Wednesday, March 19, 2025

काष्ठशिल्पांची अद्भुत नगरी" - घोणे काष्ठशिल्प संग्रहालय (कोलाड)

 
Submitted by जिप्सी on 26 March, 2017 - 11:47

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कोलाड रेल्वे स्टेशनजवळ, महामार्गाला लागुनच "कलाकृती" नावाचे एक हॉटेल आहे. खरंतर प्रत्येक महामार्गावर गावाजवळ/गावाबाहेर हॉटेल्स, ढाबे हे दिसतात. पण या "कलाकृती" हॉटेलमध्येच वसली आहे "काष्ठशिल्पांची एक अद्भुत नगरी" श्री रमेश घोणे यांचे "घोणे काष्ठशिल्प संग्रहालय". लाकडाच्या ओबडधोबड ओंडक्यामधुन साकार झालेल्या विविध कलाकृतींची अनोखी दुनिया या संग्रहालयात पाहण्यास मिळते. या नानाविध वस्तुंना "काष्ठशिल्प कला" आणि इंग्रजीमध्ये याला ड्रिफ्टवूड असे म्हणतात. म्हणजेच जळाऊ, टाकाऊ आणि जंगलातुन गोळा करण्यात आलेल्या लाकडांमधुन साकार करण्यात आलेल्या विविध कलाकृती. निसर्गाच्या मृत अवस्थेत दडलेल्या अप्रतिम शिल्पांना जिवंत रूप देण्याचे कसब श्री रमेश घोणे यांनी केले आहे आणि निसर्ग हा आपला गुरू असुन निसर्गातील घटकांचे बारकाईने निरिक्षण केले असता खुप काही गवसते याची पुरेपुर अनुभुती हे संग्रहालय पाहताना होते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९


रोहा परीसरातील दुर्गभ्रमंती

Submitted by जिप्सी on 21 June, 2016 - 01:12

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, नविन आणि यो रॉक्स सोबत रोहा परीसरातील तळगड, घोसाळगड, कुडा लेणी आणि बिरवाडीचा किल्ला अशी दुर्गभ्रमंती केली त्याची हि चित्रझलक. Happy

तळगड
रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत. त्यापैंकी तळागड हा किल्ला कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडा लेणी आणि तळागड , घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत. इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.......
कुडा लेणी
तळा-मांदाड रस्त्यावर कुडा गावातील एका टेकडीवर हि लेणी कोरलेली आहे. तळागावाहुन मांदाड गावाच्या थोडे अलीकडे कुडा लेण्यांकडे जाणारा कच्चा रस्ता जातो. काही अंतरावर कुडा लेण्यांचे सुखद दर्शन होते. गर्द झाडीमध्ये लपलेली ही लेणी फारच सुंदर आहेत.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
कुंडलिका नदी
घोसाळगड
रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्याा व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.
घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
बिरवाडी
रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे. इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्यात बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्या पैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धा-एक तास पुरतो.

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(किल्ल्यांबद्दलची माहिती ट्रेक क्षितिज.कॉम या संकेतस्थळाहुन साभार)

दक्षिण काशी - श्री क्षेत्र हरिहरेश्वर

Submitted by जिप्सी on 21 May, 2015 - 00:58

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०१

प्रचि ०२

(दोन्ही प्रचि पूर्वप्रकाशित)

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण "दक्षिण काशी" म्हणुन ओळखले जाते. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्‍या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान.

सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे.
(साभारः विकिपीडिया)

केळशी-वेळास-बाणकोट मार्गे हरिहरेश्वरला येताना वेसवी गावातुन "जंगल जेट्टीतुन" गाड्या बागमांडला येथे आणाव्या लागतात. तेथुन हरिहरेश्वर केवळ ४-५ किमी अंतरावर आहे.

वेसवी गावातील जेट्टी
प्रचि ०३

प्रचि ०४
बागमांडला जेट्टीवर वाळुने भरलेला ट्रक उतरताना
प्रचि ०५

प्रचि ०६
श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर (मंदिरात व परीसरात फोटो काढण्यास बंदी आहे.)
प्रचि ०७

प्रचि ०८
हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा
प्रचि ०९
प्रदक्षिणा मार्ग. पाणी आणि वार्‍याच्या मार्‍याने डोंगरात साकार झालेले विविध मनमोहक आकार.
(प्रदक्षिणा मार्ग अतिशय धोकादायक असल्याने भरती/ओहोटीचे गणित बघुन (स्थानिकांना विचारूनच) जावे.
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
सूर्यास्त
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
कसे जालः
मुंबईहुनः मुंबई - पनवेल - पेण - नागोठणे (वाकण) - कोलाड - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १८० ते २०० किमी)

पुण्याहुन पुणे - पौड - मुळशी - ताम्हिणी घाट - माणगाव - लोणेरे फाटा - गोरेगाव - म्हसळा - श्रीवर्धन (२ किमी आधी) - हरीहरेश्वर.
(अंदाजे १७० ते १९० किमी)

"ऋतु हिरवा" — वरंधा घाट आणि शिवथर घळ

Submitted by जिप्सी on 22 September, 2014 - 12:41

पुढे पावसाळा नभी मेघमाळा, दर्‍या डोंगराला निळा ये उमाळा
वरी कोसळे अंबराचा जिव्हाळा, दुजा स्वर्ग ऐसे दिसे विश्व डोळा
असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा

...पुन्हा पावसाळा असे जरी असले तरी त्याचे येणे सुखावह असते. प्रत्येक वेळी त्याचे रूप वेगळं असतं. कधी सुखावणार तर कधी दुखावणारं. पण काहिही असलं तरी त्याच्या येण्याने आनंद न होणारा मनुष्य विरळाच. वळवाचा पाऊस, आषाढात गरजत बरसणारा धुवांधार पाऊस, श्रावणात उनपावसाचा खेळ खेळत बरसाणारा पाऊस तर भाद्रपदात रिमझिम झरणारा पाऊस. वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरं या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणाऱ्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्‍या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात. अशा या वेड लावणार्या पावसाचे रूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. घाटमाथ्यावर कमी-अधिक तर कोकणात धुवांधार.

घाटमाथ्याला कोकणात जोडणार्‍या सह्याद्रीच्या घाटरस्त्याचे सौंदर्य तर काही औरच. पुण्याहुन मुळशीमार्गे माणगाव कोलाडला जाणारा "ताम्हिणी घाट", भोर मार्गे महाडला जाणारा "वरंधा घाट", कराडहुन चिपळुणला जाणारा "कुंभार्ली घाट", तर कोल्हापुरहुन कोकणात उतरणारा "अंबा घाट" ,"फोंडा घाट", "गगनबावडा" आणि "आंबोली घाट". प्रत्येक घाटरस्त्याचे सौंदर्य पावसात किंवा पाऊस पडुन गेल्यावर जरा जास्तच खुलते. एखाद्या जर्जर वृद्धेचे अल्लड नवतरूणीत रूपांतर व्हावे असा या घाटरस्त्यांचा पावसात कायापालट होतो. अशाच एका देशावरच्या गावाला कोकणाशी जोडणार्‍या अशाच एका "वरंधा घाटाचा" हा चित्र परीचय.

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा
ऋतु हिरवा..... ऋतु बरवा

प्रचि ०१
सांग चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट...
निरा भाटघर धरण
प्रचि ०२
चंद्रहार
प्रचि ०३
निरा देवधर धरण
प्रचि ०४

वरंधाच्या वाटेवर

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
वरंधा घाट
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२
शिवथर घळ
प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

(प्रचि सौजन्यः जिवेश)

प्रचि ३६
पुन्हा भेटुच Wink
प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९


करमरकर शिल्पालय - सासवणे (अलिबाग)

Submitted by जिप्सी on 1 April, 2012 - 15:41

सासवणे (अलिबाग) येथील करमरकर शिल्पालयाबद्दल बरंच ऐकुन होतो, पण भेट देण्याचा योग काहि आला नव्हता. ३ मार्च रोजी मायबोलीकर परदेसाई यांच्या गटगनंतर योरॉक्स, सुन्या आणि अस्मादिक यांचा प्लान ठरला ४ तारखेला अलिबागला जायचे. कोरलई किल्ला करायचा किंवा गेटवे ऑफ इंडियाला भेटुन बोटीतुन एक फेरी मारायची असा प्लान होता. कोरलईला बराच वेळ गेला असता म्हणुन गेटवेहुन बोटीने मांडवा आणि मांडव्यावरून सासवणे येथील प्रसिद्ध करमरकर शिल्पालय आणि नंतर सासवणे समुद्रकिनारा आणि साधारण तीन-चार वाजेपर्यंत मुंबईला परत असा साधारण बेत होता.

करमरकर शिल्पालयाबद्दल थोडंसः
अलिबागच्या निसर्गरम्य अष्टागारातील आवास जवळील सासवणे या गावी जगप्रसिद्ध शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर तथा नानासाहेब करमरकरांचे हे संग्रहालय आहे. अलिबाग-मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासुन साधारण तीन किमी अंतरावर करमरकर शिल्पालय आहे.
चित्रकार द.ग.गोडसे म्हणायचे, "आम्ही चित्रकार चित्रं काढतो, तेंव्हा रसिक म्हणतात हि चित्रं जिवंत आहेत, बोलतात. पण रंग-रेषाच्या करामतीनें कला कुसरीने ते शक्यहोऊ शकतं पण करमरकर जेंव्हा दगडाला जिवंतपणा आणतात हे काम मुश्किल आणि भारीच अवघड कारण इथे सुधारण्याला अवकाश नसतो. एकदा छिन्नी मारली की तो क्षण गेला..." हे क्षण अनुभवायचे असेल तर तर करमरकर शिल्पालयात जावेच लागेल.

जायचे कसे:
१. मुंबईहुन अलिबाग. अलिबागहुन मांडवा-रेवसला जाणार्‍या रस्त्याने आवास फाट्यावर उतरून (चोंडीगावाच्या थोडे पुढे) रिक्षाने सासवणे गावात.
२. मुंबई (गेटवे ऑफ इंडिया) येथुन सुटणार्‍या बोटीने (तिकिट दर ११० रूपये अप्पर डेक आणि ९० रूपये लोअर डेक) मांडवा येथे आणि त्याच तिकिटाने बसने आवास फाट्यापर्यंत. तेथुन रिक्षाने सासवने (अंदाजे ७-८ रूपये माणशी).
संग्रहालयाचे तिकिटः माणशी फक्त ५ रूपये आणि कॅमेर्‍याचे १० रूपये.

फेब्रुवारी २००९ च्या लोकसत्ता पुरवणी आलेला श्री अभिजीत बेल्हेकर यांचा हा लेखः
(या शिल्पालयाची ओळख माबोकरांना व्हाही म्हणुन सदर लेख इथे देत आहे.)

पुण्याच्या शिवाजी प्रिप्रेटरी स्कूल समोरील तो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा गेले अनेक दिवस खुणावायचा. नुकताच त्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला. त्यानिमित्ताने त्याला पुन्हा डोळे भरून पाहिले. याच वेळी डोक्यात एक नाव घोळू लागले, शिल्पकार विनायक पांडुरंग ऊर्फ नानासाहेब करमरकर! या अद्भुत विधात्याचा शोध घेत एके दिवशी असाच अलिबागच्या निसर्गरम्य अष्टागारातील सासवण्यात दाखल झालो आणि कलेच्या या अंगणात बुडायला झाले!
गतकाळात शिरलेले मन थेट २ ऑक्टोबर १८९१ या रोजनिशीला येत इथे थांबते. गणेशमूर्तिकार पांडुरंग करमरकरांच्या घरी याच दिवशी हा विनायक जन्माला आला. हा विनायक, पण कलेबाबतची आपली झेप त्या ‘गणेशा’पलीकडची असल्याचे त्यांनी लहान वयातच दाखवून दिले. घरा-भिंतींवर, गावातील देवळांत करमरकरांची ही चित्रे रंगू लागली. अशातच त्यांनी एक अश्वारूढ शिवरायांचे चित्र काढले आणि त्यातून करमरकरांची भाग्यरेषा उमटली! अलिबागचे तत्कालीन कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांनी हे चित्र पाहिले आणि त्यांनाही या कलेची-कलाकाराची भुरळ पडली. रॉथफील्डच्या मदतीने करमरकरांसाठी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे दरवाजे उघडले गेले. कलेचे हे औपचारिक शिक्षण घेत करमरकर बाहेर पडले ते ‘लॉड मेओ’ हे मानाचे पदक घेऊनच! करमरकरांची ही ख्याती रवींद्रनाथ आणि सुरेंद्रनाथ टागोरांच्या कानी गेली आणि त्यांनी करमरकरांना कलकत्त्याला बोलावले. याच काळात त्यांना टाटांनी पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठवले. लंडन, मग इटली, फ्रान्स, स्वित्र्झलड असा कलेसाठीचा मोठा प्रवास करत ते पुन्हा मुंबईत परतले. मुंबईत देवनारला स्टुडिओ उभारला आणि पहिलेच शिल्प साकारले त्या ‘शंखध्वनी’चे! ज्याने देशविदेशात मोठी खळबळ उडवून दिली. पुढे काही वर्षांतच तेवढेच तोलामोलाचे शिवरायांचे ते भव्य अश्वारूढ शिल्पही आकारास आले आणि करमरकर हे कलेच्या प्रांतातील एक वादळ ठरले! वेगवेगळय़ा कलाकृती आणि त्यापाठी मानसन्मानही चालत येऊ लागले. यात शिरपेच खोवला तो १९६२च्या पद्मश्रीने! अशा या कलाकाराची ही सारी दौलत इथे सासवण्याच्या दारी आणून सजवली-मांडली आहे.या वास्तूत शिरताच माणसांऐवजी अगोदर हे पुतळेच बोलायला लागतात, पण यातही ती मराठमोळी माऊली स्वागत करत पुढे येते. स्वागताच्या या पहिल्या शिल्पानेच भारावयाला होते. पुढे आत अशीच एक माऊली आल्यागेल्यांशी बोलत असते. ‘‘..हे विनायक करमरकर यांचे शिल्प संग्रहालय! मी त्यांची सून सुनंदा करमरकर..’’ आपलीही ओळख होते आणि मग त्यांच्याबरोबर हा कलेचा प्रवासही!
एकूण दोनशे कलाकृती! इतिहास जागवणाऱ्या शिवमुद्रा, स्वातंत्र्यातील दीपस्तंभ, धीरगंभीर थोर पुरुष, समाजमन दाखवणारे निष्पाप चेहरे, पाळीव प्राण्यांचे निस्सीम प्रेम आणि बालमनांची निरागसता अशा या कलाकृती. विषय वेगळे, तरी प्रत्येकीत एक समान धागा- सचेतन सजीव देह! जणू प्रत्येकाच्या कंठी प्राण ओतलेला!
प्रथमच दर्शन होते अंगणातील त्या सुरसुंदरीचे! या खरेतर करमरकरांच्या ‘मायेच्या पुतळय़ा’! कुणी घाटावर स्नान करून घडा घेऊन निघाली आहे. तिची लगबग अन् ओले अंग जणू अजून निथळते आहे..! ती पहा, ती कष्टविणारी साऊली अन् बाळाची माऊली! आत्ता काही क्षणापूर्वीच एकमेकांना ती बिलगली! पलीकडे लोटा-बोचके घेऊन बसलेली ती खरेतर मोलकरीण. पण देवाने बहाल केलेले सौंदर्य तिच्या या गरिबीतूनही उमलले आहे.
नानांचा मोरू नावाचा नोकर इथे वाटेतच पाय दुमडून कधीचा बसला आहे. हडकलेली शरीरयष्टी! केवळ कमरेभोवती वस्त्र आणि कुठल्याही कामासाठीची तत्पर मुद्रा! थोडेसे सांजावले की याच कलाकृतीभोवती काही मजेशीर किस्सेही रोज घडतात. येते-जाते नवखे या अचेतन (?) देहालाच विचारतात, ‘अहो, म्हात्रे कुठं राहतात.. ओ, पाटील कुठं राहतात.. अलिबागची बस गेली का?’ प्रश्न उठतात, पण मोरू उत्तरं देत नाही. कसा देईल?
एक तेलुगू स्त्री करमरकरांच्या या सर्व कलाकृती रोज चोरून पाहायची. करमरकरांनी एकदा तिला पकडले आणि आपल्या या कलेतून हळूच शिल्पबंद करत इथेच दरवाजापाशी उभे केले. जिन्याने वर वळावे तो आई भवानी छत्रपती शिवरायांना त्या तलवारीतून आशीर्वाद देत असते. पुढे जिन्याच्या पहिल्या पायरीवरच कुणा ‘व्याघ्री’ जातीचा तरुण हाती भाला घेत आपली चौकशी करू पाहतो. एखाद्या कलेत फक्त तंत्र देऊन भागत नाही. कलाकाराला त्यात आपला आत्मा सोडावा लागतो. असे घडते तेव्हाच त्या निर्जीव देहातून सजीव हालचालीही जाणवू लागतात.
वरचा मजला म्हणजे अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वाची मांदियाळी! छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, चित्तरंजनदास, आचार्य कृपलानी, न. चिं. केळकर आणि अशीच कितीतरी! प्रत्येक व्यक्तिमत्त्व फुलवताना त्याची स्वभाववैशिष्टय़ेही कळतात-उलगडतात.
शांता आपटे एकदा कार्यक्रमासाठी सासवण्यात आल्या. नानांनी त्यांना भेट म्हणून पुतळा करायला घेतला. तेव्हा त्यांनी आपला हात आणि बोटांवर आपले खूप प्रेम आहे, तेव्हा तीच गोष्ट ठळकपणे बनवा असे सांगितले. हाती डमरू घेत नृत्य, अभिनय आणि गायन करणारी ही कलाकार त्यांनी साकारली, पण ती पाहताना सारे लक्ष स्थिरावते ते हाता-बोटांच्या ताल-लय आणि गतीमध्ये!
मामा वरेरकर तर करमरकरांचे मित्र! या मैत्रीतूनच त्यांनी मामांचे एक खटय़ाळ शिल्प घडवले! वरकरणी कडक-रौद्र असणारे, पण आतून मऊ-शांत असणारे हे व्यक्तिमत्त्व दाखवताना करमरकरांनी त्यांना चक्क फणसाचे जाकीट घातले आहे. त्यांच्या स्त्रीप्रधान नाटकांना एक चिमटा घेत या पुतळय़ात त्यांना स्त्रियांप्रमाणे वळणदार केस दाखवले आहेत, कानात मासोळय़ा अडकवल्या आहेत, कलाकारांचे हे असे असते!
निरागस बालपण हा तर करमरकरांचा खास विषय! एकदा त्यांच्या नोकराचे एक रांगते मूल सतत त्यांच्यामध्ये घुटमळायचे, तेव्हा त्यांनी मूळ कलाकृती सोडून देत त्यालाच मातीतून साकार केले. पुढे या चित्राने अनेक पुरस्कारही पटकावले. त्यांची मुलगी शकुंतला एकदा हट्ट करत म्हणाली, ‘तुम्ही सगळय़ांचे पुतळे करता, माझाच नाही?’’ मग हाताची घडी, मांडी घातलेल्या आणि गाल फुगवलेल्या या आपल्या लाडक्या लेकीला त्यांनी तशाच मुद्रेत अडकवले. हे निरागस चेहरे पाहिले, की आपल्या वयाचेही भान हरपते आणि हसू फुटते! प्रश्न एकच पडतो की करमरकरांनी हे साकारताना त्या मुलांवर प्रेम केले की या शिल्पांवर!
यापुढेही किती आणि कुठल्या-कुठल्या कलाकृती! प्रत्येक शिल्प निराळे, त्यामागचा विचार, सौंदर्यखुणाही निराळ्या! पाहताना आपले भान हरपते आणि आपलाच पुतळा होतो. भवतीची शिल्प जणू बोलू-फिरू लागतात. निर्गुणाला दिलेले हे सगुण रूप! निर्जीवाला बहाल केलेले चैतन्य! कलेच्या या पंढरीतून बाहेर पडताना या कलाकाराचे हेच ‘ईश्वरी देणे’ कायमचे लक्षात राहाते!

याच करमरकर शिल्पालयातील काहि प्रकाशचित्रे (भरपूर प्रचि असल्याने दोन फोटोंचे एक कोलाज केले आहे)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
(पुढिल सफर: मुंबई-मांडवा-मुंबई) Wink )

जुन्या मराठी बालभारती मधे या विख्यात शिल्पकारावर " माझ्या भाग्यरेषा " नावाचा धडा होता. अलिबागला माझ्या घरी पाहुणे आले की त्यांना हे संग्रहालय पहायला मी आवर्जून नेतो, व प्रत्येकवेळी पुनःप्रत्ययाचा आनंद घेतो. अनेकदा आपल्यालाच आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचे मोल ठाउक नसते. एकदा ही शिल्प मुंबईला जे जे कलादालनात प्रदर्शनाकरता नेली होती तेव्हा परदेशातून आलेल्या कलासमीक्षक पत्रकारांनी करमरकर आजींना विचारल " अलिबाग हून समुद्रातन बोटीनी ही शिल्प आणलीत, या शिल्पांचा विमा किती कोटी डॉलर्स चा काढलाय?" - या प्रश्नावरून या शिल्पांच कलाविषयक महत्व लक्षात यावं - आजींनी आपल्या पिढ्या न पिढ्या त्यांच्या घरी काम करीत आलेल्या गडी माणसांकडे बोट दाखवल अन म्हणाल्या " हा बघा माझा विमा!! धिस इज माय इनश्युअरन्स!!"

शिल्पांच सौंदर्य अन जिवंतपणा काय वर्णावा? माझा मुलगा छोटा असतांना त्या कुत्र्याच्या व म्हशीच्या शिल्पाला घाबरून त्यांच्या जवळ जात नसे. जेमेतेम एक फूट उंचीच्या पुतळ्यात बोटाच्या दोन अडीच पेरांइतकाच चेहरा; पण पाहिल की लगेच लक्षात येत; अरे!! हे तर गोपाल कृष्ण गोखले!! हे तर शाहू महाराज!! प्रसिध्द शिल्प शंखध्वनी व फक्त पंचा नेसलेले पालथी मांडी घालून बसलेले कृश शरीराचे गांधीजी बघितले की नानासाहेबांचा मानवी शरीरशास्त्राचा-ह्यूमन अ‍ॅनॉटॉमीचा अभ्यास दिसून येतो. पुस्तक वाचणार्‍या छोट्या मुलाचही एक शिल्प आहे तिथे; आत्ता तो वाचता वाचता मान वर करुन आपल्या कडे बघेल अस वाटत.
अलिबागला येउन एकवेळ समुद्रस्नान केल नाही तर चालेल-तसाही तिथे समुद्र उथळ अन गढूळ आहे-पण हे संग्रहालय पहायच सोडू नका.

फक्त पंचा नेसलेले पालथी मांडी घालून बसलेले कृश शरीराचे गांधीजी बघितले की नानासाहेबांचा मानवी शरीरशास्त्राचा-ह्यूमन अ‍ॅनॉटॉमीचा अभ्यास दिसून येतो. >>> हा घ्या फोटो..

बाकी फोटोज लवकरच..
























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

बदामी हंपी https://maharashtradeshee.blogspot.com/2026/06/pune-to-gokak.html

    ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात: पुण्यातून बदामीकडे! विजयनगर साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे 'हम्पी' आणि चालुक्य...