Tuesday, March 18, 2025

उत्तर कर्नाटक

 कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

Submitted by जिप्सी on 13 November, 2011 - 15:06

दिवाळीत सलग ५ दिवसांची सुट्टी आली होती, पण ऐन दिवाळीत घर सोडुन जाणे पसंत नसल्याने पाचही दिवस घरीच होतो. अर्थात याच्या बदल्यात कुठेतरी जाऊन यायचे हा प्लान होताच ;-). मागे उत्तरांचल भटकंती करून आलो तेंव्हाच परत एकदा नोव्हेंबरमध्ये तेथे येण्याचे आमंत्रण मिळाले होते. पण एकदा जाऊन आल्याने आता दुसर्‍या ठिकाणी जायचे मन करत होते. एक मित्र खानापूरचा (बेळगाव) असल्याने त्याच्याकडे जाण्याचा प्लान ठरला. मीही हा परीसर पाहिला नसल्याने पटकन तयार झालो. आधी ८-९ दिवसाचा प्लान ठरला, पण एका मित्राचा सुट्टीचा प्रॉब्लेम असल्याने एकुण ६ दिवसाचा प्लान केला गेला. यात बेळगाव (राजहंसगड, कलावती आई मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बेळगाव किल्ला, कमलबस्ती, कणबर्गी, गोकाक फॉल), हळशी, कित्तुर (कित्तुर किल्ला, कमल नारायण मंदिर), सौंदत्ती (यल्लमा मंदिर, पारसगड, हुळी येथील प्राचीन मंदिर), गोकर्ण, ओम बीच, इडगुंजीचा गणपती, याना हिल्स, सिरसी, मुरूडेश्वर, कारवार (धावती भेट) अशी ठिकाणे कव्हर केली. फुल्ल टु धम्माल आणि भरपूर फोटोज  अशा प्रकारे हि भटकंतीसत्कारणी लागली.

याच भटकंतीतील काहि निवडक फोटो मालिकेच्या स्वरूपात मायबोलीकरांसाठी घेऊन येत आहे.

फोटो आवडले तर नक्की देऊन सोडा बघा कि वो .................... प्रतिसाद म्हणतो मी. काय समजलेत 

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
(क्रमश:)

उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

Submitted by जिप्सी on 15 November, 2011 - 13:16

भाग १ —
कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

===============================================
===============================================
ठरल्याप्रमाणे शनिवारी ५ तारखेच्या रात्री निघुन पहाटे बेळगावात पोहचलो. मित्राचे घर बेळगावपासुन साधारण ४० किमी अंतरावरील खानापूर तालुक्यातील गुंजी या गावात होते. आंघोळ, नाश्ता करून तासभर विश्रांती घेऊन लगेचच बेळगाव परीसरातील भटकंती केली.

राजहंस गड
बेळगाव जिल्ह्यातील येल्लुर गावी असलेल्या या किल्ल्याला येल्लुरगड असेही म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याकडील पोर्तुगीज व कोकणातील जंजिर्‍याच्या हबशांच्या फौजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोकण व गोवा सरहद्दीजवळ असणा‍र्‍या अनेक किल्ल्यांचा खुबीने उपयोग करून घेतला होता. चंदगड तालुक्यात असणारा कलानंदीगड व महिपाळगड, बेळगांव तालुक्यातील राजहंसगड, खानापूर तालुक्यातील भीमगड, पारगड, गडहिंग्लज तालुक्यातील सामनगड, हिक्केरी तालुक्यातील वल्लभगड, आणि सौंदती तालुक्यातील पारसगड या आठ गडांचा उपयोग छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी करून घेतला होता. या प्रत्येक गडावरून दुसरा गड दृष्टिपथात येत असल्याने एका गडावरून दुसर्‍या गडावर सांकेतिकपणे संदेश देणे सहज शक्य होत असे [ संदर्भ: वल्लभगड, विकिपिडीया]. याव्यातिरीक्त किल्ल्यासंबंधी जास्त काही माहिती नाही.
या किल्ल्यावर "बॉक्साईट" सापडल्याने खोदकाम चालु आहे अशा बातम्या सध्या स्थानिक वर्तमानपत्रात वाचावयास मिळत आहे. Sad

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
कमल बस्ती (बेळगाव किल्ला)
शहराच्या मध्यभागी असलेला हा परीसर मिलिट्रीच्या ताब्यात आहे. एक तटबंदी सोडल्यास किल्ला म्हणावा असा आतील परीसर वाटला नाही. सुरूवातीलाच दूर्गामातेचे एक सुंदर मंदिर आहे. तेथे स्थानिक लोक लिंबाच्या सालीत दिवे लावून ते देवीला अर्पण करत होते (फोटो काढण्यास बंदी :(). येथुनच थोडे पुढे जैन समुदायाचे भगवान पार्श्वनाथाचे एक सुंदर मंदिर आहे, हेच कमल बस्ती. १२०४ सालातील चालुक्य शैलीतील हे मंदिर आहे. मुख्यमंडपात छतावर कोरलेले एक भव्य आणि अतिशय देखणे "कमळ" पाहण्यासारखे आहे. यावरूनच याला कमलबस्ती हे नाव पडले असे सांगण्यात आले (फोटो काढण्यास बंदी :(). हे मंदिर उत्तम वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
मलप्रभा नदीकिनारीचे गाव "असोगा"
तुम्हाला "अभिमान" चित्रपटातील "नदिया किनारे हे राई, आई कंगना, ऐसे उलझ गए, अनाडी सजना"
हे जया भादुरीवर चित्रीत केलेले गीत आठवतंय का? या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण मलप्रभा नदिकिनारी असलेल्या या भागात केले आहे. अतिशय निसर्गरम्य आणि शांत असा हा परीसर खानापूर रेल्वेस्टेशनजवळ आहे. नदीच्या पाण्यात विकएण्ड साजरा करण्याकरीता सध्या येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते. येथील प्रसिद्ध शंकर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे.
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
बेळगावातील प्रसिद्ध मिलिटरी महादेव मंदिर आणि परीसर

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
खानापूरजवळील एक धरण

प्रचि २४

प्रचि २५
कणबर्गी
मायबोलीकर म्हमईकर यांनी आवर्जुन पहा असे सुचवलेले, बेळगाव - गोकाक रस्त्यावरील (बेळगावपासुन साधारण १० किमी अंतरावर) हे एक शांत आणि निसर्गरम्य महादेवाचे मंदिर. एका टेकडीवर हे मंदिर वसले आहे. सध्या या मंदिरात आणि पूर्ण टेकडीवरच भरपूर मधमाशा आणि मधाची पोळी असल्याने आम्हाला वर मंदिरात न जाण्यास एका पहारेकर्‍याने सांगितले. येथे एकाच नारळाला तीन फांद्या फुटल्याचे त्याने दाखवले. या चमत्काराला आणि माडाच्या झाडाला "ब्रह्मा, विष्णु आणि महेश" असे संबोधतात.

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
माडाचे झाड
प्रचि ३०
गुंजी गावातील श्री माऊली देवीचे मंदिर

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

बेळगाव फिरून फिरून दमला कि वो, तवा खाऊनच सोडा म्हणतो कि मी .......कुंदा, पेढे आणि कर्दंत वो. काय समजलेत Proud

बेळगावातील प्रसिद्ध "कुंदा"
प्रचि ३४
प्रसिद्ध "धारवाडी पेढे"
प्रचि ३५
गोकाकचा प्रसिद्ध "कर्दंत"
प्रचि ३६
(क्रमश:)

उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

Submitted by जिप्सी on 16 November, 2011 - 13:25

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

===============================================
===============================================
बेळगाव जिल्ह्यापासुन साधारण ७०-७५ किमी अंतरावरील सौंदत्ती तालुक्यात श्री यल्लमा (रेणुका) मातेचे मंदिर आहे. कन्नड भाषेत "यल्ला" म्हणजे "सर्व" आणि "अम्मा" म्हणजे "आई" यल्लमा म्हणजे "सर्वांची आई" :-). देवीच्या शक्तीपीठांपैकी एक मानले गेलेले हे मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याला यल्लमाचा डोंगर असे म्हटले जाते. बहुतेक लोकांची कुलदेवत असलेल्या या देवीच्या मंदिरात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला येथे भाविकांची खुप गर्दी असते.

श्री यल्लम्मा देवी मंदिर आणि परीसर
प्रचि ०१
रेणुकासागर जलाशय
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
अरीषण कुंड
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

===============================================
===============================================

सौंदत्तीजवळच "हुळी" या गावात "पंचलिंगेश्वराचे" अतिशय देखणे आणि पुरातन मंदिर आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. याच परीसरात अजुन दहा एक पुरातन मंदिर भग्न अवस्थेत आहे.
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
(क्रमश:)

 पारसगड (सौंदत्ती किल्ला)

Submitted by जिप्सी on 17 November, 2011 - 12:56

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

===============================================
===============================================
उत्तर कर्नाटकच्या तिसर्‍या भागात आपण भेट देणार आहोत ते सौंदत्ती शहरातील पारसगड या ठिकाणाला. पुणे-बंगळुरू हायवेपासुन (सौंदत्ती एक्झिट) काही अंतरावर सौंदत्ती शहर येण्याच्या आधीच हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. या गडाच्या नावावरून पूर्वी सौंदत्ती शहराला पारसगड हे नाव होते. शहरापासुन अगदी जवळच एका टेकडीवर पारसगड वसला आहे. या किल्ल्याचा इतिहास काही माहित नाही. भर शहरात असुनही किल्ल्याच्या आत कमालीची शांतता आणि गारवा आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात मंदिर आहे. मंदिराच्या काही भागाला सफेद रंग लावल्यामुळे त्याचे मूळ सौंदर्य कमी होत आहे. गडाच्या भक्कम तटबंदीवरून संपूर्ण किल्ला, प्रत्येक कोनातुन न्याहळता येतो, फोटो काढता येतात :-). किल्ल्यावरून सौंदत्ती शहराचे, एका धरणाचे विहंगम दृष्य पहाता येते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(क्रमश:)

नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

Submitted by जिप्सी on 17 November, 2011 - 14:03

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

===============================================
===============================================
कदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी "हलशी". बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. येथील १२व्या शतकातील पुरातन नृसिंह-वराह हे एक देखणे मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.
या मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल कासव आहे. एका गाभार्‍यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या समोरच्याच गाभार्‍यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय देखणी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिराला अवश्य भेट द्या. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

मुख्य मंदिरापासुन जवळच असलेले भग्नावस्थेतील एक पुरातन शिवमंदिर.
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
(क्रमश:)

खानापूर-रामनगर रस्त्यावर खानापूरच्या साधारण १०-१२ किमी नंतर नंदगड गावाला जायचा फाटा आहे. खानापूरात नंदगडला जायचा रस्ता विचारायचा. खानापूरहून दर १ तासाला नंदगड-हलशीसाठी टेम्पोही मिळतात. स्वतःचे वाहन असेल, तर सरळ या गाड्यांच्या मागे जाणे हा उत्तम पर्याय! हलशीला जायला व्हाया नंदगड जावे लागते. नंदगड-हलशी अंतर जेमतेम ६-७ किमी आहे.

जिप्सी फोटो भन्नाट आले आहेत. इतक्या वेळेला हलशीला जाऊनसुद्धा एवढे बारकाईने कधीच फोटो काढले नाहीत. लहानपणी बर्‍याचदा जायचो हलशीला, पण त्यावेळी मंदिर आणि परिसर याचा एकच उपयोग माहित होता... क्रिकेट/लपाछपी खेळणे :).... नाही म्हणायला प्रचि २ मधल्या विहीरीचा वापर गणपती विसर्जनासाठी व्हायचा, हल्लीच हा परिसर पुरातत्व विभागाकडे गेलाय. त्यामुळे विहीरीत गणपती विसर्जनाला बंदी आहे.

नृसिंह मंदिरातील नृसिंहाची मूळ मूर्ती (ही मूर्ती प्रचि ५ च्या गाभार्‍यातच आहे) :-
Optimized-DSC02764.JPG

नृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली.

प्रचि ३ मधला रथ लाकडी आहे. हलशीमधे दर १२ वर्षांनी लक्ष्मीची जत्रा असते, तेव्हा हा वापरतात. वर उल्लेखलेल्या नंदगड गावातही असाच रथ आहे. पण तो प्रचि ३ मधल्या रथाच्या दुप्पट ते तिप्पट आकाराचा आहे. Happy

अजून माहिती आठवेल तशी लिहिन

गोकाक

Submitted by जिप्सी on 18 November, 2011 - 13:39

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

===============================================
===============================================

मायबोलीकर सुनिल परचुरे आणि साधना यांचे गोकाक फॉल्सचे काही फोटो मायबोलीवर पाहिले होते. त्यामुळे भारताचा नायगरा असा ज्याचा उल्लेख होतो त्या गोकाक फॉल्सला या उत्तर कर्नाटक भटकंतीत भेटण्याची फार उत्सुकता होती, पण प्रत्यक्षात तेथे गेल्यावर (नोव्हेंबरच्या सुरूवातीस असल्यामुळे कदाचित) नदीला पाणी फार कमी असल्याने अगदी नळ सोडल्यासारखे धबधबे दिसत होते, त्यामुळे थोडा मूड ऑफ झाला Sad . याच ठिकाणी १८ व्या शतकात उभारलेले भारतातील पहिले विजनिर्माण केंद्र आहे. गोकाक परीसरात काहि पुरातन मंदिरे देखील पाहण्यासारखी आहे. राईसमिल, कॉटनमिलदेखील आहेत.

घटप्रभा नदीवरील झुलता पूल
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

घटप्रभा नदी आणि परीसर
प्रचि ०४

नोव्हेंबर महिन्यातच पाणी इतके कमी Sad
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
भारतातील पहिले विजनिर्माण केंद्र

प्रचि १५

प्रचि १६

गोकाक रस्त्यावर हे असे अंगावर येणारे मोठ्ठाले दगड भरपूर दिसतात. Happy
प्रचि १७

फोटोसाठी बेस्ट स्पॉट Wink
प्रचि १८

घटप्रभा नदी
प्रचि १९

खानापुरच्या मित्राने काढलेले आधीचे गोकाक फॉल्सचे फोटो Happy
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

येथील शंकर मंदिर आणि परीसरात बुचाची झाडे मस्तपैकी बहरली होती. त्यांचा धुंदकुंद सुवास वातावरण खरंच प्रसन्न करत होते.
बुचाची फुले/आकाशमोगरा/गगनजाई
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

श्री शंकर मंदिर
प्रचि २७

शिवलिंग
प्रचि २८

प्रचि २९

१८८७ सालातील एक मिल
प्रचि ३०
(क्रमश:)

कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

Submitted by जिप्सी on 18 November, 2011 - 14:38

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

===============================================
===============================================

"कित्तुर" गावचे नाव घेताच सर्वप्रथम आठवते ते स्वातंत्रसंग्रामातील रणरागिणी "राणी चेन्नमा". कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.
कित्तुरचे युद्ध:
त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते.
(साभार: विकिपिडिया)
सध्या या किल्याचे नूतनीकरण चालू आहे. याच परीसरातील एका संग्रहालयात स्वातंत्र्यसंग्रमातील वस्तु आणि पुरातन मूर्ती ठेवल्या आहेत.

म्युझियमच्या बाहेर हा आवेशातील "राणी चेन्नम्मा" यांचा पूर्णाकृती पुतळा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

===============================================
===============================================
देवगाव येथील कमल नारायण मंदिर
कित्तुर शहरात प्रवेश करण्यापूर्वी (खानापूरहुन) साधारण ५ किमी अंतरावरील देवगावात (देग्राम किंवा देगाव) कदंब शैलीतील अजुन एक पुरातन "कमल नारायण" मंदिर आहे. १२व्या शतकातील हे मंदिर कदंब राजवटीत बांधले आहे. कदंब राजवटीतील राजा शिवचित्ता यांची पत्नी राणी कमलादेवी यांनी हे मंदिर बांधुन घेतले आहे.

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

मंदिराच्या छतावरील या कमळाचे सौंदर्य कॅमेर्‍यातही मावत नव्हते Happy
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

मंदिराशेजारील एका घरात हे कारागिर दगड आणि लाकुड यांना तासुन सुंदर कलाकृती निर्माण करत होते. Happy

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(क्रमश:)

 इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर

Submitted by जिप्सी on 20 November, 2011 - 23:26

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)
===============================================
===============================================
बेळगाव, गोकाक, कणबर्गी, हळशी, कित्तुर, सौंदत्ती अशी खानापूरच्या जवळची ठिकाणे बघुन झाल्यावर आम्ही कोस्टल कर्नाटक सफरीवर निघालो. या सफरीत आम्ही मुख्यत्वे गोकर्ण, मुरूडेश्वर, सिरसी, याना हिल्स या ठिकाणाला भेट देणार होतो. खानापूरहुन येल्लापूर-सिरसी मार्गे मुरूडेश्वरला जाता येते, रस्ताही चांगला आहे. मात्र आम्ही खानापुर - लोंढा - रामनगर - सुपा - कारवार मार्गे मुरूडेश्वरला जाण्याचे ठरवले. हा रस्ता सर्वांगाने निसर्गसौंदयाने बहरलेला आहे. सकाळच दाट धुकं, आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष, हिरवा, पिवळा, तांबडा साज ल्यायलेली भात शेती, निळे आकाश निळे पाणी, दाट झाडीतुन जाणारा नागमोडी वळणाचा रस्त असा निसर्गाचा सारा नजारा या वाटेवर होता. या मार्गावरचे बरेचसे प्रचि माझ्या कलर्स ऑफ उत्तर कन्नडा या धाग्यात आहे. Happy

त्याची एक झलक:

यातील पहिले ठिकाण गोकर्ण करून मुरूडेश्वरला एक दिवस राहून दुसरा दिवस याना हिल्स, सिरसी असा आमचा प्लान होता. गोकर्णला साधारण दिड दोनच्या सुमारास पोहचलो पण गोकर्ण महाबळेश्वर मंदिर दुपारी १२:३० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद असते हे माहित नसल्याने दर्शन झाले नाहे. :(. ५ वाजेपर्यंत थांबण्यात काही अर्थ नव्हता म्हणुन आम्ही तडक मुरूडेश्वरला निघालो. वाटेत इडगुंजीच्या उभा गणपतीचे दर्शन घेतले. मुरुडेश्वरला एक रात्र राहुन दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर परत गोकर्णला आलो.

इडगुंजी गणपती मंदिर आणि परीसर
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
मंदिरात मूळ मूर्तीचा फोटो काढण्यास बंदी असल्याने हा फोटोचा फोटो Happy
प्रचि ०५

प्रचि ०६
कोकण रेल्वे Happy
वाळ्याच्या गवतापासुन केलेले हे शोपीस
प्रचि ०७
गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची कथा:
रावण हा मोठा शिवभक्त होता. शंकराकडुन आत्मलिंग मिळवण्यासाठी त्याने कठोर तपस्या सुरू केली होती. पण शंकर कही प्रसन्न होत नव्हते, शेवटी त्याने आपले एक-एक शिर कापून समर्पित करावयास सुरूवात केली. भोळा शंकर त्याच्या कठोर तपस्येवर प्रसन्न झाले आणि त्याला "आत्मलिंग" दिले. मात्र भगवान शंकराने रावणाला आत्मलिंग देताना एक अट घातली होती, ""कैलासाहून लंकेत जाईपर्यंत जर तू हे माझे आत्मलिंग कुठेही भूमीवर खाली ठेवलेस तर, ते तेथेच घट्ट रूतून बसेल!''. आत्मलिंग मिळाल्यावर रावणाची शक्ती अजुन वाढेल याची देवांना जाणीव होती म्हणुनच त्यांनी श्री गणेशाला यावर मदत करण्यास विनवणी केली. यावर श्री गणेशाने एक उपाय सुचवला, रावण नियमित संध्यापूजा करावयाचा म्हणुन त्यांनी काही वेळ सूर्याला झाकोळुन संध्याकाळचा आभास निर्माण केला. रावण न चुकता संध्यापुजा करावयचा पण त्यावेळी हातात आत्मलिंग असल्याणे धर्मसंकटात सापडला. तितक्यात रावणाला विघ्नहर्ता श्रीगणेश एका बाल गुराख्याच्या वेषात गुरे राखताना जवळच दिसला. रावणाने या बाळ गुराख्यायाला बोलावून त्याच्याजवळ शिवाचे आत्मलिंग थोडावेळ सांभाळण्यासाठी दिले. आणि "जमिनीवर ठेवू नकोस" असे त्याला बजावलेही. परंतु त्याचवेळी त्या गोपाळरूपी गणेशानेही रावणाला एक अट घातली, ""हे जड लिंग मला असह्य झाले तर मी मी तुला तीन वेळा हाक मारेन आणि तु नाही आलास तर लगेच खाली भूमीवर ठेवीन. लवकर ये!'' रावण पूजेस बसला आणि काही वेळाने गुराख्याच्या रूपातील गणेशाने त्याला हाक मारली, परंतु रावण काही वेळेवर परत आला नाही आणि गणेशाने देवांना संकटमुक्त करण्यासाठी एक देवकार्य म्हणून ते शिवाचे आत्मलिंग तेथेच भूमीवर ठेवले. थोड्या वेळाने रावन तेथे परत आला आणि शिवलिंग जमिनीवर पाहून संतप्त झाला. त्याने ते भूमीवरून खेचुन काढण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या ओढाताणीत शिवलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा झाला. हेच ते कर्नाटकातील प्रसिद्ध "गोकर्ण महाबळेश्वर" मंदिर. कर्नाटकातील सात मुक्तीस्थळांपैकी एक असलेले हे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर कदंब आणि चालुक्य मंदिर शैलीचाही प्रभाव दाखवतो.

गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात आणि परीसरात फोटोग्राफिला बंदि असल्याने फोटो काढता आले नाही. येथे हिंदू धर्माव्यतिरीक्त इतरांना प्रवेश बंदी आहे. येथे परदेसी पर्यटकांनाही मंदिरात प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी आहे. Sad
गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात खुपच छान दर्शन झाले, गाभार्‍यात असलेल्या खळग्यात हात घातला असल्यास गाईच्या आकाराच्या शिवलिंगाचा स्पर्श जाणवतो. Happy

गोकर्णचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
एक घर
प्रचि ०९
श्रद्धा आणि विज्ञान Happy
प्रचि १०
ओम बीचवर जाताना रस्त्यावर हा दिसला Happy
प्रचि ११

प्रचि १२
ओम बीच
गोकर्ण येथुन साधारण ६-७ किमी अंतरावर स्वच्छ आणि नितांत सुंदर "ओम बीच" आहे. या समुद्रकिनार्‍याचा आकार "ओम" सारखा असल्याने याला हे नाव पडले.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(क्रमश:)

मिरजान किल्ला

Submitted by जिप्सी on 22 November, 2011 - 13:24

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर
===============================================
===============================================
कधी कधी असं होतं कि एखाद ठिकाण लिस्टमध्ये नसताना अचानक समोर येतं आणि हे नसंत पाहिलं तर काही तरी मिस केलं असत असं सहजच वाटुन जात. मिरजान किल्ला आमच्या कर्नाटक सफरीच्या लिस्टमध्ये नव्हताच. आंतरजालावरून उत्तर कर्नाटकची माहिती घेतानाही याचा उल्लेख कुठेच आढळला नाही. गोकर्णला आदल्या दिवशी मंदिर बंद असल्याने दर्शन झाले नाही म्हणुन आम्ही मुरूडेश्वरला गेलो. एक रात्र तेथे राहिल्यावर दुसर्‍या दिवशी दुपारी १२ च्या आत गोकर्णला पोहचायचे म्हणुन सकाळीच निघालो. मुरूडेश्वर - कारवार रस्त्यावर कुमटा गावाच्या आधी डावीकडे माझी नजर एका बोर्डवर गेली वर "मिरजान फोर्ट" एक किमी असे लिहिले होते ("चोराची नजर बोचक्यावर आणि भटक्याची नविन ठिकाणावर Proud "). हे ठिकाण लिस्टमध्ये नसल्याने गाडी वेगात गोकर्णला जात होती. पुढे जाऊन परत यु टर्न घेऊन गाडी मिरजान गावात शिरली आणि दृष्टीस पडला अत्यंत देखणा असा हा "मिरजान किल्ला". नॅशनल हायवेपासुन फक्त एक किमीच आत असुन तास-दिडतासात सहजच बघुन होतो. तेंव्हा या ठिकाणची भटकंती करत असाल तर आवर्जुन या भुईकोट किल्ल्याला भेट द्या. Happy

मिरजान किल्ल्याचा इतिहास विकिपिडियावर येथे वाचण्यास मिळेल. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
दूर्गदेवता
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
(क्रमश: :-))

सिरसी (सहस्त्रलिंग)

Submitted by जिप्सी on 24 November, 2011 - 13:05

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर

९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला

१०. उत्तर कर्नाटक (९) — याना हिल्स

===============================================
===============================================
उत्तर कर्नाटकच्या गेल्या भागात आपण पाहिला नैसर्गिक चमत्कार "याना हिल्स" आणि आता या भागात पाहणार आहोत मानवी चमत्कार सिरसी येथील सहस्त्रलिंग. कुमटा पासुन साधारण ६०-६५ किमी आणि याना हिल्सपासुन ४० किमी अंतरावर उत्तर कन्नडा येथील एक आकर्षक पर्यटनस्थळ सिरसी हे शहर आहे. थंड हवामानामुळे येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ सुरू असते. शहराच्या मध्यभागी १६व्या शतकातील दाक्षिणात्य शैलीतील श्री मारिकांबा देवीचे सुंदर मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला भक्तांची नेहमीच गर्दी असते. येथे एका उल्लेख आवर्जुन करावासा वाटतो, आम्ही मरीकांबा देवीच्या दर्शनाला गेलो असता तेथे कर्नाटक पोलिंसाच्या खुप गाड्या आल्या होत्या. चौकशी केल्यावर कळले कि कर्नाटक राज्याचे वनमंत्री सी. पी. योगेश्वर येथे दर्शनासाठी येणार आहेत. आम्हाला वाटले कि आता १-२ तास दर्शन बंद करणार, पण तसं काही झालं नाही, भाविकांना देवीच्या दर्शनासाठी ताटकळत ठेवले नाही. मंत्र्यांच्या बरोबरीनेच इतर भाविकांनाही देवीच्या सभामंडपात सोडण्यात आले. आम्हीही वनमंत्र्यांच्या बरोबरीनेच देवीचे दर्शन घेतले. Happy राजकीय नेते, सेलिब्रीटी यांच्यासाठी इतर भाविकांना ताटकळत न ठेवता त्यांच्यासोबतच दर्शन घेण्यास देत असलेल पाहुन छान वाटलं. Happy

सिरसी - येल्लापूर मार्गावर सिरसीपासुन साधारण १५किमी अंतरावर आणि मुख्य रस्त्यापासुन १ किमी आत शाल्मला नदितील शिळांवर एक हजार शिवलिंग कोरलेली आहे. हा एक मानवनिर्मित चमत्कारच. याची कथा अशी कि, पूर्वी कोण्या एका राजाला मुलबाळ नव्हते, म्हणुन त्याने शिवाची आराधना केली. त्याला स्वप्नात दृष्टांत झाला कि एक हजार शिवलिंग कोरून घे आणि त्याची पूजा कर. त्या राजाने शाल्मल नदीच्या पात्रात असे एक हजार शिवलिंग कोरून त्याची पूजा केली आणि त्यास पुत्रप्राप्ती झाली. नदीच्या खळाळत्या पात्रातील ते असंख्य शिवलिंग पाहुन आपणही त्या शिवलिंगाना कोरणार्‍या अनामिक कारागिरांपुढे नतमस्तक होतो.

येथुन थोडे पुढे आल्यावर शाल्मला नदीवर एक झुलता पूल दिसतो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिमरीत्या या पुलाची निर्मिती केली आहे.

श्री मारिकांबा देवीचे प्रशस्त मंदिर (मुख्यद्वार)

सभागृह (देवीचे फोटो काढण्यास मनाई होती. Sad )

श्री मारिकांबा मंदिरासमोरच असलेले दाक्षिणात्य शैलीतील एक शिवमंदिर
सहस्त्रलिंग
झुलता पूल
शाल्मला नदी
(क्रमश: — पुढिल अंतिम भागात "सफर मुरुडेश्वराची

 याना हिल्स

Submitted by जिप्सी on 23 November, 2011 - 13:20

[या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर

९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला
=======================================================================
=======================================================================
उत्तर कर्नाटक भटकंतीच्या "मिरजान किल्ला" या भागात सांगितल्याप्रमाणेच काहि ठिकाणे आपल्या पूर्वनियोजित प्लानिंगमध्ये नसतात पण त्या ठिकाणाला भेट दिल्यावर नकळतच "व्वाह" असे उद्गार निघतात. मिरजान किल्ल्याप्रमाणेच अजुन एक ठिकाण म्हणजे "याना हिल्स". कारवार-मुरूडेश्वर हायवेवर कुमटा या गावापासुन एक रस्ता सिरसीला जातो (सिरसीपासुन याना हिल्स ४०किमी अंतरावर आहे). तेथुनच जवळ गर्द वनराईत लपलेले हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासुन सोळा किमी आत (वळणावळणाचा रस्ता असल्याने सोळा किमीहि जास्त वाटतात :-)) याना हिल्सचा पायथा आहे. पायथ्याला गाडी उभी करून अंदाजे दोन अडीच किमीची चढण चढुन आल्यावर सर्वात उंच भैरवेश्वरा शिखर (उंची १२० मी.) आणि मोहिनी शिखर (उंची ९० मी.) असे निसर्गाचे दोन चमत्कार दिसतात. या दोन अडीच किमीची प्रवासात आपल्याला साथ देतात ते उंचच उंच दाट झाडी, सोबत वाहणार्‍या नदीचे खळाळते पाणी, आपल्या अवतीभोवती बिनधास्तपणे बागडणारी फुलपाखरे (आम्हाला येथे ब्लु मॉर्मनने अगदी मनभरून दर्शन दिले, त्याच्या चंचलपणामुळे कॅमेर्‍यात बंदिस्त करता आले नाही पण आठवणीत मात्र कायमचे बंदिस्त केले. :-).), विविध पक्षी आणि निरव शांतता. याना हिल्सच्या जंगलात विविध प्रकारची मसाल्याची झाडे आहे, माझ्या अज्ञानामुळे मला फक्त तेजपत्त्याचे झाड ओळखु आले. Sad तासादिडतासाची हि चढण पार करण्यासाठी काहि ठिकाणी व्यवस्थित पायर्‍या आणि रेलिंग लावले आहेत. विशेष उल्लेख करावासा वाटतो कि मला या ठिकाणी गुटख्याची पाकिटे, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा/पेपर प्लेटचा कचरा, पान/गुटखा खाऊन मारलेल्या पिचकार्‍या असं काहीही दिसलं नाही. Happy
हाताशी वेळ कमी असतानाहीआवर्जुन जाऊन आलो नाहीतर या जागेला भेट दिली नसती तर काहितरी खुप सुंदर पाहण्याचे राहुन गेल्याची रुखरुख राहिली असती. उंचच उंच शिखरे आणि त्यांच्या पोटातली गुहा यामुळे उत्तर कर्नाटक भटकंतीत आवर्जुन पहावी अशी हि जागा आहे.

प्रचि ०१
गर्द सभोती रान

प्रचि ०२
आकाशाशी स्पर्धा करणारी वृक्षसंपदा

प्रचि ०३
तेजपत्ता

प्रचि ०४
गुळवेल

प्रचि ०५
पायर्‍या

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
रॉक हिल्स

प्रचि ०९

प्रचि १०
मोहीनी शिखर

प्रचि ११
भैरवेश्वरा शिखर

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
भैरवेश्वर शिखराच्या पोटातील गुहा

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

याना हिल्सबद्दल असलेल्या माहितीचा कानडी भाषेतला फलक (भाषांतर केल्यास मलाही कळवावे :फिदी:)
(क्रमशः)

मुरूडेश्वर

Submitted by जिप्सी on 25 November, 2011 - 13:38

उत्तर कर्नाटक भटकंतीचा हा शेवटचा धागा. इतर सर्व भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार आणि क्षमस्व.:-) क्षमस्व यासाठी कि पहिल्या "कलर्स ऑफ नॉर्थ कन्नडा" भागापासुन माझी "कर्नाटक एक्स्प्रेस" सुसाट सुटली. कधी दिवसाला एक तर कधी दोन असे धागे येऊ लागले. बर्‍याच जणांनी कळवले कि अरे जरा हळु हळू प्रदर्शित कर, निवांतपणे पाहु दे आणि जरा वृतांत लिहि Happy पण कसंय ना, एखादी नविन गोष्ट पाहिल्यावर लहान मुलांना जसे पटकन सगळ्यांना दाखवावेसे वाटते तसंच काहितरी माझे झाले (कोण म्हणतंय रे तिकडुन आता लहान आहेस का म्हणुन??? :फिदी:) आणि मालिकेचे भाग थोडे लांबले कि बघणार्‍याला आणि पर्यायाने धागाधारकाला थोडा कंटाळा येतो (काहि सन्माननीय अपवाद वगळता Happy ) हे माझे वैयक्तिक मत :-). त्यामुळे उत्तर कर्नाटक भटकंती करून आल्यावर लगेचच १० दिवसात कलर्स ऑफ... धरून एकुण ११ भाग प्रदर्शित केले. खरंतर खुप लिहायचे देखील होते पण भाषेच्या अडचणीमुळे त्या त्या जागेची व्यवस्थित माहिती मिळाली नाही. आंतरजालावरही फार कमी माहिती होती म्हणुन यावेळी(हि) लिखाण आखडते घेतले. Proud हि मालिका आवडत असल्याचे बहुतेकांनी प्रतिसादातुन, ईमेलमधुन, विचारपुशीतुन आणि प्रत्यक्ष फोन कॉल करून आवर्जुन सांगितले. असाच लोभ असु द्या. Happy

फक्त सहा दिवसाच्या या भटकंतीत तब्बल १७-१८ ठिकाणे पाहिली. यात मंदिरे (सौंदत्ती, कमलबस्ती, कणबर्गी, हलशी, कमल नारायण, हुळी, गोकर्ण, सिरसी, इडगुंजी), धबधबा (गोकाक), समुद्रकिनारे, (ओम बीच, गोकर्ण बीच, मुरूडेश्वर बीच), किल्ले (राजहंसगड, कित्तुर किल्ला, पारसगड, मिरजान किल्ला), नैसर्गिक चमत्कार (याना हिल्स), मानवनिर्मित चमत्कार (सहस्त्रलिंग-सिरसी) अशी सर्वप्रकारची भटकंती करून आलो. या सहा दिवसात वेगवेगळ्या जागा पाहिल्या, वेगवेगळी माणसे भेटली आणि खुप चांगले अनुभव आले. कमल नारायण मंदिरचा (कित्तुर) पूर्ण फोटो काढायाचा होता शेजारीच एक घर होते आणि घराच्या गच्चीवर जाण्यासाठी जीना. विचार आला कि ह्या घरावरून मंदिराचा पूर्ण फोटो व्यवस्थित येईल म्हणुन तिथेच बसलेल्या आजोंबाना वर जाऊ का विचारले (अर्थात भाषेची अडचण असल्याने खाणाखुणा करूनच) त्यांनी लगेचच परवानगी दिली फोटो काढुन आल्यावर त्यांनी घरी या असे निमंत्रण देऊन चहा पिण्याचा आग्रह केला. दुसरा अनुभव हुळी मंदिर परीसरातला. हुळीच्या मुख्य मंदिराचे दर्शन, फोटो काढुन झाल्यावर बसलो असता तेथे मंदिराची देखरेख करणारा आला आणि त्याने अशीच काहि सुंदर मंदिर येथुन जवळच असल्याची सांगुन आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी आला. व्यवस्थित माहितीहि दिली. याच्या बदल्यात कुठेही त्याने पैशाचा मोबदला मागितला नाही. अगदी शेवटपर्यंत तो हात हलवत आम्हाला निरोप देत होता. बेळगाव किल्ल्यातील कमलबस्ती या जैन मंदिराचा पहारेकरीहि असाच भेटला. माझ्या हातातील कॅमेरा पाहुन त्याने मंदिराच्या आत फोटोग्राफिला बंदी आहे असे सांगितले. उत्तरांचल भटकंतीतला अतिशय वाईट अनुभव पदरी असल्याने मी ताबडतोब कॅमेरा म्यान केला. तेंव्हा त्याने मोबाईलने फोटो काढण्यास परवानगी दिली. आम्ही मुंबईचे आहोत हे कळल्यावर त्याला कोण आनंद झाला. त्याने एकुण एक कोपर्‍यातील मूर्त्या आणि त्याची माहिती व्यवस्थित समजावून सांगितली. परत निघताना त्याने आत जाऊन खारीक साखरेचा प्रसाद आणुन दिला. निरोप देताना त्याने मला एक घट्ट मिठी मारली आणि पुढच्या वेळेस आलात तर मी नक्की पुरातत्व खात्याकडुन परवानगी काढुन तुम्हाला कॅमेरा आत नेण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले. Happy इथे फिरताना भाषेची थोडी अडचण जाणवली जुन्या पिढीतल्या लोकांना कन्नडच येत होती, पण तरूण पिढीला मात्र हिंदी थोडेफार कळत होते (बेळगाव, खानापुरात हि अडचण नाही जाणवली, मात्र अगदी छोटेसे गाव जिथे होते तेथे मात्र हि अडचण जाणवत होती).

त्रिपुरारी पौर्णिमेच्या संध्याकाळी आम्ही सिरसीहुन येल्लापुर मार्गे खानापुरला निघालो होतो. येल्लापुरला पोहचायला रात्र झाली होती. तो रस्ता दांडेली-अणशी अभयारण्याच्या जवळुन जात असल्याने अगदी घनदाट जंगलातुन पूर्ण चंद्राच्या साक्षीने अख्या रस्त्यावर आमचीच गाडी धावत होती. तो अनुभव वर्णनातीत. थोडावेळ गाडी थांबवून चालत जावे असे वाटत होते पण दांडेली-अनशी हा परीसर व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असल्याने तो विचार मनातल्या मनातच रद्द केला Proud (काळ्या बिबटयासाठी प्रख्यात असे हे अनशी अभयारण्य भारतातील एकमेव आहे ;-)). दांडेली-अनशी अभयारण्य हि एक वेगळीच भटकंती ठरू शकते. या रस्त्यावरून जाताना वाटेत बरेचस अ‍ॅडव्हेंचर कॅम्प्सचे फ्लेक्स लावले होते. दिवाळीची सुट्टी असल्याने बरेचसे पर्यटक दिसत होते. काली नदीच्या पात्रात व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग चालु होती.
आरक्षणासाठी पत्ता:
मुख्य संरक्षक,
दांडेली अनशी वन्यप्राणी विभाग,
वनखाते, दांडेली — ५८१३२५,
(कर्नाटक राज्य).
फोन नंबर: ०८२८४०-२३१५८५.

खरंतर आम्ही ५ जण उत्तर कर्नाटकला जाणार होतो पण आयत्यावेळेस २ जणांचे रद्द झाले तरी तीघे जायचे हे ठरवूनच आम्ही निघालो. दोघांचे आयत्यावेळेस रद्द झाल्याने बजेटचा गोंधळ होणार होता तरी हि या सर्व भटकंतीचा एकुण खर्च ३६४२/- इतकाच आला Proud मित्राचे घर खानापुरात आहे आणि त्याचीच गाडी असल्याने खर्च बराच कमी आला. या सहादिवसाच्या भटकंतीत खुप फिरलो, विविध आणि वेगवेगळी ठिकाणे पाहिली. नैसर्गिक, मानवी चमत्कार पाहिले, मंदिर किल्ल्यातील स्वच्छता भावली, राजहंसगडावर जिथे दारू पिऊन विद्यार्थांच्या (??) (हो, खरंय या किल्ल्यावर पहारेकरी नसल्याने काहि शालेय विद्यार्थी दारू पिवून एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिव्या घालत होते. हा एकच अनुभव फार वाईट होता :() धुमाकुळ पाहिला तेथेच सौंदत्तीच्या किल्ल्यावर शांततेचा उपयोग करून घेत अभ्यास करणारे विद्यार्थीहि पाहिले.
प्रामाणिक आणि अगत्यशील माणसे भेटली. इतर भटकंतीसारखीच कर्नाटक भटकंतीही जवळची वाटली. Happy

तेंव्हा जरा मोठी सुट्टी काडा आणि नक्कीच देऊन सोडा कि वो..................उत्तर कर्नाटकाला भेट म्हणतो मी. Proud
=======================================================================
=======================================================================
या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर

९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला

१०. उत्तर कर्नाटक (९) — याना हिल्स

११. उत्तर कर्नाटक (१०) — सिरसी (सहस्त्रलिंग)

=======================================================================
=======================================================================
"मुरुडेश्वर" कोस्टल कर्नाटक भटकंतीत न चुकता बघण्यासारखे ठिकाण.
याची संपूर्ण माहिती http://murudeshwar.org/ या वेबसाईटवर आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
आकाशाशी स्पर्धा करणारे गोपुर

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
गोपुर आणि उगवतीचा चंद्र आणि

प्रचि ०७
मुख्य प्रवेशद्वार

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि ०१०

प्रचि ११
मंदिर आणि शिवलिंग

प्रचि १२
गोकर्ण कथा मूर्त रूपात

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि परीसर(विविध कोनातुन)

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०
( __/\__समाप्त __/\__ )

























































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...