लिखाण माझं असलं तरी अगदी एखादाच फोटो मी किंवा नवर्याने काढलेला आहे. बरेचसे फोटो मित्र परेश जोशीने टिपलेले आहेत.
२४ मे ला पुण्यातून निघून दिल्ली डेहेराडून करून २५ ला दुपारी ऋशिकेषला पोचलो. पुण्याचा कोरडा उन्हाळा बरा की ऋशिकेषचा दमट हे ज्याचं त्यानेच अनुभवावं. या गावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आम्ही लक्ष्मण झुला रस्त्यावर एका हॉटेल/ हॉस्टेलवर मुक्कामाला होतो. तिथुनच पुढे राम झुला, जानकी झुला असल्याने एकंदरच गावात सगळीकडे गर्दी दिसली. संध्याकाळी जरा गावात फिरलो आणि गंगा आरतीचा अनुभव घेतला. गर्दी बघून मांडवात आत न जाता बाहेरच थांबलो. हा आमचा निर्णय योग्य होता, हे आरती चालु होताक्षणी लक्षात आले. आधी सगळे बसलेले सगळे प्रत्यक्ष आरतीला उभे रहातात. त्यानंतर पुढचं काही दिसत नाही. तरी आधी घेतलेला एक त्यातल्या त्यात चांगला फोटो बघा

दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता इंडिया हाइक्स च्या गाड्या येणार
होत्या. दोन मुली सोडून सगळे बर्यापैकी वेळेत पोचले. या दोन मुली इतक्या
सकाळीही राम झुला रस्त्यावर ट्रॅफिक मधे अडकल्या होत्या. आम्हाला बेस
कँपला पोचायला ६-७ तास लागणार होते. शेवटी त्यांच्यासाठी एका गाडीत जागा
ठेऊन दुसर्या दोन गाड्यांत आम्ही पुढे निघालो. अक्षरशः घाम गाळत आमचा
प्रवास चालु झाला. भर उन्हात एक टायर पंक्चरही झाले. हे सगळं व्हावंच
लागतं! शास्त्र असतं ते! जाताना अलकनंदा आणि भागिरथी यांचा संगम बघितला.
दोन वेगवेगळे प्रवाह अगदी सहज काळून येतात. वरून येणारी अलकनंदा आणि
डावाकडून येतेय ती भागिरथी! दोघी पुढे एकत्र होऊन गंगा म्हाणून वहातात.
तर मजल दरमजल करत साडे चार वाजता आमचा बेस कँप 'सारी' ला पोचलो. छोटंसं पण छान गाव आहे हे! याला beautiful village चं award मिळालं आहे. इथे गारवा नसला तरी ऋशिकेष इतका उकाडा तरी नव्हता, त्यामुळे किंचीत बरं वाटलं

आल्यानंतर थोड्या वेळात ग्रुप लिडर, लोकल गाइडशी ओळख झाली. आमची ओळख परेड झाली. आमच्यांत आयटी वाल्यांची मेजॉरिटी, एक UPSC झालेला, एक विदेशी डॉक्टर, नुकतेच बारावी झालेले दोघे-तिघे, सीए गुज्जु आणि त्याचा लहान भाऊ, मुंबईचे एक मध्यमवयीन जोडपे, दोन psychiatrist होऊ घातलेल्या मैत्रिणी असे वैविध्य होते. आम्ही २० जण, एक ट्रेक लिडर आणि २ लोकल गाइड असे २३ जण आम्ही पुढचे ४-५ दिवस एकत्र असणार होतो. पूर्ण ट्रेकचा मॅप, लक्षात ठेवायच्या गोष्टी, dos and don'ts असं सगळं सांगण्यात आलं. सहा वाजता ब्लॅक टी, सात वाजता ब्रेकफास्ट आणि आठ वाजता प्रारंभ असं रुटीन ३ दिवस असणार होतं. चोथ्या समिटच्या दिवशीचं रुटीन तिसर्या दिवशीच सांगणार होते.
घेऊन जायचे सामान एकत्र करणे, रेंट वर घ्यायच्या गोष्टी घेणे वगैरे बारिक सारिक कामे करुन आज लवकरच झोपायला गेलो. नाही म्हंटले तरी प्रवासाचा शीण होताच, त्यामुळे लगेच झोप लागली. मी साडेपाचचा गजर लावला होता पण सव्वा पाचला दुसर्या कुणाच्या तरी गजराने जाग आली आणि Whistling Thrush चा कॉल अगदी जवळून ऐकू आला. बघायला टेंट मधून बाहेर आले तर हा समोरच गात होता. त्याचा चांगला फोटो नाही माझ्याकडे.
प्रचंड थंडी असणार ह्या गृहितकाला सुरुंग लागल्याने व्यवस्थित दात वगैरे घासता आले. इडलीचा नाष्ता करून ठरल्याप्रमाणे आठ वाजता आम्ही ट्रेकला प्रारंभ केला.
क्रमशः
https://www.maayboli.com/node/85255
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - देवरियाताल (२)

देवरियाताल चंद्रशीला - सुरुवात (१)
पहिला दिवस असल्याने या दिवशी आमचा ट्रेक जरा सोपा होता. या दिवशी फार उंचीवरही गेलो नाही. सारी ६५६० फूटांवर आहे आणि ही कँप साईट ७८४१ फूट, यावरून थोडा अंदाज येइल. म्हणजे पुण्यातल्या व्यायाम करणार्यांना कळेल असं सांगायचं तर एक किंवा जास्तीत जास्त दिड ARAI टेकडी! मधेच थोडा चढ, मधेच जरा सपाटी असाच सगळा ट्रेल होता. रस्ताभर हिमालयातली अगदी सगळीकडे दिसणारी rhododendron (लोकल भाषेत बुरांश) मुबलक होती, पण सिझन नसल्याने फुलं फार नव्हती. मधे थोडे थांबत टंगळमंगळ करतही आज आम्ही २ तासात आमच्या आजच्या टार्गेटच्या म्हणजे देवरिया तालच्या जवळ आलो. पूर्वी इथे तळ्याकाठी कँपिंग करता यायचे, आता वन विभागाने हे बंद केल्याने तिथून पुढे थोड्या म्हणजे अगदी ५-७ मिनिटांवर आमचा तळ होता. आजची आमचा ट्रेक म्हणजे डोंगराच्या एका बाजूवरुन च्ढून दुसर्या बाजूला जाणे असल्याने, तिथून आमचा बेस कँप 'सारी' जवळ असला तरी दिसत नाही.
संध्याकाळी चहा झाला की तळ्यावर जायचे आहे, आत्ता झोपू नका नाहीतर रात्री झोप येणार नाही असं सांगून ट्रेक लिडर गायब झाला.(त्याच्या टेंट मधे जाऊन झोपला असावा) झोपू नका सांगितल्याने आम्हाला अतोनात झोप येत होती. एकमेकांशी ओळखी वाढवत, चहाची वाट बघत आम्ही काही जण ताटकळत बसलो, तर काही जण (including नवरा) बिंधास्त झोपले. काही जण डायनिंग एरियातच जिथे आम्ही गप्पा मारत होतो तिथे आडवे राहून मेडिटेशन करत होते (उर्फ झोपले होते)
संध्याकाळी तळ्याचे दर्शन मात्र अगदी अहाहा असे होते. तळ्यातल्या पाण्यातल्या प्रतिबिंबांचे फोटो कितीही काढले तरी मन भरत नाही.
हा तळ्याचा फोटो
थंडीच्या दिवसांत हा ट्रेक केला तर समोर दिसणारे बर्फांचे डोंगर या
सौंदर्यात अजुन भर घालतात. आमची उत्साही जनता फोटो काढून थकल्यावर आमचे
लोकल गाइड मनोज यांनी मस्त गोष्टीचा तास घेतला. हे मनोज म्हणजे सधारण
चाळिशीतले गृहस्थ असावेत. भरपूर अनुभव तर होताच पण आ णखी एक वैशिष्ठ्य
म्हणजे स्टोरी टेलर होते. इथल्या गोष्टीनंतर सगळ्या ट्रेकमधे आम्ही त्यांना
प्रत्येक मोठ्या ब्रेकला गोष्ट/ किस्सा ऐकवायला
सांगितला.
देवी (देवता) कधीतरी या तलावात स्नान करण्यासाठी आल्या होत्या म्हणून हा
देवेरिया ताल झाला. पांडव वनवासात असताना कृष्णाने त्यांच्यासाठीच हे तळे
बनवले, त्यांना विचारलेले यक्ष प्रश्न गाइडने आम्हाला विचारले. यथाबुद्धी
सगळ्यांनी उत्तरं दिली. इथे कोणताही पशू पक्षी तहानलेला राहू नये म्हणून हे
तळे कधीच गोठत नाही असं गावातले लोक सांगतात. जन्माष्टमीला गावातले लोक
तळ्याची पूजा करतात.
नंतर अजुन एक अगदी लहानसा पण आनंददायी ट्रेल म्हणजे तळ्याला फेरी! ही
फेरी मारताना छोट्या पायवाटेने जात होतो. सूर्य मावळतीला निघाला होता.
त्याचे किरण दाट झाडीतून मधे मधे वाटेवर पसरले होते. मधे मधे तळ्याचंही
दर्शन होत होतं. हे सगळं वाचण्यापेक्षा अनुभवणं कितीतरी पटीने सुखद आहे.
प्रत्येक जंगल ट्रेक मधला हा माझा आवडता पॅच असतो. इथे फक्त पक्षांचे आवाज
आणि पाउल ठेवतो तिथे पाचोळ्याचा आवाज हे अनुभवायला फार आवडतं मला. या
वाटेवर एकटी असेन तर nothing like it! इथेही ५ मिनिटांसाठी का होइना पण
होते. आणि या आधीच्या पिंढारी, आणि अगदी छोट्या अंधारबनलाही होते.
इथे जराशी कल्पना येईल
परत सगळ्यांच्या बरोबर आले
तळ्याला फेरी पूर्ण झाल्यावर अजुन एक (हवा करायला)
तळ्याकाठी फेरी झाल्यावर आमचा दुसरा लोकल गाईड विजय याने अजुन मस्त गप्पा
मारल्या. मनोजजींनी अख्यायिका सांगितल्या तर विजयने त्यामागचं शास्त्रोक्त
कारण सांगितलं.
हे तळं कढईच्या आकाराचे असल्याने, मध्यभागी खाली जे पाणी आहे त्याच्या
उष्णतेने हे तळे गोठत नाही. खाली नॅचरल सोर्सेस असल्याने हे तळे कधीही
आटलेले नाही. तसंच या सोर्सेस मधून इथलंच पाणी पलिकडे सारी गावात जाते.
बावीस वर्षाचा हा विजय म्हणजे उत्सहाचा झरा होता. सतत बोलत आम्हाला गुंतवून
ठेवायचा. आणि इतक्याशा वयात त्याच्या पोतडीत भरपूर अनुभव होते, फोटो
काढायची आवड होती, पक्षांची माहिती होती आणि मुख्य म्हणजे तो लहनाचा मोठा
झाला त्या पहाडी भागाबद्दल अतोनात प्रेम होते. देवरिया ताल मधे उतरलेले
दोन तीन जण बुडल्याच्या आणि त्यांचे प्रेतही न मिळाल्याच्या बातम्या आहेत,
पण त्या अधी जेंव्हा लोकांना हे तळे इतके खोल आहे याची कल्पना नव्हती,
तेव्हा स्थानिक लोक/ मुले या तळ्यांत पोहायला उतरत. आमचा विजय हा त्यातला
एक होता. आता उतरायची हिंमत नाही म्हणाला. या तळ्याचा तळ शोधण्याचे बरेच
प्रयत्न अयशस्वी झालेत अशीही माहिती सांगितली.
(क्रमशः)

पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - स्यालमी(३)

सुर्यास्तानंतर तळ्यावरून परत आलो. जेवणं उरकून लवकरच टेंटमधे गेलो. ४ जणांच्या टेंट मधे ३ बँग्लोरच्या मुलींबरोबर मी होते. लवकर झोप तर लागली पण १२ वाजता टोयलेट टेंटला भेट द्यावी लागली. अर्थात सगळ्या एकत्रच गेल्याने फार त्रासदायक वाटले नाही.
इथेही पहाटे लवकरच जाग आली. ठरलेले रुटिन पाळून ८:१५ ला आजच्या मोहिमेवर निघालो. हा दुसरा दिवस होता. डिफिकल्टी लेवल थोडी वाढणार होती. पूर्ण ट्रेक ९ किमी असणार होता, पण आज उतरून जायचं होतं म्हणजे ७८१० फूटांवारून आम्ही ७६०० वर जाणार होतो.
साधारण तासभर चालून /चढून आम्ही एका टेकडीच्या माथ्यावर पोचलो. हा झंडी टॉप. लाल गुलाबी बुरांशची आठवण आल्याशिवाय राहिली नाही, उन्हाळा असल्याने त्यांची साथ नव्हती.

इथे झंडी टॉपला आणि नंतरही मधे मधे पिवळे झेंडे रोवलेले दिसतात. ते पर्यटक
आणि स्थानिकांनी लावलेले आहेत. आपण योग्य मार्गावर आहोत याची खात्री
करण्यासाठी यांचा वापर खुणा म्हणून करतात.
झंडी टॉप नंतर सगळा उताराचा रस्ता सुरू होतो. सगळा रस्ता घनदाट जंगलातून
जात होता, त्यामुळे सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा त्रास अजिबात जाणवला
नाही. आणखी थोडं पुढे गेल्यावरप्तीन पायवाटा/ रस्ते होते. त्यातली मधली वाट
आम्ही घेतली. ही रोहिणी बुग्याल कडे जाते. ऱोहिणी बुग्याल कडे जाताना जंगल
संपून मधे मस्त गवताळ सपाटी लागली. दुपारचे जेवण इथे करायचे होते. पॅक लंच
मेन्यु कोबीची भाजी आणि पोळ्या होत्या. कोबी मला आवडत नाही असं नाही पण
जाडजुड कापलेला कोबी आणि बहुदा सरसों तेलांत बनवलेली भाजी मला काही जाईना.
नवरा आणि बरोबरच्या दोन्ही मित्रांची तोंडंपण फार काही वेगळी नव्हती. मग एक
भन्नाट आयडिया केली. परेशची बायको प्रियांकाने दिलेला चिवडा पोळीवर पसरला,
त्यावर थोडी भाजी पसरली आणि पोळीचा रोल करून खाल्ला. चिवड्याची क्वांटिटी
जास्त ठेवली की जेणेकरून कोबीची चवच जाणवणार नाही. स्वतःच्या जबरदस्त
कल्पनाशक्तीवर खुश झालो, कारण न जेवणं इथे तब्येतीला परवडणारं नव्हतं. सगळा
डबा संपवला. 
इथेच एका झाडावर अगदी नजरेच्या टप्प्यात आम्हाला सुतार पक्षी दिसला. त्याचा
काही चांगला फोटो घेता आला नाही पण त्याचं सुतारकाम मात्र बघता आलं.
जेवण झाल्यावर जरा गप्पाटप्पा करुन निघुन परत उतारावर लागलो. जंगलाच्या
या बाजूला rhododendron बरोबरच जुने ओक आणि मॅपल वृक्ष भरपूर होते. मधे
मधे चंद्रशीला म्हणजे आमचं टार्गेट आम्हाला दिसत होतं.(अर्थात दिल्ली अभी
दूर थी| तिथे पोचायला अजुन २ दिवस होते.)
मधेच परत ३ पायवाटा लागल्या. यातली डावीकडे जाणारी पायवाट परत 'सारी' कडे
आणि उजवीकडची उखींमठकडे जाणारी होती. मधली पायवाट आम्हाला आमच्या आजच्या
कँपसाईटकडे घेऊन गेली.
इथून सूर्यास्त खूप छान दिसणार होता पण ढगाळ हवेने त्यावर पाणी फिरले,
किंवा असं म्हणू की मावळतीच्या सूर्यावर ढग फिरले. (फालतू कोटी) पण तरी
फोटो साठी मात्र मस्त फ्रेम्स होत्या. हे अजुन काही फोटो
आल्या आल्या इथे बसणं सुख होतं. नंतर गाइडने सांगितलं समोर जो उंच डोंगर आहे. तिथेच दुसर्या दिवशी जायचंय.
अजुन एक
थोडं खाली उतरून गेल्यावर
येऊन जरा वेळ होईतो एक फार आनंद होईल अशी गोष्ट दिसली. वरून पहाडीतून वहात आलेलं थंड पाणी आमच्या इथेच खाली एका पाइपमधून आणून बादलीत सोडलं होतं. लगेच नळावर बायका जमल्या (नंतर पुरुषही जमले) सारीच्या साईटपासून सगळीकडे पाणी जपून वापरावं लागत होतं, त्यामुळे ह्या थंड आणि मुबलक मिळालेल्या पाण्यात हात पाय धुवायला फार बरं वाटलं. बायांनी चिवचिवाट करत पाण्याचा आनंद लुटला. आज फार दमणूक झाली नव्हतीच पण पाण्यात खेळून तर अजुनच फ्रेश वाटलं. इथेच मला जळवांचा प्रसादही मिळाला पण हा प्रसाद मिळाल्याचे मला दुसर्या दिवशी समजले इतक्या गपचुप त्यांनी आपलं काम उरकलं होतं.
प्रत्येक ट्रेकला असा एकतरी फोटो घेणं अनिवार्य असतं
या भागाचा सुरुवात आणि शेवट एकाच विषयाने करते. या रात्रीही एक वाजता मला टॉयलेट टेंटला भेट द्यावी लागली. एकाच वेळी निरव शांततेचा आनंद आणि गडद अंधारात एक्ट्याने टॉयलेट टेंट पर्यंत जाऊन येण्याची भिती दोन्ही अनुभवलं
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - बनियाकुंड (४)

बनियाकुंड हा आमचा पुढचा आणि शेवटून दुसरा टप्पा होता. पहाटे उठून का
खाजतंय म्हणून पाय बघितला तर जळवा लागलेल्या दोन ठिकाणी लालेलाल झालं होतं
आणि किंचीत सुजलं होतं. जळू लागलेली दिसली मात्र नव्हती म्हणून लिडरकडून
जळूचंच आहे ना हे फक्त कन्फर्म केलं आणि निवांत झाले. त्या दिवशी
नाष्त्याला पोहे आणि डोसे असं ठेवून आयोजकांनी मला आणि माझ्या बँग्लोरी
मैत्रिणींना एकाच वेळी खुश करून टाकलं. भरपेट नाष्ता करुन निघालो होतो.
पहाटे सूर्य डोंगराच्या मागे उगवत होता, आम्हाला त्याची फक्त फाकलेली किरणं दिसत होती. याचा छान फोटो मात्र नाहिये.
सूर्य अजुन वर आल्यावर
स्यालमी ते बनियाकुंड हा टप्पा बघायला गेलं तर अगदी छोटा वाटतो, कारण ट्रेकचं अंतर निव्वळ साडे पाच किलोमीटर! पण बर्यापैकी असेंट होता. दमायला होत होतं. बनियाकुंड ८५२० फूट उंचीवर आहे.
साधारण एका पेसचा चमु एकत्र चालतो आणि २-३ ग्रुप्स टप्प्याटप्प्यात पोचतात, असं ठरवून नाही तरी आपोआप घडत जातं. आजच्या ट्रेक मधे मला अगदी तंतोतंत माझ्याच गतीची मैत्रीण मिळाली. बँग्लोरवासी स्वप्ना अंदाजे माझ्याच वयाची आणि माझ्याच पेसची असल्याने जरा जास्त गप्पा झाल्या. त्यात तिही आयटी आणि मीही! मग तुझं काम माझं काम, तुझा मुल माझं मुल असे बेसिक टॉपिक्स झाले. मी आतापर्यंत फक्त ऑफिससाठी आणि ऑफिसची भाषा म्हणूनच इंग्लिशकडे बघत आलीय. तिथे या दक्षिणेकडच्या स्वप्ना आणि इतरजणांमुळे इंग्लिशमधून वायफळ गप्पाही मारल्या.
जाताना जंगलात एका झाडावर या अस्वलाच्या नखांच्या खुणा बघायला मिळाल्या.
नंतरच्या ब्रेकमधे लगेच मनोजजींकडून असे स्थानिकांचे अशा स्वापदांशी सामने
झाल्याचे एक दोन किस्से ऐकले.
दमणूक होणारा असला तरी अशक्य सिनिक होता. घनदाट जंगल हे तर रोजच असायचं
इथे जोडीला मधे एक मस्त नदी ओलांडली. नदीच्या नावासकट सगळं मोहक! नदीचं नाव
आकाश कामिनी! तिची झलक बघा
नदी ओलांडण्यासाठी छोटा जुगाड पूल बांधलेला आहे. अतिवृष्टी झाल्यास हा
पूल वाहूनही जातो. पण पाण्याची पातळी कमी असते तेंव्हा पाण्यात उतरूनही नदी
पार करता येते. नदी पार केल्यावर थोडं चढण चढल्यावर एक कुरण लागलं. इथे
दगडांपासून बनवलेल्या मेंढपाळांच्या झोपड्या दिसल्या. उन्हाळ्यात, स्थानिक
लोक त्यांच्या गायी, शेळ्या, मेंढ्यांना घेऊन इथेच रहातात. इथून थोडे पुढे
गेलो की औषधी वनस्पतींची नर्सरी लागते. साईटच्या अगदी जवळ आल्याची महत्वाची
खूण!
आणि इथून जरासं चढून पुढे गेलो तिथे अचानक एक मॅगी पॉईंट आणि पुढे रस्ता
दिसला. हा केदारनाथकडे जाणारा रस्ता! किती दिवसांनी रस्ता बघतोय असं वाटत
होतं.
इथून जवळच असलेल्या आमच्या कँप साईट्ला पोचलो.
जोरदार हसण्या-खिदळण्याचे आवाज आले. आमच्या आधीचा ग्रुप त्यांचा समिट होऊन
परत आला होता. त्यांना परत ऋषिकेशला घेऊन जाण्यासाठी गाडी येत होती, तिची
वाट बघत ते थांबले होते. दमून येऊन त्यांना बघून, CBSC ची वार्षिक परीक्षा
आधी व्हायची आणि आम्ही SSC वाले आमची परीक्षा संपण्याची वाट बघायचो तेच
आठवलं. अर्धे लोकं आले होते, अर्धे यायचे होते. दुपारच्या जेवणाला भरपूर
अवकाश होता. आमच्यातल्या गुज्जुने भरपूर खाऊ आणलेला, तो बराच शिल्लक
होता.होऊन जाऊद्या म्हणून त्याचे, आमचे एक एक खाऊचे पुडे सोडले. हळीव लाडू,
पौष्टिक लाडू संपले. गुज्जुचे खाकरे संपले आणि त्याने ठेपले काढले. त्याला
ठेपल्यांबरोबर तोंडी लावायला लोणचं हवं होतं ते मिळेना. खाऊ परत घरी
न्यायचा नव्हता (बायकोने ताकिद दिली असेल
) पण कोरडे ठेपले संपणं कठिण होतं. इतक्यात परेशला त्याचा कांलम (कांदा
लसूण मसाला) आठवला आणि ठेपले प्रश्न सुटला. गुजराती ठेपल्यांवर
महाराष्ट्रियन कांलम घालून ठेपल्याचेही wrap बनवून आम्ही बरोबरच्या
दक्षिणेच्या मंडळींनाही खाउ घातले. सगळेच ह्या fusionने काय खुष झाले
म्हणून सांगु! 
साइटचा दुसर्या बाजूने उंचावरून फोटो
या साईटवर आम्ही सगळ्यांत कमी वेळ होतो पण होतो तो सगळा वेळ अगदी
हॅपनिंग होता. आमचं वेळापत्रक आता पूर्ण बदलणार होतं. त्या दिवशी
संध्याकाळी ६ वाजता जेवून ७ वाजता झोपायचं होतं. रात्री ११-११:१५ ला उठून,
आवरू,, नाष्ता करून १२-१२:३० वाजता समिटसाठी निघायचं होतं. ६ वाजता जेवणं,
७ वाजता झोपणं आणि रात्री ११-११:१५ उठणं सगळं एकापेक्षा एक कठिण होतं
त्यात थोडा थोडा पाऊस पडायला लागला. ७:३०-८ वाजता झोप झोप असं स्वतःला
समजावत होते. पाऊस वाढला. तुफान कोसळत होता. टेंटवर थेंबांचा आवाज अजुनच
मोठा येत होता. मला झोप लागत नव्हती. पाऊस थांबून आकाश स्वच्छ होणार याची
गाइडला खात्री होती पण तरीही worst case मधे समिट रद्द करणे हाच पर्याय
होता. कधीतरी मला झोप लागली आणि ११:३० वाजता उठले तेंव्हा पाऊस पूर्ण
थांबला होता.
पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - चंद्रशीला (५)
रात्री उठून आवरलं तेंव्हा हवेत चांगलाच गारवा होता. कचकून थंडी पडली होती. रात्री १२ वाजता त्या थंडीत कुडकुडत असताना गरमागरम उपमा खायचा अनुभव चांगला उबदार होता.
समिटच्या दिवशीचा म्हणजे रात्रीचा काय प्लॅन आहे ते आदल्या दिवशीच
सांगितले होते. सुरुवातीचे १.५ किलोमीटर आम्हाला सगळ्यांनी एकत्रच जायचं
होतं. अंधार असल्याने पुढे मागे असे ग्रुप्स न करता एकत्रच जायचं होतं.
लिडर आणि दोघे गाईड हेच तिघांना लाईन सोडायची परवानगी होती. आम्हाला
त्यांनी पेसप्रमाणे उलट्या क्रमाने लायनीत उभे केले. कुडकुडत निघालो होतो.
सगळ्यांना ३ लेअर तरी घालायचेच असं सांगितलं होतं. त्या अंधारात आम्ही हेड
टोर्च लावून लयनीत जाताना काजव्यांसारखे दिसले असु, पण कुणी याचा फोटो
घेतलाच नाही. अंधारात अगदी सावकाश मुंगीच्या गतीने आम्हाला हे १.५ किमी पार
करायला १ तास लागला. चोप्ताला पोचलो. छोटा ब्रेक घेतला आणि वर बघितलं तर
चांदण्यांनी भरलेलं आकाश! नजारा डोळ्यात साठवून घ्यावा तितका कमीच! आय फोन
आणि चांगले कॅमेरा वाल्यांनी अर्थात परेशने फोटो काढले, आम्ही ती दृष्य
डोळ्यांतच साठवून घेतली.
इथून पुढच्या सुचना दिल्या. पुढचे ३.५ किमी ट्रेक करून आम्ही तुंगनाथ मंदिराजवळ पोचणार होतो.
उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ मंदिर हे जगातील सगळ्यांत उंचावरचे शिवमंदिर आहे. इथे फक्त ट्रेकर्स नाही तर यात्रेकरूही मोठ्या प्रमाणावर जातात. याचा एक फायदा असा झाला की अंदाजे ३.५ किमीचा हा रस्ता हा सिमेंटचा बांधलेला होता. मात्र प्रचंड स्टीप होता. आम्ही रात्री चढणार असल्याने यात्रेकरूंची गर्दीही नसणार होती.
इथे आम्हाला आपापल्या पेसने चढायची परवानगी दिली हे फार बरं झालं. कारण
आपल्या कपॅसिटीच्याही स्लो पेसने जाताना जास्तच दमल्यासारखं वाटलं. काही
सुचना पाळायच्या होत्या. सिमेंटचा रस्ता सोडून कुठेही जायचं नाही. एकटं
रहायचं नाही. गती कमी होतेय असं वाटलं तर सरळ मागे थांबून मागच्या ग्रुपला
जॉईन करायचं. आपापले पेसवाले कोण आहेत बघा म्हणताच स्वप्ना आणि मी
एकमेकींकडे आशेने बघितलं आणि नजरेत होकार दिसला.
हा महत्वाचा असा दुसरा टप्पा सुरू झाला आणि तो किती कठिण आहे ते कळत गेलं.
८५२० फूटांवारून १२००० फूट वर जाणार होतो. झिगझॅग अशी ११ वळणं पार करायची
होती. प्रत्येकाकडे २ लिटर पाणी असायलाच पाहिजे असं सांगितलंच होतं.
मजल-दरमजल करत अंतर पार करत होतो. मधे मधे वॉटर ब्रेक घेत होतो. गप्पा
केंव्हाच बंद झाल्या होत्या. विजय आणि मनोजजी आमचे लोकल गाईड सतत पुढे मागे
करत, वॉकी-टॉकीवर बोलत सगळे व्यवस्थित येत आहेत, बरोबर रस्त्यावर आहेत ना
बघत होते. मानसिक बळ देत होते. थांबू नका, सावकाश पण पुढे जात रहा, दमलात
तर पाच मिनिटं उभं रहा पण बसु नका असं काय काय सांगत होते. माझं आणि
स्वप्नाचं ट्युनिंग मस्त जमलं होतं. आणि आम्ही तुंगनाथला पोचलो. मोठ्ठा
आणि महत्वाचा टप्पा पार पडला. जरा वेळ टेकलो, पाणी प्यायलो. अंधारात अजुन
एक रस्ता दिसत होता त्यामुळे जरा साशंक झालो, पण एक दोन माणसं ज्या
रस्त्याने जात होती तिकडे गेलो, विचारून खात्री केली आणि हार्ट बीट्स एकदम
नोर्मलला येण्याआधी पुढच्या प्रवासाला निघालो.
तिसर्या आणि शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली. तिसरा टप्पा फक्त १/२ ते
३/४ किमी उरलंय. हे ऐकायला जितकं सोपं वाटत होतं तितकं पार करायला अजुन
अवघड! पण आता फक्त समिट दिसत होतं आणि सूर्योदयापूर्वी तिथे पोचणं हे
ध्येय! इथेही सतत वळणं येत होती. प्रत्येक वळणावर वाटे, हे शेवटचे वळण आणि
आपण ध्येय गाठणार! मधे एक दोन जणं हताश होऊन बसलेले दिसले. त्यांना चला
म्हणत एक एक पाऊल टाकत आम्ही पुढे जात राहिलो. मधेच एका टप्प्यावर वर
बघितलं तर तर तिरका कडा दिसत होता. मागे मस्त चांदणं आणि त्या बॅकग्राऊंडवर
पुढे आमच्या पुढे असलेल्या चार जणांची फक्त silhouette.. हे इतकं अमेझिंग
होतं की बघतच बसावं! पण वेळ कुठे होता. स्तिमित झालेली मी क्षणात भानावर
आले. फोन बाहेर काढून फोटो काढण्याइतकी एनर्जी खर्ची घालवायची नव्हती. ते
बघून असंच वाटलं की हे शेवटचं वळण, पण हाय! ते वळण संपलं आणि बघितलं तर
अजुन शिल्लक होतंच. पोटात किंचीत भिती वाटली. सूर्याची किरणे दिसायला
लागली होती. मी जराशी निराश झाले पण स्वप्नाला काय झालं कोण जाणे. Don't
worry, Let's go असं काहितरी ती म्हणाली आणि अंगात पॉपाय (म्हणजे कोण ते इथे बघा)
आल्यासारखी झपझप चालु लागली. मला तिथेच पुढे गेलेले ३-४ जणंही दिसु
लागले. सूर्योदय व्हायचा आहे असं कुणितरी म्हणालं आणि परत उधाण भरलं.
यानंतरची १० मिनिटं खरंच कठिण होती, अंतर संपतच नव्हतं. नवरा आणि मी आता
एकत्रच होतो. त्यानेही थोडासा धीर दिला आणि येस! आम्ही वर पोचलो!
सूर्योदयाच्या ५-७ मिनिटे आधीच वर पोचलो!
पोचलो तेंव्हाचं दृष्य असं होतं
हा अजुन एक
यानंतर ५ मिनिटांत सूर्योदय झाला आणि निसर्गाचे आणखी अविष्कार बघायला मिळाले
दूर दूर पर्यंत पसरलेल्या पर्वत रांगा
बर्फाच्छादित
आणि हे mandatory फोटो
ग्रुप फोटो! यात सगळा ग्रुप नाहीये. अजुन काही जण पोचले नव्हते.
आम्ही रात्री १ वाजल्यापासून पहाटे ५:१५ पर्यंत चढत होतो. दमायला तर होतंच
पण 'We Did It!' हे फीलिंग अमेझिंग असतं, आणि या फीलिंगसाठीच अजुन खूप खूप
ट्रेक्स करायला मिळावेत ही इच्छा आहे. 
(अजुनही क्रमशः) 
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.