Wednesday, March 20, 2024

https://bhatakajiv.blogspot.com/ ब्लॉगचा बॅक अप

 

किल्ले गाविलगड

भटका जीव

किल्ले गाविलगड

🏰 ⛳ ||१५ डिसेंबर १८०३||⛳🏰

१५ डिसेंबर रोजी #गाविलगडाचा प्रचंड असा दिल्ली दरवाजा उघडून #सरदार_बेणिसिंह स्टिव्हनसनवर तुटून पडला. सरदार बेणिसिंह उत्तरेकडे गुंतल्याचे पाहून ऑर्थर वेलेस्लीने धडक मारली. 

आणि इंग्रज सैन्य किल्ल्यात घुसले. पराक्रमाची शर्थ करून लढणाऱ्या बेणिसिंहला या लढाईत वीरगती प्राप्त झाली. मात्र उत्तरेकडून नाजूक असलेल्या गाविलगडात, बेणिसिंहला मरण येईपर्यंत स्टिव्हनसनचे सैन्य गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकले नाही.

अशाही परिस्थितीत बेणिसिंहाच्या कर्तृत्वाचा आणि स्वामीनिष्ठेचा कळस म्हणजे एवढय़ा घनघोर लढाईत गुंतला असतानाही, नागपूरकर भोसल्यांचा संपूर्ण खजिना आणि दौलत वस्तापूरमार्गे किल्ले नरनाळ्यावर पोहोचवला.

 लढाईत कसलेल्या सुमारे १६० स्वामीनिष्ठ भोयांनी हा खजिना तीन रात्रींतून नरनाळ्यावर पोहचवला. एवढे असूनही ताब्यात आल्यानंतर इंग्रजांना गाविलगडावरील तळघरातून तत्कालीन ५०० कोटींची लूट मिळाली. शिवाय सुवर्ण पत्रावर लिहलेली कुराणाची प्रतही त्यांनी ताब्यात घेतली. फितुरीचे आर्थिक बक्षिस म्हणून ही कुराणाची प्रत अचलपूरच्या नबाबाला भेट देण्यात आली!

वर्हाडच्या भूमीत धारातीर्थी पडलेल्या बेनिसिंग तथा अज्ञात विरांना विनम्र अभिवादन

🏰#गाविलगड_शौर्यदिन🏰

#गाविलगड

#वर्हाड_विदर्भ

गधेगळ

भटका जीव

गधेगळ

....गधेगळ.....

बरेचदा मंदिरे,नानाविध मुर्त्या, शिलालेख, मंदिरावरील कोरलेले शिल्पे, हे त्याकाळच्या इतिहासावरील पडदा उलगडतात. त्यातूनच  तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही समजण्यास हातभार लावतात! यापैकीच एक  ऐतिहासिक ठेवा म्हणजे  गधेगळ ही शिळा.

(शिलालेख) तत्कालीन राजाच्या कठोर आज्ञेची भीती दाखविता येईल असेच आहे!!

 श्री साकेश्वर मंदिराच्या  समोरच आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष हि गधेगळ शिळा बघितली मी!!! 

हिच्या वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. म्हणजे चंद्र-सूर्य असे पर्यंत हि आज्ञा असेल!

 मधल्या टप्प्यात एक लेख कोरलेला होता! खालच्या बाजूने गाय व नर आहे!हि झाली एक बाजू! तर तिन्ही कडून  खालच्या टप्प्यात यावर एक प्रतिमा कोरलेली आहे यात एक गाढव महिलेवर आरूढ होऊन तिच्याशी बळजबरी समागम करताना दिसतो. अशी प्रतिमा आणि लेख असल्यानेच या शिलालेखाला 'गधेगळ' हे नाव पडलं. 

म्हणजेच शिलालेखामध्ये लिहिलेली माहिती अथवा आज्ञा जे कोणी पळणार नाहीत, त्यांच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार केला जाईल, अशी ती धमकी आहे.आजच्या काळात याचे भव्य महिती फलक जरी लावले तरी काही अंशी मंदिर परिसरात दुष्कर्म, असामाजिक कृत्य, कमी होईल असे वाटते!!!

✍🏾🐅🐾⚔️🛕निखील...!

श्री अच्युतराया मंदिर हंपी

भटका जीव

🛕🛕🛕अच्युतराया मंदिर हंपी🛕🛕🛕

घर, मंदिर,लेण्या, गडकिल्ले किंवा कुठलीही वास्तू राबती असली तरच तिचं सौदर्य खुलून येते, नाही तर तीच खंडर झालंच म्हणून समजा....!!!

असंच काहीसं आहे हंपीतल श्री अच्युतराया मंदिर...!

 मातंगटेकडी व गंधमाधवन टेकडीच्या मधोमध अगदी एकांतात आहे हे मंदिर!

लांबच लांब दगडी बाजारपेठ, प्रवेशकरतांना लागणारे तीन भव्यदिव्य प्रवेशद्वार, चारही बाजूने असलेला सभामंडप,त्यात आडमाप शिल्पकलेने नटलेला दगडी शृंगार, यासर्वांच्या मागे  आपण घरात कुंड्यामध्ये शोभेची झाडे लावतो अगदी तसेच भासावी अश्याच पद्धतीने नारळाची झाडे केळीची बाग लागल्या आहेत,

हा परिसर पूर्ण दिवस दिला तरीही वेळ कमी पडावा असा आहे, भगवान विष्णूच एक रूप...तिरुवंगलनाथ ह्यांना हे मंदिर समर्पित आहे,

१५३४ मध्ये राजा अच्युतराया यांनी याचे निर्माण केलं, म्हणून त्यांचेच नाव ह्या मंदिराला व बाजारपेठेला लाभले...!

हंपी मध्ये विरुपाक्ष मंदिरा सहित अगदी बोटावर मोजता येईल ऐवढ्याच मंदिरात मूळ मूर्ती स्थानापन्न आहेत सध्या..! मूळ मूर्ती बद्दल आपण फक्त कल्पनाचित्रच रंगवू शकतो...पण ज्याअर्थी मंदिर ऐवढे देखणे असते त्यावरून तत्कालीन दगडी मूर्तीना देवत्व लाभण्यासाठी अजिबात वेळ लागला नसेल....!

म्हणूनच आम्ही आमचे पादत्राणे हंपीतील कित्येक मूर्तीहीन मंदिर जरी असले तरी सुद्धा बाहेरच काढून नतमस्तक झालो....!!!

तसं इथलं सांगण्यासारखं आडमाप आहे, पण आवडत्या राऊस्वामींचा काल्पनिक चलचित्रपट (बाजीराव मस्तानी) पुन्हा-पुन्हा पाहत असतांना निजामाच्या भेटीचा प्रसंग इथेच चित्रित करणाऱ्या दिग्दर्शकाला आज दाद द्यावीशी वाटली, 🎥📽️भाऊंन हंपीतले दगडच निजामाचे सैन्य म्हणून उभं दाखविलं😂😂😂

#हर युद्ध का नतिजा तलवारोसे नहीं होता, तलवार से ज्यादा धार चलाणेवालो के सोच में होनी चाहीये

🛕🐾🏰🌳⚔️⛳🇮🇳

✍🏾निखील....!!!

रंगपंचमी 2019

भटका जीव

⛳ श्री गुप्तेश्वर धारासुर⛳

दरवर्षी प्रमाणे यंदाही रंगपंचमीला घराच्या बाहेर असण्याचा शिरस्ता कायम राहिला, कृत्रिम रंग उधळन्यापेक्षा प्राचीन कलाकृती,मंदिरे,गडकिल्ले,वारसा  आदी बहुरंगी ठिकाणी पुर्वजानी उभारलेल्या रंगात ऐन रंगपंचमीच्या दिवशीच मिसळून जाण्यातही वैगळीच मजा असते, आमच्यासाठी आता ही परंपराच झालीय, फक्त यावेळी सातपुड्यातील डोंगररांगा व मेळघाटातील पानगळ सोडावी लागली, (सालबर्डी रद्द करणाऱ्यांनो तुम्हाला निवांत बघून घेऊ😏)

नेहमी प्रमाणेच काहींनी वेळेवर दगा दिला, तर सवयीचा भाग म्हणून निघताना झालेला उशीर यामुळे ऐनवेळी औढा नागनाथ व धारासुर हे शेजारील मराठवाड्यातील पर्याय निवडले, त्यातही धारासुर ला प्रथम प्राधान्य! दोघांचे म्हणता-म्हणता ५जण झालो आणि सदैव ऐकाच जागेवर उभी असलेली इंगोले सर यांच्या चारचाकीचेही त्या दिवसापूरते भाग्य घरून निघताना तर उजळले, परंतु मराठवाड्यात प्रवेश करताच तिच्याही चक्कीतून पीठ निघालं🤣 कारण याहीवेळी मराठवाड्यात रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यातच रस्ते आहेत, व नेहमीच राहतील बहुदा!!

असो...!

कोनेऐकेकाळची प्रभावती नगरी ही आजची परभणी! आणि या परभणी पासून कुठल्याही मार्गाने २०-३० किमी गेलं की होयसळ-चालुक्य-राष्ट्रकूट-यादव आदी राजवटीच्या समृद्धीच्या पाऊलखुणा दिसतात म्हणजे दिसतातच, त्यातीलच गंगाखेड तालुक्यातील धारासुर हे एक होय! 

मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे,

 मराठवाड्यात ज्या गावात पाणी आहे, ते गाव-खेडे, वाडी-वस्ती काहीही असो, श्रीमंत समजल्या जाते, या हिशेबाने हे धारासुर गाव गर्भश्रीमंत आहे! कारण इथे गंगाच अवतरली आहे(गोदावरी ला इकडे बरयाच ठिकाणी गंगाही म्हणतात) आणि विशेष म्हणजे या गावात ही गोदावरी दक्षिणवाहिनी होते! हिच्याच पात्रात धारेच्या मधोमध शिवपिंडी आहे, जी आजघडीला पाण्यात आहे, तिच्यामुळे गावाला धारासुर असे नाव पडले अस गावकर्याच म्हणन आहे,हे 

गावही आपल्याला अठराव्या शतकात घेऊन जाते कारण बऱ्यापैकी दगडी बांधकामाचे घरे व चिरेबंदी वाडे इथे मुबलक आहेत, आम्ही गावात प्रवेश करताच बालासाहेब नेमाणे नावाचे सद्गृहस्थ भेटले, ते माजी प.स. सदस्य होते हे त्यांनी अगदी सरतेशेवटी सांगितले, यावरूनच त्यांचे आदरतिथ्य कायम लक्षात राहील, त्यांनी आम्हाला मंदिराजवळ सोडले चहा-पाणी विचारून तेथिलच बुजुर्ग लोकांत मिसळले,अगदी प्रारंभीच मंदिर बघून स्तिमित झालो आम्ही सर्व!

 मंदिर जमिनीपासून १० फूट उंच दगडी चौथऱ्यावर आहे स्थापित आहे, जवळ गेल्यावर थोडीशी निराशा ही झाली कारण मंदिराची ऐक बाजू पूर्णतः ढासळली आहे, त्याचा प्रचंड ढिगारा झाला आहे! मंदिराला पूर्वी ३ बाजूने अर्धमंडपातून प्रवेशाची सोय होती, त्यापैकी ही बाजू पूर्णपणे ढासळली आहे, तर दुसऱ्या बाजूच्या पायऱ्या ह्या जाग्यावरच निखळल्या आहेत, तीही ढासळण्याच्या मार्गावर आहे, आम्ही बाह्यांगाने मंदिर पाहणे सुरू केले ढिगाऱ्यापासून..!

 या ढिगाऱ्यामध्येही अनेक शिल्पे दबलेली असावीत, १० फुटाच्या चौथऱ्यावर हत्ती, अश्व, व्याल आदींचे थर होते, यातील गुळगुळीत हत्ती लक्ष वेधून घेतात,डौलात चालणारे, झुंजीच्या तयारीत, काही व्यालाच्या भीतीने भयग्रस्त,काही लगबगीने चालताना काही हळूच मागे वळून पाहताना असल्या विविध रुपात हे मदमस्त हत्ती कोरलेले आहेत, ऐके ठिकाणी तर दोन गजराज आपल्या गणपती बाप्पाच्या भोवती ऐटीत उभे आहेत!!☺️

पण यांचे आजचे दुर्भाग्य थोडे मोठे आहे,कारण काही ठिकाणी झाडे उगविली आहेत, काही मातीने माखल्या गेलीत, हे कमी की काय शेजाऱ्यांनी त्यावर गोवऱ्या ही थापल्या आहेत यावर🙈🤦🏽‍♂️!

त्याच शेजाऱ्यांकडून झाडू+तुराट्या घेऊन थोडी बहुत स्वच्छता केली, हे झाल्यावर उजव्या बाजूने ७ पायऱ्या चढून आम्ही चौथर्यावर गेलो पायर्यांच्या दोन्ही बाजूने दोन

देवकोष्टक आहेत पण त्यात काहीच नाही,सभा मंडपात न जाता पुन्हा बाह्यांगानेच बघणे सुरू केले, अगदी सुरवातीला लागली ती प्राचीनकाळातील सुशिक्षित स्त्री-चा पुरावा म्हणजे "पत्रलेखिका✍🏾"  हिच्यावरची धूळ काढून हिचे फोटो घेतले फोटो काहिकेल्या व्यवस्थित मिळत नव्हते, मग पुन्हा झाडू घेऊन सर्वच शिल्पे स्वच्छ केली आणि मग नंतर पुन्हा फोटोचा प्रयत्न केला, आणि का बरं करू नये या मंदिराच्या सर्वाधिक देखण्या वास्तू आहेत त्या सुरसुंदर्या म्हणजेच अप्सरा👸🏽💃🏾!

प्रत्येकीच वेगवेगळ मोहक रूप, प्रत्येकीच वेगवेगळ प्रयोजन, खर म्हणजे आपल्या दिलखेचक अदांनी/गुणांनी मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या वासना, मोह,माया,विकार या सर्वांपासून परावृत्त करावे हा मुख्य हेतूने मंदिराच्या बाह्यांगावर ह्यांना स्थापित केल्या जाते! पण धारसुरला थोडं उलट झालंय, येथील अनामिक शिल्पकाराने जीव ओतलाय या सर्व अप्सरे मध्ये! आमच्या सारखे दगडी मने ही इथे प्रेमाने भिजून चिंब झालेत इथे💗😜!!!

 (In short dekha tujhe to yaar Dil me baji gitar🥰) यातील पत्रलेखिका, मदन,मदनिका, दर्पणा, मर्दला, विणावादक, विषकन्या,पुत्रवल्लभा,आलसकन्या, तोरणा,शत्रुमर्दिनी,नर्तकी,चामरा,

शुभंगामीनी,शुकसारिका, साप व विंचू,   खेळविणारी,स्त्री व माकड, वाद्यमग्न यौवणा आदी ज्ञात-अज्ञात शिल्पे सर्वच देखणे आहेत, ज्यांची सविस्तर माहिती नंतर कधीतरी....!!!

बाह्य भागाने संपूर्ण नेत्रसुख उपभोगल्यानंतर मंदिरात प्रवेश केला, चौकोनी रंगशीळा व त्यावर बेरंगी फरश्या बघून बासुंदी मध्ये मिठाचा खडा लागावा अस वाटले,सुमारे ८ नक्षीयुक्त स्तंभावर सभामंडपाचा भार तोललेला आहे, स्तंभावरील किर्तीमुख आकर्षक आहेत, अजून भन्नाट बाब म्हणजे सभामंडपाला दोन्ही बाजूने अतिशय कोरीव गवाक्ष/ खिडक्या आहेत, अखंड दगडाचा असा वापर कल्पनेच्या बाहेर आहे, गाभार्याच्या थोडस बाहेर पितळेचा नंदी बसवलेला आहे, तसेच दोन्ही बाजूने मंदिराचे छत/शिखर हे नक्षीदार विटांनी बनविले आहे, जे फारशे कुठेही आढळत नाही,शिखराची एक बाजू ढासळली आहे, मुख्य गाभार्याच्या द्वारपट्टीवर ही अप्रतिम नक्षीकाम आहे,आणि समस्त मंदिराचे महत भाग्य म्हणजे कुठेही ऑईलपेंट चा मारा अजून तरी झाला नाही, गाभाऱ्यात भरगच्च अंधारात श्री गुप्तेश्वराची पिंड आहे मंदिराची एकंदरीत रचना बघता ही शिवपिंडी आधुनिक वाटते, गावकर्याच्याच म्हणण्यानुसार जवळच असलेल्या केशवराज मंदिरातील मूर्ती ही येथे असावी!!! असे त्यांचे म्हणणे होते, लागलीच गुप्तेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही केशवराज मंदिराकडे गेलो, इथेही अंधारच होता, सहा अवाढव्य स्तंभावर सभामंडप व त्यामध्ये छोटेसे गर्भगृह अस स्वरूप केशवराज मंदिराच होत, पण अंधाऱ्यारात्री नंतर दुसऱ्या दिवशी तेजोमयी सूर्यप्रकाशात स्वयं तेजस्वी वाटावी अशी अत्यंत सुंदर विष्णू मूर्ती इथे होती,

अर्ध मळालेला पितांबर, खांद्यावर पांढरा रुमाल, गळ्यात एक तुळशीच्या मंजुळाची व दुसरी कापसाची अश्या २ माळा ऐवढाच या "लक्ष्मी" पतीचा पेहराव होता, पण नखापासून ते शिखापर्यंत निव्वळ दगडी नक्षीकामाने  केशवराज सजलेले होते, मला कधी-कधी वाटते की "देवाचेही" भाग्य असावं लागतं...••• नशीब, प्रारब्ध,भोग त्याच्या ही वाटेला असतेच! आता बघा  ना सेम टू सेम अशीच मूर्ती औढा-नागनाथ येथे काचेच्या पेटी मध्ये संरक्षित आहे, त्याला फुलांचे हार मावता मावत नाही,पुजा-पाती अखंडपणे चालूच असते, साधा फोटोही घेऊ देत नाहीत तिथे!! 

आणि इकडे धारासुरला बिचारे हे केशवराज निव्वळ एकांतातच...!! साधा उजेडही त्यांच्या नशिबी नाही काय म्हणावे याला???🤷🏽‍♂️टिम्ब... टिम्ब...!!!

पण केशवराज मात्र खूपच आकर्षित करत होते आणि म्हणू औढा नाहीतर इथे च आडमाप फोटो काढले, जवळच महिषासुरमर्दिनीचे प्राचीन शिल्प ही  अंधारातच होते, या सर्वांचे दर्शन घेऊन श्री केशवराज श्री गुप्तेश्वर यांना त्याचेच मंदिराचे गतवैभव पुन्हा लवकरात लवकर येऊ द्या🙏🏽🙏🏽⛳ हेच मनोभावे साकडं घातलं!!!

आणि शिमग्याचे औचित्याने इथे काहीच अस्तित्व नसलेल्या पुरातत्व विभागाच्या नावाने बोंबललो सुद्धा आम्ही🙈🙉🙊!!!

हळहळ...उद्दिग्नता घेऊन मुदगल, पोखरनी, औढया च्या मार्गी लागलो..!

मराठवाड्यातील मंदिरे...!!!

सहकारी मंडळी:- श्री मारोती इंगोले, धनंजय अडपल्लूवार, प्रशांत घुगे, अमित ढोले,

✍🏾स्वानुभव:-निखील माळी-गोरे

वत्सगुल्म-विदर्भ!!

नवरात्रोत्सव....!!!

भटका जीव

⛳⛳ नवरात्रोत्सव⛳⛳

नवरात्र हा सण देवी दुर्गेचा!! महिषासूर नावाच्या म्हशीच्या तोंडासारख्या  राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. 

आख्यायिकानुसार

राक्षसांच्या वाढत्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी समस्त देवतांनी दुर्गेची निर्मिती केली. ह्या आगाऊ

महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली.  इथेच फसला तो.... हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला! 

 तेव्हापासूनच 

उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेंपर्यँत देवी सामर्थ्य व शौर्याचप्रतीकच  झालेली दिसते!

महिषातकरी येन पूजिता स जगतप्रभूं.... अर्थात ज्याने महिषासुरमर्दिनी ला पूजिले तो जगाचा स्वामी होतो...! हे ही रूढ झाले असेल... बऱ्याचदा पूजेअंती/ युद्धविजयप्राप्ती करिता तत्कालीन वीरराजे महाराजे महिषासुरमर्दिनीला म्हशीं/रेड्याचाच बळीसुद्धा देत!!!

 याचे काल्पनिक का असेना पण उदाहरण म्हणून अगदी अलीकडील बिग बजेट असलेल्या बाहुबली चित्रपटाचे देता येईल😎 यात भल्लाळदेव युद्धाच्याप्रारंभी एक घाव दोन तुकडे करत महाकाय रेड्याचा कार्यक्रम करतो....

तर त्यांचाच भाऊ बाहुबली आधुनिकप्रगल्भते चा दाखला देतांना प्राणिप्रेम व्यक्त करत अवघ five ml blood sample देत रेड्याला जीवदान देतो!🤣🤣😂😂(हे पाहून त काही जणांनी बाहुबली ला देशद्रोही, सेक्युलर,पुरोगामी ही ठरविले असेल🙉🙊🙈) 

असो...

थोडक्यात सांगायचे झालं तर राज्य,राजवट कुठलीही असो...

चौल-चालुक्य असो की होयसळ...

चंदेल असो की परमार...

राष्ट्रकूट असो की यादव....

देवीचं महिषासुरमर्दिनी स्वरूप हे प्रचंड लोकप्रिय होतं...

म्हणूनच आजही त्या त्या राजवटीच्या अस्तित्वातच्या ठिकाणी महिषासुरमर्दिनी च देखणं रूप शिल्प/मूर्ती रुपात आपल्याला दर्शन देते म्हणजे देतेच! आपल्या देशातलं कुठलंही म्युझियम महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती शिवाय अपूर्णच म्हणावं लागेल! तर काही ठिकाणी पूर्णपणे झीज झालेल्या मूर्ती ही दिसतील, बरं ह्या ओळखन ही अगदी सोपं आहे ४ ते १० हात, प्रत्येक हातात काहींना काही शस्त्र आहेच,

पायथ्याशी चिरफाड झालेला महिषासुर त्याच्या बाजूला दुर्गेच वाहन आक्राळ विक्राळ सिंह.... बस ऐवढंच,.... 

शेवटी जाता-जाता...बरं त्या सर्वच हातात शस्त्रच आहे...ऐकाही हातात ती दांडिया ची टिपरी नाहीये त्यामुळे ते हल्ली आडमाप मेकअप करून दांडियाचा धांगडधिंगा कुठून आला माहिती नाही!!

🤦🏽‍♂️🙈🙊🙉

नवरात्रोत्सवाच्या मनस्वी शुभेच्छा....

⛳🛕🐾🐅🌳✍🏾निखील...

......नंदी......

भटका जीव

🐂🐂🐂 ...नंदी....🐂🐂🐂

महादेवाच मंदिर आहे अन नंदी दिसणार नाही असं शक्यतो कुठेच होत नाही!!!

जिथे जिथे महादेव आहे तिथे हा नंदीभाऊ शांतपणे आपल्या मालकाकडे तोंड करुन बसलेला असतोच...! समर्पणाचे प्रतीक म्हणून नंदी कडे बघितले जाते...!

नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा होता. नंदीने महादेवाची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. महादेवानी त्याला आपले वाहन आणि  आपल्या गणांचे नायकही बनविले.  नंदी हा महादेवाचा निस्सीम भक्त ही आहे.. तो  सर्व काम करणारा सेवकही आहे..

विष्णूच्या बाबतीत गरुडाचे किंवा गणपतीच्या बाबतीत उंदराचे स्थान इतके महत्वाचे नाही पण, महादेवाच्या नंदीचे स्थान अधिक महत्वाचे आहे म्हणूनच की काय शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे महादेवाचे नाव सांगितले आहे.. नंदीची, नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशी अनेक नावे आहेत.

 काही ठिकाणी विष्णूपुत्राचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाच रुप धारण केले आणि त्याचेच पुढे नंदी नाव रुढ झाले. त्यामुळे सहाजिकच महादेवाच्या आधी नंदीचे दर्शन, पूजन करन्याची प्रथा पडली असावी, म्हणूनच

काही ठिकाणी  नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाच दर्शन घेण्याची पध्दत आहे.. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या गाभार्‍यात शिरण्या आगोदर नंदी स्थापन केलेला असतो.  

काही मंदिरात सभामंडपाच्या अगोदर नंदीसाठी स्वतंत्र मंडप बनविलेले असतात. त्यालाच नंदीमंडप असेही म्हणतात. खूप ठिकाणी नंदीची मुर्ती पूर्णाकार स्वरुपाची असते, त्याची शिंगे आखूड टोकदार, खांदा आकारान मोठा असून पुढचा पाय जरी पायाखाली मुडपलेला असला तरी क्वचित पुढे टाकलेले असतो. त्यामुळे हा नंदीबॉ कधीही उठून उभा राहील असे वाटते.  

त्याची मान जरी एका बाजूला झुकलेली असली तरी दृष्टी मात्र गाभार्‍यातील पिंडीकडे लावलेली असते.गळ्यात किंवा पाठीवर,पायात घुंगराच्या... घंटांच्या माळा, घुंगराच पैंजण अशा अनेक अलंकारांनी नंदिमुर्ती नटवलेली असते. या सार्‍या सोबतच अलंकारापेक्षाही बघणार्‍यावर छाप पडते ती त्याच्या बलदंड भरदार शरीरयष्टीची! एकदम भारीच😍! असा हा महादेवाचा नम्र सेवक नंदी....!!!! पूजाअर्चा करतांना त्याचाही यथोचित मान ठेवायला हवा...!

✍🏾निखील..🛕🐾🐅🏔️🏰⛳⚔️

किर्तीमुख.....

भटका जीव

🦑🦑🦑 किर्तीमुख🦑🦑🦑

आपले मंदिरे नुसती बांधायची म्हणून अजिबात बांधलेली नाहीत, मंदिर कुठलंही बघा त्यामागे मंदिराची रचना, स्थान, भौगोलिक स्थिती या सर्वांचा जबरदस्त मेळ घालुनच ते बनविलेले असते, त्यावर असलेल्या प्रत्येक शिल्पाकृतीचाही काहींना काही अर्थही  नक्कीच असतो... पण माहिती अभावी आज मात्र कशाचा कशालाच ताळमेळ नसतो... आणि म्हणून अनावधानाने त्या-त्या शिल्पाचे, मूर्तीचे नुकसान ही होत असते,आता हेच बघा ना

तुम्ही मंदीरात गेल्यावर मंदिरांच्या प्रवेशव्दारापाशी एक राक्षसाच्या तोंडासारख एक शिल्प कोरलेले असंत. 

या शिल्पाला “किर्तीमुख” अस म्हणतात. हे किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दारापाशी ठेवण्या मागच्या दोन प्रचलित पौराणिक कथा आहे.त्यातील पहिली.....

जालंधर नावाचा एक राक्षस होता. तो महादेवाचा मोठा भक्त होता त्याला प्रचंड भुक लागायची. कितीही खाल्ले तरी त्याची भुक कधी संपायची नाही. अश्याही स्थितीत त्याने घोर तपश्चर्या केली. 

 महादेव प्रसन्न झाले....

 बोलले....काय पाहिजे...???

  जालंधर न मागून-मागून मागितल तरी काय, त भूक लागली खायला द्या😂😂

  महादेवाने त्याला स्वत:च शरीर  खायला सांगितले,त्याने पायापासून खायला सुरवात केली उरलं फक्त तोंड आणि डोकं...तरीही त्याची भूक संपली नाही....! देवा अजून भूक लागली...म्हटल्यावर भोळ्याशंकराने मस्तपैकी स्माईल देऊन त्याला जालीम उपाय सांगितला...की जिथं जिथं मी असेल... तिथं तिथं माझ्या दारात येऊन बस आणि येणार्‍या  सर्वांची पाप खाऊन टाक...!!!

न संपणारा भंडारा आहे तो...

 कितीही खाय...तुला ती कधी कमी पडणार नाही.🤣🤣

आणि म्हणून या किर्तीमुखाच शिल्प मंदिरा च्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली !!

कथा दुसरी.....

        एकदा पार्वतीच्या सौंदर्याची महती ऐकून महा शक्तिशाली जलंधर राक्षसाने पार्वतीस लग्नाची मागणी घालण्यास राहू ला आपला दूत म्हणून पाठवले. राहू कैलासावर गेला, आणि त्याने जलंधरासाठी पार्वती ला मागणी घातली. हे  ऐकून संतापलेल्या महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून एक भीषण आक्राळविक्राळ प्राणी तयार झाला, आणि तो राहूवर धावून गेला. त्या प्राण्यांचे महाभयंकर रूप पाहून राहूची चिक्कार फाटली...! मग करेल तरी काय... त्याने महादेवाच्या पायावर डोकं ठेवल...! त्यामुळे महादेवाने राहूला माफ केले. राहू तिथून निघून गेल्यावर महादेव परत ध्यानस्थ झाले.

पण बाहेर आलेल्या प्राण्यांची भूक वाढत होती. त्याने महादेवाला विचारले, मी खाऊ तरी काय? महादेवांनी सांगितले, की खा स्वतःलाच.... देवाधिदेव महादेवाची चा हुकूम सर आखोंपर मानून ह्या प्राण्यांने स्वतः ला पायापासून खायला सुरवात केली आणि खात खात त्याचे फक्त डोकेच उरले. तरीही त्याची भूक भागली नाही. महादेवाचे ध्यान संपल्यानंतर त्यांना दिसले ते फक्त त्याचे डोके!!🦑 पहिला प्रश्न देवा भूक लागली😂😂

 या खाऊगिरी वर महादेव जाम खुश झाले. त्यांनी त्या डोक्याला नाव दिले कीर्तिमुख  आणि काम ही दिलं.... तेच पाप खायचं✨

ह्या जगात कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे मनुष्याचे पाप,अमर्याद अशी भूक लागलेल्या किर्तीमुखाला देवाने काम दिले भक्तांची पापं खाण्याचे.!!!

ऐकंदरीत दोन्ही कथा मिळत्या-जुळत्या...!!!

व आशय ही सारखाच....

फक्त महादेवच नाही... तर  मंदिर  कुठलही असो आता हा दिसतो म्हणजे दिसतोच!!!

जागा मात्र कधी-कधी बदलत असतो...कधी मंदिराच्या शिखरावर...कधी मूर्ती मागच्या प्रभावळीवर....कधी प्रवेशद्वारच्या वर....

 जागा कुठंही असो पण काम आपलं तेच पापखायच...

असा हा कीर्तिमुख🦑✨

हल्लीच्या काळात यांच्यावरही बेरोजगारी च संकट आलं आहे....

कारण आपले येडे अंधभक्त🤦🏽‍♂️.....!!!याच्यावर पाय ठेवून मंदिरात जाण्याऐवजी यालाच ऑइल पेंट मारत आहे...कुणी पेढा खाऊ घालत आहेत...कुणी हळदी-कुंकू खाऊ घालत आहेत... तर कुणी याच्यावर बेलफुल टाकून बुजवून टाकत आहेत ह्याला....!!!🙈🙉🙊

 हे टाळायला पाहिजे🙏🏽🙏🏽

कदाचित याचमुळे  तो सध्या जरा नाराज दिसतो...🙃🙏🏽

वरच सर्व दोन-तीन वेळा वाचलं की तुम्ही कुठल्याही प्राचीन मंदिरात जा... तुम्हांला  किर्तीमुख दिसलाच म्हणून समजा...😊

(📸फोटू:-हिंडून फिरून मीच काढलेले आहेत)

✍🏾निखील ⚔️🐾⛳🌳🐯🛕🏰

बऱ्हाणपूर-असिरगड-जिल्पी आमनेर मोहीम भाग १

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥

 भाग १

मिर्झा राजे जयसिंग यांची छत्री

🎠🎠

इतिहासाच्या चष्म्यातून मिर्झा राजे👀

ओळखले का या मानसाला??? कसे ओळखनार? आज आपण सर्व जाती-पातितच इतिहास शोधत असतो! ह्या हिशोबाने हा राजा तर त्रयस्थच!  त्यामुळे बऱ्याचस्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात! आणि म्हणूनच असे नाव सहसा पचनीच पडत नाही, हा तोच राजा आहे, जिथे शिवरायाची गनिमी काव्याची तलवार म्यान झाली होती! हा तोच राजा आहे ज्याने शिवरायान वर जय मिळावा म्हणून यज्ञ केला होता, हा तोच राजा आहे ज्याने शस्त्र व शास्त्र यांचे व्यवस्थित राजकारण करून शिवरायान्च्या जिवनाची हमी घेऊन आग्र्याला जान्यास भाग पाडले!तोच हा रजपुत राजा!⚔

 खरे तर दक्षिणेत अनेक सरदाराना निसर्गाचा यथेच्य आनंद उपभोग घेऊ देउन शिवऱायाने आपल्या चिवट तलवारिचे पाणी पाजले होते! 

म्हणूनच कदाचित औरंगबुढ्या ने पराक्रमी मिर्झा राजेला दक्षिणेस पाठविले होते! ( याही वेळीबुढ्याने लै टेनशन घेतले होते बर का! कि दोन हिंदु (काफर)एकत्र झाले तर……!!!)

पन खाल्लेल्या मीठाला हिंदु-रजपुत सहसा गद्दारी करत नसतात हे हि औरग बुढ्याला माहिती होते! 

आणि झालेही तसेच बुढ्याचा विश्वास सार्थकी लावून शिवरायांना

 तलवार न चालविता, सह्याद्रीच्या वाघाला जेरबंद करन्यात मिर्झा राजे यशस्वी झालेत!!!!

(येथे बुढा काय खुश झाला असेल!!)

ज्या अर्थी शिवरायाना कैद केले त्या अर्थि

 जयसिंग राजे!!  मुत्सद्दी,पराक्रमी,योद्धा होते हे वेगळे सांगायची गरज नसावी!!! ⚔⚔⚔

जयसिंग राजे

  वयाच्या १० व्याच  वर्षी अंबर चे राजे झाले होते, बरेच पराक्रम यांच्या नावी होतेच! यातील काबुल-कंधार वर विजयश्री मिळविल्या बद्दल शहाजहान ने

 मिर्झा राजे हा किताब दिला होता! (याविषयी नंतर बघुयात)

आग्र्याला शिवऱाय  नजरकैदी झाले, येथे शिवरायानी, बुढ्याच्या हातावर तुर्या दिल्यात! 

अन झाले मग,इथेच माशी शिंकली येथे शिवरायांना जामीन मिर्झाराजा चा मुलगा रामसिंह होता त्यामुळे बुढ्याचा संशय  बळावला.

सत्तेसाठी स्वतःच्या भावासकट सव्वाशे नातेवाईकांना मारणाऱ्या औरंगबुढ्याने शेवटी या आपल्या निष्ठावंत सरसेनापती मिर्झा राजे जयसिंगचा २८ ऑगस्ट १६६७ ला बुऱ्हानपूर येथे कार्यक्रम (कत्ल) केला.!!! आणि वरुन त्याच्याच स्मरणार्थ हि "छत्री " बांधली.

(मिर्झाराजा च्या मृत्युसह स्वराज्याचा सर्वात मोठा धोका दूर झाला.हेहि महत्वाचे आहे बर का!)

उभ्या आयुष्याची छत्री करून ज्या मोगली सल्तनत वर धरली त्या मिर्झा राजेच्या तश्या संभाजीनगर,बाळापूर, येथेही छत्री आहे!

पन बऱ्हाणपूर येथील छत्री ( हि समाधी)विकेट पडल्यानंतर चि आहे!

आता छत्री विषयी☔:- बऱ्हाणपूर च्या थोड अलीकडेच रोडच्या डाव्या बाजूने  रस्ता शोधत-शोधत गेल कि पहिले डंपिंग मैदाना वरिल खुप मोठा कचरा आपले स्वागत करते! तुम्ही जातीवंत भटके अससाल तर कचर्याचे फारसे वाईट वाटत नाही, कारण अश्या कचर्याच्या ठिकाणीच  ऐतिहासिक स्थळ असते!

अगोदर लागते ते संगमेश्वराचे मंदिर, याच मंदिराच्या रोड ने बाहेर आले कि उजव्या हाताने सरळ केळीच्या शेतातुन गेले कि मोहना व तापी नदिच्या संगमा वर, निरव शांततेत,ताराच्या कुंपनात मिर्झा राजेची कबर+समाधी+छत्री दिसते!  जमिनीपासून १० फुट उंच चबुतऱ्या वर बांधलेली हि छत्री मुघल व राजस्थानी संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना आहे! 

पूर्णपने ३२ खांबावर, बरोबर मधात एक मोठा घुमट आहे! प्रत्येक खांबावर फुल वेली आहेत! मोठ्या घुमटाच्या आजूबाजूला ८ छोटे घुमट आहेत! छत्रीच्या छ्ताचे रक्षण होण्या हेतुने चारहि बाजुने दगडाचेच कवच वजा सज्जे बनविले आहे! हि छत्री दुरुन आकर्षीत करते! आणि हिचे खांब मोजताना आचर्यचकित करतात! ५-६,५-६ चा मस्त खेळ रंगून जातो! 

कुठूनही बघा सर्व सार्खेच आहे! तिळभर हि कमि जास्त नाही! चारहि कोपऱ्यातुन फोटो घेतला तर बऱ्यापैकी सारखाच येतो! खरे तर ऐवढ्या पराक्रमी,मुत्सद्दी,धाडसी राजाच्या समाधीवर नतमस्तक व्हाव अस मनात बऱ्याच वेळा आल होत! 

पन मि मुळातच रग्गेल!!! 

जाता-जाता सहजच त्या सुंदर दगडी वास्तूला बघून बोल्लो!!! 

ये बात मुझे अब तक समझ मे नहीं आई मिर्झा राजाजी!!!???

आप यहाँ सुकून मे हो  या बेचैनी मे हो……!!???

क्रमश:

✍🏽 निखील माळी-गोरे!!

बऱ्हाणपूर-असिरगड-जिल्पी आमनेर मोहीम भाग २

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 भाग २

आहुखाना🤰🏽 💃🏻मुमताज ची पहिली कबर!!!

 बऱ्हाणपूर फिरताना येथील मानसे खुपच सरळ भेटले, त्यांना काहीही विचारले तर त्यांचे ठरलेले उत्तर सिध्दे चले जाना...!!!!

या सिधे चले जाना च्या नादात कधी आमच्या पिटुकल्या गाडी चा पाश्वभाग शेकल्या जायचा,कधी गाडी उसाच्या शेतात,कधी किल्याच्या मागे,तर कधि नदीच्या पात्रात!!!!!😆

ऐवढी साधी सरळ मानस पुण्या नंतर थेट बऱ्हाणपूरलाच भेटले!

 मुघलांना बगिचे,बायका & इमारती बनविन्याची लैच हौस!!!

आहुखाना येथे वरिल तिन्हीचा एकत्रित संगम!  हा तसे पहायला गेले तर एकप्रकारे शिकारखानाच आहे हा, तत्कालीन शिकारी साठी निघालेल्याना आराम करण्यासाठी बनविलेला बगीच्या+महल!!!!

इतिहासाच्या चष्म्यातून👀👀

अकबरने पुत्र दानिअल (आप्ल्या सोयीसाठी डॅनि म्हनुयात) ला बऱ्हाणपूरची सुभेदारी दिलि होती, याच डॅनिमुळे आहुखानाचे आजचे रुप आहे!  डॅनीला शिकार & दारु चे चिक्कार वेसन होते,याचिच फलशृती His become Permnant BEWADA🍺🍾🍷 डॅनिची दारु सुटावी म्हणून अकबर ने लै काही-काही केले, पन काहीच उपयोग नव्हता या बाबतीत तर आजच्या काळातही तोड नाही राव!😞

महालात दारूबंदी झाली, हा डॅनि नारळात दारु बोलवु लागला, सऱ्वांचे ओव्हर झाल्यावर याच्या चेल्यानी शेवटचा PoWArPLAY घेतला बंदुकीच्या नळी मधे व बारुदानी(तोफेची बारूद ठेवन्याचे भांडे) याच्यात दारू आनने सुरु केले! झाले मग काय डॅनि चा विषयुक्त दारुने कार्यक्रम होण्यास सुरुवात झाली होती! अखेर डॅनीची वयाच्या २३व्या वर्षी विकेट पडली!!!!

त्यानंतर आला जहाँगीर याने मस्तपैकी इराण-इराक वरुन विविध झाडे आनुन झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला😆(तेव्हा जर📸फोन असता सेल्फी काढुण fb वर पन टाकला असता त्याने🌳🌳🤓🤓)

नंतर आला शाहजहान!!! 

सासूरवाडीवर प्रेम करा मग बायको तुमच्या वर प्रेम करते😘 या उक्तीप्रमाणे याने आहुखाना ची जडनघडन केलिय! तब्बल २०किमि दुरुन असलेल्या उतावळी नदीतुन पानी आनुन कारंजे,छोटा तलाव,बारादरी महल अस खुप काही बनवल! 

फक्त मुमताज साठी🤦🏻‍♂

& हि मुमताज

 भेटली कुठे माहिती आहे…???

बऱ्हाणपूर येथील मीनाबाजारातून एकदा शहाजहान  फेरफटका मारत होता. तेव्हा त्याचे लक्ष बाजारात रेशीम आणि माणकं विकायला बसलेल्या सुंदर तरुणीकडे.....💃🏻 गेलं. तिच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या बादशहाने तिची आपली तिसरी पत्नी पट्टराणी म्हणून घोषित केले!. तिच ति शहाजहांची बे…गम सौंदर्यसम्राज्ञी मुमताज (मूळ नाव : अर्जुमंद बानू)  हिच्या वर शाहजहान चे खुप प्रेम होते,

ऐवढे की तो हिच्या साठी काहीही करत होता! या काहीही करन्याच्या नादात वयाच्या ३८व्या वर्षीच चौदाव्या बाळंतपणात तिचा बुरहाणपूरला माहेरीच मृत्यू झाला! मग काय तिकडे ताजमहल अजून तयार व्हायचा होता! हि १४ रन वर रनआउट होउन पन *Woman of the shahjaha Match*घोषित होतीच!  

हिच्या BODY ला विविध मसाले, कापड, लावून ⚰ हिला ममी👻 बनवुन!

 🤦🏼‍♀ पहिले सहा महिने तिचं याच आहुखानाच्या परिसरात दफन केलं गेलं होतं. नंतर ताज पूर्ण झाल्यावर हिला सोन्याच्या पेटीत आग्र्याला नेन्यात आल!!!!

पुढे आपला प्रिय हरामखोर माणूस औरंगबुढा(इथे तो तरुण होता म्हणून त्याला आपण रंगा म्हनु!) याचीही अधुरी प्रेम कहाणी याच परिसरात झाली राव!😇आहुखाना ज्या जैनाबाद परिसरात आहे, तिथे रंग्याची मावशी रहायची, तिला तो एकदा भेटायला आला! इकडे त्याला 💎हिराबाई भेटली!!!  & झाल रंग्यासारख्या शिकारी मानसाची शिकार इकडेच झाली! रंग्या जन्मत: ढाल तलवार व कट्टरता वाद घेऊन आला होता! याचे हे प्रकरन तत्कालीन मौला-मौलवी ना अजिबात पटनारे नव्हते! रंगा पूर्णपणे निर्व्यसनी होता! त्याला व्यसनाचा माझ्यापेक्षाही १०० पटिने जास्त राग यायचा, असे असताना प्रेमाची लिटमस टेस्ट म्हणून हिराबाई ने चक्क दारूचा प्याला रंग्याच्या हातात दिला🍷त्याने हि तो घेतला! आणि पिनार तोच हिराबाई ने प्याला वापस घेतला! हिराबाई आता जैनाबादी बेगम झाली होती! रंग्या तिच्यावर जिवापाड प्रेम करु लागला

पन बे……गम झाल्या वरही तिचि पुजा-अर्चा काहिच्या नजरेत सलत होती! मग काय मुघली परंपरे नुसार हिचा हि विष देउन कार्यक्रम करन्यात आला!!!! रंग्या खुप दुखी झाला! अजूनच कट्टर झाला!!! विस्तोच🔥🔥 ना राव!!! त्याने तिची कबर ऑरंगाबाद येथे कोनत्यातरि सरोवरावर बनविली! 

आता बघुयात सध्याचा ऐतिहासिक आहुखाना……!!!!🤓

खुप कमी लोकांना माहिती आहे की *ताजमहल*हा बऱ्हाणपूर ला बनवायचा होता! तसे त्या सबंधित २२ एकर जमिन जि राखीव ठेवली होति ति म्हंजे आहुखाना! आजही ति तशीच सुरक्षित आहे, पन येथील जमीन,माती,थोडी दुर असलेली नदी,इत्यादी गोष्टी तत्कालीन अभियंत्याला खटकल्या असाव्यात! 🤔🤔

आता आहुखान्यात प्रचंड मोठा महल,आहे हा दगड,विट, चुना वापरून बनविल्या गेला आहे याच्यात ३ मोठ्या व ६ लहान-लहान खोल्या आहेत! याचे छत 🐪🐫उंटाच्या पाठीसारखे आहे!  मागच्या बाजुने सरोवर, सरोवरात तत्कालीन असलेले कारनज्याचे अवशेष आहेत! समोरच्या बाजुने बारादरी हि इमारत आहे! प्रथमदर्शनी हि इमारत अतिशय मोडकी-पडकी वास्तू दिसते! पन थोडेस बारकाईने बघितले तर लक्षात येते कि हि वास्तु कुठुनहि बघा सारखिच दिसते, हिचे १२ दगडी खांब त्यावर केलेले प्लास्टर, कोरिव काम हे डोके चक्रावनारे आहे!  असे म्हनतात कि इथेच मुमताज ला ६ महिने ठेवले होते! पन मनाला पटत नाही, कारण ति मुमताज होति!!!  आहुखानाच्या बाहेर साधारण एक किमी दुर मस्जीद वजा वास्तूसमोरील एका तळघरात मुमताजमहल हिला मृत्यूपश्चात ठेवलं गेलं होतं.हे कुणीही स्पस्ट करु शकेल! कारण येथील तळघर अतिशय देखने आहे याला दोन रस्ते आहेत,  या ऐतिहासिक वास्तूला धक्का लागू नये म्हणून या आवाराभोवतालचा परिसर पूर्वीपासूनच रिकामा ठेवला आहे.!!!!

शेवटी आहुखाना जाता-जाता म्हणेच…!!!

ना करो मुझे समझने की कोशिश,

कही मेरे किरदार से मोह्हबत ना हो जाये.!!

😘

हे सर्व बघुन आम्ही आता अजून ऐका सिधे चले जाना च्या नादात थेट तापी नदीच्या पोटात अगदी छोट्याश्या पुलावर गाडी टाकली…!!!

क्रमश:-

✍🏽निखील माळी-गोरे!

बऱ्हाणपूर-असिरगड-जिल्पी आमनेर मोहीम भाग ३

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 भाग ३ 

👑शाही किल्ला👑 सिद्धे चले जाना……!!!!

गाडी थेट तापी नदीच्या अलीकडील काठावर होती, तापी तशी काहीच तापलेली नव्हती! त्यामुळे पुलावर पानी किती आहे हे तिथे गेल्यावरच कळनार होते! पिटुकला जिव गाडी चा! तापी माय ला आवडावे असेच आम्ही ४ झन होतो! 😇 घेतल कवेत तर करता तरी काय??? या विवंचनेत गाडी त टाकलीच होती,

 गाडीचे चालक मालक इंगळे सर चिंतातुर होते! इंगोले सर फोटो व्हुव पाहत होते,पक्षीमित्र(चिव-चिव मंत्री) मिलिंद भौ! कुठला नवीन पक्षी👀 भेटते का बघत होते!  उरलो होतो मिच😎,ट्राफिक पोलिस बननेच होते, & तसेही कठीण समयास सर्वाच्या समोर असने हे हि आजकाल अविवाहित असल्याची निशानी केलि आहे लोकांनी!!🤣

यापूर्वी किल्ले राजधेर ची शिडी,किल्ले साल्हेरिचे शिखर, इथेही हा अनुभव आला होता,(खर म्हंजे मित्रांन साठी काहीही……!!!) गाडी थोडी समोर गेली पान्याचा प्रवाह दिसु लागला,अगदी शांत हळु-हळु समोर……निवांत पलीकडील काठावर! जमल बुवा! (कुठे तरि वाचले होते कि बऱ्हाणपूर  तापीचे पान्याचा थेट सुरत-गुजरातला प्रभाव पडतो तोहि खुप कमि वेळात) जिंकल्याच्या अविर्भावात गाडी एका चनेवाल्यांच्या जवळ थाबंविली! हा भल्ता भारि होता! ५चे सार्खे१० चे सार्खेच चने द्यायचा,पन बरिच माहिती दिली त्याने! 

इथून किल्याची लांबच-लांब मजबुत तटबंदि दिसुन येते! बऱ्हाणपूर ला दोन बाजुने तापी माय ने सुरक्षित केले तर उर्वरित सर्व बाजुने तटबंदीने……!!!! काय वैभव असेल शहराचे????

 शाही किल्ल्यांची मागील बाजु खूपच मस्त दिसत होती नदिच्या किनाऱ्यावरुन,जोडीला काही जुने-नवे घाट(ऱाजघाटच) बांधले आहेत,या घाटाला पहिले  ग्वाल्हेरच्या शिंदे घरान्याकडून डागडुजी साठी खर्च यायचा म्हने आता बंद आहे! हा किल्ला मोघलाना साजेसाच आहे!

 पन खरे सांगु का?? जि मजा,खुन्नस सह्याद्री व सातपुड्यात आहे ना ति कुठेच नाही!!!! 

 गाडी आता थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच! अहो जानारच ना शाही किल्ला ना तो!!

किल्ला सध्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे १५ रु प्रवेश फि देऊनच आत जाता येते! तिकिट घराच्या बाहेरच तत्कालीन चुन्याचा घाना आहे! ३-४ तोफा ठेवल्या आहेत! आत गेल्या-गेल्याच माझ ब्रेकअप💔झाल राव!😓 कारण उजव्या बाजुला असलेले पुरातत्त्व विभागाचे संग्रालय हे बंद होते! यात बऱ्यापैकी खुप साऱ्या जुन्या वस्तू,शस्त्र,भांडे & अजुन खुप काही होते!  आता इथे जावून ह्या गोष्टी पहायला न मिळने म्हंजे माझ्यासारख्या दगडाचा प्रेमभंग च आहे हो!!! लै दर्द!!! असो……!!!

इतिहासाच्या चष्म्यातून किल्ला व बऱ्हाणपूर शहर👀

साधारण इ. स. ७५३ ते ९८२ या काळात बुरहाणपूर इथे राष्ट्रकूट घराण्याचे राज्य होते. नंतर मध्ययुगात या शहराला महत्त्व प्राप्त झाले. बुरहाणपूर त्यावेळी ज्या खानदेश प्रांतात होते, त्या खानदेश प्रांतावर इ. स. १६०० पर्यंत फारुख्ही वंशाचे राज्य होते. त्याच वंशातील नासिरखानाने इ. स. १४०० च्या सुमारास या शहराची स्थापना करून त्याभोवती भक्कम तटबंदी उभारली. जि  आजही दिसुन येते! हि  तटबंदी बुरहाणपूर शहरात कुठेही जा तुम्हाला सोडत नाही  सहज दृष्टीस पडते.

 नासिरखानने सुफि संत बुराहानउद्दीन यांच्या नावाने या शहराचे नामकरण केले. मूळच्या ब्रह्मपूरचे ‘बुरहाणपूर’ झाले असाही एक मतप्रवाह आहे. बुरहाणपूर ही सुमारे २०० वष्रे फारुकी वंशीय राजांची राजधानी होती. १४५७- १५०१ या काळातील मिराएना आदिलशाह दुसरा या सुलतानाने शहरात जो किल्ला बनविला तोच शाही किल्ला म्हणून आज ओळखला जातो! नंतरच्या काळात आप-आपल्या सोयिने हे शहर घडत गेले असावे! कारण बऱ्हाणपूर ला दक्खन का दरवाजा म्हणायचे, & त्यात ही ज्याला हि इकडे सुभेदारी मिळाली तो येत्या काळात मुघल बादशाहा बनने हा जसा काय शिरस्ता झाला होता!

बर……!!! पुरे झाल्या मोगली गप्पा! इथेही मराठी पराक्रम झाले आहेत बर का!! आरक्षणाच्या साह्याने मुळीच नाही!!! तर चिवट तलवारीच्या 

जोरावर...!!!! हंबीरमामाच्या सोबतीने

राज्याभिषेकाच्या अवघ्या पंधरा दिवसानी पहिलाच वार शौर्यशंभूराजेनी बऱ्हाणपूरवरच केला⚔ मनसोक्त नेस्तनाबुत केल! हे पाहुन सर्व हिंदुस्थान नक्कीच अवाक झाला असेल, अवघी मराठी दौलत म्हनाली असेल जैसा बाप तैसाच बेटा!!!!

या कार्यक्रमानंतर आभार प्रदर्शनात 

खुद्द रंग्याबुढ्याच कारट छिछोरा अकबर काय म्हने माहितेय का……????

कस माहित असनार……????

आपली सर्व शक्ती शंभूराजे धर्मविर कि शाक्तविर या वरच वाया जात आहे ना😞😞😞!!!

छिछोरा अकबर रंग्याला म्हणे

 बऱ्हाणपूर दख्हण दरवाजा हा विस्तीर्ण दक्षिण प्रांत, जमिनीवरचा स्वर्ग विश्वरुपी सुंदरीच्या गालावरचा तिळ होता😘 पन संभाजी राजेच्या पराक्रमाने💪🏽⚔ आज उध्वस्त झाला

खाफीखानने तर लिहून ठेवले कि पिढ्यानपिढ्या घरात गाडून ठेवलेले घरमालकालाही माहिती नसलेलेही धनदौलत खनती लावून नेली!

या पराक्रमाला तोडच नाही हो!!!

नंतरच्या काळात पेशवा बाजीराव बल्ल्लाळ………यांनी, हो राऊच……!!! याच शाही किल्यावर ⛳⛳भगवा ⛳⛳ फडकविला!!!! शिंदे-होळकर यांची तंगडेओढ सुरु असताना पन तब्बल १०० वर्षे या किल्ल्यावर भगवा डौलत होता!!!

सध्यस्थिती👀👀👀

किल्याच्या उजव्या बाजुवर खुपसार्या खोल्या आहेत, पन त्यावर वटवाघुळाचे🦇🦇 अधिराज्य आहे! आम्ही इथेच खुप वेळ घातला पन यांचे अप्रतिम फोटो मिलिंदभौ ने कैद 📸केलेच!! बाहेर निघून 

सरळ गेले की तळघरात भरपुर खोल्या आहेत इकडे कोनालाही जाऊ देत नाही, याच्याच समोर दिवान-ऐ-खास,दीवान-ऐ-आम आहे, याच्या मागून तापीमायचे लैच भारी दर्शन होते! दुरवरचा आहुखाना पन दिसते! हे बघून समोर आले की लोंग 🍦च्या आकाराचा मनोरा आहे, याच्या वर काही नाही दिसले तरी याच्या खाली १-२ जोडपे नक्की दिसेल!! 🤓

याच्याच बाजुला हमामखाना आहे मला सर्वाधिक आवडलेली वास्तु आहे ही 🛀🏽🛁🚿शाहजा मुमताजचे बाथरुम🤠🚿🚿 अहो कारण हि तसेच आहे! याच्या दोन्ही बाजुने गरम व थंड पाण्याची व्यवस्था धबधब्यासार्खी  होती, छ्तावर तत्कालीन ऐवढे रंगकाम आहे कि तुम्हाला आग्रा व ताजमहल ची आठवण आल्याशिवाय राहत नाही! हे रंगकाम कवड्याची भुकटी करून केले आहे! जे चारशे वर्षां नंतरही सुखरुप आहे!  यातच कुठेतरी ताज चे रहस्य रुपी नकाशा सुध्दा आहे!

पाण्याची व्यवस्था आचर्यकारक आहे! इथे आपला शाही किल्ला पूर्ण पाहुन होतो! 

तुम्ही जर वटवाघुळाचे फोटो काढले नाही😝😝😝😝 तर ३ तास निवांत आहेत शाही किल्ला बघन्यास!!

क्रमश:

✍🏽निखील माळी-गोरे!

बऱ्हाणपूर भाग ४

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 भाग ४ 

 शाही जामा मस्जिद

(विशेष विनंती:- सहिष्णू भावनेने वाचावे)

शाही किल्ल्याच्या बाहेर आल कि परत सीधे चले जाना……!!!!!😜

भर चौकात मोठी कमान दिसली कि समजुन जायचे हिच असेल मस्जीद!!!! 

चौकनी आकाराचा भव्य दरवाजा आहे हिला! 

एक तर रमजान चा महिना, आत  जावू कि नको??? जावू कि नको?? असे होत असताना आमची मंडळी आत गेली सुद्धा!!!! आत 

गेल्या-गेल्या बरेच बंदे मोठे-मोठे डोळे करून बघत होति! याची सवय मला होतीच कारन या पुर्वी बाळापूर ची मस्जीद,

आणि तर्हाळा (रोहिले कि दर्गा) इथेही असेच होते!

पन खरे सांगायचे म्हंजे गेल्या दोन दिवसात कुठेच बऱ्हाणपूर ला इस्लाम खतरे मे जानवला नाही! तसा गंध ही आला नाही! ना तशी ओरड होति ना आरड होती, ना कट्टरता ना जागृतता होती,  अगदी शांत!!

आम्ही आत गेल्यावर डाव्या बाजुला छोटी  खोली आहे,जिला कार्यालय समजुन मि पुढें गेलो व विचारले मस्जीद देखना हे!!!

त्यात इंगोले सर ने दुरुस्ती करत देख सकते हे क्या??? असे विचारले! 🤗

उत्तर आले क्यो नही देख सकते???? जरूर देख सक सकते हो!  अंदर जाईये वहा बुखारी साब से भि मिल लिजिये वो आप को सब बताऐगे!!! 

आम्ही आत गेलो, बुखारी साहेबानी छान शाब्दिक स्वागत केले! थोड हाल-हवाल विचारने झाल्या वर माझ्यातला आगाउ पत्रकार   *वागळ्या* फेम  निखील जागा झाला! 

नको-नको ते प्रश्न मि त्याना विचारले, मला फक्त गाडी गरम करायची होती,पन शांत,संयमी,अभ्यासपुर्न उत्तरे दिली त्यांनी! अतिशय नम्रतेने दिलेले उत्तरे, बऱ्हाणपूरला साजेशे होते! शेवटि म्हने अंदर एक संस्कृत+फारसी मे शिलालेख हे ये इसकी हि बदौलत हे कि यहा कइ इलाके हे की आज भि कोइ मुश्लिम मरता हे तो उसको कंधा देनेवाले २ हिंदु होते हे! कोइ हिंदु मरता हे तो २ मुश्लिम होते हे! यहि यहाँ का रिवाज हे,और इस शहर मे कोइ सिर्फ पोलिटिक्स के लिये इफ्ताऱ पार्टी भि नहि करता हे पन आवर्जुन सांगितले! 

त्यांनी आम्हास मस्जिद बघून या असे सांगितले,  जे आम्हाला मोठे मोठे डोळे करुन बघायचे ना त्यांच्या पैकी २-३ झन आमच्या सोबत आले

 *इतिहासाच्या चष्म्यातून…!!!👀👀*

शाही जामा मस्जीद हि फारुखी शासन काळात १५९० झालि आहे! शहराच्या उत्तर दक्षिण भागात अनेक छोट्या मस्जिद आहे पन त्या सर्व दुर पडायच्या  सर्वाना सोयीचे जावे म्हणून हिचे निर्माण झाले आहे! 

नंतरच्या काळात मुघल सुभेदार मिर्झा अब्दुल रहिम खानखाना यांच्या काळात खुप बदल या मस्जीद मधे केला आहे!

 खानखाना 'रहीम '

१६०१ ते १६२७ ई . स . मध्ये अकबराच्या नवरत्नांपैकी एक कवी रहीम इथले सुभेदार होते लै भारी माणूस! . "खांद्यावर  शस्त्र आणि डोक्यात शास्त्र "अस त्याच व्यक्तिमत्व होते . हिंदी , संस्कृत , उर्दू ,व फारसी भाषा अवगत होत्या . तसेच फ्रेंच आणि इंग्रजीचे ज्ञान होते . इस्लाम धर्म मानणारे रहीम कृष्ण भक्त होते . ते श्रेष्ठ योद्धे , महान कवी आणि चांगले भूगर्भशास्त्री होते,

रहिमन धागा प्रेम का , मन तोडो चटकाय ।

टूटे से फिर ना जुडे ,जुरै गांठ परि जाय ।। ह्या त्यांच्या ओळी लै काही सांगुन जातात!!!

सद्यस्थिती………!!!!👀👀👀👀

मजबुत………!!!! शानदार……!!!!! जबरदस्त……!!!!!!!

सर्वप्रथम आत गेले किल्ले नरनाळा (महाकाली दरवाजा🌸🎋) आठवतोच!!!!

  हि मशीद दिल्लीच्या जामा मशिदी प्रमाणे बनवली आहे. या मशिदीच्या चारही बाजूला दुकाने आहेत, याचे मिनार दिल्ली पेक्षा ही उंच आहेत! मशिदीच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी एक भव्य प्रवेशद्वार आहे. याची लांबी ३४ फुट आणि रुंदी १२ फुट आहे. याला जहांगीर बादशाहाच्या काळातले दरवाजे आहेत. पहिल्यांदा हा दरवाजा १२ फुट उंच होता, पण मशिदीचा भव्यपणा बघता तो खुपच छोटा होता हिजरी १२८२  भोपाळची बेगम सिंकंदर जहां साहिबां हज च्या यात्रेसाठी मुंबईला चालली होती, त्यावेळेस ती २-३ दिवस बऱ्हाणपूरमध्ये थांबली होती. तिला हा दरवाजा मशिदीच्या योग्यतेचा न वाटल्याने जुन्या दरवाजाच्या पुढे जमीन वाढवून नवीन दरवाजा बनवला. याची उंची जवळपास २५ फुट आहे आणि हा संपूर्णपणे दगडाचा बनवलेला आहे, याच्या छतावर सुदर अशी वेल-बुट्टीची कलाकुसर केलेली आहे.मशिदीच्या उत्तर आणि दक्षिणेला दोन हौद आहेत, लांबी ३० फुट आणि रुंदी ३० फुट आहे. यातला एक हौद मशीद बनवणाऱ्या आदिल शाह फारूकी ने बनवला आहे तर दुसरा जहांगीरच्या काळामध्ये अब्दुल रहीम खानने बनवला आहे. या हौदांमध्ये लालबाग खुनी भंडारा येथून भूमिगत असलेल्या नाल्यांद्वारा पाणी येत असे, आता हा कार्यक्रम बंद  आहे. आता या हौदांमध्ये नळाद्वारे पाणी भरले जाते. मशिदीच्या उत्तरेला आणि दक्षिणेला दोन मीनार आहेत. या भव्य मीनारांची उंची १३० फुट आहे!!!

 मशिदीच्या कोपऱ्यात कमानीच्या वरच्या भागात आहे, तिन शिलालेख आहेत! यात फारुकी बादशहाची वंशावळ,  मशीद बनवल्याची तारीख आहे.

दुसऱ्या अरबी लेखाच्या खाली आहे.  *संस्कृत आणि प्राचीन देवनागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. हा सहा ओळींचा आहे.*

'' *स्वस्ति श्री संवत्‌ 1646 वर्षे, शके 1511 विरोध संवत्सरे पौष, मास, शुक्ल पक्षे 10 घटिस है का हश्या, शुभ 24 योगे वाणिज्य करणे। स्पिन दिन रात्रि, घटी 11 समय कन्या लगने श्री मुबारक शाह सुत श्री एदल शाह राज्ञी यसी तिरियं निर्माता स्वधर्म पालनार्थम"* &( माझ्या माहिती प्रमाने देशातिल ऐकमेव सहिष्णू लेख!!!)

 हा लेख बादशाहाच्या धर्मनिरपेक्षतेच प्रतिक आहे. याच प्रकारचा संस्कृत आणि अरबी मध्ये असलेला लेख अशीरगढच्या जामा मशिदीमध्ये देखील आढळतो.!!!

मस्जीदिच्या मधोमध असलेल्या घुमटा मधून बसून बोलले तर सगळीकडे ऐकू येते!(📢याच काम नाहि)

 ५ ×१५  असे याचे नक्षीदार खांब आहेत! हे पूर्णपणे कुलुप पध्दतीने फसवुन वरची छत तयार केली आहे! प्रत्येक खिडकीच्या कमानी इतक्या नक्षीदार आहेत कि मि ह्यांच्या प्रेमात पडलो आहे!😘

त्याच्यावरिल फुलांचे वेल तर माझ्या अजूनही चर्चेचा विषय आहे🎋🎋🌸🌱🌿☘🍀!!

प्रत्येक खिडकिचे वेगवेगळे विशेष होते! हे सांगन्या साठी बुखारी साहेबाने आमच्या सोबत चांगली मुल दिलीच होति! 

शेवटच्या खिडकी जवळ ऐक महाशय आलेत! 🙈🙉🙊

आता तुम्ही २ तासानी या म्हने!!!! साला बासुंदीच्या प्लेट मधे खाता-खाता काजु समजुन एखादा दगड येतो ना तसाच माझा चेहरा झाला होता!😏

चेहऱ्यावर मिलिंदभौ कडून घेतलेली उसनी स्माईल त्याला देत मि Okkkkk म्हटले! 

खर तर संपत आल होत! 

आमच!! असो ते मुल व आम्ही बुखारी कडे गेलो! 

त्याला मनस्वी धन्यवाद दिलेत!!!!!! 

परत ऐकदा सीधे बाहेर निघून आशिरगड कडे कुच केली………!!!!

क्रमश:

✍🏽निखील माळी-गोरे!!


 बऱ्हाणपूर-जिल्पीआमनेर मोहीम🔥 भाग ५

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 भाग ५ 

जंगलातिल किल्ल्याच्या तटबंदी मधे मुक्काम! शिवमंदिर व मोती महल..!!!!🔮🔮

सीधे चले जाना……सिधे चले जाना,,,!!!!

जाम वैताग आला होता!

सायंकाळचे ६:३०  झाले होते! मिर्झा राजा चि  छत्री! मुमताज चि कबर, तापिमाय चा काठ! शाही किल्ला, शाही मस्जीद, बऱ्हाणी माणसे, मराठी घोड्याच्या टापाखाली भरडली गेलेली माती,💪🏽 

सर्व अनुभवुन झाल होत,

राहिले होते ते फक्त बऱ्हाणी मिठाई,😛 यहाँ पे आये और कुछ मीठा खाया नही तो आप बऱ्हाणपूर आयेच नही!!! 

कधि-कधि लै कौतुक वाटते या मुघलाच हे जर आलेच नसते  तर आपण लढायला शिकलोच नसतो! & काही-काही पदार्थ खायला हि शिकलो नसतो! जसे की बिर्याणी,जिलेबी, मसाला पुलाव, कबाब,रुहआफजा,तंदुरि चिकन, इमरती ही सर्व मोघलांचीच देनगी!  (यातील नोन-व्हेज मि कोनासाठी तरी बऱ्याच दिवसापुर्वी खाने सोडून दिले आहे!त्यामुळे शब्द जरी रुचकर वाटत असले तरी आपली दृष्टी मिठाई वरच ठेवा!!🤑) 

 बऱ्हाणपूर मोहिम २-३ दिवसात करुन येने म्हंजे स्वताचीच फसवणूक आहे! माहिती असलेले ५७ ठिकाणे ऐतिहासिक,आचर्यकारक, प्रेक्षणीय आहे! & आमच्या सारखे इतिहासाच्या चष्म्यातून बघनारे प्राणि सोबत असले  तर काही खर नाही! रात्र झाली होती चहा च्या निमित्याने ऐका ठिकाणी थांबलो! ५ रुपयांचा चहा प्यायचा व १०० रुपयाचे चहा वाल्याचे डोके खायचे! हा भटक्या लोकांचा नित्य उद्योग असतो! या खान्यात माझे हाथ🙌🏽 कानून पेक्षाही लांब आहेत! चहा पितानाच मुक्कामा विषयी खलबते सुरु होती! मिळालेल्या माहिती नुसार मसलती अंति ३ Plan बनविले १ आसिरगड वर  मिळेल तिथे मुक्काम २ शासकिय विश्रामगृह ३ आशादेवी मंदिर!  आसिरगड खुप दुरुनच नजरेत भरतो! अलीकडेच  रानी लक्ष्मीबाई ची मोठि मूर्ती आहे! इथे मि विनाकारण एकाला गड विचारला उत्तर तर पाठच झाले होते सिधे चले जाना! यावेळी फसले काम १३ किमि सरळ जावुन कळले कि आपण नेपानगर (कोने एके काळी कागदा साठी प्रसिद्ध!) च्या मार्गाने गेलो आहे! 

मागे परत फिरून आलो! आम्हाला सिधे घालनारे दिसले नाही! नाही तर त्यानाही सीधे करायचा बेत झाला होता! आसिरगडाच्या पायथ्याशी पोचलो ऐकदाचे!  किल्ला ५ वाजताच बंद होतो! ☹

विश्रामगृहा चा काही ताळमेळ नव्हता!

आता शेवटची आशा आशादेवी मंदिरच होते, & हिच माझी मनोमन इच्छा होति! गाडी टाकली तिकडे, बाहेर कमान बघुनच वाटले कि नवीन बनावटीच एखादे मंदिर आहे! ४किमि चा रोड, काटा किर्र्रर करनारे जंगल,निरव शांतता, अरे मजाच होती...!!!! मंदिराच्या पायथ्याशी पोचलो, सामान सर्व गाडीतच ठेवले! गाडी बंद केल्या-केल्या मिलिंद भौ धावत पळत गेले याना दोन्ही-तिन्हि कार्यक्रम करायचे होते!  जवळपास पन्नासऐक पायऱ्या चढून आशादेवि चे मंदिर आले! मंदिर आसिरगड च्या पोटात होते,& हे किल्ला बांधायच्या अगोदर बांधले होते! गुफे वजा मंदिर तटबंदी ला लागूनच होते! बाहेर पत्राचे शेड होत! आमचे बघने सुरु असतानाच मिलिंद भौ धावत आले निखीलराव बहौनि झाली!!!!!

🐍🐍 कोब्रा अगदी जवळुन गेला! याची पुर्वकल्पना तर रस्त्यातच आली होती! 

मंदिरात एक मुलगा त्याचे वडील तेथील पुजारी होते,ते बाहेर गेल्यामुळे त्यांची परवानगी महत्त्वाची होती, पन हा आम्ही गेलो तेव्हापासून नकारात्मक बोलत होता! त्याचे कारन हि तसेच होते, काहि महिन्यापुर्वी खंडवा सिमि  इंकाउंटर चे सर्व आरोपी याच परिसरात मुक्कामी होते! तेव्हापासून इकडे कोनालाच मुक्कामी थांबू देत नाही🤦🏽‍♂😖 हा अनुभव नेहमीचाच राव! 🙈🙉🙊 आमच्या गोटात आता चिंतेचे वातावरण झाले होते!  

९ वाजता पुजारी आले! त्यानी विचारपुस केलि ओळखपत्र बघितले, ईथे पाणी मुळीच नाहि म्हनत, त्यानी काही घोंगड्या दिल्या व चार्जर ची सोय लावली" मस्त जमल होत!

सोबत आनलेली शिदोरी संपवुन झाली होति! अंथरूण तयार होते, म्हटले फोटो बघावेत झाले😭 आमच्या फोन ने दगा दिला! हे बघून इंगळे,इंगोले, मिलिंद भौ सर्व मंडळी बहोत खुश झाली होति! 😖😖😖

त्यायच बरोबर होतो राजरोस पने अत्याचार सुरु आहेत त्या फोन वर! 

रात्रीच्या गप्पा रंगल्या होत्या! त्यात सिधे चले जाना हा jok of day झाला होता! जंगलात आता खुप साऱ्या हालचाली वाढल्या होत्या! त्यात आभाळ आले होते! किड्याचा बाजार भरला होता! हत्ती एवढाले मछर आक्रमना साठी सज्ज झाले होते!  ओडोमोस नावाचे हत्यार मिलिंद भाउ कडे सापडले! पन या मछरानी हे हि चाटुन पुसुन खाल्ले! 

सर्व झोपले होते! मि सर्वाना दोन वेळा गाढ झोपेतुन उठवुन *काहो झोपले का???* 😛😛 हे विचारले होते! हया शोधाचा जनक मिच आहे!

 मला आज कुठेच निद्रादेवि भेटत नव्हती! मग काय मोबाईल चा जिव गेल्यावरच डायरीची आठवण आली! 

भटकेपना हा एक आनंदीरोग आहे याचे ट्रेक,जंगलभ्रमंती,सायकलिंग,बायकिंग, मिळेल ते खाने,जागा असेल तिथे बसेल, हे त्याचे मोठे लक्षणे आहेत! याचे निसर्ग,दर्या-खोर्या ऐतिहासिक स्थळे आणि रस्ते हे यांचे मोठ-मोठाले दवाखाने आहेत उपचार ज्याचे त्यानेच करायचे!ह्या दवाखान्याचा पत्ता शोधन्याच काम मि करत असतो!(हा रोग हवा असल्यास फक्त निसर्ग पर्यावरण,संस्कृती, यांचा आदरभाव करने शिकायच)  आज एक महारोगी मिलिदभौ सावदेकर-पक्षीमित्र हे उजव्या बाजुला होते! या रोग्यांने भारतातील सर्व अभयारन्य फिरले आहेत! तर मारोति इंगोले सर हे मुळातच पर्यटक होते! आता भटके झालेत आहेत! पर्यटक& हौशी भटके यात खुप फरक आहे बर का!! पर्यटकाना वातावरण चांगलेच पाहिजे! भटके मात्र स्वताला पाहिजे तसे वातावरण तयार करत असतात! कुठेही, कधीही,म्हणूनच खरा हिंदुस्थान भटक्यानाच सापडतो,  सुधाकर इंगळे सर मागील वर्षी  मेळघाट मधे🐅🐆🐾TiGer Censas ला काय केले कट्टर निसर्गप्रेमी झालेत! प्रत्येक टुर मधे ऐक-ऐक फोबिया स्वतःच काढुण टाकत आहेत

या सर्वानचे म्हातारपनात फिरन्याची काठी मिच आहे! याना काठी सोबत खांदा हि मिच देनार आहे!🤣🤣🤣🤣

सकाळ चे साडेचार झाले होते! सकाळ-झाली याना सर्वाना उठवुन मि मात्र झोपी गेलो 

मस्तपैकी दोन तास! 

सर्व कार्यक्रम झाल्यावर पुजार्याचे आभार मानुन आम्ही निघालो! राव गाडीजवळुन काय नजारा दिसत होता! कश्मिरच!

सर्व खुश त आपण हि खुश! चार किमी बाहेर एक हातपंप लागला! बाहेरगावी मि अंघोळीच्या बाबतीत खुप सेक्युलर आहे! लै पुरोगामी!!😉

पन मिलिंद भौ सहारा  वाळवंटातुन आले होते!😜

किल्ला येथूनही खूप छान दिसत होता! 

आम्ही चहा-पान्यासाठी थाबलो!

ऱमजान इद चा दिवस पन सर्व शांत! आम्ही पोहे,जिलेबी,ब्रेडपकोडा,आल्लुवडा,चहा असा जेवना पेक्षाही जास्त नास्ता करुन (हे करत असतानाच मोतीमहल या पाटीवर नजर गेलि) पन बिल १४६ रु च आले! 

होटेल वाल्याशि चर्चा केली! जबरदस्तीच इद च्या शुभेच्छा दिल्या! तो म्हने आसिरगड गाव २-३ भागो मे हे! इद यहाँ पर पुरा गाव मिलकर मनायि जाती हे! यहा पे सब शांती रहति हे सब अपने काम मे! मि मोती महल बद्दल विचारले यहाँ से चार किमि दुर हे सिधी, होटेल मे बहोत पुराना फोटु लगा हे आप देख लो! ओर फिर जाना आजकल पथ्थोरो से लगाव करने वाले जिंदा दिल इंसान बहोत कम मिलते हे!  और हा रास्ते मे शिवजी का मंदिर हे वो भि देख लो! 

किल्ला ९ वाजता उघडतो, वेळ न घालता शिधे निघालो आम्ही! 

मंदिर तर खरच अप्रतिम होते! पन गेट उघड्ल्या वरच काळाकुट्ट 🐍 नागोबा अगदी पायाच्या जवळुनच गेला😌 मंदिर खुप सुंदर आहे! छोटेसे पन सुबक पायथ्या पासुन कळसा पर्यंत सर्व दगडी बनावट! कळसावर दगडाचा मोठा सिंह आहे! 

मंदिरात प्रवेश केल्यावर 

खूपच गोंडस,गुळगुळीत बसलेला छोटासा नंदी आहे याला बघुन असे वाटले कि याच्या सोबत मस्त रानात जावे! 

मंदिरात अंधार होता मूर्ती भव्य होति बाजुनेच आमचे आदरणीय मित्र, हक्काचे आधारस्तम्भ गणपती बाप्पा🐀 पन होते! & बरोबर खिडकीतुन सुर्यकिरण शिवलिंगावरच!! 

अद्भुतियवास्तूविशेष आज अनुभवायाला मिळाले! 

मंदिराच्या समोर बारव आहे! पन हा जमिनदोस्त होन्याच्या मार्गावर आहे! हे बघून आम्ही समोर निघालो! थोडे टेकडे गेल्यावर सपाट रोड वर बऱ्याच गायी होत्या,लाग्ल्या न राव मागे! इकडे आमचे चालक-मालक परेशान झाले स्पीड वाढविला तर गाडीचा पार्श्वभाग शेकला! कशि-बशि काढली गाडी! आले ऐकदाचे मोती🔮 महल! येथून दुरवरचा टुमदार भव्य आशिरगड व त्यावरिल मिनारे दिसत होती! 

इतिहासाचा चष्मा व सद्यस्थिती

🔮 मोतीमहल हा शाहजहा ने त्याचीच अजुन एक प्रेयसी मोतीबेगम  साठी बनविला होता हीचीच हि कब्र (१६२८-१६५८) दोन मजली हि इमारत पांढरी नावाच्या नदी काठी आहे! चुना& विटाचा हा महल आहे आयला इकडे आमच ऐकहोइना या शाहजहानच्या किति बायका??😱😱

& हे मोतीच लफड  तर लैच भारिच राव! खाली भव्य ३ सभागृह वजा खोल्या आहेत! डाव्या बाजुला तिची कबर/मजार आहे! खूपच सुमसाम हा परिसर आहे! वरच्या मजल्या मधे सारख्याच असलेल्या ४ खोल्या आहेत! सर्वानच्या दरवाजे खिडक्या सेम आहेत! मागच्या बाजुने ज्या खिडक्या होत्या त्यातुन भव्य आशिरगड दिसतो!

इथे आम्ही शहीद होन्या पासून वाचलो हे खाली आल्यावर कळले! 

कारण खालून पूर्णपने त्या खिडक्या निखळल्या होत्या व त्यावर मोठ मोठ्याले आगी मोहोळ लागले होते! व आमच्या मुळे त्यानी उठाव केला होता! भव्य पटांगण च्या मधोमध मोती महल एखाद्या नशिब फूटलेल्या शिंपल्यामधील मोतीच आहे!!!

मोतीमहल फारसा पाहन्यासारखा जरी नसला तरि हि शाहजहाची आयटम 💃🏽होती! & इथून खुप सुंदर परिसर नजरेत कैद करता येतो आम्ही तो केला होता!!!

आता घौडदौड आसिरगड कडे होती!!

क्रमश:

✍🏽निखील माळी-गोरे!!

बऱ्हाणपूर-जिल्पी आमनेर मोहीम भाग ६

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 भाग ६ 

🎠अश्वत्थामागिरी🎠उर्फ 

👤आसिरगड👤 उर्फ

👽 कालीद-ए-दक्खन👽 ऊर्फ

 ⛰ बाब-ए-दख्हन⛰

ऊर्फ

⛳ आशागढ⛳

 ऊर्फ

🌳 वादी-ए-आसीरगड🌦

किती हे नावे????  कदाचित रायगड नंतर सर्वाधिक नावे या आसिरगडलाच असेल! 

काळानुरुप याचे रुप बदलले,राज्यकर्ते बदलले, तसेच नावही बदलत गेले!

हे बदलायला काळ लागला असावा!! आता मात्र मानसे बदलायला

वेळही लागत नाही हो!🙈🙉🙊

आम्ही मोती महल बघून किल्ले आसिर च्या रोड ने गाडी टाकली,चालक मालक चिक्कार टेंशन मधे होते! का नसावे आयुष्यात पहिल्यानदा समुद्रसपाटीपासून ८५० फुट उंचावर बिनागेयर ची गाडी नेनार होते! त्यात घाटवळने, लहान बाळाला चोकलेट देउन त्याची बोळवन करावी असा ३किमि  डांबरी रस्ता!🙄

तो झाल्यावर सिमेंट चा! 

जो किल्ला कटकारस्थाना शिवाय जिंकल्याच गेला नाही! तो गाडीच्या माध्यमातून चढायला आम्हि पन खुप कट रचले होते! पन या रोड च्या माध्यमातून ते उध्वस्त झाले होते! अखेरचे पाच सहा टर्न राहिले होते आमच्या साहेबानी गाडी बाजुला लावली! आता घेत नाही म्हने गाडी पुढे! जिथे थांबलो होतो तिथून अजून किमान २ किमि गड बाकी होता!

 मग काय इमोशनल ड्रामा ते मला म्हनत प्यारे आमच सर्व झाले आहे! तुझ अजुन लग्नच राहिले आहे! तुझीच काळजी आहे! आमच काही नाही राज्या तुझी देशा सह आम्हाला पन गरज आहे!  😉 हे त लैच झाल होत राव! म्हंजे ति जि  कोनी अनामिक घुबड🙇🏽‍♀ असेल तिची ऐवढी काळजी????

हे काय जमल नव्हत! पुन्हा ऐकदा नवीन कट रचुन गाडी स्टार्ट केलि! & समोरच  किमान ३-४ दुचाकी डबल-टिबल सिट बघितल्या! हे बघून अगदी सहज गाडी वर जात होती तरी दोन वेळा गाडिचा पार्श्वभाग ठेचलाच राव! 

गाडी गडाच्या दरवाज्या समोर आली! पार्किंग साठी मोठी जागा आहे इथे! 

समोरच एक दरवाजा आहे इथे भटके लोक मुक्काम करु शकतात! &  ट्रेक करत येन्याचा हाच मार्ग आहे! 

हे बघत असताना मिलिंदभौ ला बायनाक्युलर मधे मोती महल सापडला! काय दिसत होता! शाहजा ने खुप राजकारण केले हा बांधताना गडाची  पूर्ण सावली या मोती महल वर पडत होति! & ज्या डेंजर खिडकीत आम्ही उभे होते तिथूनच पूर्ण गड दिसायचा!!! आहे कि कमाल, ऐवढ्यात इंगळे साहेबानी अजुन एक तोफगोळा टाकला! म्हने कैसी रही मे तो मजाक कर रहा था! 😊😊😊

आता आम्ही तो किल्ला सर करनार होतो जो सातपुडापर्वत रांगेचा नरनाळा,गाविलगड नंतरचा शिरोमणी आहे!

तो किल्ला जो काबीज  केल्याशिवाय दक्षिण हिंदुस्थानात प्रवेश करणे अशक्य होता, तो किल्ला जो दगाबाजी शिवाय जिंकताच आला नाही!  तोच किल्ला *जो जिंकून शिवबा राजे ला यौवनासाठीच्या या दख्हन दरवाज्याला कायमच स्वराज्याच कुलूप लावून उलटपक्षी स्वराज्यासाठी  उत्तर हिंदुस्थानाचे प्रवेशद्वार करायचे होते!!! तोच किल्ला जो राजेच्या हयातीत स्वराज्यात आला असता तर अपनी धरती अपना राज व्हायला वेळ नसता लागला!!!*

आणि होताही(आहे हि) असाच बुलंद,बेदरकार,रांगडा गिरिदुर्ग!!! अगदी मोक्याच्या  ठिकाणी!  दक्षिणेच्या वाटेचा शस्त्र सज्ज पहारेकरी⚔!

आणि म्हणूनच यादव,चौहाण, अहिर, फारुखी,मुघल,निजाम,मराठा,शिंदे,होळकर, आणि इंग्रज यांचे झेंडे सार्थपने याने याच्या खांद्यावर मिरविले आहेत!   पन हा कार्यक्रम सोपा नसतो, कारण युद्धाकडून युद्धाकडे जानारी वाट ही स्मशानातुन जाते! त्यासाठी चिवट तलवारी रक्त पितात! बुलंद बुरूज कित्येक बळी घेतात! असे म्हणतात कि त्या लुटारू अल्लाउद्दीन खिलजीने याच किल्ल्याच्या परिसरात हजारोंच्या संखेत कत्तल केली होती!( *श्री कृपेने अजून तरी कोणी या खिलजी बाबत तो पर्यटनासाठी हिंदुस्थान मधे आला होता असा शोध लावला नाही नशीब आमचे!!!*)😢  आणि हे सर्व सोसून हा आसिरगड अजूनही उभाच आहे!!!!

आणि उभाच राहिल कारण पराक्रमाच्या सार्थ परंपरेचा त्याला गर्व कमी,पन माज जास्त आहे!

👀 *इतिहासाच्या चष्म्यातून.....!!!!*👁

तसा तर यादवांच्या काळापुर्वी हि या किल्ल्याचे उल्लेख आहेत! पन आजच्या आपल्या लोकाना पानिपत हि  मकरसंक्रांत ला Whats up  पोस्ट फिरविन्या पुरतेच माहिती आहे, तेव्हा हा तर परमुलुखातला किल्ला ना????

असे असले तरि *आपल्याच गद्दार लोकांन साठी काही गद्दार गोष्टीची माहिती या किल्याने जपुन ठेवली आहे!!!*

आशाअहिर नावाच्या राज्यामुळे या  किल्ल्याचे   नाव असीरगढ पडले आहे असे म्हणतात.पूर्वी किल्ला ‘आशाअहिरगढ’ या नावाने ओळखला ज्याचा कालांतराने त्याचा असीरगढ असा अपभ्रंश झाला. सर्व काही व्यवस्थित सुरु होते!!! अश्यातच 

फिरोजशाह तुघलकाचा शिपाई मलिक व त्याच कारट नसीर ख़ाँ फ़ारूक़ी याची नजर या किल्ल्यावर पडली! त्याने बऱ्हाणपूरला गद्दारीच्या खिचडीला पहिली फोडनी दिली. फारुकीन अहिरची भेट घेतली व त्याला हात जोडून सांगितले कि "मेरे भाई और गाव के ज़मीदार मुझे परेशान करते हैं,  मेरी जान के दुश्मन बने हुए हैं।  आप मेरी सहायता करें और मेरे परिवार के लोगों को इस सुरक्षित स्थान पर रहने की अनुमति दें, तो कृपा होगी"

आणि मग काय आम्ही तर कायम देवभोळे, उदार मनाचे,सहिष्णू आहिर ने   नसीर ख़ाँ च्या बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याला किल्ल्यामध्ये राहायची परवानगी दिली. या नसीर ने आज पापी(की)स्थान ला पन लाजवेल असा कार्यक्रम त्या काळी केला! त्याने पहिल्या काही डोल्यांमध्ये बायका मुलांना पाठवले आणि नंतरच्या डोल्यांमध्ये हत्यारधारी शिपाई पाठवले.आपला देव माणूसअहिर & कंपनी त्यांच्या स्वागतासाठी शालश्रीफळ घेऊन उभेच होते. जसा डोल्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला, शिपायांनी डोल्यांमधून अचानक बाहेर पडून बेसावध अहिर आणि त्याच्या मुलांना थेट स्वर्गात पाठविले . आणि अशा प्रकारे किल्ला नसीर फ़ारूक़ी कडे आला.तिकडे अकबर दख्हन दरवाज्या  ची चाबी शोधत असताना  त्याने दक्षिणेची मोहीम उघडली. जशी फारुकी बादशाहाला हि गोष्ट कळली त्याने किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त केला. हा बंदोबस्त ऐवढा मस्त होता कि किल्ला सर्व बाजूनी वेढला गेला तरी किल्ला १० वर्ष लढला असता. पन फारुकी  ने हाय खाल्ली! जाम टेंशन घेतल! 

अकबरने लै काही-काही  करूनही किल्ला ताब्यात येत नाही असे दिसल्यावर  दूत किल्ल्यात पाठवला व तहाची बोलणी करण्यासाठी फारुकी बादशाहाला आवतन  दिल. फारुकीने अकबराच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन  तहाची बोलणी करायला बाहेर आला. जशी तहाची बोलणी सुरु झाली त्याचवेळेस अकबराच्या एका शिपायाने फारुकीवर हल्ला केला आणि त्याचा कार्यक्रम झाला!!!!.

तो केविलवान्या स्वरात म्हने!!

"यह तुमने मेरे साथ विश्वासघात किया" है। यावर अकबरने म्हटले असेल अबे येड्या तु पन त असिर चा विश्वास ब्रेड ला SoS लावून खाल्ला होता न??? चाल्ला मोठा विश्वासघात म्हनायला!!!😊😊 "राजनीति में सब कुछ जायज है।" असे उत्तर दिले. अकबराने किल्ल्यावर जय मिळवला आणि किल्ल्यावर मुघल सत्तेला प्रारंभ झाला. शाहजा- रंग्या-शिंदे-होळकर-१८५७ मधील शिपाई- इंग्रज असा लांबच-लांब कार्यक्रम आहे या आसिरगड चा!!!

👁 *सद्यस्थिती व प्रेक्षणीय स्थळ*👁

किल्ला अतिशय मजबुत स्थिती मधे आहे! इंग्रजांनी फारसी वाट लावली नाही!

पहिल्याच मदार दरवाज्यात आपण कसे-कसे तीर मारले याचे अजरामर शिलालेख फारसी-संस्कृत मधे अकबर- शाहजा- व रंग्याने बसवुन ठेवले आहेत! इथे डोक्याला ताप आहे याचे फोटो हि घेतायेत नाही!

किल्ला तसा तीन भागांमध्ये विभागला जातो. १.असीरगढ २.कमरगढ ३. मलयगढ .याची पूर्व-पश्चिम लांबी ३३०० फुट असून उत्तर-दक्षिण रुंदी १८०० फुट आहे. किल्ल्याच्या तटांची उंची ८० ते १२० फुट आहे.!!! खुप काही आहे बघन्या सार्खे! पन आम्ही  येथील जामा मशीद, अश्वत्थामाच मंदिर, व वटवाघुळ 🦇🦇🦇🦇🦇🦇 यालाच जास्त वेळ दिला! चक्कर येउन पडायची वेळ आली होति पन नाकाला रुमाल बांधून आम्हि फोटो घेतलेच! किमान २०-३० हजार वटवाघुळ या किल्ल्यात बघितले आम्ही!

‘ आतमध्ये जाताच जामा मशिदीचे दोन मीनार स्पष्टपणे नजरेस पडतात. कोणेकाळी किल्ल्यावर शेती केली जात असे. हि मशीद पूर्णपणे काळ्या दगडांमध्ये बनवलेली आहे. हि मशीद फारुकी शासकांच्या वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. हि मशिद बऱ्हाणपूरच्या जामा मशिदीच्या ५ वर्षे अगोदर बांधण्यात आली. हि मशिद ९३५ फुट लांब आणि ४० फुट रुंद आहे. ५० खांबांवर याचे छत तोलले गेले आहे. या मशिदीमध्ये एकाचवेळेस १२०० माणसे सहज नमाज पढू शकत होती. मशिदीच्या मध्यभागी अरबी भाषेमधला शिलालेख आहे ज्यामध्ये मशिदीचे निर्माण वर्ष ९९२ हिजरी असे अंकित आहे. , दुसरा अरबी लेख संस्कृत आणि प्राचीन देवनागरी लिपी मध्ये कोरलेला आहे. हा सहा ओळींचा आहे.

'' स्वस्ति श्री संवत्‌ 1646 वर्षे, शके 1511 विरोध संवत्सरे पौष, मास, शुक्ल पक्षे 10 घटिस है का हश्या, शुभ 24 योगे वाणिज्य करणे। स्पिन दिन रात्रि, घटी 11 समय कन्या लगने श्री मुबारक शाह सुत श्री एदल शाह राज्ञी यसी तिरियं निर्माता स्वधर्म पालनार्थम ''। हा लेख बादशाहाच्या धर्मनिरपेक्षतेच प्रतिक आहे. याच प्रकारचा संस्कृत आणि अरबी मध्ये असलेला लेख बऱ्हाणपूरच्या जामा मशिदीमध्ये देखील आढळतो.(इथे त्याकाळातिल Copy/Pest चि भानगड असु शकते!) 

इंग्रजांना पुरून उरलेले १८५७ मधील क्रांतिकारक यांचे स्मृतिस्थळे,

 फाशीची जागा, ब्रिटिशांच्या वेळच्या मोडक्या छावण्या आदी वास्तू विखुरल्या आहेत. गडावरील महादेव मंदिर  हा एक संशोधनाचा विषय होउ शकतो!  भव्य तळघर यात पाण्याची चमत्कारीक रचना पुष्कर्नीच!  अजुन इथे अश्वत्थामा रोज पहाटे पूजा करून जातो, अशी गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या अहिर लोकांमध्ये समजूत आहे.

समोर गंगा-जमुना व मामा-भांजे हे तलाव आहेत! याची पाणी साठविन्याची पध्दत अभ्यासाचा विषय होउ शकतो! 

आसिरगड हा ५-६ तासात सहज होउ शकतो! पन तुम्ही येथील महादेवाचे मंदिर,जामा मस्जिद &🦇याच्या प्रेमात जर पडले नाही तर!

सिधे बाहेर येउन किल्ला नजरेत साठवून ह्या पराक्रमी गडाला मानाचा मुजरा करून, सिधे निघालो!!!!!

क्रमश:

✍🏽निखील माळी-गोरे!!

बऱ्हाणपूर मोहीम🔥 शेवटचा भाग ७

भटका जीव

🔥 बऱ्हाणपूर मोहीम🔥 शेवटचा भाग ७  

अपरिचीत किल्ले जिल्पी आमनेर& व्हाया मेळघाट घरी!!!!

आसिरगड वरुन निघालो! 

फक्त २ वाजले होते अवघ्या एक तासात विदर्भाच्या धारनी रोड वर मार्गस्थ झालो होतो! 

गाडीत मोठा प्रश्न उभा झाला होता कि आता करायच काय????

मि मुद्दाम आधुनिक युवा संत बाहुबली (प्रभास) च्या

 नाद्वे🤞🏻, मनिबंधम 🖖🏻, बहिर्मुखम🏹🏹 या प्रसिद्ध वाक्याला स्मरून

 सेमाडोह-कोलकास-....चि...खलदरा चे नावे अगदी घरच्या सारखी सुचविली! 

पन मला जे अपेक्षित व या मोहीमेत व्हायला हवे तेच झाले गाडित आता भटके तयार झाले होते! "अबे आता आम्ही पर्यटक नाही तर भटके झालो आहोत" असे महान वाक्य कानावर पडले! काहि तरी अपरिचीत ठिकाण पायजो रे भौ???

आता माझे शाब्दिक तिर मलाच   🏹वापस आले होते!!!  🏹  🏹 सपाक सपाक 🏹 सपाक🏹

😂😂😂😂

जय भटकेय.......!!!!⚔⚔

(इथे देवसेना व बाहुबली ने कसा सर्वांचा पोपट केला हेहि परत ऐकदा आठवले कारण या दोघांच्या भात्यामधे फक्त ७-८ तिर होते हवे तर पुन्हा बघा!! &यांच😉 आपल चालूच होत सपाक…सपाक...चालूच होत)असो,,,!!!.

आम्ही ता.धारनी (जि अमरावती येथून हा किल्ला १८ किमी आहे) इथे भुकेल्या पोटाची वास्तूशांती करुन घेतली!

धारनी मधून थोड समोर डाव्या बाजुला रोड जातो तो सरळ तापी नदीतच!!!!

जिल्पी आमनेर चे नाव सर्वप्रथम मि आजपासून किमान ४ अगोदर वर्शा पुर्वी आमचे निसर्गविषयक गुरु Dr. जयंतजी वडतकर सर यांच्या सातपुड्यातील किल्ले या पुस्तकात वाचले होते!  (&तेव्हापासूनच जिल्पीची ओढ होती)

नंतर असेच वाचताना राऊ कादंबरी,वऱ्हाड चा इतिहास यातही याचा उल्लेख आला आहे! गाविलगड-नरनाळा यांच्या बद्द्ल वाचताना पन इंग्रजांनी जिल्पी पाडून टाका असला उल्लेख आहे!! व जायच्या अगोदर  अकोल्याचे आमचे नविन पन इतिहास व मेळघाट प्राणप्रिय असलेले मित्र संदीप सरदे सर यांनी पन तुम्ही नक्की जा! इतिहास भेटला नाही तर निसर्गबघा असे सांगीतले होते! 

व सर्वात मोठा तोफगोळा तर  गाडीतच इंगळे सर नि टाकला होता ते धारनी ला होते काही दिवस तेव्हा नेहमी यायचे या तापी किनारी या किल्ल्याच्या पायथ्याशी,!

आमची 🚗गाडी नदिकिनारी लावली! तेथून तापी माय लैच मोठी दिसत होती! जुन महिन्यात ऐवढे पानी???? हाच धक्का होता! बरिच टोळके मासेमारी,झिंगे पकडत होती मि सहज सिट्टी मारली, यातली बरीच मंडळी सिट्टी च्या आवाजाने! घाबरली होति बहुदा काही झन थेट MP मधेच गेली! तापि नदी सिमारेषा आहे, पलीकडिल काठ MP तर अलिकडे आपण! सिट्टी चा आवाज ऐकून मागून एक जोडपे झुडपातुन निघले शाहजा-मोतीबे-गम चे वारसच😝😝😝

हे असे काही असले कि लैच कौतुक वाटते! जिथे निसर्ग,इतिहास अभ्यासक, भटके लोक भेटायला पाहिजे तिथे हे असले साळीन्दर प्राणी भेटतात! 

थोड समोर गेलो आणि खडकावरुन अप्रतिम गाडगा,माधवा व तापी नदीच्या संगमावरचा किल्ला दिसत होता! ऐवढ्यात मिलिंद भौ म्हने राव तुम्ही किल्ल्यावर जा इथे *Rivar lapwing* 🐧 दिसन्याचे चांस आहे! त्यांना तथास्तु म्हणून आम्ही गाडगा नदीच्या पात्रातुन चालने सुरु केले! आणि थोडस समोरच दोनपक्षि जोडीने अगदी जवळुन उडाले तेच होते rivhar lapwing (मायबोलीत नदी टिटवी)

👀 *इतिहासाच्या चस्म्यातुन व सद्यस्थिती!!*👀

चश्मा आता लावावा तरी कोनता????

आमनेरचा हा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळतच नाही.पन विटा चुना वापरुन, व याची राजस्थानी बनावटीचा हा किल्ला १४व्या ते १५व्या शतकापासुन अस्तित्वात असावा.असे सहज वाटते! मागे कुठे तरी "आइ-ने-अकबरी" मधे याचा उल्लेख आला होता! तर बाजीरावपेशव्यांचा  मुक्काम हि या किल्ल्यात झाला आहे! नंतरच्या काळात तात्या टोपे या रणझुंजाराने बऱ्याचदा आश्रय घेतलाय या किल्ल्यात! याचीच धास्ती इंग्रजांनी घेऊन किल्ल्याची ऐसी-तैसी केल्याची शंका येते! 

ऐवढे मात्र नक्की की

काळाच्या उदरात असंख्य आठवणी, असंख्य गोष्टी, असंख्य रहस्य असंख्य वास्तू जस्या सामावलेल्या असतात. त्यापैकी काही परिचित असतात तर काही गोष्टी अपरिचितच राहतात. बस त्याचाच प्रत्यय इथेच येतो!!

सद्यस्थिती……!!!!

अतिशय बिकट आहे!

जसे की एखादा म्हातारा १००रि ओलांडुन बसावा! स्मशानात त्याची लाकडे जमा व्हावी, & त्याचेच गनगोत सतत घडी बघून काहो किती वेळ आहे? असे सारखे-सारखे विचारावे ऐवढा दुर्दैवी हा किल्ला!!!! या परिसरात या किल्ल्याचे नाव काय आहे हे ही माहित नसलेल्या लोकांची आबादी जास्त आहे! त्यात आपले कुंभकरनीय पुरातत्त्व खाते?😡

काही खर नाही भौ!!!😷🤧🤢

 तीनही बाजुस पाणी आणि एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे

गडगा नदीच्या काठावरुन आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याकडे केविलवाणी बघतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे इथे गुप्तधन वाल्याचा उन्माद दिसून येतो!

चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी लैच उलुस(कमी) आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.या किल्ल्यास ८ बुरुज असून त्यापैकी ७ शाबुत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरुज भग्न झाला आहे.काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतुन याचा पाया मजबुत करण्यात आलेला आहे.यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज होते आता  सात राहिलेत* तापी, माधवा आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरुन नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे. तटबंदी  वरुन चालताना ऐका बाजुने व कोपर्यात🛳🛳🚢 टायटानिक चा प्रसंग आठवतो! पन असे करताना आपला कार्यक्रम होण्याची शक्यता जास्त आहे आता!!

खरे म्हंजे आजवर साधा बुरूज, पडका वाडा, जुन दगडी बांधकाम जरी दिसल तरि मला चिक्कार आनंद व्हायचा पन इथे हे सर्व पाहुन खुप दुख झाल!!! या नदी पात्रात होणाऱ्या अवैध वाळु उपस्याचा  थोडा  जरी पैसा शासनाने जिल्पी वर खर्च केला तर हा जिल्पी एक भव्य पर्यटनस्थळ बनु शकते!

पन करनार कोन?????

 हे सर्व बघून झाल्यावर आम्ही खाली आलो समोर MP मधे खुप सारा पाऊस सुरु होता! 

तिकडे मिलिंद भौ ने अथकप्रयत्नाअंति नदी टिटवी ला कैमेर्यात कैद केलेच!!! 

हि टिटवी नदीच्या वाळवंटी भागातच आढळते! बाकीआम्ही पहिल्यांदाच बघितल्याने हेहि अविस्मरणीयच!!! 

जाता जाता आम्ही मेळघाट मधून गेलो!  या मेळघाट बद्दल काय बोलावे या साठी आम्ही वैदर्भीयांनी थेट अमिताभ बच्चन ला नियुक्त केले आहे!!!😉 *ते सारखे म्हनत असतात मेळघाट नही देखा तो क्या देखा???* हरिसाल वरुन आम्ही बेलकुंड- कोहा- खटकली मार्गे अकोला पोचलो या रोडने इंग्रजांनी बनविलेले किमान १६० च्या वर पुल आहेत! 

पुलाच्या वर्णनासाठी कोनतरी दुचाकीवर पाहिजे😘घट्ट आवळुन😍 मग सारखा आवाज येइल अहो हळु चालवाना किती भयानक घाट आहेत👰🏻 हे!!!

 पन आमच्या नशिबी जवळपास मित्रच असतात जुने मित्र गाडी देत नाहीत! & नवीन मित्र सारखे-सारखे बोंम्ब्लत असतात! 🤣🤣 ये आरे जिव घेत का???? 

पहिलाच टुर शेवटचा करतो का???

असल बरेच काही!!!!

असो…………!!!

तसे मि काही लेखक मुळीच नाही! पन आनंद वाटून घेन्याची जुनी सवय आहे! त्यातही प्रत्येक प्रवास हा शेवटचा समजुन करत असतो हा प्रवासही नेहमीचाच आहे आणि जायचे पन कुठेच नाही🤓!!!

& तोच शब्दात मांडला आहे जास्त काहीच!!!

शेवटी 

जाता जाता

लाइक ओर कमेंट की किसको पड़ी है जनाब

बस पढ़ के मुस्कुरा दिया आपने

समझना मेरी मेहनत सफल हो गयी.

👍🏼🤣!!!

कळावे……!!!!

लोभच असावा! 

✍🏽निखील माळी-गोरे🐾

||मर्यादेय विराजते||

 बऱ्हाणपूर-जिल्पी आमनेर मोहीम चे समस्त फोटो..!

https://photos.app.goo.gl/Z6RyTeNEmsYtEYzf8

Popular posts from this blog 









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...