भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य. २०० ६’ उ. ते २४० ४२’ उ. ६८० ४’ पू. ते ७४० २४’
पू. क्षेत्रफळ १,९५,९८४ चौ.किमी. लोकसंख्या २,६६,९७,४७५ (१९७१). याच्या
उत्तरेस पाकिस्तान व राजस्थान पूर्वेस राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र
दक्षिणेस महाराष्ट्र व अरबी समुद्र आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे.
भारताच्या ६·१% क्षेत्रफळ आणि ४·८ % लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्याची
राजधानी गांधीनगर ही आहे.
इतिहास : प्रागइतिहास
काळापासून मानववस्ती असल्याचे पुरावे गुजरातेत ठिकठिकाणी सापडले आहेत.
अतिप्राचीन मानवांच्या वसाहतींच्या अवशेषांनंतर सिंधू खोरे संस्कृतीशी
संबंध सिद्ध करणारे सु. ३,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष अहमदाबाद जिल्ह्यात
धंधुकाजवळ लोथल व सौराष्ट्रातील रोझ्डी येथील उत्खननांत मिळाले आहेत.
हडप्पाकालिन ढोलविरा शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात स्थान मिळालं
आहे. हे शहर सध्याच्या गुजरात राज्यात असून त्याचे अवशेष या ठिकाणी पहायला
मिळतात. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीची ही वसाहत आहे.ढोलविरा हे शहर
आर्चिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला (ASI) सन १९६७-६८ मध्ये सापडलं होतं.
सिंधू खोऱ्यातील संस्कृतीशी संबंधित असलेल्या भारतातील या पाच मोठ्या
साईट्स आहेत. ही जगातील सर्वांत प्राचीन वसाहत किंवा संस्कृती म्हणून ओळखलं
जातं. ख्रिस्तपूर्व २६५० मध्ये ही शहरं वसवली गेली तर ख्रिस्तपूर्व
२१००मध्ये संथपणे या संस्कृतीच्या अधोगतीला सुरुवात झाली.मोहें-जो-दडो आणि
हडप्पाच्या समकालीन मातृदेवता पूजक संस्कृतीचे पुरावे आहेत, असे तज्ञांचे
मत आहे. फार पूर्वीपासून गुजरातचा सागरी व्यापार दूरदूरच्या देशांशी चालत
होता, याची साक्ष राज्याच्या विविध भागांत सापडलेली ग्रीक व रोमन नाणी
देतात. गुजरात हे नाव गुज्जरठ्ठ या प्राकृत अथवा गुर्जर राष्ट्र या संस्कृत
नावापासून आले. मध्य आशियातून हूणांबरोबर भारतात आलेले मुळचे गुर्जर प्रथम
पंजाबात स्थायिक होऊन हळूहळू दक्षिणेकडे सरकत, अबू पर्वताभोवती राहू लागले
असा समज आहे. त्यांच्या प्रदेशाला गुजरात हे नाव दहाव्या शतकापासून रूढ
झाले तथापि तो प्रदेश अधिक प्रमाणात पश्चिम राजस्थानच्या मिनमाळच्या आसपास
होता. ज्ञात इतिहासारंभी चंद्रगुप्त मौर्याच्या सेनेने गुजरातची लहानलहान
राज्ये साम्राज्याला जोडून घेतली. मौर्य सम्राटाने नेमलेला पुष्यगुप्त
वैश्य हा गिरिनगर अथवा गिरनार-जुनागढ येथे ख्रि. पू. तिसऱ्या शतकात
राज्यपाल होता. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक याने गिरनारच्या विख्यात
शिलालेखाने या भागात आपली स्मृती कायम ठेवली आहे. मौर्यामागून काही
वर्षांनी डीमीट्रिअसच्या नेतृत्वाखाली घुसलेल्या ग्रीकांची सत्ता येथे
होती. ख्रिस्तोत्तर पहिल्या चार शतकांपर्यंत गुजरातवर क्षत्रपांचे राज्य
होते. त्यांच्यापैकी इ.स. १५० मधल्या रुद्रदामनने अशोकाच्या शिलालेखाखाली
आपला लेख कोरवून ठेवला आहे. त्याच शिळेवरचा तिसरा लेख क्षत्रपानंतर
गुजरातचे स्वामी झालेल्या गुप्त सम्राटांपैकी स्कंद गुप्ताचा इ.स. ४५२ मधला
आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाअखेर गुप्तसत्ता दुबळी झाली, तेव्हा
त्यांचाच एक सेनापती मैत्रक याने सौराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापून,
वल्लभीपूर ही आपली राजधानी केली. मैत्रकाच्या प्रबळ राज्यात गुजरातचा व
माळव्याचाही बराच प्रदेश होता आणि वैभवाबरोबर विद्येचाही उत्कर्ष झाला
होता. वल्लभीपूर येथे नालंदाच्या तोडीचे विद्यापीठ असल्याची नोंद आहे.
वल्लभीच्या ऱ्हासानंतर त्या राज्याचे उत्तर गुजरातमधील मांडलिक चावडा
राजपूत वनराजाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झाले व इतिहासप्रसिद्ध
अनहिलपूरपाटण किंवा अनहिलवाडा ही त्यांची राजधानी झाली. शेवटचा चावडावंशीय
सामंतसिंह याने ज्या सोळंकीवंशीय मूळराजाला दत्तक घेतले, तो शूर असून
विद्येचा पुरस्कर्ता होता. त्याने उत्तरेतून व देशाच्या अन्य भागांतून अनेक
विद्वान ब्राह्मण आणवून गुजरातेत स्थायिक करवले. त्याने जुनागढच्या
गृहरिपूंचा आणि कच्छच्या लाखो फलाणींचा पराभव करून त्यांची राज्ये घेतली.
सोळंकी वंशाच्या दहा राजांपैकी बाराव्या शतकातले सिद्धराज जयसिंह व
कुमारपाल हे विख्यात झाले. प्रभासतीर्थाचा सोमनाथ हे सोळंकीचे आद्य दैवत.
ते जरी दोनदा भ्रष्ट होऊन लुटले गेले, तरी कुमारपालाने ते पुन्हा
बांधले होते. सोळंकीचा अस्त होताच त्यांचे मांडलिक वाघेला उदयास आले व
त्यांनी तेरावे शतकभर गुजरातवर राज्य केले. त्याच्या आठ राजांपैकी वीरधवल व
विशालदेव हे प्रसिद्ध आहेत. वीरधवलाच्या कारकीर्दीतच त्याचे अमात्य
वस्तुपाल व तेजपाल यांनी अबू, गिरनार, शत्रुंजय व कुंभारिया येथील सुंदर
देवळे बांधली. विशालदेवाने उत्तर गुजरातमधील विशालनगर स्थापन केले आणि डभई
येथील वैद्यनाथ मंदिर व भारतातील शुद्ध हिंदू स्थापत्य शैलीचा एकमेव म्हणून
प्रसिद्ध असलेला भूमिदुर्ग बांधला. करण वाघेला या शेवटच्या रजपूत राजाचा
पाडाव करून, गुजरातवरील हिंदू राजवट अलाउद्दीन खल्जीने संपुष्टात आणली. मग
इ.स. सु. १३०० पासून ४०० वर्षेपर्यंत गुजरातवर मुसलमानी अंमल होता.
त्याच्या सुरुवातीच्या काळात हिंदूंच्या जुन्या राजधान्यांचा आणि पवित्र
स्थानांचा सर्रास विध्वंस झाला. पहिली अदमासे १०० वर्षे गुजरातवर
दिल्लीच्या खल्जी व तुघलक सुलतानांची सत्ता होती. १४०९ मध्ये पहिल्या
अहमदशाहने गुजरातचे स्वतंत्र राज्य स्थापन करून, अहमदाबाद शहर वसवले. तो
आणि पहिला महमूद (महमूदशाह बेगडा) हे गुजरातच्या १६६ वर्षांतील १५
सुलतानांपैकी सर्वांत नामवंत होऊन गेले. दोघांच्याही राजवटी दीर्घकालीन,
यशस्वी व भरभराटीच्या झाल्या आणि पूर्वी लुटींनी व जाळपोळीने झालेले
गुजरातचे नुकसान त्यांच्या वैभवसंपन्न कालखंडात भरून निघाले. १५७३ मध्ये
अकबराने गुजरात जिंकून, तो मोगल राज्याचा एक सुभा बनवला. तेव्हापासून १८५
वर्षांपर्यंत बहुधा राजघराण्यातील सुभेदार आणि ठाणेदार यांच्यामार्फत
गुजरातवर मोगलांचे राज्य होते. औरंगजेबाच्या मरणानंतर थोड्याच दशकांत
मोगलांना हुसकावून मराठे गुजरातेत सत्तेवर आले. गायकवाडांनी गुजरातच्या
बऱ्याच भागांत आणि सौराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. यूरोपीय लोकांपैकी
गुजरातशी पहिला संपर्क पोर्तुगीजांचा आला. १५३७ मध्ये त्यांनी
सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील दीव बेटावर पाय रोवले व नंतर कित्येक
वर्षे अरबी समुद्रकिनाऱ्यावर आरमारी सत्ता गाजवली. तथापि त्यांच्यामागून
लवकरच दाखल होऊन, सुरतेस वखार घालणाऱ्या इंग्रजांनी देशभर हळूहळू आपला जम
बसवीत पोर्तुगीजांना निष्प्रभ केले, सागरी व्यापाराचा कबजा मिळवला आणि
भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली. ती सत्ता १९४७ पर्यंत टिकली. त्या आधी
अर्धशतकापासून भारतीयांची स्वराज्यासाठी चळवळ चालू झाली होती. १९२० मध्ये
गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या अभिनव तंत्राने
अहिंसात्मक आंदोलनाचा पहिला प्रयत्न करून देशभर जागृती केली. थोड्याच
वर्षांनंतर बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांचा
राजकीय क्षितिजावर उदय झाला. ते गांधीजींचा उजवा हात बनले. १९३० च्या
मिठाच्या सत्याग्रहासाठी अहमदाबादजवळील साबरमती आश्रमातील १२ वर्षांचे
वास्तव्य सोडून, महात्माजींनी दांडीमोर्चाने स्वातंत्र्य-आंदोलनाचे दुसरे
पर्व सुरू केले. त्यांच्या प्रत्येक हाकेला गुजरातच्या जनतेने हार्दिक
प्रतिसाद दिला. गांधीजींची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून गुजरातला असाधारण
महत्त्व आले. १९४२ च्या अंतिम स्वातंत्र्य संग्रामात गुजरात एकजुटीने
महात्माजींच्या मागे होता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यातून
गुर्जर नरेश गायकवाडांच्या बडोदे राज्याप्रमाणे इतरही अनेक लहानमोठ्या
संस्थानांची प्रजा वगळल्यासारखी झाली होती. त्या प्रजेच्या आंदोलनाने उग्र
स्वरूप घेण्याआधीच नवानगरच्या जामसाहेबांसारख्या सूज्ञ व दूरदृष्टी
संस्थानिकांच्या नेतृत्वाने गुजरात व सौराष्ट्रातली, पूर्वी ब्रिटिशांशी
स्वतंत्र तहनामे असलेली संस्थाने, भारतीय संघराज्यात विलीन झाली. अपवाद
म्हणून पाकिस्तानला मिळू पाहणाऱ्या जुनागढच्या नबाबाला त्याच्या प्रजेने
हाकलून देऊन संस्थान भारतात आणले. १९४८ मध्ये सौराष्ट्राचा एक संयुक्त
संस्थान संघ होता व गुजरातची इतर संस्थाने तत्कालीन मुंबई राज्याला जोडलेली
होती. १९५६ च्या राज्यपुनर्घटनेत कच्छ-सौराष्ट्रासकट गुजरात द्विभाषिक
मुंबई राज्यात आले आणि १९६० साली गुजरात वेगळे होऊन पंधरावे राज्य म्हणून
भारतीय संघराज्यात दाखल झाले. अहमदाबाद, बडोदे, बनासकांठा, भडोच, मेहसाणा,
खेडा, पंचमहाल, डांग, सुरत, साबरकांठा, जामनगर, अमरेली, जुनागढ, कच्छ,
राजकोट, सु रेंद्रनगर, भावनगर, बलसाड आणि गांधीनगर या राज्याच्या १९
जिल्ह्यांत, १८६ तालुके व अहमदाबाद महानगरपालिकेसह ५९ नगरपालिका आहेत.
शिवाय ४९ नगरपंचायती व ११,५६२ ग्रामपंचायती स्थानिक कारभार पाहतात. भारतीय
संविधानानुसार राज्यशासनाने सांभाळण्याचा खात्यांचा कारभार पाहणारी
गुजरातची अंतर्गत शासनव्यवस्था सामान्यतः देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे.
राजधानी तूर्त अहमदाबाद असून, तिच्यापासून थोड्या अंतरावर गांधीनगर ही नवी
राजधानी बांधण्यात येत आहे. राज्याला विधान परिषद नाही. विधानसभेच्या १६८
सदस्यांपैकी बहुसंख्य, ९३ काँग्रेस पक्षाचे असून तो पक्ष अधिकारारूढ आहे.
त्या खालोखाल संख्याबल स्वतंत्रपक्षाचे, ६६ आहे. लोकसभेवर २४ व राज्यसभेवर
११ सदस्य गुजरात राज्यातून निवडून दिले जातात. भूरचना : गुजरात
राज्यात १,१२० मी.पेक्षा उंच प्रदेश कोठेही नाही. तथापि या राज्याचे (अ)
उत्तरेकडील व पूर्वेकडील आणि कच्छ-काठेवाडमधील डोंगराळ प्रदेश, (आ)
सौराष्ट्राचे म्हणजे काठेवाडचे पठार, (इ) मैदानी प्रदेश व (ई) किनारी सखल
प्रदेश व कच्छचे रण असे चार स्वाभाविक विभाग पडतात. (अ) उत्तरेकडे
साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अरवलीचे फाटे आलेले आहेत. त्यांच्या
पश्चिम भागातून बनास व पूर्व भागातून साबरमती नद्या वाहतात. पूर्वेकडील
डोंगराळ प्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांत विंध्याचे व सातपुड्याचे फाटे
आलेले असून उत्तर भागात रतनमाळ व पावागढ (८२९ मी.) डोंगर असून त्यांच्या
उत्तरेस मही व पानम नद्या आहेत व दक्षिणेस नर्मदा व तिच्या ओरसंग व कर्जन
या उपनद्या आहेत. मध्य भागात छोटा उदेपूर व राजपीपला डोंगर असून त्यात
नर्मदा व तापी यांच्या दरम्यानचा डोंगराळ प्रदेश येतो. यात मठसर हे ८०० मी.
उंचीचे शिखर आहे. तापीच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा किनाऱ्याला
समांतर गेलेल्या आहेत. त्यांत डांग व धरमपूरचे डोंगर अधिक उंच आहेत.
सह्याद्रीवरून पूर्णा, अंबिका, औरंगा, पार व दमणगंगा या नद्या पश्चिमेकडे
खंबायतच्या आखातास मिळतात. कच्छमध्ये पश्चिमपूर्व गेलेल्या तुटक
डोंगरटेकड्यांच्या तीन रांगा आहेत. उत्तरेकडील रांग कच्छच्या रणातील
बेटांच्या रूपाने दिसते. त्यातील पछम बेटावरील डोंगर कच्छमध्ये सर्वांत उंच
(४६५ मी.) आहे. काठेवाडमधील उत्तरेकडील मंडा डोंगराळ प्रदेश राजकोटच्या
पूर्वेस असून त्याचे चोटिल शिखर ३४० मी. उंच आहे. हा भाग पश्चिमेकडील भादर व
पूर्वेकडील शत्रुंजय या नद्यांदरम्यानच्या एका अरुंद डोंगराळपट्टीने
दक्षिणेकडील गीर रांगेशी जोडलेला आहे. गीर हा अनेक टेकड्यांचा समुदाय असून
त्यात सारकाला (६४३ मी.) सर्वांत उंच व आग्नेयीकडील नंदीवेला (५२९ मी.)
त्याखालोखाल आहे. गिरनारचा पर्वत मैदानात अलग उभा असून त्याचे गोरखनाथ हे
१,११७ मी. उंचीचे शिखर गुजरातमध्ये सर्वांत उंच आहे. या सर्व डोंगराळ
प्रदेशांच्या पायथ्याचा ७५ मी. ते १५० मी. उंचीचा उताराचा प्रदेश १० ते २५
किमी. रुंदीचा असून त्यावर काही भागात गवत व काही भागात अरण्ये आहेत. (आ)
सौराष्ट्र पठार ७५ ते ३०० मी. उंचीचे असून ते लाव्हाचे बनलेले आहे. ते
मध्यवर्ती डोंगराळ भागाकडे उंचावत गेले असून त्यावरून उत्तरेकडील मच्छू व
अजी, पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय व भगवा या नद्या वाहतात. या
पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ६० मी.पर्यंत रुंदीच्या व ६०
किमी.पर्यंत व त्यापेक्षाही जास्त लांबीच्या अनेक भित्ती हे होय. (इ)
पश्चिमेस किनारी सखल प्रदेश व पूर्वेस डोंगर पायथ्याचा प्रदेश यांदरम्यान
गुजरातच्या मुख्य भूमीचे अत्यंत सपाट गाळमैदान आहे. ते सु. ९६ किमी. रुंद व
दक्षिणोत्तर ४०० किमी. लांबीचे आहे. याच्या उत्तरभागात वालुकामय आणि खेडा
जिल्ह्याच्या काही भागात वातोढ मृदा असून दक्षिणभागात नर्मदातापीच्या
खोऱ्यात काळी रेगुड मृदा आहे. या मैदानातून साबरमती, मही, नर्मदा व तापी या
प्रमुख नद्या वाहतात. (ई) दक्षिण काठेवाडाखेरीज गुजरातचा किनारा भरतीच्या
वेळी पाण्याखाली जाणाऱ्या पंकपाटांनी व खारजमिनींनी भरलेला आहे. कच्छच्या
पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवर अशा १०—१२ किमी. रुंदीच्या दलदली आहेत. भरतीचे
पाणी ओहोटीच्या वेळी त्यावरील पंकिल प्रवाहमार्गांनी परत जाते. या
पंकपाटांच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या टेकड्या आहेत. कच्छच्या आखाताच्या
दोन्ही बाजूंचा किनारी प्रदेश असाच आहे. काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावर
पंकपाट आढळत नाहीत परंतु दलदली मात्र आहेत. पोरबंदर व भादर नदीचे मुख
यांदरम्यानची दलदल विस्तीर्ण आहे. खंबायतच्या आखाताचा किनारा खाड्यांनी
युक्त आहे. येथेही दलदली असून त्यांत मधूनमधून बेटे आहेत. खंबायतच्या
आखाताचा सर्व भाग उत्थान पावलेला आहे. एके काळी खंबायतचे आणि कच्छचे आखात
निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे.
१८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी
कायमचे जोडले गेले. १९५६ मध्ये कच्छमधील अंजार येथे मोठा भूकंप झाला व २३
मार्च १९७० च्या भूकंपाने दक्षिण गुजरातचे बरेच नुकसान झाले होते.
खंबायतपासून बलसाडपर्यंतचा सर्व किनारा मही, नर्मदा, किम व तापी आणि इतर
नद्यांच्या खाड्यांनी भरलेला आहे. त्यावरही पंकपाट आढळतात. गुजरातला इतर
कोणत्याही राज्यापेक्षा जास्त लांबीचा २,५६० किमी. किनारा लाभलेला असून
त्यावर कांडला, बेडी, ओखा, पोरबंदर, वेरावळ, भावनगर, खंबायत, भडोच, सुरत ही
प्रमुख बंदरे आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दीव हे गोवा, दीव, दमण
या केंद्रशासित प्रदेशाचे बेट आहे. कच्छचे रण : कच्छच्या उत्तरेस मोठे रण व
पूर्वेस छोटे रण या विस्तीर्ण खाऱ्या दलदली सु. २१,००० चौ. किमी. क्षेत्र
व्यापतात. मोठे रण २५६ किमी. पूर्वपश्चिम व १२८ किमी. दक्षिणोत्तर
विस्ताराचे आहे. दोन्ही रणे पावसाळ्यात पाण्याखाली जातात. एरवी ती कोरडी
असतात व त्यांतून पायवाटाही जातात. छोट्या रणातील पाणी नल सरोवरामार्गे
खंबायतच्या आखातात येते. दोन्ही रणे म्हणजे समुद्रबूड जमिनीचा उचलला गेलेला
भाग आहे. बनास, सरस्वती व लुनी या कच्छच्या रणास येऊन मिळतात.
सौराष्ट्रातील नल व कच्छमधील नारायण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांखेरीज
काही किरकोळ तळी गुजरातेत आहेत परंतु मोठे तलाव नाहीत. जीर्ण स्फटिकजन्य
खडकापासून बनलेल्या मृदा निकृष्ट आहेत. तथापि बांधकामास उपयोगी असे
पोरबंदर दगडासारखे व सिमेंटला उपयुक्त असे चुना खडकासारखे मूल्यवान
खनिजप्रकार जमिनीतून मिळतात. सौराष्ट्रातील नद्या पावसाळ्यात वाहून एरवी
कोरड्या असतात. बाकी गुजरातच्या मृदा किनाऱ्याला दलदलीचा रेतीमिश्रित गाळ,
सपाटीवर जलोढ नदीगाळ, भडोच व सुरत जिल्ह्यांत काही रेगुड माती, कच्छमध्ये
आणि उत्तर गुजरातेत रेताड व वातोढ माती, अशा प्रकारच्या आहेत. राज्यातील
सर्वांत महत्त्वाचे खनिज गेल्या दशकात सापडलेले खनिज तेल व वायू होत.
अंकलेश्वर, कलोल व खंबायतखेरीज अहमदाबादजवळही त्याचा प्रचंड भूमिगत साठा
असण्याची शक्यता दिसली आहे. कच्छ व सौराष्ट्रात सु. १·७५ कोटी टन बॉक्साइट,
शेकडो कोटी टन चुनाखडक, चिनी माती व इतर जातींची चिकण माती आहे. छोटा
उदेपूर भागात आशियातील अत्यंत मोठा, १ कोटी मे. टनाहून जास्त फ्ल्यूओराइटचा
संचय, कच्छमधील लखपतजवळील व भडोच जिल्ह्यात मिळू सु. २४ लाख टन लिग्नाइट,
शिवाय क्वॉर्ट्झ, डोलोमाइट, फ्रोट, कॅल्साइट, जिप्सम व मँगॅनीज ही खनिजे
गुजरातेत उपलब्ध आहेत.
उत्तर
भाग कर्कवृत्तावर असणाऱ्या गुजरातचा प्रदेश बव्हंशी उष्ण कटिबंधातच येतो.
कच्छ सौराष्ट्रासारखे तुटक भूभाग, सागरसानिध्य आणि वेगवेगळ्या भागांतील
उंचसखलपणा या कारणांनी या राज्यातल्या तपमानात व पर्जन्यात विविध प्रकार
आहेत. दक्षिण गुजरातेत ७५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो आणि किमान व कमाल
तपमानात आत्यंतिक फरक नसतो, डांगमध्ये २०० सेंमी. पाऊस पडतो. उत्तर
गुजरातेत पाऊस ५० ते १०० सेंमी. असतो व थंडीत तपमान बरेच खाली जाते. उत्तर व
पश्चिम सौराष्ट्रात पाऊस ६७ सेंमी.पेक्षा कमी, हवा शुष्क व थंडी कडक, तर
दक्षिण व पूर्व सौराष्ट्रात पाऊस थोडा अधिक व हवामानही तुलनेने समशीतोष्ण
असते. कच्छच्या वैराण प्रदेशात पाऊस फारच कमी असतो, किमान तपमान १५·६० से. ते २१·१० से. तर बाकीच्या गुजरात राज्यात ते २१·१० से. ते २३·९० से.इतके असते. कमाल तपमान पूर्व सौराष्ट्र, कच्छ व उत्तर गुजरातेत २९·४० से. ते ३२·२० से. आणि कच्छ व सौराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांना व मध्य गुजरातेत २६·७० से. ते २९·४० से. असे राहते. अहमदाबादचे किमान तपमान १४० से. ते २७० से., कमाल तपमान २९० से. ते ४२० से. व सरासरी ३४·७० से.
याप्रमाणे असते. राज्यात वनप्रदेश थोडा आहे. सौराष्ट्रातील गीरच्या
जंगलाखेरीज भडोच व सुरत जिल्ह्यांचे पूर्वभाग आणि डांग जिल्हा एवढ्याच
भागात जंगले आहेत. उल्लेखनीय प्राणी म्हणजे आशिया खंडात फक्त गीरच्या
जंगलात आढळणारे अवशिष्ट सिंह व नल सरोवरावर दरवर्षी उतरणारे हंसक
(फ्लॅमिंगो) हे स्थलांतरी पक्षी आहेत.
लोक व समाजजीवन : गुजरातचे
बहुसंख्य म्हणजे ८०% च्यावर लोक जरी हिंदू असले, तरी त्यांच्यात अनुसूचित
जाती व अनुसूचित जमाती बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग,
दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे
नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी,
वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव,
पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक
समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील
मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत.
पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती
असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व
प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व
जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे. हिंदूंची दैवते द्वारकेचा
कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व
जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या
अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या
जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले
आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात
केंद्रित झाले आहेत. गुजरातमधील बहुसंख्य मुसलमानही गुजरातीच आपली भाषा
मानतात व काही पंथांचे धर्मग्रंथदेखील गुजराती लिपीत आहेत. गुजरातची जनता
परधर्म सहिष्णू असली, तरी जातिभेदाच्या बंधनातून मुक्त नाही व अस्पृश्यता
निर्मूलनाची प्रगतीही खुद्द महात्माजींच्या गुजरातेत अजून म्हणण्यासारखी
दिसत नाही. अनुसूचित जाती व ‘साळीपरज’ जमाती वगळता बाकीचा गुजराती समाज
एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतो. व्यापारी वर्ग अन्य कोणत्याही
राज्यापेक्षा येथे जास्त असल्याने ‘महाजन’ वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असते.
या वैश्यप्रधान संस्कृतीत अनुत्पादक विद्येला व व्यापारेतर पराक्रमाला
महत्त्व नसल्याने, ब्राह्मणक्षत्रियांचे स्थान दुय्यम आहे. ज्ञातीचे
नियंत्रण मानण्याची रूढी सामाजिक जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे.
तथापि परंपरागत आचारविचारांच्या पद्धतीत व्यावहारिक दृष्ट्या लवचिकपणाही
आला आहे व उच्चनीचतेच्या कल्पना जन्मापेक्षा आर्थिक स्थितीवरूनही ठरू
शकतात.
व्यापारात
अन्यत्र कमाई करून आपल्या गावी चांगली घरे बांधण्याची प्रवृत्ती गुजरातेत
असल्याने इतर राज्यातील खेड्यांपेक्षा इकडची खेडी अधिक संपन्न
वाटतात. खेड्यातील सामान्य घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपराची आणि
बऱ्यापैकी घरे विटांनी बांधलेली व कौलारू असतात. लहानमोठ्या शहरांमधून
मात्र सिमेंट काँक्रीटचा वापर सर्रास आढळतो. अनेक गावांचे जुन्या तटबंदीचे
भाग अजून शिल्लक आहेत. गुजराती लोक अधिकांश शाकाहारी असून खेड्यात बाजरी वा
ज्वारीची भाकरी, डाळी, तेल व भाज्या त्यांच्या भोजनात असतात. नागरी
वस्तीत गहू, तांदूळ, दूधदुभते व साखर यांचा समावेश रोजच्या आहारात नित्य
असतो. खेड्यातून पुरुषाचा वेश धोतर, कोपरी, सदरा आणि प्रसंगी अंगरखा, साफा
किंवा पागोटे व बायकांचा चोळी, घागरा, उजव्या खांद्यावर पदराची साडी किंवा
ओढणी असा असतो. तसेच पायात मोठाले पोकळ वाळे, हस्तिदंती बांगड्या, गळ्यात
वजनदार अलंकार आणि दंडांवर व नाकाकानांत ठळक दागिने घालण्याची आवड ग्रामीण
स्त्रियांत आढळते. शहरी वस्तीत पुरुष धोतर, शर्ट, डगला व टोपी घालतात आणि
स्त्रिया उजव्या खांद्यावर पदर असलेली सहावारी साडी नेसतात. उत्तर गुजरातेत
व कच्छ-सौराष्ट्रात लोकांच्या पेहरावावर राजस्थानची छाप दिसून
येते. त्याचप्रमाणे त्यांची राहणी मध्य व दक्षिण गुजरातपेक्षा वेगळी
असते. उत्तर गुजरात व कच्छ-सौराष्ट्राचे लोक जास्त काटक, कष्टाळू व कडवे ,
तर मध्य व दक्षिण गुजरातचे सौम्य, हौशी व सुखवादी वाटतात.
गुजराती
भाषा नवव्या ते दहाव्या शतकांत शौरसेनीपासून विकसित झाली, असे अभ्यासकांचे
मत आहे. संस्कृत-प्राकृतशी संबंध असल्यामुळे तत्सम व तद्भव शब्दांचा भरणा
तिच्यात आहे. त्याशिवाय फार पूर्वीपासून व्यापाराच्या निमित्ताने
इराण-अरबस्तानशी संबंध आल्यामुळे त्या देशांच्या भाषांतले, पोर्तुगीजांशी
संपर्क आल्यामुळे त्यांचे आणि मराठी-कन्नडच्या शेजारामुळे त्या भाषांचे,
असे अनेकविध शब्द गुजरातीत आले आहेत. देवनागरीतील काही अक्षरांचा आकार
बदलून व शिरोरेखा वगळून गुजराती लिपी बनली आहे. जुने कवी या भाषेला प्राकृत
किंवा अपभ्रंश म्हणत. महाकवी प्रेमानंदाने हिला प्रथम गुजराती हे नाव
दिले. तिचा विकास दहाव्या शतकापासून होऊ लागला. तेव्हापासून गुजराती
साहित्याची निर्मिती होऊ लागली. प्राचीन गुजराती साहित्य ‘गौर्जरी अपभ्रंश’
भाषेतील आहे. दहाव्या शतकात रासो हा व्रज-मारवाडी भाषांतील राजस्तुतिपर
काव्यप्रकार सुरू झाला. त्याचा उपयोग जैन कवींनी धर्मप्रचारासाठी केला.
अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत धार्मिक व नैतिक स्वरूपाच्या तरंगलोलासारख्या रचना निर्माण झाल्या. भरतेश्वर बाहुबलिरास हा जैनरास सर्वांत प्राचीन आहे. त्याशिवाय सिरिस्थूलिभद्रफागूसारखी
फागुकाव्ये किंवा ऋतूपरत्वे गाणी व बारमासी हा ऋतुगीतांचाच एक प्रकार जैन
कवींनी व नंतर उत्तरकालीन कवींनीही हाताळला. त्या उत्तर कालातल्या ऐतिहासिक
किंवा चरित्रात्मक आख्यानकाव्यांना प्रबंध म्हणत. इ. स. १४५६ मधील
झालोरच्या पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध विख्यात आहे. दुसरा कालखंड
गुर्जर भाषेच्या भक्तियुगाचा. त्यात नरसी मेहता, मीरा, आखो, भगत,
प्रेमानंद, पुरोगामी विचारसरणीचा शामळ, दयाराम, भालण, भीम अशा अनेकांनी
काव्ये रचली. त्यात नरसी-प्रेमानंद-दयाराम या त्रिमूर्तींनी गुजरात काव्यात
श्रेष्ठ स्थान मिळविले. अर्वाचीन कालखंड १८५० मध्ये सुरू झाला. त्यांत
नवप्रेरणेचा उद्गाता नर्मद, वेन चरित्रकार दलपतराम, विद्वान साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया, प्रेमकवी कलापी, कान्त, सरस्वतीचंद्र ह्या
युगप्रवर्तक कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी, भावकवी नानालाल,
कांदबरीकार कन्हैयालाल मुनशी यांची नावे उल्लेखनीय आहेत. महात्मा
गांधींच्या लेखनाने तर गुजराती भाषेत नवे गांधीयुग अवतरले. मोटेचा नाडा
धरणाऱ्या माणसालाही समजेल, अशी सुबोध गुजराती भाषा लिहिण्यास कृतसंकल्प
होऊन त्यांनी ती समाज प्रबोधनासाठी राबवली. त्यांचे समकालीन व अनुयायी काका
कालेलकर, किशोरलाल मशरूवाला, महादेवभाई देसाई, रामनारायण पाठक व धूमकेतू
अशांच्या लेखनाने दुसऱ्या महायुद्धकालापर्यंत गुजराती भाषा संपन्न झाली.
१९४० नंतरच्या काळात कादंबरीकार रमणलाल देसाई, चुनीलाल मडिया, आचार्य
गुणवंतराय, पन्नालाल पटेल कथालेखक गुलाबदास ब्रोकर, ईश्वर पेटलीकर नाटककार
चंद्रवदन मेहता विनोदलेखक ज्योतिंद्र दवे टीकाकार विजयराय वैद्य,
विष्णुप्रसाद त्रिवेदी सौराष्ट्राचे सव्यसाची साहित्यकार झवेरचंद मेघाणी
त्याचप्रमाणे उमाशंकर जोशी, राजेंद्र शाह, निरंजन भगत अशा वाङ्मयसेवकांनी
गुजराती भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे.
कला व क्रीडा : गुजरातमधील
हस्तकलांत मातीची भांडी, सुरती जरीकाम, कच्छी जडावकाम, पाटण येथील गोमेद
(अकीक) अलंकार, अखेडा लाखकाम, पालनपूरचा सुंगधी माल आणि अहमदाबाद व इतर
ठिकाणचे कोरीव लाकूडकाम उल्लेखनीय आहेत. गुजरातच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य
बाराव्या ते पंधराव्या शतकांतील जैन ग्रंथांत व नंतर पंधराव्या शतकातील
हिंदू पोथ्यांत मिळालेल्या चित्रांतून आढळते. राजपूत शैली आधीची ही
‘दक्षिणी राजस्थान’ शैली खास गुजरातची मानण्यात येते. ‘शिलावत’ शैलीतील
कच्छ व सौराष्ट्रातील भित्तिचित्रेही गुजरातच्या प्रादेशिक चित्रकलेची
स्वतंत्र शैली दाखवितात. आधुनिक काळात गुजराती चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन
लाठीनरेश मंगलसिंगजी, ब्रिजलाल भगत, खोडीदार परमार, आचार्य रविशंकर रावळ,
श्यावक्ष चावडा, कनू देसाई आदी चित्रकार ख्याती पावले आहेत. गुजरातच्या
रंगभूमीची परंपरा अंबाजी-बहुचराजी या देवींच्या उत्सवातून होणाऱ्या ‘भवाई’
नामक प्रहसनात्मक नाट्यप्रकाराइतकी जुनी आहे. आधुनिक रंगभूमीची सुरुवात
गुजरातेत १८५०च्या सुमारास झाली. त्या कामात पारशी मंडळींनी पुढाकार
घेतला. हौशी नाट्यप्रयोगापासून सुरुवात होऊन, नंतर हळूहळू धंदेवाईक नाटक
मंडळ्या नाटके करू लागल्या. प्रथम रूपांतरित नाटके होत पण लौकरच स्वतंत्र
कृती होऊ लागल्या. १८६८ पासून नर्मद, मणिलाल त्रिभुवनदास, प्रभुलाल
द्विवेदी, कन्हैयालाल मुनशी, चंद्रवदन मेहता यांच्या नाटकांनी गुजराती
रंगभूमी गाजविली. गुजरातच्या परंपरागत सामूहिक क्रीडा, रास व गरबा ही
नृत्ये आणि मार्गी व देसी हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. खेळ व करमणूक
भक्तीवर आधारल्यामुळे लोकनृत्ये व समूहगायने यांत स्त्री-पुरुषांच्या
संमिश्र समाजाला निःसंकोचपणे भाग घेता येतो. व्यापारी साहस, सुखोपभोग,
दानशूरता, कला, पुरस्कार, व्यवहारचातुर्य व श्रद्धाळूपणा ही गुजरातची विशेष
लक्षणे मानता येतील.
सांस्कृतिक भारत : गुजरात
गुजरातची
राजधानी गांधीनगर असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ १,९६,०२४ चौरस किमी
इतके आहे. अहमदाबाद हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. २०११च्या
जनगणनेनुसार गुजरातची लोकसंख्या ६,०३,८३,६२८ इतकी आहे. राज्याची साक्षरता
७९.३१टक्के आहे. राज्याची अधिकृत भाषा गुजराती असून हिंदी आणि इंग्रजी
भाषेतही व्यवहार केले जातात. राज्यात ३३ जिल्हे समाविष्ट आहेत. गुजरात
राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी करण्यात आली. गुजरात हे भारताच्या पश्चिम
प्रदेशातील राज्य आहे. महात्मा गांधी हे १९१७ ते १९३० पर्यंत याच राज्यातील
साबरमती आश्रमात रहात असत.
गुजरातमध्ये द्वारका, सोमनाथ, पालिटना,
पावागड, अंबाजी, भद्रेश्वर, श्यामलजी, तरंग, गिरनार ही महत्त्वाची धार्मिक
स्थळे आहेत. पोरबंदर हे महात्मा गांधींचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक
महत्त्व आहे. पाटणपुरा, सिद्धपूर, घुमली, दाभोई, वाडनगर, मोधेरा, लोथल व
अहमदाबाद ही शहरेही ऐतिहासिक. अहमदपूर-मांडवी, चोरवाड व तिथल हे गुजरातची
सुंदर समुद्रकिनारे. सतपुरा, सिंहाचे अभयारण्य, गिरचे अभयारण्य जंगल व
रानटी गाढवांचे अभयारण्य (कच्छ) आदी पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे
आहेत.
अलंग हे निकामी जहाजांची विल्हेवाट लावण्याचे
गुजरातमधील भारतातील एकमेव बंदर आहे. अहमदपूर मांडवी हे समुद्रकिनाऱ्यावरील
निसर्गरम्य ठिकाण आहे. अहमदाबादचे प्राचीन नाव कर्णावती असून
वस्त्रोद्योगात भारतात अग्रेसर आहे. महात्मा गांधींचा साबरमती आश्रम. आणंद
हे दुग्ध विकासात भारतात अग्रेसर. कांडला हे कच्छच्या आखातातील
आंतरराष्ट्रीय बंदर. गांधीनगर ही गुजरात राज्याची नवनिर्मित सुनियोजित
वसवलेली राजधानी. स्वामी नारायण पंथाचे अक्षरधाम हे अतिविशाल व कलात्मक
मंदिर. जामनगर हे ऐतिहासिक ठिकाण. प्राचीन राजधानी. जुनागड हे गिरनार
पर्वताच्या पायथ्याशी वसलेले प्राचीन नगर. संत नरसी मेहतांचे जन्मस्थान.
डभोई येथील तेराव्या शतकातील किल्ला. तिथल हे समुद्र किनाऱ्यावरील
निसर्गरम्य पर्यटन स्थान असून दांडी हे ऐतिहासिक स्थान आहे. इ.स. 1930 ची
महात्मा गांधींची दांडीयात्रा व मिठाचा सत्याग्रह.
द्वारका
ही श्रीकृष्णाने आपली राजधानी मथुरेहून इथे आणली. नलसरोवर पक्षी अभयारण्य.
नवसारी पारश्यांची ज्योत. पाटण ही प्राचीन राजधानी. लोथल येथील हडप्पा
संस्कृतीचे अवशेष. वडोदरा ही गायकवाड संस्थानची राजधानी असून राजवाडे.
सोमनाथ मंदिरे येथे आहेत. सुरत हे तापीवरील प्राचीन ऐतिहासिक शहर येथे
आहे.गुजराती लोकसंगीत हे सुगम संगीत नावाने ओळखले जाते. तुरी, बंगाल आणि
पावा, रावण हातो, एकतारो, जंतर, मंजिरा, झांज आणि पोटझोडे ही गुजरातची
लोकवाद्य आहेत.
गरबा, दांडिया, तिफणी आदी लोकनृत्य गुजरात मध्ये
लोकप्रिय आहेत. गरबा हे विशेषत: महिलांचे नृत्य असून विशिष्ट ठेक्यावर
टाळ्या वाजत वा हातातल्या टिपऱ्या खेळत फेर धरून हे नृत्य केले जाते. हे
नृत्य नवरात्रीत देवीच्या उत्सवात केले जाते. दांडिया नृत्यात काठी नृत्य
आणि तलवार नृत्यही अंतर्भूत असते. दुर्गा आणि महिषासुर यांच्यात झालेले
युद्ध म्हणजे दांडिया नृत्य. तिफनी नृत्य हे सौराष्ट्रातील नृत्य आहे.
कामगार स्त्रिया हे नृत्य करतात. हातात मोगरी सारखा लाकडी दंडुका घेऊन
जमिनीवर आदळले जातात. हेमचंद्र आचार्य, नरसी मेहता, मिराबाई,
प्रेमानंद भट्ट, श्यामल भट्ट, दयाराम, दलपतराम, गोवर्धनराम त्रिपाठी,
महात्मा गांधी, के.एम.मुन्शी, उमाशंकर जोशी, सुरेश जोशी, पन्नालाल पटेल,
राजेंद्र शहा हे गुजरातीतील महत्त्वाचे लेखक आहेत. कवी कांत, झवेरचंद
मेघानी, कल्पी आदी गुजराती कवी आहेत.
गुजराती लोकनाट्य भवाई या
नावाने प्रसिद्ध आहे. लोकसंगीत आणि लोककला यांच्या सरमिसळीत ही भवाई कला
सादर केली जाते.अहमदाबाद, वडोदरा, भावनगर, भूज, सुरत, जामनगर, कांडला,
केशोद, पोरबंदर, राजकोट येथे विमानतळ आहेत. लुनी, मही, साबरमती, बनास,
नर्मदा, तापी, दमणगंगा, अजी, अंबिका, अरूणावती, औरंगा, बलराम, भादर,
भु्खी, भुरूड, चिराज, चौक, फुलकी, गजांनसर, घेला, हिरन, काली, कंकावती,
करेश्वर, कायला, केरी, खारी, खोकरा, कीम, कोलाक, मालन, मिंढोला, नागमोती,
नारा, नायरा, रंगमती, रावळ, रूखमावती, रूपेन, साई, सरस्वती, शाही, सुवी,
उतावली, वेगडी, विश्वमित्री या नद्या गुजरातमधून वाहतात.
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील. त्यात त्यांचा मधल्यावेळेतला नाष्ता देखील असेल.बस मध्ये रेल्वे मध्ये गुजराथी लोक त्यांच्या घरचे पदार्थ खाताना दिसतील. त्यांचे आतिथ्य आगदी भारावून टाकणारे असते.घरातच नव्हे तर अगदी हॉटेलात सुद्धा हेच बघाना " अमे गुजराती " ( अर्थ "आम्ही गुजराथी ")
"अतिथी देवो भव " असे केवळ पाटीवर लिहून चालत नाही ,अतिथीचे भरघोस स्वागत होते. जेवायच्या अगोदर हात धुण्यासाठी ही सोय
जेवायच्या
अगोदर स्वागत पेय. गुलाबाच्या पाकळ्या घालुन केलेले पेरुचे गुलाबी सरबत
येते. आणि पापडनो चुरो. मसाला साथे आणि त्यानन्तर येते ती सुप्रसिद्ध
गुजराती थाळी.
या थाळीतले पदार्थ फुलका
( पोळी ) त्यावर मेथीना थेपला आणि वर छोटिशी दिसणारी बाकरी ( भाकरी
नव्हे.. बाकरी ही गव्हाच्या पिठाची असते आपण करतो त्या ज्वारीच्याभाकरीला
इथे "जार नो रोटलो " असे म्हणतात ) फुलका रोटलीच्या खाली दिसते "सोले कचोरी" ( मुगाची कचोरी) आणि तांदळाचे ढोकळा आता त्या पासून क्लॉकवाईज. "मगना दाळनो शिरो" अस्सल तुपातला चारोली वगैरे असलेलास्पेश्यल गुजराती शिरा "बासुंदी " व्हॅनीला इसेन्स + बदाम + भरपूर सुके अंजीर "दाळ" दालचिनी + लवंग असलेली तुरीची आमटी "पनीर नु रसाळु शाक" "लीला वटाणानु शाक" ( हिरव्या वाटाण्याची भाजी) "बतेटानु रस्साळु शाक" " लीला तुवेरनु कठोळ" ( हिरव्या तुरीची उसळ ) ( कठोळ = कडधान्य) ताटाबाहेर छास सेलेड मा काकडी बीट गाजर ,आंबे हळद ,टमेटा आणि चित्रात न दिसणारी मस्त वरुन लोणकढी तुमाची धार असलेली "मग ना दाळनी खिचडी अने कढी"
एवढे झाल्यावर पुन्हा हात धुण्याचा कार्यक्रम शेवटी मुखवास म्हणून वरीयाळी अने पान ( बडीशेप आणि पान ) या इथे थाळीचे तीन प्रकार आहेत. त्याना वेगवेगळी नावे आहेत. "नगरशेठ थाळी" असल चांदीच्या ताटात ३१ वेगवेगळे खाद्यपदार्थ "शेठ थाळी " २२ खाद्य पदार्थ " वेपारी थाळी " १५ खाद्यपदार्थ
खरी गुजराती थाली खाण्यासाठी , तीही खेडयाच्या वातावरणात, खाली बसुन व
कन्दीलाच्या उजेडात पत्रावळईवर खावयाचि असेल, तर अमदावादच्या विशालाला भेट
द्या. सोबत जुन्या पाकग्रुहात वापरल्या जाणार्या वस्तुन्चे सन्ग्रहालयही
पहावयास मिळेल.
लीलो म्हणजे ओला नाही ;हिरवा. लिलु घास म्हणजे हिरवे गवत. लीली बंगडी = हिरवी बांगडी. लीलो चेवडो = हा बटाटाच्या चिवडा असतो तसा कच्च्या पपई पासून केलेला चिवडा असतो. गुजरात मध्ये जैन लोकांच्या मुले कित्येक पदार्थात बटाटाऐवजी कच्ची केळी , कच्ची पपई यांचा वापर करतात. जैन पावभाजीत बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात
हिर्व्या
चिवड्याला येथे 'सोलापुरी चेवडो' असं महाराष्ट्रीअन नाव आहे.आणी हे दोन्ही
चिवडे बडोद्याचे (वडोदरा)चे मशहूर आहेत. अहमदाबादचे नाही.
Take your taste buds on a tantalizing journey through the royal sides of
Gujarat. Well, Gujarat is more Fame for its delicious dishes and
cuisines. People in Gujarat are probably foodies and they welcome the
people from all around the world with yummy foods and snacks. This
dishes of splendid aroma will not let you back to your natives without
tasting all the dishes. Common Let’s pack up and land to Gujarat to
taste all those varieties of dishes by booking bus tickets online with the cheapest fares in Ticketgoose.
Dabeli
Dabeli is said to be one of the favorite Gujarat snacks. You can taste
this Dabeli at every tiny shop in every nook and corner street of
Gujarat. A soft burger bun is stuffed with chili potato, dried coconut,
and tutty fruity jellies garnished with rose petals. Don’t you feel
mouth watering to taste this awesome dish? Yep, common let’s pack to
Gujarat.
Fafda-Jalebi
The name sounds itself different, as you all already know about Jalebi
let’s move on to Fafda, this mouthwatering dish is found on every corner
of the city. This Fafda is made with the help of kneading the dough of
maida and this Fafda with Jalebi is the best combo to taste. Get a try
to taste this super dish in Gujarat.
Can’t wait to taste this unique dish, common let’s start to Gujarat by
booking our journey with Ticketgoose.com with affordable cost.
Mohanthal
It’s time for adding sweetness in the mouth, yep one of the main
desserts that serve mainly in Gujarati food menu. Mohanthal is prepared
on a huge scale in the special occasion of Janmashtami that is an
offering to Lord Krishna. No one can deny Mohanthal if you want to know
the reason just start tasting it.
Ingredients of Mohanthal
Besan
Flavors of saffron
Cardamoms
Nuts like almonds and Pistachios.
पर्यटन :-
गुजरात राज्याला पश्चिमेकडील दागिना असे म्हणले जाते.गुजरातमध्ये
मंदिर,अभयारण्य ,संग्रहालय आणि इतर अनेक वैशिष्ट्यपुर्ण ठिकाणे आहेत जी
पर्यटकांना आवडतील.यामध्ये ह्रुद्यकुंज ( महात्मा गांधी निवासस्थान ) लोथल
येथील सिंधु संस्कृतीचे अवशेष, महात्मा गांधींचे जन्मस्थान कीर्ति
मंदीर,बडनगरचे हटकेश्वर मंदिर,धौलावारीया इत्यादी ठिकाणे अगदी हटके
आहेत.द्वारका,पावागड,पालिताना पर्वत्,शामलाना,गिरनार पर्वतावरील मंदीर हे
धार्मिक पर्यटनासाठी आहे.वास्तुकला आणि पुरातत्व वास्तुंमध्ये रुची
असणार्यांसाठी अहमदाबाद्,डभोई,पाटण्,मोढेरा हो ठिकाणे पाहु शकतात.सातपुडा
पर्वतराजीतील भ्रमंतीबरोबरच कोरवार्ड्,तिथल्,मांडवीचे समुद्रकिनारेही साद
घालायला आहेतच.निसर्गप्रेमींसाठी गिरचे भारतीय सिंहासाठी प्रसिध्द असलेले
राखीव वन आहेच.इतिहास हरवून जाणार्यांसाठी उपरकोट किल्ला,नजरबाग महाल,
ड्भोई किल्ला तसेच गांधी स्मारक संग्रहालय्,बडोदा वस्तुसंग्रहालय आणि आर्ट
गॅलरी पाहण्यासारखे आहे.
गुजरातमध्ये वर्षभर एकुण वातावरण स्थिर असते.मात्र काही भाग कोरडा असल्यामुळे गुजरातच्या भ्रमंतीचा सर्वोत्कृष्ट काळ अक्टोबर ते मार्च हा आहे.
गुजरात मधील धार्मिक स्थल गुजरातमध्ये हिंदू और इस्लाम धर्माशी संबधीत बरीच धार्मिक स्थान आहेत. द्वारकानाथ मंदिर सोमनाथ मंदिर तख्तेश्वर मंदिर अक्षरधाम मंदिर पालिताना मंदिर कालिका मंदिर जामा मस्जिद राज बाबरी मस्जिद रानी रुपमति मस्जिद नारायण मंदिर सिदी सैयद मस्जिद गुजरात मधील राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य गिर फाॅरेस्ट नेशनल पार्क ब्लेककब नेशनल पार्क मरीन नेशनल पार्क वंसदा नेशनल पार्क कच्छ डेजर्ट वन्यजीव अभयारण्य जंगली गधा अभयारण्य नील सरोवर पक्षी अभयारण्य कच्छ बस्टर्ड सेंचुरी शूलपानेश्वर वन्यजीव अभयारण्य
अहमदाबाद :-
गुजरात
भ्रमंतीची आपण सुरवात करुया गुजरातच्या आधीच्या राजधानीच्या शहराने,अर्थात
अहमदाबाद.अहमदाबाद हे प्राचीन शहर असून देशातील एक महत्वाचे शहर आहे.इथे
असलेल्या वास्तुंमध्ये हिंदु आणि मुस्लिम बांधकामाची शैली वापरलेली दिसते.
महात्मा गांधीशी संबधीत आठवणी इथे असल्यामुळे देशभरातून मोठ्या प्रमाणात
पर्यटक अहमदाबादला येतात.
अहमदाबादमधील
रस्ते अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहेत. पण रस्त्याची रुंदी जास्त असल्याने
कुठे सिग्नल नाही. २०१७ साली हे शहर युनेस्कोने वारसास्थळ म्हणून घोषीत
केले.११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे
गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे
नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत होते.परंतु तेराव्या
शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा
आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या
कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी
वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद
वसलेले आहे.जुन्या शहरात वळणावळणाच्या गल्ल्या आणि लाकडी कोरीवकाम असलेली
घरे आहेत. अहमदाबादमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ :- १) साबरमति आश्रम/महात्मा गांधी का घर २) केलिको टेक्सटाइल संग्रहालय ३) भद्र किल्ला ४) जामा मशीद ५) सरखेज रोजा ६) शाह ए आलम रोजा ७) राणि नो हाजिरो ८) वस्त्रपुर तलाव ९) कांकरीया तलाव १०) का़करीया प्राणी संग्रहालय ११) इस्कॉन मंदिर १२) हाथी सिंह जैन मंदिर १३) सिद्दी सैय्यद मशिद १४) विंटेज कार म्युझीयम १५) गुजरात सायन्स सिटी १६) हलते मनोरे
नियोजन :-
१. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.)
२. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. )
३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.)
४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास )
५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास )
६. अक्षरधाम मंदिर, गांधीनगर : अहमदाबादपासून ४० किमी अंतरावर आहे. (मंदिर पाहण्यास लागणारा कालावधी: ३ तास )
७. अडालज वाव : अक्षराधामपासून १८ किमी. अंतरावर आहे. बसने किंवा वडापने अगदी आरामात पोहचू शकता. (कालावधी : ४०-४५ मि.)
८. हाथीसिंग जैन मंदिर : अडालजपासून १० किमी अंतरावर आहे. दिल्ली दरवाजाला जाणारी कोणतीही बस पकडा. (कालावधी : २५-३० मि.)
९. साबरमती रिव्हरफ्रंट : हाथीसिंग जैन मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे.(कालावधी : १-१.३० तास)
साबरमती आश्रम – Sabarmati Ashram
सुरवात करुया साबरमती आश्रमापासून.
अहमदाबाद
हे नाव घेतले कि आपोआपच महात्मा गांधी आणि साबरमती आश्रम यांची आठवण
येते.गुजरातलाच महात्मा गांधींचे राज्य म्हणून ओळखले जाते.साबरमती आश्रम हा
बापुंचे घर आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र होता.साबरमती नदीच्या
काठी असलेला हा आश्रम पर्यटकांचे आकर्षण आहे.
या ठिकाणी
महात्मा गांधीच्या वापरातील अनेक वस्तु ठेवल्या आहेत.त्यांचा चष्मा,चपला
आणि पुस्तक.आश्रमात इंग्लिश्,हिंदी आणि गुजराती भाषेतील जवळपास पत्तीस हजार
पुस्तक आहेत.जर एखाद्याला गांधीजींच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या
कायाविषयी जाणून घ्यायचे असेल तर साबरमती आश्रमाला भेट द्यायलाच हवी.भारतीय
स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना म्हणजे दांडी यात्रा.याची सुरवात
याच आश्रमापासून झाली.
तीन माकडे ....
गांधीजींचा जीवनप्रवास उलगडणारे संग्रहालय...
गांधीजीनी जगाला दिलेला हाच तो संदेश..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन धृवतारे...
दोन राष्ट्रांचे पितामह...
अहिंसेची हिंसा...अखेरचा हा तुला दंडवत...
सुती धाग्यापासून बनविलेला हो फोटो...
तपस्वी, ध्यानमग्न, तेजस्वी महात्मा...
तेजाचे वलय प्राप्त झालेली वास्तू...गांधीजींचे निवासस्थान...
महात्म्याची सेवा करण्याचे भाग्य लाभलेल्या वस्तू...
एक स्वर्गीय अनुभूती...
साबरमती आश्रम
दांडी यात्रा
सुमारे १०.३० च्या सुमारास साबरमती आश्रमात प्रवेश केला. तेथील
गांधीजींच्या व्यक्तिचरित्रावर एक कटाक्ष टाकला. बाजूने जाणाऱ्या साबरमती
नदीचं पात्र पाहिलं सोबतच खादी विक्री केंद्र, वाचनालय, विनोबा भावेंची
राहण्याची जागा ह्या सगळ्याना भेट देऊन सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास
साबरमती आश्रमातून बाहेर पडलो.
मिठाचा सत्याग्रह
साबरमती नदीचे पात्र
पत्ता :- आश्रम रोड,अहमदाबाद आवर्जून पहा:-मगन निवास्,उपासना मंदिर, उद्योग मंदिर्,हृद्य कुंज आणि नंदीनी वेळः सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० प्रवेश : मोफत
भद्र किल्ला (Bhadra Fort) :-
हा
किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल
दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला
बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला
आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक
उत्तर भागात होते.
पेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार
इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच
मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या
दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे. भद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला
जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास
लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.
किल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र
या
किल्ल्याला बहुमजली तटबंदी आहे.या किल्ल्यात भद्रकाली मंदीर आहे.याच
मंदीरावरुन किल्ल्याला हे नाव पडले.या संदर्भात एक कथा सांगितली जाते.इथे
राज्य करणार्या सुलतानावर कृपा करण्यासाठी इथे लक्ष्मी माता प्रगटली आणि
तीने आशिर्वाद दिला कि हे शहर संपत्तीने भरलेले आणि समृध्द राहील. या किल्ल्यात सध्या राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात आणि परिसरात बाग व हिरवळीचे पट्टे बघायला मिळतात. पत्ता:- कोर्ट रोड ,अहमदाबाद विशेष आकर्षण :- तीन दरवाजे क्लॉक टॉवर्,आझमखान सराई वेळ- सकाळी ९ ते संध्याकाळी ५ प्रवेश फी- मोफत
कांकरिया लेक : -
हा
लेक वर्तुळाकार असून १४५१ च्या दरम्यान बांधल्याचा अंदाज आहे. हा तलाव
सुलतान मुहमद शहा आणि अहमद शहा ( दुसरा ) याने निर्माण केला.हा तलाव
गुजरातमधील सगळ्यात मोठा तलाव आहे.याचा परिघ जवळपास २.२५ कि.मी. आहे.
बहुतेक शासक याचा अंघोळीसाठी वापर करीत असल्यामुळे या तलावामध्ये पाणी
शुध्दीकरणाची व्यवस्था आहे. या तलावाच्या मधोमध द्वीप महाल आहे ज्यामुळे या
तलावाचे सौंदर्य अजून खुलले आहे.शिवाय या तलावाजवळ बाग आणि प्राणी
संग्रहालय आहे.याशिवाय तलावात बोटींगची सोय देखील आहे. हा लेक बघताना
हैद्राबादच्या हुसेन सागर तलावाची आठवण होत होती.अहमदाबाद फिरायला आला असाल
तर एक दिवसाची पिकनिक करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पत्ता:- कांकरीया,अहमदाबाद विशेष आकर्षण - लहान मुलांसाठी बाग्,संगीताच्या तालावरचे कारंजे,जॉगर्स पार्क, बलुन राईड, आर्चरी,मिरर मेझ, वेळ- सकाळी ९ ते रात्री १०, जॉगिंग करणार्यांसाठी पहाटे ४ प्रवेश फि- प्रौढांसाठी २५/- आणि मुलांसाठी १०/- जॉगिंग करणार्यांना मोफत प्रवेश
कांकरीया प्राणी संग्रहालय :-
कमला नेहरु झुलॉजिकल गार्डन किंवा कांकरीया झु हे पर्यटकांनी आवर्जून भेट
देण्यासारखे ठिकाण आहे.याची उभारणी १९५१ मध्ये झाली.हे प्राणीसंग्रहालय
कांकरीया नदीच्या तीरावर उभारले गेले आहे.इथे मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि
झाडे बघायला मिळतात.वन्यजिव अभ्यासकांना हे प्राणी संग्रहालय म्हणजे पर्वणी
आहे.इथे मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी आणि सरिसृप आह्ते.शिवाय २०१७ मध्ये
इथे एक विशेष पार्क उभारण्यात ज्यात तरस्,बिबट्या असे निशाचर प्राणी ठेवले
आहेत.इथे रात्रीसारखा काळोख केलेला असल्यामुळे हे प्राणी वावरताना आणि
त्यांचा आवाज स्पिकरमधून आपल्याला एकायला मिळतो.
याशिवाय याच परिसरात टॉय ट्रेन, वॉटर पार्क्,निरनिराळ्या राईडस आणि
खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल आहेत.उत्तम गुजराती खाणे खायचे असेल तर नगीना
वाडी या बगीच्याची थीम असलेल्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेउ शकता. पता:- कांकरीया,अहमदाबाद विशेष आकर्षण -रसाला नेचर पार्क आणि फुलपाखरु उद्यान वेळ - मार्च ते ऑक्टोबर - सकाळी ९ ते संध्याकाळी ६.२५ नोव्हेंबर ते फेब्रुवारी - सकाळी ९ ते संध्याकाळी ५ प्रवेश फी- प्रौढ- रु २०/- तीन वर्षापर्यंत - मोफत शैक्षणिक सहल - ५/- ३ ते १२ वयोगटापर्यंत १०/-
अक्षरधाम मंदिरः
अक्षरधाम मंदिर अहमादबादच्या गांधीनगर परिसरात आहे.हे मंदिर एक प्रमुख
पर्यटनस्थळ आहे.हे मंदीराची निर्मिती स्वामीनारायण संप्रदायाने १९९२ मध्ये
केली.मंदिर 32 मीटर ऊंच, 73 मीटर लांब आणि 39 मीटर रुंद आहे.स्वामीनारायण
या मनुष्यरूपी देवाचे हे सुंदर मंदिर. जवळपास ६००० गुलाबी दगडांचा वापर
करून १००० कारागिरांनी आपली कला समर्पित करून हि अदभुत वास्तू उभारली आहे.
आजुबाजुचा परिसर २३ एकर आहे. मंदिराच्या उभारणीत सिमेंटचा वापर केलेला
नाही.आत प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला एक सुंदर बगीचा व हत्तीचा आकार
दिलेली झाडे बघायला मिळतात. मंदिराच्या सभोवताली स्वामीनारायण यांचे विचार
कोरले आहेत. स्वामीनारायण यांनी वयाच्या ११व्या वर्षी गृहत्याग करून ७
वर्षात १२०० किमी.ची भारत भ्रमंती करून हिंदू धर्माच्या विचारांचा प्रसार
केला होता. गुजरातमधुन जवळपास दोन लाख लोक इथे येतात
अक्षरधाम मंदिरातील हरी मंडप हे सगळ्यात पवित्र ठिकाण आहे.भगवान
स्वामीनारायण आणि त्यांच्या अनुयायांच्या इथे मुर्ती आहेत.स्वामीनारायणांची
मुर्ती जवळपास १ टन वजनाची असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे.
स्वामीनारायणांची मुर्ती अभयमुद्रेत आहे.
मंदिराची
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ५० रुपयांचे तिकीट काढून एक प्रदर्शन आहे, ते
पहाण्यासारखे आहे. त्याच्या पहिल्याच टप्यात एक सुंदर दृश्य दिसते.एका
बाजूला असंख्य दगडे पडली दिसतात तर दुसर्या बाजूला एक मूर्ती होती जिच्या
हातामध्ये हातोडा व छिन्नी होती. हातोडा हे ताकतीचे तर छिन्नी हे बुद्धीचे
प्रतिक होते. ताकद व बुद्धीच्या योग्य मिलाफातूनच मनुष्य श्रेष्टत्वाला
पोहचतो नाहीतर त्याचा दगडच बनतो हाच संदेश हि मूर्ती देते. त्यानंतर एका
अरुंद वाटेने जंगलात आलो कि सिंह डरकाळ्या फोडताना दिसतो, गोरिला विखारी
नजरेने बघत असतो. अजगर एका झाडावर लटकत असतो आणि आजुबाजुची थंड हवा मनाला
शांत करते. काही काळासाठी खरोखरच जंगलात आल्याचा भास होतो. नंतर
महाभारतातील प्रसंगावर आधारित विविध देखावे आहेत. पुढे स्वामीनारायण यांचा
जीवनप्रवास उलगडणारा व त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर आधारित एक छोटेसे
संग्रहालय आहे.स्वामीनारायण यांच्या जीवनावरचा दृक-श्राव्य कार्यक्रम
दाखविला जातो.मिस्टीक इंडीया नावाचा ११ वर्षाचे योगी निळकंठ यांच्या
जीवनावर आधरीत कार्यक्रम दाखविला जातो.सतचित आनंद नावाचा वॉटर शो आहे ज्यात
आवाज आणि संगीतावर आधारीत कारंजे नाचतात.
२००२च्या
अतिरेकी हल्ल्यानंतर मंदिराची सुरक्षाव्यवस्था अतिशय कडक केली आहे. आपले
सगळे सामान आपल्याला बाहेरच जमा करावे लागते. इतकेच काय कमरेचा पट्टा,
पाकीटसुद्धा काढून तपासणी केली जाते. आतमध्येच १०० रुपये घेऊन २ तासात फोटो
काढून देण्याची व्यवस्था केली आहे.अक्षरधाम मंदिराची टैगलाइन आहे- "यह वह
स्थान है, जहाँ कला चिरयुवा है, संस्कृति असीमित है और मूल्य कालातीत हैं".
पत्ता: स्वामीनारायण मंदिर रोड्,कालुपुर्,अहमदाबाद ( अहमदाबापासून २६ कि.मी. )
विशेष आकर्षण : नर नारायण मंदीर्,अक्षर भवन, स्त्री मंदिर आणि साउंड शो
वेळ : सकाळी ६ ते संध्याकाळी ७ ( सोमवारी बंद )
प्रवेश फी : मोफत
इस्कॉन मंदीर : -
हे
मंदिर सोमपुरा गुजरात आणि खमिरा राजस्थान शैलीचे मिश्रण करुन उभारले
आहे.चार एकर परिसरात उभारलेल्या या मंदिरात मंदिराची वास्तु, बाग आणि
कारंजी आहेत. इस्कॉन मंदिरात मुख्यता राधा आणि कृष्ण यांच्या मुर्ती असल्या
तरी इथे बाकी देवतांच्या मुर्तॉ देखील आहेत.
पत्ता : सॅटेलाईट रोड
विशेष आकर्षण : ध्यानाचे दालन आणि सकाळी व संध्याकाळची आरती
वेळः सकाळी ४.३० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९
प्रवेश : मोफत
हाथीसिंग जैन मंदिर :-
हे मंदिर सन १८५० मध्ये हाथीसिंग केसरसिंग या जैन व्यापार्याने
बांधले,या मंदिरामुळे अहमदाबादच्या समृध्द वारश्यात भर पडली आहे,हे मंदिर
नाजुक कोरीवकाम केलेल्या संगमरवरात उभारले आहे.या मंदिरात पंधराव्या जैन
तीर्थंकरांची म्हणजे धर्मनाथांची स्थापना केलेली आहे.या मंदिराच्या परिसरात
बावन्न छोटी मंदिरे आहेत, जिथे जैनांच्या इतर तीर्थकरांच्या मुर्ती आहेत.
हाथीसिंग या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली होती. पण हे
मंदिर पूर्ण होण्याआधी वयाच्या ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढे
त्यांच्या पत्नीच्या देखरेखीखाली मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यामुळे हे
मंदिर हाथीसिंग याच नावाने प्रसिद्ध झाले.
अतिशय शांत व प्रेक्षणीय स्थळ. स्थापत्यकलेचा एक अदभुत अविष्कार. अतिशय देखणे कोरीव काम.
जामा मशिद :-
जुम्मा
मस्जिद : १४२३ साली सुलतान अहमद शाह यांनी बांधलेली भव्य व तितकीच सुंदर
अशी वास्तू..अहमदाबाद मधील पर्यटकांचे हे आणखी एक आकर्षण्,सन १४२३ मध्ये
अहमदाबादमध्ये किल्ला बांधल्यावर शुक्रवारच्या नमाजासाठी एक मशीद
बांधण्याचे सुलतानाने ठरविले.भद्र किल्ल्याच्या जवळच हि मशिद उभारली
गेली.पिवळ्या वालुकाश्मात बांधलेल्या या मशिदीला २६० उत्तम कोरीवकाम केलेल
खांब आहेत.हिंदु आणि इस्लामिक शैली अशी मिश्र बांधकाम शैली वापरुन या
वास्तुची उभारणी झालेली आहे.मात्र या मशीदीसाठी वापरलेले दगड हिंदु आणि जैन
मंदिराचे असल्याचे मानले जाते .देशातील सुंदर मशीदीपैकी एक अशी हिची गणना
होते.
पत्ता : मनेका चौक, अहमदाबाद
विशेष आकर्षण : प्रशस्त आवार आणि नाजुक कोरीवकाम असलेल्या खिडक्यांच्या जाळया वेळ : सकाळी ६ ते रात्री ८ ( नमाजाच्या वेळी मशीद पर्यटकांसाठी बंद असते) प्रवेश : मोफत
सिद्दी सय्यद मस्जिद:
१५७३
साली बांधलेली हि मस्जिद अहमदाबाद शहराच्या मधोमध आहे.पिवळ्या वालुकाश्म
दगडावर अतिशय नाजूक कोरलेल्या अर्धवर्तुळाकार जाळीदार नक्षीसाठी
प्रसिद्ध.अहमादबादमधील हि मशीद म्हणजे फोटोग्राफरसाठी पर्वणी आहे.इथले
नक्षीकाम बघून पर्यटक थक्क होतात.मशिदीच्या खिडक्यांना असलेल्या जाळीचा
इंडीयन इन्स्टीट्युट अहमादबादने लोगो म्हणून उपयोग केला आहे. पत्ता : घीकांता , अहमादबाद विशेष आकर्षण : झाडाची नक्षी असलेली खिडक्यांची जाळी वेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ६ प्रवेश फि : मोफत
जाळीदार खिडकीचे समोरील बाजूने टिपलेले सोंदर्य....
जाळीदार खिडकीचे बाहेरील बाजुने टिपलेले सोंदर्य...
चारही खडक्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे कोरीव काम आहे.
ह्या
मस्जिदीवरील भिंतीत एका जाळीवर काढलेलं एका झाडाचं शिल्प प्रसिद्ध आहे. ते
पाहिल्यावर आपल्याला सुद्धा त्या कारीगिरीचं नवल वाटतं.
सिद्दी सय्यद मस्जिद
समोर जाळीमध्ये दिसत असलेलं प्रसिद्ध शिल्प
सरखेज रोजा : अनेक
घुमट आणि मिनार एकत्र असलेली वास्तु म्हणजे सरखेज रोजा.अहमदाबाद शहरातील
इतर इस्लामिक वास्तुप्रमाणेच इथेही नाजुक कोरीवकाम बघायला मिळते. हि वास्तु
सरखेज तलाव या मानवनिर्मित तलावाच्या काठावर उभारलेली आहे. अर्थात या
वास्तुचे खांब, कमानी या इस्लामिक शैलीच्या असल्या तरी नाजुक कोरीवकामावर
हिंदु शैलीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो.
पत्ता : सरखेज मकबरा रोड, अहमदाबाद विशेष आकर्षण : शेख अहमद खाट्टू गंजी बक्षीचा दर्गा आणि बारादरी वेळः सकाळी ९ ते संध्याकाळी ६ प्रवेश : मोफत
शाह आलम रोजा :
अहमदाबाद शहरामध्ये अनेक उत्तम कोरीवकाम आणि बांधणीच्या वास्तु
आहेत.पर्यटकांनी आवर्जून पहावी अशीच एक वास्तु म्हणजे शाह आलम रोजा.यालाच
रसुलाबाद दर्गा किंवा आलम नो रोजा असेही म्हणतात.इथे सुफी पंथ मानणारे
भाविक लांबुन येउन भेट देतात. या मशीदीच्या घुमटावर मौल्यवान रत्न आणि
सोन्यानी मढवले आहे.याच मशीदीच्या आवारात चोवीस घुमटांच्या दर्ग्यात शाह
आलमच्या कुटूंबाची थडगी आहेत.मशीदीच्या जमीनीवर काळ्या आणि पांढर्या
संगमरवराने नक्षीकाम केले आहे तसेच दरवाज्याच्या चौकटी आणि खांबात मोठ्या
प्रमाणात संगमरवर वापरला आहे.
पत्ता : शाह आलम रोड, अहमादाबाद विशेष आकर्षण : संगमरवरात केलेले बांधकाम वेळ- सकाळ ते संध्याकाळ प्रवेश फि-मोफत
रानी नो हाजिरो :
रानी नो हाजिरो या गुजराती शब्दाचा अर्थ म्हणजे राणीचे थडगे.या ठिकाणी
अहमदशहाच्या राण्यांची थडगी आहेत.हे ठिकाण मुख्य शहरापासून दुर आणि शांत
जागी आहे. इथे असलेली थडगी इतर ठिकाणी जशी बंदिस्त जागी असतात तशी न
बांधता, खुल्या जागेत बांधली आहेत.थडग्यावर हिंदु,जैन आणि मुस्लिम शैलीच्या
नक्षीकामाचा प्रभाव जाणवतो.
पत्ता : मानेक चौक ,अहमदाबाद विशेष आकर्षण : या मशिदीकडे जाणार्या रस्त्यावर विविध वस्तुंची विक्री करणारी दुकाने आहेत. वेळः सकाळी ६ ते संध्याकाळी ६ प्रवेश : मोफत
गुजरात सायन्स सिटी :
मनोरंजनाबरोबरच ज्ञानात भर घालणारी जागा म्हणजेच गुजरात सायन्स सिटी.
लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी गुजरात शासनाने या सायन्स
सिटीची उभारणी केली.आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून प्रत्यक्ष
प्रयोग करुन त्यातून शिकण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. लहान मुल आणि
विद्यार्थी यांना अहमदाबाद शहरात आवर्जून भेट द्यावी अशी हि जागा.आकाराने
प्रचंड पण अजूनही विकसनशील अवस्थेत असलेली जागा. इथे मंगळयान, भूकंप,
ज्वालामुखी उद्रेक यांचा अनुभव घेण्यासाठी राईडस आहेत पण त्यासाठी किमान १५
जणांचा कंपू लागतो.
पत्ता : एस.जी. हायवे ,अहमदाबाद विशेष आकर्षण : 3D IMAX थिएटर, एनर्जी पार्क, म्युझिकल फाउंट्न, हॉल ऑफ स्पेस, ईलेक्ट्रोडोम, औडा गार्डन वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० प्रवेश फि : प्रौढांना २०/- रुपये आणि मुलांना ५/- तसेच शालेय सहलींना ५/-
या ठिकाणी मानवाच्या उत्क्रांतीपासून ते औद्योगिक विकासापर्यंत सर्व टप्प्यांचे अगदी सविस्तर विवेचन केले आहे.
वस्त्रपुर तलाव :
अहमादबादमध्ये एखादी संध्याकाळ घालविण्यासाठी उत्तम जागा म्हणजे हा
वस्त्रपुर तलाव. शहरातील शांत, निवांत परिसरात हा मानवनिर्मित तलाव
आहे.सभोवताली बाग आहे. या ठिकाणी असलेल्या खुल्या रंगमंचावर अनेक
सांस्कृतिक वर्षभर कार्यक्रम केले जातात. गुजरातची परंपरा समजून घेण्यासाठी
हे कार्यक्रम उत्तम माध्यम आहे.
पत्ता : वस्त्रपुर ,अहमदाबाद विशेष आकर्षण : हिरवाइने नटलेला किनारा आणि जॉगर्स पार्क वेळ : सकाळी ८ ते रात्री १० प्रवेश : मोफत
ऑटो वल्ड विंटेज कार म्युझियम :-
कारचा इतिहास आणि त्यामध्ये झालेल्या सुधारणांचा प्रवास जाणून घ्यायचा
असेल तर या म्युझीयमला भेट द्यायला हवी. अगदी घोड्यांनी ओढल्या जाणार्या
गाडयांपासून ते कन्व्हर्टीबल कार तसेच जुन्या दुर्मिळ कारचा इथे संग्रह
आहे.तसेच बग्गीचे नमुनेसुध्दा पहायला मिळतात.वाहनविश्वात रुची असणार्या
पर्यटकांसाठी हे वस्तुसंग्रहालय म्हणजे पर्वणी आहे.या ठिकाणी रोल्स राईस,
ब्युक कॅडीलॅक्,डेमलर, बेंटले,ख्रिसलर आणि मर्सिडीझ गाड्या बघायला मिळतात.
पत्ता : काठवाडा, अहमदाबाद
विशेष आकर्षण : लिमोझीन , स्पोर्ट कार आणि बोट टेल्ड स्पिडस्टर
वेळः सकाळी ८ ते रात्री ९
प्रवेश फि: रुपये ५०/- प्रतिव्यक्ती
कॅलिको टेक्सटाईल म्युझीयम :-
हे अहमदाबादचे एक जुने वस्तुसंग्रहालय आहे. देशभरातून गोळा केलेले जुने
वस्त्राचे नमुने, धागे आणि वस्तु यांचा इथे उत्तम संग्रह आहे.इथे काश्मीरची
पश्मिना शाल आहे तसेच गुजरातची खासियत असलेली वस्त्र आहेत.इथे भेट
दिल्यावर भारताच्या संस्कृतिक वैविध्याचा परिचय होतो.
पत्ता : शाहीबाग, अहमदाबाद
विशेष आकर्षण : पिचवाई, आदिवासी कलाकुसरीच्या वस्तु आणि भारतीय चित्रकलेचे नमुने\
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १ ( बुधवार बंद )
प्रवेश फी : मोफत ( आगावू कल्पना देणे आवश्यक )
विशाला म्युझियम
हे
आहे अहमदाबाद येथील भांड्याकुंड्यांचं म्युझियम. इटुकपिटुक गडव्यापासून
भल्या मोठ्या तांब्यापर्यंत, कातरी, सुपारी फोडायच्या अडकित्यापासून माणूस
झोपू शकेल इतक्या कढई पर्यंत. पुरुषभर उंचीच्या रांजणापासून तीन पुरुष मावू
शकतील अशा पेटाऱ्यासह.
हे सारे बघून फक्त अ ब ब इतकच!
त्या काळात स्वयंपाक करणाऱ्या बायका, पुरुष आचारी यांचे खरच कौतुक वाटले.
एव्हढा मोठा स्वयंपाक करणे, ते घाटणे, ती भांडी उचलणे, घासणे वगैरे गोष्टी
कशा करत असतील?
फुलपात्रांचे असंख्य आकार. पळ्या, देव, देवपुजेच्या वस्तू, यज्ञ-हवनाची
पात्रे, गडवे, वाट्या, झार्या, पुरुषभर उंचीचा कालथा (उलथणे). इतकच नव्हे
तर स्वयंपाक घरातल्या इवलुशा काड्यापेटीतल्या काड्यांनी तयार केलेला तीन
फुटाचा ताजमहाल!
शिंकाळी, हुक्के, घुंगूरमाळा, काटे, चमचे, पराती, कढया,.... काय नाही असं नाही.
अगदी पेटारे, कुलपं किल्या - अगदी पाच फुटी कुलूपही!
अगदी वेता-धातूचे बैल, मुखवटे आणि गदाही ! लाकडी बाऊल्स, सट, मूर्ती...
दगडी भली मोठी परात ( शेजारची वाटी; आपली नेहमीच्या आकारातली आहे )
सगळ्यात आश्चर्यजनक, खरं तर बघून वाईटच वाटलं... पण चक्क हुंडा ज्यात भरून
द्यायचा अशी हुंड्याचे डबे; लहानही आणि पाच फूट उंची आणि तितकाच घेर
असणारे!
भारतीय पद्धतीचे जुने कुकर, पानाचे डबे (एक चक्क मोराच्या आकारातही),
तबकं (ट्रे), चांदणीच्या आकाराच्या बैठकी, मुर्त्या घडवलेला मोठा पितळी
घडा, सुंदर रंगकाम करून भाजलेली भांडी, पुरुषभर उंचीचा लोखंडी
बाळकृष्ण,...
अन काय काय.
ही भांडी इतकी मोठी आहेत की त्यांच्यामागील नेहमीच्या उंचीचे दरवाजे
आपल्याला बुटके वाटू लागतात अन शेजारचे सात फुटी रस्त्यावरचे दिवेही बुटके
दिसू लागतात. अन मोठे वृक्ष झुडपं दिसू लागतात.
सर्वात जुने हजार वर्षांपूर्वीचे भांडेही दिसेल तुम्हाला.
अन घराच्या भिंती एव्हढी मोठी पसरट कढईही दिसेल. अन सहा फुटी वॉचमन इतका अन
नंतर त्याहूनही मोठा जवळजवळ सात फुटी रांजणही. अन जुन्या मोड्क्या
यंत्रांपासून तयार केलेला यंत्र मानवही !
एकून नवल वाटतय? खरं नाही वाटत? बरं मग बघाच हे फोटो; सुरेंद्रभाई पटेल यांनी हे संग्रहालय उभं केलय,अहमदाबाद येशील "विशाला" इथे!
झुलते मनोरे :
या जुळ्या मनोर्यापैकी एकाला हलविले तर दुसरा लगेच हल्तो हे पाहून
पर्यटक थक्क् होतात. अहमदाबाद शहराच्या उत्तर भागात सिद्दी बशीर मशिदीत हे
झुलते मनोरे पहायला मिळतात. इतिहासप्रेमींना हे मनोरे बघायला नक्कीच
आवडतील.हे मनोरे तीन मजली असून त्याचे सज्जे कोरीवकाम केलेले आहेत.
पत्ता : लक्ष्मी बझार
विशेष आकर्षण : मनोर्यांची उभारणी
वेळ : सकाळी ५.३० ते रात्री ९
प्रवेश फी : मोफत
दादा हरी नी वाव :-
सगळ्या
वाव सारखीच हि सुद्धा लांबलचक व प्रशस्त जागा असणारी विहीर. १४ व्या शतकात
मोहम्मद बेगडाच्या अधिपत्याखाली ह्या विहिरीचं बांधकाम झालं अडालजच्या
विहिरीपेक्षा सुद्धा हि वाव मोठी आहे.
एकंदरीत असलेला विहिरीचा आवाका
विहिरीचे प्रवेशद्वार
सुमारे ५०० वर्ष जुन्या बांधलेल्या दादा हरी नि वावचे बांधकाम हे सोलंकी वास्तुशास्त्रीय शैलीतील लाल दगडात बांधलेले आहे . विहिरीच्या प्रत्येक मजल्यावर अष्टकोनी
(8-बाजूचे बहुभुज) आहे, हे संपूर्ण बांधकाम जबरदस्त कोरलेल्या मोठ्या
खांबांवर उभे आहे. प्रत्येक मजल्यावर लोकांसाठी एकत्रित करण्यासाठी पुरेशी
जागा आहे.
अष्टकोनी बांधकाम
विहिरीचा आतील भाग
वर्षभर होणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी चढउतारांची नोंद
घेण्यासाठी त्या पातळीवर भूगर्भात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जागा आहे.
शेवटच्या मजल्यापर्यंत खेळती हवा राहण्यासाठी म्हणून उघडे छत बांधण्यात आले
आहे. विहिरीच्या दोन्ही बाजूस खालून वर अथवा वरून खाली जाण्यासाठी
गोलाकार जिन्यांची बांधणी केली आहे प्रत्येक मजल्यावर प्रकारचे शिल्प नजरेस पडतात.
हवा खेळती राहण्यासाठी असलेले छत
ये-जा करण्यासाठी असलेले गोलाकार जिने
विहिरीतील आतील बाजूस असलेली कलाकुसर
सगळ्या विहिरीमध्ये हि एकाच अशी विहीर आहे ज्या विहिरीमध्ये
तळमजल्यापर्यंत प्रवेश करू शकतो. या विहीरीच्या मागे एक दर्गा आहे तो
म्हणजे धर्मगुरू दाई हलीम हयांचा दर्गा. तिथल्या लोकांच्या माहितीनुसार
दादा हरि असं काही नाहीच आहे दाई हलीमा वरून विहिरीचे नाव हे दादा हरि असं
पडलं.
दाई हलीम मस्जिद
दाई हलीम दर्गा
दर्ग्याचे प्रवेशद्वार
नल सरोवर पक्षी उद्यान :-
देशातील एक मोठे पक्षी उद्यान म्हणजे हे नल सरोवर.वन्यजीवप्रेमींनी
नक्कीच भेट द्यावी असे हे ठिकाण. या तलावाचा परिसर ११५ कि.मी. चा
आहे.याठिकाणी शेवाळ असलेला भाग आहे त्यामुळे स्थलांतरीत पक्षी इथे मोठ्या
संख्येने येतात. यात गीज्,पेलिकन्,फ्लेमिंगो,करकोचे,बगळे हे पाणपक्षी
दिसतात.
पत्ता : अहमदाबाद्पासून ६० कि.मी.
विशेष आकर्षण : सारस पक्षी
वेळः पहाटे ५ ते संध्याकाळी ७
प्रवेश फी: प्रति व्यक्ति ६०/- कॅमेर्यासाठी रु १००/- बोटींगसाठी रु २२०/- आणि खाजगी बोट हवी असले तर रु १३२० /-
अहमदाबाद विषयी अधिक माहिती :-
इथे भेट देण्यासाठी उत्तम ऋतु कोणता ? शक्यतो अहमदाबादला हिवाळ्यात भेट दिली तर उत्तम.नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी सुखद असतो.
अहमदाबादमध्ये खरेदी काय करावी ?
पटोला सिल्क, चनिया चोळी,पारंपारीक वस्त्रे,हातमागावर विणलेले कापड, जुने दागिने इत्यादी वस्तु आठवण म्हणून नेउ शकता.
अहमदाबादमध्ये खरेदी कोठे करावी ?
लॉ गार्डन, लाल दरवाजा, सिंधी मार्केट, धालगरवाड्,मानेक चौक आणि रानी नो हजिरो येथे खरेदी करता येईल.
अहमदाबादमध्ये कोणत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल ?
अहमदाबादच्या रस्त्यावर खाकरा, ढोकळा, दाल वडा, खांडवी, खमण्,फाफडा,जलेबी,
सामोसा, भजिया,पाणीपुरी, पराठे,पावभाजी, कुल्फी आणि बन मस्का
अहमदाबादमध्ये उत्तम स्थानिक खाद्यपदार्थ कोठे मिळतात ?
स्थानिक
खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मानेक चौक्,लॉ गार्डन रोड्,भाटीयार
गल्ली, खमण हाउस, अशर्फी कुल्फी, अम्बिका दालवडा,ओम साई पराठा आणि बगदाद
फ्राय सेंटर या दुकानांना भेट द्या.
अहमदाबादमध्ये कोणता आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ?
अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे,इथून दुबई, सिंगापुर, बँकॉक आणि लंड्न इथे विमानसेवा आहे.
अहमदाबाद मध्ये कोणते उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात ?
मकर संक्राती नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
अहमदाबादपासून कोणत्या पर्यटनस्थळांना भेट देता येईल ?
गिर नॅशनल पार्क, माउंट अबु, उदयपुर्,कच्छ, कुंभलगड, पाटण्,सोमनाथ्,मोढेरा, नल सरोवर पक्षी उद्यान इत्यादी
गांधीनगरः-
साबरमतीच्या पश्चिम तटावर गांधीनगर शहराची उभारणी झाली. सन १९६० ला
महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झाले आणि गांधीनगरला गुजरातची राजधानी केले
गेले.गांधीनगर हे सुनियोजित वसवलेले शहर आहे.इथे बाजार,रस्ते आणि इमारतीचे
बांधकाम यांचे योग्य नियोजन केले आहे.या शहराची उभारणी एच.के.मेवाड व
प्रकाश आपटे या दोन आर्किटेक्टनी केली.चंदीगडनंतर गांधीनगर हे भारतातील
दुसरे सुनियोजित शहर आहे.आज जिथे गांधीनगरची उभारणी झाली तिथे एके काळी
पेठापुर नावाचे गाव होते.इथे पेठापुर नावाचा राजा राज्य करीत होता.मात्र
याच जागी नवे नियोजनबध्द शहर उभारुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या
स्मरणार्थ या शहराला गांधीनगर नाव दिले गेले.गांधीनगर अहमदाबादपासून केवळ
२७ कि.मी. लांब आहे.इथे बहुसंख्य हिंदु वस्ती आहे.मात्र रोजगारांच्या शोधात
पुर्ण भारतातून लोक इथे येउन स्थायिक झाले आहेत.
कसे जावे ?
अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरुन आपण बस्,टॅक्सीचा वापर करुन गांधीनगरला
जाउ शकतो. इथे बस रुट ट्रान्झिट व मेट्रो सेवा सुरु होणार
आहेत.व्हि.टी.ओ.एस. हि कंपनी सि.एन.जी.वर चालणार्या बसेचा वापर करुन
गांधीनगर शहरात बससेवा पुरवते.गांधीनगर-मुंबई असा राष्ट्रीय महामार्ग
आहे.तसेच अहमदाबाद रेल्वेस्थानकावरुन आपण गांधीनगरला येउ शकतो.
गांधीनगर परिसरातील पर्यटनस्थळ :-
महात्मा
मंदिर,इंड्रोडा डायनासोर आणि जीवाश्म पार्क, सरिता उद्यान, त्रिमंदीर्,फन
वर्ल्ड्,राणी रुपमती मशिद, माहुदी जैन मंदिर्,संत सरोवर डॅम
इंड्रोडा नेचर पार्क :-
गांधीनगरमधील
एक भेट देण्याजोगी अदभुत जागा. यालाच भारताचे ज्युरासिक पार्क
म्हणतात.लहान मुलांनी आवर्जून पहावे असे हे उद्यान आहे.डायनासोर संबंधीत
म्युझियम असलेले आणि त्यांच्या जीवाष्माचे जतन केलेले एकमेव पार्क इथे आहे.
गुजरात
पारिस्थितिक और अनुसंधान फाउंडेशन यांच्याकडून हे पार्क चालविले जाते.इथे
असलेले डायनोसॉरचे जीवाश्म क्रेटेसिअस काळातील आहेत.इथे १९७० मध्ये
गुजरातच्या वन विभागाने जंगल लावायला सुरवात केली.आज भारतातील एक विस्तृत
जंगल इथे आहे.हे पार्क ४२८ एक॑र परिसरात उभारले आहे.याशिवाय येथे प्राणी
संग्रहालय, अॅम्फी थिएटर आणि संशोधन केंद्र देखील आहे.तसेच इथे ब्लु
व्हेलसारख्या सागरी जीवांचे सांगाडे बघायला मिळतात.बागेत डायनासोरचे पुतळे
उभारले आहेत.डायनॉसॉरची अंडी येथे आपल्याला पहायला मिळतात.ट्रायनोसॉरस
रेक्स, मेगालोसॉरस, टाइटानोसॉरस, बारापसौरस, ब्रैचियोसाउरस,
अंर्तान्टोसोरस, स्टेगोसोरास और इगुआनोडोन अश्या डायनॉसॉरची आपल्याला अधिक
माहिती मिळते.इथे आलेल्या पर्यटकांना या अंड्यांचे फोटो काढता येतात ,मात्र
त्यांना स्पर्श करायला परवानगी नाही. या पार्कमध्ये असलेले डायनॉसॉरचे
अवशेष गुजरातच्या विभिन्न भागातून इथे जमा केलेले आहेत जसे सोंघरीर
बाग,बालासिनोर, खेड़ा, पंचमहल आणि वडोदरा जिल्ह्याचा दक्षिण भाग.
पत्ता : सेक्टर ७, गांधीनगर
वेळ : सकाळी ८ ते संध्याकाळी ६ ( सोमवारी बंद )
प्रवेश फी : प्रौढांसाठी रु ३०/- वय ५ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी रु १५/- सहलीला आलेल्या प्रति मुलासाठी रु ८/-
सरिता उद्यान :
गांधीनगरमध्ये
पर्यटक सर्वात भेट देत असलेले ठिकाण म्हणजे सरिता उद्यान.कुटूंबासह मजेत
एक दिवस घालवायचा असेल तर हे सरिता उद्यान हि आदर्श जागा आहे.साबरमती
नदीच्या तीरावर, हिरव्यागर्द झांडांनी बहरलेले,मोर आणि इतर पक्षांचा
किलबीलाटाने गजबलेले हे उद्यान शहरापासून दुर शांत वातावरणात आहे. इथल्या
प्रसन्न वातावरणात मनाला शांती मिळते आणि ताजातवाने होउन आपण बाहेर
पडतो.गांधीनगरला येणार्या पर्यटकांनी इथे आवर्जून भेट दिली पाहिजे.
पत्ता :इंद्रोडा व्हिलेज्,साबरमतॉ नदीच्या किनार्यावर, सेक्टर ९,गांधीनगर वेळ : २४ तास
त्रिमंदिर :-
गांधीनगरमधील एक प्रमुख धार्मिकस्थऴ. हे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे
जिथे शंकर्,विष्णु आणि महावीर यांच्या मुर्ति आहेत.शैव्,वैष्णव आणि जैन
धर्माचे अनुयायी या एकाच मंदिरात दर्शन घेउ शकतात.चाळीस हजार स्क्वेअर फुट
परिसरात पसरलेल्या या मंदिरात लाकडी बाके ,कारंजे,बगीचा आहे.याशिवाय या
मंदिराच्या परिसरात एक संग्रहालय आणि एक मिनी थिएटरसुध्दा आहे. याठीकाणी
जैन धर्माचा सर्वसंग परित्यागाचे तत्वज्ञान आणि हिंदु धर्माचे दोन पंथ
यांचा अनोखा मिलाफ आहे.मानवाने आपली घमेंड्,दुराभिमान सोडला कि आयुष्यातील
गुंतागुंत कशी कमी होते याचे तत्वज्ञान इथे सोप्या भाषेत सांगितले आहे.
पत्ता : दादा भवन फौंडेशन्,गांधीनगर
वेळ :सकाळी ५.३० ते रात्री १०
आरतीच्या वेळी जरुर भेट द्या
फन वर्ल्ड गांधीनगर – Fun World Gandhinagar
ज्यांना
गांधीनगरच्या भटकंतीत मौज,मस्ती,धमाल करायची आहे त्यांनी नक्कीच भेट
द्यावी अशी जागा म्हणजे फनवर्ल्ड.नावाप्रमाणेच एक दिवसाची सुट्टी घालवायला
इथे भरपुर पर्याय आहेत.फन वर्ल्डमध्ये मास्टर स्लाईड,स्काय ट्रेन, रोलर
कोस्टर,साया ट्रॉपर अश्या राईड आहेतच शिवाय बोटींगच्या सोयीबरोबर वॉटर
राईडसुध्दा आहेत.यात मुलांसाठी घसरगुंडी, लेझी रिव्हर तसेच प्रौढांसाठी
देखील काही वॉटर राईड आहेत.याच बरोबर भुक लागली तर जेवणाचा आनंद घेण्यासाठी
फन वर्ल्डमध्ये रेस्टॉरंट देखील आहे.
पत्ता : इन्फोसिटी समोर्,ढोलाकुवा, गांधीनगर वेळः सकाळी ९ ते रात्री १० प्रवेश फी: मुलांसाठी १५/- तर प्रौढांसाठी रु ३०/- राईडसाठी रु ४००/- तसेच कॉम्बो रु ६००/- ( यात राईड्,जेवण सर्व समाविष्ट असते )
पुनीत वन गाँधी नगर – Puneet Van Gandhinagar
गांधीनगरच्या
प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे पुनित वन्,इथे झाडांच्या जवळपास ३५००
जातींची लागवड केली आहे.सन २००५ निर्माण केलेल्या या उद्यानात हिंदु
धर्मातील राशीनुसार लागवड केली आहे.तसेच त्या त्या राशीचिन्हानुसार झाडांची
रचना केलेली आहे.या बागेचे पंचवटी वन,नक्षत्र वन असे चार भाग पडतात. ज्यांना बागेमध्ये व झाडांमध्ये रुची आहे त्यांनी या उद्यानाला नक्कीच भेट दिली पाहिजे. पत्ता : रोड नंबर ४८,सेक्टर १८ ,गांधीनगर वेळः आठवड्यातील सर्व दिवस खुले असते.
शिल्पकाराचे गाव ( Craftsmen’s Village ):-
गांधीनगर
या मुख्य शहराबरोबरच सात कि.मी.दुर पीतापुर नावाचे गाव आहे,या गावाची ओळख
'शिल्पकाराचे गाव' अशी आहे.याच गावात साड्यांवर नक्षीकाम केले जाते.या मुळे
इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि दुकानदार खरेदीसाठी येतात.साड्यांवर लाकडी
प्रिटींग ब्लॉकचा उपयोग करुन नक्षी उमटवली जाते.
गांधीनगरला भेट
देणार असाल तर थोडा वेळ काढून या गावाला नक्कीच भेट द्या.नजरेसमोरच
सांड्यावर उमटणारे डिझाईन पाहून इथे खरेदीचा मोह न झाला तरच नवल.
विट्ठलभाई पटेल भवन गाँधी नगर – Vithalbhai Patel Bhawan, Gandhinagar
राजकीयदृष्ट्या
आणि वास्तुकलेसाठी गांधीनगरमधील प्रसिध्द वास्तु म्हणजे विट्ठलभाई पटेल
भवन.कारण इथेच आहे गुजरातची विधानसभा.सहाजिकच त्यामुळे आत जायचे झाले तर
परवानगी आवश्यक आहे.पण पर्यटक किमान हि वास्तु बाहेरुन पाहु शकतात आणि
इथल्या वास्तुकलेचा नमुना न्याहाळू शकतात.गुजरातचे सचिवालयदेखील इथेच
आहे.वल्लभभाई पटेलांचे बंधु विठ्ठलभाई यांच्यावरुन या वास्तुला नाव देण्यात
आले आहे.या वास्तुच्या शिरोभागी अशोकस्तंभ आहे.
पत्ता : सचिवालय परिसर
वेळः कार्यालयीन कामकाजाची वेळ
बॉटनिकल गार्डन गांधीनगर – Botanical Garden
गांधीनगरचे
आणखी एक आकर्षण म्हणजे बोटॅनिकल गार्डन.लुप्तप्राय होणार्या वनस्पतींचे
हे उद्यान आहे.इथे देशभरातून वनस्पतीचे नमुने गोळा केलेत.इथे भेट दिल्यावर
भिन्न प्रकारची झाडे तसेच औषधी वनस्पतीही पहायला मिळतात.त्याचबरोबर इथे
फुलपाखरु उद्यानाची निर्मिती केली आहे. पत्ता : इंद्रोडा नेचर पार्क्,गांधीनगर वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५(सोमवारी बंद) प्रवेश फि : वय वर्ष ५ ते १२ मुलांसाठी रु ५/-, प्रौढांसाठी रु ३०/- विद्यार्थ्यांसाठी रु ८/-
डिअर पार्क :-
निसर्गाची आणि वन्यजीवांची आवड असणार्यांसाठी गांधीनगरमधील आणखी एक
आकर्षण म्हणजे डिअर पार्क.इथे हरिणांना मोकळे सोडले आहे आणि त्यांना
मोकळेपणाने खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे.लहान मुले आणि कुटूंबासमवेत
काही वेळ घालवायला हि उत्तम जागा आहे.हरणांबरोबरच इथे मोरांचाही वावर
आहे.त्याचबरोबर इथे काही दुर्मिळ वनस्पती पहायला मिळतात.
पत्ता : बायपास रोड्,गांधीनगर
वेळः सकाळी ८ ते संध्याकाळी ५
संत सरोवर बांध गांधीनगर – Sant Sarovar Dam
साबरमती
नदीवर बांधलेले हे धरण म्हणजे एक पिकनिक स्पॉट बनला आहे.श्रध्दाळू लोक
अमावस्या आणि पौर्णिमेला स्नान करण्यासाठी इथे येतात.पावसाळ्यात साबरमती
नदी जेव्हा पुर्ण भरात वहात असते तेव्हा ते दृष्य बघण्यासारखे असते. पत्ता : गांधीनगर बस स्टँडपासून ५ कि.मी. वेळ : पुर्ण दिवस आणि संध्याकाळी
महुदी जैन मंदिर गांधीनगर – Mahudi Jain Temple,
मेहसाणा जिल्ह्यातील महुदी जैन मंदिर एक प्रमुख धार्मिक आणि पर्यटन स्थळ
आहे.या मंदिराची निर्मिती जवळपास २००० वर्षापुर्वी झाली असे मानले
जाते.महुदी जैन मंदिरात घंटाकर्ण महावीरांची मुर्ती आहे.या मुर्तीत दैवी
शक्ति आहे असे मानले जाते त्यामुळे दर्शनासाठी इथे प्रचंड गर्दी असते.
मंदिराच्या बाजुला तीस फुट उंचावर एक घंटा आहे.हि घंटा वाजवली तर मनातील
इच्छा पुर्ण होतात असे मानले जाते.त्यामुळे हि घंटा वाजवण्यासाठीही मोठी
गर्दी असते.
स्वर्णिम पार्क :-
या
बागेचे मुख्य आकर्षण म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा.याशिवाय या बागेत
सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी वॉकींग ट्रॅक, हिरवळीचे पट्टे आणि
मुलासाठी खेळण्याच्या सुविधा आहेत.याशिवाय इथे ससे,खारी आणि फुलपाखरे आहेत.
पत्ता : जी.रोड्,सेक्टर १२ बी,गांधीनगर
वेळः सकाळी ६ ते रात्री १०
किशनभवन कारंजे:-
गांधीनगरमधील हे एक पर्य्टकांचे आकर्षण आहे.या कारंज्यामध्ये एल.ई.डी.बल्ब बसविले आहेत.रात्री इथे साउंड आणि लाईट शो असतो.
भारतीय
स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे योगदान याला वाहीलेले हे संग्रहालय
आहे.गांधीजींच्या दांडी यात्रेचे संपुर्ण वर्णन आणि इतिहास सांगणारी ही
जागा आहे. पत्ता : सॉल्ट माउंट्,सेक्टर १३ सी,गांधीनगर वेळः सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० प्रवेश फि : भारतीय पर्यटकांसाठी रु १०/-, परदेशी पर्यटकांसाठी रु २००/-
वासन गाव :
वासन
गाव गांधीनगरपासून १३ कि.मी. दुर आहे .भगवान शंकराच्या मंदिरासाठी हे गाव
प्रसिध्द आहे.या गावात शंकराची चोवीस मंदिरे आहेत.इथे सापडलेल्या वीटा व
नाण्यावरुन हे गाव इ.स.पुर्व काळापासून अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत.
गुजरात हा राजे राजवाड्यांच्या काळी पाहायला गेलं तर पाण्याच्या
दृष्टीने दुष्काळग्रस्त प्रदेश म्हणून गुजरातकडे पाहिलं जायचं मग
गुजरातमध्ये प्रसिद्ध काय असेल तर राज्यांच्या काळातल्या विहिरी. पूर्ण
अभ्यास करून या सर्व विहीरी पहायला हव्यात.
वाव म्हणजे पायऱ्यांची विहीर. हि विहीर १४००व्या शतकाच्या अखेरीस राजपूत
राणी रुदाबाई यांच्या स्मरणार्थ बांधली होती. प्रवासी तसेच गावकर्यांना
विश्रांतीचे एक ठिकाण म्हणून सुरुवातीस याचा वापर होत असे. अशा प्रकारच्या
अनेक विहिरी गुजरातच्या विविध भागात आहेत. नंतर याचा उपयोग प्रामुख्याने
पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी होऊ लागला.
हि
विहीर अक्षरधाम मंदिरापासून साधारणता १८ किमी.च्या अंतरावर
अहमदाबाद-गांधीनगर महामार्गावर आहे. जवळपास ७५ मी. लांब असलेली हि विहीर १६
खांबावर जवळपास ६०० वर्षानंतर भक्कम स्थितीत उभी आहे. विहिरीची रचनाच अशी
केली आहे कि सूर्यकिरणे व्कचितच पाण्याला स्पर्श करतात त्यामुळे असे
म्हणाले जाते कि बाहेरच्यापेक्षा पाण्याचे तापमान ५-६ अंशाने कमी असते.
अदालज नि वाव
"अदालज नी वाव" इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर ADALAJ STEPWELL. STEPWELL ची फोड करायची झाली तर "WELL म्हणजे विहीर" आणि "तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या म्हणजेच STEPS" म्हणून "STEPWELL".
अश्या स्टेपवेल पाचव्या ते एकोणीसाव्या शतकात भरपूर बांधल्या गेल्या. तसं
पाहायचं झाल्यास गुजरात हा पाणी टंचाईचा प्रदेश म्हणून केवळ गुजरात
प्रदेशातच १२० हून अधिक विहिरी आढळतात, त्यापैकी अदालज येथील विहिरी
सर्वत्र लोकप्रिय आहे. अदालज हे अहमदाबाद पासून सुमारे १८ किमी दूर असलेलं एक गाव. अदालज ला जायचं झाल्यास अहमदाबाद वरून सिटीबस मिळतात
अदालज विहीर पहायची झाल्यास त्याची वेळ सकाळी ८ ते ६ आहे.
अदालज नि वाव चं प्रवेशद्वार
रखरखत्या उन्हातून वाटचाल करणाऱ्या तहानलेल्या पांथस्थांना विहीर फक्त
पाणी घेण्यासाठी नव्हे तर शीतल सावलीत विसावण्यासाठी आणि विसावताना मन
रिझवीत आल्हाददायी प्रसन्न करणारी देखील. पायऱ्यांवरून खाली उतरत गेल्यावर
दिसून येतो या विहिरीवर बांधलेला पाच मजले असलेला वालुकामय दगडात खोदलेला
कोरीव महाल. कडक उन्हात विहिरीवर कडेनी छत धरत पाण्याचे बाष्पीभवन कमी करत
पाणी आटू न देणारा, जमिनीच्या पोटात खोदलेला असूनही कुंद काळोखी नव्हे तर
अगदी हवेशीर, उजेड आणि सावली असलेला, आत शीतल होत जाणारा, बाहेरच्या
उन्हाच्या झळांपासून सुटका देणारा, नेत्रदीपक कोरीवकाम असलेला.. आताच्या
अहमदाबामध्ये पंधराव्या शतकात तिथे होते दांडई राज्य; राजपूत वाघेला राज
घराण्याचे. राणा वीर सिंग राजा होता तेव्हा त्या राज्याचा. पाणी कमी असलेले
त्याचे लहान राज्य. तहानलेल्या रयतेला पाण्यासाठी दूर पायपीट करायला
लागायची तेव्हा. पाऊस पडला नाही तर दुष्काळामध्ये प्रजाजन त्रस्त व्हायचे.
राजा वीर सिंगने अडालज येथे रयतेला पाण्यासाठी आणि वाटसरू, प्रवासी
पांथस्थांना विसावण्यासाठी आगळी वेगळी विहीर बांधण्याचे ठरविले आणि कुशल
कारागिरांच्या स्थापत्य कौशल्याला सुरुवात झाली. जमिनीत खोदलेली विहीर आणि
त्यावरचा पाच मजली महाल उभारण्यास सुरुवात झाली. राजा हिंदू, साहजिकच
बांधकामावर हिंदू शैलीचा ठसा. कोरीवकामात नवग्रहांच्या प्रतिमा, तत्कालीन
संस्कृतीमधील लोकजीवन त्याच्या प्रतिमा, हत्ती, घोडे, कमळ, पक्षी साकारले
गेले. विहिरीवरचा महाल अष्टकोनी- अनेक खांबांवर उभारलेला. खांबांवर कोरीव
नक्षीकाम त्या वेळच्या संस्कृतीचे प्रतिबिंब उमटविणारे, आतमध्ये प्रशस्त
मंडपासारखी जागा. महालाच्या या अष्टकोनात भूमितीय संरचना दिसून येतात. याचे
बांधकाम सुरू असताना एक आक्रित घडले. त्या वेळचा गुजरातचा सुलतान महमूद
बेगदा ऊर्फ महमूद शहाचे या छोटेखानी राजपूत राज्यावर आक्रमण झाले आणि लढाईत
राजा वीर सिंग शत्रू कडून मारला गेला. त्याची सौंदर्यवान राणी रुपबा ऊर्फ
रुडाबाईने सती जाण्याची तयारी केली. मात्र जेत्या महमूद सुलतानने तिच्या
सौंदर्याची मोहिनी पडून त्यापासून तिला रोखले आणि तिच्यापुढे लग्नाचा
प्रस्ताव ठेवला. राणी तयार झाली ती एका अटीवर, तिच्या पतीच्या स्मरणार्थ तो
विहिरीवरचा भव्य महाल बांधून झाल्यावर ती विवाहबद्ध होणार असल्याची अट
तिने घातली. राणीच्या सौंदर्यावर फिदा होत तिच्या प्रेमात पडलेला महमूद
तयार झाला आणि या महालाचे अर्धवट राहिलेले काम त्याने झपाटय़ाने पूर्ण करून
घेतले. हिंदू मंदिरे, लेणी मोगल राजवटीकडून उद्ध्वस्त होत असल्याच्या त्या
काळात महमूदने हे काम आधीच्या कलाकृतीला धक्का न लावता त्यावर इस्लामिक
शैलीचा बाज चढवत पूर्ण केले. विहिरीवरचा हा अद्वितीय, आगळा महाल बांधून
पूर्ण होताच त्याने राणीला विवाहाबद्दल विचारले. राणी विहिरीवरच्या त्या
सुंदर महालात गेली. मनात मूर्ती पतीची. त्याचे अखंड स्मरण. प्रार्थना आणि
पूजापाठ करण्याच्या निमित्ते गेलेली राणी पुन्हा परतली नाही. पतीच्या
चित्तेच्या ज्वाळा नाही तर त्या विहिरीचे जल जल करत पतीनंतर तिने आपली
जीवनयात्रा संपवली. पतीकडून अधुरे राहिलेले कार्य पूर्ण करून तिने जीवन
समर्पित केले. राजे, बादशहा आपल्या पत्नींच्या स्मरणार्थ महाल, स्मारके
बांधण्याच्या त्या काळात ही धर्यवान स्त्री मोठय़ा चातुर्याने आपल्या पतीचे
अर्धवट राहिलेले कार्य शत्रूकडून पूर्ण करून घेत आपल्या पतीस भेटण्यास
कायमची निघून गेली.
महमूद
शहा चिडला मात्र त्याने महालाची तोडफोड केली नाही. क्रूर होत बांधकाम
करणाऱ्या त्या पाच कलाकारांची हत्या केली. त्यांच्याकडून अशी देखणी कलाकृती
होऊ नये याची दक्षता म्हणून. अशी दु:खद किनार असलेली ही बाजू या
महालाविषयी पाच शतकांपूर्वीची आख्यायिकेमध्ये सांगितली जाते. अडालज इथला हा
विहिरीवरचा महाल १४९८ साली बांधून पूर्ण झाला. त्याला पाच लाख टांक इतका
खर्च आला. महालाच्या संगमरवरी शिळेवर हे तपशील- झालेला खर्च, बांधकाम पूर्ण
झाल्याची तिथी, प्रहर आदी संस्कृतमध्ये लिहिले आहेत. पाच मजली महालाच्या
पहिल्या मजल्यावर मंडपासारखी प्रशस्त जागा आहे. पायऱ्या असलेले तीन बाजूंनी
तीन जिने असलेली ही एकमेव विहीर आहे. पहिल्या मजल्यावरच्या मंडपात तेथून
जाता येते. खांब, सज्जा, छत, गवाक्ष येथली कोरीव नक्षीकाम लेण्यांसारखी
नेत्रदीपक कलाकृती, मजल्यांना जोडणारे आतमधले चक्राकार दगडी जिने सारेच
विस्मयकारी. पाच शतकांपूर्वीच्या त्या कसबी कारागिरांचे कौशल्य फक्त
कोरलेल्या नक्षीकामात नव्हे तर भूमितीय प्रमाणबद्ध रचना, आत उत्तम
वायुविजन, थंडावा, सावली आणि उजेड दोन्ही राहील अशी रचना यात दिसून येते.
स्थापत्यशास्त्राचा या आगळ्या बांधकामशैलीचा नमुना असलेली ही विहीर आणि
वालुकामय दगडात खोदलेला भव्य महाल दोन भिन्न शैलींची नजाकत असलेला कलेचा
विलोभनीय आविष्कार होय.
अंतर्गत कलाकुसर
अदालजच्या विहिरीचा अंतर्भाग
विहिरीच्या
बांधकामाची सुरुवात झाली ती १४ व्या शतकात नंतर चंपानेरहून आलेल्या
"मेहमूद बेगडा" ह्यांनी ही विहीर पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा संकल्प केला.
सोलंकी वास्तुशास्त्रीय शैलीतील बलुआ दगडांमध्ये बांधलेली, अदालज स्टेपवेल
पाच मजली खोल आहे. प्रत्येक मजला इतका विशाल आहे की लोकांना एकत्र
येण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध आहे.
पर्यटकांसाठी असलेली प्रशस्त जागा
वर्षभर पावसामुळे पाण्याच्या पातळीत हंगामी उतार-चढ़ाव होणार त्यानुसार तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खोल खोदले गेले.
राजा मेहमूद बेगडा ह्यांनी ही विहीर पूर्ण केल्यामुळे ही विहीर
इन्डो-इस्लामिक स्थापत्यशास्त्रात बांधली गेली आहे. त्यामुळे विहिरीवरील
शिल्पसुद्धा तशीच आढळतात.
अदालज च्या विहिरीतील शिल्पकला
सन १४९८ मध्ये ह्या विहिरीचं काम पूर्ण झालं. पाचशेहुन
अधिक वर्षे पूर्ण होऊनसुद्धा आजही ह्या विहिरीवरील कोरीवकाम पर्यटकांचे
लक्ष वेधुन घेतं. विहिरीच्या बाहेरून विहिरीचं एक दृश्य ज्यावरून आपल्याला
विहीरच्या लांबीचा अंदाज येईल.
"अदालज नि वाव "चं बाहेरून टिपलेले दृश्य
खरंतर अदालजच्या विहिरीसाठी कितीही वेळ असला तरी तो कमीच वाटेल
पत्ता: अडालज रोड, गांधी नगर, अहमदाबादपासून ३० कि.मी. वेळः सकाळी ८ ते संध्याकाळी ६ प्रवेश शुल्कः मोफत विशेष महत्वाचे : दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अडालज नी वाव येथे जल उत्सवाचे आयोजन केले जाते.
मोढेरा सुर्यमंदिर (Modhera Suntemple)
अदालज विहीर बघुन झाली कि अदालजवरून मेहेसाना आणि मेहेसाना वरून
मोढेराला जाण्यासाठी बसची संख्या जास्त आहे त्यामुळे पर्यटनाचा प्लॅन
ठरवताना अदालाज बावनंतर मोढेराच्या सूर्यमंदिराला भेट देणे सोयीचे आहे.
मेहसाणात
मध्ये रेल्वेमार्ग आणि हाइवे (NH14/27) चिकटूनच आहेत. जुनं शहर आणि सिटि
बस स्टँड पूर्वेस आहे. लॅाजटाइप एकदोन हॅाटल्स आहेत. पश्चिमेस राधनपूर
सर्कल, मोढेरा सर्कल, मेहसाणा बस पोर्ट हे एकदोन किमी अंतरात आहे. इथे
जनपथ,भाग्योदय वगैरे हॅाटेलस आहेत(राधनपूर सर्कल). ठीकठाक आहेत पण व्हॅल्यु
फॅार मनी नाहीत. मेहसाणा बस पोर्ट हा डेपो उत्तम आणि स्वच्छ आहे.
बाजुलाच असलेले जैन मंदिर अवश्य पाहा. इथे भरपूर रुम्स धर्मशाळेच्या आहेत
पण फक्त जैनांसाठी. जेवण चहा नाश्ता कुणालाही मिळतो. उत्तम शाकाहार.
मेहसाणा
डेपो/मोढेरा सर्कलहून भरपूर बसेस, शेअर टॅक्सीज मोढेरा (२५किमी)
जाण्यासाठी मिळतात. रस्ता उत्तम, ७०च्या स्पीडने वाहने जातात. ट्राफिक
नाहीच.
मोढेरा पाटी सूर्यदेव
मोढेराचं
सूर्यमंदिर हे बस स्टॉप पासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. सूर्यमंदिर व
सुर्यकुंड बघून खरंच डोळ्यांचं पारणं फिटलं. इतकं भव्य मंदिर व सभोवतालचा
असलेला परिसर पाहून डोळे थक्क होतात.मोढेरा हे छोटेसे गाव आहे. इथे इतके
सुंदर सूर्यमंदिर असेल यावर विश्वास बसत नाही. मोठे आवार पुरातत्व खात्याने
बाग करून छान ठेवले आहे. आवाराबाहेरच्या शेतात मोर,वानरे आहेत. मंदिरासमोर
मोठा पायऱ्यांचा तलाव आहे. सूर्याच्या मूर्ती मंदिराच्या बाहेरच्या
भिंतीवर असल्या तरी गाभाऱ्यात नाही. शैव शिल्पे नाहीत. शेषशायी विष्णु
आहे. खांब सुंदर आहेत. मोढेराहून बेचारजी मंदिर आणखी पंधरा किमी दूर आहे.
गुजरातमधलं प्रमुख शहर अहमदाबाद इथल्या ‘वल्लभभाई पटेल विमानतळा’पासून
सुमारे शंभर किलोमीटरवर वसलेलं मोढेरा हे गाव पुष्पावती नदीच्या तीरावरच्या
सूर्यमंदिराकरिता जगप्रसिद्ध आहे. मेहसाणा शहरापासून हे गाव सुमारे ४०
किलोमीटरवर आहे. इथलं सूर्यमंदिर गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रचलित
असलेल्या नागर स्थापत्यशैलीच्या ‘मरू-गुर्जर’नामक उपप्रकाराचं उत्कृष्ट
उदाहरण आहे. दगडावर दगड रचून बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामात कुठंही
चुन्याचा उपयोग केलेला आढळत नाही.
गुजरातमधील पाटण इथून राज्य करणाऱ्या सोलंकी राजवंशातील पराक्रमी राजा
भीमदेव पहिला यानं सन १०२६ मध्ये हे मंदिर उभारलं असे इथल्या शिलालेखात
उल्लेख आहेत. म्हणजे, तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये जेव्हा राजराजा चोळ/चोल
शिवांना समर्पित भव्य बृहदीश्वर मंदिर उभारत होता त्याच काळात गुजरातमध्ये
राणा भीमदेव सोलंकी पहिला सूर्याला समर्पित हे सूर्यमंदिर उभारत होता.
गुजरातचे सोलंकीराजे म्हणजे सूर्यवंशी चालुक्य. ते सूर्यदेवाला स्वतःची
कुलदेवता म्हणून भजत असत. त्यांच्या आराध्यदेवाच्या म्हणजे सूर्यदेवाच्या
पूजेसाठी त्यांनी हे भव्य सूर्यमंदिर निर्माण केलं; पण या जागेचं महत्त्व
फार पुरातन आहे असं मानलं जातं. स्कंदपुराणानुसार, आजच्या मोढेरा गावाभोवती
एक मोठं अरण्य होतं. त्या अरण्यात ऋषी-मुनींचे खूप आश्रम होते म्हणून
त्याला ‘धर्मारण्य’ असं संबोधलं जायचं. रावणाचा वध करून अयोध्येत परतणाऱ्या
श्रीरामांनी रावणहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी सीतेसह या
धर्मारण्यात जाऊन यज्ञ केला अशी कथा आहे. आम्हाला मंदिर दाखवणाऱ्या
‘गाईड’च्या मते, प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ
केला आणि या ठिकाणी ‘मोढेरक’ या गावाची स्थापना केली. याच गावाला पुढं
‘मोढेरा’ असं म्हटलं जाऊ लागलं. श्रीराम इथं आले होते असा लोकांचा विश्वास
असल्यामुळे मोढेराच्या सूर्यमंदिरासमोरील कुंडाला ‘रामकुंड’ असंही म्हटलं
जातं. सन १०२४-२५ च्या सुमारास सौराष्ट्रातील सोमनाथाचं मंदिर
उद्ध्वस्त करून पुढं सरकणारा गझनीचा क्रूरकर्मा महमूद याचं आक्रमण चालुक्य
राजा भीमदेव पहिला यानं मोढेरा इथं
युद्ध करून रोखलं होतं. इतिहासतज्ज्ञांचं असं मत आहे, की या देदीप्यमान
विजयाचं प्रतीक म्हणून मोढेरा इथं हे भव्य सूर्यमंदिर उभारण्यात आलं.
हिंदुस्थानातील सूर्यपूजा : वेदकालापासून इराण व हिंदुस्थानात सूर्यपुजा
चालू आहे. अजुनही भारतात सूर्यपुजेला मान आहे. इराणमधून मात्र तिचे
उच्चाटन झाले. पण मधे केव्हातेरी कुठेतरी काही पंथ अजूनही तेथे गुप्तपणे ही
पूजा करतात असे वाचले होते. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे हे माणसाला
प्रथमपासून माहीत असल्यामुळे वेदात त्याची प्रार्थना केली आहे. आजही
परमेश्वराचे (सूर्याचे) आभार मानण्यासाठी आपण ही प्रार्थना करीत असतो. खरे
तर या एकाच देवाची प्रार्थना केल्यास इतर कुठल्याही शक्तीची उपासना
करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, परंतु माणसाचे मन कशात आसरा
शोधेल सांगता येत नाही. म्हणूनच त्याच्या असंख्य रुपांची तो प्रार्थना करीत
असतो. ॐ भूर्भुवः॒ स्वः । तत्स॑वितुर्वरे॑ण्यं भ॒र्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि । धियो॒ यो नः॑ प्रचो॒दया॑त् ॥ सूर्याची मुर्ती. सूर्याची
मुर्ती कशी करावी याचे काही नियम आपल्या शिल्पशास्त्रात लिहून ठेवलेले
आहेत त्याप्रमाणे त्याच्या दोन्ही हातात कमळे हवीत. ती त्या मुर्तीच्या
खांद्यापर्यंत जायला हवीत. त्याच्या पायात बुट दाखविले पाहिजेत...त्याचे
सात घोडे दाखविले पाहिजेत इ.इ. असे अनेक नियम शिल्पशास्त्रात लिहून ठेवले
आहेत व त्याच प्रमाणे मूर्ती घडवाव्या लागत.
भारतातही सूर्याची मंदीरे पार अफगाणिस्थान, पाकिस्तान पासून
दक्षिणेपर्यंत सापडतात. त्यातील गुजरातमधील मोढेरा येथील सूर्यमंदीर मी
नुकतेच पाहिले. आपल्या येथे प्रत्येक मंदिरामागे एखादी दंतकथा असते तशी
याच्यामागेही आहे. रामाने एका ब्राह्मणाला म्हणजे रावणाला मारले म्हणून
प्रायश्र्चित्त म्हणून एक यज्ञ करायचा होता. त्यासाठी त्याने एक मोढेरक
नावाची नगरी वसविली. त्याचे पुढे झाले मोढेरा. पुढे मोढेराला १०२६
साली सोलंकी घराण्याचा राजा भिमदेव याने हे सूर्यमंदीर बांधले. सोलंकी हे
सूर्यवंशाचे असल्यामुळे हे स्वाभाविकच होते. मंदीराचे बांधकाम किती काळ
चालले होते याची कल्पना नाही परंतू राजाने व त्याच्या कलाकारांनी हे मंदीर
किती जीव ओतून बांधले आहे याची कल्पना त्यावरील कलाकुसरीवरुन येऊ शकते.
बऱ्याच मंदीराप्रमाणे येथेही मावळत्या सूर्याची किरणे गाभाऱ्यात पडतात.
भारतातील बरीचशी देवळे तीन भागात बांधली जातात. गर्भगृह, गुढमंडप आणि असलाच तर स्वर्गमंडप.
या
मंदिराची काही आपली स्वत:ची वैशिष्ठ्ये आहेत. एकतर पुष्करणीत
(सूर्यमंदीरात याला सूर्यकुंड म्हणतात) पाय धुतल्याशिवाय या मंदीरात प्रवेश
करता येत नसे, म्हणजे प्रवेश करण्याचा मार्गच असा आखला होता.
सूर्यमंदिराचे समोरून टिपलेले दृश्य
मंदिराचा इतिहास पाहता कोणार्कच्या सुर्यमंदिरानंतर सर्वाधिक प्रसिद्ध असलेलं कोणतं मंदिर असेल ते "मोढेराचे सुर्यमंदिर". ह्या
मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराच्या बांधणीच्या वेळी कुठेही
चुन्याचा उपयोग केला गेलेला नाही. हे मंदिर राजा सोलंकीने सन १०२६ मध्ये २
भागात बनवलं आहे त्याचा पहिला भाग गर्भगृह व दुसरा सभामंडप असा आहे
मंदिराच्या सभामंडपात एकूण ५२ स्तंभ आहेत ज्यावर विविध देवी देवतांचे शिल्प
आहेत त्याशिवाय रामायण महाभारतच्या प्रसंगांना दाखविण्यात आले आहेत
गर्भगृह व सभामंडप
सभामंडपातील खांब
खांबांवर असलेले बारीक नक्षीकाम
मंदिर अश्या पद्धतीत बनवले आहे की जेणेकरून सकाळी होणाऱ्या
सूर्योदयाच्या वेळी पहिलं सूर्यकिरण हे गर्भगृहावर पडलं पाहिजे.
सभामंडपाच्या समोर असलेलं कुंड हे "सुर्यकुंड किंवा रामकुंड" म्हणून
प्रसिद्ध आहे सोलंकी राजा सूर्यवंशी होते ते सूर्याला कुलदैवत म्हणून पूजत
असे म्हणून त्यांनी आपल्या आद्यदेवताच्या पूजेसाठी म्हणून ह्या मंदिराची
स्थापना केली. अल्लाउद्दीन खिलजी ने केलेल्या परकीय आक्रमणात ह्या मंदिराचे
प्रचंड नुकसान झाले त्याने ह्या मंदिरातील काही मूर्त्यांची तोडफोड केली
म्हणून आजमितीस ह्या मंदिरात पूजा करणे निषिद्ध आहे.
गर्भगृह व सभामंडप
मोढेराच्या ह्या मंदिराचा उल्लेख पुराण काळात सुद्धा झालेला आहे जसं की स्कंद पुराण व ब्रह्मपुराणात हा परिसर "धर्मरण्य" म्हणून
ओळखला जात असे. पुराणानुसार असंही म्हंटलं जातं प्रभु श्रीरामाने रावणाचा
वध केल्यानंतर आपल्या गुरू श्री वशिष्ठना एक असं ठिकाण सुचविण्यास सांगितले
जिथे ते आत्मशुद्धी करू शकतील व ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळवू
शकतील तेव्हा विशिष्ट ऋषिंनी त्यांना ह्याच ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते "रामकुंड", हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर "सभामंडप "आणि शेवटी "गूढमंडप अथवा गर्भगृह.
गर्भगृह सभामंडप व सभामंडपासमोरील सूर्यकुंड
तिन्ही संकुलांची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे
१ ) रामकुंड उर्फ सूर्यकुंड
या मंदिराच्या प्राकारात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डोळ्यात भरतं ते
इथलं विशाल कुंड. याच कुंडाला ‘सूर्यकुंड’ किंवा ‘रामकुंड’ या दोन्ही
नावांनी संबोधलं जातं. या रामकुंडाची रचना गुजरात-राजस्थानमध्ये प्रचलित
असलेल्या ‘वाव’ किंवा खाली उतरता उतरता निमुळत्या होत जाणाऱ्या पायऱ्या
पायऱ्या असलेल्या विहिरीप्रमाणे म्हणजेच स्टेपवेलप्रमाणे केलेली आहे.
थोड्या थोड्या अंतरावर पायऱ्यांवर छोटी छोटी मंदिरं कोरलेली आहेत. एकेकाळी
रामकुंडाच्या पायऱ्यांवर विविध देवतांना समर्पित केलेली १०८ छोटी मंदिरं
होती. सध्या त्यातली फार थोडी चांगल्या स्थितीत आहेत.( त्याची माहिती त्या त्या फोटोंच्या खाली दिलेली आहेत.) त्यातलं
देवी घालवणाऱ्या शीतलामातेचं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाण्याचं
दुर्भिक्ष्य असलेल्या गुजरातसारख्या परिसरात अशा वावी उन्हाळ्यात पूर्ण
गावाचा पाण्याचा स्रोत असत. रामकुंड हे उत्तर दक्षिण १७६ फुट लांब आहे तर
पूर्व पश्चिम लांबी १२० फुट आहे. रामकुंडाची रचना ' वाव ' किंवा पायऱ्यानी
बनलेल्या विहीरीप्रमाणे असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते.
सूर्यकुंड
कुंडानजीक असलेली विविध देवतांची छोटी मंदिरे
यात
स्नान केल्यावर किंवा सूर्याला अर्ध्य दिल्यावर साधकाला एकूण दोन मंडपातून
जावे लागे जे गरुडस्तंभासारख्या खांबांवर उभे केले होते.
पहिल्या मंडपाचे उरलेले दोन खांब काठावरची देवळे
शितळादेवी; हिच्या डोक्यावर सूप आहे. देवीच्या साथीत मुलांना देवी येऊ नयेत म्हणून भाविक हिची पुजा करीत व अजूनही करतात. सूर्यकुंडाभोवती १०८ मुर्ती आहेत व चार कोपऱ्यात गणपती, नटराज, शितळामाता, व विष्णू यांची देवळे आहेत.
गणपती
नटराजाची अत्यंत सुबक मूर्ती. त्याच्या नृत्यातील डौल बघण्यासारखा आहे.
श्री विष्णू
या देवतांची देवळे एकसारख्या अशा देवळात आहेत.
१०८ मुर्तींपैकी काही
२) सभामंडप
रामकुंड पाहून आपण मंदिराकडे वळलो की आपल्याला प्रथम दिसतो तो
अत्यंत नाजूक कोरीव कामानं नटलेल्या खांबांवर तोललेला भव्य सभामंडप.
रामकुंडाच्या पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश करताना आधी दिसतं ते दोन
प्रचंड कोरीव स्तंभांवर उभं असलेलं कीर्तितोरण. पुढं मुसलमानी आक्रमणात या
मंदिरानं खूप घाव सोसले, त्यात या तोरणाचा वरचा भाग नष्ट झाला, तरी त्याचे
दोन खांब अजूनही गतवैभवाची साक्ष देतात. सभामंडप ‘सर्वतोभद्र’ म्हणजे चारही
बाजूंनी प्रवेशद्वारं असलेला आहे. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन
प्रकारचे आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेले छोटे खांब आणि मुख्य मंडपात
जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब, ज्यांच्यावर रामायण-महाभारतातले व
इतर पौराणिक कथांमधले प्रसंग कोरलेले आहेत. या मंदिरात सौरवर्षातील ५२
आठवड्यांचं प्रतिनिधित्व करणारे ५२ स्तंभ आहेत.
किर्ती तोरण
सभामंडप
सभामंडपाची काही छायाचित्रे:-
छतावरील नक्षिकाम
सभामंडपात
चारही बाजूंनी जाता येते. आतमधे खांबावर रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत.
छपराची उंची साधारणत: २३ फूट आहे. गुढमंढपातही अनेक शिल्पे कोरलेली आहेत
काही कामसूत्रातीलही आहेत. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३०० वर्ग फूट आहे. आतील
भागात पूर्वी सूर्याची मुर्ती असावी. त्याच्याभोवती प्रदिक्षणेचा मार्ग ही
आखलेला आहे. दर २१ मार्चला सूर्याची किरणे त्या मुर्तीवर पडतात. गुढमंडपात
एक भुयार होते असे आमच्या गाईडने सांगितले जे सध्या बुजलेले आहे असेही
सांगितले. खरे खोटे देव जाणे.
चहूबाजूस असणारे प्रवेशद्वार
सभामंडपाच्या आतील खांब व तोरण
सभामंडपातील बारीक कलाकुसर
३) गूढ मंडप
सभामंडप
बघून आपण जातो ते मुख्य मंदिराच्या वास्तूकडे, ज्याला ‘गूढमंडप’ असं नाव
आहे. गूढमंडपाच्या बाहेरील भिंतीवर सूर्यदेवाच्या १२ प्रतिमा कोरलेल्या
आहेत. तसेच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती, अष्ट दिक्पाल यांच्या
मूर्तींनी सजवलेल्या आहेत.या प्रतिमांचं वैशिष्ट्य म्हणजे, यातल्या काही
प्रतिमांमध्ये सूर्याच्या पायात गुढघ्यापर्यंतचे बूट दाखवलेले आहेत. या
मूर्तींवर पर्शियन शिल्पकलेचा प्रभाव आहे, असं काही
पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं मत आहे. गूढमंडपाच्या बाहेरील देवकोष्ठांमधून
सूर्याबरोबरच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती आणि अष्टदिक्पाल यांच्याही
मूर्ती दिसतात.
गूढमंडपाला तीन बाजूंनी तीन खिडक्या आहेत. वर्षातून काही विशिष्ट
दिवसांमध्ये या खिडक्यांमधून सूर्यकिरण प्रवेश करत आणि गर्भगृहात असलेल्या
सूर्यमूर्तीवर पडत असे उल्लेख तत्कालीन लेखांमध्ये सापडतात. गूढमंडपाच्या
दर्शनी भिंतीवर काही मिथुनशिल्पंही आढळतात. गूढमंडपावर दुर्दैवानं आज शिखर
अस्तित्वात नाही. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी या धर्मांध सुलतानानं
पाटणच्या सोलंकी राजांचा पराभव करून इथल्या हिंदुमंदिरांचा भरपूर विध्वंस
केला. त्यातच त्यानं मोढेराचं हे सूर्यमंदिरही लुटलं आणि इथल्या मूर्ती
घणाचे घाव घालून तोडल्या.
गूढ मंडप
गुढमंडपाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील देवतांची दृश्ये
मंदीराच्या बाहेरील भिंतीवरील काही शिल्पे
बर्याच नमंदीरात मंदीराचा भार उचलण्यासाठी गजथर दाखविलेला असतो. येथे मात्र कमळाचा थर दाखविलेला आहे....
गुढमंडपातून दिसणारा सभामंडप
कमानीवरील कोरीवकाम
सूर्यदेव
मंदिराच्या चहूबाजूस असलेली कलाकुसर
बाह्यभागातल्या
एका शिल्पपट्टिकेवर एक छोटेसे प्रसूतिचित्र आहे. त्यात 'स्क्वॉटिंग'
स्थितीतली प्रसूती दाखवली आहे. तिथले गाईड हे अगदी छोटे शिल्प आवर्जून
दाखवतात आणि आजकाल पश्चिमेकडे लोकप्रिय होऊ घातलेली ही प्रसूती मुळातली
आपल्याकडचीच आहे असे अभिमानाने सांगतात. (सांगत असत, आता माहीत नाही.)
आज
मोढेराच्या सूर्यमंदिरातलं गर्भगृह रिकामे आहे आणि आपण आत डोकावलं तर
गर्भगृहात चांगला आठ-दहा फूट खोल असा एक खड्डा दिसतो. इथले गाईड आवर्जून
सांगतात, की हा गर्भगृहातील दहा फूट खोल खड्डा एकेकाळी सोन्यानं भरलेला
होता आणि त्यावर सूर्यदेवाची पूर्ण सोन्याची सात घोड्यांच्या रथावर
विराजमान असलेली मूळ मूर्ती ठेवलेली होती. मूर्तीच्या भालप्रदेशात एक
तेजस्वी हिरा जडवलेला होता. मूर्तीवर पडणारे सूर्यकिरण त्यातून परावर्तित
होत असत आणि मंदिराची सर्व वास्तू दिव्य प्रकाशानं उजळून निघे.
दुर्दैवानं आज त्यापैकी काहीही अस्तित्वात नाही. खिलजीनं या मंदिराचा
पुरता विध्वंस केलेला आहे; पण तरीही जे शिल्लक आहे तेच इतकं डोळे दिपवणारे
आहे, की मूळ मंदिर किती वैभवशाली असेल हा विचार राहून राहून अस्वस्थ करतो.
सूर्यमंदिरात प्रवेश केल्यावर बाहेर निघायचा विचारसुद्धा मनात येत नाही.
सूर्यकुंड
अप्रतीम बघत रहावे असे आहे. सूर्यकुंडाच्या भोवती पायऱ्या व इतर देवतांची
मंदीरे आहेत सूर्यकुंड आयातकृती असून १७६ फूट लांब व १२० फूट रुंद आहे.
रानी की वाव
पाणी
हे जीवन. प्रत्येक जीवमात्राला जीव जगविण्याची आस. त्यासाठी पाण्याच्या
स्रोताकडे वळतात त्याची पावले. झरे, नद्या, सरोवरे, भूगर्भातील गोडय़ा
पाण्याचे झरे.. अथक शोध, उन्हातली तृषार्त वणवण पाण्यासाठी आदिम
काळापासूनची. मिळालेले पाणी जतन करताना पावसाचे पाणी साठविणे, वाहते पाणी
अडविणे, बांध, बंधारे, धरणे बांधणे, कालवे काढणे; गोडे पाणी शोधत जमिनीत
खोल विहिरी खणणे अशा विविध उपायांद्वारे पुरातन कालापासून आजमितीपर्यंत अथक
केली जाणारी आणि यापुढेही करायला लागणारी ही यातायात निव्वळ जगण्यासाठी..
उष्ण कटिबंधातील प्रदेशात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई डोळ्यातून पाणी
काढणारी. या खडतर समस्येला सामोरे जायचे, त्यावर मार्ग काढायचे प्रयत्न
आपापल्या परीने सर्वाचे.
राणी की वाव पाटी
प्राचीन भारतात त्यावेळच्या राजे, महाराजे, संस्थानिकांनी आपापल्या
राज्यात नद्यांना कालवे काढून, विहिरी बांधून तहानलेल्या रयतेला पाणी
पुरविले. जमिनीच्या पोटातील पाण्यापर्यंत खोल उतरत जाणे सुलभ व्हावे यासाठी
त्या वेळी पायऱ्या असलेल्या विहिरी बांधण्याची पद्धत रूढ होती. या प्राचीन
पद्धतीची मुळे हजार वर्षांअगोदरपासून आढळतात. संस्कृती विकसित होताना
अन्न, पाणी, निवासाच्या मूलभूत गरजा भागविण्याबरोबर कलेचा उदय होत त्याचा
आविष्कारही दैनंदिन जीवनात उमटतो. पाणथळ जागा विपुल असलेल्या गुजरात
राज्यामध्ये गोडय़ा पाण्याची वानवा शतकांपासूनची. उष्ण हवा पाण्याची गरज
अजूनच वाढविणारी. पायऱ्या असलेल्या मोठय़ा विहिरी खोदणे ही पद्धत तेथे हजार
वर्षांपासून अवलंबिली जाणारी.
राणी की वाव साधारण इ.स.१०२२ ते १०६३ च्या दरम्यान सोळंकीराजा भीमदेव
याच्या स्मरणार्थ बांधलेली आहे. हा राजा मुलराजाचा मुलगा. याचा काळ होता
१०२२ ते साधारणत: १०६३. म्हणजे ज्या काळात जेरुसलेममधे मुसलमान व ख्रिश्चन
क्रुसेडमधे एकामेकांचे गळे घोटत होते तो हा काळ. हे घराणे अनहिलवाड पट्टन
या गाचाचे म्हणून ओळखले जायचे. या घराण्याचे राजे बरेच ताकदवान असावेत कारण
ज्या प्रकारची शांतता असे बांधकाम करण्यास लागते ती त्यांनी येथे राबविली
होती हे उघड आहे.
पाटण शहराची स्थापना झाली ७४६ साली राजपूत राजी वनराजा चावडा याच्या
काळात. ही गुजरातची राजधानीही काही काळ होती. काही काळ म्हणजे अंदाजे ६००
वर्षं. चावडा घराणे अंदाजे ७४६ ते ९४२ सोलंकी घराणे अंदाजे ९४२ ते १२४४ वाघेला घराणे अंदाजे १२४४ ते १३०४ या घराण्यांनी पाटणहूनच गुजरातवर राज्य केले. अनहिलवाड (पूर्वीचे पाटण) हे त्या काळातील फार मोठे शहर असावे.
११८०
साली महंमद घोरीने पाटणवर आक्रमण केले पण सोळंकींनी ते परतवले पण
दुर्दैवाने पुढे त्याच्याच एका सरदाराने म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने १२००
च्या आसपास पाटणचा विध्वंस केला. पुढे दिल्लीच्या सुलतानाचा र्हास
झाल्यावर गुजरातचा सुलतान स्वतंत्र झाला व त्याने त्याची राजधानी
अहमदाबादला हलविली. साहजिकच त्यामुळे पाटणचे महत्व कमी कमी होत गेले.
गुजरातची जुनी राजधानी पाटनगर / पाटण होती. नंतर आक्रमणानंतर त्याची
नासधूस झाली. स्वातंत्र्यानंतर वडोदरा करण्याचा विचार होता परंतू अहमेदाबाद
झाली आणि त्यानंतर सध्याची गांधीनगर. जुन्या पाटण गावाचा रस्ता आल्यावर
विटांनी बांधलेली वीसपंचवीस फुट उंच तटबंदी आणि दरवाजे दिसतात. राणी की वाव
परिसर मोठा सुंदर राखला आहे. बाग आहे आणि भितींबाहेर मोरपण आहेत.
जमिनीच्या आत चाळीसपन्नास फुट पायऱ्या उतरून विहिर आहे. परंतू पूर्ण
शेवटपर्यंत जाऊ देत नाहीत. आतल्या भिंतींवर तीनचारशे मोठ्या मूर्ती आहेत.
एक
जलमंदिरच असावे त्या काळातले. इथे विष्णू दशावतारची
शिल्पे,सुरकन्या,विषकन्या,महिषासुरमर्दिनी ही शिल्पे प्रामुख्याने
दिसतात.ती इतकी अप्रतिम कोरलेली आहेत की त्यांचा
डौल,सौंदर्य,रेखीवपणा,त्यातले शास्त्र,त्यांचे अलंकार्,आयुधं,चेहेर्यावरील
भाव, काय बघू काय नको असे होऊन जाते. केवळ नजरबंदी करणारी कारागिरी! याच
विहिरीचा वरुन देखील देखावा बघता येतो. तोही एक विलक्षण अनुभव आहें.
मजल्या,मजल्यांच्या रचनेत जवळ्जवळ आठशे शिल्पे सामावली आहेत.तीही एक से
बढकर एक. सर्वात तळाशी शेषशायी विष्णूचे शिल्प आहे..
रानी कि वाव
मेहेसाणामार्गे पाटणला येऊ शकतो. पाटण हे लहानसे खेडेगावासारखे वाटणारे
गाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. सर्वात आधी पाटण हे पटोला साड्यांसाठी
प्रसिद्ध असणारे गाव आता 'रानी कि वाव' (राणीची विहीर) साठी पण प्रसिद्ध
आहे.पाटण गावातच वाव ला जायच्या रस्त्यावर एक म्युझियम आहे. त्याच्या समोरच
पटोला हाऊस म्हणून दुकान कम म्युझियम आहे. 10 रुपये प्रवेश फी आहे.
मालकांपैकीच एका व्यक्ती पूर्ण माहिती देते. खालच्या मजल्यावर एक हातमाग
आहे, त्यावर एक साडीचे काम बघायला मिळते. ऐतिहासिक फोटो, वेगवेगळ्या
देशातील साडीचे, कपड्याचे नमुने, वेगवेगळे साडीचे प्रकार, पटोला साडी
बनवायची प्रोसेस असं सगळे आहे. साडीच्या किमती 1.5 लाखापासून सुरू होतात.
पण 2 वर्ष वेटिंग असते. पाटणला गेल्यावर ह्यासाठी वेळ काढलाच पाहिजे.
वाटेत एका गावची तटबंदी लागली खरंतर जुन्या काळातील खरं पाटण म्हणतात ते हेच ते. तिथूनच एक किमी अंतरावर ही वाव आहे.
पाटण गावाची तटबंदी
राणी कि वावचा आजूबाजूचा परिसर हिरवळीने न्हाऊन निघाला आहे. हि हिरवळ हे पाहून आपले मन प्रसन्न होते.
'रानी कि वाव'चा परिसर
पाटण
गावात आलो कि कुठेही आपण एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी जातो आहोत असे
वाटत नाही. पाटणचा बाजार रविवारी बंद असतो हे कळले. पण त्यामुळे ट्राफिक
नसते. पाटण बस स्टँड नवीन पाटणमध्ये आहे आणि राणी की वाव जुन्या पाटणमध्ये
पाच किमी आतमध्ये. गावाच्या अगदी शेवटाला वळण घेतले कि भारतातल्या
सुप्रसिद्ध विहीरींची महाराणी म्हणावी अशा राणीं की वाव द्रुष्टीपथास
पडते.थोडी दूर दगडांची एक जमिनीवर आलेली एकफुट उंचीची पायरी दिसली. थोडे
पुढे गेल्यावर त्या पायरी पलिकडील दृष्य बघून ताजमहाल जसा एकदम समोर येतो
त्याची आठवण झाली. २३ मिटरची खाली उतरण्यास आपल्याला चार मजले सात
जिन्यांच्या सहाय्याने उतरावे लागतात. आता फक्त एकाच मजल्यापर्यंत जाता
येते. पण पूर्वी तिसर्या मजल्यापर्यंत उतरण्याची परवानगी होती. एका
नतद्रष्ट माणसाने एका मुर्तीचा हात तोडल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली.
मुर्तींचा दगड तसा ठिसूळ आहे त्यामुळेही असेल कदाचित.
विहिरीच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन पोहोचल्यावर नजर जाईल तिथपर्यंत विहीर
विहीर आणि फक्त विहीर. एका नजरेत बसणं शक्यच वाटत नाही. त्याहून समोर
दिसणारी ती कलाकुसर. प्रथमतः पाहिल्यावर प्रश्न पडतो कि ह्या सगळ्यात विहीर
आहे कुठे?
रानी कि वाव चे समोरून टिपलेले दृश्य
पाटण गावाजवळून पुरातन अशा सरस्वती नदीचा प्रवाह जातो. ही नदी आता आटलेली
असली तरी बाराव्या शतकात या नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे आलेल्या गाळात
विहीर पूर्णपणे भरून गेली. त्या नंतर लोक विहिरीचे पाणी वापरत असत पण या
विहिरीच्या बाजूच्या बांधकामाचा सर्वाना विसर पडला. विहिरीभोवती शेती केली
जाऊ लागली. १९८०च्या सुमारास काही कारणाने शेतकऱ्यांनी खोदकाम केले असता
त्यांना विहिरीचे अवशेष दिसू लागल्यावर भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन
करून ही वाव प्रकाशझोतात आणली.
वास्तू विशेष
६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी हि वाव साधारण २७ मीटर
खोल आहे. सात मजले असणाऱ्या या विहिरीत प्रत्येक मजल्यावर रेखीव शिल्पकाम
केले आहे, आजूबाजूच्या भिंतीवरसुद्धा अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. जी
पाहताच क्षणी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. विहिरीत प्रवेश केल्यावर
उजव्या बाजूस वामन अवताराचे एक शिल्प दिसते ते अतिशय दुर्मिळ असून ते
महाराष्ट्रात पाहावयास मिळत नाही.
सगळ्यात मागे दिसते आहे ती विहीर..ही गावकर्यांना थोडीफार माहीत होती.
विहिरीच्या दोन्ही बाजूस असलेली कलाकुसर
आत शिरल्याशिरल्या दिसणार्या शिल्पांनी सुशोभीत भिंती..
मागील बाजूने टिपलेले दृश्य
काळाच्या
ओघात या विहिरीला पाण्याचा पुरवठा करणार्या जमिनीखालील झर्यांनी
जमिनीतील हालचालींमुळे त्यांचे पात्र बदलले आणि नंतर ही विहीर संपूर्णपणे
गाळाने भरली. त्यामुळेच त्यातील अप्रतीम शिल्पे मुसलमानांच्या आक्रमणापासून
वाचली नाहीतर याचेही तुकडे पडले असतेच. जी शिल्पे गाळात गाडली गेल्यामुळे
वाचली तीच आता वातावरणाशी संबंध येताच झिजत जाणार हा काळाचा व निसर्गाचा
खेळ आहे असेच म्हणावे लागेल. ही विहीर तेथे आहे हे गावकर्यांना माहीत होते
कारण वृद्ध माणसे सांगतात की त्यांनी त्या विहीरीतून पाणी काढले होते पण
वटवाघळांमुळे त्यांची कधी आत जायची हिंम्मत झाली नसावी. पण त्यांना फक्त
त्या विहीरीबद्दल माहिती होती. त्या विहिरीच्या पाण्याकडे उतरण्यासाठी ज्या
पायर्या होत्या त्यावर जमलेल्या मातीवर ही मंडळी शेती नांगरत असत.ही
विहीर काळाच्या ओघात गाळात लपुन गेली होती.पुरातत्व खात्याने १९८० नंतर
अत्यंत काळजीपूर्वक उत्खनन केल्याने आता आपल्याला आहे या दिमाखदार स्वरुपात
दिसते आहे.
अप्सरा...
विहिरीची
मापे पाहिली तर आपण तोंडात अचंब्याने बोटे घालतो. ६४ मिटर लांब, एका
बाजुला २७ मिटर व एका बाजुला २७ मिटर. खोली आहे जवळजवळ २३ मिटर.
श्रीविष्णू वराह अवतार... भूदेवीला
एका हिरण्यकश्य नावाच्या राक्षसाने पळवून पाताळात एका सरोवरात लपवून
ठेवले. पृथ्वी नाहीशी झाल्यामुळे सगळीकडे हाहा:कार माजला. त्यावेळे तेथे
प्रकट होऊन श्रीविष्णूने वराहाच्या अवतारात जाऊन त्या राक्षसाचा वध करुन
भूदेवीला आपल्या सुळ्यांवर बसवून वर आणले.....अशी काहीतरी गोष्ट आहे ती...
एक सुंदर बासरीवादक..
ओठांची रंगरंगोटी करणारी एक सुंदर स्त्री...
आळस
देणार्या स्त्रियांच्या सौंदर्याबद्दल आपल्या साहित्यात बरेच काही लिहिले
गेले आहे व अशा स्त्रियांची शिल्पेही विपूल प्रमाणावर सापडतात. असेच एक
शिल्प कोपेश्वराच्या मंदिरावरही आहे...
बहुतेक मदन...हातात उस व दुसर्या हातात बाण हे त्याची चिन्हे दिसत आहेत....
पायर्यांच्या कडेला असलेल्या भिंतीवरचे कोरीवकाम...
कृष्णधवलची मजा काही औरच असते...
लहानसहान हजारो शिल्पे...
गुढरम्यता....
या प्रकारच्या खांबावर सगळा डोलारा उभा आहे..
भिंतींवरचे शिल्पकला...
यातील
मूर्तींचा खजिना सापडला १९५० च्या मध्यास. भारतीत पुरातत्व खात्याने ५०
वर्षे कष्ट करुन हा खजिन्याची गाळापासून सुटका केली व दहाच वर्षात
युनेस्कोने रानी-की-बावला जागतिक वारसाचा दर्जा बहाल केला. या विहीरीत एकूण
२९२ खांब असले असते पण आता त्यातील २२६ खांब जागेवर आहेत. आत्ता ज्या
जमिनीवर उभी आहे त्या जमिनीवर मला वाटते अजून बरेच काही सापडण्यासारखे
असणार. तेथे उत्खनन का केले जात नाही हा संशोधनाचा विषय ठरावा. गुजरात-कच्छ
ते पार सिंधपर्यंत ख्रिस्तपूर्व काळापासून अशा अतिखोल विहिरी खणण्याचे
ज्ञान स्थानिक लोकांकडे उपलब्ध होते हे निर्विवाद. पाण्याच्या काठाने
असलेले बांधकाम ना फक्त सूर्याच्या तीव्र किरणांपासून व उष्णतेपासून
संरक्षण करायचे पण मला वाटते तेथे पाण्याने गारवाही निर्माण होत असावा.
विशेषत: राण्यांसाठी... आता एवढ्या खोलवर असलेल्या पाण्यापर्यंत
पायर्यांवरुन पोहोचायचे म्हणजे वर्तुळाकार (चौकोनी पण स्कृचे तत्व) आकारात
पायर्यास हव्याच. २३ मिटर खोल उतरण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशेब केला
तर त्या वेळात भिंतीवरील शिल्पे पहात पहात खाली उतरणे हे स्वाभाविकच
म्हणायला हवे. हे वाचून तुम्ही तेथे गेलात तर आपल्या डोळ्यासमोर राण्या,
त्यांच्या दासी व इतर लवाजमा त्या पायर्या उतरत आहेत हे दृष्य निश्चितच
उभे राहील.. शिवाय या मजल्यांवर त्या काळातील खास बायकांची तुळशीबागही भरत
असे.
वामन
वामन अवतार
विहिरीत असलेल्या बहुतांश कलाकृतीत जास्त मूर्ती ह्या भगवान
विष्णूशी संबंधित आहेत. भगवान विष्णूच्या दशावतार रुपामध्येच ह्या
विहिरींची निर्मिती झाली ज्यामध्ये कल्की, नरसिंह, वामन, वाराही आणि दुसरे
अवतार सुद्धा उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त विहिरीत नागकन्या आणि योगिनी
सारख्या अप्सरांच्या कलाकृतीही पहायला मिळतात. विहिरीतील कलाकृती अद्भुत व
आकर्षक स्वरूपात बनवल्या गेल्या आहेत.
अप्सरेच्या कलाकृती
२००४ सालापर्यंत विहिरीच्या तळापर्यंत जाण्याची परवानगी होती परंतु
२००४ झाली आलेल्या भूकंपानंतर सुरक्षेच्या कारणाने चौथ्या स्तरापेक्षा
खाली जाता येत नाही. चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले
असता एक शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते.प्रेक्षक आणि विष्णू
मूर्ती यांच्या मध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून
ही मूर्ती बघावी लागते.
शेषशाही विष्णूची मूर्ती दिसते ती हि जागा
गुजरात मधील वाव या फक्त पाणी भरण्याच्या जागा नव्हत्या तर
सामाजिक अभिसरणाचे केंद्र होत्या. पाणी भरायला येणारे लोक विसावण्यासाठी
बसतील तेव्हा त्यांना या मूर्ती दिसून उत्तम विचार आणि इतिहास याची माहिती
मिळेल असा विचार या बांधकामात होता.विहिरीच्या आतील बाजूस
दशावतार, चामुंडा, कल्की, महिषासुरमर्दिनी, हनुमान, शिव पार्वती , मातृका,
सूर सुंदरी अशा अनेक कोरीव मूर्ती रानी कि वाव येथे पाहायला मिळतात.
खांबांवरची नक्षी खालच्या
मजल्यावर आपल्याला जाता येत नाही पण आपण ज्या पायर्या उतरुन जातो
त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरुन आपल्याला आतील शिल्पांचे दर्शन घडते.
सगळ्यात वर दिलेले छायाचित्र अशाच आतील भातील श्रीविष्णूच्या मूर्ती आहे.
ते कसे काढले आहे तेही दिलेलेच आहे. अशीच अजून दोनतीन शिल्पे.. आत अंधार
असल्यामुळे याची छायाचित्रे काढण्यास थोडे अवघड आहे...
ही आतील भागात असल्यामुळे तुलनेने सुस्थितीत आहेत फक्त यावर जळमटे साठलेली दिसतात आणि शिवाय कबुतरांचा त्रास आहेच...
पग घुंघरू...
श्री गणपती...
घोडेस्वार पद्मपाणि वराहावतार नागकन्या राम
विष्णूची विविध रूपे
विहिरीवर असलेले प्रत्येक मजले हे विस्तृत खांबांवर उभे
आहेत. विहिरीत उपलब्ध असलेल्या प्रत्येक मजल्यावर ४ खांब असून खांबांवरही
आकर्षक कलाकृती निदर्शनास येतात. विहिरीतील प्रत्येक खांबांवर महाभारतातील
पवित्र मानलं जाणाऱ्या किचकाच्या मूर्ती दृष्टीस पडतात. किचक महाभारतातील
मत्स्यराजाचा शक्तिशाली सेनापती होता ज्याचा मृत्यू भीमाच्या हातून झाला
होता.
विस्तृत खांब
खांबावरील कीचकाची मूर्ती
भिंतीवरील सुबक नक्षीकाम
गुजरातमधील विहिरीचा संदर्भ हा अध्यात्माशी जोडला जातो. ह्याविहिरीची
मुख्य देवता हि जलदेवता आहे असं म्हंटल जातं. साधारण पन्नास वर्षांपूर्वी
ह्या विहिरीच्या आजूबाजूच्या परिसरात आयुर्वेदिक औषधी वनस्पती होत्या
ज्यामुळे ह्याविहिरीतील पाणी हे रोगप्रतिकारक असे ज्यामुळे गावातील लोकांचा
आजारापासून बचाव होत असे. विहिरीतील असणारे हे मजले उन्हाळ्यात लोकांचे
रक्षण करत. एकूण ५०० प्रमुख व जवळजवळ ११०० लहान शिल्पे
कोरलेली आहेत. पण ती अशी कोरली आहेत की एवढी शिल्पे असून कोठेही दाटीवाटी
झाली आहे असे वाटत नाही. शिल्पांएवढेच महत्व मोकळ्या जांगांनाही कसे असते
हे आपल्याला येथे कळते. ही सगळी विहीर श्रीविष्णूच्या अवतारांवर आधारलेली
आहे. महाभारतातील प्रसंग, रामायणातील प्रसंग, काही जैन ऋषींच्या मूर्ती
तसेच बुद्धाच्याही एकदोन मूर्ती आहेत. अप्सरा, नृत्यांगना व विषकन्यांची
अगणित शिल्पे आहेतच.
किसकी सुरत चमक रही है इस आरसी में......
सगळ्यात आत पाण्याच्यावर मोडकळीस आलेली शिल्पे....
जेथे पाणी आहे ती विहीर. यावर पाणी उपसण्यासाठी मोटी आहेत त्या जुन्याच आहेत का तुलनेनी नंतरच्या काळातील याची कल्पना नाही....
विहीरीच्या बाजूने घेतलेले पायर्यांचे छायाचित्र...
सगळ्यात
शेवटच्या मजल्यावरील भिंती आता कोसळायच्या परिस्थितीत असल्यामुळे तेथे
कोणालाच जाण्यास परवानगी नाही पण तेथेही शिल्पे आहेत व वातावरण गुढरम्य
आहे. भुकंपप्रवण प्रदेश असल्यामुळे पुरातत्व खात्याला जमिनीतील हालचालींची
नोंद घ्यावी लागते. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी काचेच्या पट्ट्या ठेवल्या
आहेत. थोडीजरी हालचाल भुगर्भात झाली तर या खाली पडतात किंवा फ़ुटतात. आता
अर्थात आधुनिक उपकरणेही आणलेली असावीत.
रानी कि वाव मधील प्रशस्त मजले
ह्या ऐतिहासिक वास्तुस यूनस्को ने २२ जून २०१४ ला जागतिक ऐतिहासिक
वास्तूमध्ये सामील करून घेतलं व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व विहिरींची
राणी म्हणून ह्याचा सन्मान केला व सध्या चलनात असलेल्या १०० रु च्या
नोटेमागे "रानी की वाव"च छायाचित्र देऊन ह्यास देशभरात प्रसिध्द केलं.
रानी कि वाव चे १०० रुपयाच्या चलनावरील छायाचित्र
रानी कि वाव मनसोक्त पाहिली तरी असे वाटलं कि बरेच वर्षांपूर्वी आलो असतो
तर थेट तळमजल्यापर्यंत प्रवेश मिळाला असता पण इथपर्यंत जायला मिळते हेही
नसे थोडके.
सरतेशेवटी
एवढंच सांगेन उभ्या आयुष्यात ह्या ऐतिहासिक वास्तूस एकदातरी नक्की भेट
द्या. दगड निर्जीव असतात असे म्हणणार्यांनी रानी-की-बावच्या पायर्या एकदा
उतरायलाच पाहिजेत. मला खात्री आहे त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे
लागतील.खरोखरच अशी ठिकाणं पाहिली की आपण भारतात राहत असल्याचा इतका अभिमान
आणि आनंद वाटतो. त्या सुवर्ण काळात भारतातली शिल्पकला कळसाला पोहोचलेली
असणार यात शंकाच नाही. त्या अनाम कलाकारांच्या अतुलनिय कामगिरीपुढे
नतमस्तक!
मोढेरा - पाटण - आबू
गुजरातचे
पर्यटनाच्या दृष्टीने तीन ढोबळ भाग करता येतील. सौराष्ट्रातील पौराणिक
महत्त्व प्राप्त असलेले धार्मिक पर्यटन, कच्छमधले नैसर्गिक रण, आणि राज्यात
पसरलेली पुरातन कलाकौशल्य असलेली देवळे,मशिदी वगैरे. सापुतारा हे हिल
स्टेशन तसे पाहिले तर नाशिकला जवळ असल्याने महाराष्ट्राचेच म्हणता येईल.
तरंग हिल हे एक नव्याने उदयाला येत आहे. अहमेदाबाद,गांधीनगर,वडोदरा,सूरत
या मोठ्या शहरांमध्येही बरेच पाहण्यासारखे आहे. गुजरात
पर्यटनाच्या जाहिरातीत मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची राणी की
वाव,सिद्धपूरचे बिंदूसरोवर तीर्थ दाखवतात.
अहमदाबाद,मेहसाणा,सिद्धपूर,पालनपूर,आबू रोड(राजस्थान) हे एकाच
रेल्वेमार्गावर आहे आणि या स्टेशनांवर सोयीच्या वेळी गाड्या थांबतात.
मेहसाणापासून मोढेरा,पाटण, सिद्धपूर आणि वडनगर पंचवीस -पस्तीस किमी
परिसरांत आहे. मेहसाणा ते आबूरोड जाण्यासाठी अहमेदाबाद_अजमेर इंटरसिटी
इक्सप्रेस ( १०:२० - १३:१०) आहे. आबूरोड ते मुंबई गाड्या आहेत. १) दादर ते भुज गाडीने मेहसाणा(१२९५९), २) मेहसाणा ते आबूरोड (१९४११), ३)आबू रोड ते बान्द्रा ( १९७०८). मेहसाणा
मुक्काम तीन दिवस, माउंट आबू अडीचदिवस. सीजन ऑक्टोबरला सुरू होतो,
सेप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हॅाटेल बुकिंग आगावू करण्याची गरज नसते (
पुण्याहूनही येण्याजाण्यासाठी चांगल्या रेल्वे आहेत. इतर पर्यटक
मेहसाणाला मुक्काम करत नाहीत. अहमेदाबाद येथे थांबून कार भाड्याने घेऊन /
आयोजित सहल करून परत जातात. )
नकाशा १ नकाशा २
सिद्धपूर :-
. मेहसाणा
तेसिध्दपुर एक तासाचा प्रवास आहे. रेल्वे ओवरब्रिजवरून गावात जावे लागते.
इथे बोहरा समाजाच्या हवेली आहेत. सर्व हवेल्या बंद आहेत, मालक अमेरिकेत
अथवा दुसऱ्या शहरांत राहतात.
सिद्धपूर बोहरा हवेली १ सिद्धपूर बोहरा हवेली २ बाजारातून
दहा मिनिटे चालल्यावर रुद्र महालय आहे. आता प्रतिबंधित क्षेत्र आहे.
पुरातत्व खात्याचे लोक तसेच पोलीस इथे तैनात असतो.मात्र पर्यटकाना बघायची
परवानगी आहे. बाबरी मस्जिद प्रकरणानंतर ही विवादास्पद वास्तू घोषित केली
गेली होती कारण इथे पूर्वी मशीद होती म्हणतात.
रुद्र महालय कमान
इथे
अशा बऱ्याच कमानी होत्या आणि आत रुद्र महालय नावाचे शिवालय. दोनच कमानी
राहिल्या आहेत.येथून एक वळसा घालून मागे गेल्यावर सरस्वती नदीचे विशाल
पात्र दिसते. आता कोरडेच आहे. या तीरावर एक महादेव आणि मुक्तिधाम स्मशान
आहे. ( साताऱ्याच्या संगम माहुलीसारखे यास महत्त्व आहे.) नदीपलीकडे अजून
दोन महादेव आहेत. याच बरोबर आपल्याला बिंदु सरोवराला देखील भेट देता येईल.
बिंदु
सरोवर हे मोठे आवार आहे. संपूर्ण लाल दगडाच्या फरशीने झाकले आहे. स्वच्छ
आणि सुंदर जागा - हाइवे टच. या जागेला पौराणिक महत्त्व आहे. कपिलमुनि आणि
कर्दम ऋषींनी इथल्या कुंडापाशी आईचे श्राद्ध केले होते. कुंडास मातृतीर्थ
प्रसिद्धी मिळाली आणि श्रद्धाळू इथे आइचे श्राद्ध करतात. त्यांच्यासाठी
पंचवीसेक लाल दगडातल्या मेघडंबरी बांधलेल्या आहेत. एकामध्ये आठजण बसू
शकतात. पितृपंधरवडा दोन दिवसानंतर सुरू होणार होता तरीही पंधरा ठिकाणी विधी
सुरू होते. गुजरात सरकारने २१ कोटी रु खर्च करून ही जागा सुंदर करून टाकली
आहे. फोटोस बंदी आहे. एक म्युझिअम आहे त्यातला साडेचारफुटी काळ्या दगडातला
विष्णु अप्रतिम! आवारात कर्दमेश्वर महादेव आहे. या रस्त्यावर एकूण पाच
महादेव आहेत, हे एक विधिक्षेत्र असल्याने आणि सिद्धपुरात निम्मी वस्ती
बोहरांची यामुळे हॅाटेल्स नाहीत.
शामलाजी:-
हे धार्मिक स्थळ गुजरातच्या बनासकांटा जिल्ह्यात आहे.हे एक प्रसिध्द
धार्मिक स्थळ आहे.मेशवो नदीच्या किनार्यावर असणारे हे मंदीर भगवान
विष्णुला अर्पण केलेले आहे. अरवली डोंगरारांगाची नयनरम्य पार्श्वभुमी
असलेला हा परिसर.श्रीकृष्णाच्या मुर्तीबरोबर इथे गायींचीही पुजा केली
जाते.अर्थातच श्रीकृष्णांची इथे गोपाळ रुपात पुजा होते.वैष्णवांच्या
भारतातील १५४ महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे शामलाजी.
शरद
पौर्णिमेला इथे विशेष उत्सव असतो.याच काळात गोकुळात श्रीकृष्णाची विशेष
पुजा केली जाते.तशीच पुजा इथे देखील केली जाते.हे मंदीर ३२० फुट उंच असून
जवळपास ५०० वर्ष जुने आहे.सभामंडप,अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे तीन भाग
आहेत.शुभ्र संगमरवर दगडापासून मंदिराची उभारणी केलेली आहे.दुमजली असलेल्या
या मंदिराचे खांब आणि भिंती या नक्षीकामाने मढवून टाकलेलया
आहेत.मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग कोरले आहेत. Related Blogs: http://vadnagar.blogspot.com
वड़नगर
वडनगर
हे पंतप्रधान मोदी यांचं जन्मगाव मेहसाणापासून पूर्वोत्तर चाळीसेक किमी
दूर आहे. या शहराचा इतिहास २५०० वर्ष प्राचीन आहे.सातव्या शतकात भारतात
आलेला चिनी प्रवासी ह्यु एन त्संग यानेही वडनगरला भेट दिली होती.
इथे
एक बौध्द मठ आहे.तसेच नुकत्याच झालेल्या उत्खननात इथे प्राचीन स्तुप आणि
काही दालन सापडली आहेत.वडनगर इथे १२ व्या शतकातील सोळंकी राजवटीच्या खुणा
आढळतात.सरोवराभोवती पाचर वापरुन जोडलेले दगड किंवा पार्श्वभुमीवर असलेले
कीर्ति तोरण हे त्याचेच प्रतिक.
दुसर्या
शतकातील बुध्द्दाची मुर्ती इथे सापडली आहे.वडनगरला उत्खनन करताना दोन
कोरीव स्तुप्,चैत्यगृह आणि नउ दालन देखील मिळाली आहेत.या दालनांची रचना
स्वस्तिक आकाराची आहे.बौद्धकालीन किंवा नंतरची शिल्पे आहेत. त्यापैकी एक
विशेष म्हणजे तोरण. याचे चिन्ह आणि नाव गुजरात पर्यटन खाते - हॅाटेल्ससाठी
घेतले आहे.इथे असलेल्या अर्जुन बारी दरवाज्यावर असलेल्या शिलालेखाप्रमाणे
राजा कुमारपाल याने हे शहर इ.स.११५२ मध्ये उभारले.याच शहराला इतिहासकाळात
चमत्कारपुर्,आनंदपुर्,स्नेहपुर्,विमलापुर या नावाने देखील ओळखले जाते.
वडनगरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ताना रिरी संगीत महोत्सव.
वडनगरच्या दक्षिणेला ताना आणि रिरी या दोन ब्राम्हण कन्यांची समाधी आहे.या
दोघींची कथा आपल्याला थेट सोळाव्या शतकात घेउन जाते.अकबराच्या दरबारात
तानसेन हा सर्वात महान गायक समजला जात होता.एकदा अकबराने तानसेनाला राग
दीपक गायला सांगितला.मात्र हा राग गायिल्याने उष्णता तयार होउन त्याचा
त्रास आपल्याला होणार हे माहिती असूनही तानसेनाने तो राग गायला.त्यामुळे
तानसेनाला त्रास होउ लागला.तेव्हा तानसेनाचे गुरु रामदास यांनी त्याला राग
मेघमल्हार एकायला सांगितला.त्यामुळे पाउस पडेल व शरीराचा दाह कमी होइल.ताना
आणि रिरी या दोन भगिनी हा राग गाउ शकतात असे तानसेनाला समजले.त्याने
त्यांच्या वडीलांकडे त्यांना गाण्यासाठी परवानगी मागितली.अकबरालाही या दोन
बहिणींच्या गायनाची महती समजली आणि त्याने त्यांना दरबारात गाण्यासाठी
आमंत्रण दिले.मात्र ब्राम्हण असल्यामुळे असे करणे हे अयोग्य वाटून त्या
दोघीनी नकार कळविला.अकबराने त्यांचे मन वळविण्यासाठी आपले सैन्य वडनगरला
पाठविले.तेव्हा त्या दोन्ही भगिनींन नकार कळविला आणि आपल्यामुळे इतर
गावकर्यांना त्रास नको म्हणुन आत्महत्या केली.याच दोन्ही बहिणींची स्मृती
म्हणून दोन छोटी मंदिर उभारली आहेत आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ
दरवर्षी संगीत महोत्सव आयोजित केला जातो.
सध्या
वडनगर थोड्या उंचीवर वसलेले आहे. इथे आलेले पर्यटक हाटकेश्वर
मंदीर्,शर्मिष्ठा सरोवर्,ताना रीरी बाग्,धीरी,गौरीकुंड, खोखा गणपती,
नागमंदिर अश्या ठिकाणांना भेट देउ शकतात.याचबरोबर गुजरातमधील दोन
प्रसिध्द्द संत दयाराम आणि नरसिंह मेहता यांच्या स्मृती इथे आहेत.याचबरोबर
सुप्रसिध्द कादंबरीकार गोवर्धन त्रिपाठी,संगीतकार कौमुदी मुन्शी याच
भुमीतील.
हटकेश्वर मंदिर, वडनगर –
हे
मंदिर अठराशे वर्ष जुने आहे.तसेच काहींच्या मते नाग राजा हरिराजाने याची
निर्मिती इ.स.१४०२ मध्ये केली.त्याचबरोबर त्याचा नातु बाबुराव याने हे
मंदिर उभारण्यासाठी अजोबांना मदत केली.या मंदिरावर मोठ्या प्रमाणात कलाकुसर
आहे.इथे भेट देण्यासाठी जानेवारी ते मार्च तसेच संप्टेंबर ते डिसेंबर हा
योग्य काळ आहे.
इथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे.वडनगर अहमदाबादपासून १११ कि.मी.दुर आहे.मेहसानापासून ४७ कि.मी.आहे.सिध्द्पुर हे जवळचे स्टेशन आहे.
वडनगर आणि मोदी:-
जुन्या वड्नगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडीलांचे चहाचे दुकान
होते.नरेंद्र मोदी आपल्या वडीलांना इथे मदत करीत होते.पण आज या स्टेशनचे
स्वरुप बदलून गेले आहे. या चहाच्या दुकानात वडनगर राष्ट्रीय स्वंयसेवक शाखा
चालवणारे वकील इनामदार नेहमी येत असत.नरेंद्र मोदींचा त्यांच्याशी परिचय
वयाच्या आठव्या वर्षी झाला आणि ते स्वयंसेवक बनले.पुढे मोदी गुजरातचे
मुख्यमंत्री आणि पुढे पंतप्रधान झाले.आज वडनगरचे ब्रॉड गेज स्टेशनमध्ये
झाले आहे.तसेच मेडीकल कॉलेज आणि बस स्टँडही झाले आहे.
देवनी मोरी :-
गुजरातच्या
उत्तर भागात देवनी मोरी हे बौध्दकालीन प्राचीन अवशेष असणारे स्थळ आहे.इथे
आठव्या शतकातील बौध्द कलाकृती सापडल्या आहेत.तसेच गुर्जर्,प्रतिहार
काळातीलही काही अवशेष मिळाले आहेत.इथे सापडलेल्या वस्तु शामलाजी संग्रहालय
आणि बडोद्याच्या म्युझियममध्ये ठेवल्या आहेत.इथे सापडलेल्या वास्तुंच्या
शैलीवरुन या परिसराचा इतिहास औरंगाबाद्,अजिंठा,वेरुळ यांच्या समकालीन
असावा.इथे एक स्तुपही सापडला आहे.स्तुपावर बुध्दाच्या नउ मुर्ती गांधार
शैलीत आहेत.इथे ग्रीक प्रभाव स्पष्ट जाणवतो.पश्चिमी क्षत्रपांचा भारतीय
कलाकृतीवर पडलेल्या प्रभावाचे हे उदाहरण आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.