Tuesday, November 28, 2023

गाणगापूर माहिती मराठी

https://marathiblogger.com/gangapur-mahiti-marathi/

गाणगापूर म्हणेज दत्तभक्तांची पंढरीच. गाणगापूरला जाण्याची माझी बरेच दिवसांची इच्छा होती. परंतु कामाच्या धामधुमीत अगोदर काही जाणे जमले नाही. आपण वेळ काढला नाही तर थोडी सवड सापडत सुद्धा नाही हे ही खरेच. ह्यावेळेसच्या दिवाळीच्या सुट्ट्यात मात्र मी काही दिवस अजून सुट्या घेतल्या आणि अखेरचे एकदा जाणे नक्की केले.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

रात्रभराच्या प्रवासानंतर सोलापूर आणि तिथून अक्कलकोट असा प्रवास झाला आणि अक्कलकोटला दोन दिवस थांबल्यावर सकाळच्या बसने गाणगापूरला जाणे झाले. अक्कलकोटला मला थांबून निवांत स्वामींचे दर्शन घ्यायचे होते म्हणून मी तिथे मुक्काम करण्याचे अगोदरच ठरवून आलो होतो. हे दोन दिवस मला बरेच सुखावून गेले. स्वामी सेवेत मन कसे प्रसन्न होते हे कुण्या स्वामीभक्ताला वेगळे सांगण्याची गरज नाही. गेल्या उन्हाळ्यात मला अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर अशा तीर्थक्षेत्री जाण्याची अनिवार इच्छा झाली होती आणि इंटरनेट वर तेथील माहिती मी शोधत असो.

अक्कलकोट वरून वटवृक्ष मंदिराच्या (मुख्य मंदिर) जवळूनच सकाळी सकाळीच बस किंवा इतर वाहने गाणगापूरकडे सुटतात. अक्कलकोट ते गाणगापूर अंतर जवळपास ७०-७५ किलोमीटर असावे. खाजगी वाहने त्यांचे वाहन पूर्ण भरल्यावरच निघतात, त्यामुळे मला सकाळी पाच वाजल्यापासून किमान १ तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी एक बस मिळाली. गाणगापूरला बसने जाण्यासाठी मला जवळपास दोन तास लागले असावे. गाणगापूरला पोहोचल्यावर अगोदर मला संगमावर जायचे होते. बसस्टॅण्ड जवळच १०-१५ रुपये प्रति व्यक्ती दराने ऑटो चालतात. संगमावर गेल्यानंतर प्रथम भीमा अमरजा संगमात स्नान केले.

bhima amarja sangam gangapur
भीमा-अमरजा संगम

मुख्य गावाच्या थोडा बाहेर असलेल्या ह्या भीमा अमरजा संगमाचे विशेष महत्व आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज इथेच अनुष्ठान करायचे. आजवर ज्याबद्दल ऐकलेच होते तिथे प्रत्यक्ष आल्यानंतर अवर्णनीय आनंद झाला.

मे महिन्यापासून मला गुरुचरित्र वाचण्याची तीव्र इच्छा होती. दत्तभक्तीच्या संपर्कात मी कसा आलो हे मला सुद्धा माहित नाही. तसा मी सुरुवातीपासूनच थोडा धार्मिक आहे आणि बालपणी अनेक धार्मिक ग्रंथांचे पठण कळत नकळत केले आहे. त्यामध्ये नवनाथ पोथी सुद्धा मला आठवते. पण २०२० च्या दत्त जयंतीच्या दिवशी घडलेल्या एका आनंददायक गोष्टीमुळे माझा तीव्र ओढा ह्या भक्तिमार्गाकडे वळला असावा आणि त्याच घटनेनंतर माझ्या मनात असे शक्तिशाली भक्तितरंग निर्माण झाले असावेत. असो.

त्यानंतर तीन चार महिन्यात माझ्या वाचनात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आले. गुरुचरित्र समजून मी ऑनलाइन पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत बोलावले. ते मिळाल्यावर समजले की दोन्ही ग्रंथ वेगवेगळे आहेत. गुरुचरित्र वाचनासाठी कडक नियम असतात असे कोठेतरी वाचल्यावर नंतर वाचूया असे ठरवले. त्यातही संगमावर गुरुचरित्र वाचण्याचा योग यावा अशी मनोमन इच्छा होती. ती ह्या भेटीत पूर्ण झाली.

Gangapur mahiti marathi गाणगापूर माहिती मराठी

अक्कलकोटला वास्तव्याला असतांना एका भक्ताने तुम्ही संगमावर संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, म्हणजे तुमच्या कमी वेळेत ते पठण पूर्ण होईल व तुमची संगमस्थळी गुरुचरित्र वाचनायची इच्छा देखील पूर्ण होईल असे सांगितले. त्यामुळे मी अक्कलकोटहून येतांनाच संक्षिप्त गुरुचरित्र सोबत आणले होते.

bhima amarja sangam
संगमस्थळीचा औदुंबर वृक्ष

संगमावर आता श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी चांगली सोय झाली आहे. बरेच वाचक एकाच वेळी श्री गुरुचरित्र पारायण करतांना दिसतात. अशा भक्तिभावाच्या वातावरणात, जिथे अनेक जण श्री गुरुचरित्राचे पठण करत असतात आपल्या केलेल्या पारायणाने एक आनंददायक अनुभव वाटून जातो.

संगमस्थळीच एक मंदिर आहे आणि तिथून गाणगापूरकडे परत जातांना भस्माचा डोंगर आहे. इथे चालत जाता येते, फार दूर नाही. इथले भस्म म्हणजे आता मातीच्या स्वरूपात आहे आणि ते भाविक थोडे खोदून सोबत नेतात मी सुद्धा थोडे भस्म घेतले आणि परतीचा ऑटो पकडून मंदिरात आलो.

Gangapur mahiti marathi

bhasma hill ganagapur
भस्माचा डोंगर

तिथे येण्यापर्यंत बारा साडेबाराचा वेळ झाला होता आणि मंदिराजवळ भिक्षा मागणाऱ्यांची गर्दी होती. मला काही अन्नदान करण्याची इच्छा असल्यामुळे मे तसे केले व नंतर दर्शनासाठी लांब रांगेत लागलो.

ही रांग मंदिराच्या बाहेरून सुरु होते आणि वरच्या मजल्यावरून हळू हळू पुढे सरकत मग परत खाली मंदिरात उतरते. ह्या रांगेत गर्दी असल्यामुळे मला अडीच तीन तास लागले असावे. त्यापेक्षा खालीच प्रथम मंदिरात प्रवेश करून काही देणगीची पावती फाडल्यास वेगळ्या लहान रांगेत लागत येते असे कुणीतरी सांगत असल्याचे मी ऐकले होते. मला ह्यातील नक्की काही माहित नाही परंतु ज्यांना वेळेची कमी आहे त्यांनी अशा बाबतीत चौकशी करून पाहावी. कदाचित उपयोगी होईल.

Gangapur mahiti marathi

निर्गुण पादुकांचे दर्शन मात्र मला झाले नाही. कुणीतरी सांगत होते कि निर्गुण पादुकांचे दर्शन फक्त सकाळीच होते. आता पुढच्या गाणगापूर भेटीत दोन तीन दिवस मुक्काम करून सगळीकडे निवांत थांबून दर्शन घेण्याची इच्छा आहे दत्त महाराजांची कृपा झाली तर तोही योग येईलच ह्यात शंका नाही.

संध्याकाळच्या वेळेस निघत असलेली महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्याची मला इच्छा होती. ही इच्छा त्याच दिवशी परत निघणे असल्यामुळे शक्य झाले नाही, पण नेहमी बघत असलेल्या काही युट्युब चॅनेल वर होत असलेले पालखी सोहळ्यातील मूर्तीचे दर्शन मला मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूस झाले. तेव्हा ही मूर्ती पालखी सोहळ्यासाठी सजवली जात होती. माझ्यासाठी आश्चर्य म्हणजे मी मनोमन हीच मूर्ती शोधत होतो.

gangapur mahiti marathi

अति गर्दीमुळे गाभाऱ्यातील दर्शन मला फार वेळेस होऊ शकले नाही. गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन अजून एकदा व्हावे असे माझ्या खूप मनात होते. तेव्हा काही लोकांचे दर्शन मागील बाजूने विशेष रांगेत होत होते. तिथे उभा झाल्यावर, -पुढे चला, पुढे चला- असे कुणी ओरडले व मी सहज रांगेत लागलो आणि लगेच परत गाभाऱ्यात जाता आले. त्यानंतर चांगले दर्शन झाल्याने मनाला प्रसन्न वाटले.

माझ्या मनातील दोन्ही इच्छा अशा विनासायास पूर्ण झाल्या. नंतर बराच वेळ मी मंदिराच्या आवारात मी बसून होतो आणि मनोमन परत लवकर येऊ द्या म्हणून इच्छा सुद्धा होत होती.

Gangapur mahiti marathi

मग मंदिरातून निघाल्यावर कल्लेश्वर देवालय जाणे बाकी होते. बाहेर पडल्यावर कुणाला रस्ता विचारला तर चालत पायी जात येते असे कुणीतरी सांगितले. माझेकडे जास्त ओझे नसल्याने मी चालत गेलो. अंदाजे एक किलोमीटर अंतर असेल. कुटुंब सोबत असल्यास किंवा वेळ कमी असल्यास काही वाहन करून जाणे मला जास्त योग्य पर्याय वाटला. शेवटी प्रवासात कमीत कमी थकणे जास्त योग्य वाटते.

kalleshwara temple gangapur
कल्लेश्वर देवालय

परतीसाठी बसस्टॅन्ड वर बराच वेळ गेला आणि येणाऱ्या बस सुद्धा गर्दी घेऊनच येत होत्या. कसेतरी एका बसमध्ये जागा मिळवून मी अक्कलकोटला परत आलो आणि तिथे एक दिवस थांबून मग परत घराकडे परतलो.

अक्कलकोट आणि गाणगापूर मधील हे चार दिवस मला खूप ऊर्जा देऊन गेले. आध्यात्मिक स्तरावर काहीतरी अतीव आनंद वाटला. आता पुढील भेटीची आस आहे.

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

Monday, November 27, 2023

शिवगंगेच्या शिखरावरून इंद्रवज्र

https://www.maayboli.com/node/84388
 

बंगळूर महाराष्ट्र मंडळ हे नवीन नवीन कार्यक्रम आखून पार पाडण्याच्या बाबतीत अत्यंत उत्साही आहे. त्यांचा शिवगंगे ट्रेकबद्दल मेसेज आला तेव्हा लगेचच जाण्याचं पक्कं केलं. याआधी हुळुकुडी बेट्टा नावाच्या ट्रेकला मंडळाच्या सदस्यांबरोबर जाऊन आलो होतो. तेव्हा खूपच मजा आली होती. तो ट्रेक तसा सोपा होता. शिवगंगे त्यापेक्षा थोडासा अवघड असल्याचं गूगल केल्यावर लक्षात आलं. उंचीला सिंहगडाच्या निम्मा आहे. बंगळूर हे पश्चिम आणि पूर्व घाटापासून लांब असल्यामुळे इथे आजूबाजूला आपल्या सह्याद्रीसारखे उंच उंच डोंगर नाहीत. पण अशा टेकड्या मात्र अनेक आहेत.

पहाटे चार वाजता उठून, मुलांना उठवून तयार होऊन निघालो. पाच वाजता बंगळूरच्या बाहेर पडतानाच्या एका टोलनाक्याजवळ भेटायचं ठरलं होतं. आम्हाला थोडा उशीरच झाला. काही सदस्य आले होते, काही यायचे होते, काही पुढे जाऊन पायथ्याशी थांबले होते. आम्हीही पुढे गेलो. पायथ्याशी पोचलो, तेव्हा चहाच्या टपरीजवळ मराठी माणसांचा घोळका दिसला आणि आम्ही लगेचच त्या घोळक्यात सामील झालो. जुने ओळखीचे लोक भेटले, नवीन लोकांशी ओळखी झाल्या. आम्ही सगळे मिळून साधारण वीसपंचवीस जण होतो. होता होता जवळजवळ सगळे येऊन पोचले. एकांच्या गाडीला काहीतरी प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे आमचा अनुभवी लीडर आणि अजून एक सदस्य आम्हाला आवश्यक त्या सूचना देऊन त्यांना घेऊन येण्यासाठी निघाले आणि बाकीचे आम्ही सगळे साडेसहाच्या सुमारास पायर्‍या चढायला लागलो. त्यांची सगळ्यात महत्त्वाची सूचना ही होती की वर चढताना वाटेत एका ठिकाणी शंकर-पार्वतीचे मोठे पुतळे लागतील. तिथे पोचलो, की अर्धा ट्रेक झाला, असं समजा. त्यानंतर माकडांचा उपद्रव सुरू होतो, त्यामुळे जे काही खायचं आहे, ते तिथेच (शंकर-पार्वतीला साक्षी ठेवून!) खा, त्यानंतर नको. Lol

शिवगंगेच्या पायथ्याशी एक देवस्थान आहे आणि चढताना वाटेतही एकदोन ठिकाणी छोटी देवळं आहेत. चढायची वाट बर्‍याच ठिकाणी तशी अरुंदच आहे. आमच्यात एक तीन-चार वर्षांचा अत्यंत उत्साही पिटुकला होता. आम्ही दमलो, तरी तो दमत नव्हता. आम्ही इतक्या लवकर चढायला सुरुवात करूनही आम्हाला वरून खाली येणारे लोक भेटत होते. शिवाय आपल्यापेक्षा भराभर वर जाणारे कुणी मागून आले, तर त्यांना वाट करून द्यावी लगत होती. काही काही ठिकाणी अगदीच अडचण झाली. वर देवस्थान असल्यामुळे यात भक्तमंडळींचं प्रमाण भरपूर होतं. त्यातले बरेचसे अनवाणी चालत होते. त्यांचं कौतुक वाटलं. बराच वेळ चाललो आणि बर्‍यापैकी दमलो, तरी त्या सुप्रसिद्ध शंकर-पार्वतींचं दर्शन काही होईना! त्यानंतर अजून अर्धी वाट चढायची आहे, हेही विसरता येईना.

अखेर शंकर-पार्वती दिसले. त्यांच्या समोरच्या मोठ्या कट्ट्यावर मंडळी स्थानापन्न झाली आणि खाण्याचे डबे उघडले गेले. फळं, सँडविचेस, कोरडी भेळ, चिक्की यांची देवाणघेवाण झाली. चढून लागलेला दम जरा जिरला आणि ’अजून निम्मा ट्रेक बाकी आहे’ याची मानसिक तयारी करून आम्ही उठलो. पण खरं म्हणजे उरलेलं अंतर निम्म्यापेक्षा बरंच कमी वाटलं. उंचीच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण नक्कीच निम्म्यावर असेल. कारण यानंतर चढ तीव्र होत गेला. त्यामुळे चढणं कठीण वाटलं, पण त्या मानाने वेळ कमी लागला. पुढे सगळीकडे रेलिंग्ज बसवली आहेत, हे खूपच बरं झालं. त्याशिवाय चढणं अशक्य झालं असतं.

railings.jpg

वर पोचलो तोपर्यंत धुकं/ढग आजूबाजूला होते. ऊन असं पडलंच नव्हतं. पण जवळजवळ वर पोचलो आणि अचानक ढग बाजूला झाले. लख्ख ऊन पडलं. खालच्या बाजूला मात्र ढग तरंगत होते. माझ्या आणि नवर्‍याच्या मनात एकदम इंद्रवज्राचा विचार आला. अजून थोडं वर चढून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो तर इंद्रवज्र दिसू शकेल असं वाटलं आणि भराभर आम्ही तिकडे गेलो. सकाळचे साडेआठ वाजले होते. आता सूर्य आमच्या मागे होता, समोर खोल दरी होती आणि त्या दरीत ढग तरंगत होते. ही अगदीच अनुकूल परिस्थिती होती. सूर्यासमोर आता परत ढग आले होते. पण एकदोन मिनिटांतच ते बाजूला गेले आणि समोरच्या दरीत आम्हाला इंद्रवज्र दिसलं!

indravajra 2.jpg

खालच्या ढगावर पडलेली आपली सावली आणि त्याभोवती दिसणारं सप्तरंगी वर्तुळाकार इंद्रवज्र. इंद्रधनुष्यापेक्षा हे बरंच लहान असतं. इंग्रजीत याला ’ग्लोरी’ म्हणतात. हरिश्चंद्रगडावरून दिसणारं इंद्रवज्र बरंच प्रसिद्ध आहे. गो. नी. दांडेकरांनी राजगडावरूनही हे पाहिलं आहे. मला कधी ते प्रत्यक्षात बघायला मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मी फारसे ट्रेक्स केलेले नाहीत, अवघड तर मुळीच नाही. शिवाय आता वास्तव्य बंगळूरला. त्यामुळे हरिश्चंद्रगडासारख्या ठिकाणी जाणं आणि त्यातही हे दुर्मिळ असलेलं दृश्य बघणं, याची शक्यता अगदीच कमी आहे. (विमानप्रवासात दिसू शकतं. पण डोंगर चढून आल्याचं सार्थक वाटायला लावणार्‍या या दृश्याची सर विमानातून दिसणार्‍या दृश्याला नाही.) त्यामुळे इथे हे अनपेक्षितपणे समोर आल्याचा मला खूप आनंद झाला! आम्ही आमच्या ग्रुपमधले जे वर पोचले होते, त्यांनाही बोलवून इंद्रवज्र दाखवलं. सूर्य अधूनमधून ढगाआड जात असल्यामुळे इंद्रवज्रही अधूनमधून अदृश्य होत होतं. पण अगदी छान बघता आलं, फोटोही काढले.

shivagange peak.jpg

आता जवळजवळ सगळेजण वर पोचले होते. अगदी आमचा लीडरही मागे राहिलेल्या सगळ्यांना सोबत घेऊन वेळेत वर पोचला होता. शिरस्त्याप्रमाणे फोटोसेशन्स पार पडली. खाली दिसणारं दृश्य अतिशय सुंदर होतं. आम्ही आत्ता उभे होतो तिथून वरच्या बाजूला शंकराचं मुख्य देऊळ होतं. त्याच्या पलीकडे खाली जाऊन थोडा वेळ फिरलो. तिथून दक्षिण दिशा, म्हणजे बंगळूरची दिशा दिसत होती. अर्थात आम्ही पन्नास किलोमीटर लांब होतो आणि हवेत धुकं होतं त्यामुळे काही दिसण्याचा प्रश्न नव्हता.

view from shivagange peak.jpg

परत मागे येऊन थोडी पोटपूजा केली. तिथे काकडी, अननस, कोरडी भेळ वगैरेचं दुकान होतं. असंख्य माकडं होती त्यामुळे खाताना अतिशय काळजी घ्यावी लागत होती.
थोड्या वेळाने खाली उतरायला लागलो. तीव्र चढ चढताना जेवढा जाणवला नव्हता, तेवढा आत्ता उतरताना जाणवला. वाटेत शंकर-पार्वतीसमोर एक ब्रेक घेतला.

view from shiv parvati.jpg

आता वाटेतल्या टपर्‍या उघडल्या होत्या. चवदार मसाला ताक प्यायलं. नंतर एका ठिकाणी तिखट-मीठ घातलेले रायआवळे घेतले. आहाहा..कित्येक वर्षांनी खाल्ले. आता अकरा-साडेअकरा वाजले होते आणि कडक ऊन पडलं होतं. आत्ताही वर चढायला सुरुवात करणारे महाभाग होते. त्यातले काही वाटेतल्या देवळात थांबणारे असले, तरी काहीजण नक्कीच वरपर्यंत जायच्या उद्देशाने आलेले होते. उतरताना शेवटी शेवटी जरा कंटाळाच आला. ’वाट सरता सरेना’ असं वाटायला लागलं. एकदाचे पार्किंगजवळ पोचलो. योगायोगाने उस्मानाबादहून इथे ऑफिसच्या सहलीसाठी आलेल्या काही मुली भेटल्या. त्यांनाही मराठी माणसं भेटल्याचा आनंद झाला.
गाडी काढून निघालो. वाटेत जेवून दोन-अडीचपर्यंत घरीही पोचलो.
रोजच्या रहाटगाडग्यातून असा एखादा दिवस मिळाला, की तो मनाला ताजातवाना करतो, हे वाक्य कितीही गुळगुळीत झालेलं असलं, तरी ते १००% खरं आहे!








Sunday, November 26, 2023

आशियाई स्थापत्य वैभव – होर्यु-जी मंदिरातील खजिना

 http://www.saamana.com/manjiri-bhalerao-article-on-japanese-old-temple/

सामना ऑनलाईन

>> डॉ. मंजिरी भालेराव

होर्यु-जी मंदिर हे जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास, या विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

जपानमधील नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक. त्याची सविस्तर माहिती आपण गेल्या काही लेखांमधून पाहतो आहोत. या मंदिराच्या परिसरातील वास्तूंची माहिती पाहत असताना तिथे असलेली निरनिराळी सभागृहे, त्यामधील मूर्ती, चित्रे यांची माहिती आपण पहिली. जपानमधील सर्वात प्राचीन म्हणता येतील अशा बोधिसत्त्वांच्या लाकडी मूर्ती इथे मिळाल्या होत्या. या मूर्ती म्हणजे फक्त जपानसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी, विशेषत बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, पण होर्यु-जी मंदिर परिसरात मिळालेला खजिना इथेच संपत नाही. एक अतिशय आगळीवेगळी, एकमेवाद्वितीय अशी वस्तू या ठिकाणी मिळाली, ती म्हणजे एक लाकडी मंदिर. हे गौतम बुद्धासाठी केलेले तामामुशी मंदिर. हे छोटेसे लाकडी मंदिर साधारण 7 फूट उंचीचे आहे. इसवी सनाच्या सातव्या शतकात किंवा त्याधीच त्याची निर्मिती झाली असावी असा काही अभ्यासकांचा अंदाज आहे. अशा प्रकारचे हे पूर्व आशियातील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याला तामामुशी मंदिर (तामामुशी नो झुशी) या नावाने ओळखले जाते. तामामुशी हे एका किडय़ाचे नाव आहे. त्याच्या शरीरावर दोन खाली आणि दोन वर असे चार पंख असतात. त्यामध्ये वरचे पंख हे सप्तरंगी चमचमणारे असे असतात. या मंदिराच्या नावामध्ये या चमकदार पंख असलेल्या किडय़ाचे नाव आहे. कारण त्याच्या बाह्य बाजूवर हे पंख चिकटवले होते. एका चौरस पीठावर उभी असलेली हे एक लाकडाची छोटीशी इमारतच आहे. 233 सें. मी. (7 फूट 8 इंच) अशा उंचीचे हे मंदिर कला, स्थापत्य आणि त्याची ऐतिहासिकता यासाठी जपानच्या राष्ट्रीय खजिन्याचा एक भाग झाले आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांना व मौल्यवान वस्तूंना National Treasure of Japan असा दर्जा दिला जातो.

या तामामुशी मंदिराच्या बाबतीत केन्शिन नावाच्या एका भिक्षूने तेराव्या शतकात काही लिखाण करून ठेवले आहे. त्यानुसार हे मंदिर तामामुशी या नावाच्या एका किडय़ाच्या पंखांनी सजवले होते. ते मुळात राजकुमार शोतोकुच्या पत्नीची आई महाराणी सुइको हिचे होते. इसवी सनाच्या सातव्या शतकात बांधलेल्या मंदिरांच्या शैलीबद्दल स्पष्ट असे पुरावे बांधीव स्थापत्यात आज पहायला मिळत नाहीत. कारण अनेक मंदिरांची पुनर्बांधणी झाली, पण या मंदिरामुळे प्राचीन मंदिराचे संपूर्ण स्वरूप आणि स्थापत्य शैली आजही आपल्याला पहायला मिळते. या मंदिराच्या आतमध्ये कान्नोन (पद्मपाणी अवलोकितेश्वर) आणि बुद्धाच्या बसलेल्या अवस्थेतील ब्राँझच्या मूर्ती होत्या. याच्या चारही बाजूला चित्रे काढली होती. ती आजही पहायला मिळतात. त्यामध्ये समोरच्या बाजूला चार दिशांच्या लोकपालांपैकी दोन लोकपाल, तर बाजूच्या दोन दरवाजांवर कमळावर उभे असलेले दोन बोधिसत्त्व चित्रित केले आहेत. त्यांचे हात धर्मपाप्रवर्तनमुद्रा दर्शवणारे आहेत. यामधून ते जगातील सर्व जिवांना आश्वस्त करीत आहेत अशी कल्पना आहे. याशिवाय बौद्ध भिक्षू, काही आकाशात उडणारी दैवी व्यक्तिमत्त्वं, काही दैवी परिसर, उडणारी व्यक्तिमत्त्वं, काही प्राणी इत्यादीची चित्रेसुद्धा पहायला मिळतात. यातील काही प्रसंग हे निर्वाणसूत्र तसेच सुवर्णप्रभाससूत्र यामध्ये असलेल्या सूत्रांवर आधारित आहेत. या मंदिरामध्ये बुद्धाच्या तीन मूर्ती तसेच चार लोकपाल, हिंदू देवता लक्ष्मीसारखी समृद्धी देणारी देवता ‘किचिजोतेन’ यांच्याही मूर्ती आहेत. शोतोकु आजारी असताना या मूर्तींची निर्मिती करायला सुरुवात झाली, पण त्या पूर्ण व्हायच्या आत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ अपामे अमिताभ आणि भैषज्यगुरूच्या मूर्ती याच काळात बनवल्या गेल्या. तोरी बुस्शी या सुप्रसिद्ध कलाकाराने या मूर्ती बनवल्या होत्या. शाक्यमुनी बुद्धाच्या बरोबर असलेल्या एका बोधिसत्त्वाच्या प्रभावळीवर एक कोरीव लेख आहे. त्यामध्ये ही सगळी माहिती दिली आहे.

जपान सरकारने सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा अनेक वस्तू या मंदिराच्या परिसरातून जमा केल्या आहेत, पण यापैकी जवळ जवळ तीनशेपेक्षा जास्त मौल्यवान वस्तू आज टोकियो येथील पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयात आहेत. त्यामध्ये एका सिद्धम लिपीत ताडपत्रावर लिहिलेल्या संस्कृत हस्तलिखिताचाही समावेश होतो. अशा प्रकारे हे होर्यु-जी मंदिर जपान, बौद्ध धर्म, मौल्यवान प्राचीन वास्तू आणि वस्तू, चित्रे, ग्रंथ, कोरीव लेख, अप्रतिम दुर्मिळ मूर्ती आणि असे बरेच काही अशा मोठय़ा खजिन्याचे आगर होते असे म्हणता येईल. अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या अनेक वास्तू आणि वस्तूंचे जतन असलेले हे होर्यु-जी मंदिर जपानमधील बौद्ध धर्माचा विकास तसेच विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्ती या सर्व गोष्टींच्या अभ्यासाला आणि पुढील संशोधनाला मदत करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. जपानच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ‘निहोन शोकी’ या ग्रंथातील संदर्भ पडताळून पाहण्यासाठी, त्यांची सत्यासत्यता ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या भौतिक साधनांचा अपरंपार उपयोग होतो. जगाच्या इतिहासामध्ये इतक्या प्राचीन काळातील लाकडाच्या वास्तूंचे आणि वस्तूंचे फार थोडे पुरावे शिल्लक आहेत. त्यामुळे या सगळ्या खजिन्याची प्राचीनता आणि त्यांचे विविध प्रकार पाहता जपानच नव्हे, तर संपूर्ण जगाचा हा वारसा आहे असे म्हणता येईल.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

manjirib24@gmail.com

आशियाई स्थापत्य वैभव – जपानमधील होर्यु-जी मंदिर

सामना ऑनलाईन

>> डॉ. मंजिरी भालेराव

जपानमध्ये मंदिर स्थापत्याला सुरूवात होण्याच्या काळात नारा प्रांतातील इकारुगा गावात बांधलेले होर्यु-जी मंदिर हे जपानमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. इसवी सन 607 मध्ये बांधलेले हे मंदिर म्हणजे एक बौद्ध मठ तसेच एक बौद्ध शैक्षणिक केंद्रही होते. होर्यु-जी मंदिर व यासोबत असणारी बौद्ध स्मारके युनेस्कोद्वारे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

जपानमध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारण इ.स.च्या 7व्या शतकात कशी झाली हे आपण मागच्या भागात पहिले. यामध्ये राजकुमार शोतोकू याचा मोठा सहभाग होता. नारा प्रांतातील इकारुगा गावामधील होर्यु-जी मंदिर हे त्यापैकीच एक आहे. जपानमधील आज उभ्या असलेल्या सर्वात प्राचीन मंदिरांमध्ये याचा समावेश होतो. मुळात हे मंदिर इसवी सन 607 मध्ये राजकुमार शोतोकू याने बांधले होते. हे मंदिर म्हणजे एक बौद्ध मठ तसेच एक बौद्ध शैक्षणिक केंद्रही होते.

जपानमध्ये बहुतेक सगळ्या इमारती लाकडात बांधत असत. तसेच हे मंदिरही लाकडाचा वापर करून बांधले होते. जपानच्या इतिहासाची माहिती सांगणाऱया ‘निहोन शोकी’ या ग्रंथातून या काळाची पुष्कळ माहिती मिळते. इ.स. 607 मध्ये हे मंदिर जरी बांधले गेले तरी इ.स.670 मध्ये या मंदिरावर वीज पडली आणि त्याला मोठी आग लागली होती, अशीही नोंद या ग्रंथात केलेली आहे. या आगीमध्ये केवळ हे मंदिरच नाही, तर आसपासच्या सर्व लाकडी इमारती जळाल्या होत्या. त्यानंतर त्यांची पुनर्बांधणी केली गेली, पण तेव्हापासून त्या आज तिथे उभ्या आहेत. इथली मुख्य मंदिराची इमारत तर जगातल्या सर्वात जुन्या लाकडी इमारतींपैकी एक आहे असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी एक पॅगोडा आहे. तोसुद्धा जगातील सर्वात जुन्या लाकडी इमारतींमध्ये गणला जातो. या मंदिराला 1993 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. ‘होर्यु-जी परिसरातील बौद्ध स्मारके’ हे जपानमधील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं पहिले स्थळ आहे. मात्र यामध्ये केवळ होर्यु-जीच नाही, तर इकारुगामधील होक्की-जी मंदिराच्या आवारातील इमारतींनाही हा दर्जा दिलेला आहे.

अगदी सुरुवातीला हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा त्याचे नाव ‘वाकाकुसादेरा’ असे होते असे मानले जाते, पण जेव्हा ते जुने मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि नंतर नवीन मंदिर उभारले गेले तेव्हा त्याचे नाव बदलून होर्यु-जी असे ठेवले गेले. ‘भरभराटीला येणाऱया धर्माचे मंदिर’ असा या नावाचा अर्थ आहे. या मंदिराची उभारणी राजकुमार शोतोकूच्या वडिलांच्या स्मरणार्थ केलेली होती. मंदिरात ‘याकुशी न्योराई’ म्हणजे गौतम बुद्धाच्या ‘भैषज्यगुरू’ या रूपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. ‘भैषज्यगुरू’ म्हणजे भक्तांचे आजार बरे करणारा बुद्ध. हे आजार जसे शारीरिक असतात तसेच मानसिकसुद्धा असतात. भक्तांची दु:खं कमी करणारा, वेदना कमी करणारा तसेच महायान बौद्ध धर्मात आध्यात्मिक उन्नतीसाठी बुद्धाच्या या रूपाची उपासना केली जाते. मृत व्यक्तींच्या स्मरणार्थसुद्धा याकुशी न्योराई याची पूजा केली जाते. जपानमधील प्राचीन मंदिरांमध्ये बहुतेक वेळा बुद्धाच्या या रूपाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. काळाच्या ओघात याची जागा ‘जिझो’ म्हणजे ‘क्षितिगर्भ’ या ‘बोझुत्सू’ म्हणजे बोधिसत्त्वाने घेतली. आपल्या वडिलांना मृत्यूनंतर कोणताही त्रास होऊ नये म्हणूनही कदाचित या मंदिराची उभारणी राजकुमार शोतोकू याने केली असावी.

आज या मंदिराच्या संकुलाचे ‘साइ-इन‘ आणि ‘तो-इन’ असे दोन भाग आहेत. त्यापैकी पश्चिमेकडील भागाचे नाव ‘साइ-इन’ आहे आणि तिथे ‘कोंदो’ म्हणजे सभागृह किंवा मंदिर आणि पाच मजली पॅगोडा आहे, तर ‘तो-इन’ या पूर्वेकडील भागात अष्टकोनी आकाराचे ‘युमेदोनो’ (स्वप्नातील सभागृह) आहे. याशिवाय या मंदिर संकुलात भिक्षूंसाठी निवासस्थान, व्याख्यानासाठी सभागृह, ग्रंथालय आणि भोजन कक्षही आहेत. येथील ‘युमेदोनो’ येथे पूर्वी राजकुमार शोतोकू याचा राजवाडा होता. तोही आगीत जळाला. त्यानंतर इथे ही अष्टकोनी इमारत बांधण्यात आली. ही इमारत राजकुमार शोतोकूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बांधली गेली. खुद्द गौतम बुद्ध राजकुमार शोतोकूच्या रूपात इथे आले होते आणि त्यांनी तिथे ध्यानधारणा केली अशी आख्यायिका या परिसरात प्रसृत झाली होती. त्यामुळे काळाच्या ओघात या इमारतीला ‘युमेदोनो’ हे नाव मिळाले. 1939 साली झालेल्या उत्खननात या राजवाडय़ाचे अवशेष सापडले होते.

‘साइ-इन’ या भागात उभा असलेला पाच मजली पॅगोडा 32.45 मी. उंच आहे. त्याच्या मधोमध असलेला स्तंभ लाकडीच आहे. ‘डेन्ड्रोनोलाजी’ नावाच्या शास्त्राrय परीक्षणामुळे काळाच्या ओघात झाडावर तयार होणाऱया वलयांच्या शास्त्राrय अभ्यासानंतर झाड नेमके कधी तोडले याचा अंदाज करता येतो. त्या अभ्यासानंतर असे लक्षात आले की, या पॅगोडय़ामध्ये असलेल्या मूलस्तंभाचे लाकूड इ.स.594 मध्येच तोडले होते. पॅगोडय़ाच्या तळाशी गौतम बुद्धाच्या हाडाचा तुकडा असलेला अस्थिकरंडक आहे असे मानले जाते. 1958 साली झालेल्या डागडुजीमध्ये तो करंडक थोडा काळ त्याच्या जागेवरून सरकवला होता अशी नोंद झाहे. याच ‘साइ-इन’ या भागात ‘कोंदो’ म्हणजे मुख्य मंदिरही आहे. या मंदिराचा आकार 18.5 मी. x 15.2 मी. असा आहे. ही इमारत दुमजली आहे. पहिल्या मजल्यावर दोन स्तरांचे छत आहे, तर वरच्या मजल्यावर एकच छत आहे. या छतांचे बाहेरील कोपरे पाकार आहेत. पहिल्या मजल्यावरील सभागृहात काही प्राचीन चित्रे शिल्लक होती. त्यापैकी काही चित्रांना हानी पोचली. 26 जानेवारी 1949 रोजी या जेव्हा या परिसरातील इमारतींचे संवर्धनाचे काम चालू होते त्या वेळेस अपघाताने या सभागृहास आग लागली. 1954 मध्ये हे काम पूर्ण झाले, पण शेवटी आता जे काही शिल्लक आहे त्यामध्ये फक्त 15 ते 20 टक्के भाग हा प्राचीन मंदिराचा आहे. बाकीची पुनर्बांधणी झाली आहे. जो भाग जळाला होता, तोसुद्धा अतिशय काळजीपूर्वक एका पक्क्या इमारतीत हलवला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या विषयावर काम करणाऱया अभ्यासकांना तो उपलब्ध असेल. या इमारतीमध्ये बऱयाच मोठय़ा संख्येने चित्रे काढली होती. त्या चित्रांच्या शैलीवर अजिंठा आणि दुन हुआंग येथील चित्रशैलींचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. या मंदिरात अजूनही काही मौल्यवान गोष्टी सापडल्या. त्यांना होर्यू-जी येथे सापडलेला खजिना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या खजिन्याची माहिती पुढच्या भागात पाहू या. (क्रमश:)
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)
manjirib24@gmail.com




भटकंती – मांडवगढचा रूपमती महल

 http://www.saamana.com/maheshwar-mandavgarh-roopmati-mahal-madhya-pradesh-article-by-professor-varsha-chopde/

सामना ऑनलाईन

>>प्रा. वर्षा चोपडे

मध्य प्रदेशाला हिंदुस्थानाचे हृदय म्हटले जाते. देशातील मध्यवर्ती स्थानामुळे याला मध्य प्रदेश हे नाव पडले. हिंदुस्थानातील मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावानेसुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. इंदोर मध्य प्रदेशातील प्रसिद्ध शहर आहे. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर नगरी म्हणून याची ख्याती आहे. पर्यटक इंदोर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांना भेट देऊन पर्यटन, खाद्यसंस्कृती आणि कपडे, दागिने आणि कलात्मक खरेदीचा आनंद लुटतात. महेश्वर होळकरांची पहिली राजधानी होती. महेश्वर सुंदर आहे, पण जवळच असलेले मांडवगढ किंवा मांडू पर्यटकांना भुरळ पाडते.

ऐतिहासिक माहितीनुसार 16 व्या शतकातील सुलतान बाज बहादूर हा मांडूचा शेवटचा शासक होता. लोककथांनुसार आणि ऐतिहासिक अभ्यासानुसार एकदा तो शिकारीच्या सहलीला गेला होता, तेव्हा त्याला एक मेंढपाळ मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गात असलेली दिसली. संगीताची आवड असलेले बाज बहादूर त्या गायिकेच्या सौंदर्य आणि मधुर आवाजाने लगेचच भारावून गेले. त्याने रूपमतीला लग्नाची मागणी घातली आणि त्याच्या राजधानीत जाण्याची विनंती केली. रूपमतीने मांडूला जाण्यास सहमती दर्शवली, पण एक अट घातली. ती अट अशी होती की, ती तिच्या प्रिय नर्मदा नदीच्या दर्शनी भागातील एका महालात राहील. राणी रूपमतीसाठी मांडू येथे रेवाकुंड बांधले गेले. तिथली जमीन सुपीक होती. नर्मदेच्या पाण्यामुळे संपन्नता होती. त्यामुळे मुघल अकबराने मांडूवर स्वारी करण्याचा निर्णय घेतला आणि अधम खान नावाच्या व्यक्तीला मांडू ताब्यात घेण्यासाठी पाठवले. सुलतान बाज बहादूर शूर होता तो अखेरपर्यंत लढला. अधम खानला आव्हान देणारा बाज बहादूर मोठय़ा मुघल सैन्यासमोर टिकला नाही.त्याच्या सैन्याची संख्या कमी होती. या लढाईत बाज बहादूर मारला गेला. अधम खानने मांडूच्या सुंदर राणी रूपमतीच्या सौंदर्याविषयी खूप ऐकले होते. त्यामुळे त्याच्या मनात राणीला भेटावे हा विचार आला. राणी रूपमती नर्मदा भक्त होती. स्वाभिमानी राणी रूपमतीला हे वृत्त कळताच तिने कसलाही विचार न करता शीलरक्षणासाठी स्वत विष प्राशन केले आणि मृत्यू स्वीकारला…आणि ही प्रेमकहाणी इथेच संपली. अनेक स्मारकांपैकी राणी रूपमती पॅलेस हा निसर्गरम्य परिसरातील राणीच्या प्रेमाची आणि पवित्रतेची आजही साक्ष देत उभा आहे. ही प्रेमकथा मांडूच्या जमिनीवर कायमची कोरलेली प्रेम आणि त्यागाची कथा आहे.

निमार व्हॅली आणि दक्षिणेकडील बाज बहादूर पॅलेस या 365 मीटर उंच खडकाच्या काठावर वाळूच्या दगडाची रचना आहे. बाज बहादूर आणि राणी रूपमती यांची कहाणी मांडूच्या सुंदर अवशेषांमध्ये आजही कायम आहे. सुलतान बाज बहादूर खान यांनी 1555 ते 1562 पर्यंत माळवा सल्तनतचा शेवटचा सुलतान म्हणून राज्य केले. हिरवीगार जंगले, पठार, दऱया आणि दूरवरच्या टेकडय़ांचे विस्तीर्ण पसरलेले कधीही न संपणारे दृश्य निसर्गाच्या मोहकतेकडे नेते.

या गडावर इतरही अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे आहेत. जहाज महल त्यापैकी एक आहे. 15 व्या शतकात सम्राट मोहम्मद शाहचा मुलगा घियास-उद-दीन याने बांधला होता. हा दुमजली राजवाडा मुंज आणि कपूर अशा दुहेरी तलावांनी वेढलेला आहे. ज्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावर हलक्या हाताने तरंगत असल्याचा भास पाहणाऱयांना होतो आणि म्हणूनच याला शिप पॅलेस असेही नाव देण्यात आले आहे. एका विशाल जहाजाच्या देखाव्याचे अनुकरण करून, जहाज महलची वास्तुकला अफगाण, मुघल, हिंदू आणि मेसोपोटेमियन शैलींचे एक मिश्रण आहे. वास्तूचे सौंदर्य वाढवण्यासाठी रंगीबेरंगी दगडांनी हा वाडा बांधला आहे. या 120 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद महालात खुले मंडप, खुली टेरेस आणि बाल्कनी आहेत. त्याच्या बाल्कन्या आणि इतर बांधकाम अशा तऱहेने बांधलेले आहे की आवाज दिला तर संपूर्ण राजवाडय़ात त्याचे कंपन अनुभवायला येतात. हिंदोळा महाल हा मांडू येथील किल्ल्याच्या आत असलेला एक प्राचीन राजवाडा आहे.

हे स्थळ हिंदोळा महाल किंवा अशरफी महल ‘सोन्याच्या नाण्यांचा राजवाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे. अशरफी महल हा मांडूमधील ग्रामसमूहाचा किंवा मध्यवर्ती स्मारकांचा एक भाग आहे. येथील सुपार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर, नीळकंठ महादेव मंदिर आणि नीळकंठ पॅलेस, काकडा खो धबधबा, छप्पन महल संग्रहालय ही स्थळेही अभ्यासक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. तलावांचे विहंगम दृश्य, आजूबाजूच्या लँडस्केप गार्डन्स आणि पलीकडची हिरवळ मन मोहित करणारी आहे.

– varshakisanc@gmail.com
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी
म्हणून नियुक्त आहेत.)









भटकंती – करपाका विनायक

 http://www.saamana.com/karpaga-vinayak-temple-article-by-varsha-chopade/

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

देशात आणि विदेशात अनेक गणेश मंदिरे आहेत. पण काही मंदिरे खास असतात. कारण त्या मंदिरांची बांधकाम शैली आणि आकर्षक मूर्ती भक्तास नतमस्तक होण्यास भाग पाडतात. यापैकी करपाका विनायक मंदिर पिल्लैयर पट्टी, थिरुपत्तूर, तामीळनाडू येथील गणेश मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. हे मंदिर मदुराई शहराच्या ईशान्येस सुमारे 75 किलोमीटर आणि तामीळनाडूमधील कराईकुडी शहराच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर आहे.

पिल्लैयर हे गणेशाचे तामीळ नाव आहे त्याचा अर्थ ज्ञानाचा स्वामी असा होतो. मंदिराचा इतिहास 2500 वर्षांहून अधिक जुना आहे. हे गणपतीला समर्पित प्राचीन दगडी मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या दगडांवर सापडलेल्या आगम ग्रंथानुसार ते 1091 ते 1238 च्या दरम्यान बांधले गेले असावे. तथापि, चौथ्या शतकापूर्वीचे वेगवेगळे शिलालेख आहेत, त्यामुळे हे मंदिर केव्हा बांधले गेले याची कोणतीही अचूक तारीख नाही. कारण आपल्याला विमानम, राजगोपुरम, भाषाशैली यांसारखे विविध पुरावे आढळतात. प्राचीन सुबक नक्षीकाम आणि भव्य मंदिर डोळ्याचे पारणे फेडते.

भगवान करपाका गणेशाची सोंड उजवीकडे वळवलेली आहे आणि मूर्ती दोन हात, दोन पाय या रूपात आहे. गणपती मूर्ती सहा फूट उंच असून भव्य आहे. या मूर्तीला दगडात बनवले आणि गर्भगृहात तिची स्थापना केली आहे. संपूर्ण मूर्तीला सोन्याने मढवलेले असल्यामुळे भक्तांना प्रदक्षिणा घालता येत नाही. बाजूला पाण्याचे भलेमोठे तळे आहे. पवित्र स्नान केल्यावरच मंदिरात दर्शन घ्यावे असा नियम आहे. पण हा नियम आता फारसा पाळला जात नाही. या प्राचीन दगडी मंदिराबाबत विद्वान म्हणतात की, भगवान विनायक हा बुद्धीचा देव आहे. विनयागर करपगम वृक्षा (कल्पवृक्ष-आपल्या इच्छेनुसार काहीही देऊ शकणारे एक स्वर्गीय वृक्ष) प्रमाणे त्याच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याला ‘करपगा विनायक’ असेही म्हणतात. पाय दुमडलेला आणि पद्म आसनात जमिनीला तळव्यांचा स्पर्श न करता बसलेला दिसतो. विनायक या शब्दाचा अर्थ आहे ‘अतुलनीय नेता’. ज्या ‘सिरपी’ने म्हणजे शिल्पकाराने ही मूर्ती तयार केली होती, त्यांनी त्याचे नाव मूर्तीजवळ ‘एकतूर कोन पररूपण’ असे कोरले आहे. इतिहासकारांचे म्हणणे आहे की लेखनशैली आणि वापरलेली तमिळ अक्षरे ‘तमिझी’ प्रकार म्हणून ओळखली जातात, जी इ.स.पू. पाचव्या शतकात वापरली जात होती. उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या वलंबूरी विनायकाची पूजा करणाऱया या भक्तानुसार गणपती नवसाला पावणारा आणि इच्छापूर्ती करणारा आहे.

पशुपतिश्वरांचे शिल्प, ‘भगवान शिवाला दूध अर्पण करणारी गाय’ हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. या मंदिरात धनाचा स्वामी कुभेरन यांनीही पूजा केली होती. तसेच अध्यात्मात भर घालणारी देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गाईला या मंदिरात विशेष स्थान आहे. इतर ठिकाणांप्रमाणे तिरुवीसर, मरुधीसर आणि सेंचडेश्वरर आणि तीन देवी शिवगामी अम्मन, वदमलार मंगाईममन आणि सौंदरा नायगा अम्मान हे तिन्ही लिंगम एकाच ठिकाणी दिसतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. यात्रेकरूंना पाणी पुरवण्यासाठी मंडपमच्या आत एक मंदिर विहीर आहे. असे मानले जाते की या मंदिरात काथ्यायिनी अम्मनची पूजा केल्याने स्त्रिया दोषापासून मुक्त होतात. या अत्यंत पुरातन मंदिरामध्ये 15 हून अधिक शिलालेख आढळतात, यावरून मंदिर किती पुरातन आहे हे कळते. करपाका विनायक मंदिर हे दक्षिण हिंदुस्थानातील पांडय़ा राजवंशाच्या योगदानाची साक्ष आणि पुरावा आहे. हे मंदिर चेट्टियार, व्यापारी आणि व्यापारी समुदायाच्या नऊ वडिलोपार्जित हिंदू मंदिरांपैकी एक आहे. त्याची देखभाल चेट्टियार ट्रस्ट (नगररथर्स) करतात, विनायक चतुर्थी उत्सव येथे दहा दिवस साजरा केला जातो. नवव्या दिवशी रथोत्सव आणि शोभा मिरवणूक काढली जाते. प्रसन्न, शांत वातावरण आणि मोहक गणेश मंदिरात गणपती प्रत्यक्ष बसला आहे असा भास होतो हे नक्की.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

varshakisanc@gmail.com






आशियाई स्थापत्य वैभव – चांदीचे नसलेले रजतमंदिर गिंकाकु-जी

 


सामना ऑनलाईन

>> डॉ. मंजिरी भालेराव

क्योते या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात 17 जागतिक वारसा स्मारके आहेत, त्यापैकी एक गिंकाकु-जी मंदिर. याचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. चांदीचे मंदिर बांधण्याची योजना पूर्ण झाली नसली तरी अवलोकितेश्वराचे स्थान असलेले हे मंदिर याच नावाने ओळखले जाते.

जपानची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्योतोचे थोडेफार महत्त्व आपण मागच्या काही लेखांत पाहिले. या शहराच्या परिसरात जपानचा इतिहास आणि संस्कृतीचे विलोभनीय पुरावे दाखवणारे अनेक अवशेष पहायला मिळतात. खुद्द जपानमधल्या लोकांना या सांस्कृतिक वारशाचा खूप अभिमान आहेच, पण जगभरातून येणारे पर्यटकसुद्धा इथे खूप गर्दी करतात. अशा या सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या परिसरात आज 17 जागतिक वारसा स्मारके आहेत. त्यापैकी एक म्हणजे गिंकाकु-जी. या मंदिराच्या नावाचा अर्थ आहे चांदीचे मंदिर. जसे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर या परिसरात आहे तसेच, किंबहुना त्यापासून स्फूर्ती घेऊन चांदीचे मंदिर बांधण्याची योजना झालेली होती, पण दुर्दैवाने ते पूर्ण होऊ शकले नाही. ओशिकागा योशिमित्सुच्या स्मरणार्थ जसे किंकाकु-जी बांधले गेले तसेच त्याचा नातू ओशिकागा आशिकागा योशिमासा याच्या इच्छेखातर या स्थळी गिंकाकु-जी हे मंदिर बांधले गेले. या दोन्ही मंदिर संकुलांच्या विकासातही साम्य आहे. आधी निवृत्तीनंतरचा राजवाडा असलेले हे स्थळ ओशिकागा आशिकागा योशिमासाच्या मृत्यूनंतर एका झेन बौद्ध मंदिरात रूपांतरित झाले. कान्नोन-देन किंवा अवलोकितेश्वराचे स्थान असलेला मंडप हे येथील मुख्य सभागृह आहे. ते दुसऱया मजल्यावर आहे. त्याच्यावर चांदीचा मुलामा लावायची मुळात योजना होती, पण ती कधीच पूर्ण झाली नाही.तरीही त्याच नावाने या मंडपाची प्रसिद्धी झाली आणि आज ते रजत किंवा चांदीचे मंदिर नावाने प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे मूळ नाव हिगाशियामा जिशो-जी असे आहे. मुरोमाची शोगुनपैकी आठवा शोगुन म्हणजे अशिकागा आशिकागा योशिमासा. तो वयाच्या नवव्या वर्षी कुटुंबप्रमुख झाला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शोगुन झाला. त्याने त्याच्या आयुष्यात स्वत:ची सौंदर्यदृष्टी वापरून अनेक स्थळे विकसित केली. साधेपणा हा त्याच्या विचारांचा आणि सौंदर्याच्या संकल्पनेचा स्थायिभाव होता. याच विचारांमधून प्रसिद्ध अशी हिगाशियामा संस्कृती विकसित झाली. यामध्ये जगप्रसिद्ध जपानी चहा पिण्याचा समारंभ, फुलांची सजावट (इकेबाना), बागेची वैशिष्टय़पूर्ण रचना, नोह नाटय़ प्रकार, काव्य तसेच जपानी स्थापत्य यांचा समावेश होतो. या कला खास जपानच्या वैशिष्टय़पूर्ण कला म्हणून पुढे प्रसिद्ध झाल्या, पण त्यांचा उगम या काळात झाला होता. त्याच प्रकारे त्याने आपला हिगाशियामा राजवाडाही बांधला. इ.स. 1460 मध्ये या मंदिराचे बांधकाम करायला सुरुवात झाली, पण मध्ये ओनिन युद्धाच्या काळात यात काही काळ खंड पडला. नंतर परत त्याचे बांधकाम सुरू झाले. इ.स. 1485 मध्ये तो बौद्ध भिक्षू बनला. हिगाशियामा या क्योतोजवळ असलेल्या डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांना क्योतोच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.

इ.स.1490 मध्ये अशिकागा आशिकागा योशिमासा याच्या मृत्यूनंतर हा राजवाडा आणि परिसर यांचे रूपांतर झेन बौद्ध मंदिरात झाले. योशिमासा याचे मृत्यूनंतरचे बौद्ध धर्मातील नाव जिशो- इनदोनो होते. त्यावरून या मंदिर संकुलाचे अधिकृत नाव जिशो-जी असे पडले. ते रिन्झाई झेन पंथाच्या शोकोकु शाखेशी संलग्न आहे. रिन्झाई झेन पंथाची शोकोकु ही एक स्वतंत्र शाखा आहे. शोकोकु-जी हे क्योतोमधले एक अतिशय महत्त्वाचे बौद्ध मंदिर आहे. पूर्वी क्योतोमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली पाच बौद्ध मंदिरे प्रसिद्ध होती. त्यापैकी एक म्हणजे शोकोकु-जी होते. त्या मंदिराची स्थापनासुद्धा अशिकागा आशिकागा योशिमात्सु या आशिकागा योशिमासाच्या आजोबांनी केली होती. त्यांनीच किंकाकु-जी म्हणजे सुवर्णमंदिराचीही रचना केली होती. योशिमासानेही किंकाकु-जी या सुवर्ण मंदिराला एक भेट देऊन त्याप्रमाणे आपल्या मंदिराची रचना करायचे ठरवले. त्याच वेळेस त्याने कान्नोन-देन हे दुसऱया मजल्यावरचे सभागृह चांदीचा मुलामा देऊन सजवायचे ठरवले होते, पण दुर्दैवाने त्याच्या आधीच योशिमासाचा मृत्यू झाला होता. चांदीचा मुलामा देऊन सभागृह सजवण्याचे त्याचे स्वप्न अर्धवटच राहिले, पण पुढेही कोणी ते पूर्ण केले नाही. 16व्या शतकात या परिसरात झालेल्या युद्धात मुख्य इमारत सोडून संकुलातील बाकीच्या सगळ्या इमारती जळून खाक झाल्या. पुढे 17व्या शतकाच्या सुरुवातीला त्याचा मोठय़ा प्रमाणावर जीर्णोद्धार झाला.

या मंदिराच्या परिसरात असलेल्या बागेत हिरवळ, पाणी, खडक अशा गोष्टींचा सुरेख वापर केला आहे, पण सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तिथे असलेली पांढरीशुभ्र वाळू ! मंदिराच्या अंगणात पसरलेल्या या वाळूमुळे या मंदिर परिसराचा मनावर एक वेगळाच प्रभाव पडतो. किंकाकु-जी मंदिराच्या छतावर जसा सोनेरी फिनिक्स पक्षी बसवला आहे तसाच इथे चंदेरी फिनिक्स पहायला मिळतो. 1994 साली क्योतोमधील 17 स्मारकांना जागतिक वारसा हा दर्जा मिळाल्यामुळे इथे अशी गर्दी होणे स्वाभाविकच आहे, पण क्योतोमधील मंदिरांच्या आवारातील सुंदर बागांच्या क्रमवारीत गिंकाकु-जीच्या बागेचा क्रमांक बराच वरचा लागतो. त्यामुळेही या परिसरात येणारे पर्यटक चांदीचा मुलामा नसला तरी या रजतमंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिर संकुलात प्रचंड गर्दी करतात.

manjirib24@gmail.com

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इंडॉलॉजी आहेत.)

संस्कृती सोहळा – देशापल्याडचे गणराया

सामना ऑनलाईन

अभय कुलकर्णी 

आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे.  कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा तर महाराष्ट्राच्या लोकोत्सवातील एक महत्त्वाचा उत्सव आहे.   आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जगभरात स्थायिक झालेले मराठी जन गणेशोत्सव साजरा करत असतात, पण त्यापूर्वीपासून, अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत.  या बहुतेक देशांमध्ये आजही गणेशपूजनाची परंपरा आहे.

कोणत्याही कामाची सुरुवात आपल्याकडे नेहमीच गणेशपूजनाने केली जाते.  अग्रपूजेचा मान हा नेहमी श्री गणेशालाच दिला जातो. मात्र अनेक परदेशांतही गणेशपूजन केले जाते. त्यापैकी काही देशांत पूर्वापार ही प्रथा आहे; तर काही देशांत आपल्याकडून ही प्रथा घेतली गेली आहे.

सम्राट अशोकाच्या कन्येने नेपाळची सध्याची राजधानी असलेल्या काठमांडू येथे गणेश मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. नेपाळमध्ये पूर्वीपासूनच गणेशपूजन केले जात होते. तिथे गणेशाला ‘सूर्यविनायक‘ या नावानेही ओळखले जाते. तिथे विघ्नविनाशक देवता म्हणून गणेशाला अग्रपूजेचा मान दिला जातो. नेपाळप्रमाणेच तिबेटमध्येही याच प्रकारे गणेशपूजन केले जाते. तेथील प्राचीन मठांमध्ये गणेशाच्या पूजनाची परंपरा आहे. नवव्या शताब्दीच्या पूर्वार्धात तिबेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गणेशपूजन सुरू झाले. भूतपिशाच आणि दुष्ट शक्तींचा विनाशकर्ता म्हणून तिथे गणेशाची ओळख आहे. म्यानमारमध्येही गणेशपूजन केले जाते. तेथील बौद्ध मंदिरांतही गणेशमूर्ती आढळतात.

जावामध्ये सापडलेली गणेशमूर्ती आज लंडनच्या वस्तुसंग्रहालयात ठेवली गेली आहे. इंडोनेशियातील हिंदू लोकही गणेशाची पूजा करतात. बाली द्वीपावर राजाराणीच्या मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तींच्या उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती प्रस्थापित केली जात असे. श्रीलंकेत कोलंबोपासून सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या कदरगाम येथे गणेशाचे भव्य मंदिर आहे. बोर्नियोमध्ये गणेशपूजनाची परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. कंबोडिया आणि थायलंडमध्येही गणेशपूजनाची प्राचीन परंपरा आहे. कंबोडियाची प्राचीन राजधानी अंगारकोट येथे तर गणेशमूर्तींचा खजिनाच सापडला आहे. विविध प्रकारच्या रंगरूपात तिथे गणेशमूर्ती सापडल्या आहेत. ‘प्राहाकनैत’ या नावाने कंबोडियात गणेशपूजा केली जाते. चीनमध्ये गणेशाला ‘कुआन शी तिएन’ या नावाने ओळखले जाते. तिथे ‘कांतिगेन’ या नावानेही गणेशाला ओळखले जाते.

जपानमध्ये गणेशाला ‘कांतिगेन’ या नावाने ओळखले जाते. येथील मूर्तींना दोन किंवा चार हात असतात.  जपानमधील कोयसान संतसुजी विहारात चार ओळीत गणेशाची चित्रे मांडण्यात आली आहेत. त्यात युग्म गणेश, षड्भुज गणेश, चतुर्भुज गणेश आणि सुवर्णगणेश ही प्रमुख चित्रे आहेत.

कालांतराने गणेशाच्या पाच रूपांचे जपानमध्ये पूजन केले जाऊ लागले. कोंगो जाई तेन हे पहिले रूप होय. यालाच छत्रविनायक असे म्हणतात. गणेशाच्या दुसऱया रूपाला कोंगो जिकीतेन किंवा माल्य विनायक असे म्हणतात. तसिरा कांतिगेन किंवा भाग्यविनायक हा तिसरा गणपती होय. गेंगो एतेन हा चौथा गणपती. यालाच धनुर्विनायक या नावानेही ओळखले जाते. जेबु कुतेन हा पाचवा गणपती म्हणजे खड्गविनायक. जपानमध्ये सर्वसामान्यपणे गणेशपूजन केले जाते. चीनच्या तून हू आग येथे सन 644 मध्ये एका पर्वतावर गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याखाली चिनी भाषेत लिहिले आहे की, हा हत्तींचा राजा आहे. चीनमध्ये उभे राहून एकमेकींना आलिंगन देणाऱया दोन गणेशांची मूर्ती आढळते. म्यानमारमध्ये गणपतीला महापिनी, नेपाळमध्ये हेरंब विनायक, मंगोलियात घोटाकर आणि तिबेटमध्ये सोकापरक या नावाने ओळखले जाते. जावामध्ये गणपतीला कालांतक म्हणतात. येथील चंडिबनोन नावाच्या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेशाबरोबच गणपतीची मूर्तीही आहे. इंडोनेशियात गणपतीला बोरोगणेश म्हणतात.

अफगाणिस्तानात कुशाणपूर्व काळापासून गणेशपूजेची प्रथा होती. पश्चिम इराणमधील लुरिस्तान येथे करण्यात आलेल्या उत्खननात इ. स. पू. 1200 ते 1000 या काळातील गणेशमूर्ती सापडल्या आहेत. अहुरमज्दा या नावाने इराणी लोक गणेशाची पूजा करतात.  इराणमधील गणपती खड्गयोद्धा स्वरूपाचा असून तो नावाप्रमाणेच योद्धा आहे.

हिंदुस्थानपासून दूरवर असलेल्या देशांचा विचार करता ग्रीसमध्ये ओरेनस नावाच्या देवाची पूजा केली जाते. त्याचे स्वरूप बऱयाच अंशी गणेशाच्या स्वरूपाशी जुळणारे आहे. इजिप्तचा इतिहासकार हर्मिज याच्या मते ओरेनस हा सर्व देवांच्या आधी पुजला जाणारा देव आहे. तो बुद्धीचा देव असून त्याचे नाव एकहोन आहे. एकदंत या नावाशी या नावाचे साम्य आढळते. त्यामुळे हे गणेशाचेच वर्णन असावे असे मानले जाते.  ब्राझीलमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. मस्तक हत्तीचे आणि शरीर माणसाचे अशा प्रकारच्या देवतेचे मेसिकोतील लोक आजही पूजन करतात. बुद्धीची रोमन देवता जेनस हिलासुद्धा हत्तीचे मस्तक असते. ती गणेशाच्या समकालीन मानली जाते. तिचे पूजनही मंगळवारीच केले जाते. अठराव्या शतकातील संस्कृतचे प्रकांड पंडित विल्यम जोन्स यांनी जेनस आणि गणेश यांची तुलना करून असा निष्कर्ष काढला आहे की, गणेश आणि जेनस यांच्यात कमालीचे साम्य आढळते. गणेशाची सर्व वैशिष्टय़े जेनसमध्येही आढळतात. रोमन आणि संस्कृत शब्दांच्या उच्चारांतही साम्य आढळते. जेनस आणि गणेश हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हनोई येथे विघ्नेश्वर असे गणपतीचे नाव असून तो कमळात बसलेला असतो. ‘गणेश- अ मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड’नुसार, जगाच्या कित्येक भागांत गणेशपूजनाची प्रथा सुरू होती आणि या मूर्तींच्या आकारांत आणि प्रकारांत विभिन्नता आढळते. प्राचीन काळात हिंदुस्थानी संस्कृती दूरवर पसरलेली होती हेच यावरून सिद्ध होते.








भटकंती; केरळातील विलोभनीय धबधबे


सामना ऑनलाईन

>>प्रा. वर्षा चोपडे

आपला हिंदुस्थान देखणा आणि सारे जहां से अच्छा आहे. देशातील धुक्याने आच्छादलेली शिखरे, उत्साही प्रवाह, धबधब्याची विहंगम रूपे, हिरवेगार जंगल, विविध वृक्षवेली आणि निसर्गाचा उत्तम आनंद लुटण्यासाठी एखाद्या अद्भुत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर केरळला आवर्जून भेट द्या. केरळमध्ये एकूण 27 अप्रतिम सुंदर धबधबे आहेत. केरळमधील धबधबे त्याच्या मोहक सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जी नैसर्गिक दृश्ये आपण बघतो त्याला तोड नाही. येथील धबधब्यांच्या वाटेवरचे स्वर्गीय वातावरण, सुपारी, मिरपूड, आले आणि मसाल्यांच्या बागा आपल्या अनोख्या सुगंधाने मन बेभान करतात. केरळात अनेक धबधबे आपण बघू शकतो आणि त्यात तुडुंब भिजू शकतो. परिवारासोबत त्याचा आनंद लुटू शकतो. मी भेट दिलेले काही धबधबे मला अवर्णनीय वाटतात. कारण स्वच्छ नितळ पाणी आणि सुरक्षित जंगल मन भारावून टाकतात, तर पहिला धबधबा आहे अथिरपिल्ली धबधबा. त्रिशूर जिह्यातील चालकुडी तालुक्यातील अथिराप्पिल्ली पंचायतीमध्ये चालकुडी नदीवर स्थित आहे. कोची शहरापासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर असून ‘बाहुबली’ सिनेमात हा धबधबा अप्रतिम चित्रित केला आहे. त्यामुळे पर्यटक मुद्दाम या धबधब्याला भेट देतात. अथिरापिल्ली फॉल्स हा केरळमधील सर्वात मोठा धबधबा आहे आणि त्याला ‘दक्षिण हिंदुस्थानातील नायगारा’ असे टोपणनाव आहे. पण आता ‘बाहुबली’ सिनेमामुळे पर्यटक याला ‘बाहुबली धबधबा’ म्हणून संबोधतात. थिरापिल्ली ते वाझाचल धबधबा या मार्गावर रस्त्याच्या अगदी जवळ आणखी एक धबधबा आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘चारपा धबधबा’ म्हणतात. जवळच असलेला एझात्तुमुघम प्रकृति ग्रामम् येथील वाढाचल धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे. पावसाळय़ात जून-सप्टेंबरला लाखो पर्यटक फॉल्स आणि वाझाचल पिकनिक स्पॉटला भेट देतात. अथिरप्पिली हे तामीळनाडू आणि केरळला जोडणाऱया राज्य महामार्गावर घनदाट जंगलात वसलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला परवानगी नाही. दोन्ही बाजूंच्या चौक्या संध्याकाळी साडेसहा वाजता बंद होतात. त्यापूर्वी सर्व वाहनांना दोन्ही चेकपॉइंटमधून बाहेर पडावे लागते.

दुसरा धबधबा थुशारागिरी. कोझिकोडपासून 50 किमी अंतरावर असलेल्या थुशारागिरी धबधब्यात एरत्तुमुक्कू, माझविल चट्टोम आणि थुंबिथुल्लम पारा यांचा समावेश आहे. येथे ट्रेकिंगद्वारे किंवा वाहनाने सहज पोहोचता येते. धबधब्यांमुळे पर्वताच्या शिखरावर तयार झालेल्या सुंदर चांदीच्या मुकुटावरून थुशारागिरी किंवा ‘मिस्ट-कॅप्ड पीक्स’ हे नाव पडले आहे. पश्चिम घाटातून उगम पावणारे दोन प्रवाह येथे मिळून चालीपुझा नदी बनते. नदी तीन धबधब्यांमध्ये वळते आणि एक बर्फाच्छादित स्प्रे तयार करते, ज्यामुळे ‘थुशारागिरी’ हा शब्द आहे. ज्याचा अर्थ बर्फाच्छादित पर्वत असा आहे. पावसाळा आणि हिवाळय़ाचा काळ या धबधब्यास भेट देण्यास उत्तम आहे. अनेक पर्यटक येथे धबधब्याचा आनंद लुटतात. तुषारगिरी धबधब्याजवळ चाळीपुझा येथे तुषारगिरी पूल आहे. हा केरळमधील सर्वात उंच कमान पुलांपैकी एक आहे.

तिसरा पलारुवी धबधबा. हा धबधबाही अत्यंत प्रसिद्ध आहे. केरळ-तामीळनाडू सीमेजवळ स्थित पलारुवी धबधबा, थेनमालाच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रमुख आकर्षण आहे. पलारुवी म्हणजे ‘दुधाचा प्रवाह’. या धबधब्यात पाणी 300 फूट उंचीवरून खडकांमधून खाली येते. हे एक आनंददायक पिकनिक स्पॉट बनले आहे, जिथे कोणीही विनाव्यत्यय विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो. फेसाळणारे पाण्याचे प्रवाह, चांदीसारखा चमचमणारा आणि थंड वातावरण असलेला हा धबधबा डोळय़ांचे पारणे फेडतो. पलारुवी कोल्लमपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे आणि या जल-स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना सुमारे चार किमी खोल जंगलात जावे लागते. धबधब्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सरकारी वाहन व्यवस्था आहे. त्यामुळे वेळ असेल तर स्वर्गीय केरळला आणि या धबधब्याला जरूर भेट द्या.
– varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

भटकंती – केरळचे वायनाड इडक्कल लेणी

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळमधील वायनाड जिल्हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. केरळ, तामीळनाडू आणि कर्नाटक. खरं तर, केरळचा हा एकमेव जिल्हा आहे ज्याची सीमा इतर दोन राज्यांशी आहे. वायनाडचा हिंदू धर्माशी संबंध हजारो वर्षांपूर्वीचा आहे. हिंदूशिवाय मुस्लिम आणि ख्रिश्चन तसेच आदिवासी समुदाय येथे आनंदाने राहतात. आश्रमकोळी (वाल्मिकींचा आश्रम), योगीमुला, रामपल्ली, सीता मंड, पुथडी आणि चोरुपुरा ही ठिकाणे रामायण काळाशी संबंध दर्शवतात. रामायण, महाभारत आणि दक्षिण भारत यांचा संबंध असावा. कारण प्राचीन मंदिरे आणि पौराणिक गोष्टीत त्याचा उल्लेख आढळतो. पुलपल्ली येथे सीता-लव-कुश मंदिर असल्याची स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि पुलपल्ली येथेच देवी सीतेने लव आणि कुशला जन्म दिला अशी मान्यता आहे. आश्रम सुंदर आहे. पुलपल्ली सीता-लव-कुश मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे. मंदिर वायनाड जिह्यात आहे. तेथील आदिवासी समुदाय भगवान  राम आणि सीता यांना त्यांच्या स्वतच्या कुटुंबातील व्यक्ती मानतात. राक्षस बाणासुरमला आणि भगवान कृष्ण यांच्यातील युद्ध बाणासुरमालावर झाले होते. असे मानले जाते की, युद्धादरम्यान कृष्णाने बाणासुराचा करम (हात) कापला आणि म्हणून त्या जागेचे नाव कराबनाम पडले. बाणासूर टेकडीच्या पायथ्याशी असलेले कराबनाम मंदिर या जिह्यात  प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, रावणावर विजय मिळविण्यासाठी ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाखाली भगवान रामाने तिरुनेल्ली मंदिरात प्रार्थना केली. वायनाड जिह्यात  वाल्मिकींचा आश्रम, बाणासूर सागर धरण, कुरुवा आयलॅन्ड, कोडे तलाव, थोलपेटी वन्य जीव अभयारण्य, बांबू कारखाना, वायनाड वन्य जीव अभयारण्य, सोचीपारा फॉल्स, फँटम रॉक, नीलिमाला ह्यू पॉइंट आणि इतर प्रेक्षणीय स्थळे आपण बघू शकतो. हिंदुस्थानला खूप प्राचीन संस्कृतीचे लेणे लाभले आहे. देशातील विविध राज्यांत पुरातन लेण्या आहेत आणि त्याचा इतिहास वेगवेगळा आहे. इडक्कल लेणीहिंदुस्थानातील केरळमधील वायनाड जिह्यातील कलपेट्टापासून 25  किमी (15.5 मैल) दूर इडक्कल येथे दुर्गम ठिकाणी दोन नैसर्गिक गुहा आहेत. त्या म्हैसूरच्या उंच पर्वतांना मलबार किनाऱयावरील बंदरांशी जोडणाऱया प्राचीन व्यापारी मार्गाजवळ अंबुकुट्टी माला येथे समुद्रसपाटीपासून 1,200  मीटर आणि 3,900  फूट उंचीवर आहेत. गुहांच्या आतील भागात सचित्र लेखन आहे, जे या प्रदेशात  वस्ती असल्याचे सूचित करतात. ब्रिटिश काळात 1890 मध्ये तत्कालीन मलबार राज्याचे पोलीस अधिकारी फ्रेड फॉसेट यांनी या गुहांचा शोध लावला होता, पण कयास आहे की आदिवासींना ही लेणी परिचित असावी. त्यांनी  मानववंश शास्त्राrय आणि ऐतिहासिक महत्त्व लगेच ओळखले होते. आणि त्यावर  एक लेख लिहिला होता त्यामुळे अनेक पर्यटकांमध्ये या लेण्यांबाबत आकर्षण निर्माण झाले. इडक्कलच्या पाषाणयुगीन लेण्यावरील कोरीवकाम दुर्मिळ आहे.

खडकाचा तुकडा फुटल्यामुळे 30 फूट खोल भाग आहे. येथे एका बाजूला लाखो टन वजनाचा खडक आहे जो गुहेचे ‘छत’ असल्यागत भासते. गुहेत जे कोरीव काम तसेच मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्यांचे आणि काही अज्ञात चिन्हे बघून असे  वाटते की, इडक्कल लेण्यांमध्ये इतिहासात वेगवेगळय़ा ठिकाणी अनेक वेळा विविध समुदायांची वस्ती होती.

या गुहेला ‘अम्पकुठय  माला’ असेही म्हणतात. कारण रामाचे पुत्र लव आणि कुश यांनी डोंगरावर बाण मारून गुहा निर्माण केली होती असे मानले जाते, पण चित्रांचा सिंधू संस्कृतीशी संबंध असावा असा तर्क आहे.

केरळ राज्य पुरातत्व विभागाचे इतिहासकार लिहितात, ‘येथील प्रतीकांचा शोध हा हडप्पा संस्कृतीशी मिळताजुळता आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने द्रविडीयन संस्कृती आहे आणि सांस्कृतिक प्रसार झाल्याची साक्ष आहे. सिंधू संस्कृती अचानक नाहीशी झाली असे मानणे चुकीचे आहे. इरावथम महादेवन, सिंधू खोरे आणि गेहसूस लिपींचे अभ्यासक म्हणाले की, हे निष्कर्ष अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि ऐतिहासिकदृष्टय़ा त्याला महत्त्व आहे. केरळमधील ही लेणी प्रसिद्ध असली तरी  शेंथुरिनी (शेंदुर्नी) जंगलातील पाषाणयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. उत्तर प्रदेश आणि रामायण यांचा संबंध आहे, परंतु दक्षिण हिंदुस्थान आणि रामायण, महाभारत यांच्या संबंधावर अभ्यासकांनी आपले मत मांडणे जरुरी असून त्यामुळे अनेक शंकांचे समाधान होण्यास मदत होईल हे नक्की.

varshakisanc@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.

भटकंती – केरळमधील प्राचीन शिवमंदिरे

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

केरळ कोट्टायाम जिह्यात वसलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्याने आणि आध्यात्मिक महत्त्वाने आकर्षित तर करतेच, पण वेंबनाड सरोवराने वेढलेले वायकोम पर्यटकांना त्याच्या सुंदर पाणवठे आणि शांत वातावरणाने मोहीत करते. हेच ठिकाण वायकोम सत्याग्रहाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जो सत्याग्रह झाला होता त्याचे नेतृत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पेरियार रामासामी यांनी केले होते. एर्नाकुलम, अलप्पुझा आणि कोट्टायम येथून वायकोमला सहज पोहोचता येते. येथील पन्ना मुरिन्जापुझा बॅकवॉटर आणि हिरवा गालिचा विणलेला निसर्ग पर्यटकांना वेड लावतो.

परंपरेनुसार केळीच्या पानांवर दिल्या जाणाऱ्या ओनासाध्याचा (केरळी जेवण) आणि गोड ताडीचा आस्वाद घेणे आनंददायी अनुभव आहे. येथील मुख्य आकर्षण श्री वायकोम महादेव मंदिर हिंदू देव शिवाला समर्पित आहे. हे मंदिर अशा काही मंदिरांपैकी एक आहे जे शैव, शिव आणि वैष्णवांचे अनुयायी, विष्णूचे अनुयायी या दोघांनीही पूज्य मानले आहे. वायकोममध्ये शिवाला प्रेमाने ‘वायकोम स्वामी वैक्कथप्पन’ म्हटले जाते. येथील शिवलिंग हे हिंदू धर्माच्या दुसऱया युगातील त्रेतायुगातील असल्याचे मानले जाते आणि हे मंदिर केरळमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते.

पारंपरिक कथेनुसार खरा नावाचा राक्षस शैव विद्या उपदेश म्हणजे शैव धर्माचे ज्ञान मिळाल्यावर मलयवनातून सध्याच्या तामीळनाडूतील चिदंबरम या पवित्र शहरात गेला आणि तेथे त्याने मोक्षप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या आणि ध्यानधारणा केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव प्रकट झाले आणि त्याने मागितलेले सर्व वरदान दिले आणि त्यांच्यापासून काढलेली तीन महान लिंगे त्याला दिली. शिव यांनी खराला मोक्ष मिळविण्यासाठी लिंगांची पूजा करण्यास सांगितले आणि ते अदृश्य झाले. खरा राक्षसाने ती शिवलिंगे त्याच्या उजव्या हातात, एक डाव्या हातात आणि गळय़ात घातली व तो तीन लिंगांसह हिमालयातून दक्षिणेकडे परत येत होता. या ठिकाणी आल्यावर थकवा जाणवला म्हणून त्याने शिवलिंग खाली ठेवली. विश्रांतीनंतर जेव्हा त्याने शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हलले नाही. तेवढय़ात आकाशवाणी झाली. “जो माझा आश्रय घेईल त्याला मी मोक्ष देऊन येथेच राहीन!” खराने शिव यांची अट मान्य केली आणि मुक्ती मिळाल्यानंतर शिवलिंगांना व्याघ्रपद नावाच्या ऋषींच्या ताब्यात देऊन त्यांना संरक्षण आणि पूजा करण्यास सांगितले. मल्याळम दिनदर्शिकेनुसार वृचिका अष्टमीच्या दिवशी शिव आणि पार्वती व्याघ्रपदा ऋषींच्या समोर प्रकट झाले. शिवपार्वतीने हे स्थान ‘व्याघ्रपदपुर्म’ म्हणून ओळखले जाईल असा आशीर्वाद दिला.

व्याघ्रपद यांनी काही काळ भक्तिभावाने पूजा चालू ठेवली आणि शिव इच्छेनुसार तीर्थयात्रेला निघून गेले. एके दिवशी परशुराम त्या ठिकाणाहून जात होते. शुभचिन्हे आणि काही चमत्कारिक जाणवले म्हणून ते थांबले असता त्यांना स्वर्गीय किरण उत्सर्जित करणारे एक शिवलिंग पाण्यात बुडलेले दिसले. ते खरा राक्षसाने ठेवलेले शिवलिंग असल्याचे त्यांना समजले. परशुरामांनी विचार केला की, पृथ्वीवरील सर्वात पवित्र व्याघ्रपदपुर्मा हे स्थान मुक्ती प्राप्त करू इच्छिणाऱया भक्तांसाठी एक उत्तम आश्रय असू शकते. त्यांनी प्रार्थना व पवित्र मंत्रांचे पठण करून येथे शिवलिंगाची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव पत्नी पार्वतीसह परशुरामांसमोर प्रकट झाले. हे शिवलिंग त्यांचे परमभक्त परशुरामांनी रीतीरिवाजांनी आणि संस्कारांनी पवित्र केले आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.

आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेल्या परशुरामांनी येथे एक मंदिर बांधले आणि गावातील एका उच्चभ्रू ब्राह्मणाकडे सोपवले. शिवाची पूजा करण्यासाठी आवश्यक पवित्र मंत्र, कार्यपद्धती, श्लोक शिकवले आणि त्यांना मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून दीक्षा दिली. परशुरामांनी संपूर्ण मंदिर ब्राह्मणाला दान केले आणि अंतर्धान पावले. मंदिर व त्याच्याशी निगडित चालीरीती आणि संस्कार हे परशुरामांनीच नियोजित, निश्चित केले आहेत अशी श्रद्धा आहे.

गावकरी सांगतात जुन्या काळात हे मंदिर 108 कुटुंबांच्या मालकीचे होते. काही वादांमुळे ते दोन गटांत विभागले गेले. त्यातील एक गट राजाच्या बाजूने सामील झाला. त्यांच्यातील वाद आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत गेली. एके दिवशी दुपारच्या वेळी दुभंगलेल्या गटाचा एक गट मंदिरात आला. एका गटाचा प्रमुख नजलाल नंबुथिरी पूजा थांबवण्यासाठी मंदिरात घुसला. त्या वेळी देवतेला अर्पण केलेले अन्न नैवेद्य मंडपाच्या हॉलच्या पश्चिमेला ठेवले जात असे. नजलाल नंबूथिरी यांनी पश्चिम दरवाजातून प्रवेश केला आणि शिवाची पूजा, नैवेद्य विस्कळीत केला. परत जाताना त्याला एका विषारी सापाने दंश केला. पश्चिमेकडील दरवाजाबाहेर त्याला मृत्यूने गाठले. त्यानंतर गाभाऱयाचा दरवाजा आपोआप बंद झाला आणि गर्भगृहाच्या आतून एक स्वर्गीय आवाज ऐकू आला, “हा पश्चिम दरवाजा आता उघडू नये!” नजलाल नंबुथिरीच्या पूजेच्या व्यत्ययाविरुद्ध शिवाचा ाढाsध भक्तांनी बघितला. नंबुथिरीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या प्रांगणाचा पश्चिम दरवाजा कायमचा बंद करण्यात आला आहे. हे मंदिर केरळमधील सर्वात मोठय़ा मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसर आकर्षक आहे. नदीच्या वाळूने सपाट केलेला परिसर चारही बाजूंना चार गोपुरम किंवा प्रवेशद्वाराच्या बुरुजांसह कंपाऊंड भिंतींनी संरक्षित आहे. मंदिर उत्तर-दक्षिण दिशेला पाच अंश झुकलेले आहे. गर्भगृह वरवर पाहता गोलाकार आकाराचे आहे आणि त्यावर तांब्याचे पत्रे, दोन दालने आहेत. केरळमधील हे एकमेव मंदिर आहे, ज्यात अंडाकृती आकाराचे गर्भगृह आहे. पण बाहेरून ते गोलाकार मंदिरासारखे दिसते. अप्रतिम मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. मुख्य मंडप, पहिला खांब असलेला सभा मंडप, कक्ष आकाराच्या दगडी आणि एकाच लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. भिंती आणि खांब खूप मजबूत आहेत. गर्भगृह कक्ष पूर्णत दगडात बांधलेले आहे आणि छताचा चौकोनी आकार आहे. गर्भगृहातून सहा पायऱया ओलांडून गेल्याशिवाय आपल्याला शिवलिंगाचे दर्शन घेता येत नाही. या मागचे विलक्षण सत्य असे की, या सहा पायऱया ओलांडणे म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सरी स्वभाव या सहा अशुद्धता सोडून देणे आणि मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करणे होय.

varshakisane@gmail.com

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची-केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)

मंदिरांच्या प्रदेशात

सामना ऑनलाईन

>> प्रा. वर्षा चोपडे

हिंदुस्थानचे केरळ राज्य देशी आणि परदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण केरळ स्वच्छता आणि सुंदर निसर्ग, प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ आणि विविध देवतांचे निवासस्थान यासाठी ओळखले जाते. अलाप्पुझाचे बीचेस आणि बॅक वॉटर अप्रतिम आहेत, पण अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझापासून तीन किमी पूर्वेला करुमाडी हे गाव आहे. या भागातील श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर भेट देण्यासारखे आहे. करुमाडी गावातील श्रीकृष्ण मंदिराजवळ करुमादिक्कुत्तन, अर्धी तुटलेली बुद्ध मूर्ती सापडली होती. हे विहार बुद्धाच्या काळ्या ग्रॅनाइटच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. ही बुद्ध मूर्ती 9व्या शतकापासून 14व्या शतकाच्या कालखंडातील आहे, असे इतिहासकार सांगतात. असे म्हणतात की, या काळात केरळमध्ये बौद्ध धर्माची भरभराट झाली. या विहाराला  राज्याच्या इतिहासात आणि पर्यटनात खूप स्थान आहे, कारण केरळमध्ये बुद्धाची मूर्ती असलेले हे एकमेव विहार शिल्लक आहे.

केरळच्या प्रदेशात अय राजा वरगुणाच्या काळात बौद्ध धर्माची भरभराट झाली. त्याच्या कारकिर्दीत, बौद्ध भिक्षूंनी बुद्धाला समर्पित अनेक मंदिरे आणि मठांची रचना केली. पण जसजसा हिंदू राजाने प्रदेश ताब्यात घेतला तसतसा बौद्ध धर्म हळूहळू राज्यातून नाहीसा होऊ लागला. खरे तर अल्लापुझा आणि कुलियनच्या किनारी भागातून बुद्धाच्या मोठय़ा प्रमाणात प्रतिमा उत्खननात सापडल्या आहेत.

पण करुमादिकुटन मंदिरातील बुद्धाची मूर्ती या सर्वांच्या वर आहे. या मंदिरातील बुद्धाची मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे. असे मानले जाते की हे मंदिर एका बौद्ध भिक्खूने बांधले होते, जे बुद्धाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी केरळमध्ये आले होते. या काळ्या ग्रॅनाइटच्या बुद्ध मूर्तीबद्दल आणखी एक भाग म्हणजे ती अर्धी तुटलेली आहे. दलाई लामा यांनी 1965  मध्ये करुमाडीला भेट दिली होती. सत्ता असताना प्रत्येक धर्माच्या प्रमुखाने आपल्या धर्माला महत्त्व दिल्याचे लक्षात येते.

  त्याचप्रमाणे अदूरपासून सुमारे 11 किमी अंतरावर असलेल्या पल्लीक्कल येथे बुद्ध मूर्ती मस्तक नसलेली आढळली. करुणागपल्ली येथील बुद्धाची मूर्ती, मंदिराच्या कुंडात सापडलेली ही मूर्ती कदाचित आजपर्यंतची सर्वोत्तम मूर्ती आहे. केरळ राज्य पुरातत्व विभागाने 1980 पर्यंत ते ताब्यात घेतले तेव्हापर्यंत अनभिज्ञ स्थानिक लोकांनी त्या मूर्तीची माहिती नसल्यामुळे सामान्य दगडासारखा कपडे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला. ही मूर्ती सध्या कृष्णपुरम पॅलेस संग्रहालय, कायमकुलम येथे संरक्षित आहे.

थोडय़ा किलोमीटरवर इतरही मंदिरे आहेत, पण जवळचे कृष्ण मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर हे एक प्राचीन हिंदू मंदिर आहे जे चेंबकसेरीचे तत्कालीन शासक श्री पूरदम थिरुनल देवनारायणन थमपुरन यांनी 15 व्या – 17 व्या काळात बांधले होते. अंबालापुझा श्रीकृष्ण मंदिराला दक्षिणेकडील द्वारका म्हणून संबोधले जाते. अंबालपुझा श्रीकृष्ण मंदिर भगवान कृष्णाला पार्थसारथीच्या रूपात विराजमान करते – महाभारत युद्धादरम्यान घेतलेला भगवान कृष्णाचा एक पैलू, भगवान कृष्ण येथे उन्निकन्नन (बाल कृष्ण) म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील कृष्णाची मूर्ती काळ्या ग्रेनाईट दगडात कोरलेली असून उजव्या हातात चाबूक आणि डावीकडे शंख आहे. असे मानले जाते की एक दिवसीय पूरदम थिरुनल थमपुरन आणि संत विलवामंगलम स्वामीयार बॅक वॉटरच्या बाजूने प्रवास करत होते आणि तेवढय़ात त्यांना बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. अशी आख्यायिका आहे की, कृष्णाचे निस्सीम भक्त संत विलवामंगलम स्वामीयार यांना पिंपळाच्या झाडावर बासरी वाजवताना भगवान श्रीकृष्णाचे दर्शन झाले. देवाचे अस्तित्व जाणवून थंपुराने या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. गुरुवायूर मंदिरातील श्रीकृष्णाची मूर्ती 1789 मध्ये टिपू सुलतानच्या छाप्यांमध्ये सुरक्षिततेसाठी येथे आणली गेली होती. हे मंदिर त्याच्या अद्वितीय प्रसादम, (प्रसाद) स्वादिष्ट अंबालापुझा पल्पयासम – तांदूळ, दुधापासून बनविलेले गोड खिरीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

त्याचप्रमाणे हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध कला प्रकार – ओट्टामथुल्लल यांच्या जन्माशी संबंधित आहे. प्रख्यात मल्याळम कवी कलक्कथ्थु कंचन नांबियार यांनी अंबालपुझा मंदिर परिसरात या अनोख्या कलाप्रकाराला जन्म दिला. कुंजन नांबियार यांनी वापरलेला मिझावू (परफॉर्मिंग आर्टस्मध्ये तालवाद्य म्हणून वापरला जाणारा एक मोठा तांब्याचा ड्रम) आजही मंदिरातील एका कडय़ामध्ये जतन केलेला आहे. थुन्जाथु एझुथाचन, ज्यांना मल्याळम भाषेचे जनक मानले जाते, त्यांनी मंदिरात अध्यात्म रामायणम किलिपट्टू (रामायण आणि महाभारतम किंवा महाभारताचा अनुवाद) लिहिला असे मानले जाते. या दोन मूर्ती एकाच काळ्या ग्रॅनाइट पाषाणात बनवलेल्या आहेत.

श्रीकृष्ण मंदिर आणि बुद्ध मंदिर जवळ जवळ आहे. या भागात गेलात तर या दोन्ही मंदिरास भेट देता येते आणि निसर्गासोबत ऐतिहासिक दोन्ही मंदिरेही बघता येतात. अलाप्पुझा येथील रेल्वे स्टेशन राज्यातील जवळपास सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ सप्टेंबर ते मार्च हा आहे.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.) 

varshakisanc@gmail.com




शिवमंदिरांच्या राज्यात – हतनूर वालूरची शिवराजवट

 http://www.saamana.com/article-by-neeti-mehendale-on-history-of-temple/

अक्षता महाडिक

>> नीती मेहेंदळे

महाराष्ट्र प्रांतावर अनेक राजवटी राज्य करून गेल्या असे इतिहास सांगतो आणि इतिहास शोधताना भौतिक पुराव्यांची गरज असते. मग ते लिखित असोत किंवा शिल्पकलेत. चालुक्य, यादव, वाकाटक या राजांनी त्यांच्या देवतांची इथे मंदिरे बांधली ती शिल्पकलेची व धार्मिक दृष्टीने वारसा ठरली असली तरी हा एक मोठा ऐतिहासिक दस्ताऐवजही आहे. परभणी जिल्हा म्हणजे वाकाटक वंशातल्या कर्तबगार राणीच्या नावाने वसवली गेलेली प्रभावतीनगरी. मराठवाडय़ात इतरत्र मोठय़ा प्रमाणावर सापडलेल्या प्राचीन मंदिरांबरोबर परभणीतही अशा मंदिरांमुळे महत्त्वाचा इतिहास जतन केला गेला आहे.

हतनूर हे तसे अगदी कमी लोकवस्तीचे लहानसे गाव. सेलू या परभणी जिह्यातल्या महत्त्वाच्या शहरापासून फक्त 15 किमीवर असलेल्या गावात शिवमंदिराचा प्राचीन वारसा आजही तग धरून आहे. उत्तरेश्वराचे शिवालय आणि नागनाथ मंदिर ही दोन महत्त्वाची हेमाडपंती धाटणीची मंदिरे गावाच्या दोन्ही बाजूला वसलेली दिसतात. उत्तर चालुक्य व यादव काळातल्या या मंदिरांच्या मिश्र रचनेत व जवळच असलेल्या चारठाणा येथील हेमाडपंती मंदिरांमध्ये विशेष साम्य आढळते. मंदिराच्या भिंती साध्या असून त्यावर कोरीव काम नाही. मंडप चौरसाकृती असून खुला आहे. अगदी अर्धभिंतसुद्धा नाही. नागेश्वर मंदिराला जोडून असलेली प्रशस्त बारव आपले लक्ष वेधून घेते. बारवेच्या चारही बाजूंनी उतरता येते. मध्यभागी चार बाजूंना पायऱया असून नंतर खाली एकाआड एक पायऱया आहेत. बारव खोदण्याचा उद्देश मंदिराचा दगड पुरवणे हा तर सर्वज्ञातच आहे. हतनूरच्या जवळपासच्या बऱयाच गावांमध्ये अशा आणि अधिक सुघड बारवा सापडतात.

उत्तर चालुक्य कालीन खांबांचे तुकडे नागनाथ मंदिर परिसरात विखुरलेले आढळतात. तसंच भैरव, महिषासुरमर्दिनी, नंदी, गणपती इत्यादींच्या खंडित मूर्तीही आढळतात. मंदिराचा तलविन्यास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गाभारा असा असून प्रदक्षिणापथ निरंधार आहे. मंदिराचं मूळ अधिष्ठान उत्तर चालुक्यकालीन असून नंतरचे मंदिर यादवकालीन असल्याचे जाणवते. याचा मोठा पुरावा तिथे स्तंभावर असलेल्या शिलालेखातून स्पष्ट होतो. शके 1223 म्हणजे तेराव्या शतकात पुरुषदेव पंडित याने नागनाथ मंदिराची वृद्धी केली असा थेट संदर्भ देणारा हा लेख असून मूळ मंदिर त्याआधीचे असावे हे समजते. या मंदिरास शिलालेखात प्रसाद म्हटले आहे व हे पंचरथ भूमीज मंदिर आहे. अजून महत्त्वाची बाब म्हणजे सभामंडप व गर्भगृह या दोन्हींचे विधान तारकाकृती आहे आणि त्यांच्या चार कोपऱयांवर शिखर प्रतिकृती व चैत्य गवाक्ष आढळतात. सभामंडप विशेष उंच असल्याचे लक्षात येते. या स्तंभविरहित मंडपात नागशीर्षयुक्त अर्धस्तंभ आहे. सभामंडपाचे छत वैशिष्टय़पूर्ण असून चारही बाजूंना पाकार रेषा मध्यावर असलेल्या चौरसांना सांधलेल्या दिसतात. दगडात हे कोरीव काम फार सुंदररित्या साकारले आहे. मंदिराच्या बाह्य पृष्ठभागावर कुंभ, खूर असे मोजके थर असून जंघा भागावर रत्नपट संपूर्ण मंदिरभर दिसतो. मोजके कोरीव काम व कमी कुशल कारागिरी ही यादव काळातल्या मंदिर स्थापत्याची खूण काळ ठळक करायला मदत करते.

अजून एक वैशिष्टय़ म्हणजे भूमीज शिखर. मूळ शिखर विटांचे असून भूमीज शैलीत बांधलेले आहे. याचा अर्थ शिखरांच्या प्रतिकृतीच्या रांगा रचून वर निमुळते होत जाणारे शिखर यातून अनेक मजली असल्याचा आभास निर्माण होतो आणि मंदिरास भव्यता प्राप्त होते. शिखरावर आमलकाचे तीन थर आहेत. पडलेले मूळ शिखर नवे बांधताना जुने जपण्याचा प्रयत्न केलेला स्तुत्य आहे, फक्त रंगीत मुलामा टाळता आला असता.

जवळ असलेले उत्तरेश्वर मंदिरही अशाच रचनेचे आढळते. शेजारी असलेल्या वालूर गावात वाल्मिकेश्वर हे अजून एक हेमाडपंती मंदिर आढळते. मंदिर पुन्हा उत्तर चालुक्य व यादव संगमकाळातले असल्याचे जाणवते. मंदिर परिसरात अनेक भग्नावस्थेतल्या मूर्ती सापडतात. त्यात शेषशायी विष्णू, सूर्य, गजलक्ष्मी अशा सुंदर मूर्तीही आहेत. गावात अजून महत्त्वाचे आकर्षण म्हणजे पाकार रचनेची भव्य बारव. हजार वर्षांपूर्वीचे स्थापत्यविशेष जपणारी ही बारव म्हणजे परभणीच्या गळय़ातला मौल्यवान दागिनाच म्हणायला पाहिजे. पुरातत्त्व खात्याकडून मार्गदर्शन घेऊन सहकार्य करणे अधिक उचित ठरू शकेल. हजार वर्षांपूर्वीचा वारसा जपणे हे स्थापत्य दृष्टीतून कौशल्याचे काम आहे. ते केवळ मुलामा किंवा रंगरंगोटी ठरू नये व त्या भरात बारकावे व पुरावे गाडले जाऊ नयेत ही दक्षता घेणे नितांत गरजेचे आहे.

megmehen@gamil.com





Friday, November 24, 2023

तिर्थ बुद्रुक : सातवाहनकालीन बौद्ध केंद्र उस्मानाबाद

 

धाराशिव की उस्मानाबाद ? काय सांगतो इतिहास ? जाणून घ्या...



शिवलिंग, चामर लेणी

आजच्या घडीला नामांतराचे वारे सर्वत्र घुमू लागले आहे. इलाहाबादचे 'प्रयागराज' तर फैजाबादचे 'अयोध्या' झालेले आहे. हे वारे महाराष्ट्रातही पोहोचले आहे. नामांतर करणे योग्य की अयोग्य अशा चर्चांना उत आलेला आहे. इतिहासात होऊन गेलेल्या चुकांचा पाढाच वाचला जात आहे. ते एका अर्थाने योग्य आहे, कारण जो देश स्वतःचा उज्ज्वल इतिहास विसरतो, तो प्रगती करू शकत नाही. नाव बदलून विकास साधता येत नसला तरी स्थानिक लोकांची अस्मिता जागी होऊन सांस्कृतिक गुलामी संपवता येऊ शकते. अशाने जनभावनेचे मनोधैर्य नक्कीच वाढण्यास मदत होईल. परंतु कुठल्याही ठिकाणाचे नामांतर करण्यापूर्वी त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासणे आगत्याचे आहे.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ व अहमदनगरचे ‘अंबिकानगर’ करावे का? किंवा करू नये अशा चर्चांच्या उधाणात उस्मानाबादचे ‘धाराशिव’ का व्हावे ? याविषयी म्हणावी तसी चर्चा होताना दिसत नाही. खरे तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणांच्या अगोदर उस्मानाबादचे नाव 'धाराशिव' व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्रसैनिकांना खरी श्रद्धांजली वाहता येईल. सर्वप्रथम धाराशिव आणि उस्मानाबाद ही नावे कशी? व केव्हा? प्रचारात आली, या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूयात.

संपूर्ण उस्मानाबद जिल्ह्याला सध्याच्या ज्या उस्मानाबादमुळे ‘उस्मानाबाद जिल्हा’ हे नाव प्राप्त झाले, त्याचे पूर्वीचे नाव ‘धाराशिव’ होते, हे सर्वांना माहित आहे. या ठिकाणाला 'धाराशिव' नाव असण्याचा सर्वांत प्राचीन व अस्सल पुरावा तब्बल बाराशे वर्षांपूर्वी इ. स. ८०७, ८१० व ८१२ या वर्षांतील राष्ट्रकूटकालीन ताम्रपटांत पाहायला मिळतो. यापूर्वीही सु. सहाव्या शतकात येथील परिसरात जैन व हिंदू लेणी खोदली गेली होती. म्हणजेच आजपासून किमान पंधराशे वर्षांपूर्वीही धाराशिव हेच नाव प्रचारात असावे, हे सहजच लक्षात येते.  

धाराशिव हे नाव या ठिकाणाला कसे प्राप्त झाले, यांविषयी अनेक मत-मतांतरे आहेत. एका मतानुसार ‘धारा’ आणि ‘शिव’ नावाच्या राजांमुळे हे नाव रूढ झाले असावे. तसेच 'धाराशिव'  या नावाला दोन स्थानिक भिल्ल कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते. एका अन्य मतानुसार शहराच्या जवळच खोदल्या गेलेल्या चांभार लेणीतील सु. सहाव्या शतकातील 'शिव' (शिवलिंग) व लेण्यांजवळून वाहणाऱ्या भोगावतीच्या जल’धारा’ यामुळे 'धाराशिव' हे नाव प्राप्त झाले असावे. अन्य एक मत म्हणजे धारासूरमर्दिनीचे मंदिर होय. धारासूरमर्दिनी या शब्दातील ‘धारा’ व चांभार लेणीतील ‘शिव’ मिळून धाराशिव झाले असावे. परंतु या मतांविषयी एकवाक्यता दिसून येत नाही.

धाराशिव नावाचा उल्लेख अपभ्रंश भाषेतील ‘करकण्डचरिउ’ (११ वे शतक) व संस्कृतमधील ‘बृहत्कथाकोश’ (इ. स. ९३१-३२) या  ग्रंथांतही सापडतो. यानंतर चौदाव्या शतकात बहमनी सत्तेची पाळेमुळे या ठिकाणी घट्ट बसली. चौदाव्या शतकात ख्वाजा शमसुद्दीन दर्गा बांधला गेला. परंतु याही काळात धाराशिव हेच नाव प्रचारात होते. मुस्लिम शासक असले तरी त्यांनी जनतेच्या भाव-भावनांचा आदरच राखला. नामांतराचा कुणी विचारही केला नाही. त्यानंतर शिवकाळात या भागावर आदिलशाही व निजामशाही ही घराणी राज्य करीत होती (सु. १५ ते १७ वे शतक). त्यानंतर मोगलांकडे हा प्रदेश आला. औरंगजेबाचे वास्तव्य काही काळ तुळजापूर या ठिकाणी होते. म्हणजेच तोही जनभावनांच्या विरुद्ध जाऊ शकला नाही. यावेळीही धाराशिव नाव प्रचारात होते.

मोगल सत्ता कमजोर झाल्यानंतर निजाम-उल-मुल्क (मीर कमरुद्दीन खान) या मोगल सरदाराने हैद्राबादला आपली राजधानी बनवून इ.स. १७२४ साली निजाम राज्याची स्थापना केली. धाराशिवसह मराठवाडा निजाम राज्यात राहिले. तेथून पुढे सु. १८७ वर्षे इतर निजाम शासकांनी राज्य केले. म्हणजेच या निजामांच्या काळातही अगदी १९११ पर्यंत ‘धाराशिव’ हेच नाव प्रचलित होते. कागदोपत्रीही असाच उल्लेख मिळतो. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता धाराशिव हे नाव येथील लोकांची ओळख बनले होते, असे दिसून येते. हिंदू-मुस्लिमांच्या  कित्येक पिढ्यांना हेच नाव माहित होते. यावरून धाराशिव हे मूळ नाव या भागातील लोकांसाठी अस्मितेचा मुद्दा आहे, हे सहज कळून येते.

आता उस्मानाबाद नावाची पार्श्वभूमी पाहूयात. इ. स. १८६१ साली 'नळदुर्ग' हे जिल्हा केंद्र बदलून ते धाराशिवला आणण्यात आले. इ .स. १९११ साली उस्मान अलीने आपल्या राज्यरोहनाचे औचित्य साधून धाराशिव हे मूळ नाव बदलून उस्मानाबाद असे केले. परंतु हे नाव लोकांच्या पचनी कधी पडलेच नाही. व या नावाचा विरोध हा वाढतच राहिला. आजही जुन्यापिढीतील लोक उस्मानाबाद ऐवजी 'धाराशिव' हेच नाव मुखात घेतात. ते इतके तोंडवळणी पडले की आजही ते लोकांच्या मनात घर करून राहिले आहे. 

यानंतरचा बराचसा इतिहास आपणास माहित आहे. भारतात स्वातंत्र्य चळवळ धगधगत होती. मराठवाडयातील जनतेलाही जुलमी निजामांकडून स्वातंत्र्य हवे होते. अनेक आंदोलने व छुट-पुट लढाया सुरु होत्या. मुहम्मद अली जिनांनी पाकिस्तानचे बिगुल वाजविलेच होते. जनक्षोभ वाढत होता. पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मराठवाडयातील जनताही निजामांचा प्रतिकार करू लागली. परंतु जनभावनांचा आदर करेल तो उस्मान अली कसला. जनक्षोभ तीव्र झाल्याचे कळताच रझाकाररुपी छळ सुरु झाले. जनता यात पार होरपळून गेली. जनतेचे आतोनात हाल होऊ लागले. निजामी अत्याचाराचा पूर आला. या सर्व गोष्टींना उस्मान अली जबाबदार होता, ज्याचे नाव धाराशिव शहराला दिले गेले होते.

आजच्या पिढीतील पूर्वजांवर उस्मान अलीमुळे अत्याचार झाले. कित्येकांच्या कत्तली झाल्या. अशा या उस्मान अलीचे नाव, ज्याचा आम्हा धाराशिवकरांशी काडीचाही संबंध नाही, जो पाकिस्तानशी हातमिळवणी करू इच्छित होता, तसेच जनभावनेच्या विरुद्ध जाऊन तो स्वतंत्र राष्ट्र उभारू इच्छित होता. ज्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस व भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना पोलीस कार्यवाही करून धाराशिवसह मराठवाडा मुक्त करून घ्यावा लागला. ज्या निजाम राज्यात महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर इ. सारख्या नेत्यांना सहजासहजी सभा घेण्यास परवानगी मिळत नसे. या सर्व गोष्टींना कारणीभूत होता तो उस्मान अली. या उस्मान अलीचे नाव या जिल्ह्याला असणे म्हणजेच असंख्य हुतात्म्यांचा, देशभक्तांचा व भारतमातेचा अपमान नाही का? हा आपल्या तमाम पूर्वजांचा अपमान नाही का? मराठवाडा मुक्तीसाठी हुतात्म्यांनी रक्त सांडले नसते तर आजचे सरकार तरी येथे असते का? या सर्व गोष्टींचा विचार महाराष्ट्र सरकारने करायला हवा. 

इतर नामांतरे योग्य की अयोग्य याविषयी आम्ही धाराशिवकर सध्यातरी बोलू इच्छित नाही. परंतु उस्मानाबादचे धाराशिव हे नाव असणे किती योग्य आहे, हे या नावामागच्या इतिहासावरून कळून येते. त्यामुळे 'धाराशिव' या नावाला विरोध न करता व राजकारणाला बळी न पडता, कायदेशीररित्या एकमताने सध्याचे उस्मानाबाद हे नाव बदलून ‘धाराशिव’ हे नाव व्हायला हवे. तेव्हाच मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांस खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली जाईल.

  

धाराशिव लेणी

धाराशिव येथील दुर्लक्षित चांभार लेणी (मराठी)


लेणी क्र.२, चांभार लेणी, उस्मानाबाद.
लेणे क्र. २, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद).
उस्मानाबाद शहर व परिसरच नव्हे तर संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यालाच समृद्धशाली ऐतिहासिक व पुरातत्वीय असा वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळी सातवाहन-रोमन व्यापारी मार्ग याच प्रदेशातून जात होता. पुढे वाकाटकोत्तर काळ, चालुक्य, राष्ट्रकूट, उत्तर चालुक्य, यादव, बहामनी, आदिलशाही व निजाम काळात हा भाग एक अतिमहत्त्वाचा प्रदेश बनून राहिला. त्यामुळे साहजिकच प्राचीन लेणी, स्तूप, मंदिरे, शिल्प, किल्ले, गढी, वाडे, मठ, दर्गे, मस्जिद इ. अशी अनेक प्राचीन स्थळे जिल्ह्यात जागोजागी विखुरलेली आपणास आढळून येतात. आज हा जिल्हा ‘तुळजाभवानी मातेचा जिल्हा’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर व परिसरात धाराशिव लेणी, हातलाई देवी टेकडी, चांभार लेणी, कपालेश्वर मंदिर, लाचंदर लेणी, हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाजी दर्गा इ. स्थळे विशेष प्रसिद्ध आहेत. यांपैकी चांभार लेणीचे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असले तरी, याचे महत्व व ऐतिहासिकता अजूनही अनेकांना माहित नाही.  
तत्कालीन धाराशिव परिसराचे सर्वप्रथम सखोल सर्वेक्षण जेम्स बर्जेस या एका स्कॉटिश विद्वानाने १८७५ च्या डिसेंबर महिन्यात केले. ते धाराशिव पंचक्रोशीतील चांभार लेण्यांसह अनेक ठिकाणी फिरले व विविध स्थळांच्या नोंदी नमूद करून घेतल्या. त्यांनी १८७८ साली लंडन येथून प्रकाशित झालेल्या ‘द अँटिक्वटीज इन द बिदर अँड औरंगाबाद डिस्ट्रिक्ट्स’ या आपल्या एका अहवालामध्ये चांभार लेणीची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यावेळी त्यांनी यातील एका लेण्याचा तलविन्यासही बनविला होता. 
भोगावती नदीच्या जवळच डाव्या बाजूला असणाऱ्या एका छोट्याशा टेकडीवर सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी उत्तराभिमुख या हिंदू लेणी खोदण्यात आल्या. उस्मानाबाद शहरापासून दक्षिण-पश्चिमेला वैराग रस्त्याने जाताना या लेण्यांचे दर्शन होते. येथून पुढे डाव्या बाजूला पायवाटेने लेण्यांपर्यंत पोहोचता येते. वास्तविक पाहता येथे दोन स्वतंत्र लेणी खोदण्यात आलेली आहेत.
पहिल्या लेण्याच्या समोरील बराचसा भाग कोसळलेला असला तरी काही खोल्या व इतर खोदकाम सुस्थितीत आहे. लेण्याच्या पश्चिम दिशेला पूर्वाभिमुख द्वारावर नक्षीकाम केलेली एक खोली आहे. याच्या दोन्ही बाजूंना काही आकृती अस्पष्ट दिसतात. 
पश्चिमाभिमुख खोली, लेणे क्र. १. चांभार लेणी.

याच्या वरच्या बाजूला काही शिल्पकामांसाठी आखलेली ओळ दिसते. यांपैकी उजव्या हाताला फक्त गणेशाचे एक छोटेसे शिल्प कोरण्यात आलेले दिसून येते.
गणेश प्रतिमा (खंडित) लेणे क्र.१. (चांभार लेणी)/(सौजन्य: जयराज खोचरे)

जेम्स बर्जेसच्या मते हा शिल्पपट मुळात सप्तमातृकांसाठी आखलेला असावा. येथून थोडेशे पूर्वेला अजून एक खोली आहे. मुळात ती तुलनेने एका मोठ्या खोलीच्या मागे असावी, असे दिसते. या खोलीच्या द्वाराला तीन सपाट शाखा आहेत. जवळच चार स्तंभयुक्त ओबडधोबड काम दिसते. लेण्यासमोर पडलेला दगडांचा खच व लेण्याच्या भिंती दरम्यान अजून दोन खोल्या आहेत. त्यांपैकी एकात थोडेसे खंडित झालेले एक विशाल ‘शिवलिंग’ आहे. यामुळे येथे पूर्वीपासूनच शिवाराधना होत असावी, असे दिसून येते. या खोल्यांना लागून चार स्तंभयुक्त एक दुसरी खोली आहे. लेण्याच्या पूर्वेला शेवटी अजून एक मूर्तीविरहित खोली असून ती पश्चिमाभिमुख आहे. या लेण्याच्या समोरील एकूण भाग जवळपास १०० फुट रुंद आहे.

शिवलिंग, लेणी क्र. २. धाराशिव
शिवलिंग, लेणे क्र. १. धाराशिव.
या पहिल्या लेण्यापासून पूर्वेला थोड्याच अंतरावर वरच्या बाजूला, उत्तराभिमुख एक दुसरे हिंदू लेणे आहे. याची रुंदी २६ ते ३१.७ फुट तर खोली २५ ते २८.६ फुट भरते. या लेण्याची एकही भिंत सरळ व व्यवस्थितपणे खोदण्यात आलेली दिसत नाही. लेण्याच्या पुढचा भाग दोन अष्टकोनी खांबांनी युक्त असून दोन शिल्पविरहित अर्धस्तंभ दोन्ही बाजूंना आहेत. सभामंडपात दोन आडव्या ओळींमध्ये चार-चार असे मिळून एकूण आठ स्तंभ आहेत. यांपैकी मधल्या भागातील समोरील दोन स्तंभ १६ बाजूंचे, मागील ओळीतील मधले दोन अष्टकोनी, तर सभामंडपाच्या दोन्ही बाजूंचे चौकोनाकृती आहेत. स्तंभांचे शीर्ष साधारण आहेत. 
मंडप, लेणे क्र.२, चांभार लेणी, धाराशिव (उस्मानाबाद)
गर्भगृहाचे द्वार अलंकृत असून दोन्ही बाजूंना अर्धस्तंभ कोरण्यात आलेले आहेत. हे स्तंभ कर्नाटकातील बदामी लेण्यातील गर्भगृह, तसेच मुंबई जवळील घारापुरी येथील लेणी क्र. चार येथील प्रवेशद्वारांसारखेच आहेत.
या लेण्याचे गर्भगृह ७.१० x ७.८ फुट असून मधोमध एक ४.५ x २.८ फुटाची वेदी (उंच आसन) आहे. त्या वेदीच्या मधोमध एक फुटाचे चौकोनाकृती वेज आहे. या लेण्याचा इतर लेण्यांशी तौलनिक अभ्यास केल्यास हे दुसरे लेणे भगवान विष्णू किंवा दुर्गा अथवा महालक्ष्मी या देवतांना समर्पित असावे, असे जेम्स बर्जेस यांचे मत आहे.
लेणे क्र.२ चा तलविन्यास (सौजन्य : जेम्स बर्जेस)
जेम्स बर्जेसच्या मते चांभार लेणी हिंदू असून, ती सर्वसाधारणपणे सहाव्या शतकाच्या सुरुवातीस खोदण्यात आली असावीत. या लेण्यांच्या जवळच ‘लाचंदर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अन्य लेणी असून, भोगावती नदीच्या आजूबाजूला खडकात काही खोदकाम केलेल्या खोल्या दिसून येतात.
या चांभार लेण्यांचे स्थान लयन स्थापत्य विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. संपूर्ण भारतात आरंभिक काळात खोदण्यात आलेल्या हिंदू लेण्यांपैकी ही एक असून, येथे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात प्राचीन असे शिवलिंग आहे.  
लेणे क्र. २ समोरील आवार व सुंदर दृश्य
या प्राचीन शैव स्थळाचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. लेण्यांची स्थिती अत्यंत शोचनीय असून त्यांच्या जपणुकीची योग्य ती व्यवस्था तात्काळ न केल्यास महाराष्ट्राच्या प्राचीन वैभवाचा हा मौल्यवान ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे. लेण्यांची दुर्दशा नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे झाली आहे. हा वैभवशाली वारसा उस्मानाबादकरांनी व शासनाने जपायला हवा. तसेच या शैव-पीठाचे पुनरुज्जीवन करायला हवे. सर्वांनी एकत्र येवून उस्मानाबाद शहराचा उज्ज्वल इतिहास जगासमोर मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. असा हा अनमोल सांस्कृतिक ठेवा भावी पिढी समोर ठेवण्याच्या आतच नामशेष होवू नये, म्हणून लेणी संवर्धनाचे पवित्र कार्य हाती घ्यायला हवे. आपण सर्वांनी आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्व टिकवून ठेवल्यास आपल्या उज्ज्वल परंपरेचे खऱ्या अर्थाने रक्षण होणार आहे.

 

 

 

 https://vijaysardehindi.blogspot.com/2020/07/blog-post.html

संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित घटना (सफ़ेद चूना पत्थर में  बना शिल्प)

आज से लगभग १८०० साल पूर्व वर्तमान महाराष्ट्र सहित दक्षिण भारत के अधिकांश हिस्से पर सातवाहनों का अधिकार था. इनका व्यापार यूरोप के रोमन साम्राज्य के साथ भी हुआ करता था. रोमन साम्राज्य से विभिन्न प्रकार का सामान भारतीय प्रायद्विप के पश्चिमी समुद्री तट पर बने बंदरगाहों तक जहाजों के माध्यम से आया करता था. इन बंदरगाहों से भारत के अंदरूनी प्रदेशों से व्यापारी-सामान रोमन साम्राज्य के लिए निर्यात किया जाता था. हमारे व्यापारी भी इस वैश्विक व्यापार में निपुण थे. मसाले, मणि, सूती कपड़ा तथा अन्य जीवनावश्यक वस्तुओं का लेन-देन व्यापार के माध्यम से हुआ करता था. यह व्यापार सातवाहनकाल में अपनी चरम सीमा तक पहुँच चुका था. इसी कारण से भड़ोच, शुर्पारक (नाला सोपारा), कल्याण, चौल, ब्रह्मपुरी, भोकरधन, अरिकामेडू आदि व्यापारिक केन्द्रों एवं शहरों का विकास दिन-दूनी रात चौगुनी गति से हो रहा था.

तिर्थ बुद्रुक के निवासी

जीवन के हर अंग जैसे समाज, संस्कृति, धर्म, व्यापार, शिल्पकला एवं स्थापत्य में भी तेजी से विकास हो रहा था. इस समय बौद्ध धर्म का प्रचलन इस प्रदेश में अधिक था. बौद्धों से संबंधित स्तूप, विहार, मठ आदि वास्तुओं का निर्माण द्रुतगति से हो रहा था. भारतीय महाद्वीप में अनेक व्यापारिक मार्गों का निर्माण हो चुका था. या पहले से प्रचलन में रह चुके मार्गों का महत्त्व अब बढ़ चुका था. इनमें से एक मार्ग महाराष्ट्र के मराठवाड़ा (मध्य महाराष्ट्र) क्षेत्र से होकर गुजरता था, जिसे उस समय ‘दक्षिणापथ’ के नाम से भी जाना जाता था. मराठवाड़ा के पैठण और तगर (तेर) नामक समृद्ध केन्द्रों का नाम रोमन साम्राज्य तक पहुँच चुका था.

तेर से प्राप्त मृणमूर्तियाँ (टेराकोटा), तेर (तेर संग्रहालय से साभार)

तेर में सातवाहनों एवं रोमन सम्राज्य से संबंधित अवशेष पाए गए हैं. इनमें सिक्के, मर्तबान, हस्तिदंत से बनी स्त्रीमूर्ति, विभिन्न प्रकार के रोमन दीप आदि वस्तुएँ सम्मिलित थीं. तेर से प्राप्त हस्तिदंत से बनी मूर्ति इटली के पॉंपेई से प्राप्त मूर्ति से मिलती-जुलती है. अब तक तेर के बाद अगले पड़ाव के रूप में कर्नाटक के कलबुर्गी जिले में स्थित ‘सन्नती-कनगनहल्ली’ की चर्चा ही विद्वानों में थीं. लेकिन इन दोनों के बीच भी कुछ केन्द्रों का होना तय था. इसी दिशा में मैंने इस प्रदेश के प्राचीन पुरावशेषों से संबंधित ग्रंथों को पढ़ना एवं इस संबंधित स्थानों को भेंट देने का सिलसिला शुरू कर दिया. इसी प्रक्रिया का परिणाम था- तीर्थ बुद्रुक में नए सिरे से प्राप्त हुए बौद्ध धर्म से संबंधित शिल्प एवं स्तूप के संभावित अवशेषों की महत्त्वपूर्ण खोज.

भिमाशंकर टीला (सातवाहनकालीन स्तूप? के अवशेष), तिर्थ बुद्रुक

तीर्थ बुद्रुक नामक छोटासा गाँव महाराष्ट्र के उस्मानाबाद (प्राचीन धाराशिव) जिले के तुलजापुर तहसील से मात्र ९ किमी की दुरी पर बालाघाट पहाड़ियों की एक पहाड़ी पर स्थित है. 

तिर्थ बुद्रुक गाँव का परिदृश्य

सन २००१ में किसी साधू की कुटिया के लिए यहाँ पर स्थित एक टीले की खुदाई का काम चल रहा था. ग्रामीणों को खुदाई से बड़ी आकर की कुछ ईंटें बरामद हुई. यह काम तत्काल रोका गया. यह खबर हवा की तरह प्रदेश में फ़ैल गई. महाराष्ट्र के पुरातत्त्व विभाग के संचालक ने खबर सुनते ही उक्त स्थान की छान-बीन की. ये ईंटों से निर्मित एक गोलाकृति स्तूप के अवशेष थे (संभवतः यह एक अन्य मनौती स्तूप रहा होगा). उन्होंने बाद में इस संबंधी एक संक्षिप्त टिपण्णी विभाग की पत्रिका में भी छपवाई. ऐसा करते समय उन्होंने वहाँ पर पड़े अन्य महत्त्वपूर्ण पुरावशेषों एवं इस स्थान के प्राचीन महत्त्व की ओर अधिक ध्यान नहीं दिया. इसके बाद इस स्थान के बारे में कहीं कुछ ख़ास लिखने या सुनने में नहीं मिला.

कालभैरवनाथ मंदिर एवं आस-पास का सामान्य दृश्य, तिर्थ बुद्रुक

सन २००८-०९ में मेरे अपने गाँव अपसिंगा में सातवाहनकालीन अवशेष प्राप्त हुए, जो तिर्थ बुद्रुक से महज १६ किमी की दुरी पर स्थित है. यहाँ एक प्राचीन ढाँचे की रचना मिली, जो संभवतः किसी स्तूप की भी हो सकती है. तत्पश्चात २०१३ में इन अवशेषों पर एक शोधलेख भी प्रकाशित किया गया. 

अपसिंगा (सातवाहनकालीन  पुरास्थल) से प्राप्त ईंटों की संरचना

२०१३ में मैंने तिर्थ बुद्रुक के लगभग १४वीं सदी में निर्मित कालभैरवनाथ मंदिर को भेंट दी. इस मंदिर के प्रांगण में रखे कुछ शिल्प दिखाई पड़े. 

डेक्कन कॉलेज, पुणे में मंदिर एवं स्थापत्य की पढ़ाई का अनुभव यहाँ काम आया. इसी दौरान मैं डेक्कन कॉलेज से पी.एचडी भी कर रहा था. सर्वेक्षण का कार्य सर्वत्र शुरू था. मंदिर के सामने रखे सफ़ेद चूना पत्थर (लाइमस्टोन) में बने शिल्प मुझे कुछ अलग लगे. मैंने आस-पास के क्षेत्र की अधिक छान-बीन की. इसमें मुझे स्तूप के लिए सफ़ेद चूना पत्थर में बने अलंकृत रचनाओं के अवशेष दिखाई पड़े. 

स्तूप के अवशेष, तिर्थ बुद्रुक

यहाँ पर लगभग १३वीं सदी में बने भिमाशंकर टीले पर भी सातवाहनकालीन ईंटे तथा ईंटों से बनी किसी स्थापत्य-रचना के अवशेष दिखाई दिए. यह मंदिर तथा प्राचीन टीला खंडहर में बदल चुके थे. 

प्राचीन टीले पर बने भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक


भिमाशंकर मंदिर के अवशेष, तिर्थ बुद्रुक

इसके बाद कईं बार मैंने इस क्षेत्र का दौरा एवं सर्वेक्षण किया. इसकी विस्तृत जानकारी प्राप्त करने के बाद मुझे ज्ञात हुआ कि यहाँ पर पड़े शिल्प एवं अन्य अवशेष अमरावती और सन्नती-कनगनहल्ली के स्तूपों से मिलते-जुलते हैं. यहाँ से चूना पत्थर में बने शिल्पों के साथ सातवाहनकालीन मृद्भांड के ठिकरें, घर की छत पर लगाए जाने वाले खपरैल (tiles) तथा पद्म पदक (medallions) भी प्राप्त हुए हैं. 

स्तूप से संबंधित पद्म पदक (Medallion), तिर्थ बुद्रुक

मध्ययुगीन अवशेषों में भिमाशंकर एवं कालभैरवनाथ मंदिर के अवशेष, शिवलिंग, भैरव, महिषासुर मर्दिनी, विष्णु के शिल्प, वीरगल (hero stones), सती शिला, नंदी की प्रतिमाएँ, मंदिर से संबंधित शिलालेख आदि अवशेष प्रमुख हैं.

कालभैरवनाथ का मंदिर, तिर्थ बुद्रुक


भैरव, कालभैरवनाथ मंदिर, तिर्थ बुद्रुक
महिषासुरमर्दिनी, तिर्थ बुद्रुक

मैंने २०१५ में हैदराबाद में संपन्न पुरातत्त्व से संबंधित अंतर्राष्ट्रीय सेमिनार में तिर्थ बुद्रुक के इन पुरावशेषों सहित यहाँ के मध्ययुगीन अवशेषों पर शोधकार्य प्रस्तुत किया था.

वीरगल एवं नाग शिल्प, तिर्थ बुद्रुक

वीरगल (hero stone), तिर्थ बुद्रुक

नंदी, तिर्थ बुद्रुक

तिर्थ बुद्रुक से प्राप्त आद्य ऐतिहासिक अवशेषों का संबंध सातवाहनकाल से था. इस समय इंडो-रोमन व्यापार अपनी चरम सीमा पर था तथा व्यापारियों का आवागमन इस क्षेत्र में हुआ करता था. लगभग इसविसन की १ से ३री सदी में यहाँ चूना पत्थर एवं ईंटों से निर्मित स्तूप का निर्माण कार्य हुआ होगा. संभवतः समृद्ध व्यापर के चलते यह कार्य सफल हुआ था. अबतक दक्षिणापथ के इस व्यापारी मार्ग पर महाराष्ट्र में तेर के बाद भव्य वास्तु के अवशेष प्राप्त नहीं हुए थे. तीर्थ बुद्रुक के स्तुपावशेषों से यह बात सामने आ रही है कि तेर के बाद व्यापारी मार्ग पर तिर्थ बुद्रुक एक महत्त्वपूर्ण पड़ाव था, जो आगे जाकर सन्नती नामक स्थान से जुड़ जाता था, जबकि यह तेर इतनी विस्तृत बस्ती नहीं थी. हालाँकि इसी जिले के सिद्धेश्वर वडगाँव के सिद्धेश्वर मंदिर के पास सातवाहनकालीन एक स्थापत्य रचना प्राप्त हुई है. यहाँ पर इस काल से संबंधित ईंटें बड़ी संख्या में मिलती हैं.

संभवतः स्तूप का टीला, वडगाँव सिद्धेश्वर

तिर्थ बुद्रुक से प्राप्त शिल्प संभवतः गौतम बुद्ध के जीवन से संबंधित है. इसमें एक पुरुष एवं तीन स्त्रियों को दर्शाया गया है. 

स्तूप से जुड़ा चूना पत्थर में बना शिल्प 

हंसपट्टिका, तिर्थ बुद्रुक


इन शिल्पों के लिए प्रयोग किया गया सफ़ेद चूना पत्थर (limestone) दक्षिण महाराष्ट्र में नहीं मिलता. इसलिए अब यह निश्चित रूप से कहा जा सकता है कि यह पत्थर सन्नती-शहाबाद के क्षेत्र से यहाँ व्यापारी मार्ग से लाया गया था. कनगनहल्ली के स्तूप को सजाने के लिए वहाँ से बड़ी तादाद में मिलने वाले सफ़ेद चूना पत्थर का ही इस्तेमाल किया गया था. सातवाहनकालीन अन्य शिल्पों एवं स्थापत्य रचना को देखकर यह अनुमान लगाया जा सकता है कि यह स्तूप हीनयान मत से संबंधित रहा होगा. यहाँ के शिल्प अमरावती शैली में बनवाए गए हैं. यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों का एक महत्त्वपूर्ण उत्तरी केंद्र माना जा सकता है. अपितु, इस प्रकार के कुछ अवशेष तेर नामक स्थान पर भी मौजूद होने के कारण, अब तेर यह स्थान अमरावती शैली में बने शिल्पों के फैलाव की उत्तरी सीमा बताई जा सकती है. तिर्थ बुद्रुक और तेर के शिल्पों की शैली अमरावती होकर उक्त शिल्पों की रचना कनगनहल्ली और अमरावती से थोड़ी सी भिन्न दिखाई देती है. संभवतः इस पर स्थानीय कारीगरी का प्रभाव पड़ा हो.

संभवतः मोर की  आकृति, तिर्थ बुद्रुक


खंडित स्तूप (लाट) के अवशेष


प्राचीन टीले का एक हिस्सा, तिर्थ बुद्रुक



सातवाहनकालीन ईंटों से निर्मित दीवार, तिर्थ बुद्रुक


स्तूप संबंधित अवशेष, तिर्थ बुद्रुक

टीले का एक खुला भाग, तिर्थ बुद्रुक

सातवाहनकालीन स्थापत्य रचना के अवशेष उस्मानाबाद जिले में गड देवदरी, तेर, वडगाँव-सिद्धेश्वर एवं अपसिंगा में भी दिखाई देते हैं. इनमें से वडगाँव और अपसिंगा की स्थापत्य रचना बौद्ध-स्तूप से संबंधित होने के प्रमाण अब तक मौजूद नहीं हैं. 

गड देवदरी का प्राचीन टीला, गडदेवदरी

इन समृद्ध अवशेषों के मिल जाने से ऐतिहासिक दृष्टि से मराठवाड़ा के इस क्षेत्र का महत्त्व बढ़ चुका है तथा तिर्थ बुद्रुक यह स्थान सातवाहनकालीन एक बौद्ध केंद्र के रूप में वैश्विक पटल पर स्थापित होने में मदद मिली है.   

 



https://www.youtube.com/watch?v=uYsgUkxAFR8

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...