Wednesday, March 19, 2025

मायबोली सिंधुदुर्ग

 

गाज सागराची — "किल्ले निवती"

Submitted by जिप्सी on 11 January, 2013 - 14:46

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

किल्ले निवती मालवणपासुन साधारण पाऊण-एक तासाच्या अंतरावर वेंगुर्ल्याच्या दिशेने आहे. परूळ्याहुन थोडेच पुढे आणि पाटच्या आधी एक रस्ता भोगवे-किल्ले निवती कडे जातो. मालवण ते वेंगुर्ला सागरीमहामार्गावरील प्रत्येक गाव हे निसर्ग सौंदर्याना ओतप्रत भरलेले आहे. या गावांना जोडणारा समुद्र एकच आहे पण प्रत्येक गावात त्याचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. वेंगुर्ल्यात दोन निवती आहे. एक मेढा निवती तर दुसरी किल्ले निवती. यातील मेढा निवतीला मी बर्‍याच वेळा गेलोय. पुढे एक रस्ता भोगवेला जातो आणि दुसरा किल्ले निवतीला. परुळ्याच्या श्री आदिनारायणाचे दर्शन घेऊन साधारण अर्ध्यातासाच्या आतच आपण किल्ले निवतीला पोहचतो. साधारण ४०-४५ उंबर्‍याच्या या गावाला अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य लाभले आहे. एका बाजुला इतिहासकालीन किल्ले निवती तर दुसर्‍या बाजुला अथांग सागर आणि त्यातुन मध्येच डोकावणारे निवती रॉक्स.

निवती किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
कोकणची माणसं साधीभोळी.....काळजात त्यांच्या भरली शहाळी
प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

पुढच्या भागात येणार ना "सांताक्लॉज" सोबत "भोगव्याचा समुद्रकिनारा" पहायला? Proud

गाज सागराची — "मालवणमय"...

Submitted by जिप्सी on 6 January, 2013 - 14:12

=======================================================================
=======================================================================
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
- कुसुमाग्रज
=======================================================================
=======================================================================
आमचे FB मित्र श्री मधुकर धुरी यांनी केलेले मालवणचे अप्रतिम वर्णनः
(सदर वर्णन इथे देण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद मधुकर Happy )
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनार्‍यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणार्‍या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसर्‍या किनार्‍यावर असणार्‍या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनार्‍याना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
=======================================================================
=======================================================================

सान्निध्य सागराचे आकाश पांघराया
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या

गेल्यावेळेसच्या कोकण भटकंतीतील वरील निमंत्रणाचा मान ठेवून, नाताळ आणि वर्षाअखेरीस जोडुन आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत पुन्हा एकदा कोकण भटकंती करून आलो. नविन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मुंबईच्या कोलाहलापासुन दूर कोकणातील "मालवण" या ठिकाणी आम्ही पाचजण - मी, संदेश, राहुल, प्रतिक आणि आमची "स्विफ्टुकली" Happy गेलो होतो. यावेळेस आम्ही मुंबई ते मालवण व्हाया कोल्हापूर (गगनबावडा, करूळ घाट) असा प्रवास केला. मालवणचा मासळी बाजार/लिलाव, रॉक गार्डन, देवबाग, किल्ले निवती, निवती रॉक्स, मेढा निवती, सागरतीर्थ (आरवली - वेंगुर्ला), तोंडवळी-तळाशील समुद्रकिनारा अशी या वेळची आमची भटकंती होती. संदेश याचे घर मालवणातील देऊळवाडा येथे होते, पण आम्ही चौघेजण मात्र त्याच्या सड्यावरच्या घरात, (कोकणी भाषेत मांगर) कुंभारमाठ येथे राहणार होतो. जहां तक नजर जायेगी वहा तक सिर्फ और सिर्फ आंब्याची झाडे आणि त्यात फक्त एकच संदेशचं घर. आजुबाजुला एकही घर नाही कि कोलाहल नाही. फक्त आम्ही चौघे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सड्यावरून आंब्याच्या मोहराचा सुवास घेत चालतानाचा अनुभव वर्णनातीत आहे.

आमच्यातील एकही जण ३१ डिसेंबर "सेलिब्रेट" करणारा नसल्याने मालवणला समुद्राची गाज ऐकत जुन्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत असा बेत होता. पण नेमकं त्याचवेळेस मालवण (खासकरून तारकर्ली) पर्यटकांनी जबरदस्त गजबजलं होतं. मालवणचे रस्ते, बाजारपेठ, हॉटेल्स पर्यटकांनी ओसंडुन वाहत होते. नेमका याच वेळी मालवणात आम्हाला "सांताक्लॉज" भेटला आणि आमच्या ज्या ज्या इच्छा (शांत निवांत, पर्यटकांची गजबज नसलेला समुद्रकिनारा, मनसोक्त फोटोग्राफी, गरमागरम खमंग मत्स्याहारी जेवण) होत्या त्या त्याने पूर्ण केल्या. Proud

आता हाच सांताक्लॉज तुम्हाला मालवणची सफर घडवून आणणार आहे Happy तर मग येताय ना त्याच्यासोबत समुद्राची हि गाज ऐकायला? Happy

सर्वांची उत्सुकता ताणुन ठेवण्यासाठी सांताक्लॉजने या सिरीजमधल्या ठिकाणांची नावे न सांगण्याचे बजावले आहे. Proud त्यामुळे सगळ्यांनी आपआपले अंदाज बांधा. यातील फोटो त्या त्या भागात येणार असल्याने त्या त्या ठिकाणांची नावे समजतीलच. मालवण ठिकाण मध्यवर्ती ठेवून इतर भटकंती केल्याने या मालिकेचे नाव "मालवणमय". Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात घेऊन जाणार आहे. Proud

गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

Submitted by जिप्सी on 8 January, 2013 - 15:29

१. गाज सागराची — "मालवणमय"...

गेल्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" आज तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात फेरफटका मारायला नेणार आहे. कोळंबीपासुन सुरमयीपर्यंतच्या सगळ्या माशांचा लिलाव येथे होतो. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
चोरीचा मामला . . .
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला "किल्ले निवती"च्या निसर्गरम्य परीसरात नेणार आहे. मासळी बाजारात/लिलावात जाण्यासाठी सकाळी लवकर उठल्याने तो आता थोडावेळ विश्रांती घेतोय. Proud

तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा"

Submitted by जिप्सी on 22 January, 2013 - 15:01

१. गाज सागराची — "मालवणमय"...

२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"

३. गाज सागराची — "देवबाग आणि किल्ले निवती (सूर्यास्त-सूर्योदय)"

४. गाज सागराची — "किल्ले निवती"

५. गाज सागराची — "भोगवे समुद्रकिनारा"

६. गाज सागराची — "सागरतीर्थ"

मालवणहुन देवगड कुणकेश्वर येथे जाणार्‍या रस्त्याने साधारण ११-१२ किमी अंतरावर आचर्‍याच्या आधी तोंडवली तळाशील येथे जाण्यासाठी फाटा आहे. मालवणहुन तोंडवली-तळाशील अंतर १५ किमी आहे. दाट सुरूच्या बनातुन जाणारी वाट आपल्याला अजुन एका अस्पर्श समुद्रकिनारी घेऊन जाते. त्या आधी ओझर येथे श्री. स्वामी ब्रह्मानंद यांची समाधी गुहा आहे. येथील ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व नितळ पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे.

श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

(वरील सर्व प्रचि संदेशच्या कॅमेर्‍यातुन Happy )

तोंडवली-तळाशील समुद्रकिनारा
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
टाईमपास Happy Happy
प्रचि २३
पुढच्या अंतिम भागात भेट देऊया मालवण येथील रॉक गार्डनला आणि पाहुया सन २०१२ मधील शेवटचा सूर्यास्त. Happy

वालावल, नेरूरपार आणि धामापूर

Submitted by जिप्सी on 22 February, 2012 - 13:40

'कोकणमय'

=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग Happy या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं. Happy
=======================================================================
=======================================================================

"योग्या, हे माझ्या गावचे फोटो" नरेश त्याच्या गावचे फोटो दाखवत होता.
कुठंल रे गाव?
कुडाळ जवळील "सरंबळ""
नरेशच्या गावचे फोटो पाहत होतो. कोकण म्हटल्यावर जसं चित्र समोर येतं तसंच ते गाव फोटोत भासत होतं. (आधीच्या भागातील प्रचि ०२ Happy ) तीच ती लाल मातीतली वाट, काजुच्या बागा, विहिर, अंगणातले पक्षी (हॉर्नबिल आणि स्वर्गीय नर्तकाचे काही फोटो होते :-))
"चलो तर मग यंदाची कोकण भटकंती तुझ्या गावातुनच सुरू करू."
साधारण नोव्हेंबर मध्ये कोकण भटकंतीचा प्लान शिजला. पण तारीख ठरत नव्हती. डिसेंबर हरीश्चंद्रगड आणि इतर भटकंती, जानेवारीमध्ये दोघांच्याही प्रचिंचे प्रदर्शन, राजमाची आणि दिनेशदा गटग यामुळे प्लान पुढे जात होता. शेवटी कुठल्याही परीस्थिती फेब्रुवारीमध्ये जायचेच ठरले. ऑफिसमधील आम्ही सहा आणि नरेशचे दोन मित्र असे आठजण तयार झालो. प्लान तयार झाला आणि गुरूवारी ९ फेब्रु. ला रात्री निघुन मंगळवारी १४ ला पहाटे परत परतायचे ठरले. यात कुडाळ (सरंबळ), धामापूर, वालावल, निवती, वेंगुर्ला, अरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा, मालवण, आंगणेवाडी , सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर आणि शेवटी विजयदुर्ग असा भरभक्कम बेत होता. Happy निघण्याच्या आदल्यादिवशी एक टांगारू निघाला. शेवटी आम्ही सातजण ठरल्याप्रमाणे (आरामात ;-)) गुरूवारी रात्री १०:३० - ११ च्या सुमारास विक्रोळीहुन क्वालिसने निघालो. सुरूवातीला गप्पाटप्पात रमलेल्या एकेकांची विकेट रात्री १-२ नंतर पडु लागली (अर्थात ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला सोडुन Wink ). सकाळी साधारण ७-८ च्या सुमारास आम्ही कुडाळमार्गे सरंबळला पोहचलो. घर बंदच असल्याने सकाळी सगळ्यांनी मिळुन आधी घर स्वच्छ केले. बॅगा टाकल्या आणि चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवले. चुलीवरच्या गरम पाण्यात एक वेगळाच गंध असतो तो मला स्वतःला खुप आवडत असल्याने आंघोळ झाल्यावर अधिकस फ्रेश वाटु लागले. Happy शुचिर्भुत होऊन मी आणि नरेश गावात एक फेरी मारण्यास निघालो. खरंच गाव खुप सुंदर होते. दुरंगी बाभुळ, रीठा, काजुच्या बागा पहात/ फोटो काढत फिरत असतानाच हॉर्नबील, कोतवाल, अजुन एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले (फोटो काढता आला नाही Sad ).

प्रचि ०१
(दुरंगी बाभूळ, रीठा आणि काजू)

गावात फिरून परत घरी येईपर्यंत इतरजणांची तयारी झाली होती. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, त्याआधी सरंबळ गावच्या श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. मंदिराचे काम चालु होते पण मंदिर आणि परीसर खुपच सुंदर होता. ("सातेरी" म्हणजे "वारूळ".)

प्रचि ०२
श्री देवी सातेरी मंदिर (सरंबळ, कुडाळ)

प्रचि ०३
श्री देवी सातेरी

सरंबळ गावातुन धामापुरला जाण्यासाठी एक रस्ता आहे तेथुनच आम्ही धामापुर, वालावल मार्गे निवतीला (मुक्काम) पोहचणार होतो. पण त्या रस्त्याचे काम चालु असल्याने आम्हाला पुन्हा गावाला वळसा घालुन कुडाळ-धामापूर रस्त्याने जावे लागले. इथे थोडीशी गफलत झाली. खरंतर पहिल्यांदा धामापूर करून नंतर वालावल आणि मग पाट मार्गे निवती असं केलं असत तर वेळ वाचला असता पण आम्ही पहिल्यांदा वालावल नंतर धामापूर आणि परत वालावलला येऊन पाट मार्गे निवतीला गेलो. अर्थात याचा एक फायदाच झाला. आम्हाला नेरूर या निसर्गरम्य गाव पाहता आले. Happy
सरंबळहुन थोड्याच वेळात आम्ही श्री लक्ष्मीनारायणाच्या दर्शनासाठी "वालावल" गावी पोहचलो. आजपर्यंत वालावल गावाबद्दल जे ऐकल होतं अगदी तसाच परीसर पाहत होतो. (यावेळी आमच्या कडे कॅनन 1000D आणि 1100D असे दोन कॅमेरा असल्याने एका कॅमेर्‍याला 75-300 लेन्स आणि दुसर्‍याला 18-55 लेन्स लावली होती, सारखी लेन्स बदलायला नको म्हणुन :-), अर्थात याचा फायदाच वालावल तलावाजवळ किंगफिशर, नीलपंख टिपण्यासाठी झाला.)
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:
कुडाळ शहरापासुन १५ किमी अंतरावल असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचा त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. मला स्वतःला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे वालावल.
मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी. कुडाळ ते वालावर अंतर ~१०-१२ किमी.

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

(प्रचि: नरेश)

प्रचि १९

(प्रचि: योगेश)

वालावल गावच्या निसर्गमय मोहपाशातुन स्वत:ला नाईलाजाने सोडवून घेत आम्ही धामापूरला निघालो. वाटेतच नेरूरपार हे अतिशय शांत व रमणीय गाव लागले. नेरूरपार नदीच्या पुलावरून नदीचे आणि गावचे अतिशय मनमोहक सौंदर्य दिसते. वाटेतच कलेश्वराचे मंदिर आणि त्याच्या जवळच असलेल्या आणि कमलपुष्पांनी भरलेल्या तलावाने मोहिनी घातली आणि गाडी कलेश्वर मंदिराकडे वळवली.

प्रचि २०

प्रचि २१
नेरूर कलेश्वर:
कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे (कलेश्वर मंदिरातील फोटो घेण्यास मनाई होत). मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीवकामाने सजवले आहेत. या मंदिरा शेजारीच असलेले दुसरे व स्वतंत्र मंदिर आहे ते श्री ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे हे मंदिर अतिशय वेगळे आणि आवर्जुन पाहण्यासारखे आहे. भारतात ब्रह्मदेवाची तीन मंदिरे असुन त्यापैकी एक नेरूर येथे असुन ब्रह्मदेवाशेजारी विष्णू-लक्ष्मी, सावित्री व गायत्री देवता आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांची मंदिरे असणारे हे एकमेव प्रसिद्ध
देवस्थान.

प्रचि २२
कलेश्वर मंदिर

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६
ब्रह्मदेवाचे मंदिर आणि मूर्ती
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

नेरूरपार गावच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेत आमची गाडी निघाली धामापूरच्या भगवती मंदिराकडे.

कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. हे हि मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून भगवती देवीची मूर्तीही अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय केलेली आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्‍या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.
कोकणातील मंदिरे मला का आवडतात हे कुणी विचारल्यास माझे उत्तर असेल, शांत, निवांत आणि स्वच्छ मंदिर व परीसर आणि तेथील आख्यायिका. Happy

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेल्या या गावांची भेट आम्हाला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा अनुभव देऊन गेली. या तीनही गावांना भेट दिल्यावर कि मला वि.स.खांडेकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.

रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि

मंजुळ घंटा सांजसकाळी
गोकुळ गीते गातिल सगळी
होउनि स्वप्नी गौळण भोळी
वहावे यमुनेचे पाणी

रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते
पहावे अनिमिष ते नयनि
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि.......

वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो.

(तटि: मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)

(क्रमशः)

श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा

Submitted by जिप्सी on 1 March, 2012 - 02:09

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"

=======================================================================
=======================================================================

निवतीहुन केळुस तिठ्यावरून वेंगुर्ल्याला जायला आम्ही निघालो. इथे मात्र आमचा प्लान निघायला उशीर झाल्याने थोडासा फसला. निवतीहुन साधारण दिड-दोन वाजता निघुन रेडीचा गणपती, अरवलीचा वेतोबा, मोचेमाड समुद्रकिनारा, सागरेश्वर बीच करून मालवणला निघायचे असा बेत होता, पण निवतीमध्येच ३ वाजल्याने आणि काहि वेळ केळुसला घालवल्याने वेंगुर्ला (वेंगुर्ला जेट्टी, सागरेश्वर बीच) काही बघता आले नाही. :(.

प्रचि ०१

केळुसवरून आम्ही पहिल्यांदा अरवलीच्या वेतोबाच्या दर्शनाला निघालो. वाटेत मानसीश्वराचे मंदिर दिसलं.

प्रचि ०२

प्रचि ०३
श्री वेतोबा मंदिर (आरवली)

(मंदिरात मूळ मूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी नसल्याने वरील फोटो आंतरजालाहुन साभार)

वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात "हरवल्ली" नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून "आरवली" झाले. "हर" म्हणजे "शिव" आणि "वल्ली" म्हणजे "वस्ती". हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. "वेताने वेळेवर मन ताळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेताळ!" दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत.

मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. एव्हढी मोठी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणशी लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. कालांतराने १९९६ मध्ये भक्तांच्या साह्याने मूर्ती पंचधातूची करण्यात आली. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. देवासमोर केवळ नवस म्हणून ठेवलेल्या चपलांचे तळ दुसर्‍या दिवशी झिजलेले आढळतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते.

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
श्री वेतोबाला वाहिलेल्या वहाणांचे जोड

प्रचि ११

आरवलीच्या श्री वेतोबाचे दर्शन घेऊन आम्ही रेडीच्या गणपती मंदिराकडे निघालो. इथे आमच्य अपेक्षापेक्षा जास्त वेळ गेला. रेडी हे लोहखनिजांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे ट्रकची वाहतुक मोठ्या प्रमाणावर आणि रस्ता अरुंद. यात बराच वेळ गेला.

श्री गणेश मंदिर — रेडी
१८ एप्रिल १९७६ रोजी इथल्या खाणीत ट्रक ड्रायव्हर म्हणुन कामास आलेल्या सदानंद कांबळी यांनी रात्रपाळीचे काम संपल्यावर आपला ट्रक डोंगरावर आणून लावला. थोड्या वेळाने घरी जाण्यासाठी ते ट्रक सुरू करू लागले; पण खूप प्रयत्न करूनही ट्रक सुरू होत नाही हे पाहून ते ट्रकमध्येच झोपले. त्या रात्री श्री गजाननाने त्यांना दृष्टांत दिला कि, 'मी येथे आहे. मला बाहेर काढ.' भयचकित होऊन त्यांना जाग आली तेंव्हा पहाटेचे चार वाजले होते. घडला प्रकार गावकर्‍यांना सांगावा म्हणून त्यांनी ट्रक सुरू केला आणि काय आश्चर्य रात्री बंद पडलेला ट्रक सकाळी विनासायास चालू झाला. गावातील जुन्याजाणत्यांच्या मताने रेडीचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीलला कौल लावण्यात आला. तेंव्हा "मूर्ती दिसेपर्यंत खोदा" असा कौल दिला. खोदकाम सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी मूर्तीच्या तोंडाकडचा व कानाकडचा भाग दिसू लागला. बारा दिवसांनी संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली. अखंड जांभ्या दगडात कोरलेली हि मूर्ती सहा फूट उंच व तीन फूट रुंद आहे. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमडलेला आहे. द्विभुज मूर्तीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत असुन दुसर्‍या हातात मोदक आहे. समोरच एक भला मोठा उंदीरही आहे. तोही याच खोदकामात , पण मूर्तीनंतर सव्वा महिन्यांनी सापडला. मूळ मूर्तीला आता ऑईलपेंटचा थर लावला आहे.

प्रचि १२
(प्रसन्न मंगलमूर्ती)

प्रचि १३

मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने मंदिराचे फोटो काढता आले नाही. श्रींचे दर्शन घेतल्यावर श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी निघालो.

श्री देवी माऊली मंदिर, रेडी
श्री माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास श्रीदेवीकोशामध्ये सापडतो. श्री माऊली देवीच्या जागृतपणाची आख्यायिका सांगितली जाते ती पुढीलप्रमाणे - पोर्तुगिजांनी १८१७ साली डोंगरावरून या मंदिरावर तोफा डागल्या. तेंव्हा गावकर्‍यांनी देवीला कौल लावला. दुसर्‍या दिवशी लक्षावधी गांधीलमाश्या तेथे उत्पन्न झाल्या व पोर्तुगीज सैन्याच्या दिशेने घोंघावत गेल्या. पोर्तुगीजांनी घाबरून तेथुन पळ काढला आणि परत कधीही फिरकले नाही. असे हे श्री देवी माऊलीचे जागृत देवस्था गणपती मंदिरापासुन जवळच असुन अवश्य भेट देण्यासारखे आहे. याही मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू होते आणि देवीला कौल लावण्यात आला असल्याने फोटो नाही काढला. पण कौल लावण्याचा विधी मात्र व्यवस्थित पाहता आला.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
जवळच असलेला एक पुरातन वाडा

रेडीवरून आम्ही परत निघालो वाटेत पुन्हा त्या अरुंद रस्त्याव वेळ गेला. सूर्यास्त होण्यासाठी काहिच अवधी बाकी होता आणि आम्हाला अजुन मोचेमाड व सागरेश्वर बीच किंवा जेट्टी पहावयाची होती. दोन्ही एकदम शक्य दिसत नव्हते. शेवटी सगळ्यांच्या पसंतीनुसार मोचेमाड समुद्रकिनारी जाण्याचे ठरले आणि आमचा हा निर्णय योग्यच होता हे मोचेमाडला पोहचल्यावर समजले. Happy मोचेमाड हे वेंगुर्ल्यापासुन साधारण सात कि.मी. अंतरावर आहे. मी पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या समुद्रकिनार्‍यांपैकी अतिशय सुंदर असा हा समुद्रकिनारा. त्या समुद्रकिनार्‍याकडे जाणारी वाटही अगदी मस्त होती. कौलारू घरांच्या मागुन, काजुच्या झाडाखालुन, आंबा मोहराचा सुवास घेत, लाल मातीतुन जाणारी होती. वाट संपताच मऊशार शुभ्र वाळु पायाला गुदगुल्या करते. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि अवर्णनीय आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या भटकंतीतील हा मनाला भावलेला अतिशय सुरेख समुद्रकिनारा होता. वेळेअभावी जास्त वेळ येथे देता आला नाही पण जेव्हढा वेळ इथे व्यतित केला तो कायमचा आठवणीत राहणारा असणार आहे. Happy आधीच्या भागाव सांगितल्याप्रमाणे मोचेमाडच्या संध्याकाळचेही काही फोटो गंडलेत त्यापैकी जे बरे आले आहेत तेच येथे प्रदर्शित करतोय.


कितने गहरे हलके शाम के रंग है छलके
परबत से यूं उतरे बादल जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो......

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

वेंगुर्ल्याहुन साधारण ८ वाजता आम्ही मनिषच्या घरी कांदळगावात (मालवण) जायला निघालो तेंव्हा मी ड्रायव्हरच्या बाजुला बसलो होतो. साधारण साडेनऊच्या दरम्यान मालवण-आचरा रस्त्यावर हेडलाईटच्या प्रकाशात मला काळ्या रंगाचा मांजरीपेक्षा थोडासा मोठा एक प्राणी अंधारात हळुहळु जाताना दिसला. ड्रायव्हरने तो "कांडेचोर" असल्याचे सांगितले. तो स्वतः कोकणातला असल्याने त्याला कांडेचोर माहित होता म्हणुन सगळ्यांनी त्याला गाडी थांबवायला सांगुनही त्याने गाडी थांबवली नाही. :राग:. साधारण दहाच्या सुमारास आम्ही मनिषच्या घरी पोहचलो. हातपाय धुतले, बॅगा खोलीत व्यवस्थित लावल्या आणि गरमागरम जेवणावर ताव मारला. या दोन दिवसात बरीचशी ठिकाणे बघितल्याने रविवारचा दिवस फक्त सिंधूदुर्ग किल्ला, तारकर्ली-देवबाग हिच ठिकाणे करण्याचे ठरले.

(तटी: मंदिरासंबंधित माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)

(क्रमशः)

  मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"

Submitted by जिप्सी on 4 March, 2012 - 23:56

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा

=======================================================================
=======================================================================
आधी ठरल्याप्रमाणे रविवारचा दिवस फक्त सिंधुदुर्ग किल्ला आणि देवबाग-तारकर्ली करावयाचे ठरले होते. पण कांदळगावापासुन जवळच आंगणेवाडी, बिळवस येथील जलमंदिर, मालवणातील जयगणेश मंदिर आणि खुद्द कांदळगावात असलेले श्री रामेश्वराचे मंदिर अशी ठिकाणे करून मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचे ठरले (या ठिकाणांचे प्रचि देवबाग-तारकर्लीच्या भागानंतर प्रदर्शित करेन. Happy ).

सिंधुदुर्ग किल्ला:
मालवण शहरापासुन अगदी जवळच वसलेला सिंधुदुर्ग किल्ला हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मालवण बंदरापासुन पुढे नावेतून जावे लागते. हा किल्ला ४ किमी एव्हढ्या अंतरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या भिंती ३५ ते ४० फूट उंच आहेत. किल्ल्यापर्यंतचा जलमार्ग दाट खडकांनी भरलेला आहे. जाणकार खलाशीच किल्ल्यापर्यंत पडाव नेऊ शकतात. नाव किल्ल्याच्या ईशान्य बाजूस असलेल्या महाद्वाराजवळ येऊन थांबते.दर्यावर्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांच्याशी यशस्वीपणे मुकाबला करावयाचा असेल तर आपली सत्ता समुद्रावर असणे आवश्यक आहे, हे जाणून शिवरायांनी सागरी किल्ला बांधण्याचा निश्चय केला. कुरटे गावचे बेट पाहून "चौर्‍यांशी बंदरी ऐसी जागा नाही" असे उद्गार त्यांनी काढले होते. किल्ल्याचे महाद्वार पूर्वेस आहे. किल्ल्याचा तट दोन्ही अंगाने आत वळतो. या दोन तटांच्यामधील भागातून वळणे घेत आत गेले कि समोर महादरवाजा दिसतो. प्रवेशद्वारी एक मारूतीची प्रतिमा आहे.तटाच्या आत आले की मुख्य रस्त्यावर राजाराम महाराजांनी बांधलेल्या श्री शिवराजेश्वराच्या मंदिराकडे जातो. शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी विकिपिडीयावर अधिक माहिती येथे वाचा.

(सिंधुदुर्ग किल्ल्यात जाण्यार्‍या नावेत ४० माणसे भरल्याशिवाय नेत नाही. एकतर तुमचा ग्रुप तेव्हढा मोठा असावा लागतो किंवा मग नाव पूर्ण भरेपर्यंत वाट बघावी लागते. Sad जर तुम्हाला खाजगी बोट करून जायचे असेल तर माणशी ३५० द्यावे लागता, तेही जर ग्रुप ८-९जणांचा असेल तरच. अशी तिकिट ३८रूपये आहे. किल्ला बघावयास फक्त एकच तास देतात. एका तासाच्या आत किल्ला बघुन नावेत परतीच्या प्रवासासाठी एका तासाच्या आत या अशी ताकीदच नावेतुन उतरताना देतात. :रागः एका तासात संपूर्ण किल्ला बघणे/अनुभवने शक्य नाही त्यामुळे इतक्या कमी वेळेत जेव्हढा पाहुन घेता आला तितका किल्ला पाहुन घेतला.)

मालवण पाण्यामध्ये किल्ला, पाहुनी मनामध्ये भरला
प्रचि ०१

(कुठलाही फोटोशॉप इफेक्ट नाही (बॉर्डर आणि वॉटरमार्क सोडुन). लेन्सच्या पुढे गॉगल धरून, गॉगलचा फिल्टर असा उपयोग करून हा फोटो काढलाय. Happy )

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २७ (अ)

सागरतळातील जीवसृष्टी जवळुन पाहण्याची संधी सिंधुदुर्गजवळ स्नॉर्केलिंग आणी स्कुबा डायव्हिंग द्वारे मिळते. कोकणसफरीत एकदा तरी याचा अवश्य अनुभव घ्यावा. Happy
स्नॉर्केलिंग करताना पर्यटक
प्रचि २८

किल्ला बघुन झाल्यावर साळगावकरांच्या श्री जयगणेश मंदिरात जाऊन आलो. यानंतर सुरू झाली ती आमची खाद्यभ्रमंती. Happy बर्‍याच जणांनी आवर्जुन उल्लेख केलेल्या "चैतन्य हॉटेल" मध्ये पापलेट, सुरमई, वडे सागोती, कोलंबी फ्राय, कोळंबी लोणचं अशा विविध पदार्थावर ताव मारून आम्हीही अगदी "चैतन्यमय" झालो. Proud

चैतन्यमय प्रचि Wink
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

यानंतर खरेदीसाठी मालवण बाजारात फेरफटका मारला. रविवार असल्याने बहुतेक सगळी दुकाने बंद होती (मालवणात खरेदी करावयाची असेल तर रविवार टाळुन करा. बहुतेक दुकाने रविवारी बंद असतात.). थोडीफार खरेदी करून आम्ही आमचा मोर्चा "देवबाग-तारकर्ली"कडे वळवला.

(क्रमशः)

"तारकर्ली-देवबाग"

Submitted by जिप्सी on 7 March, 2012 - 14:14

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"

=======================================================================
=======================================================================
सिंधुदुर्ग किल्ल्यावरची भटकंती आणि चैतन्यमय झाल्यावर आम्ही तारकर्ली समुद्रकिनारी पोहचलो. मालवण शहरापासून अवघ्या ६-७ किमी अंतरावरील तारकर्ली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या अतिशय प्रगत असे ठिकाण. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणाचा संपूर्णतः कायापालट केलेला आहे. तारकर्ली येथे एमटीडीसी तर्फे तंबू निवास आणि हाऊसबोटची व्यवस्था केली आहे. अतिशय सुंदर असे हे कोकणातील अजुन एक गाव. Happy
तेथे थोडावेळ थांबुन देवबागकडे निघालो. "देवबाग" - देवांची बाग. नावाप्रमाणेच सुंदर असे हे गाव. या गावच्या एका बजूला अथांग अरबी समुद्र तर दुसर्‍या बाजूला कर्ली नदीचे पात्र. तीनही बाजुने पाण्याने वेढलेले असुनही नैसर्गिक आपत्तीपासुन वाचत आलेले हे "देवबाग". कर्ली नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाचे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्‍या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. दोन्हीचा संगम खरंच पाहण्यासारखा होता. यावेळी मीही माझा कॅमेरा बंद करून त्या क्षणांचा आनंद घेऊ लागलो. बर्‍याच वेळा फोटो काढण्याच्या नादात त्या क्षणांचा अनुभव घ्यायचा राहून जातो.
आम्हाला सागराची गाज ऐकत देवबागचा सूर्यास्त पहायचा होता. हाताशी दोन तास होते. तो वेळ सत्कारणी लावण्यासाठी देवबागजवळच असलेल्या त्सुनामी आयलंडवर वॉटरस्पोर्टची मजा लुटली. सिंधुदुर्गात गेल्यानंतर तारकर्ली-देवबागला भेट न देताच आलात तर तुमची कोकण सफर अपूर्णच राहिली. Happy

तारकर्ली
प्रचि ०१

प्रचि ०२

तारकर्ली MTDC
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
देवबाग
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
देवबाग बॅकवॉटर
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
त्सुनामी बेट
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
देवबाग किनार्‍यावरून दिसणारे भोगवे बीच (मगरीचे तोंड Happy )
प्रचि २३

प्रचि २४
सांज आली दूरातुन, क्षितीजाच्या गंधातुन
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

(क्रमशः)

तारकर्लीच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल बरंच ऐकून आहे. त्याबद्दल थोडं विस्ताराने लिही ना..>>>>>>तारकर्लीहुन साधारण ५-६ किमी अंतरावर देवबागजवळ त्सुनामी आयलंडवर वॉटर स्पोर्ट्स आहेत. यात बनाना राईड्स, स्पीड बोट, कयाकिंग आणि अजुन बर्‍याच राईड्स आहेत. पॅरासेलिंग नव्हते. प्रत्येक राईड्सची किंमत १०० रूपये माणशी. फक्त कयाकिंगची रूपये ५० माणशी. तारकर्लीहुन त्सुनामी आयलंडवर जाण्यासाठी बोट उपलब्ध आहेत पण ते सगळ्यांचे मिळुन १२०० रूपये घेतात आणि तेच जर तुम्ही देवबाग वरून आलात तर ४०० रूपये (फक्त त्सुनामी बेटावर नेण्याआणण्याकरीता, वॉटरस्पोर्ट्सचा खर्च वेगळा).

तसंच एमटीडीसीची सोय चांगली आहे का? झोपड्या दिसत तरी एकदम मस्त आहेत>>>>तारकर्ली एमटीडीसी बद्दल खुप जणांकडुन चांगला फिडबॅक ऐकला आहे. राहण्याची व्यवस्था उत्तम आहे. हाऊसबोट हे एमटीडीसीचे खास आकर्षण आहे. कोकणी जेवणाकरीता तारकर्ली-देवबाग परीसरात चांगली हॉटेल्स उपलब्ध आहेत. एमटीडीसी व्यतिरीक्तही या परीसरात बरेच हॉटेल्स्/रिसॉर्ट आहेत (अभिरूची, बाबला बीच हाऊस, भवानी बीच रिसॉर्ट, अपूर्वा बीच रिसॉर्ट, पूर्वज रिसॉर्ट (देवबाग), मनाली रिसॉर्ट असे अनेक पर्याय उपलब्ध आहे.)

या उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लान करायला काहिच हरकत नाही.

 जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)

Submitted by जिप्सी on 9 March, 2012 - 13:52

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"

=======================================================================
=======================================================================
जय गणेश मंदिर (मालवण)
मालवण शहरापासुन अर्धा किमी अंतरावर असलेलं "जयगणेश मंदिर" हे अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या मंदिराची स्थापना कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी केली आहे. श्रीगणेशभक्तांना त्यांच्या व्यवसायात निरंतर जय मिळवून द्यावा, जागतिक व्यापार-उद्योगापासुन ते खेळापर्यंत सर्वच आघाड्यावर भारतीयांना जय मिळावा, या संकल्पनेतूनच या मंदिराचे नाव "जय गणेश" असे ठेवण्यात आले आहे. सभामंडपाच्या गाभार्‍यातील घुमटावर आतल्या बाजूने गणपतीच्या आठ मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपामध्ये उभे राहिल्यानंतर आठ दिशांना असलेल्या आठही मूर्ती आपल्याभोवती आपले रक्षण करण्यासाठी उभ्या आहेत अशी दृढ भावना मनामध्ये उत्पन्न होते आणि तेथे उभे राहिल्यानंतर समोर दिसणारा हा सुवर्णगणेश सिद्धी-बुद्धीसहित आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने आणि दयादृष्टीने पाहतो आहे असेच भासते. जय गणेश मंदिरात सिद्धीच्या हातात ढाल,तलवार आणि बुद्धीच्या हातात कागद, लेखणी असून गणेशाचे पारंपारीक ध्यान मन प्रसन्न करणारे आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

रामेश्वर आश्रम (मालवण)
प्रचि ०७
श्री रामेश्वर मंदिर (कांदळगाव)
मालवणपासून अवघ्या सात-आठ कि. मी. अंतरावर असलेले कांदळगावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कांदळगावचे रामेश्‍वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा रामेश्‍वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो. सिंधुदुर्ग किल्ला बांधत असताना समुद्रातील भरतीच्या पाण्याने तटबंदीचे दगड ढासळत होते. किल्ला आकार घेत असताना लावलेले दगड कोसळत होते. बांधकामात सतत व्यत्यय येत होता. महाराज व्यथित झाले. त्याचवेळी त्यांना दृष्टांत झाला. मालवणचे ग्रामदैवत श्री रामेश्‍वर त्यांच्या स्वप्नात आले. ‘‘मालवणच्या उत्तरेकडे माझी पिंडी आहे. ती उघड्यावर असून तिच्यावर प्रथम छत्र उभे कर आणि नंतरच किल्ल्याचे बांधकाम सुरू कर.’’ रामेश्‍वराने दिलेल्या दृष्टांतानुसार छत्रपतींची स्वारी उत्तरेकडे शिवपींडी शोधावयास निघाली. जंगलमय, सखल भाग, कांदळवन, पाणी व चिखलाची दलदल असा परिसर असलेल्या एका राईमध्ये महाराजांना पिंडी आढळून आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रामेश्‍वराच्या सांगण्यानुसार शिवपिंडीवर एका रात्रीत घुमटी बांधली. स्वयंभू पाषाणाला पुराचे पाणी लागू नये यासाठी घुमटीच्या चारही बाजूने कठडा उभारला. त्या घुमटीसमोर आठवण म्हणून वटवृक्षाचे रोपटे लावले. ते वडाचे झाड सध्या ‘शिवाजीचा वड’ म्हणून ओळखले जाते. घुमटी बांधून झाल्यानंतर किल्ल्याच्या बांधकामात कोणतेही विघ्न आले नाही आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि कांदळगाव यांचे नाव अधिक दृढ करणारा आणि या नात्याची आजच्या पिढीला साक्ष देणारा असा हा उत्सव. रामेश्‍वर पंचायतन सकाळी वाजत गाजत बाहेर पडते. पालखी, तरंगे व वारीसुत्रांसह सिंधुदुर्ग किल्ल्यावर निघालेली ही स्वारी मार्गातील कामरादेवी, सीमा म्हारतळ, मारुती घाटी यांना सांगणे करून पुढच्या प्रवासाला निघते. गांगोचा अवसर कोळंब खाप्रेश्‍वराला भेटायला जातो. कोळंब पुलावर रामेश्‍वराच्या स्वारीचे शाही स्वागत होते. त्यानंतर मेढा जोशी महापुरुष मांडावर देव स्थिर होतात. या मांडावर इतर वारीसुत्रे विसर्जित होतात. मात्र रामेश्‍वराचा अवसर विसर्जित होत नाही. दुपारी श्री देव रामेश्‍वर आपल्या लवाजम्यासह जोशींच्याच होडीने सिंधुदुर्ग किल्लयावर जातो. किल्ल्यात प्रवेश करताना २१ नारळ फोडले जातात. हा सोहळाच अपूर्व असा असतो.
(साभार रामेश्‍वराची सिंधुदुर्ग किल्ला भेट! )

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
श्री रामेश्वर
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

श्रीरामेश्वर मंदिराच्या समोरच असलेले रवळनाथ मंदिर
प्रचि १४

श्री छ्त्रपती शिवाजीमहाराजांनी स्वहस्ते लावलेला वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाखाली असलेला महाराजांचा पुतळा
प्रचि १५

प्रचि १६
श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी)
मालवणपासून साधारण १४-१५किमी अंतरावर असलेल्या मसुरे गावातील बारा वाड्यांपैकी एक असलेली आंगणेवाडी आज जगाच्या कानाकोपर्‍यात प्रसिद्ध पावली आहे ती श्रीभराडीदेवीमुळे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजीअप्पा यांना एका मोहिमेमध्ये श्री भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभाला त्यामुळे आनंदित होऊन त्यांनी दोन हजर एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. आंगणेवाडीतील भरडावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणुन तिला "श्रीभराडीदेवी" असे म्हणतात. नवसाला पावणार्‍या या श्री भराडीदेवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रौत्सवाला भाविकांचा महापूर लोटतो. हा जत्रोत्सव साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात असतो.
आम्ही गेलो तेंव्हा जत्रेची तयारी जोरदार चालू होती. मंदिराला रंगरंगोटी चालु होती.

प्रचि १७

प्रचि १८

मंदिराच्या आतील कलाकुसर
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
जलमंदिर (बिळवस)
मालवणहुन आंगणेवाडीला जाताना उजवया हाताच्या रस्त्याने आतमध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण सातेरी देवीचे जलमंदिर आहे. मंदिर प्राकाराच्या सभोवताली खंदकात पाणी खेळवलेले आहे. नैसर्गिक झर्‍यांमुळे पाण्याची पातळी पाऊसकाळात जास्त असते. येथील नीरव शांताता अनुभवताना मन प्रसन्न होते.

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

(तटि: सदर भागात "फोटोग्राफिक विशेष" असं काहि नाही, पण या कोकण दौर्‍याचा एक भाग म्हणुन इथे प्रदर्शित करत आहे. Happy मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" मधुन साभार.)

(क्रमशः)

कुणकेश्वर, वाडातर, श्रीरामेश्वर (गिर्ये)

Submitted by जिप्सी on 12 March, 2012 - 13:44

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)

=======================================================================
=======================================================================

कोकण दौर्‍याचा आमचा शेवटचा दिवस उजाडला. कांदळगाव-आचरा मार्गे कुणकेश्वर, नंतर गिर्येचे रामेश्वर आणि सरते शेवटी विजयदुर्ग करून मुंबई गाठायची असा प्लान होता. त्याप्रमाणे सकाळी लवकर उठुन तयारी करून प्रथम कांदळगावच्या रामेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईला परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी साधारण ४-५ पर्यंत विजयदुर्ग पाहुन मग मुंबईला निघायचे असा बेत होता. प्लानिंगनुसार पहिल्यांदा भेट दिली ती देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर मंदिराला. महाशिवरात्रीच्या जत्रेची तयारी चालु असल्याने संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी देण्याचे काम चालु होते.

श्री कुणकेश्वर मंदिर
देवगडपासुन १५ किमी अंतराव असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिराला "कोकणची काशी" असेही म्हटले जाते. प्राचीन अशा या मंदिराची स्थापना अकराव्या शतकात झाली असे सांगण्यात येते. हे स्थान समुद्रकिनारी असल्याने सागराअच्य अलाटांनी मंदिराचा पश्चिम तट नित्य प्रक्षाळला जातो. समुद्राच्या लाटांमुळे मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणुन मंदिराच्या कलात्मकपेक्षा मजबुतीकडे जास्त लक्ष दिलेले आहे. या ठिकाणी पूर्वी कनक नावांच्या वृक्षांची राई असावी म्हणुन या स्थानास कुणकेश्वर हे नाव पडले असावे. अतिशय नयनरम्य असणारे हे कुणकेश्वर मंदिर समुद्राच्या सान्निध्यामुळे दे़खणे दिसते. येथील समुद्रकिनारा स्वच्छ आणी सुंदर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्रा भरते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गिर्येच्या रामेश्वराकडे निघालो. वाटेत वाडातर पुलावर गाडी थांबवली आणि फोटोसेशन सुरु केले. Happy

वाडातर
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

पुढे कुणकेश्वर-वाडातर मार्गे विजयदुर्गच्या वाटेवरच्या गिर्ये गावातील रामेश्वर मंदिराकडे आम्ही पोहचलो.

विजयदुर्गला पोहचण्याआधी काहि किमी अंतरावर गिर्ये येथे मुख्य रस्त्या पासून ३ कि. मी. अंतरावर इतिहासकालीन श्री देव रामेश्वर मंदिर आहे. पेशवे नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी या रामेश्वर मंदिराची उभारणी केली. देवालय साधे कौलारू आहे. समोर खास कोकणी पध्दतीच्या दिपमाळा आहेत. रामेश्वर देवालय खोलगट भागात आहे. मुख्य रस्त्यावरून अगर प्रवेशद्वाराच्या नजीकच्या पठारावरून हे मंदिर दिसत नाही. देवालयात जाण्यासाठी दीडशे मीटर लांब पंधरा मीटर खोल अशा जांभया दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग काढलेला आहे. मंदिरातील मुख्य गाभार्‍यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे पन्नास किलो चांदीची नंदीवर आरूढ मूर्ती असलेली चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती. हि मूर्ती काहि वर्षापूर्वी चोरीला गेली. Sad
ई.स. १७९२/९३ मध्ये पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख आनंदराव धुळप यांनी इंग्रजांच्या जहाजावरून पकडून जप्त करून आणलेली अजस्त्र घंटा या ठिकाणी असून ही घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी ई.स.१८२७ मध्ये श्री देव रामेश्वरला अर्पण केली.

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

या रामेश्वर मंदिराच्या आवारातच उजव्या बाजूला मराठांच्या आरमाराचे सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. ते शिव भक्त होते. रामेश्वर मंदिर भोवतालची दगडी तटबंदी, फरसबंदी पटांगण सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधले.

सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी
प्रचि २८

गिर्येच्या श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या कोकण भटकंतीतल्या शेवटच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी "विजयदुर्ग" येथे निघालो.
(क्रमश: पुढिल अंतिम भागात "किल्ले विजयदुर्ग")

"किल्ले विजयदुर्ग"

Submitted by जिप्सी on 17 March, 2012 - 03:13

'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर

'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)
'कोकणमय' (८) — कुणकेश्वर, वाडातर, श्रीरामेश्वर (गिर्ये)

=======================================================================
=======================================================================
बारा गावच्या, बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या, बारा देशातल्या मायबोलीकरा.. म्हाराजा
सांगना करुक कारन.. म्हाराजा
तुझ्या कृपाशीर्वादाने "कोकणमय" मालिकेचो ह्यो शेवटचो भाग सादर करतय.. ही सेवा चरणी रुजू करुन घे
म्हाराजा...
देवा रवळनाथा... तुझ्या कृपेने संपूर्ण मालिकेक भरभरून प्रतिसाद गावले... ही कृपा अशीच ठेव म्हाराजा...
ज्येंनी ज्येंनी ही मालिका बगली.. आवर्जून प्रतिसाद दिले त्यांचे मनापासून आभार. ज्येंनी बगली पण प्रतिसाद देवची बुद्धी नाय झाली त्येंचेव आभार Proud ... प्रतिसाद दिलेल्यांचा भला मागतंय, न दिलेल्यांका प्रतिसाद देवची बुध्दी.. व्हय म्हाराजा. Proud

सगळ्या मायबोलीकर गोतावळ्याक सुखी ठेव.. वाकड्याक सरळ कर आणि तिड्याक सिध्धो कर.. भांडनान फक्त भांडान वाडता, एकत्र इल्यात तर एकी व्हता ह्यां पटवून दी... म्हाराजा
मायबोलीची अशीच कायम भरभराट जावंदेत... म्हाराजा
एकूण सगळ्यांचा भला भला जावंदेत... म्हाराजा

आशा करतय कि दहा भागांची हि 'कोकणमय' सफर सगळ्यांका आवडली आसात.. म्हाराजा
माझ्या प्रचिंवर सगळ्यांचोच असोच लोभ कायम रवांदेत.... म्हाराजा..

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अजून नवीन उत्साहाने कोकण भ्रमंती करुक.. अशीच ताकद आणि बुद्धी दी ह्या तुका अखेरचा सांगणा... व्हय म्हाराजा..... Happy
=======================================================================
=======================================================================
किल्ले विजयदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या दक्षिणेस समुद्रात शिरलेल्या एका मोठ्या खडकावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यास घेरीया असंही नाव आहे. या किल्ल्यास २००६ साली ८०० वर्षे पूर्ण झाली. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं पान आहे. शिलाहार राजा भोज याने महाराष्ट्रात बांधलेल्या सोळा किल्ल्यांपैकी एक विजयदुर्ग हा एक. पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.जयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत.दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून पायर्‍यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या कोठारा शेजारच्या भुयारातून 'खूबलढा तोफा बारा ' या बुरुजावर यायचं या भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्‍या असून या पायर्‍यांच्या मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.
विजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.विजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्‍या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
चुना मळण्याचे जाते

प्रचि १७
हे आमचे इंद्रवज्र Happy

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सुकलेली विहिर

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

=======================================================================
=======================================================================
कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल ते माहित नाही पण कॅलिफोर्नियाच्या तोडीचे सौंदर्य कोकणात आहे हे मात्र मान्य. या चार दिवसात मनसोक्त कोकण भटकलो आणि खर्‍या अर्थाने कोकण अनुभवला. कोकणातील काही ठिकाणं तर अक्षरशः वेड लावणारी आहेत. या निसर्गाच्या नशेतच खरी धुंदी आहे त्याला कुठल्याही कृत्रिम नशेची गरज नाही. कोकणच हे सौंदर्य असंच अबाधित राहो आणि त्याचा काही अति हौशी पर्यटकांमुळे बदनाम झालेला "गोवा" न होवो हिच देवाचरणी प्रार्थना.

प्रचि २९

पुन्हा एकदा कोकणात परत येण्याचे आश्वासन देत आम्ही चार दिवसाची कोकण भ्रमंती संपवून मुंबईकडे निघालो.

(तटि: विजयदुर्ग माहिती कोकण पर्यटन पुस्तकातुन साभार. गार्‍हाण लिहिण्यास मदत केल्याबद्दल मायबोलीकर "नीलुचे" खास आभार. :-))

(समाप्त)
























































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...