सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्तसम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपलाभाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८–६१), निजामुद्दीन (कार. १४६१–६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३–८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि ⇨सातारा संस्थानची निर्मिती झाली. ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८) नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता (१९४७).
स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रे स समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले, त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्घतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत दैदीप्यमान शिखर म्हणजे साताऱ्याचे प्रतिसरकार होय.
स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही
सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा
आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट
१९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि
दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन
दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा
जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले. 
कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.
मुंबई-ठाणे-पुणे-बंगळूरू-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४) जिल्ह्यातील शिरवळ, खंडाळा, सातारा, उंब्रज व कर्हाड या प्रमुख ठिकाणांवरून जातो. तसेच पुणे-बंगळुरू हा लोहमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाट; सातारा-रत्नागिरी रस्त्यावरील कुंभार्ली घाट हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट असून, वाई-महाबळेश्र्वर रस्त्यावरील पसरणी घाट व महाबळेश्र्वर - महाड मार्गावरील पार घाट हे घाटदेखील निसर्गसुंदर व उपयुक्त आहेत.
सातार्याचे महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासूनचे अंदाजे अंतर
...पासून अंतर(कि.मी.)
मुंबई २७२
नागपूर ७६९
औरंगाबाद ३३८
रत्नागिरी २४२
पुणे ११२
मूलत: सातारा हे शहराचे नाव नसून ज्या किल्ल्याजवळ त्याची वसाहत आहे त्या किल्ल्याचे हे नाव आहे. सातारा किल्ल्याची जी नावे उपलब्ध आहेत ती अशी : मंगलाई, सप्तर्षी, सतारे, उकाबैन, इसमतआरा, शाहगड आणि अजीमतारा. या सहा नावांपैकी पहिली तीन फार जुनी आहेत. उकाबैन हे नाव बहमनी राज्यातील व त्यानंतरच्या आदिलशाहीतील आहे. अहमदनगरचा बादशहा हुसेन निजामशहा याची मुलगी व विजापूरचा बादशहा अली आदिलशहा याची राणी चांदबिबी हिला तिचा वजीर किशवरखान याने 1582 साली साताऱ्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. त्यावेळी इसमतआरा हे नाव मिळाले. इ.स. 1700 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ला घेतला त्यावेळी त्याचा मुलगा अजीमशहा याचे नावावरुन अजीमतारा हे नाव दिले आहे. उकाबैन, इसमतआरा व अजीमतारा ही नावे गेल्या सहाशे वर्षांतील आहेत. मंगलाई, सप्तवर्षी व सतारे ही नावे सहाशे वर्षांमागील असून बाराव्या शतकाच्या अखेरची असावीत. पन्हाळगडावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजांपैकी दुसऱ्या भोजराजाने पंधरा किल्ले बांधले असून त्यात सातारा किल्ल्याची नोंद मिळते.
साताऱ्याच्या दक्षिणेस उभी चढण असलेल्या आणि सपाट माथ्याच्या टेकडीवर पन्हाळ्याचा शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स.1990 च्या सुमारास सातारा (अजिंक्यतारा) किल्ला बांधला असे म्हणतात.या किल्ल्याच्या भिंतींना सतरा बुरुज आणि सतरा दरवाजे होते. आणि त्यावरुन या किल्ल्यास आणि किल्ल्या जवळील गावास सातारा हे नाव पडले असावे. परंतु सातारा या शब्दाचे अनेक अर्थ आणि व्युत्पत्ती सांगण्यात येतात. सातदरा वरुन सातारा, महादरा तो सातारा, सप्ततारा पासून सातारा, अजिंक्य ताऱ्यावरील सप्त ऋषींच्या देवालयामुळे सातारा, पन्हाळगडाच्या ईशान्य दिशेकडील पूर्वीचे गाव सातर म्हणजे सातारा आणि वर सांगितल्याप्रमाणे सतरा दरवाजे असलेल्या अजिंक्यतारा (सातारा किल्ला) किल्ल्यावरुन सातारा शब्द आलेला असावा. परंतु येथील भूमीची विशेषत: वर उल्लेखिलेल्या एकाही व्युत्पत्तीने व्यक्त होत नाही, असे स्थानिक इतिहासकारांचे मत आहे. ही विशेषत: व्यक्त करणारी म्हणून सात म्हणजे विपुल या अर्थाच्या शब्दापासून सातारा संकल्पनेची व्यत्पुत्ती काही इतिहासकार मांडतात. सातऱ्सातर, म्हणजे विस्तार असा अर्थ निघतो. विस्तार करणारा तो सातारा हे विशेषनाम भाषशास्त्री दृष्टीने योग्य ठरते. अशा रीतीने सात-सातर-सातारा अशी व्युत्पत्ती अधिक सार्थ ठरते.
सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युग पुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पहातो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद सर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्हयात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी पुरुषही होउुन गेले. सुमारे नऊ लक्ष चौरस मैलांच्या प्रदेशावर सत्ता चालविणाऱ्या मराठी साम्राज्याची सातारा ही एके काळी राजधानी होती.
सात नद्यांचे उगमस्थान असलेल्या या जिल्हयाला अंदाजे 22 हजार माजी सैनिकांच्या पराक्रमाचा वारसा लाभला आहे.आजही सेनादलात प्रचंड संख्येने जिल्हयातील जवान तळहातावर प्राण घेऊन सीमेवर देशाची सेवा बजावीत आहेत, ही ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष म्हणावी लागेल. सैनिकी जिल्हा म्हणून उदयास आलेल्या या जिल्हयातील काही गावांना मिलिटरी गावे तर काही तालुक्यांना लष्करी तालुके म्हणून आजही संबोधले जाते.
स्वातंत्र्यपूर्व काळात देश स्वातत्र्यांसाठी घडलेल्या अनेक चळवळीमध्ये मोलाचे योगदान दिलेला हा जिल्हा पूर्वी दक्षिणेकडील वारणा नदीपासून उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत दूरवर पसरला होता. स्वातंत्र्योत्तर काळात प्रशासकीय कामकाज आणि सोईच्या दृष्टीने सातारा जिल्हयाचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन स्वतंत्र जिल्हयाची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्हयातून सांगली जिल्हा तर उत्तर सातारा जिल्हयातून सातारा जिल्हा उदयास आला.
नैसर्गिक रचना :
भूगर्भीय रचना :
नद्या :
कोयना ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे. ती सुद्धा महाबळेश्वर पठारावर उगम पावते आणि पाटण तालुक्यातील हेळवाक या गावापर्यंत दक्षिण दिशेने वाहत जाते. त्यानंतर प्रवाहाची दिशा बदलून ती पुर्व वाहिनी होते आणि कराड शहराजवळ कृष्णेस मिळते. हे स्थान प्रितीसंगम म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरुन वाहनारी निरा आणि अग्नेय दिशेस वाहनारी माण या भीमा नदीच्या उप नदया आहेत. याशिवाय वांग व मांड या कृष्णेच्या उपनद्याही जिल्ह्यातून वाहतात.
हवामान व पर्जन्यमान :
विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यातील पर्जन्यमानात खूपच तफावत आहे. पूर्व भागातील दुष्काळी तालुक्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान फलटण 463 मि.मी., खटाव व खंडाळा 499 मि.मी., माण 537 मि.मी. इतके कमी आहे. तर महाळेश्वर या पश्चिम भागातील उंचीवरील ठिकाणी 2344 मि.मी. इतके जास्त आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात सह्याद्री पर्वत श्रेणीमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असून अगदी पश्चिम भागातील टोकास ते 5 हजार मि.मी. पेक्षा जास्त आहे. यामध्ये महाबळेश्वर तालुक्याचा समावेश होतो. तर पाटण, जावळी या तालुक्यात 1700 ते 2000 मि.मी. इतके आहे. जिल्ह्याच्या मध्य व दक्षिण भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा खूपच कमी असून 800 ते 1000 मि.मी. असते. यामध्ये सातारा, वाई, कोरेगाव व कराड हे तालुके समाविष्ट आहेत. पूर्व भागात म्हणजेच फलटण, माण व खटाव तालुक्यात व उत्तरेकडे खंडाळा तालुक्या पावसाचे कमी असून ते सर्वसाधारणपणे 500 मि.मी. पेक्षा कमी असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1019.7 मि.मी. आहे. 2011 चे सरासरी प्रत्यक्ष मासिक पर्जन्यमान 1315 मि.मी. आहे.
जमीन व तीचे प्रकार :
कृष्णा, वेण्णा, कुडाळी व कोयना आणि केरा या नदयांच्या खोऱ्यातील वाई, जावळी व पाटण तहसीलमध्ये अत्यंत सुपीक व गाळाची जाड थर असेलेली जमीन तयार झालेली आहे. दख्खनच्या पठारामध्ये कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजली जाते. त्यापैकी सातारा व कराड तालुक्यातील कृष्णा काठच्या जमीन कृष्णा खोऱ्यातील जमीन अत्यंत सुपीक समजल्या जातात. खंडाळा व फलटण तहसील मधील डोंगरी परिसरातील जमीन हलकी व खडकाळ आहे. परंतु निरा व तिच्या उपदयाच्या काठी असणाऱ्या जमीनी चांगल्या प्रतीच्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील नद्या व नाले यांच्या काठी असलेल्या सुपीक जमिनीचे विस्तृत पट्टे वगळता कृष्णेच्या खोऱ्याच्या पूर्वेकडील भागातील जमीन खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंत निकृष्ट आहे. ओढे नाले यामधून माळरानाचे पट्टे पसरलेले असून त्यामध्ये बाजरी सारखी हलकी पीके व जनावरांना उपयुक्त असे चांगल्या प्रकारचे गवत मुबलक प्रमाणावर वाढते.
महत्वाच्या यात्रा-उत्सव :
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याशिवाय नवरात्रोत्सवही उत्साहाने साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा, प्रतापगडावरील शिवप्रतापदिन, शिखर शिंगणापूर येथील शंभूमहादेवाची यात्रा, मांढरदेवी यात्रा उत्सव, पालीची खंडोबा यात्रा, औंधची यमाई यात्रा, सज्जनगड- दासनवमी उत्सव, म्हसवडची सिद्धनाथ यात्रा, पुसेगाव सेवागीरी यात्रा आदी अनेक यात्रा उत्सव जिल्ह्यात साजरे केले जातात.
वारसा- साहित्य-कला- संस्कृतीचा :
सातारा एक सर्जनात्मक वारसा लाभलेला जिल्हा होय. इथे अनेक तत्वचिंतक, इतिहासकार, साहित्यिक, पत्रकार, कवि जन्मास आले. जयरामस्वामी, वामन पंडित यांच्यासारखे संत तर गोविंद सागर, पठ्ठे बापूराव, आण्णाभाऊ साठे व शाहीर साबळे यांच्यासारखे शाहीर आणि रामराव चिटणीस हे बखरकार येथेच जन्मले. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, न. चिं. केळकर हे समाज सुधारक आणि द. भा. पारसनीस, रा. भ.गोडबोले, भाऊशास्त्री लेले, ग. ह. खरे, लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे ख्यातकीर्त येथेच होऊन गेले. काका कालेलकर, बा. सी. मर्ढेकर, श्री. म. माटे, वसंत कानेटकर यासारख्या साहित्यिक नररत्नांनी सातारा जिल्हयाचा सांस्कृतिक आसमंत समृद्ध केला. कृष्णा काठी वाई येथे ज्ञानसाधनेची मोठी परंपरा निर्माण झाली. विश्वकोष निर्मितीचा त्यात विशेषत्वाने उल्लेख करावाच लागेल. रवींद्र भट, अभिनेता राजा गोसावी हे इथलेच. नवभारत संशोधन पत्रिकेने आणि अन्य नियतकालिकांनी सातारा जिल्ह्याची व पर्यायाने महाराष्ट्र राज्याची मोठी सेवा केली आहे.

Sr. No Designation Functioning Area STD Code No. Telephone No. Email_id
1 Divisional Controller Satara 02162 331850
dstatstr@yahoo.co.in
dcsatara@gmail.com
1 Divl.Traffic Officer Divisional Office,Satara 02162 239479
2 Divl. Accounts Officer Divisional Office,Satara 02162 234066
3 Divl. Personnel Officer Divisional Office,Satara 02162 238169
4 Labour Officer Divisional Office,Satara 02162 238080
1 Depot Manager Satara bus stand depot contact number 02162 230064
2 Depot Manager Karad bus stand depot contact number 02164 222563
3 Depot Manager Koregaon bus stand depot contact number 02163 220221
4 Depot Manager Phaltan bus stand depot contact number 02166 222379
5 Depot Manager Wai bus stand depot contact number 02167 220680
6 Depot Manager Patan bus stand depot contact number 02372 283036
7 Depot Manager Dahiwadi bus stand depot contact number 02165 220248
8 Depot Manager Mahableshwar bus stand depot contact number 02168 260485
9 Depot Manager Medha bus stand depot contact number 02378 285259
10 Depot Manager Pargaon-Khandala bus stand depot contact number 02169 252245
11 Depot Manager Waduj bus stand depot contact number 02161 231070
महाराष्ट्राभिमान जागवणार्या, छत्रपती शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणार्या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते.
सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिमेला १२ किलोमीटर अंतरावर परळी येथे श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा सज्जनगड. या गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी.बस जाते. गडावर जाण्यासाठी ७५० पायऱ्या चढून जावे लागते. गडावर श्रीस्वामी समर्थ रामदासांची समाधी आहे. दासनवमीला तेथे मोठा उत्सव असतो. गडावर सतत पाणी असणारी दोन तळीसुध्दा आहेत. इ.स.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.१७०० मध्ये मोगल फौजांनी तो काबीज केला. परंतु औरंगजेबाच्या हयातीत मराठ्यांनी सातारा परिसरातील किल्ले परत घेतले. इ.स.१८१८ मध्ये ब्रिटिश फौजांनी सज्जनगड आपल्या ताब्यात घेतला. कुसबुद्रुक, कुसखुर्द, पळसावडे परिसरात मोरघळ येथे 3 मीटर उंचीची गुहा असून तिला तीन दालने आहेत. अजिंक्यतारा सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो. अजिंक्यतारा, अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो. पूवी या किल्ल्यावरुन शहर व सभोवताच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे. अजिंक्यतारा शिलाहारवंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये बांधला. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1698 मध्ये छ.राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली.
महाबळेश्वर- पाचगणी महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे.
परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वर येथील लिंगमाळा धबधबा, चिनामन्स धबधबा, धोबी धबधबा नयनरम्य आनंद देतात.
संपूर्ण महाबळेश्वर आणि आसपासच्या गावांना वेण्णा तलावातून पाणी पुरवठा करण्यात येतो. सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरच्या पसिरातील पर्यटकांचे हे एक महत्वाचे जलविहाराचे ठिकाण आहे. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे. महाबळेश्वर येथे सध्या पर्यटकांची बारमाही गर्दी असते.
पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात.
कसे जाल :- जवळचा विमानतळ :- पुणे 120 कि.मी.
रेल्वे- जवळचे रेल्वे स्थानक वाठार स्टे. (ता. कोरेगाव) परंतू यापेक्षा पुणे रेल्वे स्थानकच अधिक सोयीचे आहे. एसटी बसेस- पुणे- वाई- महाबळेश्वर 120 कि.मी., मुंबई - महाबळेश्वर (महाडमार्गे) 247 कि.मी. औंध पूर्वी संस्थानिकांच्या जहागिरीचे औंध हे मुख्यालय होते. पंतप्रतिनिधींचा येथे मराठा स्थापत्य शैलीतील दुमजली वाडा येथे पहाण्यासारखा आहे. किन्हईचे कुलकर्णी पदाचे वंशपरंपरागत अधिकार असलेले त्र्यंबक कृष्णा हे पंतप्रतिनिधी घराण्याचे पूर्वज. या घराण्यातील रामचंद्र अमात्याच्या पदरी असलेल्या परशुराम त्रिंबकास छत्रपती राजाराम महाराजांनी 1690 मध्ये सरदारकी आणि सुभालष्कर व समशेरजंग हे किताब दिले होते. 1909 पासून भगवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी अधिकारारुढ होते.
यमाई देवी औंध गावाच्या नैऋत्येस २४० मीटर अंतरावरील टेकडीवर यमाई देवीचे मंदिर आहे. मंदीराभोवती तटबंदी असून तिला दहा बुरुज आहेत. तटबंदीस उत्तरेस व दक्षिणेस प्रवेशद्वारे आहे. हे प्रारंभिक मध्ययुगातील तारकाकृती मंदिर असून त्यास मुखमंडप व गर्भगृह आहे. गाभाऱ्यात यमाई देवीची पाषाणातील पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. जवळच पाण्याचे तळे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून आमावस्येपर्यंत असते.
औंध वस्तुसंग्रहालय सातारा व कोल्हापूर या मुख्य शहरांना जोडणारे औंध हे गाव संस्कृतीचे अनेक अवशेष आजही जनत करुन आहे. त्यात आठ हजारापेक्षा जास्त वस्तू असलेले हे वस्तुसंग्रहालय 1938 साली बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी बांधले. विविध प्रदेशात निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक चित्रे, संगमरवरातून कोरलेली शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडच्या वस्तू, हस्तीदंती कोरीव कलाकृती आणि स्ट्राँगरुम मधील मौलिक ऐतिहासिक रत्ने यांचे दुर्मिळ दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते.हे वस्तु संग्रहालय आज महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या ताब्यात आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात.
कास व शिवसागर तलाव, बामणोली, तापोळे सातारा शहराच्या पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, या डोगराच्या कुशीत श्री शंकराचे स्थान आहे. श्रावणामध्ये हजारो भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. यवतेश्वरपासून पुढे १६ कि.मी.अंतरावर कास तलाव आहे. या तलावाचे पाणी सातारा शहरासाठी बंद पाईपने पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील या तलावाच्या परिसरात जंगली श्वापदे आहेत. हे ठिकाण सहलीचे केंद्र बनले आहे. या तलावावरुन पुढे काही अंतरावर कोयना धरणाच्या पाणलोटातील शिवसागर हा जलाशय आहे. हा भाग दाट झाडीने व्यापलेला आहे. वन विभागाने जतन केलेला नैसर्गिक वृक्षवाढीचा प्रदेश शिवसागराच्या किनाऱ्यावर आहे. बामणोली तसेच तापोळा ही जलाशयाच्या काठावरील हिरवाईने नटलेली गावे महाबळेश्वरच्या टप्प्यात असल्याने व बोटिंगसारख्या सुविधा तेथे उपलब्ध झाल्याने नवीन पर्यटन स्थळे म्हणून या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. धावडशी
साताराच्या वायव्येस ९ कि.मी.अंतरावर धावडशी हे गाव आहे. ब्रम्हेंद स्वामींना 1928 मध्ये छत्रपती शाहूंकडून इनाम म्हणून मिळालेले होते. ब्रम्हेंद्र स्वामी छत्रपती शाहूंचे राजगुरु व पेशव्यांचे गुरु होते. सन १७४५ मध्ये ब्रम्हेंद्र स्वामी निर्वतल्यानंतर छत्रपती शाहूनी त्यांच्या समाधीवर मंदिर बांधले. मंदिर उत्तराभिमुखी, अतिशय रेखीव आहे. गाभाऱ्यात भार्गवरामाची काळया पाषाणातील मूर्ती आहे. धावडशीच्या तांबे घराण्यात जन्मलेली मेरी झाँसी नही दुंगी ! असा नारा देणाऱ्या झाशीच्या राणीचे धावडशी हे जन्मगाव. आजही तिच्या वाड्याचे काही अवशेष या ठिकाणी पहावयास मिळतात. मेरुलिंग धावडशी येथील ब्रम्हेंद्र स्वामी यांचा मठ व तळी प्रसिध्द आहेत. ठोसेघर
सातारा तालुक्यातील ठोसेघर येथील धबधबा पहाण्यास पावसाळी हंगामात तरुणाई लोटलेली असते. हे स्थळ सातारा येथून 36 कि.मी. अंतरावर आहे. चाळकेवाडी येथील पठारावर उभारलेला पवन ऊर्जा प्रकल्प हेही एक आकर्षक स्थळ ठरले आहे. वाई कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले वाई हे तर दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. येथे विश्वकोश निर्मितीचे कार्य चालू आहे. वाईनजिकच्या मेणवली येथे नाना फडणवीस यांचा सुप्रसिध्द वाडा आहे. सव्वा एकराच्या प्रशस्त जागेत बांधलेल्या या वाड्यात विविध प्रकारची कलाकुसर दिसून येते. पाली पुणे-बंगलोर महामार्गावर काशिळच्या पश्चिमेस सुमारे 7 कि.मी. अंतरावर असलेले पाली येथील खंडोबा मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून ते तारळी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पौष महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. कोयना धरण
संपूर्ण राज्याला वरदान ठरलेले कोयना हे धरण पाटण तालुक्यातील कोयना नदीवर बांधलेले आहे. 1960 साली हे धरण बांधण्यात आले. धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी एवढी आहे. या धरणातील जलाशयास शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते. तापोळा ते कोयनानगर अशी बोटींगची सुविधाही पर्यटकांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. कोयनानगरचे पं.नेहरु स्मृति उद्यान कोयना जलाशयाच्या शिवसागरात भारतीय अभियंत्यांनी चौथ्या टप्प्यात लेक टॅपिंगचा अभिनव प्रयोग यशस्वी केला. कोयनानगर परिसरात अलिकडेच अत्याधुनिक पध्दतीने उभारलेले पं.जवाहरलाल नेहरु स्मृति उद्यान हेही पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे. आबालवृध्दांची तेथे वर्दळ असते. पर्यटन विकास महामंडळातर्फे येथे पर्यटन विकासाचे प्रयत्न जोमाने सुरु झाले आहेत. वनकुसवडे- पवनऊर्जा
साताऱ्यापासून ४५ कि.मी.अंतरावर पाटण तालुक्यातील वनकुसवडे पठारावर 50 मीटर उंचीच्या मनोऱ्यावर तीन पात्यांच्या विंड टरबाईनद्वारे वाऱ्याच्या गतिज ेऊर्जेचा वापर करुन विद्युत जनित्रे फिरवली जातात. यातून पवन ऊर्जा निर्माण केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प येथे साकार होत आहे. आज येथे ८५७ पवन विद्युत जनित्रांच्या सहाय्याने ३१३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते.
मांढरदेव वाईच्या उत्तरेला नऊ कि.मी.अंतरावर महादेव डोंगराच्या रांगेत मांढरदेव हे ठिकाण काळुबाई देवीच्या स्थानासाठी प्रसिध्द आहे. वाई व शिरवळहून येथे जाता येते. सन 1850 मध्ये मंदिरावर शिखर बांधले. मंदिरात मध्यभागी काळुबाई देवीची स्वयंभू मूर्ती मखरात असून ती चांदीच्या पत्र्याने मढविलेली आहे. येथे पौष शुध्द 15 ला मोठी यात्रा भरते. म्हसवडची श्री सिध्दनाथ यात्रा, वाई, लिंब गोवे, क्षेत्र माहुली व कराड येथे कृष्णामाईचा उत्सव भाविक मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात. कारखेल (ता.माण) येथे संताजी घोरपडे यांचे स्मारक आहे. कराड येथील प्रीतिसंगम कराड येथील कृष्णा-कोयनेचा संगम हा आता केवळ संगमच न राहता ज्येष्ठ नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रितिसंगमावरील समाधीमुळे येथे स्थानिक जनतेबरोबरच राजकीय नेते, पर्यटक यांचीही वर्दळ वाढली आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृति सदनही सदैव गजबजलेले असते. येथील अद्ययावत कृष्णा हॉस्पिटलमुळे परिसरातील जतनतेस वैद्यकीय सेवेचे नवे दालन खुले झाले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन आणि वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान वस्तु संग्रहालय, मनोरे ही कराडची वैशिष्ट्ये आहेत.
शिखर शिंगणापूर पुराण, इतिहास, धर्म आणि राजकारण यांचा समन्वय साधणारे शिखर शिंगणापूर हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर हे मंदीर आहे. चैत्र अष्टमीच्या दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा येथे पार पडतो. देवालयाच्या गाभाऱ्यातील शालूंकेत असलेली दोन लिंग शिवशक्तीची प्रतिके असून ती स्वयंभू आहेत असे मानले जाते. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप आणि नंदीमंडप यांचा मंदिरात समावेश आहे.
गोंदवले दहिवडीच्या आग्नेयेस आठ कि.मी.अंतरावर गोंदवलेकर महाराजांचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथे दास संप्रदायातील या महाराजांचा जन्म 1845 मध्ये व मृत्यू 1918 मध्ये झाला. येथे त्यांची समाधी असून लाखो भाविक दर्शनाला येतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम आधुनिक पध्दतीचे असून ते 1936-37 मधील आहे. गावाच्या उत्तरेस 300 वर्षापूर्वीचे भीमाशंकराचे मंदिर सुस्थितीतील आहे. चाफळ पुणे-बंगलोर महामार्गावरील उंब्रजच्या पश्चिमेला 10 कि.मी.अंतरावर कृष्णेची उपनदी मांडच्या उजव्या तीरावर चाफळ गाव वसलेले आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गावास धार्मिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. रामदास स्वामी बारा वर्षाच्या तीर्थाटनानंतर आल्यानंतर त्यांनी येथे मारुतीची स्थापना केली. समर्थानी स्वहस्ते श्रीरामाचे मंदिर येथे बांधले. शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी 300 होन दान दिले. मंदीरात राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची 1648 मध्ये स्थापना केली. जीर्ण झालेले हे मंदिर उद्योगपती अरविंद मफतलाल यांनी 1972 मध्ये नव्याने बांधून दिले. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महिला दर्शनासाठी येतात. पुसेगाव सातारच्या पूर्वेला पंढरपूर रस्त्यावर 36 कि.मी.अंतरावर येरळा नदीच्या तीरावर पुसेगाव वसले आहे. नाथपंथींच्या अकरा लिंगापैकी एक येथे आहे. येथे सेवागिरी महाराजांची समाधी आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी कामे करुन 10 जानेवारी 1947 मध्ये येथे समाधी घेतली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा या ठिकाणी भरते. त्यावेळचा रथोत्सव प्रसिध्द आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी कामे केली जातात.
जिल्हयातील अन्य महत्वाची ठिकाणे निसर्ग सान्निध्याने नटलेल्या आणि डोंगर-दऱ्या-खोऱ्यांनी व्यापलेल्या या जिल्हयातील लहान-मोठ्या गड-कोट किल्ल्यांची संख्या 25 हून जास्त आहे. तालुकावर गट-कोट किल्ल्यांची विभागणी अशी : 1) वाई- खंडाळा: कमळगड, पांडवगड, वैराटगड, केंजळगड, 2) जावळी-महाबळेश्वर: प्रतापगड,मकरंदगड, वासोटा, 3) सातारा-कोरेगाव: अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, नांदगिरी, 4) पाटण: दातेगड उर्फ सुंदरगड, गुरपावंतगड, भैरवगड, जंगलीजयगड, 5) कराड: सदाशिवगड, वसंतगड, 6) फलटण-माण: ताथवडा उर्फ संतोषगड, वारुगड, महिमानगड व 7) खटाव-वर्धनगड आणि भूषणगड आदी लहान-मोठे गडकोट किल्ले आजही इतिहासकालीन महापुरुषांच्या थोर पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत. यापैकी प्रतापगड, मकरंदगड, संतोषगड, वारुगड, महिमानगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. आगाशिव डोंगर येथील लेण्या, वाई येथील मेणवलीचा नाना फडणीस यांचा वाडा आदी जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणे पर्यटकांना साद घालतात. गड-कोट-किल्ले, अनेक प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, वस्तुसंग्रहालये, धरण जलाशय परिसरातील निसर्ग सान्निध्याने व्यापलेली स्थळे, जंगले, तीर्थक्षेत्रे, उद्याने, पावसाळयातील धबधबे अशा मनोहारी निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालीत आला आहे.
जुना राजवाडा : छत्रपती प्रतापसिंह महाराज (पहिले) यांनी हा वाडा बांधला. सध्या या वाड्यात जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह हायस्कूल सुरू आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले.
फाशीचा वड : १८५७च्या उठावात भाग घेतलेल्या क्रांतिकारकांना गेंडामाळ परिसरात फाशीची शिक्षा देण्यात आली. काहींना तोफेच्या तोंडी देण्यात आले, तर काहींना गोळ्या घालून मारण्यात आले. यात सीताराम गुप्ते, विठ्ठल वाकनीस, केशव चित्रे, नारायण पावसकर, शिवराम कुलकर्णी यांचा समावेश होता. या ठिकाणी दर वर्षी १५ ऑगस्टला शहीदांना मानवंदना देण्यात येते. येथे स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. जुने वडाचे झाड उन्मळून पडल्याने त्या जागी नवीन झाड लावण्यात आले आहे.
खिंडीतील गणपती श्री कुरणेश्वर मंदिर : पहिले बाजीराव पेशवे यांचे मेहुणे कृष्णाजी चासकर यांनी १७२३मध्ये हे दगडी मंदिर बांधले. अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण उतारावर बोगद्यापलीकडे जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर हे सातारकरांचे श्रद्धास्थान आहे. हे आवडीने फिरायला जाण्याचे, सहलीचे ठिकाण आहे. दिवंगत भाऊकाका गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा ट्रस्ट स्थापन करण्यात आला. तेथे आता आयुर्वेदीय वृक्ष उद्यान साकारत आहे. हे अत्यंत शांत व निसर्गरम्य ठिकाण आहे.
साताऱ्यातील संस्था :
सातारा तालुक्याचा पश्चिम दिशेचा परिसर :-
सर्वात आधी निसर्गरम्य अश्या सातारा तालुक्याच्या पश्चिम भागाला भेट देउया. या परिसरात पावसाळी हंगामात येणार्या फुलांमुळे जगप्रसिध्द्द झालेले कास पठार्,वजराई ,कास,दत्तवाडी-केळवली,ठोसेघर हे धबधबे, बामणोली,वासोटा अशी ठिकाणे तर यवतेश्वर, देवकळचे मंदिर्,परळी गावाचे शिवमंदीर्,सज्जनगड, समर्थसृष्टी अशी बरीच ठिकाणे येतात.
डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर
सातारा शहरच्या पश्चिमेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर यवतेश्वर हे डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव. येथे यादवकालीन बांधलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर व शेजारी ग्रामदैवत काळभैरवनाथचे देवस्थान आहे. त्या देवाची यात्रा ही या भागातील सर्वांत पहिली यात्रा असते.हे मंदिर यादवकालीन असून मंदिरात शंकराची मोठी पिंड आहे. या मंदिरात गाभाऱ्याच्या समोर दगडात कोरलेले दोन सुंदर नंदी आहेत. शेजारी काळभैरवनाथाचे मंदिर आहे. काळभैरवाची मूर्ती द्रविडीयन पध्दतीची असून मंदिराच्या कळसाची आतील बाजू पाहण्यासारखी आहे. या दोन्ही मंदिरांना सभोवताली भक्कम दगडी तटबंदी आहे. या तटबंदीच्या दक्षिणेकडील भिंतीत एक विरगळ ठेवला आहे. मंदिरासमोर एक मोठी दीपमाळ असून मंदिराच्या आवारात इतरही काही मूर्ती ठेवलेल्या आढळतात. मंदिराच्या पश्चिमेकडील पिण्याच्या पाण्याचे तळे देवतळे म्हणून ओळखले जाते. या तळ्याची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या पध्दतीची असून सध्या या तलावात जास्त पाणी टिकत नाही.
यवतेश्वर डोंगराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे 1230 मीटर आहे. डोंगराच्या उत्तर बाजूच्या टेकडीवर भैरोबाचे मंदिर आहे. त्यास पेढ्याचा भैरोबा म्हणतात. काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी यवतेश्वर येथे महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. येथूनच दूरवर कण्हेर धरण, सज्जनगड, जरंडेश्वर व मेरुलिंगाचे दर्शन घडते. सभोवती गर्द झाडी, मोकळी व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते. डोंगरावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य व अजिंक्यताऱ्याची दर्शनी बाजू नजरेच्या टप्प्यात येते. साताऱ्यातून दर अर्ध्या तासाला येथे येण्यासाठी एसटी, तसेच खासगी वाहनाची सोय आहे.
या देवस्थानाची यात्रा दरवर्षी अश्विन अमावस्येला भरते. या यात्रेची सर्व जबाबदारी यवतेश्वर, सांबरवाडी, आंबेदरे येथील ग्रामस्थ पार पाडत असतात. पालखीची भव्य अशी मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात निघून ती पालखी मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या देवाच्या आंब्याच्या झाडाजवळ जावून त्या झाडाचे पूजन केले जाते. या देवाच्या आंब्याच्या झाडाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदिवशी झाडाला एका दिवसात मोहोर येऊन पूजन झाल्यानंतर आंबे येतात. झाडाचे पूजन केल्यानंतर गावातील देवाचा भक्त त्या झाडावर चढून झाडाला आलेली आंब्याच्या मोहोराची फांदी तोडून खाली आणून ती पालखीत ठेवली जाते. तेथून पालखी व त्या भक्ताला खांद्यावर घेऊन पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत रवाना होते. या आंब्याचा मोहोर व आंबा आला की यात्रा झाली, असे मानले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
दरम्यान, यवतेश्वरावर बऱ्यापैकी झाडी असल्याने थंडावा नेहमीच असतो. येथून जरंडेश्वर, अजिंक्यतारा, मेरूलिंग डोंगररांगा स्पष्ट दिसतात. यवतेश्वराला डावीकडे वळण्याऐवजी तसेच सरळ गेलात की, अंदाजे 18 ते 20 किलोमीटरवर आपण एका मोठ्या तलावाशी येऊन पोचतो. हाच तो बहुचर्चित कास तलाव. यवतेश्वर ते कास हा रस्ता म्हणजे, अपरिमित आनंदाचा ठेवा. अनेक प्रकारची आणि रंगीबेरंगी फुलपाखरे, पावसाचे पाणी आकंठ पिऊन तृप्ततेने डवरलेले वृक्ष, असंख्य नवनवी झुडपे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण. पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर हे घाटावरचे जिल्हे पावसाळ्यात नेहमीच असा रूबाब धारण करून असतात. या सर्वांच्या जोडीला भारद्वाज, कोकीळ, बुलबुल, खंड्या, बंड्या, कोतवाल, रॉबिन, दयाळ असे अनेक पक्षी चिमणी-कावळ्यांच्या संख्येने आपली साथ देत असतात. श्रावणात येथील वातावरण अगदी प्रसन्न असते. येथील महादेव अनेकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची ख्याती राज्यभर असल्याने भाविक मोठ्या संख्येने श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी येतात.
कसे जाल? पुण्याहून सातारामार्गे यवतेश्वर 128.8 किलाेमीटर आणि मुंबईहून 271.6 किलाेमीटर
मुक्कामाची सोय : सातारा शहरात अनेक हॉटेल आणि रिसॉर्ट आहेत. साताऱ्यातील मुक्कामात किल्ले अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, कास पठार, बामणोली, चाफळ, पाटेश्वर आदी ठिकाणं पाहता येतील.
सोमेश्वर मंदिर,देवकळ (सातारा)
Petreshwar is a smaill hill few kms from Kaas Plateau. Base Village is Petri. It has a Cave & Mandir on the way to the top. A small rock patch awaits you which can be climbed easily without rope which takes you the plateau on the top. From here you can see a 360 degree view of surroundings and Kanher Dam.
कास पठार - kaas plateau - UNESCO Site
कास पठार म्हणजे निसर्ग मित्रांचे नंदनवन, ऑगस्ट , सप्टेंबर महिन्यात फुलणारे फुलांचे गालिचे, विविध रंगाची, आकाराची फुलं म्हणजे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचा जणू कुंभमेळा. नजरेचं पारण फिटणे ह्या म्हणीचा आशय खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर कास पठारावर ह्या काळात एकदा नक्की जावे.
![]() |
| सोनकी - Graham's groundsel |
कास पठार हे UNESCO च्या जागतिक वारसा
स्थळांपैकी एक आहे. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचे दोन प्रकार आहेत १)
सांस्कृतिक वारसा स्थळे २) नैसर्गिक वारसा स्थळे. साल २०१२ ला भारताच्या पश्चिम
घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला त्यात ३९ जागांचे संवर्धन
गरजेचे ठरले त्यातली एक महत्वपूर्ण जागा आहे “कास पठार”. ह्या पठारावर ८५०
प्रकारची विविध फुले फुलतात. International Union for Conservation of Nature and Natural Resources ( IUCN ) हि संस्था
जगातील विविध पशु तसेच वनस्पती ह्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करून ज्या
प्रजातींचा ऱ्हास होतो आहे त्याची एक रेड लिस्ट प्रकाशित करते, त्या प्रजातींचे
संवर्धन अत्यंत गरजेचे असते अश्या ह्या रेड लिस्ट मधील साधारण ३९ फुले हि कास
पठारावर अस्तित्त्वात आहेत. ही माहिती देण्याचे कारण की कास पठार बघतांना आपल्याला
किती जबाबदारीने ह्या फुलांचं आनंद घ्यायचा आहे हे समजू शकेल. ह्या वेगाने ऱ्हास
होणाऱ्या प्रजातींना आपल्याकडून नुकसान होणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून
कास पठार फिरायला हवे. Aponogeton satarensis (वायातुरा) नावाची अति दुर्मिळ वनस्पती
कासला आढळते ती बघायला मिळाण नशिबाचा भाग आहे. आमचं नशीब इतकं ही जोरावर नव्हतं पण
ही वनस्पती केवळ साताऱ्यात आढळते म्हणूनच तिच्या नावात हि satarensis असा उल्लेख दिसतो
साताऱ्या पासून साधारण २५ कि मी वर महाराष्ट्राचे valley of flowers, कास पठार आहे. कासला जाणारा रस्ता, घाटात उतरलेले ढग, हिरवागार शालू नेसून आपल्या
स्वागताला जणू तयार निसर्ग आणि फुलांच्या रंगांची उधळण हे बघत आम्ही सकाळी ८:००
पर्यंत कास ला पोचलो. गर्दी टाळायची असेल आणि सुट्टी हातात असेल तर आठवड्याच्या मधल्या
दिवसात कासला जावे कारण शनिवार रविवार तिथे जणू जत्रा भरते. कार पार्किंग इतक्या
दूर करावी लागेल की फुलांपर्यंत
पोचताच दामायला होईल. पण कास खरोखर बघायचं असेल तर भरपूर भटकायची तयारी करून जाणं गरजेच आहे.
![]() |
| कास तलाव - Kas Pond |
कास ला किती वेळ लागेल हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण फुलांबरोबरच विविध फुलपाखरं, पक्षी सुद्धा बघायला मिळतात. कास ला जायला काही बसेस पण आहेत साताऱ्याहून पण स्वत:चे वहान हा खरच जास्त सोयीस्कर पर्याय आहे जेणे करून तुम्ही कास पठारावर जास्त वेळ देऊ शकता. रात्री उशिरा साताऱ्यात धडकून आणि मुक्काम करून सकाळी कास पठार असा कार्यक्रम आम्ही आखला होता. आणि साताऱ्यात पोचलो तो जो मुसळधार पाऊस सुरु झाला कि उद्याची फुलांच्या दुनियेत जायची स्वप्न हा पाऊस वाहून नेतो की काय अशी काळजी वाटायला लागली पण पहाटे उठलो ते स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र निळे आकाश बघत
![]() |
| Panoramic view from kaas Plateau |
साताऱ्यात राहण्यासाठी उत्तम पर्याय
उपलब्ध आहेत, तसेच MTDC मान्यताप्राप्त राहण्याच्या व्यवस्था कास पठारा पासून जवळ
उपलब्ध आहेत. “कास पुष्प यात्री निवास” त्यासाठी संपर्क : श्री विठठल किरदात ,
भ्रमणध्वनी - 8291008666, 9594934666,
8080077606,
9420488392
कास पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव फार कमी प्रमाणात आहे. हे पठार अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. पण त्याच बरोबर येथील वातावरण शेकडो रानफुलांना पोषक असं आहे आणि ह्या अग्निजन्य खडकावरही जणू स्वर्ग अवतरतो.
पूर्वी कास पठारावर मुक्त भटकंती शक्य
होती पण पर्यटकांनी भरभरून नुकसान करायला सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या, कचरा
वाढू लागला. प्रेयसी चे फोटो फुलात बसून काढणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसी /
बायको पेक्षा ही रानफुलं नाजूक आहेत हे कदाचित समजलं नाही. मुलांना बगीचात खेळायला
आणल्यासारखे फुलात बागडायला सोडणारे पालक
ही दिसू लागले. फोटोग्राफी करण्याच्या नादात फुलांच्या बहरात कॅमेरा घुसावणारे फोटोग्राफर
दिसू लागले. आणि मग नाईलाजाने सरकारला कास पठारला कंपाउंड घालावं लागलं आता
निर्धारित रस्त्यावरून चालत पठार बघावं लागतं तरी हि ह्या कंपाउंड मधूनही फुलात
शिरणारे वीर ह्या देशात दिसतात. आपण जेव्हा कास ला भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची
नक्की काळजी घ्याल ह्याची खात्री आहे
सध्या कास ला पार्किंग शुल्क आणि प्रवेश
शुल्क आकारले जाते. कधी कधी कॅमेरासाठी सुद्धा शुल्क आकारतात ह्या पैश्यातून पठार
संवर्धनासाठी कामे तसेच जवळच्या गावांत काही कामे केली जातात. सातारा एक उत्तम
पर्यटन स्थळ आहे आणि तुम्ही कास च्या जोडीला जवळची अनेक पर्यटन स्थळे करू शकता.
चार पूर्ण दिवस सातारा परिसराची पिकनिक ठरवू शकता
कास मध्ये मिळालेले काही फुलांचे फोटो इथे टाकतो आहे.
![]() |
| Lambert's Borage - हिरवी निसुर्डी |
![]() |
| Vigna vexillata - हळुंदा, रानघेवडा |
![]() |
| Neanotis lancifolia - तारागुच्छा |
![]() |
| Impatiens oppositifolia - तेरडा |
![]() |
| Curcuma caulina - चवर |
![]() |
| Habenaria foliosa - उग्र हबेअमरी |
![]() |
| Water Willow - करंबल |
![]() |
| Nimphoides Indicum- कुमुदिनी |
![]() |
| Pogostemon deccanensis - जांभळी मंजिरी |
![]() |
| Solanum xanthocarpum - काटे रिंगणी |
![]() |
| Strobilanthes callosus - कारवी |
![]() |
| Konkan Pinda - पंद, पेंद |
![]() |
| दीपकाडी - Dipcadi montanum |
![]() |
| Cyanotis Cristata - नभाळी |
![]() |
| सोनकी - Graham's groundsel |
साताऱ्याहून कास पठारावर जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे
‘कास’ची ‘आस’
29/9/2013
रविवार साप्ताहिक सुट्टीचा वार अर्थातच घरी बसणे शक्य
नव्हते. नवीन कुठेतरी हिंडायला जाणे ओघाने आलेच. बरेच वर्षांपासून ‘कास’
पठारचे नाव ऐकून होतो. तेव्हा कुटुंबकबिला घेऊन कास पठारावर जाण्यासाठी
निघालो. लवकर निघाता निघाता सकाळचे ९.३० वाजले. सातारा मार्गे जाताना
कात्रजचा १२० रुपये टोल व आणे येथील ८० रुपये जाऊन येऊन असा २०० रुपये टोल
भरून आम्ही पुढे निघालो. एवढा टोल घेऊन सुद्धा रस्त्याची अवस्था काही
सुधारत नाही. वाटेत थोडी पेटपूजा करून साताºयात पोहचलो. नेहमीप्रमाणे वाट
चुकून थोडे सातारा हिंडलो. थोडी विचारपूस केल्यानंतर कास कडे जाण्याचा
मार्ग सापडला. कात्रज सोडल्यापासून आधे मधे पावसाची रिमझिम सुरू होतीच.
येवतेश्वराचा डोंगर चढून कास पठाराकडे जाण्यासाठीचा मार्ग तसा छानच होता.
छोटी छोटी वळणे घेत. उजव्या बाजूला सातारा शहराचे वाढते विस्तारीकरण पाहत.
मागे अजिंक्यतारा किल्ला एकंदरीत छानच वातावरण होते.
पुण्याहून सातारा साधारणपणे १२५ किलोमीटर. तेथून २२ किलोमीटरवर
कास पठार. तेव्हा ११.३० पर्यंत आम्ही कास पठारावर येवतेश्वरमार्गे पोचलो.
येवतेश्वराच्या डोंगरावर सर्वत्र फुललेली पिवळी पाहून यापुढे कास पठार अजून
सुंदर असल्याचे लक्षात आले. एव्हाना पाऊस थोडा भुरभुरच होता. पठाराकडे
जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा पर्यटक उत्साहाने या काहीच दिवस फुलणाºया
फुलांचे स्वागत करण्यासाठी मैदानावर पसरलेली होती. अर्थात हातात कॅमेरे
घेऊनच. कोणी मोबाईल कॅमेरा, कोणी महागडे डीएसएलआर कॅमेरे तर कुणी साधे
कॅमेºयातून हे सौंदर्य बंदीस्त करण्याचा प्रयत्न करत होते. आम्हीही थोडो
फोटो सेशन करून कासकडे जाण्यासाठी निघालो. पाऊसाची रिमझिम पुन्हा सुरू
झाली.
रांगच - रांग
येवतेश्वरापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतर पुढे गेलो असू नसू
तर पुढे ४० ते ५० फोर व्हिलरच्या रांगा दुतर्फा लागलेल्या दिसल्या. गाड्या
हळूहळू पुढे सरकत होत्या. एका ठिकाणी हॉटेलच्या बाहेर फोर व्हिलर लावलेल्या
दिसल्या. गर्दी चांगलीच असल्याचे आता जाणवायला लागले. हळूहळू तेथूनही
आम्ही पुढे गेलो. कासकडे जाणारा रस्ता दुतर्फा हिरवळ व पावसाने चिखलमय झाला
होता. साधारणपणे दोन फोरव्हिलर गाड्या शेजारून जेमतेम जाईल एवढच रस्ता
असल्याने वाहने सावकाश हाकावी लागत होती. येवतेश्वरावर पोहोचोस्तोवर
आम्हाला १२.३० झाले होते. तेथून गाडी हळूहळू पुढे सरकत होती. वाटेत पायी
चालत येणाºया पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसायला लागते. पठाराकडून येणाºया
प्रत्येकाच्या चेहºयावर विचित्रच भाव होते. जो तो ‘परत मागे फिरा’, पुढे
तीन ते चार किलोमीटर रांग आहे. पुढे हजार एक गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक
जॅम झाली आहे. शहाणे असला तर परत गाडी फिरवा असे प्रत्येकजण सांगत होता.
तरीही ‘कास’ची ‘आस’ काही कमी होत नव्हती.
गोगलयगायीच्या गतीने आम्ही मार्ग पुढे ढकलत होतो. एव्हाना दुपारचे २.३०
वाजले होते. गाडीत बसून, आता वैताग व चिडचिड व्हायला लागली होती. पण कासला
काहीही करून जायचे असे ठरवून हळूहळू गाडी पुढे रेटत होतो. वाटेत एका ठिकाणी
रस्त्यावर खाली चिखलात रुतलेली क्वॉलीस पाहिली. तिची दुरवस्था पाहून
भीतीही वाटली.
गाडीत बसूनबसून माझ्या लहान मुलाने चुळबूळ करायला सुरूवात
केली. कधी पोहचणार फुलं बघायला. चला ना घरी. अशी बडबड सुरू केली. समोरून
येणाºया माणसाला अजून पुढे किती गर्दी आहे हो? असे विचारले तर शहाणे
असलात तर मागे फिरा. ‘च्यायला’ फुल ट्र्ॅफिक जॅम आहे?’ असे म्हणून गावरान
शिवी हासडत हे महाशय पुढे गेले. अस्सल सातारकरांच्या भाषेत रांगडे उत्तर
मिळाल्याने आजूबाजुचे प्रवासीही हसू लागले. येणाºया-जाणाºया प्रतिक्रिया
पाहून मुलानेही ‘‘बाबा चला ना मागे जाऊ या. एवढी लोक सांगाताहेत ना? मग
मागे का घेत नाही?, एक नंबरचे हट्टी आहात (बहुधा बायकोचे शब्द मुलाच्या
तोंडात) अशी ट्याँव ट्याँव सुरू केली. पावसाचा जोर एव्हाना चांगलाच वाढला.
रिमझिम पडणाºया पावसाने आता धो-धो बरसायला सुरूवात केली होती.
कसली फुलं पाहायची मला मेलेलीला? :
एवढ्या लांब येऊन फक्त काही किलोमीटरवर असणारे कास पठार न पाहण्याचे मन काही धजवेना. घरून आणलेले फराळाचे सामान, बिस्किटे आता संपली होती. तेवढ्यात एका बार्इंंनी आमच्या गाडीच्या काचेवर हात मारून दार उघडण्यावी विनंती केली. ‘या आजींना जरा बसू देता का? आमची गाडी मागे ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. आम्ही चालत पुढे आलो आहोत. पण आम्ही पुढे जाणार असल्याचे सांगितल्यावर त्या चालेल म्हटल्या. मी ही मदत करण्याच्या भावनेने ठिक आहे असे म्हणून बसण्यास जागा देऊन पाणीही दिले. विचारपूस करता आजीबार्इंनी सांगितले की प्राधिकरणातील (निगडी) महिला बचत गटाच्या ५० महिलांबरोबर ७०० रुपये देऊन एका टुरिस्टवाल्याबरोबर येथे आले. मात्र, वय झाल्याने आता पुढे चालवत नाही. दमही लागला आहे. मी गाडीतच बसते असे पहिल्यांदा म्हटले होते. मात्र, या बार्इंनी ऐकलेच नाही. मला ही घेऊन त्या निघाल्या. कसली फुलं पाहायची या वयात माझ्या सारख्या मेलीला.’ आम्ही विषयांतर केले. आजी बाई कुठे राहतात असे विचारून घरी कोण असते? मग त्यांनीही तुम्ही कोण? कुठून आला? असे प्रश्न विचारून जरा आमचाही वेळ गेला. दहाच मिनिटात थोडे ट्रॅफिक पुढे सरकारली. समोरून मघाशी आजीबार्इंना सोडून गेलेल्या बाई परत आल्या व आम्ही माघारी जात आहोत. असे सांगून या आजीबार्इंना घेऊन गेल्या. गाडी एव्हाना दोन किलोमीटर अंतरावर पुढे गेली होती. दुपारचे तीन वाजले होते. पावसाची रिमझिम सुरूच होती.
कास पाहण्याची खुमखुमी :
कासपठार अजूनही पुढे २ ते ३ किलोमीटरवर होते. अजुन अंगात चांगलीच खुमखुमी होती. गाडी थोडी साईडला लावून पुढे चालत जाण्याचा निर्णय मी घरच्यांना सांगितला. त्यांनीही जरा बिचकतच होकार दिला. छत्री घेऊन गाडीतून बाहेर आलो. कासकडे पायी जाणाºया पर्यटकांबरोबर आम्हीही निघालो. एवढी जत्रा कशासाठी चाललेली आहे याचा विचारही मनात आला. आता पर्याय नव्हता. कासवर जाणे व तेथील फुले पाहणे हे मनात निश्चित केले होते. समोरून येणारे पर्यटक हातात पिवळी फुले दाखवून ‘पुढे अशीच फुले आहेत कश्याला तंगडतोड करताय असा सल्ला देऊन पुढे जात होती. रिमझिम सुरू असलेला पाऊसाने आता मात्र, जोरात बरसायला सुरूवात केली. वाºयापुढे आमची नाजुक छत्री थोडीच टिकणार. एकदा उलटी सुलटी होऊन छत्रीने आपला पराक्रम दाखविलाच. तसे थोडे अंतर पुढे चालत गेलो. पाठीमागून संपूर्ण पाठ व पॅन्ट भिजली होती. कॅमेरा सांभाळत पुढे जात असतानाच चिखलात पाय सटकून पडणारे पर्यटक ही पाहिले. क्षणभर हसू आवरेना. इतर पर्यटकही याचा पुरेपूर आनंद घेत होते. आपलीही अवस्था अशीच काहीशी होऊ नये म्हणून बिचकतच पुढे चालत होतो. एका हातात छत्री दुसºया हातात मुलाचा हात असा तोल सांभाळत चिखलातून पाय तुडवूत आम्ही जात होतो. पुढे एका ठिकाणी स्वयंघोषित काही कार्यकर्ते रिटर्न जाणाºया फोर व्हिलरला जागा करून देत होते. कोणाची गाडी चिखलात अडकलेली दिसली की काही तरुण टू व्हिलरवरून उतरून धक्का देऊन रस्त्यावर आणत होते. चिखलामुळे गाडीची चाके जागेवरूच फिरत होती. त्यात भर म्हणून टुरिस्ट घेऊन आलेल्या मोठमोठ्या गाड्या अंदाजे २० ते २५ गाड्या पाहून हे एवढे मोठे धुड कसे काय येथपर्यंत घेऊन आले याचे आश्चर्य वाटले. तेही गाड्या रिटर्न घेत होते. त्यामुळे अजूनच कल्ला होत होता.
धीर खचला :
सोसाट्याचा वारा, वरून पाऊस, हातात छत्री आणि लोकांनी घाबरवून सोडल्यामुळे आता मात्र, बायकोचा धीर खचला व परत जाण्याचे आदेश देऊन आम्ही आमची पायपीट थांबवून परत माघारी येण्यासाठी सुरूवात केली. या आधीही पावसात ट्रेक केले. परंतु लक्षाजवळ जाऊन माघार घेणे कधीच नाही. मात्र परिवार असल्यामुळे माघार घेणे गरजेचे होते. कासला लांबूनच रामराम घेऊन आम्ही परत फिरलो खरं परंतु परतीच्या मार्गावर सुद्धा चांगलीच ट्रॅफिक जॅम होती. मात्र, खाली साताºयाकडे जाण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही. ५ वाजेपर्यंत सातारा गाठला. गरमागरम चहा, भजी खाल्ली थोडे ताजेतवाने होऊन परतीचा मार्ग धरला. मनात ‘कास’ची ‘आस’ तशीच होती. आज नाही परंतु पुन्हा कधीतरी नक्की कासला जाऊ असा निश्चिय करून परत फिरलो.
‘कास’ आहे तरी काय?
निसर्गाचा चमत्कार म्हणजे ‘कास’चे पठार. या पठारावर वर्षातील काहीच महिने म्हणजे जून ते सप्टेंबरपर्यंत पृथ्वीतलावावर कुठेच न उगविणारी फुले उगवतात. कास पठार व परिसरात ८५० प्रजातींपेक्षा जास्त फुले असणाºया वनस्पती आढळतात. यामध्ये दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमधे समाविष्ट असणाºया सुमारे ४० विविध जातीतील फुलांचा समावेश आहे. येथील प्रत्येक फुले जास्तीत जास्त १५ ते २० दिवसांचे मेहमान असते. त्यानंतर त्याच्या जागी दुसºया जातीची फुले फुलतात. तांबड्या लाल मातीत फुलणारी हे फुले म्हणजे खरोखरोच निर्सगाचा चमत्कारच. महाबळेश्वर मधील पाचगणीचे पठारही विविध फुलांनी फुलते. तसे राजगड, रायगडावरही व अन्य किल्ल्यांवरही हा चमत्कार पाहायला मिळतो. मात्र, कासची तुलना इतरांशी होऊ शकत नाही.
मनातील
सातारा सोडून घरी परत येत असताना मनात खरंच कास पाहण्याचे गरजेचे होते काय? आपणाला तेथे जाऊन काय फायदा होणार होता? असे विचार सुरू झाले. माझेच प्रश्न माझीच उत्तरे असा संवाद होऊ लागला. त्यातून काही गोष्टी मला सुचल्या त्या येथे सांगावयासे वाटतात.
- कासचे पठार हा निर्सगाचा चमत्कार वर्षातून काही दिवसच फुलणारी ही फुले पाहण्याचा मोह कुणालाही आवारणार नाही हे नक्की. फेसबुक, विविध टिव्ही चॅनल्सवरती कासचे दर्शन लोकांना घडू लागले. नेहमीची लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणांना आता पर्यटक कंटाळू लागले आहेत. तेव्हा काही तरी नवीन ठिकाणी एनजॉयमेंट करण्यासाठी कासकडे लोकांनी मोर्चा नेलेला आहे. मी त्यातलाच एक.
- हा एक पर्यटनाचा भाग होऊ शकतो. असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, खरोखरच येथे जाणे प्रत्येकाला गरजेचे आहे काय? अभ्यासकांनीच येथील पुष्पांचा अभ्यास करून संशोधन करणे गरजेचे आहे. शक्यतो अभ्यासकांनीच येथे जाणे गजरेचे आहे.
- ‘वर्ल्ड हेरिटेज'च्या यादीत ‘पठारा'चा समावेश झाल्याने हंगामात पर्यटकांचा आकडा लाखांपर्यंत पोचतो आहे. पठाराला प्रसिद्धी मिळाल्याने साहजिकच पर्यटकांचा ओढा इकडे जास्त वाढत असल्याच्या बातम्या ही पेपरात वाचायला मिळतात.
- वनविभागाने पर्यावरण संरक्षणासाठी येथे संरक्षित जाळ्या बसविल्या आहेत. पर्यटनकर लावण्यात आला आहे. मोठी बस १५०, कार ४० रुपये, प्रति माणसी १०, ट्यू व्हिलर १० रुपये, फोटो ग्राफीसाठी व्यावसायिक छायाचित्रकारांना १०० रुपये, पर्यटक कॅमेरे ५० रुपये असा कर बसविला आहे.
- येथील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीही अनेक ठिकाणी होते. पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे गाड्या भरून आल्याने वाहतूक, पार्किंग आणि शुल्कवसुलीचे नियोजनही यामुळे नक्कीच ढासळते. पोलिसांना गर्दी आवरत येत नाही. गाडी पुढे सरकत नाही. ४-४ तास ट्रॅफिक जॅमचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे. एवढे करून देखील फुले पाहण्यासाठी अनुकूल वातावरण असले तर ठिक नाहीतर धो-धो पावसात फुले काय दिसणार. हा अनुभव ज्यांना घ्यायचा असले त्यांनी आवर्जुन कासाला जावे अन्यथा ‘दूरून डोंगर साजरे’ या प्रमाणे लांबूनच दर्शन बरे.
उपाययोजना :
- कास पठाराच्या सुरूवातीलाच पर्यटकांकडून वसुली करावी. यासाठी ठिकठिकाणी वसुली बुथ उभे करून वेळ वाचवता येईल.
- अवजड मोठ्या वाहनांना येथे जाण्यास बंदी करावी. यासाठी वनविभागाकडून स्वतंत्र्य वाहतूक योजना राबविल्यास ट्रॅफिक जॅमसारखे प्रश्न सुटून सर्वांनाच आनंद घेता येईल.
- फुले तोडणाºयांवर दंड आकारावा.
- येथे जाण्यासाठी आॅनलाईन सुविधेद्वारे नावनोंदणी करावी. त्यानंतरच परवानगी देण्यात यावी. हंगामात शनिवार व रविवारी २००० गाड्यांपेक्षा जास्त वाहनांना परवानगी देऊ नये.
- येथे जाणे खरोखरच गरजेचे आहे काय? याचा विचार प्रत्येकाने करावा.
वजराई धबधबा ___
वजराई धबधब्याला जाण्यासाठी आपल्याला सातारा जिल्ह्यातील
भांबवली गावाचा रस्ता पकडावा लागतो. साताऱ्यापासून हे २७ km आहे. तर
प्रसिद्ध कास पठारापासून
साधारण ३ km वर आहे .
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पंधरा ते वीस उंबरठा असलेलं
हे छोटंसं टुमदार गाव . गावाच्या सुरुवातीलाच ग्रामदैवत श्री जानाई देवीच छोट पण मनाला भुरळ घालणारं मंदिर आहे . गावकऱयांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून गावापर्यंतचा रस्ता, पाणी , लाईट यांची सोय करून घेतली आहे . त्यामुळे पर्यटकांना स्वतःच्या वाहनाने या ठिकाणी येता येते .
गावापासून धबधबा कडे जाण्यासाठी मळलेली पायवाट आहे . हिरवीगार गच्च झाडी त्यामधून जाणारी ही लाल पायवाट मनाला भुरळ घालते पावसाने वाटेत बऱ्याच दगडांवर मखमली शेवाळाचा मुलामा चढवला होता ,त्याच्यावर छोट्या नाजूक रंगीत फुलांची कलाकुसर करून निसर्गाने आपली अप्रतिम कलाकृती साकारली होती. त्याच्यावरून नजर हटत नव्हती .ही पायवाट साधारण २ ते २.५ कि.मि . आहे मध्येच काही अंतरावरून या धबधब्याचे पूर्ण दर्शन होते पण धबधब्यापर्यंत जायचे असल्यास आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात वाट बिकट आणि रिस्की आहे पण धबधब्यांचं विराट रूप पाहिलं की घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याच जाणवत.
हा धबधबा उरमोडी नदीच्या स्रोतातून येतो . वर्षांचे बाराही महिने तो दर्शन देतो .तो तीन टप्प्यांमध्ये पडतो . त्यांची साधारण उंची ८५३ फुूूटआहे . पाणी जिथून पडते त्या ठिकाणापासून शेवटच्या टप्प्याची उंची मात्र ५६० मि.आहे या मोजमापाने तो भारतातील दुसऱ्या नंबरचा उंच धबधबा आहे . या तीन टप्प्यांची एक आख्यायिका आहे महाराष्ट्राचे दैवत संत रामदास स्वामींनी हा पहाड आपल्या तीन पावलांमध्ये पार केला त्या तिन्ही पावलांचे हे तीन टप्पे .त्यामुळे सरळ वाहणारा हा धबधबा या तीन टप्प्यात वाहतो. पावसाळ्यात हा धबधबाआपले रौद्र रुप दाखवतो.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार कास पठारा सारखीच फूल भांबवली पठारावर पण फुलतात . गणेश चतुर्थीला गावचे लोक धबधब्याच्या पायथ्याला वजराई देवीला नैवेद्य दाखवतात तर दर वर्षी १ मे ला गावची जत्रा भरते. ग्रामदेवता श्री जानाई देवीचे मंदिरांबरोबरच येथे श्री वाघ्रेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे . तेथे नवरात्रीत वाघ देवीचे दर्शन घ्यायला येतो असे बोलतात .वजराई धबधब्याच्या ठिकाणी माथ्यावर वजराई देवीचे जागृत स्थान आहे .
गावातील लोकांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती , पशुपालन, कुक्कुट पालन आहे या सोबत सध्या येणाऱ्या पर्यटकांची चहा पाण्याची ,जेवणाची , रहाण्याची सोय करून आदरातिथ्य व उत्पन्न या दोन्हींची सांगड घालतात.
या स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी काही सूचना :-
१) अति पावसाचे दिवस सोडून हा धबधबा पाहण्यासाठी जाणे. श्रावण महिन्यात आपण जायचा बेत केला तर आपल्याला कास पठार-कास तलाव व वजराईआणि बामनोली ही ठिकाणे एका दिवसात करता येतात. उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये सुद्धा येथील वातावरण आल्हाददायक असते .
२) ट्रेकिंगचे शूज आवश्यक ,तर फुल बाह्यांचा शर्ट व ट्रॅक पॅन्ट असावी .
३) फोटो काढण्यासाठी कॅमेरा किंवा मोबाइल घेऊन जाणे बाकी जादाच सामान आपण आपल्या वाहनात किंवा गावकऱ्यांच्या घरी ठेवावे .पक्षी निरीक्षकांना विविध प्रकारचे पक्षी येथे भेटतात .तर कधी गवे सुद्धा दर्शन देतात .
४) सर्वात महत्त्वाची सूचना सोबत नेलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू पाण्याच्या बाटल्या व वेस्टन तिथे न टाकता आपल्याबरोबर घेऊन येणे . कारण हा सुंदर वारसा आपल्याला जतन करून आपल्या पुढच्या पिढीला सोपवायचा आहे.
॥ स्वच्छ भारत सुंदर भारत ॥
सुनिता शहा -शेटे
- संतोष अशोक तुपे
सातारा तालुका पर्यटनस्थळ :-
पाटेश्वर मंदिर व लेणी ( देगाव -सातारा)

सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे सातार्याला जाणार्या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी.

वर चढत जाणार्या पायर्या , वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि मधे मधे भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना.



शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती ह्या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे.




विशाल शिवलिंग
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
अग्नीवृष
हा
लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो तटांनी
बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या
बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच तर्हेने
कोरलेला आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ
नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा
हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो.
लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारातील नंदी
शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार
चतुर्मुख शिवलिंग
घट असलेले शिवलिंग
एका दगडावर दोन शिवलिंगा ऐवजी दोन कलश दिसतात, ती 'कुंभेश्वर' किंवा 'चतुर्मुख लिंग' या नावाने संबोधले जाते. 
लेणीसमूह एका वेगळ्याच कोनातून
यापुढील वर्हाडघर हा ३ लेण्यांचा समुह आहे. येथे शिवपार्वती विवाह समयी लग्नाला आलेले सर्व देवदेवता व-हाडी राहिले होते अशी दंतकथा सांगितली जाते. ह्या व-हाडघरच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला असलेली एकमेव दगडी दीपमाळ अखेरच्या घटका मोजत आहे कारण दिपमाळेचा वरपासून मध्यापर्यंचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला आहे. व-हाड घरात प्रवेश करताना ' सवत्सकामधेनू'चे शिल्प प्रथम दृष्टीस येते. जमीनीवर सुंदर नंदी आहे असून त्याच्या गळ्यातील घंटेखाली लाडूने भरलेले भांडे दर्शविले आहे. आतील व्हरांड्यात गेल्यावर एका भल्या मोठ्या वाड्यात गेल्याचा भास होतो. मधील व्हरांड्यातून निरभ्र निळे आकाश दिसते तर तीनही बाजूला बांधकाम केलेले आहे तर एका बाजूला असलेल्या खडकातील लेण्या आहेत. समोरच्या खडकात खोदीव दालनातील शिवलिंग पाहून तत्कालीन शिवभक्तीची कल्पना मनाला सुखावते. मध्यभागी भव्य शिवलिंग आहे तर यावर लहान लहान शिवलिंग कोरलेल्या असून एकाच दर्शनात शेकडो वेळा शिवदर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. आत प्रवेश केल्यावर डावीकडे विविध मूर्तीच्या पाठीमागे शेकडो शिवलिंग कोरलेल्या लेण्याच्या भिंतीचा भाग आहे.
पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे ह्याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. ह्या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इतल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो. गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतिक. तर याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.
ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डॉळे सरावल्यावर ह्याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेत आहे. ह्याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत तर दुसर्या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत

कमलफुलाचे लिंग व शिवलिंगवाहू नंदी

अजून काही वेगळे प्रकार
सहस्त्र लिंग
त्या
गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. ह्या गुहेत
विविध तर्हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर
लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र ह्या सगळ्या शिवपिंडीच्या
सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.त्याचप्रमाणे
दशवतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, चामुंडा,
कार्तिकेय इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. या लेणी समुहास " बळीभद्र " लेणी
समुह म्हणतात. या दुसऱ्या लेणीसमूहापासून तिसऱ्या लेणीसमूहाकडे जाताना
दुसऱ्या लेणीसमूहाशेजारीच लहान वटेश्वर मंदिर आहे.
डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे

तेथीलच एक शिवलिंग
ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ह्या गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख असलेले भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यांमध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.
बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतिक तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीने सुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच. याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकार

मुख्य गुहा त्यामधील सहस्त्रलिंगासह, मागच्या बाजूला एक शिवलिंगपट

शिवलिंगपट

सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट

शिवदंड

नागप्रतिमा
दगडी खांबावर शिवलिंगातून नाग प्रतिकृती कोरलेली आहे म्हणजेच 'कुंडलिन्' आहे.

गुहेच्या मध्यभागातील प्रमुख सहस्त्रलिंग
याशिवाय लेण्यात देवनागरी लिपीतील (संस्कृत मधील) शिलालेख आहेत, परंतू पुसट झाल्यामुळे शिलालेख वाचता येत नाहीत. बाजूलाच एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते.
खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
माहुली
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र.
सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी. :अंतरावरून कृष्णा नदी
वहाते. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील
वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत.या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी
संगम माहुली या नावाने ओळखतो .खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये
माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे. कारण माहुली सारख नितांत सुंदर
ठिकाण चालू घडीला मृत्यूपश्चात होणार्या संस्कारासाठीच जास्त ओळखले जाते.
कृष्णेनदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वत रांगात होतो ,तर तीन राज्ये सुजलाम
सुफलाम करीत ती आंध्रप्रदेशात बंगालच्या उपासागरास जाऊन मिळते .या साधारण
आठशे मैलाच्या प्रवासात तीचा काही छोट्या मोठ्या नद्या बरोबर संगम
होतो.त्या त्या ठिकाणी मोठी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यातील प्रमूख ठिकाण
म्हणजे सातार्यातील कृष्णा-वेण्णा संगम .अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण
सुप्रसिध्द असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे
. क्षेत्रमाहुलीचा इतिहासही असाच मनाला भिडणारा आहे.याचा संदर्भ थेट
रामायणाशी गाठ घालून देतो. रामायणात युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्याला
शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्याकरिता हिमालयाकडे रवाना होतो.
नेमकी संजीवनी ओळखता न आल्याने अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून लंकेकडे प्रयाण करतो. लंकेकडे जाताना वाटेत द्रोणगिरीचा छोटा भाग सातारा येथे पडतो यालाच जरंडेश्वरचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आणि कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमाने पवित्र झालेलं हे गाव श्री क्षेत्र माहुली म्हणून प्रसिद्ध आहे. संगमाच्या एका काठाला विश्वेश्वर मंदिर हे संगम माहुली म्हणून ओळखले जातं. दुसऱ्या काठाला रामेश्वर मंदिर हे क्षेत्रमाहुली म्हणून प्रसिद्ध आहे.

क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार. १७०७–४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०). पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीतील असून चुनेगच्ची सभास्तंभ, शिखर आणि कोनाड्यांतून मूर्तिकाम आढळते. क्वचित काही ठिकाणी भित्तीचित्रे आहेत. त्यांतील लक्ष्मीचे चित्र सुरेख आहे. चुनेगच्चीतील मूर्तीत प्रामुख्याने दशावतार, शंकरपार्वती आणि शैव परिवारातील देव-देवता, प्राणी इ. आढळतात. बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत. छ. शाहू पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगोपात्त या स्थळास भेटी देत. उत्तर पेशवाईतील इतिहासप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे या न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली असून रामशास्त्रीच्या वारसांनी त्यांच्या नावे सामाजिक न्यायासाठी एक पुरस्कार १९८४ पासून सुरू केला आहे. दुसरा बाजीराव व जॉन मॅल्कम यांची भेट व बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज-मराठे युद्धापूर्वी (खडकीचे युद्ध) येथेच झाली. माहुलीला शेवटच्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कन्यागतात येथे अनेक लोक संगमावर स्नानांसाठी जमतात. छत्रपती घराण्यातील छ.शाहू त्यांची राणी सकवरबाई, कुत्रा खंड्या यांच्या येथे समाध्या आहेत.
छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.
अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.
मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे)
नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली .
माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते सगुणेश्वराचे मंदिर .१८६५ च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ. शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले. १५० वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे .
मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही छ.शाहूमहाराजांचा “खंडया” नावाचा एक श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे .
नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब महाराजांची आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे ३०० वर्षाची परंपरा आहे .याच परीसरात सन १७३० ते १७९० या काळात बांधलेली भैरवनाथ मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदीरे आहे.
इथूनच
पुढे गेल्यास अतिशय सुंदर अशी दिपमाळ दृष्टिस पडते .या दिपमाळीकडे चालत
गेल्यास आपण पोहोचतो श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात .
माहूलीतील हे एकमेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे.अतिशय
देखणे असे हे मंदिर १७३४ साली श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी बांधले .मंदिर
हेमांडपंथी स्थापत्य शैलीतले आहे. या मंदिराची संरक्षक भिंत सात कोणी आहे.
सर्वसाधारण बांधकामात ती अष्टकोणी , षटकोणी आकाराची असते . मुख्य
मंदिराच्या समोरच शंकराचे वाहन नंदी चे दगडात कोरलेले सुंदर शिल्प आहे.
मंदिराच्या सभागृहात एक मोठी पितळी घंटा बांधली आहे. देव कोष्टकात गणेश आणि
महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील दगडी शिवलिंगावर पितळी आवरण
चढवलेले आहे. मंदिरासमोरच भव्य दीपमाळा आहे जी अखंड दगडातून बनवलेली आहे.
महाशिवरात्र, दिवाळी यावेळी इथे दीपोत्सव असतो. मंदिराचे शिखर वीट
बांधकामात बनवलेल आहे . ऊन वारा पाऊस यांना तोंड देत आजही ते सुस्थितीत
असलं तरी त्याला संवर्धनाची गरज आहे. त्यावर वाढलेल्या वड, पिंपळ सारख्या
झाडांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. मंदिराच्या प्रांगणात, येणाऱ्या
भाविकांसाठी किंवा वाटसरू साठी ओवऱ्या आहेत. एकूणच मंदिराचा थाट रुबाबदार
आहे. मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर
बाजूस ओवर्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू
आहे . मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची
बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून
मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन
मंदिराची आठवण होते .मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे .यातील नंदी
सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत
जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे . या घाटास राजघाट
असे म्हणतात .या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलींग स्थापन
केलेली एक समाधी दिसते.ही समाधी आहे शाहू नगर म्हणजे आपला सातार्याच्या
निर्माते छ. संभाजी महाराजांचे पुत्र छ. शाहू महाराजांची . या समाधीची जागा
नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडूजी करुनही तीचा फारसा उपयोग़ होत नाही .
इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी
महाराजांच्या पत्नी छञपती महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी होती .परंतू
खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील
आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या
समाध्या वाळू खाली लुप्त होतात .२००५ च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच
या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे
भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या
मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या छञपती महाराणी ताराराणी व रामराजे
यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. श्री आमुतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत
देवस्थान आहे. श्री हरिनारायण मंदिर,श्री व्यंकटेश मंदिर,श्री राम
मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री परशुराम मंदिर अशी अनेक जागृत
मंदिरे संगम माहुली आहेत.

वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र
माहुली असे म्हणतात ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ
शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश
कालीन पूल ओलांडूनच जावे लागते .हेसुद्धा घडीव दगडांनी बांधलेले सुंदर
मंदिर आहे. मंदिराचे नाव रामेश्वर असलं तरी मुख्य मंदिर महादेवाच
आहे.मंदिराच्या समोरच महादेवाचे वाहन नंदी आहे पण या नंदीची मान
गर्भगृहकडे नसून थोडी बाजूला वळलेली आहे. याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका
आहे. या नंदीची शिंगे सोन्याची होती . एक दिवस ती चोरांनी पळवली. लोकांनी
बराच शोध घेतला तरी चोर सापडले नाहीत. तेव्हा नंदीने चोर कोणत्या दिशेला
गेलेत ते आपली मान वळवून दाखवले. मंदिरा पाठीमागे राम- सीता- लक्ष्मण
यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहेत . दोन दीपमाळा आहेत त्यातील एक
सुस्थितीत आहे. दीप ठेवण्याची जागा सुद्धा चोचीत माळ धरलेल्या पक्षाचं
शिल्प कोरून अलंकृत केली आहे.
इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अनगळांचा
घाट म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदीर परशुराम
नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी
अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन
दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र
असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी
खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .
नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा
.मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या
काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे
पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी
त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे.
अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो
.हा घाट दुसरे बाजीराव पेशव्यानी बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या
राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या
उजव्या बाजुस बिल्वेश्वराचे मंदिर आहे . हे मंदीर श्रीपतराव
पंतप्रतिनीधीनी १७४२ चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले
अशी माहीती मिळते .
सोनगाव संमत निंब : क्षेत्र
माहुली गावाच्या पुढे सोनगाव म्हणून एक गाव आहे. येथे कृष्णा नदी झेड
आकारात ३० अंशांमध्ये तीव्र वळणे घेते. सोनगावाजवळ वाकेश्वराचे मंदिर आहे.
या मंदिराच्या तीन बाजूंना कृष्णा दिसते. कृष्णा उत्तरेकडून दक्षिणेला येते
व लगेच ३० अंशांमध्ये वळण घेऊन परत उत्तरकडे वळते. थोडे अंतर उत्तरेला
गेल्यावर परत पश्चिमेस वळते व परत लगेचच दक्षिणेस माहुलीकडे मार्गस्थ होते.
आपण बऱ्याच ठिकाणी इंग्रजी एस आकारात नागमोडी वळणे घेतलेल्या नद्या पाहतो;
पण असे वळण क्वचितच पाहायला मिळते.
महागाव :
माहुलीच्या दक्षिणेस महागाव आहे. हे गाव भटजी पैलवान दिवंगत दामोदर बळवंत
भिडे गुरुजी यांचे गाव. योगीराज अरविंद त्यांच्याकडे योगसाधनेबाबत चर्चा
करण्यासाठी येत असत. ते स्वतः कुस्तीगीर होते व व्यायाम शिक्षक होते.
कृष्णधाम : संगम
माहुलीच्या दक्षिण बाजूला साताऱ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्र
आहे. त्याच्या खाली थोड्या अंतरावर कोडोली हद्दीमध्ये कृष्णा नदीवरच
कृष्णधाम हे सुंदर, निसर्गरम्य सहलीचे ठिकाण आहे. रहिमतपूर रस्त्यावरून
कोडोली गावाच्या पुढे डावीकडे कृष्णधामाकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे.
अंगापूर : सातारा
रहिमतपूर रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यावर जिहे गावाच्या जवळ उजवीकडे
अंगापूरला रस्ता जातो. येथे २५० वर्षांपूर्वीचे गणपती मंदिर असून, संपूर्ण
परिसराला तटबंदी आहे. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचे प्रांगण
फरसबंद आहे.
माहुली
छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.
अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.
मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे)
नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली .
माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते सगुणेश्वराचे मंदिर .१८६५ च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ. शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले. १५० वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे .
मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही छ.शाहूमहाराजांचा “खंडया” नावाचा एक श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे .
नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब महाराजांची आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे ३०० वर्षाची परंपरा आहे .याच परीसरात सन १७३० ते १७९० या काळात बांधलेली भैरवनाथ मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदीरे आहे.

इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी महाराजांच्या पत्नी छञपती महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी होती .परंतू खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या समाध्या वाळू खाली लुप्त होतात .२००५ च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या छञपती महाराणी ताराराणी व रामराजे यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. श्री आमुतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. श्री हरिनारायण मंदिर,श्री व्यंकटेश मंदिर,श्री राम मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री परशुराम मंदिर अशी अनेक जागृत मंदिरे संगम माहुली आहेत.

वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र
माहुली असे म्हणतात ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ
शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश
कालीन पूल ओलांडूनच जावे लागते .हेसुद्धा घडीव दगडांनी बांधलेले सुंदर
मंदिर आहे. मंदिराचे नाव रामेश्वर असलं तरी मुख्य मंदिर महादेवाच
आहे.मंदिराच्या समोरच महादेवाचे वाहन नंदी आहे पण या नंदीची मान
गर्भगृहकडे नसून थोडी बाजूला वळलेली आहे. याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका
आहे. या नंदीची शिंगे सोन्याची होती . एक दिवस ती चोरांनी पळवली. लोकांनी
बराच शोध घेतला तरी चोर सापडले नाहीत. तेव्हा नंदीने चोर कोणत्या दिशेला
गेलेत ते आपली मान वळवून दाखवले. मंदिरा पाठीमागे राम- सीता- लक्ष्मण
यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहेत . दोन दीपमाळा आहेत त्यातील एक
सुस्थितीत आहे. दीप ठेवण्याची जागा सुद्धा चोचीत माळ धरलेल्या पक्षाचं
शिल्प कोरून अलंकृत केली आहे.
इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अनगळांचा घाट म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदीर परशुराम नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .
नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा .मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे. अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो .हा घाट दुसरे बाजीराव पेशव्यानी बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या उजव्या बाजुस बिल्वेश्वराचे मंदिर आहे . हे मंदीर श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी १७४२ चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले अशी माहीती मिळते .
महागाव : माहुलीच्या दक्षिणेस महागाव आहे. हे गाव भटजी पैलवान दिवंगत दामोदर बळवंत भिडे गुरुजी यांचे गाव. योगीराज अरविंद त्यांच्याकडे योगसाधनेबाबत चर्चा करण्यासाठी येत असत. ते स्वतः कुस्तीगीर होते व व्यायाम शिक्षक होते.
अंगापूर : सातारा रहिमतपूर रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यावर जिहे गावाच्या जवळ उजवीकडे अंगापूरला रस्ता जातो. येथे २५० वर्षांपूर्वीचे गणपती मंदिर असून, संपूर्ण परिसराला तटबंदी आहे. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचे प्रांगण फरसबंद आहे.
Jarandeshwar temple was of interest to me due to the fact that I pray Hanuman regularly and the special thing of this temple is Hanuman with mustache !When I searched on internet for the story, I learnt that Hanumanji picked mountain himalaya since he was not able to locate Sanjivani gutika (medicine), as he traveled to Sri Lanka a small part of that mountain fallen down, that part of hill is called as Jarendeshwar, it hill !!
I tried to look at the map to see how this might have happened, however not sure how this has happened, look at the map below from Himalaya to srilanka (in between I have marked Satara to show the track)
Anyway we are more interested in knowing the place,
Jarandeshwar, Satara
Jarandeshwar has got around 1000 steps to climb (we counted them since on internet I could also find that there are 500 to 5000 steps !! so decided to do fact finding), honestly climbing steps in painful job, so one has to try way round, which I could see from the back side of temple.
Insects found immediately after you start your walk, they are not found once you cross about 100 steps ! not on the hill top !! they are found in difference colours …
to us 1000 steps is a pain, but for these young friends aged 85 years and 75 years .. going to Hanuman darshan is a weekly affair !! and they were at so ease !!! hats off ….
As you move to back side of this temple, you will see different sizes of spherical stones, there is tradition that the groom has to come here to invite Hanuman, that time he has to lift the spherical stone (whichever he can lift) and throw it behind from the shoulders, so here is Mandar attempting his best 😛
There is one more small temple at the backmost part, from this side itself there is another way to climb this hill which is without steps
and here is map showing distance from Pune to Jarandeshwar
Jarandeshwar
अशी अखायिक सांगितली जाते कि संजीवनी आणण्यासाठी हिमालयात गेलेले रामभक्त हनुमान संपूर्ण द्रोणागिरी पर्वताच घेवून परत आले आणि त्या पर्वतातील एक खडा जमिनीवर पडला तोच हा जरंडेश्वर पर्वत. जाणकार लोक असेही म्हणतात कि या डोंगरावर बऱ्याच औषधी वनास्पती मिळतात. निसर्गाची मुक्त हस्त उधळण, प्रसन्न वातावरण, मंदिर, मठ आणि आजूबाजूच्या परिसराची ठेवण्यात आलेली स्वच्छता, यामुळे मंदिरातील होणाऱ्या विधिवत पूजा अर्चा, हनुमान जयंतीचा सोहळा, रामनवमी, श्रावणी शनिवार, जरंडेश्वर डोंगर प्रदक्षिणा, पालखी सोहळा आणि इतर समारंभाला हजारो लोक दरवर्षी येथे गर्दी करतात.
डोंगरावर जाण्यासाठी दोन मुख्य वाट आहेत व त्यांना मिळालेल्या इतर वाटा देखील आहेत. पहिली वाट सातारारोड-पडळी या गावातून येते हि वाट सरळ चढन आणि खूप दमछाक करणारी आहे या वाटेनी वर यायला सुमारे ४० मिनिट लागतात. प्रशासनामर्फत येथे नुकत्याच पायऱ्या बांधण्याची खडतर मोहीम पाडली आहे. दुसरी वाट जांब या गावातून वर येते हि सोप्पी वाट २० मिनिटात माथ्यावर पोहोचवते.
पडळी गावातून येणारी वाट:
हनुमानाचा अंगठा: थोडे चढून गेल्यानंतर हनुमानाचा अंगठा म्हणून एक ठिकाण लागते येथे हनुमानाचा अंगठ्याला ठेच लागली असे सांगितलं जातं.
तळे: डोंगराच्या मध्याच्या थोडेसे वर पाण्याच्या प्रवाहाला दगडी बांध घातलेला दिसतो. डोंगराच्या ओघळातला खडक आणि सुमारे २० फुट उंच दगडी बांध यात पावसाळी पाणी साठवले जाते. या तळ्यात दोन्ही बाजूनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सध्या मठातील वस्ती आणि भाविकांसाठी याच तळ्याच्या सुमधुर पाण्याचा वापर केला जतो.
लिंब बारामोटेची विहिर
मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता. बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो. विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी आकाराची आहे.
सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या
संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार
वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत. लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
देखभाल
रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि रोहित पवार.
कोटेश्वर शिवमंदिर -- लिंब गोवे
या मंदिराचा संदर्भ कृष्ण महात्म्य ग्रंथात आढळतो. या मंदिराला पण पौराणिक कथेची झालर आहे. सहस्त्रअर्जुनाने जमदग्नी यांची हत्या केली त्यामुळे रागाने परशुरामाने पृथ्वीला एकवीस वेळा नि:क्षत्रिय केले . आपल्या या कृतीमुळे दुःखी झालेले परशुराम भटकू लागले. याठिकाणी अगस्ती ऋषींनी परशुरामांना पाप मुक्ती साठी रुद्र जप, कृष्ण स्नान व शिव जप करण्यास सांगितले . परशुरामांच्या उग्र तपश्चर्येने शंकर प्रसन्न होऊन त्यांना पापमुक्त केले. परशुरामांच्या विनंतीवरून महादेवाची स्वयंभू पिंड येथे तयार झाली. परशुरामांच्या शतकोटी जपामुळे ती निर्माण झाल्यामुळे या स्थानाला कोटेश्वर मंदिर म्हणतात. महाशिवरात्र व श्रावणी सोमवार दिवशी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या दर्शनाला येतात. श्रावणात येथे जत्रा भरते.
* येथे येताना पर्यटकांनी आपल्यासोबत बदलण्यासाठी कपड्यांचा एक जोड अवश्य आणावा. मंदिराच्या आवारातील कुंडात कृष्णेच्या जळात मनसोक्त डुंबून महादेवाचे दर्शन घ्याव. चित्तवृत्ती प्रसन्न होतात.
संदर्भः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख
३) श्री. आशुतोष बापट्,शैलेश करंदीकर, विजय शं.माळी, संकेत फडके,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण
Solashi Shani Temple, Satara,
This time when FONA trek was decided to Kalyangad and Jarandeshwar, Patil sir decided to guide us since his hometown is at the foot of Kalyangad.Since he is aware of the shortest possible routes and possible holy places to visit on the way, first place that
we could visit on the way is beautiful Shani temple at Solshi.
I will recommend reading in details about the Temple history and efforts put in by the trust on their official website of Solashi Shani Temple
The Solshi Shani Temple is surrounded by green hills, very well maintained by Shree Tirthakshetra Sola Shivling Shanaishwar Devsthan Charitable Trust. The area is clean, idols are painted, temple is decorated by glass pieces which looks beautiful.
किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर
पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्यांसारखे दिसतात. हमरस्त्यावरच भुईंज गावातून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.
किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्या पायर्या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
चंदन- वंदन
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या
समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल
म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य
मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र
व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी
विविध मुखे कोरलेली आहेत.
मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल-
--
--
गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल
--
--
--
मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्यावरील नक्षीकाम
सभामंडप
अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही
पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव
आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.
सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामहस्ते वालीवध
हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.
शिवतांडव १
शिवतांडव २
कलशपूजन करणारे हंस
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.
छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
गर्भगृहे
गर्भगृहे
मंदिराचा अंतर्भाग
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागाचा फेरफटका करुया.एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
मंदिराचा बाह्यभाग
दिपमाळा
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊल खूणा जपणाऱ्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे पांडवकालीन भैरवानाथाचे मंदीर भारत सरकारने सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून मंदिर नव्याने जिणोध्दारीत केले आहे. त्याचे मांगल्य पावित्र्य हे किकली देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ जपत आहेत. त्यातच वीरगळींचे गाव म्हणून इतिहास संशोधकांनी राज्यातील पहिले गाव म्हणून नामांकन केले आहे.
किकली गावातील वीरगळी : -
किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
काही वीरगळ
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली दिसतात.
इब्राहिमपूर शिवमंदिर
भुंईजजवळचे चंदनगड आणि वंदनगड हे बहुतेक दुर्गभटक्यांच्या परिचयाचे.मात्र बहुतेक जण या गडावर जातात ते भुइं़-किकली-बेलमाची मार्गे.मात्र थेट चंदनगडावर जाण्यासाठी अजून एक मार्ग आहे.चंदनगडाच्या पुर्व पायथ्याला इब्राहिमपूर नावाचे गाव आहे. कोरेगाव तालुक्यातलं हे लहानखुरं खेडं. एरवी ते फार कुणाच्या लक्षात राहिलं नसतं. मात्र चंदनगडामुळं त्याची थोडीफार ओळख निर्माण झाली आहे. अर्थात या ओळखीत स्वतःची भर घालणारं एक अप्रतिम शिवमंदिर या गावात आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की माहितीअभावी म्हणा वा प्रसिद्धीअभावी लोकांची आवर्जून पावलं इकडं वळत नाहीत. अशी कैक प्राचीन, ऐतिहासिक स्थळं आपल्या अवतीभवती असतात, दिसतात. मात्र त्यावर फारसा ‘फ्लॅश’ वा ‘फोकस’ पडलेला नसतो. मग ती उपेक्षेचाच धनी बनतात. इब्राहिमपुरातील शिवमंदिर याच पंक्तीत बसणारं.
सातारा-
लोणंद रस्त्यावर पश्चिमेस इब्राहिमपूर. मुख्य रस्ता गावात जाणारा. शेजारीच
हे मंदिर. मात्र त्याचं प्रवेशद्वार उत्तराभिमुखी. बाहेरून पाहिलं तर असेल
एखादं पुरातन मंदिर असंच वाटतं खरं. मात्र मंदिरात गेलं, की अचंबित
व्हायला होतं. विशेषतः मंदिराची स्थापत्यकला थक्क करायला लावणारी आहे.
गावकरी या मंदिराला पांडवकाली मानत असले तरी हे प्राचीन मंदिर दुर्लक्षित वाटतं. पडझडीच्या मार्गावर दिसतं. तरी त्यातलं अस्सलपण कायम आहे.मंदिराचं गर्भगृह खोल असून त्यात महादेवाची पिंड आहे. आत पूर्ण अंधार. त्यामुळं खाली उतरणं थोडं जिकिरीचं ठरतं. समोर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. प्रथम चोैरस अन् मग वर्तुळ यावर तो बसविण्यात आला आहे.नक्षीदार दगडी खांब हे मंदिराचे वैशिष्ट्यं आहे. त्याला विविध आकार देण्यात आले आहेत.
चंदनगड अन् इब्राहिमपूर ही साताऱ्यापासून जेमतेम तासाभरात पोहचता येतील अशी ठिकाणं. अगदी अर्ध्या दिवसातही उरकता येईल अशी ही भटकंती. त्यामुळं वेळ मिळेल तेव्हा आवर्जून वाकडी वाट करायला हरकत नाही!
भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा
महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे
निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे
त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन
मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने
निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास
यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून
झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा
नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात
जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची
पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील
काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे
वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.
जाधव घराण्याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्यापैकी एक वाडा पडला आहे.
एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात
जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम
स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची
कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना
उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून
त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या
प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’
असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो
मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे.
राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात
फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या
घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून
आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव
घराण्याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’
असे सांगतात.
जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५
फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री
(समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील
शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस
सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत
पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे
सिद्ध होते.
त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक
नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा
लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा
पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक,
चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी,
जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी,
चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत.
त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी,
बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे
किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब,
शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत
देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी,
जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख
अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.
जाधवरावांच्या
जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका
कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती.
जाधवराव
घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे
चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते.
त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या
विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक
विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व
बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ
बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर
कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या
सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे
साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद
होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केलेल्या आहेत. त्या
घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर
राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड
इत्यादी राजघराण्यांशी आहेत.
जाधव वाडा- भुईंज
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या.
राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम,
त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे
बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव
राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली
सारख्या ऊभ्या रहात. राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे
जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी
जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे
पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी
राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी
आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला
-नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात
विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक
झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य
होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा
आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे
वास्तव्यास आहेत .
शिरवळची प्राचीन पाणपोयी :-
पुण्याहून सातार्याला येताना निरानदी ओलांडली की सातार्याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.
वाई :
वाईत, लहान- मोठी अशी शंभराहून अधिक मंदिरे आहेत. त्यांतील कृष्णा पुलाजवळची महादेव, दत्तात्रेय, दक्षिणकाठचे सिद्धश्वेर इ. काही मंदिरे एकोणिसाव्या शतकातील असून हरिहरेश्वर, अंबाबाई (महाकाली), रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा (मारुती), वाकेश्वर, गणपती (साबणे) ही पूर्व-पेशवाईतील मंदिरे आहेत. त्यांच्या चुनेगच्चीतील शिखरांचे बांधकाम मात्र पेशवाईत झाले असावे. या जुन्या मंदिरांतून काही पाषाणशिल्पे आढळतात. तद्वतच मंदिरांतील प्रतिष्ठापित मूर्तीतील काही मूर्ती, विशेषतः महालक्ष्मी, विष्णू, विठ्ठल-रखुमाई, महागणपती, महाकाली, त्रिमुखी दत्तात्रेय, गोशाळेतील संगमरवरी कृष्णमूर्ती, काशीविश्वेश्वर मंदिरातील घंटायुक्त झूल घातलेला एकसंध अलंकृत पाषाण नदी व गर्भगृहाची कलाकुसरयुक्त द्वारशाखा ही लक्षणीय आणि चित्तवेधक आहेत. महालक्ष्मी, विष्णू, काशीविश्वेश्वर, महागणपती, उमामहेश्वर, इ. मंदिरे एका विशिष्ट मराठा वास्तुशैलीत (नव-यादव) बांधलेली आहेत. या मंदिरांचे विधान चतुरस्त्र असून त्यांत गर्भगृह, सभामंडप, क्वचित अंतरालय आढळते. शिखरांवरील कोनाड्यांत चुनेगच्चीत मूर्तिकाम आहे.
गोशाळे रास्तेवाडा, विद्यमान शासकीय मुद्रणालय (मुख्यतः विश्वकोश छपाईकरिता), नगरपालिका, मोतीबाग, इ. रास्त्यांनी बांधलेले वाडे चौसोपी, प्रशस्त आहेत. वाईच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या मोतीबागेतील वाडा आनंदराव रास्त्यांनी विश्रामधाम म्हणून बांधला. त्यातील पोहण्याची खास विहीर, बाग, कारंजी, पाणी ओढण्यासाठी वैशिष्ट्यूपूर्ण रहाटगाडगे इ. अवशिष्टआहेत. या वाड्यातील दिवाणखान्याच्या भिंती भित्तिचित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत. पेशवाईतील वाडा हा एक स्वतंत्र वास्तु-विषय आहे कारण कार्यानुरूप आकारनिर्मित, भक्कम बांधकाम, सूक्ष्म कलाकुसर, छायाप्रकाशाचे कार्यानुरूप इ. वैशिष्ट्ये यात आढळतात.
वाई अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्याच्या खुणा आजही जागोजागी पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते इथल्या वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. वाईपासून केवळ सहा किलोमीटरवरील मेणवलीचा घाट प्रसिद्ध आहे.
मराठाकालीन अवशिष्ट भित्तिचित्रांत कदाचित वाईचा पहिला क्रमांक लागेल. या चित्रांचा काळ साधारणतः १७३० ते १८५४ असा वास्तूंच्या बांधणीवरून ठरविता येईल. भाव्यांच्या कोटेश्वर मंदिरातील भित्तिचित्रे ही अखेरची कलाकृती होय. मोतीबाग, पटवर्धन वाडा, जोशी (मेणवलीकर) वाडा, शासकीय मुद्रणालय इत्यादींतून भित्तिचित्रे अवशिष्ट असून जवळच मेणवली येथील नाना फडणीस वाडा व मेणेश्वर मंदिर यांतून भित्तिचित्रे आहेत. या भित्तिचित्रांत वैष्णव धर्माचा प्रभाव अधिक दिसतो. रंगसंगती, विषयांतील वैविध्य आणि रेषांचे लालित्य यांमुळे ही भित्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. चुनेगच्चीतील मूर्तिकाम आणि भित्तिचित्रांतील प्रतिमा यांतून तत्कालीन मराठमोळी संस्कृती दृग्गोचर होते.
कृष्णेचा उत्सव हे वाईचे खास वैशिष्ट्य . हे उत्सव सात घाटांवर साजरे होतात. छ. शिवाजी महाराजांच्या वेळी यास प्रारंभ झाला असावा, अशी समजूत आहे. या उत्सवांप्रमाणेच प्रत्येक वाडी व काही पेठा यांच्या वार्षिक यात्रा भरतात. मध्ययुगापासून वाई हे वेदविद्येचे व संस्कृत भाषेच्या अध्ययन-अभ्यासाचे प्रसिद्ध केंद्र समजले जात होते. विष्णुशास्त्री ग. जोशी व दत्तात्रेय जोशी (मेणवलीकर), बाळंभट रानडे, का. वा. ऊर्फ भाऊशास्त्री लेले, गोरक्षक चौंडे महाराज, राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धनबुवा, बाळशास्त्री डेगवेकर, केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) इ. विद्वान मंडळींचे येथे वास्तव्य होते. शहरात प्राज्ञपाठशाळा, चौंडे महाराजांनी स्थापिलेली श्री गोवर्धन संस्था (गोशाळा), लो . टिळक स्मारक ग्रंथालय, वाई व्यायामशाळा, ब्राह्मो समाज, वाई अक्षर इन्स्टिट्यूट या प्रसिद्ध जुन्या -नव्या संस्था आहेत. येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विद्यमाने मराठी विश्वकोशरचनेचे काम, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली १९६२ पासून चालू आहे. एकोणीसाव्या शतकात मोदवृत्त, मधुवृत्त, वृत्तसार, इ. वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होत होती. मकरंद हे मासिक काही वर्षे चालू होते. त्याच्या स्मरणार्थ मकरंद प्रतिष्ठान स्थान झाले असून त्याच्या तर्फे दरवर्षी उत्तम पत्रकारितेबद्दल पुरस्कार देण्यात येतात. सांप्रत तांबडी माती, ज्ञानकिरण ही साप्ताहिके आणि नवभारत हे मासिक येथून प्रसिद्ध होते. वाईची नगरपालिका (स्था. १८५६) आरोग्य, पाणीपुरवठा, साफसफाई इ. नागरी सुविधा पुरविते. शहरात शासकीय रुग्णालय व ग्रामीण आरोग्य केंद्र असून अनेक खाजगी दवाखाने व रुग्णालये आहेत. त्यांपैकी ‘मिशन हॉस्पिटल’ हे सर्वांत जुने असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहरात सहा माध्यमिक विद्यालये (एक इंग्रजी माध्यमाचे) असून विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखांचे एक महाविद्यालय आहे. कृषि-उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचे हळद, गूळ व धान्य यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार चालतात. दर सोमवारी बाजार भरतो. शहरात सात बँका असून तालुका पातळीवरील सर्व कार्यालये आहेत. याच्या परिसरात खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे चालविण्यात येणारे रेशीम उत्पादन केंद्र असून सहकारी सूतगिरणी आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची वसाहत हे दोन संकल्पित प्रकल्प आहेत. वाईतील मंदिरे, फुलेनगरचे बगाड व वाईच्या परिसरातील डोंगरावरील सोनजाई देवी, मेणवली (नाना फडणीसांचा वाडा, कृष्णेवरील घाट, मेणेश्वराचे मंदिर, पोर्तुगीज बनावटीची भव्य घंटा इ.) भोगाव येथील वामन पंडितांची समाधी, धोम, (धरण व नरसिंह मंदिर), बावधन (भैरवनाथाचे मंदिर, पांडवलेणी व बगाड यात्रा), मांढरदेवी (काळूबाई मंदिर व पौष पौर्णिमेची प्रसिद्ध यात्रा), भुईंज येथील सहकारी साखर कारखाना, अंबाडखिंड (वाई-भोर रस्त्यावरील), किकली (भैरवनाथ-यादवकालीन प्राचीन कलाकुसरयुक्त शंकराचे मंदिर) ही प्रसिद्ध स्थाने पर्यटकांची खास आकर्षणे होत .
ढोल्या गणपतीच्या कुशीत अन पसरणी घाटाच्या मुशीत वसलेलं एक निसर्गसंपन्न टुमदार शहर असलेलं वाई म्हणजे पर्यटक, इतिहासप्रेमींसाठी आवडत ठिकाणच. शिवपूर्वकाळापासून ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामापर्यंतच्या इतिहासाची स्मृती गाठीशी बांधलेलं हे शहर. पेशवे सरदार रास्ते यांनी उभारलेलं ढोल्या गणपतीच्या देऊळामुळे वाईची ख्याती जनमानसांत पसरलली आहे. त्यापुढे जाऊन येथील पेशवेकालीन घाट, वाडे किंवा तत्सम वास्तूंमुळे इतिहासप्रेमींच्या तसेच स्थापत्यशैलीचा अभ्यास करणाऱ्यांच्या ताईत असलेलं हे ठिकाण. अलीकडच्या दहा पंधरा वर्षात तर बॉलिवुडचे आवडते शूटिंग लोकेशन म्हणून वाईचा उल्लेख होऊ लागला आहे.
ढोल्या गणपती :-
वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व
आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट
देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे.गणपतीच्या भव्य आणि विशाल
मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर
गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे.
मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण
व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी
आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे
पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होते व मंदिर सुरक्षित
राहते. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८०
सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना
वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने
कदाचित त्याला ‘ढोल्या गणपती’ असे नामाभिधान प्राप्त झाले असावे. मूर्ती
एकसंध काळ्या दगडात कोरलेली असून, हा दगड कर्नाटकातून आणला आहे. सध्या
मूर्तीला भगवा रंग दिला आहे. त्यामुळे मूर्तीचे मूळ रूप दिसत नाही. हा
गणपती उकिडवा दोन्ही मांड्या रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीस
यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यात गळ्यातील हार, बाजूबंद व
पायातील तोडे स्पष्ट दिसतात. मूर्तीच्या मागील प्रभावळ अर्धचंद्राकृती ३
मीटर ६३ सेमी इतकी उंच आहे. गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची
किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून वास्तु शास्त्रज्ञांनी
छताच्या पाषाणाला खाचा पाडून त्यात दुसऱ्या दगडांना अणकुचीदार टोके करून
ती त्यात बसविली आहेत. महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरांत सर्वांत
उंच असून, त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची २४ मीटर आहे.
उत्तम मंदिरे
वाईमधील
घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. या शहरामध्ये धार्मिक
कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे
पेशवेकाळाची साक्ष देतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची
मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या
शैलीमध्ये समानता आहे. धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व
पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.
या मंदिरांमध्ये
लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर
आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला
दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून
ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त
सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या
छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे
आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय.
उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक
आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी
यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा
आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभार्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील
मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या
लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या
काळातील कलात्मकतेचे दर्शन घडवितात. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे
पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या
सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे
ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहचू शकतो.
वाईपासून जवळच असलेल्या बावधन गावातील बगाड ही यात्रेतील परंपरा प्रसिद्ध आहे.
वाईपासून जवळच धोम धरण असून तो परिसर पाहण्यासारखा आहे.
राहण्याची सोय -
वाईमध्ये राहण्याची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.
कसे जाल?
- पुण्याहून स्वारगेट बसस्थानकावरून वाईसाठी स्वतंत्र बससेवा आहे.
- खासगी वाहनाने पुणे-बंगळूर महामार्गावरून सुरूर फाट्यावरून वाईकडे जाण्याचा मार्ग आहे.
नाना फडणवीस वाडा, मेणवली : -
वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले.
नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.
दीड एकर परिसरामध्ये बांधलेल्या या वाड्यात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथऱ्यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या सहायाने आणि भित्तीचित्राच्या अनोख्या शैलीने बांधल्या आहेत.
वाईवरुन येताना रस्त्याला डावीकडे फाटा फुटतो.या फाट्यावर नानांच्या
वाड्याची दिशा दाखवणारा फलक आहे.गावातुन पाचच मिनीटात आपण वाड्यासमोर उभे
रहातो. आजुबाजुला पार्किंगची सोय केली आहे. 
या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो.
शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे.
या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
तिकीट काढून आत निघाले की उजव्या हाताला नगारखान्याकडे चढणारा भिंतीच्या आत असलेला जिना दिसतो.
इथून वर चढल्यावर नगारखान्याच्या खोलीत पोहचतो.मात्र आता तिथे नगारे नाहीत.
यानंतर आपला प्रवेश मुख्य वाड्यात होतो. वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.
वाड्याच्या बाह्य तटभितींस खिडक्या नाहीत. तात्कालीन संरक्षण गरजानुसार त्या बांधल्या आहेत. या वाड्याला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे १५ फूट आहे.
आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओसरी दिसते जिथे येणारे जाणार्या लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाई.तर डाव्या बाजुला घोड्याच्या पागा आहेत.मात्र त्या बाजुला पर्यटकांना प्रवेश नाही.त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.
मग आपण पोहचतो मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई.
याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे,
जवळच नाना फडणवीस यांचे जीवनचरित्र लावले आहे.
वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्यात असणार्या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत.
वाटेत वाड्याची देखणी प्रवेशद्वारे दिसतात.
या बुरुजावर चढणारी वाट अरुंद असली तरी वरुन मेणवली गावाचा नजारा दिसतो आणि पार्श्वभुमीवर पांडवगडाचा सुळका दिसतो.
हाच बुरुज मागच्या बाजुने असा दिसतो.
मुख्य वाडा आतून बघण्यासाठी पुन्हा मुख्य चौकात यायचे.ईथे उजव्या हाताला एक पाटी दिसते.
वाड्याचा काही भाग हा पर्यटकांसाठी बंदिस्त केला आहे.
भिंतीस असलेल्या खड्या जिन्याने वरच्या मजल्यावर जायचे.
काही दालन ओलांडून आपण पंगतीच्या चौकाच्या वरच्या सज्जात असतो.अर्थात वाड्याच्या या भागात प्रवेश नसल्यामुळे हा चौक वरुनच पहाता येतो.
याच चौकाच्या शेजारी दप्तराची खोली आहे.तिथे बैठक व लिखाणाचे टेबल ठेवलेले दिसते.यानंतर आपण एका महत्वाच्या दालनात येतो. 
या
वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा
दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात
मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत
सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे. 
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे.
याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे.
यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो.
हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो.
छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो.
या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो.याठिकाणी वाड्याचा जो भाग पर्यटकांसाठी उपलब्ध आहे,त्याची फेरी पुर्ण होते.
हा वाडा मराठा वास्तूशैलीत बांधला आहे. उंच तटबंदीने धूळविरहित केला आहे. त्यात हवा खेळती राहिल आणि पुरेशा प्रकाशाचाही व्यवस्था केली आहे नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखात उभा आहे. १७७० च्या दरम्यान बांधलेल्या या वाड्याची देखभाल त्यांचे खापर पणतू अशोक फडणीस आजही करीत आहेत.
या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात.मुळचे अफ्रीकेत उगवणारे हे झाड शेकडो कि.मी दुर मराठी मातीत रुजले आहे. एखाद्या हत्तीच्या पायासारखा दिसणारा याचा बुंधा पर्यटकांचे आकर्षण आहे.
या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत.
फिकट पिवळ्या रंगाने छत रंगविले आहे. त्याच्या मध्यभागी समभूज चौकनात सुंदर पानाफुलांच्या वेलबुट्टींची चित्रेकाढली आहेत. बेलबुट्टी लाल व हिरव्या रंगात आहेत. मराठा स्थापत्य शैलीचे छत सुशोभीकरणाची प्रचलित शैली होय.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे प्रश्न पडतात.
बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा १७३९ मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
अशा घंटा नाशिकच्या शंकराच्या देवळात, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरात, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळात आढळतात. सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा त्या घंटा सुस्थितीत आहेत. मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्टय़ ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.

घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळला जात असावा.
वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.
येथे जाण्याचे मार्ग :
पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली.
अथवा
पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.
वामन पंडीत समाधी भोगाव : -
वामन
नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले
मराठी कवी होते.वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन
पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी
वामन दोन होते असेही मानतात. वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते.
त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल
आहे. वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी.
यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान
होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही
दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना
बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही
दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे
एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या
विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या
व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या
मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया
मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या,
परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या
विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे
त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या
ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये
लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे. 
वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा,
तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ,
काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार,
सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा,
वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त,
गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता,
रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य
आढळते.
वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान
अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी
त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते
अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’
असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका
लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी
यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर
टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला
भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे. धोमच्या
अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका
भक्ताने बांधलेली आहे.
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.
यादवकालीन स्तंभ
तिथेच झाडोर्यांत एक दुर्ल़क्षित वीरगळ आहे. तो जरुर बघावा.
धोमचे नृसिंह मंदिर : -
वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले आणि केंजळगड,पांडवगड उत्तरेचे रखवालदार्,पश्चिमेला धोम जलाशयात जहाजासारखा दिसणारा कमळगड, तर दक्षिणेला पाचगणी, महाबळेश्वरची डोंगररांग. स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. गावातून अरुंद डांबरी रस्त्याने मंदिराच्या परिसरात पोहचतो. गर्द वनराईने वेढलेला आणि कृष्णाकाठच्या रम्य प्रदेश अचुक हेरुन इथे मंदिर उभारणी केली आहे.
तिथल्या मंदिरातही वीरगळ दिसला
दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे.
अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे.
त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम केलेले दिसते.
मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
नृसिंह मंदिरामध्ये प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.
मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.
शिवमंदिरासमोरचा नंदीमंडप. हा पुष्करिणीतल्या दगडी कासवावर उभारलेला आहे.
लक्ष्मी नृसिंह
शिवमंदिराचा टिपीकल पेशवेकालीन शैलीतला कळस
धोम गावाच्या पाठीमागेच धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केलीय. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.
ह्याच झाडीत धोम गाव आहे.
भिंतीवरुन दिसणारा आजूबाजूचा परिसर
समोर आहे तो कमळगड
जांभळी ,वैशिष्ट्यपुर्ण वीरगळीचे गाव :-
रायरेश्वर पठाराच्या दक्षिण पायथ्याला जांभाळी हे वाळकी नदीच्या तीरावर वसलेले दुर्गम गाव हे. या गावातून एक वाट थेट रायरेश्वर पठारावर चढते आणि श्वानदर्याच्या वाटेला मिळते. या गावाला वाईवरुन थेट गाडी आहे.थेट जांभळी गाडी मिळाली नाही तरी वासोळे, खावली या गाड्या चालतात. कमळगडला जाताना आपण या जांभळी गावाला भेट देउ शकतो.गावात प्रवेश केल्यावर मुख्य चौकात आपल्याला एका झाडाखाली वीरगळी ठेवलेल्या बघायला मिळतात.
जांभळी गावात एका झाडाखाली काही शिल्प आणि वीरगळ ठेवलेले पहायला मिळतात.
पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा :-
वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत.
पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून
लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती
निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती
झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं
चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत.
यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून
पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या
घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या
तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही
वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे. 
गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा
पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे
औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात
नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट
केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन
सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत
आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड
येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा,
राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले.
साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते.
शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास
तयार नव्हते.
शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा
नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता.
त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने
त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला
ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख
मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी
त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली
जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद
केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून
दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात
डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात
घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी
‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
त्यानंतर शेख मीरा
शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार
सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात
अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव,
कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग,
नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ,
महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा
सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी
मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.
महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा
वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो
वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा
एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते.
वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत
गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन
खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान
आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य
दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी
असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे
दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर
आहे.
ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर
यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या
त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता
आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या
परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
धोम
धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी
केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.
पसरणी गावात
रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ
हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.
शेख मीरा यास
बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या
उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा
पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे
असे समजते.
येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील
महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे
वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर
नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या
उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची
पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले
जातात.
कीर्तिवंतांचं गाव :-
पसरणी गावात
महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी.
शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक,
स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली
आहे. गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात
आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची
इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी
गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.
शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के
यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या
गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त
झाले आहेत.
शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के
यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात
‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.पसरणीच्या चामडी
बुटांची ब्रिटिशांना भुरळ. पसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती.
इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी
भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही
महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय
करतात.
महाबळेश्वर:-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख
३) श्री. आशुतोष बापट ,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण
४) मराठी विश्वकोष वेबसाईट
राजवाडी धबधबा
वडाचे म्हसवे : येथील वटवृक्ष तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला ‘वडाचे म्हसवे’ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन ‘फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. १८८२मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. १९०३मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कुक थिओडोर या ब्रिटिश नागरिकाने पश्चिम घाटातील वृक्षांची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी २८ प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाईजवळील पाचवड येथून मेढा रस्त्याजवळच हे झाड आहे.
वसंतगड : या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने ११व्या शतकात केली. इ. स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड ताब्यात घेतला. किल्ला त्या वेळी मसूरचे आदिलशहाचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांच्या ताब्यात होता. याच महादजीला आठ-दहा वर्षांचा मुलगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या मुलाला आपल्यापाशी सांभाळले होते. पुढे जिंजीहून परत येताना छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इ. स. १७००मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले; पण इ. स. १७०८मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांच्या तोफांच्या भडिमाराने भग्न झाले आहे. गडावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गडाच्या मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधणीचे आहे. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. कोयना तळे व कृष्णा तळे अशी दोन तळी येथे आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारही बाजूंना चार बुरुज आहेत. पुणे-कोल्हापूर हमरस्त्यावरून हा किल्ला पश्चिमेला दिसतो. किल्ल्याच्या पूर्वेस तळबीड आहे.
आगाशिव लेणी : कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. त्यांना जखीणवाडीची लेणी असेही म्हणतात. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या पावसाळ्यातील मुक्कामासाठी खोदली असावीत. कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी आगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांना ‘आगाशिवची लेणी’ असे म्हटले जाते. या परिसरात एकूण १०१ लेणी असावीत. त्यापैकी ६४ लेणी बघण्यासारखी आहेत. येथे लेण्यांचे तीन समूह आहेत. पहिल्या समूहात २६ लेणी असून, यापैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्यांत चैत्यगृहे असून, त्यामध्ये स्तूप आहेत. सहा क्रमांकाच्या लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नक्षीकाम असलेले धम्मचक्र, तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे. बाकी २२ लेणी विहार प्रकारातील आहेत. २२व्या क्रमांकाचे लेणे सगळ्यात मोठे असून, विहार प्रकारात आहे.
कराड : कोयना नदीला ‘कऱ्हा नदी’ असे पूर्वी म्हणत. कऱ्हेच्या काठी असलेले कऱ्हाटक, त्यावरून कऱ्हाट, कऱ्हाड, कराड अशी व्युत्पत्ती झाली. कोल्हापूरप्रमाणे येथे महालक्ष्मीचे मंदिर होते. सुलतानी राजवटीमध्ये ते नष्ट झाले, असे म्हणतात. विठोबाअण्णा दप्तरदार हे संतकवी येथे होऊन गेले. तसेच संत सखुबाई यांचेही येथे घर आहे. यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी. त्यांचे घर येथे आहे. राजकारणातील चारित्र्यसंपन्न व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. कराडच्या प्रीतिसंगमावर त्यांची समाधी आहे. या समाधिस्थानाजवळ एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे, तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे, तसेच अनेक नवनवीन खेळ बसविण्यात आले आहेत. या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश आहे. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेबरोबरच पर्यटक व राजकीय नेतेमंडळींचीही वर्दळ वाढली आहे. रत्नेश्वराचे सर्वांत जुने मंदिर याच घाटावर आहे. या मंदिरावर मुस्लिम शिल्पकलेप्रमाणे चार मनोरे व हिंदू कलेप्रमाणे कळस पाहायला मिळतो. कृष्णामाईच्या देवीची यात्रा चैत्र वद्य प्रतिपदा व शेवटच्या श्रावणी सोमवारी भरते.
यमाई देवीचे मंदिर : यमाई देवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे फुटांवर असून, सातव्या शतकात बांधले असावे असे मानले जाते. पंतप्रतिनिधी घराण्यातील लोकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून सोन्याचा कळसही बसविला आहे. एखादा गड किंवा किल्ल्याप्रमाणे तटबंदी असणाऱ्या या मंदिराचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे. तटावरून भोवतालच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. मंदिराकडे येण्यासाठी खालपासून पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. छोटी गाडी मंदिरापर्यंत जाते; पण यात्रा काळामध्ये मात्र गाडी वर नेता येत नाही. या मंदिराबाबत असे सांगितले जाते, की पौराणिक काळात अंबऋषी मोरणतीर्थ परिसरात तप आणि यज्ञ करीत असत. मायावी विद्या येणाऱ्या औंधासुर राक्षसाने त्यांच्या यज्ञात विघ्ने आणायला सुरुवात केली. तेव्हा यमाई मातेने त्याच्याशी घनघोर युद्ध केले आणि त्याला ठार मारले; मात्र औंधासुराने मरताना देवीजवळ आपली चूक कबूल केली आणि आपले नाव अमर राहावे अशी इच्छा व्यक्त केली. त्या वेळी यमाई मातेने त्याची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासून त्या नगरीला ‘औंधा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. औंधासुराच्या कापलेल्या मस्तकाचे छोटे देऊळ मंदिर परिसरात बांधण्यात आले आहे. औंधासुराला ठार मारल्यानंतर यमाई माता स्नानासाठी केस मोकळे सोडून येथील तळ्यात उतरली. तेव्हापासून तिला ‘मोकळाई’ असेही म्हणतात. आजही या दगडी बांधणीच्या प्रशस्त मोकळाई तलावात पाय धुवून मग देवीदर्शनाला जाण्याची प्रथा आहे. या तळ्याची श्रमदानाने साफसफाई करण्यात येते. यमाईचे दर्शन झाल्यावर पायथ्याशी असलेल्या सुंदर बागेत आराम करून म्युझियम पाहावे.
औंधला पोहोचायला प्रथम साताऱ्याला जावे लागते. सातारा शहर मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा मोठय़ा शहरांशी महामार्गाने आणि लोहमार्गाने जोडलेले आहे. औंधला जवळ असणारे दुसरे छोटे शहर म्हणजे रहिमतपूर. हे शहरदेखील रेल्वेने जोडलेले आहे. ऐतिहासिक शहर रहिमतपूर आणि तिथली १७व्या शतकातील रणदुल्लाखानची कबर आणि इस्लामी वास्तू पाहून पुढे औंधला जाता येते. औंधला जाणारा रस्ता बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे हिरव्या, पिवळ्या, नानाविध छटांनी दुतर्फा बहरलेला असतो. नागमोडी वळणं घेत जाणारा हा रस्ता एका छोटय़ा घाटमाथ्यावर येऊन पुढे औंध शहराकडे वळतो. औंध शहरात प्रवेश करण्यापूर्वी उजवीकडे दूरवर एक उंच पहाड आणि त्यावर तटबुरुजाच्या कोंदणात एका मंदिराचा कळस दिसू लागतो. हे मंदिर आहे श्री यमाई देवीचे; श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांची ही कुलदेवता. मुख्य रस्त्याला फाटा देत एक रस्ता डोंगरमाथ्याच्या दिशेने मंदिराकडे चढताना दिसतो. वळण घेत डोंगराच्या मधल्या टप्प्यावर हा रस्ता पोहोचतो तो औंधच्या श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाच्या आवारात. इथे उभी आहे १९३८ साली बांधून पूर्ण झालेली, निळेसावळे डोंगर व आकाशाच्या सान्निध्यातील संग्रहालयाची पांढरी करडी इमारत; वृक्ष, वेली, बगिचांनी वेढली आहे. या इमारतीची रचना खास संग्रहालयासाठीच केलेली आहे. या संग्रहालय वास्तूचे वैशिष्टय़ म्हणजे इमारतीच्या आत सूर्यप्रकाशाची केलेली कल्पक योजना. इथे मांडलेल्या प्रत्येक कलावस्तूवर दिवसभर पाहिजे तेवढा सूर्यप्रकाश सौम्यपणे पसरलेला असतो. या इमारतीच्या छतभिंतींची खास रचना इथल्या शिल्पचित्रांना नैसर्गिक प्रकाशात उजळवून टाकते. प्रकाशाचे असे नियोजन चित्रातील रंग, रेषा, पोत आणि शिल्पांवर घडणाऱ्या छाया-प्रकाशाच्या खेळाला अप्रतिम लावण्य बहाल करते.
आज श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक वेगळे आणि खास असे संग्रहालय ठरले आहे. या संग्रहालयाच्या आवारात प्रवेश करताच दिसते ते श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे तिथल्या आसमंतात असणारे मेघडंबरीतील स्मारकरूपी अस्तित्व. त्यानंतर आहेत इतिहासाचे पाषाणरूपी साक्षीदार; अप्रतिम जैन, वैष्णव, गजलक्ष्मी इत्यादी मूर्तीचे अवशेष, प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या शिळा- ज्याला ‘वीरगळ’ म्हणतात ते, पतिनिधनानंतर सती गेलेल्या वीरांगनांच्या ‘सतीशिळा’, ‘शिलालेख’ आणि इतर अवशेष. मुख्य इमारतीच्या समोर आवारात उभे असलेले रूपवान संगमरवरी पुतळे आणि यातून पुढे दिसतो तो या संग्रहालयाचा कमानीचा वऱ्हांडा. त्यासमोर प्रवेशद्वार आणि त्यावर विराजमान असलेली रिद्धीसिद्धीसह श्रीगणेशाची प्रतिमा, सकळ कलांची देवता.
श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा विस्तार एकूण अठरा प्रशस्त कला विभागांचा असून, त्याखाली आणि वर अशा दोन भागांत विभागल्या गेल्या आहेत. तळाचा मध्यवर्ती भाग पुन्हा दोन विभागांत विभागून, यात प्रामुख्याने पाषाण आणि धातू शिल्पांची मांडणी केलेली आहे. इथली सर्व शिल्पे नैसर्गिक प्रकाशात उजळलेली असतात. या शिल्पांच्या लयदार, आरसपानी शरीरावर होणाऱ्या छायाभेदामुळे शिल्पसौंदर्याची नेत्रसुखद अनुभूती येते. इथल्या संग्रहात आहेत काही दिग्गज कलाकारांनी साकारलेली अस्सल शिल्पं, तर काही जागतिक कीर्तीच्या कलाकारांनी साकारलेल्या महान कलाकृतींच्या हुबेहूब प्रतिकृती, त्याही तितक्याच तोडीच्या कलाकारांनी घडवलेल्या. यातल्या काही प्रतिकृती तर थेट १५-१६व्या शतकातल्या अलौकिक ठरलेल्या ख्यातकीर्त कलाकारांच्या. या प्रतिकृतीच्या मांदियाळीत आहेत खुद्द मायकल अॅन्जलोच्या (१४७५-१५६४) ‘डेविड’ची प्रतिकृती, तर इटालियन शिल्पकार अन्तोनिओ कानोव्हाच्या (१७५७-१८२२) तीन सौंदर्यवतींच्या अप्रतिम समूह शिल्पाची प्रतिकृती ‘थ्री ग्रेसेस’ आणि ‘व्हीनस इटालिका’सारखी नितळ संगमरवरी सौंदर्यवती. पूर्णाकृती धातुप्रतिमेत प्रसिद्ध इटालियन शिल्पकार, जियोवानी दा बलोनिया (१५२९-१६०८) याची ‘फ्लाइंग मक्र्युरी’ नावाची जगन्मान्य शिल्पप्रतिकृती; इथल्या शिल्पसंग्रहाची शोभा वाढवत आहे. हा शिल्पकार आपली शिल्पे कांस्य आणि पाषाणासारख्या दोन वेगवेगळ्या माध्यमांत लीलया साकारत असे. या झाल्या काही पाश्चात्त्य कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतींच्या अप्रतिम प्रतिकृती. महाराष्ट्रातल्या काही महान शिल्पकारांच्या संगमरवरी, कांस्यधातूच्या अस्सल कलाकृतीदेखील इथे प्रदर्शित आहेत. त्यात कोल्हटकरांनी घडवलेली छत्रपती श्रीशिवाजी महाराजांची दोन पूर्णाकृती देखणी कांस्यशिल्पे, एक युद्धसज्ज आवेशपूर्ण, तर दुसरे धावणाऱ्या घोडय़ावर बसलेले. याच कलाकाराचे डरकाळी फोडणाऱ्या, परंतु सावधपणे बसलेल्या आणि आपल्या शेपटीची हालचाल करणाऱ्या वाघाचे शिल्प नक्कीच लक्ष वेधून घेते.
वर्षां, ग्रीष्म, वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षांतले सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना मानवी रूपात, ते ही स्त्री रूपात कल्पून, त्यांची नितांत सुंदर शिल्पं इथे पाहायला मिळतात. या शिल्पांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचं सहज जाणवणारं मराठीपण. जणू महाराष्ट्रातल्या आसमंतात दरवळणारे हे सहा ऋतू मराठमोळं लावण्य लेवून प्रत्यक्ष आपल्यासमोर भासमान झालेले आहेत. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला नक्कीच बोलकं करते. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘वसंत वाटे अतिगोड साचा.. शृंगार केला विविध फुलांचा.. वेणींत कानांत किर कटीला. गळ्यांत दुर्डीत उणे न त्याला..’ या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंतललनेचं मूर्तरूप एकमेकांस साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन; एका हातात फुलांची परडी; तर दुसऱ्या हातात सनाल कमलपुष्पे घेतलेली. शिवाय मनगटावर सुमनवलये, तर दंडावर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत; गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज आणि टपोऱ्या गुलाब पुष्पांची दाट गुंफलेला. गोंडय़ाचा, जाडसर पण नाजूक हार गळ्यात घालून सुहास्यवदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते. याउलट ग्रीष्म ऋतू वा ‘ग्रीष्मकन्या’ उन्हाच्या झळांनी व्याकूळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’; आणि या ऋतुकन्येवर केलेली काव्य रचना, ‘घे विंझणां वातचि उन्ह आला..ये घाम वेणीभर मुक्त केला.. त्यागी तसे आभरणांसि बाला. हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला..’, मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतुकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतुराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत.
श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी शिल्पकलेलाही राजाश्रय दिला, त्यांनी अनेक स्थानिक शिल्पकार हेरून त्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्यासाठी औंधला स्टुडिओची उभारणी केली. इतकेच नाही तर उत्तम शिल्पकामासाठी लागणारा उत्कृष्ट दर्जाचा संगमरवरी दगड ते दूर परदेशातून म्हणजे इटलीतून खास औंधला त्यांच्या स्टुडिओत मागवत असत. राजेसाहेबांच्या अशा मार्गदर्शनाने औंधला खऱ्या अर्थाने प्रतिभावंत शिल्पकार तयार झाले. पांडोबा पाथरवट आणि त्याची दोन मुले, राजाराम आणि महादेव हे तीन शिल्पकार, औंधला श्रीमंत राजे भवानरावांच्याच आश्रयाने नावारूपाला आले. त्यांनी अनेक शिल्पं घडवली; त्यातली अनेक शिल्प या कलाकारांनी ‘इटालियन मार्बल’मध्ये जरी कोरली असली, तरी त्यातून साकार झाली, ती इथल्या मातीतली ‘मराठी कलाकृती’. या शिल्पकारांनी घडवलेल्या अनेक सुंदर कलाकृतींपैकी काही कलाकृती इथल्या संग्रहालयात आज पाहायला मिळतात;
संग्रहालयाच्या मध्यवर्ती भागात एक अवाढव्य बुद्धिबळाचा पट आपले लक्ष नक्कीच वेधून घेतो. या पटावर दिसतात ते एकमेकांसमोर युद्धासाठी सज्ज असलेले विविध वेशभूषेतील सैन्य. या सैन्यात आहेत शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी, परस्परविरोधी राजे, वजीर, अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि उंट. युद्धभूमीवर लाल करडय़ा रंगातील हे सैन्य त्यांच्या त्यांच्या चौकोनात सज्जपणे उभे आहे. बुद्धिबळाचा हा पट खेळ सुरू झाला की सजीव होई. दोन्ही बाजूंकडून जो हा खेळ खेळला जात असे तेव्हा ही प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.
संग्रहालयाच्या आतील प्रशस्त प्रवेश मार्ग वेगवेगळ्या गॅलरीजना जोडला असून, या मार्गावर श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींचे आत्मचरित्र कृष्णधवल छायाचित्रांच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे. या छायाचित्रांतून पुढे सरकणारा त्यांचा जीवनप्रवास दर्शकास घेऊन जातो तो थेट भारतीय लघुचित्रांच्या, जलरंग, तैलरंगांच्या चित्रमयजगतात. इथल्या गॅलरीजच्या भिंतींवर विराजमान आहेत, प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे. जगद्विख्यात देशी- परदेशी चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती, तर काही चित्रकारांच्या एकमेव अस्सल चित्रकृती, अजिंठय़ाच्या चित्रांच्या आद्य प्रतिकृती, लाकडावर केलेले अप्रतिम कोरीव काम, हस्तिदंतातील प्रतिमा आणि त्यावरील नाजूक कलाकुसर, कांस्यमूर्ती, पुतळे, चिनीमातीची रंगीत नाजूक
भांडी, कापडावरील नक्षीकाम, गालिचे, शस्त्रास्त्रे, तिबेटी, चिनी, आफ्रिकन कलावस्तू, अशा नानाविध दुर्मीळ ऐतिहासिक कलावस्तू. प्राचीन भारतीय चित्रकलेतील लघुचित्रांचा अर्थात ‘मिनिएचर पेंटिंग्ज’चा वेगळा असा खजिना इथल्या संग्रहात पाहायला मिळतो. यात मुघल, पहाडी-कांग्रा, राजस्थानी, पंजाब आणि दख्खनी चित्रशैलीच्या विजापूर, मराठा चित्रशैलीतील चित्रांचा समावेश आहे. यात काही रागमालाचित्रे, देवी-देवतांची चित्रे तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर काव्य करणाऱ्या कविभूषणाचे चित्र, छत्रपती श्रीशाहूमहाराज, पेशवे आणि काही मराठेशाहीतील प्रमुख सरदार यांची दुर्मीळ व्यक्तिचित्रे आहेत. परंतु या चित्रसंग्रहात सर्वात महत्त्वाचा आणि अद्वितीय आहे तो ‘किरातार्जुनीय’ या महाकवी कवी भारविच्या संस्कृत महाकाव्यावर आधारित लघुचित्रांचा देखणा चित्रसंच. महाकवी भारवि हा सहाव्या शतकातील एक प्रतिभासंपन्न संस्कृत कवी. महाकवी भारविच्या ‘किरातार्जुनीय’चा जवळपास शंभर चित्रांचा रंगीत संच चितारला आहे तो थेट अठराव्या शतकातील पहाडी चित्रकारांनी. कवी भारविचे ‘किरातार्जुनी’ हे सहाव्या शतकातील महाकाव्य, अनेक प्राचीन कलाकारांनी या काव्याचे रूपांतर शिल्प, चित्रात यापूर्वी केलेले आहेच.. या काव्याची भुरळ अगदी आजही तेवढीच आहे. हे काव्य आधारित आहे अर्जुन आणि किराताचे रूप घेतलेल्या देवाधिदेव महादेव यांच्यामधील युद्धावर. हे युद्ध म्हणजे शिवाने अर्जुनाची घेतलेली परीक्षा होती. ही परीक्षा का? तर अर्जुनास महादेवकडून तेजस्वी ‘पाशुपतअस्त्र’ प्राप्त करायचे होते म्हणून. ‘किरातार्जुनीय’ची कथा लघुचित्ररूपाने आपल्या समोर क्रमवार सरकत जाते ती अनेक प्रसंगांच्या चित्रणातून. हे प्रसंग बारकाव्यासह चितारलेत. यात डोंगर, झाडे, पाने, फुले, पक्षी, मृत अथवा जीवित पशू, पाणी, आकाश, देव, दानव, यक्ष, अप्सरा, राजमंदिरे, युद्धभूमी, परस्परविरोधी शस्त्रास्त्रे; जशी पर्जन्यास्त्र विरुद्ध अग्निस्त्र, सर्पास्त्र विरुद्ध गरुडास्त्र. आणि शेवटी अर्जुनाने प्रत्यक्ष पशुपती शिवाला प्रसन्न करून पाशुपतअस्त्र कसे मिळवले याचे मनोहारी दर्शन देत ही चित्रकथा संपते. भारविच्या काव्य प्रतिभेचे हे रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून साकार झालेले ‘चित्रकिरातार्जुनीय’ असे दुसरे नाही.
अजिंठा लेणीचा शोध आणि तिथली प्राचीन भित्तिचित्रे जगभराच्या कलाइतिहासाच्या विषयात एक आश्चर्याचा विषय ठरली गेली. या भित्तिचित्रांच्या प्रथम प्रतिकृती चितारल्या त्या इंग्रज चित्रकारांनी, परंतु चित्रकार आणि कला इतिहासकार असलेल्या श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी आणि त्यांच्या सहकारी चित्रकारांनी अजिंठय़ाच्या चित्रांच्या अनेक प्रतिकृती केल्या, त्याही रंगीत छायाचित्रणाच्या त्या वेळच्या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने. आज अजिंठय़ाच्या या बहुमोल प्रतिकृती औंधच्या संग्रहालयाच्या कलादालनात पाहायला मिळतात.
पाश्चात्त्य चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती आणि काही चित्रकारांच्या दुर्मीळ, परंतु मूळ चित्रकृती हे या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्टय़. प्रसिद्ध ‘रेनिसान्स’ चित्रकार लिओनाडरे दा विन्ची (१४५२-१५१९) याची ‘मोनालिसा’ आणि ‘सेंट जॉन इन द वाइल्डरनेस’ या दोन चित्रांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे आहेत. इटालियन चित्रकार राफिएल (१४८३-१५२०) याचे गाजलेले चित्र ‘मॅडोना ऑफ द चेअर’; प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार इंया ओगीस डोमिनिक एंग्रा (१७८०-१८६७) याची ‘द सोर्स’सारखी चित्रप्रतिकृती. या आणि अशा अनेक चित्रकृती सुवर्णजडित नक्षीदार चौकटीच्या कोंदणात एखाद्या अमूल्य रत्नासारख्या जपलेल्या आपल्याला इथे दिसतात. पाश्चात्त्य चित्रकारांच्या अस्सल चित्रात, स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को गोयां (१७४६-१८२८) हा ओल्डमास्टर्समधला शेवटचा चित्रकार त्यांनी स्वत: चितारलेले ‘मार्केट सीन’ हे चित्र; तर दुसरा स्पॅनिश चित्रकार एफ. लिंगर हिदाल्गो (१८८०-१९४५) याचे ‘पॅलेस ऑफ अॅलेक्झांडर’ आणि फ्रेडा मारस्टोन (१८९५-१९४९) नावाच्या चित्रकर्तीचे ‘सीन ऑफ टॉवर’ यासारखे जगद्विख्यात चित्रकार आणि त्यांच्या ‘ओरिजिनल’ चित्रकृती औंधच्याच संग्रहात आहेत. या संग्रहात विसाव्या शतकातील प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर यांनी साकारलेले शिल्पदेखील आहे.
भारतीय चित्रकलेचा युगप्रवर्तक चित्रकार राजा रवी वर्मा (१८४८-१९०६) आणि श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी दोघेही समकालीन. दोघेही एकमेकांचे प्रशंसक होते. राजा रवी वर्माने चितारलेली तीन विख्यात चित्रे, ‘सैरंध्री’, ‘मल्याळम स्त्री’ आणि ‘दमयंती’ या संग्रहालयाच्या कलादालनात जपलेली आहेत. याव्यतिरिक्त प्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर (१८६७-१९४४) यांची चित्रे. चित्रकार मुल्लर (१८७८-१९६०) यांनी चितारलेले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे चित्ररूप चरित्र. अॅन्तोनिओ त्रिंदाद (१८६९-१९३५) ज्यांची ख्याती पूर्वेचा ‘रेम्ब्रॉ’ अशी होती. महाराष्ट्रातले दिग्गज चित्रकार आबालाल रहिमान, माधव सातवळेकर, हळदणकर, बाबुराव पेंटर, रवींद्र मेस्त्री, जी. ठाकूरदास, एम.जी. गुजर, चित्रकर्ती अंबिका धुरंधर आणि बंगालच्या नंदलाल बोस, जे. पी. गांगुली, यामिनी रॉय, सरला वर्मा. सारदा उकील यांच्या प्रसिद्ध चित्रांनी इथले कलादालन सजले आहे. अर्थात एवढय़ावरच औंधचे संग्रहालय संपत नाही. श्रीमंत पंतप्रतिनिधीचे वडीलदेखील कलाप्रेमी होते. त्यांनी भिवा सुतार नावाच्या एका उत्तम चित्रकार, शिल्पकारास राजाश्रय दिला होता. या चित्रकाराने अनेक चित्रं काढली, पण त्याचे एक चित्र ‘रामपंचायतन’ खूपच प्रसिद्ध झाले, त्याच्या अनेक रंगीत शिळाछापप्रती निघाल्या, अनेकांच्या घरात त्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या ते चित्र या संग्रहात आजही विराजमान आहे. या चित्रकाराव्यतिरिक्त बरमप्पा कोटय़ांळकर नावाचा दुसरा प्रतिभावान चित्रकार पंतप्रतिनिधींकडे होता. हा चित्रकार निष्णांत व्यक्तिचित्रकार, निसर्गचित्रकार होता, पण त्याची खरी प्रतिभा दिसत होती, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांच्या चित्रणातून. ‘शिवाचे तांडव’, ‘राज्याभिषेक’, ‘कृष्ण’, ‘दत्त’ आणि ‘त्रिपुरासुरवध’ यांसारखी सुंदर चित्रं या चित्रकाराने साकारली. आज ही चित्रे त्या त्या चित्रकारांना समर्पित केलेल्या कला दालनातून मांडलेली आहेत.
हस्तिदंतात कोरलेल्या वस्तूंचे एक वेगळे दालन इथे आहे. या दालनात आहेत शुभ्र हस्तिदंतात कोरलेल्या नाजूक देवप्रतिमा, व्यक्तिप्रतिमा आणि नक्षीदार वस्तू. काही मूर्तीवर तर शुद्ध सुवर्णाचा वर्खदेखील जडवला आहे. हस्तिदंती प्रतिमांचे इथले वैशिष्टय़ म्हणजे त्यातल्या काही प्रतिमांची दिसणारी स्थानिक मराठी शैली. श्री राम, सीता, हनुमान, श्रीविष्णू शारदागणेश. इत्यादी मूर्ती मराठी शैलीत फारच खुलून दिसतात. हस्तिदंतात कोरलेल्या बंगाली आणि इतर शैलीतील मूर्तीसुद्धा इथे आहेतच. अर्थात हस्तिदंती कलेचे इथले दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे छोटी व्यक्ती शिल्पे. ही शिल्पे आहेत श्रीमंत श्रीनिवास महाराज आणि स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी आणि इतर व्यक्तींची. महत्त्वाचे म्हणजे ही व्यक्तिशिल्प घडवलीत त्या त्या व्यक्तींच्या रंगचित्रांवरून. एकीकडे त्या व्यक्तीचे चित्र आणि दुसरीकडे ही छोटी शिल्प ठेवली की त्यातलं तंतोतंत साम्य लगेच लक्षात येतं. खरं तर हा एक दुर्मीळ कलाप्रकार इथेच पाहायला मिळतो. ही हस्तिदंती कला साकारली आहे महादेव पाथरवट आणि त्याच्या शिष्यांनी; औंधलाच हे कलाकर ही कला शिकले. गुडीगर नावाच्या कर्नाटकातील शिरसीच्या कलाकाराची चंदनाच्या लाकडातील दोन कलाकृती अप्रतिम काष्ठशिल्पाचा नमुना आहेत. एक श्रीदेवी यमाई आणि दुसरे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चंदनात साकार झालेले ‘शिवचरित्र’ अत्यंत नाजूकपणे कोरले आहे.
याव्यतिरिक्त स्वत: श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधींनी चित्रित केलेली अनेक चित्रं इथल्या संग्रहालयाच्या एका दालनात मांडलेली आहेत. या चित्रात रामायणावर आधारित अनेक चित्रं आहेत. याशिवाय त्यांनीच चितारलेली, ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगावर आधारित चित्रेदेखील आहेत. सुप्रसिद्ध चित्रकार रावबहादूर धुरंधर यांच्या मते प्रतिनिधींच्या चित्राची एक वेगळी शैली होती; त्यांच्या त्या खास शैलीस त्यांनी ‘औंधस्कूल’ नावाने गौरविले होते.
औंधचे श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालयाचा फक्त एवढय़ाच संग्रहावर थांबले नाहीत तर आजही या संग्रहालयाचा चित्र, शिल्पसंग्रह समृद्ध होत आहे; त्यामुळे आधुनिक कलाकारांच्या अनेक गाजलेल्या कलाकृती आपल्याला इथे पाहावयास मिळतात. या संग्रहालयाच्या नावात ग्रंथालयाचा उल्लेख येतो कारण औंधच्या राजाने अनेक पुस्तकेही जमवली होती. त्यातूनच या ग्रंथालयाचा जन्म झाला. आज शेकडो दुर्मीळ पुस्तके अभ्यासकांसाठी इथे उपलब्ध आहेत.
औंध संस्थानचे तत्कालीन राजे श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीनी बांधलेले श्री भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय वैशिष्टय़पूर्ण होते. इथली प्रत्येक अमूल्य कलावस्तू त्यांनी स्वत: देशविदेशात जाऊन जमवलेली. त्यांच्या या कलासंग्रहाचा आणि तद्नंतर संग्रहालय उभारण्याचा काही विशिष्ट हेतू होता; हा हेतू होता मराठी मनाच्या ज्ञानमय कलाजाणिवेचा, सौंदर्यदृष्टीचा आणि विशेष म्हणजे भविष्यातील कलाकारांच्या पिढीसाठी नवनिर्मितीच्या प्रेरणास्रोतांच्या आदर्श कलासंग्रहाचा. स्वातंत्र्यपूर्व काळात चित्रकला, शिल्पकला संग्रहालयाची अशी वेगळी, आदर्श कल्पना बहुधा महाराष्ट्रात, औंधलाच प्रथम साकार झाली असावी. आज श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधीच्या मनातील संग्रहालयाची संकल्पाना सफल झाली आहे. हे संग्रहालय सर्वसामान्यांच्या कला जाणिवेचे, चित्रशिल्प कलेच्या अभ्यासकांचे प्रमुख केंद्र ठरले आहे.
डॉ. श्रीकांत प्रधान

भावलिंग - गुरसाळे


सिद्धेश्वर मंदीर - कुरोली


गुरसाळे : वडूजपासून नऊ किलोमीटरवर असणारे गाव म्हणजे गुरसाळे. या गावात १३व्या शतकातील रामलिंग मंदिर आहे.
पुसेसावळी : येथील अयाचित घराण्यातील पूर्वज पांडुरंग अयाचित यांना आळंदीकडून दोन अजानवृक्ष व ज्ञानेश्वरांची मूर्ती प्राप्त झाली. आज या ठिकाणी दोन-अडीचशे वृक्ष आहेत. या ठिकाणी असलेली ज्ञानेश्वरांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
वेळू : अभिनेता आमीर खानच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’च्या पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत साताऱ्यातील ‘वेळू’ गावाने बाजी मारली. ५० लाखांचे प्रथम पारितोषिक पटकावले; पण हा प्रवास सोपा नव्हता. वर्षानुवर्षे टँकरग्रस्त असलेले हे गाव पाण्याच्या प्रश्नासाठी एकत्र आले. एकजुटीने गावकऱ्यांनी श्रमदान करून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. या गावात कुष्ठरोग पीडितांसाठी एक आश्रम काढण्यात आला होता. त्या आश्रमाचा मी विश्वस्त होतो. त्या वेळी या गावाची पाण्याबाबतची अवस्था पहिली होतो. हा आश्रम आता दुसऱ्या संस्थेकडे वर्ग केला असून, तेथे गोपालन संस्था काढण्याचे नवीन विश्वस्तांचे नियोजन आहे. वेळू हे गाव कोरेगाव तालुक्यात असून, रहिमतपूर-औंध रस्त्यावर डावीकडे आतल्या बाजूला आहे.
सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.
पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण
वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती).
इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.
मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना
दिसते. इथेच आपण खुश होऊन जातो. वाडा बर्यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी
जोत्यासह प्रशस्त ओसरी असलेला आहे.
इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्यांच्या कोपर्यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत.
इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो.
ही दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना
खरंच खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा
भरायची. आता चित्रीकरणाच्या
निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि निगा राखलेली दिसतेय. हे एक
छानच.
पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं.
इथे या फोटोमध्ये कोपर्यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा.
परत दुसर्या बाजूने ओसरीवर यावे. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता.
आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा रिनोवेट केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.
खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले.
पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
वर्धनगड : शिवशाहीतील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला कोणी बांधला याचा संदर्भ मिळत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. कोरेगावच्या पश्चिमेला सातारा-पंढरपूर रस्त्यावरूनच याचे दर्शन होते. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे, तिचे नाव महादेव डोंगररांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे, त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर हा किल्ला दिमाखाने उभा आहे. बाजूला ललगून व रामेश्वर हे दोन डोंगर असून, यावरून किल्ल्यावर तोफांचा मारा करता येत असे. पाच मे १७०१ या दिवशी मुघलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मुघल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला, की बादशहाने खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. तसेच पावसाळ्यात मुक्कामासाठी हा भाग चांगला आहे. या योजनेस औरंगजेबाने मंजुरी दिली.
शिखर शिंगणापूर : महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर असलेले शिंगणापूर दहिवडीपासून २० किलोमीटरवर आहे. वाईजवळील जांभळी खोऱ्यापासून निघालेली डोंगराची एक शाखा म्हणजे महादेवाचा डोंगर. याच शाखेमध्ये रायरेश्वर, केंजळगड, मांढरदेव, पांडवगड, वारुगड व सगळ्यात शेवटी येते शिखर शिंगणापूर. शिंगणापूरहून फलटण, माळशिरस, म्हसवड, दहिवडी येथे सतत वाहतूक चालू असते. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्री पाडव्यापासून चैत्र पोर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध द्वादशीला महादेवाला अभिषेक करण्यासाठी अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून अनेक कावडींतून पाणी आणले जाते. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे खूप जिकिरीचे असते. मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी मारतात. ‘हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ’ अशी हाक मारतच कावड नेली जाते आणि महादेवाला अभिषेक करण्यात येतो. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांच्या विवाहाचा मुख्य सोहळा असतो.
वारुगड : महादेव डोंगराच्या रांगेतील हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक टेहळणी किल्ला. सुमारे ३००० फूट उंचीवर हा किल्ला असून, दहिवडी-फलटण रस्त्यावर तोंडले गावाच्या पश्चिमेस हा किल्ला आहे. जाधववाडा हे वारुगडाच्या पायथ्याचे गाव. येथूनच गडावर जाणाऱ्या पायवाटेची सुरुवात होते. प्रवेशद्वाराची रचना नेहमीप्रमाणेच दरवाजाचे संरक्षण करणारी आहे. दरवाजाची तटबंदी व किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी शाबूत आहे. बालेकिल्ल्याची तटबंदीही मजबूत आहे. किल्ल्यावर पाण्याची दोन-तीन टाके आहेत. समोर सीतामाईचा डोंगरही दिसतो. तसेच संतोषगडावरून सीतामाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते. येथे कारखानीस नावाचे किल्लेदार होते व त्यांच्या दिमतीला रामोशी लोकांची शिबंदी होती. माचीवर भैरोबाचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.
टोकेवाडी : येथे डोंगरावर संतोषा देवस्थान असून, हे ठिकाण तोंडले गावाजवळ दहिवडी-फलटण मार्गावर आहे. येथे भाविकांची गर्दी असते.
राजेवाडी तलाव : राजेवाडी तलावाची निर्मिती ब्रिटिश सरकारने १८७३ साली केली. तलावाचे धरण आटपाडी व माण तालुक्याच्या सीमेवर आहे व जलाशय माण तालुक्यात आहे. या तलावात राष्ट्रकुटांची राजधानी ‘मानपूर नगरी’चे अस्तित्व संपले. तथापि त्या ठिकाणी जवळच शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून, त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे.
अंभेरीचे कार्तिकेय मंदिर
काíतकेयाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्याच्या जन्मासंबंधीसुद्धा अनेक
कथा निगडित आहेत. तो शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे असे मानले असले तरी तो
पार्वतीचा अंगज पुत्र नसून, विभावसू अग्नीचा पुत्र होता. काíतकेय हा उमा,
गंगा व कृत्तिकेचा पुत्रदेखील मानला गेला आहे. जन्मानंतर त्याच्यावर
संस्कार करण्यास कोणी येईना म्हणून विश्वामित्राने त्यावर योग्य ते संस्कार
केले होते अशा असंख्य कथा आहेत. एक गोष्ट मात्र खरी की काíतकेय ही शक्तीची
देवता आहे. कदाचित काही टोळ्यांचे नेतृत्व त्याकडे होते. स्थानिक
लोकदेवतांमधून या देवतेचा उगम झालेला दिसतो. भारतभर सर्वत्र सेनापती
म्हणूनच ही देवता लोकप्रिय आहे. विविध राजसत्तांच्या नाण्यांवर असलेले
काíतकेयाचे अंकन तसेच गांधार कलेतील त्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमा हे
त्या देवतेच्या लोकप्रियतेचेच गमक होय. कोंबडा हे चिन्ह काíतकेयाच्या बरोबर
कायमच दिसते.
उत्तर भारतात लोकप्रिय असलेला काíतकेय नंतर नंतर दक्षिण
भारताकडे गेलेला दिसतो. आणि तिथे तो षण्मुगम, सुब्रह्मण्यम, आणि मुरुग्गन
या नावांनी प्रचंड प्रसिद्ध पावला आहे. खरं तर आता उत्तरेकडे काíतकेयाची
पूजा जवळपास बंद झालेली असताना दक्षिणेत मात्र त्याची लोकप्रियता अबाधित
आहे. गावोगावी काíतकेयाची मंदिरे आहेत आणि उपासकही आहेत. इथले खास वैशिष्टय़
म्हणजे दक्षिणेत त्याला दोन पत्नी दिसतात. देवसेना आणि महावल्ली ही
त्यांची नावे. खरं तर देवसेना ही त्याची पत्नी नसून त्याची शक्ती आहे.
तारकासुर वधाच्या वेळी तो देवांच्या सेनेचा प्रमुख झाला होता, त्यामुळे
देवसेना ही त्याची शक्ती होते तर महावल्ली ही त्याची पत्नी होय.
या
संपूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडील काíतकेयाच्या प्रवासात महाराष्ट्रात मात्र
त्याचे अस्तित्व अगदी नगण्य जाणवते. वेरुळच्या लेणींमध्ये काíतकेयाची
अत्यंत सुंदर मूर्ती आहे, पण इथे तो शिवपरिवारातील देवता म्हणून दिसतो.
तसेच औंढय़ा नागनाथ मंदिरावर पण सुबक अशी काíतकेयाची प्रतिमा दिसते. पण
उपास्यदेवता म्हणून वेगळे मंदिर अगदी अपवादानेच आढळते. (पुण्याला
पर्वतीवरील मंदिर)
कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
या
सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे
काíतकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज
रस्त्यावर अंभेरी या गावी काíतकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा
घाट लागतो. त्याचे नावसुद्धा काíतकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या
दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे.
वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच
जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल
बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे.
जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात
याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात
समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले
की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट)
काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. काíतकेयाला इथे एकच मुख
असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. अंदाजे अशासाठी
की वर्षांनुवष्रे तेल वाहिल्यामुळे त्या हातांवर एकप्रकारचे किटण तयार
झालेले दिसते. आणि त्या थरात ते हात झाकून गेले आहेत. उजवा हात अभय मुद्रेत
तर डावा हात कमरेवर ठेवलेला स्पष्ट दिसतो. देवाच्या उजव्या बाजूला खाली
मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे.
दोन्ही हातांच्या खाली त्रिकोणी बोकडाच्या चेहेऱ्यासारखे अंकन आढळते.
मूíततज्ज्ञ डॉ. देगलूरकर सरांच्या मते ते छगवक्त्र आणि नगमेष आहेत.
काíतकेयाचा अग्नीशी असलेला संबंध इथे नगमेषाच्या रूपात दाखवला आहे.
अग्नीनेच आपल्या मुलाला म्हणजेच काíतकेयाला खेळवण्यासाठी मेषाचे रूप घेतले
होते अशी कथा पुराणात येते, त्याचाच हा पुरावा म्हणा किंवा त्यानुसार
केलेले हे अंकन इथे दिसते. या सर्व बारकाव्यांवरून ही मूर्ती अंदाजे
बारा-तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या काíतकेय प्रतिमेच्या
गळ्यात एक घट्टसर दागिना व त्याखाली त्रिकोणी असणारा ग्रैवेयक हा दागिना
दिसतो. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती)
इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार
अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली
याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही
मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची
अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक काíतकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती
मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या
हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या
हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर
नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन
संगमरवराची एकाच तोंडाची काíतकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या
सोमवारी आणि काíतकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर
वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम
समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते
तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले
आढळतात.
इतक्या निर्मनुष्य ठिकाणाचे हे नितांतसुंदर देवस्थान मुद्दाम
जाऊन पाहिले पाहिजे. सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदी जवळ असलेले हे
ठिकाण आहे. काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळत नसली तरी शक्तीचे
प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत
प्रचंड लोकप्रिय आहे. तारकासुराच्या वधासाठी देवांनी कुमार वयातच
काíतकेयाला सेनापतीपद बहाल केलं आणि त्याने मग दैत्याचे निर्दालन केलं, असं
सांगितलं जातं. सर्व सेनानीमध्ये तो अग्रणी आहे. गीतेमध्ये विभूती योगात
भगवान म्हणतात की,
पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम
सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर:
म्हणजेच
पुरोहितांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये स्कंद तर जलाशयांमध्ये मी
समुद्र आहे. शक्ती, सेना, सामथ्र्य या सर्वाचं प्रतीक असलेला हा स्कंद,
काíतकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे
आणि त्याहीपेक्षा त्या काíतकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी
मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा
परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला
पाहिजे.
आशुतोष बापट
मुधोजी मनमोहन राजवाडा : आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे. जुना भाग भारतीय वास्तुकलेचा व त्यातील लाकडी कलाकुसरीचा सुंदर नमुना आहे. सुंदर कडीपाट, नक्षीदार भक्कम दरवाजे, लाकडी तुळया व आधाराचे खांब अशा पद्धतीच्या वास्तू आता यापुढे निर्माण होणार नाहीत. राजवाड्यात निवासी, कार्यालयीन अशा प्रकारची वास्तुरचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या व नवीन आकर्षक फर्निचरने सजविलेले दिवाणखाने येथे आहेत. त्यांना ‘गुलाबी हॉल’, ‘हिरवा हॉल’, ‘बदामी हॉल’, ‘दरबार हॉल’, ‘सुरुच हॉल’, ‘हमखासे हॉल’ अशी सुंदर नावेही दिली आहेत. पॅलेस बांधताना खासगी वापराच्या खोल्या, त्यामध्ये, कोठी, मुदपाकखाना (किचन), देवघर, माजघर, व २४ शयनगृहे अशी रचना असून, संस्थानाच्या कामकाजासाठी कार्यालये, दरबार इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. उजेडासाठी व वारा खेळण्यासाठी अनेक चौकांची खुबीने रचना केलेली आहे. त्यामधे ‘रामाचा चौक’, समारंभासाठी ‘दसऱ्याचा चौक’, ‘देवीचा चौक’, ‘तुळशीचा चौक’, ‘मुदपाक चौक’, ‘पागा चौक’ व ‘नजरबाग’ असे चौक आहेत. त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी असे खोल्यांचे विविध आकारही आहेत. वाड्याचा दर्शनी भागही खूप आकर्षक आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे व चालूही असते; मात्र हा वाडा इतर राजवाड्यांसारखा खुलेआम बघता येत नाही. फलटणच्या राजघराण्याच्या संग्रहात अनेक दुर्मीळ व्हिंटेज कार आहेत.
श्रीराम मंदिर : फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत.
जबरेश्वर मंदिर : श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून, मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी, कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे.
संतोषगड : या गडालाच किल्ले ताथवडा असे म्हणतात. विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसवण्यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. संतोषगड हा फलटणपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला मध्यम आकाराचा असला, तरी भक्कम आहे. त्याची बांधणी खुद्द छत्रपती शिवरायांनी केली आहे. संतोषगड आपल्याला तीन टप्प्यांत चढावा लागतो. पहिला टप्पा चढल्यावर आपण एका मठात पोहोचतो. या मठाजवळ तीन गुहा असून, त्यात एक तळे आणि एक मूर्ती दिसते. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. वाल्मिकी ऋषींची एक मूर्ती आहे. चढणीचा डोंगर चढून दुसऱ्या टप्प्यावर आल्यावर दोन प्रवेशद्वारांतून जाताना मारुतीचे मंदिर दिसते. मुख्य दरवाज्याचे बांधकाम पूर्णपणे कोसळलेले असून, त्याला लागून असलेली चौकीदाराची खोली मात्र शाबूत आहे. किल्ल्यावर एक मोठा खड्डा आहे आणि त्यातही एक मोठे झाड वाढले आहे. त्यामध्ये एक गुहा दिसते. गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर बालेकिल्ला आहे. तेथे तातोबा महादेवाचे मंदिर पाहण्यासारखे आहे. गडावर अनेक भुयारे व गुहा आहेत. या भुयारांच्या मार्गात पाण्याचा भरपूर साठा आहे.
गोवर्धन संस्था : सन १९०५मध्ये चौंडे महाराज यांनी या संस्थेची स्थापना केली. गोवर्धन संस्था पूर्वी मथुरापुरी येथे होती. या ठिकाणी महात्मा गांधी, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, मदनमोहन मालवीय, वल्लभभाई पटेल, सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बापूजी अणे अशा अनेक विभूतींनी भेट दिली आहे. मंदिराचा परिसर चौंडे यांच्या वारसदारांनी स्वच्छ ठेवला आहे. ग्रंथालयामध्ये गोपालन/संवर्धन या बाबतीतील ग्रंथ आहेत. मंदिरात श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती आहे. मागील बाजूस गाईंचे गोठे व गोबरगॅस निर्मिती वगैरे प्रकल्प आहेत.
मेणवली : येथे पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीसांचा भव्य वाडा आहे. सन १७६८मध्ये औंधचे पंतप्रतिनिधी यांनी मेणवली गाव नाना फडणवीसांना दिला. ही जागा नानांना खूप आवडली व त्यांनी १७८०मध्ये वाडा बांधून घेतला. यात नानांची कल्पकता, कलाप्रेम, निसर्गप्रेम दिसून येते. चौसोपी रचना असलेल्या वाड्यामध्ये तख्तपोशी, नाना फडणवीसांचा पलंग, भित्तिचित्रे बघण्यासारखी आहेत. भित्तिचित्रांमध्ये कृष्ण आणि गोपी यांची चित्रे आहेत. पूर्वी येथे पेशव्यांचे मोडी लिपीतील दफ्तर ठेवले होते. ते आता पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तसेच एक वाळूचे घड्याळही होते. वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील दिवाणखान्यात काही जुनी पेंटिंग्जही आहेत. वाड्यातील मोठ्या आकाराच्या भिंतींमध्ये एका वेळी एक माणूस जाईल एवढे जिने आहेत. येथे नानांचा मुक्काम फार काळ झाला नसला, तरी विश्रांतीसाठी ते इथे येत असत. त्यांनी वाड्याच्या मागील बाजूस कृष्णा नदीवर बांधलेला घाट अप्रतिम असून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे चालू असते.
कमळगड : रायरेश्वरावरूनच दक्षिणेस असलेल्या कमळगडाचे दर्शन होते. याचे नाव काही जण कमालगड असे उच्चारतात. धोम धरणाच्या जलाशयामुळे कमळगड एखाद्या बेटासारखा दिसतो. कमळगडावर इतर गडांप्रमाणे बुरुज, तटबंदी काही नाही. तसेच काही इतिहासही नाही. येथे एक कावेची (गेरू) विहीर आहे. ही विहीर ५० ते ५५ पायऱ्या उतरून खाली जावे लागते. तळाशी पोहोचल्यावर चहूबाजूंना खोल कपारी असून, सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. हा किल्ला ट्रेकर्ससाठीच आहे. महाबळेश्वरहून गुरेघरवरून खाली उतरून नांदगणे गावापासून पुन्हा चढण घेत येथे पोहोचता येते. महाबळेश्वरचा केट्स पॉइंट, पाचगणीचा पारशी पॉइंट येथूनही हा किल्ला दिसतो. गडाला जोडून येणारी एक डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात. जलाशयाच्या मधोमध असलेल्या आकोशी गावातूनही येथे जाता येते. धोम धरण होण्याच्या अगोदर मी येथे जाऊन आलो होतो व बऱ्याचदा जात असे. तरुणांनी हा ट्रेक अवश्य करावा.
कोंडवली : कमळगडाच्या दक्षिण उतारावर कोंडवली हे गाव आहे. प्रतापगडावर अफझलवधाच्या वेळी शिवाजी महाराजांना वाचविणारे जिवा महाला यांचे हे गाव. त्यांचे छोटे स्मारकही गावात आहे.
केंजळगड : महादेवाच्या डोंगरातील रायरेश्वरनंतर दिसतो केंजळगड. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजांनी १२व्या शतकाच्या उत्तरार्धात केली. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. दक्षिण बाजूला धोम जलाशय व उत्तरेला देवघर जलाशय आहे. मागे जवळच रायरेश्वराचे पठार आहे. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक विहंगम दृश्य दिसते. येथून कमळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात. नाकिंदा या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात. केंजळगड घेरा केलंजा, आणि मनमोहनगड या नावांनीही ओळखला जातो. ‘मनमोहनगड’ हे शिवरायांनी दिलेले नाव आहे. या अशा दुर्गांनीच तर औरंगजेबाला २६ वर्षे कडवी झुंज दिली. त्यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, ‘जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला, तर तो जिंकणे फार अवघड आहे.
पांडवगड : समुद्रसपाटीपासून ४१७७ फूट (१२७३ मीटर) उंच असलेला हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात (११७८-९३) बांधला. किल्ला आकाराने खूप लहान आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ फक्त १० एकर आहे. किल्ल्याला सर्व बाजूंनी ५० ते ६० फूट उंचीचा उभा कातळ आहे. त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी मिळाली आहे. यादव राजांचे पतन झाल्यावर हा किल्ला बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला. त्यानंतर आदिलशहा व त्यानंतर शिवाजी महाराजांनी १३ ऑक्टोबर १६७३मध्ये किल्ला ताब्यात घेतला. तो अखेरपर्यंत मराठेशाहीच्या ताब्यात राहिला. सन १७११मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना त्या वेळचे सेनापती चंद्रसेन जाधव यांनी जेरीस आणले, त्या वेळी पिलाजीराव जाधवांनी बाळाजींना पांडवगडावर सुखरूप पोहोचविले. चंद्रसेन जाधवांनी शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथास आपल्या ताब्यात देण्यास सांगितले; पण शाहू महाराजांनी त्यास नकार दिला व हैबतराव निंबाळकर यांना चंद्रसेन जाधवांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्या वेळी आदर्कीच्या लढाईत चंद्रसेन जाधवांचा पराभव झाला व ते पन्हाळ्यास गेले आणि ताराबाईंच्या गोटात सामील झाले.
लोहारे लेणी : वाई गावाच्या ईशान्येस असलेल्या सुलतानपूर गावात सातवाहन काळातील नाणी सापडली होती. तसेच जवळच असलेल्या लोहारे लेण्यांचा वार्टर फ्रेअर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सन १८५०मध्ये प्रथम उल्लेख केला. येथे आठ लेण्यांचा समूह आहे. ही लेणी पालपेश्वर लेणी म्हणून ओळखली जातात. ही लेणी सातवाहन काळातील आहेत. या भागातील किवरा ओढ्याजवळ काही ठिकाणी अश्मयुगीन हत्यारेही सापडली आहेत. तसेच सातवाहन काळातील नाणीही सापडली आहेत.
वैराटगड : पुणे-सातारा रस्त्यावर पुण्याहून येताना उजव्या बाजूला पाचवडजवळ हा किल्ला आहे. भुईंजपासूनच हा किल्ला दिसू लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पाचवड-वाई मार्गावर व्याजवडीपासून येथे जाता येते. दुसरा रस्ता पाचवड-मेढा रस्त्यावर सारातले गावातून आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने १२व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. गडावर पूर्वी तटबंदी होती. आदिलशहाकडून शिवरायांनी १६५९च्या सुमारास किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाने इसवी सन १६९९मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे सर्जागड असेही नामकरण झाले होते. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये याचा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. १८९६मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकातही या तटाचे उल्लेख आले आहेत. किल्ल्यावर पुरातन अशी कोणतीही वास्तू अस्तित्वात नाही; मात्र इमारतींचे, वाड्यांचे, जोत्याचे अवशेष दिसून येतात. कातळाची नैसर्गिक तटबंदी किल्ल्याला लाभली आहे. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी बघण्यास मिळतात. कातळावर मधाची पोळी असतात. त्यापासून सावध राहावे. गडावर वैराटेश्वराचे देऊळ आहे. देवळाच्या सभामंडपात उभे केलेले एक वीरगळ शिल्प (स्मारक) दिसते. हा वीरगळ यादव काळातील असावा. योद्ध्याच्या पराक्रमाची माहिती शिल्पपटातून त्यावर कोरलेली असते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे.
किकली भैरवनाथ मंदिर : वाई तालुक्याच्या पूर्व भागात किकली हे गाव आहे. येथील पुरातन भैरवनाथ मंदिर आवर्जून पाहावे असे आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिरामध्ये सभामंडपातील रंगशिळेवर शिल्पकलेने भरलेले चार खांब असून, त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. काही ठिकाणी शिवतांडव, वामनावतार, सुरसुंदरी, क्षेत्रपाल अशी शिल्पे आहेत. शिल्पकलेने ओतप्रोत भरलेले हे मंदिर अद्याप पर्यटकांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.
कवठे : माजी खासदार आबासाहेब तथा किसन वीर यांचे हे गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात स्वातंत्र्यसैनिक आहे. १९४२च्या लढ्यामध्ये आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या गावाने झोकून दिले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांच्या हालचालीचे हे एक प्रमुख ठिकाण होते. आबासाहेब वीर यांचे मोठे स्मारक पुणे-सातारा रस्त्याच्या पूर्वेला लागूनच आहे. शेजारी असलेले बोपेगाव हे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे गाव.
कृष्णामाई मंदिर : महाबळेश्वर येथील पंचगंगा उगम व महाबळेश्वर मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या भरपूर; पण या दोन देवळांया अगोदर बांधलेल्या मूळ कृष्णामाई मंदिराची ओळख करून घेऊ. कार पार्किंगच्या पूर्वेस साधारण पाच ते १० मिनिटांत चालत येथे पोहोचता येते. हे देऊळ फारसे परिचित नाही. अलीकडे आठ-दहा वर्षांत पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून साफसफाई करून हे मंदिर उजेडात आणले आहे. हे देऊळ कोणी बांधले याची निश्चित माहिती नाही; पण साधारण ११व्या शतकातील किंवा त्यापूर्वीचे बांधकाम असावे. या मंदिराची शैली परिचित नाही. येथे स्मशानभूमी होती. त्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते. आता येथून स्मशानभूमी हलविली आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूला विष्णू, तसेच गरुडध्वज दिसून येतात. वास्तविक विष्णूची प्रतिमा स्मशानाजवळ आढळत नाही. देऊळ वापरात नसल्यामुळे येथे स्मशान झाले असावे. आतील गोमुखातून पाणी पडत असते.
आर्थर सीट पॉइंट : पंचगंगा मंदिराच्या मागेच आर्थर सीट पॉइंट आहे. येथून चालतही जाता येते, तसेच गाडीमार्गही आहे. आर्थर मॅलेट हा ब्रिटिश ऑफिसर होता. सरस्वती नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, तेथे बाणकोट बंदरात त्याची पत्नी व लहान मूल नौकेच्या अपघातात मरण पावले. त्यांचे थडगे तेथील किल्ल्यावर आहे. हाच आर्थर सरस्वतीच्या उगमस्थानाच्या वर बसून पश्चिमेकडे आपल्या प्रिय पत्नीची आठवण काढत बसे. त्यामुळे या जागेला आर्थर सीट पॉइंट म्हणतात. जवळच एको पॉइंट आहे. येथून आवाजाचा प्रतिध्वनी येतो. तसेच मंकी पॉइंटही येथे आहे. हा महाबळेश्वरातील सर्वांत आकर्षक पॉइंट म्हणून ओळखला जातो. या पॉइंटच्या डावीकडे खोल दरीतून कोकणात जाणारी सावित्री नदी आहे, तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत. यालाच ब्रह्मारण्य असेही म्हणतात. ही सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पाडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉइंटवरून रायगड किल्ला, तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर टायगर स्प्रिंग, इको पॉइंट, एलफिन्स्टन पॉइंट आहेत.
वेण्णा लेक : १८४२ साली सातारचे राजे श्रीमंत छत्रपती अप्पासाहेब महाराज यांनी ‘वेण्णा लेक’ची निर्मिती केली. वेण्णा लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात होता. त्यानंतर दोन वेळा त्याची पुनर्बांधणी झाली. नुकतीच धरणाची उंची वाढवून त्याची क्षमता वाढविली आहे. आता पाचगणीलाही या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी याची निर्मिती झाली. महाबळेश्वरचा प्रसिद्ध बोट क्लब येथेच आहे. पर्यटकांनी कायम गजबजलेले हे ठिकाण वाई-महाबळेश्वर मार्गावरच आहे. दाट जंगलाच्या सान्निध्यातील नौकानयन ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे.
केट्स पॉइंट (नीडल होल/एलिफंट पॉइंट) : वेण्णा लेकच्या पुढे पाचगणी रस्त्याच्या बाजूला थोडे अंतर गेल्यावर डावीकडे या ठिकाणाकडे जाण्याचा रस्ता आहे आहे. दाट झाडीतून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून क्षेत्र महाबळेश्वरलाही जाता येते. पुढे आल्यावर दिसते ते कृष्णा नदीचे लांबवर पसरलेले खोरे. त्यात धोम धरणाचा व बलकवडी धरणाचा निळाशार जलाशय. समोर दिसतो झाडीतून डोकावणारा कमळगड. त्याच्या पायथ्याशी आहे जिवा महालाचे कोंडविली गाव. बाजूने हा पॉइंट हत्तीच्या मस्तकासारखा दिसतो, तर नैसर्गिक आरपार दिसणारे ‘नीडल होल’ही दिसतो.
लिंगमळा फॉल : हे सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. तसेच हा पॉइंट पाचगणी रस्त्याला वेण्णा लेकपासून अत्यंत जवळ आहे. वेण्णा नदीवर हा धबधबा आहे.
विल्सन पॉइंट : महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर डावीकडे विल्सन पॉइंटकडे रस्ता जातो. हा सनराइझ पॉइंट म्हणून ओळखला जातो. हे महाबळेश्वरमधील सर्वांत उंच ठिकाण आहे. पुढे सातारा रस्त्यावर बगदाद पॉइंट आहे. नगरपालिकेच्या नाक्यापासून उजवीकडे कोयना शिवसागराकडे रस्ता जातो. तापोळा येथे बोट क्लब आहे.
बॉम्बे पॉइंट : महाबळेश्वरमधील सूर्यास्ताची मजा बघण्यासाठी येथे पर्यटक गर्दी करतात. महाबळेश्वरचे काबुली फुटाणे, चिक्की, हंगामाप्रमाणे तुती, जांभळे, करवंदे खात सूर्यास्त होईपर्यंत मजा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
प्रतापगड : हा किल्ला महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे २३ किलोमीटरवर आहे. किल्ल्यावरून सर्वत्र सह्याद्रीच्या दुर्गम पर्वतरांगा दिसतात. अत्यंत विलोभनीय असे हे पर्वतराजीचे दर्शन खूप सुखावह वाटते. त्याची समुद्रसपाटीपासून उंची ३५४५ फूट आहे. १६५६मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली. मुख्य किल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग असून, दोन्ही ठिकाणी तलाव आहेत. किल्ल्याला सर्व बाजूंनी भक्कम तटबंदी आहे. ३० ते ५० फूट उंचीचे बुरुज आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इत्यादी बुरुजांचे अवशेष अद्यापही दिसून येतात, टिकून आहेत. किल्ल्यावर तुळजाभवानीचे मंदिर आहे. १० नोव्हेंबर १६५९ रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वांत मोठी लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. येथे महाराजांनी अफजलखानाला गनिमी काव्याने संपविले. (अफझलखान वधावर आधारित नाट्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
मधु-मकरंद गड : मधुशिखर व मकरंदगड असे दोन्ही मिळून मधु-मकरंदगड किंवा मकरंदगड अशी याची ओळख आहे. याचा आकार तट्टूच्या पाठीसारखा दिसतो. म्हणून याला सॅडल बॅक असेही म्हणतात. महाबळेश्वरमधून येथे एका दिवसाचा ट्रेक करणे शक्य आहे. महाबळेश्वरवरून प्रतापगडाच्या पायथ्यामध्ये वाडा कुंभरोशीच्या अलीकडे पार गावातून हातलोट रस्त्याने घोणसपूर गावापर्यंत जाऊन तेथून हा ट्रेक करावा. गावातील देवळात राहण्याची व्यवस्था होऊ शकते. ट्रेकर्ससाठी हे नंदनवन आहे. महाबळेश्वरहून सकाळी लवकर निघाल्यास ट्रेक करून संध्याकाळपर्यंत परत महाबळेश्वरला मुक्कामाला येता येते. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाबरोबरच याची १६५६मध्ये निर्मिती केली. गडावर आता फक्त भग्नावशेष उरले आहेत; पण येथील निसर्गसौंदर्य बघण्यासारखे आहे पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा व शिवसागर, पश्चिमेला कोकण असे निसर्गाचे सुरेख दर्शन येथून होते. शक्य असेल तर मधुमकरंदगड-कोंडनाळ-बिरमणी हा ट्रेकही करावा. घोणसपूर गावातून मार्गदर्शक घ्यावा.
चायनामन फॉल : पूर्वी चिनी लोकांसाठी असलेल्या तुरुंग परिसरातच हा धबधबा आहे.
पुस्तकांचे गाव भिलार : पुस्तकाचे गाव ही संकल्पना राबविणारे भिलार हे देशातील पहिले, तर जगातील दुसरे ठिकाण आहे, या गावात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार भि. दा. भिलारे यांचे हे गाव. थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरच हे निसर्गरम्य ठिकाण आहे. स्ट्रॉबेरी हंगामात या गावात, तसेच आसपासच्या गुऱ्हेघर, भोसे व कासवंड गावात स्ट्रॉबेरी महोत्सव साजरा केला जातो. पर्यटकांना प्रत्यक्ष शेतात जाऊन स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेता येतो. तसेच या गावातून पर्यटकांसाठी होम-स्टे (निवासी व्यवस्था) सुविधा राबविली जाते. गुऱ्हेघर येथे शासनाची शेती व वनसंशोधन संस्था आहे. (पुस्तकांच्या गावाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
पाचगणी : महाबळेश्वरजवळील हे दुसरे महत्त्वाचे गिरिस्थान. हिलस्टेशनबरोबर हे एक शैक्षणिक ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे इंग्रजी माध्यमाची बोर्डिंग स्कल्स आहेत. महाबळेश्वरला अतिवृष्टीच्या काळात पर्याय म्हणून १८६०च्या दशकात जॉन चेसन नावाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणाची निर्मिती केली. त्यांनी येथे पाश्चात्य देशांतील अनेक वनस्पती लावल्या. सिल्व्हर ओक आणि पॉइसेटिया आदींचा त्यात समावेश होता. येथील हवा वर्षभरासाठी सुखद असल्याने ब्रिटिशांनी विश्रांतीसाठी हे ठिकाण विकसित केले. रुस्तुजी दाबाश यांच्या मदतीने जॉन चेसनने या परिसरातल्या भागाचे सर्वेक्षण केले आणि जवळच्या दांडेघर, गोडवली, आमरळ, खिंगर व तायघाट या पाच गावांमधील जागेची निवड केली. येथे बाजार विकसित करण्यात आला व सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसाठी जागा देण्यात अली. पाचगणीचे ज्वालामुखीतून निर्माण झालेले पठार (टेबल लँड) हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार आहे. टेबललँड हे पर्यटकांचे व सिनेसृष्टीतील निर्मात्यांचे आवडते ठिकाण आहे. टेबललँडच्या पश्चिम बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धोम जलाशय, कमळगड, केंजळगड यांचे विलोभनीय दृश्य दिसते. उत्तरेला पांडवगड, मांढरदेवी ही ठिकाणे दिसतात. पाचगणी व महाबळेश्वरचे काबुली फुटाणे खाल्ल्याशिवाय ट्रिप पूर्ण होत नाही. इथून जाताना पर्यटकांच्या बॅगमध्ये निरनिराळ्या प्रकारची चिक्की असतेच. पारशी पॉइंट, सिडनी पॉइंट ही प्रेक्षकांची आवडती ठिकाणे. पाचगणीमध्ये आता पॅरासेलिंगसारखे धाडसी खेळ उपलब्ध आहेत.
दांडेघर : पाचगणीला वाई रस्त्यावर दांडेघर म्हणून ठिकाण आहे. येथे केदारेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे भेट दिली होती. दर वर्षी दसऱ्याला दांडेघरचे श्री केदारेश्वर व पसरणीचे काळभैरवनाथ यांचा भेट सोहळा अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.
तीन
मोठे हौद बांधून जनावरे आणि माणसांसाठी स्वतंत्र सोय केलेली दिसते. तसेच
मंदिरावरील मूíतकाम पण पाहण्याजोगे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे
माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय.
आणि
६ फूट उंचीची यमाईची देखणी मूर्ती मन प्रसन्न करते. मंदिराच्या शिखरावरील
विविध देवदेवतांच्या शिल्पाकृती थक्क करणाऱ्या आहेत. सातारा ते औंध हे अंतर
४२ कि.मी. आहे.महाबळेश्वर-पाचगणी-वाई-मेणवली
रविवार 11/11/2012
![]() |
वाई येथील मंदिर. |
![]() |
वाईतील शंकराच्या मंदिरासमोरील भव्य नंदी. |
![]() |
वाईतील गणपती मंदिराशेजारील शंकराच्या मंदिरासमोरील दीपमाळ. |
![]() |
वाईतील गणपती मंदिराशेजारील श्री काशी विश्वेश्वर मंदिर. |
![]() |
मंदिरासमोरील भव्य नंदी. |
महागणपती ऊर्फ ढोल्या गणपती :
वाईकडे जाण्याचा रस्ता
थोडा छोटाच आहे. रस्त्यावर लिहिलेल्या पाटय़ांमुळे विचारण्याची गरज लागत
नाही. दुपारी 12.30 वाईत पोचलो. गाडी लावून महागणपतीचे दर्शन घेण्यास
निघालो. वाईचे मुख्य दैवत म्हणजे इथला महागणपती. गणपतीचं देऊळ नदीवर वसलेलं
आहे. त्याला ढोल्या गणपती असंही म्हणतात. गणपतीची मूर्ती नावाप्रमाणोच
अवाढव्य आहे. हा गणपती नवासाला पावतो असे म्हणतात. मंदिर 1762 साली
पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले. गणपतीची मूर्ती 6
फूट व लांबी 7 फूट अशी आहे.
नाना फडणवीसांचे मेणवली :
वाईपासून
धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली
गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी.
निरव शांतता आहे. नाना फडणवीसांचा वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे. सुबक
बांधणीयुक्त व कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट
शांत व सुंदर आहे. सहा चौकी असलेला हा वाडा आहे. येथे श्रीमंत चिमाजी अप्पा
पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून
तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. ही घंटा पंचधातूपासून बनवलेली असून,
घंटेवर जोरात मारले असता मधुर नाद होतो. यावर 1707 असा उल्लेख आहे. येथेही
परिसरातील लोक नदीचा वापर कपडे व जनावरे धुण्यासाठी यथेच्छ करताना दिसले.
वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन
चित्रे, कारंजे आहे. भुलभुलैय्या असलेला आपणास वाटतो. वाडय़ाची काळजी
घेणारे एक गृहस्थ मला या ठिकाणी भेटले. वाडय़ासंबंधी माहिती देऊन संपूर्ण
वाडा त्यांनी आम्हाला आतून दाखविला. ज्या काळी हा वाडा राबता असेल त्यावेळी
वाडा खरच छान असला पाहिजे. नानांचा शिसमचा मोठा पलंग त्यांनी दाखवला. वाडा
बराच पडझड झालेला आहे. परंतु सुधारणा चालू असल्याचे दिसले. साहजिकच आहे
एवढा मोठा वाडय़ाची निगा राखणो अवघड आहे. वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे.
वाडय़ाशेजारून कृष्णानदी वाहते. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती
आहे. उन्हाळय़ात छोटय़ाच्या खिडकीतून कृष्णा नदी व परिसर व देऊळ छान
दिसते. या खिडकीतून थंड गार हवा जेव्हा आत येते तेव्हा फारच थंडगार वाटते.
नानांच्या वाडय़ात त्यांचा पलंग व घरातील नक्षीकाम सुंदर आहे. वाडय़ात
एकूण 4 विहीरी आहेत.
![]() |
चिमाजी अप्पांनी वसई येथून आणलेली पंचधातूची घंटा. |
![]() |
| मेणवली येथील बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी. |
![]() |
| मेणवली येथील नाना फडणवीस यांनी बांधलेला घाट. शेजारी कृष्णानदी. |
![]() |
नानांचा वाडा. |
![]() |
वाईच्या ‘ढोल्या गणपती’ची छोटी प्रतिकृती. |
![]() |
नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. |
![]() |
नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. |
![]() |
नानांच्या वाडय़ातील आतील नक्षीकाम. |
चित्रपट व मालिकांमधील वाई परिसर :
अशा
या वाई व मेणवली परिसराचे देश व परदेशातील सिनेमांमध्ये समावेश होणो
साहजिकच आहे. शुटिंगसाठी देशा-परदेशातली मंडळी नवीन जागेचा शोध घेत वाईत
पोहचले. अर्थातच येथील निसर्ग, शेजारीच असणारा महाबळेश्वर, स्वस्ताई यामुळे
सिनेमा, छोटय़ा पडद्यावरील सीरिअल, जाहिरातदार या वाईकडे आकर्षित झाले.
आमीर खानची सॅमसंग मोबाइलची जाहिरात, स्वदेसच्या चित्रपटातील शाहरुख खान
ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, गंगाजलमध्ये अजय देवगण पारावर उभे
राहून केलेली डायलॉग बाजी. ही सगळी दृश्य वाई व मेणवली परिसरातील आहेत. या
ठिकाणी छोटय़ा पडद्यावर सुरू असलेली काही मालिका ही येथूच शूट झालेल्या
आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया,
गंगा, महाभारत, काशी. तेव्हा जेव्हा कधीही वाई व मेणवलीतील मंदिर पाहल
तेव्हा या ठिकाणी पिक्चर शुटिंग केल्याचे नक्की लक्षात ठेवाल.
इथून
जवळच वाळकी व कृष्णा या नद्यांवर बांधलेले धोम धरण आहे. वाईतून बाहेर
पडलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शाळू , ऊस , हळदीची पिकं दिसतात.
मेणवलीहून जवळ असलेले मांढरदेवीचा डोंगर आहे. या डोंगरावर्पयत गाडी जाऊ
शकते. इथून आंबोडे खिंडीतून भोरलाही जाता येतं. येथून जवळ पांडवगड आहे.
परंतु परिवारासह जाण्यास योग्य नाही. भटक्यांसाठी छान जागा आहे. मांढरदेवला
जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. 25 किलोमीटरवर मांढरदेवी आहे. पुणो - भोर
मार्गे देखील आपण वाईला येऊ शकतो.
वाईच्या परिसरात गड किल्ले ट्रेकिर्ससाठी मोठी पर्वणीच आहे. पांडवगड, वैराटगड, कमळगड, चंदन-वंदन आदी किल्ले आहेत.
वाईचा महागणपती व मेणवलीचा नानांचा वाडा पाहून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी निघालो. ऐव्हाना दुपारचे 1.45 वाजले होते.
कसे जाल :
- पुणे-खेड शिवापूर-शिरवळ-खंबाटकी घाट-सुरुर-वाई.
- पुणे-खेड शिवापूर-भोर-मांढरदेव घाट-वाई.
- सातारा-पाचवड-भुईंज-ओझर्डे-वाई.
दुपारी 1.45 ला मेणवलीमधून निघालो. पसरणी घाटमार्गे पाचगणी रस्ता छान आहे. घाट संपताच पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सुरू होते. पाचगणीमध्ये पाचगणी पालिकेचा 90 रुपयांचा टोल भरून टेबल लॅण्ड पाहण्यास गेलो. तेथे 10 रुपये पार्किग आहे. टेबललॅण्डवर महाराष्ट्रातील मोठे पठार आहे. येथून पाचगणी, महाबळेश्वर व वाईचा परिसर दिसतो. दुपारी 1.25 ला महाबळेश्वरकडे जायला निघालो. वाटते पारशी पाईंट दिसतो. तेथेही पार्किग आहे. वेण्णा लेक वाटेत दिसतो. प्रत्येक माणशी 325 /- (1 तासाकरिता) बोटिंग आहे. तेथून पुढे निघालो 1.45 वाजले होते. भूक लागली होती. महाबळेश्वरच्या आधी मस्त अर्धा तास पुन्हा ट्रॅफिक लागली होती. मग गाडीतच घरून आणलेली पोळी भाजी खाल्ली. जुन्या महाबळेश्वरला जायचे मनात ठरले होते. मात्र, महाबळेश्वरला गेल्यावर नेहमी सारखा रस्ता चुकला व मुंबई-गोवा हायवेकडे जाणा:या रस्त्यावर जायला निघालो. चौकशी करून पुन्हा माघारी फिरलो.
पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य. |
पाचगणीच्या टेबल लॅण्डवरून दिसणारे दृश्य. |
वेण्णा तलाव, महाबळेश्वर |
लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंट :
लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल. |
लॉडविक पाईट वरून दिसणारे महाबळेवरचे जंगल. |
लॉडविक पाईट वरून दिसणारा सावित्री नदीचा धबधबा. |
प्रतापगडाकडे जाणारा महामार्ग. |
लॉडविक पाईट |
लॉडविक पाईट |
एक रस्ता लॉडविक पाईंट व एलिफंट हेड पाईंटकडे जात होता. रस्ता खूपच उतार असलेला होता. गाडीने तब्बल 10 मिनिटे उतरल्यावर गाडी पार्किग केलेल्या दिसल्या. हा रस्ता सायंकाळी 5 नंतर खूपच भीतीदायक असेल कारण वाटेत घनदाट जंगल आहे. तेथे पोचल्यावर समोरील डोंगरातून उगम पावणारी सावित्री नदीचा धबधबा दिसला. या पॉईंटवर जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 मिनिटे चालत जावे लागते. येथे पोहोचल्यावर समोरील डोंगरात प्रतापगड व कोकणात उतरणा:या वाटा दिसल्या. निसर्ग सौंदर्य पाहून परतीचा मार्ग धरला. ऐव्हाना 4.क्क् वाजले होते. तेथून पुन्हा रस्ता विचारून जुन्या महाबळेश्वरला गाडी वळवली.
जुने महाबळेश्वर :
जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर. |
जुन्या महाबळेश्वरमधील शंकराचे मंदिर. |
मंदिराशेजारील बाजारपेठ. |
अतिमहाबळेश्वरमंदिरा बाहेरील नंदी. |
श्री पंचगंगेचे मंदिर. येथून पाच नद्यांचा उगम होतो. |
महाबळेश्वराचे देऊळ हे यादव जाने तेराव्या शतकात बांधले असल्याचे समजले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. येथील शंकराची पिंड स्वयंभू असल्याचे सांगण्यात आले. मंदिर खूपच छान आहे. आतमध्ये कोरीव काम केलेले आहे. मंदिर पुरातन काळचे आहे. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्नी, गायत्नी या पाच नद्या उगम पावल्या आहेत. मंदिराच्या शेजारी छोटा बाजार आहे. येथे पार्किग 20 रुपये आहे.
ऑर्थर सीट पाईंट
| आपले पूर्वज. |
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. |
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. |
| ऑर्थर सीट पाईंट. |
| ऑर्थर सीट पाईंटच्या अलिकडून घेतलेले छायाचित्र. या फोटोत ऑर्थर सीट पाईंट. बारीक दिसत आहे. L-810 Nikon |
तेथून 4.30 ला ऑर्थर सीट व विडो पॉईंट पाहण्यास निघालो. पुन्हा उपद्रव शुल्क म्हणून 10 रुपये नगरपालिकेला दिले. ऑर्थर सीट पाईंट अंदाजे 7 ते 8 किलोमीटर आहे. वाटते पूर्ण जंगल आहे. सायंकाळी 5 नंतर जाण्याचे टळलेले बरे. तेथे 5 ला पोचलो. ऑर्थर सीट व विडो पॉईंट तेथून बरेच लांब चालायचे होते. थोडेच अंतर चालत गेलो. फोटो सेशन केले. 5.30 ला परत त्याच मार्गाने यायला निघालो. महाबळेश्वरमधील बाजारपेठ 6 वाजेर्पयत पाहिली. 6 ला घरचा रस्ता धरला. अंधार पडल्यावर गाडी चालावायला अजूनच मजा येत होती.
| Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र. |
| Nikon L - 810 कॅमे:यातून घेतलेले फुलाचे चित्र. |
| Nikon L - 810 कॅमे:यातून |
| महाबळेश्वर मार्केटमधील लाल दिसणारा पण आतून पांढरा व गोड मुळा. |
महाबळेश्वर - वेण्णा तलाव - पारशी पाईंट - पाचगणी - पसरणी घाट - वाई नंतर हायवे व तेथून पुण्याकडे असा मार्ग 2 तासात कापून खेड शिवापूर येथील टोल नाक्यापुढे चहा पिऊन परत घरचा मार्ग धरला. पिंपरी ते महाबळेश्वर अंतर 140 किलोमीटर आहे. एकूण 345 किलोमीटर अंतर झाले.
चाफळचे श्रीराम मंदिर
सातारा
जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा
नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव
सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास
यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ
रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला
आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील
छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.
समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव समर्थ संप्रदायाच्या मठाचे मुख्य स्थान होऊन गेले. अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.
समर्थांनी
बांधलेले मंदिर त्यांच्या पश्चात मोडकळीस आले. त्या मंदिरास डिसेंबर
1967मध्ये झालेल्या कोयना भूकंपामुळे भेगा पडल्या. मुंबईचे उद्योगपती
अरविंद मफतलाल भूकंपग्रस्त भागाच्या पाहणी पथकासोबत चाफळला मार्च 1968मध्ये
आले. त्यांनी त्या मंदिराची बिकट अवस्था पहिली आणि त्याचा जोर्णोद्धार
केला. नव्या मंदीराचे बांधकाम 1972 साली पूर्ण झाले. मंदिराच्या बांधकामात
त्याची जुन्या पद्धतीची बांधणी कायम ठेवण्यात आली.
चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.
मंदिराच्या
गाभा-यात संगमरवरी सिंहासनावर राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत.
त्यापैकी श्रीरामाची मूर्ती मध्यभागी चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे.
ती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतरत्र रामाची मूर्ती धनुर्धारी अवस्थेत
असते. चाफळच्या मंदिरातील रामाच्या हातात कमळाची फुले आहे. मूळ मूर्तीच्या
शेजारी खालील बाजूस समर्थ रामदास व हनुमान यांच्या छोट्या संगमरवरी मूर्ती
आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर कोनाड्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती
आढळतात.
समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून क-हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. चाफळच्या राममंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक 'दास मारुती'चे मंदिर आहे. त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे. मूर्तीच्या चेह-यावर विनम्र भाव आहेत. त्या मारूतीसाठी बांधलेले मंदिर सुस्थितीत आहे. गावात आलेल्या 1968 सालच्या भूकंपातदेखील हे मंदिर सुरक्षीत राहिले. राममंदिराच्या मागे उंचवट्यावर 'प्रताप मारुती'चे मंदिर आहे. त्यास भीममारूती किंवा वीरमारूती अशा नावांनी ओळखले जाते. त्या मंदिराचे शिखर पन्नास फूट उंच आहे. शिखराचे शिल्पकाम आकर्षक आहे. त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी 'भीमरूपी महारूद्रा' या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.
मंदिराचा
परिसर प्रशस्त आहे. त्याच्या आवारात समर्थांची ध्यानगुंफा आणि समर्थांचे
अस्थीवृंदावन आहे. मंदिर परिसरात सभागृह, समर्थांची पंचधातूची मूर्ती,
उत्तर व दक्षिण बाजूला विस्तीर्ण तट, म्हसोबा मंदिर, नरसोबा मंदिर, रामरथ
मंदिर व महारुद्र स्वामी समाधी मंदिर या वास्तूदेखील आहेत.
चाफळच्या राममंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एक घळी आहे. त्या घळीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते. ती घळ 'रामघळ' या नावाने ओळखली जाते. त्या घळीतून राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे, की...
"दास डोंगरी राहतो,
यात्रा रामाची पाहतो।
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे।।''
चाफळचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरांची देखरेख 'श्रीराम देवस्थान ट्रस्ट'मार्फत केली जाते. ट्रस्टकडून भाविकांसाठी तसेच मुलांवर संस्कार घडवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था होते.
चाफळ गावापासून जवळच शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट घडली होती. त्या ऐतिहासिक घटनेप्रित्यर्थ तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. चाफळ गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बडोदा संस्थानाचे राजकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांचे जन्मस्थान आहे. पेंढरकर यांना गौरवाने 'महाराष्ट्रकवी' असे म्हटले जाई. पेंढरकर यांच्या नावाचा उल्लेख 'रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत अग्रक्रमाने केला जात असे.
- संतोष अशोक तुपे



सातारा-परळीचे प्राचीन शिवमंदिर
सातारा
शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी 'परळी' या गावी
एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी
यादव काळात तेराव्या शतकात झाली असावी. शेजारी शेजारी असणाऱ्या त्या दोन
शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पडझड झालेली आहे. त्यांतील फक्त
गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे. तेथे महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. त्याच्या
शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्या स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप,
अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून त्यांतील
दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला असून त्यातील चार
पूर्णस्तंभ आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत.
सभामंडपात सुंदर आणि रेखीव असा नंदी आहे.मंदिराच्या खांबांवर सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. त्यांमधील काही आभासी शिल्पे आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या व उजव्या बाजूंस 'मिथुनशिल्पे' (कामशिल्पे) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर सुमारे सहा मीटर उंचीचा कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी पंचमुखी शिवलिंग आहे. सदाशिवाचे ते अव्यक्त रूप आहे. सदाशिव म्हणजे सद्योजत, वामदेव, अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था. त्या दाखवणारी ती प्रतिमा आहे. त्या पंचस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश यांची रूपे.
शिवाच्या
सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत.
येथे ती अव्यक्त रूपातील आहे. मंदिराच्या समोरील परिसरात मान तुटलेला नंदी
आहे.शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत. त्यांतील अनेक वीरगळांवर नक्षीदार काम केलेले आहे.
त्याच परिसरात अनेक समाधी आहेत. माझ्या मते, त्या लिंगायत समाजातील असाव्यात. त्यातील एका समाधीवर सुंदर गणेश मूर्ती एका शिवलिंगाशेजारी ठेवलेली आहे. शेजारी एक सुंदरशी 'पुष्करणी' आहे, पण ती देखभालीअभावी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
शेजारी, उरमोडी नदीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आणि महारुद्र स्वामींची समाधी आहे. केदारेश्वराचे देवालय शक्यतो पाण्याने भरलेले असल्याने तेथील शिवलिंग पाण्यात असते.
एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या एकांतवास भोगत आहे. या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही.
- संतोष अशोक तुपे
मो. 9049847956
मेणवली घाट – वाई (सातारा) | Discover Maharashtra

मेणवली घाट
मेणवली घाट – ‘स्वदेस’ चित्रपटातील शाहरुख खान ज्या नदीकाठावर बसतो तो मेणवलीचा नदीकाठ, ‘सिंघम’ चित्रपटातील अजय देवगण चे टायटल सॉंग, तसेच गंगाजल मधील पारावरील दुश्ये ही सगळी मेणवली घाटावरीलच आहेत.
या ठिकाणी छोटय़ा पडद्यावरील काही मालिका ही येथेच शूट झालेल्या आहेत. जसे ‘अगले जनम मोहे बिटिया किजो’, छोटी बहू, भाग्यविधाता, बैरी पिया, गंगा, महाभारत, काशी. तसेच इथे सर्जा, युद्ध, जिस देस मे गंगा रेहता है, गंगाजल, मृत्युदंड आणि बोल बच्चन अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
वाईपासून धोम धरणाकडे जाण्याच्या वाटेवर चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर हे मेणवली गाव आहे. संथ वाहणारी कृष्णा नदी, आजूबाजूस असणारी दाट गर्द हिरवीझाडी, निरव शांतता मनाला मोहून टाकते. कृष्णा नदीवरील घाटही पाहून मन प्रसन्न होते. येथील घाट शांत व सुंदर आहे. येथे बांधण्यात आलेला घाट हा चंद्रकोराकृती आहे. येथे दोन मंदिरे आहेत. एक विष्णू देवाचं आणि दुसरं मेनेश्वराचं (शंकराचं). या मंदिरातील गर्भगृहात पायऱ्या उतरून खाली जावे लागते. येथे ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे.
या मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली आहे. श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या किल्ला जिंकल्यानंतर विजयाची आठवण राहावी म्हणून तेथील चर्चमधील घंटा येथे आणली आहे. यावर १७०७ असा उल्लेख आहे. घंटा पंचधातूची असून त्यावर मदर मेरी ची प्रतिमा आहे.
नाना फडणीसांनी १८व्या शतकात इथे एक मोठा वाडा, घाट आणि मेणेश्वराचे व विष्णुचे मंदिर बांधले. एका बाजुला पांडवगड तर दुसऱ्या बाजुला पाचगणीला घेऊन जाणारा पासरणीच्या घाटाचा रस्ता आणि त्या दोघांमधून वाहणारी कृष्णा नदी. कृष्णेवर बांधलेला हा घाट पाहिला की मेणवलीच्या प्रेमातच पडायला होते. इथली शांतता आणि निवांतपणा मनाला एका क्षणात भावतो.
नाना फडणवीस वाडा, मेणवली (वाई) | Discover Maharashtra

नाना फडणवीस वाडा
माधुरी दीक्षित च्या ‘मुत्युदंड’ चित्रपटाचे चित्रीकरण नाना फडणवीस वाडा याच वाड्यात आणि येथील मंदिर परिसरात झाले आहे. मेणवली येथील नाना फडणवीस वाडा सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली आहे. वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन चित्रे, कारंजे आहे. सध्या वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे.
नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर मंदिर बांधले.
या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना (नगारखाना) आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.
चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते. तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली, तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत.
वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.
येथे जाण्याचे मार्ग : पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली.
अथवा
पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.
साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:
कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्यातील काही खोल्यांचे बांधकाम सुंदर आहे. या वाड्यात सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कार्यरत आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी (पंत प्रतिनिधींची कुलदेवता) यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. पूर्वेकडे आणखी एक प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणार्या भाविकांसाठी आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे.
मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे.
गाभारा चौकोनी असून त्यात पितळी मुखवटा असलेली देवीची मूती आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते.
मंदिरावर
असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत
आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.
शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे.
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
पूर्वीचे
देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर
सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती
होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला.
दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्ज्ञाकडून शिखराची व
मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.त्यावेळेच्या
स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या
आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द
होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज,
शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली.
आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत.
काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या
व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्या आहेत.
पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत.या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत.या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.
पूर्वी
वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे
मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती).
इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.
मुख्य
इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच
आपण खुश होऊन जातो. वाडा बर्यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह
प्रशस्त ओसरी असलेला आहे.
इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्यांच्या कोपर्यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत.
इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो.
ही
दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना खरंच
खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा
भरायची. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि
निगा राखलेली दिसतेय. हे एक छानच.
पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं.
इथे या फोटोमध्ये कोपर्यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा.
परत दुसर्या बाजूने ओसरीवर यावे. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता.
आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा नुतनीकरण केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.
खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले.
पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
राजेमहाडीक वाडा, तारळे
महाराष्ट्र ! म्हणजे असे राष्ट्र की, विश्ववंदनीय छ. शिवाजी महाराज याच भूमीतील सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या अमलाखाली होता. येथील रयत आक्रमकांच्या जुलमाने त्रासली होती, पण तिचे रक्षण करणारा कोणीही त्राता नव्हता. आया बहिणींची भरदिवसा ढवळ्या अब्रू लुटली जात होती तर देव व मंदिरे उद्ध्वस्त करून धर्म बुडवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हिंदूद्वेष्ठ्या आक्रमक सत्तेकडून होत होता. येथे अनेक कर्तृत्ववान, महापराक्रमी योद्धे होते पण ते आक्रमक सत्तेच्या पदरी नामजाद सरदार म्हणून नोकरीस होते. पराक्रम करायचा तो आपल्या बादशाहाच्या तिजोरीत जास्तीतजास्त नकद व मुलूख पडावा म्हणूनच. अशावेळी वेरुळच्या भोसले घराण्याचा एक धोरणी, पराक्रमी शूर योद्धा शाहजीराजे हे विजापूच्या अदिलशाहा बादशाहाच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर येथे कारभार पाहत होते. त्यांना महाराष्ट्रातील स्वकियांची काळजी वाटत होती. स्वराज्य संकल्पक शाहजी राजांनी एकदा मराठी रयतेसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता. अशावेळी त्यांनी आपल्या पुण्याच्या जाहगिरीवर छ. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ सह मोकासदार म्हणून पाठविले. जे आदिलशाहाच्या सेवेत राहून त्यांना करता येणार नाही ते मुलाकडून व्हावे हीच अपेक्षा व तशी खात्री देखील होती.
छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय. या घराण्याचा उल्लेख कविंद्र परमानंद नेवासकर यांच्या ' शिवभारत ' मधे येतो तो असा,
" महाडिक परशुराम दुजे सत्याकुली नव || "
महामानी महाडिके फत्ते खानास गांठू दे ||"
हे घराणे मूळचे कोकणातील होय. त्यांच्या पूर्वजांकडे महाड बंदराचे वतन व देशमुखी तसेच, खेड बंदराची मोकादमी मिळाल्यामुळे त्यांना ' महाडिक ' हे उपनाम मिळाले. त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही १६५० ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत होते. परसोजीराजें कर्तृत्व व निष्ठा शाहजीशी एकरुप झाली होती. कानोजीराजे महाडिकांचे शौर्य, मुत्सदीपणा परसोजींच्या रक्तात पित्याप्रमाणे होता. परसोजींच्या मृत्यूनंतर हरजीराजे हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले. शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दिल्या होत्या
शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले.
छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराज गादीवर आले. छ. संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, दादाजी काकडे हे सैन्यासह कर्नाटकात १६८१ गेले. स्वतः कर्नाटकात लक्ष घालावयास छ. संभाजी राजांना वेळ नसल्यामुळे त्यांनी हरजींना कर्नाटकाचे सर्वाधिकार आणि कर्नाटकातील सर्व गडकोटांचा अधिकार सोपविला होता. म्हैसूरचा सेनापति कुमारय्या याचा हरजींनी पराभव करून मदुरैच्या नायकाचा भरासाच भाग स्वराज्यात दाखल केला. पुढे मराठी सैन्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने हरजींची सत्ता पूर्व कर्नाटकात इतकी वाढली की ते सर्वसत्ताधिश झाले. जिंजी, अर्काट आणि भोवतालचा प्रदेश मराठ्यांचा ताब्यात होता.इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्काटपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला . हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग,
मुघलांनी छ. संभाजी राजांना पकडल्याची बातमी ऐकताच ९ - ३ - १६८९ रोजी केशव त्रिमल यांस त्रिणामली येथे हरजींने कैद केले. हरजीराजे व केशव त्रिमल यांच्यामधे कर्नाटकातील प्रमुखपदासाठी संघर्ष असला तरी दोघेही छ. संभाजी महाराजांशी अतिशय प्रामाणिक होते. हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहमदनगर जवळील भिंगार येथे मृत्यू झाल्यानंतर छ. संभाजी पुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना काही अटीवर मोगलांनी मुक्त केले. छ. शाहू महाराजांनी सातारा येथे आपली राजधानी निर्माण केली. छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला.भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इ. स. १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ‘शृंगारपूर’ येथील वाड्यात झाला. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या! छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वांत धाकट्या कन्या. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली.शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या.
१७०९ साली छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.शंकराजीराजे महाडिक यांनी स्वराज्याची सेवा करीत असताना १७२८ मध्ये देह ठेवला. त्यावेळी तारळे गावच्या तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीराणी सती गेल्या. भवानीराणी व शंकराजी यांना दुर्गोजी व अंबाजी असे दोन पुत्र होते. दुर्गोजी हे कोल्हापूर येथील स्वराज्याच्या दुसऱ्या गादीच्या संभाजींच्या चाकरीत होते तर, धाकटे अंबाजी हे सातारा छत्रपति यांच्या सेवेत होते. याच घराण्यातील भवानजी हे छत्रपति प्रतापसिंहांच्या काळात सातारा गादीच्या सेवेत होते.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे
तारळे गावाच्या नावाला प्राचीन इतिहास आहे. तारकासुर राक्षसाच्या संकटातून तारले म्हणून तारळे हे नाव मिळाले असावे. या गावामुळे आजूबाजूच्या इतर खेडेगावांचे मिळून तारळे खोरे हे संबोधन प्राप्त झाले आहे. परिसरातील कडवे येथे पांडव लेणी व रामघळ आहे, खवाळवाडीच्या डोंगरावर विंध्यवासिनीदेवीचे मंदिर आहे. तारळे गावाच्या पूर्वेला असलेल्या पाल येथे भक्तांचे दुःख हरण करणारा खंडोबा देवस्थान, दक्षिणेस चाफळ गावी प्रभू श्रीराम मंदिर तर उत्तरेस समर्थ रामदासस्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे. या आठ वाड्यांचे प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेला असून मात्र या सर्व वाड्यांचे परसदार एकाच चौकात होते. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. काळ बदलला असला तरी आपला गौरवशाली इतिहास सांभाळणा-या श्री.विजयसिंह काकासाहेब राजेमहाडिक, धैर्यशिल राजेमहाडिक व इतर वंशजांनी खूप मेहनत घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.
हरजीराजे महाडिकांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान फार मोलाचे असून त्यांच्या वारसदारांचे छ. शाहू राजांच्या काळातील योगदान तितकेच मोलाचे आहे त्याचा गौरवशाली वारसा तारळे येथे दिसून येतो. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या राजेमहाडिकांशी छत्रपति घराण्याने दोन वेळा आपल्या मुलींचा विवाह केला ते त्या गुणवत्तेचे असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. धन्य हरजीराजे, ज्यांनी सलग स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या सेवेत राहून आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्नेह, प्रेम व विश्वास मिळविला.
कडवेतील प्राचीन शिवमंदिर
एरवीच्या वहिवाटीच्या, मळलेल्या वाटा सोडून गवसत जाणाऱ्या अनवट, अपरिचित वाटा मनाला विलक्षण आनंद देतात. त्यादृष्टीनं खेडोपाडी, डोंगराच्या अवतीभवती, शांत, निवांत अन् रम्य ठिकाणी कितीतरी स्थळं दडलेली दिसतात. पाटण तालुक्यातील कडवे बुद्रूक इथलं प्राचीन महादेव मंदिर हे त्यापैकीच एक.
नागठाण्यातून तारळेला जाताना अलीकडंच कडवेला जाणारा फाटा फुटतो. कोंजवडेतून सरळ पुढं जाणारा रस्ता मुरुडच्या तारळी धरणाकडं जातो. आपण मात्र काटेवाडीतून उजव्या हाताला वळायचं. काही अंतरावरच भुडकेवाडी लागते. रस्त्यालगतच भव्य हुतात्मा स्मारक आहे. पुढची सरळ वाट आपल्याला कडवे गावात घेऊन जाते.
गावाला
डोंगराची, पवनचक्क्यांची सोबत लाभली आहे. इथलं ग्रामदैवत पावणाई देवीचं
मंदिरही भव्य आहे. तिथूनच काही अंतरावर महादेव मंदिर आहे. ते अत्यंत
प्राचीन, पुरातन आहे.
अखंड पाषाणात कोरलेल्या या मंदिराविषयी विविध
आख्यायिका ऐकावयास मिळतात. पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधल्याची
आख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात.
मुख्य गाभाऱ्यासह दोन ठिकाणी स्वयंभू शिवलिंग आहेत.
मंदिरालगत
पाषाणात कोरलेल्या गुहा आहेत. त्यातही विविध देवदेवतांच्या कोरीव मूर्ती
आहेत. सभामंडपातील दगडी खांब लक्षवेधक आहेत. गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग
आहे. सभामंडपाच्या पूर्वेला सूर्यदेवतेची अन् पश्चिमेला विष्णूच्या
मूर्तीवर सुर्यकिरण पडण्यासाठी मंदिरावर छिद्र ठेवण्यात आले आहे.
मंदिराच्या मागे दगडातच विहीर अवशेष नजरेस पडतात.
हे मंदिर ओढ्याच्या काठावर आहे. थोरला ओढा या नावानं तो ओळखला जातो. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळं, सभोवतालच्या वनराईमुळं परिसराच्या सोैंदर्यात भर पडते. निर्जन परिसरामुळं शांततेची अनुभूती लाभते.
मंदिर परिसरात भुयार असल्याची शक्यताही ग्रामस्थ व्यक्त करतात.
शिवकाळात इथं छुपा मार्ग असावा, असंही सांगितलं जातं. शिवरात्रीला मंदिरात धार्मिक उत्सव असतात.
परिसरात
आणखीही मनाला भुरळ घालणारी स्थानं आहेत. तारळी धरण, तोंडोशीची रामघळ,
जळवचं मंदिर अन् खिंड, तारळेतील ऐतिहासिक वाडे, खंडोबाची पाली ही
त्यापैकीच.
पवनचक्क्यांच्या ‘जंगला’तून सडा वाघापूरमार्गे पाटणला जाणारा रस्ता आहे. ठोसेघर, चाळकेवाडीकडं घेऊन जाणारे विविध घाटमार्गही आहेत.
एक दिवसाची ही अगदी अल्पखर्चिक छोटी सहल मनाला नक्कीच आनंद देणारी ठरते.
कात्रेश्वरामुळे "कातरपट्टे'चं झालं "कातरखटाव'!

कातरखटाव - खटाव तालुक्यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले.
गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :-
जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.
बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल?
पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात 20 रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात करूया.
सरसेनापती प्रतापराव गुजर वाडा, भोसरे…
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरे गावात शूर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भव्य वाडा आहे. भोसरे गाव कोरेगाव रहिमतपूर पासून जवळ आहे. साताऱ्यापासून साधारण ४० किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावात असलेला वाडा सद्यस्थितीत खूप चांगल्या अवस्थेत नाही. वाड्यामध्ये छोट्या घरात प्रतापराव गुजर यांचे वंशज राहतात. तेथेच प्रतापरावांचा अर्धपुतळा व स्मारक आहे. जवळच प्रताप सृष्टीचे काम सुरू आहे. गुजरांची अजून एक शाखा नागपूरला आहे.
प्रतापराव यांचा जन्म घरंदाज पाटील घराण्यात झाला होता. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव “कुडतोजी” असे ठेवले होते. लहानपणापासूनच त्यांना दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती यांची आवड होती. धिप्पाड शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, हुशारी या गुणांमुळे महाराजांनी त्यांना स्वराज्य कार्यामध्ये सामावून घेतले. जेव्हा महाराज आग्रा मध्ये अडकले होते त्यावेळी प्रतापरावांनी सरदार अष्टप्रधान या सर्वांच्या बैठका घेऊन स्वराज्य सावरले होते व संपत्ती गोळा केली होती या सर्वांमुळे कुडतोजी यांना महाराजांनी “प्रतापराव” ही पदवी दिली.
इ.स. २४ एप्रिल १६६० रोजी शाहिस्तेखानाला जाऊन मिळालेल्या मराठा सरदार संभाजी कावजी यांना प्रतापरावांनी ठार मारले. इ.स. १६६३ मध्ये सिंहगड व मावळ प्रांतात हैदोस घालणाऱ्या मोगली सैन्याचा बंदोबस्त केला. सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाहिस्तेखानाची नाचक्की केली व तो पुण्यात येऊन बसला. इ.स. ३० सप्टे १६६४ रोजी मिर्झाराजे जयसिंग याच्या खुनाचा प्रयत्न प्रतापरावांनी केला पण तो असफल ठरला. इ.स. १७ ऑक्टोबर १६७० रोजी नाशिक दिंडोरी जवळ मोगली सैन्याचा पराभव केला. क्रूर मोगल सरदार दाऊद खान व इकलासखान यांना ठार मारले.
प्रतापरावांची दोन मुले जगजीवन व खंडोजी हे शंभुराजे सोबत होते. जेव्हा क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंना धर्मांतर करायला लावले तेव्हा आपल्या राजाचं धर्मभ्रष्ट होऊ नये म्हणून या दोघांनी आपले धर्मांतर केले. खंडोजी बनले अब्दुल रहीम व जगजीवन बनले अब्दुल रहमान. अशा या पराक्रमी गुजर कुटुंबीयांना शत शत नमन.
संदर्भः-१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) दै. सकाळ्,लोकमत्,लोकसत्ता यातील लेख
३) श्री. आशुतोष बापट,सुनील शेडगे,सागर बोरकर यांचे लिखाण
४) मराठी विश्वकोष वेबसाईट
५) सापच्या वाड्याची माहिती मिसळपाव या वेबसाईटवरुन




















































































































































































































































































































































































































































































































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.