तुळशीबाग राममंदिर
- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com
पुणे आणि तुळशीबाग यांचं काही अनामिक नातं आहे. विश्रामबागवाड्याच्या पूर्वेला काही पावलांवरच तुळशीबागवाले यांच्या राममंदिराचा परिसर आहे. दरवर्षी रामजन्माचा उत्सव मंदिरात होतो. एरवी माफक गर्दीचा हा परिसर रामजन्मोत्सवाच्या वेळी माणसांनी फुलून जातो. सन १७७८ मध्ये बांधलेलं हे पेशवेकालीन राममंदिर म्हणजे भव्य मंडप आणि कलाकुसरीनं परिपूर्ण असं सर्वात उंच शिखर लाभलेला वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
पेशव्यांचे प्रमुख नगररचनाकार नारो अप्पाजी खिरे तुळशीबागवाले यांनी या राममंदिराची उभारणी केली. कौलारू उतरत्या छताचं आणि अद्वितीय अशा कळसाचं राममंदिर हा तुळशीबागेचा आणि गावठाण परिसराचा केंद्रबिंदू आहे.
भरपूर रहदारी असलेल्या लक्ष्मी रस्त्यापासून जवळच असूनही मंदिराचा परिसर शांत आणि निर्मळ आहे. दुर्मिळ अशा मुचकुंद वृक्षाचं अस्तित्व हे या परिसराचं आगळंवेगळं वैशिष्ट्य.
नारो अप्पाजी यांचा जन्म साताऱ्याजवळील पाडळीचा. छत्रपती शाहूमहाराजांच्या दरबारी त्यांनी १७१९ ते १७३२ अशी सेवा केली. १७५० च्या सुमारास नानासाहेब पेशव्यांनी नारो अप्पाजींना पुण्याचं सुभेदारपद बहाल केलं. त्यानंतर निम्मं अठरावं शतक त्यांनी पुण्याचं सुभेदारपद सांभाळलं. राममंदिराचा उंबरा १७६३ मध्ये बांधला गेला, तर १७६५ मध्ये उमाजीबाबा पंढरपूर यांनी राम-सीता-लक्ष्मण यांच्या सुबक मूर्ती घडवल्या. सन १७६७ मध्ये मूर्तींची स्थापना झाली व छोट्या मंदिराचं काम टप्प्याटप्प्यानं १७९५ मध्ये सुमारे १,३६,६६७ रुपये खर्च करून झालं.
सन १७६३ मध्ये निजामानं पुण्यावर केलेल्या विध्वंसक हल्ल्यांमध्ये निजामाला पेशव्यांच्या वतीनं मोठी खंडणी देऊन नारो अप्पाजींनी पुणं वाचवलं. धार्मिक वृत्तीच्या नारो अप्पाजींनी लिंबेगावला कोटेश्वराचं मंदिर, वडूजला शकुंतेश्वरमंदिर, पाडळीला मारुतीमंदिर उभारलं.
सन १८१४ मध्ये तुळशीबाग राममंदिराच्या उत्तरेला त्यांनी दुमजली नगारखाना बांधला. ‘खरड्याच्या संग्रामात यश प्राप्त झाले तर तुझ्या दारात चौघडा सुरू करीन’ या सवाई माधवरावांनी दिलेल्या वचनाची पूर्तता झाली. भोर संस्थानचे राजे पंतसचिव यांनी १८५५ मध्ये राममंदिराच्या गाभाऱ्याला चांदीच्या मुलाम्याचा पितळी पत्रा चढवला. नंदरामजी नाईक यांनी १८८४ मध्ये - सध्या आपल्याला दिसतं त्या - भव्य शिखराची उभारणी तीस हजार रुपये खर्चून केली. सन १८९४ मध्ये राममंदिराच्या परिसरात दत्तमंदिर बांधण्यात आलं. ता. १९ नोव्हेंबर १९९८ रोजी मंदिरपरिसराची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रांच्या वारसायादीत नोंद झाली आहे.
उत्कृष्ट सागवानी लाकूडकामातील मंडपावर नजर खिळून राहील अशी इथली कलाकुसर आहे. मंडपापासून नजर उंचावली तर मंदिराच्या प्रांगणातील इमारतीवर गेरूच्या रंगातील चितारलेली पुरातन चित्रंही दिसतात.
चुन्यामध्ये नक्षीदार, सुबक काम केलेल्या ७५ फूट उंचीच्या कळसावर ८० घडीव मूर्ती आहेत. पितळेच्या १८५ छोट्या कळसांनी परिपूर्ण असलेल्या शिखरावर निरनिराळ्या भागांत वीस वानरमूर्ती आहेत. मंदिरपरिसरात असलेली शेषशायी भगवानाची आगळीवेगळी मूर्ती, मारुतीचं व दत्ताचं सुबक, उठावदार मंदिर आणि सतीचं मंदिर हे इथल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे महत्त्वाचे भाग आहेत. एका कालखंडाचं प्रतिनिधित्व करणारं ऐश्वर्य मंदिराच्या रूपानं उभं आहे.
या मंदिराची काळानुरूप झीज झाली होती. त्यामुळे जतन-संवर्धनाची निकड ओळखून विश्वस्तांनी आणि कुटुंबीयांनी जीर्णोद्धार करायचं ठरवलं. मंदिरपरिसरातील दगडी फरशी झिजून तिचे सांधे व दगड ओबडधोबड झाले होते. ते सर्व टप्प्याटप्प्यानं बाजूला करून त्याखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वाहिन्यांची व्यवस्था झाल्यावर मूळ व नवीन दगड घडवून योग्य दरजांसह, उतारासह दगड पुन्हा बसवण्यात आले. इतर जुन्या वास्तूंप्रमाणेच मंदिराच्या सौंदर्यपूर्ण लाकूडकामावर तऱ्हेतऱ्हेचे रंग चढले होते. ते सर्व उतरवल्यावर मूळ एकसंध २५ फुटी भक्कम लाकडी खांब व त्याच्या कमानी मूळ रंगात झळकू लागल्या. रंगकाम उतरवत असताना (कै) बाबासाहेब तुळशीबागवाले यांनी लाकडी खांबाला पडलेली भेग दाखवल्यावर तीत अभियंता रवी रानडे यांनी खोचलेली टेप खोलवर जाऊ लागली.
प्रथमदर्शनी सुबक, डौलदार दिसणाऱ्या लाकडी खांबाचं तळाखालील दगडी बांधकाम उघडं केल्यावर लाकडी खांबांचे तळ वाळवीनं मोठ्या प्रमाणात खाल्लेले दिसून आले. गावठाण हे नदी किनाऱ्यापासून जवळ असल्यानं तिथल्या भूगर्भातील पाण्याची पातळी जास्त आहे. त्यामुळे वाळवीनं कुजलेला तळ मंडपाचा वरचा डोलारा सांभाळून बदलण्यासाठीची प्रक्रिया आव्हानात्मक होती. अस्तित्वातील खांब हे विशिष्ट जॅक लावून तोलून धरून व खालील बांधकाम नव्यानं पूर्ववत् करून, तसंच खांबाचा कुजलेला भाग काढून त्याखाली दगडी तळखडे घडवून सरकवायचे व त्यावर तोललेले खांब परत जागेवर ठेवायचे असं विचारान्ती ठरलं. हे काम जिकिरीचं, धाडसाचं व वेळखाऊ होतं; पण ते यशस्वीरीत्या राबवलं गेलं. दगडी तळखड्यांमुळे ३५ लाकडी खांब व मंडपही सुरक्षित झाला.
जतन-संवर्धनाच्या कामासाठी ठोस प्रमाणप्रणाली नाही. कल्पकता, अनुभव, अभियांत्रिकी सल्ला यांच्या जोरावर प्रयोगशीलता राबवावी लागते; तीसुद्धा जनतेच्या लेखी संवेदनशील असलेल्या वास्तूंबाबत. आज कुणी राममंदिरात गेलं तर मंडपामागची ही रंजक जतन-संवर्धनाची पुसटशी कल्पनाही संबंधितांना येणार नाही. त्यासाठी लवकरच एक माहितीपूर्ण दालन तयार करण्याची संकल्पना आहे. मंदिराचा कळस व मंडपाचं छत यांमध्ये बाहेरून कधीही न दिसणारी सपाट जागा आहे. तीमध्ये गाभाऱ्याकडे एक झरोका असून रामनवमीला श्रीरामांच्या पायाशी किरणोत्सव होतो. ही किमया पाहता, बांधकाम साकारणाऱ्या अनामिक कारागिरांचं कौतुक वाटतं.
मंडपाचं छत व खालून दिसणारं सौंदर्यपूर्ण नक्षीकामाचं छत यांच्या पोकळीमधून या भागात जाता येतं. छताच्या स्थैर्यासाठी जुनी खराब लाकडं बदलून जुना दणकट सांगाडा तसाच ठेवून छताची दुरुस्ती करण्यात आली. नंतर त्यावर दोन थरांतील एकमेकांत वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं गुंफलेली अर्धकौलं - जी विशिष्ट कारागिरांकडून विशिष्ट मोसमात तयार करून घेण्यात आली आहेत - बसवण्यात आली. दर पावसाळ्यात त्यांच्यावर शेवाळ जमतं आणि त्याचं ते तसं रूप पारंपरिक आहे. मंदिराच्या आवारातील गणपतीमंदिर व शिवमंदिर यांचं जतन झालं; परंतु इतर मंदिरांचं काम बाकी आहे.
मंदिराच्या उत्तरेकडील भागाला चौसोपी म्हणतात. चौसोपीतून तळघराला जाणारा जिना आहे. जिन्यातून खाली गेल्यावर दोन खणांचं रुंद तळघर आहे. मुठा नदीच्या जवळील सर्व भागांमध्ये भूगर्भाखालील पाण्याची पातळी जास्त असून कात्रजकडून शनिवारवाड्याकडे येणाऱ्या इतिहासकालीन खापरी बंद जलवाहिन्यांच्या काही वाहिन्यांचे काही उच्छ्वास मंदिराजवळील भागांमध्ये आहेत. हे तळघर पावसाळ्यात वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीला सामावून घेण्यासाठी केलेलं असणार. पावसाळा ओसरला की इथल्या पाण्याची पातळी ओसरते. स्थापत्यशास्त्रातील ही एक मोठी सोय जाणीवपूर्वक केल्याचं दिसून येतं. मंदिराच्या मागं शेषशायी भगवानाचं छोटेखानी मंदिर जमिनीलगत होतं.
त्याची उंची वाढवून, आकारमान वाढवून दगडांमध्ये त्याची फेररचना करण्यात आली आहे. मंडपाला लाकडी नक्षीकाम असलेलं, नैसर्गिक रंगातील पाना-फुलांच्या रचनेचं सौंदर्यपूर्ण छत आहे. अनेक प्रयोगान्ती लवकरच अशा छताचं वैशिष्ट्यपूर्ण जतन-संवर्धन तज्ज्ञ कारागिरांकडून शास्त्रीयरीत्या केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण अशा शिखराचं संवर्धन सरतेशेवटी केलं जाईल.
प्रभाव भारतीय संस्कृतीचा
- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
‘कृंगथेप महानखोन अमोन रत्तनाकोसिन महिंथरा आयुध्या महाधिलोक फोप नॉफरात राज्यथनी बुरीरोम उडोमरतचानीवेत महास्थान आमोन पिमान अवातान सथीत सुकाथतिया विष्णू गुम प्रसीद’ हे विचित्र भाषेतील वाटत असलेले शब्द म्हणजे एका शहराचं नाव आहे, ज्याचा अर्थ होतो, ‘देवदूतांचा वास असलेली, बुद्धाचं विश्रामस्थान असलेली, नवरत्नांनी सजलेली, जगाची आनंदी राजधानी. राजवाड्यांनी सजलेली, स्वर्गाचा आभास असलेली, इंद्रदेवाचा आशीर्वाद मिळालेली आणि भगवान विष्णूंनी निर्मिती केली अशी महाराजधानी, अजिंक्य अशी नवीन अयोध्यानगरी.’ कोणत्याही शहराचं असलेलं जगातील सर्वांत मोठं हे नाव आहे. स्थानिक लोक याला ‘कृंगथेप महानखोन’ म्हणतात, तर परदेशी लोक आणि पर्यटक या शहराला ‘बँकॉक’ या नावाने ओळखतात. रत्नकोसीन साम्राज्याचे संस्थापक आणि चक्री घराण्याची सुरुवात करणारे राजा श्रीराम यांनी १७८२ मध्ये या शहराची स्थापना केली.
ज्या ज्या देशात भटकंती करू, त्या त्या देशातील संस्कृती आणि इतिहास यांची जवळून ओळख करून घेण्याची आता मला सवय लागली आहे, त्यामुळे एखाद्या देशातील मुख्य पर्यटन स्थळं बघतानाच तिथली ऐतिहासिक स्थळं, सांस्कृतिक राजधानी समजली जाणारी शहरंसुद्धा आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करतो.
थायलंडला प्रवास करणारे बहुतांश भारतीय पर्यटक हे बँकॉक पटाया आणि फुकेत या ठिकाणी जातात. यातील बरेचसे पर्यटक लिजर टुरिझमसाठी जात असल्याने या देशाबद्दलची एक विशिष्ट अशी प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. खरंतर भारतीय संस्कृतीचं आग्नेय आशियामध्ये उमटलेलं ठळक प्रतिबिंब म्हणजे थायलंड आहे. इथल्या रूढी-परंपरा, इथल्या देवी-देवता, इथले लग्नसमारंभ, चालीरीती, पौराणिक कथा, गावांची-शहरांची नावं या सगळ्यांवरच भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे.
इथल्या एकूण संस्कृतीवर आणि राजघराण्यावर रामायणाचा मोठा प्रभाव आहे. रामायण इथे ‘रामाकियेन’ या नावाने ओळखलं जातं. आपल्या रामायणापेक्षा इथलं रामायण थोडंसं वेगळं जरी असलं, तरी एकूण मूळ कथेचा गाभा तोच आहे. रामाप्रमाणेच (Phrom)ब्रह्मा, (Wisanu) विष्णू आणि (Isuan) शिव यांना इथल्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे. इथली स्थानिक थाई भाषा ही संस्कृत, पाली, मलय आणि ख्मेर यांच्यापासून बनली असं इथले जाणकार सांगतात. Ayuthaya (अयोध्या), Chaiyaphum (जयभूमी), Suphanaburi (सुवर्ण भूमी), Phitsnulok (विष्णू लोक), Buriram (राम पुरी) या शहरांच्या नावावर संस्कृतचा प्रभाव दिसून येतो. थायलंडचा इतिहास हजारो वर्षं जुना जरी नसला, तरी ठाऊक असलेला इतिहास साधारणतः पाचव्या-सहाव्या शतकापासून सुरू होतो. द्वारवती साम्राज्य (७ वं ते १२ वं शतक), सुखोदय साम्राज्य (१३ वं ते १६ वं शतक), अयोध्या साम्राज्य (१६ वं ते १८ वं शतक), थोन बुरी राज्य (१७६७ ते १७८२) आणि १७८२ पासून सध्या राज्य करत असलेले रत्त कोसिन साम्राज्याचं चक्री घराणं असा एकंदर थाई इतिहास आहे.
सोळाव्या शतकात असलेलं अयोध्या साम्राज्य हा थायलंडच्या इतिहासाचा सुवर्णकाळ समजला जातो. त्याची राजधानी असलेलं आणि १३५१ सालात स्थापना झालेलं अयोध्या हे ऐतिहासिक शहर बँकॉकपासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या काळातील शहराचे बरेच अवशेष अजूनही शिल्लक आहेत. या पुरातन अयोध्या शहराला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा युनेस्कोकडून प्राप्त आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी इथे भेट देतात. बँकॉकच्या उत्तरेला सव्वाचारशे किलोमीटरवर सुखो थाई हिस्टोरिकल पार्क आहे. सुखोदय साम्राज्याची ही राजधानी होती. आजच्या थाई भाषेची निर्मिती आणि थायलंडची सांस्कृतिक पुनर्स्थापना इथूनच झाली. आवर्जून बघण्यासारखं हे ठिकाण असून, फार कमी पर्यटक इथे भेट देतात.
थायलंडमध्ये जरी लोकशाही असली, तरीसुद्धा राजघराण्यावर इथल्या जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि थायलंडची सेना ही थायलंडच्या राजाच्या आदेशात आहे असं मानलं जातं. चक्री घराण्याची स्थापना महाक्षत्रिय सेवक ऊर्फ राजा राम पहिले यांनी केली, त्यानंतर दहा राजे गादीवर आले. सध्या अकरावे राम इथे राज्य करतात. चक्री घराण्याचा राजवाडा आणि राजमंदिर अजूनही सुस्थितीत आहे. इथल्या राज मंदिरात प्रत्येक राजाच्या छत्र्या (समाधी) असून, मुख्य राज्यकर्त्यांची मोठी मंदिरं आहेत. या ठिकाणाला वाट फो टेम्पल कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. याच मंदिरात झोपलेल्या बुद्धाची उंचीला पन्नास फूट आणि लांबीला दीडशे फूट असलेली जगप्रसिद्ध अशी मूर्ती आहे.
बँकॉक शहरामध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे इथली घरं, इथली दुकानं, इथले मोठमोठे मॉल, इथल्या कंपन्या - मोठ्या इमारती यांच्यासमोर चतुर्भुज मूर्ती असलेल्या देवतेचं एक लहानसं का होईना मंदिर असतं. चौकशी केल्यावर समजलं, ही मंदिरं ब्रह्मदेवाची आहेत, ज्याला स्थानिक भाषेत ‘एरावान’ किंवा ‘महा ताहप्रोह्म’ असं म्हणतात. कोणतंही कार्य निर्विघ्न पार पडण्यासाठी ‘ताहप्रोह्म’चं लहानसं मंदिर उभारलं जातं.
ताहप्रोह्मचं मुख्य मंदिर हे MBK स्क्वेअर इथे आहे. इथल्या प्रसिद्ध अशा सेंट्रल मॉलजवळ त्रिमूर्ती मंदिर आहे, जिथं ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची एकत्रित मूर्ती असून, ही प्रेमाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. चांगला साथीदार मिळावा म्हणून इथे स्थानिक लोक आराधना करताना दिसतात. थाई संस्कृतीमध्ये रावण आणि त्याचा मुलगा इंद्रजित यांनासुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. थायलंडच्या ज्या चार रक्षक देवता आहेत, त्यांतील दोन रक्षक देवता म्हणजे रावण आणि इंद्रजित. या रक्षक देवतांचे मोठे पुतळे बँकॉकच्या सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेकांनी बघितले असतील.
सुरत थनी या दक्षिणेकडील शहरात असताना माझ्या गाइडच्या ओळखीमुळे मला तिथल्या एका स्थानिक लग्नामध्ये जाता आलं. इथल्या ग्रामीण भागातील लग्न असल्याने अतिशय पारंपरिक पद्धतीने हा सोहळा होता, त्यामुळे तिथली लग्नपद्धती बघता आली. इथे मुलाने मुलीला हुंडा द्यायची पद्धत आहे. पारंपरिक वेशात यज्ञविधी बौद्ध धर्मगुरू यांच्या उपस्थितीत पार पडतो. ज्याप्रमाणे मुलगी माप ओलांडून घरात येते, त्याच प्रकारे कार्यक्रम स्थळी मुलाला प्रवेश करण्यासाठी ठराविक अंतराने तीन दरवाजे उभे केलेले असतात - कांस्यद्वार, रौप्यद्वार, सुवर्णद्वार - ही तिन्ही द्वारं पार करून मुलाला यायचं असतं.
प्रत्येक द्वार पार करताना मुलगी मुलाकडून वेगवेगळी वचनं घेते किंवा काही मागणी करते. यांची पूर्तता झाल्यानंतरच मुलाला लग्नासाठी परवानगी मिळते. सकाळी पारंपरिक पद्धतीने लग्न आणि संध्याकाळी पाश्चिमात्य धाटणीची पार्टी असं साधारण नियोजन प्रत्येक लग्नात असतं.
अयोध्या, पाई, चांग माई, सुरत थनी, श्री सज्जनालय, सुखोदय ही ठिकाणं तुमच्या मस्ट व्हिजिट ठिकाणांच्या यादीत लिहून ठेवा. वेगळ्या पद्धतीने का होईना; पण भारताचाच सांस्कृतिक वारसा चालवणारा हा देश मळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेने फिरायला हरकत नाही.
निरगुडे इथलं हनुमानमंदिर
- अंजली कलमदानी, anjali.kalamdani10@gmail.com
आपल्या गावातलं मंदिर ही गावाची नुसती खूणच नसते तर सर्वांना एकत्र आणणारी, एखाद्या अनामिक नात्यानं गुंफून ठेवणारी गावची मौल्यवान ठेवही असते. देवालयातल्या देवाविषयी भक्ती, आपलेपणा, आश्वस्त करणारा आधार अशा अनेक भावना गावकऱ्यांमध्ये रुजलेल्या असतात. निरगुडे गावातील मारुतीच्या मंदिराबाबतही असंच म्हणता येईल. या मंदिराचा जीर्णोद्धार शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलं आणि ते काम पूर्णही करून दाखवलं.
छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्म झाला तो जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला सर्वांना परिचयाचा आहे. याच शिवनेरी किल्ल्याला लागून वळसा घालून डोंगराच्या रम्य परिसरातून रस्ता पुढं जातो आणि एका फाट्यावरून पुढं निरगुडे हे गाव लागतं.
फळबागा, आमराई, भाज्यांची, धान्याची शेतं पार केल्यानंतर निरगुडे गावाची वस्ती दिसू लागते. गावातला रस्ता घेऊन जातो काळ्या दगडी पाषाणात बांधलेल्या मारुतीमंदिराजवळ. मंदिराच्या संरक्षकभिंतीला ठेंगणं प्रवेशद्वार आहे. त्यातून वाकूनच आत जावं लागतं आणि मग दिसते स्थानिक पाषाणातून साकारलेली मंदिराची कलाकृती. मंदिरात पाच शिलालेख आहेत. त्यातील एकावर ‘निरगुडकर कुळात जन्मलेल्या यादव नावाच्या व्यक्तीनं - हनुमानाच्या कृपेनं भरभराट झाल्यामुळे - मंदिराची बांधणी केली,’ असा उल्लेख आहे. हा कालनिर्देश २८० वर्षांपूर्वीचा आहे. मंदिराच्या परिसरातील गजान्तलक्ष्मीच्या शिल्पावरून मंदिर १५०० वर्षं जुनं असावं असा अंदाज बांधता येईल. निरगुडकर यांच्या कुटुंबीयांकडे वंशपरंपरेनं मंदिराचं प्रतिनिधित्व आहे.
मारुतीच्या मूर्तीवर अनेक वर्षं चढवण्यात आलेलं शेंदराचं लेपन उतरवण्याचा निर्णय सन २०१० मध्ये मंदिराच्या ट्रस्टींनी घेतला. लेपन उतरवण्याच्या निर्णयापूर्वी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी ग्रंथांचा आधार घेण्यात आला व त्यामागचं शास्त्र त्यांना समजावून सांगण्यात आलं. ज्या वेळी शेंदूरलेपन उतरवायचं ठरलं, त्या वेळी गावात पूर्णपणे शांतता व एक अनामिक धडधड होती.
शेंदूरलेपनाचे जवळजवळ ९५० किलोचे थर व चांदीच्या सात नेत्रजोड्या उतरवल्या गेल्यावर आत मारुतीची रेखीव मूर्ती तर होतीच; परंतु मारुतीच्या डाव्या बाजूला सिद्धिविनायकप्रतिरूप गणेशाची मूर्तीही तिथं ‘अवतरली’. गेल्या चार-पाच पिढ्यांनी मारुतीची मूळ मूर्ती व गजाननाची मूर्ती मूळ स्थितीत पाहिलीच नव्हती; किंबहुना, गजाननाची मूर्ती हा मारुतीच्या वाकवलेल्या मांडीचाच भाग आहे अशीच साऱ्यांची समजूत होती.
गावकऱ्यांनी आपल्या आवडत्या देवाचं दर्शन घेतलं व त्यानंतर मंदिराचं जतन-संवर्धन पारंपरिक पद्धतीनं व्हावं हा निर्णय घेतला. एका छोट्या गावानं सर्वांपुढं ठेवलेला हा आदर्शही म्हणावा लागेल. सध्याच्या परिस्थितीत अनेक धार्मिक स्थळांचं नूतनीकरण नवीन सामग्री वापरून मूळ मंदिराशी विसंगत असं केलं जातं आणि पारंपरिक वारसा आपला मूळ चेहरा आणि ऐतिहासिक महत्त्व हरवून बसतो.
दगडातील मोठ्या चिऱ्यांमध्ये २८० वर्षांपूर्वी मेहनतीनं घडवलेलं हे शिल्प...पण कुणी अज्ञानानं प्रत्येक दगड तैलरंगात रेखाटन करून रंगवला होता. वीट आणि चुना यांमध्ये बांधलेल्या कळसाची पडझड झाली होती. दशावतारांच्या अनेक मूर्ती तुटल्या होत्या. मंदिराभोवतीची फरसबंदी फुटल्यामुळे प्रदक्षिणा घालणं सोईचं राहिलं नव्हतं.
गर्भगृह, अंतराळ आणि एकसंध चौकोनी दगडी मंडप असलेल्या मंदिरावर कारागिरांनी कौशल्यपूर्ण कारागिरी केलेली होती. तैलरंग शास्त्रीय पद्धतीनं उतरवल्यावर कारागिरांची करामत अधिकच स्पष्ट होऊ लागली. पूर्णपणे भग्न पावलेल्या कळसावरच्या मूर्तींसाठी नव्यानं रेखांकनं करण्यात आली. यासाठी दशावतारातील मूर्तींचा आधार घेण्यात आला.
कळसावर पूर्वीची रंगसंगती, हातानं चितारलेली रेखीव कलाकुसरीची पाना-फुलांची चित्रं आढळून आली. खाचाखोचांमध्ये काही रंग ऊन्ह-पावसाला दाद न देता टिकून राहतात आणि ऐतिहासिक पुरावा म्हणून उपयुक्त ठरतात. मंदिराच्या कळसाचं काम मूळ ढाच्याप्रमाणे चुन्यात करण्यास गावकरी तयार झाले. मंदिराच्या प्रांगणात चुना मळण्याची जुनी घाणी दगडासकट होती. ती व्यवस्थित चालू करण्याचे सोपस्कार झाल्यावर घाणी फिरवण्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या शेतातील बैल देण्याचं ठरवलं. कळीचा चुना आणून तो भिजवण्यासाठी टाकी तयार करण्यात आली. कारागिरांनी मूर्तींची घडण समजून कामाला सुरुवात केली.
मंदिराच्या सपाट छतावर घुमटाकार कळस असून त्यावर बाजूनं १६ छोटे कळस आहेत. छोट्या कळसांच्या खाली उभ्या प्रतलावर दशावतारातील मूर्ती आहेत. मंडपावर छोटा घुमट असून त्याच्या बाजूनं चार छोटे घुमट आहेत. मुख्य शिखराच्या नागप्रतिमा लक्ष वेधून घेतात. संपूर्ण शिखराचं जतन ही उन्हातानात काम करणाऱ्या कारागिरांसाठी जिकिरीची गोष्ट असते. गणेश हे कारागीर काही कामासाठी बाहेरगावी गेल्यावर अपघातानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं चुन्यात काम पूर्ण केलं. बाह्य भागावर चौकोनी दिसणारी सभामंडपाची अंतर्गत रचना करताना दगडकामातच चौकोन ते अष्टकोन आणि गोलाकार घुमट ही बांधकामरचना साकारली. त्यावर केलेल्या कोरीव कामातील प्रत्येक हत्तीची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात असून दगडकामातील फुलंही वेगवेगळी आहेत.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील चौकट पाषाणातील वेलबुट्टीतून घडवताना टणक अग्निजन्य दगडावर अशी असामान्य कलाकुसर करणं हे अवघड तर होतंच; मात्र, ती शतकानुशतकं टिकावी अशीही यामागची धडपड आहे.
मंदिराच्या जोत्यावर बाहेरच्या बाजूनं कमळांच्या प्रतिमांची मालिका असून कमळ घडवल्यावर त्याच्या बाजूनं बारीक कंगोऱ्यांची, एकमेकांत काटकोनात गुंतलेली साखळी कोरलेली आहे. कमानी, देवळ्या, आलंकारिक पानाफुलांची रेखांकनं, कमानीच्या खालच्या टोकांमधील रचना यांमध्ये कमालीची प्रमाणबद्धता व प्रावीण्य दिसून येतं. एका आडगावात साकारलेली ही कलाकृती म्हणजे या गावासाठी मोठा ऐवज आहे आणि तो त्यांनी एकमतानं जपला आहे.
जतन-संवर्धनाचं काम परिपूर्णतेकडे नेताना गावातल्या ज्येष्ठ आणि तरुण मंडळींचं सहकार्य मिळालं. मोकळ्या भागातील फरसबंदी पुन्हा दगडात करून पाण्याचा निचरा होईल अशी सुविधा साधण्यात आली आहे.
इथले महत्त्वाचे सण म्हणजे पोळा आणि हनुमानजयंती. पोळ्याला बैल ठेंगण्या दरवाजातून आत जातात. रामनवमीपासून सुरू होणारा उत्सव हनुमानजयंतीपर्यंत रंगतो. मंदिरासमोरील व्यासपीठावर सादर होणारी रामायण-महाभारतातील स्थानिक कला वाखणण्यासारखी असते. हनुमानजन्माचा सोहळा तर डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो.
मंदिरापुढील भव्य मांडवात पहाटेपासून सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम असतो...त्यात रंगून जात असतानाच तांबडं फुटतं व पहाटेचं सूर्यबिंब वर येतं...व हनुमानजन्माचा उत्सव सुरू होतो...पाळणा हलतो आणि सर्वत्र हर्षोल्हासाचं वातावरण तयार होतं. कीर्तनकार आणि साथीदारांचा आवाज टिपेला पोहोचतो. निरगुडकर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती पाळण्यातील नवजात हनुमानाचं बाळ दोन्ही हातांत धरून सर्व भाविकांच्या जवळ जाऊन त्यांच्या कपाळाला ममतेनं लावण्याची प्रथा पार पडतात. आणि, हे भक्त थोडेथोडके नव्हे तर, पंधराशेच्या आसपास असतात. प्रसाद घेत भक्तगण घरी जातात.
गावकऱ्यांनी पै पै जोडून मंदिराचं जतन-संवर्धन पूर्ण केलं आणि ता. पाच मार्च २०२० रोजी कलशारोहणाचा कार्यक्रम केला. सर्व वयोगटातील लोकांनी एकत्र येऊन पुढच्या पिढीसाठी आणि इतर सर्व लहान गावांसाठी हा आदर्श घालून दिला आहे.
रमणीय रेवदंडा
अंजली कलमदानी
अनेक राज्यकर्त्यांनी निरनिराळ्या कालखंडात ही ठिकाणं काबीज करण्यासाठी लढाया केल्या आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या शैलीचा वास्तुरूपी ठसा स्वतःच्या कारकीर्दीत उमटवला.
राज्यकर्ते बदलले तरी वास्तू टिकतात, त्यामुळे रेवदंड्याच्या किनाऱ्यावरील सद्यस्थितीत आढळणाऱ्या वास्तू पोर्तुगीजकाळातील व त्या शैलीचा प्रभाव असणाऱ्या आहेत. महाराष्ट्राच्या रमणीय पश्चिम किनाऱ्यावर आहे रेवदंडा.
अलिबागच्या दक्षिणेला १७ किलोमीटरवर रेवदंडा भरगच्च वनराजीत विसावला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित केला जातो. ही दोन्ही स्वतंत्र गावं असली तरी ऐतिहासिक घटनांच्या बाबतीतही त्यांचा उल्लेख एकत्रितरीत्या आढळतो.
रायगड जिल्ह्याच्या गॅझेटिअरमधील नोंदीवरून सन १३० पासून ते १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचं व व्यापाराचं प्रसिद्ध बंदर होतं. प्राचीन काळी या भागाला चंपावती व रेवतीक्षेत्र असं म्हणत असावेत.
चंपावती व रेवती या नावानं गुजरातमध्ये श्रीकृष्णाचं राज्य होतं. त्या पौराणिक काळाशी स्थानिक लोक चौलचा संबंध जोडतात. पश्चिम किनाऱ्यावरील अशा सौंदर्यपूर्ण व समृद्ध जागांवर परकीय राज्यकर्त्यांची नजर पडली नसती तरच नवल.
‘कोकणात शिलाहारांचा राजपुत्र झुंज हा राज्य करत आहे,’ असं अरब प्रवासी मसूदी यानं सन ९१५ मध्ये नमूद केलं आहे. सन ९७० मध्ये तिथं हिंदूंशिवाय मुसलमानही मोठ्या संख्येनं होते, तसंच नारळ, कांदे, तांदूळ इत्यादींचं अमाप उत्पन्न होत असे असा उल्लेख काही प्रवाशांनी केला आहे.
सन १५०५ मध्ये पोर्तुगीज हे चौल इथं आले व त्यांनी मुसलमानांचा पाडाव करून हळूहळू आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. या काळात काही राजवटींनी पोर्तुगीजांशी जुळवून घेतलं, तर काहींनी विरोध केला. मात्र, १५०९ नंतर पोर्तुगीजांनी आपला प्रभाव पूर्णतः सिद्ध केला.
सन १७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर, पुढं आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून पोर्तुगीजांनी आगरकोट ब्रिटिशांना दिला. सन १७४० मध्ये तह होऊन चौल प्रदेश मराठ्यांना मिळाला व पोर्तुगीज गोव्याला गेले.
पोर्तुगीज, निजामशहा, आदिलशहा, सिद्दी, फ्रेंच, ब्रिटिश यांनी आलटून-पालटून लढाया करत चौल-रेवदंड्यावर आपापलं वर्चस्व गाजवलं. कारण, चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी, नैसर्गिक सौंदर्य आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समुद्रकिनारा. रेवदंड्याचा उल्लेख इतिहासात ‘लोअर चेऊल’, ‘नॉर्थ चेऊल’ किंवा ‘पोर्तुगीज चेऊल’ (चौल) असा आढळतो.
त्या काळी सुरत व गोव्यादरम्यान चौल हे मोठं व्यापारीकेंद्र होतं. तत्कालीन पर्शिया, अरेबिया इथं समुद्रमार्गे नारळ, सुती कापड, रेशीम जात असे व तिथून खजूर, घोडे आयात होत असत. एका डच प्रवाशानं चौलचा उल्लेख ‘तटबंदी असलेलं व्यापारासाठीचं प्रसिद्ध शहर’ असा केला आहे. खंबायत, सिंध, बंगाल मस्कत इथल्या व्यापारांना हे शहर परिचित असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
तिथले श्रीमंत व्यापारी हिरे-माणकांचा व्यापार करत व चीनहून रेशीम आयात करून त्याचे झगे, नक्षीदार बिछाने तयार करत. सन १५८६ मध्ये व्हेनिसहून आलेला प्रवासी सिडर फ्रेडरिक यानं रेवदंड्याला ‘सर्व बाजूंनी भक्कम सुरक्षित भिंत असलेलं पोर्तुगीज शहर’ असं म्हटलेलं आहे. या वर्णनावरून लक्षात येतं की एकेकाळी इथं व्यापाराची गजबज होती.
एकेकाळी समृद्धीनं गजबजलेला रेवदंड्याचा किनारा सध्या मात्र भग्नावशेष सांभाळत शांत झाला आहे. पोर्तुगीज आगरकोट तटबंदीमध्ये वसलेलं गाव अजूनही अस्तित्वात आहे. इथल्या भग्न इमारतीच्या आवारात सहज फेरफटका मारला तर चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे आजही सहज सापडतात. भक्कम तटबंदीच्या आगरकोटात अनेक इमारती पोर्तुगीजांच्या काळी होत्या.
घडीव दगडांच्या इमारतींमध्ये सेनाधिकारी राहत. इथं दोन शस्त्रागारं होती. किल्ल्याला पंधरा बाजू व ११ बुरुज असल्याची नोंद आहे. असंख्य तोफा व श्रीमंत वस्तीसाठी विशेष सुरक्षित तट व तोफांची सोय होती. पोर्तुगीजकाळातील फॅक्टरी किंवा उंच चौकोनी बुरुज अजूनही अस्तित्वात आहेत. त्या काळी उंच इमारती बांधल्या जात याचा पुरावा अजूनही शिल्लक आहे.
भक्कम व सुरेख घडीव चिऱ्यांनी योग्य प्रमाणबद्धता राखून बांधलेल्या इमारतीचे अवशेष पाहताना प्रगत बांधकामतंत्राची जाणीव होते. सेंट झेविअर चॅपेलचा भव्यपणा व रेखीवपणा अवशेषांमधून प्रतीत होतो. दगडांमधील भव्य कमानी, त्यांवरील कलाकुसर वास्तुकलेतील समृद्धता दर्शवते.
तटबंदीच्या कमानी अजूनही सुस्थितीत असून त्यावर पोर्तुगीज-बोधचिन्हं आहेत. व्यापारामुळे आलेल्या समृद्धीचा अंदाज त्या काळी उभारलेल्या वास्तूच्या भव्यतेमधून, बांधकामशैलीवरून व तंत्रावरून बांधता येतो. चॅपेलच्या कमानी बांधताना वॉल्ट पद्धतीचा अवलंब करून खांबविरहित भव्य दालनाची रचना केल्याचं दिसून येतं.
आगरकोटात आज अस्तित्वात असलेल्या घराबाहेर लोखंडी गोळे पाहून आश्चर्य वाटतं; परंतु इतिहासाच्या पानांत डोकावल्यावर ‘आगरकोटात चौथ्या गुजरात बुरुजावर १८ दगडी गोळा फेकणारी कॅमल तोफ व ६५ पाऊंड लोखंडी गोळा फेकणारी तोफ होती, सातव्या बुरुजावर ४० पाऊंड वजनाचे गोळे फेकणारी गरुड तोफ व ५० पाऊंड वजनाचे गोळे फेकणाऱ्या दोन तोफा होत्या’ अशी तोफांबद्दलची सविस्तर वर्णनं आढळून येतात.
पोर्तुगीज-इमारतीखेरीज मंदिरं, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत; पण दुर्दैवानं हा परिसर अतिशय दुर्लक्षित, निर्मनुष्य आहे. पुरातत्त्व खात्याच्या पाट्या त्यांची मालकी प्रस्थापित करतात; परंतु एका कालखंडाचा इतिहास सांगणारा, वास्तुकलेतील वैशिष्ट्यपूर्ण विविधता दाखवणारा हा परिसर जतन करावा याची काळजी कुणालाच नाही.
नवनवीन पर्यटनस्थळं विकसित करण्यासाठी सरकारकडून निधी दिला जातो. त्यामध्ये पर्यटकांच्या सुविधांना प्राधान्य दिलं जातं; परंतु पर्यटनाचाच भाग असणारी अशी अनेक ठिकाणं मूलभूत सुरक्षेपासून व संवर्धनापासून वंचित राहतात. हा वारसा दुर्लक्षित राहिल्यामुळे कालांतरानं नाहीसा होईल व एका कालखंडाचा इतिहास फक्त गॅझेटिअरच्या पानांमधून वाचण्यापुरता राहील.
शतकं पुढं सरकतात...राजवटी बदलतात...परंतु राजवटींचा वारसा वास्तुरूपानं शिल्लक राहतो. त्याच्या उर्वरित भागाचं जतन-संवर्धन झालं तर इतिहासाशी संदर्भ जोडणं व त्या काळातील जीवनशैलीचा अंदाज बांधणं शक्य होतं. रेवदंड्याच्या इतिहासाला व वास्तुकलेला काळाचे अनेक पदर आहेत. त्यांचं योग्य विवेचन करणारं केंद्र तिथं असणं आवश्यक आहे.
कोकणाकडे सध्या पर्यटनाचा ओघ वाढतो आहे; पण हे पर्यटन फक्त समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी व नारळी-पोफळीचं नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी विकसित झालं तर तिथली अलौकिक वास्तुसौंदर्याची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचणार नाही व त्याच्या अनुभवाचा आनंदही घेता येणार नाही. रमणीय रेवदंड्याचं वास्तुरूपी सौंदर्य आणि पर्यायानं एकेकाळचे उर्वरित सांस्कृतिक धागेदोरे जपले गेले तर पर्यटनाचा आनंदही द्विगुणित होईल.
सर्वांत मोठं शिवमंदिर malojirao jagdale writes cambodia big shivmandir
- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
जगातील सर्वांत मोठं मंदिर हे कंबोडियातील अंकोरवट इथं आहे, हे कदाचित सर्वांनाच माहिती आहे; परंतु जगातील सर्वांत मोठं शिवमंदिर हेसुद्धा कंबोडियामध्येच आहे. कंबोडियातील ख्मेर साम्राज्याची प्राचीन राजधानी असणाऱ्या यशोधरपूरमध्ये हे शिवमंदिर आहे. याचं पूर्वीचं नाव स्वर्णाद्री असून, सध्या बाफवान नावाने हे मंदिर ओळखलं जातं. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गोष्ट अतिशय रंजक आहे.
एखाद्या वास्तूचा जगातील सर्वाधिक काळ संवर्धन आणि पुनर्बांधणीचा विक्रम या मंदिराच्या नावावर आहे. १९६० मध्ये सुरू झालेला मंदिराचा जीर्णोद्धार २०१० मध्ये पूर्ण झाला. कामाचा प्रचंड आवाका आणि त्यातल्या गुंतागुंतीमुळे या प्रकल्पाला ‘जगातील सर्वांत मोठं कोडं’ किंवा ‘वर्ल्ड बिगेस्ट जीगसॉ पझल’ असं म्हटलं गेलं.
भारतातूनच दक्षिणेकडील साम्राज्यातील काही राजवंशाचे लोक कंबोडियामध्ये आले आणि इथं ख्मेर राजसत्तेची स्थापना केली. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच इथं लहान लहान राजसत्ता होत्या, त्यांचं नंतर एकत्रीकरण होऊन एकच मोठी राजसत्ता स्थापन झाली. तसा सातव्या शतकापासून उपलब्ध इतिहास आहे, त्यानुसार पहिल्यांदा महेंद्र पर्वत, नंतर हरिहरलय आणि शेवटी यशोधरपूर अशा ख्मेर साम्राज्याचा राजधान्या निर्माण झाल्या. नंतर यशोधरपूर हे अंकोरवट नावाने प्रसिद्धी पावलं.
इजिप्त येथील राजांप्रमाणे अंकोरवटचे राजेसुद्धा स्वतःला देवराजा म्हणजे देवाचा अंश मानत. या साम्राज्याची राजधानी असलेल्या यशोधरपूरची लोकसंख्या दहाव्या-अकराव्या शतकात सुमारे दहा लाख होती. तत्कालीन जगातील हे सर्वांत मोठं शहर होतं. या शहराचं क्षेत्रफळ नव्याने उजेडात आलेल्या माहितीनुसार आत्ताच्या लंडनच्या दुप्पट, तर मुंबई शहराच्या पाचपट होतं, यावरूनच या साम्राज्याची व्याप्ती आणि आधुनिकता लक्षात येईल.
उपलब्ध तत्कालीन पुराव्यांनुसार या अंगकोर साम्राज्याचा सम्राट उदयआदित्यवर्मन (दुसरा) (कारकीर्द इ.स. १०५० ते १०६६) याने हे शिवमंदिर ११ व्या शतकाच्या मध्यात बांधलं. त्याकाळी हे मंदिर त्या राज्याचं स्टेट टेम्पल म्हणजे कुलदेव होतं. पिरॅमिड पर्वत पद्धतीची रचना असणाऱ्या या मंदिराची कळसासह उंची १६५ फूट असावी. काळाच्या ओघात वरचा सोन्याचा मुलामा असलेला लाकडी कळस नष्ट झाला आहे. सध्या मंदिराची कळसाशिवाय उंची ११५ फूट आहे. मंदिर ३२५ X ४१० फूट असं पसरलेलं असून, बाहेरून मंदिराला चारी बाजूंनी मजबूत तटबंदी आणि दगडी पायवाट आहे.
मंदिरावर शिव, विष्णू, राम, अर्जुन, रावण, इंद्रजित यांच्या चित्रांसह रामायण, महाभारतातील अनेक प्रसंग कोरले आहेत. तेराव्या शतकात चिनी राजदूत झो दागुआन याने यशोधरपूरला भेट दिली असता हे मंदिर बघितलं होतं व त्याचं वर्णन लिहून ठेवलं होतं, त्यानुसार संपूर्ण मंदिर हे ब्राँझ धातूच्या पत्र्याने अच्छादित असून, त्यावर जो कळस होता तो सोन्याचा होता. तसंच, मंदिराच्या मध्यभागी अतिशय भव्य असं शिवलिंग स्थापन केलेलं होतं. पिरॅमिडप्रमाणे एकावर एक रचलेले दगडांचे मजले, वरच्या बाजूला निमुळतं होत गेलेलं बांधकाम, अशी या वास्तूची मूळ रचना होती.
अतिशय अस्थिर असलेल्या रेतीच्या पायावर हे मंदिर उभं केलेलं होतं. आजूबाजूला असलेल्या लहान खंदक व जलाशयांमुळे ही रेती ओलसर राहत असे, ज्यामुळे या प्रचंड अवजड वास्तूला तोलून धरता येणं शक्य होतं. ख्मेर साम्राज्याचं १४ व्या शतकाच्या नंतर अधःपतन व्हायला सुरुवात झाली, ज्यामुळे बराच काळ हे राजधानीचं शहर दुर्लक्षित राहिलं. आजूबाजूचे जलस्रोत आटल्याने या भव्य मंदिराचा पाया असलेली रेती वाळून भुसभुशीत झाली व मंदिराचा प्रचंड डोलारा अस्थिर होऊन याचा मोठा भाग कोसळला.
नंतरची काही शतकं हे मंदिर पूर्णपणे विस्मृतीत गेलं होतं व जंगलाने गिळंकृत केलं होतं. मंदिराचा भाग असलेले सुमारे ५०० किलोचे हजारो दगड या आसपासच्या जंगलामध्ये विखुरले गेले होते. कंबोडिया सरकारने या मंदिराची पुनरुभारणी करण्याचं ठरवलं; परंतु त्यांना स्वतःला हे शक्य नसल्याने त्यांनी यासाठी जगभर आवाहन केलं, ज्याला प्रतिसाद देऊन फ्रेंच पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या एका टीमने या कामाचं शिवधनुष्य उचललं व प्रत्यक्ष कामाला १९६० मध्ये सुरुवात झाली.
मंदिराशी संबंधित सर्व कागदपत्रं, शिलालेख इत्यादी एकत्र केलं गेलं व कंबोडियाची राजधानी नॉम् पेन्ह इथं फ्रेंच पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयामध्ये हे ठेवण्यात आलं. दरम्यान, १९७० मध्ये कंबोडियामध्ये यादवी युद्ध सुरू झाल्याने या प्रकल्पात अडथळा तर आलाच; परंतु ख्मेर रोग या कट्टरवादी संघटनेने फ्रेंच पुरातत्त्व विभागाचं नॉम् पेन्ह येथील कार्यालय जाळून टाकलं. मूळ कागदपत्रं नष्ट झाल्यामुळे आता मंदिर पुन्हा कसं उभारायचं हा जटिल प्रश्न उभा राहिला. दरम्यानच्या काळामध्ये मंदिराचे जंगलात विखुरलेले सर्व भाग एकत्र केले गेले, जे जवळपास हजारो तुकडे होते. या तुकड्यांना एकत्र करून आता मंदिर बांधायचं होतं, त्यामुळे हे मंदिर उभारणं म्हणजे जगातलं सर्वांत मोठं कोडं बनलं. मंदिराचे विखुरलेले हजारो सुटे भाग असल्याने या प्रोजेक्टला ‘बाफ़ुआन पझल’ असं नाव दिलं गेलं.
फ्रेंच स्कूल ऑफ फार ईस्ट संस्थेचे पुरातत्त्व शास्त्रज्ञ पास्कल रॉयेर यांनी आव्हान स्वीकारून कंबोडियातील यादवी युद्ध संपुष्टात आल्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा कामाला सुरुवात केली. जागेवर उभं असलेलं, थोडंफार शिल्लक असलेलं मंदिरसुद्धा काढून सर्व भाग सुटे करण्यात आले. हे जवळपास तीन लाख तुकडे होते. मूळ कागदपत्रं आणि रेखाटनं नष्ट झाली असल्यानं आता फक्त अनुभवावरून आणि स्थानिक कंबोडियन तज्ज्ञांच्या मदतीने मंदिर पुन्हा उभं करावं लागणार होतं.
या वास्तूचे १९१० पासून उपलब्ध असलेले ९४० फोटो मिळवण्यात यश आलं आणि याच्या मदतीने सर्व तीन लाख दगडांचं नंबरिंग करण्यात आलं. पूर्वीप्रमाणे पुन्हा हे मंदिर कोसळू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली. अतिरिक्त पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नव्यानं निर्माण केली गेली, तसंच पाया भक्कम व्हावा यासाठी अतिरिक्त दगड वापरले गेले. शास्त्रज्ञ पास्कल रॉयेर यांना जगभरातील अनेक संस्थांनी या कामासाठी तांत्रिक साहाय्य पुरवलं. यामध्ये भारतीय पुरातत्त्व विभागाचासुद्धा समावेश होता. २०१० मध्ये हे मंदिर पुन्हा एकदा उभं राहिलं.
हे जगातील सर्वांत क्लिष्ट बाफ़ुआन पझल सोडवून पुन्हा मंदिर उभारण्यासाठी तब्बल ५० वर्षं लागली. यात कंबोडियाला भारत सरकार, फ्रान्स सरकार आणि युनेस्कोने भरीव मदत केली. कंबोडियाचे राजे नोर्डोम सिन्हमणी आणि फ्रान्सचे प्रधानमंत्री फ्रांस्वा फिलन यांनी या मंदिराचं लोकार्पण केलं. ३ जून २०११ ला हे मंदिर पुन्हा जगभरातील लोकांसाठी पाहण्यास खुलं करण्यात आलं. तुम्ही जर कंबोडियामध्ये अंकोरवट बघण्यासाठी जाणार असाल, तर जवळच असणारं तेथील हे शिवमंदिर न चुकता आवर्जून बघा.
(लेखक जगभर भटकंती करणारे असून, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)
निसर्ग संपन्न तांबलडेग
निसर्गसंपन्न तांबळडेग
मित्राने, त्याच्या गावाला ’विठ्ठल रखुमाई’ चा सप्ताह असल्याने येतोस काय? अशी विचारणा केली. मी कोकणात जाण्यास कधीच नाही म्हणत नसल्याने लगेच तयारी करुन निघालो. कोकणातील ’देवगड’ जवळील ’मिठबांव’ गावाच्या बाजुला असलेल्या ’तांबळडेग’ या गावी पोहचलो.तांबळडेग गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तांबलडेगच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला खाडी असल्याने समुद्र व खाडीच्या मिलापाने सुंदर सौंदर्य प्राप्त झाले आहे. तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. गावात जागोजागी आमराई व नारळाच्या बागातून लपलेली कौलारु घरं दिसत होती.घराला लागून असलेल्या वाडीत कामे करणारी माणसं दिसत होती.
सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. तांबळडेग या गावाला प्रशस्त आणि स्वच्छ असा सुमारे ४ कि.मी. लाबींचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन सोनेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मिती केली असावी. तांबळडेग चा समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असल्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो.
समुद्र किनारी जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. निरनिराळ्या असंख्य पक्षांचा विहार सुरु असतो. समुद्रात मच्छिमारी नौका लांबवर दिसतात.अशा सुंदर समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आंनद लुटता येतो.या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीत करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा सुरक्षित समजला जातो. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.गावात मासेमारी करुन आणलेली मासळी देवगड बाजारात जाते.तेव्हा गावाच्या पुर्वेला असलेल्या खाडीचा मासेमारी करीता चांगला उपयोग होतो.
समुद्र किना-याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता ’गजबा’ देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. माता गजबादेवी मंदिरापासून समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नसते.
देवगड तालुक्यातील समुद्रकासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तांबळडेग. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची या प्रजातीच्या कासवांसाठी उपयुक्त आहे.ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडतात.
तांबळडेग नगरीत सात दिवस विठू माऊली प्रगट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.संपूर्ण गाव भक्तीमय झालेला असतो.मुंबईहून
बरीच मंडळी या सप्ताहाला आवर्जून येतात. नेत्रदीपक श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती, कलाकुसर असलेले मंदिर, आकर्षक विद्युत रोषणाई, भजन असा सोहळा पहायला मिळतो. रात्री दिंडीच्या कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळी जमतात.
तांबळडेग समुद्रकिनारी चांदण्या रात्री फिरण्यास वेगळाच आंनद मिळतो. समुद्राची गाज ऐकत थंड हवेचा गारवा झेलत वाळूच्या किनारी फिरण्याचा अनुभव आंनद देतो. वेगवेगळी ताजी मच्छी खाण्याचा आंनद घेता येतो.
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना याची फारशी माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या गावी आवर्जून येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चित भेट द्यावी.
सित्तनवासल इथलं गुहामंदिरं
- अभिजित कांबळे, ab2oct@gmail.com
जगभरात विविध ठिकाणी प्रागैतिहासिक गुहा पाहायला मिळतात. तशाच गुहा भारतातल्या विविध भागांत म्हणजेच - आझमगढ, बिल्लासुरगम, भीमबेटका, बाघ, सिंगनपूर, होशंगाबाद, बुंदेलखंड, मिर्झापूर इत्यादी ठिकाणी सापडलेल्या आहेत. दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यातल्या सित्तनवासल इथं प्राचीन गुहामंदिरं आणि चित्रं सापडलेली आहेत. ही चित्रं म्हणजे भारतीय चित्रकलेचा पाया असू शकतात. अजिंठा शैलीचा प्रभाव असणारी ही चित्रं फ्रेस्को-पेंटिंग आहेत.
तामिळनाडूतल्या पदुकोट्टईच्या वायव्येला १६ किलोमीटरवर वसलेलं सित्तनवासल हे ठिकाण जैन आचार्यांचं इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या नवव्या शतकापर्यंतचं उपासनास्थान होतं. या परिसरात नर्तमले, मलैयडीपट्टी इत्यादी अन्य स्थानं आहेत. या प्राचीन गुहामंदिराचा शोध प्राध्यापक जोव्हाऊ डुब्रेल या पुरातत्त्वज्ञानं १९२० मध्ये लावला.
सित्तनवसाल हे ठिकाण ‘रॉक कट जैन गुफा’मंदिरातल्या ‘फ्रेस्को’चित्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. तामिळनाडूच्या इतिहासात सित्तनवासलला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दगडी वर्तुळं, दफनस्थळं यांसारखी मेगालिथिक्स स्मारकं या भागात आढळतात. त्यामुळं इथं प्रागैतिहासिक मानवाची वस्ती होती याची साक्ष मिळते. इथं दोनशे फूट उंचीची एक खडकाळ टेकडी असून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे.
या खडकाळ टेकडीवर आणि आजूबाजूला चार स्मारकं आहेत. या टेकडीच्या पश्चिमेला प्रसिद्ध जैन गुहामंदिर आहे. ज्याला ‘अर्हतचं मंदिर’ असं नाव आहे. इथं इसवीसनाच्या नवव्या शतकातल्या चित्रांचे अवशेष आहेत. अजिंठाचित्रांनंतर ही चित्रं महत्त्वाची समजली जातात.
पूर्वेकडं ‘एझादीपट्टम’ नावाची नैसर्गिक गुहा आहे. तीमध्ये ‘पॉलिश रॉक बेड’ आहेत. जैन तपस्वी इथं कठोर तपश्चर्या करत असत. तिथं पहिल्या शतकातला ब्राह्मी शिलालेख व असंख्य तमिळ लेख उपलब्ध झालेले आहेत.
डॉ. ए. एकंबरनाथन आणि डॉ. सी. के. शिवप्रकाशम् यांनी त्यांच्या ‘जैन इन्स्क्रिप्शन इन तमिळनाडू’ (१९८७) या पुस्तकात, गुहेच्या दक्षिणेकडच्या खडकावर सातव्या व नवव्या शतकातले सात वेगवेगळे तमिळ लेख असल्याचं नमूद केलं आहे. गुहेतली शिल्पकला अतुलनीय आहे.
चित्रं अभ्यासण्याजोगी आहेत. शिल्पांसह संपूर्ण मंदिर प्लास्टरनं झाकलेलं आहे आणि रंगवलेलं आहे. मंदिराच्या छतावर खांबांच्या वरच्या भागावर आणि तळावर चित्रं आढळतात. ती आता काळानुसार क्वचित् दिसत नाहीत किंवा नष्ट होत चाललेली आहेत. समोरचा व्हरांडा ओलांडला की आयताकृती ‘अर्धमंडपम्’मध्ये प्रवेश करता येतो. हा अर्धमंडप गर्भगृहापेक्षा किंचित उंच आहे.
त्याच्या दर्शनी भागात मध्यभागी दोन मोठे खांब आणि दोन्ही टोकांना एक असे दोन खांब आहेत. खांब दोन्ही टोकांना चौकोनी आणि मध्यभागी अष्टकोनी आहेत. खांब आणि खांबांच्या वरचा खडक एका मोठ्या तुळईच्या स्वरूपात कोरलेला आहे. अर्धमंडपाच्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या भिंतींवर कोनाडे आहेत.
दक्षिणेकडच्या देवळीमध्ये उत्थित खोदलेली बैठकावस्थेतली पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. तीखाली कोरीव लेख असून त्यात पार्श्वनाथ यांचा उल्लेख ‘लोक-आदित्य’ असा केलेला आहे. उत्तरेकडच्या देवळीत ध्यानावस्थेत जैन आचार्यांची प्रतिमा असून शेजारच्या स्तंभावर लेख कोरलेला आहे. या लेखात ‘श्रीआचार्य’ असा उल्लेख आहे. दोन्ही लेख नवव्या शतकातले आहेत. मागच्या भिंतीवर तीन मूर्ती आहेत. त्या जैन आचार्यांच्या असाव्यात. त्यांच्या डोक्यावर छत्री आहे.
त्याशिवाय मंडपाच्या दर्शनी भागातल्या दक्षिण कोपऱ्यात खोदलेला सतरा ओळींचा तमिळ लेख आहे. पांड्यवंशातला राजा श्रीमार श्रीवल्लभ व जैन आचार्य इलान गौतम यांनी या गुहामंदिराची दुरुस्ती केल्याचा, तसंच मंडपाची पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण केल्याचा उल्लेख त्या लेखात आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते, या गुहामंदिराच्या निर्मितीचं श्रेय पांड्य राजांना आहे.
या गुहामंदिरात अजिंठ्याप्रमाणे सर्वत्र चित्रं रेखाटण्याची योजना असावी. भिंतीवरच्या गिलाव्यावरून व अवशेषांवरून तसं आढळतं. व्हरांड्यामधलं चित्र नयनरम्य असून त्यात कमळाची पानं, फुलं, मासे, हंस, बदकं इत्यादी घटक दिसतात. याशिवाय, काही पक्षी व फुलं वेचणारी माणसं दिसतात. त्यांचं चित्रण वास्तववादी असून चेहरे प्रसन्न आहेत.
चित्रात तीन पुरुषांच्या आकृती आहेत. त्या पुरुषांच्या हातात कमळपुष्पे आहेत. त्यांचा वर्ण तांबूस आहे. मात्र, त्यातला एक पुरुष सुवर्णादित (सोनेरी) रंगाचा आहे. पाणी सांकेतिक पद्धतीनं दर्शवलेलं आहे. मासे व हंस पाण्यात विहार करत आहेत. कमळाचे देठ लयबद्ध आहेत. हे सरोवर जैन पुराणकथेतला भाग असावं.
या सर्व दृश्यांव्यतिरिक्त इथं काही रत्नजडित आभूषणं घातलेल्या नृत्यांगना, स्वरसुंदरी यांची चित्रं पाहायला मिळतात. काही दांपत्येही रेखाटलेली दिसतात. डावा हात दंडमुद्रेत व उजवा हात पताकामुद्रेत अशा नृत्याविर्भावात असलेली अप्सरा स्वरसुंदरी थोडी कललेली आहे. तिची नजर बाजूला रोखलेली आहे. ती नटराजाच्या अवस्थेत जाणवते, तर दुसरी नृत्यांगना स्तंभावर रेखाटलेली आहे. तिनं डावा हात आनंदानं पसरला आहे. उजवा हात पताकामुद्रेत आहे.
स्त्रीप्रतिमा, केशभूषा, केशसंभारातली फुलं, मोती ही आभूषणं आहेत. सडपातळ अंगकाठी, सिंहकटी यांमुळे ती विलक्षण मोहक वाटते. या स्वरसुंदरीच्या आकृती प्रमाणबद्ध असून त्या आकृतींच्या अंगप्रत्यंगातून अभिव्यक्त होणारी लयबद्धता चित्रकारानं अत्यंत कौशल्यानं रेखाटलेली आहे. चित्रं वास्तववादी वाटतात. या चित्रांचं तंत्र अजिंठाचित्रांशी मिळतंजुळतं आहे. अजिंठाशैलीचा प्रभाव इथं दिसतो. ही सर्व चित्रं फ्रेस्को-पेंटिंग आहेत.
अजिंठा, श्रीलंकेतील श्रीगिरी, मध्य प्रदेशातलं बाघ इत्यादी भित्तिचित्रांची परंपरा इतिहासातून पुढं येते. त्याचबरोबर दक्षिण भारतातल्या आतापर्यंत ज्ञात असलेल्या सर्वात प्राचीन फ्रेस्कोंपैकी सित्तनवासल हे आहे. ते सुरुवातीच्या जैन भित्तिचित्रांचं एकमेव उदाहरण आहे. वापरण्यात येणारं तंत्र ‘फ्रेस्को-सेको’ म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच, अशी पेंटिंग्ज् कोरड्या भिंतीवर केली जातात. युरोपमध्ये भित्तिचित्रं ही भिंत ओलसर असताना केली जातात.
त्यांना ‘फ्रेस्को ब्यूनो’ असं म्हणतात. डॉ. एस.परमशिवन यांनी या चित्रतंत्रांचं सखोल विश्लेषण केलं आहे. त्यानुसार पांढऱ्यासाठी चुना, काळ्या रंगासाठी दिवाकाळा (दिव्याची काजळी), पिवळ्या आणि लाल रंगासाठी ओचर, हिरव्या रंगासाठी टेरे व्हर्टे इत्यादी खनिज रंग वापरण्यात आलेले आहेत. सन १९३७ ते १९३९ यादरम्यान पदुकोट्टईच्या महाराजांनी चित्रं स्वच्छ-साफ करून घेतली आणि प्रिझर्व्हेटिव्ह कोटिंग लावून ती जतन करून ठेवण्यात आली आहेत.
हिमनद्यांनी वेढलेला माउंट कामेट
तिबेट व भारताची सीमा म्हणजे विस्तीर्ण पसरलेला हिमालय. लडाखपासून अगदी अरुणाचलपर्यंत तिबेट व भारताच्या मध्ये हिमालयातील विविध पर्वतरांगा अन् नद्यांचा समावेश आहे. यातील उत्तराखंड राज्यातील गढवाल भागामध्ये हिमालयातील झस्कार रांगेचा समावेश होतो. या पर्वतरांगेचं वैशिष्ट्य म्हणजे येथील उंचच उंच शिखरं.
पाकिस्तानव्याप्त काश्मीर वगळता भारताच्या हद्दीत असलेल्या हिमशिखरांपैकी दुसरं उंच शिखर म्हणजे माउंट कामेट याच पर्वतरांगेत वसलेलं आहे. पश्चिम हिमालयाचा भाग असलेल्या या शिखराची उंची आहे तब्बल सात हजार ७५८ मीटर. माना, अबी गामीन, मुकुट पर्वत यांच्यासारखी पर्वत शिखरं, विस्तीर्ण पसरलेल्या हिमनद्या अन् अनवट हिमालय यांच्या सान्निध्यात कामेट शिखर उभं आहे.
दुरून पाहिल्यावर असं वाटतं, की हिमानं आच्छादलेला एखादा मोठा पिरॅमिड. ज्याचा माथा हा काहीसा सपाट आहे.

१८५० च्या दशकांत हिमालयातील विविध शिखरं व त्याची विविध रूपं ब्रिटिशांनी जगासमोर आणली. अनादी काळापासून उभ्या असलेल्या, भारताच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या विविध शिखरांपैकी एक असलेले कामेटचा पहिलं सर्वेक्षण १८५५ मध्ये अँड्रू वॉ यांनी केलं. गिर्यारोहणाच्या दृष्टीनं मात्र कामेट प्रकाशझोतात आले ते १९०७ मध्ये. गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये कामेटची गणना ही रांगडा पर्वत म्हणून केली जाते.
ब्रिटिश गिर्यारोहक टी. जी. लॉंगस्टाफ़, एम. पी. नोल्स आणि सी. एफ. मीड यांनी या रांगडेपणाचा चांगलाच अनुभव घेतला. सतत बदलणारं हवामान, तुफान हिमवर्षाव आणि मुळात कामेट शिखराची भौगोलिक रचना यांमुळे या शिखरावरील पहिली गिर्यारोहण मोहीम अर्थातच अयशस्वी ठरली. त्या काळात समाजानं आधुनिकतेची कास धरलेली नव्हती.
त्यामुळं अर्थातच गिर्यारोहण क्षेत्रात देखील उपकरणं, विविध संसाधनं यांची ओळख व्हायची होती, त्यामुळे गिर्यारोहकांना समोर येणारी आव्हानं पेलताना सर्वच आघाड्यांवर कस लागायचा. त्या परिस्थितीचा विचार करता कामेट शिखर चढाईचा विचार करणं, हे देखील धाडसाचं होतं. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी फ्रँको-स्विस गटाने कामेटचं शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.
चार्ल्स पाथ यांच्या नेतृत्वाखाली पॉल बाऊर, रेमंड लंबर्ट, क्वेनेट रिली यांनी सर्व आव्हानांचा सामना करत कामेट शिखर गाठलं. त्या काळी इतक्या उंच शिखरावर चढाई करणं हे दुर्मीळ होतं. गिर्यारोहण क्षेत्राची खरी पायाभरणी करण्यात ज्या घटनांचा समावेश होतो, त्यापैकी एक म्हणजे १९३१ ची ही चढाई असं मानलं जातं. गिरिप्रेमीनं देखील १९९४ मध्ये माउंट कामेट शिखर मोहिमेचं आयोजन केलं होतं.
राजेश पटाडे, प्रसाद ढमाल, मोरेश्वर कुलकर्णी, वसंत लिमये अशा तगड्या गिर्यारोहकांचा संघ होता. मात्र, कामेटची आव्हानं गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांच्या जिद्दीपेक्षा वरचढ ठरली. मोहीम अयशस्वी झाली. मात्र, या संघाला रिकाम्या हातानं परत जाणं मान्य नव्हतं.
त्यांनी कामेटनं दिलेली हुलकावणी मागे सारून अगदी बाजूलाच उभ्या असलेल्या अबी गामीन या सात हजार ३५५ मीटर उंच शिखरावर चढाई केली. माउंट कामेट शिखराचा मार्ग हा पूर्वेकडील हिमनदीवरून सुरू होतो व मीड कोलच्या मार्गे शिखराकडं जातो.
अबी गामीन व माउंट कामेट शिखराचा मार्ग याच मीड कोलहून वेगळा होता. १९०७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा कामेट शिखरावर मोहिमेचा प्रयत्न केला होता, त्या वेळी गिर्यारोहक सी. एफ. मीड हे अबी गामीन व माउंट कामेट यांना वेगळं करण्याऱ्या कोलपर्यंत पोहोचले होते. तेव्हाच्या काळाचा विचार करता अशी कामगिरी करणं हे अचाट होतं.
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून या कोलला मीड कोल किंवा मीड यांची कोल असं नामकरण करण्यात आलं. या कोलहून शिखराकडं जाताना पश्चिमेकडून जोराने वाहणारे वारे गिर्यारोहकांची परीक्षा पाहतात. पठारसदृश भाग खालच्या भागात असल्यानं या वाहत्या वाऱ्यांना मोकळी दिशा मिळते, त्यामुळं यांचा वेग प्रचंड असतो.
सोबतच सततचा हिमवर्षाव व हिमनद्यांमुळं होणारी हालचाल गिर्यारोहकांना हैराण करून सोडतात. या सगळ्या दिव्यांतून पुढं गेलं, की अंगावर येणारी खडी चढण, तिथं असलेला टणक दगड गिर्यारोहकांचे स्वागत करतात, म्हणूनच अनुभवी अन् निष्णात गिर्यारोहकांची देखील कामेट शिखर चढाई करताना दमछाक होते.
कामेट शिखराचं, आजूबाजूच्या परिसराचं भौगोलिक महत्त्व मोठं आहे. तिबेट म्हणजे अर्थात चीन व भारताच्या सीमा ठरविणारा हा परिसर आहे. जुन्या काळापासून तिबेट व भारतामध्ये दळणवळण व विविध व्यापारी मार्ग जे तयार झाले त्यापैकी माना पास हा कामेट शिखर परिसरातच आहे. तसेच कामेटच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या हिमनद्या या देखील हिमालयाशी निगडित जीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या आहेत.
कामेट पश्चिम हिमनदी ही कामेट, अबी गामीन व मुकुट पर्वत प्रदेशातून पुढं विस्तारत जाते व सरस्वती नदीचा प्रमुख स्रोत बनते. दुसरीकडे कामेटची पूर्व हिमनदी ही कामेट व माना शिखरांच्या भोवती विस्तारात जाते व पुढे जाऊन धौलीगंगा व अलकनंदा नदीचा मुख्य स्रोत बनते. माउंट कामेट हा ‘ग्लेशियर ऑफ फायर’ म्हणून देखील ओळखला जातो.
सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य किरणांनी न्हाऊन गेलेला शिखरमाथा एखाद्या तांबट रंगाच्या मुकुटासारखा भासतो. शिखराहून परावर्तित झालेले सोनकिरणं कामेट शिखराच्या सभोवताली असलेल्या हिमनद्यांवर म्हणजेच ग्लेशियर्सवर अशा पद्धतीनं दिसतात जणू काही या ग्लेशियर्सवर अग्निज्वाला फुटल्या आहेत. हे दृश्य मोहून टाकणारे असते.
भारताच्या पुरातन इतिहासामध्ये देखील माउंट कामेटचा विविध ठिकाणी उल्लेख आहे. हिमालयातील अनेक पर्वतांचं नातं हे भगवान शंकराशी जोडलं गेलं आहे, अर्थात कामेट देखील याला अपवाद नाही. १९०७ मध्ये रानीखेतपासून तब्बल दोन महिने घनदाट जंगलातून वाट काढत गिर्यारोहकांचा संघ कामेटच्या पायथ्याशी पोहोचला होता. आज परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे.
जोशी मठहून नीती गावापर्यंत ९० किलोमीटर गाडीचा प्रवास करून पुढं बासुधारा मार्गे डोबला ताल या माउंट कामेटच्या पायथ्यापर्यंत २३ किलोमीटरचा ट्रेक करून पोहोचता येतं. हा संपूर्ण मार्ग तसा खडतर आहे, त्यामुळं ट्रेकिंगचा उत्तम अनुभव असेल व नेहमीपेक्षा वेगळा हिमालय बघायचा असेल, तर हा ट्रेक उत्तम आहे.
साहसी निसर्गानुभव
- विशाखा बाग
कॅनडाच्या अवर्णनीय सौंदर्यात आपण आजही फिरायला निघणार आहोत. क्षेत्रफळानुसार संपूर्ण जगात नंबर दोनवर असलेला हा देश त्याच्या लांबच लांब समुद्रकिनाऱ्यासाठीसुद्धा ओळखला जातो. कॅनडाला दोन लाख किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. जगातील सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला हा एकमेव देश आहे.
वाळवंट सोडून निसर्गातील सर्व प्रकारची वैशिष्ट्ये कॅनडामध्ये अनुभवायला मिळतात. पर्वतराजी, तलाव, तळी, जंगल, बारमाही दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, बर्फाळ प्रदेश आणि अद्ययावत शहरीकरण झालेली नावाजलेली मोठी शहरे हे सर्व काही कॅनडाच्या ट्रीपमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते.
बांफनंतर लेक लुईवरून आम्ही बसने ब्रिटिश कोलंबिया या प्रदेशातील डोंगरामधल्या अत्यंत देखण्या रस्त्याने कोलंबिया आईस फिल्डला जायला निघालो. या सिनिक रूटने जाताना आमच्या दोन्ही बाजूंना जंगल आणि बऱ्याच वेळेला आजूबाजूला बर्फदेखील होता.
कॅनडातील रस्ते रुंद आणि मोठे आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जंगलांमध्ये वन्यजीव बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आढळतात. याच रस्त्याने जाताना अचानक दोन ग्रिझली बियर आम्हाला आडवे आले.
कॅनडामध्ये ग्रिझली बियर म्हणजेच अस्वल बऱ्याच मोठ्या प्रमाणावर दिसतात. या वन्यजीवांना जंगलातल्या एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जायचे असेल तर झाडाझुडपांनी व्यवस्थितरीत्या झाकलेले पूल या रस्त्यावर तयार करण्यात आलेले आहेत.
आम्ही या रस्त्यावरून जाण्याची मजा घेत असतानाच एकीकडे डोक्यात मात्र अथाबास्का व्हॅलीमधील ग्लेशियरवर जाण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. कॅनडियन रॉकी पर्वतराजींच्याच मध्ये ब्रिटिश कोलंबिया आणि अल्बर्टा या दोन प्रदेशांच्या सीमेवर दहा हजार वर्षांपेक्षाही जुने कोलंबिया आईस फिल्ड अस्तित्वात आहेत.
ग्लेशियर डिस्कव्हरी सेंटरमध्ये पोहोचल्यानंतर आपल्या पॅकेजमध्ये दुपारचे जेवणसुद्धा समाविष्ट असते. जेवण करून मगच अत्यंत मोठ्या ग्लेशियर ट्रकमध्ये किंवा बसमध्ये आपल्याला बसवण्यात येते आणि तिथून मग आपण संपूर्णतः बर्फावरूनच साधारण ३० ते ४० मिनिटांत अत्यंत कठीण चढ चढून दहा हजार वर्षे जुन्या बर्फाच्छादित डोंगरावर म्हणजेच ग्लेशियरवर पोहोचतो.
ग्लेशियर ट्रकचा अनुभव विलक्षण होता आणि मुख्य म्हणजे आमची ट्रक चालवणारी ड्रायव्हर ही २५ वर्षांची मुलगी होती. ज्या आत्मविश्वासाने तो प्रचंड मोठा ट्रक ती चालवत होती आणि तेसुद्धा बर्फाच्छादित डोंगरावर, हे बघून मी मनोमन तिला शुभेच्छा दिल्या आणि तिच्याबरोबर फोटोसुद्धा काढला.
बर्फात खाली उतरून मनसोक्त खेळून आणि फोटो काढून पुन्हा त्याच ट्रकने आपण डिस्कव्हरी सेंटरवर परत येतो. त्यानंतर अजून एका विलक्षण ठिकाणी पोहोचायचे होते. तो अनुभवसुद्धा दहा हजारांत एक असाच म्हणावा लागेल.
आईस फिल्डपासून जवळच सनवाप्टा व्हॅलीवर आईस फिल्डच्या वर गोल आकारामधला संपूर्ण काचेचा पूल बांधलेला आहे. ६० मीटर उंच असलेला हा ग्लेशियर स्कायवॉक ४५० मीटर लांब आहे. खाली खोल बर्फाची दरी, आजूबाजूला जंगल, बर्फाचे डोंगर आणि वरून आपण संपूर्णतः काचेच्या पुलावरून हे सगळे दृश्य बघत असतो. हा नजारा मनातून न घालवता येण्यासारखाच.
इथून मग असेच अनेक वेगवेगळे ग्लेशियर बघत आम्ही व्हिसलर गावाला जायला निघालो. व्हिसलर हे खरे तर गाव नाही म्हणता येणार, कारण हे एक स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. कोस्ट माऊंटन नावाच्या पर्वतराजीमध्ये हे गाव वसवलेले आहे.
पर्वत आणि जंगलांमधील वेगवेगळ्या साहसी खेळांसाठी हे स्की रिसॉर्ट टाऊन म्हणून प्रसिद्ध आहे. नीटनेटके वसवलेले हे गाव अतिशय देखणे आहे. मुख्यतः पर्यटकांसाठीच असलेले हे गाव वेगवेगळे रिसॉर्ट्स, हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, गेम झोन, बागबगिचे आणि साहसी खेळांचे मुख्य केंद्र अशा अनेक ठिकाणांनी परिपूर्ण आहे.
छोट्याशा असलेल्या या गावात दरवर्षी २० लाख पर्यटक येत असतात. गावात पोहोचल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक-इन करून गाव बघायला बाहेर पडलो. या छोट्याशा गावामधून एक नदीसुद्धा वाहते.
या देखण्या गावात अनेक ठिकाणी फोटो काढण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होते. संध्याकाळी लाईट लागल्यानंतर तर हे गाव अतिशय रोमँटिक वाटत होते. इथे तुम्ही माऊंट बाईकिंग, स्नो बोर्डिंग, स्कीईंग, स्की जम्पिंग, झीप लाइनिंग आणि बंजी जम्पिंग हे सगळे करू शकता. आम्ही दुसऱ्या दिवशीच झीप लाइनिंग बुक केले होते.
आमच्या या पॅकेजमध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या झीप लाइन्स समाविष्ट होत्या. व्हिसलर या गावातून आपण गंडोला राईडने व्हिसलर माऊंटनवर जातो आणि तिथून चार वेगवेगळ्या ट्री टॉप ब्रिजवरून आपण या पाच वेगवेगळ्या झीप लाईन करू शकतो. कमीत कमी २०० फुटांपासून ते जास्तीत जास्त २४०० फुटांपर्यंत लांब झीप लाईनवर आम्ही थरारक अनुभव घेतला.
साधारण तीन तास ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी करायला लागतात, पण हा आयुष्यातला न विसरता येण्यासारखा रोमांचकारी अनुभव आम्ही घेतला होता. एका बाजूला बर्फाच्छादित डोंगर, खाली दाट जंगल आणि त्यावरून आपण झीप लाईनने एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जातो हा अनुभव शब्दांत मांडण्यासारखा नाही. तुम्हीसुद्धा इथे कधी भेट दिली तर एक तरी साहसी खेळ नक्की खेळून बघा.
अजून इथले एक महत्त्वाचे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे पिक टू पिक गंडोला राईड. व्हिसलरच्याच पर्वतराजीत ब्लॅककाँब रिसॉर्टला जाण्यासाठी ही केबल कार वापरावी लागते; परंतु ज्यांना रिसॉर्टला जायचे नाही ते पर्यटकसुद्धा डोंगराच्या समिटवर जाण्यासाठी केबल कार वापरू शकतात.
अर्थातच तिकीट काढून आपल्याला वर जाता येते; पण तिथे गेल्यानंतर दिसणारे दृश्य डोळ्यांत मात्र किती साठवू आणि नाही, असे होऊन जाते. निसर्गाचे हे अप्रतिम दान कॅनडाच्या झोळीत देवाने भरभरून टाकले आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला वरून दिसणाऱ्या दृश्यात होतो.
पर्वतराजी, तलाव, नदी, जंगल आणि डोंगरांच्या माथ्यावर विसावणारे स्वच्छ निळे आकाश ही इतकी साधी नैसर्गिक वैशिष्ट्ये तिथे मात्र अप्रतिमरीत्या जुळून आली होती आणि त्या दृश्यांची महती काय वर्णावी! जवळजवळ एक-दीड किलोमीटर लांब असा लाकडी स्कायवेसुद्धा तिथे आहे.
तिथून फिरत फिरत चारी बाजूंचे दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता. कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत ती दृश्ये टिपण्यासाठी सर्वांचीच लगबग तिथे दिसत होती. मी मात्र स्कायवेवर एक चक्कर मारून नंतर रेस्टॉरंट वगैरे कुठेही न जाता त्या अप्रतिम दृश्याकडे स्तंभित होऊन हरवल्यासारखी बघत बसले होते. अजूनही तो क्षण, ते दृश्य डोळ्यांसमोरून जात नाही.
भारतासाठी सध्यातरी कॅनडा हा देश आणि विषय दोन्ही बरेच मोठे आहेत. आपलीसुद्धा कॅनडाची ही भ्रमंती अजूनही पुढच्या अनेक भागांमध्ये आपण बघणारच आहोत. अजूनही बऱ्याच रोमांचकारक गोष्टी, ठिकाणे या कॅनडामध्ये आपल्याला अनुभवायची आहेत.
gauribag७@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
निसर्गरम्य कॅनडाची नजरबंदी
- विशाखा बाग
निसर्गाची मुक्त उधळण असलेला कॅनडातील बांफचा परिसर म्हणजे न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ. कॅनडा म्हणजे एक नितांत सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेला सुंदर देश.
कॅनडा, एक नितांत सुंदर, निसर्गाने नटलेला आणि विस्तीर्ण पसरलेला देश... सध्या भारताचे आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेले असले तरीही तिथल्या निसर्गाचा आविष्कार नाकारून चालणार नाही. अटलांटिक, आर्क्टिक आणि प्रशांत महासागराचा तिन्ही बाजूंनी वेढा असलेला आणि भूभागानुसार जगातील क्रमांक दोनचा असलेला हा देश.
पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही कॅनडाचे भाग बघण्यासारखे आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या देशात पूर्व आणि पश्चिम कॅनडामध्ये पूर्णपणे वेगवेगळे निसर्गाचे आविष्कार आणि शहरं बघायला मिळतात. मोठे स्वच्छ व गोड्या पाण्याचे तलाव, बारमाही वाहणाऱ्या नद्या, जगविख्यात असलेली रॉकी पर्वतराजी आणि इतरही बर्फाच्छादित मोठमोठे पर्वत अन् डोंगर हे सर्व काही आपल्याला कॅनडामध्ये बघायला मिळतं.
टोरंटो, व्हँकुव्हर, ओटावा, व्हिक्टोरिया, क्युबेक आणि मॉन्ट्रियलसारखी इथली अनेक अद्ययावत शहरंही बघण्यासारखी आहेत. त्यांची वैशिष्ट्ये अशी आहेत, की इथे शहरांमध्येच, शहराबरोबरच पावलोपावली निसर्गसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळतो.
कामानिमित्ताने मी पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांना भेट दिली होती. आज हा लेख लिहिताना पुन्हा एकदा कॅनडा डोळ्यांसमोर उभा राहिला. तसं म्हटलं तर मी या देशाच्या नक्कीच प्रेमात आहे. भरपूर निसर्गसौंदर्याने भरलेल्या या शहरांमध्ये कामाच्या संधीसुद्धा तेवढ्याच उपलब्ध आहेत. आज मी तुम्हाला अशाच अद्भुत निसर्गसौंदर्याने नटलेल्या बांफ या गावाला घेऊन जाणार आहे.
कॅलगरी या मोठ्या शहरापासून साधारण दीड तासात आपण बांफला पोहोचतो. भारतातून कॅलगरीसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. कॅलगरी ते बांफ यामधील रस्ता आपण एन्जॉय करत करत आणि गाडीतून बाहेर निसर्ग बघता बघता बांफ केव्हा येतं ते कळतही नाही.
गावात शिरतानाच रस्त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला टोकाशी बर्फाच्छादित डोंगर आपलं स्वागत करतो. दोन्ही बाजूंना नेटकी लाकडी घरं, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधून जाणारा मोठा आणि स्वच्छ रस्ता आहे. त्याच्या दुसऱ्या टोकाला बर्फाच्छादित डोंगर, हे गावात शिरताक्षणीच दिसणारं चित्र मी कधीही विसरू शकत नाही.
बांफ हे गाव अनेक कारणांनी जगभरात प्रसिद्ध आहे. बांफ नॅशनल पार्क हा कॅनडातील पहिला आणि जगातील तिसरा नॅशनल पार्क आहे. हे गाव रॉकी पर्वतांच्या सान्निध्यात आणि या नॅशनल पार्कमध्येच वसलेलं आहे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून नामनिर्देशित असलेलं हे गाव एक नावाजलेलं पर्यटन स्थळ आणि बांफ माऊंटेन फिल्म फेस्टिवलसाठीसुद्धा जगप्रसिद्ध आहे.
बो नदीच्या काठावर वसलेले हे गाव, इथे असलेल्या सल्फरयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यासाठी आणि तलावांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. येथील महत्त्वाचं आकर्षण म्हणजे बांफ गंडोला. गावापासून फक्त दहा-बारा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सल्फर नावाच्या डोंगरावर या केबल कारमधून आपल्याला जाता येतं. २२९२ फूट उंच असलेल्या या डोंगराच्या टोकावर जाण्यासाठी केबल कारने फक्त आठ मिनिटं लागतात.
जवळपास बाराही महिने ही केबल कार सुरू असते. वर गेल्यानंतर दिसणारं अप्रतिम दृश्य कधीही न विसरण्यासारखंच... संपूर्ण नॅशनल पार्कचा परिसर, बो नदी, बांफ गाव आणि आजूबाजूच्या रॉकीजच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा. निसर्गाने अमाप सौंदर्याची उधळणच इथे केलेली दिसते. अर्धा दिवस तरी तुम्ही नक्की इथे घालवू शकता.
आम्ही इथे पोहोचल्यानंतर इथल्या लाकडी ‘स्काय वे’वर चालण्याचा आनंद घेतला. मनसोक्त फोटो काढले आणि स्काय रेस्टॉरंटमध्ये कॉफीसुद्धा घेतली. इथे एक मिनी थिएटरसुद्धा आहे, त्यामध्ये तुम्हाला इथली एक माहितीवजा फिल्म दाखवली जाते.
संपूर्ण बांफच्या परिसरात छोटे-मोठे जवळपास एक डझनपेक्षाही जास्त तलाव आहेत. एकापेक्षा एक सरस आणि रम्य परिसर या तलावांच्या आजूबाजूला आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यातीलच महत्त्वाच्या दोन तलावांना आम्ही भेट दिली. मोरेन लेक आणि लेक लुई अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही कयाकिंग, बोटिंग आणि हायकिंगसारखे साहसी खेळ खेळू शकता. स्वच्छ आरसपानी असं तलावातील निळसर हिरवं पाणी, तलावाच्या मागे एका बाजूला घनदाट झाडी आणि त्यामागे बर्फाच्छादित डोंगर. या दृश्याची तुलना जगातील कोणत्याही मानवनिर्मित गोष्टीशी होऊ शकत नाही.
असंच अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बो वॉटर फॉल. गावापासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा वॉटर फॉल. इथे तुम्ही चालतसुद्धा जाऊ शकता. फक्त काळजी घेण्यासाठी काही गोष्टी बरोबर ठेवणं आवश्यक असतं. जसं की, खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आहेच; पण त्याचबरोबर ‘बेअर स्प्रे’ म्हणजेच अस्वलांसाठीचा फवारा कायम बरोबर असावा लागतो. कॅनडामध्ये वन्यजीवही मोठ्या प्रमाणावर आहेत. मोठी हरणं किंवा सांबर (मूस), रानटी उंदीर, मुंगूस, माऊंटन गोट आणि अस्वलांसारखे प्राणी इथे कायम तुम्हाला कधीही अगदी गावातसुद्धा दिसू शकतात, पण आम्हाला मात्र खूपच थ्रिलिंग अनुभव आला... जाताना आणि येतानासुद्धा.
एकंदरीतच संपूर्ण कॅनडा आणि निसर्गाची मुक्त उधळण असलेला बांफचा परिसर म्हणजे आयुष्यातील न चुकवता येण्यासारखं एक महत्त्वाचं स्थळ नक्कीच आहे. त्याशिवाय बांफच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अजूनही बरीच ठिकाणं आहेत. त्या आणि त्यासारख्या कॅनडातील अजून अनेक महत्त्वाच्या निसर्गरम्य स्थळांना आपण येणाऱ्या पुढच्या काही भागांत भेट देणारच आहोत.
gauribag7@gmail.com
अगम्य कैलास पर्वत
हिमालय म्हणजे देवभूमी. इथं देवांचा अधिवास अनादी काळापासून असल्याची अनेकांची श्रद्धा आहे, याच्या खुणा हिमालयात भटकंती करताना अनेकांना दिसतातही. याच हिमालयातील एक ‘महापर्वत’ म्हणजे नगाधिराज कैलास पर्वत. देवांचे देव महादेव यांचं आद्य ठिकाण, जिथं खऱ्या अर्थानं जीवन मोक्ष पावतं असा हा पर्वत. हिंदूच नव्हे तर बौद्ध अन जैन धर्मीयांचं पवित्र स्थान असलेला कैलास पर्वत हा जगभरातील अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. अगदी दुर्गम भागांत, अति उंचीवर, हिमवर्षावानं नटलेल्या प्रदेशांत कैलास पर्वत वसलेला आहे.
तिबेट, नेपाळ व भारतीय सीमांवर असलेल्या ट्रान्स हिमालयातील अनेक अतिउंच शिखरांपैकी असलेल्या माउंट कैलासची उंची ६ हजार ६३८ मीटर इतकी आहे. या शिखराची रचना चौकोनाकृती असून टेक्टॉनिक प्लेट्सच्या तीव्र हालचालींमुळं असा आकार प्राप्त झाला असावा, असा भूगोल शास्त्रज्ञांचा कयास आहे.
कैलास पर्वताचा संपूर्ण भाग हा काळ्या-पांढऱ्या ग्रॅनाइटनं बनलेला असून शतकानुशतकं हवामानाचा, हिमवृष्टीचा झालेला परिणाम यावर दिसून येतो. पर्वताच्या चारही बाजू हिमानं आच्छादलेल्या असतात. काळ्या-करड्या, रूक्ष वाटणाऱ्या ओसाड डोंगरांच्या मधून उभारलेला पांढराशुभ्र कडा हा सर्वांचंच मन मोहून टाकतो. ग्रॅनाइट किंवा क्रिस्टलचं संस्कृत नाव म्हणजे केलास, अन् या केलासचं सुधारित रूप म्हणजे कैलास. म्हणून या पर्वत शिखराला कैलास नाव पडलं, असं सांगितले जातं.
कैलास पर्वताचं धार्मिक महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदू भाविक शेकडो वर्षांपासून कैलास मान सरोवर यात्रा करतात. कैलास शिखर आपल्या उजव्या हाताला ठेवून शिखराच्या भोवती प्रदक्षिणा अर्थात परिक्रमा करून मान सरोवरमध्ये डुबकी घेऊन मनःशांती व मनःशुद्धी करण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. ५६ किलोमीटरहून अधिक अंतर चालत पार करत ही परिक्रमा पूर्ण होते, यात १८- १९ हजार फूट इतक्या उंचीवर देखील जावे लागते.
या खडतर यात्रेसाठी लोक आपले प्राण पणाला लावून कैलासाच्या चरणी धाव घेतात. हा पर्वत शिखर एका अद्भुत ऊर्जेचा स्रोत आहे व यातूनच मोक्ष प्राप्ती होते, असा अनेकांचा विश्वास आहे. हिंदूच नव्हे तर बौद्ध धर्मीय देखील कैलास पर्वताला पवित्र स्थळाचा दर्जा देतात. कैलास पर्वत म्हणजे अध्यात्म्याचा स्रोत व शांतीचं प्रतीक.
जैनांचे पहिले तीर्थंकार रिषभांथा यांनी देखील कैलास पर्वताजवळील अष्टपदा येथे मोक्ष प्राप्ती केली, म्हणूनच हिंदू व बौद्धांप्रमाणं जैन धर्मीय देखील कैलास पर्वताची परिक्रमा करण्यासाठी, अष्टपदा येथे मोक्ष प्राप्तीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असतात. अर्थात, येथील खडतर हवामान, अतिउंची, प्राणवायूचं असलेलं विरळ प्रमाण यामुळं कैलास यात्रा ही सगळ्यांनाच शक्य होते असं नाही. त्यात चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या तिबेटमध्ये कैलास पर्वत वसलेला असल्यानं तिथं जाण्यासाठी परवानगी मिळविणं हे अजूनच अवघड जातं.
कैलास पर्वत हा गूढ व अगम्य असण्याची अनेक उदाहरणे आहेत. हा पर्वत म्हणजे पृथ्वीला स्वर्गाशी जोडणारा एक प्रकारचा पूलच. त्यामुळं अद्भुत शक्तींनी या परिसराला वेढलेलं आहे, असं अनेक जण मानतात. पर्वत शिखराच्या पायथ्याशी असलेला ‘मान सरोवर’ हा कोणत्याही ऋतूत एखाद्या स्थितप्रज्ञ ऋषींप्रमाणे स्थिर असतो. या परिसरात गेल्यावर मानवाची वाढ झपाट्यानं होतं, असं मानतात. कैलास मान सरोवर यात्रेहून आलेल्या अनेकांची नखं, केस हे तुलनेनं झपाट्यानं वाढलेली असतात, असं अनेक जण सांगतात. हे सगळं येथील अद्भुत ऊर्जेमुळे होतं, असं म्हणतात.
६ हजार ६३८ मीटर उंच असणाऱ्या कैलास शिखरावर आजपर्यंत एकही गिर्यारोहण मोहीम यशस्वी झाली नाही. म्हणजे कैलास शिखराचा माथा अजूनही मानवासाठी अनवट व अनभिज्ञ आहे. या शिखराला हिंदू, बुद्ध व जैन धर्मीयांमध्ये असलेलं अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदूंसाठी कैलास पर्वत म्हणजे आदी शंकराचे स्थान, हा तोच भाग जिथून पृथ्वी ही स्वर्गाला जोडली जाते. अशा पवित्र ठिकाणी उगीचच लोकांच्या श्रद्धेला आव्हान देऊन अट्टाहासाने चढाई करणे म्हणजे गिर्यारोहण नव्हे, अशी समस्त गिर्यारोहकांची भावना आहे.
इथल्या पावित्र्याचं महत्त्व जपत, लोकांच्या भावनेचा आदर करत गिर्यारोहक देखील कैलास पर्वतासमोर नतमस्तक होतात. याविषयी एकदा जगातील चौदा अष्टहजारी शिखरांवर पहिल्यांदा चढाई करणारे (ती देखील कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय) इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास शिखर मोहिमेविषयी विचारले असता ते म्हणाले, “ज्या पर्वत शिखराशी करोडो लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, जिथं अनेकांची श्रद्धा असलेला देव वसला आहे, तिथं मी मुद्दामहून गिर्यारोहण मोहीम आखणे, हे मला सुसंगत वाटत नाही. गिर्यारोहणाचा पहिला नियम हाच आहे, की पर्वताचा आदर करणं. कैलास शिखराविषयी माझे मत सुस्पष्ट आहे. मी शिखरावर चढाईचा विचार करण्यापेक्षा नतमस्तक होण्यास अधिक प्राधान्य देईन.'
विशेष म्हणजे १९८० च्या दशकांत चीन सरकारनं रेन्होल्ड मेस्नर यांना कैलास पर्वत चढाई करण्याची परवानगी दिली होती, ती त्यांनी याच कारणांमुळे विनम्रपणे नाकारली.
कैलास पर्वत हा एक गूढ विषय आहे. येथे मिळणारी आत्मशांती, सतत बदलणारे हवामान व सोबतीला येथे जाणवणारी एक अद्भुत ऊर्जा ही कैलास पर्वताला इतरांपेक्षा वेगळं बनवते. हा नेहमीचा पर्वत नाही, असं येथे जाणारे असंख्य लोक सांगतात, मग ते ट्रेकर्स असो वा श्रद्धाळू ! इथे जाणारा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जगातील कोणत्याही प्रांताचा असो... सगळ्यांनाच कैलास पर्वत अद्भुत जाणवतो, हे मात्र नक्की!
पल्लवांचं वैभवशाली महाबलीपुरम
- केतन पुरी, ketan.author@gmail.com
तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. देशातलं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे. पल्लव, चोळ, मराठ्यांसारख्या राजसत्तांनी या राज्यात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या, महाल उभारले, ग्रंथालयं उभारली.
तमिळनाडूमधील मंडगपट्टू येथे पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिली शैवलेणी खोदली. ‘वीट, लाकूड अथवा कोणत्याही धातूविरहित’ ही वास्तू उभारण्यात आल्याचा शिलालेख महेंद्रवर्मननं कोरून ठेवला.
यानंतर तमिळनाडूत स्थापत्यामध्ये फार मोठा बदल घडला. पल्लव आणि बदामी चालुक्यांच्या सततच्या युद्धामुळं जितके अनिष्ट परिणाम या भागावर झाले, तेवढ्याच प्रमाणात कलेची देवाणघेवाण या दोन राज्यांमध्ये झाली. पल्लवांच्या स्थापत्यशैलीचे मुख्यत्वे तीन भाग पडतात आणि हे तिन्ही टप्पे तीन राजांच्या नावे ओळखले जातात. पहिल्या टप्प्यात लेण्यांची निर्मिती दिसते, ज्याचं श्रेय जातं महेंद्रवर्मनला.
दुसऱ्या टप्प्यात लेणी मंदिर, एकाश्म मंदिर (केवळ एका दगडातून साकारलेलं ) आणि काही प्रमाणात बांधीव मंदिरांचा प्रयोग आढळतो. याचं श्रेय नरसिंहवर्मनला जातं. तिसऱ्या टप्प्यात पूर्णपणे बांधीव मंदिरांची उभारणी झाली, ज्याचा निर्माता राजसिंहवर्मन आहे. हे तीन पल्लव राजे आणि त्यांच्या काळात विकसित होत गेलेल्या स्थापत्यशैलीचा प्रभाव कांची आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळतो.
कांचीपुरम पासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर एक महत्त्वाचं शहर समुद्र किनाऱ्यावर वसलंय. जिथं दीड हजार वर्षांपूर्वी पल्लव राजा नरसिंहवर्मन आपल्या प्रचंड फौजेनिशी येत असे, या भागात वावरत असे, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या दगडांमध्ये एक वेगळीच दुनिया तयार करण्याची जबाबदारी त्यानं अनेक कलाकारांना दिली आणि एका समृद्ध शहराची उभारणी केली. त्या अतिशय सुंदर शहराला नाव देण्यात आले ‘मामल्लपुरम’ ऊर्फ ‘महाबलीपुरम’.
नरसिंहवर्मन याचा उल्लेख कित्येकदा ‘मामलं’ म्हणून करण्यात आलाय. मामल्ल म्हणजे महान मल्ल. त्याच नावापासून महाबलीमपुरम रूढ झाल्याचं मत अनेक अभ्यासकांचं आहे. दुसरीकडं, दानशूर राजा बळी याच्याशीही या गावाचा इतिहास जोडला गेल्याचा उल्लेख स्थानिक लोक आवर्जून करतात. पौराणिक तसेच ऐतिहासिक कथांनी हा प्रदेश समृद्ध झालेला आहे.
महाबलीपुरम गावात अनेक लेणी, अनेक बांधीव मंदिरं आणि एकाश्म मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. ही पाच एकाश्म मंदिरं ‘पंच रथ’ नावाने लोकांच्या परिचयाची आहेत. त्यांची नावे सुद्धा लोकप्रिय पांडवाच्या नावावरूनच ठेवण्यात आली आहेत.
अर्जुन आणि कुंती रथ जवळ जवळ आहेत. सर्वांत मोठ्या रथाला ‘भीम रथ’ नावाने ओळखतात. त्याच्या बाजूला ‘धर्मराज रथ’ आहे तर समोर ‘नकुल-सहदेव रथ’ आहे. या पाच रथांसोबत एकाच दगडात कोरलेले नंदी, सिंह आणि हत्तीचं भव्य शिल्प आहे. धर्मराज रथावर बरेच शिलालेख आहेत. हे सर्व रथ आणि त्यांची निर्मिती सातव्या शतकातील. त्यासाठी हा नरसिंहवर्मन राजा कारणीभूत ठरला.
इथून काहीसं पुढं गेल्यावर आपल्याला अनेक लेणी लागतात. कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलल्याची किंवा गोकुळात आपल्या मित्रांसोबत मजामस्ती करतानाची गोष्ट एका लेणीत कोरून ठेवली आहे. त्याच्यापुढं सत्तर-ऐंशी फुटांच्या भल्यामोठ्या दगडी भिंतीवर गंगावतरण शिल्प कोरलंय.
पण यात केवळ गंगा पृथ्वीवर अवतरत आहे, एवढचं कोरलं नाही तर त्या वेळी पृथ्वीवर काय काय घडत होतं, त्या भगीरथानं कसे प्रयत्न केले, भगवान शिवाची आराधना करणारे साधू आणि पृथ्वीवरील अनेक प्राणी हे त्या भव्यदिव्य शिल्पात अगदी जिवंत वाटावेत असे कोरले आहेत.
महिषासुरमर्दिनी लेणीमध्ये तर सिंहावर आरूढ झालेली दुर्गा आणि म्हैस आणि मनुष्य यांच्या मिश्ररूपात महिषासुराचं आठ-दहा फुटांचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. गणेश मंदिर, ब्रह्मा-विष्णू-महेश यांची छोटेखानी लेणी, एका दगडावर कोरलेले माकड, सिंह, हत्ती यांसारखे प्राणी हे सगळं पाहत आपण येऊन पोचतो वराह लेणीच्या समोर. या लेणीचं छत पूर्णपणे रंगवलेलं होतं. अजूनही त्याचे अवशेष आपल्याला दिसतात.
वराहनं आपल्या हातात भूदेवीला उचलल्याचं शिल्प अतिशय प्रमाण, सुंदर आणि आकर्षक आहे. या वराह लेणीच्या मागं, एक लाइटहाउस आपल्या नजरेस पडतं. ते ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं असलं, तरीही त्याच्याखाली पल्लवकालीन लेणी आपल्याला आढळतात. हे सगळं काही एकाच ठिकाणी, थोड्याफार फरकाचं अंतर ठेवून खोदण्यात आलं आहे. पाच रथ आणि इतर सर्व लेणी पाहायला आपल्याला कमीत कमी चारपाच तास निवांत हवेत.
महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अतिशय सुंदर मंदिर पल्लावांच्या काळात उभारण्यात आलंय. भौगोलिक स्थानामुळं या मंदिराला ‘Sea Shore’ किंवा शोर मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिराच्या गर्भगृहात सोमस्कंदाची प्रतिमा आहे. शिव, पार्वती आणि कार्तिकेयच्या एकत्रित प्रतिमेला सोमस्कंद या नावानं ओळखण्यात येतं. मंदिराच्या बाहेर सिंहारूढ दुर्गा विराजमान आहे. सिंह हा पल्लावांच्या स्थापत्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे.
नरसिंहवर्मन किंवा राजसिंहवर्मन यांच्या काळातील बांधकाम ओळखायला फार भारी सोय या दोघांनीच करून ठेवली आहे. ज्या मंदिर किंवा लेण्यातील खांबांच्या पायामध्ये बसलेल्या सिंहाचं शिल्प असेल तर ते नरसिंहवर्मनच्या काळातील आणि जर दोन पायांवर उभारलेला सिंह असेल, तर ती वास्तू राजसिंहवर्मनच्या काळातील आहे हे स्पष्टपणानं ओळखता येतं आणि मुख्यतः सर्व बांधीव मंदिरांची उभारणी ही राजसिंहवर्मनच्या काळात झाली आहे.
नरसिंहवर्मन पल्लवांच्या घराण्यातील फार ताकदवान राजा होऊन गेला. त्याचे वडील, महेंद्रवर्मन उत्तम नाटककार होते. स्वतःला ‘विचित्र चित्त’ या नावाने तो संबोधत असे. नरसिंह ऊर्फ मामल्लने बदामीवर आक्रमण केलं आणि पुलकेशी दुसरा चालुक्य याला हरवलं. पुलकेशी दुसरा दख्खन भागात होऊन गेलेला बलाढ्य राजा होता. कांचीवर आक्रमण करणं, आपल्या वडिलांना हरवणं यांसारख्या गोष्टींमुळे मामल्ल दुखावला गेला होता. त्यानं बदामीवर हल्ला केला, पुलकेशीला हरवलं आणि स्वतःला ‘वातापीकोंड’ अशी पदवी धारण केली.
कांचीपुरम, चेन्नई आणि पुदुचेरी या तिन्ही प्रसिद्ध स्थळांपासून महाबलीपुरम दीड-एक तासांच्या अंतरावर आहे. चौदाशे वर्ष जुन्या या गावामध्ये पल्लवांच्या वैभवशाली साम्राज्याच्या पाऊलखुणा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. त्या पाहायला आणि तो इतिहास जगायला एकदातरी जायला हवं.
समुद्र सफरीचा आविष्कार!
- विशाखा बाग
नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. मोठ्या क्रूजवरून समुद्र सफरीचा आनंद अवर्णनीय होता. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मधली माझी क्रूज टूर साकार झाल्याने मी प्रचंड खूश होते. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
समुद्रातून मोठ्या क्रूजवरून फिरण्याचं सुख काही औरच असते. रॉयल कॅरेबियनच्या क्रूजवरून समुद्रात फिरताना मिळणारा आनंद अवर्णनीय होता. आजूबाजूला पसरलेला अथांग निळाशार समुद्र, दूरवर दिसणारे डोंगर आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा ही सगळी मजा अनुभवातूनच येते. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये असलेली माझी ही टूर प्रत्यक्षात साकार झालेली बघून मला प्रचंड आनंद होत होता... तेही एवढ्या मोठ्या क्रूजवर सात दिवस घालवता येणं म्हणजे मी स्वतःला खरं तर नशीबवान समजत होते.
रॉयल कॅरेबियन क्रूजला एकंदरीत १६ डेक. तिसऱ्या ते पंधराव्या डेकपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्टेट रूम्स म्हणजेच राहण्याच्या खोल्या असतात. त्याशिवाय या सर्व डेकवर सर्व वयोगटातील पर्यटकांच्या करमणुकीसाठी नानाविध गोष्टीही उपलब्ध होत्या. त्यामध्ये तिसऱ्या डेकवर कॅसिनो आणि म्युझिक हॉल, चौथ्या आणि पाचव्या डेकवर दीड हजार जण बसू शकतील,
असे रॉयल थिएटर, पब्ज, रेस्टॉरंट आणि दुकानं, सहाव्या डेकवर लायब्ररी अन् चौदाव्यापासून सोळाव्या डेकपर्यंत पर्यटकांसाठी मौजमजेची रेलचेल. दोन मोठे स्विमिंग पूल, जाकुझी, मोठ्या टीव्ही स्क्रीन, ओपन स्काय बार आणि रेस्टॉरंट, डिस्को थिएटर, जॉगिंग ट्रॅक, स्पा, जिम आणि मुलांसाठी फुटबॉल ग्राऊंड, व्हिडीओ गेम एरिया, रॉक क्लाइंबिंग वॉल अशी एक नाही तर अनेक ठिकाणं मन रमवायला तिथे होती.
इंग्लंडहून निघाल्यानंतर नॉर्वेपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पूर्ण दोन दिवस आपण फक्त नॉर्थ सी किंवा युरोपियन वॉटरमधून सेलिंग करत असतो आणि त्यामुळेच या सर्व सोयी-सुविधा पर्यटकांसाठी आवश्यक असतात. त्याशिवाय प्रत्येक ओपन डेकवर बसण्यासाठी म्हणून आरामदायी सोफे, खुर्च्या असतात. मला तरी तिथेच बसून निळ्याशार समुद्राकडे बघत पुस्तक वाचायला प्रचंड आवडत होतं आणि ती जागा मी पुस्तक वाचण्यासाठी म्हणून खरोखरच एन्जॉय केली. अथांग समुद्राकडे अनेक तास बघत बसलं तरीसुद्धा मन तृप्त होत नाही, हे मात्र खरं.
सकाळी उठून सोळाव्या डेकवरच्या जॉगिंग ट्रॅकवर समुद्र बघत एक तास फिरायचं आणि त्यानंतर चौदाव्या डेकवर पुन्हा समुद्राकडे बघतच मस्त कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट करायचा, असा जवळपास आमचा सहा दिवसांचा कार्यक्रम ठरला होताच. अथांग पसरलेलं, स्वच्छ नितळ निळं पाणी, त्यावर पडलेली नॉर्वेजियन फिऑडस् म्हणजेच डोंगरांची प्रतिबिंब, डोंगरांच्या मधूनच पाण्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची तिरीप हे दृश्य खरोखरच अविस्मरणीय होतं. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
बघता बघता आम्ही नॉर्वेपर्यंत येऊनसुद्धा पोहोचलो. आमचं पहिलं ठिकाण होतं नॉर्वेमधलं क्रिस्तियन सेंड हे समुद्राकाठी असलेलं निसर्गरम्य आणि सुबत्तापूर्ण गाव. रिसॉर्ट टाऊन म्हणूनही ते पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. गावाची अर्थव्यवस्था इथे असणाऱ्या मुख्यतः बियरच्या आणि आईस्क्रीमच्या फॅक्टरीवर अवलंबून आहे.
पर्यटनस्थळ असलेल्या या गावात ओपन एअर म्युझियम आहे जिथे साधारण पंधराव्या शतकापासून लोकवस्ती आणि त्यांची घरं कशी होती, हे दाखवलं आहे. मिनिएचर स्वरूपातील क्रिसियन सेंड हे गावसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतं. आखीवरेखीव पद्धतीने वसवलेलं हे गाव पेस्टल कलरमधल्या लाकडी घरांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचं नॉर्वेमधलं आमचं ठिकाण होतं ओलेसुंड नावाचं पोर्ट टाऊन.
हे गाव एक व्यापारी बंदर आहे; परंतु त्याचबरोबर इथे व्यापारी आणि मोठी मोठी प्रवासी जहाजसुद्धा येत असतात. अतिशय उत्तम आणि प्रचंड मोठा अन् सोयी-सुविधांनी सुसज्ज असा धक्का किंवा पोर्ट इथे जहाजांसाठी बांधलेलं आहे. मासेमारीसाठीसुद्धा प्रसिद्ध असलेल्या गावाची लोकसंख्या फक्त ६६ हजार आहे.
नॉर्वेचं अफलातून निसर्गसौंदर्य न्याहाळत आम्ही येऊन पोहोचलो फ्लाम या गावाला. आमचं क्रूज धक्क्याला लागल्या लागल्या हे गाव पाहून तर मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले. चारही बाजूंनी डोंगराच्या कुशीत असलेलं, इतक्या सुबक आणि शिस्तबद्ध रीतीने वसवलेलं हे टुमदार गाव एका स्वप्नातलंच वाटत होतं.
समुद्राच्या काठावर असलेल्या या गावात मोठी नदी आहे, नदीच्या आजूबाजूला मोठे रस्ते, बागा, झोपडीवजा असलेली मोठी लाकडी घरं, गावाच्याच मागे दिसणारे डोंगर आणि त्यामधून वाहणारे धबधबे, एका बाजूला लांब वर दिसणारी हिरवीगार कुरणं हे चित्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. छोट्याशा असणाऱ्या या गावाची लोकसंख्या फक्त पाचशे आहे; पण दरवर्षी साडेचार लाख पर्यटक या गावात येत असतात.
हे गाव तर बघण्यासारखं आहेच; पण तुम्ही इथे वीस किलोमीटर लांब चालणाऱ्या फ्लाम सीनिक रेल्वेमध्ये बसून एक चक्करसुद्धा मारू शकता. दिवसभर अशा अनेक ठिकाणी फिरून आल्यानंतर संध्याकाळी क्रूजवर आपल्यासाठी वेगवेगळे म्युझिकल शो, ऑर्केस्ट्रा आणि मॅजिक शो यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी तयारच असते. हे सगळे कार्यक्रम आपल्या तिकिटामध्येच समाविष्ट असतात; परंतु त्यासाठी आपल्याला वेळेवर तिथे पोहोचावं लागतं.
स्विमिंग पूल, जाकुझी यांसारख्या गोष्टींची मजा तर आम्ही घेतलीच; पण इथे एक अफलातून गोष्ट आम्ही केली आणि ती म्हणजे क्लोज स्काय डायव्हिंग. स्काय डायव्हिंग सिम्युलेटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सूट घालून आपण आतमध्ये जातो आणि वाऱ्याच्या प्रचंड झोतावर आकाशात तरंगल्याचा अनुभव घेतो. ॲडव्हेंचर स्पोर्टस् असणारी ही गोष्ट सगळेच जण करू शकतात, असं नाही.
क्रूजवरचे आमचे सात दिवस कसे भर्रकन निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. नॉर्वेचं अनोखं निसर्गसौंदर्य पाहत आणि क्रूजची लक्झरी, उत्तम जेवण आणि करमणूक हे सगळं अनुभवत असतानाच पुन्हा एकदा इंग्लंडला येऊन पोहोचलो.
तुमच्याकडेसुद्धा युके आणि युरोप असे दोन्ही व्हिसा असतील, तर ही ट्रीप करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. नॉर्वेचं निसर्गसौंदर्य अनुभवायला समुद्रावरची ही सफर करायलाच हवी.
gauribag7@gmail.com
मोटारींचं गाव
- वैभव वाळुंज
इंग्लंडमधील लहानशा गेडन गावाची एक अनोखी ओळख आहे. या गावाने गाड्यांचा इतिहास जीवापाड जपला आहे. या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’, ‘जॅग्वार’ अन् ‘लॅण्डरोवर’ गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी येथील संग्रहात लावून जातात.
गेडन हे इंग्लंडच्या वॉरिकशायर काऊंटीमधलं लहानसं गाव आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि आसपास असणाऱ्या सैन्याच्या छावणीसाठी प्रसिद्ध आहे. मिडलँड या इंग्लंडच्या मध्यवर्ती भागातील काही गावांजवळ ब्रिटनमधील यादवी युद्धाची सांगता झाली होती, त्याच्याही काही पुरातन आठवणी येथे फुटकळ प्रमाणात टिकून आहेत; पण तरीही जागतिक अर्थव्यवस्थेच्या नकाशावर या गावाचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं, त्याचं कारण म्हणजे या गावाला असणारा आणि त्यांनी जीवापाड जपलेला गाड्यांचा इतिहास.
ब्रिटनची ‘फॉर्म्युला वन’ गाड्यांची शर्यत होते ते ठिकाण म्हणजे सिल्वरस्टोन इथला जगप्रसिद्ध ट्रॅक. गेडन गावी होणाऱ्या गाड्यांच्या वार्षिक महोत्सवाला मी हजेरी लावली. सिल्वरस्टोन फेस्टिवल हा तीन दिवस चालणारा महोत्सव आपल्या आगळ्यावेगळ्या नियमांनी बांधलेल्या शर्यतींसाठी ओळखला जातो.
सहसा एकत्र पाहायला न मिळणाऱ्या गाड्या आपल्या बांधणी आणि जुळणीतील फरकांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी झुंजत असतात. एकामागोमाग एक वेगवेगळ्या गटांतील शर्यतींची रेलचेल या महोत्सवात दिसून येते. जगभरातील विविध देशांमधून आलेल्या नव्या गाड्या तसेच विविध शर्यतींमध्ये गाजलेल्या जुन्यापुराण्या कारदेखील या वर्षी शर्यतीत भाग घेत होत्या.
यंदा जमलेल्या लोकांमध्ये शेजारच्या गावात संग्रहालय पाहायला जाण्याचा बेत ठरला. मी गेडन गावाजवळ असणाऱ्या ब्रिटिश मोटर म्युझियम या संग्रहालयाला भेट दिली. इथे असलेला संग्रह हा जगभरातील ऐतिहासिक गाड्यांचा सर्वात मोठा साठा म्हणून शर्यतप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे.
समोर आधीच इतक्या शर्यती सुरू असताना मला पुन्हा लावलेल्या गाड्या पाहण्यात रस नव्हता. मात्र, गेडन गावाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तींनी इथे भारतातील महाराजांच्या काही गाड्या असल्याची व त्यासोबतच सैन्याने वापरलेले रणगाडे भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठेवण्यात आले असल्याची गोष्टही सांगितली.
भारतातील कोण्या राजाने आपल्या संस्थानात रस्ता झाकण्यासाठी ठेवलेल्या गाड्या आणि त्याचबरोबर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या बंगाल प्रांतात निर्यात केलेल्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा तेथे आलेल्या कार दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली. हे ऐकल्यानंतर मात्र मी उत्साहाने या ठिकाणाला भेट देण्यासाठी सज्ज झालो.
अगदी लहानसं आणि इंग्लंडच्या ग्रामीण भागातील एका कोपऱ्यातलं गाव असतानाही या ठिकाणी जगप्रसिद्ध ‘ॲस्टन मार्टिन’ व ‘जॅग्वार’ आणि ‘लॅण्डरोवर’ या गाड्यांची निर्मिती करण्याचे कारखाने आहेत. सुरुवातीला शर्यतीसाठी प्रसिद्ध झालेल्या या गाड्यांनी नंतरच्या काळात प्रवासासाठीची साधने तसेच सैन्य आणि इतर विशेष वाहतुकीसाठी व शेतीसाठी गरजेची वाहनं या सर्वांचं उत्पादन करायलाही सुरुवात केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जेव्हा तंत्रवैज्ञानिक प्रगती गतिमान झाली त्याच काळात गाड्यांचा वेग वाढता वाढू लागला आणि अनायसे इंग्लंडच्या याच भागामध्ये सिल्वरस्टोन हे शर्यतीचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. साहजिकच गाड्यांची आवड असणारे लोक या ठिकाणाला भेट देऊ लागले आणि त्यातूनच जुन्या व नावाजलेल्या प्रसिद्ध गाड्या जतन करण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून इथल्या निसर्गरम्य वातावरणात गाड्यांचे गुरगुरणारे आवाज नेहमीचे बनून राहिले.
अर्थात या ठिकाणाला संग्रहालय असं नाव असलं तरी जुन्या, थोडक्यात पडलेल्या गाड्या येथे असतील असे समजू नका. इथे असणाऱ्या जवळपास सर्वच्या सर्व जुन्या गाड्या या चालत्या स्थितीत आहेत आणि वेळोवेळी त्यांना शर्यतीत भाग घेण्यासाठी बाहेर काढलं जातं. अगदी दीडशे वर्षांपूर्वीच्या गाड्याही आपल्या मूळ स्वरूपात जतन करून त्यांची दुरुस्ती करून वापरायला काढल्या जातात.
अशा अतिमहागड्या गाड्यांचा शौक असणाऱ्या लोकांना त्या दाखवण्याचीही हौस असते. त्यामुळे जुन्या विंटेज गाड्यांचे मालक अनेकदा आपल्या गाड्या लोकांनी पाहाव्यात, यासाठी या संग्रहात लावून जातात व वेगवेगळ्या मोटर्स आणि रॅलीसाठी गरज पडेल तेव्हा त्या परत नेतात. म्हणूनच वर्षात केव्हाही गेलं तरी या संग्रहालयात काही गोष्टी नव्याने अनुभवास येतात.
इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गाड्या कशा बदलत गेल्या, तंत्र आणि विज्ञान यांच्यातील प्रगतीनुसार गाड्यांसोबतच त्यांच्याविषयीचे कायदे आणि त्यांचा वापर करणारी माणसे यांच्यात कोणते बदल झाले, वेगवेगळ्या व्यवसायांत असणाऱ्या लोकांनी गाड्यांना आपापल्या आवडीनुसार कसं स्वरूप दिलं, तसेच गरज आणि चंगळवाद या दोघांच्या मिश्रणातून एक वेगळीच जागतिक संस्कृती आणि छंद कसे तयार झाले, याचा अनुभव येतो.
भारत व पाकिस्तान वगळता जगाच्या इतर भागांमध्ये रेडिओ प्रसारणासाठी उदार कायदे असल्यामुळे इंग्लंडच्या या भागात छंदिष्ट माणसांनी गाड्यांसाठी माहिती सांगणारी विशेष रेडिओ केंद्रे बनवली आहेत. त्यावरून सातत्याने गावात नव्याने येणाऱ्या गाड्यांची माहिती प्रसारित केली जाते, तसेच आसपास घडणाऱ्या शर्यतींचं समालोचनही केलं जातं.
आता वाहन व्यवसाय हा फार क्लिष्ट आणि एकाच कारागिराची मक्तेदारी न राहता जगभरातील हजारो-लाखो ‘फोर्डोत्तर’ कामगारांमध्ये विभागला गेला आहे. असं असतानाही विज्ञानाच्या प्रगतीला हातभार लावण्याचं काम, सुदूर प्रयत्नांतून का होईना, गाड्यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
vaiwalunj@gmail.com
भागीरथी : समूह चार शिखरांचा
उत्तराखंड राज्यातील गढवाल हिमालय म्हणजे नंदनवनच. इथं वसलेली शिखरं नितांत सुंदर आहेत. विस्तीर्ण पसरलेली, हिमाची दुलई पांघरलेली, कोवळ्या सोनकिरणांना कवेत घेणारी ही शिखरं भारताच्या वैभवशाली इतिहासाची, जडणघडणीची साक्ष देतात. त्यांचं भौगोलिक महत्त्व हे देखील वादातीत आहे. या शिखरांमधील एक आघाडीचं नाव म्हणजे भागीरथी.
स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणणारा राजा म्हणजे भगीरथ, सूर्यवंशी घराण्यातील या राजाच्या नावावरून जो पर्वत समूह ओळखला जातो तो भागीरथी. हा मुळात चार शिखरांचा समूह आहे. भागीरथी -एक (६८५६ मीटर), भागीरथी - दोन (६५१२ मीटर), भागीरथी-तीन (६४५४ मीटर) व भागीरथी -चार (६१९३ मीटर) अशी या शिखरांची नावं. ही सर्व शिखरं चारही बाजूनं विविध ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्यांनी वेढलेली आहेत.
पूर्वेला वासुकी, पश्चिमेला गंगोत्री, दक्षिणेला स्वच्छंद तर उत्तरेला चतुरंगी अशी चार ग्लेशियर्स आहेत. यातील गंगोत्री ग्लेशियर हे सर्वांत मोठं. या ग्लेशियर मधूनच पुढं गोमुख तयार होतं व तेथून सुरू होते भागीरथी नदी, जी पुढं जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास करून देवप्रयागला अलकनंदा नदीशी एकरूप होते अन् गंगामातेचे रूप धारण करते.
सियाचीननंतर आशिया खंडातील सर्वांत मोठं ग्लेशियर अशी ओळख असलेलं गंगोत्री ग्लेशियर हे भागीरथी व अर्थात गंगा नदीचं मुख्य स्रोत आहे. हे संपूर्ण ग्लेशियर भागीरथी पर्वत समूहाचं विस्तारित रूप वाटावं एवढं एकरूप झालेलं आहे, म्हणूनच कदाचित या ग्लेयशीरमधून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी हे नाव दिलं गेलं असावं. भागीरथी शिखर समूह व गंगोत्री ग्लेशियर परस्परपूरक आहेत असं माझं मत आहे.
सहा हजार मीटरहून उंच असलेली चार शिखरं आजूबाजूला उभी असल्यानं गंगोत्री ग्लेशियर विस्तीर्ण असं रूप धारण करू शकलं, जे पुढे २५ कोटींहून अधिक लोकांची जीवनदायिनी असलेल्या गंगा नदीचं मुख्य स्रोत बनलं. मी गेल्या पाच दशकांत अनेक वेळा गंगोत्री येथे गेलो आहे. ग्लेशियरचं बदलणारं रूप मी अनुभवतो आहे. काही दशकांपूर्वी डोळ्यात न सामावणारे गंगोत्री हळूहळू विरळ होताना दिसतं आहे, त्यामुळे भागीरथी शिखर समूह तुलनेने जवळ आल्याचा भासतो.
भागीरथी पर्वत समूह व आजूबाजूचा परिसर हा अत्यंत पवित्र मानला जातो. तपोवन परिसर हा अनादी काळापासून ऋषीमुनींच्या तपश्चर्येचं आद्य ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आजही मी जेव्हा तपोवनला जातो, तेव्हा विविध साधू, ऋषी अत्यंत विपरीत हवामानामध्येही दृढ निश्चयानं आपला ध्यास पूर्णत्वास नेताना दिसतात.
या परिसरात गेल्यावर वाटणारी प्रसन्नता ही कदाचित तिथं असणाऱ्या हवेत वर्षानुवर्षे रुळलेली आहे, असं मला नेहमी वाटतं. मी जेव्हा मोहिमेसाठी या परिसरात जातो, तेव्हा येथे असणारी प्रसन्नता व सकारात्मकता मला पूर्ण मोहिमेसाठी शिदोरी म्हणून कामी येते, असा माझा अनुभव आहे.
गिर्यारोहणाच्या दृष्टीनं देखील भागीरथी शिखर समूह हा नावाजलेला आहे. भागीरथी - एक पासून भागीरथी- चारपर्यंत चारही शिखरांवर चढाई करणं तसं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. यात पहिल्या शिखरावर चढाई करताना गिर्यारोहकांचा जास्त कस लागतो. १९८० मध्ये जपानच्या क्योटो विद्यापीठाच्या संघानं दक्षिण-पूर्व धारेनं शिखरावर पहिल्यांदा यशस्वी चढाई केली. यांत तब्बल दोन हजार मीटर चढाई ही तंत्रशुद्ध कौशल्य पणाला लावणारी बाब होती.
आजही भागीरथी-एक या शिखरावर चढाई करण्यासाठी अगदी मोजक्याच गिर्यारोहकांचे पाय वळतात, कारण येथील काठिण्य पातळी. त्या मानानं भागीरथी-दोन हे शिखर गिर्यारोहकांना लवकर आपलंस करतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, ६५१२ मीटर उंच असलेल्या या शिखरावर गिर्यारोहकांचा राबता तुलनेनं जास्त आहे. गिरिप्रेमीच्या विविध संघानी आतापर्यंत तीन वेळा भागीरथी-दोन या शिखरावर यशस्वी चढाई केली आहे.
या शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली ती तब्बल नऊ दशकांपूर्वी. १९३३ मध्ये, जेव्हा गिर्यारोहण हे फारसं रुळलं देखील नव्हतं तेव्हा ऑस्ट्रियन गिर्यारोहक द्वयी असलेल्या एडी एलमॉथलर व टोनी मेसनर यांनी विजयी झेंडा भागीरथी-दोन शिखरावर फडकविला होता. त्याच वर्षी ब्रिटिश जोडगोळी कोलिन किर्कस व चार्ल्स वॉरेन यांनी ६४५४ मीटर उंच असलेल्या भागीरथी-तीन शिखरावर चढाई यशस्वी केली.
त्यामानाने भागीरथी-चार हे शिखर तसं दुर्लक्षित राहिलं. उंचीनं कमी असलं तरी सतत बदलणारं हवामान, तीव्र चढाई मार्ग यांमुळं पहिला यशस्वी समिट अटेम्प्ट आला तो तब्बल २००९ मध्ये, जेव्हा स्लोव्हेनियन गिर्यारोहक रॉक ब्लॅगस, लूज लिंदीच व मार्को प्रॅझॉज यांनी शिखर चढाई यशस्वी केली. याआधी भागीरथी-चार हे शिखर चढण्यासाठी सिल्व्हो कारो व मॅटजॅझ जामनिक यांनी तब्बल ११ अयशस्वी प्रयत्न केले. मात्र त्यांना शिखरमाथ्यानं नेहमी हुलकावणी दिली.
भागीरथी शिखर समूह हा अत्यंत सुंदर अशा शिखरांनी वेढलेला आहे. एका बाजूला वासुकीसारखा बलाढ्य पर्वत तर दुसऱ्या बाजूला शिवलिंगसारखं मनमोहक शिखर. आम्ही जेव्हा गढवाल हिमालयातील शिखर मोहिमांवर जातो, तेव्हा भागीरथीच्या चार शिखरांचं दर्शन ठरलेलं. शिवलिंग शिखर चढाई करताना कॅम्प एकच्या वर गेल्यावर पूर्वेला दिसणारी व सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हालेली चार टोकं, अर्थात भागीरथी शिखरं ही आम्हाला वेगळीच ऊर्जा देतात.
गिर्यारोहणच नव्हे तर गढवाल हिमालयात तपोवन असो, भोजबासा ट्रेक करताना भागीरथी शिखर मन मोहून टाकतात. या परिसरात येणारे गिर्यारोहक असो वा भाविक यात्रेकरू, भागीरथी पर्वत समूह बघून हरखून जातात, त्याच्या समोर नतमस्तक होतात.
निसर्गाचं सुंदर रूप अनुभवण्यासाठी, आपल्या देवदेवतांच्या इतिहासातील घटनांची साक्ष अनुभवण्यासाठी, जीवनदायिनी गंगामातेच्या उगमासाठी कारणीभूत असलेल्या भागीरथी शिखरांना एकदा तरी ‘याची देही याची डोळा’ बघायला हवं.
अजिंठ्याचं सुवर्णयुग
references to fact creation of caves sculptures and paintings at Ajanta during Vakataka Satavahana HarishenaSakal
अजिंठा इथल्या गुहा, त्यांतली शिल्पं आणि चित्रं यांची निर्मिती वाकाटक, सातवाहन, हरिशेन यांसारख्या अनेक राजवटींमध्ये सुरू झाली अशा स्वरूपाचे संदर्भ आढळून येतात.
‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या अभ्यासानुसार, साधारणतः आठशे वर्षं लेण्यांच्या निर्मितीचं काम या वेगवेगळ्या कालखंडांत झालं. लेण्यांची निर्मिती केल्यानंतर शिल्पनिर्मिती व सर्वात शेवटी चित्रांची निर्मिती करण्यात आली.
लेणी क्रमांक १० ची निर्मिती सर्वात प्रथम झाली असा अंदाज आहे. मात्र, याबाबत कुठंही नेमक्या लिखित नोंदी उपलब्ध नाहीत. सर्वसाधारणपणे राजा आणि राजघराण्याच्या कालखंडानुसार लेण्यांच्या निर्मितीचा काळ सांगितला जातो.
त्या काळातल्या संदर्भांनुसार अजिंठा हे ‘सिल्क रूट’वरचं महत्त्वाचं ठिकाण असल्याचे उल्लेख सापडतात. या ‘सिल्क रूट’वरून अफगाणिस्तानापर्यंत जाण्याचे मार्ग होते. या मार्गानं त्या काळात व्यापार चालत असे व वस्तूंची देवाणघेवाण होत असे.
अजिंठा लेण्यांची जागा ही अतिशय सुंदर निसर्ग असलेली आहे. या लेण्यांच्या शेजारून वाघोरा नावाची नदी वाहते, त्यामुळं पर्यटनासाठी ही जागा अतिशय महत्त्वाची होती. या ठिकाणचा जो डोंगर आहे तो बेसॉल्ट या दगडाचा आहे. या दगडाच्या टॉपोग्राफीचा अभ्यास करून दोन हजार वर्षांपूर्वी छिन्नी व हातोडी यांच्या साह्यानं लेण्यांची निर्मिती झाली.
त्या काळात दगड फोडणारे उत्तम कारागीर, वास्तुरचनाकार, चित्रकार, शिल्पकार आदींनी एकत्रितरीत्या हे काम केलेलं आहे. या सर्व कलाकारांनी प्रत्यक्षात त्या त्या काळात उपस्थित असलेल्या गोष्टीच चित्रित केलेल्या आहेत. अजिंठा ‘जातककथे’त कोणत्याही प्रकारची वेगळी फँटसी किंवा चित्रकाराच्या कल्पनेतलं चित्रण आपल्याला बघायला मिळत नाही. जे चित्रित केलं गेलं आहे ते त्या काळात अस्तित्वात होतं.
जागतिक दर्जाचं, हजारो वर्षं टिकणारं काम आपण करत आहोत याची त्या प्रत्येकाला जाणीव होती, असं म्हणता येईल. जे दिसतं, जसं दिसतं तसंच चित्रात रंगवणं यांत त्यांची खासियत होती. त्यामुळं या सर्व चित्रकलेत वास्तुकला, वेशभूषा, अलंकरण यांसारखे अनेक विषय सूक्ष्मतेनं रेखाटलेले आढळतात.
अजिंठा इथं ३० गुंफा असून क्रमांक १, २, ९, १०, १६, १७ या चित्रे असलेल्या प्रमुख लेण्या असून, बाकी काही लेण्यांमध्ये भिंतीवर किंवा छतावर चित्रे काढलेली, रेखाटनं केलेली आढळतात.
प्राचीन भारतीय संस्कृतीमधले चित्रकलेचे संदर्भ शोधताना अजिंठ्याचं सुवर्णयुग मोठ्या दिमाखात समोर येतं. प्रचंड अंधाऱ्या गुहेनं जपून ठेवलेली ही चित्रं अभ्यासण्यासाठी लेणी क्रमांक १ मधल्या ‘महाजनक/जातक’ या मोठ्या आकाराच्या चित्राची चर्चा या सदरातून करू.
‘राजा जनक राजेशाही जीवनाचा त्याग करण्याची कल्पना मांडतो,’ हा विषय चित्रकारांनी चितारताना ते या घटनेचे जणू काही प्रत्यक्ष साक्षीदारच असावेत असं आरेखनाच्या बारकाव्यांवरून वाटत राहतं.
निसर्गसहवासात वनात राहिलेला राजा अनेक दिवसांनंतर दरबारात येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी संगीत-नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे...प्रत्येक कलाकार आपापलं कौशल्य सादर करत आहेत...दोन तरुणी बासरीसह असून,
दोन तरुणी टाळ वाजवून नाद निर्माण करत आहेत...दोन तरुणी चर्मवाद्य वाजवत असून, एका तरुणीच्या हाती तंतुवाद्य आहे. एक सुंदर नर्तिका आपलं नृत्यकौशल्य दाखवत आहे. हा संगीताचा अभूतपूर्व सोहळा राजा बसलेल्या दरबारासमोरच्या जागेत एका भव्य छताखाली साजरा होत आहे.
त्याचं छत पिवळसर रंगाचं असून त्यावर अनेक त्रिमितीय चौकोनी कोनाडे आहेत. बाहेरच्या दृश्यभागावर काळसर रंगानं, उलट्या पताका असाव्यात, तशी नक्षी चितारलेली आहे. या चित्रात त्या काळातली वास्तुरचना आपल्याला अनुभवता येते. वास्तुरचनेतलं छत चारही कोपऱ्यांवर असलेल्या स्तंभावर पेललेलं आहे.
चित्रातल्या वास्तुरचनेनुसार छताच्या खाली व स्तंभाच्या आत संगीतकार्यक्रम सुरू आहे; असं असायला पाहिजे होतं; परंतु प्रत्यक्षात मात्र उभ्या स्तंभामुळं दृश्य झाकलं जातं. ते रेखाटण्यासाठी व्यत्यय येतो, तसंच दृश्याचं सौंदर्य कमी व्हायला नको; म्हणून तो स्तंभासमोरच्या बाजूस चितारला नाही.
हे चित्रकारानं घेतलेलं मोठं कल्पक स्वातंत्र्य आहे; पण ही संकल्पना चित्रातलं सौंदर्य वाढवणारी असून विषयासाठी सूचक असावी किंवा अगोदर संगीतसमारोहाचं चित्रण झालं असावं आणि नंतर वास्तूची, छताची रचना चित्रित केलेली असावी. परिणामी, स्तंभ चितारण्यास जागा उरली नसावी, असाही अंदाज करता येतो.
चित्रकारानं वाद्यवृंद वर्तुळाकार आकृतिबंधात चितारला आहे. संपूर्ण चित्रात सर्व वादकांना (Conductor) मार्गदर्शन करणारा कुणीही संगीतदिग्दर्शक नाही. सर्व संगीतवादक गोलाकार बसून एकमेकांच्या साथीनं ताला-सुरात वाद्य वाजवत आहेत व त्या गोलाकार रचनेच्या आत नर्तिका नितांतसुंदर नृत्य-अदा पेश करत आहे.
सगळेच वादक उभे राहून वाजवत असते तर नर्तिकेवर ओव्हरलॅप होऊन रसभंग झाला असता. नर्तिका वादकांच्या मागं झाकली गेली असती म्हणून तिच्यासमोरचे वादक जमिनीवर बसलेले आहेत व बाकीचे उजवीकडं-डावीकडं उभे राहून वादन करत आहेत.
सूरवाद्यं-नादवाद्यं-तालवाद्यं यांचा सुंदर मेळ या चित्रात दिसत आहे. हे सगळं जिवंत सादरीकरण आहे, म्हणून दोन्ही बासरीवादकांनी डाव्या कमरेत एकाच वेळी वाकून चर्मवाद्याचा ठेका घेतला, असं प्रत्यक्ष दिसतं, तर मान थोडी डावीकडं तिरकी करून बासरीची बाजू जमिनीला समांतर न जाता वरच्या बाजूस अधिक उचलून बासरीतून दीर्घ व वरच्या टिपेचा सूर लावला गेला आहे. म्हणजे, आवाजाची पातळी अधिक आहे, असं दिसतं.
त्यासाठी अधिक श्वास घेऊन तो नियंत्रित करण्यावर त्यांचं कौशल्य जाणवतं. नजरेच्या रोखावरून ते आपल्या सुरावर एकाग्र होत आहेत, असं दिसून येतं. चर्मवाद्यांचा आवाज अधिक असल्यामुळं टाळ वाजवणाऱ्या वादकांनी टाळ कमरेजवळ न धरता काहीसा वर,
कानांजवळ धरला आहे. इतर वाद्यांच्या आवाजात त्याचा आवाज यावा किंवा त्याची आवर्तनसंख्या (वाजवण्याची गती) जास्त असावी. आपल्या संगीतात तल्लीन असलेला असा हा वाद्यवृंद. प्रत्येक जण आपापल्या कामात आहे. आपल्या कामातून आनंद घेत आहे आणि देतही आहे...
रंगसंगती वाद्य-त्यांचं वेगळेपण, त्यांचा आकार, आधुनिकता, वाद्य वाजवण्याच्या पद्धती अशा कितीतरी बाबी त्या काळच्या समाजजीवनात राजाश्रयाला होत्या, याचा हा समृद्ध पुरावा आहे.
भारतीय वाद्यप्रकारांत बासरी व टाळ समाविष्ट आहेत; परंतु इथं चर्मवाद्य हे ढोलक नसून Bongo- ड्रम या प्रकारचं वाद्य - जे आज आपल्याला आफ्रिकी जमातीत दिसून येतं - तसं वाद्य इथं आहे. हे वाद्य ढोलकासारखं जमिनीवर आडवं ठेवून न वाजवलं जाता उभ्या अवस्थेत वापरलं जातं.
हे वाद्य आकाराच्या व आवाजाच्या पातळीनुसार धीरगंभीर अथवा कर्कश आवाजाच्या पातळीत मिळतं. चित्रात हे वाद्य वाजवणारी व्यक्ती राहणीमान, शारीरिक देहयष्टी, तसंच गडद रंगकांती व वेशभूषेवरून आफ्रिकी वंशातली आहे असं प्रत्यक्षात दिसतं.
प्रश्न पुढंच आहे : अजिंठ्यातले चित्रकार आफ्रिकेत जाऊन हा संगीतप्रकार बघून आले होते की आफ्रिकेतल्या वाद्यवृंदानं अजिंठ्यात संगीतसमारोह केला? याच स्वागत-संगीतकार्यक्रमात राजा जनक याचं मन रमत नव्हतं; हे दरबारात कुजबुज झाल्यामुळं राणीच्या लक्षात आलं; म्हणून राणी शिवली हिनं राजाला प्रश्न विचारला. इथून पुढं जातककथा सुरू होते...
(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)
अजिंठ्याचं सुवर्णयुग (भाग २)
‘महाजनक जातक’ या चित्राच्या आरेखनाची वैशिष्ट्यं गेल्या वेळच्या भागात आपण पाहिली. याच चित्रातल्या रंगसंगतीविषयी आता जाणून घेऊ.
‘महाजनक जातक’ या चित्रातल्या रंगसंगतीचे काही नमुने उपलब्ध झाले आहेत. त्या चित्रनिर्मितीतल्या रंगच्छटा (ग्रेडेशन) संख्येनं फार नसून कमी छटांमध्ये काम केलं गेलं आहे. बराच भाग हा तेजस्वी उजळ रंगात रंगवला गेला होता.
त्यातला काहीच भाग शिल्लक आहे, तर काळाच्या ओघात काही भाग पुसट झाला आहे. विषयानुसार उजळ-गडद रंग वापरून चित्रात लेव्हल्स निर्माण केल्या गेल्या आहेत. राजवाड्याचं छत, गावाच्या वेशीवरची नक्षी यांत उजळ रंगामुळं वेगळेपण जाणवतं, तर राजा मुनींच्या आश्रमात आला आहे हे दाखवताना मुनींचं वस्त्र उजळ दाखवून चित्रकारानं लक्ष वेधलं आहे. यातून मुनींच्या व्यक्तिरेखेची आकर्षकता आणि पावित्र्य दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं वाटतं.
घनतेच्या जागी गडद रंगाचा वापर करण्यात आला आहे. ठळकपणे विषय दर्शवताना चित्रात छटेतला विरोधाभास प्रभावीपणे मांडला गेला आहे. बुद्धिबळातल्या पटाप्रमाणे नक्षी हे त्यातलं उदाहरण आहे.
इथं उजळ-गडद तपकिरी, पिवळा, हिरवा व निळा या रंगांच्या छटा प्रकर्षानं जाणवतात. या चित्रातला हा भाग काळाच्या ओघात फिकट झाला आहे...त्यातले बरेच गडद रंग विरले आहेत. मात्र, उजळ रंगातला पार्श्वभाग (सर्फेस) मात्र शाबूत आहे. त्यावर रंगांचं ब्रशिंग बघायला मिळतं. चित्रकामात खूप मोठ्या आकारातल्या जाड ब्रशचा वापर केला गेला असावा असं वाटत नाही. खूप लांब स्ट्रोकचा वापर फारसा आढळत नाही. असं असलं तरी, रंग काही ठिकाणी पारदर्शक, तर काही ठिकाणी अपारदर्शक इफेक्टचा आभास निर्माण करतात.
रंगकामात ब्रशचा योग्य आकार व त्यावर दाब देऊन त्याच्या वाढलेल्या जाडीचा उपयोग करून सुंदर रेषांची, आकारांची मांडणी केली गेली आहे. गावाची वेस/सीमाद्वार हे मानवनिर्मित बांधकाम निसर्गातल्या पाना-फुलांत सामावलं जावं यासाठी तिथं रंगच्छटा हिरवी वापरण्यात आली आहे. राजदरबारात निळसर रंग राजाची श्रीमंती दाखवणारा आहे असं वाटतं.
अजिंठ्यात चितारलेला हा निळा रंग महत्त्वाच्या ठिकाणी जपून वापरला गेला आहे. चौथ्या भागांतल्या प्रसंगात राजा वेशीबाहेर जात असतानाच्या वेळी रक्षकांच्या समूहात मात्र हिरव्या रंगाचा घोडा पाहायला मिळतो.
राजा जनक किती समृद्ध होता याचं चित्रण चित्रकारानं केलं आहे. भव्य मोठा प्रासाद...उत्तम, सौंदर्यपूर्ण वास्तुरचना... कलात्मक निर्मिती, दुर्मिळ व मौल्यवान विविधरंगी दगडांचा वापर...दगडांची गोलाकार-लंबगोलाकार-दंडगोलाकार-चौकोनी-आयताकृती आकारांची रचना...उंचीचे स्तर, त्यांवरची नक्षी हे सगळं रेखीव व वास्तव आहे. या वास्तूंच्या रेखांकनामुळं त्या काळातलं वास्तूतलं वेगळेपण, प्रचलित कारागीरकौशल्य, साहित्य आदींची उपलब्धता दिसून येते.
वास्तूच्या बाह्य सौंदर्याप्रमाणेच अंतर्गत रचनाही खूप सुंदर आहे. स्तंभ व त्यावरील सुंदर त्रिमितीय नक्षी, तीवर मौल्यवान धातूंचं आलंकरण, छतावर लोंबणाऱ्या मोत्यांच्या सरींचं तोरण, छताच्या कोपरावर शिल्पाकृती, पडवीवर नक्षी अशी कलात्मक समृद्धी दिसते.
आजच्या काळातल्या वास्तुरचनेत जे आधुनिक घटक महत्त्वाचे मानले जातात; त्या दृश्यकलांच्या घटकांचा वास्तुकलेत महत्त्वपूर्ण सहभाग असतो. या सर्व घटकांच्या गुंफणीतून कलाकृतीत गुणवैशिष्ट्यं निर्माण होतात व ती या चित्रातल्या वास्तूला रचनात्मक सौंदर्य प्रदान करतात.
वास्तूची उंची, रुंदी, लांबी यांबरोबरच खिडक्या, दारं, स्तंभ, कमानी, तुळई आदी अनेक वास्तुघटक या चित्रात चितारण्यात आलेले आहेत. याशिवाय, अंतर्गत सजावटीचाही भाग इथं दिसतो. राजा महाजनक याच्या भव्य प्रासादात वरील सर्व प्रकारचे घटक पाहायला मिळतात.
बहुपर्णी कमानी, चबुतरे, चौकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरच्या गिलाव्यात केलेलं जडावकाम या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे
राजप्रासादाच्या निर्मितीला लाभणारा खास भारतीय शैलीचा भव्यपणा, तसंच गावाची वेस व तीवरची कमान, कमानीवरची चौकटीची नक्षी पाहायला मिळते.
अजिंठ्यातल्या अद्भुत वेशभूषा हा दोन हजार वर्षांपासूनच कौतुकाचा विषय आहे. याचं प्रमुख कारण हेच आहे की, आजही त्यातली मिळती-जुळती वेशभूषा आजूबाजूला बघायला मिळते. त्यातली नक्षी, आकार, आरेखन, अमूर्त-मूर्त आवर्तनं यांचा भास सातत्यानं होत असतो. ही सर्व चित्रवैशिष्ट्यं पाहता, अजिंठा इथल्या लेण्यांमधली चित्रं आणि शिल्पं हा भारतीय समाजासाठी कलेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आशय ठरतो.
(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच ‘अजिंठा कलासंस्कृती’चे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)
विदेशी संशोधकाचा ध्यास लेण्यांचा
Obsessed with foreign explorers of caves historical place archeological sectorSakal
- केतन पुरी
आपण बऱ्याच ठिकाणी हे ऐकत आलोय, की एखाद्या लेणीची निर्मिती चार-पाचशे वर्ष सुरू होती, किंवा एखाद्या मंदिरांची निर्मिती होण्यासाठी हजार वर्ष लागली. पण तुम्हाला सांगितलं, की एखाद्या लेणीची निर्मिती केवळ काही वर्षांमध्ये झाली आहे, तर त्यावर विश्वास ठेवणं आपल्याला काहीसं कठीण जाईल.
पण हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं एका विदेशी व्यक्तीनं. एक संशोधक भारतात येतो. इथल्या अत्युत्कृष्ट गोष्टीच्या प्रेमात पडतो. तब्बल ६५ वर्षे फक्त एकच ध्यास... एकच ध्येय... अजिंठा..! आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड मानलं जाणारं संशोधन ज्यांनी केलं, ज्यांच्या अभ्यास आणि अध्ययनामुळं इतिहासाचा अभ्यासक्रम बदलला.
अजिंठ्याच्या लेणींचा आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील इतरही लेणींचा दुर्लक्षित आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला इतिहास ज्यांनी अथक परिश्रमानं समोर आणला, ते महान संशोधक वॉल्टर स्पिंक. अविश्वसनीय वाटावं असं काम त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे जगासमोर मांडलं.
अजिंठ्याच्या सर्वांत प्रसिद्ध लेणींची निर्मिती केवळ १८-२० वर्षांमध्ये झाली असल्याची गोष्ट पुराव्यासहित त्यांनी सिद्ध केली आहे, तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त पानांमधून. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे फक्त अजिंठाच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागं असणाऱ्या लेणी, वेरुळ, घारापुरी लेणींच्या निर्मिती काळाची सुद्धा पुनर्मांडणी करावी लागली.
त्यांचं संशोधन, आकलन आणि मांडणी यांविषयी आपण या लेखमालेतून समजून घेऊच. त्या आधी, अजिंठ्याच्या लेणींमागं असणाऱ्या निर्मात्यांचा इतिहास आणि त्यांचा शासनकाळ समजून घेण्याची गरज आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या अजिंठा आणि वेरुळच्या लेणी जगप्रसिद्ध आहेत. जागतिक वारसास्थळांच्या यादीत असणाऱ्या या लेणींना दरवर्षी लाखोंच्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. बऱ्यापैकी लोकांचा हा गैरसमज असतो, की अजिंठा आणि वेरुळ हे फार जवळ आहेत. पण, जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपासून वेरुळ केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अजिंठा विरुद्ध दिशेला शंभर किलोमीटर अंतरावर आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणावरून अजिंठ्याला जाण्यासाठी बस तसंच स्थानिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या साहाय्यानं सहजपणे पोचता येईल. अजिंठा लेणींच्या वाहनतळापासून शटल सेवा कार्यरत असून लेणींपर्यंत जाण्याची सोय उपलब्ध आहे.
अजिंठ्याचा शोध फार रोमांचक पद्धतीनं लागला. खरेतर शोध म्हणताना आपण एका गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. भारतातील कित्येक ऐतिहासिक वास्तू कोणत्या ना कोणत्या मार्गानं कायम लोकसमूहाच्या संपर्कात राहिल्या.
ज्या वास्तू शतकानुशतके जमिनीखाली किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या, त्या उत्खननाच्या माध्यमातून पुरातत्त्व संशोधकांनी समोर आणल्या. पण काही वास्तू काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या.
लोकांचं दुर्लक्ष झालं किंवा इतर काही कारणांमुळं त्या वास्तू लोकसंपर्कापासून दूर गेल्या. अपघातानं किंवा अथक संशोधकीय प्रयत्नांमुळं त्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या. त्याला आपण शोध म्हणण्यापेक्षा पुनर्प्रकाश वगैरे शब्दांमध्ये बांधू शकतो. पण, त्या वास्तूंचं अस्तित्व कित्येक शतकांत पहिल्यांदा लोकांसमोर आल्यामुळं आपण ‘शोध’ सारखे शब्द वापरतो. असो.
अजिंठ्याच्या डोंगररांगेत शिकार सुरू होती. उन्हाळ्याचे दिवस होते. वाघाचा माग काढत काढत ही मंडळी वाघूर नदीच्या जवळ जाऊन पोचली. नदीच्या वरच्या बाजूला एक भलीमोठी गुहा त्यांना दिसली. शिकार करायला आलेल्या समूहात ब्रिटिश सैन्यातील घोडदळाचा अधिकारी जॉन स्मिथ सुद्धा होता. हातात मशाली घेऊन हे सगळे त्या गुहेत घुसले.
आतमध्ये गेल्यावर मात्र त्यानं वेगळंच विश्व दिसलं. वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रे, भलेमोठे खांब, मध्यभागी स्तूप आणि अजून खूप काही काही. हे सगळं बघून स्मिथ हरखून गेला. त्या लेणीमध्ये त्याने आपलं नाव लिहून ठेवलं. John A. Smith, २८ APRIL १८१९. अचानकपणे भारताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती जगासमोर उजेडात आली.
अपघातानं का होईना पण या लेणी समोर आल्या. वणव्यासारखी ही गोष्ट पसरत गेली. नितांत सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या लेणींच्या दर्शनासाठी कित्येक लोकांचे येणं जाणं सुरू झालं. त्यावेळेस भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. मराठ्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं होतं. इंग्रज हळूहळू संपूर्ण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करत होते. त्यातच अजिंठ्याच्या लेणी प्रकाशात आल्या.
लंडनपर्यंत लेणींची चर्चा पोचली होती. तिथून एक चित्रकार भारतात आला. मेजर रॉबर्ट गिल. उत्तम चित्रकार. रॉयल एशियाटिक सोसायटीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. अजिंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती निर्माण करण्याचा मानस होता.
त्यासाठी रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. चैत्यगृह, विहार यांच्यासोबत भिंतीवर काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती सुद्धा तयार करण्यात येणार होत्या. लेणींच्या जवळ असणाऱ्या गावामधून नैसर्गिक रंगसुद्धा तयार करण्यात आले होते.
लेणींची शक्य तेवढी साफसफाई करण्यात आली होती. तिथपर्यंत जायला पायऱ्यांची डागडुजी करण्यात आली. गिलनं जवळपास ३० चित्र तयार केली. सन १८६६ मध्ये लंडनच्या ‘द क्रिस्टल पॅलेस’ मध्ये ही चित्रं प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती.
दुर्दैव पाहा, गिलनं तयार केलेल्या २९ चित्रांपैकी २५ चित्रं आगीत जळून खाक झाली. त्यानंतर एक चित्रसुद्धा असंच जळालं. गिलने काढलेली आणि अपघातातून सुरक्षित राहिलेली उर्वरित चार चित्रे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ येथे ठेवण्यात आली.
गिल आणि पारो यांची प्रेमकथा आजही अजिंठा गावातील लोकांच्या मनात जिवंत आहे. अजिंठ्याला पहिल्यांदा जगाच्या कलामंचावर नेणारा हा महान कलाकार आजही महाराष्ट्रातील भुसावळ येथे चिरनिद्रा घेत आहे.
पण या लेणींची खरी निर्मिती कधी झाली ? याचे कलाकार कोण ? या लेणींचा काळ कसा ठरवला गेला ? अजिंठ्याचे जन्मदाते कोण ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. भारतातील सर्वांत वैभवशाली आणि श्रीमंत घराण्यांपैकी एक म्हणून वाकाटक इतिहासात प्रसिद्ध आहे.
अनेक अभ्यासक आणि संशोधक वाकाटकांच्या कारकीर्दीला भारताचे सुवर्णयुग म्हणून संबोधतात. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. एक नागपूरजवळ असणाऱ्या ‘नंदीवर्धन’ ऊर्फ ‘नगरधन’ येथील तर दुसरी ‘वस्तगुल्म’ ऊर्फ ‘वाशीम’ शाखा. नगरधन शाखेतील रुद्रसेन, प्रभावती गुप्तसारख्या प्रभावी व्यक्तिरेखा होऊन गेल्या. महाराष्ट्रातील सर्वांत सुरुवातीच्या मंदिरांपैकी काही मंदिरांची निर्मिती याच राजघराण्यानं केली. दुसरीकडं, वत्सगुल्म शाखेत फार महत्त्वाचा प्रसंग घडणार होता.
सम्राट हरिषेन गादीवर बसला होता. त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कलाकारांची नजर पडली एका सुंदर भागावर... हरिषेनच्या आधी, तब्बल तीनशे वर्ष आधी काही लेणी त्या डोंगरावर खोदल्या होत्या.
एका सुंदर जगाची निर्मिती करायला कलाकार डोंगराच्या पायथ्याला येऊन उभे होते. अजिंठ्याच्या अद्भुत लेणींची निर्मिती व्हायला सुरवात होणार होती... पण हा हरिषेन आणि त्याचे प्रतिस्पर्धी असणारे लेणीचे निर्माते कोण ? जाणून घेऊ या पुढच्या भागात...
देवांचं शिखर
14 highest peak of himalaya naga parvat geographical place trekkers climbersSakal
- उमेश झिरपे
हिमालय सर्वदूर पसरलेला आहे. भारताच्या वायव्येला काराकोरम पर्वतरांगेपासून ते थेट ईशान्येतील अरुणाचल प्रदेशपर्यंत. हिमालयातील एक-एक शिखरं किंवा शिखरसमूह ही पीएचडीचा विषय आहेत, एवढं वैविध्य इथे आहे. अष्ट हजारी शिखरं, म्हणजेच ज्यांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा अधिक आहे, अशी शिखरं जगात फक्त हिमालयात आहेत.
एकदोन नव्हे तर तब्बल चौदा ! या चौदांपैकी पाच शिखरं ही भारताच्या अतिउत्तरेला असलेल्या काश्मीरमध्ये, जो सध्या अनधिकृतपणे पाकिस्तानच्या ताब्यात आहे इथे आहेत. ज्याला आपण पाकिस्तानव्याप्त काश्मीर असं म्हणतो. येथे के-२, नंगा पर्बत, ब्रॉड पीक, गशेरब्रुम-१ व गशेरब्रुम २ अशी पाच अष्ट हजारी शिखरं आहेत. यातील प्रत्येक शिखरांचं वैशिष्ट्य अन् वैविध्य वेगळं आहे. यातील एक शिखर म्हणजे नंगा पर्बत!
या शिखराचं नंगा पर्बत असं नामकरण झालं ते इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे. इतक्या उंचीवर असलेल्या शिखरांवर सहसा हिमाचा थर असतो, मग तो ऋतू कोणताही असो. इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. नंगा पर्बत एका अगदी काटकोनात उभा राहावा असा पर्वत आहे.
ज्या टेक्टॉनिक प्लेट्स, ज्या धडकेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली, त्याचे ठळक पुरावे इथे दिसतात. शिखराचा वरचा भाग हा ग्रॅनाइटने बनलेला आहे. इथं सहसा हिम साचत नाही, म्हणून दगडी कातळ पर्वत उघड्या डोळ्यांनी दिसतो.
इतर पर्वतांच्या तुलनेत हे शिखर उघडं भासतं, म्हणून यांचं बोली भाषेतील नाव पडलं, नंगा पर्बत, ते तसंच पुढे इंग्रजीत देखील रूढ झालं. स्थानिकांसाठी हा पर्वत शिखर देवासमान आहे. याला ते देओमीर असं म्हणतात, ज्याचा अर्थ होतो देवांचं शिखर!
नावापासून वेगळेपण असलेला हा पर्वत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टीस्थान येथे असलेल्या हिमालयाच्या अतिउत्तरेकडील भागामध्ये वसलेला आहे. ८१२६ मीटर उंच असलेले हे शिखर उंचीनुसार जगातील नववे शिखर आहे.
कोणत्याही मोसमामध्ये चढाईसाठी अत्यंत कठीण शिखर म्हणून नंगा पर्बतचा लौकिक आहे. १८९५ पासून, म्हणजे जेव्हापासून हा शिखरपर्वत चढण्याचे प्रयत्न करण्यास सुरवात झाली, तेव्हापासून या शिखरावर अनेक गिर्यारोहकांचे मृत्यू झाले, म्हणून गिर्यारोहक जगतामध्ये माउंट नंगा पर्बत हा मृत्यू पर्बत म्हणून देखील ओळखला जातो.
या पर्वत शिखरावर चढाई करताना अत्यंत कठीण रिज अर्थात कड्यांवरून किंवा ८० ते ९० अंश कोनातील बर्फ व दगडांनी व्यापलेल्या कठीण भिंतींवरून चढाई करावी लागते. गिर्यारोहकांसाठी नंगा पर्बत हे नेहमीच मोठं आव्हान ठरला आहे.
रेन्हॉल्ड मेसनर (जगातील सर्व १४ अष्टहजारी शिखर मोहिमा यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक) व त्याचा भाऊ गुंतूर मेसनर यांनी नंगा पर्बत चढताना रुपाल फेस या मार्गाचा वापर केला, मात्र उतरताना हवामान कमालीचं खराब झाल्यानं ममरी रिजहून उतरण्यास सुरवात केली.
मात्र, ममरी रिजच्या तीव्रतेमुळे व सततच्या हिमप्रपातामुळे गुंतूर मेसनर यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१३ मध्ये नार्दीने फ्रेंच गिर्यारोहक एलिझाबेथ रेव्होलच्या साथीनं याच मार्गानं चढाईचा प्रयत्न केला होता, जो असफल ठरला. नंगा पर्बत शिखराची चढाई आहेच अशी आव्हानात्मक !
नंगा पर्बत शिखराचा रुपाल फेस हा प्रसिद्ध आहे. जवळपास ४ हजार ६०० मीटर उंच असलेला फेस हा जगातील सर्वांत मोठा ‘रॉकफॉल फेस’ आहे. सरळसोट उभ्या ग्रॅनाइटच्या भिंतीमुळे तुलनेने कमी हिम असतो, असलाच तर तो टणक प्रकारातील असतो. या सरळ दगडी भिंतीच्या खाली विस्तीर्ण पसरलेलं ग्लेशियर आहे.
त्यामुळं गिर्यारोहक जेव्हा इथे चढाई करतात, तेव्हा त्यांचा कस लागतोच, मात्र आजूबाजूला दिसणारं दृश्य हे डोळे दिपवणारे असतं, असं गिर्यारोहक सांगतात. भौगोलिकदृष्ट्या नंगा पर्बतचं वैविध्य हे अलौकिक आहे, हे तेवढंच खरं.
नंगा पर्बत शिखराशी गिर्यारोहण क्षेत्राची एक कटू आठवण जोडली गेली आहे. हे पर्वत शिखर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या इतर चार शिखरांपेक्षा थोडंसं पश्चिम दिशेला आहे. तुलनेने मानवी वस्ती येथील बेस कॅम्पहून जवळ आहे.
हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने थोडासा अस्थिर आहे. २०१३ साली जून महिन्यात जेव्हा या शिखरावर चढाई मोहीम चालू होती, तेव्हा बेस कॅम्पवर चीन, स्लोव्हेकिया, नेपाळ, युक्रेन, लुथेनिया इत्यादी देशांतील १० हून अधिक गिर्यारोहक होते व सोबतीला स्थानिक गाइड देखील होते.
मोहीम चालू असताना पोलिसांच्या वेशात काही लोक येथे आले व त्यांनी सर्व गिर्यारोहकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गिर्यारोहक काहीही म्हणो, त्या लोकांनी सर्व गिर्यारोहकांना बांधलं व नंतर एक-एक करून सगळ्यांना मारून टाकले.
असं कृत्य करणारी लोकं ही पाकिस्तान-तालिबान संघटनेचे दहशतवादी होते. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांना मारून जगाचं लक्ष त्यांना वेधून घ्यायचं होतं. या घटनेत १० गिर्यारोहकांचा व एका स्थानिक गाइडचा मृत्यू झाला.
संपूर्ण गिर्यारोहण जगतासाठी हा खूप मोठा धक्का होता. गिर्यारोहकांची सुरक्षा व पाकव्यात काश्मीरची अस्थिर परिस्थिती यामुळं पुन्हा चर्चिली गेली. या घटनेचा परिणाम इतका आहे, की आजही पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिर्यारोहणासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या ही नेपाळ अथवा भारतीय हिमालयाला भेट देणाऱ्या गिर्यारोहकांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्यानं इथं जाण्यास भारतीय गिर्यारोहकांना अर्थातच बंदी आहे. येत्या काळात जर काही राजकीय बदल घडले तर कदाचित भारतीय गिर्यारोहक देखील आपल्या हक्काच्या शिखरांवर चढाई करू शकतील.
नंगा पर्बतचं नाव, त्याचं रूप, त्याची चढाई, त्याचा इतिहास, त्याचा भूगोल अन् त्याचं भविष्य हे सर्वच काही वेगळं आहे. या पर्वताच्या दर्शनासाठी जेव्हा संधी मिळेल, तेव्हा माझ्यासारखा गिर्यारोहक नक्कीच चुकवणार नाही.
(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष आहेत.)
दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने पांघरला 'हिरवा शालू'; निसर्ग सौंदर्यात 27 हून अधिक धबधब्यांची भर
मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
खेड : निरव शांतता, सह्याद्रीच्या अभेद्य कडेकपारीतून फेसाळणाऱ्या जलप्रपातांचा आवाज, थंड वातावरण, सोबतीला मुसळधार पाऊस अन दाट धुक्याने वेढलेल्या रघुवीर घाटाने (Raghuveer Ghat) हिरवा शालू पांघरला आहे. निसर्गाचा अविष्कार पाहण्यासाठी जणू सादच घालत असून पावसामुळे या घाटात निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहण्यासाठी व चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावले रघुवीर घाटाकडे वळू लागली आहेत.
तालुक्यापासून खोपी येथे सुमारे ३२ किमी अंतरावर असलेला रघुवीर घाट पावसाळ्यातील पर्यटकांचे एक नवे ''डेस्टिनेशन'' ठरत आहे. शिंदी व सातारा (Satara) या जिल्ह्यांना जोडणारा हा घाट म्हणजे दळणवळणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ७६० मीटर उंच, तर लांबी १४ किमी आहे.
या घाटात पावसाळ्यात तर जणू स्वर्गच उतरल्याचा अनुभव अनेकांना येतो. दाट धुक्यांमुळे डोंगर माथ्यावर उतरलेले ढग, कड्याकपारीतून वाहणारे लहान मोठे धबधबे हे पर्यटकांना जणू काही आव्हानच देत असतात. एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगामध्ये फेसाळत कोसळणारे २७ हून अधिक धबधब्यांबरोबरच दाट धुके अन् नीरव शांततेची पर्यटकांवर मोहिनीच पडते. त्यामुळे या घाटाचे ''गारुड'' आजही पर्यटकांच्या मना मनावर कायम आहे.
गावे सातारा जिल्ह्यात
कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, उचाट, चकदेव, बन, निवळी, वाघावळे, म्हाळुंगे, सालोशी, कांदाट, अकल्पे, मोरणी आदी १४ गावे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात जोडली असली तरी रघुवीर घाटच दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे हा घाट पावसाळ्यात निसर्गाचे वेगळेच लेणं घेऊन पर्यटकांच्या स्वागतासाठी उभाच असतो.
दरडींचा धोका कायम
मुसळधार पावसामुळे कोसळणाऱ्या दरडी रोखण्यासाठी घाटात ७ ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी ७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. धबधबेही प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावले आता घाटाकडे वळू लागली आहेत. असे जरी असले तरी घाटात दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे.
अमरनाथला जाताय? प्रवास सुखकर होण्यासाठी 'या' प्रकारचे कपडे तुमच्या बॅगेत नक्की ठेवा.!
Amarnath Yatra 2024 : भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र 'बाबा बर्फानी' अर्थात अमरनाथ यात्रेला नुकतीच सुरूवात झाली आहे. महादेवाचे भक्त वर्षभर या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. ही अमरनाथ यात्रा अतिशय खडतर मानली जाते.
जम्मू आणि काश्मीर राज्यातील अनंतनाग जिल्ह्यात बाबा बर्फानी स्थित आहे. या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८८८ मीट आहे. या यात्रेचा प्रवास अतिशय कठीण मानला जातो.
या यात्रेसाठी यात्रेकरूंची तब्येत चांगली असणे आवश्यक आहे. कारण, येथील थंड वातावरण, उंचावर असलेले ठिकाण आणि कठीण मार्गासाठी तुम्ही शारिरीक आणि मानसिकरित्या मजबूत असणे आवश्यक आहे.
अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी भारत सरकार आणि विविध गैर-सरकारी संस्था वैद्यकीय शिबिरे, हेलिकॉप्टर सेवा आणि इतर सुविधांसह विविध प्रकारची व्यवस्था करतात.
या सर्व गोष्टी असूनही तुम्ही त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तुमची कपड्यांची आणि इतर आवश्यक गोष्टींची नीट तयारी करणे महत्वाचे आहे. यंदाच्या वर्षी तुम्ही देखील अमरनाथ यात्रेला जाणार असाल तर पॅकिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तिथे जाताना तुम्ही काही खास कपडे सोबत ठेवणे खूप गरजेचे आहे.
लोकरीचे कपडे
अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक वेळा तापमान खूपच खाली जाते. या तापमानात सतत बदल होत असतात. त्यामुळे, अशा परिस्थितमध्ये तुम्ही लोकरीचे कपडे सोबत ठेवा. चांगल्या लोकरीचे कपडे आधीच खरेदी करा. तिथे जाऊन असे कपडे खरेदी करण्यात तुमचे अधिक पैसे खर्च होतील. त्यामुळे, लोकरीचे ऊबदार कपडे, शॉल, मफलर, स्टोल इत्यादी गोष्टी बॅगेत ठेवायला विसरू नका.
रेनकोट सोबत ठेवा
सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अमरनाथ यात्रेला पाऊस-थंडी यांचा ऊन-सावलीचा खेळ सतत सुरू असतो. त्यामुळे, थंडीसाठी आवश्यक ऊबदार कपडे सोबत ठेवताना तुम्ही रेनकोट देखील अवश्य सोबत ठेवा.
कारण, अमरनाथ यात्रेच्या प्रवासात कधी ही पाऊस पडू शकतो. त्यामुळे, तुमच्या मापाचा आणि परफेक्ट फिटिंगचा रेनकोट अवश्य सोबत ठेवा. जेणेकरून तुमचा पावसापासून बचाव होऊ शकेल.
हातमोजे आणि टोपी
अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी बॅगेत स्वेटर, मफलर, हातमोजे, लोकरची टोपी अवश्य सोबत ठेवा. यामुळे, तुमचे थंडीपासून संरक्षण होऊ शकेल. हातमोजे अजिबात विसरू नका. कारण, तिथल्या थंड वातावरणामुळे हात गोठायला सुरूवात होते, त्यामुळे, त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकरीच्या हातमोजे अवश्य सोबत ठेवा.
बंद गळ्याचे कपडे
अमरनाथ येथील तापमान अतिशय कमी आहे. त्यामुळे, अशा स्थितीमध्ये तुम्ही बंद गळ्याचे कपडे अवश्य सोबत ठेवा. या बंद गळ्याच्या कपड्यांमुळे तुम्हाला थंडी जाणवणार नाही.
आळंदीच्या वारीला आहे जुनी परंपरा; आळंदीला कसं पोहोचाल अन् काय पहाल?
how to reach Shree Dnyaneshwar Maharaj Samadhi Mandir in Alandi history travel ashadhi wari know all details
आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या विठुरायाचं सावळे रूप पाहण्याची, त्याला भेटण्याची, त्याचं दर्शन घेण्याची. वारी ही एक घटना नसून तो एक सोहळा असतो. हा सोहळा अनुभवन्यासाठी प्रत्येक वारकरी चालू लागतो पंढरीच्या दिशेने. पण अनेकांना पंढरीला जाणं शक्य होत नाही. त्यामुळे पांडुरंगाचे अनेक भक्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीला आळंदीला येत असतात. तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आळंदीत पाहण्यासारखं काय आहे? आळंदीला पोहोचायचं कसं?आणि आळंदीचा नेमका इतिहास काय आहे.
पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (२९ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा १६ जुलैला पंढरीत पोचणार असून, मुख्य आषाढी एकादशी १७ जुलैला आहे.
श्री तीर्थक्षेत्र आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.
वारकरी संप्रदयात आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
तर आळंदीचा इतिहास काय आहे?
चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.
तुम्हाला आळंदीला राहायचं असेल तर तिथं अनेक धर्मशाळादेखील उपलब्ध आहेत. तसेच, इतर प्रेक्षणीय स्थळेदेखील आहेत. त्यांना तुम्ही भेट देऊ शकता.
आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे
इंद्रायणी नदी
कृष्ण मंदिर
मुक्ताई मंदिर
राम मंदिर
विठ्ठल रखुमाई मंदिर
स्वामी हरिहरेंद्र मठ
छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
आळंदीतील धर्मशाळा
देविदास धर्मशाळा गोपाळपूर
फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड
पाषाणकर धर्मशाळा
माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर, उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी आणि देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात.
तुम्हालाही आळंदीला जायचं झाल्यास तुम्ही कसं जाल?
आळंदीला जाण्यासाठी सर्वात स्वस्त प्रवास हा ट्रेनचा आहे. कोल्हापूरमधून यायचं झाल्यास. कोल्हापूर ते आळंदी थेट ट्रेन आहे.
नाशिकवरुन यायंच झाल्यास बस, कार असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बसने आलात तर फक्त 40 मिनिटात आळंदीला याल. तर कारने आलात तर, नाशिक फाट्यावरुन 13 मिनिटात आळंदीला पोहचाल.
मुंबई वरुन आळंदीला पोहचण्यासाठी २ तासाचा कालावधी लागतो. मुंबई- खोपोली-कामशेत-पिंपरी चिंचवड यामार्गाने तुम्ही आळंदीला येऊ शकता.
पुणे ते आळंदी ही सर्वात स्वस्त ट्रेन ५१४३५ पुणे सातारा पॅसेंजर आहे. या गाडीला पुण्याहून आळंदीला जाण्यासाठी ३९ मिनिटे लागतात. ही ट्रेन पुण्याहून 18:10:00 वाजता निघते आणि 18:49:00 वाजता आळंदीला पोहोचते.
पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, तुमची ट्रीप होईल अविस्मरणीय.!
Monsoon Travel Tips : देशातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. या पावसामध्ये चहा आणि गरमागरम भज्यांचा हमखास आस्वाद घेतला जातो. या दिवसांमध्ये निसर्ग जणू हिरवी चादर पांघरतो. त्यामुळे, निसर्गाचा हा नजारा पाहण्यासारखा असतो. अनेकांना पावसाळ्यात फिरायला जायला आवडते.
या दिवसांमध्ये तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे, गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही, आणि तुम्हाला तुमच्या ट्रीपचा छान आनंद घेता येईल. पावसाळ्यात सहलीचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? चला तर मग जाणून घेऊयात.
हवामानाबद्दल घ्या माहिती
पावसाळ्यात तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात, तेथील मार्गावर किंवा आसपासच्या ठिकाणांचे हवामान कसे आहे? याची माहिती अवश्य घ्या. फिरायला जाण्यापूर्वी तिथल्या परिस्थितीचा आणि हवामानाचा अंदाज घ्यायला विसरू नका.
यामुळे, प्रवासादरम्यान तुम्ही कुठेही अडकणार नाही. या शिवाय, तुमच्या आणि तुमच्यासोबत येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी ही माहिती घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे. फिरायला जाण्यापूर्वी हवामानाची माहिती अवश्य घ्या.
छत्री सोबत ठेवा
पावसाळ्यात वातावरण कधी बदलेल हे सांगता येत नाही. जसे की, पावसाळ्यात ढग कधी बरसतील याची शाश्वती कधीच नसते. त्यामुळे, घरातून बाहेर पडण्यापूर्वी छत्री अवश्य सोबत ठेवा.
कारण, कधी ही पाऊस पडू शकतो आणि छत्रीची कधी ही गरज भासू शकते. त्यामुळे, छत्री कॅरी करायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छत्रीसोबतच रेनकोटही सोबत ठेवू शकता. यामुळे, पावसात भिजण्यापासून तुमची सुटका होऊ शकेल.
योग्य कपडे आणि फूटवेअर
पावसाळ्यात वातावरणात भरपूर आर्द्रता असते. त्यामुळे, आपल्याला खूप घाम येतो. त्यामुळे, पावसाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी असे कपडे सोबत ठेवा की, ज्यामध्ये तुम्हाला गरम होणार नाही आणि कपडे ओले झाले तर ते सहज सुकतील. तसेच, कपड्यांसोबत असे शूज ठेवा, जे या दिवसांमध्ये सहज सुकतील. शिवाय, तुमचे पाय सुरक्षित राहतील. शक्यतो असे फूटवेअर सोबत ठेवा की जे चालताना सहजासहजी घसरणार नाहीत.
वॉटरप्रूफ बॅग सोबत ठेवा
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे, फिरायला जाण्यापूर्वी तुमचे कपडे किंवा तुमचे इतर सामान नेहमी वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा. यामुळे, तुम्ही पावसात भिजलात तरी तुमचे सामान सुरक्षित राहिल. तसेच, सोबत काही लहान प्लॅस्टिकच्या झिपलॉक पिशव्या ही ठेवा. जेणेकरून तुम्ही तुमचे पाकिट आणि मोबाईल त्यामध्ये सुरक्षित ठेवू शकता.
गर्दीपासून दूर विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठीचे उत्तम ठिकाण अंजीरले
अर्चना कदम
थोडा विसावा म्हणून आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सहलीचे नियोजन करतो. यावर्षी आम्ही बहीण भावंडांनी आपल्या कुटुंबियांसोबत कोकणला जायच ठरवल. तसेही समुद्राचे वेड प्रत्येकाला असतच. म्हणून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजीरले हे छोटेसे गाव निवडले. शहरापासून दूर, शांत, निवांत, गर्दीपासून दूर विरंगुळा म्हणून वेळ घालवण्यासाठीचे उत्तम असे ठिकाण म्हणजे म्हणजे अंजीरले. तरीही, मुलांना वाटले, एवढे बाकीचे सगळे बीच सोडून या छोट्याशा गावात आपण का जात आहोत. या प्रश्नाचे उत्तर त्यांना त्या ठिकाणावर जाऊनच मिळाले.
आम्ही सर्वजण सकाळीच आपापल्या गाड्यांनी प्रवासाला निघालो. प्रवासात मुलांची धिंगा मस्ती, गमती जमती, गप्पा सुरू होत्या. मधला रस्ता हा वळणाचा असल्याने जातानी वेळ लागतो. पोचता पोचता संध्याकाळ झाली. प्रवासामुळे थोड थकलो. जसं जसे समोर नारळाची- सुपारीच्या बागा, लाल मातीची छोटीशी चिऱ्यांची कौलारू घरे, अरुंद असे छोटे छोटे रस्ते रस्ते, समुद्राच्या लाटांचा आवाज, थंड हवेची झुळूक हे सगळ बघून मनाचा व शरीराचा थकवा दूर झाला.
संध्याकाळचा सोनेरी पांघरून घेऊन मावळतीला जाणारा सूर्य पाहून, सांजेला रंगीबेरंगी होणारा समुद्रकिनारा, त्या फेसाळणाऱ्या लाटांमधून पायाखालची अलगद घसरत जाणारी वाळू त्यावरून चालण्याची मज्जा काही औरच होती. सर्वत्र काळोखात समुद्राचा खळखळणारा लाटांचा फक्त आवाज येत होता.
दूरवर समुद्रात बारीक तिमतिमणारे मालवाहू जहाजांचे दिवे हेलकावे खात होते. शेजारीच असणाऱ्या लाईट हाऊस काळोखात उजळून दिसत होता. रात्रीचे जेवण उरकून आम्ही लवकरच झोपी गेलो. सकाळीच उठून सर्वजण बीचवर जाण्यास तयार होते. हे अफलातून निसर्ग सौंदर्याचे अविष्कार बघताना डोळ्याचे पारणे फिटले. रात्री काहीच दिसत नव्हते. स्वच्छ पाणी असलेला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा हा गर्दीपासून दूर आहे. विशेष म्हणजे हा समुद्र धोकादायक नाही. समान पृष्ठभाग असल्यामुळे समुद्रात मुलं लांबपर्यंत पाण्यात निवांत खेळू शकत होती.
कोणी किनाऱ्यावर फेरफटका मारत होते. कोणी या निसर्गाला कॅमेरामध्ये कैद करत होते. आम्ही सुद्धा पाण्यात समुद्राच्या लाटांसोबत खेळताना आपल बालपण अनुभवत होतो. फ्रेश झाल्यावर आम्ही कोकणी जेवणाचा सोलकढी, कोळंबी, सुरमई मस्त आस्वाद घेतला. अंजीरले येथील कड्यावरील गणपती मंदिर हे प्राचीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. इथला उजव्या सोंडेचा गणपती हे पर्यटकांचे श्रद्धास्थान. एका अखंड खडकामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे. कड्यावरील नारळाच्या झाडांनी मंदिर अच्छादलेले आहे.
कड्यावरून जाताना टेकडीवरून डोळ्यात न सामावणाऱ्या निळ्याशार अथांग समुद्राचे दर्शन होते. हे पाहताना आपण आपले देहभान विसरून जातो. येथील ऑलिव्हरीडले बीच आवर्जून बघण्यासारखा आहे. इथे यकासव महोत्सव म्हणजे कासवांचा अंडी घालण्यापासून जन्मानंतर त्यांचा समुद्रापर्यंत जाण्याचा प्रवास येथे अनुभवता येतो. इवली इवलीशी कासवे लाटांच्या पहिल्या स्पर्शाने कशी कावरीबावरी होतात, गडबडून जातात हे बघताना मज्जा येते. दुसऱ्या बाजूला असणारी कारले खिंड हे ठिकाण म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी पर्वणीच आहे. घनदाट हिरवळीमध्ये असणाऱ्या पठारांवर, खडकातून वाट काढत लांबवरचा सह्याद्रीचा सुखावह नजारा पाहण म्हणजे स्वर्गसुखच.
अंजीरले पासून सात ते आठ किलोमीटर लांब हरणे बीच आहे. तिथे संध्याकाळी ताज्या माशांचा लिलाव होतो. येथील मासे घेऊन चविष्ट, घरगुती, ताजे मसाले वापरून केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांवर आम्ही मनसोक्त ताव मारला. नंतर सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलो. किल्ल्यावर जाण्यासाठी जेटटी ने १५ ते २० मिनिटे लागतात. किल्ल्याचे आतील अवशेष पडलेले आहेत. पण तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
वापस येतानी समुद्रात आम्हाला डॉल्फिनचे दर्शन झाले. हा आमच्यासाठी अलभ्य लाभ होता. मुले खूप खुश झाले. नंतर आम्हाला कळाले की, येथे डॉल्फिन सफारीची सुद्धा सुविधा आहे. चार-पाच दिवस हसत खेळत, फिरण्यात कसे गेले ते कळाले नाही. परतीचा दिवस उजाडला तेव्हा मुलांची बिलकुल निघण्याची इच्छा नव्हती. त्यांना अजून एखादा दिवस थांबायच होतं. मग पुढच्या सुट्ट्यात इथेच जास्त दिवसांसाठी सहलीला येऊ असे आश्वासन देऊन सुंदर आठवणी मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खरच अंजीरलेचा किनारा म्हणजे खऱ्या अर्थाने रत्नच आहे.
काश्मीरमधील डल सरोवराची निर्मिती कशी झाली, सुंदर असूनही ‘डल’असं नाव का पडलं?
Kashmir Tourism :
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिवस काश्मीरमध्ये साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गाच्या सानिध्यात योग करण्यासाठी काश्मीरमधील डल सरोवराची निवड केली होती. पण काही कारणाने त्यांना योगा एका हॉलमध्ये करावा लागला. पण मोदींच्या योगाच्या कार्यक्रमामुळे डल सरोवर मात्र चर्चेत आलं.
हे डल सरोवर अतिशय सुंदर असून त्याचे फोटो पाहूनच आपण त्याच्या प्रेमात पडतो. मात्र, त्याला हे नाव कसे पडले. आणि त्याची निर्मिती कशी झाली याबद्दल माहिती घेऊयात.

Kashmir Tourism
या सरोवराची निर्मिती कशी झाली
या प्रश्नाचे उत्तर म्हणून अनेक सिद्धांत मांडले जातात. एक सिद्धांत सांगतो की ही एक हिमनदी आहे जी कालांतराने सरोवरात बदलली आहे. झेलम नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे डल सरोवराची निर्मिती झाली असावी असा दुसरा सिद्धांत सांगतो. मात्र, या प्रश्नाचे कोणतेही ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही.
डल सरोवर सुमारे 18 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात आहे? त्याची रुंदी सुमारे 3.5 किलोमीटर आणि कमाल खोली 20 फूट आहे. डल सरोवरात बोड दल, नागीन, गगरीबल आणि लोकुत दल अशी चार खोरे आहेत. मुघल काळात बांधलेली सुंदर उद्याने या तलावाचे सौंदर्य वाढवतात.

Kashmir Tourism
डल असे नाव का आहे?
डल तलाव हा शब्द प्रादेशिक भाषा आणि संस्कृती दर्शवतो. काश्मिरी भाषेत ‘डल’ या शब्दाचा अर्थ तलाव असा होतो. पुढे ‘डल’ सोबत ‘तलाव’ हा स्वतंत्र शब्द सामान्य बोलण्याच्या प्रवाहात जोडला गेला, नंतर त्याला ‘डल तलाव’ असे म्हणण्यास सुरूवात झाली.
डल सरोवराला काश्मीरच्या मुकुटातील रत्न किंवा श्रीनगरचे रत्न असेही म्हणतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात येथील उद्यानांचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.

Kashmir Tourism
डल सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे?
मत्स्यपालन आणि जलसंचयनाचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. पर्यटनाव्यतिरिक्त मासेमारी हा येथील दुसरा मोठा व्यवसाय आहे. यामुळे स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह चालतो.
जर तुम्ही डल सरोवराला भेट दिली, तर नक्कीच हाऊसबोटीवर बसून शिकारा करण्याचा आनंद घ्या. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डल सरोवरातील इतर महत्त्वाची ठिकाणे म्हणजे शालिमार बाग आणि निशात बाग होय. येथे गोड पाण्याचा धबधबा आणि उद्यान ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.
स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार अनुभवायचाय? मग, खेड-साताऱ्याला जोडणाऱ्या 'या' घाटाला जरुर भेट द्या
पावसाळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो.
-पराग वडके, रत्नागिरी
parag.vadake@gmail.com
लाल खेकडे, ढगांचे एकमेकांवर आपटणे, ढगांचे फुटणे, पाऊस कसा कोसळतो, क्षणात ढग आणि क्षणात स्वच्छ भव्य निसर्गाचा चमत्कार, असंख्य औषधी वनस्पती, हवे तसे सुरक्षित धबधबे हे सर्व पावसाच्या स्वागतासाठी पाहायचे असेल तर थेट गाठायचा तो खेड-सातारा (Khed-Satara) यांना जोडणारा रघुवीर घाट पाहायला.
रघुवीर घाट (Raghuveer Ghat) हा रत्नागिरी आणि सातारा दोन जिल्हे जोडतो. एकूण १२ किलोमीटरचा घाट आहे. समुद्रसपाटीपासून उंची ७६० मीटर म्हणजे जवळजवळ १४४० फूट उंच. चिपळूणकडूनसुद्धा चोरवणे, खोपी, शिरगाव ही गावे करत तेथे जाता येते. मुळात हा मार्ग वनखात्याच्या अंतर्गत येतो. व्याघ्र प्रकल्पसुद्धा (Tiger Project) याच मार्गावर येतो. सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा एखादा आणखी मार्ग असावा असा प्रस्ताव १९९० ला मांडला गेला; पण वनखात्याच्या आणि निसर्गसंपदेच्या रक्षणासाठी रडतखडत परवानग्या मिळत हा घाट पूर्ण झाला; पण आजही एकेरी मार्ग आहे.
हा १२ किलोमीटरचा प्रवास एक सुखद अनुभव आहे. विशेषतः पावसळ्यात सुरुवातीपासून तुम्हाला कोकणी खेडेगावातून दोन्ही बाजूला हिरवी भाताची रोपे आणि मध्ये काळाकुळकुळीत डांबरीरोड असा प्रवास सुरू होतो. वाटेत आत्ताच्या काळात लाल माती आणि नांगरणी तर कुठे लावणी तर कुठे चढणीचे मासे पकडणारे स्थानिक आणि फुल टू फोटोग्राफीची धमाल करत आपण जात असतो.
जर तुम्ही खेडमार्गे येणार असाल तर वाटेत खेड ते रघुवीर घाट या मार्गावर वेरूळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, बिजघर इत्यादी गावे लागतात. प्रत्येक गाव स्थानिक विविध वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. बिजघर येथे ३७५ वर्षापूर्वीचे प्राचीन शिवपार्वती काळकाई मनाई मंदिर आणि परिसर पाहण्यासारखा आहे. अशी ठिकाणे करत करत आपण घाटरांगेत वर वर जाऊ लागतो. त्या वेळी निसर्गाचा एक नैसर्गिक चमत्कार दिसतो. भारतात फक्त काही ठिकाणी दिसणारे विशिष्ट जातीचे लाल खेकडे काळ्याभोर दगडावर दिसू लागतात. ते नेमके या सीझनला कसे काय येतात कळत नाही आणि तुम्ही अगदी घाटमाथ्यावर पोहचता.
तिथे गेल्यावर सरकारने मनात आणले तर एखादे पर्यटनस्थळ कसे विकसित होऊ शकते त्याचे उदाहरण पाहायला मिळते. डोंगररांगामध्ये एक लांबलचक डोंगराची माची आहे. त्याच्या थेट आतपर्यंत शासनाने मस्त रेलींगमध्ये बसायला पेव्हरब्लॉकचा फूटपाथ बांधला आहे. त्यामुळे आपल्याला थेट दरीत जाण्याचा अनुभव घेता येतो. हाच रस्ता पुढे शिंदी गावात आणि थेट तापोळा, महाबळेश्वर वगैरेला जातो. तुमच्याकडे अजून थोडा वेळ असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. शिंदी गावातील खिंडसुद्धा अशीच पाहण्यासारखी आहे. असंख्य फोटोस्पॉट आहेत. कोकण पावसात स्वर्ग बनतो असे म्हणतात तर रघुवीर घाट त्या स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार आहे. त्यामुळे फिरस्ती करणाऱ्यांनी जरूर भेट द्यावा, असाच हा घाट आहे.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
राजापुरातील 'हे' चारही धबधबे झाले प्रवाहित; हिरव्यागार शालू पांघरलेल्या डोंगरकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे वळू लागले पर्यटक
या धबधब्याखाली आनंद लुटण्यासाठी वर्षा सहलींच्या माध्यमातून अनेकांचे पाय आता धबधब्यांकडे वळू लागले आहेत.
राजापूर : कोकणाला निसर्गदत्त (Konkan Tourism) लाभलेल्या सौंदर्याने अनेकांना भूरळ घातली आहे. उंचावरून पडणाऱ्या धबधब्यांच्या स्वरूपामध्ये ओघळणारे मोती पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. निसर्ग सहवासाचा आनंद लुटण्यासाठी ‘वर्षा सहलींच्या’ माध्यमातून हौशी पर्यटकांचा मोर्चा हिरव्यागार शालू पांघरलेल्या डोंगरकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्यांकडे आता वळू लागला आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी मृतावस्थेमध्ये असलेले तालुक्यातील धोपेश्वर येथील मृडानी नदीवरील धबधबा (Waterfall), चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीटकडा धबधबा, ओझर येथील धबधबा, हर्डी येथील कातळकडा धबधबा (Katalkada Waterfall) गेल्या काही दिवसांपासून प्रवाहित झाले आहेत. या धबधब्याखाली आनंद लुटण्यासाठी वर्षा सहलींच्या माध्यमातून अनेकांचे पाय आता धबधब्यांकडे वळू लागले आहेत.
पावसाळ्यामध्ये अविस्मरणीय आनंद मिळवून देणाऱ्या धबधब्यांकडे थेट जाण्यासाठी असलेल्या पायवाटा अरूंद आणि बिकट आहेत. रस्त्यांचीही फारशी चांगली स्थिती नाही. असे असले तरी, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परीटकडा राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढतच चालली आहे.
धोपेश्वर धबधबा : शहरापासून सुमारे तीन किमी.
चुनाकोळवणचा सवतकडा : राजापूर-ओणी- कळसवलीमार्गे २१-२२ किमी.
हर्डी येथील कातळकडा : शहरापासून सुमारे २ किमी.
ओझरचा धबधबा : राजापूर- सौंदळ या रस्त्यापासून दोन किमी.
गोवा म्हणजे नुसतं बीच नव्हे, पावसाळ्यात गोव्यात येईल खरी मजा, ही ठिकाणी नक्की पहा!
Monsoon Tourism :
गोव्याला लोक बीच पहायला जातात. सागराच्या लाटांवर स्वार होऊन ते आपले दु:ख, टेन्शन विसरून जातात. काही लोक गोव्याला एन्जॉय करायला जातात. तर काही लोक गोवा अनुभवायला जातात. पण, ज्याने गोवा पाहिला नाही त्यांना केवळ बीचेस आणि पार्टी इतकेच दिसते. पण, गोवा तेवढ्यापुरता मर्यादीत नाही.
गोव्यात असे अनेक स्पॉट आहेत. जिथे तुम्ही पावसाळ्यातही भेट देऊ शकता. गोव्याला निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. समुद्र किनाऱ्यांहून सुंदर इथली वास्तुकला, इथली जंगले, मसाल्यांच्या बागा आहेत. गोव्यात पाऊस जास्त असल्याने तिकडचे समुद्र किनाऱ्यांकडे फारसे जाऊ देत नाहीत. त्यामुळे, पावसाळ्यात जर गोव्याला जायचा प्लॅन करत असाल तर ही दुसरी ठिकाणे एक्सप्लोअर करू शकता.
अर्वालेम गुहा
महाभारत काळातील गुहा गोव्यात आहेत. पांडवही द्रौपदीसोबत गोव्यात आले होते. ही लेणी उत्तर गोव्यातील संकलीम गावात आहेत. पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात या लेण्यांमध्ये राहत होते. या लेण्यांमध्ये पांडवांचे अस्तित्व सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसला तरी स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे. या गुहा 7व्या शतकात बांधल्या गेल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे:
.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
कातळ शिल्प
ज्यांना ऐतिहासिक गोष्टी आवडतात ते गुजरात,राजस्थानला भेटी देतात. पण, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, गोव्यातही ऐतिहासिक खजाना दडलेला आहे. गोव्यातील अनेक पठारांवर कातळशिल्प पहायला मिळतात. गोव्यातील रिवोना येथील कुशावती नदीच्या काठी वसलेले उसगलीमल हे असेच एक ठिकाण आहे.
.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
अंथन डॅम
गर्दीपासून दूर एखाद्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही अंथन डॅमवर जाऊ शकता. हे ठिकाण नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आणि शांत आहे पण येथे फार कमी पर्यटक येतात. पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रण प्रेमींसाठी हे ठिकाण नंदनवन मानले जाते.
दूधसागर धबधबा
गोव्याला भेट देऊन दूधसागर धबधबा पाहिला नाही तर गोव्याला भेट देणे अपूर्ण मानले जाते. दूधसागर धबधबा हा गोव्यातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
दूधसागर धबधबा वर्षभर वाहत असतो. गोवा-कर्नाटक सीमेवर स्थित, दूधसागर धबधबा 130 मीटर उंचीवरून पडतो. मांडवी नदीने तयार झालेल्या दूधसागर धबधब्याचे पाणी दुधासारखे पांढरे दिसते. पर्वत आणि हिरवाईने वेढलेला हा धबधबा खरोखरच सौंदर्याचा अप्रतिम नमुना आहे.

चांदोली उद्यानात आढळली आक्रमक होणारी सर्वभक्षक 8 अस्वले; काय आहेत या अस्वलांची वैशिष्ट्ये?
फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. त्यांना मध आवडतो.
शिराळा : चांदोली राष्ट्रीय उद्यानात (Chandoli National Park) बुद्ध पौर्णिमेला (२३ मे) पाणवठ्यावर झालेल्या गणनेत निसर्गप्रेमींना आठ अस्वले आढळून आली आहेत. ‘अस्वलाच्या गुदगुल्या’ हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जात असल्याने या प्राण्याबद्दल सर्वांना आकर्षण आहे.
अस्वलाची (Bear) डोक्यापासून शरीराची लांबी १.४- १.८ मीटर; शेपूट १०-१२ सेंटिमीटर; खांद्यापाशी उंची ६०-९० सेंटिमीटर, वजन सामान्यत: ९०-११५ किलोग्रॅम असते. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो. मुस्कट लांब, मोठे डोके आणि खुंटीसारखी शेपटी असते. मागचे पाय आखूड, जाड असतात; तर पाऊल मोठे व पाच बोटांचे असते. प्रत्येक बोटांवर नख्या असून त्या पुढच्या पावलांवर लांब असतात. अन्नाचे चर्वण करण्यासाठी अस्वलाचा जबडा पसरट व दात सपाट असतात. त्याशिवाय चार लांब सुळे असतात.
धोका जाणवल्यावर किंवा वास घेण्यासाठी ते मागील दोन पायांवर उभे राहतात. त्यांची दृष्टी कमकुवत असते. त्यामुळे वास घेऊन त्यांना आपला मार्ग शोधून काढावा लागतो. त्यांचे नाक खूप तीक्ष्ण असते आणि ते खाद्य शोधण्यासाठी या नाकावरच अवलंबून असतात. अस्वल हा सर्वभक्षक प्राणी आहे. हिवाळ्यापूर्वी तो अतिरिक्त चरबी साठवून ठेवतो, तर हिवाळ्यात झोपेत असतात. वनातील कोणतीही निवाऱ्याची जागा त्यांना राहायला आवडते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी ते सायंकाळी बाहेर पडतात. पहाटे निवासस्थानी परतात.
फळे, फुले, कीटक, मध आणि कधीकधी कुजके मांस हे भारतीय अस्वलाचे खाद्य आहे. त्यांना मध आवडतो. झाडावर चढून मधाने भरलेले पोळे ते खाली पाडतात आणि मध खातात. वाळवीची वारुळे फोडून त्यातील वाळवी ते खातात. ते झोपेत मोठ्याने घोरतात. त्यांच्या समागमाचा काळ हा उन्हाळा असतो. सात ते नऊ महिन्यांच्या गर्भावधीनंतर डिसेंबर-जानेवारीत मादीला १ किंवा २ पिल्ली होतात.
ती दोन-तीन महिन्यांची झाल्यावर आईच्या पाठीवर बसून बाहेर जाऊ लागतात. तीन वर्षांपर्यंत ती आईसमवेतच असतात. आईच या पिल्लांचे संरक्षण करते. या जातीत नर-मादी एकनिष्ठ आढळतात. त्यांचे आयुष्य २५ ते ४० वर्षांचे असते. सर्व अस्वले चटकन आक्रमक होतात आणि धोकादायक असतात. पंजाच्या एका फटक्यानिशी ते एखाद्या व्यक्तीला ठार करू शकतात.
अस्वलांची वैशिष्ट्ये
लांब, दाट फर : अस्वलाला थंड हवामानापासून वाचवण्यास मदत करणारे लांब, दाट फर असते. फरचा रंग प्रजातींमध्ये बदलू शकतो, परंतु काळा, तपकिरी, लालसर तपकिरी आणि पांढरा यांसह सर्वांत सामान्य रंगांमध्ये समाविष्ट आहे.
मजबूत पंजे : अस्वलाचे मजबूत पंजे त्यांना चढण्यास, खणण्यास आणि त्यांची शिकार पकडण्यास अनुमती देतात. त्यांच्या पायांवर लांब, वक्र पंजे देखील असतात, जे त्यांना बर्फ आणि बर्फावरून चालण्यास मदत करतात.
लांब, टोकदार नाक : अस्वलांचे लांब, टोकदार नाक त्यांना अन्न शोधण्यास मदत करते, जमिनीखाली लपलेले कीटक आणि मुळे देखील. त्यांची चांगली गंधाची भावना देखील असते, जी त्यांना अंधारात किंवा बर्फाखाली देखील अन्न शोधण्यास अनुमती देते.
सर्वभक्षी : अस्वल सर्वभक्षी आहेत आणि ते विविध प्रकारचे अन्न खातात, ज्यात फळे, भाज्या, कीटक आणि लहान प्राणी यांचा समावेश होतो. ते उत्कृष्ट शिकारी देखील आहेत आणि ते मासे, हरिण आणि अन्य मोठे प्राणी पकडू शकतात.
पावसाळ्यात भटकंतीला जाताय? मग, 'ही' खबरदारी नक्की घ्या.!
Monsoon Travel : मॉन्सूनच्या आगमनानंतर सध्या सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यामध्ये भटंकतीचे प्रमाण वाढले आहे. निसर्गप्रेमी जिल्ह्याच्या विविध गड-किल्ल्यावर आनंद घेण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र, हे निसर्ग सौंदर्य पाहताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्यावतीने करण्यात आले.
पावसाळा आला की, मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी दैनंदिन कामाच्या ताणातून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी सुट्यांमध्ये हजारो नागरिक ट्रेकिंग किंवा भटकंतीसाठी डोंगर, घाटमाथ्यावर किंवा गड-किल्ल्यावर पोहचतात. मात्र, भटकंतीच्या अतिउत्साहामुळे व अतिधाडसामुळे दरवर्षी अनेकांचा जीवदेखील जातो. ही बाब लक्षात घेऊन भटकंतीला जाताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
रिल्स अन् व्हिडिओमुळे गर्दी...
समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट व्हिडिओमुळे भटकंतीचा ट्रेंड वाढला आहे. समाज माध्यमावर रिल्स, शॉर्ट अपलोड करण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जातो. मात्र दरड, अपघात किंवा पाण्यात बुडाल्यावर अशा लोकांना वेळेत मदत मिळत नाही आणि त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी काही सूचना गिरीप्रेमी संस्थेतर्फे नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षित ट्रेकिंगसाठी पर्याय...
चंदनवंदन किल्ला
वैराटगड
संतोशगड
वारुगड
चावंड
धोक्याची ठिकाणे...
कुंडलिका व्हॅली
अलंग मदन कुलंग किल्ला
कलावंतीण दुर्ग
हरिश्र्चंद्र गड
हरिहर किल्ला
पावसाळ्यात सह्याद्रीतील भटकंती जरूर केली पाहिजे. कारण या ऋतूमध्ये सह्याद्रीच रूप हे अत्यंत मनमोहक असते. परंतु, पावसाळी भटकंती अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे. कारण सह्याद्रीतील निसरड्या वाटा, ढासळणाऱ्या दरडी, धुके, धबधबे, ओढ्यांचे तीव्र प्रवाह टाळले पाहिजेत. मानवी जीवन खूप अमूल्य आहे. या ऋतूमध्ये मानवी चुकांमुळे मृत्यू होतो. अतिसाहस किंवा अतिरेक न करता सुरक्षित ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन भटकंती केल्यास त्याचा जास्त आनंद घेता येईल.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ
काय काळजी घ्याल?
ओळखीच्या व अनुभवी
ग्रुपसोबत ट्रेकला जावे
ट्रेकमधील भटक्यांची संख्या मर्यादित व नियोजन करता येईल, एवढीच असावी
ग्रुपकडे प्रथमोपचाराचे साहित्य असावे
ट्रेक कुठे, किती दिवसांचा आहे व लीडर, ग्रुप यांची माहिती जवळच्या व्यक्तीस द्यावी
सोबत चांगली टॉर्च ठेवावी
पावसाचा अंदाज पाहून ट्रेकचे नियोजन करावे
धुक्यात वावरताना सावधानता बाळगावी
सोबत जास्तीचे कोरडे पदार्थ ठेवावे
हे करणे टाळा...
किल्ल्यावरील तट, दरवाजे, इतर पडीक
अवशेष यांवर चढू नये
अवघड ठिकाणी फोटो किंवा सेल्फी घेणे टाळावे
पाण्याच्या प्रवाहात, ओढ्यात, नदीत उतरू नये
शक्यतो एकट्याने भटकंती किंवा
ट्रेकिंगचे नियोजन टाळावे
दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास ७६२० २३० २३१ या २४x७ हेल्पलाइन नंबरवर आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधावा
खोरनिनको धबधबा, मुचकुंद ऋषींच्या गुहेची पर्यटकांना भुरळ; एकखांबी, बल्लाळ गणेश पाहण्यासाठी गर्दी
माचाळ येथे जातानाच प्रथम मुचकुंद ऋषी यांची गुहा आहे. या मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका आहे.
लांजा : निर्सगाने नटलेला प्रदेश आणि थंड हवेचे ठिकाण असल्याने लांजा तालुका मिनी महाबळेश्वर (Mini Mahabaleshwar) म्हणून नावारूपाला येत आहे. तालुक्यातील खोरनिनको येथील मानवनिर्मित धरण, जावडे येथील एकखांबी गणपती मंदिर आणि मुचकुंद ऋषी यांची गुहा पर्यटकांना भुरळ घालत असून पावसाळ्यातील पर्यटनाला चालना मिळते.
माचाळ हे गाव निर्सगाच्या सान्निध्यात सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांवर वसलेले आहे. लांजा मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway) कोर्लेमार्ग कोचरी किंवा तळवडे मार्ग दाभोळे-शिपोशी कोचरी मार्ग माचाळ येथे जाण्यासाठी रस्ता आहे. महाराष्ट्र् पर्यटन विकास महामंडळाने या स्थळाचा ''ब'' वर्ग पर्यटनस्थळात समावेश केला आहे. माचाळच्या समोरच इतिहासातील प्रसिद्ध विशाळगड मोठ्या दिमाखात उभा आहे. या मिनी महाबळेश्वरला भेट देण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.
माचाळ येथे जातानाच प्रथम मुचकुंद ऋषी यांची गुहा आहे. या मुचकुंद ऋषी गुहेबद्दल एक पौराणिक आख्यायिका आहे. त्या ठिकाणी माचाळच्या ग्रामस्थ मंडळींनी सुंदर मंदिरही बांधलेले आहे. त्याचबरोबर या परिसरात खोरनिनको धरण आणि त्यावरचा मानवनिर्मित धबधबा हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते. तेथील निसर्गसौंदर्य आणि शांतता पर्यटकांना खिळवून टाकते. येथील कौशल्याने बांधलेल्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी नजरबंदी करते. हे धरण चारीबाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे आणि पावसाळ्यात येथील दृश्य विलोभनीय आहे.
या धरणाला दरवाजे नाहीत. जेव्हा धरण पूर्ण भरते तेव्हा त्यातील पाणी वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांसारख्या रचनेमुळे शांतपणे खाली वाहात येते, असा हा खोरनिनको धबधबा आहे. या धबधब्यात पर्यटक आंघोळ करण्यासाठी पावसाळ्यात हजेरी लावतात. जवळच जावडे येथे शिंदे कुटुंबीयांनी घरासमोर एक खांबावर टुमदार असे गणपतीचे मंदिर साकारले आहे. एका खांबावर बांधण्यात आलेल्या हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावतात तसेच प्रभानवल्ली येथील गणेशखोरी डोंगरपठारावर श्री बल्लाळ गणेशाचे मंदिर आहे. येथे भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होते.
माचाळ हे गाव थंड हवेचे ठिकाण असून, हे गाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण प्रयत्न केले गेले. त्याचे फळ आता दिसू लागले आहे.
-विवेक सावंत, लांजा
UNESCO च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं गुजरातमधील स्मृतिवन म्यूजियम तुम्ही पाहिले का?
Smritivan Museum :
UNESCO ने जगातील 7 प्रमुख संग्रहालयांमध्ये भारतातील एका संग्रहालयाची निवड केली आहे. जागतिक स्तरावर भारतीय संग्रहालयाला अशी मान्यता मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुजरातमध्ये असलेल्या स्मृतीवन संग्रहालयाला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे.
Plix Versailles Museum 2024 साठी निवडलेले गुजरातचे 'Smritivan Museum' UNESCO ने जागतिक विभागात समाविष्ट केले आहे. UNESCO 2015 पासून वर्षातून एकदा Plix Versailles Museum 2024 स्पर्धा आयोजित करते.
या स्पर्धेच्या माध्यमातून युनेस्को जगभरात होत असलेल्या आधुनिक बांधकामांवर प्रकाश टाकते. गुजरातच्या स्मृतीवन संग्रहालयासोबत जगभरातील इतर 6 संग्रहालयांचाही समावेश आहे. युनेस्कोने या पुरस्कारासाठी इतर 7 संग्रहालयांसह शॉर्टलिस्ट केले आहे. गुजरात टुरिझमच्या अधिकृत एक्स हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे.
26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमधील भुज येथे झालेल्या भीषण भूकंपाची आठवण लोकांना रहावी यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. या भूकंपात एका क्षणात हजारो लोकांचा जीव गेला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर होते. भूकंपात प्राण गमावलेल्या हजारो लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, गुजरातमध्ये 470 एकर क्षेत्रावर 'स्मृतीवन संग्रहालय' बांधले गेले.

या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाल्यामुळे गुजरातचे स्मृतीवन संग्रहालय जगभर प्रसिद्ध झाले आहे. Plix Versailles Museum 2024 श्रेणीसाठी स्मृतीवन संग्रहालयाची निवड करण्यात आली आहे. 2024 च्या जागतिक स्पर्धेसाठी निवडलेल्या स्थांसंना प्राइज व्हर्साय, इंटिरियर आणि एक्सटेरियर या तीन श्रेणींच्या आधारे स्पर्धेत भाग घ्यावा लागेल.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये युनेस्को मुख्यालयाकडून विजेत्यांची घोषणा केली जाईल. प्रिक्स व्हर्साय हे वास्तुकला आणि डिझाइनसाठी दिले जाणारे पारितोषिक आहे. हा पुरस्कार 2015 मध्ये सुरू करण्यात आला.

गुजरात टुरिझमच्या अधिकृत एक्स हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाल्यामुळे गुजरातचे स्मृतीवन संग्रहालय जगभर प्रसिद्ध झाले आहे. Plix Versailles Museum 2024 श्रेणीसाठी स्मृतीवन संग्रहालयाची निवड करण्यात आली आहे.

आशियातील सर्वात उंच धबधबा आहे ड्यूप्लिकेट? चीनी पर्यटकाने असा लावला शोध, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
Viral Video: पावसाळा सुरू होताच अनेक लोकांना फिरण्याचे वेध लागतात. अनेक लोक धबधबे पाहण्यासाठी विविध ठिकाणांना भेट देतात. धबधबा बघताना वेगळीच मज्जा येते. काही ठिकाणी उंच शिखरांवरून पाणी येते तर काही ठिकाणी जंगलांच्या मधोमध शिखरावरून ओढा वाहत असतो… हे खूप आनंददायी अनुभूती असते. पण सध्या सोसघल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चीनचा एक बनावट धबधबा समोर आला आहे. जो दिसायला खूपच सुंदर आहे. पण धबधब्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
एका चीनी व्लॉगरने धबधब्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. जगातील काही गोष्टी नैसर्गिक नसतात पण दिसायला सुंदर असतात. आता चीनचा युंटाई वॉटरफॉल याचे जिवंत उदाहरण आहे. जो आशियातील सर्वात उंच धबधबा आहे. ज्याची उंची 314 मीटर आहे. एवढ्या उंचीवरून पाणी पडल्यावर इथे येणाऱ्या लोकांना दाद द्यावी लागते. यामुळेच दरवर्षी जगभरातून शेकडो पर्यटक या ठिकाणी येतात.
व्हायरल होत असलेल्या ब्लॉगरच्या व्हिडिओमध्ये त्याने युनताई धबधब्याबद्दल सत्य सांगितले आहे. हा धबधबा दिसायला खूप सुंदर आहे परंतु हा धबधबा मानवाने बनवला आहे. चायनीज व्लॉगर कसा तरी धबधब्याच्या शिखरावर पोहोचला आणि त्याने तिथे जे काही दिसले त्याचा व्हिडिओ बनवला. जो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोठ्या पाईप्समधून धबधब्यात पाणी येत आहे.
पण जेव्हा हा व्हिडिओ सोशल मिडियावर आला तेव्हा लोकांनी याला खोटे म्हटले कारण इतका सुंदर धबधबा माणसाने बनवला आहे हे खरे वाटत नव्हते. पण नंतर युताई माउंटन सीनिक एरियाने स्वतः सांगितले की धबधब्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय याठिकाणी पाण्याचे पंप आणि पाईप्स बसवण्यात आल्याने खऱ्या धबधब्याची अनुभूती येते, असेही सांगण्यात आले. या धबधब्याचे सत्य जाणून घेतल्यानंतर येथील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कोकणात घ्या केरळाचा फिल, वॉटर स्पोर्ट्सच्या रांगेत आता हाऊसबोट दाखल
House Boat In Kokan :
सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत होत आहे. इथे स्कुबा डायव्हिंग, वॉटर बाईक असे अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी कोकणात विशेषत: मालवण-तारकर्ली बिचकडे वाढत आहे. कोकणातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक नागरिकही अनेक युक्त्या लढवत आहेत.
कोकणातील समुद्र जसे अथांग आहेत तसेच इथल्या नद्यांचे पात्रही मोठे-विस्तीर्ण आहे.कोकणातील कर्ली नदीच्या पात्रात आणि दाभोळ खाडीत हाऊस बोट सुरू करण्यात आली आहे. पाण्यावर तरंगणारं अलिशान हॉटेल असेच या बोटीकडे पाहून म्हणता येईल.

समुद्रातून किंवा खाडीमध्ये कांदळवन आणि मगर सफर करणाऱ्या पर्यटकांना हाऊस बोटची सफर करता येणार आहे. कोकणातील गुहागर मध्ये परचुरी गावात एका तरुणाने हाऊस बोट तयार करण्याचे धाडस दाखवत गुहागर मधील पर्यटन वाढीसाठी एक नवे पाऊल टाकले आहे.
दोन मजली असणारी ही हाऊस बोट आकर्षक चित्रांनी रंगवण्यात आली आहे. डायनिंग प्लेस, बेडरूम आणि रूममध्येच फ्रीज,टिव्ही,वॉर्डरोब देखील उपलब्ध आहे. २४ तासांसाठी ही बोट तुम्हाला वापरता येते. जेवण-चहा नाश्ता सर्वकाही इथे पॅकेजमध्येच मिळते.
केरळमध्ये आहेत तशा हाऊस बोट महाराष्ट्रातील पर्यटकांना अनुभवता यावी यासाठी ही बोट तयार करावी असा विचार मनात आला, असे ही हाऊसबोट सत्यवान देरदेकर यांनी बनवली यांनी सांगितले.
कोकणात कर्ली नदीच्या किनारी आणि परचुरी गावाजवळ असलेल्या दाभोळच्या खाडीत ही हाऊस बोट आहे. या हाऊस बोटमधून नदीची सफर,मगरींचे दर्शन घडते.

कोकणातील सर्वच गोष्टी केरळची आठवण करून देतात. केरळ देवभूमी असली तरी त्याच तोडीचे निसर्ग सौंदर्य कोकणलाही लाभले आहे. त्यामुळे कर्नाटक,गोवा आणि महाराष्ट्रातील लोक कोकणात येतात. तिथले ग्रामिण जीवन, खाद्यसंस्कृती एन्जॉय करतात. आशातच आता या हाऊस बोटमुळे पर्यंटकांना आनंद द्विगुणीत होणार आहे.
रिव्हर राफ्टिंगचा प्लॅन करताय? मग, भारतातील ‘या’ सर्वोत्तम ठिकाणांना नक्की द्या भेट
Travel Diaries : सध्या देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे काही जणांचा बळी देखील गेला आहे. खर तर उन्हाळ्यात अनेकांना सुट्ट्या लागलेल्या असतात. त्यामुळे, या सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाण्याची सगळ्यांची इच्छा असते.
उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सगळेजण उत्सुक असतात. रिव्हार राफ्टिंग करायला अनेकांना आवडते आणि रिव्हर राफ्टिंगसाठी उन्हाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. वॉटर स्पोर्ट्सपैकी एक असलेले हे रिव्हर राफ्टिंग हे करायला अतिशय आव्हानात्मक असते. ज्या लोकांना साहस करायला आवडते. त्यांनी आयुष्यात एकदा तरी रिव्हर राफ्टिंगचा आनंद जरूर घ्यावा.
यंदाची सुट्टीत जर तुम्ही रिव्हार राफ्टिंग करायचा विचार करत असाल तर त्यासाठी भारतातील टॉप ठिकाणे कोणती आहेत? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही रिव्हर राफ्टिंगची सर्वोत्तम ठिकाणे
महाराष्ट्रातील कोलाड
कोलाड हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मुंबई आणि पुण्याजवळ स्थित असलेले हे एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले हे ठिकाण पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले असते. कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि नदीचे नयनरम्य दृश्य रिव्हर राफ्टिंगची मजा आणखी द्विगुणित करते. महाराष्ट्रातील लोकांना जर रिव्हर राफ्टिंग करायचे असेल तर, त्यांनी या ठिकाणी जरूर जावे.
उत्तराखंडमधील ऋषिकेश
उत्तराखंड राज्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून ऋषिकेशला ओळखले जाते. हे शहर गंगा नदीच्या काठावर वसले आहे. रिव्हर राफ्टिंगची राजधानी म्हणून ही ऋषिकेशला ओळखले जाते. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. रिव्हर राफ्टिंगसोबतच तुम्ही येथील आसपासच्या ठिकाणांना ही भेट देऊ शकतात.
हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली
कुलू-मनाली हे हिमाचल प्रदेशातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. येथील उंच बर्फाच्छादित पर्वत, बर्फातील विविध खेळ आणि इतर प्रेक्षणीय ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. यासोबतच तुम्ही येथून वाहणाऱ्या बियास नदीवर रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
कर्नाटकातील कुर्ग
कर्नाटक राज्यातील कुर्ग हे एक अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. कुर्ग हे शहर तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि कॉफीच्या बागांसाठी खास करून ओळखले जाते. येथील बारीपोल नदीवर तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत इथे होतो फेल, भारतात या ठिकाणी वाहते उलट दिशेला पाणी
Manipat Tourism :
जगभरात अशी अनेक ठिकाणे अशी आहेत जी आपल्याला बुचकळ्यात पाडतात. जी ठिकाणं पाहुन आपण आश्चर्यचकीत होतो. असेच एक ठिकाण छत्तीसगडमध्ये आहे. इतर ठिकाणांप्रमाणेच छत्तीसगड हे ठिकाणही सध्या पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे.
छत्तीगडमधील एका ठिकाणी पाणी उलट्या दिशेला वाहते. हे पाणी उलट का वाहते आणि त्यासाठी संशोधकांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. मेनपत हे छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याच्या टेकड्यांमध्ये वसलेले आहे.
या ठिकाणाला छत्तीसगडमधील शिमला असेही म्हणतात. मेनपत हे एक हिल स्टेशन म्हणून खूप लोकप्रिय झाले आहे, त्यामागील कारण म्हणजे येथे वाहणारे उलटे पाणी.
मेनपत हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. या मेनपाटच्या घनदाट जंगलात बिसरपाणी गाव वसले आहे. या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे वाहणारे पाणी विरुद्ध दिशेला वाहते म्हणजेच जेथे चढ आहे त्या दिशेला वाहते. या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ हे पाणी भूगर्भातून उगम पावते. हे भूगर्भातील पाण्याचे उगमस्थान मानले जाते.

सुरुवातीला हे पाणी बाहेर आल्यावर त्याच दिशेने वाहत होते, परंतु 20-25 मीटर वाहून गेल्यावर ते 100 मीटरपर्यंत उतारावर चढताना दिसते. मात्र, हा चमत्कार नसून गावाच्या भौगोलिक स्थितीमुळे घडते असे सांगितले जाते.
गुरूत्वाकर्षनाचा नियम इथं होतो फेल
शास्त्रज्ञ न्यूटन यांनी पृथ्वीतील गुरूत्वाकर्षणाचा नियम शोधला होता. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट खालीच पडते, याला हा नियम लागू होतो, असे त्यांनी सांगितले आहे. पण, छत्तीसगडमधल्या या ठिकाणी केवळ पाणीच नाहीतर गाडीही घसरतीला कशी घसरते तसे गाडीही जाते.

इथे असलेल्या वाहत्या पाण्यात तुम्ही एखादा कागद किंवा पान टाकले तर ते वरच्या दिशेला वाहत जाते. हे आश्चर्यच असल्याचे मानले जाते.
महाराष्ट्र राज्यातील दुसरे 21 फूट जमिनीखाली असलेले अनोखे गणेश मंदिर; काय आहे खासियत?
फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो. या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे.
विरार : महाराष्ट्रातील दुसरे तर पालघर जिल्ह्यातील पहिले व एकमेव असे जमिनीखाली असलेले गणपतीचे आगळे-वेगळे मंदिर सध्या पहायला वसईत गर्दी होत आहे. नालासोपारा पश्चिम वाघोली (Wagholi) येथील जयवंत नाईक व किशोर नाईक बंधू यांच्या फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट (Fulare Charitable Trust) संचालित हे श्री गणेश ध्यान मंदिर (Ganesha Temple) असून येणा-या भाविकांना या मंदिराच्या गाभाऱ्यात ध्यानधारणा तसेच गणेशाची उपासना, आवर्तन करता येणार आहे.
एकवीस वर्षांपूर्वी नाईक बंधूंनी आपल्या वडिलोपार्जित शेतीवाडीत या गणेश मंदिराची उभारणी केली आहे. मुंबईपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर कोकणात किंवा गोव्याला गेल्याचा फील देणारा वसई-विरार (Vasai-Virar) पट्टा आहे. वाघोलीचा परिसर हा हिरवाई , निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अर्नाळा, कळंब ,राजोडी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या येत असून या पर्यटकांची (Tourists) पावले आता वाघोली गावाकडे वळू लागली आहेत.
फुलारे चॅरिटेबल ट्रस्ट हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतो. या ट्रस्टचे श्री गणेश मंदिरासोबत वाघोली गावात सुमारे बारा एकराच्या विस्तीर्ण जागेत शनी मंदिर आहे. आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका उघड्या रिंगणाच्या मधोमध शिंगणापूरसारखी स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. भाविक तिथे स्वहस्ते तेलाचा अभिषेक करू शकतात. तेलविक्री बचत गटाच्या महिलांमार्फत केलेली आहे. अभिषेकासाठी वापरले गेलेले हे तेल वाया न घालवता व्यवस्थित रिसायकल करून त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून वृद्धांना व रुग्णांना मालिशसाठी विनामुल्य प्रसाद रूपाने वाटले जाते.
शनिदेवाची प्रतिमा असलेले मंदिर प्रशस्त आणि आकर्षक आहे. लाकडापासूनचे उत्तम कौलारू काम यांची फार सुरेख रचना बांधकामासाठी केलेली आहे. आयुष्यभर कष्ट करून थकलेल्या वृद्धांच्या दुखर्या पायांना घडीभर आराम देणारी, पाय दाबून देणारी यंत्रे विनामूल्य उपलब्ध केलेली आहेत. बिना दरवाजाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरला जाणे जमत नसल्याने वसईकरांना फुलारे-नाईक परिवाराच्या शनि मंदिर सोयीचे ठिकाण ठरले आहे.
शनिमंदिरातून भाविकांना दिलेली प्रसादरूपी फुल-झाड म्हणजे पर्यावरणाचे महत्व जाणून झाडे लावा व झाडे जगवा यासाठी राबवलेला सामाजिक उपक्रमच म्हणावा लागेल. शनिमंदिराचे जयवंत फुलारे- नाईक यांनी यासाठी थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ५ लाखांहूनही अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप करत निर्सगाचा समतोल राखण्यासाठी हातभार लावला आहे.
शनिमंदिर व फुलारे ट्रस्टद्वारे आरोग्य व रक्तदान शिबीरे, विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप, खाद्य-नाट्यसंगीत महोत्सव, एकांकीका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक विषय वर्षभर राबवत असतात. मंदिर परिसरात सामवेदी खाद्य पदार्थांचा आस्वाद भाविकांना घेता येतो. या परिसरात श्री संत सद्गुरू बाळु मामा व श्री विठ्ठल रखुमाई माताचे मंदिर उभारण्यात आले आहे. दर अमावस्येला बाळु मामांच्या नावाने भंडारा असतो.
Cat's Temple : या आयलंडवर आहे मांजरांचे मंदिर, माणसांपेक्षा मांजरेच आहेत जास्त
Cat's Temple :
जगभरात अनेक मंदिरे अशी आहेत ज्याचा आपण विचारच करू शकत नाही. कोणी आवडत्या अभिनेत्याचे मंदिर बांधतो. तर कोणी एखाद्या देशसेवा करणाऱ्या सैनिकाचे. संत महात्मे, धर्माचा प्रसार करणारे लोकांची मंदिरे बनतात. पण, जपानमध्ये मात्र एका मांजराचे मंदिर बांधण्यात आले आहे. केवळ मंदिर नाहीतर ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिथे सर्वत्र मांजरेच आहेत.
जपानच्या ईशान्येला एक बेट आहे, जिथे माणसांपेक्षा जास्त मांजरी राहतात. येथे मांजरी संरक्षकांची भूमिका बजावतात. जपानमधील ताशिरोजिमा बेटावर मांजरींच्या सन्मानार्थ 'नेको निन्जा' नावाचे मंदिर आहे. जे बेटवासी आणि मांजरी यांच्यातील सुंदर नाते दर्शवते.
या मंदिरामागे अशी कथा सांगितली जाते की, पूर्वीच्या जमान्यात इथले नागरिक रेशीम उत्पादन करायचे. ताशिरोजिमाचे पूर्ण बेट हे रेशीम उत्पादन करत होते. पण या शेतकऱ्यांना इथली उंदरे त्रास द्यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या मौल्यवान रेशीम किड्यांचे उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी मांजरी पाळल्या.
इथले मछ्चिमारही मांजरीला सोबत घेऊन मासे पकडण्यासाठी जायचे. त्यांचे असे म्हणणे होते की, यामुळे नशीब फळफळते आणि अधिक मासे पकडण्यात मदत होते, असा येथील मच्छिमारांचा विश्वास होता.

आणि अशा प्रकारे मंदिर बांधले गेले
समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी मच्छिमार मांजरांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असत. असे म्हणतात की मांजर आणि येथे राहणारे लोक यांचे नाते पिढ्यानपिढ्यांचे आहे. एकदा एका मच्छिमाराने एका मांजरीला चुकून जखमी केले. त्यात ती मृत्यूमुखी पडली. त्यानंतर बेटवासीयांनी मिळून मांजरीच्या सन्मानार्थ मंदिर बांधले. या घटनेनंतर मांजर आणि बेटवासी यांच्यातील नातं आणखी घट्ट झालं.

अद्वितीय संस्कृती अजूनही टिकून आहे
हे बेट मियागी प्रीफेक्चरमधील इशिनोमाकी शहराचा एक भाग आहे. जो तोहोकू प्रदेशात आहे, ज्याने 2011 मध्ये शक्तिशाली भूकंपानंतर विनाशकारी त्सुनामी पाहिली होती. तथापि, या नैसर्गिक आपत्तीनंतरही, बेटाची अद्वितीय संस्कृती अजूनही टिकून आहे.
माणसांपेक्षा जास्त मांजरी आहेत
आज या छोट्या बेटावर केवळ ५० लोक राहतात. पारंपरिक कामे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सध्या ताशिरोजिमा बेटावर १०० हून अधिक मांजरी आहेत.
हेमाडपंती मंदिराचा होणार कायापालट
हेमाडपंती मंदिराच्या पुनर्विकासासाठी १४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. esakal
Mumbai : राहेर येथील हेमाडपंती नृसिंह मंदिर अतिप्राचीन असून, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. राज्य संरक्षित मंदिर आहे. मात्र, राजकीय अनास्थेमुळे योग नृसिंह मंदिराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.
मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने १४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे.
वास्तू शिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या ऐतिहासिक मंदिरे व इतर पुरातन वस्तू जोपासणे व ती नष्ट न होऊ देण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाच्या अधिकारकक्षेत येते, पण या बाबीकडे शासनाचा पुरातत्त्व विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने महाराष्ट्रातील ही ऐतिहासिक वास्तू मोडकळीस आली होती.
चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदापात्राच्या तीरावर राहेर येथे हेमाडपंती मंदिराचा अतिशय उत्कृष्ट वारसा नायगाव तालुक्याला लाभला आहे.
हे हेमाडपंती मंदिरात नृसिंहाची देखणी व लोभस मूर्ती असून, याची पूजा-अर्चा व नित्य सेवा करण्याची जबाबदारी राहेर येथील कुलकर्णी परिवाराकडे आहे. ते दररोज पूजा अर्चा व सेवा करतात, पण सध्या या ऐतिहासिक हेमाडपंती मंदिराची मोठी दुरवस्था झाली आहे.
राहेर येथील हे नृसिंह मंदिर हिंदूंचे श्रद्धास्थान असून, नृसिंहाच्या दर्शनासाठी भाविक दुरदूरवरून येतात. पण, मंदिराची झालेली अवस्था पाहून भाविक खंत व्यक्त करतात. हे हेमाडपंती मंदिर शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र, पुरातत्त्व विभाग याकडे लक्ष देत नव्हते. अखेर राज्य शासनाने याची दखल घेतली असून, पर्यटन विभागाच्यावतीने १४ कोटी आठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
नियोजनबद्ध विकास गरजेचा
यापूर्वी शासनाकडून मंदिराच्या विकासासाठी ७७ लाखांचा निधी मिळाला आहे; पण संबंधित गुत्तेदाराने विकासकामांच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भग्नावस्था प्राप्त झाली होती.
गोदावरी नदी किणाऱ्यावर असलेले नृसिंह मंदिर राज्य संरक्षित असून, या मंदिराचा नियोजनबद्ध विकास केल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळू शकते.
भारतातल्या या हिल्स स्टेशनवर जाण्यासाठी लागतो E-Pass? जाणून घ्या कसा काढायचा
E-pass for Hill Station:
कोणत्याही ऋतूत हिल स्टेशनवरील वाऱ्याची झुळूक अंगावर घेणं रोमांचक वाटतं. त्यामुळेच, देशातील अनेक हिल्स स्टेशनवर गर्दी पहायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी लोकांना हिल स्टेशनवर जाणे आवडते. येथे त्यांना उन्हापासून आराम मिळतो. यासोबतच लोकांना भरपूर आनंदही मिळतो.
मात्र उन्हाळ्याच्या काळात हिल स्टेशनवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी हिल स्टेशनवर जात असाल तर तुम्हाला यासाठी ई-पास आवश्यक आहे. होय, तमिळनाडूच्या हिल्स स्टेशन असलेले उटी किंवा कोडाईकनालला जाणाऱ्या लोकांना आता सोबत ई-पास ठेवावा लागेल. या दोन्ही ठिकाणी ई-पासशिवाय प्रवेश मिळणार नाही.
मद्रास उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठातील न्यायाधीश एन. सतीश आणि बी. भरत चक्रवर्ती यांनी या दोन हिल स्टेशनला भेट देऊ इच्छिणाऱ्या वाहनांसाठी ई-पास जारी करण्यास सांगितले आहे.
उन्हाळ्यात हिल स्टेशनवर पर्यटकांची वाढती गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची आकडेवारी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ई-पासद्वारे सर्व लोकांच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की या दोन हिल स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी ई-पासची आवश्यकता 30 जून 2024 पर्यंत लागू राहील. (E-Pass For Hill Stations)
उटी आणि कोडाईकोनालसह निलगिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ई-पास आवश्यक असेल. स्थानिक रहिवासी असो, शेतकरी असो की बाहेरून येणारा पर्यटक – प्रत्येकासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मात्र तामिळनाडू सरकार प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगांचे ई-पॅासेस जारी करणार आहे. ई-पास 3 रंगात जारी केला जाणार आहे.
स्थानिक रहिवाशांना हिरव्या रंगाचा ई-पास जारी केला जाईल आणि शेतातून आणि इतर ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या लोकांना निळ्या रंगाचा ई-पास दिला जाईल. त्याचबरोबर पर्यटकांना जांभळ्या रंगाचे पास दिले जातील.
E-Pass कसा काढायचा?
https://epass.tnega.org वर लॉग इन करा,
देशाच्या नागरिकत्वाच्या आधारावर Within India किंवा Outside India पर्यायावर क्लिक करा
आता मोबाईल नंबर Add करा
OTP भरल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
यानंतर तुमच्याकडे नाव,पत्ता,किती वेळ थांबणार आहेत ती वेळ, आणि गाडीचा नंबर मागितला जाईल.
पुदुच्चेरीची निसर्गरम्य सफर
भारती भांडेकर
मानवी जीवन आंनददायी बनवायचे असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात राहून तो बनवू शकतो. निसर्गाच्या अपूर्व व असाधारण अनुभव अपरिमित आनंद देतो. अशाच वैभवाचे साक्षीदार म्हणून मी नुकतेच पुदुच्चेरी ( पॉंडेचरी) येथे भ्रमंती करायला गेले. विशाल समुद्र किनारा, छोटस पण टुमदार शहर, अगदी शांत आणि समाधानी लोक इथे पहायला मिळाले. शहर म्हणाव तर रहदारी, गर्दी म्हणून नव्हती.
या छोट्याशा शहरात पर्यटन स्थळ भरपूर आणि पर्यटकही भरपूर. ओरो व्हीला, साधना फाॅरेसट, जीपमेअर मेडिकल कॉलेज, फ्रॅन्च काॅलनी, मैत्र मंदिर, अरविंद घोष यांचा आश्रम, वाळूच बन, चर्च, विविध मंदिर या सर्वाचा समावेश पहाताना दृष्टी स्तब्ध होते. या शहराच वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आलेले फ्रेंच लोक.
त्यांचे सुंदर, भव्य पॅलेससआणि अजूनही त्यांच इथल्या मातीवरचे वास्तव्य बघितले आपण वेगळ्या विश्वात आलो असेच वाटते. आता अनेक फ्रेंच पॅलेस हे हाॅटेल व्यवसायात आले आहे. या सर्व हाॅटेलमध्ये खास फ्रेंच पदार्थ मिळतात. फ्रेंच लोकांच इथल वास्तव्य बघितल्यानंतर मला सहजच प्रश्न पडला की, त्यांच्या वागण्यात एवढी सहजता कशी काय. तेव्हा कळल की, ते या भारत देशात रहातात. पण त्यांना मतदानाचा अधिकार नाही. पण आपल्या देशात त्यांना व्यवसाय करायला, रहायला आवडत, याच मला कौतुक वाटल.
रोजगाराच्या संधी तशा कमीच पण आनंदी आयुष्याची उर्मी मात्र जबरदस्त. या ठिकाणी मैत्रमंदिर आहे, जिथे १२७ देशातील लोक एकत्र रहातात. त्यांना ना भाषेची अडचण ना खाण्याची. त्यांच्या कीतीतरी पिढ्या इथेच वास्तव्यास आहे. शाळा ही संकल्पनाच इथे नाही. फक्त निसर्गाच्या सान्निध्यात राहून अनुभवातून शिक्षण इथे मिळते.
अनौपचारिक शिक्षण प्रणालीत हे विद्यार्थी घडतात. खरी धर्म निरपेक्षता मला या ठिकाणी पहावयास मिळाली. कोणतीही पदवी नसताना तो आदर्श नागरिक होतो. मैत्रमंदिरात लोक खास मेडिटेशन साठी येतात. अरविंद घोष यांनी हे मैत्रमंदिर निर्माण केले आणि जगात मैत्रीच्या नात्याचा संदेश पोचवला. शाश्वत नात ते फक्त मैत्रीचच. अनेक देशातील लोक एकत्र रहातात पण कुठेही तू तू मै मै नाही. जगावेगळ जगण निसर्गच शिकवत, हेच खर.
अरविंद घोष यांच साधना फॉरेस्ट हे तर जगावेगळच म्हणाव लागेल. ७० एकरमध्ये हे जंगल पसरलेल आहे. सर्व जगातून येथे पर्यावरण प्रेमी येतात. जंगलालाच आपल कुटुंब मानतात. आपल घर मानतात आणि त्या जंगलावर भरभरून प्रेम करतात. या जंगलात लाईट नाही, आधुनिक रस्ते नाही, गॅस नाही की सिंमेटच घर नाही. आपल्या शहरासारखी संडास बाथरूम नाही. राहण्यासाठी इथे कुटीया तयार केल्या आहेत.
या दिवसात उकडलेल अन्न ते खातात. नारळाच्या दूधाचा चहा पितात. कुठेही भेसळ नाही आणि जगण्याची भीती नाही. हे जंगल पाहिल आणि येथे रहाणारे सेवाव्रती पाहिले की, आपण वेगळ्याच विश्वात आलो असे वाटते. ही माणस मोबाइलशिवाय रहातात. अंधारात आनंदाने झोपतात. जंगली प्राण्याची भीती नाही की, सरकारकडून कुठल्याही अपेक्षा नाही. त्यांच्या जगण्याच्या गरजा अत्यल्प म्हणजे नाहीच.
अनेक देशातील लोक जंगलाची सेवा करायला येतात आणि जंगलाच अस्तित्व अबाधित ठेवतात हे विशेष. ही जगावेगळी माणस कर्तव्यनिष्ठ आणि खूप प्रामाणिक वाटली. इथल्या विशाल समुद्र आणि त्या समुद्रात मोरांबी जंगल पहावयास मिळाले. इथे मगरींच वास्तव्य आणि पाण्यातील मोठमोठे साप दिसतात. पण तरीही पर्यटक आवर्जून या समुद्र जंगलात जातात. हे विशाल भव्य अदभूत सौंदर्य पाहून माणूस स्तब्ध होतो. निसर्गाच्या भव्यतेचा हा वेगळा परिचय पर्यटकांना हवाहवासा वाटतो. या शहरातील विविधतेत अरविंद घोष यांचा आश्रम आणि त्यातील अलौकिक वस्तू संग्रहालय तर आपण विसरू शकत नाही.
पाच हजार वर्षांपूर्वीच झाड आजही या आश्रमात पहायला मिळत. अनेक वर्षांचा तो इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि मानवी जनजीवन त्या काळातील उलगडत जाते हे सामर्थ्य त्या आश्रमातील वस्तूंमध्ये पहावयास मिळते. विशाल समुद्र किनाऱ्यासोबत विशाल मानवी नात्याचा वेगळा परिचय या ठिकाणी येतो हे नक्कीच. निसर्गाच्या भव्यतेचा आणि दिव्यतेचा अलौकिक संगम निसर्ग आणि आम्ही हे नात जोडताना जाणवतो.
बिहारमध्ये असलेल्या या कुंडात माता सीतेने दिली होती अग्नि परीक्षा, हे पाणी आजही देते साक्ष
Sita Mata Kund :
रामायणात वनवास भोगत असताना माता सीतेला रावणाने पळवून नेले. त्यानंतर वानरांची सेना बनवून प्रभू श्री रामांनी रावणाचा आणि त्याच्या लंकेचा वध केला. त्यानंतर आदरपुर्वक माता सीतेला घेऊन ते अयोध्या नगरीत परतले.
पण, अयोध्येत परतल्यानंतरही सीता मातेचा वनवास संपला नव्हता. रामायणातील कथांनुसार, सीता मातेला अयोध्येत अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. जिथे सीता मातेने ही परीक्षा दिली तिथे एक कुंड आहे. ज्याचे पाणी आजही गरम आहे.
होय, रामायणातील पाऊलखुणा दर्शवणाऱ्या इतर ठिकाणांपैकीच बिहारमधील एक कुंड आहे. बिहारमध्ये असलेल्या मुंगेर या ठिकाणी गरम पाण्याचा कुंड आहे. ज्याला सीता माता कुंड असेही म्हणतात.
बिहारच्या मुंगेरमध्ये रामायणाशी
संबंधित अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी एक सीता कुंड आहे. असे मानले जाते की
इथे माता सीता निवास करते. तिथे गरम पाण्याचे कुंड तयार झाले आहे त्याचे
पाणी नेहमी गरम असते. या ठिकाणाला रामतीर्थ असेही म्हणतात.
या कुंडातील पाणी नेहमीच गरम का असते हे आजही एक गूढच आहे. या परिसरात माता सीताकुंड सोबत जवळच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या नावाने चार कुंड आहेत. परंतु सीताकुंडाचे पाणी नेहमीच गरम असते. तर इतर चार तलावांचे पाणी थंड आहे. हे अजूनही लोकांसाठी न सुटलेले कोडे आहे.

शास्त्रज्ञांनी केले संशोधन
सीता कुंडातील गरम पाण्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक वेळोवेळी येथे संशोधनासाठी येतात. मात्र आजतागायत हे गूढ कोणालाच उकलता आलेले नाही. या तलावाची लांबी आणि रुंदी २० फूट तर तलाव १२ फूट खोल असल्याचे सांगण्यात आले.
शास्त्रज्ञांनी एक चाचणी घेतली होती. त्यात असे सांगण्यात आले की येथील पाणी आठ महिने गरम असते. उन्हाळ्यात येथील पाण्याचे तापमान कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
उन्हाळ्यात फिरण्यासाठी ऋषिकेशजवळची 'ही' ऑफबीट ठिकाणे आहेत बेस्ट, बजेटमध्ये ट्रीप करा प्लॅन
Travel Diaries : सध्या देशातील अनेक भागांमध्ये उकाडा प्रचंड वाढला आहे. मे महिन्यामध्ये तर उष्णतेची तीव्रता अधिक वाढते. त्यामुळे, या दिवसांमध्ये जर तुम्हाला उकाड्यापासून दूर कुठेतरी फिरायला जायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कारण, आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्यासाठी बेस्ट असलेल्या उत्तराखंड राज्यातील काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. उत्तराखंड हे राज्य पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. येथील विविध हिलस्टेशन्स पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात.
उन्हाळ्यात थंड आणि आल्हाददायक वातावरणात फिरायला जाण्यासाठी उत्तराखंड हा उत्तम पर्याय आहे. उत्तराखंड राज्यात स्थित असलेले ऋषिकेश हे ठिकाण पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला ऋषीकेशजवळील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल.
कानातल
उत्तराखंड राज्यातील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये मसुरी, ऋषिकेश, नैनिताल, मुक्तेश्वर किंवा अल्मोडा इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे. परंतु, उन्हाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. कानातल हे ऋषिकेशजवळील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
या ठिकाणी निसर्गाचा सुंदर नजारा पहायला मिळतो. शिवाय, या ठिकाणी गर्दी ही कमी असते. उंच पर्वत, हिरवीगार जंगले आणि देवदारची झाडे कानातलच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.
देवरिया ताल
देवरिया ताल हे ठिकाण उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. हे एक लोकप्रिय ठिकाण असून या ठिकाणी सुंदर तलाव आणि घनदाट जंगल आहे. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
उन्हाळ्यातील उकाड्यापासून आराम मिळवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. या तलावासोबतच, तुम्ही या परिसरातील त्रियुगीनारायण मंदिर, चोपटा, तुंगनाथ इत्यादी ठिकाणे देखील पाहू शकता.
डोडीताल
डोडीताल हे ठिकाण उत्तराखंड राज्यात स्थित आहे. उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात हा डोडीताल नावाचा सुंदर तलाव आहे. ऋषिकेशपासून हे ठिकाण सुमारे ९० किमी आहे. हा तलाव पाहिल्यानंतर तुम्हाला नैनितालची आठवण येईल, यात काही शंका नाही.
विशेष म्हणजे या ठिकाणाला पौराणिक महत्व आहे. याच ठिकाणी श्रीगणेशाचा जन्म झाला असे, मानले जाते. त्यामुळे, या ठिकाणाला गणेशताल असे ही म्हटले जाते. येथील थंड वातावरणात तुम्हाला निवांत वेळ घालवता येईल, शिवाय ट्रेकिंग ही करता येईल.
भारतातल्या या मंदिरात मासिक पाळीच्या काळातही महिलांना दिला जातो प्रवेश, केवळ महिलांनाच आहे पुजेचा मान!
Mata Ling Bhairavi Temple : भारत हा मंदिरांचा देश आहे. इथे प्रत्येक गावात किमान १०-१५ मंदिरे आढळतात. इतकेच नाहीतर आपल्या देशात अनेक अतिप्राचिन मंदिरे आहेत. या सगळ्या मंदिरांमध्ये पुरूषमंडळीच पुजारी असतात. देवी-देवतांचा अभिषेक, नित्य पूजा तेच करतात. भारतात असेही एक मंदिर आहे जिथे महिला पुजारी आहेत.
होय तुम्ही बरोबर ऐकलेत, महिला पुजारी आहेत ही नवी गोष्ट नाही. पण, महिलांना मासिक पाळीच्या काळात सुद्धा या मंदिरात प्रवेश दिला जातो. आणि देवीची पूजाही या महिला पाळीच्या काळात करू शकतात. (Mata Ling Bhairavi Temple,Tamilnadu)
खरं तर देशात सर्वत्रच महिलांना येणारी मासिक पाळी अशुद्ध समजली जाते. या काळात महिलांना देवाची पूजा तर सोडाच पण घरात मोकळेपणाने वावरताही येत नाही. कारण, अशा महिलांना घरातील एका वेगळ्या रूममध्ये चार दिवस घालवावे लागतात.
गडचिरोली भागातील भामरागड इथे तर महिलांना पाळीच्या काळात गावापासून दूर असलेल्या झोपडीत रहावं लागतं. त्यांच्यासाठी हा काळ कठीण असतो. अशातच सर्व महिलांना सुखावणारी एक गोष्ट घडत आहे.
ती म्हणजे तामिळनाडूतील कोइंबतूर येथे असलेल्या देवी लिंग भैरवीच्या मंदिरात महिला पूजारी आहेत. कोइंबतूर स्टेशनपासून ३० किलोमीटर अंतरावर सद्गुरू वासुदेव आश्रममध्ये हे मंदिर आहे. या मंदिरातील पुजाऱ्यांना भैरवी म्हणून ओळखले जाते. या मंदिरात देवीची पूजा, नित्य अभिषेक, सजावट, देवीचा पोषाख आरती हे सगळेच महिला पूजारी करतात.
इतकेच नाहीतर या मंदिरात मासिक पाळी झालीय म्हणून कोणा महिलेला प्रवेश नाकारला जात नाही. प्रत्येक महिला ही देवीचेच रूप आहे अशी समजूत इथल्या स्थानिक लोकांमध्ये असल्याने ते महिलांना थांबवत नाहीत.
पुरूषांना प्रवेश नाही
इतरत्र महिलांना प्रवेश नाही असे बोर्ड देशातील मंदिरांमध्ये दिसतात. मात्र, भैरवी मातेच्या या मंदिरात पुरूषांना प्रवेश नाही. तसेच, देवीच्या मंदिरात येणाऱ्या महिलांना गाभाऱ्यातही प्रवेश दिला जातो.
विदर्भातील मनसरचा प्राचीन बौद्ध स्तूप ‘अवश्य पाहा’ स्थळांच्या यादीत
Must See Heritage : मनसर येथे उत्खननात सापडलेले प्राचीन बौद्ध स्तूप आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ‘मस्ट सी हेरिटेज’ (स्मारक पहायलाच हवे)च्या यादीत समाविष्ट झाले आहे. विभागाने ‘आवर्जून पहावा’ असे आवाहनही केले आहे.
भारतात प्राचीन स्मारके, वारसा स्थळांचा वेगळा इतिहास, सांस्कृतिक कला आणि वैभव आहे. मात्र, याबाबत बहुतांश भारतीयांना, देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना माहिती नसते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील वारसा स्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी हेरिटेज'' स्थळांची यादी तयार केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना स्थळे पाहण्याचे आवाहनही केले आहे.
विदर्भातील स्थळे
नागपूर रामटेक मार्गावरील मनसर गावातील प्राचीन बौद्ध स्तूप प्रसिद्ध आहे. पर्यटक व इतिहास अभ्यासक येथे भेट द्यायला येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मस्ट सी मॉनुमेंट्स’ यादीत या स्तुपाचा समावेश केला आहे. सोबतच अमरावतीच्या चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील १५ मंदिरे ही विदर्भातील तीन स्थळे पुरातत्त्व विभागाच्या ‘आवर्जून पाहायलाच’ हवीच्या यादीत समावेश केला आहे.
२१ राज्यांतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी हेरिटेज’ अशा स्मारकांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यात २१ राज्यांतील महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत. ही यादी https://asimustsee.nic.in/index.php या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
स्मारकाला कशी भेट द्याल ?
मनसर येथील प्राचीन बौद्ध स्तुपाला कशी भेट देता येईल, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. जवळचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कोणत्या हंगामात जाणे योग्य आहे. कोणत्या सुविधा मिळतील, इतकेच नाही तर स्तुपाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंट्स’च्या सर्व स्थळांची अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
‘मस्ट सी हेरिटेज’ च्या यादीत विदर्भातील तीन स्थळांचा समावेश ही चांगली बाब असली तरी विदर्भात आणखी बरीच प्राचीन वारसा स्थळे आहेत. त्यांचा सुद्धा समावेश व्हायला हवा.
- प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त, (माजी विभाग प्रमुख- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, रातुम नागपूर विद्यापीठ)
विदर्भातील मनसरचा प्राचीन बौद्ध स्तूप ‘अवश्य पाहा’ स्थळांच्या यादीत
Must See Heritage : मनसर येथे उत्खननात सापडलेले प्राचीन बौद्ध स्तूप आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या ‘मस्ट सी हेरिटेज’ (स्मारक पहायलाच हवे)च्या यादीत समाविष्ट झाले आहे. विभागाने ‘आवर्जून पहावा’ असे आवाहनही केले आहे.
भारतात प्राचीन स्मारके, वारसा स्थळांचा वेगळा इतिहास, सांस्कृतिक कला आणि वैभव आहे. मात्र, याबाबत बहुतांश भारतीयांना, देश-विदेशातील पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना माहिती नसते. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील वारसा स्थळांचे सर्वेक्षण करून ‘मस्ट सी हेरिटेज'' स्थळांची यादी तयार केली आहे. या माध्यमातून पर्यटकांना स्थळे पाहण्याचे आवाहनही केले आहे.
विदर्भातील स्थळे
नागपूर रामटेक मार्गावरील मनसर गावातील प्राचीन बौद्ध स्तूप प्रसिद्ध आहे. पर्यटक व इतिहास अभ्यासक येथे भेट द्यायला येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक महत्त्व ओळखून ‘मस्ट सी मॉनुमेंट्स’ यादीत या स्तुपाचा समावेश केला आहे. सोबतच अमरावतीच्या चिखलदरा येथील गाविलगड किल्ला आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील १५ मंदिरे ही विदर्भातील तीन स्थळे पुरातत्त्व विभागाच्या ‘आवर्जून पाहायलाच’ हवीच्या यादीत समावेश केला आहे.
२१ राज्यांतील महत्त्वाच्या स्थळांचा समावेश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी हेरिटेज’ अशा स्मारकांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. यात २१ राज्यांतील महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत. ही यादी https://asimustsee.nic.in/index.php या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
स्मारकाला कशी भेट द्याल ?
मनसर येथील प्राचीन बौद्ध स्तुपाला कशी भेट देता येईल, याची संपूर्ण माहिती वेबसाईटवर दिली आहे. जवळचे विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, कोणत्या हंगामात जाणे योग्य आहे. कोणत्या सुविधा मिळतील, इतकेच नाही तर स्तुपाची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ‘मस्ट सी मॉन्युमेंट्स’च्या सर्व स्थळांची अशी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
‘मस्ट सी हेरिटेज’ च्या यादीत विदर्भातील तीन स्थळांचा समावेश ही चांगली बाब असली तरी विदर्भात आणखी बरीच प्राचीन वारसा स्थळे आहेत. त्यांचा सुद्धा समावेश व्हायला हवा.
- प्रा. डॉ. चंद्रशेखर गुप्त, (माजी विभाग प्रमुख- प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र, रातुम नागपूर विद्यापीठ)
भारतातल्या या मंदिरात केली जाते श्री हनुमंतांची पत्नीसोबत पूजा, मंदिराचे महत्त्वही आहे खास
Hanuman Jayanti 2024 :
महाबली श्री हनुमंतांची जयंती लवकरच साजरी होणार आहे. श्री हनुमंतांना आपण बालब्रह्मचारी म्हणून ओळखतो. गावागावतल्या पारावर, मोठ्या मोठ्या मंदिरांच्या बाहेरील कट्ट्यावर मारूतीरायांचा फोटो, मूर्ती पहायला मिळते.
गावागावातही मारूतीरायांची मंदिरे आहेत जिथे मारूतीराय एकटेच असतात. पण आपल्या भारतात असेही एक मंदिर आहे जिथे मारूतीराय त्यांच्या पत्नीसोबत विराजमान आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलेत.
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमानजी आणि त्यांची पत्नी सुरवाचला यांची पूजा केली जाते. येथे बांधलेले हे जुने मंदिर वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. स्थानिक लोक जेष्ठ शुद्ध दशमीला हनुमानजींचा विवाह साजरा करतात. मात्र, उत्तर भारतात राहणाऱ्या लोकांसाठी हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. कारण हनुमानजींना बाल ब्रह्मचारी मानले जाते.

या विवाहामागे अशी आहे पौराणिक कथा
श्री हनुमंतांनी सूर्यदेवाला आपला गुरू मानले होते. सूर्य देवाला ९ दैवी ज्ञान होते. बजरंग बली यांना या सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवायचे होते. सूर्यदेवाने या ९ विद्यांपैकी ५ विद्या हनुमानजींना दिल्या, परंतु उरलेल्या 4 विद्यांबाबत सूर्यासमोर समस्या निर्माण झाली.
उर्वरित ४ दैवी शास्त्रांचे ज्ञान केवळ विवाहित शिष्यांनाच देता आले. हनुमानजी बाल ब्रह्मचारी होते. त्यामुळे सूर्यदेव त्यांना उर्वरित चार शास्त्रांचे ज्ञान देऊ शकले नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी सूर्यदेवाने हनुमंतांना लग्न करण्यास सांगितले.
आधी हनुमानजी लग्नाला तयार नव्हते. पण त्यांना उरलेल्या ४ विद्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी ते लग्नाला तयार झाले, अशी कथा पुराणात आहे.

हनुमंतांची संमती मिळाल्यानंतर सूर्यदेवाने शक्तीने एका कन्येला निर्माण केले. तिचे नाव सुवर्चला होते. सूर्यदेवाने हनुमानजींना सुवर्चलासोबत लग्न करण्यास सांगितले. सूर्यदेवांनी असेही सांगितले की, सुवर्चलासोबत लग्न करूनही तू नेहमीच बाल ब्रह्मचारी राहशील, कारण लग्नानंतर सुवर्णचला पुन्हा तपश्चर्येत मग्न होईल.
हिंदू मान्यतेनुसार, सुवर्चलाचा जन्म कोणत्याही गर्भातून झाला नाही, त्यामुळे तिच्याशी लग्न करूनही हनुमानजींच्या ब्रह्मचर्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही. आणि बजरंग बलीला नेहमी ब्रह्मचारी म्हटले जाते.
आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?
Kalsubai Peak : महाराष्ट्राचे ‘माऊंट एव्हरेस्ट’ अशी खास ओळख असलेले कळसूबाई शिखर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. पावसाळ्यात तर येथील नजारा नयनरम्य असा असतो.
नुकतीच या कळसूबाई शिखराला प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी भेट दिली होती, याचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला होता. कळसूबाई शिखराला भेट देण्याचा अनुभव त्यांनी या व्हिडिओतून व्यक्त केला होता.
हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले होते की, ‘मी अनेकदा इगतपुरीला आलो आहे. परंतु, मला कधीच या ठिकाणाबद्दल, त्याच्या सौंदर्याबद्दल ऐकायला मिळाले नव्हते. आपण सर्वांनीच आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट देण्यासाठी वेळ काढायला हवा’ अशा शब्दांमध्ये त्यांनी कळसूबाई शिखराचे अप्रतिम वर्णन केले होते.
आज आपण याच कळसूबाई शिखराबद्दल जाणून घेणार आहोत. यंदाच्या सुट्टीत तुम्ही देखील मुलांसोबत आणि कुटुंबासोबत या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी कसे जायचे? चला तर मग जाणून घेऊयात.
कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात स्थित आहे. कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्राचे 'माऊंट एव्हरेस्ट' अशी या ठिकाणाची खास ओळख आहे. समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची तब्बल ५४०० एवढी आहे. या शिखराच्या टोकावर गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा अप्रतिम नजारा दिसतो. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. (Kalsubai Peak)
कळसूबाई शिखराला कसे जायचे?
मुंबईहून कळसूबाई पर्वतावर जाण्यासाठी कसारापर्यंत लोकल ट्रेन धावते. तुम्ही ट्रेन किंवा थेट बसने अहमदनगर किंवा अकोल्यापर्यंत जाऊ शकता. त्यानंतर, तुम्ही जीपच्या मदतीने बारी गावात पोहचू शकता.
या व्यतिरिक्त पॅसेंजर ट्रेनच्या मदतीने तुम्ही इगतपुरीलाही जाऊ शकता. इगतपुरीला गेल्यानंतर, शेअरिंग टॅक्सीच्या मदतीने तुम्ही कळसूबाई शिखरापर्यंत जाऊ शकता. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे. या गावातूनच कळसूबाई शिखरावर जाण्याचा रस्ता आहे. (How to reach Kalsubai peak?)
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झालाय अद्भुत अशा या हिंदू मंदिरांचा समावेश, पहा फोटो
Hoysala Temple : होयसळा स्थापत्य ही हिंदू मंदिर स्थापत्य कलेतील इमारत शैली आहे जी होयसला साम्राज्याच्या राजवटीत 11व्या आणि 14व्या शतकादरम्यान विकसित झाली होती. आज भारतातील कर्नाटक राज्यात 13 व्या शतकात दक्षिणेकडील दख्खनच्या पठारावर वर्चस्व असताना होयसाला प्रभाव शिखरावर होता.
या कालखंडात बांधलेली मोठी आणि छोटी मंदिरे होयसाळ स्थापत्यशैलीची उदाहरणे आहेत. ज्यात बेलूर येथील चेन्नकेसव मंदिर हळेबिडू येथील होयसाळेश्वर मंदिर आणि सोमनाथपुरा येथील केसवा मंदिर यांचा समावेश आहे. यापैकी आता चन्नकेशव मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
कर्नाटकातील तीन होयसळा काळातील मंदिरे नुकतीच ‘सेक्रेड एन्सेम्बल्स ऑफ द होयसळास’च्या एकत्रित नोंदी अंतर्गत, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
12व्या शतकात बांधलेले हे मंदिर जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे भारतातील 42 वे स्मारक आणि कर्नाटकचे चौथे स्मारक आहे. तुम्हालाही या मंदिरांचे सौंदर्य पाहायचे असेल तर जाणून घेऊया या मंदिरांची खासियत काय आहे. ही मंदिरे आणि इथे कसे जायचे.

कर्नाटकातील होयसाळ मंदिरे हे त्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहेesakal
होयसाळ राजघराणं
होयसाळ राजवंशाच्या राज्यात बांधले गेलेले मंदिर म्हणून यांची खास ओळख आहे. होयसाळ घराण्याने त्यांच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे बांधली. कर्नाटकातील होयसाळ मंदिरे हे त्याचे अतिशय सुंदर उदाहरण आहे.
होयसाळ मंदिरे इतकी सुंदर आहेत की तिथल्या दगडात काव्य लिहिलेले असते. ते द्रविडीयन आणि नागारा शैलींचे बांधकाम पाहण्यास मिळते.

या मंदिरांचा परिसर एक सकारात्मक उर्जा देतोesakal
होयसाळ मंदिरे बेलूर येथे स्थित चन्नकेसव मंदिर हे इतर मंदिरांपैकी सर्वात मोठे आहे आणि ते भगवान विष्णूला समर्पित आहे. हळेबिडूचे होयसलेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. केशव मंदिर यापेक्षा लहान आहे पण त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
या मंदिरांच्या भिंतींवर विविध देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते झिग-झॅगच्या आकारात बांधलेले आहेत.
आपण आणखी काय पाहू शकता?
या तीन मंदिरांव्यतिरिक्त, केदारेश्वर मंदिर, गोरूर धरण, बसदी हल्ली, पुरातत्व संग्रहालय, श्रावणबेळगोला यांसारख्या इतर अनेक पर्यटन स्थळांनाही तुम्ही भेट देऊ शकता. केदारेश्वर मंदिर हा होयसाळ मंदिराचा एक भाग आहे. येथे असलेली नंदीची मूर्ती या मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

केदारेश्वर मंदिर हा होयसाळ मंदिराचा एक भाग आहेesakal
श्रवणबेळगोला हे दक्षिण भारतातील प्रमुख जैन तीर्थक्षेत्र आहे. बसडी हल्लीमध्ये तीन अतिशय प्रसिद्ध जैन मंदिरे आहेत - पार्श्वनाथ स्वामी मंदिर, आदिनाथ स्वामी मंदिर आणि शांतीनाथ स्वामी मंदिर. या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याचा आनंदही तुम्ही घेऊ शकता.
होयसाळ मंदिरात कसे जायचे
हि मंदिरे म्हैसूरपासून 150 किमी आहे. म्हैसूरहून इथे पोहोचायला तीन तास लागतात. ट्रेन किंवा फ्लाइटने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. याशिवाय बंगलोरहूनही तुम्ही इथे सहज येऊ शकता. इथून होलबिडूला पोहोचायला ४ तास लागतात.

हि मंदिरे म्हैसूरपासून 150 किमी आहेesakal
ऐतिहासिक वीरगळांचे माहेरघर - वेळापूर
नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक, सोलापूर
वेळापूर येथे ऐतिहासिक वीरगळांचे संग्रहालय आहे. युद्धात धारातीर्थी पडलेल्या वीरांचे ऐतिहासिक प्रसंग संग्रहालयामधील वीरगळांवर कोरलेले आहेत. असे दीडशेहून अधिक वीरगळ संग्रहालयामध्ये आहेत. याशिवाय येथील अर्धनारी नटेश्वराचे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याच मंदिरातील हर गौरीची दुर्मिळ मूर्ती विशेष लक्षवेधी आहे.
माळशिरसपासून 18 कि.मी. अंतरावर वेळापूर हे ऐतिहासिक गाव वसलेले आहे. गावास ऐतिहासिक घटनांची जणू परंपराच लाभली आहे. सिंदखेड येथील लखूजी जाधव यांच्या घराण्यातील खंडोजी जाधव यांना सन 1666 मध्ये आदिलशहाकडून वेळापूर गाव इनाम मिळाले, अशी नोंद कागदपत्रांतून दिसून येते.
गावाच्या मध्यवर्ती भागात अर्धनारी नटेश्वराचे मंदिर आहे. मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून, त्यात अनेक स्वतंत्र मंदिरे आहेत. प्रांगणाच्या समोरच भव्य चौकोनी आकाराची विपुल पाणी असलेली बारव आहे. बारवाच्या पायऱ्यांशेजारी एक यादव काळातील शिलालेख आहे. शालिवाहन शके 1227 मध्ये मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी सोमवारी यादव राजा रामचंद्र देव याचा अधिकारी ब्रह्मदेव राणा याने श्री वटेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे कोरलेले आहे. त्या शिलालेखासमोर आयताकृती सभामंडप आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.
याच मंदिराच्या मागे नंदी मंडप आहे. त्यासमोर भाविक भक्तगणांना राहण्यासाठी ओवऱ्या देखील आहेत. ओवरीत शिलालेख आहे. या शिलालेखात यादवांचा राजा रामचंद्र देव याचा अधिकारी श्री जोईदेव याचा सहकारी ब्रह्मदेव राणा याचा भाऊ बोईदेव राणा यांनी मंदिराजवळ मठ व ओवऱ्या बांधल्या, असे नमूद आहे. मंदिरावर चालुक्य स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
सभामंडपाच्या मध्यभागी नंदी आहे. सभामंडपात दोन सप्तमातृका शिल्पपट आहेत तसेच गणपती, महिषासुरमर्दिनी, चामुंडा देवी, सरस्वती देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी आहे. मुख्य गर्भगृहाच्या पीठावर हर गौरीची आलिंगन मुद्रेतील अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. मूर्तीची प्रभावळ कीर्तिमुखाने सुशोभित केलेली आहे.
तिच्या दोन्ही बाजूस अष्टदिकपाल कोरलेले आहेत. शिवाच्या हातात त्रिशूळ, जपमाळा, पाच फण्यांचा नाग दिसून येतो. हर गौरीची मूर्ती अलंकारांनी सजवलेली आहे. शिवाच्या पायाजवळ नंदी आहे. तर गौरीच्या पायाजवळ तिचे वाहन घोरपड आहे. तिच्या शेजारी गणपती आहे. अशी विलोभनीय हर गौरीची मूर्ती राज्यात एकमेव आहे.
याच मंदिरासमोर वीरगळांचे संग्रहालय आहे. ते पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहे. वेळापूर, म्हाळुंग, तोंडले, बोंडले परिसरातील सुमारे 150 हून अधिक वीरगळ या संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहेत. हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव वीरगळ संग्रहालय आहे. तेथून काही अंतरावर वटेश्वराचे महादेव मंदिर व जैन मंदिर आहे.
गावात भव्य वेस आहे. वेशीसमोर काळा मारुती मंदिर आहे. गावाबाहेरील बाजूस खंडोबा मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणात महादेव व काही मूर्ती दिसून येतात. शेजारी दीपमाळा व ओवऱ्याही आहेत. तेथून काही अंतरावर यादव काळातील मंदिर आहे. त्यास स्थानिक लोक गणिकेचा महाल म्हणतात. त्याशेजारी विस्तीर्ण तळे आहे. हा परिसर अत्यंत निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याच मंदिरासमोर तीन मुखमंडप असलेले भैरवाचे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तिच्या शेजारी मोठी विश्रांतिका आहे, ती आजही सुस्थितीत आहे.
आमच्या वेळापुरात खूप वीरगळ आहेत. त्यांचे संग्रहालय देखील आहे. त्यामुळे वीरगळांचे गाव म्हणून वेगळी आहे. अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये राज्यातील दुर्मिळ अशी हर गौरीची मूर्ती आहे, याचा आम्हास अभिमान वाटतो. राज्यभरातून वर्षभर असंख्य पर्यटक येथे येतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी येथे राज्य सरकारच्या वतीने पर्यटन निवास व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.
- रजनीश बनसोडे, सरपंच, वेळापूर
हत्तरसंग कुडलचा वारसा सर्वोत्तम
जिल्ह्यात सर्वोत्तम ऐतिहासिक वास्तूमध्ये हत्तरसंग कुडल व कोरवलीचे महादेव मंदिराचा समावेश करावा लागणार आहे. या शिवाय सोलापूरचा भुईकोट किल्ला व त्यातील मल्लिकार्जुन मंदिर, अकलूजचा किल्ला ही स्थळे देखील विकसित करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसास्थळे म्हणून अनेक महत्त्वाची स्थळे आहेत. त्यापैकी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व हत्तरसंग कुडलचे मंदिराची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. पण प्रत्यक्षात कोरवलीच्या महादेव मंदिराकडे होणारे दुर्लक्ष हे अक्षम्य आहे. या मंदिरावरील शिल्पकला निव्वळ अप्रतिम आहे. या शिवाय माळशिरस तालुक्यातील जमिनीखालील सर्वात मोठे जैन मंदिर हे देशात एकमेव आहे. सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्यासह त्यातील मल्लिकार्जुन मंदिर व शहरातील मल्लिकार्जुन मंदिर हे कलासंपन्नतेचा आविष्कार आहे.
इतिहास अभ्यासकांचा ऐतिहासिक स्थळांचा पसंतीक्रम
नितीन अनवेकर (अध्यक्ष वारसा फाउंडेशन)
अक्कलकोट येथील आशिया खंडातील सर्वात मोठे शस्त्र संग्रहालय
सोलापूरचा भुईकोट किल्ला
हत्तरसंग कुडल मंदिर समूह
सिद्धेश्वर मंदिर
वेळापूरचा मंदिर समूह
डॉ. लता अकलूजकर (इतिहास अभ्यासक व लेखिका)
हत्तरसंग कुडल मंदिर
सिद्धरामेश्वर जन्मस्थान सोन्नलगी
सोलापूरचा भुईकोट किल्ला व मल्लिकार्जुन मंदिर
अकलूजचा किल्ला
कोरवलीचे महादेव मंदिर
प्रो. डॉ. प्रभाकर कोळेकर (संचालक, कौशल्य विकास केंद्र,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ)
हत्तरसंग कुडल मंदिर
विठ्ठल मंदिर पंढरपूर
नारायण चिंचोली येथील सूर्य मंदिर
कोरवली येथील महादेव मंदिर भुईकोट किल्ल्यातील व बाहेरील मल्लिकार्जुन मंदिर
सीमंतिनी चाफळकर (वास्तू तज्ञ व अभ्यासक)
हत्तरसंग कुडल मंदिर
सोलापूरचा भुईकोट किल्ला
वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिर समूह
पंढरपूर मंदिरे-वाडे व घाट
माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर, घाट व जटाशंकर मंदिर
प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण (इतिहास अभ्यासक)
हत्तरसंग कुडल मंदिर
करमाळ्याचे कमलादेवी मंदिर
वेळापूरचे अर्धनारी नटेश्वर मंदिर
बार्शीचे भगवंत मंदिर
सोलापुरातील इंद्रभुवन इमारत.
अयोध्येतील श्री रामांचं मंदिर नागर शैलीत का बांधलं आहे? काय आहे नागर शैली?
Ram Navami 2024 :
अखेर रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहेत. सर्वच स्तरावर राम मंदिर अतिशय भव्य असावे यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट जाणून घेण्यासारखी आहे ती म्हणजे हे मंदिर नगर स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. राम मंदिरासाठी नागरा शैली वापरण्यात आली आहे. कारण ती उत्तर भारतात आणि नद्यांना लागून असलेल्या भागात प्रचलित आहे. या वास्तूकलेची काही खास वैशिष्टय आहे.
मंदिर उभारण्याच्या प्रसिद्ध शैली कोणत्या?
नगर, द्रविड आणि वेसर या मंदिर बांधणीच्या तीन शैली देशात प्रमुख होत्या. पाचव्या शतकातील उत्तर भारतातील मंदिरांवर हा प्रयोग सुरू झाला. मध्यंतरी दक्षिणेत द्रविड शैली विकसित झाली होती. नगर शैलीत मंदिर बांधताना काही खास गोष्टींची काळजी घेतली जाते.
गर्भगृह हे सर्वात पवित्र स्थान आहे
गाभाऱ्यातच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहेत. याच्या वर एक शिखर आहे. दोन्ही ठिकाणे अत्यंत पवित्र आणि मुख्य मानली जातात. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. यासोबतच आणखीही अनेक मंडप आहेत. त्यावर देवी-देवतांचे किंवा त्यांच्या वाहनांचे, फुलांचे कोरीव काम केलेले आहे. यासोबतच मंदिराचा कलश आणि ध्वजही आहे.
या शैलीचा प्रसार हिमालयापासून विंध्य पर्वतरांगांपर्यंत दिसून येतो. वास्तुशास्त्रानुसार, नागर शैलीतील मंदिरांचे बांधकाम पायापासून ते काळसाच्या टोकापर्यंत चौकोनी असते. पूर्ण बांधकाम झालेल्या नागर मंदिरात गर्भगृह, त्याच्या समोर अनुक्रमे सभामंडप आणि अर्धमंडप आढळतात. एकाच अक्षावर एकमेकांना जोडलेले हे भाग बांधले जातात.
नागरा या शब्दाची उत्पत्ती नगर या शब्दातून झाली आहे. शहरात सर्वप्रथम मंदिर बांधण्यात आल्याने त्यांना नगर असे नाव देण्यात आले. शिल्पशास्त्रानुसार नागर शैलीतील मंदिरांचे आठ मुख्य भाग आहेत
पाया ज्यावर संपूर्ण इमारत बांधली गेली आहे.
मसुरक - पाया आणि भिंती यांच्यामधला भाग
जंघा - भिंती (विशेषतः गर्भगृहाच्या भिंती)
कपोट – कॉर्निस
शिखर - मंदिराचा वरचा भाग किंवा गर्भगृहाचा वरचा भाग
ग्रीवा - शिखराचा वरचा भाग
गोलाकार अमलाका - स्पायरच्या वरच्या बाजूला फुलदाणीचा खालचा भाग
कळस - शिखराचा वरचा भाग

नागरा शैलीची परंपरा उत्तर भारतातील नर्मदा नदीच्या उत्तरेकडील प्रदेशापर्यंत विस्तारलेली दिसून येते. नागर शैलीतील मंदिरांमध्ये आराखडा आणि उंचीचे ठराविक मापदंड ठरवण्यात आलेले आहेत. ही कला सातव्या शतकानंतर उत्तर भारतात विकसित झाली, म्हणजेच परमार शासकांनी या भागात नागरा शैलीची मंदिरे बांधली, स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात नागरा शैलीला प्राधान्य दिले.
प्रभू श्रीरामाचे सिंहासन सोन्याने मढवलेले आहे. गर्भगृह आणि मजला पांढरा मकराना संगमरवरी आहे. मंदिराचे खांब बनवतानाही मकराना संगमरवरी वापरण्यात आला आहे. कर्नाटकातील चेरमोथी वाळूच्या दगडावर देवतांचे कोरीव काम केले आहे. याशिवाय राजस्थानच्या बन्सी पहारपूर येथील गुलाबी वाळूचा दगड प्रवेशद्वाराच्या भव्य आकारात वापरण्यात आला आहे.

2100 किलो वजनाची अष्टधातूची घंटा गुजरातने दिली आहे. पितळेची भांडी उत्तर प्रदेशातून आली आहेत. तर पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या विटा सुमारे 5 लाख गावांमधून आल्या होत्या.
या शैलीची मंदिरे प्रामुख्याने मध्य भारतात आढळतात
कंदरिया महादेव मंदिर ( खजुराहो )
लिंगराज मंदिर - भुवनेश्वर (ओरिसा)
जगन्नाथ मंदिर - पुरी (ओरिसा)
कोणार्क सूर्य मंदिर - कोणार्क (ओरिसा)
मुक्तेश्वर मंदिर - (ओरिसा)
खजुराहो मंदिरे - मध्य प्रदेश
दिलवाडा मंदिरे - माउंट अबू (राजस्थान)
सोमनाथ मंदिर - सोमनाथ (गुजरात)

कोणार्क सूर्य मंदिरesakal
खाडीत लालभडक उगवता सूर्य, मगरीने भरलेले जगबुडीचे खोरे अन् बरंच काही; मालदोलीत असं नेमकं आहे तरी काय?
चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य..... साधारण शंभर-सव्वाशे वर्षे मगरीने भरलेले चिवेली आणि जगबुडीचे खोरे (Jagbudi Valley). पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने खाडीकिनारी पहुडलेल्या. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर मिळेल, असा वाड्याचा परिसर. हे सर्व पाहायचं असेल तर सरळ मालदोली गाव गाठावं लागेल...!
खाडीच्या मध्यात उगवणारा सूर्य पाहायचा असेल तर सरळ मालदोली गाव (Maldoli Chiplun) गाठावं. मालदोलीमध्ये जाताना चिपळूण-गुहागर रस्ता आणि मध्ये मुंढे फाटा लागतो. तेथून भिले, केतकी, करंबवणे गाव करत जाता येते; पण माझ्या आवडीचा रस्ता म्हणजे चिपळूण बाजारपेठ ते गोवळकोट किल्ला (Gowalkot Fort) रस्ता. पुढे कालुस्ते गावाला प्रदक्षिणा घालत भिलेफाटा. तिकडून केतकी, करंबवणे करत मालदोली. हाच मार्ग का? तर दाभोळच्या बंदरात आत घुसलेली खाडी साधारण १५० किमी वळणे घेते. शेवटचे टोक म्हणजे गोवळकोट. हा १५० किमीच्या खाडीपट्ट्यात कोकणातील सागरी निसर्गजीवन अवलंबून असते.
लोटे एमआयडीसी टाकाऊ रसायने टाकते त्यामुळे हे जीवन सध्या शेवटचे घटका मोजत आहे. सतत आंदोलने आणि उपाय असा प्रकार चालू असतो तर मालदोलीला जाताना वाटेत गोवळकोट (गोविंदगड) नावाचा किल्ला लागतो. या किल्ल्याला छत्रपती शिवरायांनी भेट दिल्याचा संदर्भ आहे. किल्ला साधारण चार ते पाच एकरवर वसलेला. चहुबाजूंनी चिपळूणचे विहंगम दृश दिसते आणि संपूर्ण गोवळकोट खाडी. एकदा सहज साडेसहा वाजता या किल्ल्यावर गेलो असता साधारण दीडशे ते दोनशे धनेश पक्षी बसलेले दिसले. एवढे एकत्र धनेश पक्षी प्रथमच पाहायला मिळाले. नंतर माहिती काढली असता साधारण आठ दिवसाकरिता हे पक्षी या गडावर येतात आणि नंतर पुढे जातात, असे पक्षी निरीक्षण आहे; पण तुफान मजा आली होती.
गोविंदगड, शिवकालीन बुरूज, चुनाभट्टी, पाण्याचे टाके आणि तोफा असे अवशेष दाखवत आजही उभा आहे. तेथून तुम्ही कालुस्ते गावाला वळसा घालायचा. हा वळसा म्हणजे एक सुंदर कविता आहे. एका बाजूला मोठमोठे बंगले आणि एका बाजूला जपलेले गावपण याची सांगड आणि सोबत अतिशय दुर्मिळ असणाऱ्या खाड्यांपैकी एक खाडी गोवळकोट. तेथून अतिशय वाकडे असे कोकणी टर्न मारले की, आपण लागतो भिले रोडला आणि तेथून भिलेफाटा.
या भिलेफाट्यावर वृद्ध आजी-आजोबांचे एक दुकान आहे. तेथील कांदापोहे, बटाटावडा आणि उसळपाव एकदम चविष्ट असतात. कुठेही नाश्ता न करता पहिला मुक्काम येथे आणि मग भिले, केतकी आणि करंबवणे करत आपण मालदोली गावात पोहचतो. तेथे शैलेंद्र संसारे याचे एक छोटेखानी घरगुती रिसॉर्ट आहे. खाडीला लागूनच असल्याने पाय पसरत मस्त जेवणाची ऑर्डर द्यायची. शैलेंद्र तुम्हाला या खाडीचे वैशिष्ट्य असलेले अनव नावाचा करंगळीएवढा मासा त्याचे तिखट आणि गरम मऊ भाकरी खायला घालतो. मग निघायचे मालदोली पाहायला. मालदोलीमध्ये काय पाहायचे तर येथे खाडीत मस्त पहाटेचा लालभडक उगवता सूर्य पाहता येतो, फोटोग्राफर खुश होतात. तेथून शेकड्यात मगरी पाहायला जाता येते.
चिवेली आणि जगबुडीचे खोरे हे साधारण शंभर-सव्वाशे वर्षांच्या मगरीने भरलेले खोरे आहे. पंधरा-पंधरा फुटी मगरी शेकड्याने सहजपणे खाडीकिनारी पहुडलेल्या असतात. हे मगरदर्शन झाले की, ट्रेझरहंट करायला दिवा बेटाकडे जायचे. स्थानिक वाटाड्या झाडे तोडत तुम्हाला या बेटावर नेतो आणि साधारण दोन-तीन हजार वर्षापूर्वीचे पुरावे सापडू लागतात. भांडी, नाणी वगैरे वगैरे. हे करून दमला असाल तर पुन्हा मालदोली यायचे आणि ताम्बोशी नावाचा मासा खायचा अतिशय चविष्ट.
आता एवढं सर्व झाल्यावर डोक अजून शार्प बनवायला निघायचे मराठेवाड्याकडे. शंभर वर्षांपूर्वी कोकणात आंबा, काजू, फणस यांचे भरघोस उत्पन्न का यायचे? याचे सोपं उत्तर जाणून घ्यायला हा वाडा आवश्यक पाहायला हवा. मालदोली गावातच (कै.) रामचंद्र वासुदेव मराठे यांची हेरिटेज ठरेल, असे वास्तू आहे. हा वाडा एकूण साडेसात एकर परिसरात दोन हजार चौ. फूट बांधकामात पसरलेला आहे. वाड्याचे आरेखन , भारतरत्न अभियंता डॉ. विश्वेशरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्यांना ही वास्तू पाहण्यासारखी आहे. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य इथे जी आंब्याची बाग आहे तिथे दर चार-पाच झाडामागे सोनचाफा, बकूळ, खुरीची सुंगधित फुले देणारी झाडे लावण्यात आलेली आहेत जेणेकरून नैसर्गिकरित्या मधमाशा तिथेच फिरत राहाव्यात व परागीभवन होऊन उत्पन्न वाढावे.
सध्या आंब्याच्या बागा कमी उत्पन्नाने ग्रस्त आहेत. त्या आंबा बागायतदारांनी हा उपाय जरूर करावा. सर्वात महत्वाचे, हा वाडा वास्तूशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. अतिशय उजेड येणारी रचना, वाड्याचे दोन समान उभे भाग, संपूर्ण लाकडी काम, शंभर वर्षापूर्वीचे ड्रेनेजने गंजलेले ड्रेनेज पाईप आणि वाड्याच्या कोणत्याची मजल्यावर उभे राहिले की, दिसणारी सात एकराची आंब्याची बाग अशी रचना. जरूर हा वाडा पाहा. अर्थात, सध्या तेथे मराठे यांच्या वंशजांनी हा वाडा विश्व हिंदू परिषदेला दान केला आहे. तेथे एक वृद्धाश्रम चालवले जाते. तोही पाहता येतो. दुर्मिळ खाडी, दुर्मिळ मासे, आशियातील सर्वात मोठे नैसर्गिक मगरीचे अधिवास, विविध पक्षी आणि हेरिटेज वाडा अशी डिश भन्नाट आंब्याचा मोहराच्या वासासकट हे मालदोली गाव सर्व्ह करते. हे ठिकाण नक्कीच पाहावे असेच आहे!
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
पावसाळ्यात 'तिवडी गाव' नव्या नवरीसारखं सजतं; काय आहे गावाची खासियत?
फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
सह्याद्री आपल्याला त्याच्या कडांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे, असे समजण्याची. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो...!
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी
केसात मोकळ्या या वेटाळूनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
ना. धो. महानोर यांची ही कविता जगायची असेल तर कार, बाईक, सायकल काय मिळेल ते वाहन घ्यावे आणि चिपळूण तालुक्यातील दसपटी भागातील तिवडी गावाला भेट द्यावी. तुम्हाला कधी वाटले सालं आयुष्य खूपच रूटिन झाले आहे, मरगळ आली आहे आणि काही सुचत नाहीये तर हे गाव तुम्हाला जवळ करते, कुशीत घेते, गोंजारते आणि पुन्हा नव्याने उभारी देते नव्याने झेप घेण्याकरिता.
या गावाशी माझा संबंध आला तो आमच्या वृद्ध निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या सांजसोबत संस्थेमुळे. या गावात साधारण सात वृद्ध होते, जे निराधार होते. त्यांना दरमहा संपूर्ण किराणा द्यायचा होता; पण गाव आहे चिपळूणपासून ३५ किमी अंतरावर. अतिशय दुर्गम अशा सह्याद्रीच्या कड्यावर. कोणी कार्यकर्ता मिळत नव्हता म्हणून मी हे गाव स्वतःकडे घेतले. आज सात वर्ष झाली. दरमहा एकदा या गावात जाणे होते. पहिल्या दिवशी जो उत्साह होता तोच आजही उत्साह आहे. माझ्यामुळे या गावाचे अनेकजण चाहते बनले. कधी जायचे असले की, नंबर असतात गाडीत बसायला.
आपण चिपळूण (Chiplun) सोडले की, कराड दिशेने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जायचे आणि सरळ ३५ किमी उंच उंच चढत जायचे. सह्याद्री आपल्याला त्याच्या कड्यांवरून अलगद उंच उंच झोके देत वर वर नेत असतो. अचानक एका वळणावर गार गार वारा येऊ लागतो, हीच ती खूण. आपण सह्याद्रीच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे असे समजावे. नंतर एका बाजूला खोल दरी आणि पिटुकली गावे तर एका बाजूला उंच शिखरे. असे करत आपण गावाच्या चिंचोळ्या गेटमधून प्रवेश करतो.
हा प्रवास आणि गावाचे गेट तेथून दिसणारा अतिशय कोरीव काम केलेला सह्याद्री आणि आपण त्याच्या गर्भगृहात नतमस्तक झालेलो. सोबत वारा एवढा जोरात असतो की, तुम्ही ढकलले जाता. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्वात शुद्ध हवेचे गाव. कडांना धरून प्रवेश केला की, आत वाड्या आहेत. गावाला सर्व बाजूंनी जंगलाने व्यापलेले आहे; पण आपण अत्यंत टोकावर असल्याने सह्याद्रीच्या तासलेल्या कडा अगदी हाताला येईल, अशा दिसतात. सर्वात इथले प्रचंड आकर्षण काय असेल तर जगातील सर्व फोटोग्राफरना आकर्षित करेल, असा सूर्योदय. वातावरणात धूलीकण नाहीत आणि कडा दिसत असतात.
पहाटे साडेपाचला हजर राहायचे. एकावेळी दोन-तीन कॅमेरे लावून ठेवायचे का तर एका मर्यादेत टाईमपास मोड लावायचा म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचे रंग ते सूर्योदय पाहायला मिळतो. दुसरा कॅमेरा सभोवताली सह्याद्रीच्या सर्व कडा वेगवेगळ्या रंग फेकत असतात आणि पहिली सूर्यकिरणे सह्याद्रीवर पडताना विविध रंगांचे संमेलन भरलेले असते. या गावात कितीतरी वेळा नुसता सूर्योदय टिपायला रोज सकाळी साडेपाचला उठून मी ३५ किमी प्रवास करून एकटाच सह्याद्रीच्या कडांवर बसलेला आहे. संध्याकाळ तर बेफाट असते. प्रचंड ढग, चर्चगेटवरून बोरिवलीला जावे प्रचंड गर्दीने तसे धावत सुटलेले असतात. हे गाव ढगांच्या रेषेत समांतर येते. मी माझे काम आटपून सहज रस्त्याला उभा होतो.
समोर प्रचंड खोल दरी आणि समोर सर्व डोंगररांगा. कुठूनतरी एक प्रचंड मोठा ढग आला. जणू काही तू आमच्या गेटमध्ये का घुसलास, असे कोकणी भांडण करायला. तो माझ्या समांतर होता. साधारण अर्धा किमी हवाई अंतर असेल. ढग आला, स्थिरावला आणि मस्त आपली पोटलीची गाठ सोडली आणि साठवलेला पावूस धो धो पाडू लागला. मी अक्षरशः ढगातील धबधबा पाहत होतो. एकदा रात्री कोजागिरीला दहा वाजण्याच्या दरम्यान या गावात गेलो होतो. उंचीवरचे कडे आणि रस्ता सुरू झाला तर कारच्या पुढ्यात निळा जांभळा लाईट लागलेला रस्त्यात दिसला. पुढे पुढे निघालो तर अखंड लायटिंग. नंतर कोणीतरी माहिती दिली हा नाईटजार पक्षी लोकल भाषेत, जारवा पक्षी जिथे प्रदूषण कमी असते तिथे दिसतो; पण एवढ्या मोठ्या संख्येने तो तिवडीमध्येच दिसतो.
हा पक्षी रात्री उडताना डोळे मिचकावतो त्या वेळी त्याचे डोळे निळे, जांभळे दिसतात आणि ग्रामीण भागात बऱ्याचवेळा भूत दिसले भूत दिसले, अशी आवई उठते. तिवडी गाव (Tiwadi Village) पावसाळ्यात नव्या नवरीसारखे सजते. प्रचंड पाऊस आणि हिरवा रंग यात रंगलेले गाव. पावसात थेट सह्याद्री इथे प्रत्येक ढग अडवतो. शस्त्रक्रिया करतो, पाऊस काढून घेतो आणि ढगांना पुढे पाठवतो. त्यामुळे तुफान पाऊस पाहायचा असेल तर हे गाव गाठायचे. फक्त पावसात या गावात बऱ्याचवेळा दरडी कोसळतात. पाऊस संपला की, हे गाव कासपठार बनते. असंख्य फुललेली रानफुले, झुळझुळवाला आणि एकालयीत लाटा आदळणारा गवताचा समुद्र. कितीतरी चित्रपट शूट होतील, अशी प्रत्येक वळणावरची लोकेशन या गावाला लाभलेली आहेत.
गावाचे सरपंच रमेश पवार गावासाठी धडपडत असतात. विविध योजना मिळवून देणे वगैरे काम करतात. गावात वृद्ध एकाकी राहतात आणि काही गावकरी. या गावातील देवी पद्मावतीचा शिमगा हा सण प्रसिद्ध आहे. तसे गाव आहे छोटेखानी. फार पुरातन गाव, गावातील घरटी एक तरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात (Indian Army) असलेला किंवा निवृत्त असा आहे. अर्थात, सध्या गावात रोजगार नसल्याने बहुतांश गावातील तरुण हे नोकरीसाठी मुंबई-पुणे-चिपळूण या भागात पसरलेले. गावच्या आजूबाजूला जंगलतोडीचा शाप आहेच, जसा तो कोकणात प्रत्येक गावाला आहे. इथून पुढे जंगलात शिरायचे असेल तर वनविभागाची परवानगी लागते. तासलेला सह्याद्री, नेत्रसुखद निसर्ग, तुफान पाऊस, बेभान वारा अंगावर घ्यायचा असेल तर एकदा या गावाला भेट द्या.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
काहीतरीच काय! इथं होळीदिवशी पुरूषांकडून मार खाण्यासाठी महिला असतात उत्सुक, कारण...
Holi 2024 :
होळीनंतर ऋतूबदल होतो थंडीचा सिझन जातो आणि कडक उन्हाळ्याला सुरूवात होते. देशात होळी सणाच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशी एक परंपरा सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही म्हणाल की छे, काहीतरीच काय!
आपल्या देशात अशी एक अशी पद्धत आहे. जिथे लाडू फेकून मारण्याची परंपरा आहे. इथे पुरूष महिलांवर लाडू फेकून मारतात. या रंग नसलेल्या होळीची अनेक लोक वाट पाहत असतात. कारण, इतरांपेक्षा वेगळी असलेल्या या होळीला एक पौराणिक महत्त्व आहे. (Holi Celebration 2024)
मध्य प्रदेशातील बुधवारा येथील श्री गोकुळ चंद्र मंदिरात लाडू होळी खेळली जाते. या होळीला ३५ वर्षांची परंपरा आहे. भगवान श्री कृष्ण गोपिकांसोबत मातीचे खडे, छोटी दगडे फेकून त्यांचे माठ फोडायचे, गोपिकांसोबत होळी खेळायचे. याच धर्तीवर बुरहानपूरातील महिलांसोबत पुरूष लाडू मारून होळीचा आनंद लुटतात. (Holi 2024)
मंदिरात होळी दिवशी सायंकाळी २ तास हा कार्यक्रम पार पडतो. होळीला पुरूष राजिगऱ्याचे लाडू घेऊन मंदिरात येतात. अन् श्री कृष्णांना नैवेद्य दाखवतात. त्यानंतर तेच लाडू महिलांवर फेकून मारले जातात. आणि महिलाही हे लाडू म्हणजे श्री कृष्णांचा प्रसाद आहे असे मानून तो घरी घेऊन जातात.
भगवान श्री कृष्ण जेव्हा गोपिकांची छेड काढायचे तेव्हा गोपिका त्यांना ओरडायच्या. प्रसंगी त्यांच्या मागे काठी घेऊन पळत होत्या. त्या पद्धतीनेही वाराणसीमध्ये लठमार होळी साजरी केली जाते.
जगातलं एकमेव जंगल जिथं आहे फक्त आणि फक्त ‘महिला राज’; पुरूष गेले तर होतात असे हाल!
World Forest Day 2024 :
आज आंतरराष्ट्रीय वन दिन आहे. हा दिवस दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. जंगल आणि त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. या दिवशी, संयुक्त राष्ट्र संघ आणि अन्न आणि कृषी संघटना (FAO) अनेक कार्यक्रम आयोजित करतात.
पहिला जागतिक वन दिन २१ मार्च २०१३ मध्ये साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ही घोषणा केली. तेव्हापासून तो दरवर्षी २१ मार्च रोजी साजरा केला जातो. या वन दिनानिमित्तानेच आज आपण एका अशा जंगलाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पुरूषांना बंदी आहे अन् तिथे केवळ महिला राज चालतो.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण जगात अशीही जागा आहे जिथे एकही पुरूष नाही. आजकाल फॅड आलंय की तरूण आपल्या गाडीवर लोगो काढून घेतात ‘Girls Not Allowed’ अगदी तसंच या जंगलात पुरूषांना प्रवेश करण्यात सक्त मनाई आहे. ही जागा कोणती अन् कोण आहेत त्या महिला ज्या अज्ञातवासात राहत आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.(World Forest Day 2024 )
आम्ही ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते इंडोनेशिया देशात असून त्या जागेला पापुआ म्हणून ओळखलं जातं. तशी सगळीच वने पवित्र आहेत. पण हे जंगल जरा खास आहे. कारण या जंगलाला पवित्र जंगल म्हणूनही ओळखले जाते.
विशेष म्हणजे जगात वावरताना सतत अत्याचार,बलात्कार याची काळजी करणाऱ्या स्त्रिया इथं मोकळ्या असतात. कारण, इथं कुठल्याही पुरूषाला प्रवेश नाही. आणि जंगल आहे कुठूनही शिरता येतं असा विचार करून कोणी पुरूष गेलाच तर त्याला त्यांच्या जमातीतील पंचांसमोर उभ करून शिक्षा सुनावली जाते.
आपल्या शब्दांत सांगायचे तर पैशात ती किंमत पाच हजार असते. अन् त्यांच्या भाषेत हा दंड विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडांच्या रूपात असतो.
कसे आहे जंगलातील स्त्रियांचं राहणीमान
या जंगलातील स्त्रिया आदिवासी जमातीतील असून दक्षिण आफ्रिकेतील महिलांसारख्याच हातावर, शरीरावर गोंदवून घेतलेल्या असतात. त्या इथं नग्न वावरतात. तसेच, त्यांची आभुषणेही पक्षांची पिसे,शिंपले यांची असतात. तर त्या उदरनिर्ववाहासाठी विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यांची विक्री करतात. तसेच, जंगलातील फळे,प्राणी खाऊन जगतात.
हे जंगल आमचं घर आहे जंगलंच उरलं नाहीतर आमच्या जगण्यालाही काही अर्थ नाही. आजकाल अनेक पर्यटक येतात अन् समुद्रात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा फेकून जातात. समुद्र ही घाण पोटात घेत नाही. तो पुन्हा बाहेर फेकतो. अन् याचा आमच्या आयुष्यावर थेट परिणाम होत आहे, असे या जंगलातील एका वृद्ध स्त्रीने सांगितले.
हे जंगल सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. पण लोक याकडे दुर्लक्ष करतात, असेही त्या म्हणाल्या.
जंगलातील पाण्यात सापडणाऱ्या विशेष शिंपले विकण्यासाठी या महिला बाजारात जातात. तिथे त्यांच्या वस्तू विकल्या गेल्या की तिथूनच लागेल त्या वस्तू आणून त्या उदरनिर्वाह करतात. पण आता जंगल स्वच्छ राहीले नसल्याने शिंपले शोधण्यात जास्त वेळ जातो, असे तिथल्या महिलांना वाटते.
कोकणातील स्वप्नवत गाव 'अणसुरे'; गावात काय आहे खास?
अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वीचा सीझन. आंबे मित्रांनी मागवले होते. कुठून घ्यायचे विचार करत असतानाच राजापुरातील अणसुरे गाव आठवले. तिथले आंबेवाले सोमण बरेच दिवस पाठी होते. या घरी एकदा घर पाहायला. मुहूर्त काही मिळत नव्हता. मग, ५० बॉक्स आंबे कोणाकोणाचे अशी यादी झाली आणि स्टार्टर मारला तो थेट अणसुरे गावात (Ansure Village). कोकणचे स्वप्न म्हणूनच त्याला संबोधले पाहिजे.
अणसुरे हे गाव भारतातील पहिले गाव आहे की, ज्या गावाने स्वतःची वेबसाईट तयार केली आहे. अतिशय अनोखी माहिती या वेबसाईटवर आहे तर रत्नागिरी मार्गे आडिवरे करत अणसुरे गाठले. खरे सांगायचे तर हा समुद्र आणि आपण रत्नागिरीपासून (Ratnagiri) सोबत करत या गावात घुसतो. काही ठिकाणी एकेरी मार्ग, समुद्री पूल, दाट सुरूचे जंगल असे करत करत आपण निसर्गात खोलखोल अडकत जातो. हातातील मोबाईल बाजूला पडतात. हा फोटो काढू करत करत फोटोच फोटो काढत आपण पुढे पुढे जातो. निसर्गाने दिलेले एक पाचू रंगाचे गाव आणि त्याला लाल कातळाचे कोंदण असलेल्या गावात प्रवेश करतो.
मुक्काम सोमण यांच्याकडे होता, त्यामुळे हक्काचा यजमान, गाईड, निसर्गसेवक असे सर्वकाही जवळजवळ तेच. अणसुऱ्यातील घरे उंबरठा खाडीला लागून आणि पाठचे दार डोंगराला लागून अशा बऱ्याच वाड्यावाड्यांमधून पसरलेले. पाहू तिकडे आंबेच आंबे. चांगली चाळीस वर्षे राखलेली झाडे. उंची तर पार आडवी तिडवी. रत्नागिरीपासून साधारण ६० किलोमीटरवर अणसुरे गाव येते. गावात शिरतानाच प्रसिद्ध जैतापुराचा सडा (Jaitapur Sada) दिसतो आणि समुद्रही. त्यामध्ये साधारण एक-दोन किमीची खाडी आणि लगेच नाणार प्रकल्पाची जागा. निसर्ग एखाद्या गावाला किती भरभरून देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अणसुरे गाव. पण, विकासाच्या पाठी धावताना हे प्रचंड नैसर्गिक सामुग्री असणारे भाग लुप्त होणार आहे.
कदाचित आपली पिढी शेवटची की जी हे पाहू शकली. सोमण यांच्या घरात प्रवेश करताच आधुनिक, फ्रेश मस्त कोकम सरबत, आंबा सरबत, तळलेले गरे आणि पोहे असा नाश्ता हजर. तो खातोय तोच सोमण आले अन् म्हणाले, चला वाडी बघायला. वाडीत गेलो तर जशाचा तसा ठेवलेला जुना वाडा, साधारण शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचा. शूटिंगसाठी निर्माते वेडे होतील, असा वाडा. सर्वांत काय आवडले तर पायरहाट, बरोबर विहिरीच्या मध्यावर मोठे लाकडी सायकलसारखे चाक. चाकाचे एक टोक विहिरीतील पाणी काढण्याच्या भांड्याला दोरीने बांधलेले. आपण सायकल चालवतो तशी सायकल चालवायची की, मस्त कातळातील गोडे पाणी भराभर येऊ लागते. किती लाखो वर्षांपूर्वी हे शुद्ध पाणी तयार झाले असेल, असा प्रश्न पडतो तो आपल्याला निसर्ग मानवी उत्क्रांतीच्या चक्रातून पृष्ठभागावर आणून देतो.
आम्ही त्याच निसर्गाला पेट्रोरिफायनरी नावाचे विष बहाल करायला चाललो आहोत. सगळ्यात अणसुऱ्यात मजा म्हणजे इथे कोळी लोक छोटी तराफ्यासारखी होडी घेऊन जातात. त्यांना पैसे देऊन मस्त फिल्डिंग लावली की झालं. अणसुऱ्याच्या खाडीत मिळणारे छोटे-छोटे ताजे मासे तराफ्यावर मस्त तिखट फ्राय करून खाण्यास मिळतात. तेव्हा निसर्गाच्या अवीट चवीची अनुभूती घेतल्याचा आनंद मिळतो. अर्थात, पुढे मोठे प्रोजेक्ट आले तर हे खाडीचे वैभव नष्ट होणार हे नक्की. अणसुरे गावातून विजयदुर्ग किल्ला पाहता येतो. समुद्रात अदृश्य स्वरूपात उभी केलेली मानवी तटबंदी म्हणजे काय, त्याचे उदाहरण म्हणजे विजयदुर्ग हा अभेद्य किल्ला. हा किल्ला गाईड घेतल्याशिवाय पाहू नये. अणसुरे गावाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बागायती, मासेमारी आणि पर्यटन यावर उभी आहे. शासनाचे पर्यटन धोरण या गावात फारसे झिरपलेले नाही. त्यामुळे नकळत गावाची ठेवण आहे तशीच राहिली आहे ते पण चांगले म्हणा.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या गावाचा हापूस आंबा, रंग, चव यात किंग आहे. तुम्ही कोणताही हापूस खा आणि या पट्ट्यातील हापूस खा, तुम्हाला फरक जाणवेलच; पण दुर्दैवाने उद्या रिफायनरी आली तर प्रचंड घडामोडी या भागात होणार आहेत आणि अर्थात, परिणामदेखील होतील. या गावातून जाता जाता एक शाळा पाहिली. अतिशय मजबूत अशी ११० वर्षे झालेली शाळा; पण विद्यार्थी नाहीत या कारणाने शाळा गेली पाच वर्षे बंद आहे. पण, शाळा अगदी खाडीकिनारी. स्वातंत्र्य संग्रामात कितीतरी येथील विद्यार्थी खाडीतील पाण्याशी खेळत स्वातंत्र्याच्या गुजगोष्टी करत मोठे झाले असतील. कदाचित स्वातंत्र्यसमरातही सहभागी पण झाले असतील.
आज तीच शाळा तिची वीटही ढळलेली नाही. केवळ मुले नाहीत म्हणून बंद पाहून खूप वाईट वाटले. अणसुरे गावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणी तीन-चार एकरांत डोंगर उतारावर कुसुंब वृक्षाची देवराई आहे. पक्षी निरीक्षकांसाठी ही देवराई म्हणजे आमंत्रण. कारण असंख्य पक्षी येथे पाहायला मिळतात. अत्यंत बहुपयोगी असा हा वृक्ष आहे. ही वनराई जरूर पाहा कधीतरी. अणसुरे कोकणचे प्रतिनिधित्व हे गाव करते. असंख्य प्राचीन परंपरा, निसर्गाने निसर्गासाठी जपलेली संपत्ती म्हणजे हे गाव. कधी सवड काढून जरूर पहा.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
कोल्हापूर,नागपूर अन् जयपूर.. शहरांच्या नावातील हे ‘पूर’ नक्की काय आहे?
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गल्लीतले सगळे मिळून गावाच्या नावांच्या भेंड्या खेळायचो. त्यातही सगळ्यात जास्त शब्द हे ‘र’ वरून यायचे. कारण, शहरांची नावाच्या शेवटी पूर असायचं. भारतातील सर्वात जास्त गावं याच शब्दाने संपतात.
गावाची, शहरांची नावे तिथल्या प्रसिद्ध गोष्टींवरून ठेवली जातात. तसं पाहिलं तर, प्रत्येक शहराला विशिष्ट इतिहास आहे. कोल्हापूरात कोल्हासूर राक्षसाचा वध झाला म्हणून कोल्हापूर म्हणतात. तर, सोलापूर हे शहर सोळा गावांच्या एकत्रिकरणाने बनले आहे. त्यामुळे त्याला सोलापूर म्हणतात. पण या शहरांमध्ये पूर शब्द कॉमन आहे.
पूर हा शब्द कुठून आला. प्रत्येक नावामागे तो का लावला गेला याला एक इतिहास आहे. त्या शब्दाचा अर्थ काय याची माहिती घेऊयात.
चला लवकर, कोल्हापूर-सोलापूर गाडी भरली.. कोण हाय का अजून तिकीट घ्यायचं, असा आवाज दिवसभर बसमध्ये ऐकू येतो. तर उत्तर भारतातील अनेक शहरांची नावेही पूरनेच संपतात. जयपूर,उदयपूर, सुलतानपूर अशी नावे प्रसिद्ध आहेत.
असा हा पूर शब्द मुळचा मराठी नाहीच. तो संस्कृत शब्द आहे. संस्कृतमध्ये ‘पूर’ चा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो. त्यामुळे राजा जेव्हा आपल्या राज्याचे किंवा साम्राज्याचे नाव घेतो तेव्हा त्याच्या नावाच्या शेवटी पूर हा शब्द जोडत असे. जसे राजस्थानची सध्याची राजधानी जयपूरच्या बाबतीत घडले.
शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडणे ही काही नवीन सवय नाही, तर ती शतकानुशतके जुनी परंपरा आहे. याचा पुरावा आपल्याला महाभारत काळातही सापडतो, जिथे हस्तिनापूर हे एक मोठे साम्राज्य होते. नंतर शहरांच्या किंवा राज्यांच्या नावांना पूर हा शब्द जोडण्याची परंपरा चालू राहिली.
आज या परंपरेचा परिणाम म्हणजे भारतातील जवळपास निम्म्या शहरांच्या नावांमध्ये पूर हा शब्द जोडला गेला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की पूर हा शब्द अरबी भाषेतही आहे, जो अरबस्तानातून येणाऱ्या प्रवाशांसह भारतात पोहोचला.
३०० ते ५०० वर्षांपासून देशातल्या या गावांनी होळी साजरी केलीच नाही, कारण...
Holi Celebratrion 2024 :
तुम्हाला शोले चित्रपट आठवतोय का?. शोलेमध्ये होळी सणावेळी डाकू गब्बर सिंग सांबाला विचारतो की, होली कब है! त्यानंतर थेट होळीचा सणाचा जल्लोष दाखवला जातो. पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नाही. कारण, भारतात अशीही काही गावं आहेत जे होळी साजरी करत नाहीत.
तुम्हाला वाटेल की होळीला दुसरं काहीतरी नाव असेल. किंवा होळी दुसऱ्या एखाद्या दिवशी साजरी करत असतील. तर असं नाहीय. भारतातील काही गावांनी होळीवर बहिष्कार टाकला आहे. होळी साजरी न करण्यामागेही अनेक कारणे आहेत. ती कारणं अन् गावं कोणती याची आज आपण माहिती घेऊयात.
होळी दिवशी एकमेकांना पडकून, मागे लागून होळीचे रंग लावले जातात. लहान मुलं, अबालवृद्ध सगळेच पाण्यात चिंब होतात. रंगांची उधळण करतात. काही लोक रंगांपासून दूर राहतात. पण काही गावातील लोकांना ना रंगांची ऍलर्जी आहे ना रंग खेळण्यासाठी पाण्याची कमी पण तरीदेखील हे लोक होळी साजरी करत नाहीत. यातील पहिलं गाव आहे हरियाणा राज्यातील दुसेरपूर हे.
हरियाणातील दुरेसपूर
या गावाने ३०० हून अधिक वर्षांपासून होळी साजरी केली नाही. ज्या दिवशी संपूर्ण देश रंगात न्हावून निघतो तेव्हा दुसेरपूर गाव कोरडं असतं. कारण एका सन्याशाने या गावाला शाप दिला होता.
त्याचं असं झालं होतं की, ३०० वर्षांपूर्वी गावातील काही लोकांनी होळीच्या मुहूर्ताआधीच होळी पेटवली होती. त्यामुळे गावातील एका सन्याशाने असे करू नका, होळीला मुहूर्त वेळ पाळणं गरजेचं असतं असे सांगत होता. पण गावकऱ्यांनी त्याच काही ऐकलं नाही. तसेच त्या सन्याशाची चेष्टाही केली. तेव्हा या साधूने पेटत्या होळीत उडी घेतली आणि गावकऱ्यांना शाप दिला.
तेव्हा घाबरलेल्या गावकऱ्यांनी साधूंची माफी मागितली. तेव्हा या गावात जेव्हा कधी होळी दिवशी एखाद्या गायीला वासरू आणि महिलेला बाळ होईल त्या दिवशी गावाची या शापातून मुक्तता होईल असे साधूंनी सांगितले.
उत्तराखंड
उत्तराखंडमधील कुरझन, क्विली आणि जौदला या गावांमध्ये ३०० वर्ष झाली होळी साजरी केलेली नाही. लोककथा अशी सांगितली जाते की, या गावांचे रक्षण त्रिपुरा देवी करते. आणि या देवीला दंगा आवडत नाही. म्हणजे जास्त आवाज आवडत नाही. त्यामुळे या गावांनी होळी करणेच बंद केले आहे. रूद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले ही गावे केवळ होळीच नाहीतर ध्वनी प्रदुषण होणारा कोणताही सण साजरा करत नाहीत.
झारखंड
झारखंडमधील बोकारोच्या जवळ असलेल्या दुर्गापूर गावात १०० वर्षांपासून होळी बॅन आहे. यामागील कारण असं सांगितलं जातं की, १०० वर्षांपूर्वी गावातील राजाच्या मुलाचे निधन होळी दिवशी झाले होते. त्यानंतर योगायोग म्हणजे होळी जवळ आली असताना अचानक राजाचीह प्रकृती बिघडली.
मृत्यू समोर दिसत होता अशात होळीचा दिवस उजाडला. तेव्हा राजाने गावकऱ्यांनो सुरक्षित रहायचे असेल तर होळी साजरी करू नका असा आदेश दिला अन् राजा यमसदनी गेला.राजाच्या मृत्यूनंतर गावकरी आजही तो आदेश पाळत आहेत.
गुजरात
गुजरातमधील बसानकाठा गावातील लोक २०० वर्षांपासून होळी साजरी करत नाहीत. त्यांचेही असे म्हणणे आहे की, या गावाला काही साधूंनी शाप दिला होता. की जर होळी साजरी केली तर खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तेव्हापासून गावकरी होळी साजरी करत नाहीत.
तामिळनाडू
तामिळनाडुमध्येही होळी साजरी केली जात नाही. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात होळी जल्लोषात साजरी केली जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेदिवशी होळी साजरी केली जाते. तेव्हा दक्षिण भारतात मासी मागम साजरा केला जातो.
गोव्यातील 'या' बेटासमोर बालीचे सौंदर्य पडेल फिके, एकदा भेट द्याल तर पुन्हा जाल!
Goa Travel : भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये गोव्याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. गोव्याचे सौंदर्य एवढे अप्रतिम आहे की, दरवर्षी देश-विदेशातील असंख्य पर्यटक गोव्याला आवर्जून भेट देतात. गोव्यात अशी अनेक सुंदर आणि मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे दररोज कित्येक लोक आपल्या कुटुंबासह, मित्र-मैत्रिणींसह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आवर्जून येतात.
गोव्यातील समद्रकिनारे, किल्ले, चर्च, मंदिरे येथील नाईट लाईफ आणि खाद्यसंस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. खास करून येथील सुप्रसिद्ध समुद्रकिनारे जसे की, कळंगुट बीच, बागा बीच, अंजुना बीच इत्यादी समुद्रकिनारे अनेकांना माहित असतीलच. मात्र, या समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त गोव्यात एक असे अप्रतिम बेट आहे, ज्याच्यासमोर बालीचे सौंदर्य ही फिके पडेल. कोणते आहे हे बेट? चला तर मग जाणून घेऊयात.
दिवार बेट कुठे आहे ?
दिवार हे बेट गोव्यामध्ये स्थित असून ते चहुबाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून १० किमी अंतरावर हे मनमोहक बेट स्थित आहे. हे बेट घनदाट जंगल, निसर्गाचे सौंदर्य आणि पाण्याने वेढलेले आहे. या ठिकाणी आल्यावर तुम्हाला स्वर्गात आल्यासारखी अनुभूती येईल, यात काही शंका नाही.

diwar islandesakal
या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तुम्हाला या ठिकाणी जायचे असल्यास, जुन्या गोव्यातून केवळ फेरी बोटीद्वारे तुम्ही या बेटावर जाऊ शकता. या बेटावर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता अनुभवायला मिळेल. गोव्यात आल्यावर तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला काहीच हरकत नाही.
विशेष म्हणजे या बेटाला ऐतिहासिक वारसा लाभला असून या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पहायला मिळतात. येथे स्थलांतरित पक्ष्यांची मोठी संख्या तुम्हाला दिसून येईल. (where is diwar island)
दिवार बेटावर घालवा निवांत वेळ
दिवार बेट हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा ही काही कमी नाही. जर तुम्हाला रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल, तर त्यासाठी दिवार बेट हा उत्तम ऑप्शन आहे. येथील शांततापूर्ण वातावरणात तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. हे बेट दिसायला जरी लहान असले तरी हा परिसर निसर्गसंपन्न आहे. छोटी-मोठी झाडे, विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला नक्कीच भुरळ घालतील.

Diwar Islandesakal
दिवार बेटावर तुम्ही सायकलिंग आणि बोटिंग देखील करू शकता. सायकलिंग आणि बोटिंगसाठी दिवार हे बेट सुप्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक येथे खास सायकलिंग आणि बोटिंग करण्यासाठी येतात. यासोबतच येथील विविध प्रकारची मंदिरे, पोर्तुगीज शैलीतील घरे पाहण्यासारखी आहेत. (spends relaxing time at Diwar Island)
दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख
जिल्हा नव्हे, तर राज्यातील एक नामांकित शिवतीर्थ बनविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. सांगली जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख बनण्याइतपत ही दोन तीर्थक्षेत्रे बनू शकतील.
सांगली : जिल्ह्याच्या पर्यटन (Sangli Tourism) व धार्मिक स्थळांचा मानबिंदू म्हणून श्री क्षेत्र दंडोबा (Dandoba Temple) व श्री क्षेत्र गिरलिंग (जुना पन्हाळा) यांची ओळख आहे. भोसे, मालगाव, सिद्धेवाडी, खंडेराजुरी व खरशिंग गावच्या सुमारे १ हजार १५० हेक्टर क्षेत्रावरच्या विस्तीर्ण पसाऱ्यावर निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे.
तर तेथून जवळच असलेल्या जुना पन्हाळा अर्थात गिरलिंग देवस्थान हे देखील एक पर्यटन क्षेत्र शिवभक्तीचे केंद्र ठरू शकते. जिल्हा नव्हे, तर राज्यातील एक नामांकित शिवतीर्थ बनविण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. सांगली जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळख बनण्याइतपत ही दोन तीर्थक्षेत्रे बनू शकतील.
गिरलिंग देवस्थानची वैशिष्ट्ये
सुमारे ४०० एकर निसर्गरम्य डोंगर
सुमारे १२०० वर्षांपूर्वी शिवलिंगाची स्थापना
दाट झाडीने पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण
मानसिक स्वास्थ्य, प्रसन्न, आनंददायी निसर्ग ठिकाण
विस्तीर्ण पठारावर रंगीबेरंगी अनेक वनस्पतींचा खजिना
रामायणकालीन मंदिरात चैतन्यमय, उत्साही वातावरण
मंदिरासमोर पराशय ऋषींची, तर मंदिराच्या मध्ये वसिष्ठ ऋषींची संजीवन समाधी
अलीकडेच जांभ्या खडकातील बौध्दकालीन लेण्यांचा शोध
तीन घळींमुळे तिघई लेणी नावाचा परिसर प्रसिध्द
दंडोबाची वैशिष्ट्ये
विस्तीर्ण डोंगराच्या टोकावर पुरातन दंडनाथ मंदिर
डोंगर पोखरून पुरातन गुहेत बांधलेली पिंड, जांभ्या दगडात कोरलेला सभामंडप
नागाच्या वेटोळ्यातील दंडनाथाची मूर्ती, अखंड धुनी.
मंदिराच्या माथ्यावर सुमारे ३०० वर्षांपूर्वी उभारलेले महाकाय पाचमजली शिखर
बाजूलाच सुमारे ५ किलोमीटर अंतरावर श्री गिरलिंग देवस्थान (जुना पन्हाळा)
ट्रेकिंगसाठी आरोग्यदायी व पर्यावरणपूरक उत्तम ठिकाण
विविध प्रकारचे प्राणी, पक्षी व रंगीबेरंगी फुलांची वनसंपदा
नैसर्गिक घळी, नागमोडी रस्ता, घाट, छोटे-मोठे डोंगर, असंख्य गुहा, दऱ्या
भुयारी प्रदक्षिणा मार्ग असणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले देवस्थान
बारमाही गारवा असणारे हिल स्टेशन
बारापैकी ४ जोतिर्लिंगांच्या मूर्ती
केदारलिंग, गुप्तलिंग, काळभैरव, शिवलिंग, महिषासूरमर्दिनी,
श्री विष्णूची दगडात कोरलेली मूर्ती
निसर्गाची विविध रूपे दंडोबा डोंगर परिसरात पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी दंडोबा डोंगर परिक्रमा उपक्रम राबवण्याचा उपक्रम तीनवेळा केला. शिखरावरील ध्वजाला दृष्टिपथात ठेवून केलेली ही परिक्रमा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. एक ते दीड तासाच्या कालावधीत सुमारे सव्वासहा किलोमीटरची ही परिक्रमा विद्यार्थ्यांपासून अाबालवृध्दापर्यंत कोणीही पूर्ण करू शकेल, इतका सोपा मार्ग आहे.’’
-अभय मोरे, गिर्यारोहक, सांगली.
समुद्र मंथनावेळी बाहेर पडलेलं अमृत या मंदिरात आजही आहे, काळभैरव करत आहेत रक्षण
Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात अनेक पौराणिक गोष्टी सांगितल्या जातात. समुद्रातून अमृत बाहेर काढलं होतं ती गोष्टही तुम्ही ऐकली असेलच. देव आणि दानवांच्यात अमृत मिळवण्यासाठी झालेले युद्ध, त्यात मोहिनी रूप घेतलेले श्री विष्णू आणि विष प्राशन केलेले महादेवांची गोष्ट आहे.
त्यावेळी समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं अमृत कलश आजही आपल्याला पहायला मिळतो. तो नदीमध्ये अदृश्य स्वरूपात आहे. तो कोणत्या मंदिरात आहे. याबद्दल आपण माहिती घेऊयात.
समुद्र मंथन केल्यावर त्यातून अनेक माणके, हिरे मोती बाहेर पडले. जेव्हा अमृताचा कलश बाहेर आला. तेव्हा तो घेऊन दानव पळू लागले आणि तो कलश मिळवण्यासाठी देवही त्यांच्या पाठी पळू लागले. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. अमृताचा कलश परत मिळवावा, तो चुकीच्या हातात जाऊ नये अशी याचना सर्व देवांनी विष्णूंना केली.
तेव्हा भगवान विष्णू मोहिनी या एक सुंदर स्त्रीचे रूप घेऊन त्या ठिकाणी गेले. मोहिनी रूपावर राक्षस भाळले अन् त्या स्त्रीला त्यांनी अमृत कलश देऊन टाकला. नेवासे गावात हे अमृत वाटपाचे काम सुरू केले. मोहिनीने अमृत वाटपाला सुरूवात केली. तेव्हा सर्वात आधी देवांना अमृत वाटप केलं जात होते. अन् राक्षसांना भलतच काहीतरी दिल जात होतं.
ही गोष्ट राक्षस असलेल्या राहूच्या लक्षात आली. तेव्हा त्याने देवांचे रूप घेऊन तो तिथे पंगतीत जाऊन बसला. आणि जेव्ह अमृत त्याच्या हातात आले तेव्हा तो पिण्यासाठी तोंडाला लावणार तोच भगवान श्री कृष्णींनी सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.
राहूचं शीर उडवल्यानंतर देव-दानवांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं. या भांडणात हे अमृत प्रवरा नदीमध्ये सांडलं. प्रवरा नदीत सांडल्यानंतर अमृत प्रवाहीत व्हायला लागलं. तेव्हा महादेवांनी काळभैरव देवांना आदेश दिला की, हे काळभैरवा तुम्ही पुढे जाऊन नदीत एक कुंड बनवून त्यामध्ये हे अमृत साठवून ठेव.
भगवंत काळभैरवही आदेशाचे पालन करत प्रवरानदीच्या प्रवाहात पुढे गेले. अन् त्यांनी महादेवांचे नाव घेत त्रिशुलाने नदीत एक कुंड तयार केला. राक्षसही त्या ठिकाणी येत होते. तेव्हा काळभैरवांनी सांगितले की, अमृत तुझ्या पोटात लपवून ठेव अन् त्यावरून प्रवाहीत हो. देवांचा आदेश प्रवरा नदीनेही ऐकला अन् तिने ते अमृत लपवून ठेवले.

आजही हे अमृत कलश महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे गावात आहे. इथे नदीवर असलेल्या काळभैरवाच्या मंदिराखाली हा कलश आहे. त्यावरच पाण्यात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. आजही श्री काळभैरव त्या कलशाचे रक्षण करतात.
तसेच या अमृताच्या रक्षणासाठी आणि राक्षसांना थांबवण्यासाठी काळभैरवांनी अष्टभैरवांनाही अवाहन केले होते. अष्टभैरवांच्या आठ मूर्तीही इथे या मंदिरात पहायला मिळतात.

हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गानं 'या' गावाला दिलाय!
‘बुधल’ हे नाव समुद्राशेजारील क्षेत्र दर्शवते. प्राचीन काळी याला ‘बुद्धिग्राम’ किंवा ‘बुद्धदुर्ग’ असेही म्हणत. हे एकेकाळी भरभराटीचे बंदर होते.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
गुहागर (Guhagar) तालुक्यातील बुधल गावाची गंमत म्हणजे गाव टप्प्यात येईपर्यंत आपल्याला समुद्रकिनारा दिसत नाही आणि अचानक समुद्राचे दर्शन होते, जसे ताजमहाल पाहताना आपल्या अंदाज नसतो. पुढे ताज ताज म्हणजे नेमके काय आहे आणि अचानक अवाढव्य ताज उभा राहतो अगदी तशीच अनुभुती बुधल गावचा (Budhal Village) समुद्र किनारा समोर उभा ठाकला की देतो. हॉलिवूड, थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे.
तुम्हाला जर हॉलिवूडला (Hollywood) जायचे असेल तर लाखो रुपये खर्च येतो; पण जर अतिशय कमी खर्चात, हॉलिवूडपेक्षा लय भारी अशा समुद्रकिनारी भेट द्यायची असेल तर सरळ बुधल गाव गाठायचे. गुहागर तालुक्यातील बुधल गाव, याला बुधल सडा असेपण म्हणतात. बुधल गाव, बुधल सडा किंवा बुधलकोंड हे सरासरी पर्यटन नकाशावर नाहीत. गुहागर-वेळणेश्वर रोडवरून उजवीकडे वळणारा फाटा अडूरजवळ बुधलकडे जातो जे सुमारे ३०-४० कोळी लोकांची पारंपरिक घरे असलेले गाव, साधारण १२०० वर्ष जुने आहे.
‘बुधल’ हे नाव समुद्राशेजारील क्षेत्र दर्शवते. प्राचीन काळी याला ‘बुद्धिग्राम’ किंवा ‘बुद्धदुर्ग’ असेही म्हणत. हे एकेकाळी भरभराटीचे बंदर होते; पण आता तिथे फक्त कोळी समाज राहतो आणि मासेमारी करतो. गावातील तरुण पिढी नोकरीधंद्यासाठी पुणे-मुंबई येथे आहे. गावात शिरण्यापूर्वी तुम्हाला डाव्या बाजूला एक पाखाडी लागते. साधारण दीडशे पायऱ्या वर गेल्यावर डोंगरात दुर्गादेवीचे मंदिर (Durga Devi Temple) आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात आणि पूर्वी सोन्याचे कळस होते. तेथून संपूर्ण गुहागरचा समुद्र दिसतो. तिथे फोटोग्राफी केल्यावर थेट डोंगर उतरून गावात जायचे. तिथेच एक मोठा सडा आहे.
सडा म्हणजे कातळाची टेकडी आणि अफाट समुद्र. तुफान वेगात तो या कातळाला धडका देत असतो. काही ठिकाणी तर खडक चिरला गेला आहे. मस्त फोटो काढल्यावर आता मात्र रूपेरी वाळू आणि निळा हिरवा रंगाचा जणू पाचू कलरचा साडी नेसलेला बीच खुणावतो. असा रंग कोकणातील फार थोड्या बीचला लाभला आहे. बीचकडे जाताना कोळी घराच्या गल्ल्या गल्ल्या ओलांडत जातानासुद्धा फोटोग्राफरसाठी लुभावणारी दृश्ये पाहायला मिळतात. कोणी वृद्ध कोळी तुटलेले जाळे विनंती असतो तर कोळी आजी आदल्या दिवसाचे वाळवलेले मासे पालटत असतात. लहान मुले बिनधास्त समुद्रात उंचावरून उड्या घेत असतात. कोळी स्त्रिया घरातील कामे करत असतात आणि हळूच तुम्ही सोनवाळूमध्ये प्रवेश करता, अशी सोनेरी वाळू , हे गुहागरच्या समुद्राचे वैशिष्ट्य आहे.
अशी हुबेहूब वाळू, भुवनेश्वर किनारी आढळते आणि राजस्थानमध्ये जैसलमेरला. अलगद पायाला गुदगुदल्या करत वाळू तुम्हाला समुद्रात घेऊन जाते. या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुरक्षित बीच. अगदी लहान मुलेसुद्धा पुढपर्यंत जाऊ शकतात. कधीही बुडण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. समुद्र शांत असेल तर इथं समुद्राचा तळसुद्धा दिसतो. येथील सनसेट पाहायला विसरू नका कारण, अप्रतिम रंगाचा खेळ अनुभवता येतो. याच किनाऱ्याला थोडे पुढे चालत गेले तर छोटे छोटे कातळ आहेत. त्यावर बसून चित्रपटात पाहतो तसे नजरे क्लिक क्लिक करता येतात. या गावातच आफ्रिकेतील बाओबा नावाचे झाड आढळते.
साधारण सात लोकांनी घेर केला तर तेवढा घेर या झाडाचा आहे. स्थानिक नाव गोरखचिंच असे म्हणतात आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यात फार क्वचित ही झाडे दर्शन देतात. तिथे कोणालाही फोटो काढायला मजा येते. बीचवर जाताना वाटेतच आहे. या बीचचे मला आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे हा बीच फारसा कोणाला माहित नाही. त्यामुळे अतिशय गर्दी कमी, नसतेच कोणी म्हणाना. स्वच्छ समुद्रकिनारा आणि कोळी लोकांची लगबग. थोडक्यात, हॉलिवूड , थायलंड, पट्टाया इथला समुद्र कोकणी माणसासाठी निसर्गाने बुधल गावाला दिला आहे. कधी भेट दिलीत तर खाण्याच्या वस्तू घेऊन जा. तिथे एकही हॉटेल नाही आणि नाही तेच बरं.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
'शरीर आणि मन हलकं करणारा रानगंध'
उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात.
पावसातला, ढगातला, धुक्यातला, स्वच्छ उन्हातला हा चौकारण्यातला प्रवास अखेरीस बारमाही निवळ शंख असणाऱ्या खालच्या पाण्यापर्यंत येऊन पोहोचला होता. गच्च जंगलातली खालच्या पाण्यापर्यंतची पायपीट म्हणजे अरण्य अनुभूतीचा विलक्षण रोमांच अगदी झाडेच हिरवी नव्हेत तर दगडसुद्धा हिरव्यागार पाचूसारख्या बुरशीने वेढलेले. आरपार पारदर्शी पाण्याचे ते नितळ प्रवाह, त्यांचे सौंदर्य केवळ वर्णनातीत हे पाणी दरीत झेपावतं. ते फेसाळणारा प्रचंड जलप्रपात बनूनच.
पाण्याच्या वरच्या अंगाला चौकारण्यातला ‘खालचा भैरी’ प्रवाहाच्या काठाकाठाने त्या भैरीपर्यंत जाणं ही पुन्हा एक वेगळी रोमांचकारी अरण्यानुभती. सूर्याचा किरणही पोहोचणार नाही, अशा गच्च जंगलात पाण्याच्या प्रवाहाशेजारी दगडांच्या ओळीत एक वेगळा थोडा मोठा गोल तांदळा, तोच ‘भैरी’. भर जंगलात (Forest) शतकानुशतके वसलेल्या त्या भैरीला अक्षरश: साष्टांग दंडवत घातला. चौकारण्य अजून सरलं नव्हतं... सरणारही नव्हतं; पण दुपार उलटली होती. दिवस बुडायच्या आत माचाळ जवळ करणं आवश्यक होतं.
ओढे-नाले गच्च रानपार करत चढा उतारानं बरीच पायपीट परतीला करावी लागणार होती. सिंकाड्याचे आवाज वाढू लागले होते. शेकरुंचा चकचकाट शिगेला पोहोचला होता. पावसाचे पाणी जागोजागी मुबलक असलं तरी चराईसाठी संधीकालापासून गव्यांचा संचार वाढणार होता. अंधाराच्या आत जंगलातून बाहेर पडावं हा निसर्ग नियम आणि मुख्य म्हणजे तुकाराम आणि बहिणींचा स्वयंपाक वाडीत वाट पाहात होता. प्रत्येक जंगलात तीच झाडं, वेली, वृक्ष, पाणी-माती असलं तरी प्रत्येक जंगलाचा स्वभाव आणि सौंदर्य वेगळं असतं. त्याचा गंधही वेगळा असतो. काही जंगल कधी संपतील, असं होतं तर काही संपूच नये असं वाटतं, त्यातलंच हे चौकचं जंगल.
खरंतर हे चौकच जंगल मला पहिल्यांदा मूळचे प्रभानवल्लीच्या परिसरातले, परंतु आता कोल्हापूरकर असणारे चंदू नार्वेकर आणि उदय नागवेकरांनी सांगितल तेव्हापासून ते खुणावत होते. आज तो योग जुळून आला. सह्याद्रीच्या अंतरंगात अशा अनेक अस्पर्श जागा आहेत. त्यांचं सौंदर्य कल्पनातीत असतं अशा जागा कोणीतरी सांगतं. मग त्या जागा मनातून हटत नाहीत. सारख्या जणू बोलावतात. तेथे गेल्याशिवाय चैन पडत नाही.
तिथे आपण आणि निसर्गाशिवाय कोणीही नसतं. तिथे माणसांची गर्दी नसते. तिथे वारा मावत नाही. वास आफ्या गुदमरत नाही. उलट छातीत तो भन्नाट वारा आणि रानगंध शरीर आणि मन हलकं करतात. ती इवली रानफुलं कौतुकानं आपल्याकडे पाहात असतात. फांद्यावरचे पक्षी आपल्याकडे डोळा ठेवून असतात आणि हे सारं समजायला लागलं की आपणही त्यांच्यातलेच एक होऊन जातो आणि जंगल हे आपलं घर बनतं. (क्रमशः)
रात्रीच बंद होणाऱ्या मंदिरात दररोज महादेवांच्या पिंडीवर फुलं कोण वाहतं?
Mahashivratri 2024 : भारत हे अनेक धर्म आणि श्रद्धांचे केंद्र आहे. जगातील सर्व धर्मांमध्ये चमत्काराच्या कथा ऐकायला मिळतात. यापैकी काही चमत्कारांच्या कथा दंतकथांच्या रूपात एका पिढीकडून दुस-या पिढीला सांगितल्या जातात. तर काही आजही तेथे घडणाऱ्या रहस्यमय गोष्टींमुळे ओळखल्या जातात.
अशाच एका चमत्काराची कथा मध्य प्रदेशातील विदिशा येथील गंज बासोदा तालुक्याच्या उदयपूर गावातील महादेवाच्या मंदिराशी संबंधित आहे. दररोज सकाळी उदयपूर गावातील निळकंठेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले असता पुजारी आणि सेवकांना शिवलिंगावर असे काही सापडते जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
स्थानिक लोकांच्या मते दररोज सकाळी जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडतात. निळकंठेश्वर मंदिराचे दरवाजे उघडले असता, शिवलिंगावर फुले वाहिलेली आढळतात. स्थानिक लोक या चमत्काराबद्दल अनेक कथा सांगतात. काही लोक म्हणतात की परमार वंशाचे राज्यकर्ते शिवाचे उपासक होते. त्यांनी आपल्या 250-300 वर्षांच्या राजवटीत अनेक मंदिरे बांधली. निळकंठेश्वर मंदिर परमार वंशाचा राजा उदयादित्य याने बांधले होते.

असे मानले जाते की बुंदेलखंडचे सेनापती, आल्हा आणि उदल हे महादेवाचे इतर भक्त होते. तेच दोन वीर रोज रात्री इथे येतात आणि महादेवाची पूजा करून त्यांना कमळ अर्पण करतात. मग सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यावर महादेवाच्या चरणी फुले अर्पण केलेली आढळतात. नीलकंठेश्वर मंदिरात रात्रीच्या वेळी प्रवेश पूर्णपणे निषिद्ध आहे.
मंदिराच्या शिखरावर दिसते माणसाची आकृती
निळकंठेश्वर मंदिराशी संबंधित आणखी एक समज आहे. हे मंदिर एकाच व्यक्तीने एका रात्रीत बांधले असे लोक मानतात. बांधकाम पूर्ण करून ती व्यक्ती मंदिराच्या माथ्यावरून खाली आली होती. तेव्हा त्याची साहीत्याची झोळी वरच्या बाजूला राहिल्याचे त्याच्या लक्षात आले.
झोळी खाली घेण्यासाठी तो पुन्हा वर चढला. पण, तो खाली उतरण्याआधीच कोंबडा आरवला. अशा स्थितीत ती व्यक्ती तिथेच राहिली. त्यामुळे आजही मंदिराच्या शिखरावर त्या व्यक्तीचा आकार पाहायला मिळतो.
मुघलांनी मूर्तीचा नाश करण्याचा प्रयत्न केला
उदयपूर आता राजा उदयादित्यच्या शहरातील एका छोट्या जागेत मर्यादित आहे. त्याचवेळी महाशिवरात्रीला निळकंठेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे मंदिर विदिशाच्या गंज बासोदा तालुक्याच्या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 22 किमी अंतरावर असलेल्या उदयपूर गावात आहे. हे मंदिर स्थापत्यशैलीचा एक विशेष नमुना आहे.
मंदिराची रचना भोपाळजवळील भोजपूर महादेव मंदिरासारखी आहे. मंदिराच्या आवारात बांधलेल्या देवांच्या मूर्ती आता मोडकळीस आल्या आहेत. त्याची वाईटरित्या विटंबना करण्यात आली आहे. काही मूर्तींचे मुख गायब आहे. तर काहींचे हात गायब आहेत.

सूर्याचा पहिला किरण शिवलिंगाला अभिषेक करतो.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अशा प्रकारे बनवले आहे की सूर्याचे पहिले किरण महादेवाला अभिषेक घालते. दर महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. मुख्य मंदिर मध्यभागी बांधलेले आहे. त्याला तीन प्रवेशद्वार आहेत. गर्भगृहात शिवलिंग स्थापित केले आहे, ज्यावर उगवत्या सूर्याची किरणे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी पडतात.
शिवलिंगावर पितळी आवरण असते, ते शिवरात्रीलाच काढले जाते. शिवलिंगाची गोलाकार 5.1 फूट असून जमिनीपासून उंची 6.7 फूट आहे. त्याचवेळी जिलेहरीच्या वरच्या शिवलिंगाची लांबी 3.3 फूट आहे. मंदिरात भगवान गणेश, भगवान नटराज, महिषासुर मर्दिनी, भगवान कार्तिकेय यांच्याही मूर्ती आहेत. याशिवाय स्त्री सौंदर्याचे दर्शन घडवणारी शिल्पेही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं
रत्नागिरीतील देवडे, किरबेट बनणार 'मधाचे गाव'; लोकांना गावातच मिळणार रोजगार, मधूपर्यटनालाही चालना
शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात.
रत्नागिरी : मधमाशी संवर्धनासोबत (Beekeeping) मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील देवडे आणि किरबेट ही दोन गावे मधाचे गाव बनवण्यात येणार आहेत. राज्यात मांघर, पाटगावनंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. मधाचे गाव संकल्पनेमुळे लोकांना गावातच रोजगार मिळणार असून, कृषी पर्यटनाच्या (Agritourism) धर्तीवर मधूपर्यटनालाही चालना मिळू शकते.
शेती उत्पादनात मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे ३५ ते ४० टक्के वाढ होते. मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, या उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी देवडे आणि किरबेट ही दोन गावे वसलेली आहेत. निसर्गसंपन्न गावामध्ये कुऱ्हाडबंदी आहे. वृक्षतोड केली जात नसल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. या गावातील शेतकरी (Farmer) सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणही केले आहे. त्यामुळे मधमाशांना आवश्यक मुबलक फुलोरा खाद्य येथे मिळू शकते. गावात २०० ते ३०० मधमाशांच्या कॉलन्या आहेत. या गावात सातेरी, आग्या मधमाशांच्या जाती आढळतात. पारंपरिक पद्धतीने मध काढून त्याची विक्री करणे हा येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे; परंतु आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करता यावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना ४० गट गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्यामधून शेतकऱ्यांना दिडशे किलोपर्यंत मध मिळत आहे.
एक हजार पेट्यांमध्ये उपक्रम
या उपक्रमांतर्गत एक हजार पेट्या मधपालनासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० पेट्या देण्यात येणार असून, आतापर्यंत ५० मधपालांना ४० पेट्या दिल्या आहेत. जिथे फुलोरा जास्त आहे त्या काळात एका मधपेटीतून सामान्यतः २५ ते ३० किलो मध निघतो. शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात. या व्यतिरिक्त मधाच्या पोळ्यातून निघणाऱ्या मेणापासून अन्य उत्पादनेही तयार करता येतात. देवडे आणि किरबेट ही गावे विशाळगडाच्या पायथ्याशी असल्यामुळे ऑक्सिजन पातळी चांगली आहे.
मधमाशी संवर्धनासोबत मध संकलनाचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून गावात अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मधाचे गाव हा उपक्रम राबवला जात आहे. देवडेसारख्या निसर्गसंपन्न अशा गावामध्ये यासारख्या उपक्रमामधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करता येईल.
-अनिल कांबळे, देवडे
जगातलं हटके स्टेशन, एकही रेल्वेचा कर्मचारी नाही, प्रवासीच तिकीट काढतात अन् स्वच्छताही करतात
Railway Station :
जगाच्या कानाकोपऱ्यात अशा गोष्टी घडत असतात. ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. आज अशीच एक घटना आपण पाहणार आहोत. ज्याबद्दल कुणाला काही कल्पना असेल असे वाटत नाही. कारण, जगात असे लोकही असतात जे कोणताही गाजावाजा न करता आपलं काम वर्षानुवर्षे करत आहेत.
भारतात असंही एक रेल्वे स्टेशन आहे जिथ कोणताही कर्मचारी नाही. तरीही तिथले लोक रोज न चुकता ते स्टेशन स्वच्छ करतात. अन् तिथे तिकीट कलेक्टर बनून स्वत:च तिकीट काढतात. आणि रेल्वेत बसून प्रवासालाही जातात. होय हे खरं आहे. राजस्थानमधील सीकर-चुरु मार्गावर असलेल्या रसीदपुरा खोरी येथे हे स्टेशन आहे.
आर्थिक नुकसान होतं असं कारण देत भारतीय रेल्वेने हे स्थानक बंद केले होते. मात्र ते बंद झाल्याने ग्रामस्थांना वाहतुकीत अडचणी येत होत्या. यामुळे त्यांनी हे स्थानक चालवण्यासाठी रेल्वेकडे अनेक विनंत्या केल्या. या स्थानकाच्या साफसफाईपासून तिकीट बुकिंगपर्यंतची सर्व कामे ग्रामस्थ करतात.
2004 मध्ये बंद पडलेले रशीदपुराचे खोरी रेल्वे स्थानक संपूर्ण देशासाठी एक उदाहरण बनले आहे. हे स्टेशन 1942 मध्ये बांधले होते. मात्र वार्षिक उत्पन्न कमी असल्याने रेल्वे विभागाने हे स्टेशन 2004 मध्ये बंद केले. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांना कुठेही जाण्यास त्रास होऊ लागला. लोकांनी रेल्वेकडे अनेक मागण्या केल्या. अखेर रेल्वेने स्थानक पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी घातल्या.
या ठिकाणाहून तीन लाख तिकिटांची विक्री झाली तरच ते सुरू होईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. अखेर गावकऱ्यांच्या मदतीने हे स्टेशन सुरू करण्यात आले. आजही ते गावकरीच चालवतात. इथे येणाऱ्या लोकांची तिकिटे गावकरीच खरेदी करतात आणि मग प्रवास करतात. एवढेच नाही तर स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारीही ग्रामस्थांवर आहे.
रेल्वेने घेतला निर्णय
इतकी वर्षे ग्रामस्थांनी चालवल्यानंतर हे स्टेशन आता हायटेक करून वीस कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय नव्या शासकीय कर्मचाऱ्यांचीही येथे नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रायलाकडून ग्रामस्थान देण्यात आली आहे.
Devbagh Beach : 'लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात!'
Devbagh Beachesakal
मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा.
-पराग वडके, चिपळूण parag.vadake@gmail.com
‘लॉंचमध्ये मस्त दणकून उडी मारली. गौरवने (आमचा मित्र पुढच्या प्रवासातला कम गाईड) हात दिला आणि परूळे धक्का सोडला. गोवा ते कुडाळ लाल डबा मार्चचे रणरणते ऊन आणि सोबत ५ मित्र. कोण नागपूर, नांदेड, सोलापूर तर कोणी जळगाववाला. सगळे महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरणारे कोकणात (Konkan) उतरत होते. लाल डबा कोकणात कसा एकेकाला लाल लाल करत ते अनुभवत कुडाळमध्ये उतरलो.
तिथून रिक्षाने १७ किलोमीटरवर परूळ गाव आणि परूळ्याचा धक्का. वेळ संध्याकाळ ६ची. धक्क्यावर पोचल्यावर समोर हजारो रंग ओतून निसर्गाने मारलेले फटकारे. सगळा शीण त्या फटकाऱ्याने फाट्यावर मारून आम्हाला त्या पोट्रेटमध्ये वर निसर्गाने प्रवेश दिला. समोर देवबाग कर्ली नदी ती जेथे समुद्राला मिळते तो संगम. मस्त नदी आणि समुद्र एकमेकांवर ढुशी मारत होते.
आम्ही लॉंचमध्ये बसलो. समोर, ''सामंतांना'' लाभलेले वरदान दिसत होते. अख्ख्या डोंगरवर आंब्याची बाग आणि निसर्ग त्यांचे काहीतरी देणे असल्यासारखा. म्हणे, या सामंतांना नोव्हेंबरमध्येच अस्सल हापूस भरभरून देतो आणि पहिली पेटी १० ते २० हजार भाव खाऊन अमेरिकेत पोहोचते. सावकाश पलीकडे देवबाग बीच (Devbagh Beach) वर पोहोचलो. तिथून एका बाजूला सनसेट आणि आमची पायपीट. तेथून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या समीर तांडेलच्या घरात आलो आणि फक्त १०० फुटांवर संध्याकाळचा समुद्र मस्त लाटा उधळत किनाऱ्यावर आपली मस्ती दाखवत येतोस का माझ्यासोबत? तुला ओपन ऑफर देतो. आलास सोबत तर अख्खी दौलत तुझी! असे मस्त लाटातून सांगत होता.
िट्रपचे उद्दिष्ट स्कुबा डायव्हिंग असल्याने बाकी फिरायला गेलो नाही. मस्त रात्री सौंदाली सोलकढी असे समुद्री जेवण केले. जळगाव, नांदेड, नागपूरवाले कोकण काय चीज आहे, हे भरभरून अनुभवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०ला यशवंत आला. हा, आम्हाला आता पुढे गाईड करणार होता. ''सारंग कुलकर्णी'' नावाच्या एक समुद्रवेड्या तरुणाने सगळ्यात पहिल्यांदा भारतात अंदमान-निकोबार बेटानंतर अतिशय विस्तृत स्वरूपात कोरल रिफची दौलत सिंधुदुर्ग परिसरात असल्याचा शोध लावला. स्वतः सारंग हे मरिन जीवशास्त्रज्ञ आहेत आणि जगातील नामवंत स्कुबा डायव्हिंगमधील तज्ज्ञ आहेत. त्यांनी मालवण परिसरात शोध लावल्यावर तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तेथील तरुणांना त्यांनी एकत्र केले.
तरुण मच्छीमारी करणारे जेमतेम दहावीपर्यंत गेलेले; पण सगळ्या परिसराची इंच इंच माहिती असणारे. व्यवस्थित स्कुबा डायव्हिंगचे त्यांना प्रशिक्षण दिले. सोबत स्नॉर्क्लिंगचे पण दिले. स्कुबा डायव्हिंग म्हणजे तुम्ही तोंडावाटे हवा घेऊन समुद्रात तळाशी जाऊन खालील सौंदर्य बघणे तर स्नॉर्क्लिंग म्हणजे समुद्राच्या पाण्यात डोके खुपसून तळातील सौंदर्य पाहणे; पण खरी मजा स्कुबा डायव्हिंगमध्ये आहे. तुम्हाला सिंधुदुर्ग आणि देवबागमध्ये या दोनही गोष्टी बघायला मिळतात; पण देवबागमधील टीम ही थोडी महागडी असली तरी ती तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यापासून दूर खोल समुद्रात घेऊन जाते आणि जास्त वेळ देतात.
यशवंतने आम्हाला अशा जागी आणले की, तिथून सिंधुदुर्ग किल्ला दिवाळीच्या किल्ल्याएवढा दिसतो आणि आपण समुद्राच्या मध्यभागात. यशवंतने आम्हाला प्राथमिक ट्रेनिंग दिले. अंगठा वर केला की, मला अस्वस्थ वाटत आहे. वर घेऊन चल, अंगठा खाली केला की, मी आता ओके आहे पुन्हा मला खाली घेऊन चल आणि छान छान असे हाताने दाखवले की, आपण समुद्रसफारी एन्जोय करतोय, अशा खुणा.
सोबत दोन गाईड असतात. एक तुम्हाला खाली तळाशी घेऊन हात धरून समुद्रीसंपत्ती दाखवतो आणि एकजण समुद्राच्या पृष्ठभागावर हातात सुरक्षाट्यूब घेऊन पोहत असतो. तुम्ही वर येताना दोन्ही हात ताठ करून त्या ट्यूबमधून बाहेर काढायचे आणि दम खायचा. मला यशवंतने श्वास घ्यायला शिकवले आणि मी हळूच समुद्रात डोकं खुपसले आणि एका मिनिटात डोके बाहेर काढले. माझी तंतरली होती. वर वर सोपे वाटणारे तोंडाने श्वास घ्यायचा प्रकार लय अवघड होता भाऊ! मी पुन्हा दम खाऊन जर खाली जायला बघितले आणि हाशहुश करत पुन्हा बाहेर आलो आणि चोख त्याला सांगितलं, आपल्याला जमणार नाही. मला पुन्हा बोटीत सोड; पण त्याला या प्रकारची सवय असावी. त्याने मला धीर दिला.
मला सांगितले, तुम्ही आयुष्यात बिननाकाचे जन्माला आला आहात आणि तोंड हेच नाक, असे समजून श्वास घ्या आणि हेच आपले जीवन असे समजून एक मासा व्हा आणि शांतपणे माझ्याबरोबर चला. मी मासा झालो. तोंड माशाचे कल्ले झाले आणि यशवंतच्या हातात माझ्या आयुष्याची दोरी देऊन त्याच्या साथीने खोल समुद्रात शिरलो. हळू एकेक फूट तळाशी जात होतो आणि जाणवले पाठीवर पाच किलोची लॅपटॉपची बॅग असली की, कधी एकदा उतरवतो असे होते आणि इथे मी अक्खी जगातील सर्वात मोठी पाण्याची टाकी घेऊन फिरत होतो. थोडे कानावर पण दाब येतो. दुखतात; पण हळूहळू सवय होते आणि यशवंतने मला समुद्र काय काय लपवून आहे ते दाखवले. समुद्री फुले, समुद्री काकडी, काटेरी मासे निमो, हजारो रंगाचे मासे.
कदाचित आता ते यशवंतला ओळखू लागले असतील. हा आला की, आपल्याला खाणे मिळते कोठून कोठून. मासे अंगावर येत होते. ए मला पण बघ. ए माझी साडी बघ ए जाड्या माझा टी शर्ट बघ. अरे बापरे बाप, हा बघ कोणीतरी खडूस माझ्याकडे बघतो. असंख्य प्रकार मला एक जाणवले. हळूहळू आपण जमिनीवर आलो त्यामुळे खालचे चेहरे ओळखीचे वाटू लागले. तेवढ्यात यशवंतने हात सोडला आणि कॅमेरा काढला, मग मस्त पोझ दिल्या आणि फोटोसेशन झाले.
लोक गोव्यात जातात आणि पी पी पितात; पण तेथून थोड्या अंतरावर असलेला निसर्ग प्यायला विसरतात. त्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग पकडायचा आणि मालवण गाठायचे; पण मालवणात मुक्काम करण्यापेक्षा देवबागला मुक्काम करा. तुम्ही समुद्राच्या खांद्यावर डोके खुपसून असता आणि जाताना शिवराय आणि हिरोजी इंदुलकर यांचा निसर्गाच्या छातीवर मस्त कोरलेला, सिंधुर्दुग बघायला विसरू नका. आपण शिवराय जिथे जन्माला आले, वाढले, स्वराज्य निर्माण केले त्या साक्षात शिवराज्यात शिवाला स्पर्श करत आहोत, ही भावनाच तुम्हाला मोहवून टाकते आणि आपली महाराष्ट्रीयन लोकांची हीच संपत्ती अनुभवा.
(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
Historical Temple : एका मंदिरात देवांच शरीर अन् दुसरीकडे आहे मुख, तुम्ही हे अनोखं मंदिर पाहीलंय का?
Historical Temple :
आपल्या देशाला मंदिरांचा देश म्हटले जाते. कारण आपल्या देशात अति प्राचिन अशा अनेक मंदिराचा खजाना आहे. वेरूळमधील लेणी, प्रसिद्ध असे ६४ योगिनींचे मंदिर यांना पाहून त्यांची प्रचिती येते.
आपल्याकडे केवळ प्राचिनच नाहीतर आश्चर्यचकीत करणारीही अनेक मंदिरे आहेत. कर्नाटकातील एका मंदिरातील नंदीची मूर्ती आकाराने वाढत आहे. तर, कोल्हापुरच्या खिद्रापूरच्या मंदिरात शिवलिंग अन् त्याचा नंदी दुसऱ्या राज्यात आहे.
अशी अनेक मंदिरे अन् त्यांच्या पौराणिक कथा आपल्या देशात आहेत. ज्यांना कानोसा घेतला तर विज्ञानही त्याच्या तथ्यापुढे फिके पडते. अशाच पद्धतीच्या एका मंदिराची माहिती आज आपण पाहुयात. ज्या मंदिरात केवळ धड आहे तर त्याचे शीर दुसऱ्याच मंदिरात आहे.
भारताची देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास आश्चर्यचकित करतो. अल्मोडा जिल्ह्यात असेच एक मंदिर आहे, जिथे देवाच्या धडाची पूजा केली जाते. हे शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गरड येथे आहे. या मंदिराला कालबिष्ट गरड गोलू देवतेचे मंदिर म्हटले जाते.

गरड गोलू देवाला कल्याण सिंह बिष्ट असेही म्हणतात. या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या मनोकामनाही पूर्ण होतात. गरड गोलू यांची फसवणूक करून हत्या करण्यात आली. पटिया गावातील चांद वंशी राजांचा दिवाण सम्राट पांडे उर्फ नौलख्खा पांडे याने गरड गोलू देवाला मारले होते.
गरड गोलू यांची बहीण देवकी हिचा पती लक्ष्मीसिंग बिष्ट याने त्यांची हत्या केली होती. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, गरड गोलू हे गायी चारणारे गोपाळ होते. आणि तो त्यांच्या गायी,म्हैशी चारण्यासाठी जंगलात घेऊन गेले होते.
तेव्हा फसवून त्यांची हत्या करण्यात आली. त्याचे धड याच ठिकाणी राहिले तर त्याचे डोके अडीच किलोमीटर अंतरावर पडले. त्यामुळे गोलू यांच्या धडासह त्याच्या गायी,म्हैशींनीही दगडाचे रूप धारण केलं.
विविध राज्यातून भाविक या मंदिरात पोहोचतात. त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर ते येथे येऊन दर्शन घेतात. तसेच, भंडाऱ्याचा उत्सव आयोजित केला जातो. मंदिराचे पुजारी सांगतात की, येथे परमेश्वराच्या धडाची पूजा केली जाते.
उत्तराखंडच्या विविध जिल्ह्यांसह अन्य राज्यांतूनही येथे भाविक येतात. गरड गोलू देवता यांना न्यायदेवता मानले जाते. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर भाविक येथे बेल, फळ, फुले आणि नारळ अर्पण करतात.
या मंदिराला प्राचिन महत्त्व आहे. येथे येण्याने मनोकामना पूर्ण होतात आणि मानसिक शांती मिळते. अनेक भक्त इथे नियमित हजेरी लावतात.

पृथ्वीवर अवतरणार स्वर्ग! काश्मीरमध्ये सुरू होणार ट्यूलिप फेस्टिव्हल.. असणार विविध रंगांची 15 लाख फुलं
काश्मीर अनेक सुंदर ठिकाणांसाठी ओळखले जाते, परंतु येथील सर्वात प्रेक्षणीय आकर्षण म्हणजे ट्युलिप गार्डन. काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्यामुळे आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन 19 मार्चपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. दल सरोवराच्या काठावर वसलेली ही बाग वेगळीच आहे. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना या बागेला भेट देण्याचा सल्ला दिला होता.
यंदाही पर्यटन हंगाम सुरू होताच लोक जम्मू-काश्मीरला पोहोचू लागले आहेत. हे ट्युलिप गार्डन 19 मार्च ते 20 एप्रिल पर्यंत खुले असणार आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणाशी संबंधित माहिती देखील देऊ, जसे की तुम्ही येथे कोणती फुले पाहू शकाल, तुम्ही येथे कसे पोहोचू शकता आणि बागेच्या आजूबाजूला काय पाहू शकता.
या बागेत 15 लाखांहून अधिक ट्यूलिप आहेत -
आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन जबरवान पर्वतराजीच्या कुशीत वसलेले आहे. या बागेत 60 प्रकारच्या प्रजाती आणि 15 लाखांहून अधिक रंगीत ट्यूलिप्स आहेत. अशा रंगीबेरंगी फुलांमुळे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे आता श्रीनगरच्या प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक बनले आहे
पर्यटकांची संख्या वाढत आहे -
दरवर्षी उद्यान सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे अनेक सांस्कृतिक आणि संगीताचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येते. ट्यूलिप्स व्यतिरिक्त, फुलांच्या इतर प्रजाती देखील येथे उगवल्या जातात, जसे की - डॅफोडिल्स, जलकुंभी आणि रॅननक्युलस.
बाग फक्त एक महिन्यासाठी खुली असणार-
या बागेला भेट द्यायची असेल तर लक्षात ठेवा की ही बाग वर्षभर उघडली जात नाही. हे फक्त 1 महिन्यासाठी उघडले जाईल, म्हणून तुम्ही हे सौंदर्य पाहण्यासाठी लवकरात लवकर नियोजन करा. येथे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे, ज्याला तुम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 दरम्यान कधीही भेट देऊ शकता.
श्रीनगरमधील पाहण्यासारखी ठिकाणे -
आता जर तुम्ही श्रीनगरला जाणार असाल तर ट्यूलिप गार्डन बघण्यासोबतच तुम्ही सुंदर दल सरोवर, शालीमार बाग, निशात बाग, चष्मे शाही, परी महल, शंकराचार्य मंदिर, हरी परबत, बारामुल्ला यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. श्रीनगरला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मार्च ते ऑक्टोबर. या काळात इथे फारशी थंडी नसते आणि तुम्ही आरामात फिरू शकता.
Jaisalmer Travel : राजस्थानातील जैसलमेर शहरात फिरण्यासाठी आहेत ‘ही’ उत्तम ठिकाणे, एकदा नक्की द्या भेट
Jaisalmer Travel : राजस्थान हे राज्य तिथल्या अनेक ऐतिहासिक हवेलींसाठी आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, जी तुम्ही कधीच मिस करता कामा नये. राजस्थानातील जैसलमेर या शहराला ‘गोल्डन सिटी’ म्हणून ओळखले जाते.
जर तुम्ही मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर राजस्थानमधील जैसलमेर हे शहर बेस्ट पर्याय ठरू शकतो. या शहरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.
या शहरातील सुंदर राजवाडे, हवेली आणि ऐतिहासिक किल्ल्यांसोबतच येथील गजबजलेल्या बाजारपेठ्या तुमचे लक्ष वेधून घेतात. यासोबतच तुम्ही या शहरात डेझर्ट सफारीचा ही आनंद घेऊ शकता. आज आपण जैसलमेरमधील विविध पर्यटनस्थळांबद्दल जाणून घेणार आहोत.
जैसलमेर किल्ला
जैसलमेर शहरात हा किल्ला स्थित आहे. या किल्ल्याला 'सोनार किल्ला' म्हणून ही ओळखले जाते. आकाराने प्रचंड मोठा असलेला हा किल्ला शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून दिसतो. हा किल्ला या शहराचा जणू सुंदर मुकूट आहे.
हा किल्ला पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक गर्दी करतात. विशेष म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या किल्ल्याचा समावेश आहे. जैसलमेरला गेल्यावर या किल्ल्याला भेट द्यायला अजिबात विसरू नका. (Jaisalmer Fort)
गडीसर तलाव
जैसलमेर किल्ल्याजवळ असणारे हे पर्यटन स्थळ लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या तलावाला प्राचीन इतिहास लाभला आहे. या गडीसर तलावाची निर्मिती राजा रावल जैसलने इ.स.११५६ मध्ये केली होती. त्यानंतर, १३६७ च्या आसपास या तलावाची पुन्हा डागडुजी करण्यात आली.
विशेष म्हणजे या सुंदर तलावाच्या चार ही बाजूंना वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आणि नक्षीदार घुमट आहेत. जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर त्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता. शांततेसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. (Gadisar Lake)
पटवों की हवेली
जैसलमेर शहरातील आणखी एक लोकप्रिय ठिकाण म्हणून ‘पटवों की हवेली’ प्रसिद्ध आहे. या भव्य हवेलीचे सुंदर नक्षीकाम आणि हवेलीचा सोनेरी रंग तुमचे लक्ष वेधून घेतो. ही हवेली पाहताना आपण जणू एखाद्या सुवर्ण महालात फिरत असल्याचा आपल्याला भास होतो.
इतकी ही हवेली सुंदर आहे. इतिहासप्रेमींसाठी तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे. ही हवेली १८०५ मध्ये याच शहरातील प्रमुख व्यापारी गुमान चंद यांनी बांधली होती. (Patwon Ki Haveli)
Snowboarding In India : भारतातही घेता येईल स्नोबोर्डिंगचा आनंद; या ठिकाणांना नक्की द्या भेट
जेव्हा थंड हवामान येते तेव्हा आपल्या सर्वांना बर्फामध्ये खेळायचे असते. साधारणपणे, या ऋतूमध्ये लोक बर्फवृष्टी असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात. त्यांना फक्त बर्फातच खेळायचे नाही तर या हंगामाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी विविध अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटीजचा भाग व्हायचे आहे. अशीच एक अॅक्टिव्हिटी म्हणजे स्नोबोर्डिंग.
भारतात अशी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत जी जवळजवळ संपूर्ण हिवाळ्यात बर्फाने झाकलेली असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही येथे स्नोबोर्डिंग आणि स्कीइंगसारख्या अॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत, जिथे तुम्ही स्नोबोर्डिंगचा आनंद घेऊ शकता आणि तुमचा हिवाळा खूप खास आणि संस्मरणीय बनवू शकता.
गुलमर्ग
जेव्हा स्नोबोर्डिंगचा विचार केला जातो, तेव्हा जम्मू-काश्मीरमधील गुलमर्गचे नाव नक्कीच प्रथम मनात येते. हे शहर आशियातील सर्वोत्तम स्नोबोर्डिंग ठिकाणांपैकी एक आहे. येथे सरासरी वार्षिक बर्फवृष्टी सुमारे 45 फूट आहे. या ठिकाणाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही बिगनर असोत किंवा स्नोबोर्डिंग चॅम्पियन असाल तरीही सर्व लेव्हलच्या लोकांसाठी येथे विविध प्रकारचे उतार आहेत. आपण येथे सर्व प्रकारचे उतार आणि ट्रॅक शोधू शकता. स्नोबोर्डिंगचे शौकीन युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांतूनही गुलमर्ग येथे येतात.
पहलगाम
पहलगाम हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हा एक भाग आहे जो हिवाळ्यात बर्फाने झाकलेला असतो. पहलगाम हे स्नोबोर्डिंग आणि व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी ओळखले जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात काही अॅडवेंचर्स अॅक्टिव्हिटीजचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पहलगाममध्ये स्नोबोर्डिंग करू शकता. येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ फेब्रुवारीपर्यंत मानला जातो.
रोहतांग
स्नोबोर्डिंगचा विचार केल्यास रोहतांग हे एक उत्तम ठिकाण आहे. मनालीजवळील रोहतांग हे बर्फाच्छादित पर्वत आणि दऱ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. लोक येथे स्कीइंग आणि पॅराग्लायडिंगसारख्या अॅडवेंचर्स स्पोर्ट्सचाही आनंद घेतात. हे भारतातील स्नोबोर्डिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जरी तुम्ही बिगनर असाल, तरीही तुम्ही येथे स्नोबोर्डिंग करू शकता.
सोलंग व्हॅली
सोलंग व्हॅलीला सोलंग नाला असेही म्हणतात. हे असे ठिकाण आहे जिथे लोकांना हिवाळ्यात यायला आवडते. विंटर स्पोर्ट्स हॉटस्पॉट म्हणून याकडे पाहिले जाते. हे मनालीपासून अवघ्या 12 किमी अंतरावर आहे. थंड हवामान, बर्फाच्छादित दृश्ये हे ठिकाण देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. सोलंग नाला येथे दर हिवाळ्यात एक स्की महोत्सव देखील आयोजित केला जातो ज्यात जगातील विविध भागांतील पर्यटक सहभागी होतात. जर तुम्हाला स्कीइंग किंवा स्नोबोर्डिंगची आवड असेल तर तुम्ही सोलांग व्हॅलीला भेट दिलीच पाहिजे.
Gujarat Travel : गुजरातमधील या सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
भारताच्या पश्चिमेस वसलेले गुजरात हे देशाचे एक प्रमुख राज्य आहे. तसेच ते एक लोकप्रिय पर्यटन राज्य देखील आहे. गुजरात हे भारतातील सुंदर राज्यांपैकी एक आहे. गुजरातमधील संस्कृती, समृद्ध वारसा, नैसर्गिक लँडस्केप आणि स्वादिष्ट पाककृती पर्यटकांना आकर्षित करते.
आपल्या सांस्कृतिक ओळखीबरोबरच, गुजरातला त्याच्या अनेक ऐतिहासिक आणि अद्भुत ठिकाणांसाठी देखील एक अतिशय लोकप्रिय राज्य मानले जाते. या राज्यात अशी अनेक न पाहिलेली ठिकाणे आहेत, जी आजही पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहेत.
गुजरातमधील ढोलेरा हे एक ठिकाण आहे जे खूप सुंदर आहे. आम्ही तुम्हाला ढोलेरातील काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
ढोलेरा तलाव
ढोलेराला भेट द्यायची झाल्यास 'ढोलेरा लेक'चे नाव नक्कीच प्रथम घेतले जाते. ढोलेरा लेक वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो. खंभातच्या खाडीजवळ असल्याने ढोलेरा लेकचे सौंदर्य आणखीनच वाढते.
'ढोलेरा लेक'सोबतच त्याचे परिसरही पक्ष्यांचे माहेरघर मानले जाते. येथे तुम्हाला स्थलांतरित पक्षीही पाहायला मिळतात.
ढोलेरा धाम
ढोलेरा धाम हे केवळ ढोलेरा किंवा गुजरातचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते.
ढोलेरा धाममध्ये स्थापित स्वामीनारायणाची मूर्ती भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. ढोलेरा धामची केवळ मूर्तीच नाही तर मंदिराची रचनाही पर्यटकांना खूप आवडते. मंदिराच्या भिंतींवर अनेक प्रकारच्या उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळतात.
ढोलेरा स्मार्ट सिटी
ढोलेरा स्मार्ट सिटी देखील पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करणार आहे. हे स्मार्ट सिटी असल्याने येथे पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचतील, असे बोलले जात आहे.
वृत्तानुसार, ढोलेरा स्मार्ट सिटी सुमारे 920 चौरस किलोमीटर परिसरात पसरली आहे. स्मार्ट सिटीप्रमाणे मोठमोठ्या इमारतींबरोबरच उद्याने, क्रीडांगणे, तलावही बांधले जात आहेत. ढोलेरा विमानतळही बांधण्यात येणार असल्याची बातमी आहे.
ही ठिकाणे देखील एक्सप्लोर करा
ढोलेरामध्ये इतरही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही फिरू शकता. श्री सहजानंद स्वामी अक्षर ओरदी, श्री गोवर्धननाथजी हवेली आणि ढोलेरा जुम्मा मस्जिद देखील पाहू शकता.
Indian Islands Travel : केवळ लक्षद्वीपच नाही तर भारतातील ‘ही’ बेटे पर्यटनासाठी आहेत खास, नक्की द्या भेट
Indian Islands Travel : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाशी संबंधित काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ज्यामध्ये पर्यटनासाठी लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी प्रवासाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मालदीवसोबतच्या वादानंतर अनेक भारतीय मालदीवच्या ऐवजी आता लक्षद्वीपला फिरायला जात आहेत. त्यामुळे, आता लक्षद्वीपचा विकास करण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे.
परंतु, केवळ लक्षद्वीपला फिरायला जाण्याऐवजी तुम्ही भारतातील इतर बेटांना ही भेट देऊ शकता. ही बेटे देखील निसर्गसौंदर्याने संपन्न आहेत. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील काही बेटांबद्दल ज्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी फिरायला जायलाच हवे.
अंदमान-निकोबार
अंदमान आणि निकोबार हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. हा केंद्रशासित प्रदेश निसर्गसंपन्न असून भारताच्या दक्षिण भागात हे सुंदर बेट स्थित आहे. येथील नयनरम्य समुद्रकिनारे आणि निसर्गसंपन्न प्रदेश आपले मन जिंकून घेतो. हे एक उत्तम पर्यटन स्थळ असून येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.
अंदमान आणि निकोबारमध्ये तुम्ही ट्रेकिंग, जेट स्की रायडिंग, स्कूबा डायव्हिंग, सीकार्ट, गेम फिशिंग इत्यादी साहसी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही येथील स्ट्रीट फूड्सचा ही आस्वाद घेऊ शकता.
दीव-दमण
भारताच्या पश्चिम भागात स्थित असलेले दीव-दमण हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. दीव हे बेट फिरण्यासाठी एकदम बेस्ट आहे. येथील नयनरम्य समुद्रकिनारे तुमचे मन जिंकून घेतात. पोर्तुगीज संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या येथील वास्तू तुम्हाला दीवच्या इतिहासाची साक्ष देतात.
येथील समुद्रकिनाऱ्यांसोबत, चर्च ऑफ सेंट पॉल ते १६ व्या शतकातील किल्ल्यांपर्यंत फिरण्यासाठी तुम्हाला या बेटावर भरपूर काही आहे. येथील ऐतिहासिक वारसा पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही हॉट एअर बलून राईड, पॅराग्लायडिंग, स्कूबा डायव्हिंग, डॉल्फिन ट्रिप आणि पॅरासेलिंग इत्यादी साहसी खेळांचा ही आनंद तुम्ही घेऊ शकता.
एलिफंटा बेट
अरबी समुद्रात स्थित असलेले हे बेट पर्यटकांच्या आवडीचे आहे. येथे अनेक देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. विशेष म्हणजे या बेटावरील एलिफंटा गुहा जगप्रसिद्ध असून त्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून १० किमी अंतरावर हे बेट स्थित आहे. भगवान महादेवाला समर्पित असलेल्या या गुहा बेटाचे प्रमुख आकर्षण आहे. या एलिफंटा गुहांच्या आतमध्ये करण्यात आलेले कोरीव शिल्पकाम पाहण्यासारखे आहे.
महाबळेश्वरच्या पठारावर आखराचा गालिचा; चार वर्षांनी फुलांना बहर, 'आखरा'ची काय आहेत वैशिष्ट्ये?
सध्या महाबळेश्वरच्या पठारावर (Mahabaleshwar Plateau) आखराची फुले मोठ्या प्रमाणावर आल्याने पठार आखराच्या फुलांमुळे आकर्षक दिसत आहे.
महाबळेश्वर : दर चार वर्षांनी फुलणाऱ्या कारवी या जातीच्या प्रकारातील ‘आखरा’ या वनस्पतीला फुले येऊ लागली असून, पांढरट आखराच्या फुलांनी येथील पठार फुलून गेले आहे. या वनस्पतीचे वनस्पती शास्त्रातील नाव ‘लेपिडोग्याथास कुस्तीडाटा’(Lepidagathis cuspidata) असे आहे. या वनस्पतीची फुले पांढऱ्या रंगाची छोटी छोटी असून, २०-२५ टोकदार पानांच्या झुपाक्यावर ती येतात. मधमाशांच्या परागीभवनासाठी व आतील औषधी मधामुळे या प्रकारच्या फुलोऱ्याला विशेष महत्त्व आहे.
गवतासारखी ही वनस्पती रस्त्याच्या कडेला, जंगलात जमिनीलगत वाढलेली असते. श्रब (वेली) प्रकारात ही वनस्पती मोडते. सध्या महाबळेश्वरच्या पठारावर (Mahabaleshwar Plateau) आखराची फुले मोठ्या प्रमाणावर आल्याने पठार आखराच्या फुलांमुळे आकर्षक दिसत आहे.
-वसंतराव पाटील, सेवानिवृत्त संचालक, महाबळेश्वर मध संचालनालय
आखराची वैशिष्ट्ये
फुले साधारण अर्धा इंच लांब.
पांढऱ्या रंगाची फुले असून एक पाकळी थोडी लांब, तर दुसरी तुलनात्मक कमी लांब असते.
फुलाच्या आत परागकण असून, तेथेच मध साठलेला असतो.
फुलाचा मादक व मोहक वास मधमाशांना आकर्षून घेतो.
फुलातील मध गोळा करताना आतील परागकण मधमाशांच्या पायाला चिकटतात.
आखराच्या वनस्पतीची पाने छोटी; पण लांबट टोकदार.
सुमारे २५-३० पानांच्या तीन ते चार इंच लांबीच्या झुबक्यावर ही फुले येतात.
अन्य काळात ही वनस्पती गाई, म्हशी जनावरांना चारा म्हणून उपयोगी.
डिसेंबरमध्ये सुरू झालेला या वनस्पतीचा फुलोरा मार्चपर्यंत कमी अधिक प्रमाणात.
अशी आहे स्थिती
कारवी वनस्पतींचे प्रामुख्याने चार प्रकार.
सात वर्षांनी फुलणारी कारवी, व्हायटी.
कारवीच्या प्रकारातही दर सात वर्षांनीच फुले.
आखरा प्रकारात दर चार वर्षांनी फुले.
खरवर प्रकारात दर सोळा वर्षांनी फुले.
प्रत्येक हंगामात येणाऱ्या फुलोऱ्याच्या वेळी मधमाशा.
सध्या आखरा जातीच्या कारवी फुलांचा हंगाम सुरू.
या काळात जमा होणारा मध आखराच मध म्हणून ओळखला जातो.
कारवीच्या सर्वच जातीचा मध औषधी.
National Tourism Day : दुर्लक्षित वारसास्थळे
- ९९२२९९४३१४
शहर व जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे पर्यटक जाऊ शकतात. मात्र, तिथे पर्यटन विभाग, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने ही पर्यटनस्थळे, वारसास्थळे पर्यटकांच्या नजरेआड आहेत. या नजरेआड असलेल्या या वारसास्थळांचे मार्केटिंग केले तर पर्यटनवाढीसाठी निश्चितच आणखी चालना मिळेल यात शंका नाही.
शहरानजीकचे बुद्ध लेणीसमूह
छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तरेला सोनेरी महालापासून जवळच आहेत बौद्धकालीन लेण्या. या लेण्यांचा सातव्या शतकाच्या मध्यकाळातील कालखंड तर काही संशोधकांच्या मते पाचवे शतकाचा उत्तरार्ध ते सहाव्या शतकाची सुरुवात सांगितला जातो. संशोधकांची कालखंडविषयक वेगवेगळी मते आहेत.
बदामी चालुक्यांचा काळात अर्थात सहाव्या शतकात ही लेणी खोदली असावी. या लेण्यांमध्ये थेरवादी, महायानी आणि वज्रयाणी अशा बुद्धधम्मातील तीनही विचारधारांचे प्रतिबिंब इथल्या लेण्यांमध्ये आहे. महाविहाराकडील बाजूने आणि हनुमान टेकडीकडील बाजूने असे दोन लेणीसमूह इथे आहेत.
सोनेरी महाल
औरंगजेब बादशहासोबत आलेल्या बुंदेलखंडातील सरदार पहाडसिंगाने बांधलेला सोनेरी महाल. सोनेरी महालाची वास्तू दोन मजली आहे. वरती जाण्यासाठी दक्षिणोत्तर भागात जिने आहेत. सर्वांत वर गच्चीवर टेहळणी मनोरा आहे. इमारतीस भव्य संतुलित नक्षीदार कमानी, कमानीतून उत्तम प्रकारची प्रकाशयोजना व मध्यभागी मुख्य वास्तू अशी रचना केली आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट असे उदाहरण आहे.

महालाच्या दरबार सभागृहामध्ये सोनेरी रंगाच्या ठिकाणी खऱ्या सोन्याचे पाणी वापरून नक्षी काढण्यात आली. त्यामुळे सोनेरी महल असे म्हटले जाते. काळाच्या ओघात येथील चित्रे अंशत: नष्ट झाली. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर असलेले प्रादेशिक वस्तुसंग्रहालय १९७९ मध्ये स्थापन करण्यात आले. यात पुरातन कलावस्तूंचा संग्रह विविध दालनांमध्ये प्रदर्शित केला.
यात प्राचीन मूर्ती, चित्रे, दागिने, मातीची भांडी, शस्त्रे यासारख्या वस्तूंचा समावेश असून, पैठण व तेर उत्खननात प्राप्त भाजलेल्या मातीच्या कलावस्तू, लाकडी फळीवर व काचेवर रेखाटलेली चित्रे, मराठवाड्याच्या विविध भागांतून मिळालेली दगडी शिल्पे विशेष उल्लेखनीय आहेत. हे संग्रहालय सोमवार वगळता आठवड्याच्या अन्य दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाचपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले असते.
लाला हरदौल चबुतरा
सोनेरी महालाच्या समोरच लाला हरदौल यांची समाधी आहे. हे पहाडसिंग यांचे भाऊ होते. लाला हरदौल बुंदेल खंडातील महान सेनानी व कुशल योद्धा म्हणून परिचित आहेत. त्यांची समाधी चौरस आकाराची आहे. या समाधी परिसरात एक पायऱ्यांची विहीर आहे. बुंदेलखंडाच्या इतिहासात त्यांच्या पराक्रमामुळे वेगळे स्थान आहे. आजही त्यांच्या शौर्याच्या कथा बुंदेलखंडात व इतरत्र प्रसिद्ध आहेत.
लाला हरदौल यांचे वाढते सामर्थ्य सहन न होऊन त्यांचे भाऊ झुंजारसिंह यांनी त्यांना विजयादशमीच्या दिवशी वर्ष १६३१ मध्ये विषप्रयोग करविला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असा उल्लेख मिळतो. लाला हरदौल यांची स्मृती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही नामसमाधी हरदौल चबुतरा म्हणून ओळखला जातो. या चबुतऱ्यावर देवनागरी व उर्दू लिपीत एक लेख कोरलेला असून, त्यात हरदौल असा उल्लेख आहे.
निपट निरंजन
निपट निरंजन बाबा मूळचे बुंदेलखंडचे. १६७३ मध्ये बाबा छत्रपती संभाजीनगरात आले. तपस्येनंतर ते गुरूच्या शोधात सूलिभंजनच्या डोंगरावर नाथपंथी संतांचा मेळा जमलेला होता, तिथे ते गेले. गोरक्षनाथांचे शिष्य चर्पटनाथ तिथं होते. गुरुपौर्णिमेनिमित्त एका कढईत प्रसाद शिजवणं सुरू होते. प्रसाद होता, कढईत टाकलेल्या गोम, विंचू, साप, सरडे, खेकडे, पालींचा. चर्पटनाथांनी शाबरी कवच म्हटले.
शिजवलेल्या या प्रसादावर जलसिंचन केले आणि संतांची पंगत बसली. प्रसाद वाटला जात होता. पण, हा असला विषारी प्रसाद खायचा तरी कसा? बाबांच्या मनात संशय आला. त्यांनी प्रसाद खाल्ला नाही. सगळे साधू प्रसाद खाऊन झाल्यावर महायोगी चर्पटनाथांनी निपटबाबांचं मन जाणलं. ‘तेरे हिस्से का जो बचा है, उसे निपट ले!’ गुरू आदेश झाला. मग बाबांनी कढईच्या तळाशी उरलेसुरलं निपटून खाल्लं आणि भावसमाधीत लीन झाले.
चर्पटनाथांच्या ‘निपट ले’ या आज्ञेचं या शिष्यानं पालन केलं आणि बाबांचं नाव ‘निपट महाराज’ पडलं. बाबा सिद्ध पुरुष झाले. औरंगजेब बादशहा खुलताबाद, दौलताबाद आणि छत्रपती संभाजीनगर भागातील सुफी संत आणि सिद्ध पुरुषांच्या खास भेटी घेत असे.
पहाडसिंगपुऱ्यात राहणाऱ्या निपट बाबांची महती त्याच्या कानावर गेली. बादशहानं या साधूची भेट घेतल्याचे उल्लेख आढळतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील लेण्यांच्या पायथ्याशी त्यांची समाधी आहे.
पर्यटनासाठी योग्य, मात्र दुर्लक्षित पर्यटनस्थळे
शुलभंजन पर्वतावरील दत्त देवस्थान, संजीवन शिळा
शुलभंजन जवळील परियों का तालाब
मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हैसमाळ
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्वज
मालोजीराजे भोसले यांची वेरूळ येथील गढी
मलिक अंबरकालीन नहरींचे व्यवस्थापन
पितळखोरा येथील लेण्या
जंजाळा येथील घटोत्कच लेणी
बेगमपुऱ्यातील थत्ते हौद
घाटनांद्रा येथील जोगेश्वरी
संत ज्ञानेश्वर माउलींचे जन्मस्थान आपेगाव
अंभई (ता. सिल्लोड) येथील वडेश्वर मंदिर
वेताळवाडी (ता. सिल्लोड) किल्ला
अंतूर किल्ला (ता. कन्नड)
Tourist Places in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराजवळ आहेत आणखीही बरीच पर्यटन स्थळं, एका दिवसात होतील पाहून; जाणून घ्या
आज 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील जवळपास सात हजार लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.
यानंतर अयोध्येत येण्याची तयारी अनेक लोकांनी केली आहे. राम मंदिर भक्तांना दर्शनासाठी 23 जानेवारीपासून खुले होणार आहे. लोकांच्या मनात भव्य राम मंदिर पाहण्यासाठी उत्सूकता दिसत आहे. अयोध्येत राम मंदिरासह, इतरही सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट द्यायलाच हवी. एका दिवसात ही सुंदर ठिकाणं पाहून होतील.
राम की पैडी
शरयू नदीच्या काठावर वसलेल्या 'राम की पैडी' येथे लाखो दिवे प्रज्वलित होत असताना दिवाळीत मोठा दीपोत्सव आणि लेझर लाइट शो तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. हे अयोध्येतील घाटांचे एक समूह आहेत, जेथे भक्त स्नान करतात.
नागेश्वर नाथ मंदिर
आपण राम की पैडी येथील नागेश्वर नाथ मंदिराला भेट देऊ शकता, असे मानले जाते की ते प्रभू रामाचे पुत्र कुश याने बांधले होते. शरयू नदीत आंघोळ करताना कुशचे बाजूबंद हरवले तेव्हा ते नागकन्याला सापडले, कारण ती मुलगी शिवभक्त होती, म्हणून कुशने येथे मंदिर बांधले होते.
कनक भवन
अयोध्येच्या रामकोटमध्ये बनवलेले कनक भवन या प्राचीन शहराच्या सर्वात सुंदर इमारतींपैकी एक आहे, असे म्हटले जाते की राणी कैकेयीने ही इमारत सीता मातेला तिच्या लग्नानंतर भेट म्हणून दिली होती.
जैन श्वेतांबर मंदिर
तुम्ही अयोध्येत आलात तर जैन श्वेतांबर मंदिरालाही भेट देऊ शकता. जैन धर्मातील अनेक तीर्थंकरांचा जन्म येथे झाला, म्हणूनच या धर्माच्या अनुयायांसाठी हे पवित्र स्थान आहे.
गुप्तर घाट
हा घाट शरयू नदीच्या काठावर आहे ज्याला घग्गर घाट असेही म्हणतात. फैजाबादजवळील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पूर्वी गुप्तर घाटाच्या पायऱ्यांजवळ कंपनीची बाग होती, जी आता गुप्तर घाट जंगल म्हणून ओळखली जाते.
Travel Diaries : लक्षद्वीपमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ बेटांना भेट द्यायला विसरू नका
Lakshadweep Travel Diaries : लक्षद्वीप हा भारताचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य केंद्रशासित प्रदेश आहे. या प्रदेशाचे सौंदर्य अनेक पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे, येथे देश-विदेशातील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली होती.
या भेटीदरम्यान मोदींनी लक्षद्वीप येथील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका मारला. त्यांनी समुद्रात डुबकी तर मारलीच शिवाय, स्नॉर्किंगचा आनंद ही मोदींनी लुटला. या वेळी मोदींनी खास फोटोशूट देखील केले होते. हे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
आज आपण लक्षद्वीपमधील काही सुंदर बेटांबद्दल जाणून घेणार आहोत. जे फिरण्यासाठी बेस्ट आहेत. तुम्ही जर या थंडीत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर लक्षद्वीपचा विचार करायला काही हरकत नाही.
मिनिकॉय द्वीप
लक्षद्वीपमधील सुंदर बेटांचा विचार करायचे झाल्यास या मिनिकॉय द्वीपचा उल्लेख सर्वात आधी करावा लागेल. हे बेट येथील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि येथील नयनरम्य नजाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

मिनिकॉय द्वीप
मिनिकॉय येथील सीफूड अतिशय प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सीफूडचे शौकिन असाल तर तुम्हाला येथे खाण्यामध्ये विविध प्रकारच्या डिशेस उपलब्ध मिळतील. येथील समुद्रकिनारे आणि रिसॉर्ट्स पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. कपल्समध्ये हे द्वीप अतिशय प्रसिद्ध आहे.
बंगाराम द्वीप
हे द्वीप हिंदी महासागराच्या स्वच्छ आणि निळ्याशार पाण्यात वसलेले असून हे बेट भारतीय आणि विदेशी पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिदध मानले जाते. सीफूडसोबतच तुम्ही येथील वॉटरस्पोर्टसचा ही आनंद घेऊ शकता.

बंगाराम द्वीप
यामध्ये तुम्ही स्कूबा-डायविंग, स्नॉर्कलिंग, कयाकिंग, खोल समुद्रातील मासेमारी आणि विंडसर्फिंग वॉटर स्पोर्टसचा ही आनंद घेऊ शकता. या बेटावरून नयनरम्य सूर्यास्त आणि सूर्योदय पाहणे ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. त्यामुळे, अनेक कपल्स या बेटाला पसंती देतात.
कवरत्ती द्वीप
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून कवरत्ती द्वीपची खास ओळख आहे. या द्वीपवरील निळेशार पाणी, पांढरी वाळू आणि नयनरम्य नजारे हे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. त्यामुळे, अनेक कपल्सची या द्वीपला पहिली पसंती असते. येथे स्कूब डायविंग करायला अजिबात विसरू नका.

कवरत्ती द्वीप
आदिलशाहने बांधलेल्या नरसोबावाडीच्या दत्तमंदिराला कळस का नाही?
Datta Jayanti 2023 :
कोल्हापूरच्या पवित्र भूमीवर अनेक देवी देवतांचे पदस्पर्श झाले आहेत. त्यामूळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पवित्र तिर्थस्थान निर्माण झाली आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूरातील शिरोळ तालूक्यात असलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी होय.
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहसरस्वती स्वामींनी आपल्या तीर्थाटनात नृसिंहवाडीत वास्तव्य करून ही भूमी पानव केली आहे. या नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आहे. त्यामूळेच आज ही वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते. (Datta Jayanti 2023)
नरसोबाच्या वाडीतील घुमट असलेले मंदिर बादशहा आदीलशहाने बांधले आहे, असे सांगितले जाते. याबद्दल नृसिहवाडीतील जाणकार नागरीकांकडून सांगण्यात येते की, या नरसोबाच्या मंदिराला कळस नाही. त्याचे एक खास कारण आहे.
विजापूरचा राजा आदिलशहाच्या मुलगी अंध होती. त्याकाळात श्री दत्त महाराजांची महती आदिलशहाच्या कानावर गेली. वाडीतील दत्तस्थान पवित्र आणि जागृत आहे असेही त्याला समजले.
आदिलशहा मुस्लिम धर्माचे असूनदेखील आपल्या मुलीसाठी काहीही करायला तयार होते. आपल्या मुलीसाठी आदिलशहा दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री आला आणि त्याने दत्त महाराजांकडे त्यांच्या मूलीची दृष्टी परत मागितली. त्या नदीकाठी असलेल्या वनात पूर्वी केवळ श्रींच्या पादुका होत्या. ज्यावेळी त्या पादुकांवर आदीलशहाच्या मूलीने मस्तक ठेवले तेव्हा तिची दृष्टी परत मिळाली.
त्यामूळे खूश होऊन आदिलशहाने मंदिराचे बांधकाम मशिदीसारखे करून दिले. त्यामुळे या मंदिराला कळस नाही तर तिथे गोल घुमट आहे. एवढेच नाही तर मंदिरासमोर असलेले औरवाड आणि गौरवाड ही गावेही त्याने मंदिरासाठी दिली. आजही ती गावे मंदिरासाठी राखीव असून तिथे मंदिराची अधिकृत जमिन आहे.
नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. इतर मंदिरात असते तशी दत्त महाराजांची मूर्ती या मंदिरात नाही. इथे असलेल्या दत्त पादुकांची दररोज महापूजा होते. दुध, दही, तूप, मध साखर या पवित्र जिन्नसांचे पादुकांना दररोज स्नान घालण्यात येते. त्यानंतर फुलांनी अत्यंत सुरेख अशी सजावट करून त्यावर शाल पांघरली जाते. ही महापूजा भाविकांना दूर बसून पाहता येते.दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे.

वाडितल्या या मंदिराचा कळस घुमटासारखा आहेesakal
या मंदिरात पहाटे तीनपासून ते रात्रौ दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो. काकड आरती होते. पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूपदीप आरती, दत्तगजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम असतो.
या मंदिराबाबतची आख्यायिका
१३७८ मध्ये कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला. १३८८ मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्यादरम्यान १४२१ साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता. तर १४२२ मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या नृसिहवाडी गावात होता. नृसिंहसरस्वतींनी येथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली.
या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर १४३४ मध्ये त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान केले. नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय.
प्रसिद्ध आहे दक्षिणद्वार सोहळा
कृष्णा पंचगंगेच्या तिरावर असलेल्या या मंदिरात महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते, तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वाराचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातातपर्यंत पाणी आल्यावर .
Christmas 2023 :उत्तर भारतात मुघल सम्राटाने उभारले होते पहिले चर्च, असा आहे इतिहास
Christmas 2023 :
समाजात प्रेम अन् मानवतेचा संदेश रूजवणाऱ्या प्रभू येशूंचा जन्मदिवस म्हणून ख्रिसमस साजरा केला जातो. या दिवशी येशूंची प्रार्थना होते. लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सोहळा साजरा करतात. परदेशासह भारतातही ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतातील ख्रिश्चन परंपरेला ऐतिहासिक वारसा आहे. असं म्हणतात की पहिल्या शतकात केरळमध्ये चर्च उभारण्यात आले होते. भारतावर बादशहा अकबराचे शासन होते. तेव्हा मुस्लिम धर्माचा प्रसार मोठ्या काळात झाला. पण एका मुस्लिम शासकाने ख्रिश्चन चर्चही बांधले.

अकबर चर्चची भव्य इमारत esakal
उत्तर भारतातील पहिले चर्च आग्रा येथे मुघल सम्राट अकबराने बांधले होते. या चर्चचे बांधकाम 1599 मध्ये सुरू झाले आणि 1600 मध्ये संपले. चर्चचे बांधकाम पाद्री जीसस झेवियर यांच्या देखरेखीखाली जबाबदारीने केले गेले. या चर्चचे काम पूर्ण झाल्यावर आग्रा येथे पहिल्यांदाच या चर्चमध्ये ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला.
मुघल काळातील पहिले ख्रिश्चन चर्च
हे चर्च मुघल राजवटीत पहिले ख्रिश्चन चर्च होते, जे 1599 मध्ये बांधले गेले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे चर्च आजही अस्तित्वात आहे. लोक आजही अकबरी चर्चच्या नावाने ओळखतात. चर्चच्या बांधकामानंतर, त्याच्या सौंदर्यात कोणतीही घट झाली नाही, परंतु चर्चच्या बांधकामानंतर काही काळानंतर, त्याचे भव्य बांधकाम पुन्हा राजकुमार सलीम म्हणजेच जहांगीरने केले.
चर्चमध्ये लागली होती आग
या चर्चच्या इतिहासात अनेक चढ-उतार आले आहेत. एकदा आग लागल्यामुळे या चर्चचे मोठे नुकसान झाले, त्यानंतर या चर्चची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. विशेष म्हणजे दीन-ए-इलाही हा नवा धर्म अकबराने सुरू केला होता. हे चर्च भारतात ख्रिश्चन धर्म मजबूत करण्यासाठी बांधले गेले होते.

16 व्या शतकात बांधूनही त्याच्या भिंती आजही भक्कम आहेत esakal
चर्चच्या बांधकामानंतर ६३ वर्षांनी आग्रा शहरात ख्रिश्चनांचे आगमन झाले. या चर्चच्या बांधकामानंतर ६३ वर्षांनंतर ख्रिश्चन आग्रा शहरात आले. आग्र्याच्या या चर्चमध्ये पहिल्यांदाच ख्रिसमसचा सण साजरा करण्यात आला, जो आजतागायत सुरू आहे. सध्या या चर्चच्या देखरेखीची जबाबदारी फादर इग्निस मेरिंडा यांच्याकडे आहे.
फादर इग्निस मेरिंडा सांगतात की, या चर्चवर देश-विदेशातील सर्व धर्माच्या लोकांची श्रद्धा आहे, जे आजही नवस बोलून या चर्चमध्ये येतात. ख्रिसमसच्या निमित्ताने चर्चमध्ये केवळ आग्राहूनच नाही तर बाहेरचे लोकही येतात. अकबर चर्च ख्रिसमसच्या आधी सजवले जाते, त्यामुळे या चर्चच्या सौंदर्यात भर पडते.
उत्तर प्रदेशमध्ये स्थित आग्रा हे एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आणि स्थळांनी भरलेले आहे. अकबराच्या चर्चला भेट देण्याचे मुख्य कारण म्हणजे या चर्चची वास्तुकला, या चर्चची मध्यवर्ती भिंत लाल दगडांनी बनलेली आहे, त्यावर कोरीवकाम केलेले आहे, ते मुघलकालीन वास्तुकलेशी जुळते. जर आपण चर्चचे संपूर्ण स्वरूप पाहिले तर ते मुघल कलेशी जुळते.
घरात पाण्याच्या झऱ्यात सापडली सोन्याची दत्तमूर्ती, वजन शुन्य असूनही सहज उचलणे अशक्यच
Datta Jayanti 2023 :
कलियुगातही चमत्कार घडतात आणि हे घडलेले चमत्कारच आपल्याला देव आहे याची जाणिव करून देतात. आता अलिकडेच २०१८ मध्ये कणकवलीत राहणाऱ्या एका कुटुंबाला साक्षात दत्त गुरूंनीच आशिर्वाद दिला आहे. कणकवलीच्या मोहित्यांच्या घरी दत्त महाराज प्रगटले होते. त्याची कथा काय आहे हे आपण पाहुयात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीपासून अलिकडे असलेल्या जाणवली गावातील ही घटना आहे. जाणवली गावात मोहिते कुटुंबियांचा बंगला आहे. बंगला बांधल्यानंतर परसाबागेजवळ एका खोलीचे बांधकाम सुरू होते. ती खोली बांधून पूर्ण झाली. मोहित्यांनी ती वापरायलाही काढली. पण थोड्याच दिवसात असं लक्षात आलं की, या खोलीत कुठुनतरी पाणी पडत आहे. (Datta Jayanti)
प्रथमदर्शनी वाटायचं की आडवा-तिडवा पाऊस पडल्यावर खोलीत पाणी आलं असेल. किंवा घराखालून गेलेली एखादी पाईपलाईन फुटली असेल. पण, खोलीत पाणी यायचं कारण वेगळंच होतं. खोलीत बसवलेल्या फरशीतूनच उमाळ फुटत होता. जिथून उमाळ फुटला तिथे मोहिते यांनी खोदकाम केलं तेव्हा तिथे साडे तीन फुटावरच त्यांना पाण्याचा झरा अन् दत्त महाराजांची सोन्याची मूर्ती सापडली.
या मूर्तीचे वैशिष्ट्य असं आहे की, सोन्याची भरीव मूर्ती असून ती कोरीव आहे. ही मूर्ती सापडली तेव्हा तिच वजन केलं तेव्हा ते शून्य दाखवतं. कोणत्याही काट्यावर ठेवली तरी तेच वजन येतं. याची अजूनही पंचक्रोशीत चर्चा होते.

श्री गुरूदेव दत्तांची हीच ती आकर्षक सोन्याची मूर्तीesakal
पण, इतकं कमी वजन दाखवत असूनही एका हातात उचलणे शक्य नाही. विशेष गोष्ट अशी की, जेव्हा ही मूर्ती मिळाली तेव्हापासून रूममध्ये येणारे पाणीही बंद झाले. मोहिते परिवारानेच मंदिर बांधून तिथे मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. तर, आजूबाजूच्या गावातील लोकांना ही दत्त मूर्ती नवसाला पावणारी आहे.
साधारण ८०० ते ९०० वर्षांपूर्वीची ही मूर्ती असल्याचा अंदाज गावकरी बांधतात. येथे दरवर्षी दत्तजयंतीला मोठा सोहळा पार परडो. तर गुरूवार, पौर्णिमा यावेळीही विशेष पूजा बांधली जाते. जसा या मूर्तीच्या देवत्वाचा प्रसार होत गेला तसे तिथे भक्तांची गर्दी वाढू लागली आहे.
Dakini Temple : सायंकाळी ६ नंतर या मंदिरात काय घडतं? कोणासही प्रवेश करण्यास आहे मनाई
Dakini Temple :
एखादे प्राचिन मंदिर म्हटलं की देवांची प्रतिमा, देवांची आरती, पूजा केली जाते. दिवसातून पाच ते सहावेळा देवांची आरती, नैवेद्य सुरू असतात. पण आपल्या देशात एक मंदिर असं आहे. जिथे सायंकाळ झाली की, मंदिर बंद केलं जातं. आणि ते सकाळीच उघडतं.
मधेपुरा जिल्ह्यातील आलमनगर तालुक्यातील खुरहान गावातील माता डाकिनी मंदिर परिसरात हा नियम वेगळा आहे. संध्याकाळी 6 नंतर या मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे. पुजारी सांगतात की मंदिराचे दरवाजे सकाळी 6 वाजता उघडतात आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतात.
देवी डाकिनी मंदिरात दररोज बकऱ्यांचा बळी दिला जातो, जो येथील अनोख्या पूजेचा एक भाग आहे. याशिवाय येथे जास्तीत जास्त लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो, जो एक विशेष धार्मिक विधी दर्शवतो.
या मंदिराची स्थापना 1348 मध्ये झाली होती. दुर्गा माता म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुर्हानची माता डाकिनी जवळपास सातशे वर्षांपासून या ठिकाणी आहे. मंदिराचे पुजारी कमलेश झा सांगतात की, आईने त्यांचे आजोबा पंडित भयो झा यांना स्वप्नात दर्शन दिले होते. त्यानंतर 1348 मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने येथे मंदिर बांधले गेले.
येथे दूर्गा मातेच्या 9 व्या रूपाची पूजा केली जाते. लोक या मातेला माता जंगलवाली, माता डाकिनी आणि माता छिन्नमस्तिका या तीन नावांनी ओळखले जाते. माता जंगलवाली हे नाव आहे, कारण इथे माता जंगलात वास करत असे, तर माँ छिन्नमस्तिकेचा अर्थ आहे की ती राक्षसांचे मस्तक कापणारी आहे.
या मंदिरात मातेचा वास आहे
पंडित कमलेश सांगतात की, डाकिनी मातेच्या मंदिरात सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत पूजा केली जाते. यानंतर मंदिर परिसरात लोकांना प्रवेश बंदी आहे. त्यांच्या मते या ठिकाणी संध्याकाळनंतर माता स्वत: मंदिराच्या विशाल आवारात फेरफटका मारते, अशी श्रद्धा या भक्तांची आहे.
गोव्यात महागड्या हॉटेलवर पैसे खर्च करू नका, इथे रहा, निम्म्याहून अधिक पैसे वाचतील
लाईव्ह न्यूज
Cheap Hotels In Goa : गोव्यात महागड्या हॉटेलवर पैसे खर्च करू नका, इथे रहा, निम्म्याहून अधिक पैसे वाचतील

New Year Tour : कंटाळा घालवण्याचे ठिकाण म्हणून गोव्याला पर्यटकांनी नेहमीच पसंती मिळते. नव्या वर्षाची पार्टी आणि ख्रिसमसमुळे गोव्याला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. गोव्यात इतरवेळी कमी किंमतीत सहज मिळणाऱ्या सोयी-सुविधा वर्ष संपत आल्यावर महाग होतात.
कारण, नव्या वर्षाच्या स्वागताला गोव्यात विदेशी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे खाण्या-पिण्यासह राहण्यासाठीचे हॉटेल्सचे दरही वाढवले जातात. तुम्हीही तुमचा गोव्याला जाण्याचा प्लॅन पूर्ण करणार असाल, तर गोव्यात हॉटेल्समध्ये न राहता अशा काही खास ठिकाणी रहा जिथे कमी पैशात राहण्याची सोय होईल.
गोव्यात काही सरकारी कॉटेज, हॉटेल्स आहेत जे तुम्हाला अगदी रास्त दरात मिळू शकतात. इतर हॉटेल प्रमाणेच इथे सर्व सुखसुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे गोव्याला गेल्यानंतर या जागी राहण्याचा विचार तुम्ही करू शकता.
कोलवा रेसिडेन्सी
साऊथ गोव्यातील लोकप्रिय कोलवा बीचजवळ कोलवा रेसिडेन्सी आहे. हे सरकारी कॉटेज आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही डबल रूम-स्टँडर्ड, एसी-स्टँडर्ड रूम, एसी स्टँडर्ड रूम या श्रेणींमध्ये रूम बुक करू शकता. हॉटेलमध्ये एकूण 47 खोल्या आहेत.
सरकारी हॉटेल आहे असे समजून या हॉटेलला कमी लेखण्याची चूक करू नका. या हॉटेलमध्ये तुम्हाला कोणत्याही 3 स्टार हॉटेलप्रमाणे सुविधा मिळतील. हॉटेलमध्ये रेस्टॉरंट आणि ओपन गार्डन सुविधा देखील आहेत.
बल
रूम-स्टँडर्ड, एसी-स्टँडर्ड रूमचे भाडे - झनमध्ये 2,530-2,970 च्या दरम्यान
असते. इतर दिवसांमध्ये, डबल रूम-स्टँडर्ड, AC-स्टँडर्ड रूमचे भाडे 2,300-
2,700 रूपयांच्या दरम्यान असते.

कलंगुट रेसिडेन्सी
पणजीपासून
16 किमी अंतरावर असलेले कलंगुट रेसिडेन्सी हे गोवा पर्यटनाचे एक हाय
स्टँडर्ड हॉटेल आहे. येथे तुम्ही 4 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये खोल्या बुक करू
शकता. या हॉटेलमधील खोल्या डिलक्स सी फ्रंट व्ह्यू, एसी सूट, एसी डिलक्स
साइड व्ह्यू आणि एसी डिलक्स कॉटेज श्रेणींमध्ये बुक केल्या जाऊ शकतात.
या हॉटेलमध्ये एकूण 52 खोल्या आहेत. या हॉटेलमध्ये तुम्हाला कोणत्याही 4 स्टार हॉटेलप्रमाणे सुविधा मिळतील. पीक सीझनमध्ये म्हणजेच 23 डिसेंबर ते 1 जानेवारी 2024 दरम्यान, येथील रूमचे भाडे थोडे जास्त आकारले जाईल.

गोव्यातील प्रत्येक हॉटेल सी साईडशिवाय पूर्ण वाटत नाही. तुम्हालाही गोव्यातील एखाद्या हॉटेलमध्ये परवडणाऱ्या किमतीत राहायचे असेल, ज्यामध्ये समुद्राचे विहंगम दृश्य आहे. तर मिरामार रेसिडेन्सी तुमच्यासाठी योग्य आहे.
सकाळी आणि संध्याकाळी समुद्र किनार्यावर फेरफटका मारा आणि नेत्रदीपक सूर्योदय किंवा सूर्यास्त पहा किंवा ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या बीच पार्टीमध्ये सामील व्हा.

फार्मगुरी रेसिडेन्सी
फार्मगुरी रेसिडेन्सी फोंडा येथे सर्वत्र हिरवाईने वसलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमची ख्रिसमस किंवा नवीन वर्षाची पार्टी या हॉटेलच्या खुल्या लॉनमध्ये ठेवू शकता. हॉटेलमध्ये एकूण 39 खोल्या आहेत.
एसी स्टँडर्ड रूम, डबल रूम-स्टँडर्ड, एसी सूट आणि डॉर्मिटरीमध्ये बेडच्या आधारावर या खोल्या बुक केल्या जाऊ शकतात. हे हॉटेल इतर सर्व हॉटेल्सच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पणजीपासून अवघ्या २६ किमी अंतरावर हे हॉटेल आहे.
वास्को रेसिडेन्सी
तुम्हाला शहराच्या मध्यभागी रहायचे असेल.तर, वास्को रेसिडेन्सी हा उत्कृष्ट पर्याय आहे. तुम्हाला शॉपिंग मॉल किंवा सिनेमा हाऊसमध्ये जायचे असेल, अगदी थोड्या अंतरावर तुम्हाला सर्व काही मिळेल. हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गोव्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
विमानतळापासून जवळ असल्यामुळे, ज्या लोकांना सकाळी लवकर विमान पकडावे लागते ते या हॉटेलमध्ये बुक करतात. हॉटेलमध्ये एकूण 45 खोल्या आहेत ज्या डबल रूम-स्टँडर्ड आणि एसी स्टँडर्ड रूम श्रेणींमध्ये बुक केल्या जाऊ शकतात.

ब्रेक घ्या, डो
Sita Rasoi : सीता मातेचे स्वयंपाकघर आजही जसेच्या तसे आहे, तुम्ही पाहीलंय का?
Sita Rasoi :
सीता मातेचे स्वयंवर झालं आणि ते अयोध्येला आले. तेव्हा श्री रामांना वनवासाला जावं लागलं त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मण सुद्धा गेले. तिथे रावणाने सीतेचे हरण केले त्यानंतर वानरसेना बणवून श्रीरामांनी सीतामातेला सोडवून अयोध्येत आणले.
१४ वर्षांचा वनवास भोगून प्रभू श्रीराम अयोध्येला परतले. श्रीरामांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीने दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. त्या दिवसापासून दिवाळी साजरी करण्याची प्रथा रूढ झाली असे पुराणांमध्ये सांगितले जाते.
रामायणातील काही प्रसंगांच्या पाऊलखूणा आजही सापडतात. उत्तर प्रदेशातील मंदाकिनी नदीच्या काठावर असलेले चित्रकूट धाम हे असे स्थान आहे जिथे माता सीतेने आपला बहुतेक वेळ घालवला होता. या धाममध्ये माता सीतेचे स्वयंपाकघर आहे, जिथे माता सीता स्वयंपाक करायच्या. इथे त्या महर्षी ऋषींना भोजन द्यायच्या.
चित्रकूट धामचा इतिहास हजारो वर्षे जूना आहे. लाखो भाविक येथे भगवंताच्या दर्शनासाठी येतात. येथे कामद गिरी नावाचा पर्वत आहे, जो कोणी या पर्वताला प्रदक्षिणा घालतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते.
या ठिकाणी तुम्हाला भारत मिलाप मंदिर देखील पाहायला मिळेल. हे ते ठिकाण आहे जेव्हा वनवासात असताना बंधू भरत यांनी श्रीरामांना वनवास सोडून परत या आणि अयोध्येची गादी सांभाळा, अशी विनंती केली होती. परंतू श्रीरामांनी राजतंत्र नाहीतर एका मुलाने पित्याला दिलेले वचन पाळले. आणि वनवासाचा काळ पुर्ण करूनच ते अयोध्येला परतले.

सीता मातेचे स्वयंपाकघरesakal
येथे एक मंदिर आहे ज्यावर सीता रसोई असे लिहिलेले आहे. माता सीता येथे स्वयंपाक करायच्या. या मंदिरात सिता मातेची पोळपाट लाटणे, चूल, इतर मातीची भांडी आहेत. हे मंदिर रामजन्मभूमीच्या उत्तर-पश्चिम भागात आहे. मंदिरात तुम्हाला भगवान राम, माता सीता यांच्यासह लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आणि त्यांच्या पत्नींची छायाचित्रेही पाहायला मिळतील.
या मंदिरात तुम्हाला स्वयंपाकघरातील भांड्यांमुळेच लोक या मंदिराला मातेचे स्वयंपाकघर मानतात. इथे भेट देऊन इतिहासातील हा ठेवा पहायला लोक उत्सुक असतात. खास करून महिला वर्गात याचे आकर्षण आहे. माता सीता साक्षात देवीचेच रूप, त्यांचा स्पर्श झालेल्या या भांड्याचे आशिर्वाद घेऊन आपणही अन्नपुर्णा होऊ अशी महिलांची भाबडी इच्छा असते.

या गाभाऱ्यात स्वयंपाकातील रोजच्या वस्तू जतन करण्यात आल्यात esakal
Temples In India : या देवळात देव नाहीतर बुलेट अन् विमानाची केली जाते पूजा; इथल्या देवांची कथाच निराळी
Temples In India : भारत हा असा देश आहे जिथे पावला पावलावर काही प्राचीन मंदिर सापडतील. या मंदिरांची स्वतःची वेगळी ओळख आहे. जिथे लोक दूरदूरवरून प्रार्थना करण्यासाठी येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही देशात मंदिरे बांधण्यात आली आहेत. पण तुम्ही कधी मोटारसायकल मंदिराबद्दल ऐकले आहे का?
कारण ही कल्पना नसून सत्य आहे. राजस्थानमध्ये एक गाव आहे, जिथे देवाची मूर्ती नाही तर रॉयल एनफिल्ड बुलेट 350 मंदिराच्या आत ठेवण्यात आली आहे. इथली खास गोष्ट म्हणजे या बुलेटची पूजा करण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात.
मंदिराचे नाव काय?
या मंदिराचे नाव 'ओम बन्ना धाम' आहे. लोक त्याला 'बुलेट बाबा मंदिर' या नावानेही ओळखतात. साधारण 30 वर्षांपूर्वी या गावातील ठाकूर जोगसिंग राठोड यांचा मुलगा ओमसिंग राठोड याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. हे मंदिर त्याच ओम सिंह यांच्या नावाने बांधण्यात आले आहे.
मंदिर कुठे आहे?
ओम बन्ना धाम बुलेट बाबा मंदिर हे राजस्थानच्या जोधपूरपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली शहराजवळील चोटीला गावात आहे.
बुलेट बाबा मंदिराची थक्क करणारी कहाणी
ओम सिंग राठोड या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी दुचाकी आणि त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी ही दुचाकी पोलिस ठाण्यातून गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर दुचाकीचा शोध सुरू केला असता. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी पोलिसांना दुचाकी सापडली.
दुचाकी पुन्हा पोलिस ठाण्यात आणली. त्या रात्रीही असाच प्रकार घडला. ही घटना रोज सातत्याने घडू लागली. यानंतर एक दिवस पोलिसांनी रात्री पाळत ठेवली. पण पुढे जे घडले ते सर्वांनाच चकित केले.
रात्रीच्या वेळी दुचाकी स्वतःहून सुरू होऊन अपघातस्थळी जात होती. ही घटना पाहिल्यानंतर पोलिसांनी दुचाकी कुटुंबीयांना परत केली. कुटुंबियांनीही बुलेटचे मंदिर बांधून त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली.
एरो प्लेन गुरुद्वारा, जालंधर
जालंधर, पंजाबमधील एरो प्लेन गुरुद्वारा आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा मिळण्याची काळजी करण्याची गरज नाही. येथे लोक खेळणी विमाने दान करतात आणि व्हिसा आणि पासपोर्ट मिळविण्याची समस्या संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद मागतात. इथे मागितलेली मागणीही पूर्ण होते, असे भाविकांची श्रद्धा आहे.
Shravan 2023 : महादेवांचा चमत्कारीक नंदी; वर्षानुवर्षे भारतातील या मंदिरातील नंदीचा आकार वाढतोय
Shravan 2023 : भारतातल्या अनेक मंदिरांना विशिष्ट असा इतिहास आहे. त्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. महादेवांच्या मंदिरांत भाविकांनी गर्दी केली आहे. पुन्हा श्रावणातील सोमवारसाठी वर्षभर वाट पहावी लागणार असल्याने मंदिरात भक्तांची आज जास्त गर्दी दिसून येईल.
श्रावणाच्या शेवटच्या सोमवार निमित्त आपण महादेवांच्या एका चमत्कारीक मंदिराबद्दल जाणून घेऊयात. यागंती उमा महेश्वरा मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील कुर्नूल या ऐतिहासिक जिल्ह्यात स्थित सर्वात जुने आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील हे असे मंदिर आहे जिथे असलेल्या महादेवांच्या नंदीचा आकार वाढत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत, याच खास मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत पाहुयात.
महादेवांचे हे मंदिर श्री यागंती उमा महेश्वरा स्वामी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि देशातील सर्वात शक्तिशाली भगवान शिव मंदिरांपैकी एक मानले जाते. या मंदिराला वर्षभर जगभरातून मोठ्या संख्येने भाविक भेट देतात.
यागंती मंदिराचा इतिहास
यागंती उमा महेश्वर मंदिराचे बांधकाम पाचव्या शतकातील आहे. हे मंदिर भारताच्या दक्षिणेकडील सर्वात प्राचीन आणि महत्त्वपूर्ण मंदिरांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर भगवान शिवाचे प्रिय असलेल्या अगस्त्य ऋषींनी बांधले होते. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे आणि आता ते एक भव्य आणि पवित्र पूजास्थान म्हणून उभे आहे.
यागंती उमा महेश्वर मंदिराची आख्यायिका
यागंती उमा महेश्वराच्या मंदिराच्या अनेक दंतकथा आहेत. सर्वात लोकप्रिय म्हणजे हिंदू धर्मातील दोन महत्त्वाच्या ग्रह देवता राहू आणि केतू यांचा समावेश आहे. असे मानले जाते की दोन्ही देवतांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांना अपार शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त झाले.
दुसर्या आख्यायिकेनुसार, भगवान बालाजी पत्नी देवी पद्मावतीसह मंदिरात गेले होते. मंदिराची स्थापत्यकला देखील भारताच्या प्राचीन सभ्यतेचा आश्चर्यकारक पुरावा असल्याचे म्हटले जाते.

यागंती उमा महेश्वर मंदिर आंध्र प्रदेशची वास्तुकला
यागंती उमा महेश्वर मंदिर, त्याच्या गुंतागुंतीच्या आणि विस्मयकारक वास्तुकला असलेले, भारतातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार, त्रिपुरांथक गेट म्हणून ओळखले जाते, असे मानले जाते की चालुक्य राजांनी बांधले होते. हे मंदिर द्रविडीयन मंदिर स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण आहे आणि त्यात चालुक्य, चोल आणि विजयनगर राजवंशांच्या शैलींचे एक मनोरंजक मिश्रण आहे.
मंदिराच्या मुख्य गाभार्यात स्वयंभू लिंग किंवा भगवान शिवाचे स्वतः वाढलेले लिंग आहे. मंदिरात काही मनोरंजक शिल्पे आणि कोरीवकाम देखील आहेत, ज्यात देवी सरस्वती आणि दुर्गा यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की मंदिराची रचना अशा प्रकारे केली गेली होती की वर्षातील विशिष्ट दिवशीच सूर्यप्रकाश स्वयंभू लिंगावर पडतो.
यागंती उमा महेश्वराच्या मंदिरात वर्षभर अनेक उत्सव साजरे होतात. येथील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे महाशिवरात्री जो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या शुभदिनी येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. (Temples)

महादेवांचा कलेकलेने वाढणारा नंदीesakal
यागंती मंदिरात नंदी वाढण्याचे रहस्य
नंदीला भगवान शिवाचे वाहन मानले जाते आणि शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. यागंती मंदिरातील नंदीची मूर्ती काळ्या ग्रॅनाइटपासून बनलेली असून ती दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या मूर्तींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. ही मूर्ती अंदाजे 15 फूट लांब आणि 9 फूट उंच आहे आणि ती 5,000 वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.
यागंतीमध्ये वाढणारी नंदी
या मंदिरातील खास गोष्ट म्हणजे मंदिरात असलेल्या नंदी महाराजांचा आकार दिवसेंदीवस वाढत आहे. सुरुवातीला ही मूर्ती सध्याच्या आकारापेक्षा खूपच लहान होती. अनेक वर्षांपासून ती वाढत आहे. आता या मूर्तीचा आकार इतका वाढलाय की ती मूर्ती मंदिराच्या छताला टेकली आहे.
नंदीची मूर्ती का वाढत आहे?
नंदी महाराजांच्या वाढत्या आकाराबाबत काही सिद्धांत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे त्या क्षेत्रातील चुंबकीय क्षेत्रामुळे किंवा मंत्र आणि प्रार्थनांच्या उच्चारामुळे होणारी तीव्र कंपनांमुळे असे घडत आहे. इतरांचे म्हणणे आहे की भगवान शिवांची या मंदिरावर कृपा आहे त्यामुळे मूर्तीचा आकार वाढत आहे. हा एक चमत्कारच आहे. (Lord Shiva)

महादेवांच्या मंदिराचा परिसरesakal
नंदी मूर्तीचा आकार वाढवण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण
शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी नंदीच्या मूर्तीचा अभ्यास केला आणि काही निष्कर्ष काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार नंदी मूर्तीचा आकार वाढत नाही, तर प्रत्यक्षात ती मंदिराची रचना आहे जी जमिनीत बुडत आहे. या बुडण्याच्या हालचालीमुळे मूर्ती मूळ आकारापेक्षा मोठी दिसते.
वैज्ञानिक स्पष्टीकरण असूनही, भक्तांचा असा विश्वास आहे की मूर्तीची वाढ भगवान शंकराच्या आशीर्वादामुळे होते. ते आपली प्रार्थना करण्यासाठी आणि भगवान शिव आणि नंदीचा आशीर्वाद घेण्यासाठी दूरदूरहून येतात. हे मंदिर पर्यटकांना आणि अभ्यागतांना देखील आकर्षित करते जे नंदीच्या वाढत्या मूर्तीच्या अद्वितीय घटनेचे साक्षीदार होण्यास उत्सुक आहेत.
Historical Places : इथल्या कुंडात एकदा अंघोळ करा, असाध्य आजाराही होतील बरे, पुराणांशी आहे थेट संबंध
Historical places : भारत हा इतिहास जगणारा देश आहे. भारतात पुराणांमध्ये घडलेल्या घटनांचे पुरावे आजही आपल्याला पहायला मिळतात. रामायणातील जटायू वध असेल किंवा नाशिकमधील पंचवटी वन असेल. या गोष्टी आजही भूतकाळात घडलेल्या घटनांची प्रचिती आपल्याला देत आहेत.
रामायण-महाभारतातील मनुष्यरूपी देवांनी केलेल चमत्कार आजही घडतात. महाभारतात पांडव होते तर रामायणात राम-लक्ष्मणाची जोडी. रामायणात बांधलेला रामसेतू खरचं बांधला होता हे नासा (NASA) नेही मान्य केलं आहे.
असेच काही चमत्कारीक कुंड, जलाशय आजही आहेत जिथे अंघोळ केल्यानंतर अनेक असाध्य आजारांवर मात केली जाऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. आज आपण अशाच काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत.
भीमकुंड
भीमकुंड मध्य प्रदेशातील छतरपूर येथे आहे. हा कुंड दिसायला साधा असली तरी अतिशय गूढ ठिकाण आहे. असे मानले जाते की हे कुंड महाभारतकाळातील आहे. मात्र, ते किती खोल आहे, हे कुणालाच कळू शकलेले नाही. भीमकुंडात अंघोळ केल्यास आरोग्य सुधारू शकते, असा स्थानिकांचा विश्वास आहे.
गंगनानी
उत्तराखंडच्या गंगोत्री मार्गावर गंगनानी नावाचं एक छोटंसं गाव आहे. येथे येणारे भाविक येथे उकळलेल्या गरम पाण्याच्या पात्रात डुबकी मारतात. येथे आंघोळ केल्याने त्यांचे अनेक शारीरिक विकार दूर झाले आहेत, असे बहुतांश लोकांचे मत आहे.
मणिमहेश तलाव
मणिमहेश तलाव कैलास पर्वतावर स्थित आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशात आहे. येथे एक अतिशय सुंदर तलाव आहे, जिथे हजारो लोक स्नान करतात, स्थानिकांचा असा विश्वास आहे की येथील पाण्यामुळे स्नायू मजबूत तर होतातच, शिवाय शारीरिक जखमाही भरून निघतात.
पुष्कर सरोवर
राजस्थानमध्ये असलेले पुष्कर जगभरात प्रसिद्ध आहे. तसेच येथे एकमेव ब्रह्ममंदिर आहे. रामायणासारख्या पवित्र धार्मिक ग्रंथांमध्येही पुष्करचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळापासून येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की या पवित्र तलावात स्नान केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात. येथे आंघोळ केल्याने कॅन्सरही बरा होतो, अशी लोकांची श्रद्धा आहे.
Navratri 2023 : शक्तीचे प्रतिक आहे भारतातील हे मंदिर, एक नाही तर ६४ योगिनींचा मिळतो आशिर्वाद
Navratri 2023 : भारतात देवीची शक्ती असलेली अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी अनेक मंदिरात दैवी शक्तीचा आजही वास आहे. देवीच्या शक्तीची प्रचिती त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सहज होते.
लवकरच देशभरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सव हा नऊ रात्रींचा जागर असतो, त्यामुळे या खास दिवसात देवींच्या अनेक मंदिरांना भक्तगण भेट देतात. आज आपण अशाच एका मंदिराची माहिती घेणार आहोत. जिथे एक दोन नव्हे तर तब्बल ६४ देवींचा वास होता आणि आजही तिथे एक सकारात्मक शक्ती अनुभवण्यास मिळते. ()
भारतातील ६४ योगिनी मंदिर
भारतात एकूण चार चौसष्ठ योगिनी मंदिरे आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशातील मुरैना येथे असलेले चौसष्ठ योगिनी मंदिर सर्वात प्रमुख आणि प्राचीन आहे. मुरैना येथे असलेले हे भारतातील असे प्राचिन मंदिर आहे जे अजूनही चांगल्या स्थितीत आहे.
एकेकाळी हे मंदिर तंत्र-मंत्रासाठी खूप प्रसिद्ध होते. म्हणून या मंदिराला तांत्रिक विद्यापीठ असेही म्हटले जाते. देश-विदेशातून लाखो लोक येथे तांत्रिक तंत्र-मंत्र शिकण्यासाठी येत होते. आज या मंदिराच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. (Ekattarso Mahadev Mandir Chausath Yogini Temple history and unknown facts)
चौसष्ठ योगिनीच्या या मंदिरात जाण्यासाठी २० पायऱ्या चढून जावे लागते. हे मंदिर गोलाकार असून त्यात ६४ खोल्या आहेत. यातील प्रत्येक खोलीत एक शिवलिंग आहे. मंदिराच्या मध्यभागी एक मोकळा मंडप आहे. ज्यामध्ये एक मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर १३२३ मध्ये क्षत्रिय राजांनी बांधले होते.

चौसष्ठ योगिनीच्या या मंदिरात जाण्यासाठी २० पायऱ्या चढून जावे लागतेesakal
या मंदिरातील प्रत्येक खोलीत शिवलिंगासोबत योगिनी देवीची मूर्ती होती. पण त्यातील काही मूर्ती चोरीला गेल्यामुळे या मूर्ती आता दिल्लीच्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराला चौसष्ठ योगिनी मंदिर असे नाव पडले.
हे मंदिर १०१ खांबांवर विराजमान आहे. भारतीय पुरातत्व विभागाने हे मंदिर प्राचीन ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे. ब्रिटीश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांनी या मंदिराच्या आधारावरच दिल्लीचे संसद भवन बांधले होते. पण, याबद्दलची माहिती कुठेही सापडत नाही. मंदिर केवळ बाहेरून संसद भवनासारखेच नाही तर आतमध्ये खांबांची रचना देखील सारखीच आहे.
या सर्व ६४ योगिनी देवी आदिशक्ती कालीचे अवतार आहेत. घोर नावाच्या राक्षसाशी युद्ध करताना काली मातेने योगीनी देवीचा अवतार घेतला असल्याचे पौराणिक मान्यता आहे. चौसठ योगीनी मंदिर एकेकाळी तांत्रिक विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. एकेकाळी या मंदिरात तांत्रिक सिद्धी मिळविण्यासाठी तांत्रिकांचा मेळा भरत असे.
Shravan 2023 : १२ महिने २४ तास श्रावण पाळणारं गाव, मंदिरातून दिसते शिखर शिंगणापूरची झलक!
Shravan 2023 : आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याचं काही ना काही खास वैशिष्ट्य आहे. राजस्थानाला ऐतिहासीक तर केरळला देवभूमी म्हटलं जातं. तसंच आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटलं तर वावग ठरणार नाही. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांचे विचार जूने झाले म्हणजे ते मागे पडले असे नाही. तर त्याच संत महाराजांनी रूजवलेले विचार आजही श्रद्धेने पाळले जातात.
जिथ लोक श्रावण कधी संपतोय अन् आपण कधी मटणावर तुटून पडतोय असा विचार करत आहेत. तर अशात नेहमीच श्रावण पाळणारे एक गाव आहे. ज्या गावातील लोक मासांहार करणे तर सोडाच पण त्याचा विचारही करत नाहीत. हे काही विशिष्ट महिना किंवा वर्षभराच्या रितीप्रमाणे नाही. तर जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत या गावातील लोक मासांहार करत नाहीत.
हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील विटा तालूक्यातील रेणावी. या गावातील लोक मांसाहारापासून दूर असतात. ते केवळ या गावची प्रथा आहे म्हणूनच. या गावात नवनाथांपैकी एक असलेले श्री रेवणसिद्ध महाराजांचे भव्य मंदिर आहे. (Sangli)
देवस्थान प्रशस्त असून बांधकाम पूर्णपणे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे. डोंगरदऱ्या आणि दाट वनराईने हा परिसर वेढलेला आहे. इथे कधी-कधी कोल्हा, काळवीट, हरीण अशा वन्यप्राण्यांचेही दर्शन होते.
सह्याद्री पर्वतावर असलेल्या डोंगररांगांची सुरूवात खानापूर तालुक्यापासून होते. त्यापैकी ‘रेवागिरी’ नावाची डोंगररांग विटा शहरापासून पूर्वेस सुरू होते. विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कऱ्हाड-विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथेच श्री रेवणसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
या वेगळ्या प्रथेबद्दल ग्रामस्थ सांगतात की, श्री रेवणसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे. रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी एक आहेत. नवनाथ हे पूर्ण शाकाहारी होते. ग्रामदैवत नाथ महाराज असल्याने गावातल्या लोकांना कधीही काही कमी पडत नाही. देवांची अखंड शक्ती सकारात्मक उर्जा गावात नेहमी जाणवते. गावात कधीही भांडण-तंटे होत नाहीत. देवांसाठी आम्हीही हे संपुर्ण शाकाहाराचे व्रत केले आहे, असेही ग्रामस्थ सांगतात. (Shravan)
एखाद्याचे लग्न ठरवतानाही त्याबाबत लग्नाची बोलणी केली जाते. शाकाहारी असलेल्या कन्येची निवड केली जाते. किंवा तशी कल्पना नववधूला देऊन मगच लग्नाची सुपारी फुटते. गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाने ही परंपरा जपली आहे. तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांना याचं नवल वाटत नाही. ते श्रद्धा म्हणून या गोष्टी मनोभावे पाळतात.
रेवणसिद्धाची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारातून दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं, असं सांगितलं जातं. मंदिराच्या पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर गायमुख आहे. रेवणसिद्ध मूर्तीसमोर भव्य असा नंदी आहे. (Temples)
दगडी गुंड
मंदिरात नंदीमहाराजांसमोर एक दगड आहे. त्याला गुंड्या म्हणतात. हाताच्या तीन बोटांनी तो दगड उचलला जातो. असं म्हणतात की, मनात असलेली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड तीन बोटात अलगद उचलतो. पण जर इच्छा पूर्ण होणार नसेल तर मात्र तो दगड जागचा हालतही नाही.
anmashtami 2023 : कोल्हापुरातल्या या गावात वर्षातून दोनवेळा साजरी होते दहीहंडी; गावात श्रीकृष्णांनी केला रंभेचा उद्धार!
Janmashtami 2023 : श्रीकृष्णांची मंदिरे जशी भारतात आहेत तशी ती परदेशातही आहेत. कृष्णभक्तीचा प्रसार जगभर झाला आहे. अनेक देशात कृष्णांचे भक्त आहेत. दरवर्षी भारतात असलेल्या इस्कॉन मंदिरात परदेशातील भाविकही येतात. नाचतात गातात कृष्णभक्तीत तल्लीन होतात.
जगतकल्याणासाठी देव मनुष्यरूपात जन्म घेतात. देव असूनही यशोदामातेचा मार खातात, गोपिकांचे दही चोरतात. प्रसंगी गोवर्धन उचलून प्रजेचे रक्षण करतात. आणि जगतकल्याणासाठी भ्रमण करतात. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. कृष्ण भक्तांसाठी आज जणू दिवाळी अन् दसरा होय.
कृष्णाने अनेक ठिकाणी जाऊन राक्षसांचा वध केला. गावांचा, लोकांचा उद्धार केला. तसेच ते एकदा करवीर क्षेत्राकडे आल्याचे उल्लेख पुराणांमध्ये आहेत. या विषयी हरिवंशपुराण आणि करवीर महात्म्य या दोन ग्रंथांत फार सुंदर उल्लेख मिळतात.
करवीर महात्म्य उल्लेखाप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दोन वेळेला कोल्हापुरात आले एकदा बलरामा सोबत कालयवन वधासाठी आणि दुसऱ्या वेळी आपल्या सोळा सहस्त्र स्त्रियांच्या मानसिक पापाच्या परिवारासाठी. हरिवंशात मात्र भगवान एकदाच कोल्हापुरात आले तेही कालयवन राक्षसाच्या वधावेळेला असा उल्लेख आढळतो.
जावयाचा वध केला म्हणून बदला घेण्यासाठी कंसाचे सासरे जरासंधाने कृष्णाला मारण्यासाठी कालयवन या राक्षसाला पाठवले होते. कालयवन हा जरासंधाने बोलावलेला दुष्ट सेनापती होता. लेकीच्या पतीची हत्या केली म्हणून जरासंधाने श्रीकृष्णाचा सूड घेण्याच्या उद्देशाने सतरा वेळेला मथुरेवर आक्रमण केले होते. सतरा वेळा तो पराजित ही झाला पण मथुरेचे अतोनात नुकसान झाले. अठराव्या वेळी मात्र त्याने कालयवन नावाच्या दुष्ट दैत्याला पाचारण केले.
हा दैत्य गांधार देशाच्या पलीकडून आला असा उल्लेख आहे. अशा कालयवनाला रणांमध्ये लढण्याचा दांडगा अनुभव होता. त्यामुळे सर्व मथुरावासी यांनी भगवंतांना सांगितले की कालयवनाचे वैर हे तुमच्याशी आहे मथुरेच्या बाकी जनांशी नाही तेव्हा योग्य तो निर्णय करा. (Lord Krishna)
भगवंतांनी युद्धाला आव्हान दिले आणि आपला रथ कालयवन त्याच्यासमोर येऊन उभा केला. कालयवनाला बघून भगवान रथातून उतरले आणि रणातून पळत सुटले असा उल्लेख आहे. यामुळेच भगवान श्रीकृष्णाला रणछोड असे नाव मिळाले. भगवंतानी रण सोडलं खरं पण त्यांनी असे केले कारण त्या राक्षसाला मथूरेपासून दूर न्यायचे होते.
सह्याद्री पर्वताच्या घनघोर करण्यामध्ये दैत्याला आव्हान दिले. श्रींचा पाठलाग करत दैत्य कोल्हापुरजवळच्या विशाळगडाच्या पाठीमागे असलेल्या मुचकुंद नावाच्या राजाच्या गुहेत शिरला. मुचकुंद राजाला वरदान होते की जो कोणी त्यांची झोप मोडेल तो जळून भस्म होईल.भगवंत गुहेत आले आणि त्यांनी आपला शेला मुचकुंद राजावर पांघरला कालयवनाने रागाने कृष्ण समजून मुचकुंदाची झोपमोड केली. आणि तो जळून भस्म झाला.
करवीर महात्म्य आपल्या कथेप्रमाणे इथे येताना भगवान श्रीकृष्णांनी गाय रुपी रंभेचाचा उद्धार केला. तो परिसर म्हणजे केखले आणि जाखले. तसंच कालयवनाबरोबर युद्ध करताना भगवंताने मारलेल्या उडी मुळे पर्नाळपर्वत दोन योजन खाली आला असा उल्लेख आहे. (Janmashtami)

जाखले मंदिरातील सभामंडपesakal
आजही जाखले गावात हे गोपालेश्वराचे मंदिर आहे. पुढे करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या सोळा सहस्त्र राण्यांच्या हातून काही मानसिक पाप घडले त्याची निष्कृती करायला भगवान आपल्या परिवारासह करवीरात आले.
जाखले गावातील ग्रामस्थ लक्ष्मण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाखले गावात गोपालेश्वर हे मंदिर आहे. त्याची कथा अशी सांगितली जाते की, मोकळ्या माळावर एका निर्जनस्थळी महादेवांचे शिवलिंग होते. ते कोणालाच माहिती नव्हते. माळरानावर असंख्य गायी चारण्यासाठी गोपाळ यायचे. तेव्हा गोपाळांनी आणलेल्या गायी महादेव असलेल्या जागी जाऊन पान्हा सोडत होत्या. त्या दुधाने महादेवांना अभिषेक करायच्या.
गायींचे असे पान्हा सोडणे आश्चर्यजनक होते. त्यामुळे त्याजागी शोधले असता तिथे महादेवांची पिंड असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्या शिवलिंगाच्या जागी मंदिर उभारण्यात आले.

मंदिरातील गाभाऱ्यातील शंकरांची मूर्ती आणि शिवलिंगesakal
करवीर महात्म्यात श्रीकृष्णांनी जाखले या गावचा उद्धार केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळेच या मंदिरात कृष्णांचा जन्मकाळ सोहळा होतो. यानंतर गावात दहीहंडी असते. तर दिवाळीत येणाऱ्या तुलसी विवाहानंतर या गावची यात्रा असते. तेव्हाही या गावात दहीकाला साजरा होतो. यात्रेवेळी देवांची पालखी जेव्हा गावातील पारावर येते.
तेव्हा तिथे असलेल्या मोठ्या झाडाला दह्याने भरलेली हंडी बांधली जाते. देवांची पालखी झाडाखाली आली की, दह्याने भरलेली हंडी फोडून पालखीवर अभिषेक होतो. वर्षातून दोनवेळा दहीहंडीचा उत्सव या गावातील भक्तांना अनुभवता येतो.
जाखले गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम गोपालेश्वर मंदिर तसेच मानेवाडा येथे परंपरागत चालू आहे तसेच दहीहंडीचा कार्यक्रम सुद्धा वैकुंठ चतुर्थी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी गावामध्ये चौगुले कदम समाजातर्फे साजरा केला जातो
( संबंधीत लेख इतिहास संशोधन ॲड.प्रसन्न मालेकर यांनी दिलेल्या माहितीवरून घेतला आहे)

गावातील तुलसीविवाह अन् पालखी esakal
आश्चर्यम्! भारतातल्या या मंदिरात आहे दिवसातून तीनवेळा रंग बदलणारे शिवलिंग!
Shravan 2023 : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यांच्याशी संबंधित रहस्ये अनेक शतकांपासून लोकांना आकर्षित करत आहेत. आज श्रावणाचा तिसरा सोमवार आहे त्यानिमित्तानेच आज आपण अशा एका मंदिराबाबत जाणून घेणार आहोत जिथे रोज एक चमत्कार घडतो.
एक अनोखे मंदिर राजस्थानच्या धौलपूरमध्ये आहे. चंबळ नदीच्या खोऱ्यात वसलेले हे शिवमंदिर ‘अचलेश्वर महादेव’ मंदिराच्या नावाने ओळखले जाते. असे म्हणतात की या मंदिरात असलेले शिवलिंग दिवसातून तीन वेळा आपला रंग बदलते. (Rajasthan achaleshwar mahadev temple)
हे मंदिर डोंगराळ भागात वसलेले असल्यामुळे पूर्वी येथे मोजकेच लोक येत असत, पण हळूहळू मंदिराची माहिती मिळताच येथे भाविक येऊ लागले आणि श्रावण महिन्यात येथे विशेष पूजाही सुरू होते.
जगभरात शिवभक्त असून ते महाशिवरात्रीच्या दिवशीही येथे गर्दीचा महापूर उसळतो. भक्त इथे भोलेनाथांचे दर्शन घेऊन त्यांच्यावर अभिषेकही करतात. इथे अभिषेक केल्याने इच्छा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
येथे भगवान शंकराच्या अंगठ्याची पूजा केली जाते असे इतिहासकार सांगतात. गर्भगृहातील शिवलिंग हे पाताळातल्यासारखे दिसते. ज्याच्या वर एका बाजूला पायाच्या बोटाची खूण कोरलेली आहे, ज्याची स्वयंभू शिवलिंग म्हणून पूजा केली जाते. देवाधिदेव महादेवाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचे प्रतिक मानले जाते.
अचलेश्वर मंदिर पंधराव्या शतकात बांधले आहे. मेवाडचा राजा राणा कुंभ याने अचलगड किल्ला एका टेकडीवर बांधला. या किल्ल्याजवळच अचलेश्वर मंदिर आहे, तिथे परमेश्वराच्या शिवलिंगाखाली नैसर्गिक खड्डा आहे. या खड्ड्यात कितीही पाणी टाकले तरी तो भरत नाही. त्यात दिलेले पाणी कोठे जाते हे अद्याप एक गूढ आहे. (Shravan 2023)
हे शिवलिंग दिवसातून ३ वेळा रंग बदलते. सकाळी शिवलिंग निळसर रंगाचे, दुपारी भगवे आणि रात्री शिवलिंग काळ्या रंगाचे दिसते. असे का घडते हे आजपर्यंतचे रहस्य आहे.
भोले भंडारी भक्तांच्या इच्छा करतात पूर्ण
असे म्हणतात की या गूढ शिवलिंगाच्या दर्शनाने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात. जीवनात कोणतीही समस्या असली तरी या मंदिरात गेल्यावर त्यातून आराम मिळतो. या महादेवाच्या मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की अविवाहित मुला-मुलींना शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो.
भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी सोमवारी येथे मोठी गर्दी जमते. अविवाहितांनी १६ सोमवारी येथे जल अर्पण केल्यास त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो. याशिवाय शिवाच्या कृपेने विवाहातील अडथळेही दूर होतात.
anmashtami 2023 : या मंदिरात आहे जिवंत कृष्णांची मूर्ती; इंग्रज अधिकाऱ्यानेही केलीय शहानिशा
Janmashtami 2023 : भारतात अनेक मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिरात एक रहस्य दडलेले आहे. असेच एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे ज्याचे रहस्य आजही उलगडलेले नाही. या मंदिरात असलेली श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती जिवंत आहे. हे केवळ धार्मिक नाहीतर वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे.
भगवंतांची ही मूर्ती जिवंत असल्याची खात्री खुद्द एका इंग्रज अधिकाऱ्यानेही केली आहे. ते कोणते मंदिर अन् हा नक्की काय प्रकार आहे हे पाहुयात.
राजस्थानमधील जयपूरमध्ये भगवान गोपिनाथांचे एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये दररोज लाखो लोक त्या ठिकाणी येतात नतमस्तक होतात. गोपीनाथाच्या पायाशी नतमस्तक होतात. हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे आहे.
असं सांगितलं जातं की, मुघल जेव्हा मथुरेत आक्रमण करायला येणार होते. त्यावेळी काही भक्तांनी श्रीकृष्णांची ही मूर्ती तिथून पळवून राजस्थानात नेली. ही तीच मुर्ती आहे आणि त्या लोकांनी भगवंताचे मंदिर उभारले आहे.
कसं समजलं की मूर्ती जिवंत आहे
एखादा व्यक्ती जिवंत आहे हे त्याचे पल्स रेट पाहून सांगितले जाते. तसेच, एकेदिवशी एका भक्ताने कान्हाला अलंगन दिलं अन् त्याला श्रीकृष्णांच्या हृदयाचे ठोके ऐकू आले. त्या व्यक्तीने बऱ्याच लोकांना सांगितलं की गोपीनाथाच्या मूर्तीतून हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येतोय. यावर अनेक लोकांनी कान्हाला अलिंगन देऊन हा आवाज ऐकला.
या गोष्टीची वार्ता संपूर्ण शहरांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी लोकांची दर्शनासाठी गर्दी झाली. त्याकाळात इंग्रजांच राज्य होतं. शहरामध्ये एक इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्यापूर्वी बातमी पोचली. इंग्रज हे देवी देवतांना न मानणाऱ्या ते विज्ञानाला मारणारे होते. परंतु ही बातमी कळल्यानंतर खरी शहाणा-या करण्यासाठी तो इंग्रज अधिकारी आपल्याबरोबरच सोबत शिपायांना घेऊन त्या ठिकाणी पाहोचला.
देवांच रूप पाहून तो अधिकारी भारावून गेला. तो नतमस्तक झाला ना पाया सुद्धा पडला. पण, खरंच ही मूर्ती जिवंत आहे का? अशी शंका त्याच्या मनात आली. त्या शंकेचे निरसन करण्यासाठी त्या अधिकाऱ्याने त्याच्या हातातील पल्सवर चालत असलेलं घड्याळ काढलं. अन् मुर्तीच्या हातात घातलं. तेव्हा चमत्कार घडला, ब्रिटीश अधिकाऱ्याचे ते घड्याळ देवांच्या हातातही सुरू झालं. (Janmashtami)

हातात घड्याळ असलेली भगवंतांची मूर्तीesakal
या घड्याळाचं वैशिष्ट्य असे की, ते केवळ जिवंत व्यक्तीच्या हातात चालू राहते. हातातून बाजूला गेल्यास ते बंद पडते. हे घड्याळ भगवंतांच्या हातात जाताच सुरू झाले. आजतागायत त्या मुर्तीला असलेले ते घड्याळ सुरू असून भक्तांना याचे आप्रुप वाटतं.
या घटनेनंतर अनेक पिढ्या संपल्या, नव्याने जन्माला आल्या पण मुर्तीच्या हृदयाचे ठोके अन् हातातील घड्य़ाळ सुरूच आहे. म्हणजेच भगवंतांचे वय इतके होऊनही ते अमर आहेत.
आज सुद्धा जयपुर मध्ये गोपीनाथांची सकाळची पूजा करतात. त्यावेळेला ते घड्याळ उतरवले जातात नवीन कपडे घालतात त्यावेळेस ते घड्याळ बाजूला काढले जातात बंद होतं आणि पुन्हा ते मूर्तीला घातले जाते तेव्हा ते सुरू होते. हा चमत्कार रोजच पहायला मिळतो.
जयपूरच्या गोपीनाथ मंदिरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीशी संबंधित ओळख असे मानले जाते की गोपीनाथजी श्रीकृष्णाची मूर्ती ही मूळ मूर्ती आहे. ही मूर्ती स्वतःच प्रकट झाली आहे ती कोणत्याही कारागिराने बनवली नाही. (Shri Krishna)

गोपिनाथ मंदिरesakal
Shravan Somwar 2023 : दर बारा वर्षांनी या मंदिरावर पडते वीज; शिवलिंगासोबत घडतो चमत्कार
Shravan Somwar 2023 : आपल्या देशात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत. त्या प्रत्येक मंदिराची काहीतरी पौराणिक कथा आहे. कधी कुठल्या मंदिरात चमत्कार घडतो, तर कधी भाविकांना काहीतरी अद्भुत अनुभवायला मिळतं.
आत श्रावणाच्या पहिल्या सोमवार निमित्त आपण अशा एका खास मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. जिथे दर बारा वर्षांनी एक चमत्कार घडतो. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये हे मंदिर आहे.
हिमाचल प्रदेश हे एक सुंदर पर्वतीय राज्य आहे. जे आपल्या नैसर्गिक आश्चर्यआणि समृद्ध संस्कृतीपासून सुंदर घरे आणि प्राचीन वास्तूंपर्यंत अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. याच प्रदेशात बिजली महादेव या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर २४६० मीटर उंचीवर असलेल्या कुल्लू खोऱ्यातील कश्वरी या सुंदर गावात आहे.
या मंदिरात पवित्र असे शिवलिंग आहे. भारतातील सर्वात प्राचिन मंदिरांमध्येही याची गणना होते. चला तर मग आम्ही तुम्हाला बिजली महादेव मंदिराबद्दल सांगतो.
या मंदिरातील शिवलिंगावर दर १२ वर्षांनी वीज पडते. हे गूढ अद्याप कोणालाही समजलेले नाही आणि वीज पडण्याच्या या घटनेमुळे शिवलिंगाचे तुकडे झाले आहेत. मंदिराचे पुजारी प्रत्येक तुकडा गोळा करतात.
डाळीचे पीठ आणि ताज्या लोण्यापासून बनवलेल्या मिश्रणाने हे शिवलिंग पुन्हा चिटकवतात. यामुळे भंग झालेले शिवलिंग पुन्हा एकजीव होते. काही महिन्यांतच ते शिवलिंग पूर्वीसारखेच दिसू लागते.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शिवलिंगावर वीज कोसळणाऱ्या कोणत्याही अनिष्ट गोष्टींपासून परिसरातील रहिवाशांचे रक्षण करण्याची इष्टदेवतेची इच्छा आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की वीज हा एक दैवी आशीर्वाद आहे ज्यात विशेष शक्ती आहेत.
यामागील पौराणिक कथा काय आहे
असे म्हटले जाते की, एकदा कुल्लूच्या खोऱ्यात कुलंत नावाचा राक्षस राहत होता. एके दिवशी त्याने आपले रूप एका महाकाय सापात बदलले आणि संपूर्ण गावात रेंगाळत लाहौल-स्पीतीमधील माथान गावात पोहोचला. यासाठी त्यांनी ब्यास नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला.
ज्यामुळे गावात पूर स्थिती निर्माण झाली होती. यावर भगवान शिव राक्षसाकडे पाहत होते, रागाच्या भरात महादेवांनी त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध केला. शिवाने राक्षसाचा वध केल्यावर त्यांचे रूपांतर एका विशाल पर्वतात झाले आणि या शहराचे नाव कुल्लू असे पडले. असे मानले जाते की भगवान शंकराच्या आज्ञेने इंद्रदेव दर 12 वर्षांनी या पर्वतावर वीज पाडतात.
असंही म्हणतात की, शिवलिंगाला कान लावून ऐकल्यास पाण्याचा आवाज येतो. या पर्वताच्या बाजूने वाहत असलेल्या पर्वती नदीचाच हा आवाज येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिरात कसे पोहोचावे
हे मंदिर कुल्लूपासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. ३ किमी ट्रेकिंग करून येथे पोहोचता येते. पर्यटकांसाठी हा ट्रॅक एक वेगळी अनुभूती देणारा आहे. दऱ्या आणि नद्यांच्या काही विहंगम दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. (Shravan2023)
ag Panchami 2023 : वर्षातून एकदाच उघडतं हे मंदिर, माता पार्वती अन् महादेव शेषनागावर आहेत विराजमान
Nag Panchami 2023 : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार अन् नाग पंचमी एकाच दिवशी येण्याचा हा दुर्मिळ योग तब्बल १९ वर्षांनंतर घडला आहे. आज मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी होत आहे. गावागावात झाडाला झोके अन् त्यांच्या स्पर्धा, तर शहरात मोठ्याप्रमाणात भाविकांना प्रसाद वाटप केले जाते आहे. तर काही गावांना यात्रेचे स्वरूपही आले आहे.
आजच्या या पवित्र दिनानिमित्तच आपण देशभरातील महादेव मंदिरांची माहिती घेत आहोत. त्यामुळेच आज आपण अशा एका मंदिराबद्दल माहिती घेऊयात जे वर्षातून केवळ एकच दिवस उघडलं जातं. हे मंदिर आहे नागचंद्रेश्वराचे.
जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग बाबा महाकालेश्वर यांच्या निवासस्थानी, शिखराच्या तिसऱ्या भागात मूर्तीच्या रूपात विराजमान असलेल्या नागचंद्रेश्वराचे दरवाजे मध्यरात्री बारा वाजता उघडण्यात आले. नागचंद्रेश्वराला सिद्धेश्वर असेही म्हणतात. विशेष म्हणजे पलंगावर बसलेल्या शिव परिवाराची जगातील ही एकमेव मूर्ती आहे. (Nagchandreshwar temple of Ujjain )
आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही मूर्ती वर्षातून एकदाच पाहता येते. म्हणजेच प्रत्येक नागपंचमीला मंदिराचे दरवाजे उघडले जातात. मुर्तीच्या रूपात बसलेले भगवान नागचंद्रेश्वर ध्यानासाठी एकांतात जातात आणि नागपंचमीलाच दर्शन देतात अशी श्रद्धा आहे.
मंदिराच्या पुजार्याने सांगितले की, पूर्वी नागचंद्रेश्वराचे दर्शन वर्षभर होत असे, मात्र अपघाताची भीती पाहता आता वर्षातून केवळ एकच दिवस हे दर्शन घेतले जाते. हे मंदिर 11व्या शतकातील आहे. या मूर्तीची स्थापना 11व्या शतकात करण्यात आली होती, ज्यामध्ये भगवान शिवाला सात फण्यांनी सुशोभित केले जात आहे.
नंदी आणि सिंह ही दोन्ही शिव आणि पार्वतीची वाहने आहेत. श्रीगणेशाची ललितासन मुर्ती, उमाच्या उजव्या बाजूला कार्तिकेयाची मुर्ती आणि माथ्यावर सूर्य-चंद्रही आहेत. भुजंग परमेश्वराच्या गळ्यात आणि बाहूभोवती गुंडाळलेले आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात पोहोचतात.
शिवाची दुर्मिळ मूर्ती
नागचंद्रेश्वर महादेव मंदिरात शिवाची दुर्मिळ मूर्ती आहे. नागचंद्रेश्वर महादेव मंदिर देखील प्रसिद्ध आहे कारण ही जगातील एकमेव मूर्ती आहे जिथे भगवान शिव आणि पार्वती नागाच्या आसनावर विराजमान आहेत. नंदी महाराजांची मूर्तीही येथे आहेत. अशी मूर्ती जगभरातील कोणत्याही शिवमंदिरात दिसत नाही. (Nag Panchami 2023)
पौराणिक कथा
नागचंद्रेश्वर महादेव मंदिराबाबतही प्राचीन कथा प्रचलित आहेत. पंडित राम गुरूंच्या म्हणण्यानुसार तक्षक नागाने भगवान शंकराची खूप तपश्चर्या केली होती.त्यानंतर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि त्यांनी तक्षक नागाला दर्शन दिले. यावर शिव परिवार विराजमान झाला. शिवभक्त असल्याने तक्षक आजही त्यांच्या तपश्चर्येत मग्न आहेत. तक्षकालाही अमरत्वाचे वरदान मिळाले होते.
भगवान भोलेनाथांच्या तपश्चर्येत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वर्षातून एकदा दरवाजे उघडले जातात. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर दररोज येणाऱ्या भाविकांच्या दर्शनामुळे मंदिराच्या मजबुतीवरही परिणाम होऊ शकतो, असा शास्त्रीय विश्वास आहे, त्यामुळे हे मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. (Temple)
ag Panchami 2023 : नागाच्या या मंदिरांना भेट द्याल तर कालसर्प दोषातून होईल सुटका, नशिबही पालटेल
Nag Panchami 2023 : भारतात नागदेवतेची अनेक प्राचिन मंदिरे आहेत. त्यापैकी काही चमत्कारीक मंदिरे उत्तराखंडमध्ये आहेत. तिथे असलेली ही नागदेवतेची मंदिरे खास आहेत. याच कारण म्हणजे कालसर्प दोषांतून तुम्हाला कायमची मुक्ती मिळवण्याच ठिकाण म्हणजे ही मंदिरे आहेत.
कालसर्प योग काय आहे?
अगदी नावाप्रमाणेच “कालसर्प योग” हा सर्व सौख्य हिरावून घेणारा अत्यंत घातक असा योग आहे. अशा योगास कालसर्प म्हणण्यामागे कारण हे आहे कि कालसर्प योगात राहू व केतू असतात. त्यामुळे सर्व कार्यात अपयश येते. तसेच सर्व प्रकारच्या उत्कर्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. हा योग बनल्यावर व्यक्तीस अनेक संघर्षातून जावे लागते व अडचणींचा सामना देखील करावा लागतो.
कालसर्प योग हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिबीत असो, राजकारणी, नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्यांनी काही फरक त्यात होत नाही.
अशा व्यक्तीला सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना, कष्टाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंचा त्रास, अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते. (Nag Panchami 2023 : mythological mystery or uttarakhand nag temple)
साडेसाती सारखाच मागे लागणारा कालसर्प योगातून सुटका मिळवायची असेल तर उत्तराखंडमधील काही मंदिरांना भेट द्यावी. उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील सेम मुखेम, पिंगली नाग मंदिर पिथोरागड, धौलीनाग मंदिर बागेश्वर आणि डेहराडून जिल्ह्यातील नागथाट मंदिरावर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे.
सेम मुखेम नागराज मंदिर
टिहरी जिल्ह्यातील सेम मुखेम नागराज मंदिर लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हे मंदिर सात हजार फूट उंचीवर आहे. एखाद्याच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर या मंदिरात आल्याने दोष दूर होतो, असे पुराणात म्हटले आहे.
या मंदिराशी अनेक श्रद्धाही जोडल्या गेल्या आहेत. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्ण चेंडू घेण्यासाठी कालिंदी नदीत उतरले तेव्हा त्यांनी कालिया मर्दन केले. त्यावेळी कालिया नाग याच जिल्ह्यात येऊन राहीला. तेच गे सेम मुखेम येथील मंदिर होय.
त्यानंतर कालिया नागाच्या विनंतीवरून भगवान श्रीकृष्ण द्वारका सोडून उत्तराखंडमधील रामोला गढी येथे आले आणि मूर्तीच्या रूपात त्याची प्रतिष्ठापना केली. कालसर्प दोष दूर करण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी भाविक या मंदिरात येतात.
पिंगली नाग मंदिर
पिंगली नाग मंदिर उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील पानखु गावात आहे. गाई, म्हशींचे पहिले दूध आणि प्रत्येक पिकाचे पहिले दाणे येथील स्थानिक लोक नागदेवतेला अर्पण करतात. नागदेवता त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतात आणि भक्तांवर आपली कृपा ठेवतात, अशी त्यांची श्रद्धा आहे.
द्वापरयुगात कालिया नागाचा यमुना नदीत भगवान श्रीकृष्णाने पराभव केला, त्यानंतर तो धौलीनाग, बेरीनाग, फेनिनाग, वासुकीनाग, मूलनाग आणि आचार्य पिंगलाचार्य यांच्यासमवेत दशोली, गंगावलीजवळील पर्वत शिखरांवर स्थायिक झाला.
तेव्हापासून स्थानिक रहिवासी पिंगल नागदेवता म्हणून पिंगळाचार्यांची पूजा करू लागले. स्कंद पुराणातील मानसखंडात नागांचे सविस्तर वर्णन आहे. असे म्हटले जाते की, एका ब्राह्मणाला पिंगल नाग देवतेने स्वप्नात येऊन मी इते आहे माझे मंदिर बांध, अशी माहिती दिली होती. याच ब्राह्मणाने डोंगरमाथ्यावर मंदिर बांधून विधिवत पूजा केली. (Temples )
धौलीनाग मंदिर
धौलीनाग मंदिर बागेश्वर येथे असून कालिया नागाचे ज्येष्ठ पुत्र धौलीनाग देवता यांना समर्पित आहे. हे मंदिर विजयपूरजवळील टेकडीवर आहे. प्रत्येक नागपंचमीला मंदिरात जत्रा भरते.
धौलीनागने सुरुवातीला परिसरातील लोकांना त्रास दिला, त्यानंतर लोकांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर धौली नाग देवतेने स्थानिक लोकांचे अनेक नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण केले आणि त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला.

धौलीनाग मंदिर,बागेश्वर esaka
ऑफबीट - बाणगंगा तलाव, वाळकेश्वर, मुंबई. ( Banganga Tank, Walkeshwar Temple )
आज मोजक्या मुंबईकरांना क्वचित माहीत असेल की या बेटावर एक गोड्या पाण्याचं तळं आहे. आणि त्या बाजूलाच एक महादेव मंदिरही आहे. या तलावाचा आणि मंदिराचा वारसा थेट रामायण कालावधीला जोडला गेला आहे.
![]() |
गोमुखातून कोसळणारा पाण्याचा स्तोत्र (Banganga) |
सीतेच्या शोधार्थ श्रीराम या ठिकाणी आले होते. कदाचित दक्षिणेस असलेल्या लंकेत जाण्यासाठी या अरबी समुद्रालगत असलेल्या या बेटांच्या टोकाला ते आले असावेत. इथं आल्यावर त्यांनी बंधू लक्ष्मणाकडे पाण्याची मागणी केली. समुद्रानं वेढलेल्या या बेटावर त्यावेळी पिण्यालायक पाणी मिळणं नक्कीच दुरापास्त असावं. त्यावेळी लक्ष्मणानं या ठिकाणी जमिनीत बाण मारून जल उत्पती केली. हजारो मैलांचा प्रवास करून गंगा अवतरली.
विश्वास ठेवायला ही घटना अतर्क्य वाटते, पण अरबी समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर खाऱ्या पाण्यानं वेढलेलं असूनही एक पिण्यालायक गोड्या पाण्याचा स्त्रोत्र अखंड वाहताना दिसतो. सरासरी पाच हॉर्सपॉवरचं इंजिन खेचू शकेल इतकं पाणी तेरा त्रिकाळ या तळ्यात अव्याहतपणे जमा होताना दिसतं.
![]() |
श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) Walkeshwar Temple |
![]() |
श्री वालुकेश्वर (वाळकेश्वर) |
बाण मारून प्रकट झालेल्या गंगेस 'बाणगंगा' हे नांव पडलं. दरम्यान श्री रामांनी तिथं वास्तव्य करून शिवलिंगाची पूजा केली. तिथल्या वाळू पासून शिवलिंग तयार केलं. त्यामुळं शिवलिंगास 'वालुकेश्वर' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वालुकेश्वरचा अपभ्रंश होऊन आजचं 'वाळकेश्र्वर' झालं. सात हजार वर्षांची परंपरा असलेलं हे बाणगंगा आणि वालुकेश्वर मंदिर बऱ्याच मुंबईकरांना अपरिचित आहे.
![]() |
आयताकृती बाणगंगा तलाव (Banganga) |
![]() |
Temple Banganga |
![]() |
ओंकारेश्वर महादेव मंदिर (Banganga) |
![]() |
Banganga |
![]() |
श्री वालुकेश्वर काशी मठ (Banganga) |
![]() |
नाथ गगनगिरी महाराज ट्रस्टनं बांधलेली पाणपोई (Banganga) |
![]() |
Banganga Ghat |
तलाव परिसरात प्रामुख्यानं गौड सारस्वत ब्राह्मण वस्ती दिसते. त्यांची टुमदार जुनी कौलारू घरं दिसतात. हा पूर्ण परिसर त्यांच्या अंकित दिसतो. तर बाजूलाच मुंबई महानगरपालिकेचं छोटंसं उद्यान आहे.
![]() |
गौड सारस्वत ब्राह्मण वस्ती (Banganga) |
![]() |
दिपमाळा (Banganga) |
![]() |
Banganga |
![]() |
गंगा स्नान करणारे भाविक (Banganga) |
![]() |
गणपती विसर्जन (Banganga) |
![]() |
Banganga |
तलाव आणि मंदिर परिसराची देखभाल आणि दुरुस्ती मुंबई महानगर पालिकेकडे आहे. तर रस्त्यावर दिवाबत्तीची जबाबदारी 'बेस्ट' च्या विद्युत विभागाकडे आहे. या पुरातन जागेचे महत्व वाढवण्यासाठी 'आर्. पी. गोयंका फाऊंडेशन' या प्रसिद्ध व्यापारी आणि सेवाभावी संस्थेनं रस्त्यावरील विद्यमान विजेचे खांब बदलून ऐतिहासिक दिसणारे खांब बसविण्याचं काम मार्च २०२२ ला घेतलं होतं. या कामासंदर्भात पाहणी आणि कार्यवाही करण्यासाठी 'बेस्ट' वीजपुरवठा विभागातर्फे माझी अधिकारी या नात्यानं बऱ्याचदा तिथं भेट झाली. आणि ऑगस्ट २०२२ ला हे काम पूर्णत्वास गेलं.
![]() |
घाटावरची कार्ये करणारे ब्राह्मण (Banganga Tank) |
![]() |
नवीन उभारलेले रस्त्यावरील विजेचे खांब |
ऑफबीट - चिरनेर (Offbeat Chirner)
![]() |
श्री महागणपती (Chirner) |
![]() |
गाभाऱ्याच्या चौकटीवरील शिल्प गणेशपट्टी |
![]() |
श्री महागणपती मंदिर (Chirner) |
सरासरी शंभर वर्षांपर्यंत इथं घनदाट जंगल होतं. स्थानिक आगरी समाज जंगलातून मध, जळाऊ लाकूड, पशुपालन, फळे, रानभाज्या आणि शिकार यावर गुजराण करत. १८७८ च्या जंगल कायद्यात सुधारणा करून १९२७ ला इंग्रजांनी स्थानिकांना जंगलात बंदी घातली. त्यांच्या पोटापाण्याचे हाल होऊ लागले, साऱ्या भारतवर्षात थोड्याअधिक फरकानं स्थानिकांवर हीच वेळ आली. देशभर जंगल सत्याग्रह पुकारला गेला. त्या सत्याग्रहास उरण चिरनेरच्या आगरी जनतेने भरघोस पाठिंबा दिला.
![]() |
हुतात्मा स्मारक (Chirner) |
अहिंसेच्या मार्गानं चाललेल्या या आंदोलनाला हिंसेचं वळण मिळालं. २५ सप्टेंबर १९३० ला चिरनेरच्या अक्कादेवीच्या माळरानावर ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्यात काही स्थानिक मारले गेले. घटनेच्या चौकशी दरम्यान चिरनेरचे काही आरोपी ठरवून पकडले. गावात पोलिस चौकी नसल्यानं या गणपतीच्या देवळात त्यांना कोंडून मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचा निषेध करण्यासाठी गावातील बाळाराम रामजी ठाकूर हा तरुण देवळाजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाळारामचा हात जखमी झाला. त्या दरम्यान एक गोळी देवळाच्या लोखंडी गजाला लागली होती. ग्रामस्थांनी या लोखंडी गजाची आठवण आजही जपून ठेवली आहे. देवळात प्रवेश करताना डाव्या बाजूला हा गोळी लागलेला गज सर्वांना स्पष्ट दिसेल असा खिडकीत बंदिस्त करून ठेवलेला दिसतो.
![]() |
१९३० चा गोळी लागलेला लोखंडी गज |
![]() |
![]() |
हुतात्मा स्तंभ (Chirner) |
सप्टेंबर २००५ साली तळ्याकाठावर राखीव जागेत हुतात्मा क्रांतीकारकांचे भव्य बोलके पुतळे उभारलेले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्यांचे नांव, गांव आणि कोणत्या क्षणी त्यांना वीरमरण आलं, त्या क्षणाचा उल्लेख लिहिलेला दिसतो. श्री महागणपतीचा आशीर्वाद घेणारा प्रत्यक भाविक इथं ओढला जातो आणि या हुतात्म्यापुढे नतमस्तक होताना दिसतो.
बाराव्या शतकापासून इस्लामिक आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी केलेली आक्रमणं आणि जबरदस्तीचं धर्मपरिवर्तन यातून मंदिरं आणि मुर्त्याही सुटल्या नाहीत. मंदिरं तुटली पण त्यावेळच्या पूजाऱ्यांनी मुर्त्या वाचविण्याचा प्रयत्न केला. कुठे तळघरात, विहिरीत, तळ्यात तर कुठे जमिनीखाली मुर्त्या लपविल्या गेल्या. शिवछत्रपतींनी लावलेला स्वराज्याचा वटवृक्ष पेशवेकाळात अगदी अटकेपार फोफावला. पुन्हा देव, देश आणि स्वधर्म वाढीस लागला.
जसे नानासाहेब पेशवे गणेशभक्त होते, तसे उरण प्रांताचे त्यांचे सुभेदार रामजी महादेव फडकेही गणेशभक्त होते. धर्मांतरासाठी छळणाऱ्या पोर्तुगीजांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी उरण, पाली पोर्तुगीज मुक्त केली. त्यांना तळ्यातल्या गणेशाचा दृष्टान्त झाला आणि या महागणपतीची पुन्हा स्थापना झाली.
तळ्याकाठावर श्री महागणपती मंदिर बांधलं. मंदिराच्या पूर्वेस असलेल्या तळ्यास 'देवाचं तळं' नांव पडलं. पाच फुट उंचीची श्री महागणपतीची सिंदूरचर्चित मूर्ती पूर्वाभिमुख आहे. महडचा स्वयंभू श्री वरदविनायक आणि या मूर्तीत बरंच साम्य दिसतं. मूर्ती इतकी प्रसन्न, सुंदर आणि सुरेख आहे की, बघताक्षणी भाविक सुखावून जातो. गाभाऱ्यासमोर उंच पितळी रेखीव स्तंभावर मोठा नक्षीदार मूषक श्री महागणपतीकडे तोंड करून दोन पायावर उभा आहे.
![]() |
![]() |
गाभाऱ्यासमोरील पितळी मूषक |
![]() |
मंदिराचं नवीन बांधलेलं सभामंडप (Chirner) |
मंदिराचा गाभारा दगडी असून, अंतराळ गोल घुमटाकार आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर दगडात कोरलेली गणेशपट्टि दिसते. गाभाऱ्यावर पितळी कळस दिसतो. गाभाऱ्याच्या चार कोपऱ्यात चार चबुतरे ठेवलेले दिसतात. सध्या मूळ गाभाऱ्याला बाहेरून प्लास्टर केले असून, पूर्ण मंदिराला आतून बाहेरून उठावदार रंग लावलेला दिसतो. पुढे कालांतरानं गाभाऱ्यापुढील सभामंडप बांधलेला दिसतो.
या सभामंडपास लागूनच नजीकच्या काळात आणखी एक भव्य, प्रशस्त मंडप बांधलेला दिसतो. हा नवीन सभामंडप इतका प्रशस्त आहे की, गावातील लग्न आणि इतर शुभकार्य इथं केली जातात. तळ्याकाठच्या या मंदिरासमोर प्रशस्त समतल मोकळी जागा दिसते. मंदिराच्या उजवीकडे दक्षिणेला जुनं कौलारू मारुती मंदिर दिसतं.
तळ्याकाठावरच गणपती मंदिरासमोर पुरातन श्री शंभू महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप नजीकच्या काळात बांधलेला दिसतो. गाभारा लहान असला तरी, गाभाऱ्याच्या उजवीकडे दिवडीत गणेश तर डावीकडील दिवडीत कार्तिक स्वामींची सुबक मूर्ती दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडी असून, पिंडीवर कलशातून पडणारी अखंड जलधार दिसते. पिंडीसमोर पाषाणी भिंतीतील दिवडीत माता पार्वती स्थापित दिसते. भिंतीच्या गाभाऱ्यासमोर सभामंडपात पाषाणात घडविलेला नंदी दिसतो.
![]() |
![]() |
श्री शंभू महादेव मंदिर (Chirner) |
![]() |
गद्धेगळ (Chirner) |
![]() |
नंदी |
इ. स. १७३९ ला वसईच्या स्वारीवर निघताना चिमाजि आप्पांनी या महागणपती आणि शंभू महादेवाचे आशीर्वाद घेतल्याची माहिती गावात मिळते.
![]() |
शिवलिंग आणि मागे माता पार्वती (Chirner) |
या भव्य तळ्याला एकूण चार दगडी घाट आहेत. काही स्थानिक घाटावर झाडांच्या सावलीत मासेमारीसाठी पाण्यात गळ टाकून बसलेले दिसतात.
![]() |
मासेमारी करणारे स्थानिक (Chirner) |
![]() |
देवाचं तळं (Chirner) |
![]() |
देवाचं तळं - डावीकडे महादेव आणि समोर महागणपती मंदिर (Chirner) |
चिरनेर गावात मातीची भांडी तयार करून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना विकण्याचा व्यवसायही दिसतो. त्यासाठी लागणारी माती इथल्या शेतातून काढली जाते. माती काढल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साठवून शेततळी तयार करतात. या शेततळ्यात मस्त्योद्योग करताना स्थानिक दिसतात.
![]() |
पोपटी पार्टीचा आस्वाद घेताना महिला मंडळ (Chirner) |
![]() |
भांडी विकणारी चिरनेर ची भगिनी |
![]() |
मातीची भांडी बनवताना (Chirner) |
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी च्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती
तुळजापूर येथील या प्रकरणामुळे मंदिरांच्या धार्मिक विधींत शासकीय हस्तक्षेप होण्याचा नवा पायंडा पडू पहात आहे; कारण तुळजापूरनंतर २१ जानेवारी २०११ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरांतील मूर्तींवरील अभिषेकही हेच कारण देऊन शासनाकडून थांबवण्यात आला. देवस्थानांच्या धार्मिक विधींमधील हा शासकीय हस्तक्षेप आजच न रोखल्यास पुढे महाराष्ट्रात आणि त्याही पुढे देशभरात सर्वत्रच्या देवस्थानांमधील मूतींवरील अभिषेकही थांबेल. हळूहळू धर्मद्रोही शासन हिंदूंच्या धर्मश्रद्धेचे स्थान असलेल्या ‘मंदिरांत काय असावे आणि नसावे ?’, हेही ठरवू लागेल आणि तेथे शासनाची धर्मद्रोही धोरणे राबवली जातील; म्हणून धर्मश्रद्धेच्या रक्षणार्थ देवस्थानांमधील शासकीय हस्तक्षेपाला विरोध करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते !
----
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणून अनादी काळापासून सर्वांना परिचित असलेली तुळजापूर येथील श्री भवानीदेवी !
या देवीची पूजा आणि आराधना संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांसह संपूर्ण भारत देश करतो. श्री भवानीदेवीच्या पूूजाविधीमध्ये अनेक प्रकारचे पूजाविधी अनादी काळापासून चालत आलेले असून आपल्या नवसाप्रमाणे हे पूजाविधी करण्याची पद्धत आहे. हे विधी करण्यामागे श्री देवीचा कुलाचार करणे, कुलदेवतेला प्रसन्न करणे आणि घरात आरंभलेले शुभकार्य पार पाडणे इत्यादी अनेक उद्देश असतात.
या सर्व पूजाविधींमध्ये प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर केला जाणारा पूजाविधी म्हणजे ‘भोगी अभिषेक’! यामध्ये दही, दूध, केळी, साखर आणि लिंबू इत्यादी पदार्थ मूर्तीस लावून भक्तांना ते प्रसाद म्हणून परत दिले जातात. भक्त पंचामृत म्हणून ते ग्रहण करतात.
१. पूजाविधी करण्यामागील पूर्वापार चालत आलेला उद्देश : भक्तांकडून आणलेल्या साहित्याच्या माध्यमातून कुलदेवतेच्या मूर्तीची जोपासना, राखण व्हावी आणि तिची सुंदरता टिकून रहावी, हा उद्देश असतो. दूध, मध, लिंबू, दही आणि साखर या घटकांमधील तत्त्वाने देवीच्या मूर्तीच्या गंडकी पाषाणाला चांगला उजाळा येऊन मूर्ती सुंदर अन् आकर्षक दिसते. हे पदार्थ वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारची झीज होत नाही. या मिश्रणातून अतिशय चांगले जीवनसत्त्व असणारा पदार्थ निर्माण होतो आणि भक्तांनी तो ग्रहण केल्यास त्याला न मिळणारी जीवनसत्त्वे मिळतात. अशा प्रकारे देवीच्या मूर्तीचे रक्षण आणि भक्त यांचा विचार करूनच हा पूजाविधी अनादी काळापासून चालू आहे.
२. ‘भोगी’ पूजाविधी करण्याची पद्धत
अ. पूजाविधी करतांना प्रथम देवीच्या अंगावरील सर्व वस्त्रे काढली जातात. त्यानंतर थंड पाण्याने संपूर्ण मूर्तीची स्वच्छता केली जाते.
आ. स्वच्छतेच्या वेळी वापरण्यात येणारा कुंचला वाळ्याच्या मुळ्यांपासून बनवलेला असतो. वाळ्याच्या मुळ्या अतिशय मऊ आणि सुगंधी असतात अन् त्यात असलेल्या तत्त्वांमुळे मूर्तीच्या खाचखळग्यात कोठेही अस्वच्छता रहात नाही.
इ. अभिषेक पूजाविधी संपतांना मूर्ती पुन्हा स्वच्छ, थंड पाण्याने धुऊन, मऊ कापडाने पुसून स्वच्छ केली जाते.
ई. अभिषेकपूजा चालू असतांना कोणत्याही प्रकारच्या गतीमान दबावयुक्त पाण्याचा (प्रेशराईज्ड वॉटर) किंवा रसायनांचा वापर केला जात नाही.
देवीच्या मूर्तीची हाताळणी पुजारी अत्यंत लक्षपूर्वक आणि संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊनच करतात. आजपर्यंत पूजाविधी करतांना मूर्तीची कोणत्याही प्रकारची झीज झाल्याचे दिसून आलेले नाही. पुजारीवर्गाला देवीच्या मूर्तीची स्वतःच्या जिवापेक्षाही अधिक काळजी असते.
३. गंडकी पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा परिणाम होत नसल्याने देवीची मूर्ती बनवतांना या पाषाणाची निवड केली जाणे : या मूर्तीच्या संदर्भात इतिहासात नोंद आहे की, गडबडशहावली हसनाबादकर आणि त्या वेळचे देवीचे पुजारी श्री. माधवराव वाळके-सुरवसे पुजारी यांनी आताच्या नेपाळ प्रदेशातील गंडकी नदीच्या पात्रातून अनागोंदी येथील गंडकी पाषाण आणले आणि कुशल पाथरवटांच्या हस्ते त्यापासून मूर्ती घडवून घेतली. या पाषाणावर पाणी, हवा, रसायन इत्यादींचा कसलाच परिणाम होत नाही आणि हे पाषाण अतिशय कणखर असल्याने या पाषाणाचीच निवड केली आहे.
४. अफजलखानाच्या मूर्तीभंजनाच्या कुकृत्यापासून पुजार्यांनी मूर्तीचे संरक्षण करणे : मूर्ती रक्षणाविषयी इतिहासात आणखी एक पुरावा असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्यासाठी अफजलखान महाराष्ट्रावरच चाल करून आला. त्याने मूर्तीभंजनाचा सपाटा लावला. छत्रपतींना भवानीदेवी साहाय्य करते, तर तिलाच उपद्रव करण्याच्या उद्देशाने त्याने येथेही आक्रमण केले. तेव्हा येथील मूर्ती पुजार्यांनी दुसर्या ठिकाणी नेली आणि देवळात अन्य मूर्ती आणून ठेवली. अफजलखानाने ती मूर्ती फोडून जात्यात भरडून काढली, असा उल्लेख आहे. अशा परिस्थितीतही पुजार्यांनी मूर्तीचे संरक्षण केले.
५. भक्तांना होणार्या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारचे प्रशासन !
५ अ. शासकीय अधिकार्यांनी मूर्तीची जवळून पहाणी न करताच तिची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढून ‘भोगी’ पूजा बंद करण्यास सांगणे : अलीकडे मंदिर प्रशासनास जाग आली आणि श्री भवानीमूर्तीची झीज होत असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. या संदर्भात सूत्रबद्ध पद्धतीने चक्रे फिरू लागली. देवीच्या मूर्तीविषयी धर्मभावनेचा प्रश्न असलेला ‘भोगी’ पूजाविधी बंद करण्याचा कट शिजू लागला. त्याप्रमाणे संभाजीनगर येथील संबंधित खात्यास प्रशासनाने देवीच्या मूर्तीची पहाणी करून इतिवृत्त (अहवाल) देण्याची विनंती केली. अधिकार्यांनी ३ फूट लांबून मूर्तीची केवळ छायाचित्रे काढली आणि त्या छायाचित्रांवरून या मूर्तीची झीज होत असल्याचा निष्कर्ष काढला आणि ‘भोगी’ पूजा बंद करावी किंवा मूळ मूर्तीस चांदीचे आवरण घालावे, असे सांगितले. केवळ तर्वâवितर्कांवर असे होऊ शकते ? ‘या संदर्भात नागपूर येथील आमच्याशी संबंधित कार्यालयाकडून इतिवृत्त (अहवाल) मागवावा’, असे सांगितले आहे.
६. भक्तांच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्यामागे मोठे षडयंत्र कार्यरत असून भवानीदेवीची ‘अभिषकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी समस्त भाविकांची मागणी असणे ! : काही विघ्नसंतोषी, स्वार्थी लोकांनी प्रशासनातील अधिकार्यांच्या साहाय्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब करून हिंदु भक्तांच्या भावनांचा कसलाही विचार न करता किंवा योग्य पर्यायी उपाययोजना न करता ‘भोगी अभिषेक’ बंद करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. असे झाल्यास आपल्या कुलदेवतेचा कुलाचार करण्यापासून समाज वंचित राहील. अशा प्रकारे हिंदूंच्या धर्मभावना निरनिराळ्या मार्गाने चिरडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. हिंदूंच्या मोठमोठ्या यात्रा, उत्सव कोणत्या ना कोणत्या कारणांनी बंद पाडण्याचे किंवा न्यून करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भक्तांच्या धार्मिक भावना आणि कुलाचार यांचा विचार करता ‘अभिषेकभोगी’ पूजा बंद होऊ नये, अशी कोट्यवधी भाविकांची भावना आहे.’
- श्री. नागनाथ (भाऊ) भांजी (कदम), तुळजापूर
भक्तांना होणार्या आध्यात्मिक लाभापेक्षा मूर्ती टिकवण्याला जास्त महत्त्व देणारे मंदिरशास्त्राचे अभ्यासक ! : ‘गंडकी नदीतील प्रत्येक पाषाणातच देवत्व असते. तो केवळ गोटा असला, तरी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे; मात्र त्या पाषाणातून घडवलेली मूर्ती झिजत नाही, असे नाही. घडवलेल्या मूर्तीला टाकीचे घाव बसलेले असतात. त्यामुळे तिच्यामध्ये बारीक छिद्रे असतात आणि त्या छिद्रांमध्ये दही, केळी इत्यादीr राहू शकतात. त्यामुळे घडवलेल्या मूर्तीवर भोग लावणे चुकीचे आहे. शिवलिंगाला भोग लावण्याची प्रथा आहे; मात्र ते शिवलिंग स्वयंभू असावे लागते. अशा स्वयंभू शिवलिंगाची चकाकी वाढते, हे सत्य आहे; मात्र ‘घडवलेल्या मूर्तीवर भोग लावल्याने त्याची चकाकी वाढते किंवा सौंदर्य वाढते’, असे म्हणणे चुकीचे आहे. भोग लावण्याच्या प्रथेला धर्मशास्त्रात आधार नाही.’ - मंदिरशास्त्राचे अभ्यासक श्री. उमाकांत राणिंगा, कोल्हापूर
मूर्ती टिकवण्यापेक्षा भक्तांना तिचा आध्यात्मिक लाभ होणे जास्त महत्त्वाचे !
देवाच्या मूर्ती भक्तांसाठी असतात. मूर्तींसाठी भक्त नाहीत. त्यामुळे मूर्तींची काळजी वहाण्यासाठी भक्तांना मूर्तींचा लाभ होण्यापासून दूर ठेवणे योग्य नाही. त्या पुराणवस्तू संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे नसतात. मूर्ती शासनासाठीही नाहीत. विविध विधींमुळे मूर्तीची झीज झाली, तर तिचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. यावरून बुद्धीला किती मर्यादा असतात आणि बुद्धीने घेतलेले निर्णय कसे चुकीचे असू शकतात, हे लक्षात येते; म्हणून अध्यात्मशास्त्र शिकण्याला आणि ते जाणून घेण्याला पर्याय नाही.
हिंदु धर्माचा अभ्यास नसणारे, त्यासंदर्भात धर्माधिकार्यांचा सल्ला न मानणारे हिंदुद्वेष्टे काँग्रेस शासन असेपर्यंत सर्वच मंदिरांच्या संदर्भात ही समस्या निर्माण होणार आहे. हिंदूंना मिळणार्या चैतन्याचा स्रोत मिळू नये अन् हिंदु धर्म नामशेष व्हावा, यांसाठी साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि हिंदुधर्मद्वेष्टे काँग्रेस शासन एकजुटीने सर्व शक्ती पणाला लावून कार्यरत आहेत.
मूर्तीभंजकांविरुद्ध काही न करणारे शासन मूर्तीची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न करते, हे नाटक आहे. शेकडो वर्षे मूर्तीभंजन चालू असतांना स्वातंत्र्यानंतर सर्वपक्षीय राज्यकत्र्यांनी त्याविषयी काहीही केलेले नाही, त्यांना मूर्तीचे रक्षण व्हावे, याची कळकळ असू शकेल का ?
हिंदूंनी एकजूट करून त्यांचे सामथ्र्य या धर्मद्रोह्यांना दाखवून हिंदुराष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे. त्यासाठी हिंदूंनो, तुमचा मृतवतपणा टाकून धर्मक्रांती करायला सिद्ध व्हा ! नाहीतर तुमचे अस्तित्व ‘हिंदु’ म्हणून उरणार नाही आणि हिंदु धर्माला काही काळ ग्रहण लागेल.
‘या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा’, अशी श्री भवानीमातेच्या चरणी प्रार्थना !
- डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (भाद्रपद शु. ९, कलियुग वर्ष ५११३ (६.९.२०११)
शिवकालीन जमाखर्च प्रत
शिवरायांच्या काळातील हिशेब पत्राची अत्यंत दुर्मिळ असलेली सत्य प्रत मी इथे त्याच्या मराठी अनुवादासकट देत आहे..
ताड़केश्वर मन्दिर उत्तराखंड
मंदिर घने जंगल के बीच घाटी है और चारों तरफ ऊँचे ऊँचे देवदार के पेड़ हैं. कार से उतर कर 500 - 600 मीटर नीचे घाटी में उतरना पड़ता है. उतरने चढ़ने के लिए कंक्रीट का रास्ता और रेलिंग है. यहाँ कैफ़े या ढाबा नहीं है, लाउडस्पीकर नहीं है, साफ़ सफाई है और प्लास्टिक का इस्तेमाल मना है.
मान्यता है की यह सिद्ध पीठ 1500 साल पुरानी है. यहाँ एक आजन्म संत ताड़केश्वर रहा करते थे. एक हाथ में त्रिशूल और दूसरे में डमरू लेकर आस पास के गाँव में जाते थे. कोई गलत काम कर रहा हो या जानवरों को मार रहा हो या पेड़ों को नुकसान पहुंचा रहा हो तो प्रताड़ित करते थे. इस ताड़ना के कारण उनका नाम ताड़केश्वर पड़ गया और मंदिर भी ताड़केश्वर मंदिर कहलाने लगा. प्रस्तुत हैं कुछ फोटो :
![]() |
प्रवेश द्वार से पैदल यात्रा शुरू |
![]() |
यात्रीगण |
![]() |
भक्तों द्वारा बांधी गई लाल चुन्नियाँ |
![]() |
भक्तों के धागे |
भक्तों द्वारा दान दी गईं घंटियाँ |
ऊँचे ऊँचे देवदार के पेड़ों के बीच ताड़केश्वर महादेव मंदिर. नीचे तक धूप मुश्किल ही पहुँचती है और वो भी थोड़ी से देर के लिए |
![]() |
ताड़केश्वर महादेव मंदिर |
![]() |
मुख्य मंदिर के पास एक देवी मंदिर भी है |
कण्व ऋषि आश्रम कोटद्वार
यहाँ के मुख्य बस अड्डे से 14 किमी दूर कण्व ऋषि आश्रम है चलिए घूमने चलते हैं. यह आश्रम एक गैर सरकारी संस्था ने बनाया है जिसे जंगल में से 0.364 हेक्टेयर जमीन दी गयी थी. आश्रम मालिनी नदी के बाएँ तट पर घने जंगल के बीच है. बहुत सुंदर हरी भरी जगह है जहाँ कलकल करती मालिनी नदी की आवाज़ सुनाई देती रहती है.
मान्यता है की हस्तिनापुर के राजा दुष्यंत शिकार करते हुए भटक गए और कण्वाश्रम जा पहुंचे. कण्व ऋषि तीर्थ यात्रा पर थे. शकुन्तला ने जिसे ऋषि ने बेटी की तरह पाला था, दुष्यंत की आवभगत की. उनका गन्धर्व विवाह हुआ. दुष्यंत ने वापिस जाते हुए शकुन्तला को अंगूठी पहनाई और कहा की हस्तिनापुर आकर मिले. पर अंगूठी एक दिन नदी में गिर गई और उसे मछली निगल गई. जब शकुन्तला राजा से मिली तो उसने पहचाना ही नहीं. उधर मछली वाले ने अंगूठी बेचने की कोशिश की तो पुलिस ने पकड़ कर राजा के सामने पेश किया. राजा ने अंगूठी देखी तो सब याद आ गया. शकुन्तला की खोज की गई और राजा दुष्यंत ने उसे अपनी रानी बना लिया. बालक भरत पैदा हुआ जो बाद में चक्रवर्ती राजा बना और उसी के नाम पर भारतवर्ष बना.
कालीदास ने इस पर सात अंकों का नाटक लिखा जिसकी वजह से किस्सा और लोकप्रिय हो गया. कालिदास का जन्म कहाँ हुआ था ये तो तय नहीं है पर वे चन्द्रगुप्त द्वितीय के दरबार में रहे अर्थात चौथी शताब्दी के आसपास ही जन्मे थे. पुरातत्व विभाग याने ASI की तरफ से यहाँ कोई बोर्ड या नोटिस नहीं लगा है की कण्व ऋषि, शकुन्तला या भरत का जन्म यहीं हुआ था या वे यहीं रहा करते थे.
बहरहाल सुंदर स्थान है पर कोई पब्लिक टॉयलेट या रेस्टोरेंट की सुविधा नहीं है. सैलानी कम आते हैं. पास में नदी के दूसरी तरफ एक सरकारी और एक प्राइवेट होटल हैं जहां रुका जा सकता है. कुछ फोटो प्रस्तुत हैं:
घने पहाड़ी जंगल के बीच बना हुआ है कण्व आश्रम. बहुत सुंदर जगह है |
कण्व आश्रम के बीच बड़ा चबूतरा है जिस पर इन पांच की मूर्तियाँ बनी हुई हैं - कण्व ऋषि, कश्यप ऋषि, राजा दुष्यंत, शकुन्तला और बालक भरत |
![]() |
कण्व ऋषि. बताया जाता है कि यहाँ ऋषि द्वारा बहुत बड़ा गुरुकुल चलाया जाता था |
![]() |
कश्यप ऋषि भी यहाँ गुरुकुल में शिक्षा देते थे |
![]() |
राजा दुष्यंत और रानी शकुन्तला |
![]() |
बालक भरत शेर के दांत गिनते हुए |
![]() |
मालिनी नदी पर बना पुल |
नोटिस बोर्ड |
रामानंद जी पिछले पच्चीस सालों से यहीं आश्रम में रहते हैं और ऋषि - मुनियों, दुष्यन्त - शकुंतला के बारे में काफी जानकारी देते हैं |
शुक्रताल
- जो मनुष्य सर्वथा मृत्यु के निकट हैं उसे क्या करना चाहिए ?
- मनुष्य मात्र को क्या करना चाहिये, किसका श्रवण, किसका जप, किसका स्मरण तथा किसका भजन करे व किसका त्याग करे जिससे मोक्ष की प्राप्ति हो?
उत्तर में ऋषि शुकदेव ने सात दिनों तक श्रीमद् भागवत पुराण सुनाकर राजा के प्रश्नों का उत्तर दिया और काल से भयमुक्त कर दिया. ऋषि ने कहा:
- हे राजन,
- मनुष्य सर्वथा निडर होकर वैराग्य रुपी शस्त्र से शरीर, स्त्री, पुत्र, धन के मोह को काट फेंके,
- धैर्य के साथ निर्जन और पवित्र स्थान पर बैठ ॐ का जाप करे,
- प्राणायाम से मन वश में करे,
- बुद्धि द्वारा विषयों को दूर करे और
- कर्म कल्याणकारी रूप में लगाए.
राजा परीक्षित ने नियमों का पालन करते हुए तप किया और मोक्ष को प्राप्त हुए.
शुकदेव मंदिर परिसर का विशालकाय बरगद भी उसी समय का माना जाता है.
शुक्रताल में श्रीमद्भागवत पुराण पर आधारित भागवत कथाएँ विभिन्न भाषाओं में पूरे साल ही चलती रहती हैं.
मूर्तिकार केशवराम द्वारा निर्मित मूर्ति की उंचाई चरणों से मुकुट तक 42 फीट 3 इंच है. इसे बनाने में एक वर्ष लगा. प्राण-प्रतिष्ठा समारोह 6 अप्रैल 1989 को संपन्न हुआ |
प्राचीन वट-वृक्ष पूरे शुकदेव मंदिर परिसर पर छाया हुआ है |
बरगद की ठंडी छाँव में दोपहर |
साधू संतों का डेरा |
शिव मन्दिर |
हिंदी के अलावा कई भाषाओं में भागवत प्रवचन चलते रहते हैं |
बाज़ार का एक दृश्य |
नगर का एक दृश्य |
शांत बहती गंगा |
![]() |
दिल्ली से मेरठ बाइपास और मुज़फ्फरनगर बाईपास होते हुए शुक्रताल लगभग 125 किमी की दूरी पर है |
भारत में ममी
![]() |
हिमाचल के ग्यु गाँव में मिली ममी |
![]() |
संत ज़ेवियर की ममी का बॉक्स |
![]() |
मिश्र में प्राप्त एक सुरक्षित ममी |
गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च
|
![]() |
गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च
|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
गोवा का बैसिलिका ऑफ़ बोम जीसस चर्च |