एक-दीडच्या दरम्यान काशीद बीचच्या आधी साधारण आठ किमीवर जेवणासाठी
थांबलो. गेल्याच महिन्यात येथील हॉटेल समर्थकृपात जेवलो होतो . जेवण आवडले
होते. त्यातच हॉटेलच्या गेटला लागूनच बिअर शॉपी असल्याने ह्यांचे व
जावयांचे येथेच थांबण्याबद्दल एकमत झाले. मासे, मटण तांदळाची भाकरी
मिळाल्याने जावई एकदम खुश. व्यवस्थित खाणे-पिणे आटोपले. येथल्याच स्टॉलवर
चायनीज पदार्थांसाठीची तयारी सुरु होती. पण ही तयारी संध्याकाळसाठीची आहे
असे समजले. सुटीच्या दिवशी अगदी रात्री १२ पर्यंत येथे वर्दळ असते असे
कळले. जमल्यास संध्याकाळीही येथेच जेवायला यायचे ठरले.

येथून निघाल्यावर रूम शोधणे सुरु झाले. दोन दिवस सलग सुटी असल्याने
बहुतेक हॉटेल भरलेली होती. थोडयाफार रूम खाली होत्या तेही चढे दर सांगत
होते. पूर्वी गविंच्या एका प्रतिसादात प्रकृती रिसॉर्टचे नाव वाचल्याचे
आठवत होते तेथे पोहचलो. रिसॉर्टचे दरपत्रक पाहून भर दुपारच्या उन्हात आम्ही
गार पडलो. चार जणांसाठी रूमचा दर होता जवळपास रु.४० हजार. असे असूनही
रिसॉर्ट पूर्ण भरलेले होते. यांचेकडे कोणतीच रूम शिल्लक नसल्याचे कळल्यावर
जावयांना उत्साह संचारला. काहीही करून एखाद्या रूमची व्यवस्था कराच असे
सांगू लागले. शेवटी रूम मिळतच नाही म्हटल्यावर नाईलाज झाल्यासारखे दाखवत
आम्ही परत फिरलो. चार वाजायला आले होते. आता सरळ बीचवर जाऊन रात्री
मुक्कामी आपल्या घरीच जावे असाही विचार मनात येऊ लागला. प्रकृती
रिसॉर्टच्या थोडे पुढे मुख्य रस्त्यालाच एक रिसॉर्ट दिसले.

चौकशी केल्यावर एसी रूमचा तीन हजार असा दर मिळाला. घासाघीस करून पाच हजारात
दोन रूम ताब्यात घेतल्या. थोडा आराम करून बीचवर गेलो. आज फक्त भिजायचे.
फोटो काढायचेच नाहीत असे ठरवून फक्त एक फोन सोबत घेतला व बाकी सगळ्या
इलेकट्रोनिक वस्तू रूमवरच ठेवल्या. किनारा माणसांनी फुलून गेला होता. .
ऍडव्हेंचर स्पोर्ट्सवाल्यांची चांगलीच चलती होती. सूर्यास्त पाहून व
पाण्यात यथेच्छ मजा करून रूमवर परत आलो. नऊच्या दरम्यान जेवणासाठी बाहेर
पडलो. दुपारी जेवलो तेथेच जायचे ठरले. अंधार पडला होता आणि भूकही लागली
होती त्यामुळे आता हेच अंतर खूप जास्त वाटत होते. येथे पोहचलो आणि गर्दी
बघूनच कळले कि यांचे चायनीज जेवण खरोखरच चांगले असणार आहे. ऑर्डर दिली. वेळ
लागणार होता. मधल्या वेळात सासरा-जावयानेआडोशाला एका टेबलवर आपली सोय करून
घेतली.
यथील एक स्पेशल डिश, पॅकिंग फ्राईड राईस

पॅकिंग चिकन फ्राईड राईस, चिकन क्रिस्पी, चिकन चिली व माझ्यासाठी व्हेज
फ्राईड राईस सर्व मिळून बिल झालं रु.५६०/- फक्त! अकरा वाजले. रूमवर
जाण्यासाठी निघालो. दोन्ही मुली कामचलाऊ गाडी चालवतात त्यामुळे ह्यांची व
जावयांची ड्रिंक अँड ड्राइव्हच्या त्रासातून मुक्तता होते. वाटेत थांबून
आइस्क्रीमचा आनंद घेतला. रिसॉर्टला येऊन बऱ्याच वेळ आवारातच गप्पा मारून
झोपायला गेलो.
सकाळी आरामात उठलो. नाश्ता करून बाहेर पडलो. येथील नाश्ता म्हणजे
पोहे/उपमा. नाश्ता रु.३०/- एका प्लेटचे, चहा २० रुपये. खूप छान आणि स्वस्त.
थोडे रिसॉर्टविषयी : मुख्य रस्त्यालाच लागून दोन मजली इमारत आहे पुढे,
पार्किंगसाठी जागा, बाग, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था, पाठीमागे
स्विमिंग पूल व आमराई (पूल काही कारणाने बंद होता. आंब्याची झाडे अजून
लहान आहेत). एक विशेष वाटले इतकी चांगली व्यवस्था असून व आजूबाजूचे
रिसॉर्ट गजबजलेले असताना या रिसॉर्टमध्ये आमच्या व्यतिरिक्त कुणीही
नव्हते. जणूकाही संपूर्ण रिसॉर्ट आमच्यासाठीच राखीव होते. रिसॉर्टच्या
मालकांनी यदाकदाचित हा लेख वाचला तर माझे सांगणे आहे की व्यवस्थापनात
कुठेतरी सुधारणा आवश्यक आहे. (मालक मराठी माणूस व पुण्याचा आहे असे कळते).
रिसॉर्टचे प्रवेश द्वार ते मागील स्विमिंग पूल पर्यंतचा १८० अशांतला पॅनोरॅमिक व्ह्यू

येथील इतर काही फोटो





रिसॉर्ट सोडले व बीचवर गेलो. आज बीचवर थोडासा फेरफटका मारून काल फोटो काढले नव्हते त्याची भरपाई करून घेतली.


ब
अलिबाग परिसराचा फेरफटका
‘करू या देशाटन’ सदराच्या
मागील भागात आपण रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या उगमपासूनचा
सह्याद्रीला लागून असलेला पाली परिसर पाहिला. आजच्या भागात पाहू या
कुंडलिका नदी सागराला मिळते तेथून उत्तरेकडे असलेला पर्यटकांचा आवडता अलिबाग परिसर.
.......
रायगड
जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची
किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. इतिहासाच्या पाऊलखुणा तर येथे
जागोजागी आहेत. मुंबई व पुण्याहून साप्ताहिक सुट्टी घालविण्यासाठी येथे
येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते. जास्त पर्यटक मुंबईतील असल्याने येथे
फिरताना मुंबईत असल्यासारखे वाटते. कारण मराठी असले तरी हिंदीतच बोलण्याची
आणि इंग्रजीची स्टाइल व फॅशन करण्याची चढाओढ दिसते.
ज्यू (इस्रायली) प्रार्थनागृह, अलिबाग
अलिबाग :
मजा करायची आहे, धमाल मस्ती करायची आहे? मग चला अलिबागला! भारताचे दिवंगत
लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य, तत्त्वज्ञ नानासाहेब धर्माधिकारी, ‘जय
मल्हार’फेम देवदत्त नागे, अभिनेत्री अश्विनी भावे, ‘सारेगमप लिटिल
चॅम्प’मधील मुग्धा वैशंपायन हे सर्व अलिबागचेच. सन १९०४मध्ये स्थापन केलेली
चुंबकीय वेधशाळा अलिबागमध्ये आहे. आता येथे अत्याधुनिक यंत्रणा असल्याने
हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. अलिबागमध्ये कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे.
समाधी परिसर खूपच छान ठेवण्यात आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्यामुळेच
इंग्रजांना पश्चिम किनारपट्टीवर जम बसविता आला नाही. शेवटी इंग्रज
बंगालच्या उपसागरातून कोलकाता येथे गेले व तेथून गंगा नदीच्या काठाने
दिल्लीकडे पोहोचले.
अलिबाग
आणि त्याच्या शेजारच्या गावांमध्ये अनेक ज्यू (इस्रायली) लोक वस्ती करून
होते. त्या वेळी इस्रायल अस्तित्वात नव्हते. इस्रायली आळी (गल्ली) नावाचा
भागही अलिबागमध्ये आहे. या लोकांना बेने इस्रायली म्हणून ओळखले जायचे.
त्यांचा प्रमुख व्यवसाय तेल गाळणे आणि विकणे हा होता. त्या वेळी तेथे बेने
इस्रायली नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. त्याच्या बागेत आंबा आणि नारळाचे
अनेक वृक्ष होते. म्हणून स्थानिक लोक ‘अलीची बाग’ असे म्हणत व त्या वरूनच
अलिबाग हे नाव रूढ झाले, असे म्हणतात. मॅजेन एवॉट सिनेगॉग (Magen Avot
Synagogue) हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ येथे आहे व वारसा वास्तू म्हणून
त्याची काळजी घेण्यात येते. व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याने येथे भेट दिली
होती. अलिबागच्या आसपास अनेक बीच आहेत व अलिबाग हे मध्यवर्ती असल्याने आणि
दोन्ही बाजूला बीच असल्याने येथे गर्दी असतेच.
हिराकोट : अलिबागच्या
बसस्थानकापासून उत्तर पश्चिम कोपऱ्यात दोन किलोमीटर अंतरावर हिराकोट
तलावाशेजारीच हा भुईकोट उभा आहे. कुलाबा किल्ल्याला संरक्षक म्हणून याची
निर्मिती झाली होती. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला
१७२०मध्ये बांधला. या किल्ल्यात कान्होजी आंग्रे यांचा खजिना असे. जेव्हा
पहिले बाजीराव यांचे रावेरखेडी येथे निधन झाले, तेव्हा नानासाहेब (थोरल्या
बाजीरावांचे चिरंजीव) हिराकोट येथे मुक्कामास होते. त्यानंतर ते पेशवाईची
वस्त्रे आणण्यासाठी साताऱ्याला गेले. सन १८४३मध्ये आंग्रे यांनी किल्ला
सोडल्यावर इंग्रजांनी त्याचे तुरुंगात रूपांतर केले. किल्ल्याचे क्षेत्र
प्रतिबंधित असल्याने आपल्याला आत प्रवेश मिळत नाही व पोलिसांच्या परवानगीने
फक्त बाहेरून बघता येतो.
कुलाबा किल्ला
कुलाबा /सर्जेकोट किल्ला : अलिबागच्या
सागरकिनाऱ्यावर उभे राहिल्यावर समुद्रात एका प्रचंड खडकावर कुलाबा किल्ला व
सर्जेकोट ही जलदुर्गजोडी दिसते. ती ३५० वर्षे सागराच्या लाटा अंगावर घेत
उभी आहे. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढला जातो व
जलदुर्ग बनतो, तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला
भुईकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७
मीटर असून, पूर्व-पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे. शिवाजी महाराजांनी
मोक्याच्या बेटांवर किल्ले बांधले व जुने बळकट केले. त्यापैकी कुलाबा
किल्ला खूप महत्त्वाचा. कारण तो मुंबईच्या समोर आहे. इंग्रज व इतर
पाश्चात्य आक्रमकांवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात
केली. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली.
त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून
१६८१मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीत कुलाबा
किल्ला प्रसिद्धीस आला.

किल्ल्याचे
प्रवेशद्वार उत्तर-पूर्व दिशेला किनाऱ्याच्या बाजूला आहे. हा दुर्ग
बांधताना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन
दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या
तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या
तडाख्याचा जोर कमी होतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण,
कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली बघण्यास मिळतात. दुर्गाच्या दुसऱ्या
दरवाज्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्याला एकूण १७ बुरुज आहेत. चार टोकांना
चार, पश्चिमेला पाच, पूर्वेला चार, उत्तरेला तीन व दक्षिणेला एक बुरुज असे
आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी,
दारुखानी अशी नावे आहेत.
किल्ल्यात
प्रवेश करताच भवानी मातेचे मंदिर, पद्मावती देवी, गुलवती देवी यांची
मंदिरे आहेत. डावीकडे पुढे गेल्यावर हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार यांचा
दर्गा आहे. डावीकडे आंग्र्यांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर
अजूनही लोकांचा राबता असलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. गणेशमूर्तीची उंची
दीड फूट आहे. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असून,
गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. मंदिराच्या प्रांगणात उत्तरेस मारुतीचे व
दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची
पुष्करिणी आहे. पुष्करिणीच्या पुढे तटापलीकडच्या दरवाज्यातून बाहेर
गेल्यावर स्वच्छ पाण्याची पायऱ्या असलेली विहीर आहे.

दुर्गाच्या
दक्षिण टोकाला असलेल्या दरवाज्याला धाकटा दरवाजा, यशवंत दरवाजा, दर्या
दरवाजा अशी नावे आहेत. या दरवाज्यावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे,
वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली दिसून येते. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष
आहेत. तेथे कान्होजींच्या काळात नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त
केली जात असत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या दोन तोफा आहेत.
तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणाऱ्या कंपनीचे नाव कोरलेले आहे. डाउसन हार्डी
फिल्ड, डाऊ मूट आयर्न वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड... वर्ष आहे १८४९.
किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते. अलिबागच्या
समुद्रकिनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.
भरती-ओहोटीचे भान ठेवूनच किल्ल्यात जावे, नाही तर किल्ल्यावर अडकून पडावे
लागेल.
(कुलाबा किल्ल्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
सर्जेकोट :
कुलाबा किल्ल्याच्या उत्तरेस लागूनच सर्जेकोट आहे. मोठ्या भरतीच्या वेळी
दोन्ही किल्ले वेगळे दिसतात. दोन्ही किल्ल्यावर जाण्यासाठी पूर्वी एक वाट
होती. शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘किल्ल्यासमीप दुसरा
डोंगर असू नये. असल्यास तो सुरुंग लावून फोडावा आणि शक्य नसल्यास त्या
डोंगरावरही किल्ला बांधावा. यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते. अन्यथा
शत्रू त्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकून घेऊ शकतो.’ आज्ञापत्रातील
या आज्ञेनुसार संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट
किल्ला बांधला. किल्ल्यावर बुरुजाव्यतिरिक्त अन्य कोठलेही बांधकाम
अस्तित्वात नाही. शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा हा एक साक्षीदार आहे.
भरती - ओहोटीची गणिते :
- तिथीला तीनने गुणायचं आणि चारने भागायचे. उदा. पौर्णिमा म्हणजे १५ गुणिले ३ = ४५.
४५ भागिले ४ = ११.२५
म्हणजे सव्वा अकरा वाजता दुपारी आणि रात्री पूर्ण भरती. त्यानंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी
- भरती-ओहोटीच्या गणितात (तिथी) तीनने गुणून मिनिटे वाढवतात. नवमी असेल तर ९ गुणिले ३ भागिले ४ = ६.७५
यात सहा हा पूर्णांक तास धरायचा आणि ०.७५ म्हणजे ४५ मिनिटे (एका तासाचा ०.७५ भाग म्हणजे ४५ मिनिटे)
तसेच ९ गुणिले ३ = २७ मिनिटे, एकूण मिनिटे : ४५+२७ = ७२ मिनिटे = १ तास १२ मिनिटे
यात आधीचे सहा मिळवा म्हणजे ६ + (१ तास १२ मिनिटे) = ७ वाजून १२ मिनिटे ही भरतीची वेळ मिळाली.
-
तिथीत +१ करून त्याची पाऊणपट केली की पूर्ण भरतीची वेळ कळते. उदा.
पौर्णिमा - १५, १५+१=१६. १६ची पाऊणपट म्हणजे १२. म्हणजेच दुपारी १२ला पूर्ण
भरती. नंतर सहा तासांनी पूर्ण ओहोटी. (भरती-ओहोटीची गणिते : साभार –
‘मायबोली’)
अक्षी येथील सोमेश्वर महादेव मंदिर
तपोभूमी कनकेश्वर
कनकेश्वर
अलिबाग तालुक्यातील श्री
क्षेत्र कनकेश्वर हि तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे
आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. असें म्हणतात कि निसर्गाच्या
सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते आणि जो त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न
करतो त्याला त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. निर्बिड जंगलाचा परिसर असलेले
हे मंदिर अलिबागच्या ईशान्येस १२ कि.मी. वर एका निसर्गरम्य अशा डोंगरावर वसलेले
आहे. समुद्र सपाटी पासून उंची सुमारे ५००० फुट. अनेक दिवस नित्याच्या पाठी लागून शेवटी तो तयार
झाला. माझा जन्म हा सोमवारचा असल्याने लहानपणा पासूनच मला पशुपतीनाथां
विषयी फार प्रेम.. मग कुठेही शिवालय दिसले तरी मी त्याचे दर्शन घेतल्याशिवाय रहात
नाही.
कनकेश्वराच्या दर्शनाला
जाणार म्हणून सकाळी लवकरच थंडीतूनच निघालो.
हळूहळू वडखळ, ईस्पात असें करत कधी कनकेश्वराच्या पायथ्याशी पोहोचलो कळलेच
नाही. या स्थळाचे नाव कनकेश्वर पडण्याचे कारण म्हणजे शिवाने कनकासुर नामक राक्षसाचा वाढ केला होता अशी आख्यायिका
सांगितली जाते. शिवालयात पोहोचण्यासाठी सुमारे ७०० पायऱ्या वर चढून जावे लागते. या
पायऱ्या १७४४ साली सरदार “ रघुजी आंग्रे” यांचे दिवाण “ गोविंद रंगदास” यांनी
बांधल्या. वर जाणाऱ्या पायऱ्या जमिनीलगत
समांतर असल्याने आबालवृद्ध अगदी सहज दर्शनासाठी जाऊ शकतात.
सुरुवातीलाच एका मार्बल
मध्ये मंदिराची माहिती आणि विशेष सूचना कोरलेली आहे. अशी पायऱ्यांची माहिती देणारा
मार्गदर्शक आपल्याला आपल्याला बहुतेक टप्प्यांवर दिसतो.
कुठलाही विशेष दिवस
नसल्यामुळे भक्तांची फारशी वर्दळ नव्हती; श्रावणी सोमवारी विशेषतः फार गर्दी असते.
गप्पा मारत ..थोडेसे फोटोसेशन J करत नागोबाच्या टप्प्याला आम्ही पहिली विश्रांती घेतली.
काही अंतर चढल्यावर
कनकेश्वराची पाउल खूण असलेली “देवाची पायरी” आपल्याला प्रथम दर्शन देते. थोड्याच
वेळात आपण गायमांडी या दुसऱ्या विश्रांतीस्थानापर्यंत पोहोचतो. तिथून कठिण
चढ समाप्त होतो.

गायमांडीचा टप्पा म्हणजे एका खडकाच्या
खळग्यात गायीची पावले असून मुर्ती आहे. तसेच बाजूला ५ शिवलिंगे आहेत. एका
गुराख्याच्या गायीच्या स्मरणार्थ बांधलेली हि जागा आहे असे येथील
स्थानिकांकडून समजते. तिथून जवळच पिण्याच्या पाण्याची ही सोय केलेली आहे.
तेथील थंडगार पाणी पिऊन आपला आत्मा शांत होतो; त्याची चव जणू काही
अमृतासमानच! पुढे निर्बिड जंगलातून जाताना वाटेत पालेश्वराचे मंदिर लागते.
याची विशेषतः म्हणजे याला फक्त पालाच वाहतात. येथून थोड्याच अंतरावर
आपल्याला कनकेश्वराचे मंदिर दिसते. बाजूला असणाऱ्या प्रशस्त विहिरीला
सभोवती जाळी मारून बंदिस्त केलेली आहे. कदाचित स्वच्छता/सुरक्षेच्या
कारणास्तव केली गेली असावी. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच वानरसेना आमच्या
स्वागताला तयार होतीच. आपण त्यांच्या वाटेला गेलो नाही तर तसा त्यांचा काही
त्रास नाही.. हां पण; जर तुमच्या हातात प्रसाद किंवा खाण्याचे कही समान
वगरे असेल तर जरा सावधच! कारण माझ्या हातातला प्रसाद चक्क दोनदा गायब
झाल्यावर याचा मला चांगला अनुभव आला होता. मग काय... रिकाम्या हातानेच
कनकेश्वराच्या दर्शनासाठी आत प्रवेश केला. त्यापूर्वी प्रवेश द्वारावरच्या
भिंतीवर कोरलेले २ द्वारपाल आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. जसे
अगदी जय-विजयचं.

गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाला
मनोभावे नमस्कार केला, एक मिठी मारली आणि मनात खूप भाव-भावनाचे तरंग उसंबळून आले.
नाथांच्या “धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला ” या ओळी
नकळतच ओठातून बाहेर आल्या.
मुख्य मंदिराला लागूनच “राम
सिद्धीविनायक” देवस्थान आहे. त्याची संपूर्ण माहिती तेथील एका फलकावर लावलेली आहे.
श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य लंबोदरानंद स्वामी यांनी या मंदिराची स्थापना १८७६
साली केली आहे. मंदिराच्या परिसरात आपल्याला ब्रम्हकुंड, संत मनामाता समाधी मंदिर
इ. चे दर्शन होते. येथील निरव शांतता पाहूनच त्यावेळी संतांनी या स्थानाची तपासाठी
निवड केली असावी. कनकेश्वर परिसरातील थंडगार हवा व दाट वनराई याची कोणाला मोहिनी
पडली नाही तर नवलंच!
येथील व्याघ्रेश्वर या
देव्स्थानावरून कर्नाळा,माणिकगड,सागरगड व खांदेरी-उंदेरी हे दिसतात.
पात्रुदेवीच्या मंदिरापासून खाली गेल्यावर समुद्र व मुंबई दिसते. देवस्थानाविषयी
जी थोडी फार माहिती मिळाली ती अशी की, पुजा व अर्चा उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत
असें. मंदिरासभोवतालाचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे
देवासाठी वापरले जात असें. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदवलेला आहे.
रघुजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्यांकडून १७७६ साली पायथ्याशी असलेले सोगाव हे
गाव सर्व हक्कांसह देवस्थानाला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे
त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी जत्रा.
थोडा वेळ विश्रांती
घेतल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. पाऊले थोडीशी जडचं झाली होती निरोप
घेताना. “शिव हर शंकर नमामि शंकर” चा जयघोष मनात चालू ठेवत आणि एकदा तरी श्रावण
महिन्यात तुझ्या दर्शनाला परत येईन अशी खुणगाठ मनाशी बांधत तिथून तिथून मार्गस्थ
झालो...
कनकेश्वर निसर्गाचा एक अध्यात्मिक अविष्कार
दुपारी 11.30 चा सुमार मी आणि सौ उन्हाने करपलेल्या अवस्थेत मापगावात पोचलो
आणि मग गाडी नीट लावून एकमेकांकडे आणि समोरच्या डोंगरावरच्या पायऱ्यांकडे
डोळे मोठे करून पाहू लागलो. वेळ जरा चुकलीच होती आमची, एक तर पहाटे लवकर न
उठणे हया दुर्गुणापायी ही विचित्र वेळ आमच्यावर आली होती. सकाळी उठायला
उशीर मग भाऊच्या धक्क्यावरून 8 ची लाँच मिळाली पुढे 1.30 तास समुद्रातील
प्रवास, मग रेवस चे सुनसान आणि मोडकळीस आलेले बंदर पाहून उत्साह अजून खोलात
गेला. रेवस हुन मापगाव चोंडी मार्गे 18 किलोमीटर अंतर आहे ते पार केले आणि
गावात पोचलो. मग थोडं थांबऊया का? असं मी विचारल्यावर सौ ने नकार दर्शविला
आणि मग तिचा विश्वास थोडासा घेऊन आम्ही दोघे त्या पायऱ्या चढायला सज्ज
झालो.
पेण हुन अलिबाग कडे जाताना उजवीकडे वडखळ सोडल्यावर एक डोंगररांग दिसायला
लागते. त्यातल्या एका डोंगरावर 2 मनोरे दिसतात तो आहे कनकेश्वर चा डोंगर.
सुमारे 700 पायऱ्या असलेला हा डोंगर चढून जाताना आपल्याला खूप सुंदर निसर्ग
दाखवतो पण तो 12 च्या उन्हात कसा दिसेल हा विचार करत आम्ही चढत होतो.
सारखा दम लागत होता पण देवाचे बोलावणे आले की सगळे फिके पडते, इथे देवाचे
बोलावणे म्हणजे वेगळ्या अर्थाने घ्यावे. तर देवाच्या मनात असले की तो
आपल्याला त्रास होऊ देत नाहीत त्याचा प्रत्यय आम्हाला आला. पायर्यांच्या
बाजूला चांगली सावली आहे त्यामुळे थकवा भरून निघतो आणि त्यात सूर्य
डोक्यावर असताना खांदेरी उंदेरी कडून येणारा सुसाट वाराच आम्हाला वर घेऊन
गेला. प्रत्येक थांब्यावर वारा आम्हाला सुख देत होता आणि आम्ही कधी
कनकेश्वर पर्यंत पोचलो लक्षात आलं ही नाही.




मी साधारण 18 ते 19 वर्षांनी परत येथे आलो तरी तिकडची पुष्करणी, आजूबाजूला
असलेली गर्द झाडी मला पाहून अजून आनंदली कारण तिकडंच वातावरण अतिशय शांत,
मन प्रसन्न करणारं आणि हृदयाला भिडेल असेच होते. गायमांडी (बैठ्या गाईची
मूर्ती) पर्यंत चढ खूप दमछाक करतो पण गायमांडी पाशी पोचलो की स्वर्ग 2 बोटं
दूर असल्याची जाणीव आजूबाजूचा निसर्ग आपल्याला नकळत करून देतो. इथले पाणी
प्यायचे आणि मग 10 ते 15 मिनटं सपाट चाल करून कनकेश्वर देवस्थानची कमान पार
करून मारुतीराया पाशी यायचं. इथला गणेश श्रीराम सिद्धिविनायक असल्यामुळे
ह्या हनुमानाचे नाते त्याच्याशी काही वेगळेच आहे. खूप शांत वाटतं आणि
पक्षांचा किलबिलाट थकवा दूर करतो. इथेच बाजूला अत्यंत सुरेख बांधणीचे
ब्रह्मकुंड आहे ते पाहून एका सुंदर स्थापत्यकलेचा अविष्कार पाहायला मिळतो.
पुढे आलं की पुष्करणी त्या मागे कंकेश्वरचे आखीव रेखीव जुने मंदिर आणि त्या
मागे उंचावलेली गर्द झाडी अजून प्रसन्न करते.
इथून पुढे आलं की काही मोजक्या पायऱ्या चढून आपण श्रीराम सिद्धिविनायक
मंदिराच्या अंगणात येतो तेथून तुमच्या प्रसन्नतेचा कळस घडायला सुरुवात
होते. अत्यंत साधं बांधणीचं मंदिर त्यात अतिशय मोहक आणि देवत्व ठळक पणे
जाणवणारी श्री गणेशाची मूर्त त्याबाजूला श्री लंबोदरानंद स्वामींचं समाधी
मंदिर आणि त्यामागे धर्मशाळा, अंगण, मुदपाकखाना, अंगणात मामाच्या गावाची
आठवण करून देणारी विहीर आणि ह्या सर्वांच्या मागे उंच वाढलेली पायरी
आंब्याची आमराई. हा सगळा देखावा पाहिल्यावर तुम्ही आतून कधी ताजेतवाने होता
हे कळतंच नाही.
दर वर्षी वैशाख पौर्णिमेला श्रीराम सिद्धिविनायक यांचा जन्म दिवस मोठ्या
थाटात पण अतिशय साध्या आणि सुरेख नियोजनात साजरा केला जातो. पाच दिवसांचा
हा आनंद सोहळा सर्वजण भक्तिभावाने आणि मनमुराद आनंद लुटत साजरा करतात.
आम्ही या वर्षी2 दिवस गेलो होतो पण त्या 2 दिवसात जितकं सुख आणि आनंद मनात
भरून घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न केला. दुपारी 1 वाजता पोचलो तेव्हा
पहिली पंगत चालू होती, आणि त्यातले आग्रहाचे शब्द, त्यातून निर्माण होणारा
हस्यकल्लोळ, मग थोडेसे खेचा खेचीचे शब्द यांमुळे दोन घास सहज पोटात जास्त
जातात.
ते सगळं पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही सुद्धा तयार झालो त्या
आग्रहाच्या डोहात मुक्तपणे विहार करायला. पंगत झक्कास झाली,
साजूकतुपातल्या गरमागरम जिलब्या म्हणजे खवैय्यांना पर्वणीच. इथे एक आवर्जून
नमूद करावेसे वाटते की उत्सवातले आचारी आणि सर्व महिलावर्ग तर सुगरण आहेच
पण त्याच बरोबर पुरुष वर्ग सुद्धा तेवढाच मनापासून पदार्थ बनवत असतो
त्यामुळे इथल्या मुडपाकघराला खऱ्या अर्थाने पूर्णब्रम्ह किचन म्हणायला हरकत
नाही. कारण दोन दिवसात जिलेबी, शिरा, बटाटा भजी, मेथांबा, कढीलिंबाची
चटणी, पाण्यात कालवलेले मेतकूट, तिथल्याच झाडाच्या कैऱ्यांचे बनवलेले मस्त
चविष्ट लोणचे, त्या जोडीला आमटी भात, ताक, नाश्त्याला पोहे, साबुदाणा
खिचडी, चहा हे सगळे पदार्थ स्वर्गातून जशी पुष्पवृष्टी होते तसे आमच्या वर
येत होते आणि कोणत्याही 5 स्टार हॉटेल मधे मिळणार नाही इतकं समाधान पोटाला,
मनाला मिळत होतं.
ह्या सर्वांच्या जोडीला पहाटे पासून वेगवेगळे अध्यात्मिक आणि भक्तीने
मुरलेले जिन्नस पदरात पडत होते, ते म्हणजे काकड आरती, मग भजन, दुपारी जेवणा
नंतर धनंजय चितळे यांचे मार्मिकतेची जोड असलेले भगवत गीतेवरचे प्रवचन,
त्या नंतर आरती आणि मग कीर्तन. जन्माच्या दिवशी सकाळी कंकेश्वराच्या चार
द्वारांची पूजा करून म्हणजेच डोंगर चढून येताना लागणारे पालेश्वर द्वार,
मंदिरामागे पश्चिमेला असलेले पात्रुबाई चे द्वार, मंदिराच्या उत्तरेस
असलेले गायमुख द्वार आणि पूर्वेस असलेले व्याघ्रेश्वर द्वार. यांची पूजा
करून जन्मोत्सव सुरू होतो. त्यानंतर कीर्तन त्यात जन्माची गोष्ट मग त्या
वेळेस जन्म त्यात मग एखादा पाळणा ऐकायला येणे म्हणजे मन प्रसन्न होणे बस!!,
जन्माच्या दिवशी रात्री पालखी मग त्याची बातच न्यारी आहे, रात्तभर भजनं,
गौळणी, गजर, अभंग, श्लोक म्हणत म्हणत ती पालखी नाचवणे म्हणजे भक्ती सागरात
मनसोक्त पणे डुंबण्यासारखे आहे. बर ह्याच्या जोडीला चहा आणि हवेतला गारवा
मिळाला की आनंदाला चारचांद लागणारच.
संध्याकाळी गायमुख किंवा पात्रुबाई च्या समोर बसून सूर्यास्त बघणे म्हणजे एक वेगळेच सुख आहे.
तर असा हा अध्यात्मिक आणि नैसर्गिक अविष्काराचा रंग चढलेला हा कनकेश्वर
डोंगर सदैव मनात घर करून रहातो. मुंबईहून फार लांब नसलेला आणि जास्त वेळ न
घेणारा हा कनकेश्वर एकदा तरी पहावाच.
!! श्रीराम सिद्धिविनायक प्रसन्न !!
सुमंत परचुरे.
कसे जाल अलिबागला?
जवळचे
रेल्वे स्टेशन वडखळ व पेण - ३० किलोमीटर. जवळचा विमानतळ मुंबई - १००
किलोमीटर. जवळचे बंदर मांडवा - २० किलोमीटर. अलिबाग येथे साधी ते
पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत. वर्षभर केव्हाही जाता येते.
३५-४० कि.मी. अंतरावर श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर बीचेस आहेत. तेथील मंदिर पण छान आहे.
दिवेआगारला""पाटील मेस / खाणावळ" आहे, छान मिळतं तिथे जेवण. नक्की जेवा त्यांच्याकडे.
राहण्याची ठिकाणांची काही माहिती. फक्त संपर्क क्रमांक आहेत
, ही माहिती मला माझ्या कंपनीतील सहकार्यांकडून मिळाली आहे.
Diveagar Stay
Anand Kelkar: 0214724242
Mauli Resort: 9969383433, 9324485569, 2147225015, 2147225225
Ramesh Awlaskar: 214724707
Suhas Bapat: 21472243777
Uday Bapat: 214724235
-
Panthasta Prangan - Pure VEG - 08087660965, 07588681403
पेण, पनवेल, उरण, घारापुरी...
‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील अष्टागरांची
माहिती घेतली. या भागात घेऊ या पेण आणि पनवेल परिसराची माहिती.
..........
पनवेल,
पेण हा शेतीप्रधान परिसर आहे. या भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर होते.
तसेच मिठागरांसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. या भागात कदंब, मौर्य, सातवाहन,
शिलाहार, यादव, निजाम, मुघल, पोर्तुगीज, मराठे व शेवटी इंग्रज अशा राजवटी
होऊन गेल्या. आगरी आणि कातकरी समाजही या भागात मोठ्या प्रमाणावर आहे.
आचार्य विनोबा भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, रामभाऊ मंडलिक
याच भागातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही यशस्वी मोहिमाही याच भागात
पार पडल्या. उरण, रेवस, पेण, कर्जत, नाणेघाट, जुन्नर, पैठण असा जुना
व्यापारी मार्ग होता. आता या भागात औद्योगिक वसाहती वाढत आहेत. तसेच मोठ्या
प्रमाणावर नागरी वस्ती वाढत आहे. पनवेलसारखी महानगरपालिकाही अस्तित्वात
आली आहे.
पेण : पेण
म्हणजे विश्रांतीचे ठिकाण. बुद्धकाळापासून पेणला जुन्नर-पुणे-नगरपासून माल
येत असे. बंदर म्हणूनही पेण हे मोठे प्रसिद्ध ठिकाण होते. पेणजवळच
अंबानदीची उपनदी असलेल्या भोगवतीच्या काठावर ‘अंतोरे’ नावाचे बंदर आहे. या
बंदरातूनच रेवस खाडीतून व्यापार चाले. पेण हे अलीकडे प्रसिद्ध झाले ते
गणपतीच्या मूर्तींमुळे, तसेच पेणचे पोहे आणि पापडामुळे.
करणाई देवी मंदिर
गणेश
भिकाजी देवधर यांनी येथील मूर्ती उद्योगाचा पाया घातला. ते विजयदुर्गहून
१८८५मध्ये मुंबईला जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकण्यास आले आणि त्यांनी
पेण येथे मोल्ड वापरून मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. नारायण गणेश देवधर
यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यास सुरुवात केली. त्यांना १९४०मध्ये प्रभात
फिल्म कंपनीकडून संत ज्ञानेश्वर चित्रपटासाठी ५०० मुखवट्यांची ऑर्डर
मिळाली. आज अनेक कला केंद्रे पेणमध्ये उभी राहिली आहेत. आज पेणच्या
आसपासच्या भागातील २५ हजार कलाकार मूर्ती करण्याच्या कामात गुंतले आहेत.
साधारण १० ते १५ कोटींची उलाढाल येथे होते. परदेशस्थ महाराष्ट्रीयन येथून
मूर्ती मागवितात.
नुसतेच
गणपती नाही, तर संत मीराबाई, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा
गांधी, श्री साईबाबा, ज्ञानेश्वर, विवेकानंद, अनेक देवदेवता यांच्याही
सुरेख मूर्ती येथे तयार होतात. येथे जवळजवळ ७५ ते ८० प्रकारचे पापड तयार
होतात. पोह्याच्या गिरण्याही येथे आहेत. पानिपतच्या लढाईत वीरगती
मिळालेल्या सदाशिवराव भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई या पेणमधील कोल्हटकर
घराण्यातील होत्या.
वासुदेव बळवंत फडके यांचे घर, शिरढोण
आचार्य
विनोबा भावे यांचे गागोदे हे गावही पेणजवळच आहे. पेण व आसपासच्या भागात
शिलाहारकालीन मंदिरांचे अवशेष आहेत. शहरातील वाकेश्वर (म्हणजेच आताचे
वाकरूळ गाव), दांडेश्वर (रामेश्वर) व व्याघ्रेश्वर, गोटेश्वर, पाचणोलीचे
पाटणेश्वर ही मंदिरे त्या काळातली आहेत. अनेक शिवमंदिरे मलिक कपूर व
निजामशाही सैन्याने वेळोवेळी राजपुरीवर केलेल्या स्वारीच्या वेळी पाडून,
मोडून टाकलेली आहेत.
पेणमध्ये
पूर्वी एक किल्लाही होता. तेथे सध्या एक तहसीलदार कचेरी आहे. शिवाजी
महाराजांचे सैन्य व मुघलांचे तुंबळ युद्ध येथे झाले होते व ही लढाई जिंकली
होती. त्या वेळी सरदार वाघोजी तुपे यांनी मोठी कामगिरी केली होती. त्यात ते
जखमी झाले होते व त्यातच त्यांचा अंत झाला. छत्रपती शिवाजी महाराज येथे
दोन वेळा येऊन गेले होते.
वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा
शिरढोण : आद्य
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे हे जन्मठिकाण. फडके यांचे
क्रांतिकार्य सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांचे राहते घर स्मारक म्हणून जपून
ठेवण्यात आले आहे. फडके लहानपणी बोकडाच्या गाडीतून फिरत असत. ती गाडीही
येथे आहे. मुंबई-गोवा महामार्गावावर पनवेल जवळच हे ठिकाण आहे. जवळच कर्नाळा
पक्षी अभयारण्य आणि कर्नाळा किल्ला आहे.
विक्रम विनायक मंदिर, साळव
विक्रम विनायक मंदिर, साळव : विक्रम
इस्पात कंपनीच्या परिसरात हे सुंदर, देखणे मंदिर एका टेकडीवर आहे. आकर्षक
पद्धतीने चेकर्ड फरश्या वापरून पायऱ्या बांधल्या आहेत. बाजूने सुंदर बगीचा
आहे. बागेत आदित्य बिर्ला यांचा पुतळा आहे. अलिबागपासून २० किलोमीटर
अंतरावर कुंडलिका नदीच्या दक्षिणेस रेवदंडा ब्रिजच्या डाव्या बाजूला हे
ठिकाण आहे.
नागोठणे : हे
गाव पूर्वी अंबा नदीवरील बंदर होते. साधारण सन १९१४पर्यंत गलबते येथपर्यंत
येत असत. धरमतर खाडीमध्ये वाळू भरल्याने अंबा नदी या ठिकाणी जलवाहतुकीसाठी
योग्य राहिली नाही. रिलायन्स उद्योगसमूहाचा खनिजतेल शुद्धीकरण कारखाना व
कारखान्याची सुंदर वसाहत हे येथील आकर्षण आहे. वसाहतीमध्ये शहरापासून दूर
राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी रंगीत कारंजे असलेला सुंदर बगीचा, तसेच
करमणुकीसाठी चित्रपटगृह, खेळांच्या सुविधा, जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज रुग्णालय,
मुलांसाठी नर्सरी, तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा व्यवस्थापनामार्फत चालविली
जाते.
मुसलमान ब्रिज, नागोठणे
मुसलमान ब्रिज, नागोठणे : हा
पूल नागोठणे पूल म्हणूनही ओळखला जातो. हा ऐतिहासिक पूल सन १५८०मध्ये
निजामाचा चौल येथील सरदार अल्लुद्दीन याने बांधला. पोर्तुगीजांबरोबर सामना
करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. ४८० फूट लांब, १९ फूट उंच व नऊ फूट
नऊ इंच रुंदीचा हा पूल ४०० वर्षांचा साक्षीदार आहे. इतिहासप्रेमी
पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.
पनवेल :
मुंबई-पुणे मार्गावरील हे एक महत्त्वाचे ठिकाण. येथूनच गोव्यासाठी हमरस्ता
सुरू होतो. २५ ऑगस्ट १८५२ रोजी स्थापन झालेल्या नगरपालिकेचे सन २०१६मध्ये
महानगरपालिकेत रूपांतर झाले आहे. पनवेल हे कोकण रेल्वेवरील मोठे जंक्शन
आहे. दिल्लीपासून त्रिवेंद्रम, तसेच पुण्यापर्यंत हे रेल्वेमार्गाने
जोडलेले आहे. पनवेल हे आयुर्वेदिक, तसेच अॅलोपॅथी औषधनिर्मितीचे केंद्र
आहे. चिमाजी आप्पांनी खोदलेला वडाळे तलाव, याशिवाय जुनी मंदिरे, अशोक बाग
अशी भेट देण्यासारखी ठिकाणे येथे आहेत. मुंबई अगदी जवळ असल्याने येथून
मुंबईला येऊन-जाऊन काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. नवी मुंबई, ठाणे,
कल्याण, डोंबिवली ही सर्व महानगरे पनवेलजवळ येतात. लवकरच येथे आर्ट गॅलरी
सुरू करण्यात येणार आहे.
कर्नाळा किल्ला
कर्नाळा किल्ला :
किल्ल्यामध्ये दिसून येणाऱ्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा
असे वाटते; मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. किल्ल्याचे क्षेत्रफळ खूपच
लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडक्या स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून आत
शिरल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. समोर एका मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत.
वाड्याच्या जवळ शंकराची पिंड आहे. समोरच सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी
पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा सुळका
प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७मध्ये हा किल्ला घेतला.
कर्नाळा अभयारण्याच्या परिसरातच हा किल्ला आहे. त्यामुळे किल्ला व
अभयारण्य या दोन्ही गोष्टी पाहून होतात. अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या
आकारामुळे याचे वेगळेपण जाणवते. करणाई देवी मंदिर, तटबंदीचे जुने बांधकाम व
थंड पाण्याच्या टाक्या अद्यापही पाहण्यास मिळतात. बोरघाटावर नजर
ठेवण्यासाठी याची निर्मिती झाली. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव
कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. दोन-तीन दिवस किल्ला लढवून अगतिक
झाल्यावरच त्यांनी किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या स्वाधीन केला.
कर्नाळा
कर्नाळा अभयारण्य :
येथे वर्षभरात हंगामाप्रमाणे सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. सुमारे
१२ चौरस किलोमीटर परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. हे अभयारण्य
पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर, पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया व
रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले आहे. या ठिकाणी केव्हाही गेले
तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी पहायला मिळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ,
भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा,
शहाबाज, मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लायकॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल,
पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, शाही ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी
आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इत्यादी प्राणीही
आढळतात. जंगल परिसरात विविध औषधी वनस्पती आहेत. तळातील भागात दिंडा,
वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण, यांचे
प्रमाण जास्त आहे, तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष
आढळतात. कर्नाळा किल्लाही याच परिसरात आहे.
कर्नाळा
न्हावा शेवा बंदर (JNPT)
: न्हावा शेवा हे‘जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) म्हणूनही ओळखले जाते.
मुंबई बंदरावरील बोजा कमी करण्यासाठी, तसेच रेल्वेने मुंबईमधून इतरत्र
वाहतूक करणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याने हा प्रकल्प उभारला गेला. जगातील
अत्याधुनिक बंदरांमध्ये याचा समावेश होतो. न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर
टर्मिनल (एनएसआयसीटी) म्हणून प्रसिद्ध आहे. अरबी समुद्रावरील हे बंदर ठाणे
खाडीतील न्हावा व शेवा या दोन गावांमधील जमिनीत घुसलेल्या समुद्राच्या
पाण्यावर उभे केले आहे. आपल्याला घारापुरी बेटावरूनही हे बंदर दिसते.
कोणत्याही बंदराला भेट देणे खूप आनंददायी असते. बोटीवर कंटेनर चढविले आणि
उतरविले जात असतात, ते काम पाहण्यात खूप मजा येते. अजस्र क्रेन, कंटेनर्स
उचलून बाजूला ठेवणारी अवजड मशिनरी यांचे काम तोंडात बोट घालायला लावते.
बंदराच्या बाहेर कंटेनर वाहतूक करणारे हजारो मोठे ट्रक्स उभे असतात.
उरण : उरण
हे पुरातन शहर आहे. देवी उरणवतीवरून उरण हे नाव पडले. थोरल्या माधवराव
पेशव्यांच्या काळात उरुवन असेही नाव प्रचलित होते. अनेक भारतीय राजवंशांनी
येथे शासन केले आहे. सुरुवातीच्या इतिहासात, मौर्य साम्राज्य, सातवाहन
साम्राज्य, पश्चिमी क्षत्रप, वाकाटक साम्राज्य, चालुक्य आणि यादव यांचा
समावेश होता. १५व्या शतकात पोर्तुगीज व पाठोपाठ इंग्रजही आले. पोर्तुगीज
उरण म्हणत, तर इंग्रज ओरण म्हणत. सतराव्या शतकाच्या अखेरी सरखेल कान्होजी
आंग्रे यांचे आरमारी नेतृत्व उदयास आल्यावर त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रज
यांना हुसकावून लावले. पोर्तुगीज आणि इंग्रज येथून स्थलांतरित झाले.
त्यामुळे पोर्तुगीज वास्तव्याच्या खाणाखुणा दिसून येतात. त्या काळात
बांधलेली चर्च अद्यापही आहेत.
उरणचा कोट : आत्ताच्या
उरणमध्ये कोटनाका आहे. पूर्वी येथे किल्ला होता. पोर्तुगिजांनी येथे
किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. किल्ल्याला भक्कम तटबंदी, दिंडी दरवाजा,
शस्त्रागार, दारूगोळा व दफ्तरखाना ठेवण्यासाठी भक्कम शिबंदी होती. १० मार्च
१७३९ रोजी मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट जिंकल्याचा उल्लेख आहे. सध्या
किल्ल्याची एक भिंत अस्तित्वात आहे.
करंजा बंदर : उरणला
लागूनच दक्षिणेला हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सन १५३४मध्ये पोर्तुगीजांकडे
याचा ताबा आला. रेवस, करंजा, भाऊचा धक्का अशी वाहतूक चालू असायची. मांडवा
बंदरामुळे यावर परिणाम झाला असला, तरी थोडी-फार वाहतूक चालू असते. अवर लेडी
ऑफ चर्चची उभारणीही पोर्तुगीज राजवटीत झाली. तशीच अनेक चर्चेस करंजामध्ये
होती. त्यांचे अवशेषही दिसून येतात.
मोरा बंदर : हे बंदर चंद्रगुप्त मौर्याने वसविले. उरण वसण्यापूर्वी मोरा बंदर होते. मौर्य या शब्दावरून मोरे नाव पडले.
द्रोणागिरी किल्ला
द्रोणागिरी किल्ला : हा
किल्ला उरण शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर आहे. बहुधा यादव काळात याची
उभारणी झाली असावी. उरण आणि करंजाच्या जवळ असल्याने हा किल्ला जुन्या
काळापासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. संपूर्ण टेकडी जंगलाने
झाकलेली आहे. किल्ला देवगिरीच्या यादवच्या राजवटीखाली होता. १५३०मध्ये
पोर्तुगीजांनी किल्ला दुरुस्त केला. १५३५मध्ये फादर एंटोनो-डी-पोर्टोने
येथे तीन चर्चेस बांधली.
त्यानंतर
आदिलशहाने किल्ला जिंकला आणि काही काळ त्याच्या ताब्यात होता. अखेरीस तो
ब्रिटिशांच्या हातात गेला. १० मार्च १७३९ रोजी मानाजी आंग्रे याने या
किल्ल्यासह उरण किल्ला घेतला. किल्ल्यावरील तटबंदीचे अवशेष आढळतात. बहुतेक
इमारती व चर्च अवशेष स्वरूपात आहेत.
पिरवाडी बीच
पिरवाडी बीच : रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील हा सुंदर सागरकिनारा असून, येथून सूर्यास्ताचे सुंदर दर्शन होते.
माणकेश्वर बीच : पिरवाडी बीचच्या उत्तरेला जवळच हा सुंदर सागरकिनारा आहे.
रत्नेश्वरी देवीचे मंदिर
जसखार : उरणजवळ
न्हावा शेवा परिसरात हे ठिकाण असून, येथे रत्नेश्वरी देवीचे सुंदर मंदिर
आहे. उरण तालुक्यातील हे जागृत देवस्थान आहे. हे मंदिर उरण तालुक्यातील
जसखार या गावामध्ये उरण शहरापासून मुख्यत्वेकरून दोन किलोमीटर अंतरावर
स्थित आहे. या मंदिरामध्ये दर वर्षी चैत्रकलाष्टमीला देवीची यात्रा
भरविण्यात येते.
घारापुरी
घारापुरीची लेणी :
ही लेणी उरण तालुक्यात आहेत. परंतु सध्या मुंबईहून गेट वे ऑफ इंडियापासून
प्रवासी बोटी निघतात. त्याला साधारण एक ते दीड तास लागतो; पण पनवेल
भागातूनही हे ठिकाण जवळ आहे. घारापुरी बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या
भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किलोमीटर आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस
किलोमीटर असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. या
गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातील मौर्य वंशाची घारापुरी ही
राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव नि मुघल यांनी तिथे
क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट
पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी
हस्तगत केले. सन १७७४मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापन केले.
१९८७ साली या लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला
गेला.
हत्तीचे शिल्प
घारापुरी
लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते.
त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या
मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. एलिफंटा लेण्यांची निर्मिती इसवी सन ९०० ते
१३००च्या दरम्यान झाली असावी. येथे एक शिलालेख सापडला होता. तो
पोर्तुगीजांनी लिस्बनला पाठवला, तो गहाळ झाला. तो सापडला असता, तर याचा
कालावधी आणि ती कोणी केली याचा मागोवा घेता आला असता. ही शैव लेणी असून,
एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. येथे एकूण पाच लेणी आहेत.
त्यात शिवकथा कोरल्या आहेत.
मुख्य
गुहा अथवा शिवगुंफा भव्य असून, तिला महाकाय गुहा असे म्हणतात, ती ३९. ६३
चौरस मीटर आहे. २७ चौरस मीटरचा मंडप आहे. या लेण्यात भव्य दालन असून,
मध्यभागी एक त्रिमुखी मूर्ती आहे. तीनही मुखे अतिशय सुंदर असून, त्यांच्या
मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या संयुक्त
मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात.
रावणानुग्रह
दुसऱ्या
गुहेमध्ये रावण कैलास पर्वत उचलतो आहे असे दाखविले आहे. शंकराच्या मुकुटात
चंद्रकला आणि मागे प्रभा आहे. त्याच्या मुद्रेवर शांत, निश्चय आणि कपाळावर
तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे. शंकर बावरलेल्या पार्वतीला एका हाताने
आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.
विवाह
मंडल ही तिसरी महत्त्वाची गुंफा. येथे घारापुरीच्या लेण्यांतील
सर्वोत्कृष्ट लेणे आहे. शंकर-पार्वती विवाह यात दाखविला असून, देव-देवता
विवाह समारंभाला उपस्थित राहिले, हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे. इतर
लेण्यांमध्ये मानवती पार्वती, गंगावतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव,
भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात.
शिवपार्वती विवाह
समुद्रात
थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला
लागतात. हे पक्षी फेकलेले अन्नपदार्थ लीलया हवेतच उचलतात. सध्या तरी
मुंबईमार्गे जाणे सोईस्कर आहे; मात्र लवकरच उरण येथून पर्यटकांसाठी व
घारापुरीतील लोकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटसेवेचा प्रस्ताव विचाराधीन
आहे.
(घारापुरी लेण्यांबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
रसेश्वर, रसायनी :
हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स ही भारत सरकारची अंगीकृत कंपनी होती. १९६०
साली सुरू झालेला कारखाना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. रसायनी
वसाहतीमध्ये शंकराचे मंदिर उभारले असून, त्याला ‘रसेश्वर’ असे नाव ज्येष्ठ
साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी दिले.
कसे जाल पनवेल, उरण परिसरात?
पनवेल
हे कोकण रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असून, उत्तर भारतापासून
त्रिवेंद्रमपर्यंत रेल्वेने जोडलेले आहे मुंबई-पुणे मार्गावरील हे प्रमुख
ठिकाण असून, गोव्याला जाण्यासाठी येथूनच महामार्ग सुरू होतो. जवळचा विमानतळ
मुंबई - ३५ किलोमीटर. नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होत आहे.
पनवेलमध्ये चांगली हॉटेल्स व भोजनाची उत्तम सोय आहे. जास्त पावसाचा जुलै
महिना सोडून वर्षभरात कधीही जाण्यास योग्य.
(या भागासाठी नागोठणे शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती माधुरी सोमण यांनी काही माहिती दिली.)
अक्षी बीच :
हे मच्छिमारांचे गाव आहे. काही लोक शांतताप्रिय असतात आणि त्यांना
सागरकिनारी आनंद घ्यायचा असतो. अशा लोकांसाठी अक्षी बीच हा एक पर्याय आहे.
नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमीवरील सुंदर, शांत आणि स्वच्छ किनारा पाहणे
ही एक सुखद गोष्ट आहे. अनेक सागरी पक्षी येथे पाहण्यास मिळतात. सीगल्स,
बार-टेल्ड गॉडविट, डनलिन, टर्न्स आणि प्लेव्हर्स या किनाऱ्यावरील बऱ्याच
पक्ष्यांच्या प्रजाती येथे हंगामाप्रमाणे पाहता येतात. नागाव बीचकडे
जातानाच अक्षी गाव लागते. अक्षी गावात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच
उजव्या हाताला सोमेश्वर महादेव मंदिर आहे. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच हे
मंदिरसुद्धा कौलारू आहे. मंदिराचे सभागृह प्रशस्त असून प्रवेशद्वाराजवळ
नंदीची मूर्ती आहे. तसेच सभामंडपातील लाकडी खांबांवर बारीक कोरीवकाम केले
आहे.
अक्षी शिलालेख
‘अक्षी’
गावाची ओळख इ. स. १०व्या शतकापासून आहे. येथे पहिला देवनागरी शिलालेख
सापडला आहे. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं. गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे तो
मराठीतील पहिला शिलालेख आहे. त्यावर शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ असा स्पष्ट
उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई
याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने
देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख
संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ
ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत. खाली शापवाणीचे चित्र कोरले आहे.
अक्षी अलिबागपासून सुमारे पाच किलोमीटर दूर आहे.
रेवदंडा :
चौल आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. रेवदंडा या गावाला पाच किलोमीटर लांबीची
तटबंदी आहे. त्यात हे गाव सामावले आहे. रेवदंडा हे पौराणिक व ऐतिहासिक
ठिकाण आहे. महाभारतात रेवतीक्षेत्र म्हणून ओळखले जायचे, असे सांगितले जाते.
रेवती हे नाव श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या पत्नीच्या नावावरून पडले
असे सांगितले जाते. या गावाचे सागरी महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी येथे
किल्ला बांधायचे ठरविले. त्यानुसार सन १५२८मध्ये पोर्तुगीज कप्तान सोज याने
हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्याअगोदर १५१६मध्ये पोर्तुगीजांनी
कारखान्यासाठी एक इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी
१५२१ ते १५२४च्या दरम्यान बांधली गेली.
रेवदंडा किल्ला
कुंडलिका
नदीच्या खाडीच्या मुखावर ही अतिशय मोक्याची जागा पोर्तुगीजांनी काबीज
केली. या ठिकाणापासून खाडीमार्गाने कोलाडपर्यंत जाता येत असल्याने संभाजी
महाराजांच्या वेळी मराठ्यांनीही या ठिकाणी हल्ला केला होता; पण तो यशस्वी
झाला आंही. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी
साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. या
किल्ल्यावर पूर्वी पोर्तुगीज आरमाराचा रखवालदा नावाचा सात मजली मीनार होता
त्यापैकी चार शिल्लक आहेत.
रेवदंडा बीच
किल्ल्याच्या
प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. या मनोऱ्याच्या
पायथ्याशी तोफा पडलेल्या दिसून येतात. चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची
जोती शिल्लक आहेत. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पुढे तीन
मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. किल्ल्याच्या तटाखालून भुयारे आहेत; पण सध्या
ती बंद केली आहेत. किल्ल्याच्या तटबंदीला लागूनच रेवदंडा बीच आहे.
चौल रामेश्वर मंदिर
चौल : चौल
आणि रेवदंडा ही जोडगावे आहेत. या गावाचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे.
हे सातवाहन काळातील बंदर होते. या दोन्ही स्थळांची पौराणिक नावे
चंपावती-रेवती! चंपक म्हणजे चाफा. चौल चंपावती म्हणून ओळखले जायचे. आजही
येथे चाफ्याची झाडे दाखविली जातात; पण काहींच्या मते येथे चंपा नावाची मासे
पकडण्याची जाळी वापरली जातात, म्हणून चंपा ही ओळख, तर काहींच्या मते चंपा
नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. या पौराणिक नावांशिवाय चेमूल,
तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल,
चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख
आलेला आहे. एवढी नावे असलेले हे कदाचित एकमात्र गाव असावे. चौल
नारळी-पोफळीच्या झाडीत दडलेले अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. अलीकडील
इतिहासाप्रमाणे सन १५१६मध्ये अहमदनगरच्या राजा बुरहान याने पोर्तुगीजांना
येथे एक कारखाना तयार करण्यास आणि बंदर बांधण्यास परवानगी दिली. येथे घोडे
आयात करून ठेवले जात व त्यांचा व्यापारही होत असे.
नागाव बीच
पुण्याच्या
डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये
वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि यातून हे प्राचीन बंदर उजेडात
आले. या उत्खननामध्ये त्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत,
सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी,
मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ
‘अम्फेरा’ आणि असे बरेच काही आढळून आले. चौलमध्ये जुने कोकणी पद्धतीचे
रामेश्वर मंदिर आहे. नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव पुष्करिणी येथे आहे. मूळ
मंदिराची निर्मिती कधी, कोणी केली याची माहिती मिळत नाही; पण मराठेशाहीत
नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या
मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख आढळतात. येथे एकवीरा भगवती देवीचे
मंदिर असून, या मंदिराच्या गर्भागृहाच्या दरवाज्यावरील तुळईवर या
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम शके १६७६मध्ये (इसवी सन १७५२) केल्याचा एक
संस्कृत लेख आहे. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राइन सी’ या
आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलसमोरच
खदायीपलीकडे कोर्लईचा किल्ला आहे. येथून जंजिराही जवळ आहे.
कर्जत, पनवेल, माथेरान परिसर...
लुईझा पॉइंट, माथेरान
‘करू या देशाटन’ सदराच्या
गेल्या भागात आपण रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल परिसरातील पर्यटनस्थळे
पाहिली. आजच्या भागात पाहू या कर्जत, खोपोली परिसरातील सह्याद्रीच्या
खांद्यावर असणारी निसर्गरम्य ठिकाणे व माथेरानसारखे प्रदूषणमुक्त
गिरिस्थान...
.....
दोन
हजार वर्षांपूर्वी या डोंगराळ भागात बौद्ध साधकांनी चिंतनासाठी शांत परिसर
निवडला. त्यांच्या पाऊलखुणा अद्यापही येथे दिसून येतात. कडेकपारीत जंगलात
दडलेले किल्ले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे रक्षण करीत होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ही ठिकाणे क्रांतिकारकांना आश्रय देत होती. आज
निसर्गप्रेमींची, जास्त करून पदभ्रमण करणाऱ्यांची पावले येथे आपोआप वळतातच.
या भागावर शिलाहार, त्यानंतर यादव, निजाम, मुघल, मराठे आणि शेवटी
इंग्रजांची राजवट होती. पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा रेल्वेमार्ग व
हमरस्ता याचा भागातून जातो. रेल्वेने जाताना डोळ्यांचे पारणे फिटविणारा
खंडाळा घाट, अर्थातच अवघड बोरघाट याच भागातून जातो. याचे वर्णन करणारी माधव
जूलियन यांची कविता आठवते. ‘कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी.’
माथेरान :
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि
पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली
जागा म्हणजे माथेरान. इ. स. १८५०मध्ये या जागेचा शोध त्या वेळच्या ठाणे
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यू पोएन्टेज मॅलेट यांनी घेतला. मुंबईचे
तत्कालीन राज्यपाल लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी भविष्यातील हिल स्टेशन म्हणून
याचा पाया घातला. मॅलेट याला ट्रेकिंगची आवड होती. त्याने चौक गावातून हा
डोंगर पाहिला व त्याकडे तो आकर्षित झाला आणि गावाच्या पाटलाला घेऊन तो
डोंगर चढून गेला. वनट्री हिल पॉइंटवरून तो वर आला. त्याला हे ठिकाण खूप
आवडले. तो परत येथे आला, त्याने येथे छोटे घरही बांधले. त्याच्याबरोबर आणखी
इंग्रज अधिकारी आले व त्यांनीही घरे बांधली आणि माथेरान अस्तित्वात आले.
माथ्यावरील
जंगल म्हणून माथेरान हे नाव रूढ झाले. पूर्वी पावसाळ्यात सहसा इकडे कोणी
येत नसे. आता पावसाळ्यातही पर्यटक येत असतात. मधुचंद्रासाठी नवपरिणित
जोडपीही पायी निसर्गसान्निध्यात फिरण्यासाठी माथेरानला पसंती देतात.
माथेरानच्या जंगलात १५० प्रकारचे वृक्ष आढळतात. विविध जातीच्या, तसेच औषधी
वनस्पतीही येथे आहेत. पर्जन्यमानाला अनुकूल असणारी जांभूळ, हिरडा, बेहडा,
खैर, पांढरीची झाडे येथे दिसतात. या जंगलाचा फायदा म्हणजे कुठल्याही
पॉइंटवर जाताना सावली मिळते व उन्हाचा कधीही त्रास होत नाही.
साधारण
२६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. माथेरानमध्ये चालत किंवा
घोड्यावरूनच फिरावे लागते. कोणत्याही यांत्रिक वाहनाला येथे परवानगी नाही.
संपूर्ण पर्यावरणपूरक असे वातावरण येथे जपण्यात आले आहे. फक्त रेल्वे गावात
येते. गाड्या गावाच्या बाहेरच दोन किलोमीटर दूर उभ्या कराव्या लागतात.

नेरळ-माथेरान रेल्वे :
ही आबालवृद्धांची आवडती रेल्वे आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१
किलोमीटर अंतर सुमारे दोन तास २० मिनिटांमध्ये पार करताना एक विलक्षण आनंद
मिळतो. सह्याद्रीच्या डोंगरातील वळणे, बोगदे ही छोटी गाडी पार करत असताना
वेगळाच अनुभव येतो. इ. स. १९०१मध्ये ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध
उद्योगपती सर आदमजी पीरभॉय यांनी १६ लाख रुपये खर्च करून ही रेल्वे
बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय याने
१९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले. आता ती भारतीय
रेल्वेखात्याच्या अखत्यारीत आहे.
माथेरानमधील पर्यटनस्थळे :
शार्लोट लेक
शार्लोट लेक : माथेरानला
पाणीपुरवठा करणारा हा तलाव ब्रिटिश राजवटीतच बांधला गेला. पावसाळ्यात
पडणाऱ्या प्रचंड पावसाचे पाणी अडवून हा तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव
गर्द हिरव्या झाडीत असल्याने याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तलावाच्या
जवळच माथेरान-इको पॉइंट आणि लुईसा पॉइंट आहेत. पावसाळ्यात तलाव भरून वाहू
लागल्यावर धबधबा वाहू लागतो. त्याचा आवाज आसमंतात घुमत असतो. पर्यटक हे
पावसाळी सौंदर्य टिपण्यासाठी येथे येतात.
पॅनोरमा पॉइंट :
हा पॉइंट सूर्योदय पाहण्यासाठी असला, तरी सूर्यास्तही येथून चांगला दिसतो.
येथून पूर्, पश्चिम बाजूचे विहंगम दृश्य दिसते. पूर्वेला खालच्या बाजूस
नेरळ, तर पश्चिमेला गाडेश्वर तलाव आणि पनवेलपर्यंतचा परिसर दिसतो.
पश्चिमेला हाजीमलंगपासून सुरू झालेली डोंगररांग, चंदेरी, पेब अशी
एकामागोमाग पॅनोरमाला येऊन मिळते. पूर्वेकडे नेरळ, तसेच सिद्धगडापासून
भीमाशंकर ते खंडाळ्यापर्यंतचा भाग दिसू शकतो. पहाटे सहाच्या आधी पॅनोरमावर
पोहोचल्यास सूर्योदय बघायला मिळतो. पॅनोरमा मार्केटपासून सर्वांत लांब
म्हणजे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे.
दस्तुरी अथवा माउंटबेरी पॉइंट :
माथेरानच्या बाहेर जिथे गाड्या उभ्या करतात, तेथेच प्रवेशद्वारापाशी हा
पॉइंट आहे. या पॉइंटच्या पुढे माथेरान पाहण्यासाठी पायी किंवा घोड्यावरून
जावे लागते.
वन ट्री हिल पॉइंट :
चौक पॉइंट जवळच वन ट्री हिल पॉइंट आहे. येथूनच कलेक्टर मॅलेट पहिल्यांदा
माथेरानला आला. इथूनही खाली चौक गाव दिसते. येथील समोर दिसणारा सुळका मुख्य
डोंगरापासून अलग झालेला आहे. याच सुळक्यावर बरीच वर्षे एकच झाड होते.
म्हणून त्याला वन ट्री हिल पॉइंट म्हणतात. हा सुळका म्हणजेच वन ट्री हिल
पॉइंट.
एको पॉइंट : लुईझा
पॉइंट ते शार्लोट लेकच्या वाटेवर एको पॉइंट आहे. याच्या समोर असलेल्या
प्रचंड कातळी भिंतीमुळे आवाज केल्यास प्रतिध्वनी (echo) ऐकू येतो. त्यामुळे
हा एको पॉइंट. अनेक जण प्रतिध्वनींची मजा लुटण्यासाठी फटाकेसुद्धा घेऊन
येतात.
सनसेट पॉइंट किंवा पॉर्क्युपॉइन पॉइंट :
येथून समोर गर्द झाडीत असलेला प्रबळगड दिसतो. समोरचे जंगल खूपच विलोभनीय
आहे. प्रबळगडाच्या मुख्य पठाराला लागून एक छोटासा सुळका आहे. या
सुळक्याच्या आणि पठाराच्या खिंडीतच बहुतेक वेळा सूर्यास्त होतो.
लुईझा पॉइंट :
इथूनही समोर प्रबळगडाचा देखावा दिसतो. मार्केटपासून सोडेतीन किलोमीटर
अंतरावर हा पॉइंट आहे. लुईझाखेरीज चिनॉय, रुस्तुमजी, मलंग, हनिमून या
छोट्या-मोठ्या पॉइंट्सवरून सारखेच दृश्य दिसते. लुईझा ते शार्लोट लेकच्या
वाटेवर एको, एडवर्ड, किंग जॉर्ज हे पॉइंट लागतात.
इतर पॉइंट : चौक
पॉइंट, गार्बट पॉइंट, रामबाग पॉइंट, अलेक्झांडर पॉइंट, माधवजी पॉइंट, मंकी
पॉइंट, हार्ट पॉइंट, मालडुंगा पॉइंट, चिनॉय पॉइंट, रुस्तुमजी पॉइंट, मलंग
पॉइंट, एडवर्ड पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लिटल चौक पॉइंट. गाइड घेतला तरच
माथेरान दर्शन व्यवस्थित होते. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत.
दस्तुरी पॉइंटला लागूनच एमटीडीसीची रेस्ट हाउसेस आहेत. यांचे बुकिंग
मुंबईच्या कार्यालयातून होते. इतर हॉटेल्सदेखील बरीच आहेत. चौकशी केल्यास
काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. त्याचे दर बरेच कमी आहेत.
पेब (विकटगड) : नेरळपासून
पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पायथ्याच्या असलेल्या
पेबी देवीवरून पेब हे नाव पडले असावे. हा किल्ला चढताना लागणारे जंगल घनदाट
आहे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असेदेखील नाव आहे. ट्रेकर्ससाठी हे ठिकाण
महत्त्वाचे आहे. किल्ल्यावर घरे आहेत. त्याचा वापर छत्रपती शिवाजी
महाराजांच्या काळात धान्य कोठारांसाठी केला होता, असा स्पष्ट ऐतिहासिक
संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो. पेबच्या वाटेवरच एक धबधबा आहे.
किल्ल्यावरील गुहेसमोरून पावसाळ्यात सुंदर देखावा दिसतो. गुहेसमोरून
आपल्याला नवरा-नवरी, भटोबा असे सुळके दिसतात. या गडावर कोणत्याही ऋतूत जाता
येते. समर्थ रामदासस्वामींचे शिष्य येथे राहत असत. किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराजवळ दोन दरवाजे अवशेष स्वरूपात आहेत. तसेच इमारतींचे अवशेष व
पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक बुरुज आहे. एक दत्तमंदिर व
हनुमानाची मूर्ती येथे पाहायला मिळते.
भिवगड/भीमगड :
महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत, की इतिहासाने त्यांची दखल घेतली नाही.
त्यापैकीच भिवगड/भीमगड; मात्र ट्रेकिंगच्या सरावातून याची ओळख
गिरिभ्रमणाची आवड असलेल्यांना झाली. पुणे-मुंबईहून एका दिवसात करता
येण्यासारखा एकदम सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भीमगड. ढाक आणि भिवगड एकाच
वेळी करता येते. गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ फक्त चार एकर आहे.
कर्जतजवळील वदप व गौरकामत गावामागे छोट्याशा टेकडीवर हा किल्ला आहे.
‘ढाक’ला जाण्याचा मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत
पोहोचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘ढाक’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट
भिवगडावर जाते. पावसाळ्यात येथे एक धबधबा पाहता येतो. किल्ल्यावर फक्त
पाण्याची छोटी टाकी आहेत. भिवगडावर जाताना खोदून काढलेल्या पायऱ्याही दिसून
येतात.
चंदेरी किल्ला :
बदलापूर-कर्जत मार्गावर माथेरान डोंगररांगेतच २३०० फूट उंचीवर हा किल्ला
आहे. हे ट्रेकर्सचे आवडते ठिकाण समजले जाते. घनदाट जंगलातून वर गेल्यावर
कातळाचा भला मोठा सुळका दिसतो. किल्ल्यावर एक गुहा आणि तटबंदीचे अवशेष
आढळतात. सुळक्यावरून पूर्वेला माथेरान, पेब डोंगररांग दिसते. पश्चिमेला
भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला दृष्टीस पडतो. येथून
परिसराचे विलोभनीय विहंगम दर्शन होते. किल्ल्याचा परिसर पावसाळ्यात अधिकच
रमणीय दिसतो. येथे जवळ असणारा धबधबाही मनमोहक आहे. धबधब्याचा आस्वाद
घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.
ढाकचा बहिरी किल्ला :
हे ठिकाण कर्जत तालुक्यात असले, तरी पुण्याहून लोणावळामार्गे व मुंबईहून
कर्जतजवळील वदपमार्गे येता येते. लोणावळ्याच्या जवळ असलेल्या राजमाची
किल्ल्याजवळच हे ठिकाण आहे. घनदाट जंगलात ढाकचा बहिरी दडून बसला आहे. याची
फारशी ओळखही कोणाला नाही; पण धाडसी ट्रेकर्सना हा किल्ला आव्हान देत असतो.
ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असलेल्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे
म्हणतात. याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. गिर्यारोहणाचे साहित्य व
गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे
धोक्याचे आहे. ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. बहिरीची गुहा (तीन गुहांचा
समूह) आणि ढाकचा किल्ला. गुहेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत, तर एका गुहेत
शेंदूर फासलेला दगड आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पांथस्थांसाठी टाकीजवळ
भांडी ठेवली आहेत. भोजन झाल्यावर ती भांडी साफ करून तेथेच ठेवायची असतात.
अशी व्यवस्था करणारे गावकरी दुसरीकडे कोठेही नसावेत. १५०० फूट उंचीची
कातळाची खडी भिंत आहे.
इरशाळगड
किल्ले पन्हाळघर :
रायगडाकडे जाणाऱ्या वाटेवर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असावा.
किल्ल्याला फारसा इतिहास नाही. ४५० फूट उंचीच्या लहान डोंगरावर हा किल्ला
आहे. रायगडच्या संरक्षक शृंखलेतील हा एक किल्ला आहे. पुण्याचे इतिहास
संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. गडावर
तटबंदी शिल्लक नाही. तसेच काही इमारतींचे अवशेष दिसून येतात.
इरशाळगड
इरशाळगड :
याला किल्ला म्हणण्यापेक्षा शिखर म्हटले तर वावगे ठरणार नाही. ३७०० फूट
उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील समजला जातो. इतिहासातही किल्ल्याचा
फारसा उल्लेख नाही. मे १६६६मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी-रायरीपर्यंतचा
सारा मुलूख घेतला. तेव्हा त्यात हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला
असावा. गडावरील माचीपासून गडावर जाताना वाटेतच पाण्याचे एक टाके लागते. अशी
अनेक टाकी बघण्यास मिळतात. समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड,
कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो. हा ट्रेकर्सचा मानबिंदू आहे.
ट्रेकर्सच्या दृष्टीने हा अत्यंत कठीण समजला जातो. गिर्यारोहणाचे साहित्य व
गिर्यारोहण तंत्राची माहिती आणि गाइड असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे
धोक्याचे आहे. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दुःखद घटना घडली.
कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दुःखद अंत झाला. त्याच्या
स्मरणार्थ दर वर्षी २६ जानेवारीला मुंबई-ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
कोंडाणे
कोंडाणे बौद्धलेणी :
इ. स. पूर्व २०० म्हणजे २२०० वर्षांपूर्वीची ही लेणी म्हणजे भारताच्या
गौरवशाली कला व विचार परंपरेच्या साक्षीदार आहेत. कातळात काढलेली लेणी व
त्यामधील कोरीव काम थक्क करणारे आहे. सन १८३०मध्ये विष्णू शास्त्री यांनी
ही लेणी प्रथम पाहिली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश
जिल्हाधिकारी मिस्टर लॉ यांनी येथे भेट दिली. बौद्ध साधकांना चिंतनासाठी
अशी निर्जन स्थळी निर्माण केलेली अनेक लेणी महाराष्ट्रात आहेत. साधारण
सातवाहन राजवटीत यांची निर्मिती झाली. पुरातन बोरघाटमार्गे जाणाऱ्या
मार्गावरच ही लेणी आहेत. जंगलाने वेढलेली ही लेणी निसर्गाचे लेणे अंगावर
घेतल्यासारखी दिसतात.
यासाठी
कोंदिवडे गावापासून साधारण दीड तासाचा ट्रेक करावा लागतो. साधारण अर्ध्या
वाटेवर एक सुंदर धबधबा तुमचे स्वागत करतो. त्यानंतर आपण लेण्याजवळ आल्यावरच
गुंफा दिसतात. निसर्ग आणि मानवी कला यांचा अप्रतिम संगम आपल्या नजरेसमोर
येतो.
कोंडाणे
बुद्धलेण्यांमध्ये एकूण आठ विहार आणि चैत्यगृहे आहेत. यामधील विहार हे
सर्वांत जुने आहेत. ही लेणी इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत.
कोंडाणे लेणी ही भाजे व पितळखोरा या लेण्यांच्या समकालीन लेणी आहेत.
सातवाहन राजाच्या काळात या लेण्यांची निर्मिती झाली असावी, असे
इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. येथे असलेल्या शिलालेखात पुढीलप्रमाणे उल्लेख
आहे. ‘कण्हस अंतेवासींना बलकेन कतं’ असा ब्राह्मी लिपीत हा उल्लेख आहे.
याचा अर्थ कन्हशिष्य बलक याने हे लेणे निर्माण केले.
चैत्यगृह
चैत्यगृह : या
लेण्यातील जे चैत्यगृह आहे, त्याच्या दर्शनी भागावरील वातायान हे
पिंपळपानाच्या आकारात असून, छत हे गजपृष्ठाकार आहे. या चैत्यगृहाची लांबी
२२ मीटर असून, ते आठ मीटर रुंद व ८.५ मीटर उंच आहे. स्तूपाचा परीघ हा २.९
मीटर आहे. सध्या स्तूप क्षतिग्रस्त अवस्थेत आहे. जवळपास दोन हजार वर्षे
जुनी सागवान लाकडाची कमान आजही आपणास पाहायला मिळते. चैत्याला स्तंभाचे वलय
होते. यातील स्तंभ अष्टकोनी असून, स्तंभावर चिन्हे अंकित आहेत. आज ते
भग्नावस्थेत पडलेले आहेत. चैत्याच्या दर्शनी भागावर वेदिका पट्ट्यांचे
नक्षीकाम आहे. तसेच छज्जे आपणास पाहायला मिळतात. सुंदर असे युगलपटदेखील
येथे आहेत. या युगलपटातील पुरुष हे योद्धे असावेत. कारण त्यांच्या हातात
शस्त्रे पाहायला मिळतात. त्याच्या खाली वेदिका पट्टी व चैत्य कमानीचे शिल्प
प्रत्येक छज्जावर कोरलेले दिसते.
चैत्यगृहाच्या
अगदी डाव्या बाजूला भग्नावस्थेतील यक्षमूर्ती दिसते. त्या मूर्तीच्या
डोक्यावरील फेट्यावरील नक्षीकाम पाहून त्या वेळच्या कलावैभवाची प्रचिती
येते.
विहार व्हरांडा
विहार : चैत्यगृहाच्या
बाजूला एक विहार आहे. हा विहार आयताकृती असून, याचा दर्शनी भाग कोसळला
आहे. आतमध्ये प्रत्येक बाजूस सहा असे एकूण अठरा भिक्षू निवास आहेत. भिक्षू
निवासाच्या दरवाजावर चैत्य गवाक्ष कोरलेले आहेत. त्याशिवाय दरवाजे
असल्याच्या खुणादेखील आहेत. संभामंडप ११ मीटर लांब आहे, तर ९.५ मीटर रुंद
आहे. छतावर असलेल्या अवशेषांवरून या ठिकाणी १५ स्तंभांची मांडणी असावी असे
निदर्शनास येते.
छताला
रंगकाम असल्याचे अवशेष पाहायला मिळतात. सभागृहाच्या बाहेरच्या भागात
भिंतीला चैत्यकमानीप्रमाणे पिंपळाच्या पानाच्या कमानीत अर्ध-उठावदार स्तूप
कोरलेला आहे. वेदिका पट्टीचे नक्षीकाम आहे. तसेच याच विहाराच्या समोरील
भागावर एक शिलालेख कोरलेला आहे, जो सहज लक्षात येत नाही. अस्तित्वात
असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांचा सुयोग्य पद्धतीने वापर केलेला असून, त्या
वेळच्या जलव्यवस्थापन कौशल्याची चुणूकही येथे दिसते. ‘जेथे लेणी तेथे पाणी’
याची प्रचिती येथे येते. बौद्ध लेण्यातील पाण्याचे टाके वर्षभर भरलेले
असते. यामधील पाणी हे अतिशय थंडगार आणि शुद्ध असून पिण्यासाठी योग्य मानले
जाते. येथे मधमाश्यांची पोळी असल्याने सुगंधी द्रव्ये मारून जाणे टाळावे.
शिवाय कोणत्याही सुगंधी वस्तू सोबत घेऊ नयेत. तसेच पोळ्यांना धक्का लागेल
असे काहीही करू नये.
मुंबईमार्गे
व पुणेमार्गे कर्जत या रेल्वे स्थानकात उतरून कर्जत येथील मुख्य
रस्त्यावर, ब्रिजवर कोंढाणे लेण्याकडे जाण्यासाठी खासगी वाहने असतात. (अधिक
माहितीसाठी
http://abcprindia.blogspot.com/)
कोथलीगड
कोथलीगड :
हा पेठकिल्ला म्हणूनही ओळखला जातो. नेरळच्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि
कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ला आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी मोठी गुहा आहे. गुहेमधून दगडातून कोरून काढलेला एक
जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी
नरसाळ्याच्या आकाराचे बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड असे
म्हणतात. कर्जत-मुरबाड रस्त्यावर कर्जतच्या पूर्वेसच हा किल्ला आहे. या
छोटेखानी किल्ल्यावर शिवकाळामध्ये शस्त्रागार होते. तसेच याचा उपयोग
टेहळणीसाठीही होत असावा. येथील निसर्गसौंदर्य ट्रेकर्सना मोहात टाकते. येथे
कातळाचे शिखर व गुहापण आहे.
कोथळीगड
आंबिवली बौद्धगुंफा : कोथळीगडाच्या
पायथ्यातच आंबिवली बौद्धगुंफा आहेत. येथे पाण्याच्या टाक्या, १२ विहार
आहेत. ब्राह्मी लिपीतील एक शिलालेखही आहे. ही लेणी कोथळीगडाबरोबरच बघता
येतात. आवर्जून बघावीत अशी ही लेणी आहेत.
आंबिवली
कोथळीगड
प्रबळगड :
पनवेलच्या पूर्वेस खालापूर तालुक्यात हा किल्ला आहे. माथेरानच्या पश्चिमेस
समुद्रसपाटीपासून २३२५ फूट उंचीवर हा किल्ला आहे. मुघलांकडून हा किल्ला
ताब्यात घेतल्यावर खजिना मिळाला असे म्हणतात. सन १८१८मध्ये येथील तटबंदी व
बुरुज ढासळले आहेत. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी काही काळ येथे आश्रय
घेतला होता. किल्ल्यावर काही इमारतींचे जोते आढळून येते.
कसे जाल कर्जत परिसरात?
कर्जत,
पनवेल ही शहरे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत. जवळचा विमानतळ मुंबई.
राहण्यासाठी माथेरान, पनवेल, डोंबिवली येथे व्यवस्था होऊ शकते. माथेरान
सोडले तर बहुतेक ठिकाणी ट्रेकर्सना तेथील गावात किंवा किल्ल्यावरील देवळात
गुहेमध्ये मुक्काम करता येतो. अतिपावसाचा जुलै महिना सोडून कधीही जावे.
अर्थात यातील काही ठिकाणे दुर्गम आहेत. आपले वय आणि तब्येत या गोष्टी
लक्षात घेऊन नियोजन करावे.
बल्लाळेश्वर, वरदविनायक, बौद्धलेणी आणि बरेच काही...
‘करू या देशाटन’ सदराच्या
गेल्या भागात रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरापर्यंतचा भाग
पाहिला. या भागात जाऊ या थोडे उत्तरेकडे... सह्याद्रीच्या पायथ्याच्या
कडेने....
............
रायगड
जिल्ह्याच्या उत्तरेकडचा भागही निसर्गसमृद्ध आहे. अष्टविनायकापैकी पाली
आणि महड ही तमाम गणेश भक्तांची आवडती श्रद्धास्थाने या भागात आहेत. दोन
हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देणारी ठाणाळे खडसांबळेसारखी अनेक
बौद्धलेणीही याच परिसरात आहेत. सह्याद्रीवरून कोसळणारे धबधबे या भागाचे
सौंदर्य खुलवत असतात. जांभळे, करवंदांसारखा रानमेवा, विपुल वन्यजीवसंपदा या
भागात आहे.
श्री बल्लाळेश्वर
पालीचा श्री बल्लाळेश्वर : अष्टविनायकातला
हा एकच असा गणपती आहे, की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) ओळखला जातो.
बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. पालीचा गणपती हा अष्टविनायकांच्या
परिक्रमेतील आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. हे
स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. सूर्य उगवतो, तेव्हा त्याची
किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन तलाव
आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. गणेशाचे कपाळ
विशाल असून, डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा
असून, ती चिमाजीअप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील
सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा
नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून
जवळच उन्हेरे येथील गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
ठाणाळे व खडसांबळे ही बौद्ध लेणीही याच परिसरात आहेत. नाना फडणवीस यांनी या
लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.
श्री बल्लाळेश्वर मंदिर
पौराणिक
कथेनुसार, विश्वामित्र ऋषींनी भीमराजास, भृगू ऋषींनी सोमकांत राजास श्री
बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे. जाजलीने विभांडक ऋषींना श्री
बल्लाळविनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख मुद्गल पुराणात आहे. कृत युगात
येथे पल्लीपूर नावाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नावाचा वैश्यवाणी राहत
असे. या कुटुंबात बल्लाळ नावाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणापासूनच
ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ
भक्तिमार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे. म्हणून
कल्याणशेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला
बांधून ठेवले. नंतर बल्लाळने ‘घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन’
अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने
विप्र रूपात प्रकट होऊन बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला.
बल्लाळाने विनायकाला विनंती केली, की आपण येथे कायमचे वास्तव्य करून
भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देऊन श्री गजाननाची
स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील
शिळेमध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
पाली
खोपोलीपासून ३८ किलोमीटर अंतरावर आहे, तर पुण्यापासून १११ किलोमीटर
अंतरावर आहे. खोपोली-पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर
पनवेल-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीला रस्ता जातो. पाली हे
सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे.
उन्हेरे येथील गरम पाण्याचे कुंड
उन्हेरे : पालीच्या
जवळच नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड आहे. उन्हेरे या गावाजवळील या
गंधकमिश्रित पाण्याच्या कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार
बरे होतात, असे म्हणतात. येथे तीन कुंडे आहेत. त्यापैकी एकातील पाणी खूपच
गरम असते. इतर दोन कुंडातील पाणी सौम्य आहे. त्यामध्ये स्नान करता येते. एक
कुंड स्त्रियांसाठी, तर एक पुरुषांसाठी आहे. या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व
काळात मो. कृ. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. तसेच
बापूसाहेब लिमये यांनी महायुद्धात सरकारला मदत करू नये असे आवाहन
केल्यामुळे त्यांना शिक्षाही झाली होती.
उद्धर रामेश्वर :
रावणाने जटायूशी युद्ध करून ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले व श्रीरामांनी
ज्या ठिकाणी जटायूचा उद्धार केला ते ‘उद्धर’स्थान अशी लोकांची श्रद्धा आहे.
रामेश्वर येथे श्री शंकराचे स्वयंभू स्थान असून, येथे अस्थी विसर्जनाचे
कुंड आहे. येथूनच जवळ रामेश्वर वैभव हे थंड हवेचे ठिकाण आहे. (पाली येथून
१४ किलोमीटर)
नेणवली/खडसांबळे लेणी : नेणवली
लेण्यांनाच खडसांबळे लेणी असेही म्हणतात. खडसांबळे लेणी नेणवली गावात
असल्याने त्यांना नेणवली लेणी असे म्हटले गेले पाहिजे. परंतु ब्रिटिश
अभ्यासक खडसांबळे गावातून आल्यामुळे त्यांनी त्याला ते नाव दिले असावे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ही बौद्ध लेणी पालीजवळच आहेत. चौल बंदरावरून
नागोठणे खाडीमार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर ही लेणी
आहेत. यांचा शोध रेव्हरंड अॅबटने १८८९ साली लावला. हेन्री कझेन्स यानेही या
लेण्यांचे वर्णन केले आहे. ही लेणी इसवी सनाच्या पूर्वी दुसऱ्या शतकात
कोरलेली असावीत. या काळात सातवाहन राजवट असल्याने त्यांचीच ही निर्मिती
असावी असे मानले जाते. ही लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणूनही समजली
जातात. इ. स. पूर्व २०० त इ. स. ५००पर्यंत यांची कामे चालली असावीत. या
लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके
हे स्वातंत्र्यसेनानी याच लेण्यांत इंग्रजांपासून लपून राहिले होते. याचा
अर्थ ही लेणी त्या काळात इंग्रजांना सापडलीच नाहीत, इतक्या अवघड ठिकाणी
आहेत.
खडसांबळे लेणी
येथे
३० ते ४८ इतक्या मोठ्या संख्येने लेणी असावीत, असा संशोधकांचा कयास आहे.
लेणी किती होती याबाबतीत अनेक मते आहेत. ही सर्व लेणी एकाच दगडात कोरलेली
आहेत. हा दगड थोडा ठिसूळ असल्याने लेणी क्षतिग्रस्त झाली आहेत. लेण्यांच्या
मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला १७ भिक्खूंची निवासस्थाने आहेत. आज ती भग्न
असली, तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम होते. डोंगरातून येणारा
पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारी
योजना आजच्या घडीलाही आश्चर्यकारक आहे. अशा अनेक तांत्रिक गोष्टी
अभ्यासकांना माहिती करून घेता येतील.
साधारण
क्रमांक १ ते ९ या लेण्यांमध्ये बरीच पडझड झालेली दिसून येते. एक-दोन
ठिकाणी स्तूपांचे अवशेष दिसून येतात. लेण्यांच्या दर्शनी भागात लाकडाचे काम
असावे. कारण तशा पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात.
बरीच
लेणी नष्ट झालेली आहेत, भग्नावस्थेत आहेत. बऱ्याच लेण्यांच्या पुढील
दर्शनी भाग नष्ट झालेले असून, छताचा भाग तेवढाच राहिलेला आहे. लेण्यांच्या
एका ठिकाणी दोन स्तूपांचे अवशेष सापडतात. भिख्खूंच्या अस्थी ठेवून त्यावर
ते स्तूप कोरलेले असावेत असे दिसते. लेणे क्रमांक आठ भव्य असून,
प्रांगणातून तीन पायऱ्या चढून समोर असणाऱ्या दीर्घिकेत दालनाच्या उजव्या
बाजूस एक अंतर्दालन आहे व मध्यभागी एक खोली आहे. बाह्यदालनाच्या बाजूस
असणाऱ्या भिंतीच्या बाजूला प्रशस्त असे शयन ओटे आहेत. खोल्यांची रचना बघता
हे लेणे राहण्यासाठी असल्यासारखे वाटते. या लेण्यात एकूण पाच ओटे आहेत.
त्यामुळे येथे किमान पाच भिख्खूंची झोपण्यासाठीची व्यवस्था असावी.
नऊ
क्रमांच्या लेण्यात छत शिल्लक असून, मागच्या खोलीत व मागच्या भिंतीच्या
बाजूला ओटे शिल्लक आहेत. दहावे लेणे हे विहार लेणे आहे. याला सभागृह किंवा
मोठे चैत्यगृह म्हणता येईल. महाराष्ट्रातील मोठ्या आयताकृती आकाराच्या
चैत्यगृहात याचा समावेश होतो. या लेण्यांच्या स्तूपाच्या बाजूला एकूण १७
खोल्या आहेत. येथील स्तूप इतर लेण्यांप्रमाणे आपल्याला मध्यभागी दिसत नाही.
तो एका कोपऱ्यात दिसतो. त्याच्या बाजूलाच ११ ते २१ क्रमांकाची लेणी आहेत.
तीही भग्नावस्थेत आणि पावसाच्या पाण्यासोबत आलेल्या मातीने भरलेली आहेत.
कड्याच्या पलीकडेही अनेक लेण्यांचा समूह आहे. कडा तुटल्यामुळे त्याचे
विभाजन झालेले आहे. तिकडेही विहार संघाराम, तसेच शून्यगृह आहेत. ऐसपैस अशी
जागा असणारी, कातळात कोरलेली ही लेणी आहेत.
(अधिक माहिती http://abcprindia.blogspot.com/ येथे मिळू शकेल.)
ठाणाळे/नाडसूर लेणी
ठाणाळे /नाडसूर लेणी :
पालीच्या गणपतीजवळ एका निसर्गरम्य ठिकाणी ही बौद्ध लेणी आहेत. तैलबैला ते
मांदाड या जुन्या व्यापारी मार्गावर वाघजाई घाटावर ठाणाळे लेणी वसली आहेत.
सह्याद्रीच्या पश्चिम उतरंडीवर ही लेणी एक हजार फूट उंचीवर आहेत. ठाणाळे
गावापासून लेण्यांपर्यंत पायवाट आहे. सोबत वाटाड्या हवाच. हा लेणीसमूह
सर्वप्रथम मराठी मिशन, मुंबई यांनी इ. स. १८९०मधील जानेवारी महिन्यात जाऊन
पाहिला आणि सुप्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स यांच्या संशोधक
नजरेसमोर आणला. इ. स १८९०मध्ये कझिन्सने ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.
स. १८११मध्ये त्याने ‘Caves at Nadasur and Kharasamla’ ही पुस्तिका
प्रकाशित केली.
ठाणाळे स्तूप
ठाणाळे नाडसूर लेणी
खडसांबळे
लेणीसमूहापासून ही लेणी अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहेत. पावसाळ्यात तर
येथील वातावरण आणि निसर्ग मोहून टाकणारा असतो. डोंगरावरून झेपावणारे प्रपात
तुमची नजर खिळवून ठेवतात. वेगवेगळ्या हंगामात फुलणारी फुले, जांभळे आणि
करवंदांसारखा मेवा येथे उपलब्ध असतो. ठाणाळे येथील लेणीसमूहातील सर्व लेणी
पश्चिमभिमुख आहेत. येथे २३ लेण्यांचा समूह असून, पॉलिग्राफिक परीक्षणानुसार
इसवी सनापूर्वी ५० ते सत्तर दशकात ही लेणी निर्माण केली असावीत. निवासी
गुंफा आणि एक चैत्यविहार आहे. पूर्णावस्थेत नसलेल्या चैत्यविहाराच्या छतावर
अप्रतिम नक्षीकाम केलेले दिसून येते. हेन्री कझिन्स यांनी या गुंफांचे
वर्णन लिहून ठेवले आहे. गुंफा क्रमांक सात सर्व गुंफांमध्ये सर्वांत सुंदर
आहे. गुहेच्या संपूर्ण भिंतीमध्ये पुरुष, स्त्रिया आणि प्राणी यांच्या
आकृतीसह सजावट केली आहे. येथे दोन उल्लेखनीय शिलालेख आहेत. त्यावर
दात्यांची नावे दर्शविली आहेत.
ठाणाळे लेणी
 |
ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
|
दोन-चार आठवडे, आमचा ठाणाळे लेणी करायचा विचार चालला होता. पण वेळेला
दुसराच
ट्रेक ठरवल्यामुळे होत नव्हता. शेवटी प्रणव आणि मी १ जुलैचा रविवारी करायचा
ठरवले. ह्या वेळी आमच्या सोबत हेमेश आणी त्याची बायको स्वप्ना होती.
विकिपीडियावर सांगितल्याप्रमाणे ठाणाळे लेणी ह्या २३ बुधलेणींचा समुदाय असून, पहिल्या शतकातील आहे.
थोडक्यात प्रवासबद्दल
- मुंबई वरून खोपोलीला ट्रेन ने पोहचावे.
- खोपोली ते पाली एसटी पकडावी, त्या गाडीने पेडली गावात उतरावे
- खोपोली ते पेडली अंतर २९ किमी आहे. एसटीने प्रत्येकी ४५ रुपये तिकीट आहे.
- पेडली ते ठाणाळे साठी रिक्षा करावी (किंवा शेअर रिक्षा हि असाव्यात पण ती भरेपर्यत वाट पहावी लागेल.)
-
पेडली
ते ठाणाळे ६.५ किमी अंतर आहे, त्यासाठी आम्ही रिक्षाला १५० रुपये भाडे दिले.
प्रवासाचे वर्णन:
ठाणाळे
लेणी रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील ठाणाळे गावात आहे. पण
ठाणाळे गावात जाण्यासाठी तुम्हाला एसटीने पेडली गावात उतरायला लागते. एकंदर
इथपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट ने प्रवास वेळेत करणे, खूप मोठ काम आहे. त्यासाठी
आम्हला सकाळी ८ ची कर्जत-खोपोली ट्रेन कर्जत वरून पकडायची होती. ती ट्रेन
पकडण्यासाठी, मी सकाळी ५..२० ची सीएसमटी-कर्जत धीमी लोकल ५. ३२ ला करीरोड
वरून पकडली. हि ट्रेन कर्जतला बरोबर ७. ४०ला वेळेत पोहचली. बाकी माझे मित्र मला डोंबीवलीला भेटले.
जास्त करून कर्जतला मुबईवरून आलेली लोकल ज्या स्थानकावर लागते, त्याच
स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला खोपोली ट्रेन लागलेली असते. आम्ही ८. २५
ला खोपोलीला पोहचलो. खोपोली रेल्वे स्थानकाबाहेर हॉटेल मध्ये नाश्ता करून,
आम्ही पालीसाठी एसटी बघायला गेलो.
खोपोलीला
२ ठिकाणाहून एसटी सुटतात. एक मुख्य एसटी आगर आहे, जिथून बाहेरगावी जाणाऱ्या
एसटी येतात. हे मुख्य आगार खोपोली स्थानकातून अंदाजे ३ किमी वर आहे. तर
दुसरं रेल्वे स्थानकापासून चालत ५ मिनटाचा अंतरावर महामार्गावर आहे. येथे
नगरपरिषदेच्या गाड्या सुटण्यासाठी वेगळा आगार आहे आणि त्याचा समोर रस्त्या
पलीकडे. पाली व इत्यादी जवळपासच्या गावात जाण्यासाठी जाणाऱ्या एसटी सुटतात.
आम्ही नाश्ता करून, ह्या स्थानकात
पोहचेपर्यंत नऊ वाजले होते. त्यामुळे आमची पाली एसटी गेली होती. बहुतेक ती
एसटी ८ किंवा ८. ३० ची होती. आणि आता दुसरी गाडी ९. ४५/ १०. ४५ होती.
त्यासाठी आम्ही मुख्य आगार मध्ये जाऊन एसटी बघायचा ठरवल. आम्ही रिक्षा करून
तिथे पोहचलो. तिथून सकाळी ९ .४५ची मुंबई- पाली एसटी होती, आम्ही त्या एस्टीने जायचा ठरवलं. गाडी वेळेत आली पण सुठेपर्यंत १० वाजले.
खोपोली ते पेडली
२९ किमीचा
अंतर
पाऊण तासात पोहचलो. पेडलीला पोहचे पर्यंत
१०. ५०
झाले. पेडली पासून
पुढे
पाली अजून ११ किमी आहे.
खोपोली ते पेडली पर्यंत शेअर गाडीने प्रवास कसा करावा.
खोपोली वरून तुम्ही शेअर गाडीने सुद्धा पाली
किंवा पेडली पर्यंत जाऊ शकता. पण पाली किंवा पेडली पर्यंत थेट गाडी
नाही.त्यासाठी तुम्हाला खोपोली वरून परळी गावात जायला लागते. नंतर परळी
वरून पालीला जाण्यासाठी शेअर गाडी असतात, त्याने पेडली गावात उतरायला
लागेल. परळी वरून मृगगडला सुद्धा जातात.
तसच तुम्ही परतीचा प्रवास करू शकतात. पेडली गावातून तुम्हाला पाली, खोपोली, कर्जत आणि पनवेल ला जाण्यासाठी वेळेत एसटी आहेत.
पेडली ते ठाणाळे
गाव अंतर ७ किमी आहे. पेडलीतून आता आम्हाला ठाणाळे साठी एसटी नव्हती. बहुतेक
ठाणाळे गावातून वाया करत जाणारी ठराविक एक ते दोन एसटी असाव्यात. ठाणाळे गावात जाणाऱ्या रस्त्याला
तशी पण जास्त रहदारी दिसली नाही. त्यामुळे आम्ही पेडली वरून एकवेळेच १५०
रुपये भाडे देऊन रिक्षा केली. येते वेळी पण आम्ही त्याच रिक्षावाल्याला फोन
करून बोलवून घेतले. बहुतेक ठाणाळे किंवा त्याचा पुढच्या गावात जाण्यासाठी
शेअर रिक्षा असाव्यात. कारण आमची हि शेअर रिक्षाची ६ आसनी होती. पण आम्हाला
उशीर होत असल्यामुळे आम्ही जास्त विचारपूस न करता. भाड्यावर रिक्षा ठरवली.
जर तुम्ही ७ ते ८ जण असाल, तर तुम्हाला परवडेल.
पेडलीवरून ठाणाळे गावात पोहचायला १५ मिनटं लागली.
ठाणाळे
लेणीसाठी वाट गावाचा मागून जाते. त्यासाठी आपल्याला गावामध्ये जाऊन
विचारायला लागते. अन्यथा वाट मिळणे मुश्किल आहे. आम्ही ११. १५ ला ट्रेकला
सुरुवात केली.
ठाणाळे गाव ते ठाणाळे लेणी पर्यंतच्या वाटेचं वर्णन:
गावातल्याने
दोन घराचा मागुन जायायला सांगितले. त्या घराचा पाठी गेल्यावर, एक पाय वाट
जंगलात जात होती. आम्ही त्यावाटेने चालू लागलो. पाच मिनटात आम्ही एका लहान
मोकळ्या जागेत पोहचलो. तिथून ठाणाळे लेणी आणि डोंगर दिसतो. इथून एक वाट
डावीकडे खाली उतरताना दिसते, तर दुसरी उजवीकडे जंगलात जाताना दिसते.
उजवीकडची वाट लेणीकडे जाते. उजवीकडील वाटेने पुढे चालू लागल्यावर, वाटेत
मध्ये मध्ये वाट दर्शवण्यासाठी दगडावर बाणाचे चिन्ह केलेले दिसतात.
त्यामुळे तुम्ही न चुकता लेणीपर्यंत पोहचू शकता. जास्त करून वाट जंगलातून
जात असल्यामुळे काही ठिकाणी वाट चुकू शकतात, त्यामुळे बाण पहात जावे.
जंगलात मच्छरचा त्रास खूप होतो. वाटेत आपल्याला ३ ओढे पार करायला लागतात.
त्यात तिसरा ओढा शेवटच्या टप्प्यात येतो. ह्या ओढ्या ओलांडून ५ मिनटात
लेणीजवळ
पोहचतो.
लेणी बद्दल
लेणीपर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला १ वाजला. मला लेणी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे, लेणीबद्दल वर्णन केलेले नाही.
लेणी
एका ओळीत असल्यामुळे, ओळीतच बघून होतात. त्यात मध्ये एक लेणी रुंदीला
सगळ्यात मोठी लागते. त्याचा बाजूचाच कातळात एक मोठा स्तुपा आहे . स्तूपाचा
थोडा अजून पुढे, एक लेणीजवळ मोठा कातळ तुटून पडलेला दिसत्तो. पण त्या
कातळाच्या बाजूने एक वाट पुढे जाताना दिसते. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला
अजून ३ लेणी दिसतात. ह्या शेवटच्या लेणी, ह्याच्या पुढे लेणी नाहीत पण
इथून एक वाट
पुढे
जाताना दिसते. ह्या वाटेने पुढे गेलो असता लेणीच्या वरती पठारावर जाता
येते.
पण हि वाट कडेने जात असल्यामुळे, जपून जायला लागते.
हि वाट खाली कुठे तरी उतरताना दिसते. त्यामुळे तेथे खाली न जाता वर
पठाराकडे जावे. जिथून आम्ही वर चढलो, तिथे आम्हाला एका दगडावर लेणीच्या
दिशेने बाण केल्याचे दिसले. त्यामुळे हि वाट नक्की कुठून येते किंवा कोणी
ह्या वाटेने येतात कि नाही, ते कळलं नाही.
लेणीच्या पठारावरून दिसणारे अप्रतिम दृश्य:
साधारण
१० मिनटात आम्ही पठारावर पोहचलो. पण पठारावरून दिसणारे दृश्य सुंदरच होते.
पाऊस किव्हा पावसाचे ढग हि नसल्यामुळे. आम्हाला पठारावरून डावीकडे सुधागड
दिसत होता, तर समोर थोडा उजवीकडे सरसगड दिसत होता. तर उजवीकडे खालील ठाणाळे
गाव. आणि खाली पूर्ण हिरवागार जंगल दिसत होता. तर पाठी मुख्य डोंगर आणि त्यामधली घळ दिसते. ठाणाळे गावातून जेव्हा आपल्याला
ह्या लेणी दिसतात, तेव्हा हा एकच डोंगरा वाटतो. पण लेणीचा डोंगर आणि मुख्य डोंगर मध्ये एक घळ
लागते. त्यामुळे लेणीचा डोंगर मुळ डोंगराची सोंड वाटते.
पठारावरून
वाट वर डोंगरात जाताना दिसते. पण ह्या वाटेने बहुतेक गड माथ्यावर जाता येत
नाही. कारण आम्ही जेव्हा पठारावर पोहचलो. तेव्हा खालील गावातील काही तरुण
वर असलेल्या धबधब्यावरुन परताना,आम्हाला भेटले. आम्ही त्यांना विचारले
असता, त्यांनी हि वाट फक्त धबधब्यावर जाते सांगितले.
लेणी
मधून तुम्हाला सुधागड आणि सरसगड दिसत नाही. पठारावरून आम्ही सरळ परतीची
वाट पकडली. उतरतेवेळी १ तासात आम्ही गावात पोहचलो. ह्या ट्रेकला
आम्हाला प्रत्येकी ३०० रुपये खर्च आला.
ठाणाळे लेणी ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
 |
गावातून वर आल्यावर दिसणारा ठाणाळे लेणीचा डोंगर |
 |
ठाणाळे लेणीच्या पठारावरून दिसणारे दृश्य |
 |
पठारावरून पुन्हा परत लेणीकडे जाताना काढलेला वाटेचा फोटो
|
सरसगड :
पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी तीन ते चार
तास लागतात. गिरीदुर्ग प्रकारातील सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा
किल्ला अशा विविध नावांनी तो ओळखला जातो. सरसगड इ. स. १३४६मध्ये मलिक अहमद
(निजामशाहीचा संस्थापक) याने ताब्यात घेतला. म्हणजे हा किल्ला त्याअगोदर
अस्तित्वात होता. बहुधा कोकणातील इतर किल्ल्यांप्रमाणे शिलाहार राजवटीत
याचे बांधकाम झाले असावे (याला संदर्भ नाही.); मात्र शिवाजी महाराजांच्या
ताब्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदांना सुधागड व सरसगडाची
सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडाच्या देखभालीसाठी पाच हजार
होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची
व्यवस्था होती. सरसगडाची देखभाल १९४८ सालापर्यंत भोर संस्थानाकडे होती. .
या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या
संपूर्ण परिसराची टेहळणी करता येते.
सरसगड
संस्थाने
खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली.
किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. प्रवेशद्वाराची संरक्षणात्मक
रचना थक्क करणारी आहे. दरवाज्याच्या आत इंग्रजी ’एल’ आकाराची देवडी
बांधलेली आहे. हे दार बंद केले, तर या बाजूने शत्रू काय मुंगीसुद्धा आत येऊ
शकणार नाही अशी याची रचना आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तुंग कातळाच्या
भिंतीजवळ एक सुळका आहे. या सुळक्याच्या पायथ्याशी अनेक गुहा, तळटाकी असून,
त्यात भरपूर पाणी आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही
नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन
बुरुज आहेत. या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो.
समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पाली गाव,
अंबा नदी, उन्हेऱ्याची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व
परिसर येथून दिसतो. किल्ला ट्रेकर्ससाठी हे आवडीचे ठिकाण आहे.
सुधागड
सुधागड : पालीच्या
जवळचाच हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, याची उंची ५९० मीटर आहे.
पूर्वी हा गड भोरपगड म्हणूनही ओळखला जायचा. छत्रपती शिवरायांच्या
पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. इ. स. १६४८ साली मालवजी नाईक
कारके, सरदार मालोजी भोसले, जाधव आणि सरनाईक या शिवाजी महाराजांच्या
शूरवीरांनी किल्ला ताब्यात घेतला. शिवरायांनी या गडाचे सुधागड असे नामकरण
केले. हा किल्ला भोर संस्थानाच्या अखत्यारीत होता. गडाच्या पायथ्याशी
असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर
मुलगा अकबर याची भेट झाली होती. राजधानीसाठी याही गडाचा विचार शिवरायांनी
केला होता, असे सांगितले जाते.
महाराजांच्या
अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस,
त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ, आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद
पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजीराजांनी सुधागड परिसरात असणाऱ्या परली
गावात हत्तीच्या पायी दिले. गडावर पाण्याचे अनेक तलाव आहेत. किल्ल्यावर
पंतसचिवांचा वाडा आहे, तसेच भोरेश्वराचे मंदिर व भोराई देवीचे मंदिर आहे.
भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस सुबक नक्षीकाम असलेल्या समाध्या
आहेत. येथील जंगलात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात. भोराई देवीच्या
मंदिराजवळ पुढे पाण्याची टाकी आहेत. टाक्यांच्या डावीकडे पुढे गेल्यावर चोर
दरवाजा होता. तो आता अस्तित्वात नाही.
वरदविनायक
पाच्छापूर
दरवाज्यातून गडावर गेल्यास थोडे चढल्यावर माणूस एका पठारावर पोहोचतो.
पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर, तसेच धान्याची कोठारे, टाके,
हवालदार तळे व हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी आहे. गडावर
रायगडच्या टकमक टोकासारखे टोक असून, येथून घनगड, कोरीगड, तैलबैला व अंबा
नदीच्या खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रायगडावरील टकमक टोकासारखेच येथेही
टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर अंबा नदी व नदीच्या आजूबाजूची गावे
दिसतात.
वरदविनायक मंदिर
महडचा वरदविनायक :
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. सन १७२५मध्ये
सुभेदार रामजी महादेव बिवलर यांनी हे मंदिर बांधले. हे स्वयंभू स्थान असून
त्याला मठ असेही म्हणतात. हे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व
त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा
सांगितली जाते. एका भक्ताला त्याच्या स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात
मूर्ती पडली आहे असे दिसले. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती
मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी
महिरप असून, गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
कसे जाल पाली परिसरात?
मुंबई-गोवा
महामार्गावर वाकण येथे उतरून पालीपर्यंत जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन -
नागोठणे. जवळचा विमानतळ मुंबई - १२५ किलोमीटर. मुंबई-पुणे रस्त्यावरून
खोपोली गाव ओलांडल्यावर डावीकडे पालीपर्यंत रस्ता आहे. पाली येथे राहण्याची
व भोजनाची उत्तम सोय आहे. येथे भरपूर हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा जुलै महिना
सोडून कधीही जावे.
..........
या
भागात बौद्ध गुंफा/लेणी असल्यामुळे सुमारे १८०० वर्षांचा इतिहास आहे. या
भागाने सातवाहन, शिलाहार, यादव, निजाम, विजापूरचे आदिलशहा, त्यानंतर मराठे व
अखेरीस इंग्रज अशा राजवटी पाहिल्या. आदिलशहाच्या काळात बाणकोटपासून
महाडपर्यंत जलवाहतूक होती. बाणकोट, महाड, वरंधा, शिरवळ, पंढरपूर, विजापूर
हा तत्कालीन राजमार्ग होता. महाड परिसराचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीची
उतरण. अतिशय दुर्गम भागाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उपयोग
करून घेतला आणि निसर्गाबरोबर इतिहासाचा वारसाही आपल्याला दिला आहे. दुर्गम
भागात असलेले गडकोट आणि त्यातील कपारीतून फिरताना जो आनंद मिळतो तो वेगळाच
असतो. पोलादपूरपासून महाडपर्यंत या भागाने सह्याद्रीचा जणू मुकुटच धारण
केला आहे. पोलादपूरच्या आंबेनळी घाटापासून ताम्हिणी घाटापर्यंत निसर्गाने
मुक्त उधळण केली आहे.
घळीच्या
वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या
सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत. या
ठिकाणी पावसाळ्यात जाणे अविस्मरणीय ठरते.
वाघजाईसमोरचा
एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा दिसतो. पावसाळ्यात त्याच्या
चारही अंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. वाघजाईच्या पुढे लगेच एका
खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच
कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला. या गडावर वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये
नऊ टाकी आहेत. दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष
दिसतात. इतिहासात फारशा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून
वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. ब्रिटिशांनी इ. स.
१८५७मध्ये पक्का रस्ता तयार केला. उताराच्या शेवटी कोकणातील माझेरी, वरंध
आणि बिरवाडी ही गावे येतात.
येथे
चवदार, वीरेश्वर व हापूस ही तीन तळी आहेत. वीरेश्वर हे येथील प्रमुख मंदिर
आहे. महाड खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे
सत्याग्रहामुळे सर्वश्रुत झाले. १९२४ साली झालेल्या कुलाबा डिस्ट्रिक्ट
डिप्रेस्ड क्लास मिशनच्या सभेत रामचंद्र मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची
भेट घेऊन चवदार तळ्याबद्दलची स्थिती कथन केली. तळे सर्वांना खुले व्हावे,
यासाठी सत्याग्रह हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याची सर्वांचीच खात्री पटली.
सत्याग्रहात महाड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरबानाना टिपणीस, जी. एन.
सहस्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण समाजाचे सुधारक, ए. व्ही चित्रे हे
सीकेपी समाजसुधारक आणि त्यांचे अनुयायी सामील झाले. २० मार्च १९२७ रोजी
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची सुरुवात झाली. एक सार्वजनिक सभा घेऊन
सुरबानाना टिपणीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्व
सार्वजनिक ठिकाणे आणि तळी अस्पृश्यांसाठी खुली करण्यात येत असल्याचे जाहीर
केले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चेकऱ्यांसह चवदार तळ्याकडे चालण्यास
सुरुवात केली.
त्यांच्यापाठोपाठ
त्यांचे अनुयायी चालू लागले व लवकरच हा जमाव चवदार तळ्यावर पोहचला. चवदार
तळ्याच्या पायऱ्या उतरून डॉ. आंबेडकर पुढे सरसावले आणि आपल्या ओंजळीत पाणी
घेऊन ते पाणी सावकाश प्यायले व सत्याग्रहाची सांगता झाली. या प्रसंगाचे एक
शिल्पही येथे बसविण्यात आले आहे. या तलावाला चार बाजूने दारे होती. म्हणून
त्याला चौदार तळे असेही म्हणत.
पहिल्या
समूहातील लेणी क्रमांक १, ३, ४, ५, ६ यामध्ये भिक्खू निवास असावा. सध्या ते
मातीने पूर्ण भरलेले असून, त्यामधील शिलालेखही अस्पष्ट झाले आहेत. या सर्व
लेण्यांमध्ये कोरीव आसने आहेत. त्यांचा वापर ध्यानधारणा करण्यासाठी केला
जात असावा. नंतरच्या काळात वाटसरू मुक्कामासाठी याचा वापर करीत.
लेणे
क्रमांक चारमध्ये पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘अघासकस गमिकियसा सिवदतस
लेणे’ याचा अर्थ अघासकस गावातील उपासक सिवदत्त याने या लेण्यांचे दान
दिलेले आहे.
लेणे
क्रमांक पाचच्या प्रवेशद्वारावर पुढीलप्रमाणे शिलालेख आहे : ‘भद्र उपासकस
दुहुतूयसिरिय सिवदतस बितीया काय लेन देय धम्म’ याचा अर्थ - भद्र उपासकाची
कन्या व सिवदत्त याची पत्नी धम्म सिरी हिने धम्मदान केलेली लेणी. सिवदत्त व
त्याच्या बायकोने ही दोन लेणी दान केलेली आहेत.
कोल
बौद्ध लेण्यांचा दुसरा गट गावात शिरताच समोरच आहे. या समूहामध्ये तीन लेणी
आहेत. कोल येथील सर्व लेण्यांची पुरातत्त्व विभागाने दखल घेऊन संरक्षित
करण्याची आवश्यकता आहे. या लेण्यांची निसर्गामुळे होणारी हानी थांबविणे
आवश्यक आहे. नाही तर १८०० वर्षांपूर्वीचा हा ठेवा नष्ट होण्याची शक्यता
आहे. गावातील काही जाणकार लोकांच्या सहाय्याने लेणी संशोधक मुकेश जाधव,
प्रशांत माळी, रवींद्र मीनाक्षी मनोहर (धम्मलिपी अभ्यासक) या लेण्यांच्या
संवर्धनाचा, तसेच याची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महाड
हे तालुक्याचे ठिकाण असून, मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण
आहे. महाड रेल्वे व महामार्गाने मुंबईशी, तसेच ताम्हिणी/वरंधा घाटाने
पुण्याशी, तसेच आंबेनळी घाटाने महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूरशी जोडलेले
आहे. जवळचा विमानतळ मुंबई १२५ किलोमीटर, पुणे १३५ किलोमीटर. महाड येथे
राहण्याची, जेवाणाची सोय होऊ शकते.