Sunday, May 3, 2020

रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

शेवते धबधबा.. महाड रायगड
पाहूनच डोळ्यांचे पारणे फेडणारा.. मनाला घायाळ करणारा हा आड्राई रोड शेवते गावाजवळील हा प्रसिद्ध धबधबा आहे.. उंचावरून फेसाळणारे पाणी.. चहूबाजूंनी रांग सह्याद्री हिरवागार परिसर वातावरण धुंद करते..
अशा या जागी आवश्य भेट द्या.. पावसाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गालाही फिके पाडील असे आहे.. जर मला कोणी विचारले की स्वर्ग कोठे आहे तर मी अभिमानाने म्हणेल की पावसाळ्यात आमच्या महाड रायगड मध्ये भेट द्या.. येथेच स्वर्ग सुखाची प्रचिती येईल..
येथे जाण्यासाठी पुण्या मार्गे आलात तर एक मढेघाट कर्णावडी वरून रानवडी वाकी मार्गावर पुढे शेवते फाटा लागतो तेथून पुढे 20 मिनिटांच्या अंतरावर हा धबधबा आहे
मुंबई किंवा पुणे वरंध मार्गावरून येणार्यांनी बिरवाडी वरून वाघेरी रोड दहिवडला आल्यावर उजवीकडे वाकीरोडने वळावे पुढे सरळ खरकवाडी.. वाकी.. नंतर शेवते गावी यावे
पिकनिकचा आनंद जरूर लूटा पण निसर्गाचे भान राखून..
धन्यवाद 💐

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...