Friday, April 30, 2021

कमांडर दिलीप दोंदे - सागर परीक्रमा

 

भारतीय नेव्हीतील कमांडर दिलीप दोंदे (वय ४२ वर्षे) ह्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या सागर परीक्रमाबद्दल एका परीसंवादात ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहीतीचा थोडक्यात सारांश खाली दिला आहे. अधिक माहीती त्यांच्या अनुदिनीवर आहे. ह्या अवघड कामगिरीला पार पाडण्यात त्यांच्या आईने त्यांना सतत प्रोत्साहन दिले व ते त्याबद्दल आईचे आभार मानतात.

५ वर्षांपुर्वी नेव्हीने सर्कमनेव्हीगेशन (सागर परीक्रमा) उपक्रम आखला असल्याची माहीती त्यांना मिळाली व तो उपक्रम ते करण्यास उत्सुक आहेत का, ह्याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. त्यांनी तत्काळ होकार दिला व अशी सफर कशी करतात, त्यातले नियम काय आहेत ह्याबद्दल माहीती आंतर्जालावरुन मिळवयला सुरुवात केली. माउंट एव्हरेस्ट ५००० पेक्षा जास्त लोकांनी चढला आहे तर असे सोलो सर्कमनेव्हीगेशन फक्त १७५ लोकांनी केले आहे. ह्यातही दोन प्रकार आहेत- थांबत आणि न थांबता पुर्ण केलेली. ह्यात दुसऱ्या प्रकारात आणखीनच कमी लोक आहेत. त्यामुळे अशा असामान्य आणि कमी संख्या असलेल्या लोकांच्या समुहात आपलेही नाव असावे असे त्यांना मनापासुन वाटायला लागले.

तांत्रिकदृष्ट्या सागर परीक्रमा म्हणजे नक्की काय हे सर्कमनेव्हीगेशनच्या व्याख्येत वाचायला मिळते. सागर परीक्रम करु शकेल व सागरपरीक्रमेचे नियम पाळू शकेल अशी नौका नेव्हीकडे नव्हती त्यामुळे उपक्रमाची सुरुवात अशी नौका तयार करण्यापासुन सुरवात झाली. ही परीक्रमा एका वाऱ्याच्या शिडाने गती मिळणाऱ्या नौकेनेच करायची असते. इंजिनचा उपयोग फक्त बॅटरीसंच रीचार्ज करण्यासाठीच व बंदरातून समुद्रात जाण्यासाठीच वापरायचा असतो. त्यासाठी त्यांनी अडमिरल आवटी ह्यांच्या मदतीने एक डच डिझाइन निवडले व मांडवी नदीतीरी ह्या नौकेची उभारणी सुरु केली. मांडवी नदीच्या नावावरुनच ह्या नौकेचे नाव त्यांनी म्हादेइ ठेवले.
१५ महीन्यांच्या अथक श्रमांनंतर त्यांनी ही नौका बनवुन घेतली व त्यावर अत्याधुनिक उपकरणे बसवली. ही नौका एका मराठी माणसानीच तयार केली आहे. चाचणी घेण्यासाठी सुरुवातील कोलंबो, नंतर मॉरीशसला जाऊन तेथून येतांना एकटे परत आले. ह्या बद्दलची माहीती त्यांच्या अनुदिनीवरच वाचावी.

सागर परीक्रमा एकुण ५ टप्प्यात आखली गेली. त्यासाठी पृथ्वीगोलाच्या दक्षिण गोलार्धाची निवड करणे सर्कमनेव्हीगेशनच्या नियमांनुसार ठरले. पहील्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाला, मग न्युझीलंड, फॉकलंड, साऊथ आफ्रिका आणि मग मुंबई असे ५ टप्पे ठरले व १८ ऑगस्ट २००९ ला मुंबईहून सुरुवात केली. ह्या प्रत्येक टप्प्यात त्यांना आलेल्या अडचणींची, वादळ, वारे, ९ मीटर ऊंचीच्या लाटांना, ई. तोंड देत त्यांनी एकट्याने जे कौशल्य, शारीरीक आणि मानसिक कणखरपणा दाखवला त्याबद्दल त्यांनी लिहीलेल्या अनुदिनीवर वाचायला मिळते. ही अनुदिनी त्यांनी प्रवासात असतांनाच लिहिली. इंटर्नेट सुविधा व उपग्रहीय फोनसेवेमुळे त्यांना रोज जगाशी संपर्क साधता येत असे.

सोबत नेलेल्या खाण्याच्या पदार्थात त्यांच्या आईने कामगिरी निघण्यापुर्वी अनेक प्रयोग करुन ३ महिने टिकेल असे खाद्यपदार्थ घरी करण्याचा प्रयत्न केला. ह्याबरोबरच त्यांनी हवाबंद डब्यातील अन्नही नेले होते. प्रत्येक टप्प्या्चा शेवट ज्या बंदरावर व्हायचा तेथे नेव्हीतील सहकारी त्यांना भेटून रसद पुरवीत.
प्रवासातील काही काही दिवस खूप तणावपुर्ण असायचे, त्यांना एकमेव भीती असायची की, जर ते चुकून पाण्यात पडले व नौका निघुन गेली तर काय! त्यामुळे ते वादळवाऱ्यात, खवळलेल्या समुद्रातून नौकेवर वावरतांना स्वतःला नौकेला बांधून ठेवून, रांगत जात. ऑटोपायलटमुळे त्यांना नौका चालवण्याशिवायची कामे करता यायची.
ते ज्या-ज्या ठिकाणी गेले त्याठिकाणच्या नेव्हीने त्यांचे आदराने स्वागत केले व माणसाच्या चांगल्या स्वभावाचे जागोजागी दर्शन घडले. त्यांची नौका पहाण्यास अनेक लोक खूप उत्सुकता दाखवत.

मे १८, २०१० रोजी ते मुंबईला परतले. दुर्देवाने ज्यादिवशी ते परतले त्यादिवशी मंगलोरचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले व ही बातमी झाकोळली गेली व अनेक सामान्य माणसांना ह्याबद्द्ल कळलेही नाही.

त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले. अगदी मुद्देसुद व नेमकी उत्तरे देत त्यांनी कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला. शेवटी त्यांना विचारले गेले, "आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळतेच आहे, पण एखादे प्रेरणावाक्य सांगायचेच झाले तर तुम्ही काय सांगाल?", त्यांचे उत्तर- "कार्य सफल करण्यासाठी उठा आणि प्रथम कामाला लागा!" हे होते.

त्यांची अनुदिनी- http://sagarparikrama.blogspot.com/

 

सोलो सर्कमनेव्हीगेशन २०१० मधे बरेच वेळा ऐकण्यात आले. दोंदे यांच्या पाच दिवस आधी १४ मे २०१० ऑस्ट्रेलियन १७ वर्षीय युवती जेसीका वॅटसन हिने २१० दिवसात ही परिक्रमा करुन सोलो सर्कमनेव्हीगेशन करणारी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून विक्रम नोंदवला. याच वर्षी बहुतेक् डच कोर्टाने एका १३ का १४ वर्षीय मुलीला अशी परिक्रमा करायला मनाई केली व १६ वर्षीय ऑस्ट्रेलियन मुलगी ऍबी संदरलँड हिची बोट हिंद महासागरात निकामी झाल्याने तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

कमोडोर दोंदे यांच्या साहसाची व परिश्रमाची दाद द्यावी तितकी थोडीच. अतिशय अवघड असा हा प्रवास!

 

 

 

 

 

 

 

 

 

लाचुंग आणि गंगटोक

लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.
सिक्कीमची लोकसंख्या केवळ ५लाख. (हिंदू ६०+ टक्के बौद्ध ३०+ टक्के). त्यातील उत्तर सिक्कीमचा विरळ वस्तीचा तसाच उंची मुळे दुर्गम. लाचुंग आणि आसपास ही लहानशी गावे. सिक्कीम मधील हिमालय जसा उतरायला लागतो तो मातीचा (दक्षिणेकडे) दिसतो. उत्तर सिक्कीममधील हिमालय बहुतांशी खडकाळ.

सिक्कीम मधील मुख्य ठिकाण म्हणजे कांचनजंगा (३र्‍या क्रमांकाचे) शिखर. सिक्कीम मधे कुठेही उंचावर गेलो तर हे शिखर दिसते. त्याची दैवताप्रमाणे पूजा केली जाते असे स्थानिकांकडून ऐकले. गंगटोक मधून बघितले की या शिखराचा खडकाळपणा ध्यानात येतो. यानंतरची मुख्य गोष्ट म्हणजे तीस्ता नदी. सिक्कीम मधे आपण तीस्ता नदीच्या अंगाने जात प्रवेश करतो. तीच तीस्ता नदी उत्तर सिक्कीम मधे लाचुंग येथे आलेली दिसते. या नदीचे खोरे या भागात अतिशय खोल आहे. ठिकठिकाणी डोंगरातून धबधबे बाहेर येतात. ते इतक्या उंचीवरून (माझा अंदाज १ ते ३ हजार फूट) येतात की बहुतेक ठिकाणी सरकारने मोठमोठे जलविद्युत केंद्रे उभी करायचे ठरवले आहे.

लाचुंग हे आता मोठे पर्यटनस्थळ बनत चालले आहे. त्याला हिमालयातील स्वित्झरलँड म्हटले जाते. युमथँग भागात र्‍होडोडेड्रॉनची मोठी झाडी आहे. त्याला मार्च-मे मधे भरपूर फुले येतात. या बहरासाठी पर्यटके इकडे मोठ्या संख्येने येतात. (आम्हाला अर्थातच ती मिळाली नाहीत.) गंगटोक-लाचुंग हा प्रवास १२० किमि असला तरी जायला ५ तास लागतात. (दुर्गम रस्त्याचे एक चित्र पुढे येईल.) लाचुंग पुढे २४ किमि वर युमथँग. त्यापुढे रस्ता अधिक वर जातो आणि एका झिरो पॉईंट नावाच्या ठिकाणी थांबतो. पर्यटक इथपर्यंत जातात.

लाचुंगमधून पूर्वी तिबेटकडे जायला रस्ते (खेचराचे) होते. लाचुंग हे त्याकाळी एक व्यापारकेँद्र होते. लाचुंग मधून डोँगरातील कंगोर्‍यांपलिकडे (रिजलाईन) चीन असे स्थानिकांनी सांगितले. तिबेटशी असलेले हे नाते आजही टिकून आहे. सतराव्या कर्मापाविषयी सध्या एक वाद आहे. 16 वा कर्मापा दिवंगत झाल्यावर 17व्याचा शोध तिबेटी प्रथेप्रमाणे लहान मुलांमधे घेतला गेला. त्यातील कुठला कर्मापा अधिकृत धरायचा यावर हा वाद आहे. यातील एक दावेदार तरुण तिबेट मधून भारतात आला. हाच खरा कर्मापा असे दलाई लामाने मान्य केले. पण इतर दावेदार आणि चीन बरोबर असलेले संबंध लक्षात घेऊन भारताने त्यास मान्यता दिली नाही. 16व्या कर्मापाच्या अस्थी आणि गादी गंगटोक जवळील एका गोँपात (मोनॅस्ट्री) आहेत. त्या ठिकाणी सतराव्याला प्रवेश द्या असे सांगणारे फलक स्टीकर्स तुरळक ठिकाणी दिसतात. लाचुंग हे प्रामुख्याने बौध्द लोकवस्तीचे ठिकाण वाटले.

उत्तर सिक्कीम हा जसा दुर्गम तसा गरीब. पर्यटक इकडे येतात पण अजूनही पुरेशा संख्येने नाही. शाळा सोडलेली मुले जास्त प्रमाणात दिसतात. गोँपा हा शिक्षणाचा एक मार्ग. अगदी वसतीगृहासारखी लामा मंडळी येथे राहतात. त्या मंडळींचे भलेच होते असे आमच्या वाहनचालकाचे म्हणणे होते. तर लाचुंग मधील हॉटेलमालकाचा एक भाऊ लामा होता. लामांमधे मुली पण असतात त्यांना ऍनी म्हणतात. त्यातील मुलांना कधी कधी लग्न करायला परवानगी असते. मुलींना मात्र नाही. (ही वाहनचालकाचे माहिती.) गंगटोक मधे तिबेटॉलॉजीची एक संस्था आहे. तिकडे खूप संख्येनी पुस्तके आहेत. (भेट देता आले नाही.) उत्तर सिक्कीमची माणसे गरिबी, शिक्षण यामुळे थोडीफार दादागिरी करणारी. रोजगार राखून ठेवणारी. वाहनचालक फक्त उत्तर सिक्कीमचा असावा लागतो हा त्यातील एक अलिखित नियम.

लाचुंग कडे यायला लागल्यावर पहिल्यांदा भिडते ते उंच कपारींच्या डोंगरांचे वैभव. हा दगड कित्येकदा उभा (80-90 च्या कोनात) दिसतो. पाऊस भरपूर. दगड फारसा मजबूत नाही (असे विकीवर म्हटले आहे. मला तो खूप कठीण दगड वाटला.) दगडांच्या कपारीत पाणी साठून राहते. उंची मुळे पाण्याचा दाब वाढत जातो आणि मग डोंगर फुटतो. असे फुटलेले भाग वारंवार लागतात. वर फुटलेले भाग
पाण्याबरोबर घसरत खाली येतात. आणि अशा खडकांची नदी झाल्यासारखी दिसते. फुटलेला खडक पांढर्‍या रंगाचा. अगदी नर्मदेतल्या गोट्यांसारखा दिसतो. डोंगरातला खडक मात्र काळा. (वातावरणामुळे झालेला.) कधी कधी नदीतील खडकावर सोनेरी रंगाची पुटे (गंधक सदृश्य) दिसतात. याच भागात छोटेसे गरम पाण्याचे झरे आहेत.

फोटोमधून वरील पैकी काही.

गंगटोकमधून दिसणारे कांचनजंगा शिखर.

kanchanjenga2

लाचुंग गाव आणि तीस्ता नदी.

lachung valley

लाचुंगला जातानाचा रस्ता. खडक अगदी कॅनॉपीसारखा रस्त्यावर आला आहे.

lachung road below rock

युमथँग मधील एक भाग.

lachung 1

लाचुंगमधील गुराखी मुले.

lachung gurakhi

तीस्तातील काही दगड.

lachung stones

लाचुंगची फुले

flowers 5

lachung tree

मंत्र लिहिलेले झेंडे. (लाचुंग)

lachung flags

दगडफुटीचे एक दृष्य. दगड डोँगरामागून वाहत आले आहेत. तेच दगड मग रस्त्यावर आले आहेत.

lachung dagadfooti

lachung road dagadfooti

अधिक प्रकाशचित्रांसाठी इथे पहा

Comments

मस्त

छान फोटो आणि वर्णन.
दगडांच्या नदीत चुनखडक असावेत काय? (फेल्डस्पार अणुकुचीदार असतात असे वाटते. की आणखी काही वेगळे पांढरे दगड?)

झकास

छायाचित्र १ आणि २ ...अशक्य प्रकार आहे...आभारी आहे. माहितीही उत्तम. :)

+१

असेच म्हणतो !

गांतोक

तुमचा लेख मस्त आहे.

छायाचित्रे तर फारच मोहक आहेत. मी तिकडे पोस्टींगला असताना, नॉर्थ सिक्किमचे - वन्य प्राणी व फुलांची छायाचित्रे माझ्याकडे आहेत. आपणाला कधीतरी पाठवीन.

मला सगळ्यात भावलेल्या दोन गोष्टी -

१. प्रत्यक घरातुन छान छोट्या कुंड्यांतून फुले लावुन घर सजवलेले असते.
२. स्वच्छता व टापटीप.

तिथली लोकं गंगटुक ला गांतोक असे म्हणतात (जाता जाता)

सिक्कीमला पोस्टींग

मी राहतो त्या कॉलनीतील एक जण सिक्कीमला पोस्टींगला होते. ते ही तेथील रंजक कथा सांगुन आम्हाला जळवायचे.
प्रमोदजींनी विदर्भानंतर एकदम सिक्कीमच्या द-या-खो-यातून भटकंती चालू केली आहे. पुढील भटकंतीस शुभेच्छा.

Saturday, April 24, 2021

जपान

 http://mr.upakram.org/node/3419

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत.

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव :)

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. o:)

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

 तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत.

१. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत.
२. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत.
३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही.
४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि
५. ह्योरूजी कलादालन - नारा मधिल ह्योरूजी मंदिर येथील कलावस्तू.

नेहमीप्रमाणे आम्ही २ तासात संपवू म्हणून गेलो आणि मुख्य इमारतीनेच घाम फोडला. अर्थात ते आपल्या रसकतेवर अवलंबून आहे :) . या मुख्य इमारतीतल्याच काही वस्तू...

१. तोक्यो राष्ट्रीय संग्रहालयाची मुख्य इमारत.
image 1

२. जपानमधे सुद्धा चहाला फार महत्व आहे. पण इकडे दुधाच्या चहापेक्षा ग्रीन-टी फार पितात. इथे "चहाच्या समारंभाची कला" या विशयावर स्वतंत्र दालन आहे. हे तिथे दिलेले वर्णन,

चहा समारंभाचा मुरोमाची काळात (इ.स. १३९२ - इ.स. १५७३) उदय झाला आणि याला अझूची-मोमोयामा काळात (इ.स. १५७३ - इ.स. १६०३) टी मास्टर सेन-नो-रिक्यू यांच्याकडून औपचारिक स्वरूप प्राप्त झाले. ही जपानमधील एक प्रख्यात परंपरा आहे. टी रूम (चहाच्या खोली) मधे कलेच्या वस्तू आणि भांडी जसे की, शोभेच्या गुंडाळ्या, शोभेची पात्रे, चहाचा डबा, चहादाणी आणि इतर भांडी उदारतेने जमा केलेली असत. या भांड्यांमधे कधी कधी चीन आणि कोरिया मधून आयात केलेल्या भांड्यांचा देखील समावेश असतो आणि हि भांडी पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. काळजीपूर्वक निवडलेली आणि जमवलेली हि भांडी पाहुण्यांसाठी काढली जातात. हे दालन चहा संस्कृतीने रोवलेल्या कलात्मकतेसाठी समर्पित आहे

चहापूड आणि तत्सम ठेवायच्या छोट्या बरण्या (एदो काळ सतरावे शतक)
image 1

३. चहाच्या बरण्या आणि चहादाणी (एदो काळ)
image 1

४. मोठा जार - चेरीब्लॉसम नक्षीचा वाडगा - ड्रगन आणि फिनीक्स च्या नक्षीचा वाडगा - आणखीन एक मोठा जार (एदो काळ सतरावे शतक)
image 1

५.मोठी डिश - चेरीब्लॉसम स्त्रीची नक्षी (एदो काळ अठरावे शतक)
image 1

६. रंगीतदार भांड्यांवर सोनोरी नक्षीची कला जपानी लोक चीनी लोकांकडून शिकले. पण यात ते इतके पुढे निघून गेले की युरोपमधे जपानचीच भांडी जास्त पसंत केली जाउ लागली.
(एदो काळ अठरावे शतक)
image 1

७. दंतकथेतल्या राक्षसांच्या नक्षीचा आरसा (कोफून काळ चौथे शतक)
image 1

८. जपान मधे इ.स १२०० पासून जवळ जवळ ७०० वर्षे राजकीय शक्ती लढवय्ये समुराई लोकांच्या हातात होती. ह्या लोकांचे विशीष्ट पोषाख असत.
image 1

९. आणखीन एक
image

१०. हा पुतळा एका लढवैय्याची सोपी शैली दाखवतो. बहुधा मिनामोतो योरीतोमो चा पुतळा
image

११. कलादालन
image

या कलादालनात चित्रे, कलाकुसरीचे कपडे आणि हस्तकलेच्या वस्तू मांडल्या आहेत.
१२. कलाकुसरीचे कपडे (ती बाई, अय्या किती छान, असं जपाणी भाषेत म्हणाली सुद्धा :) )
image

१३. वर दोन्ही कोपर्‍यात दिसणारे कुत्र्याच्या आकारच्या पेट्या - मध्यभागी हिना बाहुल्या - आणि हिनाच्या वस्तू (एदो काळ एकोणिसावे शतक)
image

१४. हिना....
image

१५. हिना बाहुली आणि तिचा राजवाडा (मेजी काळ एकोणिसावे शतक)
image

१६. खोगीर आणि रिकीब
image

१७. श्वान जन्माला येताना लवकर जन्म घेतात त्यामुळे श्वानाच्या आकाराचे डबे बाळंतपणाच्या वेळी पलंगाच्या बाजूला ठेवले जायचे. एदो काळापासून ते हिना बाहुल्यांच्या बरोबर सुद्धा ठेवले जाउ लागले आणि त्यांच्यामुळे मुलिंना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाउ लागले. जपानी भाषेत यांना ओतोगिइनू आणि तोनोइइनू म्हणतात.
बाजुला दिसतायत त्या छोट्या उशा
image

१८. जपानची चित्रकला
image

१९. ही दोनही चित्रे एकाच चित्राच भाग आहेत
image

२०. आणि आता आपल्या सर्वांनाच परिचयाचे असणारे ह्सुअ‍ॅन त्सँग. विकी म्हणते यांचा काळ ६०२ ते ६६४ होता. हे चित्र कामाकुरा काळात १४व्या शतकात रेशमी कपड्यावर काढलेले आहे.
image

 

सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

 जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.

हनामी च्या काळात जपानी लोक सकाळीच अशा ठिकाणी खाण्यापिण्याचे सामान घेऊन एकत्र जमतात (चटया टाकून जागा पण पकडतात :) ) आणि दिवसभर हि झाडे पहात खाणे-पिणे गप्पा चालू असतात. फार आधिच्या काळी फक्त उच्च वर्गाला याची परवानगी होती परंतु नंतर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याची परवानगी मिळाली.
सध्या जपान मधे याचा काळ चालू आहे जो आणखिन काही दिवस चालेल. २-४ दिवस पाऊस असून सुद्धा आम्ही हनामी साठी युएनो उद्यानात जाण्याचे ठरवले जी यासाठी बरीच प्रसिद्ध जागा आहे. युएनो हा टोक्यो मधला फार जुना व मोठा भाग आहे जिथे सध्या उद्यान, प्रचंड प्राणिसंग्रहालय आणि टोक्यो राष्ट्रीय संग्रहालय आहे. तर आम्ही युएनो मेट्रो स्टेशन वर पोहोचून बाहेर आलो. युएनो उद्यान स्टेशनच्या समोरच होते परंतु आज नेहमीपेक्षा फारच जास्त गर्दि होती सकुरा पाहण्यासाठी.

१. युएनो स्टेशनच्या बाहेर सकुरा साठी झालेली गर्दि
station

२. इकडे एक जुनी शिंटो श्राईन पण आहे
shrine

३. श्राईन चा मागचा भाग
shrine

४. श्राईन बाहेरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने वाजवायची घंटा
shrine

५. हनामी साठी जमलेले जपानी लोक
japani people

६. फिकट गुलाबी रंगाचे चेरी ब्लॉसम
cherry

७. चेरी ब्लॉसम
blossom

८. जपानमधे दारू पिण्यावर फार बंधन नसल्यामुळे पेताड्यांची सुद्धा गर्दि असते
petade

९. चेरी ब्लॉसम
cherry

१०. पांढरी फुले :)
white flower

११. सकुरा डोरी अर्थात सकुरा चा रस्ता
sakura dori

१२. असाच एक काढलेला फोटो
another one

१३. असाच काढलेला आणखिन एक फोटो :)
another one

 

 

 

 

 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...