Monday, April 20, 2020

रमणीय रत्नागिरी जिल्हा

रत्नागिरी जिल्ह्याचा ईतिहास
येवा कोकण आपुलाच असा…… अश्या गोड कोकणातला एक मोठा जिल्हा रत्नागिरी! समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते. थकलेले भागलेले जीव रोजच्या राहाटगाडग्याला कंटाळुन समुद्राच्या ओढीने काही क्षण निवांत व्हायला येतात आणि समुद्राला आपल्या हृदयात साठवुन माघारी वळतात. असे हे समुद्र प्रेम! ते ज्याला कळले तो खरा भाग्यवंत!
  आणि असं समुद्राचं वैभव अनंत हस्तानं कोकणाला लाभलंय! आणि म्हणुनच पर्यटक फार मोठया संख्येने नित्य नियमाने कोकणात येतातच येतात.
रत्नागिरीला काय काय आहे? अहो काय नाही विचारा… समुद्र, निसर्ग, मासे, जहाजातली सफर, आंबे, विशेषतः कोकणचा हापुस, काजु बदाम, सुकामेवा, येथील मुर्तीकला, आकर्षक मुत्र्या, असं बरच काही अनुभवायचं असेल बघायचं असेल तर कोकण सफर करायलाच हवी.
    पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
   रत्नागिरीच्या पश्चिमेला समुद्रकिनारा आणि पुर्वेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात. परशुरामाच्या आईचे नाव "कोकण्णा" होते म्हणून या प्रदेशाला कोकण नाव पडले अशी एक शक्यता तर फार पुर्वी पासून या भुमीत कोकणी आदिवासी जाती जमातीचे वास्तव्य असल्याने कोकण किंवा अपरांत असे या प्रदेशाला नाव पडले. सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला रहाण्यासाठी जागा उरली नाही म्हणुन परशुरामांनी बाण मारुन सागर शंभर योजने मागे हटवला आणि कोकणची हि देवभुमी निर्माण केली असे पुराणकथा सांगते. त्याच कोकणातील एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी या नावाबध्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत , त्यापैकी दोन पाहू.
   रतनगिरी नावाचे साधु विजापुराहून येथे आले, त्यांची समाधी रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे म्हणून या गावाला रत्नागिरी नाव पडले असावे हि एक शक्यता तर
रत्नदुर्ग किल्ल्यावर देवी भगवती आहे तीने रत्नासुर नावाच्या दैत्याचा वध केला आणि ज्या डोंगरावर विसावली त्या डोंगराला रत्नदुर्ग तर परिसराला "रत्नागिरी" नाव पडले. रत्नदुर्ग हा गड बहामनी कालखंडापासून आहे तर रत्नागिरी शहरातील एतिहासिक वास्तु दोनशे ते अडीचशे वर्ष जुन्या आहेत. रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटीश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ शिवापुर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर हि चार ठिकाणे एकत्र करुन ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरी शहराचा दर्जा दिला, नंतर ते जिल्हयाचे ठिकाण बनले. मराठयांच्या इतिहासात रत्नागिरीचे आगळेवेगळे महत्व पहायला मिळते, रत्नागिरी साता.यातील राजांच्या ताब्यात सुमारे 1731 ते 1818 पर्यंत होते पण पुढे 1818 पासुन इंग्रजांनी यावर ताबा मिळवला.
रत्नागिरीत म्यानमार चे शेवटचे राजा थिबु आणि स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकरांना कैद करून ठेवले होते असे इतिहास सांगतो.

     रत्नागिरीच्या उत्तरेला रायगड जिल्हा, उत्तर पुर्वेला सातारा, पुर्वेला सांगली, दक्षिण पुर्वेला कोल्हापुर, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिण पश्चिमेकडुन उत्तर पश्चिमे पर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे.
रत्नागिरी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत
    रत्नागिरी
    खेड
    गुहागर
    चिपळुण
    दापोली
    मंडणगड
    राजापुर
    लांजा
    संगमेश्वर
राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आणि क्र. 204 या जिल्हयातुन गेले आहेत. सावित्री आणि वैष्णवी या जिल्हयातील महत्वाच्या नद्या. समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील अर्थव्यवस्था ब.याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे. या ठिकाणचा हापुस आंबा फार प्रसिध्द असुन विदेशात देखील निर्यात केला जातो.
नारळ, काजु, फणस, आमसुल (रातांबा) सूध्दा मुबलक प्रमाणात होतात. या ठिकाणी प्रामुख्याने तांदळाची शेती केली जाते. दापोलीचे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ प्रसिध्द असुन नवनवीन संशोधनं या ठिकाणी होत असतात. बरेच गड आणि किल्ले या जिल्हयात आजही आपल्याला पहायला मिळतात त्यातले काही महत्वाचे म्हणजे जयगड, पालगड, पूर्णगड, प्रचितगड, भवानीगड, महिपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, गोविंदगड, जयगड हे सांगता येतील.
रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी आहे. रत्नागिरी अरबी समुद्राच्या किनारी वसलेले शहर असुन भारतातील एक महत्वाचे बंदर आहे. स्वातंत्र्य लढयात ज्यांचे योगदान महत्वाचे होते असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे, शिक्षणतज्ञ समाजसेवक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरीचाच. भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच!




गणपतीपुळे - श्रीगणेश मंदिर, सागर किनारा, गर्द हिरवाई व कोकणी पाहुणचार यामुळे हे स्थान पर्यटकांचे विशेष आवडीचे केंद्र बनले आहे. समुद्राच्या विस्तीर्ण किनार्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून गणपतीपुळे हे नाव पडले.श्री गणेश मंदिराची रचना ष्ट्यपूर्ण आहे. २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट येथील गणेशमूर्तीवर पडतात. गणपतीपुळेपासून ४ कि.मी. अंतरावर पॅरासेलिंग हा प्रकल्प सुरू आहे. समुद्र किनार्यावर भरधाव धावणार्या वाहनाला मागे दोर बांधून पॅराशूटच्या साहाय्यानेसुमारे २५० फूट उंचीवर आकाशविहार करण्याचा रोमांचकारी अनुभव या ठिकाणी घेता येतो. गणपतीपुळ्यापासून १ कि.मी. अंतरावर प्राचीन कोकण म्युझियम उभे राहिले आहे. संपूर्ण कोकणाची ५०० वर्षापूर्वीची समाज रचना, व्यवसाय, इतिहास, वेश भूषा, परंपरा यांचे दर्शन या ठिकाणी होते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरनी याची उभारणी केली आहे. १३० वनस्पतींचा अनमोल खजिना येथे आहे.

फलोत्पादन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला रत्नागिरी जिल्हा येत्या काही वर्षात पर्यटन जिल्हा म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी स्वरूपानंद पावस या तिर्थक्षेत्रांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर गेले आहे. त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जिल्ह्याला विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टी लाभली असून, जयगड, बाणकोट, रनपार आदी बंदरे उद्योगातून विकसीत होत आहेत. अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नगररत्नांची खाण असलेला हा जिल्हा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहे.
बाणकोट - रत्नागिरीतील उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. खाडीकाठी वसलेले हे गाव. ब्रिटीश काळापासून या गावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख खाड्यांपैकी बाणकोटची खाडी ही प्रमुख खाडी असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननाचा उद्योग चालतो.
वेळास - नाना फडणिसांचे मूळ गाव म्हणून इतिहासात नोंदले गेलेले हे गाव म्हणजे वेळास. अत्यंत निसर्गरम्य असे हे गाव असून नारळ, सुपारी, हापूस आदी उत्पादने येथील प्रसिध्द आहेत. गावात दुर्गामातेचे मंदिर असून, याठिकाणी उत्तम शिल्पकला असलेली श्री कालभैरव, रामेश्‍वर, राम व वाघ्रेश्‍वर आदी देवळे आहेत.


केळशी - निसर्गसौंदर्याने नटलेले हे सुंदर गाव असून पर्यटकांना आकर्षित करणारा असा हा परिसर आहे. क्रांतिवीर वासूदेव फडके यांचे हे मूळ गाव. मराठेशाहीतील नामवंत सरदार फडके, केळकर, लागू हेदेखील याच गावचे. लोकमान्य टिळकांचे आजोळ देखील केळशीचे. याठिकाणी अनेक स्थळे प्रसिध्द आहेत. त्यामध्ये केळशीची महालक्ष्मी, याकूब बाबांचा दर्गा, पांढरा गणपती, श्री कालभैरव मंदिर, बेलेश्‍वर मंदिर, वाळूचा डोंगर, विश्‍वेश्‍वराचे देऊळ, दांडीचा वड, उटबरकरीण, आतगावचा टेप, खडप आदींचा समावेश आहे.
आंजर्ले - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले हे छोटे गाव. लांबच लांब व अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी असून, नारळ, सुपारीच्या anjerliहिरव्यागार बागा येथे आहेत. पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे गाव. आंजर्ल्याची खाडी, आंजर्ल्याचा समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती, मुर्डी, श्री दुर्गादेवीचे मंदिर आदी ठिकाणी अत्यंत नयनरम्य अशी आहेत.
हर्णे- जिल्ह्यातील प्रमुख बंदर म्हणून नावारूपाला आलेला हा परिसर. पुरातन काळापासून हे गाव वाहतुकीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय चालतो. हर्णे गावाचे महत्व ओळखून या ठिकाणी जलदुर्गाची निर्मिती करण्यात आली. सुवर्णदुर्ग असे या किल्ल्याचे नाव असून, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख स्थान होते. या जलदुर्गाच्या बाजूला असलेला भुईकोट किल्लाही पर्यटनासाठी चांगला आहे.
मुरूड - महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. आज हेच गाव पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हे गाव अत्यंत सुंदर असून, या ठिकाणी पर्यटन महामंडळाच्यावतीने व्यवस्थाही करण्यात आली आहे.

आसूद - दरी डोंगरांमध्ये वसलेले हे छोटे गाव असून, या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. आसूदचा लाकडी पूल ‘गारंबीचा बापू’ ने अजरामर केले. याशिवाय केशवराज मंदिर हेही पाहण्यासारखे आहे. पर्यटनासाठी हा गाव खूपच सुंदर आहे.

दाभोळ - दापोली तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. एन्रॉनमुळे हे गाव जागतिक नकाशावर आहे. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून, पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे. या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.

दापोली - मिनी महाबळेश्‍वर म्हणून नावारूपाला आलेले हे शहर म्हणजे दापोली. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालतात. दापोली कृषि विद्यापीठामुळे या शहराला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक मंडळी ओळख त्यानिमित्ताने होते. दापोलीत अनेक स्थळे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. त्यामध्ये एक म्हणजे चिखलगाव. लोकमान्य टिळकांचे हे मूळ गाव. चिखलगावप्रमाणे ऐतिहासिक महत्व असलेले दुसरे गाव म्हणजे पालगड. परमपुज्य साने गुरूजींे हे मूळ गाव. याशिवाय लाडघर, करसगाव आदी ठिकाणेही नयनरम्य व सुंदर आहेत. त्यामध्ये शहरातील तलाव, लक्ष्मीकेशव मंदिर, लेणी, आयनी, मेट, भोस्ते घाटी, महितपगड, सुमारगड, रसाळगड अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

चिपळूण - जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोटेतील औद्योगिकीकरणामुळे हा परिसर नावारूपाला आला आहे. वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले गाव असून, या ठिकाणी अनेक स्थळे parshuramपाहण्यासारखी आहेत. त्यातील प्रामुख्याने प्रसिध्द असे ठिकाण म्हणजे परशुराम. भगवान परशुरामाचे कोकणातील सर्वात प्रसिध्द देऊळ या गावामध्ये आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, गांधारेश्‍वर, डेरवण, दोणवली, करंजेश्‍वरी, रामतीर्थ आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. डेरवण येथील शिवसृष्टीचा देखावा पर्यटकांना भूरळ घालतो. कोयनानगर - जलविद्युत प्रकल्पामुळे नावारूपाला आलेले हा परिसर. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पातून होते. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दरवर्षी येत असतात. हापरिसर अत्यंत सुंदर असा आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात हे ठिकाण असल्याने गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे. या ठिकाणी कोयना धरण, कोयना अभयारण्य आदी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.

गुहागर - अत्यंत नयनरम्य असा समुद्रकिनारी वसलेले हे छोटेसे गाव. नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेले हे गाव पर्यटकांना पाहण्यासारखे आहे. शांत, सुंदर असा हा परिसर असून, याठिकाणी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. तालुक्यातील हेदवी येथील दशभुजा गणपतीचे मंदिर अत्यंत सुंदर असे आहे. लक्ष्मीगणेशाचे हे देवस्थान प्राचीन असून, अत्यंत दुर्मिळ देवतांपैकी एक आहे. गुहागरचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. सायंकाळी या ठिकाणी सुर्यास्त पाहणे हेहीएक आकर्षण असते. याशिवाय दुर्गामातेचे मंदिर, उरफाटा गणपती, व्याडेश्‍वर, वेळणेश्‍वर आदी ठिकाणी सुंदर आहेत. वेळणेश्‍वर येथील प्राचीन शिवमंदिर सुंदर असे आहे. याशिवाय रानवी, विजयगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.

संगमेश्‍वर - मुंबई-गोवा महामार्गावरील मुख्य ठिकाण. या तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना संगमेश्‍वर येथील कसबा याठिकाणी अटक झाली. याठिकाणी असलेला प्रचितगड पर्यटकांना भूरळ घालतो. ट्रेकिंगसाठी हा गड अत्यंत चांगला आहे. याशिवाय या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी मंदिरे आहेत. त्यामध्ये कर्णेश्‍वर मंदिर, सूर्यनारायण मंदिर, आमनायेश्‍वर मंदिर, जाकमाता मंदिर, विष्णूमंदिर आदींचा समावेश आहे. धोदवणे तिवरे धबधबादेखील पर्यटकांना भूरळ घालणारा आहे.

मार्लेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्यातील महत्वाचे देवालय, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत चांगले आहे. तेथील मार्लेश्‍वरचे मंदिर तर प्रसिध्द आहे. या मंदिरात आपल्याला नागांचे दर्शन घडते. मंदिराजवळ असलेला धारेश्‍वर हा धबधबा पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय महितपगड, विशाळगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण, पर्यटनाच्यादृष्टीने रत्नागिरी शहर विकसीत होऊ लागले आहे. रत्नागिरीत अनेक स्थळे पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे शहर. या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना भूरळ घालणारे आहेत. त्यामध्ये अठरा हाताचा गणपती, पतितपावन मंदिर, पांढरा समुद्र, काळा समुद्र मिरकरवाडा बंदर, भगवती किल्ला, श्रीदेव भैरी विठ्ठल रखुमाई मंदिर, मत्स्यालय, लाल गणपती, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट, लोकमान्य टिळक जन्मस्थान आदींचा समावेश आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे ganpatipuleजगप्रसिध्द असे हे ठिकाण असून, पर्यटन स्थळ म्हणून ते आता नावारूपाला आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या क्षेत्राची ओळख असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. समुद्रकिनारी हे मंदिर वसलेले असून, पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने हा परिसर विकसित केला जात असून, शासनाकडूनही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आले आहे.

मालगुंड -कवी केशवसुतांचे हे गाव. कवी केशवसुतांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले असू, श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी येणारे पर्यटक, भाविक मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकालाही भेट देत असतात. पर्यटकांना आकर्षित करणारे असे हे ठिकाण आहे. प्राचिन कोकणची ओळख पर्यटकांना करून देणारा प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. गणपतीपुळेजवळच हा प्राचिन कोकणचा प्रकल्प उभा राहिला असून, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हे प्राचिन कोकण वसविण्यात आले आहे.


जयगड बंदर व किल्ला - रत्नागिरीतील महत्वाचे ठिकाण. वाहतुकीसाठी सुरक्षित असे हे बंदर असून, या ठिकाणी जिंदाल वीज प्रकल्पामुळे हा भाग नावारूपाला आला आहे. येथील कर्‍हाटेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. जयगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला हा भाग पर्यटकांना भूरळ घालणार असा आहे.
पावस- श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरामुळे जागतिक नकाशावर आलेले हे ठिकाण. या मंदिराला भेट देण्यासाठी तसेच स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात. श्री क्षेत्र गणपतीपुळे बरोबरच पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर तिर्थक्षेत्र म्हणून विकसीत केले जात आहे.
गणेशगुळे - हे देवस्थान महागणपतीचे असून, ते गणेशगुळे गावात अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
गणपतीपुळे हे ठिकाण कोणाला माहित नसेल असे होणे शक्य नाही! तरी पण आज हि पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे अलीकडेच मी रत्नागिरीला काही कामास्तव गेलो असताना अचानकच माझ्या नातेवाईकाने “चल आज तुझ्या डोळ्याचे पारणे फेडूया ” असे म्हणून गणपतीपुळ्याला जाण्याचा बेत आखला. त्याचे हे वाक्य ऐकून मी जरा गोंधळूनच गेलो होतो आणि उगाचच भीती पण वाटत होती कि आता हा माणूस आपल्याला काय काय करायला लावणार आहे देव जाणे!
नंतर काही वेळाने मी विचारलं तेव्हा तो म्हणाला कि आपण आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तेव्हा मला कळल कि आज काहीतरी वेगळा अनुभव घेता येणार.  तसा मी गणपतीपुळ्याला वेगळ्या रस्त्याने म्हणजेच निवळी फाट्याने गेलो होतो, हा निवळी फाटा मुंबईहून कोंकणात जाताना हातखाम्ब्याच्या अलीकडे मुंबई-गोवा रस्त्यावर लागतो. निवळी फाटा ते गणपतीपूळे ( इथून पुढे पुळे असा उल्लेख करतो) हे अंतर २७ ते ३१ किमी आहे, हा रस्ता तसा सरळच गावागावातून गणपतीपुळ्यात पोहचतो. असो, आता आरे-वारे हा काय प्रकार आहे ते लिहिण्याची आता वेळ आली आहे.
रत्नागिरी शहरातून पुळ्यात जाता येते, अलीकडेच आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणार नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी हातखंबा ह्या फाट्यावरून वळण घ्यावे लागते. आत शिरल्यावर रत्नागिरी शहराची भव्यता लक्षात येते, ह्या शहरात सध्या मोठी-मोठी सरकारी कार्यालये आहेत, तसेच हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे मोठी बाजारपेठ, भव्य एस.टी.  स्थानक देखील आहे, तसेच देशातल्या कोणत्याही भागातून कोकण रेल्वे मार्गाने इथे पोहोचता येते.
एकदा का हातखंबा तिठयावरून आत शिरलात कि सरळ सरळ रत्नागिरी शहरातून गाडी हाकत न्यायची, वर म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीचे शहरीकरण तुमच्या दृष्टीस पडत राहील. मारुती मंदिर चौकातून सरळ पुढे आल्यावर एस.टी. महामंडळाचे वर्कशौप उजव्या हाताला लागेल तिथून पुढे गेल्यावर रात्नागिरी एस.टी. डेपो दिसेल., इथून पुढे गेलात कि तिसरया उजव्या वळणाला (होटेल रुद्र समोरील रस्ता ) आत वळले

इथून पुढे जाताना अजून एक छोटेखानी मारुतीचे मंदिर लागेल, मग सावरकरांचा पुतळा असलेले चौक ओलांडले कि बँक ऑफ इंडिया वरून सरळ पुढे जाऊन  फाटक हाईस्कूल लागते. तीथून पुढे सरळ गेल्यावर थोड्या अंतरावर छोट्याश्या वहाळावरचा पूल ओलांडून पुढे निघालो कि लगेचच एक चार रस्ता असलेला चौक लागेल, चौकातून सरळ पुढे गेल्यावर खऱ्या अर्थाने  गणपतीपुळ्याच्या आरे-वारेतून जाणारया रस्त्याचा प्रारंभ होतो.  इथून मात्र मासळीच्या वासामुळे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला समुद्राच्या सोबतीची जाणीव व्हायला सुरुवात येते. काही अंतरापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला कोळी बांधवांची घरे दिसतात तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे आट घुसलेले पाणी  तसेच त्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेली छोटी-मोठी जाळी दिसत राहतात. नंतर काहीश्या छोट्या उंचीच्या खाऱ्या पाण्यातील झुडुपांमधून हा रस्ता पुढे जात राहतो,  अधून मधून छोट्या घरांची सोबत असतेच. मग हा रस्ता छोटी-मोठी वळण घेत थोड काळजीपूर्वक उजव्या हाताचे वळण घेतो आणि सरळ पुढे जात राहतो तो थेट आरे गावाला जोडणाऱ्या पुलापर्यंत. समुद्राच्या आत शिरलेल्या पाण्यावरील पूल पार केला कि आपण आरे ह्या गावात शिरतो, पुढे जाताना लागणारे डाव्या हाताचे वळण सोडून पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताचे वळण घ्यावे लागते.


कोळीसरे येथील श्री भगवान महाविष्णूंचे देवस्थान पाहण्यासारखे आहे. निवळीचा धबधबा तर पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. करबुड्याचा रेल्वे बोगदा हा आशियातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जातो. याशिवाय पूर्णगड किल्ला, नाणिज, पानवालचा रेल्वे पूल आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
लांजा - लांजातील श्रीकालभैरव योगेश्‍वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, लक्ष्मीकेशव देवस्थान, मल्लिकार्जुन आदी ठिकाणे सुंदर आहेत.
राजापूर - ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव. राजापूरच्या गंगेमुळे धार्मिकदृष्ट्या नावारूपाला आलेले हे गाव. दर तीन वर्षांनी येणार्‍या गंगेसाठी राजापूर प्रसिध्द आहे. याशिवाय आडिवर्‍याची महाकाली, धूतपापोश्‍वर मंदिर, यशवंतगड, कनकादित्य, आर्यादुर्गा देवस्थान, अंजनेश्‍वराचे देऊळ आदी ठिकाणे सुंदर अशी आहेत. त्यामुळे पर्यटकांबरोबरच भाविकांची या ठिकाणी गर्दी होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...