आपल्याकडे तीर्थे म्हटल की कथा दंतकथा ह्या आल्याच. त्या स्थळाचा महिमा,
दिव्यत्वाची प्रचीती, अनुभवही आले. अत्याचार आणि धर्मांधतेच्या जखमा घेऊन
आजही काळाच्या लाटेवर आपल अस्तीत्व टिकवुन असणरी तीर्थस्थळे ही भारतात अनेक
आहेत.
अशाच एका तीर्थक्षेत्राचा परामर्श आपण घेणार आहोत ज्याने परक्या राजवटींचा वनवासही भोगला आणि स्वातंत्र्य संग्रामातल्या एका सत्याग्रहाचे, तो सत्याग्रह चिरडताना झालेल्या अत्याचाराचे साक्षीही राहीले.
पनवेल पासुन २२ किमी आणि उरणपासुन १६ किमी अंतरावर ऐतिहासिक चिरनेर गाव आहे. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या, या गावात प्रवेश करत जसजसे आत जातो, तशी मुंबईच्या गल्ली बोळांची आठवण नक्की होते. वाटेत कुंभारवाडा लागतो. मातीची मडकी, तवी, मातीचे तवे ( पहिल्यांदाच पाहिले)
बहुतेक कुंभाराच्या घरांबाहेर असा साज मांडलेला दिसतो. हे सार पाहत
रस्त्याने जाताना एक तलाव ओलांडुन पुढे गेलो की काही घरांच्या गल्लीमधुन
आपण थेट गावातल्या शाळेपुढे निघतो. इथे गावातला मुख्य रस्ता लागतो. या
रस्त्याने थेट मंदिरापर्यंत गाडीने जाता येते. याच मंदिरात नांदतो आहे या
गावाचा महागणपती गावाच आराध्य दैवत.
गणरायाच मंदिर अगदी गावाच्या ह्रदयात वसले आहे.
मंदिराचा आता जिर्णोद्धार झाला असला. तरी मुळ गाभारा पेशवेकालीन बांधकामाची साक्ष देतो, मंदिरासमोरच तळे आहे.
तस हे मंदिर प्राचीन असावे, परचक्र आल्यावर अनेक देवस्थळांची धुळधाण झाली. या विघ्नहर्त्यालाही इथल्या तळ्यात लपून रहावे लागले. किती काळ तळ्यातला आज्ञातवासात होता कुणास ठाऊक. पण मराठेशाहीचा डंका त्रिखंडात निनादू लागला आणि या गणरायाला अज्ञातवासाच्या इतश्रीचे वेध लागले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दित सरदार रामजी महादेव फडके यांना गणरायाने तळ्यात असल्याचा दृष्टांत दिला. त्यानुसार फडकेंनी तळ्यातल्या आज्ञातवासातून गणरायाला बाहेर काढले. त्याची स्थापना केली, मंदिर बांधले. तळ्यात गणरायाची
मुर्ती सापडली म्हणून ते तळे देवाचे तळे म्हणून ओळखले जाऊ लागले. हाच
गणराया भक्ताना प्रचिती देणारा चिरनेरचा आराध्य दैवत बनला. हा जसा
मराठेशाहीच्या वैभवात नांदला ना, तसा पारतंत्र्यात ब्रिटिशांंच्या जूलूमाचा
साक्षीही राहीला.
ब्रिटीश राजवटीतील काळ ब्रिटिशांनी वन संपत्ती वर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांवर जंगल बंदी लादली. लाकूड फाटा, फळे, गवत, वनऔषधी गोळा करण्यावर बंदी घालण्यात आली. गुरे जंगलात चरायला नेण्यासही मज्जाव करण्यात आला. याचा परीणाम म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आणि देशभरातून जंगल सत्याग्रहाची हाक उठली. 25 सप्टेंबर 1930 रोजी ठाणे व रायगड जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेर आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या सत्याग्रहाची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे इन्स्पेक्टर रामचंद्र दौलत पाटील यांच्या हाताखाली अलिबागचे २२ संगिनधारी पोलीस तसेच पनवेलवरून २० पोलीसांचे पथक सत्याग्रह रोखण्यासाठी आणले होते.
चिरनेरचे वैद्य अंताजी महादेव पोवळे हे सत्याग्रहात अग्रणी होते. सत्याग्रहींचे नेते भाई गुप्ते शांततेच्या मार्गाने सत्याग्रह पार पाडायचा आहे असे सांगत होते. सत्याग्रहींनी "जंगल आमच्या हक्काचे" अशा घोषणा देत इंग्रजांचे आदेश झुगारून गायी म्हशी जंगलात चरण्यासाठी नेण्याचा आणि झाडे तोडण्याचा निर्धार केला. आक्का देवीच्या माळरानावर अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींवर सरकारी हुकुमावरून पोलीसांनी गोळीबार केला. यात काही स्थानिक हुतात्मा झाले.
त्या हुतात्म्यांची नावे :-
1) धाकू गवत्या फोफेकर (चिरनेर )
2) रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोपरोली )
3) रामा बामा कोळी (मोठीजुई )
4) आनंदा माया पाटील (धाकटीजुई)
5) परशुराम रामा पाटील (पाणदिवे )
6) हसुराम बुध्या पाटील (खोकटे )
7) नाग्या महादू कातकरी (चिरनेर )
8) आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे)
सत्याग्रहींनी केलेल्या प्रतिकारात काही सरकारी यंत्रणेतील लोकही मारले गेले. त्यांची नावे :-
१) नारायण पांडू कदम (पनवेल शिपाई )
२) हरि नारायण तवटे (constable)
३) जयराम बाबाजी सावंत (Head constable )
४) काशिनाथ जनार्दन शेवडे Raundguide
५) केशव महादेव जोशी (मामलेदार )
यापैकी केशव जोशी हे झालेल्या गदारोळात पोलिसांना गोळीबार थांबवा असे सांगत असताना, गोळी लागून मृत्युमुखी पडले. या घटनेत चौदा सत्याग्रही जखमी झाले. चिरनेर सत्याग्रहात ४७ जण आरोपी म्हणून पकडण्यात आले. ठाणे सेशन कोर्टात खटला चालला. महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या खटल्याला सत्याग्रहींच्या बाजूने उपस्थित होते. यापैकी १८ जण निर्दोष सोडण्यात आले. २० जण दंड घेऊन मुक्त करण्यात आले. ९ जणांना कैदेची काहींना सहा महिने तर काहींना तीन वर्ष शिक्षा झाली.
या हुतात्माच्या स्मरणार्थ जानेवारी 1932 मध्ये एक स्तंभ उभारण्यात आला.
परंतु इंग्रज सरकारने तो स्तंभ जूनमध्ये पाडला. पुढे जानेवारी 1939 मध्ये
बा. ग. खेर यांच्या उपस्थितीमध्ये हा स्मृतीस्तंभ पुन्हा उभारण्यात आला.
यावेळेस नागरीकांनी जुन्या स्तंभाच्या कळसाची मिरवणूक काढली होती.
दरवर्षी 25 सप्टेंबर या दिवशी स्थानिक लोक हुतात्म्यांना श्रद्धांजली
वाहतात. 19 सप्टेंबर 2005 रोजी जंगल सत्याग्रहाच्या सुवर्ण महोत्सवाचे
निमित्त साधून हुतात्मांचे स्मारक उभारण्यात आले. या लढ्याचा सरकारी नोंदीत
मात्र तपशील मिळत नाही ही खंत आहे. अक्कादेवी मळ्याजवळच एक बंधारा आहे.
अनेक पर्यटक पावसाळ्यात बंधाऱ्यावर वर्षासहलीसाठी येतात, पण ह्या ऐतिहासिक
स्थळाला मात्र पदरी उपेक्षाच येते. ना इथे झालेल्या ऐतिहासिक घटनेची
माहिती देणारा फलक कोणालाही लावावासा वाटला. ह्याचे स्मारक गणपती मंदिरा
समोर आहे. पण तेही कोणी विशेष आत्मियतेने पाहत नाही. इतिहासाविषयी अनास्था
इथेही पहायला मिळते.
गणपती मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूच्या खिडकीच्या गजा पैकी एका गजावर गोळी लागल्याची खूण आहे.
या मागचे कारण असे की, सत्याग्रहींंवर झालेल्या गोळीबारानंतर चिरनेर
गावातील काही रहिवासी आरोपी म्हणून पकडले गेले. त्यांना याच गणपतीच्या
मंदिरात कोंडण्यात आले. मंदिरातील खांबाना बांधून मारहाण करण्यात आली. काय
दैव दुर्विलास पाहा हा सर्व प्रकार विघ्नहर्त्याला आपल्या समोर पाहावा
लागला. या सर्व प्रकारानंतर गावात भितीचे वातावरण होते. याच गावातील
बाळाराम रामजी ठाकूर या तरूणांने आपल्या आप्त जणांचा गोळीबारात मृत्यू झाला
याची चीड धरून पोलिसांवर सुड उगवण्यासाठी त्यांंची निर्भत्सना करत तो
देवळाजवळ आला. तेव्हा एका पोलिसाने बाळारामच्या दिशेने गोळी झाडली. बळाराम
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर होता, पोलिसाचा नेम चुकल्यामूळे गोळी
सभामंडपाच्या गजाला लागली. बाळाराम जखमी झाला पण बचावला त्याच्यावर उपचार
करण्यात आले.
मंदिराचे नूतनीकरण झाले असले तरी, तो गोळी लागलेला हा गज ग्रामस्थांनी आठवण म्हणून तसाच ठेवलेला आहे. मंडपामध्ये मुषकाची सुबक मुर्ती आहे.
गाभाऱ्यात प्रवेश करताच सात फूट उंच आणि साडेतीन फूट रुंद अखंड पाषाणातील
गणरायाची भव्य मुर्ती दर्शन देते. गणपतीच्या उजवीकडील वरच्या हातात परशू
आहे, डाव्याबाजूच्या वरच्या हातात पाश आहे, व खालील हातात मोदक आहे,
गणपतीची सोंड डावीकडे आहे, डोक्यावर मुकूट आहे. गणरायाच्या प्रसन्न रूपाचे
दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर गणपती मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमान मंदिर दिसते.
गणपती मंदिरासमोर हुतात्मा स्मारकाच्या बाजूला पाठमोरे शंकराचे प्राचीन
मंदिर दिसते. मंदिरातील जुन्या मुर्त्या पाहता मंदिर हजार बाराशे वर्ष जुने
असावे असे वाटते. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या
रंगमंडपात नंदीची मुर्ती आहे. गाभाऱ्याच्या ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे.
गर्भगृहात शिवलिंग आणि भैरवाची मुर्ती आहे पण तीला पार्वतीचा साज केला
जातो. गर्भगृहाबाहेर उजव्या बाजूच्या देवळीत एक शिल्प आहे. झीज झाल्यामुळे
ओळखता येत नाही. पण भैरव भैरवी असावेत. याच देवळीखाली दोन शिवलिंग ठेवलेले
आहेत. डाव्या बाजूच्या देवळीत गणपतीची मुर्ती आहे. या मंदिराच्या
डाव्याबाजूस सुंदर गोमुख आहे याच बाजूस तलावाशेजारी एक गध्देगाळ उभी
रोवण्यात आली आहे.
गध्देगाळीवर चंद्र, सूर्य, कलश, कोरलेले असून त्या खाली दानासंबंधी लेख
कोरलेला आहे. परंतु त्याची झीज झालेली असल्याने तो वाचता येत नाही.
त्याखाली स्त्री गाढव संकराचे शिल्प आहे. अशीच एक गध्देगाळ बाजूच्या भैरव
मंदिरात आहे. पण तीला शेंदूर फासल्यामुळे ठळकपणा गेला आहे. या मंदिरात भैरव
मुर्ती शेजारी
ही गध्देगाळ उभी आहे. यावर देखील लेख असावा पण आता खात्रीने सांगता येणार
नाही. ह्या दोन्ही गध्देगाळ कदाचित शिलाहार कालीन असाव्यात. एकंदरीत हा
परीसर प्राचीनतेची साक्ष देत आहे .
गणपती मंदिरात माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव प्रसंगी गणपतीच्या मस्तकी चांदीचा मुकूट झळाळत असतो. हा बाप्पा नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. निरनिराळ्या भागातील भाविक इथे दर्शनास येतात.
आपणही नक्की या बाप्पाच दर्शन घ्यावे, इथल्या हुतात्मा स्मारकाला भेट द्यावी. इथला इतिहासाचा परामर्श घ्यावा हीच वाचकांना विनंती.
अशाच एका तीर्थक्षेत्राचा परामर्श आपण घेणार आहोत ज्याने परक्या राजवटींचा वनवासही भोगला आणि स्वातंत्र्य संग्रामातल्या एका सत्याग्रहाचे, तो सत्याग्रह चिरडताना झालेल्या अत्याचाराचे साक्षीही राहीले.
पनवेल पासुन २२ किमी आणि उरणपासुन १६ किमी अंतरावर ऐतिहासिक चिरनेर गाव आहे. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या, या गावात प्रवेश करत जसजसे आत जातो, तशी मुंबईच्या गल्ली बोळांची आठवण नक्की होते. वाटेत कुंभारवाडा लागतो. मातीची मडकी, तवी, मातीचे तवे ( पहिल्यांदाच पाहिले)
![]() |
| तवली आणि आवा |
![]() |
| महागणपती मंदिर आणि बाजूला नवीन उभारलेला स्मृतीस्तंभ |
मंदिराचा आता जिर्णोद्धार झाला असला. तरी मुळ गाभारा पेशवेकालीन बांधकामाची साक्ष देतो, मंदिरासमोरच तळे आहे.
तस हे मंदिर प्राचीन असावे, परचक्र आल्यावर अनेक देवस्थळांची धुळधाण झाली. या विघ्नहर्त्यालाही इथल्या तळ्यात लपून रहावे लागले. किती काळ तळ्यातला आज्ञातवासात होता कुणास ठाऊक. पण मराठेशाहीचा डंका त्रिखंडात निनादू लागला आणि या गणरायाला अज्ञातवासाच्या इतश्रीचे वेध लागले. नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दित सरदार रामजी महादेव फडके यांना गणरायाने तळ्यात असल्याचा दृष्टांत दिला. त्यानुसार फडकेंनी तळ्यातल्या आज्ञातवासातून गणरायाला बाहेर काढले. त्याची स्थापना केली, मंदिर बांधले. तळ्यात गणरायाची
![]() |
| देवाचे तळे |
ब्रिटीश राजवटीतील काळ ब्रिटिशांनी वन संपत्ती वर अवलंबून असणाऱ्या स्थानिकांवर जंगल बंदी लादली. लाकूड फाटा, फळे, गवत, वनऔषधी गोळा करण्यावर बंदी घालण्यात आली. गुरे जंगलात चरायला नेण्यासही मज्जाव करण्यात आला. याचा परीणाम म्हणजे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आणि देशभरातून जंगल सत्याग्रहाची हाक उठली. 25 सप्टेंबर 1930 रोजी ठाणे व रायगड जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांनी चिरनेर आंदोलनामध्ये सहभाग घेतला. या सत्याग्रहाची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे इन्स्पेक्टर रामचंद्र दौलत पाटील यांच्या हाताखाली अलिबागचे २२ संगिनधारी पोलीस तसेच पनवेलवरून २० पोलीसांचे पथक सत्याग्रह रोखण्यासाठी आणले होते.
चिरनेरचे वैद्य अंताजी महादेव पोवळे हे सत्याग्रहात अग्रणी होते. सत्याग्रहींचे नेते भाई गुप्ते शांततेच्या मार्गाने सत्याग्रह पार पाडायचा आहे असे सांगत होते. सत्याग्रहींनी "जंगल आमच्या हक्काचे" अशा घोषणा देत इंग्रजांचे आदेश झुगारून गायी म्हशी जंगलात चरण्यासाठी नेण्याचा आणि झाडे तोडण्याचा निर्धार केला. आक्का देवीच्या माळरानावर अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींवर सरकारी हुकुमावरून पोलीसांनी गोळीबार केला. यात काही स्थानिक हुतात्मा झाले.
त्या हुतात्म्यांची नावे :-
1) धाकू गवत्या फोफेकर (चिरनेर )
2) रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोपरोली )
3) रामा बामा कोळी (मोठीजुई )
4) आनंदा माया पाटील (धाकटीजुई)
5) परशुराम रामा पाटील (पाणदिवे )
6) हसुराम बुध्या पाटील (खोकटे )
7) नाग्या महादू कातकरी (चिरनेर )
8) आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे)
सत्याग्रहींनी केलेल्या प्रतिकारात काही सरकारी यंत्रणेतील लोकही मारले गेले. त्यांची नावे :-
१) नारायण पांडू कदम (पनवेल शिपाई )
२) हरि नारायण तवटे (constable)
३) जयराम बाबाजी सावंत (Head constable )
४) काशिनाथ जनार्दन शेवडे Raundguide
५) केशव महादेव जोशी (मामलेदार )
यापैकी केशव जोशी हे झालेल्या गदारोळात पोलिसांना गोळीबार थांबवा असे सांगत असताना, गोळी लागून मृत्युमुखी पडले. या घटनेत चौदा सत्याग्रही जखमी झाले. चिरनेर सत्याग्रहात ४७ जण आरोपी म्हणून पकडण्यात आले. ठाणे सेशन कोर्टात खटला चालला. महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या खटल्याला सत्याग्रहींच्या बाजूने उपस्थित होते. यापैकी १८ जण निर्दोष सोडण्यात आले. २० जण दंड घेऊन मुक्त करण्यात आले. ९ जणांना कैदेची काहींना सहा महिने तर काहींना तीन वर्ष शिक्षा झाली.
![]() |
| जंगल सत्याग्रह हुतात्मा स्मारक |
![]() |
| इंग्रजांनी पाडलेल्या स्तंभाचा कळस |
गणपती मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूच्या खिडकीच्या गजा पैकी एका गजावर गोळी लागल्याची खूण आहे.
![]() |
| गोळी लागलेला गज |
मंदिराचे नूतनीकरण झाले असले तरी, तो गोळी लागलेला हा गज ग्रामस्थांनी आठवण म्हणून तसाच ठेवलेला आहे. मंडपामध्ये मुषकाची सुबक मुर्ती आहे.
![]() |
| श्रींची मुर्ती |
![]() |
| मंदिराशेजारील मारूती |
![]() |
| शिवमंदिर |
![]() |
| मंदिरातील शिवलिंग आणि भैरव |
![]() |
| गद्धेगाळवरील अस्पष्ट लेख |
![]() |
| भैरव मंदिरातील गद्धेगाळ आणि भैरवमुर्ती |
गणपती मंदिरात माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. उत्सव प्रसंगी गणपतीच्या मस्तकी चांदीचा मुकूट झळाळत असतो. हा बाप्पा नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. निरनिराळ्या भागातील भाविक इथे दर्शनास येतात.
आपणही नक्की या बाप्पाच दर्शन घ्यावे, इथल्या हुतात्मा स्मारकाला भेट द्यावी. इथला इतिहासाचा परामर्श घ्यावा हीच वाचकांना विनंती.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.