Wednesday, March 22, 2023

विदर्भाचे पर्यटन ( भाग ४)

 https://www.facebook.com/VidarbhaDarshan





रातन बारव आणि शिव मंदिर, गोजी, वर्धा

वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात असलेल्या गोजी येथे ही पुरातन बारव व मालखोदी शिव मंदिर आहे. ठिकाणाबाबत विश्वासार्ह माहिती स्थानिकांकडून मिळाली नाही.












पुर्वी येथे धन वगैरे पुरवून ठेवले असल्याची मान्यता लोकांमध्ये होती व ते मिळवण्यासाठी काही जणांनी खोदकाम केले त्यावरून बोलीभाषेत या ठिकाणाचे मालखोदी नाव पडले.
फोटोत ज्या मुर्त्या आहेत त्या मंदिराच्या आसपासच्या भागात जमिनीत सापडलेल्या आहेत. विशेष उत्खनन वगैरे झालेले नाही.

(फोटो आणि माहिती - Anant Irkhede)










पुरातन शिव मंदिर, रुई (वाई), यवतमाळ










पुरातन गढी/किल्ला, खापा, नागपूर

हा video मधे येथील माहिती देण्यात आली आहे






पुरातन पायविहीर, खटेश्वर, यवतमाळ
यवतमाळ पासून १७ कि. मी. अंतरावर खटेश्वर नावाचे छोटेसे गाव आहे. गावाचे हे नाव खटेश्वर महारांजाच्या नावावरुन पडले आहे. हे गाव जोडमोहपासून दोन-तीन कि. अंतरावर आहे.
फोटो मध्ये जी बारव दिसत आहे ती जोडमोह व खटेश्वरच्या मध्ये असलेल्या शेतात रस्त्याला लागून आहे.
१९०२-१९२५ या दरम्यान खटेश्वर महाराजांनी बांधलेली असावी असा स्थानिक लोकांशी संवाद साधल्यावर लक्षात येते. अतिशय अरूंद अश्या उतरत्या दगडी पायऱ्या आहेत. दुर्लक्षित असल्यामुळे पडजड झाली आहे.
(फोटो आणि माहिती - Vaishali Hire)












दिगंबर जैन मंदिर, मुक्तागिरी, मध्यप्रदेश
मुक्तागिरी हे जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण विदर्भ आणि मध्ये प्रदेश च्या सिमेवर असून अमरावती पासून हे ६५ कि.मी. दूर आहे. चिखलदर्यापासून जवळच हिरव्यागार सातपुडा डोंगर रांगांच्या कुशीत ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या 'अतिशय महत्वाच्या क्षेत्रांपैकी' हे एक आहे.
एकदा अवश्य भेट द्या !












कार्तिक स्वामी मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूरच्या बिलानपुऱ्यात श्री कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. त्या मंदिराची रचना ही जरी अर्वाचीन काळातील असली तरी तेथील मूर्ती मात्र यादवकालीन आहे. कार्तिकेयाची ती मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत असा नमुना आहे. शिव-पार्वती पुत्र कार्तिकेयाचा जन्म स्कंदपुराणानुसार तारकासुराचा वध करण्यासाठी झाला. तो देवांचा सेनापती अनेक शस्त्रांनी सिद्ध असतो. मूर्तिशास्त्रानुसार कार्तिकेय मूर्ती सहा मुखे (म्हणून त्यास षडानन असेही म्हणतात) व बारा हात अशा स्वरूपात असते. कार्तिकेयाचे वाहन मयूर आहे. अचलपूरची कार्तिकेयाची मूर्तीदेखील सहा मुखांची असून, तिची दर्शनी तीनच मुखे व सहा भुजा दिसतात. कार्तिकेय मयूर वाहनावर आरूढ आहे. यानक अवस्थेतील ती मूर्ती चार ते साडेचार फूट आहे. प्रदक्षिणा क्रमाने उजवीकडील हातांमध्ये अक्षमाला, गदा, अंकुश तर डावीकडे पाश, कमंडलू, धनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत. मूर्ती सालंकृत असून तिन्ही शीर्षांवर मुकुट आहेत. कानांत कुंडले, गळ्यात हार, दंडात केयूर, अंगद, कटी सूत्रे, स्कंधमाला, कटकवलय, पादवलय अशा सर्व अलंकारांनी अलंकृत आहे. मूर्तीच्या महिरपीवरसुद्धा कोरीव काम केलेले आहे. महिरपी वर वरील भागात शिवमूर्ती कोरलेली आहे. शिवमूर्तीच्या हातामध्ये बीजपूरक, त्रिशूळ असून ते वरदहस्त असे शिल्प आहे. कार्तिकेयाचे वाहन मोर हा सुद्धा शिल्पीने कोरीव कामाने देखणा केलेला आहे. अचलपूर नगरीत अशा बऱ्याच मूर्ती आहेत. काही भग्न स्वरूपात तर काही चांगल्या स्थितीत.
(माहिती - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)
(Photo - Pravin Tayde, Pramod Jawale, Mandir Kosh)


पार्वती मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूर येथील वतनदार देशपांडे यांच्या वाड्यात पार्वती देवीचे मंदिर आहे. तेथे पार्वती गौरी रूपात आहे. मंदिर देशपांडे यांची खाजगी मालमत्ता असली तरीही अचलपूर येथील स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. मूर्ती शास्त्रानुसार देवीच्या शिल्पाला पार्वती गौरी असे म्हणतात. मूर्ती तीन-साडेतीन फूट असावी. ती कोरीव नक्षीकाम केलेली देखणी अशी आहे. गौरी रूपातील पार्वती चतुर्भुज आहे. ती प्रदक्षिणा क्रमाने स्थानक अवस्थेत समपाद चरणात उभी आहे. मूर्तीच्या दोन उजव्या हातांपैकी एका खालील हातात अक्षमाला आहे तर दुसऱ्या वरच्या हातात दांडी धरलेल्या गोल फलकात शिवपिंड आहे. डाव्या खालील हातात कमंडलू धरलेला आहे तर वरील हातात दांडीवरील गोल फलकात गणपती प्रतिमा आहे. पार्वती गौरीला जटा मुकुट आहे. ती संपूर्ण अलंकृत आहे. तिच्या गळ्यात फलक हार, एकावली, वैकक्षक माला तर दंडात अंगद, केयुर व मनगटावर बांगड्या आहेत. तसेच, कमरेवर मेखला, पायात पादवलय, नुपूर, जोडवी असे सर्व अलंकार सजलेले आहेत. कमनीय बांधा असलेली पार्वती त्यामुळे अधिकच खुलून दिसते. मूर्तीच्या पायाशी इतर दासीगण व नंदी कोरलेले आहेत. संपूर्ण शिल्पपटात महिरप कोरलेली आहे. त्यामुळे त्या मूर्तीची उत्कृष्ट व दुर्मीळ शिल्पाचा नमुना म्हणून गणना होते.
(माहिती आणि फोटो - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)





विदर्भ स्पेशल, नागपूरी खमंग गोळा भात कढी...
विदर्भाची खाद्यसंस्कृती समृध्द आहे. ही खाद्यसंस्कृती विदर्भातील माणसांसारखी साधी, सरळ, सोपी आहे.
विशेष म्हणजे खर्चिक नाही‌. फक्त पोट भरून तृप्तीचा ढेकर देता यावा, हीच खाद्यसंस्कृतीची विशेषता

















पुरातन पायविहिर, शेलगाव बाजार, मोताळा, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात शेलगाव बाजार येथे ही अद्भुत प्राचीन बारव आहे. काळ्या पाषाणातील भव्य बांधकाम थक्क करणारे आहे. शेळगाव बाजार येथे गावापासून अर्धा किमी अंतरावर अमित खर्चे यांच्या शेतात ही पायविहिर आहे. विहिरीची साफसफाई केल्यास ही विहिर एक पर्यटन स्थळ बनू शकेल.



























































कालंका माता मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
टंकावती नगरी बार्शीटाकळी. विदर्भातील प्राचीन शहरांपैकी एक असा बार्शीटाकळी शहराचा उल्लेख करावा लागेल. इसवी सन चौथ्या शतकातील सातवाहन काळापासून येथे मानवी वस्ती होती. त्या काळी या शहराला विशेष महत्व होते व येथे बाजारपेठ होती. संपूर्ण शहरात गल्लोगल्लीत प्राचीन काळातील बांधकामाचे अवशेष सापडतात. गावात एक किल्लाही होता. येथे भुयारांची श्रृंखलाच आहे. अनेक ठिकाणी भुयार आहेत. त्यामुळे याला भुयारी शहर म्हणूनही संबोधल्या जाते. शहरात भरपूर तळघरे आहेत. प्रत्येक गल्लीत दोन ते तीन तळघरं असल्याचे आजही दिसतात. बार्शी टाकळी येथे पूर्वी बारा वेशी होत्या व या गावाचे पूर्वीचे नाव टंकावती होते. टंकावतीचा अपभ्रंश होवून टाकळी असे झाले तर बारा वेशी असल्यामुळे बारशी. त्यामुळे गावाचे नाव बार्शी टाकळी पडले. या ठिकाणी पूर्वी सातवाहनांची एक शाखा होती. येथील कालंका देवीच्या मंदिरात असलेल्या शिलालेखात भिल्लम, टेकल्ली असा उल्लेख आहे. भिल्लम हा सातवाहनांचा एक राजा होता. येथे मुस्लीम, हिंदू, जैन धर्मियांचे मंदिरे व मशिदी आहेत. यावरून या ठिकाणी सर्वधर्मिय लोक नांदत होते, असे निदर्शनास येते.
प्राचीन मुर्तीकलेचा अद्भुत नमुना, कालिंका देवी मंदिर :
शहरात कालंका मातेचे एक प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम व त्यावर चहुबाजूने कोरलेल्या मुर्ती व विविध शिल्प अप्रतिम आहेत. प्राचीन बांधकाम शैलीचा एक अद्भुत नमुना असलेले हे मंदिर पर्यटक व अभ्यासकांसाठी पर्वणीच आहे. मात्र या मंदिराला मुघलांच्या आक्रमणालाही सामोरं जावं लागलं. त्यामुळेच मंदिराची पडझड झालेली आहे. मार्कंडा व खजुराहो येथे असलेल्या मंदिराप्रमाणेच यावर मुर्ती कामुक शिल्प कोरलेले आहेत. अशाचप्रकारचे एक मंदिर लोणार येथे असून, ते दैत्यसूदन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
या मंदिराचे बांधकाम बाराव्या किंवा तेराव्या शतकात झाले असावे. मंदिर वेगळया धाटणीचे आहे. मंदिरावर कळस नाही. मंदिराच्या बाहय भिंतीवर चारही बाजुने मुर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या आतमध्ये चार खांब असून, त्यावर चारही बाजुने मूर्ती आहेत. खांबावर यक्षराजाच्या मुर्त्या आहेत. हे यक्ष मंदिराचा भार आपल्या खांद्यावर घेतात. खांबावर व मंदिराच्या आतील भागात विविध शिल्प कोरल्या आहेत. तसेच मंदिराचे बांधकाम हे नागवंशीय कारागीरांनी केले असल्यामुळे ठिकठिकाणी नागाच्या आकृती व शिल्प आहेत.
कालंका देवी येथे नेमकी कशी प्रतिष्ठापीत झाली याची ठोस आख्यायिका माहित नसली तरी सध्या मंदिरात शेंदूर लावलेले दोन उभे दगड असून, त्यांना मुकूट लावून देवीच्या रूपात सजविण्यात आले आहे. यावरुन ते अलीकडच्या काळातील असल्याचे स्पष्ट जाणवते. मुर्तीवर सुर्यप्रकाश येण्यासाठी दोन छिद्रे आहेत. पहाटे या छिद्रातून मुर्तीवर प्रकाश पडतो. या मंदिराची सध्या दुरावस्था होत आहे. भिंतीच्या दगडांची झिज होत असून, त्यावरील मुर्ती / मुर्त्या नामशेष होत आहेत. या मंदिराला भवानीचे देउळ म्हणूनही संबोधतात.
या मंदिरा बाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते हे विष्णू मंदिर आहे तर काहींच्या मते हे शिव मंदिर आहे. कारण येथे असलेली भवानी मातेची मुर्ती ही मूळ मुर्ती नाही. येथील मूळ मुर्ती हटविण्यात आली असावी किंवा इतरत्र हलविण्यात आली असावी.
आधी या मंदिरात शंकराची मूर्ती होती असे दाखले इतिहासात सापडतात. मुघलांच्या आक्रमणानंतर इथली शंकराची मूर्ती खंडित झाली. त्यामुळेच येथे भवानी मातेची मुर्ती स्थापीत करण्यात आली. आजही मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व समोर नंदी आहे त्यामुळे हे शिवालय असावे असे काहींचे मत आहे.
तर मंदिरातील स्तंभावर असलेल्या वैष्णव शिल्पांवरुन हे विष्णू मंदिर असावे असे काहींचे मत आहे. या मंदिरात पूर्वी कल्कीची मूर्ती होती. ती मूर्ती 1904 साली इंग्रज अधिका-यांनी दिल्लीला नेली असल्याचे काही नागरिक सांगतात. कल्की हा विष्णूचा दहावा अवतार ज्याचे अवतरण अजून बाकी आहे. कल्की-कलकी-कलिका-कालिंका असा अपभ्रंश होवून हे कालंका मंदिर ओळखले जात असावे.
मंदिरातील शिलालेख:
यामध्ये एक शिलालेख आहे. यावर भिल्लम, हेमाद्रि, मालुगी वगैरे यादव वंशीय राजाची नावे असून, टेकल्ली राजधानी असा उल्लेख आहे. सदरहू शिलालेख शके 1098 इ.स. 1106 मधील आहे. यादव वंशाच्या दुस-या एखाद्या शाखेने टाकळीस राजधानी केले असावे व येथे स्वतंत्र राज्य असावे असा अंदाज इतिहासकार या. मा. काळे यांनी व-हाडचा इतिहास या ग्रंथात वर्तविला आहे.
(Photo - Namita Prashant, Sachin Patil, Sandeep Sarde)
संदर्भ - एबीपी माझा, विवेक चांदूरकर 





लोणार सरोवर, बुलढाणा













 महादागड किल्ला, सातनवरी, नागपूर
नागपूर हे घनदाट जंगली जंगलेंनी वेढलेले आहे आणि येथे काही मोजणी नसलेली प्राचीन स्मारके दडलेली आहेत. सरकार आणि सर्वसामान्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटन उद्योगातील केवळ एका क्षेत्राने येथे पर्यटकांना आकर्षित केले आणि ते म्हणजे टायगर सफारी. आपल्या कम्फर्टेबल झोनमधून बाहेर पडा व पुढे जा आणि या प्रदेशात अशी अनेक मनोरंजक जागा शोधून तुम्ही थक्क व्हाल. अशीच एक मनोरंजक जागा म्हणजे महादागड किल्ला.
महादागड नागपूरपासून 34 कि.मी. अंतरावर आहे. सातनवरी गावात जाण्यासाठी नागपूर - अमरावती महामार्गावरुन सुमारे 30 कि.मी. अंतरावर प्रवास करावा लागतो. सतनावरी येथून खैरी गावाला जाण्यासाठी दीड किमीचा प्रवास करा. येथून ऑफ-रोड सुरू होते. जर आपण दुचाकीवरून किंवा एसयूव्हीद्वारे प्रवास करत असाल तरच आपले वाहन पुढे घ्या अन्यथा येथून पुढे ट्रेकिंग सुरू होते. खारी खेड्यातून एखादा स्थानिक सहकारी आपल्या मार्गदर्शक म्हणून घ्या, यामुळे आपला वेळ शोधण्याऐवजी दिशानिर्देश विचारण्यासाठी क्रॉस रोडवर वाया घालविण्यापासून वाचवेल. जाड बांबूची लागवड आणि इतर मिश्रित वनस्पती प्रजातींचा हा एक विलक्षण ट्रेक आहे. या जाड झाडाझुडपांमधून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जास्तीत जास्त साहसी लोक आपले वाहन चालवू शकतात.
पायथ्याशी तुम्हाला उजवीकडे आणि दगडी भिंतीच्या साखळीवर गणपतीची जुनी मूर्ती दिसेल, जेव्हा आपण वर चढता तेव्हा हळूहळू उंची वाढत जाईल. सामान्य व्यक्तीसाठी ही 20 मिनिटांची चढाई आहे. वाटेत काही मोजके डावे डावे वगळता तुम्हाला अशी कोणतीही पावले आढळणार नाहीत. शीर्षस्थानी पोहोचल्यावर आसपासच्या वन्य जंगलाचे सुंदर विहंगम दृश्य प्राप्त होते. हा किल्ला अत्यंत मोडकळीस पडलेला आहे. मोठमोठ्या बेड्या घातलेल्या दगडांनी तो गमावला आहे. जेव्हा कोणी या ठिकाणी ‘किल्ला पहायला’ जाताना प्रवास करतो तेव्हा किल्ल्याची दयनीय स्थिती पाहून मन निराश होते, परंतु या उंचीवरून आजूबाजूच्या निसर्गाचे सौंदर्य आपल्या निराशेची भरपाई करते.
(फोटो आणि माहिती - Mehernosh Mavalwala)









पुरातन शिव मंदिर, पाथ्रड देवी, दारव्हा, यवतमाळ


 पुरातन बारव, इजनी, महागाव, यवतमाळ


































श्री दिगांबर जैन पवळी मंदिर, शिरपूर (जैन), वाशिम




ऐतिहासिक सात मजली पायविहिर, महिमापूर, अमरावती
अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील वास्तू कलेचा अद्भुत नमुना असलेली सात मजली विहीर. महिमापूरच्या या ऐतिहासिक विहिरीचा आकार चौकोनी आहे. सुमारे ८० फूट खोली. तर रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ पायऱ्या. त्या पायऱ्या आताशा खचू लागल्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी आहेत. प्रवेशद्वारावर दोन पुष्पे दगडात कोरलेली. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. बांधकाम संपल्यानंतर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आता या विहिरीला पाणी नसल्याने अगदी तळाशीदेखील जाणे शक्य आहे.




































गडचांदूर येथील दुर्लक्षित वास्तू
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील हा पुरातन वारसा आपले अस्तित्व टिकवून उभा आहे. येथील बर्याच वास्तू पडझड होऊन नष्ट झाल्या आहेत. काळ्या पाषाणातील कोरीव अवशेष बघून ही वास्तू किती सुंदर असावी याची प्रचिती येते. पुरातत्त्व विभागाने याकडे वेळीच लक्ष नाही दिले तर उर्वरित वारसा सुध्दा नष्ट होईल.
(Photo - Rohit Patil)




रोन कॅमेर्याने घेतलेलं गोसीखुर्द धरणाचे विहंगम दृश्य

विदर्भातील प्रसिद्ध पाककृती असलेला चमचमीत पाटवडी रस्सा खाण्यासाठी खास कुठलं कारण असायची गरज नाही. गरमा गरम पुऱ्यांसोबत रस्स्यावर ताव मारल्यास मन अगदी तृप्त होते. तुमचा आवडता वऱ्हाडी पदार्थ आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.
(Photo - @mrinals_kitchen) IG
















हुरडा पार्टी


"...कुण्या गांवीं कुण्या गांवची लेक दिली, की ते सगळे गांव सोयरें झालें! त्या गांवचा कुणी साळी-कोष्टी-कुंभारही मोठ्या डौलानें सांगेल,
'फलान्या गांवचा थो बिस्ताना, आमचा जवाई होय थो!'
'कसा, जी?'
'तुमाले नाई काय मालूम? आमच्या गांवच्या ढिकल्याची लेक त्याले देल्ली ना!'
अशीं नात्यागोत्यांची जाळीं वऱ्हाडांत सर्वत्र गुंफलेली. श्रीकृष्ण त्यांचा जांवई, कारण रुक्मिणी त्यांची लेक. शिवाजीराजा त्यांचा लाहेना बाबू ! कारण जिजाऊ त्यांच्या शिंदखेड राजाची !"
- गोनिदा..
विदर्भकन्या राष्ट्रमाता जिजाऊ




















सिंदखेड राजा, बुलढाणा
सिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. ४५,००० लोकवस्तीच्या या सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, निळकंठेश्वर व रामेश्वर पुरातन मंदिरे आणि चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे बघण्याजोग्या वास्तू आहेत.















राजमाता जिजाऊ जन्म स्थान, सिंदखेड राजा, बुलढाणा
विदर्भाच्या काळ्या कसदार भूमीमधे अनेक वीर नर-नारी रत्नांची निर्मिती झाली. शिवरायांची जन्मदात्री जिजामाताही याच भूमीत जन्मल्या. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड नावाचे गाव हीच जिजाऊंची जन्मभूमी. त्यांचा जन्म ज्या जाधव घराण्यात झाला. त्या घराण्याने आपल्या पराक्रमाने राजवैभव मिळविले व खर्या अर्थाने ते रयतेचे राजे झाले, म्हणून या गावाला सिंदखेडराजा हे नाव पडले. आज तालुक्याचे गाव असलेले सिंदखेडराजा प्राचीन काळी आलापूर या नावाने ओळखले जात असे. सिंधुरम नावाच्या राजाने हे खेडे वसविले म्हणून त्याचे नाव सिंदखेड पडले असे म्हणतात.
सिंदखेडकर राजे जाधवरावांच्या बखरीमध्ये बखरकार म्हणतो की, 'कदीम वस्ती आलापूर नंतर सिंदुराजा गौळी याने अलिकडे सिंदखेड वस्ती केली.' परंतु बखरकारांच्या या उल्लेखाशिवाय सिंदुराजाचा कोणताही पुरावा आढळत नाही. उपलब्ध पुअराव्यावरून सिंदखेडचे मूळ नाव सिद्धपूर किंवा सिद्धक्षेत्र हे असावे. सिंदखेड येथील जुन्या कागदपत्रांमधे सिध्दक्षेत्र, सिद्धपूर असा उल्लेख आढळतो. येथील निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये शके 1509 मधील शिलालेख कोरलेला आहे. त्यात 'परगणे शीधपूर' असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याचप्रमाणे सिंदखेडचे प्रसिध्द संतकवी गोसावीनंदन यांच्या चरीत्रामधे "सिंदखेड स्थळ | सिध्दांचे केवळ | देखोनी तात्काळ | वास केला ||" असे या गावाचे वर्णन आहे. यावरुम या परिसरात अनेक सिध्द, योगी होऊन गेलेत म्हणुन 'सिध्दपूर' हे या गावाचे मूळ नाव असून त्याला कालांतराने 'सिध्दक्षेत्र' म्हटले गेले असावे व त्याच्र रुपांतर 'सिंदखेड' असे झाले असावे हे स्पष्ट होते. बुलढाणा गॅझेटीयरमध्ये सिंदीच्या झाडावरुन हे नाव या गावाला पडले असावे असा उल्लेख आहे. 'वर्र्हाडाचा इतिहास' लिहिणारे या.मा.काळे यांनाही तसेच वाटते. पण या परिसरात सिंदीची झाडे नाहीत, तसेच यापूर्वीही नव्हती. त्यामुळे हे म्हणणं खरे नाही.....!
अकबराच्या काळात व त्यानंतरी बरीच वर्षे सिंदखेड मेहेकर सरकाराखाली असल्याचे उल्लेख आढळतात. येथील नीलकंठेश्वर मंदीर, पुतळा, बारव, रामेश्वर मंदीर यासारख्या प्राचीन अवशेषांवरुन सिंदखेड हे बाराव्या शतकापासून अतिशय महत्वाचे स्थळ होते हे दिसून येते.











जिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा, बुलढाणा 

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीच्या शुभेच्छा 
एक सामान्य स्त्री, धैर्य, सामर्थ्य, भक्ती, संस्कार, न्याय या शब्दांचे अर्थ खऱ्या अर्थाने या दुनियेने तुझ्याच चरित्रातून अनुभवले.
समोर अनंत संकटे उभी असताना मराठ्यांचा राजा घडवणे हि सोपी बाब न्हवे. एका स्त्रीला कसलेही अधिकार नसलेला तो काळ, पण माणसाला माणूस जोडत या स्त्रीने असा काही चमत्कार घडवला कि इथला प्रत्येक मराठ्यांच्या धमन्यातल रक्त स्वातंत्र्याचा चित्कार करू लागलं. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे बंध घालून तिने एक केले या समाजाला.
तुमचं आमचं नात काय.... जय जिजाऊ जय शिवराय





लोणार सरोवराच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ !
2006 नंतर प्रथमच पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.














आंनदेश्वर, लासुर, अमरावती
सध्या माझा मुक्काम माहेरी दर्यापूरला आहे, बऱ्याच दिवसांनी इकडे आल्यामुळे माहेरपण पुरेपूर उपभोगत आहे हे वेगळं सांगायला नकोच! नुकतीच कुटुंबासह लासुरला भेट दिली. वयाची ३६ वर्षं उलटली तरी अगदी गावाजवळ असलेल्या या मंदिरात जाण्याचा योग काही आला नाही!
दर्यापूरपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर लासुर नावाचे खेडेगाव आहे, ते प्रसिद्ध आहे एका विशेष बाबी साठी, ती म्हणजे इथे असलेले आंनदेश्वर शिव मंदिर! दर्यापूर-अकोला मार्गावर असलेल्या लासुर गावात स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत थेट जायला सुस्थितीतला सिमेंटचा रस्ता आहे ज्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
विशेष आकर्षणाची गोष्ट म्हणजे हे शिवमंदिर आहे तब्बल ८०० वर्षं जुनं, १२ व्या शतकात बांधलेलं! पुरातन पण खूप सुंदर!
बऱ्यापैकी उंचावर वसलेल्या या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील रम्य आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने जरा डोकावून नजर फिरवली की सगळीकडे हिरवागार दिसतं.. झाडं.. आणि खाली पसरलेलं कुरण.. त्यात चरत असलेल्या गायी..वर पसरलेले मळभ दाटून आलेलं आभाळ.. फार छान देखावा!
लोखंडी फाटक ओलांडून आत गेलं उजव्या हाताला आहे पिंपळ! मस्त पसरलेला.. हिरवागार...वाऱ्यावर मनसोक्त झुलणारा...झाडाभोवती पार बांधलेला..पाराशी निवांत बसलेली गावातली एक-दोन जुनी खोडं…अंगात बंडी-धोतर..सोबत पाण्याची जुनाट बाटली आणि काठी...डोक्यात असंख्य विचार असलेली..विचारांची मालिका तोडत कुणी पाहुणा बोलला तर मात्र आपल्या गावरान भाषेत संवाद साधणारी! असो!
तर,वळूया मंदीराकडे.. संपुर्ण दगडी बांधकाम, मोठमोठ्या शिळांवर अतिशय कलात्मकरित्या रचलेलं हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. कोणार्कच्या
सुर्यमंदिराशी मेळ खाणारं हे मंदिर फारच सुंदर दिसतं!
दगडी पायऱ्या चढून वर गेलं आत प्रशस्त सभामंडप आहे, विशेष म्हणजे या मंदिराला कळस नाही,गोलाकार छताचा भाग संपूर्ण मोकळा, त्या छतातून दिसणारं निळं आकाश आणि चालणारा उनसावल्यांचा खेळ.. सगळंच अचंबित करणारं..या न बांधलेल्या छताबद्दल अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे की हे मंदिर दैत्यांनी एका रात्रीत बांधलेय,सकाळ होताच हे दैत्य पळून गेले, छताचा भाग बांधायचा राहून गेला तो गेलाच... कायमचा!
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या दगडी शिळांनी हे मंदिर बांधलाय त्या प्रकारचा दगड आसपासच्या जवळपास २०० किलोमीटर परिघात सापडत नाही,त्यामुळे एवढे प्रचंड दगड या परिसरात आणले कसे? हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे!
संपुर्ण मंदिर हे सभामंडपातल्या १२ खांब आणि भिंतीतल्या ६ अशा एकूण १८ दगडी खांबांनी तोलून धरले आहे, प्रत्येक खांब खूप सुंदर, कोरीवकाम असलेला, भितींवर, अगदी छतावर देखिल नक्षीकाम कोरले आहे! छिन्नी-हातोड्या सारख्या आयुधांनी इतकं सुंदर शिल्प कोरणं म्हणजे खरंच कमाल!
हे मंदिर त्रिदल आहे,म्हणजे तीन गाभाऱ्यांनी बनलेले,प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन उप गाभारे आणि समोर एक मुख्य गाभारा असे तीन गाभारे नजरेस पडतात. डावीकडच्या गाभाऱ्यात मंदिर परिसरात सापडलेल्या काही मुर्त्या ठेवल्या आहेत तर उजवीकडच्या गाभाऱ्यात पूर्वी एक विहीर होती म्हणतात, त्यातून तळघरात जाण्यासाठी एक छुपा रस्ता होता, आता ती विहीर बुजवलेली दिसते..तसेच हा गाभारा कुलूपबंद होता.
मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर दाराशी डाव्या उजव्या बाजूला दोन यक्षमूर्ती आहेत...आतमध्ये प्राचीन शिवलिंग आहे,श्रावण महिना सुरू असल्याने भाविक मोठया श्रद्धेने या जागृत आंनदेश्वराची पूजा करत होते...बेलपत्री आणि फुलं वाहिलेली काळीशार पिंड मोठी सुरेख दिसत होती बरं!तुरळक गर्दी असल्याने निवांत दर्शन करता आले.. चित्त प्रसन्न झालं दर्शन घेऊन!
मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला बऱ्यापैकी रुंद दगडी चौथरा आहे, तसेच खाली उतरून देखिल प्रदक्षिणा मारता येते,त्यासाठी सिमेंटची पाऊलवाट बनवली आहे, अर्थात अलीकडे बनवली असावी.
बाहेरून देखील मंदिराची सुबकता ठायी ठायी जाणवते, विशिष्ट रचनेत मांडलेले दगड लक्ष वेधून घेतात.बाहेरच्या बाजूने सुद्धा कोरीवकाम आहे,पाना फुलांची नक्षी,कोरलेले गायक नर्तक वादक या सोबतच नरसिंह अवतार आणि कृष्णासह गोपिका यांच्या मूर्ती फारच मोहक दिसतात. काही नक्षीकाम काळाच्या ओघात भंगलेले आढळते.
वरुन बघितल्यास हे मंदिर स्वस्तिकच्या आकाराचे आहे असे दिसतं.. एका प्रचंड रथाला हत्ती जोडलाय असा देखील आभास होतो.
असे म्हणतात बऱ्याच वर्षांअगोदर हे संपूर्ण मंदिर जमिनीच्या आत गडप झाले होते, हळूहळू मंदिराचा छताकडचा भाग वर येऊ लागला, जमिनीतून हे विहिरी सारखे काय वर यायला लागले? याचा गावकऱ्यांनी शोध घेतला, ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली, उत्खननात हे लक्षवेधी मंदिर बाहेर आले.
या मंदिराची काळाच्या गरजेनुसार वेळोवेळी डागडुजी करण्यात आली, गरज पडेल तिथे सिमेंट लावून दगड सांधण्यात आले.पुरातत्व विभागाने ती जबाबदारी नीट पार पाडली,हे दिसूनच येते.
मंदिराच्या आवारात बसण्यासाठी लोखंडी बेंचेस आहेत, त्यांचे प्लॅस्टिकचे आवरण देखील अजून निघाले नव्हते,नुकतेच लावले असावेत. मंदिराचा परिसर देखील स्वछ आहे, देखभाल कोण करत असावं ते कळलं नाही कारण मी गेले तेव्हा आतमध्ये मंदिरात देखील कोणी पुजारी दिसला नाही. मंदिरात ना दानपेटी आहे ना देणगी देण्यासाठी पावती फाडण्याची व्यवस्था. पण एकूण मंदिराचे सुरळित चाललेले कामकाज बघता गावकऱ्यांनी सामायिकरित्या जबाबदारी उचललेली दिसते.
प्रदक्षिणेच्या रस्त्यावर भिंतीला टेकून एक म्हातारे बाबा बसलेले दिसले, बऱ्याच वेळपासून तसेच बसले असावेत, कुठे तंद्री लागली होती कुणास ठाऊक?इतके निश्चल की मंदिराचाच एक अविभाज्य भाग असावेत.असो!
हे हरवलेलं मंदिर आता हळूहळू माणसांना सापडायला लागलंय,पूर्वी इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नव्हती पण आजकाल काही हौशी मुलांनी आणि इतिहासाची आवड असलेल्यांनी केलेले व्हिडीओज आणि डॉक्युमेंटरी यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. आम्ही तिथे असताना तिथे आलेला एक माणूस गुगलवर मंदिराबद्दल वाचूनच मंदिर शोधत आला होता.
१९५८च्या पुरातत्त्व स्मारकासंबंधीच्या अधिनियमानुसार हे मंदिर एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.मंदिराला कुठल्याही प्रकारची बाधा पोहचवल्यास शिक्षापात्र गुन्हा नोंदवण्यात येऊ शकतो आणि दंडसुध्दा आकारण्यात येऊ शकतो, तसा सुचनावजा फलक फाटकाबाहेर लावण्यात आला आहे.
या परिसरात फोटोज तर इतके सुंदर येतात की अकोल्याच्या एका साडीच्या ब्रॅण्डने आपल्या जाहिरातीसाठी इथे फोटोशूट देखील केले आहे.आम्ही सुद्धा अर्थातच भरपूर फोटो काढले..घरापासून अवघ्या एका तासात येणं-जाणं होतं..एक ऐतिहासिक वास्तू बघायला मिळते.. आणि एक सुंदर अनुभव गाठीशी जमा होतो!
तर मंडळी, अमरावती-अकोला भागात आलात तर नक्की या आंनदेश्वर मंदिराला भेट द्या..रोडलगतच हे लासुर गाव आहे..उत्तम रस्ता आहे थेट मंदिरापर्यंत..भेटीचा पुरेपूर आनंद आणि समाधान लाभणार याची १००% खात्री बाळगा!
✍ विनया मगरे-सहस्त्रबुद्धे.
(Photo - Devashish Shah)













मुक्ताबाई मंदिर, सालबर्डी, अमरावती
विदर्भ आणि मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर सालबर्डी येथे माळू नदी आणि डोंगराळ भागात निसर्गाच्या सान्निध्यात हे पुरातन मंदिर वसलेले आहे. जवळच दोन पुरातन लेण्या, पांडव कचेरी, शिवधाम गुफा, धारुल येथील अंबादेवी गुफा, अनेक नैसर्गिक गुफा, गरम पाण्याचे झरे, अश्मयुगीन गुफा आणि त्यावरील शैलचित्रे बघायला मिळतात.
भौगोलिकदृष्ट्या ही सर्व ठिकाणे मध्य प्रदेशात येतात. महाराष्ट्रातील पुरातन वास्तू मध्ये त्यांची गणना करता येत नाही. असे असले तरी अमरावती जिल्ह्याच्या वरुड व मोर्शी तालुक्यातील ग्रामस्थांचा या क्षेत्रांशी नित्य संपर्क येतो. म्हणून सांस्कृतिकदृष्ट्या ती विदर्भाशी निगडित मानता येतात.





उद्ध्वस्त झालेली पुरातन लेणी, माना, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील माना येथे असलेल्या दोन हजार वर्षापूर्वीच्या पुरातन लेणी होत्या. पण सन २०११ साली कोळसा खनिज उत्खननात ही लेणी उद्ध्वस्त करण्यात आल्यामुळे हा पुरातन वारसा नष्ट झाला आहे. नष्ट होण्याआधीचे काही फोटो :



वैनगंगा नदी पात्रात असलेला हत्ती गोटा
📍 पवनी, भंडारा











पुरातन लेणी, सालबर्डी, अमरावती
लेण्या म्हटले की आपल्याला आठवतात अजिंठा-वेरूळची लेणी परंतु अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या सालबर्डी येथे प्राचीन लेण्या आहेत. सालबर्डी येथे आपण सगळे गेले असाल महादेव गुहे कडे न जाता मांडू नदीच्या डाव्या बाजूने आपण सरळ चालत गेल्यास दगडांच्या विचित्र नैसर्गिक रचना मधून दगडधोंड्यातून वाट काढत नदी नदीने काही अंतर चालत गेल्यानंतर आपणास पहिली गुहा दिसते. अंदाजे 10×40 अशा आयताकृती रचनेत चार खांबावर दगडात कोरलेली अपरिचित अशी पहिली लेणी. ही लेणी वेरूळच्या लेणी क्रमांक 11 सारखी आहे काळया पाषाणात सरळ कोरलेली ही लेणी आहे दोन खांबांच्या आत मधून प्रवेश केल्यास समोर कोरीव प्रवेशद्वार दिसते व उजव्या व डाव्या बाजूला दोन खोल्या साधारण आठ बाय आठच्या दिसून येते. दोन्ही खोल्यांचे प्रवेशद्वार समोरासमोर असून आत मध्ये काळोख असल्यामुळे वटवाघळांचा निवास आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत मध्ये प्रवेश केला असता अंदाज 40 फूट बाय 40 फूट असं सभागृह आहे सभागृहाच्या मध्यभागी मोठा ओटा असून ओट्याच्या किनाऱ्यावर चार स्तंभ आहे त्यातील एक स्तंभ पूर्ण नाहीसा झाला आहे. सभागृहातून गर्भगृह आपणास सहजपणे दिसते त्याठिकाणी आता वटवाघळांचे निवास स्थान आहे त्या काळातील कारागीरांनी दगडांवर केलेले छंनीचे घाव अजुनही आपणास बघायला मिळतात.
तज्ञ लोकांच्या मते म्हणजेच डॉक्टर जयंत वडतकर यांच्या मते ही लेणी साधारण दुसऱ्या शतकातील म्हणजे सातवाहनकालीन असायला पाहिजे. ही लेणी बघून आपण सरळ माळू नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत गेल्यास दगड धोंड्यातून वाट काढत पुढे गेल्यास आणखी त्याच पद्धतीची दुसरी लेणी आपणास बघायला मिळतात परंतु तेथील दगड ठिसूळ असल्यामुळे बहुदा ही लेणी पूर्ण होऊ शकली नाही असे वाटते. सध्या या लेणींच्या आत मध्ये वाळू सिमेंटने छपाई केल्यामुळे त्याचा ऐतिहासिक पणा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे लोकांचे दुर्लक्ष असल्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत चालले निसर्गाचे अद्भुत नजारे आपणास बघायचे झाल्यास आपण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अजून काही अंतर चालत गेल्यास निसर्गनिर्मित गुफा पण बघू शकता.
सालबर्डी येथे बर्याचश्या नैसर्गिक गुहा आहे त्याचबरोबर मानव निर्मित गुहा (लेणी) आहेत सालबर्डी येथील पुरातन शिवाच्या गुहे कडे जाताना माळू नदी ओलांडून सितान्हाणी किंवा मुक्ताबाई मंदिराकडे जाणाऱ्या वाटेने आपण थोडे ओढ्या ओढ्या ने चालत गेलो की ओढ्याच्या एक बाजून उंच नैसर्गिक काळ्या दगडाची भिंत दिसते या दगडाच्या वरच्या बाजूला साधारण तीन बाय तीन असे दोन लेण्या कोरल्या असून त्यातील एका लेणीत शिवलिंग कोरले आहे व दुसऱ्या लेणी शिवलिंग सोबत दर्शनी भागात विष्णू व त्यांच्या दोन्ही बाजूला गरुडाची शिल्प कोरले आहे व लिंगाच्या डाव्या बाजूला एक देवतेची मूर्ती कोरली असून तिच्या मांडीवर अजून एक देवता बसलेली आहे मूर्त्यांची झीज झाली असल्यामुळे मुर्त्या नेमक्या कधी आहे ते कळत नाही येत नाही ओढ्याला पाणी असताना येथे जाणे शक्य नाही इतर वेळेला कातळ कोरीव ह्या लेन्या थोडी कसरत करून बघता येईल.
अशा या नैसर्गिक आणि मानव निर्मित कलेला बघण्याकरिता प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायला हवी.
(माहिती आणि फोटो - शिवा श्रीकृष्णराव काळे)







 पुरातन पायविहीर, मलकापूर, बुलढाणा
(Photo - Hitesh Patil)




















पुरातन पायविहीर, बार्शीटाकळी, अकोला
अकोल्यापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर असणारी ही प्राचीननगरी बार्शीटाकळी. यादव, वाकाटक आणि मुघल साम्राज्याचे साक्षीदार असणारे, कुण्याकाळी बाजारपेठ, व्यापाराचे मोक्कयाचे ठिकाण असणारे सध्याचे तालुक्याचे गाव. असंख्य तळघरे व भुयारांची श्रुंखला असल्याने हे 'भुयारीशहर' म्हणूनही ओळखल्या जाते. येथे असे म्हणतात, की प्रत्येक गल्लीत दोनतीन तरी तळघरे मिळतात. यापूर्वी आपण बघितले की, मुघल सरदार हसन बार्शी यांच्या नावावरून बार्शी असे नाव पडले, मात्र पूर्वीच्याकाळी येथे बारा वेशी होत्या आणि त्यामुळेच या भागाचे नाव बार्शी असे पडले असावे असेही ऐकण्यात आले आहे. त्याकाळी वाकाटक साम्राज्याची पश्चिम राजधानी म्हणून ओळखल्या जाणारे 'वत्सगुल्म' म्हणजेच आत्ताचा वाशीम जिल्हा. वाशीम जिल्हा आधी अकोल्या जिल्ह्याचाच भाग होता,1998 मध्ये अकोल्यातुन विभाजित होऊन स्वतंत्र जिल्हा झाला. प्राचीन काळापासूनच या राजधानीच्या व्यापाराचा मुख्यमार्ग हा बार्शीटाकळीहुन जात असे. अकोला, बाळापूर, पिंजर, पातूर यांचा केंद्रबिंदू साधणारे बार्शीटाकळीच्याच माध्यमातून तेव्हाही बाळापूर ते कारंजा व्यापारमार्ग चालायचा. याकरिता भुयारीमार्गांची खास व्यवस्था असायची.याचे उत्तम सोदाहरण म्हणजे येथील भुयारी मार्ग दाखविणारी "तीन मजली पायविहीर".
पुरातनकाळी जलसंचयाच्या हेतूने ठिकठिकाणी आकर्षक आणि हेतूपूरस्सर बारव, पायविहीरी असायच्याच. ज्यांचा उद्देश केवळ जलसाठा येथवर मर्यादित नसून त्यामध्ये व्यापार तसेंच संरक्षणाच्या, बचावाच्या दृष्टीनेही काही सुरुंग व भुयारीमार्ग रहात असत.
बार्शीटाकळीतील "तीन मजली पायविहीर" देखील भुयारीमार्ग असणारी विहीर आहे. जो मार्ग बार्शीतून थेट बाळापूरला निघतो. याविहिरीत पूर्वी मुघलांची छावणी असायची असे म्हणतात. साधारणतः 24फुट x 20फुट आकाराचची विहिर असून,आतील बाजूस डाव्या बाजूला दोन मोठ्ठाल्या खोल्या आहेत. खोल्यांमध्येही खिडक्या असून,पायरीपायरीवर दिवेलावणीसाठी देवळ्यांची व्यवस्था पाहायला मिळते. आकर्षक विटांची बांधणी मन मोहून घेते. विटा, चुना, दगड यांच्या साहाय्याने विहिरीचे बांधकाम केलेले आहे. बाराही महीने जलसाठवून ठेवणारी ही विहीर पूर्वीच्या काळी असंख्य गावांची तहान भागवत असे, मात्र आता जरीही पाणी आटत नसले तरीही यातील पाणी पिण्यायोग्य नाही. तेथील स्थानिक इनामदार साहेब आमच्यासोबत होते, त्यांनीच आम्हाला सर्व माहिती पुरविली. ही विहीर त्यांची खाजगी मालमत्ता असून विहिरीला सातशे वर्ष झाल्याचे त्यांनी सांगितले. सद्या त्यांची आठवी पिढी विहिरीची जपणवूक करते आहे मात्र कशा पद्धतीने जतन व्हावयास हवे याची पुरेपूर कल्पना त्यांना नाही याची जाणीव नक्कीच झाली.
दुर्लक्षित वास्तू खजिन्यांपैकी हाही असाच एक खजिना आहे...असो, विहिरीसमोरच एक पिराचा दर्गा आहे, तेथे त्यांनी आम्हाला आवर्जून दर्शनास नेले. दर्गाही सातशे आठशे वर्ष प्राचीन असून संपूर्ण काळ्या पाषाणतीलच आहे. मोठमोठाल्या काळ्या दगडापासून भक्कम चौथरा बांधलेला आहे. येथे चारही बाजूनी दरवाजे असून वर चौकटीवर पारशी उर्दू भाषेत कोरीव काम आहे. जे ते काय लिहिलंय त्यांना माहिती नाही. दर्गा देखील पांढऱ्या रंगाने रंगवून काढलेला आहे.. असो, विहीर खास आहे, नक्की बघा. 👍😊
✍️ नमिताप्रशांत.





















Ganesh Dhamodkar
येथील व्हिडिओ: https://youtu.be/SD8JChQVSbM
Hirapur Dolmen - a neglected heritage site
YOUTUBE.COM
Hirapur Dolmen - a neglected heritage site








नारळी गोटा, गुरवळा, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यात निसर्ग पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने वनविभागाने गडचिरोली पासून 12 किमी अंतरावर असलेल्या पोटेगाव रोडवर गुरवळा येथे नेचर सफारी सुरु केली आहे. या नेचर सफारी दरम्यान तुम्ही निसर्ग सफारीचा मनमुराद आनंद लुटू शकता, कितीतरी प्राणी पक्षी वन्यजीवांचे दर्शन या सफारी मध्ये होईल. सोबतच निसर्गाचे अनेक आविष्कार या दरम्यान दिसतील त्यापैकीच हा एक नारळी गोटा.
हा एक दगड अजब पद्धतीने आपला तोल सांभाळत उभा आहे. याचा आकार नारळासारखा असल्यामुळे या दगडाला नारळी गोटा म्हणून ओळखले जाते. अशाच प्रकारचा एक दगड चेन्नई मधील महाबलीपुरम येथे आहे तो कृष्णाचा "लोण्याचा गोळा" म्हणून प्रसिद्ध आहे.
गडचिरोली वरून गुरवळा सफारी पार्क फक्त 12 km अंतरावर आहे. 20 नाही.















































गंगा बिशन जाट नावाचे सेनापति या दरवाज्याचे राक्षणकर्ते होते, त्यामुळेच जटपुरा नाव रूढ़ झाले. या परिसरात शाहिद गंगा बिशन जाट ची समाधि आज ही आहे.













कमळेश्वर मंदिर, लोहारा, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा येथील छोट्याशा गावात पुरातन महादेव मंदिर अस्तित्वात आहे, हे मंदिर जवळपास 1100 वर्षे जुने आहे.
अमरावती रोडवर यवतमाळ पासून अवघ्या 5कि.मी. अंतरावर लोहारा हे गांव आहे. अमरावतीला जातांना अगदी रस्त्यावरून येथील महादेवाचे हेमाडपंथी मंदिर दिसते. हे मंदिर यादवकालीन असून यादवांचे प्रधान हेमाद्री यांनी त्याची बांधणी केल्याचे मंदिराच्या धाटणीवरून लक्षात येते. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना असल्याचे दिसून येते. ह्या मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न व शांत आहे. अशा या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघायला मिळते. महादेवाच्या पिंडीसमोरील श्री गणेशाचे विलोभनीय रूप आपणास पाहावयास मिळते. महाशिवरात्रीला येथे भक्तांची गर्दी जमते. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे भक्तांना एक अद्भुत शांती चा अनुभव देते.



















पुरातन शिव मंदिर, कोथळी, मोताळा, बुलढाणा
कोथळी येथे दोन पुरातन शिव मंदिर आहेत. यापैकी एक गावाच्या बाहेर विश्वगंगा नदीच्या तीरावर आहे तर दुसरे गावात आहे. आज आपण गावातील मंदिर बघुया. ह्या मंदिरावरील शिल्प पाहून हे मंदिर त्याकाळी विष्णूचे मंदिर असावे. असे दिसून येते. मात्र आज रोजी मंदिरात शिवलिंग स्थापित आहे.
या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या चहूबाजूने यक्षाचे शिल्प कोरलेले दिसून येतील. हे यक्ष मंदिराच्या भार आपल्या खांद्यावर घेऊन आहेत. तसेच चहूबाजूने दगडावर सुरेख नक्षी कोरल्या गेली आहे.
ह्या शिवलिंगाला शाळिग्राम महादेव म्हणून ओळखतात ह्या शिवलिंगाच्या खाली विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाच्ये शिल्प आहे. सकाळी सूर्य उगवताना ह्या शिवलिंगावर सूर्यकिरणे पडतात त्यामुळे ह्या मंदिराची रचना किती वैशिष्ट्य पूर्ण पद्धतीने केलेली आहे हे बघून आपण भारावून जाल..!
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बारीक कोरीव मूर्ती व शिल्प कोरण्यात आलेली दिसून येतील येथे विष्णू देव व सुरसुंदरीचे शिल्प देवी देवतांची अनेक उल्लेखनीय शिल्प ह्या मंदिरात बघायला मिळतातं...!
माहित आणि फोटो - Stories by Atul
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मरणार्थ त्यांच्या कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे त्यांचा महाकाय पुतळा उभारण्यात येत आहे. टाकाऊ पोलादी वस्तूंपासून हा पुतळा तयार करण्याचे सध्या काम सुरू आहे.






नागपुर फुटाळा तलाव वरील कालचे अद्भुत असे दृश्य




























पुरातन वाडे, वलगाव, अमरावती
अमरावती शहराच्या लगतच असलेल्या वलगाव मधील हे वाडे. वर्हाडावर म्हणजे पश्चिम विदर्भावर हैद्राबादच्या निजामाची सत्ता असताना गनेडीवाल नावाच्या मारवाडी गृहस्थाला वलगावची जहागिरदारी मिळाली होती. त्यांच्या आश्रयाने इतरही मारवाडी कुटुंबे इथे सावकारी व व्यवसायासाठी स्थायिक झाली. त्यांनी बांधलेले हे वाडे आजही ब-यापैकी सुस्थितीत आहेत. लढ्ढा, राठी, सिकची, गनेडीवाल या कुटुंबांचे हे वाडे.
(माहिती आणि फोटो - जयदीप देशमुख)

गणेडीवाल ह्यांचे कडे अकोलिजहागित ता.अकोट जिल्हा अकोला ह्या गावाची पण जहागिरी होती.अकोलीला जहागीर वाडा होता. उकळकार ह्यानिं तो विकत घेतला .गावातील एका व्यक्ती कडे 3एकर शेती चा शेतसारा भरण्याच्या वादा वरून जहागीर दारा सोबत भांडण झालं..गावात दहशत पसरावी म्हणून त्या काळातील अमरावती मधे दहशत निर्माण करणारा पहेलवान दाऊदखान ह्याला जहागीरदार ने अकोलित 15दिवस मुक्कामी ठेवले. दररोज सायंकाळी गावातून फिरून कुणाशी न बोलता पहेलवान त्याचे शरीर येस्टीचे जोरावर दहशत निर्माण करीत होता.अकोलिजहागिर मघे बहिरांमसिंह नावाचा पहिलवान होता. दाऊद खान चे शरीर येस्टी समोर गावातील पहिलवान खुजे होते. प्रत्यक्ष वादाचे दिवशी वादग्रस्त शेतात. दाऊदखान विरुद्ध अकोला जहागीर मधील ग्रामस्थ वाद झालं.बहिरम सिंह पहिलवान , पूनामसिंग धुळे व इतर गावातील लोकांनी शेतात गर्दी केली शिक्षकाला महिन्याला 12रु पगार चे काळात बहिरम सिंह पहेलवानाचे बायकोने 3रु रोजने पहेलवणास दगड मरण्या करता बाया सांगितल्या होता.त्या दगड फेकीचा त्यावर काही परिणाम होत नव्हता. दाऊद खान ने सर्वांना सांगितले परत जा शेतकरी आणि आमच्यात वाद आहे आम्ही बघून घेवू बाकीच्यांनी मधे पडू नका. लोक ऐक्याला तयार नव्हते.दाऊदखान चे पाय पडायचं एका स्त्रीने नाटक केलं दाऊदखान वाकल ,त्या संधीचा फायदा घेवून दाऊद खान वर वार केला.तसाच दाऊद खान पडला. दाऊद खान ला अकोली तील पहेलवणानी मारल ही वार्ता अमरावती शहरात पसरली त्यावेळी अमरावती मधील लोकांनी पेढे वाटले.दाऊद खान च प्रेत शेतातून गावात आने पर्यंत त्याचे शरीरातून रक्त सस्ता वर पडत होत. पहिलवान मेला, त्या नंतर गावात आपले प्रस्त ज्यास्त दिवस टिकू शकणार नाही त्या विचाराने मिळेल त्या भावात शेती विकून जहागीर दाराने अकोलिजाहागिर सोडण्याचा निर्णय घेतला.














मिर्झा राजे जयसिंग यांनी बांधलेली ऐतिहासिक पायविहिर, जयपूर, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताळा तालुक्यातील जयपूर हे छोटं ऐतिहासिक गाव. मिर्झा राजे जयसिंग विदर्भ दौर्यावर असताना काही काळ जयपूर येथे वास्तव्यास होते. त्यांनी येथे पायरी विहीर आणि छत्री बांधली. छत्री सध्या अस्तित्वात नाही. पण विहीर मात्र अजून तग धरुन जयसिंगांची साक्ष म्हणून आहे.
ही पुरातन विहीर अष्टकोणी आहे. विहीरीचा खालील भाग दगडात बांधलेला आहे. आणि वरील भाग जुन्या काळातील चपट्या विटांनी बांधलेला आहे. विहीरीच्या आत खोल्या आहेत. विहीरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी पायर्या आहेत. विहीर अजून सुस्थितीत आहे, साफसफाई आणि डागडुजी केल्यास सुंदरता वाढेल.
जयपूर हे ऐतिहासिक गाव आहे. येथे मिर्झा राजे जयसिंगांच्या खाणाखुणा सापडतात. गावाच्या पुर्व दिशेला सुर्य मंदिर आहे. विहीर परिसरात तीन प्राचीन समाधी होत्या, त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. आधी जयपूर आणि कोथळी एकच गाव होते. जयपूर हे नाव जयसिंग यांच्या नावावरुनच ठेवले गेले आहे. जवळच गोसिंग गाव आहे त्या गावाचा संबंध सुध्दा जयसिंगाशी असावा. जयसिंगांचे मुळ गाव राजस्थान मधील जयपूरच आहे त्यामुळे त्यांनी या गावाला जयपूर नाव दिले.
गावात प्राचीन वाडे, देशमुख यांची पुरातन दोन माळ्याची इमारत आहे. हे गाव श्री संत गजानन महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे. गजानन महाराज यांच्या पादुका जयपूर गावात आहेत. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून गावात हनुमान मंदिर आणि मस्जिद भिंतीला भिंत लागून आहे.
माहिती - श्याम देवकर
फोटो - दिपक वानखडे, दिनेश खिरोडकर













तपोनेश्वर मंदिर समूह
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात, यवतमाळ दारव्हा रोडवर बोरी अरब (बोरी चंद्रशेखर) या गावाजवळून अवघ्या 2 km अंतरावर हे एक सुंदर प्राचीन मंदिर समूह काळाच्या व प्रशासनाच्या माऱ्यात आजही टिकून आहे.
हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील हे मंदिर समूह यादवकालीन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा समूह व चंद्रपूर जिल्ह्यातील सोंडो समूहा प्रमाणे येथे मंदिर समूह आहेत. येथे एकच मंदिर नसून छोटे मोठे 7 मंदिरे आहेत त्यातील 4 प्राचीन आहेत, माझ्या लहानपणी मी इथे नेहमी भेट द्यायचो, पूर्वीच्या काळी इथे नक्कीच यापेक्षा जास्त मंदिरे असतील, काळाच्या ओघात ती नामशेष झाली, त्याचे अवशेष व खानाखुणा परिसरात पसरलेल्या आढळतात. तपोवन म्हणजे जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निर्माण केलेला भाग, त्यासाठी इथे पाण्याने सदैव भरून असलेले एक सुंदर जलकुंड (अनसूया कुंड) आहे ज्यात अंघोळ करून मंदिर समूहात तपश्चर्या करायची. (खोली साधारणतः 30 ते 35 फूट) बाजूला एक मोठी विहीर आहे, मुख्य मंदिर बरेचशे शिल्लक आहे, त्यातील पिंड ही बरेचदा पाण्याखाली असते, काळ्या दगडांच्या चिऱ्यांचे व प्रस्तर खडकांचे मंदिराचे बांधकाम आहे. स्तंभ, पाद, स्तंभशीर्ष व प्रत्यक्ष स्तंभ अशी रचना आहे. या स्तंभावर छत तोललेले आहे शिखर द्विजंघायुक्त आहे. दोन वैशिष्टपूर्ण चतुर्भुज असलेल्या मुर्त्या चांगल्या स्थितीत आहेत. मुर्त्या शिवस्वरूप भैरव क्षेत्रपाल च्या आहेत, दोन्ही चांगल्या स्थितीत आहेत. (अंदाजे 900 च्या आसपास च्या राष्ट्रकूट कालीन असाव्यात) या एकाच मंदिरावर आता कळस शिल्लक आहे बाकीचे ढासळले, सर्वच मंदिरात शिवलिंग आहे, आधुनिक मंदिरात हनुमान, दत्त अश्या प्रतिमा आहेत. दोन प्रचिन नंदी, एक वीरगळ, स्तंभावर असणारे स्त्री शिल्प, नृत्यांगना, स्त्री प्रतिमा, एक वैशिष्टपूर्ण पिंड, एक चतुर्भुज शिव अशी शिल्पे आहेत, या सर्वांचे योग्य जतन होणे गरजेचे आहे. स्थानिकांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिसराला कंपाऊंडसह काही कामे केली आहेत, मात्र कुंड पूर्वीपेक्षा जास्त कोसळले आहे त्याची दुरुस्ती व एका मंदिरावरील कळस तसेच छोट्या मंदिराची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे.
- हरीश ससनकर
इतिहास अभ्यासक (चंद्रपूर)















समृद्धी महामार्गचा प्रारंभ बिंदू, शिवमाडका, नागपूर
हिंगणा शहरातील शिवमडका गावाजवळ असलेला हा झिरो पॉइंट. हा चौक #महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील दुसरा सर्वात मोठा चौक (चौक) आहे जो नागपूर इंटरचेंज (हिंगणा) येथे 18 एकरमध्ये पसरलेला आहे.
राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर २५ इंटरचेंज असून महामार्गालगत १८ नवनगरे असतील. महामार्गावर ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचे पूल ३२ असून लहान पुलांची संख्या ३१७ आहे.







सासु सुनेची विहीर, रिद्धपुर, अमरावती
मराठी मधील पहिला ग्रंथ, काव्य, कथाचे उगम स्थान, रिद्धपुर म्हणजे महानुभाव संप्रदायाची काशी, मंदिराचं गाव, गोविंदप्रभूंचे कर्मस्थान असे हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात जरी असले तरी चांदुर बाजार या तालुक्याच्या ठिकाणा पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.
रिद्धपुर हे गाव देवगिरीच्या यादवांच्या काळात महत्वाचं ठिकाण होते, वऱ्हाड प्रांतातील महत्वाचा परगणा होता एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळख होती. येथिल प्राचीन इतिहास आपल्या उराशी घेऊन आजही हे गाव आपले एक वेगळे अस्तित्व घेऊन उभे आहे. ह्या गावात श्री गोविंद प्रभु ने बर्याचलिला केल्यात त्यांचे अस्तित्व आजही बघायला मिळतात. त्यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे रिद्धपूर येथील सासु सुनेची विहीर. श्री गोविंद प्रभू यांच्या आज्ञेवरून केशव नायक या व्यक्तीने ही विहीर बांधली असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
विहिरीची रचना ही अनोख्या पद्धतीने असून ताऱ्यासारखे आहे. विहिरीला आत उतरण्याकरीता तिन्ही बाजूनि पायऱ्या आहेत. एक फूट रुंदीच्या 10 पायऱ्या नंतर ऐक मोठी पायरी अशा तीन टप्यात तीस पायऱ्या आहेत. ज्या खाली उतरतांना निमुळत्या होत जातात व एका बाजूला चौकोनी विहीर आहे ज्यात मुख्य झरा असावा, एका आख्यायिकेनुसार विहीर ज्यांच्या मालकीचे आहे तेथील सासु सुना नेहमी पाण्याकरिता भांडत असे सदर प्रकरण हे श्री गोविंद प्रभु पर्यंत गेले त्यांनी त्या दोघींचे भांडण सोडवत विहिरीचे दोन भाग करण्यास सांगितल तेव्हापासून या विहिरीला सासु सुनेचे विहीर म्हणून ओळखल्या जाते.
बाराव्या शतकात पाण्याची गरज व उपयुक्तता जाणून ह्या विहीरीचे बांधकाम केले आहे. अशा प्रकारच्या विहिरी फार तर राजस्थानमध्ये आढळतात ज्यांना पुष्करणी सुद्धा म्हणतात. ह्या विहिरीच्या बांधकामाकरिता खरप प्रकाराच्या दगडाचा उपयोग केलेला आहे. ही विहीर नसून एक मोठे कुंड किंवा तलावच वाटतं त्या काळातील बांधकाम शास्त्र किती प्रगत होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही सुंदर विहीर आहे. आजूबाजूला खारे पाणी असताना गोड्या पाण्याच्या मुख्य स्त्रोत जिवंत झरा हेरून त्या ठिकाणी विहीर बांधली गेली आहे. कितीही दुष्काळ पडला तरी या ठिकाणचे पाणी आटत नाही असे लोक म्हणतात. हा एक चमत्कारच आहे. रिद्धपूर गावाजवळ मोठी नदी नसून त्या काळात बाराही महिने या विहिरीचा उपयोग होत असे. हे परंपरागत जलव्यवस्थापन प्रगत व्यवस्थेचे उदाहरण आहे. बाराव्या शतकापासून 19 व्या शतकापर्यंत ज्या वीहिरीने गावाची तृष्णा भागवली ती विहीर आज खितपत पडली आहे, काळाच्या ओघात विहीरीची उपयुक्तता संपली म्हणून ही विहीर दुर्लक्षित आहे. यामुळे या जिवंत संस्कृतीचा श्वास गुदमरतोय, परंपरागत चालू असलेल्या जल स्तोत्रांचा उपयोग व्हायला पाहिजे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे अश्या पारंपरिक जलस्त्रोता कडे दूर्लक्ष केल्या जाते. ही दुफळी दूर करण्याकरिता लोकसहभागातून अशा प्रकारच्या विहिरींचे साफसफाई व संवर्धन व्हायला पाहिजे, तेव्हाच कुठे हा ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा ही विरासत आपण जपू शकू व या ऐतिहासिक वारशाला न्याय देऊ शकु.
महानुभवांची काशी म्हणून रिद्धपुरला भेट दिल्या नंतर एकदातरी या सुंदर विशेष रचना असलेल्या सासू सुनेच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीला जिने आपल्या पूर्वजांची सात शतक तृष्णा भागवली तिची कृतज्ञता व्यक्त करण्या करिता भेट द्यायला हवी.
(माहिती - शिवा श्रीकृष्णराव काळे)


















नृसिंह मंदिर, चांडोळ, बुलढाणा
चांडोल ह्या गावाला पूर्वी चंपावती नगर म्हणूनही ओळखले जायचे हे गाव बुलडाणा शहरापासून ३६ की अंतरावर आहे
ह्या चांडोळ गावाची ओळख पूर्वी मंदिरांचं गाव म्हणून एके काळी होती. चांडोळ गावात प्राचीन शैलीत बांधलेले काळ्या पाषाणातील मंदिरं आहे.
राज्यभर नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; त्यापैकी बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर ह्या चार ठिकाणी नृसिंह मंदिर आहेत आज आपण चंडोळ येथील मंदिर बघत आहोत.
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर एक अतिशय दुर्मिळ अशे बारा ज्योतिर्लिंगाचे शिल्प कोरलेले असून असे शिल्प कदाचितच एखाद्या मंदिरावर असावे.
सभामंडपातील खांबावर काही देखनिय शिल्प कोरलेले आहे. ह्या नरसिंह मंदिरात तीन गर्भगृह असून दोन गर्भगृहात शिवलिंग तर मुख्य गाभाऱ्यात भगवान नरसिंहाची मूर्ती आहे. गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती प्राचीन सिंहरूपातील हिरण्य कपशुचा वध करतानाची आहे. वेरूळच्या १५ व १६ व्या क्रमांकाच्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे.
हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत असून मंदिरात आल्यावर आपल्याला अत्यंत शांतता जाणवते.
माहिती आणि फोटो - दिपक डोभाळ

















खोल महादेव मंदिर, चांडोळ, बुलढाणा
चांडोल ह्या गावाला पूर्वी चंपावती नगर म्हणूनही ओळखले जायचे हे गाव बुलढाणा शहरापासून ३६ की अंतरावर आहे. ह्या चांडोळ गावाची ओळख पूर्वी मंदिरांचं गाव म्हणून एके काळी होती. चांडोळ गावात प्राचीन शैलीत बांधलेले काळ्या पाषाणातील मंदिरं आहे.
ह्या मंदिराचा गाभारा जमिनीत खोलवर असल्यामुळे ह्याला कदाचित खोल महादेव हे नाव पडले असावे मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर काही देवी देवतांची शिल्प आहे.
गाभाऱ्यात उतरण्यासाठी पायऱ्या एकदम सरळ असल्यामुळे आपल्याला सावकाशच खाली उतरावे लागते गाभाऱ्यात एक मोठे शिवलिंग असून आतमध्ये आपल्याला गारवा जाणवतो.
मंदिराचे बांधकाम बाहेरून अर्धे दगडात तर अर्धे विटात केलेले आहे. मंदिर परिसरात अनेक शिल्प तुटलेल्या अवस्थेत आहेत.
माहिती - दिपक डोभाळ

राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या खनिजसंपत्तीत मोठी भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन ब्लॉक (खाणी) आढळून आल्या आहेत.
राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सौजन्य - दै. सकाळ

कुणाला माहिती आहे की अमरावती जिल्ह्याच्या इतिहास मध्ये सुद्धा एक भयावह रणकंदन झाले आहे !!
कुणाला माहिती आहे ब्रिटीश फौजेच्या अधिकारी चे मुंडके रणांगणात आमच्या विराने फिरवले आहे!!
कुणाला माहिती आहे की अमरावती जिल्ह्यात सुद्धा एक जोहरकुंड पेटले होते, कुणाला माहिती आहे की आमच्या जिल्ह्यात सुद्धा सौदामिनींचा जोहर झाला ??
अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार !!
आमच्या इतिहास ची पाने अलगदपणे उघडल्या जाणार !!
गाविलगड शौर्य दिवस!!
१४ ते १५ डिसेंबर
गाविलगड चिखलदरा 🔥
अवघे अवघे या !!!
- शिवा श्रीकृष्णराव काळे


रणांगणावरील शौर्य युद्धप्रसंगाचे डावपेच सैन्यातील कठोर शिस्त या तीनही कौशल्यावर निष्णात असलेल्या नेपोलियन ने संपूर्ण युरोपात आपला विजयी अश्व दोंडाईत युरोपातील अनेक लढाया जिंकून तो फ्रान्सचा सम्राट झाला
याच युरोप विजेत्या नेपोलियनला आवरण्यासाठी इंग्रजांनी ड्युक ऑफ वेलिंग्टन म्हणजेच जनरल वेलस्ली याची निवड केली जनरल वेलस्लीने रणांगणावर सतत यश मिळवले होते हे त्या निवडी मागचे कारण,
वॉटरलूच्या युद्धात सम्राट नेपोलियनचा पराभव करून जनरल वेलस्ली इतिहासात अजरामर झाला या जनरल वेलस्लीने आपण युद्धातील डावपेच धडे भारतात गाविलगडच्या युद्धात शिकलो अशी लिखित कबुली देऊन ठेवली आहे.
गाविलगडच्या या युद्धात जनरल वेलस्लीशी भिडणारा व जंग जंग पछाडले तरी तब्बल सात दिवस गडावर पाय न ठेवू देणारा विर होता सरदार बेनिसिह, जनरल वेलस्लीने सरदार बेणीसिंहाच्या शौर्याची व युद्ध कौशल्याचे मुक्तकंठाने स्तुती केली आहे
जनरल वेलस्ली हा पुढे ड्युक ऑफ वेलिंग्टन झाला इंग्लंडचा पंतप्रधान ही झाला पण भोसल्यांचा हा पराक्रमी सरदार बेनी सिंह मात्र इतिहासातून उपेक्षितच राहिला मातब्बर शत्रुने त्याचे प्रशंसा केले पण आम्ही मात्र त्याला विसरलो
गाविलगडचे युद्धात लढता लढता बेनिसिंह दिल्ली दरवाजा जवळ धारातीर्थ पडला त्या क्षणी त्याच्या पत्नीने देवतलावाच्या बाजूला सरण रचून जोहर केला, विदर्भाच्या इतिहासातले हे गौरव व सुवर्णपृष्ठ एक उपेक्षित विस्मृत सत्यकथेला उजाळा देण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामातील पहिल्या फळीच्या शहिदांना मानवंदना देण्यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान तर्फे मागील सहा वर्षापासून गाविलगड शौर्य दिन व स्मृतिबंधन सोहळा साजरा करण्यात येतो तो यावर्षी सुद्धा होत आहे तरी विदर्भातील या इतिहासाला उजळा देण्यासाठी आपण यावे व इतिहासाला सन्मानित करणाऱ्या प्रवाहाचे साक्षीदार व्हावे ही विनंती
दि. 14 व 15 डिसेंबर 2022



छोटा गोवा, पारशिवनी, नागपूर



धार मंदिर समूह, लोणार, बुलढाणा
गंगा भोगावती (धार) - गंगा भारतीयांचं आदरस्थान..
जीवनदायीनी गंगा जेथेही वाहते तेथे आजुबाजुच्या प्रदेशाला "सुजलाम सुफलाम" करत फुलवित जाते. या मातेसमान प्रवित्र गंगेच्या ऋणातून ऊतराई होण कठीणच..
माती, आकाश, जल, पशु यांची कृतज्ञता मानणारी आपली भारतीय संस्कृती म्हणुनच आपल्या पूर्वजांनी जेष्ठमासाच्या शुक्लपक्षात प्रथमतिथी एकमेपासुन ते दशमीपर्यत गंगेचे पूजन करण्याची प्रथा भारतात साजरी केल्या जाते.
लोणार सरोवराचे सौन्दर्य जिच्यामुळे आबादित आहे अशी ही गंगा भोगावती ( धार ) तीर्थ किंवा अखंड वाहणारी कपीला संगम तीर्थ,
धारेचा ऊल्लेख "स्कंदपुराण", "विदर्भाचा इतिहास" यामध्ये ही येतो.
छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक प्रसंगी लोणारच्या कपिलातिर्थाचे / धाराचे पाणी छत्रपतींच्या अभिषेकासाठी लोणार वरून नेण्यात आले होते. हा आमच्या लोणारच्या इतिहासात कोरलेला सुवर्णक्षण / अभिमाना चा क्षण आहे..
देवगिरी चे राजे क्रुष्णदेव व महानुभावाचे संत 'चक्रधर स्वामी' यांची प्रथम भेट येथे झाली याची नोंद 'लीळाचरित्र' मध्ये येते..
शुक्राचार्य शाळा मंदिराकडे असणाऱ्या खाचेतून वर चढले असता धार मंदिर समूह लागतो. वर्षाचे बाराही महिने येथील गोमुखातून पडणारी संतत धार हे या धारा मंदिराचे वैशिष्ठ. हेच गोडे पाणी पुढे विवराच्या पाण्याला जाऊन मिळते. धार पडणार्या कुंडाला "धार कुंड" किंवा गोमुख म्हटले जाते. बाजूलाच दुसरा कुंड आहे त्याला ब्रम्ह कुंड म्हटले जाते.
धारेसामोरील वडाच्या झाडाखालील जागा महानुभाव पंथीयांच्या चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली असल्याचे सांगण्यान येते. देवगिरीचे सम्राट कृष्णदेवराय यांचे गर्वहरण केल्याची कथा देखील लीळा चरित्रात दिलेली आहे.
सम्राट कृष्णदेवरायाने ओतलेल्या संपत्तीकडे ढुंकूनही न पहाता चक्रधरस्वामी मठात निघून गेले. या महापुरुषाचा हा निस्वार्थी पणा पाहून सम्राटाला आपली चूक उमगली आणि ते चक्रधर स्वामींना शरण गेले अशी ती कथा आहे. धार मंदिर समूहात शिव, विष्णू, गणपती, जगदंबा अशी काही मंदिर आहेत.
संदर्भ - वर्हाडाचा इतिहास (कै. या.मा. काळे)
माहिती साभार - डाॅ. वर्षा मिश्रा #lonardarshan


खंडोबा मंदिर, हिंगणघाट, वर्धा
(फोटो - संपतराव पवार)


विजासन लेणी, भद्रावती, चंद्रपूर
विजासन लेणी ही विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील विजासन गावाजवळ एका टेकडीमध्ये कोरलेली आहे. भद्रावती शहरामध्ये असलेल्या बौद्ध कला असलेल्या लेण्यांची मालिका आहे. विजासन येथील काही लेणी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून वापरात आहेत.
विजासनच्या आजूबाजूची सर्वात जुनी स्थळे सातवाहन वंशातील यज्ञ श्री सातकर्णी यांच्या कारकिर्दीत इसवी सन पूर्व 1 ले शतकातील आहेत. तत्सम मेगालिथिक लेण्यांप्रमाणेच, विजासन येथील लेणी कोसळू नयेत म्हणून हेतुपुरस्सर अरुंद बोगद्यांसह दगडी पायथ्याशी कापण्यात आली होती.विजासन येथील मुख्य गुहा एका सरळ रेषेत खडकात 71 फूट (~21 मीटर) पसरलेली आहे, ज्याचा शेवट कोरीव बुद्ध असलेल्या चेंबरमध्ये होतो.
(फोटो आणि माहिती - ak_travelsgram)


पुरातन पायविहिर, मोझर, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्य़ातील नेर परसोपंत तालुक्यात मोझर या गावी शिव मंदिरामध्ये ही बारव आहे. लहान आकाराच्या या पायविहिरचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात चौकोनी आकाराच्या असलेल्या पाषाणावर 11 लहान शिवलिंग आणि मधोमध एक मुख्य शिवलिंग असे बारा ज्योतिर्लिंग कोरलेले आहेत.
(फोटो आणि माहिती - मिलिंद कुलकर्णी, यवतमाळ)
स्थानिक जुने आध्यात्मिक गुरू श्री. परशराम महाराज यांच्या प्रेरणेने मोझर येथील भेंडे परिवाराने विहीर आणि त्यावरचे ज्योतिर्लिंग मंदिर बांधले. नुकताच मंदिर आणि परिसराचा जीर्णोद्धार केला. विहीरीच्या बाजूलाच परशराम महाराजांची मूर्तीदेखील आहे. विहिरीच्या पायऱ्यांच्या बरोब्बर वरच हे ज्योतिर्लिंग मंदिर बांधले आहे.



स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेली सातमजली पायविहीर, महिमापूर, अमरावती
आश्चर्याने तोंडात बोटे जावीत अशी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली, औरस-चौरस भव्य ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या इवल्याशा गावात १४ व्या शतकापासून आजही दिमाखात उभी आहे. तथापि, महाराष्ट्र राज्याची संपत्ती आणि अमरावती जिल्ह्याचे वैभव असलेल्या या विहिरीकडे शासनाने सातत्याने केलेले दुर्लक्षही विहिरीइतकेच आश्चर्यकारक आहे.
अशी आहे रचना:
संपूर्ण बांधकाम दगडाचे. आकार चौकोनी. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती.
विहिरीचा इतिहास :
१४४६ ते १५९० या १४४ वर्षांच्या कालखंडात बहामणी साम्राज्याच्या पाच पातशाही होत्या. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदीलशाही, हैदराबादची कुतूबशाही, बिदरची बरीदशाही आणि अचलपूरची इमादशाही, अशा त्या पाच पातशाही होत. अचलपूरच्या इमादशाहीचे संस्थापक फते इमाद उल मुल्क हे होते. फते इमाद उल मुल्क यांनी आरंभीच्या काळात भरमसाठ बांधकामे केलीत. ठळक बांधकामात चिखलदऱ्यातील दोन मशिदी, गाविलगड किल्ल्याचा परकोट, परतवाड्यातील हौद कटोरा ही उदाहरणे देता येतील. महिमापूरची विहीरही त्याच काळातील, असल्याचा निष्कर्ष इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील यांनी ठामपणे व्यक्त केला.
या रचना कालौघात नष्ट :
जमिनीपासून तीन-चार फूट उंचीपासून विहिरीच्या तळापर्यंतचे बांधकाम आजघडीला बघता येत असले तरी त्याशिवाय कालौघात नष्ट झालेली इतर अनेक वैशिष्ट्ये या विहिरीत होती, हे अभ्यासकांच्या शोधमोहिमेतून पुढे आले. पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. पाहणाऱ्याला ही विहीर असल्याचे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. ते प्रमुख वैशिष्ट्यही होते. वरील दोन मजले पडल्यामुळे आता विहिरीच्या आतील बांधकाम वरून बघता येते. या विहिरीच्या आत आजदेखील कपाऱ्यांसमान भासणारी गूढ रचना आहे. कपारींचे गूढ काय, याबाबत जाणकारांमध्ये खल होत राहतो.
(माहिती - Amar Bhagwat)
(फोटो - Devashish Shah)



सोमेश्वर मंदिर, नेर, यवतमाळ
नेर परसोपंत मध्ये महादेवाचे पुरातन व हेमाडपंथी शैलीत बांधलेले श्री क्षेञ सोमेश्वर मंदीर आहे. परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक वर्षापासून हे मंदिर मातीच्या गढी खाली झाकून ठेवण्यात आले होते. सन 1902 मधे गावकर्यांनी हे मंदिर बाहेर काढले.
मंदिरात काळ्या पाषाणात सुबक कोरीव काम केलेले आहे. विशेष म्हणजे मंदिराचा सभामंडप व गर्भगृह हा लांबलचक आहे पण रोज पहाटे स्वत: सुर्याची किरणे थेट महादेवाच्या पिंडी पर्यंत पोहचतात. प्रत्येकानी नजरेत साठवून ठेवावं असं ते दृष्य असते.
हे मंदीर गेले 30 ते 35 वर्षापासून पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. मंदिराचा काही भाग पडक्या अवस्थेत आहे. याचे बांधकाम व सौंदर्यीकरण व्हावे अशी सर्व गावकर्यांची इच्छा आहे.
साभार - अजिंक्य वसंतराव काडगळे


आमच्या गावातील मारुती च्या पारावर ठेवलेली ही विरगळ..
गावकर्यांमधे कुणालाच माहीती नाही ही विरगळ आहे म्हणुन काही लोक शितला माता म्हणुन येथे पुजा करतात.. मी काहींना विरगळ असल्याचे बरेचदा सांगीतले आणी याला शेंदुर फासुन हा वारसा नष्ट न करण्याचे आव्हान केले पण दर वेळेस गावाला जातो तेव्हा विरगळला शेंदुर फासलेला असतो .. दुर्भाग्य आमच्या गावचे
विरगळ म्हणजे विराचे स्मारक जो व्यक्ती गावाच्या रक्षणार्थ ,युध्दामधे ,जनावराच्या सरंक्षणासाठी युध्दात विरगती मिळवतो त्याच्या स्मरणार्थ विरगळ कोरल्या जाई ..
विरगळ कथा वाचातांना तिला खालुन वर वाचावे लागते .. या विरगळ मधे खालील कप्प्याधारे ऐक योध्दा युध्दात विरगती ला प्राप्त झाला असुन वरील कप्प्यात त्याला कैलासवासी दाखवले आहे ..ज्यात तो हात जोडुन शिवलिंगाला प्रणाम करत आहे... सर्वात वरील कळसावर सुर्य चंद्र कोरला आहे .याचा अर्थ जोपर्यंत चंद्रसुर्य आहे तोवर याची कीर्ती राहील ...
मोहन ठाकरे देशमुख

विदर्भ आणि विदर्भाचं जेवण कायम गरम आणि तिखट, बिट्ट्या, रोडगे, वांग्याची अन् पातोड्याची भाजी म्हणजे तोंडाला पाणी.. 🤤 आणि आग सोबतच.. 🥵
पण या जेवणाची चव आणि लोकांची माणुसकी याची सर दुसरीकडे कुठेच नाही..
Photo - Sangram Burde



विदर्भातील ब्रम्हदेव !!
आज बघुया विदर्भातील मंदिरांमध्ये असलेल्या ब्रम्हा यांच्या पुरातन मुर्ती :
सदरची ही शिल्पे ब्रह्मदेवांची नसून "विश्वकर्मा " यांची आहेत!
Jakhadi Harsh जी दादा ,परंतु हातामध्ये स्त्रुव , पोथी, अक्षमाला, कमंडलू आहे. विश्वकर्मा विग्रहात सूत्र, पट्टीका, परशु असतो.



त्र्यंबकेश्वर मंदिर, पारशिवनी, नागपूर
आपल्या विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील हे पुरातन मंदिर आहे. मुळात दक्षिण भारतात असलेली मंदिराची शैली आपल्याला विदर्भात पाहायला मिळते. मंदिरातील शिखर, सभामंडप, गर्भगृह आजही खूप उत्तम स्थितीत आहे..🙌
जमल्यास नक्की भेट द्या नागपूर पासून पारशिवानी एका तासाच्या अंतरावर आहे जवळपास 34 कि. मी.
(Photo - @ghumanewali) IG



किल्ले खोब्रागड..
शोधभ्रमंती गडचिरोलीच्या दुर्गम दुर्गरत्नाची !
गडचिरोलीतील कुरखेडा या तालुक्याच्या ठिकाणाहून पुढे 36 किलोमिटर अंतरावर खोब्रागडी नदीच्या काठावर खोब्रामेंढा नावाचं छोटंस गाव आहे. खोब्रा या नागवंशीय जातीच्या आदिवासी गोंड लोकांच हे मुळ गाव. गावापासून दोन किलोमिटरवर डोंगराच्या कुशीत प्राचिन हनुमान मंदीर आहे. या भागात कोणतेही नवीन वाहन घेतले गेले की या ठिकाणी देवदर्शनाला आणले जाते. दर वर्षी हजारो लोक या मंदीराला भेट देतात.
मंदीराला लागूनच दोन किलोमिटर उंचीचे दोन घनदाट डोंगर आहेत. त्यावर खोब्रागड किल्ला आहे. दोन्ही डोंगरांच्या मध्यापर्यंत एक वाट जाते. तसं तिला वाट म्हणनंही चुकीचं... मारुती मंदीरापासून कासराभर अंतरापर्यंतच ती आहे, त्यापुढे सगळे दगडधोंडे आणि पाचोळ्यात हरवलेलं. रिकाम्या जागी पावलं टाकत, अंदाजे दिशा धरत पावलं टाकत रहायची. असं करत राहीलो की आपण कुठेतरी बांधबंदीस्ती किंवा डोंगरावरच्या नालीवर बांधलेल्या दगडी बंधाऱ्यासारख्या तटबंदीला जाऊन भिडतो.
दोन्ही डोंगराच्या मध्ये गेलं की भुलभुलय्या आहे. उजवीकडच्या डोंगरावर जायला काहीच जागा दिसत नाही. सगळं जंगल माजलेलं. डावीकडे थोडी मोकळी जागा, पायवाटेच्या खाणाखुणी दिसतात. तिकडं चालत, दगडी टप्पे चढत गेलो की आपण डोंगराच्या माथ्यावर पोहचतो आणि समोर अप्रतिम नजारा दिसतो. सर्व बाजूने डोंगर आणि त्यामध्ये एक मोठं तळं आहे. त्यात पावसाळ्याच्या तोंडावरही चांगलं पाणी आणि आजूबाजूला चांगलं हिरवं गवत आहे. जणू काही आत्ता एखादा हरणाचा कळप चरायला येईल आणि त्यापाठोपाठ घनदाट जंगलातून पटेरी वाघ त्यांचा पाठलाग करु लागेल.
या डोंगराच्या माथ्यावर दोन खुप मोठ्या शिळा आहेत. त्यांच्यामध्ये दोन तीन फुटांचे अंतर आहे, खालपासून वरपर्यंत सारखेच. त्यातून पुढे थोडं उतरत गेलं की आपण पुन्हा दोन्ही डोंगरांच्या मध्ये पोहचतो. झाला किल्ला पाहून असं वाटून आपण परत फिरण्याची शक्यता असते. आम्ही ती खरी ठरवत उतरायलाही सुरवात केलेली. पण पाहिला तो किल्ला वाटत नाही... दुसरा डोंगर चेक करुन पाहूच म्हणत आम्ही पुन्हा परत फिरलो.
किल्ल्याला एकच दरवाजा आहे आणि तो ही पुर्वेकडून अशी ओझरती माहिती होती. दिशांचा घोळ टाळण्यासाठी कंपास (होकायंत्र) काढलं. दिशा सेट केल्या आणि मग रिकाम्या जागी पाय टाकत आणि त्यासाठी गरजेनुसार जागा रिकामी करत उजवीकडील डोंगराला उजवी घालायला सुरवात केली. वरच्या तटबंदी दिसू लागल्या वाट काढत त्या पार करत गेलो आणि केवळ नामोल्लेखापुरते असलेले पुर्वेकडचे प्रवेशद्वार काढले.
तटबंदी, त्यावरुनचे व्हू पॉईंट्स, गडावरील वास्तव्यच्या खाणाखुणा, खडकात ठरावीक अंतरावर खोदलेले खड्डे, खडकांचे सपाट चबुतरे... असं भरपूर काही पाहत हा टप्पा पार करुन किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.
खोब्रागड हा नैसर्गिक किल्ला आहे. तत्कालीन राजांनी या किल्ल्याची जी बांधबंदिस्ती, तट बांधणी केली आहे, तिला आजही तोड नाही. काही ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. पण तरीही तिला तोल आणि मोल कमी झालेले नाही. गडावरील वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. त्यांचे चौथरे गतवैभवाची साक्ष देताहेत. गडाला अनेक टप्प्यात तटबंदी आहे. त्या सर्वाचा मुकूटमणी म्हणजे बालेकिल्ला.
बालेकिल्ल्याला पश्चिमेच्या बाजूला मोठी, मध्यम मोठ्या आकाराच्या दगडांची बांधीव तटबंदी आहे. तसा संपूर्ण बालेकिल्लाच बांधीव आहे. पण पुर्वेकडची बाजू ही त्याची सिग्नेचर ठरावी एवढी सुंदर आहे. या तटबंदीतून घालच्या टप्प्यातून बालेकिल्ल्यात यायला एक छोटा रस्ता आहे. आजही तो जसाच्या तसा शाबूत आहे. फक्त आतल्या बाजूने तो दगडमातीने गाडला गेल्याने गुडघे आणि कोपर वा पंजांवर सपाट होत त्यात घुसावं लागतं एवढंच. तीन चार लोकांनी चार पाच तास श्रमदान केलं तर खोब्रागडच वैशिष्ट्य असलेली ही बालेकिल्ल्याच्या तटबंदीची वाट गतवैभव मिळवू शकेल.
बालेकिल्ल्यावरुन चहोबाजूचा नयनरम्य घनदाट परिसर डोळ्यांची पारणे फेडतो. पुर्वेला थेट छत्तीसगडपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल, टिपागड डोंगररांगा.. दुसरीकडे वैरागड, धानोऱ्याची बाजू आणि कुरखेड्याकडेही... जिकडे पाहू तिकडे जंगलच जंगल. येथून जे काही दृष्टीक्षेपात येतं त्यावरुन या किल्ल्याचं मोल स्पष्ट होतं. हे नुसतं वाचून नाही कळणार... प्रत्यक्ष अनुभवायला हवं. तो थंडगार मनमोकळा वारा उऱात साठवत नजर क्षितीजापर्यंत खेळवायला हवी. मग जी अनुभूती येते ती चिरकाळ उरात साठली नाही तर नवल. येवून जावून चार किलोमिटर भरलेल्या या दुर्गभ्रमंतीला पाच तास लागले. निवांत सर्व काही पाहिलं, अनुभवलं, काळजात साठवलं.
या किल्ल्यावर खोब्रा नागवंशातील राजा नित नेवरा कुलसंगे यांचे अधिपत्य होते. त्यांच्या ताब्यात 52 गड आणि 184 परगण्यांचा कारभार होता, असे म्हणतात. (या किल्ल्यांची नावे आम्ही शोधत आहोत. कुणालाकडे काही संदर्भ असेल तर द्यावा.) नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी (भोसले दप्तर अभ्यासणे बाकी आहे.) आक्रमण करुन येथील राजाचा पराभव केला व गडाची नासधुस केली. पुढे या परिसराकडे भोसल्यांचे दुर्लक्ष झाले तेव्हा याच गोंडवंशातील राजा दुर्गशाह सयाम याने शाह घराण्याची स्थापना केली, असे जुणे जाणकार सांगतात.
गडचिरोली म्हणजे गोंडवणाचं काळीज. गोंडवणा साम्राज्याच्या लौकीक आजही जागता ठेवणारे आणि अगदी रामायण महाभारतापासूनचा वारसा सांगणारे अनेक किल्ले या भागात आहेत. याशिवाय संख्यात्मक दृष्ट्या आकडेवारीत येणारे पण प्रत्यक्षात नाव, गाव, किल्ल्याचा कुठेही उल्लेख वा संदर्भ नसलेलेही काही किल्ले गोंडवणात आहेत.
मुळात आदीवासी भागातील किल्ले आणि उर्वरीत भारतातील किल्ले यात मोठा फरक आहे. गोंदिया-गडचिरोलीतील घनदाट डोंगररांगांमधील कचारगड, प्रतापगड, टिपागडसारखे गिरीदुर्ग अभ्यासताना हा फरक प्रकर्षाने जाणवतो. त्यातल्या त्यात सपाटीच्या भागातील वैरागड, सानगढी, पवनी, भंडारा, आंबागड असे किल्ले उर्वरीत भारताच्या स्थापत्यशास्राशी नाते सांगतात. पण मध्य भारतातील ऐन घनदाट जंगलांच्या मध्यातील वनदुर्गांची बातच वेगळी आहे.
गडचिरोली-गोंदियात अनेक डोंगर गड म्हणून ओळखले जातात. त्या डोंगराखालील गावांच्या नावात गड नाही, पण डोंगरांच्या नावात गड आहे. कदाचीत तत्कालीन आदिवासी बांधव या डोंगरांच्या माथ्यावर वस्ती करुन, आवश्यक तेवढी तात्पुरती बांधबंदीस्तीसारखी तटबंदी करुन नैसर्गिक स्थितीचाच वापर गिरीदुर्ग म्हणून करत असावेत. त्यातूनही त्यांना गड म्हणून अधिष्ठान प्राप्त झाले असावं.
दुर्गांचा वापर करणारा समाज, वापराचा कालावधी, तत्कालीन युद्धकला व युद्धसामग्री या सर्वाचा विचार करता डोंगरांचे गड म्हणून असलेले स्थान व वापरही वादातीत आहे. अशा वनदुर्ग, गिरीदुर्गांचाही धांडोळा घ्यायचा शिवनेरी ट्रेकर्सचा प्रयत्न आहे. न जाणो यातून खोब्रागडासारखं अजून एखादं चांगलं दुर्गरत्न हाती लागायचं...
- - - -
किल्ले खोब्रागड, खोब्रामेंढा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली.
मोहिम दिनांक : 6 जून 2020, शनिवार
सहभागी टीम शिवनेरी ट्रेकर्स : संतोष डुकरे Santosh Dukare नागेश ठोंबरे Nagesh Thombare नितिन पंडीत Nitin Pandit कैलास उईके @kailas uike
साभार - शिवनेरी ट्रेकर्स



बाजागड... गडचिरोली जिल्ह्यातील पूर्णतः दुर्लक्षित प्राचिन वनदुर्ग. महाराष्ट्र - छत्तिसगड सीमेजवळील कुलभट्टी (ता. धानोरा) गावाजवळील जंगलात आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या या किल्ल्यावर घंटा किंवा तत्सम धातूवाद्यांसारखा वाजणारा एक दगड आहे. गोंडी धर्मगुरू इथे 18 प्रकारची वाद्य एकाच वेळी वाजवत अशी अख्यायिका आहे. वाटा हरवलेल्या घनदाट निर्मनुष्य जंगलातील सर्वात उंच डोंगराच्या माथ्यावर बालेकिल्ला आणि त्यातील दगडांच्या राशीवर विराजमान असलेलं हे नादब्रम्ह...
(Video - शिवनेरी ट्रेकर्स टीम)

आदिम संस्कृतीचा नाद घुमवणारा... बाजागड !
इतिहास वा वर्तमानाच्या पटावरुन नाहीसे झालेले, ट्रेकिंगच्या क्षितिजावर उदयाला न आलेले दुर्लक्षित किल्ले शोधण्याच्या मोहिमेतलं शिवनेरी ट्रेकर्सचं या आठवड्यातील दुर्गरत्न... बाजागड !
गडांची (किल्ल्यांची) संख्या खूप म्हणून जिल्ह्याचं नाव गडचिरोली, पण माहित असलेले किल्ले मात्र जेमतेम तीन... टिपागड, वैरागड, सुर्जागड... त्यापलीकडे चौथं नाव येत नाही. उर्वरीत किल्ल्यांच्या शोधमोहिमेत खोब्रागड व भोवरागडानंतर बाजागड ची पहाणी करायचं ठरलं आणि भल्या पहाटेच शिवनेरी ट्रेकर्सची टीम गडचिरोलीहून धानोराकडे रवाना झाली.
बाजागडचे जे काही ऑनलाईन, ऑफलाईन संदर्भ उपलब्ध आहेत... ते महाराष्ट्र छत्तिसगड सीमेजवळच्या कुलभट्टी गावानजीकच्या जंगलातील बाजागड डोंगरावरील धातुवाद्यांप्रमाणे वाजणाऱ्या दगडाचे. हा दगड आणि गोंडी आदिवासींचे श्रद्धास्थान म्हणून गडचिरोलीकरांना हा डोंगर माहित आहे. किल्ला म्हणून त्याकडे कुणी गांभिर्याने पाहिलेलं नाही, ना तसा कुठं कुणी उल्लेख केल्याचं आढळतं. गड किल्ले किंवा इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात त्याचा अद्याप उल्लेख नाही. असो...
मजल दरमजल करत आम्ही कुलभट्टीला पोहचलो. गावात चौकशी केली. किल्ल्यावर फार कुणी जात नसल्यानं आणि एक दोन पाऊस पडून गेले असल्यानं डोंगरातल्या वाटा आता नाहीशा झाल्या असतील, फार फार तर पायथ्याच्या तळ्यापर्यंत जाता येईल, असं सगळ्यांच मत पडलं.
जरा विनवण्या केल्यानंतर लथखोर राऊत हे हरहुन्नरी बहुआयामी जेष्ठ व्यक्तीमत्व आमचा वाटाड्या व्हायला तयार झालं. पहिले घरात गेले आणि कुऱ्हाड खांद्यावर टाकून आले. सुरवातीचं सपाट मोकळं जंगल, मग खाचरं व वहित सुरु असलेली वावरं पार करुन बाजागडच्या शेजारच्या डोंगराचा पायथा गाठला. वाटांचा पत्ता नव्हता. राऊत भाऊ, काका, मामा दिशा धरुन त्या घनदाट जंगलात वाट काढत चढू लागले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपली टीम चालत राहीली.
एका ठिकाणी डोंगराच्या पोटाशी एक मोठा दगड व त्याच्या बुडाशी एक दगडी हौद लागला. बाजागडात उगम पावणाऱ्या इथल्या मुख्य नदीचं ते उगमस्थान होतं. या हौदातून वर्षभर पाणी वाहत असतं, आताही तो भरलेला होता. येथून पुढं गडाची खरी चढाई होती.
दीड दोन तासांच्या चढाईनंतर गडमाथा गाठला. तटबंदी स्वागत करत होती. संपूर्ण माथा, तटबंदी, त्यालगतची बायोडायव्हर्सीटी, दगडांच्या राशी, वाजणारा दगड आदी सर्व नजरेखालून घातलं, जरा बारकाईनं अभ्यासण्याचा प्रयत्न केला आणि परत फिरलो.
येताना राऊत मामांनी झाडांना कुऱ्हाडीनं खुणा केल्या होत्या. (कसंतरी वाटत होतं मनात, पण झाडं त्यांची, जंगल त्यांचं आपण पाहुण्या मानसानं काय बोलायचं अशा भयाण ठिकाणी म्हणून त्यांना अशा खुणा करु नका, त्याऐवजी आपण दगडावर दगड रचू... थोडा पाला तोडून टाकू वगैरे सांगण्याचा आगाऊपणा केला नाही.) त्यामुळे जाताना पटकन जाऊ असं वाटलं. पण कसलं काय...
त्या घनघोर जंगलात एका ठिकाणी राऊत मामा हतबल होवून बसला, बीडी पेटवली आणि आभाळात ढग सोडत म्हणाला... *मै इथर बहुत घुमा... पर अब घुम गया* 😨 म्हणजे वाट चुकलीेये आणि काहीच सापडत नाहीये. मग आमचं होकायंत्र बाहेर आलं आणि दिशा धरत सुरू झाला एक थरारक प्रवास...
मामांच्या मनाची चलबिचल जरा शांत होवू दिली.त्याच्या मनात विश्वास भरला. "तुम जिधर बोलोगे उधर जायेंगे... खाली छत्तीसगड मत लेके जाना बस्स" 🥺
अनेकदा... "इथच थांबा. म्हणून मामा हातातली कुऱ्हाड सावरत दिसेनासा व्हायचा. बराच वेळ कानोसा आला नाही की आता मामाला शोधायला शोधमोहीम राबवावी लागते की काय... असं वाटून जायचं.
टीमचा अनुभव, होकायंत्र आणि राऊत मामांची 'दिल की आवाज' कामी आली आणि आम्ही गावकुसात आलो, नक्की महाराष्ट्रातच आलोय ना... की छत्तिसगडला उतरलोय... याची चारदा खात्री करून घेतली तो भाग वेगळा.
- - - - -
बाजागड मोहिमेतील काही महत्वाची निरिक्षणे...
1) स्थानिक आदिवासींच्या जीवनात या किल्ल्याचं स्थान मानाचं आहे. स्थानिक लोकं त्याला बाजागड किल्ला म्हणूनच ओळखतात.
2) बाजागड किल्ला खुप प्राचिण आहे. गोंड राजांच्याही आधीचा... अगदी आदिवासींच्या सुरवातीच्या अवस्थेपासूनचा... असे इथले आदिवासी बांधव सांगतात. आदिवासींच्या मुळ स्थानांपैकी ते एक पवित्र स्थळ मानले जाते.
3) टिपागड पे पूजन होता था, बाजागड पे बाजा बजता था और बैरागड पे भोजन होता था..! असं स्थानिक आदिवासी सांगतात. यातून इथल्या आदिवासी जीवनात रुढ असलेल्या टिपागड, वैरागड व बाजागड या तिन किल्ल्यांचं कोरिलेशन... परस्पर संबंध स्पष्ट होतात. अशा अनेक किस्से कहाण्या आहेत... त्यांचे डॉक्युमेंटेशन करणं ही एक स्वतंत्र मोहिम होऊ शकेल.
4) बाजागड हा त्या भागातला सर्वात उंच डोंगर आहे. त्याचा माथा बालेकिल्ल्यासारखा आहे आणि तशीच त्याला तटबंदी आहे.
5) ही तटबंदी संपूर्ण रचलेली दगडी भिंत आहे, काही ठिकाणी ती पाच सहा फुट शाबूत आहे, बहुतेक ठिकाणी तिचा बेस कायम आहे, मात्र ती बरीच उंच असावी व गेल्या काही शतकांपूर्वीच ती उध्वस्त होवून तिचे दगड तटबंदीपासून खाली घरंगळत गेल्याचे दिसते.
6) तटबंदीच्या आतील भाग सपाट, घरांच्या बेससारखा आहे. आता त़्यात बांबूची अनेक बेटं वाढलीत.
7) गडाच्या तटबंदीच्या आतील जागा पुर्वजांच्या वास्तव्याची म्हणून पवित्र मानली जाते. ते गडाची पुजा करतात, त्या भागात गेल्यावर तटबंदीच्या बाहेर चप्पल काढतात.
😎 गडाच्या माथ्यावर, तटबंदीच्या आत किंवा आसपास कुठंही कोणताही देव, देऊळ, शेंदूर फासलेला दगड वगैरे काही नाही.
9) घंटेसारखा वाजणारा धातूचा दगड हे तिथलं मुख्य आकर्षण आहे. पण त्या दगडाची पुजा वगैरे होत नाही. तो दगड किल्ल्याच्या आत आहे.
10) तटबंदीशेजारीच गडूर नावाचं एक खुप मोठ्या खोडाचं उंच झाड आहे. त्याला या भागात सापाचं झाड म्हणून ओळखतात. या जंगलातलं ते एकमेव आहे म्हणतात. त्याला दीड दोन हात लांब फळं (शेंगा) येतात. साप चावल्यावर त्या झाडाच्या शेंगा उगळून तो लेप पाजतात व दंशाच्या ठिकाणी लावतात.
11) लथखोर राऊत व इतर काही आदिवासींकडं किल्ल्याच्या अनुषंगाने काही जुनी कागदपत्रे, माहिती आहे. मात्र ती शोधायला वेळ लागणार असल्याने उपलब्ध होवू शकली नाहीत.
12) किल्ला जीवंत जलसाठा आहे. भर उन्हाळ्यातही पाझरत असतो. त्याच्या मध्यावर नदीचं एक उगमस्थान आहे, त्याच्या कुंडातून पाणी वर येत असतं डोंगरात आडवी विहीर असल्यासारखं. पायथ्याला सगळीकडून तलाव आहेत, अजूनही त्यात बऱ्यापैकी पाणी आहे.
13) या भागात वृक्ष, वेली व इतर वनस्पतींची डायव्हर्सिटी प्रचंड आहे. येन, बांबू, शिसम, कुम्ही, केरा, आमटा, मोह, हिरडा, बेहडा आदी असंख्य मोठे वृक्ष आहेत. मोर, रानडुकरे, विविध प्रकारचे सर्प, वाघ आदी जंगली प्राणी व श्वापदांचा वावर असल्याचे स्थानिक सांगतात.
14) हा भाग आदिवासींच्याही एकदम इंटेरियर कोअर झोनचा, गाभ्याचा आहे. इथल्या बहुसंख्य आदिवासी स्रिया अजूनही चोळी घालत नाहीत. लुगडंच लपेटलेलं असतं अंगाला. वापरातील अनेक वस्तूही युनिक कलाकुसरी व सजावटीच्या आहेत. माणसं अतीशय मृदू स्वभावाची, मितभाषी व चांगली आहेत. हिंदी ही मुख्य भाषा आहे. मराठी समजत नाही अनेकांना.
15) तंबाखुचा बटवा, लहान मुलांचे पाळणे ते अगदी मासे व तत्सम शिकारीची साधणे आणि शेती अवजारे लाकडाचीच असल्याचं दिसतं. पारंपरिक शेती अवजारांमध्येही मोठी विविधता आहे.
- - -
शिवनेरी ट्रेकर्स, टीम बाजागड : संतोष डुकरे (पुुणे), नागेश ठोंबरे (सांगली), नितिन पंडित (नांदेड), तेजदीप ढगे (सातारा), निलेश मांद्रे (चंद्रपूर); स्थानिक वाटाड्या - लथखोर राऊत, कुलभट्टी


बुधनेश्वर प्राचीन शिव मंदिर, मढ, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यांत मढ नावाच्या गावात बुलढाणा ते अजिंठा मार्गावर असलेले अति प्राचीन बुधनेश्वर देवस्थान. या मंदिराचे बांधकाम पुर्ण दगडात झालेले असून हेमाडपंथी शैलीचे दिसून येते. अत्यंत सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पैनगंगा नदीच्या उगमाने पावन झालेले बुलढाणा येथील जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. मंदिराच्या मागिल बाजूला एक गोमुख आहे. त्यातून पाणी कुंडात येते आणि कुंडातून पैनगंगा नदीचा उगम सुरू होतो.
या मंदिराची स्थापना लिखीत पुराव्यानुसार 1639 मध्ये झाली तसा तिथे शिलालेख उपलब्ध आहे. हे शिव मंदिर अतिशय प्राचीन असून गाभार्यात महादेवाची पिंड आहे. ही पिंड पंचमुखी आहे. मंदिरात प्राचीन मुर्ती सुध्दा येथे आढळतात. शासनाने काही वर्षांपूर्वी या मंदिराला “बी” तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. सध्या मंदिराचा जुना सभामंडप काढून नवीन जिर्णोध्दाराचे काम सुरू आहे.


नयनरम्य, निसर्गरम्य गडचिरोली 😍
ठिकाण - पेठा, ऐटापल्ली, गडचिरोली

सात बहिणींचा डोंगर - पेरजागड
सोनापूर, चंद्रपूर


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
यवतमाळ जिल्ह्यातील पुरातन मंदिरे :

जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
चंद्रपूर जिल्ह्यातील मंदिरे :

जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
बुलढाणा जिल्ह्यातील मंदिरे :

जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
चंद्रपूर जिल्ह्यातील बारव :



जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
वर्धा जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
भंडारा जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
नागपूर जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
वाशिम जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
यवतमाळ जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
अकोला जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
अमरावती जिल्ह्यातील बारव :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
बुलढाणा जिल्ह्यातील बारव :


वीर हनुमान मंदिर, अड्याळ, भंडारा
अड्याळ हे गाव भंडारापासून सुमारे 27 कि.मी. अंतरावर, पौनी रोडवर आहे. गावात वीर हनुमानाची 9 फूट उंच मूर्ती आहे. हनुमानाने एका हातात डोंगर धरला आहे आणि त्याच्या पाया खाली दानव जंबुमलीला पायदळी तुडवताना दिसत आहे. या मंदिराच्या असेंब्ली हॉलमध्ये भगवान महादेवाचे एक छोटेसे मंदिर आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळापासून हनुमान आणि महादेव लिंग यांचे दैवत इथे आहेत आणि सुमारे १८९५ च्या सुमारास अड्याल येथील श्री साधूजी फुटाणे यांनी हे मंदिर बनवले होते. २००२ साली या दोन्ही मंदिरांचे नूतनीकरण गावकऱ्यांनी केले. हे मंदिर भव्य, सुंदर कलाकृती आहे. राम नवमीला प्रतिमेची भव्य रथयात्रा काढली जाते. ही यात्रा घोडा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि हनुमान जयंतीपर्यंत असते. वाल्मिकी रामायण, ससुन्दर कांडामध्ये रावण हनुमानाचा कब्जा करण्यासाठी प्रहस्ताचा मुलगा जंबुमालीला पाठवितो. जंबुमाली हनुमानावर त्याच्या असंख्य बाणांनी हल्ला करतो. हनुमान जंबुमालीच्या दिशेने एक मोठा खडक फेकतो, परंतु तो त्याला ठार करण्यात अपयशी ठरतो. मग हनुमानाने जांभूमलीकडे एक मोठे सालआचे झाड फेकून त्याचा वध करतो. हे प्राचीन दैवत वाकाटक काळापासून किंवा त्यापूर्वीचे सुद्धा असू शकते. असे म्हणतात की देवता स्वयंभू आणि जागृत आहे. जवळच खेडेगावात, चकारा येथे एक सुंदर प्राचीन मंदिर आहे.
माहिती - श्री चंद्रकांत भुते



जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
गडचिरोली जिल्ह्यातील किल्ले :


जागतिक वारसा सप्ताह (१९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर)
भंडारा जिल्ह्यातील किल्ले :


सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेली ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेली ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. रामजन्मोत्सवनिमित्त मंदिरातून गेल्या ५७ वर्षांपासून निघणारी शोभायात्रेचा आता केवळ नागपूरच नाही महाराष्ट्रात नावलौकिक असून लाखो लोक या शोभायात्रेत सहभागी होत असतात.

रेल्वेस्थानकाला लागून रामझुल्यावरून खाली उतरताना पोद्दारेश्वर राम

मंदिर हा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. १९९१ ला श्रावण महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी त्यावेळच्या रेल्वेस्थानकाजवळ भूमिपूजन झाले होते. रामभक्त आणि समाजसेवी जमनाधर पोद्दार यांनी या मंदिरासाठी त्यावेळी पुढाकार घेतला आणि त्यांनी स्वखर्चाने मंदिराचे बांधकाम केले होते. मंदिराच्या निर्मितीसाठी लाल काळ्या रंगाचे दगड त्यावेळी कोराडी येथून आणले होेते. त्यावेळी खास काशीवरून पंडित प्रभूदत्त हे पौरोहित्य करण्यासाठी आले होते. रामाचे मंदिर पोद्दार परिवाराने बांधले तेव्हापासून पोद्दारेश्वर राम मंदिर म्हणून ओळख निर्माण झाली आहे आणि देशभरात या मंदिराचा नावलौकिक असून देशविदेशातील लोक प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी या मंदिरात येत असतात.

मंदिरात प्रवेश करताच उत्तराभिमुख भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीतामाता यांच्या तीन सुंदर मूर्ती दिसतात. उजवीकडे पूर्वाभिमुख शिवमंदिर आहे. या मंदिरात नर्मदेश्वर शिवलिंगासह भगवान कार्तिकी, गणेश, शेषनाग, पार्वती यांच्या मूर्ती आहेत. दक्षिण व पूर्व यांच्यामधील कोपऱ्यात हनुमंताची सुंदर मूर्ती आहे. याशिवाय सहा खिडक्यांमध्ये हनुमान, विष्णू-लक्ष्मी, गरुड, सुग्रीव, गंगा, महालक्ष्मी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. शंभर पूर्ण वर्षे झालेल्या या अनोख्या मंदिरात सर्व धर्माचे लोक येऊन दर्शन घेत असतात. यावेळी मंदिराचे विश्वस्त पुनीत पोद्दार यांनी सांगितले, आमची पाचवी पिढी मंदिरात कार्यरत असून या मंदिराशी आता लाखो लोक जुळले आहेत. रामनवमीला निघणारी शोभायात्रा ही साऱ्या देशाचे आकर्षणचे केंद्र झाली असून त्यासाठी रामजन्मोसवाच्या तीन महिने आधी तयारी सुरू असते.

सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम 
मंदिरात केवळ धार्मिक नाही तर शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम

राबवले जातात. दर कोजागिरी पौर्णिमेला दम्याच्या रुग्णांसाठी या ठिकाणी औषध दिले जात असून हजारो नागरिक त्याचा लाभ घेतात. येथील औषध घेतल्यानंतर अनेकांचा दम्याचा आजार बरा झाला झाला असल्याचा दावा करण्यात येतो. शिवाय आरोग्य शिबीरासह गरिबांसाठी शैक्षणिक उपक्रमही राबवले जातात.

 


मोमीनपुरा भागातून रामरथावर पुष्पवृष्टी मंदिरापासून काही अंतरावर मोमीनपुरा ही मुस्लिमांची वस्ती आहे.

रामनवमनीनिमित्त निघणारी शोभायात्रा असो की मंदिरात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो मुस्लीम समुदायातील अनेक लोक त्यात सभागी होत असतात. शोभायात्रेच्यावेळी मोमीनपुरा भागातून रामरथावर पुष्पवृष्टी करून प्रभूरामचंद्राचा जयजयकार करतात. ही परंपरा गेल्या ५७ वर्षांपासून सुरू आहे.

बुलडाणा - निलकंठेश्वर मंदिर, सिंदखेड राजा सिंदखेडकर जाधवांच्या घराण्याचे संस्थापक व जीजा मातोश्रीचे जन्मदाते “लखुजी जाधवराव” यांच्या काळात सन १५५७ मध्ये “राघोजी लखुजी जाधवराव” यांनी येथील निळकंठेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केला होता. या अर्थाचा एक अकरा ओळींचा शिलालेख आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत येणारे हे ऐतिहासिक हेमाडपंथी निळकंठेश्वर मंदिर गावाच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. पारंपरिक पद्धतीचे सर्वात जुने बांधकाम आहे. उत्कृष्ट इमारत या ठिकाणाची पूर्वीची भव्यता आणि समृद्धीचे पुरावे देतात. विदर्भातील बुलडाणा जिल्यातील सिंदखेड नावाचे गाव हीच जिजाऊंची जन्मभूमी. उपलब्ध पुराव्यावरून सिंदखेडचे मूळ नाव सिद्धपुर किंवा सिद्धक्षेत्र हे असावे असे वाटते. जुन्या कागदपत्रामधील उल्लेख तसेच येथील निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये शके १५०९ मधील शिलालेख कोरलेला आहे. त्यात “परगणे शीधपूर” असं स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. येथील निलकंठेश्वर मंदिर, पुतळा बारव, रामेश्वर मंदिर यासारख्या प्राचीन अवशेषांवरून सिंदखेड हे बाराव्या शतकापासून अतिशय महत्वाचे स्थळ होते हे दिसून येते. महाशिवरात्री विशेष... बुलडाणा - निलकंठेश्वर मंदिर, सिंदखेड राजा सिंदखेडकर जाधवांच्या घराण्याचे संस्थापक व जीजा मातोश्रीचे जन्मदाते “लखुजी जाधवराव” यांच्या काळात सन १५५७ मध्ये “राघोजी लखुजी जाधवराव” यांनी येथील निळकंठेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार केला होता. या अर्थाचा एक अकरा ओळींचा शिलालेख आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत येणारे हे ऐतिहासिक हेमाडपंथी निळकंठेश्वर मंदिर गावाच्या दक्षिण-पश्चिम भागात आहे. पारंपरिक पद्धतीचे सर्वात जुने बांधकाम आहे. उत्कृष्ट इमारत या ठिकाणाची पूर्वीची भव्यता आणि समृद्धीचे पुरावे देतात. विदर्भातील बुलडाणा जिल्यातील सिंदखेड नावाचे गाव हीच जिजाऊंची जन्मभूमी. उपलब्ध पुराव्यावरून सिंदखेडचे मूळ नाव सिद्धपुर किंवा सिद्धक्षेत्र हे असावे असे वाटते. जुन्या कागदपत्रामधील उल्लेख तसेच येथील निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये शके १५०९ मधील शिलालेख कोरलेला आहे. त्यात “परगणे शीधपूर” असं स्पष्ट शब्दात उल्लेख आहे. येथील निलकंठेश्वर मंदिर, पुतळा बारव, रामेश्वर मंदिर यासारख्या प्राचीन अवशेषांवरून सिंदखेड हे बाराव्या शतकापासून अतिशय महत्वाचे स्थळ होते हे दिसून येते. #vidarbha_darshan #Buldanakatta 🚩🚩बुलडाणा कट्टा पेज🚩🚩 बुलडाणा जिल्ह्याचं मानाचं पेज दीक्षाभूमी जातीयतेचे चटके सोसत दलित समाज हजारों वर्षांपासून खितपत पडला होता... गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या समाजाला, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रात बांधणाऱ्या बौध्द धम्माची दीक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली... या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेलं स्थान म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी... 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमी होती... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौध्द धम्माची दीक्षा घेतली... तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो... या दिवसाची आठवण म्हणून दीक्षाभूमीवर एक भव्य वास्तू बांधण्यात आलीय... नाग लोकांचं वास्तव्य असलेलं ठिकाण म्हणजे नागपूर... तथागत बुध्दांचा संदेश नाग लोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला... तसंच विजयादशमीला सम्राट अशोकांनं कलिंगची लढाई जिंकली होती... या विजयानंतर सम्राट अशोकांनं बौध्द धम्माचा स्वीकार केला होता... त्यामुळेच धम्माची दीक्षा देण्यासाठी नागपूर हे ठिकाण आणि विजयादशमीचा दिवस निवडला गेला... धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीचा परिसर बौध्द बांधवांच्या गर्दीनं गजबजून जातो... पंचशील ध्वजांनी सारा परिसर सजलेला दिसतो... जय भीमच्या जयघोषानं वातावरण भारलेलं असतं... कुठं बुध्दवंदना, कुठं सभा, कुठं भीमबुध्दगीतांचा कार्यक्रम, यांनी परिसर न्हाऊन निघतो... स्तुपाच्या दर्शनासाठी यादिवशी देशभरातून बौध्द बांधव दीक्षाभूमीला भेट देतात... पुस्तकांचे स्टॉलही येथे मोठ्या प्रमाणात लावले जातात... या दिवशी हजारों पुस्तकांची विक्री होते... या ऐतिहासिक स्थानाला केवळ बौद्ध बांधवच नाही, तर नागपूरला आलेला पर्यटकही हमखास भेट देतच असतो... जागतिक मानवतावादाचं मूर्तीमंत उदाहरण असलेलं दीक्षाभूमी केवळ श्रध्देचं स्थान नाही, तर एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळींचं प्रेरणास्थान बनलेलं आहे... - निकेश जिलठे #vidarbha #vidarbhadarshan #vidarbha_darshan #nagpur दीक्षाभूमी जातीयतेचे चटके सोसत दलित समाज हजारों वर्षांपासून खितपत पडला होता... गुलामगिरीच्या साखळदंडात अडकलेल्या समाजाला, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रात बांधणाऱ्या बौध्द धम्माची दीक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिली... या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेलं स्थान म्हणजे नागपूरची दीक्षाभूमी... 14 ऑक्टोबर 1956 ला विजयादशमी होती... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह याच दीक्षाभूमीवर बौध्द धम्माची दीक्षा घेतली... तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो... या दिवसाची आठवण म्हणून दीक्षाभूमीवर एक भव्य वास्तू बांधण्यात आलीय... नाग लोकांचं वास्तव्य असलेलं ठिकाण म्हणजे नागपूर... तथागत बुध्दांचा संदेश नाग लोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला... तसंच विजयादशमीला सम्राट अशोकांनं कलिंगची लढाई जिंकली होती... या विजयानंतर सम्राट अशोकांनं बौध्द धम्माचा स्वीकार केला होता... त्यामुळेच धम्माची दीक्षा देण्यासाठी नागपूर हे ठिकाण आणि विजयादशमीचा दिवस निवडला गेला... धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीचा परिसर बौध्द बांधवांच्या गर्दीनं गजबजून जातो... पंचशील ध्वजांनी सारा परिसर सजलेला दिसतो... जय भीमच्या जयघोषानं वातावरण भारलेलं असतं... कुठं बुध्दवंदना, कुठं सभा, कुठं भीमबुध्दगीतांचा कार्यक्रम, यांनी परिसर न्हाऊन निघतो... स्तुपाच्या दर्शनासाठी यादिवशी देशभरातून बौध्द बांधव दीक्षाभूमीला भेट देतात... पुस्तकांचे स्टॉलही येथे मोठ्या प्रमाणात लावले जातात... या दिवशी हजारों पुस्तकांची विक्री होते... या ऐतिहासिक स्थानाला केवळ बौद्ध बांधवच नाही, तर नागपूरला आलेला पर्यटकही हमखास भेट देतच असतो... जागतिक मानवतावादाचं मूर्तीमंत उदाहरण असलेलं दीक्षाभूमी केवळ श्रध्देचं स्थान नाही, तर एक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळींचं प्रेरणास्थान बनलेलं आहे... - निकेश जिलठे #vidarbha #vidarbhadarshan विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल" चंद्रपूर येथील गोंडराजे राजा बिरशहा यांचे निधना नंतर त्यांचे आठवणीखातीर राणी हिराई ने बांधलेली सुंदर वास्तू खऱ्या अर्थाने प्रेमाचे प्रतीक आहे। "एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एकमेव वास्तू असावी...." राजा बिरशाह यांची समाधी (सुंदर वास्तू) राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कार्यातून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास बघितला पाहिजे, युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता विशिष्ट दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून नि कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, याकरिता प्रेमदिनाचे पाश्चिमात्य प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून दरवर्षी इको-प्रो संस्था, चंद्रपूर व एफ ई एस महिला महाविद्यालय, चंद्रपूर यांचे वतीने राजा बिरशाह यांच्या समाधीवर पुष्पअर्पण करून इतिहासाच उजाळा दिला जातो विदर्भाची ओळख जगाच्या नकाशावर Tiger capital of india अशीच आहे त्यात ताडोबा हे वाघ बघायचे असल्यास हक्कांची जागा..या करता पण बरेच पर्यटक चंद्रपुर ला भेटी देतात पण शहरातील या हाकेच्या अंतरावर असलेल्या या वारसास्थळाला भेट देण्यास मुकतात... त्या करता हा छोटेखानी प्रयत्न... माहिती व फोटो :- Vishal Ravindra Deokar #शेयर_करायला_विसरू_नका विदर्भातील दुर्लक्षित "ताजमहाल" चंद्रपूर येथील गोंडराजे 'राजा बिरशहा' यांचे निधना नंतर त्यांचे आठवणीखातीर 'राणी हिराई' ने बांधलेली सुंदर वास्तू खऱ्या अर्थाने 'प्रेमाचे प्रतीक' आहे। "एखाद्या राणीने राजाच्या आठवणीखातीर बांधलेली एकमेव वास्तू असावी...." राजा बिरशाह यांची समाधी (सुंदर वास्तू) राणी हिराई ने बांधून त्यांच्या प्रति असलेले प्रेम आपल्या कार्यातून अजरामर केले. या निरागस प्रेमाचा इतिहास बघितला पाहिजे, युवकांनी क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, आपल्या विविध नात्यातील प्रेम व्यक्त करण्याकरिता 'विशिष्ट' दिवसाची गरज नसून ते आपल्या वागणुकीतून नि कार्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, याकरिता प्रेमदिनाचे पाश्चिमात्य प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न म्हणून दरवर्षी 'इको-प्रो संस्था, चंद्रपूर व एफ ई एस महिला महाविद्यालय, चंद्रपूर यांचे वतीने 'राजा बिरशाह' यांच्या समाधीवर पुष्पअर्पण करून इतिहासाच उजाळा दिला जातो विदर्भाची ओळख जगाच्या नकाशावर Tiger capital of india अशीच आहे त्यात ताडोबा हे वाघ बघायचे असल्यास हक्कांची जागा..या करता पण बरेच पर्यटक चंद्रपुर ला भेटी देतात पण शहरातील या हाकेच्या अंतरावर असलेल्या या वारसास्थळाला भेट देण्यास मुकतात... त्या करता हा छोटेखानी प्रयत्न... माहिती व फोटो :- Vishal Ravindra Deoka . सिंदखेड राजामधील ऐतिहासिक ठिकाणे सिंदखेडराजा या गावाची निर्मिती अतिशय कल्पकतेने करण्यात आली होती. जेथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, तो लखुजी जाधव यांचा वाडा वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. या राजवाड्याची उभारणी १५७६मध्ये पूर्ण झाली. राजवाड्याचे भव्य प्रवेशद्वार तेथील समृद्धीची साक्ष देते. दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार तीन मजली आहे. सर्वप्रथम खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षक भिंत असलेला सज्जा आहे. प्रवेशद्वारावर दगडांत कोरलेले १४ नारळांचे तोरण आहे. सद्यस्थितीत केवळ एक-दोन नारळांच्या शिल्पकृती मूळ स्वरूपात आहे. प्रवेशद्वाराची उंची ११.६५ मीटर आहे. राजवाड्याला भक्कम तटबंदी होती. त्यावर टेहळणीसाठी आवश्यक यंत्रणाही होती. राजवाड्यात १२ दालने, वैशिष्ट्यपूर्ण तळघर, त्यात हवा येण्यासाठीची व्यवस्था होती. परंतु आता त्यातील अनेक वास्तूंचे केवळ काही अवशेषच शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यास जुन्या तोफा व इतर साहित्य दिसते. थोडे पुढे गेल्यानंतर म्हाळसा महालाचे अवशेषच दिसतात. जिजाऊंचा जन्म येथेच झाला होता. सध्या तेथे एक दगडी खोली असून त्यात जिजाऊ व बालशिवाजीचा पुतळा बसविला आहे. दारावर जिजामाता जन्मस्थान अशी पाटी आहे. जिजाऊंचे बालपण येथेच गेले. त्यांचा विवाह होईस्तोवर त्यांच्या आई-वडिलांनी जिजाऊंना आदर्श संस्कार दिले. त्यांना स्वभिमानी व करारी बाणाही शिकविला. स्वराज्य व सुराज्याची पायाभरणी अशी सिंदखेडराजा येथेच झाली होती, असे म्हणायला हरकत नाही. या जवळच नृत्यमहाल किंवा कंचनी महाल आहे. काही अंतरावर लखुजी जाधव यांची समाधी आहे. तीही शिल्पकलेच्यादृष्टीने कल्पक आहे. प्रवेशद्वारावर हत्तीस्वार सिंहाच्या दोन मूर्ती आहेत. शिलालेखही आहे. सिंदखेड राजा-जालना मार्गावर मोती तलाव आहे. देऊळगावहून सिंदखेडमध्ये प्रवेश करताच चांदनी तलाव दिसतो. मोती तलाव-चांदणी तलाव हे दोन्ही तलाव जलअभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत. लखुजी जाधव यांच्यापूर्वीचे नीळकंठ आणि रामेश्वर ही मंदिरे आहेत. जवळपास २५ देवालये, मठ, तीन मशीदी, दोन दर्गे, चावड्या, वाडे, पुष्करण्या आदी वैभव येथे आहे. जिजामाता यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा गावांच्या मध्यभागी प्रस्तापित आहे. राजवाड्याला भव्य असे लाकडाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक नगरखाना बांधलेला आहे. लहान पण सुंदर अशी बाग राजवाड्याच्या आत तयार केली गेलेली आहे. जिजामाता यांचा पुतळा बागेमध्ये उभा क #vidarbha_darshan #vidarbha #sindhkhedraja #jijamata. सिंदखेड राजामधील ऐतिहासिक ठिकाणे सिंदखेडराजा या गावाची निर्मिती अतिशय कल्पकतेने करण्यात आली होती. जेथे राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, तो लखुजी जाधव यांचा वाडा वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. या राजवाड्याची उभारणी १५७६मध्ये पूर्ण झाली. राजवाड्याचे भव्य प्रवेशद्वार तेथील समृद्धीची साक्ष देते. दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार तीन मजली आहे. सर्वप्रथम खाली देवड्या, त्यावर नगारखाना व त्यावर संरक्षक भिंत असलेला सज्जा आहे. प्रवेशद्वारावर दगडांत कोरलेले १४ नारळांचे तोरण आहे. सद्यस्थितीत केवळ एक-दोन नारळांच्या शिल्पकृती मूळ स्वरूपात आहे. प्रवेशद्वाराची उंची ११.६५ मीटर आहे. राजवाड्याला भक्कम तटबंदी होती. त्यावर टेहळणीसाठी आवश्यक यंत्रणाही होती. राजवाड्यात १२ दालने, वैशिष्ट्यपूर्ण तळघर, त्यात हवा येण्यासाठीची व्यवस्था होती. परंतु आता त्यातील अनेक वास्तूंचे केवळ काही अवशेषच शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यास जुन्या तोफा व इतर साहित्य दिसते. थोडे पुढे गेल्यानंतर म्हाळसा महालाचे अवशेषच दिसतात. जिजाऊंचा जन्म येथेच झाला होता. सध्या तेथे एक दगडी खोली असून त्यात जिजाऊ व बालशिवाजीचा पुतळा बसविला आहे. दारावर 'जिजामाता जन्मस्थान' अशी पाटी आहे. जिजाऊंचे बालपण येथेच गेले. त्यांचा विवाह होईस्तोवर त्यांच्या आई-वडिलांनी जिजाऊंना आदर्श संस्कार दिले. त्यांना स्वभिमानी व करारी बाणाही शिकविला. स्वराज्य व सुराज्याची पायाभरणी अशी सिंदखेडराजा येथेच झाली होती, असे म्हणायला हरकत नाही. या जवळच नृत्यमहाल किंवा कंचनी महाल आहे. काही अंतरावर लखुजी जाधव यांची समाधी आहे. तीही शिल्पकलेच्यादृष्टीने कल्पक आहे. प्रवेशद्वारावर हत्तीस्वार सिंहाच्या दोन मूर्ती आहेत. शिलालेखही आहे. सिंदखेड राजा-जालना मार्गावर मोती तलाव आहे. देऊळगावहून सिंदखेडमध्ये प्रवेश करताच चांदनी तलाव दिसतो. मोती तलाव-चांदणी तलाव हे दोन्ही तलाव जलअभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत. लखुजी जाधव यांच्यापूर्वीचे नीळकंठ आणि रामेश्वर ही मंदिरे आहेत. जवळपास २५ देवालये, मठ, तीन मशीदी, दोन दर्गे, चावड्या, वाडे, पुष्करण्या आदी वैभव येथे आहे. जिजामाता यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा गावांच्या मध्यभागी प्रस्तापित आहे. राजवाड्याला भव्य असे लाकडाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक नगरखाना बांधलेला आहे. लहान पण सुंदर अशी बाग राजवाड्याच्या आत तयार केली गेलेली आहे. जिजामाता यांचा पुतळा बागेमध्ये उभा आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...