Saturday, March 4, 2023

विदर्भातील पर्यटन ( भाग ३)

 चारठाणा (ता.जिंतूर जि. परभणी) देशपांडे यांचा अप्रतिम वाडा. चारठाणा हे एकमेव गाव आहे महाराष्ट्रातले जिथे एकाच जागी पुरातत्व विभागाने ८ वास्तु संरक्षीत केल्या आहेत. हे गांव हेरीटेज व्हिलेज करावे अशी मागणी आहे. प्राचीन मंदिरे पुष्करणी बारव असलेले फार सुंदर गाव आहे.



नेहमी आढळून येणाऱ्या गणेशपट्टी एेवजी वेगळी पट्टी दिसती आहे. श्री गणेश, देवी सरस्वती व संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज.

मराठवाडा- विदर्भ भागातील चार दिवसांची भटकंती मोहीम.
दहा किल्ले व ऐतिहासिक परिसर भटकंती.
जुलै २०२२
१. टेंभुर्णी - सोलापूर
२. औसा - लातूर
खारोसा- हिंदु लेणी,
निलंगा- निळकंठेश्वर मंदिर
३. उदगीर - लातूर
८ जुलै २०२२
४. कंधार किल्ला - नांदेड
५. नांदेड किल्ला- नांदेड
गुरुद्वारा मंदिर
६. माहूरचा किल्ला
रेणुका देवी मंदिर, माहूर म्युझियम, पांडवलेणी माहूर.
९ जुलै २०२२
हिंदु लेणी- शिऊर.
औंढा नागनाथ
७. जिंतूर - परभणी
८. पाथरी - परभणी
वैजनाथ मंदिर परळी
१० जुलै २०२२
९. धर्मापुरी - बीड
धर्मापुरी मंदिर
१०. धारूर - बीड



















गाविलगड किल्ला, चिखलदरा, अमरावती
हा किल्ला चिखलदर्या जवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य़ गोंडानी घेतला. गाविलगड ह किल्ला विदर्भाचे भूषण आहे. गाविलगडाचा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.
गाविलगडाचे हे वैभवशाली बांधकाम पहाताना सहाजिकच त्याचा इतिहास आपल्या समोर येतो. हा भाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पुर्वी या डोंगरावर गवळी लोकांना मातीचा कोट उभारला होता. अशी वंदता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनिय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे.
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजुक स्थितीमधे अजूनही शाबुत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; मात्र तोही दुर्लक्षित आहे.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम आपल्याला चकीत करते. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे पहात रहावी अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्यावरुन आपण दरवाजामधून प्रवेश करतो. आतील पहारेकर्यांच्या जागा, घुमट पाहून पुढे चालू लागतो. पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चवथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा आपली वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांच्या निवासाचे कक्ष आहेत.
दरवाजाला लागूनच असलेले अशाप्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर आढळत नाही.
मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० कि.मी. वर आहे. मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मि आहे. एस टी महामंड्ळाच्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमीत सुटतात.चिखलदर्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर कडून धारणी हरिसाल, सेमाडोह ते चिखलदरा हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असल्यामुळे हा गाडीरस्ता सुर्यास्त ते सुर्योदय या रात्रीच्या वेळेस बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होवू शकते. चिखलदरा ते गाविलगड हे दोन किलोमिटरचे अंतर असून गाविलगडापर्यंत वाहनाने आपण जावू शकतो. चिखलदर्याच्या कडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.



पुरातन शिव मंदिर, राजगड, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव. गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी. आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला. गावामध्ये मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा वाढवते.































































 पुरातन विरगळ, महागाव, चंद्रपूर
ताडोबाच्या घनदाट जंगलात महागाव येथे पुरातन विरगळी अस्तित्वात आहेत. जंगलात असल्यामुळे हा ऐतिहासिक वारसा अजून दुर्लक्षित आहे. येथे 200 हून अधिक विरगळ आहेत. 1 फुटापासून 6 फुट उंचीच्या लहान मोठ्या विरगळ आहेत. ह्या दगडी विरगळी वर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आहे. विरगळी वर घोडा, हत्ती, सैन्य कोरलेले आहे. विरगळ म्हणजे एखादा विर योद्धा युध्दात मरण पावल्या नंतर त्याच्या आठवणीत हे शिल्प उभारण्यात येत असे.














आपण सर्वांनी होळीचे अनेक प्रकार पाहिले असतील जसे, गोटमार होळी, लठमार होळी, आणि भरपूर वेगळे परंतु विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे होळीच्या सणाला गुद्दलपेंडी असा आगळा- वेगळा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये दोन खुंट्या गडून त्याला एका लांब दोर बांधला जातो. यावर खेळाचे एका वेळेस भरपूर round चालू शकतात. यात एका round मध्ये दोन स्पर्धक दोरीच्या दोन बाजूस उभे राहून त्याला एका हातानी घट्ट धरतात व एकमेकाला गुद्दे (अर्थात बुक्के) पेंडतात (अर्थात मरतात) व ज्याचा हातातून दोर सुटला तो स्पर्धक पराभूत होतो. दर वर्षी या खेळात अनेक लोक भाग घेतात परंतु गेल्या वर्षीपासून संचारबंदी मुळे हा खेळ घेण्यात आला नाही आहे.
------- सुबोध आवारी

होळीला यवतमाळ जिल्ह्यात 'घानमाकड' हाही प्रकार असतो. एक उभं खोड जमिनीत अर्धं पुरून त्याच्या वर आडवा ओंडका खोबण करून बसवतात आणि दोन लहान मुलं त्या आडव्या ओंडक्याच्या दोन टोकांवर बसून तो आडवा ओंडका गोल फिरवतात. जत्रेतल्या खेळण्यासारखे हे खेळणे म्हणजे घानमाकड. साधरणतः होळीलाच तोडलेल्या लाकडांपासून बनवतात. आम्ही फक्त फोटोत पाहिलं. आमच्या वडिलांनी लहानपणी प्रत्यक्ष खेळले आहे.
मेळघाटातील कोरकु आदिवासी आपली संस्कृती आणि परंपरा अजूनही जपून आहेत. त्यांचा वर्षांतील सर्वात महत्वाचा सण आहे होळी आणि रंगपंचमी. बाहेरगावी कामानिमित्त असलेले बांधव होळी साठी आवर्जुन उपस्थित होतात. कोरकु आदिवासी स्वत:ला रावणाचे वशंज समजतात आणि त्याचा पुत्र मेघनाद ( इंद्रजित ) याची पुजा करतात. मेळघाटात मेघनादाची प्रतिष्ठापणा फार थोड्या ठिकाणी केली आहे. अशाच पैकी अंत्यंत दुर्गम भागात हत्रु या गावी कोरकु ढाण्याच्या (वस्तीच्या) मधोमध मेघनादाची स्थापना केली आहे. होळीच्या दिवशी लोक त्याची पुजा करतात. त्या दिवशी तेथे यात्रा भरते.
साभार---संदीप सरडे





सुंदर प्राचीन शिवमंदिरांचा त्रिकोण, धोत्रा नंदई, बुलढाणा
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH753A रोडवर जालना पासून ५५ किलोमीटर अंतरावर तर चिखली वरून फक्त ३३ किलोमीटर अंतरावर धोत्रा नंदई हे गाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील सुमारे २ हजार लोकसंख्या असलेले हे गाव. या गावात ३ सुंदर अशी प्राचीन हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे शिवमंदिरे आहेत. तीनही मंदिराचे प्रवेश द्वार पूर्वेकडेच आहे. परिसरात एक खूप मोठा काळा पाषाणात कोरीव पाण्याचा रांजण सुद्धा आहे. उत्तरेला एक चौकोनी पाण्याचा बारव विहीर आहे. जिचा बराचसा भाग बुजलेला आहे.
हा १२ व्या शतकातील ३ शैव मंदिराचा समूह चालुक्य काळातील असून अशा प्रकारचा मंदिर समूह फारसा दिसत नाही. महत्वाचे आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे ही मंदिरे गावाच्या ३ दिशेला त्रिकोणी स्तिथीमध्ये आहेत. ती तशी का आहेत हा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे येथे शिव भक्तांची वर्दळ असते. मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभावर अत्यंत सुंदर कोरीव काम केलेले आहे. कला आणि इतिहासप्रेमींनी एक वेळ अवश्य भेट द्यावे, असे प्राचीन सुंदर ठिकाण.














घनदाट जंगलात अजूनही उभा आहे अष्टकोनी वाडा, पोटेगाव, गडचिरोली

आपण अनेक ऐतिहासिक किल्ले, महाल, हवेल्या, वाड्यांना इतिहासाच्या पुस्तकांतून वाचतो किंवा प्रत्यक्ष बघतो. असाच एक प्राचीन वाडा गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट अरण्यात असलेल्या पोटेगाव येथे असून चक्क अष्टकोनी बांधकाम असलेला हा वाडा आजही जुन्या आठवणी जागवत ताठ उभा आहे.

चंद्रपूर, नागपूरसह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा मध्य भारतातील बऱ्याचशा भागांवर तब्बल पाचशे ते सातशे वर्षे राज्य करणाऱ्या गोंडराजांच्या राजवटीचा फारसा उल्लेख होत नाही. विशेषत: चंद्रपूरच्या गोंडराजांच्या राजवटीत निर्माण झालेल्या जमीनदाऱ्यांमध्ये झालेल्या बांधकामांचा उल्लेखही फारसा होत नाही. भीम बल्लाळसिंग यांनी शिरपूर येथून बल्लारशा येथे गादी आणल्यावर पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी येथून चंद्रपूरच्या राज्याचा कारभार पाहिला.तेव्हा चंद्रपूर राज्यात गडचिरोली जिल्हा समाविष्ट होता. पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी बल्लारपूरहून चंद्रपूर येथे गादी स्थानांतरित करण्यासाठी झरपट नदीच्या काठावर नव्या किल्ल्याच्या परकोटाचा पाया रचला. पण, हा किल्ला त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. पुढे त्यांचे पुत्र हिरशहा यांच्या काळात बांधकाम पूर्ण होऊन बल्लारशाची राजधानी चंद्रपूरला स्थानांतरीत झाली. याच राजा हिरशहाच्या काळात चंद्रपूर राज्यात एकूण १७ जमीनदाऱ्या निर्माण झाल्या. यापैकी पोटेगावची जमीनदारी सुरपाम परिवाराला मिळाली.अनेक वर्षे गोंडराजांचे जमीनदार असलेले येथील सुरपाम या परिसरात राजे म्हणूनच ओळखले जात. याच परिवारातील श्रीमंत महाराज बारीकरावबापू लालबाबा सुरपाम पोटेगाव येथून आपल्या जमीनदारीचा कारभार बघायचे. येथे सर्वत्र त्यांचा प्रचंड दबदबा असायचा. जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर कर्मचारीसुद्धा त्यांच्या भेटीला पोटेगाव येथे यायचे. पुढे आपल्या परिवारासाठी एक भव्य वाडा बांधावा, असा विचार करून १९४२ मध्ये त्यांनी हा अष्टकोनी चिरेबंदी वाडा बांधायला घेतला. वाड्याचा अष्टकोनी भक्कम चौथरा, पुढे बाकदार कमानीचे प्रवेशद्वार, लाकडी कलाकुसरीचे दरवाजे, महिरपी खिडक्या, मागच्या भागातून वर जाणारे दोन नक्षीदार जिने, वरच्या भागातील सजावटीचा सज्जा, अष्टकोनी आकाराचे बलदंड स्तंभ, अशा पद्धतीने हा वाडा चहूबाजूने आकार घेत असताना बारिकरावबापू सुरपाम यांच्या या वाड्याची ख्याती आणि त्यांच्या श्रीमंतीची महती सर्वदूर पसरू लागली. इथेच घात झाला.

या वाड्याच्या बांधकामावर असलेले मजूर व काही लोकांची वक्रदृष्टी त्यांच्या खजिन्यावर पडली. एका रात्री त्यांच्या घरी दरोडा पडला आणि होते नव्हते सारे चोरट्यांनी लंपास केले. श्रीमंतीत जगणारा सुरपाम परिवार अगदीच गरीब झाला आणि हा वाडा तसाच अर्धवट राहिला. आपल्या अर्धवट स्वप्नाकडे बघत बारीकरावबापू सुरपाम यांनीही देह त्यागला. आता या वाड्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने तो दुरवस्थेत आहे. येथील नगाराही फुटला आहे. पुरातत्त्व विभागाने या प्राचीन वास्तूकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.रावाचे झाले रंक...
तब्बल २०० एकर जमीनदारी असलेला सुरपाम परिवार येथे राजा, महाराजांसारखेच जीवन जगत होता. पण, त्या दरोड्यानंतर सारेच बदलले. वाडा अर्धवटच राहिला आणि या परिवाराचे वंशज रावाचे रंक झाले. बारीकरावबापू यांना खुशालराव, नेपाळराव आणि देवराव अशी तीन मुले व तीन मुली होत्या. आता खुशालराव यांचे चिरंजीव महेश, रवीचंद्र व नरेश सुरपाम, नेपाळराव यांचे चिरंजीव दिलीप व सचिन, देवराव यांचे पुत्र अभिमन्यू हयात आहेत. मात्र, देवराव यांचे पुत्र माणिकराव यांचा मृत्यू झाला. पण, माणिकराव यांचे पुत्र दिनेश सुरपाम हयात आहेत. बारीकराव सुरपाम यांची ही नातवंडे अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत. यातील महेश खुशालराव सुरपाम याच गावातील वनविभागात वनमजूर म्हणून काम करतात.

Source : "सकाळ












 कोट जहांगीर किल्ला, कोट, अमरावती
पेशवाई च्या काळात अनेक सरकारांना स्वतंत्र जहागीरी मिळाल्या. होळकरांना महेश्वर (इंदोर), शिंद्याना ग्वाल्हेर, गायकवाडांना बडोदा, त्याच प्रमाणे पवारांना धार ईत्यादी याच पवार घराण्यातील फतेहसिंह पवार यांना मेळघाट ची जहागीर मिळाली. त्यांनी हरीसाल जवळ कारा - कोट (जहागीर) येथे स्वतःचा छोटेखानी गढीवजा किल्ला बांधला. तेंव्हा त्यांच्याकडे विभागातील ९९९ गावांची सारावसुली होती असे लोक सांगतात. फक्त नावाचीच सुखी नदीचा बारमाही पाणी असलेला नदीकाठचा संपन्न प्रदेश त्यांनी राजधानी साठी निवडला आणि त्यांची प्रजा असलेल्या गरीब आदिवासींचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर वारसाहक्काने जहागीरी राजा कुमानसिंह यांचे कडे आली. 1857 च्या राष्ट्रीय उठावाच्या वेळी तात्या टोपे जळगाव (जामोद) येथील मुगुटराव देशमुख यांच्या सोबत मेळघाटात आले. इंग्रजी फौज त्यांचा पाठलाग करीत होती. तेव्हा राजा कुमानसिंहाने तात्या टोपेंना माखला येथील महालात आश्रय दिला. इंग्रजांनी फौज माखला येथे पोहोचली तेव्हा राजा कुमानसिंहाने आपल्या आदिवासी फौजेसह त्यांचा कडवा प्रतिकार केला. परंतु इंग्रजांच्या बंदुकींपुढे आदिवासींच्या तिर - कमानिंचा निभाव लागला नाही. या लढाईत राजा कुमानसिंहाचा पराभव झाला. तात्या टोपे तेथून निसटले परंतु माखल्यात आदिवासींच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडला. शेवटी ती प्रेते बैलगाडीत भरुन गावामागच्या दरीत (खोर्यात) फेकण्यात आली तो भुतखोरा नावाने आजही प्रसिद्ध आहे. राजा कुमानसिंहाच्या महालाचे अवशेष सध्याच्या रेस्टहाऊस च्या मागे पहावयास मिळतात. गावातील मंडळी कोरीव दगडांचा उपयोग गुरे बांधण्यासाठी करतात.
त्यानंतर राजा भरतसिंहाकडे जहागीर आली. त्यानंतर राजा मदनमोहन सिंह यांचे कडे जहागीर आली तेंव्हा ब्रिटीश राजवटी तर्फे त्यांचे राज्य खालसा न करता त्यांचे कडे सारा वसुलीचे काम देण्यात आले. त्यांचा काही वर्षांपुर्वी देहांत झाला. शेवटापर्यंत ब्रिटिश राजवटी तर्फे त्यांना मानधन मिळत होते. स्वराज्यानंतर त्यांच्या कडे असलेली साडेतीन हजार एकर शेतजमीन सिलिंग मध्ये सरकार जमा करण्याचे आदेश आले त्या बदल्यात महीना बाराहजार रूपये वेतन सरकारने कबुल केले. परंतु संपूर्ण जमीन सरकारजमा न करता त्यांनी पिढ्यानपिढ्या त्यांच्या सोबत असलेल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या नावाचे जमिनीचे पट्टे लिहुन दिले व सरकारी मानधन नाकारले. त्यांच्या नंतर जहागीरी राजा योगेंद्रसिह यांचे कडे आली. सध्या ते धारणी जवळ सुसरदा येथे राहतात. सुसरदा येथील महाल सुध्दा बघण्यासारखा आहे. त्यांचे धाकटे बंधू राजा मानसिंह बऱ्हाणपूर येथे स्थायिक झाले आहेत. ही माहिती त्यांच्याच भाऊबंदकीतील श्री पद्मसिंह काकुसिंह पवार यांनी दिली. अजूनही राजघराण्याचा दबदबा कायम आहे.
हरीसाल जवळील चिखली गावाच्या पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर नांदुरी कारया नंतर कोट (जहागीर) गावाजवळ छोटेखानी टेकडीवर हा गढी वजा किल्ला आहे. या प्रदेशातील ही सर्वात उंच टेकडी असुन आजुबाजुची नांदुरी, कारा, कोट जांबु, लवादा, कोठा अशी सहा गावे स्पष्ट दिसतात.. टेकडी खालील सुखी नदीत बारमाही पाणी वाहते. त्यामुळे तेथील शेतकरी बारमाही उत्पन्न घेतात. नैसर्गिक व भौगोलिक दुरुषटीने संपन्न प्रदेशामध्ये किल्याची बांधनी केली आहे.
किल्ल्याला पुर्व आणि पश्चिम असे दोन दरवाजे आहेत. ओबडधोबड दगडांनी बांधलेला परकोट जवळपास उध्वस्त झाला आहे. दोन्ही दरवाजा जवळील देवडया स्पष्ट दिसतात. मध्यभागी सर्वात उंच ठिकाणी भाजलेल्या चापट विटांनी भक्कम महाल बांधला आहे. छत पुर्णपणे कोसळले आहे. तरीही महालाच्या भव्यतेची कल्पना येते. खिडक्यांच्या काठाने महिरपीत सुबक कोरीवकाम केलेले आढळते. महालात अनेक दालने असुन तो बहुतेक दोन मजली असावा. वर जाण्याच्या दरवाजे व पायर्यांचे अवशेष शिल्लक आहेत. टेकडीवर पाण्याच्या विहिरी व टाक्याचे अवशेष आढळतात. मेळघाटातील अनेक घडामोडींचा साक्षीदार हा कोट - कारया चा किल्ला आहे.
माहिती - संदीप सरडे
फोटो - गौरव कडू

तात्याटोपे आमच्या इथे पण आले होते
















































































ईशान सपत्निक

ब्रह्मेशानजनार्दनार्क मूर्ती
ब्रह्मा,शिव ,विष्णू आणि सूर्य या चारही देवतांची तयार झालेली संयुक्त मूर्ती.

ईशान सपत्निक .पत्नीच्या हातात कमलनाल आहे.

स्त्री आणि माकड.सुरसुंदरी ला माकडाने विवस्त्र केले आहे.
नृत्य गणेश,अष्टभुज मूर्ती,वाद्यसंगीताची साथ देणारे गण दोन्ही बाजूला आहेत.

आलसा किंवा लीलावती
पुर्व दिशेचा अधिपती इंद्र,उजव्या पाठीमागच्या हातात वज्र आहे.सपत्निक शचि सह.वाहन हत्ती पायाशी दाखवले आहे.
एकटा ईशान-त्रिशूल,अक्षमाला,त्रिमुखी नाग,कमंडलू.
जटामुकुट, पायाशी बैल.
स्त्री-मुंगुस- साप

पत्रलेखिका
नटेश शिव- आठ हाताची तांडव नृत्य मूर्ती.
शुकसारिका
इंद्र पत्नी शचि
अंधकासूरवध अलिढासनातील मूर्ती .


इंद्र शचिसह



विदर्भाची काशी : मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडादेव, गडचिरोली
गडचिरोली जिल्हयात तसेच विदर्भात भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून मार्कंडा तिर्थस्थान ओळखला जातो. जिल्हा मुख्यालय यापासून 45 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यात मार्कंडा हे देवस्थान असून ते चामोर्शीच्या वायव्यच्या दिशेला आहे.
वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या डाव्या तिरावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ठ शिल्पकलेची आठवण करुन देणारे मार्कंडा देवालय आहे. प्रगट कला संस्कृतीचे, मार्कंडेय ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे मार्कंडेश्वर मंदिर सर्वात मोठे असून मुर्तीमंत मंदिर आज दिमाखाने उभे आहे. मंदिराच्या सभोवताल दगडावर वेरुळ, अजिंठा व खजुराहो प्रमाणे कलाकृतीचे नमुने भिंतीवर कोरलेले आढळतात. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. पिंडीच्या खाली भुयारीवाट असल्याचे जुने लोक सांगतात. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तरवाहिनी वाहत असल्यामुळे या ठिकाणाला पुराण काळापासून भाविकांसाठी विशेष आकर्षण निर्माण झालेले आहे. हे हेमाडपंथी मंदिर आहे.
मंदिराच्या भोवती अनेक लहान मोठया देवळांचा समूह असून काही मंदिराचे भग्न अवशेष पाहायला मिळातात. मंदिराजवळ ज्योतिर्लिंग असून मंदिराला लागून भुवनेश्वर, गणपती, हनुमान, महिषासूर मर्दिनी यासारखे लहान-मोठे मंदिर आहेत. मुख्य मंदिरापासून वैनगंगा नदीच्या पात्रात उतरण्याकरीता पायऱ्या आहेत
विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि पर्यटकांना आकर्षित करणारे हे ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी 15 दिवस ते पाऊण महिन्यांपर्यंत भव्य यात्रा भरते. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व विदर्भातील लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. जिल्हा मुख्यालयाहून भाविकांना जाण्यासाठी गडचिरोली-चामोर्शी मार्गे मार्कंडा एस.टी. बसची सोय आहे. चंद्रपूरहून गोंडपिपरी, आष्टी, चामोर्शी मार्गे जाता येते. मुल-हरणघाट मार्गे मार्कंडा असाही प्रवास करता येतो. या ठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी निवासस्थान, भोजन व्यवस्था आदी पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी उपलब्ध करण्यात आल्यास अधिक पर्यटक आकर्षित होतील. हया सोयी करण्यास येथे भरपूर वाव आहे.
संकलन :- सतीश अलोनी













































चिंतामणी शिव मंदिर, कोथळी, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यांतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथे मनाला आकर्षित करणारे हेमाडपंथी शिवालय (चिंतामणी मंदिर) या नावाने ओळखण्यात येते. या मंदिराचे बांधकाम पुरातन कोरीव पद्धतीचे असून, एकरूपता जाणवते. प्रवेशद्वारासमोर शंकराचे वाहन असलेले नंदी विराजमान आहे. या नंदीच्या अंगावर विशिष्ट कलाकुशलतेने कोरलेली अखंड साखळी घंटा आहे. मंदिराचे खांब दगडी आहे. या मंदिराचे बांधकाम १३ व्या शतकातील असावे, असा जाणकाराचा अंदाज आहे. कोथळी गावाची अस्मिता जपणारे हे एक प्राचीन शिवालय आहे. मंदिराच्या गाभार्यात महादेवाची तेजस्वी शिवलिंगाची स्थापना आहे. 












या पिंडीचा गुळगुळीतपणा मनाला प्रफुल्लित करणारा असून, समोर सभामंडप असून, अखंड दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहे. यावरून हे लक्षात येते की त्यावेळेस शिल्पकला अवगत होती. मंदिराच्या मागून वाहणारी विश्वगंगा नदी सौंदर्यात आणखी भर घालते. संध्याकाळी लालबुंद झालेला सूर्य मावळतीला असताना आपले प्रकाशकिरण पिंडीवर पडतो. तर सकाळी उगवताना गावातील पिंडीवर पडतो. सूर्यकिरणे वेधून घेणारी हे शिवलिंग आहे गावातील व गावाबाहेरील मंदिराची कलाकृती प्रत्यक्ष पाहिली असता त्यातील कलाकुसर करणार्याचे परिश्रम व सार्मथ्य व धनसंपत्ती यांची कल्पना येते ही कलाकृती आता काळाच्या ओघात जीर्ण होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या काळातील जीवनशैली कशी असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.








सोनामाता पायविहीर, बाबुपेठ, चंद्रपूर 






गेल्या दहा वर्षांत नको तिथे ब्रिज,रस्ते, उड्डाणपूल निर्माण करण्यात आले तितक्या निधित संपूर्ण विदर्भात रस्ते वीज पाण्याची सोय झाली असती....
अप्रतिम यवतमाळ येथील महादेवाचे मंदिर आपण दाखवल्याबद्दल आपल्या अभिनंदन
बुलढाणा येथील अप्रतिम दर्जाचे महादेवाचे मंदिराचे बांधकाम आपण दाखवल्याबद्दल धन्यवाद
चंद्रपूर येथील सुंदर महादेवाचे मंदिर दाखविले या बद्दल आपले धन्यवाद
अकोला येथील महादेवाचे मंदिर दाखल्याबद्दल आपले धन्यवाद






 पंचकोनी शिवलिंग, मनसर, नागपूर 



भव्य शिवलिंग, बाबुपेठ, चंद्रपूर








गुणगान तुझे... ओठांवर राहू दे.... चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे 🙏गण गण गणात बोते 









विदर्भातील काही पुरातन कृष्ण मुर्ती :

चंद्रपूरमध्ये खोदकामावेळी श्रीकृष्णाची मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती आढळून आल्यानंतर नागरिकांनी तिची पूजा केली. ही प्राचीन मूर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होतेय.
शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स

हि कृष्ण मूर्ती पहूर ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील आहे.बघा तत्कालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना.
मुख्य मूर्तीच्या चारही बाजूने लहान मूर्ती कोरल्या आहेत.
विष्णू मूर्ती आहे शंख चक्र आहे आणि ४ हात आहे







हासिक छत्री, बाळापूर, अकोला
अकोला जिल्हयात बाळापूर गावाच्या दक्षिणेस नदीतीरावर शिवाजी महाराजांसोबत पुरंदरचा तह करणारया मिर्झाराजा जयसिंगाने काळ्या दगडात बांधलेली पाच घुमटांची छत्री असून तिच्या छतावरील नक्षीकाम वेधक आहे.
इथून जवळच मन व म्हस नदीच्या संगमावर एका छोट्याशा उंचवट्यावर 'बाळापूरचा किल्ला' आहे. या किल्ल्यावरून जिल्ह्याचा दूरवरचा प्रदेश नजरेत पडत असे.











 रामपूरी ता मानवत जिल्हा परभणी
हे मल्लिकार्जून मंदिर खूपच पुरातन आणि भव्य आहे. मंदिराचे गर्भगृह खूप खोल असून सुंदर आहे. मंदिर परिसरात इतर देवतांच्या मूर्ती आणि नंदी भग्न अवस्थेत आहेत. मंदिराचे बाजूला एका चौथऱ्यावर विरगळ शिल्प ठेवली असून पुजा केली जाते ‌. रामपूरी गावात १२ हनुमान मंदिर असून त्यातील एक मंदिर गोदावरी नदी किनारी आहे.नदी किनार्यावर आनखी एक शिव मंदिर आणि शैव मठ आहे.
कृपया जाणकारांनी या मंदिराचे बांधकाम शैली विषयी माहिती द्यावी.
धन्यवाद
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...