Saturday, August 28, 2021

मध्यप्रदेशातील मितावली आणि पडावली मंदिरे

 

मंदिर की गढी? गढी पडावली

सामना ऑनलाईन

>> डॉ. सरिता विनय भावे

या आगळ्यावेगळ्या सरळ रेषेवरील मध्यबिंदूचे स्थान भूषवणारी, एखाद्या मौक्तिक मालेच्या मधोमध असणाऱया सुरेख ‘पदका’सारखी असलेली ही जागा आहे ‘गढी पडावली’. नावापासूनच या स्थानाबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण व्हायला लागते. रस्त्याजवळच्या प्रवेशद्वारातूनच आपल्याला समोरची भुईकोट किल्ला अथवा गढीसारखी वाटणारी विशाल वास्तू दिसते.

विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारी सुलभ आणि सोयिस्कर विमानसेवा, सुखकर प्रवासासाठी आवश्यक असे उत्कृष्ट दर्जाचे रस्ते या कारणांमुळे टुरिस्ट जगतात आपले राजधानीचे शहर दिल्ली, जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ असणारे आग्रा (उत्तर प्रदेश) आणि वैशिष्टय़पूर्ण ‘हवामहल’ असलेले जयपूर (राजस्थान) सुप्रसिद्ध आहेत. हिंदुस्थानच्या नकाशात या तिन्ही स्थळांना जोडले असता त्रिकोणासारखा आकार तयार होतो. म्हणून हिंदुस्थानातील ‘गोल्डन ट्रँगल’ या विश्वविख्यात नावाने या जागा ओळखल्या जातात.

 

त्यामुळे साधारणतः एकाच रेषेवर, एकमेकांपासून अगदी 5 कि. मी. अंतरावर असल्या तरीही स्वतःचे आगळेपण जपलेल्या, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरपासून साधारण 40 कि. मी. अंतरावर असलेल्या तीन जागांचे एकत्रित ‘गोल्डन स्ट्रेट लाइन’ असे नामकरण करावे काय, असा विचार माझ्या मनात चमकून गेला होता! या तिन्ही विलक्षण जागा मी एका दिवसात एकापाठोपाठ बघितल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही इतकी भन्नाट प्रेक्षणीय स्थळे इतिहास, स्थापत्य कला या सर्व अंगांनी उच्च कोटीची असूनही अक्षरशः ओस पडलेली आहेत. या जागांचे विश्लेषण करायला विद्वान वाट काढून इथे येत नाहीत की शिल्पकारांच्या काwशल्याचे काwतुक करायला कलाप्रेमी इथे फिरकत नाहीत. या स्थळांच्या नशिबी असा शुकशुकाट येणे हे सरकारचे, त्या अनाम शिल्पकारांचे आणि आपल्या सगळ्यांचेच दुर्दैव आहे.

यापैकी ‘चौसष्ट योगिनी मंदिर’ (मुरैना) आणि ‘बटेश्वर मंदिर समूह’ या स्थळांबद्दल यापूर्वीच या सदरात लिहिले आहे. या दोन्ही जागा आडबाजूला असल्याने विशेष प्रचलित नसल्या तरी सर्व शंकांचे निरसन होईल इतका ‘डेटा’ त्यांच्याबद्दल निश्चितच उपलब्ध आहे. उरलेल्या तिसऱया जागेबद्दल मात्र तसे म्हणता येत नाही. नमनालाच इतके घडाभर तेल ओतायला भाग पाडणारी, या आगळ्यावेगळ्या सरळ रेषेवरील मध्यबिंदूचे स्थान भूषवणारी, एखाद्या मौक्तिक मालेच्या मधोमध असणाऱया सुरेख ‘पदका’सारखी असलेली ही जागा आहे ‘गढी पडावली’.

नावापासूनच या स्थानाबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण व्हायला लागते. रस्त्याजवळच्या प्रवेशद्वारातूनच आपल्याला समोरची भुईकोट किल्ला अथवा गढीसारखी वाटणारी विशाल वास्तू दिसते. डेरेदार झाडे आणि चौथऱयांवर नीट रचून ठेवलेल्या उत्खननात सापडलेल्या कलाकृती यांच्यामधून जाणाऱया विस्तीर्ण वाटेवरून आपण तिथपर्यंत पोचतो. दोन बाजूंना असणाऱया महाकाय सिंहिणी आपले स्वागत करतात (घाबरू नका, पाषाणमूर्ती आहेत त्या!). तीसएक पायऱया चढून गेल्यावर आत ‘महालसदृश’ रचना असेल असा विचार करत असताना समोरचे खांबाखांबांचे ‘मंडपाकृती’ मंदिर बघून आपण आश्चर्यचकितच होतो. यापेक्षा जबरदस्त धक्का अजून बसायचा आहे, याची तेव्हा आपल्याला सुतराम कल्पना आलेली नसते. उत्सुकतेने आत शिरल्यावर मात्र आतील महामुर शिल्पसृष्टीमुळे आपण अक्षरशः भांबावूनच जातो. चारही बाजूंची व छतसुद्धा व्यापलेली इतकी गजबजलेली, त्रिमितीय शिल्पे आपल्याकडे सर्वबाजूंनी रोखून पाहत असून त्यांनी आपल्याला वेढून घेतल्याचा विचित्र भास तिथे होतो. आंतरजालावर ब्लॉग लिहिणाऱया एका व्यक्तीने, आपण माळरानावर आडवे पडून जसा लक्षावधी तारकांनी चमचमणाऱया नभाचा आस्वाद घेतो, तसा जमिनीवर आडवे पडून या छताच्या सौंदर्याचे रसपान करण्याचा मोह होतो असे लिहिले आहे! ती कवीकल्पना नसून तशा कृतीनेच छतावरील शिल्पांचा नीट अर्थ लावता येऊ शकेल हेच इथले सत्य आहे. ‘आमच्या सौंदर्याकडे सुद्धा लक्ष द्या’ असा जणू टाहो पह्डणाऱया अबोल शिल्पांनी तिथला कोपरा न् कोपरा अक्षरशः जिवंत झालेला आहे. पह्टोग्राफीची आवड असणाऱयांना तर पॅमेऱयाचा अँगल काय/कसा लावू, कशाकशाचे पह्टो काढू अशी द्विधा मनःस्थिती व्हावी इतके शिल्पभांडार खुले झालेले दृष्टीपथास येते.

दहाव्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या गर्भगृह आणि मंडप यापैकी मुखमंडपच आता शिल्लक राहिलेले आहे. मंदिरानजीकच्या अवशेषांत मिळालेल्या विशाल नंदीच्या प्रतिमेवरून उंच अधिष्ठानावर उभारलेले हे ‘शिवमंदिर’ असावे असे प्रतीत होते. आतील भिंतींवर ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, गणेश, काली या देवतांचे तसेच विष्णुअवतार, भागवत, रामायण, महाभारत, पुराणांशी संबंधित प्रसंगांचे अंकन केलेले दिसते. एकोणिसाव्या शतकात गोहदच्या जाट राजांनी याचे गढीत परिवर्तन केले. जागोजागी त्याच्या खाणाखुणा मूळ रचनेशी मेळ घालणाऱया नवीन बांधकामातून, विखुरलेल्या तोफगोळ्यांतून आपल्या नजरेस पडतात.

‘गोल्डन स्ट्रेट लाइन’च्या जागांवर कुठेही चेकपोस्ट/सुरक्षा कर्मचारी नाही, प्रवेशशुल्कही नाही. बऱयापैकी स्वच्छता आणि ओसाड वाटल्या तरी समाजविघातक वृत्तींचा अभाव या इथल्या जमेच्या बाजू आहेत. मात्र थोडीफार माहिती देऊ शकेल अशी जाणकार स्थानिक व्यक्ती, प्रशिक्षित गाईड यांच्या अनुपस्थितीमुळे या जागांचा सर्वांगसुंदर अनुभव न येता एक अधुरेपणा वाटत राहतो. अप्रतिम स्थापत्य आणि शिल्पलावण्य बघून नेत्र आणि हृदय सुखावतात परंतु त्यांचा रंजक इतिहास, कथा, दंतकथा सांगणारं कुणी नसल्यानं कान आणि मेंदू मात्र आसुसलेलेच राहतात….

  • sarita.bhave1204@gmail.com

 

 

 

 

मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात अनेक पुरातन मंदिरे आहेत त्यापैकीच ह्या दोन जागा : मितावली आणि पडावली. नुकतीच इथल्या प्राचीन मंदिरांना भेट दिली. यापैकी नवव्या शतकातील बांधकाम असलेले मितावली येथील वर्तुळाकार मंदिर अजूनही बरेच सुस्थितीत आहे. आपल्या संसदेची वास्तू या मंदिराची प्रेरणा घेऊन बांधण्यात आली असे मानण्यात येते. छोट्या टेकडीवर स्थित मितावली थोडे दुर्गम भागातच आहे. ग्वाल्हेर - कानपुर हायवेवर १० किमीनंतर हायवे सोडल्यावर, पुढील २५ किमीचा रस्ता बरेच ठिकाणी खचलेला आहे. मात्र सभोवतालचे दृश्य रस्त्याबद्दलच्या वैतागाला थोडे सुसह्य करते. हिरवीगार शेते, लहानमोठ्या टेकड्या आणि त्या दिवशी कधी नव्हे ते दिसलेले निळे आकाश यामुळे मजा आली. अशात उजव्या हाताला मितावलीची टेकडी दिसू लागली. पायथ्याला तीन-चार वाहने एका वेळी लागतील एवढीच पार्किंगची जागा आहे. भोवताली विस्तीर्ण मळे आहेत पण जमीन सपाट नाही त्यामुळे पायथ्याशी पार्किंग मिळाले नाही तर अर्धा पाऊण किमीवर गाडी लावून चालत जावे लागते. आम्ही सुदैवाने आरंभाचे पक्षी (अर्ली बर्ड्स) होतो त्यामुळे त्रास झाला नाही. लगेच चढण सुरू झाली.

From mitawli 131013

१०० फूट दगडी पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते.

चढण छोटी असली तरी एकदम खडी आहे त्यामुळे बर्‍यापैकी दम लागला. शेवटची पायरी चढली आणि मंदिराची वास्तू एखाद्या प्रचंड भित्तीचित्राप्रमाणे अचानक समोर आली.

या छोट्या दरवाजातून मंदिरात प्रवेश होतो.

आत जाताच विस्तीर्ण वर्तुळाकार स्तंभरचना मन वेधून घेते. या प्रकाराच्या मंदिरांना चौसष्ठ योगिनी मंदिर म्हणतात असेही कळले. बाहेरील वर्तुळाला आतील बाजूने चौसष्ठ कोनाडे आहेत आणि प्रत्येकात एक छोटे शिवलिंग स्थापित आहे.

मध्यभागी गर्भगृह आहे, यातही शिवलिंग आहे. मात्र आता पूजा वगैरे होत नाही. पूर्वी एक कायमस्वरुपी पुजारी असायचा.

मंदिराची इमारत छतावरुन कशी दिसेल अशी उत्सुकता वाटल्याने तिथेही चढून पाहिले. तिथून इमारतीचा सुबक वर्तुळाकार आणि भव्यता आणखीनच उठून दिसत होती. दूरवर हिरवी शेतीही दिसत होती, आमच्या गाड्याही सुरक्षित दिसल्या.

तेवढ्यात एक स्थानिक आपणहून ओळख करून घ्यायला आला. त्याने आणखी माहिती दिली. त्यानुसार स्थानवैशिष्ट्यामुळे इथे खगोलशास्त्र आणि गणित यांची अभ्यासकेंद्रे होती. त्या माणसाने भिंतींवरील कोरीव कामाकडेही आमचे लक्ष वेधले. मंदिराखाली पूर्वी पाण्याची कुंडे होती आणि मंदिर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी आपसूक त्या कुंडांत जावे अशी रचना असल्याचेही त्याने सांगितले.

मितावली पाहून झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर असलेल्या एका डेरेदार झाडाखाली बसून खाणे-पिणे उरकले, काही काळ विश्रांती घेतली आणि खाली उतरून ४-५ किमीवर असलेल्या पडावलीच्या वाटेला लागलो.
जवळच सखल भागात असलेल्या पडावलीतील मंदिराची मात्र बरीच दैना झाली आहे. बाहेरुन भक्कम बुरुज दिसतात, बाहेरची मोठी बागही छान सांभाळली आहे मात्र आतील मंदिराचे आणि पुढे १९ व्या शतकात जाट राजांनी बांधलेल्या गढीचे भग्नावशेषच उरले आहेत.

केवळ एक गाभारा सुस्थितीत आहे ज्याच्या छतावर आणि भिंतींवर कोरीव काम पाहायला मिळते.

एक दोन ठिकाणी खजुराहो शैलीतील शिल्पांच्या ओळीही कोरलेल्या आढळतात.

जिथे जाण्यासाठी आजही बरेच कष्ट पडतात तिथे नवव्या-दहाव्या शतकात इतक्या उच्च प्रतीचे बांधकाम करणार्‍या अनामिक कारागीरांसाठी अपार आदर वाटला. उत्तम स्वच्छता आढळली. एक मात्र आहे की या दोन्ही ठिकाणी खाण्या-पिण्याच्या वा तत्सम सोयी फारशा नाहीत. पण एका अर्थी बरेच आहे, त्यामुळे या स्थानांचे अलिप्त - गंभीर व्यक्तिमत्व टिकून राहिले आहे असे वाटले.
फारशा परिचित नसलेल्या या प्राचीन स्थळांची ही सहल पुरातनाशी काही काळ नाते जोडून गेली आणि खूप आनंद देऊन गेली हे मात्र नक्की.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
इथे भेट द्यायची असेल तर ग्वाल्हेर मध्ये मुक्काम करुन कारने जाण्याखेरीज पर्याय नाही. बस वगैरेची काहीही सोय नाही. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभराचे खाणे-पिणे बरोबर घेऊन जावे लागते. 

 

 

lyuten या ब्रिटीश architekt ने नव्या दिल्लीची वास्तू ८५ वर्षापूर्वी बांधून पूर्ण केली. त्यातील लोकसभेच्या इमारतीमध्ये आणि पडावलीचे मंदीराम्ध्ये असलेले साम्य विलक्षण आहे. त्या सम्बन्धी त्याने कुठेतरी उल्लेख केला असला पाहीजे. ASI मध्ये मध्ये किंवा नेशनल म्यूझीउम मध्ये या बाबतची माहिती मिळू शकेल.
फतेपूर सिक्री येथे अकबर बादशहाने एका साधरणत: दहा फूट उंचीच्या स्त्म्भावर स्वत:चे तख्त व त्याच्या भोवती अष्ट प्रधानांच्या गोलाकार असलेल्या आठ मसनदी अशी रचना केलेली आहे. याची या लेखावरून आठवण झाली.

 

छान आणि नवीन जागा दाखवलीत ."मूर्ती कुठे गेल्या " : ग्वालिअर किल्याच्या पायथ्याशी गुजरी महाल आहे त्याचे आता संग्राहलय केले आहे तेथे बऱ्याचशा मूर्ती ठेवल्या आहेत .

 

हे मंदिर ब्रिटीश अधिकाऱ्यानं बांधलय. ते पण बायकोचा नवस पुर्ण करण्यासाठी.

http://www.agarmalwa.mp.gov.in/wp-content/uploads/2016/08/DSCN3621.jpg

मध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिरासंदर्भातील एक किस्सा खूप लोकप्रिय आहे. असं सांगतात की हे  हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असणारं भारतातील एकमेव मंदिर आहे ज्याचा जीर्णोद्धार एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केला होता.

१८७९ साली ब्रिटिश सैन्य अफगाणिस्तानमध्ये तेथील पठाणांशी लढत होतं. ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व लेफ्टनंट कर्नल मार्टिन हे करत होते. मार्टिन यांची पत्नी मध्य प्रदेशातील आगर मालवा या ठिकाणी वास्तव्यास होती.

लेफ्टनंट कर्नल मार्टिन हे दररोज आपल्या पत्नीला पत्र लिहीत असत आणि आपली ख्यालीखुशाली कळवत असतं. युद्धभूमीवरचा इतिवृत्तांत देखील या पत्रांमध्ये असे, पण

एका दिवसापासून अचानकच मार्टिन यांचे पत्र येणं बंद झालं.

कर्नल मार्टिन

युद्धभूमीवर लढत असलेल्या आपल्या नवऱ्याची खुशाली कळत नसल्याने लेडी मार्टिन काळजीत पडल्या. चिंताग्रस्त राहू लागल्या. आशावेळी गावातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महादेवाच्या मंदिराबद्दल कुणीतरी त्यांना सांगितलं. लेडी मार्टिन यांनी मंदिरात जायचं ठरवलं.

लेडी मार्टिन ज्यावेळी मंदिरात पोहोचल्या त्यावेळी देखील त्या पतीच्या सुरक्षेच्या विचाराने काळजीत होत्या. मंदिरातील पुजाऱ्याने लेडी मार्टिन यांना काळजीचं कारण विचारलं, त्यावेळी त्यांनी पुजाऱ्याला युद्धाबद्दल सांगितलं. आपले पती सुरक्षित असतील की नाही याबद्दल आपण चिंतीत असल्याची माहिती दिली.

मंदिराच्या पुजाऱ्याने मंदिराची आणि महादेवाची महती लेडी मार्टिन यांना सांगितली आणि महादेव कुठल्याही परिस्थितीत आपल्या भक्तांचं रक्षण करतो असं सांगितलं. आपणही महादेवाची भक्ती करावी असा सल्ला पुजाऱ्याने लेडी मार्टिन यांना दिला.

पुजाऱ्याच्या सांगण्यावरून लेडी मार्टिन यांनी ११ दिवसांचं ‘लघुरुद्र अनुष्ठान’ करण्याचा निर्णय घेतला. ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचं पठण त्यांनी सुरू केलं.

आपला पती जर युद्धभूमीवरून सुखरूप परतला तर आपण मंदिराचा जीर्णोद्धार करू असा नवस त्यांनी महादेवाजवळ बोलला.

लेडी मार्टिन यांनी सुरू केलेल्या अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी लेडी मार्टिन यांना एक पत्र मिळालं. पती लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांचं ते पत्र होतं. या पत्रात आपण सुखरूप असल्याचं मार्टिन यांनी पत्नीला कळवलं होतं.

लेफ्टनंट कर्नल मार्टिन यांनी पत्रात लिहिलं होतं की, ” युद्धादरम्यान मी कायम तुला पत्र लिहीत असे पण एके दिवशी अचानक आमच्या सैन्याला पठांणांनी चहूबाजूंनी घेरलं. पठाणांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला. अनेक ब्रिटिश सैनिक मारले गेले. आम्ही युद्ध हरणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण अचानक एक योगी युद्धभूमीवर अवतरला. त्याच्या डोक्यावर लांबच लांब जटा होत्या आणि हातात त्रिशूळ होता. या योगी माणसाचं तेजस्वी रूप आणि युद्धभूमीवरील कौशल्य बघून पठाण युद्धभूमीवरून पळून गेले आणि हारत चाललेलं युद्ध आम्ही जिंकलो. आमचे प्राण देखील वाचले”

काही दिवसांनी लेफ्टनंट कर्नल मार्टिन आगर मालवा येथील ब्रिटिश छावणीत परतले त्यावेळी पत्नीने त्यांना आपण महादेवाजवळ बोललेल्या नवसाविषयी सांगितलं. त्यामुळे मार्टिन पत्नीसह महादेवाच्या दर्शनाला गेले. मंदिरातील महादेवाची मूर्ती आणि युद्धभूमीवरील योगी यांमध्ये कर्नल मार्टिन यांना विलक्षण साधर्म्य आढळलं. ती मूर्ती बघताच मार्टिन महादेवाच्या चरणी लीन झाले आणि ते देखील महादेवाचे भक्त झाले.

पत्नीचा नवस पूर्ण करण्यासाठी मार्टिन यांनी १५००० रुपये दान दिलं आणि त्यातूनच आगार मालवा येथील बैजनाथ महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरातील शिलालेखवर आज देखील या गोष्टीचा उल्लेख बघायला मिळतो.

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...