Sunday, June 2, 2024

vidarbha darshan फेसबुक पेज बॅक अप ७










 आता मूळ रुपात आले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर; मंदिराला मिळाले ७०० वर्षांपूर्वीचे रूप
रंग रंगोटी, टाईल्स, चांदी काढून टाकल्यामुळे मंदिराचे पुरातन रुप समोर आले आहे. २ जून पासून मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.













श्रीमंत दाजीसाहेब देशमुख यांचा भुईकोट, शेंबाळ पिंपरी, यवतमाळ
साधारण 400 वर्षा चा इतिहास असलेला देशमुख भुईकोट / मोठी गडी (7 बुरुज, 3 प्रवेशद्वार च्या आत बाले किल्ला, 30-35 फूट उंच भक्कम भिंती, 9 एकर वर पसरलेली)
(फोटो आणि माहिती - Mayur Lade)




राणी महाल, खाटकली, अमरावती
हा महाल बेलकुंड-खाटकली राज्य महामार्ग क्रमांक 204 पासून 3 किमी आत उजव्या बाजूला घनदाट जंगलात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणारी ही ऐतिहासिक वास्तू शेवटच्या घटका मोजत आहे. काळ्या पाषाणात बांधकाम असलेली ही अद्भूत रचना आता पूर्णपणे ढासळली आहे. वास्तूच्या उरलेल्या अवशेषांमध्ये झाडी झुडपे वाढलेली आहे आणि सुंदर स्मारक नष्ट करत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा विदर्भातील आणखी एक ऐतिहासिक वास्तू कायमची नष्ट होईल.
(Photo - Mahernosh Mavalwala)

















बावनदरी गढी/किल्ला, पिंपळनेर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे ऐतिहासिक गढी शेवटच्या घटका मोजत आहे. स्थानिक या गढीला बावनदरी म्हणून ओळखतात.

कृष्ण, चिकणी खुर्द, यवतमाळ
(Photo - Vedant Maind)





सिंदखेड राजा येथे उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर
बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधी समोर उत्खननात पुरातन शिव मंदिर सापडलं आहे. मंदिर यादवकालीन असून त्याचे बांधकाम तेराव्या शतकातील आहे असे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Source - ABP Majha



































आज भगवान श्री नृसिंह जयंती. त्या निमित्ताने सादर आहे विदर्भातील नृसिंह मंदिरे आणि मुर्ती :
































चिटणवीस वाडा, नागपूर
आहा.... कित्ती छान वाडा !
होय...... प्रत्येकाचे हेच उदगार ....
'रख्माजी गणेश रणदिवे' हे भोसले दरबारातील पहिले चिटणवीस होते. (1729-1771) ते रघुजी पहिले यांच्यासोबत 1744 साली नागपुरात आले तेव्हा हा वाडा बांधण्यात आला होता. या वाडयाला आज 250 वर्षाहुन अधिक काळ झाला आहे. वाडयाचे वैभव आजही दिमाखात उभे असून या भल्या मोठ्या वाडयाचे संपूर्ण बांधकाम विटा, माती आणि लाकडात झालेले असून श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भित्तिचित्रे असणारा सुशोभित दिवानखाना, भुयार, नंदीघर, देवघर, पाटा-वरवंटा, जातं, जूनी पितळीची भांडी पाहुन इतिहासकालीन स्मृती जाग्या झाल्या.
(माहीती - कल्पना गुलालकारी)
(फोटो - हर्षल भांबुलकर)












हौज कटोरा, अचलपूर, अमरावती
अचलपूरचा इतिहास म्हणजेच 'वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा) आता पार बदलून गेले आहे. संपन्नतेची साक्ष पटवणाऱ्या खुणा तेवढय़ा शिल्लक आहेत, इतकी ती संपन्नता लयास गेली आहे. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते.
अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते.
(Photo - travel_0_graphy IG)




























मुक्ताई देवस्थान आणि धबधबा, डोमा, चंद्रपूर
डोमा येथील मुक्ताई मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. तेथील धबधब्यात भिजून चिंब होण्याचा आनंद काही औरच असतो. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआप तिकडे ओढली जातात.
शंकरपूरजवळ हिरव्या वनराईने नटलेला मुक्ताई डोंगर आहे. येथेच जागृत देवस्थान मुक्ताई गुफा मंदिर आहे. लगतच्या डोंगराच्या ४५ फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.
या भागात निसर्गाने अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. पक्ष्यांचा चिवचिवाट, माकडांचा हुपहुप आवाज आणि पाण्याचा सळसळणारा आवाज पर्यटकांना मनसोक्त आनंद देत आहे. याच धबधब्यावर सूर्याचे किरण पडल्यानंतर दिसणारा इंद्रधनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो. धबधब्याच्या बाजूला एक गुहा आहे. ही गुहा धबधब्यापासून वरती डोंगरावर जाते. त्यातून जाताना शरिराला नागमोडी वळण घेत जावे लागते. त्याचाही आनंद पर्यटकांना मिळतो. मुक्ताईच्या निसर्ग सौंदयाचा आनंद घेण्यासाठी लांब अंतरावरील पर्यटकांची खूप मोठी गर्दी दररोज होत असते.
सोमनाथ शिव मंदिर, डोंगर शेवली, बुलढाणा

























सात बहिणी डोंगर, पेरजागड किल्ला, सोनापूर, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी अभयारण्या अंतर्गत येणारा हा पेरजागड डोंगर सात बहिणीचा डोंगर किंवा सेवन सिस्टर्स हिल म्हणून ओळखला जातो. हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा गड ट्रेकर्स साठी एक पर्वणीच आहे. डोंगराचे मोठ मोठे दगड रचनात्मक दिसतात. चढाई करून शिखरावर पोहचल्यावर तिथून दिसणारे विहंगम दृश्य मन प्रसन्न करून टाकणारे आहे. या गडावर छोट्या गुहा दिसून येतात. दगडात कोरलेल्या पायर्या आहेत. असे सांगितले जाते की येथे सात बहिणींचे वास्तव्य होते. त्यांची नावे 1) अंबाई 2) निंबाई 3) उमाई 4) गौराई 5) मुक्ताई 6) पवराई 7) भिवराई होते. त्या मोठ्या साहसी, त्यागी व भाविक होत्या. त्यांचे प्रतिक म्हणून पेरजागडच्या उंच शिखरास सात बहिणीचे शिखर (डोंगर) असे म्हणतात. येथून जवळच मुक्ताई देवस्थान आणि मुक्ताई धबधबा आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
लंकेनाथ, ता. नेर, जि. यवतमाळ येथील शिव मंदिरातील पुरातन मुर्ती. विठ्ठल?
(Photo - Vyankatesh Kute)












भोवरागड किल्ला, धानोरा, गडचिरोली
गडचिरोलीच्या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला वनदुर्ग भोवरागड/भौरागड/भवरागड. आंतरजालावर कुठेच माहिती उपलब्ध नसलेला अज्ञातवासातील किल्ला. धानोरा गावापासून ४ कि.मी अंतरावर सोडे या गावाजवळ पहाडीवर भवरागड किल्ला आहे. तिथे डोंगर कपारीत शिव मंदिर आहे तसेच या पहाडीच्या मागे कठाणी नदी वाहते.
सध्या येथे यात्रा सुरु आहेत त्यामुळे भाविकांची गर्दी बघायला मिळते. गडाच्या पायथ्याशी यात्रा भरते. पायथ्यापासून चढाईला सुरुवात केल्यावर ओबडधोबड दगडांच्या पायऱ्या आहेत तर कुठे सिमेंटच्या पायऱ्या देखील आहेत. मोठ्मोठ्या दगडी शिळांच्या गुहेत शिवलिंग स्थापित आहेत. विदर्भातील लोकांनाही माहित नसलेल्या या किल्ल्याचे पावित्र्य आदिवासी बांधवांनी जपून ठेवले आहे.
(Photo - @middleclasscreator)


















अंबाई निंबाई देवस्थान, चिमूर, चंद्रपूर
(Photo - Shailesh Bokade, Nikhil Wadhai)





महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
💐
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील कोथळी येथे दोन पुरातन मंदिरे आहेत. यापैकी पुरातन विष्णू मंदिराच्या जवळच एक साधे दगड मातीचे बांधकाम असलेले मंदिर आहे जे खूप लोकांना परिचित नाही. बाहेरून हे छोटेसे टुमदार मंदिर वाटत असले तरी आत भव्य दिव्य असे शिवलिंग स्थापित आहे. शिवलिंगाची उंची साधारणतः 4-5 फुट उंच असावी. मंदिराचा इतिहास उपलब्ध झाला नाही. पण एकदा अवश्य भेट द्यावी असे ठिकाण आहे.




भव्य शिवलिंग, बाबुपेठ, चंद्रपूर
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जायकवाडीतील पाणी कमी झाल्याने ऐतिहासिक मंदिरे दृष्टिपथास













श्री शृंगऋषी संस्थान, अनसिंग, वाशिम
हे संस्थान फार पुरातन आहे. शृंगऋषी हे विभांडक ऋषींचे पुत्र. राजा दशरथाच्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचे पौराहित्य त्यांनी केले होते. त्यांच्या डोक्यावर एक शिंग होते म्हणून त्यांना शृंग ऋषी म्हणत. अनसिंगची ही भूमी त्यांची तपोभूमी होती.
याठिकाणी हेमाडपंथी मंदिर बांधलेले आहे. कारला तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील श्री संत कार्लेकर महाराजांनी या मंदिराचे पुनःरूज्जीवन केले. अलीकडे भक्तांनी त्याला कलरकोटेड करून आधुनिक बनविले.
मंदीर परिसर अतिशय रम्य आहे. बाजूला बारव आहे, तिच्यात गोमुख आहे. लगतच्या धरणाचे पाणी बारवेत शिरल्याने गोमुख पाण्यात बुडाले. चैत्र प्रतिपदेला येथे यात्रा भरते.


Girls at play- in the streets of Bhandara, photograph taken in 1914 by Ragoba Dadhe of Bhandara.









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...