Monday, July 5, 2021

चार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक

 

खुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात. उपक्रमावर क्रिडाविषयी लेख फारसे येत नसल्याने मी त्यांना येथे येण्याचे आमंत्रण दिले होते परंतु जालावर मराठी टंकण्याचा फारसा अनुभव नसल्याने त्यांचे लेखन उपलब्ध होण्यास मर्यादा आल्या. खालील लेख वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. तसे प्रतिसादांतून दिसल्यास त्यांना पुन्हा रितसर आमंत्रण देण्याचा मानस आहे.


काही दिवसांपूर्वी राहूल द्रवीडच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा दौरा केला व त्या दौर्‍यात इंग्लंडचा १-० असा पराभव करून नव्याने स्थापित झालेली "पतौडी ट्रॉफी" जिंकली. भारत व इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या क्रिकेट संघांनी एकमेकांविरूद्ध कसोटी सामने (Test Matches) खेळायला प्रथम सुरुवात केली त्याला गेल्या जून महिन्यात ७५ वर्षे झाली. २५, २७ आणि २८ जून १९३२ या दिवसांत लंडनमधील "लॉर्डस्‌" मैदानावर या दोन संघांतील पहिला सामना खेळला गेला होता व त्या घटनेचा गौरव करण्यासाठी "इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स (ICC)” या नव्या ट्रॉफीची स्थापना केली. एके काळी भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी खेळलेले असे एकमेव खेळाडू इफ्तिकार अली खान उर्फ नबाब ऑफ पतौडी, सिनिअर (मन्सूर अली खान ’टायगर’ पतौडीचे वडील आणि हिंदी चित्रपटाचा नायक सैफ अली खानचे आजोबा) यांचे नाव या नव्या ट्रॉफीला दिले गेले आहे.


१९३२ मधला भारताचा दौरा मात्र यंदाच्या दौर्‍याइतका सुरळीतपणे पार पडला नव्हता. उलट सुरुवातीपासूनच बराच गोंधळ झाला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिलाच कसोटी सामना होणार होता. खरे म्हणजे १९२९ मध्ये भारतीय क्रिकेटला ’इंपिरिअल क्रिकेट कॉन्फरन्स’ (ICCचे जुने नाव) कडून कसोटी सामन्यांचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर भारताने लगेचच इंग्लंडला आपला संघ पाठवावा अशीही शिफारस झाली होती. परंतु प्रत्यक्षात संघ पाठवायला तीन वर्षे लागली. “नकटीच्या लग्नात सतराशे विघ्ने" अशी एक म्हण आहे. भारतीय क्रिकेटच्या पहिल्या दौर्‍यात संकटाचे रूपाने आले होते चार महाराज. सर्वप्रथम, इंग्लंडच्या दौर्‍याचे वृत्त कानावर पडल्याबरोबर विजयनगरचे महाराजकुमार (जे "विझ्झी" या नावाने प्रसिद्ध होते) यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाला ५०,००० रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली. अर्थात, त्यामागे आपल्याला कप्तानपद मिळावे याची अपेक्षा होती. ते ऐकताच विझ्झींचे दुष्मन पतियाळाच्या महाराजांनी विझ्झींच्या ऑफरवर कुरघोडी करण्यासाठी बोर्डाला कळवले की खेळाडूंच्या चाचणीचा, प्रॅक्टीसचा आणि इंग्लंड दौर्‍यातील पहिल्या महिन्याचा सर्व खर्च ते करतील. बोर्डाला मनापासून हवे होते पतौडीचे नबाब आणि दुलीपसिंहजी. परंतु ते दोघे इंग्लंडमध्ये राहत होते आणि इंग्लंडच्या संघातून खेळण्याची अपेक्षा बाळगून बसले होते. त्यामुळे त्या दोघांनीही भारतासाठी खेळायला नकार दिला. मग "अडला हरी गाढवाचे पाय धरी" या प्रथेप्रमाणे पतियाळाच्या महाराजांना कप्तान बनवले गेले. विझ्झींना उप-कप्तान (Vice Captain) बनवायचे ठरवले गेले. परंतु खरी परिस्थिती अशी होती की पतियाळाचे महाराज राजकारणात एवढे गर्क झाले होते की दोन-तीन वर्षे ते क्रिकेट खेळलेच नव्हते व विझ्झी अतिशय कमी दर्जाचे खेळाडू होते. म्हणून मग बोर्डाने ठरवले की इंग्लंडमध्ये काही वर्षे क्रिकेट खेळून नुकतेच भारतात परतलेले लिंबडीचे महाराज घनश्यामशिंहजी यांना उप-कप्तान आणि विझ्झींना उप-उप-कप्तान (Deputy Vice Captain) बनवायचे. ती बातमी ऐकताच विझ्झींनी बोर्डाला आपली तब्येत अचानक खराब झाल्याने आपण इंग्लंडला जाऊ शकणार नाही असे कळवले. तेव्हा "सुंठी वाचून खोकला गेला" असा विचार करून बोर्डाने त्यांचा राजिनामा आनंदाने स्वीकारला आणि खेळाडूंची निवड करायला सुरुवात केली. त्यावेळचे जातीभेद व धर्मभेद यांचा विचार करून सात हिंदू, चार मुसलमान, चार पारशी आणि तीन शिख असे खेळाडू निवडून संघ बनवला.

शेवटी एकदाचा मग तो संघ १९३२ च्या मे महिन्यात इंग्लंडला जायला निघाला. अचानक पतियाळाच्या महाराजांनी आपली तब्येत बिघडली असल्याचे निमित्त करून संघातून आपले अंग काढून घेतले. मग आयत्या वेळी पोरबंदरच्या महाराजांना कप्तान बनवले गेले. त्यावेळी हे महाराज लोक कोठेही - विशेषत: इंग्लंडला - एकटे जात नसत. सारा परिवार घेऊन जायचे. त्यामुळे संघ आधी पुढे गेला व "वरातीमागून घोडा" गेल्यासारखे पोरबंदरचे महाराज पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी जेमतेम काही दिवस इंग्लंडमध्ये हजर झाले. ते पहिल्या एक-दोन सामन्यांत खेळले. त्यात त्यांच्या धावांची गोळाबेरीज झाली तीन. त्यावर इंग्लंडच्या एका खट्याळ पत्रकाराने त्यांच्याबद्दल "भारताच्या कप्तानाकडे धावांपेक्षा रोल्स-रॉईस अधिक आहेत" असे लिहिले. त्या टीकेला घाबरून पोरबंदरच्या महाराजांनी लिंबडीच्या महाराजांना कप्तान बनवून आपण फक्त भाषणे करायची आणि मुलाखती द्यायच्या असे ठरवले परंतु कसोटी सामन्याच्या दोन दिवस आधी लिंबडीच्या महाराजांची पाठ लचकली व त्यांनीही आपले अंग काढून घेतले. त्यामुळे मग संघातले ३७ वर्षंचे ज्येष्ठ खेळाडू कर्नल सी. के. नायडू यांना आयत्यावेळी कप्तान बनवण्यात आले.

नायडू आपल्या उतार वयातही सुदृढ होते आणि चांगली फटकेबाजी व द्रुत गोलंदाजी करायचे. त्या दौर्‍यातील एका महत्त्वाच्या सामन्यात त्यांनी एक दमदार शतकही ठोकले होते. खरे म्हणजे फक्त क्रिकेटचा विचार केला असता, तर नायडूच पहिल्यापासून कर्णधार व्ह्यायला हवे होते. परंतु त्या काळात भारतीय क्रिकेटवर राजे, नबाब आणि ब्रिटिश अधिकार्‍यांची सत्ता होती. नायडू कप्तान झाले तरी संघातल्या कटकटी मात्र थांबल्या नाहीत. त्यांचे नाव कप्तानपदी पाहिल्याबरोबर संघातील काही खेळाडूंनी बंड पुकारले. सैन्यात बरेच आयुष्य काढल्यामुळे नायडू कडक शिस्तिचे आणि व्यायामप्रेमी होते. ते सकाळ संध्याकाळ व्यायाम आणि रोज मैदानावर भरपूर प्रॅक्टिस करायची या दोन गोष्टींवर भर द्यायचे, त्यामुळे काही लाडावलेल्या खेळाडूंना ते आवडत नव्हते. सामन्याच्या आदल्या रात्री त्यांनी पोरबंदरच्या महाराजांच्या हॉटेलमधील खोलीचे दार ठोठावले आणि त्यांना उठवून बरेच खेळाडू नायडूंच्या हाताखाली खेळायला तयार नाहीत त्यामुळे सामना रद्द करायला हवा असे सांगितले. बिचारे महाराज घाबरले आणि त्यांनी बोर्डाला फोन केला व सामना रद्द करायचा आपला निर्णय जाहीर केला. सुदैवाने बोर्डाच्या सदस्यांनी त्यांचा निर्णय धुडकावून दिला आणि सामना वेळेवर सुरु व्हायलाच हवा असा महाराजांना ठासून दम भरला. या सार्‍या गोंधळानंतर दुसरे दिवशी सारे खेळाडू (त्यापैकी काही अक्षरश: डोळे चोळत) मैदानावर, उशीरा का होईना पण हजर झाले.

सी के नायडू

एकदा सामना सुरु झाल्यावर मात्र नायडूंनी आपल्या सार्‍या खेळाडूंन गोर्‍या साहेबांविरुद्ध देशासाठी अटीतटीने खेळायची प्रेरणा देऊन आपल्या उत्कृष्ट नेतृत्व-कौशल्याची झलक सार्‍या जगाला दाखवली. त्यांचे तरुण आणि अननुभवी साथी ते तीन दिवस अगदी कस लावून खेळले आणि त्यांच्या भारतीय चाहत्यांबरोबर इंग्रजी क्रिकेटप्रेमी जनतेची वाहवा मिळवून गेले. तो सामना इंग्लंडच्या संघाने जिंकला परंतु, भारताने त्यांना चांगलीच झुंज दिली. स्वत: नायडूंनी पहिल्या फळीमध्ये ४० धावा काढल्या आणि दोन बळी घेतले. या सामन्यात महम्मद निसारने सहा बळी घेतले आणि जहांगीर खान व अमरसिंग यांनी प्रत्येकी चार बळी घेतले. अमरसिंगने दुसर्‍या फळीत ५१ धावाही काढल्या. संघाचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. एकंदरीत एवढे सारे गोंधळ होऊनही दौर्‍याचा शेवट चांगला झाला.

आज रांचीमधल्या एका छोट्या खोलीत राहणार्‍या कुटुंबात मोठा झालेला, भारतीय रेल्वेच्या एका तिकीट कलेक्टरचा मुलगा महेन्द्रसिंग धोनी हा भारताचा कप्नात बनला आहे. गब्बर श्रीमंत महाराजांपासून गरिबीत वाढलेल्या धोनीपर्यंतचा भारतीय क्रिकेटचा हा प्रवास अखेरीस "रावापासून रंकापर्यंत" पोहोचला आहे.

- सुनील आणावकर
ह्यूस्टन, टेक्सास.

 

 

 

 

 

Sunday, July 4, 2021

सह्याद्रीच्या वाटा

 1) Trek इट »गुळुंचवाडीचे निसर्गनवल!

अभिजित बेल्हेकर.
ही गोष्ट आहे, एका नैसर्गिक रचनेची, भौगोलिक आविष्काराची! पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-नगर रस्त्यावर आळेफाटय़ाच्या पूर्वेला गुळुंचवाडी गावाजवळ हे निसर्गनवल दडलंय. पुण्याहून आळेफाटा ९६ किलोमीटर तर आळेफाटय़ाहून साधारण १८ किलोमीटरवर हे गुळुंचवाडी गाव. हे गाव ओलांडताच लगेच अणे घाट सुरू होतो. या घाटाची दोन-चार वळणे घेताच डाव्या हाताला दरीत एक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचे कुतूहल चाळवते.
या डोंगराच्या एका शिरेवरच एक भलामोठा नैसर्गिक बोगदा तयार झालेला दिसतो. एखाद्या पुलाच्या कमानीप्रमाणे त्याची ही रचना. उत्सुकतेपोटी हे स्थळ पाहण्याची इच्छा होते. ती दरी उतरत खाली जावे आणि त्या भौगोलिक आविष्काराच्या पुढय़ात उभे राहावे. केवळ दर्शनानेच एक क्षण उडायलाच होते. निसर्गाचे हे कोडे अजब रसायन वाटू लागते.
कुणी, कशी आणि कधी तयार केली ही रचना? त्या कमानीवर नजर टाकत असतानाच हे असे असंख्य प्रश्न सतावू लागतात. सुरुवातीचा काही काळ केवळ हे आश्चर्य बघण्यातच जातात. मग हळूहळू या कोडय़ाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हा शोध घेण्यासाठी थोडेसे भू-शास्त्राकडे वळावे लागते. आपला भू-प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे. यातील काही स्तर हे कठीण तर काही मऊ-मुदू प्रकारातील आहेत. या भू-स्तरांवर निसर्गातील ऊन, वारा, पाऊस आणि पाणी हे बाह्य़घटक सतत परिणाम करत असतात. हजारो वर्षांच्या या संघर्षांत (घर्षण) मृदू खडकाचे भूस्तर नष्ट होतात. क्वचित प्रसंगी त्यांचे रूप-आकारही बदलतात. निसर्गाने तयार केलेले हेच आकार – चेहरे मग आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गुळुंचवाडीच्या या शिलासेतूमागेही हेच कारण.
घडले असे, की गुळुंचवाडीच्या या बोगद्याजवळूनच वरच्या बाजूने एक ओढा खाली येतो. एरवी कोरडय़ा असणाऱ्या या भागात पावसाळय़ात मात्र या ओढय़ातून साऱ्या डोंगराचे पाणी खाली वाहत येते. ते इथे या बोगद्याच्या डोंगररांगेला येऊन अडते. मग अशा वेळी कित्येक वर्षांपासून या पाण्याने वाट मिळवण्यासाठी या डोंगराशी संघर्ष सुरू केला. पाण्याच्या या संघर्षांतून डोंगराच्या पोटातील मृदू खडकाच्या स्तराची झीज होत गेली. छताच्या व तळाच्या बाजूचा कठीण खडक तसाच राहिला. पाण्याने स्वत:ला वाट तयार करून घेतली. पुढे हजारो वर्षे हे पाणी या जागेतून असेच वाहत – घर्षण करत राहिले आणि ज्यातून मग तयार झाला हा नैसर्गिक बोगदा!
गुळुंचवाडीचा हा बोगदा तब्बल २१ मीटर लांब, ९ मीटर रुंद आणि २ ते ६ मीटर उंचीचा आहे. या अदूभुत बोगद्याखालून जाताना निसर्गाच्या या चमत्कारात अडकायला होते. या बदलांचे आश्चर्य वाटू लागते. विज्ञानाची ही रहस्ये मनाला भुरळ पाडतात. बरोबरच्या एखाद्या गावक ऱ्याशी हा सारा अनुभव जोडावा तर तो आपला त्याचे श्रेय पांडवांना देऊन रिकामा होतो. ‘‘कौरव-पांडव युद्धात पांडवांपैकी कुणाच्या तरी एकाच्या बाणाचा नेम चुकला अन् इथं डोंगराला भोक पडलं!’’ त्याची ही कथा ऐकत आपण आपले गालातल्या गालात हसायचे आणि या भू-शास्त्रीय आविष्काराला एका लोककथेचीही जोड द्यायची!
पावसाळय़ात इथे आले, की या बोगद्याखालून ओढय़ाचे पाणी एका छोटय़ा धबधब्याचे रूप घेऊन धावत असते. आता या पाण्यावर पुढे एक पाझर तलावही बांधला आहे. या बोगद्यातून पाणी खळाळू लागले, की भोवतालच्या हिरवाईवर या नवलाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. एरवीही कधी आलो तर या बोगद्याच्या शांत सावलीत बसून अणे घाटातून होणारी वाहतूक पाहण्यातील बालसुलभ भावावस्था अनुभवावी वाटते. मध्येच या कमानीत शिरणारा वारा सूं-सूं आवाज करत वाहू लागतो. तर संध्याकाळी मावळतीचे रंग या कमानीला न्हाऊ घालू पाहतात. अमेरिकेतील ती ‘गोल्डन आर्च’ही अशीच केशरी रंगात न्हाणारी. एक क्षण तिचीच आठवण झाली. अगदी त्या सारखी नसली, तरी त्या पठडीतील हे निसर्गनवल! फरक एवढाच, की ‘गोल्डन आर्च’च्या वाटय़ाला अमाप प्रसिद्धी आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक तिथे आपली हजेरी लावतात. तर आमच्या या गुळुंचवाडीच्या बोगद्याच्या वाऱ्याला मात्र त्या गावचा खेडूतही उभा राहत नाही. गुळुंचवाडीच्या कमानीच्या मनातले हे दु:ख जाणून घेत तिच्या शरीरावरून प्रेमाने एक हात फिरवला आणि घाटवाटेने पुढच्या प्रवासाला निघालो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
2) Trek इट »जुन्नरची पर्यटनवाट
मनोज हाडवळे | October 29, 2015
डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणारे अनेकदा या डोंगरांच्या जगातून धावणाऱ्या वाटांवरही रमतात. जुन्नरच्या पश्चिमेला अशीच एक वाट या भटकंतीच्या जगात रममाण झाली आहे.
पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरमध्ये फिरण्यासारखी खूप काही स्थळे आहेत. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, देवराया, ग्रामीण आदिवासी संस्कृतीचे दर्शन देणारी जंगलांच्या कुशीत विसावणारी गावे असे बरेच काही इथे आहे. अशाच काही स्थळांची भेट घडवणाऱ्या जुन्नरमधील एका वाटेवर आज स्वार होऊयात.
जुन्नरहून आपटाळेमार्गे नाणेघाट आणि पुन्हा नाणेघाटातून घाटघरमार्गे जुन्नरला येणारी ही वर्तुळवाट. शिवनेरीच्या कुशीतून ही वाट निघते. थोडेसे अंतर गेलो, की डोंगरकुशीतील बौद्धकालीन तुळजा लेणी भेटते. तिचे ते कोरीव काम पाहायचे आणि पुन्हा पुढे निघायचे. थोडय़ाच वेळात आपण आपटाळे गावात पोहोचतो. या प्रवासात डाव्या बाजूला दिसणारे वरसुबाईचे डोंगर, आंबे हातविजला जाणारा इंगळूनचा घाट आपली सोबत करत असतो. आपटाळय़ातून २ मार्ग फुटतात. एक दाऱ्या घाटाकडे तर दुसरा आपल्या ठरलेल्या नाणेघाटाकडे जातो.
एव्हाना आपण घाटमाथ्यावरील वातावरण सोडून हळूहळू कोकणचा अनुभव घ्यायला सुरवात केलेली असते. जुन्नरच्या अगदी १५-२० किलोमीटरवर हा कोकणचा अनुभव. तो मनाची अवस्था तरल करून जातो. आजुबाजुला लाल माती, खळाळणारे झरे, देवराया वाटाव्यात अशी घनदाट झाडांची जमावट आणि या सर्वात आपल्याला घेऊन जाणारी ही वळणदार वाट. थोडय़ाच वेळात समोर एक अजस्र डोंगर दिसू लागतो. सगळीकडून २५०-३०० फूट नसíगकरीत्या तुटलेला कडा. या कडय़ावर तटबंदी. अरे हा तर चावंड किल्ला. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत आपण रस्त्यावरील चावंड पाटीजवळ येतो. उजवीकडे वळायचे आणि जंगल वाटेत हरवून जायचे. ही वाट आपल्याला चावंड किल्ल्याला थोडासा वळसा घालून चावंड गावात घेऊन जाते. डोक्यावरील टोपी पडेल एवढा उंच किल्ला आणि त्यावर चढण्यासाठी असणारी डोंगराच्या पोटात लपलेली वाट पाहून आपण अचंबित होतो. जितका चावंड किल्ला अजस्र, अभेद्य आणि अचल तितकेच सुंदर, निसर्गरम्य असे चावंड गाव.
गडावरची पुष्करणी, खोदीव तळी, अन्य वास्तू पाहायच्या आणि गड उतरत पुढे निघायचे. पुन्हा थोडय़ाच अंतरावर आणखी एक फाटा फुटतो. पूर गावाकडे निघतो. या गावात एक प्राचीन मंदिर दडलेले. कुकडेश्वर! कुकडी नदीच्या उगमस्थळी हे कोरीव मंदिर ९ व्या शतकात कुणा झंज राजाने बांधले. मध्यंतरी पुरातत्त्व खात्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पाहायचे आणि पुन्हा मुख्य रस्त्याला येत नाणे घाटाकडे कूच करायची.
डावीकडे असणारा शंभूचा डोंगर जणु एखादा किल्लाच वाटावा अशा दिमाखात उभा असतो. मजल दरमजल करत, आजूबाजूचा निसर्ग अनुभवत, छोटे मोठे जलाशय, भाताची शेते आपली सोबत करत आपला प्रवास सुरू असतो. थोडय़ाच वेळात समोर तो नानाचा अंगठा दिसू लागतो. वातावरण स्वच्छ असेल तर उजवीकडे दूरवर भरवगडाची भिंत दर्शन देते. थोडय़ाच वेळात डावीकडे जीवधन किल्ला हसतमुखाने आपले स्वागत करतो. जीवधनचा सोबती वानरिलगी चा सुळकाही आव्हान देत असतो. वेळ असेल तर गडावर जायचे, नाहीतर पुढे निघायचे.
थोडे पुढे आलो, की नाणे घाटाच्या आधीच एकदम तुटलेला कडा आणि खोल दरी मनात धडकीच भरवते. हा अपूर्ण अवस्थेतला गुणा घाट. अजून पुढे गेलो, की नाणे घाटातील उजवीकडचा दगडी रांजण आणि गणेश मंदिर दिसू लागते. पावसाळ्यात इथे बऱ्याचदा धुके असते, त्यामुळे फार लांबचा परिसर दिसत नाही. पण धुक्याचा हा खेळही अनुभवण्यासारखा. नाणेघाट गेल्या २३०० वर्षांपासून महाराष्ट्राच्या आद्य राजा सातवाहनांचे भूषण सांगत आहे. दख्खनच्या तत्कालीन समृद्धीत नाणे घाटाचा फार मोठा वाटा राहिला आहे. त्याच्या या निमुळत्या नाळेतून खाली उतरताच समोर विस्तीर्ण पसरलेले कोकण उभे राहते. तळाशी सर्वत्र हिरवाई पसरलेली. नाणे घाटाची नागमोडी वाट या हिरवाईतून खाली उतरत असते. नाणे घाटातील गुहेत सातवाहनांनी केलेल्या दानधर्मावरचे ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या परिवारातील सदस्यांची शिल्पेही इथे कोरण्यात आली होती. पण आता त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. मनात आले तर जीवधनची चढाई करावी, नाणेघाट उतरून खाली जंगल वाट तुडवत कोकणात उतरावे किंवा बाजूच्या भोरांडय़ाच्या नळीने खाली उतरण्याचा आनंद घ्यावा आणि नसेलच काही करायचे तर इथेच नाणे घाटाच्या डोक्यावर निरभ्र आकाशदर्शन करत मुक्काम करावा. जुन्नर शहरापासून नाणेघाट ४५ किलोमीटर दूर आहे. पण मजल दरमजल करत हे अंतर जास्त वाटत नाही.
आता परत फिरताना निमगिरी-हजसरची वाट पकडायची. परतीच्या या वाटेवर नाणेघाटातून साधारण ५ किलोमीटरवर अजनावळे गाव लागते. या निसर्गरम्य गावातील देवराई बघण्यासारखी आहे. आपण पुढे जात राहावे आणि निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण करत राहावी..असाच हा रस्ता. काही अंतर गेलो, की निमगिरी गाव लागते. निमगिरी गावच्या पश्चिमेला डोक्यावर निमगिरीचा किल्ला छत्रछाया धरून अविचलपणे उभा असतो. वेळ असेल तर या गडाचे दर्शन घ्यायचे नाहीतर पुढे मार्गस्थ व्हायचे. परतीच्या या वाटेवर आपल्या एका बाजूला विविध डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला माणिकडोह जलाशय आपली सोबत करत असतो. जलाशयाच्या पलीकडच्या तीरावर दिसणारा चावंडही आपल्यावर करडी नजर ठेवून असतो. नागमोडय़ा वाटेने सरकत असताना वाटेतच अचानकपणे हडसर गाव येते. याच्या डोक्यावरच तो हडसरचा किल्ला. खाली पायथ्यावरूनही त्याची ती अभेद्यता डोळय़ांत भरते. डोंगर कपारीशी लपून बसलेली वाट गडाचे निमंत्रण देते. हाताशी वेळ असेल तर या गडाचीही वारी करायची, अन्यथा पुढे सरकायचे. थोडय़ाच वेळात माणिकडोह धरणाजवळून ही वाट पुन्हा जुन्नर शहरात दाखल होते.
साधारण शंभर किलोमीटरच्या या प्रवासात शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हडसरसारखे किल्ले; तुळजा लेणी, कुकडेश्वर मंदिर, प्राचीन नाणेघाट अशी अनेक गिरिस्थळे त्यांचे दर्शन देतात. छोटी गावे, त्यातील देवराया, भोवतीच्या डोंगररांगा, त्यावरचे जंगल, नद्या, जलाशय असे बरेच काही या वाटेवर भेटते. डोंगररांगा भटकणाऱ्यांसाठी हा सारा भागच वेड लावणारा आहे. मग चला तर!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »मांजरसुबा
सुधीर जोशी | August 27, 2015
वर्षां सहल म्हटल्यावर नगर जिल्हा कधी कुणाच्या डोळय़ांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. पण या शहराच्याच जवळ असलेला हा मांजरसुबा किल्ला भवतालच्या ओसाड माळावरही या दिवसात वेगळा भासतो.पर्जन्य सहल आणि तीसुद्धा अहमदनगरला म्हटलं तर कोणीही वेडय़ातच काढील, पण खरोखरच नगरच्या अगदी जवळ नगर-वाम्बोरी रस्त्यावरील मांजरसुबा हा किल्ला आणि जवळील डोंगरगणला भेट द्याल तर थक्कच व्हाल. एका नयनरम्य ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद नक्कीच होतो.जुलै ते सप्टेंबर हा काळ फारच छान. हा किल्ला पूर्वीच्या नगर- औरंगाबाद आणि नगर-मनमाड या दोन्ही व्यापारी आणि लष्करी महत्त्वाच्या मार्गावर मोक्याच्या जागी आहे. दोन्ही मार्गावरील एक एक घाट या किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातात. टेहळणी आणि घाटमार्गाचे संरक्षण याकरिता अगदी मोक्याची जागा.या किल्ल्याचे खरे नाव ‘मजार-ए-सुबा’ अपभ्रंश मांजरसुबा. साधारणपणे पर्वतीइतकाच उंच. चढण अतिशय सोपी. किल्ला दुर्गम नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे एक चिरेबंदी बांधकामाची आजही सुस्थितीतील इमारत आहे. येथे कचेरी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असावे. या इमारतीच्या गच्चीवर जाता येते. येथून दूरवरचा प्रदेश निरखता येतो. या किल्ल्यावर एक भव्य दुमजली महालही आहे, पण आज तो पूर्णपणे पडलेला आहे. पणत्याच्या भिंती तो किती देखणा असावा याची साक्ष देतात. हे निजामशाहीतील बांधकाम नगरमधील ‘फरहाबाग’ या सुंदर राजवाडय़ाशी साम्य दाखवते.आपले स्वत:चे वाहन असल्यास आपण फरहाबाग या ऐतिहासिक महत्त्वाच्या व सुस्थितीतील वास्तुलाही याच सहलीत भेट देऊ शकता. या किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जलतरण तलाव आणि हमामखाना. आज ह्य़ा हमामखान्याची पडझड झाली आहे. पण एक गोष्ट जाणवते की नगरसारख्या निपाणी प्रदेशात आणि तेसुद्धा टेकडीवर हमामखाना आणि जलतरण तलाव कसा? आणि हेच येथील नवल आहे. या टेकडीच्या उत्तरेला पावसाचे पाणी अडवून त्याची साठवण टाकी खोदून केलेली आहेत. याकरिता निजामशाहीत अरबस्तानातून जलसंधारणतज्ज्ञ बोलावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अहमदनगरमधील पाणीपुरवठा योजना अमलात आली. उत्तरेकडील रंगमहालातील मोटेच्या सहाय्याने हे पाणी उचलले व खेळवले जाई. आजही येथे मुबलक पाणीसाठा असतो. या पाणसाठय़ाकडे जाण्यास एक भुयारी जिना असून पुढे डोंगरकडय़ाच्या बाजूने अवघड रस्ता आहे. किल्ल्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून हे लष्करी ठाणे तसेच विलासक्रीडा स्थान असावे. किल्ल्याच्या वरील व पायथ्याशी असलेल्या छोटेखानी पठारांवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये अनेक रंगीबेरंगी रानफुलेही आढळतात.या किल्ल्याच्या पायथ्याजवळील डोंगरघळीत विसावले आहे निसर्गरम्य निवांत ठिकाण डोंगरगण. येथे एक जागृत शिवमंदिर आहे. येथे श्रावणात यात्रा भरते. येथे पावसाळ्यातील पाण्याचे प्रवाह आणि  छोटेखानी धबधबा आपल्याला सुरक्षित जलक्रीडेचा आनंद देतात. येथे असलेल्या एका गुंफेला सीतेची न्हाणी म्हणतात. येथेही आपल्याला फार चढउतार करावी लागत नाही. अहमदनगर परिसरात पाऊस फारच कमी असतो, पण ही वर्षांसहल मात्र नक्कीच संस्मरणीय होईल. याशिवाय अहमदनगरमध्ये अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणांनाही आपण भेट देऊ शकतो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
3) Trek इट »मुशाफिरी : आंबवडे
अभिजित बेल्हेकर | August 6, 2015
वर्षां सहलींना सध्या गती आली आहे. यामध्ये कुटुंबासह जाऊन पाहण्याजोगी आणि शांततेचा स्पर्श देणाऱ्या स्थळांच्या शोधार्थही अनेक जण असतात. अशांसाठीच पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील आंबवडे गाव खूप काही देऊनजाईल.
पाऊस कोसळू लागला, की ज्या काही ठिकाणांची आठवण होते त्यामध्ये पुणे जिल्हय़ातील रायरेश्वर ही अशीच एक हमखास जागा. वर्षां ऋतू सुरू झाल्यावर एकदा तरी या रायरेश्वराच्या पठारी जाणे होते. या प्रत्येक वेळी धावताना आणखी एक जागा मध्येच अडवते. पायांना बांधून ठेवते आणि मनाला भुरळ पाडते. ती म्हणजे आंबवडे!
हिरडस मावळातील हे एक छोटेसे गाव. डोंगरदरीत, हिरवाईच्या कुशीत पहुडलेले. गावाला खेटूनच एक खळाळता ओढा वाहतो. या ओढय़ाच्या काठावर दाट झाडीत एक प्राचीन शिवालय दडले आहे आणि या साऱ्यांच्या सहवासात कधीही गेलो, तरी केवळ नीरव शांतता आणि भरून राहिलेली प्रसन्नताच अनुभवायला मिळते!
..आंबवडेची ही अनुभूती गेली कित्येक वर्षे हृदयात साठवलेली आहे. म्हणून तर दरवर्षी वर्षांकाळ सुरू झाला, की रायरेश्वराच्या वाटेवर निघायचे आणि वाटेतील या आंबवडय़ात अडकायचे असा जणू नियम झाला आहे.
भोरपासून १० किलोमीटरवर हे आंबवडे गाव. इथपर्यंत येण्यासाठी भोरवरून एसटीची सोय आहे. डोंगरदरीतली ही वाट हिरवाईची सोबत करतच निघते. पावसाने सारा भवताल भिजून चिंब झालेला असतो. रस्त्याकडेला खाचरांमध्ये तरारलेला भात त्याचा गंध उधळत असतो. या अशा धुंदीतच आंबवडय़ाला पाय लागतात आणि मनातील ते स्वप्न सत्यात उतरलेले दिसू लागते.
खळखळत्या ओढय़ाच्या काठावर शांतपणे पहुडलेले ते गाव. ओढय़ाच्या पलीकडच्या तीरावर घट्ट झाडी आणि या झाडीतच दडलेले ते नागेश्वराचे प्राचीन शिवालय. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या एखाद्या सरीने स्वच्छ-ताजे झालेले हे दृश्य. त्याला पाहताच शरीराआधी मन चिंब भिजून जाते.
या दृश्यातील ते ओले रंग अनुभवण्यासाठी निघावे तो अगदी सुरुवातीलाच एक कमान आपले स्वागत करत पुढय़ात येते, ‘सर जिजिसाहेब सस्पेंशन ब्रिज’! आंबवडय़ाचे पहिलेच नवलविशेष!
आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. या संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी गावातच आहे. ही समाधी आणि नागेश्वर मंदिर या संस्थानकाळच्याच आठवणी. ही दोन्ही स्थळे ओढय़ाच्या पलीकडे. या पैलतीरी जाण्यासाठीच कधी संस्थानकाळी हा झुलता पूल इथे आकारास आला. आंबवडय़ात शिरणाऱ्या प्रत्येक पावलांचा काही काळ इथे या झुलत्या पुलावर रेंगाळतो.
आंबवडे गावाशेजारून वाहणारा हा ओढा म्हणजे छोटीशी नदीच आहे. चांगली रुंदी आणि खोली. म्हणून मग हे पात्र ओलांडण्यासाठी १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी केली. याची रुंदी ४ फूट तर लांबी दीडशे फुटांच्या घरात आहे. पुलाच्या दोन्ही अंगास रेखीव कमानी आहेत. त्यावर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे लेख आहेत. माथ्यावर ‘ओम’ हे शुभचिन्ह कोरलेले आहे.
हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजिसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या साऱ्या तपशिलाची नोंद या पुलाच्या दोन्ही बाजूकडील स्वागत कमानींवर घेतलेली आहे.
झुलत्या पुलाचा तपशील वाचला, की त्याच्यावरचे हे चालणे, हलणे आणखी मजेशीर वाटू लागते. ही गंमत अनुभवायची आणि पलीकडच्या तीरावर दाखल व्हायचे. अगदी सुरुवातीला आपण समाधी परिसरात येतो. एका मोठय़ा इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजिसाहेब यांचा अर्धपुतळा आहे. ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला हा पुतळा पाहण्यासारखा आहे. या अशा स्मारकांच्या केवळ दर्शनातूनही इतिहासाच्या त्या पर्वात बुडायला होते.
या स्मारकाशेजारूनच एक वाट नागेश्वराकडे उतरते. हे मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच एक पायरी मार्ग वळणे घेत या नागेश्वरासमोर दाखल होतो. मोठा फरसबंदी प्राकार, भोवतीने तट, ओवऱ्या, पाण्याची कुंडे, पाण्याचे वाहते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभे असलेले नागेश्वर मंदिर! एखादा नायक असावा असे.
दूरवरूनच ही रचना लक्ष वेधून घेते. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरच एक लेख लावलेला आहे. ज्यामध्ये नागसंस्कृतीतील लोकांचा हा देव असून, या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्याचा अल्लेख आहे.
मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती नाजूक शिल्पकाम केलेले आहे. आतील स्तंभही शिल्पकलेने नटलेले आहेत. बाहय़भिंतीवर उमलती कमळे, झाडांच्या पानांचे नक्षीपट उठवण्यात आले आहेत. हत्तीवर अंबारीत स्वार झालेली कुणी राजमान्य व्यक्ती, शरभ, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखरही असेच कोरीव. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या मागील पूर्व अंगासही एक कोरीव दरवाजा असल्याचा भास होतो. पण जवळ गेल्यावर तो त्या स्थापत्याचाच एक भाग असल्याचे समजल्यावर उडायला होते.
आंबवडय़ाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उडय़ा घेत धावत असतो. जवळ गेल्यावर त्याच्या तुषारांमध्ये भिजायला होते. पावसाळय़ातील त्याचे हे विराट रूप पाहण्यासारखे असते.
ओढय़ाचा हा खळखळाट अनुभवत मंदिर प्राकारात यावे तो ती नीरव शांतता पुन्हा स्पर्श करू लागते. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना आहे. ज्यातून पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत. पाण्याच्या या प्रवाहांनाही एक नाद असतो.
भोवतीची गर्द झाडी, त्यातील पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचे खेळते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभा नागेश्वराचा तो प्राकार! हे सारे पाहता-अनुभवताना चित्त एकाग्र होऊ लागते. आपल्या या समाधीला, या शांत अनुभूतीला गाभाऱ्यातील तो घंटानाद खोलवरची कंपने पुरवत असतो. मध्येच पावसाची एखादी सर येते. तिच्या पाठी दरीत कोंडलेले ढगही उतरतात आणि सारेच चित्र धूसर होते. त्या धूसरपणात दिसणाऱ्या आकृतीलाही एक गूढता असते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
4) Trek इट »रतनवाडीचा अमृतेश्वर
अभिजित बेल्हेकर | June 18, 2015
निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव राऊळही भटक्यांची पावले जखडून ठेवत असते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेगळाच खेळ मांडला आहे. या खेळात आहेत आकाशात घुसलेले उंच पर्वत-सुळके, कोकणात कोसळणारे खोल कडे, देशावर चढणाऱ्या अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्या रहाळावर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!
भंडारदरा पुण्याहून २०० तर मुंबईहून १८० किलोमीटरवर. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहे. या भंडारदऱ्याच्या जलाशयावर आलो, की निळाशार जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा हा सारा खेळ समोर उभा राहतो. खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!
अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!
पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »जयगडची सफर
गीता सोनी | May 7, 2015
गणपती पुळय़ाला अनेक जण जातात. पण या पुळय़ाच्या परिघातच अनेक आडवाटेवरची प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहेत. यातीलच जयगड परिसरातील स्थळांची ही सफर ..
रस्त्याच्या उजव्या बाजूला लालसर जांभ्या दगडाचे कातळ, डाव्या बाजूला हाताच्या अंतरावर अथांग पसरलेला शब्दश: निळाशार समुद्र, किनाऱ्यावरची हिरवीगार दाट झाडी, त्यातून मधूनच डोकावणारे उतरत्या कौलारू लाल छपरांचे पुंजके, समुद्रातील पाण्याला समतल उडणारे पांढरे शुभ्र सी-गल्स आणि या ‘लाइव्ह’ निसर्गचित्राचा ‘गेटअप’ वाढवणारे काळेभोर गुळगुळीत नागमोडी रस्ते. अगदी बरोबर ओळखलत, हे सारे वर्णन आहे आपल्या कोकणाचे आहे.
गेल्याच आठवडय़ात धावत पळत केलेल्या कोकणभेटीत याहूनही कितीतरी अनुपम निसर्गसौंदर्य आमची साथ करीत होते. श्रीगणपती-पुळे आणि रत्नागिरी टापूतील ठरावीक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर आम्ही काही हटके ठिकाणांकडे मोर्चा वळविला होता. यातच काही हाताशी गवसली.
जयगडची ओळख खरेतर आपल्याला शालेय पुस्तकांतच झालेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासापासूनच आम्ही हे नाव वाचत आलो आहोत. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपती पुळय़ापासून हे ठिकाण अवघे अठरा ते वीस किलोमीटरवर. शास्त्री नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते अशा खाडीकाठावर हा जयगड उभा आहे.
जवळ येताच त्याची तटबंदी खुणावू लागते. त्याची भक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. आत शिरताच त्याचे ते वास्तुवैभव भुरळ पाडू लागते. सभोवती उंच तटबंदी, त्यावर वर-खाली करण्यासाठी बांधलेले उंच दगडी जिने अजूनही उत्तम अवस्थेत आहेत. तटबंदीवरून टेहाळणी करण्यासाठी बांधले गेलेले झरोके, बुरूज सुस्थितीत आहेत. तटावरून फिरताना गडाभोवतालच्या तीनही बाजूंस पसरलेला समुद्र, वाळूचा किनारा, नारळाच्या झाडांची दाटी हे सारे ‘दिल खुश’ करून टाकते.
किल्ल्यात मध्यभागी हनुमान आणि गणपतीचे मंदिर आहे. जवळच एक पडका वाडाही आहे. ही वाडय़ाची वास्तू मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची असल्याचे सांगितले जाते. या गडाचे बांधकाम अंदाजे सतराव्या शतकात, आदिलशाही राजवटीत झाले. पुढे हा किल्ला मराठा आरमारात सामील झाला आणि शेवटी सन १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला असे इतिहास सांगतो.
या किल्ल्याच्या नावाबद्दलही एक आख्यायिका इथे सांगितली जाते. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना, कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून नरबळी देण्याचे ठरले. यासाठी ‘जयबा मल्हार’ नावाच्या व्यक्तीने स्वेच्छेने प्राणार्पण केले. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ गडाचे नाव ‘जयगड’ असे निश्चित झाले.
तसा विचार केला तर पाहणाऱ्याला जयगड ही एखादी पडकी वास्तू वाटेल. पण आपल्या मराठी मनांसाठी मात्र अशा वास्तू केवळ इमारती नसतात. तिथे पाय ठेवता क्षणीच आपल्यातील इतिहास जागा होतो. कधी काळी या मातीला झालेला शिवरायांचा पदस्पर्श, इथे घुमलेले त्या पराक्रमी मावळ्यांचे ‘हर हर महादेव’चे नारे हे सारे आठवू लागते. हा सारा थरार अनुभवण्यासाठी तरी आपण जयगड किल्ला पाहायला हवा.
या किल्ल्यापासून जवळच असलेले, लाल-पांढऱ्या रंगातील ब्रिटिशकालीन जयगडचा दीपस्तंभही पाहाण्यासारखा आहे. सन १९३२ मध्ये ब्रिटिशांनी याची रचना व बांधकाम केले. अजस्त्र महाकाय लोखंडी पाया असलेल्या या दीपगृहाचा वरील भाग पितळेचा आहे. साधारण ८२ वर्षांपूर्वी उभारलेल्या या ‘लाइट हाउस’ची तत्कालीन रचना व यंत्रणा इतकी अद्ययावत आहे, की आजही ती कार्यरत आहे. हे दीपगृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यटनस्थळांना एक वेगळे वैशिष्टय़ प्राप्त करून देणाऱ्या या दीपगृहांची रचना व कार्य अभ्यासणे हे जिज्ञासू पर्यटकांना निश्चितच रोचक वाटू शकेल.
जयगड गावापासून चारपाच किलोमीटर अंतरावर असलेले कऱ्हाटेश्वर शिवमंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे पूर्णपणे लाकडी बांधकामाचे देऊळ एका तुटक्या कडय़ावर असल्यासारखे भासते. मुख्य म्हणजे मंदिरामागे असलेल्या साठसत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर दिसणारा काळा दगडी कातळ, समोरचा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, तिथे मिळणारा शांत एकांत, हवेचा प्रसन्न ताजेपणा हे सारे फक्त अनुभवण्यासारखेच आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Maharashtra Times
हैदराबाद म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या एका श्रीमंत राज्याची राजधानी. अर्थातच त्यामुळे तिचा डौलही तिला साजेसा असणारच. मोत्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या शहरांत बरीच पर्यटनस्थळं आहेत. स्मारकांपासून ते संग्रहालयापर्यंत आणि बगिच्यापासून फिल्मसिटीपर्यंत खूप काही इथं आहे. वर्षाअखेरीस एखादा छोटासा हॉलिडे प्लॅन करत असाल तर हैदराबाद हा बेस्ट पर्याय आहे. 
गोवळकोंडा किल्ला - गोवळकोंडा हा भारतातला एक प्रसिद्ध किल्ला. गोवळकोंडा म्हणजे मेंढपाळाचा किल्ला. मुळात हा मातीचा किल्ला होता त्यानंतर कुतूबशाही घराण्यानं हा किल्ला पुन्हा मजबूत बांधला. हैदराबादपासून ११ किलोमीटर्सवर हा किल्ला आहे. इथला परिसर सुंदर आहे. जुन्या काळातल्या महालांचे अवशेष, भल्यामोठ्या तोफा, मोठाले दरवाजे बघण्याजोगे आहेत. गोवळकोंडा किल्ल्याची माहिती लाईट व साऊंड शोच्या माध्यमातून सांगितली जाते. 
चारमिनार व मक्का मशीद - चारमिनार हे हैदराबादमधलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या चार मिनारांभोवती हे शहर वसवलेलं आहे. ४८.५ मीटर्स उंच असे चार मिनार आहेत. आत ४५ प्रार्थनास्थळं आहेत व एक मशीद आहे. मक्का मशीद ही हैदराबादमधील सर्वात जुनी मशीद. मक्कामधल्या मातीच्या विटा यासाठी वापरल्या गेल्या असल्याचं सांगितलं जातं. म्हणून त्याला मक्का मशीद असं नाव दिलं आहे.
बिर्ला मंदिर- व्यंकटेश्वराचं हे मंदिर आहे. हे मंदिर सफेद मार्बलचा वापर करून बांधण्यात आलं आहे. इथली मूर्ती ही तिरुपतीच्या मूर्तीसारखी आहे. 
सलार जंग संग्रहालय- सलारजंग हे एक सुंदर वस्तूसंग्रहालय आहे. हे संग्रहालय मुसी नदीकाठी आहे. प्राचीन काळातली हस्तलिखितं इथे पाहायला मिळतील. पर्शिअन कारपेट्स, चिनी बनावटीच्या अनेक वस्तू इथे आहेत. राणी नूरजहाँच्या कट्यारी आणि राजांच्या तलवारींचं खास कलेक्शन आहे. 
हुसैन सागर- हुसैन सागर हा खूप मोठा तलाव आहे. इथून दिसणारं सुंदर दृश्य व बोटिंगची सुविधा यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी होत असते. बुद्धाचा अखंड पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. तलावाच्या भोवती एनटीआर गार्डन, नेकलेस रोड, लुंबिनी पार्क अशी बरीच बघण्याजोगी ठिकाणं आहेत. ही गार्डन्ससुद्धा अतिशय सुंदर आहेत. 
चाऊमोहल्ला राजवाडा - अठराव्या शतकातला निजामाचा हा राजवाडा अतिशय सुंदर आहे. युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार अलीकडेच त्याला देण्यात आला होता. भव्य व वेगळ्या स्टाईलने बांधलेला हा राजवाडा सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला असला तरी अजूनही त्याचा दिमाख कायम आहे. इथे चार युरोपियन व मुघल पद्धतीचे महाल आहेत. सुरूवातीला ४५ एकर्सवर असलेला हा राजवाडा आता १२ एकर्सवर उरला आहे. 
रामोजी फिल्मसिटी - जवळपास दोन हजार एकरांवर पसरलेली, जगातली सर्वात मोठी फिल्मसिटी अशी याची ओळख आहे. या फिल्मसिटीमध्ये निसर्गरम्य आणि कृत्रिम आकर्षणंही अनेक आहेत. हिंदी, दाक्षिणात्य अशा शेकडो चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. एक संपूर्ण दिवस यासाठी राखून ठेवावा असं हे ठिकाण आहे. 
नेहरु झूऑलॉजिकल पार्क - तीनशे एकरांवर पसरलेलं हे उद्यान निसर्गप्रेमींनी जरुर भेट द्यावी असं आहे. जवळपास २५० प्रजातींचे प्राणी-पक्षी इथे पाहायला मिळतात. इथे असलेल्या प्राण्यांना शक्य तितक्या त्यांच्या नैसर्गिक वातावरणात ठेवण्यात आलं आहे. सफारी पार्क, नॅचरल हिस्ट्री संग्रहालय असे अनेक पर्याय उपल्ध आहेत. 
शॉपिंग स्पेशल - हैदराबाद हे शॉपिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या शहरात वेगवेगळे बाजार आहेत. इथल्या प्रत्येक बाजाराची खासियत वेगळी आहे. फळबाजार, ‌बांगड्यांचा बाजार, पुस्तकांचं मार्केट, अत्तर बाजार असे अनेक बाजार इथे आहेत. 
संकलन - शामल कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
5) Maharashtra Times
नागपूरजवळची वन डे डेस्टिनेशन!
ताडोबा, नागझिरा, नवेगावबांध, बोर, लोणार, चिखलदरा अशी अनेकानेक स्थळे विदर्भाचे मानबिंदू आहेत. पण, त्याव्यतिरिक्तही बरीच स्थळे पावलापावलावर भेटतात. नागपूरच्या शंभर किलोमीटरवर अशीच असंख्य स्थळे आहेत. दिवाळीच्या आठवड्याभराची सुट्टी एक दिवसावर आलेल्यांसाठी हे पर्वणी ठरतात. निसर्ग, सोशल, धार्मिक पर्यटनाची भूक भागवितात. त्यातीलच काही निवडक स्थळांचा हा धावता आढावा.
आंभोरा
ब्रह्मगिरी पर्वतावर पाच नद्यांच्या संगमस्थळी वसलेले श्री क्षेत्र आंभोरा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. नागपूरपासून पाचगाव, डोंगरगाव, कुही, वेलतूर मार्गे ८० किलोमीटर तर भंडाऱ्यापासून केवळ १८ किलोमीटर हे स्थळ आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांचा संगम येथे आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेला परिसर हे स्थळाचे वैशिष्ट्य आहे. टेकडीवर चैतन्यश्वराचे जाज्वल्य मंदिर आहे. चहूबाजूंना नद्यांचे मोठे पात्र, संगम, पहाड, टेकडी, हिरवीगार वनराई असे मनोहर दृश्य पाहताना माणूस क्षणभर दु:ख विसरून जातो.
मनसर
नागपूरपासून ४५ किमी अंतरावरील मनसरला पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आहे. या ठिकाणाला गाव म्हणावे की किमया? भावनांच्या रंगपत्रात एकेका स्वप्नांचे कुंचले बुडवून विधात्याने 'मनसर' चितारले आहे. वाकाटक, सातवाहन काळातील समृद्ध संस्कृतीने हे ठिकाण संपन्न केले आहे. इथल्या कणाकणांवर निसर्गाने आपली सुबत्ता पांघरून ठेवली आहे. हा खजिना जरूर पहावा. येथून जवळच रामधामही आहे.
नगरधन
नगरधन हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. रामटेकपासून सुमारे सात किमी तर नागपूरपासून ३४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. ही जागा प्राचीन काळात 'नंदीवर्धन' म्हणून ओळखल्या जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधनच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. हौशी पर्यटकांनी भूक भागविण्यासाठी हा किल्ला सक्षम आहे.
पेंच
जैविक विविधतेने नटलेले पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर-जबलपूर मार्गावर ८० किलोमीटर अंतरावर आहे. वाघोबासोबत विविध प्राणी, पक्षी पाहण्याची सोय येथे आहे. पेंच नदीवर तोतलाडोह येथे एक विशाल बांध आहे. या धरणाचे पाणी ७७ किलोमीटर परिसरात पसरले आहे. आदिवासींचे जीवन जवळून न्याहाळण्याची सोयही येथे आहे. पेंचला गेल्यानंतर अंबाखोरी दुर्लक्षित राहू नये याचीही खबरदारी घ्यावी.
आदासा
नागपूरपासून ३७ किमी अंतरावरील आदासा येथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. कळमेश्वर आ धापेवाडामार्गे येथे जाता येते.
कुँवारा भीवसेन
नागपूरपासून ६४ किमी अंतरावर पारशिवनी तालुक्यात हे स्थळ आहे. हे स्थळ गों‌ड आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. येथे मोठी गर्दी होते. पेंच नदीच्या काठावर हे स्थळ आहे. त्यामुळे श्रद्धेला पर्यटनाचे महत्त्व प्राप्त होते.
नवेगाव खैरी
पारशिवनीपासून जवळच नवेगाव खैरी हे पर्यटनस्थळ आहे. येथील तलावाच्या चारही बाजूंनी वनसंपदा असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होते. पक्षीप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट स्थळ ठरते. हे स्थळ नागपूरपासून ६४ किलोमीटर अंतरावर आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल
नागपूरपासून २१ किलोमीटर अंतरावरील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आला आहे. जपानी पद्धतीने बांधलेले हे टेम्पल आज मन मोहून टाकते. नागपूरला येणारे बहुतांश पर्यटक या स्थळाला भेट दिल्याशिवाय राहात नाही.
रामटेक
गावाच्या चहुबाजूने हिरवळ आणि पूर्व दिशेला उंच डोंगर हे रामटेक या पौराणिक गावाचे वैशिष्ट्य! ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले हे गाव कुणाचे श्रद्धास्थान तर एखाद्या इतिहासवेड्यासाठीचे पर्यटनस्थळ ठरते. हिरवळीने नटलेल्या डोंगरावर प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि कवी कालिदासांचे स्मारक, हे गावाचे वैशिष्ट्य ठरते. नागपूरपासून ४८ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
पारडसिंगा
अनसुया मातेचे मंदिर असलेले पारडसिंगा डबा पार्टीसाठीही ओळखले जाते. कुटुंबांसोबत जाताना दर्शनाला पर्यटनाची जोड द्यायची झाल्यास हे ठिकाण उत्तम! नागपूरपासून सुमारे ६० किमी अंतरावर हे स्थळ आहे.
मोहगाव झिल्पी
नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावरील मोहगाव झिल्पी हा तसा तलाव परिसर. पण, निसर्ग सौंदर्याने या स्थळाला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. विकेंडला बाहेर जाणाऱ्यांसाठी हा सोयीचा पर्याय ठरतो.
खेकरानाला
नागपूरपासून ६२ किमी अंतरावर खापाजवळ असलेला खेकरानाला नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेला आहे. पर्यटकांना मोहून जाते.
खिंडसी
तुफान लाटांवर आरूढ झालेली वॉटर स्कूटर सुसाट वेगात उडवावी... चोहीकडे पसरलेल्या विस्तीर्ण निळ्याशार पाण्यात आपणच एकटे.. मुग्ध आणि धुंद मग पाण्यावरचे रंग कापीत ओठावंर मंजुळ गाणी आळवीत किनारा गाठावा... तर नजरेला सापडावी एक मायानगरी. तिलाच म्हणतात. खिंडसी. नागपूपासून अवघ्या ५६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
मेळघाट
उंच डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्या, तलाव, हिरव्यागार डोंगरकड्यावरून कोसळणारा धबधबा, गर्द वनराई, वाघोबासह विविध प्राणी पाहण्याची सोय मेळघाटात आहे. म्हणून देशातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये मेळघाटचा समावेश होतो. केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे तर ऐतिहासिक गाविलगड, नरनाळा किल्लाही येथे आहे. सिपना, खंडू, गडगा, तापी, वान व पूर्णा या नद्या आकर्षणाचे केंद्र आहेत. वान, अंबाबरवा, नरनाळा व मेळघाट अशी चार अभयारण्ये तर गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाटचे सौंदर्य खुलविते. याच मेळघाटातील चिखलदरा विदर्भाचे का‌श्मीर म्हणूनही ओळखले जाते.
नागपूरपासून अंतर - अमरावती १५० किलोमीटर व तेथून पुढे शंभर किलोमीटरवर मेळघाट आहे.
कसे जाणार? - नागपूरवरून येणाऱ्या प्रवाशांना अमरावतीनजीकचे बडनेरा रेल्वेस्थानक जवळचे आहे. बडेनरावरून अमरावती दहा किमी असून तेथून परतवाडामार्गे चिखलदराला जाता येते. मेळघाटात प्रवेश करता येतो. सोबतच एसटी महामंडळाच्या बसेस किंवा खासगी वाहनदेखील सोयीचे ठरते.
निवास व्यवस्था - एमटीसी हॉलिडे रिसोर्ट : गोराघाट पॉइंट (कॉनव्होकेशन कॅम्प) व चिखलदरा येथे मोझरी पॉइंट, चिखलदरा व धारणी येथे शासकीय विश्रामगृह, कोलकास विश्रामगृह व खाजगी हॉटेल्स
वाहन व्यवस्था - जिप्सी व अन्य वाहने उपलब्ध
संपर्क - वेबसाइट www.maharashtratourism.gov.in
दूरध्वनी क्रमांक:
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - ०७२१ - २६६१६०१
चिखलदरा रिसोर्ट - ०७२०-२३०२३४/२३०२६३
काय पहाल? - देवी पॉइंट, भीमकुंड (धबधबा), हरिसन पॉइंट, गावीलगड किल्ला, नरनाळा किल्ला, शक्कर तलाव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, शासकीय उद्यान, कलालकुंड, सनसेट पॉइंट, पंचबोल पॉइंट, जत्राडोह, माखला, जवाहर कुंड
वन्यजीव - पट्टेदार वाघ, रानगवा (रानम्हैस), रानकुत्रे, बिबट, दुर्लभ चांदी अस्वल, चितळ, सांबर, चौशिंगा, भेडकी, खवल्या मांजर, उडती खार, पाणमांजर आदी.
इथेही द्या भेट -मोझरी, नल दमयंती तलाव, सालबर्डी, कौंडण्यपूर, रिद्धपूर
@@@@@@@@@@@@@@@@@@@
6) वरंध घळ : समर्थाचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध झाल्या. शिवथरघळीच्या अगदी जवळ अजून एक घळ आहे. या घळीचे नाव स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे चार किलोमीटरवर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक-दोन ठिकाणी लागते. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेवून समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट घळीपाशी जाते. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळजवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलत: ही नसíगक घळ असणार. नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. आतमध्ये जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबी-रुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. या ठिकाणाचा उल्लेख हा ‘मठाचा माळ’ असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ज्ञ सांगतात.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
7) वेगळी हम्पी अनुभवण्यासाठी सानापूर तलाव, त्याच्या आसपास डोंगरांतून वाट काढणारे रस्ते, अनेक कालव्यांचे जाळे अशा अनेक जागा हम्पी परिसरात दडलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रमुख मंदिरे पाहायला एक दिवसही पुरतो आणि वेगळी हम्पी जगायला एक महिनाही कमी पडतो. फरक नजरेचा आणि दृष्टिकोनाचा असतो. चला, मग हम्पीची सफर करायची ना ?
Look what I saw in the "Top Marathi News"app: http://www.loksatta.com/lokbhramanti-news/visit-in-hampi-1335023/
############################
8) Veer Dam, near pune is a key bird-watching hotspot around Pune; especially famous for the Bar-headed Geese & Demoiselle Cranes. We have done multiple trips to this place in different seasons and have been pleasantly surprised with some of the sightings at this place. Till date we have sighted 96 different species of birds at Veer Dam.
One of the best parts about this place is that you will get to see Waders, Raptors as well as Flycatchers in and around Veer Dam. Not many places offer such variety.. Located around 70 KMs from Pune, this place offers a good stretch of 7-8 KMs along the river Nira. This entire belt along the river is extremely rich with Avifauna.
How to reach:
Take the Mumbai-Bangalore highway and drive up-to Shirwal, where you need to turn left onto the Khandala-Loni road to Baramati. Driving for around 4-5 KMs, take a left and you will reach the Tondal village.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
9) Bhigwan : Bhigwan Bird Sanctuary, located on Pune-Solapur Road, has been a winter paradise for bird lovers, nature enthusiasts and avian photographers for many years. Also known as ‘Bharatpur of Maharashtra’, the main attractions of Bhigwan are the beautiful, pink flamingos and Brahmani ducks that fly all over from the northernmost parts of the world every year around this time.  But what will make the bird watching experience truly mesmerizing for your children is hopping on to a boat, which will take the visitors through the backwaters of the Ujjain dam to watch these feathered beauties at closer quarters.  After returning to the shores, you can also catch a glimpse of herons, gulls, egrets, terns and other rare waders. If the lady luck is on your side, few raptors namely osprey, marsh harrier and spotted eagles, may also show up.
How to get there:The best way to reach Bhigwan is to drive yourself there.  From Pune, you can take Hadapsar- Loni – Bhigwan route. There are two birding spots in Bhigwan – Diksal and Kumbharwadi.   You may have to ask the local villagers for the right directions to these spots and hire boats.
पुणे-सोलापूर हमरस्त्यावरील भिगवणपासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स.च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं यमाई किंवा जगदंबा देवीचं मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे. या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
10) अनुभवा हाही गोवा
Maharashtra Times | Dec 25, 2015
गोव्याला जायचं म्हणजे बीचेस आणि चर्चेसची चर्चा आलीच. पण ज्यांना नेहमीचं सगळं करून पुन्हा काही वेगळं करायची उर्मी येते, त्यांच्यासाठीही गोव्यात खूप काही आहे. इअरएंडला किंवा नव्या वर्षामध्ये गोव्याचा प्लॅन करत असाल तर खास तुमच्यासाठी आहे हा हटके गोवा.. Ibrahim.afghan@timesgroup.com
गोव्यात नेहमीचा बीच टाळून वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर थेट दक्षिण गोव्यातला पाळोळे बीच गाठा. अर्धगोलाकार आकाराचा हा किनारा परवडणाऱ्या खाण्यापासून मनमोकळ्या धमालीपर्यंत सर्व काही देईल. समोर बेट आहे. एकट्याने चालताना किंवा तेथील शॅकच्या बाहेर बीच चेअरवर बसून किनाऱ्याच्या उजव्या हाताला असलेल्या डोंगराचं टोक आणि समोरचं बेट याच्या मध्ये बुडणारा सूर्य पकडायचा प्रयत्न करा.
ज्यांना ख्रिस्तमसचा गावातला माहोल अनुभवायचा असला तर दिवाडी बेटावर जा. गोव्याची राजधानी पणजी आणि जगप्रसिद्ध सेंट झेव्हीयरचं शव असलेल्या सेंट बॅसिलिका चर्चपासून ते जवळ आहे. फक्त फेरीबोटीतून जावं लागतं. गावात वावरताना सावधान. फार आवाज करू नका. कारण या गावातल्या लोकांनी गावची शांतता भंग होईल म्हणून पूल नाही होऊ दिलेला अजून. पण सगळीकडे पायी हिंडता येतं. आणि असं वाटेल की तुम्ही तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या काळात पोचलेला आहात. या गावकऱ्यांनी ते टिकवून ठेवलंय.
एकांतातील धबधब्यापाशी धमाल करण्याचा प्लॅन असेल तर नेत्रावळीकडे रवाना व्हा. ट्रेनने मडगावला गेल्यानंतर तेथून बसेस जातात किंवा ग्रूप असेल तर गाडी करून जाता येतं. तिथे अर्थात सांभाळून माहितगाराच्या मदतीनंच जा. आणि काळजी घ्या. कारण तेथे काळा चित्ता आढळतो. सांगे तालुक्यातील नेत्रावळी हा जंगलाचा भाग आहे. त्यासंदर्भात, गोवा पर्यटन विभागाची उत्तम मदत घेता येईल. ते राहण्याचीही सोय करतील. तेथे टाळ्या वाजवताच बुडबुडे निर्माण करणारे तळं पाहता येईल किंवा तिथून जवळच असलेलं नऊ हजार वर्षांपूर्वीची नदीच्या काठावरील दगडात कोरलेली चित्रकला पाहता येईल.
लांब निसर्गाच्या सानिध्यात गोवा अनुभवायचा असेल, तर पणजी शहरापासून जवळच असलेल्या आणि पुन्हा फेरीबोटनं जावं लागणाऱ्या चोडण बेटावर जा. हे आता डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे दिवाडी बेटावरूनही जाता येतं. विशेषतः मडस्कीपर हा जमिनीवर चालणारा मासा पाहाल तेव्हा हा अनुभव कधीच विसरणार नाही. बाकी, म्युझिक, डान्स, फिश आणि बुझ हे नेहमीच्या यशस्वी ठिकाणी तुम्हाला सापडेलच.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
11) पावसाळी सहली साठी रायगडाजवळील अजून उजेडात न आलेला मांडले धबधबा.
12)महाराष्ट्रातील निसर्ग आणि लेणी पर्यटनाची वेधक आणि वाचक माहिती...
13) महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर.
औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात.  
भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन  या मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरी सुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे असेच आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
14) बेस्ट संग्रहालय
आणिक डेपो येथे हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये बेस्ट बसचा संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला आहे. ज्या वेळी बेस्टने (बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय एॅण्ड ट्रान्स्पोर्ट) बस आणि ट्राम वाहतुकीचा ताबा मिळवला त्या काळापासूनच्या घडामोडी या संग्रहालयात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. १९४७ पासून बेस्ट बसमध्ये झालेले बदल या संग्रहालयातून पाहायला मिळणार आहेत. बेस्टचा उगम ते बसची िवटेज स्टाइल याचा इतिहास या संग्रहालयामुळे जिवंत झाला आहे. बेस्ट बसची आठवण म्हणून संग्रहालयाच्या बाहेर ब्रिटिशकालीन घडय़ाळ लावण्यात आले आहे. आणिक डेपोच्या तिसऱ्या मजल्यावर हे संग्रहालय आहे. बेस्ट बसची जुन्या काळातील तिकिटेही या संग्रहालयात पाहायला मिळतात. दोन दशकांपासून सुरू असलेले एक आण्याचे तिकीट आणि मासिक, साप्ताहिक पास या दुर्मीळ गोष्टीही या संग्रहालयात जपून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर जुन्या काळांपासून धावत असलेल्या बेस्टच्या बसेस आणि त्यांचे विविध प्रकार यांची छबीही या संग्रहालयात पाहायला मिळते. त्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. १९७४ च्या दरम्यान असलेल्या ट्राम ते डबलडेकर बस अशी स्थित्यंतरे संग्रहालयाच्या रूपाने जिवंत झाली आहेत. तसेच आजच्या काळातील बसची प्रतिकृतीही या संग्रहालयात पाहायला मिळते.
कसे जाल? –
आणिक आगार, वडाळा, मुंबई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
15) महाराष्ट्र निसर्ग उद्यान 
मिठी नदीच्या पात्रात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली पक्षी निरीक्षणासाठी जायचे. तेव्हा त्यांनी मिठीच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे, असे सांगितले होते. त्यानंतर मिठी नदीच्या पात्राजवळ असलेल्या या डिम्पग ग्राऊंडमध्ये त्यांनी पहिले झाड लावले. त्यांनी आंबा, वड, िपपळ, उंबर, पळस अशी पर्यावरणाला आधारभूत ठरणारी पाच झाडे लावून या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली. १९९४ साली हे उद्यान तयार झाले. त्या दरम्यान काही झाडे वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही लावण्यात आली. या उद्यानाच्या निर्मितीसंदर्भात पर्यावरणाच्या अभ्यासाचे ध्येय होते. शहराच्या जवळच्या निसर्गाचे या माध्यमातून आज संवर्धन होत आहे. याचा उपयोग जनजागृतीसाठी होत आहे. निसर्ग उद्यानाची निर्मिती करताना इथे कोणतेही पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे मुद्दाम आणलेली नाहीत. हे पक्षी, पाखरे उद्याननिर्मितीदरम्यान अधिवास शोधत या उद्यानापर्यंत पोहोचले आहेत. सध्या या उद्यानात पक्ष्यांच्या १२८ जाती, ८२ प्रकारची फुलपाखरे तर ३२ साप आढळतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पाऊल ठेवता क्षणी बाहेरच्या वातावरणातील आणि उद्यानाच्या वातावरणातील फरक जाणवतो. या दोन्ही तापमानामध्ये सुमारे ५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. या उद्यानात केवळ शोभेसाठी झाडे लावलेली नाहीत. ही झाडे समजावून देण्यासाठी तज्ज्ञ सज्ज असतात. फुले, फळे, त्यांचा फुलण्याचा काळ, त्याचा उपयोग, झाडाच्या सालीचा उपयोग, औषधी झाडांचे उपयोग अशी संपूर्ण माहिती देण्यात येते. एवढेच नाही तर त्या झाडावर कोणते पक्षी, फुलपाखरे येतात हेदेखील सांगितले जाते.
कसे जाल? –
मध्य रेल्वे मार्गावरील सायन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकावरून येथे रिक्क्षाने अथवा बसने पोहोचता येते.
16) ग्लोबल विपश्यना पॅगोडा 
तब्बल ३२५ फुटांची उंची आणि २८० फुटांचा व्यास असलेला हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. हे स्मारक २.५ दशलक्ष टनांच्या जोधपूर स्टोनपासून तयार केले असून इंटरलॉकिंग दगडांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची उभारणी करण्यात आली आहे. तसेच हे बांधकाम अनंतकाळपर्यंत टिकावे म्हणून त्यात सिमेंट किंवा पोलाद या बांधकामातील पारंपरिक वस्तू वापरण्यात आलेल्या नाहीत. भारतातीलच नव्हे तर संबंध जगातील हजारो लोक दर वर्षी विपश्यनेला येतात. म्यानमार सरकारकडून भेट म्हणून प्रदान करण्यात आलेला अत्यंत भव्य असा ६० टनांचा बसलेल्या बुद्धाचा पुतळाही येथे आहे. हा २१ फूट उंचीचा पुतळा एकाच संगमरवरी दगडातून कोरलेला असून तो देशातील सर्वात मोठा गौतम बुद्धांचा पुतळा मानला जातो. तसेच प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी विपश्यना पॅगोडासाठी रंगविलेली बुद्ध चित्रावली ही प्रसंगचित्रे प्रत्येकाने पाहावीच अशी आहेत. मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.
कसे जाल? –
ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई जवळ मुंबईच्या नर्ऋत्येला आहे. बोरिवली रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकात उतरून गोराई खाडीला जाणारी बस पकडावी. तेथून पॅगोडाला जाण्यासाठी फेरी बोटची सोय उपलब्ध आहे. गाडीने जायचे असल्यास मीरा रोड येथून शिवाजी पुतळ्याच्या चौकातून काशिमिरा मार्गे जाता येते.

Thursday, July 1, 2021

वर्धा जिल्ह्याचे पर्यटन

 

बोर : वन्य जीवांची वैभवशाली परंपरा

मध्य भारतातील विविध प्रकारच्या वन्यजीवांचे अधिवास असलेल्या बोर व्याघ प्रकल्पासोबतच सभोवतालच्या बफरझोनमध्ये तसेच जिल्ह्यातील इतर भागातील वनक्षेत्रात वन्यजीवांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. खवल्या मांजरासह दुर्मीळ होत असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण, तसेच वन्यप्राण्यासाठी सुरक्षित अधिवासामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बोर अभयारण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वन्यजीव आहेत. त्यामुळे वन्यजीव अभ्यासक, निसर्गप्रेमी व पर्यटकही जिल्ह्यातील विविध भागात भेट देत आहेत. मानद वाईल्ड लाईफ वार्डन कौशल मिश्रा यांनी ‘वाईल्ड पिलग्रिमस ऑफ वर्धा’ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास करुन शोध प्रबंध तयार केलाआहे. जिल्ह्यातील जैव विविधता, वन्यजीव या संदर्भात मागील तीस वर्षाच्या अभ्यासातून जिल्ह्याचे वन व वन्यजीव वैभवाची माहिती त्यांनी संकलीत केली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघासह विविध वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. परंतू सभोवताली असलेल्या सुमारे शंभर पेक्षा जास्त किलोमिटरच्या परिसरात असलेल्या वन्यजीव संदर्भात माहिती देतांना कौशल मिश्रा म्हणाले, ब्राम्हणवाडा, रीठ, डगा, खैरवाडा, मदना जावठी, शिवणगांव, खेरवाडा चांदनी या परिसरात वाघ व बिबट यांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. या भागात हमखास वाघ किंवा बिबट यांचे दर्शन होते. बफर झोन मध्ये वन्यप्राण्याची संख्या वाढत असतांना जिल्ह्याच्या इतर वन क्षेत्रातही वन्यजीव संवर्धनाचे काम समाधानकारक आहे.

तडस, रानकुत्रे या प्राण्यांचे अस्तित्व याच परिसरात असले तरी ठिपक्या मांजर सालई पेट, माळेगाव, सावदा आदी भागात दृष्टीस पडतात. या परिसरात ऊसाची शेती वाढत असल्यामुळे येथे त्यांना अधिवास मिळाला आहे. अस्वलाच्या वास्तव्यामध्ये प्रामुख्याने रिधोरा तामसवाडा भागात अधिवास असून हा भाग अस्वलखोरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. अस्वलीचे वास्तव्य सोनेगाव रीठ, सुसुद येथे सुद्धा असल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात वन्यजीवामध्ये सर्वाधिक अस्तित्व व अधिवास असलेल्या प्राण्यांमध्ये निलगाय, सांबर, हरित, रानडुक्कर, वानर, चितळ यांचा समावेश आहे. समुद्रपूर, गिरड, आर्वी, कारंजा, सेलू, हिंगणघाट आदी परिसरात वन्यजीवाचे वास्तव्य आहे. रोहना, कावडघरा, जांभूळधरा आदी माळराणावर काळा हरिनचे वास्तव्य आहे. आष्टी पार्डीच्या जंगलात रानगायीचे अस्तित्व आहे.
‘खवल्या मांजर’ दुर्मीळ
चुनखडी व टेकडी असलेल्या भागात वास्तव्य करणाऱ्या ‘खवल्या मांजर’ दुर्मीळ होत आहे. जिल्ह्याचे वैभव असलेले खवल्या मांजराचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. दहेगाव गोंडी, सुसुम याच परिसरात केवळ अधिवास असलेल्या या वन्यजीवाची सुरक्षा आवश्यक असल्याने दुर्मीळ प्राणी म्हणून सर्व वन्यजीव प्रेमींनी यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे कौशल मिश्रा यांनी सांगितले.

खवल्या मांजर हा पूर्णपणे रात्रीचर प्राणी असल्यामुळे सहजासहजी या प्राण्याला पाहणे शक्य होत नाही. या प्राण्याबद्दल अधिक अभ्यास केल्यानंतर त्यांचा अधिवास कसा सुरक्षित राहिल. याकडे विशेष लक्ष देतांना घोरपड पकडणाऱ्या शिकाऱ्याकडून या प्राण्यांचे संरक्षण आवश्यक आहे.
- अनिल गडेकर,
जिल्हा माहिती अधिकारी,
वर्धा

मुंबईची सफर

 

मुंबई दर्शन

मे महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरु झाल्या की वेध लागतात ते पर्यटनाचे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे अशी आहेत की जेथे जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करावे लागते. त्यामुळे मुंबईतल्या मुंबईत फिरणे अधिक सोईचे होते. अशा मुंबई स्थित पर्यटनस्थळांची माहिती मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे ती येथे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस (व्हिक्टोरिया टर्मिनस)
छत्रपती शिवाटी टर्मिनस इमारत सुंदरतेचा नमुना असून आज जगामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या एक सुंदर स्थानक म्हणून गणले गेले आहे.

सन 1888 मध्ये ब्रिटीशांनी बांधले असून व्यवस्थित बसविलेली तावदाने आणि भिंतीवरील नक्षीकामासमवेत तिच्या दर्शनी भागावर अत्युत्तम भुषणकला कोरण्यात आली आहे. फ्रेडरिक विल्यम्स स्टीवन्स या वास्तुशास्त्रकाराने या स्थानकाची रचना रु.16.14 लाख इतके शुल्क घेवून केली आणि ही इमारत पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली.

छ.शि.ट.च्या कळसावर राणी व्हिक्टोरियाचा पुतळा असल्यामुळे राणी व्हिक्टारिया राजवटीच्या स्मरणार्थ या स्थानकास ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ असे नाव देण्यात आले होते.

मुंबईमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपनगरीय तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांकरिता हे फार महत्त्वाचे स्थानक आहे. हे भारतातील एक सर्वात व्यस्त स्थानक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) 
महात्मा ज्योतिबा फुले मंडई किंवा क्रॉफर्ड मार्केट हे नाव बाँम्बेचे पहिले आयुक्त आर्थर कॉफर्ड यांच्या नावावर ठेवण्यात आले. शहराच्या उत्तरेकडील शेवटच्या जुन्या ब्रिटीश भागात स्थित असलेली मंडई त्याच्या उंच घड्याळ टॉवर आणि घुमटाने क्षितिजालाही घाबरविते. ही मंडई 1869 मध्ये पूर्ण झाली आणि सर कवासजी जहांगीर यांनी या शहरास ही भेट दिली. लॉकवुड किपलींग यांनी बाहेरील भिंत आणि दगडांचे कारंजे यांची रचना केली होती.

फ्लोरा फाऊंटन 

फ्लोरा फाऊंटन जुन्या चर्चगेटच्या बॉम्बे फोर्टजवळ उभे असून आता तेथे मोठे रस्ते असून त्यास हुतात्मा चौक असे म्हटले जाते. बाँम्बेचे माजी राज्यपाल सर बार्टले फ्रेर यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आले असून नंतर ग्रीक देवता फ्लोराचे नाव देण्यात आले.

जहांगीर कला दालन 

काळाघोडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाजवळ स्थित असून हे दालन मुंबईच्या कलाकारांकरिता समकालीन कला दाखविते.  हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून के.के. हेब्बर आणि होमी भाभा यांच्या ईच्छेमुळे सर कवासजी जहांगीर यांनी स्थापना केली होती. ही अवाढव्य संस्था भारतीय कलेस पुनरुज्जीवन प्राप्त करून देवू शकते असा या ठिकाणाचा इतिहास.

गेटवे ऑफ इंडिया 
भारताचे प्रवेशद्वार हे उल्लेखनीय चिरकालीन स्मारक असून त्याची देखील जॉर्ज विटेल यांनी रचना केली आहे.

एलिफंटा लेणी 

एलिफंटा लेणी मुंबईमधील मुंबईच्या दुसऱ्‍या किनाऱ्‍यावर वसलेली आहे. 1987 मध्ये युनेस्को जागतिक पुरातन वास्तु ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले. या ठिकाणी असंख्य स्थानिक आणि परकीय पर्यटक भेट देत असतात. पोर्तुगीजांनी या लेणीस घारापुरी ऐवजी ‘एलिफंटा’ असे आधुनिक नाव दिले. एलिफंटातील त्रिमुर्ती शंकराचे तीन तोंड ब्रम्ह, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडविते. येथे अन्य शिल्प नटराज आणि सदाशिव यांच्या उठावांचे आणि अर्धनारीश्वराच्या भव्य नक्षीकामाचे दर्शन घडविते.

मणी भवन
साधं आणि सुंदर संग्रहालय, महात्मा गांधीनी 1917 ते 1934 मुंबईस भेट दिली त्यावेळेस गांधीजी येथे राहत असत. मणीभवन येथे गांधीजींची खोली आणि ते वापरत असलेल्या वस्तुंसहित पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवल्या असून हे संग्रहालय लेबरनम मार्ग, ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ स्थित आहे. ही इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील ह्या कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता.

ही इमारत रविशंकर जगजीवन झवेरी आणि मणी कुटुंबाची होती जे योगायोगाने गांधींजींचे मित्र होते आणि मुंबईतील ह्या कालावधीमध्ये त्यांचा पाहुणचार करीत असत. मणीभवनमधूनच गांधीजींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी आणि खिलाफत चळवळींचा प्रारंभ केला होता. सदर इमारत 1955 मध्ये गांधी स्मारक निधीने गांधींजींचे स्मारक म्हणून परिरक्षणाकरिता ताब्यात घेतली होती.

मरीन ड्राईव्ह 
मरीन ड्राईव्ह हे दक्षिण मुंबईतील किनाऱ्‍यालगत असलेल्या उलट्या ‘सी’ आकाराच्या सहा मार्गाच्या काँक्रीट रस्त्याने 3 कि.मी. इतक्या भागात विस्तारले आहे. नरीमन पॉईंट ते मलबार हिल असा जोडणारा मरीन ड्राईव्ह पश्चिम-दक्षिण-पश्चिम बाजूने दलदलीच्या जमिनीवर बांधण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्हचे (नेताजी सुभाषचंद्र मार्ग म्हणूनही ओळखले जाते) मुख्य आकर्षण म्हणजे पाने असलेली ताडाची झाडे एका ओळीने असल्यामुळे मोहून टाकतात. एका बाजूला सन 1920 आणि 1930 मध्ये बांधलेल्या डेको कलेच्या इमारतींचा नमुना आणि दुसरीकडे अरबी समुद्र यामुळे रस्त्यास वास्तुशिल्पाची जोड येते. मरीन ड्राईव्ह हे मुंबई मॅरेथॉन, लडाऊ विमानांचा हवाई कार्यक्रम यासहित अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. या ठिकाणाला रात्रीच्या रस्त्यावरील दिवे हिऱ्यांच्या हाराप्रमाणे दिसतो यामुळे यास ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट
पूर्वीचे विज्ञान संस्थेचे कवासजी जहांगीर सभागृहाचे चांगल्या भारतीय समकालीन कला प्रदर्शित करता यावे यासाठी चार मजली प्रदर्शन सभागृहात रुपांतरीत करण्यात आले.

सन 1911 मध्ये जॉर्ज राजे-पाच आणि राणी मेरी यांच्या भारतास भेट दिल्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.
या भागामध्ये एलिफंटा बेट आणि बंदराच्या आसपासच्या अन्य समुद्रकिनाऱ्‍यांवर जाण्याकरिता बोट सेवादेखील आहे. त्याच्या मागील बाजूस सुंदर असे जुने आणि नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे.

मलबार टेकडी
मलबार टेकडी, अतिशय लहान टेकडीवर वाळकेश्वर मंदिर असून त्यांचे संस्थापक राजे सिलहारा होते. पोर्तुगीजांनी मंदिर उध्वस्त केले होते परंतु रामा कामत यांनी 1715 मध्ये ते पुन्हा बांधले. 50 मीटर (80 फूट) उंच मुंबईतील सर्वात उंच ठिकाण आहे.

मलबार टेकडी हे शहरातील जास्त गर्दीचा निवासी भाग असून उद्योग जगतातील आणि करमणूक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींची येथे निवासस्थाने आहेत.

राजभवन (राज्यपालांचे निवासस्थान) आणि वर्षा बंगला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थानही येथे आहे.

चौपाटी समुद्रकिनारा
मुंबईचे नागरिक आणि पर्यटक येथे वारंवार जात असल्यामुळे कदाचित चौपाटी समुद्रकिनार हा मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. मलबार टेकडीच्या पायथ्याशी तसेच मरीन ड्राईव्हचा शेवट या ठिकाणी स्थित असलेला हा समुद्रकिनारा मध्य मुंबईतील एकमेव समुद्रकिनारा आहे. तरुण जोडप्यांपासून कुटुंबापर्यंत मजा लुटण्यासाठी येतात तसेच आपली सायंकाळची वेळ घालविण्यासाठी वरिष्ठ नागरिक येत असतात तसेच या चौपाटीवर शुद्ध हवेमध्ये श्वास घेण्यासाठी येथे येणे प्रत्येकाला आवडते.

कमला नेहरु उद्यान 
मलबार टेकडीच्या पायथ्याशी वसले असून मुख्यतः बालकांसाठी असलेल्या उद्यानास भारताच्या प्रथम पंतप्रधानांच्या पत्नीचे नाव देण्यात आले आहे .1952 मध्ये सुरु झालेले उद्यान मरीन ड्राईव्ह आणि चौपाटीचा चहूबाजूचा नजारा दाखवितो.

तारापोरवाला मत्स्यालय
तारापोरवाला मत्सालय हे शहरातील एकमेव मत्स्यालय आहे. सन 1951 मध्ये बांधकाम झालेल्या या वास्तुस एकूण रु. 8,00,000/- इतका खर्च आला. यामध्ये समुद्र आणि तलावातील पाण्यातील मासे पहावयास मिळतात. हे मत्स्यालय प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह येथे स्थित आहे. येथे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ माशांसहित समुद्र आणि गोड्या पाण्याच्या माशांच्या 100 प्रजाती आहेत. येथील आकर्षणामध्ये शार्क, कासव आणि मोऱ्‍या यांचा समावेश होता.

सहा दशके जुने असलेल्या मुंबईतील या मत्स्यालयाचे अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे. नुतनीकरणासाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर मागील वर्षी ३ मार्च २०१५ रोजी हे मत्स्यालय पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ, विलोभनीय, शोभिवंत मासे येथे पहावयास मिळतात.

फोर्ट भागातील व्हिक्टोरियन इमारती
फाऊंटन वा फोर्ट भागामधील पाहण्यासारख्या अन्य इमारती म्हणजे भव्य राजाभाई टॉवर, मुंबई उच्च न्यायालय, जुने सचिवालय आणि एका शेवटच्या भागात शास्त्रीय संस्था यासहित मुंबई विद्यापीठ इमारत.

त्याजवळ सेंट थॉमस कॅथेड्रल, दि एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे वा टाऊन हॉल, पोलिस महासंचालकांचे कार्यालय, मुख्य पोस्ट कार्यालय आणि थॉमस कुक इमारत स्थित आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्यालयही चर्चगेट स्थानकापासून जवळपास समोरील पदपथावर आहे. ही इमारत म्हणजे गोठीक आणि इंडो-सेरासेनिक शैलीचा उत्तम नमुना आहे.

बहुसंख्य इमारतीत रात्रीची रोषणाई असते. ही ठिकाणे पाहण्यासाठी एमटीडीसीची छतविरहीत बसमधून आस्वाद घेणे विलक्षण अनुभव असतो.

मुंबईतील प्राणीसंग्रहालय 
प्राणीसंग्रहालय आणि उद्यान मुंबईच्या मध्यभागी भायखळा येथे स्थित असून त्यास राणी जिजाबाई उद्यान किंवा राणीबाग म्हणून ओळखले जाते. मुलतः व्हिक्टोरिया उद्यान म्हणून संबोधले जाणारे सन 1861 मध्ये बनविले गेले होते. उद्यानामध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयही स्थित असून औद्योगिक आणि शेतीच्या उद्देशाकरिता बनविले होते.

हाजी अली 
हाजी अली दर्गा वरळी भागाच्या मध्यभागी असून हे पवित्र स्थान मुस्लीमांचे संत जे मक्का येथे यात्रेस जात असताना मृत्युमुखी पडले त्यांच्या आठवणीस्मरणार्थ आहे. एक श्रद्धा अशी आहे की दागिन्यांचा लहान डबा तरंगत होता आणि तो या समुद्रामधील दगडांच्या बिछान्यावर आराम करण्यासाठी जेथे आला तेथेच किनाऱ्‍यापासून 500 वार लहान दगडी बेटावर भाविकांनी दर्गा बांधली. शहराच्या महालक्ष्मीच्या सीमेस अरुंद दगडी बांधाने हे बेट जोडते. हा दगडी मर्गास कुंपण नसून भरती असताना समुद्राच्या पाणी या बांधावर आपटते. म्हणून दर्ग्यामध्ये फक्त ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. या दगडी मार्गावर चालताना दोन्ही बाजूने समुद्र हा सहलीच्या यात्रेचा विलोभणीय क्षण आहे.

महालक्ष्मी मंदिर 
भुलाभाई देसाई मार्गावर स्थित असलेले हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर संपत्तीची देवता महालक्ष्मीकरिता बांधले आहे. साधारण 1785 मध्ये बांधलेले ह्या मंदिराचा इतिहास हॉर्नबाय वेलार्डच्या इमारतीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी वेलार्डची भिंत बांधत असताना दोन वेळा भिंतीचा काही भाग कोसळला त्यावेळेस प्रमुख अभियंता पाठारे प्रभु यांना वरळीजवळील समुद्रामध्ये लक्ष्मीच्या मुर्तीचे स्वप्न पडले. शोध घेऊन मूर्ती सापडल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले. त्यानंतर वेलार्डचे काम कोणतीही अडचण न येता पूर्ण करता येवू शकले.

सिध्दीविनायक मंदिर

प्रभादेवी येथे स्थित असलेले हे गणपती देवाच्या स्मरणार्थ प्रमुख मंदिर असून 200 वर्षापूर्वीच्या जुन्या मंदिराच्या जागेवर पुनर्बांधणी करण्यात आली आहे. काळ्या दगडाने बांधलेल्या या मंदिरात गणपतीच्या दोन मूर्त्या असून अर्धा फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे.

या मूर्तीचे अपूर्व वैशिष्ट्य असे की, त्याची सोंड जव्या बाजूस वळली असून गणपतीच्या मूर्तीमध्ये सहसा आढळत नाही. दर्शन व पूजेचा महत्‍त्वाचा वार मंगळवार असतो परंतु या मंदिरामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

नेहरु तारांगण 

लंबवर्तुळाकार नेहरु केंद्राची उंच कणसाच्या बुरखुंडासारखी दिसणारी इमारत महालक्ष्मीच्या उत्तरेकडे दिसते. येथे तारांगणात प्रचार केंद्र आणि संगीत जलसा-नि-चित्रपट सभागृह आहे. हे तारांगण पृथ्वीवरुन कोणत्याही ठिकाणाहून भूत, वर्तमान वा भविष्यामधील कोणत्याही वेळी आकाशाचे प्रतिबिंब दर्शविते.

नेहरु शास्त्रीय केंद्र
नेहरु शास्त्रीय केंद्र हे साठच्या दशकामध्ये प्रथम शास्त्रीय व तंत्रज्ञान संग्रहालय म्हणून नावारुपास आले त्यानंतर 8 एकरवर पसरलेल्या शास्त्रीय पार्क जीवनाच्या मालमत्तांसंबंधीत, रेल्वे इंजिन, ट्रामगाड्या, अतिजलद विमान आणि वाफेवरील लॉरी यासारख्या गोष्टींचे प्रदर्शन समाविष्ट असलेले भारतातील सर्वात मोठे क्रियाशील शास्त्रीय केंद्र आहे.

प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय
व्हिक्टोरियन वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले प्रीन्स ऑफ वेल्स संग्रहालय हे राजे जॉर्ज-पाचवे मुंबई भेटीस आले त्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. त्याची संकल्पना जॉर्ज विटेट यांनी केली होती आणि ते सन 1923 मध्ये पूर्ण करण्यात आले.

हे भारतातील खरोखरच उत्तम संग्रहालय असून त्यामध्ये भारतातील प्राचीन संस्कृसहित विविध युगातील धनसंग्रह, सत्यकला, रंगीत चित्र आणि शिल्प येथे आहेत.

-विलास सागवेकर, 
उपसंपादक

मुंबईतील ‘माईलस्टोन्स..’

मुंबईत अजुनही तग धरून असलेल्या ब्रिटीशकालीन 'माईलस्टोन्स'ची माहिती माझ्या वाचनात आली आणि त्यांचा शोध घेण्यास मी सुरुवात केली. माईलस्टोन्सचा माग काढता काढता अचानक ‘मुंबईच्या किल्ल्या’बद्दल वाचनात आलं आणि मी थेट प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहोचलो. दरम्यान माईलस्टोन्स मागे पाडले. आता मला माझ्या वाचनातून सापडलेल्या व मी पाहिलेल्या त्यापैकी काही माईलस्टोन्स बद्दल माहिती इथे देत आहे.

मुंबईतील रस्त्यावरचे ३०० वर्षे वयाचे इतिहासपुरुष अर्थात माईलस्टोन्स असे एकूण तेरा-चौदा माईलस्टोन होते व आजमितीस त्यातील केवळ सहा-सातच शिल्लक असून बाकीचे काळाच्या (की रस्त्याच्या?) उदरात गडप झाले आहेत अशी माहिती बऱ्याच ठिकाणी मिळते.. मी यापैकी काही 'माईलस्टोन'चा माग काढला व त्यांचं प्रत्यक्ष 'दर्शन' घेऊन आलो.. त्या 'माईलस्टोन्स'चे फोटो व लोकेशन आपल्याशी शेअर करतोय..!

हे सर्व माईलस्टोन्स मुळात सहा-सात फूट उंच होते असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो व ते तसे असावेत असा अंदाज आपण सहज बांधू शकतो कारण रस्त्यांवर मोटारी अवतरण्यापूर्वी सर्व प्रवास बैल वा घोडागाडीतून होत होता व बैलगाडी किंवा घोडागाडीची उंची जास्त असल्यामुळे त्यात बसलेल्या सवारीला किती अंतर झाले किंवा राहिले हे सहज दिसण्यासाठी तेवढी उंची गरजेचीच होती. हे माईलस्टोन्स आयताकृती उभट चौकोनी दगडाचे असून त्यावर रोमन अक्षरं कोरलेली आहेत व टॉप पिरॅमिडच्या आकाराचा आहे हे सोबतच्या फोटोंवरून दिसेल.

या माईलस्टोन्सवरील सर्व अंतरं 'सेंट थॉमस चर्च' पासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' म्हणजे आताच्या फोर्ट मधील हॉर्निमन सर्कलच्या पश्चिम दिशेस आहे, ते..! हुतात्मा चौकातून पूर्व दिशेस 'वीर नरिमन रोड' नांवाचा जो सरळ रस्ता 'अकबर अलीज' वरून हॉर्निमन सर्कलला जातो, तो रस्ता थेट या सेंट थॉमस चर्चलाच पोहोचतो. हे चर्च १६७६ साली बांधायला घेतलं व जवळपास चाळीस वर्षांनी म्हणजे १७१८ मध्ये पूर्ण होऊन प्रार्थनेसाठी खुलं करण्यात आलं अशी माहिती विकीपेडिया देतो.. या चर्चमुळेच पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील सुरूवातीच्या स्टेशनचं नांव 'चर्चगेट' ठेवण्यात आलं आहे...

चर्चचा इतिहास थोडक्यात कथन करण्याचं कारण, मुंबईतल्या मैलांच्या दगडावरील अंतर या चर्चपासून मोजली गेली आहेत.. 'सेंट थॉमस चर्च' हे '0'- झीरोमाईल - मानलं गेलं होतं.. मी पाहिलेल्या सर्व दगडांवर '....FROM ST. THOMAS'S CHURCH' असा स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो.. चर्च ७१८ मध्ये तयार झालं असं लक्षात घेतलं, तर अंतर दर्शविणारे हे मैलांचे दगड सन १७१८ च्या नंतर बसवले गेले असावेत असा निष्कर्ष काढावा लागेल, म्हणजे त्याचं आजचं वय ३०० वर्ष व आसपास असल्याचं लक्षात येतं..!!

मी बघितलेला पहिला माईलस्टोन चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिमेस, ऑर्थर रोडच्या नाक्यावर आहे.. लालबाग मार्केटकडून जो पुलरस्ता चिंचपोकळी स्टेशनच्या पश्चिम दिशेस येतो व नंतर डावीकडे वळून भायखळ्याच्या दिशेने जातो, अगदी त्या वळणावरच डावीकडे हा 'माईलस्टोन' उभा आहे. हा 'माईलस्टोन' सेंट थॉमस चर्च' पासूनच 'IV MILES' – चार मैल - अंतर दर्शवितो.. या दगडावर कोरलेली 'IV MILES FROM ST. THOMAS'S CHURCH' ही अक्षरं जमिनीच्या पोटात लुप्त होण्याच्या मार्गावर असली तरी अजूनही स्पष्ट वाचता येतात..

मी पाहिलेला दुसरा माईलस्टोन सायनच्या पूर्वेस 'तामिळ संघम' नावाची प्रसिद्ध संस्था ज्या गल्लीत उभी आहे, त्याच गल्लीत उभा आहे. मुंबईहून सायनच्या दिशेने जाताना, उजव्या बाजूचे 'गांधी मार्केट' गेलं की लगेच पुढे काही अंतरावर 'तामिळ संघम'ची इमारत लागते.. ही इमारत, बाहेरचा मेन रोड व मेन रोडला समांतर, पण आतून जाणाऱ्या गल्लीच्या टोकाशी उभी आहे.. ही आतून जाणारी गल्ली पुन्हा पुढे मेन रोडला मिळते त्या गल्लीत हा माईलस्टोन उभा आहे.. हा असा मेन रोड पासून आत उभा का, या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही.. या दगडावर 'VIII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – आठ मैल - अशी अक्षरं कोरली आहेत.. कोणी स्थानिकाने या दगडास पिवळा रंग दिला आहे तो बहुतेक त्यावरील 'चर्च' या अक्षरांमुळे त्याची भाविक वृत्ती जागृत झाल्यामुळे असावा.. या दगडावरील सर्व डिटेल्स आजही स्वच्छ वाचता येतात.. हा दगड फुटपाथच्या पोटात समाधी घेण्याच्या तयारीत तिरका उभा आहे..!!

तिसरा माईलस्टोन मला भेटला तो दादरच्या पूर्वेस असलेल्या 'चित्रा सिनेमा'च्या अगदी समोरच्या बाजूस असलेल्या गुरूद्वारा इमारतीच्या दक्षिण टोकाच्या फुटपाथवर..! ह्यावर 'VI MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सहा मैल- अशी अक्षरे कोरली आहेत.

मला भेटलेला चौथा माईलस्टोन दादर पश्चिम येथील कबुतरखान्याजवळ असलेल्या गोल देवळापासून पोर्तुगीज चर्चकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. नेमकं सांगायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी या परिसरातल्या ज्या बस स्टॉप जवळ बॉम्ब स्फोट झाला होता, त्या बस स्टॉपच्या शेजारीच हा दगड दिसेल. हा मैलाचा दगड 'VII MILES FROM ST.THOMAS'S CHURCH' – सात मैल - अंतर दर्शवतो.

असे आणखी दोन ते तीन माईलस्टोन्स मुंबईतील काळबादेवी, गोवालिया टँक आणि ताडदेवच्या भाटीया हॉस्पिटलपाशी असल्याचा उल्लेख नेटवर सापडतो. परंतु मी ते पाहिले नसल्यामुळे त्यांची माहिती इथे दिलेली नाही.

आता शिल्लक असलेले व मी पाहिलेले मैलाचे दगड आता जेमतेम दोन-अडीच फूट जमिनीवर आहेत. हे सर्वच माईलस्टोन्स निर्वासितासारखे असहाय्य होऊन फुटपाथवर दुर्लक्षित आहेत. दादरच्या गोल देवळाजवळच्या माईलस्टोनची अवस्था फारच बिकट आहे. केवळ एक फुटभर शिल्लक असलेल्या या माईलस्टोनवरील केवळ ‘VII’ एवढीच अक्षरे वाचता येतात, बाकी सर्व फुटपाथने गिळून टाकलंय. हे सर्व मैलाचे दगड ‘ग्रेड वन’च्या ‘हेरीटेज’ प्रकारचे असावेत. हा आपला इतिहास आहे, वारसा आहे..! यांची जपणूक करून ते भावी पिढ्यांच्या माहितीसाठी सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. ३०० च्या दरम्यान वय असणाऱ्या या पुराणपुरुषांना वृद्धाश्रमात (म्युझियममध्ये) न हलवता, आहे त्याच जागी त्यांना त्यांच्या मुळच्या स्वरुपात आणून, शेजारी त्यांची थोडक्यात माहिती देणारी पाटी लावल्यास अधिक सोईस्कर होईल.

- गणेश साळुंखे
9321811091





मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले.. (भाग १)

काळा घोडा

दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापित, पुतळ्यांत 'काळा घोडा' पुतळ्याचा अव्वल नंबर लागेल. अव्वल याचसाठी की पूर्वी इथं असलेल्या या पुतळ्याविषयी बऱ्याच मुंबैकरांना ऐकून का होईना पण माहिती आहे.

सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारात असलेल्या चौक व परिसराला 'काळा घोडा' म्हणतात.. हा परिसर मुंबईचा 'आर्ट अॅण्ड कल्चर डिस्ट्रीक्ट' म्हणून ओळखला जातो. जहांगीर आर्ट गॅलरी आणि त्यातील 'समोवार' रेस्टॉरन्ट (आता बंद), गॅलरीच्या समोरचं ऱ्हिदम हाऊस (हे ही आता बंद), इथून हाकेच्या अंतरावर असलेली नॅशनल आर्ट गॅलरी, भव्य म्युझियम आणि कला, संस्कृती, चित्रपट, नाटक आणि साहित्य यांवरील उत्तमोत्तम कार्यक्रम सातत्याने आयोजित करणारी ख्यातनाम जर्मन संस्था 'मॅक्समुल्लर भवन' अशासारख्या मातब्बर कलाकेंद्रांनी वेढलेला हा सारा परिसर..! हा सर्व परिसर जरी 'मुंबई'च्या कला क्षेत्रातील घडामोडीचा आयना म्हटला जात असला तरी तो प्रतिनिधित्व करतो ते मुख्यत: दक्षिण मुंबईतल्या 'एलीट क्लास'चं..! ही मुंबई ‘My Mumbai’ वाल्यांची..’ ‘माय मुंबई’ वाले त्या तिथे, मेट्रो पलीकडे आणि उपनगरांत..! मेट्रो सिनेमा पलिकडील सामान्य मुंबईकरांचा तसा या संस्थांशी वा या परिसराशी (अस्तंगत झालेलं ऱ्हिदम हाऊस वगळता) नोकरी व्यतिरिक्त फारसा संबंध येत नाही. नाही म्हणायला गेल्या काही वर्षापासून इथे भरत असलेला 'काळा घोडा फेस्टीवल' आता उपनगरातही चांगलाच परकोलेट होऊ लागलाय.. 'एलीट क्लास' आता उपनगरातही विस्तारायला लागलाय असा त्याचा अर्थ काढता येईल.

असो. जहांगीरच्या अगदी दारात, डेव्हिड ससून लायब्ररीच्या समोर सध्या जो पार्कींग लॉट आहे, तिथे हा 'काळा घोडा' त्याच्यावरील स्वारासकट १८७९ च्या मध्यावर उभा राहिला, तो सन १९६५ सालापर्यंत तिथेच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळुहळू ब्रिटीशांच्या सर्व पुतळ्यांची रवानगी गोडावूनमध्ये केली गेली त्यात हा पुतळाही होता.

१८७५ साली इंग्लंडच्या राजाने (तेव्हाच्या भारताच्याही), किंग एडवर्ड सातवा (प्रिन्स ऑफ वेल्स) यांने, मुंबईस भेट दिली व त्याच्या स्मरणार्थ त्याचा हा भव्य अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला. हा पुतळा सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून या मुंबईतील श्रीमंत व परोपकारी ज्यू व्यापाऱ्यांने त्या वेळच्या मुंबई शहराला आणि शहरवासियांना भेट दिला होता. खरं तर हा पुतळा सातव्या एडवर्डचा, पण तो त्याच्यामुळे कधीच ओळखला गेला नाही. पुतळा सुरुवातीपासून ओळखला जातो तो त्याच्या घोड्यामुळे !

घोड्यावर सवार सातवा किंग एडवर्ड संपूर्ण लष्करी, फिल्ड मार्शलच्या, गणवेशात असून राजा व त्याच्या बुटापासून केसांपर्यतचे काळ्या दगडात कोरलेले सर्व बारकावे मुद्दाम बघण्यासारखे आहेत. अत्यंत प्रमाणबद्ध असलेल्या आणि काळ्या पत्थरात घडवलेल्या या संपूर्ण शिल्पात घोड्याचं सौष्ठव इतक्या अचूकपणे पकडलय की तो अगदी जिवंत असून कधीही चालायला लागेल असा क्षणभर भास होतो आणि कदाचित म्हणून सातव्या एडवर्डपेक्षाही घोडाच लोकांच्या लक्षात राहिला असावा. कदाचित असंही असेल, की आपल्यावर राज्य करणाऱ्या राजाचं नाव कस घ्यायचं आणि म्हणून त्याचा उल्लेख काळा घोडा असा तेव्हाचे लोक करत असतील. इथं मला माझ्या आजीची आठवण येते. माझी लालबागची आजी आजोबांचा उल्लेख ‘हापिस आलं’, ‘हापिस गेलं’ अशी करायची, तसं असेल किंवा एवढं मोठ कठीण नाव घेण जमतही नसेल त्या काळच्या लोकांना..! ते काही असलं तरी या जोडीतला लोकांच्या लक्षात राहिला तो घोडाच..!

देश विदेशात “बॉम्बे”ची मोस्ट हॅपनिंग प्लेस म्हणून ‘काळा घोडा’ - तो तिथे नसला तरी - अजुनही मशहूर आहे.. नाव कायम असलं तरी घोडा त्याच्यावरील स्वारासकट त्याच्या या जागेवरून गायब आहे. अनेकांना वरील कथा माहितही असेल परंतु नवीन पिढीला ‘काळा घोडा’ म्हणजे नक्की काय हे माहित नसण्याचीच शक्यता आहे..

तर असा हा 'काळा घोडा' सध्या भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात (राणीच्या बागेत) उभा आहे.. उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे तिकीट काढून आपण आत गेलो की डाव्या हाताला अगदी समोरच आपला सुप्रसिद्ध ‘काळा घोडा’ त्याच्या पाठीवर सातव्या एडवर्डला घेऊन दिमाखात उभा आहे.. इतकी वर्ष उलटून गेली तरी त्याचा आणि त्याच्यावरील राजबिंड्या स्वाराचा रूबाब जराही कमी झालेला नाही.. हे संपूर्ण शिल्पच देखण आहे.. आता या इतक्या अप्रतिम शिल्पाला इथे का म्हणून उभं केलं असावं, असा बावळट प्रश्न मला पडला होता. नंतर मनात आलं की स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीश साम्राज्यवाद्यांचे पुतळे त्यांच्या मूळ जागेवरून हलवताना त्याचं ‘सरकारी वर्गीकरण’ केल गेलं असाव.. जे फक्त माणसांचेच पुतळे होते ते अन्य ठिकाणी गेले. हा पुतळा मात्र ‘प्राण्या’ सकट होता आणि म्हणून कदाचित याची रवानगी 'प्राणी' संग्रहालयात करावी असं एखाद्या देसी बाबूच्या मनात आलं असणं शक्य आहे आणि परिणामी घोडा स्वारासकट इथे आला असावा..

जाता जाता –

‘काळा घोडा’ हे सुरेख शिल्प सर अल्बर्ट डेव्हिड ससून यांनी सन १८७९ साली रु. १,२५,०००/-खर्चून बनवून घेतले होते.. घोड्यासहीत स्वाराचे संपूर्ण शिल्प सुमारे १२-१३ फूट उंचआहे.. श्री. मोरेश्वर शिंगणे आणि श्री.बाळकृष्ण आचार्य यांनी सन १८८९ साली लिहिलेल्या 'मुंबईचा वृत्तांत' या पुस्तकात वरील माहिती मिळते..

या पुतळ्याच्या खाली एक चबुतराही होता. या चबुतऱ्यावर किंग एडवर्डच्या भारतातील संस्थानिकांशी झालेल्या मुलाखतीचं दृश्य कोरलेलं होतं असं श्री. शिगणे यांनी लिहून ठेवलंय.. चबुतऱ्यावर कोरलेले भारतीय संस्थानिकांचे चेहेरे तर इतक्या सफाईने कोरले होते की कोणता चेहेरा कोणाचा हे सहज लक्षात यायचं असं शिंगणे म्हणतात.. या चबुतऱ्याचा शोध घ्यायचा मी खूप प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही..!

'काळा घोडा' ही अप्रतीम कलाकृती आणखी काही काळाने काळाच्या उदरात गडप होण्याच्या आत आपण हे शिल्प जरूर बघून घ्यावं..

-गणेश साळुंखे
9321811091
(संदर्भ - मुंबईचा वृत्तांत -सन १८८९-लेखक मोरेश्वर शिंगणे व बाळकृष्ण आचार्य)

मुंबईतील पुतळे : हलवलेले आणि हरवलेले.. (भाग २)

  • पुतळा 'हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया'चा

काळा घोड्यानंतर मूळ जागेवरून हलवलेल्या 'क्विन व्हिक्टोरीया'च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही..

'काळा घोडा' चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो.. हुतात्मा चौकात चर्चगेट स्टेशनच्या दिशेने समोरच 'सीटीओ'ची म्हणजे आपल्या 'तार ऑफीस'ची इमारत आहे. (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या इमारतीत सुरू झालं. कालांतराने १९१०-११ सालात ते सीएसटी शेजारच्या सध्याच्या भव्य इमारतीत नेण्यात आलं). 'तारायंत्र' बंद झालं असलं तरी इमारतीचं ‘सीटीओ’ नांव अद्याप कायम आहे. या इमारतीच्या मागे स्वराज्यात बांधलेली ‘एमटीएनएल’ची इमारत व या इमारतीच्या मागे असलेली 'टाटा टेलीकम्युनिकेशन्स'ची भव्य इमारत व त्यावरचा उंचं टॉवर आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे.. ‘टाटा टेली.’ म्हणजेच पूर्वाश्रमीचं 'व्हिएसएनएल'चं ऑफीस..

तर, हे टाटा टेलिकम्युनिकेशन्सचं ऑफीस ज्या जागी आहे, बरोबर त्याच जागी इंग्लंडची तत्त्कालीन महाराणी 'हर हायनेस व्हिक्टोरीया' हिचा शुभ्र संगमरवरात घडवलेला सिंहासनाधिष्ठीत आणि उंच संगमरवरी मखरात बसवलेला पुतळा होता.. मखराची उंची ४०-४२ फूट होती तर सिंहांसनासहीत पुतळ्याची उंची १५-१६ फूट एवढी होती. सबंध मुंबईत त्याकाळी येवढा सुंदर पुतळा दुसरा नव्हता असा उल्लेख श्री.शिंगणे यांच्या पुस्तकात सापडतो (पुतळ्याचा त्याच जागचा जुना फोटो वर दिला आहे)..

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे पुतळे दृष्टीआड करण्याची जी टूम निघाली, त्यात इतर पुतळ्यांप्रमाणे हा पुतळादेखील मूळ जागेवरून हलवून त्याची रवानगी भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये करण्यात आली..

मी नुकताच हा पुतळा पाहून आलो.. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या 'इस्ट लॉन'वर झाडांच्याखाली अगदी उघड्यावर ब्रिटीशांचे सात-आठ पुतळे हारीने मांडून ठेवलेयत, त्यात मध्यभागी हा पुतळा आहे.. गेली अनेक वर्ष ऊन-वारा-पाऊस व पक्ष्यांच्या शिटा झेलून महाराणीच्या चेहेऱ्याची साफ विटंबना झालेली आहे.. तिचं नाक साफ झडलं असून हातातला राजदंड तुटलाआहे.. पुरेश्या काळजी अभावी मुळच्या पांढऱ्याशुभ्र असलेल्या या देखण्या शिल्पावर काळपट पुटं चढलीत. असं असुनही पुतळ्याचं मूळ सौंदर्य जराही उणं झालेलं नाही.. सिंहासनावरील कलाकुसर आणि राजचिन्हं, आता उठून उभी राहील असा भास निर्माण करणारी तिची बसण्याची ढब, हात लावून सरळ कराव्या असं वाटायला लावणाऱ्या, तीनं परिधान केलेल्या राजवस्त्राला पडलेल्या चुण्या, केवळ लाजबाब..! सोबत पुतळ्याचे काल-परवाच काढलेले फोटो आहेत. पण नुसते फोटो बघण्यापेक्षा थोडीशी सवड काढून राणीच्या बागेत जावून ही अप्रतीम कलाकृती रूबरू बघून याच असं मी सांगेन..

या पुतळ्याचा इतिहास पाहता महाराणी व्हिक्टोरीयाच्या हा पुतळा कदाचित 'जन्मल्या'पासूनच एका जागेवर न राहाण्याचं नशीब घेऊन आला होता की काय कुणास ठाऊक..!

सन १८५८ मध्ये राणीने हिन्दुस्थानचा कारभार ईस्ट इंडीया कंपनीकडून आपल्या हातात घेतला, या घटनेच्या स्मरणार्थ राणी व तिचा नवरा प्रिन्स अल्बर्ट यांच्या नांवाने भायखळा येथे एक बाग व म्युझियम 'व्हिक्टोरीया गार्डन अॅण्ड अल्बर्ट म्युझियम' स्थापन करण्याचे तत्कालीन मुंबईकरांनी ठरवलं. (याचंच पुढे राणीचा बाग व स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात ‘जिजामाता उद्यान’ असं नामकरण झालं) या कार्याचे पुढारी होते आपले जगन्नाथ नाना शंकरशेट, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि काही बडे ब्रिटीश अधिकारी..

मुळात या बागेत राणीचाच पुतळा बसवायचा होता, परंतु तसे केल्यास तिच्या नवऱ्याला काय वाटेल या ‘हिंदुस्थानी’ विचाराने ‘प्रिन्स अल्बर्ट’चा पुतळाही तिथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. राणीच्या सन्मानार्थ हा पुतळा बडोद्याचे महाराज श्रीमंत खंडेराव गायकवाड यांनी रोख ८० हजार रूपये खर्चून प्रख्यात इंग्लिश शिल्पकार एन. नोबेल यांच्याकडून घडवून घेतला होता.. परंतू पुतळ्याचं रुपडं पाहताच गायकवाड सरकार राणीच्या बागेत पुतळा स्थापन करायला तयार होईनात व त्या ऐवजी मुंबई शहरातील कोटाच्या (फोर्ट) बाहेर प्राईम जागी हा पुतळा बसवावा असा हट्ट ते धरून बसले.. अखेर खंडेराव गायकवाडांच्या हट्टापाई शेवटी 'राणी'ची प्रतिष्ठापना वर उल्लेख केलेल्या जागी करण्यात आली व सन १९४७ नंतर पुन्हा 'राणी'ला भायखळ्याच्या तिच्या सुरूवातीस मुक्रर केलेल्या जागी आणून 'टाकलं' गेलं. राणीचा हा सुंदर पुतळा अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत बेवारश्यासारखा अजून तिथेच बसून आहे.. तर अल्बर्ट महाराजांचा काहीच पत्ता लागत नाहीय..

जाता जाता -

पुतळ्याची सुरुवातीची जागा राणीची बाग काय किंवा नंतरची 'टाटा टेलिकम्युनिकेशन्स'ची जागा काय, राणीच्या सिंहांसनाधिष्ठीत मूळ पुतळ्यात मखराची कल्पना नव्हती.. संगमरवरी मखर नंतर मुद्दाम बनवलं गेलं होतं.. स्वतंत्र भारतात या पुतळ्याची रवानगी भायखळ्याच्या राणी बागेत केली गेली तरी त्या पुतळ्याइतकंच, किंबहूना कांकणभर सरसच असलेल्या त्या मखराचं काय झालं असावं हा प्रश्न मला पडला होता.. माझ्या परीनं मी शोध घेत होतो.. माझ्या वाचनात आलेल्या अनेक पुस्तकांत या पुतळ्याचा व त्याच्या सध्याच्या पत्त्याचा उल्लेख सापडायचा, परंतू मखराचा उल्लेखही नसायचा..

परंतू शोधला की देवही सापडतो या उक्तीप्रमाणे अगदी परवाच, नेटवर सर्च करताना, मला मखराचा ठावठिकाणा अचानक सापडला.. विख्यात रेमंड कंपनीचे मालक श्री.सिंघानीया यांच्या मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या बंगल्याच्या आवारात उघड्यावर परंतू सुरक्षित असल्याचा उल्लेख http://thefourthseat.blogspot.in/2014/01/the-mystery-of-missing-marble-canopy-of.html?m=1 या वेबसाईटवर मिळाला..आपण या वेबसाईटला जरूर भेट देऊन माहिती घ्या.. अर्थात हा पत्तोल्लेख २०१४ सालचा आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे हे मला अद्याप प्रत्यक्ष बघाचीय.. या आठवड्यात जमवेन बहुतेक.. कोण येतंय सोबत?

- गणेश साळुंखे
9321811091
(12.04.2016)

मुंबईतील पुतळे; हलवलेले आणि हरवलेले.. (भाग ४ व शेवटचा)

‘मार्क्विस आर्थर वेलस्ली’ आणि ‘क्विन व्हिक्टोरिया’ – हरवलेले पुतळे

मुंबईतील ब्रिटीशकालीन पुतळ्यांच्या सद्यस्थितीवरील एकूण चार लेखांपैकी हा शेवटचा चौथा भाग.. या भागात मुंबईत पूर्वी असलेल्या परंतू स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या जागेवरून ‘हलवले’ल्या आणि आता 'हरवले’ल्या दोन पुतळ्यांची माहिती आपण घेऊ..

मागच्या तिसऱ्या भागात आपण हॉर्निमन सर्कल व त्यातील कारंजाच्या (एशियाटीक कडे पुढा करून उभं राहीलं असता) उजव्या बाजूस देवळीत स्थानापन्न असलेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याची माहिती घेतली होती.. या लेखाचा विषय असलेला 'मार्क्विस ऑर्थर वेलस्ली' याचा पुतळा हॉर्निमन सर्कल मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याच्या बरोबर समोर, म्हणजेच कारंजाच्या डाव्या बाजूस होता.. ऑर्थर वेलस्ली सन १७९८ साली कोलकाता येथे गव्हर्नर जनरलच्या पदावर होते.. कॉर्नवॉलिसप्रमाणे हे ही जबरी योद्धे होते.. १८०३ साली मराठ्यांबरोबर आसे येथे झालेल्या लढाईत यांनी मराठ्यांवर विजय मिळवला होता व त्यांच्या या विजयाच्या सन्मानार्थ हा पुतळा येथे बसवण्यात आला होता.

हा पुतळा मोठा नमुनेदार होता. एका उंच चंबूतऱ्यावर वेलस्ली बसले होते. बाजूला खाली त्यांची मॅडम बसली आहे आणि दुसऱ्या बाजूस खाली एक देशी नागरिक उभा आहे. वेलस्ली त्या देशी नागरिकाला एक तोडा बक्षीस देत असून त्याची शेजारी खाली बसलेली मॅडम चबुतऱ्यावर असलेल्या “Wisdom, Energy, Integrity” या शब्दांकडे बोट दाखवत आहे. पुतळ्याचा चबुतरा ज्या चौथऱ्यावर बसवलाय, त्या चौथऱ्याच्या एका बाजूस वाघ व दुसऱ्या बाजूस सिंहाचा पुतळा आहे. वाघ हे भारताचे प्रतिक तर सिंह इंग्लंडचे.. आसेच्या लढाईत सिंहाने वाघावर म्हणजे ब्रिटीशांनी मराठ्यांवर विजय मिळवला असे हे वाघ-सिंहाचे पुतळे सुचवत आहेत.. हा पुतळाही स्वराज्यात हलवला गेला सध्या या पुतळ्याचा मुक्काम कुठे आहे याचा काहीच ठाव ठिकाणा कळत नाही.. हा ‘हरवलेला’ पुतळा आहे. याचे एक जुने चित्र इंटरनेटवर मिळाले, ते सोबत जोडत आहे.
‘हरवलेला’ दुसरा पुतळा आहे राणी व्हिक्टोरियाचा..!

आपण सीएसटी स्टेशनच्या पश्चिम दिशेने बाहेर पडून डाव्या हाताला दहा-बारा पावलं चाललो की स्टेशनचं भव्य मेन गेट लागतं.. या मेन गेट समोर, समोरच्या कॅपिटल थेटराकडे पाठ करून उभं राहिलं की स्टेशनचा घुमटादार मुख्य मनोरा व त्याखालच्या महिरपीतलं भव्य घड्याळ दिसतं. या घड्याळाखाली एक उभट रिकामा कोनाडा दिसतो त्याकडे आपलं लक्ष गेलंय कधी? या रिकाम्या कोनाड्यात स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचा सहा-साडेसहा फुटी उंच पुतळा होता. स्वातंत्र्यानंतर इतर पुतळ्याप्रमाणे तो ही इथून ‘हलवला’ गेला परंतु तो सध्या ‘हरवलेला’ आहे. सध्या हा पुतळा नेमका कुठे आहे हे शोधूनही सापडले नाही. सोबत या ठिकाणी असलेल्या राणीच्या पुतळ्याचा जुना फोटो व सध्याचा रिकामा कोनाडा असलेला नविन फोटो देत आहे.

‘व्ही.टी.’ स्टेशनचं नामकरण १९९६ साली ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं झालं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव या स्टेशनला दिलंय त्यांचा पूर्णाकृती पुतळा स्टेशनच्या रिकाम्या कोनाड्यात राणीच्या जागी स्थापन केल्यास स्टेशनच्या नामकरणास अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं.

जाता जाता –

हॉर्निमन सर्कलमध्ये समोरासमोर असलेल्या कॉर्नवॉलिस आणि वेलस्ली या दोन पुतळ्यांनी त्याकाळी मोठी धमाल उडवली होती.. कॉर्नवॉलिसच्या पुतळ्याला स्थानिक हिंदू लोक हळू हळू देव मानायला लागले होते.. त्याची पूजाअर्चा करून त्यांना नवसही बोलू लागले होते.. कॉर्नवॉलिस याच्या पुतळ्यांच्या बाबतीत माडगावकर त्यांच्या १८६२ साली प्रकाशित ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात लिहितात, “या पुतळ्याला कित्येक हमाल, दुसरे गरीब गुरीब लोक भजत व नवस घेत व त्यासमोर नारळ, विडा, दक्षिणा ठेवून मानणूक करीत. परंतु अलीकडे सरकारने हे खूळ बंद करून टाकिले आहे. आता कॉर्नवॉलिसच्या पुतळ्यासमोर पोलीस ठेऊन गर्दी हटवली तर लोक वेलस्लीच्या पुतळ्याला भजायला लागले.. हा कोणीतरी नवा विलायती देव सरकारने आपल्यासाठी पाठवला आहे असा त्या काळच्या लोकांचा समज होऊन इथेही पुन्हा तोच प्रकार घडायला लागला. शेवटी या ठिकाणीही सरकारला पहारेकरी ठेवावे लागले होते असं माडगावकरांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

-गणेश साळुंखे
९३२१८११०९१
संदर्भ - ‘मुंबईचे वर्णन’, ले.गोविंद माडगावकर, सन १८६२

"मुंबईचा 'फोर्ट'.."

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेला 'फोर्ट' एरिया ज्याने पाहिला नाही त्यानं मुंबई पाहिली नाही असं म्हणायला हरकत नाही.. फोर्टातले ते प्रशस्त रस्ते आणि फुटपाथ, त्या भव्य आणि देखण्या इमारती, प्रत्येक इमारतीला असलेला घाटदार घुमट वा उंच मनोरा याची भुरळ न पडणारा विरळाच..!

मुंबईचा फोर्ट एरीया हा प्रामुख्याने व्यापारी व कार्यालयीन परिसर आहे. निवासी मनुष्य वस्ती इथं अगदी तुरळकच सापडते. ब्रिटीशराज मध्येही हा ब्रिटीशांच्या व्यापाराचा महत्त्वाचा हिस्सा होता.. फोर्ट म्हणजे किल्ला. जुने मुंबईकर फोर्टचा उल्लेख 'कोट' असा करायचे व 'कोट' या मराठी शब्दाचा अर्थही किल्ला असाच आहे (आठवा, गड-कोट).

तर या परिसराला 'फोर्ट' हे नांव पडण्यामागे या परिसरात इंग्रजांचा 'किल्ला' होता हे आहे. मुळात हा किल्ला इंग्रजांचा नसून पोर्तुगिजांनी बांधलेला होता.. पोर्तुगीज वनस्पती शास्त्रज्ञ 'गोर्सिया दा ओर्ता' हा मुंबई बेट लीजवर घेऊन अभ्यासासाठी इथं मुक्कामाला होता. स्वत:च्या निवासासाठी त्याने 'मनोर हाऊस' नावाचे किल्लेवजा घर बांधले होते. या घराचं लोकेशन सध्याच्या एशियाटीक सोसायटीच्या मागं कुठतरी होतं... (मूळ 'मनोर हाऊसचे' दोन दरवाजे व त्यातील एक बुलंद इमारत अजूनही शाबूत असून ती नेव्हीच्या ताब्यात आहे.) हा परिसर सध्या नेव्हीच्या (आय.एन.एस. आंग्रे) ताब्यात असल्याने तिथं कोणाला जाता येत नाही.

मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर या 'मनोर हाऊस'चा ताबाही ब्रिटीशांकडे आला. ब्रिटीशांनी आपल्या व्यापारी पेढीचे सागरी शत्रूंपासून संरक्षण करणे या हेतूनं किल्ल्याचा उत्तर, दक्षिण व पश्चिम दिशेकडे विस्तार करून त्याला पक्के बुरूज व मजबूत तटबंदी केली.. किल्याच्या तटबंदीला तीन मुख्य दरवाजे होते. उत्तरेस, सध्याच्या सीएसटी स्टेशनसमोरच्या दरवाजाला 'बझार गेट', दक्षिणेला आताच्या काळाघोडा किंवा जहांगीर आर्ट गॅलरीच्या परिसरातअसलेल्या गेटला 'अपोलो गेट' तर पश्चिम दिशेस 'चर्च गेट' अशी नावं दिली.. 'चर्चगेट' हे सध्याचं जे फ्लोरा फाऊंटन आहे, बरोबर त्याच कारंजाच्या जागी होतं.. पूर्वेस तर समुद्राचंच सानिध्य होतं.. पूर्वेकडचा समुद्र आणि उर्वरीत बझारगेट, अपोलोगेट व चर्चगेट अशा चार दिशांच्या आतील भागाला 'फोर्ट' हे नांव मिळालं, तेथे आज किल्ला अस्तित्वात नसला तरी चार-साडेचारशे वर्षांनंतरही कायम आहे व 'फोर्ट' नांवाने ओळखला जाणारा भागही तोच आहे.. इतिहासात या किल्ल्याचा 'बॉम्बे कॅसल' असाही उल्लेख आहे.

किल्ल्याच्या तीन गेट्सपैकी 'अपोलो गेट' तर नांवासकट गायब झालं आहे तर 'चर्च गेट' व 'बझार गेट' नांवापुरतं का असेना, अस्तित्त्वात आहे.. इंग्रजांचा 'फोर्ट' कधीचाच काळाच्या पडद्याआड गेला असला तरी या किल्ल्याचा नेपोलियनच्या हल्ल्याच्या भितीने सीएसटी स्टेशनच्या मागील बाजूस केलेल्या वाढीव तटबंदीचा भाग मात्र अजुनही बऱ्यापैकी शाबूत आहे. या वाढीव बांधकामाला ब्रिटीशांनी नांव दिलं 'फोर्ट सेंट जॉर्ज'..! सध्याचं सेंट जॉर्ज हॉस्पिटल याच्याच भागावर उभारून त्याला 'सेंट जॉर्ज' असं नांव दिलंय ते त्यामुळेच..! (संदर्भ-स्थलकाल, अरुण टिकेकर)

सीएसटी स्टेशनच्या मागे असलेल्या 'पी.डीमेलो' मार्गाने (आताचा शहीद भगतसिंग मार्ग) जाताना, सेंट जॉर्ज हास्पिटलचं या रस्त्यावरचं प्रवेशद्वार व सीएसटी स्टेशनचं नव्याने बांधलेलं मागील प्रवेशद्वार यांच्या दरम्यान किल्ल्याचा हा भाग आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या आवारातूनही याच्याकडे जाता येतं..

किल्ल्याचा हा तटबंदीसहीतचा हा भाग मुळात दारूगोळ्याचं कोठार होतं.. शहराच्या वाढत्या पसाऱ्याला मोकळीक मिळावी म्हणून तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर याने वर उल्लेख केलेल्या तिन्ही 'गेट्स'च्या दरम्यानची तटबंदी १८६० साली तोडून टाकली मात्र 'फोर्ट सेंट जॉर्ज'चं बांधकाम येवढं मजबूत होतं, की ते तुटता तुटेना व म्हणून ते तसंच ठेवलं गेलं व म्हणूनच ते आजही आपल्याला पाहाता येतं.. अगदी रस्त्यावरून मशीद बंदरच्या दिशेने जातानाही किल्ल्याची भिंत सहज पाहता येते.. या किल्ल्याच्या बुलंद भिंती, त्यात शत्रुवर दारुगोळा डागण्यासाठी ठेवलेल्या उभट, अरुंद फटी (गनस्लीट्स), किल्ल्याचं दणकट छत,आतील तीन-साडेतीन फुट रुंद भिंती पाहता येतात.

सध्या या 'किल्ल्यात' महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याचं ऑफिस असून तिथं श्री.बी.व्ही.कुलकर्णी नांवाचे इतिहासाविषयी आस्था व अभ्यास असणारे संचालक आहेत. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी सर्व माहिती आनंदाने दिली व किल्ल्याचे फोटोही काढू दिले.. त्यांनी मुंबई व परिसरातल्या किल्ल्यांवर लिहिलेल्या पुस्तकाची झेरॉक्सही अगत्याने दिली.. इतका सहृदय सरकारी अधिकारी असू शकतो हे त्यांना भेटून कळतं..

प्रत्येकाने आपल्या इतिहासाचे ते अवशेष प्रत्यक्ष बघावेत व आपल्या इतिहासाची छोटीशी सफर करून यावी असं सुचवावंसं वाटतं..
-गणेश साळुंखे09321811091

धारावीचा काळा किल्ला (भाग एक)

‘धारावी’ आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं लक्ष वेधून घेतो.

इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं नांव 'फोर्ट रिवा किंवा रेवा' असं असलं तरी पूर्वीपासून हा किल्ला 'काळा किल्ला' या नांवानेच ओळखला जातो. या इतिहास पुरुषाचं आजचं वय वर्ष २८० मात्र..!!

धारावीच्या 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'च्या समोर 'बीईएसटी'चे धारावी व काळा किल्ला असे शेजारी शेजारी दोन बस डेपो आहेत. या बस डेपोच्या पूर्वेकडील भिंतीला अगदी लागून हा 'काळा किल्ला' उभा आहे. बस डेपोच्या उगवतीच्या दिशेच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या तीन-चार फुटाच्या पॅसेजमधून थेट या किल्ल्याकडे जायला वाट आहे.

मी व माझे सहकारी श्री.अनिल पाटील नुकतेच हा किल्ला पाहून आलो. हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेश करण्यासाठी याला दरवाजा नाही. आता मुळात दरवाजाच नव्हता की आजुबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही. पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास शिडीवरून अथवा एके ठिकाणी तुटलेल्या तटबंदीवरून आंत प्रवेश करता येतो.

किल्ल्याची तटबंदी मूळची अती मजबूत असल्याने अजून शाबूत आहे. तटबंदीच्या दर्शनी भागावर "सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला" अशी दगडात कोरलेली पाटी असून सदर मजकुराखाली 'इंजिनिअर' म्हणून कोणाची तरी आद्याक्षरे कोरलेली आहेत.

किल्ल्याची तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजुनही सुरक्षित आहेत. किल्ल्याच्या आतील भागाचे फोटो काढण्यासाठी आम्ही किल्ल्याला लागून अभ्या असलेल्या इमारतीच्या गच्चीवर गेलो. वरुनही किल्ला झोपड्यांच्या व झाडांच्या गराड्यात हरवून गेला होता. वरुन दिसणारा किल्ल्याचा बाणाच्या फाळासारखा आकार लक्षात येत होता. या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख bijoor.me या वेबसाईट वर सापडतो परंतु आम्ही आत न गेल्याने ते पाहता आले नाही..

इमारतीच्या गच्चीवरून समोर उत्तरेला मिठी नदीचे पात्र, पश्चिम दिशेला काही अंतरावर असलेला माहीमचा किल्ला आणि पूर्वेच्या टेकडीवरचा सायनचा किल्ला अस्पष्टसा दिसत होता. सायन ते माहीमच्या दरम्यान मिठी नदी (माहीमची खाडी) पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहते. एके काळी या मिठी नदीचं पात्र विस्तीर्ण असून ते या काळ्या किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत होतं अशी इतिहासात नोंद आहे. धारावी बस डेपो, डेपोपलीकडील मोठा रस्ता व निसर्ग उद्यान या सगळ्या आजच्या काळातील गोष्टी मिठी नदीच्या पात्रात भरणी टाकून केलेल्या आहेत हे त्या इमारतीच्या गच्चीवरून बघताना सहज लक्षात येत होतं.

'काळा किल्ला' मिठी नदीच्या दक्षिण तिरावर असून माहीमचा किल्ला मिठी नदी समुद्रास जिथे मिळते त्या ठिकाणी आहे तर पूर्वेचा सायनचा किल्ला याच मिठी नदीच्या दक्षिण तटावर सायनच्या टेकडीवर उभा आहे. हे तिन्ही किल्ले ‘ब्रिटीश मुंबई’च्या उत्तर सीमेचे खंदे रखवालदार होते.

ब्रिटीशांच्या ताब्यात तेव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा इलाखा होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश, ‘साष्टी’ इलाखा, म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. पोर्तुगिजांनी त्यांच्या ताब्यातील भूभागाचे सागरी शत्रूंपासून रक्षण व्हावे या हेतूने वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर (आताच्या ‘ताज लॅण्ड्स एंड’ किंवा ‘हॉटेल सी रॉक’ येथे) बांधलेला ‘केस्टेला डी अग्वादा’ अगदी आजही बघता येतो.

या लेखाचा विषय असलेला ‘काळा किल्ला’ ब्रिटीशांनी इसवी सन १७३७ मध्ये बांधला हे आपण सुरुवातीस पाहिले. सन १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटीशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे इलाख्याचे रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची निकड वाटली आणि त्यातून या किल्ल्याची निर्मिती झाली. एका अर्थाने ‘काळा किल्ला’ मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे असे म्हटले तर चुकणार नाही.

जाता जाता -

‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. मुंबईतील धारावी व भाईंदर येथील ‘धारावी’ याचा काय संबंध असावा किंवा मुंबईतल्या धारावीचे, ‘धारावी’ व किल्ल्याचे ‘रीवा फोर्ट’ अशी नांवे कशी पडली असावीत, या संबंधी एक तर्क पुढील भाग दोन मध्ये..!

                        धारावीचा काळा किल्ला (भाग दोन व शेवटचा)

या कथेच्या पहिल्या भागात बघितलेला ‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे.

‘काळा किल्ल्या’चे कागदोपत्री नाव ‘रीवाचा किल्ला’ असे आहे. जनरली किल्ल्याच्या नावावरून गावाचे नाव किंवा किल्ल्याच्या गावाच्या नावावरून किल्ल्याचे नाव पडणं कॉमन आहे. ‘रीवाचा किल्ला’ आणि ‘धारावी’ या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे हे निश्चितच. या संबंधाने मी काही तर्क केले आहेत, ते इथे देतोय..
किल्ल्याच्या नावाबाबत तर्क

हा किल्ला ब्रिटीशांनी बांधला व त्याला नाव दिले ‘फोर्ट रीवा’ असा अनेक ग्रंथात उल्लेख आहे. मिठी नदीच्या किनारी, मोक्याच्या जागेवर हा किल्ला आहे. नदी जवळचा किल्ला म्हणजे इंग्रजीत ‘The River Fort’. या ‘The River Fort’चं बोलीभाषेत ‘द रीवा फोर्ट’ झाले असणे शक्य आहे व पुढे काळाच्या ओघात ‘द’ गळून केवळ ‘रीवा’ शिल्लक राहिला असणे सहज शक्य आहे. पोर्तुगीज भाषेत तर नदीला 'रिओ' असंच म्हणतात हा उच्चारही 'रिवा'च्या जवळ आहेच. अशा तऱ्हेने या किल्ल्याचे नाव ‘फोर्ट रीवा’ झाले असावे..!
‘धारावी’च्या नावाबाबत तर्क

मुंबई परिसरातील ‘धारावी’ हे नाव ‘धारा देवी’ या देवीच्या नावावरून आले असावे अशी शक्यता इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी त्यांच्या ‘महिकावतीच्या बखरी’त मांडला आहे. परंतु या परिसरात ‘धारा देवी’ नावाची देवी होती असल्याचे शोधूनही सापडले नाही. हां, नाही म्हणायला ‘धारेश्वर’ नावाचे शंकराचे देऊळ असल्याचा उल्लेख सापडतो. राजवाडे यांनी मांडलेली शक्यता भाईंदर येथे सिद्ध झाली आहे..तिथे ‘धारावी किल्ला’ही आहे आणि ‘धारावी देवीही’, परंतु मुंबईत तसा धागा सापडला नाही.

इतिहासाचार्यांच्याच बखरीचा आधार घेऊन असे म्हणता येते की, सन १३०० च्या आसपास मध्ये बिम्ब नावाचा राजा प्रसिद्ध झाला व त्याने महिकावती (मुंबई माहीम) शहर वसवले. हा राजा साष्टी (ठाणे) इलाख्यातून येथे आला होता. या राजा बिम्बाने मुंबईत नव्याने राजधानी वसवताना आपल्या साष्टी इलाख्यातील स्थानाचीच नावे इथल्या स्थानांना दिली असे दिसते. उदा. ‘माहीम’ मुंबईतील व केळवे-पालघरमधील, ‘नायगाव’ हे ठाण्यातही आहे आणि मुंबईतही, शितलादेवी पालघर व मुंबईतील माहीमच्या शिवेवरही सापडते. तद्वत राजा बिम्बाने भाईंदर येथील ‘धारावी’चे नाव, माहीमपासून जवळच असलेल्या परिसराला देऊन त्याचे नाव ‘धारावी’ ठेवले असावे का?

की, ‘ब्रिटीशांच्या ‘द रीवा’ या किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश पुढे ‘धारावी’ होऊन या किल्ल्याच्या परिसराला ‘धारावी’ हे नाव मिळालं असावं का? मला तरी दोन्ही तर्क पटतात. बघा आपल्यालाही पटतात का.

- गणेश साळुंखे
9321811091

शिवडीचा किल्ला

मुंबई शहरात ऐतिहासिक वारसा जपत आजही चांगल्या स्थितीत असलेला किल्ला म्हणजे शिवडीचा किल्ला. हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाच्या पूर्वेला दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे. 

द कुन्हा नाम इतिहासकाराच्या मते शीवजवळील छोटी जागा अशा अर्थी त्याला शेवरी व नंतर अपभ्रंश होऊन शिवडी असे नाव पडले. शिवडी हे बेट तसे मोक्याचे ठिकाण. पूर्व बाजूला अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला शीवचे बेट. दोघांच्या मध्ये अर्थातच खाडी. उत्तरेस खाडीच्या पलीकडे साष्टी बेट असे बेटाचे भौगोलिक स्थान होते.

अगदी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत शीव व शिवडीच्या दरम्यान अनेक मिठागरे होती व ती अगदी माहुलीच्या खाडीपर्यंत होती. शिवडीला स्थानिक मच्छिमार अर्थातच होतेच व त्यांच्याही नौका पनवेलच्या खाडीपर्यंत जाऊन अन्नधान्य, भाजीपाला व तत्सम जीवनावश्यक वस्तूंची ने आण करत होत्या.

शिवडीचा किल्ला बहादूरखानाच्या ताब्यात असताना किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पीराचा दर्गा बांधण्यात आला. १५३४ च्या तहात पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर ह्या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. १६७२ साली जंजिऱ्याच्या सिद्धीकडून मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर इंग्रजांनी अनेक नविन किल्ले बांधले व जुने किल्ले मजबूत केले. परळ बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील टेकडीवर असलेल्या शिवडी किल्ल्याचे नुतनीकरण/मजबुतीकरण इंग्रजांनी १६८० मध्ये पूर्ण केले होते.

मुंबई शहरात सध्या सर्वात चांगल्या अवस्थेत असलेल्या ह्या किल्ल्याचे नुतनीकरण पुरातत्व व वस्तुसंग्रहालय खात्याने 2007-2008 केले. किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपण सैय्यद जलाल शहा यांच्या दर्ग्याजवळ येतो. किल्ल्याच्या काटकोनात वळणाऱ्या प्रवेशद्वाराने आत गेल्यावर अर्धवर्तुळाकार छताच्या दोन लांबलचक इमारती दिसतात. ह्याच इमारतींचा वापर तुरुंग व त्यानंतर गोडावून म्हणून केला गेला. किल्ल्याच्या चारीबाजूंना असणारी तटबंदी अजून शाबूत आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिकोणाकृती बुरुज येथे पाहायला मिळतात.

मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरील ऐका खडकाळ टेकडीवर हा किल्ला आहे. बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आत आणखी एक तटबंदी किंवा भक्कम तटबंदीयुक्त वास्तुसमूह असे या किल्ल्याचे ढोबळ स्वरुप आहे. या किल्याचे सर्वात बाहेरचे अंग म्हणजे सर्वसाधारणपणे चौकोनी तलविन्यास म्हणता येईल अशाप्रकारची सीमाभिंत. ही सीमाभिंत जाड पण सरळसोड असून पूर्णपणे दगडात बांधलेली आहे. या भिंतीला तांत्रिक दृष्ट्या बाह्य तटबंदी किंवा बाह्यतम तटबंदी असेही म्हणावेसे वाटेल. या किल्‍ल्याच्या दक्षिण व उत्तरेकडील बाह्यत्तम सीमाभिंतीत असे एकूण दोन दरवाजे आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारात फक्त दरवाजांचे आकार शिल्लक आहेत. एकेकाळी त्यांना दारे असणार.

बाह्यतम तटबंदीच्या दक्षिणाभिमुख दरवाज्यातून आत गेल्यानंतर अगदी वीस-पंचवीस फुटावरच मुख्य भागाच्या अनियमित आकाराच्या तटबंदीतील दक्षिणकेडील पूर्वाभिमुख भागात एक प्रवेशद्वार आहे. या द्वाराच्या रुंदीच्या भागात काही अंतरावर दाराच्या चौकटीच्या खाचा गिलाव्यामध्ये स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे या भितीच्या रुंदीत एकेकाळी लाकडी किंवा लोखंडी चौकट व दारे असण्याची शक्यता आहे. या भिंतीची रुंदी बरीच आहे. त्यामुळे हा द्वारमार्ग छोट्या भुयारी मार्गासारखा वाटतो.

शिवडी किल्ल्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हिवाळ्यात सैबेरियातून हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत येत असतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन मुंबईकरांसह जगभरातील पर्यटकांना येथे घेता येते.

पुरातत्त्व खात्याने नुतनीकरण केल्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेला किल्ला आणि लगतच्या समुद्रात दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी या दोन्ही बाबी पर्यटन स्थळ म्हणून महत्त्वाच्या ठरतात.

कसे जावे -
हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकापासून पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गाच्या खालून जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने सरळ चालत गेल्यास दहा मिनीटांच्या अंतरावर हजरत अली बाबांचा दर्गा लागतो. या दर्ग्याच्या लगतच या किल्ल्याचे द्वार आहे.

संकलन - विलास सागवेकर

तारापोरवाला मत्स्यालय

मुंबईमध्ये पर्यटन स्थळांची कमतरता नाही. परंतु काही ठिकाणं लहान मुलांच्या आवडीची तर काही मोठ्यांच्या. त्यामुळे मुंबईच्या रहिवाशांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही काय काय पहावे हा प्रश्न पडणे साहजिक आहे. परंतु या यादीत सर्वांना आवडणारं एक ठिकाण कायम स्थान मिळवून आहे ते म्हणजे मरीन ड्राईव्हवरचं तारापोरवाला मत्स्यालय.

अरबी समुद्राची गाज आणि खारे वारे अंगावर घेत गेली अनेक दशके पर्यटकांच्या सेवेत असलेल्या या मत्स्यालयाचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते २७ मे १९५१ रोजी झाले. तेव्हा या मत्स्यालयाच्या बांधकामासाठी एकूण ८ लाख ९० हजार रूपये खर्च आला होता, ज्यापैकी श्री. व श्रीमती विकाजी डी.बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी जोडप्याने दोन लाख रूपये देणगी दिली होती. या मत्स्यालयाची देखभाल दुरूस्ती महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात येते.

१९५१ मध्ये जेव्हा हे मत्स्यालय पर्यटकांना खुले करण्यात आले तेव्हा भारतातील हे एकमेव सार्वजनिक मत्स्यालय होते. या ठिकाणी प्रेक्षकांना एकाचवेळी समुद्रातील, गोड्या पाण्यातील तसेच उष्णकटीबंधातील लहान शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळत असल्याने हे देशातील एक प्रेक्षणीय स्थळ ठरले आहे. दरवर्षी चार ते पाच लाख पर्यटक भेट देणाऱ्या या मत्स्यालयाला आजपर्यंत देशविदेशातील महनीय व प्रसिद्ध व्यक्तींनीही भेट दिली आहे.

सदर मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४,०९६ चौ.मी. असून मत्स्यालयाच्या इमारतीचे क्षेत्रफळ १,०९८ आणि खुले क्षेत्र २,९९८ चौ.मी. आहे. मत्स्यालयामध्ये नुतनीकरणाआधी प्रदर्शनार्थ १६ सागरी, ९ गोड्या पाण्याच्या मोठ्या टाक्या आणि ३२ उष्णकटीबंधीय लहान टाक्या होत्या. या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे सागरी आणि गोड्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले होते.

सहा दशके जुने असलेल्या मुंबईतील या महत्त्वाच्या पर्यटनस्थळामध्ये सुधारणा घडवून आणणे ही काळाची गरज होती. त्यानुसार ते अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहेत. नुतनीकरणासाठी काही काळ बंद ठेवल्यानंतर मागील वर्षी ३ मार्च २०१५ रोजी हे मत्स्यालय पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. आता पर्यटकांना स्थानिक माशांव्यतिरिक्त परदेशातून आयात केलेले जगभरातील दुर्मिळ, विलोभनीय, शोभिवंत मासे एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये पूर्वी स्थानिकरित्या मिळणारे ३० ते ५० प्रकारचे विविध मासे व जलजीव पहावयास मिळत. त्यासाठी मुंबईतील कुलाबा लाईट हाऊस, गिरगाव चौपाटी, वरळी चौपाटी, कफ परेड या क्षेत्रातील समुद्र किनारी वाणा, फेरा पद्धतीची जाळी लावून स्थानिक कोळी बांधवांच्या सहकार्याने नियमितपणे मासे व जलजीव उपलब्ध करून घेऊन ते मत्स्यालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येत असत. सदर परंपरा आजही चालू आहे.

पूर्वीच्या टाक्या आता आकाराने मोठ्या करण्यात आल्या असून त्यांना फ्लेक्सी ग्लास प्रकारच्या ११० मि.मी. जाड काचा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिमेंटच्या भव्य टाक्यांमधील रंगीत आणि आकर्षक मासे व इतर जलजीव अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. प्रत्येक टाकीमध्ये खाऱ्या व गोड्या पाण्यातील आकर्षक शोभिवंत मासे व जलजीवांच्या विविध प्रजाती, नैसर्गिक वातावरणानुरूप खडक, पान वनस्पती इत्यादींसह आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केलेल्या पाहायला मिळतात. त्यांची माहिती एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित केली जात असल्याने पर्यटकांना त्याबाबत सविस्तर माहितीही मिळते. नुतनीकरणानंतर संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलीत करण्यात आले असल्याने पर्यटकांना थंड आणि सुखद वातावरणात ही जलसृष्टी अनुभवता येत आहे.

नुतनीकरण करण्यात आलेल्या मत्‍स्यालयाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे ते म्हणजे प्रवेशद्वारापाशी निर्माण करण्यात आलेले भुयारी मत्स्यालय. याखालून जाताना १८० अंशामध्ये खाऱ्या पाण्यातील मासे पाहण्याचा अनुभव घेता येतो. भुयारी मत्स्यालयातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला नव्याने स्थापित करण्यात आलेल्या ५० आसनव्यवस्थेच्या वातानुकूलीत प्रेक्षागृहामध्ये मत्स्यालयातील मासे, मत्स्यव्यवसाय, सागरी मासेमारी आदींबाबत वैज्ञानिक तसेच उद्बोधक माहितीपट पाहता येतात. समोरच कारंजा उभारण्यात आला असून वातावरण आल्हाददायक बनविण्यात तो मदत करतो. त्यापुढे मुख्य प्रदर्शनी हॉल आहे.

मत्स्यालयातील सागरी विभागामध्ये स्थानिकरित्या मिळणाऱ्या लेपटी, किळीस, पाकट, हेकरू, तांब, खडकपालू, शेवंड, समुद्रसाप, जेलीफिश यांच्याबरोबरच आता भारतातील तसेच परदेशातून आयात केलेले अतिशय दुर्मिळ डॅम्सेल, बटर फ्लाय, एंजल, ट्रिगर, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मूरीश, सी ॲनीमोन इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. हॉलच्या मधील भागात ठेवण्यात आलेल्या गोड्या पाण्याच्या विभागामध्ये देखील देश विदेशातील अरोवाना, बेडूक, सिक्विड, पिरान्हा, कॅट फिश, रोहू, कटला, मृगळ इत्यादी प्रकारचे शोभिवंत मासे व जलजीव पाहायला मिळतात. तर, छोट्या प्रदर्शनी विभागात लहान टाक्यांमध्ये गोल्ड फिश, एंजल, गोरामी, बार्ब, शार्क, फ्लॉवर हॉर्न, सिक्लिड, पॅरट, ट्रेटा, गप्पी, कोळंबी, डिस्कस इत्यादी प्रजातींचे आकर्षक मासे पाहता येतात.

सदर मत्स्यालयासाठी मोठ्या व्यक्तींना ६० रूपये तर १२ वर्षाखालील मुलांना ३० रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तर, शैक्षणिक संस्था, दिव्यांग व्यक्ती, सैनिक व प्रशासकीय सेवेतील निवृत्त कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना सवलतीचे दर ठेवण्यात आले आहेत. मत्स्यालयाच्या आतले छायाचित्रण करण्याची इच्छा असलेल्यांसाठी त्यासाठीचे शुल्क भरून छायाचित्रण करू देण्याची सोयही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मंगळवार ते रविवार सुरू असणाऱ्या या मत्स्यालयाच्या प्रदर्शनाची वेळ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ आणि इतर दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अशी आहे. सोमवारी ते देखभाल, दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात येते. पश्चिम रेल्वेवरच्या मरीन लाईन्स किंवा चर्नी रोड स्टेशनवर उतरून येथे जाता येतं अथवा मरीन ड्राइव्ह वरून जाणाऱ्या रस्ते वाहतुकीचाही पर्याय आहेच.

सध्या विद्यार्थ्यांना सुट्टया आहेत. त्यामुळे मुंबई दर्शन करताना मरीन ड्राईव्ह वरील तारापोरवाला मत्स्यालयाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मग आपण कधी नियोजन करताय मत्स्यालयाला जायचं....

-ब्रिजकिशोर झंवर
सहायक संचालक (महान्यूज)











लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...