Saturday, April 24, 2021

जपान

 http://mr.upakram.org/node/3419

हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळाली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत - मित्रपरीवारासोबत जिवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

वसंत ऋतुच्या आगमानाची सुरुवात साकुराच्या बहराने होते. हा बहर एक आठवडा टिकतो अणि मग साकुराची फुले गळून पडतात, जपान मधल्या साकुराच्या झाडांना चेरीची फळॆ येत नाहीत.

जपानी ललनांचे गाल साकुराच्या फुलांप्रमाणे गुलाबी कि साकुराच्या फुलांचा रंग जपानी ललनांच्या गालाप्रमाणे गुलाबी हे मला एक न उलगडलेले कोडे :~

साकुराचा बहर

हानामीचे वेध एक आठवड्यापसून लागतात, ऑफिच्या साकुरा लंचच्या पार्ट्या ठरून सामुदाइक साकुरा लंच साकुराच्या झाडाखाली ठरवून केला जातो.

साकुराच्या पार्क मधे पार्ट्या आयोजीत केल्या जातात. साकुरा आणि साके (お酒、जापनीज वारुणी, तीला दारू म्हणणे हे पाप समजले जाते जपानमधे) हे एक अतूट नाते आहे. साकेच्या बाटल्यांवर बाटल्या रिचवून, गाणि म्हणत, चकट्या पिटत सर्व जपानी जनता जीवाचा साकुरा करीत असतात.

हा जपानी सदगृहस्थ साकेदेवतेला शरण जाउन, डोळयात साकुरा साठवून, बायकोच्या मांडीवर डोके ठेउन स्वर्गिय सुखात रममाण होउन गेला आहे. हीच खरी साकुरा भोगल्याची पावती आहे.
धन्य तो साकुरा, धन्य ती साके आणि धन्य तो धन्याता पावलेला जपानी. मला तर लइच हेवा वाटून राहिलाय राव :)

बहरलेल्या साकुराचे विहंगम दृष्य

माझ्या नशिबाने जपानला रहाण्याच योग येउन (आइ.टी. झिन्दाबाद) हानामी याचि देही याचि डोळा पहण्याचे भाग्य लाभले. जपानी लोक़ांच्या समवेत त्यांच्या अंतर्गत गोटात जाउन हानामी अक्षरश: भोगली, साकेच्या पवित्र डोहात डुंबुन :-p
स्वर्ग जर असेल तर तो नेमका असाच असेल. o:)

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

 तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत.

१. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत.
२. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत.
३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही.
४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि
५. ह्योरूजी कलादालन - नारा मधिल ह्योरूजी मंदिर येथील कलावस्तू.

नेहमीप्रमाणे आम्ही २ तासात संपवू म्हणून गेलो आणि मुख्य इमारतीनेच घाम फोडला. अर्थात ते आपल्या रसकतेवर अवलंबून आहे :) . या मुख्य इमारतीतल्याच काही वस्तू...

१. तोक्यो राष्ट्रीय संग्रहालयाची मुख्य इमारत.
image 1

२. जपानमधे सुद्धा चहाला फार महत्व आहे. पण इकडे दुधाच्या चहापेक्षा ग्रीन-टी फार पितात. इथे "चहाच्या समारंभाची कला" या विशयावर स्वतंत्र दालन आहे. हे तिथे दिलेले वर्णन,

चहा समारंभाचा मुरोमाची काळात (इ.स. १३९२ - इ.स. १५७३) उदय झाला आणि याला अझूची-मोमोयामा काळात (इ.स. १५७३ - इ.स. १६०३) टी मास्टर सेन-नो-रिक्यू यांच्याकडून औपचारिक स्वरूप प्राप्त झाले. ही जपानमधील एक प्रख्यात परंपरा आहे. टी रूम (चहाच्या खोली) मधे कलेच्या वस्तू आणि भांडी जसे की, शोभेच्या गुंडाळ्या, शोभेची पात्रे, चहाचा डबा, चहादाणी आणि इतर भांडी उदारतेने जमा केलेली असत. या भांड्यांमधे कधी कधी चीन आणि कोरिया मधून आयात केलेल्या भांड्यांचा देखील समावेश असतो आणि हि भांडी पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. काळजीपूर्वक निवडलेली आणि जमवलेली हि भांडी पाहुण्यांसाठी काढली जातात. हे दालन चहा संस्कृतीने रोवलेल्या कलात्मकतेसाठी समर्पित आहे

चहापूड आणि तत्सम ठेवायच्या छोट्या बरण्या (एदो काळ सतरावे शतक)
image 1

३. चहाच्या बरण्या आणि चहादाणी (एदो काळ)
image 1

४. मोठा जार - चेरीब्लॉसम नक्षीचा वाडगा - ड्रगन आणि फिनीक्स च्या नक्षीचा वाडगा - आणखीन एक मोठा जार (एदो काळ सतरावे शतक)
image 1

५.मोठी डिश - चेरीब्लॉसम स्त्रीची नक्षी (एदो काळ अठरावे शतक)
image 1

६. रंगीतदार भांड्यांवर सोनोरी नक्षीची कला जपानी लोक चीनी लोकांकडून शिकले. पण यात ते इतके पुढे निघून गेले की युरोपमधे जपानचीच भांडी जास्त पसंत केली जाउ लागली.
(एदो काळ अठरावे शतक)
image 1

७. दंतकथेतल्या राक्षसांच्या नक्षीचा आरसा (कोफून काळ चौथे शतक)
image 1

८. जपान मधे इ.स १२०० पासून जवळ जवळ ७०० वर्षे राजकीय शक्ती लढवय्ये समुराई लोकांच्या हातात होती. ह्या लोकांचे विशीष्ट पोषाख असत.
image 1

९. आणखीन एक
image

१०. हा पुतळा एका लढवैय्याची सोपी शैली दाखवतो. बहुधा मिनामोतो योरीतोमो चा पुतळा
image

११. कलादालन
image

या कलादालनात चित्रे, कलाकुसरीचे कपडे आणि हस्तकलेच्या वस्तू मांडल्या आहेत.
१२. कलाकुसरीचे कपडे (ती बाई, अय्या किती छान, असं जपाणी भाषेत म्हणाली सुद्धा :) )
image

१३. वर दोन्ही कोपर्‍यात दिसणारे कुत्र्याच्या आकारच्या पेट्या - मध्यभागी हिना बाहुल्या - आणि हिनाच्या वस्तू (एदो काळ एकोणिसावे शतक)
image

१४. हिना....
image

१५. हिना बाहुली आणि तिचा राजवाडा (मेजी काळ एकोणिसावे शतक)
image

१६. खोगीर आणि रिकीब
image

१७. श्वान जन्माला येताना लवकर जन्म घेतात त्यामुळे श्वानाच्या आकाराचे डबे बाळंतपणाच्या वेळी पलंगाच्या बाजूला ठेवले जायचे. एदो काळापासून ते हिना बाहुल्यांच्या बरोबर सुद्धा ठेवले जाउ लागले आणि त्यांच्यामुळे मुलिंना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाउ लागले. जपानी भाषेत यांना ओतोगिइनू आणि तोनोइइनू म्हणतात.
बाजुला दिसतायत त्या छोट्या उशा
image

१८. जपानची चित्रकला
image

१९. ही दोनही चित्रे एकाच चित्राच भाग आहेत
image

२०. आणि आता आपल्या सर्वांनाच परिचयाचे असणारे ह्सुअ‍ॅन त्सँग. विकी म्हणते यांचा काळ ६०२ ते ६६४ होता. हे चित्र कामाकुरा काळात १४व्या शतकात रेशमी कपड्यावर काढलेले आहे.
image

 

सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

 जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.

हनामी च्या काळात जपानी लोक सकाळीच अशा ठिकाणी खाण्यापिण्याचे सामान घेऊन एकत्र जमतात (चटया टाकून जागा पण पकडतात :) ) आणि दिवसभर हि झाडे पहात खाणे-पिणे गप्पा चालू असतात. फार आधिच्या काळी फक्त उच्च वर्गाला याची परवानगी होती परंतु नंतर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याची परवानगी मिळाली.
सध्या जपान मधे याचा काळ चालू आहे जो आणखिन काही दिवस चालेल. २-४ दिवस पाऊस असून सुद्धा आम्ही हनामी साठी युएनो उद्यानात जाण्याचे ठरवले जी यासाठी बरीच प्रसिद्ध जागा आहे. युएनो हा टोक्यो मधला फार जुना व मोठा भाग आहे जिथे सध्या उद्यान, प्रचंड प्राणिसंग्रहालय आणि टोक्यो राष्ट्रीय संग्रहालय आहे. तर आम्ही युएनो मेट्रो स्टेशन वर पोहोचून बाहेर आलो. युएनो उद्यान स्टेशनच्या समोरच होते परंतु आज नेहमीपेक्षा फारच जास्त गर्दि होती सकुरा पाहण्यासाठी.

१. युएनो स्टेशनच्या बाहेर सकुरा साठी झालेली गर्दि
station

२. इकडे एक जुनी शिंटो श्राईन पण आहे
shrine

३. श्राईन चा मागचा भाग
shrine

४. श्राईन बाहेरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने वाजवायची घंटा
shrine

५. हनामी साठी जमलेले जपानी लोक
japani people

६. फिकट गुलाबी रंगाचे चेरी ब्लॉसम
cherry

७. चेरी ब्लॉसम
blossom

८. जपानमधे दारू पिण्यावर फार बंधन नसल्यामुळे पेताड्यांची सुद्धा गर्दि असते
petade

९. चेरी ब्लॉसम
cherry

१०. पांढरी फुले :)
white flower

११. सकुरा डोरी अर्थात सकुरा चा रस्ता
sakura dori

१२. असाच एक काढलेला फोटो
another one

१३. असाच काढलेला आणखिन एक फोटो :)
another one

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...