‘रांजण’ हा शब्द वाचून तुम्हाला काही आठवलं का ? मला तर तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवली. त्याने नाही का, रांजणात लहान – लहान दगड टाकले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. मग तो ते पाणी प्यायला आणि स्वतःची तहान भागवली. अशीच काही रांजणं आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुकडी नदीमध्ये. पण, ही रांजणं कोणी मनुष्याने बनवली नाहीत, ती आपोआप तयार झाली आहेत. एवढंच नाही तर, “आशिया खंडातील महाकाय जलकुंड” म्हणून त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झाली आहे. त्यांनाच रांजण खळगे म्हणतात.या जलकुंडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती बारमाही आहेत. दुष्काळ पडला तरी आटत नाहीत ! विज्ञान सांगतं, ही नद्यांची भौगोलिक विशेषता आहे. त्या पाण्यासोबत लहानमोठे दगडगोटे वाहून आणतात आणि प्रवाह संथ झाला की ते तिथेच असलेल्या खाचखळग्यांमध्ये साठतात. पाण्याच्या प्रवाहानुसार हे खाचखळग्यांमध्ये साठलेले दगडगोटे तिथल्या तिथेच आपटत- फिरत राहतात. त्यामुळे रांजणाच्या आकाराचे गोल खळगे तयार होतात. बेसाल्ट खडकांमध्ये तयार झालेले हे खळगे हळूहळू मोठे होतात आणि मग त्यातूनच जलकुंडांची निर्मिती होते. पण त्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. असेच तयार झालेले हे रांजण खळगे !
पाण्याचा प्रवाह व दगडगोट्यांच्या करामतीने कुकडी नदीवर खिंड तयार झाली आहे. तिची लांबी २०० मीटर आणि रुंदी ६० मीटर आहे. त्यात तयार झालेले विविध आकारांचे, लांबी-रुंदींंचे खळगे अगदी गुळगुळीत आहेत. ते पाहताना आपण जणू मंगळावरच आलोय असं वाटावं ! जशी वर्ष लोटली तशी या खळग्यांची खोलीही वाढतच गेली. काही ठिकाणी तर अगदी १०० फूट खोल खळगेही आहेत ! निसर्गाची ही निर्मिती खरंच सुंदर आहे. कारण, खळगे बनायला वर्षानुवर्षांचा काळ लागत असला तरी त्यानंतर दिसणारं दृश्य मात्र विलोभनीय असतं. या रांजणखळग्यांबाबत आणखी एक दुर्मीळ गोष्ट म्हणजे इथे राहणाऱ्या पक्ष्यांनी बनवलेली मातीची घरटी. घरटीही दुर्मीळ आणि इथे आढळणारे पक्षीही ! भारतातील खूप कमी ठिकाणी अशी घरटी पाहायला मिळतात. त्यामुळे रांजणखळग्यांची सफर पक्षीप्रेमींसाठीही पर्वणीच ठरते.
पूर्वी फक्त भौगोलिक बदलांचा अभ्यास करणारे अभ्यासकच इथे यायचे पण, गिनिज बुकमध्ये नोंद झाल्यानंतर अनेक उत्साही पर्यटकही ही निसर्गाची निर्मिती पाहायला आवर्जून येतात. याशिवाय कुकडी नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना असलेली मळगंगा देवीची मंदिरं आणि या दोन्ही मंदिरांना जोडणारा ‘झुलता पूल’ही पर्यटकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरतोय. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही वाढतेय. मग या वीकेंडला तुम्हीही करा की बेत रांजण खळगे पाहण्याचा ! त्यासोबतच तुम्ही मोराची चिंचोली हे पर्यटनस्थळही पाहू शकता.
प्रचलित
नावे : टाकळी हाजी/कुंड माउली/निघोज/मळगंगा (टाकळी हाजी असाच उल्लेख
करावा,कारण एक हाजी टाकळी नावाचे गाव नगर-पुणे वेशीवर आहे.)
कसे जायचे : पुणे-नगर महामार्गावर,सुप्रसिध्द्,अष्टविनायकांपैंकी एक रांजणगावच्या गणपतीच्या चौफुल्यावर,डाव्या बाजुला वळण घेतले की सोने-सांगवी,पाबळ फाटा क्रॉस केला की टाकळी हाजी.
वेळ : पुण्यापासुन ६० कि.मी..दुचाकीवर ,१ ते १.५ तास...
रस्ता : रांजणगाव पर्यंत हाय-वे पुढे २५ एक कि.मी. ग्रामसडक.....तीन-एक कि.मी. थोडासाच खराब....
जाताना बघण्यासारखे :
१) वाघोलीतले वाघेश्वरीचे मंदीर...ईथे एक पेशवेकालीन समाधीही आहे..बोटींग आहे...
२) तुळापुर ::जायच्या मुख्य रस्त्यापासुन ६ किमी आत...ईतर काहीही सांगण्याची गरज नाही.
३) कोरेगाव भीमा : नदीच्या कठड्यावर वसलेले गाव...
४) रांजणगावचा गणपती : अष्टविनायकांपैकी एक

जाताना हे बघुन डोक्याला शॉट लागला...मीठाबरोबर थेट मिरच्या..

....घोडनदीच्या किनार्यावर ....शिवकालीन मंदीरे आणे एक अपुर्ण राजवाडा....

धोके आणी सुचना :
१) रांजणगावपासुन थेट टाकळी हाजी पर्यंत,मुख्य रस्त्यावर दुचाकी-चारचाकीचे गॅरेज नाही.थोडस गावात शिरावं लागत..आठ ते नऊ किमी...
२) खळगी वरुनच पहावीत...खोलात शिरु नये...रांजणखळग्यांमध्ये प्रवाहात अनेक जण वाहुन गेलेत,त्यांची शव देखील मिळाली नाहीत.......काही दिवसांपुर्वी...पावसाळ्यात वाळुचा ट्रक वाहुन गेलाय...तो आख्खा ट्रक सापडला नाही...आता पाणी आटलेले असले तरी पाण्याचा प्रवाह कुठुन सुरु होतो आणी कुठुन नाहीसा होतो ते कळत नाही.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.