पिंपरी-चिंचवडमधली खादाडी | Maayboli
Submitted by Admin-team on 16 December, 2009 - 13:40
Group content visibility:
Public - accessible to all site users
आणखी शोधा
स्नॅक्स
पिंपरी चिंचवड
पिंपरी
स्नॅक
पिंपरी-चिंचवड
चिंचवड
ऐतिहासिक स्थळांच्या सहली
सांस्कृतिक कार्यक्रम तिकीट
गणेशोत्सव सजावटीचे साहित्य
मराठी संगीत सीडी
अन , सी फूड स्पेशल म्हणाल तर
अन , सी फूड स्पेशल म्हणाल तर एकचं - मालवण समुद्र , गावडे कॉलनी जवळ, टेल्को गेट समोर.
Submitted by suryakiran on 29 April, 2010 - 07:01
मराठा - pune-bombay हायवे वर
मराठा - pune-bombay हायवे वर आहे. तिथे महाराश्ट्रियन जेवन मस्त मीलते. फक्त व्हेज.
पत्ता:
नाशिक फाटा, बस स्टाप पुढे, हायवे वर रोड ट्च , पुण्या कडे जाताना डाव्या हाताला.
जरुर ट्र्याय करा.
Submitted by thete_swati on 4 May, 2010 - 05:39
बर्ड व्हॅली नामक हॉटेल झालय
बर्ड व्हॅली नामक हॉटेल झालय शाहुनगरात. प्रचंड ब क वा स.
अन रेट कै च्या कै आहेत.
Submitted by दीप्स on 5 May, 2010 - 04:51
रहाटणी जवळ पिंपरी गावात
रहाटणी जवळ पिंपरी गावात मिसळसाठी प्रसिद्ध अन खुप जुन हॉटेल आहे , माळी आळी मधे सावतामाळी मंदीरासमोर. जनता हॉटेल. आवर्जून जावे अन खावी अशी मिसळ मिळते. हो पण दुपारी १ वाजेपर्यंतच मिळते त्या नंतर नाही.
Submitted by suryakiran on 5 May, 2010 - 05:03
, माळी आळी मधे सावतामाळी
, माळी आळी मधे सावतामाळी मंदीरासमोर. जनता हॉटेल>>
सुर्यकिरणानो आमच अज्ञान जाणताच तेव्हा पत्ता नीट द्या बॉ 
Submitted by झकासराव on 5 May, 2010 - 05:19
जनता हॉटेल शिवाजी
जनता हॉटेल
शिवाजी पुतळाचौकाच्या अलिकडे,
माळी आळी, सावता माळी मंदिरा समोर.
पिंपरीगाव, पिंपरी.
झकासराव पुरे का इतकी डिटेल.
Submitted by suryakiran on 5 May, 2010 - 05:35
कमाल आहे राव वाल्हेकर वाडी
कमाल आहे राव वाल्हेकर वाडी रस्त्यावरचे वाघेरे यांचे "रानमळा " कोणालाच माहित नाही ? गावरान चिकन आणि मटन भाकरीचे हे माहेर घर आहे. ( इथे मात्र त्याच्या आधिचे काहीही मिळत नाही ) रात्री १०:३० ला बंद होते. अशोक सराफ, भरत जाधव जर चिंचवडच्या जवळपास असतील तर त्यांची एकमेव पसंती. आणि हो पांढरा रस्सा, तांबडा रस्सा हवा असेल तर मग संध्याकाळी ७ वा जायला हवे. बघा चाखुन अन कळवा मला.
Submitted by नितीनचंद्र on 5 May, 2010 - 05:48
सुर्यकिरण ओक्के. नितीन
सुर्यकिरण ओक्के. 
नितीन तुम्ही अजुन माहिती लिहा.
व्हेज लोकांसाठी देखील सांगा जरा. 
Submitted by झकासराव on 5 May, 2010 - 06:05
मालवणी समुद्र, टाटा मोटर्स
मालवणी समुद्र, टाटा मोटर्स गेट समोर, चिंचवड...
नुसते आठवले की तोंडाला पाणी सुटते... 
Submitted by मार्को पोलो on 1 June, 2010 - 03:24
सावरकर लायब्ररीच्या मागे
सावरकर लायब्ररीच्या मागे गायत्री शाकाहारीसाठी एकदम मस्तच.ईथे सगळेच मस्त मिळते.
Submitted by shravaneejoshi on 1 June, 2010 - 03:48
चंदन आता मालवण समुद्रची एक
चंदन आता मालवण समुद्रची एक शाखा नव्या सांगवी मधे पण उघडली आहे. कासारवाडी ब्रिज कडे जाताना ब्रीजच्या अलिकडे.
अन गायत्री भोजनालयाची लज्जात काही ओरचं, आजचं गायत्री बघितलं की पुर्वीचं सुहास भोजनालय आठवतं.
Submitted by suryakiran on 1 June, 2010 - 04:06
श्रीबालाजी स्नॅक्स
श्रीबालाजी स्नॅक्स सेंटर
प्रेमलोक पार्क कडून बिजलीनगर कडे वळताना डाव्या बाजुला दुकानांच्या गर्दीत आहे.
सगळ्या चाट प्रकारांसाठी स्वस्त आणि मस्त.
यांचा २ वर्षांपूर्वी फक्त एक स्टॉल होता. आता स्वतःच्या जागेत आहे.
लिन्क रोड वर तृष्णा आहे..तिथेही शाकाहारी जेवण उत्तम मिळते.
Submitted by मितान on 4 June, 2010 - 14:28
टाटा मोटर्स मट्रेल गेट(ERC
टाटा मोटर्स मट्रेल गेट(ERC Gate) समोर.. जगुबाई. नॉनव्हेजसाठी.. नक्की ट्राय करून बघा..
Submitted by योगिता on 5 June, 2010 - 12:39
चाफेकर चौकात करमरकर यांचे
चाफेकर चौकात करमरकर यांचे स्नॅक्स सेंटर सुप्रसिध्द आहे. माझा एक सिंधी मित्र तेथील स्वच्छ्तेची प्रशंसा करतो. सकाळी नास्ट्यासाठी पोहे, उपमा, इडली, मिसळ हे पदार्थ चांगले मिळतात. पार्सल न्यायचे म्हणले की करमरकरांचा मुलगा एक रुपया जास्त घेऊन कॅरी बॅग देतो. देताना आपण पर्यावरणाचे महानगरपालिकेने गटार नदीत सोडल्यापेक्षा आपण जास्त नुकसान करतो आहोत असा भाव असतो. माझ्या सारखा कोकणस्त भेटल्यावर तर तो हे मला ऐकवल्याशिवाय सोडत नाही. कदाचित कोकणस्तांनीतरी नियम पाळावेत असा आग्रह असावा त्याचा.
नुकतच हॉउस ऑफ रोल्स नावाच नव दुकान पिंपरीचिंचवड नाट्यगृहाजवळ माझ्या चक्रवर्ती नावाच्या मित्राने थाटलय. रविवारी दुपारी तुडुंब जेऊन रात्री फारस जेवायची इच्छा नसते तेव्हा हा रोल बरा वाटतो. ही रोल खाऊन राहण्याची पध्दत प.बंगाल मध्ये जास्त प्रसिध्द आहे. यात नॉनव्हेज रोल सुध्दा असतात. आपल्याकडे लोकांना आवडायला वेळ लागेल.
पिंपरीच्या साई चौकात भेळ पाणीपुरी सॅडविचेसच्या अनेक गाड्या उभा असतात. सिंधी लोकांना भेळ, पाणीपुरीची चव फार आवडते. इथली पाणिपुरी वेगळीच लागते.
चिंचवडगावात संध्याकाळी मशिदीसमोर बटाटा भजी, मिर्ची भजी ची स्पेशल एक गाडी आहे. लांबुन लांबुन याचे प्रेमी येतात.
Submitted by नितीनचंद्र on 5 June, 2010 - 22:48
"लै भारी कोल्हापुरी" -
"लै भारी कोल्हापुरी" - अप्रतिम कोल्हापुरी जेवण........
व्हेज, नॉनव्हेज दोन्ही मस्तच!!!! तिकडच्या जेवणाला तोड नाही. आवर्जुन जावे
असे ठिकाण. PCMC मधे इतके चांगले जेवण.....आणि इतकी चांगली service
कोठेही मिळत नाही. पत्ता खाली देत आहे.....
A/2/4 D1 Block, Nr Thermax Chowk, MIDC Rd, Chinchwad, Pune - 411033
Submitted by चन्द्रकान्ता on 15 June, 2010 - 04:54
वर्षाविहार-२०१० चा धागा सुरू
Submitted by ववि_संयोजक on 16 June, 2010 - 00:27
कविंची मिसळ खाल्ली आहे का
कविंची मिसळ खाल्ली आहे का कोणी ?
छानच असते.
Submitted by सुनिता on 29 July, 2010 - 03:09
बाप रे. बाहेर खायला इतकी
बाप रे. बाहेर खायला इतकी ठिकाणं आहेत चिंचवड मधे!
मी लहान असताना फक्त वृशाली आणि मयूर होतं.
नंतर काही वर्षांनी शीतल म्हणून एक सुरु झालं होतं.
एकदा पाहुण्यासारखं जायला पाहिजे चिंचवडला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लिहिलेली ठिकाणं ट्राय करता येतील.
Submitted by मेखला on 5 August, 2010 - 12:23
मेखलाजी, जेव्हा वृशाली होत
मेखलाजी, जेव्हा वृशाली होत तेव्हाही नेवाळे मिसळवाले होते. मारुतीच्या मंदीरापाशी भागवतांच होटेल होत जिथे कांदाभजी मिळायची. फरक इतकाच या दोन्ही ठिकाणी महिला यायच्या नाहीत.
Submitted by नितीनचंद्र on 13 August, 2010 - 04:43
आजकाल कोणाला नवीन काही शोध
आजकाल कोणाला नवीन काही शोध लागल्याचे दिसत नाहीत.
Submitted by नितीनचंद्र on 15 September, 2010 - 23:49
घरोंदा हॉटेलचा उल्लेख आलेला
घरोंदा हॉटेलचा उल्लेख आलेला दिसत नाही.
Submitted by नितीनचंद्र on 3 October, 2010 - 08:46
घरौंदा जुन्या मुंबई पुणे
घरौंदा जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर पुण्याकडे जाताना फिनोलेक्स चौकात डावीकडे वळल्यावर कोर्टाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर आहे.
Submitted by नितीनचंद्र on 3 October, 2010 - 23:39
ठिक आहे. जाऊन पाह्यला हवं.
ठिक आहे. जाऊन पाह्यला हवं.
Submitted by सुनिता on 4 October, 2010 - 04:45
कोणी सांगेल का चावडी कस
कोणी सांगेल का चावडी कस आहे??
शिवाय डांगे चौकाच्या जवळच रोजवुड??
Submitted by झकासराव on 4 October, 2010 - 09:20
'घरौंदा'चं इंटीरीयर छान आहे.
'घरौंदा'चं इंटीरीयर छान आहे. वेगळाच फील येतो. दुपारच्या वेळी स्नॅक्ससाठी देखील चांगली जागा.
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:21
'चावडी'मध्ये चवीपेक्षा
'चावडी'मध्ये चवीपेक्षा व्हरायटीसाठी जावं. अर्थात,
पदार्थांच्या व्हरायटीपेक्षा ए.सी. हॉल, ओपन पॅसेज, भारतीय बैठक अशीच
व्हरायटी जास्त
चवीबद्दल फार विशेष सांगण्यासारखं नाही, जास्त मसालेदार असल्यानं काहींना 'चवदार' वाटण्याची शक्यता.
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:24
अजमेरा कॉलनीमधलं 'छाया पराठा'
अजमेरा कॉलनीमधलं 'छाया पराठा' अप्रतिम. चव आणि सर्व्हीस दोन्ही मस्त. पहिला पराठा संपेपर्यंत "अगला कौनसा?" अशी विचारणा होते
पूर्वी ते साखर पराठा देखील बनवायचे, स्पेशल आयटम होता तो. कितीही पराठे
खाऊन झाले तरी शेवटी एक साखर पराठा खायचाच, असा नेम होता. नंतर त्यांनी हा
आयटम काढून टाकला (कार्बनमुळं तवे खराब होतात, असं काहीतरी कारण दिल्याचं
आठवतंय).
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:29
निगडीच्या 'सावली'बद्दल कुणीच
निगडीच्या 'सावली'बद्दल कुणीच लिहीलं नाही? निगडी उड्डाणपुलाखालच्या चौकात डावीकडं वळल्यावर लगेच डावीकडं वळल्यावर 'सावली' दिसतं. दुपारी किंवा संध्याकाळी डोसा, उत्तप्पा असं काहीतरी खायचं असेल आणि कॉफी पित निवांत बसायचं असेल, तर चांगलं ठिकाण. जेवणामध्ये भरपूर व्हरायटी मिळेल, चित्र-विचित्र नावाच्या डिशेस मिळतात (चायनीज स्टार्टर पासून ते पंजाबी डिशेस पर्यंत).
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:33
चाफेकर चौकाच्या अलीकडं
चाफेकर चौकाच्या अलीकडं 'गायत्री' स्टॉल आहे. स्पेशल आयटम - मूग भजी. शिवाय फक्त गुरुवारी दडपे पोहे मिळतात. हा पदार्थ मिळणारे अजून कोणतेही ठिकाण जवळपास माहिती नाही.
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:37
हा धागा इतके दिवस नजरेतून
हा धागा इतके दिवस नजरेतून सुटला होता. जिज्ञासूंनी इथे जरुर शंका लिहाव्यात. यथाशक्ती निरसण केले जाईल. 
Submitted by मंदार शिंदे on 4 October, 2010 - 17:39
जैन शाळा चिंचवड शेजारी एक
जैन शाळा चिंचवड शेजारी एक उडप्याच होटेल आहे. चवदार रवाळ इडली चटणी शेकडाच्या भावाने मिळतात.
Submitted by नितीनचंद्र on 4 October, 2010 - 23:36
पदार्थांच्या व्हरायटीपेक्षा
पदार्थांच्या व्हरायटीपेक्षा ए.सी. हॉल, ओपन पॅसेज, भारतीय बैठक अशीच व्हरायटी जास्त >>>

सावली मध्ये जेवणाची क्वालिटी बरीच बरी आहे. पण सर्विस... मला तरी फार चांगला अनुभव नाय आला. त्यामुळे मी टाळतोच.
कधी काळी साने बंधु डायनिंग हॉल सुरु झालेला तेव्हा खुपच भारी होते जेवण. नंतर ढेपाळला दर्जा.
आता तर काय तिथे सानिधी नावाच हॉटेल सुरु झालय पंजाबी वै वै...
प्रदिपचा समोसा मस्तय. 
Submitted by झकासराव on 5 October, 2010 - 13:04
प्रदिपची पाणीपुरी सुद्धा मस्त
प्रदिपची पाणीपुरी सुद्धा मस्त मिळते.
Submitted by सुनिता on 7 October, 2010 - 03:16
प्रदिपचा सामोसा गेले वीस
प्रदिपचा सामोसा गेले वीस पेक्षा जास्त वर्ष मी खातोय. खरच चव अत्युत्तम आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये रविवारी रात्री जेवायला गेलात की सेवा ढेपाळते हा अनुभव सर्वत्र आहे.
Submitted by नितीनचंद्र on 7 October, 2010 - 12:22
पिंपरी चौकातुन शगुन चौकात
पिंपरी चौकातुन शगुन चौकात जाताना पुलाच्या अलिकदे रत्ना व्हेजिटेरिअन होटेल आहे, तिथलि टेस्ट मस्तच आहे
Submitted by शिवास on 18 July, 2011 - 07:30
नव्या सांगवीत PWD gound वर
नव्या सांगवीत PWD gound वर "बारामतीचा खमंग वडापाव" नावाचा एक गाडा संध्याकाळी ६ नंतर लागतो. फारच छान चव!!
Submitted by आबा. on 19 July, 2011 - 04:57
सांगलीच्या भेळेची चव चिंचवड
सांगलीच्या भेळेची चव चिंचवड मधे -- महावीर भेळ - चिंचवडगाव बसस्टॉप जवळ... 
Submitted by कपिल_पुणे on 1 September, 2011 - 17:40
संत तुकारामनगर- डी.वाय. पाटील
संत तुकारामनगर- डी.वाय. पाटील कॅम्पसमधले "दक्षिण" एकनंबर हॉटेल आहे. (म्हणजे आम्ही असतांना होते) आता रिन्नोव्हेशन नंतर तिथली मजा गेली आहे असे मित्रलोक्स सांगत असतात.
त्याच भागात गणपती मंदिरासमोर 'जोसेफ वडापाव' ची गाडी (कधीकधी) लागलेली असते. तुम्ही कधी त्या भागात असलात, आणि तुमच्या नशीबाने जोसेफ अंकल त्यादिवशी आलेला असेल तर नक्की ट्राय करा तिथला वडापाव. नशीब फारच जोरावर असेल तर मूंगभजीसुद्धा मिळेल.
मला नक्कीच धन्यवाद द्याल तुम्ही ! 
Submitted by ज्ञानेश on 2 September, 2011 - 10:19
ज्ञानेश ~ अहो मागच्या शनिवारी
ज्ञानेश ~
अहो मागच्या शनिवारी मी चक्क संत तुकारामनगर - डीवायपी तसेच वाय.सी.एम. - याच परिसरात होतो ना...! गणपती मंदिर काही माहीत नाही पण डीवायपीच्या आसपास 'शनी चौक' आहे तिथे मुलाची सासुरवाडी आहे. तिथेच रात्रीचे भोजन होते. तुमचा 'दक्षिण' हॉटेलचा उल्लेख आज, आत्ता, वाचला, अन्यथा मी त्या जोडीला आणि सूनेच्या घरातील अन्य दोघांना तेथेच नेले असते.
...तसे झाले असते तर मग इथेच तुम्हाला धन्यवादही दिले असते.
फिर कभी....त्यावेळी शक्य झाल्यास तुम्हीही या तिथे...जुन्या आठवणींना उजाळाही मिळेल आयताच.
Submitted by अशोक. on 2 September, 2011 - 11:07
अरेरे, थोडक्यात चुकामूक !
अरेरे, थोडक्यात चुकामूक ! 
पुढच्या वेळी तिकडे जाल तेव्हा नक्कीच मी सांगीतलेल्या ठिकाणांना भेट द्या. मलाही शक्य असेल तर येईनच ! आयुष्यातली काही सर्वोत्तम वर्षे त्या परिसरात गेली आहेत, तेव्हा अटॅचमेन्ट आहेच ! वायसीएमला तर 'पडीक' असायचो आम्ही.
असो.
बाकी विपूत बोलू, इकडे अवांतर होतंय ! 
Submitted by ज्ञानेश on 2 September, 2011 - 12:12
>>काकडेपार्कमधे एक वडापाववाला
>>काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४
तास तो पण मस्त, वड्याचा साईज पुणेकरांना शोभणार नाही एवढा मोठा आणि चव
सुद्धा जबरी. <<
हे कुठे आहे? पोद्दार शाळेजवळ? आणि चाफेकर चौकात करमरकरांचे दुकान कुठे
आहे? आणि ती भजी-वाडापावची गाडी कुठल्या मशिदीसमोर आहे, चाफेकर चौकात का?
Submitted by रंगासेठ on 7 September, 2012 - 01:09
हे कुठे आहे? पोद्दार शाळेजवळ?
हे कुठे आहे? पोद्दार शाळेजवळ? >>>> हो... काकडे
पार्कमधलं SBI चं ATM आहे त्याच्या बरोबर समोर.. त्याच बाजुला.. सुविधा
च्या समोर... फक्त तो रोज असतोच असं नाही.. त्यामुळे मनात आलं अन गेलो
त्याच्याकडे वडापाव खायला असं करता येत नाही..
रच्याकने, तो पार्टी साठी वगैरे पाव-भाजी पण बनवुन देतो.. अप्रतिम असते
(साधारण ५ वर्षापुर्वी तरी अप्रतिम होती, पण तेव्हाचा वडा-पाव अन आताचा
वडापाव यामधे चवीत घसरण नसल्याने पावभाजी आतापण अप्रतिम असेल अशी आशा
करायला हरकत नाही)
रोजवुड भारी आहे. >>>> +१
Submitted by चिमुरी on 7 September, 2012 - 02:48
डांगे चौका आहे रोजवुड
Submitted by चिमुरी on 7 September, 2012 - 02:52
डांगे चौकात. जर चाफेकर
डांगे चौकात.
जर चाफेकर चौकातुन जात असाल तर डांगे चौकाच्या जस्ट अलिकडे डावीकडे आहे.
फक्त व्हेज आहे. तिथला पनीर कस्तुरी मसाला अफलातुन आहे. 
Submitted by झकासराव on 7 September, 2012 - 04:27
हे प्रदिप समोसा कुठे आहे.
हे प्रदिप समोसा कुठे आहे. जायला हवं.
Submitted by केदार on 7 September, 2012 - 10:37
केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी
केदार प्रदीप स्वीट्स हे निगडी चौकातच कोहिनुर आर्केड ह्या बिल्डिन्गमध्ये तळमजल्यावर आहे.
तिथे समोसा छान मिळतो. तिथले लांबट ड्राय गुलाबजामुन देखील छान आहेत.
Submitted by झकासराव on 10 September, 2012 - 00:00
तिथे समोसा छान मिळतो.<< तिथला
तिथे समोसा छान मिळतो.<< तिथला सामोसा एकदम छानच
त्या शिवाय तिथली दुध मलई ची मिठाई खुप चांगली असते
भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच
Submitted by स_सा on 10 September, 2012 - 00:18
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.
एकचा पराठ्यात पोट पॅक. 
Submitted by झकासराव on 10 September, 2012 - 00:53
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा
सशा दिल्ली स्वादमध्ये पराठा देखील जबरी आहे.<< हो का ??
पुढच्या वेळेस ट्राय करेन
Submitted by स_सा on 10 September, 2012 - 00:58
सगळ्यात भारी ईडली,चटणी आणि
सगळ्यात भारी ईडली,चटणी आणि वडापाव खायचा असेल तर मल्लिकडे ! एकदम झक्कास. 
Submitted by सूर्यकिरण on 10 September, 2012 - 01:27
खायचा असेल तर मल्लिकडे !>>
खायचा असेल तर मल्लिकडे !>> ह्याचा पत्ता मिळेल का?
कुठल्या कॉर्नरला असतो? 
Submitted by झकासराव on 10 September, 2012 - 05:39
मी तर माझा आवडता पदार्थ वड़ा
मी तर माझा आवडता पदार्थ वड़ा पाव, भेळ फारच miss करत आहे..........
Submitted by समीर_@ on 10 September, 2012 - 09:36
मला निगडीमधले काही चांगले
मला निगडीमधले काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज आणि चाट चे ठिकाणे सुचवा. पिंपरी-चिंचवड मधले पण सुचवा
Submitted by nishabagul on 14 September, 2013 - 05:12
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले.:स्मित:
प्रदीप स्वीटस चिंचवडस्टेशनसमोरच्या रस्त्यावर पण आहे. अजून हिंजवडी की औंध अश्या ठिकाणी पण नवीन शाखा उघडलीय म्हणे.
Submitted by रश्मी. on 14 September, 2013 - 06:24
काही चांगले सी-फूड,
काही चांगले सी-फूड, नॉन-व्हेज>>> पुना गेट हॉटेल मध्ये नॉनव्हेज चांगलं आहे अस मित्र म्हणतात.
मी नेहमीच व्हेज खाल्लय.. पण पार्टीत वै मित्र तिथल्या फिश वर खुश असतात.
Submitted by झकासराव on 16 September, 2013 - 00:04
नेवाळे सोडुन चांगली मिसळची
नेवाळे सोडुन चांगली मिसळची ठिकाणं सांगा बर....
Submitted by रीया on 16 September, 2013 - 06:43
रिया, चिन्चवड गावातील बस
रिया, चिन्चवड गावातील बस स्टोप जवळ अरिहन्त मिसळ एकदम मस्त !! एकदा खाल्ली कि प्रेमात पडतो आपण, मिसळिच्या !!
Submitted by धनवन्ती on 16 September, 2013 - 06:50
मिसळची ठिकाणं सांगा बर....>>>
मिसळची ठिकाणं सांगा बर....>>>
दे धक्का
जयश्री
सगळीकडे सकाळी ११ च्या आत नंबर लावावा.
पैल्या धारेची मिसळ उत्तम असते.
नंतर कट / सॅम्पल तितके चवदार रहात नाही.
Submitted by झकासराव on 16 September, 2013 - 06:54
निशा बागुल , "मालवणी समुद्र"
निशा बागुल , "मालवणी समुद्र" - चिन्चवड टाटा मोटर गेट समोर - मोरे सभाग्रुहा च्या अलिकडे .. दर वाजवी आणि मस्त चव !!
Submitted by धनवन्ती on 16 September, 2013 - 06:55
जयश्री झाली ट्राय करुन दे
जयश्री झाली ट्राय करुन 
दे धक्का कुठे आहे?
अरिहन्त कुठे आहे?
Submitted by रीया on 16 September, 2013 - 06:56
काळेवाडीमध्ये ज्योतिबा
काळेवाडीमध्ये ज्योतिबा मन्दीरा जवळ (पूजा ज्वेलर्स समोर) कच्ची दाबेली छान मिळते.
Submitted by अर्निका on 16 September, 2013 - 07:07
कविंची मिसळ कशीय?
Submitted by चिमुरी on 16 September, 2013 - 07:14
कविंची मिसळ
कविंची मिसळ कशीय?>>>>>>>>>>कविं म्हन्जे काय?
Submitted by अर्निका on 16 September, 2013 - 07:23
होटेल कामक्षी ...... प्युअर
होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.
KSB चॉक ते Thermax चॉक मधे.
Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.
पण लॉन मधे जास्त जागा नाहि म्हणुन थोडी वाट पाहवी लागते.......
बाकी उत्तम...........
Submitted by कविमंदार on 16 September, 2013 - 08:47
येस, कामाक्षी इज बेस्ट पण
येस, कामाक्षी इज बेस्ट पण महाग आहे थोडंस!
मला लॉनपेक्षा आत हॉटेलात बसायला आवडलं 
फुल्ल प्रायव्हसी! वेटर्स पण जास्त डिस्टर्ब करत नाहीत पण हाकेच्या अंतरावर उभे असतात, बोलावलं की येतात.
Submitted by रीया on 16 September, 2013 - 08:49
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण
प्रदीपचा माल उत्तम असतो, पण जिलेबी सोडुन काहीही खा. जिलबी एकदम बकवास. बाकी नमकीन एकदम मस्त असते. एकदाच नाव ऐकुन गेलो होतो. आवडले. >>>> +१११
निगडी चॉकात प्रदीप मधे उत्तम रसमलाई आणि अन्गुर मलाई आणि सोलकडी मिळते.....
Submitted by कविमंदार on 16 September, 2013 - 08:51
रिया. >>> बरोबर आहे पण
रिया. >>> बरोबर आहे पण हॉटेलात बसल्यावर मोकळी हवा आणि गाणी याचा आनंद नाही घेता येत......
Submitted by कविमंदार on 16 September, 2013 - 08:55
हो, योग्य वेळी योग्य जागा
हो, योग्य वेळी योग्य जागा निवडता यायला हवी
रानवारा ला सध्या कोणी जाउन
रानवारा ला सध्या कोणी जाउन आलय का ??
Submitted by शाहिर on 26 September, 2013 - 06:57
रानवारा पेक्षा.. रानमळा ट्राय
रानवारा पेक्षा.. रानमळा ट्राय करा.. मस्त आहे
Submitted by योगिता on 26 September, 2013 - 07:26
भोज ..राजस्थानी थाळी चांगली
भोज ..राजस्थानी थाळी चांगली असते .. १९० रु. पुर्ण शाकाहारी ..
आकुर्डिला वासू चे हॉटेल आहे त्यच्या शेजारीच आहे ..दाल बाटी असते ..
Submitted by शाहिर on 1 October, 2013 - 06:49
प्रदीपची नवी branch शिवार
प्रदीपची नवी branch शिवार चोकात उघडली आहे
Submitted by कुहु on 1 October, 2013 - 06:55
भोज ..राजस्थानी थाळी चांगली
भोज ..राजस्थानी थाळी चांगली असते .. १९० रु. पुर्ण शाकाहारी ..>>> इथेच आधी चौधरी दा धाबा होतं.
चांगलं होतं पण चाललं नाही (ह्या दोन्हीचे मालक सेम आहेत)
. त्याच जागेत आधी वासुज बिर्याणी होतं ते ही बंद पडल.
आता हे चांगल आहे असं म्हणताय तर निदान हे तरी नीट चालावं बॉ..
Submitted by झकासराव on 1 October, 2013 - 07:33
हे पिंची एरियात येतं
हे पिंची एरियात येतं का?
कासारवाडीमधलं आमंत्रण हॉटेल माझं ऑल टाईम फेव्हरेट आहे 
Submitted by रीया on 1 October, 2013 - 08:24
मालवण समुद्र अपडेट : चिंचवड
मालवण समुद्र अपडेट : चिंचवड मधील जुन्या हॉटेल मालकांचे नवे हॉटेल कामिनीच्या बिल्डिंगमधे चालू केले आहे. खरी चव तिथे आहे. (पहिली जागा भाड्याची होती वाटते)
Submitted by डीविनिता on 18 January, 2014 - 09:05
नवीन काही अपडेट्स ?? रामदेव
नवीन काही अपडेट्स ??
रामदेव धाबा आता अधिक प्रशस्त आणि अधिक नीटनेटका झालाय.
आधी टिपिकल धाबा होता.
तिथे रबडी आणि गुलाब जामुन दोन्ही भारी.
पापड चुर्मी, मसाला खिचिया, राजस्थानी पिज्झा भारी.
भाज्यांमध्ये काही पन्जाबी आयटम्स आहेत. एव्हरेज टेस्ट.
काही राजस्थानी सिजनल भाज्या मिळतात.
माहितीगार सोबत असेल तर उत्तम.
गव्हाचा रोटला एक खाल्ला तर चार पाच चपात्या खाल्ल्याच फिलिन्ग येतय.
दाल फ्राय आणि दाल तडका भारी आहे.
दाल बाटी देखील चांगली.
मिसळ मध्ये जयश्रीची चव उतरल्यासारखी वाटली मागच्या वेळी. 
खंडोबा चौकातच काळभोरनगर मध्ये पिटर इन्ग्लन्डच्या शोरुमच्या वर , अन्नपुर्णा (नावाच कन्फ्युजन आहे) डायनिन्ग हॉल आहे.
महाराष्ट्रियन पद्धतीचं जेवण देणारा.
त्यांनीच अनलिमिटेड नाश्ता करण्यासाठी त्याच बिल्डिन्ग मध्ये जवळच एक नाश्ता सेन्टर सुरु केलय.
उत्तम चव, भरपुर व्हरायटी, माफक दर.
एका व्यक्तीचे १०० रु.
आम्ही गेलेल्या रविवारी खालील नाश्ता बुफे होता.
पोहे, उपमा,(बारीक शेव), शिरा, साबुदाणा खिचडी, दुध, केलॉग्ज, मिसळ पाव, पुरण पोळी, चहा , कॉफी, दोन टाइपचे ज्युस, खारी शंकरपाळी, गोड शंकरपाळी, ब्रेड बटर.....
काहीही घ्या, कितीही घ्या आणि एन्जॉय करा.
चव अत्यंत उत्तम.
उपमा, शिरा, मिसळ पाव, सा खि सर्वच भारी होतं.
पुरण पोळीला जागा उरली नाही त्यामुळे नाही खाल्ली. 
Submitted by झकासराव on 6 November, 2014 - 04:00
सांगवी मधे एक मिसळ १९४९/१९५०
सांगवी मधे एक मिसळ १९४९/१९५० (नक्की आठवेना) का काय आहे तिथे मिसळ मस्त आहे 
डॉ. सातीसोबत माझं तिथे गटग झालेलं
ती मिसळ नंतर २ वेळा खाऊन आले.
सिद्धीविनायकवाल्यांनी सांगवीत एक छोटेखानी हॉटेल टाकलंय ते फारच बेक्कार आहे 
औंध मधे कढाई मधे चाट आयटम्स मस्त मिळतात.
सांगवी आणि औंध मधेही आता सुजाता मस्तानी आलीये.
चिंचवडच्या कामाक्षी हॉटेलचा उल्लेख आधी केलाय का मी? एक नंबर हॉटेल आहे 
विश्रांतवादी मधे एक दिल्ली स्वाद आहे तिथे पराठे आणि छोले भटुरे ऑसम मिळतात.
निगडीत प्रदिपच्या समोर पौर्णिमा भेळची गाडी आहे त्यांची शेवपुरी मस्त असते
Submitted by रीया on 17 November, 2014 - 10:25
पौर्णीमा भेळची पाणी पुरी मला
पौर्णीमा भेळची पाणी पुरी मला कधी नव्हे ते आवडलेली. 
आकुर्डीत मन्डैच्या अलिकडे वेन्कटेश हॉटेलच्या समो (लक्ष्मि राइस वर्ल्डच्या बाजुला फोटो स्टुडिओ आहे त्याच्या समोर) एक गाडी लागते त्याच्याकडे शेवपुरी, भेळ, पानीपुरी असे सर्वच आयटेम भारी आहेत.
Submitted by झकासराव on 17 November, 2014 - 23:36
झकास, आपल्या एरियात चाट
झकास, आपल्या एरियात चाट आयटम्स कुठेच चांगले नाहीत राव!
Submitted by आबा. on 18 November, 2014 - 00:03
रीया, तुझ सांगवीत काय असत
रीया, तुझ सांगवीत काय असत सारख 
Submitted by आबा. on 18 November, 2014 - 00:04
आबा, चिंचवडला मोरया गोसावी
आबा, चिंचवडला मोरया गोसावी मंदीराजवळ चांगले मिळतात चाट.. भेळ, पापु, कच्छी दाबेली इ. वडापाव मात्र काकडे पार्कातच
Submitted by चिमुरी on 18 November, 2014 - 00:10
पिंपरीत अशोक थिएटर जवळ एका
पिंपरीत अशोक थिएटर जवळ एका गल्लीत कच्छी दाबेली मिळते. तिथली टेस्ट अप्रतिम अस्ते ,मी तरी अजुन इतरत्र कुठेच नाही अनुभवली अशी
Submitted by आबा. on 18 November, 2014 - 00:17
चिमे, आम्ही चिंचवड एरियात
चिमे, आम्ही चिंचवड एरियात नाही येत 
Submitted by आबा. on 18 November, 2014 - 00:18
झकासराव, रामदेव धाब्याबद्दल
झकासराव, रामदेव धाब्याबद्दल अगदी अगदी.
रिया...कामाक्षी कुठे आहे चिंचवडमध्ये?
Submitted by इश्श on 18 November, 2014 - 00:19
आबा, चिंचवडला मोरया गोसावी
आबा, चिंचवडला मोरया गोसावी मंदीराजवळ चांगले मिळतात चाट.. भेळ, पापु, कच्छी दाबेली इ. वडापाव मात्र काकडे पार्कातच
>>>>
+११११११११११११११११११११११११११११११
आसा

Submitted by रीया on 18 November, 2014 - 00:19
रिया...कामाक्षी कुठे आहे
रिया...कामाक्षी कुठे आहे चिंचवडमध्ये?
>>
कीस्बी चौकात 
भोलाच्या शेजारी
बर्डवॅली जवळ
Submitted by रीया on 18 November, 2014 - 00:20
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र..
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र.. तुमच्या एरियात नाहिये का काही.. मग चांगला स्कोप आहे की तुम्हाला 
Submitted by चिमुरी on 18 November, 2014 - 00:24
इकडे गप्पा काय मारताय फक्त
इकडे गप्पा काय मारताय फक्त खादाडी ठिकाणं लिहा.
कामाक्षी बर्ड व्हॅली समोर, भोला हॉटेल शेजरी, केएसबी चौकात आहे.
Submitted by झकासराव on 18 November, 2014 - 00:43
चाट आयटेम्स्च काय तर वडापाव
चाट आयटेम्स्च काय तर वडापाव देखील चिखली रोडला फारसे चांगले नाहियेत.
Submitted by झकासराव on 18 November, 2014 - 00:45
झकास, वक्रतुंडला ट्राय केले
झकास, वक्रतुंडला ट्राय केले काल चाट आयटम्स. छान आहे चव. 
Submitted by आबा. on 20 November, 2014 - 23:08
शेगावची कचोरी चिंचवडला दररोज
शेगावची कचोरी चिंचवडला दररोज संध्याकाळी तानाजीनगरला महाकाली मंदीरासमोर मिळु लागली आहे तशीच ती साने चौकातही मिळते म्हणे.
Submitted by नितीनचंद्र on 20 November, 2014 - 23:13
रीया ति विश्रांतवाडीला येऊन
रीया ति विश्रांतवाडीला येऊन दिल्ली वाल्या हॉटेलात कधी खाऊन गेलीस?
Submitted by -Sushant- on 20 November, 2014 - 23:23
नि३जी, आम्ही साने चौकाजवळच
नि३जी, आम्ही साने चौकाजवळच राहतो. नक्की कुठे ते सांगता येइल का ?
Submitted by आबा. on 20 November, 2014 - 23:24
nonveg साठी एखादे चांगले
nonveg साठी एखादे चांगले restaurant आहे का जवळपास?
मटण / चिकन भाकरीसाठी आम्हाला सदाशिव पेठेत आवारेमधे जावे लागते.
Submitted by प्रथम म्हात्रे on 21 November, 2014 - 00:58
चाट आयटेम्स्च काय तर वडापाव
चाट आयटेम्स्च काय तर वडापाव देखील चिखली रोडला फारसे चांगले नाहियेत.>>>> मिळतो कि..
बर्ड वॅलीच्या मागच्या गल्लीत.. भावेश्वरी वडापाव.. खावूनच बघा एकदा
बर्ड व्हॅली चिखली रोडला कधी
बर्ड व्हॅली चिखली रोडला कधी पासून गेली? 
सुशांत दादा, बर्याचदा येते फॅमेली सोबत पण अजुन रस्ता लक्षात रहात नाहीये 
माझं मला पण जायचंय एकदा 
Submitted by रीया on 21 November, 2014 - 01:24
वक्रतुंडने चाट आयटेम्स हल्लीच
वक्रतुंडने चाट आयटेम्स हल्लीच सुरु केलेत.
वक्रतुंड मध्ये आइसक्रीम मस्त आहे.
तो बास्कीन रॉबेन्स आइसक्रीम ठेवतो.
साबु वडे देखील मला आवडलेले तिथले.
जेवण मात्र तितकस आवडत नाहिये.
भावेश्वरी, नेमकं कुठे आहे?
रिया तिने आम्ही जाउ शकु ५-१० मिनिटात असं ठिकाण सांगितलय.
चिखली रोडला आहे अं नव्हे.
साने चौकात शेगाव कचोरी?? (हमारे जेलमे सुरन्ग) च्या चालीवर वाचा.
लवकरात लवकर नेमकं ठिकाण सांगा.
Submitted by झकासराव on 21 November, 2014 - 01:35
ओकेज! मलाही जवळ आहे ना ते
ओकेज! मलाही जवळ आहे ना ते ठिकाण?
मग मीही जाऊन बघेन एकदा 
Submitted by रीया on 21 November, 2014 - 01:36
रीया तु दिल्ली हॉटेल जे
रीया तु दिल्ली हॉटेल जे म्हण्तेय ते प्रतिक नगरमधलच का?
Submitted by -Sushant- on 21 November, 2014 - 01:36
प्रथम, जवळपास पण कुठल्या
प्रथम, जवळपास पण कुठल्या एरियाच्या.
याअगोदरच्या पोस्ट वाचल्यात का ??
ट्रेनिंगसाठी हत्ती गणपती चौकाजवळ राहायला होतो महिनाभर. तेव्हा आवारेत चिकनथाळी रू.२६ ला होती
Submitted by आबा. on 21 November, 2014 - 01:47
जेवण मात्र तितकस आवडत
जेवण मात्र तितकस आवडत नाहिये.
>>> एव्हढ्यात गेलेलास का?
मला तरी छान वाटली जेवणाची क्वालीटी 
Submitted by आबा. on 21 November, 2014 - 01:48
ए तानाजीनगरला कुठे? मी
ए तानाजीनगरला कुठे? मी डेक्कनपासून एकदोनदा आणलीय कचोरी..
Submitted by डीविनिता on 21 November, 2014 - 01:58
नॉनव्हेज साठी तिरंगा,
नॉनव्हेज साठी तिरंगा, बॉम्बेपुणे रोड
Submitted by डीविनिता on 21 November, 2014 - 01:59
नॉनव्हेजसाठी पहिली पसंती
नॉनव्हेजसाठी पहिली पसंती गोल्डन पाल्म… काही दिवसांपूर्वी आकुर्डीमध्ये बजाज समोर असलेल्या "सिल्वर सेवन" मध्ये गेले होते. फिश छान होते. शिवाय तिथे शांत आणि सुंदर वातावरण आहे.
संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल आहे. इथले वातावरण बहुतेक लोकांना आवडणार नाही. पण इथे मिळणाऱ्या चायनीज पदार्थांची चव उत्तम आहे. शिवाय रेट कमी आहेत. इथली चिकन दम बिर्याणी मला प्रचंड आवडते. अमेरिकन चॉपसुई आवडत असेल तर इथली ट्राय करा.
आकुर्डी स्टेशनला श्वार्मा किंग मध्ये श्वार्मा चांगला मिळतो.
भेळ चौकात गणेश भेळ आणि ओम स्वादिष्ट भेळ इथे चांगले चाट मिळते. तसेच प्रदीपच्या समोरील पोर्णिमा मध्ये सुद्धा चांगले चाट मिळते. ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत असते.
संभाजी चौकामध्ये पुजारी वडापाव चांगला मिळतो. आणि कॅफे कुल जवळ दाबेली मस्त मिळते.
पिंगारा मध्ये वेज चांगले मिळते. चीज केक आवडत असेल तर भेळ चौकाजवळ Sweet Chariot ट्राय करून बघा
आता आमच्या घराजवळ लोकमान्य हॉस्पिटल समोर काका हलवाई यांची ब्रांच सुरु झाली आहे. चितळेंची आणि जोशी वडेवाल्यांची यांनी पिंपरी-चिंचवड मध्ये ब्रांच सुरु करावी असे मला सतत वाटतं
Submitted by nishabagul on 17 March, 2015 - 06:42
संभाजी चौकाजवळच्या
संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल आहे. >>>> डिटेलमध्ये पत्ता द्या ना
Submitted by आबा. on 17 March, 2015 - 06:47
zomato वर पूजा क्लासिक
zomato वर पूजा क्लासिक कॉम्प्लेक्स एवढाच पत्ता दिला आहे.
निगडी प्राधिकरण मधील संभाजी चौकातून आकुर्डी-चिखली रोड ने जायचे.
ब्रिजच्या अलीकडे उजव्या बाजूला १ इंडिअन ऑईलचा पेट्रोल पंप आहे. त्याच्याच
शेजारी आहे ते. संभाजी चौकामध्ये कोणालाही विचारा पेट्रोल पंप कुठे आहे.
तिथून अगदी जवळच आहे. फक्त राँग साइड ने गाडी न्यावी लागते
Submitted by nishabagul on 17 March, 2015 - 07:17
https://plus.google.com/11032
Submitted by nishabagul on 17 March, 2015 - 07:29
पिंपरीच्या शगुन चौकात
पिंपरीच्या शगुन चौकात सुगंधालया शेजारी वैष्णूज म्हणून नवीन झाले आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तवा सबजी मस्त बनवतात. करेला मसाला भन्नाट होता. रोट्या युपी साईड स्टाईलने बाहेर बनवतात.
Submitted by डीविनिता on 17 March, 2015 - 08:19
चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली
चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली आहे का कोणी ??
चाफेकर चौक मध्ये डांगे चौक बस स्टॉप आहे तेथे रिलायन्स मार्केट जे अजुन सुरु झालेले नाही
त्याच्या शेजारच्या बोळात
भारी वाटली
त्यांची दूसरी शाखा कालेवाडी रोडवर आहे
Submitted by joshnilu on 17 March, 2015 - 08:58
सुजाता मस्तानी हेरिटेज प्लाझा
सुजाता मस्तानी हेरिटेज प्लाझा चिंचवड गांव बस स्टैंड शेजारी तीच पुणेरी चव
Submitted by joshnilu on 17 March, 2015 - 08:59
शर्मा पावभाजी, संत ज्ञानेश्वर
शर्मा पावभाजी, संत ज्ञानेश्वर चौक (अन्ऑफिशिअली कॉल्ड अॅज् भेळ चौक), पेठ क्रमांक २५, पिंपरी-चिंचवड नवनगर (अन्ऑफिशिअली कॉल्ड अॅज् प्राधिकरण), निगडी, पुणे - ४११०४४ येथील जैन पावभाजी आणि ग्रीनपिस पुलाव आजच खाल्ला. फारच चविष्ट आहे. दरही वाजवी - प्रत्येक रू.५०/- फक्त.
Submitted by चेतन सुभाष गुगळे on 17 March, 2015 - 09:02
मालवण समुद्र - गुणवत्ता
मालवण समुद्र - गुणवत्ता खालावली आहे एकदम (कामिनी शेजारी शिफ्ट झालेय मागच्या वर्षी)
Submitted by डीविनिता on 17 March, 2015 - 09:03
ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच
ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत >>> हो खाल्ली आहे.
मागच्या दिवाळीला आणली होती.
त्यांच्याकडुन दिवाळीला बरेच जण फराळाच घेउन जातात.
Submitted by झकासराव on 18 March, 2015 - 01:41
शर्मा पावभाजी इथे
शर्मा पावभाजी इथे कुल्फीसुद्धा अप्रतिम मिळते
Submitted by nishabagul on 18 March, 2015 - 01:42
मालवण समुद्र - गुणवत्ता
मालवण समुद्र - गुणवत्ता खालावली आहे एकदम >>> अनुमोदन
Submitted by nishabagul on 18 March, 2015 - 01:45
नॉनव्हेजसाठी पहिली पसंती
नॉनव्हेजसाठी पहिली पसंती गोल्डन पाल्म… काही दिवसांपूर्वी आकुर्डीमध्ये बजाज समोर असलेल्या "सिल्वर सेवन" मध्ये गेले होते. फिश छान होते.
>>>>>>> गोल्डन पाम रेग्युलर झालयं, चेंज म्हणुन आता "सिल्वर सेवन" ट्राय करणेत येइलं
Submitted by आबा. on 18 March, 2015 - 01:56
पिंपरीच्या शगुन चौकात
पिंपरीच्या शगुन चौकात सुगंधालया शेजारी वैष्णूज म्हणून नवीन
झाले आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही. तवा सबजी मस्त बनवतात. करेला मसाला भन्नाट
होता. रोट्या युपी साईड स्टाईलने बाहेर बनवतात.
>>>>>>
डीविनिता, ते नॉनव्हेज पण आहे का? मी व्हेजच खाल्लंय फक्त. मस्त होतं ते पण. नेक्स्ट टाईम नॉनव्हेज ट्राय करेन.
Submitted by इश्श on 18 March, 2015 - 01:58
शर्मा पाभा नाय आवडत.. गीता
शर्मा पाभा नाय आवडत.. गीता पाभा बरी असते.
संभाजी चौकाजवळच्या पेट्रोलपंपाच्या शेजारी "संग्रीला" नावाचे छोटे हॉटेल
आहे. इथले वातावरण बहुतेक लोकांना आवडणार नाही. >> बापरे तिथे
जाण्याचे कधी धाडस होईल असे वाटत नाही.
ओम स्वादिष्ट भेळच्या शेजारीच महावीर नावाचे खाऊचे दुकान आहे. त्यांच्याकडची मिनी बालुशाही खूप खुसखुशीत असते.>> +१
काका हलवाईची सुरु झाली ब्रांच १५ तारखेपासून हे बरे झाले. पण प्राधिकरणात
हाटेल, ब्रांच सुरु होतात आणि न चालल्यामुळे बंद पडतात. ते कॉर्न क्लब आहे
का अजून?
Submitted by लंपन on 18 March, 2015 - 03:18
गीता पाभा बरी असते. >> लंपन
गीता पाभा बरी असते.
>>
लंपन कुफेहेपा!
गीता पावभाजी ऑसम असते
Submitted by रीया on 18 March, 2015 - 03:37
इश्श>हो नॉनव्हेज पण आहे. पण
इश्श>हो नॉनव्हेज पण आहे. पण चायनिज अगदीच बोअर बनवतात
Submitted by डीविनिता on 18 March, 2015 - 03:58
गीतामधील कॉफी माझ्या बायडीला
गीतामधील कॉफी माझ्या बायडीला फार आवडते.
Submitted by आबा. on 18 March, 2015 - 04:34
लंपन, हो मलासुद्धा शर्मा पाभा
लंपन, हो मलासुद्धा शर्मा पाभा नाही आवडली. गीता पाभा चांगली असते. एकदा जाऊन या संग्रीला मध्ये
अहो, तो वैश्णू शुद्ध शाकाहारी आहे आणि क्वालिटी काही इतकी खास नाही.>> पिंपरीत फक्त तवा भाज्या चांगल्या आहेत. सुरुवातीला दालफ्राय बरी असायची. एकदा बिर्याणी आणली तर फक्त प्लेन राईस आणि उकडलेल्या भाज्या होत्या. तुकारामनगरच्या दुकानात तर माज एवढा एकच आयटम जबरी आहे.
औंधच्या शिवसागरची पावभाजी पण आलीये सौदागरात > म्हणजे औंधच्या शिवसागर हॉटेलवाली का? का ही दुसरी? सौदागरात exact कुठे सुरू झालीयये?
+१ कुठे आहे सुरु?
हैद्राबाद हाउस, कोकणे चौकात आहे. आधी साशंक होतो, पण इथले प्रतिसाद बघून एकदा जाऊन यायला हरकत नाही अस वाटतय.
ट्युलिप, कोकणे चौकात आहे हैद्राबाद हाऊस.बिर्याणी बद्दल +१
रंगाशेठ जाऊन या. नॉनव्हेज खाणारे असाल तर चांदीच तुमची 
शिवसागर वाल्यांनी ब्रांच उघडलीये वाकडला
हिंजवडी वरून विशालनगरचा जो टर्न लागतो तिकडे कुठेशी आहे.
पत्ता नीट विचारून सांगते.
याच एरियात एक काशी चाट भंडार आहे. चाट ऑसम मिळतंय तिकडे.आजकाल पनीर कुल्चा सूरू केलाय तोही मस्त.
इंदोर स्वीट्स पण मस्तय. इतके अप्रतिम पोहे/ढोकळा मी कुठेच खाल्लेला नाही कधी.
रच्याकने, फेज १ ला कॉग्नि/ सींबॉयसीस पाशी गाड्या लागतात त्यावरही सगळंच फार मस्त मिळंत.
#लॉकडाउन_विरंगुळा
#निलउवाच
पिंपरी चिंचवड मधील खाद्ययात्रा (काही इंटरनेटवरील संदर्भ व काही माझी addition करून ही लिस्ट बनवली आहे)
१. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत,
ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त
मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्याची चटणी मात्र अत्युत्तम.
गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू
असतं.
स्नॅक्स सेंटर चापेकर चौक, चिंचवड गाव, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार
३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन
पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ , लिंक रोडवर दे धक्का गावडे पेट्रोल पम्प
समोर, पिंपरीगावात निसर्ग एक शाखा चिंचवडगाव मंडई शेजारी आली आहे,
४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे.मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात.
५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प
सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा
पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा,
भजी ह्या अजून काही खासियती.
६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी
पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस
७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प.
ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर.
८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव
गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे.
९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव.
इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला.
१०.वडापाव - निगडी प्राधिकरणात 'वासू वडापाव'. कॅम्प एजुकेशन जवळ एक काका हातगाडी लावतात त्यांचा वडापाव पण भारी आहे.
10.A दिवसा फत्तेचंद शाळे बाहेर आणि रात्री चापेकर चौकात मिळणारा दत्त्या चा वडापाव.
10.B लिंक रोड ला डॉमिनोज शेजारी हातगाडी लावतो तो सुद्धा ट्राय करून पहा चांगला आहे.
10.C थरमॅक्स चौकातून चिखली कडे जाताना डाव्या हाताला 'काका वडापाव' पण मस्त.
11. साबुदाणा खिचडी,पोहे,उपमा, इडली चटणी साठी मोरया गोसावी मंदिराजवळ गपचूप वाड्यात सुद्धा हे सर्व अतिशय उत्तम चवीचे आणि वाजवी दरात मिळते. गपचूप कडे उपवासाची मिसळ सुद्धा लै भारी. बटाट्याचा चिवडा,उपासाचे पापड यावर साबुदाणा वडा कुस्करून दाण्याची आमटी घालतात. मस्त लागते. मोरया गोसावी मंदीरा समोरचं 'चिंतामणी' मध्य उपवासाचे थालीपीठ मिळते ते पण छान.
12.गांधी पेठेतील मोरया गोसावी मंदिराशेजारी बालाजी स्नॅक्स सेंटर म्हणजेच कवी मिसळ देखील छान आहे. त्यांचा संध्याकाळी वडा सॅम्पल मिळतो तोही बेस्टच.ज्यांना बेडेकरची मिसळ आवडते तसल्या गोड्या लोकांसाठी पण तिखट मागितली तर झणझणीत पण मिळते.कवी यांची दर चतुर्थीला उपवासाची मिसळ व साबुदाणा वडा एक नंबर.
13.आपल्याला नेवाळे मिसळ देखील आवडते बुवा.अतितिखट असलेला हा प्रकार फारच कमी जणांना झेपते.नेवाळेची मिसळ बरेचं लोक खाऊ शकत नसले तरी मला ती आवडते. अजिबात तिखट न झेपणाऱ्या लोकांनी त्या वाटेला न गेलेलंच बरं. त्याची बटाटा भजी मात्र अतिउत्तम. त्या क्वालिटीची भजी अजून तरी मी कुठे इतरत्र खाल्ली नाहीत.
14.गांधी पेठेत नेवाळे मिसळ समोर आणि मशिदीच्या बाजूला (Axis बँक atm शेजारी)असलेला हेंद्री मिसळ जॉईंट पण छान आहे.
15.गांधी पेठेत HDFC ATM समोर मोरया वडापाव एकदम झकास व तिखट चव, वडापाव,भजी,पॅटिस छान असतो आणि गरमागरम मिळतो.
16.रोज् वूड शाकाहारी जेवणं चांगले ,यांचे चायनीज पण छान असते.
17.लिंक रोड वरचे कालिका मातेच्या देवळाजवळ सॅफारोन.. दोनदा गेलो.. दोन्हीवेळा खुप छान पंजाबी जेवण
18. तंदुरी पदार्थ आणि बिर्याणी साठी सर्वात आवडते आणि सवयीचे चापेकर चौकातले . नॉनव्हेज जास्त आहेत पदार्थ ,व्हेज फार कमी.
19. जिलेबी साठी गांधी पेठेतील यशवंत. यांच्याकडे बाकरवडी पण छान मिळते.
20. प्रदीप स्वीट्स च्या पिंचि मध्ये भरपूर शाखा आहेत. एकंदरीत सर्वचं पदार्थ उत्तम क्वालिटीचे मिळतात.सगळ्यात बेस्ट समोसा व रसमलई
21.निगडी चौकातले गोकुळ स्वीट्स मध्ये देशी शुद्ध तुपातली जिलेबी आणि इमरती मिळते, गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबजल वगैरे टाकून. जबरदस्त लागते.
22.चखणा आयटम घ्यायचे असतील तर 'बंधन स्वीट्स' शाहूनगर बागेजवळ. एकापेक्षा एक भारी प्रकार मिळतात.
23.पिंचि मध्ये येत नसले तरी एका स्वीट मार्टचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही ते म्हणजे परिहार चौक,औंध इथले 'मिठास'. काय जागा आहे राव. ड्राय फ्रुट बासुंदी, सीताफळ रबडी खावी तर इथेचं. बंगाली मिठाईचे तर इतके प्रकार आहेत कि बास्स. खीर कदम आणि संदेश चे भयानक सुंदर प्रकार मिळतील. ते आवर्जून खावेचं, राहिलचं तर कमल भोग आणि घेवर पण लै भारी. एका भेटीत समाधान होण्यासारखे नाहीचं हे ठिकाण.
24. एलप्रो चौका अलीकडे 'चौपाटी' मध्ये चाट चांगले आहेत. थंड पाण्याची पाणीपुरी मिळते, चवीला एकदम मस्त.
25.प्राधिकरणात भेळ चौकाच्या थोडेसे पुढे 'ओम शिव स्वादिष्ट' मधली भेळ,पाणीपुरी आणि रगडा पुरी भारी आहे.
26.पावभाजी,पराठे आणि इतर - गीता स्नॅक सेंटर, शर्मा, नायडू आणि पिंगारा हे तिघे निगडी प्राधिकरणात जवळ जवळ आहेत.पावभाजी सगळ्यांकडे चांगली आहे, गीता मध्ये मस्तानी पण चांगली मिळते. शर्मा कडे मटका कुल्फी आवर्जून खावी अशीचं. पिंगारा मध्ये चीज पराठा सुद्धा आवर्जून खावा असाचं तो हि फक्त 70 रुपयांत. भरपूर चीज भरून देतो.
27.आकुर्डी स्टेशन समोरचं बरेचं प्रसिद्ध असे 'शहाजी पराठा' आहे (तेचं ते लक्ष्मी रोड वाले) पराठे, दही भल्ला,लस्सी एकदम कडक.त्याचे दर मात्र लक्ष्मी रोडच्या शाखे पेक्षा इथे बरेचं जास्त आहेत.
28.. पिंपरी मधले छाया पराठा सुद्धा चांगले आहे. अतिशय स्वस्त आणि मस्त पराठे. 50-60 रुपयांत व्हेज आणि 90 रुपयांत चिकन, खिमा पराठा मिळतो. सोबत बटर,दही आणि ग्रेव्ही सुद्धा येते.
29.घरगुती थाळी हवी असेल तर चाफेकर चौक मधील खरे यांचा सुहास डायनिंग हाॅल. खूप वर्षापासून आहे.
30.अजून एक थाळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे नैवेद्यम. पुणे मुंबई हायवे ला आहे,आकुर्डी खंडोबाच्या माळाजवळ. आधी थाळीनंतर आईस्क्रीम द्यायचे कॉम्प्लिमेंट्री ,आता बंद केलंय
31.हिंदुस्थान बेकरी पॅटिस ,अफलातून व गरमागरम चाफेकर चौकच्या थोडे अलीकडे जनता सहकारी बँक समोर व चितळे स्वीटच्या बाजूलाच
32.ग्लोबल ग्रिल:- सिगरी. पिंपरी सेंट्रलच्या ईमारतीत. बार्बेक्यू नेशन पेक्षा ईथली चव आणि विविधता चांगली आहे
33.रंगोली:- राजस्थानी पदार्थ चांगले मिळतात. दाल बाटी वगैरे. राघवेंद्र
स्वामी मठाजवळ.इथली रबडी ,पंजाबी पदार्थ ,खास ओल्या हळदीची भाजी मस्तच
,जरा हटके चव
कोणतीही पंजाबी भाजी तिखट भाजी करायला सांगितली तर अफलातून करून देतात
34. बाबा रामदेव ढाबा:- रंगोलीप्रमाणेच. दाल बाटी मस्त एकदम. जयपुरी गट्टे की सबजी पण झकास. निगडी ट्रांसपोर्ट नगरीत
35.भक्ती शक्ती उद्यान, निगडी ह्याच्या इथे एक चाटवाला गाडी लावतो त्याच्याकडची दहीभल्ला चाट एकदम अनोखी. पाणीपुरीच्या लांबट पुरीमध्ये दहीवडा भरुन त्यावर भरपूर थंडगार दही, चिंचेचं पाणी, तिखट वगैरे भरुन जबरा प्रकार देतो. आलू टिकी चाट पण त्याच्याकडे मिळते.
36.माउली चहा (पिंपरीगाव) आणि नीलम चहा (पिंपरी कॅम्प) अतिशय कडक चहासाठी प्रसिद्ध. मसाला अजिबात नाही. कडक चहा हीच खासियत.
37.हॉटेल सावली, निगडी चौक इथले लसूणी पालक सूप लै भारी. बाकी पदार्थ तसे नेहमीचेच पण चव छान.
38.सॉल्टी चायनिज - मासुळकर कॉलनी हे बहुधा पिंपरी चिंचवडमधलं पहिलं चायनिज सेंटर असेल. हातगाडीपासनं सुरुवात करुन ह्यानं आज छोटेखानी हॉटेल टाकलंय. ह्याच्याकडची अमेरिकन चॉपसुई जबरदस्त. तशी कुठेच खाल्ली नाही.
39.कैलास डेअरी - चिंचवड स्टेशन. ह्याचाकडची ताक, लस्सी अतिसुंदर. संध्याकाळी हाच बाहेर मसाला दूधाची गाडी लावतो. साय टाकलेलं घट्ट मलईदार मसाला दूध, नशिबात असेल तर कधी कधी हा साय टाकलेली कॉफीसुद्धा करुन देतो. ती तर अजूनच भारी.
40.शाहुनगरच्या बागेबाहेर असलेला पवार वडापाव चांगली चव थोडे थांबावे लागते पण समोरच (लगेच तळलेला गरमागरम)मिळतो.
41.पाव पॅटीससाठी प्रेमलोक पार्क मध्ये बेंगलोर साई हाटेलवजा खादाडी केंद्र (मोठ्ठी खूण म्ह़नजे रस्त्यामधल्या पारासमोरच)
स्नॅक्स सेंटर, प्रेमलोक पार्क कडून बिजलीनगर कडे वळताना डाव्या बाजुला दुकानांच्या गर्दीत आहे.सगळ्या चाट प्रकारांसाठी स्वस्त आणि मस्त.यांचा २ वर्षांपूर्वी फक्त एक स्टॉल होता. आता स्वतःच्या जागेत आहे.
43.ढोकळा प्रदीप आणि गावातला वाघेश्वर स्वीट मार्ट.दडपे पोहे आणि कट दोसा गायत्री एक्दम विरूद्ध बाजूल (हिंदुस्थान बेकरीच्या समोर)
44. प्राधिकरणात स्वीट जंक्शन नावाच्या स्वीट मार्टात चांगली कचोरी व समोसा मिळतो ,थोडे वेळ्वेअर ७.३० पर्यंत गेल्यास गरमही लाभतो.
45.चिंचचड लोकमान्य ब्रिज खाली अप्पांचा वडा, प्रतिभा कॉलेज काळभोर नगर समोरील वडा( शेट्टी उद्यान) हे आपल्या घरगुती वड्याच्या चवीसारखे.
46.बारामती वडापाव, अख्या सांगवी/पिंपळे गुरवात वर्ल्ड फेमस आहे. चटणी पण भारी असते त्याची. साई चौकातल्या मंडईत, संध्यकाळीच असतो फक्त.
47.कोयते वस्ती, पुनावळे इथल्या पुरोहित स्वीट्स नामक छोट्या दुकानात कलाकंद मिळतो. माझ्या मते हा जगातला सर्वोत्तम कलाकंद आहे.
48.अस्सल खानदेशी ऑथेटिकेटेड डिश मिळण्याचे ठिकाण !
संभाजी चौक , निगडी
चौकात स्वीट मार्ट आहे त्याच्या विरुद्ध दिशेस , सध्या गणपती बसतो , खालच्या गाळ्यात आहे हे हॉटेल.
बिबडा(coarse papad made from Jowar), चिकनीचे पान(coarse papad made of
red Jowar), गुरमई रोटी( a sweet roti made of jiggery infused with
cinnamon and special homemade Masala), खानदेशी पुरणपोळी, केळीची
भाकरी(Bhakri made with flour made of dried and ground banana), कळण्याची
भाकरी(bhakri made of black gram & Jowar), केळीचा बिबडा बिबडा,
खानदेशी शेव भाजी, खानदेशी पाटोड्यांची भाजी असे बरेच वेगळा पदार्थ मिळतात
49.चाट साठी - अजमेरात माताजी, state bank of India च्या विरुद्ध दिशेला.
दिल्ली स्वाद - निगडीत.
आणि आकुर्डी स्टेशन जवळ अरोमा - चिकन सलामी, चीझ सॅण्डविच साठी.
50.गांधी पेठेत परदेशी फरसाण मार्ट एकदम छान आणि ताजे पदार्थ मिळतात.
51.लोडेड बाईट्स - केशवनगर शाळेजवळ
इथले सँडविच ,पास्ता , बर्गर एकदम सुप्पर , सँडविच मेकिंग हटके व अफलातून
आहे. काकडी ,टोमॅटो स्लाइस नसतात तर ग्रेटेड मसाला असतो आणि चव।अफलातून.
बॉम्बे सँडविच अवश्य try करावेच असे.
52. मिसळीसाठी "जयश्री"
पत्ता : बजाज अॅटो मेन गेटसमोर, आकुर्डी.
त्याला ऑर्डर देताना बोलायच कोल्हापुरी दे किंवा तर्री मारुन दे. दणका सहन करु शकत असाल तरच अशी ऑर्डर द्या. नाहितर नॉर्मल ऑर्डर
53.व्हेज हॉटेल्स मध्ये मला आवडणारे "रसोई से"पत्ता: भेळ चौकाच्या थोडस पुढे उजव्या बाजुला रोड टच.
इथे तंदुर पनीर मध्ये बरीच व्हरायटी आहे. टेस्ट छान आहे. सर्विस चांगली आहे.
54.बे लिफ ब्रिस्टो - जुना जकात नाका , चाफेकर चौक ते बिर्ला हॉस्पिटल रस्तावर -बेसमेंटला आहे सह्हीच आहे...इथला पनीर टिक्का म्हणजे लाजवाब.तस्सेच चायनीज सिझलर्स एक से एक, हॉंगकॉंग व स्लो बोट सिझलर्स मस्ट try. ह्यांच्याकडे आधी अफलातून आईस्क्रीम पकोडा मिळायचा, आता मेनूकार्ड मधून काढून टाकलाय.
55.प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी गंडा राज" कडची इडली आणि डोसे अतिशय स्वस्त आणि मस्त असतात..एकदा नक्की चव बघा
56.प्राधिकरण संभाजी चौकात "cakes and cream " नावाचा दुकान आहे तिथे veg patice आणि cakes पण मस्त असतात
57.मराठा - पुणे मुंबई हायवे वर आहे. तिथे महाराश्ट्रियन जेवन मस्त मीलते. फक्त व्हेज.पत्ता:नाशिक फाटा, बस स्टाप पुढे, हायवे वर रोड ट्च , पुण्याकडे जाताना डाव्या हाताला.
58.पिंपरीच्या साई चौकात भेळ पाणीपुरी सॅडविचेसच्या अनेक गाड्या उभा असतात. सिंधी लोकांना भेळ, पाणीपुरीची चव फार आवडते. इथली पाणिपुरी वेगळीच लागते.
59.जैन शाळा चिंचवड शेजारी एक उडप्याच होटेल आहे. चवदार रवाळ इडली चटणी शेकडाच्या भावाने मिळतात.शिवाय डोसा 55 प्रकार मिळतात.
60.पिंपरी चौकातुन शगुन चौकात जाताना पुलाच्या अलिकदे रत्ना व्हेजिटेरिअन होटेल आहे, तिथलि टेस्ट मस्तच आहे
61.भेळ चौकात दिल्ली स्वाद म्हणून दुकान आहे तिथे छोले भटूरे मस्तच, दूध मलई व समोसाही मस्त आहें
62.होटेल कामक्षी ...... प्युअर वेज.KSB चॉक ते Thermax चॉक मधे.Live Orchestra बरोबर गाणे ऐकत ऐकत छान शाकाहारी जेवण.
63.चिंचवड आप्पाची मिसळ खाल्ली आहे का कोणी ??चाफेकर चौक मध्ये डांगे चौक बस स्टॉप आहे तेथे PH DIGNOSTICSS च्या बाजूला शेजारच्या बोळात मंडईच्या मागच्या बाजूला , भारी वाटली
64.सुजाता मस्तानी हेरिटेज प्लाझा चिंचवड गांव बस स्टैंड शेजारी तीच पुणेरी चव
65.सौ. बोर्लीकर. आकुर्डी गुरुद्वारापाशी. ह्यांच्याच पुरणपोळी सर्व दुकानात असतात चितळे, पाटणकर आणि इतर बरेच ठिकाणी..
66. नायडू पावभाजी निगडी ,अफलातून चव व डिश डेकोरेशन मस्त
67. मयूर मिसळ रावेत, तर्रीदार मिसळ आणि चवीसाठी फेमस
68.किगा आईक्रीम लिंक रोड गावडे पेट्रोल पंप समोर.अफलातून आईस्क्रीम फ्लेवर ,पुरणपोळी ,मोदक ,आणि बरेच हटके फ्लेवर आहेत
69.अन्नपूर्णा व्हेज हॉटेल , इलप्रो चौक ,अजूनही कधीतरी मस्त क्वालिटी मिळते तर कधी गंडते. तेथील स्पेशल गडबड आईस्क्रीम माझे फेव्हरेट आहे
70.मोरया गोसावी मंदिराजवळ रोहित वडेवाले ब्रँच चालू झाली आहे ,वडा सॅम्पल मस्त आहे.
71.जिलेबी एकदम गरमागरम ,ICICI ATM च्या समोर गांधी पेठ चिंचवडगाव
72.ढोकळा व चवली फली एकदम क्रिस्पी व कुरकुरीत ,चिंचवड बसस्टँड जवळ ,कमला कॉर्नरला गाडी लागते.
73. संपूर्ण चिंचवड गाव व गांधी पेठ व्यापाऱ्यांना चहा पुरविणारा ,माऊली चहा सेंटर, मूळ दुकान ,अमृततुल्य चहा आहे ,पागेची तालीम गणपती मंदिरासमोर
74.विनूज पाणीपुरी व भेळपुरी ,
संभाजी चौक ,निगडी,Near LIC Building, Sector 26
अप्रतिम चव व स्वच्छता ,पार्सल झोमॅटो वर देखील उपलब्द आहे.
75. संभाजी चौक ,विनूज पाणीपुरी शेजारील पुरोहित वडापाव ,एकदम गरमागरम आणि टेस्टी ,सोबत तळलेला भरपूर बेसन चुरा देतात, टेंस्टी वडापाव.
47 - गुंडम की काहीतरी नाव आहे. चव अगदीच ठीकठाक आहे. अन्नपूर्णा अगदी बेक्कार आहे. रत्ना चांगलं आहे पिंपरीच, बरेच जुने आहे. आम्ही विशाल ला गेलो की तिथे जायचो. गावात वृषाली म्हणून हाटेल होते हिंदुस्तान बेकरिपाशी आद्य उडुपी हाटेल असावे ते गावातील. बंद पडले. कवीची मिसळ हल्ली असते तिखट. यशवन्त चे गुजा अप्रतिम असतात आणि कलादिपचा ढोकळा पण. पूर्वी गावात टेलको गृहिणीचं कॅन्टीन होत तिथे पण उत्तम पदार्थ मिळत केशवनगर ला होतं. माझ्या लहानपणी मोरया मंदिरापाशी खाडे म्हणून एक बाई ब वडे विकत केवळ अफलातून प्रसाद
स्नॅक्स अस नाव होतं सिमन्त च्या समोर. भेळी पण छान मिळत राजकुमार वाल्याची मस्त असे. परदेशी भडभुंजा पण फारच जुना आहे. बुंदी लाडू भूषण भागवत कडे छान मिळतात फक्त दिवाळीत मिळतात मात्र. अप्पा मिसळ - अगदीच पास , काहीच हायजीन नाही. बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. प्राधिकरण मधली काही काही दुकाने बंद झाली आहेत वर लिहिलेली. जकात नाक्या पाशील बिस्त्रो चालू आहे का अजून? पूर्वी अजून एक फार हिट म्हणजे मयूर थाळी अजून आहे पण आता तेवढी चव नाही. तुमचा वाडा / आळी कोणती?
बोरलीकर काकूंकडे पु पोळी असतेच पण खवा पोळी पण मस्त असते. >>> बहुतेक यांची मुलगी डोंबिवलीत हाच बिझनेस करायची, उत्तम खवा पोळ्या, आमच्या आधीच्या गल्लीत राहायची. आता कुठे शिफ्ट झाली माहिती नाही. मी पूर्वी आणल्यात पुरणपोळ्या आणि खव्याच्या पोळ्या तिच्याकडून. त्यावेळी अनंत हलवाईकडे वगैरे पोळ्या असायच्या तिच्या. हाताखाली बायका पण होत्या करायला, ती स्वत:ही करायची.
आता अमेरिकेत असते.
महादेव पॅटिस: इंस्टा वरचे पेड रिव्ह्यू पाहून गेलो आणि पस्तावलो. ह्यांच्याकडे जाताना चौकात एक गाडी आहे. (शगुन कडून येऊन महादेव पॅटिस च्या गल्लीत वळतो तो चौक) त्याच्याकडे रगडा पॅटिस अशक्य चविष्ट मिळतं. दहिवडा, दाल पक्वान्न वगैरे पण छान आहे. पॅटिस खाल्लं की लगेच शेजारी खरवसवाला आहे, तो खा.. मिल्क केक देखील मस्त.
तिथून जरा पुढे या. एक खूप मोठं फर्निचर मॉल आहे त्या गल्लीत 2,3 आईस्क्रीम मस्तानीवाले आहेत, त्याच्या विरुद्ध बाजूला shawrma फॅक्टरी नावाचं छोटा स्टॉल आहे. चांगला मिळतो.
अजिंक्यराव ,
महादेव पॅटीसवाला फार जुना आणि फेमस आहे.
खूप अपेक्षा घेउन गेलो की ओमफुस होतेच.
त्याच्या समोरच slice of heaven आहे, त्याच्याकडे खूप व्हरायटी सँडविच आहेत, चांगली चव आणि फ्रेश.
रॉय कुठला area वै सांगाल तर माहितगार लोकं काही सांगतील की.
मी तर प्रथमच ऐकले हे नाव.
आज एक ठिकाण असे मिळाले की हा धागा खणून वर काढतेय.
मणीरामस् इडली- प्राधिकरणातील नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन हाॅल शेजारी.
इडली उपलब्ध वेळ तर चितळेंना पण तगडे आव्हान देणारी- 6.30am to 11 am and then 6 pm to 8 pm!!!
तरी खूप गर्दी कारण चव आणि दर्जा आणि तत्पर सेवा.
फक्त इडली आणि चटणी मिळते. तिथेच खाणारे 10% तर पार्सल नेणारे 90%. किंमत वाजवी वाटली.
पिंचिंकर बघा एकदा जाऊन.
धनवंती पिंचीत असाल तर पुढल्या महिन्यात होळी आसपास पिंपरी मध्ये घेवर/ घियर जिलेबी मिळते नक्की ट्राय करा, सिंधी जलेबी प्रकार आहे, फक्त दोन आठवडे मिळतो ओव्हर द काउंटर होळीच्या वेळी. इतर वेळी ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो. मोठ्या कुठल्याही हल्वाया कडे मिळेल.
मणिरासम इडली नोंद घेतली
धन्यवाद
शाहूनगर, पिंची मध्ये एक तामिलियन डोसा नामक स्नॅक्स सेंटर आहे. बहिरवाडे ग्राउंड गेट समोर. उत्तम आहे.
शिवाय बजेट फ्रेंडली.
त्या डोसावाल्याच्या समोरच त्रिमूर्ती वडापाव छान आहे, भजी देखील मिळतात. हा फक्त संध्याकाळी असतो.
शाहूनगर मध्ये DY पाटील कॉलेज जवळ south delight नामक सेंटर आहे. सकाळी स्नॅक्स, दुपारी south meal असते संध्याकाळी परत स्नॅक्स.
तिथे घी पोडी इडली आणि अप्पम कोकोनट मिल्क सोबत हे दोन्ही गोष्टी छान. इतरत्र हे सहजी न मिळणारे पदार्थ.
बऱ्याच दिवसात इकडे लिहिले नाही..
स्लाइस ऑफ हेवन try केलं, उशिरा हि जागा try केल्याचं वाईट वाटलं. आवडत्या जागांमध्ये add झालंय आता.
तिखट आंध्रा जेवणासाठी- महेश आंध्रा मेस. चिकन फ्राय विशेष आवडले. बिर्याणी जरा तेलकट आहे.
शुद्ध शाकाहारी- रामदेव बाबा ढाबा निगडी. पनीर मराठा विशेष आवडली, बाकी जेवणाचा दर्जा देखील उत्तम आहे.
मराठी कोल्हापुरी चिकन मटण थाळी- हॉटेल गावकरी थाट, रावेत पम्पिंग जवळ
तुकाराम महाराज ब्रिज क्रॉस करून मुकाई चौकाकडे जाताना डाव्या हाताला आहे.
चिकन सुक्का, चिकन ग्रेव्ही, अळणी सूप, पांढरा रस्सा, सोलकढी. ज्वारी/बाजरी
भाकर/ चपाती/ रोटी, इंद्रायणी/ अळणी भात.. चिकन/मटण अंडे सोडून बाकी सगळे
अनलिमिटेड. चव अप्रतिम, दर पण परवडण्यासारखे. पांढरा रस्सा सगळ्यात बेस्ट.
इतर हॉटेलात पांढरा रस्सा घ्यावासा वाटत नाही, इथे वाट्या भरभरून पिल्या
जातो.
चहा: आकुर्डी- थाटात चहा. चांगला आहे, पण स्मोकर खूप असतात. येवले आताशा लै गार चहा द्यायला लागलेत.
या चहाच्या जवळच एक त्रिमूर्ती बिर्याणी आहे. किमतीच्या मानाने खूप चांगली बिर्याणी.
इडली- नादब्रह्म
डोसा- महादेवा- आकुर्डी चौकात
Slice of heaven पिंपरी मार्केट
साई चौकातून उजव्या हाताच्या गल्लीत, गुरुद्वाराच्या अलिकडे, महादेव पॅटिस च्या समोरच्या बाजूला.
खूप उत्तम चव.
अजिंक्यराव धन्यवाद भर घातल्याबद्दल
महादेव डोसा शोधतो चौकात कुठेय ते.
धनवंती 
इथे लिहिलंय का माहीत नाही.
तळबीडकर वडे आकुर्डी चिखली रोड, साने चौकाच्या पुढे डावीकडे. उत्तम चवीचा गरमागरम वडा फार छान.
वर आकुर्डीतील जो थाटात चहा सांगितलंय, त्याच्या शेजारी एक वडेवाला आहे, बरेच मोठे दुकान आहे. त्याच्याकडे सामोसा छान होता.
वाकड खाऊ गल्ली- दत्त मंदिर रोड. इथे खाऊ गल्लीच्या टोकाला एक अंडीवाला आहे, त्याच्याडे बॉईल एग भुर्जी छान आहे. नि अंडा घोटाळा पण.. खाऊ गल्लीच्या अलीकडे पंजाबी अम्रीत्सरी छोले कुल्चे.. चव छान आहे आणि पोट भरतं एकाच कुलच्याने.. सोबत कुणी असेल तर एखाद प्लेट सोया चाप पण घ्यायला हरकत नाही. पण कधीतरीच खायला ठीक.. महिन्यात दुसऱ्यांदा खाल्लं तर बोर होतं. याच भागात इंदोरी चाट खूप छान मिळतात. एक मोठे दुकान आहे तिथे दत्त मंदिर रस्त्याला.. ह्या इंदोरी च्या अलीकडे एक ढोकळा खमण चे दुकान आहे. *गरम आणि ताजे* असतील तर इथले पांढरे ढोकळे खूप छान लागतात. एकदा दुपारी गेलो तेव्हा गार ढोकळे घश्याखाली जात नव्हते.
स्नॅक्स सेंटर आहे. बहिरवाडे ग्राउंड गेट समोर. उत्तम आहे.
शिवाय बजेट फ्रेंडली. >> हे अजिबातच आवडले नाही.
याच्यापेक्षा HDFC कॉलनीकडून काका हलवाईकडे जातानाचा रोडवर डाव्या बाजूला
'कन्नन'ने गाडी लावलेली असते सकाळी ६ पासून. इडली वडा सांबार चटणी ती भारी
लागते.
काका हलवाई ला लेफ्ट घेऊन थोडेसे पुढे गेलात तर डाव्या बाजूला 'सिध्देश्वर'
छोटेसे हॉटेल आहे तिथले वेगवेगळ्या प्रकारचे डोसे अगदी मस्त आणि उत्तपा,
टोमॅटो ऑम्लेट छान आहे.
महादेव पॅटिस वाला अतिशय बोअर झाला आहे हे मी कन्फर्म करते.
लहानपणापासुन तिथे खाल्लं आहे त्यामुळे बिघडलेली चव नीट लक्शात येते आहे.
पिम्परी चौकात एक इडली दोसा वाला आहे . बालाजी नाव आहे बहुदा. एकदम
कोपर्यात आहे दुकान. दारुच्या एका दुकानाशेजारी. फार मस्त इडली दोसा मिळतो.
मी जन्मायची होते तेन्व्हा म्हणजे ८९ साली ते त्या जागी गाडी लावायचे.
तेन्व्हा दिड रुपयांना डोसा मिळायचा आता चाळीस ला आहे एवढाच फरक आहे. इतके
वर्ष झाले चवीत काडीचाही बदल नाही. मस्ट ट्राय जागा आहे. जाउन बघा.
मोशी डुडुळगाव मधे पुणेरी स्वीट्सच्या समोर एक दावणगिरी डोसा वाला आहे. त्यांची क्वालिटी देखील छान आहे.
मुसल्लाम mezza 9 तरी केलं बकवास
आयुष्यात काही गोष्टी अश्या येतात की खूप झळाळणाऱ्या आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात येणारी पहिली वहिली संततधार.. आणि त्या सुगंधात, त्या सुंदर वातावरणात उन्हाने लकलकलेला जीव शांत होतो, अश्याच एका उन्हाच्या तलखीने भाजून काढलेल्या दिवसात ती माझ्या आयुष्यात आली, पण पावसाआधी दूर पडलेल्या पाण्यामुळे सुगंध जसा आपल्यापर्यंत पोहचतो तसाच तिचाही सुगंध येत होता, तशीच ती आली.. नाजूक, साजूक सुंदर... चिकन रान..
आमचं मिलन झालं ते म्हणजे पठारे मंगल कार्यालय सॉरी सॉरी, पठारे खानावळ, मोशी..
मी खाल्लेलं हे पहिलं चिकन रान. एखादा पदार्थ पहिल्यांदा वाईट लागला तर आपल्या आयुष्यात कायमचा बाद होतो, तसे होऊ नये म्हणून भरपूर रिसर्च करून पठारे कार्यालय निवडले आणि त्याचे चीज झाले. चिकन रान तर अफलातून होतेच, पण सोबत जे काळ्या मसाल्यातले जबरदस्त चिकन खाल्लं तेपण उत्कृष्ठ! चिकन मटण प्रेमींनी नक्की जा...
अजिंक्यराव
पठारे खानावळ मध्ये आमच्या ऑफिसची एक।पार्टी झालीय.
तिथे veg मध्ये कोथिंबीर वडी देखील छान होती. बाकी टिपिकल पंजाबी भाजी स्टार्टर वै चव चांगली होती.
नॉनव्हेज प्रेमी लोकांनी चिकन रान आणि बिर्याणी वर ताव मारला. तिथे पावणेआठ
पर्यंत पोहचले पाहिजे म्हणजे जागाही मिळते आणि सुरवातीला फार गर्दी
नसल्याने तबियत मध्ये बनवलेले उत्तम चवीचे खाणे मिळते.
नंतर किचनमध्ये घाई होते. सुरवताची कोथिंबीर वडी इतकी छान होती की नॉनव्हेज
प्रेमी लोकांनी एक डिश परत मागवलेली. त्यांना घाईत बनवलेली आली 
सुर्या, महाग वाटले ते
आता आहे की अतिक्रमण मध्ये पाडले आहे?
कमलनयन बजाज स्कुल समोर धनश्री हॉस्पिटल लगत हॉटेल ओंकार pure veg.
स्नॅक्स साठी बरा option आहे.
पोहे उप्पीट मिसळ वै
वरच्या मजल्यावर जेवण मिळते.
मेस सारखे थाळी आणि काही इतर मेन्यू
Ok आहे
त्याचे स्टफ पराठे चांगले वाटले. घरगुती असतात तसे पण जाड आणि मोठे. बटर तूप असले नखरे नाहीत. पनीर आणि आलू पराठा आवडला.
2 update
1) शाहूनगर तामिलीयन डोसा
कवालिटी उतरली असे जाणवत आहे
2) शाहूनगर मधील काका हलवाई ब्रँच बंद पडली. त्याच्याकडे कंदी पेढे (
सातार्यापेक्षा वेगळ्या चवीचे होते मात्र ) आणि मँगो मलाई बर्फी मला
आवडलेली.
>>
2) शाहूनगर मधील काका हलवाई ब्रँच बंद पडली. त्याच्याकडे कंदी पेढे (
सातार्यापेक्षा वेगळ्या चवीचे होते मात्र ) आणि मँगो मलाई बर्फी मला
आवडलेली. >> ते स्पाइन रोडवर शिफ्ट झालेत/होतील.
---
बादवे आम्ही आजकाल बऱ्याचदा साऊथ डिलाईटला जातो. कुर्मा-अप्पम, आप्पे, साऊथ मिल्स वगैरे चांगले आहेत.
आता परवा तमिळ नवीन वर्ष म्हणून ३२०/- ला साद्या पार्सल आणलं. केळीच पान वगैरे दिलं होतं. छान होता मेनू.
---
या भागात घरगुती हेल्दी टिफीन देणारे कोणी आहे का?रोज भाकरी-भाजी-उसळ. शक्य असेल तर विकेंडला नॉनव्हेज.
पठारे खानावळ जेव्हा तळवडे मध्ये होती, तेव्हा चिकन रान पार्सल आणून खाल्लेलं.
मला नव्हतं आवडलं तेव्हा.
आताच्या मोशीच्या हॉटेलात थाळी घेतलेली, छान चव होती.
चिकन रान ट्राय करायला हवं पुन्हा एकदा.
मुर्ग मुस्सलम थरमॅक्स चौकातील पंजाबी रसोई मध्ये खाल्लेलं, छान होत
आज हिंजवडीच्या गोदावरी रुचुलू मधून चिकन फ्राय बिर्याणी मागवली. जाऊन खाणार होतो पण का कुणास ठाऊक मॅप वर दिसलेच नाही.
बिर्याणी: खडे मसाले आणि एकंदरच मसालेदार, तिखट (म्हणजे जाळ तिखट नाही)
मला जशी आवडते तशी. चिकन पीस पण पुरेसे होते. प्रत्येक घासाला येईल इतपत
चिकन होतं, सालन पण प्रॉपर चवदार होतं.
फक्त एकच, चिकन ज्यूसी नव्हतं. माझ्याकडून 4 स्टार!
अरोमा आजकाल जरा क्वालिटी वेगळी देतेय (किंवा मला कंटाळा आला असावा) म्हणून हे नवं काहीतरी try केलं.
ग्रँड हाय स्ट्रीट मॉल हिंजवडी ला वर सातू लिटी चोखा खाल्ले ते ओके वाटले(बिहार चा लिटी चोखा चा स्टॉल फूड मॉल ला, पण महाराष्ट्र ची भाकरी भाजी वरण भात चा स्टॉल महाराष्ट्रात नाही असंही वाटलं.भाकरी चे स्टॉल मॉल ला आले की बंद पडतात.लोकांची समजूत 'महाराष्ट्र खाणे म्हणजे भाकरी आणि लाल भडक तिखट खाताना 2 घास खाऊन टाकून द्यावी लागणारी शेवभाजी किंवा पिठलं' अशी झालीय बहुतेक.(किमान पिंपरी चिंचवड मध्ये तरी.) भाकरी असलेलं, पण टिपिकल खानदेश किंवा सावजी किंवा कोल्हापूर तिखट नसलेल्या,भरपूर मिरपूड मारून उग्र न बनवलेल्या नॉर्मल भाज्या द्या भाकरीसोबत, त्याची नीट जाहिरात करा की त्या सौम्य आहेत.अमराठी लोक भाकरी आवडीने खातात.बरोबर आकर्षण म्हणून पुरणपोळी आणि कोथिंबीरवडी ठेवा.इत्यादी डोक्यात आलं.) आम्ही बरंच तिखट खाणारे, पण काहीवेळा घरी मागवलेली मागवलेली शेवभाजी इतकी तिखट होती की पीठ मिसळून थालीपीठ म्हणून खावी लागली.
या धर्तीवर आता एक दोन वेळा पुणे सातारा हायवेवर हॉटेल वैशाली आहे, तिथलं मराठी खाणं जरा पोटाला झेपलं.तेल भेंडी(म्हणजे नॉर्मल भेंडीची परतून केलेली भाजी) आवडली.
सर्वोत्तम भेळ कुठं मिळेल?
चिंचेच्या काळ्या कोळात (गोड नव्हे आंबट), भडंग, हिरव्या मिरची पुदिनाच्या
पेस्टचे पाणी, प्रमाणात फरसाण, असली तर छोटी मुगडाळ किंवा शेगाव कचोरी
कुस्करून, बारीक चिरून कांदा, बारीक शेव, कोथिंबीर त्यावर रुपायएव्हढं दही,
तळलेली मिरची, आणि खायला चमचा ऐवजी पापडी
आरके बिर्याणी?
कुठे आहे?
इचलकरंजीच्या फेमस दत्त भेळच्या फ्रॅंचाईज शाखा मध्यंतरी दिसत होत्या. आता सुरू आहेत का माहीत नाही.
कोल्हापूर style भेळ.
पण हल्लीची भेळ बनवणारी पिढी ओली भेळ म्हणालो की हुं म्हणून चटणी टाकून भेळ
एकदम ओली करून देतात. तशी नको, बेताची ओली असेल तर मजा खायला.
नाहीतर चटण्या ची टेस्ट overpower करते.
पीके बिर्याणी हाउस मधले जेवण नॉनव्हेज खाणाऱ्या मित्राना आवडले होते.
तिथे अळणी सूप दिले जाते नॉनव्हेज कोणत्याही ऑर्डर सोबत. शिवाय तांबडा
पांढरा सप्लाय सुरू असतो. मित्रानी मटण हंडी वै घेतलेले. कांदा असतो दही
लावलेला सोबतच.
Veg मध्ये थोडीफार व्हरायटी आहे.
बरी टेस्ट veg मध्ये. हे काळेवाडी कडून एम्पायर इस्टेट समोरच्या ब्रिजकडे जाताना डाव्या हाताला.
गुडलक आळंदी रोडला मोशी भारतमाता चौकच्या पलीकडे गेलो की.
तिथले नॉनव्हेज जेवण मित्राना अजिबात आवडले नव्हते.
गोडसर चव असलेलं मटण वै दिलेलं.
गरमागरम नव्हते, कोमट पेक्षा थंड रसा वै.
जाणकार मित्रांच्या मते मटण देखील शिळे वाटत होते.
तिथे veg ऑप्शन देखील एकदम कमी आणि below average टेस्ट.
अरिहंत ची मिसळ अजिबात आवडली नव्हती.
साखर जास्त होती त्यात. गोडसर चव.
आरके केटरर (बिर्याणी) गणेश अपार्टमेंट, पंचतारा नगर, सेक्टर 28, गंगा नगर आकुर्डी.
insta वर रीळ बघितलं आणि गूगल review पण चांगले आहेत. फक्त पार्सल मिळते, बसून खायची सोय नाही- एकंदर द्राविडी प्राणायाम घडणार आहे, म्हणून विचार करतोय, आधी इथं विचारून घ्यावं
अरेच्या, इथं लिहिलं नाही की कुणी इतक्यात:
आरके बिर्याणी 2 वेळा खाल्ली, चांगली वाटली, म्हणजे खुप उत्तम नाही, oily होती.. तिथला कबाब पण चांगला वाटला.
भेळेचा नाद मी सोडला आहे.
आकुर्डी रेल्वे स्टेशन भागात खूप चांगले जॉइन्ट्स आहेत, shawrma किंग तर आहेच, no review required.. त्याच्या जवळ एक केरळी रेस्तराँ आहे ते आवडलं होतं.
श्रावण स्पेशल: आकुर्डी स्टेशन जवळ माधव इडली अप्रतिम आहे, लातूर स्टाईल, दाण्याची- दालचिनी घातलेली ऑस्म चटणीत डिप केलेली जाळीदार इडली, चवदार जबराट सांबर, आणि थोडीशी लालसर चटणी एक.. नक्की try करा, बाकी पण पदार्थ मस्त आहेत.
किवळे चौकात कृष्णा नावाचे रेस्तराँ आहे. पार्किंगसाठी जागा आहे. माझ्याकडे त्यांचा नंबर सुद्धा आहे.
किवळे भागात आलात तर भेट देऊन बघा.
एकदा माझ्याकडून त्यांना पेमेंट (जी पे) झालेलं. ते पैसे सुद्धा त्यांनी दुसर्या दिवशी परत केले.
फिल्मस्टार जितेंद्र ने पण एक खानावळ सुरू केलीय सिंबॉयसिस च्या रस्त्याला. पण महाग असेल म्हणून अजून बघितलं नाही.
रावेत बीआरटी रोडला (मुकाई चौकापासून 300 मीटर) "ले स्टोन" आवडलं. गार्डन, हटस आणि डायनिंग हॉल.
थोडं महाग आहे.

नेवाळे मिसळ्...एकदम बेस्ट!!
नेवाळे मिसळ्...एकदम बेस्ट!! पाण्याचा ग्लास आणि साखरेची वाटी सोबत घेऊन बसावं लागतं फक्त
Submitted by प्रीति on 16 December, 2009 - 13:51
पत्ता मिळेल का प्ल्झिज...
पत्ता मिळेल का प्ल्झिज...
Submitted by स्वप्नाली on 16 December, 2009 - 22:15
नेवाळे मिसळ नको. तिथे मिसळला
नेवाळे मिसळ नको.
तिथे मिसळला अजिबात टेस्ट नाही. नुसतीच तिखट आहे.
आणि त्या हॉटेलच वातावरण तुम्हाला स्वातंत्र्यपुर्व काळात घेवुन जाइल.
पुणेरी पाट्या नाहीत पण तुसडेपणात चितळ्याना कॉम्पीटेशन.
त्यापेक्षा जयश्री मिसळ बरी.
मिसळीसाठी "जयश्री"
पत्ता : बजाज अॅटो मेन गेटसमोर, आकुर्डी.
त्याला ऑर्डर देताना बोलायच कोल्हापुरी दे किंवा तर्री मारुन दे. दणका सहन करु शकत असाल तरच अशी ऑर्डर द्या. नाहितर नॉर्मल ऑर्डर
वडापावसाठी "वासु वडापाव"
पत्ता: भेळ चौकाजवळ एक कॅफे कॅफे डे आहे. त्याच्या जवळ.
फक्त व्हेज हॉटेल्स मध्ये मला आवडणार "रसोई से"
पत्ता: भेळ चौकाच्या थोडस पुढे उजव्या बाजुला रोड टच.
इथे तंदुर पनीर मध्ये बरीच व्हरायटी आहे. टेस्ट छान आहे. सर्विस चांगली आहे.
Submitted by झकासराव on 16 December, 2009 - 22:53
झकासराव धन्यवाद.... "वासु
झकासराव धन्यवाद....
"वासु वडापाव" सहीच!!!
Submitted by चिमुरी on 16 December, 2009 - 23:01
वासु वडापाव माझ हि फेवरेट
वासु वडापाव माझ हि फेवरेट ठीकाण आहे :फिदी:... मी प्रोजेक्ट केला होता वासु वडापाव च्या मालकावर "Journey from Road to Restaurant" त्या वेळी त्या मालकांचा मुलगा होता... त्यानेच सगळी माहिती देलेली... अॅक्सीडेंट मध्ये त्याच निधन झाल
... वासु रेस्टॉरंट माझी मेस होती... माझ एक वेळच जेवण तीथेच असायच 
वरच्या ठीकाणां व्यतीरिक्त मला अजुन काही 'शाकाहारी' खाण्याच्या जागां बद्दल माहिती हवी होती ... आभार
Submitted by sas on 22 December, 2009 - 16:11
.
Submitted by sas on 22 December, 2009 - 16:10
नेवाळे मिसळ त्याला मिसळ
नेवाळे मिसळ
त्याला मिसळ म्हणायचं का फोडणी घातलेलं तिखटाचं पाणी म्हणायचं????
मी एकदाच घरी आणली त्यात अर्धा किलो मटकीची उसळ शिजवून घातली तरी त्याचा तिखटपणा कमी होत नव्हता. तिखटाशिवाय दुसरी काहीच चव नसते त्या मिसळीला. नाही आवडली.
त्यापेक्षा मोरया गोसावी मंदीराच्या बाजुला बागेसमोर एक हॉटेल आहे तिथली मिसळ आवडली.
बिर्ला हॉस्पिटलकडे जायच्या रस्त्यावर नवीन झालेलं बे लिफ ब्रिस्टो सह्हीच आहे...इथला पनीर टिक्का म्हणजे लाजवाब.
अन्नपुर्णा अजिबात आवडलं नाही....पण इथे फक्त व्हेजसाठी जवळपास दुसरा चॉईस नाहीये...वरती एक अजून हॉटेल आहे कामिनी ते पण चांगल आहे व्हेज नॉनव्हेजसाठी. जरा बरं असं एवढ एकच हॉटेल दिसलं मला इथे
काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ तास तो पण मस्त, वड्याचा साईज पुणेकरांना शोभणार नाही एवढा मोठा आणि चव सुद्धा जबरी.
इथल्या माँजिनिजची टेस्ट लैच बेकार
Submitted by श्यामली on 22 December, 2009 - 22:16
काकडेपार्कमधे एक वडापाववाला
काकडेपार्कमधे एक वडापाववाला असतो फक्त संध्याकाळी ४ तास तो पण मस्त.>>>>>>>>> अगदी मस्तच असतात तिथले वडे

मला कालच कळलेली माहिती, "पंचशील" ला वेज छान मिळतं म्हणुन. मी स्वतः कधी तिथे गेलेली नाहिये, आणि ते कुठे आहे तेही माहीत नाही..
Submitted by चिमुरी on 22 December, 2009 - 22:23
वा वा ...वासुवडापावाच्या
वा वा ...वासुवडापावाच्या आठवणीनेच गहीवरुन आलं......किती दिवस झाले निगडीला जाऊन!
अजमेरामधे छाया नांवाचे एक हॊटेल आहे. तीथले पराठे खूप सही असतात. मला उत्तर भारतातही तीतके छान पराठे नाही मिळाले अजून कुठे!
एच ए कॊलनीमधे एक कॆंटीन आहे. तीथल्या सामोश्याची, मिसळची आणि ईडलीची चव मी तर कधीच विसरू नाही शकणार!
Submitted by प्रकाश काळेल on 23 December, 2009 - 01:07
निगडी भक्ति-शक्ति च्या मागे
निगडी भक्ति-शक्ति च्या मागे रामदेव बाबा धाबा - ठिक
चिंचवड स्टेशन रोड वर HDFC ATM च्या बाजूला चायनिज - ठिक
नेवैद्यम आणि मयूर डायनिंग हॉल निगडी-पिंपरी मेन हायवे वर
Submitted by प्रशान्त on 23 December, 2009 - 03:46
पिम्प्रि त नाहि मिळत का अस
पिम्प्रि त नाहि मिळत का अस छान ?
Submitted by सोनल८४ on 23 December, 2009 - 06:30
बिर्ला हॉस्पिटलकडे जायच्या
Submitted by झकासराव on 23 December, 2009 - 08:24
गाडगीळांच्या लायनीत पुढे
गाडगीळांच्या लायनीत पुढे .
तानाजीनगर आणि पोद्दार शाळेजवळ असलेलं काकडेपार्क
Submitted by श्यामली on 23 December, 2009 - 10:08
१. प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी
१. प्राधिकरणआत LIG मध्ये "मणी गंडा राज" कडची इडली आणि डोसे अतिशय स्वस्त आणि मस्त असतात..एकदा नक्की चव बघा
२. चिंचवड गावात गणपती मंदिरा च्या अलीकडे "बालाजी मिसळ" अतिशय चविष्ट असते, बसायची जागा आपण ठीक आहे
३. प्राधिकरण संभाजी चौकात "cakes and cream " नावाचा दुकान आहे तिथे veg patice आणि cakes पण मस्त असतात
४. वासू रेस्तौरांत मध्ये "तंदूर पनीर" एकदम मस्त मिळत
Submitted by किर्तिपार्खि on 29 December, 2009 - 01:12
वासु ने non-veg सुरु केले
वासु ने non-veg सुरु केले आहे. वडापाव सेंटर शेजारी. बिर्यानी छान मिळते.
हे नेवळे मिसळ कुठ आलं? गांधी पेठेत कां?
Submitted by यशवन्त नवले on 6 January, 2010 - 10:23
चिंचवड-केशवनगर- अरिहंत
चिंचवड-केशवनगर- अरिहंत