Saturday, July 30, 2022

ब्राझील

 नमस्कार
मंडळी ,
पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला.
जायची तयारी सुरू झाली. कुणी सांगीतले म्हनुण फरसाण,
काजु, मनुखे,बदाम्,विविध चॉकलेट्,लोणचे,पापड असे अनेक खाद्यप्रकार बरोबर घेतले.मैत्रिणिसाठी भारतिय ड्रेस घेतले,प्रवासी बॅगसुध्दा नविन घेतली कारण कधी अशी वेळच आली नव्ह्ती. असो.....
गावावरुन ४-५ मित्र आले जोरदार पार्टी झाली,प्रत्येकाने आपापल्या परिणे मोलाचे मार्गदर्शन केले जरी ते कधी परदेशी गेले नव्ह्ते.रात्रि १:५० चे विमान होते, निघण्यापुर्वी स्काईपे वरूण मैत्रिणीशी बोललो आणी खात्री करुन घेतली की कितीही आणीबाणी आली तरीही तीने माझ्या आगमनापुर्वी साओ पावलो विमानतळावर हजर रहावे.कारण मी माझा भ्रमणध्वनी नेणार नव्ह्तो म्हनुन.दोन टॅक्सी घेउन आम्ही ८ जण गिरगावातुन निघालो तेव्हा रात्रिचे १० वाजले होते.सोसायटीकडे एक नजर टाकली जसा मी कधीच परतणार नव्ह्तो.......आणि निघालो.मित्र मस्करी करत होते पण माझे तिकडे लक्ष नव्ह्तेच मुळी.मी जे काही करतोय ते बरोबर कि नुसताच वेडेपणा चाललाय असा विचार मनात डोकाउन गेला..आणी माझ मलाच ओशाळल्यासारखं
वाटले.अशा विचारातच विमानतळावर पोहोचलो.मित्रांशी गप्पा आटोपत्या घेउन विमानतळामधे प्रवेश केला
.सामान जमा करण्यासाठी रांगेत दाखल झालो.....ईतक्यात
एक अधिकारी माझ्याकडे आला ....तिकीट , पासपोर्ट तपासले आणी चौकशी करू लागला.
अधिकारी: कुठे चाललात?
मी: ब्राझिलला.
अधिकारी: कशासाठी?
मी: फिरण्यासाठी.
अधिकारी:३ महीने ?......इथे काही कामधंदा नाही का?
मी: आहे साहेब,माझं ऑफीसच कामकाज माझा भाऊ बघणार आहे.
ईतक्यात दुसरा अधिकारी तेथे आला ..दोघे काहीतरी बोलले .......परिणामी मला रांगेमधून बाजुला घेण्यात आले.माझे बॅगमधील सर्व सामानाची कसुन तपासणी केली गेली.आनी परत.......
अधिकारी: एवढे खाद्यपदार्थ का घेऊण जाताय? तिकडे काही मीळत नाही का?
मी: ३ महीने रहायच आहे आनि आपले पदार्थ तिकडे मीळत नाहीत साहेब......
अधिकारी:हुं....आनी ही व्हिस्की ?
मी: तिकडच्या मित्रांसाठी....(खरं तर माझ्यासाठीच. असावा आपला ब्रॅंड म्हनुन)
तब्बल दीड तासांनी मला सोड्ण्यात आले.एवढ्च सांगतो कि एखाद्या अतिरेक्यासारखी माझी चौकशी झाली.बॅग जमा करुन,तपासणी यंत्राची परीक्षा पास झालो.....जोराचा श्वास घेतला...जराशी बरं वाटले आनी आतिल दुकानामधे ऊगाचच
डोकावत हळुह्ळु पुढे निघालो.येथील श्रिमंती थाट बघुन मलातरी परदेशात आल्यासारखे वाटले. मी फक्त वस्तुंच्या किमति पाहुन समाधान मानले( काय करणार?)......अन जरा रमतगमतच गेटवर पोहोचलो..परत एकदा बॅग तपासणी झाली ...विमा नात जाउन बसलो.मित्राना फोन केला ,हकिकत सांगितली अनि मला पहिल्यांदाच गहिवरुन आले ........तसाच निरोप घेतला...
२ बाय २ सीटवर खिड्कीजवळ बसलो.थोड्या वेळाणे एक मध्यम वयाच्या बाई आल्या...अनि त्यांनी खिड्कीजवळच्या
जागेवर दावा केला. मी खात्रि करुन त्यांना जागा देउन बाजुच्या सिटवर बसलो. मनातच ट्रॅव्हल एजंटला शिव्यांची
लाखोली वाहिली कारण त्याने मला खिड्कीजवळची जागा बूक केल्याच सांगितले होते.असो मी स्वतः खात्रि न करताच बसलो आनी आमचा पोपट झाला.विमानाने टेक ऑफ घेतला....मी खिड्कीतुन खाली पाहिले...काळोख अन खाली
दिव्यांच्या प्रकाशात ऊजळलेली मुंबई.....केवळ अप्रतिम नजारा!!!!!! थोड्या वेळाने नाश्टा आला.. यथेच्च समाचार घेतला, नंतर काही वेळाणे ड्रिंक्स आले ,न लाजता ३-४ टिन बियर प्यायलो..अन दीली ताणुन.सकाळी ८ वाजता अ‍ॅमस्टरडॅमला उतरलो....फ्रेश झालो ..२:३० तास वेळ होता.
सुंदर विमानतळ अनि त्याहुन सुंदर तिथल्या मुली बघत गेट्वर आलो. पुढील विमान वेळेवर निघाले.आता माझी जागा खिड्कीजव़ळ होती.विमानाने टेक ऑफ घेतला....मी
खिड्कीतुन खाली बघितले .......बराच वेळ तो कापुस पींजल्यासारखा नजारा अन खाली नि़ळाशार समुद्र..कॅमेरा नसल्याची खंत वाटली. सवयीने परत ३-४ टिन बियर प्यायलो ,पोट्पुजा केली ...अन झोपी
गेलो..थोड्या वेळात जाग आली...बियरने आपली जात दाखवली......माझ्या शेजारी एक जर्मण माणुस अनि पलिकडे ब्रझिलियन बाई ...दोघांनी उठायच तेव्हा आमी १
नंबरला जाणार....एकदा दोनदा असं दर अर्ध्या तासाने ४-५ वेळा जाव लागले...१-२ वेळा हसुन मला जाऊ देणारे माझे शेजारी खाऊ की गिळू असे नजरेनेच सांगु लागले.आता मनाशिच ठरवले परत विमानात बियर प्यायची नाही.(फुकट आसली तरीही).
आताशा जरा बरे वाट्ले....विमान ३३००० फुटावरुन चालले होते...खिड्कीतुन खाली बघितले अजुनहि फक्त पाणीच दिसत होते.......दुरदुरपर्यंत जमीन दिसत नह्वती...
घड्याळात ३ वाजलेले......आत्तापर्यंत काहीसा बिनधास्त असलेला मी मनातुन घाबरलो....मनात अचानक विचाराच काहुर ऊठ्ले.......अन केव़ळ चॅट वरची ओळख असताना एका अनोळखी व्यकतीला भेटायला मी १७००० कि.मि.च्या प्रवासाला निघालो होतो....मला मी केलेल्या धाडसाची भीति वाटायला लागली...एकाही मित्राला माझ हे धाडस आवड्ल नव्हते......जवळजवळ सर्वांना खात्रिच होति की माझा पोपट
होणार........अचाऩक मला तिचा चेहरा आठवला .......माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला....जरासा सावरलो ...जर ती भेटली तर तो माझ्यासाठी ए॓तिहसिक क्षण असणार होता.......मी मनातच त्या भेटीची ऊजळणी केली....अनि
शान्त चित्ताने एक झपकी मारली.....अनाऊन्समेंट झालि ..मला जाग आली.. काय बोलली ती बाई एक शब्दही समजला नाही..कुठ्ली भाशा आहे ते पण नाही समजल.६:३० वाजले होते ......१ तास बाकी होता.....फ्रेश झालो ......कॉफी घेतली .....कसलासा फॉर्म भरायला दिला अनो़ळखी भाशेत
.....पुन्हा शेजारी ऊपयोगी पडले.....जे जे त्यांनी सांगितले तसे डोके गहाण ठेवुन लिहिले. मला तर मी निरक्षर आहे असेच वाटले.......लॅडींगची सुचना झाली अनि विमान सुखरुप
उतरले......चालत चालत पुढे आलो.......ईथे एका सुंदर मुलीने हसुन स्वागत केले......दोन मधील एका रांगेकडे बोट दाखवले......एक रांग स्थानिक लोकांची अनि दुसरी आमची परप्रांतियांची
......पुढे आलो बॅग कुठे मीळतील हे विचारले ....समोरचा माणुस काय बोलला काहीच समजले नाही....जे माझ्या विमानातले प्रवासी होते त्यांच्या मागे चालु लागलो.एवढ्या गर्दीमधे मला बॅग सापडेल हे अशक्यच वाट्ले.१० मिनिटातच गुलाबि रंगाची रिबीण बांधलेली बॅग दिसली .......दोन्हि बॅग
घेतल्या .......लोकल फोनवर नंबर एडी चा मोबाईल नंबर फिरवला......फोनमधली बाई काय बोलत होती काहिच कळेणा.......रात्रिचे ९ वाजलेले.....१० वेळेला फोन लावला
असेल पण पलिकडुन ओळखीचा आवाज आला नाही...ए़का माणसाच्या हातात भारतिय पासपोर्ट पाहिला धावत जाऊण त्याला गाठ्ले.....त्याने टेलिफोन चे कार्ड घ्यायला सांगितले.मी त्याला मदतिची विनंति केली , त्याने कारण
सांगुन पोबारा केला....संपलं सगळं....शेवटी देवावर हवाला ठेवुण बाहेर जायचा निर्णय घेतला......कधी फारसा देवावर न विसंबणारा मी पण आठवतील तेवढ्या देवांची नावे घेत बाहेर आलो....समोर बरीच गर्दी दिसत होती .......जरा बाजुला होऊन शोधाव असा विचार आला ईतक्यात झपकन एक लाल टी शर्ट घातलेली आक्रुती आली .......मला काही कळायच्या आत त्या आक्रुतीने मला मीठी मारली अन मी भानावर येईपर्यंत तिने माझे चुंबनही घेतले होते.........होय ती एडीच
होती.....माझा २४ तास प्रवासाचा शिण नाहीसा झालेला.तिच्याकडे एकदा बघितले ...........आयुश्यात पहिल्यांदाच डोळ्यातुन आनंदाश्रु आले......बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला
......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....
क्रमशः...........

 

विमानातळा बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....

सकाळी ९ च्या सुमारास जाग आली. एडी टीव्ही पाहत होती .एडी: गुड मोर्निंग माय इंडियन ......मी :गुड मोर्निंग .......मी : edy i wants to talk with adesh .तिने मोबाईलवर आदेशचा नंबर लावला .फोन लागला नाही. २-३ वेळा असेच झाले मी: what happened edy? ..edy: i don't know...मी रागानेच तिच्याकडून मोबाईल घेतला ..रिडायल केला. फोन लागला नाही. ती बाई फोनवर पोर्तुगीज मध्ये बोलत होती. काय प्रोब्लेम आहे ते काही कळत नव्हते. एडीशी बोलण्याचा निष्फळ प्रयन्त केला...उपयोग झाला नाही....कारण एडीच इंग्रजी फारच बाल्या अवस्तेथ होते. मी काहीही विचारले तरी ती ( i don't know, sorry , i fargot, i like , my lunch ,your dinner ) अशा १-२ शब्दात उत्तर द्यायची.. तिला फारच कमी इंग्रजी येत होते आणि माझे उच्चारही तिला समजत नव्हते... मी खिडकीच्या काचा सरकवल्या आणि बाहेर नजर टाकली. शहर पूर्णपणे जागे झालेले होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावताना दिसत होत्या. एका बाजूला उंचच उंच इमारती ......मधेच छोटे छोटे बंगले....बरयापैकी हिरवी झाडेही दिसत होती. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तिथली स्वच्छता....फटाफट आवरून रात्री एडीच्या नकळत लपवून ठेवलेले पाकीट घेतले (कुठलीही रिस्क नको म्हणून) आणि खाली आलो नाष्टा करण्यासाठी...त्यांनी वेळ संपली असे सांगितले......रात्र चकना खाऊन काढली होती.....पोटात कावकाव चालू झालेली होतीच...

.तसेच बाहेर पडलो. मला साओला पोहोचून १५ तास झाले तरी मी आदेशला फक्त हे सांगू शकत नव्हतो कि मी सुखरूप पोहोचलो आणि एडी भेटलीय.....रस्त्याने चालत चालत निघालो ....रहदारी भरपूर होती.... काही माणसे मुले मुली चालताना दिसत होत्या .......एकंदरीत खात्यापित्या घरचे लोक दिसत होते.....अगदी गुबगुबीत..........काही आफ्क्रीकन लोकही होते.......आणि मी STD बूथ शोधत होतो....एकही बूथ दिसला नाही ..........कुणाशीही बोलण्याची सोय नव्हती.......तिथे फक्त आणि फक्त पोर्तुगीजच भाषा चालते......कुणी बरा माणूस दिसला कि त्याच्याशी मी इंग्रजीत बोलायचो आणि तो मख्ख पणे माझ्याकडे पहायचा .....मग एडी त्याला काहीतरी सांगायची .....माझ्याकडे रागाने बघायची..........तिला माझा हे वागणे आवडत नव्हते आणि मला तर फोन करायचा होता.....मग तिने एका दुकानातून फोन कार्ड घेतले आणि पिसिओवरून आदेशला फोन लावला.......फोन लागेना............तिने दुकानदाराला विचारले .......तरीही फोन लागेना ........मी तिला रस्त्यावरच्या लोकांना विचारायला सांगितले आणि तिने २-३ लोकांना विचारले ..ते ट्राय करायचे पण उपयोग झाला नाही.....मी पाहत होतो ........प्रत्येक जन सुरवातीचा कोड वेगळा डायल करायचा ,०००० ९१ ९८२००-----डायल करायचा कुणी ००११ ९८२००------ , पण फोन काही लागेना..........मला तर वाटले हि एडी नावाप्रमाणेच वेडी दिसतेय .... मी तिला फक्त मला टेलिफोन ऑफिसला घेऊन चल अस सांगितले......आणि ती कशी मूर्ख आहे तेही सांगितले .........माझा पार चढला होता......तिच उत्तर होतं मी कधीच ISd कॉल केलेला नाही.........आम्ही टेलिफोन ऑफिस शोधत २० मिनिट तरी चाललो असू आणि एकदाचे सापडले.....मी पुढे होऊन रिसेप्शन ला बसलेल्या मुलीला विचारले .......तीला काहीच समजले नाही......परत एडीला पुढे केले ......त्या मुलीने ००१५ ९८२००------ असा फोन लावा असे सांगितले ..बाजूच्याच पिसिओ वरून काल लावला आणि चक्क फोन लागला ........

.मी : आदेश मी वेळेत पोहोचलो ,एडी आलेली होती ,काळजी करू नकोस.मी एडीच्या घरी गेल्यावर स्काइप वर बोलू ओके .....

आदेश : ठीक आहे ......एक वाईट बातमी आहे तुझा मित्र सुरेश ऑफ झालाय......

मी : कसा काय? .....फोन कट झाला.....

मी परत ट्राय केला ......फोन लागला नाही ..........एडी ने प्रयत्न केला आणि तिने कार्ड संपले असे सांगितले.......१ मिनिटाच्या आत....मला काहीच बोध झाला नाही .पण माझे महत्वाचे काम झाले होते आणि एक वाईट बातमी समजली होती......मी एडीला जेवायचे असे खुणेनेच सांगितले आणि सुरेशचा विचार करत तिच्यामागे चालू लागलो......मला फक्त एक फोन करायला ३ तास लागले......थोडे विषयांतर झालेय पण एवढे सर्व विस्ताराने सांगण्याचा उद्देश एवढाच कि तुम्हाला माझ्यापुढील समस्यांचा अंदाज यावा ......पुढेही असे बरेच प्रसंग आले पण आता त्याची चर्चा येथे करणार नाही............

एका हॉटेलपाशी एडी उभी राहिली .......मी मानेनेच माझा होकार दिला .....आतमध्ये एसी असल्याने बरे वाटले ......समोरच प्लेट होत्या ......मी एडीच्या मदतीने भरपूर पदार्थ घेतले ........पुढे प्लेटचे वजन केले .......आणि एक कोपर्यातल्या टेबलावर आम्ही बसलो ......माझ्यासाठी बीयर मागवली......बियरची टेस्ट मस्तच होती.......पण जेवणातला मला भात आणि वालाची उसळ (वरणा ऐवजी ) सोडून एकही पदार्थ आवडला नाही.....बाकी सर्व सोडून मी भात आणि वालाची उसळ परत घेतली......तिखट किंवा मिरची कशातही नव्हती ...पूर्ण जेवण बेचव.........प्यायला पाणी विकत .फुकटच पाणी नाही......बिल आले ७५ रियाल ......७५*२७= २०२५ रुपये .........त्यात पाण्याचे ८ रियाल ..८*२७= २१६ रुपये .........मला माझे पैसे ८ दिवसातच संपतील असे वाटले.......हे सर्व लिहिले कारण मी एक मध्यमवर्गीय आहे ........बीयर आणि कोल्ड ड्रिंक एकच भाव.........एक ना दोन गोष्टी.......अनंत समस्या.असो

जेवण करून बाहेर आलो. एडीने माहिती काढली तीही या शहरात प्रथमच आली होती..........एका बसमध्ये बसलो ..........तिकीट ६ रियाल ....कुठेही उतरा पुढच्या स्टोपला नाहीतर शेवटच्या ...तिकीट एकच ........अशा बर्याच गोष्टी मला हळूहळू समजल्या .......एके ठिकाणी उतरलो .......जवळच पार्क होते .तिथे थोडा वेळ फिरलो ........सर्व आखीव रेखीव .......नंतर लोकल ट्रेन पकडून बस डेपोला गेलो ..........वीटोरिया ची २ तिकिटे आरक्षित केली ....कुठल्याशा मॉलमध्ये भटकलो .........आणि संध्याकाळी जेवण करून ८ वाजताच हॉटेलवर आलो.....कारण एडी म्हणाली बाहेर रात्री फिरणे धोक्याचे आहे ...........टीवी लावला ........सर्व पोर्तुगीज ..........लवकरच झोपून घेतले.......सकाळी हॉटेलचे बिल भरले .......६८० रियाल .....दोन दिवसाचे ६०० आणि जे फ्रीजमधील बियर आणि पाणी प्यायलो ते ८० ............२ दिवसात १००० रियाल खर्च झाले म्हणजे २७००० रुपये .......कुठलीही ऐश केली नाही.वायफळ खर्च केला नाही .........माझ्याकडे सगळे १२५००० रुपये होते .......त्यातले २७००० खर्च झाले २ दिवसात ........९८००० मध्ये मला ६८ दिवस राहायचे होते ........माझ्या चेहऱ्यावरून एडीने माझी चिंता ओळखली .............एडी: don't worry love ...in vitoria .my money ......जीवात जीव आला .........बस डेपोला आलो ...........१ नंबरला गेलो तर १.५ रियाल म्हणजे ४० रुपये .....इलाज नव्हता दिले ............बस स्टेशन एखाद्या मॉल सारखेच होते ......इथे तिकिटाशिवाय कुणालाही बस प्लाटफोरमवर जायला परवानगी नाही .............बसमध्ये बसताना प्रत्येकाचे ओळखपत्र तपासतात ..माझा पासपोर्ट तपासला ..........आणि मगच आतमध्ये प्रवेश मिळाला.......उभा एकही प्रवासी नव्हता ......१६ तासाचा प्रवास करून वीटोरिया ला पोहोचलो .........आता पुढील भागात थोडक्यात प्रवास वर्णन आणि काही फोटो............हा भाग काहीसा कंटाळवाणा वाटेल तुम्हाला ....पण एका अनोळखी देशात (खंडात म्हणाना) ...........कुणाचीही कुठलीही मदत होण्याची शक्यता नसताना ........मी केलेले हे धाडस आणि त्याचा मनावर येणारा ताण तुमच्या लक्षात यावा म्हणून केलेला हा प्रपंच ......... 

मंडळी , १६ तासाचा प्रवास करून विटोरियाला पोहोचलो.

एस्पिरीतो सांतो या ब्राझील मधील घटक राज्याची राजधानी म्हणजे हे विटोरिया शहर. साधारणत: आपल्याकडील पुणे शहराच्या तोडीचं फरक एवढाच कि हे एक बंदर आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले हे ब्राझीलमधील प्रमुख बंदरापैकी एक आहे. मला प्रथम दर्शनीच आवडलेलं हे एक सुंदर शहर आहे.प्रशस्त अशा rodoviario (बस आगार) मधून बाहेर येऊन चालतच साधारण चार-पाच मिनिटात आम्ही घरी पोहोचलो. दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये बसवून एडी लगेच बाहेर गेली आणि परतली ते लाडक्या अबुल ला घेऊनच.मला घ्यायला साओला आल्यामुळे एडीने त्याला पेट हाउस मध्ये ठेवले होते फी भरून . त्याला बेन्जामिन अबुल हे त्याच नाव.वय एक वर्ष आणि लोभस अस त्याच रूप.आल्याबरोबर त्याने माझ्याकडे झेप घेतली आणि माझ्या मांडीवरच बसला. माझी आणि याची ओळख सुद्धा वेबकॅम वरचीच पण कुठलेही आढेवेढे न घेता त्याने माझ्याशी दोस्ती केली. माझ्याकडून लाड करून घेतल्यावरच त्याने मला सोडलं.कुणीही घरी आल्यावर अबुलच पहिलं स्वागत करणार हा इथला शिरस्ता.जोपर्यंत तुम्ही याचे लाड करणार नाही तोपर्यंत हा तुमच्यावर ओरडत राहणार अगदी मालकिणीने गप्प बसायला सांगितले तरीही.एका महागड्या रेसचा हा कुत्रा (एडीला याला कुत्रा म्हणलेलं आवडत नाही) याची खासियत म्हणजे आता तो जेवढा आहे शरीराने तेवढाच तो आयुष्यभर असणार शेवटपर्यंत अगदी बोन्साय केल्यासारखा. एडीच्या सुख दुखाटला तिचा साथीदार.पुढील वर्षी जेंव्हा एडी भारतात येईल ती बेन्जामिन अबुल सोबतच.तो सुद्धा परदेशवारी करणार आमच्यासारखी. तर येथील आमच्या घरात आम्ही तीनच मेम्बर एडी मी आणि अबुल. खर सांगायचं तर एडीला याची जास्त चिता वाटत होती अबुल मला घरातील एक मेम्बर म्हणून स्वीकारेल कि नाही. त्याने माझ्या बाजूने कौल दिला आणि मी या घरातील सदस्य झालो. पुढे माझा घरातील निवांत वेळ अबुल बरोबर खेळण्यात मजेत गेला. याची समज अगदी माणसासारखी आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण एडी जर दुखी असेल तर हा दुखी होतो हे मी अनुभवाने सांगतो आहे. त्याचे सर्व नावागावासाहित रजिस्ट्रेशन आहे .आणि त्याची मेडीकल फाईलहि आहे रेगुलर चेक अप पण होते. ऐकून होतो पण प्रत्यक्ष प्रथमच पहिले. असो

दुसरया दिवशी सकाळी बाहेर निघालो. एडी एक-दोन शेजार्यांना अभिवादन केले मी आपला मागे उभा . कुणीही एडीकडे हा कोण म्हणून चौकशी केली नाही कि माझ्याकडे पाहिलेही नाही.मला आश्चर्य वाटले पण बरेही वाटले कारण भाषेची अडचण होतीच. आम्ही चालतच निघालो. रस्त्यावर छोटी मोठी दुकाने होती, बहुतेक दुकाने मुली/बायका च चालवत होत्या. बरयापैकी स्री पुरुष समानता दिसत होती. काही दुकानात मुली अगदी केस कापण्याचे काम करताना दिसत होत्या. तुम्ही माणसाकडे किंवा बाईकडे कटिंग करा पैसे तेवढेच हे ज्ञानही मला इथेच झाले. आपल्याकडे असे नाही असे ऐकून आहे अनुभव नाही. रस्त्यावर फेरीवाले दिसत नव्हते.गाड्या सुसाट धावत होत्या कारण कुणीही रस्त्यामधून चालत नाही. रस्ते चकाचक आणि सगळ्यात विशेष म्हणजे कुणीही होर्न वाजवत नव्हते याचे मला आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. आमच्या इथे गिरगावात घराबाहेर पाच मिनिट पडलात तरी कर्कश आवाजांनी कान बधीर होऊन जातात.मारुती होंडा फियाट अनेक प्रकारच वाहने धावत होती. सकाळची कामावर जाण्याची वेळ असल्याने बसमध्ये गर्दी होती. आम्ही एका बँकेमध्ये शिरलो .एडीने टोकन घेतले आणि आम्ही आमचा नंबर येण्याची वाट पाहत बसलो. वातानुकुलीत वातावरण होते. बाहेर मुंबैसार्खीच गर्मी असल्याने सुखावलो. बँकेमध्ये जास्त स्टाफ लेदिएस दिसत होता. ज्याचा नंबर आहे त्याचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय दुसऱ्याकडे कर्मचारी लक्ष देत नाहीत. कितीही वेळ लागला तरी. फारशी गर्दी नसल्याने आमचे काम लवकरच आटोपले.मी एक कॉफी प्यायलो इथे एक बंर आहे बहुतेक बँक ,मॉल,शोप्पिंग सेंटरमध्ये कॉफ्फी ठेवलेली असते ती अगदी मोफत.ब्राझील हा कॉफ्फी उत्पादन करणारा जगातील १ नंबरचा देश आहे याची खात्री पटली आणि खरोखरच अप्रतिम चवीची कॉफी प्यायची असेल तर तुम्हालाही ब्राझीलला जावे लागेल.

फिरत फिरत आम्ही एका पार्कमध्ये आलो. फारशी मोठी नसली तरी तेथील आंबा फणस आणि वडाची झाडे पाहून मला एक क्षण तरी मी भारतात असल्याचा भास झाला.जरासं भटकून काही फोटो काढले.आणि संध्याकाळी परत फिरलो.रस्ता समुद्राच्या बाजूने होता. तिथे काही जहाज होते.आणि msc कंपनीचे एक जहाज पाहून मला खूप बरे वाटले ,कारण माझा एक मित्र या कंपनीत काम करतो आणि जानेवारीमध्ये याच पोर्टला त्याचं जहाज येणार होतं आणि तो मला भेटणार होता.नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक बंर गाठला, चायनीज हॉटेल होते आणि जापनीज पण.चायनीज जवळचे वाटले मस्त चिकन फ्राय आणि बटाटा फ्राय मागवले. स्कोल(ब्राझील मधील सर्वां प्रसिद्ध बियर ) होतीच. मला आवडलेली ब्राझीलमधील हि एकमेव डिश. ब्राझील मध्ये बटाट्याला बतातच म्हणतात हे विशेष. मस्त ताव मारला अन घर गाठले.

क्रमश:

हे काही फोटो:-

काल रात्री आमच्या घराजवळील एका पार्कमध्ये गेलो होतो सहज आपला शतपावली करावी म्हणून .साधारण आठ- साडेआठ च्या सुमारास. प्रशस्त अशी हि बाग. प्रवेश केल्यावर डाव्या हाताला लहान मुलांना खेळण्यासाठी खास विभाग होता . झोपाळे, घसरगुंडी आणखीही विविध प्रकारच्या सुविधा होत्या. त्या लहानग्यांचे तर्हेतर्हेचे रंगीबेरंगी कपडे ,त्यांचा तो गुलाबी असा वर्ण आणि त्यांची ती चाललेली मस्ती पाहून मला आपल्या लहानपणाची आठवण झाली. मला तर ती सगळी खेळण्यातली असल्यासारखीच वाटत होती. थोडेसे पुढे गेल्यावर एक फुटबाल मैदान,तिथे काही लहानमोठी मुले फुटबाल खेळण्यात दंग झालेली, उजवीकडे पार्कच्या मधोमध एक कारंजे त्यावर सोडलेल्या रंगीबेरंगी प्रकाशझोतामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोठमोठी झाडे हि बाग बरीच जुनी असल्याची साक्ष देत होते. जागोजागी बसण्यासाठी बाक होते आणि त्यावर आपल्याच विश्वात रममाण झालेले तरुण-तरुणी, काही म्हातारे लोक बसले होते. पायपीट करणारया लोकांसाठी पायवाटही होती. दुसर्या बाजूला एक छोटेशे स्टेज होते त्यावर काही मुलांचा नाचण्याचा सराव चाललेला होता समोर प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था होती. एका कोपऱ्यामध्ये जोरदार संगीताचा आवाज येत होता. आपोआपच पाय तिकडे वळले. तो एक प्रशस्त असा बार होता मध्यभागी टेबल मांडलेले , एका बाजूला त्याचं किचन आणि दुसर्या बाजूस मोठमोठे स्पीकर्स वाजत होते. एक मनुष्य गात होता आणि एका बाजूस बरेचसे लोक नाच करत होते.आणि त्यामध्ये १०-१२ जोडपी हि म्हातारी होती.मला थोडीशी गम्मत वाटली. आम्ही तेथेच हिरवळीवर बसलो आणि त्या मैफिलीचा आस्वाद घेतला. मुले मोठी झाल्यावर दुसरीकडे राहतात आणि हे वयोवृद्ध लोक असे आपल्याच मस्तीत जगतात. साठ आणि सत्तरीच्या पुढील हि माणसे न संकोचता एकमेकांच्या मिठीत संथपणे नाचण्यात मग्न होती. मला तर त्यांचा हेवा वाटला.कुणालाही गाणे गायचे असल्यास परवानगी होती.एडीने माझ्याकडे नाचण्याचा हट्ट धरला, मला नाचता येत नाही हे माहित असूनही. तिच्या आग्रहाखातर मी तयार झालो. इथे मात्र ते लोक आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते, कुणी माझ्या नाचण्याला हसतही होते.यापूर्वी कधीही न केलेली माझी नाचण्याची हौस अशा रीतीने पूर्ण झाली.

आज सकाळीच एडीची मैत्रीण पावला (ANA PAULA) घरी हजर झाली. खरतर ती मला पाहायला आली होती. एडीच्या सर्व मैत्रिणींप्रमाणे पावलाचाही मी ब्राझीलला येईल यावर विश्वास नव्हता. तिने एडीला तसे बोलून दाखवलेही होते तरीही एडीची जवळची मैत्रीण असल्याने ती घरी आली होती. एडीने माझी ओळख करून दिली. पावलाने एडीला विचारायचे एडीने मला सांगायचे, माझे उत्त्तर परत एडीने पावलाला भाषांतर करून सांगायचे. अशा खेळातच एडीने तिला लंचसाठी आग्रह केला. एडी किचनमध्ये आणि मी हिच्याबरोबर काय बोलणार.पण एडीने हा प्रश्न लीलया सोडवला.तिने आम्हाला बियर सर्व्ह केली आणि ती किचनमध्ये निघून गेली (एडी घेत नाही). मी रोज पिणारा माणूस पण थोडासा नर्व्हस झालो. तिनेच चियर्स केले आणि आमची पार्टी सुरु झाली.ब्राझीलची बियर आणि भारतीय चकना आणि तेही एका परदेशी मुलीबरोबर. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. मलाच माझ्या भाग्याचा हेवा वाटला. मधेच एडीने LAPTOP आणून दिला आणि माझा प्रोब्लेम सुटला. मी तिला माझे भारतातील भटकंतीचे फोटो दाखवले. तिनेही खुणेनेच त्यावर प्रतिक्रिया दिल्या.एडीने पावलाला इंडिअन पदार्थ खायला दिले.काजू ,बदाम तर ठीक पण फरसाण खाल्यावर तर तिची एकदम हवाच निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणीच आले .साधारण तिखट असलेले ते फरसाण आपल्याकडे लहान मुले हसत खातात ते तिला खूपच तिखट लागले.तिला नॉर्मल व्ह्यायला १० मिनिटे गेली. एडीने तर कधीच त्याला हातही लावला नाही. असे हे ब्रज़िलिअन लोक तिखट जवळजवळ खातच नाहीत म्हणाले तरी चालेल.नंतर आम्ही यथासांग पेटपूजा केली. पावला गेली आणि आम्ही आवरून बाहेर पडलो ते बीचवर जाण्यासाठी.

मी, एडी आणि जुनिअर ( एडीच्या मैत्रिणीचा मुलगा हा माझा चांगला मित्र झाला ). कारण तो माझ्याशी बोलू शकत होता. नाही- नाही, त्याला इंग्लिश फारसे येत नव्हते पण तो पीसीवर गुगल वर पोर्तुगीज-इंग्लिश वापरून माझ्याशी गप्पा मारायचा. १२ वर्षाचा मुलगा खूपच सालस आणि शांत स्वभावाचा आहे.पुढे बर्याच वेळेस आम्ही त्याला आमच्याबरोबर नेत असू .आम्ही तिघे भर दुपारी एका बीचवर गेलो. बीचचे नाव होते प्राया दो कान्ता .एका बाजूला उंचउंच इमारती ,आणि समोर पसरलेला निळा समुद्र असा हा सुंदर बीच. जास्त लिहित बसत नाही. खाली फोटोच देतो. अनीत चारच्या सुमारास परत एका दुसर्या बीचवर गेलो त्याचे नाव इला दे बोई.आतापर्यंत मीही बर्मुडा वापरायला सरावलो होतो आणि बरीच भटकंती बर्मुडा घालूनच केली.

क्रमश:

 आज मी आपल्याला रिओ दि जानेरियो या शहराची ओळख करून देणार आहे. ब्राझील मधील क्रमांक-२ चे हे शहर, १८२२ ते १९६० हि ब्राझीलची राजधानी होती. नैसगिक सौंदर्य लाभलेलं हे अतिशय सुंदर अस शहर आहे. इथे Christ the Redeemer ,Corcovado ,Sugarloaf mountain आणि जगप्रसिद्ध अशी फुटबॉलची पंढरी मेराकाना स्टेडीयम हि प्रेक्षणीय स्थळे आहेत.आज आम्ही Christ the Redeemer या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणार आहोत. कॉर्कॉवाडो या पर्वतावर हा पुतळा उभा आहे. हे रिओ मधील सर्वात उंच ठिकाण, शहराच्या कुठल्याही भागातून हा पुतळा आपले लक्ष वेधून घेतो.हॉटेलपासून अर्ध्या तासातच आम्ही या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो. लगेचच एक मुलगी सामोरी आली, तिने या पर्वतावर कार अथवा ट्रेनने जाता येईल अशी माहिती पुरवली. मी ट्रेनसाठी उस्सुक होतो पण ट्रेनला वेळ असल्याने आम्ही कारने जायचे ठरवले,आम्ही दोघे आणि बसमधून उतरलेल्या दोन लेडीज असे आम्ही चारजण कारमध्ये बसलो , ज्या मुलीने हि माहिती दिली ती स्वतः कार चालवत होती. रस्त्यामध्ये एक दोन ठिकाणी थांबून आम्ही काही फोटो काढले. आणि पुढे मार्गस्थ झालो. संपूर्ण असा घाटाच्या या वळणदार रस्त्याने हि मुलगी सफाईने गाडी चालवत होती. मध्ये मध्ये काही माहिती पुरवत होती.रस्त्याच्या दुतर्फा हिर्वेगर्द जंगल आणि थंडगार हवेचे झोत अंगावर घेत ९-१० कि मी चढण चढून गेल्यावर आम्हाला उतरवण्यात आले. आता इथून पुढे रस्ता धोकादायक असल्याने पुढचा प्रवास तेथील प्रशासनाच्या छोट्या छोट्या मिनी बसने करावा लागणार होता .त्या मुलीनेच ती बसची तिकिटे आणून दिली .बसने ३-४ कि मी चा थरारक प्रवास करून आम्ही उतरलो. येथे आम्ही चहापान करून पुढे मार्गस्थ झालो. आता दोन पर्याय होते. इथून लिफ्टची सोय आहे किंवा तुम्ही चालत जाऊ शकता. आम्ही चालत निघालो कारण ते सुंदर असे रिओ शहर इतक्या उंचावरून आणखी सुंदर दिसत होते आणि आम्हाला फोटोहि काढायचे होते. त्या दोन बायका ज्या आमच्या कारमध्ये होत्या त्याही आमच्या बरोबर होत्या. एडीशी गप्पा मारत आणि नाही काही माहिती विचारत होत्या. मी हा एवढा भारतातून आलोय याचं त्यांना आश्चर्य वाटत होते. त्यातली एक मुलगी केप्री तेथिल फायर ब्रिगेड मध्ये काम करत असल्याचे समजले. जोरदार हवा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटलं आम्ही वर पोहोचलो जिथे लिफ्ट मधील लोक बाहेर येत होते . इथून पुढे २ टप्पे सरकत्या जिन्याने पार करून आम्ही त्या पुतळ्या जवळ पोहोचलो.त्या पुतळ्याची भव्यता आणि ते रेखीव शिल्प पाहून मी नतमस्तक झालो. येथे पर्यटकांची चांगलीच गर्दी होती.देश विदेशातले ते लोक फोटो काढण्यात मग्न आणि तेथून दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत होते . काही लहान मुलांची किरकिर चालू होती.तरुण तरुणीचे डोळ्यात डोळे घालून गुप्तगु चालू होते. आम्ही येथे २ तास थांबलो. भरपूर फोटो काढले ते खाली देत आहे. मला आवर्जून सांगावे वाटते कि एवढ्या उंच ठिकाणी एवढ्या छोट्याशा जागेत तिथल्या प्रशासनाने पर्यटकांसाठी शक्य त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आम्ही येथील हॉटेलमध्ये लंच करून परतीच्या प्रवासाला लागलो. ती मुलगी आमची वाट पाहत थांबलेली होती. कारने खाली येऊन हॉटेल गाठले. तुम्हाला कल्पना यावी म्हणून थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. फार रोचक असे मला काही लिहिता येत नाही. आहे ते गोड मानून घ्यावे हि विनंती. कधी आमच्यासारखा योग आल्यास अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण.

क्रमश:

काही फोटो:-

























 

आज सकाळी लवकरच जागआली. सहा वाजले असतील,खिडकीतून खाली नजर टाकली, रस्त्यावर मोठमोठे ट्रक्स,बसेस ,कार धावत होत्या. आमचे हॉटेल बस आगाराजवळच असल्यानेही असेल, लोकांची वर्दळहि सुरु झालेली होती. याच हमरस्त्यावर मोठासा उड्डाणपूल, रस्त्याच्या आणि पुलाच्या मध्यावर पादचार्यांसाठी मार्ग बनवण्यात आलेला होता. त्यावरून काही माणसे, मुले आणि स्रिया लगबगीने निघालेल्या दिसत होत्या.उड्डाणपुलाच्या पलीकडे अजस्र अशा क्रेन नजरेस पडल्या आणि त्यापलीकडे काही जहाजे नांगर टाकून विश्राती घेत होते. ते तेथील बंदर असावे.आज आमचा रीओमधील प्रसिद्ध अशा शुगर-लोफ ला भेट देण्याचा बेत होता. पण तेथिल रोप-वे ११-१२ च्या सुमारास सुरु होत असल्याने मी तेथील सत्य साईबाबांच्या आश्रमाला भेट द्यायचे ठरवले,पत्ता ठावूक नव्हता तरीही मला तेथे जाने गरजेचे वाटत होते. एक कारण असे कि कोणीतरी भारतीय भेटण्याची शक्यता आणि महत्वाचे म्हणजे तेथे काही स्वस्तात राहण्याची सोय होईल असा माझा कयास होता.तसे झाले तर आणखी दोन दिवस रिओ पाहता येईल असाही एक हिशोब मनात होता. बस आगारात येऊन तेथे काही माहिती मिळते का बघितले पण सर्वत्र नकारघंटाच कारण आमच्याकडे कुठलाही पत्ता नव्हता. मला फक्त तेथे आश्रम/मंदिर आहे अशी अधुरी माहिती होती. मी फक्त एडीला एकदा सत्य साईबाबांचा फोटो दाखवलेला होता तोही वितोरीयाच्या रस्त्यावर अगरबत्तीच्या कव्हरवर. नाग चंपा , केवडा , जस्मिन अशा भारतीय अगरबत्ती तेथील लोकांमध्ये फारच लोकप्रिय होत्या. त्यावर पत्ता आपल्या बेंगलोर शहराचा होता. त्या माणसाकडे हा माल कुठून खरेदी करत अशी चौकशी केल्यावर त्याने रिओ ला आश्रम असल्याचे सांगितले होते. तो प्रत्यक्ष एकदाच गेलेला असल्याने त्याला लिखित पत्ता माहित नव्हता. आमच्याकडे त्याच फोने नंबर असल्याने एडीने त्याला फोन केला त्याने काही अधुरी माहिती दिली, त्याआधारे आम्ही तेथील टॅक्सी स्टॅण्डवर चौकशी गेली. एडीला हा सर्व मूर्खपणा वाटत होता पण माझा निग्रह पाहून तिने चौकशी चालू ठेवली आणि आमच्या प्रयत्नांना यश आले. एक टॅक्सी ड्रायवरने आम्हाला तेथे सोडण्याची तयारी दाखवली.मी खुश झालो आणि १५ मिनिटामध्ये त्याने आम्हाला एके ठिकाणी सोडले आणि तेथून वरच्या दिशेने जाणारया रस्त्याने ५ मिनिटे लागतील असे सांगून निघून गेला. वरती पोहोचलो तर ते एक प्रशस्त असे चारच होते. आमचा पूर्ण पोपट झालेला होता. ते चर्च पाहून झाल्यावर मी एडीला तेथील कर्मचार्याकडे चौकशी करण्यास भाग पाडले. तिने काहीशा नाखुशीनेच विचारले आणि चक्क आम्हाला त्याने फोन नंबर आणून दिला. बाहेरून एडीने फोन लावला पण रविवार असल्याने ते बंद होते. राहण्याची काही सोय नाही हेही समजले. त्याला हिंदी येते का असे विचारल्यावर नाही असे उत्तर आले. फोन ठेवताना मात्र तो ओम साई राम असे म्हणाला हे एडीने मला सांगितले. एव्हाना ११ वाजून गेलेले, माझी कोणी भारतीय भेटेल हि आशा मी सोडून दिली आणि बस पकडून आम्ही शुगर-लोफ्च्या दिशेने निघालो. आतापर्यंत ज्या भागातून आम्ही प्रवास केला होता तो भाग काहीसा जुना भासत होता, काही माल गोदामे , जुनाट इमारती आणि काहीसा मागास असा हा भाग मला वाटला. पण थोड्याच वेळात आम्ही एका प्रशस्त रस्त्यावर आलो. आता मात्र इथे सर्वत्र चकचकाट, रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या इमारती, रंगीबेरंगी शो रूम्स आणि माणसांची अलोट गर्दी इतकेच काय ट्राफिकहि जाम झालेले होते. काही वेळातच बस उजवीकडे वळली आणि इतके वेळ हळूहळू जाणारी बस सुसाट वेगाने धाऊ लागली. रस्त्याच्या एका बाजूला मोठासा फुटपाथ मध्ये चौपदरी रस्ता बाजूला पार्किंग त्यापलीकडे बराचसा मोठा असा हरित पट्टा ज्यामध्ये हिरवळ आणि मोठमोठी झाडे मागे-मागे धावताना दिसत होती. त्यापलीकडे असाच चौपदरी रस्ता, पार्किंग आणि मोठासा फुटपाथ आणि त्या बाजूला निळाशार असा समुद्र . खिडकीतून येणारी ती मोकळी हवा मनाला सुखावत होती आणि इतक्यात मला महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे दर्शन झाले. मी काहीशा ओरडूनच एडीचे लक्ष तिकडे वेधले.मला खूप आश्चर्य वाटत होते तरीही मला भारत देशाच्या या सुपुत्राचा अभिमान वाटला आणि मीही भारतीय असल्याचा सुद्धा. मी एडीला गांधीजींविषयी माहिती देण्यास सुरवात केली आणि मला पुन्हा एकदा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एडीला गांधीजींविषयी बरीच माहिती होती.आता आम्ही बसमधून उतरून चालतच शुगर-लोफ्च्या पायथ्याशी आलो. तिकीट घेऊन रांगेत दाखल झालो.इथेही पर्यटकांची बरीच गर्दी आणि काहीसा गोंगाट चालू होता. आमचा नंबर आला आणि आम्ही रोपवेच्या ट्रोलिमध्ये प्रवेश केला. ५६०-७० लोक आरामात उभे राहू शकतील एवढी जागा होती.पण सर्वांनाच बाजूला उभे राहण्यात स्वारस्य होते कारण तेथून दिसणारे मनोहारी दृश्य क्लिक करता येण्यासाठी. मशीन सुरु झाले तसा काहीसा आवाज झाला आणि आम्ही वरवर उचलले गेलो. आणि ३-४ मिनिटातच आम्ही पहिला टप्पा पार करून पर्वताच्या शिखरावर आलो. तिथे मध्यभागी असलेल्या थियेटरमध्ये दाखल झालो. सर्व पर्यटक आल्यावर तिथे त्या स्थळाबद्दलचां माहितीपट दाखवण्यात आला. हे दोन पर्वत बाजूबाजूला आहेत एक छोटा आणि दुसरा त्यापेक्षा कितीतरी उंच. माझ्या माहितीप्रमाणे १८००-२००० मीटर. प्रथम टप्प्यात छोट्या पर्वतावर आणि दुसर्या टप्प्यात उंच अशा सुगर-लोफ वर जाता येते. हा रोपवे जगातील पहिला असा आहे. बर्याच हॉलीवूड पटामध्ये या रोपवेवर चित्रीकरण करण्यात आलेले आहे. आणि मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे कि कोणीतरी एका माणसाने हातात लांबच लांब काठी घेऊन या रोपवेचा दुसरा टप्पा तारेवरून चालत पार केला आणि हा जागतिक विक्रम आहे अशी. काहीशी माहिती त्या फिल्म मध्ये देण्यात आली. असो.

बाहेर येऊन आम्ही तेथील दुकानामध्ये भटकंती केली. कुठेही काहीही अवांतर खरेदी करायची नाही हा आमचा अलिखित नियम होता आणि आम्ही तो येथेही पाळला हे वेगळे सांगायला नको. वेग वेगळे गिफ्ट आर्टिकल्स, शोभेच्या वस्तू , पेंटींग्ज आणि बरेच काही.मी आपला बर्याच वस्तू हातात घेऊन न्याहाळून पाहत असे, त्याची किंमतही विचारत असे(घ्यायची नसतानाही ) याचे एडीला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. किंमत एकदा कळली कि त्याला २७ ने गुणायचे आणि हीच वस्तू भारतात किती स्वस्त मिळते ते एडीला सांगायचे हा मला एक छंदच लागला होता होता. तेथील हॉटेलमध्ये पोटपूजा उरकून आम्ही आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला.अचानक येणारे ढग आणि मध्येच रिमझिम येणारा पाऊस. समुद्रावरून येणारी स्वच्छ शुद्ध मोकळी हवा, ते भारलेले वातावरण आणि एडीचा सहवास मला तर तो दिवस संपूच नये असे वाटत होते. एडीची अखंड बडबड चालू होती मला आताशा तिच्या उच्चाराची सवय झालेली होती. तरीही आमचा बराचसा संवाद हातवारे करूनच होत असे. तिला असलेली माहिती मला देण्याचा ती सतत न कंटाळता प्रयत्न करीत असे. इथे बराच वेळ घालून आम्ही पुढील टप्पा पार केला आणि तेथील वातावरणाचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही . केवळ स्वर्गीय अशा त्या वातावरणाने मला भरून टाकले.जिकडे पहावे तिकडे निळाशार समुद्र पसरलेला, मधेच काही पर्वत हिरव्यागार रंगाने नटलेले. माथ्यावरती सूर्य देव तळपत होता पण आज तो काहीसा निस्तेज भासत होता. पायथ्याजवळ गरम हवा असताना इथे चक्क थंडी वाजत होती . एका क्षणि उन तर दुसर्याच क्षणी रिमझिम पाऊस असा उनपावसाचा खेळ चालू होता. एवढ्या उंचीवरून रस्त्यावरच्या त्या उत्तुंग इमारती खूपच लहान दिसत होत्या आणि दूरवर असलेला तो जगप्रसिद्ध कोपाकाबाना बीच त्याचे वैभव मिरवत दिमाखात खुणावत असल्याचा मला भास झाला. प्रचंड असा हवेचा झोत आणि त्याबरोबर एक काळाकुट्ट असा ढग अचानक प्रगटुन अंधारमय वातावरण तयार झाले आणि तो जसा अकस्मात आला तसा क्षणार्धात निघूनही गेला.खालच्या पर्वतासारखी मुबलक जागा येथे नसल्याने पर्यटकांची फोटो काढण्यासाठी धांदल चालू होती. आपण कुठेतरी स्वर्गात आणि खोल दूरवरून छोटे छोटे ढग वरवर येताना आपल्याबरोबर स्वच्छ आणि शुद्ध मोकळी हवा घेऊन येत आणि त्या स्पर्शाने मला तर आपले अस्तित्व नाहीसे झाल्यासारखे वाटले,. मन आकाशात उंचउंच भरारी घेत होते. मग आम्हीही थोडे फोटोज घेतले आणि पर्वत शिखराच्या उतारावर असलेल्या जंगल वजा बागेमध्ये चक्कर मारली. एवड्या छोट्याशा जागेचा नियोजनबद्ध वापर मला भावून गेला. बांबूची आणि अनेक प्रकारची झाडे मधेच सिमेंटची पायवाट. काही ठिकाणी बसण्याची सोय होती. आम्हीही येथे विसावलो. अशा त्या वातावरणात एडीला अचानक भरून आले . तिला अचानक तिच्या आई-वडिलांची आठवण झाली.ते तिला एकटीला या जगात तेरा वर्षाची असताना देवाघरी निघून गेले. तिला कसेबसे शांत केल्यावर तिने मला त्यानंतर केलेल्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली ती इथेच. हे वातावरण आणि एडीचा जीवनप्रवास ऐकत वेळ कसा भुरकन उडून गेला. एव्हाना पाच वाजले होते मग पाय निघत नसतानाही परत फिरावं लागले पुन्हा एकदा त्या स्वर्गीय वातावरणाचा डोळे मिटून आस्वाद घेतला.खोल श्वास घेऊन ती स्वत्च्छ हवा आणि तेथील वातावरण मनात साठवून घेतले. आणि आम्ही कॉपाकाबाना बीचवर जाण्यासाठी सज्ज झालो. ३-४ कि मी लांब पसरलेला हा बीच. तेथील जगप्रसिद्ध कॉपाकाबाना पैलेस होटल पाहून मला मुंबईच्या ताज हॉटेलची आठवण झाली.येथील व्हीआयपी लोकांच वावर येथे असतो अशी माहिती मला एडीने पुरवली. आणखीही मोठमोठी हॉटेल या शहरात आहेत पण याच महत्व काही वेगळेच . या बीचचे वैशिस्ठ्ता म्हणजे येथील सफेद माती. बीचवरून फिरतफिरत आम्ही चालत असताना एक शेगदाणे विकणार्या माणसाने मला अडवले. एडी थोडीशी मागे असल्याने त्याला वाटले मी एकटाच आहे. त्याने मला एक पुडी देऊ केली. मी ती नाकारली. तरीही तो माझ्या मागेच लागला. मी नकार दिला तरीही त्याने जबरदस्ती ती माझ्या हातात दिली. इतक्यात एडी आली. तिने त्याला समजावले तो काही ऐकेना. प्रश्न ४-५ रीयालचा होता पण मला त्याचा रागच आला होता मी त्याच्यावर जोरात ओरडलो तेंव्हा तो निघून गेला.आम्ही पुढे चालत आलो आणि नारळपाणी पिण्यासाठी थांबलो. आणि अचानक तो मनुष्य परत आला त्याच्याबरोबर आणखी एक मनुष्य होता. त्याने आमच्या टेबलावर जोरात हात आपटला आणि एदिकडे पाहून जोरजोरात भांडू लागला. एडी घाबरली आणि मीही मनातून थोडासा घाबरलो होतो.मी त्याला त्याची पुडी परत केली. त्याने ती सरळ फेकून दिली आणि पैसे मागू लागला.समोरून एक पोलीस येताना मी पहिला होता. आणि तो माणूस हट्टाला पेटला होता. आणि मीही. एडी त्याला पैसे द्यायला लागली ते मी घेतले खिशात ठेवले. आता त्याने माझा हात पकडला. मी जोरात हिसका दिला मागे सरून ती प्लास्टिकची खुर्ची उचलली आणि युद्धाच्या पवित्र्यात उभा राहिलो.मी एडीला त्या पोलिसाला बोलवायला सांगितले. तो आला . एडीने त्याला हकीकत सांगितली.नारलपानिवाल्या दुकानदारानेही आमची चूक नसल्याचे पोलिसाला सांगितले. त्याने त्या लोकांना दम भरला ते निघून गेले.पण मी जो पवित्र घेतला होता त्याबद्दल त्याने एडीला मला समाज द्यायला सांगितली आणि आता इथे थांबू नका ते लोक चांगले नाहीत तेंव्हा इथून निघून जा असे सांगितले.तसेही ६:३० झाले होते आणि मीही मनातून जाम घाबरलो. एडीही घाबरलेली होती तरीही मी तिला धीर देत होतो.बस पकडली आणि हॉटेलवर आलो. एडीने मला पूर्ण रस्ताभर बरीच समज दिली आणि मीही ती ऐकून घेतली कारण माझी चूक मला कळली होती. हॉटेलवर आलो आणि रात्री जेवणही रुममध्ये घेतले. दुसर्या दिवशी सकाळी रिओ सोडले आणि वितोरीयाला सुखरूप परत आलो.हा माझा ब्राझीलमधील एकमेव वाईट अनुभव. अर्थात आम्ही वितोरीया सोडून इतर ठिकाणी कधीच रात्री बाहेर फिरलो नाही. ते केवळ एडीच्या कडक नियमामुळे. तिथे गुन्हेगारी बर्याच मोठ्या प्रमाणावर आहे. आणि drugs घेणारे लोक असल्याने दिवसा ढवळ्या लुटमारही होते. मला तरी नशिबाने अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही. आज इतकेच.चुकभुल माफी असावी.
क्रमश:
हे कही फोटो:-

2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27आज सकाळी एडीने मला थोडे लवकरच उठवले. मला झोप फारच प्रिय असल्याने ती सहसा माझी झोप मोडत नसे.आज नेहमिपेक्षा ती जरा जास्तच खुशीत आणि उत्साहात होती आणि त्याला कारणही तसेच होते आज तिचा वाढदिवस होता.मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.झटपट तयार झालो आणि घराबाहेर पडलो .आज आम्ही व्हिला-व्हेल्हा येथे जाणार आहोत. मी एडीसाठी घेतलेला लाल ड्रेस तिने परिधान केलाय, लाल रंग हा एडीचा सर्वात आवडता रंग आणि माझा सर्वात नावडता. पण तरीही तिला तो खुलून दिसत आहे. विटोरिया ते व्हिला-व्हेल्हा हे बसने १ तासाचे अंतर आहे. आम्ही बस पकडली आणि एडीने मला व्हिला-व्हेल्हा नेव्हल स्कूलमध्ये तिचे वडील शिक्षक होते आणि विल्हा-वेल्हा येथे तिचा जन्म झाला असल्याची माहिती दिली. याच कारणास्तव स्वारी आज भलतीच खुशीत दिसत होती. विटोरिया हे बंदर आहे. समुद्राची जी खाडी आहे त्याच्या एका बाजूला वीटोरिया आणि दुसरया बाजूस विल्हा-वेल्हा. अगदी समोर दिसत असले तरीही पलीकडे जाण्यासाठी एका लांबच लांब अशा three ponte bridge वरून प्रवास करावा लागतो. खाडीच्या बाजूने असणार्या चौपदरी रस्त्याने पुढे आल्यानंतर एक प्रशस्थ असा मॉल आहे त्याला वळसा घालून बस या थ्री पोन्ते पुलावर आली.बराचसा उंच आणि साधारण ४-४.५ कि मी लांब असा हा पूल स्थापत्यशार्स्त्राचा उत्तम असा नमुना आहे. पुलावर आल्याबरोबर समोरच्या किनाऱ्यावर असलेल्या पर्वतावरील चर्च दृष्टी पथास पडते. एडीने आम्ही आज तेथे भेट देणार आहोत असे सांगितले.खाडी पार करून पूल संपला ,थोडेसे पुढे जाऊन बस उजवीकडे वळाली आणि त्यानंतर पुढच्याच थांब्यावर आम्ही उतरलो.खरेतर आम्हाला थोडेसे पुढे उतरायचे होते. येथून आम्ही चालत निघालो आणि एडीने रस्त्यामध्ये मला तिची शाळा , ती पूर्वी जेथे काम करायची ते ऑफिस आणि तिच्या लहानपणीच्या बालसुलभ आठवणी मला ऐकवल्या.मध्येच एडी एका इमारतीसमोर उभी राहिली आणि काहीतरी आठवणीत गढून गेली. क्षणभर मी बरोबर आहे हेही ती विसरली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिचे डोळे भरून आलेले. याच जागेवर त्यांचे घर होते आणि येथेच तिचा जन्म झाला होता. तिला तिच्या आईवडिलांची आठवण झाली होती.आईवडील गेल्यावर या मोठ्या घरात तिला एकटीला रहाण्याची भीती वाटायची आणि मुख्य म्हणजे आईवडिलांची आठवण तिची पाठ सोडत नसे. पुढे सज्ञान झाल्यावर एडीने ते घर विकून टाकले आणि तिने वितोरीयाला घर घेतले. नोकरीही वितोरीयालाच असल्याने तिला ते सोयीचे वाटले. आता त्या जागेवर कसलेतरी न्यायालयीन फोरम आहे. फोटोमध्ये ते दिसेलच. समुद्रकिनारी असलेले ते घर तिने विकले होते त्याचा आज तिला पश्चाताप वाटत होता. समोरील छोट्याशा बीचवर आम्ही थोडा वेळ बसलो.तिच्या बालपणीचे बरेचसे किस्से तिने मला सांगितले. मैत्रिणीची नावे त्यांची घरे आणि त्यांच्याबरोबर घालवलेले बालपण यावर ती भरभरून बोलली. आणि मध्यच ती उठून उभी राहिली. डोळे बंद करून तिने खोल श्वास घेतला.......आणि मला म्हणाली, येथील हवासुद्धा किती शुद्ध आणि वेगळी आहे ना विलासराव? मी होकार दिला पण त्यात काही राम नव्हता ते तिला जाणवले. माझा जन्म येथे झाला आणि बालपणही येथेच गेले म्हणून मला असे वाटत आहे तुला कसा काय बदल जाणवनार.तुझ्या कसल्याच आठवणी येथे नाहीत तू फक्त मला बरे वाटावे म्हणून हो म्हणालास, अशी हि एडी.
1
2
3

आता आम्ही बाजूलाच असलेल्या नेव्हल स्कूलमध्ये निघालो. गेटवर सुरक्षा तपासणी करून आम्हाला आत सोडण्यात आले. भव्य अशा गेटमधून आत गेल्यावर भले मोठे एक पटांगण ओलांडून पुढे आल्यावर प्रशासकीय इमारत होती. एडीने मला तेथील प्रत्येक विभागाची माहिती करून दिली. तिचे वडील बसायचे ते ऑफिस , त्यांचा वर्ग असे सर्व झाल्यावर आम्ही मुख्य इमारतीसमोर ठेवलेले काही यंत्र, जे जहाजावर वापरतात त्यांची माहिती करून घेतली.आणि शेवटी तेथील छोट्या पण सुबक अशा छोट्याशा त्रिकोणी आकाराच्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हजर झालो.माझ्या आयुष्यामध्ये मी चर्चमध्ये गेलो ते ब्राझीलमध्ये आल्यावर.मला चर्चमध्ये नक्की कशी प्रार्थना करायची याची माहिती नव्हती मी फक्त हात जोडून उभा राहिलो. प्राथना आटोपल्यावर एडी तेथील फादर बरोबर काहीतरी बोलली त्यांनी मला पुढे बोलावले आणि आमच्यासाठी छोटीशी प्रार्थना केली.तेथून बाहेर पडल्यावर एडीने मला आमच्यासाठीच केलेली प्रार्थना होती , आणि जीझसची आमच्यावर सतत कृपा राहील असे सांगितले , हे सांगताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. आणि याबद्दल तिच्यामनात आता कुठलीही शंका नव्हती. जगामध्ये एकच देव आहे आणि तो म्हणजे जिझस अशी तिची धारणा आहे. असो.येथून आम्ही त्या पर्वतावर असलेल्या मोठ्या चर्चकडे रवाना झालो. दोन्ही बाजूला उंच उंच झाडे आणि मध्ये दगडी अशी पायवाट. ते गुळगुळीत झालेले दगड तेथे असणार्या वर्दळीची साक्ष देत होते. येथे वरती सोडण्यासाठी बसची सोय होती पण आम्ही पायीच निघालो. अर्ध्या तासाने आम्ही वरती पोहोचलो असू . येथे आम्ही थोडी विश्राती घेतली. कॉफी पिऊन वरील पायऱ्या चढण्यास सुरवात केली.खालून छोटेसे दिसणारे हे चर्च खूपच प्रशस्त होते. उंचावर असल्याने जोरदार हवा आणि तेथून दिसणारा तो खाडीवरचा पुल पलीकडे वितोरिया शहर आणि मागे व्हिला-व्हेल्हा हे शहर. उजवीकडे त्या पुलावरून धावणाऱ्या मोटारी, पलीकडे गगनाला गवसणी घालणार्या उंचउंच इमारती आणि समोर समुद्र आणि त्यावरून निघालेले जहाज नजरेच्या टप्प्यात येत होते. या बीचचे नाव 'प्राया द कोस्टा' असे आहे. हा तिचा सर्वात आवडता बीच. याच बीचवर घर घेण्याच एडीच स्वप्न आहे.येथे आम्ही बरेच फोटो घेतले. खाली आल्यावर जवळच असलेल्या सिमेट्री मध्ये, एडीच्या आईवडिलांची भेट घेतली, तिने मनोमन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना माझी ओळख करून दिली. आणि अचानक तिच्या मनाचा बांध फुटला तिला रडू कोसळले, मला करता येण्यासारखे काहीच नसल्याने मी फक्त तिच्या खांद्यावर थोपटले आणि ती शांत होण्याची वाट पाहत उभा राहिलो.तिचा आवेग ओसरल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला, मीही हात जोडून तुमच्या लेकीची मी सर्व काळजी घेईल असे मनातल्या मनात वचन दिले.
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
बाहेर आल्यावर आम्ही जवळच असलेल्या 'गारोटो' या प्रसिद्ध अशा चोकलेट कंपनीला भेट दिली. तेथे भरपूर खरेदीही केली. येथेच एक टाक्सिवाला माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याशी इंग्रजीमध्ये संवाद सुरु केला. मी इंडिअन आहे हेही त्याने ताडले आणि मी त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या. त्याच्याबरोबर फोटोही काढला. त्याचा ई-मेल घेतला आणि आम्ही प्राया द कॉस्ताला आलो. हा बीच मलाही खूप आवडला. इथे एक बरे आहे समुद्रकिनारी सुट्टीचा दिवस सोडला तर फारशी गर्दी नसते.बीचवरून वाळूतून चालताना आम्हाला दोन सुमो( जाडी माणसे) दिसली. मी एडीला फोटो घ्यायला सांगितले, अशा गोष्टी तिला आवडत नसत तरीही माझ्यासाठी ती त्या करत असे. काही वेळ फिरून आम्ही घरी परत आलो.फ्रेश झालो आणि एडीच्या चार मैत्रिणी पावला, मिर्टेस,केली आणि दिल हजर झाल्या.थोड्याच वेळात जुनिअरही आला. मी त्याला केक आणण्यास सांगितले. केक कापण्याचा मान मला देण्यात आला, मी आणि सर्वांनी एडीला शुभेच्छा दिल्या, आणि आमची पार्टी सुरु झाली.आज ब्राझीलमधील फ्लेमिंगो आणि वास्को या टीमचा फूटबॉलचा अंतिम सामना होता.जुनिओर, केली ,मिर्टेस ,पावला ,दिल हे सगळे फ्लेमिंगो ला सपोर्ट करत होते. फक्त एडीचा सपोर्ट वास्को ला होता. फ्लेमिंगो हि रीओची टीम ब्राझीलमधील सर्वात ख्यातनाम आहे. सर्वांनी मला माझा सपोर्ट कोणाला याची विचारणा केली. मी अर्थातच एडीच्या टीमला पाठींबा दिला. मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे कि घरामध्ये टीव्हीवर सामना बघायचा होता आणि हे सर्व लोक आपापल्या टीमची जर्सी घालून सामना पाहायला बसले.हे लोक जर्सी बरोबर घेऊन आलेले होते. जुनिअर सुद्धा. मला जर्सी नव्हती तरी एडीकडे एक वास्कोची टोपी होती ती मला घालावीच लागली. त्याशिवाय माझा वास्कोला पाठींबा आहे असे हे लोक मानायलाच तयार नव्हते.तुम्हाला कुठल्याही खेळाबद्दल असे वेड असणारे लोक संपूर्ण जगाच्या पाठीवर कोठेच भेटणार नाहीत हे मी खात्रीने सांगू शकतो.सामना सुरु झाला आणि संपलाही,आमची टीम ४-१ अशी हरली. म्हणजे हरणारच होती. फ्लेमिंगोच्या प्रत्येक गोलला हे सर्व लोक जोरात ओरडायचे कुणी पिपाण्या वाजवायचे आणि नाचायचे सुद्धा. आम्ही विरोधक असूनही त्यांच्यात सामील व्हायचो.सामना संपल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवण घेतले आणि एडीच्या सर्व मैत्रीणीना निरोप दिला आणि घरी परत आलो. मला आणि एडीला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण सर्वांनी न विसरता दिले. आणि त्या हे विसरूनही गेल्या. परत कोणीही आम्हाला बोलावले नाही आणि आम्ही कुणाच्या घरी कधीच गेलो नाही.मी माझ्या वास्तव्यात कुणाच्याही घरामध्ये गेलो नाही. एकंदरीत शांत प्रवृत्तीचे हे लोक, मलातरी कधीही बसमध्ये,रस्त्यावर, गर्दीमध्ये कुणी कुणावर ओरडताना.भांडताना किंवा मारामारी करताना दिसले नाहीत(रिओ चा प्रसंग सोडून).एडी नेहमी म्हणते ह्या माझ्या मैत्रिणी नाहीत, फक्त सहकारी आहेत ते मला मनोमन पटले.त्यातल्या त्यात मिर्टेस हि एडीची जवळची सहकारी(एडी कुलीग म्हणते ).माझ्या संपूर्ण वास्तव्यात मला कुणीही साधा चहा/ कॉफी पाजली नाही.असा का एडीच्या सहकार्यांचा पाहुणचार. असो.
क्रमश:
हे काही फोटोज
22
23
24
25
26
27
28
29
30
31

 ब्राझीलला येऊन एक-दीड महिना उलटून गेला. बर्यापैकी फिरून झालेले परंतु खाण्याची खूपच आबाळ होत होती. तसे एडी नवीन-नवीन पदार्थ बनवायची पण ते सगळे त्यांच्या पद्धतीने. मला बऱ्यापैकी तिखट खायची सवय असल्याने माझ्या जिभेची चव गेली होती खरतर आता मी ते मिळमिळीत जेवण जेऊन पूर्ण वैतागलो होतो. नाश्त्याला ब्रेड ,कुकीज,टोस्ट, केक,बिस्कीट असले पदार्थ. जेवणात नुडल्स,फ्राईड राइस,मिरची न वापरून केलेले ते चिकन असले पदार्थ असायचे. वेगवेगळ्या पालेभाज्या त्याही अर्ध-कच्च्या केवळ एवढ्यासाठी मला कधी एकदा भारतात परत जाईल असे झाले होते.सकाळी उठून एडीला बरोबर घेऊन सुपरमार्केट गाठले. कसलेतरी पीठ मिळाले बहुतेक मैदा असावा ते घेतले, साबुदाणा हि सापडला, शेंगदाणे,जाडे हरबरे,लवंग, मिरी, तमालपत्र असे जे मसाल्याचे पदार्थ मिळाले ते घेतले.पण लाल तिखट काही मिळाले नाही. एक लाल तिखट असलेली पुडी मला सापडली पण एडी म्हणाली तो लाल कलर आहे, तरीही खात्री वाटेना म्हणून तेही घेतले. बाकी रवा तूप आणि बरेच काही म्हणजे काही मिळाले नाही.भाज्यांच्या विभागात भेंडी, गवार ,भोपळा ,वांगी, बटाटे,कांदे, कोथिंबीर,आले,लसून अशी खरेदी झाली.हिरव्या मिरच्या काही मिळेनात. दुसर्या एका मॉल मधेही शोधले हिरव्या मिरच्या मिळेनात.तेथे एक छोटीशी मंडई होती तिथे खूप शोधल्यावर हिरव्या मिरच्या सापडल्या. एडीने चिकन, मासे,अंडी घेतले आणि घरी परतलो.होय आज मी स्वतः: काही बनवण्याचा विचार केला होता, पर्यायच नव्हता म्हणाना.एडीने बटाटा, कांदे,टोमातो,भेंडी,आले,कोथिंबीर,मिरच्या,लसून योग्य प्रमाणात कापून घेतले.माझ्या दिग्दर्शनाखाली कामाला सुरवात झाली.कढई मध्ये तेल टाकले ते थोडेशे गरम झाल्यावर त्यात मिरच्या,लसून आणि आले परतून घेतले, जरा वेळाने कांदा घालून चांगला सोनेरी रंग येऊ दिला, मग टोमातो टाकून परतले,ते सर्व एकजीव झाल्यावर त्यात बटाटे टाकून परतले आणि त्यावर झाकण ठेवले.२-३ मिनिटांनी त्यात थोडेसे पाणी टाकले ,चवीप्रमाणे मीठ घातले.मंद आचेवर ठेवले. तोपर्यंत दुसर्या स्टोव्ह वरती भात आणि वालाची उसळ एडीने केली (येथे वरण हा प्रकार नाही).अशाच प्रकारे थोडी भेंडी आणि चिकन बनवले. माझ्यासाठी मिरची वापरून आणि एडीसाठी बिनमिरचीचे.एवढे सगळे झाल्यावर गिट्सचे गुलाबजामून त्यावरील सूचनेप्रमाणे वाचून बनवले ,हे मी बरोबर नेले होते. आता मी गुलाबजामून खाणार मग एडीनेही तिच्यासाठी आपल्याकडे खीर असते तसा काहीसा पदार्थ तयार केला. आमच्यात जणू स्पर्धाच सुरु होती.आता आम्ही चपाती बनवण्याचे काम हाती घेतले. मला भाजी बनवण्याचा थोडातरी पूर्वानुभव होता परंतु चपाती पहिल्यांदाच. एडीला चपाती काय प्रकार आहे तेच माहित नव्हते तरीही चपाती बनवण्याची तिची तयारी होती. पीठ तिनेच मळले त्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागली. एकदाचे जमले आणि नवीनच प्रश्न पुढे आला.ब्राझीलमध्ये कसले आलेय लाटणे. मग तिनेच एक छोटीशी काचेची बाटली शोधून काढली आणि लाटायला सुरवात केली मी भाजण्याचे काम हाती घेतले.पापड तळले आणि शेवटी या सर्वाचा फडशा पाडला. इकडे आल्यापासून आज प्रथमच माझे पोट भरले होते. शेवटी आपले खाणे ते आपलेच. तिने बनवलेल्या मोसंबी आणि सफरचंद ज्युसचा आस्वाद घेऊन आमच्या या खादाडीची सांगता झाली.माझे कुठलेहि पदार्थ एडीने कधीही खाल्ले नाहीत अपवाद फक्त गुलाबजामून आणि पापड. गुलाबजामून तर तिला इतके आवडले कि माझ्या वाट्यालाही येत नसत. असो.खालील फोटो पाहून तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल. अर्थातच 'हसना मना हैं'.
1
2
3
4
5
6
7
8

******************

दुपारी बाहेर पडलो. आणि तडक 'पेद्रो दि सिबोला' हे पार्क गाठले. विटोरीयाच्या विमानतळाजवळ असलेले हे एक सुंदर पार्क आहे.सिबोला= कांदा ,पार्कमध्ये एक मोठासा दगड आहे त्याचा आकार काहीसा कांद्यासारखा दिसतो म्हणून हे नाव देण्यात आलेय. येथील फोटो मध्ये ते तुम्ही पाहू शकता पण जालावर जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला याची प्रचीती येईल. मला फोटोग्राफीचे फारसे ज्ञान नसल्याने मला तसे फोटो काढता आलेले नाहीत. पार्कमध्ये गेल्यावर डाव्या बाजूलाच कोंबड्या ,शेळ्या,माकडे, गाई ,ससे असे अनेक प्राण्यांचे दर्शन झाले जे मला या शहरात कधीही झाले नाही.थोडेसे पुढे लहानसा तलाव आणि त्यामध्ये बदके विहार करत होती. आजूबाजूला गर्द हिरवी झाडे आणि मध्ये स्वच्छ डामरी रस्ता. पुढे आल्यावर एक मोठेसे कारंजे ,येथे बरीच लहान मुले अंगावर उडणार्या तुषारांचा आनंद घेत होती. जवळच विमानतळ असल्याने एखादे विमान डोक्यावरून जाई आणि पुढच्याच क्षणी ते विमानलावर अलगद उतरत विसावत होते.आता जास्त काही लिहित बसत नाही हे पहा काही फोटो.
1
2
3
4
5
6
7
8

******************

नाताळ जवळ आला असल्याने आम्ही काही खरेदीसाठी मॉलमध्ये आलो. एरव्ही विशेष गर्दी नसलेला हा भव्य मॉल तुडूंब गर्दीने गजबजून गेला होता. कुठल्याही दुकानामध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. विविध दुकानामध्ये नानाविध वस्तूंचा खच पडलेला. प्रत्येक दुकानापुढे तेथे असलेल्या सवलत आणि विविध स्कीम्सचे दर झळकत होते.लोकांचा तो उत्साह आणि भरभरून खरेदी पाहून मी अचंबित होऊन गेलो. मॉलच्या मध्यभागी तर दुमजली देखावा उभारण्यात आला होता. सांताक्लौज लहान मुलांना खेळणी आणि चोकोलेत वाटत असल्याने तेथे लहान मुलांचा गराडा पडलेला दिसला. वेगवेगळे हलते पुतळे वापरून केलेला तो देखावा अप्रतिम असाच होता.फोटो पाहून तुम्हालाही त्याचा अंदाज येईल.तिकडेही रीण काढून सण करण्याची पद्धत आहे हि नवीनच माहिती मला एडीने पुरवली.एडीने तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही कपडे ,काही मिठाई खरेदी केली.रस्त्याच्या बाजूची झाडे रंगीबेरंगी दीपमाळा वापरून कलात्मक रीत्या सजवण्यात आलेली होती.आम्ही ज्या पार्कमध्ये शतपावली करायचो तेही रोषनाईने उजळून निघाले होते. एकंदरीत पूर्ण ब्राझील नाताळ साजरा करण्यासाठी सज्ज झालेले होते.
1
2
3
4
5
6
7
8
9
10

************

आमची ओळख झाल्यावर एडीने इंग्रजीची शिकवणी लावली होती.दर सोमवारी सायंकाळी ती ७-९ अशी वेळ असे. तेथील शिक्षक पाचेको आणि विद्यार्थी मोनिका,वाल्डीनिया,डोमिनिक, जायरो आणि गुस्ताव या सर्वाना मला पाहण्याची इच्छा होती. मला त्यांच्या वर्गात बसण्याची विशेष परवानगी देण्यात आली.विस्डम क्लासेस च्या एका वर्गात फक्त ६ विद्यार्थी आणि आता मी सातवा. आम्ही क्लास मध्ये आल्यावर एडीने माझी ओळख करून दिली.क्लास सुरु झाला.हे सर्व जन नोकरी करणारे होते. जायरो तर सोफ्तवेयर इंजीनियर पण त्याला सोप्या शब्दांचे साधे स्पेलिंग सांगता येत नव्हते.आज क्लास ८:३० ला संपवण्यात आला आणि आता मला भारताबद्दल प्रश्न विचारण्यात आले. वाल्डीनिया हिने तर तिथे एवढे साप आहेत आणि तुम्ही लोक त्यांच्या सानिध्यात कसे राहू शकता असा अजब सवाल केला.त्यांना भारताचे नाव सोडून काहीही माहिती नव्हती.माहिती नसली तर चालेल पण बरेच गैरसमजही होते. मोनिकाने तर एडीला एक वीदिओ पाठवला होता त्यात एक हकीम फुटपाथला एका स्त्रीचा दात काढतो आहे अगदी साधी पक्कड वापरून. येथील उच्च शिक्षणही पोर्तुगीज मध्ये असल्याने डॉक्टर,इंजीनियरलाही इंग्रजी बोलता येत नाही.बोलणे तर दूर समजत सुद्धा नाही.मग मी त्यांना भारतात जवळपास ३५० बोली भाषा वापरल्या जातात असे सांगितले.वेगवेळ्या जातीधर्माचे लोक एकत्र आनदाने राहतात अशी काही प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या आजच्या अभ्यासात NEWS हा शब्द होता.त्याची फोड करून N=NORTH,E=EAST,W=WEST,S=SOUTH असा हा शब्द तयार झाल्याचे सांगितले. मी कुठेतरी वाचले होते खरे-खोटे मला माहित नाही पण ठोकून दिले.या माझ्या अगाध ज्ञानावर तर पाचेकोही चकित झाला.मला त्यांनी त्यांची सर्वांची नावे मराठीत फळ्यावर लिहायला सांगितली.असेच पुढे २-३ वेळा मी तेथे अर्ध्या तासाचे लेक्चर घेतले.आणि शाळेतील शिक्षकदिना नंतर सरळ दुसरे व्याख्यान ब्राझीलमध्ये दिले.
1

*****************

येथून आम्ही कम्बुरी बीचवर पोहोचलो.येथे संध्याकाळी खाद्यजत्रा भरते.चायनीज,केक ,पेस्ट्रीज,आईस्क्रीम,ज्यूस आणि तिकडील निरनिराळे खाद्यपदार्थ यांची छोटी-छोटी टपरीवजा स्टोल्स आणि दुसरया बाजूस भेटवस्तू , कागदी फुले ,गृह सजावटीसाठी लागणाऱ्या लहानसहान वस्तू आणि स्रियांसाठी चाफ,आणि दैनंदिन वापरासाठी लागणार्या वस्तूंची आकर्षक मांडणी केलेली दुकाने.लहान मुलांसाठी विविध खेळ. येथे मला दोन मुले अंगाला चांदीचा रंग लावून उभी असलेली पाहायला मिळाली. एकाने परीचा अवतार धारण केला होता. तो हात जोडून शांतपणे उभा होता.दुसरा थोडासा रोबोसारखी हालचाल करून लोकांची ,विषेत: लहान मुलांची करमणूक करत होता.एखादे लहान मुल त्याला पैसे द्यायला जवळ आले कि तो खाली वाकून त्याच्याकडील पैसे घ्यायचा त्याचवेळेला त्याने अंगावर बसवलेल्या मशीनमधून विचित्र असा आवाज यायचा आणि ते लहान मुल भांबावून जायचे. जरा मोठी मुले आल्यावर तो पैसे घेताना पटकन कोठूनतरी छोटेसे कार्ड काढायचा त्यामध्ये भविष्य लीहिलेले असायचे.पैसे कमावण्याचा त्यांचा अनोखा मार्ग मला आवडला.पुढे चायनीज याकुसोबा खाऊन आम्ही फिरत असताना मला गांधीजी परत एकदा भेटले.मी तर त्यांच्याबरोबर फोटोही काढून घेतला. पुढे एका दुकानात कुत्र्यांसाठी कपडे होते ,तेथेही बरीच गर्दी होती. आणखी पुढे तर मला एक अगरबत्तीवाला दिसला त्याच्याकडे सर्व भारतीय अगरबत्ती होत्या. सत्यसाई यांच्या फोटोसहित.पुढे बरेचदा आम्ही त्या माणसाला भेटत असू.
क्रमशः
1
2
3
4
5
6
7

 

आजचा हा भटकंती वरचा शेवटचा लेख. असा तर आणखी खूप ठिकाणी फिरलो पण थोडीशी आपल्यालाही काही ठिकाणची ओळख व्हावी म्हणून इतका प्रपंच केला. आज या २-३ ठिकाणची भ्रमंती केलेला अनुभव लिहितो आहे .जे काही लेखन मि केले आहे तो माझा अनुभव आहे १००% खरा. मी कधीकाळी ब्राझीलला जाईल असे मला कधीच वाटले नव्हते आणि मी कधी एखादी लेखमाला लिहू शकेल असे तर मला स्वप्नातही वाटले नव्हते. खरेतर माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही. एवढे दिवस आपण हे कॉमेंट्री सारखे असलेले लिखाण सहन केलेत तसे आणखी एक भाग सहन करा. मग मी येथे परत फक्त वाचक बनून राहील. मला वाचनाचा हव्यास आहे लिखाणाचा तर अजिबातच नाही.माझा हा लेख (किंवा लेखमाला म्हणू हवे तर) पहिला आणि शेवटचा/ची आहे असे मी आजच जाहीर करतो. कुणाला आवडले असेल कुणाला नसेलही. सर्वांचे आभार मानतो. चूकभूल माफी असावी. धन्यवाद.

***************************

इथे आल्यापासून पहिल्यांदाच सकाळी पाच वाजता उठावं लागलं, कारण मला येथील रेल्वे बघण्याची फार इच्छा होती. मला वाटले प्लाटफार्मवर जाऊन रेल्वे बघावी.चार दोनदा क्लिक करावं आणि चालू पडावं. पण ते शक्य नाही असे एडीने मला सांगितले.कारण इथे विनातिकीट प्लाटफार्मवर जाता येत नाही. मग आम्ही रेल्वेचे तिकीट आरक्षित केले. कोलेटिना येथे जाण्यासाठी.इथे रेल्वेचे जास्त जाळे नाही.सकाळी ७ वाजता एक विटोरिया-बेला होरीझोन्ते अशी एकच पेसेंजर रेल्वे जाते.परत कुठलीही रेल्वे नाही,फक्त संध्याकाळी बेलाहोरीझोन्ते इथून सकाळी ७ वाजता सुटलेली रेल्वे विटोरियाला पोहोचते.
त्यामुळे पर्याय नव्हता. सकाळी आवरून ६ वाजता बस थांब्यावर आलो तर बाजूच्या टपरीवजा हॉटेलमध्ये बरीच गर्दी दिसली. कुठलीशी फुटबाल टीम होती आणि जवळपास २५-३० तरुण असावेत.विशेष म्हणजे ते सकाळी ६ वाजता बियर पीत नाचत होते. त्यापेक्षाही मी जास्त चकित झालो ते या गोष्टीने कि ते ज्या गाण्यावर नाचत होते ते होते "नगाडा, नगाडा,नगाडा बजा" असे कुठल्याशा हिंदी सिनेमाचे गाणे. मला त्या मालकाबरोबर बोलण्याची इच्छा झाली होती पण एडी नको म्हणाली आणि आम्ही बस पकडून रेल्वे स्टेशनला आलो. जरासा वेळ होता काही फोटो घेतले आणि रेल्वेत जाऊन बसलो. येथे सोडवायला येणार्या लोकांनाही आतमध्ये सोडत नव्हते.शिवाय प्रत्येकाला आपले ओळखपत्र दाखवणे गेजेचे होते.मी पारपत्र दाखवले होते.२*२ अशी आसने होती, मध्ये बरीच जागा होती. प्रत्येक डब्यामध्ये टीव्ही, फिल्टरचे थंड पाणी अशा सुखसोयी होत्या. आसने आरामशीर होती अगदी पाठीमागे घेतले तर झोपण्यासाठी खूपच आरामदायी.मला आपल्या दख्खनच्या राणीची आठवण झाली जिने मी नेहमी प्रवास करतो.थोड्याच वेळात गाडी सुरु झाली आणि एक माणूस आला, तो प्रत्येक सीटला एक प्लास्टिकची पिशवी अडकवून निघून गेला. कोणी काहीही खाल्ले तर कचरा त्यामध्ये टाकायचा.मला हि पद्दत आवडली. मी कुणालाही कचरा खिडकीबाहेर टाकताना पहिले नाही. मी खिडकीत बसून बाहेरचा प्रदेश न्याहाळत होतो आणि काहीबाही फोटो टिपत होतो.थोड्या वेळाने एक माणूस ट्रोली घेऊन आला, आम्ही केक आणि कॉफी घेतली. फेरीवाला वगैरे हा प्रकार इथे दिसत नाही. कोलेतीनाला उतरलो आणि लगेच शहरात जाणारी बस मिळाली . बस खचाखच भरली होती कारण यानंतर ३० मिनिटे दुसरी बस नव्हती. रेल्वे स्टेशन पासून शहर लांब असल्याने सर्वांनाच बसने प्रवास करायचा होता. २० मिनिटातच शहरात आलो. एदिलाही इथले काहीही माहित नसल्याने थोडी विचारपूस केली. हे एक तालुकावजा गाव असल्याने विशेष काही पाहण्यासारखे नव्हते. एक मोठी नदी गावामधून वहात असल्याने गाव दोन भागात विभागले गेलेले होते. नदीवरील पुलावरून उगाचच पलीकडे गेलो. बराच पाऊस झाला असल्याने नदी दुथडी भरून वाहत होती.नदीचे नाव 'स्वीट रिव्हर' असे होते पण आता या क्षणालातरी तिचे पाणी एकदम गढूळ दिसत होते. पलीकडे असाच गावामधून फेरफटका मारला. आणि एका छोट्याशा दुकानात प्रवेश केला.दुकानाची मालकीण रोझीने इंग्रजीमध्ये बोलायला सुरवात केली. मी मोठमोठ्या शहरात फिरलो पण या रोझीएवढे अस्खलित इंग्रजी बोलणारे मला तरी कोणी भेटले नाही. तिने माझी विचारपूस केली , लगेच एडीला आणि मला शुभेच्छाही दिल्या. आणि एक-दोन घ्यायचे तिथे चांगले पाच टौप गळ्यात घातले.तिला असे वाटत होते मी बळीचा बकरा आहे आणि हे सर्व पैसे मी देणार आहे. तसे तिने बोलूनही दाखवले.एडीची हि खासियत, नवीन कपडे खरेदी हि तिची सर्वात आवडती गोष्ट. मग मी रोझीला त्या शहरात काही पाहायला आहे का विचारले. तर तिने येथे तसे विशेष काही नाही पण येथील मुली पाहण्यासारख्या आहेत ( सुंदर आहेत) असे सांगून माझी मस्करी केली. आणि बोनस म्हणून इथे एक चांगले हॉटेल आहे तिथे जेवण खूप अप्रतिम मिळते अशी माहिती दिली. तसही लंच घेतले नसल्याने आम्ही ते हॉटेल गाठले. मि आपली नेहमीचे भात आणि वालाची उसळ,बटाटा फ्राय,सलाड घेतले. इतके चवदार जेवण मला यापूर्वी आणि नंतरही कुठल्याही हॉटेलमध्ये मिळाले नाही.सहसा एकदा वाढून घेतल्यावर परत काहीही न घेणारया एडीने आज तीनदा वेगवेगळे पदार्थ घेतले.तिने मलाही त्याचा आग्रह केला.मी चवही घेतली पण नेहमीप्रमाणे मला ते बेचव वाटले.पण तिने परत एकदा कॉलेतीनाला फक्त या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी येऊ असे मला सांगितले. एडीला खाण्याची इतकी आवड आहे कि ती मी फक्त खाण्यासाठी जगते (जगण्यासाठी खात नाही) असे बिनदिक्कत सांगते. बाहेर आल्यावर असेच तासभर हे दुकान ते दुकान असे भटकत राहिलो, बस पकडली आणि वितोरीयाला परत आलो.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
**********************

विटोरियाचे वातावरण जवळपास मुंबईसारखे आहे. दमट हवामान असल्याने फार फिरल्यावर दमायला होत असे. त्यात अधेमधे अचानक पाउस येतो आणि त्यानंतर परत गर्मी चालू तर कधी थंडी असे लहरी हवामान . इथेहि जोराच्या पावसानंतर शहरामध्ये रस्ते पाण्याने भरून वाहतात, घरामध्ये पाणी घुसते असले प्रकार होतात. विशेषत: साओ आणि रिओ ला. एकदा तर एक मोठो पूलच अर्धा वाहून गेल्याचे मी टीव्ही वर पहिले. या समस्या सार्वत्रिक असाव्यात असे मला वाटते. मला मुंबईच्या गरम हवामानाची सवय असल्याने मला इथे कुठलाही त्रास झाला नाही, या ७० दिवसात मी कधीही आजारी पडलो नाही, पण माझे वजन ३-४ किलोने कमी झाले होते ते जेवण आवडत नसल्याने. घरी मी बनवायला सुरवात केली होती पण आम्ही बर्याचदा कुठे-कुठे भटकत असू त्यामुळे हि समस्या कायम होती.मला एखाद्या हिलस्टेशनला भेट देण्याची इच्छा होती म्हणून एडीने सांता तेरेसाची दोन तिकिटे आरक्षित केली. बसने चार तास लागणार होते. मी नेहमीच खिडकीजवळ बसत असे आणि एडीने याबद्दल कधीही तक्रार केली नाही. बसने शहराला मागे टाकले , हायवे रिकामाच होता बस वेगाने पुढे सरकत होती. मी बाजूच्या निसर्गाचे निरीक्षन करत होतो. बहुतेक घरे हि शेतात एकटी-दुकटी दिसत होती. रस्त्याच्या कडेला छोटे मोठे लाकडी गेट आणि पुढे घरापर्यंत लाल मातीतून वळणावळणाने जाणारा रस्ता. आजूबाजूला झाडाची गर्दी असलेली ती बंगलीवजा घरे, बहुतेक घरासमोर चारचाकी वाहने, त्यापुढचे हिरवे शेत , आणि संपुर्ण शेताला तारेचे कम्पाउन्ड. मलातरी हायवेवर एखादे जनावर आलेय असे दृश्य कधीही पहायला मिळाले नाही.आता बसने हायवे सोडला आणि डावीकडे वळण घेतले, थोडे पुढे येऊन एक छोटेसे गाव लागले तिथे बस थांबली, बहुतेक लोकांनी चहापाणी घेतले आम्हीही कॉफी घेतली आणि बस पुढे मार्गस्थ झाली.आता एक वळण घेऊन बस कच्च्या रस्त्याने पुढे जात होती. या भागात बराच पाउस झालेला असल्याने बाजूला पाणी साठलेले दिसत होते. संपूर्ण अशा कच्च्या घाटरस्त्याने बस अतिशय हळूहळू जात होती. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसरीकडे खोल दरी, पाउस जरी पडून गेला तरी आता थोडेसे उन पडले होते. काही ठिकाणी समोरून अचानक दुसरे वाहन येई आणि रस्ता अरुंद असल्याने चालकाला बरीच कसरत करावी लागत असे. रहदारी फार म्हणजे फारच कमी होती. आजूबाजूच्या घरामधील लोकांची कामाची लगबग सुरु होती. या रस्त्यावर प्रथमच मी कॉफीची झाडे पहिली. आणि लोकांना शेतात काम करताना पाहिले. काही ठिकाणी गुरे चरताना दिसत होती पण त्यामागे कुठेही मला गुराखी दिसला नाही. आताशा घाटरस्ता पार करून बस एका चांगल्या रस्त्याला लागली. आता हवेतील गारवा चांगलाच जाणवत होता आणि थोड्याच वेळाने आम्ही नियोजित ठिकाणी उतरलो. या गावामध्ये बहुतेक बैठीघरे होती,मधेच एखाददुसरे दुमजली घर दिसे.छोटी छोटी बैठी आणि टुमदार घरे आकर्षक रीतीने बांधलेली होती. आम्ही चालतच गावातून फेरफटका मारला, दुपार झाली असल्याने जेवण उरकून घेतले आणि गावाच्या थोड्याशा बाहेर असलेल्या बागेमध्ये आलो. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढी आकर्षक आणि मोठी बाग बघून मला नवल वाटले.बागेच्या दोन्ही बाजूला बागेपेक्षाही सुंदर असे बंगले होते. एकसारखा दुसरा दिसत नव्हता. चौकशी करता असे समजले कि येथे बरेच जर्मन वंशाचे लोक राहतात .खूप पूर्वीपासून इथे ते लोक स्थाईक झाले आहेत आणि गावात त्यांची संख्या ८० % होती. इथेच एक बायोलोजीकाल पार्क असल्याचे समजले. २ किमीवर असले तरी आम्ही चालतच निघालो. आजुबाजुला उंच उंच डोंगररांगा, दुपार असूनही कोवळे भासणारे ऊन, सर्व परिसरावर धुक्याची छाया पसरलेली. हवा तर इतकी मोकळी आणि शुद्ध कि थकवा असा वाटतच नव्हता आणि अंगात उत्साह भरून राहिला होता. या भागात काही बरीच दुमजली घरे आणि काहीसं शहरी वातावरण जाणवत होते. पार्कमध्ये प्रवेश केला आणि पार्क कसले ते पूर्णतः जंगलच होते. आम्ही थोडेसे पुढे गेलो आणि मला एक गोष्ट खटकली ती तिथे त्यावेळेला तरी आम्ही सोडून मला कोणी दिसले नाही.मला थोडीशी भीती वाटली . मागे येऊन ऑफिसमध्ये चौकशी केली तेव्हा भीतीचे काहीही कारण नाही असे समजले आणि निश्चिंत होऊन मग आम्ही सर्व पार्क पालथे घातले. इथे रंगीबेरंगी पोपट, एक वेगळ्याच जातीचे खुपच लहान असे माकड पाहायला मिळाले. बरेचसे कासवही होते त्यातले एक कासव उलटे पडले होते,त्याची सरळ होण्याची धडपड चालू होती आणि त्याला काहीही आधार नसल्याने सरळ होताही आले नसते.एडीने मला त्याला सरळ करण्यास सांगितले मला त्याला हात लावायची किळस वाटली.तेथे पिंजरा नसल्याने एडी आतमध्ये गेली,तिने त्याला सरळ तर केलेच , त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याच्याशी गप्पा मारत बसली.मलाही आत बोलवले पण मी नकार दिला. मला कासव हा प्राणी बिलकुलच आवडत नाही तिथे हि एडी त्यांच्यात जाऊन बसली होती. १५-२० मिनिटांनी त्याच्याशी गप्पा मारून झाल्यावर ती बाहेर आली. मग मला तिने पूर्वी घरात एक कासव पाळले होते, त्याच्या सवयी, खाणेपिणे, ते मेल्यावर ती किती रडली आणि कशी दुख्खी झाली होती ते सांगितले.प्राण्यावर तिचे मनापासून प्रेम आहे,पण तरीही ती फक्त झुरळाला घाबरते. माझ्या चायनीज चाटींग मैत्रिणींचा तर ती कॉक्रोच असाच उल्लेख करते. इथेच मी हमिंग बर्ड पहिले. हमिंग बर्ड या छोट्याशा पक्षावर येथील एका शास्त्रज्ञाने बरेचसे संशोधन केलेले होते आणि त्यानेच हे पार्क उभारले होते. येथे बरेचसे लोक या हमिंग बर्ड चा अभ्यास करण्यासाठी येतात असे समजले. तो शास्त्रज्ञ ज्या घरामध्ये येथे राहत असे तेथे पाण्याच्या बाटल्या टांगून ठेवलेल्या होत्या आणि बाटलीच्या तळाशी छोटासा पाईप आणि त्याला एक सूक्ष्म छिद्र होते. ते हमिंग बर्ड बरोबर त्या छिद्राला चोच लावून पाणी पीत. ते उडत असताना आवाज होतो. त्यांच्या पंखांची खूपच जोरात हालचाल झाल्याने हा आवाज येतो त्यामुळे त्यांना हमिंग बर्ड म्हणतात.चिमणी सारखा दिसणारा पण आकाराने चिमणीपेक्षा खूपच लहान असे हे बरेच हमिंग बर्ड, त्यांचा होणारा तो लयबद्ध आवाज आणि त्यांची होणारया विलक्षण चपळ हालचाली यांचे निरीखन करत बराच वेळ गेला. माझ्याकडे याचे वीडीओ आहेत. १८ ते २० एमबी असल्याने ते येथे टाकता येणार नाहीत . नंतर तेथे काही प्राणी जतन केलेला एक विभाग आहे तेथे गेलो. फोटो टाकले आहेत. बाहेर पडलो कॉफी घेतली आणि रस्त्याने जाताना एक सुंदर,छोटासा , साधासा बंगला मला आवडला त्याचा फोटो घ्यायचा विचार होता पण तिथे दोन सुंदर मुली बसलेल्या होत्या. मी फोटो काढावा तर त्याना शंका घ्यायला जागा होती. म्हणून एडीला सांगितले.तिने त्यांना तसे विचारले तर त्या आतमध्ये निघून गेल्या. मग मी फोटो घेतला. मला जर राहण्यासाठी ब्राझीलमधील कुठले एकच ठिकाण निवडायचे असेत तर ते असेल सांता तेरेसा. बस थांब्यावर परत आलो. बसला अवकाश होता म्हणून समोरच्या आईसक्रीमच्या दुकानात गेलो. खूप विविध प्रकार होते. एडीने मला विचारले मी आपले जे रंग बरे वाटले ते चार-पाच गोळे घेतले. एडीने तर ८-१० घेतले. मला तर त्यातला एकही प्रकार आवडला नाही. फारच वेगळी चव त्यामुळे मी ते तसेच सोडून दिले.फारशी गर्दी नसल्याने आम्ही तेथेच बसून वेळ घालवला. बस आली आणि परतताना वेगळ्याच मार्गाने आम्ही विटोरियाला परतलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते.
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24

********************

आज आमचा 'गुआरापारी' या नामचीन बीचवर जाण्याचा बेत ठरला होता. आमची ओळख झाल्यापासून खूप वेळा मी हे नाव एडीकडून ऐकले होते. तसे तर या परिसरात बीचला तोटा नाही पण या बीचवर एडीची विशेष मर्जी होती. मलाही उत्सुकता होतीच मग काय सकाळीच निघालो.जुनिअरलाही बरोबर घेतले आणि बस पकडली. तो असला कि आम्ही बीचवरच्या वाळूमध्ये फुटबॉल खेळायचो. तासंतास आम्ही पाण्यामध्ये डुंबत असायचो. मला समजत नसले तरी तो माझ्याशी गप्पा मारायचा असा हा जुनिअर माझा मित्र झाला होता. तीनेक तासाचा हा रस्ता ,शेवटपर्यंत हायवेचा प्रवास, पोटातील पाणीसुद्धा हलत नव्हते इतका आरामदायी प्रवास करून आम्ही गुआरापारीला पोहोचलो. हे बर्यापैकी मोठे शहर होते, मोठमोठे मॉल नजरेत भरत होते आणि बरेच पर्यटकही रस्यावर भटकताना दिसत होते. विशेष म्हणजे बस आगारापासून हा बीच ६-७ मिनिटाच्या अंतरावर आहे. सुरवातीलाच एक मोठेसे हॉटेल लागले, ते ओलांडून पुढे गेल्यावर लांबच लांब,वक्राकार फारच सुंदर बीच नजरेत भरतो. इथे खुप हॉटेल्स आहेत आणि हा पर्यटकांचा खूपच फेवरेट असा बीच आहे. डावीकडे संपूर्ण उंचउंच इमारती, उजवीकडे मोठासा फुटपाथ त्यावर ठराविक अंतरावर असलेली झाडे,रुपेरी वाळू आणि २-३ किमी पसरलेला हा बीच आणि क्षिताजापर्यंत पसरलेला समुद्र. पोटपूजा उरकून सरळ समुद्रातच उतरलो. मधेच बाहेर येऊन फुटबाल खेळायचा आणि काही वेळाने परत पाण्यात. सात वाजता परत निघालो. आता काही फोटो:-
क्रमशः
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12

 मला परत निघायला आता आठ दिवस बाकी राहिले होते. बरीच भटकंती झालेली होती आणि एवढे दिवस अखंड बडबड करणारी एडी काहीशी अबोल राहू लागली, आपल्याच विचारात हरवल्यासारखी. मी कारण विचारले तर ती 'काही नाही' असेच उत्तर देई .माझीही अवस्था काही वेगळी नव्हती.दोन तीन दिवस राहिल्यावर तर तिची झोपच उडाली होती. खाण्या पिण्यात लक्ष नव्हते. शेवटी निघायचा दिवस उजाडला, दुपारी चारची बस होती. मी माझे सामान भरेपर्यंत एडी मार्केटला जाऊन आली. तिने माझी आई, बहिण , माझे जवळचे मित्र, मुंबईत माझ्या शेजारी राहणारा छोटा समीर, आदेश असे सर्वांसाठी कॉफी ,गिफ्ट आणि चोकलेट आणले होते. घरी आल्यावर आपल्या हाताने तिने वेगवेगळ्या कागदी पिशव्या भरून त्यावर ज्याचे गिफ्ट आहे त्याचे नाव लिहिले. आदेशसाठी तर टि-शर्ट, सेंट अशी विशेष भेट आणली होती. माझ्यासाठी व्हाईट रम जी मला विशेष आवडत असे .३:३० वाजता घर सोडले, अबुल ला पेटहाउस मध्ये सोडले. एरवी आम्ही बाहेर निघाल्यावर दंगा करणारा अबुल आज शांत होता.एडी मला नेहमी सांगायची ती जास्त दिवस बाहेर जाणार आहे हे अबुलला बरोबर समजते. आज खरोखर त्याने जराही हट्ट केला नाही. फक्त एकदम केविलवाण्या नजरेने तो एडीकडे पहात राहिला. त्याला बाय करून बस आगारात आलो. परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. मी आपला उगाच खिडकीच्या बाहेर बघत राहिलो, विटोरिया मागे जाईपर्यंत. मी परत कधी येथे येईल कि नाही असा विचार माझ्या मनात आला. कदाचित हो...... कदाचित नाहीही......... एडी काहीही बोलत नव्हती मी काही विचारले तर हो किंवा नाही असे उत्तर येई. अकरा वाजता बस थांबली, मी जेवण केले एडीने फक्त केक आणि कॉफी घेतली तीही माझ्या आग्रहाखातर. सकाळी १० वाजता साओ ला पोहोचलो. ट्राफिक लागल्याने बराच उशीर झाला होता. मी तरी जमेल तशी झोप काढली पण एडी रात्रभर झोपली नाही ( तशीही तिला प्रवासात झोप येत नाही ). माझे विमान सायंकाळी ६ चे होते त्यामुळे बराच वेळ होता. आदेशला फोन केला आणि मी साओला पोहोचल्याचे सांगून वेळेत मुंबई विमानतळावर येण्यास सांगितले. फ्रेश झालो आणि असेच गप्पा मारत बसलो. आतापर्यंत शांत असलेली एडी आता मला सूचना देत होती. आम्ही पुढे कसं आणि काय करायचं यावर बराच खल केला. आणाभाका घेतल्या आणि एका तासामध्ये विमानतळावर पोहोचलो तेव्हा १ वाजला होता. कॉफी घेतली, विमान वेळेवर आहे याची खात्री करून घेतली. बस आगारातून येताना एकदा बस बदलावी लागली होती. एडीला बस आगारातून ४ वाजताची बस होती. मी माझ्याकडे १०० डॉलर वेगळे ठेवलेले होते. त्यातले ५० डॉलर बदलून मी रियाल घेतले ,काहीतरी ७२-७३ रियाल मिळाले. त्यातले ३० रियाल चे मी एडीला विमान तळावरून बस आगाराला जाणाऱ्या स्पेशल बसचे तिकीट काढून दिले, बहुतेक टूरिस्ट हि सेवा घेतात.एक ठिकाणी बस बदलून ९ रियाल मध्ये आम्ही आलो होतो. पण मला एडीची काळजी वाटत होती आणि हि बस विनाथांबा असल्याने लवकरही पोहोचणार होती. २ रियालची नोट मी आदेशला दाखवण्यासाठी म्हणून जवळ ठेवली आणि बाकीचे रियाल मी तिला खाऊसाठी देऊन टाकले. एडी आता परत शांत होती. आम्ही पुन्हा-पुन्हा एकमेकांना सूचना देत राहिलो.एडीची बस आली, १० मिनिटे वेळ होता आता मात्र ती काहीही न बोलता माझ्याकडे पहात राहिली.तिचे डोळे भरून आले होते माझे हात हातात घेऊन ती फक्त मुसमुसत होती. बसमधील मुलाने आवाज दिला एडीने मला घट्ट मिठी मारली, मला किस करून ती बसमध्ये जाऊन बसली. मी खिडकीबाहेर उभा होतो , तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते मी तिचे डोळे पुसले, तिने माझ्या हाताचे चुंबन घेतले. बस निघाली मी तिला काळजी घे, मला तुझी गरज आहे असे निक्षून सांगितले, बस दिसेनाशी होईपर्यंत हात हलवून आम्ही एकमेकांना निरोप देत राहिलो. बस निघाली आणि एवढ्या वेळ अनावर होत असूनही रोखून धरलेल्या अश्रूंना मी वाट करुन दिली. सुन्न मनाने मी तेथे बराच वेळ बसून राहिलो. दुसर्यांना रडताना पाहून टर उडवणारा मी आज स्वत:ला रोखू शकलो नाही.त्याही अवस्थेत मी स्वतः:वरच हसलो. नेहमी मी कसा कठोर आहे, कुठल्याही प्रसंगी मला कसे रडायला येत नाही अशा फुशारक्या मारणारा , आणि रडले म्हणजेच दुख: व्यक्त होते का? असे प्रश्न विचारणारा मी आज स्वत:ला रोखू शकलो नाही हे कबूल करावेच लागेल. तिच्याच विचारात बराच वेळ बसून राहिलो, फ्रेश होऊन ज्या टेबलवर आम्ही पहिली कॉफी घेतली होती तेथेच कॉफी घेतली. तीन वाजता समान जमा केले, आणि दहाच मिनिटात मी जेथून विमान सुटणार तेथे पोहोचलो. येथे मला कुठलाही त्रास झाला नाही.विमान वेळेवर उडाले, न पिण्याचे ठरवूनही पुन्हा बियर प्यायलो पण आता ते औषध म्हणून (दुख: विसरण्यासाठी). सकाळी PARIS ला उतरलो तर हि थंडी. माझ्याकडे स्वेटर नव्हते मला तर हूडहुडी भरल्यासारखे झाले होते. विमानतळात प्रवेश केल्यावर बरे वाटले. इथे काही नुतनीकरण होत असल्याने मला बस पकडून दुसरया टरमीनल ला जावे लागले .काही वेळेला तर काही भागात मी एकटाच असायचो ,विचारायलाही कोणी नसायचे. जागोजागी फलक असल्याने अडचण आली नाही. विमानाला दोन तास अवकाश होता. मी तेथील दुकानामध्ये फेरफटका मारला.५० डॉलर चे ३१ युरो, कमिशन जाऊन २७ हातात आले . तेथील मुलीला मी २५ युरो मध्ये दोन व्हिस्कीच्या बाटल्या येतील का असे विचारले. ती नाही म्हणाली. मग तिनेच एक रेड लेबल व्हिस्कीची एक आणि एक ब्रान्डी येईल असे सांगितले.मी ते घेतले काही पर्याय नव्हता. त्या मुलीने त्यातूनही काही सेंट परत दिले. माझ्याकडे २ युरो आणि हे सेंट उरले होते. मी तिला परत एवढ्या पैशामध्ये काही मिळेल का असे विचारले तिने हसत-हसत नकार दिला. बाहेर खूप धुके होते. आम्हाला येथून बसमधून विमानाजवळ नेण्यात आले. काहीतरी अडचण असल्याने विमान आतमध्ये उभे करण्यात आलेले होते. बरेचसे प्रवासी मराठी बोलत होते पण मी कुणाशीही बोललो नाही. शिडीने विमानात चढलो.फारसे प्रवासी नव्हते. माझ्यासेजारी तर कोणी नव्हतेच . तसाच आडवा झालो . मला जाग आली तेव्हा मला दरदरून घाम आलेला होता आणि मला उलटी होईल असे वाटत होते. उठायचा प्रयत्न केला तर तेही जमेना. माझा तोल जात होता. मी तसाच बसून राहिलो. थोड्या वेळाने जरा बरे वाटले मग तोंड धुवून आलो. मला खूप थकवा जाणवत होता. या प्रवासात मी फक्त ज्यूस घेतला आणि रात्री १ वाजता मुंबई विमानतळाबाहेर आलो तेव्हा माझ्या खिशात फक्त ब्राझिलचे दोन रियाल, फ्रान्सचे दोन युरो आणि दोन्हीकडचे काही सेंट होते . आदेश बरोबर माझे पाच मित्र आले होते.माझा मित्र सरकारात कार्यकारी अभियंता आहे त्याने माझ्यासाठी पुष्पगुच्छ आणला होता, मी नकार दिला पण तो एवढा मला घ्यायला खास सोलापूरवरून आला असल्याने मी शेवटी तो स्वीकारला. रस्त्यामध्ये मित्रांच्या प्रश्नांना उत्तरे देत २:३० ला घरी आलो. मला प्रवासाचा थकवा जाणवत होता पण माझे हे सर्व मित्र मुंबईबाहेरून आले होते आणि सकाळी ते परत जाणार होते म्हणून पहाटे ३ वाजताच पार्टी केली. सकाळी त्त्याना निरोप दिला . असो. फारच विषयांतर झाले आहे. पण मला ते गरजेचे वाटले.असो.

आता बरयाच मिपाकरांना मी ९८००० (३६३० रियाल) रुपयात ६८ दिवस कसे काढले याबद्दल उत्सुकता आहे. तसे प्रतिसादही आलेत. एवढ्या पैशात हे केवळ अशक्य आहे पण मला ते शक्य झाले कारण मी एडीच्या घरी पोहोचल्यावर फक्त १०० रियाल माझ्याकडे ठेवले आणि बाकी सर्व एडीच्या हवाली केले होते. बाकीचा सर्व खर्च एडीने आनंदाने केला. एडी पुढच्या वर्षी भारतात येणार आहे आणि तिची माझ्याबरोबर भारतात राहण्याची तयारी आहे. पुढे अनंत अडचणी आहेत पण आम्ही त्यावर मत करू असे मला वाटते, एडीला तर खात्री आहे. म्हणूनच तर आपला देश, आपले सर्वस्व सोडून कधीही न पाहिलेल्या अशा अनोळखी देशात आणि माझ्यासारख्या अनोळखी (७० दिवस बरोबर राहिलोय फक्त ) माणसा बरोबर राहण्याची तिची तयारी आहे. मी तुला फसवले तर काय करशील ? या प्रश्नावर तिचे उत्तर असते ' Jesus knows everything ,he only send you to me, and i believe in Jesus'.माझी आई गावी राहते. मी आणि माझा चुलत भाऊ आदेश मुंबईत असतो.मला कित्येकदा एडीने बोलून दाखवले आहे कि तुला आईची किंमत नाही म्हणून तू आईला गावाला राहू देतोस. माझी आई असती तर मी हे कधीच केले नसते. एडी जेव्हा भारतात येईल तेव्हा तिला सर्वात पहिल्यांदा माझ्या आईला भेटायचं आहे आणि तिला मुंबईला घेऊनच परतायचं आहे. आणि हि तिची भारतात येण्यासाठीची एकमेव अट आहे. तुम्ही कंटाळून जाल पण एवढे सगळे ९ भाग लिहिल्यावर मला आता या काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असे मला वाटते.

******************

आदेश हा माझा चुलत भाऊ. वय तेवीस.आठवी पास. मी नोकरी सोडून गावी गेलो, पुढे व्यवसाय चालू करायचा माझा विचार चालू होता. नऊ वर्षे नोकरी केली, आता सुटल्यासारखे वाटले म्हणून दोन महिने गावी फिरून परत मुंबईला आलो तर हाही बरोबर आलेला. त्याने शाळा सोडलीच होती आणि मीही नोकरी. फक्त कार्ड छापले आणि व्यवसाय चालू केला. fax machine आणि intercom system विकणे आणि दुरुस्ती करणे.यथावकाश काम मिळत गेले आणि व्यवसाय वाढला. तर हा आदेश माझ्याबरोबर काम शिकून तीनच वर्षात तो संपूर्णपणे माझ्या मदतीविना सर्व कामे पार पडू लागला. विक्री आणि दुरुस्तीही. दोन माणसे त्याच्या हाताखाली दिली आणि मी भटकंती चालू केली.मला भटकंतीची आवड होतीच आणि आता दोन पैसेही गाठीला होते मग मी चार वर्षात भारतभर फिरलो. कधी पंधरा दिवस कधी महिनोन महिने. बरेचसे आश्रम पालथे घातले. मंदिरांना भेटी दिल्या .ओशो ,विवेकानंद ,रामकृष्ण परमहंस यांचे मिळतील ती सर्व पुस्तके वाचून टाकली ,काही पुस्तकांची परत परत पारायणे केली.इतरही अनेक विषयाचे अवांतर वाचन केले.खरंतर हातात आलेला भेळीचा कागद सुद्धा वाचायचा सोडला नाही .पण निसर्ग माझा सगळ्यात मोठा विक पोइंट .लग्न तर केले नव्हतेच करायचा विचारही नव्हता. मुंबईत असताना थोडीफार मदत आदेशला करत असे पण ती नगण्यच. आता तर आदेशने xerox machine,cctv,time attendance,fingreprint,security systems यातील ज्ञानही आत्मसात करून विक्री आणि दुरुस्ती दोन्ही आघाड्या तो सांभाळत आहे. मिळालेल्या संधीच याने सोन केल आहे ,मला हे सर्व सांगताना अभिमान वाटतोय पण हे सर्व श्रेय त्याचे स्वत:चे आहे.मला एवढेच सांगायचे आहे कि हा माझा मनेजर (होय मी त्याला आता मेनेजरच म्हणतो ) आदेश जर माझ्याबरोबर नसता तर हि कामधंदा सोडून केलेली भारतभ्रमंती आणि हि ब्राझीलवारी मी स्वप्नातही करू शकलो नसतो. व्यवसायाचे product details फक्त एवढ्याच साठी दिलेत कि एक अशिक्षित ( आठवी पास) लहानशा खेड्यातून आलेला मुलगा इच्छा असेल तर बरेच काही करून दाखवू शकतो हे मला सांगायचं आहे. येथील कुटुंब म्हणजे आई, मी आणि अर्थातच आदेश.असो.

आदेश :
src="http://lh6.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6IMCzHA1I/AAAAAAAAA9g/L3E3PeJLyR8/Z10jr96k.jpg"
width="320" height="208" alt="1" />
src="http://lh4.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6ILUDA3sI/AAAAAAAAA9Y/r2r1jc1SBxQ/Z1pcyzjh.jpg"
width="320" height="240" alt="2" />
src="http://lh3.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6IL9RhgpI/AAAAAAAAA9c/CnH-Ljrq8_I/Z18yk0i1.jpg"
width="320" height="240" alt="3" />

***************************

सद्या ब्राझीलमध्ये असलेले सदस्य म्हणजे एडी, बेन्जामिन अबुल आणि आता Baxte. अबुल हा अतिशय लोभस असा एडीचा कुत्रा आहे (ती त्याला कधीच कुत्रा संबोधत नाही). वेगळ्याच कुठल्याशा रेसचा या अबूलला घेऊन जेव्हा फिरायला बाहेर जात असू , एडीच्या हातावर बसून इकडे तिकडे टकामका पाहणारा हा अबुल लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे. इकडे सर्रास लोकांकडे पेट आहेत तरीही अनेक अनोळखी लोक अबुलची चौकशी करत असत. त्याला खेळण्यासाठी अगणित अशी खेळणी एडीने आणलेली आहे. डॉल पासून अगदी फुटबाल पर्यंत. त्याला आंघोळ घालणे, ड्रायरणे त्याचे केस सुकवणे, त्याचे केस विंचरणे आणि हे सर्व करत असताना त्याच्याशी गप्पा मारताना, आणि तोही कसा तिच्या गप्पांना आपल्या कृतीतून उत्तरे देतो हे मी स्वत: अनुभवले आहे. एखाद्या खोडकर लहान मुलासारखा वागणारा हा अबू एडीचा जीव कि प्राण.खुशीत असेल तर जागेवर अतिशय वेगाणे गोल-गोल फिरणे, त्याचे ख़ुशी आणि दुख व्यक्त करणारे डोळ्यातील भाव अगदी सहज लक्षात येतात. शेजारची अबुची मैत्रीण करोलिना , तिचं नुसते एडीने नाव घेतले तरी सैरावैरा इकडेतिकडे धावणारा आणि खिडकीतून तिला पाहण्य्यासाठी धडपडणारा अबुल खरोखर विलक्षण व्यक्तिमत्व आहे. एडीचा घर तिसर्या मजल्यावर आहे. कितीही आवाज न करता आम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचलो कि अबुचा आवाज सुरु होई ते दार उघडून त्याला जवळ घेईपर्यंत. एडी आलेली त्याला चाहूल लागत असे त्यात कधीही चूक झालेली मला आठवत नाही. फोनची बेल वाजली कि एडीकडे येऊन जोरात भुंकत असे ते अगदी फोन उचलेपर्यंत. एडी किचनमध्ये असेल किचनमध्ये हा लुडबुड करणार, कपडे धूत असेल तर बाजूच्याच खिडकीत बसून तिच्या काम संपण्याची तो वाट पाहत राही. एडी बाहेर गेली तर परत घरी येईपर्यंत कशालाही तोंड न लावणारा अबुल आम्ही घरी आल्यावर हावरटा सारखा खाताना मी पाहीला आहे. त्याला आवडते म्हणून कधीकधी एडी त्याला बाथ साठी बाहेर पाठवत असे. तिकडून हे साहेब आंघोळ करून पायात मोजे,गळ्यात टाय अशा रुबाबात घरी परत येतात. असा हा अबुल. एडी बाहेर गेल्यावर त्याला खूप एकटे वाटते म्हणून एडीने आता अलीकडेच baxte हा अबुच्याच रेसचा नवीन सदस्य आणलेला आहे. आता त्या दोघांचे खेळणे, त्यांची भांडणे, baxte कसा अबुल पेक्षा वेगळा आहे हे एडी मला सांगत असते. एखादा प्राणी माणसाचे जगणे कसे सुकर करू शकतो, त्याला वाटणारा एकटेपणा कसा नाहीसा करू शकतो हे मी स्वत: अनुभवले आहे. एकदा मी एडी घरात नसताना त्याला उशीने चांगलेच बदडले कारण एडी घरात असताना त्याला हात जरी उगारला तरी तो माझ्यावर भुंकत असे, मला जरा त्याचा रागच होता. एडी घरी येईपर्यंत तो कपाटाखाली लपून बसला होता, एडीने दार उघडले आणि त्याने तिच्याकडे धाव घेतली. त्याला घेऊन एडी तडक माझ्याकडे आली आणि अबुल का रडला आणि तू त्याला का मारले असा तिने मला प्रश्न केला. यात थोडीशीही अतिशयोक्ती नाही याची नोंद घ्यावी. म्हणून तर त्याला आम्ही आमच्या कुटुंबाचा सदस्य समजतो. एडी भारतात येणार ते बेन्जामिन अबुल ला बरोबर घेऊनच. असो.

अबुल आणि BAXTE :

src="http://lh5.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FWPiuuuI/AAAAAAAAA7Q/iUv-PO-qLMI/s512/DSC00705.JPG"
width="480" height="640" alt="1" />
src="http://lh3.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FixqFWBI/AAAAAAAAA7g/3Wv1PWzARpQ/s640/DSC00011.JPG"
width="640" height="480" alt="2" />
src="http://lh5.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FsEzKKLI/AAAAAAAAA8A/vHN6qhLTtSI/Z135yvwz.JPG"
width="320" height="416" alt="3" />
src="http://lh3.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FRkN6QDI/AAAAAAAAA7A/xGbVeP48E6g/DSC00280.JPG"
width="640" height="480" alt="4" />
src="http://lh4.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FoXWkUBI/AAAAAAAAA7o/YsunsU06MVo/s512/DSC00231.JPG"
width="480" height="640" alt="5" />
src="http://lh3.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FYiDytpI/AAAAAAAAA7U/kQK25EC30m4/s640/DSC00790.JPG"
width="640" height="480" alt="6" />
src="http://lh6.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6Fs65AX5I/AAAAAAAAA8I/qBs8u0FZ6nA/Zh4dqut.JPG"
width="320" height="240" alt="7" />
src="http://lh4.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FtTEU4XI/AAAAAAAAA8Q/89IwE3HW9Vw/Z18bhc7c.JPG"
width="320" height="416" alt="8" />
src="http://lh6.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FrIGrKNI/AAAAAAAAA70/43Ems1CbCho/OQAAAIcPuXNC6Wtqb3DR5lc4cpLtj2hmEYgBzFjcKXeHIPoXbI447-UQu8Eg443j-X2TbFHVRZIb0NOf4wGJ9eN9RSMAm1T1UJnmfkSpXBP20gXRVgEuuRZanCGs.jpg"
width="240" height="320" alt="9" />
src="http://lh3.ggpht.com/_p79GMe5GsE4/TF6FrdSDtXI/AAAAAAAAA74/EGl0Ixl-jm0/OQAAAI003leiOBiVbBSGOXskIGXu6PWYABFydzAMihBEwRCer29XPsUgZP7idjI5E1ziemKJfFl1V8DWx1yQEy0daQ8Am1T1UHtQW_cndD54aZ26zPDqIHNh9H14.jpg"
width="400" height="400" alt="10" />

************************************

सर्वांची उत्सुकता खूपच ताणली त्याबद्दल माफी असावी. आता हा सगळा लेखनप्रपंच जिच्यामुळे घडला त्या एडीबद्दल थोडेसे. आईवडील एडी १३ वर्षाची असतानाच वारले. त्यानंतर अनाथासारखी एकटी राहिलेली हि एडी. कोणीही नातेवाईक नाही भाऊ बहीन नाही.नोकरी करून स्वत:चे समृद्ध जीवन जगत असताना आमची ओळख झाली आणि पुढचा इतिहास तर तुम्ही वाचलाच आहे. माझ्या संपूर्ण वास्तव्यात माझे कपडे घुवून स्वत:च्या हाताने इस्त्री करणारी, माझ्यावर कधीही कुठलाही अविश्वास व्यक्त न करणारी, शिकून घेऊन माझ्यासाठी चपात्या लाटणारी, फिरण्याची फारशी आवड नसतानाही माझ्याबरोबर भटकणारी, अबुलला जीवापाड जपणारी, केवळ मला घ्यायला/सोडायला साओला आल्यामुळे अबुलला एकटे सोडावे लागले म्हणून पेट हाउसला फोन करून चौकशी करणारी, कुणाच्याही दुख्खाची कणव वाटणारी, जमेल तेवढी दुसर्याला मदत करणारी, जगत फक्त एकाच देव आहे आणि तो फक्त जिझस असे मानणारी, जे काय चांगले वाईट प्रसंग जीवनात घडतात ते जीझसच्या इच्छेनुसारच होतेय याबद्दल अढळ विश्वास असणारी, आईला मुंबईत आणले तरच माझ्याबरोबर मुंबईत राहणार अशी अट घालणारी, आदेशसाठी स्वत: भारतीय मुलगी पसंद करणार असे सांगणारी, मी भारतात जर तुला मारले तर? ....नेव्हर डू इट, आय विल फाईट विथ यु ,यस आय एम अ ब्रज़िलिअन असे बिनदिक्कत सांगणारी, माझ्या रशियामध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारया मेघाशी (माझी लाडकी भाची) वेळोवेळी संवाद साधून तिला अभ्यासाठी शुभेच्छा देणारी , ब्राझील मधील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पाहायला परत ब्राझील ला जायचं असं आवर्जून सांगणारी अशी हि एडीबाई. मंडळी हि कथा नसल्याने काही भावनिक आणि अनावश्यक असे काहीसे लिहिले असल्याची भावना वाटत असेल तर मला माफ करा. पण हा माझा अनुभव मी जसा घडला तसाच आपल्याला सांगितला आहे . कुठलीही फुशारकी मला मारायची नाहीय. उलट पुढे काय होणार आहे हे आज मलाही माहित नाही. तसेही माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मी ठरवले तसे काहीही घडलेले नाही. मला चांगली नोकरी मिळाली नाही.मला आयटी मध्ये करीयर करायचे होते आणि अमेरिका गाठायची होती तेही करता आलेले नाही. अनपेक्षीतपणे मी व्यवसायात आलो ज्यावर मी कधीही विचार केला नव्हता, आदेश सारखा मेनेजर मला मिळाला या सर्व गोष्टी कडे मागे वळून पहाताना मला फक्त एकच दिसते ते म्हणजे हा जो प्रवास आहे ते माझे विधिलिखित होते. कुणाला पटो न पटो पण मनुष्य आपला प्रवास आपल्या बरोबर घेऊन येतो तो फक्त आपल्याला आधी समजत नाही. असे माझे व्यक्तिगत मत आहे. कुठलाही दावा मला करायचा नाहीय.

 http://www.misalpav.com/node/13708

 

 

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...