चार तालुक्यांना एकत्र जोडणारा - देवाचा डोंगर
रत्नागिरी
जिल्ह्यातील खेड,मंडणगड,दापोली आणि रायगड जिल्ह्यातील महाड या
तालुक्यांच्या भौगोलिक सीमांचा केंद्रबिंदू असलेल्या देवाच्या डोंगरावरील
टेपाडावर मल्लिकार्जुन/महादेवाचे मंदिर आहे. महाडहून तुळशी खिंडीमार्गे
खेडकडे जाताना मंदिराचा कळस दुरूनच लक्ष वेधून घेतो. देवाचा डोंगर म्हणजे
जणू एक पठारंच!! समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे पाचशे मीटर आहे.
पठारावर खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक, मंडणगड-भोळावली, दापोली-जामगे आणि
महाड तालुक्यातील ताम्हाणे (टेंबेवाडी) ही गावे आहेत. २०० हेक्टरवर
पसरलेल्या या डोंगरावर चारही गावे मिळून एकूण १५० घरं आहेत व ती सर्व
हाकेच्या अंतरावर आहेत. टेपाडावर असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचा हल्लीच
जीर्णोद्धार केलेला दिसून येतो. थेट मंदिरापर्यंत गाडीरस्ता झालेला आहे.
वीस ते पंचवीस पायर्या चढून आपला मंदिरात प्रवेश होतो.
मंदिराच्या प्रांगणात समोरील बाजूस शेंदूर लावलेला दगड व डाव्या बाजूस एक तुळशी वृंदावन नजरेस पडते. मंदिराच्या गाभाऱ्यात खोलगट भागांत शिवलिंग कोरलेलं आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला मंदिरात उसत्व साजरा केला जातो. त्या दिवशी मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याच टेकडीवरून सभोवताली दिसणारं विहंगम दृश्य थक्क करणारं आहे. निरभ्र वातावरणात किल्ले रायगड, प्रचंडगड, राजगड, कावळ्यागड, मोहनगड, प्रतापगड, मधुमकरंदगड, मिठखडा, महिपतगड, सुमारगड, रसाळगड, चकदेव व मल्लिकार्जुन पर्वत, पालगड आणि मंडणगड पर्यंतचा नजारा दृष्टीक्षेपात येतो.
पठारावर पावसाचे प्रमाण देखील जास्त आहे व वर्षभर थंड वातावरण असते. पठारावरील घरे जांभा किंवा बेसाल्ट दगडातील व तीव्र उताराच्या छपराची आहेत. शेतीत भात, नाचणी, वरी इत्यादी पिकं घेतली जातात. येथे धनगर समाजाची वस्ती असल्याने दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. एकूण मिळून दररोज ३००-३५० लिटर दूध पालगड गावात डेअरीमध्ये विक्रीसाठी नेले जाते. चारही तालुके मिळून तीन शिक्षकी आठवीपर्यंत शाळा या डोंगरावर आहे. पुढच्या शिक्षणासाठी मात्र विध्यार्थ्यांना पालगड किंवा लाटवण येथील हायस्कूल मध्ये जावे लागते. पावसाळ्यात देवाच्या डोंगरावरील वातावरण अतिशय निसर्गरम्य असते. दापोली, खेड, पुणे आणि मुंबई येथून अनेक पर्यटक व भक्तजन दर्शनासाठी हजेरी लावतात. एकाच वेळी चार तालुक्यांची सफर करायची असेल तर महाड शहरापासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेला देवाचा डोंगर, तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त अनुभवण्यासाठी तुमची आतुरतेने वाट बघतोय.
देवाच्या डोंगरावर जाण्यासाठी गाडीरस्ता :-
(खेड - तुळशी बुद्रुक - देवाचा डोंगर - २८ किमी),
(दापोली - पिसई - पालगड/विसापूर - जामगे - देवाचा डोंगर - ३५ किमी),
(मंडणगड - लाटवण - भोळावली - देवाचा डोंगर - २७ किमी),
(महाड - विन्हेरे - तुळशी बुद्रुक - देवाचा डोंगर - ३६ किमी).
भटकंती गणपतीपुळे आणि परिसराची
गणपतीपुळे
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
कवी केशवसुतांचे जन्मस्थान "मालगुंड"
जिंदाल यांचे "जय गणेश मंदिर" (जयगड जवळ)
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
श्री गणेशाची मनमोहक मूर्ती 

प्रचि ०९
प्रचि १०
जयगडच्या वाटेवर . . . 
प्रचि ११
किल्ले जयगड
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
जयगडची खाडी
क-हाटेश्वर
अतिशय सुंदर आणि निवांत असे श्री शंकराचे देवस्थान 
प्रचि २२
प्रचि २३
पुन्हा कधीतरी या वळणावर भेटुयाच 

पर्यटनाचे आगर - "गुहागर"
सर्वप्रथम तमाम मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टीचा फायदा घेत व २०१५ वर्षात कमी ठिकाणी
झालेल्या भटकंतीचा बॅकलॉग भरण्यासाठी ४ दिवसांची गुहागर भटकंती करून आलो. मुंबई
- पुणे - सातारा - उंब्रज - पाटण - कोयनानगर - कुंभार्ली घाट - चिपळुण -
गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - राई-भातगाव मार्गे गणपतीपुळे - जयगड - तवसाळ -
अंजनवेल - गोपाळगड - गुहागर - चिपळुण - कुंभार्ली घाट - पाटण - दातेगड
किल्ला - सडा वाघापुर मार्गे सातारा - शेरे लिंब येथील "बारा मोटेची विहिर"
- बावधन (वाई) - पुणे - मुंबई असा भरगच्च कार्यक्रम होता.
सदर भटकंतीचा हा चित्र वृत्तांत. 
प्रचि ०१
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश
प्रचि ०२
हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ
प्रचि ०३
हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या
बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते.
ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर
वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती
सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा
जपुनच!
प्रचि ०४
हेदवीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा
प्रचि ०५
प्रचि ०६
उफराटा (उरफाटा) गणपती मंदिर (गुहागर)
प्रचि ०७
खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासुन गुहागरला वाचवण्यासाठी, एका भक्ताच्या
हाकेला श्री गणपती धावून आला. पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख
वळवून सागराकडे म्हणजेच पश्चिमाभिमुख केले. समुद्र शांत झाला व गुहागरचे
संरक्षण झाले. दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणुन "उफराटा गणपती".
(आख्यायिका)
गुहागरचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
वेळणेश्वर
प्रचि ११
दुर्गादेवी मंदिर
प्रचि १२
प्रचि १३
राई-भातगाव पूल
प्रचि १४
गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव भातगाव व रत्नागिरी तालुक्यातील राई या
गावांना जोडणारा पूल. या पुलामुळे गणपतीपुळे, जयगड, या स्थळांना भेट देऊन
रत्नागिरीस जाणे सुलभ झाले.
प्रचि १५
जयगडची खाडी
प्रचि १६
प्रचि १७
रोहिले गाव
हेदवीच्या पुढे तवसाळला जाणार्या रस्तावर "रोहिले" नावाचे गुहागर तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असलेले गाव वसले आहे.
प्रचि १८
प्रचि १९
तवसाळचा समुद्रकिनारा
प्रचि २०
तवसाळ - जयगड फेरी बोट
प्रचि २१
तवसाळहुन अगदी ४०-४५ मिनिटात आपल्या गाडीसहित जयगडला पोहचत येते आणि तेथुन
पुढे कर्हाटेश्वर, मालगुंड गावांना भेट देत गणपतीपुळ्यास कमी वेळात जाता
येते.
(राई-भातगावहुन जाकादेवी मार्गे गणपतीपुळे तर तवसाळ-जयगड फेरीबोटीने मालगुंड मार्गे गणपतीपुळे)
प्रचि २२
प्रचि २३
जयगड किल्ल्याचा उपदुर्ग "विजयगड"
प्रचि २४
गोपाळगड
प्रचि २५
प्रचि २६
टाळकेश्वर दीपगृह
गोपाळगडाच्या जवळच दीपगृह आणि टाळकेश्वर मंदिर आहे. येथील कर्मचार्यांच्या
परवानगीने दीपगृह पाहता येते. संध्याकाळी ५ पर्यंत दीपगृह पाहता येते.
प्रचि २७
प्रचि २८
टाळकेश्वर मंदिर
प्रचि २९
अंजनवेल येथील बहुचर्चित एनरॉन प्रकल्प
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
आंबेमोहर
प्रचि ३४
प्रचि ३५
बकुळ
प्रचि ३६
अंजनवेल येथील "अंजन वेल"
प्रचि ३७
चांडाळ चौकडी 
प्रचि ३८
तळटीपः
१. प्रकाशचित्रे टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत. 
२. वरील काही माहिती "पराग पिंपळे" यांच्या "साद सागराची
गुहागर-वेळणेश्वर-हेदवी" या पुस्तकातुन. गुहागर भटकंतीसाठी (रादर को़कण
भटकंतीसाठी) अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. 
पुढील भागात "गणपतीपुळे परीसर" 

कोकणच्या गालावरची खळी - "दापोली"
परशुरामाच्या भुमीत.....
प्रचि ०१
मे महिन्याच्या सुरूवातीलाच आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा उचलत चार
दिवस दापोली बाईक भटकंतीची योजना आखली गेली. तसंही ब-याच दिवसात कुठलीही
भटकंती झाली नव्हती, त्यामुळे हे चार दिवस वाया जाऊ द्यायचे नाहीच असं
मनोमन ठरवलं आणि दापोली तेही बाईकने जायचं ठरलं. माझ्या विशलिस्टमध्ये
पावसाळ्यात माळशेज घाटात आणि कोकणात बाईकने जायचे हे होतेच. त्यापैकी
पावसाळ्यात माळशेज घाटात ब-याचदा जाऊन आलो आता बाईक सफर करायची होती ती
कोकणची. मुंबईहुन दापोली साधारण २२५ ते २३० किमी अंतरावर आहे. याआधीही मी
दोनदा दापोली भटकंती करून आलो.
मुंबई, दापोली परीसर, केळशी, वेळास आणि पुन्हा मुंबई असा आमचा प्लान साधारण
होता. पुढे त्यात थोडासा बदल करून कोस्टल रूटने प्रवास करायचा ठरलं.
मुंबई - पनवेल - माणगाव - आंबेत मार्गे दापोली, पन्हाळकाजी (मुक्काम) व
तेथुन बुरोंडी - लाडघर - मुरूड कर्दे - पाळंदे (मुक्काम) - हर्णे -
आंजर्ले - केळशी - वेळास - बाणकोट - वेसवी (वेसवीहुन जंगल जेट्टीने बाईक्स
बागमांडला पर्यंत) - बागमांडला - हरीहरेश्वर (मुक्काम) - श्रीवर्धन -
दिवेआगर - दिघी (बोटीने बाईक राजापुरी पर्यंत) - मुरूड (जंजिरा किल्ला) -
नांदगाव - काशिद - बोर्ली मांडला - रेवदंडा - चौल - नागाव - आक्षी - आलिबाग
- पेण पनवेल मार्गे मुंबई. 
याच प्रवासातील काही क्षणचित्रे.
चला सफरीला......
प्रचि ०२
कड्यावरचा गणपती (आंजर्ले)
प्रचि ०२
बुरोंडी
प्रचि ०३
तामसतीर्थ (लाडघर)
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
पन्हाळेकाजी लेणी
प्रचि ०७
प्रचि ०८
हर्णे बंदर
प्रचि ०९
प्रचि १०
पाळंदे
प्रचि ११
सुवर्णदुर्ग आणि हर्णे गाव
प्रचि १२
पाजपांढरी गाव
प्रचि १३
उटंबर
प्रचि १४
श्री महालक्ष्मी मंदिर (केळशी)
प्रचि १५
केळशीचा समुद्रकिनारा
प्रचि १६
प्रचि १७
कोकणचा मेवा
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
रातांबे
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
(पूर्वप्रकाशित)
सुगंधीतकोकण
सोनचाफा
प्रचि ०२७
तामण
प्रचि २८
देवचाफा
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
कोकण यात्रा - १: केळशी - दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्या या गावाला पर्याय नाही.
स्वतःचे वाहन घेऊन जायचे असल्यास छानच, पण घाटात वाहन चालवण्याचा
अनुभव असणारा चालक बरोबर असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. पु.लंच्या 'म्हैस'
ह्या कथेत म्हटल्याप्रमाणे "गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या
अर्थाने लागायला लागली" असा प्रकार ज्या लोकांच्या बाबतीत होतो त्यांनी आधीच
औषधे घेतलेली बरी.
गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना
आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणार्या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या
भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या
आहेत. इथे पडणार्या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून ह्या
पाखाड्या तयार केल्या आहेत. पवसाळ्यात बिदीवर असणार्या घरातील अंगणापासून
ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.
वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या
व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको,
कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही.
त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच
पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची!
केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे. गावात
काही घरात गावकर्यांनी गोबर गॅसची सोय करून घेतली आहे व इतरही अनेक
घरात तशी सोय करायचं घाटत आहे.
कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर
असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड.
नियोजित मुंबई-गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला
जरा डाग लागल्यासारखं झालं असलं, तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा
टिकवून ठेवला आहे.
रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण
एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक नैसर्गिकरित्या तयार झालेली
वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व
विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या
भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे.
या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्या
बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात.
टेकडीवर बसून दिसणार्या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेट
दिलेल्या पर्यटकांचा अनुभव.
सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक
डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती.
तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही
सहकार्यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या
गोष्टी समोर आल्या:
किनार्यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात
जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी
मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा
काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले.
या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे
थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले
आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या
दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली
होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७"
असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने
हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी
सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्यांनी बांधकाम केलेली
शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.
पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी.
यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन
पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या
वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या
कामावर न्यायालयाने बंदी आणली.
गावात अनेक देवळे आहेत, पण त्यातली प्रमुख दोन – एक रामाचे देऊळ
आणि दुसरे महालक्ष्मीचे.
याच दोन देवळांशी गावातले दोन प्रमुख उत्सव निगडीत आहेत – रामनवमी
आणि महालक्ष्मीची यात्रा. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या
स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी
खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. ह्या दोन देवळांची माहिती
एकत्रित देण्यामागचा हेतू हा, की रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे
दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल
तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत. महालक्ष्मीच्या उत्सवाचे वर्णन एका कवीने
पुढीलप्रमाणे केले आहे, त्यातूनच आपल्याला कल्पना येईल.
देवीचे गाणे - श्री महालक्ष्मी केळशी
उत्सवाचा काल सत्वरी जवळी तो आला
प्रेमभराने ग्रामस्थांसी मोद बहु झाला || धृ ||
चैत्रमासी आनंद होतो मातेच्या सदनी
पाडव्याच्या दिनी जातसे ढोल गृहवरुनी
जमती सारे मानकरी नी ग्रामस्थ दोन्ही
श्रावण करिती वर्षफळाचे अनन्य चित्तानी
नूतन वर्षी समाराधना घालीतसे कोणी
वारी नेमुनी चूर्ण सेविती गंधाची वाटणी
ऐशी रिती उत्सावासी प्रारंभ केला || प्रेमभराने _ _ _ १ ||
दुसरे दिवशी जमती सारे वारी एकत्र
गृहागृहांतून पट्टी गोळा करण्याचे सत्र
तक्रारीला जागा नाही ऐसे ते तंत्र
नियमबद्ध तो केला ऐसा उत्सव सुयंत्र
साक्ष देतसे शिक्षा करुनी त्यासी अपवित्र
सरसावे जो फुट पाडण्या देऊनी कानमंत्र
ऐशा रीती सहा दिवस तो काळ त्वरे गेला || प्रेमभराने _ _ _ २ ||
अंगणात तयार केला मंडप भोजना
सप्तमीच्या दिवशी कामे असती ती नाना
आकडी घेउनी फिरती वारी केळीच्या पाना
दोन डांगा ओढा ऐशी आज्ञा हो त्यांना
हक्काचा तो फणस द्यावा त्वरित महाजना
सायंकाळी भाजी चिरण्या भगतांच्या ललना
पातवड्याचे खोरे झाले तयार सेवेला || प्रेमभराने _ _ _ ३ ||
अष्टमीच्या दिवशी चाले भोजन जोरात
प्रसाद भक्षण करा यथास्थित गोडी बहु त्यात
साठे-आखवे-परांजपे हे वाढती पंक्तीत
प्रसादाचे खोरे जाती इतर ज्ञातीत
फणस भाजी, वांगी हरभरे पातळ भाजीत
पुरण लोणचे यांची गोडी नाही वर्णवत
सारच तो दिमाख चाखुनी जीव बहु धाला || प्रेमभराने _ _ _ ४ ||
कलमदानी मंडपात सहा बैठका
हरिदासाची मध्ये आणि समोर बैदिका
उजवी बाजू असे राखिली ग्रामस्थ लोकां
डावे बाजूस मानकर्यांची बसते मालिका
लामणदीप आणि समया तेवती चंद्रिका
दोन बैठका वाढून दिधल्या इतर त्या लोकां
कीर्तनासी प्रारंभला रंग बहु आला || प्रेमभराने _ _ _ ५ ||
गोंधळाची वेळ जाहली ऐका वृतांत
मधे गोंधळी वामभागी पुजारी तिष्ठत
चांदीची ती दिवटी बुधली विलसे हस्तात
सभोवताली साथ चालते इतर चौघांत
गोंधळगीत चालले ते ऐसे रंगात
पूजा जाहली तेव्हा केले दीप प्रज्वलीत
गीत संपले दीप समूह तो पारावर गेला || प्रेमभराने _ _ _ ६ ||
एकदिशी उत्सवात दिवस भाग्याचा
कामे असती बहु त्या दिनी वेळ महत्वाचा
दागदागिने घातलेला नवीन झिलईचा
मुखवास तो नेऊन ठेविती पेटीत अंबेचा
अबदागीर वाजंत्री नी डंका बाराचा
वारा चवर्या उष्मा होतो प्रवास लांबीचा
वार्षिक राज्या पाहुनी भाविक मानस गहिवरला || प्रेमभराने _ _ _ ७ ||
हंड्या ग्लासे छते लावुनी करिती तो छान
कलमदानी मंडप होतो शोभायमान
मखरताटी रथपुतळीची मूर्ती ठेऊन
आत राणी राज्या करीतसे जणू संस्थान
श्री निसबत कारभारी सही संपूर्ण
रुप्या ताटी चांदीची ती समई ठेऊन
धामधुमीचा दिवस ऐसा वेगे तो गेला || प्रेमभराने _ _ _ ८ ||
द्वादशीला लिखिते जाती तेरा ग्रामात
अजरालय मुळवट वेळवट यांत
त्रयोदशीला अमुची यात्रा त्वरे पार पडत
भालदार विडेवाटणी सेवक लोकांत
प्रातःकाली बहिरी दर्शन जन संघ निघत
चांदीचा मुखवास लागला मूर्तींना आत
पावलीची ओढ लागली ढोल्या गुरवाला || प्रेमभराने _ _ _ ९ ||
चतुर्दशीला जेवणवाडी तयार ती केली
रथ स्थापना करुनी मंडळी सत्वर परतली
भोई जेवणकीस तयारी देवळात गेली
उभाघर, तिठ्ठे आळी वाढू लागली
त्रयोदशी नी चतुर्दशी या दोन्ही दिनकाळी
चीरकदान दिवल्याचे ते मंडप भवताली
चांदीचा मुखवास लागला मंडप स्वमिनीला || प्रेमभराने _ _ _ १० ||
आज बलुते जाति सर्वही सेवक लोकांत
जोशी, खरवळे, शिधये, गद्रे ब्राह्मण ते त्यांत
क्षेत्रपाल नी रथपुतळीला केळवण होत
वेळातटीचे लोक उतरती गद्रे गृहात
चतुर्दशीचे शुभ्र चांदणे पडले प्रशांत
आजारालययिचे लोक तळ्यावर बसुनी हवा खात
डोळांभरुनी पाहुनी घ्याहो सत्वर मूर्तीला || प्रेमभराने _ _ _ ११ ||
वेळ जाहली मंडपी आले परके ग्रामस्थ
आदर सत्कारांची त्यांच्या धावपळ ती होत
ठायी ठायी उभे राहुनी वृद्ध जाणिस्त
गुलाब अत्तर वार्यांकरवी त्यांस देववीत
हजार त्यांचे मानकरी जे विडा उचलीत
भालदार हो प्रवेश करिती वाजत गाजत
चकित व्हावे पाहुनी ऐशा कडक शिस्तीला || प्रेमभराने _ _ _ १२ ||
पहाटेची वेळ जाहली गोंधळ उतरला
सोनियाचा कळस, आरसा, रथ सज्ज झाला
चांदीचा तो दीप लागे आज आरतीला
मंडपात ताटामधुनी गुलाल उधळीला
"आई जगदंबे अंबाबाई" भजन घोष झाला
रथाभोवती चंद्रज्योती पुष्पनळा फुलला
रथयात्रेचा पौर्णिमेचा दिवस उजाडला || प्रेमभराने _ _ _ १३ ||
पौर्णिमेच्या मंगल आणि रम्य प्रातःकाळी
रथाभोवती जमते ब्राह्मण तरुणांची टोळी
"दुर्गे दुर्गट वारी" ऐशी आरती ती सगळी
घाईघाईने खांदी घेती तेव्हा रथपुतळी
रेटारेटी कौतुक पाहे जनता ती भोळी
"हर हर महादेव" ऐशी उठे आरोळी
हौस फिटली ह्या वर्षीची रथ पुढे गेला || प्रेमभराने _ _ _ १४ ||
पाखाडीशी भोई ज्यात तयार ते असती
ब्राह्मण जाऊनी डुंगवाले रथ पुढे नेती
मिरवत मिरवत आठ वाजता गद्र्यांच्या पुढती
डेल्यावरती घेत बसला तेव्हा विश्रांती
पीठाचे ते दिवे लाउनी स्त्रिया पूजा करिती
दही पोहे थंडगारसे भोई सेविती
प्रसाद खाता "भले ग भोई" शब्द तदा स्फुरला || प्रेमभराने _ _ _ १५ ||
महाजन सदनी प्रसाद आज पुरणपोळीचा
वारी त्यांना लाभ देती आपल्या पंक्तीचा
वेळ असतो तब्बल तेथे तीन तासांचा
उपाध्याय पूजा सांगण्या हक्क स्त्रियांचा
प्रवास संपे ऐशा रीती सर्व उभागराचा
साठे आळी फिरुनी आला उलटा रथ साचा
नवागरसि भोई आले आता सेवेला || प्रेमभराने _ _ _ १६ ||
नापित पूजा घेउनी फिरला परांजपे वाडी
हक्क पुजेचा जुना स्त्रियांच्या फडक्यांच्या फेडी
होळी बहिरी पेठ आणि पिंपळ पिछाडी
दोन भाया तेकुनी तेथे कुंभार वाडी
त्वरे घेउनी इतर स्थळे आला आघाडी
शेतामध्ये पुतळादेवी त्वरे रथ सोडी
इकडे म्हणती आता रथ जड आला || प्रेमभराने _ _ _ १७ ||
गावाच्या दक्षिणेस व देवीच्या देवळाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी
सोळाव्या शतकात बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे. महाराजांनी यांना
गुरुस्थानी मानले होते व आपल्या कोकण दौर्या दरम्यान केळशीस येऊन
त्यांचे आशीर्वादही घेतले होते अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
केळशीला कधी जावे: अक्षरशः वर्षातून कधीही जावे. तरीही सांगायचे
झाल्यास महालक्ष्मीच्या यात्रेदरम्यान व डिसेंबर-जानेवारी ह्या थंडीच्या
महिन्यांत जाणे सगळ्यात चांगले.
जवळची गावे: आंजर्ले - इथलीही यात्रा पाहण्यासारखी असते;
आडे, उटंबर, दापोली, करडे, आसूद, हर्णै, मंडणगड, वेळास,
बाणकोट, श्रीवर्धन.
प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि केळशी:
- कॅम्लिनचे संस्थापक श्री. नानासाहेब दांडेकर हे केळशीचे.
- लोकमान्य टिळक यांचे आजोळ.
- आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे.
- मध्यप्रदेशात मराठी झेंडा फडकत ठेवणार्या माजी मंत्री व खासदार
सुमित्रा महाजन यांचं सासरघरचं गाव हे केळशी.
राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.
१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी आहेत.
२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.
३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय
होऊ शकते.
५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा
असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले
एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.
पुण्याई व एन्-गुलमोहर समोरासमोर आहेत.
तर मग, येताय नं आमच्या केळशीला ?
संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:
आभार प्रदर्शन:
(१) दक्षिणा: नुसतीच प्रकाशचित्रे न
टाकता मला संपूर्ण लेख लिहिण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल. खरं तर
"प्रोत्साहित करणे" हे फारच मिळमिळीत बोलणं झालं. माझ्या डोक्यावर बसून
लिहून घेतला असं म्हणणं जास्त संयुत्तिक ठरेल 
(२) माझी आजी (बाबांची काकू) श्रीमती कल्पना जोशी, जिच्या संग्रहात देवीच्या उत्सवाची ती कविता सापडली.
संदर्भ: टेकडीबद्दल काही माहिती व संशोधकांची नावे यासाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8613089.cms
कोकणात ८००० वर्षांपूर्वीची सागरी भिंत
म. टा. वृत्तसेवा, रत्नागिरी
हडप्पा संस्कृतीपेक्षाही प्राचीन अशी संस्कृती कोकणात वसत होती, याचे पुरावे पुढे आले आहेत. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपर्यंत अनेक ठिकाणी समुदतळाशी बांधलेल्या भिंती आढळल्या आहेत. त्या सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील विभागप्रमुख डॉ. अशोक मराठे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले आहे. ही भिंत सुमारे २२५ किलोमीटर लांब आणि ३ मीटर रूंद आहे. ती दगडी असून, सलग नाही. त्या काळी समुद किनाऱ्यावर ही भिंत बांधली असावी, पुढे समुदाचे पाणी किनारा ओलांडून आत घुसले असावे आणि ही भिंत पाण्याखाली गेली असावी, असा अंदाज आहे. ही भिंत का बांधली असावी, त्याचे कारण स्पष्ट होत नाही.
या भिंतीचा शोध सहा वषेर् सुरू होता. त्यासाठी उपग्रहामार्फतही काही फोटो काढण्यात आले. त्यांच्या अभ्यासाअंती आढळले की, समुदकिनाऱ्यापासून या भिंतीचे अंतर ठिकठिकाणी एक ते चार किलोमीटर आहे. श्रीवर्धन, केळशी, कोळथरे, दाभोळ, एन्रॉन जेटी, वेळणेश्वर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणी भिंतीचे अस्तित्व दिसले आहे. समुदातील धूपप्रतिबंधक बंधारा असे कदाचित या भिंतीचे स्वरूप असण्याची शक्यता आहे. ३१ जुलैला केंदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालयाकडे हा प्रकल्प अहवाल सादर केला जाणार आहे. मोहेनजोदडो संस्कृती चार हजार वषेर् जुनी असल्याचे मानले जाते. त्या भिंंतींचे वयोमान आठ हजार वर्षे आहे. याचा अर्थ त्या काळीही कोकणात प्रगत मानवी संस्कृती नांदत होती, असेही डॉ. मराठे म्हणाले.
शांत, नयनरम्य कोळिसरे
लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.
निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी
तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी
जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी
आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.
मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग
श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर
ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची
देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे
कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे
आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले
गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.
सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.
डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर
श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.
हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.
नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर
मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून
प्रत्यक्ष पाहणार्यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती
चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या
डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत.
उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे
डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार
कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना
नक्कीच करायला हवी.
मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.
नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर
श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:
उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.
टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.
उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या
काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे.
आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार
पाहणार्या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन
आपल्याला मदत करता येऊ शकते.
जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना
त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे.
निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व
फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची
अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच
वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी
गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी
करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण
पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.
या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले आहे.
भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.
असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!
चिरंजीव परशुराम भूमी प्रांगण, बुरोंडी
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].
ज्ञान, शक्ती, त्याग आणि सृजन यांचा साक्षात्कार म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम. आपल्या काळातील अत्याचारी आणि समाजविघातक राज्यकर्त्यांना आणि शक्तींचं निर्दालन करुन समाजजीवन सुरक्षित करणारे चिरंजीव भगवान परशुराम. अपरांत भूमीची निर्मिती करणारे आणि राजा शिवछत्रपतींच्या प्रेरणास्थानांपैकी एक असणारे भगवान परशुराम. पहिला ब्रह्मक्षत्रिय म्हणून ओळखले गेलेले जमदग्नीपुत्र परशुराम.
तरुण पिढीला अशा चिरंजीव परशुरामांचे मूर्त रूपात प्रेरणादायी दर्शन घडावे या हेतूने इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, भोसरी आणि न्यु मॉडर्न ऑप्टिशियन्स, पुणे चे संचालक श्री. अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी चिरंजीव परशुराम भूमी प्रांगणाची निर्मिती केली आहे. हा प्रकल्प भगवान परशुरामांनीच निर्माण केलेल्या कोकणभूमीत दापोलीपासून साधारण १०-१२ किलोमीटरवर असलेल्या बुरोंडी या गावात टेकडीवर उभा राहिलेला आहे.




४० फूट व्यास असलेल्या अर्धगोलाकृती पृथ्वीवर श्री. ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी फायबर ग्लास मधे घडवलेली परशुरामांची २१ फुटांची उत्तराभिमुख भव्य मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. पृथ्वीच्या अर्धगोलाकृती अंतर्भागात सप्तचिरंजीवांचे स्मरणस्थान असून त्यात भविष्यात तारांगण आणि बाहेर Optic Garden तयार करण्याची योजना आहे.





कोकणातला एक निसर्गचमत्कार म्हणून ओळखल्या जाणार्या तामसतीर्थ नामक सागरतीराचे या ठिकाणाहून दर्शन होते. समुद्राचा फक्त याच भागाचे पाणी तांबडे दिसते म्हणून त्याला तामसतीर्थ असे म्हणतात. चहूबाजूने हिरवाई ल्यालेले पर्वत आणि मधे भगवान परशुरामांचा भव्य पुतळा हे दृश्य बघताना भान हरपते.
श्री परशुराम भूमी प्रांगणातून होणारे तामसतीर्थाचे मनोहारी दर्शन:
इतर छायाचित्रे:



चिरंजीव परशुराम भूमी या वास्तूचे शिल्पकार:
डॉ. बाळकृष्ण नारायण दिवेकर, Ph.D, Concrete Technology, पुणे
श्री. हेमंत शरद साठ्ये, B. Arch, पुणे
श्री. पद्मनाभ प्रभाकर लेले, ठेकेदार, AMIE, पुणे
श्री. सुहास गजानन जोशी, B.E., M.Tech, AMIE, पुणे
श्री. सदानंद सुरेश ओक, DCE, पुणे
श्री. आशुतोष आपटे, BFA, पुणे
विशेष सहकार्य:
सौ. मधुवंती व श्री. प्रफुल्लचंद्र देव, इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
सौ. पौर्णिमा व श्री. राजेंद्र मनोहर
सौ. अपर्णा व श्री. अतुल केतकर
श्री. विवेक गोगटे
श्री. पांडुरंग पांगारे
विशेष सूचना: सकाळी लवकर किंवा मग संध्याकाळी पाचच्या सुमारास बुरोंडी गाठणे इष्ट. जेवण दापोलीतच घ्यावे.
परशुराम या पौराणिक व्यक्तिरेखेबद्दल माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत. विशेषत: २ कथांमध्ये परशुरामाचा उल्लेख येतो - पृथ्वी २१ वेळा नी:क्षत्रिय कारणे, आणि पितृआज्ञा पाळण्यासाठी आईचा शिरच्छेद. याबद्दल माझ्या शंका अशा:
१) पृथ्वीवरचे सर्व क्षत्रिय मारले का? तसे असेल तर नवीन कुठून निर्माण झाले? ते सगळे अत्याचारी होते का? माझ्या माहितीप्रमाणे य कथेची सुरवात एका राजाने गाय (सुरभी? पण खात्री नाही) चोरल्यापासून होते. या गुन्ह्याबद्दल एकवेळ त्या राजाला मारणं ठीक, पण सगळे क्षत्रिय का? ते सगळेच 'अत्याचारी आणि समाजविघातक' होते का? हे कसं, कोणी ठरवलं? त्यानंतरचे राजे/ सत्ताधारी एकदम चांगले होते का? ते असे कशामुळे झाले? सध्याचे राज्यकर्ते 'अत्याचारी आणि समाजविघातक' असल्याची खात्री आपल्यापैकी बहुतेकांना आहे. तर आताही पृथ्वी नी:क्षत्रिय कारणे हा आदर्श या अवताराच्या कार्यातून घ्यायचा आहे का? राज्यकर्ते चांगले व्हावेत म्हणून किंवा चांगल्या लोकांनी राज्यकर्ते व्हावे म्हणून परशुरामाने काय केले?
२) रेणुकेला इंद्राने फसवल तेव्हा ती फसली. हे कळल्यावर इंद्राला काही नं करता जमदग्नीने परशुरामाला सांगितले की तुझ्या आईचा शिरच्छेद कर. त्याने ताबडतोब आज्ञा पाळली. त्यामुळे खुश झालेल्या बापानी (जमदग्नी) त्याला वर मागायला सांगितले, तर त्याने पुन्हा आईला जिवंत करून घेतले. - - या कथेत परशुरामाचे वागणे 'आदर्श' आहे का? बापाची चुकीची किंवा अन्यायकारक आज्ञा पाळली पाहिजे, हा आदर्श समाजासमोर सतत राहावा म्हणून ही कथा सांगितली जाते का?
मला आपल्या कोणाच्याही श्रद्धांचा अधिक्षेप करायचा नाही. पण केवळ पुराणात आहे म्हणून एखादी गोष्ट चांगली, आदर्श आहे असं मान्य करणं मला जमत नाही. कदाचित या कथा मला नीट माहित नसतील. जाणकारांनी सांगितल्या तर बरे.
परशुराम अवतारात क्षत्रियांचा वंशविच्छेद, आणि महाभारतात खांडव वनातल्या नागांचा, या गोष्टी (आणि उदात्तीकरण) मला इतर सगळ्या हिंदू संस्कृतीत नं बसणाऱ्या , खटकणार्या वाटत राहतात.
पृथ्वी नि:क्षत्रिय करणे म्हणजे सगळ्या क्षत्रियांना मारणे नव्हे. जे
राजे मातले होते, अत्याचारी होते त्याच राजांना व जुलमी व्यक्तींना
परशुरामाने मारले. शिवाय त्याकाळीही स्त्रिया व मुले यांना मारले जात नसेच.
त्यामुळे अत्याचारी राजांची कुटुंबे त्यातून वाचलीच. बाकीचे न्यायी व
चांगले राजे होते त्यांना परशुरामाने हात लावला नाहीच.
(आपल्याकडे दुर्दैवाने शब्दार्थावर भर देऊन मतितार्थाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची सवय आहे याचे हे उत्तम उदाहरण.)
>>त्यामुळे खुश झालेल्या बापानी (जमदग्नी) त्याला वर मागायला
सांगितले, तर त्याने पुन्हा आईला जिवंत करून घेतले. - - या कथेत परशुरामाचे
वागणे 'आदर्श' आहे का?
कितीही चुकीची असली तरी वडीलांची आज्ञा पाळणे हे त्या काळी आदर्शच समजले जात असेल.
आईला मारल्यावर वडील हवे ते माग असा वर देतील हे परशुरामाला माहीत असणार.
म्हणूनच त्याने वडीलांची आज्ञा पाळली. म्हणजे यातून त्याने दोन्ही गोष्टी
साधल्या. वडीलांची आज्ञा पाळली गेली, आणि आई पण मिळाली. पण मला स्वतःला हे
मारुन पुन्हा जिवंत करण्याची गोष्ट खरेच घडली असेल हे पटत नाही. कदाचित
आश्रमातून बाहेर काढली असेल व वडीलांनी सांगितल्यावर पुन्हा आत घेतली
असेल.
माझं गाव
माझ आजोळ बुरोंडी जे दापोली- कोरथळे मार्गावर आहे. आणि हे मनमोहित दृश माझ्या गावातील आहे ........अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, अतिशय आल्हाददायक हवामान आणि नितांत सुंदर, नितळ समुद्र किनारे हे माझ्या गावाचे वैशिष्टय़ आहे.
हा बुरोंडी - लाडघर चा समुद्र किनारा
लांबवर पसरलेला समुद्र! समोर खुणावणारे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारा वर आणि वरती निळे निळे चमकणारे आकाश.











राणे वाडीची दुर्गा देवी





एक टेकडीवर ४० मी. व्यासाच्या पृठीविवर एक २० फूटी परशुरामाचा पुतळा उभा केला.
पृथ्वी ला दारे केल्यामुळे आत जाता येते आत गेल्यावर सुखद गारवा
आनिघुमाणारा आपला आवाज या कौतुकात आपण दंग होतो. अजून पृथ्वीच्या आतल्या
बाजूला तारांगण होणार आहे.
अजून बाजूच्या परिसरात ‘Optic Garden’ बनवण्याचे काम चालू आहे. रस्ता घसरडा आहे


लाडघर ते गणपतीपुळे
२३ जानेवारी २०१२
आज तशी सकाळी ६ वाजताच जाग आली होती, पण उबदार अंथरुण सोडून उठायला ७ वाजले... मग पटकन फ्रेश होवून, नाष्टा केला आणि लाडघरचा निरोप घेतला...
(दुरर्या दिवशीची मुक्कामाची जागा...)
(तीसर्या दिवशीच्या प्रवासासाठी सज्ज)
आजच्या प्रवासाची सुरुवात समुद्र किनार्यावरुनच झाली... लाडघर ते बुरुंडी समुद्र किनार्यावरुन देखील जाता येतं... खरंतर मुरुड-कर्दे ते बुरुंडी हा एकच लांबच्या लांब समुद्र किनारा आहे... सकाळच्या गार वार्यात सायकलवर छान वाटत होतं... समुद्र किनारी आमच्या सोबतीला फक्त सीगल पक्षी होते... अफाट समुद्र, लाटांच संगीत, ताजी आणि दमट हवा आणि कोवळं उन्ह असं छान वातवरण जुळून आलं होतं... आजच्या सफरीची सुरुवात अगदी स्वप्नवत होती... साधारण अर्धा तास आम्ही समुद्र किनारी चाललो आणि मग डांबरी रस्ता धरला... मागे वळून पाहिलं तर समुद्राचा अगदी नयनरम्य देखावा होता...
काही क्षणातच आम्ही बुरुंडी गाव मागे टाकलं आणि दाभोळच्या दिशेने निघालो... लगेचच चढ लागला... कोकणातले चढ म्हणजे जरा वेगळेच... चढ एकदम स्टीप असतो, रस्ता जेमतेम ७ फुट रुंद आणि रस्त्याच्या दुतर्फा आंबा-काजूची झाडं... आणि आज तर सकाळच्या दवाने रस्ता मस्तपैकी ओला झाला होता, जणू काही सडा मारुन सजवल्या सारखा वाटत होता...
तीघेही आपाआपल्या तंद्रीतच सायकल चालवत होतो... चढ संपला आणि परशुराम स्मारक लागलं... कोण्या एका बील्डरने ही सगळी जागा विकत घेतलीय आणि आता तो इथली वनराई नष्ट करुन बंगले उभारतोय... आणि त्यानेच हे स्मारक उभारलय...
झाडं तोडून बोडकं केलेला माळ बघून खूपच खंत वाटली... जास्त वेळ न थांबता पुढचा प्रवास सुरु केला... थोड्याच वेळात उजव्या हाताला कोळथरेला जाणारा फाटा लागला... कोळथरेहून देखील दाभोळला जात येतं, पण आम्ही मात्र सरळ पंचनदी गावाला जाणारी वाट सोडली नाही... थोडासा चढ आणि मग मोठ्ठा उतार संपल्यावर पंचनदी गाव आलं... उतारावर सुपारीच्या बागा बघून रेवदंड्याची आठवण झाली... लहानपणी आम्ही अशा बांगामधे पडलेल्या सुपार्या गोळा करायचो आणि बोरं विकणारीला द्यायचो, त्याबदल्यात ती आम्हाला एक-दोन मुठ बोरं द्यायची... रोज शाळेत जाताना सुपार्या गोळा करणं हा आमचा उद्योग असायचा...
पंचनदी गावात एका घराच्या अंगणात रामफळं विकायला ठेवली होती... ती विकत घेतली, तर त्या आजीने आम्हाला खारीने चाखलेलं एक रामफळ असंच खायला दिलं... पुण्याहून सायकलने आलोय असं कळल्यावर त्या आजी खूप आनंदी झाल्या... घरातल्या सगळ्यांना बोलवून आमच्या बद्दल सांगीतलं आणि आमचं खूप कौतुक केलं... पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा घेवून आजींचा नोरोप घेतला... पंचनदीहून अजून १० कि.मी. चा चढ-उतार संपवून आम्ही दाभोळला पोहचलो...
(दाभोळच्या उतारावर प्रसाद)
(दाभोळ जेट्टी)
दाभोळहून फेरीने धोपवे गाठलं... धोपवे सोडलं आणि चढ लागला... दुपारच्या ११ च्या उन्हात चढावर जीव कासावीस होत होता... मान खाली टाकून एक-दोन-तीन-चार असे पेडल्स मोजत हळू-हळू चढ संपवला आणि एका झाडाखाली आडवे झालो... समोरच दिवाळं निघालेला एराँनचा प्रकल्प उभा होता...
रस्त्यावर अजीबातच रहदारी नव्हती, एकंदरीतच इथला सभोवताल भकास वाटत होता... चढावर अंगातली सगळी ताकद संपली होती, मग पंचनदीमधे घेतलेली रामफळं बाहेर काढली... आंबट-गोड अशी मस्त चव होती... घोटभर पाणी प्यायलो आणि गुहाघरचा रस्ता धरला... पावूण तासात गुहाघर गाठलं...
उन्ह खूप होतं आणि जेवणाची पण वेळ झाली होती, मग इथेच जेवून थोडा आराम करायचं ठरलं... वरण-भात, पोळी-भाजी, सोलकडी आणि वाटीभर आमरस असं पोटभर जेवलो आणि आराम करण्यासाठी गुहाघरच्या समुद्रकिनारी पोहचलो... गुडघाभर पाण्यात उभं राहिल्यावर गार लाटांमुळे एकदम प्रसन्न वाटलं... पांढर्याशुभ्र फेसाळ लाटा उन्हात अजूनच चमकत होत्या... खोलवर समुद्र निळा-हिरवा भासत होता... भर उन्हात सुद्धा समुद्रकिनारी छान वाटत होतं...
एखाद तास आराम केल्यावर पुन्हा सायकलींवर स्वार झालो... घरुन निघताना जरा कमीच पैसे सोबत घेतले होते, म्हणून मग गुहाघरला थोडे पैसे काढले आणि चिपळूण कडे जाणार्या चढाला लागलो... जेवणानंतर चढ नकोसा होतो अगदी, पण आजचा मुक्काम गणपतीपुळ्याला करायचा होता आणि ते अजून खूप दुर होतं, म्हणून हळू-हळू का होईना पुढे सरकत होतो... चढावर एकजण सायकल ढकलत निवांत चालत होता... हाय-हैलो झाल्यावर कळालं की तो रशीयावरुन ३ महिन्याच्या सुट्टीवर आलाय... मुंबईहून त्याने प्रवास सुरु केला होता आणि शेवट त्याला अंदमानात करायचा होता, पण अधे-मधे कुठे थांबायच हे त्याने ठरवलं नव्हतं... एकदम रमता-जोगी प्रकारचा तरुण होता... थोड्या गप्पा झाल्यावर त्याला बाय करुन आम्ही पुढे निघालो... जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला "वेळणेश्वर आणि हेदवी" अशी पाठी दिसली... चिपळूणचा रस्ता सोडला आणि उजव्या हातचा रस्ता धरला... अगदी निवांतपणे आम्ही सायकली चालवत होतो... अधून-मधून झाडांच्या सावलीत थोडावेळ आराम करायचो...वेळणेश्वरच्या जरा आधी त्या रशीयन तरुणाने आम्हाला गाठलं आणि म्हणाला,"Today, can I stick to you guys for the rest of the journey?"...
आम्ही होकार दिला आणि त्याला आमच्या टीम मधे शामील करुन घेतलं... त्याच्या सोबत अजून गप्पा झाल्यावर कळालं की, साहेबांकडे चांगला नकाशा सुद्धा नाहिये, नीट माहिती न काढताच साहेब सफरीला निघालेत आणि ते पण एका अनोळखी देशात... तरी सुद्धा तो एकदम निवांत होता...
हेदवी साधारण ५-६ कि.मी. असताना उजव्या हाताला वेळणेश्वरचा फाटा लागला... इथून वेळणेश्वर २-३ कि.मी. अंतरावर होतं... वेळणेश्वरला न जाता आम्ही हेदवीच्या वाटेने पुढे निघालो... हेदवीला गणपतीचं दर्शन घेतलं आणि फेरी पकडण्यासाठी तवसाळच्या दिशेने सायकली पळवल्या... सारखे छोटे-मोठे चढ-उतार लागतच होते... गेले २ तास समुद्र दिसलाच नव्हता आणि अचानक एका वळ्णानंतर समुद्र दिसला...
थोडावेळ समुद्राला लागूनच रस्ता होता आणि मग परत चढ सुरु झाला... चढत असताना उजव्या हाताला समुद्राचा नितांत सुंदर देखावा सतत नजरेत होता... चढ संपताच, देखावा बघण्यासाठी थांबलो...
(यशदीप, मी आणि रमन वोल्ह्कोव (रशीयन तरुण))
इथून थोड्या वेळातच तवसाळ गाठलं... लिंबू सरबत प्यायलो आणि फेरीत बसलो... फेरीच्या टपावर चढून समुद्र न्याहाळत बसलो... आज खूपच चढ-उतार होते... पाय जाम दमले होते आणि गणपतीपुळे अजून निदान २० कि.मी. दूर होतं... जयगडच्या जेट्टीवर पोहचलो तेव्हा सुर्य कलत आला होता... जेट्टी नंतरचा चढ संपल्यावर उजवीकडे जयगडला न जाता डावीकडची गणपतीपुळ्याची वाट धरली... आजचा सुर्यास्तपण सायकल वरुनच अनुभवला...
सुर्य मावळातच भरभर कळोख पसरु लागला आणि आमच्या सायकलीपण जोरात पळू लागल्या... साधारण एक तासात २० कि.मी. अंतर कापून आम्ही गणपतीपुळ्याला पोहचलो... आमच्या मागे-मागे येत तो रशीयन पण पोहचला... "you guys are crazy" असं म्हणत त्या रशीयन तरुणाने आजच्या सोबत केलेल्या प्रवासाच वर्णन केलं... त्याला खूप भुक लागली होती, म्हणून तो चायनीज हॉटेल शोधण्यासाठी गेला आणि "जमलं तर उद्या वाटेत भेटू" असं म्हणत आम्ही देखील मुक्कामाची जागा शोधू लागलो... एका जागी स्वस्तात मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंग शेकत आंघोळी उरकल्या आणि जेवणासाठी बाहेर पडलो... प्रसादचा डावा गुडघा खूपच दुखत होता... त्याला चालताना प्रचंड वेदना होत होत्या... आजची रात्र आराम करुन जर बरं वाटलं तर पुढे येतो नाही तर इथूनच बसने पुण्याला जातो, असा त्याचा विचार होता... मला आणि यशदीपला पण तेच योग्य वाटलं...
पर्यटनाचे आगर - "गुहागर"
सर्वप्रथम तमाम मायबोलीकरांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टीचा फायदा घेत व २०१५ वर्षात कमी ठिकाणी
झालेल्या भटकंतीचा बॅकलॉग भरण्यासाठी ४ दिवसांची गुहागर भटकंती करून आलो. मुंबई
- पुणे - सातारा - उंब्रज - पाटण - कोयनानगर - कुंभार्ली घाट - चिपळुण -
गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - राई-भातगाव मार्गे गणपतीपुळे - जयगड - तवसाळ -
अंजनवेल - गोपाळगड - गुहागर - चिपळुण - कुंभार्ली घाट - पाटण - दातेगड
किल्ला - सडा वाघापुर मार्गे सातारा - शेरे लिंब येथील "बारा मोटेची विहिर"
- बावधन (वाई) - पुणे - मुंबई असा भरगच्च कार्यक्रम होता.
सदर भटकंतीचा हा चित्र वृत्तांत. 
प्रचि ०१
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश
प्रचि ०२
हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ
प्रचि ०३
हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या
बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते.
ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर
वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती
सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा
जपुनच!
प्रचि ०४
हेदवीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा
प्रचि ०५
प्रचि ०६
उफराटा (उरफाटा) गणपती मंदिर (गुहागर)
प्रचि ०७
खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासुन गुहागरला वाचवण्यासाठी, एका भक्ताच्या
हाकेला श्री गणपती धावून आला. पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख
वळवून सागराकडे म्हणजेच पश्चिमाभिमुख केले. समुद्र शांत झाला व गुहागरचे
संरक्षण झाले. दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणुन "उफराटा गणपती".
(आख्यायिका)
गुहागरचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
वेळणेश्वर
प्रचि ११
दुर्गादेवी मंदिर
प्रचि १२
प्रचि १३
राई-भातगाव पूल
प्रचि १४
गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव भातगाव व रत्नागिरी तालुक्यातील राई या
गावांना जोडणारा पूल. या पुलामुळे गणपतीपुळे, जयगड, या स्थळांना भेट देऊन
रत्नागिरीस जाणे सुलभ झाले.
प्रचि १५
जयगडची खाडी
प्रचि १६
प्रचि १७
रोहिले गाव
हेदवीच्या पुढे तवसाळला जाणार्या रस्तावर "रोहिले" नावाचे गुहागर तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असलेले गाव वसले आहे.
प्रचि १८
प्रचि १९
तवसाळचा समुद्रकिनारा
प्रचि २०
तवसाळ - जयगड फेरी बोट
प्रचि २१
तवसाळहुन अगदी ४०-४५ मिनिटात आपल्या गाडीसहित जयगडला पोहचत येते आणि तेथुन
पुढे कर्हाटेश्वर, मालगुंड गावांना भेट देत गणपतीपुळ्यास कमी वेळात जाता
येते.
(राई-भातगावहुन जाकादेवी मार्गे गणपतीपुळे तर तवसाळ-जयगड फेरीबोटीने मालगुंड मार्गे गणपतीपुळे)
प्रचि २२
प्रचि २३
जयगड किल्ल्याचा उपदुर्ग "विजयगड"
प्रचि २४
गोपाळगड
प्रचि २५
प्रचि २६
टाळकेश्वर दीपगृह
गोपाळगडाच्या जवळच दीपगृह आणि टाळकेश्वर मंदिर आहे. येथील कर्मचार्यांच्या
परवानगीने दीपगृह पाहता येते. संध्याकाळी ५ पर्यंत दीपगृह पाहता येते.
प्रचि २७
प्रचि २८
टाळकेश्वर मंदिर
प्रचि २९
अंजनवेल येथील बहुचर्चित एनरॉन प्रकल्प
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
आंबेमोहर
प्रचि ३४
प्रचि ३५
बकुळ
प्रचि ३६
अंजनवेल येथील "अंजन वेल"
प्रचि ३७
चांडाळ चौकडी 
प्रचि ३८
तळटीपः
१. प्रकाशचित्रे टेक्निकली तितकेसे खास आले नाहीत. 
२. वरील काही माहिती "पराग पिंपळे" यांच्या "साद सागराची
गुहागर-वेळणेश्वर-हेदवी" या पुस्तकातुन. गुहागर भटकंतीसाठी (रादर को़कण
भटकंतीसाठी) अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. 
पुढील भागात "गणपतीपुळे परीसर" 

रत्ननगरी "रत्नागिरी" – (९) चिपळुण परीसर
=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते चिपळुण परीसरातील हेदवी,
वेळणेश्वर, श्री परशुराम मंदिरांना. (सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या
रत्नागिरी भटकंतीतले आहेत. महाराष्ट्रातील या ठिकाणांची माहिती व्हावी
म्हणुन पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
वशिष्ठी नदी आणि परीसर (परशुराम घाटातुन)
श्री परशुराम मंदिर
जयगडची खाडी
गणपतीपुळ्याहुन गुहागरला जायचा राई–भातगाव पूल
=================================================
=================================================
हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी हि वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व येथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव. पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.
(श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर)
श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले.मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढर्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणार्यांनाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आपल्याला पर्यटन व तिर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो.
अशा या हेदवी गावात श्री दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिराव्यतिरीक्त अजुनही बरेच काही बघण्यासारखे आहे.
हेदवीचा सुंदर समुद्रकिनाराश्री उमा महेश्वर मंदिर –
हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे.
१७७० ते १७८० दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर
उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर
असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभार्यात एक शिवलिंग असून
मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंडदेखील आहे.
बामणघळ – हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!
बामणघळ
असे हे लक्ष्मीगणेशाचे सुंदर मंदिर समुद्राजवळच असल्याने समुद्राची गाज ऐकत आपल्या मनातील भक्तीभावाला साद घालण्याचा आनंद अवर्णनीय असतो आणि तो अनुभवण्यासाठी एकदा तरी हेदवीला अवश्य भेट द्या.
जायचे कसे?
१) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - अडुर - हेदवी (२४ किमी)
२) मुंबई ते गुहागर ( ३१३ किमी)
गुहागर - पालशेत - साखरीआगार - वेळणेश्वर - हेदवी (३० किमी)
=================================================
=================================================
श्री क्षेत्र वेळणेश्वर
=================================================

श्री वेळणेश्वर
वेळणेश्वरच अप्रतिम समुद्रकिनारा
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)===
रत्नागिरी" – (१० – अंतिम) - एक खाद्य भ्रमंती
=================================================
=================================================
कोकण हे जसे स्वच्छ,सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार झाडांतुन धावणारी लाल
मातीची पायवाट, कौलारू घरे, हिरवागार निसर्ग, प्रेमळ कोकणी माणसे या
गोष्टींसाठी जरी प्रसिद्ध असले तरी ते प्रसिद्ध आहे ते इथल्या
खाद्यसंस्कृतीसाठीही. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे,
हापूस आंबे, फणस, करवंद न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे.
तेंव्हा रत्ननगरी रत्नागिरीच्या शेवटच्या भागात आपण "कोकणी खाद्यभ्रमंती"
करूया. 
=================================================
=================================================
प्रेमळ इशारा – ENTER AT OWN RISK 
=================================================
=================================================
व्हेज थाळी
कोकणची प्रिती......वडे सागुती 
मांदेली ताट
मांदेली फ्राय
चिकन बिर्याणी
सुरमई ताट
सुरमई फ्राय
स्वीट डिश
कोकण सफर आणि कोकणी मेव्याशिवाय कशी पूर्ण होणार???
कोकम सरबत
हापूस आंबा (जुना फोटो)
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
फणस (जुना फोटो)
रानमेवा – करवंद (जुना फोटो)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – समाप्त 
री महाकाली (आडिवरे)
=================================================
=================================================
आजच्या रत्नागिरी सफरीत आपण आज भेट देणार आहोत ते कोल्हापुरच्या
अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेल्या आडिवर्याच्या श्री महाकाली मंदिराला.
(सदर फोटो माझ्या दोन वर्षापूर्वीच्या रत्नागिरी भटकंतीतले आहेत.
महाराष्ट्रातील थोड्याशा अपरीचित अशा या ठिकाणांची माहिती व्हावी म्हणुन
पुन्हा या चित्रमालिकेत देत आहे.)
=================================================
कोकण म्हटले की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवा निसर्ग, फेसाळणारा समुद्र,
नारळी-पोफळीच्या बागा आणि त्यातून जाणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे व
त्यातील अगत्यशील माणसे. असे हे कोकण अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते
म्हणजे येथील जागृत देवस्थाने, सुबक मंदिरे आणि देवदेवतांच्या थक्क
करणार्या आख्यायिकांकरीता. काही परिचित तर बरीचशी अपरिचित अशी हि
देवस्थाने. असेच एक ऐतिहासिक परंपरा लाभलेले एक देवस्थान म्हणजे आजच्या
आपल्या भेटीचे ठिकाण आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर.
कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणे महत्त्व असलेले व आडिवरे गावचे भूषण
असेलेले श्री महाकाली मंदिर हे रत्नागिरीपासून ३४ किमी आणि राजापुरपासून २८
किमी अंतरावर आहे. महाकाली देवस्थान हे राजापुर
तालुक्यातील जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती
आहे. धार्मिक संचित असलेले हे ठिकाण येथील सुंदर निसर्गसौंदर्यामुळे पर्यटन
स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे.
आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या
पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी
भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी
नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच
प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली.
त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने
दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मल वर घे आणि माझी स्थापना कर".
त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री
महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती
अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली.
(श्री महासरस्वती)
मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री
महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी,
प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शन
घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री
देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि
महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण
परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच
श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर असून
श्री महाकालीची मूर्ती हि अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराचा सभामंडप
प्रशस्त आहे. अशा या प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी
आंग्रे, समर्थ रामदास स्वामींनी भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे पुरावे
सापडतात.

दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध
प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय
आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला
वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच
काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक
कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
सध्याच्या धकाधकिच्या जीवनात आपण काही विरंगुळ्याचे क्षण आपण नेहमी शोधत
असतो. निर्मळ आणि मनसोक्त आनंद देणारे क्षण आपल्याला पर्यटनातून हमखास
मिळतात. अशा या जागृत देवस्थानाला व
नितांत सुंदर परिसराला एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटन व तीर्थटन या दोन्हीचा लाभ घ्या.
परिसरातील इतर काही ठिकाणेः
श्री महाकालीचे माहेर वेत्येः महाकालीच्या पश्चिमेस वसलेले वेत्ये गाव हे
पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. वेत्येच्या समुद्रकिनारी काही वर्षापासून
सुरूची लागवड करण्यात आली आहे तसेच वेत्ये खाडीमध्ये नौकाविहारासाठी व
पोहण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा आहे.
कशेळीचा श्री कनकादित्य (सूर्यमंदिर), पूर्णगडचा किल्ला, माडबनचा समुद्रकिनारा, गणेशगुळ्याचा गणपती आणि तेथील रम्य समुद्रकिनारा, सुरूच्या बनातील भाट्ये बीच आणि नारळ संशोधन केंद्र. भाट्ये आणि पूर्णगड खाडीवर पूल झाल्याने रत्नागिरी शहरापासून जवळ अशी हि धार्मिक आणि पर्यटन स्थळे. रत्नागिरी - राजापुर मार्गावर एकापाठोपाठ एक येणारी हि ठिकाणे एका दिवसात सहज पाहता येतात.
माडबन येथील नयनरम्य समुद्रकिनारा (सध्या वादाच्या भोवर्यात सापडलेला)
जायचे कसेः
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी किंवा राजापुर येथे यावे.
रत्नागिरी पासून अंतर - रत्नागिरी, पावस, गावखडी, पूर्णगड, कशेळी, आडीवरे ( ३४ किमी)
राजापुर पासून अंतर - धारतळे, आडीवरे ( २८ किमी)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)===
थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा
=================================================
=================================================
रत्नागिरीच्या आजच्या भटकंतीत आपण भेट देणार आहोत थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा), पावस आणि भाट्येच्या समुद्रकिनार्याला.
=================================================
थिबा पॅलेस (थिबा राजाचा राजवाडा)
प्रचि १
प्रचि २
पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी मंदिर
प्रचि ३
आवळीच्या झाडातुन प्रकटलेला "आवळी गणेश" (पावस)
प्रचि ४
भाट्ये खाडी
प्रचि ५
भाट्ये खाडीवरचा पूल
प्रचि ६
भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा समुद्र
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
भाट्ये खाडीपुलावरून दिसणारा रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारा
प्रचि ११
भाट्येचा समुद्रकिनारा
प्रचि १२
प्रचि १३
भाट्ये समुद्रकिनारी बांधत असलेले पर्यटक निवास
प्रचि १४
हॉटेल कोहिनूर समुद्र
प्रचि १५
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)==
डेरवणची शिवसृष्टी
=================================================
=================================================
रत्नागिरीच्या या सफरीत आज आपण भेट देणार आहोत ते डेरवण येथील शिवसृष्टीला.
चिपळुण शहरापासुन साधारण १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासुन साधारण ४ किमी अंतरावर
श्री सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतीप्रित्यर्थ हि शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात
श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार
करण्यात आले आहे. एकदा तरी आवर्जुन भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)
प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
रत्ननगरी रत्नागिरीच्या या तिसर्या भागात आपण भेट देणार आहोत ते गणपतीपुळे येथील "प्राचीन कोकण" या अनोख्या म्युझियमला.
=================================================
=================================================
"गणपतीपुळे" कोकण किनारपट्टीवरील डोंगराच्या पायथ्याशी असलेले जागृत व
स्वयंभु श्री गणेश मंदिर. कोकणातील ३००-४०० वर्षाची परंपरा असलेले
महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. भारतातील अष्टद्वारदेवतांपैकी हि
पश्चिमद्वार देवता. समोर क्षितीजापर्यंत पसरलेला निळाशार समुद्र, पांढरी
शुभ्र वाळू, सभोवतीचा हिरवा निसर्ग आणि त्यावर कळस म्हणजे गुलाबी रंगातील
सुंदर गणेश मंदिर. अशी रंगांची मुक्तहस्ते उधळण असलेला हा परिसर मला नेहमीच
आकर्षित करत असे. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किमी अंतरावर कोकण
टुरीझम डेव्हलपमेंट आणि रीसर्च सेंटर यांचा ३ एकर परिसरात उभारलेला
"प्राचीन कोकण-५०० वर्षापूर्वीचे कोकण" हा प्रकल्प आहे. "पर्यटनातून
रोजगार निर्मिती" हा विषय घेऊन काही महाविद्यालयीन तरूण तरुणी येथे काम
करीत आहेत. ५०० वर्षापूर्वीचे कोकण, तेथील जीवनपद्धती, रोजगार, संस्कृती
यांची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून
आपण आत जाताच संस्थेच्या मार्गदर्शकाकडून तांब्याच्या पेल्यातुन थंडगार
आणि गोड पाणी देऊन आपले स्वागत होते. प्रत्येकी १५ रुपये इतके नाममात्र
शुल्क (कॅमेर्यासाठी रूपये १०/- जादा) देऊन आपण गाव पहायला सज्ज होतो.
गावात प्रवेशद्वाराशीच एक सुंदर सजवलेली बैलगाडी आपले स्वागत करते. समोरच
एक निवांत कोकणी माणुस आपले पारंपारीक वाद्य वाजवत बसलेला दिसतो. यावरूनच
आतील गावाची आपल्याला कल्पना येते.
सजवलेली बैलगाडी
निवांत बसलेला कोकणी माणूस
गावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला एक गुहा लागते. या गुहेच्या आधी
फळांनी भरलेली एक टोपलीही दिसते. हि गुहा म्हणजे काळाचे प्रतिक असून आपण
वर्तमानकाळातून भुतकाळात प्रवेश करतो. प्रकल्पाची
संपूर्ण माहिती देण्याकरीता संस्थेचे मार्गदर्शक आपल्या सोबत असतात. गावात
आपल्याला प्रथम दिसते ती "नक्षत्र बाग". आपली संस्कृती निसर्गातून फुलली
आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून
त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव
जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि
नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष
"आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य,
सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष
पाहत आपण गावात प्रवेश करतो.
काळाची गुहा
फळांनी भरलेली टोपली
गावात प्रवेश केल्यावर आपल्याला दिसते ते "वाघजाई" या ग्रामदेवतेचे
मंदिर. वाघजाई देवीबद्दल माहिती देतान सांगीतले कि, ज्या निसर्गात वाघ असतो
तो निसर्ग समृद्ध मानला जातो. पूर्वीचा कोकण असाच समृद्ध होता. आपल्या
पुर्वजांनी निसर्गाला देवत्व बहाल केल्याने ग्रामदेवतेचे नावहि निसर्गाशी
संबंधित आहे. ग्रामदेवतेचे मंदिराजवळच कोकणचे जनक श्री परशुराम यांची
प्रतिकृती आहे. ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आपण गावात फेरफटका मारण्यासाठी
निघतो. पूर्वीच्या बारा बलुतेदार पद्धतीवर आधारलेल्या या गावात आपल्याला
प्रथम भेटतो तो एक बलुतेदार - नाभिक. या नाभिकाबद्दल लोकसाहित्यातील एक
मजेशीर वर्णन आम्हाला सांगीतले ते असे कि गावातली प्रत्येक गोष्ट हि
नाभिकाला माहित असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट हि गावभर
होते तेव्हा तुम्ही गाव बघायला आला हि गोष्ट ज्याअर्थी नाभिकाला समजली
त्याअर्थी ती सगळ्या गावाला समजेल. 
ग्रामदेवता – वाघजाई
भगवान श्री परशुराम
नाभिक
प्रथेप्रमाणे सर्वांत आधी आपण जातो ते खोताच्या घरात. अंगणातच सुपारी कातरत बसलेले खोत आपल्याला दिसतात. माजघरात खोताची बायको उभी आहे. कोकणी स्त्रिया शूर व सुंदर होत्या पण त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माजघराचा उंबरठा हि त्यांच्या साठी मर्यादा होती. पडवीत खोतांची दोन मुले परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. खोताच्या घराची हुबेहुब प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. खोताच्या घरातून आपण जातो ते एका शेतकर्याच्या घराकडे. पूर्वी बारा बलुतेदार, राजे यांना धान्य पुरवण्याचे काम शेतकरी करायचा. शेतकऱ्याच्या घराशेजारीच गोठा आहे. त्याची सर्व अवजारे जसे, नांगर, इरलं, मासे पकडायची खोयणी, कणगी आपल्याला येथे पहायला मिळतात.
खोताचे घर
सोंगट्या खेळत बसलेली खोताची मुले
अशा प्रकारे गावात फेरफटका मारताना आपल्याला एक एक बलुतेदार भेटत जातो.
गणपती सणाला लाल मातीचे गणपती, मातीची भांडी बनविणारा कुंभार, सावंतवाडीची
प्रसिद्ध लाकडी खेळणी बनविणारा सुतार,
पाण्यात जाळे टाकून मासे पकडणारा कोळी, तेलाच्या घाण्यावरून तेल काढणारा
तेली, चर्मकार, माडीवाला, बागकाम करणारा माणूस, गारूडी, दरवेशी, वाणी,
धनगर, कडकलक्ष्मी यांना भेट देत देत आपण पोहचतो ते पाणवठयावर. उंचावरून
पडणारे पाणी, मातीचा बांध, पाणी भरणार्या कोकणी स्त्रिया हा सर्व देखावा
सुंदर आहे. गावात सर्वात जो उंच पाणवठा असे तेथे बंधारे बांधून ते पाणी
प्रत्येक घराकडे नेले जाते. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे एकमेव असे ठिकाण कि
जेथे सगळेजण एकत्र येत असे.
पाणवठ्यावर पाणी भरत असलेली कोकणी स्त्री
बागकामात व्यस्त असलेला कोकणी माणूस
कडकलक्ष्मी
चर्मकार
वाणी
सुतार
कुंभार
सुप, टोपल्या बनविणारी कोकणी स्त्री
कासार
कोळी
प्रत्येक समाजाची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती असते. कोकणी खाद्यसंस्कृती चवीष्ट आहे. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. कोकणी माणसांच्या याच संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या वस्तू तांदुळ काढण्याचे घिरटं, जातं, कोकणी कूकर म्हणजेच मोदकपात्र, परात येथे पाहवयास मिळतात.
पूर्वापार चालत आलेली कोकणी भांडी
पूर्वापार चालत आलेली कोकणी भांडी
कोकणातील मुख्य सण "गौरी–गणपती"
घरकामात व्यस्त असलेली कोकणी स्त्री आणि शेजारी खेळत असलेली लहान मुलगी
शिकार करणारा कोकणी
शिकार करून घरी परतताना
माडीवाला
दरवेशी
धनगर
गारूडी
विहिर
साकव
यानंतर आपण पोहचतो ते सगळ्यात उंच भागात. येथे ३० ते ३५ फुट उंच मचाण बांधलेला आहे. त्यावरून आजुबाजुचे विहंगम दृष्य दिसते. गणपतीपुळ्याचा निळाशार समुद्र, गावातील नारळीपोफळीच्या बागा, खारफुटीचे जंगल खुपच नयनरम्य दिसते.
मचाण
मचाणाच्या समोरच दशावतारात वापरले जाणारे मुखवटे टांगुन ठेवले आहेत. ते तुम्ही स्वतःच्या चेहर्यावर लावू शकतात.
दशावतारी मुखवटे
मुखवटे लावून आमचा हा "दशावताराचा" प्रयोग 

कोकणात आढळणार्या निरनिराळ्या जातींच्या सापांचे व कोकणातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आपणास बघावयास मिळते. तसेच विविध दुर्मिळ पक्ष्यांचे संग्रहालय सुद्धा आहे. गावात फेरफटका मारून तुम्ही दमलात आणि भुक लागली असेल तर इथले "आतिथ्य" रेस्टॉरंट तुमच्या स्वागताला तयार आहे. खास कोकणी पदार्थ म्हणजेच भाजणीचे गरमागरम थालिपीठ, उकडीचे मोदक, फणसाचे सांजण, कोकम/आवळा सरबत यावर यथेच्छ ताव मारता येतो. जर तुम्हाला येथे काही खरेदी करावयाची असेल तर कोकण टुरीझमच्या हस्तकला केंद्रात अनेक गोष्टी आपणास पहायला आणि खरेदी करायला मिळतात. या संस्थेने केवळ ५०० वर्षापूर्वीच्या कोकणसंस्कृतीचे दर्शन देणारे केवळ खेडेच नाही उभारले तर कोकणातील उत्पादनांना बाजारपेठ देण्याचा प्रयत्नही चालवला आहे.
अशा या प्राचीन कोकणीसंस्कृतीचे दर्शन घेत आपण गावच्या वेशीपर्यंत पोहचतो. गावच्या वेशीवर शेंदुर फासून देव ठेवला आहे आणि हाच देव गावचा राखणदार मानला जातो. कोकणी माणसे फार श्रद्धाळू आहेत ती जेव्हा गावच्या बाहेर जातात तेव्हा या राखणदाराला नमस्कार करून जातात. या सर्व सफरीमध्ये आपणही या खेड्याचा एक भाग होऊन जातो आणि आपल्या नकळतच आपण या देवाला नमस्कार करून या गावाचा निरोप घेतो.
गावचा राखणदार
जायचे कसेः
१. मुंबई - गोवा महामार्गावर रत्नागिरीला येण्यापूर्वी १५ किमी वर निवळी
येथे गणपतीपुळयाकडे जाणार्या रस्त्याचा फाटा फुटतो तेथून सुमारे ३५ किमी
अंतरावर गणपतीपुळे आणि गणपतीपुळयाहून १ किमी अंतरावर आहे प्राचीन कोकण.
मुंबई - रत्नागिरी हे अंतर ३७५ किमी
२. रत्नागिरीहून हातखंबामार्गे गणपतीपुळे हे अंतर ४८ किमी असून नेवरे मार्गे हेच अंतर फक्त २९ किमी एवढेच आहे. गणपतीपुळयाहून १ किमी अंतरावर आहे प्राचीन कोकण.
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)==
श्री क्षेत्र मार्लेश्वर
=================================================
=================================================
श्री मार्लेश्वर देवस्थान
– संगमेश्वर तालुक्यातील देवरूख गावापासुन अंदाजे १६-१७ किमी अंतरावर
सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळ या गावातील डोंगरावर असलेले अतिशय जागृत
देवस्थान म्हणुन श्री मार्लेश्वर ओळखले जाते. जवळच असलेला धारेश्वर धबधबा
मार्लेश्वराच्या सौंदर्यात अजुन भर टाकतो. भर पावसात येथील निसर्गसौंदर्य
शब्दातीत असते. मार्लेश्वर येथील गुहेत असलेल्या मंदिरात श्री शंकराची
मूर्ती आणि शिवपिंड असुन भगवान श्री शंकर नागरुपाने दर्शन देतात अशी
भाविकांची श्रद्धा आहे. येथील शांत व गूढ वातावरण निश्चितच मनाला विलक्षण
अनुभव देणारे आहे. येथे विविध प्रकारचे पक्षीहि पाहवयास मिळतात. मकर
संक्रांत, महाशिवरात्री, श्रावणी सोमवार हे उत्सवाचे दिवस. चला तर आज या
मार्लेश्वराचे दर्शन घेऊया.
मार्लेश्वरला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक संगमेश्वर
मुंबई-संगमेश्वर अंतर (रस्याने) – साधारण ३१५ किमी
संगमेश्वर - देवरूख अंतर – १६-१७ किमी
देवरूख-मारळ अंतर – १५ किमी
=================================================

प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=
रत्नदुर्ग किल्ला
=================================================
=================================================
रत्नागिरीच्या भटकंतीत आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी शहरापासुन जवळच
असलेल्या ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्याला. रत्नागिरी शहरापासुन अवघ्या २ किमी
अंतरावर रत्नदुर्ग किल्ला उभा आहे. सदर किल्ला हा तीनहि बाजुंनी समुद्राने
वेढला असुन पायथ्याशी भगवती बंदर आहे. गडाची तटबंदी भक्कम असुन त्यावरून
चालत समुद्राचे विहंगम दृष्या बघता/टिपता येते.
किल्ल्यावरच भगवती देवीचे अतिशय सुंदर मंदिर असुन या गडाला भगवतीचा किल्ला
असेही म्हणतात.. किल्ल्याच्या माथ्यापर्यंत चांगला डांबरी रस्ता असल्याने
वाहन थेट माथ्यापर्यंत जातात. संध्याकाळी ६ वाजता किल्ल्याचे दरवाजे बंद
होत असल्याने सूर्यास्त पाहून लवकर गडाच्या खाली येणे बरे. रत्नागिरी
शहरातील आवर्जुन बघण्यासारखे एक ठिकाण.
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
श्री भगवती देवीचे मंदिर
प्रचि ७
श्री भगवती देवी
प्रचि ८
गडावरून दिसणारे भगवती बंदर
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
गडावरून दिसणारे सूर्यास्ताचे मनोहर दृष्य
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=
गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण
राष्ट्रदेवीचे निसर्व निर्मित केवळ नंदनवन
– कवी माधव
"कोकण" – महाराष्ट्राच्या कोंदणातील हिरवागार पाचू. समोर
पसरलेला निळाभोर आणि शांत समुद्रकिनारा, आकाशाशी स्पर्धा करणार्या उंचच
उंच नारळपोफळींच्या बागा, हिरव्यागार झाडांमधुन धावणारी लालचुटुक मातीची
वाट, आंबा, फणस, काजू इ, रानमेवा, कौलारू चिरेबंदी घरे, वडे सागुती असा
फक्कड बेत, प्रेमळ कोकणी माणूस हे सगळे रसायन एकत्र केले कि तयार होते
"कोकण". भगवान परशुरामने वसवलेल्या याच कोकणातील एक भाग म्हणजे
"रत्नागिरी" जिल्हा. आंबे-फणस, नारळ-पोफळींच्या बागांनी समृद्ध रत्नागिरीला
अप्रतिम असे निसर्गसौंदर्य बहाल केले आहे. याच रत्ननगरीचा एक हा एक
फेरफटका.
रत्नागिरी भटकंतीची सुरुवात आपण श्रीगणेशाच्या दर्शनाने करूया.
=================================================
=================================================
गणपतीपुळे
– मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर
असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस
पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते.
समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला
"पुळ्याचा गणपती" असेही म्हणतात. समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि
त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर
तीर्थाटनाचाही आनंद देते.
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रदक्षिणा मार्ग
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारा
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
=================================================
=================================================
गणेशगुळे
– गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका
डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार
बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते.
अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते.
रत्नागिरी-पावस अंतर साधारण १८-२० किमी
पावस-गणेशगुळे अंतर साधारण २-३ किमी
=================================================
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
=================================================
=================================================
भंडारपुळे
– "आरेवारे" या गावाजवळ खाडीवर पूल झाल्याने रत्नागिरीहुन गणपतीपुळ्याला
जाणारा मार्ग हा भंडारपुळे गावातुन जातो. या गावाला अतिशय सुंदर आणि रमणीय
समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याहुन रत्नागिरीला जाताना डोंगरावरून
समुद्रकिनार्याचे विलोभनीय दृष्य दिसते. या गावातील बहुतेक लोक घरी गणपती
आणत नाहीत. गणपतीपुळ्याचा गणपती हेच या गावचे मुख्य दैवत आहे. गणपतीपुळे ते
भंडारपुळे अंतर साधारण २ किमी आहे.
=================================================
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=
कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.
निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.
मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग
श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर
ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.
सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.
डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर

श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.

हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.
नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर



मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून प्रत्यक्ष पाहणार्यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना नक्कीच करायला हवी.

मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.
नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर

श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:
उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.
टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.
उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.
जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.
या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्यापैकी यशस्वी झाले आहे.





भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.
असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!
------------------------------------------------------------------
माहितीसाठी विशेष आभारः तेरेदेसाई व मराठे परिवार;
अंतर व सनावळीच्या अचूकतेसाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.
संस्कृती-सोहळा -मार्लेश्वरचा विवाह!

>> जे. डी. पराडकर
देवाला हळद लागली, घाणा भरून झाला, हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार होणारे विवाहापूर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले की, साऱया भक्तगणांना प्रतीक्षा असते ती अपूर्व निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या श्री देव मार्लेश्वराच्या आणि साखरप्याच्या गिरीजादेवी या दोन देवतांच्या विवाहाची. देवतांचा हा कल्याण विधी सोहळा 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दुपारी संपन्न होणार आहे. यासाठी असंख्य शिवभक्त सह्याद्रीच्या कडेकपारीत आदल्या दिवसापासून दाखल होतात.
हिरवीगार वनराई, नीरव शांतता आणि मन प्रफुल्लित करणारा गारवा अशा निसर्गरम्य सान्निध्यात मार्लेश्वर यात्रोत्सवातील देवाच्या विवाहाचा महत्त्वाचा क्षण आता जवळ आला आहे. गेले काही दिवस ज्या क्षणाची भक्तगणांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे, तो साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा 14 जानेवारी रोजी सह्यशिखरावर रंगणार आहे. 12 जानेवारीपासून सुरू झालेल्या मार्लेश्वर यात्रोत्सवातील श्री देव मार्लेश्वराच्या विवाहापूर्वीचे सर्व विधी आंगवली येथील मूळ मठात संपन्न होणार आहेत. हे विधी झाल्यावर मकर संक्रांतीतील हा विवाह सोहळा रंगणार आहे. आंगवली मठात सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यावर पुजारी मठातील मार्लेश्वराचा टोप हलवून तो सुवासिनींकडे देतात. माता गंगेची मूर्तीही या वेळी मानकरी अणेरावांच्या मांडीवर ठेवत दोघांचेही घाणे भरण्याचा सोहळा पार पडतो. यानंतर देवाला आणि गंगामातेला हळद लागल्यावर त्यांना सुवासिनींनी शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर देवाचा टोप आणि गंगामातेची मूर्ती जागेवर ठेवली जाते. रात्री विवाहापूर्वेचे सर्व धार्मिक विधी झाल्यावर मध्यरात्री 12 वाजता यजमान वाडेश्वर, देवरुखची दिंडी, वांझोळेची कावड, लांजा वेरळमधून आलेल्या दिंडीसह शेकडो भाविकांना बरोबर घेत चर्मकार बंधूंच्या मशालीच्या साहाय्याने मार्लेश्वराच्या पालखीने शिखराकडे प्रस्थान केले जाते. या पालखीसोबत लांजा वेरवलीचे मराठे, पाटगावचे मठाधिपती, आंगवलीचे मानकरी अणेराव, पुजारी जंगम यांच्यासह वाडेश्वरासोबत आलेले मानकरी आणि भाविक यांचा समावेश असतो. नवरदेवाच्या पालखीत गंगामाता आणि मल्लिकार्जुन विराजमान असतात. रात्री उशिरा या पालख्या पवईजवळ आल्यानंतर साखरप्यातून गिरीजामातेची पालखी एकत्र आल्यावर सर्व पालख्या हर हर महादेवाची गजर करीत शिखराकडे प्रयाण करतात. यात्रोत्सवातील मुख्य दिवस म्हणजे मार्लेश्वर गिरीजा देवीचा विवाह सोहळा. कल्याण विधी सोहळा झाल्यावर सर्व पालख्यांचे शिखरावरच वास्तव्य असते.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे 15 कि. मी.आणि आंगवली या गावापासून 11 कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेले श्री मार्लेश्वर हे पवित्र व जागृत देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’ व त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुंजन प्रसन्नतेचे वरदान आहे.
श्री क्षेत्र मार्लेश्वर देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहा स्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एका वेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभाऱ्यात मात्र 25 माणसे उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभाऱयात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोलवर गेलेली विवरं आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात. मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत.
कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रोत्सव असतो. 13 जानेवारी 2025 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱया या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात. पूर्वी मारळ, आंगवली या गावांना फारसे कोणी ओळखत नव्हते, परंतु आज मारळ, आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ होय. दरवर्षी मकर संक्रांतीला तेथे होणारा कल्याण विधी म्हणजेच मार्लेश्वर-गिरीजादेवीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. मकर संक्रातीला पारंपरिक पद्धतीने मार्लेश्वर देवाचा विवाह संपन्न होणार आहे. या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱयातून लाखो भाविक आदल्या दिवशी सह्याद्रीच्या कडेकपारीत दाखल होतात. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू झाली असून आंगवली येथील श्रीदेव मार्लेश्वर आणि कोंडगावची गिरजादेवी यांच्या विवाह सोहळ्यास विशेष महत्त्व असते व यास कल्याण विधी असे म्हणतात. सनई चौघडय़ाच्या सुरात पारंपरिक विधिवत मंगलमय वातावरणात शिवशंभोचा गजर करीत विवाह सोहळा पाहण्यासाठी प्रचंड जनसागर लोटतो. मानपान विडे भरणे, मुलगी दाखविणे, पसंती हळद लावणे, उतरणे, आंतरपाट मंगलाष्टके यांसारखे हिंदू धर्मात लग्नासाठी पारंपरिक विधी होतात तेवढे विधी या देवांच्या लग्न सोहळ्यात केले जातात.
महाराष्ट्राचं वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचे श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा आविष्कारच! श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास आध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.





































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.