
गेली १०-१५ वर्षे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातची कमान हातात घेतल्यापासून अमिताभ बच्चनच्या भारदस्त आवाजात एक घोषणा सातत्याने आपल्या कानावर पडते – “कुछ दिन तो गुजारो गुजरातमे”. मित्रहो! आज पुन्हा एकदा वर्षभराने नवीन प्रवास वर्णन लिहीत आहे ते आमच्या गुजरात सहलीनिमित्त. करोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेनंतर आणि जुलैमध्ये लसीकरणांनंतर आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला लागले. दिवाळी दरम्यान सोशल मीडियावर अनेकांच्या सहलीची छायाचित्रे दिसायला लागली. एकाने तर अतिशयोक्ती करून सांगितले गोव्यात हॉटेल्स उपलब्ध नसल्याकारणाने पर्यटक समुद्र किनाऱ्यावर झोपले आहेत. दिवाळी निमित्त आम्ही मित्रपरिवारही एकत्र आलो होतो. सहलीचा विषय निघाला आणि साधारणपणे गुजरातमधील “स्टॅचू ऑफ युनिटी” आणि “रण ऑफ कच्छ” करावे असे मनात आले.
जेव्हा प्रत्यक्ष्य सहलीची रचना करायला लागलो, तेव्हा लक्षात आले या दोन्ही जागांमध्ये साधारण ५०० किओमीटरचे अंतर आहे आणि हातामध्ये फक्त ५ दिवस आहेत. पुन्हा पुन्हा गुजरातमध्ये जाणे शक्य नव्हते, त्यामुळे संपूर्ण रूपरेषा ५ दिवसात कशी करता येईल याचा विचार करायला लागलो. एकमत होत नसल्याने आणि प्रवासही खूप असल्याने ट्रॅव्हल एजेंटची मदत घ्यावी असे ठरले. थोडीफार चर्चा करून, सहलीची अंतिम रूपरेषा ठरली. पुणे-मुंबई-केवडीया-वडोदरा-अहमदाबाद-भुज–कच्छ-अहमदाबाद-पुणे असा २००० किलोमीटरचा प्रवास आणि ४ कुटुंब.
प्रत्यक्ष सहल सुरू होईपर्यंत, करोनाचे सावट पुनःश्च गडद व्हायला लागले आणि सहल होणार कि नाही याची शाश्वती वाटेनाशी झाली. अखेर २८ डिसेंबर ही तारीख उजाडली आणि आता आपण सहलीला जाणार हे नक्की झाले.
दिवस १ – २८ डिसेंबर २०२१ – मुंबई ते केवाडिया (गुजरात) : साधारण संध्याकाळी ५ वाजता आम्ही सर्व चिंचवडहून नियोजित टेम्पो ट्रॅव्हलर मधून निघालो. मुंबईचे ट्रॅफिक किती अनिश्चित आहे याचा प्रत्यय आम्हाला प्रवासाच्या पहिल्याच टप्यात आला. साधारण कळंबोलीजवळ २ तासाच्या ट्रॅफिकजॅममध्ये अडकलो आणि रात्री १०.४५ च्या दरम्यान दादरला पोहोचलो. नजीकच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून, अगदी १5 मिनिट आधी रेल्वेमध्ये बसलो. दादर ते थेट केवडीया हि ट्रेन दररोज रात्री चालते. बऱ्याच वर्षांनी रेल्वे प्रवास करत होतो आणि नमूद करायला आवडेल बोगी स्वच्छ होती. कुठलाही प्रवास करताना आपल्याला विभिन्न संस्कृती आणि विविध समाजाचा अनुभव येतो. संपूर्ण बोगीच गुजराती बांधवांनी भरली असल्याने, आम्हाला हा अनुभव प्रवासाच्या पहिल्याच टप्यात आला. 😊


दिवस २ – २9 डिसेंबर २०२१ – स्टॅचू ऑफ युनिटी (केवडीया ) : सकाळी ७.३० वाजता आम्ही केवडीया रेल्वे स्टेशनला पोहोचलो. स्टॅचू ऑफ युनिटी, नर्मदा जिल्ह्यातील केवडीया या छोट्याश्या तालुकावजा गावात नर्मदा धरणावर बांधला आहे. बरोड्यापासून साधारण ८६ किलोमीटर अंतर असेल या गावाचे. नियोजित योजनेप्रमाणे आम्ही नर्मदा टेन्ट सिटी २ मध्ये राहणार होतो आणि केवडीया स्टेशनला आम्हाला कॉम्पलिमेन्टरी पीक-अप होता. थोडेसे अनऑर्गनाइज्ड वाटले आणि इथे साधारण अर्धा तास गेला आमचा. बसमधून पुढे ६ किलोमीटरवर आमचे रिसॉर्ट होते, जाताना सरदार वल्लभभाई पटेलांच्या भव्य पुतळ्याची झलक मिळाली. रिसॉर्टवर पोहोचल्यावर थोडे फ्रेश झालो आणि न्याहारी करून घेतली. आम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ली चेक-इन मिळाले नाही, दुपारी १२.३० पर्यंत आम्हाला थांबायला लागणार होते. २ ते २.३० तास आम्ही रिसॉर्टच्या बाजूला असेलल्या नर्मदा नदीच्या बॅकवॉटरवर घालवले.





दुपारी २.३० च्या सुमारास जेवण करून आम्ही स्टॅचू ऑफ युनिटीला जायला निघालो. या परिसरात बाहेरील डिझल किंवा टुरिस्ट गाड्यांना परवानगी नसल्याकारणाने, येथील इ रिक्षा किंवा पब्लिक बसेस मधून प्रवास करायला लागतो. आम्ही बसचा पर्याय निवडला, परंतु रिक्षाचा पर्याय थोडा महाग असला तरी तोच निवडावा असे वाटले. आम्हाला ३ तासांमध्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर, डॅम व्हिव पॉईंट, स्टॅचू ऑफ युनिटी आणि लेजर शो करायचे होते. याशिवाय या भागात रिव्हर राफ्टिंग आणि सायकलिंग या २ ऍक्टिव्हिटी आहेत. हे सर्व करायला इथे किमान २ दिवस हवेत आणि आम्हाला हे सर्व ३ ते ४ तासात करायचे होते. आम्ही घाई घाईमध्ये पहिले डॅम व्हिवला गेलो, इथे विशेष काही नव्हते. महाराष्ट्रातील कितीतरी धरणांची सह्याद्री पर्वतरांगांमधून दिसणारी दृश्ये कैक पटीने अधिक नयन रम्य आहेत असे वाटले. येथून पुढे आम्ही व्हॅली ऑफ फ्लॉवरला गेलो, हि जागाही सोसो होती. ऐकीव माहितीनुसार हि जागा या भागातील डंप यार्ड होते. सरदार पटेलांच्या पायाशी असलेली जागा सुंदर असावी या कारणांस्तव, मा. नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार या जागेचे बगीच्यामध्ये रूपांतर करण्यात आले.


स्टॅचू ऑफ युनिटी :
व्हॅली ऑफ फ्लॉवरहुन पुढे आम्ही स्टॅचू ऑफ युनिटीला गेलो आणि समोर आला १८२ मीटरचा सरदार वल्लभभाई पटेलांचा भव्य पुतळा. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५६२ विविध संस्थानाचे एकत्रीकरण करून भारतीय संघराज्य बनवण्याचे मोलाचे आणि तितकेच कठीण कार्य भारताचे पहिले ग्रहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांनी केले. स्टॅचू ऑफ युनिटी हा भव्य पुतळा, या लोहपुरूषाच्या विशेष सन्मानार्थ बांधला आहे. एखाद्या दृढनिश्चयी व्यक्तीचा तितक्याच दृढनिश्चयी व्यक्तीकडून संकल्प ठरवून केलेला सन्मान आमच्या नजरेत दिसत होता आणि त्याच बरोबर त्या साधारणश्या परिसराचा केलेला कायापालट दिसत होता. मिळालेल्या माहितीनुसार इथे दररोज साधारण १५००० पर्यटक भेट देतात, या तुलनेत स्टॅचू ऑफ लिबर्टीला साधारण १०००० पर्यटक भेट देतात. संपूर्ण गावाचे आणि पर्यायाने गुजरात राज्याचे अर्थकारण या एका भव्य प्रतिकृतीने बदलले आहे.

बरोबर आणलेले सामान काउंटरला देऊन आम्ही पुतळ्याच्या अधिक-अधिक जवळ जायला लागलो. हा पुतळा आपण 2 प्रकारे बघू शकतो, पहिला डेक आपल्याला एस्कलेटरने सरदार पटेलांच्या पावलांशी घेऊन जातो. आम्ही सर्वही पहिल्या डेकवर गेलो. पावलाशी गेल्यावर आपण सरदारांच्या पावलाच्या बोटाएवढेही नाही याची कल्पना आपल्याला येते. संपूर्ण वर्तुळाकार डेकवरून आपल्याला चोहूबाजूने नर्मदा नदीचे पात्र दिसते. हि सर्व दृश्य बघून आम्हा सर्वांच्या अंगावर शहरे आली. येथून खाली उतरून लिफ्टने आम्ही ऑब्झर्वेशन डेकच्या रांगेत उभे राहिलो. लिफ्टने आपण साधारण १२२ मीटरवर आतील बाजूने सरदारांच्या छातीपर्यंत येऊन पोहोचतो. येथूनही आपल्यास नर्मदेचे एका बाजूचे पात्र दिसते. अजून एक नमूद करण्यासारखी आणि अभिमानस्पद माहिती म्हणजे, या भव्य पुतळ्याचे प्रमुख वास्तुविशारद ९१ वर्षीय मराठमोळे पद्मभूषण राम सुतार आहेत. भारत सरकारतर्फे त्यांचा इ.स १९९९ मध्ये पद्मश्री आणि इ.स २०१८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. अतिशय तृप्त मनाने लेसर शो बघायला आम्ही खाली उतरलो आणि आमच्या बुकिंग मधील गोंधळ पुन्हा एकदा अनुभवला. हा लेसर-शो बघायला २ डेक आहेत आणि दोन्ही मिळून फक्त १२० लोकांना प्रवेश मिळतो. हे फुल्ल झाल्यावर आपल्याला प्रवेश मिळत नाही आणि या करता वेळेत बुकिंग करणे आवश्यक असते. आमच्या ट्रॅव्हल प्लॅनरकाढून या बाबतीत हलगर्जीपणा झाला होता. आपली फसगत झाली आहे हे लक्षात आले परंतु चीड चीड करण्याशिवाय आमच्या हातात काही नव्हते. रस्त्यावरून थोडीफार लेझरशोची दृश्ये बघितली आणि रिसॉर्टवर परतलो. पुन्हा येथे नियोजनातील त्रुटी लक्षात आल्या आणि आपल्या अपूर्ण माहिती मिळाली आहे याचा प्रत्यय आला. आमचे जे रिसॉर्ट आहे ते एका भागात होते आणि ६ वाजता तेथील परतीच्या बस बंद होतात. येथील इ-रिक्षा फक्त स्त्रिया चालवतात आणि हॉटेल दुर्गम असल्याने विशेष कोणी येण्यास उत्सुक नव्हते. अखेर एक “दीदी” ४ फेऱ्या मारायला तयार झाली आणि आम्ही परत फिरलो. एव्हाना थंडी वाढली होती आणि आजूबाजूच्या परिसरात केलेली रोषणाई छानशी दिसत होती. परत आल्यावर पुढच्या प्रवासाकरता असलेल्या आमच्या नियोजित टेम्पो ट्रॅव्हलरचा पास मिळवला जेणेकरून पुढील प्रवास सुकर होईल. जेवण करून थोडावेळ सांस्कृतिक कार्यक्रम बघून आम्ही झोपायला गेलो. डोळे मिटल्यावर मनात विचार आला, थोडेफार गैरव्यवस्थापन झाले परंतु मानवनिर्मित भव्य निर्मिती बघून डोळ्याचे खऱ्या अर्थाने पारणे फिटले. मनात अलगद हा विचार आला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अरबी समुद्राच्या मधोमध बनेल तेव्हा तो मराठी माणसाकरिता खरोखर एक अभिमानाचा क्षण असेल.






येथे सहलीच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे - १) किमान २ दिवसांचे नियोजन करावे २) साधारण दुपारी १२ पर्यंत इथे पोहोचावे. ३) ४-५ जागा इथे बघायला आहेत,पण स्टेटचू ऑफ युनिटी आणि त्याचा लेझर शो हे सगळ्यात आकर्षक आहे. येथील रोषणाई बघायला रात्रीचा वेळ ठेवावा. ४) बाकी गोष्टीतील सायकलिंग आणि राफ्टिंग करता येईल. हे करताना निवांत वेळ घालवता येईल हे बघावे ५) महाग असली तरी शक्यतो टेन्ट सिटी १ मध्ये राहावे अथवा दुसरे सोयीस्कर ठिकाण निवडावे. ६)दिवसभराकरिता इ-रिक्षा किंवा इ-कार बुक करावी. ७) केवडीयापासून २०० किलोमीटरमध्ये बरोडा आणि अहमदाबाद शहरे आहेत. केवडीया-बरोडा-अहमदाबाद केवळ अशी ५ ते ६ दिवसाची सहल करावी. ८) पुणे-मुंबईच्या प्रवाश्यांना स्वतःचे वाहन घेणे अधिक योग्य, किंवा सरळ अहमदाबादपर्यंत विमान प्रवास करावा.अहमदाबाद ते केवडीया जनशताब्दी ट्रेनला नजीकच्या काळात विस्ताडोम कोच बसवले आहेत ज्याच्यातून तुम्हाला ३६० डिग्री व्हिव मिळतो.
दिवस ३ – ३०.१२.२०२२ – केवडीया ते अहमदाबाद व्हाया बरोडा – सकाळी ८.३० वाजता न्याहारी करून बरोड्याला निघायचे आमचे नक्की झाले होते. बरोड्यामध्ये लक्ष्मीविलास पॅलेसला भेट द्यायची आणि अहमदाबादला निघायचे असा प्लॅन होता. केवडीया ते बरोडा अंतर ९० किलोमीटर आहे आणि साधारण २ तासाचा प्रवास आहे. ठरल्याप्रमाणे न्याहारी करून निघालो आणि समोर लॅव्हिश टेम्पो ट्रॅव्हलर दिसली. १७ सिटरला १२ सीटरमध्ये रूपांतर केले होते आणि आतमध्ये पुशबॅक बकेट सीट्स होती. आतले इंटेरिअरही अतिशय सुंदर होते. एकंदरीतच आम्ही खुश झालो आणि सकाळी ९.३० ते १० वाजता आमचा प्रवास सुरु केला.


लक्ष्मीविलास पॅलेस, बरोडा – दुपारी १२ वाजता आम्ही बरोड्याला पोहोचलो. तिकीट काऊंटरला सगळ्यांची तिकिटे काढून आम्ही महालामध्ये गेलो. रिसेप्शनवर आम्हा प्रत्येकाला ऑडिओ प्लेअर दिला गेला. हा प्लेअर मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. साहजिकच आम्ही मराठी भाशा निवडली. हा ऑडिओ प्लेअर म्हणजे या जागेची माहिती देण्याकरता चक्क रेकॉर्डेड मार्गदर्शक आहे. पॅलेसच्या रचनेनुसार आणि त्यातील विविध भागांनुसार माहिती ध्वनिमुद्रित केली आहे. आपण प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर, तिथे असलेल्या संग्रहित वस्तूंची इत्यंभूत माहिती आपल्याला यावर मिळते आणि हा महाल पाहणे सुकर होते. या महालाची थोडक्यात माहिती अशी कि, हा महाल मराठा सरदार महाराजा सयाजीराव गायकवाडांनी १८९० मध्ये बांधला. ५०० एकरवर पसरलेली हि जगातील सगळ्यात मोठी निवासी वास्तू आहे. अगदी तुलना करायची झाली तर हा महाल बंकींगहॅम पॅलेसच्या चौपट आहे. या महालातील विशिष्ठ रंगरचना, झुंबर आणि विविध कलाकृती बघून येथील ऐश्वर्याचे दर्शन घडते. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी या महालातील विविध कलाकृती साकारायला त्याकाळातील प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्माला पाचारण केले होते. महालातील एका खोलीमध्ये प्राचीन काळातील मुख्यतः मराठा साम्राज्यात वापरलेल्या शस्त्रात्रांचे प्रदर्शन आहे. विविध शस्त्रांची माहिती ऐकायला खरेच छान वाटते. महालाच्या आजूबाजूला मोठे उद्यान आणि गोल्फ कोर्स आहे. महालात न्याहारीचीही सोय आहे. थोडी फार न्याहारी करून आम्ही महालाच्या परिसरात असलेले महाराजा फतेहसिंघ संग्रहालय बघायला गेलो. इथे प्रमुखतः विविध चित्रकृती आणि जुन्या काळातील पेहरावांचे प्रदर्शन आहे. एव्हाना दुपारचे दीड वाजले, थोडी चौकशी करून आम्ही ‘गोवर्धन थाल’ या गुजराती डायनिंग हॉलमध्ये जेवायला गेलो. एकंदरीत छान जेवण होते, परंतु इतके पदार्थ एकदम जात नाहीत. संध्याकाळी अहमदाबादच्या अक्षरधाम मंदिरात जाण्याचा आमचा ओरिजिनल प्लॅन होता, परंतु उशिर झाल्यामुळे ते होणे शक्य नव्हते. म्हणून बरोड्याच्या सयाजी बागेत आम्ही थोडा वेळ घालवला. येथून पुढे आम्ही सरळ अहमदाबाद्ला निघालॊ. बरोडा ते अहमदाबाद हे साधारण ११५ किलोमीटरचे अंतर आहे. संध्याकाळी ७ वाजता आम्ही अहमदाबादला पोहोचलो. अहमदाबाद्ला आमचा फक्त नाईट हॉल्ट होता. सर्व बायकांचा खरेदीचा प्लॅन होता, पण तेथे संप असल्याकारणाने विशेष काही मिळाले नाही. आजचा बहुतांश दिवस प्रवासात गेला. नजीकच्या एका हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही सर्व झोपी गेलो.




दिवस ४ – ३१.१२.२०२१ – अहमदाबाद – भुज : आज आम्हाला भुजला निघायचे होते. अहमदाबादमध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत, परंतु आमच्या हातात फक्त आजचा अर्धा दिवस होता. म्हणून आम्ही ३ जागा बघायच्या ठरवल्या. अदलज स्टेपवेल, अक्षरधाम स्वामीनारायण मंदिर आणि अहमदाबादपासून ९० किलोमीटरवर असलेले मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्यमंदिर. एक दिवसाच्या नाईटओव्हरमध्ये सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे सामान उतरवा आणि परत भरा. सकाळी १० वाजता आम्ही निघालो आणि १५ किलोमीटरवर असलेल्या अदलज स्टेपवेलला पोहोचलो.
अदलज स्टेपवेल, अहमदाबाद – स्टेपवेलला अचूक मराठी शब्द मिळाला नाही परंतु जर रचनेचा विचार केला तर विशिष्ट रचना असलेली विहीर आणि पायऱ्या. उत्तर भारतात अश्या तर्हेच्या अनेक विहिरी आहेत, एकट्या गुजरातमध्ये अश्या १२० विहिरी आहेत. अदलज विहीर यातील सर्वात मोठी आहे. हि विहीर वाघेला साम्राज्याचे राजा राणा वीरसिंगनी १४९८ मध्ये पावसावरील अवलंबित्व कमी करण्याकरता बांधायला घेतली. परंतु बांधकाम पूर्ण होण्याआधीच मोहम्मद बेगडा या मुस्लिम शासकाने आक्रमण केले आणि त्यात राणा वीरसिंगना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या पत्नीने या विहिरीचे बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडला. याचे बांधकाम पुढे मोहम्मद बेगडाने केल्यामुळे या विहिरीच्या बांधकामावर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही संस्कृतीचा प्रभाव दिसतो. साधारण इथे एखाद तास घालवून आम्ही पुढे अक्षरधाम मंदिराकडे जायला निघालो.




स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर – दुपारी १२ वाजता आम्ही मंदिरापाशी पोहोचलो. २००२ साली झालेल्या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था खूप कडक आहे. मोबाईल-कॅमेरा आत नेण्यास परवानगी नाहीये. सर्व वस्तू जमा करून आम्ही आत गेलो. स्वामी पंथाच्या योगीजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन प्रमुख स्वामी महाराजांनी १९७९ साली स्वामीनारायण मंदिराचा पाया रचला आणि १३ वर्षांमध्ये १९92 साली हे बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण मंदिर परिसर, २३ एकराचा आहे. अतिशय भव्य आणि तितकेच आकर्षक असे हे मंदीर आहे. मंदिरातील भगवान स्वामी नारायण, त्यांचे शिष्य आणि सर्व देवी देवतांच्या मुर्त्या खूपच सुबक आणि प्रसन्न अश्या आहेत. संपूर्ण जगभरात एक हजारहून अधिक स्वामीनारायण मंदिरे आहेत. काही वेळ मंदीर परिसरात घालवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मंदीर परिसरात फोटो काढायला परवानगी नसल्या कारणाने, इंटरनेटवर उपलब्ध असलेले फोटो या ब्लॉग करता वापरत आहे.


सूर्य मंदिर, मोढेरा – येथून पुढे, आम्ही मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिराकडे मोर्चा वळवला. आमच्या नियोजित योजनेनुसार हे ठिकाण करायचे नव्हते. परंतु प्रवासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भूजला जाताना थोडी वेगळी वाट करून या जागेला जाणे शक्य होते. संपूर्ण प्रवास साधारण दोन – अडीच तासाने वाढणार होता. आधीच उशीर झाल्यामुळे पटकन सबवेमध्ये सेंडविचेस खाल्ले आणि तीन वाजेपर्यंत मोढेराला पोहोचलो. मोढेराचे सूर्य मंदिर, १० व्या शतकात चालुक्य राजवंशातील राजा भीमाने बांधले. हे मंदिर मेहसाणा जिल्ह्यातील पुष्पावती नदीच्या किनाऱ्यावर बांधले आहे. या मंदिरात सध्या कुठलीही पूजा अर्चना होत नाही आणि मंदिर पुरातत्व खात्याच्या अख्त्यायारीत येते. या मंदिर परिसराचे मुख्यतः ३ भाग आहेत, मुख्य मंदिर, सभा मंडप आणि पाण्याचे कुंड. गेली काही वर्षे तामिळनाडू किंवा कर्नाटकातील विविध प्राचीन मंदिरे बघितली, हे मंदिरही त्याच शृखंलेतले आहे. साधारण १ तास आम्ही येथे काढला.




मोढेरा ते भुज – मोढेराहून पुढे आम्ही भूजला निघालो. साधारण ३१६ किलोमीटरच्या प्रवासाला ६ तास लागणार होते. काही रस्ता सुस्थितीत तर काहीसा खराब असा होता. मोढेराहून निघाल्यावर मोहरीची पिवळी शेती रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच्या-लांब पसरेलली दिसत होती. गाडीमध्ये गाणी, भेंड्या, आणि वेगवेगळे खेळ करत वेळ कसा गेला कळलेच नाही. माझ्या मते कुठल्याही प्रवासाची हीच मजा असते. पोहोचेपर्यंत रात्रीचे १०-१०.३० वाजले. आज वर्षाचा शेवटचा दिवस होता. जेवण करून आणि थोडे ताजेतवाने होऊन आम्ही सगळे मस्तपैकी पत्याचा डाव मांडला आणि नवीन वर्षाचे स्वागत करून सर्वजण झोपी गेलो.

दिवस ५ – रण ऑफ कच्छ : ०१.जानेवारी २०२२ – आज आमच्या सहलीचे शेवटचे आणि प्रमुख ठिकाण होते. ग्रेट रण ऑफ कच्छ. आमचे हॉटेल भुज रेल्वे स्टेशनला लागूनच होते आणि आणि तेथेच “रण उत्सव – टेन्ट सिटी” चा कॉम्प्लिमेंटरी पीक अप पॉईंट होता. न्याहारी करून साधारण सकाळी ९.30 च्या सुमारास आम्ही बसमध्ये चढलो. रण ऑफ कच्छला आपल्याला एकाच सहलीमध्ये दोन भव्य अनुभव मिळतात – एक प्रत्यक्ष रण आणि दुसरा टेन्ट सिटीने आयोजित केलेला उत्सव. भुज ते कच्छ हे ९० किलोमीटरचे अंतर २ तासात पूर्ण झाले. सरळ रस्ता आणि दोन्ही बाजूला रखरखते वाळवंट असा हा प्रवास होता. सकाळी ११.१५ वाजता आम्ही प्रत्यक्ष “रण उत्सव – टेन्ट सिटीला” पोहोचलो.

२००५ साली छोट्या स्वरूपात सुरु झालेला ३ दिवसाचा रणोत्सव, आता गुजरात टूरिजम भव्य स्वरूपात १०० दिवस चालवते. अनेक इव्हेंट म्यानेजमेन्ट कंपनी आणि लोकल रिसॉर्ट छोट्या मोठ्या स्वरूपात हा महोत्सव नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करतात. सगळेच अबव्ह बजेट असले, तरी तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत तश्या सुविधा उपलब्ध आहेत. टेन्टसिटीमध्ये आम्ही साधारण २ तास आधी पोहोचलो होतो, परंतु नर्मदा टेन्ट सिटीपेक्षा कितीतरी अधिक सुखद अनुभव येथे आला. चेक-इन प्रक्रियाहि आरामदायक होती. वेटिंग लॉन्जमध्ये व्यवस्थित बसण्याच्या सोय, चहा-कॉफी-सरबत, सर्व ऍक्टिव्हिटी आणि सुविधांची माहिती स्वागत कक्षातच मिळाली. लागूनच खरेदी करण्याकरता विविध स्टॉल आहेत, तिथे सर्व बायकांनी तासभर यथेच्छ खरेदी केली. २ तास कसे गेले ते कळलेच नाही. साधारण १ वाजता आपापल्या टेन्टमध्ये आम्ही चेकइन केले. ९ समूह आणि ३५० टेन्टसमध्ये विभागलेल्या या टेन्ट सिटीला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. प्रत्येक समूहाच्या बाहेर प्रशस्त मैदान आहे. एकदम आटोपशीर तरीही सर्व सुविधांयुक्त असे हे टेन्ट आहेत. आमच्या मुला-मुलींना खेळायला कुत्री आणि सायकली मिळाल्या त्यामुळे त्यांनी धमाल केली. येथील सर्व रेस्टॉरंटची मांडणी वेगवेगळ्या समुहानुसार केली आहे, जेणेकरून व्यवस्थापन योग्यतर्हेने केले जाईल. रेस्टॉरंटची सजावट आणि जेवणाचा दर्जा पंचतारांकित हॉटेलचा आहे. दुपारी ३ वाजता आम्ही जेवणे उरकली. आमचा पुढचा प्रोग्रॅम होता, बसने रणला जायचे. आम्ही तडक बसमध्ये जाऊन बसलो.
टेन्टसिटीबद्दल महत्वाची माहिती - नर्मदा टेन्टसिटी २ हि प्रावेग कम्युनिकेशन नावाची बीएसइ लीस्टेड कंपनी चालवते आणि नर्मदा टेन्ट सिटी १ हि लाल्लोजी अँड सन्स चालवते. आमचा पहिला अनुभव प्रावेग बरोबर होता आणि तो सोसो होता. कच्छमध्येही या दोन्ही कंपन्या आहेत. कच्छमध्ये आम्ही लाल्लोजी अँड सन्सच्या "रण उत्सव - द टेन्ट सिटी" मध्ये राहिलो आणि निश्चितच येथील अनुभव अधिक दर्जेदार होता.







रण ऑफ कच्छ, प्रत्यक्ष टेन्ट सिटी पासून २.५ किलोमीटरवर आहे. ग्रेट रण ऑफ कच्छ साधारण ७५०० चौरस किलोमीटर पसरले आहे आणि काही भाग पाकिस्तानातील सिंध प्रांतात आहे. हे पृथ्वीवरचे सर्वात विस्तृत असे मिठाचे वाळवंट आहे. येथून मैलोन्मैल आपल्याला फक्त पांढरी जमीन दिसते. एकेकाळी हा सर्व भाग अरबी समुद्राखाली होता, कालांतराने भूगर्भीय बदलाने समुद्र वेगळा झाला आणि उरले ते मिठाचे वाळवंट. पावसाळ्यात येथे मिठाची दलदल तयार होते आणि आरबीसमुद्राच्या खांबाती-आखाता पसरते. साधारण नोव्हेंबरच्या दरम्यान पाणी जिरायला सुरुवात होते आणि त्यानंतर येथे पर्यटक यायला सुरुवात होते. निसर्गाचे हे आश्चर्य आपल्याला थक्क केल्याशिवाय राहत नाही. आमच्यातील कित्येकांना हि माहिती नव्हती आणि त्यांचा समज होता कि हे पांढऱ्या रेतीचे वाळवंट आहे. साधारण १० मिनिटामध्ये बसने एका थांब्यापाशी पोहोचलो आणि आम्हाला पांढरे रण दिसायला लागले. उंटाच्या गाडीने काही मैल प्रत्यक्ष जागेवर पोहोचलो आणि पूर्ण पांढरे रण दृष्टीक्षेपात आले. मला अथांग पसरलेल्या समुद्राचे किंवा अथांग नदीपात्राचे मला खूप कुतुहूल वाटते. इथेही काहीसे असेच दृश्य होते. इथे तासनतास शांत बसून राहावे असे वाटत होते, परंतु कमीवेळात पूर्ण सहल करायची असल्याने हे शक्य होत नाही. उंटगाडीतून उतरल्यावर आमच्यापैकी सर्व मुलींनी (लहान आणि मोठ्या दोन्ही) पॅरामोटोरिन्ग केले. मुलांनी उंटाची फेरी मारली. काही वेळ येथे बसून आणि फिरून आम्ही घालवला. साधारण संध्याकाळी ७ वाजता परत जायला निघालो. काही जण बसने परत गेले तर काही जण उंटगाडीने. थोडेसे फ्रेश होऊन, रात्रीचे जेवण करून घेतले. त्यांनतर इथे कल्चरल प्रोग्रॅम होता, तो साधारण तासभर बघितला. येथील स्थानिक कलाकारांची गाणी, फोल्क डान्स आणि काही विशेष थक्क करणारे स्थानिक कार्यक्रम. छान वेळ गेला या कार्यक्रमात. येथे यायचे साधारण २ दिवस आहेत पौर्णिमा किंवा अमावास्या. या दोन्ही दिवशी ताऱ्यांनी भरलेले पूर्ण आकाश अतिशय विलोभनीय दिसते. आम्हाला हा अनुभव लडाखमधील नुब्रा व्हॅलीला आलेला. आज ढग असल्याने मात्र तारे स्पष्ट दिसत नव्हते. हा कार्यक्रम बघून, थोडे फार फिरून आम्ही पुन्हा टेन्टपाशी आलो. थोड्या फार गप्पा मारून झोपी गेलो.








दिवस ६ परतीचा प्रवास – कच्छ – अहमदाबाद – पुणे : ०२.जानेवारी २०२२ : पहाटे लवकर उठून आम्ही २.५ किलोमीटर व्हाईट-रणपर्यंत मॉर्निंग वॉल्क केले आणि न्याहारी उरकून सकाळी ९.३० ला परतीचा प्रवास सुरु केला. आम्हाला कच्छला आल्यावर असे जाणवले अजून किमान २-3 दिवस तरी इथे हवे होते, काही महत्वाच्या जागांना आम्हाला जाता आले नाही. असो, आम्हा सर्वांनाच हा विचार मनात आला कि ज्या स्केलने हि इव्हेंट रिसॉर्टने आयोजित केली आहे ते खरेच अविश्वनीय आहे. आमची बस साधारण ११.३० पर्यंत भूजला आली आणि पुढील ६ तासांचा अहमदाबादपर्यंतचा प्रवास आमच्या ट्रॅव्हलरने मौजमस्ती करत केला. वाटेमध्ये चामुंडाकृपा नावाच्या एका ढाब्यावर गुजराती जेवण केले. अतिशय माफक दरात छान जेवण मिळाले. एअरपोर्टवर फार वेळ नव्हता, रात्री ९.३० वाजता आमच्या विमानाने उड्डाण केले आणि साधारण रात्री १२ वाजता चिंचवडला आम्ही सर्व घरी पोहोचलो. नेहमीपेक्षा या सहलीमध्ये थोडेफार ढिसाळ नियोजनाचा अनुभव आला, परंतु असे आंबट-गोड अनुभवसुद्धा तुम्हाला अनन्य आठवणींचे अल्बम तयार करून देतात आणि पुढच्या सहलीचे नियोजन अधिक सचोटीने करायची ऊर्जा देतात. पुन्हा भेटूया लवकरच, धन्यवाद!!
कच्छ / भुजजवळील इतर महत्वाची ठिकाणे - 1) कोटेश्वर महादेव हे प्राचीन महादेवाचे मंदिर(येथे भारताची जमीन संपते - धनुषकोडीसारखी), 2) कलोडुंगर जेथून रण ऑफ कच्छचा ३६० डिग्री पॅनारॉमिक व्हिव दिसतो 3) मांडवी समुद्र किनारा 4) भुजमधील स्वामीनारायण मंदिर 5) ढोलावीरा आणि सुरकोटाडा हि हडप्पा संस्कृतीची प्रतीके.



समाप्त!
वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट
वडोदरा - एकता पुतळा एक धावती भेट
नर्मदा नदीवरील Sardar Sarovar Dam धरण गुजरात सरकारचा प्रकल्प आहे आणि
धरण भिंती पुढील जमीन परिसर एकता पुतळा (Statue of unity) प्रकल्पासाठी
राखीव केला आहे. तो केंद्र सरकारकडे आहे.
हे धरण उभारताना किती विरोध झाला हे सर्वांना माहीत आहेच.
सरदार वल्लभभाई पटेल पुतळा उर्फ एकता पुतळा (Statue of unity - SOU)
याबद्दल ऐकून होतो. २०१८ ला उद्घाटन झालं आणि नंतर लगेचच मार्च २०२० ते मे
२०२२ दरम्यान कोरोना निर्बंधांमुळे जाणे रहीत झालं. आताच या आठवड्यात जाऊन
आलो. पुतळ्यासमोर थोडं बडोदाही पाहावं हे ठरवलं. आमच्या धावत्या सहलीतील
काही चित्रे प्रथम.
आमचा प्लान असा होता-
दादर एकता नगर ट्रेनने बडोद्याला उतरलो (०५:३०)
ही गाडी पुढे शेवटी एकता नगर/केवडिया/statue of unity ला जाते तरी बडोद्यात
दोन दिवसांचे हॉटेल घेतले. सर्व जागा ,बस स्टँड पूर्वेलाच आहे. सयाजीगंज
पोलिस स्टेशन जवळच आहे व त्यामागच्या रस्त्यावर असंख्य हॉटेल्स आहेत. गाडी
पहाटे साडेपाचलाच जाते. त्यामुळे स्थानिक बस स्टँडवर(आणि उत्तम स्वच्छ
स्टेशन समोरच जवळच आहे.) वेळ काढून आठ वाजता हॉटेल शोधले.
फोटो १
बडोदा पूर्व स्टेशन परिसरात
पहिला दिवस सकाळी लक्ष्मी विलास पॅलेस(३किमी) बाहेरूनच पाहिला. आतल्या भागासाठी यूट्यूबवर चानेल लालनटॉपवर विडीओ (१तासाचा) पाहा.
फोटो २
सयाजी युनिव्हर्सिटी
फोटो ३
joy train route, सयाजी बाग.
दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचची कालचीच ट्रेन पकडली. बस स्टँडवजवळच्या हॉटेलातून पोहे चहा घेतले. हातात लगेज नव्हते . फक्त पाण्याची बाटली, मोबाईल, पैसे,एटीएम कार्ड घेतले. म्हणजे पुढे सामान ठेवणे ही कटकट गेली. तिथे खाण्याच्या वस्तू आणि मोठ्या बॅगा नेता येत नाहीत.
साडे सातला एकता नगरला पोहोचलो.
फोटो ४
एकता नगर रेल्वे स्टेशन
बाहेरच्या एसी बसने SOU पार्किंगला उतरलो.
फोटो ५
free ac bus, एकता नगर रेल्वे स्टेशन
प्रवेश तिकिटे दोन प्रकारची आहेत. पुतळ्याभोवती फिरणे यासाठी रु१५० चे
तिकिट आहे ते आदल्या दिवशीच काढले होते आणि पीडीएफ printed पेज नं २ वर SoU
entry ticket 1/2/3/4 अशी नावे आणि QR code असतो ते अधिक ओरिजिनल आइडी
प्रूफ आधार वगैरे दाखवावे लागते. ते पाहून आत सोडतात.
त्याची खिडकी आठला उघडते. पण आमचे तिकिट (१५०रु) होते आणि लगेज सामान नव्हते त्यामुळे पहिलेच आत गेलो.
फोटो ६
parking lot locker room
या तिकिटावर पुतळ्याच्या आतमध्ये वरती ४५व्या मजल्यावर viewing gallery
आहे तिकडे जाता येत नाही. त्यासाठी रु ३८० चे तिकिट आणि time slot
8-10,10-12,12-14.. वगैरे घ्यावा लागतो. थंडीत धुके असते व दूरचे दिसत
नाही. धरणाची भिंत दिसत नाही. त्यामुळे ते तिकिट घेतले नव्हते. आठ ते
पावणे नऊ पुतळा पाहून बाहेर आलो.मंगळवार ते शुक्रवार गर्दी नसते.
फोटो ७
पुतळ्याकडे
बाहेर फ्री एसी बसने जंगल सफारीला(२किमी) उतरलो.
फोटो ८
Jungle Safari entry
फोटो ९
जंगल सफारी १
फोटो १०
जंगल सफारी २
जंगल सफारीचे ओनलाइन तिकिट काढले नव्हते. ते तिकडे खिडकीवर फक्त
कार्डानेच काढता येते (रु २००). युपिआई पेमेंट किंवा रोखीने मिळत नाही.
इथे खूप पिंजरे आहेत. आफ्रिकन पशू पक्षी आणि भारतीय काळा वाघ(बिबट्या), हे
खास आकर्षण सवा तासात पाहून बाहेर आलो. पूर्ण सावकाश पाहायला अडीच तीन तास
हवेत.
जंगल सफारी तून बाहेर येऊन इ रिक्शाने(५०रु) परत SOU Prking मध्ये आलो.
Platform no 5 वरून Circular route bus दर पंधरा मिनिटांनी सुटतात. कुणी
असो वा नसो.
फोटो ११
circular route bus
बसचे तिकिट ५०रु बसमध्येच रोखीने काढायचे. एकूण ४२ किमी बस फिरवतात. तीन
चार ठिकाणी पाच पाच मिनिटे थांबवितात फोटो काढण्यासाठी,पाणी ,खाणे यासाठी.
दीड ते अडीच तास लागतात. परत मूळ जागी आणल्यावर एसी बसने भारत भवनाला आलो .
फोटो १२
circular route bus मार्ग
तिथून इ रिक्षाने रेल्वे स्टेशनला पाऊणला आलो. (अकरा ते पाच एसी बस रेल्वे स्टेशनला फेरी मारत नाहीत, पुतळा ते भारत भवन जातात.)
१३:४०ला प्रतापनगर (वडोदराचे एक उपनगरी स्टेशन) जाणारी लोकल ट्रेन मिळाली
आणि साडे तीनला पोहोचलो. तिथून बडोदा स्टेशन सात किमी आहे (व्हाया
लक्ष्मीविलास पॅलेस. तो कालच पाहिला होता). रिक्षावाले १२०रु घेतात. तर अशी
थोडक्यात एकता पुतळा Statue of unity सहल आटोपली. सहल आयोजनासाठी
यूट्यूबवरच्या विडिओंचा खूप उपयोग झाला.
(( इथे पटेलांचा मोठा पुतळा उभारण्यापेक्षा त्या जागी नदीवर दोन तीरावर टॉवर उभारून त्यावर ग्लास ब्रिज लावला असता तर ते अधिक चांगले झाले असते. ते एक विशेष अराजकीय आकर्षण ठरले असते. एक छोटा पुतळा डॅम व्ह्यू पॉइंटवर आहेच. ))
इतर माहिती आणि टिप्स
Lakshmi Vilas palace, Vadodara. Photo slide show.
https://youtu.be/faAsaD2bDrg
एकता पुतळा परिसर आणि जंगल सफारी slide show.
https://youtu.be/FQWMEiQztQ0
बडोद्यामध्ये काय पाहावे
Municipality site वर attractions वर जा
काही virtual tours पाहता येतील.
तांबेकर वाडा भित्तीचित्रे - virtual tour
Maharaja Fateh Singh Museum - virtual tour
लक्ष्मी विलास पॅलेस यूट्यूब विडिओ
vmc.gov.in
सयाजी म्युझीअम आणि तांबेकर वाडा पाहा. सुंदर आहे.
------------
खादाडी बडोद्याची
खाने में क्या है?
https://youtu.be/WgHbfmHe5Nc?si=o30nZOly_UltoBWx
Times foodie
https://youtu.be/P-fYHmY3x0c?si=RT8D6wBK_lZ2iEZt
याच ठिकाणी नाही खाल्लं पण हे पदार्थ खाल्ले दुसरीकडे.
---------------------
स्टेशनजवळचा पूर्व भाग फार अस्वच्छ आहे. रिक्षावाल्यांनी थुंकून आणि गुटखा
पाकिटे टाकून वाट लावली आहे. स्टेशनही अस्वच्छ आहे. अगदी दादर टर्मिनस
सुद्धा.(बांद्रा टर्मिनस सोडून. तेही पूर्वी बकाल होते.) जेव्हा तिकिटे
काढण्यासाठी कूपन्स आणि त्याची मशिने होती तेव्हा सर्व मशिनांच्या कूपन
स्लॉट्समध्ये चुईंगगम भरलेला असे.) एकूण पश्चिम रेल्वेची सर्वच स्टेशने
घाण दिसली. पश्चिम रेल्वेच्या सर्वच रेल्वे गाड्या भंगारात टाकण्याच्या
अवस्थेत आहेत. जेव्हा प्रवासी फस्टक्लासचे तिकीट काढतो तेव्हा प्लाटफार्मवर
त्याला काहीही फर्स्ट क्लास मिळत नाही.
स्टेशन समोरचा स्थानिक बस डेपो ही एकमेव चांगली जागा आहे. चकचकीत फरशी, खुर्च्या, स्वच्छ टॉइलेट्स, सुंदर ऐसपैस चौकशी कक्ष वगैरे.
दूरच्या बसेसचा एसटी डेपोही छान आहे परंतू तो स्थानिक व्यापाऱ्यांनी गजबजून टाकला आहे. खूप आडवळणाने वाट काढत बसपर्यंत पोहोचता येतं.
जाण्याच्या अगोदर बडोदा आणि पुतळ्याचे बरेच विडिओ यूट्यूबवर पाहून घेतले. त्यामुळे सहल ठरवणं सोपं झालं.
* शनिवार रविवार फार गर्दी असते.
* सोमवारी बडोद्याचा महाल आणि एकता पुतळा परिसर बंद असतो.
*बडोद्याला जायला यायला (मुंबईहून) भरपूर गाड्या आहेत. पण एकता पुतळ्याहून
परत येण्यास एक गाडी दुपारी दोनला आणि नंतर संध्याकाळी सात किंवा रात्री
नऊला आहेत. तिकडे आकर्षणं खूप आहेत परंतू त्यासाठी एक/दोन दिवस राहायला
हवे. एक दिवसीय सहलीसाठी अगदी मोजकी ठिकाणं करायला हवीत. ती यूट्यूबवरच्या
विडिओ तून पाहून नक्की केली.
*बडोद्यातील सयाजी बाग(कामठी बाग) आणि त्यातली joy train ही लहान मुलांसाठी एकमेव आकर्षण आहे.
*एकता पुतळा परिसरात लहान मुलांसाठी activity काही नाही. जंगल सफारी प्राणी
संग्रहालय ठीक आहे. Dino trail,cactus garden, butterfly garden इथे काही
विशेष नाही. तरी थोडी गर्दी होती.
&&&&&
एकता पुतळा -जावे पोहोचावे कसे
* रेल्वेने येणाऱ्यांना 'एकता नगर' टर्मिनस (केवडिया हे जुने नाव)स्टेशन
येथे उतरावे लागते. हे परिसरातले पहिले ठिकाण आहे. इथून पुढे अडीच किमी
भारत भवन -पुतळा पार्किंग साडेसात किमी -जंगल सफारी नऊ किमी - dam view
point अशी एसी बस सर्विस फुकट नेते.वेळ सकाळी साडे सात ते रात्री आठ
पर्यंत.
*मुंबई दादर पश्चिम ते एकता नगर रोज 23:50 to 07:30 train no 12927/12928
आहे 21:15 to 05:30 आहे. इतर ठिकाणांहून गाड्या आहेत पण सोयीची वेळ नाही.
रात्रीची आकर्षणे म्हणजे light and sound show, cruise,lighting पाहून दादर
ट्रेन सहज मिळते. अहमदाबादहून जनशताब्दी रोज पावणे अकराला येते व लगेच परत
जाते. या गाडीला विस्टाडोम डबा आहे.
*एकता पुतळ्याला स्वतःच्या वाहनाने गेल्यास श्रेष्ठ भारत भवनच्या
पार्किंगला वाहनं ठेवावी लागतात. तुमच्याकडे टेंट सिटी दोन,तीन याचं बुकिंग
असेल तर ते दाखवून तिथे कार नेता येते.
*इतर ठिकाणे गाठण्यासाठी इ रिक्षा आहेत. त्यांचे भाडे किती ते sou site वर https://soutickets.in
*बडोदा, अहमदाबाद येथून मोजक्याच एसटी बसेस आहेत. ओनलाइन बुकिंग करणे. त्या बसेसचा डेपो/पार्किंग जंगल सफारी जवळ आहे.
एकता पुतळा परिसर - राहावे कुठे?
फोटो १३
एकता नगर रेल्वे Retiring रूम
स्टेशनजवळ (समोर) दोन मोठी हॉटेल्स दिसतात.
Galaxy Unity
Reva Bhavan
भारत भवनपासून दीड किमीवर
Hotel BRG Budget Stay हे फार लोकप्रिय आहे. जेवण थाळी साधी चारशे रुपये पडतात. शिवाय इ रिक्शाचा खर्च वाढतो.
याशिवाय
Tent city one
Tent City two
Tent City Narmada
इथे तंबूत राहण्याची सवय असायला हवी.भाडेही बरेच आहे.
राहाणे,जेवण आणि ई रिक्षा प्रवास खर्चिक आहे.
&&&&&&
*एकता पुतळा परिसर आकर्षणे -
खूप आहेत.
साईट soutickets.in पाहा. वेळा ,नियम,तिकिट दर दिले आहेत.
बोटींगचे तीन पर्याय दिसतील.
लहान मुलांना पाहण्यासारखे जंगल सफारी झू म्हणता येईल. तरुणांसाठी रिव्हर
राफ्टिंग आहे. वयस्करांना Ekta dinner cruise आवडेल कदाचित. गोव्यातील
क्रूजशी तुलना नको कारण नाच गाणी आणि नानवेज जेवण नाही. लाइटिंग आहे.
नौका विहार दोन आहेत. एक पुतळ्यासभोवार आणि दुसरा तलावात क्रमांक दोनमध्ये. इथे अहमदावादवरून येणारे sea plane उतरते. म्हणजे अगदी ते येणारे उडणारे पाहाणे सुद्धा मजेदार ठरेल. वेळ माहीत हवी.
पुतळ्यावर लेझर टाकून माहिती सांगणे ही कल्पना मला फारशी आवडली नाही. त्यापेक्षा भारत भवनमध्ये एखाद्या हॉलमध्ये दोन तीन भाषांत अर्ध्या तासाचे चित्रपट ठेवायला पाहिजेत.
जाताजाता
फोटो १४
राऊंड ट्रिप बसमधून दिसलेले नर्मदा परिक्रमा करणारे.
___________________
एकतानगर स्टेशनच्या रस्त्यावरची हॉटेल्स महागडी आहेत. त्या ऐवजी गरुडेश्वर गावात चांगली होम स्टे आणि घरगुती जेवणाची सोय आहे. मराठी घरे खुप आहेत. अंतराच्या दृष्टीने एकतानगर स्टेशनपासुन पुतळा डावीकडे पाचेक कि.मी. असेल तर गरुडेश्वर उजवीकडे तितकेच अंतर आहे. पण लोकल जीप्स असतात ये-जा करायला. दिवसभराची जीप ठरवली तर आसपासची ८-१० ठिकाणेही बघुन होतात (कुबेर मंदीर, अनुसुया माता,शूलपाणीश्वर वगैरे). त्यामुळे एक दिवस गरुडेश्वर आणि आसपास बघुन मुक्काम, एक दिवस पुतळा आणि एक किवा दोन दिवस बडोदा (विथ मुक्काम) असे करता येईल. टेन मात्र ही एकच सोयीची आहे दादरहुन.
तत्सम जीपवाला अथवा एखाद्या homestay चा नंबर दाखवून ठेवा इथे
m |
होम स्टे साठी हि लिंक सापडली
होम स्टे
गरुडेश्वर - आणि इतर कुबेर मंदिर वगैरे.
या नावाचे तसेच टिळकवाडा ही नावे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांच्या वर्णनात
येतात. रस्त्याकडे आहेत. गरुडेश्वराचे महत्त्व म्हणजे महाराष्ट्रातील एक
संन्यासी (अगोदर विवाहित) संत श्री टेंबे स्वामी तिकडे जाऊन राहिले. समाधी
आहे. तर या नावाची रेल्वे स्टेशने केली आहेत तिथे रेल्वे थांबत नाहीत.
एकट्या दुकट्या पर्यटकांना शेअरिंग जीप ठरवणे परवडणारे नाही. चार सहा भाविकांनी ठरवून वाहन केल्यास ती ठिकाणे सहज जमतील.
आता खरे तर राणी साहेबांसमावेत दालने पहायला मिळणार नाहीत. तरीही बडोदा शहरातील विविध भागात सयाजी राव गायकवाड यांच्या कर्तृत्वाचा ठसा पहायला मिळतो. मला एकता मूर्तीच्या रूपात वल्लभाई पटेलांना पाहायला व्हिआयपी म्हणून सपत्नीक भेट द्यायची संधी मिळाली. सूरत चा नवा किल्ला जमल्यास जरूर पहावा. शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीमुळे हा किल्ला जरा बदनाम होता. आता तो पहायला मिळणे एक पर्वणी आहे. विविध कालखंडातील घटना, आतील वातानुकूलित दिवाणखाने वापरणारे बदलले की कसे दिसत, तोफा, व इतर शस्त्र सामुग्री कशी आदर्शवत ठेवावी ते पहायला मिळाले.
जॉय ट्रेनला ओनलाइन तिकिटांची गरज नाही. खिडकीवरच तिकिट घ्या.
दर ४५ मिनिटांनी गाडी भरून सुटते. १५० लोक एका फेरीत जातात. सध्या अंधार लवकर होतो. प्राण्यांच्या पिंजऱ्यात जवळून जाताना ते दिसणार नाहीत. तीन वाजता आत जाऊन प्रथम गाडी फेरी करा. त्यानंतरच प्राणी पाहायला जा. बागेला चार गेट्स आहेत. काला घोडा चौकाकडच्या गेटने आत गेल्यास डावीकडे प्रथम तिकिट खिडकी आणि स्टेशन आहे. एक /दोन नंबरच्या गेटने गेल्यास उजवीकडे आहे.
https://ysawant.blogspot.com/2019/03/blog-post_27.html
लिटिल रण ऑफ कच्छ, आणि इको कॅम्प
आमच्या दुसऱ्या गुजरात फॅमिली ट्रिप मध्ये आम्ही पाहिलेलं लिटिल रण ऑफ कच्छ इथे शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. गोड मानून घ्यावा. खारट दिसला तरी.
दुसऱ्या गुजरात फॅमिली ट्रिप मध्ये आमचा रण ऑफ कच्छ ह्या ठिकाणी भेट द्यायचा बेत ठरला. ट्रिप च्या आधी कुठे जायचं, काय पाहायचं असं संशोधन करताना आम्हाला लिटिल रण ऑफ कच्छ हि जागा समजली. इथल्या काही भागात पक्षी निरीक्षक येतात. आम्हाला पक्षी निरीक्षणात रस नव्हता. आम्हाला इथला स्थानिक प्राणी म्हणजे रानटी गाढव पाहायचे होते. इथले सपाट वाळूचे भाग बघायचे होते. भुज आणि रण ऑफ कच्छ बघून झाल्यानंतर आमची स्वारी आली लिटिल रण ऑफ कच्छ मध्ये. किडी आणि जोगड ह्या दोन गावांच्या मधल्या भागात असलेल्या इको कॅम्प ह्या ठिकाणी.
किडी गावाच्या पुढे रस्ता अरुंद. रस्त्यात एक गायींचा खूप मोठा कळप चालला होता. शंभर एक गाई असतील. अरुंद रस्ता अख्खा गाईंनी व्यापलेला. आमची रुंद टेरॅनो त्या कळपात घालायला मन होईना. सहा दिवस गुजरातच्या सपाट रस्त्यांवर शंभरच्या वर वेगात पळणारी टेरॅनो आता गोगलगायीच्या चालीने चाललेली. असा बराच वेळ गेला. मग मागून एक स्थानिक टेम्पोवाला आला. त्याने बिनदिक्कत त्याचा टेम्पो कळपात घातला. मग त्याच्या बरोबरीने आम्ही तो कळप पार केला. With great power comes great responsibility हे मी टेरॅनो चालवताना कधीच विसरत नाही.
पुढे एका ठिकाणी रस्त्यापासून जवळ एक नीलगाय दिसली.
इको कॅम्प हि जागा तिथले पोहोचल्यावर आम्हाला तिघांना लगेच आवडली.
| इको कॅम्प |
जी रानटी गाढवं बघायला इथे आलो ती जवळपासच्या परिसरात दिसली. जितकं जवळ जाता येईल तितक्या जवळ जाऊन फोटो काढले.
| इंडियन वाइल्ड ऍस, घुडखुर |
| कळप |
| मिठाच्या राज्यात |
वैधानिक इशारा : लिटिल रण ऑफ कच्छ हे एक वाळवंट आहे. इथे दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास होण्याची शक्यता आहे. फक्त उन्हाळ्यात नाही तर इतर ऋतूतही.
खुशी माझ्याबरोबर आली मिठाचे डोंगर बघायला.
| मिठाच्या ढिगासमोर |
संध्याकाळच्या चहानंतर आमच्या जीप सफारी साठी अजय धमेचा त्यांच्या महिंद्रा थर जीप सोबत तयार होते. ह्यांना लिटिल रण ऑफ कच्छ परिसराची खडानखडा माहिती आहे. सुरुवातीला त्यांनी आम्हाला वाइल्ड ऍस बद्दल माहिती सांगितली. कळप दाखवले. नर एकेकटे किंवा छोट्या गटाने राहतात. माद्या आणि त्यांची पिल्लं कळपात राहतात. प्रत्येक मादी बरोबर एक पिल्लू होतं. जरी दिसायला गाढवासारखे असले तरी हे प्राणी वेगात पळू शकतात. जीपच्या वेगात. ह्यांच्या मागच्या पायांची लाथ अतिशय तडाखेदार असते. हे साधारण वीस ते तीस वर्ष जगतात.
वाइल्ड ऍसचे कळप वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही निघालो लिटिल रण ऑफ कच्छ मधला सूर्यास्त पाहायला. आणि सॉल्ट फार्म, म्हणजे मिठाची शेती पाहायला.
एका ठिकाणी इंडियन वाइल्ड ऍसची हाडं होती.
| इंडियन वाइल्ड ऍसच्या हाडांबरोबर फोटो |
नजर जाईल तिथपर्यंत सपाट भाग. दूर क्षितिजावर मृगजळ दिसलं. मृगजळ किंवा mirage हा नुसता शब्द जरी दिसला तरी मनात विचारांची वावटळ उठते. जे अस्तित्वात नाही ते दाखवतं ते मृगजळ. जे अस्तित्वात आहे ते न दाखवणं हे ही एक मृगजळच ना. पहिल्या प्रकारचं हे समजून येणारं, तर दुसऱ्या प्रकारचं सहजासहजी समजून न येणारं. जग किती फसवं आहे ते एका जागी बसून शांतपणे विचार करायला लागल्यावरच समजतं. introspection म्हनत्यात त्यासनी. बरं, जे दिसतं आहे ते मृगजळ आहे का नाही ते तरी कसं ओळखायचं. म्हणजे एक असा कुठला फॉर्मुला अस्तित्वात नाही जो सगळ्या ठिकाणी लागू पडेल. प्रत्येक ठिकाणच्या वेगळ्या तऱ्हा. दुनिया जितकी दिसते त्यापेक्षा लाख पटींनी complicated आहे.
| लिटिल रण ऑफ कच्छ मधे संध्याकाळची सफारी ड्रायव्हर सीट वर अजय धमेचा मागे दीप्ती आणि खुशी |
लिटिल रण ऑफ कच्छ चा भाग १९७२ साली इंडियन वाइल्ड ऍस अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. लिटिल रण ऑफ कच्छ हे एक वाळवंट आहे. पण हे आपल्याला माहित असलेल्या नेहमीच्या वाळवंटांसारखं नाहीये. कोणे एके काळी हा भाग वाळवंट नव्हता. दोन हजार वर्षांपूर्वी इथल्या काही भागात समुद्र होता. ह्या भागातून नद्या वाहात होत्या. ह्या सुपीक भागात शेती केली जात होती.
![]() |
| १७७७ सालचा ईस्ट इंडिया कंपनीचा नकाशा ... गुजरात चा भाग पहा |
![]() |
| १९०९ सालचा नकाशा स्त्रोत - विकिपीडिया |
अजय धमेचांना आम्हाला सूर्यास्त पाहण्यासाठी एका खास जागी घेऊन जायचं होतं. तिथे वेळेत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांची महिंद्रा थर जोरात पळवली. नव्याने इथे आलेल्या ड्रायव्हरने असले प्रकार करू नयेत. गाडी उलटण्याची धोका संभवतो.
| सॉल्ट फार्म, म्हणजे मिठाची शेती |
अजय धमेचा आम्हाला सूर्यास्त बघायला एका जगात भारी जागी घेऊन आले. एकदम वेळेत.
| लिटिल रण ऑफ कच्छ मधला सूर्यास्त |
![]() |
| मिठाच्या राज्यात |
| मिठाच्या राज्यातली फोटोग्राफी |
![]() |
| मिठाच्या राज्यात |




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.