जिल्ह्याविषयी
भूगोल
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे
क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व
वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक),
दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला
रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य
रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर
मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून जिल्ह्यातील तिचा प्रवाहमार्ग १३०किमी. आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिम-पूर्व व त्यानंतर वायव्य-आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात. वारणा नदी सांगली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतश्रेणीतील प्रचितगडजवळ उगम पावते. तिची लांबी १७३ किमी. आहे. उगमानंतर ती शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातून काहीशी दक्षिणेकडे वाहत आल्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून (कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांची सरहद्द) प्रथम आग्नेयीकडे व त्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते. सांगली शहराजवळच हरिपूर येथे ती कृष्णेला मिळते. मोरणा ही वारणेची उपनदी शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात धामवडे टेकडीजवळ उगम पावते. सह्याद्रीच्या दक्षिण व आग्नेय दिशेने पसरलेल्या डोंगररांगांच्या दरम्यानच्या प्रदेशातून दक्षिण व आग्नेय दिशेत वाहत आल्यानंतर शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीला मिळते. काडवी, कानसा, शाली, अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या आहेत.
सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी येरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. पश्चिमेकडील वर्धनगड-मच्छिंद्रगड आणि पूर्वेकडील महिमानगड-पन्हाळा डोंगररांगांमधून प्रथम दक्षिणेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन सांगली शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रह्मनाळजवळ ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु.८५ किमी. आहे. येरळा नदीला पश्चिमेकडून नानी नदी व सोनहिरा ओढा, तर पूर्वेकडून कापूर नाला येऊन मिळतो. अग्रणी नदी खानापूर पठारावर बलवडीच्या जवळपास उगम पावते. उगमानंतर सु.३२ किमी. अंतर दक्षिणेस वाहत आल्यानंतर वज्रचौंदे येथून ती आग्नेयवाहिनी बनते. जिल्ह्याच्या बाहेर ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिच्या प्रवाहमार्गाची लांबी सु.८५ किमी. आहे.
माण (माणगंगा) नदी सांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागातील आटपाडी तालुक्यातून आग्नेय दिशेस वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह फक्त ३५ किमी. इतका कमी असला तरी तिच्या उपनद्या मात्र खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांचे जलवहन करतात. कोरडा नदी जतच्या जवळपास उगम पावते. उत्तरेस वाहत जाऊन ती जिल्ह्याच्या बाहेर माण नदीला मिळते. माण नदी पुढे भीमा नदीला मिळते. जतच्या ईशान्येस सु. ४ किमी. अंतरावर बोर नदी उगम पावते. या नदीने जत तालुक्याच्या पूर्व भागाचे जलवहन केले आहे. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाऊन जिल्ह्याच्या बाहेर ती भीमा नदीला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु. ६४ किमी. आहे.
ऐतिहासिक महत्त्वाचे
प्राचीन इतिहास असलेल्या ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते. त्यावेळी हरिपूरची लोकसंख्या २,००० तर सांगलीची लोकसंख्या फक्त १,००० होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर पटवर्धन कुटुंबात अंतःकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून अलग झाले. तत्पूर्वी सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये होत असे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधील शिराळा तालुक्यातील बिळाशीच्या सत्याग्रहाची नोंद भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात झाली आहे.गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.मिरज येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध असून येथील वाद्ये जगभर पाठविली जातात. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंतराजे हे करतात.
स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण करतेवेळी सांगली, मिरज व जत ही संस्थाने सातारा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने तो जिल्हा आकारमानाने मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला होता. त्यामुळे १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन उत्तर सातारा व दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. १९६५ मध्ये मिरज व खानापूर तालुक्यांचे विभाजन करून कवठे महांकाळ व आटपाडी असे आणखी दोन तालुके नव्याने निर्माण करण्यात आले. तालुका पुनर्रचनेनुसार १९९९ मध्ये पलूस, तर २००२ मध्ये कडेगाव या तालुक्यांची नव्याने निर्मिती करण्यात आली.
चिंतामणराव पटवर्धन, दादासाहेब वेलणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, वि.स. खांडेकर, विजय हजारे, विष्णुदास भावे, वसंतदादा पाटील इ. सांगली जिल्ह्यातील थोर व्यक्ती होत ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे. पेशवाईच्या काळात या भागावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. त्यांपैकी चिंतामणराव पटवर्धन यांनी या भागाचा चांगला विकास घडवून आणला. त्यांनी छोटी धरणे, बंधारे व ताली बांधून जलसिंचनाखालील क्षेत्र वाढविले. दुग्धोत्पादनासाठी विविध योजना आखल्या. ग्रामीण विकासासाठी ग्रामोद्योग योजना सुरू केली. श्री गजानन मिल सुरू करण्यासाठी दादासाहेब वेलणकर यांना प्रोत्साहन दिले, तर सांगली येथे साखर कारखाना सुरू करण्यास शिरगावकर बंधूंना मदत केली. शैक्षणिक संस्थांच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. प्रसिद्घ देशभक्त, झुंझार नेते आणि प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात झाला. प्रसिद्घ क्रिकेटपटू विजय हजारे हे सांगलीचेच. सुप्रसिद्घ मंगेशकर कुटुंबियांचे काही वर्षे वास्तव्य सांगली येथे होते.महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील पदमाळे हे होय.
विशेष हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले. कलावंतांचा जिल्हा म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती हे सांगली जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे.
संस्थानी खाणाखुणा, सुंदर कृष्णाकाठ आणि सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे जन्मस्थान हीदेखील सांगलीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. नाट्यपंढरी व कलावंतांचा म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात तसेच कृषी क्षेत्रातही प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहे.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे.
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र – मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.
दळणवळण
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज
हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. सांगली हा महत्त्वाचा
जिल्हा असल्याने आपल्याला येण्याची जाण्याची सोय चांगली आहे. 
1 डिव्हीजनल कंट्रोलर सांगली (0233) 2332113 dcstsgl@sancharnet.in
1 डिव्हीजनल ट्रॅफीक ऑफिसर्,सांगली (0233) 2331345
2 डिव्हीजनल अकाउंट ऑफिसर्,सांगली (0233) 233083
3 डिव्हीजनल पर्सनल ऑफिसर्,सांगली (0233) 2332246
4 डिव्हीजनल लेबर ऑफिसर्,सांगली (0233) 2332249
1 डेपो मॅनेजर, सांगली बस स्थानक (0233) 2530648
2 डेपो मॅनेजर, मिरज बस स्थानक (0233) 2222329 3 डेपो मॅनेजर, इस्लामपुर बस स्थानक (02342) 224110
4 डेपो मॅनेजर, विटा बस स्थानक (02347) 272022
5 डेपो मॅनेजर, तासगाव बस स्थानक (02346) 250471
6 डेपो मॅनेजर, आटपाडी बस स्थानक (02343) 221830
7 डेपो मॅनेजर, जत बस स्थानक (02344) 246249
8 डेपो मॅनेजर, कवठेमहांकाळ बस स्थानक (02341) 222055
9 डेपो मॅनेजर, शिराळा बस स्थानक (02345) 272218
सांगली हे शहर असले तरी गावाचे 'तितके शहरीकरण' झालेले अजूनतरी बघायला मिळत नाही. छोटेसे व आटोपशीर गाव. नाट्यपंढरी , हळद, गणपतीचे देऊळ , वेशीवरून वाहणारी कृष्णा नदी , हरिपूर संगम इत्यादी अनेक गोष्टी सांगलीचे वैशिष्ट्य अथवा भेट देण्यासारखी ठिकाणे म्हणून विचारात घेत असताच या शहरात एक खाद्यसंस्कृती तयार आहे अथवा अगदी साध्या भाषेत अनेक उत्तमोत्तम व खाण्याची ठिकाणे उपलब्ध आहेत याचा अचानक विचार आला.
हॉटेल चालवून आपण लोकांची मोठी सेवा करत आहोत अथवा हाटेलाबाहेर तिष्ठत बसलेले गिर्हाईक हेच आमचे समाधान किंवा खाण्यालायक काहीही आणि कसलेही द्या खपेल असे प्रकार येथे तसे कमीच दिसतात हेदेखील इथल्या संस्कृती का काय म्हणतात त्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल असे जाता जाता नमूद करतो. असो.
तर खाण्याच्या ठिकाणांची यादी करताना पदार्थवार यादी केली आहे . खालील ठिकाणे व तेथे मिळणारे पदार्थ हे स्वतः व अनेक लोकांकडून टेष्ट ( दोन्ही स्पेलिंग !) झाले असल्यामुळे बऱ्यापैकी खात्री बाळगण्यास हरकत नाही. नमूद केलेली ठिकाणे ही सकाळच्या नाष्ट्यापासून दुपारचे जेवण ते संध्याकाळच्या वेळी खाण्याच्या पदार्थांपासून ते 'दस्त ए साकी में आफताब' येईपर्यंतची यादी आहे.
पोहे :
१. मंजू चे पोहे : वालचंद कॉलेज पाठीमागे / विलिंग्डन कॉलेज समोर गाड्यावर
. पोहे व भाजी उत्तम मिळतात. . समांतर : सांगलीत पोह्यांवर सांबार
घेण्याची पद्धत आहे. येथे सांबार म्हणजे इडली बरोबर देतात ते नसून मिसळीचा
रस्सा
(समजण्यासाठी :शॅम्पल) असतो. कुठल्याही तिखट पदार्थात ( उदा तांबडा रस्सा ,
मटन वगैरे ) तिखटाची भुकटी वापरात नाहीत . त्यामुळे खान्देशी वगैरे तिखट
खाऊन जी जळजळ आणि आग होते तसे न होता तिखटाचीही चव घेता येते.
२. गणेश नाष्टा सेंटर. विश्रामबाग. ( येथील जवळपास सर्वच पदार्थ चांगले
असतात . मात्र पोहे , उप्पीट , पायनॅपल शिरा, वडा सांबार उत्तम )
३. हळद भवन. ( ब्रेड उसळ /चिवडा , पोहे , वडा सांबार इत्यादी )
४. पहाटे ४ वाजता स्टेन्ड समोर गाड्यावरील पोहे.
५. हॉटेल पैप्रकाश: विश्रामबाग चौक ( मसाला टोस्ट खाऊन पहाच .)
६. प्रभू प्रसाद : बापट बाल शाळेसमोर ( वडा सांबार . यांच्याकडे थोडेसे रस्सम सारखे सांबार /सॅम्पल मिळते. )
७. के टी नाश्ता सेंटर : एसटी स्टॅन्ड जवळ ( वडा सांबार , पोहे ).
मिसळ या पदार्थास दुर्दैवाने सांगलीत तितका न्याय मिळाला नाही मात्र वडा सांबार मिळणाऱ्या जवळपास सर्वच ठिकाणी मिसळ चांगली मिळेल .
८ . थोडे लांबी जायची तयारी असल्यास अंकली फाट्यावर जैन वडा व अरिहंत वडा येथे वडा सांबर नक्की खाऊन पहा.
९. एन डिज : होंडा शो रूम शेजारी व काळ्या खणी शेजारी ( दूध कोल्ड्रिंक .
कॉफी बियर. माझ्या माहितीत कॉफी बियर सांगली सोडून कुठे मिळत नाही)
उसाचा रस वगैरे प्यायचा झाल्यास सगळीकडेच उत्तम मिळतो . कुठेही प्या .
दुधाचे सर्वच पदार्थ हे येतील खास वैशिष्ट्य . सांगलीचेच असलेले चितळे
बंधू यांच्या पदार्थाना येथे खूपच कमी मागणी आहे व खूप मोजक्याच दुकानांत
त्याचे पदार्थ मिळतात. का ? सुज्ञास सांगणे नलगे .
१. रामविश्वास दुग्धालय :वसंतदादा समाधीमागे ( सर्वच पदार्थ अतिउत्तम .
त्यातही बासुंदी व आम्रखंड हे अप्रतीम. सांगलीबाहेरही प्रचंड मागणी .).
२. मंगल मिठाई : मारुती चौक ( पेढे व कलाकंद अप्रतिम )
३. बसाप्पा : मारुती चौक ( गुलाबजाम , अंगूर मलई व अनेक पदार्थ. )
४. सीरवी बंधू : राममंदिर चौक ( ढोकळा , जिलबी कचोरी वगैरे पदार्थ चांगले मिळतात ).
५. सांगलीजवळ कुरुंदवाड व नरसोबावाडी येथेही बासुंदी उत्तम मिळते . दाट व सायीसकट मिळणारी बासुंदी .
संध्याकाळनंतर भेळेचे अनेक गाडे सुरू होतात. तसेच चायनीज ( भारतीय
चायनीज) ची छोटी मोठी हॉटेल्स ही चालू होतात. सांगलीत ज्या दर्जाचे चायनीज
मिळते तसे मी अन्य कुठल्याही शहरात खाल्याचे आठवत नाही. तरीही कोणत्या
चायनीज हॉटेल मध्ये काय खावे हे नमूनेदाखल देत आहे .
१. संभा भेळ : वखारभाग.
२. स्टार भेळ : पंचमुखी मारुती रोड सुरुवात
३. प्रतापसींह उद्यानासमोरील भेळेचे गाडे.
४. क्रांती भेळ : विश्रामबाग ( चायना हट शेजारी ) ( भेळ ,थालीपीठ, शेवपुरी ,पावभाजी वगैरे छान मिळते .)
५. चिकन ६५ चे अनेक गाडे आता चालू झाले आहेत तरीही एस्टी स्टेन्ड येथील कैफ
चिकन व पुष्कराज चौक येथील श्रावणी चिकन या गाड्यांवर मस्त चिकन ६५ व सीजन
मध्ये एकदम ताजे सुरमई /बोंबील मिळतात.
६. चाइना हट : विश्रामबाग ( क्रांती भेळ शेजारी ) ( सर्वच चायनीज पदार्थ जबरदस्त. येथील चायनीज चे अक्षरशः व्यसन लागते )
७. कॉलेज कॉर्नर ला चायनीज चा एक गाडा असतो तेथे फक्त 'चायनीज भेळ' हा पदार्थ खावा .
८. हॉटेल बावर्ची. प्रताप टॉकीज मागे
९ आनंदराव यांचा गाडा : १०० फुटी सुरुवात ( अंडा पेटीस , भुर्जी . एकदा
गाड्यासमोरून निघाला की दरवळनाऱ्या वासामुळे काहीतरी खाऊन जाणारच.)
१० . हॉटेल हनुमान ( विश्रामबाग) : डोश्यांसाठी उत्तम ठिकाण .
११. पैप्रकाश राममंदीर चौक ( सीझलर्स चांगल्या मिळतात. अजूनही वाजवी किंमत ).
१२. एन डिज होंडा शो रूम शेजारी : ( येथे चायनीज गाड्यावर व्हेज मंचुरियन
खावे) तिथेच टोस्ट चा गाडा देखील आहे त्याच्याकडील टोस्ट खाणे .
१३. शिवाजी पुतळा जवळ मिरज येथे गाड्यावर भजी.
अशा अनेक ठिकाणी खाऊन झाल्यावर रात्रीसाठी मस्त गरम गरम चिकन / मटण
तांबडा पांढरा रस्सा हवाच. . कोल्हापुरात जशा छोट्या खाणावळीं मधून
अतिउत्तम घरगुती चिकन मिळते तसेच इथेही मिळते. यादी बरीच आहे पण चांगली
ठिकाणी काही ..
१. हॉटेल अनुराधा : सिव्हिल हॉस्पिटल रोड ( जुने) (पांढरा रस्सा ).
२. गिरीजा : खिलारे मंगल कार्यालयाजवळ ( एक्दम ताजे घरगुती गरम चुलीवरील मटन / भाकरी )
३. हॉटेल सौरभ आणि हॉटेल नंदनवन : कोल्हापूर रोड. ( चिकन मॅग्नेट हा पदार्थ इथे घेतलाच पाहिजे . )
४. रहेमतुल्ला : मिरज ( खास इस्लामी चिकन )
५. सांगलीजवळ इचलकरंजी येथे बुगड खानावळ
६. शेतकरी : १०० फुटी रोड
७. क्रांती मेस विजयनगर.
८. पूर्वा गार्डन : विजयनगर
९ आर्य ( आर्या ) :
राममंदीर चौक येथील हॉटेल नवरत्न येथे मसाला टोस्ट चांगला असतो .
मिरज मध्ये मंगळवार पेठ येथे ' मेघराज ' मधील वाडा सांबार खूप छान होता पण आता कसा असतो माहीत नाही.
मिरज मार्केट - संधयाकाळी "गुडलक " च्या गाडी वर ' रगडा पॅटिस' खूप छान असते तशी चव कोठेच नाही
मेन कोर्स पेक्शा सांगली हे स्नॅक्स चे गाव आहे. उप्पीट हे सांगलीचे सिग्नेचर स्नॅक म्हणायला हरकत नाही. बृयाच टपर्यांवर, उडप्यांच्या हॉटेलात भरपूर डालडा/तेल, उडीद डाळ आणि कडी पत्ता घालून केलेल्या उप्पीटाची गोल वाफळाती मूद आणि तो कडी पत्त्या मुळे येणारा विशिष्ट कर्नाटकी पद्धतीचा वास डोळे, नाक, जीभ तिन्ही इंद्रिये तृप्त करून जातो. बापट बाल जवळ प्रसाद नाष्ता सेंटर आणि विश्रामबाग मध्ये गणेश, दोन्ही ठिकाणचे उप्पीट मस्त. सांगलीच्या भेळेचा युएसपी म्हणजे सांगली चे चुरमुरे. थोडे से बुटके आणि जाड असे चुरमुरे नुसते सुध्दा खमंग लागतात. चुरमुरे जाड असल्यामुळे, गोड आणि तिखट पाणी अगदी खूप टाकून पण मऊ पडत नाहीत. मुंबई प्रमाणेच सांगलीत सुद्धा सिझन मध्ये भेळेत कैरीच्या फोडी टाकतात. मिसळी पेक्षा इथे वडा साम्बार, कट वडा जास्त फेमस आहेत. सांगली-मिरज रोडवर गेस्ट हाऊस ला पंडित पेट्रोल पंप शेजार च्या गाड्यावर मस्त कट वडा मिळायचा. पोह्यांचं विचाराल तर वर बर्याच जणांनी सांगितल्या प्रमाणे मंजुचे पोहे दी ब्येष्ट.
तर अशी ही थोडक्यात केलेली सांगलीची खाद्यभ्रमंती. ही सर्व ठिकाणे सोडून नेहेमीची पंजाबी भाज्या / दाल फ्राय जिरा राईस देणारी अनेक हॉटेल सांगलीत उपलब्ध आहेत. उदा हॉटेल नटराज :राममंदिर चौक अथवा हॉटेल पर्ल : विजयनगर . डॉमिनोज आणि तत्सम चेनही उघड्या आहेत (!) पण वर नमूद केलेले पदार्थ /ठिकाणे नक्की अनुभवा.सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
विमानाने
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ 250 किमी अंतरावर आहे. कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.
रेल्वेने
सांगली आणि मिरज जंक्शन रेल्वे स्थानक अनुक्रमे 45 व 53 कि.मी अंतरावर आहेत. सांगली दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.
रस्त्याने
स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचा वापर करून ठिकाणापर्यंत जाता येते. पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय.
रहाण्याची सोय
सांगली येथील शासकीय विश्राम गृह, थोडयाच अंतरावर आहे. याशिवाय थोडयाच अंतरावर लॉजिंग ची सोय आहे.
मिरज तालुका
• सांगली येथील श्री गणेश मंदीर व कृष्णाकाठी कै. वसंतदादा पाटील यांची समाधी.
• सांगली येथील आयर्विन पुल व गणेश दुर्ग.
• हरिपूर येथील कृष्णा व वारणा नद्यांचा संगम व श्री संगमेश्वर देवालय, बागेतील गणपती.
• तुंग येथील समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
• मिरज येथील रेल्वे जंक्शन, ख्वाँजा शमशुद्दीन मिरासाहब दर्गा.
• भोसेजवळ दंडोबा डोंगरावरील दंडेश्वर मंदीर व अभयारण्य.
• बेळंकीजवळ श्री सिद्धश्वर मंदीर.
तासगाव तालुका
• तासगाव येथील श्री गोपूर, गणेश मंदीर.
• कवठेएकंद येथे अतिप्राचीन श्री सिद्धराज देवालय, खंडोबा मंदिर.
• बेदाणा व द्राक्षांसाठी प्रसिद्ध तालुका
पलूस तालुका
• अंकलखोपजवळ श्री क्षेत्र औदुंबर व दत्त मंदीर.
• पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी.
• ब्रम्हनाळ येथील कृष्णा व वेरळा संगम.
• भिलवडीजवळ (भुवनेश्वरवाडी) येथील भुवनेश्वरी देवीचे अति प्राचीन मंदीर.
वाळवा तालुका
• बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रातील श्री रामलिंग बेट.
• नरसिंहपूर येथील भुयारातील श्री नृसिंह मंदीर.
• किल्ले मच्छिंद्रगड येथे श्री मच्छिंद्रनाथाचे देवालय.
• येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन मंदीर (डोंगरमाथ्यावर).
• ऊरण इस्लामपूर येथील संभूआप्पा देवालय.
• शिवपुरी येथील सिद्धेश्वर देवालय.
कवठेमहांकाळ तालुका
• कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली मंदीर.
• आरेवाडी येथील श्री बिरोबा देवालय.
शिराळा तालुका
• शिराळा येथील श्री गोरखनाथ मंदीर, येथेच समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदीर.
• चांदोली येथील वारणा धरण (वसंतसागर) व अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान.
• प्रचितगड प्रेक्षणीय किल्ला.
• चांदोली खु. प्रेक्षणीय कंधार डोह धबधबा.
• गिरजवडे येथील जोतिर्लिंग देवस्थान.
आटपाडी तालुका
• आटपाडी येथील कैद्यांची खुली वसाहत (तुरुंग) (स्वतंत्रपूर).
• खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदीर.
• करगणी येथील श्री राम मंदीर.
• वलवण येथील मोराचे थवे.
• राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव.
जत तालुका
• जत येथील श्री यलम्मा देवी मंदीर व श्रीराम मंदीर.
• गुड्डापूर येथील दानम्मा मंदीर.
• बनाळी येथील बनशंकरी मंदीर.
• गिरगांव येथे डोंगरावरील श्री लक्ष्मी मंदीर.
• सोर्डी येथील श्री दत्त मंदीर, मलाकसिद्ध.
• गुडघरी सिद्धनाथ येथे हेमाडपंथी देवालय.
खानापूर तालुका
• रेणावी येथील श्री रेवणसिद्ध मंदीर.
कडेगांव तालुका
• देवराष्ट्रे येथील कै. यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी व सागरेश्वर अभयारण्य.
• कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.
सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी यांनी या देवस्थानची स्थापना केली. ते जेव्हा सांगलीत आले तेव्हा सांगली केवळ पाच हजार वस्तीचे लहान खेडेगाव होते. या शहरास राजधानीचे रूप देण्याचा संकल्प करून त्यांनी गणेशदुर्ग किल्ला आणि गणपती मंदिर उभारले. सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे.
चिंतामणराव पटवर्धनांनी कृष्णा नदीकाठी १८१४ मध्ये गणेश मंदिराची उभारणी सुरू केली. ती पुढे तीस वर्षे सुरू होती, असे सांगितले जाते. मुख्य मंदिर काळ्या पाषाणातील असून पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.
संस्थानकाळात सन. 1811 ला मंदिरच्या बांधकामास प्रारंभ झाला. मंदिरासमोरील भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर मंदिरांची बनावट काळ्या दगडातील आहे. पायासाठी मजबूत धर नसल्याने प्रथम ३० ते ४० फूट खोदाई करून दगड व चुना यांचा पाया तयार करून घेण्यात आले. नदीच्या पश्चिम बाजूला खालपासून तटबंदी करण्यात आली. तटबंदीच्या पलीकडे नदीला सुंदर घाट बांधण्यात आला. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा तटबंदीशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. तसेच नदीच्या पूर्वेकडे धूप होत नाही. त्यामुळे पुरापासून गावालाही संरक्षण मिळते. अशा कल्पकतेने हे मंदिर बांधलेले आहे. हे पेशवाई शैलीचे पंचायतन मंदिर आहे. बांधकाम पूर्णं झाल्यावर 1844 साली पाचही मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बांधकाम पूर्णं होण्यास जवळजवळ तीस वर्षांचा कालावधी लागला. पाचही मुर्त्यां संगमरवरी आहेत. श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी जो दगड शिल्लक होता, तो उपलब्ध करून या मुर्त्या बनविण्यात आल्या आहेत. भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी या मुर्त्या तयार केल्या आहेत. संस्थान काळातच श्री. गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली.
दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
संस्थानचा गणेशोत्सव
गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती
मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी
उत्सव सुरू होण्यापूर्वीच 'चोर' गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार
हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने
संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार,
चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि
दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. 'पुढल्या
वर्षी लवकर या... ' च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो.
हत्तींची परंपरा
गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस
हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज
उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू
हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला
होता. त्याला 'लाडका बबलू' असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने
त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे,
शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. त्याचे
अचानक निधन झाले त्यावेळी त्याच्या अंतयात्रेवेळी जनसागर लोटला होता. 
गणेशदुर्ग किल्ला : प्रशासकीय कारभारासाठी पटवर्धन संस्थानिकांनी या भुईकोट किल्ल्याची उभारणी केली. या ठिकाणी तटबंदी केलेली असून खंदकही होता. सध्या येथे जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. वसंतदादा पाटील यांना येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते.
प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.
प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.
प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.
प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.
प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.
प्रचि--०6 –
प्रचि--०7 –
प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.
प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.
प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.
संगमेश्वराचा इतिहास थेट रामायणाशी जोडला आहे. वनवासात असताना शिवभक्त
प्रभू श्रीरामाने वाळूपासून हे शिवलींग तयार करून पूजा केली असल्याची
आख्यायिका जाणकारांकडून सांगितली जाते. मंदिराचे बंधाकाम हेमाडपंथी
असून खांबांचा अर्धा भाग कोरीव असून अर्धा भाग गोलाकार चकत्यांनी बनला
आहे. या चकतीवर आघात केला असता घंटेसारखा आवाज येतो. भिंतीवर
गणेशमूर्ती कोरल्या आहेत. देवाच्या आंघोळीच्या पाण्याचे रांजण असून
मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग रुपात मूर्ती आहे. त्यावर दुधाचा अभिषेक
केल्यास दहा बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात. बाजूची साळुका आणि लिंग यात
बोटभर अंतर असून खाली वाळू व पाणी आहे. हे लिंग वाळूचे असूनही ते झिजत
नाही, हे त्याचे वैशिष्ट्य.
'श्रीगुरुचरित्रा'त या
तीर्थक्षेत्रचा 'वरुणा संगम असे बरवे तेथे तुम्ही स्नान करा मार्कंडेय
नावे संगमेश्वर पुजावा' असा उल्लेख आहे. श्रीक्षेत्र काशी नंतर हरिपूर
येथेच स्वयंभू मार्कंडेश्वर आहे.
श्री संगमेश्वर हे हरिपूर चे
ग्रामदैवत आहे. वर्षातून तीनवेळा यात्रा भरते. श्रावण सोमवार,
महाशिवरात्री आणि पौष पौर्णिमाला भरणारी विशाळी यात्रा, यावेळी संपूर्ण
पंचक्रोशीतील शिवभक्त मोठी गर्दी करतात. विशाळी यात्रेदिवशी निघणाऱ्या
पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. मंदिराच्या आवारात गणपती,
हनुमान, कृष्णामाई आणि विष्णू मंदिर असे शिवपंचायतन आहे. शहरापासून जवळ
असूनही गावाचे गावपण जपले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच भलीमोठी कमान
आणि हनुमान मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिराची दगडी तटबंदी, कोरीव
विस्तीर्ण नदीघाट पहाण्यासारखे आहे. येथील जगप्रसिध्द हळदीची पेवे आणि
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या संगीत शारदा नाटक
लिहलेला वृक्ष पार अशी अनेक ठिकाणे आहेत.
हरिपूर येथील मार्कंडेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग
सांगली येथील मुख्य बसस्थानका पासून अवघ्या २ किलोमीटरवर हरिपूर गाव
आहे. स्थानका शेजारील शास्त्री चौकातून खाजगी वाहने, रिक्षा आणि विशेष
म्हणजे टांग्याची ही सोय आहे.
इथं खूपच छान वृक्षारोपण केलेले आहे येणाऱ्या पर्यटकांसाठी निवांत बसून निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मोक्यावर व्ह्यू पॉइंट बनवलेले आहेत .विविध प्रकारची आणि आकर्षक रंगांची फुलपाखरे इथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात .बऱ्याच प्रकारचे पक्षी इथे दर्शन देतात .
हा डोंगर भोसे , खरशिंग आणि देशीग या तीन गावांच्या वेशीवर आहे सध्या आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र येऊन श्रावण महिन्यात दंडोबा परिक्रमा आयोजित करतात सात दिवसांच्या या परिक्रमेची सांगता पारायणाने होते .
दंडोबाचा डोंगर हा सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावाजवळचा पाच ग्रामपंचायतींच्या हद्दीत सुमारे ११५० हेक्टरवर पसरलेला एक डोंगर आहे. डोंगरावर पुरातन दंडनाथाचे देऊळ आहे. डोंगरात सुमारे शंभर ते सव्वाशे फूट पोखरून तयार केलेल्या गुहेतच नागाच्या वेटोळ्यात दंडनाथाची मूर्ती आहे. प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने रस्तादेखील असून पुरातन काळातील चित्रे आता कालौघात पुसट झाली आहेत.

डोंगरावर एक पाच मजली मनोरा आहे. मनोर्याचा सर्वांत वरचा भाग आहे तेथे चार ते पाच माणसे उभी राहू शकतील एवढीच जागा आहे. पहिल्या टप्प्यावर जायला पायर्या आहेत, पण तिथून पुढे वरती जायला मानवनिर्मित पायर्या नाहीत; सध्या तेथे एक दगड आहे; त्याचा उपयोग करून वरती जाता येते. चौथ्या टप्प्यावर वरती जाण्यासाठी पायर्या आहेत. एका वेळी एकच माणूस जाईल एवढीच जागा आहे. वरती गेल्यावर या परिसरातला अंदाजे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रदेश दिसतो. स्थानिक लोकांच्या मते जर वातावरण चांगले असेल तर मनोर्यावर उभे राहिल्यावर विजापूरच्या गोल-घुमटाचे शिखर दिसते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत क्रांतिकारकांचे नेते रत्नाप्पा कुंभार यांचे या ठिकाणी गुप्त वास्तव्य व कचेरी होती.
कधी विचार केलायत की एखाद्या गावात किती मंदिरे असतील? कदाचित ४-५, किंवा १०-१२ मंदिरे?
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची! आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते.
आळसंद गावची लोकसंख्या साधारण ९ हजार असून गावात प्राचीन इतिहास पाहायला मिळतो. प्राचीन काळात सातारच्या औध संस्थानातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जात होते.
विशेष म्हणजे ही सगळी मंदिरे वेगवेगळ्या देवदेवतांची आहेत. यामध्ये हेमाडपंथीय मंदिरांचाही समावेश आहे.
रामदास स्वामींनी अकरा मारुतींचे मंदिर या ठिकाणी बनविले आहे. या मंदिरात वेगवेगळया रुपातील आणि भागातील मारुतींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सरस्वती देवीची मूर्ती या ठिकाणी शिळेवर कोरण्यात आल्याचे आढळून येते. महाराष्ट्रात अशी मूर्ती क्वचितच आढळून येतात.
येथील
काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे हेमाडपंथी मंदिर असून सुमारे ३५० वर्षे
जुने आहे. येथील दगडी खांब नक्षीदार आहेत. या ठिकाणी शिव-पार्वती असे
पंचमुखी शिवालय आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर, गणपतीचे मंदिर, मायक्का
मंदिर, नागदेवता मंदिर, लक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर अशी जुन्या काळातील
मंदिरे अस्तित्वात आहेत.
काही मंदिरे ही गेल्या २० ते २५ वर्षांमध्ये ग्रामस्थांनी स्वत:च्यादेखील बांधली आहेत. या गावांमध्ये गुमानगिरी, लालगिरी आणि मनशागिरी महाराज अशा ३ महाराजांनी जिवंत समाधी घेतल्या आहेत.
आळसंद गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीकही पाहायला मिळते. येथे मुस्लिम धर्मियांच्या पीरांचे २ दर्गेसुद्धा आहेत. राजवल्ली आणि दस्तीगर पीर असे त्यांची नावे आहेत.
आळसंद गावामध्ये या सर्व मंदिरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. महाराष्ट्रात एवढी मंदिर एकाच गावामध्ये असणारे हे दुर्मिळ गाव आहे. कदाचित देशभरातही अशा प्रकारची फार कमी गावे असतील.
विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धाचे स्वयंभू
स्थान आहे. देवालयाच्या पूर्व बाजूस उसळसिद्ध व पश्चिम बाजूला भुयारात
विश्वाराध्य आहे.
येथील रेवणसिद्ध मंदिर हे नाथपंथीय रेवणसिद्धस्वामींचे मंदिर आहे. १६व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले. हे लिंगायत समुदायाचे श्रद्धास्थान आहे. श्री देव रेवणसिद्धनाथ यांनी सोलापूर शहरातील लिंगायत समुदायाचे मुख्य संत श्री सिद्धेश्वर महाराजांना भेट दिली होती. चिपळूण-कराड-विजापूर रस्त्याच्या दक्षिणेस रेवणसिद्ध मंदिर उभे आहे. असे म्हणतात, की या पर्वतावर ८४ पवित्र ठिकाणे आहेत. येथे आता उद्यान तयार करण्यात आले आहे. रेवण पर्वतावर निरनिराळ्या रंगांची माती सापडते. भक्त भस्म म्हणून याचा वापर करतात.
आटपाडी तालुक्यात श्री खरसुंडाचे प्राचीन देवस्थान असून ते सुमारे ११२५ वर्षापुर्वीचे आहे.वर्षातील पौष आणि चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते.
मंदिराची रचना हेमाडपंथी
श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे.
खारसुड सिद्धाची आख्यायिका
औंध संस्थानाचे अधिपती बाळासाहेब महाराज यांच्या सूचनेवरून प्रसिध्द कारखानदार किर्लोस्कर यांनी हा मंडप बांधला आहे. गाभार्यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे.
या ग्रामदेवतेची आख्यायिकाही अतिशय मनोरंजक आहे. मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिध्दनाथाच्या कृपेने त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली. या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली. म्हणून या स्थानास खरसुंडी सिध्द-खरवस, शुंड सिध्द असे नांव प्राप्त झाले. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो.
श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा
गाभार्यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे.शिखरावर भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्णकलश असून त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. श्री सिद्धनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई-चौघडा वादनाने सुरू होतो. त्यानंतर मूर्तीस अभिषेक घालून पत्रीपूजा बांधण्यात येते.
पत्रीपूजेनंतर ’श्रीं’ची कापडी पूजा बांधण्यात येते. संपूर्णपणे कापडाचा वापर करुन विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे येथील प्रमुख वैशिष्टय आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. खरसुंडी गावातील पुजारी मंडळींकडून सिद्धनाथांची विविध स्वरुपात पूजा बांधली जाते. भल्या पाहाटे श्रींच्या मूर्तीस गरम पाण्याने स्नान घालण्यात येते. देवांना कौल लावला जातो. त्यानंतर श्रींची सुंदर अशी पूजा बांधण्यात येते.
दररोज श्रींची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा करण्यात येते. पूजेसाठी विविध प्रकारचे प्राणी वापरतात. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते.
सशाची पारध
माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते. मोठ्या उत्सवात पालखी सोहळा रंगतो. त्यास 'पारधी पौर्णिमा उत्सव' असे म्हणतात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सशाचे मांस तसेच मीठ व गुलाल यांच्या मिश्रणापासून ही पारध बनवली जाते.
वर्षभर विविध उत्सवांचं आयोजन
मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. यात चैत्रपाडवा, रामनवमी, नाथअष्टमी, चैत्र वद्य दशमी, चैत्र यात्रा, नवरात्रौत्सव, देव सीमोल्लंघन शिकारीसाठी प्रस्थान, पालखी सोहळा, माघ पौर्णिमा, श्रीनाथ जन्मकाळ, कार्तिक वद्य प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुद्ध त्रयोदशी, अधिकमास यांचा समावेश होतो. याठिकाणची सासणकाठ्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे. नवसाच्या सासणकाठ्या, मानाची सासणे, श्री सिद्धनाथांच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल- खोबऱ्याची उधळण करतात. यावेळी भाविक गुलालाने अक्षरशः न्हाऊन निघतात.
खरसुंडी नगरीतील मंदिर परिसर, गावातील सर्व रस्ते, गावचा परिसर गुलालाने व भाविकांनी खचाखच भरलेला असतो. 'नाथबाच्या नावानं चांगभलं', 'सासनाचं चांगभलं'च्या जयघोषाने परिसर दुमदुमुन निघतो. ढोल-ताशांच्या निनादावर सासणकाठ्या नाचत असतात. हे मनोहारी दृष्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविक येथे हजेरी लावतात. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं.
कडेपूर येथील श्री डोंगराई देवी.
हिंदुस्तानातील देव-देवतांची पवित्र व जग्रूत मंदिरे पर्वताच्या, डोंगर-गड, व नदीकिनारी उगम, संगमावर वसली आहेत. यापैकी समुद्र सपाटीपासून २९०० फुट उंचावर सह्याद्री पर्वताच्या रांगेत पूर्वेच्या टोकावर आकाशी चुंबन घेणारे, चंद्र-सूर्याच्या प्रकाशाने दिवसरात्र सुशोभीत दिसणारे, नानविविध लतावेलीच्या हिरव्यागार गर्ध झाडीने नटलेल्या, नयन रम्य टिकाणी वसलेले असे हे डोंगराई देवीचे गिरीकंदरातील अतीप्राचीन डोंगराई शक्तीपीठ आहे.
मध्ययुगात इ. स. 1209 राजा भोज यांचा, देवगिरीचा सम्राट सिंधण यादव यांनी पराभव करून , सातारा (पुर्वी सांगली सातारा जिल्ह्यात होती) कोल्हापूर भागावर सत्ताप्रस्थापित केली. त्यांच्या पदरी असलेल्या हेमाद्रिपंताने महाबळेश्वर येथे बरीच हेमाद्रिपंताकडून महाबळेश्वराच्या पूर्वेस (160 कि. मी.) कडसुर पर्वत (पूर्वीचा लिंगराज पर्वत) या डोंगरावर म्हणजेच “आताचे श्री क्षेत्र डोंगराई” या टीकाणी मंदिर उभारणी कराणेस पंताकडून व्यवस्था केल्याचे समजते. शिर्के, व जावळीच्या मोरे घरण्याची सत्ता आल्यावर, अनेकर सरदार ब काडेपूरच्या यादव-देशमुख घराण्यांनी देवीच्या मंदिराची वेळोवेळी डगडुजी केली.त्यांनी कडेपूरचे लढाऊ यादव-देशमुख व परिसरातील शेकडो भक्त हाताशी धरून, तटबंधी गड बांधला . उत्तर दिशेला (औंध) देविकडे तोंड करून चिरेबंदी मोठा दरवाजा बांधला. गडाच्या पायार्या केल्या. या डोंगराई गडावरुन चारी दिशांची स्पष्ट टेहळणी केन्द्र म्हणून निवड करून , तोफखांय व्यवस्था केली. 12 वर्षे तीर्थथान करुन इ. स. 1645 साली, श्री समर्थ रामदास स्वामी चाफलाहून (उंब्रज मार्गे) प्रथम काडासूर (आताचे नांव कडेपूर) या परिसरमध्ये आले. तेव्हा त्यांनी या डोंगरीईवर काहीतरी, दैविक गोष्टींचा साक्षात्कार झाला. त्यावेळी त्यांचे वय 37 वर्षे होते. डोंगराई मंदिरावर राजगुरू समर्थ रामदास स्वामी यांनी येथे मारूतीरायंची व अन्य देवतांची स्थापना केल्याचे जाणकारकडून व इतर पुस्तकाच्या आधारे दिसून येते. यादव घराला त्यांनी अनुग्रह दिला. सध्या या ठिकाणी आर्य समाजाचे देवीचे अत्यंत परमभक्त “पटवी बंधू भगिनी” व त्यांचे सर्व भागात विखुरलेले अन्य नातेवाईक हे यासाठी (डोंगाराईच्या भक्तीसाठी ) भरपुर मदत करतात.
चालुक्यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला
एक नजर
भाळवणी (ता. खानापूर) येथे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख.
चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार
शेतकऱ्यांकडून बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व व्यापाऱ्यांकडून दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात
मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेख शोधला. जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेणी, त्यांची कामगिरी, जैन धर्मीयांचे स्थान यांची माहिती नव्याने प्रकाशात आली. हळेकन्नड लिपीतील हा जिल्ह्यातील सर्वांत जुना शिलालेख असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
भाळवणी (ता. खानापूर) गाव प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील सध्याच्या बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथून राज्य करणाऱ्या चालुक्य राजांची भाळवणी उपराजधानी होती. गावात मोठी व्यापारपेठ असल्याने प्रसिद्ध व्यापारी गावात वास्तव्यास होते. गावचे नागरिक, व्यापाऱ्यांनी मोठी मंदिरे बांधल्याचा उल्लेख शिलालेखांत आहे. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी, एक देवनागरी शिलालेख सापडले. त्यापैकी दोन चालुक्यकालीन, तर एक यादवनृपती दुसरा सिंघन याच्या काळातील आहेत. सर्व शिलालेख सध्या कऱ्हाड येथे आहेत. मात्र, सध्या उपलब्ध झालेला शिलालेख त्याहून वेगळा आहे.
तीन भागात शीलालेख
या लेखाचे तीन भाग आहेत. प्रारंभी जैन देवतेची स्तुती करण्यात आली आहे. त्यानंतर दानलेख लिहिला आहे. त्यानंतर शेवटच्या भागात शापवचन लिहिले आहे. भाळवणी येथे असलेल्या प्राचीन मूळसंघ नावाच्या जैन बस्तीचा सामान्य शेतकरी, प्रमुख व्यापाऱ्यांनी मिळून जीर्णोद्धार केला. या बस्तीतील गंध, धूप, नैवेद्य या नैमित्तिक धार्मिक कार्यासाठी काही जमीन, फुलझाडांच्या दोन बागा, काही दुकानांमधून येणारे उत्पन्न दान म्हणून दिले आहे. शिलालेखांवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध प्रा. काटकर, कुमठेकर यांनी धारवाड येथे राष्ट्रीय इतिहास परिषदेत वाचला.
वर्षभर अभ्यास
प्रा. काटकर, कुमठेकर यांना सापडलेला हळेकन्नड लिपीतील शिलालेखाचे ठसे घेऊन वर्षभर अभ्यास करण्यात आला. राहुल गंगावणे, बाळासाहेब पाटील यांनी सहकार्य केले. शिलालेखातील दान हे २० फेब्रुवारी १०७० रोजी देण्यात आले आहे. भाळवणीतील व्यापारी, ६० शेतकऱ्यांनी शिलालेख लिहून ठेवलाय.
अभ्यासानंतरचे निष्कर्ष
हा शिलालेख चालुक्यराजा सोमेश्वर (दुसरा) याच्या राजवटीतला आहे.
सोमेश्वराची कारकीर्द सन १०६८ ते १०७६ अशी केवळ आठ वर्षेच झाली होती.
या काळातील त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याइतके शिलालेख आढळून येतात.
शिलालेख हा जुन्या कन्नड लिपीत आहे.
नेवरी वाडा
नेवरीतील नारायण आप्पाचा वाडा
●●●●●●●●●◆◆◆◆●●●●●●●●●●●
नेवरी गाव हे कडेगाव तालुक्यातील विविध कारणांमुळे प्रसिद्ध गाव (जिल्हा सांगली) , मग ते सध्याचे राजकीय दबदबा असेल किंवा पंचक्रोशीतील सर्वांत डेव्हलपड खेड असेल, लोकसंख्याही तशी गावची भरपूर त्यामुळे ज्या बाजूने नेवरीकर झुकतील त्याचाच गुलाल आमदारकीसाठी किंवा इतर पदांसाठी व्हायचा हा इतिहास आहे.
तसेच गावाला ऐतिहासिक वारसा हि लाभला आहे, छ. शिवरायांचे जावई सरसेनापती. हरजीराजे महाडिक यांचे बंधू व्यंकोजी महाडिक यांनी वसवलेले गाव म्हणूनही या गावाकडे पहिले जाते. आजही गावच्या दक्षिण बाजूला ऐतिहासिक बारव , आमराई, व बाजूला हत्तीकुंड पाहायला मिळतो. कालांतराने मुलुख वर्चस्वाने या गावात महाडिक व इंगवले यांच्यात सत्ता संघर्ष झाला व इंगवले लोकांना हे गाव सोडून जावे लागले (सध्या हे लोक कराड जवळील रिसवड या गावात राहतात)
गावामध्ये पूर्वीच्या काळचे भरपूर वाडे होते पण कालांतराने काही नष्ट केले गेले तर काही वाडे आजही आपले आस्तित्व , इतिहास टिकवून आहेत. गावामध्ये गोडवनाजवळ नारायण आप्पाचा वाडा, त्याच्या बाजूलाच पाटलांचा वाडा, चिंचनकर आळीला ब्राह्मणाचा वाडा, गणेश चौकातील वाडा, पिराच्या वाड्यात 1-2 वाडे आहेत. सध्या मात्र यातील थोडेसेच चांगल्या स्थितीमध्ये आहेत.
आपण या वाडयांच्या बांधणीबद्दल थोडी माहिती घेऊया, गोडवणाजवळील नारायण आप्पाच्या वाडा हा आजही चांगल्या अवस्थेत आहे, वाड्याचे निरीक्षण केले असता असे निदर्शनास येते कि हे बांधकाम संपूर्ण चुन्यामध्ये झाले असून, दरवाजाच्या वरती शिल्प कोरले आहेत (पूर्वी एक पद्धत होती कि ज्या काळात बांधकाम होईल त्या काळातील एक घोषित चिन्ह त्या बांधकामावर कोरले जायचे)
या शिल्पामध्ये शरभ (वाघ व सिंहाचे प्रजननातुन निर्माण झालेला प्राणी) दाखवला आहे, शरभाच्या पायामध्ये हत्ती दाखवला आहे (हत्तीची शिकार), मध्यभागी कुंभ दाखवला आहे. हे शिल्प शिवकाळातील प्रत्येक किल्ल्यावरील दरवाजावरती आपणास पाहायला मिळते याचा अर्थ हे बांधकाम हि शिवकाळातीलच आहे ( या चिन्हाचा अर्थ त्या राज्यामध्ये कोनत्याही सत्तेबरोबर संघर्ष करण्याची ताकद (शरभ) , राज्यामध्ये भरभराटी येवो (कुंभ) असा त्याचा अर्थ होतो)
वाड्याची रचनाही नियोजन बद्ध आहे, दरवाजा लाकडी आहे तर आतमधून रात्रीचे वेळीस दरवाजा बंद करणेसाठी लाकडी ओंडका आतमधून लावण्याची सोय आहे, चोहो बाजूने दगडी भिंत आहेत व आतमध्ये एका ओळीत घरांचे माती बांधकाम, समोर लहान मुलांना खेळण्यासाठी आंगण, पाण्यासाठी मोहरी, मौल्यवान वस्तू दडवून ठेवण्यासाठी खोदलेले प्याव (भुयारी खोली), व घरांवरती कंभरभर मातीचे छत ज्यामुळे घर पावसाळ्यात गरम राहायचे तर उन्हाळ्यात थंड. अप्रतिम बांधकाम.
सलाम त्या कारागिरांना.....!!!
🖋मनोज महाडिक
9156571313
श्री_हरणेश्वर_महादेव
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इ.स.1883 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पण त्याच्या 106 वर्ष आधी तासगाव (जि.सांगली) येथील संस्थानिक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी तासगाव येथे सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. इथला ऐतिहासिक रथोत्सव संपूर्ण राज्यासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे.
तासगावचे संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे या घराण्यातील पराक्रमी सरदार होते. या घराण्याचे मूळ पुरूष पुण्यश्लोक हरभट (बाबा) पटवर्धन हे होते. ते गणपतीपुळे येथील गणपतीचे फार मोठे भक्त होते. अनेक वर्षांपासून ते दुर्वांच्या रसाचे प्राशन करून श्रींची खडतर आराधना करीत होते. असं म्हणतात की त्यातून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त केली होती. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार घराण्याच्या उत्कर्षासाठी कोकण प्रदेशचा निरोप घेऊन त्यांनी देशांतर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांचा मुक्काम इचलकरंजी इथे झाला. तिथे त्यांची भेट पुण्यातील पेशवे दरबारातील प्रसिद्ध सरदार इचलकरंजीकर घोरपडे यांच्याशी झाली. त्यांनी हरभट बाबांच्या सहा मुलांची पुण्याला पेशवे दरबारी शिफारस करून नोकरी मिळवून दिली. हरभट बाबांचे एक चिरंजीव म्हणजे रामचंद्रपंत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे परशुराभाऊ. पण परशुराभाऊंना दुदैवाने वडीलांचा सहवास फार कमी लाभला. इ.स. 1746 च्या दरम्यान रामचंद्रपंतांचे देहावसन झाले. त्यानंतर आई, चुलते यांनी भाऊंचा सांभाळ केला. भाऊ संस्कृत पठण, पत्रलेखन आणि मर्दुमकी या क्षेत्रात निपुण होते. इ.स.1755 ते 1799 या काळात सुमारे शंभर लढायांमध्ये त्यांनी पराक्रम गजवला. त्यावेळी ब्रिटीश सेनापती लॉर्ड वेल्स यांनी भाऊंबद्दल गौरोवोद्गार काढले होते. राजनिष्ठेचा महामेरू, युद्धतज्ञ असल्यामुळे माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या युद्धानंतर भाऊंना कसबे तासगावची नेमणूक दिली. त्यावेळी भाऊंनी तासगावच्या संस्थानाची मुहूर्तमेढ 1767ला रोवली. 1770 ते 1799 या कालंखंडात भाऊंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. टिपू सुलतान बरोबरही भाऊंची अनेक युद्धही झाली. याचवेळी मोहिमांच्या निमित्ताने भाऊंना अनेकवेळा कर्नाटक आणि श्रीरंगपट्टनचे दर्शन झाले. तेथील हिंदू मंदिरे आणि गोपूरं पाहून भाऊ आश्चर्यचकित झाले.
पटवर्धन घराणे गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे भक्त होते. भाऊंचे आजोबा हरभट बाबा हे गणपतीपुळे येथे गणपतीचे पुजारी होते. त्यांच्याकडूनच भाऊंना गणेशभक्तीचे बाळकडू मिळाले. दरम्यान 1971 मध्ये भाऊ तासगाव येथे स्थायिक झाले. थोड्याच दिवसात त्यांना गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दर्शन दिले. त्यावेळी प्रत्येक वेळी गणपतीपुळेला येऊन दर्शन घेण्याचा त्रास घेण्यापेक्षा तासगाव येथेच माझी प्रतिष्ठापना कर, असे श्रींनी भाऊंना स्वप्नात सांगितले, अशी मान्यता आहे. गणपतीपुळे येथील गणपतीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार भाऊंनी कर्नाटक इथून गवंडी, सुतार, शिल्पकार आणि राजस्थानातून चित्रकार आणून 1771 ते 1779 या काळात तासगाव येथे सिद्धीविनायकाचे भव्य मंदीर उभारले. तासगावच्या गणपती मंदीराची रचना ऐतिहासिक आणि अतिशय भव्य दिव्य आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मोठे प्रशस्त पटांगण आहे. समोर प्रवेशद्वार आणि देवस्थानची कचेरी आहे. शेजारी रथगृह आहे. प्रवेशद्वारावर 7 मजली (96 फूट उंचीचे) राज्यातील एकमेव गोपूर आहे. तेथून पुढे गेल्यावर केंद्रस्थानी पूर्वी कार्यरत असलेली कारंजे दगडी प्रांगण आहे. मंदीराच्या पश्चिम बाजूला नक्षीदार खांबांनी केलेला सभामंडप, पाचही देवतांचे दगडी मंदीर आहे. गोपूर मात्र दगड आणि विटा अशा साहित्यांने युक्त आहे. भाऊंनी श्रीरंगपट्टण येथे पाहिलेली रथोत्सवाची कल्पना तासगावात आणली. रथोत्सवासाठी प्रथम भाऊंनी तीन मजली लाकडी रथ तयार केला. इ.स. 1779 मध्ये प्रथम त्यांनी तासगावात रथोत्सवाला सुरूवात केली. श्रीं ची प्रतिष्ठापना झाली. तासगावात रथोत्सवाला सुरवातही झाली. मात्र गावची भरभराट झाली तरच गावकरी आणि श्रींचे मानकरी, सार्थक यांचे पाठबळ मंदिराला मिळेल. या जाणीवेतून भाऊंनी व्यापारी, चित्रकार, संगीतकार, मानकरी यांना जमीनी दिल्या.
तासगावच्या रथोत्सवास 237 वर्षांची परंपरा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात भाविक भक्तीभावाने हा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. हा रथ पाच मजली आणि तीस फूट उंचीचा आहे. रथोत्सवाच्या दिवशी गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमिटरवर असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान या रथोत्सवास सुरवात होते. राजवाड्यात प्राणप्रतिष्ठापना केलेली मातीची मूर्ती आणि संस्थानची 125 किलोची पंचधातूंची मूर्ती पालखीतून वाजत - गाजत मंदिरात आणली जाते. त्यानंतर तेथे दोन्ही मूर्तींची आरती केली जाते. त्यानंतर जमलेला लाखो भाविकांचा जनसमुदाय गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात रथ ओढण्यास सुरवात करतो. यावेळी गुलाल व पेढ्यांची होणारी उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी गौरी हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झालेलं असतं. हा रथ काशीविश्वेश्वराच्या मंदीरापर्यंत ओढत नेला जातो. तेथे आरती करून मातीच्या मुर्तीचे कापूर नाल्यात विसर्जन केलं जातं. विसर्जनानंतर पंचधातूंच्या मुर्तीसह मिरवणूक पुन्हा गणपती मंदीराकडे येते. या रथोत्सवाने शहरातील वातावरण मंगलमय झालेलं असतं.
सातमजली गोपुरांचे आणि २४२ वर्षांची रथयात्रेची परंपरा लाभलेले तासगाव येथील गणेश मंदिर चांगलेच प्रसिद्ध आहे. मराठय़ांचे सरसेनापती म्हणून पेशवाई काळात दक्षिण मुलुखगिरीत टिपू सुलतान, हैदर खान यांच्याशी लढाई गाजविणाऱ्या परशुरामभाऊंनी या मंदिराची पायाभरणी केली, तर त्यांचे पुत्र अप्पा पटवर्धन यांनी कलशारोहण केले.
मराठय़ांच्या स्वराज्यविस्तारात पेशवाईच्या कालखंडात ज्या ज्या सरदारांनी मर्दुमकी गाजविली अशांना दक्षिण भारतातील संस्थाने देण्यात आली. यामध्ये प्रमुख होते ते हरभटबाबा पटवर्धन. पटवर्धन घराण्यातील परशुरामभाऊ पटवर्धन यांना तासगावचा सुभा मिळाला. मूळ पुरुष असलेल्या हरभटबाबांची गणेशभक्ती परंपरागत आली असल्याने परशुरामभाऊ पटवर्धनांनी तासगावमध्ये गणेश मंदिराची उभारणी केली.
तासगावचे गणेश मंदिर हे दाक्षिणात्य स्थापत्य कलेचा वारसा म्हणूनच ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही असे गोपूर हे तासगावच्या गणेश मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्टय़. त्याचबरोबर उजव्या सोंडेची गणेशमूर्ती हेदेखील अनोखपण म्हणावे लागले. तासगावच्या गणेशोत्सवातील रथयात्रेला २४२ वर्षांची परंपरा लाभली आहे.
पटवर्धन घराण्यातील मूळ पुरुष असलेले हरभटबाबा हे कडवे गणेशभक्त. त्यांचे मूळ गाव कोकणातील गणपतीपुळ्याजवळील कोथवडे. हरभटबाबांनी दुर्वारस प्राशन करून गणेशपूजा केली असल्याचे सांगण्यात येते. परशुराम हे हरभटबाबांचे नातू. पेशवाईमध्ये अनेक लढायांमध्ये मर्दुमकी गाजवलेले. मराठय़ांच्या मुलुखगिरीत दक्षिणेत वावरत असताना तेथील मंदिराची स्थापत्यकला त्यांना आवडली आणि त्यांनी आपल्या संस्थानामध्ये तासगावला गोपुराचे गणेश मंदिर उभारले.
तासगावचे गणेश मंदिर तीन टप्प्यांत पाहण्यास मिळते. सातमजली ९६ फूट उंचीचे गोपूर, भव्य सभामंडप आणि गाभारा. मुख्य मंदिर ९.४४ ७ ८.८३ मीटर आकाराचे मुख्य मंदिर तर सभामंडप १३.७ ७ १०.३६ मीटर आकाराचा आहे. मंदिरात प्रवेश करीत असताना लागणारे गोपूर सातमजली असून यासाठी कर्नाटकातील गदगहून आणलेल्या दगडांचा वापर करण्यात आला. कर्नाटकातील वडार समाजातील कारागिरांकडून या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाला तब्बल २० वष्रे लागली. १७७९ मध्ये सुरू झालेले मंदिरउभारणीचे काम १७९९ मध्ये परशुराम यांचे पुत्र अप्पाजी पटवर्धन यांनी पूर्ण केले.
या मंदिरात उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशोत्सवात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे आगमन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसात या गणेशाची मिरवणूक काढण्यात येते. १७८५ मध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू करण्यात आली. यासाठी पाच मजली खास रथ तयार करण्यात आला असून प्रारंभी हा रथ लोखंडाचा करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या वर्षांपासून सागवानी लाकडाचा रथ तयार करण्यात आला.
कापूर ओढय़ाकाठी सातशे मीटर अंतरावर असलेल्या काíतकस्वामींना भेटण्यास गणेश रथातून जातो. ३० फूट लांब आणि पाचमजली रथ गणेशभक्त दोरखंडाच्या साहाय्याने ओढत नेतात. या वेळी रथातून गणेशभक्तांवर फुले, गुलाल, पेढे यांची बरसात करण्यात येते. तसेच दर संकष्टीला सायंकाळी पाच वाजता गणेशाची पालखी पश्चिमेस असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात येते.
असा हा उत्सव म्हणजे आम्हा तासगावकरांसाठी एक Get Together च , व्यवसाय , नोकरी , शिक्षण यासाठी बाहेर गेलेला प्रत्येक व्यक्ती आवर्जून न चुकता या उत्सवासाठी उपस्थित रहातो. तुम्हीही कधी वेळ भेटला तर नक्की भेट द्या .
सांगली संस्थानाप्रमाणेच हत्ती आहे पण तो राजवाड्यात असतो. उत्सवात तो देवळात आणून परत नेतात.देवाच्या मूर्तीस दुरूनच पाहावे लागते. पुजारी एकदाच सकाळी हात लावून पुजा करतो. राजेसाहेबही फक्त उत्सवात गाभाऱ्यात जातात.
रोजचा नैवेद्य राजवाड्यात केला जातो ते ताट एक ठराविक मनुष्यच चांदीच्या
ताटातून देवळात नेतो. भाकरी आणि मुळ्याच्या शेंगांची ( माइनमुळ्याची)
भाजी हाच नेवेद्य असतो. तर ते खाऊन ताट परत राजवाड्यात जाते.
त्या मनुष्याची नेमणूक सूचना राजाच्या कुटुंबातील कुणाला स्वप्नातून होते
आणि त्या मनुष्यासही तसा आदेश स्वप्नात मिळतो म्हणतात. तर ते एक गूढच आहे.
नैवेद्यातले अन्न दुसऱ्या कुणास मिळत नाही.
आरवडे इस्कॉन मंदिर ता- तासगाव
E-mail: LOK.Office@pamho.net
Telephone: Chinmayi dasi: +91-(0)9850723481
Krishna Bhakta das: +91-(0)9921177798
Address: Hare Krishna Gram
At-Post: Aravade
Taluka: Tasgaon
District Sangli

नक्की काय आहे कवठे एकंदमध्ये?
खरंतर कवठे एकंद हे खूप लहानसं खेडं आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगांव तालुक्यातलं. तासगांवपासून साधारण पाच-सहा किलोमीटर्सवर असणारं. इथलं बिर्हाडसिद्ध हे देवस्थान प्रसिद्ध आहे. श्रावणातल्या दर सोमवारी इथं जत्रा भरते आणि आसपासच्या गावातले लोक कवठ्यापर्यंत चालत येतात. श्रावणातल्या रिमझिम पावसात तर पाच-सहा किलोमीटर्स हे अंतर काही जास्त नाही. तर या बिर्हाडसिद्धासमोर दसर्याच्या रात्री म्हैसूरच्या दारूकामाच्या बरोबरीने असलेली आतषबाजी केली जाते.
असं म्हणतात की ही
दोनशे वर्षांहूनही अधिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे. इथल्या
दारूकामासाठी लागणारी शोभेची सर्व दारू गावातच बनवली जाते. रुई, शेवरी,
चुना पावडर, हडताळ, विविध रंगांचा खार, हजार स्फोटकं, असं साहित्य वापरुन
शोभेची
दारू बनवतात. आपल्याकडं जशी गणेशोत्सव मंडळं असतात, तशी तिथं दारूकाम
मंडळंही आहेत. त्यामुळं प्रत्येक मंडळात बनणार्या दारूकामाचा फॉर्मुला हे
त्यांचं-त्यांचं ट्रेड सिक्रेट असतं. लोक यातही बरेच प्रयोग करतात आणि हे
रहस्य त्या-त्या गटातल्या मुख्य व्यक्तीकडं गुपित ठेवलं जातं. घरातल्या
ज्येष्ठ व्यक्तींकडे हे शास्त्र असतं, त्याला 'गोलंदाज' म्हणतात. आज
गावात शोभेची दारू बनविणारे ३ ते ४ हजार 'गोलंदाज' आहेत, यावरुन येथील
उत्सवाचा अंदाज येईल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच या उत्सवात
आणि दारूकाम बनवण्यात सहभागी होतात. दसर्यानंतर लोक दिवाळीसाठीही इथले
फटाके येऊन घेऊन जातात.
कसे होते हे दारूकाम?
शिंगटी:

ही शोभेची दारू खरंतर झाडाच्या बुंधा पोखरून त्यात भरली जाते. चिंचेचं झाड यासाठी जास्त उपयोगी ठरतं. चार- पाच फूट लांबीचा चिंचेच्या झाडाचा बुंधा कापून त्यात तीन-चार इंच व्यासाचं आरपार छिद पाडतात आणि त्यात लाकडी मुसळ्याने शोभेची दारू ठासून भरतात. बरेचदा ही अशी दारू भरताना स्फोट होतात आणि दरवर्षी अशी किमान एखादी तरी दुर्घटना घडतेच घडते. तर या चिंचेच्या खोडात भरलेल्या दारूला शिंगटं म्हणतात. हे शिंगटं किंवा शिंगटी रस्त्याच्या कडेला तीन-तीन फुटांचे खड्डे खणून त्यात बसवतात. ही शिंगटी तब्बल दीड-दोनशे फूट उंच उडते. आणि आकाशात मस्त रंगीबेरंगी तुषार दिसतात.
औट:
पोखरलेल्या नारळात दारू भरून हा औट नावाचा फटाका तयार करतात. हा औट आकाशात भिरभिरत जाऊन फुटतो. कधीकधी हा औट आकाशात एखादा देखावाही तयार करतो. पण हाच औट परत येऊन एखाद्या घरावर पडला तर घराची कौलंही फुटतात.
जमिनीवरचे देखावे:

शिंगटी आणि औट आकाशात जाऊन फुटतात पण जमिनीवरचे देखावेही काही कमी नसतात. एका काठीवर देखावा उभा केला जातो. त्यातही मोर, फुगडी हे नेहमीचे यशस्वी कलाकार. एकदा का पेटवलं की काठीभोवती बांधलेली दारू त्या काठीला गोल-गोल भिरवते आणि नाचरा मोर किंवा फुगड्या घालणार्या बायका मनोहारी दिसतात. दरवर्षी या देखाव्यांत भर पडतच राहते.
आजवर डिस्को, सोनेरी झाड,
कारंजे, सुदर्शन चक्र, फुगडी, मोर, स्वागत कमान, धबधबे, भारताचा नकाशा,
गेटवे ऑफ इंडिया, अमेरिकेतील र्वल्ड ट्रेड सेंटरचा नजारा या आतषबाजीतून
जमिनीवर आणि आकाशात दाखवला गेलाय. यावर्षी तर आर्मीने केलेला सर्जिकल
स्ट्राईक हे मुख्य आकर्षण असणार आहे. दरवर्षी घडणार्या दुर्घटना सोसूनही
आज कवठे एकंद आपली परंपरा पुढे चालवत आहे. इतक्या जुन्या परंपरेचे काही
दस्तावेज आज उपलब्श नसले तरी तरी तिचं संवर्धन केलं जातं आहे, हे ही काही
कमी नाही. 
श्री संत नामदेव महाराजांसंबंधी आजही कवठे एकंद व परिसरात एक अख्यायिका सांगितली जाते. नामदेव महाराज आषाढी वारीसाठी दरवर्षी दिंडी घेऊन पंढरपुरास जात. एके वर्षी कवठे गावातून मधल्या वाटेने नामदेव महाराजांची ही दिंडी जात असताना श्रीसिध्दराज मंदिरासमोरच्या रस्त्यावर आल्यानंतर नामदेवांचे लक्ष मंदिराकडे गेले. मंदिराच्या आवारात असलेली विठ्ठल-रखुमाईची मूर्तीही त्यांना दिसली. हे विठ्ठल मंदिर असावे, या कल्पनेने नामदेव दिंडीसह मंदिराकडे निघाले.
मंदिराच्या उत्तर दरवाज्याजवळ येताच मुख्य मंदिरासमोर असणारा नंदी त्यांना दिसला. नंदीस पाहताच हे शिवमंदिर असावे, असा विकल्प त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आवारात असलेल्या विठ्ठलमूर्तीस प्रथम नमस्कार करुन सर्व वारक-यांसह त्यांनी नंदीजवळ जाऊन बाहेरुनच आतील देवाला नमस्कार केला, तो काय आश्चर्य ! मंदिरातील पिंडीवरती प्रत्यक्ष पंढरपूर येथील पांडुरंगाची मूर्ती त्यांना दिसू लागली. नामदेवांच्या मनातील विकल्पाचे निरसन झाले. प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन तेथेच झाल्यामुळे पुढे न जाता नामदेव महाराजांनी पंढरपुरात होणारे त्या उत्सवातील सर्व कार्यक्रम पुढे पाच दिवस त्याच ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले. परत जाताना त्यांनी दिंडीच्या प्रवासी काळातील नित्यपूजनातल्या त्यांच्याजवळ असलेल्या श्रीविठ्ठल व रखुमाईच्या मूर्ती आठवण म्हणून मंदिरात ठेवून दिल्या.
आजही श्रीसिध्दराजांबरोबर त्यांची पूजा केली जाते. हा चमत्कार घडल्यानंतर मंदिराच्या बाहेरील परिसरात एक पार बांधला गेला. छायाचित्रात दिसणारा हाच तो कट्टा ! 'नामदेवाचा कट्टा' किंवा 'नामदेवाचा पार' म्हणून आजही तो प्रसिद्ध आहे.
मंदिरात आषाढी पोर्णिमेदिवशी श्रींची पालखी मंदिराबाहेर आणून ह्याच नामदेव पारावर ठेवली जाते. कृष्ण-गोपाळांचे खेळ होतात, दहीहंडी फोडली जाते, तसेच नामदेवांनी सुरु केलेल्या किर्तन परंपरेनुसार आषाढी गोपाळकाल्याचे वेळी या पारावरील श्रींच्या पालखीसमोर आजही टाळ मृदुंगाच्या गजरात किर्तनसेवा केली जाते.
महाराष्ट्रातील जी पावन तीर्थक्षेत्र म्हणून उदयास आलेली आहेत त्या तीर्थक्षेत्रापैकी उत्तर वाहिनी कृष्णातीरी ( जिला दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते ) या ठिकाणी एक गांव वसलेले आहे ते म्हणजे सद्यस्थितीतील नागठाणे.
नागठाणे गावचा प्रवास हा दहाव्या शतकापासून गवळेवाडी आकराशे सत्तर ( ११७० ) पासून नागेवाडी १७ व्या शतकापासून नागठाणे असा हा गवळेवाडी, नागेवाडी, चा सर्व साधारण नऊशे ते एक हजार ( ९०० ते १००० ) वर्षाचा प्रवास. या गावात ब्रिटीश काळात एक व्यक्तीमत्वे या गावास लाभले. आपणा सर्वाना माहितीतील नटसम्राट बालगंधर्व.
बालगंधर्वाचे मुळ नावं नारायण श्रीपाद राजहंस ( कुलकर्णी ) असे होते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ साली नागठाणे येथे झाला. आज ही गंधर्वाचा कुळकायद्याने गेलेला वाडा सुस्थितीत आहे. जन्म जातच गंधर्वाना लता दिदीच्या सारखा कंठ होता. त्यांचा गळा सुमधुर होता ते शिक्षणासाठी पुणे येथे गेले असता त्यांचा गायण, नाटकात कामे करणे आवडत असल्याने त्यांनी आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून नाट्य क्षेत्र हे आपली कर्म भुमी म्हणून त्यांनी स्वीकारली विवीध नाटकांमध्ये शास्रीय गायन त्यांनी केले कालांतराने त्यांनी आपली गंधर्व नावाची नाट्य कंपनी चालू केली.
गंधर्वाना लहान वयात लोकमान्य टिळकांनी गंधर्वाचे शास्रीय गायन व भुमिका सादरीकरण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बालगंधर्व ही पदवी दिली तेव्हा पासून ते नारायण राजहंसाचे नटसम्राट बालगंधर्व झाले आणि तो काळ त्यांनी ३० ते ३५ नाटकांच्या माध्यमातून गाजवला त्यांनी त्यांच्या कारकिर्दिमध्ये अनेक भुमीका आजरामर केल्या त्यातील त्यांची महत्वाची म्हणजे स्री वेशातील भुमीका लोकांना थक्क करून सोडे.
महाराष्ट्रातील अनेक गावागावात त्यांची नाटके सादर व्हायची हे सर्व कार्यक्रम तिकीटावरती असायचे परंतू नागठाणे गावातून येणाऱ्या गावकरी लोकांसाठी फ्री पासची सोय असायची नागठाणेमध्ये शिराळकरांच्या कट्ट्यावर गंधर्वाची नाटके चार चार दिवस सादर व्हायचे याच बरोबर किर्लोस्करवाडीचे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या विनंतीवरून सुद्धा नाटकांचे प्रयोग होत असत त्यांची गाजलेली काही नाटके " एकच प्याला " , " संयोगवर " , " शांकुतल " , " मानापमान " , " मृचकटिक " ई. अशा महान कलाकाराने नाट्य कंपनी मधून मिळवलेल्या पैशातून नागठाणे गांवचा सुपूत्र म्हणून आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ नागेश्वर मदीरा समोर मंदीरात जाणसाठी दगडी पायऱ्याने बांधकाम केले आहे त्या बांधकामामध्ये कोरलेल्या शिला लेखात पुढील मजकूर लिहलेला आपणास पाहावयास मिळतो तो असा " श्री नागेश्वर महाराज यांचे चरणी कै. श्रीपाद कृष्ण कुलकर्णी (राजहंस) रा. नागठाणे यांचे स्मरणार्थ चि. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या पायऱ्या बांधल्या मिती कार्तिक शु॥ १५ शके १९५२ " अशा या महान कलाव्यक्तीचा मृत्यू १५ जुलै १९६७ साली पुणे येथे झाला.
अकराव्या शतकाच्या मध्यंतरीला नागदेऊरचे ( नागपुरचे ) देशमुख नंतर कवठेमहंकाळ येथील रांजणी गावी वास्तव्यास असणारे भोसले हे ११४२ साली रांजणी येथील आपले जेष्ठ बंधू हिरोजी भोसले यांना सोडून दोन नंबरचे बोनोजी भोसले हे गवळीवाडी येथे कायमचे वास्तव्यास आले व त्यांचे दोन बंधू ऊरुण इस्लामपूर येथे व रामजी भोसले हे येडेनिपाणी येथे वास्तव्य करू लागले.
बोनेजी भोसले यांनी गवळेवाडीचा पूर्ण अभ्यास काही वर्षात केला. नंतर गवळेवाडीची पाटीलकी असणाऱ्या व्यक्तीचा खून करून गवळेवाडीची सत्ता आपले हाती घेतली आणि ते स्वतः वाडीचा कारभार पाहू लागले. वाडीतील सर्व सीमेवर मार्ग शोधू लागले त्यांच्या नजरेसमोर होते की ऐन उन्हाळ्यात वाडीवरील २०० वर असणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई पडत असल्याचे जानवले. आणि ते पाण्याच्या शोधासाठी एक दिवस वाडी शेजारी असणाऱ्या झाडीमध्ये ते गेले फिरत - फिरत ते नदी काठी असण्याऱ्या टेकडीवर जाऊन पोहचले त्या ठिकाणी त्यांना एक ऋषी तपसाधना करत असलेले दिसले बानोजींनी त्यांचे दर्शन घेतले आणि ऋषीची विचारपूस केली..
बानोजींना ऋषी सांगू लागले मी या गावातून चाललो असताना तहान भागवण्यासाठी मी या नदी पात्रातील पाणी प्राशन करून विश्रांतीसाठी या टाकडीवरती वस्तीसाठी काही दिवस होतो त्या दरम्यान या टेकडीवरती शंकर पार्वती मुक्कामासाठी आले होते. त्या दोघांनी ही या उत्तरेस वाहणाऱ्या नदीची खूप प्रशंसा केली. या नदीस त्यांनी कृष्णा म्हणून संबोधले आहे. या टेकडी परिसरात नागांचे असणारे वास्तव्य पावण करण्यासाठी त्यांनी येथे शिव लिंगाची स्थापना केली आहे. या शिव लिंगा वरती नेहमी दोन नागांची वस्ती असते. सकाळी शंकर पार्वती या दोघांनी कृष्णेच्या पात्रामध्ये उत्तर दिशेस तोँड करुन या ठिकाणी आले असता मी त्यांना नमन केले आणि त्यांनी मला शिव लिंगाची सेवा करण्याची आज्ञा दिली. तेव्हा पासून मी या ठिकाणी या नागटेकडी वरती या शिवलिंगाची पहाटे कृष्णेत आंघेळकरून उत्तर वाहिनीचे पाणी या शिवलिंगावरती घालतो आहे. या उत्तर वाहिनी कृष्णेत जो कोणी उत्तर दिशेस तोंडकरुन पाण्यामध्ये डुबकी मारेल, त्याचे पातक नाहीसे होईल या गोष्टीचा तु प्रसार कर असा अशिर्वाद देवून शंकर पार्वती या ठिकाणाहून लुप्त झाले....
हे ऋषींचे बोलणे ऐकल्यानंर बानोजी आपली व्यथा ऋषींना सांगितली, त्यावर ऋषी म्हणाले या कृष्णेचे पाणी कधीही उन्हाळ्यात आटलेले नाही, मी गेली कित्येक वर्षे पाहत आहे, आपण या नागटेकडीच्या बाजूस राहण्यासाठी यावे हे ऐकून बानोजींनी सुद्धा मनोमनी या भागात रहाणेचे ठरवले आणि ते गवळीवाडीत परत आले व वाडीतील लोंकांची बैठक घेवून त्यांना सर्व हकिकत सांगून गवळीवाडीतील पांठरी मातीसारखीच माती या टेकडी व परिसरात असल्याचे हीत त्यांनी नमुद करून सर्वानी माझ्याबरोबर या नागटेकडीकडे वास्तव्यास यावे असे सांगितले व काही महिन्यातच नागटेकडी शेजारी वस्ती निर्माण झाली. याच गवळेवाडीतील दोन कुटुंबे गवळेवाडीच्या उत्तर दिशेस असणाऱ्या खोलभागात आपल्या जमिनीमध्ये राहण्यास गेले. नागटेकडी व खोलभाग यांचे मधोमध दोन कुटुंबे नदिच्या किणारी वास्तव्य करु लागले. कालांतराने ही दोन कुटुंबे नागटेकडी येथे राहण्यास गेली मात्र खोलभागातील कुटुंबे कायमस्वरुपी या खोल भागातच राहु लागल्याने खोल भागावरुन खोले असे त्यांचे आडनांव झाले व आडनांवरून त्यांच्या वस्तीचे खोलेवाडी असे नाव पडले अलिकडेच या वाडीचे सुर्यगांव असे नाव अस्थीत्वात आहे......
नागटेकडी वरती राहण्यास आलेल्या बानोजी भोसले आता पाटील झाले होते. त्यांना आपल्या मुळ गांवचे नांव नागदेऊर आणि नागटेकडी या शिंवलिंगा भोवती वास्तव्यास गवळेवाडी येथे वास्तव्य असणाऱ्या भागात आजही पांढरी या नावाने ओळखले जाते. याच नागेवाडीत अनेक पिढ्या गावचा मुळ इतिहास आपल्या पुढच्या पिढीस सांगत कालवश झाल्या आहेत....
नागेवाडीचे नामांतर सतराव्या शतकात नागठाणे असे झाले. या नागठाणेचे महात्म्य आसपासच्या शहरापर्यत पोहचले हेते. तासगांव शहराच्या राणीसाहेब सावित्रीबाई पटवर्धन उत्तर वाहिनी नदीमध्ये अंधोळ करुन पुण्य मिळवण्यासाठी आल्या त्यांनी या नदीमध्ये स्नान केले व तासगांव येथे नागठाणेचे त्यावेळचे कारभारी यांना तासगांव येथे बोलावून घेवून उत्तर वाहिनी कृष्णा तीरी भव्य उत्तरेश्वर महाराज यांचे चरणी घाट बांधण्याची आपली कल्पना सांगितली. नागठाणेकरांची मान्यता मिळताच काही कालावधीमध्ये घाट बांधकामासाठी लागणारे साहित्य या कृष्णातीरी येवून पडले. आणि शेपाचशे लोक या घाटाचे काम करू लागले. या घाटाची रचना नागेश्वर मंदीरातून भूयारी मार्गाने कृष्णानदीमध्ये असणाऱ्या डोहातील मंदिरात नंदी, नदीसमोर शिवलिंग, शिवलिंगाच्या सभोवती सात स्मृती, सात मृतीच्यावर छत्री, छत्रीच्या पुढील बाजुस जलकुंड, जलकुंडातून घाटाची सुरुवात, जलकुंडात जादा होणारे पाणी निघून जान्यासाठि भव्य गोमूख, गोमुखातून निघनारे पाणी मंदीरापासून दूर नेण्यासाठी साखळी, ऐन पावसाळ्यात देखील भुयारि मार्गाने या मंदीरामध्ये पूजा होणेसाठी शिसव या धातूने या मंदीराचे व घाटाचे बांधकाम रचनेनुसार पाचव्या पायरीपर्यत आले आणि या पायरीमध्ये बरोबर मध्यभागी " श्री उत्तरेश्वर महाराज चरणी सावित्रीबाई पटवर्धन तासगांवकर निरंतर शालीवाहक शके ॥ १७४६ सुश्रानुनाम सवत्सरे ॥ " अशी अऱ्याची शिला बसवण्यात आली आहे, हे नागठाणेकर कारभारी व गावकरी यांना पसंत न पडल्याने त्यांनी घाटाचे काम थांबवले. तासगांवकर पटवर्धन राणीसाहेबांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याची खूप प्रयत्न केला परुंतू, नागठाणेचे कारभारी यांना मान्य नसल्याने अखेर राणी साहेबांनी झालेले घाटाचे काम तसेच अर्धवय सोडून भिलवडी येथे दक्षिण वाहिनी कृष्णा तारी साहित्य हलवून घाटाचे काम पूर्ण करूण घेतले. आजही आपणास हा घाट भिलवडी येथे दिमाखात उभा असलेला पहावयास मिळतो आहे....
या घाटाचे अवशेष उखरून गावकरी मंडळींनी नागठाणे येथे कृष्णा तीरी नाईकबा मंदिराचे काम पुर्ण केले आहे. या मंदीराचा पाट भिँतीला राणी साहेबांच्या नावाची शिला लेख कोरलेला घाटाचा तो दगड लावण्यात आला आहे....
अश्या या पुरातन गवळेवाडी ( नागठाणे ) लोकसंख्या १५,००० आणि खोलेवाडी ( सुर्यगांव ) लोकसंख्या १,७०० इतकी असून सुर्यगांवमध्ये फक्त काळंबा देवीचे मंदीर असून बाकी सर्व मंदिरे नागठाणे येथे आहेत. सुर्यगांवचे सर्व लोक नागठाणे येथे देवाचे दर्शनासाठी येतात व नागठाणेचे सर्व लोक देवीच्या दर्शनासाठी सुर्यगांव येथे जातात..
बरीचशी नेहमीपेक्षा वेगळी वाटली.. एक वीरगळ , लक्ष्मी नारायणाची मूर्ती हे नेहमी सारखे होते..
परंतू विष्णूची एक नितांत सुंदर मूर्ती होती ..त्या वातावरणाशी विसंगत ..ती मूर्ती पहाताच हैदराबादच्या बिर्ला संग्रहालयामधल्या मूर्तीची आठवण झाली ..
तिथे २ शिलालेख आहेत ..


खालील चित्रामध्ये शिलालेखा वरचा कोल्हा किंवा तत्सम प्राणी दिसतो आहे.
दुसर्या शिलालेखाच्यावर एक सूर्य आणि एक चंद्र आहे

आणि २ मूर्ती आहेत ज्या ॠषी च्या आहेत म्हणून सांगितल्या जातात..
त्यांची चेहरेपट्टी आणि वेष

एक उभी मूर्ती

हा एक चेहरा एक तर खुपच अलिकडचा किंवा खूपच जुना असेल

ओवर्या ..पूर्वी यामधे पिंडी होत्या .. त्यापूर्वी रहाण्यासाठी वापरत असाव्यात.
या मांजर्या खडकात कोरल्या आहेत ..
तिथे असलेले अजून एक भग्न शिल्प
वीरगळ : येथे नेमका युद्धाचा प्रसंग नष्ट झाला आहे

गणपतीची मूर्ती नंतर 'अॅड'वलेली वाटली

दोन हत्ती : हे दोन वेग वेगळे असावेत ..दोन्हींचा आकार , कलाकुसर पाहता त्यांचा जोडा सध्याच जमवलेला दिसतोय

ही विष्णूची मूर्ती : एवढी सुंदर मूर्ती मी फक्त म्युझियम मध्येच पाहिल्या आहेत.
गाभार्यात असल्याने चोरून फोटो काढला आहे .. त्यामुळे तिच्या सौंदर्याचा
अंदाज येत नाही..केवळ या मूर्ती साठी एकदा तिथे जाउन यावे ..

हे कोणाचे चरणकमल ?
या मंदिराच्या परीसरात सर्व शिल्पे विखरून पडली आहेत.. शिलालेखाला देव समजून नारळ फोडणे सुरू आहे..
देवळाचा जीर्णोद्धार करताना डेकोरेशन कराव्या तशा मूर्ती लावल्या आहेत ..त्या मुळे मूळ क्रम , स्थिती आता कळत नाही ..
आपल्या वारशाबद्दल पुन्हा एकदा कोरडी हळहळ व्यक्त करून नाना पाटलांचे दर्शन घेतले..

आणि घराकडे निघालो ..
एकंदर शैलिवरून शिलाहार/ यादव कालातील असावे असे वाटते.
कोरीव स्तंभ चालुक्य शैलीतिल आहेत. पण शिलाहार यादवांनि हीच शैली अंगीकृत केल्याने नेमका काल ओळखणे अवघड जाते.
शिलालेखाचा दगड माझ्यामते गधेगाळ आहे. खाली दिसतोय तो कोल्हा नसून गाढव आहे. वर एखादे दान व् नंतर शापवाणी असावी. पण अर्धवटच काम आहे.नुसते आरेखन करून फ़क्त लेख कोरून उरलेले काम तसेच सोडलेले दिसते. विरगळावर सहसा शिलालेख नसतोच.
नंतरच्या मूर्ती ऋषींच्याच स्त्रीची मूर्तीबहुधा दासीची असावी. तो एक नुसता चेहराच दिसतो तसे चेहरे काही ठिकाणी पाहिलेले आहेत. पेडगावच्या बहादुरगडातील मंदिरात तसे काही चेहरे आहेत. अनाकलनीय वाटतात. काही वेळा मुखलिंगे अशा पद्धतीची पण असतात.
हे बघा तसे चेहरे, पण ही मुखलिंगे नव्हेत.
ते नुसतेच चरणकमल असलेली मूर्ती बहुधा सूर्याची असावी पण नक्की सांगता येत नाही.
बाकी सर्वांगसुंदर विष्णू मूर्ती दिवेआगरच्या रूपनारायण मंदिरात आहे. त्याची सर कशालाच नाही.
सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरडय़ा हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औदुंबरसारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्ष्यांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकडय़ांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सूर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवटय़ा, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावशा, पोपट, कोकीळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटतं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे यांचा हक्काचा निवारा आहे.
वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन अॅम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होताना आढळत नाही.
अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्या पॉइंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभरवाचे मंदिर लागते. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉइंट हे अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.
कसे जाल?
मिरज रेल्वे स्थानकापासून ६० किलोमीटर, कराडपासून ३० किलोमीटर. ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर. पुणे-बंगळुर महामार्गावरील कराडपासून बससेवा उपलब्ध.
केव्हा जाल?
पावसाळा हा उत्तम कालावधी.
श्री चौरंगीनाथ मंदिर ,सोनसळ
क्षेत्र औदुंबर : हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक नरसिंह सरस्वती यांचा येथे आणि नरसोबाची वाडी येथे कृष्णा नदीच्या काठी मुक्काम होता. औदुंबर येथे त्यांनी एका चातुर्मासात मुक्काम केला होता. श्री नरसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यामुळे दत्तभक्तांची येथे वर्दळ असते. ब्रह्मानंदस्वामी हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. ते येथेच समाधिस्थ झाले. त्यांच्याबरोबर आलेल्या मेरूशास्त्री यांनी ब्रह्मानंदांच्या साह्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ‘ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. ब्रह्मानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी औदुंबरचा प्रशस्त घाट भक्तांच्या देणगीतून बांधला. कवी हणमंत नरहर जोशी, अर्थात काव्यतीर्थ कवी सुधांशू यांचे निवासस्थान व जन्म ठिकाण येथेच आहे. त्यांनी अनेक मराठी भक्तिगीते, भावगीते लिहिली. कवी कुंजविहारी यांनी ह. न. जोश्यांना सुधांशू हे नाव दिले. औदुंबरक्षेत्री चैत्रात कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. येथील कृष्णा नदीचा घाट व निसर्गरम्य परिसर खूपच छान आहे. येथे नौकानयनाची सोय आहे. नदीच्या पत्रामध्ये मगरींचा मुक्त वावर आहे. आष्टामार्गे येथे जाता येते.
एकूणच आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण, रामलिंग बेटावरची पुरातन देवालय आणि नौका-विहार. रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायच असेल तर रामलिंग नौका विहाराचा आनंद लुटायला लवकरच जायला हवं.
रामलिंग बेट नौका विहारासाठी भोजन आदी सुविधेबाबत बालाजी बोटिंग क्लबचे सदस्य धनाजी पाटील (भ्रमणध्वनी-9552940507) किंवा माणिक कारंडे (भ्रमणध्वनी-9594795400) यांच्याशी पर्यटकांनी संपर्क साधावा.
कंधारडोह : हे सांगली जिल्ह्यातील अवघड, पण निसर्गरम्य ठिकाण आहे. पदभ्रमंती (ट्रेकिंग) करणाऱ्या धाडसी पर्यटकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जाता येते. परतीसाठी आल्या वाटेने उतरून परत चांदेल, गोठणे धनगरवाड्यामार्गे कुंडी गाव गाठावे किंवा जाणकार वाटाड्या सोबत असल्यास रुंदिवहून पुढे कंधारडोहच्या घळीत उतरून कंधार धबधबा पाहता येईल.
प्रचितगड : शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ला शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल, असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२ मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो. नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या पश्चिमेला असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. साखरपा येथून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे.
बागणी भुईकोट किल्ला : दोन-तीनशे वर्षांपूर्वी बाजारपेठ होती. १७व्या शतकात येथे हा किल्ला बांधला असावा. सध्या येथे तटाचे भग्नावशेष दिसून येतात. हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथे पीरचा दर्गा असून, मोठा उरूस भरतो.
वाटेगाव : प्रसिद्ध शाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते व लेखक अण्णा भाऊ साठे यांचे हे गाव. कासेगावजवळच पश्चिमेला हे गाव आहे. येथे त्यांचे स्मारक आहे. क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, हुतात्मा किसन अहिर असे अनेक लोक पत्रीसरकारमध्ये क्रांतिकार्य करीत होते. सावकारांपासून भूमिपुत्रांची होणारी पिळवणूकही या आंदोलनाने थांबवली होती.
कडेगाव : हे गाव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ताबूतांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या १५० वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. विशेष म्हणजे या ताबूतांच्या मिरवणुकीत हिंदूंना मानाचे स्थान आहे. भाऊसाहेब देशपांडे यांनी कडेगाव मोहरमचा पाया घातला व पीरजादे यांनी त्यावर कळस चढविला, असे म्हटले जाते. देशपांडे, सातभाई, हकीम, शेटे, पाटील, आतार, युसूफ बागवान, महंमद बागवान, माईंकर, तांबोळी, कळवात, सुतार, मसूदमाता, शेख असे ताबूत मिरवणुकीत भाग घेतात. ताबूतांची उंची २०० फुटांपर्यंत असते. ताबूतांमध्ये पाच फुटांचे वीस ते पंचवीस मजले असतात. बांबूच्या कळकावर आधारित ताबूतांसाठी सूत, चिखल, ४८ कळकाचे तुकडे, १६ खांब, आठ कैच्या एवढी सामग्री लागते. याची जोडणी करीत असताना कोठेही गाठ बांधली जात नाही. ताबूत रंगीबेरंगी नक्षीकामाने सजविले जातात. अगोदर कळसाकडून पायाकडे अशी त्यांची बांधणी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते.
भिलवडी येथील कृष्णा दगडी घाट वास्तुशिल्पाचा वैशिष्ठ्यपूर्ण नमुना आहे. कृष्णेच्या उगमापासून असा घाट आढळत नसल्याचा उल्लेख केला जातो.घाटाचा इतिहास मोठा रंजक आहे.इसवी सन १७७९ मध्ये मराठा सलतनीचे सरदार श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी बांधला.परशुरामभाऊंचा मुस्लिम सरदाराकडून १६९४ मध्ये पराभव झाला.या घाटाची लांबी सव्वा चारशे फूट आहे.एकशे दोन फूट रूंदी आहे दोन्ही बाजूला चार फूट व्यासाचे चौदा बुरूज आहे.बेचाळीस पायर्या आहेत.गावाकडील बाजूस दगडी ओवारी आहे.
ओवरीच्या पाठीमागील बाजूस घाटाच्या मध्यभागातून समांतर असे भुयार आहे. त्यातून महिला नदीपात्रात जात असत.नदीपात्रातील मध्यभागी महिलाच्या स्नानासाठी कुंडे होती.कुंडंच्या खोलगट भागात घोडे,जनावरे यांचे पाय अडकून अपघात होऊ लागल्याने कालांतराने येथे अष्टकोटी मंदीर बांधण्यात आले.त्यामध्ये शंकाराची पिंड आहे.घाटाच्या आणखी वैशिष्टयापैकी ओवारी पाहिले असता तो सपाट भासतो.महापुरातही ओवारी दगड सुस्थितीत आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात या ओवारीमध्ये गावातील शेतक्री वर्गाच्या धान्याची साठवणूक होत असत.
गेल्या दोन-तीन दशंकात गावकर्यांनी या चिरंतन वास्तूच्या रक्षणासाठी काही पावले उचलली.ग्रामस्वच्छता अभियानाच्या पार्श्व भूमीवर या घाटाबाबत जागरूकता आणखी वाढली.कृष्णामाई उत्सव,दीपोत्सव अशा उपक्रमांच्या निमित्ताने घाटची स्वच्छता होते.ऎतिहासिक वास्तू बरोबर गावाची व परिसराची शान असलेला हा घाट चिरंतन प्रतीक आहे.
जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध आहे. भारतीय समाजाचे
आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते .
आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी
आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व
तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा
खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी
मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे .
युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह '
रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा
हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी
तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर
भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र
काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या
रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेली
, जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह
रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV ,
मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला
असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि
आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो योग्य नियोजन केले तर
लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि
चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच
अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण
आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .
ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
माहिती आणि लेखन -
डॉ . शशिकांत पाटील , संदीप पाटील
Audumbar
Day 1: Pune > Siddhagiri > Stavnidhi > Kothali > Khidrapur > Kuntugiri
Day 2: Kuntugiri > Ramlingh Tirth > Ichalkaranji > Kumbhoj
Day 3: Kumbhoj > Audumbar > Pune
Clocked 700+ KMs
How to reach: On NH4 from Pune side before Kolhapur take exit to Wadgaon. Proceed to Astha and look for Audumbar diversion.
Time of visit: May 2011
We
started early AM. The road was running through lush green farms once we
left wadgaon. On the way a huge peacock crossed the street.
Unfortunately it happened so quickly that I didn’t have time to stop and
pull my camera...
Adumbar is small village in the interiors. A sacred temple of Lord
Dattatraya is located on the banks of the Krishna River. This place is
overgrown with audumbar trees and hence the name.
Just on the opposite banks lies a Bhuvanesvari temple. The boatman takes you across the river in 5 minutes charging you just 5 rs.
We returned back to Pune in the evening with wonderful memories.


















































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.