Sunday, May 31, 2020

खजुराहो

खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल्पकला, ह्या देशाच्या भरभराटिची, संस्कृतीची आणि संपन्नतेची साक्ष देणारी कलाकुसर...
आम्ही ह्या अद्भुत भूमिची सफर डिसेंबर, २००९ च्या शेवटच्या आठवड्यात केली. खजुराहो, दिल्ली पासुन रेल्वेने १० ते १२ तासांवर आहे. स्टेशन अगदी छोटेसे आणि स्वच्छ आहे. हे गाव हवाई मार्गाने मुंबई, दिल्लीला आणि कोलकत्याला जोडलेले आहे. खजुराहो गाव तसे फारच लहान आहे पण येथे अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि पंचतारांकित हॉटेल्स आहेत.
खजुराहो हे गाव प्राचिन काळी खजुरांच्या झाडांनी वेढलेले असल्याने हे नाव पडले.
ह्या गावाची लोकसंख्या जेमतेम १५००० असेल. ईथल्या लोकांची उत्पन्नाची साधने म्हणजे पर्यटन आणि शेती.
हॉटेल्स ५०० रुपयांपासुन १५००० पर्यंत मिळतात. जेवणात पराठ्या पासुन पिझ्झ्यापर्यंत आणि सांबर पासुन सिझलर्स पर्यंत सर्व काही मिळते.
ईथे गेल्यावर फिरण्याचे सोपे आणि स्वस्त साधन म्हणजे रिक्षा. ईथे मंदिरे पाहताना गाईड नक्की करा.
ईथे एव्हडे परदेशी पर्यटक येतात कि तुमच्या शेजारी उभा राहुन एखादा अगदी साधा वाटणारा गाईड अस्खलिखित फ्रेंच किंवा जपानी बोलायला लागला कि चाट पडायला होते.
खजुराहो नीट पहायचे म्हणजे कमीतकमी ३ दिवस तरी पाहिजेत.
आम्ही ह्या भूमिची सफर ईथे जवळच असलेल्या पांडव गुहांपासुन सुरु केली.
पांडव गुहांचा रस्ता पन्ना च्या जंगलामधुन जातो.
प्रचि १
पन्नाचे जंगल
असे म्हणतात की ह्या गुहांमध्ये पांडवांनी वनवासात असताना वास्तव्य केले.
असे म्हणतात की ईथे जे तळे आहे ते भिमाने गदा मारुन तयार केले. ह्या तळ्यावरील Rock Formation पहाण्यासारखे आहे.
प्रचि २
भिमाने गदा मारुन तयार केलेले तळे
परत येताना राणेह ह्या धबधब्याला भेट दिली. हा धबधबा केन नदीवर आहे. त्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धबधब्याला पाणी कमीच होते. पण पहाण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथले Rock Formation. ह्याला भारताचे Grand Canyon म्हणतात. ईथले Rock Formation ५ किमी लांब व १०० फूट खोल आहेत. हे सर्व खडक crystalline granite असुन गुलाबी, लाल, पिवळा, नारंगी, राखाडी अशा विविश रंगात सापडतात. एकाच ठिकाणाहून एव्हडे विविध दगड मिळण्याची ही भारतातली बहुदा एकमेव जागा असावी.
प्रचि ३
राणेह धबधबा
-
-
-
प्रचि ४
रॉक फॉरमेशन
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
एकाच ठिकाणाहून निघालेले विविध प्रकरचे दगड
-
-
-
पांडव गुहा व राणेह धबधबा पाहुन सायंकाळी बुंदेली नृत्य-प्रकार तसेच मंदिरांची माहिती देणारा खास रात्रीचा दृक्-श्राव्य (light and sound show) खेळ ही पाहिला.
प्रचि ७
बुंदेली नृत्ये
-
-
-
प्रचि ८
दुसर्‍या दिवशी आम्ही खजुराहोच्या जगप्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला निघालो. ईथली सर्व मंदिरे चंदेला राजांच्या राजवटीत, दहाव्या ते बाराव्या शतकात बांधली गेली. एके काळी ईथे ८५ मंदिरे होती. काळाच्या ओघात, दुर्लक्षिले गेल्यामुळे व आक्रमणांमध्ये बरीच मंदिरे नष्ट झाली. आता फक्त २२ मंदिरे अस्तित्वात आहेत. ही सर्व मंदिरे खजुराहोच्या दक्षिण, पुर्व व पच्शिम ह्या दिशांना पसरलेली आहेत.
आम्ही आमचा प्रवास दक्षिण-पुर्व मंदिरांच्या समुदायाकडुन सुरु केला. ह्या समुदायात चतुर्भुज, दुल्हा देव, पार्श्वनाथ आणी आदीनाथ अशी मंदिरे येतात. ईथे गाईड नक्की करावा. ते मंदिरांची फार छान माहिती देतात.
जरी सर्व मंदिरांचे स्थापत्यशास्त्र एकच असले तरी त्यांवरची शिल्पकला थक्क करणारी आहे. प्रत्येक मंदिर पायापासुन ते कळसापर्यंत शिल्पकलेने मढविलेले आहे. प्रत्येक मंदिरावर पुराणकाळातल्या कथा, त्याकाळचे लोकजीवन, नृत्ये, खेळ, शिकार, प्रणयदृष्ये असे कोरलेले आहे. ह्या सर्व शिल्पांमध्ये देव, देवता, राजा, दास, दासी, शिकार, शिकारी, दांपत्य, कुटुंब, नृत्यांगना, गायक, वादक, प्रेमी युगुल, श्रृंगार करणारी तरुणी, तरुण, अप्सरा, ललना असे सर्व काही आहे.
सर्व मंदिरे व मुर्त्या ईतक्या जिवंत, सुंदर आणी प्रमाणबद्ध आहेत की आपण त्याच काळात वावरतो आहोत असा भास व्हावा.
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
तिसर्‍या दिवशी आम्ही पच्शिम मंदिरांच्या समुहाला भेट द्यायला निघालो.
पच्शिम मंदिरांच्या समुहातली सर्व मंदिरे एकाच परिसरात येतात व ही सर्व मंदिरे बाजारपेठेच्या जवळच आहेत. ह्या समुहात कंदरीया महादेव मंदिर, चौसष्ठ योगिनी मंदिर, चित्रगुप्त मंदिर, लक्ष्मण मंदिर, मातंगेश्वर मंदिर व वराह मंदिर अशी मंदिरे येतात. ही सर्व मंदिरे नीट पहायची असतील तर तुमच्याकडे किमान ५-६ तास तरी हवेत.
ही सर्व मंदिरे बघताना भान हरपुन जाते. ह्या मंदिरांतला प्रत्येक दगड ईतका सुंदर घडविला आहे की थक्क व्हायला होते. हजारो हातांनी शतके राबुन घडविलेले ते काम पाहुन ऊर अभिमानाने भरुन येतो.
ईथल्या मंदिरांभोवतीच्या बर्‍याचशा शिल्पात आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम (ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम) सांगितले आहेत त्यांचा ऊल्लेख केला आहे. एक परीपुर्ण व सफल जीवन जगण्यासाठी व मोक्षप्राप्तिसाठी हे चारही आश्रम पुर्ण करणे अतिशय गरजेचे आहे हे वारंवार सांगितले आहे. ह्या चारही आश्रमांमध्ये करण्याची सर्व कामे प्रत्येक मंदिराच्या भोवताली कोरलेली. ईथे हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या सर्व भौतिक व शारीरीक गरजा पुर्ण करा व ते सर्व झाल्यावर त्या सर्वशक्तिमान विधात्यामध्ये विलीन व्हा. जुन्या काळी जे पुजारी सांगायचे की आधी मंदिर प्रदक्षिणा पुर्ण करा व मग नंतर गाभार्‍यात या हेच त्यासाठी.
प्रचि ३१
कंदरीया महादेव. (कंदरा = गुहा)
खजुराहोतील सर्वात मोठे व सर्वात भव्य मंदीर.
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
कंदरीया महादेव
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ३९
-
-
-
प्रचि ४०
-
-
-
प्रचि ४१
-
-
-
प्रचि ४२
-
-
-
प्रचि ४३
-
-
-
प्रचि ४४
-
-
-
प्रचि ४५
-
-
-
प्रचि ४६
-
-
-
प्रचि ४७
-
-
-
प्रचि ४८
-
-
-
प्रचि ४९
-
-
-
प्रचि ५०
-
-
-
प्रचि ५१
-
-
-
प्रचि ५२
-
-
-
प्रचि ५३
-
-
-
बर्‍याचशा गोष्टी शिकुन भारावलेल्या मनाने आम्ही ह्या जादुई देवनगरी चा निरोप घेतला ते परत येण्याच्या ईर्‍याद्यानेच.


भारत हा विविधतेने नटलेला देश आहे हे आपण जाणतो. इथे प्रांतिक वैविध्यता तर दिसून येतेच परंतु स्थापत्य आणि सांस्कृतिक वेगळेपणही जाणवते.
भारताच्या प्रत्येक राज्यात बघण्यासारखं, फिरण्यासारखं बरंच काही आहे. यात ऐतिहासिक वास्तूंचाही समावेश आहे बरं का! यातलंच एक जगप्रसिद्ध ठिकाण म्हणजे मध्यप्रदेशातलं छतरपूरमधील खजुराहो मंदिर.
khajuraho 4 inmarathi
ancient origins
ह्या मंदिराचं सौंदर्य बघायला भारतातूनच नाही तर देशविदेशातूनही हजारो पर्यटक येत असतात.
खजुराहो मंदिराचा इतिहास :
खजुराहोचा इतिहास तब्बल एक हजार वर्ष जुना म्हणता येईल. चंदेल साम्राज्याची ती राजधानी होती. चंद्रवर्मन यांनी चंदेल आणि खजुराहोची स्थापना केली. ते राजपूत होते.
असं म्हटलं जातं की, चंद्रवर्मनाची आई हेमवती दिसायला अतीशय सुंदर होती. ती एका रात्री कमळांनी बहरलेल्या तलावात स्नान करत असताना साक्षात चंद्रदेव तिच्या सौंदर्याला भाळले आणि मनुष्यरूप धारण करून भूतलावर आले.
आणि हेमवतीच्या पोटी चंद्रवर्मनाने जन्म घेतला, परंतु समाज ह्याला स्वीकारणार नाही म्हणून तिने चंद्रदेवाला बोल लावले.
आपल्या कृत्याचं प्रायश्चित्त म्हणून चंद्रदेवाने तिला राजमाता होण्याचा वर दिला. तिने चंद्रवर्मनला घेऊन खजुराहोला जाण्यास सांगितलं आणि तिथे तिचा पुत्र राज्य करेल तसंच अनेक मंदिरं सुद्धा बांधेल असं खात्रीपूर्वक सांगितलं.
चंद्रवर्मन खरोखरच पित्याप्रमाणे कर्तृत्ववान आणि तेजस्वी होता. एखाद्या शस्त्राशिवायही तो वाघाची शिकार करण्यास समर्थ होता. त्याने अनेक युद्ध जिंकली.
तलाव आणि बाग -बगीच्यांनी आच्छादित अशी तब्बल ८५ मंदिरं त्यांनी खजुराहोत बांधली. त्यानंतर एक मोठा यज्ञ करून हेमवतीच्या पापांचे परिक्षालन केले .
खजुराहोच्या मंदिरात जैन तसेच हिंदू धर्माची विचारसरणी मानली जात होती आणि त्यानुसारच मंदिरं होती. UNESCO तर्फे खजुराहोला ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणजेच जागतिक वारसा असण्याचा मान दिला गेला.
khajuraho 8 inmarathi
तेराव्या शतकात दिल्लीच्या सुलतानाने चंदेलवर चढाई करेपर्यंत सर्वकाही सुरळीत चालू होतं. सर्वजण खजुराहोच्या मंदिरांची पूजा करीत असत, परंतु इस्लामिक हस्तक्षेपानंतर चित्र पालटू लागले.
सुलतानाने अनेक मंदिरांची तोडफोड करत त्यांना जमीनदोस्त केलं. धार्मिक दैवतं नष्ट होत होती आणि त्यातली काही वाचावी म्हणून स्थानिकांनी ते ठिकाण सोडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून उरलेली मंदीरं त्यांच्या नजरेत येणार नाहीत आणि निदान ती तरी वाचतील.

जंगलातील मंदिरं  :

सुलतानाने बरीच मंदिरं पाडली, मात्र जी तुलनेने थोडी आतील भागांत होती ती इस्लामकाळातही १३ ते १८व्या शतकात बचावली. ती हल्ल्यांपासून तर नक्कीच वाचली पण झाडांपासून त्यांचा बचाव झाला नाही. मंदिरांवर झाडं- वेली वाढू लागल्या.
khajuraho 5 inmarathi
दरम्यान एका ब्रिटिश खलाश्याच्या कानावर ह्या मंदिरांची खबर पोहोचली. त्याला ह्यात काही तथ्य वाटलं नाही, पण निदान एकदा शोध घ्यावा ह्या हेतुने त्याने एका स्थानिकाच्या मदतीने मंदिराला भेट दिली आणि आश्चर्यचकित झाला.
पुढे १८३८ मध्ये ती मंदिरं जगासाठी खुली झाली.

पश्चिम समूह :

khajuraho temples 2 inmarathi
पुढे काही ब्रिटिश इंजिनिअरांनी ही मंदिरं शोधली आणि त्यांच्या चमूला पश्चिम समूह असं नाव दिलं.
त्यात लक्ष्मी मंदिर, वराह मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदरिया महादेव मंदिर, सिंह मंदिर, देवी जगदम्बा मंदिर, सूर्य (चित्रगुप्त) मंदिर मंदिर, विश्वनाथ, नन्दी मंदिर, पार्वती मंदिर ह्यांचा समावेश होतो.

पूर्व समूह :

khajuraho temples 3 inmarathi
indo vacations
ही मंदिरंही प्रामुख्याने देवालाच समर्पित केलेली आहेत. त्यात वामन मंदिर, जावरी मंदिर, जैन मंदिर यांचा समावेश होतो तर दक्षिण समूहात चतुर्भुज मंदिरआणि दुल्हादेव मंदिराचा समावेश आहे.

मंदिरातील शिल्पकला :

खजुराहोची ही प्राचीन मंदिरं विश्वविख्यात आहेत ती त्यावरील कोरीव मुर्तींमुळे. १०% कोरीवकाम हे कामक्रीडा, मिलन, तसेच प्रेमाशी निगडित आहे. अनेक कामासने त्यावर खूप चांगल्याप्रकारे कोरली गेली आहेत.
ह्यावरून आपल्याला पूर्वीच्या काळीही कामशास्त्रास असलेलं महत्व दिसून येतं. अन्न, वस्त्र, निवारा ह्याबरोबरच कामभावनाही महत्वाची असते आणि भारत तर कामसूत्राचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
khajuraho temples inmarathi
native planet
स्त्रियांचं केलेलं चित्रणही वाखाणण्याजोगं आहे, कारण त्यांच्याही कामभावनांचा आदर आणि सन्मान राखत त्या मूर्ती कोरलेल्या आहेत. स्त्री- पुरुष समानता ह्यातून दिसून येते आणि स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात नव्हती ह्याचं मनोमन समाधान वाटतं.
स्त्रियांच्या शारीरिक गरजा ह्या पुरुषांप्रमाणेच असतात आणि त्यात लपवण्यासारखं किंवा गैर काहीच नाही ही विचारसरणी भावते. पुरातन असले तरी विचारांनी नक्कीच ते अधिक प्रगल्भ आणि आधुनिक तसेच कलाप्रधान होते असं म्हणायला हरकत नाही.
फक्त मनुष्यच नव्हे तर प्राण्यांचेही कामजीवन त्यात पाहायला मिळतं. ह्याशिवाय शीव आणि शक्तीची विविध रूपंही बघायला मिळतात.
khajuraho 6 inmarathi
ज्याप्रकारे त्या मूर्ती अगदीच दर्शनीय भागात दिसून येतात त्यावरून एक समजतं, ते म्हणजे कर्त्याला त्या प्रामुख्याने आणि उघडउघड दाखवायच्या होत्या. लोकांना त्या सहज दिसाव्यात हा त्याचा मूळ हेतू असूच शकतो.
खरंच, कसा होता पूर्वीचा काळ आणि कसा झालाय आत्ताचा काळ! खुल्या विचारांच्या समाजाला बुरसटलेल्या, कोत्या विचारांची बुरशी कधी, कशी आणि का लागली हेच कळत नाही.
khajuraho temples 1 inmarathi
native planet
वेळ आलीये ती काही गोष्टी बदलायची आणि विचारांनी श्रीमंत होण्याची. अर्थात सध्या होत असलेली वैचारिक प्रगती स्वागतार्हच म्हणता येईल.
अशा विविध ठिकाणी गेल्यावर पर्यटनाचा आनंद तर मिळतोच, पण वास्तूंमधून जुन्या काळाशी एक धागा जोडता येतो. त्यांना जाणून घ्यायची संधी आपल्याला मिळते.
तसं पाहिलं तर ह्या सर्व जागा निर्जीव, अबोल, पण नीट लक्ष दिलं तर त्यातही आपल्याला जिवंतपणा दिसून येतो आणि आपण त्यांच्याशी संवाद साधत त्यांना जाणून घेऊ शकतो.
आपल्याला आपले आजी आजोबा जसे गोष्टी सांगायचे अगदी तसेच ही जुनी मंदिरदेखील सांगतात..! गरज आहे ती आपण लक्ष देऊन ऐकण्याची. आपल्याप्रमाणे पुढच्याही पिढीला त्या ऐकता याव्यात ह्यासाठी त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची.
Wnter-Getaway-Experience-Khajuraho inmarathi
thelalit
कदाचित त्याचं आपण प्रत्यक्ष संवर्धन करू शकणार नाही, पण आपल्यामुळे त्याला नुकसान पोहोचणार नाही ह्याची प्रत्येकानं खबरदारी घेतली तरी फार मोठी गोष्ट होईल.
मध्यप्रदेशातील आपला हा सांस्कृतिक वारसा अभिमान वाटावा असाच आहे. चला तर मग लवकरच ह्या नयनरम्य स्थानाला प्रत्यक्ष भेट देऊया! येताय ना?
या वर्षी मध्यप्रदेशातील कान्हा, जबलपूर व खजुराहो या ठिकाणांना भेट दिली.
कान्हा... जंगल सुरेख. स्वच्छता वाखाणण्याजोगी.. गाईड उत्तम.. वाघाचे दर्शन झाले. सकाळच्या वेळचे जंगल फार सुंदर दिसले.जबलपूर ला धुवांधार धबधबा, ६४ योगिनी देउळ व भेडा घाट ला भेट दिली. भेडा घाट ला नर्मदेचे दर्शन झाले. दोन्ही बाजूला संगमरवरी कपारीतून बोट राईड घेतली.
म प्रदेशात रस्ते अतिशय खराब. तेवढीच माणसे बोलायला छान. आदरातिथ्य उत्तम. अधेमधे फार कमी गावे लागतात. माणसे जरा मागास वाटली. हाॅटेल बुकिंग करताना शक्यतो मध्य प्रदेश टूरीझम ची करावीत.
खजुराहो थोडेसे बाजूला आहे. आम्ही जबलपूरहून गेलो. शेवटचे ५० मैल खड्डयांचाच रस्ता आहे. इथे एवढा टूरिझम आहे तर सरकारने लक्ष घालून रस्ते सुधारायला हवेत. खजुराहोला १० व्या शतकातील २०-२२ देवळे आहेत. बरीच सुस्थितीत आहेत. चंडेल राजांच्या राजवटीत ही देवळे बांधली गेली. जवळच पन्ना येथील खाणीतला दगड वापरला आहे. साधारणपणे लढाईत विजय मिळाला की नवीन देउळ बांधले गेले. अशी ८५ देवळे होती असे म्हणतात. कालांतराने ही देवळे झाडीत झाकली गेली व नजरेआड गेली. या भागात विशेष काही पिकत नाही म्हणून पण शत्रू फार फिरकला नाही.तो जमाना डिजिटल नव्हता. टी व्ही सेल फोन सिनेमा अजून अस्तित्वात नव्हते. अशा वेळेस आपल्या राजेरजवाड्यांनी कलाकारांना आसरा देउन संस्कृती संवर्धनाचे मोठे काम केले आहे. यात शिल्पकारांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी जे देवळे सजवण्याचे काम केले आहे त्यामुळे आपण भूतकाळात डोकावून बघू शकतो आणि आपल्या पूर्वजांच्या रहाणी विषयी काही आडाखे बांधू शकतो.
एखादी लढाई जिंकली की त्या विजयाचे प्रतिक म्हणून विजयस्तंभ अथवा मंदिर बांधलेले दिसून येते.  १०००-१२०० वर्षापूर्वीची मंदिरे आजही चांगल्या स्थितीत पहायला मिळतात. चंडेल राजांच्या कारकिर्दीत खजुराहोची मंदिरे बांधली गेली. खजुराहो म्हणजे मिथुन शिल्पे असा आपला एक समज असतो. पण प्रत्यक्षात १० % शिल्पे अशा प्रकारची आहेत. रात्री  लाइट साउंड शो होता. साधारण पार्श्वभूमी कळण्यास उपयोग होतो.
   चांदण्या  रात्री  कार्यक्रम पाहिल्यास देवळे फार सुंदर दिसतात.
 असे म्हणतात की खजुराहोत ८५ देवळे बांधली  होती त्यातील २०-२२ आता दिसतात. ही देवळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज च्या  अधिकारात असल्याने चांगल्या स्थितीत रहातील अशी आशा. तीन भागात ही देवळे विभागली आहेत. आर्किलाॅजिकल सर्व्हे तर्फे गाईडस् मिळतात अथवा आॅडिओ गाईड बुक्स आहेत. आम्ही गाईड घेतला....प्रश्न विचारता येतात.सर्वात प्रथम लक्ष्मण मंदिर पाहिले....इथे लक्ष्मणाचे देउळ कसे असे वाटत होते तेव्हा कळले की ते लक्ष्मण वर्मन याने बांधले आहे. हे देउळ बरेच सुस्थितीत आहे . सगळी देवळे मोठ्या चौथऱ्यावर आहेत. इथली देवळे नागर शैलीतली आहेत. पंचायतन पद्धतीने मेन देव मधे व बाजूला चार दिशाला चार छोटी देवळे आहेत.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भरपूर शिल्पे आहेत. बाहेर युद्धातील देखावे, लग्नाचा देखावा, वाद्यवृंद इत्यादी शिल्पे आहेत. देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर चार प्रकारची शिल्पे आढळतात. सुरसुंदरी .. कुणी पायातला काटा काढते, कुणी सिंदूर लावते तर कुणी आरशात पहाते. त्रिभंग प्रकारातील बरीच शिल्पे आहेत. चेहऱ्यावर हावभाव सुंदर. मूर्तीना बाक दिल्याने सैंदर्यात भर पडली आहे. या शिल्पामध्ये एक प्रकारची लय आहे असे
Laxman Temple
वाटते.  मदतनीस छोट्या आकारात दिसतात. तो त्यांचे स्टेटस दाखवण्यासाठी म्हणे...... केशरचनेचे वेषभूषेचे अनेक प्रकार दिसतात. साध्या दगडातून इतकी सुंदर शिल्पे वेगवेगळे भाव दाखवतात. त्या शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे थोड...नाव मात्र राजाचे होते . नाही म्हणायला शिल्पकारांसाठी म्हणून एक शिल्प इथे केले आहे.देवदेवतांची अनेक शिल्पे आहेत.  एका विचित्र प्राण्याचे शिल्प सगळीकडे दिसते"..आपल्या मनातले चांगले व वाईट याचे द्वंद्व दाखवले आहे. या सगळ्याबरोबर सेक्स दाखवणारी बरीच शिल्पे आहेत. तांत्रिक विद्या मानणाऱ्या लोकांचा प्रभाव या मंदिरांवर आहे असे म्हणतात तर काही लोकांच्या मते धर्म अर्थ काम मोक्ष अशा चार पायऱ्या ही शिल्पे दाखवतात. पूर्वी माझा असा समज होता की अशी शिल्पे फक्त खजुराहोतच आहेत पण ती अनेक मंदिरात दिसतात इतकी चांगल्या स्थितित नसली तरी...मग खजुराहो एवढ्या चर्चेत का?
या मंदिरात कुठेही सिमेंट वापरलेले नाही जोड काम इंटरलाॅक पद्धतीने सगळे दगड बसवले आहेत.हे अतिशय कौशल्याचे काम आहे. इथून जवळच असलेल्या पन्ना मधील खाणीतून सगळा सॅंडस्टोन वापरला आहे. आजही तिथे उत्तम प्रतीचा दगड मिळतो आहे. काही ठिकाणी रिलीफ शिल्पे दिसतात, म्हणजे दगडाना उउठावदेउन काम केले आहे.

या नंतर कंडारिया महादेव हे सर्वात मोठे मंदिर आहे. या च्या प्रवेशद्वारावर सुंदर तोरण कोरलेले आहे ज्यावर यक्ष किन्नर व गांधर्व दिसतात. ते नेहमी अधांतरी दाखवतात. कंडारिआ म्हणजे गुहेत रहाणारा .या मंदिरावर पुन्हा तोच पॅटर्न दिसतो मूर्तींचा पण जास्त सुबक व मोठा आकार आहे. ८०० च्या हून जास्त शिल्पे या एका मंदिरात आहेत. ती बनवायला किती दिवस व कष्ट लागले असतील .आधी सगळे कोरीव काम होउन मग तेमंदिर नकाशाबरहुकुम बांधले गेले असे गाईड ने सांगितले. महादेव मंदिर पुढुन बघितले तर एकावर एक सात शिखरे दिसतात. हे सर्वात भव्य मंदिर विद्याधर राजाने बांधले आहे. महंमद गझनी ला हरवून आणि शेवटी तह करून ही जागा वाचवली होती. त्या विजया नंतर या देवळाची निर्मिती झाली. याच्या शिखरावर ८४ छोटी शिखरे दिसतात. ८४ लक्ष योनी नंतर मोक्ष प्राप्त होतो ही कल्पना मांडली आहे. कैलास पर्वत डोळ्यापुढे ठेवून ही रचना केली आहे. हळू हळू चढत जाणारी रचना देवळाला भव्यता प्राप्त करून देते.
बाहेरील भागात सप्तमात्रृका वाहनाबरोबर दिसतात. अग्नि व स्वाहा हे ही बघायला मिळतात. अग्नि ला अर्पण करताना जे स्वाहा म्हणतो तीच ही देवता.
त्या नंतर जगदंबी , चित्रगुप्त व विश्वनाथ मंदिरे पाहून बाहेर असलेले ११ फुट शिवलिंगाचे मंदिर पाहिले. हे सर्वासाठी खुले आहे व पूजा होते. बाकी आतील मंदिरात गाभाऱ्यात मूर्ती आहेत पण पूजा होत नाही.
काही अंतरावर असलेले चतुर्भुज मंदिर दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले. शिवाचा मुकुट, बु्द्धाचा चेहरा, विष्णूचे अंग व कृष्णाची बासरी ची पोज असे या मूर्तीचे वर्णन करतात. या मंदिरावर मिथुन शिल्पे नाहीत. कुठे न दिसणारे नरसिंहीणी चे शिल्प आहे. गंगा यमुना हे शिल्प ही दिसते.

 शिल्पकडेदोनवेगळ्या  पाहिल्यास वेगळे भाव दिसतात.
 एका शिल्पात एक सुंदरी
  केस पुसत आहे आणि तिच्या केसातले पाण्याचे थेंब पाहून एक हंस फसला आहे व मोती म्हणून त्याकडे बघत आहे. असे अनेक बारकावे या शिल्पात आहेत व गाईडस ते सगळे दाखवतात.
अजून एक गंमत म्हणजे गाईड आरशाचा तुकडा घेउन उन्हाचा फायदा घेउन कवडसे पाडून बारकावे दाखवतात.
देवळाच्या अलिकडे वराह टेंपल आहे. एका दगडातून कोरलेले वराह अवताराचे शिल्प आहे. हात लावून लावून दगड गुळगुळीत होऊन मेटल चा वाटतो. त्याच्या मुखात वीणावादन करणारी सरस्वती तर दोन्हीबाजूला मिळून नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. ३३ कोटी देवांचे प्रतिनिधी म्हणून ३३३ छोट्या सुबक प्रतिमा काढल्या आहेत. अगदी छोटे असले तरी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे हे देउळ म्हणजे.या सगळ्या मंदिरात दशावतार भेटत रहातात.

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...