवर  हा पॅलेस बांधला.कुफ्री जाता जाता हा पॅलेस  लांबून दिसतो. महाराजा पटियाला आपल्या शानदार जीवनशैली साठी जगभर प्रसिद्ध होते. चाळीस रोल्स राईस( Roles Rails car) गाड्या यांच्या गॅरेज मधे होत्या. "पटियाला पेग,पटियाली सलवार,लस्सी दा ग्लासा", अशा अनेक गोष्टी प्रिन्सली स्टेट्स  पटियाला बरोबर जोडल्या गेल्या आहेत.

सरते शेवटी,हाॅटेलवर परत आलो.खुप दमलो होतो. पाठ टेकताच निद्राधीन झालो.....

बाकी पुढे...

केले.

अ   हिमलयन बुल्बुल    अलालबुड्या बुलबुल

https://www.misalpav.com/tourism/53715 -१

https://www.misalpav.com/tourism/53727 -२

https://www.misalpav.com/tourism/53743 -३

https://www.misalpav.com/tourism/53761 -४

सरते शेवटी,हाॅटेलवर परत आलो.खुप दमलो होतो.पाठ टेकताच निद्राधीन झालो.....

आता पुढे...

मागील एका भागावर मिपाकर कंजूस भाऊंनी प्रतिसादले आहे कि त्यांना पॅकेज्ड टुर आवडत नाही.बरेच बघायचे राहून जाते.मी त्यांच्या मताशी सहमत आहे.परंतू ज्याना भटकंती मधे जास्त रूची नाही.कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवायचा आहेत. डोक्याला ताप नको आहे वर्षभराचा शिणवटा घालवून स्वताला रिचार्ज करयचे आहे आशा लोकांसाठी पॅकेज्ड टुर  चांगले ऑप्शन आहे.काय बघायचे,हाॅटेल, गाडी, विमान,रेल्वे टिकट बुकिंग अशा गोष्टींवर विचार करायला वेळ नसतो त्यांच्या साठी प्रवासी कंपन्यांकडून सर्व सोयी उपलब्ध केल्या जातात. याचे सुद्धा काही फायदे आहेत. नवीन ओळखी होतात,मित्र मिळतात,सर्वसमावेशक गुण वाढतो.बिझनेसची जाहिरात होते ,ग्राहक मिळतात इत्यादी, इत्यादी.  असो....

आज २६ मे,कालच्या प्रमाणेच  लवकर उठून बाहेर पडलो.गुलाबी थंडी होती आणी नव्हती पण.निरव शांतता.कालचे सद्गृहस्थ आज पुन्हा भेटले.आजच्या सकाळच्या फिरण्यात हिमालयन बुलबुल, ब्लॅक बुलबुल,रोफस सिबीया दिसली(पुण्याकडील ब्राह्मणी मैना, भांगपाडी मैने सादृश्य दिसते) 

अ              अ लाल गाल्या,लालबुड्या बुलबुल सर्व भारतात दिसतात त्यांचा पिछवाडा लाल असतो. तर  हिमालयन बुलबुल फक्त हिमाचल,उत्तरांचल   तत्सम प्रदेशात आढळतो.त्याचा पिछवाडा पिवळा असतो.

भगवान भी नाॅटी बाॅय से कम नही.....

इथे संदिप खरे यांची कवीता आठवली,

"देते कोण,देते कोण,देते..."

अबाय बाय शिमला......... आज शिमल्यातील तंबू गोळा करून मनाली कडे प्रयाण करायचे होते.बिलासपूर,सुंदरनगर मंडी हा भाग हिमालयाच्या सखल भागात तर कुल्लू, मनाली,रोहतांग हे अनुक्रमे चढत्या भाजणीने  उंचीवर असलेल्या जागा.त्यामुळे चढउताराचा प्रवास होता.मण्डी बिलासपूर, सुंदर नगर, हा भाग "सुकेत घाटी", म्हणून ओळखला जातो.कुल्लु शहर, पंडोह धरण,सतलुज बियास परियोजना आणी बरेच काही दिसणार होते,प्रवास बियास नदीकाठाने झाला ,तो थेट उगमस्थान पर्यंत.याचे वर्णन पुढे येईलच. 

छोट्या गाड्या हाॅटेल बाहेर तयार होत्या. स्टाफ  सुहास्य वदने निरोप देण्यासाठी उभा होते. बस थांब्यावर सर्व पर्यटक पोहचले. पुढचा प्रवास सुरू झाला.हिमालयाचे निसर्ग सौंदर्य लक्षात येण्यासाठी काही प्रचि गाडीत बसल्या बसल्याच काढली आहेत.

अ        अ 

अ अ

अ अ

अ अ

पर्यटक गप्पात गुंतले व नंतर पेंगुळले.लहान मुले,चारच होती पण दंगा चालू होता.तीन दिवसात चांगले मित्र झाले. एकमेकाला उपनावे दिली.विकी कौशल,अरिजीत सिंग, कियारा अडवाणी वगैरे.त्यांचे या बद्दलचे तर्क अजब होते पण संयुक्तिक वाटले. 

पर्यटकांमधे जोश भरावा या उद्देशाने टिम लिडरने अंताक्षरी खेळण्याचा प्रस्ताव मांडला व आज माझी मॅरेज ॲनव्हरसरी आहे सांगून एक गाणे म्हणले.पर्यटक भावूक झाले. सर्वानी त्याला शुभेच्छा दिल्या.(प्रवास संपल्यावर  टिम लिडरला खोपच्यात घेतले व खरे सांगा खोदून खोदून विचारले.शेवटी ट्रेड सिक्रेट  म्हणून गौप्यस्फोट केला.अर्थात ते मी कुणाला सांगीतले नाही.) दोन ग्रुप मधे चढाओढ सुरू झाली.वयवर्ष पाच ते पंच्याहत्तर सारे सक्रिय झाले व आपापल्या जनरेशनची गाणी म्हणू लागले.

सात वर्षाच्या अरिजीतने, "निघालो घेऊन दत्ताची पालखी", हे गाणे अत्यंत ताला सुरात म्हंटले.आई बाप धन्य झाले. पुढे त्याचे "हे सुरांनो चंद्र व्हा",गाणे ऐकून तर मी त्याला डोक्यावर घेतले. मुलाचा आवाज  गोड आहे म्हंजे जनुकीय प्रभाव आहे,समजले आईबाप दोघेही चांगले गायक,सोलो, डुयेट अशी एकामागोमाग एक गाणी म्हणून मैफिल सजवली.वरिष्ठ पर्यटकांनी आपली भडास निकाली."तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही...., हम तुम्हें चाहते है ऐसे....".समां बांधला.अंताक्षरीचे समापन गाणाऱ्या जोडप्याने नवविवाहित दांपत्यासाठी एक डुयेट गावून केला.

"गाता रहे मेरा दिल,तू ही मेरी मंझील".

चाहते,चाहते, सुनते,सुनते सर्वांना चहाची तल्लफ आली आणी पंण्डोह धरण ओलांडून गाडी बियास  व्ह्यू पाॅईंट वर चहासाठी गाडी थाबंली.चहा ब्रेकनंतर पुन्हा प्रवास सुरू झाला.दुपारचा एक वाजला,गाडी जेवणासाठी थांबली. मस्त  जेवण झाले.साधारण चार वाजता बिलासपूर, मंडी शहर मागे टाकत "आर के शाॅल", दुकाना समोर गाडी उभी राहीली.तिन्ही बाजूला उंच उंच डोंगर,जवळच पार्वती नदीचा खळाळता प्रवाह.निसर्गरम्य वातावरण.चहा ब्रेक नंतर शाॅपिंग.

हिमाचली टोप्या,जॅकेट, शाल,स्वेटर्स आणी घरगुती बनवलेल्या लोकरीच्या कलाकृती विक्रीस उपलब्ध होत्या.पर्यटकांना अकर्षित करण्यासाठी हातमागावर शाल विणण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली. बहुतेक तरूण मंडळी  हातमाग नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होते. मी आणी दोन वरिष्ठांना मात्र याचा पूर्वानुभव होता.

अ अवांतर.

माझ्या शालेय शिक्षणात इयत्ता चौथी हे फार महत्त्वाचे वर्ष,चौथी ते सातवी विणकाम हा नवीन विषय अभ्यासक्रमात शिकवला जायचा

गुरूजी ,शेवटच्या तासाभरात कापूस बोंडातून सरकी काढणे,तो धनुकली ने स्वच्छ  करणे, त्याचे पेळू बनवणे,टकळीवर किंवा चरख्यावर सुत कतणे ही सर्व कामे विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचे.पुढे कातलेल्या सुताचे गुंडे बनवणे. ताणा-बाणा बनवून हातमागावर चढवणे. धोट्यावर,लाकडी सहा इंची वस्तू,सुत गुंडाळून  त्याला ताणा-बाणा मधून इकडून तिकडे पळवणे..... हुश्श, चौथी ते सातवी याचे मार्क मिळायचे. वर्गाततली काही निवडक मुलेच फक्त  हे काम करायची. गुरूजींनी सुद्धा किती चांगले कापड विणले याची नोंद परफॉर्मन्स अप्रायजल व्हायची.

असो, विषयांतर झाले.

आमचे कुटुंब खरेदी करता गेले.मी बाहेर टेहळणी करत होतो. उंच आकाशात घारी घिरट्या मारत होत्या. दूर डोंगरावर कापशी घार बसलेली दिसली. तिथेच एक महाकाय घार दिसली. तिचाही फोटो घेतला.नंतर ओळख परेड मधे निरखून बघताना ती सामान्य घार नसून दुर्मिळ असा तो काळा गरूड (Black Eagle)होता.  कॉर्नेल युनिव्हर्सिटीने सुद्धा याची पुष्टी केली. एक आणखीन दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाल्याने पर्यटनाचा आनंद द्विगुणित झाला हे वेगळे सांगावयास नकोच.

अ पर्यटकांनी बरीच खरेदी केली. सामानाची गुणवत्ता चांगली होती.पुण्यासारख्या समशीतोष्ण ,मैदानी भागात फारसे उपयोगी नव्हते. हौसेला मोल नाही......

टिम लिडरने उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगायला सुरूवात  केली. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजताच निघायचे होते. वसिष्ठ मंदिर, रोहतांग खिंड आणी अटल टनल बघणार होतो. इतक्या लवकर का निघायचे याचा तपशील पुढच्या भागात सांगतो.

"रोहतांग खिंडीला भेट देण्यासाठी विशेष  गरम पोशाखाची गरज आहे जसे "रूपा के थर्माकोट",लोकरीचे हातमोजे,पायमोजे,गरम हायनेक स्वेटर्स,छत्री स्नो चष्मा वगैरे आणी ते सर्व तुम्हीं आणले असेलच",आशी उद्घोषणा करून IED टाकला.पर्यटक अस्वस्थ झाले. "इथेच कुठे तरी गाडी थांबवा,गरम कपडे वगैरे खरेदी करूया",आणी तत्सम मागण्या सुरू झाल्या.काहीजण म्हणाले,"मनाली,माॅलरोड वर सर्व मिळेल,आपण तिथे घेवू",माॅलरोड दहा वाजता बंद होतो सांगून आणखीन एक ब्लास्ट केला. वातावरण तंग झाले.

मग मी उठून समोर आलो.ओळख दिली. स्नो बाऊंड भागातला माझा अनुभव सांगीतला. पर्यटकांना आश्वस्त केले. "साधारण स्नो फाॅल मार्चनंतर बंद होतो.तापमान वाढते,बर्फ वितळायला सुरूवात होते.दिवसा बर्‍यापैकी गरम असते.वाहती हवा असेल तरच हाडे गोठवणारी थंडी असते अन्यथा वातावरण सुखकर असते. तेव्हां घाबरण्याची गरज नाही. जास्त  गरम कपड्याची अवशकता भासणार नाही". थोडी अस्वस्थता कमी झाली.

टिम लिडरने नंतर स्पष्टीकरण देत म्हणाला," या भागात हवामानातील बदल अनपेक्षित असल्याने व ते कधी बदलेल याचा भरवसा नसल्याने आम्हीं पर्यटकांना अधिकच्या सुचना देतो".पुन्हा पर्यटक माझ्याकडे बघू लागले.मी म्हणालो"हवामान बदलण्याचा भरवसा नसतो हे बरोबर आहे पण बेभरवशाचे बदल फक्त ऋतूचक्र बदलताना,शिशीर संपलाय, वसंतही आपला मुक्काम लवकर हलवण्याची चिन्हे दिसत आहेत.आजचे तापमान बघता ग्रीष्माची चाहूल स्पष्ट दिसत आहे. काळजी करू नका.

पुढे लिडरने सांगीतले,"फर", का ओव्हरऑल ड्रेस,स्नो गाॅगल,स्नो बुट ,हातमोजे,पायमोजे भाड्याने मिळतील.पर्यटकांचा जीव भांड्यात पडला.तरीही मी पुन्हा म्हणालो याची गरज नाही.इतके गरम होणार की काढुन फेकून द्यावे लागेल.उद्या दुपारी आपण या विषयावर बोलू.

अ अवघ्या सहा सात तासांचा प्रवास पण चहा पाणी,खाणे पिणे व बियास व्ह्यू पाॅईंट असे बघत बघत मनालीच्या वेशीवर पोहचण्यास संध्याकाळचे साडेसात आठ वाजले.इथे सुद्धा भरपूर यर्यटकांची गर्दी,तंग रास्ते असल्यामुळे मुख्य  बस थांब्यावर जायला एक तास व हाॅटेलवर छोट्या गाडीने जायला पाऊणतास लागला.साडेनऊ वाजता हाॅटेल वर पोहोचलो. काही यात्री माॅल रोडवर उतरले.

सकाळी तीन वाजताच निघायचे असल्याने लगेच बिस्तर पकडला.......

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...