Saturday, February 28, 2026

इंग्लंड भटकंती

 मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत अशी लंडन आणि उर्वरित यू. के. मधली ठिकाणे सांगा (शक्यतो निसर्ग सुंदर ठिकाणे. म्यूज़ियम्स बघण्यात आम्हाला इंट्रेस्ट नाही).
 
डाॅर्सेट- डर्डल डोअर, वेमथ
बाथ
आयल आॅफ वाईट
दि नीडल्स
आयल आॅफ मॅन
स्काॅटलँड- हायलँड्स
बीच आवडत असतील तर बोर्नमथ,स्कारबराह.
ब्लॅकपूल प्लेझर बीच
लेक डिस्ट्रिक्ट
स्नोडोनिया
लेयन पेनिनसुुुला
पीक डिस्ट्रिक्ट
Stonehenge
शिवाय बालाजी मंदिर, स्वामीनारायण मंदिर, हॅराॅडस, शार्ड, टावर ब्रिज, आॅक्सफर्ड स्ट्रिट,पीकॅडली, ट्र्फलगार, लंडन अाय, लाॅर्ड्स, याॅर्क व्हिल, न्यु कासल, लेस्टर अशी ही ठिकाणं आहेत.

 पूलला रहाता मग ब्राऊन सी आयलंड पण बघा. फेरी ने एक दिवसाची ट्रीप आणि ३ वर्षाच्या मुलाला मोर बघायला मजा येइल. पूल की वरून बोट मिळेल. ऑगस्ट मध्ये कुटुंब बरोबर असेल तर बोर्नमथ चा एअर शो चुकवू नका.

 

मराठी आंतरजालावर युकेमधील प्रवासवर्णने (लंडनखेरीज) फारशी वाचायला मिळाली नाहीत आजवर.

अनेक इंग्रजी चित्रपटांत इंग्लंडचा उत्तर भाग, आयर्लंड व स्कॉटलंडमधली विरळ लोकवस्ती असलेली निसर्गरम्य स्थळे दाखवतात. संधी मिळताच हे सर्व बघण्याचा मानस आहे. त्यापैकी एक - Lulworth Cove.

Lulworth Cove

तुमच्या पर्यटन मोहिमांना शुभेच्छा. कृपया प्रवासवर्णन नक्की लिहा.

डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

मी गेल्या वर्षी पूल, इंग्लंड येथे काही महिने होतो. तेव्हा पूल पासून जवळच डर्डल डोअर हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे असे समजले. मग असेच एका दिवशी तिकडे जायला निघालो. पूल वरून वूल ला जाणारी ट्रेन पकडली. पूल वरून वूलला जायला फक्त १८-२० मिनिटे लागतात ट्रेनने. वूल स्टेशनच्या बाहेरून taxi मिळते डर्डल डोअरला जायला. तिने अवघ्या १५ मिनिटात डर्डल डोअर जवळ पोचलो. जिथे taxi सोडते तिथेच एक हॉटेल आहे जिथे राहण्याची आणी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. बरीच लोक कॅराव्हान घेऊन आली होती आणी त्या कॅराव्हान मधेच राहत होती. त्या हॉटेल पासून अंदाजे 10 मिनिटाची पायवाट आहे डर्डल डोअर पर्यंत पोचायला.

डर्डल डोअर हे चूनखडीने बनलेले नैसर्गिक ठिकाण आहे. ज्युरासिक कोस्टचा एक भाग तसाच समुद्रात गेलेला आहे आणी त्याला मध्ये एक छिद्र तयार झाले आहे समुद्राच्या पाण्यामुळे. प्रत्यक्षात ही जागा खाजगी मालकीची आहे; तरी सर्वाना तिथे जायला परवानगी आहे.

taxi जिथे सोडते तिथून एक तीव्र उतार आहे डर्डल डोअरला जायला.
taxi stand पासून डर्डल डोअरकडे जाणारी पायवाट.

ही पायवाट एका ठिकाणी संपते आणी तिथून पुढे थोड्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला सरळ डर्डल डोअरच्या समोर घेऊन जातात.
वरून काढलेले काही फोटो.

डर्डल डोअरचे काही फोटो खाली जावून एकदम जवळून काढलेले.

समुद्राचे पाणी खूपच थंड असल्याने पाण्यात जाण्याची हिम्मत झाली नाही.

जवळपास २ तास तिथे राहिलो आणी मग पुन्हा पायऱ्या चढून वर आलो. ज्या पायवाटेने डर्डल डोअरला आलो होतो तिने चालत चालत लुल्वर्थ कोवला जायला निघालो. हे अंतर अंदाजे २ की.मी आहे. पूर्ण पायवाट समुद्राच्या कडेने जाते. एका बाजूला अथांग समुद्र आणी दुसऱ्या बाजूला सुंदर हिरवळ.

लुल्वर्थ कोवच्या अगोदर एक सुंदर डोंगर दिसला समुद्रात. त्याचा फोटो.

लुल्वर्थ कोव म्हणजे नैसर्गिक रित्या तयार झालेले एक वर्तुळ म्हणू शकतो. तुम्ही अगदी कोवच्या मुखाशी जावू शकता. पण मुखाशी जाण्यापेक्षा डोंगरावरूनच फार सुंदर दिसते हे ठिकाण.
इथे काही हॉटेल्स आहेत आणी बाथरूमची सोय आहे.

लुल्वर्थ कोवचे काही फोटो.

तिथे काही लोकांची घरे देखील आहेत. इतक्या सुंदर ठिकाणी रहायला मिळत असल्याचा हेवा वाटला.


मग तिथे काही वेळ घालवला नी परत पूलला आलो.

अतिशय सुंदर जागा आहेत दोन्हीही. किमान एकदा तरी भेट द्याव्यात अश्या.

 

पहिल्या भागात डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोवची माहिती दिली होती.
त्याची लिंक इथे -
इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

ह्या भागाची सुरवात एका फोटोने.

ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते. हे prehistoric monument आहे. Archaeologists च्या म्हणण्यानुसार व कार्बन डेटिंग नुसार प्राप्त माहिती प्रमाणे हे ठिकाण ख्रिस्तपूर्व 3000 ते ख्रिस्तपूर्व 2000 दरम्यान बांधले गेले असावे. म्हणजे आधुनिक माणसाच्या खुणा दिसायच्या अगोदरपासून. ही जागा नक्की काय असावी आणि कशी उभारली असावी ह्या बद्दल बरेच तर्क वितर्क आहेत. कारण हे दगड इतके मोठे आहेत की ते त्या काळातल्या माणसाला तिथे घेऊन जाणे (त्या वेळी चाकाचा शोध लागला न्हवता) आणी असे उभे करणे, एकमेकांवर ठेवणे कसे शक्य झाले असेल हे एक कोडेच आहे. काहींच्या मते ही जागा म्हणजे मृत लोकांना पुरण्याची जागा होती. कारण ह्या जागेच्या आजूबाजूला केलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व 3000 काळातील माणसाच्या हाडाचे अवशेष सापडले होते. युनेस्कोने ह्या जागेला 1986 मध्ये वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिला.
स्वतःची गाडी नसल्यानी आम्ही एका टूर कंपनी बरोबर जायचे ठरवले. ती टूर कंपनी सॅलिसबरी वरून स्टोनहेंजला घेऊन जाणार आणि परत सॅलिसबरीला आणून सोडणार असा प्लॅन होता. इंग्लंड मध्ये वेगवेगळ्या रूट वर वेगवेगळ्या खाजगी कंपन्या रेल्वे सेवा देतात. मग आम्ही पूल वरून Southampton ला साऊथ वेस्ट ट्रेन ने गेलो. तिथे गाडी बदलली आणि तिथून सॅलिसबरी स्टेशनला ग्रेट वेस्टर्न रेल्वेने गेलो. हा जवळपास दीड तासाचा प्रवास आहे. टूर ऑपरेटरची गाडी स्टेशनच्या बाहेर उभीच होती. सॅलिसबरी वरून अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागली बस ने तिथे जायला. बसने एका रिसेप्शन सेंटरला सोडले. तिथे स्टोनहेंजचे तिकिट घ्यावे लागते. आम्ही टूर वाल्याकडून आलेलो असल्याने त्याने अगोदरच तिकिटाची सोय केलेली होती. ते तिकिट घेऊन एका दुसर्या बस मध्ये बसलो आणि त्या गाडीने स्टोनहेंज जवळ नेऊन सोडले.
लोकांनी जवळ जाऊन नासधूस करू नये म्हणून स्टोनहेंजच्या बाजूने दोरी लावून आत जायला मनाई केलेली आहे. पण वर्षातील एक दिवस असा असतो जेव्हा तुम्हाला ह्या वास्तूला हात लावायची परवानगी असते. तो म्हणजे 21 जून; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
बऱ्यापैकी गर्दी असल्याने जास्त फोटो काढता आले नाहीत. कारण प्रत्येक वेळी फोटो काढतां कुणीतरी आडवे यायचेच. तरी पण जमतील तसे काढलेले अजून काही फोटो खाली देत आहे.

तिथे जवळपास दीड तास थांबून परत यायला निघालो. वाटेत 'ओल्ड सेरम' नावाच्या एक जागी २ तासा साठी सोडले बसने.
ओल्ड सेरमची रचना एखाद्या पडक्या किल्यासारखी आहे. आपल्याकडे एक सो एक किल्ले असल्याने एवढे काही विशेष वाटले नाही ओल्ड सेरमचे. (पण मुख्य फरक हा होता की आपल्या इकडे असते तसे कुणीही भिंतीवर प्रियकर प्रेयसीचे नाव खडूने लिहिले न्हवते किंवा आजूबाजूला कचरा केला न्हवता.) स्वतः:चा भूतकाळ जतन करण्याबाबत असलेली काळजी कौतुकास्पद.

मग शेवटी बसने सॅलिसबरी स्टेशनला सोडले. सॅलिसबरी मध्ये एक कॅथेड्रल आहे.इंग्लंड मधील अन्य शहरांप्रमाणेच हे अतिशय सुंदर शहर आहे. तिथे थोडा वेळ फिरून परतीची ट्रेन पकडली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

इंग्लंड भटकंती

 मंडळी, मी सध्या यू. के. मधे आहे. आणि माझी अर्धंगिनी आणी 3 वर्षाचे सुपुत्र इकडे 2 महिन्यासाठी येत आहेत. तर ह्या 2 महिन्यात आवर्जून बघावीत ...