Sunday, September 27, 2026
http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete
"'Indian Temples" incomplete back up
Location: Mahad village of Raigad District,MaharashtraBuilt in: 1725 AD
Built By: Subedar Ramji Mahadev Biwalkar
Dedicated to: Lord Ganesha
Entry:Free
Photography:Not Allow
Significance: one of among Ashtavinayak temple
Temple Timing: 5Am to 10Pm
Visiting Timing: 1 Hour
Best time to Visit: During Ganesh Chaturthi
Phone : +91-2192-266912
Nearest Railway Station: Chiplun Railway station
Nearest Airport: Mumbai Airport
About Varad Vinayak Temple
Varad Vinayak Temple looks like a house with a tiled roof. There is a Gomukh towards north with Holy water coming out of it. A small lake lies at the west. The temple is only 2.5 meters long and 2.5 meters broad. Dome is 8 meters high with a golden pinnacle. The sanctum of the temple, made up of stone and surrounded by beautiful elephant carvings, houses the idol.
Other Ashtvinayak Temple in Maharashtra
- Mayureshwar Temple at Morgaon, Pune
- Ballaleshwar Temple in Pali Raigad
- Chintamani Temple at Theur, Pune
- Girijatmaj Temple at Lenyadri, Pune
- Vighnahar Temple at Ozar, Pune
- Mahaganapati Temple at Ranjangaon, Pune
- Shri Siddhi Vinayak, Siddhatek
- Triambakeshwar Temple
- Girijaatmaja Vinayak Temple
- Chintamani Vinayak Temple
- Bhimashankar Temple
- GrishneshwarTemple
AC room: 1200/-
AC deluxe room: 1800/-
2. Motel Visava
3. Hotel Kuber Palace
There are 16 rooms with attached baths.
Wednesday, September 23, 2026
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com back up
धनत्रयोदशी
*💎💎 धनत्रयोदशी 💎💎*
*आश्विन वद्य त्रयोदशी*
*… भावार्थ …*
‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो.
*… व्यावहारिक…*
हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते.
*…आध्यात्मिक…*
या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. *त्यामुळे साधना करणार्या जिवासाठी हा दिवस ‘महापर्वणी’ समजला जातो.*
*…… महत्त्व……*
*…या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते.* या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
…धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.’
… या दिवशी श्री विष्णूच्या अप्रकट शक्तीच्या आधारे श्री लक्ष्मीची उजवी नाडी कार्यरत होऊन त्यातून उत्पन्न होणार्या तेजतत्वात्मक लहरी वेगाने ब्रह्मांडाकडे झेप घेतात. लक्ष्मीतत्वाच्या उजव्या नाडीच्या कार्यरत अवस्थेमुळे या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील वायूमंडल हे सोन्यासारख्या चमचमणार्या सोनेरी कणांनी उजळून निघालेले असते. या चमचमणार्या सोनेरी कणांतील श्री लक्ष्मीचे चैतन्य जिवाला मायेतील ऐश्वर्य प्रदान करून त्याच्या साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करते; म्हणून या दिवशी धनाच्या रूपात श्री लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. श्री लक्ष्मीच्या भावपूर्ण पूजेमुळे प्रत्यक्ष धनाच्या अधिपतीचे, म्हणजेच कुबेराचे पृथ्वीच्या कक्षेत आगमन होते.
… पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून
खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा
यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून
राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न
करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा
विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.
〰〰〰〰🔥〰〰〰〰
*संकलन - निखिल आघाडे ९७६३५०६०४०*
*🏺🏺धन्वंतरि जयंती🏺🏺*
*श्री धन्वंतरि देवता*
〰〰〰〰〰〰
*धन्वंतरि जन्म*
‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धन्वंतरि एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्या हातात ‘जळू’, तिसर्या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. (समुद्रमंथनातून बाहेर आला.) या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतो
*पूजन*
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात.
कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून
लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली
आहे. धन्वंतरि हा अमृततत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची
पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे
कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून
देण्यात येतो
〰〰〰〰🏺〰〰〰〰
*संकलन - निखिल आघाडे ९७६३५०६०४०*
*यमदीपदान*
प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) (टीप २) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
*मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।*
*त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।*
अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.
‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्या अर्थाने त्यांना प्राप्त होत नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्षमिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’
*धनत्रयोदशी कथा*
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.
तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला.
म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती
असेही म्हणतात.
〰〰〰〰🏺〰〰〰〰
*संकलन - निखिल आघाडे ९७६३५०६०४०*
*_ही दिवाळी आपल्याला व आपल्या परिवारास सुख , शांती व भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना_*
(२)दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर-हेदवी(रत्नागिरी)
*महाराष्ट्रातील अष्टविनायकातर काही प्रसिद्ध गणेश मंदिरे*
*भाग -२*
*दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर-हेदवी(रत्नागिरी)*
✍🏻 *लेखन-निखिल रामराव आघाडे*
▬۩۞۩ *(९७६३५०६०४०)*۩۞۩▬
*खालील संकेत स्थळी अवश्य भेट द्या*
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
हेदवी मंदिर(आरवली) रत्नागिरी ,आरवली फाटा येथील हे मंदिर महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तु.
मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा, फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व इथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव. पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणार्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.
दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले.मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढर्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसर्या हातात त्रिशुळ, तिसर्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसर्या हातात पाश, तिसर्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणार्यांनाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आपल्याला पर्यटन व तिर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो. अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरीक्त अजुनही बरेच काही बघण्यासारखे आहे.
*राहण्याची सोय :*
हेदवीला राहण्यासाठी हॉटेल्स किंवा लॉज मात्र नाहीत; परंतु गावात काही ठिकाणी घरगुती स्वरूपात राहण्याची व्यवस्था केली जाते. हेदवीपासून जवळ गुहागर आणि चिपळूण या ठिकाणी मात्र राहण्याची चांगली सोय होऊ शकते.
*जाण्याचा मार्ग :*(बस)
हेदवी गुहागरपासून 25 किमी अंतरावर आहे. गुहागर किंवा चिपळूणवरून हेदवीला जाण्यासाठी बस आहेत; परंतु त्याचे प्रमाण कमी आहे; मात्र या दोन्ही ठिकाणांहून खासगी वाहनांची सोय होऊ शकते.
*जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:*
उमा-महेश्वर मंदिर (हेदवी पासून ३-४ किमी) आणि गुहागर पासून २० किमी.
*क्रमशः*
✍🏻 *लेखन-निखिल रामराव आघाडे*
▬۩۞۩ *(९७६३५०६०४०)*۩۞۩▬
ताडोबा अभयारण्य चंद्रपूर
जंगलाच्या मध्यभागी असलेले ताडोबा आणि तेलीयाचे निळेशार
जलाशय, त्या सभोवताली पसरलेले पानगळीचे उत्कृष्ट वन आणि त्या वनात ठायीठायी
आढळणारे असंख्य वन्यप्राणी! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे
निसर्गदेवतेला पडलेले निसर्गस्वप्नच जणू ! येथील तांबड्या मऊसुत मातीच्या
रस्त्यावरून सावकाश जात चितळ, भेकर, सांबर, वानरांनी दिलेल्या धोक्याच्या
इशारांचा मागोवा घेत ‘त्याला’ शोधणे असो वा पाणवठ्यांच्या परिसरात
निश्चल-नि:शब्द रेंगाळत कानोसा घेत ‘त्यांची’ प्रतीक्षा करणे असो, यासारखी
उत्कंठा कशातच नसावी. मग अशा संयमित प्रतीक्षेनंतर एका लयीत परंतु संथगतीने
पाऊल टाकत झाडीतून बाहेर येणा-या रौद्रसौंदर्यी ‘त्यांचे’ दर्शन झाले की
थरारून वाटून जाते, निसर्गदेवता म्हणजे वाघच! हे अनुभव फक्त ताडोबातच !
ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान. ३१ मार्च १९५५ रोजी ते
घोषित झाले. त्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी.इतके आहे. त्यालगत पूर्वीपासूनच
चांगले जंगल होते. ब-याच अवधीनंतर २५ फेब्रुवारी १९८६ रोजी ताडोबा
भोवतालच्या ५०९ चौ.कि.मी.च्या जंगलाला संरक्षित करून अंधारी अभयारण्याची
निर्मिती झाली.
ताडोबाच्या नावात खरा तर मोठा इतिहास दडला आहे. कोणे एकेकाळी या परिसरातील
गावप्रमुख तारूबाबा हा वाघाशी मोठ्या धैर्याने लढून मारला गेला. या
तारूबाबाचे नाव येथील प्राचीन जलाशयास पडले आणि तलावाभोवतालचे जंगलही त्याच
नावाने प्रचलित झाले. कालांतराने ब्रिटिशांच्या काळात या तारूबाबाचे
ताडोबा झाले. हा तलाव मात्र नैसर्गिक आहे का कोण्या गोंड राजाने बांधला,
कोणास ठाऊक? आता ताडोबा जलाशयालगत एका जुन्या चिंचेच्या झाडाखाली
तारूबाबाचे लहानसे देवालय आहे. पूर्वी पंचक्रोशीतील आदिवासी वाजतगाजत
तारूबाबाच्या दर्शनाला येत. तेव्हा जानेवारी महिन्यातील प्रत्येक रविवारी
येथे लहानशी जत्राही भरत असे. आता मात्र हे सारे थांबले. या ताडोबा तलावाचे
जल मात्र अजूनही पवित्र मानले जाते. ते रोगनाशकही मानले जाते. शिवाय हे
पाणी शेतात शिंपडल्यावर भरघोस निरोगी पीक पदरी पाडते. अशा कल्पना परिसरातील
आदिवासींच्या मनात मात्र अजूनही रुजलेल्या आहेत.
अंधारी अभयारण्याचे नाव मात्र त्या परिसरातून वाहणा-या नदीवरून पडले आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि त्या भोवतालच्या जंगलात वाघांचे अस्तित्व
पूर्वापारपासूनच आहे. १९७० च्यापूर्वी येथील चिचपल्ली, कोळसा हे ‘जंगल
ब्लॉक’ खास वाघांच्या शिकारीसाठीच राखीव होते. येथे शम्मी कपूर, प्रेमनाथ
यांच्यास अनेकांनी वाघांच्या शिकारी केल्यात. मग वाघांसह सर्वत्र
प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आल्यावर येथील वन्यप्राण्यांची संख्या वाढू
लागली. त्यात १९७३ साली वाघांच्या संवर्धनासाठी देशभरात ‘व्याघ्र प्रकल्प’
कार्यान्वित झाला. कालांतराने ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि त्या भोवतालच्या
अंधारी अभयारण्यात वाघांसाठी असलेला उत्कृष्ट अधिवास, खाद्य व पाण्याची
मुबलक उपलब्धता आणि तेथील वाघांची संख्या लक्षात घेऊन २३ फेब्रुवारी १९९५
रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. या व्याघ्र
प्रकल्पातील एकूण ६२५ चौ.कि.मी.च्या संरक्षित क्षेत्रास गाभा क्षेत्राचा
(कोअर) दर्जा असून त्या भोवतालचे ११०१ चौ.कि.मी. क्षेत्र हे ‘बफर’ क्षेत्र
आहे. हा महाराष्ट्रातील दुसरा व्याघ्र प्रकल्प होय.
येथील जंगल हे प्रामुख्यान कोरडे पानगळीचे आहे. ते ‘दक्षिण उष्णकटीबंधी
पर्णझडीचे वन’ या प्रकारात मोडते. सागवान आणि बांबू या येथील प्रमुख
वनस्पती आणि प्रजाती होय. त्य़ाशिवाय ऐन, अर्जुन, धावडा, करई, सलई, तेंबू,
मोह, कुंभा, पळस, पांगारा, बहावा, रोहीण, कुसुम, बेहडा, आवळा, जांभूळ,
आंबा, उक्षी अशा प्रमुख प्रजातींस विविध प्रकारच्या वनस्पतींनी येथील जंगल
अत्यंत समृद्ध आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे जंगल हिरवाईने नटलेले असते. हिवाळा संपता
संपता वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर पानगळीला सुरुवात होते आणि पाठोपाठ पळस,
पांगारा, कुंभा वृक्षांच्या आकर्षक फुलांनी हे सारे रान बहरून जाते.
आसमंतात मोहाच्या फुलांचा आणि आंब्याच्या मोहरांचा सुगंध दरवळू लागतो. मग
ग्रीष्माचे आगमन होते. हवेतील उष्मा वाढू लागतो तसा बहावा, अर्जुन, सलईच्या
वृक्षांना बहर येतो. हळूच वृक्षांच्या टोकांना कोवळी पालवी दिसू लागते.
त्या पालवीच्या विविध रंगछटांनी जंगलाची रंगत अधिकच न्यारी होते. त्यावेळी
मोहाच्या पालवीची रंगछटा आणि करईच्या पालवीची हरियाली काय वर्णावी!
ताडोबाच्या जंगलाचं गूढ सौंदर्य तुम्हाला इथं खेचून आणतं !
वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तर विशेष
उल्लेखनीय आहे. येथे वानर, रानडुक्कर, चितळ, सांबर, गव यांचे मोठमोठाले कळप
जागोजाग दिसून येतात, तर खूप भित्रे असणारे भेकर आणि सतत सावध असणारे
चौसिंगा यांचे दर्शन अधूनमधून होतच असते. शिवाय वाळवी-कीडे खाण्यात मग्न
असणारे अस्वल आणि शिकारीच्या प्रयत्नात असणारी रानकुत्र्यांची झुंड अवचित
दृष्टीस पडते. त्याचबरोबर भारतीय जंगलातील सर्वात देखण्या रुबाबदार
बिबळ्याचे येथे सहजगत्या होणारे दर्शन अचंबित करणारे ठरते. शिवाय मानवासह
समस्य उत्कृष्ट गुणाचे मूळ समजलेली वृक्षं, चिचुंद्री आणि फक्त रानातच
आढळणारे रुडी मुंगूस अधूनमधून दिसत असतात. चांदी अस्वल उदमांजर, खवलेमांजर,
रानमांजर, सायळ, ससा, उडणारी खार असे रात्रींचर प्राणीही येथे आहेत, परंतु
दिवसा ते क्वचितच दृष्टीस पडते. ताडोबा आणि तेलीयाच्या जलाशयात मगरींची
संख्याही तशी बरीच आहे. या मगरींना मात्र पाण्याकाठी सूर्यस्नान करताना सहज
पाहता येते.
पक्ष्यांच्या दृष्टीने ताडोबा-अंधारीचे जंगल अत्यंत समृद्ध आहे. मुळात येथे
स्थानिक पक्ष्यांची विविधता विपुल तर आहेच. शिवाय हिवाळ्यात दीर्घ अंतर
स्थलांतर करून येणा-या जलपक्ष्यांनी आणि रानपक्ष्यांनी हे जंगल गजबजून
जाते, तर अनेक पक्षी भर उन्हाळ्यात येथे फक्त वीणीकरताच आगमन करतात. मोर,
राखी रानकोंबडा, पिलक, काळ्या डोक्याच्या हळद्या, टकाचोर, सोनपाठी सुतार,
तुर्रेवाला कोतवाल, हरेल, निलकंठ ठिपकेवाला कवडा, सर्पगरुड, तीसा,
मत्स्यगरुड, मध्याळगरुड यासह असंख्य जातींचे पक्षी येथे ठायीठायी दिसत
असतात, तर नवरंग, स्वर्गीय नर्तक यासारखे सुंदर पक्षी खास वीणीकरिता येथे
येतात. शिवाय अनेकदा दुर्मिळ गिधाडांचेही येथे दर्शन होते.
ताडोबा-अंधारीचे आत्मा म्हणजे इथले वाघ!
ताडोबा-अंधारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे वाघांचे येथे होणारे सहज दर्शन!
पूर्वी ताडोबामध्ये सकाळी ६ ते सायंकाळी ६ असा पूर्ण दिवस पर्यटकांना
प्रवेश दिला जात असे. जंगलात कोठून कसेही पायी फिरावयास परवानगी असे.
दिवसभर जंगलात लोकांची वर्दळ असे. तेव्हा येथील वाघ दिवसापेक्षा रात्रीच
वावरणारे होते. त्यात अजून एक आश्चर्यकारक नोंद म्हणजे १९९६ पर्यंत या
जंगलात वाघिणीला एकावेळी चार छावे जन्माला आल्याची नोंद जवळपास नाहीच.
परंतु १९९६ पासून परिस्थिती एकदमच बदलली. एकतर पर्यटकांवर हळूहळू नियंत्रण
वाढू लागले आणि वाघिणीने एकावेळी चार पिल्ले जन्माला घालणे ही अतिसामान्य
बाब झाली. परिणामी येथील वाघ दिवसा तर दिसू लागलेतच, परंतु त्यांची
संख्याही भरपूर वाढली. आता तर भारतीय वाघांचे सर्वोत्कृष्ट जननस्थळ म्हणून
फक्त ताडोबा-अंधारीचाच उल्लेख करता येईल. त्यामुळे सर्व वयोगटातील
पिलांसोबत वाघांचे होणारे दर्शन यामुळे वन्यजीव विशेषत: व्याघ्रप्रेमींचे
ताडोबा हे आवडते ठिकाण झाले आहे.
अर्थात वाघांसह येथे ४१ जातींचे सस्तन प्राणी, जवळपास २९० जातींचे पक्षी,
जवळपास ३० जातींचे सरपटे, जवळपास ३५ जातींचे अष्टपाल, जवळपास ७५ जातींची
फुलपाखरे, जवळपास २० जातींचे मासे यासह असंख्य जातींचे कीटक आणि
वनस्पतींच्या विविध प्रजाती यांनी ताडोबा-अंधारीचे जंगल अत्यंत समृद्ध आहे.
रीचे ग्रहण आता ताडोबालाही लागले आहे. शिवाय स्थानिक परिसरातून होणारी
बांबूतोड ही तशी चिंताजनक आहे. तथापि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे
सर्व अधिकारी आणि क्षेत्र कर्मचारी हा निसर्गाचा वारसा आणि महाराष्ट्र
राज्याचे हे गौरव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
येथील हिवाळा हा अत्यंत थंड तर अत्यंत उष्ण असल्याने जानेवारी ते एप्रिल हा
काळ ताडोबा अनुभवण्यास तसा चांगला. राहण्याची सुविधा तशी इथे कमी असल्याने
आणि जंगलातील आरक्षण २८ दिवस अगोदर करण्याची सोय असल्याने ताडोबा भेटीचे
नियोजन आगाऊ केलेले केव्हाही चांगले.
वाघाची प्रजाती ही विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे हे सर्वच जण जाणतात. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जरी यांची संख्या वाढताना दिसत असली तरी चोरटी शिकार, जंगलतोड आणि पर्यटनाचा दबाव लक्षात घेता वाघांच्या संरक्षणासाठी व्यापक आणि अथक प्रयत्नांची गरज आहे. वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील आहेच, तथापि आता जनसहभागाची आणि आर्थिक योगदानाची गरज आहे.
आपण आपले आर्थिक योगदान राज्य सरकारद्वारा नियंत्रित ‘ताडोबा-अंधारी टायगर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन’मध्ये देऊ शकता.
अधिक माहितीसाठी क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मुल रोड,
चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२४०१. दूरध्वनी (०७१७२) २५१४१४ Email :
cf_fdtatr@rediffmail.com यावर संपर्क साधावा.
आरक्षणासाठी उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, मध्यवर्ती
वनराजीक महाविद्यालय परिसर, मुल रोड, चंद्रपूर, महाराष्ट्र-४४२ ४०१,
दूरध्वनी (०७१७२) २५५९८०
Email: ddcoretatr@gmail.com येथे संपर्क साधावा.
'मधुकेश्वर मंदिर'
वास्तूशिल्पकलेच्या अजोड नमुन्यांचं बनवासीचं 'मधुकेश्वर मंदिर'…
ऐका,या शिव मंदिराच्या काही खांबांना असं काही 'पॉलीश' केलं आहे की त्यांत
आपल्या कपड्यांचे निळा,गुलाबी सारखे रंग दिसतात ;आणि मंडपाच्या कोरीव
कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल (convex) व अंतर्गोल (concave)
'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार
दिसतात;देव-देवतांसारखे
लाल माती, हिरव्या गर्द झाडीच्या कर्नाटकातील देखण्या 'शिर्सी' पासून २३ कि.मी.वर असलेल्या 'बनवासी'चं दोन हजार वर्षांपूर्वीचं मधुकेश्वर(महादेव) मंदिर म्हणजे वास्तू शिल्पकला आविष्कार सौंदर्याचा एक अजोड नमुनाच ! दुस-या ते अठराव्या शतकांच्या दरम्यान चुटु वंशियांनी प्रथम बांधलेल्या, इ.स.३२५ पासून २५० वर्षे राजधानी राहिलेल्या,बनवासी च्या अप्रतिम मधुकेश्वर मंदिरात शिल्पकलेची एक-दोन नव्हे तर ४०चे वर स्तिमित करणारी वैशिष्ठे बघायला मिळतात.ती कळण्यासाठी मात्र जाणकार 'गाईड' बरोबर हवा !
सगळ्यात वैशिष्टपूर्ण आहे तो नंदी मंडपातील होयसाळा धर्ती शैलीतील प्रचंड मोठा नंदी.शिव मंदिरांतील बहुतेक नंदी हे सरळ पिंडीकडे चेहरा करून असतात.इथला नंदी तिरकस बसलेला असून,त्याचा एक डोळा शंकराच्या पिंडीकडे असून, त्यांत शांत भाव दिसतो; तर दुसरा डोळा शेजारच्या मंदिरातील पार्वतीकडे असून,तिने मारल्याने,त्यांत रागीट भाव जाणवतो.या मंडपाच्या मायादेवी कोरीव कारागिरी खांबांना दिलेल्या बहिर्गोल(convex) व अंतर्गोल (concave) 'इफेक्ट' मुळे आपले हात वर-खाली केल्यावर चक्क दोनाचे चार दिसतात.स्वत:ला देव-देव्यांसारखे चार हात करून पहायला कोणाला आवडणार नाही ? काही खांबांना असं 'पॉलीश' केलं आहे की त्यांत आपल्या कपड्यांचा निळा,गुलाबी सारखा रंगही दिसतो.स्वयंभू चतुर्भूज देव्यांनो रंगमय वस्त्रानिशी या खांबांत स्वत:ला करा नमो नम:!
मधुकेश्वर मंदिरात प्रवेश करताच दिसतात दोन विशाल स्थंभ.पहिला ४०फूट उंचीचा,एकसंध दगडातील 'ध्वजस्तंभ';आणि दुसरा 'दीप' किंवा 'ज्योतीस्तंभ'. देवालयात पाच मंडप असून,आवारात देव-देवतांसंबंधित अनेक वैशिष्ठपूर्ण गोष्टी आहेत. होयसाळ शैलीतील प्रत्येक खांबावरचं कोरीव कारागिरीचं नक्षीकामही निरनिराळं !सभा मंडपातील एका खांबांवर नागरी,हळकन्नड,तेलगु,तमिळ, संस्कृत अशा पाच भाषांतील शिलालेख असून,जमिनीवर चुटु वंशाची नागशिला आहे.त्रिलोक मंडपातील सिंहासनात खाली पाताळ;सत्व,रज,तम प्रतिकांचा भूलोक;वरती देवलोक असून,देवळातील घंटेमधून 'ओमकारा'चा नादध्वनी बराच काळ ऐकू येतो.मधुकेश्वर मंदिरात कोरलेले अष्ट दिशांचे देव त्यांच्या वाहनांसह;सपत्निक ('गाईड'ने कानडीतील पुस्तकावरून भाषांतरीत करून सांगितल्या प्रमाणे): पूर्व: इंद्रदेव-वाहन ऐरावत;पत्नी सचिदेवी.पश्चिम:वरुणदेव-वाहन मगर+हत्ती रूप;पत्नी अलकादेवी.उत्तर: कुबेरदेव-वाहन घोडा;पत्नी चित्रलेखा दक्षिण: यमदेव वाहन रेडा;पत्नी श्यामलादेवी. आग्नेय(S-W) : अग्नि-वाहन दोन तोंडी मेंढा;पत्नी अग्निस्वाहादेवी. वायव्य(N-W): वायू-वाहन सारंग(हरिणी);पत्नी अंजानादेवी.ईशान्य(N-E) : ईश्वर-वाहन नंदी;पत्नी पार्वती नैऋत्य(S-E): निराऋती-वाहन राक्षस;पत्नी दीर्घादेवी.
भित्तीचित्रात दूध देतानाची दोन तोंडाची गाय असून,तिचे एक मुख झाकले असता,वासराला पहिल्यांदीच दूध पाजत असल्याने घाबरल्यासारखी वाटते; तर दुस-या तोंडाने वासराकडे वात्सल्याने पहात असल्या सारखी वाटते.दोन देह,एक मुख अशी प्राण्यांतील विकृतीही कोरलेली दिसते.एका खोलीत बंद आहे सहाशे वर्ष जुना ग्रानाईटचा एकसंध पलंग.सूर्यनारायणा च्या मूर्तीचे खाली सात घोड्यांचे चित्र कोरलेले असून,एके ठिकाणी गणपतीची उभी अर्धी मूर्ती असून, तिचा दुसरा अर्धा भाग काशीत असल्याचं मानलं जातं.म्हणून या मंदिराला 'दक्षिण काशी' ही संबोधलं जातं.एका छोट्या नंदीवर टोर्चने प्रकाशझोत टाकला असता त्याची बुबुळे हालताहेत असा भास होतो.
अस्तंबा ऋषीची यात्रा
अस्तंबा ऋषीची यात्रा
सातपुडयातील उंच डोंगर....
दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान...
अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज
चढतात. दिपावली पर्वावरील धनत्रयोदशीला अस्तंबा ऋषीची यात्रा भरते. ह्या
यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्यप्रदेश राज्यातील हजारो तरुण
पदयातत्रेने अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी शिखराकड़े रवाना होतात. निसर्गरम्य
वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते.
म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र
सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची
अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा
जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर
धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी
विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो.
आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन
झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन
करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख
असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा (
अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते.
दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक
दिवस अगोदरच कॉल्लेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन
यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. कोठार, देवनदी, असली,
नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला
जातात.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे
हि मूर्ती काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्ती साधारणपणे ८व्या शतकातील म्हणजे शिलाहारकालीन आहे. महाराष्ट्रात शिलाहारांच्या ३ शाखा – उत्तर कोकणाचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कऱ्हाड / कोल्हापूरचे शिलाहार. आता काहींना प्रश्न पडेल, शिलाहारांच्या तीन शाखा, मग हि मूर्ती कोणत्या शिलाहार शाखेने तयार करून घेतली आणि ती कोणत्या मंदिरात होती?
उत्तर कोकणचे शिलाहार या राजघराण्याने हि मूर्ती तयार करून घेतली. याच राजघराण्याने इ.स.१०६० मध्ये अंबरनाथचे सुप्रसिद्ध शिवमंदिर बांधले. हे राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक. इ.स. ८०० ते १२५० अशा साधारणपणे ४५० वर्षांचा त्यांचा काळ. या शिलाहार राजांची राजधानी होती श्रीस्थानक (सध्याचे ठाणे).
सिद्धेश्वर तलाव परिसरात ब्रम्हदेवाचे मंदिर असावे आणि हि मूर्ती त्या मंदिरातील गाभाऱ्यात असावी. तसेच मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले असावे आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्तीला वाचवण्यासाठी तिला मंदिराजवळ असलेल्या तलावात (म्हणजे आताच्या सिद्धेश्वर तलावात) लपवून ठेवली असावी.
ह्याचाच अर्थ असा निघतो कि ८व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात
ब्रम्हदेवाची पूजा होत होती. अशीच दुसरी एक ब्रह्मदेवाची मूर्ती नालासोपारा
येथील मंदिरात आहे.
मूर्ती सुमारे ५ फुट उंच आणि उभी आहे. मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे
हातात काय असावे हे कळायला मार्ग नाही. मुर्तीशास्त्राप्रमाणे अक्षमाला,
वेद, कमंडलू आणि माला असावी. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर
चौथे डोके मूर्तीच्या मागच्या आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे.
डोक्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेला मुकुट आहे. कानात कुंडले असून जानवे आणि
करगोटा धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मुर्तीच्या
उजव्या बाजूला सावित्री आणि डाव्या बाजूला सरस्वती खोदलेली आहेत. दोन्ही
बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर
प्रभावळ आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
श्री क्षेत्र भालचंद्र गणेश मंदीर(गणेशखिंड),अहमदनगर
श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदीर पुणवाडी,अहमदनगर
पुणवाडी,अहमदनगर
श्री सदगुरु मठ, मेहकरी
२. संत खुशालभारती महाराज
मार्गशीष वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी या कालखंडामध्ये कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरी पारायण,गाथा भजन विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आमटी-भाकरीचा भंडारा असतो. २०-२५ हजार लोक भंडारयाचा लाभ घेतात.
Tuesday, 3 November 2015
श्री घोडेश्वरी देवी,अहमदनगर
*********************
श्री सिध्देश्वर मंदीर, सिध्देश्वरवाडी, पारनेर,अहमदनगर
हे बांधकाम विश्वकर्मा यांच्या काळाचे आहे. येथे शिलालेखमोडी लिपीमध्ये कोरलेले आढळते. रामायण व महाभारताचा अभ्यास केल्यास पाराशर ऋषींना येथे तपश्चर्या केलेली आहे. या मंदीराचा संबंध पुराणाशी आहे.
केडगावची रेणुकामाता,अहमदनगर
याच मंदिरात दैवदैठण येथील संत शिरोमणी श्री. निंबराज महाराज काशीयात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळीच्या स्वरुपात दर्शन दिले. मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निंबराज महाराज आले असताना भुकेने व्याकूळ झालेले होते. त्यांनी सरळ देवीस विनवणी केली, तर साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली. त्यांनी अंतज्ञानाने जाणले व ते देवीभक्त झाले. त्यांनी आपल्याबरोबर काशीयात्रेहून आणलेली गंगेची कावड मंदिराशेजारील बारवेलमध्ये ओतली. आज कितीही उन्हाळा असलातरीही बारवेलमध्ये पाणी असतेच.
१९४५ मध्ये के. बाबासाहेब मिरीकरांनी मंदिरापर्यतचा रस्ता ब्हावा, अशी अपेक्षा श्री गुरव कुटूंबीयांनी व्यक्त केली. येथे नवरात्रात घटी म्हणून स्त्रिया राहतात. मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे. परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी परसळी (ओवऱ्या) आहेत. मंदिराची पूजाअर्चा चार गुरवांच्या घरात विभागली आहे. शहरालगत असलेले हे मंदिर नवरनवला. मंदिराभोवती उंच तट असून, मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रागंण आहे. मंदिराशेजारी भाविकासांठी सुंदर बगिचा तयार वात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येते. येथे जाण्या-येण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून जादा गाड्याची सोय करण्यात येते. हजारो भाविक देवीदर्शनाने मंत्रमुग्ध होतात. हार फुले-नारळ खाद्यपदार्थ व खेळणीच्या दुकाणे असतात. नवरात्रोत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा भरते. नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपुजन होते आणि देवीचे पारंपारीक दागिने चढवीले जातात. सीमोल्लंघनाच्या दिवशी मानाच्या काठ्या श्री रेणुकामातेच्या दर्शनाने गेल्यानतंर उत्सवाची सांगता होते.
श्री विठ्ठल-रुख्मिणी(धाकटी पंढरी),अहमदनगर
श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, मांजरसुंबा, नगर,अहमदनगर
श्रावण महिन्यात येथे महिनाभर श्रावणी यात्रा असते. मुख्य यात्रा तिसऱ्या व चौथ्या सोमवारी असते. येथे प्रत्येक महिन्याल्या राहुरीच्या गोरक्षनाथ मंड्ळ यांच्याकडुन भंडारा असतो. कार्तिक शु.१३ ला गोरक्षनाथ प्रकटदिन साजरा केला जातो. महाशिवरात्रीला देवाला गंगेच्या पाण्याने आंघोळ घातली जाते, यासाठी पायी कावडी जातात. आषाढी एकादशीला यात्रा भरते. शुध्द एकादशीला भंडारा असतो.
श्री विरभद्र (बिरोबा), मिरी (अ.नगर)
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला ) येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
पद्मावती देवीमंदीर, घोसपुरी,अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावतील जठार घराण्यात एक व्यक्ती राह्त होती. तो माहुरगडाच्या जगदंबेची अतिशय मनापासुन भक्ती करत होता. त्याचे लग्न होऊन बरेच दिवस झाले ,परंतु त्याला मुलबाळ होईना म्हणुन त्याने माहुरगडच्या जगदंबेला मुलबाळ होऊ दे, असे साकडे घातले व तो जगदंबेची मनापासुन भक्ती लागला .त्याला एके दिवशी रात्री स्वप्न पड्ले की ,स्वप्नात देवीने सांगितल्याप्रमाणे तो भल्या पहाटे उठुन शेताता स्व्प्नात सांगितलेल्या ठिकाणी गेला. तेवढ्यात एका छोट्याशा बालकाचे रड्णे ऎकु आले .नंतर तो आवाजाच्या दिशेने जावु लागला .जवळ गेल्यानंतर त्याला फ़ुललेल्या तरवडाच्या झाडाखाली एक सुंदरशी मुलगी द्रुष्टीस पड्ली .त्याने ते छोटेसे बालक अलगत उचलुन आपल्या घरी आणले . तिला पाहताच त्याच्या पत्नीला व घरातील सर्वांना आनंद झाला ते दोघेही त्या मुलीचा सांभाळ ,पालणपोषण करु लागले. तिचे नाव पद्मावती असे ठेवले. जगदंबेच्या क्रुपेमुळे तिला घरातील सर्व मंड्ळी अंबिका असे म्हणत. अंबिका आता उपवर झाली .तिचे लग्न करावे असे तिच्या आई-वडिलांना वाटु लागले. मुलाचा शोध घेता घेता नगर तालुक्यातील मौजे रुईछ्त्तीशी येथील दरंदले कुटुंबातील एका मुलाशी अंबिकेचा विवाह ठरला. योग्य वेळेत तिचे लग्न करण्यात आले. अंबिका सासरी जावु येऊ लागली. दरंदलेंचा शेतीचा व्यवसाय फ़ार मोठया प्रमाणात होता. दिवस उन्हाळ्याचे होते. त्याने नांगराची इरजीक घालावयाचे ठरविले. अनेक शेतकरयांना इरजीकाचे आमंत्रण देण्यात आले. नंतर अंबिकेला न्याहरीसाठी स्वंपाक करावयास सांगितले. इरजिकीचा दिवस उगवला .अंबिकाने स्वंपाक करण्यास सुरवात केली. तिने ५ भाकरी व शेडगाभर कालवण केले. सासरे भाकरी घेण्यासाठी शेतावरुन घरी आले तर सुनबाईने भाकरीचे टोपले भरुन ठेवले होते. सासरयाने टोपले उचलुन शेतावर नेले. न्याहरीची वेळ झाली होती .शेतक्ररयांना त्यांनी न्याहरीसाठी हाक मारली. भाकरी कालवणाचे टोपले सोडले असता टोपल्यात पाचच भाकरी असल्याचे निदर्शनास आले. हे पाहुन सासरयांना विचार पडला. हे जेवण सर्वांना कसे पुरणार ? पण भुकेची वेळ असल्यामुळे सर्वांनी ठरविले की थॊडी थॊडी भाकरी खाऊया तर सासरयांनी जेवण वाढण्यास सुरवात केली. जेवढ्या भाकरी उचलल्या जात तेवढ्याच भाकरी टोपल्यात परत दिसु लागल्या .कालवणही तेवढेच दिसु लागले. सर्वांची जेवणे पोटभर जेवणे झाली तरी टोपल्यात पाच भाकरी व शेडगाभर कालवण तसेच शिल्लक राहिले. सर्वजण आश्चर्यचकित झाले .ही बातमी शेतकरयांमार्फ़त हा हा म्हणता संपुर्ण रुई गावात पसरली . अंबिकेच्या सासुला ही बातमी कळली ती अतिशय नाराज झाली .तिला वाटले की कोणीतरी काट्कीन आहे. हिला आपल्या घरंदाज कुटुंबात ठेवणे चांगले नाही,असे कुटुंबातील सर्वांना वाटले, दुसरा दिवस उजाडताच दुसरयादिवशी अंबिकेला माहेरी पाठवण्याची. सुनबाईना माहेरी घेऊन जाण्यासाठी सासरयांची नेमणुक झाली. त्याकाळी कुठल्याही प्रकारची वाहने नव्हती. सासरयाच्या घरी एक सुंदरशी घोडी होती .ती घोडी घेऊन अंबिका व सासरे यांचा प्रवास सुरु झाला. विसापुरच्या अलिकडे नगर तालुक्यातील घोसपुरी नावाचे गाव आहे. तेथपर्यंत येण्यास दुपार झालीहोती. कडक उन्हाळा असल्यामुळे घोसपुरी गावातील एका विहीरीवर विसाव्यासाठी अंबिका व तिचे सासरे थांबले. त्या विहीरीवर पाणी काढण्यासाठी काहीच साधन नव्हते. त्या विहीरीच्या मालकास विचारले असता त्यानेही काही साधन नसल्याचे सांगितले,म्हणुन त्यांनी थोडे पुधे जावुन नदीच्या कडेला झरा पाहिला व त्या ठिकाणी अंबिका पाणी आणण्यासाठी गेली. पाणी घेतले व सासरयांना दिले व अंबिका देखील पाणी प्याली. झरयाजवळील निसर्गरम्य परिसर पाहुन अंबिकेचे मन रमले व अंबिका काहीतरी निमित्त करुन सासरयापासुन दुर अंतरवर गेली .अंगावरील सर्व दाग-दागिने झरयाजवळील एका दगडाखाली ठेवुन ती तेथे गुप्त झाली. बराच वेळ झाला अंबिका काही येईना.सासरा विचारात पडला. त्याने अंबिका म्हणुन मोठ-मोठ्याने हाक मारण्यास सुरवात केली . तर गावापासुन २ कि.मी अंतरावर असलेल्या टेंभी नावाच्या डोंगरावरुन जी असा आवाज एकु येवु लागला. आवाजाच्या दिशेने सासरा घोड्यावर बसुन टेंभीच्या डोंगरावर धावत गेला. तेथे जावुन पाहतो तर अंबिका कोठेच दिसेना, टेंभीच्या डोंगरावरुन अंबिका अशी हाक मारली देवीने त्यांना गुप्त झालेल्या ठिकाणावरुन आवाज दिला .सासरे पुन्हा घोड्यावर बसुन गुप्त झालेल्या ठिकाणी आले. त्या घोड्याबरोबर त्या घोड्याचे शिंगरु होते. तेथे येवुन आपल्या सुनेस शोधले परंतु देवी दिसली नाही. यावेळी त्यांनी पुन्हा देवीला हाक मारली. त्यावेळी देवीने टेंभीवरुन आवाज दिला पुन्हा पुन्हा असे घडत राहिल्याने घोडी व शिंगरु टेकडी चढता चढता थकुन गेले .घोडी व शिंगरु ज्या ठिकाणी थकले त्या ठिकाणी त्यांचे पावले पाषाणात उमटले. त्या पाऊलखुणा आजही जशाच्या तशा दिसतात.
नृसिंह मंदीर (भातोडी),अहमदनगर
या मंदीरामध्ये पांडुरंग खंडु राऊत हे व्रुध्द बासरीवाद्क खुप सुंदर बासरी वाजवतात.
नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर
रेट_वॉल_ऑफ़_इंडिया (कुंभळगड)
जगातील सर्वात लांब भिंत
'ग्रेट वॉल ऑफ चायना' विषयी
सर्वांनीच ऐकलेले आहे.
परंतु
जगातील दुस-या सर्वात लांब
भिंतीविषयी खूप कमी लोकांना माहित
असेल. ही भिती दुस-या देशात
नव्हे तर आपल्या भारत देशात आहे.
ही राजस्थान
राज्यात असलेल्या कुंभळगड
किल्याची भिंत आहे.
ही 'ग्रेट वॉल ऑफ इंडिया'
म्हणून ओळखली जाते.
उदयपूरपासून ६४ किमी दूर अंतरावर
असलेल्या या किल्ल्याची निर्मिती महाराणा कुंभाने
१५ व्या दशकात केली होती.
किल्ल्याचे क्षेत्रफळ ३६ किमी असून
ही जगातील दुसरी सर्वात लांब
भिंतीच्या श्रेणीमध्ये मोडते.
कुंभळगड
मेवाडच्या साम्राज्याच्या किलेबंदचा भाग
होती.
इथे महाराणा प्रतापचा जन्म झाला होता.
किल्ल्याच्या आतमध्ये ३६० पेक्षा जास्त
मंदिर आहेत.
किल्ल्याच्या भिंतीवरून अरावली पर्वत
रांगा १० किलोमिटर दूरपर्यंत दिसतात.
किल्ल्याच्या भिंतीभोवती १३ दरी आहेत.
पैठण*
जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचनप्रकल्प. या प्रकल्पाचे आराखडे प्रथमत: जुन्या हैदराबाद राज्याने तयार केले होते. त्यांमध्ये बीड जिल्हयांतील जयकुचीवाडी या खेड्याजवळ गोदावरी नदीवर २,१४७ दशलक्ष घ. मी. जलसाठ्याचे धरण बांधण्याची योजना होती. खेड्याच्या नावावरून प्रकल्पास जायकवाडी प्रकल्प हे नाव पडले. राज्यपुनर्रचनेनंतर व विविध पर्यायी जागांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर जयकुवाडीऐवजी वरच्या बाजूस असलेल्या १०० किमी. वरील पैठण येथे धरणाचे बांधकाम करावयाचे निश्चित होऊनही प्रकल्प सध्याच्याच नावाने ओळखला जाऊ लागला. धरणजागा बदलल्याने कालवे पूर्वीपेक्षा वरच्या पातळीवरून नेणे व सिंचनाखाली अधिक क्षेत्र आणणे शक्य झाले, पैठण उजव्या कालव्याची पातळी उंचावल्याने त्यामधून माजलगाव जलाशयास पुरवठा करणे तसेच गेवराई व माजलगाव या परंपरागत दुष्काळी तालुक्यांना सिंचनसुविधा उपलब्ध करणे शक्य झाले. प्रकल्प –अहवाल १९६४ मध्ये पुर्ण झाला. पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ कै. लालबहादूरशास्त्री ह्यांच्या हस्ते १८ऑक्टोबर १९६५ रोजी झाला. जायकवाडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सांगता २४ फेब्रुवारी १९७६ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली.
प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला २७ दरवाजे आहेत. या धरणाला मराठवाड्याला अन्यसाधारण म्हत्यव आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संद्याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्या सागराच्याच किनारी असल्याचा भास आपल्याला होतो. संद्याकाळी काळी क्षितिजापलिकडे डुंबणार्या सुर्याची किरणे समुद्राच्या पाण्याला सोनेरी करून टाकतात. हे दृश्य अतिशय मनमोहक दिसते.
जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते म्हेसुरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी धबधबाही आहे. तालावर नाचणारे पाणी पाहण्याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.
टाहाकारी मंदिर*
महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल या शक्तिदेवतेचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूर, तुळजापूर, अंबेजोगाई, माहूरगड ही प्राचीन ‘शक्ति’स्थाने याचीच प्रचिती देतात. या प्राचीन माळेतीलच एककोरीव मणी म्हणजे नगर जिल्ह्य़ातील अकोल्याजवळचे टाहाकारी!
अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात अनेक प्राचीन व कलाकुसरीने युक्त मंदिरे आहेत. अकोल्याहून समशेरपूरमार्गे टाहाकारी साधारण वीस किलोमीटरवर. अकोले आणि संगमनेरदोन्ही ठिकाणांहून एस.टी. बसची सोय. खरेतर गावात शिरेपर्यंत टाहाकारी देवीची श्रद्धा कानी येत असते. पण प्रत्यक्ष गावात गेल्यावर मात्र आढळा नदीकाठच्या त्या भव्य, कोरीव मंदिरावरील शिल्पकलेचे गारुडच मनावरआरूढ होते. त्रिदल पद्धतीचा गाभारा, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप अशी मंदिराची रचना. यातील मुखमंडपच दहा खांबांवर आधारित. यावरूनच मंदिराची भव्यता ध्यानी येते. अध्र्यापर्यंत भिंत. या भिंतीचा बाह्य़ भागआणि या खांबांवर मुक्त हस्ते कोरीव काम केलेले. बाह्य़ भागावर शिव, पार्वती, गणेश, देवी आदी देवता; हत्ती, व्याल, घोडे असे प्राणी. यक्ष-यक्षिणी, अप्सरा, सुरसुंदरी आदी देवगण आणि जोडीने काही मैथुनशिल्पेहीकोरलेली! या मुखमंडपातच भिंतीलगत दगडी कक्षासनांची (बसण्याचे ओटे) रचना केलेली. मुखमंडपातील हे ‘वेरुळ’ पाहत सभामंडपात शिरल्यावर तर हे मंदिर लेणे आणखी विस्तीर्ण होते. बारा खांबांवर आधारित हा मंडप.त्याच्याभोवती पुन्हा तीन दिशांना तीन गर्भगृह. पैकी समोरचे मुख्य! हा मुख्य गाभारा आणि सभामंडपा-दरम्यान पुन्हा अंतराळाची रचना.
मंदिराची ही एकूण रचनाच गुंतागुंतीची! पण थोडेसे शांतपणे, लक्षपूर्वक पाहू लागलो की हा सारा गुंता त्यातली कोरीव कला दाखवत सहज सुटत जातो. सभामंडप आणि अंतराळाच्या खांबावर विविध भौमितिक आकृत्या,यक्ष प्रतिमा आणि देव-देवतांचे मूर्तिकाम केलेले आहे. सभामंडपाच्या छतावर एकात एक गुंफलेली वर्तुळे आणि मधोमध लटकणारे एक दगडी झुंबर आहे. अंतराळात काही देवकोष्टेही आहेत. मुख्य गाभाऱ्याच्यादरवाजावरही बारीक नक्षीकाम केले असून, त्याच्या शीर्षपट्टीवर गणेशाऐवजी देवीची संकेतमूर्ती स्थापन केली आहे. हे सारेच अफलातून! पण आपल्याकडील देवदर्शनामध्ये या इतक्या सुंदर मंदिरांना काहीच स्थाननसते. त्यामुळे मग या साऱ्या नजाऱ्याकडे दुर्लक्ष करत आपण फक्त त्या अभिषेक आणि हार-तुऱ्यांमध्ये अडकतो. दुर्दैव कुणाचे? आमचे की या जागोजागीच्या संपन्न वारशाचे हेच कळत नाही. मुख्य गाभाऱ्यातील त्याजगदंबेचे दर्शन घेत बाहेर यावे तो तिच्या बाह्य़ भिंतीवरील मूर्तिकाम थक्क करून सोडते. या मंदिराची बाह्य़रचना तारकाकृती आहे. ही भिंत अगदी छोटय़ा-छोटय़ा अंतरावर विविध कोनात दुमडली आहे. या दुमडलेल्याप्रत्येक छोटय़ा भिंतीच्या मध्यावर ओळीने हे मूर्तिकाम केलेले आहे. खरेतर टाहाकारी मंदिराचे हेच मुख्य आकर्षण! या मूर्तिकामात गणेश, शिव-पार्वती, चामुंडा आदी देवतांबरोबरच सुरसुंदरीचे तब्बल बावीस आविष्कारप्रकटले आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल त्यांचा मान! त्यांच्या रचना-शैलीतून तत्कालीन कला आणि सौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात. कुठकुठल्या या सुरसुंदरी..! कधी आरशात स्वत:चे सौंदर्यपाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा - ‘दर्पणा’, तर कुठे नृत्य अवस्थेतील नृत्य सुरसुंदरी! बासरी, मृदंग वाजवणाऱ्या, हाती पक्षी घेतलेल्या शुकसारिका, मुलालाघेतलेल्या मातृमूर्ती अशा या त्रिभंग अवस्थेतील हे नाना सौंदर्याविष्कार! ..असे म्हणतात या सुरसुंदरीचा जन्म समुद्रमंथनातून झाला. खरेखोटे माहीत नाही, पण त्या अमृताचे भाव मात्र आजही त्यांच्या दर्शनी चमकूनजातात!
टाहाकारीचे हे मंदिर पाहिले, की मग त्याच्या निर्माणाच्या काळात उतरावेसे वाटते. या मंदिराची शैली, रचना यावरून ते यादवकालीन नि:संशय! शिवाय या मंदिराशेजारीच आणखी एक मोडकळीस आलेल्या मंदिरावर एकशिलालेख आढळला. ज्यावर साल दिले होते शके १०५० म्हणजेच आजच्या भाषेत इसवी सन ११२८! आणखी काय हवे!
टाहाकारीसारखी अनेक कोरीव शिल्पमंदिरे आज आपल्याकडे खेडोपाडी उपेक्षेचे जीवन जगत आहेत. अशा प्राचीन वास्तूंच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या पुरातत्त्व विभागाचे त्यांच्याकडे लक्ष नाही तर दरदिवशी ढासळत्याबांधकामाने स्थानिक गावकऱ्यांचे मात्र चित्त लागत नाही. मग यातूनच जीर्णोद्धाराची टूम निघते. निधी जमतो आणि काम सुरू होते. पण शास्त्र-इतिहास सोडून फक्त श्रद्धेतून केले जाणारे हे प्रयोग म्हणजे ‘आजारापेक्षाउपचार जालीम!’ अशा पद्धतीचे ठरतात. टाहाकारीचे हेच दु:ख! एवढय़ा महत्त्वाच्या मंदिरापर्यंत पुरातत्त्व विभाग पोहोचलाच नाही, तेव्हा गावकऱ्यांनीच त्यांचे काम सुरू केले. जुनी, प्राचीन मोडकळीस आलेली शिखरेउतरवली. तिथे नवी अत्यंत विजोड अशी रंगीबेरंगी शिखरे चढवली. एवढा सुंदर मुखमंडप असताना त्यावर पुन्हा ‘आरसीसी’ मंडप घालण्यात आला. अनेक मूर्तीना विनाकारण शेंदूर थापला. आतील भाग रंगरंगोटीनेबटबटीत केला आणि या साऱ्यावर पुन्हा देणगीदारांच्या याद्या, नवे आरसे, झुंबरे असे बरेच काही..! हजार-अकराशे वर्षे जुने-प्राचीन असलेल्या या कोरीव मंदिराचे ऐतिहासिक मोल पार धुळीस मिळवले. टाहाकारीसारखे हेअसले प्रयोग गावोगावी सुरू आहेत आणि सरकार, संबंधित विभाग, तज्ज्ञ मंडळी आणि सुजाण लोकप्रतिनिधी या साऱ्यांनाच याकडे लक्ष द्यायला वेळ नाही! आमच्या गौरवशाली इतिहासाचाच हा भयाण वर्तमान म्हणावाकी काय! असे असले तरी टाहाकारी मंदिर आवर्जून पाहण्यासारखेच आहे. महाराष्ट्रातील प्राचीन ठेवा जपून कसा ठेवता येईल याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
बेडसे लेणी*
पुणे- मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे एक वाट गेली आहे. बेडशाकडे येण्यासाठी या वाटेवरच असलेल्या करुंज गावी उतरायचे. कामशेतपासून हे अंतर आठ किलोमीटर! इथे येण्यासाठी पवनानगरकडे धावणाऱ्या एसटी बस, जीप सोयीच्या पडतात. या करुंज गावच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातच ही बेडसे लेणी! पायथ्याच्या बेडसे गावात पोहोचलो की हे लेणे दिसू लागते. एकुटवाणे, एखाद्या व्रतस्थ संन्याशाप्रमाणे डोंगरकडय़ाच्या उंच जागी बसल्यासारखे! पायथ्याच्या या गावावरूनच या लेण्यालाही बेडसे नाव मिळाले. पण याचा अनेकजण ‘बेडसा’ असा चुकीचा उल्लेख करतात. इंग्रज येऊन गेले पण त्यांनी आमच्या अनेक गावांच्या नावामागचे हे मात्रे खाऊन त्याला काने घातले. खरेतर त्यांनी चुकीचे उच्चार, त्यानुसार पुढे चुकीचे स्पेलिंग तयार केले आणि मग हीच चुकीची नावे आम्हीही धारण केली. असो. अध्र्याएक तासात हा डोंगर चढून आपण त्या शैलगृहाच्या प्रांगणात येतो. दक्षिणोत्तर शंभर-दोनशे मीटर लांबीच्या त्या कातळकडय़ात खोदलेला लेण्यांचा हा छोटासा गट! एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप, पाण्याची कुंडे असा हा सारा बेडशाचा ऐवज. सकाळी-सकाळी आलो, की हा सारा देखावा उगवत्या सूर्यकिरणांनी झळाळून निघालेला असतो. या प्रकाशवाटेवरच स्वार होत मग हे शिल्प पाहण्यास निघावे.
इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील हे खोदकाम! याची आजची ओळख जरी बेडसे असली तरी इथल्याच एका लेखातून या लेण्याचे ‘मारकूड’ हे प्राचीन नावही पुढे येते. त्याची ही प्राचीन ओळख काढत मग बेडशाचे एकेक दालन शोधत निघावे. बेडशाला पाहण्यासारखे ते त्याचे चैत्यगृह आणि त्याचा तो आगळा-वेगळा विहार! बेडशाचे हे चैत्यगृह बाहेरून नीटसे दिसत नाही. कारण ते खोदत असतानाच त्याच्या पुढय़ातील कातळ तसाच ठेवला. तत्कालिन कलाकारांनी बहुधा छताकडील काम करण्यास आधार मिळावा म्हणून तो असाच ठेवला असेल. पण त्यामुळेच ही लेणी कशी खोदली जायची याची कल्पना येते. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातही एका कोपऱ्यात कातळाचा एक भाग असाच तासायचा ठेवला आहे. ही अशी उणीव तेव्हाच्या कर्तृत्त्वाची जाणीव देते. अनेकदा हा एवढा अवाढव्य उपसलेला दगड कुठे टाकला असेल अशा प्रश्न पडतो. बहुधा तो अन्यत्र बांधकामासाठीही वापरला जात असेल. पण बेडशाच्या चढाईत शेवटच्या वळणावर डाव्या हातास मातीखाली दगडांच्या छिलक्यांचा एक मोठा थर आढळून आला. इथे केलेल्या पायरी मार्गामुळे उघडय़ा पडलेल्या या थरातील हे तुकडे नि:संशय वरील लेण्यातील! खडकाआड दडलेल्या या चैत्यगृहात पाऊल टाकताक्षणीच त्याच्या भव्यतेने बुजायला होते. बाहेरून अर्धवट भासणारे हे लेणे इथे आल्यावर एका भव्य वास्तुअलंकाराचे रूप घेते.
तब्बल अठ्ठावीस फूट उंचीचे हे दालन! दर्शनी चार खांबांवर आधारित व्हरांडा, बाजूच्या भिंतीत खोल्या आणि या व्हरांडय़ापाठीमागे कातळातच खोलवर कोरलेले चैत्यगृह! पण या साऱ्यातही लक्ष स्थिरावते ते त्या समोरील भव्य-दिव्य स्तंभांवर! मध्यभागी दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धव्यक्त अशा या खांबांनी जणू हा तीस फूट लांब आणि १२ फूट रूंदीचा सारा व्हरांडाच तोलून धरला आहे. हे खांब पायापासून थेट छताला भिडलेले. हर्मिकेचा चौथरा, त्यावर ते भले मोठे घट आणि त्यातून बाहेर पडलेले अष्टकोनी खांब; शिरोभागी पुन्हा जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना, त्यावर आरपार खोदलेल्या चौरंगात रायआवळ्याच्या आकाराचा आमलक आणि शेवटी छताकडे पुन्हा एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार स्त्री-पुरुषांच्या जोडय़ा! हे स्तंभ म्हणजे एखादे स्वतंत्र लेणेच! एखाद्या नाजूक दागिन्याप्रमाणे त्यांना घडवले-सजवले आहे.
घोटून गोलाई दिलेल्या त्या घटांवर सुरुवातीस लक्ष जाते. कुंभाराने चाकावर आकार देत घडवावेत असे हे कातळातील घट! केवळ छिन्नी-हातोडय़ाने त्याला कसा आकार दिला असेल? त्याचे गळ्याकडील काठ कसे घडविले असतील? सारेच प्रश्न त्या काळावर स्वार झालेले! घटात उभे केलेले खांब दाखविण्याची ही कल्पना मात्र दैनंदिन व्यवहारातून आलेली. कुठल्याही लाकडी खांब-पायांना कीड-वाळवी लागू नये म्हणून त्याचा जमिनीशी असणारा थेट संपर्क तोडत ते भांडय़ात (घट) ठेवण्याची प्रथा आपल्याकडे खूप जुनी आहे. प्रारंभीच्या लेण्यांवर या बांधीव स्थापत्याचा मोठा प्रभाव होता. त्याअंतर्गतच या कल्पनेनेही इथे स्थान मिळवले. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाची टोपी चढवलेली आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवले आहे. किती संवेदनशील हे हात आणि त्यामागचे मनही! या स्तंभांच्या शिरोभागी असलेल्या पशूंच्या आणि त्यावरील स्त्री-पुरुषांच्या जोडय़ा तर अफलातून आहेत. घोडा, हत्ती आणि बैलांच्या या जोडय़ा आणि त्यावर स्वार स्त्री आणि पुरुष! अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम! यातील प्राणी तर हुबेहूब वाटतात. सहज आणि नैसर्गिक असे त्यांचे हावभाव! यातील घोडय़ांना लगाम नाही, अंगावर जीन नाही. बहुधा हे अपुरे काम रंगकामातून दाखवले जात असावे. इथल्या हत्तींना सुळे नाहीत, पण त्याजागी खोबणी केलेल्या दिसतात, ज्यावरून तिथे खरेखुरे हस्तीदंत बसविले जात असावेत. या प्राण्यांवर स्वार स्त्री-पुरुषही तेवढेच सजीव! त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे सारेच पाहण्यासारखे! यातील स्त्री-पुरुषांचे हात वरच्या कातळाला टेकलेले आहेत. जणू त्या प्राण्यांच्या हालचालीनेच त्यांनी स्वत:ला सावरण्यासाठी हा आधार घेतलाय. वेरूळची ख्याती जशी त्याच्या ‘केलास’मध्ये तशी बेडशाची कीर्ती त्याच्या या स्तंभांमध्ये!
बेडशातील हे विशेष स्तंभ मौर्य शैलीतील! त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हणतात. ‘पर्सिपोलिस’ हे इराणमधील एक प्राचीन शहर आणि तिथले हे पर्सिपोलिटन स्तंभ! तिथल्या संस्कृतीचा प्रभाव मौर्याच्या कलेवर आणि पुढे याच शैलीची छाया बेडशाच्या या खांबांवर पडली. कुठे हा इराण, कुठे त्या मौर्याचे राज्य आणि कुठे हे कामशेत जवळचे बेडसे लेणे! संस्कृतीची ही सरिता कुठून कुठे वाहत असते, गंमतच आहे! व्हरांडय़ाच्या अन्य भागावरही चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले. या व्हरांडय़ातच भोवतीच्या भिंतीत प्रत्येकी दोन खोल्या काढल्या आहेत. यातील डावीकडील एका खोलीचे काम अपुरेच आहे. उर्वरित खोल्या मात्र ओटय़ांसह खोदून तयार! पैकी उजवीकडच्या एका खोलीच्या द्वारपट्टीवर एक लेख आहे. ‘नासिकतो अनदस सेठीस पुतस पुसणकस दानं’ अर्थ असा, की नासिकचा कुणी श्रेष्ठी आनंदच्या मुलाने याचे दान दिले. या लेखात आजच्या नाशिक शहराचा प्राचीन उल्लेख मिळतो. यातील श्रेष्ठी म्हणजे कुणी व्यापारी आहे. या श्रेष्ठीवरूनच व्यापाऱ्यांच्या नावामागे आज लागणारा ‘शेठ’ हा शब्द तयार झाला आहे. इतिहासातील हे लेख, पण वर्तमानाला हे असे अनेक तपशील पुरवत असतात. मुख्य चैत्यगृहाच्या दाराशी असलेल्या भिंतीच्या वरच्या बाजूस पिंपळपानाची ती मोठी कमान कोरली आहे. पुन्हा खाली तीन चैत्यकमानी कोरलेल्या. यातील मधल्या आणि डावीकडील कमानी खालून चैत्यगृहात जाण्याचे मार्ग, तर उजवीकडच्या कमानीखाली छोटय़ा-छोटय़ा छिद्रांच्या नक्षीतून एक सुंदर गवाक्ष कोरलेले! यातील प्रत्येक चैत्यकमानीमध्ये पुन्हा फुला-पानांची सुंदर नक्षी गुंफलेली! व्हरांडय़ातील या शिल्पकामाचा ताण घेऊन प्रत्यक्ष चैत्यगृहात यावे तो या भव्यतेला गुढता प्राप्त होते. गजपृष्ठाकृती छत, त्याच्यातून निघालेल्या त्या सव्वीस खांबांची ती प्रदक्षिणा, तिच्या मधोमध पाठीमागे तो चैतन्याचा अंश असलेला स्तूप! या स्तूपावर त्यावेळेच्या लाकडी छत्रावलीचा खांब आणि त्यावरील कमळाचे छत्र अद्याप शाबूत! चैत्यगृहातील सुरुवातीचे दोन खांब सोडले तर उर्वरित सर्व अष्टकोनी. यातील उजवीकडच्या काही खांबांवर कमळ, चक्र, त्रिरत्न आदी शुभचिन्हे कोरली आहेत. चैत्यगृहातील ध्वनी नाद ऐकण्यासाठी आम्ही मंत्रांचा उच्चार केला आणि अद्भुत असा प्रतिध्वनी उमटू लागला. त्या प्रतिध्वनी मुळे मन मोहरून निघाले.
बेडशाच्या छतालाही लाकडी तुळया होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत शाबूत असलेल्या या तुळया पुढे चोरल्या गेल्या. प्राचीन वास्तूंमधील साहित्याची अशी चोराचोरी आमच्याकडे फार जुनी. नशीब हे, की कातळात कोरलेले हे खांब वगैरे पळविता येत नाहीत. बेडशाच्या या चैत्यगृहात सुंदर चित्रकामही होते. त्याचे काही अंश इथल्या भिंती-खांबांवर आजही दिसतात. १८६१ पर्यंत हा प्राचीन चित्रांचा ठेवा शाबूत होता. असे म्हणतात, त्यावर्षी कुणी मोठा इंग्रज अधिकारी ही लेणी पाहण्यास येणार होता. मग त्याच्यासाठी साफसफाईचे हुकूम सुटले आणि मग स्थानिक सरकारी लोकांनी ही लेणीच साफ केली. यामध्ये त्या जीर्ण पापुद्रय़ावर कशीबशी तग धरून असलेली चित्रेही पार खरवडून काढली. काय म्हणावे आता? त्या गोऱ्या साहेबाने इथे आल्यावर कपाळाला हात लावला असेल हे वेगळे सांगायला नको. या चैत्यगृहाशिवाय बेडशाचा विहारही आगळा-वेगळा! चैत्यगृहाप्रमाणे त्याची चापाकार रचना आणि भोवतीने खोल्या! वेदिकापट्टी आणि चैत्याकार कमानींनी या सर्व खोल्या एकमेकांना जोडलेल्या. या प्रत्येकात झोपण्याचे बाक, कप्पे अशी योजना. पण यातील उजवीकडच्या एका खोलीत झोपण्याच्या बाकातच तिजोरीप्रमाणे (लॉकर) दोन मोठाल्या कप्प्यांची अनोखी रचना केली आहे. पण मग सर्वपरित्यागाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या वास्तूत धनसंचयाची रचना कशी हेही एक नवलच!
बेडशाच्या या लेणीच्या बाह्य़ बाजूस ओळीने थंडगार-मधुर पाण्याची कुंडे, बसण्यासाठी ओटे खोदलेले आहेत. यातील एका कुंडावर त्याच्या दानधर्माचा लेखही आहे. याशिवाय दोन स्तूपही कोरलेले आहेत. निसर्गरम्य परिसर, पर्यटकांची अगदी अपवादात्मक हजेरी या साऱ्यामुळे इथे या लेणीत सदैव निरव शांतता नांदत असते. त्यातच पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याने हा सारा परिसरही स्वच्छ नेटका ठेवला आहे. बेडशाला आजवर अनेकदा आलो. कधी त्याच्यासाठी तर कधी पुढे तुंग-तिकोन्याच्या दुर्गभ्रमंतीसाठी! एक अपूर्व अशी इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील कोरीव लेणी पाहण्याचा आनंद ही अपूर्वच असतो.
पाबळ- मस्तानी गढी व विज्ञान आश्रम*
इतिहासातील अनेक पात्रे वर्तमानाला अद्याप निटशी उलगडलेली नाहीत. अनेकदा अशा पात्रांचा खरा इतिहास समजण्याऐवजी त्यांच्या विषयीच्या रंजक कहाण्याच जास्त परिचित झालेल्या असतात. थोरल्या बाजीरावांच्या मस्तानीचा उल्लेख यामध्ये खास करावा लागेल. मस्तानी कोण, कुठली, बाजीरावाबद्दलची तिची निष्ठा, तिचा मुलगा समशेर बहाद्दरनेही पेशव्यांबरोबर पानिपतच्या रणांगणावर पराक्रम गाजवत सोडलेला प्राण, हा सारा इतिहास कुणाच्या गावीही नसतो पण त्याऐवजी तिचे सौंदर्य आणि तिच्या गळ्यातून उतरताना दिसणारा रंगलेल्या विडय़ाचा रस..! या असल्या अतिरंजित कथा मात्र सर्वत्र परिचित असतात. असो, एकूणच पेशवाईतील या पात्राभोवतीचे तत्कालीन गूढ अद्याप कायम आहे.
इतिहास जे काही थोडेफार सांगतो त्यानुसार बुंदेलखंडचा राजा छत्रसालची ही मुलगी! इसवी सन १७२९ च्या सुमारास बाजीरावांच्या आयुष्यात ती आली. या दोघांमधील प्रेम जसे फुलत गेले तशी पुण्याच्या शनिवार वाडय़ावरही अनेक वादळे उठू लागली. बाजीराव-मस्तानीच्या या नात्यास आप्तेष्टांपासून ते धर्ममरतडांपर्यंत अनेकांचा उघड विरोध झाला. पुढे हा विरोध आणि ताणापासून मस्तानीला दूर ठेवण्यासाठीच बाजीरावाने तिला शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ आणि लोणी (ता. आंबेगाव) ही तीन गावे इनाम दिली. यातील पाबळला तिच्यासाठी चार बुरुजांची एक बळकट गढीही बांधली. एकूणच या प्रखर विरोधातही बाजीरावाने मस्तानीला अंतर दिले नाही. अशातच उत्तरेत एका मोहिमेवर गेलेले असताना कुठल्याशा आजाराने बाजीरावांना घेरले आणि यात २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदेच्या दक्षिणतिरी रावेरला त्यांचे निधन झाले. बाजीराव गेले पण जीवन मात्र मस्तानीचेच संपले! त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच ‘जेथे राया तेथे मी’ असे म्हणत या मस्तानीनेही पाबळच्या या गढीत आपला प्राण सोडला! गावाबाहेर जिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या जागी तिची समाधी बांधण्यात आली.
जिवंतपणी जिची उपेक्षा झाली त्या मस्तानीच्या वाटेला मृत्यूनंतरही फक्त उपेक्षाच आली. ना तिच्या प्रेमाची कदर कोणी केली ना तिच्या मृत्यूची! मस्तानी पाठोपाठ तिची ही वास्तूही बेवारस झाली. दिवसामागे तटबंदीचे दगडचिरे निघू लागले. पुढे तर तिला नावे ठेवणाऱ्यांनीच तिच्या या गढीच्या दगड मातीने स्वत:ची घरे बांधली. आज ही गढी पूर्णपणे नामशेष होऊन तिचे खिंडार बनले आहे. या खिंडारात नाही म्हणायला तो अखेरचा एक बुरूज कसाबसा शिल्लक आहे. आता ही जागाही कोणीतरी बळकावण्यापूर्वीच तिथे या मस्तानीच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही करता आले तरच पाबळच्या इतिहासाला काही अर्थ राहील. गढीप्रमाणे समाधीचीही व्यथा! गावाबाहेर रानात असलेल्या या समाधी भोवतीच्या भिंती ढासळल्या आहेत. भोवताली झाडा-झुडपांचे रान माजले आहे. हे सारे कमी होते म्हणून की काय मध्यंतरी गुप्तधनाच्या लालसेपोटी कुणीतरी माथेफिरूने या समाधीचीच तोडफोड केली. दुर्दैवाचे हे फेरे मस्तानीच्या मृत्यूनंतरही तिला असे छळत राहिले. खरे तर सारा आमच्याच इतिहासाचा धागा. त्याचेही तितक्याच संवेदनशील हातांनी संरक्षण करण्याची गरज आहे. पण ना आमच्याकडे असे हात आहेत ना तसे मन ! नाही म्हणायला एक दिव्याचा खांब या समाधीजवळ अद्याप निष्ठेने उभा आहे आणि समाधीवरील दगडी कुंडीतील जाईचा वेल गेली कित्येक वर्षे मस्तानीच्या प्रेमाचा दरवळ पसरवत फुलतो आहे.
पाबळचा मस्तानीचा हा सारा इतिहास जसा आपल्यासमोर व्यथा बनून पुढे येतो. त्याचप्रमाणे इथल्या भूगोलाने मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत एक नवी कथा जन्माला घातली आहे. पाबळचा भोवताल हा तसा पूर्णपणे रखरखीत, पाण्यावाचून करपलेला माळ! अशा या माळावर १९८३ च्या सुमारास डॉ. श्रीनाथ कलबाग नावाचा एक व्रतस्थ अवतरला. शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीमुळे देश-विदेशातील सर्व आकर्षणांना लाथ मारत त्याने इथे पाय रोवले! ग्रामविकासाचे ध्येय आणि तेही प्रयोगशील शिक्षणातून! या एकाच ध्यासातून या कर्मवीराने इथे एक प्रयोगशाळाच उभी केली- विज्ञान आश्रम! जिला भेट देण्यासाठी देश-विदेशातून अनेक अभ्यासक-संशोधक आणि सामान्य पर्यटक इथे येत असतात.
संस्थेच्या नावातच आधुनिकता (विज्ञान) आणि परंपरेचा (आश्रम) मिलाफ आहे. निसर्गावरच आधारित इथला अभ्यास, शिक्षण असे सारे काही आहे. चाकोरीबद्ध शिक्षण देण्याऐवजी मुलांची विविध कौशल्ये-गुणवत्ता विकसित करत त्यातून एकूण समाजाचाच विकास साधण्याचा प्रयत्न या प्रयोगशाळेतून केला जातो. इथे आलो की संस्थेच्या डोंबवजा खोल्यांपासून ते मुलांनीच विकसित केलेल्या विविध तंत्र कौशल्यांपर्यंतचा साराच प्रवास थक्क करून सोडतो. शेती, पाणी, हवामान, पशुपालन, गृह, आरोग्य, अभियांत्रिकी या साऱ्याच क्षेत्रातील प्रयोग संशोधन आणि कार्यानुभवात मुलांप्रमाणेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचाही सहभाग असतो. ग्रामीण विकासावर कुठेतरी चर्चा-व्याख्याने झोडण्या-ऐकण्यापेक्षा अशा एखाद्या उपक्रमाला भेट दिली की डोळे उघडतात, पाय जमिनीवर येतात आणि हात मदतीसाठी धावतात! असे पर्यटन आपल्याला समृद्ध करण्याबरोबरच संवेदनशील करत जाते! पाबळला जाण्यासाठी पुण्यापासून शिक्रापुर पर्यंत बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल. स्वत:चे वाहन असेल तर अगदी उत्तम आहे.
कराड (आगाशिव) ची लेणी
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर' असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
(जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. समाजकंटकांकडून त्यातील काही गुंफांचे मूळ पुरातन स्वरूप नष्ट करण्याचे काम अलिकडच्या काळात झाले आहे.- संदर्भ- दै. लोकसत्ता )
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. दरवर्षी ह्या लेण्या पाहायला येणार्यांची संख्या वाढते आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात. आता त्यांची हि श्रद्धा असली तरी त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होते. या बौद्ध लेण्या आहेत हे त्यातील ऐतिहासिक संदर्भ, शिल्पे यावरून दिसून येते. या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग म्हणून या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज मनात रूढ करण्यात आले. आता संपूर्ण डोंगरात कोरलेल्या या ६४ अवाढव्य लेण्या एका रात्रीत आणि तेही केवळ स्वताच्या नखाने कशा कोरणार हा प्रश्नच आहे. बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आगाशिव परिसरातील या लेण्या म्हणजे कराडचे सांस्कृतिक वैभव म्हणायला हरकत नाही.
यापैकी काही लेण्या पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. तरीही बर्याच लेण्या सुस्थितीत आहेत. त्यांचे सरकारने नीट जतन केले पाहिजे. अजंठा-वेरूळ प्रमाणे कराड च्या या लेण्यांचा विकास केला, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित केले तर निश्चितच कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल. त्यादृशीने या आगाशिवच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरात एको टुरिझम प्रकल्प राबवण्याची घोषणा सरकाने केली आहे. परंतु सरकारची हि घोषणा प्रत्यक्ष कृतीत कधी उतरते याचीच वाट कराडची जनता पाहत आहे.
दिवेआगर*
ऐतिहासिक तालुक्यातलं दिवेआगर गावही अतिप्राचीन , निसर्गरमणीय... गेल्या दहा वर्षांपासून या गावाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालंय , ते तिथे सापडलेल्या सोन्याच्या गणपतीमुळे. द्रौपदी धर्मा पाटील या १७ नोव्हेंबर १९९७ ला , नारळी-सुपारीच्या बागेत काम करत असताना जमिनीखाली सुमारे दीड फुटावर त्यांना एक पेटी सापडली. त्यात बावन्नकशी सोन्याची गणपतीची रत्नजडीत मूर्ती पाहून काही क्षण त्या निश्चल , स्तब्ध झाल्या. योगायोगानं , नव्हे दैवयोगानंच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. हा काय चमत्कार आहे ?, हे त्यांना कळेना. आजही ही मूर्ती पाहिली की अनेकांना हाच प्रश्न पडतो. कुठल्या काळातली असेल ही मूर्ती , कुणी आणि का ती जमिनीखाली ठेवली असेल , याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्या अनुषंगाने श्रीवर्धनच्या इतिहासावर संशोधकांनी एक दृष्टिक्षेप टाकला.<p> </p>मंदारपट्टण बंदराजवळ कुडे-मांदाड येथे बौद्ध लेणी गुंफा आहेत. या ठिकाणी प्राचीन काळी मौर्य व नंतर शिलाहारांचं राज्य होतं. तसेच श्रीवर्धन तालुक्याच्या दक्षिणेस असलेल्या बाणकोट-दासगाव खाडीत पालीपट्टण नावाचं बंदर होतं. या बंदरातूनही परदेशाशी व्यापार चालत असे. या बंदराजवळही लेणी गुंफा आहेत. जवळ महाड हे मोठे व्यापारी केंद्र आहे. परदेशाचा माल महाडला येई व देशावरील माल महाड बंदरातून परदेशी जात असे. या व्यापारामुळे श्रीवर्धन तालुका समृद्ध झाला. हे जसे वरदान होते , तसाच तो शापही होता. कारण त्यामुळेच इथे अरब चाचे व नंतर पोर्तुगीजांचे समुद्रहल्ले झाले. ते संपत्तीची लुटालूट करतील व मंदिरे भ्रष्ट करत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणूनच सुमारे एक हजार वर्षांपूर्वी दिवेआगरची सुवर्णगणेशाची प्रतिमा जमिनीत पुरून ठेवली गेली असावी , असा अंदाज आहे. आजही दिवेआगरात देवांच्या भग्न मूर्ती , तसेच पुष्करणी-शिलालेख , गंधेगाळ , क्षेत्रपाळ असे प्राचीन अवशेष आढळतात.<p> </p>या गावात सहाव्या शतकापासूनचे ताम्रपट सापडले आहेत. सुवर्ण गणपतीची मूर्ती सापडली तिथेच शके ९८२ चा दिवेआगर ताम्रपट सापडला होता. तो मराठीतला पहिला ताम्रपट मानला जातो. त्यामध्ये दिवे असा गावचा उल्लेख असून वेदविद्या पारंगत घैसास , देवल , मावलभट्ट आदी ब्राह्मण राहत होते. त्याकाळी सोन्याच्या नाण्यांचा वापर होता. त्यामुळे या गणपतीचा काळही एक हजार वर्षांपूर्वीचा ठरतो. दिवेआगरच्या सुवर्णगणेशाच्या दोन्ही कानांवर सोनचाफ्याच्या फुलाबरोबर पायरीचा आंबा कोरला आहे. मूर्तीच्या मुखवट्यावरील व्याघ्रमुख पाहून ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची वाटते. त्याकाळी या भागात शिलाहार घराण्याचं राज्य होतं. इ.स. ८०० ते १२६० हा त्यांचा सुमारे ४६० वर्षांचा कालावधी. शिलाहारांचा पराभव देवगिरीच्या यादवांनी केला व नंतर देवगिरीच्या यादवांचा पराभव अल्लाउद्दीन खिलजीनं केला , तेव्हापासून महाराष्ट्रात मुसलमानी सत्तेला सुरुवात झाली.<p> </p>सुवर्णगणेशाशिवाय रूपनारायणाचं शिल्पही अप्रतिम आहे. तेही शिलाहार कालीनच आहे. काही शिलाहार राजे स्वतःला रूपनारायण भक्त असे बिरूद लावत. आगरात माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्मोत्सव आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्णगणेशाचा प्रकटदिन उत्साहाने साजरा केला जातो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणार्या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते.हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरे पाहण्याजोगी आहेत. दिवेआगरमध्ये राहण्यासाठी एम.टि.डि.सी ,व खाजगी हाँटेल आहेत.घरगुती जेवण व राहण्याची सोय आहे.
सातपुड्यातील तोरणमाळ
महाराष्ट्रातील हिल स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुसर्या क्रमांकावर तोरणमाळचा समावेश आहे. सातपुड्याच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदुरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचे पठार उंच आहे. हरिणीला जशी आपल्याजवळ असलेल्या कस्तुरीची कल्पना नसते त्याचप्रमाणे तोरणमाळच्या सौंदर्याची कल्पना असलेले अहिराणीच्या खान्देशात फारच कमी आहेत. कालपर्यंत इथे दळणवळणाच्या सुविधांचा अभाव होता. या सर्वांचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले.
अंबा-अंबिका लेणी, जुन्नर
जुन्नर - नारायणगाव रोड ला बादशहा तलाव पासून दिसणाऱ्या डोंगरात ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. ह्या लेण्यांचे जुन्नर शहरापासून २ कि.मी एवढे अंतर आहे
महाबळेश्वर
महाबळेश्वराच्या मंदिरात येथुन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचं पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
येथील स्टॅनबेरीज, रासबेरीज, जांभळं, लाल रंगाची मुळे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो. आर्थर सीट पॉइंर्ट[संपादन] समुद्र सपाटी पासून १ ३ ४ ० मीटर उंचीवर असलेले हे महाबळेश्वर मधील एक पॉइंर्ट आहे. सर आर्थर यांच्या नावा मुळे या जागेचे नामकरण करण्यात आले होते. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे
गांधारपाले
दाभोळ बंदर
दाभोळ बंदर
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिध्द बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्यानकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर तीहामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरूमककेला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजाअसेही म्हणतात.
इथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्र विणत असते. अगदी १००वर्षांपूर्वीपर्यत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुदर वस्रे विणली जातहोती. शिवाशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या प्रचंड इतिहाच्या खाणाखुणा येथीलकिनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती,डोंगरकपारीतून दिसतील. तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदूराजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि याबंदरात समुद्रमार्गे पोर्तुगूज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्यामध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास ३०० वर्षांपासून अधिक काळ मूसलमानी सत्तांचाअंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींना इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींना आपल्यासत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमानसत्तांनी बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया, मुसलमानांशी युध्दे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्यभागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणिडोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तलझाली वा ते इथून गेले. व् शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहिदझाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचेभक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.
त्या काळात दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसूनजात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्गहोता. आजही पंढरपूर-क-हाड-चिपळून-गुहागर रस्त्याचे विजापूर-गुहागर असेच नाव आहे. असा हा दाभोळ गावअनेकवेळा बरबाद झाला. तितकेवेळातो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनीदाभोळला भेट दिली आणि तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.
इतिहासात डोकावाल तर दाभोळचे इतिहासकालीन महत्त्व सहज ध्यानात येते. दाभोळचे ऐतिहासिक स्थानसांगणा-या वास्तू आज भग्नावस्थेत आहेत. काहींची जेमतेम निशाणी आहे.तर काही ठिकाणी फक्त लाहन-लहान खुणा उरल्या आहेत. दाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसायमोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात.दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरीलकोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेलेअसतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरूनधक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेचमाशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात.या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारंपाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो
बंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावं. चिपळूनहून येणा-या या वाशिष्ठी नदीच्याखाडीचे दृश्य विहंगम दिसते. या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे तर अंजनवेलगावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्राकशही नजरेस पडतो. डोंगरावरआधुनिकतेकडे नेण्या-या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.दाभोळ बंदरातून दर तासालासुवर्णदुर्ग शिपिंग अॅन्ड मरिन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूकचालते. यामुळे आपण स्वत:च्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळून-गुहागर, वेळणेश्वर, हेदवीअशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे,रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.
भारताच्या पश्चिम किना-यावरील दाभोळ हे सर्वांत जुने बंदर आहे. या इतिहाससंपन्न प्राचीन दाभोळला आपणआवर्जून भेट द्यायला हवी.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
रांजणखळगे...निघोज
ढगाळलेल्या वातावरणात थंडगार गारव्याचा अनुभव घेत, रांजणासारख्या आकाराचे अर्धा किलोमिटर पसरलेले लहानमोठे निसर्गाचा आविष्कार म्हणजेच रांजणखळगे,त्यातून धबधब्यासारखे फेसाळणारे पाणी, कुकडी नदीवरील कुंडावर झुलता पूल, दोन्ही बाजूला असणाऱ्या श्री मळगंगा देवीचे मंदीर व दर्शन घेताना भाविक पहावयासमिळतात. पुणे नगर सरहद्दीवर निसर्गातील नवलामध्ये एक दिवस सुखद घालवता येतो.
पुणे व नगर जिल्ह्यात शिरूर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवरून कुकडी नदी वाहते. पुणे येथून रांजणगाव गणपती मार्गे टाकळी हाजी वरून कुंड पर्यटन स्थळ अवघ्या ७३किलोमिटर अंतरावर आहे. तर नगर येथून निघोज मार्गे ह्या ठिकाणावर जाण्यासाठी ७० किलोमिटर अंतर प्रवास करावा लागतो. कुंड पर्यटनस्थळावर जाऊन निसर्गाच्याचमत्काराचा अभ्यास करत मळगंगा देवीचे दर्शन करत परिसरातील निसर्गात कुटूंबासमवेत पर्यटनाचा खरा खुरा आनंद घेता येतो. कुकडी नदीवरील रांजणखळगे "कुंड पर्यटनस्थळ' याकडे जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध नाही. टाकळी हाजी व निघोज पर्यंत एसटीची सुविधा असली तरी एक दिवसाच्या प्रवासाला ती अडचण करू शकते. खासगीवाहन नेऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटता येईल. येथे दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल झाल्याने चार चाकी वाहनांना वाहतूक करून परिसरातील इतर ठिकाणे पहावयासमिळतील. येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी खासगी बसेस व शालेय शैक्षणिक सहली येत असतात.
कॉम्पॅक्ट बसॉल्ट व व्हेलिक्युलर बसॉल्ट खडकाचे थर एका आड एक आहेत. नदी प्रवाहात ते कापले गेल्याने ते नीट दिसतात. पाण्याच्या प्रवाहात लाहन मोठे भोवरे तयारहोतात. या भोवऱ्यामध्ये छोटे मोठे गोटे अडकून फिरू लागतात. नदीपात्रातील घर्षण क्रिया सुरू होते. या गोट्यांना "टूल्स' असे म्हणतात. भोवऱ्यात अडकून सतत गोल गोलफिरत राहिल्याने वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच खड्डे आणखी मोठे झाले की त्यांना रांजणासारखा आकार तयार होतो. भूशास्त्रीय परिभाषेत "पॉट होल्स' या संज्ञेने त्यांचीओळख आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी रांजणखळगी पहावयास मिळतात. मात्र कुकडी नदीवरील अर्धा किलोमिटर अंतरात असणारी ही रांजणखळगी निसर्गाचाचमत्कार समजली जातात. त्यामुळे भूशास्त्राचे अभ्यासक आवर्जून कुंड पर्यटन स्थळाला भेट देतात.
काही रांजणखळगे इतक्या जवळजवळ आहे की त्यांच्या भिंती व कडा एकमेंकामध्ये मिसळून गेल्या आहेत. कुंड मोठ्या विशाल आकाराचे असून त्याच्या खोलीची माहीती कोठेही आढळत नाही. उंच सखल भागात ही रांजणखळगे असल्यामुळे ते पावसाळ्यात धब्याधब्याचे रूप धारण करताना दिसतात. खळग्यांमधून येणारे फेसाळलेले पाणी वखडकाच्या कपारीत पाकोळ्यांनी तायर केलेली घरटी पर्यटक तासन्तास पहात असताना पहावयास मिळतात. सध्या कुकडी नदीत पाणी सोडले असल्याने फेसाळणारे पाणीपहावयास पर्यटक गर्दी करत आहेत. या रांजणखळग्यावर झुलता पूल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावरून हे रांजणखळगे म्हणजेच निसर्गातील नवल पहातायेते. दोन्ही बाजूला येथे मळगंगा देवीचे मंदीर आहे. टाकळी हाजी परिसरातील विविध विकास कामातून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरात दिवसभरवास्तव करून राहाता येते.
या परिसरात या व्यतिरिक्त पुण्याहून सरळ रांजणगाव गणपतीचे दर्शन घेता येते. नगर वरून येताना दर्याबाई पाडळी मंदीर, माकडे व लवणस्तंभ पहाता येते. निघोज गावातमळगंगा देवीची बारव, गावातील भव्य मंदीर पाहावयास मिळते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
भुलेश्वर मंदिर
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्प अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तीमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
१६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप - १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तीमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरुपी दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ् मयात व स्कंदपुराणाच्या काशिखंपात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्त्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तीगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भूलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलीकडेच उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरसकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेलात, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनोऱ्याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.
सवतसडा
मस्तानी तलाव
पळसदेवमधील श्री पळसनाथ
श्री क्षेत्र पार्वतीपुर (पार)
श्री आदिशक्ती श्रीरामवरदायिनी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठतील एक जागॄत शक्तीपीठ आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व हिंदू - मराठा सरदार, कुलवंत मराठा घराणी आणि समस्त वीरशैव समाज या सर्वांची ही कुलदैवत आहे.
श्रीरामवरदायिनी आईचे सुंदर देवालय हेमाडंपंथी पध्दतीने बांधण्यात आले आहे. मंदिराचे कळसासहित सुशोभिकरण केले असलेल्याने मंदिराच्या सौंदर्यात अमाप भर पडली आहे. मुख्य सभा मंडपासमोर असलेल्या पटांगणात एक प्राचीन झाड आहे तेथे बगाड लागते. सहयाद्रीच्या कुशीत घनदाट वनरार्इत नटलेले हे गाव. निसर्गाने अतिशय उदार अंत:करणानं अनोखे असे सॄष्टीसौंदर्य हया पावन परिसराला बहाल केले आहे. जवळूनच वाहणारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदी व छ्त्रपतीच्या का ळात या नदीवर बांधलेला प्राचीन पुल हे या गावच्या सौंदर्यात आणखी एक आभूषण.
मांढरगड ची काळूबाई
त्यामुळे मांढर या शब्दाची व्युत्पती मंदार आणि मांढव्य या शब्दावरून झाली आहे.
तेव्हा आदिमाता पार्वतीने महाकालीच्या रुपात त्या दानवांचा विनाश केला
आणि मंदार पर्वतावर विश्रांतीसाठी आली आणि तेथेच स्थानपन्न झाली.
तिलाच "मांढरदेवी काळूबाई" म्हणतात .
श्री काळेश्वरी देवी उर्फ काळूबाईचे पुरातन मंदिर आहे.
संपूर्ण महाराष्ट्र तसेच कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या
काळूबाईची नवरात्रात यात्रा असते. देवी नवसाला पावणारी असल्याने नवस चुकते करत असतात.
समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर असलेल्या गर्द वनराईत विराजमान झालेल्या
काळूबाईचे स्थान पर्यटकांना आकर्षित करत असते.
यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जात असते.
यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात.
देवीच्या जागराने सारा परिसर दुमदुमुन जातो.
ती शस्त्रधारी नाही. या देवीला कालीमाता एवजी काळूबाई हा अस्सल मराठी शब्द रूढ झाला आहे .
"दिव्यति इति देवी" अशी देवी या शब्दाची व्युत्पती सांगितली जाते.
पौष पौर्णिमेच्या दिवशी गडावर जत्रा साजरी केली जाते.
पिंगळजाई भवानी माता,पिंगळी
चकीत करणारी गोष्ट म्हणजे ह्या देवीच्या अगदी मूर्तीसमोर नंदी, कासव, व हनुमानाचेही मंदिर आहे पण इथे रामाची मूर्ती व शिवलिंग कुठेच पाहायला मिळत नाही...
सभामंडपातील खांबावर कोरीवकाम नाही
दीपमाळेच्या मागेच रसत्याला लागून हनुमानाचे मंदिर आहे व मंदिराबाहेर एक वीरगळ व दोन सतीशिळा पाहायला मिळतात.
कळसूबाई शिखर (Kalsubai Shikhar)
अकोल्यापासून चे अंतर :
कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकर्यांनी पायर्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.
इतिहास : कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.
पहाण्याची ठिकाणे : कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदर्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदर्याला जाणार्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात.वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.
स्वत:चे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरुन भंडारदर्याला जातांना, भंडारदर्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.
येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदर्याला राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
बारी गावात/ भंडारदर्याला जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय :
शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या अगोदर एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बारी गावातून ३ तास लागतात.
श्री सप्तश्रृंगीमाता वणी
सप्तश्रृंगगडाचे पायथ्याचं गाव नांदुरी येथून घाटरस्ता सुरू होतो सुमारे दहा किमी अंतराचा हा घाटमार्ग आहे. ह मार्ग संपल्यावर आपण गडाचे पठारावर येऊन पोहोचतो. या पठाराची समुदसपाटी पासून उंची ४७०० फूट आहे.येथे गावठाण आहे. येथे समोर अंगावर येणारा सरळसोट कडा दिसतो. या कड्या मधेच एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे मंदिरात वर जाण्यासाठी पाचशे बांधीव पायऱ्या आहेत. या मूळ पायऱ्यांचं बांधकाम पेशवेकालीन सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाई आणि कान्हेरे बंधू यांनी केल्याचे सांगतात .संपूर्ण पायरी मार्गावर छप्पर घातलेले आहे. पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर आहे. देवीची उभी मूर्ती पूर्वाभिमुख भव्य अतिशय रेखीव असुन. आठ ते दहा फूट उंचीची आहे, अठरा भूजायुक्त मूतीचे हातात विविध आयुधे आहेत. देवीचा डाव्या बाजूचा एक हात कानाला टेकलेला आहे.
या ठिकाण विषयी दंतकथा असुन. मार्कंडेय ऋषी या ठिकाणी तपस्चर्या करीत होते, त्यांचे या तपाने देवी प्रसन्न झाली व तिचे आज्ञे ने त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. देवीचे हे स्थान लोकांना परिचित नव्हते अनेक शतकापूर्वी या परिसरात धनगर आपली गुरे चरण्यासाठी नेत एका धनगरास येथे मधाचे पोळे दिसले ते काढत असताना त्याला देवीची मूर्ती दिसली व हे स्थान प्रकाशात आले.
गडावर व परिसरात कालीकुंड व सुर्यकुंड, जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुलतिर्थ, मार्कंण्डेय दर्शन, शितकडा अशी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे आहेत.
चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते, नवरात्र उत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर सकाळी महापूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम असतो. नवमीच्या दिवशी शतचंडी याग केला जातो. मंदिराच्या मागे असलेल्या गुहेच्या माथ्यावर एक दुर्गम सुळका आहे. त्यावर निशाण चढवणं हा देवीच्या यात्रेतला हा नवरात्रीतला महत्त्वाचा कार्यक्रम असतो. कोजागिरी पौणिमेला लाखो भाविक गडावर येतात.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
श्री रेणुकामाता माहूरगड
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो
नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
|| आदिशक्ती दुर्गेची नऊ रुपे ||
वारी वारी जन्म मरान्ते वारी Iहारी पडलो आता संकट निवारी I१I
जय देवी जय देवी महिषा सुर्मार्दिनीIसुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी !ध्रुI
तुजवीन भुवनी पाहता तुज ऐसे नाही Iचारी श्रमले परंतु न बोलवे काही I
साही विवाद करिता पडिले प्रवाहीIते तू भक्तालागी पावसी लवलाही I२I
प्रसन्ना वदने प्रसन्ना होसी निजदासा Iक्लेशापासुनी सोडीवी तोडी भवपाशा I
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशाIनरहरी तल्लीन झाला पद्पान्काज्लेषा I३I
जय देवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी!सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी|४|
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां ।। १ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ।। २ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी ।। ३ ।।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं ॥ ध्रु ॥
आरती ओवाळू एकाग्र भक्ती ॥
निर्गुण जे होते सगुणत्वा आले
चराचर हे सकळीक तुज पासोनी झाले
माया वेष्टित जग हे सगुण तवा केले
त्रैलोक्य सत्य असुनीही झाले ॥
एसी सगुण तुजला लेणी कांचन जडिताची
अनेक वस्त्रे शोभती कांचन भरिताची
बैसुनी सिंहासनी ;नृत्ये गणिकांची
पाहशी तू नयनी जननी जगताची ||
हरिहर ब्रह्मादिक येती नमनासी
जे जे वर मागती ते ते त्या देशी
कृपाळू अंबे माते पालन भक्तासी
परशुरामा दिना करुणाकर होसी ||
पाहुनिया रूप तुझे l मोदं मना झाला ll
श्रवण मंगळ्वारीं l जमुं सगळ्या आम्हीं नारी l
शोभवुनि स्थानासि l पूजूंया गौरीसि ll
सुगंधी सुमनें हीं l वाहूंया तिजला ll १ ll
वाहूनि हळदीकुंकु l सौभाग्यासी मागूं l
पोडश परिची पत्रीं l घेउनिया सत्पात्रीं ll
प्रेमाने भक्तिनें l अर्पूंया तिजला l
ओंवाळू आरतीला l मंगलगौरी तुजला ll २ ll
पंचारती ओवाळू l नैवेधासि समर्पूं l
जमूनि ग मैत्रिणी या l खेळू खेळाला ll
आनंदें प्रतिवर्षी, येईं गृहां आमुच्या l
ओंवाळू आरतीला. ll ३ ll
शंख चक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमो $स्तुते ||१||
नमस्ते गरुडा रूढे कोलासुर भायाग्कारी ||
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||२||
सर्वज्ञे सर्व वराडे सराव दुस्त भायाग्कारी ||
सर्व दुक्ख हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||३||
सिद्धीबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायेनी ||
मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||४||
आद्यंत रहिते देवी आद्य शक्ती महेस्वरी ||
योगाजे योग्साम्भूते महालक्ष्मी नमो $स्तुते ||५||
स्थूल सूक्ष्म महारावद्रे महासक्ती महोदरे ||
महा पाप हरे देवी महालक्ष्मी नमो $स्तुते ||६||
पद्मासानास स्थिते देवी पराब्ब्राम्हा स्वरूपिणी ||
पर्मेशी जगन मत r महालक्ष्मी नमो $स्तुते ||७ ||
स्वेताम्बर धरे देवी नानालंकार भूषिते ||
जगात स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमो $स्तुते ||८||
गिरिवर विंध्य शिरोधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुंबिनि भूरि कुटुंबिनि भूरि कृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१॥
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शंकरतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते ।
दनुज निरोषिणि दितिसुत रोषिणि दुर्मद शोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥२॥
अयि जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृंग निजालय मध्यगते ।
मधु मधुरे मधु कैटभ गंजिनि कैटभ भंजिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥
अयि जगदंब मदंब कदंब वनप्रिय वासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृंग निजालय मध्यगते ।
मधु मधुरे मधु कैटभ गंजिनि कैटभ भंजिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥३॥
अयि रण दुर्मद शत्रु वधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते
चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥५॥
अयि शरणागत वैरि वधूवर वीर वराभय दायकरे
त्रिभुवन मस्तक शूल विरोधि शिरोधि कृतामल शूलकरे ।
दुमिदुमि तामर दुंदुभिनाद महो मुखरीकृत तिग्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥६॥
अयि निज हुँकृति मात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्र शते
समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीज लते ।
शिव शिव शुंभ निशुंभ महाहव तर्पित भूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥७॥
धनुरनु संग रणक्षणसंग परिस्फुर दंग नटत्कटके
कनक पिशंग पृषत्क निषंग रसद्भट शृंग हतावटुके ।
कृत चतुरङ्ग बलक्षिति रङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥८॥
जय जय जप्य जयेजय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते
झण झण झिञ्जिमि झिंकृत नूपुर सिंजित मोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटीनट नायक नाटित नाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥९॥
अयि सुमनः सुमनः सुमनः सुमनः सुमनोहर कांतियुते
श्रित रजनी रजनी रजनी रजनी रजनीकर वक्त्रवृते ।
सुनयन विभ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमर भ्रमराधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१०॥
सहित महाहव मल्लम तल्लिक मल्लित रल्लक मल्लरते
विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्ग वृते ।
सितकृत पुल्लिसमुल्ल सितारुण तल्लज पल्लव सल्ललिते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥११॥
अविरल गण्ड गलन्मद मेदुर मत्त मतङ्गज राजपते
त्रिभुवन भूषण भूत कलानिधि रूप पयोनिधि राजसुते ।
अयि सुद तीजन लालसमानस मोहन मन्मथ राजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१२॥
कमल दलामल कोमल कांति कलाकलितामल भाललते
सकल विलास कलानिलयक्रम केलि चलत्कल हंस कुले ।
अलिकुल सङ्कुल कुवलय मण्डल मौलिमिलद्भकुलालि कुले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१३॥
कर मुरली रव वीजित कूजित लज्जित कोकिल मञ्जुमते
मिलित पुलिन्द मनोहर गुञ्जित रंजितशैल निकुञ्जगते ।
निजगुण भूत महाशबरीगण सद्गुण संभृत केलितले
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥१४॥
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥१॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः ।
ज्योत्स्ना यै चेन्दुरुपिण्यै सुखायै सततं नमः ॥२॥
कल्याण्यै प्रणतां वृध्दै सिध्दयै कुर्मो नमो नमः ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः ॥३॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यातै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥४॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः ॥५॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शाध्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥६॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥७॥
या देवी सर्वभूतेषु बुध्दिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥८॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥९॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१०॥
या देवी सर्वभूतेषु छायारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥११॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१२॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१३॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१४॥
या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१५॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१६॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१७॥
या देवी सर्वभूतेषु श्रध्दारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१८॥
या देवी सर्वभूतेषु कान्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥१९॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२०॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२१॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२२॥
या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२३॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२४॥
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२५॥
या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२६॥
इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानं चाखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः ॥२७॥
चितिरुपेण या कृत्सनमेद्वयाप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥२८॥
स्तुता सुरैः पूर्वमभीष्टसंश्रयात्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता ।
करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्याभिहन्तु चापदः ॥२९॥
या सांप्रतं चोध्दतदैत्यतापितैरस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
या च तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः ॥३०॥
गुह्यातिगुह्यगोप्त्री त्वं गृहाणास्तत्कृतं जपम् ।
सिध्दिर्भवतु मे देवि त्वत्प्रसादान्महेश्वरि ॥३१॥
इति देवीसूक्तम् समाप्तम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्॥२॥
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम्॥३॥
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम्॥४॥
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देव जुष्टामुदाराम्।
तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्येऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥
आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्व:।
तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मी:॥६॥
उपैतु मां देवसख: कीर्तिश्चमणिना सह।
प्रादुर्भुतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥
क्षुत्पपासामलां जेष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम्।
अभूतिमसमृध्दिं च सर्वानिर्णुद मे गृहात॥८॥
गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्।
ईश्वरिं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्॥९॥
मनस: काममाकूतिं वाच: सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य मयि श्री: श्रेयतां यश:॥१०॥
कर्दमेनप्रजाभूता मयिसंभवकर्दम।
श्रियं वासयमेकुले मातरं पद्ममालिनीम्॥११॥
आप स्रजन्तु सिग्धानि चिक्लीत वस मे गृहे।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम्।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥
आर्द्रां य: करिणीं यष्टीं सुवर्णां हेममालिनीम्।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह॥१४॥
तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्॥१५॥
य: शुचि: प्रयतोभूत्वा जुहुयाादाज्यमन्वहम्।
सूक्तं पञ्चदशर्च च श्रीकाम: सततं जपेत्॥१६॥
पद्मानने पद्मउरू पद्माक्षि पद्मसंभवे।
तन्मे भजसि पद्मक्षि येन सौख्यं लभाम्यहम्॥१७॥
अश्वदायै गोदायै धनदायै महाधने।
धनं मे लभतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥
पद्मानने पद्मविपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि संनिधस्त्वं॥१९॥
पुत्रपौत्रं धनंधान्यं हस्ताश्वादिगवेरथम्।
प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे॥२०॥
धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसु।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरूणं धनमस्तु मे॥२१॥
वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृतहा।
सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन:॥२२॥
न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति:।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्॥२३॥
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांसुकगन्धमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीदमह्यम्॥२४॥
विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधवप्रियाम्।
लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम्॥२५॥
महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥२६॥
श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते।
धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायु:॥२७॥
विविध लिखाणा मधुन या ठिकाणा विषयी व त्यांच्या संख्ये विषयी भिन्नता आढळते, हि संख्या कोठे १०८ तर काही लिखाणात ५१ मानली जाते. देवीभागवता मधे पुढील १०८ पीठ देवतांचा उल्लेख आहे.
१) विश्वलाक्षी २) लिंगधारिणी ३) ललिता ४) कामाक्षी ५) कुमुदा ६) गोमती ७) कामचारणी ८) मदोत्कटा ९) जयंती १०) गौरी ११) रंभा १२) कार्तीमती १३) विश्वेश्वरी १४) पुरूहुता १५) सन्मार्गदायिनी १६) नंदा १७) भद्रकर्णिका १८) भवानी १९) बिल्वपत्रिका २०) माधवी २१) भद्रा २२) जया २३) कमला २४) रुद्राणी २५) काली २६) कपिला २७) महादेवी २८) जलप्रिया २९) मुकुटेश्वरी ३०) कुमारी ३१) ललिताअंबिका ३२) मंगला ३३) उत्पलाक्षी ३४) महोत्पोला ३५) आमोक्षादी ३६) पाडळा ३७) नारायणी ३८) रुद्रसुंदरी ३९) विपुला ४०) कल्याणी ४१) एकविरा ४२) चंद्रिका ४३) रमणा ४४) मृगावती ४५) कोटवी ४६) सुगंधा ४७) त्रिसंध्या ४८) रतीप्रिया ४९) शुभानंदा ५०) नंदिनी ५१) रुक्मिणी ५२) राधा ५३) देवकी ५४) परमेश्वरी ५५) सीता ५६) विंध्यवासिनी ५७) महालक्ष्मी ५८) उमा ५९) आरोग्या ६०) माहेश्वरी ६१) अभया ६२) नितंबा ६३) मांडवी ६४) स्वाहा ६५) प्रचंडा ६६) चंडिका ६७) वरारोहा ६८) पुष्करावती ६९) देवमाता ७०) परावरा ७१) महाभागा ७२) पिंगळेश्वरी ७३) सिहिका ७४) अतीशांकरी ७५) उत्पला ७६) लोला ७७) लक्ष्मी ७८) अनंगा ७९) विश्वमुखी ८०) तारा ८१) पुष्टी ८२) मेधा ८३) भीमा ८४) तुष्टी ८५) शुद्धीकाया ८६) माता ८७) धरा ८८) धृती ८९) कळा ९०) शिवधारिणी ९१) अमृता ९२) उर्वशी ९३) औषधी ९४) कुशोदका ९५) मन्मंथा ९६) सत्यवादिनी ९७) निधी ९९) गायत्री १००) पार्वती १०१) इंद्राणी १०२) सरस्वती १०३) प्रभा १०४) वैष्णवी १०५) अरुंधती १०६) तिलोतमा १०७) विमला १०८) ब्रह्मकला ...................................................................................................................................................................
जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे.
पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म
घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा
आणि आराधना केली जाते. या पहिल्याच
दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला
'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या
दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात
होते.
डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या
पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची
कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे
नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी
झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या
यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित
केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे
समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र
इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ
प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की
प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर
नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना
यज्ञासाठी बोलावले आहे.
अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य
वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले
तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा
यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते.
तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी
जाण्याची परवानगी दिली.
स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची
वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी
देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण
तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते.
नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत
राग आला. तिथे शंकराच्या प्रती
तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून
आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक
शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने
संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य
होते, असे तिला वाटले
आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची
जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न
झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून
घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर
त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून
प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने
पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या
कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती
'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.
पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री'
देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला
होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती
शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून
नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि
शक्ती अनंत आहे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे.
ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी.
नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात
मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि
भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे
आणि भव्य आहे.
तिच्या उजव्या हातात जपमाळा आणि
डाव्या हातात कमंडलू असतो. तिने पूर्वजन्मात
हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला
त्यावेळी नारदमुनींने तिला भगवान शंकर पती
म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या
करायला सांगितली होती. या तपस्येमुळे या
देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी
असे म्हणतात.
एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या
केली. उपवास काळात तिला ऊन आणि
पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला
होता. या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षांपर्यंत
केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस
काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून
दिल्यामुळे तिला 'अपर्णा' हे एक नाव पडले.
क्षीण झाले होते. तिची ही अवस्था पाहून
तिची आई मेना खूप दु:खी झाली होती. तिने
तिला या कठीण तपस्येपासून मुक्त
करण्यासाठी 'उमा' अगं! नको ग नको! अशी
हाक दिली. तेव्हापासून देवी
ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे 'उमा' हे एक नाव
पडले. तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात
हाहाकार उडाला. सर्व देवदेवता तिच्या
तपस्येची प्रशंसा करू लागले. शेवटी ब्रह्मदेवाने
तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून
सांगितले, की 'हे देवी! आजपर्यंत इतकी कठोर
तपश्चर्या कुणीही केली नाही. तुझ्या
तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे. तुझी
मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान शंकर
तुला पती रूपात प्राप्त होतील. आता तू
तपस्या सोडून लवकर घरी जा. लवकरच तुझे पती
तुला घ्यायला येतील.' असा वर त्यांनी
दिला.
ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे.
तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप,
त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.
देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि
सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे
रूप आहे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
"या देवी सर्वभूतेषु माँ चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।"
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी या देवीची
पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी
देखील या दिवशी पूजा केली जाते. या
दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट
होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन
होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा
विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला
येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान
राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम
शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या
मस्तकावर घंटेच्या आकराचा अर्धचंद्र असल्यामुळे
तीला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते.
शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे.
या देवीला दहा हात आहेत. या दहा
हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.
तीचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी
तयार असते.
माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि
संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे
निवारण लगेच करते. तीचा उपासक
सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो.
तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे
रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती
पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ
देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या
देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता
बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण
शरीरात कांती-गुणांची वाढ होते.
आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त
आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना
पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.
आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची
उपासना करण्यासाठी तयार व्हा. तीची
उपासना केल्यामुळे सर्व संसारीक संकटातुन
मुक्ती मिळते. आपण नेहमी तीची उपासना
करण्यासाठी अग्रेसर असावे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
अमृतपूर्ण कलश, चक्र तथा गदा
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥
सिंहरूढा अष्टभुजा कुष्माण्डा यशस्वनीम्॥
भास्वर भानु निभां अनाहत स्थितां चतुर्थ दुर्गा त्रिनेत्राम्।
कमण्डलु चाप, बाण, पदमसुधाकलश चक्र गदा जपवटीधराम्॥
पटाम्बर परिधानां कमनीया कृदुहगस्या नानालंकार भूषिताम्।
मंजीर हार केयूर किंकिण रत्नकुण्डल मण्डिताम्।
प्रफुल्ल वदनां नारू चिकुकां कांत कपोलां तुंग कूचाम्।
कोलांगी स्मेरमुखीं क्षीणकटि निम्ननाभि नितम्बनीम् ॥
आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न
केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले
जाते. संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे
म्हणतात. कुम्हड्यांचा बळी तिला अधिक
प्रिय आहे. या कारणामुळेही तिला कुष्मांडा
म्हणून ओळखले जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या
दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने
कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना
केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या
देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची
रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची
आद्यशक्ती आहे.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे
निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच
आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.
तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून
निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि
प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच
आहे. देवीच्या आठ भुजा आहेत. ही देवी
अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण,
कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे.
आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन
सिंह आहे.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा
होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि
आरोग्यात वाढ होते. या देवीला प्रसन्न
करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.
मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला
शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.
कुष्मांडाची उपासना मनु्ष्याला रोगापासून
मुक्त करते. त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे
घेऊन जाणारी ही देवी आहे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
(हा मंत्र ५ व्या दिवशी जाप करावा)
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची
पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन
'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान
स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद 'कुमार कार्तिकेय' नावानेही
ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे
सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार
आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला
आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या
या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या
उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर
उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.
डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच
खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे
त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग
पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर
विराजमान असते. यामुळे या देवीला
पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह
आहे.
विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात
स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप
पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन
पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते.
यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने
उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र
होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण
होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि
सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी
मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या
उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल
होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी
असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज
प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून
मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून
मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा
चांगला पर्याय दुसरा नाही.
माहिती संकलन-:निखिल आघाडे.
दुर्गेचे सहावे रूप (६)
'या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥
ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी
या देवीची उपासना केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते.
योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान
आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक
कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून
देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्या भक्ताला
देवी सहजपणे दर्शन देते.
दुर्गेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागे एक
कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते.
त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या
कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी
कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष
भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने
त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची
इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या
प्रार्थनेचा स्वीकार केला.
अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा,
विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या
तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या
विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले.
महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम
पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी
असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी
या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म
घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे
तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी
पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने
महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा
पुराणात आहे
कात्यायनी अमाप फलदायक आहे.
कालिंदीच्या यमुना किनारी भगवान
कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी ब्रज
गोपींनी या देवीची पूजा केली होती. ही
देवी ब्रजमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात
प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत
तेजःपुंज आहे. तिला चार भुजा आहेत. देवीचा
उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा
आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे.
डावीकडील वरच्या हातात तलवार आणि
खालच्या हातात कमळाचे फूल
आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म,
काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने
प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला
अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो
व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो
रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.
सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला
शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.
यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे
दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या
रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या
साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा
तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण
पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य
लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस
विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी
माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही
डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार
आहेत.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून
अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे
कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या
उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान
करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा
आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात
खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी
आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे
तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने
भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी
कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.
राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून
जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी
आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.
कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे
पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती
शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने
होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊ
शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
या नावाने प्रसिद्ध आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी
कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी
साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते.
यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे
दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर
झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या
रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या
साक्षात्कारापासून मिळणार्या पुण्याचा
तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण
पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य
लोकांची प्राप्ती होते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस
विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी
माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही
डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार
आहेत.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून
अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात. गाढव हे
कालरात्री देवीचे वाहन आहे. वर उचललेल्या
उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान
करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा
आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात
खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी
आहे. परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे
तिचे नाव 'शुभंकारी' सुद्धा आहे. यामुळे भक्ताने
भयभीत होण्याचे काहीही कारण नाही. देवी
कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे.
राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून
जातात. ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारी
आहे. या देवीचे भक्त पूर्णत: भयमुक्त असतात.
कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे
पूर्ण पालन केले पाहिजे.
मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे. ती
शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने
होणार्या शुभ कामांची गणना केली जाऊ
शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा
केली
माहीती संकलन-:निखिल आघाडे
या देवी सर्वभूतेषु माँ गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची
पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने
सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप,
दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व
प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा
अधिकारी होतो. या देवीचा रंग पूर्णत: गोरा
आहे. या गोर्यापराची उपमा शंख, चंद्र आणि
कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय
आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।'
तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची
आहेत.
महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन
आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा
आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे.
वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील
डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी
अत्यंत शांत स्वभावाची आहे.
पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या
केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या
अनुसार तिने भगवान शंकराला पती
करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते.
तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान
शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ
घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली.
तेव्हापासून तिला महागौरी या नावाने
संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा
भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे.
आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या
कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते.
महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या
उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण
जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला
पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात
वर्णिला आहे.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची
सिद्धी देणारी देवी आहे. दुर्गा पूजेच्या
नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.
या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने
करणार्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी
प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय
मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती,
प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ
सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.
देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या
भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी
प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे
शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे
त्यांना लोक 'अर्धनारीनटेश्वर' या नावाने
ओळखतात.
देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे
वाहन सिंह आहे. ती कमळाच्या फूलावरही
विराजमान होऊ शकते. तिच्या उजव्या
बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी सिद्धीदात्रीची कृपा प्राप्त
करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले
पाहिजेत. तिच्या कृपेने अनेक दु:ख दूर करून तो
सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला
मोक्षाचा मार्गही मिळतो. नवदुर्गामध्ये देवी
सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीची
उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व
मनोकामना पूर्ण होतात.
माहिती संकलन-:निखिल आघाडे
श्री महालक्ष्मी कोल्हापूर
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले
या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
वेळणेश्वर मंदिर
सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर . येथील गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत. मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक लोक या काळ भैरवाला कौल लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी.
वेळणेश्वर समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल , स्वच्छ आणि सुरक्षित अशा समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला " मेरुमंडल "म्हणतात.
अशा या निसर्ग समृद्ध ठिकाणाला सर्वांनी एकदा तरी अवश्य भेट द्यायला हवीच!
⛳शिवभक्त - निखिल आघाडे⛳
पांडव लेणी, नाशिक
सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले दिसून येते.
पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
श्री तुळजाभवानी तुळजापूर
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
तुळजाभवानीचे प्रतिरूप करमाळ्याची कमलाभवानी
कमलाभवानीचा इतिहास पाहिला तर मराठा सरदार राजे रावरंभा निंबाळकर यांच्या उपासनेमुळेच तुळजापूरची तुळजाभवानी माताच करमाळ्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते . तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानल्या जाणा-या करमाळ्याच्या कमलाभवानी मातेला मोठा इतिहास लाभला आहे .
करमाळ्याच्या पूर्वेकडील उंच माळावर वैशिष्ट्यपुर्ण स्थापत्यकलेचा नमुना असणारे कमलाभवानीचे मंदीर आहे १७ व्या शतकात बांध ण्य़ात आलेले आहे हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसत आहे. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पाय-यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची ४.३ फुटाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे . मंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभा-यात श्री विष्णु - लक्ष्मिची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभा-यात सुर्यानारायनाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. एकाच मंदिरात पाच देवतांचे शक्तीपंचायतन असलेले करमाळ्यातील कमलाभवानी मातेचे मंदिर दुर्मीळ आहे तसेच कार्तिक स्वामीची मूर्ती देखील या मंदिरामध्ये पहावयास मिळेल. या शिवाय मुख्य मंदिराच्या समोर तीन गगनचुंबी गोपुरे आहेत. शहरामध्ये कोणत्याही बाजूने प्रवेश करताना दुरवरूनच देवी मंदिराचे स्थान दर्शविणारी ही गोपुरे उत्कृष्ट बांधणीची साक्ष देत उभी आहेत. मंदिर बांधणीचा विचार केला तर या मंदिर बांधकामात ९६ या आकडयाला फारच महत्व दिल्याचे स्पष्ट होत आहे. कारण ७५ फुट लांबी व ६५ फुट रुंदीच्या या मंदिराची उभारणीच ९६ खांबावर झाल्याचे दिसत आहे .
पाटेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर(जि.सातारा)
(जि.सातारा)
असं म्हणतात पाटेश्वरला निघताना १ गोणी तांदूळ घेऊन सोबत गेलात
आणि प्रत्येक पिंडीवर २ दाणे ठेवले तर तांदूळ संपतील पण पिंडी संपणार नाहीत
घनदाट झाडीचा प्रदेश , अल्लडपणे उड्या मारत जाणारे धबधबे ,
सातत्याने ऐकू येणारे मोरांचे आवाज आणि
वाटेवर दिसणारी हजारो शिवलिंगे...
सातारा शहरापासून १० किलोमीटरवर असलेल्या देगांव गावापासून
पाच किलोमीटरवर अंतरावर असलेले पाटेश्वर
समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर आहे.
पाटेश्वराच्या डोंगरात असलेली हेमाडपंथी लेणी वास्तुशिल्पाचे आदर्श नमुने आहेत.
डोंगरावरच्या घनदाट झाडीत महाकाय आकाराची शेकडो शिवलिंगं आहेत.
मोठ्या पिंडींवर अनेक छोट्या पिंडी कोरलेल्या दिसतात.
यातल्या प्रत्येक पिंडीचा आकार , रचना आणि नक्षीकाम वेगवेगळे आहे.
गाडीचा मार्ग संपल्यावर घनदाट झाडीतून चालायला सुरुवात केल्यावर
डोंगराच्या कपारीत रिद्धीसिद्धी सोबत असलेली गणेशाची सुंदर मूर्ती दिसते.
थोडसं पुढे गेल्यावर निळ्याशार पाण्याचं ,
कमळांच्या फुलांनी भरून गेलेलं सुंदर तळं दिसतं.
या तलावातही अनेक शिवपिंडी आहेत.
तळ्याच्या बाजूलाच सद् गुरू गोविंदनाथ
स्वामी महाराजांचा समाधी आश्रम आहे.
शिवपिंडी दिसतात.
हा परिसर पाहताना कंबोडियाच्या अंकोर मंदिराची आठवण येते.
मंदिराच्या बाजूला दगडी तटबंदी आहे.
तसेच मोठे दगडी खांब आणि नक्षीदार छत आहे.
मंदिराबाहेर दोन दगडी दीपमाळा आहेत.
मध्यभागी नंदीचे मंदिर आहे.
हा नंदी म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
४५ फूट उंची असलेल्या या मंदिराचं बांधकाम घडीव
दगडांनी केलेलं आहे. मंदिरात पाटेश्वराची पिंड आहे.
शंकर आणि शेषधारी विष्णूच्या मूर्तीही दिसतात.
दक्षिणेला भैरवाची मूर्ती दिसते.
प्रवेशद्वाराजवळ रोकडोबाची मूर्ती आणि मानवी शरीर
असलेला गरुड आहे.
याच परिसरात कार्तिक स्वामी आणि बलिभद्राची मंदिरं आहेत.
मूर्ती आढळतात.
मंदिराचं बांधकाम १७०८ ते १७४९ या काळात परशुराम
तारायण अनगळ या प्रसिद्ध वासतुविशारदाने केल्याचा उल्लेख सातारा गॅझेटमध्ये
आढळतो.
पाटेश्वर डोंगरावरून संपूर्ण परिसराचे विहंगम दृष्य दिसतं.
एकीकडे जरंडेश्वर तर दुसरीकडे सज्जनगडाच्या परिसराचा
रमणीय देखावा दिसतो.प्रवास
खासगी वाहन असल्यास पाटेश्वराच्या पायथ्याशी ठेवावे लागते
जवळच असलेल्या सातारा शहरात जेवण तसंच राहण्याची सोय होऊ शकेल.
नकट्या रावळाची विहीर
प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही
वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे.आहे. तेथे असणाऱ्या
पायविहिरीला स्थानिक नागरिक नकट्या
रावळ्याची विहीर म्हणून ओळखतात. दगड आणि पांढऱ्या
मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील
पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त
पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ' नकट्या रावळाची ' ही
विहीर सुमारे 41.5 मीटर लांब असून, त्यात 30.5 मीटर
लांबीचा सोपानमार्ग व खाली 11 बाय 11 मीटर
चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत
उतरण्यासाठी 84 पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या
कमानीवर नक्षीकाम केलेले आहे .प्रत्येक 20 पायऱ्यांनंतर एक
मोठी पायरी (सोपान) आहे. पायऱ्या संपतात त्या
ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान
आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत.12 व्या शतकात
'शिलाहार' राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही
ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती.
ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे
राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात
आठ प्रकारची वर्गवारी असून नकट्या रावळ्याची
विहीर ही सातव्या वर्गवारीतील असल्याचे
सांगण्यात येते.
ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा ! सातारा , thoseghar waterfall ! satara
सर्व सातारकरांना विनंती कि फोटो share करून साऱ्या जगाला दाखवा
आणि सातारा पर्यटन वाढीस चालना द्या …
पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे.
विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.
रामदासस्वामींच्याच सज्जनगडापासून जवळ असणाऱ्या ठोसेघर धबधबा पाहणाऱ्या पर्यटकांना येणार आहे
म्हणूनच यंदा ठोसेघर ग्रामपंचातीने पर्यटकांच्या स्वागतासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
धबधब्याचा जलप्रपात पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन
झुणका-भाकरची मऱ्हाटमोळी झणझणीत मेजवानी दिली जाणार आहे.
कृष्णा- कोयना व शिवगंगा यांचा त्रिवेणी प्रितीसंगम...
उत्तरेहुन वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहुन येणारी कोयना दोघी अगदी आमने सामने येवून एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पुर्वेला वाहत
जातात.
असे काटकोनात वाहने सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पर कराडचा प्रितीसंगम मात्र त्याला अपवाद.
तसे म्हंटले तर कृष्णा व कोयना सख्या बहिणीच...
महाबळेश्वर हे या दोघीँचे उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक,
थोरली बहिण कृष्णा समजुतदारपणे वगणारी. ही लहान मुलीसारखी डोँगर- दर्याँमध्ये जास्त खेळत बसत नाही.
हिला घाई असते ती घाटांवर यायची. तहानलेल्या पिकांना पाणि पाजून ताजे तवाने करण्याची.,
तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खुप खोडकर...
डोँगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते. हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे.,
प्रतापगड, मकरंदगड, आणि वासोटा, जावळीचे खोरे म्हणजे यांचे आंगण, पण धाकटी असली तरी आंगात जोर फार...
पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते.
तर अश्या या दोघी. अगदी भिन्न
स्वभावाच्या पण सख्या बहिणी.
जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना.
उस शेती पिकवणारी कृष्णा,
तर भात पिकवणारी कोयना.
वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा,
तर प्रतापगडच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना.
पण कराडला आलेवर दोघीँचाही ऊर दाटून येतो आणि धावत येवून दोघी एकमेकांना अलिँगन देतात.
"उत्तर भारतात जे स्थान गंगा यमूनेला तेच महाराष्ट्रात कृष्णा- कोयनेला, आणि कराड म्हणजे इथले प्रयाग."
कृष्णेचा किँवा कोयनेचा एकेरी उच्चार मराठी माणूस सहसा करत नाही. आपण नेहमी "कृष्णा कोयनाच" म्हणतो.
उदा. महाराष्ट्र गितातील हे कड्व,
"रेवा, वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी,
एक पणाच्या भरती पाणी,
मातीच्या घागरी,
किंवा आपण शाळेत शिकलेली ही कविता.-
कशासाठी पोठासाठी, देशासाठी - देशासाठी.
गंगा आणि गोदावरीसाठी, कृष्णा- कोयना यांच्यासाठी.
याच कराडच्या प्रितीसंगमात शिवप्रभूंनी व त्यांच्या मावळ्यांनी अफजल्याच्या वधानंतर शस्त्रे धुतले.
यामुळे कृष्णा कोयना व शिवगंगा असा त्रिवेणी प्रितीसंगम झाला.
हा परिसर इतका सुंदर आहे की आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी, छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहीते ते यशवंतराव चव्हाणांपर्यँत पण यांच्या सौँदर्याला भुलले.
याच संगमावर कराडची ग्रामदेवी आई जगदंबा श्री उत्तरालक्ष्मी व शिवप्रभूस्थापीत आई जगदंबा तुळजा भवानीचे मंदीर आहे. तसेच यशवंतराव
चव्हाण यांची समाधी आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांनी " राजा शिवछत्रपती व शेलार खिँड " मध्ये कराडच्या प्रितीसंगमाचे सुरेख वर्णन केले आहे.
या प्रितीसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत. उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रुप दिसते. तर पावसाळ्यात याचे रौद्र रुप दिसते.
मराठी मानसाने निदान एकदा तरी कराडच्या या प्रितीसंगमाचे दर्शन घ्यावे...
सिद्धेश्वर कुरोली
महादेवाचे जागृत शिवलिंग आणि त्यावरील ११ धारी पत्रातून होणार शिवनाद ...
सातारा शहरापासून ५० कि.मी च्या अंतरावर आहे
त्यांनी दैत्यांचा नाश करुन भूमि सुफलाम् केली .त्यामुळे जनता भयमुक्त झाली.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ निघून गेला.देशात बहामनी राज्य आले.दुहीमुळे त्याचे भाग झाले.
त्यापैकी विजापुरच्या आदिलशाहीखाली हा कुरोली भाग आला.
'मी येथे प्रगट होत आहे,तरी मला वर काढावे.त्यानुसार जमिन नांगरत असताना नांगराच्या फाळाला रक्त लागल्याचे आढळले.
त्यानंतर ती जमिन खोदण्यात आली व त्या ठिकाणी पिंड निघाली.तोच हा श्री सिद्धेश्वर होय.
वेदावती गंगेत विलीन होणाऱ्या ओढ्याकाठी या पिंडीची स्थापना करुन छोटेसे मंदिर बांधले गेल.
नंतर छत्रपति शंभूराजे पुत्र शाहू महाराजांतर्फे मंदिराचा जीर्णोद्धार झाला
'श्री सिद्धेश्वरमहात्म्य' हे अध्यायी ओवीबद्ध् पुस्तक रचून प्रकाशित केले आहे.
त्यावेळेस गावातील लांबवर पसरलेले ग्रामस्थ तसेच सिद्धेश्वरचे भक्त समस्त साताऱ्यातून दर्शनासाठी येतात
आणि रथोत्सव सोहळा पाहून जातात ....
अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत गावातील हिंदू तसेच मुस्लिम महिला हि उपवास धरतात
हे एक वैशिष्ट्य येथे पाहायला मिळते ..... तसेच सिद्धेश्वर हा आमचाही देव आहे असे मुंस्लीम बांधव अभिमानाने म्हणतात ....
शीवनाद होतो गहन । परम पावन क्षेत्र जें ॥ ४५ ||
----------- गोंदवलेकर महाराज
१)जागृत शिवालिंगातुन येणारा शिवनाद.
२)यशवंत बाबा महाराजांची समाधी
३)क्षेत्रफळानुसार मोठे गांव
४)प्रसिद्ध मराठी सिनेकलाकार दिवंगत राजा गोसवीचे यांचे जन्मगांव
५)सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गांव
६) दारूबंदी साठी प्रसिद्ध असे गाव
७) किर्तन केसरी ह.भ.प. श्री विलासबुवा गरवारे ह्यांचे गाव
१) श्री सिद्धेश्वर स्वयंभू शिवलिंग आणि त्यातून होणारा शिवनाद
२) सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराजांचे निर्वाण स्थळ
३) ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित राम मंदिर
४) विठोबा - विरोबा मंदिर ५) हनुमान मंदिर ६) कुर्लेश्वर मंदिर ७) हनुमान मंदिर
८) खंडोबा मंदिर ९) मशीद १०) दत्त मंदिर अशी जुनी धार्मिक स्थळे आहेत.
यमाई देवी मंदिर औंध
यमाई देवीचे देवस्थान औंध च्या दक्षिणेस असलेल्या डोंगराच्या माथ्यावर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे.
भक्त जणांवर चाललेला औंधसुराचा अन्याय दूर करण्यासाठी जोतीबा चालून आले
परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षाच्या शक्ती पुढे कमी पडू लागली
तेव्हा जोतिबांनी श्री यमाई ची मदत घेऊन औंधसुराचा वध केला आणी जनतेस भयमुक्त केले.
आणी तेह्वाच हा पौष पौर्णिमेचा दिवस भक्तगणांनी आनंद उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरवात केली,
आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मंदिरा सभोवतालचा परिसर हा निसर्गरम्य आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी पायऱ्या तसेच रस्ता उपलब्ध आहे.
पायरी मार्गाने डोंगर चढताना सुरुवातीस देवीच्या पादुकांचे दर्शन होते आणी
पुढे अंतर-अंतरावर दोन्ही बाजूंस संगमरवरात कोरलेली हत्ती, वाघ, सिंह, द्वारपाल
यांची शिल्पे पहावयास मिळतात तसेच डोंगरात असलेले गणेश मंदिराचे दर्शन होते.
हे संग्रहालय श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी तयार केले असून यामध्ये
अनेक चित्रकृती, शिल्पे आणी पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
यांची संगम्राव्रातील शिल्पे आणी पुढे नजरेस पडतो.
मंदिराच्या आवारात गणपती, दत्त, विष्णू, हनुमान व सरस्वती यांच्या मूर्ती व दत्त मंदिर आहे.
तटबंदिस पूर्वेस एक खिडकी असून तिच्या दोन्ही बाजूस फिरते दगडी खांब
येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेतात. खिडकीतून सूर्योदयाची किरणे थेट
श्री यमाई देवीच्या मुखावर पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री यमाई देवीची
काळ्या पाषाणात घडविलेली आणी कमळात स्थित असलेली मूर्ती आहे.
मुक्त झालेल्या औंधासुराने देवीकडे याचना करून तिच्या मंदिरासमोर स्थान प्राप्त केले.
म्हणूनच देवीच्या मंदिरासमोर औंधासुराचेही मंदिर आहे.
या मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून या मध्ये श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी
आपल्या कुंचल्यातून चितारलेली पुरानातील घडामोडींची तैलचित्रे आहेत.
मंदिराच्या अवरमध्ये असलेली दीपमाळ हि राज्यातील सर्वात उंच दीपमाळ आसे बोलले जाते.
या मंदिराच्या शेजारीच राजवाडा आहे. राजवाड्यामध्ये देखील श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी याच्या कलाकृती आहेत.
यात्रेस महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्राबाहेरून देखील भक्त येतात.
मोकळाई मंदिर: औंध गावामध्ये असलेल्या तळया शेजारी असलेले हे मंदिर
जुन्या काळातील दगडी बांधकामातील आहे. जेव्हा यमाई मातेने औंदासुराचा वाढ केला
तेह्वा झालेल्या युद्ध जखमांचा दाह देवीस असह्य झाला तेह्वा मातेने
येथील तळ्यात आपलेकेस मोकळे सोडून जलविहार केला आणि दाह शमविला,
यामुळे या ठिकाणी देवीस मोकळाई म्हणून प्रसिद्धी लाभली.
तळ्यातील पाणी पवित्र आहे आणि शरीरावरील रोग नाहीसे करतो आसे मानले जाते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
आपल्या 'औंध' मधे यमाई मंदिरात आहे
औंध गावातील यमाई मंदिरासमोर असून तिची उंची तब्बल ६५ फूट आहे...
क्रुरकर्मा अफझलखानालाही झाले नाही ..त्यालाही या दीपमाळेची भुरळ पडली ..
असा उल्लेख बाँम्बे गॅझेटिअर मधे आढळतो
शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !
महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील
म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे.
इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर
हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते .
हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते
तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.
पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून
मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी
आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना
भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन
मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत.
शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.
या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत.
मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर
आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो.
इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे.
छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे
आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस
हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.
मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच
अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत
तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.
मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते.
या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.
मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे.
मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे.
मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो.
मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून
थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज
यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते.
यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत.
मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते
याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.
१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते.
पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते.
हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते.
कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो.
देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात.
या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते.
द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते.
हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात
तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते.
द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.
शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता
माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन
त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला
हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले
आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.
शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)
मुंबई - सिंधुदुर्ग. 459 की.मी
पुणे - सिंधुदुर्ग. 356 की.मी
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com
जगातील सर्वोत्तम शिवस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम
ना बड्या घोषणा, ना मोठ्या वल्गना. नाहीत निवडणुकीच्या मोसमातील शिवप्रेमाचे पोकळ उसासे. तरीही केवळ शिवभक्तीच्या ध्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एक (आजच्या मितीला तरी) भव्य राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्रात नव्हे, तर दूर आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्याच्या जंगली पट्ट्यामध्ये आज साक्षात उभे राहिले आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मंदिराच्या पुरातन भिंतीजवळच या अपूर्व शिवस्मारकाची उभारणी मोठ्या कष्टाने मराठी नव्हे तर तेलगु बांधवांनी केली आहे हे विशेष! आजच्या बांधकाम सामुग्रीचा विचार करता या स्मारकाचे मूल्य दोनशे कोटींच्या वर जाईल. हैदराबादपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर नलमलाई पर्वताच्या रांगांमध्ये आणि घनदाट अरण्यात असे भव्य स्मारक उभारण्याची ज्योत एखाद्याच्या हृदयात पेटावी हेच खरे नवल. १९७४ मध्ये जेव्हा रायगडावर शिवराज्याभिषेकाचे तीनशेवे वर्ष साजरे केले जात होते तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींसह रायगडावर जमलेल्या लाखोंच्या मेळ्यात मोरोपंत पिंगळे या ऐतिहासिक नावाच्याच एका तेलुगु शिवप्रेमी इसमाच्या डोक्यात ही ठिणगी पडली.
मूळ नागपूरवासी मोरोपंतांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते या धर्मकृत्यासाठी सोबत घेतलेच, शिवाय श्री. टी. जी. व्यंकटेश हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि रायलसीमा केमिकल्स या उद्योग समूहाचे कारखानदार तसेच कै. जी. पुलारेड्डी अशी अनेक पक्षांचे आणि धर्मीयांचे बळकट हात या महान कार्यासाठी एकत्रित आणले. या तेलुगु बांधवांनी 'शिवाजी स्फूर्ती केंद्रम' या संस्थेची प्रथम स्थापना केली. १९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या दोघांना त्या पवित्र क्षेत्री पाचारण केले. त्यांच्याच हस्ते स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक साकारणाऱ्या आणि महाबलीपुरम येथील स्थापत्य शास्त्र कॉलेजचे प्राचार्य असलेल्या श्री गणपती सत्पथी त्यांच्या खनपटीला अहोरात्र बसून या शिवस्मारकाचा सुंदर आराखडा बनवून घेतला.
या राष्ट्रीय स्मारकाचा तळमजला पंचाहत्तरशे स्क्वेअर फूट असून तेथे शस्त्रागारांची व चित्रकलेची अनेकदा प्रदर्शने भरविली जातात. पहिल्या मजल्यावरचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा दरबार हॉल केवळ नावातच नव्हे तर प्रत्यक्ष रूपात 'दरबार हॉल' आहे. या स्मारकाची उंची ब्याऐंशी फूट असून वरच्या नक्षीदार घुमटाची उंची अठ्ठेचाळीस फुटांची आहे. या मंडळींनी मुंबईत येऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रोफेसर एन. पी. खानविलकरांना गाठले होते. त्यांच्याकडून शिवरायांचा सिंहासनाधिष्ठित बारा फूट उंचीचा ब्राँझचा सुंदर पुतळा घडवून घेतला. तो चार फुटी चबुतऱ्यावर बसवला गेला आहे. त्या दरबार हॉलमधील शिवपुतळ्याच्या आजूबाजूचे भव्य खांब, वरचा देखणा छत, अनेक धातूंतून बनवलेले पुढचे दोन खूर उंचावत दिमाखात उभे ठाकलेले बारा अश्व हा स्फूर्तीदायी प्रकार मुळातून पाहण्यासारखा आहे. दरबार हॉलच्या चारी भिंतीवर शिवचरित्र कथन करणारी सुमारे साठहून अधिक भव्य रंगीत चित्रे आहेत. त्या प्रत्येक चित्राखाली अभ्यागतांसाठी इंग्रजी, हिंदी आणि तेलगुमध्ये त्या त्या प्रसंगाची नेमकी आणि नेटकी वर्णने केली आहे.
गोवळकोंडा जिंकून, राजांनी मार्च १६७७ मध्ये भागानगर (आताचे हैदराबाद) सोडले. ते तिरुपती मार्गे जिंजीकडे (आताच्या तामिळनाडूमध्ये) निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत वीस हजारांचे घोडदळ आणि तीस हजार पायदळ अशी चतुरंग सेना होती. आत्माकपूरच्या तळावर आपला मुख्य फौजफाटा ठेवून ते मर्यादित सड्या फौजेनिशी मलय पर्वतावरील श्रीशैलमकडे आले. बाजूच्या नदीमध्ये स्नान करून शिवरायांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. एप्रिल १६७७ मध्ये राजांचा तिथे सलग नऊ दिवस मुक्काम होता. तिथला निसर्गदेवतेचा अजब नजारा पाहून राजे इतके प्रसन्न आणि प्रभावित झाले की, त्यांनी हा दुसरा कैलासच आहे असे धन्योद्गार काढले. आज हैदराबादवरून श्रीशैलम दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. पाऊणशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर नीलपर्वताच्या मोठ्या रांगा आणि दुतर्फा घनदाट राखीव जंगल लागते. श्रीशैलम जवळ येताच अचानक घोड्यावरून खाली उडी ठोकावी तशी एक खोलगट दरी लागते. तेथेच श्रीशैलसागर हे धरण डोंगराच्या खोबणीमध्ये बांधले गेले आहे. ते पार केले की उंचवट्यावर श्रीशैलम लागते.
आजसुद्धा इथली निसर्गराजी मनाला भुरळ घालते. तो शांत आणि पवित्र परिसर पाहून शिवरायांना विरक्ती आली होती. शिवरायांनी त्या प्राचीन मंदिराच्या उत्तरेस स्वखर्चाने एक भव्य गोपुरम बांधून कढले आहे. त्याचा 'शिवाजी गोपुरम' असा आज उल्लेख केला जातो. ह्याच चिरेबंदी भव्य कमानीतून कार्तिक महिन्यामध्ये दीप पूजनासाठी भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. राजांच्या आगमनापूर्वीच त्यांच्या अनुयायांनी तेव्हा याच परिसरात घाईने एक 'ध्यानमंडपम्' नावाची टोलेजंग वास्तू बांधून काढली होती. ती कालौघात पडून गेली आहे. मात्र त्या ध्यान मंदिराचे एक जुने छायाचित्र शिवाजी स्फूर्ती केंद्राकडे उपलब्ध आहे. आता तसेच ध्यानमंदिर नव्याने बांधायचा या मंडळींनी संकल्प सोडला आहे.
शिवस्मारकाच्या शेजारीच आवारात स्मारक समितीने 'शिवाजी अतिथी भवन' नावाचे तीन मजली मोठे गेस्टहाऊस बांधले आहे. त्यामध्ये साठ खोल्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आवारात एक सुसज्ज ग्रंथ विक्री केंद्र, आयुर्वेदिक औषधींचे प्रदर्शन अशा बऱ्याच सोयी आहेत.
शिवराय आणि त्यांचे सुपुत्र संभाजी व राजाराम या तिघांनीही दक्षिणेत कोलार, चिकमंगळूर, जिंजी, तंजावर, बेंगलोर ते त्रिचन्नापल्ली अशा विस्तीर्ण भूप्रदेशात तलवार गाजवली होती. औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या छाताडावर बसला होता. तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी शिवपुत्र राजाराम गोसाव्याचे रूप घेऊन सातशे मैल दक्षिणेत चालत गेले आणि आजच्या चेन्नई जवळ जिंजी येथे त्यांनी राज्य स्थापन केले हा वास्तव इतिहास आहे. शिवरायांचे महाराष्ट्रात कुठे नाही असे भव्य स्मारक दक्षिणेत व्हावे ही खूपच मंगलमय घटना आहे.
शिवरायांनी स्वखर्चाने गरीब यात्रेकरूंसाठी श्रीशैलम येथे अन्नछत्र बांधले होते. ते पुढे अनेक दशके सुरू होते. येथील नलमलाई पर्वतातील चांचू वनजमातींची अनेक गीते मी ऐकली. त्यामध्ये शिवरायांच्या श्रीशैलम भेटीचा गौरव आहेच.
दूर श्रीशैलमच्या जंगलातील शिवरायांचा तो दरबार पाहून मी जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा आमच्या भग्न रायगडाभोवतीची कावल्याची ऐतिहासिक खिंड, कोकण दिवा, लिंगाणा ही गिरीशिखरे आणि किल्ले माझ्या मनाभोवती गर्दी करत होती. शिवरायांच्या रायगडाचा जिर्णोद्वार बाजूला राहू दे किमान आजची गडावरची दुरवस्था तरी कधी संपणार आहे, हा मेलेला महाराष्ट्र रायगडासाठी तरी कधी जागा होणार आहे असे प्रश्न ते सर्वजण मला विचारीत होते.
महाराष्ट्र सरकारचे बहुचर्चित शिवस्मारक कधी पूर्ण व्हायचे असेल ते होवो. परंतु निस्सिम शिवभक्तीच्या ध्यासातून आणि कष्टत्यागातून आम्ही श्रेष्ठ असे राष्ट्रीय शिवस्मारक बांधू शकतो. इतिहासकारांच्या फळीला किंवा एखाद्या शासकीय कमिटीला न जमेल असे संपूर्ण सेतू माधवराव वाङ्मयाचे प्रकाशन करू शकतो, याचे अद्वितीय उदाहरण दूरदेशीच्या तेलुगु बांधवांनी घालून दिले आहे. मी इतिहासाच्या वेड्या शोधापायी आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकेपर्यंत जाऊन आलो आहे. मात्र श्रीशैलम येथील शिवस्मारकासारखे शिवरायांचे अन्य भव्य स्मारक मला तरी कोठेही पहावयास मिळाले नाही. ते निर्माण करणाऱ्या शिवप्रेमी तेलुगु बांधवांना मानाचा मुजरा!!
http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete
http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...
-
पुणे खादाडी :- अमर्यादित पण मिनी थाळी हवी असतील तर आपटे रोड वरील आशा डायनिंग हॉल ला पर्याय नाहीं. लॉ कॉलेज रोडवरील कृष्णा डायनिंग हॉल मध्ये...
-
http://bhargavasarma.blogspot.com/2010/01/basar-rare-temple-of-goddess-saraswathi.html Basar - A Rar...
-
https://matriwords.com/2019/02/17/hampi-continues-to-live-part-1/ Hampi Continues to Live – Part 1 In this several-part series...








