सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे.
Print Pageसहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे.
थोपटेअण्णांच्या घरातील धाकटे सदस्य - लई अॅटिटुड होता याला.
हे गव्हाच्या शेतात बसले होते,

मित्रहो,
अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध
करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल
आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे
अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.
रविवारी
सकाळी ठरल्याप्रमाणे लवकर उठुन घरातुन मिंटित बसुन निघालो, मुंबई-पुणे
हायवेला फारशी वर्दळ नसल्याने बरोबर २० मिनिटात राजशेखरच्या घरी पोहोचलो
आणि शिरस्त्याप्रमाणे चहा पाणि घेउन शिक्रापुरला निघालो,मोशि -आळंदि
-सणसवाडि मार्गे शिक्रापुरला साडेनवुला ट्च, आहा लई मजा आली गाडी चालवायला
सकाळी सकाळी. अभिजित हडपसरहुन येउन तिथेच जॊईन झाला. शिक्रापुर पासुन
डाव्या हाताला एक फाटा जातो तो पाबळला, त्याच रस्त्यावर साधारण १७ - १८
किमि वर मोराचि चिंचोळी हे गाव आहे, आता जे नावात आहे ते गावात पण आहे, हो
दोन्ही चिंच पण आणि मोर पण. इथे श्री. आनंदराव थोपटे यांच्या घरीच जेवणा
खाण्याची सोय आहे, त्यांच्या बरोबर आधीच बोलणी झालेली होती, तसेच त्यांनी
पण सकाळपासुन ३-४ फोन करुन कुठे आलेलो आहोत ते विचारलेले होतेच.
गाड्या
त्यांच्या घराच्या समोर लावल्या आणि सगळी पोरं खाली उतरवली. जवळ जवळ दोन
तास पोरांना मांड्यावर घेउन आया व पोरं दोन्ही पार्ट्या जाम कंटाळल्या
होत्या, अशा वेळी ड्रायव्हर असणं हे सर्वात सुखाचं काम असतं, रिझर्व्ह सिट
आणि हात पाय हलवायला जागा. थोपटेंनी काही मोराची अंडि साठवुन तसेच छोटि
पिल्लं पकडुन त्यांना वाढवणं सुरु केलं आहे,

पुढच्या वर्षी हे मोर मोठे झालेले असतील आणि लहानपणापासुन - यहां मॆ घर घर खेली - असल्याने तिथंच आसपास राहतील. ’ पोहे होत्याती गरम तवर रानातुन जाउन या चटदिशि ’ इति, थोपटेमावशी लगेच चहा घेउन त्यांच्या घराच्या मागच्या रानात फिरायला निघालो. मागं एका तात्पुरत्या पाटामधुन मोटार चालु करुन पाणि सोडलेलं होतं, पोरं आणि त्यांचे आईबाप असे सगळेच त्यातुन चालत चालत गेलो, आसपासची शेती पाहिली, मग गोव्यात जसे डॊल्फिन दर्शनाचे होतात तसे मोर दर्शनाचे कार्यक्रम झाले. परत येताना माझ्या बायकोला अबोलीचं झाड दिसलं, ही तिची अतिशय म्हणजे अतिशय आवडती फुलं ( पुरावा - आज पर्यंत सासरहुन ३ अबोली रंगाचे शर्ट मिळालेत). आमच्या सोलापुरच्या घरि सुद्धा खुप झाडं आहेत अबोलीची असो.. तिनं खुप फुलं गोळा केली,

तेवढ्यात थोपटेअण्णांच्या लेकाचा आवाज ऎकुन परत घराकडे आलो, गरम गरम पोहे तयार होते, हाण हाण हाणले कारण आता इथुन पुढे रांजणखळगे पाहायला जायचं होतं आणि तिथं बरेच चालावं लागणार होतं. तो पर्यंत सगळी पोरं मातीत खेळुन मजा करत होती, आज काल घराच्या बाहेर पडलं की डांबर नाहितर सिमेंट्चे रस्ते आणि जी बाजुला माती असते ती नको नको त्या गोष्टींनी रंगलेली पण इथं पोरांना मातील खेळायला त्यांच्या आरोग्य निरिक्षक आया पण काही म्हणत नव्हत्या.
पुढच्या वर्षी हे मोर मोठे झालेले असतील आणि लहानपणापासुन - यहां मॆ घर घर खेली - असल्याने तिथंच आसपास राहतील. ’ पोहे होत्याती गरम तवर रानातुन जाउन या चटदिशि ’ इति, थोपटेमावशी लगेच चहा घेउन त्यांच्या घराच्या मागच्या रानात फिरायला निघालो. मागं एका तात्पुरत्या पाटामधुन मोटार चालु करुन पाणि सोडलेलं होतं, पोरं आणि त्यांचे आईबाप असे सगळेच त्यातुन चालत चालत गेलो, आसपासची शेती पाहिली, मग गोव्यात जसे डॊल्फिन दर्शनाचे होतात तसे मोर दर्शनाचे कार्यक्रम झाले. परत येताना माझ्या बायकोला अबोलीचं झाड दिसलं, ही तिची अतिशय म्हणजे अतिशय आवडती फुलं ( पुरावा - आज पर्यंत सासरहुन ३ अबोली रंगाचे शर्ट मिळालेत). आमच्या सोलापुरच्या घरि सुद्धा खुप झाडं आहेत अबोलीची असो.. तिनं खुप फुलं गोळा केली,
तेवढ्यात थोपटेअण्णांच्या लेकाचा आवाज ऎकुन परत घराकडे आलो, गरम गरम पोहे तयार होते, हाण हाण हाणले कारण आता इथुन पुढे रांजणखळगे पाहायला जायचं होतं आणि तिथं बरेच चालावं लागणार होतं. तो पर्यंत सगळी पोरं मातीत खेळुन मजा करत होती, आज काल घराच्या बाहेर पडलं की डांबर नाहितर सिमेंट्चे रस्ते आणि जी बाजुला माती असते ती नको नको त्या गोष्टींनी रंगलेली पण इथं पोरांना मातील खेळायला त्यांच्या आरोग्य निरिक्षक आया पण काही म्हणत नव्हत्या.
शेवटी
रांजण्खळगेला निघताना पोरांना अक्षरक्ष: उचलुन थोडं विसळलं आणि पुन्हा
गाड्यांत बसवलं, अभिजितच्या गाडित थोपटेअण्णा गाईड म्हणुन बसले होते, तिथुन
निघुन मलठणमार्गे रांजणखळगे पाहायला आलो, पार्किंगच्या गोंधळाच्या
नियमाच्या पुरेपुर पालन करत मोकळ्या मॆदानात २-३ वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं
पार्किंग करुन मंदिराजवळुन खाली नदी पात्रात खळगे पाहण्यासाठी उतरलो. थोपटे
अण्णांच्या वॊकिंग कॊमेट्री आणि अभिजित बरोबरच्या ’ खळगे म्हणजे पाणि व
ज्वालामुखी व उल्कापात’ अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.असेहि सगळ्या सिव्हिल
इंजिनियरना दगड म्हणलं की किति ब्रास याचीच काळजी असते, पण अभिजित तसा
नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि असा एक मित्र असल्याबद्दल माझाच अभिमान
वाटला. आता हे खळगे कसे का कधी असले शास्त्रीय प्रश्न विचारु नका,आम्ही
रविवारच्या सहली या साठी काढत नाही त्या साठि गुगला. इथं फक्त फोटो पाहा
आणि मजा करा.
गालावरच्या
खळीत जी मजा आहे ती नदितल्या खळग्यात कुठं असं म्हणु नका, फोटोवरुन कल्पना
येईलच नाहीतर प्रत्यक्ष जाउन पाहा हा फार जबरदस्त नजारा आहे, विशेषत:
फोटोग्राफर्स साठी तर निश्चितच, ब्लॆक व्हाईट फोटोग्राफिसाठी तर खुपच
सुंदर. हे त्या खळग्यांचे फोटो.




हा चेहरा राजशेखरने दाखवला म्हणुन लक्षात आला, (नाहीतर आम्हाला प्रत्येक दगड म्हणजे आमचेच पत्रिबिब वाटते)

असे बरेच छोटे छोटे दगडी पुल आहेत तिथे.

तिथंच एका खळग्यातल्या पाण्यातले बेडुकदादा.

हे खरंच रांजणासारखं दिसतय.



बालविक्रमादित्याला सापड्लं त्याचं सिंहासन.

सगळे
खळगे पाहण्यात १-२ तास गेले, आता तिथल्या देवळाजवळ आणि आमच्या पोटात कावळे
ओरडायला सुरुवात झाली होति. मग तिथुन परत आलो थोपटे अण्णांच्या घरी, तोवर
मावशींनी जेवण करुनच ठेवलेलंच होतं, भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, दोन
प्रकारचा ठेचा, शेंगादाण्याची चटणी, मसालेभात व कढी असा बेत होता. भाकरी
होतानाचा मला यापेक्षा चांगला फोटो अजुन मिळाला नाही,


घराबाहेरच खाटांसमोर टेबलं मांडुन जेवायची व्यवस्था केलेली होती. ताटं वाढुन आणली, आधीच भुक लागलेली होती त्यात असं जेवण
पुढं आल्यावर कशाला थांबा असा विचार केला त्यातच थोपटेअण्णा एका भल्या थोरल्या किटलीतुन घरचं तुप घेउन आले आणि भातावर आमटी घ्यावी तसं तुप भाकरीवर घालु लागले, अगागा अस्सल घरगुती तुपाच्या वासानं भुक अजुनच खवळली आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर एका चिंचेच्या झाडाखाली विश्रांतीची सोय केलेली होती,
हे महाशय खांबावर बसुन मजा पाहात होते आमची.
तिथं थोडि विश्रांती घेउन निघताना १-२ मोरांनी दर्शन देउन आमचा दिवस सार्थकी लावला व आपल्या गावाचं नाव राखलं.


घराबाहेरच खाटांसमोर टेबलं मांडुन जेवायची व्यवस्था केलेली होती. ताटं वाढुन आणली, आधीच भुक लागलेली होती त्यात असं जेवण
पुढं आल्यावर कशाला थांबा असा विचार केला त्यातच थोपटेअण्णा एका भल्या थोरल्या किटलीतुन घरचं तुप घेउन आले आणि भातावर आमटी घ्यावी तसं तुप भाकरीवर घालु लागले, अगागा अस्सल घरगुती तुपाच्या वासानं भुक अजुनच खवळली आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर एका चिंचेच्या झाडाखाली विश्रांतीची सोय केलेली होती,
तिथं थोडि विश्रांती घेउन निघताना १-२ मोरांनी दर्शन देउन आमचा दिवस सार्थकी लावला व आपल्या गावाचं नाव राखलं.
नेहमीप्रमाणे मला मोहवणा-या तेजोनिधी लोहगोलाची ही छायाचित्रं,
आणि
त्या सुर्यास्ताच्या बरोबरच हा एक व्रुक्षास्त, सुर्य नारायण उद्या पुन्हा
येतील पण ह्याचा पुन्हा उदय होण्यासाठी आपल्यालाच हात पाय हलवले पाहिजेत,
किमान आपल्या लेकरा बाळांसाठी तरी.

फोटोंसाठी अभिजितला धन्यवाद. राजशेखरकडचे फोटो आले की टाकतो खाली.
तर अशी ही या वर्षातली दुसरी ट्रिप सुफ़ळ संपुर्ण झाली
“नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच
ढगांशी वारा झुंजला रे,
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी ,
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच,
नाच रे मोरा……”
बघा ! वाचताना नकळत तुम्हीही लयबद्ध आवाजात बोललात. हे बालगीतच तसं आहे. ते ऐकलं किंवा वाचलं तरी आपण भूतकाळात जातो आणि बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात. तेव्हा शाळेत आपण मोठ्या उत्साहाने कोरसमध्ये हे गीत म्हणायचो, पण तुम्ही कधी असा नाचणारा मोर पाहिलात का? आंब्याचं वन तर आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिलंय. पण, पावसाची चाहूल लागताच आनंदाने नाचणारा मोर पाहणारा खरंच भाग्यवान! अशा भाग्यवानांच्या यादीत तुम्हांलाही यायची इच्छा आहे का ? जर उत्तर ‘हो’ असेल तर ‘मोराची चिंचोली’ तुमची वाट बघतेय.
मोराची चिंचोली. नाव थोडं वेगळं आणि आकर्षक आहे ना ! खरं तर या गावात फार पूर्वीपासून चिंचेची खूप झाडं आहेत. त्यामुळे त्याला चिंचोली हे नाव पडलं. त्यानंतर इथे आढळणाऱ्या मोरांमुळे गावाच्या नावात त्यांची भर पडली व ‘मोराची चिंचोली’ म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. गावाचं हे ‘मयूरवैभव‘ टिकवण्यात गावकऱ्यांचा मोठा वाटा आहे. चिंचोलीतील शांत वातावरण व जैवविविधतेमुळे इथे पूर्वीपासूनच मोर वास्तव्यास आहेत. “आपला राष्ट्रीय पक्षी असलेला हा देखणा मोर गावाचे वैभव आहे ,तसेच भगवान कार्तिकेयाचे वाहनही !” या समजुतीमुळे गावकऱ्यांनी कधीही मोरांची शिकार केली नाही. उलट त्यांंचं अस्तित्त्व टिकून राहावं व त्यांची संख्या वाढावी म्हणून गावकऱ्यांनी आपल्या शेतांभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडं लावली. त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं. एवढंच नाही तर पुढच्या पिढीनेही त्यांना इजा न पोहोचवता त्यांची काळजी घ्यावी, असे संस्कारही केले.म्हणूनच आजच्या घडीला गावातल्या लोकसंख्येइतकीच मोरांचीही संख्या आहे. जवळजवळ ३ हजारांच्या घरात ! शहरांतल्या प्राणिसंग्रहालयात एखादा मोर दिसताना पंचाईत आणि इथे मात्र हजारोंच्या संख्येत मोर ! तेही सहज घरासमोरच्या व्हरांड्यात फिरताना दिसणारे !
इथले गावकरी आणि मोरांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे.मोर ‘हे गाव आपलंच असल्यासारखे’ बिनधास्त इथे फिरतात आणि त्यांच्या एकांताची काळजी गावकरी घेतात. मोरांना लपता यावे म्हणून ग्रामस्थांनी खास शेताच्या परिसरात, मोकळया जागांवर मोठी झाडं लावली आहेत. शिवाय उन्हाळ्यात त्यांना अन्नपाण्याचा तोटा होऊ नये यासाठी त्यांची खाण्यापिण्याची सोय मनुष्यवस्तीपासून दूर रानात केली जाते. यामागे गावकऱ्यांचा एक ठोस विचार आहे.तो म्हणजे मोरांचा मूळ लाजाळू स्वभाव बदलू दयायचा नाही. त्यांना पाळीव करायचं नाही. इतका विचार गावकरी करतात ! त्यामुळे या गावकऱ्यांपासून आपल्याला काही इजा पोहोचणार नाही, हे मोरांना कळून चुकलंय म्हणून ते गावात, शेतांत सहज फिरतात. ते गावकऱ्यांपासून दूर पळत नाहीत, पण कोणी नवीन दिसलं की मात्र सरळ धूम ठोकतात.
ऐन पावसाळ्यात इथे येणं म्हणजे दुग्धशर्करायोगच ! मी दुग्धशर्करायोग म्हटलं कारण, मेघराजाच्या वर्षावाने न्हाऊन निघालेली धरती, वातावरणातला सळसळणारा उत्साह , ताजी हवा आणि या अशा ‘मौसम मस्ताना’ मध्ये हिरव्यागार माळरानावर डौलाने ठेका धरणारे मोर ! ‘याचि देही, याचि डोळा पाहावा हा सोहळा ! हे दुर्मिळ दृश्य पाहताना “ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच…” हे बोल मुखात आले नाहीत तर नवल ! गावाचं हे ‘मयूरवैभव’ सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक ‘मोराची चिंचोली’ पाहण्यासाठी इथे येतायत. गेल्या ४-५ वर्षांत मुंबई-पुण्याजवळचा ‘वन डे पिकनिक स्पॉट‘ म्हणून हे गाव नावारूपाला आलंय. याची दखल घेऊन काही गावकऱ्यांनी पर्यावरणपूरक कृषी पर्यटन केंद्रही उभारली आहेत. तिथे पर्यटकांच्या राहण्याची व जेवणाची सोय होते. शिवाय खेडेगावातील साध्या जीवनाचा जवळून अनुभव घेता येतो. इथल्या माणसांच्या मनाची श्रीमंती पाहून प्रसन्न वाटतंं. हे सगळं असलं तरी तिथे जाण्यापूर्वी काही नियम समजून घ्या. त्यांचं पालन केलं तरच हा निर्भेळ अनुभव तुम्हांला घेता येईल.
मोर हा अतिशय लाजाळू आणि संवेदनशील पक्षी आहे. त्यामुळे त्याला तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या.
‘मोराची चिंचोली’ला जाण्यापूर्वी तुमचं आगाऊ बुकिंग करा. पर्यटकांची संख्या जास्त होत असल्यास आज गावाला येऊ नका असं गावकरी थेट सांगतात.
फोटोसाठी किंवा काही खाऊ घालण्यासाठी मोराच्या पाठीमागे लागू नका.
मोर काही खात असेल तर तिकडे अजिबात फिरकायचं नाही.
पर्यटन केंद्रात फक्त शाकाहारी जेवणच मिळतं. संपूर्ण गावात मद्यपानास बंदी आहे.
याशिवाय मोरांच्या सूक्ष्म हालचाली टिपायच्या असतील तर आणखी काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. इथे जवळजवळ अडीच-तीन हजार मोर आहेत. त्यामुळे सतत त्यांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो. जर आवाजाचा लक्षपूर्वक कानोसा घेतला तर मोर कुठे आहेत ते कळतं. शेतात फिरताना या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतात. मोराबरोबरच मोठ्या संख्येने लांडोरीही पाहायला मिळतात. शेतात एकाच ठिकाणी अनेक लांडोरी पाहायला मिळाल्या की समजायचं मोर जवळपासच आहे. याव्यतिरिक्त एकत्र उडणारे मोर-लांडोर , नाचणारे मोर-लांडोर, पिसं स्वच्छ करणारे मोर, झाडाच्या शेंड्यावर बसलेले मोर, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर, प्रणयक्रीडा करणारे मोर-लांडोर अशा मोरांच्या अनेक दुर्मीळ हालचाली तुम्हांला टिपता येतील. त्यासाठी सकाळी ६.०० ते ८.०० व सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंतची वेळ अगदी मोक्याची आहे. इथे जास्त गोंधळ घालायचा नाही. मोराच्या हालचाली टिपायच्या असतील तर शांतताच हवी, नाहीतर मोर जवळ येणारच नाहीत. मोरांव्यतिरिक्त इथे बया पक्षी, खंड्या, भारद्वाज, कीर्कीडे अगदी सहज दृष्टीस पडतात. तसेच चिंचेच्या झाडांसोबतच डाळींबाच्या बागा व गर्द आमराईही मन मोहून टाकते.म्हणूनच तर म्हणतात ‘मोरांची चिंचोली’ हा एक निसर्गसंपन्न व आगळा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीही तो नक्की घ्या.मोराची चिंचोली आहे कुठे ?
पुणे -अहमदनगर मार्गावरील शिरूरजवळ मोराची चिंचोली आहे.अहमदनगर मार्गाच्या सुरूवातीला डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून आत सुमारे २३ किमी अंतरावर हे गाव आहे. मोराची चिंचोलीपासून अंदाजे २० किमीवर निसर्गाचा आणखी एक आविष्कार आहे. तो म्हणजे रांजणखळगे त्याला निघोज कुंड, मळगंगा कुंड असेदेखील म्हणतात. इथे येणारे पर्यटक आवर्जून रांजणखळगे व रांजणगावच्या महागणपतीचेही दर्शन घेतात. शिवाय शिक्रापूरपासून जवळच संभाजी महाराजांची समाधीही आहे. त्यामुळे एकाच भेटीत ही सगळी पर्यटनस्थळं पाहायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.