Wednesday, September 15, 2021

सफर क्राकोची

 युरोपमधे माझी चालु असलेली भटकंती यावर आधारीत हा लेख आहे. मागील वर्षी आम्ही केलेल्या क्राकोच्या सफरीचे थोडक्यात वर्णन लिहित आहे.

दिवस पहिला :

ख्रिसमस आणि युरोपचे एक वेगळेच नाते आहे आणि ते अनुभवायचे असेल तर युरोपमधील कोणत्याही शहराला त्या दरम्यान भेट देणे हे आलेच!! तर अशीच मागील वर्षी ख्रिसमसच्या आठवड्यात मी, सपत्नीक व मित्रपरिवारा बरोबर Central Europe मधील Poland ह्या देशात, ७व्या शतकात वसलेल्या Krakow या अतीशय टुमदार शहराला भेट द्यायचे ठरवले.

k1
* Bratislava - Krakow रोड ट्रिप

Bratislava या Slovakia च्या राजधानी पासुन ७ तास कारने प्रवास करुन Krakow ला पोहोचलो. होस्टेलचे बुकिंग आधीच केले असल्यामुळे गाडी थेट होस्टेल जवळच उभी केली. बाहेर तापमान साधारण -७ degree celcius एवढे होते. नजर जाईल तिथ पर्यंत बर्फ पसरला होता आणि वरुन पावसाची रिपरिप चालुच होती. एकदाचे होस्टेलमधे चेक-इन केले, सामान खोलित ठेवले आणि मग क्राकोच्या मेन सेंटर मध्येच फेरफटका मारायचे ठरले.
पाषाणयुगापासुन अस्तिवात असलेले आणि ७व्या शतकात वसलेले हे युरोप मधील एक ऐतिहासिक शहर आहे. त्यात आपल्या शहरांचे जुनेपण टिकवुन ठेवणे यात युरोपियन लोकांचा खासच हातखंडा आहे., त्यामुळे शहरात फिरताना आपण भुतकाळात कधी पोचलो हे समजतच नाही. आमचे होस्टेल, क्राकोच्या "Ryneck glowny" (रायनेक ग्लाउनी) अर्थात मेन मार्केट स्क्वेएर पासुन जवळच असल्याने, बाहेर पडताच आम्ही थेट स्क्वेएर मधे पोचलो.

k2
* मेन स्क्वेएर - डाव्या बाजुला सेंट मेरीज कॅथिड्रल आणि त्या समोरील ख्रिसमस मार्केट

क्राकोचा हा स्क्वेएर १५व्या शतका पर्यंत युरोप मधला सर्वात मोठा स्क्वेएर मानला जायचा. या एकाच स्क्वेएरमधे एकिकडे सेंट मेरीज चर्च, मधे टाउन हॉल आणि बाजुला सर्वत्र ख्रिसमस मार्केट थाटले गेले होते. त्याच्या मधोमध होता लाईट्स आणि ग्लिटरने सजवलेला उंच ख्रिसमस ट्री.
St.Merry's Basilca अर्थात सेंट मेरीज चर्च हे लाल दगडात बनवलेले १४व्या शतकातील चर्च आहे. युरोपमधील इतर cathedral's इतके भव्य नसले तरी ह्या चर्चचे ऐतिहासीक महत्व आहे आणि एक गंमत अशी की, ह्या चर्चच्या मनोर्यावरुन दर तासाला trumpet वाजवले जाते. परंतु त्याचे सुर पुर्ण केले जात नाहीत (थोडक्यात एखाद्या टेप वर चालु असणारे गाणे मधेच बंद केल्या सारखे). ह्याचे कारण असे की कोणे एकेकाळी क्राकोवर शत्रुने चाल केली होती आणि ते सैन्य ह्या चर्च वरच्या trumpet वादकाने बघितले आणि लोकांना सावध करण्यासाठी ह्या पठ्ठ्या जोरजोरात trumpet वाजवु लागला. त्याचे सुर ऐकुन क्राकोवासी आणि त्यांचे सैनिक सतर्क झाले व त्यांनी शहराचे रक्षण केले. पण ह्या सगळ्या भानगडीत शत्रुने मात्र ह्या trumpet वादकाचा तीराने खात्मा केला. त्यामुळे त्याच्या प्रित्यर्थ अशी हि trumpet वादनाची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.
चर्च आतुन साधारणच होते. चर्चच्या आत फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे, कॅमेरा म्यान करुन ठेवला होता. चर्च मधुन निघुन मग पुढे पेटपुजे साठी आम्हि भारतीय होटेल कडे वाटचाल केली. होटेल मधे ऐन भुकेच्या वेळी पोचल्याने बिर्याणी, पनीर, चिकन कढाई, रोटी ह्यावर यथेच्छ ताव मारुन आम्ही गाव भटकंतीला पुन्हा सुरवात केली.
आमच्या ग्रुपमधे २ बायका असल्याने आमची वारी थेट वळली ती shopping mall कडे. १४व्या शतकातुन थेट २१व्या शतकात प्रवेश झाल्या सारखे वाटले. मॉल मध्ये नेहमीची शॉपिंग झाली आणि आम्ही परत होस्टेल मध्ये पोचलो ते दुसर्‍या दिवशी लवकर उठुन भटकंतीला निघायचे या विचारानेच.

k3
* शॉपिंग मॉल मधे

दिवस दुसरा :

सकाळी ९ च्या सुमारास Wawal castle वर पोचलो. हा castle, wawal नावाच्या टेकडीवर बांधलेला असल्यामुळे त्याला हे नाव पडले आहे. हा किल्ला जरी ११व्या शतकातला असला, तरी इथे अगदी ५०,००० वर्षापुर्वीपासुन वस्ती होती असे पुरावे सापडले आहेत आणि ज्याचे जतन ह्या किल्ल्यात केलेले आहे. त्यातल्याच एका दंतकथे नुसार, ह्या टेकडीवरील रहिवाश्यांचे एक dragon संरक्षण करत असे. त्या dragonची आठवण म्हणुन, आता ह्या टेकडी खाली dragonची प्रतिकृती बनवली आहे.

k4
* Wawal castle

k5
* ड्रॅगन

किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य मोहक होते. समोर वाहणारी विस्तुला नदी, त्या पलीकडे न्यु क्राको शहर आणि सर्वत्र पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि बर्फ म्हणजे स्नो फाईट हि आलीच!! मग एकमेकांना बर्फाचे गोळे मारत, आमचा किल्ला बघुन झाला. आता आम्ही पुढे निघालो ते क्राकोचे main attraction असलेले - "Auschwitz-Birkenau" (आउश्वित्स-बर्कनाव) अर्थात दुसर्‍या महायुद्धातील Death camp.

k6
* किल्ल्यावरुन दिसणारे दृश्य

k7
* स्नो फाईट

क्रमश

पोलिश मित्राकडून क्राकोबद्दल बरीच माहिती ऐकलेली आहे. दुसर्‍या महायुद्धात आणि पुढे कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी पोलंडमधल्या सुंदर शहरांची पार लावली पण क्राकोचं सौंदर्य टिकून आहे असं म्हणतात. अनेक ठिकाणी पाहिलेल्या फोटोंमधून ते पटतंही. मुख्य चौक, कासल आणि कासलवरून दिसणार्‍या दृष्याचे फोटो फारच सुंदर आहेत. विशेषतः अमेरिकेतली ठोकळेबाज, आधुनिक, प्लास्टीकी शहरं बघितल्यानंतर युरोपातली गरीब शहरंही सुंदर वाटतात. (होय, मी पाश्चात्य जगात बर्‍याच देशात फिरल्याची ही अ-क्षीण जाहिरात आहे.) क्राको सुंदरच दिसतंय.

क्राकोमधे अन्य काही जुन्या-नव्या कथिड्रल, चर्चेस वगैरे आहेत का? (पोलिश लोकं आता फार धार्मिक वाटतात विशेषतः कम्युनिस्ट राजवट उलथल्यानंतर आणि पोप जॉन पॉलमुळे; म्हणून आगाऊ चौकशा!) पोलंडमधे पोलिश भाषा सोडून इतर काही कानावर आलं का? भाषेची अडचण तुम्हाला आली का? ब्राटीस्लाव्हा-पोलंड असा प्रवास केलात, तर ब्राटीस्लावाही दाखवा की! स्लोवाकीयामधे स्किईंग सोडून इतर काही होत नाही असा माझा गैरसमज आहे, तो फोटोबिटो दाखवून खोडून काढलात तर फार आवडेल.

राकोमधे अन्य काही जुन्या-नव्या कथिड्रल, चर्चेस वगैरे आहेत का?
क्राकोमधे हे एक मुख्य कॅथिड्र्ल आहे आणि अजुन एक wawal castle मधे आहे. क्राको पासुन जवळच असलेले Wadowice गाव, म्हणजे पोप जॉन पॉल २ यांचे जन्मस्थान.. आम्ही मात्र तिथे जाउ शकलो नाही. तसेच Jasna Gora या क्राको पासुन १ तासाच्या अंतरावर असलेल्या गावात, Jasna Góra Monastery ह्या ठिकानी जगप्रसिद्ध Black Madonna चे painting आहे. परंतु वेळेअभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही.
पोलंडमधे पोलिश भाषा सोडून इतर काही कानावर आलं का? भाषेची अडचण तुम्हाला आली का?
युरोपमधल्या कुठल्याहि टुरिस्ट ठिकाणी गेल्यास, हमखास इंग्लिश बोलले जाते. त्याला क्राको देखिल अपवाद नाही.  

Auschwitz-Birkenau"-

Steven Spielberg यांचा ऑस्कर विजेता चित्रपट "Schindler's List" पाहिला असल्यास हे नाव तुम्हाला चटकन लक्षात येइलच. मी देखिल हा चित्रपट काहि वर्षांपुर्वी बघितला आणि तेव्हाच कधीतरी ह्या ठिकाणी जाउन यावे अशी मनात नोंद करुन ठेवली होती. हे आज प्रत्यक्षात खरे होत होते.
क्राको ह्या मुख्य शहरापसुन साधारण १ तासाच्या अंतरावर Aushwitz ह्या छोट्याश्या गावात हा "Auschwitz-Birkenau" concentration camp आहे. दुसर्‍या महायुद्धातील नाझींनी बांधलेला आणि जगापासुन लपवुन ठेवलेला, हा जगातला सर्वात मोठा Nazi concentration camp होता. १९४०-१९४५ ह्या ५ वर्षांच्या अवधीत इथे १.३ million लोकांचा अत्यंत क्रुर आणि निर्दयीपणे हिटलरच्या नाझी सैनिकांनी खातमा केला. अशा ह्या ठिकाणी आम्ही दुपारी १च्या सुमारास बसने पोचलो. बस मधुन उतरताच समोर दिसले ते कुप्रसिद्ध "Arbeit gate" ज्याला "Hells Gate" म्हणुनहि ओळखले जाते.

a1

* Arbeit gate

ह्याच गेट मधुन लाखो माणसे, लहान मुले, बायका - ज्यु, जिप्सी, पॉलिश, डच, युद्ध कैदि अशा अनेकांना आत नेण्यात आले. जे पुन्हा कधीच आपल्या घरी परतु शकले नाहित.
गेट जवळ पोहोचताच आपल्याला एक अनामिक भिती आणि सुन्न करणारे वातावरण जाणवु लागते. गेट जवळच मिळालेले recorders कानाला लावले व आम्ही आत शिरलो. आत मधे प्रवेश करताच पहिले नजरेस पडते ते लाल विटांच्या आणि छोट्या खिडक्या असलेल्या २ मजली इमारती व सर्वत्र पसरलेले लोखंडी तारांचे कुंपण. त्यात सगळीकडे साचलेला बर्फ आणि शांतता एक वेगळेच वातावरण तयार करत होते. Recorders व गाईड च्या निर्देशानुसार आम्ही प्रत्येक इमारतीत शिरत होतो. १९४७ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर पॉलिश सरकारने ह्या ठिकाणी सापडलेल्या वस्तुंचे संग्रहालय स्थापन केले आहे. आम्ही ह्या वस्तु पाहुन आवाक होत होतो, काहि ठिकानी तर किळस देखिल वाटत होती. इथे मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांच्या चपला, कापलेल्या केसांचा ढिगारा, सामानाच्या पेट्या, अपंग लोकांचे खोटे हात्/पाय, तर कुठे चश्मे, तसेच लहान मुला-मुलिंचे व मोठ्यांचे रक्ताने माखलेले कपडे, गॅस चेंबर मधे वापरण्यात येणार्‍या विषारी गोळ्या ह्या देखिल ठेवल्या आहेत. दुसर्‍या महायुद्धात हिटलरेने काबीज केलेल्या जागांचे नकाशे व इथे आणलेल्या लोकांचे फोटो, त्यांची माहिती अशा एक ना अनेक वस्तु इथे आहेत, ज्या तुम्हाला वास्तवाच्या जवळ घेउन जातात.

lklj

* लाल विटांच्या इमारती

mnm

* तारांचे कुंपण

jklj

dd

ffg

fkjrfkl

* विषारी गोळ्या

kdfnkfjd

djcfhjdfc

* कैद्यांचे फोटो व माहिती

असे ह्या Aushwitz-I चा निरोप घेउन आम्ही निघालो ते Birkenau ह्या extermination camp अर्थात death camp कडे. ह्यालाच Aushwitz-II असेही म्हटले जाते. ह्याच्या मुख्ख्य द्वारावर प्रवेश करताच "Shindlers list" ह्या सिनेमात दाखवलेल्या त्या मोठ्या दगडी दरवाजाची आठवण झाली. त्यातुन अनेक बंदी बनवलेल्या सामान्य लोकांना ट्रेनच्या बंदिस्त बोगितुन आणण्यात येई व त्यांचे अमानवी हाल करुन त्यांना मारले जाई. येथे आणलेल्या लोकांना नाझी सैनिक अक्षरशः कोंबड्यांचा खुराड्यासारख्या दिसणार्‍या खोल्यांत डांबुन ठेवित. रोज सकाळी ऊन असो वा थंडी, ह्या कैद्यांची नग्नावस्थेत गेट समोरील, अगदी ४ फुटबॉल मैदाने मावतील इतक्या मोठ्या पटांगणात हजेरी लागे वा परेड घेत. ह्यात एखादा कैदी मागे राहिला तर त्याला जागेच गोळीने ठार मारले जाई. काहिंवर विषप्रयोग केले जात असत तर कुठे अमानवी वैद्यकिय प्रयोग केले जात असत. काम करण्यास असक्षम असणार्‍या कैद्यांना गॅस चेंबर मधे टाकुन मारण्यात येत असे. या सर्व खुणा आम्हाला तिथे असलेल्या खोल्यांतुन फिरताना दिसत होत्या आणि जाणवतहि होत्या. ह्या खोल्या म्ह्णजे एकही खिडकी नसलेली बैठी घरे. ह्या खोल्यांमधे, ज्या प्रमाणे bunker bed असतात तसे लाकडाच्या फळ्या टाकुन विभाजन केले होते.

ddd

* Birkenau गेट

kj

* कैद्यांना आणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रेनची बोगी

kjdfp

* बंकर बेड

oi

* बंदिवासात असताना कैद्यांनी काढलेले चित्र

jdhkjdf

ewr

दुसरी खोली म्हणजे स्वच्छतागृह. खोलिच्या मध्यभागी एक नाला खणला होता व ह्याच्या दोन्ही बाजुला बसुन मलमुत्र विसर्जीत केल्यावर त्यातच उतरुन तो नाला साफ करायला लागत असे. तिसरी खोली होती "Gas chamber". ज्यात फक्त वरुन चिमनी सारखे openinig असे. ह्या खोलित कैद्यांना डांबल्यावर चिमनी मधुन विषारी गॅसच्या गोळ्या सोडल्या जात असत. आत त्या लोकांचे काय हाल झाले असतील ह्या नुसत्या विचारानेच अंगावर काटा येतो.
१७ जानेवारी १९४५ रोजी जेव्हा रशियन सैनिक इथे हल्ला करणार आहेत असे नाझींना समजले, तेव्हा ह्या संपुर्ण कँपच्या खाणाखुणा मिटवण्यासाठी १ आठवड्यात ६०,००० कैद्यांना जिवंत जाळले. ती जागा आजही तितकीच भयानक दिसते. त्यावेळी जाळल्या गेलेल्या लोकांच्या अस्थी आजही तिथे काचेच्या एका भांड्यात जतन करुन ठेवल्या आहेत.

kdjw

* मित्र राष्ट्रांनी केलेल्या हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त झालेले बंकर

ghj

uy

* जाळण्यात आलेल्या लोकांच्या अस्थी

अर्थात इतकी भयानक जागा म्हटली कि भुतांच्या गोष्टी, किस्से हे आलेच. काहि स्थानिक लोकांना ह्या ठिकानी रात्री फिरताना विचित्र अनुभव आल्याचे समजते. माझा आणि मित्रांचा रात्री Aushwitz गावात मुक्काम करायचा इरादा त्यासरशी आमच्या बायकांनी धुडकावुन लावला. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास Auschwitz-Berkanau चा खिन्न मनाने निरोप घेउन पुन्हा क्राको शहरात परतलो.

क्रमशः 

थंडीचे दिवस असल्याने दुपारीच कधीतरी सुर्यास्त झाला होता; त्यामुळे पुन्हा क्राकोच्या main square मधे पोचेपर्यंत ख्रिसमस मार्केट आणि माक्रेट हॉल, दिव्याच्या प्रकाशात झगमगत होता. त्यात वरुन पडणारा कापसा सारखा पांढरा शुभ्र बर्फ, कडाक्याची थंडी आणि कडाडुन लागलेल्या भुकेमुळे अजिबात वेळ न घालवता सरळ हॉट वाईनचा स्टॉल गाठला. गरमा गरम वाईन आणि त्या सोबत रोस्टेड पोटॅटो, मश्रुम, कबाब हादडायला सुरवात केली. सुट्टीचा सिझन असल्याने सर्वत्र आमच्या सारख्या प्रवाशांची वर्दळ चालुच होती. त्यात स्टॉल्स मध्ये विकायला ठेवलेल्या पोलंडच्या काही खास अशा handmade crockerys, पॉलिश टॉफिज, सॉसेजेस हे सगळेच आकर्षित करत होते. सँटाक्लॉज बरोबर फोटो काढायला तर लहानांन पासुन मोठ्यां पर्यंत सगळ्यांचीच गर्दी, त्यात गंमत म्हणजे हा सँटा गिफ्ट देण्या ऐवजी प्रत्येका कडुन फोटोचे पैसे उकळत होता!! बाकी मार्केट मधे कुठे कोण बेधुंद पणे नाचत होते, गात होते तर कुठे वाईन आणि एकुनच दारुचा overdose झाल्याने नुसतेच झिंगत होते; पण ह्याचा कुणाला कसला त्रास असा जाणवत नव्हता. उलट हे सगळे अनुभवण्यात गंमत वाटत होती आणि त्यामुळे Aushwitz बघताना आलेला उदासपणा केव्हा गायब झाला हे समजले देखिल नाही.

m1
* Main market hall

kfh
* Clock टॉवर

m3
* रोस्टेड पोटॅटो, मश्रुम आणि हॉट वाईन

sd
* पॉलिश चिज

df
* पॉलिश handmade crockery

dfg
* हॉट वाईन स्टॉल

kjh
* Main square

ksjdfg
* हॉस्टेलकडे जाणारा रस्ता

रात्री उशिरा पर्यंत आम्ही मार्केट मधेच फिरत होतो. त्यातला main market hall हा शेकडो वर्षांपासुन क्राकोमधल्या लोकांसाठी खरेदीची मुख्य जागा होती, पण आता मात्र आत मधे टुरिस्टसाठिच सगळ्या वस्तु विकायला ठेवल्याचे दिसले. तसे आम्ही नेहमी प्रमाणे सफरीची आठवण म्हणुन काही वस्तु पटापट खरेदी करुन होस्टेल वर निघालो. दिवसभर झालेल्या भटकंतीमुळे झोप कधी लागली हे समजले देखिल नाही.

दिवस तिसरा:

सकाळी उशिराच डोळे उघडले. आवराआवर होई पर्यंत सकाळचे ११ वाजुन गेले होते. आजचा दिवस ख्रिसमसचा असल्याने बहुतेक सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे गावात फिरताना आद्ल्या दिवशी सारखी वर्द्ळ दिसली नाही, तर त्या उलट एक शांत क्राको अनुभवता आले. आमचा आजचा कार्यक्रम क्राकोचे UNESCO world heritage चा दर्जा लाभलेले Salt mines बघायचा होता, परंतु आज ख्रिसमस असल्याने mines बंद आहेत असे हॉस्टेल मधेच समजले, त्यामुळे आम्ही सगळे थोडे हिरमुसलोच. तरी पुढच्या खेपेस या mines बघायला नक्की परतु, अशी मनाची समजुत काढुन जेवायला हॉटेलात शिरलो. जेवताना आम्ही खास पोलंडचि speciality असलेले egg soup मागवले होते. मी सोडुन कुणालाही आवडले नाही. मित्राने पोलंडमधे मिळणारी Hot beer मागवली, जी त्याच्या घशाखाली उतरता उतरत नव्ह्ती. बाकी जेवण बरे होते. त्या-त्या गावचे काहितरी खावे असे आम्ही फिरताना नेहमीच करतो. कधी तो प्रयोग सफल होतो आणि मृणालिनीबाई लगेच मिपावर त्याची पाकृ आपल्यासाठी सादर करतातच ;)

lkfh
* क्राको रेल्वे स्टेशन

fgkhl
* युरोपियन तिळाच्या फ्रेश ब्रेडचा स्टॉल

lkgh
* क्राकोमधे फेरफटका मारताना...

uir
* City tour car

po
* बग्गी

oi
* दुपारी ४ वाजता...

संध्याकाळी ५ पर्यंत आमचा फेरफटका पुर्ण झाला आणि क्राकोच्या आठवणींन सोबत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
असे हे UNESCO world heritage site असलेले क्राको शहर जरी छोटेसे आणि आडबाजुला असले तरी इथे येणार्‍या प्रत्येकाला मोहुन टाकते हे नक्कीच!!!

समाप्त

 पोलिश व्होडका प्यायलीत का? पोलंडमधे एक खास व्होडका मिळते, झुब्रोव्का नावाची. त्या बाटलीत कोणत्यातरी गवताची काडी टाकलेली असते आणि तिचा विशेष स्वाद त्या व्होडकाला येतो. ही व्होडका अमेरिकेत आणायला बंदी होती (किंवा आहे). पण ही व्होडका चविष्ट असते खरी!
तुम्ही प्यायलेली गरम वारूणी मसालेदार होती का?

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...