
कसे जावे
दमण
मुंबई अहमदाबाद वेएवे रस्त्याने वापीला (१६० किमि) डावीकडे वळल्यास दहा
किमिवर दमण आहे. जाताना पोलुशन फार वाटले तरी दमणला अजिबात नाही. वेस्टर्न
रेल्वेच्या सर्वच गाड्या वापीला थांबतात. स्टेशनच्या पश्चिमेस
टॅक्सी,ओटोरिक्षा आणि बसेस दमणला (१० किमि.) तर पुर्वेच्या दादरा,नगरहवेली
,खानवेलसाठी. वापी बस स्टँड पश्चिमेला पाचसे मिटर्सवर आहे.
नदीच्या उत्तर भागाला 'नानी दमण' - फक्त दमण म्हणतात. इथून एका पुलाने दक्षिणेकडचे 'मोटी दमण' ( याच नावाने ओळखतात) जोडले आहे. एक वेगळा पादचारी पूल आहे. दमण स्टँडवरून जांपोरे बीच (६ किमि )जाण्यासाठी बस ,ओटो मिळतात. दोन किमिवर फोर्ट आहे, पण स्टँडवरून अर्धा तासात पुलावरून चालतही जाता येते.
कसे जावे :-
१) Pune - Dadar - Dadar West - Vapi - Daman (Two Days )
बुधवारी 11096 Pune Ahmedabad Ahimsa Express १९:५० ला पुण्यातून निघून रात्री १:४५ ला वापीला पोहोचते, टॅक्सी रात्री सुद्धा मिळते
वापी
मधून टॅक्सी आहेत ३० ते ५० रुपये पर सीट दमण साठी. दमण मध्ये हॉटेल सहज
उपलब्ध असतात (सुट्ट्या सोडून) . जेवण चांगले मिळेल व्हेज नॉन व्हेज असे
पाहिजे तसे. मराठी येते बऱ्याच लोकांना पण हिंदी जास्त चालते
२) Mumbai - Vapi - Daman One Day
मुंबई
वरून एका दिवसात दमण होऊ शकते 22953 Gujarat Super fast Express सकाळी
५:४५ ला निघून ८:४५ पर्यंत वापी ला पोहोचते. reservation ची गरज पण नाही
लवकर गेलात तर छान विंडो सीट मिळते
वापीमधून दमण साठी टॅक्सी लगेच मिळते GSRTC CNG बसेस पण आहेत.
वापीवरून मुंबई ला येताना १७:०० ला 59046 Valsad - Bandra Passenger मिळते, बोरिवली मध्ये लोकल पकडावी पुढे ...
डहाणू: स्वतःची गाडी असेल तर समुद्रकिनाऱ्यावरून मस्त रस्ता आहे तिथे बीच आणि काही हॉटेल्स आहेत. डहाणू पासून २५ किमी वर NH८ चारोटी ला वर Mahalaxmi Mandir आहे. आता इथून पुढे मुंबई किंवा वापी / सिल्वासा असे कुठेही जाता येईल.
पुणे स्टेशन वरून ट्रॅव्हल्स असतात सुरत साठी सेमी स्लीपर / स्लीपर ५००/- /
७००/- त्या वापी ला भल्या पहाटे सोडतात. तिथून ऑटो करावी लागते वापी
स्टेशन किंवा बस स्टॅण्ड पर्यंत .. पुढे वरील प्रमाणे
सिल्वासा ४० किमी साठी - वापी ला जावे लागेल तिथून सिल्वासा साठी बस आहेत सिल्वासा मध्ये मराठी जास्त चालत. सिल्वासा मधून मधुबन साठी बस मिळते धरण साठी स्टॉप आहे तिथे लायन सफारी पण आहे. तिथे दमण गंगा चे पात्र खूप खोल आणि मोठे आहे
हे भाग वापीच्या पुर्वेस/आग्नेय दिशेस आहेत.
सिल्वास - वापीअगोदरच्या भिलाड स्टेशनपासून उजवीकडे १८ किमि.
खानवेल याहीपुढे.
वापी - सिल्वास २४.
३) रेल्वेने :-
जर रेल्वेने दमणला जायचे असेल तर जवळचे स्टेशन वापी आहे. वापी फक्त १० कि.मी. आहे.इथून २० मिनीटात बसने आपण दमणला पोहचु शकतो.
४) विमानाने :-
दमणला विमानतळ नाही.मात्र जवळचा विमानतळ मुंबई आहे.
दमणला मुंबईतून जायचे असेल तर अंतर आहे १९३ कि.मी. तर अहमदाबादपासून ३६७ कि.मी. आहे.वडोदर्यापासून हे अंतर ३०० कि.मी आहे.
कधी
जावे: Aug to Nov (बाकी ३१DEC ला खूप गर्दी असते). सुरत १२० किमी - वापी
तो सुरत ट्रेन बेस्ट (सुरत मध्ये Textile Market ला खरेदी करा Bombay
Market ला नको)
काय पाहावे
दमण स्टँडपासून दमण जेट्टी/ दरिया पाचशे मिटर्स
अंतरावर आहे. उत्तरेस ६ किमिवर देवका बीच, मिरासोल वाटरपार्क आहे. दक्षिणेस
पुल ओलांडल्यावर अर्धा किमीवर फोर्ट मोटी दमण भागात आहे. किल्ल्याच्या
भिंती चांगल्या स्थितीत आहेत. याच भागात सचिवालय,परगोला गार्डन,नगरपालिका
इमारत,दोन चर्चेस जवळच आहेत. एन्ट्री फी नाही. फक्त सकाळी साडेसहाला एक
मास/सर्विस असते. दिवसभरात कुणी येत नाही चर्चमध्ये. इमारती पाहात फोर्टात
रस्त्याने फिरायला मजा वाटते. स्वच्छता आणि शांतता आहे. पाच किमिच्या
जांपोरे बीचला जाता येईल. इथले बीच काळपट वाळूचे आहेत. चांगले नाहीत.
जांपोरे किनाय्राला सुरुची झाडे आहेत, खाण्याच्या टपर्या आहेत. दमणमध्येच
नेव्हीचा एअरपोर्ट आहे. मोटी दमण भाग टापटीप आहे.दमण बस डेपो जवळ टुरिस्ट
मदत केंद्र आहे.तिथे रोज संध्याकाळी मिनी बस सुटते. सगळी ठिकाणं माणसी ३५
रुपयांत फिरवतात.इकडच्या भागात गाव, वस्त्यांची नावं ***वाड, ***फालिया
अथवा ***पारडी अशी बरीच असतात.
दमण आणि सिल्वास हॅाटेल्स लिस्ट
दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )
दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )
मधील हॉटेल उमेश टॅक्सी स्टॅन्ड च्या अगदी जवळ आहे (पोलीस स्टेशन समोर) तिथे जेवण चांगले आहे
५००/- पासून रूम्स होत्या (२०११)
Gurukripa, Sovereign पण जवळ आहेत एकदम छान लोकेशन ला आहेत rooms above ५०००/-
जेवण चांगले मिळते. Sovereign ला बहुतेक Pure Veg पण मिळते
बाकीची थोडी जास्त महाग आहेत दमण ला ७स्टार का ५ स्टार हॉटेल पण आहे (The Deltin, Daman https://www.deltin.com/the-deltin/)
ढाबा; वीरा दा ढाबा Veera Da Dhaba, Daman
राहाणे हॅाटेल्स, खाणे
सर्व हॅाटेल्स दमण स्टँड ते दरिया या रस्त्यावर आहेत. बार आणि
रेस्टॅारंट्स बरेच आहेत पण ते खरेतर बारच असावेत. दुपारचे वातावरण अर्थातच
सुस्त होते.
अहमदाबाद हायवेने १६०~ किमि वापी - पश्चिमेस दहा किमि दमण आहे.
दमण ते जांपोरे बीच पाच किमि.
सचिवालय इमारत

पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.
दमण बीच :-
दमण बीचला इकडे बोंबील बीचहि म्हणतात.. फोटोतही बोंबील सुकवायचे खांब आणि दोऱ्या दिसत आहेत.
दमण बीच
दमणचे लाईट हाउसः-
दमनगंगेच्या किनार्यावर असलेले हे लाईटहाउस म्हणजे दमनमधील एक महत्वाचे ठिकाण मानले जाते.
मीरासोल लेक गार्डन
मिरासोल लेक रिसॉर्ट्मध्ये मिरासोल वॉटर पार्क आहे. विशेषतः उन्हाळ्यात
इथे वॉटर स्पोर्ट्चा आनंद घेता येतो. हे एक थीम पार्क आहे. सकाळी ९ ते
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे सुरु असते. इथे २ किंवा ५ रुपये एन्ट्री फी
आहे. आतमध्ये महागडे रेस्टॉरंट आहे काहीही ना घेता भरपूर फोटो सेशन करा.
फोर्ट झीरॉम किल्ला :-
दमनगंगा नदीच्या उत्तर किनार्यावर उभारलेल्या या किल्ल्याला सेंट झीरॉम
याच्या नावावरुन फोर्ट झिरॉम हे नाव देण्यात आले आहे. या किल्ल्यातच 'अवर
लेडी ऑफ दी सी' हे चर्च आहे.याची वास्तुरचना पोर्तुगीज शैलीची आहे.
पोर्तुगीज काळात झालेला संघर्षाच्या स्मृती इथे असलेल्या ख्रिश्चन
स्मशानभुमीच्या रुपाने दिसतात.
मोती दमन किल्ला-
पर्यटक
या किल्ल्याला आवर्जून भेट देतात.या किल्ल्यातून समुद्रांच्या लाटांचे
दृष्य दिसते. गतकाळच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या किल्ल्याला जरुर भेट
द्या.
मोटी दमण किल्ला, दक्षिण दरवाजा
दमण नगरपालिका इमारत
रोझारिओ चर्चमधला एक सज्जा
रोझारियो फरशीवरील नोंद
रोझारियो चर्च पाटी
बॅाम जेझस चर्चमधला एक सज्जा
बॅाम जेझस चर्चमध्ये
बॅाम जिझस चर्च पाटी
टेक्निकल स्कूल प्रवेशद्वार
परगोला गार्डन
किल्ल्यातला एक रस्ता.
किल्ल्यातला एक रस्ता.
किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.
पादचारी नवीन पुलावरून पुर्वेकडचा दिसणारा दमणगंगा नदीवरचा वाहनांसाठीचा राजीव गांधी सेतू.
सोमनाथ महादेव मंदीर :-
दमणला येउन बीच फिरुन झाल्यावर मनाला शांती देणार्या आणखी एका ठिकाणाला
जरुर भेट द्यावी ते म्हणजे सोमनाथ महादेव मंदीर. दमणमधील हे एक प्राचीन
मंदीर आहे. एका साधूच्या स्वप्नातील उल्लेखामुळे या शिवलिंगाची स्थापना
करण्यात आली.स्थानिक लोकांमध्ये हे शिवस्थान फार महत्वाचे आहे.
डोमनिकन मठाचे अवशेष :-
डॉमनिकन मठ हा कॅथोलिक पंथाचा उपासना स्थळ म्हणता येईल. इथल्या भुतकाळाचे प्रतिनिधीत्व करणारे हे एतिहासिक स्थळ आहे.
जेट्टी गार्डन :-
दमण असलेली सुंदर बाग म्हणजे हि जेट्टी गार्डन! इथे आपण कारंजांचा आनंद
घेउ शकतो. सहकुटूंब सुट्टी व्यतित करण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. हि बाग
सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असते.
नगोआ बीच :-
पर्यटकांमध्ये हा बीच खुप लोकप्रिय आहे. इथे पाणी स्वच्छ निळ्या रंगाचे
आहे. दमणमध्ये एक संध्याकाळ घालवण्यासाठी हि एक आदर्श जागा आहे. परंतु इथे
समुद्रात पोहणे मात्र धोकादायक आहे, कारण समुद्राचा तळ खडकाळ आहे.
देवका बीच :-
दमणमधील हा समुद्रकिनारा देखील पर्यटकात लोकप्रिय आहे. मात्र इथेही पोहणे
सुरक्षित नाही, तसेच वॉटर स्पोर्ट नाहीत.कारण हा समुद्रकिनारा देखील खडकाळ
आहे.
काही उपयोगी गुजराती वाक्ये
*बस डेपो/एटीएम/सिनेमाघर क्यां छे?
- बस डेपो कुठे आहे?
!! डेपोमाटे आ रस्ताथी आगळ जाओ।
- डेपोसाठी या रस्त्याने पुढे जा.
!! सामे छे एटीएम.
- समोरच आहे एटीएम.
!! डेपोनी पाछळ सिनेमा छे।
- डेपोच्या मागे सिनेमा आहे.
* म्यूजियम आजे खुलु रहेशे?
- आज म्यूजियम उघडे असेल?
!! ना। काले सवारे नव वागे खुलशे।
- उद्या सकाळी नऊ वाजता उघडेल.
!! बपोरे बे थी त्रण वाग्यासुधी बंध रहे छे।
- दुपारी दोन ते तीन बंद असते.
!! आवतिकाले पब्लिक हॅालिडेमाटे बंध रहेशे। तमे काले'ज जुओ।
- परवा पब्लिक हॅालिडेमुळे बंद असेल. तुम्ही उद्दयाच पाहा.
!! बीचउपर सांजे जाओ तो सारु थशे ।
- बीचवर संध्याकाळी गेलात तर बरं होईल.
* डेपो केटला दूर छे?
- डेपो किती दूर आहे?
!! आ तो पाछळच छे।
-हा तो मागेच आहे.
!! दसेक मिनिट दूर छे।
- दहाएक मिनिटांवर आहे.
* दमणनी बस क्यां मळशे?
- दमणची बस कुठे मिळेल?
!! त्यां सात नंबरउपर।
- त्या सात नंबर वर.
* दमण जवामाटे बस क्यारे मळशे?
- दमणला जाणारी बस केव्हा मिळेल?
* बस क्यारे आवशे?
- बस केव्हा येईल?
!! वार छे।
- थोडा वेळ लागेल. थोड्या वेळाने येईल.
!! हमणाज् आवशे।
- येईल आताच.
!! घणी बधी बस्सो छे । पाँचपाँच मिनिटमां उपडे छे।
- खूप बस असतात. पाचपाच मिनिटाला सुटतात.
*अहियाँ जोवामाटे शूशू छे?
- इथे बघण्यासारखे कायकाय आहे?
!! घणीबधी जग्याए छे।
- खूपसाय्रा जागा आहेत.
!! सामे जाओ तो दमणनो दरियो छे।
- समोर गेलात तर दमणचा समुद्र आहे.
!! चाररस्ताथी डाबी बाजू निकळो तो जेट्टी अने नानो किलो देखाय।
- चाररस्त्यावरून डावीकडे गेलात तर जेट्टी आणि छोटा किल्ला दिसेल.
!! पुल पार करिने मोटी दमणना किलामां जई शकाय। पंधरवीस मिनिट लागशे।
- पुल पार करून मोटी दमणमधल्या किल्ल्यात जाता येते. पंधरा वीस मिनिटे लागतील.
!! बे चर्चो किलामां'ज छे।
- दोन चर्च किल्ल्यातच आहेत.
रेस्टारोंमा
रेस्तरांमध्ये
!! अहिया टेबल खाली छे।उपर फैम्ली रुमपण छे।
- इथे टेबल रिकामे आहे. वरती फैम्लीरुम आहे.
* नाश्तो'मा शु छे?
- नाशत्यासाठी काय आहे?
!! आ लो मेन्यु।
- हा घ्या मेन्यु.
!! चा केवी जोईए तमने/आपणे?
- चहा कसा हवाय?
* तीन नॅार्मल,दोन कमी साखरेचा,एक बिनासाखरेचा.
- त्रण नॅार्मल,बे मोळो अने एक बिनाशक्करवाळो।
* कार्ड पेमेंट'नी सगवड छे केम?
- कार्ड पेमेंटची सोय आहे का?
!! तमारी ए नोट बिजी आपो ने।
- तुमची ही नोट दुसरी द्या ना.
* नाश्तो झाझो स्पाइसी ना बनावो।
- नाश्ता फार तिखट नको.
* आ आइसक्रिम ढिल्लो पडी गयु छे केम?
- हे आइसक्रिम वितळलं आहे.
!! आजे चार कलाक पावर बंध हती एटले एम थयु ।
- आज चार तास वीज नव्हती म्हणून असं झालं.
* पावरनो प्राब्लेम छे केम?
- पावरचा प्राब्लेम आहे का?
!! अवारनवार पावर जती नही पण बहु दिवसपछी एम थयु।
-सारखीसारखी पावर जात नाही पण आज बय्राच दिवसांनी असं झालं.
हॅाटेलवर
* रुम मळशे केम?
* रुम खाली छे?
- रुम मिळेल?
- रुम रिकामी आहे?
!!केवी रुम जोईए?
- कशी हवीय रुम?
!! डिलक्स/सादी/एसीवाळी?
- डिलक्स/सादी/एसीवाली?
!! एसीवाळी बे रुमो छे।
- एसीच्या दोन आहेत.
!! एक रोडनी सामे ने बीजी दरियासामे।
- एक रस्त्याकडची आणि दुसरी समुद्राकडची.
!!एसीरुमनो टॅक्स वधु छे।
- एसीरुमचा टॅक्स जास्ती आहे.
* मारामाटे एक अंग्रेजी छापो सवारे मळशे केम?
- मला सकाळी एक इंग्रजी पेपर मिळेल का?
* अमे नॅानवेज खाता नथी। सेपरेट वेज रेस्तरां छे?
* शु पालिश करवानु छे।
- शुपालिश करायचं आहे.
* आम्ही नानवेज खात नाही, वेगळं वेज रेस्तरां। आहे का?
-अमे नानवेज खाता नथी । वेज रेस्तरां छे केम?
!! छे ना!! जुदाजुदा छे।
- आहे ना वेगवेगळं.
!! ए लो तमारी ३०१नी चाबी।
- ही घ्या तुमची ३०१ ची चावी.
!! तमारा लान्ड्रीना कपडा सवारे आठ पेला आपजो।
- तुमचे लाँन्ड्रीचे कपडे सकाळी आठच्या आत द्या.
!! सांजे सातवागे रुमउपर पाछळ आवशे।
-संध्याकाळी सातला रुमवर परत येतील.
* रुमवर पाणी येत नाही.
- पाणी आवतो नदी।
* फॅन चालतू नथी।
- फॅन चालत नाही.
* आ गिझर केविरिते चालू करवानू?
- हा गिजर कसा चालू करायचा?
!! आ तो ओटोमॅटिक छे, पाणी चालू करशो तो थोडीवार पछी गरम पाणी आवशे।
- हा ओटोमॅटीक आहे. पाणी चालू केल्यावर थोड्यावेळाने गरम पाणी येईल.
* नळ/टेप खोलवा आवडतू नदी।बहु टाइट छे।
- नळ उघडता येत नाही. फार घट्ट आहे.
!! अहिंथी फरवामाटे टॅक्सी बोलावी शकाय। टॅक्सी जोईए केम?
- फिरण्यासाठी टॅक्सी बोलावता येते. टॅक्सी हवी आहे का?
!! अमारी सर्विस केम लाग्यु?
- आमची सर्विस कशी वाटली?
!! अने नाश्तो अने जमण गम्यु केम?
- नाश्ता आणि जेवण आवडलं का?
!! फरी आवजो!
- पुन्हा या!
* नक्की येउच
-अमे चौक्कस आवशो।
* तमारु दमण बहु गम्यु।
- तुमचे दमण फार आवडले.
बिना शक्कर वाडो , ह्यांच्यापेक्षा 'एक चा नॉर्मल, बे ओछु खांड नाखीने, अने एक बद्धी मोरी चा आपो' म्हणावे (नेमक्या गुजरातीत)
अर्थ - एक नॉर्मल चहा, दोन कमी साखरेचे आणि एक बिन साखरेचा चहा द्या
दमणमध्ये काय खरेदी कराल ?इथे आपल्याला हस्तकलेच्या वस्तु, चामड्यापासून केलेल्या वस्तु तसेच स्मृतीचिन्ह खरेदी करता येतील.
दमण मध्ये मुक्काम असेल तर
वलसाड ३० किमी - सकाळी वलसाड साठी GSRTC बस पकडावी एका तासामध्ये वलसाड,
एकदम सोप्पं आहे, वलसाड मध्ये स्वामीनारायण मंदिर जे तिथलं बीच (Tithal
Beach) वर आहे अप्रतिम लोकेशन. २-३ किमी चा बीच आहे. साई बाबा मंदिर आहे.
वलसाड मध्ये जेवण चांगले मिळेल आणि कपडे छान स्वस्त मिळतात (अर्थात बस आणि
रेल्वे स्टेशन पासून दूर गेलात तरच)
(वलसाड मधून थेट मुंबई किंवा पुणे साठी ट्रेन मिळेल त्यामुळे दमण मधून चेक आऊट करून वलसाड केले तरी चालेल)
इतर ठिकाणे: अतुल, आनंद (गावाची नवे आहेत हो), Atul, Anand, Umbergaon Beach, Vrindavan Studio हि नवे अशीच शोधा
जवळची मोठी गावे (Railway Station) : Vapi, Valsad, Surat, Dahanu (रोड)
http://ekpravas.blogspot.com/2012/12/silvassa.html
Silvassa
Pune-Vasai-Arnala-Dahanu
Dahanu-Bordi
Bordi-Surat-Sivassa
Silvassa-Jawahar
Jawahar-Pune
After 2 day stay in Dhanu-Bordi we proceeded to Surat which
was 180 Kms. This was unplanned activity. After eventful day of shopping we
reached Silvassa a little late.
Next day we first visited the Vanganga Lake Garden.
Vanganga Lake Garden Dadra
Where: 5 kms
from the main town in Dadra
Time to see: 2 hours, Best time to visit early morning, evenings.
Timings: Opens at 9.30/10 This park is closed on Tuesdays
The beautiful jogging path around the garden is refreshing.
The ducks swimming merrily. The rustic bridges, tranquil surroundings, flowers - it's a right mix of romantic mood for anybody!
Vasona Lion Safari Park
Where: It is located in Vasona,
9 kms away from Silvassa on the Khanvel Road.
Timings: 9:00am-5:00pm (Closed on
Mondays)
Time to see: 1 hour
Its small enclosed safari. Its spread over 20 hectares and it houses a lion named Dharam and a lioness named Sonal.
There’s a 20 minutes ride in closed vehicle to see the Lions.
Few peacocks were busy looking for food.
Tribal Cultural
Museum:
Where: located in the heart of
Silvassa, Chaar Rasta
Timings: museum is closed on
Tuesdays
The museum showcases masks, hunting tools, fishing gear, musical instruments, agricultural implements, household kitchen articles and life-size statues of local tribals and their leaders.
In afternoon we proceeded to Jawahar.












No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.